आषाढाच्या पहिल्या दिवशी

आजचा दिवस ‘कालिदास दिन’ या नावाने ओळखला जातो. कुणी म्हणेल, आमच्याकडे तर कधीपासून पाऊस पडत आहे. तर कालिदासाचा यक्ष ज्या रामगिरीवर रहात होता तिथे कदाचित त्या काळात पहिले ढग आषाढात येत असतील, किंवा तो पहिला ढग नसेलही. त्या दिवशी त्याला तो ढग पाहून आपण पत्र लिहावे अशी कल्पना सुचली असेल. ते काही असो, पण मेघदूत हे काव्य आणि त्याच्या रचनेची कथा मात्र अजरामर झाली आहेच.

या दिवसाच्या निमित्याने मला फेसबुक आणि वॉट्सॅपवर मिळालेले लेख आणि काव्य मूळ लेखक व कवींचे आभार मानून खाली देत आहे.

************

कुबेराच्या शिव पूजेला शंभर फुलांपैकी एक फुल कमी पडते म्हणून तो यक्षाकडे बघतो तेव्हा यक्ष त्याला सांगतो की ते .फुल मी माझ्या प्रेयसीच्या डोक्यात घातले आहे तेव्हा चिडलेला कुबेर त्याला त्याच्या प्रेयसी पासून एक वर्ष विरहाचा शाप देतो आणि हीच शापवाणी मेघदूत या अमर खंड काव्याची निर्माती ठरली.
शापवाणी आणि सुंदर काव्य यांचा काहीतरी नातं असावं रामायण महाकाव्यालाही क्रौंच पक्षाच्या प्रणयी जोडप्याला मारणाऱ्या शिकाऱ्याला; वाल्मिकींनी दिलेशी शापवाणीच आधारभूत ठरली.

असो आज आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. मेघदूताची आठवण आज हटकून होते ती या ओळीने
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रिडा -परिणत गज-प्रेक्षणीयं ददर्श*

मेघेन + आश्लिष्ट ( लिप्त / वेढलेला)
सानु — पर्वत शिखर वा उंच पठार
वप्रक्रिडा — बैलांचे वा हत्तींचे ढुशा मारत खेळणे
ददर्श — पाहिला ( दृश् धातु)

(विरह पीडित यक्षाला ) आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखरांना लिप्त करणारा मेघ ; क्रिडा करणाऱ्या प्रेक्षणीय हत्ती प्रमाणे दिसला
अनेकांना ही मेघदूताची सुरवात वाटते पण ही दुसऱ्या कडव्यातली तिसरी ओळ आहे

हे पूर्ण काव्य मंदाक्रांता वृत्तात आहे १० ते २० ओळी एखाद्या वृत्तात लिहणे आणी साधारण ४५० ओळी एका वृत्तात लिहणे वेगळेच इथेच कालिदासाची प्रतिभा दिसते
विरही यक्ष या मेघालाच आपला दूत बनवून प्रेयसीकडे पाठवतो ही मेघदूताची कल्पना
प्रथम हा यक्ष मेघाला आपल्या प्रियतमेच्या नगरी पर्यंत जाण्याचा मार्ग सांगतो हा मेघदूताचा पहिला भाग पूर्व मेघ नावाने ओळखला जातो .यामध्ये ८ पर्वत ९ प्रदेश आणि १० नद्या यांच्या विहंगम दृश्याचे सुंदर वर्णन कालिदासाने जमिनीवर राहून केले आहे सुंदर भौगोलिक वर्णन आहे. हे त्याचे वर्णन म्हणजे इंजिनियरिंग भाषेत टॉप व्हु वर्णन म्हणायला हरकत नाही. तर उत्तर मेघ हा यक्षाने प्रेयसीला दिलेला संदेश आहे आता चार मासच शाप संपायला उरले आहेत मी कार्तिक मासात येतोच आहे. असे हे यक्षाचे विरहगान आहे

कालिदासाच्या साधारण चाळीस साहित्य कृतीं मधल्या सात उत्कृष्ट साहित्य कृती अशा
१) शांकुतल २) मेघदूत ३) कुमार संभव ४) रघुवंश ५ ) मालविकाग्नीमित्रम् ६ ) विक्रमोवंशीय ७ ) ऋतुसंहार (संहारचा अर्थ समुह वा एकत्रीकरण 😊)
या अजरामर साहित्यामुळेच कालिदास सर्वोतम व कविच्या गणनेत प्रथम क्रमांकावर येतो आणी नंतर कुणीच कवी येत नाही सांगणारा हा श्लोक
पुरा कविनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास : |
अद्यापि ततुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभुव ॥

कनिष्ठिका — करंगळी अनामिका — १) करंगळी नंतरचे बोट २) नाव नसलेला
ततुल्यकवेरभावात — त्याच्या तुल्य कवीच्या अभावात

पूर्वी ( उत्तम ) कवींच्या गणना प्रसंगी कालिदास करंगळी वर अधिष्ठित झाला आणी त्याच्या तुल्यबळ कवी न मिळाल्याने करंगळी नंतरचे बोट अनामिका ( नाव नसलेले ) अद्यापिही तसेच राहिले आहे

नरेंद्र

************

गुजगोष्टी मध्ये गुंग, भार्येच्या संगतीत
भान नाही त्याला, गेली आज्ञा विस्मृतीत

क्रोधित यक्षराजा, सुनावी शिक्षा अशी
पत्नीला विलग करुनी, धाडला दूरदेशी

जाता सामोरे क्रोधाला, हद्दपार केले त्याला
शिक्षा भोगणार एक, पण जाहली युगुलाला

विरहात होती तीही, ना सुचे अन्नपाणी
पण सांगणार कोणा, तिची करुण कहाणी

येता वर्षाकाल, बरसल्या धारा जेव्हा
आठव येता त्याला, व्यकुळला जीव तेव्हा

दूत करुनी मेघाला, धाडला पत्नीकडे
शुभवार्ता सांगावी, असे घातले साकडे

घेऊन निरोप त्याचा, तो मेघ रवाना झाला
कालिदासाची लेखणी, ‘मेघदूत’ जन्मा आला……

मधुश्री वैद्य

****************

आषाढस्य प्रथम दिवसे


मेघदूत लिहिणाऱ्या कवि कुलगुरू कालिदास यांची आज जयंती ! आषाढ महिन्याचा पहिला दिवस.आषाढस्य प्रथम दिवसे या अजरामर श्लोकाची निर्मिती केली.
विदर्भातील रामटेक/रामगिरी इथून या ढगाचा हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास यात वर्णन केला आहे. हा आषाढातील काळाभोर मदमस्त हत्तीसारखा ढग खूप दूरवर प्रवास करेल अशी खात्री वाटल्याने त्यालाच प्रेमिकांचा दूत बनवून पाठवले आहे. सध्याच्या मोबाइल युगात एखाद्या ढगालाच माणसाप्रमाणे दूत बनवणे खूप रोमांचक वाटते.
अलका नगरीत एक यक्ष कुबेराला महादेवाच्या पुजेसाठी सकाळी उमललेली ताजी कमळे रोज देण्याचे काम करत असतो. नवपरिणीत पत्नीबरोबर वेळ मिळावा म्हणुन तो यक्ष रात्रीच कमळे तोडून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कुबेर पूजा करत असताना त्या उमलू लागलेल्या फुलात रात्री कोंडला गेलेला भुंगा कुबेराला डंख मारतो. त्या काळच्या पद्धतीनुसार कुबेर यक्षाला शाप देतो. आणि त्या यक्षाची व त्याच्या प्रियेची ताटातूट होते.
मग रामगिरीहून,जिथे सीतेची स्नानकुंडे आहेत,अशा ठिकाणाहून अश्रुभरलेल्या डोळ्यांनी यक्ष मेघापाशी निरोप देतो. राम आणि सीता यांचा पण विरह प्रसिद्ध आहे.
वाटेतल्या निसर्गाच्या अप्रतिम वर्णनानी नटलेले हे काव्य !आपल्याला नर्मदा,वेत्रवती नदी, विदिशा नगरी,कदंब वृक्षांनी नटलेले पर्वत,उज्जैन, अवंती नगरी,शिप्रा नदी,महांकालेश्वर सगळ्याचे वर्णन करत या मेघाचा प्रवास गंभीरानदी, हिमालयाच्या कुशीत उगम पा्वलेली जान्हवी/गंगा नदी,मानस सरोवरापर्यंत होतो. कैलासाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीत मेघ पोचतो.
तो मेघाला स्वत:च्या घराचे,त्याच्या आसपासच्या मंगल खुणांचे वर्णन करतो.शापातले किती दिवस राहिलेत हे फुलांनी मोजणाऱ्या ,विरहाने कृश झालेल्या आपल्या पत्नीचे वर्णन करतो..परत येऊन तिची खुशाली कळव सांगतो.
ताटातूट,विरह हाच या काव्याचा पाया आहे.आपण आपल्या मनात सतत रहाणाऱ्या व्यक्तीची आठवण काढत असतो. आठवण हा शब्द पण योग्य नाही,त्या व्यक्तीला कधीचं विसरलेले नसतो.
याच भावनेचे प्रतिबिंब या अमर काव्यात मिळते.
कविकुलगुरु कालिदास यांना सादर प्रणाम !!
आजच्या विज्ञान युगात मेघाला दूत बनवून पाठवणे किती काव्यमय वाटते नाही. आषाढातला पहिला दिवस घेऊन येतो खूप सण,व्रतवैकल्ये !!कोरोनामुळे खर तर भांबावून गेलो आहोत. अशा वेळी आपल्या जीवनातली भक्ती,श्रद्धा आपल्याला तारुन नेतील. निमिषार्धात संपर्क साधण्याच्या या युगात आषाढाच्या पहिल्या दिवशी कवि कुलगुरु कालिदास यांचे स्मरण करु या !!
माधुरीशिधये

कविकुलगुरु कालिदास आणि त्याचे साहित्य यांची ओळख करून देणारे माझे लेख इथे वाचावेत – आनंद घारे
https://anandghare2.wordpress.com/2010/09/09/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8/

***********

आषाढाच्या पहिल्या दिवशी अवचित दिसशी मला
म्हणुनिया विनवीत मेघा तुला

रामगिरीवर एक यक्ष मी
काळ कंठितो विरही कामी
कसा सांगू मी शाप भोगतो व्यथा जाळते मला
म्हणुनिया विनवीत मेघा तुला

स्वीकारी या कुटजफुलांते
ऐक प्रार्थना प्रसन्नचित्ते
स्वागत करितो प्रीतिवचाने प्रणयी हा पोळला
म्हणुनिया विनवीत मेघा तुला

तुला पाहुनी सुखासीनही
कातर होती , होती विरही
कथा काय मग कंठ मिठीचा प्रिय ज्यांचा तुटला
म्हणुनिया विनवीत मेघा तुला

तप्तांचा तू असशी आश्रय
इंद्रसचिव तू , तू करुणामय
निरोप माझा घेउनी जाई अलकानगरीला
म्हणुनिया विनवीत मेघा तुला

प्रिया दूर मम तिला भेटशील
मनी वाटते नाही न म्हणशील
विफल विनवणी सुजनी बरवी नको शठी सफला
म्हणुनिया विनवीत मेघा तुला

कुठला घ्यावा मार्ग प्रथम तो
सांगुनी नंतर निरोप कथितो
दूत होऊनी पोचीव माझ्या दुःखी दयितेला
म्हणुनिया विनवीत मेघा तुला

गीत – डॉ. वसंतराव पटवर्धन
संगीत – अरूण काकतकर
स्वर – पं . जितेंद्र अभिषेकी

महाकवी कालिदास दिन


☁️🌧️☁️🌦️☁️🌧️☁️

वासन्तं कुसुमं फलं च युगपद् ग्रीष्मस्य सर्वं च यद्!
यच्चान्यन्मनसो रसायनमतः सन्तर्पणं मोहनम्!
एकीभूतमभूतपूर्वमथवा स्वर्लोकभूलोकयोः!
ऐश्वर्यं यदि वाञ्छसि प्रियसखे शाकुन्तलं सेव्यताम्!!

वसंतऋतूतला मोहोर आणि ग्रीष्म ऋतूतलं फळ हे सर्व एकाचवेळी ( युगपद्) ज्यात आहे, जे ( एकाच वेळी) मनाला शांत करणारे ( संतर्पणम्) आणि मोहितही करणारे आहे. किंवा स्वर्ग आणि पृथ्वी यांचं ऐश्वर्य जर एकाच वेळी एकत्र हवं असेल तर प्रियमित्रा, तू शाकुंतलाचा आस्वाद घे.
कालिदास हे भारतीय साहित्यविश्वाला पडलेलं एक स्वप्न होतं. दोन महाकाव्य लिहिल्यामुळे कविकुलगुरु असं बिरुद गीतगोविंदकार जयदेव ( १२ वं शतक) यानं त्याला लावलं. जयदेवानंच त्याला ‘ कविताकामिनीचा विलास’ असं सार्थ विशेषण बहाल केलं.
अठराव्या शतकात युरोपीयन लोकांचा संस्कृत भाषेशी परिचय झाला. कलकत्ता येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले सर विल्यम जोन्स हे रीतसर संस्कृत शिकणारे पहिले विद्वान. त्यांनी त्यांचे गुरु रामलोचन यांच्या मदतीनं कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतलाचं प्रथम लॅटिन भाषेत आणि नंतर इंग्रजी भाषेत अनुवाद केला. त्यांनी तो प्रसिद्ध निसर्गवादी ( naturalist) शास्त्रज्ञ फाॅर्स्टर यांना त्यांचे मित्र हुम्बोल्ट यांच्यामार्फत दिला. फाॅर्स्टर यांनी त्याचा जर्मन भाषेत अनुवाद केला आणि तो जर्मन कवी Goethe ( मराठीत गटे) यांच्या हातात पडला.‌ तो वाचल्यावर ते अक्षरशः तो ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचले. पाश्चात्य देशात नुकताच मूळ धरू लागलेला सौंदर्यवाद ( romanticism) कालिदासाच्या निसर्गकन्या शकुंतलेच्या मोहक चित्रणानं बहरून आला. कालिदासाच्या शाकुंतलानं वेडा झालेल्या या कवीनं शाकुंतलासंबंधी जे उद्गार काढले त्याचा संस्कृत अनुवाद वरील श्लोकात आहे. तो कुणी केला हे माहित नाही.
…..प्रा. डॉ. निर्मला कुलकर्णी

☁️🌧️☁️🌦️☁️🌧️☁️

★।। कालिदास सरताज कवींचा ।।★

हरि:ओम…..! नर्मदे हर……..!
सुप्रभात, सादर स्नेह वंदन……!
रसिकहो नमस्कार…….
आज आषाढ महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदा ……

भारतीय साहित्य जगतात आजचा दिवस “महाकवी कालिदास दिन” म्हणून साजरा करण्याचा प्रघात आहे. कोण हा महाकवी कालिदास? आज आपण त्यांच्याबद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आदि कवी महर्षी वाल्मिकी व महामती श्री भगवान वेदव्यास यांच्या नंतर भारतीय साहित्य जगताला आपल्या अलौकिक प्रतिभेने व दिव्य अशा काव्य संपदेने ललामभूत ठरणारा हा महाकवी केवळ भारतीयच नव्हे तर सर्व जगातील रसिकांचा, साहित्यप्रेमींचा, अभ्यासकांचा व संशोधकांचा अभ्यास विषय व सरताज झाला आहे. आपल्या काव्यातून शब्दालंकार, उपमा, निसर्ग वर्णन,उत्कट शृंगार, मानवी भावभावना व श्रेष्ठ सांस्कृतिक व साहित्यिक मूल्य प्रस्थापित करणारा हा बहुमुखी प्रतिभेचा अद्वितीय कविराज स्वतःबद्दल मात्र कमालीचे मौन बाळगतो. त्यामुळेच त्याचा जन्म, त्याचे शिक्षण, त्याची गुरुपरंपरा, त्याचे देहावसान या बाबतीत इतिहासामध्ये कोणताही ठोस लेखी पुरावा मिळत नाही. व त्यामुळे अनेक मत मतांतरे असल्याचे जाणवते. तरीही भारतीय साहित्य जगतात व पर्यायाने विश्व शारदेच्या प्रांगणात आपल्या काव्य कैलास निर्मितीतून अलौकिक व शुक्र ताऱ्या प्रमाणे अढळ स्थान प्राप्त करणाऱ्या या महाकवीला आपण भारतीयांनी योग्य तो सन्मान व हवा तसा न्याय दिला नाही ही खंत रसिकजनांच्या मनात घर करून राहतेच.

हा कालिदास आपल्याला भेटतो तो लोककथातून किंवा किंवदंतीतूनच. त्याबद्दल सर्व मान्य व बहू प्रचलित असलेली कथा अशी आहे. काशीराज नरेशांचे आपल्या एकुलत्या एक राजकन्ये वर ( वेदवती /विद्योत्तमा वर) खूपच प्रेम होते.कारण ती सुपुत्री, सुशील,सौंदर्यसंपन्न, राजकारण कुशल व साहित्यशास्त्रविनोदा यामध्ये असाधारण गती असलेली एक प्रतिभावंत रूपगर्विता होती. काशी राजाच्या दरबारात येणाऱ्या कितीतरी पंडितांची परीक्षा घेऊन तिने त्यांना परास्त केले होते. ही अशी तेजस्वी कन्या बालपणापासून प्रधान पुत्र असलेल्या तिच्या सवंगड्या बरोबरच वाढली. लहानाची मोठी झाली. स्वाभाविकच उभयतांमध्ये एक अंगभूत आकर्षण व स्नेहभाव निर्माण झाला. त्या आधारे प्रधान पुत्राने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला, पण तू माझ्या बाबांच्या नोकराचा पुत्र आहेस, मी तुझ्याशी विवाह करणार नाही. असे म्हणून या मानिनीने त्याचा प्रस्ताव झिडकारला.

तिच्या या नकारामुळे तो सूडाने अंतर्बाह्य पेटला व एखाद्या मुर्खाशीच हिचा विवाह करून हिचा आजन्म सूड घेण्याचे त्यांनी ठरवले. तो अशा महामूर्खाच्या शोधात बाहेर पडला. असेच फिरत असताना जंगलात एका झाडाच्या फांदीवर बसून तीच फांदी तोडणारा एक मूर्खश्रेष्ठ त्याला सापडला. शरीराने धडधाकट, दिसायला सुंदर व धारदार नाकाचा,सावळ्या अंगकांतीच्या व टपोऱ्या डोळ्यांच्या या मूर्खाला प्रधान पुत्राने सर्व बनाव करून दरबारात त्याच्या शिष्य परिवारासह महापंडित व साहित्य शास्त्राचा मूर्धन्य विद्वान म्हणून सादर केले.
राजकुमारीने विचारलेल्या साहित्य शास्त्रातील सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्या तथाकथित शिष्यांनी दिल्यामुळे या महा पंडिताला दरबारात बोलण्याची वेळच आली नाही. त्याच्या या अलौकिक पंडित्यावर राजकुमारी भाळली व प्रधान पुत्राने केलेल्या बनावानुसार उभयतांचा विवाह पार पडला. आपल्या वैवाहिक सहजीवनाचे एक वेगळेच अलौकिक भावस्वप्न उराशी घेऊन राजकन्येने त्याच्या संसारात पाऊल टाकले.

पण हाय रे दुर्दैव….. ज्याला महापंडित समजून तिने साता जन्माचा सहचर म्हणून निवडले होते तो तद्दन मूर्ख असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मनात योजलेल्या सर्व स्वप्नांचा अगदी चक्काचूर झाला, भीषण भवितव्याच्या जाणिवेने तिच्या डोळ्यापुढे काळाकुट्ट अंध:कार पसरला. पण ती राजनीती कुशल असल्यामुळे तिने स्वतःला सावरले अशा मुर्खा बरोबर आजन्म संसार करण्याची शिक्षा भोगण्या पेक्षा विधवा म्हणून विजनवासात राहणे जास्त श्रेयस्कर वाटून तिने कमरेची कट्यार काढून त्याच्या गळ्यास लावली. तो घाबरला व त्याने झालेला सर्व प्रकार एका क्षणात तिला सांगून टाकला. प्रधान पुत्राने आपला असा सूड घेतला आहे हे तिच्या लक्षात आले पण आता वेळ निघून गेली होती. तरीही याच्याजवळ अल्पांशाने तरी साहित्य शास्त्र विनोदबुद्धी आहे का याचा शोध घेण्यासाठी तिने त्याला प्रश्न केला……
“अस्ति कश्चित वाग्विशेष:……..?”

हा प्रश्न ऐकून तो अधिकच गोंधळला, राजकन्येने त्याच्या गळ्यास तीक्ष्ण कट्यार लावली, राज कन्येचा हा रुद्रावतार पाहून त्याने कसाबसा आपला जीव वाचवला व रात्रीच्या अंधारात गवाक्षातून उडी मारून तो अदृश्य झाला. जनश्रुती नुसार पुढे त्याने भगवती काली मातेची उपासना करून अलौकिक असे ज्ञान प्राप्त करून घेतले. त्याच्या उपासनेने प्रसन्न होऊन अभिनव वाग्विलासिनी शारदा काली मातेच्या रूपात त्याच्यासमोर प्रकट झाली. आणि तिने त्याला काव्यालंकार संपन्न केले.कालीमातेच्या प्रसादातून मिळालेल्या या प्रतिभेच्या वरदानाची प्रासादिक कृतज्ञता म्हणून तो स्वतःला “कालिदास” म्हणवू लागला. मात्र राजकन्येने विचारलेला तो प्रश्न त्याचा मेंदू पोखरतच होता, तो प्रश्न होता……
अस्ति कश्चित वाग्विशेष: ……. ?”

या प्रश्नातील एकेका शब्दाने सुरुवात करून या महाकवी ने भारतीय साहित्य जगतामध्ये अनुलंघ्य असे काव्य कैलास निर्माण केले. व उन्मत्त राजकुमारीस उत्तर दिले.
१) अस्ति :- या शब्दापासून सुरुवात करून महाकवी कालिदासांनी “कुमार संभव” नामक महाकाव्याची रचना केली. या महाकाव्याचा विषय शिवपार्वतींची प्रेम कथा व परिणय सोहळा असा आहे. तारकासुराच्या वधासाठी भगवान कार्तिकेयांच्या जन्म हेतूने रचण्यात आलेल्या शिवपार्वतींच्या प्रेम कथा व परिणय कथेचे यात सुरम्य वर्णन आहे. यात महाकवी कालिदासांची प्रतिभा गिरीराज हिमालयाच्या उत्तुंग उंची सारखेच त्याचे अलौकिक दर्शन आपणास घडविते. या महाकाव्याचा पहिला श्लोक पुढीलप्रमाणे आहे.
“अस्त्युत्तरस्याम दिशी देवतात्मा
हिमालयो नाम नगाधिराज:।
पूर्वा परो तोय निधिन् वगाह्य
स्थित: पृथ्वीव्या इव मानदंड:।। ”

२ ) कश्चित:- या शब्दापासून सुरुवात करून महाकवी कालिदासांनी “मेघदूत” नावाचे जगप्रसिद्ध असे खंडकाव्य रचले आहे.कुबेराच्या शापाने शापित झालेला यक्ष शिक्षा म्हणून एक वर्षासाठी पृथ्वीतलावर येतो. रामगिरी च्या( रामटेक, नागपूर ?) आश्रयाला तो राहतो. त्याच्या पृथ्वीतलावरील निवासास आठ महिने पूर्ण झाले आहेत.अलकापुरीतील आपल्या प्रेयसीच्या मीलनास उत्सुक,व्याकुळ आणी आतुर झालेला यक्ष आषाढाच्या पहिल्याच दिवशी आकाशातून जाणाऱ्या मेघांना दूत बनवून अलकापुरीत राहणाऱ्या आपल्या प्रिय प्रेयसी ला संदेश पाठवितो असे या खंड काव्याचे कथानक आहे. मंदाक्रांता वृत्तात 120 मुक्तकातून व पूर्व मेघ व उत्तर मेघ अशा दोन भागातून हे खंड काव्य कालिदास आपल्यापुढे मांडतात. हे खंडकाव्य म्हणजे कालिदासांच्या संपूर्ण व स्वतंत्र प्रज्ञेचा उत्तुंग आविष्कार होय. या संपूर्ण खण्डकाव्यातून उत्कट व प्रसंगी उत्तान शृंगाराचे अप्रतिम वर्णन कालिदासाने केले आहे. कश्चित् शब्दा पासून सुरु होणारा या काव्याचा पहिला श्लोक पुढीलप्रमाणे आहे…….
“कश्चित् कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्त:।
शापेनास्तंगमित्य महिमा वर्ष भोग्येण भर्तृ:।
यक्षश्चक्रे जनक तनया स्नान पुण्योदकेषु ।
स्निग्धच्छाया तरुषुवशितम रामगिर्याश्रमेषु।। ”

३ ) वाक् :- वाक् या शब्दापासून सुरुवात करुन महाकवी कालिदासांनी भगवान श्रीरामांचे पूर्वज महाराज श्री रघूंच्या वंशाच्या जीवनादर्श व पराक्रमाचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. रघु वंशातील सत्तावीस पिढ्यांचे अतिशय सुंदर तपशीलवार व मनोहर असे वर्णन यात वाचावयास मिळते. तत्कालिन नीती कल्पना, न्यायव्यवस्था, चारित्र्य प्रियता ,न्याय प्रियता,स्वप्नातहि दिलेला शब्द पाळण्याची परंपरा व रघुवंशीयांच्या महान पराक्रमाचे यात साद्यंत सप्रमाण वर्णन आहे. वाक् या शब्दापासून महाकवी कालिदास यांनी रचलेल्या या महाकाव्याचा पहिला श्लोक पुढीलप्रमाणे आहे……
“वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ: प्रतिपत्यये।
जगत: पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ।।”

४ ) ऋतुसंहार :- वरील तीन सुप्रसिद्ध काव्यां व्यतिरिक्त महाकवी कालिदास यांचे ऋतूसंहार हेही एक खंडकाव्य प्रसिद्ध आहे. ऋतुसंहार ही कालिदासाची पहिली रचना असल्याचे विद्वानांचे मत आहे. प्रत्येकी 18 ते 20 श्लोकांच्या सहा सर्गातून, सहाही ऋतूंचे विलक्षण निसर्ग वर्णन यात कालिदासाने केले आहे. विशेषतः ऋतू बदलाचा मानवी प्रेम जीवनावर होणार्या परिणामाची सूक्ष्म व तरल मांडणी महाकवी कालिदास या काव्यातून करतात.
याशिवाय महाकवी कालिदास यांनी तीन अतिशय सुंदर अशी नाटकेही लिहिली आहेत.
१ ) मालविकाग्निमित्र :- राजा अग्निमित्र व मालविका यांच्यातील सुरस प्रेम कथेची या नाटकात अतिशय सुंदर मांडणी महाकवी कालिदासांनी केली आहे.
२ ) अभिज्ञान शाकुंतल :- महाकवी कालिदासांची जगप्रसिद्ध अशी ही नाट्यरचना. जगातील बहुतेक सर्व भाषांमधून या अतिशय सुरस व भावपूर्ण नाटकाची भाषांतरे झालेली आहेत. जर्मन महाकवी गटे हे अभिज्ञान शाकुंतल डोक्यावर ठेवून नाचला ते उगाचच नाही. विश्वामित्र व मेनका कन्या शकुंतला व महाराज दुष्यंत यांच्यातील प्रेम कथेचे अतिशय तरल, नाट्यपूर्ण व तपशिलवार चित्रण कालिदास या नाटकातून करतात.
“काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुंतला”
अशी उक्ती प्रसिद्धच आहे. कण्व मुनींच्या ह्रुदयातील पितृ वत्सल उलघाल हा या नाटकातील प्रसंग पिढ्या न पिढ्या रसिकांच्या मनावर कोरला गेला आहे. या नाटकातून तत्कालिन ऋषी संस्थेचे वर्णन, आश्रमिय वातावरणाचे सुंदर वर्णन, नागर व आश्रमिय जीवन,राज्यव्यवहाराचे वर्णन, कालिदासाची प्रतिभा आपल्याला घडविते.

३ ) विक्रमोर्वशीय:- महाकवी कालिदासाची हीसुद्धा एक अप्रतिम नाट्यकृती. राजा पुरुरवा व उर्वशी यांची अतिशय रहस्यमय, गुंतागुंतीची,उत्कंठा वर्धक व तरल संवेदनापूर्ण अशी प्रेमकथा महाकवी कालिदास यातून आपल्यापुढे मांडतात.
याशिवाय महाकवी कालिदास हे ज्योतिष तज्ञही असल्याने ज्योतिष विषयक “उत्तर कालामृतम् ” नावाच्या एका ज्योतिष ग्रंथाचीही नोंद कालिदासांच्या नावाने आहे.
महाकवी कालिदास हे भारतीय साहित्य व काव्य जगतातील एक उत्तुंग कैलास शिखर आहे. त्यांनी निर्माण केलेल्या या रस सिद्ध, दर्जेदार व कालजयी साहित्यकृतींचा गौरव करण्यासाठीच भारतीय साहित्य जगताने त्यांना “कविकुलगुरू” “कनिष्ठिकाधिष्टित” व “कविता कामिनी विलास” या गौरवशाली उपाधींनि गौरविले आहे. समस्त भारतीयांना ललामभूत होणारा व येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भारतीय समाज जीवन, भारतीय अध्यात्म, भारतीय निसर्ग, भारतीय भावभावना, भारतीय कुटुंब जीवन, ऋषी परंपरा व दिव्य चरित्रांचे उदात्त चित्रण करणाऱ्या या अलौकिक साहित्यकृतींचे दर्शन घडविणार्या या महाकविचा परिचय व्हावा व त्याच्या साहित्य कृतींचा आस्वाद घेण्याचा, अभ्यास करण्याचा विचार आमच्यात रुजावा म्हणून हा लेखन प्रपंच.

आज आषाढ शुद्ध प्रतिपदा अर्थातच “कालिदास दिन “अथवा “कालिदास जयंतीच्या” निमित्ताने महाकवी कालिदासाच्या या उत्तुंग,असामान्य,अतुलनीय कर्तुत्वाला मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन……! धन्यवाद….!
स्नेह प्रार्थी,
।।।© अक्षर योगी ।।।
राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य, ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज,
समर्थ नगर, अमळनेर,जि.जळगाव.


जाई आज शकुंतला निजगृहे, येई भरूनी मला ।
दाटे कंठ, मनात साखळतसे चिंता सुखाची तिच्या ॥
माझी ही स्थिती होतसे, मग दशा होई पित्याची कशी ।
जाई सोडुन ती घरास मुलगी, वाईट वाटे किती ॥ – शार्दूलविक्रीडित

नरेंद्र गोळे

Madhav Bhokarikar
अभिज्ञानशाकुंतलम् आणि त्यातील चार श्लोक !
आज आषाढ शुद्ध, प्रतिपदा ! या दिवशी आवर्जून आठवतो, तो या देशातील महाकवि कालिदास ! ‘उपमा कालिदासस्य’ हे अगदी भाषेतील अलंकार शिकण्यापूर्वीपासूनच माहिती आहे. हा श्लोक या संबंधानेच आहे.
उपमा कालिदासस्य नोत्कृष्टेति नो मम ।
अर्थान्तरन्यास विन्यासे कालिदास विलिष्यते।।
भावार्थ – उपमा किंवा अर्थान्तरन्यास अलंकाराचा प्रयोग असो, सर्व काव्यप्रकारात विशेष चमक निर्माण करतात.
महाकवि कालीदासाच्या कित्येक रचनांमधील प्रमुख रचना म्हणजे, संस्कृतमधील सात रचना ! खंडकाव्य असलेले ऋतुसंहार आणि मेघदूत, महाकाव्य मानले जाणारे रघुवंशम् आणि कुमारसंभवम्, आणि तीन अलौकिक अशा नाट्यकृती, त्या म्हणजे मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् आणि अमर झालेली नाट्यकलाकृती म्हणजे, अभिज्ञानशाकुन्तलम् !
शकुंतलेची कथा, ही महाभारतातील ! विश्वामित्र ऋषींची घोर तपश्चर्या पाहून, आपल्या इंद्रपदाची काळजी पडलेल्या इंद्राने, त्यांचा तपोभंग करण्यासाठी स्वर्गलोकीची अप्सरा, मेनका या सौंदर्यवतीला पाठवले. विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या, मेनकेने भंग केली, आणि तिला विश्वामित्र ऋषींकडून मुलगी झाली. विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या भंग झाल्याने, मेनका आता त्यांच्यासोबत थांबण्याचे प्रयोजनच नव्हते. मेनका, या तिच्या छोट्या नवजात मुलीला, जंगलात सोडून स्वर्गलोकी निघून गेली. या मुलीला वाढवले, ते शकुंत पक्ष्यांनी, आणि म्हणून शकुंत पक्ष्यांनी वाढवलेली, ती शकुंतला, असे तिला म्हणू लागले. तिला आश्रमात आणून आश्रय दिला, आपल्या मुलीसारखे वाढवले, ते कण्वमुनींनी ! ही शकुंतला ही दुष्यंत राजाची पत्नी होती, तिला भरत नांवाचा पुत्र झाला, आणि त्या भरत राजाच्या नांवावरूनच आपल्या देशाचे नांव, भारत पडले.
अभिज्ञानशाकुंतलम्, हे नाटक महाभारतातील या शकुंतलेच्या कथेवर आधारलेले. कण्वमुनींनी जिचा सांभाळ आपल्या आश्रमात मुलीप्रमाणे केला, ती शकुंतला ! राजा दुष्यंताशी जिचा गांधर्वविवाह झाला, त्याच्यापासून झालेला पुत्र भरत याची माता, ती शकुंतला ! अशा शकुंतलेवर, कालिदासाने नाटक लिहीले, त्या नाटकाच्या महत्तेबद्दल नाट्यकला रसिक म्हणतात –

काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला〡
तत्रापि चतुर्थोअङ्कस्तत्र श्लोक चतुष्ट्यम् ⅼ ⅼ
भावार्थ – सर्व काव्यप्रकारात नाटक रमणीय, आणि नाटकांमधे देखील ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ आणि त्यात देखील त्याचा चौथा अंक, आणि त्यातील परमावधी म्हणजे ते चार श्लोक !
या नाटकाला, त्यातील श्लोकांना एवढे महत्व देण्याचे कारण म्हणजे, यांत करूण रसाचा परमोच्च बिंदू महाकवि कालिदासाने गाठला आहे. आजच्या दिवशी, या ‘कालिदास दिनी’ वाटले, की ते चार श्लोक सांगावेत, म्हणून हा प्रपंच !
मुलीच्या लग्नानंतर, ती तिच्या सासरी जाते, त्यावेळी तिच्या मात्यापित्यांच्या ह्रदयात, काय कालवाकालव होत असेल, काय भावना निर्माण होत असतील, त्यांच्या आयुष्यभरच्या वात्सल्याचा झरा, कसा भरभरून येत असेल, याचे चित्रण या महाकविने केले आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे होणारी पित्याची अवस्था, तपस्वी कण्वमुनी देखील थांबवू शकले नाही, तर तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं !
प्रथम मुख्य श्लोक –
यास्यत्यद्य शकुन्तलेति ह्रदयं संसपृष्टमुत्कण्ठया,
कण्ठः स्तम्भितवाष्पवृत्तिकलुषश्चिन्ताजडंदर्शनम् 〡
वैक्लव्यं मम तावदीदृशमिदं स्नेहादरण्योकसः,
पीड्यन्ते गृहिण: कथं न तनयाविश्लेषदु:खैनवैः ⅼⅼ
भावार्थ – आज शकुंतला निघून जाईल, त्यामुळे (माझे) ह्रदय दु:खाने काठोकाठ भरले आहे, अश्रूप्रवाह थांबवण्यामुळे गळा भरून आला आहे, (हा प्रसंग मला पाहवला जात असल्याने, माझ्या) दृष्टीत जीव राहिला नाही (ती निर्जीव झाली आहे). ज्या वनवासी शकुंतलेला मी केवळ वाढवले (जन्म दिला नाही), (तरी) तिच्याप्रति निर्माण झालेल्या या स्नेहामुळे माझ्यासारख्या (परक्याची) ही अशी विकल अवस्था होते, तर आपल्या स्वत:च्या मुलीच्या वियोगाने, ते गृहस्थी लोक किती बरे दु:खीत होत असतील ? खरोखर अतिशय दु:खी होत असतील.

दुसऱ्या श्लोकात, हा महाकवि, मुलीला पाठवणीच्या वेळी, तिचे आईवडील तिला उपदेश करतात, तसेच जावयाला संबोधतात, ते पहाण्यासारखे असते. या उपदेशात देखील पित्याच्या ह्रदयातील मुलीच्या विरहाची वेदना दिसत असते. मुलीच्या उत्तम भविष्याची इच्छा करणारा, तिला आशीर्वाद देणारा पिता, ही अंतरीची वेदना काय, आणि कशी लपवणार ? कण्वमुनी, तिच्या मुलीला शकुंतलेला हा उपदेश करतानाचा हा श्लोक आहे.
दुसरा मुख्य श्लोक –
सुश्रूषस्व गुरुन् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने ,
भर्तुर्वि प्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीप गमः ⎸
भूयिष्ठमं भव दक्षिणा परिजने भाग्येष्व नुत्सेकिनी ,
यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामाः कुलस्याधयः ||
भावार्थ – तू तुझ्या सासूसासरे वडिलधाऱ्यांची सेवा कर, सपत्नींसोबत सखींप्रमाणे वाग, पतिकडून काही वेळा (तुझ्यावर) अपमानीत होण्याचा प्रसंग आला, तरी रागावून त्याच्याविरूद्ध असे काही वागू नको, सेवक व दासदासींसोबत तू उदारवृत्ती बाळग, आणि आपल्या भाग्याबद्दल गर्व होवू देवू नको, अहंकार करू नको; असे आचरण करणाऱ्या स्त्रिया या गृहिणी, हे नामाभिधान सार्थ करतात, आणि याच्या विपरीत वागणाऱ्या, त्या कुटुंबाला त्रासदायकच ठरतात.
तिसऱ्या श्लोकात या महाकविने प्रकृतिचे, म्हणजे तिच्या निसर्गाशी आलेल्या संबंधाचे वर्णन केले आहे.
तिसरा श्लोक –
पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु या ,
नादत्ते प्रिय मण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम् |
आद्ये वः कुसुमुप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः ,
सेयं याति शकुन्तला पति-गृहं सर्वे रनुज्ञायताम् ||
भावार्थ – शकुंतला ही निसर्गकन्या आहे, त्यामुळे आश्रमातील व सभोवतालच्या वृक्षवेली, पशुपक्षी यांच्याशी तिचा स्नेह सहोदरासारखा आहे. ती प्रथम वृक्षांना पाणी द्यायची, आणि नंतर स्वत: प्यायची. तिला अलंकार अतिशय आवडतात, मात्र वृक्षवेलींच्या स्नेहामुळे अलंकारासाठी ती पानसुद्धा तोडत नव्हती, वृक्षाला आलेल्या पहिल्या फुलाचा, ती पुत्रोत्सव साजरा करायची. अशी माझी शकुंतला, तिच्या पतिगृही सर्वांनाच अनुसरणारी होईल.
चौथ्या श्लोकात, शकुंतलेशी गंधर्वविवाह करणाऱ्या दुष्यंतासाठी एक मनोज्ञ व भावुक असा संदेश दिला आहे. हा महत्वाचा आहे.
चौथा श्लोक –
अस्मान् साधु विचिन्त्य संयम धनानुच्चैः कुलं चात्मन –
स्त्वय्यस्याः कथमप्यबान्धवकृतां स्नेहप्रवृत्तिं च ताम् |
सामान्य प्रतिपत्तिपूर्वकमियं दारेषु दृश्या त्वया ,
भाग्यायत्तमतः परं न खलु तद्वाच्यं वधूबन्धुभिः ||
भावार्थ – आम्हा तपस्वी लोकांची निश्चलता, आपल्या उच्च कुळाचा विचार करता, आमच्या अनुमतीशिवाय तुम्ही केलेले प्रेम यांचा योग्य विचार करून, तुम्ही हिच्यासोबत, तसेच तुमच्या इतर पत्नींसोबत सारखेच वर्तन करायला हवे; यानंतर मात्र जे काही होईल, ते तुमच्या भाग्याप्रमाणे होईल, अर्थात त्याबद्दल आम्हाला काही अडचण असणार नाही.
महाकवि कालिदासांच्या श्लोकांचे समर्थपणे भाषांतर, मी काय करु शकणार ? मात्र हजारो वर्षांपूर्वीच्या पित्याचे अश्रू आणि ह्रदयवेदना व मनांतील मूक भावना, या पालन केलेल्या मुलीची, तिच्या सासरी रवानगी करतांना, या महाकवीने आपल्या अंत:चक्षूने बघीतले, आणि जन्म झाला, तो या अलौकिक नाट्यकृतीचा, अभिज्ञानशाकुंतलम् याचा !
© ॲड. माधव भोकरीकर

फेसबुकवरून साभार दि. ११-०७-२०२१

संस्कृत भाषेची किमया

संस्कृत भाषेतील चमत्कृती दाखवणारा हा लेख श्री.विश्वंभर मुळे यांचे आभार मानून या ठिकाणी संग्रहित करीत आहे.
राघवयादवीयम् आणि रामकृष्णगीतम् या दोन अद्भुत काव्यांची माहिती इथे पहा.
https://anandghare.wordpress.com/2019/01/17/%e0%a4%85%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%98/

।।संस्कृत भाषेची किमया।।

इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना एक वाक्य नेहमी सांगितले जाते ते म्हणजे ” A QUICK BROWN FOX JUMPS OVER THE LAZY DOG” या वाक्याचे विशेषत्व हे आहे की ह्या वाक्यात इंग्रजी वर्णमालेतील सर्व वर्ण आले आहेत. पण आपण जर पाहिलं तर ह्या वाक्यात काही त्रुटी आढळून येतात जसं की इंग्रजी वर्णमालेत २६ वर्ण असताना इथे मात्र ३३ आले आहेत. O,A,E,U,R ह्यांचा परत परत वापर केला गेला आहे.तसेच A,B,C,D… हा क्रम पाळला नाही .
तेच जर आपण खालचा श्लोक पाहिला तर संस्कृत भाषेची किमया आपल्याला लक्षात येईल-
क:खगीघाङ्चिच्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढण:।
तथोदधीन पफर्बाभीर्मयोSरिल्वाशिषां सह।।

अर्थात – पक्ष्यांचं प्रेम, शुद्ध बुद्धीचा, दुसऱ्याच्या बलाचे अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात अग्र, मनाने निश्चल व निर्भीड आणि महासागराचे सर्जन करणारा कोण आहे? असा राजा मय ज्याला त्याच्या शत्रूंचे देखील आशीर्वाद प्राप्त आहेत.
ह्यात जर आपण पाहिलं तर संस्कृत वर्णमालेतील सर्व ३३ व्यंजने आली आहेत आणि ती ही अगदी क्रमाने. तसेच जर आपण संस्कृत वर्णमाला पाहिली तर ती सर्वात वैज्ञनिकदृष्ट्या तयार झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल.
स्वर – अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः।
व्यंजन –
कंठ्य- क ख ग घ ङ ।
तालव्य- च छ ज झ ञ ।
मुर्ध्न्य- ट ठ ड ढ ण ।
दन्त्य- त थ द ध न ।
ओष्ठ्य- प फ ब भ म ।
मृदु व्यञ्जन – य र ल व श ष स ।
महास्फुट प्राण- ह क्ष ।
वरील वर्गीकरण जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की किती वैज्ञानिक भाषा आहे संस्कृत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वर वेगळे व्यंजन वेगळे इंग्रजी सारखं सर्व एकत्र नाही. परत व्यंजनातही अजून वर्गीकरण कंठातून येणारे व्यंजन कंठ्य, तालातून येणारे तालव्य, टाळू आणि जिभेच्या द्वारे मुर्ध्न्य आणि ओठाद्वारे ओष्ठ्य. त्यातही कंठ ते ओठ क्रम अगदी योग्य. परत पुढे जर पाहिले तर प्रत्येक वर्गातील १ व ३ व्यंजन अल्पप्राण (कमी श्वास लागणारे) आणि २ व ४ व्यंजन महाप्राण (जास्त श्वास लागणारे). प्रत्येक वर्गातील पाचवे व्यंजन म्हणजे अनुनासिक अर्थात नाकाचा वापर करून उच्चारावे लागते. त्यामुळेच संस्कृत भाषा ही संगणकासाठी सगळ्यात योग्य भाषा आहे असं वैज्ञानिकांच मत आहे.
संस्कृत भाषेची जादू बघायची झाल्यास आपण संस्कृतातील वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करून पाहू शकतो. त्यातील काही विशिष्ट उदाहरणे खाली देत आहे.
‘माघ’ नावाचे एक महाकवी भारतामध्ये होऊन गेले. त्यांनी त्यांच्या ‘शिशुपालवधम्’ ह्या महाकाव्यात केवळ ‘भ’ आणि ‘र’ ह्यांचा वापर करून एक श्लोक तयार केला आहे. तो असा –
भूरिभिर्भारिभिर्भीभीराभूभारैरभिरेभिरे।
भेरीरेभिभिरभ्राभैरूभीरूभिरिभैरिभा:।।
अर्थात – जमिनीला पण वजनदार वाटेल अशा, वाद्ययंत्राप्रमाणे आवाज काढणाऱ्या आणि मेघाप्रमाणे कृष्णवर्ण असणाऱ्या निर्भीड हत्तीने आपल्या शत्रू हत्तीवर हल्ला केला.
तसेच ‘किरातार्जुनीयम्’ ह्या काव्य संग्रहात महाकवी ‘भारवि’ ह्यांनी केवळ ‘न’ चा वापर करून श्लोक तयार केला आहे.
न नोननुन्नो नुन्नोनो नाना नाना नना ननु।
नुन्नोSनुन्नो ननुन्नेनो नानेना नन्नुनन्नुनुत्।।
अर्थात – जो मनुष्य युध्दात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून घायाळ होतो तो खरा मनुष्य नाहीये, जो आपल्यापेक्षा दुर्बलांना घायाळ करतो तो ही खरं मनुष्य नाही ये, ज्या मनुष्याचा स्वामी घायाळ नाही ये तो घायाळ नाही ये आणि घायाळ मनुष्याला घायाळ करणारा खरा मनुष्य नाही ये.
पुढे जर पाहायला गेलं तर महायमक अलंकरातील एक श्लोक आहे. ह्याचे चारही पद सारखे आहेत पण प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न आहे.
विकाशमीयुर्जगतीशमार्गणा
विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः।
विकाशमीयुर्जगतीशमार्गणा
विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः॥
अर्थात – अर्जुनाचे बाण सर्वत्र व्याप्त झाले आहेत. ज्यामुळे शंकरांचे बाण खंडित झाले आहेत. ह्याप्रकारे अर्जुनाचे रणकौशल पाहून दानवांचा पराभव करणारे शंकरांचे गण आश्चर्यचकित झाले आहेत. शंकर आणि तपस्वी अर्जुनाचे युद्ध पाहण्यासाठी शंकरांचे भक्त आकाशात आले आहेत.
हे वाचून तुम्हाला संस्कृत भाषेची किमया लक्षात आलीच असेल. तेंव्हा “भाषाणां जननी” असणाऱ्या संस्कृत भाषेचा प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा.

शेवटी माघ कवींनी केलेल्या कृष्णाच्या स्तुतीने थांबतो.
दाददो दुद्ददुद्दादी दाददो दूददीददोः।
दुद्दादं दददे दुद्दे दादाददददोऽददः॥
अर्थात – श्रीकृष्ण, प्रत्येकास वरदान देणारा, दुराचारी माणसाचा छळ करणारा‌ व त्यांना शुद्ध करणारा, जो आपल्या हातांनी दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या दुराचारी लोकांचा नाश करू शकतो. त्या कृष्णाने शत्रूवर आपले वेदनादायक बाण मारले.
धन्यवाद..!!
जयतु संस्कृतम्..!!

विश्वंभर मुळे (गोंदीकर)

संस्कृत भाषेतील शब्दांची साखळी

संधि या पद्धतीने दोन शब्दांना जोडून एक नवा शब्द करण्याची सोय संस्कृत भाषेत केली आहे हे या भाषेचे एक वैशिष्ट्य आहे. ही साखळी कशी लांबवत नेली आहे हे वरील उदाहरणात दिले आहे. आता गंगेच्या अनुशंगाने त्यात आणखी काही शब्दसुद्धा जोडता येणे शक्य आहे.

अद्भुत संस्कृत काव्ये राघवयादवीयम् आणि रामकृष्णकाव्यम्

१. राघवयादवीयम्

१७व्या शतकात होऊन गेलेल्या वेंकटाध्वरि या कवीने राघवयादवीयम् नावाची एक अद्भुत काव्यरचना केली आहे. त्यात तीसच श्लोक आहेत, पण ते सरळ वाचले की त्यातून रामाची गोष्ट निघते आणि उलट वाचले की श्रीकृष्णाची. या प्रकारच्या काव्याला अनुलोमविलोम काव्य म्हणता येईल. तीस सुलट आणि तीस उलट असे दोन्ही मिळून साठ श्लोक होतील. श्री वेंकटाध्वरि यांचा जन्म कांचीपुरमजवळ अरसनीपलै इथे झाला. त्यांनी लक्ष्मीसहस्रम् या ग्रंथासह १४ ग्रंथ लिहिले.

क्या ऐसा ग्रंथ किसी अन्य धर्म मैं है ?
इसे तो सात आश्चर्यों में से पहला आश्चर्य माना जाना चाहिए —

यह है दक्षिण भारत का एक ग्रन्थ। क्या ऐसा संभव है कि जब आप किताब को सीधा पढ़े तो रामायण की कथा पढ़ी जाए और जब उसी किताब में लिखे शब्दों को उल्टा करके पढ़े तो कृष्ण भागवत की कथा सुनाई दे।

जी हां, कांचीपुरम के 17वीं शदी के कवि वेंकटाध्वरि रचित ग्रन्थ “राघवयादवीयम्” ऐसा ही एक अद्भुत ग्रन्थ है।इस ग्रन्थ को ‘अनुलोम-विलोम काव्य’ भी कहा जाता है। पूरे ग्रन्थ में केवल 30 श्लोक हैं। इन श्लोकों को सीधे-सीधे पढ़ते जाएँ, तो रामकथा बनती है और विपरीत (उल्टा) क्रम में पढ़ने पर कृष्णकथा। इस प्रकार हैं तो केवल 30 श्लोक, लेकिन कृष्णकथा के भी 30 श्लोक जोड़ लिए जाएँ तो बनते हैं 60 श्लोक।

पुस्तक के नाम से भी यह प्रदर्शित होता है, राघव (राम) + यादव (कृष्ण) के चरित को बताने वाली गाथा है ~ “राघवयादवीयम्।” उदाहरण के तौर पर पुस्तक का पहला श्लोक है,

वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।
रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥ १॥

अर्थात
मैं उन भगवान श्रीराम के चरणों में प्रणाम करता हूं, जो
जिनके ह्रदय में सीताजी रहती है तथा जिन्होंने अपनी पत्नी सीता के लिए सहयाद्री की पहाड़ियों से होते हुए लंका जाकर रावण का वध किया तथा वनवास पूरा कर अयोध्या वापिस लौटे।

विलोमम्:-

सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः ।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥ १॥

अर्थातः-
मैं रूक्मिणी तथा गोपियों के पूज्य भगवान श्रीकृष्ण के
चरणों में प्रणाम करता हूं, जो सदा ही मां लक्ष्मी के साथ
विराजमान है तथा जिनकी शोभा समस्त जवाहरातों की शोभा हर लेती है।

इसकी रचना श्री वेंकटद्वारी ने की थी जिनका जन्म कांचीपुरम के निकट अरसनीपलै में हुआ था। वे वेदान्त देशिक के अनुयायी थे। वे काव्यशास्त्र के पण्डित थे। उन्होने १४ ग्रन्थों की रचना की जिनमें से ‘लक्ष्मीसहस्रम्’ सर्वाधिक महत्वपूर्ण है। कहते हैं कि इस ग्रन्थ की रचना पूर्ण होते ही उनकी दृष्टि वापस प्राप्त हो गयी थी।

सन्दर्भ
” राघवयादवीयम्” के ये 60 संस्कृत श्लोक इस प्रकार हैं:-

राघवयादवीयम् रामस्तोत्राणि

वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।
रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥ १॥

विलोमम् :
सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः ।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥ १॥

साकेताख्या ज्यायामासीद्याविप्रादीप्तार्याधारा ।
पूराजीतादेवाद्याविश्वासाग्र्यासावाशारावा ॥ २॥

विलोमम् :
वाराशावासाग्र्या साश्वाविद्यावादेताजीरापूः ।
राधार्यप्ता दीप्राविद्यासीमायाज्याख्याताकेसा ॥ २॥

कामभारस्स्थलसारश्रीसौधासौघनवापिका ।
सारसारवपीनासरागाकारसुभूरुभूः ॥ ३॥

विलोमम् :
भूरिभूसुरकागारासनापीवरसारसा ।
कापिवानघसौधासौ श्रीरसालस्थभामका ॥ ३॥

रामधामसमानेनमागोरोधनमासताम् ।
नामहामक्षररसं ताराभास्तु न वेद या ॥ ४॥

विलोमम् :
यादवेनस्तुभारातासंररक्षमहामनाः ।
तां समानधरोगोमाननेमासमधामराः ॥ ४॥

यन् गाधेयो योगी रागी वैताने सौम्ये सौख्येसौ ।
तं ख्यातं शीतं स्फीतं भीमानामाश्रीहाता त्रातम् ॥ ५॥

विलोमम् :
तं त्राताहाश्रीमानामाभीतं स्फीत्तं शीतं ख्यातं ।
सौख्ये सौम्येसौ नेता वै गीरागीयो योधेगायन् ॥ ५॥

मारमं सुकुमाराभं रसाजापनृताश्रितं ।
काविरामदलापागोसमावामतरानते ॥ ६॥

विलोमम् :
तेन रातमवामास गोपालादमराविका ।
तं श्रितानृपजासारंभ रामाकुसुमं रमा ॥ ६॥

रामनामा सदा खेदभावे दया-वानतापीनतेजारिपावनते ।
कादिमोदासहातास्वभासारसा-मेसुगोरेणुकागात्रजे भूरुमे ॥ ७॥

विलोमम् :
मेरुभूजेत्रगाकाणुरेगोसुमे-सारसा भास्वताहासदामोदिका ।
तेन वा पारिजातेन पीता नवायादवे भादखेदासमानामरा ॥ ७॥

सारसासमधाताक्षिभूम्नाधामसु सीतया ।
साध्वसाविहरेमेक्षेम्यरमासुरसारहा ॥ ८॥

विलोमम् :
हारसारसुमारम्यक्षेमेरेहविसाध्वसा ।
यातसीसुमधाम्नाभूक्षिताधामससारसा ॥ ८॥

सागसाभरतायेभमाभातामन्युमत्तया ।
सात्रमध्यमयातापेपोतायाधिगतारसा ॥ ९॥

विलोमम् :
सारतागधियातापोपेतायामध्यमत्रसा ।
यात्तमन्युमताभामा भयेतारभसागसा ॥ ९॥

तानवादपकोमाभारामेकाननदाससा ।
यालतावृद्धसेवाकाकैकेयीमहदाहह ॥ १०॥

विलोमम् :
हहदाहमयीकेकैकावासेद्ध्वृतालया ।
सासदाननकामेराभामाकोपदवानता ॥ १०॥

वरमानदसत्यासह्रीतपित्रादरादहो ।
भास्वरस्थिरधीरोपहारोरावनगाम्यसौ ॥ ११॥

विलोमम् :
सौम्यगानवरारोहापरोधीरस्स्थिरस्वभाः ।
होदरादत्रापितह्रीसत्यासदनमारवा ॥ ११॥

यानयानघधीतादा रसायास्तनयादवे ।
सागताहिवियाताह्रीसतापानकिलोनभा ॥ १२॥

विलोमम् :
भानलोकिनपातासह्रीतायाविहितागसा ।
वेदयानस्तयासारदाताधीघनयानया ॥ १२॥

रागिराधुतिगर्वादारदाहोमहसाहह ।
यानगातभरद्वाजमायासीदमगाहिनः ॥ १३॥

विलोमम् :
नोहिगामदसीयामाजद्वारभतगानया ।
हह साहमहोदारदार्वागतिधुरागिरा ॥ १३॥

यातुराजिदभाभारं द्यां वमारुतगन्धगम् ।
सोगमारपदं यक्षतुंगाभोनघयात्रया ॥ १४॥

विलोमम् :
यात्रयाघनभोगातुं क्षयदं परमागसः ।
गन्धगंतरुमावद्यं रंभाभादजिरा तु या ॥ १४॥

दण्डकां प्रदमोराजाल्याहतामयकारिहा ।
ससमानवतानेनोभोग्याभोनतदासन ॥ १५॥

विलोमम् :
नसदातनभोग्याभो नोनेतावनमास सः ।
हारिकायमताहल्याजारामोदप्रकाण्डदम् ॥ १५॥

सोरमारदनज्ञानोवेदेराकण्ठकुंभजम् ।
तं द्रुसारपटोनागानानादोषविराधहा ॥ १६॥

विलोमम् :
हाधराविषदोनानागानाटोपरसाद्रुतम् ।
जम्भकुण्ठकरादेवेनोज्ञानदरमारसः ॥ १६॥

सागमाकरपाताहाकंकेनावनतोहिसः ।
न समानर्दमारामालंकाराजस्वसा रतम् ॥ १७।।
विलोमम् :
तं रसास्वजराकालंमारामार्दनमासन ।
सहितोनवनाकेकं हातापारकमागसा ॥ १७॥

तां स गोरमदोश्रीदो विग्रामसदरोतत ।
वैरमासपलाहारा विनासा रविवंशके ॥ १८॥

विलोमम् :
केशवं विरसानाविराहालापसमारवैः ।
ततरोदसमग्राविदोश्रीदोमरगोसताम् ॥ १८॥

गोद्युगोमस्वमायोभूदश्रीगखरसेनया ।
सहसाहवधारोविकलोराजदरातिहा ॥ १९॥

विलोमम् :
हातिरादजरालोकविरोधावहसाहस ।
यानसेरखगश्रीद भूयोमास्वमगोद्युगः ॥ १९॥

हतपापचयेहेयो लंकेशोयमसारधीः ।
राजिराविरतेरापोहाहाहंग्रहमारघः ॥ २०॥

विलोमम् :
घोरमाहग्रहंहाहापोरातेरविराजिराः ।
धीरसामयशोकेलं यो हेये च पपात ह ॥ २०॥

ताटकेयलवादेनोहारीहारिगिरासमः ।

हासहायजनासीतानाप्तेनादमनाभुवि ॥ २१॥

विलोमम् :
विभुनामदनाप्तेनातासीनाजयहासहा ।
ससरागिरिहारीहानोदेवालयकेटता ॥ २१॥

भारमाकुदशाकेनाशराधीकुहकेनहा ।
चारुधीवनपालोक्या वैदेहीमहिताहृता ॥ २२॥

विलोमम् :
ताहृताहिमहीदेव्यैक्यालोपानवधीरुचा ।
हानकेहकुधीराशानाकेशादकुमारभाः ॥ २२॥

हारितोयदभोरामावियोगेनघवायुजः ।
तंरुमामहितोपेतामोदोसारज्ञरामयः ॥ २३॥

विलोमम् :
योमराज्ञरसादोमोतापेतोहिममारुतम् ।
जोयुवाघनगेयोविमाराभोदयतोरिहा ॥ २३॥

भानुभानुतभावामासदामोदपरोहतं ।
तंहतामरसाभक्षोतिराताकृतवासविम् ॥ २४॥

विलोमम् :
विंसवातकृतारातिक्षोभासारमताहतं ।
तं हरोपदमोदासमावाभातनुभानुभाः ॥ २४॥

हंसजारुद्धबलजापरोदारसुभाजिनि ।
राजिरावणरक्षोरविघातायरमारयम् ॥ २५॥

विलोमम् :
यं रमारयताघाविरक्षोरणवराजिरा ।
निजभासुरदारोपजालबद्धरुजासहम् ॥ २५॥

सागरातिगमाभातिनाकेशोसुरमासहः ।
तंसमारुतजंगोप्ताभादासाद्यगतोगजम् ॥ २६॥

विलोमम् :
जंगतोगद्यसादाभाप्तागोजंतरुमासतं ।
हस्समारसुशोकेनातिभामागतिरागसा ॥ २६॥

वीरवानरसेनस्य त्राताभादवता हि सः ।
तोयधावरिगोयादस्ययतोनवसेतुना ॥ २७॥

विलोमम्:
नातुसेवनतोयस्यदयागोरिवधायतः ।
सहितावदभातात्रास्यनसेरनवारवी ॥ २७॥

हारिसाहसलंकेनासुभेदीमहितोहिसः ।
चारुभूतनुजोरामोरमाराधयदार्तिहा ॥ २८॥

विलोमम् :
हार्तिदायधरामारमोराजोनुतभूरुचा ।
सहितोहिमदीभेसुनाकेलंसहसारिहा ॥ २८॥

नालिकेरसुभाकारागारासौसुरसापिका ।
रावणारिक्षमेरापूराभेजे हि ननामुना ॥ २९॥

विलोमम् :
नामुनानहिजेभेरापूरामेक्षरिणावरा ।
कापिसारसुसौरागाराकाभासुरकेलिना ॥ २९॥

साग्र्यतामरसागारामक्षामाघनभारगौः ॥
निजदेपरजित्यास श्रीरामे सुगराजभा ॥ ३०॥

विलोमम् :
भाजरागसुमेराश्रीसत्याजिरपदेजनि ।स
गौरभानघमाक्षामरागासारमताग्र्यसा ॥ ३०॥
॥ इति श्रीवेङ्कटाध्वरि कृतं श्री ।।
कृपया अपना थोड़ा सा कीमती वक्त निकाले और उपरोक्त श्लोको को गौर से अवलोकन करें की दुनिया में कहीं भी ऐसा नही पाया गया ग्रंथ है ।

शत् शत् प्रणाम 🙏 ऐसे रचनाकार को।

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः—

२.रामकृष्णकाव्यम्

वरील काव्याशिवाय आणखी काही कवींनी संस्कृतमध्ये अनुलोम विलोम काव्ये लिहिली आहेत. त्यातले एक आहे दैवज्ञ सूर्यकवी याने लिहिलेले ‘रामकृष्ण काव्यम्’. यातील पहिलाच श्लोक असा आहे-
तं भूसुतामुक्तिमुदारहासं वंदे यतो भव्यभवं दयाश्री:|
रामपक्षी अन्वयार्थ – सीतेची सुटका करणाऱ्या गंभीर हास्य असणाऱ्या, भव्य असा अवतार असणाऱ्या, व ज्याच्यापासून सर्वत्र दया व शोभा प्राप्त होतात अशाला (त्या रामचंद्राला) मी वंदन करतो
हीच ओळ उलट लिहित गेल्यास …
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतम्||.
कृष्णपक्षी अन्वयार्थ – भव्यप्रभा असणारा सूर्य व जलमय चंद्र यांचाही जो देव त्याला, संहार करणाऱ्या (पूतने)लाही मुक्ति देणाऱ्याला, आणि सृष्टीला प्राणभूत असणाऱ्या त्या यदुनंदनाला मी वंदन करतो.

दि.२१-०१-२०१९

अधिक माहिती

आपल्या मौल्यवान, समृद्ध परंपरेची ओळख, पुन्हा एकदा !
लहानपणी आपण उलटसुलट कसाही वाचला तरी तोच शब्द आणि त्याचा तोच अर्थ होणारे अनेक शब्द आणि वाक्ये वाचली आहेत. उदा. रबर,रामाला भाला मारा,चीमा काय कामाची इ … अनेक भारतीय भाषांमध्ये या प्रकाराला संस्कृतोद्भव “विलोमपद ” असा शब्द आहे तर इंग्रजीत PALINDROME व उर्दूत मस्तावी कल्ब (Mastawi Qalb ) म्हणतात. या प्रकारे कुणी संपूर्ण काव्यच केले असेल तर? तेही व्याकरणाचे अत्यंत कठीण नियम असलेल्या संस्कृत भाषेत ! ….
जगातील सर्वात जुन्या भाषांमध्ये संस्कृत भाषेचा समावेश होतो. वेद,पुराणे,वैद्यकशास्त्र,अर्थशास्त्र,संगीत, शृंगार,ज्योतिषविद्या,खगोलशास्त्र,रसायनशास्त्र,युद्धशास्त्र,नृत्य,गणित, बांधकाम,वास्तू अशा अगणित विषयांवर संस्कृतमध्ये प्रचंड ज्ञानभांडार उपलब्ध आहे.जर्मन कवी गटे हा शाकुंतल काव्य वाचून एवढा आनंदित झाला की तो ते काव्य चक्क डोक्यावर घेऊन नाचला होता. याच संस्कृत भाषेचे व्याकरणाचे किचकट आणि कडक नियम पाळूनही एक अत्यंत अद्भुत काव्य निर्माण केले गेले आहे. हा चमत्कार केवळ योगायोगाने घडलेला नसून त्यावेळी अनेक मंडळी असे वाड़मय लीलया निर्माण करीत असत असे वाटते. सुमारे ४५० वर्षांपूर्वी मराठवाड्यातील पार्थपूर (आज ते बहुधा अस्तित्वात नसावे) येथिल दैवज्ञ सूर्यकवी याने ‘रामकृष्ण काव्यम ‘ लिहिले आहे. हे काव्य अत्यंत अदभूत आणि कदाचित जगातील एकमेव काव्य असून त्याची प्रत्येक ओळ सरळ वाचली असता त्यात प्रभू रामचंद्रांबद्दल सांगितले असून अगदी तीच मूळ संस्कृत ओळ उलट क्रमाने वाचल्यास त्यात भगवान श्रीकृष्णाबद्दल काही वर्णन आहे. (सोबतचे चित्र पाहावे यापैकी दुसऱ्या चित्रात पहिल्या ओळीखाली लगेचच तीच ओळ उलट क्रमाने छापली आहे.).
यातील पहिलाच श्लोक असा आहे-
तं भूसुतामुक्तिमुदारहासं वंदे यतो भव्यभवं दयाश्री:|
रामपक्षी अन्वयार्थ – सीतेची सुटका करणाऱ्या गंभीर हास्य असणाऱ्या, भव्य असा अवतार असणाऱ्या, व ज्याच्यापासून सर्वत्र दया व शोभा प्राप्त होतात अशाला(त्या रामचंद्राला) मी वंदन करतो
हीच ओळ उलट लिहित गेल्यास …
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतम्||.
कृष्णपक्षी अन्वयार्थ – भव्यप्रभा असणारा सूर्य व जलमय चंद्र यांचाही जो देव त्याला, संहार करणाऱ्या (पूतने)लाही मुक्ति देणाऱ्याला, आणि, सृष्टीला प्राणभूत असणाऱ्या त्या यदुनंदनाला मी वंदन करतो.
या विलोमकाव्याबद्दल संस्कृतचे गाढे विद्वान श्री. भि. वेलणकर यांनी लिहिलेले पुस्तक ‘केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाने’ प्रसिद्ध केले आहे. त्यात श्री. वेलणकर यांनी इ.स. १५४२ मध्ये रचल्या गेलेल्या ‘रसिकरंजन ‘ या काव्याचा उल्लेख केला आहे. लक्ष्मणभट्ट पुत्र रामचंद्र याने रचलेल्या या काव्याची ओळ सरळ वाचली असता ती शृंगार वर्णन करणारी तर उलट वाचली असता त्याच अर्थ वैराग्यपूर्ण असा आहे. या दोन पूर्ण विरुद्ध गोष्टींचा एकाच ओळीत असा मिलाफ करणे दाद देण्यासारखे आहे.
या पुस्तकाच्या परिशिष्टात श्रीरामकवीविरचित श्रीरामकृष्ण विलोमकाव्याचे ५ श्लोकही दिले आहेत. शेवटी दिलेली पुष्पपात्र बंध काव्य,गोमूत्रिका बंध काव्य, कमलबंध काव्यही अशीच उत्सुकता वाढविणारी आहेत !
असे म्हणतात की तंजावर येथील जगातील सर्वात मोठ्या शिलालेखामध्ये अशा प्रकारे लेख आहे की तो सरळ वाचल्यास रामायण तर उलट वाचल्यास महाभारत आहे.
इतक्या अद्भुत काव्याबद्दल वाचावे तितके कमीच आहे.
मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.com

श्री.करंदीकर यांचे आभार मानून ….. दि.१५-०७-२०२०