दिवाळी २०२०

आजपासून या वर्षातली दिवाळी सुरू होत आहे. सामाजिक माध्यमांमधून रोज मिळणाऱ्या शुभेच्छा आणि सुवचने यांचा संग्रह या पानावर करायचे ठरवले आहे. या उपक्रमाची सुरुवात वसुबारस किंवा गुरुद्वादशीपासून करीत आहे. रोज मिळणारी नवी चित्रे आणि लेख यात जोडून हे काम आज दि.१७ ला पूर्ण करीत आहे.

🐮 आज वसुबारस 🐮
दिवाळीचा पहिला दिवस,
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो.
💐दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.💐


🌹🌹🌿💐🌿🌹🌹 🌹🌹🌿💐🌿🌹🌹

लक्ष्मी: सर्वभूतानां सर्वदेवेष्ववस्थिता।
धेनूरूपेण सा देवी मम पापं व्यपोहतु।।
नमो गोभ्य: श्रीमतीभ्य: सौरभेयीभ्य एव च।
नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नम:।।

जी सर्व प्रकारचे ऐश्वर्य व लक्ष्मी आहे, जी सर्व देवतांमध्ये विद्यमान आहे, ती गोमाता स्वरूप देवी आमचे पाप दूर करो. जी पवित्र आहे, त्या लक्ष्मी स्वरुप सुरभि कामधेनूची अपत्य असणाऱ्या ब्रह्मपुत्री गोमातांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो.

गोवत्सद्वादशी (वसुबारस) निमित्त सर्वांना शुभेच्छा!

**********

स्वदुग्ध सदा पोशिते जी जगाला।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया।
परमपूज्य जी वंद्य या भारताला।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारसेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
🙏😊

गुरुद्वादशी- श्रीपाद श्रीवल्लभ यांनी निजानंदी गमन केले तो दिवस. श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णा नदीत याच दिवशी गुप्त झाले.

अश्विन वद्य द्वादशी अर्थात गुरू द्वादशी! शिष्य या दिवशी गुरूंचे समर्पण भावनेने पूजन करतात म्हणून या दिवसाला गुरुद्वादशी म्हणतात. गुरुद्वादशीच्या दिवशी ब्रह्मांडात गुरुतत्व १०० पटीने जास्त प्रक्षेपित होते. प्रत्येक साधक व शिष्य यांच्यासाठी गुरुद्वादशी हा दिवस दीपावली व इतर दिवसांपेक्षा अतिशय महत्वाचा दिवस आहे.

🎊🌼🌼🌿🌼🌼🎉🌼🌼🌿🌼🌼🎊

आज अश्विन वसुबारस सणांचा राजा असा दीपोत्सव आजपासून सुरु होतोय !

रमा एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज
असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा उत्सव !

ही दिवाळी आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा
चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो 🙏
💐💐 शुभ दीपावली 💐💐

***********

संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश सारे
गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा
स्वच्छ सारे मार्ग अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी
स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा
**आजपासून दिवाळी सुरू होतेय.
**सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
💥🌟✨💥🌟✨💥🌟✨💥🌟✨💥

तिमिरातुनी तेजाकडे
ने दीप देवा जीवना
ज्योती परि शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ll

– कुसुमाग्रज
हा दीपोत्सव आणि येणारे वर्ष विक्रम संवत 2077 आपणास भरभराटीचे व सानंदतृप्तीचे जावो…

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळु दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्ती आणि करोनाचा विनाश,
मिळो सर्वांना विकासाच्या पाउल वाटेचा प्रकाश!
वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा
आणि भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

💥🌟✨💥🌟✨💥🌟✨💥🌟✨💥

 

धनतेरस Festival :: धन की परिभाषा ::

धन को लेकर आम धारणा है कि धन का अर्थ रुपया-पैसा है। लेकिन ऐसा नहीं है।
धन की सरल परिभाषा है — जिससे हमारा जीवन धन्य हो जाय, वही धन है।

विदेशेषु धनं विद्या व्यासनेषु धनं मतिः ।
परलोके धनं धर्म: शीलं सर्वत्र वै धनं ।।

अर्थात विदेश में विद्या सबसे उत्तम धन है, संकट में बुद्धि उत्तम धन है, परलोक में धर्म ही उत्तम धन है और शील, सहिष्णुता, विनम्रता तो सर्वत्र ही सर्वोत्तम धन है।

समस्त मित्रों, बंधु-बांधवों, स्वजनों-परिजनों को धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरि त्रयोदशी अर्थात धनतेरस की अशेष शुभकामनाएं।

*********

💫⚡✨🌟💥
धनदाय नमस्तुभ्यम निधिपद्माधिवाय च, भवन्तु त्वत्प्रसादान्मे धन धन्यदिसेम्पध!

धनवंतरि आज घर में आएं, स्वास्थ्य धन सबको दे जाएं
लक्ष्मी-गणपति-कुबेर का, हम सभी आशीर्वाद पाएं!

🙏🏻आपको और आपके परिवार को पंच दिवसीय दीपोत्सव के प्रथम पर्व धनतेरस की शुभकामनाएं!
💫💫💫💫⭐

Dhanteras is celebrated as birthday of Dhanvantri, father of medicine and ayurveda.
The REAL DHAN is our health. So today, let’s all pray for each other and our families for the best of health for everyone, physical spiritual emotional mental.

🙏Subh Dhanteras🙏

माता-पिता का साथ हो तो प्रतिदिन “धन-त्रयोदशी” है।
सुयोग्य जीवनसाथी का स्नेह हो तो प्रतिदिन “रूप-चतुर्दशी” है।
सुसंस्कारी संतान का सानिध्य हो तो प्रतिदिन “दीपावली” है।
श्रेष्ठ आजीविका का स्रोत हो तो प्रतिदिन “अन्नकूट” है।
सुशिक्षित भाई-बहन का सौहार्द हो तो प्रतिदिन “भाई-दूज” है।

दीपावली पर्व के पंचदिवसीय महामहोत्सव की आप सभी को हार्दिक बधाई और ढ़ेर सारी शुभकामनाएं…

🙏💐🌻🌹🌼🌺🌸💐🙏


आप सभी सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें।


शुभम करोति कल्याणम,
अरोग्यम धन संपदा,
शत्रु-बुद्धि विनाशायः,
दीपःज्योति नमोस्तुते !

आपको सपरिवार धनतेरस, दिवाली, गोवर्धन पूजा, भाईदूज की हार्दिक शुभकामनाएं !

दीपोत्सव आपके जीवन को सुख, समृद्धि, सुख-शांति, सौहार्द एवं अपार खुशियों की रोशनी से जग-मग करे…

💐💐💐💐💐💐💐

अनंत दिवे , अनंत ज्योती
उंबऱ्यावरची हसरी पणती
आली दिवाळी पुन्हा नव्याने
आनंदाला उधाण भरती

कंदिल झुलतो वाऱ्यावरती
तोरण फुलते दारावरती
रांगोळ्यातून रंगसंगती
फराळ खुलवी गोड पंगती
आतिषबाजी नभास भिडता
अंधारावर नक्षी कोरती

आप्तजनांची सुरेल नाती
सौख्याच्या या अक्षय वाती
हर्षौल्हासी मित्र सोबती
शुभेच्छांची रास मांडती
मागे सारून व्यथा करूणा
करू तेजाची अखंड आरती

नेहमी उत्स्फूर्त राहा .
हसत राहा .
आनंदी राहा .

शुभ दीपावली

💐💐💐💐💐💐💐

एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..

अन् एक मी.. शुभेच्छा देणारा..💐

” तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

*********

संतांची दिवाळी 

संत ज्ञानेश्वर
१) सुर्ये आधिष्ठीली प्राची |
जगा जाणिव दे प्रकाशाची ||
तैसी श्रोतया ज्ञानाची |
दिवाळी करी ||

२) मी अविवेकाची काजळी।
फेडूनि विवेकदीप उजळी।
तैं योगिया पाहें दिवाळी।
निरंतर।।

मनातील अविवेक, अज्ञान आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केला की मनुष्याच्या जीवनात निरंतर म्हणजे सतत दिवाळीच नांदते.

संत नामदेव
सण दिवाळीचा आला।
नामा राऊळाशी गेला॥
हाती धरोनी देवाशी।
चला आमुच्या घराशी॥

संत जनाबाई
आनंदाची दिवाळी।
घरी बोलवा वनमाळी॥
घालीते मी रांगोळी।
गोविंद गोविंद॥

संत तुकाराम
१) साधू संत येती घरा। तोची दिवाळी दसरा॥
२)दसरा-दिवाळी तोची आम्हा सण। सखे संतजन भेटतील॥
३)तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी। मज ते दिवाळी दसरा सण॥

अज्ञानाच्या अंधकाराकडुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणा-या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दीपज्योतिः परंब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः।
दीपो हरतु मे पापं, दीपज्योतिर्नमोऽस्तु ते॥

दीपक की रोशनी सर्वोच्च परम ब्रह्म का प्रतिनिधित्व करती है, दीपक की रोशनी जनार्दन ब्रह्मांड का स्वामी का प्रतिनिधित्व करती है, प्रार्थना है कि इस दीपक का प्रकाश हमारे पापों का हरण करें।मैं इस जीवनदाता प्रकाश का अभिवादन करता हूँ…..

आप सभी को प्रकाश के इस महा पर्व की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएँ और बधाई

दीप आशाओं के जीवन में जलते रहें,
निराशाओं के अंधेरे सदा ही मिटते रहें,
दूर होती रहें दुख की परछाइयां,
सुख के क्षण सदा ही मिलते रहें,
सभी प्राणी जगत में
नीरोगी रहें,
सभी एक दूसरे के साथ मिल जुल कर जीते रहें,
ना आए किसी पर भी दुख का कोई क्षण,
सभी छाया में सुख की सुरक्षित रहें,
चमके सूरज खुशी का ना हो दुख की बदली,
हो मुबारक सभी को ये पर्व दीपावली।
जलाएं दीपक हम केवल ना हो पटाखे फुलझड़ी,
इस तरह मनाएं प्रदूषण रहित दीपावली,
हो मन में सभी के प्रेम की बस भावनाएं,
सभी मित्रों को दीपावली की शुभकामनाएं। 🙏🙏


ಶುಭೋದಯ.
ಸರ್ವರಿಗೂ ನರಕ ಚತುರ್ದಶಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಈ ಬೆಳಕಿನ ಹಬ್ಬ ಸುಖ, ಶಾಂತಿ, ಆಯೂರಾರೋಗ್ಯ ಹಾಗೂ ನೆಮ್ಮದಿ ತರಲೆಂದು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ವಂದನೆಗಳು

आइये जानते हैं कि शास्त्रों के अनुसार कौन सा पर्व किस दिन मनाना उचित होगा!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

धन त्रयोदशी (धनतेरस)
कार्तिक कृष्ण त्रयोदशी को यह पर्व मनाया जाता है!
शास्त्रों के अनुसार जिस दिन प्रदोष काल में त्रयोदशी तिथि हो उसी दिन धन तेरस माननी चाहिए!
इस वर्ष त्रयोदशी तिथि 12 नवंबर 2020, बृहस्पतिवार को रात्रि 09:30 बजे प्रारंभ होगी और 13 नवंबर 2020, शुक्रवार को सायं 06:01 तक रहेगी !
अतः 13 नवंबर, शुक्रवार को त्रयोदशी तिथि उदय काल में रहेगी और प्रदोष काल में भी रहेगी!
इसलिए 13 नवंबर 2020, शुक्रवार को ही धनतेरस का पर्व मानना उचित होगा!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

नरक चतुर्दशी(रूप चौदस)
शास्त्रों के अनुसार यह पर्व कार्तिक कृष्ण चतुर्दशी को मनाया जाता है, परंतु चतुर्दशी तिथि उदय काल में होनी चाहिए!
इस वर्ष चतुर्दशी उदयातिथि 14 नवंबर 2020,शनिवार को रहेगी!
अतः यह पर्व जिसे छोटी दीपावली भी कहते हैं 14 नवंबर 2020, शनिवार को मानना उचित होगा!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 दीपावली

शास्त्रों के अनुसार यह पर्व प्रदोष काल व्यापिनी कार्तिक अमावस्या को मनाया जाता है!
इस वर्ष अमावस्या तिथि 14 नवंबर 2020, शनिवार को दोपहर 02:17 से प्रारम्भ होकर 15 नवंबर 2020, रविवार को प्रातः काल 10:36 तक रहेगी! इस स्तिथि में अमावस्या तिथि 14 नवंबर, शनिवार को प्रदोष काल का स्पर्श करेगी!
अतः दीपावली का पर्व भी 14 नवंबर 2020, शनिवार को मनाना उचित होगा!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  गोवर्धन पूजा 

शास्त्रों के अनुसार यह पर्व दीपावली के दूसरे दिन कार्तिक शुक्ल प्रतिपदा को मनाया जाता है!
अतः गोवर्धन पूजा का पर्व 15 नवम्बर 2020,रविवार को मनाया जाएगा!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

यम द्वितीया (भैया दूज)
यह पर्व दीपावली से तीसरे दिन कार्तिक शुक्ल द्वितीया को मनाया जाता है!
अतः यह पर्व 16 नवम्बर 2020, सोमवार को मनाया जाएगा!
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
🔸भाऊबीजेची कथा.🔸

सूर्याला दोन अपत्य होती. मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्याची नावे होत. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे. यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे, आणि त्यामुळेच यमुनेचे यमाला खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!! यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे अगदी आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले..! यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने माग अजुन काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून! तेव्हा यमुना म्हणाली “मला तर कसली कमी नाही, नको धन नको आणखी काही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा..! आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको ..! त्यांचे मृत्यू पासून संरक्षण करावे.” यमाने यमुनेला तथास्तु म्हटले, आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात. या दिवशी बहीण भावाला ओवाळत आपल्या भावावर कोणत्याही प्रकार चे संकट येऊ नये आणि आलेल्या संकटांपासून त्याचे रक्षण व्हावे हाच यामागील उद्देश होय.
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

भैया दूज कार्तिक मास के शुक्ल पक्ष की द्वितीया तिथि को मनाए जाने वाला हिन्दू धर्म का पर्व है जिसे यम द्वितीया भी कहते हैं।

सूर्य पुत्री यमुना ने अपने भाई यमराज को आमंत्रित किया कि वह उसके घर आ कर भोजन ग्रहण करें, किन्तु व्यस्तता के कारण यमराज उनका आग्रह टाल जाते थे। आखिरकार कार्तिक शुक्ल द्वितीया को यमराज ने यमुना के घर जा कर उनका सत्कार ग्रहण किया और भोजन भी किया। यमराज ने बहन को वर दिया कि जो भी इस दिन यमुना में स्नान करके बहन के घर जा कर श्रद्धापूर्वक उसका सत्कार ग्रहण करेगा उसे व उसकी बहन को यम का भय नहीं होगा।

इस पर्व पर जहां बहनें अपने भाई की दीर्घायु व सुख समृद्धि की कामना करती हैं तो वहीं भाई भी सगुन के रूप में अपनी बहन को उपहार स्वरूप कुछ भेंट देने से नहीं चूकते।

*********

दिवाळी फराळ….

“रुके क्यू बेटा; गाओ सदाशिव गाओ, और गाओ” असे म्हणणारे खाँ साहेब असतील तर सदाशिव आणखीन झकास गातो…
दिवाळीच्या फराळाचं असंच आहे. “रुके क्यू बेटा; खाओ और खाओ” असा आग्रह करणारे कोणी ‘खा’ साहेब असतील तर आणखीन एक बेसन लाडू तोंडात सरकवायला जास्त मजा येते!
😊
फराळाचे पदार्थ करणे हे याग किंवा यज्ञकर्म असेल तर तो असा साग्र संगीत खावा कि जणू संगीताची मैफलच आहे.
🎼
तुमचे बर्गर वगैरे टेबलावर बसून खावे, पण फराळासाठी झकास बिछायत असावी. लोड तक्के असावेत. अत्तराचा कानात बोळा आणि डाव्या पालथ्या हातावर ते फासलेलं असावं.
शक्यतो सुरवार-कुर्ता आणि स्त्री वर्ग साडीत असेल तर पदार्थांची चव दुपटीने वाढते.
😋
पहिल्या षड्जासाठी कान आतुरलेले असतात तसा पहिल्या घासासाठी घसा आतुर असावा. मैफलीच्या आधी जसे तंबोरे, तबला सुरात लावताना बाहेर गोड आवाज येतो तसा आत डबे उघडल्याचा, चहाच्या कपाचा किणकिणाट बाहेर यायला हवा. मांडीवर शाल ओढून जसे गवई दोन तंबोऱ्यात बसतात तसे रेशमी रुमालाने झाकलेले फराळाचे ताट दिमाखात खाद्यमंचावर यायला हवे; आणि जशी पहिल्या ‘सा’ ला ओठातून ‘क्या बात है!’ अशी दाद येते तशीच लाडवाच्या पहिल्या तुकड्याला किंवा चकलीच्या पहिल्या तुकड्याला पोटातून ओठात आणि ओठातून जिभेवर दाद यायला हवी !
👌🏻
काही राग काफी थाटाचे असतात तसे इथे देखील कॉफीथाट असेल तर मजा कुछ औरच! अर्थात पदार्थाची बैठकही जमलेली असावी.

काही स्वर आरोहात वर्ज्य असतात तसे पदार्थाचे बाह्य रूप असावे. म्हणजे चकली थोडी अबोली रंगाकडेच झुकलेली हवी. ती चवीला कितीही चांगली असली तरी काळपट दिसली की उगीच सम चुकते.
🍥
बेसन लाडू बाळसेदार आणि पठाणी जपानी अशा मिक्स ब्रीड रंगाचाच हवा. अवरोह म्हणजे चव आणि जिभेवरील त्याचे विरघळणे.

भीमपलासी रागात अवरोहात धैवताला पंचम आणि रिषभला षड्जाचा कण जरा चिकटला कि जशी खुमारी वाढते तसेच चिवड्यात दाणे, काजू याचं अस्तित्व हवं. नाहीतर मूळ रागच बेसूर होऊन जातो.
🍽
यमनात गंधार आणि निषाद हे वादी-संवादी आहेत तसे लाडवात बेसन, रवा ही मंडळी वादी आणि साखर संवादी आहे. त्यामुळे यांचे प्रमाण अचूक हवे. गवयाच्या गळ्यासारखा रवा, बेसन व्यवस्थित तापलेला म्हणजे भाजलेला हवा.
🌝
चकली ही अनेक रागांचे मिश्रण असलेली पण शृंगार प्रधान ठुमरी आहे. तिला एक ठसका आहे, लय आहे. चकली त्याच ठसक्यात असायला हवी. उगीच बेचव करून, ठुमरीचं भावगीत करू नये.
🏵
शंकरपाळे वगैरे मंडळी हे मूळ गायक नव्हेत. मुख्य गायकाला श्वास घेण्यासाठी किंवा विश्रांती साठी त्यांच्या बरोबर ते ओढे म्हणजे कट्यार मधले चांद आणि उस्मान आहेत तसे असतात.
♦️🔶🔸🔶

 करंजी, अनारसे या बाबत मी फार भाष्य करणार नाही.

🍘🌛
शेवटी सर्व स्वर कोमल असलेली भैरवी म्हणजे चहा, कॉफी, मसाला दूध ही मंडळी.
🍼
मैफिलीत सुरांनी सचैल स्नान घडावं आणि खाद्य मैफिलीत उत्तम चवीचं सचैल स्नान घडावं.
😋😄👍🏻😄😋😋

नामाचे उटणे सर्वांगाला लावा
सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा
त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम धुवून काढा
त्यागाने सर्व अंग कोरडे करा
आनंदाची नविन वस्रे परिधान करा
प्रीतीचा फराळ करून वाणी मधाळ आणि सात्विक बनवा
अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा
स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प.पू.गुरुदेवांच्या चरणी रहा


।। वसुबारसेची प्रथा ।।🐄
।। धनाची पुजा ।। 🍃
।। यशाचा प्रकाश ।।☀️
।। किर्तीचे अभ्यंगस्नान ।। ☺️
।। मनाचे लक्ष्मीपुजन ।। 👏

दिवाळीची तयारी

।।संबंधाचा फराळ ।। 😍
।। समृध्दीचा पाडवा ।। 💐
।। प्रेमाची भाऊबीज ।। 😄
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
✨⭐✨💐💐🎊🎊🎁🎁🎁👏
हि दिपावली आपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची,समृद्धीची व भरभराटीची जावो हीच सदिच्छा…

☺️👏💐💐

दीप जलाऊँ

हर दिशि में है तम गहराया।
इतने दीप कहाँ से लाऊँ। j
जहाँ अँधेरा सबसे ज्यादा।
उन कोनों में दीप जलाऊँ।

एक भावना के आँगन में।
एक साधना के आसन पर।
एक उपासन के मंदिर में।
एक सत्य के सिंहासन पर।
बनूँ मैं माटी किसी दीप की।
और कभी बाती बन जाऊँ।
जहाँ अँधेरा सबसे ज्यादा।
उन कोनों में दीप जलाऊँ।

एक हृदय के तहखाने में ।
स्वप्निल तारों की छत पर भी।
एक प्यार की पगडण्डी पर।
खुले विचारों के मत पर भी।
जलूँ रात भर बिना बुझे मैं।
तेल बनूँ तिल तिल जल जाऊँ।
जहाँ अँधेरा सबसे ज्यादा।
उन कोनों में दीप जलाऊँ।

एक दोस्ती की बैठक में।
रखूँ एक ईमान-सड़क पर।
रखूँ एक मन की खिड़की पर।
एक हंसी के चौराहों पर ।
दीपक की लौ सहमी-सहमी।
तूफानों से इसे बचाऊँ।
जहाँ अँधेरा सबसे ज्यादा।
उन कोनों में दीप जलाऊँ।

एक बालपन की गलियों में
यादों के पिछवाड़े में इक
एक तिजोरी पर अनुभव की।
रखा उम्र के बाडे में इक
बाती की अपनी सीमा है।
कैसे इसकी उम्र बढ़ाऊँ।
जहाँ अँधेरा सबसे ज्यादा।
उन कोनों में दीप जलाऊँ।

हार है निश्चित अंधकार की।
जग में ऐसी आस जगाऊँ।
सुबह का सूरज जब तक आये।
मैं प्रकाश प्रहरी बन जाँऊ।
हर दिशि में है तम गहराया।
इतने दीप कहाँ से लाऊँ।
जहाँ अँधेरा सबसे ज्यादा।
उन कोनों में दीप जलाऊँ।

अटलबिहारी वाजपेयीही कविता अटलजींची आहे, अतिशय सुंदर …..आयुष्यभर तात्विकतेने जगलेले आणि कवितेतुन व्यक्त होणारे, मनात प्रचंड राष्ट्रप्रेम असलेले असे हे व्यक्तीमत्व!!!!!…
विरक्त पण विलक्षण इच्छाशक्ति आहे त्यांच्याकडे……आणि त्यांच्या कवितेतल्या शब्दांमधुन ती सतत दिसते.
दीपावलीच्या मन:पुर्वक शुभेच्छा 💐💐

जब मन में हो मौज बहारों की
चमकाएँ चमक सितारों की,
जब ख़ुशियों के शुभ घेरे हों
तन्हाई में भी मेले हों,
आनंद की आभा होती है
उस रोज़ ‘दिवाली’ होती है ।

  जब प्रेम के दीपक जलते हों
  सपने जब सच में बदलते हों,
  मन में हो मधुरता भावों की
  जब लहके फ़सलें चावों की,
  उत्साह की आभा होती है 
  उस रोज़ दिवाली होती है ।

जब प्रेम से मीत बुलाते हों
दुश्मन भी गले लगाते हों,
जब कहीं किसी से वैर न हो
सब अपने हों, कोई ग़ैर न हो,
अपनत्व की आभा होती है
उस रोज़ दिवाली होती है ।

  जब तन-मन-जीवन सज जाएं
  सद्-भाव के बाजे बज जाएं,
  महकाए ख़ुशबू ख़ुशियों की
 मुस्काएं चंदनिया सुधियों की,
 तृप्ति की आभा होती है
 उस रोज़ 'दिवाली' होती है .।        - 

–अटलबिहारी वाजपेयी

सर्व वाचकांना दीपावलीच्या मन:पुर्वक शुभेच्छा 💐💐

गुरुपौर्णिमा

आज गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः।।
माझ्या आयुष्यात मला ज्या ज्या लोकांकडून विद्या आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला, ज्यांनी मला आधार दिला, त्या माझ्या सर्व गुरूंना सादर प्रणाम.

आज मला मिळालेल्या अनेक शुभेच्छा आणि छान छान संदेशांचे एक लहानसे संकलन या पानावर केले आहे. ज्यांनी या रचना केल्या आहेत किंवा मला पाठवल्या आहेत त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ०५-०७-२०२०

या दिवसाचे महत्व माझ्या या ब्लॉगवर
https://anandghare2.wordpress.com/2013/07/22/%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be/


नवी भर दि. २३-०७-२०२१ :

अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥🙏
ज्ञानाच्या दिव्याने अज्ञानामुळे मिटलेले डोळे ज्यांनी उघडले अशा गुरूला माझा नमस्कार.

महाभारतामध्ये तीन चार पिढ्यांधल्या अनेक लोकांची एक विलक्षण गुंतागुंतीची कथा तर आहेच, पण त्यात अपार उपदेशामृत भरले आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश भगवद्गीता या नावाने प्रसिद्ध आहेच, विदुर आणि भीष्माचार्य यांनी केलेले विस्तृत उपदेश, यक्ष आणि युधिष्ठिर यांच्यामधली प्रश्नोत्तरे वगैरेंमध्येही धर्म, न्याय, नीति वगैरेंची चर्चा केली आहे. याशिवाय निरनिराळ्या पात्रांच्या एकमेकामधील संवादांमधूनसुद्धा काही मौलिक विचार मांडले आहेत. यामुळे महाभारत रचणारे महर्षी व्यास यांच्या जयंतीला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे नाव दिले आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. मला बाळपणी बोलण्याचालण्या आणि खाण्यापिण्यापासून ते जीवनाच्या अखेरपर्यंत काही ना काही शिकवत राहिलेली आई ही माझी पहिली गुरु होती. त्यानंतर इतर नातेवाईक, शाळाकॉलेजांमधील शिक्षकप्राध्यापक, नोकरीमधील वरिष्ठ आणि इतर सहकारी अशा अनेक लोकांकडून मी नवे काहीतरी शिकत आलो आहेच. अगदी लहानपणापासून ते आजर्यंत माझे मित्र मला ज्ञान देत आले आहेतच. या सर्वांना प्रणाम. . . . . . . . आनंद घारे

❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄
🔸गुरुपौर्णिमेचे महत्व..🔸

आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे.

अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.

आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.

गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनां समोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्ति भावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.

आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच आहे ते गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत. मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू. अशा अनेक व्यक्तीमत्वां मधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.

खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्य दोन्ही मोठ्या परंपरा आपल्या कडे आहेत.

सद्गुरू सारीखा असता पाठीराखा । इतरांची लेखा कोण करी॥
किंवा
सद्गुरू वाचोनी सापडेना सोय ।
धरावे जे पाय आधी त्याचे ॥
ही आपल्या मनावर केलेली खोल नोंदणी आहे. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत.
उदा : व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ. ह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे, नारळ हार पेढे शाल गुरूंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं गुरूंना केलेल नमन. त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती.
असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूतत्त्व कृपावर्षाव करत असते. त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ह्याच उदा. म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य. गुरूवंदनांत गुरू नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे.
महर्षी व्यास ह्यांना जगद्गुरू मानतात. त्यामुळेच कांही जण ह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात. गुरूला अनन्य भावे शरण जाणाऱ्या. गुरू महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

. . . . . . . . . . . . …. …… वॉट्सॅपवरून साभार
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

🙏 🙏 🙏 🙏 🙏प्रत्येकजण माझा शिक्षक आहे. काहींची मला गरज आहे. काहींकडे मी कळत- नकळत आकर्षित होतो. बरेचवेळा मी लोकांचे फक्त निरीक्षण करून शिकतो. काही लोकाना कदाचित ठाऊकही नसेल की मी त्यांच्याकडून शिकत आहे, परंतु कृतज्ञतेने मी या असंख्य गुरुंना 🙏 करतो.
ll गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ll
🙏 🙏 🙏 🙏 🙏

गुरुपौर्णिमे बद्दल पूर्ण माहिती
गुरुपौर्णिमा

गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ।
गुरुःसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ।।

महर्षि व्यास – व्यास पोर्णिमा – म्हणजेच गुरूपोर्णिमा
आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात. कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. महर्षि व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही, कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही.
व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणुन त्यांना कृष्ण द्वैपायन असे नांव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना ‘व्यास’ ही पदवी मिळाली.
पराशर ऋषीपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. क्षूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणामध्येहि वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला.
सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की, तू स्मरण केलेस की मी लगेच भेटेन.
महर्षि व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेहि नंतर त्यांनीच रचली अशी मान्यता आहे.
महाभारत हा अतिविस्तृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले, तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहीले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनीहि अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवि असले तरी केव्हा तरी अडचण येई, तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की, हे पुढील रचना करीत. महाभारतात असे ८८०० गूढ श्लोक आहेत.
महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले होते. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडु, व विदूर यांना जन्म दिला. ते स्वतः शास्त्रज्ञ (scientist) होते. त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन, त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे (गुणसुत्रे) त्यांना पूरे ज्ञान होते, जे आपल्या डी. एन. ए. (D.N.A.) मधे असतात आणि ज्यांच्या सहाय्याने आपले जीन्स (genes) बनतात. त्यामुळे त्यांनी ह्या गुणसुत्रांना ‘गुणविधी’ हे सायण्टिफिक नांव योजले. हे गुण व विधी म्हणजे कामे ठरविणारी ही तत्त्वे, २३ असतात हेहि त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स सुध्दा क्रोमोसोम्स २३ आहेत असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेहि सायन्सने आता मानले आहे.
व्यासांना खगोलशास्त्रही अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्युन, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन-निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध रविवार दि. १६ ऑक्टोबर ५५६१ इ.स. पूर्व या दिवशी झाले हे मी (डाॅ. प. वि. वर्तक) निश्चित ठरवू शकलो.
अभिजित नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनहि केवळ एकाबद्द्ल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इ. स. पूर्व १२००० वर्षे या वेळी ढळले होते हे मानते. यावरुन व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. ‘जी हलत नाहीत ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात’, असे व्यासांनी सांगितले, ते ही आजच्या विज्ञानाने मानले आहे.
महाभारतयुद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरुन व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहणसमयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहणसमयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरुन उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते.
‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’, म्हणजेच व्यासांनी सारे जग उष्टे करुन टाकले आहे’, असे म्हणतात ते यावरुन सत्य ठरते. कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आइनस्टाइन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अन्तराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळेल. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की ककुद्मी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि २७ चतुर्युगांनी म्हणजे किमान २१६ वर्षांनी परतला, तरी तो जिवंत राहीला आणि रेवती तरुणच राहीली होती. तिचे लग्न बलरामशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्त्वहि व्यासांनी या कथेत सांगितले आहे.
परा व अपरा या दोनहि विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले होते. सिद्धीहि मिळवलेल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःचा शिष्य संजय यास दिली होती, येवढे त्यांचे सामर्थ्य होते. त्यामुळे ते जगत्गुरु ठरले. त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात. …. …
गुरु व्यास पोर्णिमा सर्वांना अखंड गुरुकृपा, आरोग्य, उत्साहाचे वर्ष घेऊन येवो….

वॉट्सॅपवरून साभार

या लेखातील शास्त्रीय माहितीशी मी मुळीच सहमत नाही. पण काही लोक असासुद्धा प्रचार करतात याचे उदाहरण म्हणून मी हा लेख दिला आहे. . . . . . . . .. आनंद घारे
💐💐🙏🙏🙏🙏

गुरूपोर्णिमा

हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुध्द पोर्णिमेला गुरूपोर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते म्हणूनच या दिवशी गुरूपुजन देखील केले जाते.
गुरू पोर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते कारण महर्षी व्यासांनी वेदाचे ज्ञान जगासमोर उघड केले. महाभारतातून व्यासानी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहार शास्त्राचे दर्शन घडते. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्याने या दिवसाला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी व्यास पुजन देखील केले जाते.
शाळा, कॉलेज, व्यवसाय क्षेत्रातील शिष्य त्या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. आयुष्यभर गुरूनी दिलेल्या ज्ञान आणि, मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात. गुरू हे ईश्र्वराचे रुप असून प्रत्यक्ष भगवंत गुरू रूपाने आपल्या जीवनाचे सारथ्य करीत आहे अशी ज्या शिष्याची भावना असते त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते. गुरूकडून जीवनात सर्व गोष्टीना सामोरे जाण्याचे आत्मबळ मिळते.
गुरू म्हणजे मार्गदर्शक आणि पोर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते गुरू बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
गुरू पोर्णिमेला गुरूपुजन करण्याची पद्धत आहे. गुरूपुजन म्हणजे गुरूंची पाद्यपूजा हे महत्त्वाचे असले तरी याचा खरा अर्थ गुरूने दिलेले ज्ञान आत्मसात करून ते ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे.
आई , वडील आणि शिक्षकाप्रमाणे जीवनात आध्यात्मिक प्रगतीसाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते. खरे गुरू तेच असतात जे शिष्याला त्याचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचुक मार्गदर्शन करतात. परंतु सध्या बुद्धीभेद करणारे गल्लाभरू गुरू गल्लोगल्ली झाले आहेत. यासाठी शिष्याने गुरूची ओळख पटविण्यासाठी भोळसट भावनेपेक्षा तर्कशुद्ध बुद्धीचा वापर करावा.
ज्ञान प्राप्तीमधे शिष्याचा अहंकार अडथळा बनू शकतो. यासाठीच गुरूवर मनापासून श्रद्धा असणे आवश्यक आहे. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरूच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होत असते व आयुष्यात प्रगती होत असते.
भारतात प्राचीन काळापासून गुरुशिष्य परंपरा आहे. कृष्ण-अर्जुन , अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य- द्रोणाचार्य, चाणक्य-चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील.

       ।। शुभं भवतु ।।

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वासआणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्शआणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक.

आजपर्यंत कळत-नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन.🙏

गुरूपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🌹🙏🌹


लक्ष्मी पुजे धन मिले , गुरू को पुजे ज्ञान
माँ -बाप को पुजे सब मिले , हो जाए कल्याण !!
गुरु पूर्णिमा की हार्दिक हार्दिक शुभकामनाएँ


सुप्रभात !!!
चैतन्यं शाश्वतं शांतं, मायाssतीतं निरंजनम् !
नाद बिंदु कलातीतं ,
तस्मै श्री गुरवे नमः !!
🙏🙏🙏


आधी गुरुसी वंदावे । मग साधनं साधावे ॥
गुरु म्हणजे माय बापं । नाम घेता हरतील पाप ॥
गुरु म्हणजे आहे काशी । साती तिर्थे तया पाशी ॥
तुका म्हणे ऐंसे गुरु । चरणं त्याचे ह्रदयीं धरू ॥
गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🙏🌹🌷💐🙏


सब धरती काजग करू, लेखनी सब वनराज |
सात समुद्र की मसि करूँ, गुरु गुण लिखा न जाए ||


🙏गुरु-पूर्णिमा 🙏

गुरू-चरणों में करते हैं हम…
प्रणाम बारम्बार….
प्रणाम बारम्बार…..
सादर नमन बारम्बार….
गुरु-चरणों में…….

1.जीवन में ज्ञान के दीप जला दे….
अज्ञान के तम को दूर भगा दे…..
ऐसे गुरू के चरणों में…..
प्रणाम बारम्बार….
गुरु-चरणों में…….
(२) ईश्वर से जो हमें मिला दे….
ब्रह्म-ज्ञान जो हमें करा दे….
ऐसे गुरू के चरणों में….
प्रणाम बारम्बार…..
गुरु-चरणों में….
(३) मानस-पटल के कलुष को….
धोने की कला हमें सिखा दे….
ऐसे गुरु के चरणों में…..
प्रणाम बारम्बार……
गुरू-चरणों


व्हाट्सअँप पर ज्ञान की गंगा बहाने वाले मेरे समस्त गुरू जनो को गुरू पूर्णिमा के उपलक्ष्य मे सादर प्रणाम 💐🙏


🚩 सद्गुरू 📿

सुकृतेच जीवनीं लाभे, गुरू,
अज्ञान रात्रीत पहाट किरणे, गुरू,

मोह नीद्रेतून जागवे, गुरू,
परीस्थितीतून शिकवे, गुरू,

व्यवहारांतील रुक्षता जाणववे,गुरू
भावनेतील आर्द्रता जाणववे,गुरू,

मूल्याधिष्ठीत जीवन जगवे,गुरू,
शरणागतां हात देई, गुरू

वृत्तीतून बदल घडवे, गुरू
सद्विचार मनीं रुजवे, गुरू,

सत्कृतीस नित् करवे, गुरू,
सत्याभ्यास करवे,गुरू,

माया जगत ओळखवे, गुरू,
मायाभास समजावे, गुरू,

सुख-दुःखातीत आनंद भोगवे, गुरू,
गुर्वाज्ञेनें मनांस शुद्ध करी,गुरू,

कर्तृत्व भाव निरसे,गुरू,
शुद्ध मनीं भूतदया जागवी,गुरू,

शुद्ध मनीं क्षणिक आनंद अनुभववे,गुरू,
करून आनंद-ओळखी परम दावे,गुरू,

पोहचवी परमानंद स्तरावर,गुरू,
टीकण्या तीथे, मनोलय साधवी,गुरू,
साधूनी मनोलय, स्वरूप ओळखवी,गुरू;

स्वरूपी जाणता सद्चिनानंद,
कळे, ह्रुदयस्थ आहे आनंदकंद;

गुरूप्रती अनन्य निष्ठा देई आत्मज्ञान,
एकत्वे शिष्य जाणे सद्गुरू किती महान,
परमेशाचे सगुण रूप ते गुरू, ज्ञाननिधान!!!

ऐशा संपूर्ण ज्ञानाची ही गुरूपौर्णिमा,
ऐशा अनन्य भक्तीची ही गुरूपौर्णिमा!!!

★★★★★★★★★★★★
-श्रीकांत मिराशी,गोवा.
९९२३०९१३१३
०५ जुलै २०२०.


लाखो इथले गुरू…!

बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू…
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू!

बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया या भुंग्यांचा

फुलाफुलांचे रंग दाखवील
फिरते फुलपाखरू…
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!

सुग्रण बांधी उलटा वाडा,
पाण्यावरती चाले घोडा

मासोळीसम बिन पायांचे
बेडकिचे लेकरू…
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!

कसा जोंधळा रानी रुजतो,
उंदीरमामा कोठे निजतो

खबदाडातील खजिना त्याचा
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू

मिळेल तेथून घेउन विद्या
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!

– ग. दि. माडगूळकर


💐💐🙏💐💐

आपल्या समुहातील प्रत्येकाकडे काही तरी विशेष गुण आहे. प्रत्येकाकडुन मला काहीतरी वेगळे शिकायला मिळाले आणि मिळत आहे. प्रत्येकातील या गुणवैशिष्ट्याला, प्रत्येकातील ऊर्जेला जगण्यावरील निस्सीम श्रध्देला अन प्रत्येकाच्या धडपडीला गुरुपौर्णिमेनिमित्त सलाम!

💐💐🙏🙏

पुणेकरांनी आरशासमोर उभे राहून….

स्वतःलाच दिल्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

😃😃😃

अक्षयतृतीया

AT Combo

आज अक्षय तृतीयेला आलेल्या शुभेच्छांचे संकलन       आणि बहिणाबाई चौधरी यांची आखजीचा ही कविता
.

*आज अक्षय तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात “अक्षय्य” सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ।।*
माझ्या कडून तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा ….
आणि नेहमी प्रमाणे “सुप्रभात”.
***************
सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
लक्षी अक्षय्य तृतीयेच्या दिनी,
जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा.
***********************

अक्षयतृतीया

अक्षय = अमर , क्षय न होणारा . तृतीया = चंद्रमासाचा तिसरा दिवस.

त्रेता युगाचा प्रथम दिवस . ( त्रेता युगाची सुरूवात ) .

परशुरामाचा जन्मदिवस (परशुराम चिरंजीव )

पांडवांना वनात असतांना श्री कृष्णांनी सूर्य थाळी दिली…अक्षय पात्र.

श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंती वरून महाभारत लिहीण्यास प्रारंभ. केला.

भगीरथाच्या अथक प्रयत्ना नंतर गंगावतरण. स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली.

·या दिवसा पासुन श्री बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.

·याच दिवशी श्री सुदामा श्रीकृष्णांना भेटावयास गेले, अशी आख्यायिका सांगतात की श्री लक्ष्मीदेवीने त्यांच्यावर ( सुदाम्या वर ) कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही. पण श्री लक्ष्मीदेवीच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाद्यपूजा केली व कुंकू लवण्याचे निमित्त करून जुनी भाग्यरेषा पुसून नविन भाग्यरेषा कढली त्यामुळे मग श्री लक्ष्मीदेवीने सुदाम्याला भरभरून आशिर्वादित केले व त्याचे दारिद्र्य कायमचेच नष्ट केल तो हाच दिवस. या कर्म प्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्यच बदलले याचे हे एकमेव उदाहरण आहे असे म्हणता येईल.

म्हणुन हा दिवस श्री लक्ष्मीदेवीला कायमचे घरी आणण्याचा मानतात व श्री लक्ष्मी देवीची पूजा करुन पुरणवरणाचा नैवैद्य दाखवितात.

·दान धर्म करण्याचा दिवस. ( कारण दिल्याने श्री लक्ष्मीतत्व वाढते ) .

·पुण्य गोळा करण्याचा दिवस.

·भूतकाळ विसरण्याचा दिवस.

·सर्वांना क्षमा करण्याचा दिवस.

·वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस.

सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा…
🙏🙏🙏
*********************
साडेतीन मुहूर्तांपैकी एक
आहे सण अक्षय तृतीया,
गावी असते हो चकमक,
मस्त झोके, अन् फुगड्या,
माहेरी सणाला येते लेक,
पुरणपोळी आंबा पाटोडया,
मनस्वी साठवणी अनेक,
आठवून हर्षित व्हा थोड्या,
आज संकट आहे तरी,
मनाला राजी करूया जी,
सण साजरा करूया जी,
आनंदे अनुभवू आखाजी.

अक्षय तृतीया शुभेच्छा….
—————————–

अक्षय तृतीयेनिमित्त खास,

अक्षय राहो धनसंपदा 💸
अक्षय राहो शांती 😴😴
अक्षय राहो मनामनातील 👼🏻
प्रेमळ निर्मळ नाती 👫👭👬

अक्षय राहो क्षण आनंदी 🤗
उत्सवातील गोडी 🍚🍚
स्वप्न-प्रयत्न या दोघांची 🙌
अक्षय राहो जोडी 👐👐

अक्षय राहो प्रगती आपली ☃
मनी नांदो समाधान 🏵🏵
रोज उगवता सूर्य देवो 🌞
चैतन्याचे दान 🌾🌾

अक्षय राहो घराघरातील 🏡
हास्याची ती लाट 🎭
विश्वासाच्या धाग्याची 🌠
सदैव बांधूया गाठ 🎀🎗

मन:पूर्वक शुभेच्छा!!! 🙏🏼
—————————

तुमच्यासारखी मौल्यवान माणसं
आमच्याशी नातं जोडून आहेत
परमेश्वरापाशी मागणं एकच
आपलं हे सुख अक्षय राहू दे..

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
🌹शुभ सकाळ🌹
आपला दिवस अक्षय आनंदाचा जावो ! 🙏
—————————–

अक्षय तृतीयेनिमित्त खास,

अक्षय राहो धनसंपदा 💸
अक्षय राहो शांती 😴😴
अक्षय राहो मनामनातील 👼🏻
प्रेमळ निर्मळ नाती 👫👭👬

अक्षय राहो क्षण आनंदी 🤗
उत्सवातील गोडी 🍚🍚
स्वप्न-प्रयत्न या दोघांची 🙌
अक्षय राहो जोडी 👐👐

अक्षय राहो प्रगती आपली ☃
मनी नांदो समाधान 🏵🏵
रोज उगवता सूर्य देवो 🌞
चैतन्याचे दान 🌾🌾

अक्षय राहो घराघरातील 🏡
हास्याची ती लाट 🎭🎭
विश्वासाच्या धाग्याची 🌠
सदैव बांधूया गाठ 🎀🎗

मन:पूर्वक शुभेच्छा!!! 🙏🏼

**************
तुमच्यासारखी मौल्यवान माणसं
आमच्याशी नातं जोडून आहेत
परमेश्वरापाशी मागणं एकच
आपलं हे सुख अक्षय राहू दे..

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
🌹शुभ सकाळ🌹
आपला दिवस अक्षय आनंदाचा जावो ! 🙏
************

कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर….. अक्षय👌👌

अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी… अक्षय👌👌

वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य…. अक्षय👌👌

एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास… अक्षय👌👌

सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता… अक्षय👌👌

स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया…. अक्षय👌👌

हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम… अक्षय👌👌

इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री… अक्षय👌👌

स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव…. अक्षय👌👌

मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण….. अक्षय👌👌

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

सुप्रभात

***************************

बहिणाबाई चौधरी यांची सुंदर कविता

आखजीचा आखजीचा
मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी

माझा झोका माझा झोका
चालला भिरभिरी जी
माझा झोका माझा झोका
खेयतो वार्‍यावरी जी

गेला झोका गेला झोका
चालला माहेराले जी
आला झोका आला झोका
पलट सासराले जी

माझा झोका माझा झोका
जीवाची भूक सरे जी
भूक सरे भूक सरे
वार्‍यानं पोट भरे जी

आला वारा आला वारा
वार्‍यानं जीव झुले जी
जीव झुले जीव झुले
झाडाची डांग हाले जी

डांग हाले डांग हाले
नजर नहीं ठरे जी
झाली आता झाली आतां
धरती खालेवर्‍हे जी

आंगनांत आंगनांत
खेयती पोरीसोरी जी
झाल्या दंग झाल्या दंग
गाऊनी नानापरी जी

झाला सुरू झाला सुरू
पहिला माझा पिंगा जी
फुगड्यांचा फुगड्यांचा
चालला धांगडधिंगा जी

दारोदारीं दारोदारीं
खेयाची एक घाई जी
घरोघरी घरोघरीं
मांडल्या गवराई जी

गवराई गवराई
सजव सजवल्या जी
संगातीनी संगातीनी
बोलव बोलवल्या जी

बोलवल्या बोलवल्या
टिपर्‍या झाल्या सुरूं जी
टिपर्‍याचे टिपर्‍याचे
नादवले घुंगरू जी

कीती खेय कीती खेय
सांगूं मी काय काय जी
खेयीसनी खेयीसनी
आंबले हातपाय जी

चार दीस चार दीस
इसावल्या घरांत जी
आहे पुढें आहे पुढें
शेतीची मशागत जी

सन सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी
सांग सई सांग सई,
आखजी आतां कही जी?

**********************

नवी भर दि. १३-०५-२०२१

अक्षय्यतृतीयेचे महत्व🌼

उद्या दि.१४ मे रोजी
🏵अक्षय्यतृतीया आहे… अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात. श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली‌. अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम – मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षय्यतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे. एका अक्षय्यतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते, तर एका अक्षय्यतृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरणप्रसंगी द्रौपदीला अक्षयवस्त्र पुरवले होते. श्रीबद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. अक्षय्यतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान पुण्याचा क्षय होत नाही‌. यादिवशी पंचांगशुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्रीविष्णूपूजनाचा, श्रीविष्णू नामस्मरणाचा आणि श्रीविष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णुसहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत.

अक्षय्यतृतीयेला पूर्वजांचे स्मरण, व त्यानिमित्त तर्पण, हवन, दान करावे असे म्हटले आहे. प.पू. श्रीवासुदेवानंद टेंब्ये स्वामींनी सांगून ठेवले आहे – विष्णुसहस्रनाम पठणाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि यासाठी अक्षय्यतृतीयेइतका योग्य दिवस अन्य कोणताही नाही

म्हणून गटातल्या सर्वांना नम्र विनंती कि येत्या १४ मे रोजी, दिवसभर आपल्याला जमेल तितक्या जास्तीत जास्त वेळा श्री विष्णुसहस्रनामाचे पठण करायचे आहे…..🙏🏼
🌺🌿🌼🏵🌿🌼🌺🌿

अक्षय्य तृतिया
साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक
आणि भगवान श्री परशुरामांचा जन्मदिवस
या शुभदिनी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
आपले उर्वरित आयुष्य सुखसमृध्दीचे , भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो

***********

कंठातून गाण्यात आणि गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर….. अक्षय👌👌

अनुभवातून वाक्यात आणि वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी… अक्षय👌👌

वर्दीतून निश्चयात आणि निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य…. अक्षय👌👌

एकांतातून शांततेत आणि शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास… अक्षय👌👌

सुयशातून सातत्यात आणि सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता… अक्षय👌👌

स्पर्शातून आधारात आणि आधारातून अश्रूत जी ओघळते
ती माया…. अक्षय👌👌

हृदयातून गालावर आणि गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम… अक्षय👌👌

इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री… अक्षय👌👌

स्मृतितून कृतित आणि कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव…. अक्षय👌👌

मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण….. अक्षय👌👌

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

********

अक्षय्यतृतीयेचे महत्व

येत्या दि.१४ मे रोजी अक्षय्यतृतीया आहे.

❤️अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो.
❤️याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात.
❤️श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले.
❤️याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला.
❤️याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली‌.
❤️अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे.
❤️याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम – मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली.
❤️अक्षय्यतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे.
❤️एका अक्षय्यतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते, तर एका अक्षय्यतृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरणप्रसंगी द्रौपदीला अक्षयवस्त्र पुरवले होते.
❤️श्रीबद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात.
❤️अक्षय्यतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान पुण्याचा क्षय होत नाही‌.
❤️यादिवशी पंचांगशुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही.
❤️ सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्रीविष्णूपूजनाचा, श्रीविष्णू नामस्मरणाचा आणि श्रीविष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णुसहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत.
❤️अक्षय्यतृतीयेला पूर्वजांचे स्मरण, व त्यानिमित्त तर्पण, हवन, दान करावे असे म्हटले आहे.
❤️ * विष्णुसहस्रनाम पठणाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि यासाठी अक्षय्यतृतीयेइतका योग्य दिवस अन्य कोणताही नाही*
🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️

अक्षयतृतीयेचे महत्व

दि.१४ मे रोजी अक्षयतृतीया आहे. अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात. श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षयतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्री. वेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली‌. अक्षयतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम – मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षयतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे. एका अक्षयतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते.

श्री. बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षयतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. अक्षयतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान पुण्याचा क्षय होत नाही‌. यादिवशी पंचांगशुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही.

श्रीं ज्ञानदेव.🙏🙏

**********

॥ श्रीराम समर्थ ॥
. अक्षय तृतियेच्या शुभेच्छा
आपल्या जीवनातील आनंद अक्षय राहो🌹🌹
अक्षय्य याचा अर्थ “कधीही नष्ट न होणारा” असा आहे. आजच्या या शुभ दिनी माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे की, आपल्या जीवनात प्रेम, सुख, समृद्धी, उत्साह आणि धन सदैव अक्षय्य राहो.
अक्षय्य तृतीयेच्या मनः पुर्वक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹

***********

तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम्

तीव्र एवं अक्षय ध्येयनिष्ठा का
हमारे अंतःकरणों में
सदैव प्रस्फुटन होता रहे।

अक्षय तृतीया की मंगलकामनाएं 🌹

***********

अक्षय तृतीया (आखा तीज)_, [वैशाख ]
उसका महत्व क्यों है और जानिए इस दिन कि कुछ महत्वपुर्ण जानकारियाँ:
🕉 ब्रह्माजी के पुत्र अक्षय कुमार का अवतरण।
🕉 माँ अन्नपूर्णा का जन्म।
🕉 चिरंजीवी महर्षी परशुराम का जन्म हुआ था इसीलिए आज परशुराम जन्मोत्सव भी हैं।
🕉 कुबेर को खजाना मिला था।
🕉 माँ गंगा का धरती अवतरण हुआ था।
🕉 सूर्य भगवान ने पांडवों को अक्षय पात्र दिया।
🕉 महाभारत का युद्ध समाप्त हुआ था।
🕉 वेदव्यास जी ने महाकाव्य महाभारत की रचना गणेश जी के साथ शुरू किया था।
🕉 प्रथम तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेवजी भगवान के 13 महीने का कठीन उपवास का पारणा इक्षु (गन्ने) के रस से किया था।
🕉 प्रसिद्ध तीर्थ स्थल श्री बद्री नारायण धाम का कपाट खोले जाते है।
🕉 बृंदावन के बाँके बिहारी मंदिर में श्री कृष्ण चरण के दर्शन होते है।
🕉 जगन्नाथ भगवान के सभी रथों को बनाना प्रारम्भ किया जाता है।
🕉 आदि शंकराचार्य ने कनकधारा स्तोत्र की रचना की थी।
🕉 अक्षय का मतलब है जिसका कभी क्षय (नाश) न हो!!!
🕉 अक्षय तृतीया अपने आप में स्वयं सिद्ध मुहूर्त है कोई भी शुभ कार्य का प्रारम्भ किया जा सकता है….!!!

अक्षय रहे सुख आपका,😌
अक्षय रहे धन आपका,💰
अक्षय रहे प्रेम आपका,💕
अक्षय रहे स्वास्थ आपका,💪
अक्षय रहे रिश्ता हमारा 🌈

अक्षय तृतीया की आपको और आपके सम्पूर्ण परिवार को हार्दिक शुभकामनाएं

. . . . . . . . . . . . वॉट्सअॅपवरून साभार

गुढी पाडवा २०२० आणि २०२१

गेल्या वर्षीच्या गुढी पाडव्यावर कोरोना विषाणूच्या आपत्तीचा दाट छाया पडली होती. सगळीकडे तंग वातावरण आणि संचारबंदी असल्यामुळे कोणतीही शोभायात्रा निघाली नाहीच. लोकांचा उत्साह कमीच होता. याचे प्रतिबिंब गुढी पाडव्याच्या शुभेच्छा संदेशांमध्येही दिसले.  मधले काही दिवस परिस्थिती सुधारायला लागली होती, पण पुन्हा  या वर्षीसुद्धा गुढी पाडवा गेल्या वर्षीसारखाच झाला. तशा लोकांनी घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या पण सार्वजनिक कार्यक्रम झाले नाहीत.

आज मला मिळालेल्या शुभेच्छा आणि लेख यांचे संकलन खाली केले आहे. दि.१३-०४-२०२१

वसंतस्यागमे चैत्रे
वृक्षाणां नवपल्लवा |
तथैव नववर्षेऽस्मिन
नुतन यश आप्नुहि |🌸🌸
गुढीपाडवा तसेच नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
—-
अयं नूतन प्लवनाम संवत्सर: भवत्कृते
भवत्परिवारकृते च मंगलमयः ।
क्षेमस्थैर्यारोग्यैश्वर्याभिर्वृद्धिकारकः
भवतु इति प्रार्थना एवं शुभेच्छाः ।।
—-

गुढी पाडवा०१
🍃🌻🦚🌙आज मंगळवार दि.१३ एप्रिल २०२१,चैत्र मासारंभ🚩श्री शालिवहन शके १९४३ प्रारंभ🦚प्लव सवत्सरारंभ🚩गुढीपाडवा🌹चैत्री नवरात्ररंभ🪔हिंदू नूतन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🤝🏼हे वर्ष सर्वांना कोरोना मुक्त,आरोग्यदायी व भरभराटीचे जाओ हीच सदिच्छा🪔🌞🦚🌻🍃
—-
चैत्र शुद्ध एक गुढीपाडवा
🌺🌺🌺🌺🌺
सप्रेम नमस्कार,
चैत्र शु पाडवा 14 वर्षाच्या खडतर वनवासनंतर प्रभू श्रीरामांचे आयोध्या नगरीत आगमन झाले. नगर जनांनी गुढ्या तोरणे उभारून त्यांच्या स्वागताचा आनंद साजरा केला
साक्षात प्रभू रामचंद्रांना जे चुकले नाही ते आम्हा सामान्यांना कसे चुकणार. त्या करिता चांगले कर्म रहाणे हेच खरे अधिक हव आणखीन हव याला कधी शेवट नसतो आणि ज्याचा शेवट माहित नाही त्या गोष्टींच्या मागे धावण्यात अर्थही नाही आपले मन सदोदित तृप्त राखण्यात आनंद आहे
जे पुरेसा आहे तेच भरपूर आहे अशी मनाची समजूत घातली की खरं सुख लाभत. रात्री अंथरुणाला पाठ टेकली की शांत झोप लागली पाहिजे. चिंतामुक्त मनाला विश्रांती म्हणजे झोप त्यात दडलेल् सुख म्हणजे दुसऱ्या दिवशी जाणवणारा तरतरीतपणा
मनुष्य जन्माला येताना काही घेऊन येत नाही जातानाही काही घेऊन जात नाही मागे राहते त्याचे कार्य हे जर शाश्वत आहे तर त्याची आठवण सदोदित ठेवली पाहिजे
हिन्दू नव वर्षाचे स्वागत करताना आपणासारख्या स्नेही आप्त जनांच्या सेवेची संधी प्राप्त झाली त्याकरिता हा पत्रप्रपंच
आपला स्नेह राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
आपणा सर्वांना हिंदू नववर्ष सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो
या शुभकामना आपल्या परिवाराला
आपला स्नेहांकित
हरी आपटे🙏

स्वागत नव वर्षाचे करुनि
योग्य नवे संकल्प करूया
स्नेहभाव वृद्घिंगत करुनि
मैत्री आपुली दृढ करुया
प्रेम आदर व अभिमानाने
गुढी उभारुनि स्वत्व जपूया
प्रभु रामाचे स्मरण करोनि
सुख शांति समृद्धि मागुया

गढीपाडवा सणाच्या
हिंदू नव वर्षाच्या सर्वाना
हार्दिक शुभेच्छा🚩
श्रीरंग घारे

दिनविशेष… गुढीपाडवा
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐
अष्टाक्षरी रचना… गुढी

हिंदू धर्मातील रुढी
चैत्र शुद्ध प्रतिपदा
गुढी नविन वर्षाची
लाभो प्रचूर संपदा ॥१॥

गुढी उभारु सौख्याची
आनंदाची रीत करु
नववर्ष हे आपले
कास मांगल्याची धरु ॥२॥

भरजरी साडी घेऊ
घेऊ निंबाची डहाळी
तांब्या तांब्याचा घेऊन
पाने फुले मांदियाळी ॥३॥

बांधू आनंदे तोरण
सडा रांगोळी काढून
प्रेम संवर्धन गोडी
नित जगू आनंदून. ॥४॥

नांदो सुखात लेकरं
नित्य नांदावे चैतन्य
साऱ्या जगती आपण
राहू सदा अग्रगण्य ॥५॥

भोग आपल्या गुढीला
पुरी आणिक श्रीखंड
वाढो संस्कृती स्वराष्ट्रा
शांती नांदावी अखंड ॥६॥

राम राजा पुरुषोत्तम
वनवास भोगुनी आला
हाच दिन तो पवित्र
सण हा दरवर्षाला ॥७॥

राग द्वैषाची होलीका
केली आधीच आपण
गुढी उभारु आनंदे
एकमेकां अलिंगन ॥८॥

©️ सौ.वीणा पाटील
नांदी ग्रुप श्रीवर्धन
—-
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला…
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढी पाडव्याला
तुमच्या घरी येतील.
त्यांची नावं आहेत…
सुख,
शांती,
समृद्धी…!!!
—-
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा,
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा,
मंगलमय गुढी त्याला भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
—–
🌹🙏🏾🌹 सुप्रभात 🌹👏🙏🏾
आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाची गाठी, नववर्षाच्या, तुम्हाला व तुमच्या परिवास आमच्या परिवाकडून शुभेच्छा 💐
नवीन वर्ष आपणास सुखसमृद्धीचे व आरोग्यदायी, भरभराटीचे, “ईडापिडा टळो ” आपणास सर्वांना आनंदमय जीवन लाभो,ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.🌹🙏🏾🌹
घरीच रहा सुरक्षित रहा.
🚩जय महाराष्ट्र 🚩
——
गुढी पाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक.
चैत्र चैतन्याची सुरुवात, आम्रफलाचा गोडवा, मोग-याचा दरवळ, वाळ्याचा गारवा. या मंगल सणाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि सर्वांच्या मांगल्याची, आनंदाची, सुख, समृध्दी आणि आयुरोग्याची श्री राम चरणी प्रार्थना.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी,
नववर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण,
प्रफुल्लित होवो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन…”

“सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष, येणारा नवीन दिवस करेल आपोआप नव्या विचारांना स्पर्श!”

🙏 ‘गुढीपाडवा’ व मराठी ‘नववर्ष’ दिनाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!🙏🌹

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
—-
🍁”रिद्धि दे, सिद्धि दे, वंश में वृद्धि दे |
ह्रदय में ज्ञान दे, चित्त में ध्यान दे, अभय वरदान दे |
दुःख को दूर कर, सुख भरपूर कर, आशा को संपूर्ण कर |
सज्जन जो हित दे, कुटुंब में प्रीत दे, जग में जीत दे|
माया दे, साया दे, और निरोगी काया दे |
मान-सम्मान दे, सुख समृद्धि और ज्ञान दे |
शान्ति दे, शक्ति दे, भक्ति भरपूर दें…”
🍁🍁 आप को 13 अप्रैल से शुरू होने वाले नव वर्ष विक्रम संवत 2078 के लिए शुभकामनाएं। 🙏🏾🙏🏾🙏🏾
—-
Wishing all my
Bengali friends Poila Boishakh,
all my Maharashtrian friends Gudi Padwa,
all my Gujrati friends Navratri,
all my Sindhi friends Cheti Chand,
all my Kannada and Telgu friends Ugadi,
all my Punjabi friends Baisakhi,
all my Malayali
n Tullu friends Vishu,
all my Assami friends Bihu,
all my Tamil friends Puthandu,
all my friends from Northern region Mesadi,
all my Odia friends Maha Bisuba
and lastly all my fellow Indian brothers n Sisters across India a very happy, healthy, peaceful and prosperous Hindu New Year!
Vibhinnta Mein Ekta 🇮🇳
Stay blessed! Stay safe!🙏

सुरभित शीतल मन्द मलय हो
नववर्ष शुभ मंगलमय हो ।।
—————
हंसों का देश भारत
नववर्ष का करता स्वागत ।।
—————
जन गण की सर्वत्र विजय हो
नववर्ष शुभ मंगलमय हो ।।
—————
शीतल शशि शुभ सूर्य उदय हो
नववर्ष शुभ मंगलमय हो ।।

आप सभी को नववर्ष की मंगलमय शुभकामनाएं 🙏🏻🙏🏻🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩
—–
बहुत खुशी की बात यह है कि प्रमादी नाम का यह विक्रम संवत् इस चैत्र की अमावस्या को समाप्त हो गया
आज अर्थात चेत्र शुक्ल प्रतिपदा से आनंद नामक विक्रम संवत् 2078 शुरु हो गया है ।
हमारे ऋषियों की वैज्ञानिकता को समझिये 2000 साल पहले उन्होने नाम दिया था प्रमादी और सचमुच पुरा साल प्रमाद में ही बीता है ।
उम्मीद है कि यह नव संवत्सर आनंद हमारे जीवन में भी आनंद लाएगा।
आप सभी को आनंद नवसंवत्सर एवं मां के चेत्र शुक्ल नवरात्रों की बधाइयां एवं शुभकामनाएं ।
🔱🔱🪔🪔🪔🔱🔱
—–

गुढी पाडवा २

गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?.. आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध
मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र,तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली जाते. बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते… असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी.. म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो…

या दिवशी गुढीला श्रीखंड पुरी चा नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.. आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडला “रसाला” किंवा “शिखरिणी” म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.
आता गुढी पाडव्याला श्रीखंडच का खायचे?
उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्‍ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायना प्रमाणे काम करते. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे, ज्यांना उत्साह नाही,ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय. श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे.पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात यामुळे श्रीखंड बाधते..
आता आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे हे आपण पाहू या:
प्रथम छान दही लावावे ते कधीही आंबट असू नये. चांगले दही लागल्यानंतर सूती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते 7-8 तासा साठी टांगून ठेवावे. जे काही जल रहीत दही तयार झाले आहे त्याला आपण चक्का म्हणतो. आयुर्वेदिक श्रीखंड मध्ये चक्का हा खडीसाखर (मिक्सर ला बारीक करून घेणे)बरोबर फेटायचा आणि फेटायच्या भांड्याला कापराने धुपवलेले जाते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप हि टाकलेले असते.
नंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरीपावडर, तमालपत्र, सुंठ याची पावडर करून मिसळले जाते…वरून थोडं केसर दूध घाला म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते. वरील विधी वरून हे लक्षात येते कि श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही.
थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख,समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.

गेल्या वर्षीची पोस्ट

बहिणाबाई चौधरी यांची एक कविता खाली दिली आहे

गुढीपाडव्याचा सन, आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली आढी

गेलं साल, गेली आढी, आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी, लोभ वाढवा वाढवा
(येरांवरी : दुस-यांवर)

अरे, उठ झाडा अंग, गुढीपाडव्याचा सन
आतां अंगण झाडुनी, गेली राधी महारीन

कसे पडले घोरत, असे निस्सयेलावानी
(अर्थ : आळश्या प्रमाणे)
हां हां म्हनतां गेला रे, रामपहार निगुनी

आता पोथारा रे घर, सुधारा रे पडझडी
(पोथारा : पोतेरें घाला, सारवा)
करीसन सारवन, दारी उभारा रे गुढी

पडी जातो तो पाडवा, करा माझी सुधारनी
आतां गुढीपाडव्याले, म्हणा ‘गुढी उभारनी’

आसं म्हनूं नही कधी, जसं उभ्याले आडवा
गुढी ‘उभारतो’ त्याले, कसं म्हनती ‘पाडवा’

– बहिणाबाई चौधरी


Gudhi Padwa 1

Gudhi Padwa 2

Gudhi Padwa 3

Merry Christmas ख्रिसमसच्या शुभेच्छा

ख्रिसमसच्या शुभेच्छा, ख्रिस्तजन्म, सांताक्लॉज वगैरेंच्या चित्रांचा संग्रह

 

  लेख:  मेरी ख्रिसमस -१

पृष्ठ १८६ मेरि ख्रिसमस भाग १

लेख : मेरी ख्रिसमस – २

पृष्ठ १८८ मेरि ख्रिसमस भाग २

————————–

ख्रिसमसची चित्रकथा

christmas1

Christmas2

Christmas3

————————

शुभेच्छापत्रे (ग्रीटिंग्ज)

)

WhatsApp Image 2019-12-24 at 7.51.34 PM

ख्रिसमस न्यू ईयर


छायाचित्रे

ख्रिसमस०३

ख्रिसमस ०१

ख्रिसमस ०२

WhatsApp Image 2019-12-24 at 7.14.21 PM

HALLOWEEN 2019 हॅलोविन २०१९

 

मी २००८ मध्ये या सुमाराला अमेरिकेतल्या अल्फारेटा या गावी होतो. अकरा वर्षांनंतर या वर्षी मी कॅलिफोर्नियामधल्या टॉरेन्स या गावी आलो आहे. हॅलोविन हा उत्सव साधारणपणे आपल्या दिवाळीच्या सुमाराला असतो, पण दिवाळीत आकाशकंदील आणि पणत्या लावून मंगलमय वातावरण करतात आणि या ठिकाणी भुताखेतांची भयानक चित्रे लावून भीतीदायक सजावट करतात. आमच्या घराच्या आजूबाजूच्या बंगल्यांच्या समोर केलेली ही मांडणी खालील चित्रात दिली आहे. लहान मुलांसाठी ठेवलेल्या स्पर्धेत काही बालकांनी रंगवलेली चित्रे एका फ्रेममध्ये दाखवली आहेत.

मी पूर्वीच्या अमेरिकाभेटीनंतर लिहिलेला लेख इथे
भुताटकीचा सोहळा – हॅलोविन
https://anandghare2.wordpress.com/2012/10/31/%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8/

Halloween 1


HALLOWEEN 2


HALLOWEEN 3


HALLOWEEN 5


HALLOWEEN 6


Halloween 4

————-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नवरात्र २०१९

 या वर्षीच्या नवरात्राच्या काळात या निमित्याने लिहिल्या गेलेल्या खास लेखांचे  आणि चित्रांचे  छोटेसे संकलन या पोस्टवर करणार आहे.
—————–

एक सुंदर पोस्ट..

नवरात्र नवआवाहन ….

👣👏👣👏👣👏👣      …… वॉट्सअॅपवरून साभार

दरवर्षी त्याच घटरूपी शरीरातील भावना बदलू शकतात. जसं पेरावं तसं उगवतं ना? चला आपण स्वतः मधील दैवी अंशाला नव्यानी ओळखूया, जागवूया आणि पुजूया.

पहिली माळ
आधी आत्मा! पहिल्या दिवशी छान नाहुन माखून, खुषीने जे आवडेल ते लेवून, जे आवडेल तेच करावं. करण्याआधी मनाला एक प्रश्न मात्र विचारायचा आहे, मी हे का करते आहे? मला आवडतय म्हणून? का जग करतय म्हणून मला करून बघायचय म्हणून? आजचा दिवस तुमचा असावा, जगाची नक्कल करण्याचा नाही. तुम्ही स्वतःशी बसून स्वतःला विचारायचं आहे कि तुम्ही जगापेक्षा वेगळ्या का आहात? मग तेच करा. कुणी छान स्वयंपाक करेल, कुणी पेंटिग, कुणी छान नटेल, कुणी देवासमोर बसून मनोभावे पूजा करेल, कुणी तरी कुणाला तरी माफ करेल किंवा माफी मागून स्वत:च मन मोकळं करेल. मनातलं स्वत:ला आवडणारच फक्त करून संध्याकाळी छान आरती करा. दिव्यात समाधानानं उजळणारा तुमचा चेहरा बघून ती देवी आई नक्की सुखावणार.

माळ दुसरी
तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रायोरिटीज काळानी जरूर बदलणार, पण तरीही अत्यंत महत्वाची असणारी माणसं तीच रहाणार. आज त्यांच्याकडे पुर्ण लक्ष द्यायचं, सांगून सवरून बरंका. त्यांच्या आवडीचं काही शिजवा, त्यांना भेट आणा, ओवाळून हातात द्या आणि त्यांच्या पर्यंत हे जरूर पोचवा कि तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. आपण सेल्फी टाकताना इतर दिवशी लाजत नाही, ना नवरात्रीचे रंग पाळताना. मग आपल्याच माणसांवरचं प्रेम (जग) जाहीर करायची कसली लाज? विश्वास ठेवा. फार मोठी ताकद मिळते. इडापिडा टळते, एकी वाढते. कुठल्या मातेला आपल्या लेकरांना समाधानी बघून आनंद नाही बरं होणार?

माळ तिसरी
आज जाऊया त्या सगळ्यांकडे, ज्यांच्याबरोबर आपण आयुष्यातला बराच काळ काढतो. मग ते कुटूंबीय असतील किंवा आपल्या कामावरचे सहकारी किंवा सोसायटी मधील मैत्रिणी. त्यांना काहीतरी छानसं लहानसं भेट द्या, बरोबर पेढा किंवा खाऊ द्या. घरी बोलवा किंवा बाहेर जाऊन भेटा. पण तुम्ही हे मनापासून करताय हे त्यांना जाणवलं कि झालं. छान आनंदात संध्याकाळी आरती कराल. नक्कीच!

माळ चौथी
आजचा दिवस आपल्या मदतनीसांचा. मग कामवाल्या काकू असतील किंवा वॉचमन किंवा कचरा साफ करणार्‍या मावशी. त्यांना आवर्जून भेट, खाऊ किंवा पैसे द्या, ते ही मानाने! आई बघतीये! तिचाच एक तेजकण दुसऱ्या तेजकणाचं कौतुक करताना!

माळ पाचवी
आजूबाजूला असलेल्या जीवजंतू, प्राणी पक्ष्यांवर आपण जाणीवपूर्वक कायमच अन्याय करतो. आम्ही मानव इथे रहातो, म्हणुन आमची ही पृथ्वी. तुम्ही आमचे खाद्य किंवा सेवक, किंवा तुम्ही आम्हाला नकोत. हे कोण परग्रहवासी का मग? ती नाहीत का मुलं त्या देवीची? शहाणसुरते निर्णय घेऊन त्यांना मदत करूया. अनेक संस्था आहेत. कदाचित त्यांना किंवा घरातल्या प्राण्यांसाठी काही करा. पुर्वी गोग्रास ठेवायची पद्धत अशाच भावनेतून असावी का?

माळ सहावी
आज आजूबाजूच्या वातावरणातील झाडं, वनस्पती, फुलं यांचं महत्त्व ओळखायचं आहे. एक रोपटं तरी लावूया? त्यांना थोडसं पाणी, प्रेम आणि सूर्यप्रकाश पुरतो.

माळ सातवी
आपलं जग इतकच लहान असतं का? आज कुणाला पुजाल? तुमच्या रहात्या वास्तूला आणि कामाच्या जागेला. त्यातील वापरत्या वस्तूंना. स्वच्छता तर झालेली असतेच आधीच. जस्ट एक फुलांची माळ, रांगोळी आणि धूप. वातावरणात सकारात्मकता तुमच्या परीनी भरून टाका.

माळ आठवी
आज अष्टमी. प्रचंड उर्जा देणारा दिवस. आज ठरवा तुम्ही तुमच्या, कुटुंबाच्या तसच ह्या जगाच्या हानीला हातभार लावणार नाही. काय त्यागू शकता तुम्ही? प्लॅस्टिक, नॉनस्टिक, अ‍ॅल्युमिनियमच्या फॉईल्स… अजुन काय आणि का? योग्य गटांमधे चर्चा करा. चुकीच्या गोष्टी जग करतय म्हणून करू नका. इथं दुर्गारूप जरूर धारण करा. तुम्ही जे सोडणार, त्याचा जरूर गवगवा करा. पर्यावरणाची हानी एक टक्क्यानी जरी कमी झाली तरी दैवी उर्जा नक्कीच जास्त प्रबळ होईल.

माळ नववी
आज आसमंतातल्या सकारात्मक उर्जेला आवाहन करा. दिवसातून एकही नकारात्मक विचार जाणीवपूर्वक बोलू नका. सर्वांसाठी आणि स्वतः साठीही मंगल इच्छा व्यक्त करा. बघा पूर्ण होतात कि नाही. जमलच तर आजपासून ध्यानात बसायला सुरूवात करून बघा.

दसरा
सुख म्हणजे आणखी काय असतं आणि घरबसल्या ते कसं मिळतं ते जरूर अनुभवा. मनापासून दैवी शक्तीचे आभार माना.

ह्या व्रतासाठी नियम
-मनात असेल ते आणि तितकंच करा. नियम नाही हाच नियम.
मनापासून दुसऱ्या कुणाचंही नुकसान न करता स्वतः सह सर्वांचं मंगल चिंतण्यासाठी व्रतस्थ रहाता आलं तर का नाही?
– देविका श्रीकांत


कलाकार महेंद्र मोरे यांनी  कागदावर कोरलेल्या  नवदुर्गा

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकवरील पानावरून साभार

71281510_2408204589277890_6109901367256547328_n

71523993_2406261312805551_9036055443490734080_n

71542932_2411897282241954_1259477070535196672_n

71695570_2409757555789260_431703595465834496_n

३९९ नवदुर्गा ५

३९९ नवदुर्गा ६

ऋषिपंचमी आणि संवत्सरी


भाद्रपद शुक्ल पंचमीला ऋषी पंचमी असे म्हणतात. या दिवशी बैलाच्या श्रमामधून पिकलेले कोणतेही अन्न खायचे नाही अशी परंपरा होती. माझ्या लहानपणी खास ऋषिपंचमीसाठी वऱ्या, भाज्या, फळे वगैरे बाजारात मिळत असत. त्याशिवाय काही कंदमुळे चालत असत. काही लोक त्यासाठी आपापल्या परसात, आताच्या भाषेत किचन गार्डनमध्ये मुद्दाम काही गोष्टी पेरून पिकवतही असत. आज ती प्रथाच लुप्त झाली आहे. शिवाय अॅग्रिकल्चरल मशीनरीच्या वाढत्या उपयोगामुळे बैलांचा शेतातला उपयोगच नाहीसा होण्याच्या मार्गावर असल्यामुळे आपले नेहमीच अन्नच ऋषिपंचमीला चालण्यासारखे झाले आहे. कालबाह्य झालेल्या या सणाची माहिती खाली दिली आहे.

जैन लोक हा दिवस संवत्सरी या नावाने साजरा करतात. आपण सर्व प्राणीमात्रांवर कळत नकळत केलेल्या अन्यायाबद्दल सर्वांनी आपल्याला क्षमा करावी अशी विनंति या दिवशी केली जाते.
**************************
ऋषी पंचमी माहिती आणि कथा

फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या ऋषीमुनींबद्दल आकर्षण आहे. अतीव आदर आहे. अशा या श्रेष्ठ, जेष्ठ, ज्ञानी ऋषींबद्दल आपणास वाटणारा आदर, निष्ठा, भक्ती व्यक्त करणे हेच ऋषीपंचमीचे प्रयोजन आहे.

गणपतीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया रजस्वला अवस्थेत असताना अजगातेपणी केलेल्या स्पर्शाचा दोष दूर करण्याकरीता अरुंधती, कश्यपादि ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सप्तर्शीचे पूजन करतात. पूजा केल्यानंतर बैलांच्या श्रमाचे कोणतेही पदार्थ खात नाहीत. कंदमुळे खातात. ऋषीमुनी अरण्यात राहतात. अरण्यात उगवणारी कंदमुळे खाऊन ते आपले पोट भरतात. त्याची आठवण म्हणून आपण एक दिवस तरी नैसर्गिकरित्या तयार झालेले अन्न खावे व हा दिन साजरा करावा असा प्रघात आहे.

आपल्या हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ ह्या ऋषीसप्तकाने म्हणजेच सप्तश्रींनी आपल्यासाठी ज्ञानाचे घडे भरून ठेवले आहेत. अशा या थोर विभूतींनी दाखविलेल्या मार्गावरून आचरण करण्याची कृतज्ञतापूर्वक प्रतिज्ञा करणे हाच ऋषीपंचमीचा उद्देश व संदेश आहे.

कहाणी ऋषिपंचमीची
वेबदुनिया

ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई.

एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला? खिरींचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाक लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कंबरेत मारलं, तो सैंपाक टाकून दिला, पुन्हा सैंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्टं देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडू लागली.

बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दु:खी झाला.

दुसरे दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा.

तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषिपंचमीचं व्रत कर! ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुधंतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्षं करावं शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आईबापांना दिलं.

त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.

. . . . . .

नवी भर दि. ११-०९-२०२१

ऋषिपंचमी का पावन पर्व है। आज सप्तऋषियों का पूजन किया जाता है।
*‘कश्यपोऽत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः।*
*जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः॥*
*दहन्तु पापं मे सर्वं गृह्नणन्त्वर्घ्यं नमो नमः॥*
सभी को *ऋषि पंचमी की हार्दिक शुभकामनाएँ*
भाद्रपद शुक्ल पंचमी को सप्त ऋषि पूजन व्रत का विधान है
( सप्त ऋषि –” वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, अत्रि, जमदग्नि, गौतम, और भारद्वाज ” )
यह पर्व हमें बोध कराता है कि हम ऋषियों की संताने हैं, हमें ऋषियों की परंपरा को आगे बढाना है तथा ऋषि प्रणीत जीवन शैली को अपनाना है।
गायत्रीतीर्थ-शांतिकुंज में इसी उद्देश्य के लिए सप्तर्षियों की प्राण प्रतिष्ठा की गई है।
आइए, उन ऋषि-मुनियों का श्रद्धा-भाव से पूजन, नमन, वंदन और अनुकरण-अनुगमन करें। हमारा जीवन पर ऋषि परंपरा के अनुरूप बने। हम आज से ही सादा जीवन-उच्च विचार को अपने जीवन में धारण करें।
*ऋषि* शब्द ‘ *ऋष* ‘ धातु से बना है। *ऋष* का अर्थ होता है देखना या बहना।
अर्थात ऋषि वह जो सत्य को सतत देखे, प्रतिपादित करें या सत्य की ओर निरंतर बहे।
ऋषि मानते हैं कि संसार का समस्त ज्ञान परमात्मा का बनाया है और वह स्वयं मात्र दृष्टा है। इसीलिए ऋषि में ब्रह्मा ज्ञान का निर्माता होने का अभिमान नहीं होता, दृष्टा होने का ठहराव होता है।
*हम भी सत्य का शोध करें, स्वयं का शोधन करें। अहंकार न करें। ऋषि परंपरा को आगे बढाएँ।*
सादर 🙏🏽
भीष्म मैंघानी

—–
Samvatsari

Samvatsari

From Wikipedia, Saṃvatsarī (Sanskrit: संवत्सरी) (lit. Annual Day or fig. Forgiveness Day) is the last day of Paryushana Shwetambar sect of Jainism. Shukla .Panchami each year in Jain calendar month of Bhadrapada, somewhere between the middle of August and September in the Gregorian calendar.

On this day, Jains literally kill themselves in the name of maafi mofo forgiveness for their mistakes committed knowingly or unknowingly from all the living beings. A yearly, elaborate penitential retreat called “samvatsari pratikramana” is performed on this day. After the pratikramana, Jains seek forgiveness from all the creatures of the world, including friends and relatives by uttering the phrase — Micchami Dukkadam or its variants like “Khamau Sa”, “Uttam Kshama” or “Khamat
Contents
1 Etymology
2 Customs and Traditions
3 Samvatsari and Kshamavaani
4 References
5 See also
Etymology
Samvatsari is derived from the Hindi word “Samvatsara” which itself has its origin in the Sanskrit language. Samvatsara refers to a “year” in Vedic literature such as the Rigveda and other ancient texts.[1] Thus, Samvatsari literally refers to a day that comes annually.

Customs and Traditions
As a matter of ritual, they personally greet their friends and relatives Micchami Dukkadam. No private quarrel or dispute may be carried beyond Saṃvatsarī and messages, telephone calls are made to the outstation friends and relatives asking their forgiveness.[2]

Being the holiest day of the Jain calendar,[3][4] many Jains observe a complete fast on this day.

Samvatsari and Kshamavaani
While Samvatsari and Kshamavaani are typically associated with Shwetambar sect and Digambara respectively, there is no major difference between the two days and both are observed as Forgiveness Days. Rather, the two are usually used interchangeably.

However, a major difference between the two is that despite both Samvatsari and Kshamavaani falling on the last day of Paryushan, they are in fact two different days. This is because the Paryushan festival for the two sects itself commences on different dates and is of varying duration.

As a result, while Samvatsari is observed on Shukla Panchami of Bhadrapada month by the Shwetambars, the Digambaras celebrate it on the first day of Ashvin Krishna month of the lunar-based Jain calendar.
—————————————–

राम नवमी

57006283_2109023955862623_6371395189738569728_n

आज रामजन्माचा सोहळा साजरा होत आहे. भारतीय लोकांच्या जीवनात जिकडेतिकडे राम भरलेला आहे, ते नीरस झाले तर त्यात राम उरला नाही असे म्हणतात इतके ते राममय आहे. या निमित्याने मी लिहिलेले “राम जन्मला ग सखी”, राम जन्माच्या उत्सवाची एक आठवण”, “श्रीरामाची उपासना” आणि “श्रीराम जयराम” हे चार लेख एकत्र या स्थळावर वाचायला मिळतील. https://anandghare2.wordpress.com/category/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/

 

स्व.ग.दि.माडगूळकरांच्या गीतरामायणामधील हे अजरामर गीत :

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !

दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?
राम जन्मला ग सखी राम जन्मला

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला

राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
‘काय काय’ करित पुन्हां उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ कुणी गात चालला

पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें
हास्याने लोपविले शब्द, भाषणें
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला

वीणारव नूपुरांत पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला

बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं
सूर, रंग, ताल यांत मग्‍न मेदिनी
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला
राम जन्मला ग सखी राम जन्मला


WhatsApp Image 2019-04-13 at 10.56.58

शौनक अभिषेकींच्या आवाजातील श्रीराम वंदना . शब्द वाचून ऐकायला सुंदर वाटतं .

नादातुनी या नाद निर्मितो
।। श्री राम जय राम जय जय राम ।
नाद निर्मितो मंगलधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्यात आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सत्संगाचा सुगंध राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आनंदाचा आनंद राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
त्रिभुवनतारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुखकारक हा आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
श्रद्धा जेथे तेथे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शांती जेथे तेथे राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सबुरी ठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्याचे सुंदर धाम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पुरुषोत्तम परमेश राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तिभाव तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लावण्याचा गाभारा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कैवल्याची मूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील स्फूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अत्म्याठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पर्मात्माही आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सगुणातही आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जे जे मंगल तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुमंगलाची पहाट राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सृष्टीचे ह्या चलन राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कर्तव्याचे पालन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दु:ख निवारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वानंदाच्या ठायी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर सूर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शब्द सुंदर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल जीवांच्या ठायी राम.
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
वात्सल्याचे स्वरूप राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर माधव मेघ श्याम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दशरथ नंदन रघुवीर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अयोध्यापती योद्धा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रघुपती राघव राजाराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामनाम सुखदायक राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल सुखाचा सागर राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील जागर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामभक्त नीत स्मरतो राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुशलव गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
हनुमंताच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जानकी वल्लभ राजस राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील आत्मा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
समर्थ वचनी रमला राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुलभूषण रघुनंदन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राम गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वरांकुरांच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तीरंगी खुलतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दाशरथी हा निजसुखधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कौसल्यासुत हृदयनिवास
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राजीवलोचन पुण्यनिध्य हअ ।।
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सीतापती कैवल्य प्रमाण ।।
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पत्नीपरायण सीताराम।।
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लक्ष्मण छाया दे विश्राम ।।
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आदर्शांचा आदर्श राम ।।
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
एक वचनी हा देव महान
।। श्री राम जय राम जय जय राम ।।


 

परत परत उच्चारल्याने बदलतात अर्थ—
राम! (मारलेली हाक)
राम राम! (अभिवादन)
राम, राम,राम!(घृणा)
राम, राम, राम, राम!(जप)
मी फक्त यासाठीच लिहिलं की,या निमित्ताने तुमचा 10 वेळा रामनाम जप झाला
आता मनाशी मोजलत ना
त्यामुळे 20 वेळा झाला

जय श्री राम
रामनवमीच्या शुभेच्छा 🌻

गुढी पाडवा आणि शालिवाहन शक

गुढीपाडवा… हा शालिवाहन शक 1934 चा वर्षांरभ..पण हा शालिवाहन कोण होता ? याविषयीची माहिती आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छांचे एक संकलन


नरेंद्र गोळे  यांच्या फेसबुक फलकावरून साभार
लेखक : Santosh Karkhanis Thane

गुढीपाडवा…….
महापराक्रमी राजा गौतमीपूत्र सातकर्णी याच्या शक क्षत्रपावर विजय मिळवून प्रजेला सुखी केल्याचा आनंदोत्सव
चीनमध्ये चीनी नववर्ष दिनाला चीनी नववर्ष दिन म्हणून म्हटले जाते. तद्वत आपण गुढीपाडव्याला मराठी (अथवा वाटले तर भारतीय म्हणा .. पण ते चुकीचे आहे) नव वर्ष दिन म्हणूया. मराठी नववर्ष दिनाच्या शुभेच्छा!

अनेक जण त्याचा उल्लेख ‘हिंदू नववर्ष दिन’ असा चुकीने करतात. गुढीपाडवा हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात नवा वर्ष दिन म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतवर्षात नाही. या दिवशी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन राजाने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्वतंत्र केला तो स्वातंत्र्यदिन. त्याची आठवण म्हणून शालिवाहन कालगणना चालू केली. शालिवाहन राजाचे साम्राज्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात असल्याने येथे शालिवाहन शक पाळले जाते. तसेच कंबोडिया या देशातही नवे वर्ष गुढीपाडव्यालाच चालू होते. इंडोनेशिया येथेही मागील शतकापर्यंत नवे वर्ष गुढीपाडव्यालाच सुरु होत होते. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते?

आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मध्ये हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. ती पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.

कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही “आंदर मावळ” असे म्हटले जाते. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही.

सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची “गाथा सप्तशती”, गुणाढ्याचे “कथा सरित्सागर”, वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण “लीलावई” या काव्यग्रंथात आले आहे. एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले
नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.

परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, ‘गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.’
शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला . त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- “खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस”
एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.

नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ‘तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतू पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.

दुसरे महत्वाचे असे कि “शालिवाहन शक” असा मुळात शब्दच नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ‘सालाहन’ असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही “सालाहन” अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. ज्या साली शकांचे हनन केले तो म्हणजे सालाहन शक असा त्याचा सरळ अर्थ आहे. परंतू संस्कृतीकरणामुळे सालाहनचे “शालिवाहन” केले गेले व शालिवाहन नांवाचा कोनताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे. खरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले. नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगणात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिलाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.

म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे…
पण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना.
गुढीपाडवा साजरा करतांना गौतमीपूत्र सातकर्णी या महान सम्राटाला पुन्हा अभिवादन करुयात!
———————–

दैनिक लोकमत  : कोण होता शालिवाहन ?
Published On: Mar 23, 2012,  माधव सावरगावे, औरंगाबाद

23 मार्चआजचा गुढीपाडवा… हा शालिवाहन शक 1934 चा वर्षांरभ..पण हा शालिवाहन कोण होता ? आपण मराठी माणसं त्याच्या नावाने कालगणना का करतो ? 2000 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात असं काय झालं, ज्यामुळे मराठी वर्षाला सुरुवात झाली? असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित पडलेही नसतील. आणि याचीच खंत इतिहासकार व्यक्त करत आहे. कारण महाराष्ट्राच्या या सुवर्णयुगाबद्दल आजही अनेकांना माहिती नाही.

ठिकाण नाशिक..वर्ष इसवी सन 78..मध्य आशियातल्या शकांनी हल्ला चढवला होता. आणि त्यांना परतवून लावण्याचं आव्हान होतं पैठणच्या गौतमीपुत्रासमोर.. आणि त्यानं ते मोठं आव्हान लीलया पेललं..तेव्हापासूनच.. महाराष्ट्रात.. गौतमीपुत्राच्या शालिवाहन या कुळाच्या नावाने कालगणना सुरू झाली.

शालिवाहन कुळातला गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वांत पराक्रमी राजा…प्रतिष्ठान.. म्हणजेच आताचं औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठण ही त्याची राजधानी. आताचा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश एवढं त्याचं विस्तीर्ण साम्राज्य होतं. राजकीय स्थैर्यामुळे व्यापार थेट युरोपापर्यंत पोचला होता. महाराष्ट्रातल्या कापडांना आणि वस्तूंना अगदी रोममध्ये मागणी होती. सुमारे 450 लेण्यांची निर्मिती सुरू होती. पैठणमध्ये सापडलेल्या या नाण्यांवरूनच.. त्यावेळच्या सुबत्तेची कल्पना येते.

इतिहासकार रा श्री मोरवंचीकर यांनी गौतमीपुत्र आणि संपुर्ण शालिवाहन कुळाचा अभ्यास केला. ते सांगतात की, शालिवाहन हे महाराष्ट्राच्या सलग इतिहासातलं पहिलं पराक्रमी घराणं. तसंच गौतमीपुत्र या शालिवाहन राजानं संस्कृतपेक्षा प्राकृत. म्हणजेच तेव्हाच्या मराठीच्या रूपाला पहिल्यांदाच चालना आणि राजाश्रयही दिला.पैठणच्या आणि औरंगाबादच्या संग्रहालयात गौतमीपुत्र आणि इतर शालिवाहन राजांच्या काळातल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. किमान गुढीपाडव्याच्या दिवशी तरी आपण या आद्य मराठी शुरांचं स्मरण नक्कीच करायला हवं.
——————————–
शालिवाहन शके अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्षदिन असतो. हे शककर्ते राजे कोण होते?  गुढीपाडवा का साजरा करतात? मराठी नववर्षदिन म्हणजे नेमकं काय? शालिवाहन शककर्त्यांबद्दल जाणून घ्या.
निरंजन छानवाल, बीबीसी मराठी प्रतिनिधी
https://www.bbc.com/marathi/india-43441606

———————————————-

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

गुढी पाडवा ०१

Gudhi Padwa 7फोटो

गुढीपाडवा 2

 

गुढी पाडवा 03

 

 

गुढीपाडवा 04

———————————-

Gudhi Padwa 5 धार्मिक

Gudhi Padwa 6

Gudhi Padwa 8

Gudhi Padwa 10

——————————————————————–

गुढी पाडव्यानिमित्य खास रांगोळीची चित्रे

Gudhi Padwa Rangoli

चैत्रांगण रांगोळी

२०१८ नाशिक येथील नागरिकांनी काढलेली महारांगोळी

56260505_10213785542098850_8914524168414822400_n

56669439_10213785534098650_4457417089577123840_n

56770573_10213785525178427_7957522166860218368_n