When Insults Had Class
The exchange between Churchill & Lady Astor: She said, ‘If you were my
husband I’d give you poison,’ and he said, ‘If you were my wife, I’d
drink it.
मि.चर्चिलना उद्देशून लेडी एस्टर उद्गारल्या:”जर तू माझा पति असतास तर मी तुला विष दिले असते.”
त्यावर मि.चर्चिल म्हणाले:”जर तू माझी पत्नी असतीस तर मी ते प्यालो असतो.
—————————————————————————————
A member of Parliament to Disraeli: ‘Sir, you will either die on the
gallows or of some unspeakable disease.’ ‘That depends, Sir,’ said
Disraeli, ‘whether I embrace your policies or your mistress.’
एक एम्.पी डिजरेलीला म्हणाला:”महाशय, आपण फासावर तरी लटकणार आहात किंवा एकाद्या घाणेरड्या रोगाला बळी पडणार आहात.”
त्यावर डिजरेली म्हणाले: “मी तुमच्या धोरणांना जवळ करीन की तुमच्या प्रेमपात्राला, यावर ते अवलंबून असेल.”
——————————————————————————————
‘He has all the virtues I dislike and none of the vices I admire.’ –
Winston Churchill
विन्स्टन चर्चिल: “मला न आवडणारे सारे सद्गुण त्याच्या अंगी आहेत, पण मला कौतुक वाटावे अशी एकही खोड त्याला नाही.”
‘A modest little person, with much to be modest about.’ – Winston Churchill
विन्स्टन चर्चिल: “अत्यंत नम्र माणूस, त्याने आपले नम्रपणे (दबूनच) वागावे असेच बरेच कांही त्याच्याकडे असलेला.
———————————————————————-
‘I have never killed a man, but I have read many obituaries with great pleasure. ‘Clarence Darrow
क्लॅरेन्स डॅरो: “मी स्वतः कधी कोणाला ठार मारले नाही, पण अनेक जणांविषयीचे मृत्युलेख वाचतांना मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या.”
———————————————————————-
!’He has never been known to use a word that might send a reader to the
dictionary.’ – William Faulkner (about Ernest Hemingway).
‘Poor Faulkner. Does he really think big emotions come from big
words?’ – Ernest Hemingway (about William Faulkner)
अर्नेस्ट हेमिंग्वेबद्दल बोलतांना विलियम फॉकनर वदले: “त्याच्या लिखाणातल्या एकाद्या शब्दाचा अर्थ पहाण्यासाठीसुध्दा कोणाला शब्दकोष पहावा लागला असे कधी एकले नाही.” (सगळे लिखाण फारच सरळसोपे, अगदी बाळबोध हो!)
त्यावर अर्नेस्ट हेमिंग्वे उद्गारले: “बिच्चारा फॉकनर! मोठमोठे बोजड शब्द वापरल्यामुळे त्यातल्या भावना तीव्र होतात असे त्याला खरेच वाटते की काय!”
—————————————————————————————–
‘Thank you for sending me a copy of your book; I’ll waste no time
reading it.’ – Moses Hadas
मोजेस हॅडॅस:”आपल्या पुस्तकाची प्रत मला पाठवल्याबद्दल मी आपला आभारी आहे; ते वाचण्यात मी आपला वेळ वाया घालवणार नाही.”
———————————————————————-
‘I didn’t attend the funeral, but I sent a nice letter saying Iapproved of it.’ – Mark Twain
मार्क ट्वेन: “मी अंत्ययात्रेला हजर नव्हतो, एक छानसे पत्र पाठवून मी माझी मंजूरी कळवली.”
—————————————————————-
He has no enemies, but is intensely disliked by his friends.’ – Oscar Wilde
ऑस्कर वाइल्ड: “त्याला एकही शत्रू नाही, पण त्याचे मित्रच त्याचा भयंकर दुःस्वास करतात.”
——————————————————————–
‘I am enclosing two tickets to the first night of my new play; bring a
friend….
if you have one.’ – George Bernard Shaw to Winston Churchill
‘Cannot possibly attend first night, will attend second…. if there
is one.’ – Winston Churchill, in response.
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी चर्चिल यांना पत्र लिहिले,”माझ्या नव्या नाटकाच्या पहिल्या खेळाची दोन तिकीटे सोबत पाठवीत आहे; तुमच्या एकाद्या मित्राला सोबत घेऊन यावे ….. जर तुम्हाला कोणी मित्र असलाच तर.”
चर्चिल यांनी उत्तर पाठवले,”पहिला खेळ मी बहुधा पाहू शकणार नाही. दुस-याला हजर राहीन. ….. जर कधी तो झालाच तर.”
———————————————————————
‘I feel so miserable without you; it’s almost like having you here.’ –
Stephen Bishop
स्टीफन बिशप: “तुझ्याविना मी इतका कासावीस होऊन गेलो आहे; जवळ जवळ तू इथेच असल्यासारखे वाटते आहे.”
——————————————————————-
‘He is a self-made man and worships his creator.’ – John Bright
जॉन ब्राइट: “तो एक स्वयंनिर्मित माणूस आहे आणि आपल्या निर्माणकर्त्यावर त्याची भक्ती आहे.”
—————————————————————
‘I’ve just learned about his illness. Let’s hope it’s nothing trivial.’ – Irvin S. Cobb
आयर्विन एस्.कॉब:”त्याच्या आजारपणाबद्दल नुकतंच ऐकलं. तो अगदी क्षुल्लक नसावा अशी आशा करू.”
———————————————————————
‘He is not only dull himself, he is the cause of dullness in others.’
– Samuel Johnson
सॅम्युअल जॉन्सन : “तो फक्त स्वतःच मंदबुध्दी नाही, इतरांच्या मंदपणाला तो कारणीभूत आहे.”
——————————————————————–
‘He is simply a shiver looking for a spine to run up.’ – Paul Keating
पॉल कीटिंग : ” तो मूर्तिमंत शहारा आहे आणि भरण्यासाठी एका पाठीच्या कण्याच्या (अंगाच्या) शोधात आहे.”
———————————————————————
‘There’s nothing wrong with you that reincarnation won’t cure.’ Jack E. Leonard
जॅक ई लिओनार्ड : “पुनर्जन्मातून जे सुधारता येणार नाही असे कांहीच चुकीचे तुझ्यात नाही.”
—————————————————————–
‘They never open their mouths without subtracting from the sum of
human knowledge.’ – Thomas Brackett Reed
टॉमस ब्रॅकेट रीड : “जगातील एकंदर ज्ञानात घट आणल्याखेरीज ते आपले तोंड उघडत नाहीत.”
—————————————– ——————-
‘In order to avoid being called a flirt, she always yielded easily.’
– Charles, Count Talleyrand
चार्ल्स, काउंट टॅलीरँड : “लोकांनी चवचाल म्हणू नये म्हणून ती सहज संमती देते.”
——————————————————-
Why do you sit there looking like an envelope without any address on
it?’ – Mark Twain
मार्क ट्वेन :”तू असा बिनपत्त्याच्या लिफाफ्यासारखा कां बसून राहिला आहेस ?”
——————————————————
‘His mother should have thrown him away and kept the stork.’ – Mae West
मे वेस्ट :”त्याच्या आईने त्याला फेकून देऊन स्टॉर्क पक्ष्याला ठेवून घ्यायला हवे होते. ”
——————————————————————-
‘Some cause happiness wherever they go; others, whenever they go.’ –
Oscar Wilde
ऑस्कर वाइल्ड :”कांही लोक जिथे जातील तिथे आनंद निर्माण होतो तर कांही लोक जेंव्हा (ते निघून) जातील तेंव्हा. ”
————————————————————-
‘He uses statistics as a drunken man uses lamp-posts.. . for support
rather than illumination.’ – Andrew Lang (1844-1912)
अँड्र्यू लँग : “एकादा दारुड्या दिव्याच्या खांबाचा जसा उपयोग करून घेतो तसा कांही लोक संख्याशास्त्राचा करतात. ….
उजेडासाठी नव्हे तर आधारासाठी. ”
——————————————————————–