हेलन केलरची गोष्ट

तीस चाळीस वर्षांपूर्वी मी ‘किमयागार’ नावाचे एक वेगळ्या प्रकारचे नाटक पाहिले होते. त्यात भक्ती बर्वे यांनी प्रमुख भूमिका केली होती. त्यातली लहानपणची हेलन कमालीची दंगेखोर होती. तिला दिसतही नव्हते आणि ऐकायलाही येत नव्हते. तिला अक्षर, शब्द, वाक्य हे काहीच समजत नव्हते, भाषा ही संकल्पनाच माहीत नव्हती तर ती व्यक्त कशी होणार? ती चित्रविचित्र किंचाळ्या मारायची आणि सतत हातपाय झाडत रहायची. जो कोणी तिच्याजवळपास येईल त्याला किंवा तिला त्याचा जबर तडाखा मिळत असे. तिला कसे सांभाळायचे हेच तिच्या आईवडिलांना समजत नव्हते. अशा मुलीला शिकवायला एनी किंवा अने अशा एकाद्या नावाची एक तरुण शिक्षिका येऊन रहाते. ती तरी या मुलीला काय शिकवणार? असे विचारल्यावर ती सांगते “भाषा आणि फक्त भाषा”. प्रत्येक वस्तूला एक नाव असते हेच हेलनला कळायला खूप वेळ लागला. अने तिच्या हातात एक वस्तू देत असे आणि बोटाने तिच्या हातावर त्या वस्तूचे नाव लिहित असे. असे पुन्हा पुन्हा केल्यानंतर एक दिवस हेलनला वॉटर हा शब्द आणि पाणी यांचा संबंध समजला. हेलनला अत्यंत तल्लख बुद्धी असल्यामुळे ती भराभर शब्द शिकत गेली. ऐकायला येत नसले तरीही तोंडाने त्यांचे उच्चार करणेही शिकली. एक दिवस तिने आईला “मम्मा” असी हाक मारली. हे सगळे नाटककार वि.वा.शिरवाडकरांनी अत्यंत खुबीने रंगवले होते. हे नाटक मार्क ट्वेन यांच्या एका इंग्रजी पुस्तकावर आधारलेले होते. त्यांनी ते उलगडून सांगितले असेलच. पुढे जाऊन हेलन केलर जगप्रसिद्ध झाली आणि जगभर फिरून आली. माझे मित्र आणि सहकारी श्री.शरद पांडुरंग काळे यांनी लिहिलेली या हेलन केलरची गोष्ट त्यांचे आभार मानून इथे देत आहे. . . . . . आनंद घारे

हेलन केलर १९२०

हेलन केलरची गोष्ट

लेखक : श्री. शरद पांडुरंग काळे
निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र

शाळेत असतांना आठवीच्या पुस्तकात हेलन केलर नावाचा धडा, मराठीच्या “मंगल वाचन” या क्रमिक पुस्तकात होता. त्या आंधळ्या आणि बहिऱ्या मुलीची कथा अविस्मरणीय अशीच होती. वयाच्या एकोणिसाव्या महिन्यात या छोट्या बालिकेला कोणत्यातरी अज्ञात रोगाने ग्रासले होते. कदाचित तो मेंदूचा आजार मेनिंजायटीस असावा. त्यामुळे तिची दृष्टी गेली आणि ती बहिरी देखील झाली. हेलन केलर यांच्या शब्दात, त्यांचे आयुष्य धुक्याने गच्च भरलेल्या समुद्रावर जसे वाटेल, तसे गेले. आठवते तेंव्हापासून डोळे आणि कान, ही पंचेंद्रियांपैकी दोन इंद्रिये कायमची निकामी झालेली असतांना, ही मुलगी तिचे जीवन कसे जगली असेल? या विचारानेच जीव कासावीस होतो. उतारवयात बहिरेपणा आल्यावर असहाय्य झालेल्या वृद्धांचे जीवन केविलवाणे असते. इथे तर जन्मजात म्हणावे असे बहिरेपण आणि आंधळेपण तिच्या वाट्याला आले होते.

२७ जून १८८८ रोजी हेलनचा जन्म केलर कुटुंबात, अमेरिकेतील अलाबामा राज्यातील टुसुकांबा या शहरवजा खेड्यात झाला होता. टुसुकांबा गावातील आयव्ही ग्रीन नावाचे केलर कुटुंबाचे पारंपरिक घर आता संग्रहालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. तिचे वडील आर्थर हेनले केलर हे त्या गावातील एका वृत्तपत्राचे संपादक होते. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धानंतर स्वतंत्र अमेरिकेविरुद्ध, गुलामगिरी कायम राहावी यासाठी सात राज्ये एकत्र आली होती. त्या राज्यांच्या बाजूने लढणाऱ्या सैन्यात कॅप्टन म्हणून हेलनच्या वडिलांनी काही वर्षे आपली सेवा दिली होती. सन १८६५ मध्ये युद्ध जिंकल्यावर अमेरिकन संसदेने या सैन्यावर कायमची बंदी घातली. हेलन केलरचे पूर्वज स्वित्झर्लंडचे रहिवासी होते. त्यांच्यापैकी एक जण बहिऱ्या मुलांसाठी असलेल्या शाळेत शिक्षक होते! हेलनने आपल्या आत्मचरित्रात ह्या योगायोगाचा आवर्जून उल्लेख केला आहे.

अतिशय लहान वयात हे अपंगपण आल्यामुळे हेलन लढायला शिकली. तिने वयाच्या सातव्या वर्षापर्यंत कुटुंबतील सदस्यांशी “मन की बात” सांगण्यासाठी साठ संकेत विकसित केले होते! पदरवावरून कोणता सदस्य आसपास आहे, हे ती सांगू शकत होती. सन १८८६ मध्ये हेलनच्या आईच्या वाचनात चार्ल्स डिकन या प्रसिद्ध अमेरिकन लेखकाचे “अमेरिकन नोटस” हे स्फूर्तिदायक लिखाण आले. त्यात त्यांनी लॉरा ब्रिजमन नावाच्या अंध आणि बहिऱ्या स्त्रीची कहाणी सांगितली होती. त्यामुळे तिच्या आईने हेलनला तिच्या वडिलांबरोबर बाल्टिमोर येथील नाक, कान, घसा व नेत्रतज्ञ डॉ. ज्युलियन चिस्लो यांच्याकडे पाठविले. त्या डॉक्टरांनी तिच्यावर काही उपचार करून अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्याकडे पाठविले. ग्रॅहम बेल त्यावेळी बहिऱ्या मुलांसोबत काम करीत होते. बेल यांनी हेलन आणि तिच्या वडिलांशी चर्चा झाल्यावर, त्यांना अंधांसाठी स्थापन झालेल्या बोस्टन येथील पर्किन्स संस्थेत पाठविले. याच संस्थेत लॉरा ब्रिजमन यांचे शिक्षण झाले होते. त्या संस्थेचे निर्देशक त्यावेळी मायकेल अनाग्नोस हे होते. त्यांनी त्यांच्या संस्थेतून शिक्षण झालेल्या वीस वर्षीय अने सलिव्हन या युवतीवर हेलनची जबाबदारी सोपविली. ही युवती पुढील ५० वर्षे हेलन बरोबर आया आणि आई होऊन राहिली!

३ मार्च १८८७ रोजी अने सलिव्हन हेलन केलरच्या अलाबामा येथील घरी राहावयास गेली. तिने लगेचच कामाला सुरुवात केली. त्यावेळी हेलन सहा वर्षांची होती. अने सलिव्हनने हेलनला, बोटांवर शब्दांचे स्पेलिंग शिकवायला सुरुवात केली. पहिला शब्द तिने डॉल निवडला! सहा वर्षाच्या बालिकेला खरतर बाहुला बाहुली मध्ये किती मजा वाटत असते! पण हेलनने बाहुली कधी पाहिलीच नव्हती. अनेने हेलन साठी बाहुली भेट म्हणून आणली होती. हेलन बाहुली किंवा डॉल शिकतांना उत्सुक होती. पण ते अवघड वाटले असेल म्हणून, किंवा त्यात स्वारस्य वाटले नसेल म्हणून, तिने शिकण्यासाठी असहकार पुकारला. अनेच्या लक्षात आले की, हेलनला शब्द आणि वस्तू यातील परस्परसंबंध समजत नसल्यामुळे, तिला ते शिक्षण नीरस वाटत होते!

अनेने आपली चिकाटी सोडली नाही. पण हेलनने देखील न शिकण्यासाठी उच्छाद मांडला. अनेने हेलनच्या आई वडिलांना सांगून त्यांच्यासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था करवून घेतली. केलरचे वडिलोपार्जित घर प्रचंड मोठे असल्यामुळे, त्यासाठी अडचण भासली नाही. अने बरोबर लढाई सुरू असतांना, हेलनला एका सुंदर क्षणी वॉटर म्हणजे पाणी समजले. अनेने बाथरूम हेलनला नेऊन तिथे थंड पाण्याचा नळ तिच्या हातावर सोडला, आणि दुसऱ्या हातावर बोटाने w a t e r असे लिहीले! एकीकडे एका हातावर पाणी पडत असतांना, अनेने तिच्या दुसऱ्या हातावर लिहिलेले स्पेलिंग हेलनला समजले! हेलनने आपल्या हाताने अनेच्या हातावर पुन्हा बोटाने w a t e r असे लिहून दाखविले! त्या क्षणाबद्दल तिला काय वाटले हे हेलनने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. हेलन म्हणते “त्या सुवर्णक्षणी माझ्या आत्म्याचा जन्म झाला!” बिचारीला आपल्या भावना व्यक्त सुद्धा करता येत नव्हत्या. पण त्या क्षणी झालेला आनंद तिने मनाच्या कप्प्यात साठवून ठेवला होता. त्या दिवशी अने कडून ती ३० शब्द शिकली, आणि त्या शब्दांचा व त्या वस्तूंचा परस्परांशी असलेला संबंध तिला समजला.

सन १९०५ मध्ये अने सलिव्हनने हार्वर्ड विद्यापीठातील जॉन मेसी नावाच्या एका तरुणाशी लग्न केले. काही वर्षे अने आणि जॉन दोघेही हेलन कडे पूर्ण वेळ लक्ष देत होते. पण नंतर जॉन आणि अने मध्ये दुरावा निर्माण झाला, व दोघे ही वेगळे राहू लागले! त्या दोघांनी घटस्फोट मात्र घेतला नव्हता. अनेची हेलन वर कमालीची निष्ठा होती. अने मुळेच हेलन घडत होती. त्या बहिऱ्या आणि अंध दगडातून एक सुंदर शिल्प कोरले जात होते. अने हे काम पूर्ण श्रद्धेने करीत होती. सन १८९० मध्ये हेलनने बोस्टन येथील बधिर मुलांसाठी असलेल्या हॉरेस मान पाठशाळेत बोलण्याचे धडे घ्यायला सुरुवात केली. जवळजवळ २५ वर्षे झगडल्यानंतर तिला, दुसऱ्याला समजेल असे, बोलता येऊ लागले!

तिच्यासाठी जीवनातील प्रत्येक क्षण संघर्ष होता! सर्व सुविधा उपलब्ध असूनही न शिकणाऱ्या मुलांसाठी हेलनचा आदर्श फार मोठा आहे. अशा विद्यार्थ्यांना आपल्याला ते उदाहरण सातत्याने द्यायला हवे. सन १८९४ ते १८९६ दरम्यान तिने न्यूयॉर्क मधील बधिरांसाठी असलेल्या राईट ह्युमसन शाळेत जाऊन सांकेतिक स्वरूपात संवाद साधण्याचे धडे घेतले. इतर विषय देखील त्या शाळेत ती शिकली. सन १८९६ मध्ये तिने तरुण मुलींसाठी असलेल्या केम्ब्रिज शाळेत काही महिने व्यतीत केले. तिच्या संघर्षाच्या गोष्टी आता लोकांना थोड्या फार प्रमाणात समजू लागल्या होत्या.

मार्क ट्वेन या प्रसिद्ध लेखकाने तिची मुद्दाम भेट घेतली. तिने आपल्या बुद्धिमतेची त्यांच्यावर चांगलीच छाप पाडली होती. त्यांनी तिची ओळख आपला मित्र हेनरी रॉजर्स बरोबर करून दिली होती. हे रॉजर्स महोदय तेल कंपनीत उच्च पदावर काम करीत होते. तिच्या बुद्धिमतेची आणि जिद्दीची चांगलीच छाप त्यांच्यावर देखील पडली. हेलनला रॅडक्लिफ महाविद्यालयात दाखल करवून त्यांनी तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला. अने अर्थातच सावली सारखी हेलन बरोबर असायची. वर्गात तिच्याबरोबर बसून प्रत्येक लेक्चर ती हेलनला समजावून सांगायची! ब्रेल, ओष्ठ स्पर्श भाषा, टायपिंग आणि बोटांवर स्पेलिंग अशा अनेक संवाद शैली हेलनने आत्मसात केल्या होत्या. वयाच्या २४ व्या वर्षी सन १९०४ मध्ये या महाविद्यालयातून हेलन पदवी परीक्षा उत्तीर्ण झाली! सन १९०५ मध्ये हेलनने अने आणि जॉन मेसी यांच्या मदतीने द स्टोरी ऑफ माय लाईफ हे पहिले पुस्तक लिहून प्रसिद्ध केले! अंध आणि बहिरेपणा आयुष्यभराच्या सोबतीला असतांनाही, हतबल न होता, हेलनने ज्या हिंमतीने येथपर्यंत मजल मारली होती, ती अतिशय कौतुकास्पद होती. अने आणि जॉन या दोघांनी तिला चांगली साथ दिली होती हे खरे असले तरी, मनाची उमेद राखण्याची तिची जिद्द खरोखरच जगावेगळी म्हंटली पाहिजे. त्या नंतर पुढे त्यांनी १२ पुस्तके लिहिली होती.

विसाव्या शतकातील पहिली ५० वर्षे हेलन केलरने अनेक सामाजिक आणि राजकीय विषय हाताळले. संततीनियमन, स्त्रियांच्या वेदना, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांचे हक्क ह्या विषयांवर त्यांनी भरपूर काम केले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर त्यांनी विविध समस्यांना तोंड देणाऱ्या लोकांचे जीवन कसे सुधारता येईल, याकडे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी अमेरिकेत आणि बाह्य जगतात देखील पोहोचत होती. आपले अनुभव विविध ठिकाणी त्या सांगू लागल्या. शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या रुग्णाच्या व्यथा त्यांनी अमेरिकन काँग्रेस समोर मांडायला सुरुवात केली त्यांच्यासाठी काय करायला हवे, ह्यावर विचार करून, त्यांची मांडणी उत्तमप्रकारे त्यांनी वेळोवेळी केली. त्यामुळे अमेरिकेत शारीरिक अपंगांसाठी सुविधा निर्माण होऊ लागल्या. हेलन केलर यांची ही मानवतेसाठी फार मोठी देणगी होती.

सन १९१५ मध्ये त्यांनी शहर विकासक जॉर्ज केसलर यांच्या सोबत हेलन केलर आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानची स्थापना केली. अंधपणाची कारणे आणि परिणाम, पोषण मूल्यांची कमतरता यावर अभ्यास करण्यासाठी या प्रतिष्ठानमध्ये अग्रक्रम देण्यात आला होता. सन १९२१ मध्ये अमेरिकन फेडरेशन फॉर ब्लाइन्डस या संस्थेची स्थापना झाली आणि हेलन केलर यांच्या प्रयत्नांना आकार येऊ लागला. सन १९२४ मध्ये त्या या संस्थेच्या सदस्य झाल्या. जनतेत अंध, मूक आणि बधिर लोकांच्या प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. सन १९४६ मध्ये त्यांची नेमणूक अमेरिकन फाऊंडेशन ऑफ ओव्हरसीज ब्लाइंड या संस्थेच्या कौन्सिलर म्हणून झाली. सन १९४६ ते १९५७ दरम्यान त्यांनी जगभरातील ३५ देशांमध्ये प्रवास करून अंधांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. सन १९५५ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि खडतर अशी ६४००० किलोमीटरची आशिया खंडाची सफर पाच महिन्यात पूर्ण केली. त्यांच्या या सफरीमुळे आशियात एक नवचैतन्य सळसळू लागले होते. एक अंध आणि बधिर बाई ७५ व्या वर्षी हे प्रयत्न करीत आहे, हे दृश्यच देवदुर्लभ होते!

त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले. सन १९३६ मध्ये अमेरिकेतील प्रतिष्ठेचे समजले जाणारे थिओडर रुझवेल्ट विशिष्ट सेवा पदक देण्यात आले होते. सन १९६४ मध्ये अध्यक्षीय स्वातंत्र्य पदक देण्यात आले होते. सन १९६५ मध्ये त्यांची निवड वुमेन्स हॉल ऑफ फेम मध्ये झाली होती. त्यांना जगातील विविध नामवंत विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली होती. त्यात दिल्ली विद्यापीठाच्या डॉक्टरेटचा देखील समावेश होता.
हेलन केलर यांचे निधन १ जून १९६८ रोजी झोपेतच झाले. एका संघर्षमय जीवनाचा लौकिक दृष्ट्या अंत झाला होता, पण अंध असूनही अतिशय डोळसपणे जगलेले त्यांचे अलौकिक जीवन मात्र जगाच्या इतिहासात अजरामर झालेले आहे.
……/////////……./////////……. शरद काळे
1 Comment
Anand Ghare
अभ्यासपूर्ण लेख. हेलन केअर तर अद्वितीय होतीच, एका अंध आणि मुक्याबहिऱ्या मुलीशी संवाद कसा करायचा हे एक खूप मोठे आव्हान पेलणाऱ्या अनेचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तिच्या गोष्टीवर एक सुंदर मराठी नाटक आले होते त्यात भक्ती बर्वेची प्रमुख भूमिका होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर – १

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्य मला मिळालेल्या लेखांचे संकलन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील लेखांच्या संग्रहाचा दुसरा भाग : https://anandghare.wordpress.com/2021/05/28/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-2/

विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन (२६ फेब्रुवारी,१९६६)

प्रायोपवेशन करून तात्यारावांनी देह त्यागला. त्या संदर्भात मी इंटरनेटवर शोधाशोध सुरु केली आणि मला सुभाष नाईक हे नाव दिसले .(स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनाच्या स्मृतीनिमित्तानें) त्यानी लिहिलेला एक लघुलेख वाचायला मिळाला..तेवढ्यासाठी मी मा.सुभाष नाईक याना फोन केला,त्यांच्याशी बराच वेळ बोललो. त्यांचा लेख नावानिशी, अपलोड करू का ? म्हणून परवानगी मागितली,त्यांनी त्याला मान्यता दिली त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार .त्यांचा लेख देत आहे.

मृत्यु आणि स्वा. सावरकर : स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनाच्या स्मृतीनिमित्तानें

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेला होता.

‘की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास निसर्गमाने
जे दिव्यदाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे

यावरून त्यांचे सुस्पष्ट विचार आपल्याला कळतात. त्यांच्या जीवनातल्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या आपल्या ‘हे स्वतंत्रते’ या स्फूर्तिप्रद कवितेत त्यांनी म्हटलेलें आहे – ‘तुजसाठि मरण तें जनन , तुजवीण जनन तें मरण’. देशाच्या स्वातंत्र्याचा एवढा ध्यास की त्यावरून निज-जीवन ओवाळुन टाकावें, अशी त्यांची वृत्ती व कृती होती.

लंडनमध्ये मदनलाल धिंग्राने इंग्रज ऑफिसर कर्झन वायली ( Curzon Wyllie) याचा जो वध केला, त्यामागे प्रेरणा सावरकरांचीच होती. तसेंच, त्यानी इंग्लंडमधून भारतात सशस्त्र लढ्यासाठी शस्त्रही धाडली होती. हे सारे मृत्यूशी संबंधित खेळ’च .नंतर, अटकेत पडल्यावर, फ्रान्सच्या मार्सेलीस बंदरात जहाजातून ते पळून गेले, तेव्हां त्यांच्यावर जर गोळीबार झाला असता, तर त्यात मृत्यु पावण्याची शक्यता होतीच, आणि सावरकरांनी पलायनापूर्वी ती नक्कीच विचारात घेतली असणार.

अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा इतकी कडक होती, की तें जीवन असह्य होऊन कांहीं कैद्यांनी आत्महत्याही केली . त्या काळाबद्दल सावरकरांनी स्वत:च लिहून ठेवलें आहे की, त्या काळात, विशेष करून जेव्हां त्यांची प्रकृती प्रचंड खालावलेली होती, त्यावेळीं त्यांना स्वत:ला, या मार्गाचा अवलंब आपणही करावा असें वाटलें होतें. ध्यानात घ्या, सर्व परिस्थिती प्रतिकूल असतांना, एकट्यानें तिला तोंड देतांना, (No support-system) , अशा या ग्रासलेल्या नकारात्मक मन:स्थितीतून बाहेर येणें किती कठीण असेल ! त्याची कल्पनाही करणें कठीण आहे. पण, त्यातूनही सावरकर निग्रहानें सावरले, मृत्यूचें दार न ठोठावतांच त्याच्या संभाव्य मिठीतून बाहेर पडले. खरं सांगायचं तर, त्या वेळी अंदमानातील क्रातिकारकांना मृत्यु म्हणजे ‘साल्व्हेशन’च ( मुक्ती ) वाटत होतें. पण हा ‘निगेटिव्ह’ विचार झाला. त्या salvation च्या , मुक्तीच्या, आकर्षणापासून बाहेर येणें सोपें नव्हे. पण सावकरांनी दुर्दम्य इच्छाशक्तीनें तें साधलें. कारण, आपण जीवित राहून देशासाठी योगदान देऊं शकूं ही त्यांची खात्री . देशासाठी मृत्यूशी जवळीक बाळगणें हा एक संबंध झाला ; आणि नकारात्मकरीत्या त्याला भेटणें, म्हणजे कर्तव्यच्युत होणें, हा अगदी वेगळा संबंध झाला. तसल्या संबंधाला सावरकर बळी पडले नाहींत. मृत्यूची भीती त्यांनी conquer केलेली होती, तिला पूर्णपणें कह्यात आणलें होतें.

अगदी देशाच्या स्वातंत्र्यानंतरही, आपल्याच सरकारनें त्यांना महात्मा गांधीच्या खुनाच्या खटल्यात गोवलें , तेव्हां त्या महापुरुषाला काय वाटलें असेल ? ‘ याचसाठी केला सारा अट्टाहास ?’ असा प्रश्न नक्कीच त्यांच्या मनात आला असेल. जी माणसें दोषी ठरलीं, त्यापैकी दोघांना मृत्युदंड झाला , हें आपल्याला माहीतच आहे. ज़रा कल्पना करा, दोषी नसतांनाही जर सावरकरांना दोषी ठरविलें गेलें असतें, तर काय भयंकर प्रकार झाला असता !! कल्पनेनेही अंगावर शहारे येतात ! अनेकानेक महापुरुषांना , त्यांचा दोष नसतांनाही मृत्यू स्वीकारावा लागला आहे. येशू ख्रिस्त हें एक उदाहरण. पण येशू मृत्यूला घाबरला नाहीं . गांधी खून खटल्यात तर नथूराम व आपटेही घाबरले नाहींत, (टीप – ध्यानीं घ्या, इथें त्यांच्या कृत्याचें ग्लोरिफिकेशन करण्याचा यत्किंचितही हेतू नाही; आपण केवळ मृत्यूवर चर्चा करत आहोत ), तिथें सावरकरांसारखा नरसिंह घाबरणें शक्यच नव्हतें. निग्रहानें त्यांनी स्वत:चा बचाव कोर्टात केला , सत्य त्यांच्या बाजूनें होते, व ते सुटले , पण मृत्यूच्या दाराचें पुन्हां एकवार दर्शन घेऊनच !

१९४५ सालीं स्वातंत्र्यवीरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सांगलीला मृत्युशय्येवर होते. तेही क्रांतिकारक होते, त्यांनीही अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेली होती. त्यांना लिहिलेल्या पत्रात स्वातंत्र्यवीर म्हणतात की आपल्याला तर लहानपणापासूनच मृत्यूची सोबत आहे. आतां शांतपणें त्याला सामोरें जावें. यावरून त्यांचा मृत्यूविषयींचा दृष्टिकोन आपल्याला कळतो.

कांहीं काळ आधी, याच विषयावर स्वातंत्र्यवीर काय म्हणाले, हें पाहणेंही उपयुक्त ठरेल. त्या वेळीं वा. वि. जोशी यांनी, ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी बद्दल चर्चा करून, ‘ज्ञानदेवांनी आत्महत्या केली’ असा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर, ‘ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीला आत्मार्पण म्हणावें की आत्महत्या ?’ असा प्रश्न उपस्थित करून स्वातंत्र्यवीरांनी समर्पक विष्लेषण केलें होतें – ” जें जीवनांत संपायचें होतें तें संपलेलें आहे , आतां कर्तव्य असें उरलेलें नाहीं , अशा कृतकृत्य भावनेनें ‘पूर्णकाम’ झालेले धन्य पुरुष आपण होऊन प्राण विसर्जित करतात. तें कृत्य ‘उत्तान अर्थीं बळानें जीव देणें ’ असूनही, त्याला आत्मसमर्पण म्हणून जें गौरविलें जातें, तें यथार्थ असतें.” यातून सावरकरांचें मृत्युविषयक तत्वज्ञान दिसून येतें.

हिंदूंमधील ‘प्रायोपवेशन’ तसेंच जैनांमधील ‘संथारा’ या प्रकारच्या मृत्युभेटीला सन्मान मिळतो , तें आदराला पात्र ठरतें . ( टीप- इथें धर्माचा उल्लेख हा केवळ वर उल्लेखलेल्या प्रथांबद्दल आहे प्रस्तुत लेखाचा धर्माशी प्रत्यक्षा प्रत्यक्ष कांहीं संबंध नाहीं ). त्या आदराचें कारण सावरकारांच्या वरील विवेचनातून स्पष्ट होतें.

जेव्हां स्वातंत्र्यासाठी क्रांतीलढा सुरूं केला तेव्हां , ‘आपल्याला भारत स्वतंत्र झाल्याचें पहायला मिळेल’ अशी सावरकरांना अजिबात कल्पना नव्हती. देश स्वतंत्र झाल्यावर तसें त्यांनी स्वत: म्हटलेलेंही आहे. नंतरही, स्वत:च्या अधिक्षेपाचा विचार त्यांनी दूर ठेवला ; देश स्वतंत्र होण्याचें त्यांना समाधान होतें , आणि त्यामुळे त्यांना कृतकृत्य वाटलें असल्यास त्यात नवल नाहीं. गांधी खुनाचें किटाळ दूर झाल्यावर, सावरकरांनी स्वत:च्या गतकाळाविषयीं लेखन करून आपल्या सर्वासाठी अमूल्य ठेवा ठेवला. मृत्यूच्या दोन एक वर्षें आधी त्यांनी ‘भारताच्या इतिहासाची सहा सोनेरी पानें’ हा विचारप्रवर्तक ग्रंथ लिहिला .

हें सर्व साध्य झाल्यानंतर, जीवनसाफल्य प्राप्त झालें असें वाटून, त्यांनी प्रायोपवेशन करण्यांचे ठरविले. मंडळी, विचार करा, आपणां सार्‍यांना भूक-तहान काटणें, थोड्या वेळानंतर कठीण होऊन जातें. एक वेळ माणूस अन्नावाचून कांहीं काळ काढूं शकेल ; परंतु पाणी हें तर जीवन आहे, त्याच्यावाचून रहाणें किती कष्टप्रद ! तिथें दिवसेन् दिवस अन्नपाण्यावाचून काढणें यासाठी किती जबरदस्त मनोनिग्रह लागत असेल , याची कल्पनासुद्धां करणें कठीण आहे. प्रायोपवेशनानें सावरकरांनी स्व-देहाचें ‘विसर्जन’ केलें. पण मृत्यूला कसें सामोरें जावें, याचा एक महान वस्तुपाठ ते आपल्यासाठी ठेवून गेले.अशा वेळीं समर्थ रामदासांच्या वचनाची आठवण येते – ‘महाथोर ते मृत्युपंथेंचि गेले ; कितीएक ते जन्मले आणि मेले’. मरणें आणि ‘मृत्युपंथानें जाणें’ यांतील भेद, जो रामदासांनी संगितला आहे, तो सावरकरांच्या कृतीतून आपल्यापुढे एक आदर्श म्हणून नेहमीच उभा राहील.–

सुभाष स. नाईक मुंबई.

मराठी बद्दल ते कायमच आग्रही असायचे,म्हणून आंग्ल भाषेतील शब्दांना मराठीमधे प्रतिशब्द दिले व ते आपण रोज वापरतो. थोडे शब्द उदाहरण म्हणून देतो.
महापौर, दूरध्वनी, दिग्दर्शन, प्राचार्य, संचलन, पटकथा, मुख्याध्यापक, स्थानक, ध्वनिमुद्रण, शस्त्रसंधी, वार्ताहर ,संपादक इत्यादी.
अंतकाळ जवळ आल्यावर त्यांच्या जवळच्या माणसाने नर्सला बोलवा म्हटल्यावर त्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या ओठी शब्द आले, अरे परिचारिकेला बोलवा असे म्हणता येत नाही का?

नेहमी लिखाणाचा शेवट करताना त्या संबंधी एक गाणे देत असतो आज त्या बद्दल विचार करताना अनादी मी अनंत मी हे गाणे अनिवार्यच होते.
मार्सेलिस येथे मोरिया बोटीतून मारलेल्या त्या सुप्रसिद्ध आणि त्रिखंडात गाजलेल्या उडीनंतर त्यांना परत ताब्यात घेतले जाते. आता नानाविध प्रकारे छळ होणार हे नक्की म्हणून त्याला धीरोदत्तपणे तोंड देता यावे म्हणून रचलेली धैर्यदायी कवच मंत्र रचना (सन १९१०) त्यांनी लिहिली,
“अनादी मी अनंत मी “
https://youtu.be/FRDKzNqZVNE

वीर सावरकरांना विनम्र अभिवादन आणि शत शत प्रणाम.

प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०

संदर्भ : इंटरनेट, श्री.सुभाष नाईक, आठवणीतली गाणी, यु ट्युब, विकिपीडिया.

******************

मावळत्या दिनकरा..!

२६ फेब्रुवारी १९६६, होय याच दिवशी सायंकाळी हिंदूस्थानात एक नाही तर दोन सुर्य अस्ताला गेलेत. एक नेहमीचा नैसर्गिक नितीनियमांप्रमाणे पृथ्वीवरील सर्व जीवमात्रांना प्रकाश देऊन कर्मफळाची अपेक्षा न करता मावळला, तर दुसरा आपले क्षात्रतेज निर्माण करुन, मिळालेला मनुष्यजन्म पतित पावन करुन, अखंड हिंदूराष्ट्र निर्मितीचा ज्वालामुखी अखंड तेवत ठेवत प्रायोपवेशनाने मावळला. त्या धगधगत्या ज्वालामुखीचे नांव होते स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर..!
सुर्याची ऊबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनेही शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता, या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे विनायक दामोदर सावरकर..! स्वातंत्र्यवीर सावरकर ही व्यक्ती नाही तर ते अखंड तेवत राहणारे विचारांचे विद्यापीठ आहे.
मातृभूमीच्या रक्षणार्थ, मातृभाषेच्या जिवीतार्थ, स्पृष्य अस्पृशांच्या व जातीभेदाच्या सीमा मिटवून अखंड हिंदवी राष्ट्र निर्मीतीसाठी आपले तन, मन, धन, संसार, मोह, माया पणाला लावणारा एकमेवाद्वितीय हिंदू ह्रदयसम्राट..!
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अवघ्या विश्र्वातील असे एकमेव स्वातंत्र्ययोद्धा होते ज्यांना एकाच आयुष्यात दोन दोन जन्मठेपेची शिक्षा झाली. सदर शिक्षा भोगून आल्यावर देखील हा महान योद्धा आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ पुन्हा राष्ट्र जीवनात सक्रिय झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अवघ्या विश्वातील असे पहिले लेखक आहेत की, ज्यांच्या ‘१८५७ चा भारताचा स्वातंत्र समर’ या पुस्तकावर दोन दोन देशांनी प्रकाशनापूर्व बंदी घातली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे प्रथम स्नातक होते, ज्यांची पदवी, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे, ब्रिटिश सरकारने, हिसकावून घेतली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे प्रथम भारतीय विद्यार्थी होते ज्यांनी मातृभुमीच्या प्रेमाखातर, तात्कालिन ग्रेट ब्रिटनच्या राजा प्रती निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार दिल्याने परिणामस्वरूप त्यांना शिक्षण घेऊनही, ‘बॅरीस्टर’ हि पदवी मिळाली नाही तसेच वकीली करता आली नाही.
स्वातंत्रवीर सावरकर असे प्रथम भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते, ज्यांनी सर्वप्रथम पुण्यात विदेशी वस्त्रांची होळी केली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तिरंगा झेंड्याचे मधोमध धर्म चक्र लावण्याबद्दल सल्ला दिला होता. तात्कालिन राष्ट्रापती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा सल्ला मान्य केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यपुर्व काळातील ब्रिटीश साम्राज्याशी लढा देणारे असे पहिले राजकीय बंदिवान होते, ज्यांचे प्रकरण हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे पहिले क्रांतिकारी होते ज्यांनी हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल चिंतन केले आणि बंदी जीवन समाप्त होताच अस्पृश्यता आणि इतर कुप्रथांविरुद्धच्या सामाजिक कार्यात वाहून घेतले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अवघ्या विश्वातील असे पहिले कवी होते कि, ज्यांनी अंदमानच्या एकांत कारागृहात भीतींवर खीळा आणि कोळशाने मातृभूमीवर विविध कविता लिहून मुखोद्वत केल्या. अशा प्रकारे मुखोद्वत केलेल्या सुमारे दहा हजारांहून जास्त ओळी त्यांनी जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका झाल्यावर पुन्हा लिहून काढल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे वर्णनपर जी सुप्रसिद्ध काव्य लिहिले आहे त्यातही हिंदू राष्ट्राची प्रखर संकल्पना मांडली आहे.

हे हिंदूशक्ती संभूत दीप्तितम तेजा
हे हिंदू तपस्यापुत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा..!

कवी मन असलेले भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदूत्वाबद्दल ‘ हिंदू मेरा परीचय’ हि जी सुप्रसिद्ध कविता लिहिलेली आहे ती वाचत असतांना डोळ्यासमोर एकच तेजोमय प्रतिमा उभी राहते,‌ आणि ती प्रतिमा स्वातंत्रवीर सावरकरां व्यतिरीक्त अन्य असूच शकत नाही.

मेरा परीचय..!
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!
मै शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार–क्षार।
डमरू की वह प्रलय ध्वनि हूँ, जिसमे नचता भीषण संहार।
रणचंडी की अतृप्त प्यास, मै दुर्गा का उन्मत्त हास।
मै यम की प्रलयंकर पुकार, जलते मरघट का धुँआधार।
फिर अंतरतम की ज्वाला से जगती मे आग लगा दूँ मैं।
यदि धधक उठे जल, थल, अंबर, जड चेतन तो कैसा विस्मय..?
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

मै अखिल विश्व का गुरु महान्, देता विद्या का अमरदान।
मैने दिखलाया मुक्तिमार्ग, मैने सिखलाया ब्रह्मज्ञान।
मेरे वेदों का ज्ञान अमर, मेरे वेदों की ज्योति प्रखर।
मानव के मन का अंधकार, क्या कभी सामने सका ठहर..?
मेरा स्वर्णभ मे घहर–घहर, सागर के जल मे छहर–छहर।
इस कोने से उस कोने तक, कर सकता जगती सोराभ्मय।
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

मैने छाती का लहू पिला, पाले विदेश के क्षुधित लाल।
मुझको मानव में भेद नही, मेरा अन्तस्थल वर विशाल।
जग से ठुकराए लोगों को लो मेरे घर का खुला द्वार।
अपना सब कुछ हूँ लुटा चुका, फिर भी अक्षय है धनागार।
मेरा हीरा पाकर ज्योतित परकीयों का वह राजमुकुट।
यदि इन चरणों पर झुक जाए कल वह किरीट तो क्या विस्मय..?
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

होकर स्वतन्त्र मैने कब चाहा है कर लूँ सब को गुलाम..?
मैने तो सदा सिखाया है करना अपने मन को गुलाम।
गोपाल राम के नामों पर कब मैने अत्याचार किया?
कब दुनिया को हिन्दू करने घर–घर मे नरसंहार किया..?
कोई बतलाए काबुल मे जाकर कितनी मस्जिद तोडी..?
भूभाग नहीं, शत–शत मानव के हृदय जीतने का निश्चय।
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..‌!

मै एक बिन्दु परिपूर्ण सिन्धु है यह मेरा हिन्दु समाज।
मेरा इसका संबन्ध अमर, मैं व्यक्ति और यह है समाज।
इससे मैने पाया तन मन, इससे मैने पाया जीवन।
मेरा तो बस कर्तव्य यही, कर दू सब कुछ इसके अर्पण।
मै तो समाज की थाति हूँ, मै तो समाज का हूं सेवक।
मै तो समष्टि के लिए व्यष्टि का कर सकता बलिदान अभय।
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं..? त्यावर सावरकर म्हणाले, “ We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं.

लंडनमधलं इंडीया हाऊस हे स्वातंत्र्यवीर कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घेतलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून – ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढत होता.

हे सर्व क्रांतिकार्य देशाबाहेरून चाललं होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणा-यांत सिंहाचा वाटा असलेल्या मॅझेनीचं आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची सावरकरांच्या भाषेतली प्रस्तावना एवढी तेजस्वी आणि प्रेरणादायी होती, की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि तिच्यावर बंदी आणली. अर्थातच ती जास्त प्रसिध्द झाली. सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. याचवेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उदध्वस्त होण्याची वेळ आली.

घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते. कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे खरं तर आजही मोठ्या गौरवाने गावं असं हे मातृभूमीला हूंकारलेले, सागराशी हितगुज करणाऱ्या संकल्पनेचे हे अजरामर काव्यगीत..! आपण अनेकदा ऐकलं अन पुटपुटलं देखील आहे. या काव्याच्या प्रत्येक शब्दांतून मातृभूमीच्या आदरार्थ जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकतांना वाचले पाहिजेत अन वाचतांना ऐकले देखील पाहिजेत..!

स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनला बॅरीस्टरच्या शिक्षणासाठी गेले असतांना, त्यांचा मुलगा प्रभाकर याच्या अकस्मात मृत्यूची बातमी त्यांना समजते. त्यातच ब्रिटीशां सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला सुरु केला. त्यामुळे त्यांना लंडन मध्ये कधीही अटक होण्याची शक्यता होती. या दरम्यान ते सहज साईट सिइंगला लंडन जवळच असलेल्या ब्रायटन नावाच्या एका गावाजवळील समुद्र किनारी गेले होते. भारत भुमीच्या स्वातंत्र्याबद्दल आत्मचिंतन करत‌ असतांना, एकदम त्यानां हे गीत स्फुरलं..!

सदर प्रसंगाची पुर्वपीठीका अशी होती की, ब्रिटनमध्ये भारतीय क्रांतीवीर मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत.

त्या सागरावर रागावलेला, रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.’ भूमातेच्या चरणतला तुज धूता । मी नित्य पाहिला होता. त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास, मित्र मित्राला म्हणतो तसा, की चल जरा फिरायला जाऊ दुस-या देशात..!
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ । सृष्टीची विविधता पाहू
त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
जननी-ह्रद विरहशंकितहि झाले । परि तुवां वचन तिज दिधले.
पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन. जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन। त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी । मी जगदनुभव-योगे बनुनी ।
मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी
पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला l सागरा प्राण तळमळला ।।१।।
लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी । ही फसगत झाली तैशी
पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती । दशदिशा तमोमय होती
तमोमय म्हणजे अंधःकारमय मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे । की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता. प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंचा
राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे बहु जिवलग गमते चित्ता । रे तुज सरित्पते, जी सरिता । रे
हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत. माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।
यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात,
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा ?
माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी । मज विवासना ते देशी
विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे अबला न माझिही माता । रे
माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला
आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.
मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय.
स्वातंत्र्यपुर्व काळात, ब्रिटीश साम्राज्याला सतत आव्हान देऊन सळो की पळो करणाऱ्या या भारतमातेच्या सुपुत्राला स्वतंत्र भारतात मात्र पुन्हा एकांतवासच मिळाला.
स्वातंत्र्योत्तर काळातील कथीत मवाळ गटाच्या नेत्यांशी झालेल्या वैचारिक मतभेदांमुळे या भारतमातेचा सुपुत्राला एकाकी जीवन जगावे लागले. एवढेच नाही तर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा खटला पण त्यांचेवर भरण्यात आला. ऐतिहासिक लाल किल्ल्यात चाललेल्या या खटल्याची सुनावणी झाली अन त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. पण तात्कालीन स्वतंत्र्य भारताच्या सरकारने गांधी हत्येबाबत खटल्याचा न्यायालयीन निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा श्री. जीवन लाल कपुर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करून स्वातंत्र्यवीर सावरकर या निष्काम कर्मयोग्यास पुन्हा एकदा व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला व इतिहासात या स्वातंत्र्यवीरास खलनायक ठरवण्याचा वेळोवेळी प्रयत्न सुरू ठेवला. हा चौकशी आयोग दिनांक २१ नोव्हेंबर १९६६ रोजी आस्तीत्वात आला ( स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजीच प्रायोपवेशनाद्वारे आपला देह निसर्गाच्या स्वाधीन केला होता). त्यानंतर दिनांक ३० नोव्हेंबर १९६९ रोजी या चौकशी आयोगाने आपला चौकशी अहवाल शासनास सादर केला.स्वातंत्र्यवीर सावरकर या जगात राहिलेले नसतांना देखील, या चौकशी आयोगाने आपल्या अहवालात सावरकरावर संशयास्पद ठपका ठेऊन, या महान नरवीरास स्वातंत्र भारताच्या इतिहासात एक प्रकारे व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही असे वाटते.

तरूणपीढीने स्वातंत्रवीर सावरकरांच्या चैतन्यमयी विचारांचे, लिखाणाचे वाचन करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आज रोजी सायंकाळी पश्चिमेला प्रखर तेजोमय झालेला सुर्य हा मावळतांना त्याचा लालबूंद रंग हा प्रखरतेची साक्ष देत होता.
क्षितिजावरचा सुवर्ण पिसारा आवरून ढळणाऱ्या अशा या तेजोमय सुर्याकडे लक्ष द्यायला कोणासा वेळ नव्हताच अन खंतही..!
अस्ताला जाणाऱ्या भास्कराकडे पाहता पाहताच मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीची जाणीव करणाऱ्या असंख्य आठवणी मनांत डोकावू लागल्या. नकळत जेष्ठ कवी कै. भा.रा तांबे यांची एक कविता ओठावर आली.
मावळत्या दिनकरा अर्घ्य तूज जोडोनी दोन्ही करा !
जो तो वंदन करी ऊगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या !
रीत जगाची ही रे सवित्या, स्वार्थपरायणपरा !
जेष्ठ कवीवर्य भा.रा. तांबे यांच्या संवेदनशिल मनात काय विचार असेल या कवितेद्वारे सुर्याशी संवाद साधतांना..?
एखाद्याच्या हातात पद अथवा सत्ता असतांना त्याचा उदोउदो करणारी मंडळीच त्याची सत्ता गेल्यानंतर मात्र त्या व्यक्तीकडे ढुंकूनही पहायला तयार होत नाही.
नेहमी आपल्या अवती भवतीच असलेल्या स्वार्थी जगाचा कटू अनुभव अस्ताला जाणाऱ्या सुर्याकडे पाहून शब्दात मांडण्याचा प्रयत्न या महान अवलीयाने लीलया केलेला आहे.
उपकाराची कुणा आठवण..? ‘शितें तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंड पुजेपण, धरी पाठीवर शरा,
मावळत्या दिनकरा ..!

मोठ्या उद्दीग्न मनाने कवीने या कडव्यामधून खोटारड्या जगाची रीत सांगीतली आहे. तोंडपुजे लोक अवती भवती असतात, पण तुमची पाठ फिरली की तेच लोक निंदेचे शर किंवा वाग्बाण पाठीवर मारणार. प्रेमाचे, स्नेहाचे ढोंग करणारी स्वार्थी माणसे कवीला दिसतात.

असक्त परी तू केलीस वणवण, दिलेस जीवन, हे नारायण,
मनी तू धरीले सानथोरपण, समदर्शी तू खरा..! मावळत्या दिनकरा..

स्वत: अपार कष्ट करून, अवघे आयुष्य पणाला लाऊन समाजासाठी चंदनासारखे झिजलेल्या अनेक महान व्यक्तींचे स्मरण या ओळीतून कवीने चाणाक्षतेने करून दिले आहे.
या कवितेने मावळतीला झुकलेला दिनकरही क्षणभर थांबला अन काव्य प्रतिभेचे अलौकीक तेज लाभलेल्या कवी भास्कराला (भा.रा.तांबे) त्याने वंदन केले..!
मावळत्या दिनकरा..! कदाचित हा मावळता दिनकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मा असल्याचा मला भास होत होता. होय हा सिद्धहस्त स्वातंत्र्यवीर, लेखक, कवी, समाजसेवक, नेता, आजही अश्वत्थाम्यासारखा फिरत असेल अन स्वतंत्र्य भारताच्या आजच्या परीस्थितीकडे पाहून मनातच पुटपुटत असेल, हेची फळ मम तपाला…!
आजच्या तरुण पिढीने याबाबत अंतर्मुख होऊन विचार करणे अभिप्रेत आहे.
थांबतो इथेच. जय सावरकर..!
विचारमंथन..!

राजेश पुराणिक.

अंत्ययात्रा

तात्यांचे प्राणोत्क्रमण झाल्याची दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी साडेबारा वाजता वृत्त प्रसृत केले. वृत्त ऐकताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांतसंघचालक कै. काशीनाथपंत लिमये आणि आचार्य अत्रे आले. त्यांनी तात्यांच्या खोलीत जाऊन अंत्यदर्शन घेतले. आता अंत्ययात्रा काढण्यासाठी प्राथमिक सिद्धता करण्याचे दायित्व सर्वच कार्यकर्त्यांवर-विशेषतः हिंदूसभेच्या कार्यकर्त्यांवर पडले. त्यांनी यात्रेसाठी एक लष्करी गाडा शव वाहून नेण्याकरता मिळवण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिका-यांना तशी विनंती करण्यात आली. परंतु ती नाकारण्यात आली. ही वार्ता आचार्य अत्रे यांना समजल्यावर त्यांनी, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना विनंती केली की, शासनाकडून आपली मागणी पुरी होत नसल्याने व्ही. शांताराम यांनी त्यांच्या चित्रनगरीतून तोफा व बंदुका घेऊन बसलेले सैनिकांचे चित्रफलक लावलेला ट्रक सिद्ध करून द्यावा. त्यांच्या या विनंतीला मान देऊन व्ही. शांतारामांनी अवघ्या वीस-एक तासांत लष्करी गाड्याप्रमाणे एक ट्रक सिद्ध करून धाडला. अंत्ययात्रा सावरकर सदनपासून निघून गिरगावातल्या चंदनवाडी विद्युत्वाहिनीत जाणार होती. म्हणजे तब्बल ६-७ मैलांचे अंतर होते. तरीही सहस्रावधी स्त्री-पुरुष आरंभापासून यात्रेत सामील झाले होते. त्या यात्रेची व्यवस्था आचार्य अत्रेही पाहत असल्याने ते प्रथमपासून उपस्थित होते. त्याआधी दर्शनासाठी शासनाच्या वतीने मंत्री मधुसूदन वैराळे, व्ही. शांताराम व संध्या, लता मंगेशकर आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती येऊन आपली श्रद्धांजली वाहून गेल्या होत्या. शासनाच्या वतीने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा दुखवट्याचा संदेश माझ्या नावे सर्वप्रथम सचिवालयातून आला. मात्र त्या दिवशी मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री शासकीय दौ-यावर मुंबईबाहेर गेले होते. यात्रेतील जनता ‘सावरकर अमर रहे’, ‘सावरकरांच्या राजकारणाचा विजय असो’, ‘हिंदू धर्म की जय’, ‘हिंदू राष्ट्र की जय’ आदी घोषणा देत होते. एका गाडीत ‘नंदादीप समिती’ च्या कार्यकर्त्या सावरकरांची पदे गात होत्या, तर दुसच्या गाडीत भजनी मंडळाच्या स्त्रिया भजने म्हणत मिरवणुकीच्या अग्रभागी जात होत्या. वाटेत ठिकठिकाणी कमानी, फुलांच्या परड्या रस्त्यांवर उभारल्या होत्या आणि तात्यांचे शव ठेवलेला लष्करी गाडा जसा पुढे जात असे तशी त्यावर परड्यांतून पुष्पवृष्टी केली जात होती. यात्रा जेव्हा आर्थर रोड तुरुंगापाशी आली, त्या वेळी एक आगळे दृश्य दिसले. तुरुंगाच्या बाहेरच्या मुख्य दारावर पहारा करणारे पोलीस शवगाडा समोर येताच त्यांचा फिरता पहारा थांबवून खांद्यावरच्या बंदुका खाली उलट्या धरून दक्ष स्थितीत नतमस्तक होऊन उभे राहिले होते, तर त्या चार भिंतीच्या मागे असलेल्या चाळीच्या वरच्या मजल्यावरून जमलेल्या कैद्यांनी स्वयंस्फूर्तीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे’, ‘स्वा. सावरकर की जय’ अशा घोषणा देऊन श्रद्धांजली वाहिली. वरील हृदयस्पर्शी दृश्य शव-गाड्यावरून मला स्पष्ट दिसत होते. पार्थिव देहाची मिरवणूक बॉब सेन्ट्रल रेल्वे स्टेशनपाशी आली. त्या वेळी संघाच्या गणवेषधारी स्वयंसेवकांनी तात्यांना सैनिकी पद्धतीने मानवंदना दिली. मिरवणूक जेव्हा भडकमकर मागनि जाऊ लागली तशी घराघरातून लोक येऊन मिरवणुकीत सामील होत होते. पुढे गिरगाव रस्त्यावरून शवयात्रा चंदनभूमीकडे सरकू लागली त्या वेळी रस्ता शोकाकूल जनतेच्या अलोट गर्दनि व्यापून गेला होता. घराघराच्या गच्च्या माणसांनी भरून गेल्या होत्या. त्या वेळची आठवण झाली की, पुढे साप्ताहिक ‘मार्मिक’ च्या व्यंगचित्राखाली जी ओळ प्रसिद्धली होती त्याचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. तात्यांच्या ‘सागरा, प्राण तळमळला’ ह्या काव्यपंक्तीप्रमाणे रचलेली ती ओळ म्हणजे ‘प्राणा, (जन) सागर तळमळला!!’ शेवटी अंत्ययात्रा चंदनवाडीत पोचली. त्या वेळी भाषण करताना आचार्य अत्रे यांनी निदर्शनास आणले की, स्वा. सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताला श्रद्धांजली वाहण्यास महाराष्ट्र शासनाचा एकही मंत्री उपस्थित असू नये, ही शरमेची गोष्ट आहे. त्या वेळी समाजातूनही ‘शेम’ ‘शेम’ च्या आरोळ्या उठल्या. नंतर अनेक मान्यवर वक्त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यावर सुधीर फडके यांनी ‘श्रीराम, जयराम जय जय राम! चा गजर सुरू केला, आणि तो चालू असताना तात्यांच्या अचेतन शरीराला विद्युत्दाहिनीत अग्नी दिला गेला.

या क्रांतीसूर्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…

संदर्भ- आठवणी अंगाराच्या, पृष्ठ- २६-२८, विश्वास सावरकर

©सावरकरी_विचाररत्ने फेसबुक पेज


आज २६ फेब्रूवारी २०२१ पंचावन्न वर्षापूर्वीचा तो दिवस अजूनही मला चांगलाच आठवतो. सावरकर सदन मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रायोपवेशन चालले होते. १ फेब्रुवारी १९६६ पासून त्यांनी अन्नपाणी, औषधे यांचा त्याग केला होता. आणि आत्मार्पण करण्याचे योजले. त्या आधी ” आत्महत्या आणि आत्मार्पण ” हा लेख लिहून त्यांनी दोन्हीमधला फरक विषद करून सांगितला होता. एखादी व्यक्ती आपले सर्व इप्सित साध्य करते, आता इच्छा म्हणून काहीच उरत नाहीं, तेव्हा केवळ भुईला भार म्हणून न राहता आपले जीवन तृप्तपणे संपवणे म्हणजे आत्मार्पण हे त्यांनी सूचित केले होते. आणि त्याप्रमाणे शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी, ते स्वतःही मृत्यूला सामोरे गेले. त्या दिवशी दादर येथील त्यांच्या घरातून निघालेली प्रचंड अंत्ययात्रा रात्री चंदनवाडीच्या स्मशानभूमीत पोचली. चित्रपती व्ही. शांताराम यांनी स्वतः तोफा ठेवलेली शृंगारलेली गाडी दिली होती त्यावर हिंदुमहासभेच्या भगव्या ध्वजांत गुंडाळलेले त्यांचे पार्थिव एखाद्या सिंहा प्रमाणे जाणवत होते. ते उघड्या डोळ्यांनी गेले होते. अंत्ययात्रेच्या आरंभी आचार्य अत्रे, व्ही. शांताराम , मुंबईचे महापौर, सोपानदेव चौधरी, सुधीर फडके आदी सावरकर भक्त होते. लाखो लोकांचा महासागर चंदनवाडीच्या स्मशानभूमीकडे वळला होता. त्यामध्ये तरुण होते वयस्क होते, पुरुष -स्त्रिया शाळकरी विद्यार्थी असे सर्वच भावनाशील होऊन सामील झाले होते. नव्हते फक्त काॅंग्रेसवाले. खुद्द राज्याचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई हे स्वतः सावरकर भक्त होते. त्यांना स्वातंत्र्यवीरांच्या अंत्ययात्रेत सामील व्हायचे होते, पण सरकारने त्यांनाही मनाई केली होती.

स्मशानभूमीत अत्र्यांनी भाषणात सांगितले,” येथे लाखो लोक जमलेले आहेत पण या महाराष्ट्र सरकारचा एकही मंत्री हजर नाही त्याचा मी धिक्कार करतो. स्वातंत्र्यवीर तात्या आज आपणातून गेले.तात्यांनी जन्मभर मृत्यूशी झुंज दिली. अनंत मरणे मारून ते शेवटपर्यंत जगले. आणि मृत्यूशी झगडता झगडता आज निघून गेले. आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे अप्रिय काम आपल्यावर येऊन पडले आहे. स्वातंत्र्यवीर केवळ स्वातंत्र्यवीर नव्हते. वाङ्मयीन, सामाजीक अशा प्रत्येक क्षेत्रात ते अग्रेसर होते. आज वास्तविक राष्ट्रपतींनी तात्यारावांना ” भारतरत्न ” पदवी द्यावयास हवी होती ! आज महाराष्ट्र सरकारचा कोणीही मंत्री हजर नाही याला काय म्हणावे? तात्या महान क्रांतिकारकच नाहीत , महान साधू आहेत ! त्यांनी प्रायोपवेशन केले ! आत्मार्पण केले ! कुमारील भट्टाने अग्निकाष्टे भक्षण केली. शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. ज्ञानेश्वरांनी – एकनाथांनी समाधी घेतली. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. तसे आमचे तात्या ! त्यांनी आत्मार्पण केले. प्रायोपवेशन केले ! तात्यांसारखा माणूस पुन्हा होणे नाही. यानंतर सुधीर फडके यांनी “ आम्ही जातो आमुच्या गांवा “ हा तुकोबांचा अभंग गात सर्व जमावाला त्यात सामील करून घेतले व थोड्याच अवकाशात तात्याराव अनंतात विलीन झाले.

आणि दुसऱ्या दिवसापासून आचार्य अत्रेंनी ‘दैनिक मराठा ‘ मधून रोज तात्यारावांच्या जीवनाचे एकेक पैलू उलगडणारे चौदा अमर लेख लिहिले. स्वातंत्र्यवीरांची क्रांतिकारी गाथा आणि आचार्य अत्र्यांची सिद्धहस्त लेखणी यांच्या संगमाचा हा एक मनोमिलाप होता. सावरकरांच्या हाल अपेष्टा आणि यमयातना त्यांच्या लेखांतून वाचताना आपले रक्त उसळू लागते. काळजात हजारो सुया टोचल्या जातात. आपल मेंदू जणू उखळात घालून ठेचत आहे असे जाणवते. आणि त्या सावरकर नामक क्रांतीकारकांच्या मुगुटमणीप्रती आपण नतमस्तक होतो. केवळ त्या पवित्र पायावर साक्षात दंडवत घालावेत, हीच एक भावना मनांत शिल्लक रहाते. ते सर्व मृत्युलेख वाचून मी इतका भारावून गेलो की ते सर्व लेख माझ्या हस्ताक्षरात लिहून
त्याचे “मृत्युन्जय ” हा ग्रंथ हस्तलिखीत ग्रंथ तयार करून मी आचार्य अत्रे याना अर्पण केला. एखाद्या छापील पुस्वतकांप्ररमाणे मी त्याची रचना केली होती. आ. अत्र्यांनी दैनिक मराठा मध्ये माझ्यावर लिहून माझे कौतुक केले होते.आचार्य अत्र्यांच्या त्या अग्रलेखांचे पुस्तक कधी निघाले नाही. कदाचित त्यांच्या कुटुंबीयाकडेही हे लेख नसावेत. मात्र आजही ते सर्व अग्रलेख माझ्या संग्रहात आहेत. एकेक अग्रलेख वाचताना आजही अत्र्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचा वास किती प्रभावी होता, याची जाणीव या भाषाप्रभूंची लेखणी आणि वाणी वाचता ऐकताना होते.खुद्द आचार्य अत्र्यांनीच म्हटले होते ‘ भाषा प्रभू म्हणवणारे आम्ही, पण आज आम्हांलाही शब्द वाकवताना कसरत करावी लागते आहे. इतके ते दुःखाने उन्मळून गेले होते. त्यांनी लिहीलेल्या त्या अमर अग्रलेखामधील पहीलाच अग्रलेख मी माझ्या मित्रांच्या अवलोकनार्थ आज स्वातंत्र्यवीरांच्या चोपन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त वाचनासाठी देत आहे. क्रांतीकारकांच्या मुकुटमणीला कोटी कोटी प्रणाम.

— प्रा. मं. गो. राजाध्यक्ष.

१. तात्या गेले !

          अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की ,

               की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
               लब्ध प्रकाश इतिहास - निसर्ग माने,
               जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे,
               बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे !

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला , त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, ” देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !” वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची pज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला ‘ अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की , ‘ १० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. ! ‘ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते.

अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून ‘ मोरिया ‘ बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच ‘ भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी ‘ असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ” आझाद हिंद “चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे ‘ पाया ‘ आणि सुभाषचंद्र हे ‘ कळस ‘ आहेत ! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें , पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. काँग्रेसच्या राज्यांत सावरकरांना काहीं किंमत राहिली नाही. उलट गांधीजींचे खुनी म्हणून त्यांना पकडून त्यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण त्या अग्निदिव्यातून ते सहीसलामत सुटले.

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत ‘ हे कृष्ण, हे श्याम ‘ असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली.
तुकोबा ‘ आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा ! ‘ असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून
कांहीच उरले नाही.

               धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
               कर्तव्यं मे न विद्यते किंचीत
               धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
               प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम
  आचार्य अत्रे.
  दैनिक मराठा : दिनांक २७ मार्च १९६६.

*************

सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले शब्द

शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

सर्व लेख वॉ ट्सअॅपवरून साभार दि.२६-०२-२०२१

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म आमच्या जमखंडी गावात झाला, पण त्या मानाने मी लहानपणी त्यांच्याविषयी फारच कमी ऐकले होते. मोठेपणीसुद्धा इतर समाजसेवकांच्या मानाने त्याच्यासंबंधी फारच कमी लिहिलेले माझ्या वाचनात आले. एका अर्थी ते उपेक्षितच राहिले असे वाटते. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्याने त्यांची ओळख करून देणारा एक संक्षिप्त लेख मला मिळाला. विकीपीडियावरून मिळालेली माहिती त्यात मिळवून मी खाली दिली आहे.

**********

डीप्रेस्डक्लास मिशन संस्थेचे संस्थापक , अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठविणारे कै.विठ्ठल रामजी शिंदे यांचे आज पुण्यस्मरण .विठ्ठल रामजी शिंद्यांचा जन्म एप्रिल २३, इ.स. १८७३ रोजी वर्तमान कर्नाटक राज्यातील जमखिंडी संस्थानातील मराठी कुटूंबात झाला. त्यांच्या बालमनावर कुटुंबातील उदारमतांचा प्रभाव पडला. १८८८ मध्ये पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून ते बी. ए झाले मुंबई येथे जाऊन त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.
ते प्रार्थना समाजात दाखल झाले, न्या रानडे ,भांडारकर के.बि रानडे यांचेही ते संपर्कात आले. प्रार्थना समाजाने त्यांना इंग्लंडला पाठविले . १९०६ साली त्यांनी Depressed Classes Mission ची स्थापना केली. ग्रामीण महाराष्ट्रा मध्ये आज जो शिक्षणाचा प्रसार झाला आहे त्यामध्ये त्यावेळच्या म. ज्योतिबा फुले यांचेसह विठ्ठल रामजी शिंदे यांचेही नाव घ्यावेच लागेल.
शिंदे यांनी महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळींत उच्चनैतिक भूमिकेवरून भाग घेतला. मुंबई कायदे-कौन्सिलच्या १९२० च्या निवडणुकीत पुण्यातून मराठयांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहत्यांची विनंती त्यांनी अव्हेरली; कारण त्यांना जातीय तत्त्व मान्य नव्हते. उलट मागासलेला जो बहुजनसमाज, त्याचा कैवार घेणारा बहुजनपक्ष स्थापन करून त्याच्यावतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली. या पक्षाने शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व स्त्रीवर्ग यांच्या हितसंबंधांसाठी झटण्याचा निर्धार प्रकट केला. या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही. महात्मा गांधी-प्रणीत १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे, या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था १९०७ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. १९११ साली मुंबईत एक ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ भरविली. १९१८ च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठी त्यांनी चळवळ केली. पुणे येथे १९२८ साली भरलेल्या ‘मुंबई इलाखा शेतकरी परिषदे’चे नेतृत्व शिंदे यांनी केले. अखेर सरकारला सारावाढ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली. १९२६ ते १९३२ या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसांत एकी करावी, कामगारांसमवेत एकजूट करावी तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन केले.
अस्पृश्यवर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबधी १९०५ मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मर मध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला. ‘बहिष्कृत भारत’ (१९०८), ‘अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास’ (१९२२), ‘ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग’ (१९२७) हे लेख व ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (१९३३) हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे या विषयावरील प्रमुख लेखन होय.
अभिवादन

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकाच्या फलकावरून साभार

. . . . . . . . . . . . . .


विकीपीडियावरील माहिती.
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87

विठ्ठल रामजी शिंदे (जन्म : जमखिंडी, २३ एप्रिल १८७३; मृत्यू : २ जानेवारी १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात.

मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले. आपला समाज रूढी व परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांडे आहेत. त्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांना मान्यता देऊन त्या तत्त्वांचा प्रसार लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाचे कार्य करत असताना त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये दौरा करून एकेश्वरी धर्मपरिषद आयोजित केलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

जीवन
शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘’डिप्रेस्ड क्लास मिशन’’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली. या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती : अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणॆ, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे, इत्यादी. या संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या शाखा अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या.

लेखन
शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडांत रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी ‘ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर’ नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून ‘ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर’ या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.

वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसऱ्या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे ३७५ पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.

आत्मचरित्र
‘माझ्या आठवणी व अनुभव’ नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगत. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत.

प्रवासवर्णने
इंग्लंडमधील रोजनिशीत त्यांनी प्रथम त्यांच्या बोटीवरील प्रवासाबद्दल लिहिले आहे. तौलनिक धर्माचे अध्ययन करण्यासाठी ते ऑक्सफर्डला आले होते. ते पॅरिसला गेले व तेथील इमारतींचे कलासौंदर्य पाहून याबाबत फ्रेंचांची ग्रीकांशीच तुलना होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्य व सुधारणा यांचा मिलाफ या राष्ट्रांत झाला आहे, असे त्यांस वाटले.

ब्राह्मो समाजास शंभर वर्षे झाली, त्यानिमित्ताने शिंदे यांनी पश्चिम बंगालची सफर केली. तेव्हा ते ब्राह्मो उपासना केंद्रे चालवणाऱ्या रवींद्रनाथांना भेटले. ‘रवींद्रनाथांचा आवाज अलगुजासारखा कोमल व हृदयप्रवेशी होता. आणि त्या उपासनेत त्यांनी लोकाग्रहाखातर छोटे सुंदर पदही म्हटले, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यानंतर शिंदे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या शहरांत व गावांत ब्राह्मो धर्मावर भाषणे दिली.

शेतकरी चळवळ
वि.रा. शिंदे यांनी इ.स. १९२० ते २६ या काळात शेतकरी चळवळ उभी केली. पण सरकारने तुकडे बंदीचे बिल मागे घेताच चळ‍वळीत वाद सुरू झाले, आणि चळवळ थांबली.

मेरी क्यूरी स्तोत्रएक वैज्ञानिक, मराठी भाषातज्ज्ञ आणि शीघ्रकवी असलेले माझे जुने सहकारी आणि मित्र श्री.नरेंद्र गोळे यांनी लिहिलेले मादाम मेरी क्यूरी यांचे स्तोत्र त्यांच्या चर्यापुस्तकाच्या भिंतीवरून साभार घेऊन इथे संग्रहित केले आहे. संस्कृत श्लोक आणि लोकप्रिय हिंदी गाणी यांचे त्याच वृत्तात आणि चालीवर भाषांतर करण्यात तर त्यांचा हातखंडा आहेच, त्यांनी अनेक नव्या काव्यरचनाही केल्या आहेत. त्यातली ही एक आगळीवेगळी कविता.

मेरी क्युरी (७ नोव्हें. १८६७, वॉर्सा, पोलंड-४ जुलै १९३४, सॅव्हॉय, फ्रान्स). आज मेरी क्युरीचा जन्मदिन. त्यानिमित्ताने लिहिलेले हे “मेरी स्तोत्र”, मेरीच्या लोकोत्तर गुणांना उजागर करते!

जन्मगाव वॉर्सा, मुळी वारसा न फारसा ।
तरीही उजळलीस तू, मेरी किरण-अर्जिता [१] ॥ धृ ॥
उदय [२] गोंधळात ना, म्हणून त्यजशी देश ना ।
कष्ट काढले जिथे ती, कर्मभूमी फ्रान्स ना ॥ १ ॥
रुचसी शिक्षकास [३] तू, पियरेस कांक्षसीही तू ।
शोधवेड साधण्या, वरशीही लग्नगाठ तू ॥ २ ॥
’किरणे युरेनियमची [४]’ ती, विषय कठीण मानती ।
निवडसी तयास तू, तुला न वाटते क्षिती ॥ ३ ॥
“मी” म्हणत थंडी ये, नळात पाणी गोठते ।
उबेस कोळसा [५] नसे, तरी ज्ञानभक्ती तेवते ॥ ४ ॥
प्रखर युरेनियमहुनी, जे द्रव्य किरण सोडते ।
शोधण्या तयास, सकल मूलद्रव्य [६] हुडकते ॥ ५ ॥
गवसले असेही द्रव्य, किरण दिव्य सोडते ।
’पोलोनियम [७]’ म्हणून ती देशाभिमान दावते ॥ ६ ॥
पिचब्लेंड [८] मधून आगळे मग द्रव्य आढळे नवे ।
प्रारणे सशक्त, दिप्ती लक्षगुणित जाणवे ॥ ७ ॥
हे ’रेडियम [९]’ नवेच द्रव्य, दिप्ती दूर फाकते ।
टनात खनिज चाळता, लघुग्रॅम फक्त हाती ये ॥ ८ ॥
शोध लावला म्हणून, लाभले ’नोबेल [१०]’ही ।
शोधते कसे जनांस उपयुक्त ते ठरेल, ही ॥ ९ ॥
अकस्मात, चालता पियरेस देत धडक [११] एक ।
वाहने उजाडले तिचे आयुष्य विरह देत ॥ १० ॥
आयरीन [१२] गुणी खरीच, किरणोत्सार घडवते ।
ईव्ह धाकटी, पियानो, जन-रंजनास वाजवे ॥ ११ ॥
उपचार [१३] दिप्तीचेही ती, शोधण्यास राबली ।
’नोबेल’ लाभले पुन्हा, दिगंत कीर्ती जाहली ॥ १२ ॥

[१] अर्जिले किरणांस जिने ती, किरण-अर्जिता
[२] वॉर्सा त्याकाळी रशियाच्या गुलामगिरीत कितपत असल्याने, देशात उदय होणे कठीण असे वाटून मेरी स्क्लोडोवस्का हिने पोलंड हा स्वदेश सोडला होता. ती चरितार्थ चालवण्याकरता तसेच शोधजिज्ञासा शमवण्याकरता फ्रान्समधे स्थलांतरित झाली होती.
[३] पिअरे क्युरी या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांना, मेरी तिच्या कष्टाळू आणि जिज्ञासूवृत्तीमुळे आवडू लागली. तिलाही ते आवडत असत. परस्परपूरक वैज्ञानिक काम करत राहिल्याने, पुढे त्यांच्यात प्रेम होऊन, मग त्यांचे लग्न झाले.
[४] मेरीने युरेनियमची किरणे हा अवघड विषय अभ्यासाकरता निवडलेला होता.
[५] मेरी क्युरीची गोष्ट हाडे गोठवणार्‍या थंडीत चौथ्या मजल्यावर कोळसा वाहून नेऊन ती ऊब मिळवत असे. तोही संपला की असतील नसतील ती कापडे गुंडाळून कुडकुडत बसावे लागे. तरीही तिची शिकण्याची जिद्द उणावली नाही.
[६] अनेक मूलद्रव्यांची छाननी करून मेरीने किरणोत्सारी मूलद्रव्ये वेगळी काढली होती.
[७] सर्वप्रथम ज्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध तिने लावला त्यास तिच्या मायदेशाच्या नावावरून त्यांनी ’पोलोनियम’ हे नाव दिले.
[८] हे युरेनियमचे प्रख्यात असलेले खनिज आहे. युरेनियम काढून घेतलेल्या पिचब्लेंडमध्ये अथक परिश्रमानी शोध घेऊन मेरीने पोलोनियम हुडकून काढले.
[९] पुढे पोलोनियमपेक्षाही अधिक सक्रियता पिचब्लेंडमध्ये आढळून आली. तेव्हा रेडियमचा शोध लागला.
[१०] पोलोनियम आणि रेडियमच्या शोधाखातर मेरी क्युरी आणि तिचे पती पिअरे क्युरी यांना १९०३ सालचे नोबेल पारितोषिक, नैसर्गिक किरणोत्सर्जनाचा शोध लावणार्‍या हेन्री बेक्वेरल यांचेसोबत विभागून मिळाले होते.
[११] या अपघातात पियरे यांचा मृत्यू झाला.
[१२] ही क्युरी दंपत्याची मोठी मुलगी. कृत्रिम किरणोत्सर्जनाचा शोध लावल्याखातर हिला १९३५ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.
[१३] मेरीने पियरे यांच्या पश्चात किरणोत्साराचे वैद्यकीय उपयोग आणि तत्संबंधित कायदे यांचा व्यासंगी अभ्यास केला होता. तिच्या ह्या कामाची पावती म्हणून किरणोत्साराच्या अभ्यासाखातर तिला १९११ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.
https://nvgole.blogspot.com/2011/11/blog-post.html

अणुऊर्जेचे जनक डॉ.होमी भाभा

आज ३० ऑक्टोंबर! हा प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.होमी भाभा यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचा ’संस्थापक दिन (फाऊंडर्स डे)’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. अणुऊर्जा खात्यामध्ये काम करून निवृत्त झालेले श्री.नरेंद्र गोळे यांनी लिहिलेला एक संग्राह्य लेख खाली दिला आहे. श्री.नरेंद्र गोळे यांचे आभार.

डॉ.होमी भाभा यांच्यासंबंधित माझ्या काही आठवणी इथे दिल्या आहेत.
https://anandghare2.wordpress.com/2012/11/01/%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7/

मला भावलेले भाभा

नरेंद्र गोळे
·
आज ३० ऑक्टोंबर!
भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचा ’संस्थापक दिन (फाऊंडर्स डे)’
.
माझ्या आईवडिलांच्या छत्रछायेत मी जेवढा काळ वाढलो, मोठा झालो, त्याहूनही अधिक काळ मी अणुऊर्जाविभागाच्या छत्रछायेत नांदलो आहे. त्याच्या कार्यसंस्कृतीची छाप माझ्या वर्तनावर आढळून आली तर तो अपघात नाही, मी एकतीस वर्षे त्या संस्कृतीचा घटक राहिलो आहे. माझ्या आईवडिलांप्रती मी जेवढा कृतज्ञ आहे, तितकाच मी अणुऊर्जाविभागाप्रतीही कृतज्ञ आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रशालेच्या २३ व्या तुकडीतून अणुऊर्जाशास्त्र शिकल्याचा मला सर्वथैव अभिमान आहे!
.
अणुऊर्जाविभागाच्या निर्मितीस ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या अदमासे निम्म्या वाटचालीत मीही त्यासोबत वाट चाललो आहे. त्याचाही मला अभिमान आहे. ह्यानिमित्ताने यापुढेही अणुऊर्जाविभाग देशाच्या कीर्तीत मोलाची भर घालतच राहो हीच प्रार्थना!
.
होर्मसजी जहांगीर भाभा ह्यांचा आज जन्मदिवस. टाटा मूलभूत विज्ञान संस्था आणि भाभा अणुसंशोधन केंद्र ह्या त्यांनीच निर्मिलेल्या दोन अभिमानास्पद संस्था, त्यांचा जन्मदिवस ’संस्थापक दिन (फाऊंडर्स डे)’ म्हणून साजरा करत असतात.
.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या ’आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत अणुऊर्जा विभाग आजपासूनच तंत्रज्ञान विकसन आणि कार्यान्वयन केंद्रे सुरू करत आहे. त्यांतून विस्तृत व्यापारी उपयोगाकरता तंत्रज्ञानानाचे अनुकूलन केले जाईल. संशोधन व विकास केंद्रे, उद्योग आणि उदयमान उद्योजक, तसेच शैक्षणिक संस्था ह्यांच्या शक्ती एकवटण्याचे प्रयास ह्या केंद्रांतून केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुढील केंद्रांवर आजच ही योजना कार्यान्वित केली जात आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. कमलेश निळकंठ व्यास ह्यांचे हस्ते त्यांचे उद्घाटन होणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रात सकाळी १००० वाजतापासून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
.
१. भाभा अणु संशोधन केंद्र (भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर), मुंबई
२. इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र (इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटोमिक रिसर्च),
कळपक्कम
३. राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञान केंद्र (राजा रामण्णा सेंटर फॉर अडव्हान्सड
टेक्नॉलॉजी), इंदौर
४. चल ऊर्जा आवर्तनक केंद्र (व्हेरायबल एनर्जी सायक्लॉट्रॉन सेंटर),
कोलकाता; आणि
५. भारतीय भौतिकी प्रयोगशाळा (इंडियन फिजिकल लॅबोरेटरी), गांधीनगर
.
त्यानिमित्ताने भाभांच्या आठवणी सांगणारा माझा लेख पुन्हा प्रसारित करत आहे.
.
मला भावलेले भाभा
लेखकः नरेंद्र गोळे २०२००८०३


होर्मसजी जहांगीर भाभा [१]
(जन्मः ३० ऑक्टोंबर १९०९, मुंबई,
मृत्यूः २४ जानेवारी १९६६, माऊंट ब्लांक)
शास्त्राभ्यास करे, कलेत विहरे, नेतृत्व देई पुरे
बांधे संघटना, जनांत विचरे, चित्रांत व्यक्ती भरे ।
ठेवी देश पुढे, नवे घडवि जो, शास्त्रज्ञ देशातले
भाभा होर्मसजी, महान जगती, आदर्श ठेवीतसे ॥ – शार्दूलविक्रीडित
– नरेंद्र गोळे २०२००७१५
.
होमी भाभा ह्यांना आपण सर्वच भारताच्या अणुऊर्जेचे जनक म्हणून ओळखतो. मात्र ह्याव्यतिरिक्त होमी भाभा एक उत्तम नेते होते. एक उत्तम कलाकार होते. उत्कृष्ट पर्यावरणवादी होते. द्रष्टे होते. देशभक्त होते. ह्याचे काही पुरावेच मी इथे सादर करणार आहे.
.
होमी भाभा एक उत्तम नेते
.
भारतातील अवकाशविज्ञानसंशोधनाचे जनक विक्रम साराभाई म्हणाले [२], “ह्या अणुऊर्जा विभागातच नाही तर असंख्य शास्त्रज्ञांत आणि विद्यापीठांतून अणुऊर्जा प्रशालेत येणार्‍या तरूणांत, जो आत्मविश्वास आणि प्रेरणा भाभा निर्माण करू शकत, ज्या प्रकारे त्यांना निरंतर आधार देत असत, तोच खरा त्यांनी आपल्याकरता मागे ठेवलेला वारसा आहे.”
.
होमी भाभांनी केंब्रिज विद्यापीठाच्या कैस महाविद्यालयातून १९२७ साली यांत्रिकी अभियंत्रज्ञ पदवी प्राप्त केली होती. व्यावसायिक म्हणून ते प्रशिक्षित अभियंते होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भौतिकशास्त्रज्ञ होते. टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक होते. भारतीय आण्विक कार्यक्रमाचे जनक म्हणवले जात असत. ’ऍटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे’चे संस्थापक संचालक होते. ह्या संस्थेसच त्यांचेपश्चात त्यांचे नाव देण्यात आले. ती ’भाभा अणुसंशोधन संस्था, झाली. ह्या दोन संस्था म्हणजे भारतीय अण्वस्त्रविकासाच्या कोनशीलाच आहेत.
.
होमी भाभा उत्तम कलाकार होते
.
केंब्रीजमध्ये असतांना होमी भाभांनी काल्ड्रॉन ह्यांच्या ’लाईफ इज अ ड्रीम’, हँडेल ह्यांच्या ’सुस्सान्ह’ आणि मोझार्ट ह्यांच्या ’ईडोमेनो’ ह्या ऑपेरांचे नेपथ्य केले होते [३].
.
ते तेवढ्याच वकूबाचे चित्रकारही होते. संगीत रसिक होते. कलाप्रेमी होते. कलेला आश्रय देणारे थोर व्यक्ती होते. अभिजात कलांप्रती त्यांना लहानपणापासून प्रेम होते. संगीत आणि संस्कृतीच्या वातावरणात ते वाढले. त्यांच्या कुटुंबाचा पुस्तकसंग्रह वैभवशाली होता. त्यात कला आणि संगीतावरील खूप पुस्तके होती. पाश्चात्य अभिजात संगीताच्या तबकड्यांचाही त्यांचेकडे संग्रहच होता. त्यांना चित्रकला आणि रेखाकलेत रुची व गतीही होती. शाळेत असतांना विख्यात पारशी कलाकार जहांगीर लालकाका ह्यांचेकडे ते चित्रकलेचे धडे गिरवत असत. ’बॉम्बे आर्ट सोसायटीच्या’ अनेक वार्षिकोत्सवांतून त्यांनी कलेकरताची पारितोषिके प्राप्त केली होती.
.
होमी भाभा उत्तम रेखाचित्रे काढत असत. आम्ही आमच्या उमेदवारीच्या काळात ज्या प्रशिक्षणशाळेच्या वसतीगृहात राहत होतो, त्याच्या चौदाव्या मजल्यावरील उपाहारगृहातील चारही भिंतींवर त्यांच्या रेखाचित्रांच्या चौकटी विद्यमान आहेत. भारतातील उत्तम चित्रकार मक्बूल फिदा हुसेन ह्यांचेही एक उत्तम रेखाचित्र भाभा ह्यांनी काढलेले आहे.
.
होमी भाभा उत्कृष्ट पर्यावरणवादी होते [४]
.
भाभांना झाडे आणि फुले ह्यांबाबत एक विशेषच आकर्षण होते. दिखाऊ वॄक्षारोपण समारोहांपासून ते स्वतःला वेगळेच ठेवत असत. टाटा मूलभूत विज्ञान संस्थेची उभारणी होत असतांना, सुमारे २५ प्रचंड असे वड आणि पिंपळाचे वृक्ष कापावे लागणार होते. ते त्यांनी उचलून इतरत्र लावले होते. ह्याच संस्थेत नेपिअन-सी-रोड वरून उचलून आणलेले दोन वृक्षही आहेत. एक आहे ३० फुटी पांढरा चाफा आणि एक आहे ३५ फुटी बुचाचे झाड. असेच एकदा त्यांनी पेडररोडच्या पदपथावर महापालिकेच्या लोकांना पर्जन्यवृक्ष तोडण्याच्या तयारीत असलेले पाहिले. त्यांना फार दुःख झाले. ट्रॉम्बेला परतताच त्यांनी तो वृक्ष तोडण्यापूर्वीच रु.३०/- देऊन विकत घेतला आणि केनिलवर्थ इमारतीच्या आवारात लावला. ट्रॉम्बेमध्ये अशाचप्रकारे त्यांनी वाचवलेले सुमारे १०० वृक्ष आहेत.
.
मला आठवते. भाभा अणुसंशोधन केंद्रात ’मॉड्युलर लॅबोरेटरी’ नावाची पाऊण किलोमीटर लांबीची लांबलचक इमारत आहे, तिच्या पाठीमागे स्टेट बँकेपाशी पिंपळ आहे, नंतर ओळीनी दहा प्रचंड वटवृक्ष आहेत, शेवटास एक उंबरही आहे. ह्या वटवृक्षातील एक वृक्ष कृष्णवट आहे. असे ऐकून आहे की, हे सारे वृक्ष असेच मरणाच्या दारातून परत आणलेले आहेत. आज त्यांचे वय संस्थेच्या वयाहूनही अधिक आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच संस्था विकास साधत आहे. येथील शास्त्रज्ञांच्या, सर्व भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशा कामगिरीचे, ते मूक साक्षीदार आहेत.
.
होमी भाभा द्रष्टे होते [५]
.
१९४८ साली जेव्हा भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली आणि भाभा त्या आयोगाचे संस्थापक अध्यक्ष झाले तेव्हा भाभा म्हणाले होते की, “पुढील दोन दशकांत अणुऊर्जा देशातील अर्थव्यवस्थेत आणि उद्योगांत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. औद्योगिकदृष्ट्या आधीच विकसित असलेल्या राष्ट्रांहून भारतास मागे राहायचे नसेल तर अणुऊर्जेचा विकास अधिक ऊर्जस्वलतेने करावा लागेल.”
.
तसा तो विकास आपण घडवलाही. त्यामुळेच १९७४ व १९९८ च्या अणुचाचण्या यशस्वी करून आपण अण्वस्त्रसज्ज देश होऊ शकलो. ह्याबाबतीत सर्व जगात आपण घेतलेली आघाडी हा त्यांच्या दूरदृष्टीचाच परिपाक आहे. अणुऊर्जा आणि अवकाश संशोधन ह्या दोन्हींतही भारताने आज जी नेत्रदीपक प्रगती केलेली ते त्यांच्या दूरदृष्टीचेच फलित आहे.
.
होमी भाभा देशभक्त होते
.
होमी भाभांनी विश्वकिरणांच्या वर्षावांवर मोलाचे संशोधन केले होते. ते ब्रिटनमध्ये राहूही शकले असते. तिथे त्यांना सन्मानही मिळाला असता. मात्र, पुरेसा सन्मान आणि आर्थिक पाठबळ मिळत असेल तर देशातच राहून, इतर सुदैवी देशांत असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या तुल्यबळ संस्था, आपल्या देशातच उभ्या करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांचे मत होते[६]. टाटा मूलभूत विज्ञान संस्था, ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे (ए.ई.ई.टी., भाभांच्या अपघाती मृत्यूनंतर ह्याच संस्थेचे नामकरण भाभा अणुसंशोधन केंद्र असे करण्यात आले) आणि त्याची प्रशिक्षण शाळा, ह्या भारताच्या संशोधनक्षेत्रावर चिरकाल राहणारा ठसा उमटविणार्‍या संस्था त्यांनीच स्थापन केल्या. १९५४ साली पद्मभूषण हा नागरी सन्मान देऊन त्यांच्या ह्या कार्याचा गौरवही करण्यात आला.
.
अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारतास भाभांनी आजवर अग्रेसर ठेवले आहे. शिक्षणाकरता परदेशात गेल्यावर, परदेशातच न राहता जाणीवपूर्वक देशात परतून, देशाकरता एवढी देदिप्यमान कामगिरी करणारे होमी भाभा, कोणत्याही मोजपट्टीने निस्सीम देशभक्तच म्हणावे लागतील!
.
थोर स्फूर्तीदात्याची अनपेक्षित अखेर
.
१९६६ मध्ये भाभा असे म्हणाले होते की [७], भारत येत्या १८ महिन्यांतच अणुस्फोटके तयार करेल. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी, ते २४ जानेवारी १९६६ रोजी सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीच्या (इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सीच्या) शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीसाठी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे, एअर इंडियाच्या १०१ क्रमांकाच्या मुंबई ते न्यूयॉर्क उड्डाणातून, कांचनगंगा नावाच्या बोईंग-७०७ विमानाने जात होते. तेव्हा आल्प्स पर्वतातील माँट ब्लांक शिखरानजीक, त्या विमानाचा चालक आणि जिनेव्हा विमानतळ ह्यांच्यात विमानाच्या स्थितीबाबत गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे अपघात होऊन विमानातील सर्वच्या सर्व ११७ लोक मारले गेले. दुर्दैवाने त्यातच होमी भाभांचा मृत्यू झाला.
.
आज होमी भाभांना ओळखत नाही असा भारतीय विरळाच असेल. उण्यापुर्‍या ५७ वर्षाच्या आयुष्यात देशास अण्वस्त्रसज्जतेप्रत नेणार्‍या अनेक संघटना व व्यक्ती उभ्या करणार्‍या ह्या द्रष्ट्या नेत्यास सादर प्रणाम.
.
थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा ।
आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा ॥
.


[१] होमी जहांगीर भाभा http://nvgole.blogspot.com/2011/10/blog-post_30.html
.
[२] द व्हिजन अँड द व्हिजनरी https://www.icts. http://res.in/…/files/The-Vision-and-the-Visionary.pdf
.
[३] जहांगिर निकल्सन आर्ट फौंडेशनचे संकेतस्थळ http://jnaf.org/artist/homi-bhabha/
.
[४] होमी भाभा- फादर ऑफ न्यूक्लिअर सायन्स इन इंडिया, आर.पी.कुलकर्णी अँड व्ही.शर्मा, बॉम्बे पॉप्युलर प्रकाशन, १९६९.
.
[५] सागा ऑफ ऍटोमिक एनर्जी इन इंडिया कॉमेमोरेटिव्ह व्हॉल्यूम्स ह्या संग्रहातील भाभा ह्यांचे उद्धृत. हे संग्रह भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
.
[६] होर्मसजी जहांगीर भाभा https://anuvad-ranjan.blogspot.com/2012/04/blog-post_13.html
.
[७] घातपात की अपघात? नीरा मुजूमदार, द प्रिंट, २४ जानेवारी २०१८ https://theprint.in/…/the-theories-india-nuclear…/31233/

*****

डॉ.होमी भाभा यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने काढलेली नाणी

वॉट्सअॅपवरून मिळालेला दुसरा लेख :


💥🌸आमचा अन्नदाता🌸💥

होमी जहांगीर भाभा

भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ

जन्मदिन – ऑक्टोबर ३०, इ.स. १९०९

होमी भाभा (इ.स. १९०९ – इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.
जीवन
भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.
इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.
DR HOMI JEHANGIR BHABHA
The physicist, institution builder, musician, painter and artist. Initiator of the atomic energy and space programmes in India. Single author paper in Nature at the age of twenty five, Director of Atomic Energy Establishment Trombay (AEET) at the age of thirtynine, Governor General, International Atomic Energy (IAEA) at the age of forty eight, credited to select Vienna as the Head Quarters of IAEA through his casting vote thanks to his love for music, Mozart and Beethoven, untimely death at the age of 56 in Air India plane crash over Mont Blanc, France. Proud to be part of Bhabha family and remembering his 111 th birthday today, October 30, 2019.
Dr Homi Bhabha

परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले

आज परमपूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांची जन्मशताब्दी आहे. १९६१ ते ६३ या काळात मी ठाणे येथील तत्वज्ञान विद्यापीठात रहात होतो. तेंव्हा अधून मधून त्यांचे दर्शन होत होते, त्यांच्या पायाशी बसून त्यांचे दोन शब्द ऐकायला मिळत होते. पण त्यावेळी मी फक्त १५-१६ वर्षांचा होतो, त्या वयात त्यांची थोरवी कळण्याची माझी पात्रता नव्हती आणि पुढे जाऊन ते इतके थोर व्यक्ती होणार असतील याचीही तेंव्हा काही कल्पना नव्हती. त्यांच्या स्मृतीला शत शत नमन🙏🙏🙏

‘तेथे कर माझे जुळती’ या मथळ्याखाली मी लिहिलेल्या लेखमालिकांचे पहिले पुष्प मी परमपूजनीय शास्त्रीजींच्या चरणी वाहिले होते.
http://anandghan.blogspot.com/2008/12/blog-post_8662.html

. . . . .

आज प.पू.शास्त्रीजींच्या जन्मदिनानिमित्य श्री. भारतकुमार राऊत यांनी १४ विद्या ६४ कला या फेसबुकाच्या भिंतीवर लिहिलेला लेख त्यांचे आभार मानून या ठिकाणी संग्रहित करीत आहे.

‘मनुष्य गौरव!’


हिंदु धर्मशास्त्राचे पुरस्कर्ते, प्रवचनकार व स्वाध्याय'चे जन्मदाते पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांचा आज जन्मदिन. आज त्यांच्या आठवणींचे मधाचे मोहोळच मनात उठले. त्यातून टिपलेले हे मधुकण! भारतरत्न’नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रेष्ठ नागरी पद्म पुरस्कार पद्मविभूषण' पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर झाला, तेव्हा अनेकांनी प्रश्न विचारला की, हे पांडुरंगशास्त्री कोण? केवळ इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये ज्यांच्या बातम्या व मोठाले फोटो छापून येतात व टीव्हीच्या बातम्यांमध्ये जेबाबा’, बुवा' वमहाराज’ म्हणून झळकत राहतात, त्यांच्यापलिकडे गेलेले व भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण व त्याचा वापर अतिसामान्य जनतेच्या स्वयंउद्धारासाठी करणाऱ्या या खऱ्या महात्म्याची ओळख बरीच वर्षे स्वत:ला अभिजन' म्हणवून घेणाऱ्या समाजाला झालीच नव्हती. पण पांडुरंगशास्त्री आठवलेंना अशा समाजाकडून आपल्याला काही प्रशस्ती मिळावी, अशी अपेक्षाही नव्हतीच. संस्कृत व भारतीय तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास करून याच विषयावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ठसा उमटवणारे पांडुरंगशास्त्री आपल्याच कार्यात मग्न होते. ठाणे, रायगड आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात पसरलेले त्याचे लाखो पाठिराखेदादाजी’ म्हणून त्यांच्या चरणावर लीन होत होते. त्यांच्या उद्धाराचा विचार करण्यात व तो विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यातच दादाजींना स्वारस्य होते.
१९५४मध्ये त्यांनी स्वाध्याय' परिवाराची स्थापना केली. आपला अभ्यास आपण करावा, आपणच आपले गुरू व्हावे, ही त्यांची भावना. या परिवाराला त्यांनीप्रयोग’ करायला शिकवले.
भारतीय तत्त्वज्ञानातील वेगवेगळ्या सूत्रांना केवळ केवळ ग्रंथ व पाठशाळांमध्ये बंदिस्त करून न ठेवता जीवनाच्या खुल्या विद्यापीठात त्यांचा वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे थेट अभ्यास व्हावा म्हणून त्यांनी १९५८ मध्ये तत्त्वज्ञान विद्यापीठ' सुरू केले. या प्रयोगाला अभुतपूर्व यश लाभले. पश्चिम किनारपट्टी परिसरात, विशेषत: मच्छिमार समाजात क्रमिक शिक्षणाचा अभाव असल्याने व कदाचित त्यामुळेच हा समाज व्यसनाधीन बनला असल्याचे ध्यानात आल्याने दादाजींनी त्यांच्याकडे आपले लक्ष केंद्रीत केले. त्या मोहिमेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की, दादाजींच्या गिरगाव चौपाटीवर झालेल्या स्वाध्याय प्रवचनाला गुजरातच्या कांडला बंदरापासून गोव्याच्या मुरगाव बंदरापर्यंतचे स्वाध्यायी आपापल्या नौकांतून आले. त्यांनी नांगरलेले शेकडो, पडाव, नौका व बोटींमुळे गिरगाव चौपाटीजवळचा समुद्र अक्षरश: भरून व त्यामुळे भारावून गेला होता. धार्मिक सुधारणांसाठी असलेला मानाचा टेंपलटन पुरस्कार त्यांना १९९७ मध्ये लंडनमध्ये प्रिन्स फिलिप यांच्या हस्ते मिळाला, तर दोनच वर्षांत ते रॅमन मॅगसेसे पुरस्कारचे मानकरी ठरले. त्याच वर्षी भारत सरकारने त्यांनापद्मविभूषण’ने गौरवले.
परंतु इतके राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान व पुरस्कार मिळवूनही दादाजी शांत व नम्रच राहिले. या मधले काहीच माझे नाही, मी केवळ निमित्त आहे', हे गीतेतीलइदं न मम’चे तत्त्वज्ञान ते बोलून दाखवत व मंद स्मित हास्य करत आकाशाकडे पाहून हात जोडत.
दादाजी जगात कुठेही असले, तरी दर गुरूवारी ते न चुकता गिरगावातील प्रर्थना समाजजवळील घरात असत व तिथे ते दिवसभर आपल्या स्वाध्यायींना भेटत. त्यांची व्यक्तिगत विचारपूस करत व सल्लाही देत.
या त्यांच्या गुरूवारच्या बैठकीं'मध्ये दादाजींना भेटण्याचे भाग्य मला अनेकदा लाभले. मीमहाराष्ट्र टाइम्स’चा संपादक असताना सगुण-निर्गुण' सदरात दादाजींचेमाझे अध्यात्म’ हे सदर सुरू झाले, तेव्हा त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा साक्षात्कार दर आठवड्याला होत राहिला.
दादाजींबरोबर गप्पा मारणे हा एक अभुतपूर्व अनुभव तर असायचाच पण त्यातून निखळ आनंदही लाभायचा. झोपाळ्यावर किंवा लांब हाताच्या खुर्चीत निवांत बसलेले दादाजी शांत स्वभावाचे होते, तसेच ते मृदू भाषीही होते. त्यांना चिडलेले कुणी कधी फारसे पाहिलेले नसेल. दोन्ही हाताची बोटे एकमेकांना जोडत ते मोठाली प्रमेये सोप्या व सुटसुटीत भाषेत समजावत राहायचे.
त्यांचा मुद्दा समजला नाही किंवा पटला नाही, असे त्यांना वाटले, तर ते वेगवेगळी उदाहरणे, दृष्टांत देत समजावण्याचा प्रयत्न करायचे. त्यांची उदाहरणेसुद्धा सहज, सोपी व दररोजच्या जीवनातली. ती चटकन समजायची.
त्यांच्या अनेक वाक्यांचा व दृष्टान्तांचा माझ्या जीवनावर खोलवर परिणाम झाला.
एकदा त्यांनी विचारले, तू देवापुढे हात जोडतोस, तेव्हा काय मागतोस?'.. प्रश्न थोडा अडचणीचा. कारण देवाकडे मी असंख्य वेळा असंख्य मागण्या केलेल्या होत्या. मी त्यांची जंत्रीच वाचली. दादाजी मंद हसले. म्हणाले,तू कृतघ्न आहेस!’ मी हादरलो. विचारले, दादाजी असे का म्हणता?' त्यांचे पुन्हा ते तसेच मंद स्मित. असे बघ, देवाने तुला माणसाचा जन्म दिला. बुद्धी दिली, दोन पाय दिले आणि मुख्य म्हणजे दोन हात दिले. इतर कुठल्या प्राण्याला असे सगळे मिळाले? मग देवाकडे आणखी काय व कशाला मागायचे?
तसेच असेल, तर देवाला नमस्कार तरी कशाला करायचा?'.. मी. त्याच्यासमोर दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार करायचा, तो केवळ त्या विधात्याने हे दोन हात दिले म्हणून त्याचे आभार मानण्यासाठी!’
माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. देवाकडे पाहण्याची, त्याला वंदन करण्याची दृष्टीच बदलली.
असे अनेक उपदेश ते आपल्या `स्वाध्यायीं’ना देत राहिले. त्यामुळेच त्यांचा प्रभाव वाढतच राहिला.
२५ ऑक्टोबर २००३ रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अक्षरश: लाखोंची गर्दी झाली. तपोवन विद्यापीठाच्या आवारातच त्यांना चीरनिद्रा देण्यात आली.
अर्वाचीन काळातील एक ऋषी, हिंदुधर्मतत्त्वांचा डोळस पुरस्कर्ता व गीतेतील कर्मयोग तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यासक आपल्यातून कायमचा निघून गेला.
त्यांचा जन्मदिन ‘स्वाध्याय’ परिवार ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा करतो. यंदा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत त्यांना शत शत नमन!

भारतकुमार राऊत

महात्मा ज्योतिबा फुले

सत्याच्या शोधातसत्याच्या शोधात..!
विद्येविना मती गेली। मतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
हे एकमेव ब्रीदसूत्र ऊराशी बाळगून हयातभर केवळ गांजलेल्या, पीडलेल्या व नाकारल्या गेलेल्या समाजाच्या उन्नतीसाठीच झटणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांनी विधवा-विवाह, अस्पृश्यता विरोध, बाल विवाहांना विरोध, क्रमिक शिक्षण अशा अनेक चळवळी केवळ स्वबळावर हाती घेतल्या व समाजाच्या सक्रिय पाठिंब्यावर त्या यशस्वी करूनही दाखवल्या. त्यांनी हाती घेतलेल्या सर्व कार्यांमध्ये उजवे ठरते, ते त्यांचे सत्यशोधक चळवळी'च्या स्थापनेचे कार्य. या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला आज १४७ वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्धापन दिनानिमित्त महात्मा फुले व त्यांच्या सर्वसत्यशोधक’ कार्यकर्त्यांना अभिवादन!
आज सत्यशोधक चळवळीचे काहीच अस्तित्व कुठेही जाणवत नसले, तरी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव सर्वत्र जाणवत होता. महाराष्ट्रात सत्यशोधक समाज स्थापन करून तो हयातभर नेटाने चालवण्यामागे व त्यांची वाढ करण्यामागे महात्मा फुलेंचा निश्चित हेतू होता. त्यांनी प्रयत्नपूर्वक व नेटाने ही चळवळ त्या दिशेनेच पुढे नेली. त्यांचे हे कार्य महत्त्वपूर्ण आहे.
तेव्हा व नंतरही अनेक तथाकथित विद्वान व समाजशास्त्रज्ञांनी सत्यशोधक चळवळीची टिंगल करताना ते फुलेंनी ब्राह्मण समाजाविरुद्ध उगारलेले शस्त्र आहे, असे अशी टिंगल केली. ब्राह्मणेतरांमध्ये सत्यशोधकांविरुद्ध रोष निर्माण व्हावा, हेच या मागचे सूत्र होते. वास्तविक महात्मा फुलेंच्या मनात ब्राह्मण विरोध नव्हता, मात्र ते ब्राह्मणवादाच्या विरुद्ध निश्चितच होते. तसे ते आपल्या भाषणांतून व लिखाणातून वारंवार व्यक्तही करत.
महाराष्ट्रात व देशात सत्यशोधक समाजासारख्या राजकारणेतर संस्था जन्माला आल्या होत्या. ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज यासारख्या संस्थांकडे चांगले मनुष्यबळ व अर्थबळही होते. तरीही महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज टिकून राहिला व एका शतकाच्या काळात वाढतच गेला. याचे कारण १९व्या शतकाच्या उत्तरार्धात एका बाजूला सर अलेक डग्लस ह्यूम यांनी काही नेटिव्ह उच्चशिक्षीत नेत्यांच्या सहाय्याने राष्ट्रीय सभेची स्थापना केल्यापासूनच दुसरीकडे राजकारणबाह्य अशा सामाजिक-सांस्कृतिक संघटनेची गरज जाणवू लागली होती. राष्ट्रीय सभेत दादाभाई नवरोजी, न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यासारखे उच्चविद्याविभूषित नेते होते. दुसरीकडे पुण्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर प्रभृतींनी राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका बाजूला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करत असताना दुसऱ्या बाजूला आपल्या राजकीय विचारांच्या प्रसारासाठी मराठीत केसरी' व इंग्रजीतमराठा’ या वृत्तनियतकालिकांची सुरुवात केली होती. बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक व शैक्षणिक चळवळी सुरू होऊन सतीच्या दुष्ट प्रथेसारख्या दुष्ट प्रथांना सक्रिय विरोध चालू झाला होता.
महात्मा फुलेंनीही महाराष्ट्रात बहुजन समाजाला व त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील मुलांसाठी शाळा काढल्याच, शिवाय मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्नपूर्वक वेगळी शाळा काढून मुलींना सुशिक्षीत करण्याचा चंग बांधला होता. त्याचवेळी त्यांनी बालविवाहांविरुद्धही मोहिम उघडली. अशा तऱ्हेने सारा समाजच राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी तयार होत असताना या कार्यात माझा ब्राह्मणेतर बहुजन समाज कुठे आहे, हा प्रश्न जोतिबांच्या मनात होताच. या समाजाचे पुनरुत्थान करायचे, तर या समाजाला आधी आपले हक्क व स्थान यांची जाणीव करून द्यायला हवी, हे महात्मा फुलेंनी जाणले. व या चळवळीचे एक आयुध म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करायचे ठरवले.
जोतिबा फुलेंच्या मते तत्कालिन पंडित व तथाकथित धर्ममार्तंड सत्य' म्हणून पोथी-पुराणांचा आधार घेत जे काही सांगत व शिकवत होते, ते सारे समाजातील गांजलेल्यांचे अधिक शोषण करण्यासाठी मांडलेले थोतांड होते. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्याविरुद्धच बंड उभे केले. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला.
देवाविषयी किंवा निसर्गावषयी ‘निर्मिकहा शब्द वापरला, त्यावरुन सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतीबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी तत्कालिन कनिष्ठ मानल्या गेलेल्या वर्गातील लोकांसाठीगुलामगिरी’ हा उपदेशपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला.
ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेची वाटली. सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानताना एकेश्वरवाद, ईश्वर, भक्ती व व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्याचप्रमाणे ग्रंथप्रामाण्यवादाला विरोध `सत्य हेच परम’ मानवी सद्गुणांची जोपासना अशाप्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्वज्ञान मांडले. ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी त्यामध्ये मध्यस्थाची अथवा भिक्षूची आवश्यकता नाही, याचं प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केलं.
त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ याचं स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजाने दिले. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म या गोष्टींना त्यांनी थारा दिला नाही तर सत्य हेच परब्रह्म आहे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला.
हे विचार मनाला व बुद्धीला आवाहन करणारे व आव्हान देणारेही होते. त्यामुळेच महात्मा फुलेंची लोकप्रियता वाढू लागली. पुरोहिताशिवाय अंत्यसंस्कार, श्राद्ध, विवाहादी धार्मिक कार्ये करता येतात, हा विचार क्रांतिकारक होता. पण पुरोहितांच्या दंडेलीला कंटाळलेल्या समाजातील मोठ्या गटाने हा विचार मानला. २०व्या शतकाच्या सुरुवातीलाच मुंबई, पुणेच नव्हे, तर नासिक, औरंगाबाद अशा शहरांतही पुरोहितांच्या पौराहित्याशिवाय विवाह पार पडू लागले. विवाह प्रसंगी म्हटली जाणारी मंगलाष्टके हमखास संस्कृत मध्ये असत. त्यांचा साधा अर्थही कुणाला कळत नसे. म्हणून फुलेंनी स्वत:च मराठीत मंगलाष्टके रचली. ती खूपच लोकप्रिय झाली. आजही सत्यशोधक चळवळ मानणाऱ्या कुटुंबांत हीच मंगलाष्टके गायली जातात.
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रस्तृ़त केले आहे मानवता धर्माची शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला. सामाजिक परिवर्तनाची दिशा सत्यशोधक समाजाने समाजातील दीनदलित उपेक्षीत समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला.
सत्यशोधक समाजातर्फे ‘दीनबंधू’ नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. या नियतकालिकाचे संपादक ‘कृष्णराव भालेराव होते.
‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्थी ।।’ हे या समाजाचे घोषवाक्य होते. अशा तऱ्हेने सर्व बाजूंनी विकसित होत समाजाला सांस्कृतिक क्रांतीकडे घेऊन जाणाऱ्या सत्यशोधक समाजामध्येच दुफळीची कीड लागली. गट-तट निर्माण झाले व पुढे ही चळवळ केवळ इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच उरली. जे ब्रह्मो समाजाचे, प्रार्थना समाजाचे झाले, त्याच वाटेने जात सत्यशोधक चळवळ अखेर अस्तंगत झाली, हे महाराष्ट्राचे दुर्दैव!

भारतकुमार राऊत

. . . . . . . . . . फेसबुकवरून साभार दि.२३-०९-२०२०

सेनापति बापट

सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोलीच्या लढ्यात तिथल्या किसानांचे खंबीरपणे नेतृत्व केले म्हणून त्यांना सरदार ही पदवी मिळाली आणि ते सरदार पटेल म्हणूनच अजरामर झाले. आपले सेनापति बापट देशाच्या राजकारणात इतक्या उंचीवर पोचले नाहीत, पण तेसुद्धा एक अद्वितीय लढाऊ व्यक्तीमत्व होते. मध्य मुंबईमधल्या एका महत्वाच्या रस्त्याला सेनापति बापटांचे नाव दिले आहे. पुण्याचा एक महत्वाचा रस्ताही सेनापति बापट यांच्या नावाने आहे. पण हे गृहस्थ कोणत्या युद्धात कुठल्या सेनेचे सेनापति होते? याची माहिती माझ्या पिढीमधल्याही फारशा लोकांना नव्हती. नव्या पिढीतली मुले तर सरळ एसबी रोड असेच म्हणतात. सेनापति बापट यांच्यासंबंधी श्री.द्वारकानाथ संझगिरी यांनी पोटतिडिकेने लिहिलेला एक लेख वॉट्सअॅपवर वाचनात आला. तो खाली दिला आहे, तसेच विकासपीडिया या स्थळावर मिळालेली माहिती खाली संग्रहित केली आहे.

पिस्तूल ते झाडू

लेखक :द्वारकानाथ संझगिरी

किती गोष्टी सेनापतींच्या सांगू? ते दोनदा मॅट्रिक पास झाले. पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून बसले तेव्हा संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवली. त्यांची बुद्धिमत्ता त्यांना आयसीएसकडे सहज घेऊन गेली असती; पण त्यांनी क्रांतिकार्यात उडी घेतली. मग स्वातंत्र्य चळवळीत विद्यार्थी रूप घेतलं म्हणून मॅट्रिकला बसावं लागलं तेव्हा पहिले आले. नंतर स्वा. सावरकरांच्या क्रांतिकार्यात उडी घेतली. त्यांनी सावरकरांना गुरू मानलं. ते सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेचे महत्त्वाचे घटक होते. सावरकरांनी त्यांना सांगितलं, ‘रशियाला जाऊन बॉम्बची विद्या शिकून ये.’ गुरूची आज्ञा त्यांनी शिरसावंद्य मानली आणि ते रशियाला निघून गेले. बॉम्ब विद्या शिकल्यावर त्यांनी सावरकरांना सांगितलं. ‘‘मला फक्त परवानगी द्या. मी ब्रिटिश पार्लमेंट उडवून येतो.’’ सावरकरांनी त्यांना कसंबसं रोखलं.

माणूस कापरासारखा ज्वालाग्राही. कधीही पेट घेऊ शकेल असा. मधल्या काळात बरीच उलथापालथ झाली. सावरकरांना अंदमानात जावं लागलं. बापटांनी हिंदुस्थानात येऊन मुळशीच्या सत्याग्रहात उडी घेतली आणि पांडुरंग बापट कायमचे सेनापती बापट झाले. मुळशीचा सत्याग्रह हा मुळशी धरणाच्या बांधकामामुळे ज्यांच्या जमिनी जात होत्या, त्या जमीनधारकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्याचा लढा होता. ह्या लढ्याच्या वेळी त्यांनी हिंसक अस्त्र फेकून दिलं आणि सत्याग्रहाचं अहिंसक शस्त्र हाती घेतलं. क्रांतिकार्यात असताना मृत्यूच्या हातात हात घेऊन चालतोय याची त्यांना जाणीव झाल्यावर त्यांनी बायकोला पत्र लिहून कळवलं, ‘आपल्या मित्राशी लग्न करून नीट प्रपंच कर. उगाच होरपळून घेऊ नकोस.’ यांचं शरीर आपल्यासारखंच हाडामांसाचं होतं. पण मन लोखंडाचं होतं. लोखंडाचे चणे ते, आपण साधे चणे खातो, त्या सहजतेने खायचे.

मुळशीच्या सत्याग्रहानंतर त्यांनी बॉम्ब सोडला. चरखा हातात घेतला. ते गांधीवादी झाले. हे स्वार्थासाठी टोपी फिरवणं नव्हतं. हा वैचारिक बदल होता. सावरकर काय, गांधी काय, सेनापती बापट काय, स्वर्गातून पृथ्वीवर येताना बॅगेत फक्त त्याग नावाची वस्तू घेऊन आले. स्वार्थ त्यांनी वरच स्वर्गात ठेवला होता. एकदा पु. ल. देशपांडे सेनापतींना एका कार्यक्रमासाठी घेऊन जाताना सेनापती एका पुलाच्या पायऱ्या मोजत वर चढले. पुलंनी त्यांना विचारले, ‘तात्या, पायऱ्या मोजताय?’ तात्या मिस्कीलपणे म्हणाले, ‘पूर्वी मला रशियन भाषा येत होती. फ्रेंच येत होती. पुढे त्यांचा वापर नसल्यामुळे विसरलो. माझ्या खिशात मोजायला काहीही नसतं. त्यामुळे आकडे विसरू नयेत म्हणून पायऱ्या मोजतो.’

जिथे अन्याय दिसला तिथे सेनापती बापटांनी लढा दिला. त्यांनी पक्ष पाहिला नाही. ज्या नेत्याचे विचार ज्या क्षणी पटले, त्याचं नेतृत्व स्वीकारलं. सावरकरांच्या हिंदू महासभेने निजामा विरुद्ध भागानगरचा सत्याग्रह पुकारला. तात्या बापटांनी त्यात पुढाकार घेतला. अंमळनेरला गिरणीची टाळेबंदी उठण्यासाठी सानेगुरुजींनी प्राणत्याग करायचं ठरवलं, त्यावेळी अनेक नेते तिथे सानेगुरुजींचं मन वळवायला गेले. बापटांनी सानेगुरुजींना कळवलं, तुम्ही एकट्याने प्राणत्याग करू नका. मी तुमच्याबरोबर प्राण त्यागायला येतो. ती बंदी उठली आणि दोघांचे प्राण वाचले. पुन्हा ४२च्या चले जावच्या वेळी समाजवाद्यांच्या एका मेळाव्यात ते वाघासारखे गुरगुरत फिरत होते आणि म्हणत होते, ‘मला कुणीतरी बॉम्ब आणून द्या. मला निकराची लढाई लढू द्या.’

ते गांधीवादी झाले तरी सावरकरांबरोबरची मैत्री अभेद्य होती. सावरकरांकडे फार थोडी माणसं अपॉइंटमेंटशिवाय येऊ शकत. त्यांत एम.एन.रॉय आणि सेनापती बापट होते. वर मी म्हटलंच आहे की, निजामा विरुद्ध सावरकरांनी भागानगर सत्याग्रह केला. सेनापतींना तो पटला. ते गांधीवादी, तरी सावरकरांच्या बाजूने सत्याग्रहात उतरले. त्यांना शिक्षा झाली. शिक्षा घेऊन येताना त्यांना वाटेत आप्पा कासार म्हणजे सावरकरांच्या शरीररक्षकाने वाकून नमस्कार केला.
सेनापतींनी त्याला काय आशीर्वाद दिला असेल?
ते म्हणाले, ‘जा. मोठ्यातली मोठी शिक्षा घेऊन ये.’
त्यावेळचे आशीर्वाद पण काय असायचे!
पुढे गांधीजींची हत्या झाली. विचार करा, गांधींवर प्रेम करणाऱ्या सेनापतींना काय वाटलं असेल? पण नंतर काही दिवसांनी नथुराम गोडसेला केस लढवून, त्याचे विचार मांडण्यासाठी एका वर्तमानपत्रात ‘गोडसे मदतनिधी’ जमवण्यात आला. त्यात पाच रुपयांची देणगी सेनापती बापटांची आहे.
बसतो विश्वास?
‘नथुरामने केलेलं कृत्य निंदनीय आहे. पण त्याचं मत मांडायचा त्याला अधिकार आहे.’ ही त्यांची भूमिका होती.
याला म्हणतात मत स्वातंत्र्यावरचं प्रेम! आणि कट्टर लोकशाहीवादी असणं.

आजच्या काळात सेनापतींवर काय काय आरोप झाले असते विचार करा. पण त्यावेळी लोकांना साधं लाकूड कुठलं आणि चंदन कुठलं ते कळायचं. जवाहरलाल नेहरू त्यांच्या प्रेमाचा माणूस, पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते नेहरूं विरुद्ध लढले. बेळगाव-कारवार प्रश्नात आघाडीवर राहिले. एकदा एका चळवळीत त्यांना कल्याणच्या पुढे यायला बंदी होती. ते खेडुताच्या वेशात थेट स्टेजवर आले. चळवळ दिसली की हा सेनापती त्यात उडी मारायचा.

पुढे वय होत गेलं. मग देशसेवा कशी करायची? त्यांनी झाडू हातात घेतला. स्वतःची गल्ली ते साफ करायचे आणि आपली माणसं, ते झाडू मारायला येणार म्हणून आपल्या लहान मुलांना आधीच हगवून, मुतवून ठेवत. म्हणजे मग स्वतःला साफ करायला नको.

तात्याराव सावरकर त्यांना म्हणत, ‘‘तू मला गुरू मानतोस ना, मग आता विश्रांती घे.’’

तेवढीच गोष्ट त्यांनी सावरकरांची ऐकली नाही. 88 वर्षांचे होईपर्यंत लढले.
कधी बॉम्ब, कधी चरखा, कधी लेखणी, कधी पिस्तूल, कधी झाडू घेऊन!
सतत मृत्यूला आव्हान देत.
ज्या मृत्यूला आपण इतके घाबरतो, त्या मृत्यूला ते सतत बरोबर घेऊन वावरले. तोच सेनापती बापटांना घाबरला.

पिस्तूल ते झाडू हा विलक्षण प्रवास करणाऱ्या या महामानवाला निदान दादरकरांनी तरी विसरू नये. तो कृतघ्नपणा होईल. त्यांना कुणी ‘एक म्हातारा’ म्हणणं निर्लज्जपणा. माझ्या भावना पोचतायत ना तुमच्यापर्यंत?

द्वारकानाथ संझगिरी.

सेनापती बापट व दादर….

गिरणगाव ही एकेकाळी मुंबईची वेगळी ओळख होती, इथले लोक, चाळ संस्कृती कशी दिमाखाने आपली एक परंपरा टिकवून होती. हे गिरणगाव आता नामशेष झालंय. आता इथे उच्चभ्रू, हाय प्रोफाईल लोकांसाठी टॉवर उभे राहिलेत. स्टेटस सिम्बॉल जपणाऱ्यांची नवी संस्कृती इथे वाढू लागलीय. इतकी की परेलच्या सेनापती बापट मार्गाचा एक मैलाचा तुकडा तोडून त्याचे नामकरण आता अमेरिकन स्टईलमध्ये *’गोल्डन माईल’ असे करण्याचा एका बिल्डरचा प्रयत्न सुरू आहे. आजच्या पिढीला मुळशीचा लढा आणि त्याचा हा सेनापती ठाऊकही नसेल, म्हणूनच सेनापती बापट यांच्याबाबतचा हा लेख आज शेअर करत आहे. हा लेख वाचल्यावर कदाचित या महापुरूषाचे कार्य कळेल. त्यांची आठवण सांगणाऱ्या मार्गाचे नामकरण करणे तुम्हाला योग्य वाटते का? तुमचं तुम्हीच ठरवा आणि रक्त खवळलं नसेल तर शांत बसा….

सध्या एका धक्कादायक वास्तवाकडे मी वळतोय. दादरमधल्या मंडळींना आपल्याच विभागात राहिलेले महापुरुष ठाऊक नाहीत. विशेषतः नव्या पिढीला.
परवाचीच एक गोष्ट सांगतोय.

दादर स्टेशनच्या जवळ एका दुकानात काहीतरी घेत होतो. इतक्यात एक संवाद कानावर पडला. एक ‘क्ष’ व्यक्ती ‘य’ व्यक्तीला चैत्यभूमीकडे जायचा रस्ता विचारत होती. ती ‘य’ व्यक्ती त्या ‘क्ष’ व्यक्तीला सांगत होती, ‘इथून सरळ जायचं. मग गोखले रोड लागेल. पुन्हा सरळ जायचं. मग एक सर्कल लागेल. तिथे पाच रस्ते फुटतात. त्या सर्कलमध्ये एका म्हाताऱ्या माणसाचा पुतळा आहे. तो पुतळा, क्रिकेटमध्ये पंचाने फलंदाजाला बाद दिल्यावर बोट कसं वर करतो तसा वर बोट करून उभा आहे. त्या बोटाच्या दिशेने गेलं की चैत्यभूमी येते.

’मी त्या ‘य’ व्यक्तीला म्हटलं, ‘आपण दादरचे?
’‘हो’, तो म्हणाला.
‘शाळा कुठली?’ मी विचारलं.
त्याने सांगितलं.
शाळा माझी नव्हती म्हणून मी सुटकेचा निःश्वास सोडला.
मी त्याला म्हटलं, ‘त्या पुतळ्यातल्या व्यक्तीचं नाव सेनापती बापट. एका सेनापतीला तुम्ही तो म्हातारा केलात.
’‘बरोबर बोललात.’ तो माझं म्हणणं फारसं मनावर न घेता म्हणाला, ‘बापट की फाटक असा माझा गोंधळ होत होता. तुमचं जनरल नॉलेज चांगलं दिसतंय.
’मला त्याच्या निगरगट्टपणाचं कौतुक वाटायला लागलं. मी त्याला आधी या रानडे रोडचे, रानडे कोण हे ठाऊक आहेत का विचारायच्या मूडमध्ये होतो. पण मी नाही विचारलं. कारण ‘ते माझ्या आईचे मामा होते’ असं त्याने निर्लज्जपणे सांगितलं असतं तर…

सेनापती बापट दादरच्या एका तरुण मुलाला ठाऊक नसणं हे दादरच्या शैक्षणिक गर्वाचे तुकडे आहेत. तुमच्या मनात जर आदरभाव नसेल तर पाठ्यपुस्तकांतून मिळणारं ज्ञान हे अळवावरच्या पाण्यासारखं असतं. कधी निघून जातं कळत नाही. आम्ही दादरकर एवढे नशीबवान आहोत की, एक त्यागी महापुरुष आमच्यात वास्तव्य करून गेला.

विकासपीडियावरून घेतलेली माहिती


सेनापति बापट
सेनापती बापट : (१२ नोव्हेंबर १८८० – २८ नोव्हेंबर १९६७). सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक. पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेट्यात धरणग्रस्त गावांकरिता व शेतकऱ्यांकरिता बापट यांनी सत्याग्रहाचा लढा दिला.त्यामध्ये महाराष्ट्रातील जे शेकडो सत्याग्रही सामील झाले त्यांचे त्यांनी नेतृत्व केले. त्यामुळे ‘सेनापती बापट’ या शब्दावलीने ते ओळखले जाऊ लागले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे गरीब कुटुंबात जन्म झाला. आईचे नाव गंगाबाई. माध्यमिक आणि बी.ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. डेक्कन कॉलेजमध्ये सशस्त्र क्रांतीच्या द्वारे भारत स्वतंत्र करण्याची शपथ तलवारीवर हात ठेवून घेतली. बी.ए. परीक्षेत १९॰३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंबई विद्यापीठाचे शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच क्रांतिकारक विचारांचा प्रचार करीत असल्यामुळे शिष्यवृत्ती बदं होऊन शिक्षण अपुरे राहिले.

श्यामजी कृष्ण वर्मा या क्रांतिकारक नेत्याशी परिचय होऊन त्यांच्या मदतीने पॅरिस येथे राहून तेथील रशियन क्रांतिकारकांकडून प्रचंड स्फोटक बाँबची तंत्रविद्या हस्तगत केली. त्या तंत्रविद्येची पुस्तिका भारतात व बंगालमधील क्रांतिकारक गटांपर्यंत पोहोचविली. क्रांतिकारकांच्या कटाच्या एका खटल्यात माफीच्या साक्षीदाराने बापटांचे नाव उघडकीस आणल्यामुळे बापट हे १९॰८ ते १९१२ पर्यंत चार वर्षे अज्ञातवासात राहिले. नंतर १९२१ पर्यंत स्वत:च्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि समाजसेवेचे व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर स्वीकारले. १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालविले. या आंदोलनात कारागृहवासाची तीनदा शिक्षा त्यांना झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेत असताना राजद्रोहात्मक भाषणे केल्याबद्दल अनेकदा अनेक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली.

संस्थांनी प्रजांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानाच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या; त्याबद्दल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. आंदोलन करीत असताना कारागृहात आंदोलनाला पूरक अशा तऱ्हेचे साहित्य लिहिले व ते प्रकाशित केले. त्यांनी अपुरे राहिलेले छोटेसे आत्मचरित्र लिहिले आहे. बरेचसे लेखन मराठीत व थोडे इंग्रजीत व संस्कृतमध्ये केले; लेखनाला पद्याकार दिला. क्रांतिवादी राजकारणाचे समर्थन करणारे, भगवतगीतेच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले, राष्ट्रमुक्ती व अन्याय प्रतिकार या दोन मुद्यांना अनुसरून युक्तिवाद केलेले हे साहित्य आहे. चैतन्यगाथा हे पुस्तक वाचले म्हणजे त्यांचे मूलभूत विचार लक्षात येतात. मराठीमध्ये योगी अरविंदांच्या इंग्लिशमधील आध्यात्मिक तत्त्वज्ञानावरील ग्रंथांचा उत्कृष्ट अनुवाद बापटांनी केला आहे. अरविंदांचा दिव्यजीवन हा मोठा ग्रंथ बापटांनी प्रसन्न शैलीने मराठीत उतरविला आहे. त्यांचे साहित्य समग्र ग्रंथ (१९७७ ) म्हणून साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानाने प्रसिद्ध झाले आहे.

संदर्भ : नवरे, श्रीपाद शंकर, सेनापती, मुंबई, १९७६.

लेखक – लक्ष्मणशास्त्री जोशी

स्त्रोत – मराठी विश्वकोश

*****

नवी भर दि. १२-११-२०२०: श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार

स्वातंत्र्य सेनानी अर्थात सेनापती बापट यांची आज जयंती (१२ नोव्हेंबर १८८०)

१९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेट्यात धरणग्रस्त गावांकरिता व शेतकऱ्यांकरिता बापट यांनी सत्याग्रहाचा लढा दिला.त्यामध्ये महाराष्ट्रातील जे शेकडो सत्याग्रही सामील झाले त्यांचे त्यांनी नेतृत्व केले. त्यामुळे ‘सेनापती बापट’ या नावाने ते ओळखले जाऊ लागले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे गरीब कुटुंबात जन्म झाला. आईचे नाव गंगाबाई. माध्यमिक आणि बी.ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. डेक्कन कॉलेजमध्ये सशस्त्र क्रांतीच्या द्वारे भारत स्वतंत्र करण्याची शपथ तलवारीवर हात ठेवून घेतली.

श्यामजी कृष्ण वर्मांच्या इंडिया असोसिएशन या संस्थेत दाखल झाले तेथे ते क्रांतिकारी लढ्यात सामील झाले. पॅरीस येथे जाऊन त्यांनी रशियन क्रांतीकाराकाक्डून बॉम्ब बनविण्याचे शिक्षण घेतले. कलकत्ता येथे अनेक क्रांतीकारकांना त्यांनी हि विद्या शिकवली .भारतात येताना त्यांनी अनेक शस्त्रे आणली . माणिकटोला बाम्ब्स्फोट प्रकरणात त्यांचा संबध आहे हे नरेंद्र गोस्वामी यांनी सांगितल्यावर ते भूमिगत झाले . गोवा मुक्ती लढ्यतही त्यांनीभाग घेतला. १९१३ ते २२ हे दशक त्यांनी आपल्या कामाचे स्वरूपच बदलले. पारनेरच्या दलित वस्तीत जाऊन शिक्षण प्रबोधन सुरू केली. हातात झा़डू घेऊन रस्ते गटारेस्वच्छ केली.

चार वर्ष लोकमान्य टिळकांच्या सोबत केसरीच्या संपादकीय कामात हातभार लावला. १९१९ साली मुंबईतील सफाई कामगारांचा यशस्वी संप घडवून आणला. अगदी शेवटी सीमा लढ्यासाठी त्यांनी प्राणांतिक उपोषण केले, स्वत इंदिराजी यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण सोडावे अशी विनंती केली .त्यांनी उपोषण सोडले पण सीमा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही .

योगी अरविंदांचा त्यांचा कधीही प्रत्यक्ष भेटीचा योग आला नाही पण ते एकमेकांना जाणत होते .मराठीमध्ये योगी अरविंदांच्या इंग्लिशमधील आध्यात्मिक तत्त्वज्ञानावरील ग्रंथांचा उत्कृष्ट अनुवाद बापटांनी केला आहे. अरविंदांचा ‘दिव्यजीवन’ हा मोठा ग्रंथ बापटांनी प्रसन्न शैलीने मराठीत उतरविला आहे. त्यांचे साहित्य समग्र ग्रंथ (१९७७ ) म्हणून साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानाने प्रसिद्ध झाले आहे.अरविंद आश्रमाच्या माताजींनी त्यांना २९ फेब्रुवारी १९६० रोजी सुवर्ण मुद्रा दिली .त्यावेळी सेनापतींनी म्हणलेली संस्कृत काव्य खाली दिले आहे.

**********

Bharatkumar Raut यांनी १४ विद्या ६४ कला यांच्या फेसबुकावरील भिंतीवर दिलेला लेख .. साभार दि.१२-११-२०२०

असा सेनापती!

संपूर्ण भारतीय बनावटीचा बाँब बनवण्यापासून स्वत:च्या मुलाच्या बारशात हरिजनांसाठी खास भोजनाची व्यवस्था करण्यापर्यंत सेवा कार्य करणारे सेनापती बापट यांचा आज जयंती! त्यांच्या स्मृतींना मानवंदना!
पांडुरंग बापट यांचा जन्म पारनेर (जिल्हा अहमदनगर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची ‘जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती’ मिळाली. त्यांना बी. ए. परीक्षेत १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पारनेर तालुक्यातील गणेशखिंड येथील गणपती मंदिरात ते राहत असत.
या मंदिरापासून सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर यांदरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे. या मार्गाची सध्या पडझड झाली आहे. त्यांचे पारनेर मधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले.
असे असले तरी “माझ्या बॉंबमुळे एकही बळी गेला नाही. ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते” असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तरीही अलीपूर बॉंब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
१९२१ पर्यंत ते स्वतःच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यांनी समाजसेवा हेच व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले.
१९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले. या आंदोलनादरम्यान बापट यांना सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले.
या आंदोलनात त्यांना तीनदा कारागृहावासाची शिक्षा झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. संस्थानांतल्या प्रजाजनांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी संस्थानाच्या प्रवेशबंद्या मोडल्या व त्याबदल कारागृहवासही सोसला.


स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.
नोव्हेंबर १९१४ मध्ये सेनापती बापटांना मुलगा झाला. त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले.
एप्रिल १९१५ मध्ये ते पुण्यात वासूकाका जोशी यांच्या ‘चित्रमयजगत’ या मासिकात नोकरी करू लागले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठातही नोकरी केली आहे. दैनिक मराठा सोडल्यानंतर ते लोक-संग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले. त्याचबरोबर डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत.
बापटांच्या पत्नीचे ४ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. त्यानंतर सेनापती बापट मुंबईतीत झाडूवाल्यांचे नेतृत्व करू लागले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या ‘संदेश’ नावाच्या वृत्तपत्रात एक मोठे निवेदन दिले.
झाडू-कामगार मित्रमंडळ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. सप्टेंबर १९२९ मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाली.
अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इन्द्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती, उल्लासकर दत्त हे भयंकर यातना सहन करीत वेडे झाले होते. हे पाहून, सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालविली.
त्यासाठी ते घरोघर फिरत, लेख लिहीत, सभा घेत. या प्रचारासाठी बापटांनी ’राजबंदी मुक्ती मंडळ’ स्थापन केले होते. १९४४ साली नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले.

सेनापती बापट यांच्या स्मृतीप्रीत्यर्त पोस्टाचे तिकीट


असे सेनापती बापट! डोक्यावर गांधी टोपी, अंगावर कोट व धोतर, असे बापट कधी क्रांतिकारक असतील, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. हयातीच्या उत्तरार्धात त्यांनी सेवाव्रत अंगिकारले होते.
माझे व माझ्या अनेक शाळकरी मित्रांचे भाग्य हे की दादरच्या आमच्या साने गुरुजी विद्यालयात सेनापती अनेकदा येत. त्यावेळी त्यांचे जवळून दर्शन होई व त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळे. तो आम्हा सर्वांच्या आयुष्यातील सुवर्ण काळ होता.
१९६७मध्ये २८ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले. दादरच्या स्मशानातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

 • भारतकुमार राऊत

डॉ.विक्रम साराभाई यांची जन्मशताब्दी

homi_650_081216121857
दि.१२ ऑगस्ट २०१९
आज स्व.डॉ.विक्रम साराभाई ह्यांची जन्मशताब्दी. यानिमित्य त्यांचा परिचय करून देणारे दोन लेख खाली दिले आहेत. मी १९६६ मध्ये अणुशक्तीखात्याच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये निवडला गेलो तेंव्हा डॉ.विक्रम साराभाई त्या खात्याचे प्रमुख होते. डॉ.होमी भाभा यांनी स्थापन केलेल्या ‘अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्राँबे’ या संस्थेचे ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ असे नामकरण डॉ.विक्रम साराभाई यांनी केले त्या प्रसंगी मी त्यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिले. माझे ट्रेनिंग संपल्यानंतर १९६८मध्ये मी नोकरीवर रुजू झालो तेंव्हा आमचे ऑफीस कुलाब्याला ज्या इमारतीत होते तिथेच डॉ.साराभाई यांचेही कार्यालय होते. ते एरवी अहमदाबादला किंवा फिरतीवर असत, पण अधून मधून मुंबईच्या त्या ऑफीसात येत असत त्यावेळी कधीकधी त्यांचे ओझरते दर्शन होत असे.
तारापूर येथील पहिले अणुविद्युतकेंद्र राष्ट्राला अर्पण करण्याचा एक जंगी सोहळा त्यांनी मुंबईत आयोजित केला होता. तो पाहण्याचे भाग्य मला लाभले आणि तिथला झगमगाट व डॉ.साराभाई यांचा ऐटबाज वावर पाहूनच माझे डोळे दिपले होते. त्यांनी भारतातल्या दोन ठिकाणी मोठी अणुशक्तीकेंद्रे आणि मोठे कारखाने यांचे संयुक्त असे अॅग्रोइंडस्ट्रियल कॉम्लेक्स उभारण्याचे संकल्प करून त्यांच्या रूपरेखा आखल्या होत्या. त्यासंबंधीची माहिती त्यांनी आपल्या व्याख्यानात दिली. पण पुढे त्यांचे अचानक निधन झाल्यानंतर ते प्रकल्प बारगळले. डॉ.साराभाई यांनी चेन्नैजवळील कल्पकम इथे अणुशक्तीकेंद्रासोबतच एक मोठे संशोधनकेंद्र स्थापन करण्याचा केलेला बेत मात्र पुढे चांगला नावारूपाला आला आणि आज इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च या नावाने प्रसिद्ध आहे.
डॉ.साराभाई यांनी भारतातल्या अवकाश संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. डिपार्टमेंट ऑफ स्पेसच्या अंतर्गत आज अनेक संस्था काम करत आहेत आणि त्यातली इसरो या नावाची संस्था आज जगप्रसिद्ध झाली आहे. अवकाश संशोधनाबरोबरच संरक्षणखात्याच्या उपयोगासाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे बनवण्यातही त्याने मोठे यश संपादन केले आहे.

एका श्रीमंत कारखानदाराच्या घरी जन्माला येऊन शास्त्रज्ञ झालेल्या डॉ.साराभाई यांनी मृणालिनी या प्रसिद्ध नृत्यविशारद अशा दाक्षिणात्य विदुषीशी विवाह केला आणि त्यांची कन्यका मल्लिका साराभाईसुद्धा प्रख्यात नृत्यांगना आणि सामाजिक कार्यकर्ती झाली. डॉ.साराभाई यांच्या आजच्या जन्मशताब्दीच्या दिवशी फेसबुकवर त्यांच्याविषयी आलेले दोन लेख खाली संग्रहित केले आहेत. त्यासाठी श्री.नरेंद्र गोळे आणि श्री.माधव विद्वांस यांचा मी उपकृत आहे.

I have also included two articles I received on e-mail.
. . . . . . . . . . . . . . . . . . . .

Sarabhai1

 लेखक – नरेंद्र गोळे
भारतीय अवकाश कार्यक्रमाचे द्रष्टे प्रणेते,
भारतीय अणुऊर्जा आयोगाचे दुसरे अध्यक्ष विक्रम साराभाई.
जन्मः १२-०८-१९१९, अहमदाबाद, गुजरात
मृत्यूः ३०-१२-१९७१, कोवलम्‌, थिरुवनन्तपुरम्‌, केरळ
.
“कुणीही नेता नसतो आणि कुणीही नेला जात नसतो. पुढारी म्हणूनच जर ओळख करून द्यायची असेल तर, उत्पादक म्हणून करून देण्याऐवजी जोपासक म्हणून करून द्यावी. तो जमिनीची मशागत करतो. बीज रुजण्यास, वाढण्यास, पोषक वातावरण निर्माण करतो, पर्यावरण घडवतो. स्वतः पुढारी असल्याचे पटवून देण्याची निकडीची गरज नसलेल्या, उदार व्यक्ती त्याकरता हव्या आहेत.” – विक्रम साराभाई

भारतीय अवकाश कार्यक्रमापासून विक्रम साराभाईंचे नाव विलग करणे अशक्यच आहे. त्यांनीच भारतास अवकाश संशोधनाच्या जागतिक नकाशावर आणले. मात्र त्यांनी इतर क्षेत्रांतही तेवढेच पायाभूत कार्य केलेले आहे. वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती, अणुऊर्जा, विजकविद्या आणि इतर अनेक क्षेत्रांत अखेरपर्यंत त्यांनी निरंतर कार्य केलेले आहे.

साराभाईंच्या व्यक्तिमत्वातील सर्वात लक्षणीय पैलू म्हणजे त्यांच्या स्वारस्यांचा विस्तृत पल्ला होय. संकल्पनांचे रूपांतरण संस्थांत घडवण्याची त्यांची शैलीही अपूर्वच आहे. आजच्या सशक्त इस्रोचे जनकही तेच आहेत. ते एक सर्जनशील शास्त्रज्ञ होते. यशस्वी आणि दूरदृष्टीचे उद्योजक होते. सर्वोच्च कोटीचे संशोधक होते. थोर संघटक होते. आगळे शिक्षणशास्त्री होते. कलेचे मर्मज्ञ होते. सामाजिक बदलांचे उद्यमी होते. पथदर्शी व्यवस्थापन प्रशिक्षक होते. आणखीही बरेच काही होते.

मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व असूनही ते एक सहृदय व्यक्ती होते. त्यांच्यात इतरांप्रतीची करूणा ओतप्रोत भरलेली असे. त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर जादू करून तिला ते आपलेसे करून टाकत असत. त्यांच्यासोबत त्यांची वैयक्तिक मैत्री ताबडतोब प्रस्थापित होत असे. आपल्या आश्वासक पुढाकाराने आणि इतरांप्रतीचा आदर ते सहज व्यक्त करू शकत असल्यानेच हे संभव झाले असावे.

ते स्वप्ने पाहत असत. त्यांचेपाशी अपार कष्ट करण्याचे अतुलनीय सामर्थ्यही होते. ते द्रष्टे होते. ते संधी पाहू शकत. नसलेल्या संधी निर्माण करू शकत. साराभाईंबाबत असे निरीक्षण नोंदवतात की; “त्यांच्याकरता आयुष्याचे उद्दिष्ट आयुष्यासच स्वप्न बनवणे आणि मग ते साकार करणे हे होते”. शिवाय साराभाईंनी इतर अनेकांनाही स्वप्ने पाहायला शिकवले. ती साकार करायला शिकवले. भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे यश हे त्याचे प्रमाणपत्रच आहे. “साराभाई एक संशोधक शास्त्रज्ञ आणि दूरदृष्टीचे उद्योग संघटक व कल्पक संस्थानिर्माते ह्या दोहोंचे एक विरळ मिश्रण होते. देशाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीकरता त्यांनी अनेक संस्था निर्मिल्या.” त्यांना अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्रांतील कौशल्यांची उत्तम जाण होती. कुठलीही समस्या त्यांच्याकरता किरकोळ नव्हती. त्यांचा बहुतांशी वेळ त्यांच्या संशोधन कार्यातच व्यतीत होत असे. पुढे त्यांच्या अकालीच झालेल्या मृत्यूपर्यंत ते संशोधनकार्यांवर देखरेख करत राहिले. त्यांच्या देखरेखीखाली एकोणीस व्यक्तींनी पी.एच.डी. पदवी प्राप्त केली. साराभाईंनी वैयक्तिकरीत्या आणि आपल्या सहकार्‍यांसोबत मिळून सहासष्ट शोधनिबंध राष्ट्रीय नियतकालिकांत प्रकाशित केले होते.

असे सांगितले जाते की, संघटनेतील पदानिरपेक्ष कुणीही, कोणत्याही दडपणाविना आणि कोणत्याही न्यूनतेच्या भावनेविना साराभाईंना भेटू शकत असे. ते त्या व्यक्तीस बसवून घेत असत. समानतेने वागवत असत. त्यांचा वैयक्तिक प्रतिष्ठेवर विश्वास होता. इतर व्यक्तींची प्रतिष्ठाही ते सांभाळत असत. कामे करावयाच्या अधिक चांगल्या आणि कार्यक्षम उपायांचा ते सदैव शोध घेत असत. जे काही ते करायचे, ते सर्जनशील असायचे. तरूण व्यक्तींची ते पराकोटीची काळजी करत असत. त्यांच्या सामर्थ्यांवर त्यांना प्रचंड विश्वास असे. त्यांना संधी आणि स्वातंत्र्य पुरविण्यास ते नेहमीच तयार असत.

विक्रम साराभाईंचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबादेतील एका सधन कुटुंबात झाला. त्यांच्या वंशपरंपरागत घरातच त्यांचे बालपण गेले. आयुष्याच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील महत्त्वाचे लोक तिथे भेटी देत असत. ह्याचा साराभाईंच्या व्यक्तिमत्त्वविकासावर महत्त्वाचा परिणाम झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अंबालाल होते आणि आईचे सरलादेवी. मादाम मारिया माँटेसरी ह्यांच्या धर्तीवर, त्यांच्या आई सरलादेवींनी काढलेल्या शाळेत त्यांचे सुरूवातीचे शिक्षण झाले. गुजरात महाविद्यालयातून इंटरमिडिएट सायन्सची परीक्षा पूर्ण केल्यावर, १९३७ मध्ये ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे आले. तेथून १९४० मध्ये त्यांनी नॅचरल सायन्सेसमधील ट्रायपॉस परीक्षाही पार केली. दुसर्‍या महायुद्धाच्या सुरूवातीस ते भारतात परतले आणि बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आय.आय.एस.सी.) मध्ये रुजू झाले. तिथे ते सी.व्ही रमण ह्यांच्या देखरेखीखाली विश्वकिरणांवर संशोधन करू लागले. “टाईम डिस्ट्रिब्यूशन ऑफ कॉस्मिक रेज” हा त्यांचा पहिला शोधनिबंध त्यांनी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या प्रोसिडिंग्जमध्ये प्रकाशित केला. १९४० ते १९४५ दरम्यानच्या साराभाईंच्या विश्वकिरणांवरील कामात विश्वकिरणांच्या कालसापेक्ष बदलांवर गायगर-मुल्लर गणकांच्या साहाय्याने बंगळुरू येथे आणि काश्मीरी हिमालयातील उच्चस्तरीय स्थानांवर केलेला अभ्यासही समाविष्ट आहे. युद्धसमाप्तीनंतर त्यांचा विश्वकिरण भौतिकशास्त्रातील पी.एच.डी.चा अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते केंब्रीजला परतले. १९४७ मध्ये त्यांना केंब्रीज विद्यापीठाकडून त्यांच्या, “कॉस्मिक रे इन्व्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्यूडस” ह्या शोधनिबंधाकरता, पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. युरेनियम-२३८ च्या, ६२ लाख विजकव्होल्ट ऊर्जेच्या गॅमा किरणांच्या साहाय्याने केलेल्या, प्रकाशकीय विदलनाच्या छेदाचे अचूक मापनही, त्यांनी पी.एच.डी. शोधनिबंधाचा एक भाग म्हणून पूर्ण केले होते. पी.एच.डी. मिळाल्यानंतर ते भारतात परतले आणि आपले विश्वकिरण भौतिकशास्त्रातील संशोधन पुढे सुरू केले. भारतात त्यांनी आंतरग्रहीय अवकाशांचा अभ्यास केला. सौर-अवकाशीय संबंधांचा आणि भूचुंबकीय शक्तींचाही अभ्यास केला.

साराभाई एक थोर संस्था संघटक होते. त्यांनी विविध क्षेत्रातील मोठ्या संख्येतील संस्था एकतर स्वतःच उभारल्या आहेत किंवा त्या उभारण्यास हातभार लावलेला आहे. साराभाईंनी ज्या संस्था उभारण्यास हातभार लावले त्यातील पहिली संस्था होती, अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशन (ए.टी.आय.आर.ए.). विश्वकिरण भौतिकशास्त्रातील पी.एच.डी.चा अभ्यास पूर्ण करून केंब्रीजहून परतल्यावर लगेचच त्यांनी हे काम पत्करलेले होते. वस्त्रोद्योग तंत्रज्ञानातील कुठलेली औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेले नव्हते. ए.टी.आय.आर.ए.ची स्थापना ही भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाची पायरी होती. त्या काळी बहुसंख्य कापड गिरण्यांत गुणवत्ता दर्जा नियंत्रणाची कुठलीच तंत्रे वापरली जात नसत. ए.टी.आय.आर.ए. मध्ये साराभाईंनी असे वातावरण निर्माण केले की, निरनिराळ्या शाखांतील, निरनिराळ्या गटांत परस्पर विचारविनिमय होऊ शकेल, ज्यामुळे नव्या संकल्पनांचा उदय होऊ शकेल. साराभाईंनी निर्माण केलेल्या आणि सांभाळलेल्या विविध संस्थाना परस्परांच्या अनुभवांचा आणि तंत्रांचा लाभ मिळत असे. साराभाईंनी निर्माण केलेल्या त्यातील सर्वात प्रसिद्ध अशा काही संस्था पुढीलप्रमाणे आहेत.

१. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पी.आर.एल.), अहमदाबाद
२. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय.आय.एम.), अहमदाबाद
३. कम्युनिटी सायन्स सेंटर, अहमदाबाद
४. दर्पण अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस, अहमदाबाद
५. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थिरुवनंतपुरम्‌
६. स्पेस अप्लिकेशन्स सेंटर, अहमदाबाद
७. फास्ट ब्रीडर टेस्ट रिऍक्टर (एफ.बी.टी.आर.), कलपक्कम
८. व्हेरायबल एनर्जी सायक्लॉट्रॉन प्रोजेक्ट, कलकत्ता
९. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ई.सी.आय.एल.), हैदराबाद
१०. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (यू.सी.आय.एल.), जादुगुडा, बिहार

जानेवारी १९६६ मध्ये होमी भाभा ह्यांचा मृत्यू झाल्यानंतर साराभाईंना अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्त करण्यात आली. त्या वेळी ते प्रामुख्याने तीन क्षेत्रांत कार्यरत होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, “सध्या मी तीन क्षेत्रांतील मूलभूत जबाबदार्‍या सांभाळत आहे. पहिली म्हणजे, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचा संचालक म्हणून आणि विश्वकिरण भौतिकीचा प्राध्यापक म्हणून. इथे मी माझे संशोधनही पूर्ण करत आहे आणि पी.एच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करत आहे. दुसरी म्हणजे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च प्रोग्रॅमचा अध्यक्ष, तसेच प्रोजेक्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रॉकेटस अँड स्पेस टेक्नॉलॉजीचा प्रमुख म्हणून. तिसरी म्हणजे, विशेषतः रसायने आणि औषधनिर्मितीभोवती केंद्रित असलेल्या, आमच्या कुटुंबाच्या व्यापार क्षेत्रातील स्वारस्याच्या लक्षणीय भागाची धोरणनिर्मिती, संचालन, संशोधन नियोजन आणि मूल्यांकन.” अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या लॅबोरेटरी ऑफ न्युक्लिअर सायन्सेसशीही त्यांचे नियमीत स्वरूपाचे संबंध होते. असे असूनही देशाच्या स्वारस्याखातर साराभाईंना, कोणतीही नवी जबाबदारी हाती घेण्यापासून काहीही परावृत्त करू शकत नव्हते. त्याकरता त्यांना कौटुंबिक व्यवसायांपासून स्वतःस दूर करून घ्यावे लागले. भारतातील अणुऊर्जा आणि अवकाशसंशोधन कार्यक्रम ह्या दोन्हींच्याही प्रमुखपदी तेच होते. मे १९६६ पासून तर त्यांचा मृत्यू होईपर्यंत हे असेच चालत राहिले.

अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञानातील अंगभूत प्रचंड सामर्थ्य-संभावनांची त्यांना जाण होती. विस्तृत पल्ल्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासकार्यांत त्यांचा उपयोग होण्यासारखा होता. अशा विकासाकरता संचार, मापनशास्त्र, हवामानाचे अंदाजशास्त्र आणि नैसर्गिक संसाधनांचे दोहन अशा क्षेत्रांची नावे घेता येतील. साराभाईंनी निर्माण केलेल्या अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीने, अवकाश शास्त्रातील संशोधनात आणि पुढे जाऊन अवकाश तंत्रज्ञानात पुढाकार घेतला. साराभाईंनी देशातील प्रक्षेपण तंत्रज्ञानाचेही नेतृत्व केले. भारतातील उपग्रहाद्वारे दूरदर्शन प्रसाराच्या विकासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

भारतातील औषधनिर्मिती क्षेत्रातील पायाभरणीचे कार्यही साराभाईंनीच केलेले आहे. कोणत्याही किंमतीत सर्वोच्च गुणवत्ता मानांकने प्रस्थापित करावी आणि सांभाळावी लागतील, ह्याची जाण असलेल्या औषधनिर्मिती क्षेत्रातील पहिल्या काही तज्ञांतीलच ते एक तज्ञ होते. विजकीय विदा प्रक्रियण आणि संचालन-संशोधन तंत्रे औषधनिर्मिती क्षेत्रात वापरणारेही ते पहिलेच होते. भारतातील औषधनिर्मिती क्षेत्रास स्वावलंबी करण्यास आणि स्वदेशात स्वतःच अनेक औषधे व उपस्करांची निर्मिती सुरू करण्यात त्यांची कळीची भूमिका होती.

साराभाईंची सांस्कृतिक स्वारस्ये सखोल होती. त्यांना संगीतात, प्रकाशचित्रणात, पुरातत्त्व शास्त्रात आणि विशुद्ध कलांतही रस होता. पत्नी मृणालिनी ह्यांच्यासोबत मिळून त्यांनी दर्पण अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस, अहमदाबाद; ही प्रकटीकरणकलांना वाहिलेली संस्था स्थापन केली होती.

शास्त्रज्ञांनी स्वतःला हस्तिदंती मनोर्‍यांत बांधून घेऊ नये, केवळ शुद्ध वैज्ञानिक शैक्षणिक उद्दिष्टांत हरवून जाऊन, समाजासमोरील समस्यांकडे डोळेझाक करू नये, असे त्यांना वाटत असे. देशातील विज्ञानशिक्षणाच्या अवस्थेबाबत त्यांना गहिरी चिंता वाटे. त्यात सुधार घडवण्याकरता त्यांनी सामुदायिक विज्ञान केंद्राची स्थापना केली.

एखाद्याशी केवळ काही मिनिटेच बोलून त्याची गुणवत्ता जाणून घेण्याची विलक्षण हातोटी त्यांना साधली होती. वस्तुतः ते अनेकदा असेही म्हणत असत की, व्यक्तीच्या डोळ्यातील चमक पाहूनच ते तिला जोखू शकत असत. प्रणालीबद्ध प्रयत्नांनी व्यक्तिविकास घडवण्यावर त्यांचा विश्वास होता. प्रसंगी चाकोरीबाहेर जाऊनही, ते एखाद्यास विकासाची पूर्ण संधी मिळवून देत असत. त्यांचे व्यक्तित्व प्रसन्न होते. त्यांच्यासोबत काम करणार्‍यांना त्यांच्या केवळ स्मितातूनही प्रेरणा प्राप्त होत असे.

साराभाई ३० डिसेंबर १९७१ रोजी कोवलम्‌, थिरुवनंतपुरम्‌, केरळ येथे निवर्तले. १९७४ मध्ये इंटरनॅशनल ऍट्रॉनॉमिकल युनिअन, सिडनी ह्यांनी साराभाईंच्या सन्मानार्थ असा निर्णय घेतला की, चंद्रावरील ’सी ऑफ सेरेनिटी’ मधील बेसेल विवरास, ’साराभाई विवर’ म्हणून ओळखले जावे.
.
संदर्भः https://vigyanprasar.gov.in/vikram-sarabhai/
——————————

Sarabhai family

लेखक – Madhav Vidwans

अंतराळ संशोधनात बजावलेल्या मोलाच्या कामगिरीसाठी इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियनतर्फे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार ठरलेल्या अश्या डॉ. विक्रम साराभाई यांची आज जयंती १२ ऑगस्ट १९१९.
डॉ. विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमानंतरच १९६९ साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) स्थापना झाली.आईआईएम अहमदाबाद च्या स्थापनेतही डॉ. विक्रम साराभाई यांची मुख्य भूमिका होती.होमी भाभा यांच्या मृत्यु नंतर ते १९६६ मध्ये परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनले.अनेक आंतर्राष्ट्रीय संस्थांची अध्यक्षपदे त्यांच्याकडे होती.अवकाश संशोधना बरोबरच त्यांनी टेक्स्टटाईल,फार्मासिटिकल,अणुऊर्जा,कला या क्षेत्रात ही विशेष कामगिरी केली आहे .त्यांनी स्थापन केलेल्या ATIRA (Ahmedabad Textile Industry’s Research Association) ने आधुनिक वस्त्रोद्योगाचा पाया रचला.फार्मासिटिकल उद्योगात सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग आणि रिसर्च टेक्निकचा वापर त्यांनीच केला.Electronics Corporation of India Limited (ECIL),Uranium Corporation of India Limited (UCIL)अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली.
१९७५ डॉ. विक्रम साराभाई यांनी इंग्लंडच्या प्रयोगशाळेत संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ .वसंत गोवारीकर यांना भारताच्या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन करून भारतात आणलं होतं .”ब्रिटनप्रमाणे वातानुकुलित लॅब्ज आणि ऑफिससारख्या सोयी आम्ही देऊ शकणार नाही, पण बसायला एक टेबल, खुर्ची आणि एक कपाट नक्कीच देऊ शकतो”, असं म्हणून डॉ. साराभाईंनी देशापुढील आव्हानही स्पष्ट केलं होतं, कारण त्यावेळी संशोधनासाठी विशेष बजेट वगैरे नव्हते. डॉ. विक्रम साराभाई यांनी शास्त्रज्ञांना स्वप्न दाखवलं, नवी दिशा दिली.खंबीर नेतृत्व हाही त्यांचा एक व्यक्तिविशेष.
डॉ. अब्दुल कलाम यांनीही आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात साराभाई यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले आहे.ते स्वप्न पाहायचे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्या साठी हवी ती मेहनतही घ्यायचे.त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य त्यांच्या सह्काऱ्यांसाठी नेहमीच एक प्रेरणा स्रोत म्हणून राहिल होतं.त्यांनी त्यांच्या सहकार्यांना एक वेगळी दृष्टी दिली होती.मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली गेली होती. आर्यभट्ट च्या सफल संक्षेपणा नंतर अनेक उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले गेले ज्यासाठी साराभाई यांची नेहमीच आठवण केली जाते.कारण या सगळ्या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टि आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली भारत सरकारचा पद्म भूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मा विभूषण हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आला.(अधिक माहिती साठी –दवबिंदू या ब्लॉग मधून )
– माधव विद्वांस


Articles received on E-mail 

A collection of Tweets made by Shri A. Sanatkumar. These were tweeted by a person with Twitter Handle “Lone Wolf Ratnakar‏ @GabbarSanghi”.

Today’s Google Doodle in honor of Dr. Vikram Sarabhai on occasion of his 100th Jayanti, founder of India’s space program, man behind ISRO, one of the greatest Indian scientists of modern era,who set up a chain of institutions all over India, including IIM-A.
Vikram 1

It would not be an exaggeration to say modern Ahmedabad owes a lot to Vikram Sarabhai. Some of the most iconic institutions there, IIM, Darpana, Sarabhai Community Science Center, ORG, Physical Research Lab were all set up by him or a result of his vision.

Vikram Sarabhai was born on August 12, 1919, to Ambalal Sarabhai, a well known textile industrialist in Ahmedabad, and Sarala Devi. It was an auspicious day of Garuda Panchami. When the Sarabhais wanted to educate their children, they were not satisfied with existing schools.

And so they set up a school at home, hired some of the best teachers for both science and arts. Vikram as well as his 8 siblings were a big beneficiary of the home schooling, and up to matriculation they studied at home only.

With his father being an influential man, many famous people would visit the Sarabhai’s house in Ahmedabad, among them were Gurudev Rabindranath Tagore , J. Krishna Murthi, Motilal Nehru, Jawaharlal Nehru, Sarojini Naidu, Maulana Azad, C. F. Andrews, C. V. Raman.

And Mahatma Gandhi stayed in their home for some time while recovering from an illness. This interaction with such great minds, influenced Vikram’s thought process and character too. Like most other boys of his age, he loved to play, do tricks on the bicylce, was mischievous.

Vikram Sarabhai was absolutely brilliant at mathematics and science, and with his hard working nature, managed to be at the top of the class always. He went to Cambridge after completing his college education in India.

In 1939, Vikram passed the Tripos in Physics, considered to be one of the toughest exams then. On his return to India, he joined the Physics Department in IISc that was then headed by the renowned C.V.Raman. His counterpart was none other than Dr.Homi J Bhabha.

Bhabha at that time was doing research on Mesons and Cosmic Rays in IISc. Typically every substance on earth has 3 fundamental particles- the electrons (-ve charge), protons(+ve charge) and neutrons( neutral). However there is another class of particles in space the mesons.

And these mesons are formed by cosmic rays as per most scientific theories. Over 600 such cosmic rays pass through the human body every year, and they can penetrate the hardest rocks too. Vikram’s first scientific paper was on periodical variation of cosmic rays intensity.

This research helped him to study further on interplanetary space, relation between sun and earth and the magnetic phenomena on earth. It was during this time that Vikram got the idea of establishing a cosmic ray research institution in India.
Vikram3When he went to the Himalayas in Kashmir, 1943 for study of cosmic rays at high altitudes, he got the idea of establishing a research center at such a height. After the end of the 2nd World War, Vikram once again went to Cambridge in 1945 to continue his study on cosmic rays.

Vikram’s work on cosmic rays in Kashmir was at Apharwat, on the banks of Alpathari lake, a regular family outing spot very summer. Located at 13,000 feet above sea level, this is where he decided to set up a future research institute.

Vikram set up the Physical Research Laboratory at Ahmedabad in 1948, with Dr. K.R.Ramanathan as it’s first director. Starting off with just few students and some lab assistants, it soon grew into one of India’s premier institutions.

Even when he got busy in his later years, Vikram still maintained close contact with the institution he founded. Starting off as Professor, he later became the Director in 1965. It sponsored a cosmic ray research institute at Gulmarg in 1955.

And when DAE( Dept of Atomic Energy) established a full fledged high altitude research center in Gulmarg, his long standing dream became a reality. Later on similar such centers were opened in Kodaikanal and Thiruvananthapuram.

When Homi Jehangir Bhabha, was killed in an aircrash in 1966, many wondered who would take over AEC. It was a large void to be filled, however Vikram Sarabhai more than proved to be equal to the task, guiding India’s fledgling nuclear program in right direction.

One of Vikram Sarabhai’s greatest achievements would be in the foundation of ISRO, when he convinced the PM, Jawaharlal Nehru of the need for India’s own space program.

Aware that India did not have the resources to undertake something like a manned mission to the moon or to planets, he felt that space technology could be used for multiple applications like earth mapping, satellite TV, which were more relevant to Indian needs

INCOSPAR( Indian National Committe for Space Research) was set up in 1962 by Nehru on his reccomendation, and this eventually become ISRO in 1969.

There are some who question the relevance of space activities in a developing nation. To us, there is no ambiguity of purpose. We do not have the fantasy of competing with the economically advanced nations in the exploration of the Moon or manned space-flight. – Vikram Sarabhai

But we are convinced that if we are to play a meaningful role nationally, and in the community of nations, we must be second to none in the application of advanced technologies to the real problems of man and society.- Vikram Sarabhai, guy was a true visionary of his times.

Vikram got good support from Homi Bhabha to set up India’s first ever space station at Thumba near Thiruvananthapuram. Being very close to the Earth’s magnetic equator, it made it the ideal location for scientists to conduct atmospheric research.

Nov 21, 1963- The first rocket launch took place from Thumba, the efforts of Vikram Sarabhai had borne fruit. One of the members present at the launch was a certain APJ Abdul Kalam, who just started his career then, and was part of the original INCOSPAR

SITE or Satellite Instructional TV was once again the result of his interactions with NASA in 1966, to have such a program in India. The project for the first Indian satellite was started during Vikram’s time, and Aryabhatta in 1975 was due to his efforts again.

Vikram Sarabhai’s legacy was vast, IIM Ahmedabad was the result of his dream to have a world class management institute in India. The first market research organization in India, ORG was again founded by him.

He also set up the AITRA, to provide support and guidance to Ahmedabad’s booming textile industry. Sarabhai Community Science Center in Ahmedabad was set up by him to popularize science education.

It was not just the sciences, along with his wife Mrinalini he founded Darpana Academy of Performing Arts to promote culture, along with an association to help the Blind people.

Other institutions founded by Dr. Vikram Sarabhai- Faster Breeder Test Reactor in Kalpakam Variable Energy Cyclotron Project in Kolkata Uranium Corporation of India Ltd in Jharsuguda, Jharkhand.

Vikram was pretty much a hands on person, could often be seen at late hours in the lab working on solutions. As a teacher, he believed in being a guide to the students, engaging in continous discussion with them on their research, encouraging them.

As a human being Vikram Sarabhai was a gem of a person, down to earth, humble. He believed in using science as a tool for India’s development and progress after independence, and his thoughts were always in that direction.

Inspite of his busy schedule, Vikram Sarabhai devoted equal time to his family, and also his family’s industrial group. He would often take time out to listen to every one, and people would often pour out their woes to him.

“In our vast land people come from many backgrounds. Not every one is lucky enough to have the education we have. So, we have to listen to everything they say to understand what is in their mind.”- Vikram Sarabhai, he was some one who respected every person.

He treated every one as his equal without any class distinction, helped others in need. His belief was simple, every person in the world is worthy of respect irrespective of their class or status. Vikram Sarabhai was truly a man of simple living and high thinking.

On Dec 30, 1971 Vikram Sarabhai passed away at Kovalam,of a sudden heart attack, on one of his visits to Thumba. One of the greatest scientists of modern India was no more, and yet the legacy he left behind- ISRO, IIM would ensure he would never be forgotten.
Vikram 2

Vikram Sarabhai’s statement on India’s space program, and his vision for the future. Such wonderful clarity of thought and purpose, and it should answer many nay sayers too.

People like Dr. Vikram Sarabhai do not come so easily. His legacy will live on forever with us, through ISRO, IIM-A. A scientist with a love for fine arts. On his 100th Jayanti, take time to pay a silent tribute to a gem of a human being. #Naman

One of the reasons for ISRO’s success, was the first 3 men behind it, Vikram Sarabhai, Satish Dhawan and UR Rao. One laid the foundation, the other 2 built upon it, and took it to great heights. India will forever be grateful to these 3 men
————————————————————————-

Ashok Malhotra

Yes, we must celebrate the legacy of Sh Vikram Sarabhai, who suddenly died young at just 52 yrs of age on Dec 30, 1971 when the Bangladesh liberation War was still on, remembering his contributions, mainly as (copied):

His Legacy
The Vikram Sarabhai Space Centre, (VSSC), which is the Indian Space Research Organization’s lead facility for launch vehicle development located in Thiruvananthapuram (Trivandrum), capital of Kerala state, is named in his memory.
Along with other Ahmedabad-based industrialists, he played a major role in setting up of the Indian Institute of Management, Ahmedabad.
Indian Postal Department released a commemorative Postal Stamp On his first death anniversary (30 December 1972)

Vikram_Sarabhai_1972_stamp_of_India
In 1973, the International Astronomical Union decided that a lunar crater, Bessel A, in the Sea of Serenity will be known as the Sarabhai crater.
The lander on India’s moon mission Chandrayaan II is named Vikram in his honor which will finally land near South Pole of the moon on Sep 7, 2019.
A unique educational institute for community has been named as Vikram A Sarabhai Community Science Centre (VASCSC)(https://www.vascsc.org/) located at Ahmedabad, Gujarat. Vikram Sarabhai established this institute around 1960s. VASCSC is a premier institute of science and mathematics education where learning is fun and joyful. School students enjoy learning basic concepts of science and mathematics by doing various exciting activities and creating models.”

आद्य मराठी उद्योजक स्व.लक्ष्मणराव किर्लोस्कर

Laxmanrao k

kirloskar-6-inmarathi-495x370

हा लेख श्री.माधव विद्वांस यांनी १४ विद्या ६४ कला या स्थळाच्या फेसबुक पानावर दिला होता. या सर्वांचे मनःपूर्वक आभार

‎Madhav Vidwans‎ -14vidya_64kala

*सायकल दुरुस्तीचे दुकान ते शेतीसाठी लोखंडी नांगर कारखाना काढून किर्लोस्कर उद्योगसमुहाची स्थापना करणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांची पुण्यतिथी
लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर (२० जून १८६९-२६ सप्टेंबर १९५६) हे किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक, जन्म गुर्लहोसूर येथे. धारवाड व कलादगी येथे प्राथमिक शिक्षण. अठराव्या वर्षी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचा अभ्यास पूणे केला. पुढे व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम चित्रकला-शिक्षक व नंतर बाष्प-अभियांत्रिकीचे अध्यापक. १८९७ मध्ये ते मुंबई सोडून बेळगावला आले. थोरल्या भावाच्या मदतीने त्यांनी सायकल, पवनचक्की, कडवा कापणीयंत्र, लोखंडी नांगर वगैरे वस्तूंच्या उत्पादनास प्रारंभ केला. १९१० साली औंध संस्थानाधिपतींकडून सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्याने लक्ष्मणरावांनी कुंडलच्या निर्जन व निर्जल माळावर `किर्लोस्कर ब्रदर्स’ या नावाने कारखाना उभारला व किर्लोस्करवाडीच्या वसाहतीस प्रारंभ केला. हया कारखान्यातून लोखंडी नांगर, चरक, मोटा, रहाट वगैरे कृषिअवजारांचे उत्पादन सुरू झाले. भांडवल करण्यात आले. तीमध्ये विविध प्रकारचे हात पंप, लहानमोठे यांत्रिक पंप, घरगुती लोखंडी फर्निचर, लेथ इत्यादींचे उत्पादन होऊ लागले.

१९३४-३८ मध्ये लक्ष्मणराव औंध संस्थानचे दिवाण होते. १९४५ मध्ये ते कारखान्याच्या संचालकपदावरून निवृत्त झाले. १९५३ साली प्रथमच `मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍंड इंडस्ट्रीज’चे सन्माननीय सदस्यत्व लक्ष्मणरावांना देण्यात आले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे निधन झाले.

औद्योगिक कारखाने चालविण्याचे व्यावसायिक शिक्षण घेतलेले नसताही लक्ष्मणरावांनी सर्व गोष्टी अतिशय परिश्रमाने साध्य केल्या. त्यांना वाचनाचा अतिशय नाद होता. विश्वासू व कर्तबगार सहकारी निर्माण करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. लक्ष्मणरावांच्या यशाचे रहस्य म्हणजे ग्राहकांच्या गरजांची पूर्वजाणीव आणि वस्तूच्या उत्कृष्ट गुणवर्त्तेचा आग्रह. कणखर शिस्त, पद्धतशीर काम, जगभर आपला माल लोकप्रिय करण्याची तीव्र आकांक्षा, हे त्यांचे वर्तनसूत्र होते. किर्लोस्करवाडीची रचना करताना `कॅउबरी’ किंवा `नॅशनल कॅश रजिस्टर’ ह्या सुविख्यात पश्चिमी कंपन्यांनी बांधलेल्या औद्योगिक वसाहती त्यांच्या नजरेसमोर होत्या. कारखान्याचे स्वतःचे एखादे मासिक असावे, हीही त्यांची एक आधुनिक कल्पना होती. १९६९ साली भारत सरकारने लक्ष्मणरावांची जन्मशताब्दी देशभर साजरी केली; त्या निमित्ताने टपाल खात्याने वीस पैशांचे एक तिकिटही काढले.”
———————