संक्षिप्त दासबोध

समर्थ रामदासांनी लिहिलेला दासबोध हा फक्त संन्यस्त वृत्तीने आध्यात्मिक विचार सांगणारा ग्रंथ नसून यात अनेक प्राचीन धार्मिक ग्रंथांमधील विचारांचे सार आहे. त्यांत भक्तिमार्ग आणि परमार्थ याचे विवेचन आहेच, त्याशिवाय सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनात मार्गदर्शन करेल, अगदी आजच्या युगात उपयुक्त वाटेल असेही खूप कांही यात आहे. पूर्वीच्या काळी घरोघरी दासबोधाची पोथी किंवा पुस्तक असायचे आणि अनेक लोक त्याचे नित्यनियमाने वाचन करीत असत. पुढच्या पिढीतल्या लोकांना कदाचित ते जड वाटेल म्हणून त्यांच्या सोयीसाठी डॉ.धनंजय घारे यांनी संक्षिप्त दासबोधाची रचना केली आहे. ही ओवीबद्ध रचना क्रमाक्रमाने या पानावर देत आहे. सर्वांनी तिचा लाभ घ्यावा अशी विनंति.

खाली दिलेल्या DOWNLOAD या खुणेवर क्लिक केल्यावर संक्षिप्त दासबोध वाचता येईल. वर जिथे 100% असे दाखवले आहे तिथे + या चिन्हावर क्लिक करून अक्षरे 125% इतकी मोठी केल्यास वाचायला मदत होईल.

समर्थ रामदास आणि दासबोध यासबंधीची अधिक माहिती या स्थळावर उपलब्ध आहे.

प्रास्ताविक आणि अध्याय १

स्तवन आणि नाना लक्षणे

अध्याय -२

स्वगुणपरीक्षा व त्रिविधताप व नवविधा भक्ती

. . . . . . . . . .

अध्याय ३.

“सद्गुरुसत्शिष्य, बद्धमुमुक्षुसाधकसिद्ध लक्षणे तथा अन्तर्बाह्य पिण्डब्रह्माण्डस्थित देव_शोधन”

अध्याय ४

“चतुर्दश ब्रह्म, मायोद्भव”

अध्याय ५

गुण, रुप, जगज्ज्योति

अध्याय ६

भीम तथा विवेक वैराग्य

अध्याय ७

” नाम, रूप तथा अखण्ड ध्यान ”

अध्याय ८

आत्मज्ञानसप्ततिन्वयपञ्च_महाभूत 

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आणि अभियंता दिवस

दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस (इंजिवियर्स डे) म्हणून साजरा केला जातो. मी स्वतः अभियंता असल्यामुळे मला याचा अभिमान आहेच. मी या दिवशी काही ठिकाणी पाहुणा म्हणून जाऊन भाषणेही दिली आहेत. या वर्यी या निमित्याने डॉ.विश्वे्वरय्या यांच्याबद्दल माहिती आणि इंजिनियरांवर लिहिलेल्या काही मजेदार गोष्टी या पानावर संग्रहित केल्या आहेत. सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🔸सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.🔸

🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.

डॉ. विश्वेश्वरैया यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे झाला. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम या गावचे. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते.

विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजामध्ये झाले. १८८० मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. १८८३ मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले.

स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला. १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. नासिक जिल्ह्यात त्यांची प्रथम नियुक्ती झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे त्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. १९०४ साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली.

खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्यांच्यामुळे त्यांनी पाण्याचा अपव्यय टाळला. १९०६ साली एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची साहाय्यक बंदर अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणून काम केले. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेत त्यांनी भाग घेतला. १९०७ साली मुंबई सरकारच्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली.

१९०९ साली हैदराबाद संस्थानात विशेष सल्लागार अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. हैदराबाद शहराची पुनर्रचना, मूसा व इसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुरापासून शहराचे संरक्षण ही कामे त्यांनी केली. याच वर्षी म्हैसूर संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या विनंतीनुसार त्यांनी म्हैसूर संस्थानच्या प्रमुख अभियंता पदाची सूत्रे हाती घेतली. १९१२ ते १९१८ ही सहा वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण, उद्योग,कृषी आदी सर्व क्षेत्रांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. म्हैसूर आर्थिक परिषदेला स्थायी रूप देऊन अनेक विकासकामे हाती घेतली. उदा., म्हैसूर बँक, म्हैसूर विद्यापीठ, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, मुलींचे पहिले वसतिगृह व शेतकी महाविद्यालय, वृंदावन गार्डन यांची उभारणी, कन्नड साहित्य अकादमी, आर्थिक लेखा परीक्षणाबरोबरच कार्यक्षमता लेखा परीक्षण वगैरे. रेशीम उत्पादन, चंदन तेल, साबण, धातू व क्रोम टॅनिंग, सिमेंट, साखर कारखाने, लघू उद्योग, हॉटेल व उपाहारगृहे, विश्रामधाम, मुद्रणालये, क्लब यांच्या निर्मिती उद्योगास त्यांनी चालना दिली.

म्हैसूरसाठी भाटकलला बंदराची सोय केली. आपल्या प्रयत्‍नांनी रेल्वेचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या कक्षेत आणले. काही ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग उभारले. सेवाभरती शर्ती, मागासवर्गीयांसाठी राखीव जागा आदी समाजोन्मुख कार्ये त्यांनी केली. १९२६ साली त्यांनी म्हैसूर संस्थानच्या सेवेचा स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, श्री जय चामराजेंद्र ऑक्युपेशनल इन्स्टिट्यूट वगैरे संस्थांशी घनिष्ट संबंध आला.

मुंबईची प्रिमियर ऑटोमोबाइल इंडस्ट्री स्थापण्यातही त्यांनी विशेष प्रयत्‍न केले. हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी (सध्याची दि हिंदुस्थान एरॉनॉटिक्‌स) व ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेतही त्यांनी भाग घेतला.

विश्वेश्वरय्या यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने देशातील अनेक योजना साकार झाल्या. धुळे जिल्ह्यातील पांजरा नदी ते दात्रटीपर्यंत वक्रनलिकेने पाणीपुरवठा ही योजना साकार करून त्यांनी धुळे शहर पाणीपुरवठा योजना व सुरत शहर पाणीपुरवठा योजनाही साकार केली. सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याचा बिकट प्रश्न त्यांनी सक्कर बंधाऱ्यांची उभारणी करून सोडविला. शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या व कमीत कमी पाण्यात अनेक तऱ्हेच्या पिकांना पाणी देण्याची गट पद्धती त्यांनीच सुरू केली. ओरिसा राज्यातील महापूराच्या नियंत्रणाचे निर्मातेही तेच. म्हैसूरपासून १८ किमी. वरील कृष्णराजसागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. सु. ४० मीटर उंचीला लागणारा पाया लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. आज या धरणामुळे सु. ८ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येते. १२.५ कोटी रुपयांची कावेरी बंधारा योजना त्यांनीच पूर्ण केली.

यांखेरीज कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड व विजापूर शहर पाणीपुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांनी अभिकल्पित केल्या. नवी दिल्लीची योजनाबद्ध सुधारणा त्यांनीच केली. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर केलेले कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष (१९२१-२२), भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष (१९२५), मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, मुंबई बॅक बे चौकशी समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार, भद्रावती पोलाद कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष, अखिल भारतीय उत्पादक संस्था (१९४१) संचालक, जमशेटपूर टाटा लोखंड व पोलाद कारखाना, मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र, मुंबई प्रांत आरोग्य समितीचे सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक उद्योग उन्नती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. मुंबई, कराची, बडोदा, सांगली, मोरवी, भोपाळ, पंढरपूर, अहमदनगर, नागपूर, भावनगर,राजकोट, गोवा या नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले.

विश्वेश्वरय्या यांनी पाच वेळा अमेरिकेचे दौरे केले. खेरीज जपान, इटली, इंग्‍लंड, स्वीडन, रशिया, कॅनडा, सिलोन (श्रीलंका), जर्मनी व फ्रान्स या देशांना विविध निमित्तांनी भेटी दिल्या.

शिस्त हा त्यांच्या परवलीचा शब्द होता. ते सतत कठोर परिश्रम करीत. प्रत्येक काम नियमित, नीटनेटके व स्वच्छ असावे हा त्यांचा आग्रह असे.

भारताच्या प्रगतीसाठी आपल्या भाषणांतून व लेखनांतून ते तळमळीने विचार मांडीत. भारताच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय संरक्षणातील धोके, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रबांधणी व राष्ट्रीय कार्यक्षमता या विषयांवर त्यांनी व्यक्त केलेले विचार मार्गदर्शक होतील. आपल्या विषयातील त्यांचे ज्ञान अत्यंत अचूक होते. एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना रेल्वेच्या बदललेल्या आवाजावरून त्यांनी १.५ किमी. वरील रेल्वे रूळ उखडले आहेत असे अचूक अनुमान काढून हजारो प्रवाशांचे प्राण वाचविले होते.

रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया (१९२०), प्‍लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया (१९३४), प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेम्वॉयर्स ऑफ माय वर्किंग लाइफ (१९६०) ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.

नवभारताचे एक निर्माते म्हणून विश्वेश्वरय्या यांच्या विविधोपयोगी कार्याचा व त्यांच्या ज्ञानाचा अनेक संस्थांनी, विद्यापीठांनी व शासनांनी गौरव केला. लोकांमध्ये ते एम्. व्ही. या नावाने परिचित होते.

ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहाबाद व म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन गौरवले. १९५५ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्‍न’ देऊन गौरवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले. विश्वेश्वरय्यांनी अनेक संस्थांना लाखो रूपयांच्या देणग्या दिल्या. देशातील अनेक संस्थांना विश्वेश्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले आहे. सर विश्वेश्वरय्या यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बंगलोर येथे ‘सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम’ उभारले आहे. हे म्युझियम भारतातील सर्वांत मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनी अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांस प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जातो.

त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेही १९९८ पासून त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित झाले. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्‍न सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने १९९७ पासून ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे.

विश्वेश्वरय्यांनी आपल्या जन्मगावी सुंदर घर बांधले असून १९७१ मध्ये त्याचा राष्ट्रीय स्मारकात समावेश केला गेला आहे. या घरातील वस्तुसंग्रहालयात विश्वेश्वरय्या यांच्या नित्य वापरातील काही वस्तू, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू व भारतरत्‍न गौरवपदक ठेवण्यात आले आहे. गावातील विशाल बागेत त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. बंगलोर येथे या शतायुषी महापुरुषाचे निधन झाले.

स्रोत: मराठी विश्वकोश, कुलकर्णी, सतीश वि.
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

अभियंत्यांचे दैवत डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

नोकरीतून निवृत्त झाल्यावर सर्वसामान्य व्यक्ती कुटुंबाबरोबर व्यक्तिगत जीवन जगते;मात्र निवृत्तीनंतरही पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने थोडीथोडकी नव्हे तर ५५ वर्षे देशाच्या जनतेच्या सेवेसाठी देणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने भारतरत्न असते.होय,मी आज ज्यांच्याबद्दल माहिती सांगतोय ते आहेत- देशातील साऱ्या अभियंत्यांचे दैवत,आधुनिक भारताचे रचनाकार ‘सर,भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या’
१५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन! संपूर्ण भारतभर १९६८ पासून त्यांचा जन्मदिन हा अभियंता दिन (इंजीनियर्स डे) म्हणून साजरा होतो.सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील सक्कर या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी कल्पकतेने सोडवला. घाणेरडे,दूषित पाणी प्यावे लागत असलेल्या तिथल्या लोकांना अतिशय कमी खर्चात शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यायला मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि भारताच्या एका युवक आणि कल्पक अभियंत्याचे नाव जागासमोर आले. १८८४ मध्ये त्यांना इंग्रज सरकारने नाशिक विभागात अभियंत्याची नोकरी दिली.मात्र १९०७ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. अर्थात ती आराम करण्यासाठी नव्हे तर आपल्या कर्तृत्वाला नवनवीन क्षितिजे निर्माण करून देण्यासाठी! आपल्या निवृत्ती वेतनातून आपल्या गरजेएवढे पैसे घेऊन उर्वरित पैसे ते गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करीत. शालेय शिक्षण घेत असतानाच ते आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले होते.त्यांच्या घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती.पण त्यांची आई मनाने श्रीमंत आणि जिद्दी होती. आपल्या शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून त्यांनी शिकवण्या करून पैसा उभा केला आणि नंतरच्या सर्वच परीक्षा ते पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. शिक्षणासाठी आपल्यासारखा संघर्ष करण्याची वेळ अन्य कुणावर येऊ नये म्हणून आपल्या निवृत्ती वेतनातून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पैसा देऊ केला होता.
निवृत्तीनंतर ते स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी युरोपला गेले.हैदराबादच्या निजामाच्या निरोपानुसार तिथला दौरा अर्धवट सोडून ते भारतात परत आले आणि मुसा नदीच्या पुराच्या पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढला. यामुळे त्यांचा नावलौकिक अधिकच वाढला.म्हैसूरचे मुख्य अभियंता झाल्यावर त्यांनी कावेरी नदीवर कृष्णसागर नावाचे धरण उभे केले. महात्मा गांधी देखील हे अजस्त्र धरण पाहून चकित झाले होते.या धरणाच्या पाण्यावर त्यांनी वीज निर्मिती केली.या विजेने त्यावेळी म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन गार्डन उजळून निघाले.पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या म्हैसूर संस्थांचे दिवाण झाले. त्या सहा वर्षातच त्यांनी म्हैसूर विद्यापीठ,पोलाद कारखाना, सिमेंटचा कारखाना, रेशीम,चंदन,तेल,साबण यांची उत्पादने त्यांनी त्याकाळात सुरू केली.शिक्षण,उद्योग आणि शेती या क्षेत्रातही म्हैसूर संस्थानने नेत्रदीपक कामगिरी केली.मुंबई औद्योगिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष,भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष,नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार असे विविध पदे त्यांनी भूषविली. कराची,बडोदा,सांगली,नागपूर, राजकोट,गोवा आदि नगरपालिकांना आणि इंदोर, भोपाळ,कोल्हापूर,फलटण अशा संस्थांनांना त्यांनी अडचणीच्या काळात मदत केली.हैदराबाद शहर वसविले, पुण्याजवळील खडकवासला जलाशय उभारण्यात योगदान दिले.
राष्ट्र बांधणीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना इंग्रज सरकारने सर हा सर्वोच्च मानाचा किताब दिला तर मुंबई, कोलकाता,अलाहाबाद,म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना मानाची डिलीट ही पदवी दिली.भारत सरकारने १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न या उपाधीने अलंकृत करून त्यांच्या कार्याला सलाम केला.
विश्वेश्वरय्या हे आधुनिक काळातील विश्वकर्मा होते. झिजलात तरी चालेल पण गंजू नका हा मंत्र त्यांनी तरुणांना दिला. वयाची नव्वदी ओलांडल्यावरही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता.१५ सप्टेंबर १९६१ ला भारतभर त्यांची जन्मशताब्दी म्हणजे १०० वा वाढदिवस साजरा झाला. निष्ठावान,चारित्र्यवान आणि विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता असल्याचा गौरव पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला.पृथ्वीवर प्रकाश पर्व निर्माण करणाऱ्या या अभियंत्याची प्राणज्योत १४ एप्रिल १९६२ ला मावळली.एक कल्पक इंजिनिअर,वैज्ञानिक, निर्माता आपल्यातून निघून गेला. १९६८ पासून त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो.

सुनियंत्रित आचरण,प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद ही त्यांच्या प्रदीर्घ जीवनाची पंचसूत्री होती.त्यांच्या स्मृती आणि कार्यास विनम्र अभिवादन!!! देशातील सर्वच अभियंत्यांना इंजिनियर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!!!

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

. . . . नरेंद्र गोळे
अवकाशप्राप्त अभियंता, भाभा अणुसंशोधन केंद्र आणि संलग्न अध्यापक, विद्याप्रसारक मंडळ ठाणे

१५ सप्टेंबर २०१८ हा दिवस म्हणजेच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांचा १५८ वा जन्मदिन आहे. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांच्या नावाने सुरू झालेल्या ’विश्वेश्वरय्या प्रादेशिक अभियांत्रिकी विद्यालय, नागपूर’ ह्या संस्थेतून मी विद्युत अभियंत्रज्ञ झालेलो असल्याने, त्यांच्या जन्मदिनानिमित्त बोलण्याची संधी मला लाभत आहे ही फारच आनंदाची गोष्ट आहे. मला नेहमीच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांबाबत आपुलकी वाटत आलेली आहे. ह्याचे आणखीही एक कारण आहे. ते म्हणजे माझे पणजोबा नारायण गोडबोले, विश्वेश्वरय्यांसोबतच पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून इंजिनिअर झालेले होते.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी चिकबल्लापूर, म्हैसूर येथे झाला होता. त्यांचा जन्मदिन अभियंत्रज्ञदिन म्हणून पाळला जातो. त्यांची मातृभाषा तेलुगू आहे. पुढे विश्वेश्वरय्यांनी प्रथम तत्कालीन म्हैसूर संस्थानाकरता आणि नंतर भारत देशाकरता अत्यंत महत्त्वाची अनेक पदे भूषवली. देशांतर्गत अनेक महत्त्वाच्या अभियांत्रिकी प्रकल्पांची संकल्पना रुजवली आणि ते देशाच्या सर्वोच्च आदरास पात्र ठरले.
ते विख्यात अभियंत्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. आधुनिक भारताच्या निर्माणात त्यांनी अत्यंत कळीची भूमिका बजावलेली आहे. ते कृष्णराजसागर धरण आणि प्रसिद्ध वृंदावन उद्यानाचे शिल्पकार होते. धरणांच्या दरवाजांकरता त्यांनी प्रथमच पोलादी झडपांचा उपयोग केला. हल्लीच्या पाकिस्तानातील सुक्कूर गावास सिंधू नदीचे पाणी पुरविण्याची योजना त्यांनी केली.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (जन्मः १५ सप्टेंबर १८६०, मृत्यूः १४ एप्रिल १९६२ )
१९१२ ते १९१८ दरम्यान ते म्हैसूर संस्थानचे दिवाण होते. त्या काळात त्यांनी संस्थानात चंदनतेल आणि चर्म वस्तूंच्या उद्योगांची निर्मिती केली. भद्रावती पोलाद प्रकल्प सुरू केला. तिरुमला आणि तिरुपती दरम्यानचा रस्ता त्यांनी निर्माण केला.
१९०६-०७ दरम्यान प्रतिनियुक्तीवर एडनमध्ये असतांना त्यांनी एडन शहराची पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजना निर्माण केली. निजामाकरता काम करत असता, हैदराबाद शहराकरता त्यांनी पूरनियंत्रण योजना राबवली तर विशाखापट्टणम शहरास समुद्री क्षरणापासून संरक्षण करणारी योजना दिली. १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न पदवी दिली गेली. पंचम जॉर्ज बादशहाने त्यांना ब्रिटिश भारतीय साम्राज्याचा नाईटहूडही दिलेला होता. ते शंभर वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या हयातीतच, भारत सरकारने त्यांचे नावे पोस्टाचे तिकीट काढले. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांना बंगळुरू येथे देवाज्ञा झाली.
भारतातील अग्रगण्य अभियंत्यांत मानाचे स्थान असलेल्या ह्या आधुनिक भारताच्या आद्य अभियंत्यास अभियंत्रज्ञदिनी आदरपूर्वक प्रणिपात!

इंजिनियर असल्याचा अभिमान बाळगा पण सिव्हील इंजिनियर असल्याचा दुप्पट अभिमान बाळगा. कारण ही एकमेव अशी शाखा आहे जी, भवन ते विमानतळ, धरण ते कृषी, सिंचन ते पर्यावरण, ऊर्जा ते वास्तुरचना, पथ ते उद्यान या सर्वाशी संबंधित आहे. समाजाच्या सर्व आयामांना स्पर्श करणारी ही विद्या शाखा असल्यानेच तिला नागरी (Civil) असे संबोधले जाते. या शाखेला अव्दितीय उंचीवर नेण्याचे काम डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले. त्यांना प्रणाम करुया आणि सिव्हील इंजिनियर असल्याचा अभिमान बाळगुन कायम समाजहितैषी असे काम करुया.
🙏🏻💐अभियंता दिनाच्या शुभेच्छा..💐🙏🏻

🏦🏡⛩️🏣🏬🏨🏭🏣🏟️🏪🎢🛤️🛣️🌉🌌🛬🚠🛳️🚉🗼⛽🚧🚥🚏

This group is Engineers dominated, so wish you all a very happy 😊 ❤ 😀 💜 “Engineers Day”. This is another feather in your cap that new Gujarat CM Bhupendra Patel is also a civil engineer, that is, he is one among you. Mr. Patel is notebly a Diploma holder too.

भारत के सर्वश्रेष्ठ महान इंजीनियर्स जिनको आज इंजीनियर्स डे पर सम्मान पूर्वक याद करना जरूरी है।

 1. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
 2. डॉ ए पी जे अब्दुल कलाम -मिसाइल मैन
  3.श्री सतीश धवन -एरोस्पेस सुपरसोनिक इंजीनियरिग इसरो।
  4 ई श्रीधरन -मेट्रो मेन
  5 सुंदर पिचाई- गूगल के संथापक
  6 कल्पना चावला- पहली एस्ट्रोनॉट
  7सत्या नाडेला- माइक्रोसॉफ़्ट
  8 नागदरा रोमोराव नारायण मूर्ति -इंफोसिस
  9 वर्गीज़ कुरियन- स्वेत क्रांतिकारी- अमूल डेयरी
  10 सत्यनारायण गंगाराम पित्रोदा-मोबाइल
  11 आदिशिर गोदरेज-बिज़नेस मेन
  12 सुब्रम्हयम रामदोराई-स्किल डेवलपमेंट
  13 थॉमस कालीनाथ – इलेक्ट्रिकल ईइजीनियर -हिताची
  14 विक्रम साराभाई -स्पेस टेक्नोलॉजी
  15 सत्येंद्र दुबे -नेशनल हाई वे
  16 रवि ग्रोवर – न्यूकलर एनेर्जी
  17 प्रोफेसर एम एम शर्मा -केमिकल इंजीनियरिंग
  18 रछपाल सिंह गिल- भाखरानंगल बांध
  19 चेवांग नोरफेल -ग्लेशियर मैन
  20 सचिन बंसल -फ्लिपकार्ट
  21 राजेन्द्र कुमार पचौरी -क्लाईमेट चेंज
  [12:00, 15/09/2021] +91 89528 28005: 22 नीतीश कुमार -मुख्य मंत्री
  23 पी के थेरेशिया – भारत की पहली महिला मुख्य अभियंता
  24अजय भट्ट- यू एस बी के आविष्कारक

25आयलासोमायजुला ललिता -भारत की पहली महिला इंजीनियर

ENGINEER
Someone asked an engineer,”Why do you feel proud of being an engineer?” He smiled and replied. The income of a lawyer increases with the increase in crimes and a doctor’s income increases with the increase in diseases, but an engineer’s income increases with the increase in the prosperity of people or even the whole nation. That’s why, we
engineers feel so proud.”
A file in hand is the identity of a lawyer stethoscope in hand-a doctor and a chalk in hand-a teacher, but nothing in hand and everything in mind is the identity of an engineer.

Happy Engineer’s Day …

Today Sept 15th is Sir M.Visvesvaraya ‘s birthday. The Greatest civil engineer ever born in the country. Built Krishna Raja Sagardam in Mysore on Cauvery river with stone and Hydraulic lime. It is one of the largest dams in Asia and also built Brindavan garden down stream. Sir MV has done many works in the country. The Maharaja of Mysore appointed him Devaan and He carried out many works in the country .TheHarihar Steel plant, Sukkur dam and also advised Vizag port to sink a sand barge to protect it sea erosion. Born Inthe year 1861 died in the year 1961. I remember when he was bed ridden Smt. Savitri Telugu cinema star visited him. He advised his assistants to dress him with his regular dress including coat and head gear. He gave education to many students who cannot afford. He use to arrange by post their school fees exact amount in Rs and Annas. His habits were also very appreciable. Never taken home the office pen or pencil. Salutations to the great soul. . . . . . . Shantaram.

विश्वेश्वरैयांचे वंशज

हे लोक सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे कोणी नातू किंवा पणतू नाहीत, पण त्यांनी विश्वेश्वरय्या यांचा वारसा पुढे चालवला आहे.

आज अभियंता दिनाच्या निम्मिताने आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया याचं स्मरण करतो. या निम्मिताने मी आजवर जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या विश्वेश्वरैयांच्या काही खास अशा वंशजांची ओळख करून देत आहे.

१. कोल्हापुरात डॉ डी. वाय. पाटील यांना भेटायला एक VIP व्यक्ती हेलिकॉप्टरने आली होती. भेट झाल्यावर निघतांना हेलिकॉप्टर काही सुरु होईना.
पायलट हेलिकॉप्टर कंपनीच्या टेक्निकल टीमशी बोलले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या VIP नां तत्काळ पुढे निघायचं होतं, त्यात कंपनीच्या टेक्निकल टीमला दुरुस्तीसाठी जागेवर यायला ३ दिवसांचा वेळ लागेल असं कळवलं. परिसरात दुसरं हेलिकॉप्टरसुद्धा उपलब्ध नव्हतं.
मग डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव श्री संजय पाटील यानी कोल्हापुरातील एका कार मिस्त्रीला तिथं बोलावलं. या मिस्त्रीने आयुष्यात कधी हेलिकॉप्टरला हातही लावला नव्हता पण त्या अवलियाने अर्ध्या तासात हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला. पायलटने खात्री केल्यावर आलेली VIP मंडळी सुखरूपपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली.
गंमत म्हणजे बेकायदा हेलिकॉप्टर दुरुस्ती केली म्हणून नागरी उड्डयन मंत्रालयाने या मिस्त्रीची चौकशी लावली होती.
याच मिस्त्रीने २००६ साली भंगारात गेलेल्या एका कारमध्ये बदल करून ती कोल्हापुरात रंकाळ्याच्या पाण्यावर चालवून दाखविली होती.
फिरोज मोमीन हा तो अवलिया.

२. विजार-शर्टातला ITI शिकलेला इचलकरंजीमधला एक तरुण ५० वर्षापूर्वी ४ सीटर इलेक्ट्रिक कार तयार करून शहरातून चालवत होता. सर्वजन कुतूहलाने पहात असतांना ही कार खंडाळ्याचा घाट चढणार का, असा टोमणा त्यातील एकाने मारला.
त्या तरूणाने कार चार्ज केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कार मुंबईत मंत्रालयासमोर उभी केली.
पुढे त्यांनी किमान ५० एक नवे शोध लावले, प्रत्येकाची एक इंडस्ट्री उभी केली, त्यातील काही कंपन्या जागतिक पातळीवर सुद्धा गेल्या.
१९७६ साली एका प्रख्यात जापानीज कंपनीला आपल्या एका प्रोडक्टच्या निर्मितीसाठी २० सेकंद लागणारं Cycle Time यांने इचलकरंजीमध्ये ते १२ सेकंदात बसवून दाखवलं.
जगप्रसिद्ध फाय गृपचे संस्थापक श्री पंडितराव कुलकर्णी हे या अभियंत्याच नाव.

३. युरोप मध्ये फिरता रंगमंच पाहून “तो मी नव्हेच” या नाटकासाठी ते महाराष्ट्रात बनवायचं स्वप्न घेवून नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आले होते. बऱ्याच अभियंत्यांना, रचनाकारांना आणि कंपन्यांना भेटून सुद्धा त्यांना हवं तसं डिझाईन मिळत नव्हतं.
कोल्हापुरात एकदा प्रयोग संपल्यावर त्यांचा एका मित्र पणशीकराना एका लोहाराच्या पालावर घेवून गेला. पणशीकरांनी अगदी इनिछेने आपली संकल्पना त्याला समजावून सांगितली.
त्या लोहाराने दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या फिरत्या चाकावर पुली आणि लिव्हर गिअर वापरून फिरता बहुमजली रंगमंचाचा मॉडेल चालवून दाखविला जो पुढे पणशीकर आणि इतर सर्वच नाटककारांनी आपल्या वापरता आणला.
किर्लोस्करांनी डीझेलवर चालणारा जनरेटर मार्केटमध्ये आणला तेव्हां या लोहाराने कोळश्यावर चालणारा जनरेटर बनवला जो डीझेल जनरेटरच्या दुप्पट कार्यक्षमतेने चालणारा आणि फक्त ३० % किमतीत बनवला होता.
ही असामी म्हणजे इयत्ता दुसरी शिकलेले म्हादबा मिस्त्री अर्थात महादेव शेळके.

४. उद्योगाची आणि अभियांत्रिकी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला पाथरवट (वडार समाजातील एक उपजात) समाजातील एका तरुण दगड फोडता-फोडता, धरणाच्या कालवा खुदाईची कंत्राटे घेऊ लागला.
पुढे बंधारे, धरण, रस्ते, पाईपलाईनची कामे घेत वस्त्रोद्योग, उर्जा, महामार्ग, बांधकाम सारख्या क्षेत्रात आपला उद्योगविस्तार १००० कोटींच्याही पुढे नेला.
कित्येक उच्चशिक्षित अभियंत्याना घडवणारा बंडी, धोतर, गांधीटोपी वेशातला हा अशिक्षित पण विद्वान अभियंता म्हणजे रामचंद्र मारुती मोहिते.

५. सांगली जिल्ह्याच्या पेड गावातील चांभार कुटुंबातील एक युवक मुंबईतील माझगाव डॉक वर वेल्डरचं काम करणाऱ्या आपल्या मोठ्या भावासोबत शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू झाला. तिथे काम करता-करता इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. देश-विदेशात काम करून व्यावसायिक अनुभव मिळवला. पुढे स्वतःची कंपनी सुरु केली (त्या कंपनीच्या नावात आपल्या सर्व भावांच्या नावाचा समावेश आहे) जिथे ४५०० लोक काम करतात आणि आजचा टर्नओवर ५०० करोड आहे. २०१४ ला आपल्या भावाला मिरजेचा आमदार बनवला.
बालपणी जाती-व्यवस्थेचे चटके खात ज्या गाव-विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायला मनाई होती त्याच गावात त्यांनी सार्वजनिक विहीर खोदून दिली.
हे आहेत मुंबईतील DAS Offshore चे श्री अशोक खाडे, आणि DAS चा फुल्लफॉर्म आहे – दत्ता, अशोक, सुरेश

६. टाटा मोटर्स मध्ये काम करणाऱ्या एका इंजिनीअरने टाटा इस्टीम या गाडीच्या निर्मिती प्रक्रीयेमध्ये आपलं कौशल्य वापरून कंपनीचे २.५ करोड रुपये वाचविले.
त्याच्या बक्षीसापोटी मिळणारं प्रमोशन नाकारून आपल्या गावाकडच्या अल्पशिक्षित तरुण मित्रांना कंपनीत नोकरी देण्यासाठी विनंती केली.
टाटा मोटर्सने ती आनंदाने मान्य केली आणि अल्पावधीत याद्वारे ३०० तरुणांना रोजगार मिळाला. यातूनच २००१ साली सेवा क्षेत्रातील एका नव्या व्यवसायाचा उदय झाला ज्याची मजल आज ७५,००० लोकांच्या रोजगारापर्यंत येऊन पोचली आहे.
पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, संसद भवन, सुप्रीमे कोर्ट, १०० एक महत्वाच्या खाजगी कंपन्या, १५ महत्वाची विमानतळे, ५० महत्वाची मंदिरे आणि अजून बरंच काही…
२२ राज्यातील ७० शहरात कार्यालये उघडली. सोबत शेती, Life Science, महाराष्ट्र आणि जम्मू मधील १०८ Emergency Medical Service , मेगा फूड पार्क, न्यूक्लिअर सायन्सचे Peace Applications, शहरी कचरा व्यवस्थापन या आणि अशा अजून बऱ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली.
आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी या युवकाने आपल्या देशाच्या विकासाच स्वप्नं पाहून त्याच नावाने कंपनी स्थापन केली होती. आज याची वार्षिक उलाढाल २००० कोटींची पुढे आहे.
महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगतीत गेल्या ६० वर्षात महत्वाच योगदान दिलेल्या (हयात असलेल्या) ६० व्यक्तींमध्ये याचं नाव अग्रक्रमावर येतं.
आपल्या व्यवसायामुळे १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले पाहिजेत, १० लाख लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपली कंपनी १०० देशात कार्यरत असली पाहिजे या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे, मानवता जपणारे आणि जगणारे, अत्यंत संवेदनशील आणि सदैव हसतमुख असणारे, मुळचे रहिमतपूरचे आणि VIT कॉलेजचे Electronics इंजिनीअर असणारे
BVG म्हणजेच भारत विकास ग्रुपचे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड

या सगळ्यांनी आम्हांला प्रेरणा दिली, आमचं जीवन सुखकर केलं आणि देशाच्या निर्मितीत भरीव योगदान दिलं.

माहितीत असलेल्या, नसलेल्या अशा सर्वच विश्वेश्वरैयांच्या खऱ्याखुऱ्या वंशजांना अभियंता दिनाच्या निमित्ताने मानाचा सलाम ! 🙏

 • कुलभूषण बिरनाळे

ख-या इंजिनिअर तर सगळ्या महिलाच आहेत. ….. डब्याचं झाकण उघडत नसेल तर कोणत्या बाजूने दणका घालायचा ते तिलाच माहिती… निसटणारी पक्कड कशी पकडायची… डुगडुगणारं पोळपाटाचा पाट स्थिर कसा करायचा… गळणारा नळ बंद करताना कसा हळुच रिव्हर्स करायचा… गॅस शेगडी कमी जास्त करताना मध्येच बंद पडत असेल तर, बंद न पडू देता कशी वापरायची… संपलेल्या पावडरच्या डब्यातून शेवटच्या कणापर्यंत हातावर आपटून कशी पावडर काढायची…

अशा एक ना अनेक कुशलतेची कामं करणाऱ्या महिला इंजिनिअर्स ना खूप खूप शुभेच्छा🙏

संस्कृत सुभाषिते – इंग्लिश आणि मराठी अर्थासह -८

आधीचे भाग :

संस्कृत सुभाषिते – इंग्लिश आणि मराठी अर्थासह (भाग १)
Learning Sanskrit through Subhashitani (Part -1)
सुभाषितांमधून संस्कृत शिकूया (भाग १)
https://anandghare.wordpress.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF/

संस्कृत सुभाषिते – इंग्लिश आणि मराठी अर्थासह (भाग २)
Learning Sanskrit through Subhashitani (Part -2)
सुभाषितांमधून संस्कृत शिकूया (भाग २)
https://anandghare.wordpress.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2/

संस्कृत सुभाषिते – इंग्लिश आणि मराठी अर्थासह (भाग ३)
Learning Sanskrit through Subhashitani (Part -3)
सुभाषितांमधून संस्कृत शिकूया (भाग ३)
https://anandghare.wordpress.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2-2/

संस्कृत सुभाषिते – इंग्लिश आणि मराठी अर्थासह -४
Learning Sanskrit through Subhashitani (Part -4)
सुभाषितांमधून संस्कृत शिकूया (भाग ४)
https://anandghare.wordpress.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2-3/

संस्कृत सुभाषिते – इंग्लिश आणि मराठी अर्थासह -५
Learning Sanskrit through Subhashitani (Part -5)
सुभाषितांमधून संस्कृत शिकूया (भाग ५)
https://anandghare.wordpress.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2-4/

संस्कृत सुभाषिते – इंग्लिश आणि मराठी अर्थासह -६
Learning Sanskrit through Subhashitani (Part -6)
सुभाषितांमधून संस्कृत शिकूया (भाग ६)
https://anandghare.wordpress.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2-5/

संस्कृत सुभाषिते – इंग्लिश आणि मराठी अर्थासह -७
Learning Sanskrit through Subhashitani (Part -7)
सुभाषितांमधून संस्कृत शिकूया (भाग ७)
https://anandghare.wordpress.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2-6/


या भागातील सुभाषिते ७०१ ते ८००

Learning Sanskrit through Subhashitani
सुभाषितांमधून संस्कृत शिकूया – भाग ८

७०१ : १७-०८-२०२०
जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः।
स हेतुः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च॥

घटः जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते। सः सर्वविद्यानाम्, धर्मस्य च धनस्य च हेतुः (भवति)।

A pot gets filled in due course with constant fall of water drops. That is the means of acquiring all types of expertise (knowledge/ learning). The same is in the case of (acquisition of) meritorious gains as well as of wealth.

घटः, सः & हेतुः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of घट- pot, तद्- that, it & हेतु- cause, reason, means, क्रमशः- अव्यय- regularly, successively, gradually, जलबिन्दुनिपातेन- न. लिं. तृ. वि. ए. व. of जलबिन्दुनिपात- fall of water drops- जल- न. लिं.- water, बिन्दु- पु. लिं.-drop, निपात- fall, descent- (नि+पत्- पतति १ ग. प. प. to fall)- जलस्य बिन्दु- जलबिन्दुः -जलबिन्दोः निपातः- जलबिन्दुनिपातः – both ष. तत्पुरुष स., पूर्यते- वर्त. तृ. पु. ए. व. of पूर्- ४ ग. आ. प. to fill, fill out, सर्वविद्यानाम्- स्त्री. लिं. ष. वि. ब. व. of सर्वविद्या- all knowledge, education, learning- सर्व- all, entire, विद्या- knowledge, education, learning- सर्वा विद्या- सर्वविद्या- स. प्रादि तत्पुरुष स., धर्मस्य & धनस्य- पु/न. लिं. ष. वि. ए. व. of धर्म- good code of conduct, religion & धन- wealth, money, च-and as well

एक एक थेंब पाणी पडून क्रमाक्रमाने संपूर्ण हंडा पाण्याने भरतो. त्याचप्रमाणे सर्व विद्या, धर्म आणि धन संपत्ती यांचा संचय होतो.

नरेंद्र गोळे
थेंब थेंब करूनी तो भरतसे पुरा घडा ।
तशी विद्या, सर्व धर्म, धन, संपत्ति साठते ॥

७०२ : १८-०८-२०२०
गुणानामन्तरं प्रायस्तज्ञो जानाति नेतरः ।
मालतीमल्लिकामोदं घ्राणं वेत्ति न लोचनम् ॥

तज्ञः प्रायः गुणानाम् अन्तरम् जानाति, इतरः न (जानाति)। घ्राणम् मालतीमल्लिकामोदम् वेत्ति। लोचनम् न (तद् वेत्ति)।

Mostly, an expert (knowledgeable) knows the difference between the qualities (virtues) and not the other. A nose knows the fragrance of Malati and Malika (varieties of Jasmine), not an eye.

तज्ञः (तद्+ ज्ञः)- knowledgeable or specialist in it- ज्ञ- adjctv- knowing, familiar with, ज्ञः- (suffixed to compound) a wise and learned man- ( कार्यज्ञ, शास्त्रज्ञ, सर्वज्ञ etc.) तद् जानाति इति- तज्ञः उपपद तत्पुरुष स., & इतरः- the other, another (इतर-पु, इतरा-स्त्री, इतरत्-न)- both in पु. लिं. प्र. वि. ए. व., प्रायः (प्रायस्)- अव्यय- probably, mostly, generally, गुणानाम्- पु/न. लिं. ष. वि. ब. व. of गुण- quality, virtue, अन्तरम् & मालतीमल्लिकामोदम्- पु/न. लिं. द्वि. वि. ए. व. of अन्तर- distinction, difference & मालतीमल्लिकामोद- fragrance of Malati and Malika (varieties of Jasmine) flowers, आमोद- fragrance, perfume, मालती च मल्लिका च- मालतीमल्लिका- द्वंद्व स., मालतीमल्लिकयोः आमोदः- मालतीमल्लिकामोदः – ष. तत्पुरुष स, जानाति & वेत्ति- वर्त. तृ. पु. ए. व. ज्ञा- जानाति- जानीते ९ ग. उ. प. to know, understand & विद्- २ ग. प. प. to know, understand, न-no, not, घ्राणम् & लोचनम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of घ्राण- a nose & लोचन-an eye

तज्ञ लोकच गुणांमधला फरक जाणतात, मालती आणि मल्लिका यांच्या फुलांचे सुवास नाकाला समजतात, डोळ्यांना नाही. कदाचित ही दोन्ही फुले दिसायला सारखी दिसत असतील.

नरेंद्र गोळे
गुणांतील उणेदूणे तज्ञ जाणती, ना दुजे ।मालती मोगरा गंध नाक जाणे, न नेत्र ते ॥

७०३ : १९-०८-२०२०
न तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिरः।
यो वै युवाऽप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ॥
पाठभेद: बालोsपि यः प्रजानाति तं देवाः—
महाभारत. १. १३३.११

येन अस्य शिरः पलितम्, तेन (सः) स्थविरः न भवति। यः युवा अपि, अधीयानः (अस्ति), तम् वै देवाः स्थविरम् विदुः। (पाभे; यः बालः अपि प्रजानाति, तम् देवाः—)

One who got his head grey-haired, by that he does not become aged (matured, knowledgeable). Even a youth, who has studied well -(पाभे; Even a young person, who is well informed- knowledgeable) is considered matured by divine people.

येन- by whom & तेन- by that- पु. लिं. तृ. वि. ए. व. of यद्- who & तद्- that, it, अस्य- his- पु. लिं. ष. वि. ए. व. of इदम्- he, स्थविरः, यः, युवा & अधीयानः- all in- पु. लिं. प्र. वि. ए. व. of- स्थविर- aged, old, firm, steady, यद्- who, युवन्- young, youthful, अधीयान- well-reading, one studying well, one who is going over scriptures- वर्त. का. वा. धा. सा. वि. of अधि+इ- to study, read through, learn- (इ- एति २ ग. प. प. to go, come to), शिरः & पलितम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of शिरस्- head, skull & पलित- adjctv- grey-haired, aged, old, न- no, not, भवति- happens – वर्त. तृ. पु. ए. व. of भू- १ ग. प. प. to be, to exist, अपि- अव्यय- even, also, and, तम् & स्थविरम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. of तद्-he & स्थविर- old, aged, वै- अव्यय- a particle of affirmation- indeed, truly, देवाः- – पु. लिं. प्र. वि. ब. व. of देव- God, divine person, विदुः- वर्त. तृ. पु. ब. व. of विद्- वेत्ति वेद २ ग. प. प. to know, understand -पाभे; यः & बालः- -पु. लिं. प्र. वि. ए. व. of यद्- who & बाल- child, young, प्रजानाति- वर्त. तृ. पु. ए. व. of प्र+ज्ञा to be well-read, learned- (ज्ञा- जानाति- जानीते – ९ ग. उ. प. to know, learn)

फक्त डोक्यावरचे केस पांढरे झाल्याने कोणी पोक्त होत नाही. चांगले शिकलेल्या तरुणाला (किंवा ज्ञानी अशा बालकालाही) देव सज्ञान समजतात. नुसते वयाने वाढून काही उपयोग नाही, ज्ञान आणि विद्या संपादन करणे आवश्यक आहे.

७०४ : २०-०८-२०२०
प्रज्ञया मानसं दुःखं हन्याच्छारीरमौषधैः ।
एतद्विज्ञानसामर्थ्यं न बालैः समतामियात् ॥
महाभारत. ३.२१९. १८

मानसम् दुःखम् प्रज्ञया हन्यात्। शारीरम् (दुःखम्) औषधैः (हन्यात्)। एतद् विज्ञानसामर्थ्यम् (भवति)। बालैः समताम् न इयात् ।

Mental agony should be solved with wisdom. Physical indisposition should be overcome by medicines. This is the strength of knowledge. One should not equate himself with children (One should not be childish and suffer)

मानसम्, शारीरम् & दुःखम्- all in न. लि. द्वि. वि. ए. व. of मानस- pertaining or concerning to mind- (मनस्- mind, heart- न. लिं.), शारीर- pertaining to body- (शरीर- body-न. लिं.) & दुःख- agony, pain, sorrow, प्रज्ञया- स्त्री. लि. तृ. वि. ए. व. of प्रज्ञा- knowledge, intelligence, discretion, हन्यात् & इयात्- both २ ग. प. प. विध्यर्थ तृ. पु. ए. व. of हन्- हन्ति- to kill, strike & इ- एति to go, to come to, औषधैः & बालैः- तृ. वि. ब. व. of औषध- न. लिं.- herb, medicine in general & बाल- पु. लिं- child, infant, ignorant, एतद्- this & विज्ञानसामर्थ्यम्- strength of knowledge, विज्ञान- science, knowledge, सामर्थ्य- strength- विज्ञानस्य सामर्थ्यम्- ष. तत्पुरुष स., both in न. लि. प्र. वि. ए. व., समताम्- स्त्री. लि. द्वि. वि. ए. व. of समता- equality, sameness, न- no, not

मनाचे दुःख समंजसपणे विचार करून घालवावे, शरीराची पीडा औषधोपचार करून घालवावी. विज्ञानामध्ये अशी दुःखे बरी करण्याची शक्ती आहे. त्यामुळे (आकांडतांडव करण्याचा) बालिशपणा करू नये. योग्य तो उपचार करून घ्यावा.

७०५ : २१-०८-२०२०
मातेव रक्षति पितेव हिते नियुंक्ते
कान्तेव चापि रमयत्यपनीय खेदम् ।
लक्ष्मीं तनोति वितनोति च दिक्षु कीर्तिम्
किं किं न साधयति कल्पलतेव विद्या॥

विद्या, माता इव रक्षति, पिता इव हिते नियुंक्ते, कान्ता इव च अपि खेदम् अपनीय, रमयति, लक्ष्मीम् तनोति, कीर्तिम् च दिक्षु वितनोति। (सा) कल्पलता इव किम् किम् न साधयति।

Education (knowledge) protects like a mother, directs towards (makes us do) good deeds like a father, entertains like a wife, after removing sorrow, brings in wealth and spreads fame in all directions. (Tell me this education/knowledge) Like a wish-granting creeper, what all things it can not achieve?

विद्या- education, knowledge, माता (मातृ)- mother, कान्ता- wife & कल्पलता- wish-granting creeper- (कल्प- adjctv- feasible, possible, imagined, लता- creeper- या लता कल्पितम् ददाति सा- कल्पलता- बहुव्रीही स.) all in स्त्री. लि. प्र. वि. ए. व., पिता- पु.लि. प्र. वि. ए. व. of- पितृ father, लक्ष्मीम् & कीर्तिम्- स्त्री. लि. द्वि. वि. ए. व. of लक्ष्मी- wealth, goddess of wealth & कीर्ति- fame, इव- अव्यय- like, similar to, रक्षति, नियुंक्ते, तनोति & वितनोति- वर्त. तृ. पु. ए. व. of रक्ष्- १ ग. प. प. to protect, guard, नि+ युज्- to order, deploy, appoint, depute- (युज्- युनक्ति- युंक्ते ७ ग. उ. प. to join, connect, employ), तन्- तनोति- तनुते – ८ ग. उ. प. to grant, perform, fill, stretch and वि+ तन्- to spread, stretch, रमयति- entertains, cajoles & साधयति-makes it happen or achieve- प्रायोजक वर्त. तृ. पु. ए. व. of रम्- रमते १ ग. आ. प. to be pleased, delighted & साध्- साध्नोति ५ ग. प. प. to accomplish, finish, हिते- स. वि. ए. व. of हित- interest, good, pleasing- क. भू. धा. वि. of हि-हिनोति ५ ग. प. प. to gratify, please, अपि- अव्यय- also, even, and, खेदम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. of खेद- depression, dejection, अपनीय- after removing, destroying- पू. का. वा. ल्यबन्त धा. सा. अव्यय of अप+नी- (नी-नयति-ते- १ ग. उ. प. to bring, carry), & दिक्षु- स्त्री. लिं. स. वि. ब. व. of दिश्- direction, quarter of the sky, च- and, किम्- what, which, किम् किम्- what all, what-ever, न-no, not

विद्या आईप्रमाणे रक्षण करते, पित्याप्रमाणे हित दाखवते, पत्नीप्रमाणे आपली दुःखे दूर करून मनोरंजन करते आणि समृद्धी व कीर्ती वाढवते, ती कल्पवृक्षाप्रमाणे असते, तिच्यापासून काय काय साध्य होत नाही ?

नरेंद्र गोळे
आईपरी जपत, हीत पित्यापरी दे
पत्नीपरी रिझवि, दुःख लयास नेते ।
समृद्धि, कीर्ति, पसरीत दिगंत ने ती साधे न काय, जणु कल्पलताच विद्या ॥ – वसंततिलका

७०६ : २२-०८-२०२०
यस्तु क्रोधं समुत्पन्नं प्रज्ञया परिबाधते।
तेजस्विनं तं विद्वांसो मन्यन्ते तत्त्वदर्शिनः ॥
-महाभारत. ३ .२९ .२०

यः समुत्पन्नम् क्रोधम्, प्रज्ञया परिबाधते, तम् तु तत्त्वदर्शिनः विद्वांसः तेजस्विनम् मन्यन्ते।

(When asked by Draupadi, ‘Why you people do not get angry on Kauravas’, Yudishtir replies)-
On the other hand, the wise people, who know the actual facts (who think logically), consider him a hero, who controls anger, with intelligence (carefully), when it is produced.

समुत्पन्नम्, क्रोधम्, तम् & तेजस्विनम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. of समुत्पन्न- generated, produced- क. भू. धा. वि. of सं+ उद्+ पद्- to occur (पद्- पद्यते ४ ग. आ. प. to go, approach), क्रोध- anger, wrath, तद्- he & तेजस्विन्- one who is heroic, bright, dignified, यः – पु. लिं. प्र. वि. ए. व. of यद्- who, प्रज्ञया- स्त्री. लिं. प्र. वि. ए. व. of प्रज्ञा – knowledge, intelligence, judgement, wisdom- परिबाधते- आ. प. वर्त. तृ. पु. ए. व. of परि+ बाध्- to get over, control- (बाध्- बाधते- १ ग. आ. प. to oppress, press hard), तु- अव्यय- but, on the other hand/ contrary, तत्त्वदर्शिनः & विद्वांसः- पु. लिं. प्र. वि. ब. व. of तत्त्वदर्शिन्- one who see the logic/true state/ fact- तत्त्व- logic, true state, fact- तत्त्वम् पश्यति इति- उपपद तत्पुरुष स. & विद्वस्- knowing, wise, learned, scholar, मन्यन्ते- वर्त. तृ. पु. ब. व. of मन्- मन्यते- ४ ग. आ. प. to think, believe, consider, conceive

जे शहाणे लोक आलेल्या रागाला विचाराने (बुद्धीने) आवर घालतात त्यांनाच विद्वान लोक तेजस्वी मानतात.

नरेंद्र गोळे
शहाणे लोक संतापा, बुद्धीने बांध घालती । जाणते मानती त्यांना, तेजस्वी तत्त्वदाविते ॥

७०७ : २३-०८-२०२०
लोके वैधर्म्यम् एतत्तु दृश्यते बहुविस्तरम्।
हीनज्ञानाश्च हृष्यन्ते क्लिश्यन्ते प्राज्ञकोविदाः।
बहुदुःखपरिक्लेशं मानुष्यमिह दृश्यते ॥
महाभारत. १. १९६.२४

लोके हीनज्ञानाः च हृष्यन्ते, प्राज्ञकोविदाः क्लिश्यन्ते, एतद् तु बहुविस्तरम् वैधर्म्यम् दृश्यते। इह बहुदुःखपरिक्लेशम् मानुष्यम् दृश्यते।

This is the reply by Rushi, named Baka, who was blessed with a long life, on Indra’s query, on ‘what is his experience on worldly life;
‘In this world, stupid people are spending a happy life while intellectuals suffer. This widespread difference is seen (everywhere). It is seen that, in this world, life of humanity is full of great sorrow and suffering.

लोके- in this world- पु/न. लिं. स. वि. ए. व. of लोक- world, हीनज्ञानाः & प्राज्ञकोविदाः- पु. लिं. प्र. वि. ब. व. of हीनज्ञान- ज्ञानेन हीनः यः सः -बहुव्रीही स.- stupid or ignorant person- (हीन- devoid of- क. भू. धा. वि. of हा- जहाति- २ ग. प. प. to abandon & ज्ञान- wisdom, knowledge) & प्राज्ञकोविद- intellectual and experienced person- प्राज्ञः- intellectual, learned, knowledgeable, कोविदः- experienced, wise, प्राज्ञः च कोविदः च- द्वंद्व स., च-and, हृष्यन्ते & क्लिश्यन्ते- both ४ ग. आ. प. वर्त. तृ. पु. ब. व. of हृष्- हर्षति १. प. प. & हृष्यते ४ ग. आ. प. to be happy, to rejoice & क्लिश्- क्लिश्यते- to be afflicted, to suffer, एतद्- this, it, तु- अव्यय- but, on the other hand, बहुविस्तरम्, वैधर्म्यम्, बहुदुःखपरिक्लेशम् & मानुष्यम्- all in न. लिं. प्र. वि. ए. व. of बहुविस्तर- widespread- बहु- large, much, great, विस्तर- at length, in detail, wide- बहु विस्तरम्- स. प्रादि तत्पुरुष स., वैधर्म्य- dissimilarity, difference, characteristics- धर्म्य- adjctv- endowed with particular quality, characteristic- विविधानि धर्म्यानि – समा. प्रादि तत्पुरुष स., बहुदुःखपरिक्लेशम्- न. लिं. प्र. वि. ए. व. -with lot of sorrow and great suffering- दुःख- sorrow & परिक्लेश- great suffering- दुःखम् च परिक्लेशम् च- द्वंद्व स.- बहु दुःखपरिक्लेशम् – स. प्रादि तत्पुरुष स., मानुष्य- pertaining to human, mankind- (मनुष्य or मानुष- human, man), इह- अव्यय- here, in this world, दृश्यते- gets to see- कर्मणि प्रयोग तृ. पु. ए. व. -दृश्- पश्यति- १. प. प. to see, look at

या जगात अडाणी लोक मजेत राहतात आणि बुद्धीवान विद्वान लोकांना क्लेश सहन करावे लागतात, हा फरक सगळीकडे दिसतो. माणुसकी बाळगणाऱ्या लोकांना खूप क्लेश आणि दुःख भोगावे लागते. ही आजचीच परिस्थिती नाही तर महाभारतकाळातसुद्धा होती.


७०८ : २४-०८-२०२०
वरं दरिद्रः श्रुतिशास्त्रपारगो न चापि मूर्खो बहुरत्नसंयुतः।
सुलोचना जीर्णपटापि शोभते न नेत्रहीना कनकैरलंकृता ॥

श्रुतिशास्त्रपारगः दरिद्रः वरम् (अस्ति), न मूर्खः बहुरत्नसंयुतः च अपि। (स्त्री) सुलोचना जीर्णपटा अपि शोभते, न कनकैः अलंकृता (शोभते)।

Poor man who is very knowledgeable in scriptures and scientific texts is preferred to a stupid person who is endowed with plenty of jems. A woman with beautiful eyes, having even worn out clothes, looks splendid, not the one, who is blind and is adorned with gold ornaments.

श्रुतिशास्त्रपारगः, दरिद्रः, मूर्खः, & बहुरत्नसंयुतः- all in पु. लि. प्र. वि. ए. व. of श्रुतिशास्त्रपारग- expert in scriptures and scientific knowledge- श्रुति- sacred text, शास्त्र- scientific knowledge, पारग- proficient, one who has mastered something- पारम्- end of extremity, furtherest- पारम् गतः इति – उपपद तत्पुरुष स.- श्रुतिः च शास्त्रम् च – श्रुतिशास्त्रम्- द्वंद्व स.- श्रुतिशास्त्रे पारगः -श्रुतिशास्त्रपारग- स. तत्पुरुष स., दरिद्र- poor, मूर्ख- stupid, ignorant, & बहुरत्नसंयुत- owning abundant quantity of jems- बहु- adjctv- abundant, many, large, रत्न- न. लि.-jems, संयुत- endowed with, having- क. भू. धा. वि. of- सं +यु- (यु- यौति २ ग. प. प. & युनाति- युनीते ९ ग. उ. प. to unite, join)- बहु रत्नम् -बहुरत्नम् – समा. प्रादि तत्पुरुष स. & बहुरत्नैः संयुतः यः सः -बहुरत्नसंयुतः -बहुव्रीही स., वरम्- अव्यय- better than, preferable to, न- no, not, च- and, अपि-अव्यय- even, also, and, सुलोचना, जीर्णपटा & नेत्रहीना- all in स्त्री. लि. प्र. वि. ए. व. of सुलोचन- one with beautiful eyes- लोचन- eye, शोभनौ लोचनौ यस्याः सा- सुलोचना & जीर्णपट- one with torn or old clothes- जीर्ण- old, worn out- क. भू. धा. वि. of- जृ(दीर्घ)- १, ४, ९ -प. प. & १० ग. उ. प. – जरति, जीर्यति, जृणाति, जारयति-ते- to grow old, worn out)- पटः -पटम्- पु/न. लिं- garment, clothes- both in पु. लि. प्र. वि. ए. व.- जीर्णाः पटाः यस्याः सा- जीर्णपटा & नेत्रहीन- one who is devoid of eyes- नेत्र- eye, हीन- devoid of- क. भू. धा. वि. of- हा-जहाति २ ग. प. प. to abandon- नेत्राभ्याम् हीना या सा- all बहुव्रीही स., शोभते- वर्त. तृ. पु. ए. व. of शुभ्- १ ग. आ. प. to shine, to be splendid/ handsome, अलंकृता- स्त्री. लि. प्र. वि. ए. व. of अलंकृत- odorned, decorated – क. भू. धा. वि. of- अलं+कृ- (कृ- करोति-कुरुते ८ ग. उ. प. to do), कनकैः- न. लिं. तृ. वि. ब. व. of कनक- gold

श्रुति आणि शास्त्रांमध्ये पारंगत असलेला गरीब माणूस चांगला असतो, एकादा मूर्ख रत्नांनी मढवलेला असला तरी तो कधीच नाही. दागिन्यांनी मढलेल्या आंधळ्या बाईपेक्षा एकादी सुंदर डोळे असलेली (सुलोचना)च जास्त शोभून दिसते. आपल्या अनेक सुभाषितांमध्ये अशाच प्रकारचा उपदेश आहे.

नरेंद्र गोळे
असो गरीबी, श्रुतितज्ञ शोभतो
न भूषणांनी, परि मूर्ख शोभतो ।
न भूषवीताहि, सजे सुलोचना जरी श्रुंगारीत, न अंध शोभते ॥ – वंशस्थ

७०९ :२५-०८-२०२०
वाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छतश्च विशेषतः ।
प्रोक्तं श्रद्धाविहीनस्यारण्यरुदितोपमम् ॥

श्रद्धासमेतस्य विशेषतः च, पृच्छतः वाच्यम् । श्रद्धाविहीनस्य प्रोक्तम् अरण्यरुदितोपमम् (भवेत्)।

One, who is sincere and particularly one who is inquisitive should be taught (told, spoken to). Anything told (taught) to the one, who is not interested, is like crying in a forest.

श्रद्धासमेतस्य, पृच्छतः & श्रद्धाविहीनस्य- पु. लि. ष. वि. ए. व. of श्रद्धासमेत- One who is with interest, faith or who is sincere – श्रद्धा- respect, belief, interest, faith, समेत- with, having, possessing- क. भू. धा. वि. of सं+ इ- (इ-एति २ ग. प. प. to go, go to), पृच्छत्- one who is inquisitive, questioning- वर्त. का. वा. धा. सा. वि. of प्रच्छ्- पृच्छति ६ ग. प.प. to ask, question, inquire & श्रद्धाविहीन- disinterested person, person devoid of faith- विहीन- devoid of – क. भू. धा. वि. of वि+ हा- (हा- जहाति २ ग. प. प. to abandon, leave)- श्रद्धया विहीनः- श्रद्धाविहीनः, विशेषतः -(विशेषतस्)- अव्यय- especially, particularly, वाच्यम् & प्रोक्तम्- न. लि. प्र. वि. ए. व. of वाच्य- to be told, spoken, taught- (also वक्तव्य, वचनीय & वाक्य)- कर्मणि वि. धा. सा. वि. of वच्- वक्ति २ ग. प. प. to say, speak, tell, communicate & प्रोक्त- spoken, told, prescribed – क. भू. धा. वि. of प्र+ वच्- (वच्- वक्ति २ ग. प. to speak, talk, अरण्यरुदितोपमम्- like crying in a forest- अरण्य- forest, रुदित- crying- क. भू. धा. वि. of रुद्- रोदिति २ ग. प. प. to cry, weep, howl, उपमा- resemblance, similarity, equality- अरण्ये रुदितम्- अरण्यरुदित- स. तत्पुरुष स.- अरण्यरुदितस्य इव उपमा यस्य तद्- अरण्यरुदितोपमम्- बहुव्रीही स.

ज्याच्या मनात श्रद्धा आहे आणि विशेषतः जो उत्सुकतेने प्रश्न विचारतो त्याला सगळे सांगावे. ज्याचा विश्वासच नाही किंवा ज्याचे लक्षच नाही अशा माणसाला काही सांगणे हे रानातल्या रडण्यासारखे निरर्थक आहे.

नरेंद्र गोळे
श्रद्धेने ऐकत्यालाच, सांगावेही विचारता । सांगणे, न रुचे त्याला, जंगली रडणे असे ॥ – अनुष्टुप्‌

७१० : २६-०८-२०२०
विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्
विद्या भोगकरी यशःसुखकरी विद्या गुरूणां गुरुः।
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परा देवता।
विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्याविहीनः पशुः॥
भर्तृहरी नीतिशतक २०

विद्या नाम नरस्य रूपम् अधिकम्, (सा) प्रच्छन्नगुप्तम् धनम् (अस्ति)। विद्या भोगकरी, यशःसुखकरी, विद्या गुरूणाम् गुरुः (भवति)। विदेशगमने विद्या बन्धुजनः (अस्ति)। विद्या परा दैवतम् (भवति)। विद्या, न हि धनम्, राजसु पूज्यते । विद्याविहीनः पशुः (भवति)।

A thing called Education or knowledge gives a man added handsomeness (personality). It is a hidden treasure, within. It is instrumental for all pleasures. Education helps one to achieve fame and happiness. It is the teacher amongst all teachers. When one is in a foreign land, it acts like a well-wisher (friend). Education is supreme Goddess. It is the Education, and not the wealth, that is honoured by Kings. One who is devoid of Education is like an animal.

विद्या- Education, knowledge, भोगकरी- one that causes enjoyment- (भोगः -enjoyment, fruition, करी, करम्, करः- who or what causes- भोगम् करोति इति- उपपद तत्पुरुष स.), यशःसुखकरी- one that helps to achieve fame and happiness.(यशस्- fame, glory, सुखम्- happiness- यशः च सुखम् च- यशःसुखम् -द्वंद्व स.- यशःसुखम् करोति इति- उपपद तत्पुरुष स.), परा- (परः, परम्)- supreme, ultimate, देवता (दैवतः, दैवतम्)- deity, divinity, God- all in स्त्री. लिं. प्र. वि. ए. व., नाम (नामन्)- an, appellation, a name, रूपम्- figure, look, appearance, अधिकम्- added, excessive, additional, प्रच्छन्नगुप्तम्- secret hidden- प्रच्छन्न- covered, hidden- क. भू. धा. वि. of प्र + छद्-(छद्- १ &१० ग. उ. प.- छदति-ते & छादयति-ते), गुप्तम्- secret, unknown, धनम्- wealth, money- all in- न. लिं. प्र. वि. ए. व., नरस्य- पु. लिं. ष. वि. ए. व. of नर-a man, person, गुरूणाम्- पु. लिं. ष. वि. ब. व. of गुरु- teacher, guide, गुरुः- teacher, बन्धुजनः- well-wishing person- (बन्धु- brother, friend, जन- person- बन्धुः इव जनः -उपपद तत्पुरुष स.), विद्याविहीनः- one who is devoid of Education- {विहीन- devoid of- क. भू. धा. वि. of वि+हा (हा- जहाति- २ ग. प. प. to leave, abandon)- विद्यया विहीनः – तृ. तत्पुरुष स.) & पशुः- animal- all in पु. लिं. प्र. वि. ए. व., विदेशगमने- न. लिं. स. वि. ए. व. of विदेशगमन- going to a foreign land- (विदेश- foreign land- विभिन्नः देशः- समा. प्रदि तत्पुरुष स., गमन- going- विदेशे गमनम्- स. तत्पुरुष स.), न हि-अव्यय-
not even, राजसु- among kings- पु. लिं. स. वि. ब. व. राजन्, पूज्यते- gets honoured- कर्मणि प्रयोग तृ. पु. ए. व. of पूज्- पूजयति-ते १० ग. उ. प. to honour, worship

विद्या माणसाला अधिक रूप देते, विद्या हे दडलेले गुप्तरूपातले धन आहे, विद्येमुळे आपल्याला उपभोग घेता येतो, सुख मिळते, ती सर्व गुरूंमधली श्रेष्ठ गुरु आहे. परदेशात विद्या हीच आपले बंधुजन आहे (तिची मदत होते), विद्या ही श्रेष्ठ देवता आहे. राजाकडून विद्येचा सन्मान होतो, धनाचा होत नाही. ज्याच्याकडे कुठलीही विद्या नाही असा माणूस जनावरासारखा असतो.
“विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकिले द्रव्यही … ” असा एक मराठी श्लोक आहे.


७११ २७-०८-२०२०
सर्वथा संत्यजेत् वादं न कंचित् मर्मणि स्पृशेत्।
सर्वान् परित्यजेत् अर्थान् स्वाध्यायस्य विरोधिनः॥

वादम् सर्वथा संत्यजेत्। मर्मणि न कंचित् स्पृशेत्। स्वाध्यायस्य विरोधिनः, सर्वान् अर्थान् परित्यजेत्।

One should avoid argument completely. Nothing (that is said) should hurt anyone (touch anyone’s heart). One should totally give up all types of things that are not in the interest of self study (of scriptures or sacred texts)

वादम्- पु. लि. द्वि. वि. ए. व. of वाद- dispute, controversy, allegation, सर्वथा- अव्यय- by all means, altogether, entirely, संत्यजेत् & परित्यजेत्- should leave or avoid totally & स्पृशेत्- would touch- all in-विध्यर्थ तृ. पु. ए. व. of सं +त्यज् & परि +त्यज् – (त्यज् -त्यजति १ ग. प. प. to leave, abandon, quit) & स्पृश्- स्पृशति-६ ग. प. प. to touch, to reach, मर्मणि- न. लि. स. वि. ए. व. of मर्मन्- न. लि.- a vital part of the body, any weak or vulnerable part., heart, न- no, कंचित्- (किम्+ चित्)- some, little, न कंचित्- nothing, not even a bit, स्वाध्यायस्य & विरोधिनः- पु. लिं. ष. वि. ए. व. of स्वाध्याय- self-study, reading- (स्व- अध्याय)- स्व- ones own, self, अध्यायः – study, reading- स्वस्य अध्यायः – ष. तत्पुरुष स. & विरोधिन्- पु/न. लिं- adjctv- opposed to resisting, inconsistent with, सर्वान् & अर्थान्- पु. लिं. प्र. वि. ब. व. of सर्व- all, entire & अर्थ- a thing of interest or value or cause

माणसाने नेहमी वादविवाद टाळावेत. कुणाच्या मर्माला कधीही स्पर्श करू नये. (कुणाला दुखवू नये.) स्वाध्यायाला विरोध होईल अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा. स्वतःच्या अभ्यासावर लक्ष द्यावे, उगाच वितंडवाद करण्यात वेळ वाया घालवू नये.

नरेंद्र गोळे
सर्वथा वाद टाळावे मर्मा हात न लावता । स्वाध्यायाला न सोयीचे, टाळावे सर्व ते स्वये ॥

७१२ २८-०८-२०२०
शरीरनिरपेक्षस्य दक्षस्य व्यवसायिनः।
बुद्धिप्रारब्धकार्यस्य नास्ति किञ्चन दुष्करम् ॥

शरीरनिरपेक्षस्य, दक्षस्य, व्यवसायिनः, बुद्धिप्रारब्धकार्यस्य न किञ्चन दुष्करम् अस्ति।

One who is bodily strong, alert, enterprising or industrious and one who commences his work with due application of his mind, nothing is difficult to achieve.
शरीरनिरपेक्षस्य, दक्षस्य, व्यवसायिनः,

बुद्धिप्रारब्धकार्यस्य- all in पु. लिं. ष. वि. ए. व. of शरीरनिरपेक्षः- one who is healthy or not having any bodily deficiency- शरीर-body, bodily strength निरपेक्ष- निर्- अव्यय- without, free of, devoid of, अपेक्षा- expectation, need, necessity (अप+ईक्ष् -१ ग. आ. प. to expect)- निर्गता अपेक्षा यस्मात् सः – निरपेक्षः one not having any expectation & यस्य शरीरम् निरपेक्षम् सः- शरीरनिरपेक्षः -both बहुव्रीही स., दक्ष- alert, attentive, व्यवसायिन्- one who is industrious, enterprising- (व्यवसाय- business, effort, exertion), बुद्धिप्रारब्धकार्य- one who does work applying his mind, wise worker- बुद्धि- स्त्री. लिं- intellect, comprehension, talent, प्रारब्ध- commenced, begun- क. भू. धा. वि. of प्रा+रभ् (रभ्- रभते -१ ग. आ. प. to begin)- कार्य- work- (also करणीय, कर्तव्य, कृत्य)- कर्मणि. वि. धा. सा. वि of कृ- करोति-कुरुते ८ ग. उ. प. to do- बुद्ध्या प्रारब्धम्- बुद्धिप्रारब्धम्- तृ. तत्पुरुष स.- यद् कार्यम् बुद्धिप्रारब्धम् तद्- बुद्धिप्रारब्धकार्यम्- बहुव्रीही स., किम्- what, which, किम्+ चन- किञ्चन- little, small- न किञ्चन- nothing, दुष्करम्- न. लि. प्र. वि. ए. व. of दुष्कर- one which is difficult to do or achieve- दुःखेन क्रियते इति- उपपद तत्पुरुष स., अस्ति- वर्त. तृ. पु. ए. व. of अस्- अस्ति २ ग. प. प. to be, to exist

धाडधाकट निरोगी शरीर असणारा, नेहमी सावध (दक्ष) असणारा, उद्योगी वृत्तीचा, आणि बुद्धी वापरून काम करणारा अशा माणसाला काहीही करणे कठीण नसते. तो कुठलेही काम हातात घेऊन ते तडीला लावू शकतो.

नरेंद्र गोळे
विना व्यंग देह ज्याचा, दक्ष जो व्यवसायिक । बुद्धीने करी जो कार्ये, त्यास काही न दुष्कर ॥

७१३ २९-०८-२०२०
सद्विद्या यदि का चिन्ता वराकोदरपूरणे।
शुकोप्यशनमाप्नोति रामरामेतिच ब्रुवन् ॥
पाठभेद: शुकोपि वृत्तिं लभते मधुरं भाषते यदि।

यदि सद्विद्या (अस्ति तदा) वराकोदरपूरणे का चिन्ता (भवति)। शुकः अपि च राम राम इति ब्रुवन् अशनम् आप्नोति। {शुकः अपि यदि मधुरम् भाषते, (सः) वृत्तिम् लभते}

If one has good education (knowledge or skill), what worry is there for filling the wretched stomach. Even a parrot gets its food by its ability to mutter the name of Ram repeatedly (Even a parrot gets what it wants, if it speaks sweetly)

यदि- अव्यय- if, incase, वराकोदरपूरणे- स. वि. ए. व. of वराकोदरपूरण- वराक- poor, petty, wretched, उदर- न. लि.- stomach, belly, पूरण- filling, accomplishing- (पूर्- पूर्यते ४ ग. आ. प. to fill)- वराकम् उदरम्- वराकोदरम्- समा. प्रादि तत्पुरुष स. & वराकोदरमस्य पूरणम्- वराकोदरपूरणम्- ष. तत्पुरुष स., सद्विद्या- good education, knowledge, skill- सत्- (सती- स्त्री. लिं.)- proper, good, essential, विद्या- knowledge, skill, education- सती विद्या- सद्विद्या- समा. प्रदि तत्पुरुष स., का (किम्)- what & चिन्ता- worry, anxiety- (चिन्त्- चिन्तयति-ते १० ग. उ. प. to think, consider)- all three in स्त्री. लि. प्र. वि.ए. व., शुकः – a parrot & ब्रुवन्- saying, speaking- वर्त. का. वा. धा. सा. वि. ब्रू- ब्रवीति(आह)- ब्रूते- २ ग. उ. प. to speak, say- both in पु. लि. प्र. वि.ए. व., अपि- अव्यय- even, also, and, च-and, राम- पु. लि. सं. वि.ए. व.- राम राम- repeatedly muttering name of Ram, इति- अव्यय- like, in this way, अशनम्- न. लिं. द्वि. वि. ए. व.- food, act of eating- (अश्-अश्नाति ९ ग. प. प. to eat), आप्नोति- वर्त. तृ. पु. ए. व. of आप्- आप्नोति- ५ ग. प. प. to get, obtain – (पाभे: मधुरम् & वृत्तिम्- both in न. लिं. द्वि. वि. ए. व. of मधुर- sweet pleasant & वृत्ति- request, entreaty, भाष्- भाषते- speaks & लभ्- लभते get, obtains- both १ ग. आ. प. वर्त. तृ. पु. ए. व.

विद्यावंताला पोटाची खळगी भरण्याची चिंता कशाला ? राम राम ( किंवा विठू विठू) असे गोड बोलणाऱ्या पोपटालासुद्धा खायला मिळते. ज्याने कोणतीही विद्या संपादन केली असेल तो आपले पोट सहज भरू शकेल.

नरेंद्र गोळे
विद्यावंतास का चिंता पोटाची पडावी कधी । नुसते गोड बोलून जगती लोक नांदती ॥

७१४ ३०-०८-२०२०
काकतालीयवत्प्राप्तं दृष्ट्वापि निधिमग्रतः।
न स्वयं दैवमादत्ते पुरुषार्थमपेक्षते ॥

काकतालीयवत् प्राप्तम् निधिम् अग्रतः दृष्ट्वा अपि, (तद् निधिम्) दैवम् स्वयम् न आदत्ते। (तद् प्राप्तुम्, दैवम्) पुरुषार्थम् अपेक्षते।

Like a proverbial coincidence of a crow’s flying from a tree and a palm (a ripe Tad fruit) of the tree falling on a man below, if one comes across a treasure, the destiny will not act to enable him to possess it, (the destiny) expects some human efforts (by the person)

काकतालीयवत्- like a proverbial coincidence of a crow’s flying off from a tree and a palm (a ripe Tad fruit) falling from it, प्राप्तम्, निधिम् & पुरुषार्थम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. of प्राप्त- obtained, encountered, got- क. भू. धा. वि. of प्र+ आप्- (आप्- आप्नोति ५ ग. प. प. to get), निधि- treasure, a storehouse & पुरुषार्थ- human effort or exertion- पुरुष- a man, person, अर्थ- effort or exertion- यद् पुरुषेण क्रियमाणम् अर्थम् तद्- बहुव्रीही स., दैवम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of -दैवम्- destiny, fate, luck, स्वयम्- अव्यय- itself or oneself, अग्रतः – adverb- in front of, before, दृष्ट्वा- after seeing, locating, encountering- पू. का. वा. त्वांत धा. सा. अव्यय of दृश्- पश्यति -१ ग. प. प. to see, अपि- अव्यय- even, also, न- no, not, आदत्ते- receives, possesses, takes hold of & अपेक्षते- expects, wants – वर्त. आ. प. तृ. पु. ए. व. of आ +दा (दा- ददाति- दत्ते ३ ग. उ. प. to give) & अप+ ईक्ष्- (ईक्ष्- ईक्षते १ ग. आ. प. to see, observe)

कावळा बसून फांदी मोडल्यासारखे योगायोगाने धन समोर पडलेले दिसले तरी ते नशीबाने स्वतःहून तुमचे होत नाही, त्यासाठी तुम्ही काम करण्याची अपेक्षा असते.

७१५ ३१-०८-२०२०
न लभन्ते विनोद्योगं जन्तवः संपदां पदम् ।
सुराः क्षीरोदविक्षोभमनुभूयामृतं पपुः ॥

जन्तवः विना उद्योगम्, संपदाम् पदम् न लभन्ते। सुराः क्षीरोदविक्षोभम् अनुभूय, अमृतम् पपुः।

Living beings do not get wealthy position (acquire riches) without making any effort (without being industrious). Gods had to experience (undergo) tremendous agitation of ocean of milk (during its churning), before they could drink the nectar of immortality.

जन्तवः & सुराः- पु. लिं. प्र. वि. ब. व. of जन्तुः- living being & सुरः – God, संपदाम्- स्त्री. लिं. ष. वि. ब. व. of संपद् – wealth, riches, पदम्, क्षीरोदविक्षोभम् & अमृतम्- पु/न. लिं. द्वि. वि. ए. व. of पद- position, place & क्षीरोदविक्षोभ- tremendous agitation of ocean of milk- क्षीरः/ क्षीरम्- milk, उदन्- न. लिं.- water, उदनः धीः -उदधिः, क्षीरस्य उदधिः इति – क्षीरोदः-उपपद तत्पुरुष स., क्षोभ- agitation, disturbance, shaking, वि- अव्यय- prefix implies: greatness, intensity- विक्षोभ- great agitation- क्षीरोदस्य विक्षोभम् -क्षीरोदविक्षोभम्- ष. तत्पुरुष स., & अमृत- nectar of immortality, विना- अव्यय- without, in the absence, उद्योगम्- effort, work, exertion, industry, न- no, not, लभन्ते- वर्त. तृ. पु. ब. व. of लभ्-लभते १ ग. आ. प. to get, अनुभूय- after experiencing, undergoing- पू. का. वा. ल्यबन्त धा. सा. अव्यय of अनु+भू- (भू- भवति १ ग. प. प. to exist, to be), पपुः- drank- परोक्षभूत तृ. पु. ब. व. of पा- पिबति- १ ग. प. प. to drink

उद्योग (प्रयत्न) केल्या शिवाय संपत्ती आणि उच्च पद कुणालाही मिळत नाही. देवांनी समुद्राचे प्रचंड मंथन केल्यानंतर त्याना अमृताचा लाभ झाला.

नरेंद्र गोळे
केल्याविना न उद्योग, मिळते संपदा कधी । देवांनी मंथले क्षीर, तेव्हा अमृत लाभले ॥

७१६ ०१-०९-२०२०
सर्वैरपि गुणैर्हीनो वीर्यवान्हि तरेद्रिपून्।
सर्वैरपि गुणैर्युक्तो निर्वीर्यः किं करिष्यति ॥
महाभारत. सभापर्व

सर्वैः गुणैः हीनः अपि, वीर्यवान् हि रिपून् तरेद् । सर्वैः गुणैः युक्तः, अपि निर्वीर्यः किम् करिष्यति?

Even if one is devoid of all virtues, but is a brave person, he alone will be able to win over his enemy. What could one do, if he has mastered all qualities, but is gutless? (not courageous/ impotent).

सर्वैः & गुणैः – पु/न. लिं. तृ. वि. ब. व. of सर्व- all, entire & गुण- quality, virtue, ability, हीनः युक्तः, निर्वीर्यः & वीर्यवान्- पु. लिं. प्र. वि. ए. व. of हीन- devoid of, wanting, deficient & युक्त- comprising of, provided with, having -both क. भू. धा. वि. of हा- जहाति २ ग. प. प. to leave, abandon & युज्- युनक्ति युंक्ते ७ ग. उ. प. to bestow, employ, endow with & निर्वीर्य- gutless impotent, not courageous- निर् – अव्यय- prefix indicate: absence, devoid of, वीर्य- valour, prowess, potency, strength, निर्गतम् वीर्यम् यस्मात् सः – निर्वीर्यः – बहुव्रीही स. & वीर्यवत्- one who is brave, strong, with prowess- वीर्य- valour, वत्- adjctv- affix to noun implies possession, likeness, अपि- अव्यय-even, also, and, हि- अव्यय- surely, indeed, alone, रिपून्- पु. लिं. द्वि. वि. ब. व. of रिपु- enemy, opponent, तरेत्- would over come- विध्यर्थ तृ. पु. ए. व. of तृ(दीर्घ)- तरति १. ग. प. प. to overcome, escape from, cross over, किम्- what, करिष्यति- द्वितीय भविष्य. तृ. पु. ए. व. of कृ- करोति- कुरुते ८ ग. उ. प. to do, make

एकाद्या माणसाकडे इतर कुठलेही गुण नसले तरी त्याच्या अंगात शौर्य असले तर तो शत्रूंवर विजय मिळवतो आणि एकादा सर्वगुणसंपन्न माणूस जर दुबळा किंवा घाबरटअसला तर तो काय करेल?

७१७ ०२-०९-२०२०
One of my members of BC group, a retired Sanskrit teacher from Kolhapur, sent me a Shloka from Mundakopanishad, a quote from which is adopted in our national emblem. She had certain doubts in grammar. I discussed it with her. I have chosen that Shloka as my today’s homework, to the best of my understanding.

उपनिषदामधून संस्कृत शिकूया
सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाssक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्‌ ॥
मुण्डकोपनिषद् ३.१.६

सत्यम् एव जयते अनृतम् न (जयते), देवयानः पन्थाः सत्येन विततः, येन आप्तकामाः ऋषयः आक्रमन्ति हि, यत्र सत्यस्य तत् परमम् निधानम् (अस्ति)।

The Truth alone conquers and not the falsehood. The path of the journey of the gods which was stretched out by Truth, by which the sages, who have renounced all worldly desires and attachments, ascend, where that Truth has its supreme abode.

सत्यम् & अनृतम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of सत्य- Truth & अनृत- falsehood, deception, fraud- ऋतम्- Truth, अन्+ ऋतम्- अनृतम्- falsehood- नञ्तत्पुरुष स., सत्येन- by Truth & सत्यस्य- of Truth- तृ. वि. ए. व. & ष. वि. ए. व. of सत्य, एव- अव्यय- alone, only, जयते- वर्त. आ. प. तृ. पु. ए. व. of जि- to conquer, defeat, vanquish- (जि- जयति १ ग.- normally- प. प. with उपसर्ग such as वि + जि or परा +जि- आ. प.), देवयानः पन्थाः विततः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of देवयान- one which is travelled by God- देवाः येन पथा यान्ति सः- देवयानः -बहुव्रीही स., पथिन्- पु. लिं- road, way- (पन्थाः पन्थानौ पन्थानः), वितत- stretched, extended, spread out- क. भू. धा. वि. of वि+ तन्- (तन्- तनोति- तनुते ८ ग. उ. प. to stretch, spread, extend), येन- by which- तृ. वि. ए. व. of यद्- what, which, आप्तकामाः & ऋषयः- पु. लिं. प्र. वि. ब. व. of आप्तकाम- one who has renounced all worldly desires, Supreme soul- आप्त- attained, gained, achieved, काम- desire- आप्तम् कामम् येन सः – आप्तकामाः- बहुव्रीही स. & ऋषि- sage, ascetic, आक्रमन्ति- approach, conquer, vanquish- वर्त. तृ. पु. ब. व. of आ+ क्रम्- (क्रम्- क्रामति- क्रमते १ ग. उ. प. & क्राम्यति ४ ग. प. प. to go, walk), हि-अव्यय- indeed, surely, यत्र- अव्यय- where, तत्, परमम् & निधानम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of तद्- that, it, परमम्- supreme, ultimate & निधानम्- abode, destination

फक्त सत्याचाच विजय होतो, खोट्याचा होत नाही. सत्याने आखलेला जो मार्ग देवांनी अनुसरला आहे, त्यावरून सर्वसंगपरित्याग केलेले ऋषी परम सत्याच्या ध्येयाच्या (मोक्षाच्या) दिशेने पुढे जात आहेत.

७१८ ०३-०९-२०२०
अहस्तानि सहस्तानामपदानि चतुष्पदाम् ।
फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम् ॥
भागवत- स्कंध. १.१३.४६

अहस्तानि सहस्तानाम् (जीवनम् अस्ति), चतुष्पदाम् अपदानि (जीवनम् अस्ति), फल्गूनि महताम् (जीवनम् अस्ति), तत्र जीवः जीवस्य जीवनम् (अस्ति)।
(जीवनम् = भक्ष्यम् = life = article of food)

Living-beings, not having hands, are (natural) food for sustaining living-beings that are having hands, those without legs are food for four-legged living-beings and weak or feeble ones are food for living-beings who are strong and mighty. Like wise, one living-being is food of the other living-being.
अहस्तानि, अपदानि & फल्गूनि- न. लिं. प्र. वि. ब. व. of अहस्तम्- one which is without hands- हस्त- hand- न हस्त – अहस्त- नञ्तत्पुरुष स.- हस्तेन विना यद् तद् – अहस्तम्- बहुव्रीही स., likewise- अपदम्- one which is without leg- पदम्- foot, leg & फल्गु- weak or feeble one, सहस्तानाम्, चतुष्पदाम् & महताम्- पु/न. लिं. ष. वि. ब. व. of सहस्त- one which is with hands- हस्तेन/ हस्ताभ्याम् सहितम् यद् तद्- बहुव्रीही स., चतुष्पद- one which is four-legged-चत्वारि पदानि यस्य तद्- बहुव्रीही स., & महत्- great, mighty, strong, तत्र- अव्यय- there, in that manner, जीवः & जीवस्य- पु. लिं. प्र वि.& ष. वि. ए. व. of जीव- life, living being, जीवनम्- न. लिं. प्र. वि. ब. व. of जीवन existence, vital energy, life

हात असलेले (माणसे) हात नसलेल्यांवर, चार पाय असलेले (पशू) पाय नसलेल्यांवर (वनस्पतींवर), सशक्त अशक्तांवर असे सर्व जीव दुसऱ्या जीवांवर जीवंत राहतात.

७१९ ०४-०९-२०२०
अहिंसायां तु निरता यतयो द्विजसत्तम।
कुर्वन्त्येव हि हिंसां ते यत्नादल्पतरा भवेत् ॥
महाभारत. वनपर्व अ.२१२
(Said by धर्मव्याध to a ब्राह्मण)

द्विजसत्तम, यतयः अहिंसायाम् निरताः (अपि), ते हिंसाम् हि कुर्वन्ति एव। (तद्) यत्नात् तु अल्पतरा भवेत्।

Oh Great Brahmin, though, Sages (Ascetics) are devoted to nonviolence, they also commit acts of violence. With conscious efforts it would however be, of smaller nature.

द्विजसत्तम- noblest Brahmin- पु. लिं. सं. वि. ए. व. – द्विज- twice born (जन्मना जायते शूद्रः संस्कारैर्द्विज उच्यते- a brahmin- सत्तम- (सत्+ तमः)- virtuest, the best- द्विजेषु सत्तमः -द्विजसत्तमः – स. तत्पुरुष स., यतयः, निरताः & ते – all in पु. लिं. प्र. वि. ब. व. of यति- sage, ascetic, निरत- devoted, engaged, attached- क. भू. धा. वि. of नि+ रम्- (रम्- रमते १ ग. आ. प. to be pleased, to rejoice, sport) & तद्- he, अहिंसायाम्- स्त्री. लिं. स. वि. ए. व. of – अहिंसा- nonviolence- हिंसा- violence- न हिंसा- अहिंसा- नञ्तत्पुरुष स., तु- अव्यय- but, however, on the other hand, हिंसाम्- स्त्री. लिं. द्वि. वि. ए. व. of हिंसा, हि- अव्यय- indeed, surely, कुर्वन्ति- वर्त. तृ. पु. ब. व. of -कृ- करोति- कुरुते ८ ग. उ. प. to do, make, एव- अव्यय- just, only, यत्नात्- पं. वि. ए. व. of यत्न- effort, attempt, exertion, अल्पतरा- स्त्री. लिं. द्वि. वि. ए. व. of अल्पतर- smaller in nature, of lesser order- अल्प- small, less, तर- the suffix used for comparative degree, भवेत्- would happen to be- विध्यर्थ तृ. वि. ए. व. of भू-भवति १ ग. प. प. to be, to exist

हे महान ब्राह्मणा, ऋषीमुनी जरी अहिंसेचे पुजारी असले तरीसुद्धा ते हिंसा करतच असतात, मात्र ती (हिंसा) कमी करण्याचे प्रयत्न ते करतात.

नरेंद्र गोळे
द्विजश्रेष्ठा, अहिंसेला ब्राम्हण श्रेष्ठ मानती । करती तेहि हिंसा, जी प्रयत्ने अल्प राखती ॥

७२० ०५-०९-२०२०
उपार्जितानामर्थानां त्याग एव हि रक्षणं ।
तडागोदरसंस्थानां परीवाह इवाम्भसाम् ॥

तडागोदरसंस्थानाम् अम्भसाम् परीवाहः इव, उपार्जितानाम् अर्थानाम् त्यागः एव हि रक्षणम् ((भवति)।

Like the best way to preserve the quality of water in a pool is to keep it regularly overflowing, the best way to preserve the wealth earned is its proper utilisation (for the welfare of the society)

तडागोदरसंस्थानाम्, अम्भसाम्, उपार्जितानाम् & अर्थानाम्- all in न. लिं. ष. वि. ब. व. of तडागोदरसंस्थम्- collected in catchment area of a pool, tank- तडाग- a pool, tank, उदर- cavity, inside of anything, belly, संस्थम्- adjctv- staying, existing, stationary- (स्था- तिष्ठति १ ग. प. प. to stay) तडागस्य उदरम्- तडागोदरम्- ष तत्पुरुष स., तडागोदरे संस्थम्- तडागोदरसंस्थम्- स. तत्पुरुष स., अम्भस्- water, उपार्जित- earned, acquired, gained- क. भू. धा. वि. of उप+ अर्ज्- (अर्ज्- अर्जति १ ग. प. प. to procure, earn), अर्थ- wealth, riches, money, परीवाहः (परिवाहः)- natural overflow & त्यागः- giving up, to let go- both- पु. लिं. प्र. वि. ए. व., इव- अव्यय- like, in a same way as, एव- अव्यय- only, just, alone, हि- अव्यय- surely, indeed, रक्षणम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of रक्षण- preservation, protection, look after

ज्याप्रमाणे तलाव भरून त्यातले पाणी थोडे वाहून जाण्यामुळे ते पाणी शुद्ध राहते त्याप्रमाणे माणसाने मिळवलेल्या द्रव्याचे दान करत राहिल्याने ते सुरक्षित राहते.

नरेंद्र गोळे
पाणी शुद्ध रहाण्याला, तळ्याचे वाहणे बरे । तसे अर्जित पैशाला, अल्पांशे दान ते बरे ॥

७२१ ०६-०९-२०२०
गौरवं प्राप्यते दानात् न तु वित्तस्य सञ्चयात् ।
स्थितिरुच्चैः पयोदानां पयोधीनामधःस्थितिः॥

(जनैः) दानात् गौरवम् प्राप्यते, न वित्तस्य सञ्चयात् (गौरवम् प्राप्यते)। पयोदानाम् स्थितिः उच्चैः (भवति तथा), पयोधीनाम् स्थितिः अधः (भवति)।

One is able to get respect by his action of philanthropy (by helping the needy with his wealth) and not by accumulation of the wealth. Position of water-giving clouds his high (above the sky and it is of value to people), but the position of water-rich oceans is below (on earth and it is of no value for people).

दानात् & सञ्चयात्- पं. वि. ए. व. of दान- donation, charity, granting & सञ्चय- collection, accumulation- (सं+ चि- चिनोति- चिनुते ५ ग. उ. प. to collect), गौरवम्- द्वि. वि. ए. व. of गौरव- honour, respect, fame, प्राप्यते- able to get, attain- कर्मणि प्रयोग तृ. वि. ए. व. of प्र+ आप्- (आप्- आप्नोति ५ ग. प. प. to get), न- no, not, वित्तस्य- ष. वि. ए. व. of वित्त- wealth, money, property, पयोदानाम् & पयोधीनाम्- both in पु. लि. ष. वि. ब. व. of पयोदः cloud- पयस्- न. लिं.- water- पयः ददाति इति -पयोदः- उपपद तत्पुरुष स. & पयोधिः – ocean, sea- पयसाम् धीः – ष. तत्पुरुष स., स्थितिः -स्त्री. लि. प्र. वि. ए. ए. व. – position, status, staying, standing- (स्था- तिष्ठति- १ ग. प. प. to stand, stay), उच्चैः- at top, high place, above & अधः (अधस्)- below, at lower region- both अव्यय

दान करण्यामुळे गौरव प्राप्त होतो, पैशांचा संचय करण्यामुळे नाही. पाणी देणारे ढग ऊंच आभाळात असतात, तर पाण्याचा साठा करणारा समुद्र खाली असतो.


७२२ ०७-०९-२०२०
ग्रासोद्गलितसिक्थेन का हानिः करिणो भवेत्‌ ।
पिपीलिका तु तेनैव सकुटुम्बोपजीवति ॥

करिणः ग्रासोद्गलितसिक्थेन (तस्य करिणस्य) का हानिः भवेत्‌? तेन एव तु (ग्रासोद्गलितसिक्थेन), पिपीलिका सकुटुम्बा उपजीवति।

For an elephant, what is the big loss, if something from the ball of cooked rice spills out, while putting it in the mouth (by its trunk), but an ant, along with its entire family, feeds itself on that.

करिणः – पु. लि. ष. वि. ए. व. of करिन्- an elephant, ग्रासोद्गलितसिक्थेन- पु. लि. तृ. वि. ए. व. of ग्रासोद्गलितसिक्थः – spilling from a ball of cooked rice- ग्रासः -पु. लि.- food, mouthful, उद्गलित- spilt, dropped off – क. भू. धा. वि. of उद्+गल्- (गल्- गलति- १ ग. प. प. to drop, trickle, spill)- सिक्थः- पु. लि.- ball of cooked rice, का, हानिः पिपीलिका & सकुटुम्बा – स्त्री. लिं. प्र. वि. ए. व. of किम्- what, हानि- loss, damage, detriment, पिपीलिका- an ant & सकुटुम्बा- with whole family- या कुटुम्बेन सह सा or कुटुम्बेन सहिता सा- सकुटुम्बा- सहबहुव्रीही स., भवेत्‌- would occur- विध्यर्थ तृ. पु. ए. व. of भू-भवति १ ग. प. प. to be, to exist, तेन- by that- पु/न. तृ. वि. ए. व. of तद्- that, it, एव- only, just, alone & तु- but, on the other hand – both अव्यय, उपजीवति- वर्त. तृ. पु. ए. व. of उप +जीव् – (जीव्- जीवति १ ग. प. प. to live, to be alive, survive)

हत्तीने भाताचा गोळा तोंडात टाकत असतांना तो फुटून त्यातले काही कण खाली पडले तरी त्याला काय फरक पडतो ? पण एकाद्या मुंगीचे मात्र त्यावर सहकुटुंब जेवण होईल.


७२३ ०८-०९-२०२०
जातस्‍य नदीतीरे तस्‍यापि तृणस्‍य जन्‍मसाफल्‍यम् ।
यत्सलिलमज्‍जनाकुलजनहस्‍तावलम्बनं भवति ॥

नदीतीरे जातस्‍य तृणस्‍य तस्‍य अपि जन्‍मसाफल्‍यम् (भवति)। यद् सलिल-मज्‍जन-आकुल-जन-हस्‍त-अवलम्बनम् भवति।

The grass that has grown on the banks of a river also finds usefulness of its life at times, as it could be of help to a person in distress while getting drowned in the water.

नदीतीरे-न. लिं. स. वि. ए. व. of नदीतीर- नदी- स्त्री. लिं- river, तीर- न. लिं- bank, shore, नद्याः तीरम्- ष. तत्पुरुष स., जातस्‍य तृणस्‍य & तस्‍य-all in ष. वि. ए. व. of जात- पु/न. लिं.- born, produced, grown- क. भू. धा. वि. of जन्- जायते ४ ग. आ. प. to be born, produced, तृण- न. लिं.- grass & तद्- पु/न. लिं.- he, it, अपि- अव्यय- even, also, and, जन्‍मसाफल्‍यम्- fulfillment of the lifetime- जन्‍मन्- न. लिं.- birth, creation, साफल्‍यम्- fulfillment, usefulness- जन्‍मस्य साफल्‍यम्- ष. तत्पुरुष स., यद्- अव्यय- (used as direct or subordinate assertion or in the sense of because, since)- as, since सलिलमज्‍जनाकुलजनहस्‍तावलम्बनम्- a support for the hands of a person in distress while drowning in water- सलिल- न. लिं.- water, मज्‍जन- न. लिं- drowning, sinking- (मस्ज्- मज्‍जति ६ ग. प. प. to plunge, sink, bathe, dip), आकुल- adjctv- afflicted, affected, agitated, जन- a person, man, हस्‍त- hand, अवलम्बनम्- help, assistance, support- (अव+ लम्ब्- (लम्ब्- लम्बते १ ग. आ. प. to hang, stick to)- सलिले मज्‍जनम्- सलिलमज्‍जनम्- ष. तत्पुरुष स.- सलिलमज्‍जनात् आकुलम्- सलिलमज्‍जनाकुलम्- पं. तत्पुरुष स., सलिलमज्‍जनाकुलम् जनम्- सलिलमज्‍जनाकुलजनम्- समा. प्रादि तत्पुरुष स.- सलिलमज्‍जनाकुलजनस्य हस्तौ- सलिलमज्‍जनाकुलजनहस्तौ- सलिलमज्‍जनाकुलजनहस्तयोः अवलम्बनम्- सलिलमज्‍जनाकुलजनहस्‍तावलम्बनम्- both ष. तत्पुरुष स., भवति- वर्त. तृ. पु. ए. व. of भू – भवति १ ग. प. प. to be, to exist)

जेंव्हा एकादा नदीत बुडत असलेला माणूस नदीकिनारी उगवलेल्या गवताचा आधार घेतो (आणि वाचतो) तेंव्हा त्या गवताच्या जन्माचे सार्थक होते.


७२४ ०९-०९-२०२०
दाता न दापयति, दापयिता न दत्ते यो दानदापनपरो मधुरं न वक्ति।
दाता च दापनपरो मधुरं च वक्ता एतत्त्रयं जगति पुण्यकृतो लभन्ते ॥

दाता न दापयति, दापयिता न दत्ते, यः दानदापनपरः मधुरं न वक्ति। जगति दाता च दापनपरः च मधुरम् वक्ता (च) एतत् त्रयम् पुण्यकृतः लभन्ते।

A donor does not make other to give donation (he gives himself), the one who makes others to donation, does not donates himself, the one who is busy in making donation and also makes others to do donations, does not speak politely. In this world, only fortunate people get this triad, of one who is a donor, who also makes others to give donation and who also speaks politely (in single person)

दाता, दापयिता, यः, दानदापनपरः, दापनपरः, वक्ता & पुण्यकृतः – all in -पु. लिं. प्र. वि. ए. व. दातृ- a donor, giver, दापयितृ- one who makes others to do donations, यद्- who, दानदापनपर- one who is busy in making donation and also makes others to do donations- दान- न. लिं.- donation, दापन- causing to do donation, पर- solely devoted to, wholly engaged, दानम् च दापनम् च- दानदापनम्- द्वंद्व स.- दानदापने परः- दानदापनपरः- स. तत्पुरुष स., दापनपर- busy in making others to do donations- दापने परः-स. तत्पुरुष स., वक्तृ- speaker, talker & पुण्यकृत- fortunate person- पुण्य- meritorious deed, virtue, कृत- one who has done- क. भू. धा. वि. of कृ- करोति- कुरुते ८ ग. उ. प. to do- येन पुण्यम् कृतम् सः – पुण्यकृतः – बहुव्रीही स., दापयति- causes to give grant, donation- प्रायोजक वर्त. तृ. पु. ए. व. of दा- ददाति-दत्ते ३ ग. उ. प. to give, दत्ते- gives, donates- वर्त. आ. प. तृ. पु. ए. व. of दा- to give, मधुरम्- pleasant, sweet, एतद्- this, it & त्रयम् – triad, a combination of three- all in न. लिं. प्र. वि. ए. व., न- no, not, वक्ति- वर्त. तृ. पु. ए. व. of वच्- २ ग. प. प. to speak, talk, जगति- न. लिं. स. वि. ए. व. of जगत्- world, लभन्ते- वर्त. तृ. पु. ब. व. of लभ्- लभते- to get, acquire

जो स्वतः दान करतो तो दुसऱ्याकडून दान करवून घेत नाही, जो दुसऱ्यांकडून दान करवून घेतो स्वतः दान करत नाही. जो दान करतो आणि करवूनही घेतो तो गोड बोलत नाही. दान करणारा, दान करवून घेणारा आणि गोड बोलणारा असे तीनही गुण असणारा माणूस या जगात फक्त पुण्यवान लोकांनाच भेटतो.


७२५ १०-०९-२०२०
दानान्न दुष्करं तात पृथिव्यामस्ति किंचन।
अर्थे च महती तृष्णा स च दुःखेन लभ्यते ॥
-महाभारत. ३. २६०. २८

तात, दानात् दुष्करम् पृथिव्याम् न किंचन अस्ति । (जनानाम्) अर्थे महती तृष्णा च (वर्तते)। सः (अर्थः) च दुःखेन लभ्यते।
(महर्षी व्यासेन युधिष्ठिराय प्रोक्तम्)

My Son, there is nothing more difficult than giving away things in charity. The greed to possess things is really great and that ( the possession) is acquired with great difficulties.

तात- a term of affection, endearment, father- पु. लि. सं. वि. ए. व., दानात्- न. लि. पं. वि. ए. व. of दान- charity giving, donation, दुष्करम्- न. लि. प्र. वि. ए. व. of- दुष्कर- difficult to do, achieve- दुःखेन क्रियते इति- उपपद तत्पुरुष स., पृथिव्याम्- स्त्री. लि. स. वि. ए. व. of- पृथुवी /पृथ्वी- world, earth, न- no, not, किंचन- (किम् + चन)- something, little bit, न किंचन- nothing, none, अस्ति- वर्त. तृ. वि. ए. व. of अस्- २ ग. प. प. to be, to exist, अर्थे- पु/न. लि. स. वि. ए. व. of- अर्थ -wealth, property, material possession, महती & तृष्णा- स्त्री. लि. प्र. वि. ए. व. of- महत्- great, huge, strong & तृष्णा- hunger, thirst, desire, greed, च- and, सः -पु. लि. प्र. वि. ए. व. of- तद्- that, he, दुःखेन- न. लि. तृ. वि. ए. व. of- दुःख- pain, trouble, exertion, लभ्यते- कर्मणि प्रयोग वर्त. तृ. वि. ए. व. of- लभ्- लभते १ ग. आ. प. to get, obtain

अरे बाबा, दान करण्याइतके या जगात काहीही कठीण नसते, लोकांना संपत्तीची खूप तहान असते आणि ती कष्टानेच मिळते. त्यामुळे ती सोडायला कुणीही तयार नसतो.

७२६ ११-०९-२०२०
धर्मार्थकाममोक्षाणामारोग्यं साधनं यतः।
तस्मादारोग्यदानेन तद्दात्तं स्यात्चतुष्टयम् ॥

यतः धर्मार्थकाममोक्षाणाम् आरोग्यम् साधनम्, तस्मात् आरोग्यदानेन, तद् दत्तम् चतुष्टयम् स्यात्।

(This one in praise of our medical services)
Since good health is conductive to adhere to good codes of conduct ( to be religious), to earn wealth, to get desires fulfilled and finally achieve salvation, for that reason by providing good health services to any one, the merit of that service would be fourfold effective.

(धर्म, अर्थ, काम & मोक्ष are together called पुरुषार्थ- a goal every human strives to achieve)
यतः (यतस्)- आव्यय- since, as, so that, धर्मार्थकाममोक्षाणाम्- पु/न. लिं. ष. वि. ब. व. of धर्मार्थकाममोक्ष- धर्म- good codes of conduct, religion, अर्थ- wealth, goal, काम- desire, sensual enjoyment, मोक्ष- salvation – धर्मम् च अर्थम् च कामम् च मोक्षम् च- धर्मार्थकाममोक्षम्- द्वंद्व स., आरोग्यम्- good health, physical fitness, तस्मात्- from that, due to that- पं. वि. ए. व. of तद्- that, it, आरोग्यदानेन- न. लिं. तृ. वि. ए. व. of आरोग्यदान- gift of a good health, दान- grant, donation, आरोग्यस्य दानम्- ष. तत्पुरुष स., साधनम्, तद्, दत्तम् & चतुष्टयम्- all in न. लिं. प्र. वि. ए. व. of साधन- – means, the instrumental case, complete attainment of an object, तद्- that, it, दत्त- a thing that is given, made over, delivered- क. भू. धा. वि. of दा- ददाति- दत्ते ३ ग. उ. प. to give, grant & चतुष्टय- fourfold, group consisting of four, स्यात्- would become, would be- विध्यर्थ तृ. पु. ए. व. of अस्- अस्ति २ ग. प. प. to be

आरोग्य हेच माणसाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ मिळवण्याचे साधन आहे, त्यामुळे आरोग्याचे दान करण्यामुळे हे चारही दिले जाते. वैद्याला हे सर्व दान केल्याचे पुण्य मिळते.

नरेंद्र गोळे
धर्मार्थकाममोक्षादी, आरोग्यानेच साधती । जना आरोग्य जे देती, वैद्य ते, पुण्य अर्जती ॥

७२७ १२-०९-२०२०
यच्छन् जलमपि जलदो वल्लभतामेति सकललोकस्य ।
नित्यं प्रसारितकरो मित्रोऽपि न वीक्षितुं शक्यः ॥

पंचतंत्र

जलदः जलम् यच्छन् अपि सकललोकस्य वल्लभताम् एति। मित्रः नित्यम् प्रसारितकरः अपि वीक्षितुम् शक्यः न (भवति)

The cloud giving just the water becomes darling of the entire world. But the Sun (a friend), with his spread out rays (extended arms), going around the world everyday is not possible even to look at.
Here we have double meaning (श्लेष) for words प्रसारितकरः & मित्रः
1) मित्रः -a friend with his extended hands (for friendship)
2) मित्रः- the Sun with his blazing rays (sustaining all living being)

जलदः, यच्छन्, मित्रः, प्रसारितकरः & शक्यः – all पु. लिं. प्र. वि. ए. व. of जलद- cloud- जलम् ददाति इति- उपपद तत्पुरुष स., यच्छन्- giver giving- वर्त. का. वा. धा. सा. वि. of दा- यच्छति १ ग. प. प. to give, grant, मित्र- the Sun, a friend, प्रसारितकरः – one with extended arms- प्रसारित- spread out, extended- प्रायोजक क. भू. धा. वि. of प्र + सृ- (सृ- सरति १ ग. प. प. to go move), कर- hand, ray- प्रसारितौ करौ यस्य सः -बहुव्रीही स. & शक्य- possible, able- (also शकनीय & शकितव्य) कर्मणि वि. धा. सा. वि. of शक्- शक्नोति ५ ग. प. प. to be able, जलम्- न. लिं. द्वि. वि. ए. व. of जल- water, अपि- अव्यय- even, also, सकललोकस्य- ष. वि. ए. व. of सकललोक- entire world- सकल- adjctv- entire, whole, लोक- पु/न. लिं.- world- सकलम् लोकम् -समा. प्रादि तत्पुरुष स., वल्लभताम्- स्त्री. लिं. द्वि. वि. ए. व. of वल्लभता- love, liking- वल्लभ- adjctv- beloved, desired, एति- वर्त. तृ. पु. ए. व. of इ- २ ग. प. प. to go, attain to, get, नित्यम्- अव्यय- daily, always, constantly, वीक्षितुम्- पू. का. वा. हेत्वार्थ तुमन्त धा. सा. अव्यय of वि+ ईक्ष्- (ईक्ष्- ईक्षते- १ ग. आ. प. to see, behold), न- no, not

फक्त पाणीच देणारा ढग सगळ्या जागाचा लाडका असतो, पण रोज हात पसरणाऱ्या मित्राकडे (किरणांमधून प्रकाश देणाऱ्या सूर्याकडे) पहाणेही शक्य नसते.

केवळ देत जो पाणी जगाला आवडे ढग । सर्वदा मित्र जो सूर्य जगास पाहता न ये ॥

७२८ १३-०९-२०२०
यो नात्मजे न च गुरौ न च भृत्यवर्गे
दीने दयां न कुरुते न च बन्धु-वर्गे।
किं तस्य जीवितफलं मनुष्यलोके
काकोऽपि जीवति चिराय बलिं च भुङ्क्ते॥
हितोपदेश- सुहृद्भेद- ४४

मनुष्यलोके यः न आत्मजे, न च गुरौ, न च भृत्यवर्गे, न च बन्धुवर्गे दीने (च), दयाम् न कुरुते, तस्य जीवितफलम् किम् ? काकः अपि बलिम् भुङ्क्ते, चिराय जीवति च।

In this world, one who is not compassionate towards his child, teacher (elder), servants, relatives (friends) and to the people who are afflicted or poor, what is the use of his longevity? Even a crow lives a long life, partaking food offered to it (in the name of their departed elders, before it is consumed by a householder)

मनुष्यलोके, आत्मजे, गुरौ, भृत्यवर्गे, बन्धुवर्गे & दीने- all in- पु/न. लिं. स. वि. ए. व. of मनुष्यलोक- in the mortal world- मनुष्य- human, man, लोक- world- मनुष्याणाम् लोकम् -ष. तत्पुरुष स., आत्मज- child, progeny- आत्मनः जातः इति- उपपद तत्पुरुष स., गुरु- teacher, elder, भृत्यवर्ग- servant class- भृत्य- servant, dependent- (भर्तव्य, भरणीय & भार्य)- कर्मणि वि. धा. सा. वि. of भृ- भरति-ते & बिभर्ति- बिभृते १ & ३ ग. उ. प. to support, maintain, fill & वर्ग- class, group- भृत्याणाम् वर्गः ष. तत्पुरुष स., बन्धुवर्ग- relatives, friends- बन्धुनाम् वर्गः -both ष. तत्पुरुष स. & दीन- afflicted, poor, यः & काकः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of यद्- who & काक- a crow, न-no, not, च- and, दयाम्- स्त्री. लिं. द्वि. वि. ए. व. of दया- compassion, mercy, कुरुते, भुङ्क्ते & जीवति- वर्त. तृ. पु. ए. व. of कृ- करोति-कुरुते ८ ग. उ. प. to do, make & भुज्- भुनक्ति- भुङ्क्ते- ७ ग. उ. प. to eat, consume, devour & जीव्- जीवति- १ ग. प. प. to live, be alive,, तस्य- his- पु. लिं. ष. वि. ए. व. of तद्- he, जीवितफलम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of जीवितफल- purpose of life, use of life- जीवित- living, being alive – क. भू. धा. वि. of जीव्- जीवति- १ ग. प. प. to live, be alive, फल- purpose, result, fruit- जीवितस्य फलम्- ष. तत्पुरुष स., किम्- अव्यय- a particle of interrogation- why, what then, अपि- अव्यय- even, also, बलिम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. of बलि- food offered (in the name of departed elders, before it is consumed by a householder), चिराय- न. लि. च. वि. ए. व. of चिर- a long time, च- and

जो माणूस आपला मुलगा, वडीलधारे लोक, नोकरचाकर, नातेवाईक, मित्र आणि दीनदुबळे यांच्यावर दया दाखवत नाही अशा माणसाच्या दीर्घायुष्याचा काय उपयोग आहे? कावळासुद्धा पिंडाचे घास खाऊन खूप काळ जगतो.

७२९ १४-०९-२०२०
वितर वारिद वारि दवातुरे
चिरपिपासितचातकपोतके।
प्रचलिते मरुति क्षणमन्यथा
क्व च भवान्क्व पयः क्व च चातकः ॥

वारिद, दवातुरे चिरपिपासितचातकपोतके वारि वितर। अन्यथा क्षणम् मरुति प्रचलिते, क्व च भवान्? क्व पयः? क्व च चातकः?

Oh Cloud, give away water to young ones of Chataka- bird, who are scorched by forest-fire and are thirsty for a long time. Otherwise, in a moment when the wind starts blowing, where will be yourself, where will be your water and where will be the Chataka?

वारिद- पु. लिं. सं. वि. ए. व. -cloud- वार्- न. लिं- water- वारि ददाति इति -वारिदः उपपद तत्पुरुष स., दवातुरे, चिरपिपासितचातकपोतके, प्रचलिते & मरुति -all in पु. लिं. स. वि. ए. व. of दवातुर- दवः- forest, fire, fever, pain & also means forest fire, आतुर- suffering, injured, afflicted- दवेन आतुरः- तृ. तत्पुरुष स., चिरपिपासितचातकपोतक- ever thirsty young ones of Chataka bird- चिर-adjctv- for a long time, since long, पिपासित-thirsty- प्रायोजक क. भू. धा. वि. of पा- पापयति-ते- desiderative- पिपासति -wishes to drink- (पा- पिबति- १ ग. प. प. to drink)- चिरम् पिपासितम्- चिरपिपासितम्- समा. प्रादि तत्पुरुष स., चातक- name of a bird (believed to be surviving only by drinking raindrops directly), पोतक- young one of a bird or an animal, चातकस्य पोतकः – चातकपोतकः -ष. तत्पुरुष स. & चिरपिपासितः चातकपोतकः -चिरपिपासितचातकपोतकः – समा. प्रादि तत्पुरुष स., प्रचलित- blowing, shaking, moving- क. भू. धा. वि. of प्र+ चल्- (चल्- चलति १ ग. प. प. to go, move) & मरुत्- पु. लिं- wind, वारि- न. लिं. द्वि. वि. ए. व. of वार्- water, वितर- आज्ञार्थ द्वि. पु. ए. व. of वि+ तृ(दीर्घ)- to grant, give, confer, bestow on- {तृ(दीर्घ)- तरति १ ग. प. प. to cross over, swim, float} – अन्यथा- अव्यय- otherwise, in another way, क्षणम्- moment, instant, क्व- अव्यय- where, , whither, च- and भवान् & चातकः- पु. लिं. प्र. वि. ए. व.of भवत्- a respectful or honorific pronoun- you & चातक- see above, पयः- न. लिं. प्र. वि. ए. व.of पयस्- water

हे ढगा, रानामधील वणव्यामुळे पोळलेल्या चातक पक्ष्याच्या पिलांना कधीपासून लागलेली तहान भागवण्यासाठी लवकर पाण्याचा वर्षाव कर. नाहीतर क्षणभरात वारा सुटला तर तू कुठे असशील, तुझे पाणी कुठे असेल आणि तो चातक कुठे असेल ? शक्य असेल तेंव्हा चांगले काम लगेचच करावे असा संदेश या सुभाषितात दिला आहे.

नरेंद्र गोळे
बरस तू जल चातक पिल्लही
असत खूप तहानलि ह्या क्षणी ।
पवन नेइल वाहुन तो तुला मग कुठे अससी तु, कुठे पिले ॥

७३० १५-०९-२०२०
सहस्रशक्तिः च शतं शतशक्तिः दशापि च।
दद्यातापःच यः शक्त्या सर्वे तुल्यफलाः स्मृताः ॥
महाभारत अश्वमेध. अ-९०.९७

यः सहस्रशक्तिः (सः) च शतम् दद्यात्, (यः) शतशक्तिः (सः) दश अपि च (दद्यात्), (यः) शक्त्या आपः च दद्यात्, (ते) सर्वे तुल्यफलाः स्मृताः।

One who has capacity of thousand fold, shall at least give away hundred of it, one who has capacity of hundredfold shall give tenfold, (one who has nothing worthwhile to give) even if one offers water (to a needy) to the best of his ability, the meritorious virtue of all of them are considered on par (equal).

यः, सहस्रशक्तिः, शतशक्तिः -all in पु. लिं. प्र. वि. ए. व. of यद्- who, सहस्रशक्ति- capacity of thousand fold or times- सहस्रम्- thousand, शक्ति- स्त्री. लिं- power, capacity, ability- (शक्- शक्नोति- ५ ग. प. प. to be able)- सहस्रम् शक्तिः यस्य सः- सहस्रशक्तिः & शतशक्ति- capacity of hundredfold- शतम्- hundred- शतम् शक्तिः यस्य सः- शतशक्तिः- both बहुव्रीही स., च- and, शतम् & दश- both in- न. लिं. द्वि. वि. ए. व., दद्यात्- विध्यर्थ तृ. पु. ए. व. of दा-ददाति-दत्ते ३ ग. उ. प. to give, grant, अपि- अव्यय- also, even, शक्त्या- तृ. वि. ए. व. of- शक्ति- ability, power, आपः – न. लिं. प्र. वि. ए. व. of -आपस्- water, सर्वे, तुल्यफलाः & स्मृताः- पु. लिं. प्र. वि. ब. व. of सर्व- pronoun- all, entire, whole, तुल्यफल- equal in value- तुल्य- comparable, equal, same (also तुलनीय, तुलितव्य)- कर्मणि वि. धा. सा. वि. of तुल्- तोलति १ ग. प. प. & तोलयति- ते- to weigh, measure, फल- result, fruit value- तुल्यम् फलः यस्य सः -तुल्यफलः -बहुव्रीही स. or तुल्यः फलः -तुल्यफलः -समा. प्रादि. तत्पुरुष स. & स्मृत- considered, valued – क. भू. धा. वि. of स्मृ- स्मरति १ ग. प. प. to consider, remember, be aware of

ज्याच्याकडे हजाराची शक्ती असेल त्याने शंभर द्यावेत, शंभराची शक्ती असेल तर दहा द्यावेत, ज्याच्याकडे काहीच नसेल त्याने पाणी दिले तरी या सगळ्यांचे फळ सारखेच समजले जाते.

७३१ १६-०९-२०२०
जाया त्वर्धं शरीरस्य नृणां धर्मादिसाधने ।
नातस्तासु व्यथां काञ्चित्प्रतिकूलं समाचरेत् ॥
भविष्य पुराण १. ८. ३७

नृणाम् धर्मादिसाधने जाया तु शरीरस्य अर्धम् (भवति)। अतः तासु न काञ्चित् व्यथाम् प्रतिकूलम् तु समाचरेत्।

In achievement principal objects of human life beginning with Dharma etc., (namely धर्म, अर्थ, काम & मोक्ष) the wife forms the other half of the body of men (mankind). Therefore nothing hurting them or against them should be done.

(अर्धो वै एष आत्मनः यत् पत्नी- the wife is the other half of the body- अर्धांगी- तैत्तिरीय संहिता ६.१.८.५)
नृणाम्- पु. लिं. ष. वि. ब. व. of नृ- man, mankind, धर्मादिसाधने- न. लिं. स. वि. ए. व. of- धर्मादिसाधन- achievement of objects beginning with Dharma etc.- आदिः- beginning, commencement- often at the end of compound means- beginning with, etc., धर्मादि- objects beginning with Dharma- (namely धर्म, अर्थ, काम & मोक्ष together called पुरुषार्थ), साधन- means, an instrument, aid- धर्मादिनाम् साधनम्- धर्मादिसाधनम्- ष. तत्पुरुष स., जाया- wife- (word derived from- पतिर्भार्यां संप्रविश्य गर्भो भूत्वेह जायते। जायायास्तद्धि जायात्वं यदस्यां जायते पुनः।), तु- अव्यय- but, on the other hand, शरीरस्य- न. लिं. ष. वि. ए. व. of शरीर-body, अर्धम्- half, अतः (अतस्)- अव्यय- therefore, for that reason, तासु- to them- स्त्री. लिं. स. वि. ब. व. of तद्- she, काञ्चित्- स्त्री. लिं. of किम्+ चित्- something- न काञ्चित्- nothing, व्यथाम्- स्त्री. लिं. द्वि. वि. ए. व. of व्यथा- anxiety, agony, pain, hurt, प्रतिकूलम्- पु/न. लिं. द्वि. वि. ए. व. of प्रतिकूल- adjctv- unfavourable, hostile, contradictory, समाचरेत्- विध्यर्थ प. प. तृ. पु. ए. व. of समा +चर्- to practice, do, perform, behave towards – (चर्- चरति १ ग. प. प. to walk, move, go)

माणसाने धर्मादि (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष) साध्य करण्यात त्याची पत्नी त्याचे अर्धे अंग (अर्धांगिनी) असते. म्हणून त्यांना नवऱ्याने (तिला) किंचितही त्रास होईल असे तिच्या विरोधात वागू नये.


७३२ १७-०९-२०२०
तदा स वृद्धो भवति तदा भवति दुःखितः।
तदा शुन्यं जगत्तस्य यदा मात्रा वियुज्यते ॥
महाभारत. १२.२६६.३०, स्कन्दपु.६.१०२

यदा सः मात्रा वियुज्यते, तदा (सः) वृद्धः भवति, तदा (सः) दुःखितः भवति, तदा तस्य जगत् शुन्यम् (भवति)।

When one gets to loose his mother, he (suddenly) gets matured (old, grown up), he experiences grief (feels miserable), his world gets meaning less (empty)

यदा- when, at what instant & तदा- then, at that moment, -both अव्यय, सः, वृद्धः & दुःखितः -पु. लिं. प्र. वि. ए. व. of तद्- he, वृद्ध- matured, old, grown up- क. भू. धा. वि. of वृध्- वर्धते १ ग. आ. प. to grow, increase & दुःखित- distressed, afflicted, miserable, मात्रा- स्त्री. लिं. तृ. वि. ए. व. of मातृ- mother, वियुज्यते- gets separated- कर्मणि प्रयोग तृ. पु. ए. व. of वि+ युज्- to leave, abandon, separate- (युज्- युनक्ति-युंक्ते ७ ग. उ. प. to join, attach, add), भवति- वर्त. तृ. पु. ए. व. of भू-भवति १ ग. प. प. to be, to exist, तस्य- पु. लिं. ष. वि. ए. व. of तद्- he, जगत्- world & शुन्यम्- zero, empty, void, vacant- both न. लिं. प्र. वि. ए. व.,

जेंव्हा माणसाच्या आईचा वियोग होतो तेंव्हा तो एकदम प्रौढ होतो, दुःखी होतो आणि त्याला हे जग शून्यवत भासू लागते.

७३३ १८-०९-२०२०
नूनं हि ते कविवरा विपरीतवाचो
ये नित्यमाहुरबला इति कामिनीस्ताः ।
याभिः विलोलतरतारकदृष्टिपातैः
शक्रादयोऽपि विजितास्त्वबलाः कथं ताः॥
भर्तृहरि शृङ्गारशतक १०

ये कविवराः कामिनीः, ‘ताः अबलाः’ इति नित्यम् विपरीतवाचः नूनम् हि ते आहुः। याभिः विलोलतरतारकदृष्टिपातैः शक्रादयः अपि विजिताः ताः कथम् तु अबलाः (स्युः)?

Those great poets, who always assuredly make statements addressing loving ladies as weaker sex, they indeed make wrong statements. Those who, by the strength of their powerful charming eyes, have conquered even Indra and others (mightier ones), how can they be indeed considered weak.

ये, कविवराः, ते, शक्रादयः & विजिताः -all in पु. लिं. प्र. वि. ब. व. of यद्- who, कविवर- great among the poets- कवि- poet, वर- adjctv- best, excellent, finest- कवीनाम् वरः- ष. तत्पुरुष स., तद्- he, शक्रादि- person like Indra etc- (see सु-७८ above) & विजित- one who won, conquered- क. भू. धा. वि. of वि+ जि- (जि- जयति- १ ग. प. प. to win), ताः अबलाः & विपरीतवाचः- all in स्त्री. लिं. प्र. वि. ब. व. of तद्-she, अबला- weak or helpless woman- बला- strong woman- न बला- अबला- नञ्तत्पुरुष स., & विपरीतवाच्- wrong or contrary statement- विपरीत- adjctv- wrong, contrary, opposite- क. भू. धा. वि. of वि+ परि+ इ- (इ- एति २ ग. प. प. to go, to go to)- वाच्- talk, speech, word, कामिनीः- to lovely women- स्त्री. लिं. द्वि. वि. ब. व. of कामिनी- loving or lustful woman, इति- thus in this manner, नित्यम्- always, constantly, नूनम्- with certainty, assuredly, surely, हि- indeed, कथम्- how, in which way, तु- indeed, surely, अपि-even, also -all above are- अव्यय, आहुः (ब्रुवन्ति)- वर्त. प. प. तृ. पु. ब. व. of ब्रू- ब्रवीति-ब्रूते २ ग. उ. प. to say, talk, याभिः -by whom- स्त्री. लिं. तृ. वि. ब. व. of यद्- who, विलोलतरतारकदृष्टिपातैः- पु/न. लिं. तृ. वि. ब. व. of विलोलतरतारकदृष्टिपात- strength of powerful charming moving glance- विलोल- tossing, moving, tremulous, तर- suffix used for comparative degree- विलोलतर- superior moving, तारक- adjctv- catching, projecting, विलोलतरः तारकः -विलोलतरतारकः – समा. प्रादि. तत्पुरुष स., दृष्टि- स्त्री. लिं- seeing, sight, पात- cast, throw, attack, दृष्टेः पातम्- दृष्टिपातम्- casting of eye (glance)- ष. तत्पुरुष स., विलोलतरतारकम् दृष्टिपातम्- विलोलतरतारकदृष्टिपात- समा. प्रादि. तत्पुरुष स.

जे कविवर स्त्रीला नेहमी “तीअबला” असेच म्हणतात त्यांचे म्हणणे खरे तर चुकीचे आहे. ज्यांनी फक्त एका भिरभिरत्या मोहक कटाक्षाने इन्द्रादिकांना जिंकले आहे त्यांना अबला कसे म्हणावे ?

नरेंद्र गोळे
काही स्त्रियांस म्हणती अबला कवी जे
आहे खरे तर चुकी तसल्या कवींची ।
इंद्रादिका नजरभेट हरे जयांची
त्यांना कशास अबला कुणिही म्हणावे ॥ – वसंततिलका

७३४ १९-०९-२०२०
वृक्षमूलेऽपि दयिता यस्य तिष्ठति तद्गृहम्।
प्रासादोपि तया हीनः कान्तार इति निश्चितम् ॥
महाभारत. शान्तिपर्व. अ. १२. १४४

यस्य दयिता वृक्षमूले अपि (तस्य सह) तिष्ठति, तद् (तस्य) गृहम् (भवति)। तया (दयितया) हीनः प्रासादः अपि कान्तारः इति निश्चितम्।

One, who has his beloved wife with him, even under a tree, that becomes his home. Even a mansion without her (beloved wife) is certainly like a dreadful forest.

यस्य- whose- पु. लि. ष. वि. ए. व. of यद्- who, दयिता- beloved woman, wife- स्त्री. लि. प्र. वि. ए. व.- दयित- beloved, compassionate- क. भू. धा. वि. of दय्- दयते १ ग. आ. प. to love, feel compassionate or pity, वृक्षमूले- न. लि. स. वि. ए. व. of वृक्षमूल- root or base of a tree -वृक्ष- tree, मूल- root or base- वृक्षस्य मूलम्- ष तत्पुरुष स., अपि-अव्यय- even, also, तिष्ठति- वर्त. तृ. पु. ए. व. of स्था-१ ग. प. प. to stand, stay, remain, तद्- that & गृहम्- home, house- both- न. लि. प्र. वि. ए. व., तया- by her- स्त्री. लि. तृ. वि. ए. व. of तद्- she, हीनः- devoid of, without- क. भू. धा. वि. of हा-जहाति २ ग. प. प. to leave, abandon, प्रासादः- mansion, palace & कान्तारः dreaded forest- all in- पु. लि. प्र. वि. ए. व., इति- अव्यय- thus, as, निश्चितम्- अव्यय- decidedly, positively, certainly

ज्या माणसाची प्रिया (पत्नी) त्याच्या सोबत झाडाखाली जरी असेल तरी ते त्याचे घर होते आणि ती जर नसेल तर राजवाडासुद्धा निश्चितच अरण्यासारखा असतो. गृहिणीमुळे घर बनते.

नरेंद्र गोळे
पत्नी साथ असे त्याचे, झाडाखाली वसे घर । नसे ती साथ तयाचा, राजवाडा जणू वन ॥

७३५ २०-०९-२०२०
अप्रियाण्यपि कुर्वाणो यः प्रियः प्रिय एव सः।
दग्धमन्दिरसारेऽपि कस्य वह्नावनादरः ॥

यः प्रियः अप्रियाणि कुर्वाणः (स्यात् तथापि) अपि, सः प्रियः एव (भवति)। कस्य दग्धमन्दिरसारे अपि, वह्नौ अनादरः (भवति)।

One who is dear to a person, even if he does any hurtful deeds, he remains beloved to him. Which person, whose best (beautiful) house is even burnt down in fire, is indifferent to the fire.

यः (यद्)- who, प्रियः- beloved, one who is liked, सः (तद्)- he, कुर्वाणः- one who is doing- कुर्वत् (प. प.) & कुर्वाण ( आ. प). – doing- वर्त. का. वा. धा. सा. वि. of कृ- करोति- कुरुते ८ ग. उ. प. to do & अनादरः- disliking, disrespect, disdain- आदर- respect- अन्+ आदर- नञ्तत्पुरुष स.- all in पु. लिं. प्र. वि. ए. व., अप्रियाणि- न. लिं. द्वि. वि. ब. व. of अप्रिय- one which is disliked or hurtful- न प्रिय- नञ्तत्पुरुष स., अपि-even, also & एव- just, alone, only-both अव्यय, कस्य- to whom- पु. लिं. ष. वि. ए. व. of किम्- who, दग्धमन्दिरसारे- पु. लिं. स. वि. ए. व. of दग्धमन्दिरसार- one whose best (beautiful) house is burnt down- दग्ध- burnt down, consumed by fire- क. भू. धा. वि. of दह्-दहति १ ग. प. प. to burn, scorch, मन्दिर- house, building, सार- adjctv- best, excellent, sound- सारम् मन्दिरम्- मन्दिरसारम्- विशेषणोत्तरपद कर्मधारय स.- यस्य मन्दिरसारम् दग्धम् सः -दग्धमन्दिरसारः- बहुव्रीही स., वह्नौ- पु. लिं. स. वि. ए. व. of वह्निः- fire

प्रिय व्यक्तीने न आवडणारी कृती केली तरीसुद्धा ती प्रियच राहते. ज्याचे सर्वात चांगले घर जळाले आहे असा तरी कोणताही माणूस अग्नीचा अनादर करतो ?


७३६ २१-०९-२०२०
मित्रं वा बन्धुं वा नैवातिप्रणयपीडितं कुर्यात्।
स्वं वत्समतिपिबन्तं विषाणकोट्याक्षिपति धेनुः ॥

मित्रम् वा बन्धुम् वा अतिप्रणयपीडितम् न एव कुर्यात्। धेनुः अतिपिबन्तम् स्वम् वत्सम् विषाणकोट्या क्षिपति।

One should not take undue advantage of affection or love of a friend or a brother /relative ( and trouble them). A cow drives away its calf with edge its horn which quaffs (sucking milk excessively).

मित्रम्, बन्धुम्, अतिप्रणयपीडितम्, अतिपिबन्तम्, स्वम् & वत्सम् – पु/न. लिं. द्वि. वि. ए. व. of मित्र- friend, बन्धु- brother, relative, अतिप्रणयपीडित- one who is excessively troubled by taking advantage of affection or love- अति- अव्यय- excessive, very much, प्रणय- love, affection, friendly acquaintance, पीडित- troubled, harassed- क. भू. धा. वि. of पीड्- पीडयति-ते १० ग. उ. प. to trouble, harass- अतिप्रणयेन पीडितः- अतिप्रणयपीडितः -तृ. तत्पुरुष स., अतिपिबन्त- quaffing excessively- पिबन्तम्-पु. लिं. द्वि. वि. ए. व. of पिबत्- drinking- वर्त. का. वा. धा. सा. वि. of पा-पिबति १ ग. प. प. to drink, to quaff, स्व- pronoun- one’s own, belonging to self, वत्स- calf, young of an animal, न- no, not, एव- अव्यय- just, only, so, कुर्यात्- विध्यर्थ प. प. तृ. पु. ए. व. of कृ- करोति- कुरुते ८ ग. उ. प. to do, make, धेनुः- cow, milch-cow- स्त्री. लिं. प्र. वि. ए. व., विषाणकोट्या- by edge of a horn- स्त्री. लिं. तृ. वि. ए. व. of विषाणकोटि- विषाण- पु/न. लिं.- horn, कोटि-टी- स्त्री. लिं.- edge, curved end- विषाणस्य कोटिः – ष. तत्पुरुष स., क्षिपति- वर्त. तृ. पु. ए. व. of क्षिप्-६ ग. उ. प. (& ४ ग. प. प.)- to throw, discharge, let go

मित्र किंवा बांधवाच्या प्रेमाचा त्याला त्रास होईल इतका उपयोग कुणीही करून घेऊ नये. स्वतःचे वासरू जरी अती दूध पिऊ लागले तर गायसुद्धा त्याला शिंगाच्या टोकाने दूर ढकलते.


७३७ २२-०९-२०२०
ययोरेव समं वित्तं ययोरेव समं कुलम् ।
तयोर्मैत्री विवाहश्च न तु पुष्टविपुष्टयोः ॥
महाभारत. आदिपर्व. अ. १४१ & पंचतंत्र- सुहृद्भेद १६६
पाठ भेद : कुलम्–श्रुतम् & मैत्री–सख्यम्

समम् वित्तम् ययोः एव (अस्ति), समम् कुलम् (श्रुतम्) ययोः एव (अस्ति), मैत्री तयोः (एव भवति), (सख्यम् तयोः एव भवति), विवाहः च तयोः (एव भवति), न तु पुष्टविपुष्टयोः (एव भवति)

Said by Drupada to (Dronacharya, his गुरुबन्धु, when he visited him in his royal court for help, sighting his relelationship)
The marriage and friendship could happen between two individuals who have comparable financial status and comparable family background (comparable level of education) and not between those, well-to-do and weak (poor)

समम्- equal, comparable, वित्तम्- wealth, money, कुलम्- family, race, श्रुतम्- study of Scriptures or science, education, सख्यम्- friendship, relationship- all in न. लिं. प्र. वि..ए. व., ययोः- between two of whom, तयोः- between two of them & पुष्टविपुष्टयोः -between strong/fat and weak- all in- पु. लिं. ष. वि. द्वि. व. of यद्- who, तद्- he, it, that & पुष्टविपुष्ट- पुष्टः च विपुष्टः च- द्वंद्व स., पुष्ट- nourished, strong, वि-अव्यय- prefix to verb or noun indicates- opposition, negation, वि+ पुष्ट- weak, undernourished, पुष्ट-क. भू. धा. वि. of पुष्- पोषति १ ग. प. प., पुष्यति ४ ग..प. प. & पुष्णाति ९ ग. प. प. to nourish, thrive, एव- अव्यय- just, only, alone, मैत्री- स्त्री. लिं.- friendship & विवाहः- पु. लिं- marriage- both- प्र. वि..ए. व. च- and, न- no, not, तु- अव्यय- indeed, surely, but

राजा द्रुपदाने द्रोणाचार्यांना असे सुनावले, “समान संपत्ती आणि समान कुल (किंवा समान ख्याति) असणाऱ्यांमध्येच विवाहसंबंध आणि मैत्री होते, दणकट आणि दुबळे (श्रीमंत आणि गरीब) यांच्यात होत नाही.”

या अपमानामुळे द्रोणाचार्य आणि द्रुपद या गुरुबंधूंमध्ये कायमचे वैर निर्माण झाले आणि ते जन्मभर टिकले. अखेर द्रुपदाचा मुलगा धृष्टद्युम्न याने द्रोणाचार्यांचा वध केला.

७३८ २३-०९-२०२०
सहायबन्धना ह्यर्थाः सहायाश्चार्थबन्धनाः।
अन्योन्यबन्धनावेतौ विनाsन्योन्यं न सिध्यतः॥
महाभारत. उद्योग पर्व. ५. ३७. ३८

अर्थाः सहायबन्धनाः हि (भवन्ति)। सहायाः च अर्थबन्धनाः (सन्ति)। एतौ अन्योन्यबन्धनौ (स्तः)। (एतौ) विना अन्योन्यम् न सिध्यतः।

All forms of earnings (wealth, gains, fulfillments, achievements) are entirely dependant on (tied to) companions (assistants, associates) and ( in turn) these companions are connected to (such) earnings. These two are mutually dependents. Without either of them nothing is possible.

अर्थाः सहायाः सहायबन्धनाः & अर्थबन्धनाः – all in पु. लिं. प्र. वि. ब. व. of अर्थ- money, purpose, gain, achievement, सहाय- help, companion, assistant, सहायबन्धन- dependant on (tied to or bound by) companion- बन्धन- act of binding, a bond, tie, सहायः एव बन्धनः यस्य सः – सहायबन्धनः – बहुव्रीही स. & अर्थबन्धन- dependant on (tied to or bound by) money, purpose, gain- बहुव्रीही स.- same as above, हि- अव्यय- indeed, surely, च-and, एतौ- they two, अन्योन्यबन्धनौ- tied to each other- both in- पु. लिं. प्र. वि. द्वि. व. of एतद्- this, he, it & अन्योन्यबन्धन- अन्योन्यः /अन्योन्यम्- mutual or reciprocal dependence- अन्योन्यः बन्धनः- अन्योन्यबन्धन- समा. प्रादि. तत्पुरुष स., विना- अव्यय- without, न- no, not, सिध्यतः- वर्त. तृ. पु. द्वि. व. of सिध्- सिध्यति- ४ ग. प. प. to be accomplished, fulfilled

अर्थप्राप्तीसाठी सहाय्याचे बंधन केले जाते आणि सहाय्यामधून अर्थप्राप्ती होते. अर्थप्राप्ती आणि सहाय्य या दोघांचा एकमेकाशी संबंध जोडलेला असतो, त्यांच्याशिवाय काही साध्य होत नाही.

७३९ २४-०९-२०२०
दूरस्थोSपि न दूरस्थो यो यस्य मनसि स्थितः।
यो यस्य हृदये नास्ति समीपस्थोSपि दूरतः ॥

यः यस्य मनसि स्थितः (सः) दूरस्थः अपि न दूरस्थः (भवति)। यः यस्य हृदये न अस्ति (सः) समीपस्थः अपि दूरतः (वर्तते)।

One who is close to one’s heart, even if he stays away from him, he is not really far away. But one who has no place in one’s heart, even if he stays near
by, it is as if, he is far away.

यः -who & यस्य- whose- पु. लिं. प्र. & ष. वि. ए. व. of यद्- who, मनसि & हृदये- स. वि. ए. व. of मनस्- न. लिं.- mind, heart & हृदय- heart, mind- पु/न. लिं.- स्थितः- staying, standing, living- क. भू. धा. वि. of स्था- तिष्ठति १ ग. प. प. to stand, stay, दूरस्थः & समीपस्थः -पु. लिं. प्र. वि. ए. व. of दूरस्थ- one who is staying far away & समीपस्थ- one who is staying close, nearby- दूर- far away, at a distance & समीप- close, nearby- दूरे/ समीपे तिष्ठति इति -दूरस्थ/ समीपस्थ- उपपद तत्पुरुष स., दूरतः (दूरतस्)- from afar, far away, at a distance & अपि- even, also- both- अव्यय, न- no, not, अस्ति- वर्त. तृ. पु. ए. व. of अस्- २ ग. प. प. to be, to exist

जो मनामध्ये राहतो तो प्रत्यक्षात दूर असला तरी दूर राहणारा नसतो आणि जो हृदयामध्ये नसतो तो जवळ असला तरी दूरच असतो.

नरेंद्र गोळे
हृदयी नसता स्थान भासतो दूर बाजुचा । अंतरी राहणारा तो भासे जवळ दूरचा ॥

७४० २५-०९-२०२०
आपरितोषाद्विदुषां न साधु मन्ये प्रयोगविज्ञानम्‌ ।
बलवदपि शिक्षितानामात्मन्यप्रत्ययं चेतः ॥
कालिदास-मालविकाग्निमत्र

विदुषाम् आपरितोषाद् प्रयोगविज्ञानम्‌ साधु (इति अहम्) न मन्ये। बलवद् शिक्षितानाम् चेतः अपि आत्मनि अप्रत्ययम् (भवति / दृश्यते)।

Until the learned people are fully pleased with my drama performance, I do not consider my knowledge of dramatics as good. It appears that, the mind of extensively trained (educated) people also does not feel confident about the self in this regards.

विदुषाम् & शिक्षितानाम्- पु. लिं. ष. वि. ब. व. of विद्वस्- learned, educated, knowledgeable & शिक्षित- educated, trained- क. भू. धा. वि. of शिक्ष्- शिक्षते १ ग. आ. प. to learn, acquire knowledge, आपरितोषाद्- with full satisfaction- पं. वि. ए. व. of आपरितोष- आ- prefix has many connotations- one of them is till, until, upto, परितोष- complete satisfaction, gratification, pleasure, delight, प्रयोगविज्ञानम्‌- न. लिं. द्वि. वि. ए. व. of प्रयोगविज्ञान- art of (skill of) performance – प्रयोग- application, performance, dramatic presentation, विज्ञान- knowledge, wisdom, proficiency, skill- प्रयोगस्य विज्ञानम्- ष. तत्पुरुष स., साधु- अव्यय- well done, nice, enough, न- not, no, मन्ये- वर्त. प्र. पु. ए. व. of मन्- मन्यते ४ ग. आ. प. & मनुते- ८ ग. आ. प. to believe, consider, suppose, fancy, बलवद्- अव्यय- excessively, strongly, vigorously, very much, चेतः (चेतस्)- consciousness, mind, heart, reasoning faculty- न. लिं. प्र. वि. ए. व., अपि- अव्यय- also, even, आत्मनि- पु. लिं. स. वि. ए. व. of आत्मन्- self, one self, soul, प्रत्यय- certainty, surety, cognition- न प्रत्यय- नञ्तत्पुरुष स.- अप्रत्यय- अप्रत्ययम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of अप्रत्यय- unconvinced, not trusting, uncertain-

सुशिक्षित लोकांना माझ्या प्रयोगामधून आनंद होत नाही तोपर्यंत माझे समाधान होत नाही पण जास्तच शिक्षण घेतलेल्यांचे मन अस्थिर दिसते. (त्यांचे सहज समाधान होत नाही.)

७४१ २६-०९-२०२०
बोद्धारो मत्सरग्रस्ता: प्रभव: स्मयदूषिता:।
अबोधोपहताश्चान्ये जीर्णमङ्गे सुभाषितम् ॥ – भर्तृहरि नीतिशतकम्-२

बोद्धारः मत्सरग्रस्ता: (सन्ति), प्रभव: स्मयदूषिता: (सन्ति), अन्ये च अबोधोपहस्ताः (भवन्ति)। (तस्मात् कारणात्) सुभाषितम् (मम/विद्वत्जनानाम्) अङ्गे जीर्णम् (भूतम्)।

Knowledgeable people (Scholars) are full of jealousy among themselves, people who are in position of power (Masters) are full of arrogance and rest of the people suffer from ignorance. Therefore noble thoughts- सुभाषित- (of learned Authors/mine) get digested in (their) stomach only (does not get expressed)

बोद्धारः, मत्सरग्रस्ता:, प्रभव:, स्मयदूषिता:, अबोधोपहस्ताः, अन्ये – all in पु. लिं. प्र. वि. ब. व. of बोद्धर्- (विद्वस्)- intellectual, knowledgeable person, मत्सरग्रस्त- person full with jealousy, intolerance- मत्सर- jealousy, intolerance, ग्रस्त- affected, suffering from- क. भू. धा. वि. of ग्रस्- ग्रसते १ ग. आ. प. to seize, eat up, swallow- मत्सरेण ग्रस्तः- तृ. तत्पुरुष स., प्रभु- the master, person holding control, स्मयदूषित- suffering from arrogance, स्मय- arrogance, pride- दूषित- polluted, troubled- स्मयेन दूषितः- तृ. तत्पुरुष स., अबोधोपहत- suffering from ignorance, stupidity, अबोध- ignorance, stupidity, उपहत- struck, hurt, injured- क. भू. धा. वि. of उप+ हन्- (हन्- हन्ति २ ग. प. प. to strike, kill)- अबोधेन उपहतः- तृ. तत्पुरुष स., अन्य- other, another, सुभाषितम्- noble thoughts, well- said quotes- सु- prefix means: good, well, noble- भाषित- thing that said, quoted- क. भू. धा. वि. of भाष्- भाषते १ ग. आ. प. to say, speak & जीर्णम्- जृ(दीर्घ)- १, ४ & ९ प. प., १० उ. प. – जरति, जीर्यति, जृणाति, जारयति- ते, to wear out, wither, grow old- both in न. लिं. प्र. वि. ए. व., अङ्गे- पु/न. लिं. स. वि. ए. व. of अङ्ग- body

विद्वान लोकांना (दुसऱ्यांचा) मत्सर वाटत असतो, शक्तीशाली लोकांकडे (मालकांकडे) उद्धटपणा असतो, उरलेले लोक अज्ञानी असतात. यामुळे सुभाषिते (सर्व लोकांच्या) पोटातच जिरून जातात. ती सांगितली जात नाहीत. राजा भर्तृहरीने शेकडो सुभाषिते लिहिली, पण त्याच्या काळात त्यांचा व्हायला हवा तेवढा प्रसार कदाचित झाला नसेल म्हणून त्याने हे सुभाषित लिहिले असेल.

नरेंद्र गोळे
सुबुद्ध करती हेवा, उद्धट शक्तिमान ते । अज्ञानी अन्यही सारे, दुर्लक्षती सुभाषिते ॥

७४२ २७-०९-२०२०
हठादाकृष्टानां कतिपयपदानां रचयिता
जनः स्पर्धालुश्चेदहह कविना वश्यवचसा।
भवेदद्य श्वो वा किमिह बहुना पापिनि कलौ
घटानां निर्मातुस्त्रिभुवनविधातुश्च कलहः॥
भोजप्रबन्ध- २४४

हठाद् आकृष्टानाम् कतिपयपदानाम् रचयिता जनः वश्यवचसा कविना स्पर्धालुः चेद् अहह, किम् बहुना, इह, पापिनि कलौ, अद्य वा श्वः घटानाम् निर्मातुः त्रिभुवनविधातुः कलहः भवेत्।

Forcibly putting together composition of several words, if a person desires to be a competitor to a scholar who has mastery over words (who has mastered the art of writing), then alas in short (most likely) here, in this period of sinner Kali (Kaliyuga), today or tomorrow there will be strife between a maker of earthen pots and the creator of three worlds.

हठात्- forcibly, with violence- पं. वि. ए. व. of हठ- force, insistence, आकृष्टानाम्, कतिपयपदानाम् & घटानाम्- all in पु. लिं. ष. वि. ब. व. of आकृष्ट- drawn together, put in with effort- क. भू. धा. वि. of आ+ कृष्- (कृष्- कर्षति १ ग. प. प. to drag, pull out), कतिपयपद- a certain number of words- कतिपय- adjctv- a certain number, several, some, पद- words & घट- earthen pot, pitcher, रचयिता, जनः स्पर्धालुः & कलहः- all in पु. लिं. प्र. वि. ए. व. of रचयितृ- maker, creator- (रच्-रचयति-ते १० ग. उ. प. to make, arrange, plan), जन- person, people, स्पर्धालु- one who wishes to compete, competitor- स्पर्धा- competition, rivalry, यः स्पर्धायाम् अलितुम् इच्छति सः -स्पर्धालुः- बहुव्रीही स., (अल्-अलति १ ग. प. प. to be competent) & कलह- strife, fight, कविना & वश्यवचसा- पु. लिं. तृ. वि. ए. व. of कवि- a poet, a scholar, learned person & वश्यवचस्- one who has mastery over speech, words- वश्य- adjctv- to be under control, subdued, desired, wished- (वशनीय, वशितव्य)- कर्मणि वि. धा. सा. वि. of वश्- वष्टि २ ग. प. प. to wish, desire, long for), वचस्- न. लिं.- speech, words- वश्यम् वचः येन सः -वश्यवचस्- बहुव्रीही स., चेद्- if, if at all, अहह- a particle of surprise or wonder like: Ah, Alas, किम् बहुना- in short, most probably, इह- here, in this world, अद्य- today, वा-or & श्वः (श्वस्)- tomorrow- all are अव्यय, पापिनि & कलौ- पु. लिं. स. वि. ए. व. of पापिन्- one who has sinned, a sinner & कलि- period personified as- Kaliyuga, निर्मातुः & त्रिभुवनविधातुः- पु. लिं. ष. वि. ए. व. of निर्मातृ- creator, maker- (निर्+ मा-to make, produce- मा- माति २ ग. प. प. to measure, limit) & त्रिभुवनविधातृ- creator of three worlds- त्रि- three- (त्रयः पु. लिं. & तिस्रः स्त्री. लिं.), भुवन- world, विधातृ- creator, maker- त्रयः भुवनाः- त्रिभुवनाः- समा. प्रादि तत्पुरुष स. & त्रिभुवनानाम् विधातृ- ष. तत्पुरुष स., भवेत्- विध्यर्थ तृ. पु. ए. व. of भू- भवति १ ग. प. प. to be, to exist

जबरदस्तीने काही शब्दांना ओढून ताणून कसेबेसे जुळवणारा सामान्य माणूस जर शब्दप्रभू असलेल्या कवीशी स्पर्धा करायला लागला तर या कलियुगामध्ये लवकरच मडकी बनवणारा कुंभार आणि त्रिभुवनाचा निर्माता परमेश्वर यांच्यातसुद्धा भांडण लागेल. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी?

नरेंद्र गोळे
करूनी ओढाताण अक्षरं रची कोणि नवखा
करू स्पर्धा पाहे सकल कळत्या शब्दप्रभुशी ।
तरी भासे ऐसे, घट घडविता स्पर्धत जणू जसा ईशाशी त्या सृजन करत्या विश्व सगळे ॥

७४३ २८-०९-२०२०
Here are few सुभाषितs called ‘अन्योक्ती’ under category of ‘काव्यशास्त्रविनोद’. In them, we find certain points of our daily life are highlighted with the help of observing things in nature:

अधः करोषि रत्नानि मूर्ध्ना धारयसे तृणम्।
दोषस्तवैव जलधे रत्नं रत्नं तृणं तृणम् ॥

हे जलधे, (त्वम्) रत्नानि अधः करोषि, तृणम् मूर्ध्ना धारयसे। (एषः) तव एव दोषः (अस्ति)। रत्नम्, रत्नम् (एव भवति)। तृणम् (तु) तृणम् (अस्ति)।

Oh, Ocean, you hold gems deep down at the bottom and hold up grass on your head. (No one is to be blamed for this). The fault is entirely yours only. (After all) a gem is a gem and grass is grass!
(It points out at our ignorance in identifying Gems around us and go after grass)

जलधे- पु. लिं. सं. वि. ए. व. of जलधि- ocean, जलम्- water, जलम् धियति इति जलधिः – उपपद तत्पुरुष स., रत्नानि- न. लिं. द्वि. वि. ब. व. of रत्न- Gem, precious stone, अधः (अधस्)- अव्यय- below, down, lower region. करोषि (प.प.) & धारयसे (आ. प.)- वर्त. द्वि. पु. ए. व. of कृ- करोति- कुरुते ८ ग. उ. प. to do, make & धृ- धारयति- ते- १० ग. उ. प. to hold, carry, bear, तृणम्- न. लिं. द्वि. वि. ए. व., तृण – grass, मूर्ध्ना- पु. लिं. तृ. वि. ए. व. of मूर्धन् (मूर्ध्वन्)- head in general, forehead, – तव (ते)- yours- पु. लिं. ष. वि. ए. व. of युष्मद्, एव- अव्यय- only, just, just so, दोषः- fault, blame, defect, weak point- in -पु. लिं. प्र. वि. ए. व., रत्नम्- gem & तृणम्- grass- both in -न. लिं. प्र. वि. ए. व.

अरे सागरा, तू रत्नांना तळाशी ठेवतोस आणि गवताला डोक्यावर घेतोस हा तुझाच दोष आहे बरे, अरे रत्न हे रत्न असते आणि गवत हे गवत असते. (तुला त्यांच्यातला फरक कळत नाही का?)

७४४ २९-०९-२०२०
अपसर मधुकर दूरं परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे।
इह न हि मधुलवलाभो भवति परं धूलिधूसरं वदनम् ॥

हे मधुकर, दूरम् अपसर, इह केतकीकुसुमे परिमलबहुले अपि मधुलवलाभः न हि भवति, वदनम् परम् धूलिधूसरम् (भवति)।

Oh, Honeybee, Go away. Here, in Ketaki-flower, even if it has plenty of fragrance, you will not get a bit of heney, (but your) face will get covered excessively with dust (of pollen).

मधुकर- honey-bee- पु. लिं. सं, वि. ए. व.- मधु- न. लिं.- honey, मधु करोति इति- मधुकरः- उपपद तत्पुरुष स., दूरम्- here used adverbially as: far away, distant from, अपसर- आज्ञार्थ द्वि. पु. ए. व. of – अप+ सृ- to go away, withdraw, retire- (सृ- सरति १ ग. प. प. & सिसर्ति ३ ग. प. प. to go, move, proceed), केतकीकुसुमे & परिमलबहुले- न. लिं. स. वि. ए. व. of केतकीकुसुम- Ketaki- flower- केतकः – पु. लि.- a name a thorny plant with fragrant invisible flowers protected with series of attractive yellow outer calyces, कुसुम- न. लिं.- flower- केतकस्य कुसुमम्- केतकीकुसुमम्- ष. तत्पुरुष स. & परिमलबहुल- one which has excessive fragrance- परिमल -fragrance, scent, perfume, बहुल- adjctv- abundant, plenty, copious- यस्य परिमलः बहुलः तद्- बहुव्रीही स., इह-here, in this place, अपि- even, also, & न हि- not at all- all are अव्यय, मधुलवलाभः – पु. लिं. प्र, वि. ए. व. of मधुलवलाभः – gain of a bit of honey- मधु- honey, लव- a bit, drop, little- लाभ- gain, benefit, acquisition- लवस्य लाभः- लवलाभः & मधुनः लवलाभः- मधुलवलाभः – both ष. तत्पुरुष स., भवति- वर्त. तृ. पु. ए. व. of भू- १ ग. प. प. to be, to exist, परम्- अव्यय- beyond, excessively, very much, वदनम् & धूलिधूसरम्- न. लिं. प्र, वि. ए. व. of वदन- face & धूलिधूसर- covered with dust- धूलि- पु. लिं- dust- धूसर- adjctv- dusty, dusky, धूलिना धूसरम्- धूलिधूसर- तृ. तत्पुरुष स

अरे मधुकरा, (अग मधमाशी), इथल्या केवड्याच्या फुलाला खूप सुगंध आहे, पण तुला त्यात कणभरसुद्धा मध मात्र मिळणार नाही, फक्त तुझे तोंड धुळीने पार माखून जाईल.

नरेंद्र गोळे
रे भुंग्या सर दूरी, ये केतकीकळ्य़ा सुगंध फार ।
मधू न इथे मुळी रे, धूळीने धूसरच मुख होईल ॥ – आर्या (१२,१८; १२,१५)

७४५ ३०-०९-२०२०
आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं।
प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम्।
आस्तेsधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां
श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह॥

अहो, आकर्ण्य आम्रफलस्तुतिम्, मात्सर्यदोषात् इह, तद् जलम् नारिकेलान्तरम् अभूत्, तथा एव पनसम् प्रायः कण्टकितम्, उर्वारुकम् द्विधा जातम्, कादलम् एव अधोमुखम् आस्ते, द्राक्षाफलम् अलम् क्षुद्रताम् (गतम्), जाम्बवम् बत श्यामत्वम् गतम्।

Oh, hearing the praise of Mango fruit in this world, troubled by (suffering with) jealousy, the water went inside a Coconut, likewise probably Jackfruit got thorny exterior, Cucumber (Muskmelon) cracked on surface, Banana just remained with face down turned, grapes got turned to minimal size, alas Rose-apple (Jamun) went dark blue.

अहो- अव्यय- a particle showing surprise, wonder- Ah, Oh, आकर्ण्य- after listening- पू. का. वा. धा. सा. ल्यबन्त अव्यय of आकर्ण्- आकर्णयति-ते १० ग. उ. प. to hear, listen, आम्रफलस्तुतिम् & क्षुद्रताम्- स्त्री. लिं. द्वि. वि. ए. व. of आम्रफलस्तुतिः- paise of a mango fruit- आम्र- mango, फल- fruit, स्तुतिः- paise, laudation- आम्रस्य फलम्- आम्रफलम् & आम्रफलस्य स्तुतिः आम्रफलस्तुतिः- with ष. तत्पुरुष स. & क्षुद्रता- smallness, minuteness- क्षुद्र- adjctv- small, minute, मात्सर्यदोषात्- पु. लिं. पं. वि. ए. व. of मात्सर्यदोष- pains or suffering due to jealousy, मात्सर्य- envy, jealousy, malice, दोष- adjctv- guilt, blame, blemish, fault, crime etc. मात्सर्यः इव दोषः मात्सर्यदोषः- उपपद तत्पुरुष स., तद्- that, it, जलम्- water, नारिकेलान्तरम्- inside of a coconut- नारिकेल- coconut, अन्तरम्- inside, interior, नारिकेलस्य अन्तरम्- ष. तत्पुरुष स., पनसम्- jackfruit, कण्टकितम्- (कण्टकित-adjctv)- got thorny- कण्टकः-कं- thorn, sting- कण्टकानि एति इति- कण्टकितम्- उपपद तत्पुरुष स., उर्वारुकम्- cucumber, muskmelon, जातम्- happened, turned, (जात- क. भू. धा. वि. of जन्- जायते- ४ ग. आ. प. to be born, produced), कादलम्- fruit of plantain tree- (कदलः- कदली- plantain tree), अधोमुखम्- face down-turned, अध:- अधस्- अव्यय- down, below, मुखम्- face- अध: मुखम् यस्य तद् – बहुव्रीही स., द्राक्षाफलम्- fruit of grapes- द्राक्षा- grapes, फलम्- fruit- द्राक्षायाः फलम्- ष. तत्पुरुष स., जाम्बवम्- that of rose-apple (Jamun)- जम्बु (जम्बू)- स्त्री. लिं- rose-apple (Jamun)- all in न. लिं. प्र. वि. ए. व., शामत्वम् & गतम्- न. लिं. द्वि. वि. ए. व. of श्यामत्व- black colour, dark blue colour- श्याम- black, dark blue & गतम्- went, turned- (गत- क. भू. धा. वि. of- गम्-गच्छति १ ग. प. प. to go, turn over), अभूत्- अनद्यतन भूत. तृ. पु. ए. व. of भू- भवति १ ग. प. प. to be, to exist, आस्ते- वर्त. तृ. पु. ए. व. of आस्- २ ग. आ. प. to be, exist, , lie, sit, द्विधा- in two parts, splitting, एव- only, just, alone, अलम्- excessively, greatly, बत- particle of regret, pity & इह- here, in this world- all अव्यवs

आंब्याच्या फळाची स्तुति ऐकून मत्सराने पोळलेल्या नारळाच्या पोटात पाणी जमले, फणसाच्या अंगावर काटे आले, काकडी तडकली, केळ्याच्या घडाने आपले तोंड खाली केले, द्राक्ष संकोचाने आक्रसले आणि जांभूळ श्यामरंगाचे झाले. आंब्याच्या स्तुतीचा हेवा करण्यामुळे बाकीची फळे अशी झाली अशी कल्पना या सुभाषितात मांडली आहे.

नरेंद्र गोळे
आंब्याची परिसून श्रीफल स्तुती, पोटात पाणी भरे
काटेही फणसास सर्व फुटले, ये काकडीला तडे ।
केळ्याने घड टाकले, निरसली हेव्यामुळे द्राक्षही होई जांभुळ जांभळे, जगच हे हेव्यामुळे पेटले ॥

७४६ ०१-१०-२०२०
तावत्कोकिल विरसान्यापय दिवसान्वनान्तरे निवसन् ।
यावन्मिलदलिमालः कोऽपि रसालः समुल्लसति ॥
-पंडितराज जगन्नाथ-भामिनीविलास-६

कोकिल, तावत् वनान्तरे निवसन् विरसान् दिवसान् यापय, यावत् मिलदलिमालः कः अपि रसालः समुल्लसति।

Oh Cuckoo, pass these unpleasant or unhappy days staying inside the forest, untill the time the mango tree, stormed with flight of bees, glitters flashingly (These are laments of a poet who prefers stay incognito till he is able to meet people who will be able to appreciate his poetry)

कोकिल- Indian cuckoo- पु. लि. सं. वि. ए. व., तावत्- till then, till that time/ such time & यावत्- till which time, when – both अव्यय, वनान्तरे- पु/न. लि. स. वि. ए. व. of वनान्तर- inside or within forest- वनम्- forest, अन्तरम्- adjctv- inside or within- वनस्य अन्तरम्- ष. तत्पुरुष स., निवसन्- residing, staying, dwelling- वर्त. का. वा. धा. सा. वि. of नि+वस्- (वस्- वसति- १ ग. प. प. to live, stay, dwell, विरसान् & दिवसान् – पु. लि. द्वि. वि. ब. व. of विरस- tasteless, insipid, unpleasant- रस- juice, interest, object of taste- रसेन विहीनम्- विरसम्- तृ. तत्पुरुष स. & दिवस- day, time, यापय- प्रायोजक आज्ञार्थ द्वि. पु. ए. व. of या-यापयति -ते to cause to spend, pass time- (या- याति- २ ग. प. प. to go, to come to), मिलदलिमालः – one who is stormed with flight of bees- मिलत्- assembling with, meeting with- वर्त. का. वा. धा. सा. वि. of -मिल्- मिलति-ते ६ ग. उ. प. to meet, assemble, gather, अलिः- bee, माला- garland, collection, group, cluster- अलीनाम् माला- अलिमाला- ष. तत्पुरुष स., मिलत् अलिमालाः यस्य सः -मिलदलिमालः -बहुव्रीही स, कः (किम्)- which, who, रसालः- mango tree- all in पु. लि. प्र. वि. ए. व., अपि- अव्यय- even, also, कः अपि- whichever, समुल्लसति- glitters flashingly- वर्त. तृ. पु. ए. व. of सं+ उद् +लस्- to brighten up, bloom up- (लस्- लसति- १ ग. प. प. to shine, glitter, flash)

अरे कोकिळा, जोपर्यंत आंब्यााच्या झाडांवर भुंग्यांचे झुंड येऊन त्यांना आनंदाने चमकवत नाहीत (आंब्याच्या झाडांना मोहोर येत नाही किंवा वसंत ऋतु येत नाही) तोपर्यंतचे हे नीरस दिवस तू रानामध्येच राहून घालव. कवीला असे वाटते की जोपर्यंत रसिक श्रोते भेटत नाहीत तोपर्यंत कवीने लपूनच रहावे.

७४७ ०२-१०-२०२०
पाटीर तव पटीयान् कः परिपाटीमिमामुरीकर्तुम् ।
यत्पिषतामपि नृणां पिष्टोऽपि तनोषि परिमलैः पुष्टिम् ॥
-पंडितराज जगन्नाथ- भामिनीविलास-१२

पाटीर, तव इमाम् परिपाटीम् उरीकर्तुम् कः पटीयान् (भवति), यत् पिष्टः अपि, पिषताम् नृणाम् अपि परिमलैः पुष्टिम् तनोषि।

Oh Sandalwood, whoever is capable of bettering (competing with) your example of selflessness that even after getting ground in the form of a paste, you even provide pleasure (comfort) to the people, who are grinding you, with your fragrance.

पाटीर- sandalwood- in पु. लि. स. वि. ए. व., तव (ते)- yours- ष. वि. ए. व. of- युष्मद् -you, परिपाटीम् & इमाम्- स्त्री. लि. द्वि. वि. ए. व. of परिपाटी- example, manner, method & इदम्- this, it, उरीकर्तुम्- to follow, adopt, accept- पू. का. वा. हेत्वार्थ तुमन्त धा. सा. अव्यय of उरी+ कृ- (कृ- करोति- कुरुते- ८ ग. उ. प. to do), कः, पिष्टः & पटीयान्- both पु. लि. प्र. वि. ए. व. of किम्-who, पिष्ट- one who got grounded- क. भू. धा. वि. of of पिष्- पिनष्टि ७ ग. प. प. to grind, pound, crush & पटीयत्- one who is capable of bettering in proficiency, skill, cleverness- (पटु- पु. लिं & पटी- सत्री. लिं- proficient, clever- पटीयस्- comparative & पटिष्ट- superlative), यद्- अव्यय- that, as, पिषताम् & नृणाम्- पु. लि. ष. वि. ब. व. of पिषत्- one who is grinding- वर्त. का. वा. धा. सा. वि. of पिष्- ७ ग. प. प. (see above) & नृ- a man, mankind, परिमलैः- पु. लि. तृ. वि. ब. व. of परिमल- perfume, fragrance, scent, पुष्टिम्- स्त्री. लि. तृ. वि. ए. व. of पुष्टि- nourishment, means of comfort- (पुष्-पोषति, पुष्यति, पुष्णाति १, ४ & ९ ग. to nourish, nurture), तनोषि- वर्त. द्वि. पु. ए. व. of तन्- तनोति- तनुते ८ ग. उ. प. to cause, produce, stretch, extend, अपि- अव्यय- even, also

चंदना, तुझ्याहून जास्त निस्वार्थ उदाहरण दुसऱ्या कोणाचे असू शकेल ? ज्या लोकांनी तुला घासून पीठ केले तरी त्याचा लेप लावल्यानंतर त्या लोकांनासुद्धा तू सुगंधच देतोस.

७४८ ०३-१०-२०२०
बहिरतिनिर्मलरूपं वहतस्ते दीप दैवतः जगति।
अवगतमचिरादान्तरमौज्ज्वल्यं कज्जलद्वारा ॥

दीप, ते बहिर् अतिनिर्मलरूपम् वहतः, जगति दैवतः (इव भासि)। अचिराद् (तव) आन्तरम् औज्ज्वल्यम् कज्जलद्वारा (सर्वैः) अवगतम् (भवति)।

Oh Lamp, by your appearance of outwardly exceedingly bright feature, you are divinity to the world. But soon, the brightness within you will be exposed through the soot emitted.

दीप- lamp- पु. लिं. सं. वि. ए. व., ते (तव)- yours & वहतः – of carrying, appearing – ष. वि. ए. व. of युष्मद्- you & वहत्- carrying- वर्त. का. वा. धा. सा. वि. of वह्- वहति- ते १ ग. उ. प. to carry, bear, बहिर् (बहिस्)- अव्यय- on the out side, outwardly अतिनिर्मलरूपम्- न. लिं. द्वि. वि. ए. व. of अतिनिर्मलरूप- अति- अव्यय- prefix used to indicate- exceedingly, too, very, निर्मल- spotless, pure, without blemish, रूप- figure, appearance, अति + निर्मल- अतिनिर्मल- अतिनिर्मलम् रूपम्- समा. प्रादि. तत्पुरुष स., जगति- न. लिं. स. वि. ए. व. of जगत्- world, दैवतः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of दैवत- Divinity, God, अचिराद्- पं. वि. ए. व. of अचिर- advrb/ adjctv- soon, within short, quickly, आन्तरम्, औज्ज्वल्यम् & अवगतम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of- आन्तर- of inside, belonging to interior, औज्ज्वल्य- brightness, brilliancy & अवगत- exposed, known, comprehended- क. भू. धा. वि. of अव+ गम्- (गम्- गच्छति- १ ग. प. प. to go), कज्जलद्वारा- by means of soot- कज्जल- soot, lamp-black, द्वारा- through, by the way of -( द्वार्- स्त्री. लिं- door, gate)- कज्जलस्य द्वारा- ष. तत्पुरुष स.

अरे दिव्या, बाहेरून तुझे लखलखते रूप पाहून तू देवच आहेस असे भासते, पण लवकरच तुझ्यामधली काजळी किती उज्ज्वल आहे तेही सर्वांना अवगत होईल. चांगल्यातही काही न्यून असते, दिव्याखाली अंधार या अर्थाने हे सुभाषित आहे.

७४९ ०४-१०-२०२०
भ्रातः काञ्चनलेपगोपितबहिः ताम्राकृते सर्वतो
मा भैषीः कलश स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि।
ताम्रत्वं गतमेव काञ्चनमयी कीर्तिः स्थिरा तेsधुना
नान्तःतत्त्वविचारणप्रणयिनः लोकाः बहिर्बुद्धयः॥

काञ्चनलेपगोपितबहिः सर्वतः ताम्राकृते, भ्रातः, कलश, मा भैषीः, देवालयस्य उपरि चिरम् स्थिरः भव। अधुना ते ताम्रत्वम् गतम् एव, काञ्चनमयी कीर्तिः स्थिरा (अस्ति)। लोकाः न अन्तःतत्त्वविचारणप्रणयिनः (ते) बहिर्बुद्धयः (भवति)।

Oh, my brother, Kalasha (a fixture on top of the temple), though you have been given a coat of gold and are made of copper body, do not fear, stay steady forever over the top of the temple. By now your identity of copper is forgotten and your golden fame has been established. People are not inclined to go deep into and find out the exact truth. They just go by outer appearance.

काञ्चनलेपगोपितबहिः- one who has been given a coat of gold & सर्वतः -from every side, every where- बहिः (बहिस्)- on the outside, outer side & सर्वतः (सर्वतस्) – both अव्यय, काञ्चन- gold, लेप- coat, गोपित- getting concealed, covered up- क. भू. धा. वि. of प्रायोजक of गुप्- गोपायति- (गुप्- गोपयति-ते १० ग. उ. प. to conceal, guard, protect)- काञ्चनस्य लेपः -काञ्चनलेपः -ष. तत्पुरुष स. & काञ्चनलेपेन गोपितः -काञ्चनलेपगोपितः – तृ. तत्पुरुष स, ताम्राकृते, भ्रातः & कलश- all in पु. लिं. सं. वि. ए..व. of -ताम्राकृति -ताम्र- copper, आकृति- body- ताम्रस्य आकृतिः -ताम्राकृतिः – one which is made of copper- -ष. तत्पुरुष स., भ्रातृ- brother & कलश- Kalash- top fixture on top of the temple, मा- a particle of prohibition- do not, that not, lest, भैषीः- get frightened- आज्ञार्थ द्वि. पु. ए. व. of प्रायोजक of भी- ( भाययति, भापयति, भाषयते- (भी- बिभेति ३ ग. प. प. to fear, be afraid of), देवालयस्य & ते- (तव)- पु/न. लिं. ष. वि. ए. व. of देवालय- temple- देव- God, deity आलय-abode, house- देवस्य आलयः- देवालय- ष. तत्पुरुष स. & युष्मद्- you, उपरि- अव्यय- at the head of, on top, upon, चिरम्- अव्यय- forever, for a long time, स्थिरः- adjctv- steady, fixed, firm, भव- आज्ञार्थ द्वि. पु. ए. व. of भू- भवति १ ग. प. प. to be, to exist, अधुना- अव्यय- now, at this time, ताम्रत्वम्- identity of copper & गतम्- gone (क. भू. धा. वि. of गम्-गच्छति १ ग. प. प. to go)- both- न. लिं. प्र. वि. ए. व., एव- अव्यय- just, only, काञ्चनमयी- of gold, made of gold- काञ्चन- gold, मय- काञ्चनमयी- affix used to indicate- made of, composed of, कीर्तिः – fame, glory & स्थिर- steady- in स्त्री. लिं. प्र. वि. ए. व., लोकाः, अन्तःतत्त्वविचारणप्रणयिनः & बहिर्बुद्धयः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of लोक- people, अन्तःतत्त्वविचारणप्रणयिन्- inclined to go deep and find out the exact truth- अन्तः (अन्तर्)- अव्यय- inside, inner, तत्त्व- truth, fact, अन्तर्+ तत्त्व- अन्तःतत्त्व- विचारण- discussion, consideration, अन्तःतत्त्वस्य विचारणम्- अन्तःतत्त्वविचारणम्- प्रणयिन्- desirous of, fond of- अन्तःतत्त्वविचारणस्य प्रणयिन्- अन्तःतत्त्वविचारणप्रणयिन्- both ष. तत्पुरुष स. & बहिर्बुद्धि- one who is interested in the outer appearance, characteristic- बहिर्- outer, external, बुद्धिः – consideration, mind- बहिर् बुद्धिः यस्य सः- बहुव्रीही स.

अरे कलशा, माझ्या भावा, तू जरी तांब्याचा असलास आणि तुझ्यावर सोन्याचा फक्त मुलामा दिला असला तरी तू भिऊ नकोस, देवळाच्या शिखरावर शांतपणे स्थिर रहा, तू तांब्याचा आहेस हे सगळे लोक विसरून गेले आहेत आणि ते तुला सोन्याचाच समजतात. कुणीही खोलात जाऊन सत्य शोधत नाहीत, ते वरवरचेच पाहतात.
This is other side of proverb “All that glitters is not Gold”

नरेंद्र गोळे
तांब्याच्या कलशा विलेपित मुलामा सोनियाचा तुला
राहा तू कळसावरी, झळकसी तू कांचनी राजसा ।
तांबे लोपुन, स्वर्णदीप्त दिससी, झाली अशी कीर्तिही कोणी सत्य न पाहतो, भिउ नको, जाऊन लेपांतरी ॥

७५० ०५-१०-२०२०
युक्तोऽसि भुवनभारे मा वक्रां वितनु कन्धरां शेष।
त्वय्येकस्मिन् कष्टिनि सुखितानि भवन्ति भुवनानि॥
पाठभेद: कष्टिनि–दुःखिनि

शेष, भुवनभारे, युक्तः आसि, कन्धराम् वक्राम् मा वितनु। एकस्मिन् त्वयि कष्टिनि (दुःखिनि), भुवनानि सुखितानि भवन्ति।

Oh Shesha, you have been engaged in shouldering the burden of three worlds. Please do not bend and stretch your neck. By you undergoing suffering alone, all the three worlds are staying safe (are comfortable).

शेष- Name of the legendary snake ‘Adishesha’ who is believed to be carrying the three worlds on his head)- पु. लि. सं. वि. ए. व.,भुवनभारे, एकस्मिन्, त्वयि, कष्टिनि & दुःखिनि all in- स. वि. ए. व. of भुवनभार- burden of the earth/world- भुवन- न. लिं- earth, world, भार- पु. लि.- burden, weight, load- भुवनस्य भारः- ष. तत्पुरुष स., एक- पु. लिं.- one, single, युष्मद्- you, कष्टिन्- & दुःखिन्- पु. लिं.- one who is suffering, getting tormented, युक्तः -पु. लि. प्र. वि. ए. व. of युक्त- engaged, deployed- क. भू. धा. वि. of युज्- युनक्ति- युंक्ते ७ ग. उ. प. to use, deploy employ, join, unite, आसि- वर्त. द्वि. पु. ए. व. of अस्-२ ग. प. प. to be, exist, कन्धराम् & वक्राम्- स्त्री. लि. द्वि. वि. ए. व. of कन्धरा- neck & वक्र- adjctv- bent, curved, मा- do not, lest- a particle of prohibition, वितनु- आज्ञार्थ द्वि. पु. ए. व. वि+ तन्- (तन्- तनोति- तनुते ८ ग. उ. प. to extend, stretch), भुवनानि & सुखितानि- न. लिं. प्र. वि. ब. व. of भुवन- world & सुखित- getting happy, comforted, भवन्ति- वर्त. तृ. पु. ब. व. of भू- भवति १ ग. प. प. to be, to exist

अरे शेषा, तू त्रिभुवनाचा भार आपल्या खांद्यावर घेतला असलास तरी आपली मान वाकवू किंवा ताणू नकोस. तू जे कष्ट घेत आहेस त्यामुळेच हे त्रिभुवन सुखात राहते आहे.

७५१ ०६-१०-२०२०
येनामन्दमरन्दे दलदरविन्दे दिनान्यनायिषत।
कुटजे खलु तेनेहा तेने हा मधुकरेण कथम् ॥
-पंडितराज जगन्नाथ-भामिनीविलास ९

येन मधुकरेण, अमन्दमरन्दे दलद्-अरविन्दे दिनानि अनायिषत, हा, तेन कुटजे खलु ईहा कथम् तेने।

A honeybee, which has spent days with fully blooming lotus filled with excessive nectar, alas why indeed, it has now opted for (bitter) flowers of Kutaja ( a medicinal herb)

येन, तेन & मधुकरेण- पु. लिं. तृ. वि. ए. व. of यद्- who, which, तद्- that, he, मधुकर- honeybee- मधु- न. लिं.- honey, मधु करोति इति- मधुकरः- उपपद तत्पुरुष स., अमन्दमरन्दे, दलदरविन्दे & कुटजे- पु. लिं. स. वि. ए. व. of अमन्दमरन्द- one which is full with excessive nectar- मन्द- inactive, dull, low, small- न मन्द- अमन्द- active, excessive, full- नञ्तत्पुरुष स.- मरन्द- juice of flowers, nectar -अमन्दम् मरन्दम्- अमन्दमरन्दम्- समा. प्रादि तत्पुरुष स., दलदरविन्द- blooming lotus, water lilly- दलद्- blooming, opening- वर्त. का. वा. धा. सा. वि. of दल्- दलति १ ग. प. प. to bloom, open- दलितः अरविन्दः- दलदरविन्द- विशेषणपूर्वपद कर्मधारय स. & कुटज- Kutaja- a bitter medicinal herb, दिनानि- न. लिं. द्वि. वि. ब. व. of दिन- day, अनायिषत- अनद्यतन भूत आ. प. तृ. पु ए. व. of प्रायोजक of नी- cause to carry, lead- नाययति-ते- desiderative- निनीषति-ते, हा- अव्यय- a particle of expressing pain, detection, alas, खलु- अव्यय- indeed, surely, ईहा- desire, wish- (ईह्- ईहते १ ग. आ. प. to wish, think of), कथम्- अव्यय- how, in what way, तेने- परोक्षभूत आ. प. तृ. पु. ए. व. of तन्- तनोति-तनुते ८ ग. उ. प. to stretch, bend, perform

ज्या मधुकराने (मधमाशीने) पू्र्ण फुललेल्या आणि मधुर मधाने भरलेल्या कमळाच्या फुलासोबत दिवस काढलेले आहेत त्याने आता कुटजाच्या कडू फुलाला का बरे निवडले आहे ?

७५२ ०७-१०-२०२०
हरिवक्षोगता लक्ष्मीरपि शोभार्थमेव यत्।
बिभर्ति कमलं हस्ते कान्याशंसाधिका भवेत् ॥
योगवासिष्ठ्य उत्तरार्ध ६.११७.२१

हरिवक्षोगता लक्ष्मीः अपि शोभार्थम् एव यद् कमलम् हस्ते बिभर्ति, का अन्या आशंसा (तस्याः) अधिका भवेत्।

Even Goddess Lakshmi, who has her place on the chest of Lord Vishnu, opts to hold a lotus in her hand for enhancing her beauty, what more a lotus can wish to achieve (for declaration of its beauty)

हरिवक्षोगता, लक्ष्मीः, अन्या, का, अधिका & आशंसा- all in स्त्री. लिं. प्र. वि. ए. व. of हरिवक्षोगत- one who has gone to (stayed on) the chest of Hari- हरि- one of the Trinity- Vishnu, वक्षस्- chest, breast, गत- gone, stayed, occupied- क. भू. धा. वि. of गम्- गच्छति १ ग. प. प. to go, वक्षसि गता- वक्षोगता- स. तत्पुरुष स.- हरेः वक्षोगता- हरिवक्षोगत- ष. तत्पुरुष स., लक्ष्मी- name of consort of Vishnu- goddess of wealth, अन्य- adjctv- other, another, किम्- what, which, अधिक- adjctv- additional, more, greater & आशंसा- declaration, assurance, imagination, अपि- अव्यय- even, also, शोभार्थम्- for beauty, grace, elegance- शोभा- beauty, grace, elegance, अर्थम्- purpose, meaning, object, desire- शोभायाः अर्थम्- ष. तत्पुरुष स., एव- अव्यय- just, only, mere, यद् – अव्यय- used as assertion: since, because, as, कमलम्- न. लिं. द्वि. वि. ए. व. of कमल- lotus, हस्ते- पु. लिं. स. वि. ए. व. of हस्त- hand, बिभर्ति- वर्त. तृ. पु. ए. व. of भृ- बिभर्ति- बिभृते ३ ग. उ. प. to bear, cherish, भवेत्- would be- विध्यर्थ तृ. पु. ए. व. of भू-भवति १ ग. प. प. to be, to exist

जी विष्णू भगवानांच्या छातीवर (हृदयात) वसते अशी लक्ष्मी ज्या कमळाला हातात धरते त्या कमळाला आपल्या सौंदर्यासाठी आणखी काय हवे?

नरेंद्र गोळे
अंतरी हरिच्या राहे, लक्ष्मी ती घेतसे करी । कमळास अशा काय, प्रशंसा पाहिजे भली ॥

७५३ ०८-१०-२०२०
न लोके दीप्यते मूर्खः केवलात्मप्रशंसया ।
अपि चापिहितः श्वभ्रे कृतविद्यः प्रकाशते ॥
महाभारत शान्तिपर्व.अ. २८७.३१

लोके मूर्खः केवलात्मप्रशंसया न दीप्यते। कृतविद्यः श्वभ्रे अपिहितः अपि च प्रकाशते।

In this world, stupid person can not shine merely by self-glorification. One who has acquired knowledge (education, skill), even if he is hidden inside a chasm (cave) also is able to get recognition.

लोके & श्वभ्रे- न. लि. स. वि. ए. व. of लोक- world & श्वभ्र- chasm, fissure in rock/earth, मूर्खः, कृतविद्यः & अपिहितः -पु. लि. प्र. वि. ए. व. of मूर्ख- stupid person, dull man, कृतविद्य- educated or knowledgeable person, one who has skill- कृत- done, accomplished- क. भू. धा. वि. of कृ-करोति-कुरुते ८ ग. उ. प. to do, make, विद्या- education, knowledge, skill & अपिहित- (पिहित)- hidden concealed, shut- क. भू. धा. वि. of अपि+धा- (धा- दधाति- धत्ते ३ ग. उ. प. to place, set), केवलात्मप्रशंसया- स्त्री. लि. तृ. वि. ए. व. of केवलात्मप्रशंसा- mere self-esteem glorification- केवल- adjctv- mere, sole, exclusive, आत्मन्- self, one’s own, प्रशंसा- स्त्री. लिं.- praise, glorification- आत्मनः प्रशंसा- आत्मप्रशंसा- ष. तत्पुरुष स.- केवला आत्मप्रशंसा- केवलात्मप्रशंसा- समा. प्रादि तत्पुरुष स, न- no, not, दीप्यते & प्रकाशते- वर्त. तृ. पु. ए. व. of दीप्- ४ ग. आ. प. to shine, blaze, to be illustrious & प्र+ काश्- (काश्- काशते १ & ४ ग. आ. प. to shine, appear, to be visible), अपि- अव्यय- even, also, च- and

मूर्ख लोक केवळ स्वतःची बढाई मारण्यमुळे चमकत नाहीत आणि ज्याने ज्ञान संपादन केले आहे असा माणूस गुहेत असला तरी त्याचा प्रकाश पडतो.

स्वस्तुती करुनी फक्त मूर्ख ख्याती न पावती ।
अव्यक्तच जरी राहे सुशिक्षीत प्रकाशतो ॥
अप्रकट जरी राहे सुशिक्षित प्रकाशतो ॥ – अनुष्टुप मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२०१००८

७५४ ०९-१०-२०२०
न व्याधिर्न विषं नापत् तथा नाधिश्च भूतले।
खेदाय स्वशरीरस्थं मौर्ख्यमेकम् यथा नॄणाम् ॥
–योगवासिष्ठ २. १३.१३

नॄणाम् खेदाय, न व्याधिः, न विषम्, न आपत्, न आधिः च भूतले तथा (भवति) यथा स्वशरीरस्थम् मौर्ख्यम् एकम् (अस्ति)।

On the surface of this world, for the distress or sorrow of the people, there is no ailment, no poison, no tragedy and no anxiety is like the single drawback of inborn stupidity within them.

नॄणाम्- for the people, men- पु. लिं. ष. वि. ब. व. of नृ- man, person, खेदाय- पु. लिं. च. वि. ए. व. of खेद- distress, sorrow, depression, pain, torment, न- no, not, व्याधिः- physical ailment, sickness & आधिः- mental ailment, sickness- both पु. लिं., विषम्- poison, स्वशरीरस्थम्- inborn, inherent, inbuilt – स्व- one’s own, self, शरीर- body- स्वस्य शरीरम्- स्वशरीरम्- ष. तत्पुरुष स. & स्वशरीरे तिष्ठति इति- स्वशरीरस्थ- उपपद तत्पुरुष स. मौख्र्यम्- stupidity, ignorance, एकम्- single, one- -all- न. लिं., आपद्-स्त्री. लिं.- calamity, misfortune- all in प्र. वि. ए. व., च- and, भूतले- on the surface of this world- भूः- स्त्री. लिं.- earth, world, तलम्- न. लिं.- surface, base- भुवाः (भुवः) तलम्- भूतलम्- ष. तत्पुरुष स., तथा- like that, comparable to, similar to & यथा- like which, how much, in what way- both अव्यय

माणसाच्या अंगातल्या स्वतःच्या मूर्खपणामुळे त्याला जेवढा त्रास किंवा खेद होतो तेवढा या भूतलावरील (जगातल्या) कुठल्याही (बाह्य) रोगाने, संकटाने, विषाने किंवा मानसिक आजाराने होत नाही.

नरेंद्र गोळे
आपत्ती, विष वा आधी, व्याधीही जेवढी नसे । खेदास कारण होते, स्वमूर्खता नरा सदा ॥

७५५ १०-१०-२०२०
पठन्ति चतुरो वेदान् धर्मशास्त्राण्यनेकशः।
आत्मानं नैव जानन्ति दर्वी पाकरसं यथा ॥
चाणक्य नीतिदर्पण १५.१२

(ते) चतुरः वेदान् पठन्ति, धर्मशास्त्राणि अनेकशः (पठन्ति), (तथापि) (ते) आत्मानम् एव न जानन्ति, यथा दर्वी पाकरसम् (पाकरसस्य स्वादम् न जानाति)।

They have read all four Vedas, read many other religious scriptures frequently (in various ways or manners) but are unable to understand the self (आत्मन्), like a ladle or spoon does not know the taste of delicacies (it serves)
(This Subhashit is similar to No.112 of last year- यस्य नास्ति निजा प्रज्ञा)

चतुरः & वेदान् -पु. लि. द्वि. वि. ब. व. of चतुर्- four & वेद- Veda- Holy learning, sacred knowledge, पठन्ति & जानन्ति- वर्त. तृ. पु. ब. व. of पठ्- पठति १ ग. प. प. to read, recite, study & ज्ञा- जानाति- जानीते ९ ग. उ. प. to know, understand, धर्मशास्त्राणि- न. लि. द्वि. वि. ब. व. of धर्मशास्त्र- religious scripture, a code of laws, jurisprudence- धर्म- a code of conduct, religion, शास्त्र- scriptural injection, any department of science or knowledge- धर्मस्य शास्त्रम्- ष. तत्पुरुष स., अनेकशः – अव्यय- frequently, in various ways or manners, आत्मानम्- पु. लि. द्वि. वि. ए. व. of आत्मान्- self, individual soul, oneself, एव- अव्यय- just, only, न- no, not, यथा- अव्यय- like, in which way, दर्वी-(दर्वि)- स्त्री. लिं.- ladle, spoon, पाकरसम्- पु. लि. द्वि. वि. ए. व. of पाकरस- taste of cooking- पाक- cooking, ripeness, maturity, रस- taste, juice, essence- पाकस्य रसः- ष. तत्पुरुष स.

ते चारही वेद वाचतात, धर्मशास्त्रांचे अनेक वेळा पठण करतात, पण ते स्वतःलाच समजून घेत नाहीत. हे म्हणजे चमच्याला स्वयंपाकाची चव कळत नाही असे आहे.

नरेंद्र गोळे
शिकती चारही वेद, धर्मशास्त्रे अनेक ती ।
स्वतःस जाणती ना ते, चमचा चव ना जाणतो ॥
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२०१०१०


७५६ ११-१०-२०२०
मुकुटे रोपितः काचः चरणाभरणे मणिः।
न हि दोषः मणेः अस्ति किं तु साधोः अविज्ञता ॥

काचः मुकुटे रोपितः, चरणाभरणे मणिः (कल्पितः), (एतद्) मणेः दोषः न हि अस्ति। किम् तु ( तद्) साधोः अविज्ञता (अस्ति)।

A glass bead is fixed ( planted) in crown and a jewel is fixed in the ornament of feet. It is not at all fault of the jewel but purely the ignorance of its creator/dealer (of the ornaments)

काचः- a glass, crystal, रोपितः- planted, fixed, fixed- क. भू. धा. वि. of प्रायोजक of रुह्- रोपयति-ते- (रुह्- रोहति १ ग. प. प. to grow, mount, plant, climb, मणिः – jewel & दोषः – fault, blame, blemish- all in पु. लिं. प्र. वि. ए. व., मुकुटे & चरणाभरणे- न. लिं. स. वि. ए. व. of मुकुट- crown, crest & चरणाभरण- a ornament of feet- चरण- foot, आभरण- ornament, decoration, adornment- चरणस्य आभरणम्- चरणाभरणम्- ष. तत्पुरुष स., मणेः & साधोः- पु. लिं. ष. वि. ए. व. of मणि- jewel & साधु- normally means sage, gentleman, honest person but here it means: creator or dealer, merchant, न हि- अव्यय- not at all, अस्ति- वर्त. तृ. पु. ए. व. of अस्- २ ग. प. प. to be, exist, किम् तु- अव्यय- but surely, but then, on the contrary, अविज्ञता- स्त्री. लिं. प्र. वि. ए. व.- ignorance, disrespect, contempt- विज्ञ- adjctv- intelligent, wise, skilful- विज्ञता- intelligence, expertise- न विज्ञता- अविज्ञता- नञ् तत्पुरुष स.

जर एकाद्या काचेला मुकुटामध्ये बसवले आणि मण्याला पायातल्या पैंजणात बांधले गेले तर त्यात त्या मण्याचा काहीच दोष नाही. ते करणाऱ्या माणसाच्या अज्ञानामुळे तसे झाले असेल.

मुकुटी रोविली काच, पायी शोभा मणी करे । मण्याची न चुकी हयात, अज्ञानी योजता ठरे ॥

७५७ १२-१०-२०२०
प्रसह्य मणिमुद्धरेन्मकरवक्त्रदंष्ट्रान्तरात्
समुद्रमपि सन्तरेत्प्रचलदुर्मिमालाकुलम्
भुजङ्गमपि कोपितं शिरसिपुष्पवद्धारयेत्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥
भर्तृहरि नीतिशतक -४

प्रसह्य, मकरवक्त्रदंष्ट्रान्तरात् मणिम् उद्धरेत्, प्रचलद्-ऊर्मि-माला-आकुलम् समुद्रम् अपि सन्तरेत्, कोपितम् भुजङ्गम् अपि शिरसि पुष्पवत् धारयेत्, न तु प्रति-निविष्ट-मूर्ख-जन-चित्तम् आराधयेत्।

With great difficulty (with great endurance), a jewel could be extracted from the fangs in the mouth of a crocodile, sea full of series of forcefully moving waves even could be crossed, an angered (excited) snake can be held on the head like a flower, but surely not try to please a person who is obstinate and stupid.

प्रसह्य- forcibly, violently, with great endurance- पू. का. वा. ल्यबन्त धा. सा. अव्यय of प्र+ सह्- (सह्- सहते १ ग. आ. प. to bear, endure, suffer, मकरवक्त्रदंष्ट्रान्तरात्- from the fangs in the mouth of a crocodile- पं. वि. ए. व. of मकरवक्त्रदंष्ट्रान्तर- मकर- पु.लिं.- crocodile, वक्त्र- न. लिं- mouth, दंष्ट्रा- स्त्री. लिं.- fang, tooth, अन्तर- adjctv- inside, within, मकरस्य वक्त्रम्- मकरवक्त्रम्- मकरवक्त्रस्य दंष्ट्रा- मकरवक्त्रदंष्ट्रा- मकरवक्त्रदंष्ट्रायाः अन्तरम्- मकरवक्त्रदंष्ट्रान्तरम्- all in ष. तत्पुरुष स., मणिम्- पु/स्त्री. द्वि. वि. ए. व. of मणि- jewel, उद्धरेत्, सन्तरेत्, धारयेत् & आराधयेत्-all in विध्यर्थ प. प. तृ. पु. ए. व. of उद्+ हृ- to extract, extricate, save, rescue- (हृ- हरति-ते १ उ. प. to carry, take, convey), सं+ तृ(दीर्घ)- to cross across- {तृ(दीर्घ)- तरति- to cross, float}, धृ-धारयति-ते १० ग. उ. प. to bear, hold & आ+ राध्- to propitiate, please- (राध्- राध्नोति५ ग. प. प. to propitiate, please, succeed, प्रचलद्- moving, tossing- वर्त. का. वा. धा. सा. वि. of प्र+ चल्- to shake, tremble- (चल्- चलति-१ ग. प. प. to move, walk), ऊर्मि- पु. लिं.- wave, current, माला- स्त्री. लिं- row, line, collection, आकुल- adjctv- filled with, full of, समुद्रम्- पु. लिं. द्वि. वि ए. व. of समुद्र- sea, ocean- प्रचलद् ऊर्मिः- प्रचलदूर्मि- समा. प्रादि तत्पुरुष स.- प्रचलदूर्मीनाम् माला- प्रचलदूर्मिमाला- ष. तत्पुरुष स.- प्रचलदूर्मिमालया आकुलम्- प्रचलदूर्मिमालाकुलम्- तृ. तत्पुरुष स, अपि- अव्यय- even, also, कोपितम् & भुजङ्गम्- पु. लिं. द्वि. वि ए. व. of कोपित- provoked, angered- क. भू. धा. वि. of प्रायोजक of कुप्- (कुप्- कुप्यति ४ ग. प. प. to be angry, excited), & भुजङ्गः- snake, serpent, शिरसि- न. लिं. स. वि. ए. व. of शिरस्- head, पुष्पवत्- like a flower- पुष्प- flower, वत्- adjctv- an affix denotes ‘as’, ‘like’, न तु- अव्यय- surely not, not all, – obstinate stupid person’s mind- प्रति- अव्यय- against, counter, opposition to, निविष्ट- fixed, seated- क. भू. धा. वि. of नि+ विश्- ६ ग. प. प. to sit down, rest, प्रतिनिविष्ट- obstinate, मूर्ख- stupid, जन-person, चित्तम्- द्वि. वि. ए. व. of चित्त- mind, intention, heart- प्रतिनिविष्टः मूर्खः & प्रतिनिविष्टमूर्खः जनः -प्रतिनिविष्टमूर्खजनः – both समा. प्रादि तत्पुरुष स.- प्रतिनिविष्टमूर्खजनस्य चित्तम्- प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तम्- ष. तत्पुरुष स.

खूप प्रयत्न केल्याने एकाद्या सुसरीच्या वाकड्या दातांमधले रत्न काढून घेता येईल, प्रचंड लाटांनी खवळलेला समुद्र पार करून जाता येईल, चिडलेल्या सापाला फुलासारखे डोक्यावर धारण करता येईल, पण हटवादी मूर्खाचे समाधान करता येणार नाही. “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे … परंतू मूर्खाचे हृदय धरवेना पळभरी” हे याच अर्थाचे दुसरे सुभाषित आहे.

बळेच मणी काढता मकर तोंडिचा ये जरी
कुणी लहरमालिकांतुनि तरून जाईलही ।
अलंकरण मानुनी शिरि धरील सापा कुणी
परंतु समजूत ना पटु शके खुळ्यांची कधी ॥ – पृथ्वी
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२०१०१२


७५८ १३-१०-२०२०
वरं पर्वतदुर्गेषु भ्रान्तं वनचरैः सह।
न मूर्खजनसम्पर्कः सुरेन्द्रभवनेष्वपि ॥
-भर्तृहरेः नीतिशतकम्

पर्वत-दुर्गेषु वनचरैः सह भ्रान्तम् वरम् (अस्ति)। मूर्ख-जन-सम्पर्कः सुरेन्द्र-भवनेषु अपि न (वरम् भवति)

Wandering on mountains and inaccessible terrains in the company of forest-dwellers is preferred to that of living in the Mansions of the Lord of Gods, along with stupid people.

पर्वतदुर्गेषु & सुरेन्द्रभवनेषु- न. लिं. स. वि. ब. व. of पर्वतदुर्ग- mountain and inaccessible terrains पर्वत- mountain, hill, दुर्ग- inaccessible or dangerous terrain- पर्वतः च दुर्ग च- पर्वतदुर्गः- द्वंद्व स. & सुरेन्द्रभवन- सुरेन्द्र- Lord of Gods- सुर- God, इन्द्र- Lord, Master, King- सुराणाम् इन्द्र- सुरेन्द्रः & भवन- Mansion, Dwelling- सुरेन्द्रस्य भवनम्- सुरेन्द्रभवनम्-both ष. तत्पुरुष स., वनचरैः- पु. लिं. तृ. वि. ब. व. of वनचर- forest dweller, wild animal, woodman, वन- forest- वने चरति इति- वनचरः – उपपद तत्पुरुष स., सह- अव्यय- with, in the company of, along with, भ्रान्तम् & वरम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of भ्रान्त- roamed, gone astray, wandered- क. भू. धा. वि. of भ्रम्- भ्रमति १ ग. प. प. & भ्रम्यति ४ ग. प. प. to to roam, go astray, wander & वरम्- adjctv- excellent, better, preferred, मूर्खजनसम्पर्कः contact (stay) with stupid person- पु. लिं. प्र. वि. ए. व.- मूर्ख- stupid, जन- person सम्पर्कः- contact, company- मूर्खः जनः – मूर्खजनः -समा. प्रादि तत्पुरुष स. & मूर्खजनानाम् सम्पर्कः- मूर्खजनसम्पर्कः- ष. तत्पुरुष स., अपि- अव्यय- also, even, न-no not

इंद्राच्या महालात मूर्ख लोकांच्या सहवासात राहण्यापेक्षा दुर्गम डोंगरांमधल्या वन्य प्राण्यांसोबत राहणे बरे.

नरेंद्र गोळे
बरा वन्यपशूंसंगे, निवास दुर्ग पर्वती । मूर्खांसंगे नको वास, जरी इंद्रगृही असे ॥

७५९ १३-१०-२०२०
शिरः शार्वं स्वर्गात् पशुपतिशिरस्तः क्षितिधरं
महीध्रादुत्तुङगादवनिमवनेश्चापि जलधिम्।
अधो गङ्गा सेयं पदमुपगता स्तोकमथवा
विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः॥
भर्तृहरि नीतिशतक- १०

स्वर्गात् शिरः शार्वम्, पशुपतिशिरस्तः क्षितिधरम्, उत्तुङगात् महीध्रात् अवनिम्, अवनेः च अपि जलधिम्, सा इयम् गङ्गा अधः पदम् उपगता स्तोकम् अथवा। विवेकभ्रष्टानाम् विनिपातः शतमुखः भवति।

From the heaven to the head of Shiva, from Diva’s head to mountain, from mighty mountain to earth (plains), from the land to the sea, this Ganga (river) underwent fall little by little. Perhaps one who has lost discretion faces series of downfall

स्वर्गात् उत्तुङगात् महीध्रात् & अवनेः- all in पं. वि. ए. व. of स्वर्ग- पु. लिं.- heaven, उत्तुङग- adjctv- lofty, high, महीध्र (महीधर)- पु. लिं.- mountain- मही- स्त्री. लिं.-Earth, land- महीम् धारयति इति -महीधरः or महीध्रः- उपपद तत्पुरुष स. & अवनि- स्त्री. लिं.- Earth, land, शिरः, शार्वम्, क्षितिधरम्, अवनिम्, जलधिम् & पदम् -all in- द्वि. वि. ए. व. of- शिरस्- न. लिं.- head & शार्वम्- न. लिं.- belonging to or of शर्वः- शिवः, शंकरः, क्षितिधर- mountain- क्षिति- स्त्री. लिं.- earth, धर- holder, क्षितिम् धारयति इति- क्षितिधरः- उपपद तत्पुरुष स., अवनि-earth, जलधि- sea, ocean- जल-water- जलम् धियति इति- जलधि- उपपद तत्पुरुष स. & पद- position, stage, पशुपतिशिरस्तः- from the head of पशुपति- (शिवः, शंकरः), पशुपतेः शिरस् -पशुपतिशिरस् तः (तस्)- suffix indicates ‘of’, ‘from’, च- and, अपि- also even, सा (तद्) – she, इयम्-(इदम्)- this, गङ्गा- name- Ganges & उपगता- undergone- (उपगत- undergone, come to- क. भू. धा. वि. of उप+ गम्- गच्छति-१ ग. प. प. to go)- all स्त्री. लिं. प्र. वि. ए. व. अधः (अधस्)- अव्यय- lower, below, down, स्तोकम्- adjctv- little, small, अथवा- अव्यय- विवेकभ्रष्टानाम्- पु. लिं. ष. वि. ब. व. of विवेकभ्रष्ट- विवेक- discretion, judgement, भ्रष्ट- fallen, deviated- क. भू. धा. वि. of भ्रंश्- १ ग. आ. प. भ्रंशते & ४ ग. प. प. भ्रश्यति to fall, deviate- विवेकात् भ्रष्टः – पं तत्पुरुष स., विनिपातः & शतमुखः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of- विनिपात- a great fall, drop- पात-fall- (पत्-पतति १ ग. प. प. to fall- वि+ नि+पत्) & शतमुख- hundredfold- शतम्- hundred, मुखम्- countenance, front, face- शतम् मुखम्- समा. प्रादि तत्पुरुष स., भवति- वर्त. तृ. पु. ए. व. of भू- १ ग. प. प. to be, to exist

स्वर्गातून शंकाराच्या डोक्यावर, शंकराच्या मस्तकावरून पर्वतावर, उत्तुंग पर्वतावरून खाली जमीनीवर आणि जमीनीवरून वहात वहात समुद्रामध्ये अशा प्रकारे गंगेचा थोडा थोडा अधःपात होत जातो. विवेकभ्रष्ट झालेल्याचे असेच शंभर मुखांनी पतन होते.

नरेंद्र गोळे
पडे गंगा स्वर्गातुनि, गिरिवरी ती उतरते
तिथूनी ती खाली अवनिवरती वाट क्रमते ।
तशी खाली खाली उतरत निघे सागर तळी विवेकभ्रष्टांचे स्खलन घडते तद्वत पुरे ॥ – शिखरिणी

७६० १५-१०-२०२०
सिंहो व्याकरणस्य कर्तुरहरत्प्राणान् प्रियान् पाणिने-
र्मीमांसाकृतमुन्ममाथ सहसा हस्ती मुनिं जैमिनिम्।
छन्दोज्ञाननिधिं जघान मकरो वेलातटे पिङ्गलं
अज्ञानावृतचेतसामतिरुषां कोऽर्थस्तिरश्चां गुणैः॥
-पंचतंत्र
सिंहः व्याकरणस्य कर्तुः पाणिनेः प्रियान् प्राणान् अहरत्। हस्ती र्मीमांसाकृतम् जैमिनिम् मुनिम् सहसा उन्ममाथ। वेलातटे मकरः छन्दोज्ञाननिधिम् पिङ्गलम् जघान। अज्ञानावृतचेतसाम् अतिरुषाम् तिरश्चाम्, गुणैः कः अर्थः (भवति)

One lion took away dear life of great writer of principles of grammar, Panini, writer of deep philosophical reflections, Sage Jaimini was crushed by one elephant violently. On a seashore, one crocodile killed Pinglala, the treasure-house of Vedic hymns. For animals that are fully stooped in ignorance and are very violent, the qualifications are of no meaning (They are not able to value the qualifications)

सिंहः- lion, हस्ती (हस्तिन्)- elephant, मकरः- crocodile, कः- (किम्)- what, अर्थः- meaning, purpose- all in पु. लिं. प्र. वि. ए. व., पाणिनेः – पु. लिं. ष. वि. ए. व. of पाणिनि- name of person known to be creator of Sanskrit grammar, व्याकरणस्य & कर्तुः – न/पु. लिं. ष. वि. ए. व. of- व्याकरण- grammar & कर्तृ- maker, creator, प्रियान् & प्राणान्- both in पु. लिं. द्वि. वि. ब. व. of प्रिय- dear, loving, प्राण- life, breath of life, अहरत्- अनद्यतन भूत तृ. पु. ए. व. of हृ- हरति- १ ग. प. प. to take away, snatch, lead, र्मीमांसाकृतम्, जैमिनिम्, मुनिम्, छन्दोज्ञाननिधिम् & पिङ्गलम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. of र्मीमांसाकृत- one who well-known philosopher -critic- र्मीमांसा- deep reflection- name of one of the six chief दर्शन- system of philosophy- येन र्मीमांसाः कृताः सः- र्मीमांसाकृतः – बहुव्रीही स., जैमिनि- name of a sage, मुनि- sage, ascetic, छन्दस्- न. लिं.- sacred texts of Vedic hymns- ज्ञानम्- knowledge निधि- treasure-house, छन्दसाम् ज्ञानम्- छन्दोज्ञानम् & छन्दोज्ञानानाम् निधिः- छन्दोज्ञाननिधि- -both ष. तत्पुरुष स.- treasure-house of knowledge of sacred texts of Vedic hymns & पिङ्गल- name, सहसा- अव्यय- suddenly, rashly, forcibly, उन्ममाथ- killed & जघान- killed- both परोक्षभूत तृ. पु. ए. व. of उद्+ मंथ् -मथ्- to kill, strike, destroy- (मंथ् -मथ्- मंथति (मथति)- मथ्नाति-१ & ९ ग. प. प. to churn) & हन्- हन्ति २ ग. प. प. to strike, kill, वेलातटे- स. वि. ए. व. of वेलातट- वेला-sea-shore तट- edge, bank- वेलायाः तटम्- वेलातटम्- ष. तत्पुरुष स., अज्ञानावृतचेतसाम्, अतिरुषाम् & तिरश्चाम्- पु/न. लिं. ष. वि. ब. व. of अज्ञानावृतचेतस्- one who/which is fully stooped in ignorance- अज्ञान- ignorance, आवृत- covered, filled, pervaded- क. भू. धा. वि. of आ+वृ- (वृ- वरति-ते १ ग. उ. प. to choose, opt, select), चेतस्- mind- अज्ञानेन आवृतम्- अज्ञानावृतम्- तृ. तत्पुरुष स. & अज्ञानावृतम् चेतस्- अज्ञानावृतचेतस्- विशेषणपूर्वपद कर्मधारय स., अतिरुष्- one who/which is very angry -अति- अव्यय- very, great, रुष्- पु/न. लिं- One who/which is angry & तिर्यच्- (तिरश्ची- स्त्री. लिं.) animal, गुणैः- पु/न. लिं. तृ. वि. ब. व. of गुण- qualification, academic brilliance,

संस्कृत भाषेचे व्याकरण तयार करणाऱ्या पाणिनीचे प्राण एका सिंहाने हरण केले, वेदांची मीमांसा लिहिणाऱ्या जैमिनि मुनीला एका उन्मत्त झालेल्या हत्तीने चिरडून टाकले, छन्दज्ञानाचा खजिना असलेल्या पिङ्गलाला समुद्रकिनाऱ्यावरील मगरीने मारून टाकले. अज्ञानात बुडलेल्या चवताळलेल्या रानटी प्राण्यांना सद्गुणांचा काय अर्थ कळणार आहे?

सिंहाने, प्रिय प्राण पाणिनि मुनींचे घेतले या जगी
मीमांसा करता मुनी चिरडला हत्तीनं तो जैमिनी ।
छंदांचे करतेहि पिंगलमुनी नक्रे जिवे मारले
अज्ञानी अतिकृद्ध जंगलमृगा सद्गूण का खायचे ॥ – शार्दूलविक्रीडित

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२०१०१५

७६१ १६-१०-२०२०
स्थाणुरयं भारहार: किलाभूदधीत्य वेदं न विजानाति योऽर्थम्।
योऽर्थज्ञ इत्सकलं भद्रमश्नुते नाकमेति ज्ञानविधूतपाप्मा ॥
-यास्काचार्य- निरुक्त

यः वेदम् अधीत्य अर्थम् न विजानाति अयम् भारहार: स्थाणुः किल अभूत्। यः अर्थज्ञः इत्सकलम भद्रम् अश्नुते, ज्ञानविधूतपाप्मा नाकम् एति।

One who after steadying the Veda, does not understand its true meaning (of the contents), this person has become indeed like a load carrying pillar. One who has understood the essence of contents and driven away all his sins with this realisation, enjoys everything auspicious in this world and ascends to heaven.

यः, भारहार:, स्थाणुः, अर्थज्ञः, ज्ञानविधूतपाप्मा & अयम्- all पु. लिं. प्र. वि. ए. व. of यद्-who, भारहार- load-bearing, porter- भार- load, burden, weight, भारम् हरति इति- भारहार:- उपपद तत्पुरुष स., स्थाणु- pillar, post, platform अर्थज्ञः- one who has understood the meaning, knowledgeable- अर्थ- meaning, purpose, gain- अर्थम् जानाति इति- अर्थज्ञः- उपपद तत्पुरुष स., ज्ञानविधूतपाप्मा- one whose sins have been driven away by the knowledge (realisation)- ज्ञान- knowledge, realisation, विधूत- dispelled, waved, removed- क. भू. धा. वि. of वि+ धू- (धू- ६ प. प. & १, ५, ९ & १० उ. प.-धुवति, धवति-ते, धूनोति- धुनुते, धुनोति- धुनीते & धूनयति-ते)- to shake, remove, destroy), पाप्मा- पु. लिं. प्र. वि. ए. व. of पाप्मन्- sin, crime- विधूतः पाप्मा- विधूतपाप्मा- समा. प्रादि तत्पुरुष स. & ज्ञानेन विधूतपाप्मा- ज्ञानविधूतपाप्मा- तृ. तत्पुरुष स. & इदम्- he, this, वेदम्, अर्थम्, नाकम्, इत्सकलम् & भद्रम् – all in पु. लिं. द्वि. वि. ए. व. of वेद- scared knowledge, scripture, अर्थ- meaning, purpose, नाक- heaven, इत्सकल- here every thing, इतस्- (इतः)- hence, from here, in this world, सकल- adjctv- entire, all, full & भद्र- good, auspicious, अधीत्य- after steadying, reading- पू. का. वा. ल्यबन्त धा. सा. अव्यय of अधि+ इ- (इ- एति २ ग. प. प. to go), न- no, not, विजानाति, अश्नुते & एति- all वर्त. तृ.पु. ए. व. of वि+ ज्ञा- (ज्ञा- जानाति- जानीते ९ ग. उ. प. to know, understand), अश्- ५ ग. आ. प. to enjoy, get, experience & इ- २ ग. प. प. to go, to come to, किल- अव्यय- indeed, certainly, अभूत्- अनद्यतन भूत. तृ. पु. ए. व. of भू-भवति १ ग. प. प. to be, to happen, exist,

ज्या माणसाने वेदांचा अभ्यास करूनही त्यांचा खरा अर्थ समजून घेतला नसेल तो खरे तर शिरावर भार घेऊन उभा असलेल्या खांबासारखा असतो. जो वेदांचा सगळा अर्थ समजून घेतो तो आपल्या ज्ञानाने पापांना धुवून टाकतो आणि स्वर्गात जातो.


७६२ १७-१०-२०२०
अथवाभिनिविष्टबुद्धिषु व्रजति व्यर्थकतां सुभाषितम्।
रविरागिषु शीतरोचिषः करजालं कमलाकरेष्विव ॥

अथवा, शीतरोचिषः करजालम् रविरागिषु कमलाकरेषु इव, अभिनिविष्टबुद्धिषु सुभाषितम् व्यर्थकताम् व्रजति।

Perhaps, like cool beams of moon light to sunshine -loving lotus-ponds, good advice (well-said quote- सुभाषितम्) goes useless (waste) for those who have obstinate or determined mind.

अथवा- अव्यय- perhaps, or, शीतरोचिषः- न. लिं. ष. वि. ए. व. of शीतरोचिस्- moonlight,- शीत- adjctv- cool, cold, रोचिस्-न. लिं- light- शीतम् रोचिः- विशेषणपूर्वपद कर्मधारय स.- शीतरुच्- पु. लिं.- moon, करजालम्- stream of light- कर- a ray of light, जालम्- net, web- कराणाम् जालम्- करजालम्- ष. तत्पुरुष स., रविरागिषु, कमलाकरेषु & अभिनिविष्टबुद्धिषु- all in पु. लिं. स. वि. ब. व. of रविरागिन्- one who is passionately fond of Sun- रविः – पु. लि.- Sun, रागिन्- passionately fond of, desirous of- रवेः रागी यः सः -रविरागिन्- बहुव्रीही स., कमलाकर- lotus-pond- कमलम्- lotus, आकर- source, mine- कमलानाम् आकरः – कमलाकरः – ष. तत्पुरुष स., अभिनिविष्टबुद्धिः- obstinate or determined mind- अभिनिविष्ट- obstinate, determined, resolute- क. भू. धा. वि. of अभि+ नि+ विश्- (विश्- विशति ६ ग. प. प. to enter, sit, go), बुद्धि- स्त्री. लिं.- mind thinking- अभिनिविष्टा बुद्धिः यस्य सः- अभिनिविष्टबुद्धिः, इव- अव्यय-like, सुभाषितम्- sane advice, well-said quote- न. लि. प्र. वि. ए. व.- सु- अव्यय- prefix implies: good, well, very, भाषित- saying, that is said- क. भू. धा. वि. of भाष्-भाषते १ ग. आ. प. to speak, say, व्यर्थकताम्- स्त्री. लि. द्वि. वि. ए. व. of व्यर्थकता- uselessness, meaningless -व्यर्थ- useless, waste, meaninglessness, व्रजति- वर्त. तृ. पु. ए. व. of व्रज्- १ ग. प. प. to go, follow

ज्याला सूर्याच्या प्रकाशाचे प्रेम आहे अशा कमळाच्या तलावाला चंद्राचे थंड किरण काही कामाचे वाटत नाहीत कदाचित त्याचप्रमाणे हटवादी बुद्धीच्या माणसाला सुभाषिते व्यर्थ वाटतात.

७६३ १८-१०-२०२०
अहमेव गुरुः सुदारुणानामिति हालाहल मा स्म तात दृप्यः।
ननु सन्ति भवादृशानि भूयो भुवनेस्मिन् वचनानि दुर्जनानाम् ॥

हालाहल, ‘अहम् एव गुरुः सुदारुणानाम्’ इति मा स्म दृप्यः। तात, भवादृशानि, दुर्जनानाम् वचनानि, अस्मिन् भुवने ननु भूयः सन्ति।

Oh Deadly Poison, do not get proud thinking thus ‘I alone, am great among all very violent beings’. My friend, surely, there exist in abundant talks of wicked people in this world like those matching your honour!

हालाहल- deadly poison, तात- Dear, My friend- both पु/न. लिं. सं. वि. ए. व., अहम्, गुरुः, भूयः & दृप्यः- all in प्र. वि. ए. व. -of अस्मद्- I, we, गुरु- adjctv- great, important, mighty, भूयस्- adjctv- abundant, many, very much & दृप्यः- one who is proud, arrogant- कर्मणि वि. धा. सा. वि. of दृप्- दृप्यति ४ ग. प. प. to be proud, arrogant, सुदारुणानाम् & दुर्जनानाम्- both पु. लिं. ष. वि. ब. व. of सुदारुण- very ruthless or violent- सु- अव्यय- prefix implies, good, very much, great & दुर्जन- wicked person- दुष्टः जनः – समा. प्रादि तत्पुरुष स., भवादृशानि & वचनानि- न. लिं. प्र. वि. ब. व. of भवादृशम्- adjctv- like your honour & वचनम्- saying, talk, भुवने- न. लिं. स. वि. ए. व. of भुवन-world, earth, अस्मिन्- in this- पु/न. लिं. स. वि. ए. व. of इदम्- this, सन्ति- वर्त. तृ. पु. ब. व. of अस्- २ ग. प. प. to be, to exist, एव-just, only, ननु- certainly, surely, इति- particle used to mark the conclusion- thus, like & मा स्म- particles used to imply prohibition- do not, let not, lestlest- all अव्यव अरे हालाहला (विषा), मीच सर्वात दारुण (भयानक) आहे म्हणून गर्व बाळगू नकोस, अरे बाबा, दुष्टांची तुझ्यासारखीच विखारी अशी पुष्कळ वचने या जगात नक्कीच आहेत.

७६४ १९-१०-२०२०
आशा हि लोहरज्जुभ्यः विषमा विपुला दृढा।
कालेन क्षीयते लोहं तृष्णा तु परिवर्धते ll
-योगवासिष्ठ ६. ९१. ६

लोहरज्जुभ्यः आशा हि विषमा विपुला दृढा (भवति)। लोहम् कालेन क्षीयते। तृष्णा तु (कालेन) परिवर्धते।

Compared to steel ropes, desire is rugged (very strong), profound and unswerving. Over the period, the steel gets corroded, whereas the desire keeps growing.

लोहरज्जुभ्यः- स्त्री. लिं. पं. वि. ब. व. of लोहरज्जु- लोह- steel, metal in general, रज्जु- rope, cord, – लोहस्य रज्जुः- लोहरज्जुः -ष. तत्पुरुष स., आशा- expectation, desire, wish, विषमा- rugged, very strong, unusual, odd, विपुला- profound, large, spacious, दृढा- firm, solid, unswerving & तृष्णा- thirst, hunger, desire- all in स्त्री. लिं. प्र. वि. ए. व., हि- अव्यय- surely, truly, लोहम्- steel- न. लिं. प्र. वि. ए. व., कालेन- पु. लिं. तृ. वि. ए. व. of काल- time, period, क्षीयते- gets reduced- प्रयोजक तृ. पु. ए. व. of क्षि- क्षयति १ ग. प. प. to decay, wane, ruin, diminish & परिवर्धते- वर्त. तृ. पु. ए. व. of परि+ वृध्- (वृध्- वर्धते १ ग. आ. प. to increase, grow), तु- अव्यय- but, on the other hand

अभिलाशा ही लोखंडाच्या दोरखंडापेक्षाही घट्ट, विपुल आणि दृढ असते. काही काळानंतर लोखंड गंजून क्षीण होते, पण माणसाच्या मनातला हव्यास मात्र वाढतच जातो.

लोहदोराहुनी हाव सशक्त घट्ट सुदृढ ।
गंजुनी क्षरते लोह हाव वाढत जातसे ॥ मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२०१०१९

७६५ २०-१०-२०२०
उदारचरितः त्यागी याचितः कृपणोSधिकः।
एको धनं ततः प्राणान् अन्यः प्राणांस्ततो धनम् ॥

त्यागी याचितः उदारचरितः (भवति), कृपणः (त्यागिनः) अधिकः (उदारचरितः अस्ति)। एकः धनम् ततः प्राणान् (त्यजति), अन्यः प्राणान् ततः धनम् (त्यजति)।

When someone solicits (asks, beggs), a man with giving nature (a brave man ) is generous (philanthropic). But a miser is bit more than him. The former gives his wealth initially and then gives up his life (if need be), (but) the other will part with his life first (protecting his wealth) and give up his wealth later (eventually).

त्यागी (त्यागिन्)- adjctv- brave, generous, one who is ever ready to give, याचितः- one who is asked from- क. भू. धा. वि. of याच्- याचते-१ ग. आ. प. to beg, solicit, request, उदारचरितः- one who is generous- उदार- generous, liberal, चरित- behaviour, conduct- क. भू. धा. वि. of चर्-चरति १ ग. प. प. to walk, practice, observe- उदारम् चरितम् यस्य सः – बहुव्रीही स., कृपणः- adjctv- mean, miser, अधिकः- one who is more, extra, एकः- one, single & अन्यः- other, another- all in पु. लिं. प्र. वि. ए. व., धनम्- न. लिं. द्वि. वि. ए. व.- धन- wealth, money, प्राणान्- पु. लिं. द्वि. वि. ब. व. of प्राण- life, breath of life- (usually in plural), ततः- (ततस्)- अव्यय- then, thereupon, thence

उदार वृत्तीचे लोक याचकाला दान देणारे असतातच, पण चिक्कू लोक त्यांच्याहून अधिक दानशूर असतात. पहिला आधी द्रव्य देतो आणि नंतर प्राण सोडतो, तर दुसरा आधी आपले धन सांभाळण्यासाठी जीव देतो आणि नंतर ते धनही देतो (ते तर जातेच).

७६६ २१-१०-२०२०
न दुर्जनः सज्जनतामुपैति बहुप्रकारैरपि सेव्यमानः।
भूयोऽपि सिक्तः पयसा घृतेन न निम्बवृक्षो मधुरत्वमेति॥

दुर्जनः बहुप्रकारैः सेव्यमानः अपि सज्जनताम् न उपैति। निम्बवृक्षः पयसा घृतेन भूयः सिक्तः अपि मधुरत्वम् न एति।

A wicked person, even after persuading or tending in various ways, does not acquires noble quality (good behaviour). A Neem tree, even if tended constantly by sprinkling milk and ghee does acquires sweetness- (does not loose its bitterness)

दुर्जन- wicked person- दुष्टः जनः- समा. प्रादि. तत्पुरुष स., सेव्यमानः- one who is being pursued, attended upon, honoured- प्रयोजक वर्त. का. वा. धा. सा. वि. of सेव्-सेव्यते- (सेव्-सेवते १ ग. आ. प. to serve pursue), निम्बवृक्षः- Neem tree- निम्ब- Neem, वृक्षः- tree- निम्बस्य वृक्षः- ष. तत्पुरुष स. & सिक्तः watered, sprinkled- क. भू. धा. वि. of सिच्- सिंचति-ते ६ ग. उ. प. to water, sprinkle- all in पु. लि. प्र. वि. ए. व., भूयः (भूयस्)- अव्यय- repeatedly, frequently, often, बहुप्रकारैः- तृ. वि. ब. व. of बहुप्रकार- many ways, various manner- बहु- adjctv- many, multi, various, प्रकार- manner, way, fashion- समा. प्रादि. तत्पुरुष स., अपि- अव्यय- also, even, सज्जनताम्- स्त्री. लिं. द्वि. वि. ए. व. of सज्जनता- good behaviour, noble qualities- सत्- good, noble, जन-person- सत् जनः- सज्जनः- समा. प्रादि. तत्पुरुष स.- ता suffix implies quality, न-no, not, उपैति & एति- gets, acquires- वर्त. तृ. पु. ए. व. of उप+ इ- to acquire, reach & इ- to go – २ ग. प. प., पयसा & घृतेन- न. लिं. तृ. वि. ए. व. of पयस् – milk & घृतम्- ghee, clarified butter, मधुरत्वम्- न. लिं. द्वि. वि. ए. व. of मधुरत्व- pleasing taste, sweetness- मधुर- adjctv- sweet, pleasing, pleasant- त्व- suffix implies: quality, nature

दुष्ट माणसाला कितीही प्रकारे समजावले तरी त्याच्यात सज्जनपणा येत नाही. कडुनिंबाच्या झाडावर दूध आणि तूप शिंपडले तरी त्यात गोडवा येत नाही. “कडू कारले तपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच” किंवा “कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच” अशा म्हणी आहेत.

नरेंद्र गोळे
दुष्टा कितीही जरि आर्जवीले
त्याच्यात ना सज्जनता कधी ये ।
शिंपून दूधा व तुपानंही त्या निंबास गोडी न कधीच येई ॥ – इंद्रवज्रा

७६७ २२-१०-२०२०
दुर्जनाचरितं मार्गं प्रमाणं कुर्वते खलाः।
विश्वस्तान् हिंसितुं द्रौणिरुलूकमकरोद् गुरुम् ॥

खलाः दुर्जनाचरितम् मार्गम् प्रमाणम् कुर्वते। द्रौणिः विश्वस्तान् हिंसितुम् उलूकम् गुरुम् अकरोद्।

Wicked people follow the ways that have been practiced by cruel people. To kill innocent (sleeping five sons Pandavas) Ashwathama chose an owl as his Guru- (He seems to have seen an owl stealthily devouring young ones of crows at night)

खलाः- पु. लिं. प्र. वि. ब. व. of खल- wicked person, दुर्जनाचरितम्, मार्गम्, प्रमाणम्, उलूकम् & गुरुम्- all in द्वि. वि. ए. व. of दुर्जनाचरित- one that is followed by wicked people- दुर्जन- wicked people- दुष्टः जनः- समा. प्रादि. तत्पुरुष स.- आचरित- observed, followed- क. भू. धा. वि. of आ+चर्- (चर्- चरति १ ग. प. प. to walk, go about- दुर्जनेन आचरितम्- दुर्जनाचरितम्- तृ. तत्पुरुष स., मार्ग (न. लिं)- way, method, course, manner, प्रमाण- standard, evidence, proof, testimony, उलूक (पु. लिं.)- owl, गुरु (पु. लिं.)- teacher, advisor, कुर्वते- वर्त. आ. प. तृ. पु. ब. व. of कृ- करोति-कुरुते ८ ग. उ. प. to make, do, द्रौणिः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of द्रौणि- Ashwathama- son of द्रोण (द्रोणाचार्य), विश्वस्तान्- पु. लिं. द्वि. वि. ब. व. of विश्वस्त- relied on, believed in- क. भू. धा. वि. of विश्वस्- १ ग. प. प. to believe, trust, हिंसितुम्- to harm, torture- पू. का. वा. हेत्वार्थ तुमन्त धा. सा. अव्यय of हिंस्-१, ७ प. प.& १० उ. प.- हिंसति, हिनस्ति, हिंसयति-ते- to strike, hit, kill, injure, hurt, अकरोद्- अनद्यतन भूत प. प. तृ. पु. ए. व. of कृ-८ ग. to do,

दुष्ट लोक क्रूर लोकांचा मार्ग अनुसरतात. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा याने घुबडाला गुरु मानले आणि (ज्याप्रमाणे घुबड रात्रीच्या अंधारात दुसऱ्या पक्ष्यांच्या पिलांना खाते त्याप्रमाणे रात्री चोरासारखे लपतछपत जाऊन) पांडवांच्या झोपलेल्या निरागस मुलांना ठार मारले.

७६८ २३-१०-२०२०
निष्णातोsपि च वेदान्ते साधुत्वं नैति दुर्जनः।
चिरं जलनिधौ मग्नो मैनाक इव मार्दवम् ॥
पाठभेद : साधुत्वम्–वैराग्यम्

मैनाकः चिरम् जलनिधौ मग्नः (अपि) मार्दवम् (न एति) इव दुर्जनः वेदान्ते निष्णातः अपि च साधुत्वम् (वैराग्यम्) न एति।

Like a Mainak- mountain, which for long, submerged in the ocean, will not get any softness, a wicked person specialised in Vedanta will not get noble qualities- (will not get over the worldly desires or passion)

मैनाकः- name of a mountain- said to be son of Himalaya & Mena, मग्नः- submerged, immersed, sunk- क. भू. धा. वि. of मस्ज्- मज्जति ६ प. प. to sink, plunge, bathe, दुर्जनः – wicked person- दुष्टः जनः – समा. प्रादि तत्पुरुष स. & निष्णातः – adjctv- expert, conversant, well versed -(क. भू. धा. वि. of नि+ स्ना- to plunge deep into, to be perfect- स्नाति- २ ग. प. प. to bathe)- all in पु. लिं. प्र. वि. ए. व., चिरम्- अव्यय- for a long time, जलनिधौ & वेदान्ते- पु. लिं. स. वि. ए. व. of जलनिधि- sea, ocean- जल- water, निधि- treasury, storehouse, abode- जलनाम् निधिः – ष. तत्पुरुष स. & वेदान्त- (उपनिषद्)- which come at the end of Vedas- system of philosophy which teaches the ultimate aim and scope of Vedas, मार्दवम् & साधुत्वम्- द्वि. वि. ए. व. of मार्दव- softness, gentleness, mildness- मृदु- adjctv- soft, tender, delicate & साधुत्व- innocence, fitness, good behaviour – साधु- adjctv- good, fit, noble,- (वैराग्यम्- worldly desires or passion)- त्व suffix implies quality, nature, इव- अव्यय- like, similar to, अपि- अव्यय- also, even, च- and, न- no, not, एति- वर्त. तृ. पु. ए. व. of इ-२ ग. प. प. to go, to come to, become

मैनाक पर्वत समुद्रामध्ये बुडून राहिला असला तरी तो मऊ होणार नाही, त्याचप्रमाणे दुष्ट माणूस वेदांतात निष्णात झाला तरी तो साधू (किंवा संन्यासी) होत नाही.

७६९ २४-१०-२०२०
परवित्तजिहीर्षया प्रवृत्तः पिशुनः तु स्वयमेव नाशमेति।
सुलभः शलभस्य किं न दाहः पृथुदीपग्रसनाय जृम्भितस्य ॥

परवित्तजिहीर्षया प्रवृत्तः पिशुनः स्वयम् एव तु नाशम् एति। पृथुदीपग्रसनाय जृम्भितस्य शलभस्य दाहः किम् न सुलभः?

A wicked person, who is bent upon grabbing the wealth of others gets himself destroyed. Isn’t a moth which opened its mouth wide for swallowing a large lamp got burnt itself easily?

परवित्तजिहीर्षया- स्त्री. लिं. तृ. वि. ए. व. of परवित्तजिहीर्षा- desire for grabbing wealth of others- पर- other, another, वित्त- wealth, जिहीर्षा- desire to grab, swallow- परस्य वित्तम्- परवित्तम् & परवित्तस्य जिहीर्षा- परवित्तजिहीर्षा- both ष. तत्पुरुष स., प्रवृत्तः- occupied with, inclined, engaged in, – क. भू. धा. वि. of प्र+ वृत्- (वृत्- वर्तते १ ग. आ. प. to be, to exist), पिशुनः- wicked, cruel, vile, दाहः -getting burnt, destruction & सुलभः- easy, effortless- सुखेन लभते इति- उपपद तत्पुरुष स.- all in पु. लिं. प्र. वि. ए. व., नाशम्- द्वि. वि. ए. व. of नाश- destruction, end- (नश्- नश्यति ४ ग. प. प. to be lost, vanish, destroyed), एति- वर्त. तृ. पु. ए. व. of इ- २ ग. प. प. to go, to come to, become, पृथुदीपग्रसनाय- पु/न. लिं. च. वि. ए. व. of पृथुदीपग्रसन- swallowing of a large lamp- पृथु- adjctv- large, big, दीप- lamp- ग्रसन- swallowing, devouring- (ग्रस्- ग्रसते १ ग. आ. प. to swallow, grab, devour- पृथुः दीपः- पृथुदीपः – समा. प्रादि तत्पुरुष स. & पृथुदीपस्य ग्रसनम् -ष. तत्पुरुष स., जृम्भितस्य शलभस्य- पु. लिं. ष. वि. ए. व. of जृम्भित- opened mouth- क. भू. धा. वि. of जृम्भ् (जृभ्)- जृम्भते- जृभते- १ ग. आ. प.- to yawn, open the mouth wide, शलभ- moth, locust, स्वयम्- of its own, oneself, एव- just, only, तु- but, on the other hand- all अव्यय, किम् न- अव्यय- a particle of interrogation- isn’t it, doesn’t it.

परक्याच्या धनाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारा स्वतःच नाश पावतो. मोठ्या दिव्याला गिळंकृत करण्यासाठी जबडा उघडून त्यावर झडप घालणाऱा किडा (पतंग) किती सहजपणे जळून खाक होतो ना?

७७० २५-१०-२०२०
मनो हि जगतां कर्तृ मनो हि पुरुषः परः ।
मनःकृतं कृतं लोके न शरीरकृतं कृतम् ॥
योगवासिष्ठ- ३.८९.१

मनः हि जगताम् कर्तृ (अस्ति)। मनः हि पुरुषः परः (भवति)। मनःकृतम् (हि) कृतम् लोके (भवति)। शरीरकृतम् न कृतम् (अस्ति)।

Mind alone is the creator of these (three) worlds. Mind certainly is the unfathomable Supreme Being. Creation of the mind alone is the real creation. Physically created thing is really no creation at all.

मनः, कर्तृ, पुरुषः, परः, कृतम्, मनःकृतम् & शरीरकृतम्- all in प्र. वि. ए. व. of मनस्- न. लिं.- mind, intelligence, perception, wish, conscience, कर्तृ- न. लिं.- one who creates, makes, performs, पुरुष- पु. लिं.- a man, functionary, Supreme Being, परः- पु. लिं.- ultimate or final beatitude, कृतम्- न. लिं.- done, created- कृत- क. भू. धा. वि. of कृ- करोति-कुरुते ८ ग. उ. प. to do, make, create, मनःकृतम्- न. लिं.- done by mind, conscience- मनसा कृतम् & शरीरकृतम्- न. लिं.- done by body, physically done- शरीरेण कृतम्- both – तृ. तत्पुरुष स., जगताम्- न. लिं. ष. वि. ब. व. of जगत्- world, लोके- पु/न. लिं. स. वि. ए. व. of लोक- world, हि- अव्यय- surely, indeed, न-no, not

मन हाच या जगातला कर्ता आहे, मन हाच परम पुरुष आहे, मनाने केलेली कृती हीच खरी कृति, शरीराने केलेल्या कृतीला अर्थ नाही.

नरेंद्र गोळे
जगातला पुरुषार्थ घडवी मन नेहमी । मनाने होतसे कार्य शरीराने न ते कधी

७७१ २६-१०-२०२०
यथा हि मलिनैः वस्त्रैः यत्र कुत्रोपविश्यते।
वृत्ततः चलितोऽप्येवं शेषं वृत्तं न रक्षति॥

( मनुष्यः) मलिनैः वस्त्रैः (युतः) यथा हि यत्र कुत्र उपविश्यते (तथा), वृत्ततः चलितः अपि एवम् शेषम् वृत्तम् न रक्षति।

As the one, who is in dirty clothes, sits any where and every where, the one who has once deviated from the path of proper behaviour, does not even attempts to protect his balance credentials.

मलिनैः & वस्त्रैः- न. लिं. तृ. वि. ब. व. of मलिन- adjctv- dirty, soiled- (मल- dirt, filth, dust- म्लै-१ ग. प. प. to be soiled, dirty) & वस्त्र- cloth, यथा- अव्यय- as, in which way, how, हि- अव्यय- indeed, surely, यत्र & कुत्र- where, in which place or case- both अव्यय, उपविश्यते- gets settled, sits- कर्मणि प्रयोग तृ. पु. ए. व. of उप+ विश्- to sit down, to take a seat- (विश्- विशति ६ ग. प. प. to enter, go, enter into), वृत्ततः- from the character, behaviour, conduct- वृत्त- character, behaviour, conduct- क. भू. धा. वि. of वृत्- वर्तते- १ ग. आ. प. to be, to engage oneself, to behave- suffix of तस् (तः)- implies -from that’ ‘thence’, चलितः- fallen, deviated, moved- क. भू. धा. वि. of चल्- चलति-१ ग. प. प. to shake, go, move, अपि- अव्यय- even, also, एवम्- अव्यय- thus, in this manner, so, शेषम् & वृत्तम्- न. लिं. द्वि. वि. ए. व. of शेष- adjctv- balance, remaining- (शिष्- शेषति- to leave as balance, remainder & वृत्त- behaviour, न- no not रक्षति- saves, protects- वर्त. तृ. पु. ए. व. of रक्ष्- १ ग. प. प.

ज्याने घातलेले कपडे आधीच मळलेले आहेत असा माणूस इकडे तिकडे कुठेही बसतो ( त्याला आपले कपडे मळतील याची काळजी वाटत नाही.) त्याप्रमाणे योग्य मार्गावरून एकदा ढळलेला माणूस आपल्या इतर वर्तणुकीकडेही लक्ष देत नाही.

७७२ २७-१०-२०२०
यद् यदिष्टतरं तत्तद् देयं गुणवते किल।
अतः एव खलो दोषान् साधुभ्यः संप्रयच्छति ॥

यद् यद् इष्टतरम् तद् तद् गुणवते किल देयम् (भवति)। अतः एव खलः साधुभ्यः दोषान् संप्रयच्छति।

One would normally offer whichever things he likes for himself to the people he respects. Perhaps that is the very reason why a wicked person keeps showering noble people with blemishes (faults) (Here is a pun in use of word दोष, as wicked man has nothing to offer to others, except his blemishes)

यद्- which, since & तद्- that, since that- both अव्यय- यद् यद्- whichever & तद् तद्- precisely that, इष्टतरम् & देयम्- न. लि. प्र. वि. ए. व. of इष्टतर- preferred one, better option- इष्ट- loved, desired, liked- क. भू. धा. वि. of इष्- इच्छति- ६ ग. प. प. to wish, long for, choose- तर- suffix is indicative of comparative degree & देय- (also दातव्य & दानीय)- worth giving, to be offered- कर्मणि वि. धा. सा. वि of दा- १ ग. प. प. यच्छति to give, गुणवते- पु. लिं. च. वि. ए. व. of गुणवत्- a noble or knowledgeable person- गुण- quality, virtue- वत्- affix shows possession, किल- अव्यय- indeed, certainly, assuredly, अतः (अतस्)- अव्यय- from this, hence, अतः एव- for this very reason, खलः- wicked person- पु. लिं. प्र. वि. ए. व., साधुभ्यः- पु. लिं. च. वि. ब. व. of साधु- noble or virtuous person, दोषान्- – पु. लिं. द्वि. वि. ब. व. of दोष- fault, blemish, संप्रयच्छति- offers liberally, gives freely- वर्त. तृ. पु. ए. व. of सं+ प्र+ दा- (दा- १ ग. प. प. यच्छति to give)

माणसाला स्वतःला जे जे आवडते तेच तो दुसऱ्यांना देतो. म्हणूनच दुष्ट लोक सज्जनांना भरपूर दोषच देतात.

७७३ २८-१०-२०२०
वर्जनीयो मतिमता दुर्जनः सख्यवैरयोः।
श्वा भवत्युपघाताय लिहन्नपि दशन्नपि ॥
पाठभेद: भवत्युपघाताय–भवत्यपकाराय

मतिमता, दुर्जनः सख्यवैरयोः वर्जनीयः (भवति)। लिहन् अपि दशन् अपि श्वा उपघाताय (अपकाराय) भवति।

A wicked person should be avoided either for friendship or for enmity by an intelligent person. Either licking or biting of a dog, both cause harm.

मतिमता- by an intelligent or knowledgeable person -पु. लिं. तृ. वि. ए. व. of मतिमत्- मति- स्त्री. लिं- intellect, judgement, knowledge, thought- मत्- affix implies possession, दुर्जनः, वर्जनीयः, श्वा, लिहन् & दशन्- पु. लिं. प्र. वि. ए. व. of दुर्जन- wicked person- दुष्टः जनः – समा. प्रादि तत्पुरुष स., वर्जनीय- to be avoided, shun- (also वर्जितव्य & वर्ज्य)- कर्मणि वि. धा. सा. वि. of वृज्- वर्जति १ ग. प. प. to avoid, shun, श्वन्- dog, लिहत्- licking & दशत्- biting- both वर्त. का. वा. धा. सा. वि. of लिह्- लेढि २ ग. प. प. tolick & दश्- दशति- १ ग. प. प. to bite, सख्यवैरयोः- in friendship and enmity- न. लिं. स. वि. द्वि. व. of सख्यवैरम्- सख्यम् च वैरम् च- द्वंद्व स.- सख्य- friendship & वैर- enmity, अपि- अव्यय-even, also, उपघाताय- for striking, assault & अपकाराय- for harm- च. वि. ए. व. of उपघात- assault- प्रयोजक क. भू. धा. वि. of उप+हन्- घातयति- ते- (हन् -हन्ति २ ग. प. प. to kill, strike) & अपकार- harm, भवति- वर्त. तृ. पु. ए. व. of भू- १ ग. प. प. tine, to exist

शहाण्या माणसाने दुर्जनाशी सख्यही करू नये किंवा वैरही धरू नये. कुत्र्याचे चाटणे आणि चावा घेणे हे दोन्ही अपायकारकच असते.

नरेंद्र गोळे
दुर्जनाशी शहाण्याने
सख्य वा वैर ना धरू ।
चाटला चावला कुत्रा दोन्ही हानीस कारण ॥

७७४ २९-१०-२०२०
शिखी वार्यपि नादत्ते भूमेर्भुङ्क्ते बलादहिम्।
दौरात्म्यं तन्न जाने किं सर्पस्य शिखिनोऽथवा॥
योगवासिष्ठ-६.११८.१९

शिखी भूमेः वारि अपि न आदत्ते (तथापि) अहिम् बलाद् भुङ्क्ते। किम् तद् दौरात्म्यम् सर्पस्य अथवा शिखिनः (अहम्) न जाने।

The peacock does not take in even water from the surrounding area (it is just to stress its harmless nature), but eats up the (venomous) snake mercilessly. Whether this is because of cruelness of snake or that of peacock, I fail to understand.

शिखी & शिखिनः- पु. लिं. प्र & ष. वि. ए. व. of शिखिन्-a peacock, भूमेः- स्त्री. लिं. ष. वि. ए. व. of -भूमि- earth, soil, ground, वारि & अहिम्- both द्वि. वि. ए. व. of वारि- न. लिं.-water & अहि- पु. लिं.- snake, serpent, आदत्ते -takes in, receives, accepts & भुङ्क्ते- eats, devour- both वर्त. आ. प. तृ. पु. ए. व. of आ+ दा- (दा- ददाति- दत्ते ३ ग. उ. प. to give, grant) & भुज्- भुनक्ति-भुंक्ते ७ ग. उ. प. to eat, बलाद्- पं. वि. ए. व. of बलम्- strength, violence, force, सर्पस्य- – पु. लिं. ष. वि. ए. व. of सर्प- snake, serpent, किम्- used as particle of interrogation- ‘whether’, ‘is it?’, तद् – that, it & दौरात्म्यम्- cruelty, wickedness both in- न. लिं. प्र. वि. ए. व., जाने- वर्त. प्र. पु. ए. व. of ज्ञा- जनाति- जानीते-९ ग. उ. प. to know, understand, अपि- even, also, अथवा- or, instead, perhaps, & न- no, not- all अव्यय

मोर जमीनीवरचे पाणीसुद्धा घेत नाही, पण सापाला मात्र निष्ठुरपणे मारून खातो. तो साप दुष्ट असतो म्हणून की हा मोराचाच क्रूरपणा असतो हे माहीत नाही.

नरेंद्र गोळे
पाणीहि घे न भूमीचे, तो मोर सर्प खातसे ।
दुष्टता ह्यात सापाची, की मोराची कळेच ना ॥ – अनुष्टुप्‌


७७५ ३०-१०-२०२०
सर्पाणां च खलानां च सर्वेषां दुष्टचेतसाम्।
अभिप्राया न सिध्यन्ति तेनेदं वर्तते जगत्॥
पाठभेद -च सर्वेषां दुष्टचेतसाम्=च परद्रव्यापहारिणाम्

सर्पाणाम् च खलानाम् च सर्वेषाम् दुष्टचेतसाम् अभिप्रायाः न सिध्यन्ति। तेन इदम् जगत् वर्तते।

Plans or evil designs of snakes, wicked people as well as all those with crooked mind do not ultimately materialise. That is why this world is surviving.

सर्पाणाम्, खलानाम्, सर्वेषाम् & दुष्टचेतसाम्- all in- पु. लिं. ष. वि. ब. व. of सर्प- snake, serpent, खल- wicked person, सर्व- everyone, all & दुष्टचेतस्- one who has evil design, mind- दुष्ट- wicked, depraved, defiled- क. भू. धा. वि. of दुष्- दुष्यति ४ ग. प. प. to be bad, evil, चेतस्- न. लिं.- mind, consciousness, heart- दुष्टम् चेतः यस्य सः- दुष्टचेतस्- बहुव्रीही स., अभिप्रायाः- पु. लिं. प्र. वि. ब. व. of अभिप्राय- intention, object, aim, purpose, opinion, न- no, not, सिध्यन्ति- वर्त. तृ. पु. ब. व. of सिध्- सिध्यति ४ ग. प. प. to be accomplished, fulfilled, successful, इदम्- this, it & जगत्- world- both- न. लिं. प्र. वि. ए. व., तेन- by that, because of that- तृ. वि. ए. व. of तद्- that, it, वर्तते- is surviving, existing- वर्त. तृ. पु. ए. व. of वृत्-१ ग. आ. प. to be, to exist, to happen

साप, दुर्जन आणि दुष्ट बुद्धी असलेल्या, दुसऱ्यांचे द्रव्याचा अपहार करणाऱ्या अशा सर्व लोकांनी केलेले सगळे बेत अखेर साध्य होत नाहीत म्हणून हे जग अजून चालत आले आहे.

नरेंद्र गोळे
साप वा दुष्ट दोन्हींच्या सर्वची दुष्ट योजना । सिद्धीस जात नाहीत त्यामुळे जग चालते ॥

७७६ ३१-१०-२०२०
अवश्यं पितुराचारं पुत्रः समनुवर्तते ।
नहि केतकवृक्षस्य भवत्यामलकीफलं ॥

पुत्रः पितुः आचारम् अवश्यम् समनुवर्तते। केतकवृक्षस्य आमलकीफलम् नहि भवति।

Surely a son follows in every respect the behaviour or conduct of his father. A tree of Ketaki flowers will not bear Amala berries.

पुत्रः- son- पु. लिं. प्र. वि. ए. व., पितुः & केतकवृक्षस्य- पु. लिं. ष. वि. ए. व. of पितृ- father & केतकवृक्ष- tree of Ketaki flowers- केतकः- tree of Ketaki flowers, वृक्ष- tree- केतकस्य वृक्षः- केतकवृक्षः- ष. तत्पुरुष स., आचारम् & आमलकीफलम् both- पु. लिं. द्वि. वि. ए. व. of आचार- behaviour, conduct, practice & आमलकीफल- Amala berries- आमलकः (आमलकी)- Amala tree, फलम्-fruit- आमलकस्य फलम्- आमलकीफलम्- ष. तत्पुरुष स., अवश्यम्- अव्यय- certainly, surely, necessarily, समनुवर्तते – follows fully, conducts accordingly & भवति happens, bears- both वर्त. तृ. पु. ए. व. of सं+ अनु + वृत्- (वृत्- वर्तते १ ग. आ. प. to be, to exist, happen & भू- १ ग. प। प.- to be, to exist, happen, नहि- अव्यय- not at all, surely not

मुलगा साहजीकच आपल्या वडिलांच्या वागण्याचे तंतोतंत अनुकरण करतो. केवड्याच्या झाडाला कधी आवळ्याची फळे लागत नाहीत. खाण तशी माती असे म्हणतात, “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. माणसाचे गुणधर्म आनुवंशिक असतात असे या सुभाषितात सांगितले आहे. यालाही काही अपवाद असतातच.

नरेंद्र गोळे
अनुसरे वडीलांना स्वभावे पुत्र नेहमी । केवड्या आवळे काही स्वभावतः न लागती ॥

७७७ ०१-११-२०२०
कश्चिद् दुःखे वर्तमानः सुखस्य स्मर्तुमिच्छति।
कश्चिद् सुखे वर्तमानो दुःखस्य स्मर्तुमिच्छति ॥
-महाभारत १४.१२.७

दुःखे वर्तमानः कश्चिद् सुखस्य स्मर्तुम् इच्छति। सुखे वर्तमानः कश्चिद् दुःखस्य स्मर्तुम् इच्छति।

When one is in difficulties (unhappy), he wants to remember his happy days. When one is having pleasant time, he likes to recollect his difficult days. (These are the words of Shrikrishna to Yudhistir, who was grieving the deaths of his near and dear ones, after the great war)

दुःखे & सुखे- both in न. लि. स. वि. ए. व. and दुःखस्य & सुखस्य -both in न. लि. ष. वि. ए. व. of दुःख- sorrow, grief, unhappiness & सुख- joy, happiness, delightful time, वर्तमानः – present time, living in, existing, staying- वर्त. का. वा. धा. सा. वि. of वृत्- वर्तते १ ग. आ. प. to be to exist & कश्चिद्- (कः+चित्) -some one, one who, both in -पु. लि. प्र. वि. ए. व., स्मर्तुम्- to recollect, to remember- पू. का. वा. हेत्वार्थ तुमन्त धा. सा. अव्यय of स्मृ- स्मरति १ ग. प. प. to remember, to think of, to be aware of, इच्छति- वर्त. तृ. पु. ए. व. of इष्- ६ ग. प. प. to desire, wish, want

माणूस जेंव्हा दुःखीकष्टी असतो तेंव्हा त्याला सुखाच्या आठवणी हव्या वाटतात आणि तो जेंव्हा मजेत असतो तेंव्हा त्याला (उगाच) कष्टाच्या आठवणी काढायची इच्छा होते. असे महाभारतयुद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले.

७७८ ०२-११-२०२०
अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च।
वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या षड्जीवलोकस्य सुखानि राजन् ॥

महाभारत विदुरनीति

राजन्, अर्थागमः, नित्यम् अरोगिता च, भार्या प्रिया च प्रियवादिनी च, पुत्रः वश्यः च, विद्या अर्थकरी च, (एते) षड् जीवलोकस्य सुखानि (भवन्ति)।

Oh King, getting the money (by right means), having perpetual good health, loveable and sweet-talking wife, obedient son, educational qualification capable of earning money, these six are the pleasures of the living world.

राजन्-Oh King- पु. लिं. सं. वि. ए. व. of राजन्-Oh, अर्थागमः- availability (provision) of funds- अर्थ- money, purpose, aim, आगमः- arrival, acquisition- अर्थस्य आगमः- ष. तत्पुरुष स., पुत्रः- son, वश्यः- under control, obedient- adjctv- all in पु. लिं. प्र. वि. ए. व., अरोगिता- having good health, absence of diseases- अरोगित- adjctv- न रोगित- नञ्-तत्पुरुष स.- रोगित- sick, infirm, diseased, भार्या- wife, प्रिया- loving, darling, प्रियवादिनी- pleasant speaking- प्रियम् वदति या सा – प्रियवादिनी- बहुव्रीही स., विद्या- knowledge, education, skill & अर्थकरी- (अर्थकर)- capable of earning- अर्थम् कारयति इति- अर्थकर- उपपद तत्पुरुष स.- all in- स्त्री. लिं. प्र. वि. ए. व., च-and, जीवलोकस्य- पु/न. लिं. ष. वि. ए. व. of जीवलोक- mortal life, worldly living- जीव- life, living, existing, लोक- world- जीवितम् लोकम्- जीवलोकम्- विशेषणपूर्वपद कर्मधारय स., षड् (षट्) – six & सुखानि- pleasures, joys- both in- न. लिं. प्र. वि. ब. व., नित्यम्- अव्यय- always, everyday

अरे राजा, पैसे येणे (धनाची प्राप्ती), नेहमी निरोगी राहणे, आवडणारी (प्रिय) आणि गोड बोलणारी पत्नी, आज्ञाधारक मुलगा आणि उत्पन्न मिळवून देणारी विद्या ही या जगातली सहा सुखे आहेत.

७७९ ०३-११-२०२०
दिनमेकं शशी पूर्णः क्षीणस्तु बहुवासरान्।
सुखाद्दुःखं सुराणामप्यधिकं का कथा नॄणाम् ॥

शशी एकम् दिनम् पूर्णः (भवति), क्षीणः तु बहुवासरान् (अस्ति)। सुराणाम् अपि सुखाद् दुःखम् अधिकम् (विद्यते)। (तत्र) नॄणाम् का कथा (स्यात्)?

The Moon is full only for a day in a month, while he is partial for most of the other days. Even for Gods, there is more sorrow than joy, then what to tell about the humans

शशी, क्षीणः & पूर्णः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of शशिन्- the moon, क्षीण- waned, become lean, diminished- क. भू. धा. वि. of क्षि- क्षयति १ ग. प. प. to diminish, wane, become lean & पूर्ण- full, filled out, covered- क. भू. धा. वि. of पूर्- पूर्यते ४ ग. आ. प. to be full, to fill, to cover, surround, एकम्-one, single, दुःखम्- sorrow, hardship, trouble, अधिकम्- adjctv- more, excessive & दिनम्- day- all in- न. लिं. प्र. वि. ए. व., तु- अव्यय- but, on the other hand, बहुवासरान्- पु. लिं. द्वि. वि. ब. व. of बहुवासर- many days- बहु- adjctv- many, multi, वासर- day- बहुः वासरः- बहुवासरः -समा. प्रादि तत्पुरुष स., सुराणाम् & नॄणाम्- पु. लिं. ष. वि. ब. व. of सुर- a God & नॄ- man, human being, अपि- अव्यय- also, even, सुखाद्- न. लिं. पं. वि. ए. व. of सुख- joy, happiness, का- what & कथा- state of affairs, story, mention, account- both- स्त्री. लिं. प्र. वि. ए. व.

महिन्यातून फक्त पौर्णिमेच्या एका दिवशी चंद्राचे पूर्ण बिंब असते आणि इतर सर्व दिवस ते क्षीण झालेले दिसते म्हणजे देवालासुद्धा सुखापेक्षा दुःखच जास्त असते तर माणसांची काय कथा?

नरेंद्र गोळे
पौर्णिमा एकदा येते एरव्ही चंद्र क्षीण हो । दुःखे देवांसही भारी मानवा काय सोडती ॥ – अनुष्टुप्

७८० ०४-११-२०२०
श्लाघ्य: स एको भुवि मानवानां
स उत्तमः सत्पुरुषः स धन्यः।
यस्यार्थिनो वा शरणागता वा
नाशाभिभंगाद्विमुखा: प्रयान्ति ॥

यस्य अर्थिनः वा शरणागताः आशाभिभंगात् विमुखा: न प्रयान्ति, सः एकः मानवानाम् भुवि श्लाघ्य:, सः उत्तमः, सत्पुरुषः, सः धन्यः (अस्ति)।

When, people approach anyone, asking for something or for seeking refuse, are not turned away totally disappointmented (with loss of hope), he is the one praiseworthy among the people. He is the best one, a noble one and indeed a blessed one.

यस्य- whose- पु. लिं. ष. वि. ए. व. of यद्- who, अर्थिनः शरणागताः & विमुखा: – पु. लिं. प्र. वि. ब. व. of अर्थिन्- one who solicits, asks begs, शरणागत- one who seeks refuse, protection- शरण- refuse, protection, आगत- one who has come to- क. भू. धा. वि. of आ+ गम्-गच्छति १ ग. प. प. to come to, शरणार्थे आगतः यः सः- शरणागतः & विमुख- one who is turned away, declined- विगतः मुखात्- विमुखः- व्याधि. प्रादि तत्पुरुष स., आशाभिभंगात्- पं. वि. ए. व. of आशाभिभंग- loss of all hopes- आशा- desire, hope, अभि- अव्यव- prefix implies greatly, totally, भंग- destruction, loss, break – अभिभंग- total loss- आशायाः अभिभंगः- आशाभिभंगः – ष. तत्पुरुष स., प्रयान्ति- वर्त. तृ. पु. ब. व. of प्र+ या to set out, undergo- (या- याति २ ग. प. प. to go, move), सः (तद्)- he, एकः- one, alone, श्लाघ्य: – praiseworthy, respectable (also श्लाघितव्य & श्लाघनीय)- कर्मणि वि. धा. सा. वि. of श्लाघ्- श्लाघते १ आ. प. to praise, commend, उत्तमः- the best, excellent, सत्पुरुषः – noble or virtuous person- सत्- noble, virtuous, good, पुरुषः – person, man- सत् पुरुषः – समा. प्रदि. तत्पुरुष स. & धन्यः- adjctv- blessed or fortunate- all in – पु. लिं. प्र. वि. ए. व., मानवानाम्- among the men- पु. लिं. ष. वि. ब. व. of मानव- man, human, भुवि- स्त्री. लिं. तृ. वि. ए. व. of भू- earth, न-no, not, वा-or

ज्या माणसाकडे भिक्षा किंवा शरणागति मागायला गेलेला कोणीही विन्मुख किंवा निराश होत नाही असा माणूसच या जगातल्या सर्व माणसांमध्ये सर्वात उत्तम, प्रशंसनीय आणि धन्य असा सत्पुरुष असतो.

नरेंद्र गोळे
तो एक होतो बहु स्तूत्य लोकी
ज्या मागता काहि मिळे लगेच ।
जाई निराशून न याचताही वा आश्रयाला न मुके कुणीही ॥ – इंद्रवज्रा

७८१ ०५-११-२०२०
युधिष्ठिर महाबाहो शृणु धर्मभृतांवर।
नातप्ततपसो लोके प्राप्नुवन्ति महत्सुखम्।
सुखदुःखे हि पुरुषः पर्यायेणोपसेवते ॥
महाभारतम्-03-आरण्यकपर्व-260

महाबाहो, धर्मभृतांवर, युधिष्ठिर, शृणु (मे वचः), लोके अतप्ततपसः (कः अपि), महत्सुखम् न प्राप्नुवन्ति। पुरुषः सुखदुःखे पर्यायेण हि उपसेवते।

Oh mighty one and great among upholders of prescribed codes of conduct (Dharma), Yudhistir, listen, in this world, one who has not undergone suffering (done penance), does not get great happiness. Man experiences happiness and sorrow in a cyclic order one after the other.

महाबाहो- महान्- strong, long, बाहु- arm- महान्तौ बाहू यस्य सः- बहुव्रीही स.- long armed, powerful, धर्मभृतांवर- great among followers of religious codes of conduct- धर्म- prescribed codes of conduct, religion, भृत- upholder, follower- क. भू. धा. वि. of भृ- बिभर्ति- बिभृते- ३ ग. उ. प. to bear, support, uphold, वर- adjctv- best, finest, better than- धर्मम् बिभर्ति इति- धर्मभृत्- उपपद तत्पुरुष स.- धर्मभृताम् वरः यः सः – धर्मभृतांवरः- बहुव्रीही स. & युधिष्ठिर- Name – all in पु. लिं. सं. वि. ए. व., शृणु- आज्ञार्थ द्वि. पु. ए. व. of श्रु- शृणोति ५ ग. प. प. to listen hear, लोके- पु/न. लिं. स. वि. ए. व. of लोक- world, पुरुषः- man, human & अतप्ततपसः- one who has not under gone penance, suffering, distress- both- पु. लिं. प्र. वि. ए. व.- तप्त- one who practiced penance, distressed, heated- क. भू. धा. वि. of तप्- तपति १ ग. प. प. to blaze, suffer, under go penance- न तप्त- अतप्त- नञ् तत्पुरुष स., तपसः -न. लिं. प्र. वि. ए. व. of तपस्- न. लिं.-penance- अतप्तम् तपसः यस्मात् सः- बहुव्रीही स., महत्सुखम्- न. लिं. द्वि. वि. ए. व. of महत्सुख- great happiness- महत्-great, excessive, highest, सुख- joy, happiness- महत् सुखम्- समा. प्रादि तत्पुरुष स., न-no, not, प्राप्नुवन्ति- वर्त. तृ. पु. ब. व. of प्र+आप्- to achieve, experience- (आप्- आप्नोति ५ ग. प. प. to get), सुखदुःखे- न. लिं. स. वि. ए. व. of सुखदुःख- सुखम् च दुःखम् च- द्वंद्व स.- joy and sorrow, पर्यायेण- तृ. वि. ए. व. of पर्याय- regular recurrence, going or winding round, हि- अव्यय- surely, indeed, उपसेवते- वर्त. तृ. पु. ए. व. of उप+ सेव्- to follow, enjoy- (सेव् – सेवते १ ग. आ. प. to serve, to wait or attend upon)

अरे धर्मपालन करण्यात श्रेष्ठ अशा शक्तीशाली युधिष्ठिरा, ऐक, या जगात तप (श्रम) करून न तापलेल्या माणसाला मोठे सुख मिळत नाही. माणसाला सुख आणि दुःख या गोष्टी आलटून पालटून उपभोगायला मिळत असतात.

७८२ ०६-११-२०२०
भैषज्यमेतद् दुःखस्य यदेतद् नानुचिन्तयेत्।
चिन्त्यमानं न व्येति भूयश्चापि प्रवर्धते ॥

दुःखस्य एतद् भैषज्यम्, यद् एतद् न अनुचिन्तयेत्। चिन्त्यमानम् न व्येति। (तद्) भूयः च अपि प्रवर्धते।

(This is the advice given by Vidura to Dhritarashtra, who was mourning the loss of his sons after the great War)
For the sorrow, it is the best medicine, that one should not keep thinking about it. When one keeps recollecting it, it does not diminish, but even keeps growing more.

दुःखस्य- न. लिं. ष. वि. ए. व. of दुःख- sorrow, tragedy, एतद्- this & भैषज्यम्- medicine- both न. लिं. प्र. वि. ए. व., यद्-अव्यय- since, as, न- no, not, अनुचिन्तयेत्- प. प. विध्यर्थ तृ. पु. ए. व. of अनु+ चिन्त्- to recollect, to think over or about- (चिन्त्- चिन्तयति- ते १० ग. उ. प. to think), चिन्त्यमानम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of चिन्त्यमान- one which is being recollected, remembered- वर्त. का. वा. धा. सा. वि. of चिन्त्- to think, व्येति & प्रवर्धते- वर्त. तृ. पु. ए. व. of वि+ इ- to get spent, get vanished, disappear- (इ-एति २ ग. प. प. to go, to come to) & प्र+ वृध्- to get increased, expanded- (वृध्- वर्धते १ ग. आ. प. to grow, increase), भूयः (भूयस्)- अव्यव- more, extra, च- and, अपि- अव्यव- even, also

दुःखाचा विचार न करणे हेच त्याच्यावरील औषध आहे. त्याचा विचार करत राहण्यामुळे ते कमी तर होत नाहीच, उलट वाढते. असा उपदेश विदुराने युधिष्ठिराला केला.

७८३ ०७-११-२०२०
क्षीयन्ते सर्वदानानि यज्ञहोमबलिक्रियाः।
न क्षीयते पात्रदानमभयं सर्वदेहीनाम्॥

सर्वदेहीनाम्, सर्वदानानि (तथा) यज्ञहोमबलिक्रियाः क्षीयन्ते, (परन्तु) पात्रदानम् (तथा) अभयम् न क्षीयते।

{Meritorious gains or credits (पुण्यम्) earned through} All types of philanthropical deeds (charity) and all types of sacrificial offerings during Yajna-Yagas get diminished over the period. But the credit earned by helping any needy deserving and the mercy shown to (protection offered to) any living being does not ever get diminished.

सर्वदेहीनाम्- पु. लिं. ष. वि. ब. व. of सर्वदेहिन्- every living being- सर्व- every, देहिन्- living being- सर्वः देही- सर्वदेहिन्- समा. प्रादि तत्पुरुष स., सर्वदानानि- all kinds of charities- न. लिं. प्र. वि. ब. व. of सर्वदान- सर्व- all, every, entire, दान-charity, donation- सर्वम् दानम्- सर्वदानम्- समा. प्रादि तत्पुरुष स., यज्ञहोमबलिक्रियाः- all types of sacrificial offerings during Yajna-Yagas- स्त्री. लिं. प्र. वि. ब. व. of यज्ञहोमबलिक्रिया- यज्ञ- पु. लिं- sacrificial rite, an act of worship, होम- पु. लिं- consecrated fire for offerings to Gods, बलि- offering, oblation, क्रिया- स्त्री. लिं.- doing, action, activity- यज्ञः च होमः च बलिः च – यज्ञहोमबलिः- द्वंद्व स. & यज्ञहोमबलीनाम् क्रिया- यज्ञहोमबलिक्रिया- ष. तत्पुरुष स., क्षीयन्ते & क्षीयते- कर्मणि प्रयोग तृ. पु. ब. व. & ए. व. of क्षि- १, ५ & ९ ग. प. प.- क्षयति, क्षिणोति & क्षिणाति to diminish, reduce, decay, ruin, पात्रदानम्- charity done to deserving- पात्र- deserving, worthy, दानम्- donation, grant, charity- पात्रेभ्यः दानम्- पात्रदानम्- च. तत्पुरुष स.,अभयम्- removal of fear, protection from fear, security, safety- भय-fear, danger- न भयम्- अभयम्- नञ् तत्पुरुष स.- न. लिं. प्र. वि. ए. व., न- no, not,

दानधर्म, होमहवन, यज्ञ, बळी देणे वगैरे क्रियांमधून मिळालेल्या पुण्याचा क्षय होत जातो, पण पात्र (योग्य) माणसाला सहाय्य आणि अभय देण्यातून मिळालेले पुण्य कमी होत नाही. इतर प्रकारच्या कर्मकांडांपेक्षा असे चांगले काम करावे असे यात सांगायचे आहे.

७८४ ०८-११-२०२०
तृणोल्कया ज्ञायते जातरूपं वृत्तेन भद्रो व्यवहारेण साधुः।
शूरो भयेष्वर्थकृच्छ्रेषु धीरः कृच्छ्रेष्वापत्सु सुहृदश्चारयश्च ॥
-महाभारत- विदुरनीति- २५६

जातरूपम् तृणोल्कया ज्ञायते, भद्रः वृत्तेन (ज्ञायते), साधुः व्यवहारेण (ज्ञायते), शूरः भयेषु (ज्ञायते), अर्थकृच्छ्रेषु धीरः (ज्ञायते), कृच्छ्रेषु आपत्सु सुहृदः च अरयः च (ज्ञायन्ते)

With help of hay-torch gold gets identified (tested), by behaviour a good person is recognised, by dealing with a person his fitness is judged, heroism of a person is recognised during hazards, inner strength of a person is tested during financial crisis, and enemies and friends are identified during calamities and misfortunes.

जातरूपम्- न. लिं- Gold, भद्रः- desirable, friendly, good, साधुः- noble, fit, well-behaved, शूरः- brave, heroic, धीरः- strong- minded, resolute, courageous- all in पु. लिं. प्र. वि. ए. व., सुहृदः (सुहृद्)- friends, kind-hearts & अरयः (अरि)- enemies, adversaries- both पु. लिं. प्र. वि. ब. व., तृणोल्कया, वृत्तेन & व्यवहारेण- तृ. वि. ए. व. of तृणोल्का- a torch or fire made of hay- तृण- न. लिं.- grass, hay, उल्का- flame, torch, meteor- तृणस्य उल्का- ष. तत्पुरुष स., वृत्त- behaviour, character- क. भू. धा. वि. of वृत्- वर्तते १ ग. आ. प. to behave, to be & व्यवहार- business, occupation, dealing, भयेषु, कृच्छ्रेषु, अर्थकृच्छ्रेषु & आपत्सु- स. वि. ब. व. of भय- पु/न. लिं- fear, danger, hazard, कृच्छ्र- पु/न. लिं- difficulty, hardship, calamity, अर्थकृच्छ्र- financial hardship- अर्थ- wealth, money, purpose, अर्थस्य कृच्छ्रम्- ष. तत्पुरुष स. & आपत्- स्त्री. लिं.- calamity, misfortune, danger, ज्ञायते- gets identified, known, recognised- कर्मणि प्रयोग तृ. वि. ए. व. of ज्ञा- जानाति-जानीते ९ ग. उ. प. to know, understand, च- and

गवताच्या ज्वालांमधून (आगीत तापवल्याने) सोन्याची परीक्षा होते, सज्जन त्यांच्या वृत्तीवरून ओळखले जातात, भयंकर परिस्थितीत शूर कोण आहे ते समजते, पैशाची टंचाई असतांना खंबीर माणूस समजतो आणि कठीण काळामध्ये कोण आपला मित्र आहे आणि कोण शत्रू आहे याची पारख होते.

७८५ ०९-११-२०२०
इज्याध्ययनदानानि तपः सत्यं क्षमा दमः।
अलोभ इति मार्गोऽयं धर्मस्याष्टविधः स्मृतः॥अ॥
तत्रपूर्वश्चतुर्वर्गो दम्भार्थमपि सेवते।
उत्तरश्च चतुर्वर्गो नामहात्मसु तिष्ठति ॥ब॥
महाभारत-विदुरनीति २५६.३५.५७ &५८

इज्या-अध्ययन-दानानि, तपः, सत्यम्, क्षमा, दमः, अलोभ इति अयम् अष्टविधः धर्मस्य मार्गः स्मृतः (अस्ति)। तत्र पूर्वः चतुर्वर्गः दम्भार्थम् अपि सेवते। उत्तरः च चतुर्वर्गः न-अमहात्मसु तिष्ठति।

The way for practicing prescribed course of conduct (for religious life), comprising of eight different manner (way) is said to be, offering sacrifices in Yagas, study of holy scriptures, giving material help to needy, penance, truthfulness, forgiveness, self-control and absence of greediness. In that the former four categories are even used for showing off (for building up prestige) by some, but the later four are practiced (used by) only by really great people.

धर्मस्य- पु. लिं. ष. वि. ए. व. of धर्म- prescribed course of conduct, religion, इज्याध्ययनदानानि- न. लिं. प्र. वि. ए. व. of इज्याध्ययनदानम्- sacrifice, study (of scriptures) & donation- इज्या – स्त्री. लिं-sacrifice, अध्ययन- न. लिं.- study (of scriptures), दान- न. लिं- giving, granting- इज्या च अध्ययनम् च दानम् च- द्वंद्व स., तपः- पु. लिं- penance, suffering, सत्यम्- न. लि.- truth, क्षमा- स्त्री. लिं- forgiveness, patience, दमः- पु. लिं- self-control, firmness of mind, अलोभ- पु. लिं- absence of greediness- लोभ- greed, desire- न लोभः- नञ् तत्पुरुष स., इति- अव्यय- as follows, of this category or nature, अयम्- (इदम्)- this, अष्टविधः- पु. लिं-eight types- अष्टन्- eight, विधः- type, mode- विशेषणपूर्वपद कर्मधारय स., मार्गः- पु. लिं- way, approach, स्मृतः- prescribed, said- स्मृत- क. भू. धा. वि. of स्मृ- स्मरति- १ ग. प. प. to lay down, recall, remember, पूर्वः- earlier, former, चतुर्वर्गः- four categories- चतुर्- four, वर्गः- class, categories, items & उत्तरः- later one- all in- प्र. वि. ए. व., तत्र- अव्यय- there, in that place, दम्भार्थम्- for pride, arrogance, अपि- अव्यय- even, also, सेवते- serves, is used & तिष्ठति- stays, stands, applies- वर्त. तृ. पु. ए. व. of सेव्- १ ग. आ. प. to serve, attend upon & स्था- १ ग. प. प. to stand, stay, to be left, नामहात्मसु- पु. लि. स. वि. ब. व. of नामहात्मन्= महात्मन्= न + अमहात्मन्= great, magnanimous, distinguished- (double negative) – महत्- great, large, big, आत्मन्- soul, महान् आत्मा यस्य सः- महात्मन्- बहुव्रीही स.

यज्ञामध्ये बळी (त्याग), विद्यांचे अध्ययन, दानधर्म, तपश्चर्या, सत्य, क्षमा, स्वतःवर ताबा आणि लोभ नसणे हे धर्माचरणाचे आठ मार्ग (धर्मशास्त्रांमध्ये) सांगितले आहेत. त्यातले पहिले चार मार्ग कदाचित दाखवण्यासाठी (दांभिकपणे) केले जातात, पण उरलेले चार मार्ग महान लोकच आचरणात आणतात.

७८६ १०-११-२०२०
दारेषु किञ्चित् स्वजनेषु किञ्चित् गोप्यं वयस्येषु सुतेषु किञ्चित्।
युक्तं वा न युक्तमिदं विचिन्त्य वदेत् विपश्चिन् महतोsनुरोधात्॥

विपश्चित्, दारेषु किञ्चित्, स्वजनेषु किञ्चित्, वयस्येषु (किञ्चित्), सुतेषु किञ्चित् गोप्यम्, इदम् युक्तम् न वा युक्तम् (इति) विचिन्त्य, महतः अनुरोधात् वदेत्।

A wise man should after a thorough consideration of whether it is proper or not proper, with great caution, agree to reveal only little bit of things that need to be kept secret to his wife, relations, friends and sons.

विपश्चित्- learned, wise, intelligent- पु. लि. प्र. वि. ए. व. , दारेषु, स्वजनेषु, वयस्येषु & सुतेषु- all in स. वि. ब. व. of दारा- स्त्री. लिं.-wife, स्वजन- पु. लिं.- relation, own people- स्व- pronoun- one’s own, self, जन- person- स्वस्य जनः- ष. तत्पुरुष स., वयस्य- पु. लिं.- a friend, contemporary & सुत- पु. लिं.-son, किञ्चित् (किम्+ चित्)- a little, somewhat, गोप्यम्- न. लिं, द्वि. वि. ए. व. -of गोप्य- a secret, one that needs to be concealed, hidden- (also गोपनीय, गोपितव्य)- कर्मणि वि. धा. सा. वि. of गुप्- गोपयति-ते १० ग. प. प. to hide, conceal, इदम्- this, it & युक्तम्- proper, correct, fit- क. भू. धा. वि. of युज्- युनक्ति युंक्ते ७ ग. उ. प. to be fit, right, ready for- both न. लिं, प्र. वि. ए. व., न-no, not & वा- or- both अव्यय, विचिन्त्य- after a thorough thinking, analysis, reflection- कर्मणि वि. धा. सा. अव्यय of वि+ चिन्त्- चिन्तयति-ते १० ग. उ. प. to think, reflect, महतः -by great through- ष. वि. ए. व. of महत्- large, great, big- अनुरोधात्- पं. वि. ए. व. of अनुरोध- approval, compliance, regard, consideration- (अनु+ रुध्- to assent, agree to- रुध्- रुणद्धि- रुंद्धे ७ ग. उ. प. to oppose, obstruct), वदेत्- विध्यर्थ तृ. पु. ए. व. of वद्-वदति १ ग. प. प. to say, speak

शहाण्या माणसाने योग्य आणि अयोग्य यांचा सारासार विचार केल्यानंतर आणि खूप सावधगिरी बाळगूनच गोपनीय बाबींची किंचितशी माहिती आपल्या पत्नीला, मुलांना, वयस्क लोकांना किंवा इतर आप्तेष्टांना सांगावी. शक्यतो त्याने कुणालाही काहीच सांगू नये, संपूर्ण गुप्तताच बाळगावी.

नरेंद्र गोळे
योग्यायोग्याच्या करूनी विचारा
सांगावे थोडेच जे गोपनीय ।
पत्नी, मुलांना, स्वजनांस थोडे मित्रांस थोडेच, वा ना वदावे ॥ – उपजाती

७८७ ११-११-२०२०
विदग्धव्याहारैर्न जडमतिरानन्दति मना
गनालापज्ञानां न च वचनतः खेदमयते।
न विन्दत्यानन्दं जरठवृषभश्चन्दनरसै
रसौ पङ्कालेपैरपि विषादं न जुषते ॥

जडमतिः विदग्धव्याहारैः न आनन्दति, मनागनालापज्ञानाम् वचनतः न च खेदम् अयते। (यथा) असौ जरठवृषभः चन्दनरसैः आनन्दम् न विन्दति पङ्कालेपैः अपि विषादम् न जुषते।

The dull headed person does not enjoy the scholarly speech of an intellect nor he feels sad by the words of those who are ignorant of good conversation. The old bull does not feel happy by the application of sandal wood paste, nor does it feel sad when covered with coat of mud or slough.

जडमतिः- dull or stupid minded- जड- adjctv- dull, stupid, मति- स्त्री. लि.- mind, thinking, knowledge- जडा मतिः यस्य सः- बहुव्रीही स., असौ (अदस्)- that, it & जरठवृषभः- old bull- जरठ- adjctv- old, aged, infirm, वृषभ- bull, जरठः वृषभः- समा. प्रादि तत्पुरुष स. – all in पु. लिं. प्र. वि. ए. व., विदग्धव्याहारैः, चन्दनरसैः & पङ्कालेपैः- all in पु/न. लिं. तृ. वि. ब. व. of विदग्धव्याहार- scholarly speech- विदग्ध- learned, scholarly, cleverly- क. भू. धा. वि. of वि+ दह्- (दह्- दहति- १ ग. प. प. to burn), व्याहार- speech, words- विदग्धः व्याहारः – समा. प्रादि तत्पुरुष स., चन्दनरस- sandal paste- चन्दन- sandal, रस- sap, juice, flavour- चन्दनस्य रसः – ष. तत्पुरुष स. & पङ्कालेप- coat of mud or slough- पङ्क- पु/न.- mud, slough, आलेप- coat, cover- पङ्कस्य आलेपः- ष. तत्पुरुष स., न- no, not, आनन्दति, अयते, विन्दति & जुषते- all in वर्त. तृ. पु. ए. व. of आ+ नन्द्- to enjoy, feel happy- (नन्द्- नन्दति १ ग. प. प. to be glad, pleased), अय्- १ ग. आ. प. to go, prosper, thrive, विद्- विन्दति-ते ६ उ. प. to feel, get, find & जुष्-६ ग. आ. प. to undergo, suffer- (also means: to be pleased, to like, to take pleasure), मनागनालापज्ञानाम्- पु. लिं. ष. वि. ब. व. of मनागनालापज्ञ- one who is ignorant of good conversation, one who is good in incoherent speech, मन- (मनस्-न. लिं.)- mind, understanding, perception, अग- adjctv- unapproachable, unreachable, आलापः- speech, talking, conversation, मनसः अगनम् यद् तद्- मनागनम्- not understandable, incoherent- बहुव्रीही स.- मनागनः आलापः- मनागनालापः -समा. प्रादि तत्पुरुष स., ज्ञ- adjctv- knowing, wise, familiar with- मनागनालापे ज्ञः- मनागनालापज्ञः- स. तत्पुरुष स, वचनतः- by words of- वचन- word, talk, तः (तस्)- suffix implies, ‘from’, ‘by that’ न च खेदम्, आनन्दम् & विषादम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. of खेदः- pain, sorrow, distress, आनन्द- joy, happiness & विषाद- sorrow, sadness, अपि- अव्यय- even, also

मठ्ठ बुद्धीच्या माणसाला विद्वत्तापूर्ण व्याख्यान ऐकून काही आनंद होत नाही किंवा अडाणी लोकांची वायफळ बडबड ऐकून काही त्रासही होत नाही. म्हाताऱ्या बैलाला चंदनाचा लेप लावल्याने आनंद होत नाही किंवा चिखलाने माखला तरी त्याचे चांगले किंवा वाईट वाटत नाही. निर्बुद्ध लोकांना कशानेच काहीच फरक पडत नाही.

७८८ १२-११-२०२०
दन्तावलेन्द्रमभितो ननु दानलाभ
प्रत्याशया भ्रमर चारु करोषि गीतम्।
जानाति किं स तव गानरसं मदान्धो
दानार्थिनं प्रसभमस्यति कर्णवातैः ॥

सुभाषितकौस्तुभ-९

भ्रमर, (त्वम्) अभितः दन्तावलेन्द्रम् दानलाभप्रत्याशया ननु चारु गीतम् करोषि। किम् सः मदान्धः तव गानरसम् जानाति? प्रसभम् (सः) दानार्थिनम् (त्वाम्) कर्णवातैः अस्यति।

O bee, you sing nicely around the King of elephants, with an intention of getting in return ichor (the juice that exudes from its temples of an elephant when it is in rut.) But does that elephant, which is blind with intoxication, know what the essence of your music is? While you expect to get its ichor, it will quickly drive you away by flapping of its ears.
(Here use of word दान which also means ichor, the poet indirectly refers to people who try to please and seek favour from a hot-headed person who does not appreciate him and is likely to cast him away.)

भ्रमर- large black bee – पु. लिं. सं. वि. ए. व., दन्तावलेन्द्रम्, गानरसम् & दानार्थिनम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. दन्तावलेन्द्र- king of elephant- दन्तावल- an elephant- दन्तावलानाम् इन्द्रः- दन्तावलेन्द्र- ष. तत्पुरुष स., गानरस- essence of music, melody of the song- गान- song, रस- essence, elegance- गानस्य रसः- गानरसः- ष. तत्पुरुष स., & दानार्थिन्- seeker of grant or seeker of ichor- दानस्य अर्थिन्- ष. तत्पुरुष स., अभितः (अभितस्)- अव्यय- in the proximity of, near, before, ननु- अव्यय- surely, certainly, दानलाभप्रत्याशया- स्त्री. लिं. तृ. वि. ए. व. of दानलाभप्रत्याशा- दान- grant, gift- also means: ichor or juice that exudes from temples of an elephant (मद), लाभ- gain, प्रति-अव्यय- prefix implies towards, for, आशा- desire- दानस्य लाभः- दानलाभः & दानलाभस्य प्रत्याशा- दानलाभप्रत्याशा- both- ष. तत्पुरुष स., चारु- adjctv- pleasing, beautiful, गीतम् -न. लिं. द्वि. वि. ए. व. of गीत- song- क. भू. धा. वि. of गै- गायति- १ ग. प. प. to sing, करोषि- वर्त. द्वि. पु. ए. व. of कृ- करोति- कुरुते ८ ग. उ. प. to do, make, किम्- अव्यय- a particle of interrogation, सः & मदान्धः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of तद्- he & मदान्ध- blind with intoxication- मद- intoxication, rut, ichor, अन्ध- blind- मदेन अन्धः – तृ. तत्पुरुष स., तव- ष. वि. ए. व. of युष्मद्-you, जानाति & अस्यति- वर्त. तृ. पु. ए. व. of ज्ञा- जानाति- जानीते ९ ग. उ. प. to know, understand & अस्- ४ ग. प. प. to throw, cast off, give up, कर्णवातैः- पु. लिं. तृ. वि. ब. व. of कर्णवात- blow of air by ear- कर्ण- ear, वात- wind, blow of air- क. भू. धा. वि. of- वा-वाति- २ ग. प. प. to blow- कर्णेन कृतः वातः यद् तद- कर्णवातः -बहुव्रीही स., प्रसभम्- अव्यय- by force, violently

अरे भ्रमरा, तू मदमस्त झालेल्या हत्तींच्या राजाच्या कपाळामधून निघणाऱ्या श्रावाच्या (दानाच्या) आशेने गोड गाणे गुणगुणत सभोवती फिरत आहेस, पण त्या मस्तवालाला तुझ्या गाण्याचा रस समजत आहे का? तो तर आपल्या कानाच्या वाऱ्याने तुला उडवून टाकत आहे. दानाच्या आशेने लघटपणा करणाऱ्यांना उद्धटपणे दूर केले जाऊ शकते.

७८९ १३-११-२०२०
नासौ युष्मद्विहृतिसमयो मानसं यात हंसाः
जृम्भन्तेऽमी ननु जलधराश्छादिताशास्तमोभिः ।
पुष्णन्त्येतान् कटुविरटतस्ते बकानेव नास्मिन्
काले दीप्त्यै कलरवकलाकौशलं पेशलं वः ॥

सुभाषितकौस्तुभ-१०

हंसाः, असौ न युष्मद् वहृतिसमयः, (यूयम्) मानसम् यात। अमी जलधराः तमोभिः छादिताशाः ननु जृम्भन्ते।
अस्मिन् काले ते एतान् कटुविरटतः बकान् एव पुष्णन्ति, न वः कलरवकलाकौशलम् दीप्त्यै पेशलम् (भवति)

Oh Swans, this is not the time for you for enjoyment. Please go to Manas lake. These clouds, having covered all directions with darkness, are spreading out all over. During this time only these cranes, cackling horribly, thrive. Your skill in making pleasant sound does not shine. (This is to advise a poet, who is trying to display his talents at an inopportune time. An example of अन्योक्ति)

हंसाः- पु. लिं. सं. वि. ब. व. of हंस- swan, न- no, not, असौ & वहृतिसमयः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of अदस्- that & वहृतिसमय- enjoyment time- विहृति- स्त्री. लिं.- enjoyment, pleasure, sport, समय- time- वहृतेः समयः – वहृतिसमय – ष. तत्पुरुष स., युष्मत्- पं. वि. ब. व. of युष्मद्- you, मानसम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. of मानस- a sacred lake on mount Kailas, यात- आज्ञार्थ द्वि. पु. ब. व. of या- याति २ ग. प. प. to go, अमी-those & जलधराः- clouds- both पु. लिं. प्र. वि. ब. व. of अदस्-that & जलधर- जल- water, जलम् धरति इति- उपपद तत्पुरुष स., तमोभिः- न. लिं. तृ. वि. ब. व. of तमस्- darkness, छादिताशाः -स्त्री. लि. प्र. वि. ए. व. of छादिताशाः- enveloped in all directions- छादित- enveloped, covered- क. भू. धा. वि. of छद्- १० ग. उ. प. छादयति-ते- to cover, conceal, आशाः- directions, space around, ननु- अव्यय- surely, certainly, जृम्भन्ते & पुष्णन्ति- वर्त. तृ. पु. ब. व. of जृम्भ्- (जृभ्)- १ ग. आ. प. to spread out, extend everywhere & पुष्- पुष्णाति ९ ग. प. प. to thrive, support, nurture, अस्मिन्- this & काले- in the time- पु. लिं. स. वि. ए. व. of इदम्- this & काल – time, कटुविरटतः, एतान् & बकान्- पु. लिं. द्वि. वि. ब. व. of कटुविरटत्- cackling horribly- कटु- न. लिं.- improper, unpleasant, विरटत्- cackling, screaming- वर्त. का. वा. धा. सा. वि. of वि+ रट् – (रट्- रटति १ ग. प. प. to shout, yell, cry), एतद्- this & बक- Indian crane, एव- अव्यय-only, just, alone, वः- yours- ष. वि. ब. व. of युष्मद्- you, दीप्त्यै- स्त्री. लिं. च. वि. ए. व. of दीप्तिः- brilliance, extreme loveliness, कलरवकलाकौशलम्- skill in making pleasant sound- कल- sweet indistinct, jingling, tinkling, रव- sound- कला- art, skill, कौशलम्- expertise, mastery कलः रवः – कलरवः- समा. प्रदि तत्पुरुष स., कलरवस्य कला- कलरवकला- ष. तत्पुरुष स. & कलरवकलासु कौशलम्- कलरवकलाकौशलम्- स. तत्पुरुष स., & पेशलम्- adjctv- charming, lovely- both in न. लिं. प्र. वि. ए. व.

अरे हंसांनो, हा तुमच्या आनंदाचा (अनुकूल) काळ नाही आहे. तुम्ही आपले मानससरोवराकडे निघून जा. या काळ्या ढगांनी सगळ्या दिशांना अंधारून टाकले आहे. या काळात कर्कश आवाज करणारे बगळेच फोफावतील. तुमच्यासारखे मधुर कूजन करणारे नाहीत. ज्यावेळी बेडूक डराँव डराँव करत असतो तेंव्हा कोकिळाने शांत व्हावे अशा अर्थाचेही एक सुभाषित आहे. गुणी लेखक, कवि, कलाकार वगैरेंनासुद्धा आपले गुण दाखवण्यासाठी अनुकूल वेळ असावी लागते असे याचे तात्पर्य आहे.

७९० १४-११-२०२०
हन्ति जातानजातांश्च हिरण्यार्थेऽनृतं वदन्।
सर्वं भूम्यनृते हन्ति मा स्म भूम्यनृतं वदेः ॥

मनुस्मृती ८.९९ & महाभारत. विदुरनीति

(मनुष्यः) हिरण्यार्थे अनृतम् वदन्, जातान् (पूर्वजान्) अजातान् (जनिष्यमाणान्) च हन्ति। (सः) भूम्यनृते (भूम्यार्थे अनृतम् वदन्) सर्वम् हन्ति। (अतः त्वम्) भूम्यनृतम् मा स्म वदेः।

A man who speaks a lie for the sake gold strikes (brings disgrace to) his forefathers and the progeny that were to be born in future. (But) If he speaks untruth for the sake of land he strikes everything. (Therefore) May you not ever speak a lie for the sake of land.

हिरण्यार्थे & भूम्यनृते- पु. लिं. स. वि. ए. व. of हिरण्यार्थ- for the sake gold- हिरण्यम्- न. लिं.- gold, अर्थ- purpose, sake of- हिरण्यस्य अर्थम्- हिरण्यार्थम्- ष. तत्पुरुष स. & भूम्यनृत- lie for the sake of land- भूमि- स्त्री. लिं.- earth, land, भूमेः निमत्तं अनृतम् यद् तद्- भूम्यनृतम्- बहुव्रीही स., अनृतम्- untruth, a lie, सर्वम्- all, entire & भूम्यनृतम्- all in न. लिं. द्वि. वि. ए. व., ऋतम्- truth- अन् ऋतम्- अनृतम्- नञ् तत्पुरुष स., वदन्- speaking, talking- वर्त. का. वा. धा. सा. वि. of वद्-वदति १ ग. प. प., जातान् & अजातान्- पु. लिं. द्वि. वि. ब. व. of जात- born, taken birth & अजात- न जात- नञ् तत्पुरुष स.- unborn, yet to be born- क. भू. धा. वि. of जन्-जायते ४ ग. आ. प. to be born, च- and, हन्ति- वर्त. तृ. पु. ए. व. of हन्-२ ग. प. प. to kill, strike, destroy, मा स्म- अव्यय- a particle of prohibition- may you not, lest, वदेः- विध्यर्थ द्वि. पु. ए. व. of वद्- वदति- to speak

सोने मिळवण्यासाठी खोटे बोलण्यामुळे माणूस आधीच जन्मलेले (आपले पूर्वज) तसेच अजून न जन्मलेले (वंशज) यांचा (त्यांच्या नावलौकिकाचा) नाश करतो आणि जमीनीसाठी खोटे बोलण्यामुळे सगळ्यांचाच नाश करतो. म्हणून माणसाने सोन्याच्या किंवा जमीनीच्या लोभाने खोटे बोलू नये.

७९१ १५-११-२०२०
अनसूयः कृतप्रज्ञः शोभनान्याचरन्सदा।
अकृच्छ्रात्सुखमाप्नोति सर्वत्र च विराजते ॥
-महाभारत-विदुरनीति ५.३५.५५
पाभे: अकृच्छ्रात्सुखमाप्नोति- नकृच्छ्रं महदाप्नोति & विराजते–विरोचते

(यः) अनसूयः कृतप्रज्ञः (च सः) शोभनानि आचरन् सदा,अकृच्छ्रात् सुखम् आप्नोति (न महद् कृच्छ्रम् आप्नोति) सर्वत्र विराजते (विरोचते) च।

One, who is without any jealousy and is an accomplished scholar, always keeps doing things that are auspicious or good. He enjoys life without much difficulty (does not face great difficulty) and shines everywhere.

असूया- स्त्री. लिं.- envy, intolerance, jealousy- असूयः- one who is jealous, envious- अन् असूयः- अनसूयः- one who is not jealous or envious & कृत- accomplished, done- क. भू. धा. वि. of कृ- करोति- कुरुते ८ ग. उ. प. to do, make, प्रज्ञः – learned, wise, intelligent, कृतः प्रज्ञः कृतप्रज्ञः- विशेषणनाम सामान्यनाम संबंध कर्मधारय स.- one who is accomplished in facilities of knowledge – both in पु. लिं. प्र. वि. ए. व., शोभनानि- auspicious things- न. लिं. प्र. वि. ब. व. of शोभनम्- auspicious, splendid, virtuous, आचरन्- practicing, observing- वर्त. का. वा. धा. सा. वि. of आ+ चर्- (चर्- चरति १ ग. प. प. to move, walk), सदा- always, daily & सर्वत्र- everywhere- both अव्यय, सुखम् & कृच्छ्रम्- both in- न. लिं. द्वि. वि. ए..व. of सुख- happiness, joy & कृच्छ्र- miserly, trouble, difficulty, अकृच्छ्रात् -पं. वि. ए..व. of अकृच्छ्र- without any pain or difficulty- न कृच्छ्र- नञ् तत्पुरुष स., महत्-adjctv- great, large, big, विराजते, विरोचते & आप्नोति- वर्त. तृ. पु. ए. व. of वि+राज्- to shine, appear successful (राज्- राजति-ते १ ग. उ. प. to shine glitter, appear splendid), वि+ to shine, appear successful (रुच्- रोचते १ ग. आ. प. to shine, glitter, appear splendid) & आप्- ५ ग. प. प. to get, accomplish, च-and

जो कुणाचा हेवा करत नाही, ज्ञानी आहे आणि नेहमी चांगले आचरण करतो अशा माणसाला अडचणी न येता सुखे प्राप्त होतात आणि तो सर्वत्र चमकतो.

७९२ १६-११-२०२०
श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चाप्यवधार्यताम्।
आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत् ॥अ।।
यद्यदात्मनि चेच्छेत तत्परस्यापि चिन्तयेत्।
आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत् ॥ब॥
-पद्मपुराण, शृष्टि १९.३५७–३५८

(हे मनवाः) धर्मसर्वस्वम् श्रूयताम्, श्रुत्वा च अपि अवधार्यताम्। (तेषु) आत्मनः प्रतिकूलानि परेषाम् न समाचरेत्। यद् यद् आत्मनि च इच्छेत तत् परस्य अपि चिन्तयेत्।

Please listen to essence of Dharma (Prescribed Codes of Conduct /Religious stipulations). Then try to understand them in correct perspective, after dwelling over them in mind. Whatever is harmful to adopt for yourself, those should not be applied in case of others. Whichever is acceptable (agreeable) to you, consider that for others too.

श्रूयताम् & अवधार्यताम्- आज्ञार्थ तृ. पु. ब. व. of श्रु- शृणोति ९ ग. प. प. to listen, study, learn & अव+ धृ- to understand, know accurately, first (धृ- धरति १ ग. प. प. & धारयति- ते १० ग. उ. प. to hold, bear), धर्म- prescribed codes of conduct, Religion, सर्व- all, every, स्वम्- belonging to, property, wealth, सर्वस्य स्वम् यद् तद्- सर्वस्वम्- the whole of it, in enteritis- बहुव्रीही स., धर्मस्य सर्वस्वम् -धर्मसर्वस्वम्- ष. तत्पुरुष स.- entire stipulations of codes of conduct (religion)- न. लिं. द्वि. वि. ए. व., श्रुत्वा- after listening- पू. का. वा. त्वान्त धा. सा. अव्यय of श्रु- शृणोति ९ ग. प. प. to listen, च- and, अपि- अव्यय- even, also, आत्मनः & आत्मनि- पु. लिं. ष & स. वि. ए. व. of आत्मन्- self, one’s own, प्रतिकूलानि- न. लिं. द्वि. वि. ब. व. of प्रतिकूल- adverse, unfavourable, contrary, परेषाम्- पु. लिं. ष. वि. ब. व. of पर- other, समाचरेत् & चिन्तयेत्- विध्यर्थ प. प. तृ. पु. ए. व. of सं+ आ+ चर्- to follow, observe, practice- (चर्- चरति १ ग. प. प. to walk, move, go) & चिन्त्- चिन्तयति- ते १० ग. उ. प. to think, consider, यद् – which & तद्- that- both अव्यय, यद् यद्- whichever, whatever, इच्छेत- विध्यर्थ आ. प. तृ. पु. ए. व. of इष्- इच्छति ६ ग. प. प. to desire, wish, long for, परस्य- पु. लिं. ष. वि. ए. व. of पर- other

धर्माचे सर्व सार ऐकून आणि ते समजून घेऊन मनात धारण कर (लक्षात ठेव). जे स्वतःला प्रतिकूल वाटते असे काहीही दुसऱ्यांसाठी करू नकोस, जे तुला स्वतःला हवे असे वाटेल त्याचाच इतरांसाठी विचार कर.

७९३ १७-११-२०२०

न राज्यं न च राजाsसीन्न दण्ड्यो न च दाण्डिकः।
धर्मेणैव प्रजास्सर्वा रक्षन्ति स्म परस्परम् ॥

न राज्यम् आसीत्, न च राजा (आसीत्), न दण्ड्यः (आसीत्),न च दाण्डिकः (आसीत्)। प्रजाः सर्वाः धर्मेणे एव परस्परम् रक्षन्ति स्म।

There was no kingdom nor there was any king. There was no criminal or violator of law worthy of punishment nor there was anyone to impose the punishment. All people got protected by themselves ( mutually) by virtue of following prescribed codes of conduct (good religion- Dharma)

 • Perhaps an ideal society

न- no, not, राज्यम्- kingdom, राजा (राजन्)- king, दण्ड्यः (also- दण्डनीय & दण्डितव्य)- one who is to be punished, criminal- कर्मणि वि. धा. सा. वि. of दण्ड्- दण्डयति-ते १० ग. उ. प. to punish, impose fine, chastise, दाण्डिकः- a staff-bearer, a judge to give punishment- -(दण्ड- staff, mace, stick)- all in पु. लि. प्र. वि. ए. व., आसीत्- was there- अनद्यतन भूत. तृ. पु. ए. व. of अस्- अस्ति २ ग. प. प. to be, to exist,, च- and प्रजाः & सर्वाः- पु. लि. प्र. वि. ब. व. प्रजा- people, subject & सर्व- all, entire, धर्मेणे- न. लिं. तृ. वि. ए. व. of धर्म- prescribed codes of conduct, religion, एव- अव्यय- alone, just, only, परस्परम्- पु. लि. द्वि. वि. ए. व. of परस्पर- adjctv- mutual, each other, mutually reciprocally, against one another, रक्षन्ति- वर्त. तृ. पु. ब. व. of रक्ष्- रक्षति १ ग. प. प. to protect, garud, take care of, स्म- अव्यव- a particle added to the present tense of verbs to give sense of past tense

इथे कोणी राजा नाही, की कुणाचे राज्य नाही, कोणी शिक्षा करणारा नाही आणि कोणी शिक्षा भोगणाराही नाही. सर्व प्रजा धर्मानुसार वागते आणि सर्वजण परस्परांचे रक्षण करतात. कदाचित सत्ययुगामध्ये असा एक आदर्श समाज रहात होता.

७९४ १८-११-२०२०
स्वल्पस्नायुवसावसेकमलिनं निर्मांसमप्यस्थि गोः
श्वा लब्ध्वा परितोषमेति न तु तत्तस्य क्षुधाशान्तये।
सिंहो जम्बुकमङ्कमागतमपि त्यक्त्वा निहन्ति द्विपं
सर्वः कृच्छ्रगतोऽपि वाञ्छति जनः सत्त्वानुरूपं फलम् ॥

भर्तृहरि नीतिशतक ३०

श्वा गोः स्वल्प-स्नायु-वसा-अवसेक -मलिनम् निर्मांसम् अस्थि अपि लब्ध्वा परितोषम् एति, न तु तत् तस्य क्षुधा-शान्तये (भवति)। सिंहः अङ्कम् आगतम् जम्बुकम् अपि त्यक्त्वा द्विपम् निहन्ति। सर्वः जनः क्रुच्छ्र-गतः अपि सत्त्व-अनुरूपं फलम् वाञ्छति ।

A dog feels happy even if it gets a bone devoid of flesh, dirtied by bits of ligament and marrow, although that does not satisfy its hunger. A lion kills an elephant leaving a fox, which has landed on its lap. Persons seek fruits (their catch/ gains) according to their own status, even if they have to face difficulties.

श्वा- (श्वन्)- dog, सिंहः- lion, सर्वः- all, entire, जनः- people, क्रुच्छ्रगतः-one who faced difficulty, took effort- क्रुच्छ्र- adjctv- difficulty, hardship, misery, गत- gone, undergone, faced- क. भू. धा. वि. of गम्- गच्छति १ ग. प. प. to go- all in पु. लिं. प्र. वि. ए. व.)- क्रुच्छ्रः गतः- क्रुच्छ्रगत- विशेषणपूर्वपद कर्मधारय स., गोः- पु/स्त्री. लिं. ष. वि. ए. व. of गो-cow or bull, स्वल्प- adjctv- little, small, स्नायु- ligament, वसा- marrow, आवसेक- पु. लिं.- sprinkling, मलिन- adjctv- soiled, dirtied, स्नायु च वसा च- स्नायुवसा- द्वंद्व स., स्वल्पम् स्नायुवसा- स्वल्पस्नायुवसा- विशेषणपूर्वपद कर्मधारय स., स्वल्पस्नायुवसायाः आवसेकः- स्वल्पस्नायुवसावसेकः- ष. तत्पुरुष स. & स्वल्पस्नायुवसावसेकेण मलिनम् -स्वल्पस्नायुवसावसेकमलिनम्- तृ. तत्पुरुष स.- devoid of flesh dirtied by bits of ligament and marrow, निर्मांसम्- without meat, flesh- निःशेषम् मांसम्- व्याधिकरण प्रादितत्पुरुष स. (निर्- अव्यव- prefix to a word conveys sense of : without devoid of, free from), मांसम्- meat, flesh, अस्थि- न. लिं.-bone, परितोषम्- contentment, full satisfaction, परि- अव्यव- prefix to a word conveys sense of : full, complete, very much, अङ्कम्-पु/न. लिं- lap, spot, आगतम्- arrived, reached- क. भू. धा. वि. of आ+ गम् (गम्-गच्छति १ ग. प. प. to go), जम्बुकम्- jackal, fox, द्विपम्- elephant, फलम्- fruit, reward, result, सत्त्वानुरूपम्- according to own status- सत्त्व- capacity, vitality, substance, अनुरूपम्- resembling, like, according to- अनु- अव्यव- prefix to a word conveys sense of : like, imitation of, conformable to- all in- द्वि. वि. ए. व., अपि- अव्यव- also, and, even, लब्ध्वा- having got, received & त्यक्त्वा- rejecting, abandoning- both पू. का. वा. त्वान्त धा. सा. अव्यव of लभ्- लभते १ ग. आ. प. to get, acquire, gain & त्यज्- १ प. प. to leave, abandon, एति, वाञ्छति & निहन्ति- वर्त. तृ. पु. ए. व. of इ- २ ग. प. प. to go, come to, वाञ्छ्- १ ग. प. प. to long for, desire & नि+हन्- to kill, destroy- (हन्- हन्ति-२ ग. प. प. to kill), तु- अव्यव- but, and now, as regards, तद्- that, it, तस्य- his, its- ष. वि. ए. व. of तद्, क्षुधाशान्तये- स्त्री. लिं. स. वि. ए. व. of क्षुधाशान्ति- satisfy or quench the hunger- क्षुधा- स्त्री. लिं.- hunger, शान्ति- removal, ease, alleviation- क्षुधायाः शान्तिः – ष. तत्पुरुष स., न- no, not

कुत्र्याला एकादा सुकडा आणि घाणेरडा ( मांस नसलेला) हाडाचा तुकडा मिळाला, त्याने त्याची भूक भागत नसली तरीही तो त्याने खूष होतो. सिंहाच्या मांडीवर येऊन बसलेल्या कोल्ह्यालाही तो सोडून देतो पण हत्तीला मारतो. माणसे कष्ट सहन करूनसुद्धा पण आपापल्या दर्जानुसार फळाची इच्छा करतात. यावरच “कोल्हा काकडीला राजी” होतो, पण “वाघ भूक लागली म्हणून गवत खात नाही” अशा अर्थाच्या म्हणी आहेत.

७९५ १९-११-२०२०
अष्टौ गुणाः पुरुषं दीपयन्ति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च।
पराक्रमश्चाबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च ॥

प्रज्ञा, सुशीलत्वदमौ, श्रुतम् च पराक्रमः च अबहुभाषिता च यथाशक्ति दानम्, कृतज्ञता च, अष्टौ गुणाः पुरुषम् दीपयन्ति।

Intelligence (discernment), good naturedness & self control, knowledge of scriptures, valour (bravery), restrained talking, charity according to the capacity and sense of gratitude are eight qualities that make a person enlightened one.

पराक्रमः – bravery, valour, courage- पु. लिं. प्र. वि. ए. व., प्रज्ञा- intelligence, wisdom, discernment, अबहुभाषिता- restrained talking, reticence- बहु- adjctv- much, many, large,भाषित- spoken, uttered- क. भू. धा. वि. of भाष्- भाषते १ ग. आ. प. to speak- भाषिता- nature of talking- बहुः भाषिता- बहुभाषिता- habit of talking too much, न बहुभाषिता- अबहुभाषिता- नञ् तत्पुरुष स., कृतज्ञता- sense of gratitude- कृत- done, accomplished, service- कृतम् जानाति इति- कृतज्ञ- grateful, thankful- उपपद तत्पुरुष स.- all in स्त्री. लिं. प्र. वि. ए. व., शील- character, nature- सुभगः शीलः- सुशील- good nature- समा. प्रादि तत्पुरुष स.- सुशीलत्व- good naturedness, दम- control of senses- सुशीलत्वः च दमः च- सुशीलत्वदमौ- द्वंद्व स.- in पु. लिं. प्र. वि. द्वि. व., यथाशक्ति- as per capacity, ability- यथा-अव्यय- as, like, शक्ति- strength, capacity- यथा शक्तिः- विशेषणपूर्वपद कर्मधारय स., दानम्- charity & श्रुतम्- knowledge of scriptures- both in- न. लिं. प्र. वि. ए. व.,च, अष्टौ & गुणाः- पु. लिं. प्र. वि. ब. व. of अष्टन्- eight & गुण- quality, virtue, पुरुषम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. पुरुष- man, person, दीपयन्ति- cause to light up, illuminate- प्रयोजक वर्त. तृ. पु. ब. व. of दीप्- दीप्यते ४ ग. आ. प. to shine, blaze

आकलनशक्ती (बुद्धीमत्ता, प्रज्ञा), सुशीलपणा (सौजन्य), विवेकबुद्धी (स्वतःवर ताबा असणे), शास्त्रांचे ज्ञान, पराक्रम, आपल्या कुवतीनुसार दानधर्म करणे, वायफळ बडबड न करणे (मितभाषी) आणि कृतज्ञता हे आठ गुण माणसाला प्रकाशमान करतात.

कर्तृत्व, बुद्धी, मितभाषिताही
सौजन्यही, धैर्य, कृतज्ञताही ।
औदार्य, शक्ती, गुण ऐकलेले कीर्ती पुरूषास जगात देती ॥ – इंद्रवज्रा

७९६ २०-११-२०२०
प्रज्ञामेवागमयति यः प्राज्ञेभ्यः स पण्डितः।
प्राज्ञो ह्यवाप्य धर्मार्थौं शक्नोति सुखमेधितुम् ॥
-महाभारत-विदुरनीति २६७.३५.६६

यः प्राज्ञेभ्यः प्रज्ञाम् आगमयति, सः प्राज्ञः, पण्डितः हि धर्मार्थौं अवाप्य, सुखम् एधितुम् शक्नोति ।

One who acquires knowledge from well-read knowledgeable people, that wise and proficient person surely, would be successful in leading a life as per prescribed codes of conduct (Dharma) and acquire wealth too and thereby lead a happy life.

यः (यद्)- who, प्राज्ञः- aise, intelligent, सः (तद्)- he, that man, पण्डितः- proficient, clever, learned, प्राज्ञेभ्यः- from well-read knowledgeable people- पु. लिं. पं. वि. ब. व. of प्राज्ञः, प्रज्ञाम्- स्त्री. लिं. द्वि. वि. ए. व. of प्रज्ञा- intelligence, wisdom आगमयति- studies, learns, attains- प्रयोजक वर्त. तृ. पु. ए. व. of आ+गम्- (गम्- गच्छति १ ग. प. प. to go, move, धर्मार्थौं- न. लिं. द्वि. वि. ए. व. of धर्मार्थ- धर्म- prescribed codes of conduct, religion, अर्थ- wealth, purpose, object- धर्मम् च अर्थम् च- द्वंद्व स., अवाप्य- having obtained, got- पू. का. वा. धा. सा. ल्यबन्त अव्यय of अव+आप्- (आप्- आप्नोति ५ ग. प. प. to get, obtain, एधितुम्- हेत्वार्थ तुमन्त धा. सा. अव्यय of एध्-एधते १ ग. आ. प. to live in comfort, to prosper, सुखम्- न. लिं. द्वि. वि. ए. व. of सुख- happiness, joy शक्नोति- वर्त. तृ. पु. ए. व. of शक्- ५ ग. प. प. to be able, capable जो माणूस ज्ञानी आणि विद्वान लोकांकडून ज्ञान प्राप्त करतो तो खरा पंडित होतो आणि धर्म व अर्थ प्राप्त करून सुखी होऊ शकतो.

७९७ २१-११-२०२०
मरणान्तानि वैराणि निवृत्तं नः प्रयोजनम् ।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव ॥
रामायण- युद्धकाण्डः ९९-३९

वैराणि मरणान्तानि (भवन्ति)। नः (अस्माकम्) प्रयोजनम् निवृत्तम् (अस्ति)। एषः मम अपि यथा (एषः) तव (आसीत्)। अस्य संस्कारः क्रियताम्।

Enmities (between two) end with death (of one). (Now) he is also mine as he is yours. (So) his obsequial ceremony (cremation) is to be got done (with due respect). {This is the advice of Rama to Vibhishana after the death of Ravana}

वैराणि & मरणान्तानि- न. लिं. प्र. वि. ब. व. of वैर- enmity, hostility, quarrel & मरणान्त- ending with death, मरण- death, अन्त- end, conclusion- मरणे अन्तम् याति इति- मरणान्त- उपपद तत्पुरुष स., नः (अस्माकम्)- ours- ष. वि. ब. व. of अस्मद्- I, we, प्रयोजनम् & निवृत्तम्- न. लिं. प्र. वि. ए. व. of प्रयोजन- purpose, object, use, motive & निवृत्त- completed, over, ceased- क. भू. धा. वि. of नि+ वृत्- (वृत्- वर्तते १ ग. आ. प. to be, to exist, एषः & संस्कारः- पु. लिं. प्र. वि. ए. व. of एतद् – this person, he & संस्कार- obsequial ceremony, मम- mine, तव- yours & अस्य- his, of this person- ष. वि. ए. व. of अस्मद्- I, we, युष्मद्- you & इदम्- this personhe, क्रियताम्- to be got done- कर्मणि प्रयोग आज्ञार्थ तृ. पु. ए. व. of कृ- करोति-कुरुते ८ ग. उ. प. to do, make, perform, अपि- even, also & यथा-like, in which way, manner- both अव्यय मरणाबरोबर वैर संपते. आपले (युद्धाचे) प्रयोजन संपले आहे. आता हा (रावण) जसा तुझा आहे तसाच माझा आहे. त्याचे व्यवस्थित अंत्यसंस्कार करायला हवेत. असे रामाने रावणाचा वध केल्यानंतर बिभीषणाला सांगितले.

७९८ २२-११-२०२०
साम्ना दानेन भेदेन समस्तैरथ वा पृथक्।
विजेतुं प्रयतेतारीन्न युद्धेन कदाचन ॥
मनुस्मृति
पाठभेद: विजेतुम्- साधितुम्

(मनुष्यः) अरीन्, साम्ना, दानेन, भेदेन, अथ वा समस्तैः (वा) पृथक् विजेतुम् (साधितुम्) प्रयतेत, न कदाचन युद्धेन (प्रयतेत)।

When confornted by enemies or adverseries, for winning them over (to be successful), one has to first exercise reasonable persuasion (patience), then must try to concede some ground (by compromise), if that does not succeed) then must try to penetrate other side by dividing them. All these methods are to be employed separately one after the other or all of them together as required. Waging a war should never an option.

अरीन्- द्वि. वि. ब. व. of अरिः – enemy, foe, साम्ना, दानेन, भेदेन & युद्धेन- तृ. वि. ए. व. of सामन्- न. लिं- appeasing, conciliation, gentleness, दान- gift, giving, भेद- dividing, breaking, separating & युद्ध- war, confrontation, समस्तैः- तृ. वि. ब. व. of समस्त- entire, all, combined- क. भू. धा. वि. of सं+ (अस्- अस्ति २ ग. प. प. to be, to exist), पृथक्- अव्यय- separately, singly, one by one, विजेतुम्- to win over, to defeat & साधितुम्- to be successful, to accomplish- both हेत्वार्थ तुमन्त धा. सा. अव्यय of वि + जि- १ ग. आ. प. (जि-जयति १ ग. प. प. to win) & साध्- साध्नोति-५ ग. प. प. प्रयतेत- आ. प. विध्यर्थ तृ. पु. ए. व. of प्र+ यत्- to try well or hard- (यत्- यतते १ ग. आ. प. to attempt, to try), न- not, no, कदा- when, at what time, कदा+ चन- some time, at one time, न कदाचन- never, अथ- now, here, वा- or- all- अव्यय

माणसाने आपल्या शत्रूला सामोपचाराने, त्याला काही देऊन किंवा फूट पाडून, यातले एकएक किंवा सर्व प्रयत्न करून जिंकावे, त्याच्याशी कधीच लढाई करू नये. कदाचित अशा प्रकारच्या शिकवणीमुळेच भारतीय लोक युद्धशास्त्रात मागे पडले आणि आक्रमकांचे फावले.

७९९ २३-११-२०२०
पापं कर्तुमृणं कर्तुं मन्यन्ते मानवाः सुखम्।
परिणामोSतिगहनो महतामपि नाशकृत् ॥

मानवाः पापम् कर्तुम्, ऋणम् कर्तुम् सुखम् मन्यन्ते। (परन्तु तयोः) परिणामः अतिगहनः, (तथा) महताम् अपि, नाशकृत् (भवति)।

Men derive happiness while doing evil deeds and while incurring debt. (But) the consequence of these is really very deep and disastrous in case of even mighty (powerful people).

मानवाः- पु. लिं. प्र. वि. ब. व. of मानव- man, human, पापम्, ऋणम् & सुखम्- न. लिं. द्वि. वि. ए. व. of पाप- sin, evil deed, forbidden deed, ऋण- debt, obligation in general & सुख- joy, happiness, कर्तुम्- for doing, incurring- हेत्वार्थ तुमन्त धा. सा. अव्यय of कृ-करोति- कुरुते ८ ग. उ. प. to do, make, मन्यन्ते- वर्त. तृ. पु. ब. व. of मन्- मन्यते ४ ग. आ. प. to consider, think, believe, परिणामः- result, outcome, consequence अतिगहनः – very deep, of great magnitude- अति- अव्यय- prefix implies: great, excessive, very much, गहनः- adjctv- deep, thick, inexplicable- विशेषणपूर्वपद कर्मधारय स. & नाशकृत्- disastrous, ruining- नाश- destruction, ruin- नाशम् करोति इति- नाशकृत्- उपपद तत्पुरुष स.- all in पु. लिं. प्र. वि. ए. व., महताम्- पु. लिं. ष. वि. ब. व. of महत्- great, noble, mighty, अपि- अव्यय- even, also

पाप आणि ऋण करतांना (कर्ज घेतांना) माणसाला मजा वाटते, पण त्यांच्या अत्यंत गहन अशा परिणामांमुळे मोठ्या मोठ्यांचासुद्धा नाश होतो.

८०० २४-११-२०२०
जीर्णमन्नं प्रशंसन्ति भार्यां च गतयौवनाम्।
शूरं विजितसंग्रामं गतपारं तपस्विनम् ॥

महाभारत विदुरनीति२७०.३५.७०

(सज्जनाः) (भोजनत् पश्चात्) जीर्णम् अन्नम् प्रशंसन्ति। (ते) (तारुण्यकाले गृहिणीत्वम् साधयति) भार्याम् गतयौवनाम् (प्रशंसन्ति)। (ते) विजितसंग्राम् शूरम् (प्रशंसन्ति)। (ते) गतपारम् तपस्विनम् (प्रशंसन्ति)।

(Wise people) applaud (praise) the food that is easily digested. They applaud an aged wife (who has successfully completed her commitments in her youth). They appreciate a brave man who has won his war and they applaud a ascetic who has been able to achieve his set goal.

जीर्णम् & अन्नम्- न. लिं. द्वि. वि. ए. व. of जीर्ण- digested- क. भू. धा. वि. of जृ(दीर्घ)- १, ४ & ९ प. प. & १० ग. उ. प. -जरति, जीर्यति, जृणाति, जारयति-ते to digest, decay, to grow old, अन्न- food, भार्याम् & गतयौवनाम्- स्त्री. लिं. द्वि. वि. ए. व. of भार्या- wife & गतयौवना- one who has passed her youth, aged woman- गत- gone, past -क. भू. धा. वि. of गम्- गच्छति १ ग. प. प. to go, यौवन- youth- गतम् यौवनम् यस्याः सा- गतयौवना- बहुव्रीही स., विजितसंग्राम्, शूरम्, गतपारम् & तपस्विनम्- पु. लिं. द्वि. वि. ए. व. of विजितसंग्राम- one who has won his war- विजित- won, conquered- क. भू. धा. वि. of वि+ जि- to overcome- (जि- जयति १ ग. प. प. to win, conquer), संग्राम- war, battle- विजितम् संग्रामम् येन सः- विजितसंग्रामः- बहुव्रीही स., शूर- brave, courageous, गतपारः- one who has reached his goal- गत- (see above), पारम्- end or extremity of anything- गतम् पारम् येन सः – गतपारः & तपस्विन्- ascetic, one who is practising penance, प्रशंसन्ति- वर्त. तृ. पु. ब. व. of प्र+ शंस्- to applaud, praise very much- (शंस्- शंसति-१ ग. प. प. to praise, extol)

(सज्जन लोक) पचलेल्या अन्नाची प्रशंसा करतात, उतार वयातल्या पत्नीचे (सुगृहिणीचे) कौतुक करतात, लढाई जिंकून आलेल्या वीराची स्तुति करतात आणि भवसागर पार तरून गेलेल्या तपस्व्याची प्रशंसा करतात.

आज सुभाषितांचे आठवे शतक पूर्ण झाले.

दुर्गाशक्ती -२

नवरात्रीच्या निमित्याने श्री.विनीत वर्तक यांनी फेसबुकवर काही देदिप्यमान महिलांवर लेख लिहिले आहेत. त्यातले काही निवडक लेख या पानावर संग्रहित केले आहेत. श्री.वर्तक यांचे मनःपूर्वक आभार

दुर्गाशक्ती -भाग १ इथे पहा
https://anandghare.wordpress.com/2019/01/06/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%a5%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a4%b8/

१.समाजसेविका डॉक्टर मंदाकिनी आमटे

डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बहुतेक लोकांनी पाहिला असेल. त्यांच्यासारखेच समर्पित जीवन जगणाऱ्या तयांच्या सुविद्य पत्नी डॉ.मंदाकिनी आमटे यांचा परिचय.

समाजसेविका डॉक्टर मंदाकिनी आमटे
.. विनीत वर्तक ©

दोन अपूर्णांक मिळून एक पूर्णांक होतो हे कितीही खरं असलं तरी आज आपल्याला पूर्ण करणाऱ्या त्या अपूर्णांकांची निवड करण्याचे निकष बदललेले आहेत. स्वभावाआधी बँक बॅलन्स आणि माणसाआधी फ्लॅट महत्वाचा झाला आहे. पगार किती, कंपनी कोणती हे बघून प्रेमात पडणारे अनेक जण आहेत. अर्थात हे निकष चुकीचे अथवा बरोबर हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण आपलं सर्व सुखसंपन्न; आरामाचं आयुष्य सोडून अश्या एखाद्या जंगलात जिकडे जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टी उपलब्ध नाहीत, तो भाग आयुष्याच्या रंगीत स्वप्नांपासून कोसो दूर आहे, अश्या एखाद्या ठिकाणी आपल्या जोडीदारासोबत आपल्या जीवनातल्या नवीन वळणाची सुरूवात करावी हा निर्णय घेणं, आणि तो गेली ४८ वर्षांपेक्षा जास्त काळ निभावून नेणं हे एखाद्या तपश्चर्येएवढंच कठीण आहे. हे सगळं करत असताना सर्व आघाड्यांवर आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून समाजसेवेचं अविरत व्रत आजही निभावणाऱ्या दुर्गाशक्ती म्हणजेच डॉक्टर मंदाकिनी आमटे.
विश्व हिंदू परीषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेल्या एका सधन कुटुंबातून त्यांनी आपलं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. भूलतज्ञ म्हणून आपलं पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांची ओळख सर्जन असलेल्या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याशी झाली. शस्त्रक्रियेच्या वेळी एकत्र काम करत असताना दोघांचे ऋणानुबंध जुळले ते कायमसाठी. पण खरी अडचण पुढे होती. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांचा म्हणजेच बाबा आमटे यांचं कार्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. आनंदवन म्हणजेच चिखलदरा सारखं एखादं थंड हवेचं ठिकाण असावं असा विचार करणाऱ्या डॉक्टर मंदाकिनी आमटेंसाठी हे सगळं अतिशय नवीन होतं. त्यातही बाबा आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाची जबाबदारी प्रकाश आमटे यांच्यावर टाकली होती. कुष्ठरोगाने पिडीत असलेल्या लोकांना समाजाने वाळीत टाकलेलं होतं, अश्या लोकांसोबत काम करणाऱ्यांना आपली मुलगी देणं हे त्यांच्या घरच्या लोकांना रूचलं नव्हतं. त्यातही अश्या लोकांच्या कल्याणासाठी, त्यांनतर पर्यायाने एका जंगलात आयुष्य काढण्याचा निर्णय स्वीकारून मंदाकिनी आमटे यांनी एका वेगळ्या पाऊलवाटेवर आपला प्रवास सुरु केला.

दार नसलेलं घर, इलेक्ट्रीसिटी; पाणी अशी कोणतीही व्यवस्था नसलेल्या ठिकाणी त्यांनी एका नवीन जीवनाची सुरूवात केली. माडीया-गोंड जमातीतील आदिवासी लोक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो लांब होते. भ्रामक समजुती आणि अंधश्रद्धा अश्या विळख्यात अडकलेल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं शिवधनुष्य पेलणं खूप कठीण काम होतं. एकतर हे लोक दुसऱ्या लोकांच्या जवळ जायला घाबरत असत याशिवाय त्यांची भाषा वेगळी होती. भाषा शिकून त्याचवेळी कोणत्याही सुविधांपासून वंचित असलेल्या ठिकाणी घर चालवणं हे त्याहून कठीण काम होतं. जेवायला लागणारी भाजी स्वतः पिकवण्यापासून ते नाल्यामधील पाणी हंड्यात भरून आणून त्याला चुलीवर उकळवून पिण्यायोग्य बनवेपर्यंत सगळंच कोणत्याही सुविधांशिवाय करायला लागायचं. साप, विंचू, जंगली श्वापदं, पाऊस, थंडी या सगळ्या काळात वीजेशिवाय चुलीवर संसार करताना त्याचवेळी एक डॉक्टर बनून समाजसेवेचं आपलं व्रत चालू ठेवणं हे कल्पनेपलीकडलं आहे. हे सगळं करूनसुद्धा पत्नी, आई या सगळ्या भूमिका सुद्धा त्याच निष्ठेनं निभावणं याची कल्पना पण आपण करू शकत नाही.

डॉक्टर प्रकाश आमटे यांनी, आपण आपल्या पत्नीला साधी एक साडी घेऊ न शकल्याची खंत केबीसीसारख्या कार्यक्रमात बोलून दाखवली होती, यावरून कोणीही विचार करू शकेल की, आपल्या जोडीदाराबरोबर त्याच्या सगळ्या निर्णयात ठामपणे उभं राहून समाज सेवेचं अविरत व्रत स्वीकारण्यासाठी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी किती त्याग केला असेल. १९९५ साली मोनॅको या देशाने डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेताना त्यांच्यावर एक पोस्टल स्टॅम्प काढला. असा सन्मान मोनॅको या देशाकडून मिळवणारं आमटे कुटुंब हे जगातील दुसरं व्यक्तिमत्व होतं. २००८ साली त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर प्रकाश आमटे सोबत डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेतली गेली. त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना मॅगसेसे कमिटीने म्हटलं होतं,
“In electing Prakash Amte and Mandakini Amte to receive the 2008 Ramon Magsaysay Award for Community Leadership, the board of trustees recognizes their enhancing the capacity of the Madia Gonds to adapt positively in today’s India, through healing and teaching and other compassionate interventions.”
आज हेमलकसा येथील ‘लोकबिरादरी प्रकल्प’ निष्काम कर्मयोग आणि समाजसेवेसाठी जागतिक पातळीवर नावाजलेला आहे. आज आमटे कुटुंबियांची तिसरी पिढी हा समाजसेवेचा वसा पुढे नेते आहे. पण एकेकाळी जेव्हा या भागात माणूस म्हणून जगणं अशक्य होतं, अश्या काळात त्यांनी आपल्या जीवनाच्या सोनेरी वळणाची सुरूवात या जंगलातून केली. आज समाजात इतकी उंची गाठल्यावर पण गर्वाचा लवलेश किंवा अभिमान त्यांच्या चालण्याबोलण्यात कुठेच दिसत नाही. एक सामान्य स्त्रीसुद्धा आपल्या कर्तृत्वाने असामान्य कामगिरी करू शकते, एकाचवेळी अविरत समाजसेवेचं व्रत करताना असंख्य अडचणींना सोडवत सगळ्याच पातळीवर एक आदर्श जीवन जगू शकते. संपूर्ण भारतापुढेच नाही, तर जगापुढे एक दुर्गाशक्तीचं असामान्य उदाहरण ठेवणाऱ्या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.
माहिती स्रोत :- गुगल
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
https://vartakvinit.blogspot.com/2020/10/blog-post_19.html

२. वैज्ञानिक रोहिणी गोडबोले

… विनीत वर्तक ©

चूल आणि मूल यांत रमणारी भारतीय स्त्री जरी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकली, तरी तिच्यासाठी काही क्षेत्रांचा विचार करणं शक्यच नव्हतं. काही क्षेत्रांत पुरुषांची मक्तेदारी होती. अश्या एखाद्या क्षेत्रात एखाद्या स्त्रीने प्रवेश करून, त्यात आपलं स्थान निर्माण करणं हा भाग तर दूरच पण अश्या एखाद्या क्षेत्रात काम करणं हा विचार पण क्रांतिकारी होता. मुलींनी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभं रहावं अशी पुढारलेली विचारसरणी असलेल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात रोहिणी गोडबोले यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. मुलींसाठी असणाऱ्या शाळेत शिकताना तिकडे विज्ञान हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट नव्हता, त्यामुळे स्कॉलरशिपसारखी परीक्षा देऊन विज्ञानाचा अभ्यास त्यांनी केला. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांतून शिकून त्यात कारकीर्द होऊ शकते हे त्यांच्या ध्यानीमनी पण नव्हतं. गणितात गोडी वाढवण्यासाठी एखादी शिकवणी लाव, हा त्यांच्या शिक्षकांनी दिलेला सल्ला त्यांनी पाळला आणि गणित या विषयातली त्यांची आवड अजून वाढली. गणितज्ञ होऊन आपल्याला नोकरी मिळेल की नाही याची शंका वाटल्याने त्यांनी आपलं लक्ष भौतिकशास्त्राकडे वळवलं.
पुण्याच्या परशुरामभाऊ कॉलेज मधून बी.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण मुंबई आय.आय.टी. मधून केलं. आपल्या विज्ञानातील अभ्यासाला पुढे नेण्यासाठी त्यांनी कण-भौतिकशास्त्राची (particle physics) निवड केली. कण-भौतिकशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी त्यांनी प्रतिष्ठित अश्या स्टोनी ब्रुक इथल्या न्यूयॉर्क विद्यापीठातून मिळवली. अमेरिकेत पुढे संशोधन करण्याची संधी असतानासुद्धा त्या १९७९ साली भारतात परत आल्या. भारतात आल्यावर त्यांनी टी.आय.एफ.आर. (Tata Institute of Fundamental Research) इकडे प्राध्यापक म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर १९८२ ते १९९५ त्या मुंबई विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक होत्या. १९९८ पासून त्यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बंगळुरू इकडून प्राध्यापक म्हणून आपलं काम सुरु ठेवलं आहे. या सर्व काळात त्यांनी जवळपास १५० पेक्षा जास्ती शोधनिबंध लिहीले आहेत, तर अजून १५० पेक्षा जास्ती शोधनिबंधामध्ये त्या सहकारी आहेत.
कण-भौतिकशास्त्रातील महत्वाचा शोध मानल्या गेलेल्या हिग्स-बोसॉन हा कण शोधण्यासाठी गेली ३० वर्ष त्यांनी संशोधन केलं आहे. त्यांच्या या संशोधनामुळे त्यांना,
International Detector Advisory Group (IDAG) for the International Linear Collider at the European research lab, CERN
या जगातील अतिशय आघाडीच्या भौतिक विज्ञानातील संशोधकांच्या ग्रुपचं मानद सदस्यत्व प्राप्त झालं आहे. भौतिक शास्त्रातील स्टॅंडर्ड मॉडेल ज्यात प्रोटॉन, फोटॉन, न्यूक्लिअस अश्या कणांवर त्यांनी संशोधन आणि अभ्यास केला आहे. याशिवाय भौतिकशास्त्रातील हाय एनर्जी कोलायडरमधून नवीन कणांच्या निर्मितीसाठी त्यांनी आपलं योगदान दिलं आहे.
२००२ साली जगातील भौतिकशास्त्रात संशोधन करणाऱ्या स्त्रियांच्या परिषदेसाठी पॅरीस इकडे जाण्याचा बहुमान मिळालेला आहे. (International Conference on Women in Physics) पॅरीस इथे गेले असताना स्त्रियांना या क्षेत्रात काम करण्यासाठी समाजाची मानसिकता जागतिक पातळीवर आणि भारतात किती संकुचित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यासाठी समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं ठरवलं. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपले सहकारी रामकृष्ण रामास्वामी यांच्या सोबत
“Lilavati’s Daughters: The Women Scientists of India”
हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकाचं नावही त्यांनी भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या गोष्टीवरून ठेवलं आहे. भास्कराचार्य ज्याप्रमाणे आपल्या गणितातील अडचणी मुलगी लीलावतीशी बोलत असत, त्याप्रमाणे या पुस्तकात भारताच्या स्त्री संशोधकांचा प्रवास लिहलेला आहे. भारतीय स्त्री वैज्ञानिकांचा हा प्रवास, या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी भारतातील स्त्रियांना प्रोत्साहन देईल.

एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आपला प्रवास सुरू करून परदेशी संशोधन करण्याची संधी उपलब्ध असतानासुद्धा भारतातच राहून, कण-भौतिकशास्त्रात आपलं भरीव योगदान त्यांनी भारतासाठी दिलं. नुसतं संशोधनापुरतं मर्यादीत न राहता आपल्या लिखाणातून, मार्गर्शनपर भाषणांतून भारतातील अनेक स्त्रियांना संशोधन क्षेत्रात येण्यासाठी तसेच सन्मानाने वागणूक मिळवून देण्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी त्यांचा जागतिक पातळीवर गौरव झालेला आहे. भारत सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेताना त्यांना २०१९ साली पद्मश्री सन्मानाने गौरवलं आहे. स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थान गाठू शकतात हे सिद्ध करताना वैज्ञानिक, प्राध्यापक रोहिणी गोडबोले यांनी दुर्गाशक्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण भारतातील सगळ्याच स्त्रियांसमोर ठेवलं आहे. त्यांच्या या प्रवासाला माझा नमस्कार आणि पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
माहिती स्रोत :- रोहिणी गोडबोले पेज, गुगल
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
https://vartakvinit.blogspot.com/2020/10/blog-post_20.html

आमची शाळा – एक ऐंशी वर्षे जुना लेख

परशुरामभाऊ हायस्कूल


माझे शिक्षण जमखंडी गावातल्या परशुराम भाऊ हायस्कूल या विद्यालयात झाले. त्याच्या चाळीस वर्षे आधी माझे वडील कै.बाळकृष्ण पांडुरंग घारे हेसुद्धा त्याच शाळेत शिकले होते. या शाळेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्य निघालेल्या स्मारकग्रंथामध्ये माझ्या वडिलांनी एक सविस्तर लेख लिहून आमच्या शाळेने क्रीडाक्षेत्रात त्या काळात केलेल्या भरीव कार्याचा आढावा घेतला होता. योगायोगाने हा दुर्मिळ लेख माझ्या हाती आला आणि मी तो इथे संग्रहित केला आहे. ऐंशी वर्षापूर्वीच्या वातावरणाचा आणि तेंव्हा प्रचलित असलेल्या भाषेचाही यामुळे परिचय होईल. माझ्या वडिलांनी आमच्या शाळेवर केलेली एक हृद्य कविताही खाली दिली आहे.

भूमीपूजन समारंभ

आज अयोध्या इथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिरासाठी भूमीपूजनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा झाला. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीमान नरेन्द्र मोदी यांनी हे भूमीपूजन केले. त्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात कवी वाल्मिकी आणि गोस्वामी तुलसीदास यांच्या रामायणातील श्लोक आणि दोहे यांचा समावेश करून श्रीरामाचे अपूर्व असे गुणगान केले तसेच सर्व देशवासियांना प्रेरणादायक संदेश दिला. हे भाषण भविष्यकाळातही वाचकांना प्रेरणा देत राहो या उद्देशाने मी या ठिकाणी संग्रहित केले आहे. त्यासाठी परवानगी असावी अशी विनंति आणि अपेक्षा आहे.


Text of PM’s speech at Bhoomi Pujan ceremony of ‘Shree Ram Janmabhoomi Mandir’ in Ayodhya, Uttar Pradesh
Posted On: 05 AUG 2020 3:37PM by PIB Delhi
सियावर रामचंद्र की जय!

जय सियाराम।

जय सियाराम।

आज ये जयघोष सिर्फ सियाराम की नगरी में ही नहीं सुनाई दे रहा बल्कि इसकी गूंज पूरे विश्व भर में है। सभी देशवासियों को और विश्व भर में फैले करोड़ों भारत भक्तों को, राम भक्तों को, आज के इस पवित्र अवसर की कोटि-कोटि बधाई।

मंच पर विराजमान यूपी की गवर्नर श्रीमती आनंदीबेन पटेल जी, यूपी के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, पूज्य नृत्य गोपालदास जी महाराज और हम सभी के श्रद्धेय श्री मोहन भागवत जी, ये मेरा सौभाग्य है कि श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट ने मुझे आमंत्रित किया, इस ऐतिहासिक पल का साक्षी बनने का अवसर दिया। मैं इसके लिए हृदय पूर्वक श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट का आभार व्यक्त करता हूं।

राम काजु कीन्हे बिनु मोहि कहाँ बिश्राम॥

भारत, आज,भगवान भास्कर के सानिध्य में सरयू के किनारे एक स्वर्णिम अध्याय रच रहा है। कन्याकुमारी से क्षीरभवानी तक, कोटेश्वर से कामाख्या तक, जगन्नाथ से केदारनाथ तक, सोमनाथ से काशी विश्वनाथ तक, सम्मेद शिखर से श्रवणबेलगोला तक, बोधगया से सारनाथ तक, अमृतसर से पटना साहिब तक, अंडमान से अजमेर तक, लक्ष्यद्वीप से लेह तक, आज पूरा भारत,राममय है। पूरा देश रोमांचित है, हर मन दीपमय है। आज पूरा भारत भावुक भी है। सदियों का इंतजार आज समाप्त हो रहा है। करोड़ों लोगों को आज ये विश्वास ही नहीं हो रहा कि वो अपने जीते-जी इस पावन दिन को देख पा रहे हैं।

साथियों,

बरसों से टाट और टेंट के नीचे रह रहे हमारे रामलला के लिए अब एक भव्य मंदिर का निर्माण होगा। टूटना और फिर उठ खड़ा होना, सदियों से चल रहे इस व्यतिक्रम से रामजन्मभूमि आज मुक्त हो गई है। मेरे साथ फिर एक बार बोलिए, जय सियाराम, जय सियाराम!!!

साथियों,

हमारे स्वतंत्रता आंदोलन के समय कई-कई पीढ़ियों ने अपना सब कुछ समर्पित कर दिया था। गुलामी के कालखंड में कोई ऐसा समय नहीं था जब आजादी के लिए आंदोलन न चला हो, देश का कोई भूभाग ऐसा नहीं था जहां आजादी के लिए बलिदान न दिया गया हो। 15 अगस्त का दिन उस अथाह तप का, लाखों बलिदानों का प्रतीक है, स्वतंत्रता की उस उत्कंठ इच्छा, उस भावना का प्रतीक है। ठीक उसी तरह, राम मंदिर के लिए कई-कई सदियों तक, कई-कई पीढ़ियों ने अखंड अविरत एक-निष्ठ प्रयास किया है। आज का ये दिन उसी तप, त्याग और संकल्प का प्रतीक है।

राम मंदिर के लिए चले आंदोलन में अर्पण भी था तर्पण भी था, संघर्ष भी था, संकल्प भी था। जिनके त्याग, बलिदान और संघर्ष से आज ये स्वप्न साकार हो रहा है, जिनकी तपस्या राममंदिर में नींव की तरह जुड़ी हुई है, मैं उन सब लोगों को आज नमन करता हूँ, उनका वंदन करता हूं। संपूर्ण सृष्टि की शक्तियां, राम जन्मभूमि के पवित्र आंदोलन से जुड़ा हर व्यक्तित्व, जो जहां है, इस आयोजन को देख रहा है, वो भाव-विभोर है, सभी को आशीर्वाद दे रहा है।

साथियों,

राम हमारे मन में गढ़े हुए हैं, हमारे भीतर घुल-मिल गए हैं। कोई काम करना हो, तो प्रेरणा के लिए हम भगवान राम की ओर ही देखते हैं। आप भगवान राम की अद्भुत शक्ति देखिए। इमारतें नष्ट कर दी गईं, अस्तित्व मिटाने का प्रयास भी बहुत हुआ, लेकिन राम आज भी हमारे मन में बसे हैं, हमारी संस्कृति का आधार हैं। श्रीराम भारत की मर्यादा हैं, श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम हैं।

इसी आलोक में अयोध्या में राम जन्मभूमि पर, श्री राम के इस भव्य-दिव्य मंदिर के लिए भूमिपूजन हुआ है। यहां आने से पहले, मैंने हनुमानगढ़ी का दर्शन किया। राम के सब काम हनुमान ही तो करते हैं। राम के आदर्शों की कलियुग में रक्षा करने की जिम्मेदारी भी हनुमान जी की ही है। हनुमान जी के आशीर्वाद से श्री राममंदिर भूमिपूजन का ये आयोजन शुरू हुआ है।

साथियों,

श्रीराम का मंदिर हमारी संस्कृति का आधुनिक प्रतीक बनेगा, हमारी शाश्वत आस्था का प्रतीक बनेगा, हमारी राष्ट्रीय भावना का प्रतीक बनेगा, और ये मंदिर करोड़ों-करोड़ लोगों की सामूहिक संकल्प शक्ति का भी प्रतीक बनेगा। ये मंदिर आने वाली पीढ़ियों को आस्था, श्रद्धा, और संकल्प की प्रेरणा देता रहेगा। इस मंदिर के बनने के बाद अयोध्या की सिर्फ भव्यता ही नहीं बढ़ेगी, इस क्षेत्र का पूरा अर्थतंत्र भी बदल जाएगा। यहां हर क्षेत्र में नए अवसर बनेंगे, हर क्षेत्र में अवसर बढ़ेंगे। सोचिए, पूरी दुनिया से लोग यहां आएंगे, पूरी दुनिया प्रभु राम और माता जानकी का दर्शन करने आएगी। कितना कुछ बदल जाएगा यहां।

साथियों,

राममंदिर के निर्माण की ये प्रक्रिया, राष्ट्र को जोडऩे का उपक्रम है। ये महोत्सव है- विश्वास को विद्यमान से जोड़ने का। नर को नारायण से, जोड़ने का। लोक को आस्था से जोड़ने का। वर्तमान को अतीत से जोड़ने का। और स्वं को संस्कार से जोडऩे का। आज के ये ऐतिहासिक पल युगों-युगों तक, दिग-दिगन्त तक भारत की कीर्ति पताका फहराते रहेंगे। आज का ये दिन करोड़ों रामभक्तों के संकल्प की सत्यता का प्रमाण है।

आज का ये दिन सत्य, अहिंसा, आस्था और बलिदान को न्यायप्रिय भारत की एक अनुपम भेंट है। कोरोना से बनी स्थितियों के कारण भूमिपूजन का ये कार्यक्रम अनेक मर्यादाओं के बीच हो रहा है। श्रीराम के काम में मर्यादा का जैसा उदाहरण प्रस्तुत किया जाना चाहिए, देश ने वैसा ही उदाहरण प्रस्तुत किया है। इसी मर्यादा का अनुभव हमने तब भी किया था जब माननीय सर्वोच्च न्यायालय ने अपना ऐतिहासिक फैसला सुनाया था। हमने तब भी देखा था कि कैसे सभी देशवासियों ने शांति के साथ, सभी की भावनाओं का ध्यान रखते हुए व्यवहार किया था। आज भी हम हर तरफ वही मर्यादा देख रहे हैं।

साथियों,

इस मंदिर के साथ सिर्फ नया इतिहास ही नहीं रचा जा रहा, बल्कि इतिहास खुद को दोहरा भी रहा है। जिस तरह गिलहरी से लेकर वानर और केवट से लेकर वनवासी बंधुओं को भगवान राम की विजय का माध्यम बनने का सौभाग्य मिला, जिस तरह छोटे-छोटे ग्वालों ने भगवान श्रीकृष्ण द्वारा गोवर्धन पर्वत उठाने में बड़ी भूमिका निभाई, जिस तरहमावले, छत्रपति वीर शिवाजी कीस्वराज स्थापना के निमित्त बने, जिस तरह गरीब-पिछड़े, विदेशी आक्रांताओं के साथ लड़ाई में महाराजा सुहेलदेव के संबल बने, जिस तरह दलितों-पिछ़ड़ों-आदिवासियों, समाज के हर वर्ग ने आजादी की लड़ाई में गांधी जी को सहयोग दिया, उसी तरह आज देशभर के लोगों के सहयोग से राम मंदिर निर्माण का ये पुण्य-कार्य प्रारंभ हुआ है।

जैसे पत्थरों पर श्रीराम लिखकर रामसेतु बनाया गया, वैसे ही घर-घर से, गांव-गांव से श्रद्धापूर्वक पूजी शिलाएं, यहां ऊर्जा का स्रोत बन गई हैं। देश भर के धामों और मंदिरों से लाई गई मिट्टी और नदियों का जल, वहां के लोगों, वहां की संस्कृति और वहां की भावनाएं, आज यहां की शक्ति बन गई हैं। वाकई, ये न भूतो न भविष्यति है। भारत की आस्था, भारत के लोगों की सामूहिकता की ये अमोघ शक्ति, पूरी दुनिया के लिए अध्ययन का विषय है,शोध का विषय है।

साथियों,

श्रीरामचंद्र को तेज में सूर्य के समान, क्षमा में पृथ्वी के तुल्य, बुद्धि में बृहस्पति के सदृश्य और यश में इंद्र के समान माना गया है। श्रीराम का चरित्र सबसे अधिक जिस केंद्र बिंदु पर घूमता है, वो है सत्य पर अडिग रहना। इसीलिए ही श्रीराम संपूर्ण हैं। इसलिए ही वो हजारों वर्षों से भारत के लिए प्रकाश स्तंभ बने हुए हैं। श्रीराम ने सामाजिक समरसता को अपने शासन की आधारशिला बनाया था। उन्होंने गुरु वशिष्ठ से ज्ञान, केवट से प्रेम, शबरी से मातृत्व, हनुमानजी एवं वनवासी बंधुओं से सहयोग और प्रजा से विश्वास प्राप्त किया।

यहां तक कि एक गिलहरी की महत्ता को भी उन्होंने सहर्ष स्वीकार किया। उनका अद्भुत व्यक्तित्व, उनकी वीरता, उनकी उदारता उनकी सत्यनिष्ठा, उनकी निर्भीकता, उनका धैर्य, उनकी दृढ़ता, उनकी दार्शनिक दृष्टि युगों-युगों तक प्रेरित करते रहेंगे। राम प्रजा से एक समान प्रेम करते हैं लेकिन गरीबों और दीन-दुखियों पर उनकी विशेष कृपा रहती है। इसलिए तो माता सीता, राम जी के लिए कहती हैं-

‘दीन दयाल बिरिदु संभारी’।

यानि जो दीन है, जो दुखी हैं, उनकी बिगड़ी बनाने वाले श्रीराम हैं।

साथियों,

जीवन का ऐसा कोई पहलू नहीं है, जहां हमारे राम प्रेरणा न देते हों। भारत की ऐसी कोई भावना नहीं है जिसमें प्रभु राम झलकते न हों। भारत की आस्था में राम हैं, भारत के आदर्शों में राम हैं! भारत की दिव्यता में राम हैं, भारत के दर्शन में राम हैं! हजारों साल पहले वाल्मीकि की रामायण में जो राम प्राचीन भारत का पथ प्रदर्शन कर रहे थे, जो राम मध्ययुग में तुलसी, कबीर और नानक के जरिए भारत को बल दे रहे थे, वही राम आज़ादी की लड़ाई के समय बापू के भजनों में अहिंसा और सत्याग्रह की शक्ति बनकर मौजूद थे! तुलसी के राम सगुण राम हैं, तो नानक और कबीर के राम निर्गुण राम हैं!

भगवान बुद्ध भी राम से जुड़े हैं तोसदियों से ये अयोध्या नगरी जैन धर्म की आस्था का केंद्र भी रही है। राम की यही सर्वव्यापकता भारत की विविधता में एकता का जीवन चरित्र है! तमिल में कंब रामायण तो तेलगू में रघुनाथ और रंगनाथ रामायण हैं। उड़िया में रूइपाद-कातेड़पदी रामायण तो कन्नड़ा में कुमुदेन्दु रामायण है। आप कश्मीर जाएंगे तो आपको रामावतार चरित मिलेगा, मलयालम में रामचरितम् मिलेगी। बांग्ला में कृत्तिवास रामायण है तो गुरु गोबिन्द सिंह ने तो खुद गोबिन्द रामायण लिखी है। अलग अलग रामायणों में, अलग अलग जगहों पर राम भिन्न-भिन्न रूपों में मिलेंगे, लेकिन राम सब जगह हैं, राम सबके हैं। इसीलिए, राम भारत की ‘अनेकता में एकता’ के सूत्र हैं।

साथियों,

दुनिया में कितने ही देश राम के नाम का वंदन करते हैं, वहां के नागरिक, खुद को श्रीराम से जुड़ा हुआ मानते हैं। विश्व की सर्वाधिक मुस्लिम जनसंख्या जिस देश में है, वो है इंडोनेशिया। वहां हमारे देश की ही तरह ‘काकाविन’रामायण, स्वर्णद्वीप रामायण, योगेश्वर रामायण जैसी कई अनूठी रामायणें हैं। राम आज भी वहांपूजनीय हैं। कंबोडिया में ‘रमकेर’रामायण है, लाओ में ‘फ्रा लाक फ्रा लाम’ रामायण है, मलेशिया में ‘हिकायत सेरी राम’तो थाईलैंड में ‘रामाकेन’है! आपको ईरान और चीन में भी राम के प्रसंग तथा राम कथाओं का विवरण मिलेगा।

श्रीलंका में रामायण की कथा जानकी हरण के नाम सुनाई जाती है, और नेपाल का तो राम से आत्मीय संबंध, माता जानकी से जुड़ा है। ऐसे ही दुनिया के और न जाने कितने देश हैं, कितने छोर हैं, जहां की आस्था में या अतीत में, राम किसी न किसी रूप में रचे बसे हैं! आज भी भारत के बाहर दर्जनों ऐसे देश हैं जहां, वहां की भाषा में रामकथा, आज भी प्रचलित है। मुझे विश्वास है कि आज इन देशों में भी करोड़ों लोगों को राम मंदिर के निर्माण का काम शुरू होने से बहुत सुखद अनुभूति हो रही होगी। आखिर राम सबके हैं, सब में हैं।

साथियों,

मुझे विश्वास है कि श्रीराम के नाम की तरह ही अयोध्या में बनने वाला ये भव्य राममंदिर भारतीय संस्कृति की समृद्ध विरासत का द्योतक होगा। मुझे विश्वास है कि यहां निर्मित होने वाला राममंदिर अनंतकाल तक पूरी मानवता को प्रेरणा देगा। इसलिए हमें ये भी सुनिश्चित करना है कि भगवान श्रीराम का संदेश, राममंदिर का संदेश, हमारी हजारों सालों की परंपरा का संदेश, कैसे पूरे विश्व तक निरंतर पहुंचे। कैसे हमारे ज्ञान, हमारी जीवन-दृष्टि से विश्व परिचित हो, ये हमारी, हमारी वर्तमान और भावी पीढ़ियों की ज़िम्मेदारी है। इसी को समझते हुए, आज देश में भगवान राम के चरण जहां जहां पड़े, वहाँ राम सर्किट का निर्माण किया जा रहा है!

अयोध्या तो भगवान राम की अपनी नगरी है! अयोध्या की महिमातो खुद प्रभु श्रीराम ने कही है-

“जन्मभूमि मम पुरी सुहावनि”॥

यहां राम कह रहे हैं- मेरी जन्मभूमि अयोध्या अलौकिक शोभा की नगरी है। मुझे खुशी कि आजप्रभु राम की जन्मभूमि की भव्यता, दिव्यता बढ़ाने के लिए कई ऐतिहासिक काम हो रहे हैं!

साथियों,

हमारे यहां शास्त्रों में कहा गया है-“न्राम सदृशो राजा, प्रथिव्याम् नीतिवान् अभूत”॥ यानि कि, पूरी पृथ्वी पर श्रीराम के जैसा नीतिवान शासक कभी हुआ ही नहीं! श्रीराम की शिक्षा है-“नहिं दरिद्र कोउ दुखी न दीना”॥ कोई भी दुखी न हो, गरीब न हो। श्रीराम का सामाजिक संदेश है- “प्रहृष्ट नर नारीकः,समाज उत्सव शोभितः”॥ नर-नारी सभी समान रूप से सुखी हों। श्रीराम का निर्देश है- “कच्चित् ते दयितः सर्वे, कृषि गोरक्ष जीविनः”। किसान, पशुपालक सभी हमेशा खुश रहें। श्रीराम का आदेश है-“कश्चिद्वृद्धान्चबालान्च, वैद्यान् मुख्यान् राघव। त्रिभि: एतै: वुभूषसे”॥ बुजुर्गों की,बच्चों की, चिकित्सकों की सदैव रक्षा होनी चाहिए। श्रीराम का आह्वान है- “जौंसभीतआवासरनाई।रखिहंउताहिप्रानकीनाई”॥ जो शरण में आए,उसकी रक्षा करना सभी का कर्तव्य है। श्रीराम का सूत्र है- “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”॥ अपनी मातृभूमि स्वर्ग से भी बढ़कर होती है। और भाइयों और बहनों, ये भी श्रीराम की ही नीति है- “भयबिनुहोइन प्रीति”॥ इसलिए हमारा देश जितना ताकतवर होगा, उतनी ही प्रीति और शांति भी बनी रहेगी।

राम की यही नीति और रीति सदियों से भारत का मार्गदर्शन करती रही है। राष्ट्रपिता महात्मा गांधी ने, इन्हीं सूत्रों, इन्हीं मंत्रों के आलोक में, रामराज्य का सपना देखा था। राम का जीवन, उनका चरित्र ही गांधीजी के रामराज्य का रास्ता है।

साथियों,

स्वयं प्रभु श्रीराम ने कहा है-

देशकाल अवसर अनुहारी। बोले बचन बिनीत बिचारी॥

अर्थात, राम समय, स्थान और परिस्थितियों के हिसाब से बोलते हैं, सोचते हैं, करते हैं।

राम हमें समय के साथ बढ़ना सिखाते हैं, चलना सिखाते हैं। राम परिवर्तन के पक्षधर हैं, राम आधुनिकता के पक्षधर हैं। उनकी इन्हीं प्रेरणाओं के साथ, श्रीराम के आदर्शों के साथ भारत आज आगे बढ़ रहा है!

साथियों,

प्रभु श्रीराम ने हमें कर्तव्यपालन की सीख दी है, अपने कर्तव्यों को कैसे निभाएं इसकी सीख दी है! उन्होंने हमें विरोध से निकलकर, बोध और शोध का मार्ग दिखाया है! हमें आपसी प्रेम और भाईचारे के जोड़ से राममंदिर की इन शिलाओं को जोड़ना है। हमें ध्यान रखना है,जब जबमानवता ने राम को माना है विकास हुआ है, जब जब हम भटके हैं विनाश के रास्ते खुले हैं! हमें सभी की भावनाओं का ध्यान रखना है। हमें सबके साथ से, सबके विश्वास से, सबका विकास करना है। अपने परिश्रम, अपनी संकल्पशक्ति से एक आत्मविश्वासी और आत्मनिर्भर भारत का निर्माण करना है।

साथियों,

तमिल रामायण में श्रीराम कहते हैं-

“कालम् ताय, ईण्ड इनुम इरुत्ति पोलाम्”॥

भाव ये कि, अब देरी नहीं करनी है, अब हमें आगे बढ़ना है!

आज भारत के लिए भी, हम सबके लिए भी, भगवान राम का यही संदेश है! मुझे विश्वास है, हम सब आगे बढ़ेंगे, देश आगे बढ़ेगा! भगवान राम का ये मंदिर युगों-युगों तक मानवता को प्रेरणा देता रहेगा, मार्गदर्शन करता रहेगा! वैसे कोरोना की वजह से जिस तरह के हालात हैं,प्रभु राम का मर्यादा का मार्ग आज और अधिक आवश्यक है।

वर्तमान की मर्यादा है, दो गज की दूरी- मास्क है जरूरी। मर्यादाओं का पालन करते हुए सभी देशवासियों को प्रभु राम स्वस्थ रखें, सुखी रखें, यही प्रार्थना है। सभी देशवासियों पर माता सीता और श्रीराम का आशीर्वाद बना रहे।

इन्हीं शुभकामनाओं के साथ, सभी देशवासियों को एक बार फिर बधाई!

बोलो सियापति रामचंद्र की…जय !!!

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1643518

प्र. बा. जोग – एक प्रसिद्ध खास पुणेरी माणूस

प्र. बा. जोग – एक प्रसिद्ध खास पुणेरी माणूस

आचार्य अत्रे यांच्याप्रमाणेच अफाट आणि अचाट बोलणारे वक्ते म्हणून पुण्यातले श्री.प्र.बा.जोग प्रसिद्ध होते. त्यांच्या भाषणांना तुफान गर्दी होत असे आणि लोक हंशाटाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत असत. त्यांच्यासंबंधी वॉट्सअॅपवरून मिळालेला लेख खाली दिला आहे. काही पुणेरी पाट्या या पानावर दिल्या आहेत. https://anandghare.wordpress.com/2019/06/03/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a5%80/

पुणेरी पाट्या लावण्याची परंपरा या भिडूने सुरू केली.

पुण्यनगरीला पाट्यांच शहर म्हणलं जातं. कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त अपमान करून घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ पुणे. आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील पण पहिली फेमस पाटी कोणी लावली त्या भिडूच नाव आम्ही तुम्हाला सांगू शकतो.
प्रभाकर बाळकृष्ण जोग म्हणजे प्र.बा.जोग विद्वान माणूस विक्षिप्त असतो अस म्हणतात, पुणे तर विक्षिप्त लोकांनी भरलेलं शहर आहे. प्र बा जोग हे या सगळ्या विक्षिप्त पुणेकरांचे बादशहा होते.

ते मूळचे वकील. शिवाय क्रिकेट सामन्याचे अंपायर, पट्टीचे वक्ते आणि वर राजकारणी सुद्धा. पण त्यांचा सगळ्यात आवडता छंद भांडणे हा होता. पेशाने ते वकील , त्यात सदाशिव पेठ त्यात भांडण्याची खुमखुमी असलेले . म्हणजे किती जालीम रसायन असेल याची कल्पना करा भांडण्यासाठी त्यांना कोणतेही कारण पुरायचे. अगदी लाकडी जिन्यावरून चालताना आवाज झाला किंवा गवळ्याने चरवी जोरात आदळली या कारणाने देखील त्यांची भांडणे व्हायची. पण ही सगळी भांडणे मारामाऱ्या टाइप नसून तात्विक असायची.

गंमत म्हणजे यातूनच त्यांनी मी हा असा भांडतो नावाचं पुस्तक देखील लिहिलं होतं.

ही सारखी सारखी होणारी भांडणे टाळावी यासाठी त्यांनी घरात प्रवेश करतानाच काही पाट्या लिहून ठेवल्या होत्या.

माझ्यावर विश्वास असेल तर या, नाहीतर कायमचे कटा (गणगोतासह).
या वाक्याखाली दोन्ही दिशांना बाण दाखवून ‘कटण्याचा मार्ग’ही दाखवलेला!
अशी पाटी पाहून आत जाण्याची कुणाची हिंमत झालीच, तर समोरच्याच बाजूला एक उंचच्या उंच फलक वाचायला मिळायचा. त्यात दहा सूचना लिहिलेल्या.

‘‘लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरेंची बोलावणी करणेस दुपारी १२ ते ४ येऊ नये’’
‘इना, फिना, लक्स वगैरेचे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकिटे खपविणारे, भीक मागणारे, मदत मागणारे, अमके कुठे राहतात, तमक्याचा लग्नाचा मुलगा कोठे राहतो वगैरे चौकशी करणारे, वर्गणी मागणारे यांनी बिलकुल येऊ नये.
तुमच्या सोयीच्या वेळी माझेकडे येऊ नका.
खासगी भेटी ७ ते ९, शनिवारी सुट्टी, दुपारी १२ ते ४ या वेळेत कोणीही येऊ नये,
अशा अनाहूत सूचनांचाही भडिमार करणाऱ्या या दहा सूचनांच्या खाली जी कडी केली आहे, ते वाक्य असे :
वरील सूचना सर्वासाठी आहेत. गेली २४ वर्षे लोकांच्या अवेळी येण्याने त्रासलो, म्हणून या सूचना कराव्या लागल्या आहेत, क्षमस्व!” – प्र. बा. जोग
प्र. बा. जोग यांच्या या पाट्यांनी संपूर्ण पुणे शहरात धमाल उडवून दिली होती.
सगळेजण त्यांना घाबरायचे पण तरीही फक्त पाट्या वाचण्यासाठी अनेकजण त्यांच्या वाड्यात चक्कर मारून यायचे. पुण्यात पाट्यांचा आद्य जनक म्हणून त्यांना ओळखलं गेलं.
त्यांचे तात्विक वाद अनेक ठिकाणी व्हायचे. पुण्यातल्या सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत त्याना बोलण्याची इच्छा असायची पण त्यांना बोलू दिलं जात नसे.

त्यामुळे चिडून त्यांनी त्यांनी आपल्या चारचाकीला (बहुतेक अँबॅसॅडर किंवा फियाट गाडी असावी!) टपावर लाकडी फळ्या ठोकून एक ‘चालता’ असा मंचच बनवून घेतला होता आणि स्वतःची पसंत व्याख्यानमाला सुरू केली. त्या मंचावर ते दोन खुर्च्या टाकत एकावर आपल्या छोट्या मुलाला व्याख्यानाचा अध्यक्ष म्हणून बसवत व शेजारी आपण उभे राहून भाषण ठोकत. त्यांचे गंमतीदार भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. स्वारगेट जवळच्या नेहरू स्टेडिअमवर रणजी ट्रॉफीचा सामना होता तिथे काही तरी राजकारण करून प्र.बा.जोग यांना अंपायरिंग करू दिल गेल नाही, एवढंच काय तर ते येऊन भांडतील म्हणून मैदानात सुद्धा प्रवेश करू दिला नाही.

यामुळे चिडलेल्या जोगांनी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षक गॅलरीपेक्षाही उंच असे मचाण बांधले आणि सामना सुरू होताच, त्या मचाणावर बसून लाऊडस्पीकरने त्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन केले. जोगांच्या या धावत्या कॉमेंट्रीसाठीही पुणेकरांनी भरगच्च गर्दी केली होती.

त्यांच्या या भांडण्याच्या छंदामुळे त्यांची वकीली चांगली चालायची. मुंबई राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी यांनी दारुबंदी केली, आणि प्र.बा. जोगांची वकिली फळफळली.

‘दारुबंदीचा गुन्हा करा आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला सोडवीन’
अशी जाहिरातच त्यांनी करायला सुरुवात केली. या दारुबंदीच्या खटल्यांमध्ये जोगांनी एवढा पैसा मिळवला, की त्यांनी आपल्या घराला ‘मोरारजीकृपा’ असे नाव दिले. त्यांनी विधानसभेच्या अनेक अपक्ष म्हणून अनेक निवडणुका लढवल्या आणि प्रत्येक वेळी हरले. पण नगरसेवक पदी मात्र ते हमखास निवडून येत. सलग दोन वेळा त्यांनी पुण्याचं उपमहापौर पद सांभाळलं.

पुढे त्यांच्या नावाने त्यांच्या मुलांनी शाळा व ज्युनिअर कॉलेज सुरू केले. पी जोग क्लासेस चे सुहास जोग अस्थिशल्यविशारद विलास जोग, बालरोगतज्ज्ञ प्रमोद जोग ही प्र.बा. जोग यांची मुले होत. बिग बॉस मुळे फेमस झालेला अभिनेता पुष्कर जोग हा सुहास जोगांचा मुलगा आणि प्र.बा.जोग यांचा नातू.

आजही जुन्या पुण्यात गेलं तर आचार्य अत्रेंच्या खालोखाल प्र.बा.जोग यांच्या बद्दल किस्से ऐकायला मिळतील. ते प्रचंड हुशार होते, त्यांच्या कडक शिस्तीचा, त्यांच्या फटकळ स्वभावाबद्दल पुण्यात एक आदरयुक्त दरारा होता.

त्यांनी लिहिलेल्या पाट्यांना कॉपी करून पुणेकरांनी हा विक्षिप्तपणा अजरामर करून ठेवला.

—————-

हा लेख मला वॉट्सअॅपवरून मिळाला होता, इंटरनेटवर शोध घेतल्यानंतर हा लेख मला इथे सापडला. लेखकाचे आभार आणि इथे संग्रहित करण्यासाठी अनुमति असावी अशी विनंति. https://bolbhidu.com/p-b-jog-puneri-pati/

श्री. प्र बा जोग यांची अधिक माहिती इथे
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0.%E0%A4%AC%E0%A4%BE._%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97

कागदाचे पान

मंगेश पाडगावकर पान

कसं आहे ना?

एक कागदाचं पान असतं…!!

‘श्री’ लिहलं, की पूजलं जातं …

प्रेमाचे चार शब्द लिहले, की जपलं जातं…

काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं…

एक कागदाचं पान असतं…!!

कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं…

कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं…

कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं…

आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं…

एक कागदाचं पान असतं….!!

जे लेखकाच्या लेखणीला हात देतं…

जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं…

जे व्यापाऱ्याच्या हिशोबाला ज्ञात ठेवतं…

आणि हो, वकीलासोबत कोर्टात गेलं, की साक्षही देतं…

एक कागदाचंपान असतं…..!!

पेपरवेट ठेवला, की एकदम गप्प बसतं…

काढून घेतला, की स्वच्छंदी फिरतं आणि
कशांत अडकलं, तर फडफडायला लागतं…

एक कागदाचंपान असतं…..!!

ज्यावर बातम्या छापल्या, की वर्तमानपत्र बनतं…

प्रश्न छापले, की प्रश्नपत्रिका बनतं…

विवाहाचं निमंत्रण छापलं, की लग्नपत्रिका बनतं…

तर कधी आदेश~संदेश लिहले, की तेच टपालही बनतं…

एक कागदाचं पान असतं….!!

माणसाच्या जीवनांत आणि त्यांत खूप साम्य असतं…!!

एक कागदाचंपान असतं…!!🎊🎊🎊

पुणे का आवडते ?

नवी भर : आवडते जुने पुणे  …..  दि.२८-०५-२०२० खाली पहा


 

पुणे शहराविषयीचे अनेक मजेदार लेख मी “पुणे मार्गदर्शक (मिस)गाईड” या भागात एकत्र केले आहेत. https://anandghare.wordpress.com/2018/12/02/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a1/
हा लेख जरा मोठा असल्यामुळे स्वतंत्रपणे प्रकाशित करत आहे. याच्या लेखकाचे नाव माहीत नाही, पण इतिहासकाळापासून अगदी आजच्या संगणकयुगापर्यंत बदलत गेलेल्या पुण्याची सगळी वैशिष्ट्ये त्याने गोळा केली आहेत.
……. वॉट्सअॅपवरून साभार

सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,

पेशव्यांच्या ‘सर्व’ पराक्रमांचे पुणे..

लाल महालात ‘तोडलेल्या’ बोटांचे पुणे..

इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे..

‘कोटी’सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे..

नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणा-या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे..

“सौ. विमलाबाई गरवारे च्या पोरांचा गर्वच नाही तर माज आहे पुणे”

सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणा-या नू.म.वि., भावे स्कूल चे पुणे..

SP, FC, BVP, SIMBY, Modern, MIT आणि वाडिया चे पुणे..

आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून (की बांधून?) Two Wheeler वाल्या मुलींचे पुणे..

RTO कडून License to kill इश्यू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे..

Info Tech park चे पुणे..

Koregaon Park चे पुणे..

कॅम्पातल्या श्रूजबेरी वाल्या कयानींचे पुणे..

चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे..

वैशाली च्या yummy सांबार चे पुणे..

रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे..

तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे..

खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे..

JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे..

कॅड बी आणि कॅड एम चे पुणे..

सोडा शॉप चे पण पुणे..

अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे..

University मध्ये शिकणा-यांचे पुणे, आणि University च्या जंगलात ‘दिवे लावणा-यांचे पुणे..

कधी ही न थकणा-या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे (तिथली साधी डोक्याची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही)..

खवय्यांसाठी जीव देणा-या German Bakery चे पुणे, आणि चवी साठी जीव टाकणा-या खवय्यांचे पुणे..

बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg ‘थाळी’ वाले पुणे..

सदशिवातले बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपु-यातले रात्रीचे लजीज पुणे..

मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणा-या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे..

शिकणा-यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणा-यांचे पण पुणे..

‘सरळ’ मार्गी प्रेमिकांच्या ‘Z’ bridge चे पुणे..

सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे..

ताजमहाल पाहून सुद्धा “बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान” अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे..

फटकळ, खवचट, उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे..

‘इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही’ अशी ख्याती मिरवणारे पुणे !..

पेशवे पार्कातल्या पांढ-या मोरांचे आणि वाघांचे पुणे..

आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणा-या “फुलराणी” चे पुणे..

भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे..

पुरुषोत्तम आणि फिरोदियाच्या जल्लोषाचे पुणे..

bollywood ला acting ची अक्कल शिकवणा-या wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणा-या ‘NFAI’ चे पुणे..

फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्व्हा, भानुविलास आणि नटराज चे पुणे..

आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे..

गोगलगायीशी स्पर्धा करणा-या PMPML चे पुणे..

प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणा-यांचे पुणे आणि
कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे..

लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे..

प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे..

Christmas ला MG Road ला हौसेने केक खाणारे पुणे..

भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे..

सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे..

Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे…

पहिला संपूर्ण भारतीय सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे..
आणि “आम्हाला कशाला लागतोय mobile ?” असे पण म्हणणारे पुणे..

जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Mercs, VolksWagon आणि Jaguar, Nano बनवणारे पुणे..

सकाळ संध्याकाळी फिरायला जाणा-या थकलेल्या पायांचे पुणे,

Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणा-यांचे पुणे..

पर्वती वर प्रॅक्टीस करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे..

पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे..

उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,..

Sunday ला सकाळी पॅटीस, पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणा-यांचे पुणे,
कसबा आणि गुरूवारातल्या भावड्यांचे पुणे..

सदाशिव, नारायण, शनिवारातल्या भाऊंचे पुणे..

बारा महिने २४ तास online असणारे, पण दुकान मात्र दुपारी दोन-चार तास बंद ठेवणारे,
असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेवाद्वितीय पुणे !!💪😎े Share the post if you’re proud to be a punekar

*************************
नवी भर दि. २८-०५-२०२०
 पुणेकरांना नक्कीच आवडेल

आमचे जुने पुणे

(लेखकाचा शोध घेतला, पण तो काही भेटला नाही.)
६०- ७० वर्षांपूर्वीचे पुणे पाहीलात का?
लकडी पुलावर पूर्वी मांडी घालून बसलेली वीतभर उंचीची ‘सगुणा’ नावाची स्त्री ही बाया बापड्यांचे खास आकर्षण असे. त्यांनी विचारलेल्या अवखळ प्रश्नांना सगुणा बिनधास्त उत्तरे देऊन लीलया टोलवत असे!
१९४० चे दशक असावे ते. आज मागे वळून पाहिले तर पुण्याचे ते रस्ते, ती माणसे, ते पडके वाडे, ते टांगेवाले, त्या सायकली सगळे सगळे नामशेष झाले आहे. उरलेले अवशेषही संपण्याच्या मार्गावरच आहेत. पर्वती, चतुःशृंगी, शनवार वाडा हे पुण्याचे मानदंड. आजची शानदार सारस बाग त्या काळी पुण्यात नव्हती. खोल तळ्यात गणपती बुडालेला होता.
पेशवे पार्कचा ऐसपैस प्रदेश आणि तेथली गर्द झाडी थेट निसर्गाच्या कुशीतच माणसांना ओढून न्यायची. संभाजी पार्क त्यावेळी नव्याने आकाराला आले होते. सगळे पुणे संध्याकाळी आणि विशेषतः रविवारी संभाजी पार्ककडे चाललेले असायचे. गणेश पेठेतून जिमखान्यापर्यंत फक्त १० पैशांत आरामात जाता यायचे. त्या वेळी शनिवार वाड्याचे भव्य पटांगण व्याख्यात्यांना बोलावण्याची एक महत्त्वाची जागा होती. मस्तानी दरवाज्या जवळच्या पिंपळाच्या गर्द सावलीत जादूगार आपली जादू पेश करायचे.
ही जादू पाहण्यासाठी खूप गर्दी होत असे. बाहेरून आलेला पाव्हना जेवण्यासाठी हमखास विजयानंद थिएटर जवळ असणाऱ्या, आगगाडीसारख्या लांबच लांब पसरलेल्या ‘ गुजराथ लॉज ‘ मध्ये जात असे. डुल्या मारुती, जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, भिकारदास मारुती अशा वैविध्यपूर्ण आणि पुणेकरांप्रमाणेच अस्सल नावे धारण करणारा हनुमान आपल्या जयंतीला साऱ्या पुण्यातच धुमाकूळ घालायचा.
तुळशी बाग, बेलबाग ही पुणेकरांची खास श्रद्धास्थाने. धुपारती, दीपारती होताना निर्माण होणारे येथील वातावरण पुणेकरांच्या भक्तीभावनेचेच प्रतीक असे. या ठिकाणी प्रसिद्ध ह.भ.प. कीर्तनकारांची सदाच चालणारी कीर्तने ऐकण्यासाठी घरातल्या आजीबाई हाताने फुलवाती वळता – वळता बुवांच्या सुश्राव्य कीर्तनातील मोक्याच्या जागांना दाद देताना टाळ्या वाजवण्यासाठी हातही जरा मोकळे ठेवीत.
तुळशीबाग म्हणजे लहान मुलांची खेळणी मिळण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. राम-लक्ष्मण- सीता यांच्यासमोर उभ्या असणाऱ्या मारुतीच्या उजव्या हाताला लांब सरळ रेषेत जमिनीवरच त्यावेळी बायका हारीने दुकाने मांडून बसलेल्या असत.
तसेच पुढे गेल्यावर नगाऱ्याची देवडी असे. त्या बोळकंडीतील अंधाऱ्या जागी दोन्ही कट्टयांवर काही माणसे चक्क झोपलेली असायची. त्या काळात चितळ्यांचे प्रस्थ पुण्यात नव्हते. काका हलवाई व दगडूशेठ हलवाई यांनीच पुणेकरांचे तोंड गोड करण्याचा मक्ता घेतलेला होता.
सोन्या मारुती चौकातील कन्हैय्यालाल सराफाची पेढी भलतीच जोशात होती. एस.पी.कॉलेज समोरचे जीवन रेस्टॉरंट कॉलेज विद्यार्थ्यांची जान होती. सामिष भोजनासाठी त्याकाळी लक्ष्मी रोडवर गोखले हॉल समोर ‘सातारकर हेल्थ होम’ हे भोजनगृह होते.
प्रसिद्ध पहिलवानांचे फोटो तेथे ओळीने लावलेले असत. त्यांचे पिळदार स्नायू, पिळदार पोटऱ्या दाखवणारी बलदंड शरीरे आम्हां तरुणांच्या डोळ्यांत भरत.
सामिष भोजनाचा हा परिणाम आहे, असे वाटून तेथे तगड्या शरीराचे तरुण यायचे, तसेच काडीपैलवानही मोठ्या आशेने जेवण्यासाठी यायचे !
डेक्कन जिमखान्यावरील कॅफे गुडलक व लकी ही दोन इराणी रेस्टॉरंट समाजातील उच्चभ्रूंचे अड्डेच समजले जात. त्याकाळी उडप्यांची मिरासदारी पुण्यात फारशी जाणवत नव्हती. सोन्या मारुती चौकात त्याकाळी जुनी दूधभट्टी होती. ती गवळी लोकांनी नुसती भरून जात असे. कोणत्याही कुलुपाची किल्ली हमखास बनवून देणारा ‘बाबूलाल किल्लीवाला’ याच रस्त्यावर आपले दुकान थाटून बसलेला होता. तेव्हाचे हे डुप्लिकेट किल्ल्या बनवून देणारे एकमेव दुकान पुण्यात होते.
त्या काळात पुण्यात उत्तम जिलब्या ‘मथुरा भवन’ मध्ये मिळत. पायातल्या चपला हमखास चोरीला जाण्याचे ठिकाण म्हणजे दगडू शेठ दत्तमंदिर! आजच्या इतके पुण्याचे ओद्योगिकीकरणं झालेले नव्हते.
पुणे हे विद्येचे माहेरघर व शिक्षणाचे केंद्रस्थान असल्याने लांबून- लांबून मुले शिकण्यास येत. त्या काळात आजच्यासारखा जीवनाचा भन्नाट वेग नव्हता. रस्त्यावरून व्यवस्थित चालता यायचे. झोपडपट्टया मोठ्या प्रमाणावर नव्हत्या. रस्त्यावरून जाताना भेटणारे ओळखीचे लोक थांबून मनापासून बोलत.
बोलता- बोलता मुलांच्या हातावर ढब्बू पैसा तरी ठेवत वा शेंगदाणे, खारे दाणे, खारका असा खाऊ मूठभर ठेवत. त्याकाळात सिमेंटच्या गगनचुंबी इमारती पुण्यात नव्हत्या.
आठवते तिथपर्यंत पर्वती, भांबुरडा, कोथरूड गावठाण, एरंडवणे ही त्या काळातली जंगले होती. हल्ली सारेच पुणे सिमेंटचे जंगल झालेले आहे! पोस्टमन, शाळेतला शिपाई आणि फार तर पोलीस हीच ड्रेसवाली मंडळी वेगळी अशी उठून दिसायची. सायकली मात्र अमाप दिसायच्या. कारण पुणेकरांचे जीवनच सायकलवर अवलंबून होते. पुणेरी टांगेवाले हे एक मासलेवाईक प्रकरण होते. त्यावेळी भल्या सकाळी मोराची पिसे लावलेली उंच टोपी घालून रामनामाचा गजर करीत येणारा ‘वासुदेव’ पुणेकरांच्या घरातीलच एक झालेला असे. तो सगळ्यांना नवलाख पायऱ्यांवरून थेट जेजुरीला घेऊन जायचा, चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करणाऱ्या वारकऱ्यांच्या घोळक्यात नेऊन पांडुरंगाचे दर्शन घडवायचा.
तेथून तुळजापूरच्या भवानी व कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायांवर घालून आणायचा. ‘चाईला औखद, वाताला औखद’ म्हणणाऱ्या वैदू बायका पुण्यात घरोघर हिंडायच्या. जालीम जडीबुटी देणाऱ्या या बायकांची माजघरापर्यंत उठबस असे. भाकरीच्या तुकड्यावर सागरगोटे देणाऱ्याही काही बायका टोपलीला चहुबाजूंनी गोधडी सारखे कापड लावून तीत सागरगोटे, बांगड्या, करगोटे, खडे, अंगठया ठेवीत आणि ती टोपली डोक्यावर व काखोटीला मूल घेऊन पुण्याचे गल्ली बोळ तुडवीत असत. गर्दीचे पुण्याला वेडच असावं. तीन डोळ्यांचं पोरं लोकांना रस्त्यावर दाखवून त्यातून पैसा मिळवणारे लोक इथेच गोळा होत. मग त्या पोराला पाहायला ही झुंबड उडे.
त्या काळी पुण्यात वाहनांचे अपघात क्वचितच होत. त्यामुळे एखादा अपघात झाला तरीही ते दृश्य पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमे.
मला आठवते त्याप्रमाणे ताराचंद हॉस्पिटल जवळ, श्री समर्थ व्यायाम मंदिरा समोरच्या मोकळ्या पटांगणात गोल रिंगणातून सतत सायकल चालविण्याची शर्यत त्यावेळी एक चर्चेचा, आकर्षणाचा विषय झालेला होता. त्या फिरणाऱ्या सायकलवरच आंघोळ करणे, कपडे बदलणे इ गोष्टी तो इसम करीत असे!
सतत ७२ तास सायकल चालवण्याचा विक्रम पाहण्यासाठी लोक तोबा गर्दी करीत. जादूचे खेळ, डोंबाऱ्यांची कसरत, गारुड्यांचे नागाचे, दरवेशी लोकांचेअस्वलाचे व माकडवाल्यांचे भागाबाईचे खेळ कुठे ना कुठे चालत असत व लोक खूष होऊन पैसे फेकीत. मुठा नदीला पावसाळ्यात आलेला पूर पाहण्यासाठी होणारी गर्दी व या पुरात उड्या टाकून पोहणाऱ्या धाडसी तरुणांना पाहण्यासाठी व प्रोत्साहन देणाऱ्यांची गर्दी हा प्रसंगअविस्मरणीय असे.
लकडी पुलावर पूर्वी मांडी घालून बसलेली वीतभर उंचीची ‘सगुणा’ नावाची स्त्री ही बाया बापड्यांचे खास आकर्षण असे. त्यांनी विचारलेल्या अवखळ प्रश्नांना सगुणा बिनधास्त उत्तरे देऊन लीलया टोलवत असे!
लोकांची हसून-हसून मुरकुंडी वळे. मग तिला लोक प्रेमाने पैसे देत, खायला आणून देत. त्या काळात पुण्यातील उंच इमारत म्हणजे विश्रामबाग वाड्यासमोरील बँक ऑफ महाराष्ट्रची इमारत. त्यानंतर मग कॉर्पोरेशनची इमारत आणि तिसरी लकडी पुलाजवळील एल आय.सी.ची बिल्डिंग. पुण्याचे हे ६०-७० वर्षांपूर्वीचे रूप आजही माझ्या मनातून पुसले गेलेलं नाही.
पुण्यातील गल्ली-बोळ माझ्या पायांनी तुडवले गेले असल्याने व पुढे सायकल वरून आख्खे पुणे पालथे घातले असल्याने, मी ते विसरूच शकत नाही. तो माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे —श्री संजीव वेलणकर यांच्या face book page वरून साभार.लेखक अज्ञात🙏🏻
Comments
Sudhir Dandekar
सर्व निरिक्षणे खूपच छान शब्दांकन करून मांडल्यामुळे आपल्या आठवणी चलतचित्राप्रमाणे सर्व जिवंत झाल्या. खूपच सुखद. हे पाहून लेखकाने आपले नांव सांगितलं आम्हालाही त्यांच्याशी संपर्क साधायला आवडेल
फेसबुकावरून साभार दि. २८-०५-२०२०

ओळखा पाहू – भाग १

आजकाल व्हॉट्सअॅपवर अनेक मजेदार कोडी प्रसारित होत असतात. अशीच काही कोडी या भागात संग्रहित करायचे ठरवले आहे. मला ही कोडी जशी मिळत गेली तसतशी नवी कोडी वर देऊन जुनी कोडी खाली ठेवली आहेत. त्यामुळे ती क्रमवार दिसत नाहीत. तुम्हीही आधी सोडवायचा प्रयत्न तर करून पहा.
मला मिळालेली जमतील तेवढी उत्तरे मी खाली दिली आहेत.

या पहिल्या भागात मी २० कोडी दिली आहेत. यापुढील आणखी  कोडी इथे पहा. https://anandghare.wordpress.com/2020/05/28/%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8/

****************************************
नवी भर दि.१३-०५-२०२० : १७, १८, १९, २०

१७. फुले आणि मिठाया

🌸🍫🍀🍩🌹🍪💐🥮🍥
फुल आणि मिठाई एकत्र झाली आहे बघुया कोण वेगळं करून दाखवतो.
१)ढाणीरापेतरा
२)र्फीनिबधाशिगं
३)गुभोबराजलाग
४)रईसईमजाला
५)वंबुंडुशेदीलाती
६)अजिस्टलेरबी
७)स्वंसवदबेडीनजा
८)कघीनेवरर
९)सणीफुफेदाली
१०)चुगतीररामोमो
११)ल्लामेचरलीगुस
१२)काईजुलीजुतक
१३)चंबलरोपामदा
१४)खंगुबालश्रीक्षीड
१५)रहरमोलखीगु
१६)शिरीकजापारात
१७)लाकंलीदकली

.

.

१. रातराणी पेढा
२. निशिगंध बर्फी
३. गुलाब राजभोग
४. जाई रसमलाई
५. शेवंती बुंदीलाडू
६. अॅस्टर जिलेबी
७. जास्वंद बेसनवडी
८. कणेर घीवर
९. सदाफुली फेणी
१०. मोगरा मोतीचूर
११. चमेली रसगुल्ला
१२. जुई काजूकतली
१३. चंपा दालमोठ ?
१४. गुलबाक्ष श्रीखंड
१५. गुलमोहर खीर
१६. पारिजातक शिरा
१७. लिली कलाकंद

**************

१८. मराठी चित्रपट

हिंदी वाक्यातून मराठी चित्रपट ओळखा.

१. बंद मंदिर
२. महाराष्ट्र राजधानीका दामाद
३. भाईके पत्नीकी चूडियाँ
४. लव कुश के सम्राट पिता
५. धरतीके पीठपे
६. एक गाडी दो सवारी
७. अभिनेताओंका बादशाह
८. मेरा शोहर सबसे अमीर
९. मन्नतसे माँगा मेरा पती
१०.ऐसा ये फसाना
११.पेडगाँवके होशियार लोग
१२. बेटी ससुराल चली
१३. बाबुलके घरकी साडी
१४. पिछा करना
१५. पुराना वो सोना
१६. चँपियन बननेका मिशन
१७. जीता हुआ
१८.हम हमारे गाँव जाते हैं
१९. कुली की मौज
२०. था एक जोकर
२१. बेटी का दान
२२. कानून की बात किजिये
२३. साससे बढकर दामाद
२४. एक आवारा दिन
२५. मेरी प्यारी सौतन
२६. हनिमून
२७. आगे का पैर
२८. कितने देर तेरी राह देखूँ
२९. मकान
३०. बेटा मैं तेरे लिये कैसी लोरी गाऊँ

.

१. देऊळ बंद
२.मुंबईचा जावई
३.वहिनींच्या बांगड्या
४. अयोध्येचा राजा / रामराज्य
५. जगाच्या पाठीवर
६. डबलसीट
७. नटसम्राट
८. माझा पती करोडपती
९. नवरा माझा नवसाचा
१०. अशी ही बनवाबनवी
११. पेडगावचे शहाणे
१२. लेक चालली सासरला
१३.माहेरची साडी
१४. पाठलाग
१५. जुने ते सोने
१६. मिशन चँपियन
१७. विजेता
१८. आम्ही जातो अमुच्या गावा
१९. हमाल दे धमाल
२०. एक होता विदूषक
२१. कन्याादान
२२. कायद्याचं बोला
२३. सासू वरचढ जावई
२४. एक उनाड दिवस
२५. सवत माझी लाडकी
२६. मधुचंद्र
२७. पुढचं पाऊल
२८. पाहू रे किती वाट
२९. घरकुल , ते माझे घर
३०. बाळा गाऊ कशी अंगाई

***************

१९. स्त चे शब्द

शेवटचे अक्षर स्त असलेले शब्द

१ पाठीवर असणारा हात
२ एक धातू
३ संपूर्ण नायनाट
४ त्रासून गेलेला
५ एक नक्षत्र
६ खूप छान
७ बांधून ठेवलेला
८ अगदी योग्य
९ लाजरा बुजरा
१० मित्र
११ शिमग्यात मागितलेली बिदागी
१२ एखाद्यावर टाकलेला विश्वास
१३ प्रभावी व्यक्तिमत्त्व
१४ सगव्ठे खाऊन सपवणे
१५ चौकशी
१६ कमी मूल्य असलेले
१७ खूप सारे
१८ सूर्य मावळणे
१९ रात्रीची राखण
२० पींकदाणी
२१ नेमून दिलेले काम करणारा
२२ भरवसा देणे
२३ सगळे विखुरलेले असणे
२४ घटनेची तीव्रता सांगणारा शब्द
२५ खूप मोठे

१ वरदहस्त,
२ जस्त
३ उध्वस्त
४ त्रस्त
५ हस्त
६ मस्त
७ बंदीस्त
८ रास्त
९ भिडस्त
१० दोस्त
११ पोस्त
१२ भिस्त
१३ भारदस्त
१४ फस्त
१५ वास्तपुस्त
१६ स्वस्त
१७ समस्त
१८ सूर्यास्त
१९ गस्त
२० तस्त
२१ नेमस्त
२२ आश्वस्त
२३ अस्ताव्यस्त
२४
२५ प्रशस्त

*******************

२०. चार अक्षरी शब्द

तुम्हाला असे चार अक्षरी शब्द शोधायचे आहेत की त्या शब्दाच्या पहिल्या अक्षरावर फक्त अनुस्वार असेल. पहिल्या अक्षराला काना मात्रा ऊकार काही नसेल. उदाहरण —
जमिनीखाली येणारी भाजी—
उत्तर—कंदमुळ

तर चला मग सोडवा तुमचे शब्दकोडे😊😊

१)ग्रहणाचा एक प्रकार—
२)कचर्‍याची गाडी—
३)शंकराचे एक नाव—
४)देवासमोर अखंड लावायचा दिवा—
५)पूज्य—
६)खुप गार—
७)कैदी—
८)साष्टांग नमस्कार—
९)गंगेचे पाणी
१०)विद्रोह करणारा—
११)एक रोग—
१२)संघाचे हे खुप शिस्तबद्ध असते—
१३)सांज—
१४)गणपतीचा प्रसाद—
१५)रावण—
१६)राजकपुरनी आणलेली एक नायिका किंवा एक नदी—
१७)रांगोळी—
१८)गाढव—
१९)रावणाची बायको—
२०)गणपतीचे एक नाव—
२१)हत्तीच्या कान आणि डोळ्यामधले स्थान—
२२)तामिळनाडुतील एक जिल्हा—
२३)एखाद्या माहितीबद्दल काहीही खबर नसणे
२४)काळोख—
२५)कुळाची यादी—
२६)साठवुन ठेवलेले पैसे—

तर सुरु करा सोडवायला असंही आज सर्वांकडे भरपूर वेळ आहे !😊

१. खंडग्राास
२. घंटागाडी
३. गंगाधर
४. नंदादीप
५. वंदनीय
६. थंडगार
७. बंदीवान
८. दंडवत
९. गंगाजल
१०. बंडखोर
११. संधीवात
१२. संचलन
१३. संध्याकाळ
१४. पंचखाद्य
१५. लंकाधीश
१६. मंदाकिनी
१७. रंगवल्ली
१८. लंबकर्ण
१९. मंदोदरी
२१. लंबोदर
२२. तंजावूर
२३.
२४. अंधःकार
२५. वंशावळ
२६. गंगाजळी

आता उरलेला एक शब्द कुणीतरी सांगावा.
आनंद घारे

श्री गजानन काळे यांनी उत्तर दिले आहे २३. गंधवार्ता. त्यांचे आभार.

नवी भर दि.२४-०४-२०२० : १५, १६

१५. प्रसिद्ध नायिका

ओळखा पाहू – प्रसिद्ध नायिका

1) न र्णा से प अ
2) र ला गो र्मि टा श
3) ख शा रे आ पा
4) म शा द ग म बे श
5) ना र रो शि क ड क्षि मि
6) ना र्थ भ म स शो
7) दा न मा हि ह रे व
8) हा न नू ज र
9) धु ला बा म
10) री कु मी मा ना
11) न त नू
12) ली ता बा गी
13) सि ला मा न्हा
14) रा ना दि
15) मा ती ला यं ज वै
16) नी द प मि
17) न ञा से चि सु
18) रा नो बा सा य
19) नी मा मा हे लि
20) मा नो म र
21) ना सा ध
22) ब स्सु त म
23) ध्या सं
24) ता म ज मु
25) खा रे
26) बा वि न द्या ल
27) ता ली बा गी यो
28) ता रं जी
29) भा री या दु ज
30) से मु न मू न न
31) टे भा खो शु
32) रा णा रु णी अ ई
33) या प डी प डिं ल का
34) राॅ री ना य
35) बी वी न र प बाॅ
36) ग नी सिं तु
37) राॅ नि रु य पा
38) वा लि ता ल र प
39) न ल हे
40) की ला श
41) मी र्जी च स मौ ट
.
.
.

१)अपर्णा सेन
२)शर्मिला टागोर
३)आशा पारेख
४)शमशाद बेगम
५)मीनाक्षी शिरोडकर
६)शोभना समर्थ
७)वहीदा रेहमान
८)नूरजहान
९)मधुबाला
१०)मीनाकुमारी
११)नूतन
१२)गीताबाली
१३)मालासिन्हा
१४)नादिरा
१५)वैजयंतीमाला
१६)पद्मिनी
१७)सुचित्रा सेन
१८)सायराबानो
१९)हेमामालिनी
२०)मनोरमा
२१)साधना
२२)तबस्सुम
२३)संध्या
२४)मुमताज
२५)रेखा
२६)विद्या बालन
२७)योगीता बाली
२८)रंजीता
२९) जया भादुरी
३०)मुनमूनसेन
३१)शुभा खोटे
३३)डिंपल कपाडिया
३४) रीना रॉय
३५)परवीनबाबी
३६)नीतुसिंग
३७)निरुपा रॉय
३८)ललिता पवार
३९)हेलन
४०)शकीला
४१)मौसमी चटर्जी


१६. जिल्हयांची नावे

नमस्कार महाराष्ट्रीयन मंडळी
🙏🏻 🙏🏻
खाली महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची नावे लपलेली आहेत… बघा ओळखता येतात का❓

1) 🌙🌊
2) 🕯️🤷🏻‍♀️
3) 🦊🌊
4) 🐮 Dha ❌
5) 🍽️🍴🥄 Ra
6) 🐍🌊
7) 🔥❌
8) 🐝 D
9) 💎🚶‍♀️🧎‍♀️
10) 7️⃣ Aara
11) 🔥 gaon
12) 🦎🏠
13) 🛕🏜️ Chi 😭
14) 📯 Ne
15) 🅰️🍹
16) Gon 🪔
17) 🦵 Oor
18) 🥞 1 1/2
19) ❌😤
20) ⬆️ Dha

👍👍😅👍👍

१. चंद्रपूर
२. मुंबई ?
३. कोल्हापूर
४. बुलढाणा
५. भंडारा
६. नागपूर
७. जालना
८. बीड
९. रत्नागिरी
१०. सातारा
११. जळगाव ?
१२. पालघर
१३.गडचिरोली
१४. पुणे ?
१५. अकोला
१६. गोंदिया
१७. लातूर
१८. नांदेड
१९. नाशिक
२०. वर्धा

************************
नवी भर दि.१९-०४-२०२० : ११,१२,१३,१४

११. शब्द ओळखा

[ चार अक्षरी शब्द ओळखा.तिसऱ्या अक्षरावर अनुस्वार आला पाहिजे.]
जसे रानमेवा ……करवंद
1——एक लांब आकाराचा दगड
2—–लाकडी चारपायी
3—–एक बैठक
4—-भरपुर केस असलेली अळी
5—-वालुकामय प्रदेश
6—-खुप मोठे भांडण
7—-भरपुर, न संपणारे
8—-अडवुन धरणे
9—-कोणत्याही कामात तरबेज
10—-ऊन्हाळ्यात मुद्दाम खातात
11—-नल प्रेमिका
12—–कसलाच काही नेम नाही
13—दुधाचा गोड पदार्थ
14—-अगदी मापात
15—दुसऱ्याबद्दल मनात कणव असणारा
16—–अल्प बुध्दीचा
17—-ताकदवान ,खुप शक्तीशाली
18—–रामाचा सेवक
19—-अयोध्यापती
20—-गालफुगी
21—-दह्यापासुन बनविलेला एक पदार्थ
22—–गावचा अधिकारी ,कारभारी
23—-जखमी होणे
24—-एक गोड वडीचा प्रकार
25—-जगन्माता ,देवी
26—-गणपतीचे एक नाव
27—-प्रख्यात ,सुप्रसिध्द
28—-एक स्त्रीयांचा अलंकार
29—–परमेश्वर
30—-विरस होणे,

.

.
१. वरवंटा
२. घडवंची
३. सतरंजी
४. सुरवंट
५. वाळवंट
६. खडाजंगी
७. गडगंज
८. प्रतिबंध
९.
१०. गुलकंद
११. दमयंती
१२. निरबंध
१३. कलाकंद
१४. मापदंड
१५. दयावंत
१६. मतिमंद
१७. बलवंत
१८. हनुमंत
१९. रामचंद्र
२०. गालगुंड
२१. आम्रखंड
२२. सरपंच
२३. जायबंदी
२४. कलाकंद
२५.जगदंबा
२६.एकदंत
२७. नामवंत
२८. बाजूबंद
२९. भगवंत
३०. रसभंग


१२.नाटके

या गाजलेल्या मराठी नाटकांची नावे सांगा…

1) हि ला सू पा ले णू र्य मा स

2) ळ श ल्लो सं क य

3) चि क य त दा दा

4) ज ध ला र णा वी म्ह ति ली

5) ची ली फु श्रुं झा ले अ

6) का गो ल ए ष्ट ची ग्ना

7) ही ही स स रे

8) ची ठी मि दा ह बा को ई

9) ड न लं नि ऱ्हा घा ला ड व य लं

10) ची त रा ऱ्या र व व वा

11) चे चं चा का द्र

12) या मा सा ली हि ची ल व

13) ष पु रू

14) र ईं खा स बा रा ड म

15) ची रू व मो शी मा

16) था ले द्या अ क ची क च्या कां

17) व ध ला णी डे कु मा क गे

18) तो ल मी म रा बो य थू से न ड गो

19) नी नी म ध्या

20) रे ला लो झा च्या

.

.
१.सूर्य पाहिलेला माणूस
२.संशयकल्लोळ
३.यदाकदाचित
४.वीज म्हणली धरतीला
५. अश्रूंची झाली फुले
६. एका लग्नाची गोष्ट
७.सही रे सही
८.हमीदाबाईची कोठी
९.बिऱ्हाड निघालं लंडनला
१०. वाऱ्यावरची वरात
११.काचेचा चंद्र
१२. हिमालयाची सावली
१३. पुरुष
१४.सखाराम बाइंडर
१५.मोरूची मावशी
१६.अकलेच्या कांद्याची कथा
१७.गेला माधव कुणीकडे
१८. मी नथूराम गोडसे बोलतोय
१९.ध्यानीमनी
२०.लोच्या झालारे


१३. साहित्यिक

खालील दिलेल्या अक्षरांत काही सुप्रसिद्ध मराठी लेखक किंवा कवींची नावे दडलेली आहेत..
ओळखा पटापट..

१. वी य त ळ वं ज द
२. आ ह ना य टे री ण प रा
३. के अ द श प्र द त्रे ल्हा
४. बा नी रो र स ब जि
५. ट सं प त बा व
६. भा र्गा त ग दू व
७. भें ष सु डे भा
८. म ल्ली ती प रु चि मा त
९. ई ण त दे जि सा र
१०. पां ल दे डे पु श
११. रे अ णा ढे रू
१२. वा ए श कुं र ज म ल हे
१३. गि र ळ गं ड ध गा गा
१४. क णे री म ग ग रा ड श
१५. बो ग गो मं ले ड ला
१६. ध ख र गो द्या ले वि
१७. चिं ण ना शी वि ता जो य म क
१८. द बा म बा क
१९. रू त्त सं पु ळे षो व का त म
२०. णे त का अ र नं क
२१. क ष णे री क शि र
२२. का ट त र सं ने व क
२३. क गे धू र्णि मं श म क
२४. ती र्वे रा इ क व
२५. की जा री र गि

हार्दिक शुभेच्छा

Complied by …  GUNESH BHIDE

.

.

१.जयवंत दळवी
२. हरी नारायण आपटे
३. प्रह्लाद केशव अत्रे
४. सरोजिनी बाबर
५. वसंत बापट
६. दुर्गा भागवत
७. सुभाष भेंडे
८. मारुती चितमपल्ली
९.रणजित देसाई
१०. पु ल देशपांडे
११. अरुणा ढेरे
१२. महेश एलकुंचवार
१३. गंगाधर गाडगीळ
१४. राम गणेश गडकरी
१५. मंगला गोडबोले
१६. विद्याधर गोखले
१७. चिंतामण विनायक जोशी
१८. बाबा कदम
१९. वसंत पुरुषोत्तम काळे
२०. अनंत काणेकर
२१. शिरीष कणेकर
२२. वसंत कानेटकर
२३. मधू मंगेश कर्णिक
२४. इरावती कर्वे
२५. गिरीजा कीर


१४.भाज्या

पुढील वर्णना नुसार भाज्या
ओळखा… …
1) माणूस म्हणलं की होणारच…
2) ही अशी नजर म्हणजे धाकच बाई……
3) हे फळ म्हणजे एक तीर्थक्षेत्र…..
4) याला ‘ट’ लावलं की झालं माकडाचं…….
5) यातला ‘ब’ काढला की बाय-बाय……
6) याला कापलं कि यानं रडवलंच समजा……
7) चार बायका एकत्र आल्या की त्यांचा संपतच नाही……
8) पुण्या जवळून वाहणारी नदी……….
9) सांभाळ करणारे…..
10) पाठ खरबड, खायची परवड………
11) बायकांची नाजूक नाजूक बोटं………
12) फुल च, पण जरा जाडजूड आणि वेगळं……
13) थंड हवेचं, बर्फाळ प्रदेशातील एक पर्यटन स्थळ…..
14) केसांची एक प्रकारची रचना, फक्त शेवटी वेलांटी द्या….
15) गोष्टीतल्या म्हातारीची गाडी…….

.
१.चुका
२.करडी
३. काशीफळ
४.शेपू
५.बटाटा
६.कांदा
७.घोळ
८.मुळा
९.पालक
१०.दोडका
११.भेंडी
१२. प्लॉवर
१३.सिमला मिरची
१४. कोबा
१५.भोपळा

*******************************

नवी भर दि. ०५-०४-२०२० : ८,९,१०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

८. राम नवमी निमित्त श्री रामाची गाणी ओळखा.

1… रा र आ क ये
2… उ श्री रा प झा
3… पा र सा ला सी स्व
4… वी प श्री झ अं
5… रा ज ग स रा ज
6… कौ रा बा कौ रा
7… घ घ च तू आ रा
8… र रा ग ग तो बो श
9… वी न श्री म
10.. र आ आ ध का बो
11… रा ह्र रा ना
12.. श्री घ ब क तू रे तू ल – कु बा
13.. श्री च ध द मा पा व्हा
14.. पा वे का तू ब श्री
15.. रा क प पा गा भ आ
16.. र आ प स्प पा म के
17.. रा म मो ने भ पा का
18.. स्व श्री. रा प्र ऐ कु ल रा गा
19.. से बां से बां रे सा सी रा की ज
20.. न नौ प फी ग न गं उ भ … श्री नां सां श्री पा क

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
१. रामा रघूनंदना आश्रमात या कधी रे येशिल
२. उठी श्रीरामा पहाट झाली
3. पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवराला
४.
५. राम जन्मला ग सखी राम जन्मला
६.कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
७. घडी घडी घडी चरण तुझे आठवते रामा
८. रघुपती राघव गजरी गजरी, तोडित बोरे शबरी
९.
१०. रघुनंदन आले आले, धरणीमाता कानी बोले
११. रामाहृदयी राम नाही
१२ श्रीरामा घनश्यामा बघशिल कधी रे तू
१३. श्रीरामाचे चरण धरावे दर्शनमात्रे पावन व्हावे
१४.
१५.
१६.
१७,
१८. स्वये श्रीरामप्रभू ऐकती
१९.सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी
२०. नकोस नौके परत फिरू
मी बरीचशी गाणी ओळखली आहेत. उरलेली वाचकांनी सांगावी.

९. भारतीय खाण्यातले पदार्थ ओळखा

Hey foodies………
Guess the names of these indian food dishes…

1. K.5/2 🅿️🚰
2.💪🅰️L⛎
3.👑🅿️🚰
4.L🅰️ch🅰️ 🅿️🅰️®️👋
5.But®️ ❎🅰️n
6. Ch❎ 👩💲L 🅰️
7. 🅿️🚰 but®️ 👩💲L.A.
8. 👩laℹ k🅾️ f👋
9. ♏ℹ❎ 🍆🍐🍠
10. 🍅 🍵
11. 👩t ®️ 🅿️⛎la🅾️
12. 🍹👩la ℹ
13. 👩 💲la 👨d
14. ✈️ ❎n

१.कढाई पनीर
२. दम आलू
३. शाही पनीर
४.लच्छा पराठा
५. बटर नान
६. चना मसाला
७. पनीर बटर मसाला
८. मलाई कोफ्ता
९. मिक्स्ड व्हेजिटेबल
१०.टोमॅटो सूप
११. मटर पुलाव
१२. रसमलाई
१३. मसाला पापड ?
१४. हवाई नान ?
————

१०. म्हणी ओळखा

आजचा खेळ थोडा गमतीचा आहे
म्हणी ओळखायचा
अद्याक्षरे दिलेली आहेत तुम्ही दिलेल्या अद्याक्षरावरून म्हणी ओळ्खयच्या आहे
उदा. अ ते मा — अति तेथे माती.

१. दे दे दं
२. चो म चां
३. व ते वां
४. पु पा मा स
५. ए ना ध भा चिं
६. आ बि ना
७. अ ना गा पा ध
८. उं मां सा
९. झा मु स ला
१०. वा लं गा श
११. आ जी बा उ
१२. न फुं सो इ ति गे वा
१३. मा म मा ज
१४.दा क का
१५. घ मा चु
१६. इ आ ति वि
१७. न ल स वि
१८. क ना त्या ड क
१९. आ अं घे शिं
२०. ए गा बा भा

चला सुरू करा …..!!!

.

.

1 देखल्या देवा दंडवत २ चोराच्या मनात चांदणे 3 वड्याचे तेल वांग्यावर 4 पुढचे पाठ मागचे सपाट 5 एक ना धड भाराभर चिंध्या 6 आयत्या बिलावर नागोबा 7 अडला नारायण गाढवाचे पाय धरी 8 उंदराला मांजर साक्षी 9 झाकली मूठ सव्वा लाखाची 10 वासरात लंगडी गाय शहाणी 11 आयजीच्या जीवावर बायजी उदार 12 नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे 13 माय मरो मावशी जगो 14 दाम करी काम 15 घरो घरी मातीच्या चुली 16 इकडे आड तिकडे विहीर 17. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने 18 कर नाही त्याला डर कशाला 19 आला अंगावर घेतला शिंगावर 20 एक गाव बारा भानगडी

*****************************

नवी भर दि. २९-०३-२०२०

७. मराठी गाणी 

💿📀    मराठी गाणी ओळखा    📀💿
( एक-दोन गाणी जुनी आहेत पण तुम्ही ऐकलेली आहेत)
उदा. सा वि तु रे म वे हे ला
उत्तर – सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड हे लागले
(1) घ सुं श्री अ झा
(2) गो गो पा फु छा दा म ए व आ
(3) सां क क तु भा मा म
(4) दि म सु न मी सं मा रे
(5) न न अ सु फु
(6) गो गो न मां आ
(7) दा कं ये ओ ये गा
(8) ह ह जो बा पा पा म झु खे
(9) ह हा नं घ पा त्या दे ह गो
(10) सां ये गो सा सा
(11) उ शु चां
(12) रा ही बा ह रा ही बा
(13) म जा द्या घ आ वा की बा
(14) निं झा चं झो गं बा
(15) या ज या ज श प्रे क

गाणी परिचयाची असली तरी  विचारण्याची पद्धत वेगळी असल्याने थोडा वेळ लागेल.

मराठी गाणी ओळखा कोड्याचे उत्तर-
१ घनःश्याम सुंदरा श्रीधरा
२ गोरी गोरी पान फुलासारखी छान
३ सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
४ दिसते मजला सुखचित्र नवे


७ दाटून कंठ येतो
८ हलके हलके जोजवा
९ हले हा नंदाघरी पाळणा
१० सांज ये गोकुळी सावळी सावळी
११ उगवली शुक्राची चांदणी
१२ राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
१३ मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा
१४ निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला गं बाई
१५ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

*****************************************

नवी भर दि. २३-०३-२०२०

६. शब्दांच्या अजब जोड्या
चला डोक्याला अजून एक नविन खाद्य !
खालील कोड्यात दिलेल्या कंसामधे अशी अक्षरे लिहा की ज्या मुळे कंसाच्या आधी दिलेला शब्द पूर्ण होईल आणि कंसाच्या पुढे दिलेल्या शब्दासाठी सुरुवात होईल.
कंसामध्ये जेवढे डॅश दिले आहेत तेवढी अक्षरे लिहायची आहेत.
उदा. वानर (_ _) पती . उत्तर आहे ( सेना) वानरसेना आणि सेनापती.

१) उप(_ _) दान
२) चंद्र (_ _) दालन
३) सदा(_ _) मान
४) सम(_ _) भरीत
५) श्री (_ _) भूमी
६) बस(_ _) खर
७) स्वयं(_) पती
८) दान(_ _)वीर
९) शूर (_ _)माता
१०) नंदा(_ _)दान
११) मान (_ _)गर
१२) सदा(_ _) चौघी
१३) यश(_) फळ
१४) सह(_ _ _) दान
१५) वजन(_ _) वान
१६) पाठ(_ _)वड
१७) व्यंग(_ _) पट
१८) सह(_ _) दान
१९) राज(_ _)वृक्ष
२०) सुख(_ _)पाठ

.

.

.

१) उप(_ _) दान     –  वर
२) चंद्र (_ _) दालन    – कला
३) सदा(_ _) मान    – वर्त
४) सम(_ _) भरीत    -रस
५) श्री (_ _) भूमी     – रंग
६) बस(_ _) खर     – कण
७) स्वयं(_) पती     – भू
८) दान(_ _)वीर    – शूर
९) शूर (_ _)माता    – वीर
१०) नंदा(_ _)दान    – दीप
११) मान (_ _)गर    – धन
१२) सदा(_ _) चौघी    – चार
१३) यश(_) फळ    – श्री
१४) सह(_ _ _) दान   – जीवन
१५) वजन(_ _) वान    – दार ?
१६) पाठ(_ _)वड     – लाग
१७) व्यंग(_ _) पट    –  चित्र
१८) सह(_ _) दान   – मत
१९) राज(_ _)वृक्ष     – वट
२०) सूख(_ _)पाठ    – शांति

नवी भर दि. २२-०३-२०२० : ४,५

४.खालील हिंदी गाणी ओळखा

1.पुरे झाली आजची भेट उद्या पाहिजे तेवढ्या गप्पा मार
2.आता तर तुझ्यामुळेच आहे माझा प्रत्येक आनंद
3.पुन्हा पुन्हा पहा हजार वेळा पहा
4.तू जिथे जिथे जाशील माझी सावली बरोबर असेल
5.तुझ्या डोळ्या शिवाय या जगात काय ठेवलय
6.हळू हळू चाल चंद्र आभाळात आहे
7.माझ प्रेम पत्र वाचून तू रागवू नकोस
8.कधीच तुझा पदर सोडणार नाही मी
9.या रंग बदलणार्‍या जगात माणसाची वागणूक ठीक नाही
10.दिवस कलला संध्याकाळ झाली
11.हे हृदय वगैरे प्रेम वगैरे मी नाही जाणत
12.तुझं माझ्याशी पहिल्यापासून काहीतरी नात आहे
13. पूर्ण शहरात तुझ्यासारखे कोणी नाही
14. तू जर साथ देण्याचे वचन दिले तर मी अशीच गाणी म्हणत राहीन.
15. जीवन हे प्रेमाचे गाणे आहे रोज सगळ्यानी गायले पाहिजे.
✍चला तर मग लागा कामाला🧐
कोरोना मॅसेज पासून आराम🙌
सुट्टीतला डोक्याला व्यायाम🤗

———–
कोड्याचे उत्तर-
१ आज की मुलाकात बस इतनी
२ अब तो है तुमसे हर खुशी अपनी
३ बार बार देखो हजार बार देखो
४ तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा
५ तेरी आंखों के सिवा दुनियामें रखा क्या है
६ धीरे धीरे चल चाँद गगनमें
७ ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना होना
८ कभी तेरा दामन ना छोडेंगे हम
९ इस रंग बदलती दुनियामें इन्सान की नीयत ठीक नहीं
१० ढल गया दिन हो गयी शाम
११ दिल विल प्यार व्यार मैं क्या जानूं रे
१२ तेरा मुझसे है पहले का नाता कोई
१३ सारे शहरमें आपसा कोई नही
१४ तुम अगर साथ देने का वादा करो
१५ जिंदगी प्यार का गीत है
***************************

५. प्र अक्षराने सुरू होणारे शब्द

काय घरीच आहात ना?
🙏🏻
चला खेळूया काहीतरी…

प्र चे कोडे. पहा जमतेय का?
खालील शब्दांना योग्य प्रतिशब्द शोधा. शब्दाची सुरुवात प्र पासून असावी

1घटना
2संसार
3पध्दत
4पहाट
5पराक्रम
6धबधबा
7ॐकार
8उजेड
9जगबुडी
10अनुभव
11जहाल/तीव्र
12सखोल
13पोहचवणे/पसरवणे
14रोगाची लागण
15चाबूक
16गणपतीचे नाव
17अल्हाददायक
18सुर्याचे नाव
19देशाटन
20उन्नती
21नागरिक
22वादल
23उद्देश/हेतु
24गमक
25अपराध
26आनंद
27हुशारी
28पणतु
29श्रृंगार
30तेजोवलय
31मार्गस्थ होणे
32त-हा
33कमल
34निसर्ग
35घाव
36माप
37लांबलचक/विस्तृत
38विरोध
39वर्गवारी
40पहिला
41परिणाम होणे
42रोज
43आग्रहाने सांगणे
44पहिली तिथी
45ऐसपैस
46देणे
47उलटून बोलणे
48कष्ट
49विशाल
50विश्वासघात
————–

कोड्याचे उत्तर-
१ प्रसंग
२ प्रपंच
३ प्रघात
४ प्रभात
५ प्रताप
६ प्रपात
७ प्रणव
८ प्रकाश
९ प्रलय
१० प्रचिती
११ प्रखर
१२ प्रगल्भ
१३ प्रचार
१४ प्रसार
१५ प्रतोद
१६ प्रथमेश
१७ प्रसन्न
१८ प्रभाकर
१९ प्रवास
२० प्रगती
२१ प्रजा
२२
२३ प्रयोजन
२४
२५ प्रमाद
२६ प्रमोद
२७ प्रज्ञा
२८ प्रपौत्र
२९ प्रसाधन
३० प्रभावळ
३१ प्रयाण
३२ प्रथा
३३ प्रमोदिनी
३४ प्रकृती
३५ प्रहार
३६ प्रमाण
३७ प्रदीर्घ
३८ प्रतिबंध
३९ प्रतवारी
४० प्रथम
४१
४२ प्रतिदिन
४३ प्रतिपादन
४४ प्रतिपदा
४५ प्रशस्त
४६ प्रदान
४७ प्रत्युत्तर
४८ प्रयास
४९ प्रचंड
५० प्रतारणा

*****************************

१. पौराणिक पति

आपण आपल्या बालपणापासून रामायण व महाभारत या कथा ऐकल्या आहेत. या कथे मधिल काही असामान्य स्त्रियांचे पती कोण होते, ते आज आपणास ओळखण्याची कामगिरी पार पाडायची आहे.

१ देवयानी
२ मंदोदरी
३ वृषाली
४ माद्री
५ जानकी
६ सुदेष्णा
७ यशोदा
८ हिडींबा
९ उर्मिला
१० अहिल्या
११ उत्तरा
१२ सुभद्रा
१३ तारा
१४ सुमित्रा
१५ शकुंतला.

पाहूया कोण कोण ओळखू शकतो..? 🚩

.

.

.

१ ययाती
२ रावण
३ कर्ण
४ पंडु
५ श्रीराम
६ विराट
७ नंद
८ भीम
९ लक्ष्मण
१० गौतम ऋषि
११ अभिमन्यू
१२ अर्जुन
१३ सुग्रीव व वाली
१४ दशरथ
१५ दुष्यंत

——————–
२. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने… बौद्धिक खुराक.

आपल्या मराठीच्या ज्ञानाची चाचणी… आणि पर्यायाने ज्ञानात भर…..
खाली दिलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहायचा आहे
कुठलाही काना, मात्रा, वेलांटी, उकार, जोडाक्षर वा अनुस्वार नसलेले उत्तर असावे

१. हत्ती –
२. पंकज-
३. तोंड –
४. पाणी –
५. नमस्कार –
६. बाप –
७. बाण –
८. बाग –
९. समस्या –
१०.घास –
११.धाक –
१२.भांडण –
१३.नवरा –
१४.पर्वत –
१५.कठीण –
१६.पुरुष –
१७.द्रव्य –
१८.आवश्यकता –
१९.उलगडा-
२०.दूध –
२१.रूची-
२२.गंध –
२३.गृह –
२४.घोडा –
२५.पाऊल –
२६.डोळा –
२७.तृण –
२८.रस्ता –
२९.हात –
३०.वारा-
३१.सुवर्ण –
३२ अंबर –
३३.खून –
३४.रास –
३५.कप्पा –
३६.पक्षी –
३७.किल्ला –
३८.अवचित –
३९. मृत्यू –
४०.अग्नि –
४१.काळ –
४२.जंगल –
४३.अविरत –
४४.आश्चर्य –
४५.अभिनेता-
४६.ढग –
४७.पोट-
४८.अंधार-
४९.ध्वनि –
५०.ओझे –

🙏🏻🙏🏻🙏🏻
कु. दिशा दिनेश जोशी

.

.

.

१. हत्ती – गज
२. पंकज- कमल
३. तोंड – वदन
४. पाणी – जल
५. नमस्कार – नमन
६. बाप – जनक
७. बाण – शर
८. बाग – उपवन
९. समस्या – अडचण
१०.घास – कवळ
११.धाक – वचक,जरब
१२.भांडण – कलह
१३.नवरा – धव
१४.पर्वत – अचल,नग
१५.कठीण – अवघड
१६.पुरुष – नर
१७.द्रव्य – धन
१८.आवश्यकता – गरज
१९.उलगडा- उकल
२०.दूध – पय
२१.रूची- चव
२२.गंध – दरवळ
२३.गृह – घर,सदन
२४.घोडा – हय
२५.पाऊल – चरण
२६.डोळा – नयन
२७.तृण – गवत
२८.रस्ता – पथ
२९.हात – कर
३०.वारा- पवन
३१.सुवर्ण – कनक
३२ अंबर – वसन,पट, नभ
३३.खून – वध
३४.रास – खच
३५.कप्पा – खण
३६.पक्षी – खग
३७.किल्ला – गड
३८.अवचित – एकदम
३९. मृत्यू – मरण
४०.अग्नि – अनल
४१.काळ – समय
४२.जंगल – वन
४३.अविरत – सतत
४४.आश्चर्य – नवल
४५.अभिनेता- नट
४६.ढग – घन,जलद
४७.पोट- उदर
४८.अंधार- तम
४९.ध्वनि – रव
५०.ओझे – वजन


३. आजचे कोडे… मराठी नाट्यगीते

नाट्यगीत रसिकांसाठी खास…  इंग्रजी वर्णनावरून मराठी नाट्यगीते ओळखा …

1. I hold your hand oh beautiful
2. Whom do I seek asylum
3. How do I give up this position at your feet
4. I find my life meaningless
5. Not so old, merely 75
6. I will not talk to you dear
7. See dear, the night is over
8. I find in him god of love
9. This scarf is so boring
10. She is like a crescent of moon
11. You are a delicate flower in the midst of a dangerous jungle
12. I have a moon on my forehead
13. The sky is full of dark clouds
14. Don’t you rush so much
15. Don’t you forget sign of our meeting

.

.

.

१.कर हा करी धरिला शुभांगी
२. वद जाऊ कुणाला शरण
३. कशी या त्यजू पदाला
४. अर्थशून्य भासे मज हा
५. म्हातारा इतुका न
६. नाही मी बोलत नाथा
७. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनि
८. मला मदन भासे हा
९. अरसिक किती हा शेला
१०. चंद्रिका ही जणू
११. गर्द सबोती रान साजणी तू तर चाफेकळी
१२. भाळी चंद्र असे धरिला
१३. नभ मेघांनी आक्रमिले
१४. घाई किती .. आले रे बकुळफुला
१५, नको विसरू संकेत मीलनाचा