बाह्यशिल्पे

मोठ्या इमारतींच्या छपरावर पडलेले पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पन्हळीमधले पाणी नळांद्वारे खाली जमीनीवर आणले जाते. पण जुन्या इमारतींमध्ये भिंतीवर बसवलेल्या गारगॉइल्समधून ते भिंतींपासून दूर खाली पडत असे. या गारगॉइल्सचा आकार एकाद्या विचित्र किंवा भयानक प्राण्याच्या किंवा मानवाच्या तोंडासारखा असायचा. आपल्या पुरातन मंदिरांच्या बाहेरच्या बाजूला किंवा कळसावर इतर अनेक देवता, यक्ष, किन्नर वगैरेंच्या मूर्ती बसवलेल्या असतात. त्या फक्त शोभेसाठी असतात. त्यांची पूजा केली जात नाही. अशी काही बाह्यशिल्पे एकत्र करून मी या चित्रात दाखवली आहेत.

External mini sculptures

gargoyle :
a grotesque carved human or animal face or figure projecting from the gutter of a building, typically acting as a spout to carry water clear of a wall.