शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्। असे उपनिषदांतले एक वचन आहे. शरीराचे उत्तम आरोग्य राखणे हे धर्माचरणासाठी पहिले साधन आहे. तो सुखी आयुष्याचा मूलमंत्र आहे वगैरे वगैरे सांगायची गरजच नसते. उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी जे उपाय सांगितले जातात त्यात योगसाधनेवर भर दिला जातो. हे बाळकडू लहानपणापासूनच मिळत गेले असल्यामुळे ते अंगात भिनले होते. पण नोकरीला लागल्यावर योगीसने करण्यासाठी वेळच मिळत नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले होते.
जवळजवळ वीस वर्षांपूर्वी आस्था नावाच्या चॅनेलवर योगशास्त्राविषयीचा एक कार्यक्रम सुरू झाला आणि अल्पावधीत त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्या कार्यक्रमात योगासने आणि प्राणायाम वगैरे दाखवत असत. मी अशा प्रकारचे इतर अनेक कार्यक्रम ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शनच्या काळापासून अधून मधून पाहिले होते. त्यातले काही सुमार तर काही उत्तम असत पण “ज्यांना अमके अमके व्याधीविकार आहेत किंवा ज्यांचे वय इतक्याहून जास्त आहेत अशा लोकांनी यातली आसने करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.” असा इशारा अखेरीस दिला असल्यामुळे मला त्यातले काही करून पाहण्याचे धाडस होत नसे. पण आस्थावरल्या या कार्यक्रमात अशी भीती घातली जात नव्हती. माझे काही सहकारी आणि नातेवाईकसुद्धा तो कार्यक्रम पाहून त्याचे चाहते झाले. आमच्या घरी रहायला आलेल्या एका पाहुण्याने भल्या पहाटे उठून टीव्हीवरला तो कार्यक्रम सुरू केला त्या वेळेस आस्था या चॅनेलवरचा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहिला आणि बाबा रामदेव हे नावही मी पहिल्यांदा या कार्यक्रमामुळेच ऐकले.
साधू सत्पुरुषाचा वेश धारण केलेले बाबा ज्या प्रकारची कॉम्प्लेक्स आसने करून दाखवत होते ते कौतुक करण्यासारखे होते. विशेषतः पोटातल्या निरनिराळ्या स्नायूंना ओढून ताणून किंवा फुगवून ते जी काय करामत दाखवत होते ते पाहून माझ्या पोटात गोळा उठत असे. आपल्या पोटात इतके वेगवेगळे स्नायू आहेत तरी की नाही याचीच मला शंका वाटायला लागली होती कारण तिथे जे कोणते स्नायू होते ते चरबीच्या पडद्याच्या आत दडून त्यांचा एकच गोलघुमट झालेला दिसायचा. रामदेव बाबांची वाणी त्यांनी दाखवलेल्या योगासनांपेक्षाही जबरदस्त होती. “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती उपकारे।।” या संतवाणीचे जीवंत उदाहरणच आपण सादर करीत आहोत असा आव ते आणत होते. त्यांच्या सांगण्यात अचाट आत्मविश्वास होता. भसाभसा उछ्वास टाकत कपालभाती प्राणायाम दाखवतांना “साँस बाहर फेकते समय उसके साथ अपने शरीरमेसे सभी रोगोंको और रोगजंतुओंको बाहर फेक दो। जल्दही सभी बीमारियोंसे मुक्त हो जाओगे।” अशा प्रकारची त्यांनी केलेली फेकाफेक ऐकल्यानंतर तो कार्यक्रम पुन्हा पहाण्याची गरज नाही असे मी माझ्यापुरते ठरवले होते. पण इतर लोकांवर बाबांची जबरदस्त मोहिनी पडतच होती. त्यांचे टीव्हीवरले कार्यक्रम कमी होते की काय, लोकांनी त्याच्या सीडी आणल्या आणि त्या पाहणे सुरू केले. निरनिराळ्या शहरांमध्ये मोठ्या मैदानांवर त्यांची योगसाधनेची भव्य शिबिरे भरत आणि हजारो लोक त्यात भाग घेऊ लागले. योगाचे महत्व मला पटलेले असल्यामुळे मी सुद्धा जरी त्यांच्या शिबिराला गेलो नाही तरी त्यांच्या एका शाखेच्या रोज होणाऱ्या योगाभ्यासाची थोडी सुरुवात केली. त्या दिवसापासून गेली सातआठ वर्षे मी नियमितपणे रोज सकाळी तासभर योगिक व्यायाम आणि प्राणायाम करत आहे आणि त्यामुळे माझी पचनशक्ती व रोगप्रतिकारशक्ती तरी नक्कीच वाढली आहे असे मला वाटत आले आहे.
माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर ज्या नवनवीन कल्पनांचा प्रसार केला त्यात प्राचीन भारतीय योगशास्त्राचा जाहीर प्रचार आणि प्रसार केला. इतका की २१ जून हा जागतिक योगदिवस साजरा करायची सुरुवात केली. काल आणि यापूर्वी होऊन गेलेल्या जागतिक योगदिनांनिमित्य मिळालेल्या काही रचना आणि चित्रे खाली संग्रहित केली आहेत.
२१-०६-२०१९ आज के योग दिन के उपलक्ष्य में योग की परिभाषा (१) पातञ्जल योग दर्शन के अनुसार – योगश्चित्तवृत्त निरोधः अर्थात् चित्त की वृत्तियों का निरोध ही योग है। (२) सांख्य दर्शन के अनुसार – पुरुषप्रकृत्योर्वियोगेपि योगइत्यमिधीयते। अर्थात् पुरुष एवं प्रकृति के पार्थक्य को स्थापित कर पुरुष का स्व स्वरूप में अवस्थित होना ही योग है। (३) विष्णुपुराण के अनुसार – योगः संयोग इत्युक्तः जीवात्म परमात्मने अर्थात् जीवात्मा तथा परमात्मा का पूर्णतया मिलन ही योग है। (४) भगवद्गीता के अनुसार – सिद्धासिद्धयो समोभूत्वा समत्वं योग उच्चते (2/48) अर्थात् दुःख-सुख, लाभ-अलाभ, शत्रु-मित्र, शीत और उष्ण आदि द्वन्दों में सर्वत्र समभाव रखना योग है। (५) भगवद्गीता के अनुसार – तस्माद्दयोगाययुज्यस्व योगः कर्मसु कौशलम् अर्थात् कर्त्तव्य कर्म बन्धक न हो, इसलिए निष्काम भावना से अनुप्रेरित होकर कर्त्तव्य करने का कौशल योग है। (६) आचार्य हरिभद्र के अनुसार – मोक्खेण जोयणाओ सव्वो वि धम्म ववहारो जोगो मोक्ष से जोड़ने वाले सभी व्यवहार योग है। (७) बौद्ध धर्म के अनुसार – कुशल चितैकग्गता योगः अर्थात् कुशल चित्त की एकाग्रता योग है।
विकिपीडिया से
२१-०६-२०१६ आज आंतरराष्ट्रीय योग दिवसके उपलक्ष्य पर मेरी एक छोटीसी रचना प्रस्तुत करता हूँ। सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये, योगासन करे, साधना करे, काहे घबराये, काहे घबराये ।। योगासन कर तनसे, ध्यानसाधना मनसे, सर पे गुरू का हाथ रहे तो गयी मुष्किले झटसे । सुन सुन सुन, अरे यारा सुन, योग ध्यानमे बडे बडे गुन, लाख दुखों की एक दवा है, चाहे आजमाये, काहे घबराये, काहे घबराये ।।
२१-०६-२०२० आजचा दिवस योगायोगांचा आहे. आज समर सोलस्टाइस म्हणजे या वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. आजच दुर्मिळ असे कंकणाकृति सूर्यग्रहण आहे आणि फादर्स डेही येतो. सर्वांना हा दिवस आनंदाचा जावो आणि अधिक चांगल्या सुखसमृद्ध जीवनाचा शुभारंभ ठरो अशा शुभेच्छा.
आजपासून ५७ वर्षापूर्वीचा म्हणजे २१ जून १९६३ चा दिवस माझ्या चांगला लक्षात राहिला आहे. तेंव्हा मी नुकताच इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रहायला गेलो होतो. नवीन मित्रांशी ओळखी होत होत्या. त्या दिवशी सकाळी आम्ही चार पाच मित्र मिळून जवळच्या उडुपी हॉटेलमध्ये गेलो, सर्वांनी आपापल्या आवडीनुसार इडल्या, वडे, दोसे, उत्तप्पे वगैरे खाल्ले. तृप्त होऊन बाहेर आलो तेंव्हा रस्त्यावरची बरीच मुले आणि माणसे आकाशात काहीतरी बघत असतांना दिसली. आम्हीही पाहिले तेंव्हा तिथे सूर्यग्रहण लागलेले दिसले. त्यापूर्वी मी घरी रहात असतांना मला कधीच ग्रहण लागलेले असतांना काही खाऊ पिऊ दिलेले नव्हते. त्या दिवशी नकळत हा नियम मोडला गेल्याचे लक्षात आल्यावर आधी तर भीतीने माझ्या पोटात गोळाच उठला होता, पण आपल्यासोबत आणखीही बरेच लोक असल्याचे पाहून धीर आला. दिवसभरात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंतही कुणालाच काहीही अपाय झाला नाही हे पाहून मी निर्धास्त झालो. ग्रहण हा एक सावल्यांचा खेळ आहे हे शाळेत शिकवले गेले असले तरी ते कळले होते, पण वळायचे बाकी होते. आज ग्रहण लागलेले असतांना दुपारचे सुग्रास जेवण करतांना तो प्रसंग आठवला. त्या दिवसानंतर आतापर्यंतच्या काळात शंभरावर ग्रहणे लागून आणि सुटून गेली असतील, पण मी कधीच त्या काळात खाणेपिणे वर्ज्य केले नव्हते.
दर एकोणीस वर्षांनी तिथी आणि तारीख यांची पुनरावृत्ती होत असते हे मला माहीत आहे, पण तो दिवस अमावास्येचा आणि ग्रहणाचा असला तर सूर्यग्रहणाचीही पुनरावृत्ती होते की काय ? कोण जाणे !
२१-०६-२०२१ आज पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातला वर्षातला सर्वात मोठा दिवस. पुण्याला तो सुमारे सव्वा तेरा तासांचा असणार आहे. पण म्हणून तो सर्वात गरम असणार आहे का? पुण्यात तरी नाहीच. आज पहाटे छान गारवा होता आणि आता अकरा वाजायला आले तरी फारसे कडक ऊन पडलेले नाही, त्यामुळे दुपारीही अंगाची लाहीलाही वगैरे काही होणार नाही. कारण गेले दोन आठवडे तरी आभाळ ढगाळ आहे आणि अधून मधून पावसाच्या सरी येत आहेत. ढगामुळे सूर्याचे बरेचसे किरण वाटेतच अडवले जातात आणि जमीनीतल्या ओलाव्यामुळे ती फार तापत नाही. शिवाय सगळीकडे हिरवळही पसरली आहे ती डोळ्यांना थंडावा देते. कर्कवृत्तावरील वाळवंटांमध्ये मात्र आज दिवस मोठा असेल आणि शिवाय सूर्याचे किरण सरळ रेषेत येतील. त्यामुळे अशा प्रदेशात आजचा दिवस असह्य असण्याची शक्यता आहे. आज जागतिक योगदिवस आहे. हवामानही अनुकूल आहे. सर्वांनी सकाळी सकाळी उठून योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे केले असेलच. मीही थोडे करून घेतले.
21-06-2022
आज वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे, जागतिक योग दिवस आहे आणि संगीत दिवससुद्धा आहे.
आज सालभरका सबसे बडा दिन और जागतिक योगदिवस तो है ही, संगीतदिन भी है। उस उपलक्षमे एक रचना वॉट्सॅपसे ……
📯🎼🎵🎶🎷🎸🎹🎺🎻🥁🎷🎶🎵 मैंने गुरुदेवजी से पूछाँ की 🎵🎶 सारे गम 🎷🥁 कैसे दूर होंगे ?
उन्होंने कहा – बेटा 🎻🎺 सा रे ग म 🎺🎹 से ही सारे गम मिट सकते है..तू 🎸🎼 मनि मनि📯🎼 करके पैसे के पिछे मत भाग 🎹🎺 म नि 🎻🥁 करके मन में खुद का 📯🎼 म ध 📯🎼 ढूंढ ले सुरों को ही अपना 🎵🎶 ध नि 📯🥁 बना ले फिर देख
🎻🎺 सा रे ध नि 🎷🎶 तेरे पास आयेंगे..
🎶🎷 सा रे ग म 🎺🎸 मिट जाएंगे..दुःख से 🎷🥁 प रे 🎷🎶 हो जाओगे..
प्रभू का 🥁🎺 सा नि ध 🎹🎼 मिल जाएगा..
🎷🎺 ग म के 🎻🎺🎹 🥁 सा रे सा प 🎷 📯🥁 म रे 🥁🎻🎺 हुए दिखेंगे..
🎷🎼 नि रे 📯🎻 मन के 📯🎷 ध नि 🎻🎹 हो जाओगे.. 🎵🎶🎷 अपूर्व 📯🎼🎸 जीवन संगित🎵🎶🎷🥁 गूंज उठेगा…
🌹🍁🍀🌹
अंतर्राष्ट्रीय योग दिवस
योग भगाए रोग खुशी जीवन में मिलती संयमित होता जीव योग से शांति मिलती।
ध्यान से मिलता ज्ञान योग से आती शक्ति सेहत,नीयत ठीक हमेशा रहती सबकी।
जीने का सही तरीका हमको योग सिखाता ज्ञान से ये विज्ञान की ओर हमें ले जाता।
योग हमारी जान योग है शान हमारी योग से ही तो विश्व में है पहचान हमारी।
योग संजीवन बूंटी है हम सबको करना होगा ऋषि,मुनियों की परंपरा को जीवित रखना होगा।,,,, गोपी साजन
दक्षिणायन
आजच दक्षिणायनाला सुरुवात होत आहे.
आज२१जूनवर्षातीलमोठादिवस
सूर्याचे_उत्तरायण पूर्ण होऊन उद्यापासून सूर्य दक्षिणेस प्रवास सुरू करेल त्याबाबत मराठी विश्वकोश मधील माहिती*
दक्षिणायन : क्रांतिवृत्त (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीचा मार्ग) खगोलीय विषुववृत्ताला छेदत असल्याने सूर्य विषुववृत्ताच्या कधी उत्तरेस तर कधी दक्षिणेस असतो. सूर्याचे उत्तरेकडे सरकणे २२ जूनला संपते. या दिवशी सूर्य विषुववृत्तापासून उत्तरेस जास्तीत जास्त दूर म्हणजे उत्तर संस्तंभी (विष्टंभी) असतो. या क्षणी सूर्याची क्रांती [⟶क्राति-१] विषुववृत्तापासून जास्तीत जास्त (सु. २३·१/२°) असते. यानंतर सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे सुरू होते. सूर्याच्या या दक्षिणेकडे सरकण्याला दक्षिणायन म्हणतात. हे सरकणे २२ डिसेंबरपर्यंत म्हणजे सूर्य दक्षिण संस्तंभी (अवष्टंभी) येईपर्यंत चालू असते म्हणून सायन कर्कसंक्रांतीपासून ते सायन मकरसंक्रांतीपर्यंतचा काळ दक्षिणायनाचा होय. दक्षिणायनामध्ये एखाद्या विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी सूर्य ज्या स्थानी उगवतो त्याच्या अधिक दक्षिणेला तो त्यानंतरच्या दिवशी उगवतो. दक्षिण गोलार्धात या काळात दिवस मोठामोठा व रात्र लहानलहान होत जाते, तर उत्तर गोलार्धात दिवस लहानलहान व रात्र मोठीमोठी होत जाते. संपातबिंदूंना वर्षाला सु. ५० विकला उलट गती असल्याने दक्षिणायनाचा काळही मागेमागे सरकत असतो [⟶ संपातचलन]. हल्ली आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीस दक्षिणायन सुरू होते. हिंदूंमध्ये दक्षिणायनाला धार्मिक दृष्ट्या कमी लेखलेले आहे. यात देव झोपलेले असतात. उत्तरायणात मृत्यू यावा म्हणून ते लागेपर्यंत भीष्म शरपंजरी पडले होते, अशी कथा आहे. सध्या साधारणपणे आषाढ ते पौष हा काळ दक्षिणायनाचा असतो.
‘उदरभरण’ म्हणजे जीवंत राहण्यासाठी अन्न अत्यंत आवश्यक असते म्हणून ते पोटात ढकलणे असे वाटते. त्याच्या जोडीला श्रीहरीचे नाम घेतले की त्याला जाणिजे यज्ञकर्म असे म्हणून उच्च दर्जा दिला गेला आहे. पण जेवण म्हणजे फक्त पोट भरणेच नाही. खाणे हा सर्वांचाच अत्यंत आवडता विषय असतो. आवडलेला रुचकर पदार्थ मनसोक्त खाण्यामधून जी तृप्ती मिळते ती अवर्णनीय असते. त्याचा समावेश मी खाद्यंतीमध्ये करतो. अलीकडच्या काळातल्या वैद्यकीय शास्त्रामधल्या तज्ज्ञांनी खाण्यापिण्यावर खूप बंधने घालून ठेवली आहेत. एका बाजूला चांगले चुंगले पदार्थ खाण्याचे आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला ही बंधने यांचा तोल सावरत रहावे लागते. या विषयावरील काही मनोरंजक लेखांचे इथे संकलन केले आहे. यातले काही लेख मी पूर्वी प्रकाशित केलेले आहेत आणि काही नव्याने मिळालेले आहेत
१. हे नको, ते नको, मग खाणार तरी काय? २. पोळी आणि चपाती ३. क्या भात है!! ४. वडा पाव आख्यान ५. माझी चायनीज खाद्यंती ६. वदनी कवळ घेता! ७. दिवाळीतली खादाडी ८. खाद्य पदार्थांची नावेओळखा पाहू ९. चित्पावनी भोजन १०. पुरणपोळी ११. गुणकारी गूळ १२.पुणेरी ताट १३.आमरस १४. आपोषण १५. जेवण करण्यापूर्वी मंत्र उच्चारण
१. हे नको, ते नको, मग खाणार तरी काय?
अतिविशाल महिलांनो, सुटीत काय काय हादडाल? Have a great weekend ladies …
foodsfoods2
foods3
म्हणून मला तो पाठवावा लागला….. That’s why I had to pass this on – – …. मला धोका पत्करायचा नव्हता … – – – didn’t want to risk it – – – आणि तुमच्या ओठावर गोड स्मितहास्य आणायचे होते. And I wanted to put a smile on your face. दि. १२-६-२००९
२. पोळी आणि चपाती
मराठी भाषेत ‘पोळी’ व ‘चपाती’ हे पर्यायशब्द म्हणून जवळजवळ वापरले जातात. उच्चभ्रू समाजात ‘पोळी’ व तदितर समाजात ‘चपाती’ हा शब्द वापरला जातो असे ढोबळपणे म्हणता येते. ‘पोळी’ व ‘चपाती’ आणि ‘कालवण’ व ‘कोरड्यास’ या दोन शब्दजोड्यांत सामाजिक भेद तर आहेच; पण त्याचबरोबर भाषाकुळांचा भेदही आहे.
‘चपाती’ हा संस्कृत ‘चर्पट’चा तद्भव आहे; तर ‘पोळी’ हा खास द्राविड कुळातील शब्द आहे. तमीळमध्ये मराठीप्रमाणेच ‘पुरणपोळीगे’ असा शब्द आहे. तमीळ व हळेगन्नडमधील (प्राचीन कन्नडमधील) प वर्णाचा ‘व्हसागन्नड’ मध्ये (नूतन-कन्नड) ‘ह’ वर्ण होतो. पुरण>हुरण, पोळी-होळी, ‘पू’ (फूल) ‘हू’ इत्यादी. ‘पुराणपुष्पवल्ली’ म्हणजे ‘हळे-हुकबळी’ (जुनी हुबळी). त्यामुळेच मराठीत ‘होळी’ रे ‘होळी’ पुरणाची ‘पोळी’ असे शब्दांकन झाले आहे. ‘प’, ‘क’ व ‘य’ हे वर्णही एकमेकांची जागा घेतात. विशेषण भीषण: >विभीषण>बिभीषण:, कवि>कपि (विद्वत्कवय: कवय:, केवलकवयस्तु केवलं कपय: – सुभाषित), वंग>बंग इत्यादी. संस्कृत ‘चर्पट’ याचा मराठी पर्याय चप्पट – चापट – चपाती. कणकेची लाटी पोळपाटावर (पोळी+पाट) ठेवून लाटण्याने लाटली (म्हणजे चपटी केली) की ‘चपाती’ तयार होते. आद्य श्रीमद्शंकराचार्यांचे ‘भज गोविन्दम्’ हे स्तोत्र ‘चर्पटपञ्जरी’ (चर्पटपञ्चरी) म्हणूनही ओळखले जाते. ‘चपातीची चवडी’ असा त्याचा अर्थ आहे. खरे पाहता, मराठीतील ‘धम्मकलाडू’ (धम्म – धम्मिल्ल – गोलाकार केसांचा ‘अंबाडा’) सोडला तर ‘चापटपोळी’ची कूळकथा ही आहे.
आंग्ल भाषेतील Lady या शब्दाची ‘मूळ कथा’ अभ्यासली तर त्याचा अर्थ ‘पोळी लाटणारी’ असाच आहे. प्राचीन आंग्ल भाषेत hiaefdige असा शब्द आहे. त्याचा अर्थ, ‘गृहस्वामिनी’. Hiaf याचा मूळ अर्थ ‘loaf.’ जर्मन भाषेत मूळ अर्थ knead (कणिक तिंबणे). तो शब्दही dough आणि dairy या शब्दांशी नाते सुचवतो. ‘रांधा, वाढा’ यातून आंग्ल Lady ही सुटली नाही म्हणायची ! ती ‘loaf kneader’ पोळीसाठी कणिक तिंबणारी, पोळ्या करणारी बाईच राहिली. प्राचीन आंग्ल भाषेत Lady म्हणजे ‘bread-keeper’.
(मो.गो. धडफळे यांच्या ‘भाषा आणि जीवन’मधील मूळ लेखाधारे) . . . वॉट्सॅपवरून साभार
***********
३. क्या भात है!!
—आमटीभात… वरणभात… दहीभात… ताकभात… कालवणभात… पिठलंभात… केशरीभात… वगैरे सांप्रत काळात भारत देशात डाएट नावाच्या फॅडने किंवा स्टाईलने भात किंवा तांदूळ ह्या आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा पदार्थावर फार मोठी कुरघोडी करायला लावली आहे. विकेट किपिंग करताना जांभया दिल्याबद्दल पाकिस्तानी कॅप्टन सरफराज अहमद जितका बदनाम झालाय त्यापेक्षा काकणभर जास्तच बदनामी डाएट ह्या प्रकाराने भाताची केलेली आहे. आणि समस्त भारतीयांसाठी ही गोष्ट खचितच महान चिंतेची बाब आहे. भा र त ह्या शब्दाची व्युत्पत्तीच मुळात ‘भात जेवण्यात रत असलेल्या लोकांचा देश’ अशी व्हायला हवी होती आणि तेच जास्त संयुक्तिक झालं असतं नाही का. ज्या देशाच्या नावातच भात लपलेला आहे अशा लोकांनी भात सोडणे किंवा वजन वाढते म्हणून त्याला त्यागणे म्हणजे ऑस्ट्रेलियाने स्लेजिंगचा त्याग केल्यासारखं होईल. भारतीय माणसाने आमटी भाताला नाही म्हणणे म्हणजे आमटीभाताचा घोर अपमान, म्हणजे स्टीव्ह बकनरने सचिनला नॉट आऊट देण्यासारखं आहे. बकनरने सचिनला खोटं आऊट देऊन आपलं नाव राखावं आणि आपण आमटीभात जेवून आपलं. मी एक भारतीय आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि देशातल्या प्रांतागणीक विविधतेने नटलेल्या भाताच्या परंपरांचा मला अभिमान आहे. उत्तरेला काश्मीरी पुलाव पासून ते दक्षिणेकडील तामिळ रस्सम भाता पर्यंत, द्वारकेच्या गुज्जू कढी खिचडी पासून ते ओरिसा, बंगालच्या माछ भातापर्यंत, महाराष्ट्रातल्या केशरी भाता पासून ते हैदराबादेलतल्या बिर्याणी पर्यंत, कर्नाटकातल्या भिसीब्याळी अन्नम पासून ते लखनवी बिर्याणी पर्यंत भाताच्या सर्व परंपरांची आणि विविधतेने नटलेल्या परंपरांची मला आवड आणि अभिमानही आहे. भारतात शेतीचं युग असल्यापासून आद्य पिकांमध्ये असलेलं धान्य सर्वार्थाने तांदूळच असेल. अनेक वर्षं चुलीवर शिजत असलेला भात गॅसवर आला आणि पेज हा पदार्थ गायब व्हायला सुरुवात झाली. कुकर ह्या प्रकाराने भात शिजवण्याची पद्धत क्रिकेट मधल्या टी ट्वेंटीसारखी करून ठेवली आहे. मॅच चालू होऊन कधी संपते हे कळतही नाही. एरव्ही सोय म्हणून मान्य आहे पण निवांत असू तेव्हा गॅसवर खरी ‘कसोटी’ म्हणजे कुकर शिवाय भात लावायला हवा. अस्सल भाताची मजा त्यात आहे. खरंतर तांदूळ शिजवायला ठेवून त्याचा अप्रतिम सुगंध हळूहळू स्वयंपाकघरात पसरायला हवा. पण कुकर फिल्डिंगला येतो आणि त्याला ह्या सुगंधाचा कॅच काही पकडता येत नाही. तो कायम ड्रॉपच होतो. भाताची एक गम्मत आहे. भात हा एकटा कधीच नांदत नाही. तो जेव्हा एकटाच असतो तेव्हा त्याचं रुक्ष पिंड होतं. पण त्याच्या मुदीला गोडंवरणाची, लिंबाच्या फोडीची, आणि वरून तुपाच्या धारेची साथ मिळाली आणि एखाद तुळशीपत्राचं टॉपिंग मिळालं की त्याचा नैवेद्य होतो, पण वरणभात तुप आणि लिंबू 🍋 किंवा लिंबाचं लोणचं म्हणजे स्वर्ग सुखच. रिष्ता वही है किंतू सोच नई है. गोडंवरण भात म्हणजे हृषीकेश मुखर्जींचा सिनेमा असेल तर नॉनव्हेज बिर्याणी ही वेबसिरीज आहे. रसिक माणूस या दोन्ही गोष्टी एकत्र एन्जॉय करू शकतो. जो एकावरच अडून राहतो त्याचं आयुष्य अगदीच निरस आणि एकसुरी ठरतं. वरण, आमटी, रस्सा, रस्सम, कालवण, कढी, सांबार, पिठलं हे भाताचे शाश्वत सोबती आहेत. त्यांना कुणीही भाता पासून वेगळं करू शकत नाही, त्यांनी भाताची साथ शेवटपर्यंत देणं अलिखित नियम आहे. डाळीच्या प्रमाणासोबत त्या दोघांचं नातं घट्ट होत जातं. कधीकधी आमटीची माया पातळ होते आणि भाताच्या उदार फटींमधून द्रव पदार्थ ताटभर पसरतो. सुखाच्या आठवणीं सारखी डाळच शिल्लक राहते. अशावेळी त्यांचा संसार अर्ध्यावरती डाव मोडल्याचा भास होतो. भातुकलीच्या खेळामधल्या राजाराणी सारखा. चिंचं, गूळ, आमसूल, आगळ, कढिलिंबं, मिरच्या, कैरी, शेगटाच्या शेंगा, क्वचित वांगी, टोमॅटो खरे टेस्टमेकर्स आहेत. नागपुरात वांगी भात अतिशय आवडता आहे त्यांच्यामुळे गेमला एलिगन्स आहे. ही व्यंजनं ज्याला आवडत नाहीत, त्याचं आयुष्य फोल आहे. जीरा राईसमधलं तडतडलेलं जिरं, दही बुत्तीमधली उडदाची डाळ, पुलावातलं तमालपत्र, कढी खिचडीमधली लवंग, काश्मिरी पुलावामधले काजू इत्यादी इत्यादी जेवणाच्या कहाणीमधले ट्विस्टस आहेत, ते शोधून ज्याला एन्जॉय करता आले त्याचं खाद्य जीवन आनंदी आणि परीपूर्ण ठरतं. आमटी आणि भाताचा संसार मला उमा महेश्वरांच्या संसारसारखा वाटतो. जेवणाने कितीही वेगवेगळे अवतार घेतले तरी सरतेशेवटी संध्याकाळी भात आमटी बरोबर पानात समोर आला की पोटात अगोदरच शांतता नांदायला लागते, आणि व्वा तोंडातून आपसूकच येतो मऊ भात किंवा गरगट्ट भात ह्या बरोबर मेतकुटाने वेळ मारून नेता येते. थोडा ओव्हर रेटेड. बाकी परफॉर्मन्स फक्त वेळ मारून नेण्या इतकाच. भाताची खरपुडी म्हणजे अगदी कव्हर ड्राइव्ह. सायीच्या दुधाची किंवा सायीच्या दह्याची साथ मिळाली की सोनेपे सुहागा असतो. मग त्याबरोबर तोंडी लावायला कही लागतंच असं नाही फोडणीचा भात हा नाईट वॉचमन असतो. आदल्या रात्रीचा त्याचा गेम दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सेशनपर्यंत आरामात चालतो. शेंगदाणे आणि सांडगी मिरची हे दोघे नॉन स्ट्रायकिंग एन्डला असले की, चुरचुरीत फोडणीच्या भाताचा गेम विशेष बहरतो वगैरे. खिचडीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. कमी वेळात अगदी मनसोक्त खाता येईल आणि तृप्ततेचा आनंद देऊन जो रोल दिया है उसको निभानेका फर्ज वो बहोत अच्छे तरिकेसे अदा करती है. आणि कढीची साथ असेल तर स्वर्गसुखाचा आनंद देण्यात कसूर करत नाही. पोट व पिच बिघडलंय आणि विकेट पडताहेत अश्या सिच्युएशनमध्ये पिचवर उभं राहायलाच हवंय, कंटाळा आलाय आणि तरीही एक बाजू सांभाळायची आहे, अचानक घरी कोणीतरी आलंय आणि आस्कींग रेट वाढला आहे, किंवा अगदी हौस म्हणून साग्रसंगीत टेक्निकल आणि निवांत बॅटिंग करायची आहे- अश्या सगळ्याला पर्याय फक्त राहुल द्रविड आणि खिचडी हाच असू शकतो. साथीला भाजलेला पोह्याचा पापड, सांडगी मिरची, एखादी कोशिंबीर असली तर नुसती इनिंग सांभाळली जात नाही तर फॉलोऑन मिळालेली अख्खी मॅच जिंकली जाऊ शकते. रात्रीच्या जेवणात भातापेक्षा सूप सलाड घेणाऱ्या लोकांचं मला कौतुक वाटतं. आणि त्यांना समाधान असतं डाएट सांभाळल्याचं. (सूप आणि सलाड लोकं रात्रीच्या जेवणात ‘घेतात’. हे केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी की आम्हीं तुमच्यापेक्षा वेगळे आहोत.तुम्ही मात्र भात ‘जेवता’). एकंदरीतच आमटी भाताचं पोटभर जेवण म्हणजे उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म असतं. दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ ही अध्यात्माची पहिली पायरी असली तर कोन नाय कोनचा, डाळ भात लोनचा, हे जीवनाचं गुह्यतम गुढ ज्ञान आहे. क्षोत्रं चक्षु: स्पर्शनंच रसनं घ्राणमएवच ह्या सर्वांना सोबत घेऊन जो हे ज्ञान प्राप्त करतो त्याला संसारात काहीच कमी राहत नाही. इतिश्री आमटीभात पुराण संपूर्णम् 🌹🌹🌹🌹💐💐💐💐 मूळ लेखक अज्ञात, श्री अजय दांडेकर यांच्या मुखपुस्तकाच्या भिंतीवरून साभार दि. २५-१०-२०२१
४. वडा पाव आख्यान
विश्व शारदा साहित्य उपक्रम – शब्द फुले वडा पाव जरी आज कुणी ठरवले असेल आज वडा पाव दिन. तरी रोजच कुणीच राहु शकत, नाही तुम बीन. गरीबांसाठी तु पोटभर आणि स्वस्त श्रीमंतांसाठी पण चमचमीत मस्त कारण काहीही पुरते पण समोर पाहून तुला सगळेच करतात फस्त. नव्या नवरीसारखा देखणा तुझा थाटमाट, हळद लागलेला सोनेरी मुखडा अंगातल्या चोळीत, बटाटा , आलं लसूण, मिरची चा घाट. शेजारी ठसकेबाज, मिरची बाई ,करवली. अशा लज्जतदार , सौंदर्यावर कुणाची नजर जावु नये म्हणून प्रियकर पावानं तुला हळुच कुशीत लपविली.
कवयित्री – वर्षा कुमठेकर
फक्त तुझ्या गंधाने मम मोह अनावर होतो रसनेचा लगाम सुटतो मी सहज ओढला जातो। हे बटाट्यावड्यांनो..!
पाहुन पिवळी तव कांती मी अति भुकेला होतो हातात यायच्या आधी नजरेने खाऊन घेतो। हे बटाट्यावड्यांनो..!
मग पाव पांघरूनी वरती लसणीची चटणी भरूनी तळल्या मिरचीच्या संगे मी तुजला उचलून घेतो। हे बटाट्यावड्यांनो..!
प्रकृती स्वास्थ्य वाद्यांचा किती विरोध झाला तरीही हे प्रेम न माझे घटते आस्वाद तुझा मी घेतो। हे बटाट्यावड्यांनो..!
आज जागतिक वडा पाव दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
🙂❤️🙂❤️😋😋😋
बटाटा वडा हे बटाटा वड़ा दिल नहीं देना था देना पड़ा बटाटा वडा हे बटाटा वड़ा प्यार नहीं करना था करना पड़ा बटाटा वड़ा
होते जो होश में हम ऐसे न झूम जाते अच्छा यहीं था पहले हम तुम न पास आते ओ ओ अब्ब दूर जाना हैं मुश्किल बड़ा बटाटा वडा हे बटाटा वड़ा दिल नहीं देना था देना पड़ा बटाटा वड़ा डा डा डा बटाटा वड़ा
लगता है आज दिल के अरमान निकल रहे हैं कैसी है ाग जिसमें हम दोनों चल रहे हैं जा ठन्डे पानी का ले आ तू घड़ा बटाटा वडा हे बटाटा वड़ा दिल नहीं देना था देना पड़ा बटाटा वड़ा
मस्ती में दिल की कश्ती जाए न दुब अपनी दुबे के पार उतारे जोड़ी हैं खूब अपनी तू भी कवारी हैं मैं भी हूँ छडा बटाटा वडा बताता वडा दिल नहीं देना था देना पड़ा बटाटा वड़ा टा वदा टा वादा
Movie/album: हिफाज़त
*******************************
५. माझी चायनीज खाद्यंती
मी लिहिलेला हा लेख मिसळपाव या संकेतस्थळावर दि.१८-८-२००८ ला प्रकाशित झाला होता.
मी मुंबईला येण्यापूर्वीपासून फोर्ट विभागात कांही चायनीज रेस्टॉरेंट्स होती. आमच्या ऑफीसच्या गेटामधून बाहेर पडताच कांही पावले अंतरावर ‘मँडारिन’ की ‘नानकिंग’ अशा नांवाची दोन तीन खाद्यगृहे होती. चारी दिशांनी बांक दिलेल्या इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या त्यांच्या ठळक, थोड्या भडकच, पाट्या मोठ्या आकर्षक होत्या. दरवाजातून दिसणारे इंटिरियर, आंतले फर्निचर आणि वेटर्सचे कपडे लक्ष वेधून घेत. पण लहानपणापासून चिनी लोकांच्या खाण्याबद्दल जे कांही ऐकले होते त्यावरून इथे कदाचित विंचवाच्या नांगीची चटणी, झुरळांची कोशिंबीर आणि सापाचे काप असले पदार्थ ‘लिंगचांगफू’ किंवा ‘हानछाऊशुई’ असल्या अजब नांवाने मिळत असतील असे वाटे. त्यामुळे हॉटेलच्या समोरून जातांना ते कितीही खुणावत असले तरी आंत पाय ठेवण्याची इच्छा होत नसे. ताज आणि ओबेरॉयसारख्या मोठ्या हॉटेलांमध्ये सेमिनार, कॉन्फरन्स वगैरेंच्या निमित्याने कधी तरी जाणे होत असे. एकदा चंव तरी घेऊन पहावी म्हणून तिथल्या खाद्यंतीतले चायनीज पदार्थ चाखून पाहिले आणि ते इतके आवडले की पोटभर खाऊन घेतले. त्यांची आवड दिवसेदिवस वाढतच गेली आणि अजून ती टिकून आहे.
धीर चेपल्यानंतर मित्रांच्यासोबत चायनीज हॉटेलांना भेट द्यायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे त्या ठिकाणांचे मेनूकार्ड पूर्णपणे इंग्रजीतच असायचे आणि त्यात आक्षेपार्ह वाटणारा कोणताच जिन्नस दिसत नव्हता. ती हॉटेले जरी चिनी लोकांनी चालवली असली तरी तिथे येणारे सगळे ग्राहक हिंदुस्थानीच होते, त्यामुळे इथले लोक जे खाऊ शकतील असेच पदार्थ तिथे ठेवले जाणार हे उघड होते. यापूर्वी मी शेकडो मक्याची कणसे भाजून आणि तूपमीठ लावून खाल्ली होती, त्यांच्या किसाच्या गोळ्यांचे तळलेले वडे किंवा तो फोडणीला घालून तयार केलेले उपम्यासारखे पदार्थ खाल्ले होते, पण मक्याचे लुसलुशीत कोवळे दाणे वाफवून किती चविष्ट लागतात हे मला माहीत नव्हते. घरात टोमॅटोचे सार कधी केले गेले तर आम्ही जेवणाबरोबरच त्याचे भुरके मारीत असू, पुरणाच्या पोळीच्या सोबतीने कटाची आमटी व्हायचीच आणि आजारी पडल्यावर भाताची पेज प्यायला देत. या सगळ्या पेय पदार्थांना इंग्रजीत ‘सूप’ म्हणतात आणि पाश्चात्य लोक ते जेवणापूर्वी पितात हे मात्र तेंव्हा माहीत नव्हते. मुंबईला आल्यावर एक दोन वेळा उडप्याकडचे सूप पिऊन पाहिले, पण ते एकादी चटणी किंवा सॉस गरम पाण्यात मिसळून ढवळून दिल्यासारखे लागले, त्यामुळे फारसे पसंत पडले नाही. पण चायनीज पध्दतीचे स्वीट कॉर्न सूप पिऊन मात्र तिथल्या तिथे ‘कलिजा खलास झाला’. पुढे मी अनंत प्रकारची ‘क्लीअर’ आणि ‘थिक’ सूप्स चाखून पाहिली, त्यात ‘लेंटिल’, ‘ तिरंगा’, ‘लंगफंग’, ‘क्रॅब’ वगैरे प्रकारही आले. पण माझ्या मते तरी ‘ चिकन कॉर्न सूप’ हाच सर्व ‘सूप’ प्रजातींचा निर्विवाद बादशहा आहे.
मसालेभात, बिर्याणी, पुलाव, खिचडी आदि प्रकारात मोडणारा चायनीज फ्राईड राइस दिसायलाही वेगळा असतो आणि चवीलाही. आपला मसालेभात साहजीकच मसालेदार असणार, हैदराबादी बिर्याणीही चांगली झणझणीत असते, पुलाव थोडा सौम्य असतो आणि मुगाची खिचडी तर ‘आजारी स्पेशल’ समजली जाते. चांगली शिजलेली पण सुटी सुटी शिते असलेला चायनीज फ्राईड राईस मुळातच चविष्ट पण बेताचा तिखट असतो आणि त्यात आपल्याला हव्या त्या चटण्या व सॉस मिसळून त्याचे पाहिजे तसे संस्करण करता येते. शिवाय त्यासोबत मांचूरियाची ग्रेव्ही असली म्हणजे आहाहा ! ! ! क्या बात है? नूडल्सची गुंतागुंतीची भेंडोळी सोडवावीत का कापावीत या संभ्रमात पडून ती खातांना आधी आधी थोडी पंचाईत होत असे. त्याचे तंत्र जमायला लागल्यानंतर ती आवडायला लागली.
या सगळ्या चायनीज पदार्थात भोपळा मिरची, पातीचे कांदे, फरसबी, गाजर वगैरे एरवी वेगवेगळे खाण्यात येणारे पदार्थ एकत्र असतात आणि त्यातून निराळीच चंव निर्माण होते. कांही पदार्थात बांबूचे कोंब, बेबी कॉर्न, लसणीची हिरवी पाती यासारखे नवखे पदार्थही असतात. मुख्य म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचे झाले तर “सर्वात मका” असतो. तो कधी दाण्यांच्या रूपात असेल तर कधी त्याचे मैद्यासारखे गुळगुळीत पीठ ग्रेव्हीला लावलेले असेल किंवा त्या पिठात बुडवून तळलेले गोळे असतील. जोडीला सोया सॉससारख्या वेगळ्या चवी असतात. तेलाचा वापर माफक प्रमाणात केलेला असतो. कदाचित आले आणि लसूण या पाचक गोष्टी त्यात सढळ हाताने मिसळलेल्या असल्यामुळे ते पदार्थ पचायला हलके पडत असतीलही. निदान अशी समजूत तरी असते. या सगळ्या गुणांमुळे चायनीज खाणे जगभर सगळीकडे दिवसेदिवस लोकप्रिय होत गेले. मुंबईतल्या फोर्टमधल्या खास हॉटेलांतून लवकरच ते उपनगरांमधल्या सर्वसामान्य उपाहारगृहांमध्ये आले आणि आता तर रस्त्यांच्या कडेला असलेल्या वडापावाच्या स्टॉल्समध्ये व हांतगाड्यांवर चायनीज खाद्यपदार्थ मिळू लागले आहेत. अगदी लहान गांवातल्या पत्र्याच्या शेडमधल्या हॉटेलातल्या मेनूकार्डावर चायनीज विभाग असलेले मी पाहिले आहे. ‘मॅगी टू मिनिट नूडल्सने’ त्यांना घराघरात पोचवले आणि आता जागोजागी चायनीज पदार्थ करायला शिकवणारे क्लासेसही दिसतात. सगळेच खाद्यजग असे ‘चायनीजमय’ झाले असल्यामुळे निष्णात किंवा शिष्ट खवय्ये लोक आता ‘थाई’ आणि ‘मेक्सिकन’ ‘क्युझिन’चे कौतुक करू लागले आहेत.
पण आपल्या भारतीय हॉटेलात मिळणाऱ्या चायनीज पदार्थांचे बरेचसे भारतीयीकरण झालेले असते. त्यातल्या जिरे, मिरे, लवंग, वेलदोडे, कोथिंबीर, पुदिना वगैरे मसाल्यांचा चंवी ओळखून येतात आणि लोकांना त्या आवडतात. चीनला जाण्याची संधी कांही मला मिळाली नाही, पण पश्चिमेकडे मात्र बहुतेक ठिकाणच्या चायनीज हॉटेलांत चिनी वंशाचे वाटणारे नकटे चपटे लोकच काम करतांना दिसतात. आता सगळीकडे ‘इंडियन फूड’ सुध्दा मिळते, पण त्याच्या खानावळी एकाद्या गल्लीबोळात आडबाजूला असतात. चायनीज रेस्तराँ मात्र शहरांच्या मध्यवर्ती भागांत मोक्याच्या नाक्यांवर झोकाने विराजमान दिसतात. तिथे मिळणाऱ्या अन्नाची चंव वेगळीच असते. आपण जन्मात कधी न पाहिलेली पाने, फुले आणि बिया व त्यांचे अर्क त्यात घातलेले असतात. त्यातल्या भाज्या आणि मांसाचे तुकडे व्हिनेगारसारख्या द्रवात भिजवून ठेवत असतील. एकादा पदार्थ खाल्ल्यानंतर नक्की त्यात काय होते ते ओळखण्याएवढा मी त्यातला तज्ञ नाही, पण पूर्वी खाल्लेल्या पदार्थापेक्षा त्यात कांही तरी वेगळे असे आहे इतपत समजून येते. या आगळ्या चंवी कधी खूप आवडतात तर कधी नाही. पण मिळमिळीत कॉंटिनेंटल पदार्थांपेक्षा त्या नक्कीच उजव्या असतात.
😋😋😋😋😋😋😋 ६. वदनी कवळ घेता!
गेल्याच आठवड्यात एका घरगुती विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला. कोरोनाचे सर्व नियम स्वयंशिस्तीने पाळून संपन्न झालेला तो मंगलसोहळा !वधू -वर आणि मित्रमंडळाकडील सर्व उपस्थिती चाळीसच्या घरात !घरगुतीपणाचे आल्हाददायी वातावरण! लग्नकार्यालय देखील घरगुतीच म्हणजे वधूच्याच घरी ! पंधरा- पंधरा जणांच्या दोन पंगती आणि तिसरी आणि शेवटची पंगत दहा माणसांची! प्रत्येकाला बसायला पाट आणि समोरील भव्य केळीच्या पानालाही रंगीत पाट. पाटाला रांगोळी !अलीकडे दुर्मिळ झालेल्या काही प्रथा ‘ कोरोना’ मुळे दृष्टीस पडल्या! पहिल्या पंक्तीतच वधू-वरांच्या सोबत ‘ श्लोक’ म्हणण्याचा कोणी तरी आग्रह केला. वराच्या मित्राने नवदांपत्याकडे पाहतच शुभारंभ केला.
वदनी कवळ घेता | नाव घ्या बायकोचे | सहज स्मरण होते| नाम घेता तियेचे| बनविले तियेने | कष्ट घेऊनी अन्न | कौतुक प्रियेचे न करता | जेवितो तो बेइमान | त्या छोट्या पंगतीत मोठी खसखस पिकली. मी श्लोक म्हणणाऱ्याचे कौतुक केले. त्याने “ही माझी रचना नाही व्हॉट्सऍपला ‘मधुकर लेले’ नामक कोणा कवीचा हा “श्लोक” असल्याचे प्रामाणिकपणे सांगितले. अलिकडे तेही सौजन्य दुर्मिळ झालेले! म्हणून त्याचेही पुन्हा कौतुक ! मला हे लग्नपंगतीतील भोजनश्लोक पूर्वीपासूनच फार आवडतात. खात खात गाणे आणि गात गात खाणे, याची मजा काही औरच !लहानपणी आमच्याही गावात लग्नाला जेवणाच्या मोठाल्या पंगती उठायच्या. वामनपंडितांचे श्लोक! त्यातील प्रश्नोत्तरे ! काही काही कळायचं नाही. पण रामदासांचा ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक लक्षात राहायचा. वदनी कवळ घेता| नाम घ्या श्रीहरीचे| सहज हवन होते | नाम घेता फुकाचे | जीवन करी जिवित्वा | अन्न हे पूर्णब्रम्ह | उदरभरण नोहे | जाणीजे यज्ञ कर्म | समर्थ रामदासांच्या या श्लोकाचा अर्थ जरी लहानपणी समजत नव्हता तरी त्याचा भावार्थ उमजत होता. आजही अनेक ठिकाणी हाच श्लोक म्हटला जातो . त्यानंतर भोजनश्लोकाचे आधुनिक रूप प्रथमच ऐकले ते परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धनांच्या गोपुरी आश्रमात. आदरणीय भाऊ बागलकर त्यावेळी गोपुरी आश्रमाची व्यवस्था पाहायचे. दुपारचे गोपुरीतच शेतकरी कामकरी वर्गाने पिकविलेले पूर्णान्न आणि जेवणाच्या पंगतीच्या वेळी पूज्य साने गुरुजींनी रचलेला तो श्लोक ! भाऊ सांगत आणि आम्ही शिबिरार्थी एकसाथ गाऊ. वदनी कवळ घेता |नाम घ्या मातृभूचे| सहज स्मरण होते |आपल्या बांधवांचे | कृषिवल कृषीकर्मी |राबती दिनरात | श्रमिक श्रम करोनी |वस्तू ह्या निर्मितात | करुनी स्मरण त्यांचे |अन्न सेवा खुशाल | उदर भरण व्हावे |चित्त होण्या विशाल | भारतमाता की जय | सानेगुरुजीनी किती सोप्या शब्दात हे सारे मांडले आहे. राष्ट्रसेवा दलाच्या स्नेहभोजनासाठी गुरुजीनी ही भोजन प्रार्थना रचली. सेवादलाच्या अनेक दस्तानायक शिबिरात आणि कथामालेच्या अनेक कार्यक्रमात हा श्लोक आम्हीही घ्यायचो! आमच्या शाळाशाळांत शालेय पोषण आहार सेवन करताना हा श्लोक म्हणायला मी मुलांना सांगत असे! भावना एकच, ज्यांच्यामुळे आपण अन्नग्रहण करीत आहोत. त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे! त्या हातांपुढे लीन होणे! कालच्या लग्नसोहळ्यात ‘ वदनी कवळ घेता ,नाम घ्या बायकोचे ‘ ही ओळ ऐकली आणि मला काळानुसार श्लोकाच्या शेवटच्या ओळीत पडलेला फरक बरंच काही सांगून गेला! समर्थ रामदास ,”उदर भरण नोहे| जाणिजे यज्ञकर्म |’ पूज्य साने गुरुजी ,” उदरभरण व्हावे | चित्त होण्या विशाल |” लग्नसमारंभातील तो युवक,” कौतुक प्रियेचे न करता |जेवितो तो बेइमान|” थोडक्यात काय , घास घेत असताना अन्नदात्याचे उपकार मानणे महत्त्वाचे !समर्थ रामदासांनी सृष्टिकर्ता श्रीहरीचे स्मरण करायला सांगितले, पूज्य सानेगुरुजींनी अन्न निर्माण करणाऱ्या, राबणाऱ्या कृषीवल कृषिकर्मींच्या हाताचे स्मरण करायला सांगितले, तर त्या युवकाने संसार काटकसरीने चालवत आपणास जेवू घालणा-या क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असलेल्या धर्मपत्नीचे स्मरण करायला सांगितले !त्या छोट्या लग्नसोहळ्यातील तो भोजनश्लोक ऐकून वाटलं, ‘अरे! सारेच संपलेले नाही अजून !’ हिंदू संस्कृती, संयम आणि समाधान यावर जशी उभारलेली आहे, तशीच ती कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे आणि उभारलेलीच राहणार! त्याचीच प्रचिती त्या लग्नातील एकविसाव्या शतकातील बदल झालेला तो श्लोक देऊन गेला! कौतुक प्रियेचे न करता |जेवितो तो बेइमान|”*
🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️ ✍🏼 सुरेश शामराव ठाकूर लेखक साने गुरुजी कथामालेचे जेष्ठ कार्यकर्ते आहेत
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
७. दिवाळीतली खादाडी – लहानपणच्या आठवणी
दिवाळीला चार पांच दिवस उरले की स्वयंपाकघराचा भटारखाना कार्यान्वित होई. दिवसभर सतत कांही भाजणे, परतणे, तळणे सुरू राही. त्या काळात गॅसची सोय नसल्याने सारे काम लाकूड व कोळसा या इंधनावर होत असे. दिवाळीच्या फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी खास मोठ्या चुली व शेगड्या बनवल्या जात तसेच मोठमोठी पातेली, पराती व कढया अडगळीतून बाहेर निघत. स्वयंपाकघरातील प्रक्रियांचा सुगंध घऱभर दरवळत असे. कधी कढलेल्या तुपाचा स्निग्ध सुवास तर कधी मिरच्यांचा ठसका आणणारा खाट. बेसनाच्या भाजणीचा घमघमाट बाहेरच्या खोलीपर्यंत दरवळला की कुणीतरी मुलांनी स्वयंपाकघरात जाऊन त्याची वर्दी द्यायची. मग भाजणे थांबवून पुढील प्रक्रिया सुरू होई. तळणीचा घाणा सुरू झाला की मुले सुद्धा स्वयंपाकघरात घोटाळत व मोठ्या उत्साहाने त्या कामाला हातभार लावत. कडबोळ्यांची वेटोळी बनवणे, करंजीत सारण भरून अर्धवर्तुळाकार कापणे, शंकरपाळ्यासाठी आडव्या उभ्या रेघा ओढणे असली कामे त्यांना मिळत. पोळपाटावर पुऱ्या लाटणे व उकळत्या तेला तुपात तळणी करणे ही कौशल्याची कामे अर्थातच अनुभवी स्त्रिया करीत.
दिवाळीची अधिकृत सुरुवात नरकचतुर्दशीपासून होते. त्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करून झाल्यावर सर्वांचे सगळे लक्ष फराळाचे बोलावणे येण्याकडे लागलेले असे. देवाची पूजा आणि नैवेद्य दाखवून झाला की फराळाला सुरुवात होत असे. यातले सारेच पदार्थ आधी तयार करून ठेवले असलेले असले तरी नैवेद्य दाखवून झाल्याखेरीज ते चाखून पहाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्याची चंव पाहण्याची उत्कंठा सर्वांनाच असायची. लाडू, करंज्या, चिरोटे व अनरसे हे गोड पदार्थ आणि शेव, चिवडा, चकल्या व कडबोळी हे तिखटमिठाचे पदार्थ असायचेच. शंकरपाळ्यांच्या गोड आणि तिखटामिठाच्या अशा दोन्ही प्रकारच्या आवृत्या असत. लाडूमध्ये रवा, बेसन, संमिश्र असे प्रकार असत आणि त्यात पुन्हा पाकातले कडक आणि पिठीसाखर मिळवून केलेले ठिसूळ असे उपप्रकार असत. त्यातला एकादा प्रकार फराळात, दुसरा जेवणात, तिसरा बांधून देण्यसाठी वगैरे विभागणी होत असे. इतर पदार्थांमध्येसुध्दा अशीच विविधता असे.
खाण्याचे इतके प्रकार आणि पदार्थ असतांना मुलांना आणखी काय पाहिजे? “हरहर महादेव” करून त्यावर तुटून पडायचे. फराळ खातांखातांनाच मधून मधून “कडबोळी या वेळी छान खुसखुशीत झाली आहेत. “, “म्हणजे काय? माझी नेहमीच होतात. “, “चांगलं भरपूर मोहन घातलं तर कां नाही होणार?”, “पण शेव थोडी कडकडीत राहिल्यासारखी वाटते. “, “तशी नसली तर तिचा चुरा होणार नाही का? मग तो भुगा कोण खाईल? “, “अनरसे थोडे चिवट वाटतात ना?”, “अगं बाई, डब्याचं झाकण चुकून उघडंच राहिलं वाटतं. “, “ही हवा तर अशी आहे! सर्दावायला जरासुध्दा वेळ लागत नाही”, “ते जाऊ दे, पण चंवीला किती मस्त झाले आहेत?”, “ही करंजी दिसायला एवढी मोठी, पण फोडली की नुसती पोकळ! “, “तुला काय पुरणानं गच्च भरून पाहिजे?”, “कडबोळी काय मस्त झाली आहेत?”, “त्यात थोडा ओवा परतून घातला आहे. त्याने वेगळी चंवही येते आणि पचनालाही मदत होते ” अशा प्रकारे फराळातल्या प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण होत फराळाचा कार्यक्रम सावकाशपणे चांगला रंगायचा.
दिवाळीचा तिसरा दिवस पाडवा म्हणजे ‘बडा खाना’, ‘ग्रँड फीस्ट’ किंवा ‘मेजवानी’चा दिवस ! त्या काळात प्रचलित असलेल्या पक्वानांचे वर्गीकरण केले तर श्रीखंड आणि बासुंदी हे सर्वोत्कृष्ट श्रेणीतले पदार्थ, साखरभात, पुरणपोळी, बेसनाचे लाडू वगैरे उत्कृष्ट श्रेणीत आणि लग्नाच्या जेवणात हमखास असणारे जिलबी आणि बुंदीचे लाडू ही लोकमान्य पक्वान्ने असत. पुरणाचे ‘कडबू’ आणि ‘हुग्गी’ या नांवाची गव्हाची खीर हे आमच्या भागातले कानडी पध्दतीचे प्रकार याच श्रेणीत मोडत. शेवयाची खीर, शिरा यासारखे पदार्थ बनवण्यासाठी सणासुदीची वाट पहायची गरज नसायची. सहज केंव्हाही मनात आले की ते पटकन केले जात असत. ते लोकमान्य असले तरी ते मेजवानीत असलेच तर दुय्यम स्थानावर असत. त्याशिवाय खास उपवासाचे, फराळाचे, बाळंतिणीला किंवा लहान मुलांना पौष्टिक म्हणून देण्याचे असे निरनिराळे असंख्य गोडाधोडाचे पदार्त असले तरी ते मोठ्या मेजवानीत सहसा केले जात नसत. पेढे, बर्फी वगैरे मिठाया जेवणात वाढल्या जात नसत. फ्रूट सॅलड, कस्टर्ड, आइस्क्रीम वगैरे नाविन्यपूर्ण पदार्थ हौस म्हणून कधी तरी केले जात. बंगाली रसगुल्ले, चमचम, सोंदेश किंवा उत्तर भारतातल्या हलवायांच्या विविध मिठाया त्या काळात घरी तयार केल्या जात नव्हत्या आणि आमच्या त्या लहान गांवातल्या बाजारातही तेंव्हा मिळत नव्हत्या.
पाडव्याच्या मेजवानीत श्रीखंडपुरीचा बेत हे जवळ जवळ ठरूनच गेले होते। इतक्या माणसांसाठी पोटभर श्रीखंड बनवणे हेसुध्दा एक आव्हानच असे. त्या काळात चितळे, वारणा किंवा अमूलचे श्रीखंडाचे डबे आणून ते फ्रीजमध्ये ठेवायची सोय नव्हती. जितके श्रीखंड करायचे असेल त्याच्या तीन चारपट दूध आदल्या दिवशी आणून ते तापवायचे, त्याला चिनी मातीच्या बरणीत किंवा मातीच्या मडक्यात विरजण लावून ठेवायचे, दही जमताच त्याला पंच्यात बांधून खुंटीला टांगून ठेवायचे आणि अखेर ते पंच्यातले चक्क्याचे गोळे एकत्र करून त्यात पिठीसाखर, वेलदोड्याची पूड, केशर वगैरे चांगले मिसळायचे, जायफळ उगाळून त्याची पेस्ट त्याला लावायची, त्यावर चारोळ्यांचे दाणे पसरायचे वगैरे सारे सोपस्कार केल्यानंतर ते श्रीखंड बनायचे. या सर्व प्रक्रियांमध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्व असते. त्यातली कोणतीही कृती वेळेवर केली नाही तर घोटाळा होण्याची शक्यता असते. सगळी अवधाने सांभाळून अखेर ज्या वेळी ते पानात वाढले जाईल त्या वेळी त्या श्रीखंडाला नेमका हवा तितकाच आंबटपणा आणि गोडवा आला म्हणजे मिळवली.
कोठल्याही सणासुदीला नैवेद्यासाठी शेवयाची खीर आणि पुरण असायलाच हवे अशी प्रथा त्या काळी होती. श्रीखंड हे मुख्य पक्वान्न झाले. नैवेद्याच्या ताटात एकादा लाडू, मोदक किंवा शिऱ्याची मूद ठेऊन ‘पंच’पक्वान्नाचा आंकडा साधला जात असे. जेवणावळीसाठी केळीची पाने आणून, त्यांना बरोबर सारख्या आकारात कापून ती मांडली जात. शक्यतो प्रत्येक पानाभोवती कमानीची रांगोळी काढली जाई. यात आपापली कला दाखवण्याची चुरस असे. अगदीच वेळ कमी पडला तर उरलेल्या पानांभोवती रांगोळी घालण्याच्या यंत्राने पट्टे ओढत. त्यात फुले आणि वेलबुट्ट्यांची नक्षी निघत असे.
पानांत कोणते अन्नपदार्थ कोणत्या क्रमाने आणि कोणत्या जागेवर वाढायचे याचे नियम ठरलेले होते. केळीच्या पानाच्या डाव्या भागात सर्वात वर मीठ आणि लिंबाची फोड ठेवायची. त्यानंतर अनुक्रमाने कुटलेली सुकी चटणी, वाटलेली ओली चटणी, कोशिंबीर, भरीत, चटका वगैरे दुय्यम तोंडी लावणी असत. अखेरीस तळलेले सांडगे, पापड्या, कुरडया, भजी वगैरे कुरकुरीत पदार्थाने डावी बाजू सजत असे. उजव्या बाजूला ईशान्य दिशेला आमटीचा द्रोण ठेवलेला असे. भोपळा किंवा वांग्याच्या भाजीतल्या मोठ्या फोडींचा उपयोग द्रोणाला आधार देण्यासाठी करून कांही लोक या नावडत्या भाज्या खाणे टाळत. बटाट्याची सुकी भाजी हवीच, जोडीला फ्लॉवरचा रस्सा किंवा एकादी सैलशी पालेभाजीही असे. आग्नेय बाजूला भाताची पांढरी शुभ्र मूद अलगद हाताने ठेवून तिच्यावर पिवळ्या धम्मक वरणाने ‘आइसिंग’सारखी सजावट करीत. त्यावर पळीभर तूप वाढले की पहिले वाढणे संपले.
‘वदनी कवळ घेता …..’ श्रीहरीचे नांव घेऊन ‘यन्तुनदयो वर्षन्तु पर्जन्याः सुपिप्पलाओषधयो भवन्तु। …….’ अशी प्रार्थना करायची आणि नमःपार्वतीपते हरहरमहादेव श्रीगुरुदेवदत्त असा सामूहिक जयजयकार करून जेवणाला सुरुवात होत असे. त्यातसुध्दा पहिल्या घासात खीर संपवायची, त्यानंतर लिंबाची फोड वरणभातावर पिळायची, त्यावर द्रोणातली आमटी ओतून भात कालवून घ्यायचा हा जेवण सुरू करण्याचा अलिखित क्रम ठरलेला असायचा. त्यानंतर हवा तो पदार्थ खायला मोकळीक होत असे. तोंपर्यंत भात वरण आणि तूप वाढायला येत असे. पुढे श्रीखंडपुरी येणार हे ठाऊक असल्यामुळे सहसा कोणी तो घेत नसे. ‘पांढऱ्या’ भाताच्या पाठोपाठ ‘काळा’ किंवा मसालेभात येई तो मात्र आवडीने घेऊन खाल्ला जात असे. बटाटा, वांगी, तोंडली वगैरेंच्या फोडी घातलेला मराठी मसालेभात व्यवस्थित रीतीने केला तर फ्राइड राईस, पुलाव किंवा बिर्याणीपेक्षाही अधिक चविष्ट लागतो असे माझे मत आहे.
भातप्रकरण शक्यतों झटपट आवरून गाडी श्रीखंडपुरीच्या मुख्य रुळांवर येत असे. त्या सुमारास श्लोक म्हणणे सुरू होत असे. समर्थांचे मनाचे श्लोक हा मुख्य स्टॉक असला तरी वामन पंडित आणि मोरोपंतांच्या रचनांना प्राधान्य मिळे. संस्कृत श्लोक म्हंटले तर जास्तच चांगले, पण त्यात रामरक्षेतले सर्वांना तोंडपाठ असलेले श्लोक टाळले जात. शहरातून आलेले पाहुणे टाळाटाळ करायचा प्रयत्न करीत, पण त्यांना जास्तच आग्रह होत असे. अखेर थोड्याफार प्रॉम्प्टिंगच्या सहाय्याने ते आग्रहाला मान देत. सगळ्यांनाच श्रीखंडाचा भरपूर आग्रह होत असे. त्या काळातल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब वगैरे विकारांचे प्रमाण फारसे नसे आणि नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करण्याची सोय व पध्दत नसल्यामुळे कोणाला हा रोग जडला असल्याचे तो विकोप्याला जाण्याच्या आधी समजतही नसे. त्यामुळे घरातली एकादी आजारी व्यक्ती सोडल्यास इतर कोणाचेच कसलेही पथ्य नसे. वेळ पडल्यास नेहमीच्या जेवणाच्या दुप्पट तिप्पट आहार सेवन करण्याची आणि तो पचवण्याची क्षमता सगळ्यांकडे असे. त्याचा अशा प्रसंगी पुरेपूर उपयोग करून घेतला जात असे. निदान तासभर तरी रंगलेली पाडव्याच्या मेजवानीची पंगत ताकभाताने संपे तेंव्हा सर्व मंडळी तृप्त होऊन “अन्नदाता, पाककर्ता, भोजनकर्ता सुखी भव। ” असा आशीर्वाद देऊन पानावरून उठत.
आनंदघन या माझ्या अनुदिनीवरील आली दिवाळी या लेखमालिकेतून . . ऑक्टोबर २००८ …… आनंद घारे
********************
८. खाद्य पदार्थांची नावे ओळखा पाहू
दिवाळी म्हणजे खादाडीचा सण चला कोडे सोडवा☺️ खवय्येगिरी
आता जरा खाण्याकडे वळू या.
१.पानाचे ठेवले पदरावर पदर बेसनाच्या सारणाची त्यामधे भर चवीला हवा , चिंचेचा गर वाफवुन तळा भरभर …….?
२.छिद्राचे गोल वडे तुपात तळले पाकात घोळवले……..
३.बेसन कांदा ,मिरची भारी गरम खाण्याची मजाच न्यारी……
ठेवा सुंदर पात्र शुद्ध करुनी चौरंगी त्या चंदनी रांगोळी भवती सुरेख बरवी काढा तयालागुनी चौरंगावरती चहुदिशि पहा ठेवा सुगंधी फुले डाव्या बाजुस नेहमी भरुनिया तांब्या असावा जले
चटणीच्यावरि पात्रशीर्षि इवले वाढा लवण मागुती लिंबाला मग अष्टमांश चिरुनी वाढा तिथे फोड ती चटणी लोणची मीठ घेउनि सवे कोशिंबिरीची नदी पात्री वाहु नये म्हणून तिजला निथळून घ्यावे आधि
उजव्या बाजुस वाढती रुचिकर भाजी कढी आमटी डाळिंब्या उसळी, अळु फदफदी, सारे पहा गोमटी सारे जिन्नस वाहती म्हणुनिया द्रोणांतरी वाढणे वाढा शांतपणे नको गडबडी थेंबास ना सांडणे
भाजी कोरडि त्यासवे कवण हो पात्रांतरी ती बरे केळी केळफुले अपक्व फणसा फोडून त्याचे गरे आठळ्या उकडुनि फोडणी करुनिया किंवा बटाटे जरी घाला तो कढिलिंब लाल मिरच्या आणी जिरे मोहरी
वाढा ओदन शुभ्रसा वरण ते लिंबू लवण त्यावरी साजूक तूप तयावरी धरुनिया ती धार हो साजिरी हा झाला पहिला असाच दुसरा वाढा मसाले आता दध्योदन आणि शेवटास करुनि होण्या मनी शांतता
भातासोबत वाढणे आणुनिया पोळी पुरी भाकरी असता तांदुळ भाकरी मऊ जरी नवनीत घाला वरी पोळ्याही घडिच्या करा फुगवुनि अर्धी न वाढा कधि काढा ताजि पुरी झणी तळुनिया तळुनी न ठेवा आधि
पापड नाचणी कुर्डई तळुनिया मिरगुंड किंवा जरी वाढावी नच ‘घेइ घेइ’ करुनी आग्रह नको यापरी गोडाची मग जिन्नसे करुनिया वाढा जरा आग्रहे तो ही माणूस पाहुनि,न इतरा जाणा परब्रह्म हे
मोदक सुंदर शुभ्र ते करुनिया त्याच्या कळ्या काढूनि आती सारण चांगले भरुनिया नाके जरा दाबुनि आता त्या उकडा, हळूच धरुनि पात्रांतरी वाढूनि नाके फोडुनि त्यामधे घृत अहा साजूक द्या ओतुनि
आता ते सुरु भोजनास करणे “वदनी कवळ” गाउनि हरहर पार्वती शंकरा स्मरुनिया सीतापती वंदुनी आणी शेवटी भोजनान्त समयी तक्रा आणा मागुनी ऐसे हे सगळे व्यवस्थित करा ही रीत चित्पावनी 💐🌹🇮🇳🙏🙏🙏🇮🇳🌹💐
१०.पुरणपोळी
शाळेत असताना व्याकरणात शिकवलेली वॄत्ते आठवा….. एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना….! 😋😍
इंद्रवज्रा:
चाहूल येता मनि श्रावणाची होळी तथा आणखि वा सणाची पोळीस लाटा पुरणा भरोनी वाढा समस्ता अति आग्रहानी ||
घोटा असे पुरण ते अति आदराने घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||
मालिनी :
अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती कडक नच करावी राहुद्या तैलवंती
मंदाक्रांता:
घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||
पृथ्वी :
करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||
शार्दूल विक्रिडित:
हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे ||
आज पासून सुरू होणाऱ्या होलिकोत्सवा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…..!! 🌷🌷🌷🌷🌷
११.गुणकारी गूळ
गुरुचरित्र: लहानपणी मी शाळेत डबा घेऊन जात असे तेव्हा माझ्या डब्यातील भाजी इतर विद्यार्थी मात्र फारशी खात नसत. कोल्हापुरातल्या लोकांना झणझणीत तिखट खाण्याची सवय आणि माझी भाजी गोड लागायची कारण त्यात गूळ घातलेला असायचा. मी आईला विचारायचो की, आपण स्वयंपाकात गुळ का वापरतो? बरेच दिवस त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. गुरुचरित्रामध्ये माझ्या परमपुज्य सद्गुरूंनी सांगितलं आहे, गुळमिश्रित अन्न शिळं होत नाही. मग आम्ही लागलो प्रयोगाला. वांग्याची भाजी गुळ घालून आणि गूळ न घालता तयार करून ठेवली दोन दिवस. दोन दिवसांनी पाहिले तर गूळ घातलेल्या भाजीपेक्षा न घातलेली भाजी अतिशय सडलेली होती. आपल्याकडे प्रवासाला जाताना दीर्घकाळ टिकणाऱ्या दशम्या ह्या गुळापासून यासाठी तर बनवत नव्हते? नक्कीच!
संशोधनामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. प्राचीन बांधकामामध्ये स्लॅब, माळवद टाकताना चुन्यामध्ये गूळ घालत असत. अशा अनेक प्रयोगातून समजलं गूळ हा अँटीफंगल, अँटीबॅक्टरियल म्हणून काम करतो. गुळाला हा गुणधर्म त्याच्यामध्ये असणाऱ्या भरपूर प्रमाणातल्या फॉस्फरस या मुलद्रव्यामुळे प्राप्त होतो हे राजीव दीक्षित यांनी निर्विवादपणे सिद्ध केलं आहे.
गूळ घातलेल्या जेवणाचा उपहास करू नका, जे उत्तम आहे, बुद्धीवर्धक आहे ते स्वीकार करा. डॉ. अभिराम जोशी
. . . . . . . . . . . . .
१२.पुणेरी ताट
पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रम आयोजकांनी “पुणेकरास” मेनू विषयी त्याचं मत मागितल… त्यावेळी त्यांना पुणेकराने दिलेले हे उत्तर… “मेनू साधारण असा असावा”😌 १. वरण-भात, तूप, मीठ, लिंबू – त्यात शक्य असल्यास चमचाभर पूरण. २. मसाले भात पण त्यावर ताज्या ओल्या नारळाच किसलेलं खोबर आवश्यक… ३. पुऱ्या, आळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी, ४. सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी. ५. पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसळा भजी. ६. “ओल्या नारळाची” कोथिंबीरीची चटणी, काकड़ी- शेंगदाणे कूट आणि दही घातलेली कोशिंबीर. ७. चवी पुरतं पंचामृत. ८. गोडात श्रीखंड किंवा बासुंदी. ९. मठ्ठा.
“आता काही सूचना…. लक्ष्य पूर्वक वाचा..” 🤨आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको. 🤨तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको. 🤨श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये… 🤨 आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही… श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही… 🤨आळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावे, उगाच तुकडे तुकडे टाकू नये… 🤨तसेच, खोबरे देखील पाऊण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको. 🤨मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते ५ ते ६ मि.मी. पेक्षा जास्त लांबीचे नको. 🤨वरणाची डाळ “एक-पात्रीच” हवी, नाहीतर चव बदलते. 🤨पापड-कुरडई मरतुकडे नको…. त्याच्यातला “कुरकुरीतपणा” निघुन गेल्यास आमची “कुरकुर” सुरु होईल… 🤨गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे. 🤨ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी… तिखट नको… त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारखं तिखट त्यात उधळू नये…
😌 “आता पान वाढावयाच्या सूचना -“ १. पाट मांडून त्यासमोर छान रांगोळी घालावी.. २. पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे… ३. पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग “शून्य अंश” पकडून मीठ वाढावे आणि ४. त्याच्या “उणे पाच अंशावर” लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे वाढावे… ५. उणे ९० अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी. ६. मध्यभागी भाताचा मुद असावा व सगळं वरण “भसकन” वाढू नये… वरणाचा ओघळ नको… आणि त्यावर “साजूक तुपाची धार” हवीच… पण त्यासाठी जेवणार्यास वाट पहायला लावू नये… तुपाचा चमचा चांगला खोलगट असावा.. मागून चेपलेला अपेक्षित नाही. ७. मुदाचा आकार प्रमाणशीर असावा… “भसाडा नको…” ८. वरण-भाता खाली मसाले भात वाढावा. ९. मसाले-भाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी.. १०. आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी. ११. उजव्या हाताला वरच्या बाजूला ४५ अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी. १२. आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी. 😌 वर नमूद केलेल्यात काही त्रुटी असल्यास तुमच्या तुम्हीच दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये. आणि उपकार केल्यासारखा वाढप्याचा चेहरा असू नये. 😡
बस ऐवढेच अपेक्षित आहे. सुचना संपल्या.🙏
“काटेकोर” पुणेकर… 🤣
१३. आमरस
१) मिक्सर किंवा ग्राईंडरने पातळ केलेला आमरस म्हणजे आंब्याचा अपमान… २) त्यात दूध घालण्याचा प्रकार म्हणजे आमरसात भेसळ… ३) स्वीट डीश म्हणून जेवणानंतर आमरस खाणं म्हणजे पोळीवर केलेला अन्याय… ४) आमरस बाधू नये म्हणून मिरीपूड, तूप घालणं म्हणजे आंब्यावरचा अविश्वास… ५) आमरस न खाता नुसत्या फोडी खाणं म्हणजे युतीला मतदान न करता कम्युनिस्टांना मतदान करणं… ६) आंब्याचं आमरसापेक्षा मिल्कशेक करणं म्हणजे अरुण जेटलींना कायदेमंत्रीपदापेक्षा अर्थमंत्री करणं… ७) आमरस बाहेरून विकत घेत खाणं म्हणजे आयारामांना तिकिट देणं… ८) आमरसासोबत कांदा भजी, वडे वगैरे पदार्थ खाणं म्हणजे नोकरीसोबत साईड बिझनेस असणं… ९) आमरस आणि पोळी/पुरी हेच सर्वस्व मानणं म्हणजे अल्पसंतुष्ट असणं… १०) आमरसावर तुटून पडणं म्हणजे सर्जिकल स्ट्राईक करणं… आणि आमरस न आवडणं म्हणजे देशद्रोही असणं….
बघा .. म्हणूनच म्हणते… “चवीने खाणार त्याला हापूस मिळणार”
. . . . . . . वॉट्सॅपवरून साभार दि. १२-०५-२०२२
😋😋😋😋😋😋😋😋
१४.आपोषण
काल कामावरून आल्यावर स्नान करून जेवायला बसलो, तेंव्हा सोबत एक किर्तनकार मित्र ही जेवायला होता. मित्र ही डॉक्टर आहे व वैष्णव देखील. जेवतांना मी आपोषण घातलं व त्याने विचारल,”मी बर्याच जणांना ही क्रिया करतांना पाहिलंय, पण याचा नेमका अर्थ काय? याचा आपल्या शरीरावर उपयोग होतो?”. त्याला दिलेले उत्तर- जेवण म्हणजे यज्ञ आहे अस मानतात कारण आपण ज्या प्रकारचे अन्न खातो त्या प्रकारचे आपले शरीर व विचार होत असतात. जाठराग्नीला आयुर्वेदात ” जाठरो भगवान अग्नी” अस म्हणाल आहे तर स्वतः भगवान गीतेत सांगतात ” अहं वैश्वानरोभुत्वा प्राणीनाम देहं आश्रितः”. याच कारण अस की आपण आपल्या पेक्षा ईश्वर श्रेष्ठ आहे मानतो त्याच प्रकारे भूक लागली की आधी जेवाव म्हणूनच आयुर्वेदात भुकेला ‘आधारणीय वेग’ या वर्गात उल्लेखल आहे. ज्या प्रकारे ईश्वराला आपण चांगल्या गोष्टी अर्पण करतो त्याच प्रकारे जाठराग्नीलाही उत्तम आहार द्यावा म्हणून जाठराग्नीला देव मानल जात. आहार हा नेहमी षड-रसात्मक, गरम, व्यंजनयुक्त व सकस असावा. जेवतांना मौन बाळगावे (बोलतांना राग येऊ शकतो व त्याने अन्नाचा विपाक व्यवस्थीत होत नाही किंवा पित्तज व्याधी वाढतात), वड, पिंपळ, उंबर या झाडांखाली जेवू नये (या झाडांची घाण अन्नात पडू शकते), अन्न ताजे व सात्विक असावे. जेवण एकांतात करावे. जेवणापूर्वी बाहेर जाऊन आला असाल तर वस्त्रे बदलावीत ( स्वच्छ वस्त्र अंगात असावीत), सदरा बनियन काढावी व शेंडी सोडावी (ज्याने कपड्यावरील सूक्ष्म जीव अन्नात येत नाहीत व शेंडी सोडल्याने मस्तिष्क ग्रंथीवरील ताण कमी होतो), हात पाय व तोंड स्वच्छ धुवावे व गुळणा करावा. आसनावर बसल्यावर आधी जमिनीवर पाण्याचे सिंचन करावे ( जमीन शुद्ध करावी), नंतर त्यावर पात्र ठेऊन पात्रावर सिंचन करावे (पात्र स्वच्छ करावे) मग पात्रात आहार पदार्थ घ्यावेत (वाढावेत). पात्रा भोवती पाणी फिरवावे जेणे करून जीव- जंतू त्यायोगे पात्राकडे येणार नाहीत. जीव-जंतूकरिता पात्राबाहेर चित्रावती द्याव्यात व भाताच्या 5 आहुती जाठराग्नीस द्याव्यात (पचनास हलका व जाठराग्नी प्रदीप्त करण्यास उपयोगी) नंतर हाताच्या तळव्यात बसेल एवढे पाणी ओठाच्या मदतीने प्यावे (ओढून पिऊ नये) जे फक्त घश्यापर्यंत जाईल जेणे अन्नाचा घास होणे व गिळणे या क्रिया व्यवस्थित होतील. मग संपूर्ण आहार घ्यावा. जेवणा नंतरही तळहातात पाणी घेऊन “अमृते पिधानमसी स्वाहा” म्हणून पाणी प्यावे ज्याचा अर्थ आता जठरावर झाकण टाकले आहे म्हणजेच जेवणानंतर जठरात काहीही टाकू नये (4 तास कमीत कमी विनाकारण गरज नसताना काही खाऊ अथवा पिऊ नये)
तरीही ही पोस्ट छोटी लिहीत आहे. आपल्याला आपल्या आर्य सनातन हिंदू धर्मावर अभिमान असावा. 🙏
. . . . वॉट्सॅपवरून साभार दि.१६-०६-२०२२
१५. जेवण करण्यापूर्वी मंत्र उच्चारण
जेवण करण्यापूर्वी मंत्र उच्चारण का आवश्यक आहे? शास्त्रोक्त कारण जाणून घ्या
अन्न ग्रहण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनेक प्रकारच्या ऊर्जा शरीरात प्रवेश करतात. खरं तर, अन्न आपल्या शरीराची हालचाल ठेवण्यासाठी इंधनासारखे काम करते. असे मानले जाते की जर शरीराला योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने अन्न मिळाले नाही तर अनेक शारीरिक विकार जन्म घेऊ शकतात. शुद्ध आणि सकस अन्न हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे आणि आपले मन देखील शुद्ध करते.
‘जसे अन्न खाल्ले जाते, तसे मन होते’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल, खरे तर ही म्हण म्हणण्यात आली आहे कारण स्वच्छ आणि शुद्ध पद्धतीने तयार केलेले अन्न अनेक प्रकारे फायदेशीर असते. म्हणूनच शास्त्रात असे अनेक नियम सांगितले आहेत की जेवण्यापूर्वी हात पाय धुणे, जमिनीवर बसून अन्न खाणे, अन्न अनेक वेळा चघळणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्न खाण्यापूर्वी मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. या सर्व प्रश्नांचे स्वतःचे महत्त्व आहे आणि शास्त्रात वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. ‘जेवण करण्यापूर्वी मंत्र का म्हणावे’ या अशाच एका प्रश्नाचे उत्तर आज आम्ही आपल्याला देणार आहोत-
कोणतेही पाप टाळण्यासाठी मंत्र आवश्यक आहे
असे मानले जाते की आपण जेवण सुरू करण्यापूर्वी आपण भोजन मंत्राचा जप केला पाहिजे. वास्तविक हा मंत्र अनेक पापांपासून मुक्तीचा मार्ग आहे. जेवणापूर्वी भोजन मंत्राचा जप म्हणजे ज्याने आपल्याला हे अन्न दिले आणि आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचा मार्ग मोकळा केला त्या देवाचे आभार मानणे. भोजन मंत्राचा उपयोग आपल्याकडून नकळतपणे झालेल्या कोणत्याही चुकीच्या क्षमेसाठी त्या देवाला प्रार्थना करण्यासाठी देखील केला जातो, जसे की शेतात नांगरणी करताना किंवा धान्य दळताना किंवा शिजवताना, एखादा प्राणी नकळत मेला तर देव आम्हांला त्या पापापासून मुक्त करील. पापांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक घास घेताना परमेश्वराचे नामस्मरण करावे आणि ते देवाला अर्पण करावे. जेवणापूर्वी अन्न मंत्र पठण केल्याने संस्कारांचा प्रवेश होतो
रज-तम-प्रधान वाणी जेवताना खात असलेले अन्न आणि वातावरणावर सारखे संस्कार करते. जेव्हा असे अन्न आपल्या शरीरात प्रवेश करते तेव्हा हे संस्कार आपल्या शरीरातून निघून जातात. अन्नावरील रज-तम संस्कारामुळे अन्न खाण्याचा मुख्य उद्देश म्हणजेच शरीर व मन सुदृढ असणे, हे पूर्ण होत नाही. त्यामुळे अन्न तयार करण्याआधी आणि भोजन करण्यापूर्वी भोजन मंत्राचा जप केल्याने शरीरात चांगले संस्कार होतात. तत्पूर्वी नामस्मरण केले असेल तरच या अन्नाचे सेवन खरोखरच लाभदायक ठरू शकते.
नकारात्मक शक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी
खाणे ही अशी प्रक्रिया आहे जी आजूबाजूच्या अनेक नकारात्मक ऊर्जांना देखील उत्तेजित करते. म्हणून अन्न खाताना आणि अन्न मंत्राचा जप करताना विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून कोणत्याही नकारात्मक उर्जेचा प्रवेश आणि कोणत्याही नकारात्मक उर्जेचा हस्तक्षेप टाळता येईल. म्हणून, हिंदू धर्मात भोजनाचा पहिला तुकडा भोजन मंत्रासह देवाच्या नावाने काढला जातो. असे केल्याने प्रत्येक नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते.
शास्त्र
भोजन मंत्राचा जप केल्यानंतर भोजन करणे शास्त्रानुसार अतिशय शुभ मानले जाते. अन्न मंत्राने शरीर सर्व प्रकारच्या शक्तींनी परिपूर्ण होते, असा शास्त्रात उल्लेख आहे. त्याचे पूर्ण फळ मिळावे म्हणून अन्न मंत्र पठण करण्याचीही पद्धत आहे. नियमानुसार भोजन केले आणि त्यापूर्वी अन्न मंत्राचा जप केला तर त्याचे फळ अनेक पटींनी वाढते. अन्न घेण्यापूर्वी हातपाय धुवावेत, तोंड स्वच्छ करावे व अन्न मंत्राचा जप करावा.
आपल्या भारतीय सनातन संस्कृतीत अनेक भोजन मंत्र असले तरी मुख्य तीन मंत्र आहेत. ज्यामध्ये प्रथम खालील मंत्राचा उच्चार करून सुरुवात करावी.
भोजन मंत्र ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्। ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना।१। ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:
अर्थ- हा मंत्र गीतेतील चौथ्या अध्यायातील २४ श्लोकांचा आहे. म्हणजे ज्या यज्ञात अर्पण केले जाते ते म्हणजे स्रुवा इत्यादि देखील ब्रह्म आहे आणि हवनयोग्य द्रव्य देखील ब्रह्कम आहे आणि ब्रह्मरूपाने अग्नीला अर्पण करणे हे रूप क्रिया देखील ब्रह्म आहे. त्या ब्रह्म कर्मात स्थित असलेल्या योगीला प्राप्त होण्यास योग्य फळ देखील ब्रह्मच आहे. अन्न॑प॒तेन्न॑स्य नो देह्यनमी॒वस्य॑ शु॒ष्मिणः॑ । प्रप्र॑ दा॒तार॑न्तारिष॒ऽऊर्ज॑न्नो धेहि द्वि॒पदे॒ चतु॑ष्पदे ।२। ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:
अर्थ- हा मंत्र यजुर्वेदातील ११ अध्यायांचे ८३ श्लोक आहे. हे परमपिता, परमात्मा, हे विविध अन्नधान्य देणाऱ्या! आम्हाला विविध प्रकारे अन्न पुरवा. आम्हाला रोगमुक्त आणि पौष्टिक आहार देऊन आम्हाला ओजस द्या. हे अन्नदात्याचे परोपकारी ! असा कायदा करा की प्रत्येक जीवाला अन्न मिळेल आणि सर्वांना सुख-शांती मिळेल. ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै। तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥ ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:।३।
अर्थ- हा अतिशय प्रसिद्ध मंत्र जो शाळांमध्ये शिकवला जातो. कथो उपनिषदातील हा श्लोक आहे. या मंत्राचा अर्थ असा की हे सर्व रक्षणकर्ता देवा ! आम्हा दोघांचे (गुरू आणि शिष्य) रक्षण करा. आम्हा दोघांना एकत्र पालन करा. आम्हा दोघांनाही बळ मिळो. आम्हा दोघांनी घेतलेले शिक्षण मंगलमय होवो. आम्ही कधीही एकमेकांचा मत्सर करू नये. शास्त्रामध्ये अन्न हे पूजनीय मानले गेले आहे, अन्न घेण्यापूर्वी आपण अन्नपूर्णा मातेचे आभार मानले तर अन्न आपल्याला नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा देते आणि अन्नामुळे होणाऱ्या अनेक विकारांपासूनही आपले रक्षण करते. अशाप्रकारे मंत्र शास्त्रानुसार अन्न खूप महत्वाचे आहे आणि जेवण्यापूर्वी तुम्ही देवाचे स्मरण केले पाहिजे, असे केल्याने तुम्हाला अन्नातून अधिक ऊर्जा मिळेल.
काल म्हणे आंतरराष्ट्रीय चहा दिवस होता. या निमित्याने मिळालेली काही मजेदार आणि काही उद्बोधक ढकलपत्रे (फॉरवर्ड्स) इथे संग्रहित केली आहेत. सर्व मूळ लेखक आणि विशेषतः श्री. कौस्तुभ केळकर नगरवाला यांचे मनःपूर्वक आभार
उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
मुंबईत तो पिला जातो पुण्यात घेतला जातो कोल्हापुरात टाकला जातो तर, नागपुरात तो मांडला जातो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
क्षण आनंदाचा असो वा आलेल असो टेंशन आळस झटकायला लागतो तसाच थकवा घालवायला ही लागतो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
काहीच काम नसताना पण चालतो आणि खूप काम असलं तरी पण लागतो गप्पा मारताना जसा लागतो तसाच एकटेपणा मिटवायला ही लागतो
चहा ला वेळ नसते पण, वेळेला चहाच लागतो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो…….
एक चहाप्रेमी ☕ कडून चहा दिनाच्या मंगलमय शुभेच्छा !
शुभ प्रभात
तुमचा दिवस आनंदात जावो ☕☕☕☕☕☕☕☕☕
माझे मित्र दिलीप पेंडसे यांची आठवण : मी मुंबैमधे चहाचे ऐस्क्रीम चवीने खाल्ले आहे, १९६१ साली.आपण?अरुणाचल मधे एका खेडेगावी चहाचे गरम डिकाॅक्शन वर याक या प्राण्यांचे दुधापासून बनविलेल्या लोण्याचा विरघळणारा गोळा हलवत चहा घेतला आहे!
चहा गीत : रात्रीचा समय सरुनि येत उष:काल हा, प्रिये चहाsss
☕☕☕☕☕☕☕☕☕
चहाची आरती – अप्पासाहेब पाटील
जय देव जय देव जय चहामाई एक घोट घेता स्फूर्ती तू देई जय देव जय देव
प्रातःकाले तुजवीण कोणी नाही सकाळ संध्याकाळ तुजसंगती जाई वेळी अवेळी तुझी आठवण येते चुलीवरती चहाचे भांडे ते चढते जय देव जय देव
नाश्त्यासोबत तू शोभून दिसशी भजी वड्या शेजारी तुझीच बशी ढगाळ दुपारी तुज वाचून घालवू कैसी गारठा पडला कि तुच तारीसी जय देव जय देव
सरकार दरबारी तुझी हाजेरी चहाशिवाय फाईल कैशी जाईल वरी फौजदार जमादार तुझे दस्तक सारे नमवीती तुजपुढे मस्तक जय देव जय देव जय
ऐसे गुण गाण तुझे गाता गाता पुढला चहाचा कप झाला रिता आता कोण्या देवीचे पाय मी धरु आपला चहा आता आपणच करू जय देव जय देव जय
😀😀😀
जय जय चहा 👍👍🌹
चाहूँगा मै तुझे (चहा, tea) साँझ सवेरे
☕☕☕☕☕☕☕☕☕
इस दिवस के उपलक्ष्य में. मजाकिया मिथुनवाला बीबी से, सुनो जैसे तुम्हारी बनायी हुई चाय मे शक्कर नही. . वैसे मेरा किसी और के साथ चक्कर नही.. ☕😳😳
☕☕☕☕☕☕☕☕☕
अंतरराष्ट्रीय चाय दिवस
मला हे comparison आवडले.
चहा…! की कॉफी…!!
चहा म्हणजे उत्साह.., कॉफी म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री.., कॉफी म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट.., कॉफी अक्षरशः निवांत…!
चहा म्हणजे झकास.., कॉफी म्हणजे वाह मस्त…!!
चहा म्हणजे कथासंग्रह…, कॉफी म्हणजे कादंबरी…!
चहा नेहमी मंद दुपार नंतर…, कॉफी एक धुंद संध्याकाळी…!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे…, कॉफी पिताना स्वप्न रंगवायची…!!! ☕🍵 ☕☕☕☕☕☕☕☕☕
सकाळी चहा आणि संध्याकाळ नंतर मात्र कॉफी…च
चहा कसा ओट्यापाशी केसांचा अंबाडा वळून अगदी घरगुती अवतारातही केला तरी चालतो… पण कॉफी चा वेगळाच आयाम…. ती छान तय्यार होऊन करायची किंवा छान तय्यार होऊन मस्त Enjoy करायची…
चहा कसा घोटभर कॉफी मात्र मोठा “मग”भर…
चहा असा गरम गरम झटकन चटकन पिउन मोकळं व्हायचं आणि कॉफी मात्र पिताना मस्त रेंगाळायचं…
चहा रोजच अनिवार्य कॉफी कधीतरी तरीही अनिवार्यच…
चहा म्हणजे चर्चा, गहन विषय सोडवतानाची गरज कॉफी म्हणजे कळत नकळत पेश करना “दिल की अरज…”
चहा म्हणजे हार्मोनियम कॉफी म्हणजे सतार…
चहा पिताना हवा झोंबता गारवा कॉफी पिताना हवा कातर मारवा…
किती लिहीणार या चहा आणि कॉफी वर… दोन्ही ही अनिवार्य जन्मभर…
☕☕☕☕☕☕☕☕☕
एक ऐतिहासिक माहिती
मिरजेत दोनशे वर्षांपूर्वी आला चहा सन १७९९ च्या पत्रात उल्लेख, चांदीची चहादाणी, परशुराम भाऊंनी मिरजेतून युध्दभूमीवर मागवला चहा शंभर वर्षांपूर्वी मिरजेत गाजलं चहाचं ग्रामण्य, नामजोशींबरोबर चहा पिणाऱ्या त्रिंबक साठेंच्या घरावर बहिष्कार
मानसिंगराव कुमठेकर मिरज
आज जागतिक चहा दिन..त्या निमित्ताने चहाच्या इतिहासाची चर्चा होत आहे. मिरज शहरात चहा हे पेय पेशवाईच्या उत्तरार्धात आल्याचे आढळून येते. प्रसिध्द सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सन १७९९ मध्ये मिरजेतून चहा मागविल्याची नोंद आहे. त्यामुळे सुमारे २२१ वर्षे चहा हे पेय मिरजकरांची तल्लफ भागवत आहे. तर, चहा पिण्यावरून शंभर वर्षांपूर्वी मिरजेत मोठे ग्रामण्य प्रकरण उद्भवले होते. किर्लोस्कर नाटक मंडळीचे तत्कालीन मॅनेजर त्रिंबक साठे यांच्या घरावर मिरजेतील ब्राम्हणांनी बहिष्कार घातला होता. अनेक शतकांपासून भारतात चहा हे लोकप्रिय पेय आहे. पूर्वी टपरीवर मिळणाऱ्या चहांचे विशेष ब्रॅन्डस ही तयार झाले आहे. त्यांच्या शाखा निरनिराळ्या शहरांतून चहाशौकिनांची तल्लफ भागवत आहेत. मात्र, मिरज शहरात चहा हे पेय पेशवाईच्या उत्तरार्धात आल्याचे आढळून येते. सन १७९९ मध्ये प्रसिद्ध सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनी युध्द भूमीवरून मिरजेस आपले पुतणे गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन यांना पत्र पाठवून चहा आणि चहादाणी मागविली होती. १५ एप्रिल १७९९ च्या या पत्रातील मागणीनुसार बाळासाहेब पटवर्धन यांनी २२ एप्रिल रोजी चहा व चांदीचे पात्र परशुराम भाऊंकडे रवाना केल्याची नोंद आहे. या नोंदीनुसार सुमारे २२१ वर्षांपूर्वी चहा हे पेय मिरजेत आल्याचे दिसून येते.
चहा मुळे मिरजेत उद्भवले ग्रामण्य एकमेकांना एकत्र आणणारा हाच चहा मात्र, काही व्यक्तिना त्रासदायक ठरला होता. सन १८९१ मध्ये पुण्यात पंचहौद मिशनमध्ये चहा घेतल्याने पुण्यातील ४२ व्यक्तिंवर जातिबहिष्कृतपणाचे ग्रामण्य सुरू होते. याच प्रकरणातील एक सदस्य नामजोशी हे २९ सप्टेंबर सन १८९२ रोजी मिरजेत आले. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर त्यांनी रिफ्रेशमेंट रूममध्ये त्रिंबकराव साठे यांच्याबरोबर चहा घेतला. त्रिंबकराव साठे हे प्रसिध्द अशा किर्लोस्कर नाटक मंडळीचे मॅनेजर होते. त्यांनी ‘पंचहौद’ प्रकरणातील व्यक्ति बरोबर चहा घेतल्याने मिरजेतील भिक्षुक मंडळीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. तीन-चार वर्षे त्यांच्या घरी श्राध्द, महालय, श्रावणी व अन्य विधी करण्यास ब्राम्हण येत नसत. प्रख्यात नाटककार गोविंद बल्लाळ देवल हे हरिपूरमधून जरूरीपुरते भिक्षुक आणून साठेंच्या घरची धर्मकृत्ये करीत. मिरजेतील या ग्रामण्याची काही कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहेत.
सन १८९५ मध्ये साठे यांच्या मातोश्रींचे निधन झाले. मध्यरात्रीची वेळ होती. नाट्याचार्य देवल हे साठेंच्या घरीच होते. मात्र, अंत्येष्टीसाठी भिक्षुक आवश्यक होता. मिरजेतल्या मंडळींनी तर बहिष्कार टाकला होता. रात्रीच्या वेळी मिरजेपासून दूर असणाऱ्या हरिपूरमधून भिक्षुक आणणेही अवघड होते. त्यामुळे नाट्याचार्य देवल यांनीच रात्रीच्या त्या समई अंत्येष्टीची पोथी कुणाकडून स्वतःच अंत्येष्टीचे विधी करण्याचे ठरवून मंत्राग्नीचे पाठ एकदा वाचून घेतले. साठेंच्या मातोश्रीची अंतयात्रा मध्यरात्रीनंतर तीन मैलावर असलेल्या कृष्णा नदीवर पोहचली. तितक्यात हरिपूरचे रावजी भटजी टांग्यातून येऊन त्यांनी मंत्राग्नीचा संस्कार केला. पुण्यातील पंच हौद प्रकरणाचा मिरजेशी अर्थाअर्थी काही संबंध नसताना केवळ नामजोशींबरोबर चहा पिल्याने त्रिंबकराव साठें सारख्या एका प्रतिष्ठीत गृहस्थावर ही वेळ आली होती. एका चहामुळे हा प्रसंग साठे कुटुंबावर सलग तीन-चार वर्षे ओढवला होता.
☕☕☕☕☕☕☕☕☕
आज बऱ्याच चहावरील पोस्ट वेगवेगळ्या ग्रुपवर वाचायला मिळाल्या त्यातलीच एक आवडलेली…….
आवड “टी”
सगळं टिपीकल. ठरवून आणलेला सहजयोग. मान खाली घालून, आपल्याच पायाचा अंगठा बघत तिची एन्ट्री. हातात कांदेपोही ट्रे डोळ्याच्या एका कोपर्यातून, तो तिला हलकेच डोळभरू बघतो. त्याला ती आवडते बहुतेक. पुढचा अर्धा तास. अपेक्षित 21 सवाल जवाब. बोलून दमलेली सिनीयर मंडळी. “तुम्ही दोघं बोला आता मनमोकळे…” त्या दोघांच्या वाट्याला मागच्या गॅलरीचा एक कोपरा. अरेच्च्या… गोड आहे तिचा आवाज. जवळून आणखी छान दिसतेय. पसंत आहे मुलगी. बहुतेक… हाच तर प्राॅब्लेम आहे त्याचा. पटकन् डिसीजन घेताच येत नाही त्याला. ती हळूच त्याच्याकडे बघते. त्याच्या डोक्यावर देवानंदी कोंबडा. ऊंच गोरापान. बँकेत नोकरी. स्वतःचं घर. आणखीन् काय हवं ? चालतंय की… तिची हरकत नाहीये. हवापाण्यावर फालतू चर्चा करून , दोघं ती पंधरा मिनटं वेस्ट करतात.. वडीलमंडळी आत बोलावतात. ती दोघं आत. ती स्वयपाकघरात सटकते. पाचच मिनटात ती चहाचा ट्रे घेऊन हजर. फुलांची बेलबुट्टी नेसलेले ठेवणीतले कप. नाजूक किणकिणणारे. चहाचा कप देताना झालेला की केलेला ओझरता स्पर्श. शॉक लगा शॉक लगा… तो चहाचा पहिला घोट घेतोक आणि… ठरलं.. तीच चव. त्याच्या आईसारखीच चव. तोच घट्ट दुधाळ चहा. एकदम कड्डक. “आठवल्यांकडचं दूध आणि.. राज एम्पोरियमचा फॅमिली मिक्श्चर ?” तो विचारतो. “अगदी बरोबर…” तिच्या बाबांच्या पांढऱ्या भरघोस मिशीतून, चहा गाळल्यासारखे शब्द सांडतात. चहा आवडतो, चहा पटतो.. म्हणून ती आवडते आणि तीही पटते. चट मंगनी पट ब्याह… त्याचे बाबा साखरपुड्याच्या वेळी शम्मीकपूर होतात. “बारात ठीक सात बजे पहुँच जायेगी. घबराईये नही.. हमें कुछ नही चाहीये.. हम सिर्फ ई इतना चाहते है की, हमारे घर आये मेहमानोंका स्वागत, सूनबाई ऐसेही चायसे करे..” सगळे खो खो खेळत ढगफुटी हसतात. आज तीस वर्षांनी त्याला सगळं आठवतंय. आयुष्याच्या संध्याकाळी, दिवसाच्या संध्याकाळी गॅलरीत बसून दोघं चहा ढोसतायेत. “तुझ्या हातचा टी आवडला , म्हणून तुला पसंत केली.” ती दातदिखाई तोंडभर हसते. ‘बघण्याच्या कार्यक्रमाच्यावेळी, माझ्याबरोबरची माझी मावसबहीण आठवत्येय ?” तिनं विचारलं. ” ती गोरीगोरी, घारोळी, कुरळ्या केसांची, सारखी खिदळणारी, साधना कट ?” तो नकळत बोलून जातो. “तिनंच केला होता चहा. मला चहा करताच येत नव्हता तेव्हा. साखरपुडा ते लग्न. मधे महिना होता फक्त. घोटून घोटून चहा करायची प्रॅक्टीस केली रोज.” ती निरागस इनोसन्टली बोलून जाते. “अर्रर …… ती पण चालली…” तो जीभ चावतो. तिचा चेहरा पडतो. त्याचं नेहमी असंच होतं. पटकन् कुठलाच डिसीजन घेता येत नाही त्याला. बास झालं. चहाचा रसाळ घोट फुरकावून, यावेळी तो फर्मली बोलून जातो. “मला तेव्हा तूच आवडली होतीस. आणि आत्ताचा तुझ्या हातचा चहा सुद्धा…” ती खूष. “तूच माझी आवड”टी”..” त्याच्या डोळ्यात ती हा एका वाक्याचा शिनेमा बघते आणि.. नव्याने दोन कप चहा टाकायला सुसाट किचनमधे पळते. हॅप्पीवाला “टी”डे टुडे !
……..कौस्तुभ केळकर नगरवाला.
*माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.. . . . . . .
.. .अनुमतिसाठी आभार
. . . . . . . . .. . . . . . . .
नवी भर दि. १५-१२-२०२१ – आज खरा जागतिक चहा दिवस आहे.
आज जागतिक चहा दिन
आज जागतीक चहा दिन…. पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.
चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते… जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.. मुंबईकरांनीही गुलाबी थंडीत पहिल्या चहाचा अस्वाद घेण्यासाठी गर्दी केली आहे.
अमृत प्राशन केलं की अमरत्व मिळतं असं म्हणतात… पण मर्त्य मानवाला अमृताचा लाभ कसा होईल? म्हणूनच मग अमृताशी पैजा जिंकणारा चहाच अमृततुल्य मानून पुणेकरांनी आपली कल्पकता दाखवली… आज जागतिक चहा दिवसाच्या निमित्तानं पुण्यातल्या या अमृततुल्य चहाची चव आपण चाखायलाच हवी….
झी २४ तास वरून साभार
आज १५ डिसेंबर आज जागतिकचहादिन. त्या निमित्ताने चहाचे विविध प्रकार. सीटीसी चहा. सीटीसी चहा म्हणजे आपण रोज घरात, आणि हॉटेलमध्ये पितो तो चहा. हा चहा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये बाजारात उपलब्ध आहे. चहाची पाने तोडून ती वाळवली जातात आणि मग त्यांना दाणेदार रूप दिले जाते. या प्रक्रियेत काही बदल होतात. चहाची चव आणि सुवास वाटतो. पण हा चहा ग्रीन टी इतका नैसर्गिक राहत नाही आणि तितका आरोग्यकारीही नसतो. ग्रीन टी. या चहाला प्रोसेस्ड केले जात नाही. हा चहा रोपाच्या वरच्या कच्च्या पानांपासूनच तयार केला जातो. पाने सरळ तोडून आपण चहा बनवू शकतो. यात अँटी-ऑक्सिडंट जास्त असतात. ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. विशेषत. हा चहा दूध आणि साखर न घालता प्यावा. यात कॅलरीही नसते. ग्रीन टीपासूनच हर्बल आणि ऑर्गेनिक चहा तयार केले जातात. हर्बल चहा. ग्रीन टीत तुळस, अश्व गंधा, वेलदोडे, दालचिनी वगैरे घालून हर्बल टी किंवा चहा तयार होतो. यात एक किंवा तीन चार हर्ब एकत्र करूनही घातले जातात. बाजारात हर्बल टी तयार पाकिटातून मिळतो. सर्दी खोकल्यावर हा हर्बल चहा गुणकारी आहे. औषध म्हणून याचा वापर जास्त होतो. ऑर्गेनिक टी. ज्या चहाच्या वनस्पतींच्या वाढीसाठी कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जात नाही, त्याला ऑर्गेनिक किंवा सेंद्रिय चहा म्हणतात. हा चहा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो. व्हाईट टी. हा चहा सर्वात कमी प्रोसेस्ड चहा आहे. काही दिवसांच्या चहाच्या कोवळ्या पानांपासून हा तयार केला जातो. त्याचा हलका गोड स्वाद खूप छान असतो. यात कॅफिनही खूप कमी आणि अँटी ऑक्सिडंट सर्वात जास्त असतात. एक कप व्हाईट टीमध्ये केवळ 15 ग्रॅम कॅफीन असते. तर ब्लॅक टीमध्ये 40 आणि ग्रीन टीमध्ये 20 ग्रॅम कॅफिन असते. ब्लॅक टी. कोणताही चहा दूध आणि साखर न घालता प्याला की, त्याला ब्लॅक टी असे म्हणतात. ग्रीन किंवा हर्बल चहा हा दूध न घालताच प्यायला जातो. पण कोणत्याही प्रकारचा चहा ब्लॅक टीच्या रूपात पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. इन्स्टंट चहा. या वर्गात टी बॅग्ज वगैरे येतात. म्हणजे पाण्यात घाला आणि लगेच चहा तयार. टी बॅग्जमध्ये टॅनिक अॅहसिड असते, हे नैसर्गिक अॅोस्ट्रीजेंट असते. यात विषाणूरोधक आणि जीवाणूरोधक गुण असतात. या गुणांमुळेच टी बॅग्ज सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापरले जातात. लेमन टी. लिंबाचा रस असलेला चहा आरोग्यासाठी चांगला असतो. कारण चहाचे जे अँटी ऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाहीत, लिंबाचा रस घातल्याने ते मिसळले जातात. मशीनचा चहा . अनेक ऑफिसेस, रेल्वे स्टेशन, विमानतळ वगैरे सार्वजनिक ठिकाणी मशीनमध्ये पैसे टाकल्यावर लगेच चहा मिळतो. गरमागरम चहा पिण्याचे समाधान याशिवाय या चहातून काही मिळत नाही. कारण यात कोणताही घटक नैसर्गिक नसतो. इतरही काही प्रकारचे चहा आहेत, त्यात ताण घालवण्यासाठीचा चहा, रिजूविनेटिंग, स्लिमिंग टी आणि आईस टी सध्या खूप लोकप्रिय आहेत. या चहांमध्ये विविध प्रकारच्या वनौषधी मिसळलेल्या असतात. उदाहरणार्थ दालचिनी, तुळस वगैरे. दालचिनीमुळे ताजेतवाने वाटते तर तुळशीमुळे प्रतिकारकशक्ती वाढते. स्लिमिंग टीमध्येही वजन कमी करण्यास मदत करणारे घटक आहे. चयापचय क्रियेचाही स्तर थोडा वाढतो. पण हा चहा केवळ पूरक म्हणून प्यावा. केवळ या चहाने वजन कमी होत नाही. आईस टी मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणून तो पिणे हिताचे नाही. संकलन.#संजीववेलणकर पुणे. ऋणानुबंध समूह अमरावती
. . . . वॉट्सॅप / फेसबुकवरून साभार
****************************************
नवी भर दि. २२-०५-२०२२ :
जागतिक चहा दिवस
चहा☕☕
चहा शब्द च हवाहवासा…. त्याला घेण्याचे कोणतेही फिक्स टाईम नाही. हा सकाळ व संध्याकाळ असतोच. चहासोबत बिस्किट नाष्टा, भजे, फरसान जोडीने काहीही चालते व व लज्जत वाढवतात.
चहा साधा कटिंग, मलाई मारके, अशा बरेच प्रकारातील मिळतो. येवलेकर चहा, अमृत चहा हे पण आता नावाजले. कुल्हड मधील चहा हा पण वेगळाच अनुभव देतो. चहा मधील घटक जसे अद्रक, विलायची, गवती चहा, चहा मसाला दूध इत्यादी घटकांवर आणि त्यांच्या प्रमाणावर चहाची रंगत ठरते ,दर्जा ठरतो. लॉंग ड्राईव्ह ला जायचे…. मधेच थांबून रस्त्यावर कोळशाचा निखाऱ्यावर भाजलेला भुट्टा आणि वाफाळता चहा घेतला की प्रवासाचा शीण चुटकीसरशी पळतो.. मस्त फ्रेश पुढे जायला तयार!! एक गरम चाय की प्याली हो.. कोई उसको पिलाने वाली हो… ही कल्पना सुखाची.. सर्वच पुरुष करतात (सर्वांनाच ती मिळते असे नाही! हा भाग वेगळा!!). महिलावर्गाला ही वाटतच की… आज रविवार आहे… मस्तपैकी संध्याकाळचा चहा तरी आहो नी हातात द्यावा… तो हातात दिलेला चहा खूप काही सांगून जातो.. प्रेमाचं प्रतीक च जणू!! चार जण जमल्यावर, गप्पांचा फड रंगतो.. तेव्हा या चहा ला तोड नाही! गप्पांमधे तो अजून रंगत आणतो. बरे वाटत नसेल तर आल्याचा चहा.. भिजून आला तर चहा.. थकलात घ्या चहा.. कंटाळा आला घ्या चहा…काहीच नाही तर ..आहे की चहा!! ग्रीन टी, ब्लॅक टी हे पण हळू हळू बस्तान मांडत आहेत पण चहा तो चहा.. वाह उस्ताद… खरे ना?
सौ सुचिता मेहेंदरगे १६/०९/२०२०
चहा दिवस २०२२
चहाचा महिमा
प्रिये ये त्वरेने चहा पिऊ दोघे मला आवडे ते संगे घेऊ दोघे || १ ||
गरम गरम वाफ निघे बघ त्याची जिभेवरी आठवे चव मग त्याची || २ ||
असे वाटते की पटकन उठावे गॅसवर पातेलं सुबक ठेवावे || ३ ||
दूध पाण्या संगे उकळूनी घ्यावे हलकेच त्यात मिश्री,पत्ती सोडावे || ४ ||
उकळून येता मग रंग बदलेल त्याचा जशी नववधू नवा रंग घेई सासरचा || ५ ||
हळूवार चहाला मग गाळून घ्यावे जणू दुर्गुण स्वतः विसर्जित करावे || ६ ||
निवांत बसोनी घोट घोट प्यावे मनी माणसा तू मग तृप्त व्हावे || ७ ||
असा हा महिमा चहाचा वदावा गृही अतिथी येता तयांना ही द्यावा || ८ ||
आधीच्या काळात जगभरात बहुतेक सगळीकडे राजेमहाराजांचे राज्य होते, पण विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे माझ्या लहानपणच्या काळापर्यंत सगळीकडे लोकशाही, हुकुमशाही, साम्यवाद वगैरे प्रकारच्या राजवटी आल्या होत्या. इंग्लंडसारख्या काही देशांमध्ये नावापुरते किंवा शोभेसाठी राजे, राण्या वगैरे उरल्या होत्या, पण त्यांच्या हातात सत्ता राहिली नव्हती. पण त्या काळात आपल्याकडे मात्र घरोघरी चार राजे आणि चार राण्या असायच्याच, इस्पिक, बदाम, चौकट आणि किलवरच्या ! तेंव्हा पत्त्याचा जोड ही एक घरातली आवश्यक वस्तू असायची आणि फावल्या वेळात पत्ते खेळणे हा लहानमोठ्या सगळ्यांचा आवडता विरंगुळा होता. मी तर अगदी मला कळायला लागल्यापासून भिकार-सावकार, पास्तींदोन, ३०४, बदाम७, झब्बू, रमी, चॅलेंज, पेनल्टी, नाठेठोम वगैरे खेळ खेळतच लहानाचा मोठा झालो. कॉलेजमध्ये गेल्यावर ब्रिजचा सॉफिस्टिकेटेड उच्चभ्रू खेळही शिकलो. लग्न झाल्यावर माझ्या सासुरवाडी मंडळींचे खूप मोठे कुटुंब होते. दिवाळीसारख्या काळात भरपूर पाहुणे मंडळी येत. तेंव्हा दहाबाराजण मिळून बिझिकचा डाव मांडला जात असे.
त्याच्या आधी म्हणजे मी नोकरीला लागलो तेंव्हा त्या टीव्हीच्या आधीच्या काळात आमच्या ट्रेनिंग स्कूलच्या हॉस्टेलमध्येसुद्धा पत्ते कुटणे हा टाइमपासचा पॉप्युलर मार्ग होता. बदाम सात किंवा झब्बू वगैरे खेळ तेंव्हा जरा बालिश वाटायला लागले होते. ब्रिज खेळण्यासाठी चार सराईत खेळाडू हवेत आणि एका वेळी फक्त चारजणच तो खेळू शकत. त्यापेक्षा रमी हा खेळ कितीही कमीजास्त मुले येऊन जाऊन खेळू शकत असल्यामुळे तोच जास्त खेळला जात असे.
“द्यूतामध्ये पांडव हरले” वरून झालेल्या महाभारतापासून बोध घेत “कध्धी कध्धी जुगार खेळू नये” हे माझ्या बालमनावर इतके ठसवले गेले होते की मी तोपर्यंत कधी एक पैसा जुगारावर लावला नव्हता. त्यामुळे पैसे लावून रमी खेळायला मी तयार होत नव्हतो, पण आमच्या ग्रुपमधल्या लीडरच्या मते जगात कोणीही आणि कधीही फुकट रमी खेळत नसतो. तसे केले तर खेळणारे लक्ष देणार नाहीत, कुणीच पॅक करणार नाही, सगळेजण खेळत राहतील, त्यामुळे कुणालाच हवी असलेली पाने मिळणार नाहीत आणि खेळ कंटाळवाणा होईल. त्याचे म्हणणे बरोबर वाटत असले तरी तोच सर्वात चलाख आणि हुशार असल्यामुळे तो नेहमी आपल्याला लुटेल असे वाटून काही मित्रांनी माझी बाजू घेतली. शेवटी अशी तडजोड करण्यात आली की अगदी कमी स्टेकवर खेळायचे आणि कुणीही तिथल्या तिथे रोख पैसे द्यायचे घ्यायचे नाहीत. सगळा हिशोब मांडून ठेवायचा आणि हरलेल्या पैशांची जितकी टोटल होईल तितके पैसे सगळ्यांनी मिळून हॉटेलात जाऊन खाण्यापिण्यात खर्च करायचे. यात जिंकलेल्या मुलांना फुकट खायला मिळत असले तरी हरलेल्यांना त्याचे विशेष दुःख होत नसे. गंमत म्हणजे मी सहसा हरत नव्हतो. त्यानंतर आमच्या कित्येक संध्याकाळी आणि रात्री रमी खेळण्यात आणि खाण्यापिण्यात रंगल्या.
घरोघरी टेलिव्हिजन आल्यानंतर रिकामा वेळ घालवायचे ते पहिल्या क्रमांकाचे साधन झाले, त्यासाठी एकत्र बसून पत्ते कुटायची गरज उरली नाही किंवा ती आवड राहिली नाही.. लहान लहान विभक्त कुटुंबे झाल्यामुळे घराघरात ईन मीन तीन माणसे शिल्लक राहिली. वाडा किंवा चाळ संस्कृती लयाला गेल्यामुळे शेजारी पाजारीही जमेनासे झाले. या सगळ्यांमुळे सामुदायिक पत्ते खेळणे मागे मागे पडत गेले. इंटरनेट आणि मोबाईल क्रांतीनंतर तर घरातली माणसेही एकेकांपासून दूर दूर रहायला लागली. लहान मुलेही मोबाईल किंवा टॅब्लेटवरच्या गेम्समध्ये रमायला लागली. त्यामुळे घराघरातून पत्ते कटाप होत गेले. मात्र काँप्यूटरवर एकट्यानेच खेळायचे फ्रीसेल आणि सॉलिटेअरसारखे अनेक पत्त्यांचे खेळही निघाले आणि त्यांच्या निमित्याने पत्त्यातले राजा राणी गोटू नेहमी माझ्याडोळ्यांसमोर येत असतात.
नोकरीत असतांना काही वर्षे आम्ही रोज अणुशक्तीनगरपासून कुलाब्यापर्यंत बसने जात होतो. तेंव्हा मात्र पुढच्या बाजूला चार चार जणांचे दोन ग्रुप ब्रिज खेळायचे आणि मागच्या बाजूची आठदहा मुले पपलू खेळायची. अर्थातच पपलूवर पैसे लावले जात आणि त्याचा हिशोब मांडून ठेवला जात असे. ब्रिज मात्र कसलीही कन्व्हेन्शन्स किंवा कसलाही विधिनिषेध न बाळगता, पैसे न लावता बिनधास आणि मोकळेपणाने खेळला जाई. त्यात नेहमी तावातावाने ओव्हरबिडिंग केले जायचे आणि ते अशक्य कॉन्ट्रॅक्ट बुडले की सगळेजण त्याचा दोष आपापल्या पार्टनरवर ढकलायचे. आमच्या बाजूला बसलेले दोघेतीघेही लक्ष देऊन आमचा खेळ पहात असत आणि कुणाचे कुठे चुकले हे सांगायला तत्पर असत. त्यामुळे प्रत्यक्ष खेळापेक्षा नंतर झालेली त्याची चिरफाडच जास्त रंगायची. पण त्या वादावादीतही एक प्रकारची मजा येत असे आणि मुंबईच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत करायचा प्रवास कंटाळवाणा होत नसे.
तर माझ्या अशा असंख्य आठवणी या पत्त्याच्या खेळाशी जोडलेल्या आहेत. अशा या पत्त्यांबद्दल मला मिळालेले तीन मनोरंजक लेख मी एकत्र केले आहेत. श्री.द्वारकानाथ संझगिरी आणि इतर अनामिक लेखकांचे मनःपूर्वक आभार. . . . . . . . आनंद घारे
१. तुम्हाला माहित आहे का पत्ते कॅलेंडरशी संबंधित आहेत. ☞ एका वर्षात 52 आठवडे असतात. पत्ते सुद्धा 52 असतात. ☞ एका वर्षात चार हंगाम असतात (Winter हिवाळा, Spring वसंत, Summer उन्हाळा, Autumn शरद). पत्त्यात सुद्धा 4 सुट (इस्पिक, बदाम, किलवर, चौकट) असतात. ☞ प्रत्येक हंगामात 13 आठवडे असतात. प्रत्येक सूट मध्ये 13 पत्ते असतात (1,2,3,4,5,6,7,8,9,10,11 गुलाम, 12राणी, 13 बादशाह) ☞ वर्षात 12 महिने असतात. पत्त्यात 12 चित्रांचे पत्ते असतात.(गुलाम, राणी, बादशाह) लाल पत्ते दिवस, तर काळे पत्ते रात्र दर्शवितात. ☞ 1+2+3+4+5+6+7+8+9+10+11+12+13 = 91 याला 4 ने गुणल्यास 91×4 = 364 आणि जोकरचा एक मिळवल्यास 365. एक वर्षाचे दिवस होतात. ☞ काय हा फक्त योगायोग आहे की सखोल बुद्धिमत्ता. ☞ आणखी थोडे गमतीशीर One, Two, Three, Four, Five, Six, Seven, Eight, Nine, Ten, Jack, Queen, King यातील अक्षरांची संख्या मोजा ती येते 52. ⇥ इस्पिक – नांगरणी /कर्तव्य दर्शविते. ⇥ बदाम – पीक /प्रेम दर्शविते. ⇥ कीलवर – भरभराट /वाढ दर्शविते. ⇥ चौकट – पीक काढणे /संपत्ती दर्शविते. ☞ कधी कधी 2 जोकर असतात ते लीप वर्ष दर्शवितात.
तर पत्ते हा फक्त खेळ नसून त्यामागे एक सखोल तत्वज्ञान आहे.🙏
२. पत्ते हरवले
एकेकाळी पत्ते हा कौटुंबिक खेळ होता. आठवड्यातून एकदा तरी पत्ते होत. आता शेवटचे पत्ते कधी खेळले आठवत नाही. माझ्या ताना पिही निपाजा ह्या पुस्तकातील ७, ८ वर्षापूर्वीचा यासंबंधीचा लेख मी वाचकांसाठी पुन्हा सादर करत आहे. . . . द्वारकानाथ संझगिरी
परवा कपाट लावताना माझं लक्ष एका पत्त्यांच्या कॅटकडे गेलं. माझ्या लग्नाच्या सुटाएवढा मला तो जुनाट वाटला. सुटाकडे पाहून तो मुलासाठी त्याच्या लग्नात उपयोगी होईल का, असा विचार माझ्या मनात येतो. त्या सुटाने माझ्या शरीराची साथ वीस वर्षांपूर्वीच सोडली. शरीराच्या महत्त्वाकांक्षेच्या कक्षा वाढल्या; त्या सुटाला झेपल्या नाहीत. तो खरा बोहारणीकडे जाऊन बार्टर सिस्टिमने भांडं घरात यायचं; पण त्याचे पैसे माझ्या सासर्यांनी दिले असल्यामुळे त्याला कपाटात मानाचं स्थान होतं.
पण तेच नशीब त्या पत्त्याच्या कॅटचं नव्हतं. तो कॅट, झुरळांसाठी ठेवलेल्या डांबरगोळ्या चघळत एखादा म्हातारा कुत्रा कोपर्यात पडून राहावा तसा पडून राहिला होता. पण माझ्यासाठी तो माझ्या बालपणीच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग होता. मीच तो काढून टेबलावर ठेवला. तो किंचित जीर्ण झाला होता. त्या कॅटवरची गोरी बाई वयोमानाप्रमाणे ‘पिवळी’ पडली होती. पण बावन्नच्या बावन्न पत्ते त्या कॅटमध्ये होते. हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याकडे जुळी मुलं आली की हरवतात, तसं पेन, रुमाल, महत्त्वाच्या व्यक्तीचा पत्ता किंवा फोन नंबर, रेल्वे तिकीट, क्वचित प्रसंगी मोबाइल वगैरे गोष्टी माझ्याकडे हरवण्यासाठी येतात. ‘इथे वस्तू हरवून मिळतील’ अशी पाटी माझ्या पाठीवर लावायला हरकत नाही. पण त्या कॅटमधला एकही पत्ता मी हरवला नव्हता. मर्सिडिजमधून जाणार्या माणसाने फियाटकडे पाहावं, तसं माझ्या मुलाने त्या पत्त्यांच्या कॅटकडे पाहिलं. माझ्यासाठी ती मर्सिडिज होती.
गोष्टींची पुस्तकं आणि पत्त्यांचा कॅट हे माझे लहानपणीचे सखेसोबती! गोष्टी कशा, तर पोपटात जीव असलेला राक्षस किंवा हट्टी राजकन्या. सरळ सुस्वभावी राजकन्या मला कधीच भेटली नाही. मी माझ्या मुलाला अशी पुस्तकं आणून दिल्याचं स्मरत नाही. तो टी.व्ही. आणि कॉम्प्युटरशी एकरूप झालेल्या पिढीतला. त्याला या फॅन्टसीची गरजच काय होती?
पण ही पिढी आणखी एका आनंदाला मुकली असं मला वाटतं. पत्ते खेळण्याच्या! गड्डा-झब्बू, बदामसत्ती, लॅडीस, चॅलेंज हे शब्द त्यांच्यासाठी स्पॅनिश भाषेएवढे परके आहेत. मी हे शब्द अभ्यासाबरोबर शिकलो. दबकत दबकत ‘रमी’ची माडी चढलो. लॅडीस खेळताना मला उगाच महिलांच्या डब्यात शिरल्यासारखं वाटायचं. खरंतर लेडीज आणि लॅडीस यांचा काहीही संबंध नसावा. लॅडीस खेळताना हातात इस्पीक एक्का आल्यावर कुंबळेला त्याचा चेंडू वळल्यावर किंवा रामदास आठवलेला केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावर होणार नाही, एवढा आनंद मला व्हायचा. बदाम-इस्पीकला मान होता; चौकट-किलवरला तितकासा नव्हता. पण पत्त्यांमध्ये ही जातिव्यवस्था का रुजली, हे मला कधीच कळलं नाही. गड्डा-छब्बू देताना पठाणाचं कर्ज फेडल्याचं समाधान वाटायचं. ‘चॅलेंज’ हा खेळ मी अत्यंत बावळट चेहर्याने खेळायचो. मूलतः माझा चेहरा बावळट असल्यामुळे चेहरा बावळट ठेवताना मला सलमानला अभिनय करताना पडतात, तसे कष्ट कधीच पडले नाहीत. चॅलेंज खेळात बनवाबनवी महत्त्वाची. चार एक्के म्हणत मी चार दुर्या बेमालूमपणे लावायचो आणि पुन्हा चार एक्के लावताना आता लावलेले खरे आहेत, असा भाव चेहर्यावर असायचा. या बाबतीत माझ्यात आणि शिबू सोरेनमध्ये साम्य आहे. त्याच वॉरंट निघूनही चेहर्यावर भाव स्वातंत्र्याच्या चळवळीत तुरुंगवास भोगल्यासारखा. उद्या तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याच्या चेहर्यावर भाव असतील चारधामची यात्रा करून आल्यासारखे. त्यामुळेच ‘चॅलेंज’ खेळातली माझी गती पाहून, हा मुलगा मोठेपणी मंत्री होईल, असं भाकीत अनेकांनी केलं होतं. माझ्या दुर्दैवाने ही खोटं बोलण्याची कला मला फक्त पत्त्यांमध्ये अवगत होती. एरवी तिकीट खिशात असूनही समोर चेकर आला, की माझा चेहरा खिशात तिकीट नसल्यासारखा होतो.
प्रवासाला निघालोय आणि पत्त्यांचा कॅट नाही, ही गोष्ट अशक्य होती. प्रवासाला जाताना मी एकदा तिकीट विसरलोय, खायचा डबा विसरलोय; पण पत्त्यांचा कॅट नाही. सुट्टीत जेवणं संपली, बिछाने घातले, की पत्ते सुरू. त्या वेळी माणशी एक खाट, हा हिशेब नव्हता. बिछाने हे घालायला लागायचे. घरातली सर्व मंडळी एकत्र यायची. माझ्या आजोबांचा घरात दरारा. सुना घाबरून असत. पण काकी माझ्या आजोबांच्या धाकाला न जुमानता झब्बू द्यायची. त्या वेळी सुनांना सासर्याचा दरारा वाटे. आताचे सासरे सुनांनी ताटात टाकलं ते गिळतात.
पत्ते हा सामाजिक बांधीलकी जपणारा खेळ आहे. मग ते गाडीतले प्रवासी असोत किंवा मुंबईच्या चाळीतले रहिवासी. आमच्या चाळीत पत्त्यांनी कितीतरी भांडकुदळ कुटुंबं एकत्र आणली. सौ. भोसले आणि सौ. दामलेंचं नळावरचं भांडण ठरलेलं. भोसले हे स्वतःला शिवाजी महाराजांच्या वंशातले असं समजायचे आणि तसं सांगायचे. पण एकदा चाळीत चोर शिरला तेव्हा त्याच्या हातात सुरा असेल असं समजून ते सार्वजनिक संडासात शिरले होते. ‘भीतीने काही झालंच तर होणारी गैरसोय टाळावी,’ या हेतूने ते तिथे शिरले, अशी मल्लिनाथी सौ. दामलेंनी तेव्हा केली होती. दामलेंच्या शौर्यकथाही चाळीला ठाऊक होत्या. एकदा ट्रेनने बाहेरगावी जाताना त्यांचा लहान मुलगा स्टेशनवर राहिला, तेव्हा डब्यातल्या लोकांनी ओरडून सांगितलं, ‘‘साखळी खेचा, खेचा.’’ त्यांचा हात साखळीजवळ जाईना. शेवटी सौ. दामल्यांनी पुढे सरसावून साखळी ओढली आणि म्हणाल्या, ‘‘हे संडासाची साखळी खेचत नाहीत, इथली कुठली खेचणार?’’ दोघांच्या भांडणात हे सर्व निघायचं.
पण भोसलेंच्या घरी रविवारी दुपारी मटणाचं जेवण झालं, की अळवाचं फदफदं आणि आंबट वरणाचे भुरके मारून दामले रमीच्या डावासाठी येत. सौ. भोसले या सर्वांना प्रेमाने चहा करून देत. मुंबईत कुठल्याही चाळीत शनिवार संध्याकाळ आणि रविवार दुपार ही रमी खेळण्यासाठी राखीव असायची. त्यांच्या मांडीला मांडी लावून मी थरथरत्या हाताने रमी शिकलो. पैसा पॉइंटने रमी खेळणं हेसुद्धा त्या वेळी रोमहर्षक वाटायचं. मला आठवतंय, पहिल्यांदा रमीत जिंकून मी पाच रुपये कमावले तेव्हा स्कॉलरशिप मिळाल्याचा आनंद माझ्या चेहर्यावर होता. माझ्या पहिल्या कमाईत मी सावंतांच्या शेवंताला मोगर्याचा गजरासुद्धा घेऊन दिला होता. ती गुडलक म्हणून माझ्या बाजूला बसायची. पुढे नोकरी लागल्यावर ऑफिसला जाताना स्टाफबसमध्ये मेंडीकोट आणि थोडं जमायला लागल्यावर ब्रिजचा डाव जमत असे. ऑफिसात पहिला चहा घेता घेता सुद्धा चर्चा असायची, ‘‘तू कशी चूक केलीस, गुलामाऐवजी राणी टाकायला हवी होतीस’’ किंवा ‘‘तू नोट्रम्च्या भानगडीत पडायलाच नको होतंस,’’ वगैरे गोष्टींची! पत्त्यांतलं डोकं फक्त आपल्यालाच आहे, ही प्रत्येकाची ठाम समजूत होती.
नंतर मी किंचित सुखवस्तू झालो. ट्रेनचा प्रवास संपून आधी स्कूटर आणि मग कार आली. चाळ जाऊन बंद दरवाजाचा फ्लॅट आला. भांडणं संपली होती. शेवंता दामल्यांच्या सुधीरचा हात धरून निघून गेली होती. पत्तेही नकळत निघून गेले होते. त्यांची जागा इतर गोष्टींनी घेतली. माझ्या मुलानेही कधी पत्त्यांचा हट्ट धरला नाही. गोट्या, गोष्टींची पुस्तकं, पतंग, पत्ते, मॅटिनी त्यांच्या आयुष्यात कधी आलेच नाहीत. टी.व्ही., कॉम्प्युटर, डिस्कोने त्यांची जागा घेतली. कधीतरी चिरंजीव कॉम्प्युटरवर पत्त्यांचा डाव मांडून एकटाच खेळताना दिसतो. पण पत्ते ही काही प्रेयसीप्रमाणे एकांतात आस्वाद घ्यायची गोष्ट नाही. ती चारचौघांत खेळून आस्वाद घ्यायची गोष्ट आहे. पण सोडलेली सिगरेट पुन्हा कधीतरी ओढावीशी वाटते, जुन्या प्रेयसीला पुन्हा भेटावंसं वाटतं, तशी पुन्हा एकदा पत्त्यांची मैफल जमवावीशी वाटते. पण कशी जमणार? दामले देवाघरी गेले. त्यांच्याशी भांडायला भोसले त्यांच्या पाठोपाठ गेले. शेजारी बसायला शेवंताही नाही. पत्ते कपाटात आहेत. त्यांतले गुलाम, राजाराणी नाहीत. काय करायचं खेळून?
( ताना पिहिनी पाजा ह्या मॅजेस्टिक प्रकाशनाच्या पुस्तकातून)
३. पत्त्यांचा डाव आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ
“शंकरलीला” या पुस्तकातील उतारा.
दुर्री – म्हणजे पृथ्वी व आकाश. तिर्री – म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. चौकी – म्हणजे चार वेद. पंजी – म्हणजे पंचप्राण. छक्की – म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, लोभ व मत्सर हे सहा विकार. सत्ती – म्हणजे सात सागर. अठ्ठी – म्हणजे आठ सिद्धी. नववी – म्हणजे नऊ ग्रह. दश्शी – म्हणजे दहा इंद्रिये = पाच कर्मेंद्रिये + पाच ज्ञानेंद्रिये. गुलाम – म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या वासना, इच्छा. माणूस त्यांचाच गुलाम होऊन जातो. राणी – म्हणजे माया. राजा – म्हणजे या सर्वांवर स्वार होऊन त्याना चालवणारा. एक्का – म्हणजे विवेक. माणसाची सारासार बुद्धी. या सर्व खेळाला स्वाधीन ठेवणारा तो “विवेक”. दश्शीवर दबाव असतो गुलामाचा. वासनाच इंद्रियांना नाचवते. वासना उत्पन्न होते मायेमुळे. तिच्या नादाने वाहावत जाते ते माणसाचे मन. माणूस. तो राजा, पण या राजालाही मुठीत ठेऊ शकतो तो विवेक. सर्वात महत्वाचं म्हणजे – “हुकुमाचा एक्का म्हणजे सद्गुरू” 🙏धन्यवाद🙏
इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना एक वाक्य नेहमी सांगितले जाते ते म्हणजे ” A QUICK BROWN FOX JUMPS OVER THE LAZY DOG” या वाक्याचे विशेषत्व हे आहे की ह्या वाक्यात इंग्रजी वर्णमालेतील सर्व वर्ण आले आहेत. पण आपण जर पाहिलं तर ह्या वाक्यात काही त्रुटी आढळून येतात जसं की इंग्रजी वर्णमालेत २६ वर्ण असताना इथे मात्र ३३ आले आहेत. O,A,E,U,R ह्यांचा परत परत वापर केला गेला आहे.तसेच A,B,C,D… हा क्रम पाळला नाही . तेच जर आपण खालचा श्लोक पाहिला तर संस्कृत भाषेची किमया आपल्याला लक्षात येईल- क:खगीघाङ्चिच्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढण:। तथोदधीन पफर्बाभीर्मयोSरिल्वाशिषां सह।।
अर्थात – पक्ष्यांचं प्रेम, शुद्ध बुद्धीचा, दुसऱ्याच्या बलाचे अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात अग्र, मनाने निश्चल व निर्भीड आणि महासागराचे सर्जन करणारा कोण आहे? असा राजा मय ज्याला त्याच्या शत्रूंचे देखील आशीर्वाद प्राप्त आहेत. ह्यात जर आपण पाहिलं तर संस्कृत वर्णमालेतील सर्व ३३ व्यंजने आली आहेत आणि ती ही अगदी क्रमाने. तसेच जर आपण संस्कृत वर्णमाला पाहिली तर ती सर्वात वैज्ञनिकदृष्ट्या तयार झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. स्वर – अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः। व्यंजन – कंठ्य- क ख ग घ ङ । तालव्य- च छ ज झ ञ । मुर्ध्न्य- ट ठ ड ढ ण । दन्त्य- त थ द ध न । ओष्ठ्य- प फ ब भ म । मृदु व्यञ्जन – य र ल व श ष स । महास्फुट प्राण- ह क्ष । वरील वर्गीकरण जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की किती वैज्ञानिक भाषा आहे संस्कृत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वर वेगळे व्यंजन वेगळे इंग्रजी सारखं सर्व एकत्र नाही. परत व्यंजनातही अजून वर्गीकरण कंठातून येणारे व्यंजन कंठ्य, तालातून येणारे तालव्य, टाळू आणि जिभेच्या द्वारे मुर्ध्न्य आणि ओठाद्वारे ओष्ठ्य. त्यातही कंठ ते ओठ क्रम अगदी योग्य. परत पुढे जर पाहिले तर प्रत्येक वर्गातील १ व ३ व्यंजन अल्पप्राण (कमी श्वास लागणारे) आणि २ व ४ व्यंजन महाप्राण (जास्त श्वास लागणारे). प्रत्येक वर्गातील पाचवे व्यंजन म्हणजे अनुनासिक अर्थात नाकाचा वापर करून उच्चारावे लागते. त्यामुळेच संस्कृत भाषा ही संगणकासाठी सगळ्यात योग्य भाषा आहे असं वैज्ञानिकांच मत आहे. संस्कृत भाषेची जादू बघायची झाल्यास आपण संस्कृतातील वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करून पाहू शकतो. त्यातील काही विशिष्ट उदाहरणे खाली देत आहे. ‘माघ’ नावाचे एक महाकवी भारतामध्ये होऊन गेले. त्यांनी त्यांच्या ‘शिशुपालवधम्’ ह्या महाकाव्यात केवळ ‘भ’ आणि ‘र’ ह्यांचा वापर करून एक श्लोक तयार केला आहे. तो असा – भूरिभिर्भारिभिर्भीभीराभूभारैरभिरेभिरे। भेरीरेभिभिरभ्राभैरूभीरूभिरिभैरिभा:।। अर्थात – जमिनीला पण वजनदार वाटेल अशा, वाद्ययंत्राप्रमाणे आवाज काढणाऱ्या आणि मेघाप्रमाणे कृष्णवर्ण असणाऱ्या निर्भीड हत्तीने आपल्या शत्रू हत्तीवर हल्ला केला. तसेच ‘किरातार्जुनीयम्’ ह्या काव्य संग्रहात महाकवी ‘भारवि’ ह्यांनी केवळ ‘न’ चा वापर करून श्लोक तयार केला आहे. न नोननुन्नो नुन्नोनो नाना नाना नना ननु। नुन्नोSनुन्नो ननुन्नेनो नानेना नन्नुनन्नुनुत्।। अर्थात – जो मनुष्य युध्दात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून घायाळ होतो तो खरा मनुष्य नाहीये, जो आपल्यापेक्षा दुर्बलांना घायाळ करतो तो ही खरं मनुष्य नाही ये, ज्या मनुष्याचा स्वामी घायाळ नाही ये तो घायाळ नाही ये आणि घायाळ मनुष्याला घायाळ करणारा खरा मनुष्य नाही ये. पुढे जर पाहायला गेलं तर महायमक अलंकरातील एक श्लोक आहे. ह्याचे चारही पद सारखे आहेत पण प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न आहे. विकाशमीयुर्जगतीशमार्गणा विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः। विकाशमीयुर्जगतीशमार्गणा विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः॥ अर्थात – अर्जुनाचे बाण सर्वत्र व्याप्त झाले आहेत. ज्यामुळे शंकरांचे बाण खंडित झाले आहेत. ह्याप्रकारे अर्जुनाचे रणकौशल पाहून दानवांचा पराभव करणारे शंकरांचे गण आश्चर्यचकित झाले आहेत. शंकर आणि तपस्वी अर्जुनाचे युद्ध पाहण्यासाठी शंकरांचे भक्त आकाशात आले आहेत. हे वाचून तुम्हाला संस्कृत भाषेची किमया लक्षात आलीच असेल. तेंव्हा “भाषाणां जननी” असणाऱ्या संस्कृत भाषेचा प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा.
शेवटी माघ कवींनी केलेल्या कृष्णाच्या स्तुतीने थांबतो. दाददो दुद्ददुद्दादी दाददो दूददीददोः। दुद्दादं दददे दुद्दे दादाददददोऽददः॥ अर्थात – श्रीकृष्ण, प्रत्येकास वरदान देणारा, दुराचारी माणसाचा छळ करणारा व त्यांना शुद्ध करणारा, जो आपल्या हातांनी दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या दुराचारी लोकांचा नाश करू शकतो. त्या कृष्णाने शत्रूवर आपले वेदनादायक बाण मारले. धन्यवाद..!! जयतु संस्कृतम्..!!
विश्वंभर मुळे (गोंदीकर)
संस्कृत भाषेतील शब्दांची साखळी
संधि या पद्धतीने दोन शब्दांना जोडून एक नवा शब्द करण्याची सोय संस्कृत भाषेत केली आहे हे या भाषेचे एक वैशिष्ट्य आहे. ही साखळी कशी लांबवत नेली आहे हे वरील उदाहरणात दिले आहे. आता गंगेच्या अनुशंगाने त्यात आणखी काही शब्दसुद्धा जोडता येणे शक्य आहे.
आजकाल व्हॉट्सअॅपवर अनेक मजेदार कोडी प्रसारित होत असतात. अशीच काही कोडी संग्रहित करायचे मी ठरवले. अशी २० कोडी पहिल्या भागात संग्रहित करून झाल्यानंतर आणखी कोडी येतच राहिली. म्हणून मी आता हा दुसरा भाग उघडला आहे. यात नवी कोडी दिली आहेत. तुम्हीही आधी ही कोडी सोडवायचा प्रयत्न तर करून पहा. मला मिळालेली जमतील तेवढी उत्तरे मी खाली दिली आहेत.
१.ज्यांनी समुद्रप्राशन केला…?? २.ह्या ऋषींना भगवान परशुरामांनी पृथ्वी दान केली होती…?? ३.ह्या ऋषींनी कुंतीला वरदान दिले होते…?? ४.ह्या ऋषींच्या अस्थी पासून एक शस्त्र बनविले होते…?? ५. परशुरामाचे वडील आणि शंकराचा एक अवतार…?? ६.चंद्राचे वडील…?? ७.महर्षी वेद व्यासांचे वडील…?? ८.ह्या ऋषींचा ग्रह , तारे, तसेच भविष्य शास्त्र याचा अभ्यास होता…?? ९.मेनका हिने या ऋषींचा तपोभंग केला होता…?? १०.विष्णूचा अवतार वामन ह्यांच्या आई वडिलांची नावे…?? ११.श्री रामाचे गुरु…?? १२.श्री कृष्णा चे गुरु…?? १३.कौरव आणि पांडव यांचे गुरु…?? १४.द्रोण भीष्म पितामह यांचे गुरू…?? १५.ह्या ऋषींनी शकुंतला हीचा सांभाळ केला होता…?? १६.ह्या ऋषींचा अणु रेणू चा अभ्यास होता…?? १७.या ऋषींच्या नावाने एक पक्षी आहे…?? १८.लवकुशांचा सांभाळ केला १९.गुरुपौर्णिमा हा उत्सव यांचे स्मरण म्हणून केला जातो २०. गणपतीस्तोत्र या महर्षींनी लिहिले…??
काही प्रार्थना कित्येकांच्या मुखोद्गत असतात. असेच काही छोटे श्लोक व प्रार्थना पुढील अक्षरांवरुन तुम्हाला ओळखायचे आहेत जसे प्रा वि क ग वि द सा प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा। १ मो मो मी बा ता २ व म सू को स ३ या कुं तु हा ध या शु व ४ स मं मां शि स सा ५ क व ल क म स ६ गु र्ब्र गु र्वि गु र्दे म ७ ग जो ई स गु ८ म स भ पं जा ९ आ प तो य ग सा १० शां भु श प सु ११ ब्र नं प सु के ज्ञा मू १२ स सु स स स नि १३ स स यो तु घ १४ व क घे ना घ्या श्री १५ शु क क आ ध सं १६ प्र म रा चिं जा १७ कै शि चं फ मा मु झ १८ व सु दे कं चा म १९ मा रा म रा स्वा रा म रा २० त्व मा पि त्व त्व बं स त्व २१ ज्या ज्या ठि म जा मा त्या त्या ठि नि रू तु
२२ भी रू म रु व ह मा २३ रा रा स वि रा र भ
🙏सौ. चारुलता घोंगे🙏
.
. १.मोरया मोरया मी बाळ तान्हे २. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ३. या कुंदेंदु तुषार हार धवला ४. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ५. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती ६. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः ७. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ८. मना सज्जना भक्ति पंथेचि जावे ९. आकाशात् पतितम् तोयम् यथा गच्छति सागरम् १०. शांताकारम् भुजगशयनम् पद्मनाभं सुरेशम् ११. ब्रह्मानंदं परमसुखदम् केवलं ज्ञानमूर्तीम् १२. १३. सदा सर्वदा योग तूझा घडावा १४. वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे १५. शुभंकरोति कल्याणम् आरोग्यं सुखसंपदा १६. प्रभाते मनी राम चिंतीत जावा १७. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी १८. वसुदेवसुतम् देवम् कंसाचाणूरमर्दनम् १९. माता रामो मत्पिता रामचंद्रः २०. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुः सखा त्वमेव २१. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
१ बाग आहे पण फुले नाहीत २ वहात्या पाण्याचा थांबा ३ सांगायला दगड पण आहे गाव ४ थकल्या भागल्यांची वाडी ५ मदतीचा हात पुढे करणारे ६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको ७ आडवी तिडवी वस्ती ८ लहान पाखरू ढेरी मोठी ९ फाॅरेनची गल्ली १० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती ११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली १२ मिठाई वाला हनुमान १३ बेवडा ब्रीज १४ पिडाकारी दैवताचा ओटा १५ हार आहे तोही दगडाचा १६ याचे थालीपीठ होत नाही १७ नकार देणारी पेठ १८ नमुनेदार वसाहत १९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत २० इथे बांगडीवाले आहेत का हो? २१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली २२ गिळंकृत करणारे मास्तर २३ सगळे इथे एेटीत २४ सुगंधित नगर २५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय!
तुमची वेळ सुरु होतेय आत्ता :
कालावधी : वाचल्यानंतर 3 तास. …. नाहीच जमले तर उत्तरे खाली पहा 🤨🤨🥱😴🙂☺️
.
.
.
१ बाग आहे पण फुले नाहीत – तुळशीबाग २ वहात्या पाण्याचा थांबा – नळस्टॉप ३ सांगायला दगड पण आहे गाव – पाषाण ४ थकल्या भागल्यांची वाडी – विश्रांतवाडी ५ मदतीचा हात पुढे करणारे – सहकारनगर ६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको – येरवडा ७ आडवी तिडवी वस्ती – वाकडेवाडी ८ लहान पाखरू ढेरी मोठी – चिमण्या गणपती ९ फॉरेनची गल्ली – हॉंगकॉंग लेन १० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती – लोकमान्य नगर ११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली – धनकवडी १२ मिठाई वाला हनुमान – जिलब्या मारुती १३ बेवडा ब्रीज – दारुवाला पूल १४ पिडाकारी दैवताचा ओटा – शनी पार १५ हार आहे तोही दगडाचा – खडकमाळ १६ याचे थालीपीठ होत नाही – विद्यापीठ १७ नकार देणारी पेठ – नाना पेठ १८ नमुनेदार वसाहत – मॉडेल कॉलनी १९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत – हिराबाग २० इथे बांगडीवाले आहेत का हो? – कासारवाडी २१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली – घोरपडी पेठ २२ गिळंकृत करणारे मास्तर – हडपसर २३ सगळे इथे ऐटीत – हिंजवडी २४ सुगंधित नगर- चंदन नगर २५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय! -मगरपट्टा
🤨🤨🥱😴🙂☺️🤨🤨🥱😴🙂☺️🤨🤨🥱😴🙂☺️
२५. ळीकारांत शब्द
बघुया तुमचे मराठी किती पक्के ! . किमान १० उत्तरे देणारा हुशार ! 😊🙏 . प्रत्येक उत्तर लिहिताना शेवटचे अक्षर “ळी” आले पाहिजे.
1 हाताचे शेवटचे बोट,., 2 एक कडधान्य…… 3 फणसातील बी…. 4 कृत्रिम दात….. 5 केरळमध्ये राहणारा माणूस… 6 पावसाचे पाणी पत्र्यावरून खाली पडते.. 7 प्राण्यांचे नाव.. 8 आचमनासाठी वस्तू… 9 फाल्गुन महिन्यातील सण…. 10 वाळलेली केळी…. 11 सरळ नाक असलेल्या स्त्रीच्या नाकाची उपमा.. 12 रामदास स्वामींच्या खांद्याला असते ती… 13 सकाळी म्हणायचे भजन.. 14 दोन्ही हातांनी वाजवतो ती… 15 भाजी चिरायचे साधन… 16 नारळाच्या झाडाची फांदी… 17 पायच्या बोटातील दागिना … 18 एक रंग…. 19 संतांच्या हातातील वाद्य… 20 महाराष्ट्रातील एक जात… 21 डॉक्टरांचे औषध .. 22 लहान लाकडे एकत्र बांधून केलेली .. 23 पुरात न मोडणारे.. 24 तीन ठिकाणची केलेली यात्रा … 25 फुल उमलण्यापूर्वीची अवस्था… 26 अनेक डाळींच्या पिठाचा घा 27 श्रीखंड बासुंदीत शोभेसाठी घालतात.. 28 गव्हाच्या पिठाची करतात ती .. 29 पेशव्यांच्या कानातील दागिना… 30 मदतीसाठी मोठय्याने मारतात ती,.. 31 सण समारंभात दारात काढतो ती.. 32 पूरण घालून करतो ती… 33 दिवाळीतील तिखट पदार्थ… 34 दूध घालतो ती.. 35 बागकाम करणारा .. 36 दिव्यांचा सण .. 37 झाडाची पण खाते ती.. 38 संक्रातीला या रंगाची साडी नेसतात .. 39 गालावर पडते ती.. 40 प्रतिस्पर्ध्याची मात ..
चला मित्रमंडळी तुमची वेळ सुरू होते आहे आता ……. आपल्याकडे तर पैकीच्या पैकी गुण मिळवणारे हुषार लोक आहेत.🙂
आज मी एक मजेदार प्रश्न मंजुषा घेऊन येत आहे. तुम्ही रोजच advertise बघता ना टीव्ही वर. तिथलेच काहीसे उत्तर. मग तयार ना… 1)नृत्य देवताच्या नावाने प्रसिद्ध पेन्सिल 2)फुलाच्या नावाने प्रसिद्ध बाम 3)अमर प्रेमाचे प्रतीक असलेला चहा 4)हिंदु देवताच्या नावाने प्रसिद्ध चार चाकी वाहन 5)काकाच्या नावाने ओळखले जाणारे चिप्स 6)उद्योग पतीच्या नावाने प्रसिद्ध बल्ब 7)उंच शिखराच्या नावाने प्रसिद्ध मसाला 8)अति महत्त्वाची व्यक्ती या नावाने सुटकेस 9) उत्तराखंड तील पर्वताच्या नावाने फेस वॉश 10)उद्योग पतीच्या आडनाव ने न. वन साबण 11)बगिच्याच्या नावाने ओळखले जाणारी साडी 12)एका शहराच्या नावाने ओळखले जाणारे चादर 13)एका झाडाच्या नावाने प्रसिद्ध असलेले टूथ पेस्ट 14)आशिया खंड या नावाने प्रसिद्ध असलेले पेंट 15)एका पक्षाच्या नावाने प्रसिद्ध साबण 16)वरदान देणाऱ्या पिठाचे नाव 17)बाय बाय करनारे प्रसिद्ध नमक 18)डोकं आणि खांदा चा वापर करून बनवलेला कोंडा शाम्पू 19 पहिली प्रसिद्ध धावपटु च्या नावाने प्रसिद्ध पंखा 20)चाकाच्या नावाने असलेले कपडे धुण्याचे साबण
. . .
1)नृत्य देवताच्या नावाने प्रसिद्ध पेन्सिल. नटराज . 2)फुलाच्या नावाने प्रसिद्ध बाम. झंडू बाम 3)अमर प्रेमाचे प्रतीक असलेला चहा. ताजमहाल चहा . 4)हिंदु देवताच्या नावाने प्रसिद्ध चार चाकी वाहन. मारुती . 5)काकाच्या नावाने ओळखले जाणारे चिप्स. अंकल चिप्स 6)उद्योग पतीच्या नावाने प्रसिद्ध बल्ब. बजाज 7)उंच शिखराच्या नावाने प्रसिद्ध मसाला. एव्हरेस्ट 8)अति महत्त्वाची व्यक्ती या नावाने सुटकेस. व्हीआयपी 9) उत्तराखंडातील पर्वताच्या नावाने फेस वॉश. हिमालय 10)उद्योग पतीच्या आडनाव ने नं. वन साबण. टाटा 11)बगिच्याच्या नावाने ओळखले जाणारी साडी. गार्डन सिल्क 12)एका शहराच्या नावाने ओळखले जाणारे चादर. सोलापूरी 13)एका झाडाच्या नावाने प्रसिद्ध असलेले टूथ पेस्ट. नीम टूथ पेस्ट 14)आशिया खंड या नावाने प्रसिद्ध असलेले पेंट. एशियन पेंट 15)एका पक्षाच्या नावाने प्रसिद्ध साबण. डोव्ह साबण 16)वरदान देणाऱ्या पिठाचे नाव. आशीर्वाद आटा 17)बाय बाय करनारे प्रसिद्ध नमक. टाटा नमक 18)डोकं आणि खांदा चा वापर करून बनवलेला कोंडा शाम्पू . हेड ऐंड शोल्डर 19 पहिली प्रसिद्ध धावपटु च्या नावाने प्रसिद्ध पंखा. उषा पंखा 20)चाकाच्या नावाने असलेले कपडे धुण्याचे साबण. व्हील साबण
२७ ष्ट / ष्ठ चे शब्द
शब्द सुचवा,
मात्र प्रत्येक शब्दाच्या शेवटी “ष्ट” किंवा ” ष्ठ” असे जोडाक्षर असावे.
. . १. गोष्ट २. स्पष्ट ३. धष्टपुष्ट ४. पिष्ट ५. अरिष्ट ६. परिशिष्ट ७. विशिष्ट ८. घनिष्ट ९. खाष्ट १०. उद्दिष्ट ११. उत्कृष्ट १२. सर्वोत्कृष्ट १३. निकृष्ट १४. आप्तेष्ट १५. वसिष्ट १६. स्वामीनिष्ठ १७. समाविष्ट १८. शिष्ट १९. दुष्ट २०. भ्रमिष्ट २१. कष्ट २२. इष्ट २३. पुष्ट २४. ज्येष्ठ २५. संतुष्ट २६. अनिष्ट २७. इष्ट २८. अष्ट २९. आकृष्ट ३०. उष्टं ३१.क्लिष्ट ३२. दुष्ट ३३. स्वादिष्ट ३४. चविष्ट ३५. छंदिष्ट ३६. नादिष्ट ३७. भ्रष्ट ३८. वितुष्ट ३९. कनिष्ठ ४०. घनिष्ट ४१. मिष्ट ४२. गर्विष्ठ ४३. दृष्ट ४४. अष्ट
२८. ‘की’ कारांत शब्द
नमस्कार मंडळी. आज आपल्या साठी एक नवीन कोडे पाठवित आहे. थोडासा विचार केला तर सहजपणे सोडविता येईल. अट फक्त एकच, शेवटचे अक्षर “की”असलेले शब्द शोधायचे आहेत.
०१ दाराची बहीण ०२ मातीची भांडी ०३ कृष्णाची माता ०४ नवनागातील एक नाग ०५ एक कडधान्य ०६ छोटे लाकूड ०७ एक अलंकार ०८ एक काव्यप्रकार ०९ एक आजार १० एक नाते ११ दोन बोटांनी केलेला आवाज १२ छोटी पोळी १३ रामपत्नी १४ छोटे तालवाद्य १५ नाकाचा अलंकार १६ केवडा १७ आखूड १८ पाहिजे तेव्हढी १९ चकचकीत २० एक रंग २१ शारीरिक आवेग २२ केरळमधील धरण २३ ३॥ पट २४ संगीत वैशिष्ट्य २५ दुफळी २६ रंग उडालेली २७ एका घाटाचे नांव २८ ढोंगी २९ नाचणारी ३० पतंगाची मदतनीस ३१ गुद्दा ३२ स्वतःभोवती फिरणे ३३ एक नदी ३४ अशुभ चेहरा ३५ मोडलेली ३६ आवडती ३७ लबाड ३८ निराधार ३९ भीती ४० दुरावा असलेली ४१ एक जुने नाणे ४२ क्षणिक झोप ४३ कापसाचे बी ४४ बडबडी ४५ एक ऋषी ४६ भावंडातील दुजाभाव ४७ एक विद्यापीठ ४८ कीड पडलेली ४९ एक छोटे तालवाद्य ५० पराक्रम
१. उगवला चंद्र पुनवेचा २.झुलतो बाई रास झुला ३. कर हा करी धरिला शुभांगी ४. लाजून हासणे अन् हासून ते पहाणे ५. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ६.डाव मांडून भांडून मोडू नको ७. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे ८. विसरशील खास मला दृष्टीआड होता ९. फुलले रे क्षण माझे फुलले रे १०. जाईन विचारित रानफुला ११. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले १२. तुला न कळले मला न कळले १३. मज गमे ऐसा जनक तो १४. अजुनी रुसून आहे खुलता कळी खुलेना १५. आज अचानक गाठ पडे १६. अरे वेड्या मना तळमळसी १७. कृष्णा मिळाली कोयनेला १८. मालवून टाक दीप १९. जाळीमंदी पिकली करवंदं २०. समजावुनी व्यथेला समजावता न आले २१. मावळत्या दिनकरा
३०. शब्दाचा दुसरा अर्थ
दिलेल्या वाक्यावरून शब्दाचा दुसरा अर्थ सांगायचा आहे. 🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏 1 हार पण गळ्यातील नाही 2 बंडल पण नोटांचे नाही 3 चपला पण पायताण नाही 4 समाधी पण थडगे नाही 5 मजला पण मला नाही 6 फूल पण देवासाठी नाही 7 पत्र पण डाक नाही 8 फळ पण खाण्याचे नाही 9 तळ पण मुक्काम नाही 10 चीज पण खाण्याचे नाही 11 ठोक पण मार नव्हे 12 बेडी पण लग्नाची नाही 13 उत्तर पण दिशा नाही 14 कुडी पण दागिना नाही 15 सडा पण फुलांचा नाही 16 कळ पण वेदना नाही 17 धार पण पाण्याची नाही 18 जरा पण किंचीत नाही 19 दागिना पण चिंचेशी संबंध नाही 20 काटा पण फुलाचा नाही 🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏
१. पराजय २. थापा ३. वीज ४. समाधी लावणे ५. माळा प्लोअर ६. मूर्ख ७. पान ८. परिणाम, कर्माचे फळ ९. तळपाय १०. उपयोग ११. घाऊक १२. हातकडी १३. प्रश्नाचे उत्तर १४. शरीर १५. सडाफटिंग १६. यंत्राचा भाग १७. सुरीची धार १८. म्हातारपण १९.चिंचपेटी २०. वजनाचा काटा
३१.हिंदी गाणी -१
आजची क्वीझ : आजचे प्रश्न सोपेच आहेत विषय — प्रत्येकात दोन उत्तरे आहेत . १) आशा भोसले यांचा दागिना हरवला आहे ,त्या एकदा मराठीत सांगतात तर एकदा हिंदीत.कोणत्या गाण्यातून सांगतील . मराठी: बुगडी माझी सांडली ग. हिंदी : झुमका गीरा रे २) एकात नायिका सांगते ती मागे च आहे तर दुसऱ्यात नायक सांगतोय तो पण मागेमागेच आहे.पहिलं आशाचं दुसरं रफीचं . 3)सलील चौधरी यांचे संगीत फार उच्च दर्जाचे मानले जाते .स्वतः लता त्यांची फॕन ! त्यांचे दोन सिनेमे कोणते ज्यात एकही गाणं नव्हतं ,तरीही ते सिनेमे गाजले. ४)पूर्वी मुलींची लग्न जुळणं हा एक प्रॉब्लेम असायचा ,आता मुलगा असो मुलगी असो लग्न जुळणं (आणि ते टिकणं) हा प्रॉब्लेम आहेच .त्यामुळे जाहिराती वधुवरसुचक मंडळ यांचा सहारा घ्यावा लागतो . आता जी दोन गाणी ओळखायची आहेत ती तर चाळीस पन्नास वर्षांपूर्वीची आहेत .एकात नायक चक्क वधुवरसुचक मेळाव्यात जशी माहिती नाव आडनाव घराचा संपूर्ण पत्ता घरात कोणकोण हे सांगावं लागतं तसं सांगतो. तर दुसऱ्यात तो जाहिरात दिल्यासारखं सांगतो. दोन्हीही किशोरकुमार ची गाजलेली गाणी आहेत . ५)साधनाची दोन गाणी ,एकात तिचा दागिना हरवला आहे तर दुसऱ्यात तोच दागिना सापडला आहे ६) ही दोन्ही गाणी नाना ची आहेत.एकात खरे नाना आहेत म्हणजे आजोबा (मुखड्याच्या शेवटी उल्लेख येतो).तर दुसरे डुएट आहे. पहिल्यात हिरो हिरॉईनला स्टोरी सांगत असतो तर दुसऱ्यात तिच्या कडून western dance शिकत असतो.दोन्हीही एकाच सिनेमाची गाणी. एक रफीचे दुसरे रफी सुमनचे . ७)ही दोन रफी आशाची गाणी .दोन्हीही मध्ये रफीचं म्हणणं आहे की आत्ता आता तर आली आहेस आणि आत्ताच? दोन्हीही अतिशय गाजलेली गाणी एकात देवआनंद तर दुसऱ्यात जितेंद्र . ८)कावळ्याला उडून जा सांगणारी ही दोन गाणी .त्याला कोणतीही भाषा येत नसल्याने कुठल्याही भाषेत सांगितलं तरी काय फरक पडतो. एकात लता मराठीतील एका गाण्याच्या कडव्यात कावळ्याला उड उड म्हणतेय तर दुसऱ्यात उदित नारायण पंजाबी मिश्रित हिंदीत उडुन जा म्हणतोय ! ९)आता थोडी काठिण्यपातळी वाढवू रामायणात सीता तरी वनवासात रामाच्या बरोबरच होती.पण लक्ष्मणाच्या बायकोच्या दुखाःचं काय .मराठीत तरी एका गाण्याने तिला न्याय दिला आहे. हिंदीत शेवटी आनंद बक्षीनीच एका गाण्यात तिची कैफियत मांडली आहे. सर्वांसमक्ष ती रामाला तिच्या दुखाःबद्दल सांगते ? दोन्हीही गाणी ओळखा १०)ही दोन्हीही गाणी सलील चौधरी ची ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांची . एक लताचं दुसरं आशाचं . खरं तर ह्या डॉक्टरला सांगायच्या गोष्टी क्षणा क्षणाची ह्रदयाची वाढती धडधड वगैरे . एकात वैजयंतीमाला तर एकात तनुजा !
कोड्याचे उत्तर-
२- जरा हौले हौले चलो मोरे साजना ( सावन की घटा) दिवाना मुझसा नहीं इस अंबर के नीचें ( तीसरी मंजिल ) ३ – कानून, इत्तेफाक ४- माय नेम इज एंथोनी गोन्साल्विस (अमर अकबर) जरूरत है जरूरत है जरूरत है(मनमौजी) ५- झुमका गिरा रे(मेरा साया) मिला है किसीका झुमका(परख) ६- एक था गुल और एक थी बुलबुल ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे ७- अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं ढल गया दिन हो गयी शाम ८ – मराठी- पैल तो गे काऊ कोकताहे हिंदी- उड़ जा काले कावा तेरे मूँह विच खंड पावा ( गदर ) ९- मराठी- उर्मिले त्रिवार वंदन तुला ( भावगीत) हिंदी- ओ रामजी बडा़ दुख दीना (रामलखन) १०- घड़ी घड़ी मेरा दिल धड़के (मधुमती) बागमें कलियाँ खिली (चाँद और सूरज)
३२. हिंदी गाणी -२
हमारे जमानेके हिन्दी सिनेमाके कुछ प्रसिद्ध गानोंके अंतरे की एक पंक्तियों को नीचे दिया गया है।
बेवजह तारीफ़ करना आप की आदत तो नहीं
उनकी तमन्ना दिल में रहेगी , शम्मा इसी महफ़िल में रहेगी
नशे की रात ढल गयी , अब खुमार ना रहा
ज़िन्दगी है इक सफ़र, कौन जाने कल किधर
जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
शबनम के मोती, फूलों पे बिखरे
बदले दुनिया सारी, तुम न बदलना
दूर है मंज़िल दूर सही प्यार हमारा क्या कम है
इन होंठों की हसरत में , तपते जलते होते
ऐसा कहाँ रे, ऐसा कहाँ रे
पूर्ण उत्तर १. आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है … घर – गुलजार २. प्यार किया तो डरना क्या … मुगले आझम – शकील बदायुनी ३. दोस्त दोस्त ना रहा .. संगम – शैलेंद्र ४. आ जा सनम मधुर चाँदनी मे हम .. चोरी चोरी – हसरत जयपुरी ५. मै जिंदगी का साथ निभाता चला गया … हम दोनों – साहिर लुधियानवी ७. गाता रहे मेरा दिल … गाइड – शैलेंद्र ८. राही मनवा दुख की चिंता क्यूँ सताती है … दोस्ती -आनंद बक्षी ९. तुमने मुझे देखा होकर मेहरबाँ … तीसरी मंजिल – मजरूह सुलतानपुरी १०. गोरी तेरा गाँव बडा प्यारा …. चितचोर – रविंद्र जैन
३३. मराठी गाणी
खालील वाक्यांवरून मराठी गाणी ओळखायची आहेत.
१) Oh my dear friend , you are asking me honey but — 2) The same moon is shining in the sky 3) I am a brave soldier of a new period , new era 4) The sons of human are helpless / dependent in this world 5) The Goddess Saraswatee has sat on a peacock 6) People will feel sorry for a very few days 7) We should love this life and enjoy it hundred times 8) Here I am swallowing glasses after glasses of drink carelessly 9) These trees , climbers and the animals in this forest are my relatives 10) The star of Venus and a gentle breeze
१. मधु मागसि माझ्या सख्या परी २. तोच चंद्रमा नभात ३. ४. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ५. ६. जन पळभर म्हणतिल हाय हाय ७. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ८. धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले ९. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे १०. शुक्रतारा मंद वारा
३४ ‘स’ शेवटचे अक्षर असलेले शब्द
डोकेबाज कोड आहे. असे चार अक्षरी शब्द लिहा की त्यातले शेवटचे अक्षर “स” आले पाहिजे.
1 आजूबाजूला- 2 प्रशस्त- 3 दूधाचा एक पदार्थ – 4 संगत सोबत- 5 चेष्टा- 6 हट्ट किंवा हेका – 7 लाळ – 8 काकडीचे लोणचे – 9 घाबरणे किंवा तळमळ – 10 हुज्जत घालणे – 11 कथेकरी बुवा – 12 अधिक महिना – 13 लंघन – 14 फालतू बडबड – 15 एकरूप होणे – 16 एक संत – 17 एक गोड पक्वान्न – 18 डौलदार पक्षी- 19 तर्क वितर्क – 20 एक अलंकार – 21 वर्षातील चार महिन्याचा काळ – 22 भाबडा – 23 उदंड – 24 खमंग- 25 एक राग – 26 बंदुकीची गोळी – 27 पोरकं किंवा अनाथ – 28 एक तीर्थक्षेत्र- 29 मसाल्याचा एक पदार्थ – 30 राबता – 31 तरफदारी – 32 “D” जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारा आजार-
1 आजूबाजूला- आसपास 2 प्रशस्त- ऐसपैस 3 दूधाचा एक पदार्थ – खरवस 4 संगत सोबत- सहवास 5 चेष्टा- उपहास 6 हट्ट किंवा हेका – ध्यास 7 लाळ – मुखरस 8 काकडीचे लोणचे – कायरस 9 घाबरणे किंवा तळमळ – कासावीस 10 हुज्जत घालणे – घासाघीस 11 कथेकरी बुवा – हरदास 12 अधिक महिना – मलमास 13 लंघन – उपवास 14 फालतू बडबड – बकवास 15 एकरूप होणे – सहवास 16 एक संत – रामदास 17 एक गोड पक्वान्न – सुधारस 18 डौलदार पक्षी- राजहंस 19 तर्क वितर्क – अदमास 20 एक अलंकार – कर्णघोस 21 वर्षातील चार महिन्याचा काळ – चातुर्मास 22 भाबडा – निरागस 23 उदंड – भरघोस 24 खमंग- खरपूस 25 एक राग – मालकंस 26 बंदुकीची गोळी – काडतुस 27 पोरकं किंवा अनाथ – बेवारस 28 एक तीर्थक्षेत्र- बनारस 29 मसाल्याचा एक पदार्थ – खसखस 30 राबता – उठबस 31 तरफदारी – शिफारस 32 “D” जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारा आजार- मुडदुस
**************
३५ उकाराचे तीन अक्षरी शब्द
प्रत्येक शब्द तीन अक्षरी हवा. शब्दाची सुरवात उ अक्षराने व्हायला हवी. बाराखडीच्या क्रमाने शब्द शोधल्यास कोडे लवकर सुटेल.
१ मोदकाची पारी २गर्मी ३कुटण्याचे साधन ४नदीची सुरवात ५पाऊस थांबणे ६आगाऊ रक्कम ७धिंगाणा ८निमगोरा ९वैराण १०प्रकाश ११दिवाळीत अंगाला लावतात १२झोप उघडणे १३मालाचा खप १४दक्षिणेतील आचारी १५झेप १६एक डाळ १७कमतरता १८चांगले १९जबाब २०प्रगती २१भव्यदिव्य २२खोल नव्हे ते २३पाणी २४सूर्य उगवणे,विकास २५पोट २६खिन्न २७व्यापार २८भले करणे २९बोलीवर पैसे,वस्तु देणे ३०कंटाळा ३१बाग ३२विष्णू ३३भरती ३४खोडकर ३५एक नास्ता ३६अनशन ३७समुद्रातील वाळू काढणे ३८खोकल्याची ढास ३९दोघे ४०मनाची प्रसन्नता ४१शंकर ४२लक्ष्मणाची पत्नी ४३कामाची गती ४४जास्त होणे ४५सरळ नव्हे ते ४६वमन ४७बोलणे,श्लोक म्हणणे ४८विलंब ४९दम टाकणे ५०शिजवलेले कडधान्य.
व्ही.जी.कुलकर्णी यांचे कोडे आहे
१. उकड २. उकाडा ३. उखळ ४. उगम ५. उघाडी ६. उचल ७, उच्छाद ८. उजळ ९. उजाड १०. उजेड ११. उटणे १२. उठणे १३. उठाव १४. उडपी १५. उड्डाण १६. उडीद १७. उणीव १८. उत्तम १९. उत्तर २०. उत्कर्ष २१. उत्कृष्ट २२. उथळ २३. उदक २४. उदय २५. उदर २६. उदास २७. उदीम २८. उद्धार २९. उधार ३०. उद्वेग ३१. उद्यान ३२. उद्धव ३३. उधाण ३४. उनाड ३५. उपमा ३६. उपास ३७. उपसा ३८. उबळ ३९. उभय ४०. उमेद ४१. उमेश ४२. उर्मिला ४३. उरक ४४. उलटी ४५. उलटे ४६. उलटी ४७. उच्चार ४८. उशीर ४९. उसासा ५०. उसळ
३६.पूजेचे साहित्य ओळखा
खाली पूजेचे साहित्य दिले आहे, अक्षरे विस्कळीत आहेत ती बरोबर करून पूजेला लागणाऱ्या साहित्याची यादी मिळवा..😊👍🏻
उदा. प दी प धु = धूपदीप
1 टा शं घं ख 2 म्ह प ता ण ळी 3 दा ध क्ष गं अ 4 ले हा र फु 5 न ई रा म जं स नि 6 न ग स ट रं आ पा चौ 7 र द शे कुं दुं ळ कुं ह 8 क्का ला बु ल गु 9 ब ऱ्या पा म सु दा 10 ई ळे ठा फ मि 11 र उ त्ती पू ब का द 12 र श ना ल क ळ 13 स्त्र का व सा प चे 14 वे ड न जो जा 15 ने ड्या पा ची वि 16 ळे आं हा चे ड ब्या 17 कुं क ळ रि ह खा ड 18 णे र र प ता उ ब पिं 19 रे ळ ब गु खो 20 ल र्वा स बे दू ळ तु 21 ती ल वा ते वा ल ती फु 22 टी ण ओ ख 23 ब चे ळी खां के 24 से क्षि पै टे णा सु द 25 डे ब्या भां तां 26 ळ हू दु ग तां 27 क चे त ती ब र आ 28 ती पा र धु 29 ती पु र का र आ 30 त ध मृ ख चा दू र सा पं 31 द्य हा वे म नै
एक कोडे जरा विरंगुळा आणेल मधल्या अक्षरावर रफार असणारे 3 अक्षरी शब्द लिहा उदाहरणार्थ : एक शहर = कर्जत
१] कथानकाचा पहिला अर्धा भाग = २] सगळ्या गोष्टींची माहिती असणारा = ३] बरा न होणारा आजार = ४] चिखल = ५] नवजात शिशू = ६] पाषाणहृदयी = ७] गुजराण = ८] दर्शविणे,दाखविणे = ९] पक्का विचार = १०] आरसा = ११] स्वच्छ,नितळ = १२] त्याज्य,वगळलेला = १३] निडर = १४] विनवणी,साकडे = १५] नेहमी = १६] हवा नसलेला = १७] अभिनंदनाचा एक प्रकार = १८] माजोरडा = १९] तक्रार = २०] एकांत ठिकाण = २१] माल परदेशात पाठविणे =
मला सुचली तेवढी उत्तरे दिली आहेत. कृपया बाकीची कळवावी. १. पूर्वार्ध २. सर्वज्ञ ३. दुर्धर ४. कर्दम ५. अर्भक ६. निर्दय ७. निर्भर ८. दर्शन ९. निर्धार १०. दर्पण ११. निर्मळ १२. १३. निर्भय १४. १५. सर्वदा १६. निर्वात १७. १८. १९. २०. २१. निर्यात
*************
३८. नाट्यगीते ओळखा
प्रश्नमंजुषा
नाट्यपदे ओळखा. उदाहरणार्थ : शु मी वं = शुरा मी वंदिले
१. ते लो गो = २. म म भा हा = ३. हृ ध हा बो ख = ४. उ चं पु = ५. ख तो प्रे = ६. प्री सु दु = ७. न कृ स = ८. ग स रा सा = ९. न वि सं मी = १०. वि म मी या = ११. प्र अ ग = १२. मृ र मो = १३. प्रि प रा स स = १४. म मं सा = १५. जी मु तू ज टा पा ज = १६. यु म दा र = १७. स व व ना = १८. ज गं भा = १९. दे हा श = २०. घे छं म = २१. र मी चं क =
प्रश्नमंजुषाकार..
AK मराठे,कुर्धे, पावस,रत्नागिरी
१.तेजोनिधि लोहगोल २. मला मदन भासे हा ३.हृदयी धरा हा बोध खरा ४. उगवला चंद्र पुनवेचा ५. खरा तो प्रेमा ६. प्रीती सुरी दुधारी ७. नरवर कृष्णासमान ८. गर्द सभोती रान साजणी ९. नको विसरू संकेत मीलनाचा १०. विलोपिले मधुमीलनात या ११. प्रभू अजि गमला मनी तोषला १२. मृगनयना रसिक मोहिनी १३. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनि १४. मदनाची मंजिरी साजिरी १५. जीवनातल्या मुशाफिरा तू जपुन टाक पाऊल जरा १६. युवति मना दारुण रण १७. सत्य वदे वचनाला नाथा १८. जय गंगे भागीरथी १९. दे हाता शरणागता २०. घेई छंद मकरंद २१. रवी मी चंद्र कसा मज
१. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी २. रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना ३. पान जागे फूल जागे भाव नयनी दाटला ४. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना ५. फुले का पडती शेजारी, फुले वेचत बहरू कळियांसी आला ६. घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला ७. बहरला पारिजात दारी , ८. चाफा बोलेना, चाफा चालेना ९. मोगरा फुलला १०. अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ११. अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती हो १२. काटा रुते कुणाला, आक्रंदताति कोणी १३. आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे १४. वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं १५. सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का १६. चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचले १७. बगळ्यांची माळ फुले अजूनि अंबरात १८. नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायचा १९. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख २०. या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या २१, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
******************************
४०. पासवर्ड ओळखा
A man locked his personal computer with a password and wrote some words in the hint box. One day his wife tries to login in his absence using the hints which contained the following:
आज सरलेल्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्याने मिळालेले काही संदेश … वॉट्सअॅपवरून साभार
२०१९
काळाच्या अनावर
वाहत्या ओघात
आपल्या आयुष्यातल्या काही वर्षांचा
हिशोब काय ठेवणार?
आयुष्याने जर इतकं
अमर्याद दिलं आहे
तर मग जे मिळालं नाही
त्याचा हिशोब काय ठेवणार?
सुहृदांनी दिला आहे
इतका स्नेह, इतकं प्रेम
तर शत्रूंच्या शत्रूत्वाचा
काय हिशोब ठेवणार?
लख्खं उजेडाचे
इतके दिवस आहेत इथे
तर रात्रींच्या अंधाराचे
काय हिशोब ठेवणार?
आनंदाचे दोन क्षण
पुरेसे आहेत उमलण्याला
तर मग मनातल्या खिन्नतेचा
काय हिशोब ठेवणार?
मधूर आठवणींच्या खुणा
इतक्या आहेत आयुष्यात
की थोड्याशा दुःखद गोष्टींचा
काय हिशोब ठेवणार?
इतकी फुले मिळाली आहेत
काही जिवलगांकडून
काटे किती बोचले
याचा काय हिशोब ठेवणार?
चंद्राचे चांदणे इतके
हृदयंगम आहे की
त्यावर कलंक केवढा
याचा काय हिशोब ठेवणार?
केवळ आठवणीनीच
अंतःकरण पुलकित होत असेल
तर मग भेटलो न भेटलो
याचा हिशोब काय ठेवणार?
काही ना काही नक्कीच
खूप छान आहे प्रत्येकात
मग जरासे काही चुकले असेल तर
त्याचा काय हिशोब ठेवणार?
२०२०..✍🏻
कवी : अज्ञात
मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता…
” सरणारे वर्ष मी “
मी उद्या असणार नाही
असेल कोणी दूसरे
मित्रहो सदैव राहो
चेहरे तुमचे हासरे
झाले असेल चांगले
किंवा काही वाईटही
मी माझे काम केले
नेहमीच असतो राईट मी
माना अथवा नका मानु
तुमची माझी नाळ आहे
भले होओ , बुरे होओ
मी फक्त ” काळ ” आहे
उपकारही नका मानु
आणि दोषही देऊ नका
निरोप माझा घेताना
गेट पर्यन्त ही येऊ नका
उगवत्याला ” नमस्कार ”
हीच रीत येथली
विसरु नका ‘ एक वर्ष ‘
साथ होती आपली
धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला
तुम्ही मला खुशाल विसरा
दोष माझा प्राक्तनाला
शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही
मी माझे काम केले
बाकी दूसरे काही नाही
निघताना ” पुन्हा भेटु ”
असे मी म्हणनार नाही
” वचन ” हे कसे देऊ
जे मी पाळणार नाही
मी कोण ? सांगतो
” शुभ आशीष ” देऊ द्या
” सरणारे वर्ष ” मी
आता मला जाउ द्या।
————————–
नेमकं काय झालं
तेच घर
तीच माणसे
तीच कामे
तीच भांडणे
काहीच नाही बदललं
म्हणे वर्ष सरलं
सांगा नेमकं काय झालं ?
सणवार
पाहुणेरावळे
लग्नकार्य
उपासतापास
यातच आयुष्य गेलं
म्हणे वर्ष सरलं
सांगा नेमकं काय झालं ?
अहो गेले ते गेले
उरले ते आपले
पाहुण्याला निरोप द्यावा
तसं वर्ष सोडावं
दुसरा पाहुणा येतो तसं
नव्याला सामोरं जावं
कसले फटाके न् मिठाई
आले तसे वर्ष जाई
कर्तव्याच्या चाकोरीत
आला दिवस घालवणं
हवेत विरले तरी
नवे संकल्प करत रहाणं
आपल्या हाती एकच
कॅलेंडरचं पान उलटणं
डाॅ. तरुजा भोसले – वळसंगकर
——————-
इस बीतते वर्ष पर शिवमंगल सिंह ‘सुमन’ की चन्द अनमोल पंक्तियाँ ..
जिस-जिस से पथ पर स्नेह मिला, उस-उस राही को धन्यवाद।
जीवन अस्थिर अनजाने ही,
हो जाता पथ पर मेल कहीं,
सीमित पग डग, लम्बी मंज़िल,
तय कर लेना कुछ खेल नहीं
दाएँ-बाएँ सुख-दुख चलते,
सम्मुख चलता पथ का प्रमाद
जिस-जिस से पथ पर स्नेह मिला, उस-उस राही को धन्यवाद
साँसों पर अवलम्बित काया,
जब चलते-चलते चूर हुई,
दो स्नेह-शब्द मिल गये,
मिली नव स्फूर्ति, थकावट दूर हुई
पथ के पहचाने छूट गये,
पर साथ-साथ चल रही यादें
जिस-जिस से पथ पर स्नेह मिला, उस-उस राही को धन्यवाद….
💐Very nice Tribute to the Passing Year 2019…. A Poem by Gulzar:
आहिस्ता चल ज़िंदगी,
अभी कई कर्ज चुकाना बाकी है
कुछ दर्द मिटाना बाकी है,
कुछ फ़र्ज़ निभाना बाकी है ।
रफ्तारमे तेरे चलने से –
कुछ रूठ गए, कुछ छुट गए ।
रूठों को मनाना बाकी है,
रोतों को हसाना बाकी है ।
कुछ हसरतें अभी अधुरी है,
कुछ काम भी और ज़रूरी है ।
ख्वाहिशें जो घुट गई इस दिल में,
उनको दफनाना बाकी है ।
कुछ रिश्ते बन कर – टूट गए,
कुछ जुड़ते-जुड़ते छुट गए ।
उन टूटते-छूटते रिश्तों के,
ज़ख्मों को मिटाना बाकी है।
तु आगे चल मैं आता हूं,
क्या छोड़ तुझे जी पाऊंगा ?
इन सांसों पर हक है जिनका,
उनको समझना बाकी है ।
आहिस्ता चल ज़िंदगी,
अभी कई कर्ज चुकाना बाकी है ।।
——————————
2019 संपताना आणि 2020 ला सुरुवातीपासुनच ….
😔 दुःख — Delete करून टाका
😄 आनंद– Save करून घ्या
👥 नाते—-Recharge करा
👭 मैत्री —-Download करा
👹 शत्रूत्व — Erase करून टाका
👆 सत्य —Broadcast करा
😷 खोटे—Switch Off केलेलेच बरे
🙄 तणाव—Not Reachable होईल तेवढे चांगले
❤ प्रेम – Incoming असूदे
💔 दुस्वास–Outgoing होईल तर बरे
😃 हास्य—Inbox मध्ये घ्या
😭 अश्रु – Outbox मध्येच राहू द्या
😡 राग—-Hold वर ठेवा
😊 स्मितहास्य—Send करत रहा
📩 मदत—-Ok म्हणा
💟 मन—Vibrate मोड वर ठेवा
मग बघा आयुष्यातील Ringtone कसा सुंदर वाजतो
👌🏻
——————————
माणसाने जरूर पुढे आणि पुढेच जावे
परंतु क्षणभर मागे वळून पहावे…..
नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्प,नवीन दिशा, एक नवी सुरुवात. बरेच वेळा झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे… असे म्हणतात. पण जुन्या गोष्टी दुर्लक्षित करून मनुष्याला भविष्याकडे जाता येत नाही.
आज जुन्या गोष्टींविषयी विचार करण्याचा दिवस. आपल्या हातून घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवून,पुढील वर्षी त्यातून चांगल्या कशा होतील ते बघण्याचा दिवस. तसेच गतकाळात झालेल्या चुका त्यामागची कारणे शोधून काढून, पुढे त्या कशा टाळता येतील असा संकल्प करण्याचा आजचा दिवस.
नुकत्याच सुरू झालेल्या उत्तरायराणा मुळे उत्साहाने उत्कर्ष साधण्यासाठी मी, माझ्या कुटुंबासाठी व देशासाठी अजून काय करू शकतो ते ठरवण्याचा आजचा दिवस आहे.
आपणा सर्वांना येणारे इंग्रजी नववर्ष सुखासमाधानाचे, भरभराटीचे, आरोग्यदायी जावो ही प्रभू राम चरणी प्रार्थना.
————————–
वैसे शुभकामनाएं तो ठीक हैं……सब लोग फारवर्ड कर ही रहे हैं, लेकिन मैं आपको ऐसी शुभकामनाएं देना चाहता हूं कि वास्तव में आपका भला हो और मन प्रफुल्लित हो जाए——-
मेरी कामना है कि :-
1 – आपका जीवन साथी आपसे लड़े नहीं और आपकी हर बात बिना कहे मान जाए ।
2 – आपकी काम वाली बाई रेगुलर आती रहे!
3-आप चाहे जितना भी खाना खाए, आपका वजन न बढ़े!
4 – आपके मोबाइल की बैटरी हमेशा फुल चार्ज रहे–
5 – आपको सदा पार्किंग की जगह मिल जाए!
6- आपका घर हमेशा परफेक्शन से सैट रहे!
7- फैशन अनुरूप कपड़े हमेशा आपकी अलमारी में भरे रहें!
8- आपको बहुत सारी फिल्में देखने का मौका मिले!
9 – कोई भी प्रोग्राम या पार्टी में आपको क्या पहनना है, वो सपने में ही पता चल जाए !
10- And last but not the least!…..पिंक नोटों से आपका बटुआ हमेशा भरा रहे!
आपको और आपके परिवार को नया साल मुबारक हो ….
🤣🤣🤣🤣🤣
————————
Finally, Just a day to the end of 2019.*
To My Creator = I say Thank You.
To my true friends = I appreciate you all.
To those who showed me love = I’m grateful.
To those who hurt me = I forgive and forget.
To those I really hurt = I’m so sorry, please forgive me.
To those who challenged me = lets do it again.
To those I showed love = I still love you and I ALWAYS WILL. To those who helped me = *I am so grateful.
THANK YOU FOR MAKING 2019 A FRUITFUL YEAR for ME.
WISHING YOU A PROSPEROUS 2020 AHEAD.
———————
Ancient Romans would have been most happy today that they have to write the date as
XXXI – XII – MMXIX
For the last time and tomorrow, it is going to be
I – I – MMXX
(a saving of 6 letters every time that needs to be cut into stone)
🙄😁😁
Let us the thankful to our ancestors for inventing zero. 😊 😊
————————–
I’m walking into 2020 with a clear heart and mind. If you owe me, please clear it & you’re welcome. If I owe you, let it go, lesson learnt (for u offcourse). If you wronged me, it’s all good because I dont care. If I you’re angry with me, that’s your problem. If we aren’t speaking, cool (I love you and I wish you well). If I’ve wronged you, u need to introspect (it was intentional). Life is too short for pent up anger, grudges, extra stress or pain.
हमारे बाबाजी हमेशा चाहते हैं हर हाल में खुशी
🙏😁😂😜🙏
—————————
Hello friends🙋🏻♀🙋🏻♂
Today December 31st.. At my home on New year’s eve.. I’m organising a dinner with snacks, drinks etc.. Simple celebration of the good times in 2019 from 7 pm onwards. If you would like to enjoy these moments and think that it is a good idea you can do the same at your home!. 🍷🥃🍾
—————————–
मी २००८ मध्ये या सुमाराला अमेरिकेतल्या अल्फारेटा या गावी होतो. अकरा वर्षांनंतर या वर्षी मी कॅलिफोर्नियामधल्या टॉरेन्स या गावी आलो आहे. हॅलोविन हा उत्सव साधारणपणे आपल्या दिवाळीच्या सुमाराला असतो, पण दिवाळीत आकाशकंदील आणि पणत्या लावून मंगलमय वातावरण करतात आणि या ठिकाणी भुताखेतांची भयानक चित्रे लावून भीतीदायक सजावट करतात. आमच्या घराच्या आजूबाजूच्या बंगल्यांच्या समोर केलेली ही मांडणी खालील चित्रात दिली आहे. लहान मुलांसाठी ठेवलेल्या स्पर्धेत काही बालकांनी रंगवलेली चित्रे एका फ्रेममध्ये दाखवली आहेत.
सन २००६ मध्ये मनोगत या त्या काळातल्या प्रमुख मराठी संकेतस्थळावर श्री.नरेंद्र गोळे यांनी या विषयावर एक लेखमालिका लिहिली होती. त्यांचे मनःपूर्वक आभार मानून ती मालिका इथे संग्रहित केली आहे. या लेखमालिकांमध्ये त्या कविता लिहिणाऱ्या कवींची माहितीही दिली आहे.
नवी भर : त्यानंतरच्या काळात मिळालेली अनेक विडंबनेही मूळ कवितांसह संग्रहित केली आहेत
———————-
प्रेषक नरेंद्र गोळे (०५/०७/२००६)
विडंबने-१ आम्ही कोण?
विडंबने-२ दासबोध आणि उदासबोध
विडंबने-३ ‘विरामचिन्हे’ आणि कवीची ‘विरामचिन्हे’
विडंबने-४ ‘रांगोळी घालतांना पाहून’ आणि ‘रांगोळी घातलेली पाहून’
विडंबने-५ ‘माझे जीवन गाणे’ आणि ‘माझे जीवन खाणे’
विडंबने-६ ‘स्वयंवर झाले सीतेचे’ आणि ‘विडंबन झाले कवितेचे’
नवी भर दि. ०७-११-२०१९: याशिवाय ‘जन पळ भर’ ही कविता, कविवर्य भा.रा.तांबे यांची माहिती आणि श्री.मकरंद करंदीकर यांनी केलेले तिचे विडंबनही खाली दिले आहे
नवी भर दि. ०५-०७-२०२०ः दिवस तुझे हे फुलायचे ही कविता आणि विडंबन
नवी भर दि.१९-०६-२०२१: दिवस तुझे आणि किलबिल किलबिल यांची विडंबने
नवी भर दि.२२-०६-२०२१: एक विरसग्रहण – काही बोलायाचे आहे
नवी भर दि. ०१-०९-२०२१ : झुकुझुकु झुकुझुकु अगीनगाडी, किलबिल किलबिल आणि फिटे अंधाराचे जाळे – कविता आणि विडंबने
नवी भर दि.०३-०३-२०२२ : लिसन माझ्या सोन्या बाळा कविता आणि तिचे भाषांतर
नवी भर दि.०६-०६०२०२२ : ‘जन पळ भर’ या कवितेचे आणखी एक विडंबन
——————————————————-
१.आम्ही कोण?
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।
दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥ १ प्रमुख
सारेही बडिवार येथिल पाहा! आम्हापुढे ते फिके ।
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूप्रती द्यावया ॥
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजी या ।
फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके ! ॥ २ ॥
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे ? ।
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ? ॥
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ।
ते आम्हीच, शरण्य मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते ! ॥ ३ ॥
मूळ कवीः कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत
फैजपूर, २९ नोव्हेंबर, १९०१
मनोरंजन, मे, १९०२
ही कविता त्यांच्या ‘हरपले श्रेय’ ह्या कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या १९८५ सालच्या पुनर्मुद्रणातून घेतलेली आहे.
कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत (०७-१०-१८६६ ते ०७-११-१९०५) हे मराठी नवकवितेचे आद्य उद्गाते होत. केशवसुत मुख्याध्यापक होते. ते वयाच्या 39 व्या वर्षी प्लेगने वारले. केशवसुतांच्या निवडक कविता ‘हरपले श्रेय’ ह्या त्यांच्या कवितासंग्रहात प्रसिद्ध झालेल्या आहेत. ‘अढळ सौंदर्य’ ह्या कवितेत, त्यांनी निसर्गाचे सौंदर्य कसे अढळ असते, त्याचे बहारदार वर्णन केलेले आहे. त्यांची ‘गोष्टी घराकडील’ ही कविता, गावातील स्वगृहाचे स्वाभिमानाने गुणगान करण्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यांनी ‘दुर्मुखलेला’ ह्या कवितेत, त्यांना दुर्मुखलेला म्हणणाऱ्या शिक्षकाला उद्देशून, ‘लंगड्यास लंगडा म्हटल्याने काहीच साध्य होत नाही, लंगडा मात्र मनाने दुखावला जातो’ हे जगन्मान्य सत्य निर्विवादपणे उजागर केलेले आहे. लोकमानसात त्यांच्या तुतारी कवितेचे स्थान अढळ आहे. ‘आम्ही कोण?’ ह्या कवितेत त्यानी व्यक्तविलेला कवीविषयक दृष्टिकोन आजवर मी वाचलेल्या सर्व अभिप्रायात सर्वोत्कृष्ट म्हणता येईल. त्यातून केवढा आत्मविश्वास प्रकट होतो ते प्रत्यक्षच वाचून सहज समजेल.
आम्ही कोण? (विडंबन)
केशवसुत, क्षमा करा.
आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।
फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥
किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥
ते आम्ही – परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।
ते आम्ही – न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।
त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥
काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी, ।
दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे, ॥
दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा उदे ।
दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं! ॥ ३ ॥
विडंबन: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार, १९२२
ही कविता आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुले ह्या, परचुरे प्रकाशनतर्फे १९८६ साली प्रसिद्ध झालेल्या, अकराव्या आवृत्तीतून घेतलेली आहे.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार (१३-०८-१८९८ सासवड, ते १३-०६-१९६९) हे, मराठी शिक्षणक्षेत्र (कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत प्रिन्सिपॉल, अनेक शिक्षक परिषदांचे अध्यक्ष, बी.टी. चे परीक्षक), वाङमय (कऱ्हेचे पाणी हे आत्मवृत्त, बडोदा वाङमय परिषदेचे अध्यक्ष), साहित्य (झेंडूची फुले, बडोद्याच्या कुमारसाहित्य परिषदेचे अध्यक्ष, नाशिक साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष), नाटक (साष्टांग नमस्कार, ब्रह्मचारी, घराबाहेर, उद्याचा संसार), चित्रपट (पायाची दासी, पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता शामची आई, चित्रमंदिर चित्रपटगृहाचे मालक, अत्रे पिक्चर्स चे निर्माता), पत्रकारिता (जयहिंद सायंदैनिक, दैनिक मराठा, नवयुग साप्ताहिक, समीक्षक मासिक यांचे संपादन, बेळगावच्या पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष, अत्रे प्रिंटींग प्रेस), राजकारण (कॉन्ग्रेस, समाजवादी पक्ष, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांचे कार्यकर्ते, आमदार, लोकसभा निवडणुकीत अपयश), समाजकारण (संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते) या सर्वांवर अमिट छाप सोडणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. व्यवसायाने शिक्षणतज्ञ (बी.ए., बी.टी., टी.डी. लंडन) असणाऱ्या अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अत्यंत कळीची भूमिका बजावली. त्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच खंडी आत्मवृत्ताच्या प्रस्तावनेत ते म्हणतात:
“आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. ढोंगाचा मी पहिल्यापासून शत्रू. माझ्या नाटकांतून, चित्रपटांतून आणि वृत्तपत्रांतून ढोंगाचे मी क्रूरपणे वाभाडे काढलेले आहेत. गेली पन्नास वर्षे समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत, शाळामास्तरापासून तो गिरणीमालकापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. त्यामुळे समाजाच्या बहिरंगामध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये केवढी फारकत आहे, ह्याची जाणीव माझ्या इतकी दुसऱ्या कुणालाही असणे शक्य नाही. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.”
त्यांचा झेंडूची फुले नावाचा विडंबनात्मक कवितासंग्रह जगद्विख्यात आहे. मराठीत तरी दुसरा विडंबनकाव्यसंग्रह वाचल्याचे मला स्मरत नाही. त्यांच्या सर्वव्यापी अनुभवाचे सार रोकड्या शब्दात, त्यामध्ये व्यक्त झालेले आहे. हे पुस्तक मुळातच वाचनीय आहे. त्यातच ‘आम्ही कोण’ ह्या केशवसुतांच्या कवितेचे हे विडंबन दिलेले आहे. विडंबनाची व्याख्या, वापर आणि मर्यादा ह्यांबाबत त्या पुस्तकाचे संपादक श्री.स.गं.मालशे, स्वत: आचार्य अत्रे आणि त्यांचे गुरू साहित्याचार्य श्रीपाद कृष्ण उर्फ तात्यासाहेब कोल्हटकर यांचे विचार ह्या पुस्तकात ग्रथित केलेले आहेत.
——————-
विडंबने-२ दासबोध आणि उदासबोध
प्रेषक नरेंद्र गोळे ( १७/०७/२००६ )
॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक १ ॥
॥ स्तवननाम दशक प्रथम ॥
॥ श्रीराम ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ। काय बोलिलें जी येथ ।
श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १ ॥
ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद ।
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २ ॥
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्म निरोपण। निरोपिलें ॥ ३ ॥
भक्तिचेन योगें देव। निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव। ईये ग्रंथीं ॥ ४ ॥
मुख्य भक्तीचा निश्चयो। शुद्धज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो। बोलिला असे ॥ ५ ॥
शुद्ध उपदेशाचा निश्चयो। सायोज्यमुक्तीचा निश्चयो ।
मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६ ॥
शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो ।
अलिप्तपणाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ७ ॥
मुख्य देवाचा निश्चयो। मुख्य भक्ताचा निश्चयो ।
जीवशिवाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ८ ॥
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो ।
आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९ ॥
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण ।
नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १० ।
मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण ।
कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११ ॥
नाना किंत निवारिले । नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२ ॥
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें ।
तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३ ॥
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४ ॥
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५ ॥
नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये ।
तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६ ॥
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती ।
नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७ ॥
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८ ॥
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता ।
गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९ ॥
इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ ।
भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २० ॥
भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे
भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१ ॥
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२ ॥
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३ ॥
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला ।
अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४ ॥
कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५ ॥
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६ ॥
मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७ ॥
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ। येकसरां ॥ २८ ॥
मार्ग सांपडे सुगम। न लगे साधन दुर्गम ।
सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९ ॥
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३० ॥
योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य ।
चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१ ॥
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२ ॥
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥
बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष ।
अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४ ॥
नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५ ॥
नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६ ॥
ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती ।
मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७ ॥
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम
॥ समास पहिला ॥ १ ॥
दासबोधात वीस दशके असून प्रत्येक दशकात अनेक समास आहेत. वर पहिल्या दशकातील पहिला समास दिलेला आहे.
सतराव्या शतकात मुसलमान राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला त्रासले होते. सामान्यजन भयग्रस्त झालेले होते. अशा वेळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी व शूर राजाचे जाणत्या राजात रूपांतर होण्यासाठी ज्या संताचा लाभ महाराष्ट्राला झाला तो म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. जांब गावी १५३० चैत्र शुद्ध नवमीस माध्यान्ही त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव नारायण सयाजीपंत ठोसर. वयाच्या बाराव्या वर्षी, विवाहप्रसंगी ‘सावधान’ शब्द ऐकून ते लग्नमंडपातून पळून गेले. नंतर नाशिकजवळ, गोदावरीकाठी टाकळी येथे त्यांनी बारा वर्षे एकाग्रतेने रामोपासना केली. आत्मसाक्षात्कार होऊन ते स्वानुभवारूढ झाले. आत्मज्ञानाने संपन्न होऊन ते वयाच्या चोविसाव्या वर्षी तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. बारा वर्षे सबंध हिंदुस्तानभर त्यांनी पायी प्रवास केला. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी, शके १५६६ मध्ये ते कृष्णातीरी आले. त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली. शिवाजीमहाराजांना स्वराज्यहितोपदेश केला. महाराजांनी राज्य त्यांच्या झोळीत टाकल्यावर त्यांनी ते महाराजांनाच सांभाळण्यास सांगून स्वराज्यास भगवा ध्वज दिला. मनाचे श्लोक, दासबोध, विविध आरत्या इत्यादी विपुल साहित्य त्यांनी निर्माण केलेले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक पिढ्यांचे जीवन घडलेले आहे.
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ॥
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा ।
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ॥
उदासबोध (दासबोधाचे विडंबन)
-मंगेश पाडगावकर
आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।
अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे ।
त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥
या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ?
लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥
भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश ।
दुर्जना यश, सज्जना अपेश। सर्वत्र दिसे ॥ ४ ॥
नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा ।
सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥
देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती ।
भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥
कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती ।
तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥
येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती ।
त्यातुन कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥
कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुन्ड राज्य करी ।
प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥
दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे ।
काळा कडु गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥
सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी ।
भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥
ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद ।
काळा कडु आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥
इति श्री उदासबोधे कविजनतासंवादे ग्रंथारंभनाम समास
उदासबोधातील पहिला समास वर दिलेला आहे. संपूर्ण ग्रंथात असे पन्नास समास आहेत.
मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ला, सिंधुदूर्ग इथे झाला. त्यांनी मराठी व संस्कृत मधून, मुंबई युनिव्हर्सिटीतून एम.ए. केले. ते युनायटेड स्टेटस् इन्फोर्मेशन सर्व्हिस मध्ये संपादक होते. जरी ते कवी म्हणून जास्त प्रसिद्ध असले तरी सिद्धहस्त लेखकही आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रह आणि अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातील ‘बोलगाणी’ खूपच प्रसिद्ध आहे.
——————-
विडंबने-३ ‘विरामचिन्हे’ आणि कवीची ‘विरामचिन्हे’
प्रेषक नरेंद्र गोळे ( २०/०७/२००६ )
‘विरामचिन्हे’
– राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज
जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा ‘स्वल्पविराम’ मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!
आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे ते ‘प्रश्नचिन्हां’कित.
अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला ‘अर्धविराम’ तेथ; गमले येथून हालू नये !
झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची ‘उद्गार’वाची मन !
आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश –
ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश !
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,
देवा! ‘पूर्णविराम’ त्या तव पदी दे शीघ्र आता मला !
राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज (२६ मे १८८५- २३ जानेवारी १९१९, सावनेर) हे मराठीतील संगीत नाटकांचे प्रख्यात नाटककार होते. मात्र ते तेवढेच सिद्धहस्त कवी आणि विनोदी लेखकही होते. विनोदी लेखन त्यांनी ‘बाळकराम’ ह्या टोपणनावाने केले. त्यांच्या कवितांचा संग्रह डॉ.भीमराव कुलकर्णी यांनी ‘संपूर्ण वाग्वैजयंती’ ह्या नावाने प्रसिद्ध केलेला आहे. प्रस्तुत कविता ह्याच पुस्तकाच्या २६ मे १९८५ ह्या त्यांच्या जन्मशताब्दीदिनी प्रसिद्ध झालेल्या पंधराव्या आवृत्तीतून घेतलेली आहे.
कवीची ‘विरामचिन्हे’ (‘विरामचिन्हे’ चे विडंबन)
– आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार
मानवी जीवनलेखांतील गोविंदाग्रजांनी दर्शविलेल्या ‘विराम-चिन्हां’ पेक्षा कवीच्या आयुष्यातील ‘विरामचिन्हे’ निराळी असावीत ही गोष्ट हल्ली शुद्धलेखनासंबंधी चालू असलेल्या वादास धरूनच नाही काय!
जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर ‘करू का काव्य?’ वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा ‘स्वल्पविराम’ मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !
झाले काव्य लिहून – यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी ‘प्रश्नचिन्हा’ कुल!
अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला ‘अर्धविराम’ तेथ; गमले तेथून हालू नये !
झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे ‘गायन’ ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची ‘उद्गार’ वाची मन !
पुढील श्लोक ‘कोरसा’ दाखल असून तो वाचकांनी कवीला ऐकू न जाईल अशा हलक्या स्वरांत गुणगुणावयाचा आहे. बाकी ऐकू गेले तरी काय व्हायचे आहे म्हणा?
डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी –
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, ‘पूर्णविराम’, त्या कविस या देशी न का आजला? १
१. आमच्या गायनप्रिय रसिक वाचकांसाठी वरील कवितेचे ‘नोटेशन’ आम्ही येथे देत आहोत. त्यामुळे कवितेच्या अर्थाबरोबर तिच्यातील ‘संगीत’ ही वाचकांना सहज समजून येईल. काव्यगायनेच्छू बालकवींचीही त्यामुळे चांगलीच सोय होणार आहे. मात्र ‘स्वरलेखन’ करतांना आम्ही ‘प्रो.मौलाबक्षांची चिन्हे’ न वापरता आमची स्वतःची ‘चिन्हे’ वापरली आहेत, हे एक सुचिन्हच नव्हे काय? स्थलाभावामुळे टंकालयातील (फौंड्री) टंचाईमुळे दर श्लोकातील एकाच चरणाचे नोटेशन देणे शक्य झाले आहे.
, ? ; ! . ॥ ध्रु ॥
,ऽऽ ;ऽ ,ऽऽऽ ,ऽऽऽ ,ऽऽऽऽऽ १
?ऽऽ ?ऽ ?ऽऽऽ ?ऽऽऽ ?ऽऽऽऽऽ २
;ऽऽ ;ऽ ;ऽऽऽ ;ऽऽऽ ;ऽऽऽऽऽ ३
!ऽऽ !ऽ !ऽऽऽ !ऽऽऽ !ऽऽऽऽऽ ४
.ऽऽ .ऽ .ऽऽऽ .ऽऽऽ .ऽऽऽऽऽ ५
आचार्य अत्रे ह्यांचा परिचय विडंबने-१ मध्ये दिलेलाच आहे.
—————-
विडंबने-४ ‘रांगोळी घालतांना पाहून’ आणि ‘रांगोळी घातलेली पाहून’
प्रेषक नरेंद्र गोळे ( ३०/०७/२००६ )
रांगोळी घालतांना पाहून
– कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत
होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.
आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.
होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!
चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.
रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.
आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!
तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!
चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
“जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!”
“आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी.”
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!
१८ डिसेंबर, १८९६
करमणूक, २६-१२-९६
का. रत्नावली, फे., १९०१
कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांचा परिचय विडंबने-१ मध्ये दिलेलाच आहे. ही कविता त्यांच्या ‘हरपले श्रेय’ ह्या कवितासंग्रहातून घेतलेली आहे.
रांगोळी घातलेली पाहून (‘रांगोळी घालतांना पाहून’चे विडंबन)
– राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज
“साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे;
नित्याच्या अवलोकने परि किती होती जगी आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,”
रांगोळी बघुनीच केशवसुता हे आठवे बोलणे.
रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्या! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य कथणे वाटे तुला काय तो?
जो तूते वदवे न अर्थ मनिचा तोंडात आला तरी,
तो मी बोलुनि दाखवीन अगदी साध्याच शब्दी परी.
चैत्री आंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
रांगोळीहि कुणी तिथे निजकरी ती घातली त्यावर.
ज्यां आमंत्रण त्या घरी मुळि नसे ऐशा स्त्रियांलागुनी
त्या चिन्हांतुनि हा विशेष निघतो आहे गमे मन्मनी-
या या! आज असे सुरेख हळदीकुंकू पहा या स्थली
बत्तासे बहु खोबरे हरभरे खैरात ही चालली!
ठावे कोण न जात येत- दिधले कोणास आमंत्रण;
नाही दाद घरात ही मुळि कुणा; दे धीर हे लक्षण.
संधी टाकुनि छान फौज तुमची कोठे पुढे चालली?
बायांनो! अगदी खुबी विसरता तैलंगवृत्तीतली !
नाते, स्नेह, निदान ओळख तुम्हा येथे न आणी तरी,
या; आमंत्रण राहुं द्या; परि शिरा सार्याजणी या घरी!
लाभे ते फुकटातलेच हळदीकुंकू तुम्हाला जरी,
होई काय नफा अचानक तयामाजी न कित्तीतरी?
ही आगंतुकवृत्ति आपण जरी धिक्कारिली यापरी,
प्राप्ती चार घरे उगीच फिरुनी होईल का हो तरी?
चाले काय असे उगीच भिऊनी? तुम्हीच सांगा खरे!
या डोळा चुकवून नीट; डरतां आता कशाला बरे?
कोणाच्या नजरेत येइल तरी होणे असे काहि का?
केला का खटला कुणावर कुणी ऐसा अजुनी फुका!
बायांनो! तर या, नकाच दवडू संधी अशी हातची,
जा जे काही मिळेल तेच भरल्या रस्त्यातुनी खातची!
कामे ही असली हितावह कधी होतील का लाजुनी?
या-या-या तर धावुनी; त्यजु नका रीती पुराणी जुनी!
कोणाच्या घरचे असेल हळदीकुंकू कधी नेमके
ज्या बायांस नसेल हे चुकुनिया केव्हा तरी ठाउके,
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे चालत काय काय अगदी हे नेहमी पाहणे!
राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज ह्यांचा परिचय विडंबने-३ मध्ये करून दिलेलाच आहे. हे विडंबन त्यांच्या ‘संपूर्ण वाग्वैजयंती’ ह्या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे.
————————–
विडंबने-५ ‘माझे जीवन गाणे’ आणि ‘माझे जीवन खाणे’
प्रेषक नरेंद्र गोळे ( ३०/०७/२००६ )
माझे जीवन गाणे
– मंगेश पाडगावकर
माझे जीवन गाणे, गाणे || धृ ||
व्यथा असो, आनंद असू दे |
प्रकाश किंवा तिमिर असू दे ||
वाट दिसो, अथवा ना दिसू दे |
गात पुढे मज जाणे || १ ||
कधी ऐकतो गीत झर्यांतुन |
वंशवनाच्या कधी मनांतुन ||
कधि वार्यांतुन, कधि तार्यांतुन |
झुळझुळताती तराणे || २ ||
तो लीलाघन स्तय चिरंतन |
फुलापरी उमले गीतांतुन ||
स्वरास्वरांतुन आनंदाचे |
नित्य नवे नजराणे || ३ ||
गा विहगांनो माझ्यासंगे |
स्वरांवरि हा जीव तरंगे ||
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन |
उसळे प्रेम दिवाणे || ४ ||
मंगेश पाडगावकर यांचा परिचय विडंबने-२ मध्ये दिलेलाच आहे. त्यांचे हे गीत वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेले आहे. आणि खूपच विख्यात आहे. तुम्हीही नक्कीच ऐकलेले असेल.
माझे जीवन खाणे (माझे जीवन गाणे चे विडंबन)
– प्रभाकर बोकील, मुंबई
माझे जीवन खाणे, खाणे || धृ ||
पथ्य असो, उपवास असू दे |
प्रकार इतुके, फिकिर नसू दे ||
वाट असो, वा ताठ ‘उभ्याने’ |
खात निरंतर रहाणे || १ ||
कधी झोडतो, पंचपक्वान्ने |
दंश जिभेला, कधी ठेच्यातून ||
कधी भज्यांतून, कधी वड्यांतून |
विरघळतात ‘बहाणे’! || २ ||
खा, जन खा हो, माझ्यासंगे |
जिव्हेवरी हा, जीव तरंगे ||
तुमच्या मुखी, रसस्वादसुखाचे |
उसळो खाद्य-तराणे || ३ ||
लोकसत्ता हास्यरंग पुरवणी-नोव्हेंबर २००३ च्या अंकात, विडंबन काव्य स्पर्धेच्या अंतर्गत हे विडंबन प्रसिद्ध झाले होते. लेखकांविषयी चार शब्द लिहावेत एवढी मला त्यांचेविषयी माहिती नाही. माहीतगार मनोगतींनी अवश्य मदत करावी. मात्र त्यांच्या विडंबनाचा आनंद मी मनसोक्त आस्वादिला आहे. धन्यवाद प्रभाकरजी!
———————————
विडंबने-६ ‘स्वयंवर झाले सीतेचे’ आणि ‘विडंबन झाले कवितेचे’
प्रेषक नरेंद्र गोळे (०९/०७/२००९ )
विख्यात कविता आणि त्यांची तेवढीच विख्यात विडंबने यांच्या या मालिकेत, आता विडंबन कशाला म्हणू नये याचे एक उत्तम उदाहरण पेश करतो आहे.
मूळ कविता गदिमांच्या गीतरामायणामधली आहे.
श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतू अंतरींचे
उभे ठाकले भाग्य सांवळे समोर दुहितेचें ॥ १ ॥
मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजीं एकवटुनिया निजशक्ती सारी
फुलूं लागलें फूल हळू हळू गालीं लज्जेचें ॥ २ ॥
उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे ॥ ३ ॥
अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे ॥ ४ ॥
हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी
“आज जानकी अर्पियली मी दशरथापुत्रासी”
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे ॥ ५ ॥
पित्राज्ञेने हळू उठे ती, मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधीर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचे ॥ ६ ॥
नीलाकाशी जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेच भरले रामांगी मधू नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झाले माया-ब्रह्माचे ॥ ७ ॥
झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजी देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे ॥ ८ ॥
अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वाचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे ॥ ९ ॥
गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी! त्यांच्या गीतरामायणातले हे एक सुप्रसिद्ध गीत आहे.
कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात ग. दि. माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा – संवाद – गीतलेखनाचे काम केले. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान केवळ अजोड आहे. प्राचीन मराठी काव्यातील गीतभांडाराला अर्वाचीन काळात माडगूळकरांनी अधिक समृद्ध केले.
संताच्या काव्यातील आंतरिक गेयगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांच्या काव्यातील स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील प्राथमिक पण सरळ भिडणारा लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून माडगूळकरांची गीते निर्माण झाली. अध्यात्म, देशभक्ती, बालकविता, शृंगार हे सर्व विषय त्यांनी अतिशय सहजतेने हाताळले.
आरंभी ते वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत होते. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा (१९४९), जोगिया (१९५९), चार संगीतिका (१९५६), गीतरामायण (१९५७), काव्यकथा (१९६२), चैत्रबन (चित्रपटगीते) (१९६२), गीतगोपाल (१९६७), गीतसौभद्र (१९६ ८)-अशी काव्यनिर्मिती झाली. ‘वैशाखी’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे १५ लघुकथा लिहिल्या; आकाशाची फळे, उभे आडवे धागे या कादंबऱ्या व युद्धाच्या सावल्या हे नाटक – इत्यादी स्वरूपाचे लेखनही त्यांनी केले. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८० पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १० हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद – यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ (२४ मराठी व १ हिंदी) चित्रपटांत अभिनयही केला.
चित्रपटातील पात्रांच्या भावनांनुसार, कथाविषयाला खुलावट आणणारी चित्रपटगीते लिहिण्यात ते सिद्धहस्त होते. गेयता, नादमाधुर्य, लयकारी आणि मराठी भाषेतील गोडवा ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये. उद्धवा अजब तुझे सरकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, बाई मी विकत घेतला शाम यांसारख्या अनेक गीतांमधून साध्या सोप्या भाषेत ते मोठे तत्त्वज्ञान सांगून जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या लेखणीने लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली होती. १९४२ च्या आंदोलनात, सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पोवड्यांची निर्मिती केली होती.
गीतरामायण ही गदिमांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली एक साहित्यिक देणगीच म्हणावी लागेल. त्यांच्या गीतरामायणाने व त्याला दिलेल्या बाबूजींच्या (ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके) संगीताने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. गीतरामायणाचे शेकडो प्रयोग झाले. मराठी रसिकांनी गदिमांना प्रेमादरपूर्वक महाराष्ट्राचे ‘आधुनिक वाल्मिकी’ अशी पदवी बहाल केली. यातूनच त्यांच्या रसिकप्रियतेची खात्री पटते. गीतरामायणाचे पुढील काळात हिंदी, बंगाली, तेलगू व कानडी या भाषांत भाषांतरही झाले.
गदिमांना भारत सरकारने पद्मश्री (१९६९) हा किताब बहाल केला. ते संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले.
१९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते. १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले तरी जनमानसहृदयात ते गीतकार व गीतरामायणकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले.
श्रेयअव्हेर: वरील गदिमांची ओळख मनसेच्या संकेतस्थळावरून साभार घेतलेली आहे.
विडंबन झाले कवितेचे हे त्याचे विडंबन खोडसाळ यांनी खालीलप्रमाणे सादर केले.
मनोगतावर स्वतंत्र कविता म्हणून, तर त्यांच्या ‘तेंडूची पाने’ या अनुदिनीवर कविता आणि विडंबन या दोन्हीही सदरांत.
ते काव्य असे आहे.
विडंबन झाले कवितेचे
प्रेषक खोडसाळ ( १२/०८/२००८)
साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे
विडंबन झाले कवितेचे॥धृ॥
कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे
पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतू अंतरीचे
उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे ॥१॥
वक्र टाळकी कसून वाचती काव्य अर्थवाही
नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टी पाही
फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे ॥२॥
सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही
तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई
कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे ॥३॥
अंगारुनिया आले डोळे, चरफडले राजे
मुक्त हासऱ्या प्रतिसादांचे बघून सडे ताजे
पडू लागले तृतीय लोचन अमुच्यावर त्यांचे ॥४॥
हात जोडुनी म्हणे विडंबक तो कविराजासी
“आज विडंबन अर्पियले मी अपुल्या चरणासी”
संतापाने मिटले डोळे क्रुद्ध का कवीचे? ॥५॥
काव्याकाशी कशी भरावी उषःप्रभा लाल
उगी राहिलो वामांगी शब्देविण कंगाल
कवन रचुनिया धनी जाहलो शरसंधानाचे ॥७॥
नाही उरला राम, चालले ते वनवासाला
कविराजांच्या हात घालसी का कासोट्याला
त्यांच्या वर्मी घाव बैसले खो खो हास्याचे ॥८॥
खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?
कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता
साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे? ॥९॥
खोडसाळांनी त्यांच्या ’तेंडूची पाने’ या अनुदिनीस लिहीलेली प्रस्तावना हाच त्यांचा सर्वज्ञात खराखुरा परिचय आहे. “मनोगत ह्या मराठी भाषेला वाहिलेल्या (बहुधा) सर्वोत्कृष्ट संकेतस्थळावर अनेक प्रतिभावान हौशी कवी आपल्या रचना सादर करतात. त्या वाचून आपल्याला असे काही लिहिता येत नाही याचा मला खूप राग यायचा. सांगू नका कोणाला, पण माझी अवस्था ते काय असूयाग्रस्त की मत्सरग्रस्त म्हणतात ना तशी व्हायची. मग ठरवलं – नाही ना आपल्याला असे काही छान छान, नवनवीन कल्पनांनी नटलेले, साहित्यिक मूल्यांनी ओतप्रोत, इ. इ. लिहायला जमत, मग ठीक आहे. जे लिहितात त्यांची विडंबनात्मक टर उडवायची. कोल्ह्याला द्राक्षं आंबट, दुसरं काय. परत विडंबन करणे तुलनेने बरेच सोपे, खासकरून छंदबद्ध कविता वा गजलांचे. तयार जमीन, तयार यमकें, रेडीमेड कवाफी. आपण फक्त ओळी जराशा उलटसुलट केल्या की झाले विडंबन तयार. वाचणाऱ्यांनाही गंभीर रचनांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा ‘हसा आणि विसरून जा’ छाप विडंबने वाचणे सोयीस्कर वाटते. त्यामुळे आमच्यासारख्यांची चलती असते. कोणी नाक मुरडलेच तर कानाच्या पाळ्या धरून आचार्य अत्र्यांच्या ‘ झेंडुची फुले’ चा वारसा सांगावा. वर अत्यंत आदराने (नाटकं करायला आपलं काय जातय) ‘ क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्प विषयामती: ‘ वगैरे वाक्यं टाकावी. एकाच वेळी आपला विनम्रपणा आणि सु’संस्कृत’पणा दाखवण्याची संधी का सोडा? (संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्ये पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या कामी येतात. ) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर ‘टाकणार आहे’ लिहिणार होतो पण ‘देण्याचा मानस आहे’ कसे भारदस्त वाटते, नाही? मूळ रचनांचा दुवाही देईन. विडंबन आवडो न आवडो, वाचकहो, त्या मूळ रचना जरूर वाचा ही मात्र खोडसाळाची कळकळीची विनंती आहे. त्या प्रतिभावंतांची थट्टा करण्याच्या माझ्या पापाचे यामुळे थोडे तरी परिमार्जन होईल.”
खोडसाळ हे मनोगतावरील एक अत्यंत प्रथितयश प्रतिभावान आहेत. त्यांच्या विडंबनांची मोहिनी पडलेले असंख्य लोकच त्यांच्या प्रतिभेची खरीखुरी कल्पना देऊ शकतील.
मात्र या विडंबनात त्यांनी मूळ काव्यविषयाचे विडंबन केलेलेच नाही. तर केवळ प्रसिद्ध चालीचा, आकृतीबंधाचा, नवविडंबकांच्या आवडत्या वस्तूवर हल्ला बोलण्याच्या वृत्तीचे विडंबन करण्यासाठी, उत्तम उपयोग करून घेतलेला दिसून येतो. वरील दुव्यावरही त्यांनी हे काव्य स्वतंत्र कविता म्हणूनच दिलेली होती. प्रतिसादकांनी मात्र त्याचे विडंबन म्हणूनच कौतुक केलेले दिसून येते.
दोन्हीही काव्ये सुंदर आहेत. ‘विडंबन झाले कवितेचे’ हे मूळ ‘स्वयंवर झाले सीतेचे’ या गीताचे कुठल्याच निकषाने विडंबन ठरत नाही. तथाकथित विडंबनात मूळ गीताच्या चालीव्यतिरिक्त कोणतेही साम्य वा संबंध दिसून येत नाही. मात्र हे “नवविडंबकांच्या आवडत्या वस्तूवर हल्ला बोलण्याच्या वृत्तीचे विडंबन” आहे यात कसलाही संशय नाही.
म्हणून विडंबन कशाला म्हणू नये याचे मात्र हे एक चांगले उदाहरण ठरले आहे.
———————-
कविता आणि विडंबन
प्रेषक यशवंत जोशी ( ०६/०७/२००९)
प्रतिभा
(१२-५-०९ ला सुचलेली रचना )
कविता उमेद कवीची मरगळ झाडून टाकते
विडंबन तगडे असे कवितेस झाकून टाकते ॥
कविता जणू नवी नवरी भाववेडी फाकडी
विडंबन दादला धटिंगण वळते कवितेची बोबडी॥
कविता रमविण्या जनां नवरसांचे चाळ बांधते
विडंबन राजा रसाचा निखळ हास्य ओठी विलसे ॥
स्वांतस्सुखे परमार्थ साधणे ती कवितेची मनीषा
रांगडा आनंद लुटणे ही विडंबनास अभिलाषा ॥
——————————-
विडंबन
प्रेषक केशवसुमार (०३/०३/२००७)
प्रथम लिहीणाऱ्या कवीचा आदर नंतर लिहीलेल्या कवितेची खिल्ली
प्रथम लिहीलेल्या शब्दांची नोंद नंतर त्यांच शब्दांची फेर मांडणी
प्रथम मिळालेल्या अनुभवांची आठवण नंतर घेतलेल्या अनुभवांची टवाळी
केशवसुमार…
————————–
Makarand Karandikar, October 6 at 10:43 PM · जन पळभर म्हणतील बायबाय**
आता निवडणुका होतील. जनसेवेसाठी आसुसलेले आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी सर्वकाही करणारे नेते आपण पाहतोय ! निवडणुकीचे निकाल लागल्यावर काय होईल हे खुद्द निवडणूकच आपल्याला सांगत्ये आहे.
कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेवरून मला सुचलेली कविता …
( त्यांची विनम्र क्षमा मागून )
मी होता राहील कार्य काय,
जन पळभर म्हणतील बायबाय ।।
निकाल लागता, थोडे चिडतील,
ईव्हीएम फोडीत, शिव्या घालतील,
उठतील बसतील, तुम्हा विसरतील,
तुमचा त्यांचा संबंध काय, ।।१।।
पक्ष बदलतील, पक्ष फोडतील,
सारे आपुला क्रम आचरतील,
शिव्या घालतील, मिठ्या मारतील,
पुन्हा जाऊनी पैसेच खाय ।।२।।
खड्डे पडतील, पूलही पडतील,
सारे आपुल्या कामी लागतील,
कमिशन घेतील, ठेके देतील,
कुणी मरता त्यांचे काय जाय ।।३।।
झाडे तुटतील, घरे पाडतील,
नाले भरतील, नद्या आटतील,
शेतकरी हे जीवही देतील,
ते मरता त्यांचे यांस काय? ।।४।।
घरी बसोनी काय कुढावे,
मतदाना का विन्मुख व्हावे,
तेथे जावे, मत नोंदावे,
चांगले कुणी निवडोनी जाय ।।५।।
***मकरंद करंदीकर, makarandsk@gmail. com
( शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावी ) पण मतदान मात्र नक्कीच करा !!
———–
याच कवितेचे आणखी एक विडंबन :
जन पळभर म्हणतील RIP RIP
मी जाता होईल weep weep
फोटो सारे करतील upload
Share होतील आठवणी गोड
श्रद्धांजली च्या post मध्ये
त्यांचे branding करेल creep
ग्रुप एकदिवस बदलेल DP
दिवस सरता चालू TP
तेच emoji तेच अंगठे
सरकत राहील एकेक clip
Forwards येतील, reels नाचतील
ट्रेंड्स नवनवे viral होतील
अखंड scrolling चालू राहील
वाजत राहील beep beep
अशा virtual जगास्तव का कुढावे
Followers च्या वाढीमागे का गुंतावे ?
थोडकीच पण घट्ट विणावि
नाती मोजकी deep deep
सलिल
(परवा गायक KK च्या अकस्मात मृत्यूच्या बातमीनंतर सोशल मीडियावर त्याबद्दल अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट्स वाचण्यात आल्या. त्यानंतर जे वाटलं त्यातून ही कविता शब्द बद्ध केली.
ही कविता टीका म्हणून केलेली नाही. एक समाज म्हणून आपण कसे बदलतोय याबद्दल आहे. मी स्वतः देखील याचाच भाग आहे. म्हणून स्वतःलाच समज देणाऱ्या या ओळी लिहिल्या आहेत.
तुम्हालाही त्या relevant वाटतील अशी आशा आहे.) सलील चौधरी
श्री.सलील चौधरी यांच्या फेसबुकवरून साभार दि.०६-०६-२०२२
. . . . मूळ कविता – श्री. भा.रा.तांबे
जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’
मी जातां राहील कार्य काय।।
सूर्य तळपतिल चंद्र झळकतिल।
तारे अपुला क्रम आचरतिल।।
असेच वारे पुढे वाहतिल।
होईल कांही का अंतराय।।
मेघ वर्षतिल शेतें पिकतिल।
गर्वानें या नद्या वाहतिल।।
कुणा काळजी कीं न उमटतिल।
पुन्हा तटावर हेच पाय।।
सखे सोयरे डोळे पुसतिल।
पुन्हा आपल्या कामी लागतिल।।
उठतील बसतील हसुनि खिदळतिल।
मी जातां त्यांचें काय जाय।।
राम कृष्णही आले गेले।
त्यां विन जग कां ओसचि पडले।।
कुणीं सदोदित सुतका धरिलें।
मग काय अटकलें मजशिवाय।।
अशा जगास्तव काय कुढावें ।
मोहिं कुणाच्या कां गुंतावें।।
हरिदूता कां विन्मुख व्हावें ।
कां जिरवुं नये शांतींत काय।।
कविवर्य भा.रा.तांबे यांची संक्षिप्त माहिती – विकीपीडियावरून
भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ – डिसेंबर ७, १९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
————————–
श्री. माधव विद्वांस यांच्या फेसबुक पानावरून साभार. (संपादित) दि. २७-११-२०१९
डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका !! असे सुंदर भाव गीत लिहिणारे स्वर्गीय कविवर्य भा. रा. तांबे यांचा आज जन्म दिवस .(२ ७ नोव्हेंबर १ ८ ७ ४ ) मरावे परी गीत रुपी उरावे .
हिंदी भाषिक प्रदेशात जन्म घेऊन व त्याच भागात जीवन घालविलेल्या या कविश्रेष्ठाची मराठी प्रतिभा अदभुत होती
त्यानी २२५ चे वर कविता लिहिल्या त्यांचा जन्म ग्वाल्हेर जवळ मुगावली येथे झाला तर शिक्षण अलाहाबाद व आग्रा येथे झाले. महाराष्ट्राच्या बाहेर राहूनही त्यांनी त्यानी २२५ चे वर कविता लिहिल्या मराठीची केलेली सेवा उल्लेखनीय आहे
त्यांची लोकप्रिय अजरामर गाणी ”’ नव वधु प्रिया मी बावरते — मधु मागसी माझ्या सख्या –तुज्या गळा माझ्या गळा — डोळे हे जुलमी गडे – कला ज्या लागल्या जीवा -जन पळभर म्हणतील हाय हाय -मावळत्या दिनकरा–रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी -कवी वासुदेव गोविंद मायदेव यांनी त्यांच्या ७ ५ कविता संपादित केल्या तर डॉ माधवराव पटवर्धनानी “तांबे यांची समग्र कविता” हे पुस्तक १ ९ ३ ५ मध्ये प्रकाशित केले. तांबे यांचे मुलाचे (डॉ र भा. तांबे ) घरी भावनगर येथे १ ९ ६ २ साली जाणेचा योग आला होता त्यावेळी शाळेत असल्याने तांबे यांचे तैलचित्र पाहून यांचा फोटो तुमचेकडे कसा ? या प्रश्नावर माझे वडील असे ऐकताच मला खूप आनंद झाला होता . !!अभिवादन !! त्यांची गाजलेली गीतें
नववधू प्रिया मी ——तुझ्या गळां माझ्या गळां —–मधु मागशि माझ्या —-मावळत्या दिनकरा ——या बालांनो या — रे या हिंदबांधवा थांब——-अजुनि लागलेंचि दार —– कशी काळनागिणी—— कळा ज्या लागल्या जीवा —–कुणि कोडें माझें उकलिल —-घट तिचा रिकामा —-घन तमीं शुक्र बघ—– चरणिं तुझिया मज देईं —–जन पळभर म्हणतिल —– डोळे हे जुलमि गडे —–तिनिसांजा सखे मिळाल्या ——–तें दूध तुझ्या त्या — —— निजल्या तान्ह्यावरी माउली —– पिवळे तांबुस ऊन कोवळे —– भाग्य उजळलें तुझे —-
———————————————————
”दिवस तुझे हे फुलायचे! झोपाळ्या वाचून झुलायचे”!!
या गाण्याचे विडंबन.
दिवस कधी हे सरायचे,
घरातल्या घरात फिरायचे।।
कामवालीची झाली मजा,
घरात मी भोगी सजा।
घरकाम किती मी करायचे,
घरातल्या घरात फिरायचे।।१||
कधी ना घासली भांडी,
झाडून कधी ना काढी।
बोळ्याने फरशीला पुसायचे,
घरातल्या कामात रमायचे।।२||
कपडे हे धुता धुता,
दमले गं बाई मी आता।
पसारा कितीदा आवरायचे,
घरातल्या घरात दमायचे।।३||
बाहेरचे खाण्याचा छंद,
हॉटेल बेकऱ्या बंद।
उपवास किती मी करायचे,
घरात उपाशी मरायचे।।४||
स्वयंपाकाचा येई मज आळस,
बाई येईना स्वयंपाकास।
वरण भाताने पोट हे भरायचे,
घरातल्या घरात गिळायचे।।५||
कुणाकडे नसे जाणे,
कुणीच घरी ना येणे।
व्हाट्सऍप हाती धरायचे,
घरातून साऱ्यांशी बोलायचे।।६||
बाहेर कोठे ना जाऊ,
टीव्हीवर रामायण पाहू।
उरलेल्या वेळात घोरायचे,
घरातल्या घरात रहायचे।।७||
कधी होईल करोनाचा नाश,
कधी सुटेल मृत्यूचा पाश।
प्रतीक्षा करत जगायचे,
घरातल्या घरात झुरायचे ||८||
(कवी कोण माहीत नाही, पण वस्तुस्थितीचे फारच मार्मिक वर्णन केले आहे.) 👌
वजन वाढते फ़ार
सोसेना काट्याला भार
कळेना काय ते करायचे
मोजून मापून जेवायचे॥४॥
दिवस तुझे …..
आपुल्या घरच्यापाशी
फिर तू गडे जराशी
हालत चालत राहायचे
मोजून मापून जेवायचे॥५॥
दिवस तुझे ….
😆😆😆😆 फेसबुकवरून साभार दि.१९-०६-२०२१ 😆😆😆😆
२. अविनाश चिंचवडकर, बंगलोर यांनी केलेले विडंबन
दिवस घरी हे बसायचे!
दिवस घरी हे बसायचे
खिडकीच्या बाहेर बघायचे
घराच्या बाहेर न जाणे
कंटाळा आला की खाणे,
टी. व्ही. च्या समोर बसायचे!
मोजावी घराची खोली
गिळावी भाजी अन पोळी,
बायकोचे टोमणे ऐकायचे!
करावे ऑफिसचे काम
बॉसचा त्रासही जाम,
दिवसभर ऑनलाईन रहायचे!
माझ्या या घराच्या पाशी
थांबव तो करोना राक्षसी,
देवाला विनवणी करायचे!
– अविनाश चिंचवडकर
😆😆😆😆 😆😆😆
टकमक टकमक डोळे फिरती
टकमक टकमक डोळे फिरती
भिरभिर भिरभिर मेसेज हिंडती
जागोजागी मोबाईल दिसती
मेंबर सारे व्हाट्सअप्प पाहती
स्वप्नी आले काही एक मी
ग्रुप पाहिला भारी
टकमक टकमक डोळे फिरती।।1।।
या ग्रुपची गंमत न्यारी
इथे नांदती मेंबर्स सारी
कुणी न मोठे कुणी धाकटे
कुणी न बसती मुकाट एकटे
मेसेज सारे अख्खा वाचती
कोणी रागवत नाही
स्वप्नी आले काही एक मी
ग्रुप पाहिला भारी।
टकमक टकमक डोळे फिरती।।2।।
नाही ऑफिस नाही शाळा
“सुप्रभात”ची वेळ पाळा
मेसेज तुम्ही केंव्हाही टाका
बंधन कोणा नाही
विनोद अन कविता पाठवी
कोणी सिनेसंगीत पाठवी
मेसेज आवडती भारी।
स्वप्नी आले काही एक मी
ग्रुप पाहिला भारी।
टकमक टकमक डोळे फिरती।।3।।
इथले मेंबर्स हुशार भारी
नियमांचे काटेकोर पालन करती
ऍडमिन येथे दोन असती
मनोरंजनात ते भारी असती
म्हणाल ते ते सारे मिळते
उणे न कोणा काही
स्वप्नी आले काही एक मी
ग्रुप पाहिला भारी।
टकमक टकमक डोळे फिरती।।4।।
अशोक कुलकर्णी . . . . . फेसबुकवरून साभार दि.१९-०६-२०२१
मूळ कविता :
गीत – शान्ता शेळके, संगीत – श्रीनिवास खळे, स्वर – सुषमा श्रेष्ठ
किलबिल किलबिल पक्षि बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई !
त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही
नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही
तिथल्या वेली गाणी गाती, पर्या हासर्या येती जाती
झाडावरती चेंडु लटकती, शेतामधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही
***************************************
विरसग्रहण ( कुसुमाग्रजांची क्षमा मागून)
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
हाय का डेरिंग बोलायचं? डेरिंगच नाय तर कसा बोलशील. अन डेरिंग करुन बोललाच तर फुकाट जोड खाशीन याच भ्याव हाये ना. आन नको तोलु देवळाच्या दारात भक्ती. भक्तीत खोट निघाली तर चारचौघात खोटा पडशीन!
माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही
आरं ते प्लास्टिकच फूल हाये फुलाचा शेंट मारलेला डिट्टो फुलावानी दिसतय. मधमाशाबी फशीत्यात. आता कलाकारीच हाये म्हन्ल्यावर कशी पाकळी फुलनं?
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
त्ये नक्षत्र का काय हाये त्येंच्या गावात बंटा मारलेले ल्वॉक र्हात्यात. काही बी बरळत्यात. त्येंच्या बरळन्यात कोन्ला काय घावनं काय सांगता येत नाही. त्येन्ला शब्दात पकडायला गेल की तेल लावलेल्या पैलवानावानी निसटत्यात.
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही
आबाळामधी पाखर असत्यात चान्न्या असत्यात तसे ढग बी असत्यात. काही ढवळे असत्यात काही काळे असत्यात. काही काळे ढग जांभळावानी दिसत्यात. ढग हाये म्हनून त पाउस पडतुया. र्हातोय यखांदा ढग कोपर्या मदी पडून. वार्या वावधनाचा त्योबी वाहून जातोय. समद्याच ढगातून काय पानी येत नसतयं. काही रहस्य बिहस्य नसतयं.
दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही
आता गलबत म्हनल्यावर लांबच हुब र्हानार ना! ती काय व्हडी हायका फळकुटाची किनार्याव यायला. किनारा उथळ असतुय. किनार्याकं यायच म्हनल तर तटून बसन. रुतून बी बसन वाळूत. समद्या दर्यावर्द्यांना माहीत अस्तय हे. व्हडीतुन गलबतापोतुर जात्यात ल्वॉक.
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही
कह्याचा आलाय कृपाकटाक्ष? डोळ्यातून आग वकत होती. निस्ते आगीचे फव्हारे. मग वन्वा लागनार नाय तर काय व्हनार? अन आगीलाच निखार्याोवं कसा जाळनार तू? याड लागलय का?
😂😂😂😂😂
प्रकाश घाटपांडे
(मिसळपाव ,ऐसी अक्षरे वर पूर्वप्रकाशित )
फेसबुकवरून साभार दि. २२-०६-२०२१
मामाच्या अशा गावाला जाऊया का ?
हे विडंबन कुणी केले ते माहीत नाही. पण भविष्यातली ही संभाव्य परिस्थिती विदारक आहे. शहरीकरणामुळे मामाची गावेच कमी होत चालली आहेत आणि जी आहेत तिथे पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे मामाच भाच्यांना बोलवायला धजत नाही.
सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ……..
झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂🚎🚎🚎🚎
😝😂😆
झाडे लावा झाडे जगवा
उन्हाळ्याच्या सुटीत झुकुझुकु झुकुझुकु अगीनगाडीत बसून पळती झाडे पहात मामाच्या गावाला जाण्यात भाच्यांची मजा असायची. आता ती धुरांच्या रेषा हवेत काढणारी आणि कोळशाच्या इंजिनावर झुकुझुकु चालणारी कूऊऊऊ गाडीही राहिली नाही आणि बहुतेक मामांची दुष्काळग्रस्त गावे भाच्यांसाठी नव्हे तर पाण्याच्या टँकरसाठी येणाऱ्या आगगाडीची वाट पाहू लागली आहेत.
मूळ गाणे
झुकुझुकुझुकुझुकु अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाच्या गावाला जाऊया
मामा मोठा तालेवार
रेशिम घेइल हजार वार
कोटविजारी घेऊया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊ याऽऽ जाऊ याऽऽ
. . . . ग.दि.माडगूळकर
*********************************
३१ डिसेंबर २०१८ वर्षअखेरची ओली पार्टी
पहिले गाणे कदाचित गटारी अमूशेचे असेल किंवा ३१ डिसेंबरचे. या वर्षाची मजेदार सांगता करायला फिट्ट आहे. श्री.चिंतामणी जोगळेकर यांचे आभार आणि स्व.शांताबाई शेळके यांची क्षमा मानून ……..
हे विडंबन आता पुन्हा एकदा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना वाचायला मिळेल. नावासह प्रसिद्ध करणाऱ्या सर्वांना धन्यवाद..
शांताबाई शेळके यांच्याविषयी पूर्ण आदर आहेच.
मूळ गाणे
किलबिल किलबिल पक्षि बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुलें बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई!
त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही
नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही
तिथल्या वेली गाणी गाती, पर्या हासर्या येती जाती
झाडांवरती चेंडु लटकती, शेतांमधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही
. . . शांता शेळके
——————
असेच दुसरे एक मद्यगीत
फिटे अंधाराचे जाळे या गाण्याची चाल असलेले ३१ डिसेंबरचे गीत……..
पिती अंधारात सारे
झाले मोकळे हो ग्लास
नाकातोंडातून वाहे
एक उग्र असा वास !!१!!
बार जागे झाले सारे
बारबाला जाग्या झाल्या
सारे जमता हो एकत्र
बाटल्याही समोर आल्या
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास !!२!!
दारु पिऊन नवेल्या
झाल्या बेवड्यांच्या जाती
बारमधेच साऱ्यांच्या
सरु लागल्या हो राती
क्षणापूर्वीचे पालटे
जग भकास भकास !!३!!
जुना सकाळचा प्रकाश
झाला संध्येचा काळोख
दारुड्यांचा दारुड्यांना
दारुनेच अभिषेक
एक अनोखे हे मद्य
आले ग्लासात ग्लासात !!४!!
🍻🍻🍻😝😝😝
कवी- श्री.दे.शि.दारूडे
मूळ गीत …
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखोऱ्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी
संगे जागल्या साऊल्या
एक अनोखे लावण्य
आले भरास भरास
दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे
जग उदास उदास
झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास
साऱ्या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ
गेली तळास तळास
. . . . सुधीर मोघे
——————————————
नवी भर दि. ७-०१-२०२२
मूळ कविता
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक
कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक
कवी: ग.दि.माडगूळकर
विडंबन
एका ढिगात होती, वस्त्रे बहु सुरेख
होती पडून छोटी, चिंधी तयांत एक
शिंपी तिला न घेई, शिवण्यास पाटलोणी
चिंधीस का कधीही, समजेल वस्त्र कोणी?
कधी चोर त्या दुकानी, चोरून माल नेती
तेही न त्रास देती, चिंधीस काही एक
चिंधीस खंत वाटे, का मी निरूपयोगी?
हेटाळणी एवढी का, माझ्याच फक्त भोगी?
फडके म्हणून का, माझी नसे महत्ता?
मज गोधडीत घ्या ना, तुकडा म्हणून एक!
एके दिनी परंतु, चिंधीस त्या कळाले
साथीमधे तियेचे, उजळून भाग्य आले
भारी विशेष वस्त्रे, असुयेत होती खाक
मिरवे बनून चिंधी, कोविड 😷मास्क एक
😄😀
(Fb वर सापडली, कवी अज्ञात)
—————
नवी भर दि.०३-०३-२०२२ : लिसन माझ्या सोन्या बाळा
आता या विंग्रजाळलेल्या कवितेचे श्री.नरेंद्र गोळे यांनी केलेले भाषांतर
मराठी अनुवाद करणे हे तर रोजचे घावन घाटलं.
मात्र ह्याचा अनुवाद करावा लागेल असे स्वप्नातही ना वाटलं!
.
ऐक माझ्या सोन्या बाळा, केव्हाच झाली सकाळ
निर्वाणीची सुचना आता, अंथरुणातून उगव
.
छानपैकी दात घास, चमकव तुझे दात
हसण्यावारी नेऊ नकोस, हितच आहे त्यात
.
गरमगरम दूध केलंय, घालून हळद साखर
हाताने तू विटा फोडशील, हे प्यायलास तर
.
एक पेला दोनदा प्यायलास, तर जीवनसत्त्व भरपूर
होशील धोनी तूही आणि मग धावांना येईल पूर
.
गणिताच्या गुरूजींना विचार सार्या शंका
मधल्या सुट्टीत पाठ कर मराठीच्या कविता
.
शाळा सुटल्यावर संध्याकाळी घरी ये लवकर
येता येता वाटेतच पाठ कर वाक्प्रचार
.
आजोबांच्या वाढदिवसाचे रात्री आहे जेवण
अशा भवतालातच होते मुलांचे संगोपन
.
मराठीची शिकवणीही लावू तुला खास
दैनिकांत शोधलं खूप पण लागला नाही माग
.
मूळ कवीः मुरारी देशपांडे ९८२२०८२४९७
.
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००२२८
श्रावणमासी हर्ष मानसी या कवितेचे विडंबन याच संकेतस्थळाच्या या भागात.