वैज्ञानिक दृष्टीकोन

आपल्या देशात विज्ञान / तंत्रज्ञान या विषयांमध्ये शिक्षण घेऊन पदवीधर झालेल्या लोकांची संख्या फार मोठी आहे, पण हे लोक त्यांच्या आयुष्यात विज्ञानाला किती महत्व देतात? ते अंधश्रद्धेपासून किती प्रमाणात मुक्त झाले आहेत? याचा विचार करता फार कमी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असतो अशी तक्रार मोठ्या शास्त्रज्ञांनी केली आहे. या वर्षी राष्ट्रीय विज्ञानदिवसाच्या निमित्याने मिळालेला एक लेख. लेखिकेचे मनःपूर्वक आभार.
विज्ञान म्हणजे काय ? हे मी या लेखात सविस्तर विषद केले आहे. https://anandghan.blogspot.com/2018/02/blog-post_16.html

सायंटिफिक टेम्पर

सायंटिया / सायंशिया या मूळ शब्दाचा अर्थ -ज्ञान .यातून पुढे सायन्स,सायंटिफिक, सायंटिस्ट असे शब्द उगम पावले. सायंटिफिक टेम्पर हा शब्द 1976मध्ये भारतीय संविधानात कलम 51-ए मध्ये ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्य काय असतात’ या विधाना अंतर्गत घटनादुरुस्ती द्वारे समाविष्ट करण्यात आला. याची व्याख्या करायची झाली तर ती याप्रमाणे करता येईल:
एखादी गोष्ट फक्त शतकानुशतके वडीलधारी किंवा इतर लोक करत आहेत म्हणून न करता त्याकडे साहसी व समीक्षात्मक दृष्टीने बघणं,नवं संशोधन वा सत्य स्वीकारणं आणि वस्तुस्थितीवर भर देत जितका पुरावा हाती असेल तितक्याच तथ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन अस म्हणता येईल.

पाऊस पडून शेकडो वर्षे बीज रुजत असेल, फांद्या एकमेकांवर घासून हजारो वर्षे आग लागत असेल, शेकडो मृतदेह कुजत असतील, एखाद्या विशिष्ट झाडाची फळं खाऊन आजार बरा होत असेल आणि त्याच झाडाच्या पायथ्याशी उगवलेलं भुछत्र खाऊन विषबाधा अनेक वर्षे होत असेल. पण ज्या क्षणी प्रागैतिहासिक मानवाच्या मनात हे का आणि कसं? असे प्रश्न निर्माण झाले त्याक्षणी माणसाच्या आयुष्यात विज्ञानाचा जन्म झाला असं मानायला हरकत नाही.

तिथपासून ते आज माईंड क्लोन बनवण्याच्या प्रवासापर्यंत आपली मजल गेली असली तरी सायंटिफिक टेम्पर आपल्यात खरोखरच रुजलंय का ,याच उत्तर देणं अवघड आहे. आपल्या दृष्टीने विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळा आणि जीव, भौतिक, रसायन ही तीन शास्त्र आणि त्यांची उपशास्त्र. पण शास्त्र या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला तर, मोजणी, संरचना, अवकाश,आणि बदल यावर आधारित गणित ही शाखा निर्विवादपणे ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ हे दाखवण्याच एक शास्त्र आहे हे आपण विसरतो. अनुमानांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करून विश्लेषण करणारं तर्कशास्त्र आपल्या गावीही नसतं. इतकंच काय समाजाच्या सुव्यवस्थेसाठी निर्मिलेली अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र ही देखील शास्त्रच.

यातली सामाजिक शास्त्र ही अपूर्ण लिविंग सायन्सेस समजली जातात कारण त्यात स्थळ, काल, परिस्थिती, घटना यानुसार 100% वस्तुनिष्ठता येणं अशक्य असतं.त्यात थोडीफार व्यक्तिनिष्ठता येतेच. पण वरील इतर शास्त्र मात्र प्रयोग, निरीक्षण, अनुमान या कसोट्यांवर कुणालाही कुठेही सिद्ध करता येतील अशी आहेत.

स्वतःच्या विचारातील त्रुटी व व्यक्तिनिष्ठतेनुसार झुकणारा कल ओळखायला देखील वैज्ञानिक दृष्टीकोनच लागतो .कारण मेंदूतील सगळ्यात मोठा भाग सेरेब्रम हा स्पर्श, दृष्टी, श्रवण = अनुभव व भावना यासोबतच संभाषण, तर्कबुद्धि व शिकण्याची प्रक्रिया=आकलन यासाठीही जबाबदार असतो. म्हणजेच एकच भाग सायंटिफिक टेम्परसाठी लागणाऱ्या तर्कबुद्धि साठी आणि त्याच वेळी अतार्किक ,अविचारी वागण्याला कारणीभूत ठरणाऱ्या भावना या घटकासाठी सारखाच जबाबदार असतो.आणि यामुळेच वैज्ञानिक दृष्टीकोन व तो तयार व्हावा असं वातावरण असणं अत्यंत गरजेचं आहे.

दोन गट असतात : आपण पहिल्यापासून प्रगतच आहोत म्हणून वसकन अंगावर येणारे
नाहीतर क्वांटम फिजिक्स, molecular डिझाईन , जेनेटिक्स असे शब्द तोंडावर फेकून आपणच विज्ञानवादी असण्याचा दावा करणारे

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आत्मा असलेला बुद्धिप्रामाण्यवाद आपण अव्हेरतो. लोकायत आणि चार्वाकची परंपरा असणाऱ्या देशाला बुद्धिप्रामाण्यवादाचं इतकं वावडं का? याचा विचार करायला हवा. आपल्याकडे विज्ञान शिकणारी व्यक्ती ही वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून असेलच आणि विज्ञान या विषयाशी संबंध नसणाऱ्याचा त्याच्याशी दुरान्वयेही संबंध नसावा असे काही गैरसमज प्रचलित आहेत.

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा न्यूटन ‘ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी समजून घेण्यास फक्त आपणच (मानव) समर्थ आहोत’ असं म्हटल्याने त्याची प्रतिभा, संशोधन व अभ्यास झाकोळते का? अजिबातच नाही. म्हणूनच आपलं यान मंगळावर जाण्याच्या आदल्या दिवशी राधाकृष्णन तिरुपतीला त्याची प्रतिकृती वाहून ‘not to leave anything to chance’ असं म्हणतात तेव्हा मोहीम यशस्वी झाली ती बालाजीमुळे नव्हे तर शास्त्रज्ञांच्या perception व perspiration मुळे याचं भान आपण बाळगलं पाहिजे आणि राधाकृष्णन यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांच्या कृतीला वैयक्तिक श्रद्धा म्हणून त्यांच्यातील शास्त्रज्ञातून वेगळं काढता आलं पाहिजे.

वरील गैरसमज खरे ठरता, ,भारताच्या औद्योगिक जगताची पायाभरणी करणारा एक उद्योजक आणि हिंदुराष्ट्र व अध्यात्म यांची महती जगाला सांगायला चाललेला भगव्या कपड्यातील एक संन्यासी यांच्यात 1893 साली जपानहून कॅनडाकडे जाणाऱ्या जहाजावर जी चर्चा झाली त्याने भारावून जाऊन 1930 आणि 1940 साली दोन जगविख्यात संस्था उभारण्याचं उद्योगपतींना काही प्रयोजनच नव्हतं! त्या दोन महान व्यक्ती होत्या: स्वामी विवेकानंद व जमशेदजी टाटा. आणि विज्ञानाची ही नवलतीर्थे आजही भारताची मान उंचावत आहेत: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च! त्यामुळे जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं हे छापील ,टाळीबाज वाक्य बाजूला ठेवलं तर उत्तम. विज्ञान व अध्यात्म हातात हात घालून चालल्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

दुसरं उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. प्रगतिशील हिंदुराष्ट्र या कल्पनेला आयुष्य वाहून घेतलेले सावरकर म्हणतात : “बुद्धिवादी, विज्ञानवादी सुधारकांनी सर्व प्रकारचा धार्मिक भाबडेपणा, लुच्चेगिरी मग ती वैदिक असो, बायबलीय असो की कुराणीय तिच्या कचाट्यातून मानवी बुद्धी मुक्त करणं हेच पवित्र धर्मकार्य समजावं’

आपल्या श्रद्धांची बेटं ही वादळात सापडलेल्या जहाजाला तात्पुरता आधार देणारी असली तरी जहाजाचा तो मुक्काम नसतो हे लक्षात घेऊन योग्य वेळी ते बेट सोडता यायला हवं आणि श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी या भंपक वाक्याचं श्राद्ध घालता यायला हवं. जिथे श्रद्धा असते तिथे प्रश्न नसतात. त्याअर्थी श्रद्धा डोळस असू शकत नाही. हे काही वेळेला आधार देणारं असलं तरी आपली जगण्याची पद्धत व प्रेरणा तेवढीच आहे का हे जरूर बघायला हवं.

त्यामुळे आपला धर्म, शिक्षण, धारणा, जडणघडण, पूर्वाश्रमीचे संस्कार हे सगळं एका बाजूला ठेवून आपण एखाद्या गोष्टीची who, what, when, where, why and in what way (how) अशी निर्मम तटस्थपणे चिकित्सा करतो तेव्हा आपण विज्ञानाचं बोट धरलंय असं समजायला हरकत नाही. त्यासाठी तुकाराम महाराजांच्या एका ओळीचं स्मरण देखील पुरेसं ठरावं ‘ सत्य असत्याशी मन केले ग्वाही, ना मानियले बहुमता.

आता दुसरी बाजू :
मानवी संस्कृती विकसित झाली ती विज्ञान तंत्रज्ञानाच्या बळावर यात वाद असूच शकत नाही. मात्र आज कल्पनातीत असं तंत्रज्ञान, मध्ययुगीन संस्थारचना आणि अश्मयुगीन भावभावना या परिस्थितीत आपण जगत आहोत. संस्कृतीचा जन्म, उदय आणि विकास कशाच्या जोरावर झालाय हे समजून घेतलं तर लक्षात येईल की त्यासाठी आवश्यक असणारं kin /group selection हे फक्त ज्ञान नव्हे तर भावभावना ,हेतू,गरजा, भाषा ,सुरक्षितता अशा अनेक गोष्टींच्या आधारावर झालं आहे. आणि त्यामुळेच विज्ञान तंत्रज्ञानाला कप्पेबंद असून चालणार नाही. ना ते विज्ञानाच्या सोयीचं आहे ना माणसाच्या. संस्कृतीच्या रसरशीत ,खळाळत्या ,जिवंत प्रवाहाच्या कडेकडेने जात मग त्यात सामील होणं हा पर्याय अधिक सोयीस्कर ठरावा. कारण ? डार्विनचे थेट निसर्गदत्त वारसदार असलेल्या एडवर्ड विल्यम यांच्या शब्दात सांगायचे तर :
परग्रहवासीयांना माणसाच्या तंत्रज्ञानाचं जराही कौतुक नसेल. ते तिथपर्यंत पोहोचलं त्या अर्थी ते प्रगतच असणार! मानवी संस्कृतीचं मूल्यमापन करायचं झाल्यास ते विज्ञान तंत्रज्ञानाने नव्हे तर सुसंस्कृतपणाच्या मोजमापाने करावं लागेल. त्यासाठी कला, संगीत, तत्वज्ञान, धर्म , अशा मानव्यविद्याचा आधार घ्यावा लागेल. या विद्या म्हणजे समाजाचं , त्यांच्या भावभावना ,मानसशास्त्र यांचं प्रतिबिंब.

यामुळेच ज्ञानसूर्य तेजाने तळपताना हा प्रवाह आटणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे.
विज्ञानासोबत विवेक हवा हे वाक्यही असंच काहीसं फसवं. विज्ञान म्हणजे सत्य , विज्ञान म्हणजे अपूर्णत्व मान्य करण्याचा प्रामाणिकपणा, विज्ञान म्हणजे दुसऱ्याने आपलं म्हणणं सप्रमाण सिद्ध केलं तर त्याला त्याचं श्रेय देण्याचा मोठेपणा, विज्ञान म्हणजे हट्ट सोडता येणं ,ऐकून घेता येणं ,नव्या पद्धतीने विचार करता येणं ,आपल्या आकलनात सुधारणा करणं
विवेक यापेक्षा वेगळा नसतो.

विज्ञान दिनाच्या दिवशी फक्त शास्त्रज्ञांचे फोटो पुढे पाठवत बसण्या ऐवजी आणि विज्ञान शाप की वरदान अशा उथळ चर्चाना प्रोत्साहन देण्याऐवजी संविधानात ‘आपली मूलभूत कर्तव्य’ या विभागात नमूद केलेलं ‘ To develop the scientific temper ,humanism ,spirit of enquiry and reform ‘म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं तरी पुष्कळ,नाही का?

गौरी साळवेकर

सूचना : या लेखात काही तपशिलातल्या चुका दिसतात, पण लेखिकेने मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.

नैसर्गिक आणि कृत्रिम बुद्धीमत्ता

हा लेख आधी ‘कृत्रिम बुद्धीमत्ता आणि आपले भवितव्य’ या नावाने सादर केला होता. बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ती किती प्रकारची असते याची माहिती देणारा एक लेख यात समाविष्ट केला आहे. त्यात दिलेल्या आठ प्रकारांपैकी किती प्रकारच्या बुद्धिमत्ता कृत्रिमरीत्या विकसित करता येणार आहेत याचाही विचार करायला हवा. २२-०३-२०२२

आजकाल कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयावर बरीच चर्चा सुरू आहे. ही गोष्ट आता फक्त शक्यतेच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात उतरायला लागली आहे. हिची अमर्याद वाढ होऊन त्यातून मानवजातीचा संहार होईल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. ती यायच्या आधी आज उपलब्ध असलेल्या आधुनिक साधनांमुळेही माणसाच्या मेंदूवर आघात होत आहेत. या अंकीय प्रणालीवरील वाढते परावलंबित्व आपले माणूसपण हरवत आहे. हा काय प्रकार आहे आणि किती गांभिर्याने घेतला पाहिजे यावर माझे मित्र आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मश्री शरद पांडुरंग काळे यांचा एक वाचनीय लेख त्यांचे आभार मानून खाली देत आहे.

१. होमो डिजीटॅलीस

शरद पांडुरंग काळे
निवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र

आपला मेंदू हा एक प्रकारचा अतिशक्तीशाली असा संगणकच आहे. लॅपटॉप, टॅबलेट, डेस्क संगणक असे संगणकाचे जसे वेगवेगळे प्रकार आहेत, तसाच मेंदूदेखील एक संगणक आहे, पण तो नैसर्गिक आहे. त्याला कार्यरत ठेवण्यासाठी जी ऊर्जा द्यावी लागते, ती बाहेरून विद्युत प्रभाराच्या स्वरूपात द्यावी लागत नाही, तर ती अन्नातून मिळते, हा या कृत्रिम आणि नैसर्गिक संगणकांमधील मोठा फरक आहे. संगणकाचा प्रभार संपला की त्याला विद्युतजोडणी करून प्रभार पुरवावा लागतो. हा प्रभार संपल्याचा प्रकार सहसा घडत नसला तरी, तो कमी झाला तर मेंदूच्या बाबतीतही प्रभार द्यावा लागतोच! जर पोटात कावळे ओरडायला लागले, तर आपला संगणक बंद पडत नाही, पण चिडचिडा मात्र होतो. पोट भरलेले असले की तो नीट काम करू शकतो. कृत्रिम संगणकातील प्रणाली काही ठरावीक काळानंतर जुनी होते. बाजारात नवीन येणाऱ्या विविध ऍप्सच्या स्वरूपातील आज्ञावल्यांशी जमवून घेणे तिला जमेलच असे नसते! त्यामुळे आज्ञावल्यांच्या नवीन पिढीशी समतोल साधण्यासाठी ही संगणकाची मूळ प्रणाली बदलावी लागते. त्यामुळे कदाचित त्याला सामावून घेणारे हार्डवेअर किंवा प्रत्यक्ष काम करणारे भाग बदलावे लागतात. काही वर्षांनी कोणताही तांत्रिक बिघाड न होता देखील संगणक बदलावा लागतो, कारण त्याच्या जुन्या चालक प्रणालीस नव्या ऍप्सना चालविण्याइतका वेग तरी नसतो, किंवा स्मृतिमंजुषा तरी नसते. मेंदूच्या बाबतीत असे काही शक्य नसते! जन्मतः त्याला जी प्रणाली मिळालीली असते, तिला पर्याय नसतो. जी स्मृतिमंजुषा आपल्याला एकदा मिळालेली असते, ती टिकवून ठेवावी लागते.

शिक्षणाने आणि अनुभवाने आपल्या या नैसर्गिक संगणक चालकप्रणालीचा वेग, एका ठरावीक मर्यादेपर्यंत वाढविता येतो. आयुष्यभर त्या प्रणालीच्या साथीनेच आपल्याला जगावे लागते. त्याचे वायरिंगही बदलता येत नाही किंवा हार्डवेअर देखील बदलता येत नाही! जगात बदल तर रोज होत असतात. या नव्या बदलांशी सामावून घेत असतांना किंवा त्यांच्याशी समतोल साधण्यासाठी, प्रणालीत जी कमालीची लवचिकता असावी लागते, ती निसर्गाने कोणत्या स्वरूपात आपल्याला दिली आहे, हे सांगता येत नसले तरी, ती दिली आहे हे मात्र नक्की सांगता येते. त्यामुळे बैलगाडीत बसलेला माणूस सहजपणे विमानात बसू शकतो. कदाचित थोडे आश्चर्य त्याला नक्की वाटेल, थोडी भीतीदेखील वाटेल, पण विमान प्रवासाशी तो जमवून घेतोच. आयुष्यभर जमिनीवर बसून स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीच्या हातची चव आधुनिक स्वयंपाकघरात अजिबात बदलत नाही. म्हणजे हार्डवेअर बदलले म्हणून प्रॉडक्टमध्ये फरक पडत नाही! त्याचे कारण आपल्या मेंदूचा संगणक लवचिक आणि अतिशक्तीशाली प्रणालीचा आहे हेच असते! संगणक क्षेत्रातील प्रगतीचा वेग आश्चर्यकारक तर आहेच, पण ज्या तऱ्हेने कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) इथे धुमाकूळ घालत आहे, तो पाहता संवेदनशील मनामध्ये काही विचारतरंग उमटत आहेत. मेंदूला हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा पर्याय निर्माण करीत असतांना, आणि अंकीय प्रणालीवरील भर देतांना, आपण आपल्या मेंदूच्या आज्ञावलीचे पुनरप्रणाली लेखन तर करीत नाही ना? आपल्या मेंदूला आपण असंवेदनशील तर बनवत नाही ना? त्याच्या भावना बोथट होत आहेत का? आपल्या मानवी इतिहासात हजारो वर्षांपासून जी भावना मूल्ये जपली गेली आहेत, त्यांना तडे तर जात नाहीत ना? आपल्या जीवनातील नेमकी ध्येये गाठत असतांना, जीवनात मिळणारे समाधान किंवा आनंद आपण हरवून तर बसणार नाही ना? वैयक्तिक महत्वाकांक्षा नाती विसरायला लावीत आहेत का?

नील स्टीफनसन ह्यांच्या स्नो क्रॅश नावाच्या विज्ञानकथेत अशी कल्पना केली आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावाखाली, माणूस चेतासंस्थेतील जैवरसायनशास्त्रात अधोगतीच्या गर्तेत चालला आहे. ह्यातून मानवतेला वाचविण्यासाठी कथेचा नायक हिरो यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली जाते. हा जो हिरो असतो तो कोणत्याही सॉफ्टवेअर प्रणालीचा भेद करण्यात कुशल असतो. हिरोचे पहिले काम म्हणजे जगभरातील माणसांच्या मनाचा वेध घेणाऱ्या स्नो क्रॅश नावाच्या विषाणूंचा बंदोबस्त करणे हेच असते. ह्या विषाणूंच्या प्रभावामुळे माणसांचे रूपांतर हे एक प्रकारच्या जैविक यंत्रात होते. या यंत्राला सद्सद्विवेकबुद्धी, स्वतःची उर्मी, सृजनशीलता किंवा व्यक्तिमत्त्व असे काहीच नसते! मेंदूच्या मुळाशी एकदा का त्याचे रोपण झाले की, हा विषाणू आपल्या हातपायांचे नियंत्रण करणाऱ्या बाह्यपटलाखाली असलेल्या प्रणालीचा ताबा घेतो. त्यामुळे प्रतिक्षिप्त क्रियांवरचे नियंत्रण नाहीसे होते, व माणसाचे रूपांतर चलप्रेतात होते! या चलप्रेताची विचारशक्ती संपलेली असते आणि त्याचा नैसर्गिक सावधपणा पूर्णतः लयाला गेलेला असतो. आता प्रश्न असा आहे की, माणसाची सध्याची स्थिती ह्या चलप्रेतांसारखी होत आहे का? अंकीय तर्कशास्त्रावर आधारित लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट इत्यादी भ्रामक वास्तवतेच्या प्रभावामुळे, आपण मानव म्हणून जे अतिशय उत्कृष्ट अशा भावना अनुभवतो, त्या परस्पर संवाद, सौन्दर्याचा आस्वाद घेण्याची प्रवृत्ती, सहानुभूती, संवेदनशीलता, सर्जनशीलता, आंतरिक उर्मी आणि प्रेम यांना कायमचे मुकण्याची शक्यता कितपत आहे? न संपणाऱ्या अंकीय प्रणालीच्या राजमार्गावर धावत असतांना आणि अधिकाधिक स्वयंचलित गोष्टींचा ध्यास घेत असतांना, ज्ञानाचे आकलन होण्याची मानवी क्षमता कमी तर होणार नाही ना?

एलन ट्युरिंग ह्यांना आधुनिक संगणक प्रणालीचा जनक असे संबोधले जाते. सन १९३० मध्ये त्यांच्या मते प्राण्यांचा मेंदूला किंवा माणसाची मध्यवर्ती चेतासंस्थेला अंकीय संगणक म्हणून संबोधता येईल. या विषयावर त्या काळात बराच वादविवाद आणि चर्चा झाली होती. जे कृत्रिम बुद्धिमत्तेचे संशोधक आहेत, त्यांच्यामते अंकीय प्रणालीवर आधारित यंत्रांना माणसासारखी बुद्धिमत्ता मिळू शकेल. त्यांना एलन ट्युरिंग यांचे म्हणणे स्वीकारार्ह आहे. काही चेतातज्ञांच्या (नयूरोलॉजिस्ट) मते त्यात तथ्यदेखील आहे. त्यांना असेही वाटते की माणसाच्या मेंदूची अंकीय प्रणालीत हुबेहूब प्रतिकृती बनवीता येऊ शकेल. बरेचसे चेतातज्ञ, तत्वज्ञ आणि भौतिकी शास्त्रज्ञ मात्र या मताशी अजिबात सहमत होत नाहीत. काही जण तर ह्या विचाराला दिवास्वप्न असेही म्हणतात! काहीजण त्याला गूढ विश्वास समजतात! मानवी मेंदूमध्ये समस्या सोडविण्यासाठी जी पद्धती वापरली जाते, ती ट्युरिंगच्या संगणकाशी मिळतेजुळती आहे ह्या कल्पनेला छेद देणारा एक विचार रोनाल्ड सिक्युरेल आणि मिग्वेल निकोलेलीस यांनी मांडला आहे. त्यांच्या मते मानवी मेंदूमध्ये एक अतिशय वेगळ्या धर्तीची संगणकीय प्रणाली असते. अंकीय प्रणालीपेक्षा ही सर्वस्वी भिन्न असते. हिला त्यांनी ऑरगॅनिक कॉम्प्युटर किंवा सेंद्रिय संगणक असे संबोधले आहे. ह्यात अंकीय आणि अनलॉग प्रणालींचे आवर्ती मिश्रण असते. मेंदूकडे येणारे संदेश आणि माहिती नानाविध पद्धतींनी येत असते. त्या सर्व input किंवा येणाऱ्या सांकेतिक, दृश्य, श्राव्य आणि भावार्थ सिग्नलचे विश्लेषण करून, त्यावर योग्य तो output देणे आणि त्यांची नेमकी तामिली कशी होती ते पाहाणे, हे कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम संगणकीय प्रणालीत बसत नाही. संगणकाची असेंब्ली भाषा आणि input सिग्नल्सचा ताळमेळ असतो, आणि दिलेल्या संगणकासाठी तो बदलत नाही. मेंदूत अशा अनेक असेंब्ली भाषा आणि input भाषा असतात. याचे outputsदेखील अनेक पद्धतींनी व्यक्त होत असतात. मेंदूचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यातील सीमारेषा आपल्याला ओळखता येत नाहीत. त्यांच्या इंटरफेसेस याही सेंद्रिय स्वरूपाच्या असतात. त्यातूनच ह्या सेंद्रिय संगणकाचे कार्य चालत असते. ह्या सेंद्रिय संगणकातून वेगवेगळ्या पातळ्यांवर शरीराचे नियंत्रण केले जाते.आंतरपेशीय प्रथिन संयुगे हे या सेंद्रिय संगणकाचे दृश्य संदेशवाहक असतात.त्यांच्या मार्फत पेशींचे प्रजनन, वाढ, कार्य आणि नाश होत असतो. त्यातूनच आपण शिकतो, शिकवितो, गातो, गाणे ऐकत असतो, कलांचा आस्वाद घेत असतो, निराशेने त्रासून जातो, आनंदाने बेहोष होतो, सार काही या सेंद्रिय संगणकाचा प्रताप असतो.

या सेंद्रिय संगणकाचे आज्ञालेखन किंवा प्रोग्रॅमिंग नक्की कसे होते, कधी होते, त्यातील बग्ज किंवा दोष दूर कसे होतात ही कोडी अजून पूर्ण उलगडलेली नाहीत. त्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की, सेंद्रिय संगणकांना ट्युरिंग संगणकासारखे हाताळता येत नसले तरी, अनेक विविध जैविक प्रक्रियांद्वारे त्यांना आज्ञांकीत केले जाऊ शकते. अगदी मूलभूत स्तरावर, ज्याला या सेंद्रिय संगणकाची असेंब्ली भाषा म्हणता येईल, त्या मानवी आनुवंशिक नकाशातील असंख्य जनुकांमार्फत अभिव्यक्त होत, उत्क्रांतीमध्ये निवड होत होत विकसीत होत गेलेल्या आज्ञावल्या ह्या शरीराच्या जडणघडणीत वास्तुविशारद म्हणून कार्य करतात. प्रसवपूर्व काळात म्हणजे मूल गर्भावस्थेत असतांना आणि जन्मल्यानंतर मेंदूची त्रिमिती रचना पूर्ण करण्यात ह्या आज्ञावल्यांचा मोलाचा वाटा असतो. सुमारे एक लाख वर्षांपूर्वी जे मानवी चेताजाळे (न्यूरल नेटवर्क) विकसित झाले होते त्याचे हे प्रतिबिंब आहे, म्हणजे निसर्गात हा वास्तुविशारद तेंव्हापासून कार्यरत आहे. त्यामानाने मानवाने निर्माण केलेला संगणक अवघ्या शंभर वर्षांचा आहे! एकदा मूल जन्माला आले की, आपल्या कौटुंबिक, सामाजिक आणि भौतिक पर्यावरणाशी संवाद साधण्यासाठी हे चेताजाळे सक्षम असते. अर्थात आज्ञावल्यांचे लेखन, पुनर्लेखन, सुधारित आवृत्त्या हा निसर्गक्रम त्यात अव्याहतपणे चालूच आहे. मानवी संस्कृतीचे विविध कंगोरे आणि सामाजिक परस्पर संवाद यांच्या आंतरक्रियांमुळे मध्यवर्ती चेतासंस्था अधिक प्रगल्भ आणि अधिक कार्यशील होत राहाते. एखाद्या कलाकाराला आपली कला रसिकांसमोर सादर करतांना, आपले आजचे प्रदर्शन कालच्या किंवा आधीच्या प्रदर्शनापेक्षा सुंदर व्हावे अशीच इच्छा असते. शिवाय या कलेत निष्णात होऊन सर्वोत्कृष्ट प्रदर्शन कसे करता येईल यासाठी त्याची धडपड सुरू असते. ह्या सर्व भावना मेंदूमध्येच निर्माण होत असतात. त्यासाठी आज्ञावल्यांमध्ये जे फाईन ट्युनिंग किंवा तरल संतुलन असावे लागते, ते बदल नकळतपणे होत राहातात. सामाजिक मेंदू हा जो प्रकार असतो, तो म्हणजे एखाद्या प्रजातीच्या एकत्रित विचारशक्तीचा प्रभाव दर्शवतो.

होमो सेपियन्स म्हणजे आधुनिक मानवाच्या बाबतीत बोलायचे झाले तर उत्क्रांतीदरम्यान त्याच्या निओकॉर्टिकल म्हणजे दृक्श्राव्य संवेदनांशी संबंधित पेशीसमूहात खूपच वाढ झालेली आढळून येते. दैनंदिन जीवनात अनुभवास येणाऱ्या विविध सामाजिक जटिल प्रश्नांशी ही वाढ संबंधित आहे. जर समाजात तणाव असेल, मग तो धार्मिक असो, राजकीय असो वा तीव्र स्पर्धेमुळे असो, त्याला सामोरे जाण्यासाठी सातत्याने मानवाला प्रयत्न करावे लागतात. संघर्ष हा जीवनाचा मूलमंत्र असतो. बहुतांशी जनतेत आपल्या वयाची पन्नाशी किंवा साठी गाठेपर्यंत हा संघर्ष असतोच. काहींच्या वाट्याला तो उतारवयात देखील नशिबी असतो. अर्थात संघर्षमय जीवनातून यशाच्या शिखराकडे जाणारे अनेक असतात. अशा संघर्षमय यात्रा मानवाच्या जनुकीय नकाशात दूरगामी परिणाम घडवून आणू शकतात. मानवी समाजात आपण परस्परसंवाद साधण्याची क्षमता खूप वाढविली आहे. त्या मानाने चिंपॅंझी (पॅन ट्रोग्लोडाईट) आणि बबुन (पॅपीओ पॅपीओ किंवा पॅपीओ अनुबिस) यांच्यामध्ये सामाजिक संवादाची मर्यादा फारशी वाढली नाही. त्याच प्रमाणात त्यांच्या दृक्श्राव्य संवेदनांशी संबंधित पेशीसमूहात फारशी वाढ झालेली आढळून येत नाही.

आपल्या मेंदूला आज्ञावल्या लिहिण्याचे किंवा पुनर्लेखनाचे अजूनही मार्ग आहेत. मेंदू आणि यंत्र यांच्या इंटरफेस वर झालेल्या गेल्या शतकातील मुलभूत आणि नैदानीक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, मानवी मेंदू कृत्रिम साधनांचा वापर करून या आज्ञावल्यांमध्ये बदल घडवू शकतो. रोबोटीक किंवा यंत्रमानव हा त्याचाच नमुना आहे. शरीरात कृत्रिम हातपाय सामावून घेण्यासाठी मेंदू त्याच्या आज्ञावल्यांमध्ये बदल घडवू शकतो. म्हणजेच कृत्रिम साधनांच्या वापरासाठी न्यूरल नेटवर्क किंवा चेताजाळे स्वतःला अभिमुख करून घेऊ शकते. ह्या निष्कर्षांचा गर्भितार्थ असा आहे की, आपल्या स्वतःच्या भावना ह्या बाह्य घटकांचा समावेश करण्यासाठी सहजपणे पुनर्लिखीत होऊ शकतात! गंभीर स्वरूपाच्या अर्धांगवायूने गलितगात्र झालेल्या रुग्णांमध्ये कृत्रिम अवयवांच्या रोपणास प्रतिसाद देणाऱ्या आत्मसंवेदना, मेंदू आणि यंत्र यांच्या इंटरफेसवर नोंदल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच कॉर्टिकल किंवा सबकॉर्टिकल बदलांमुळे घडून येणाऱ्या कायम स्वरूपी आज्ञावलींचे पुनर्लेखन आंशिक स्वरूपात का होईना, पण अशा रुग्णांना वरदान ठरू शकतात.

म्हणजे आपण पुन्हा एकदा त्याच मुद्यावर येतो. मेंदूचे रूपांतर आपण फक्त अंकीय संगणकात करू शकलो नाही तरी, ही प्रणाली वापरणाऱ्या उपकरणांच्या वाढत्या संख्येमुळे आणि वाढत्या अवलंबत्वामुळे मानवी मेंदू बदलेल का? तो अंकीय प्रणालीच्या आहारी जाईल का? तसे झाले तर मानवी मेंदूची जी भावनिक जडणघडण आहे, त्यात मोठाच बदल घडू शकतो. त्यामुळे मानवाचे रूपांतर एका जैविक यंत्रात होऊ शकते! अंकीय प्रणालीची मानवी जीवनात होणारी ही ढवळाढवळ चांगली मानावी की भविष्यातील धोक्याची नांदी? मानवी वर्तन आणि मानवी कौशल्य या दोन्ही महत्वाच्या गोष्टींचे अवमूल्यन होऊन माणूस शक्तिशाली बनला तरी मानवतेचा पराभव यामध्ये आहे का, ह्यावर गंभीर पणे विचारविनिमय होणे अपेक्षित आहे. अंकीय प्रणालीच्या सातत्याने संपर्कात राहिल्यामुळे वैमानिकांच्या उड्डाणकौशल्यापासून रेडिओलॉजिस्टच्या नमुना ओळखण्याच्या कौशल्यापर्यंत, मानवी कार्यक्षमतेवर खोलवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यावरून आपण गृहीतक मांडू शकतो की, वैमानिकांच्या बाबतीत आधुनिक विमानांच्या अंकीय प्रणालींमुळे, रेडिओलॉजिस्टच्या बाबतीत अंकीय प्रतिमा विश्लेषणात्मक प्रणालीमुळे, त्यांच्या सर्जनशीलता, आंतरिक उर्मी आणि समस्या उकल करण्याची क्षमता नक्कीच कमी होऊ शकतात. जेंव्हा एखादा विषय समजावून घेतांना, त्याच्याशी संबंधित महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे असतात. ऑनलाइन हे मुद्दे कधीही मिळतील अशी खात्री असते, तेंव्हा ते मुद्दे लक्षात न राहण्याची किंवा त्यासाठी मेहेनत न घेण्याकडे लोकांचा कल असेल, हे साधे तर्कशास्त्र आहे! कित्येक वर्षे आपण दूरध्वनी क्रमांक सहजपणे लक्षात ठेवीत होतो. आपल्या बँकेशी संबंधित खाते क्रमांक सहसा विसरला जात नसे. आपली स्मृती मंजुषा उत्तम प्रकारे कार्य करीत होती. पण गेल्या दशकात आपली भिस्त आता हातातील भ्रमणध्वनीवर अधिक आहे. जर फोन हरवला तर आपल्या स्मृतींची पाटी कोरी झाल्यासारखे वाटते. इतरांचा सोडा, स्वतःचा तरी भ्रमणध्वनी क्रमांक आठवेल की नाही याचीचशंका येते. स्मार्टफोन तर आता एव्हढे स्मार्ट झाले आहेत की, फोन हरवला, तर नवीन सिम टाकले की नव्या फोन मध्ये सर्व माहिती जशीच्या तशी उमटते! म्हणजे कुठे काही लिहून ठेवण्याची सुद्धा गरज राहात नाही. थोडक्यात तुम्हाला अधिकाधिक परावलंबी करण्याचा जणू या स्मार्टफोन आणि संबंधित प्रणालींनी विडाच उचलला आहे. माहिती विश्वसनीय पद्धतीने मेंदूत साठविली जाण्याची आपली क्षमता कमी होत जाणार आहे.

फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप यासारख्या संगणकीय किंवा अंकीय सामाजिक माध्यमांच्या प्राबल्यामुळे, आपल्या नैसर्गिक आणि सामाजिक वर्तनावर बराच अनिष्ट परिणाम होत चाललेला आहे. शेरी टर्केल नावाच्या लेखिकेने या विषयावर “Alone together” अशी एक वास्तवावर आधारित कादंबरी लिहिली आहे. त्यात मानव आता तंत्रज्ञानाकडून अधिक अपेक्षा करतो आणि एकमेकांपासून दूर जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. संदेश पाठविणे, आलेले संदेश फॉरवर्ड करीत राहाणे आणि निरर्थक किंवा दुरान्वयेदेखील संबंधित नसलेल्या गोष्टींवर मत व्यक्त करीत फक्त असंतोष वाढवीत राहणाऱ्या नवीन पिढीतील काही किशोर वयीन मुलांच्या मुलाखती तिने त्यासाठी घेतल्या होत्या. या भ्रामक वास्तवतेच्या माध्यमांचे व्यसन हे माणसाला निराशेच्या गर्तेत ढकलण्याची शक्यता वाढत चालली आहे. मानवी सहानुभूतीचा अभाव आणि परस्पर संवाद कमी होत जाणे, एकटेपणात अजून नैराश्य येणे ह्या सर्व गोष्टी या मुलाखती दरम्यान लेखिकेला तीव्रतेने जाणवल्या होत्या. या मुलाखती वाचल्यावर आणि बऱ्याच गोष्टींचा स्वतः अनुभव घेतल्यानंतर ही सारखी “कनेक्टेड” राहण्याची जी प्रवृत्ती अतिशय वेगाने पसरत आहे, त्यामुळे ज्यांच्याशी आपण जवळून संपर्क साधू शकतो, अशा लोकांची संख्या लॉगॅरिथमिक प्रमाणात वाढत आहेत. फेसबुकवर किती मित्र जोडले गेले यावरून तुमची लोकप्रियता ठरते! म्हणजे आपल्या दृक्श्राव्य क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक मोठ्या संख्येने आपण लोकांच्या संपर्कात येतो! पण त्याचा खरोखरीच काही उपयोग आहे का? त्या मोठ्या मित्रमंडळातील किती लोक खरेच तुमचे हितचिंतक किंवा खरे मित्र आहेत? तुम्ही स्वतः लिहिलेल्या पोस्ट या माध्यमांमध्ये महत्वाच्या नसतात, तर तुम्ही किती पोस्ट शेअर केल्या, त्यावर तुमची कार्यप्रवणता ठरत असते! शेवटचा महत्वाचा प्रश्न, तुमच्या प्रगतीत (की अधोगतीत?) या सामाजिक माध्यमांचा किती सहभाग आहे? दिवसाच्या शेवटी मानसिक तणाव वाढविणाऱ्या या गोष्टींपासून चार हात दूर राहून, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे महत्वाचे आहे, हेच खरे आहे.

या अंकीय प्रणालीवरील वाढते परावलंबित्व आपले माणूसपण हरवत आहे. होमो सेपियन्स या आपल्या शास्त्रीय नावात बदल करून ते होमो डिजिटॅलीस असे करावे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ही गंभीर परिस्थिती आहे का? ह्याकडे लक्ष द्यायला हवे का? मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम तर आहेतच, पण या अंकीय प्रणालीचे वाढते प्रस्थ असे काही सामाजिक तणाव निर्माण करतील, की त्यांचा दूरगामी परिणाम मानवाच्या भविष्यावर अनिष्ट परिणाम करू शकेल. या लक्षवेधक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे हेही खरे आहे.

. . . . . . . . . .

या लेखावर आलेले काही प्रतिसाद खाली दिले आहेत.

नरेंद्र गोळे
माहिती विश्वसनीय पद्धतीने मेंदूत साठविली जाण्याची आपली क्षमता कमी होत जाणार आहे. .>>> हे खरे आहे. कारण वैधता पडताळणीचे दर टप्प्यावरील निकष ’विसरत’ राहिल्याने, अवचित आलेले पडताळणीचे काम करणेच अशक्यप्राय होऊन, मिळालेल्या माहितीची विश्वसनीयता संशयास्पदच रहाणार आहे.

Shriram Paranjape
विचार करायला लावणारा लेख. बहुतेक whatsapp groups चा forwarded messages हा प्राण असतो. याचाच सरळ अर्थ असा की कुठल्या तरी संघटित टोळ्या आपल्या विचारांना एक ( बहुधा अनिष्ट) वळण देण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांचा कब्जा घेण्याच्या प्रयत्नात असतात.

Rajesh Pishte-Deshmukh
खूपच सुंदर लेख. या सगळ्या ज्ञान अन माहितीच्या जंजाळात मानव कमालीचा विसरभोळा होऊन एकटेपणाचा साथीदार बनेल का सर असा मला प्रश्न पडलायं.

Sangeeta Godbole
सर ..डोळ्यांत अंजन घालणारा लेख . चुरचुरले तरी व्याधी बरा करणारा ..वस्तुस्थिती अशीच आहे .विचार तर करायलाच हवा .आणि सुस्थितीत बाहेरही पडता यायला हवे.

Anand Ghare
खूपच विस्तृत लेख, मलाही एका दमात पूर्ण वाचता आला नाही. संगणकांमुळे माणसाच्या काही कौशल्यांमध्ये घट होण्याची शक्यता आहे, उदाहरणार्थ पाठांतर, तोंडचे हिशोब वगैरे गोष्टी पुढील पिढी करतच नाही. मानवी भावना कशा निर्माण होतात आणि त्यांवर कसा किंवा कितपत ताबा ठेवता येतो हेच मुळात गूढ आहे. त्यांच्यावर कृत्रिम बुद्धीमत्तेचा जास्त परिणाम होऊ नये असे मला वाटते. संगणक आणि स्मार्ट फोन यांचा अती वापर होत असल्यामुळे माणसांच्या सवयीच बदलत आहेत ही गोष्ट निश्चितच चिंताजनक आहे. पण यांच्या विरोधात येणाऱ्या संदेशांचाही महापूर येत आहे.

उत्तर – Sharad Kale
Anand Ghare साठीच्या किंवा सत्तरीच्या पुढे आपण आहोत. नवीन पिढीत आणि आपल्यात ४० -५० वर्षांचे अंतर आहे. पाठांतरावर भर देणारा अभ्यास किंवा स्मृतींवर अवलंबून असलेले दैनंदिन जीवन बदलत चालले आहे यात शंका नाही. त्यामुळे लेखात व्यक्त केलेल्या काही विचारांवर विरोधी सूर किंवा नाराजीचा सूर उमटू शकतो. पण माझ्या दृष्टीने प्रश्न तो नाही. जेंव्हा आपण दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींसाठी किंवा आवश्यक गोष्टींसाठी तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांवर अवलंबून राहात असतांना, बुद्धीचा आणि शरीराचा वापर अपेक्षित नसेल तर त्यातून जो रिकामा वेळ उपलब्ध होणार आहे, त्याचे योग्य नियोजन आपण करू शकू का? व्यसनांच्या आहारी जाण्यासाठी हा वेळ वापरला तर जाणार नाही ना? काळाबरोबर चालत असतांनादेखील सृजनशीलता नवीच असते. त्यामुळे नवीन वाटा, नवे व्यवसाय, नवे छंद निर्माण होतीलच. प्रश्न तो नाही. प्रश्न आहे की, आपला समाज त्या दृष्टीने प्रगल्भतेच्या रस्त्यावर आहे की नाही हा! काळजी ती आहे. सोशल माध्यमांवर आपण किती वेळ घालवत आहोत, याचे मोजमाप होत असतेच. त्यावरून जर प्रत्येकाने विचार करून आपल्या जीवनाची दिशा योग्य आहे की नाही ते ठरवायचे आहे. लोकांनी पाठांतर करीत राहिले पाहिजे, असा अन्वयार्थ नसून ज्ञानमार्गावर आपण बुद्धीचा विकास न झाल्यामुळे दिशाहीन तर होणार नाही, हे पाहिले पाहिजे.

**************************************

२. बुद्धिमत्तेचे प्रकार

असे सांगतात की प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन याला तो ‘ढ’ आहे असे म्हणून शाळेतून काढून टाकले होते, आइन्स्टाइन याला त्याच्या कॉलेजातल्या कमी गुणांमुळे कुठे नोकरी मिळत नव्हती म्हणून त्याने कारकुनाची नोकरी धरली होती, रामानुजम याला मॅट्रिकची परीक्षा पास होणे अवघड झाले होते. हे सगळे अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी होते हे त्यांनी केलेल्या प्रचंड कार्यावरून जगाला दिसून आले. मला वॉट्सॅपवर मिळालेला या विषयावरील एक लेख खाली दिला आहे. अज्ञात मूळ लेखकाचे मनःपूर्वक आभार. दि. २२-०३-२०२२
. . . . .

प्रचलित शिक्षण व्यवस्थेमुळे कितीतरी लोक न्यूनगंडामध्ये गेले असतील. असे होऊ नये म्हणून आपल्या मुलांची ‘बुद्धिमत्ता’ ओळखा.

 "आमचं लेकरू हुशार आहे पण जरा अभ्यासात कमी आहे", अशा वाक्याला बरेच जण अजुनही हसतात.
  शाळेच्या अभ्यासात कमी आहे किंवा परीक्षेत फार मार्क्स मिळत नाहीत, तर ती व्यक्ती 'बुद्धीमान' नाही हा आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे.
 खरंतर गार्डनर (Howard Gardner) या मानसशास्त्रज्ञाने ही समजूत कशी ठार चूकीची आहे हे सांगितलंय.
त्याने बुद्धीमत्तेचे मुख्य आठ प्रकार पाडले. कुठल्याही व्यक्तीमध्ये या आठ प्रकारांपैकी एक किंवा अधिक बुद्धिमत्तांचं कमी-अधिक प्रमाण असतं, असं त्याचं त्याचं मत होतं.
1. Visual - Spatial Intelligence :- 
 या प्रकारामध्ये अचूक नकाशा बघणे, random भटकत असतानाही दिशांचा योग्य अंदाज येणे, फोटो-ग्राफ्स-तक्ते मधून अर्थ काढणे, कोडी सोडवणे, चित्र, patterns मध्ये गती असणं हे सगळं येतं. आर्किटेक्ट, इंजिनीयर, चित्रकार वगैरे यात येतात.
 1. Linguistic – Verbal Intelligence :-
  या प्रकारात भाषेवर प्रभुत्व, शब्दांवर पकड, भारी बोलता येणं किंवा मध्ये मध्ये शाब्दिक विनोद/कोट्या करता येणं हे सगळं येतं. यात शिक्षक, वकील, पत्रकार, काही राजकारणी वगैरे येतात.
 2. Logical – Mathematical Intelligence :-
  आपल्या शाळेत ज्या लोकांना “हुशार” समजतात, अशी मंडळी या प्रकारात येतात. गणित सोडवणं, abstract गोष्टींची लॉजिकल उत्तरं देणं हे सगळं येतं. वैज्ञानिक, गणितज्ज्ञ, इंजिनीयर, कॉम्प्युटर प्रोग्रामर वगैरे लोक यात येतात.
  1. Bodily – Kinesthetic Intelligence :-
   शरीराची वेगवान हालचाल करणं, शरीरावर प्रचंड कंट्रोल असणं, मेंदू आणि डोळ्यांत/इतर अवयवांत भन्नाट co-ordination असणं, हे सगळं या प्रकारात येतं. खेळाडू, डान्सर, शिल्पकार वगैरे लोक यात येतात.
  2. Musical Intelligence :-
   चाल, धून, ताल वगैरे लक्षात राहणं, वाद्यांबद्दल आवड असणं, लवकर नवीन गाणी किंवा विविध वाद्यं शिकता येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगीतिक बुद्धीमत्ता होय. गायक, संगीतकार, कंपोझर वगैरे मंडळी यात येतात.
  1. Interpersonal Intelligence :-
   लोकांशी संवाद साधता येणं, लोकांच्या भावना समजून घेता येणं, त्यानुसार स्वतःच्या वागण्यात बदल करून घेणं, मित्रमंडळी बनवता येणं, त्यांना जपणं, कुठे कसं वागावं हे समजणं, वाद सोडवणं हे सगळं यात येतं. मानसशास्त्रज्ञ, टीम लिडर, काऊन्सीलर, सेल्सपर्सन, राजकारणी माणसं वगैरे
  2. Intrapersonal Intelligence :-
   हे वरच्या प्रकारच्या उलट. हे स्वतःमध्ये हरवलेले असतात. यांना स्वतःच्या विश्वात दंग राहायला आवडतं. स्वतःचे strengths आणि weaknesses यांना माहिती असतात. नवनवीन कल्पना ते मांडतात (पण मोस्टली मनातल्या मनात ). विचारवंत, वैज्ञानिक, लेखक अशी माणसंं या प्रकारची बुद्धीमान असतात.
  3. Naturalistic Intelligence :-
   हा प्रकार त्याने जरा उशीरा मांडला. काही लोकांना निसर्ग आवडत असतो. पक्षी, जंगलं, समुद्र, डोंगर, जैवविविधता अशा सगळ्या गोष्टींचे ते चाहते असतात. शहरात फार मन लागत नाही, खेड्याकडे जाऊन मोकळ्या आभाळाखाली चांदण्यात झोपणं फार आवडत असतं. पर्यावरणतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी वगैरे सगळे लोक यात येतात. अशा प्रकारे आपली एक बुद्धीमत्ता ओळखली आणि त्यानुसार आपल्या जीवनाची दिशा ठरवली तर आनंदमय होईल सगळं भविष्य. एकापेक्षा जास्त बुद्धीमत्ता असल्यास उत्तमच, मग अशा वेळी भविष्याचा स्कोप अजुन मोठा होतो.
   आपल्या शालेय वयात ज्या बॅक बेंचर्सना आपण अभ्यासामुळे, कमी मार्क्स मुळे हलक्यात घेतो ते लोक कसले भारी खेळाडू, कलाकार असतात हे जरा आठवा. आपल्या एकूणच प्रचलित शिक्षणव्यवस्थेमुळे कितीतरी लोक depression, न्यूनगंडामध्ये गेले असतील हे सुद्धा आठवा.
   त्यामुळे इंटरनेट वर अलरेडी उपलब्ध असलेली ही माहिती सोप्या शब्दांत इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. वाचकांपैकी कोणाचा फायदा झाला तर मला आनंदच होईल

संगणकाचे बदलते तंत्रज्ञान

सुरुवातीच्या काळातला संगणक अजस्त्र आकाराचा असायचा आणि तो तितकेसे महान काम करत नसे. यामुळे मुंबईमध्ये फक्त टीआयएफआर, बीएआरसी, आय़आयटी अशा संशोधनक्षेत्रातल्या संस्थांकडे तो आला. पुढे आयुर्विमा आणि बँका यांनी त्यांचा वापर सुरू केला तेंव्हा त्याला खूप विरोध झाला होता, पण त्याने जगभरातल्या कामकाजात केलेली क्रांति लक्षात घेता त्याला दामटून पुढे आणले गेले. पीसीचा जन्म झाल्यानंतर तो घराघरात आला. संगणकाला माहिती पुरवणे आणि त्याने दिलेली माहिती गोळा करून तिला सांभाळून ठेवण्यासाठी फ्लॉपी, सीडी, डीव्हीडी यासारखी अधिकाधिक क्षमतेचा साधने निघाली आणि पाहतापाहता ती दिसेनाशीही झाली. याचा आतापर्यंतचा आढावा घेणारा हा सुरेख लेख. श्री.तुषार कुटे या मूळ लेखकाचे मनःपूर्वक आभार आणि त्यांनी या लेखाला इथे संग्रहित करायला अनुमति द्यावी अशी विनंति.

बदलते तंत्रज्ञान

तुषार कुटे – सफर विज्ञानविश्वाची
घर शिफ्ट करत असताना साफसफाईमध्ये घराच्या एका कोपऱ्यामध्ये घेऊन दिलेल्या सीडीचे आणि डीव्हीडीचे पाऊच आणि कंटेनर्स नजरेस पडले. सन २००२ ते २०१२ या दरम्यानच्या काळामध्ये मी जमवलेल्या या सीडी व डीव्हीडी होत्या. मागच्या दहा वर्षांमध्ये त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. परंतु त्यादिवशी या पाऊच आणि कंटेनरने भूतकाळ जागृत केला. माझ्या संग्रहामध्ये जवळपास ४०० सीडी व डीव्हीडी असतील. आज त्या मी ई-कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीकडे सुपूर्द केल्या.

संगणक वापरायला सुरुवात केली त्याच सुरुवातीच्या काळामध्ये माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी फ्लॉपी डिस्कचा आम्ही वापर करायचो. साडेतीन इंच आकार असणाऱ्या या फ्लॉपीमध्ये केवळ १.४४ एमबी पर्यंत माहिती साठवता यायची. याचे देखील आम्हाला अप्रूप वाटत असे. एका संगणकातून दुसऱ्या संगणकामध्ये माहिती कॉपी करण्यासाठी त्याचा आम्ही सहज वापर करायचो. परंतु १५ ते २० वेळा वापरल्यानंतर ही फ्लॉपी खराब व्हायला लागायची. त्यातील डेटा करप्ट व्हायचा आणि मग आम्ही नवीन फ्लॉपी विकत घ्यायचो. त्या काळात सायबर कॅफेमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी प्रति तास तीस रुपये मोजावे लागायचे. त्यामुळे एका तासामध्ये इंटरनेटवरून भराभर माहिती डाऊनलोड करून आम्ही फ्लॉपी डिस्कमध्ये साठवून घरच्या संगणकावर लोड करायचं.

फारच थोड्या कालावधीमध्ये फ्लॉपी ड्राईव्ह देखील कालबाह्य झाले. त्यांची जागा ‘सीडी’ने घेतली. बाजारामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ सीडी उपलब्ध झाल्या. संगणकाच्या सीडी ड्राईव्हद्वारे त्यातली माहिती वाचता यायची. तसेच कॉपी करता यायची. एका सीडीची माहिती साठवण्याची क्षमता ७०० एमबी इतकी होती! त्या काळात ती प्रचंड वाटायची. सीडी ड्राईव्हद्वारे सीडीमधील माहिती फक्त बघता येत होती. परंतु सीडीमध्ये माहिती साठवता येत नव्हती. खूपच कमी लोकांकडे त्यावेळी ‘सीडी राईटर’ उपलब्ध होता. सीडी राईटर असणारा संगणक म्हणजे उच्च प्रतीचा संगणक, असे आम्ही मानत असू. आपल्याला एखादी सीडी राईट करायची असेल तर ज्याच्याकडे सीडी राईटर आहे त्याच्या संगणकाचा वापर करून आम्ही नवीन सीडी बनवून घेत असू. कालांतराने जवळपास सर्वच संगणकांमध्ये सीडी रायटर देखील उपलब्ध झाले. त्यामुळे सीडीमध्ये माहिती साठवणे सोपे झाले होते. संगणकातील बरीचशी महत्त्वाची माहिती आम्ही सीडीमध्ये साठवायला लागलो.

पुढे मागे संगणकाची हार्ड डिस्क जर खराब झाली तर? हा प्रश्न आम्हाला सतावत असायचा. त्यामुळे बरीचशी महत्त्वाची माहिती सीडीमध्ये साठवली जायची. लवकरच या संगणकातील माहितीच्या पिढीमध्ये डीव्हीडी दाखल झाली. डीव्हीडीची क्षमता साडेचार जीबी इतकी प्रचंड होती! याच काळामध्ये री-राईटेबल सीडी आणि डबल साइडेड सीडी व डीव्हीडी देखील उपलब्ध झाल्या होत्या. तंत्रज्ञानाची ही प्रगती खरोखर अचंबित करणारी होती. संगणकीय माहितीचा साठा वाढत चाललेला होता. त्यामुळे अशा नवनवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची आवश्यकता तर होतीच.
डीव्हीडी रीडर बरोबरच राईटर देखील लवकरच बाजारात आले. मग आमचा डीव्हीडी रायटिंग चा उद्योग सुरू झाला. त्याकाळात इंटरनेटवर उपलब्ध होणारी महत्त्वाची माहिती तसेच चित्रपटातली गाणी व चित्रपट देखील डीव्हीडीमध्ये साठवून ठेवू लागलो.

अनेक संगणकीय नियतकालिकांसोबत देखील सीडी आणि डीव्हीडी उपलब्ध होत होत्या. त्यातली माहितीदेखील अमुल्य अशी होती. या सर्व सीडींचा माझ्याकडे बराच मोठा संग्रह तयार झाला. यातून त्या ठेवण्यासाठी नवीन पाऊच आणि कंटेनर देखील मी विकत घेतले होते. कधी कोणती माहिती लागत असेल तर लगेच ती सीडी अथवा डीव्हीडी काढून संगणकामध्ये उघडली जायची. अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

परंतु दहा वर्षांपूर्वी पेन ड्राईव्ह नावाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संगणक विश्वात प्रवेश केला. माहिती साठवण्यासाठी तसेच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हे अतिशय सुलभ तंत्रज्ञान होते. मी पाहिलेला पहिला पेन ड्राईव्ह १२८ एमबी क्षमतेचा होता! कालांतराने त्याची क्षमता वेगाने दुप्पट होत गेली. आज आपल्याकडे टीबी अर्थात टेराबाईटमध्ये देखील पेन ड्राईव्ह उपलब्ध आहेत. पेन ड्राइवचा जमाना आल्यानंतर सीडी आणि डीव्हीडीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. याशिवाय इंटरनेट अन वेबसाईटस देखील वेगाने वाढत होत्या. त्यामुळे कोणतीही गोष्ट लागत असेल तेव्हाच इंटरनेटवरून डाऊनलोड करायला लागलो. अर्थात माहिती साठवून ठेवण्याची आवश्यकता तर नव्हती.

काळाच्या ओघामध्ये सीडी आणि डीव्हीडी ड्राइव्ह देखील आता लॅपटॉप व संगणकामध्ये उपलब्ध होत नाहीत. परंतु संगणकीय माहितीचा साठा करण्यासाठी या तंत्रज्ञानाने संगणकाच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले होते. आज माझ्याकडे असलेल्या सर्व सीडीज व डीव्हीडीची एकूण क्षमता ही एका पोर्टेबल हार्ड डिस्क इतकी आहे! यांना तंत्रज्ञानाची किमयाच म्हणावी लागेल. इंटेलचे संस्थापक गॉर्डन मूर यांनी संगणक विश्वाला मूरचा नियम सांगितला आहे. जरी तो संगणकातील मायक्रोप्रोसेसरला वापरण्यात येत असला तरी संगणकीय माहितीसाठ्याला देखील तो निश्चित लागू होतो. आज आपण वापरत असलेल्या हार्ड डिस्क देखील कालांतराने कालबाह्य होतील आणि नवे तंत्रज्ञान त्याची जागा घेईल. ही काळाची गरज आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान हे इतिहासात तितकेच महत्त्वाचे होते, हे विसरून चालणार नाही!

. . . .

काही माहितीपूर्ण प्रतिसाद :

Ramesh Rahalkar
मी पहिला संगणक बघितला तेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो, १९७८ सालाची गोष्ट आहे. Commodore Pet. Memory – १००० bytes. त्या काळी floppy disks नव्हत्या. Screen, keyboard व tape recorder एकत्र fuse केलेले ते unit होते. तेव्हा अर्थातच DOS सुद्धा नव्हती. फक्त Basic मध्ये काही लहान, सोपे programs लिहिता येत होते (१००० bytes मध्ये किती लिहिणार?). माझ्या प्रोफेसरकडे तो होता, व बघून मी खूपच impress झालो होतो.

Mangesh Anāokar
ऐंशीच्या दशकांत सुरुवातीला आम्ही चक्क ८ १/२ इंची फ्लाॅपी वापरत होतो. त्याच सुमारास स्मगल्ड पीसींची भारतात एण्ट्री झाली, ज्यामध्ये ५ १/४ इंची फ्लाॅपी असायची. ड्राइव्हसुद्धा एकच होता आणि असा पीसी चालायचा डाॅस २.० वापरुन. एकच ड्राइव्ह असल्याने त्याला ‘A’ ड्राइव्ह संबोधिले जायचे.
प्रथम उतलब्ध असलेल्या फ्लाॅपी या SSSD (Single Side Single Density) प्रकारच्या आणि २५६ KB साईजच्या होत्या. मग प्रथम SSDD प्रकारच्या ५१२ KB च्या व नंतर DSDD (Double Side Double Density) प्रकारच्या १.२० MB च्या फ्लाॅपी व ड्राइव्ह आलेत.
तो पर्यंत पीसीचा प्रथम PC-XT हा दोन ड्राइव्हचा पीसी, A आणि B ड्राइव्ह सोबत आला. त्यामुळे आता ‘बॅकअप’ घेणे साध्य होउ लागले.
लगोलग PC-AT हा दोन ५ १/४ इंच फ्लाॅपी ड्राइव्ह सोबत १० MB आकाराच्या ‘राक्षसी’ आकाराचा हार्ड ड्राइव्ह ‘C’ ड्राइव्ह म्हणुन आला.
इथुन पुढे प्रगती झपाट्याने झाली. पहिला पीसी इण्टेल ८०८० वापरुन IBM ने अमेरीकन बाजारात उतरविलेला होता. पण १९८५ पर्यंत इंटेलचे ८०८१, ८०८२, ८०८३, ८०८४, ८०८५ वापरुन बनल्या गेलेल्या संगणका नंतर ८०८६ वापरुन बनलेला संगणक ‘३८६’ म्हणुन बाजारात आला तो पर्यंत डाॅस ३.० सुद्धा आलेली होती.
१९९० नंतर डाॅस ४.० आली. मायक्रोसाॅफ्टची अधिकृत काॅपी सुद्धा ५ १/४ इंची फ्लाॅपीवरच उपलब्ध होती.
या सुमारास ३ १/२ इंच आकाराची १.४४ MB ची फ्लाॅपी व ड्राइव्ह वापरात आले. या फ्लापींना कडक आवरण होते, जे ५ १/४ इंच फ्लाॅपींना नसायचे.
IBM ने नव्वदच्या सुमारास ‘पेण्टीयम’ आणला, ज्यामध्ये CD ड्राइव्ह वापरला होता. सहाजिकपणे अधिकृत आॅपरेटींग सिस्टम CD वरच उपलब्ध होती.
ज्यांना संगणकांच्या इतिहासात उत्सुकता आहे, त्यांनी ‘Osborne’ लिखीत पुस्तके वाचावीत. नांव लक्षांत नाही, पण पहिला खंड ‘Part Zero’ पासुन सुरु होतो.

पहिला मायक्रो प्रोसेसर ४०४० कां व कसा घडला इथपासुन पुढील कांही काळांत कसे बदल घडत गेलेत, याची माहिती त्यांत वाचायला मिळेल.

आनंद घारे : हा लेख आणि त्यावरील कॉमेंट्स वाचून तीनचार दशकांमधला प्रवास डोळ्यांसमोर आला. पीसी हा शब्दसुद्धा ऐकला नव्हता तेंव्हा माझ्या एका मित्राने टीव्हीचा मॉनिटर आणि टेप रेकॉर्डर यांचा उपयोग करून घरी एक खेळातला कॉम्प्यूटर तयार केला होता. काही ऑफिसेसमधल्या कॉंप्यूटर्ससाठी पंच्ड कार्ड्स वापरत असत. मग पीसी, पीसीएक्सटी वगैरे आले. ते डॉसवर चालायचे. तिथपासून बघता बघता आता किती प्रगति झाली आहे ?

अत्याधुनिक दुर्बिण

जगातली सर्वात मोठी, सर्वात महागडी आणि अत्याधुनिक अशी दुर्बिण तयार करून ती अंतराळात पाठवून दिली आहे. पृथ्वीपासून चंद्र जितक्या अंतरावरून फिरत असतो त्याच्याही तीन चार पट पलीकडे एका जागेवर या दुर्बिणीला ठेवले जाईल आणि ती पृथ्वीच्या बरोबरच सूर्याची प्रदक्षिणा करत राहील, पण ती अवकाशातील दूर दूर असलेल्या ताऱ्यांचे निरीक्षण करून सगळी माहिती पृथ्वीवर राहणाऱ्या शास्त्रज्ञांना पुरवेल. या अगडबंब दुर्बिणीचे नाव आहे वेब स्पेस टेलिस्कोप. श्री बाळासाहेब पाटोळे यांनी या अद्भुत दुर्बिणीची सविस्तर माहिती या अभ्यासपूर्ण लेखात दिली आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार.

हबल अल्ट्रा डीप फिल्ड या आगळ्यावेगळ्या फोटोवर श्री.विनीत वर्तक यांचा लेखही खाली दिला आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार.

. . . . . . . . . . . . . . .

सफर विज्ञानविश्वाची : 75000 करोडचे टाईम मशीन ⏳ . . . . म्हणजेच

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप JWST 💸


लेखन : बापा – बाळासाहेब पाटोळे 📝

अंतरीक्ष…. हा अगदी लहानपणापासूनच माझा आणि आपल्या सर्वांचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय.
माझ्या बाबतीत म्हणाल तर मी वयोमानाने जसजसा मोठा होत गेलो तसं अंतरीक्ष आणि खगोल माहिती वाचणे, त्यासंबंधी डॉक्युमेंटरी बघणे हे जणू व्यसनच होत गेले. आजही माझ्याकडे अश्या डॉक्युमेंटरी चे जवळपास 50 GB चे कलेक्शन आहे आणि ते सर्व मी पाहून संपवले आहे, आणि अजूनही नवनवीन माहिती साठी शोध चालूच असतो. असो…. माझ्याविषयी बोलण्यापेक्षा आपण मूळ मुद्द्यावर येऊ.
या अनंत अश्या अंतराळात काय आणि किती गोष्टी/वस्तू सामावल्या आहेत हे अजून ही शेकडो वर्षे अभ्यास करून मानवजातीला पूर्णतः माहीत होईल याबद्दल नेमकी खात्री देता येणार नाही इतका अफाट पसारा या अनंत विश्वात विसावलेला / पसरलेला आहे.
मानव अगदी अनादी काळापासून खगोल अभ्यास करत आलाय आणि कालपरत्वे तो अभ्यास एका वेगळ्या उंचीवर गेला तो म्हणजे गॅलिलिओ गॅलिली या शशोधकाने लावलेल्या दुर्बीण च्या शोधामुळे. त्यानंतर आजतागायत लहान मोठ्या आणि विविध प्रकारच्या हजारो दुर्बिणी (टेलिस्कोप) आजही अहोरात्र आकाशाकडे टक लावून आहेत आणि दिवसागणिक नवनविन खगोलीय माहिती गोळा करत आहे.
दुर्बिणी वापरात आल्यानंतर अनेक खगोल संशोधक वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी लावून अंतिरक्ष पिंजून काढू लागले पण त्यांना कांही अडचण जाणवू लागल्या आणि त्यापैकी कांही म्हणजे “प्रथ्वीवरील वातावरणा तील धूलिकण” आणि “नैसर्गिक व मानवनिर्मित उजेड” या दोन गोष्टी आकाशातून दुर्बिणीत येणाऱ्या प्रकाशाला अडथळा ठरू लागल्या. त्यामुळे दुर्बिणीतून नेमकी प्रतिमा मिळणे अवघड होऊ लागले.
याचे उत्तर शोधले खालील पध्दतीने:
अनेक महाकाय दुर्बिणी मानवाने निर्मित केल्या आणि त्या पृथ्वीवर असणाऱ्या उंचच उंच अश्या पर्वतावर नेऊन ठेवल्या जिथं कोणताही मानव निर्मित प्रकाश अडथळा करणार नाही आणि पर्वताच्या उंचीमुळे तेथील वातावरण ही अगदीच तुरळक असे असेल. त्यामुळे वातावरणातील धूलिकण प्रतिमेला बिघडवू शकणार नाहीत.
यामुळे निरीक्षण करणे अगदीच सोपे आणि विना अडथळा होऊ लागले.
पण यालाही कांही मर्यादा येऊ लागल्या आणि यातही एक अडचण होऊ लागली. ती अडचण कोणती???
💿💿💿💿💿💿💿💿💿💿💿💿💿
चला पहिला एक उदाहरण घेऊ…
जुन्या काळातील फोनोग्रामची जी एलपी डिस्क असते ती एकदा डोळ्यासमोर आणा, आता त्या डिस्क वर ज्या वर्तुळाकार खाची आहेत त्या लक्षात घ्या. त्या खरेतर वर्तुळाकार जरी असल्या तरी त्या सर्पिलाकार असतात, म्हणजेच त्या खाचा डिस्क च्या मध्यातून सुरू होतात आणि डिस्क फिरेल तसे त्या खचित अडकणारी सुई बाहेरून फिरत फिरत त्या डिस्क च्या केंद्रापर्यंत आपोआप सरकत पोचते.
अगदी तंतोतंत असाच आकार आपल्या मिलकीवे गॅलक्सी (मंदाकिनी आकाशगंगा) ची आहे, याच आकाशगंगेत आपली सूर्यमाला आहे आणि याच सुर्य मालेत आपली पृथ्वी आणि इतर ग्रह आहेत. मजेची गोष्ट म्हणजे आपल्या सुर्यासारखे करोडो इतर सूर्य आणि त्यांच्या ग्रह मालिकाही आपल्या याच मंदाकिनी आकाशगंगेत आहेत.
आता वरती जी मी दुर्बिणीतून निरीक्षणात होणारी अडचण सांगत होतो ती अशी की, आपल्या सुर्यमालेच्या चारी बाजूस अनेक इतर सूर्यमाला विखुरलेल्या आहेत आणि या आपल्याला इथं पृथ्वीवर बसून दिसणे शक्य होत नव्हते. का?? तर त्याचे कारण म्हणजे वरील जसे मी फोनोग्राफ च्या एलपी डिस्क च्या खाचेबद्दल सांगत होतो ते पुन्हा डोळ्यासमोर आणा,
आता समजा….. ती डिस्क म्हणजे आपली मंदाकिनी आकाशगंगा. त्यावर असणाऱ्या सर्पिलाकार खाचा म्हणजे अनेक सूर्यमालाच्या ओळी, आणि त्या खाचेतील एक एक बारीक खड्डा म्हणजे एक एक सूर्यमाला. आता त्या खड्ड्यात बसून (म्हणजेच एक सुर्यमालेच्या एखाद्या ग्रहावर बसून) आपल्याला त्या एलपी डिस्क च्या पलीकडील खाचेत किंवा डिस्कच्या मध्यावर काय आहे? किंवा त्या डिस्कच्या पलीकडे काय आहे? हे त्या एका खाचेच्या खड्ड्यात राहून दिसणे कसे शक्य होईल???
आणि नेमकं हीच अडचण आपल्याला पृथ्वीवर तैनात केलेल्या कोणत्याही दुर्बिणीतून बघताना होत असते.
यासाठी त्या खड्ड्यातून बाहेर पडून खूप वरती उंचीवर जावे लागेल जेणेकरून डिस्क चे केंद्र आणि डिस्कच्या पलीकडे ही आपली नजर पोचू शकेल.
यावर उपाय ही एक तोडगा 20व्या शतकाच्या 90व्या दशकात शोधला गेला तो म्हणजे . …….
हबल टेलिस्कोप च्या माध्यमातून.
🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️

हबल_टेलिस्कोप 🛰️🚀

ही टेलिस्कोप 24 एप्रिल 1990 रोजी अंतराळात स्थापन करण्यात आली.
⭕️ #हबलचीठळकवैशिष्ट्ये:
🏮१. त्याकाळची किंमत 2600 करोड रुपये
🏮२.पृथ्वीपासून अंतर 545 किलोमीटर
🏮३. वेग 28000 किलोमीटर / प्रतितास
🏮४. प्रत्येक 97 मिनिटांत एक पृथ्वी प्रदक्षिणा
🏮५. मूळ आरसा 2.4 मीटर (जवळपास 7 फूट)
🏮६. वजन 12200 किलो
🏮७. तापमान 20 डिगरी सेल्सिअस
🏮८. 90 दशकातील कॅमेरा, इन्फ्रा रेड कॅमेरा
ही दुर्बीण पृथ्वीच्या वातावरणाच्या ही कितीतरी वर उंचीवर असल्याने त्यामध्ये वातावरण अथवा मानवनिर्मित प्रकाश यांचा अडथळा तर नाहीच याउपर म्हणजे दुर्बीण अजून उंचीवर गेल्याने आपल्या सुर्यमालेच्या बाहेर डोकावणे ही शक्य झाले. मागील 30 वर्षाच्या कारकिर्दीत या दुर्बिणीने अनेक अजब असे शोध लावले आहेत आणि अजूनही पुढील 10 वर्षे तिचे कार्य चालूच असणार आहे.
पण….. हबल दुर्बीण बनवली गेली तेंव्हा ती पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करताना अचानक कांही अडचण झाली आणि त्याच्या प्रतिमा ठीक येईना झाल्या होत्या तेंव्हा त्याकाळच्या अंतराळवीरांनी स्पेस वॉक करत जरुरी असणारे बदल व दुरुस्ती करत ही दुर्बीण यशस्वीपणे अपेक्षित अश्या पद्धतीत कार्यरत केली आणि वेळोवेळी आवश्यक ते तांत्रिक बदल करत हबल ला आजही कार्यरत ठेवले आहे.
जेंव्हा पासून यांत्रिक प्रगती चालू झाली त्यानंतर सतत हि प्रगती चालूच आहे. सुदैवाने गेल्या दोन दशकांत मात्र ही प्रगती अतिजलद गतीने होत आहे.
आज आपण खरेदी केलेला अद्ययावत असा मोबाईल अगदी 6 महिन्याच्या आत मागासलेला वाटू लागतो इतका वेग आजच्या तंत्रज्ञानाने घेतला आहे.
ही गोष्ट अगदी सामान्य अश्या मोबाईल बाबत घडते मग विचार करा संशोधन क्षेत्रातील यंत्रसामुग्री मध्ये किती वेगवान आणि थक्क करणारे बदल होत असावेत.
आणि म्हणूनच 1990 साली प्रस्थापित झालेली हबल दुर्बीण 1996 सालीच या संशोधकांना मागासलेली वाटू लागली आणि या संशोधकांनी पुढील अद्ययावत अशी दुर्बीण बनवण्याचा घाट 1996 साली घातला.
युरोपियन स्पेश एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी व नासा तसेच अन्य 9 देशांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याने ही मोहीम सुरू केली.
⛔️ #जेम्सवेबअंतराळदुर्बीण 💸 ही दुर्बीण जरी 1996 साली बनवण्यास चालू झाली तरी मधील काळात अनेक तांत्रिक, राजकीय, आर्थिक समीकरणे बदलत गेली आणि त्यामुळे जवळपास अडीज दशके म्हणजेच 25 वर्षाचा काळ हे स्वप्न सत्यात उतरण्यास लागला. या विलंबामुळे त्याचे निर्मीती मूल्य कितीतरी पटीने वाढले पण एक गोष्ट चांगली झाली आणि ती म्हणजे आज आता उपलब्ध असणारे तंत्रज्ञान यात समाविष्ट करण्याची संधी संशोधकांना मिळाली ज्याचा सदुपयोग त्यांनी अगदी बिनधास्तपणे केला. हबलची पुढील वारसदार असणारी ही दुर्बीण, पण या दोघीत कांहीही समानता नाहीय. दोन्ही दुर्बीणी मधील ठराविक फरक कळण्यासाठी सोबतचा फोटो अवश्य बघा. जेम्स वेब दुर्बीणीची टेक्नॉलॉजी आणि त्याची स्थापन कक्षा या हबल पेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत.

⭕️ #जेम्सवेबदुर्बीणठळक_वैशिष्ठ्ये खालीलप्रमाणे:
🏮१. हबल पेक्षा तीन पट मोठा आरसा (मिरर) 6.5 मीटर
🏮२. या दुर्बिणीची मापं, 69.5 मीटर लांबी आणि 46.5 मीटर रुंदी. याच्या सन शिल्ड ची मापे टेनिस कोर्ट एवढी आहेत.
🏮३. एकूण वजन 6200 किलोग्रॅम
🏮४. आजची किंमत 75000 करोड (भारतीय चलन मूल्य)
🏮५. प्रथ्वीपासून परिक्रमा कक्षा 15 लाख किलोमीटर.
🏮६. अंदाजे कार्यकाळ (अपेक्षित) 10 वर्षे
🏮७. तापमान (वजा) -223 डिगरी सेल्सिअस.

जेम्सवेब दुर्बीण कुठं असेल !!! ❓❓❓

आता इतक्या मोठ्या दुर्बिणीला पृथ्वीपासून इतक्या दूरवर का बरं स्थापित करण्यात येत आहे?? आणि नेमकं 15 लाख किलोमीटर हेच अंतर का ठेवलंय ?? चला याची माहिती घेऊ…
सूर्य, चंद्र, प्रुथ्वी आणि जवळपास सर्व ग्रह तारे यांची प्रत्येकाची स्वतःची एक गुरुत्वाकर्षण क्षमता / ताकद असते, आणि ही क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी व वेगवेगळ्या अंतरापर्यंत कार्यरत असते.
आपल्या पृथ्वीचा एकमेवाद्वितीय असा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र. हा चंद्र पृथ्वीपासून 3,84,500 किलोमीटर या अंतरावरून पृथ्वीची प्रदक्षिणा करत असतो. याला कारणीभूत आपल्या पृथ्वीची आणि चंद्राची स्वतःची गुरुत्वाकर्षण ताकद हीच आहे.
सूर्य मात्र आपल्या पृथ्वीपासून 14.84 करोड किलोमीटर इतक्या अंतरावर असूनही सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपली पृथ्वी सूर्याची परिक्रमा करत असते.
आपली पृथ्वी आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण क्षमता जरी वेगवेगळ्या असल्या तरी यांच्या फिरण्याच्या जागा गृहीत धरता आतापर्यत शशोधकांनी अंतराळात अश्या पाच जागा शोधून काढलेल्या आहेत की जिथं सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या एकमेकांवर होणाऱ्या परिणामाने त्या विशिष्ट अंतराळ स्थळांवर प्रभावित गुरुत्वाकर्षण हे शून्य होऊन जाते. अंतराळातील अश्या पाच जागांना L1, L2, L 3, L 4 आणि L5 अशी नावं दिली गेली आहेत, त्यापैकीच एक जागा L2 ही पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे आणि या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे इथं पृथ्वी किंवा चंद्र यांची सावली ही पोचत नाही, त्यामुळे दुर्बिणी ला कांही अडथळा होण्याची शक्यता येत नाही. तसेच इतक्या अंतरामुळे सूर्याचे तापमान या दुर्बीणीच्या उपकरणांवर ही परिणाम करू शकणार नाही.
पण तरीही सूर्याकडिल असणाऱ्या दुर्बिणीच्या बाजूचे तापमान 100 डिगरी सेल्सिअस आणि सूर्याच्या विरुद्ध बाजूचे तापमान हे शून्याच्या खाली म्हणजेच ऋण 270 डिगरी सेल्सिअस इतकं खाली असणार आहे.
सूर्याच्या या तापमानापासून वाचण्यासाठी या दुर्बिणी ला सन शिल्ड बसवण्यात आले आहे जे टेनिस कोर्ट इतक्या प्रचंड आकाराचे आहे आणि याच मुळे दुर्बिणीचे तापमान हे ऋण 230 ते 270 डिगरी सेल्सिअस इतके कायमस्वरूपी राखले जाईल आणि हेच तापमान गृहीत धरून दुर्बिणीतील सर्व उपकरणे विकसित केली गेली आहेत.
पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर हे अंतर कायम ठेवत ही दुर्बीण ही पृथ्वीसोबत सूर्याची वार्षिक परिक्रमा करत राहील. आणि आपले काम चोख बजावत मिळालेली माहिती आपल्या पर्यंत पोचवत राहील.


⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️⛔️

जेम्सवेबदुर्बिणीचीठळक आणिआश्चर्यकारक वैशिष्ठ्ये खालील प्रमाणे*:

🏮१. मूळ आरसा हा 21 फूट आकाराचा आहे, पण तो एकसंध नसून एकूण 18 षटकोनी आकाराच्या लहान लहान आरश्यानी मिळून बनलेला आहे.
🏮२. या अठरा षटकोनी आकाराच्या प्रत्येकी 4.3 फूट असणारे आरसे हे बेरेलीयम या धातूपासून बनवले आहेत आणि या प्रत्येक आरशावर वर 48 ग्राम सोन्याचा थर ही लावला आहे. सोने हा युनिक धातू असल्याने अंतराळातील कोणत्याही गॅस अथवा रासायनिक सामुग्रीचा वाईट परिणाम या आरशांवर होणार नाही.
🏮३. हे 18 आरसे पुन्हा एकत्र येऊन एकसंध असा 21 फुटाचा आरसा तयार होण्यासाठी एकूण 126 छोट्या मोटर यात बसवण्यात आल्या आहेत. दुर्बीण इच्छित स्थळी पोचल्यावर हे सर्व आरसे आपली निर्धारित हालचाल करून 21 फूट आरसा तयार करतील.
🏮४. या दुर्बिणीचा मेंदू म्हणजे ISIM Integrated Science Instrumentation Module (संयुक्तिक वैज्ञानिक उपकरन नियामक भाग). या व्यतिरिक्त Spacecraft Bus (अंतराळायन वाहन) ही व्यवस्था ही आहे, याची जबाबदारी म्हणजे या दुर्बिणीला सुनिश्चित स्थळी पोचवणे, पोचल्यानंतर दुर्बीण व्यवस्थितपणे उघडून त्यांची कार्यप्रणाली चालू करणे, माहिती (प्रतिमा) गोळा करणे, मिळलेल्या माहितीचे पृथक्करण करणे, आणि ही माहिती पृथ्वीवर पाठवणे.
☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️☢️

जेम्सवेबदुर्बीणीलाप्रामुख्याने खालील जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत*:

⚠️१. बिग बँग नंतर च्या पहिल्या कांही शेकडो हजारो वर्षांनंतर उत्पन्न झालेल्या किरणांचा अभ्यास करणे
⚠️२. त्यानंतर प्रथमच तयार झालेल्या कांही आकाशगंगा यांचे निरीक्षण करणे
⚠️३. अगदी दूरस्थ तसेच आपल्या व इतर आकाशगंगेत असणाऱ्या ग्रह ताऱ्यांचे विस्तृत निरीक्षण करणे.
⚠️४. डार्क मॅटर (दैवी ताकद वस्तुमान) याचा शोध घेणे
⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️
आता येऊ मूळ मुद्द्याकडे…..

टाईम_मशीन 🚀

वेळेच्या मागे पुढे जाऊन डोकावणे याला टाईम ट्रॅव्हल म्हणतात पण हे खरंच शक्य आहे?
जेम्स वेब ही दुर्बीण 1350 करोड वर्षांपूर्वी घडलेला बिग बँग (महाविस्फोट) कसा काय बघणार??
त्यानंतर लगेच बनलेल्या आकाशगंगा कशा काय तपासणार???
हीच तर खरी गंमत आहे….या गमतीशीर कारणासाठीच तर हा लेख माझ्या हातून सुटला आहे.
प्रकाश (लाईट) ही या साऱ्या अफाट अश्या अंतराळातील एकमेव गोष्ट आहे जी कधी बदलत नाही की आपल्या गती मध्ये बदल करत नाही. प्रकाशाची गती ही नेहमीच स्थिर आणि अबाधित राहिली आहे आणि गंमत म्हणजे ही एक प्रकाशाची गती आजतागायत कोणीही गाठू शकले नाही.
प्रकाशाची गती नेमकी असते तरी किती??
2,99,793 (दोन लाख नव्व्यानव हजार सात शे त्र्यानव) किलोमीटर प्रति सेकंद इतका भयानक वेग हा लाईटचा असतो.
(म्हणजेच जवळपास 3 लाख किलोमीटर प्रतिसेकंद).
आता याला 60 ने गुणले की येणारे उत्तर म्हणजे 180 लाख किलोमीटर हे अंतर एक मिनिटात प्रकाश पार करतो असा त्याचा अर्थ आहे.
आता 180 लाख किलोमीटर हे अंतर जर दर मिनिटाला पार होत असेल तर मग प्रतितास , प्रतिदिन आणि प्रतिमहिना किती अंतर पार होत असावे?.
आता 180,00,000 ला 60x24x365 गुणा, याचे जे उत्तर येईल तो आकडा म्हणजेच प्रकाश पृथ्वीवरील एका वर्षात जे अंतर पार करेल ते किलोमीटर असेल. आणि याच अंतराला #एकप्रकाशवर्ष म्हटले जाते.
आपले ब्रह्मांड इतके अफाट पसरलेले आहे की त्याचे अंतर आपल्या पृथ्वीवरील किलोमीटर किंवा मैल या परिमानाने मोजणे अशक्यप्राय आहे म्हणूनच अंतराळातील अंतर हे प्रकाश वर्षात मोजले जाते.
आता एक प्रकाश वर्ष म्हणजे 300000x60x60x24x365 किलोमीटर अंतर हे एव्हाना आपल्या लक्षात आलेले आहेच.
आता यापुढील आणखी एक गंमत पाहू………
#टाईमट्रॅव्हल……
⏳🚀
आपला सूर्य आपल्या पासून 14.84 करोड किलोमीटर इतक्या अंतरावर आहे, सुदैवाने हे अंतर जरी करोडो किलोमीटर असले तरी एक प्रकाश वर्षाच्या अगदीच एका क्षुल्लक भागाइतकेच आहे.
सूर्यापासून निघणारा सूर्यप्रकाश आपल्या पर्यंत म्हणजेच पृथ्वीवर पोचण्यास 8 मिनिटे आणि 27 सेकंद इतका वेळ लागतो. याचा दुसरा अर्थ काय?
याचा सरळ सरळ अर्थ हाच आहे की आपण जेव्हा केंव्हा सूर्याकडे पाहतो तेंव्हा आपल्याला सूर्य हा 8 मिनिटे 27 सेकंदापूर्वी जसा होता तसाच दिसत असतो आणि आताचा सूर्य आपल्याला आतानंतर 8 मिनिटं आणि 27 सेकंदानंतर दिसणार असतो.
आता खरी गंमत ही की आपण या प्रकाश वेग आणि अफाट अंतराच्या खेळामुळे विनासायास 8 मिनिटं आणि 27 सेकंदाचा टाईम ट्रॅव्हल करून भूत काळातील सूर्य पाहत असतो.
याचा आणखी एक वेगळा अर्थ म्हणजे आपल्याला पृथ्वीवर राहून कधीही ताजा ताजा सूर्य पाहता येतच नाही.
मला वाटतंय आपल्याला आता प्रकाश वेग, प्रकाशवर्षं आणि टाईम ट्रॅव्हल ह्या संज्ञा आता समजून गेल्या असतील.
याच अनुषंगाने आपण अंतराळातील जे कांही बघत असतो ते म्हणजे त्या वस्तू/ग्रह/ताऱ्यापासून परावर्तित अथवा प्रसारित झालेला प्रकाश हा असतो, आता ती वस्तू किती प्रकाशवर्षं दूर आहे यावर आपल्याला दिसणारा प्रकाश किती प्रकाश वर्ष पूर्वीचा आहे हे अवलंबून असते.
म्हणजेच आपण अंतराळातील जे कांही पाहत असतो ते वर्तमान काळातील कधीच नसते तर ते भूतकाळातीलच असते.
आता याच शास्त्रीय आणि मूलभूत आधारावर आपण जेम्स वेब या दुर्बिणीतुन भूतकाळातील घडलेल्या घटना पाहणार आहोत.हबल ने ही त्याच्या कुवतीनुसार शकय तिथं पर्यंत अश्या अनेक आकाशगंगा आणि ग्रह तारे यांची अंतरे आणि अंदाजे त्यांचा जन्मकाळ वर्तविला आहे.
जेम्स वेब ही दुर्बीण हबल दुर्बिणीपेक्षा 10 पट अधिक सक्षम आणि ताकदवान आहे. आणि याचमुळे या जेम्स वेब दुर्बीणीला ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली त्यावेळचा प्रकाश जो अंदाजे 1350 करोड प्रकाशवर्षं दूर असणार आहे त्याला शोधून त्याचे निरीक्षण करायचे आहे आणि तो सापडला की आपसूकच महाविस्फोट आणि त्यांनतर उत्पन्न झालेल्या आकाशगंगा यांची कांही ना कांही माहिती ही मिळणारच. आणि म्हणूनच या दुर्बिणीला भूतकाळ दर्शवणारी, टाईम ट्रॅव्हल करणारी दुर्बीण म्हटलं जातं आहे.
जेम्स वेब अंतराळ दुर्बीण ही 25 डिसेंबर 2021 रोजी अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली आहे आणि जवळपास 30 दिवसांच्या प्रवासानंतर ती नियोजित स्थळी म्हणजेच L2 पॉईंट वर पृथ्वीपासून 15,00,000 किलोमीटर अंतरावर प्रस्थापित होईल. आता सध्या जवळपास 13 लाख किलोमीटर अंतर पार झाले आहे, या दरम्यान प्रवास चालू असताना दुर्बीण आपली ठराविक उपकरणे उघडून सेट करत आहे आणि उर्वरित उपकरणे निर्धारित स्थळी पोचल्यानंतर उघडून कार्यान्वित होतील.
पण लगेच आपल्याला माहिती पोचवली जाणार नाहिय, पाहिले 5 ते 6 महिने आपल्याच मंदाकिनी आकाशगंगा (मिलकी वे गॅलक्षी) चे निरीक्षण ही दुर्बीण करत राहील आणि सर्व उपकरणे यानुसार सेट केली जातील आणि हीच माहिती मूलभूत माहिती म्हणून स्टोअर केली जाईल आणि मग आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून येणारी माहिती गोळा केली जाईल व त्याचा अभ्यास मूलभूत माहितीशी तुलनात्मक रीतीने तपासली जाऊन आपल्याकडे माहिती प्रसारित केली जाईल.
जेम्स वेब दुर्बिणीत चार प्रकारचे इन्फ्रा रेड पद्धतीचे सेन्सर बसवले गेले आहेत ते अगदी लाखो, करोडो प्रकाश वर्षे दूर असणारा अंधुक प्रकाश ही टिपण्याची क्षमता बाळगून आहेत. हबल मध्येही अश्या इन्फ्रा रेड दुर्बीण आहेत पण त्यांची क्षमता इतकी अफाट नक्कीच नाही.
या अश्या अजीब आणि विस्मयकारक कारणांमुळे ही दुर्बीण अतिशय वेगळी आणि खगोलीय अभ्यासाला एक वेगळं वळण देणारी जादुई कांडी ठरणार आहे.
आता उत्सुकता आहे ती कधी या दुर्बिणी पासून अपेक्षित अशी माहिती यायला चालू होईल याची.
(वरील सर्व माहिती वेगवेगळ्या वेब साईटवरून, यु ट्यूब विडिओ मधून आणि माझ्याकडिल उपलब्ध असणाऱ्या डॉक्युमेंटरी मधून संग्रहित केली आहे, माहिती मध्ये कांही शंका अथवा बदल आवश्यक असल्यास मला मेसेंजर वर कळवा, योग्य माहिती नक्कीच यात समाविष्ट केली जाईल किंवा आवश्यक ते बदल केले जातील. सोबतचे फोटो हे गुगल वरून व नासा च्या पेज वरून साभार घेतले आहेत)
एक अंतराळवेडा
बापा – बाळासाहेब पाटोळे
इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर
टोकियो, जपान.

सफर विज्ञानविश्वाची ( Safar Vidnyanvishwachi ) या फेसबुकवरील ग्रुपवरून साभार दि.२२-०१-२०२२

*********************

हबल अल्ट्रा डीप फिल्ड

… विनीत वर्तक
सुमारे ४०० वर्षापूर्वी मानवाने आकाशाकडे दुर्बिणी मधून बघायला सुरवात केली. त्याआधी जे काही आपण बघत होतो ते उघड्या डोळ्यांनी.. आकाशात घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींची नोंद करत मानव पुढे जात होता. त्याच्या ह्या बघण्याला खूप मर्यादा होत्या. त्यामुळे आकाशाची खरी ओळख व्हायला माणसाला १६१० हे साल उजाडावं लागलं. ह्याच वर्षी गॅलिलिओने आकाशाकडे दुर्बिणीतून बघितलं. त्याला जे काही त्या दुर्बिणीतून दिसलं, त्याने मानवाला एक नवीन दृष्टी आकाशाकडे बघण्याची मिळाली.ह्या दृष्टीतूनच पुढे अनेक शोध लागले.
अवकाश दुर्बिणीच्या कल्पनेवर काम सुरु व्हायला १९७० साल उजाडलं. नासा, युरेपियन स्पेस एजन्सी आणि स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट ह्यांनी एकत्र येऊन ह्या प्रोजेक्ट वर काम सुरु केलं. ख्यातनाम अवकाश वैज्ञानिक ‘एडविन हबल’ ह्यांच्या स्मरणार्थ ह्या दुर्बिणीला त्यांचं नाव दिल गेलं. १.५ बिलियन अमेरिकन डॉलर ( जवळपास ९७ अब्ज रुपये) किमतीची हबल दुर्बीण १९८३ ला अवकाशात जाणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात १९९० मध्ये स्पेस शटल डिस्कव्हरी मधून पृथ्वीच्या लो ऑर्बिट मध्ये स्थापन करण्यात आली.
‘हबल टेलिस्कोप’ ने मग जे बघितलं त्याने मानवाचा ह्या विश्वाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला. हबल ने बघितलेल्या काही फोटोंनी मात्र विश्वाचे अंतरंग कधी नव्हे ते माणसाला समोर दिसले. हबल चा एक फोटो जगात खूप प्रसिद्ध आहे. त्या फोटोचं नाव आहे “हबल अल्ट्रा डीप फिल्ड”. असं काय आहे ह्या फोटोत? की विश्वाच्या एका काळोख्या भागातून घेतला गेलेला हा फोटो जगाच्या सर्वच अवकाश संस्शोधक आणि वैज्ञानिकात प्रसिद्ध आहे. तर जाणून घेऊ ह्या ह्या “हबल अल्ट्रा डीप फिल्ड” ची गोष्ट.
“हबल अल्ट्रा डीप फिल्ड” हा फोटो हबल टेलिस्कोप ने घेतलेला असून ह्यात तब्बल १३ बिलियन प्रकाश वर्ष लांब असणाऱ्या गोष्टी आपण बघू शकत आहोत. ( जो प्रकाश फोटोत आला आहे तो १३ बिलियन वर्षापूर्वी निघाला आहे.) ह्या पूर्ण फोटोत आपण पूर्ण विश्वाचं आयुष्य बघू शकत आहोत. सप्टेंबर २००३ ते जानेवारी २००४ ह्या काळात अवकाशाच्या एका छोट्या अंधाऱ्या कोपऱ्यात हबल ने आपली लेन्स थांबवून ठेवली. ‘फोर्नेक्स’ह्या तारकासमूहात ही जागा केवढी होती तर २.४ आर्कमिनिट. सोप्प्या शब्दात सांगायचं झालं तर १ मिलीमीटर X १ मिलीमीटर चा कागद १ मीटर अंतरावर धरला तर तो जितकी जागा व्यापेल तेवढा हा भाग. किंवा पूर्ण अवकाशाचं जर २६ मिलियन भागात विभाजन केलं तर त्यातला एक भाग. इतके दिवस त्या भागाचं निरीक्षण केल्यावर हबल ने जे विश्व दाखवलं ते म्हणजे ‘हबल अल्ट्रा डीप फिल्ड’.ह्यात हबलने एक दोन नाही तर तब्बल १०,००० पेक्षा जास्त आकाशगंगाचा वेध घेतलेला होता. ( हबल दुर्बीण खूप छोट्या प्रकाशाचा वेध घेऊ शकते. हे म्हणजे मुंबईत बसून अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील एका झाडावर असलेल्या काजव्याच्या प्रकाशाचा वेध घेण्याएवढं प्रचंड आहे.) ह्यातील प्रत्येक आकाशगंगेत मिलियन, बिलियन तारे आहेत. म्हणजे हा फोटो एकाच वेळी ट्रिलियन अपॉन ट्रिलियन तारे दर्शवित आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्यातल्या काही आकाशगंगा प्रचंड जुन्या आहेत तर काही अवघ्या ६०० मिलियन वर्षाच्या आहेत.
ह्या फोटो मधील एक छोटासा प्रकाशाचा ठिपका पण एक आकाशगंगा आहे. म्हणूनच हा फोटो म्हणजे विश्वाच्या अनंततेचं दर्शन आहे.
१)ह्या फोटोमधील इंग्रजी क्रॉस प्रमाणे ज्या ताऱ्यांचा प्रकाश दिसत आहे, ते आपल्याच मिल्की वे आकाशगंगेतील तारे आहेत. हबल दुर्बिणीत जवळच्या ताऱ्यांना बघताना होणाऱ्या परिवर्तनामुळे तसं दिसत आहे.
२)ह्यात सर्व प्रकारच्या आकाशगंगा आपल्याला बघायला मिळतात. ह्यात आपण काही नवीन आकाशगंगा पण बघू शकतो ज्या पृथ्वीपासून ५ बिलियन प्रकाशवर्षापेक्षा कमी अंतरावर आहेत. ह्या फोटोच्या डाव्या बाजूच्या खालच्या बाजूस एक पिवळसर आकाशगंगा दिसते आहे(थाळीप्रमाणे). ( फोटोत हिरव्या बाणाने ही आकाशगंगा दाखवलेली आहे. )
३)ह्या फोटोत आपण ५ ते १० बिलियन वर्षापूर्वी च्या आकाशगंगा पण बघू शकत आहोत. त्या काळात विश्व खूप विचलित अवस्थेत होतं. त्यामुळे अनेक आकाशगंगाची आपआपसात टक्कर हे नवीन नव्हतं. अशाच त्या काळातल्या आकाशगंगा आपण एकमेकात टक्कर होताना आणि मिसळताना बघू शकत आहोत. ह्या फोटोतील मार्क केलेल्या ह्या तीन आकाशगंगा एकमेकात मिसळताना दिसत आहेत. त्यांचे रंग पर्पल,ऑरेंज आणि रेड आपण बघू शकतो. ( फोटोत आकाशी रंगाच्या वर्तुळात ह्या तीन आकाशगंगा आपण बघू शकतो. )
४)ह्या फोटोत आपण अगदी जुन्या म्हणजे जवळपास १० बिलियनपेक्षा जास्त प्रकाशवर्ष लांब आणि जुन्या आकाशगंगा ही बघू शकतो आहोत. वरच्या तीन आकाशगंगेपासून आपण सरळ खाली आलो की एक लाल रंगाची रेष दिसेल. ही आकाशगंगा विश्व निर्मितीच्या सर्वात प्राथमिक स्वरूपातली आकाशगंगा आहे. ह्या आकाशगंगे नंतर बाकीच्या आकाशगंगा अस्तित्वात आल्या आहेत. किंबहुना विश्व अस्तित्वात येतं गेलं आहे. ( फोटोत पिवळ्या रंगाच्या वर्तुळात अंधुक अशा लाल रंगात दिसणारी आकाशगंगा १० बिलियन वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. हा प्रकाश १० बिलियन वर्षापूर्वी तिकडून निघालेला आहे. )
हा फोटो म्हणजे विश्वाने केलेला अनंताचा प्रवास आहे. ह्याची जर अजून मोठी इमेज मिळाली तर अजून सुस्पष्टरीत्या आपण विश्वाच्या प्रवासाला बघू शकतो. १३ बिलियन वर्षापूर्वी असलेलं विश्व ते आज असणारं विश्व, हा पूर्ण प्रवास हबल च्या ह्या एका फोटोत बंदिस्त झाला आहे. १.५ बिलियन डॉलर खर्च करून नासा ने बनवलेल्या हबलमागचा खर्च आणि त्यामागची मेहनत ह्या एका फोटोत वसूल झाली आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
“हबल अल्ट्रा डीप फिल्ड” आजही आपल्यासोबत बोलतो. आपल्याला दाखवतो ते विश्वाच प्रचंड स्वरूप जे फक्त आपल्याला दिसणाऱ्या आकाशाच्या २६ मिलियन भागांपेकी एका भागात समाविष्ट आहे. मग विचार करा, उरलेल्या भागात किती विश्व सामावलेलं आहे!! ज्याकडे अजून आपण बघितलेलं नाही किंवा ते आपल्याला दिसलेलं नाही…
माहिती स्त्रोत :- नासा, फ्युचर
फोटो स्त्रोत :- नासा

आधुनिक काळातले भारतीय शास्त्रज्ञ

या पानावरील शास्त्रज्ञ :
१.सुब्रह्मण्यम चंद्रशेखर
२. पांडुरंग सदाशिव खानखोजे
३. हरगोबिंद खुराणा
४.राजगोपाल चिदंबरम
५. सर जगदीशचंद्र बोस
६. श्रीनिवास रामानुजन
७. विश्वकर्म्यांच्या कथा
८. डॉ. हिम्मतराव बावसकर
९.सत्येंद्रनाथ बोस
१०. व्ही.जी.कुलकर्णी

११. डॉ.वसंत गोवारीकर

ही पानेही पहा :
१. शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे https://anandghare.wordpress.com/2021/04/17/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e-%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%bf/

२. अणुऊर्जेचे जनक डॉ.होमी भाभा : https://anandghare.wordpress.com/2020/10/30/%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%8a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%95-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be/

३. डॉ.विक्रम साराभाई यांची जन्मशताब्दी : https://anandghare.wordpress.com/2019/08/12/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9c/

४. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या https://anandghare.wordpress.com/2021/09/15/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%ae-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%af%e0%a5%8d/

या पानावर पहा

१. शास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर

नोबेल पारितोषिक विजेते खगोल व भौतिक शास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांची याज जयंती.त्यानिमित्त दैनिक प्रभात पुणे मधील माझा लेख. (माधव विद्वांस)
त्यांचे वडील रेल्वेच्या लाहोर विभागाचे महालेखापाल होते.त्यांची बदली लाहोर येथे झाली होती.तेथेच सुब्रह्मण्यम यांचा जन्म झाला. त्यांना दोन मोठया बहिणी व तीन लहान भाऊ होते.त्यांची आई लेखिका होती त्यांचे काका चंद्रशेखर वेंकटरामन हे पण भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते होते. चंद्रशेखर वयाच्या १२ वर्षापर्यंत घरातच शिकले. त्यांच्या वडिलांनी त्यांना गणित आणि भौतिकशास्त्र शिकवले आणि त्यांच्या आईने त्यांना तमिळ शिकवले. वर्ष १९२२ ते २५ या दरम्यान त्यांनी चेन्नई येथे हिंदू हायस्कूल मधे माध्यमिक शिक्षण घेतले. नंतर वर्ष १९२५ ते १९३० या कालावधीमधे त्यांनी मद्रास विद्यापीठात अभ्यास केला. वयाच्या १८व्या वर्षी वर्ष १९२९ मधे त्यांनी अर्नोल्ड सोमरफेल्ड यांचे प्रेरणेतून “कॉम्पटन स्कॅटरिंग अँड द न्यू स्टॅटिस्टिक्स” (“The Compton Scattering and the New Statistics”) हा त्यांचा पहिला शोध निबंध सादर केला व तो ‘इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स’ मध्ये प्रकाशित झाला. वर्ष १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील पदवी प्राप्त झालेवर त्यांना केंब्रिज विद्यापीठात पदवी प्राप्त करण्यासाठी भारत शिष्यवृत्ती देण्यात आली, त्यांना ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमध्ये प्रवेश मिळाला. इंग्लंडला जाताना बोटीवरच्या प्रवासादरम्यान चंद्रशेखरांनी पांढऱ्या व छोट्या ताऱ्यांचे बाबत निरीक्षण केले.त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षीच ताऱ्यांचे पडणे व नष्टहोणे या बाबतीत संशोधन केले होते. वर्ष १९३५ मधे लंडनच्या रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसाइटीच्या कार्यशाळेत या विषयावर आपला शोध निबंध सादर केला होता.

चंद्रशेखर यांनी त्यांच्या आयुष्यातील भौतिकशास्त्रातील विविध प्रकारच्या समस्यांवर काम केले, तारकीय संरचना, पांढरे तारे व काळे तारे तसेच ताऱ्यांचेवरील कृष्णविवर, स्टेलर डायनॅमिक्स, स्टोकास्टिक प्रक्रिया, रेडिएटिव्ह ट्रान्सफर, हायड्रोजन एनीन, हायड्रोडायनेमिक स्थिर स्थिरता, अश्या अनेक विषयांचे संशोधन केले होते.

वर्ष १९३५ मधे मध्ये चंद्रशेखर यांना हार्लो शॅपले यांनी हार्वर्ड वेधशाळे मधे अभ्यागत व्याख्याता म्हणून थोड्या कालावधीसाठी नेमणूक केली होती. हार्वर्डच्या भेटीदरम्यान चंद्रशेखर यांनी शॅपलीला मोठ्या प्रमाणात प्रभावित केले, परंतु त्यांनी हार्वर्ड रिसर्च फेलोशिपची ऑफर नाकारली. त्यानंतर त्यांनी डिसेंबरमध्ये त्यांनी अमेरिकेत प्रवास केला. त्याच वेळी चंद्रशेखर यांची पांढऱ्या व छोट्या ताऱ्यांचे अभ्यासक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कुईपर यांची गाठ पडली. कुईपर यांची नुकतीच यर्क वेधशाळेत नेमणूक झाली होती. कुपरकडून प्रशंसनीय शिफारस झाल्यानंतर वर्ष १९३६ मध्ये चंद्रशेखर यांना यर्क वेधशाळेत आमंत्रित केले. तथापि त्यांनी ती ऑफर नाकारली. वर्ष १९४१ मधे चंद्रशेखर सुरवातीस सहयोगी प्राध्यापक म्हणून आणि दोन वर्षानंतर पूर्ण प्राध्यापक म्हणून शिकागो विद्यापीठात राहिले. त्यानंतर त्यांना वर्ष १९४६ मधे प्रिन्सटन युनिव्हर्सिटीने त्यांना दुप्पट पगार देऊ केला. तथापि शिकागोमध्ये त्यांना तेवढाच देकार मिळाल्याने ते तेथेच राहिले. १९५३ मधे त्यांनी आणि त्यांची पत्नी लता चंद्रशेखर यांनी अमेरिकन नागरिकत्व घेतले. चंद्रशेखर यांना अनेक पुरस्कार आणि पदके प्राप्त झाली. ते सुमारे २० वर्षे अॅस्ट्रॉफिकल जर्नलचे संपादक होते.
वर्ष १९६९ मधे त्यांना भारत सरकारने पदमविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, “आम्ही आपल्या देशात चंद्रशेखर ठेवू शकत नाही हि खूप खेदजनक गोष्ट आहे.” त्यांना सन १९८३ मध्ये फिजिक्समधले नोबेल पारितोषिक देण्यात आले. ताऱ्यांच्या आय़ुष्यमानाच्या अखेरीनंतर त्याचे रूपांतर शुभ्र बटुमध्ये (व्हाइट ड्वार्फ) किंवा कृष्णविवरामध्ये (ब्लॅक होल) केंव्हा होईल याची सीमा चंद्रशेखर यांनी सांगितली. ती त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. डॉ सुब्रम्हण्यम चंद्रशेखर यांचे २२ ऑगस्ट १९९५ रोजी शिकागो येथे निधन झाले.

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील फलकावरून साभार दि.१९-१०-२०२१ (संपादित)

***********************************

२.डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

पांडुरंग सदाशिव खानखोजे

कृषी तज्ञ पांडुरंग सदाशिव खानखोजे यांची आज जयंती ‘(७ नोव्हेंबर १ ९ ८ ३ )निधन २ २ जानेवारी १ ९ ६ ७
लोकमान्य टिळकांच्या विचाराने प्रभवित झालेले डॉ खानखोजे हे पहिल्या महायुद्धाचे वेळी युरोपात होते .
त्यांनी जर्मन हिंदुस्थानी लोकांचा क्रांतिकारी गट स्थापन केला होता. त्यांच्या भारत प्रवेशावर ब्रिटीशांनी बंदी घातली होती .
त्यानंतर ते मेक्सिको मध्ये गेले .तेथे त्यांनी कृषिविषयक संशोधन केले . वनस्पतीशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी मेक्सिकोत वास्तव्य केले . ते मेक्सिको सरकारचे कृषी संचालक या पदावरही होते. तेथे त्यांनी एका बेल्जियन महिलेशी विवाह केला .त्यांना दोन मुली होत्या त्यांच्या सह १ ९ ४ ७ नंतर ते भारतात आले
!!अभिवादन !!”
माधव विद्वांस यांच्या फेसबुकाच्या भिंतीवरून साभार दि. ७-११-२०२१

विकीपीडियावरील माहिती

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे (नोव्हेंबर ७, इ.स. १८८४:वर्धा, महाराष्ट्र – जानेवारी १८, इ.स. १९६७) हे एक मराठी कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म आणि शालेय शिक्षण महाराष्ट्रातील वर्धा येथे झाले. १९११ साली खानखोजे अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले.

कृषी शास्त्रज्ञ खानखोजे
अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. पांडुरंग खानखोजे मेक्सिकोत गेले. १९२० सालापासून ते १९४७ सलापर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषिसंचालक म्हणून नेमले होते. मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या भव्य भित्तीचित्रांच्या पंक्तीत डॉ.खानखोजे यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत ‘आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल’ असे लिहिले आहे.

मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी डॉ. खानखोजे यांनी शेतकरी संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली.त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षांतून दोनदा पीक देणारी जात विकसित केली. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांवर पुस्तिका छापल्या. नपुंसकांवर इलाज करण्यासाठी पूर्वी माकडांच्या ग्रंथीतून हार्मोन्स मिळवली जात. पण लोकांनी ओरड केल्यावर हे थांबवावे लागले; परंतु यावर उपाय म्हणून डॉ. खानखोजे यांनी मध्वालू या जंगली वनस्पतीपासून अशी हॉर्मोन्स मिळवली. मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले. ते स्वतः शाकाहारी असल्याने त्यांनी जेवणात अनेक नवीन पाककृती विकसित केल्या.त्यांनि ‘तेवी-मका’ ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली.

क्रांतिकारक खानखोजे
पांडुरंग खानखोजे यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. १९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गदर पक्ष स्थापन करण्यात पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न केले. आपण शेतीसंबंधी जे ज्ञान मिळवले ते भारतीयांच्या कामाला यावे अशी तीव्र इच्छा खानखोजे यांना होती. पण भारत स्वतंत्र व्हावा ही इच्छा त्याहीपेक्षा तीव्र असल्याने त्यांनी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांची संघटना बनवून ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार केले. मग त्यांनी जपान, अमेरिका, जर्मनी आणि मेक्सिकोत जाऊन तेथेही हे कार्य त्यांनी चालू ठेवल्याने ते भारतात परतले तर त्यांना पकडून तुरुंगात डांबायला ब्रिटिश सरकार टपले होते. त्यामुळे जरी त्यांचे भाऊ, आई व वडील वारले तरी त्यांना भारतात परत येता आले नाही. शिवाय त्यांच्याकडे भारतात परत यायला ब्रिटिश पासपोर्टही नव्हता.

भारताला स्वातंत्र मिळाल्यावर, १९४९ साली तेव्हाच्या मध्यप्रांताचे कृषिमंत्री रा. कृ. पाटील यांनी मध्य प्रांतातील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती, सहकारी शेती याचा अवलंब करण्यास कितपत वाव आहे हे पाहण्यासाठी डॉ. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमून त्यांना भारतात बोलावले. त्यांनी आपल्याकडे दिले जाणारे शेतीचे शिक्षण किती उपयोगाचे आहे, त्यात संशोधनास किती वाव आहे, शेतीवर काही प्रयोग करण्यासाठी प्रायोगिक शेते आहेत का, शेतीतील सुधारणा खेडोपाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची काही सोय केली आहे का, शेतीचे यांत्रिकीकरण करणे इष्ट आहे का, अल्पभूधारकांनी सहकारी तत्त्वावर शेती करावी का हे सगळे ठरवण्यासाठी भारतभर हिडून शेतीचे निरीक्षण केले. २८९ शेतकरी व ८२ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी सामूहिक शेतीचे प्रयोग सुरू करण्याचे सुचविले. हिंदी-मराठीत पुस्तिका काढायचेही सुचविले. पण मेक्सिकोमध्ये खानखोजे यांना जेवढे काम करता आले तेवढे भारतात करता न आल्याने ते असंतुष्ट राहिले. १९५५साली डॉ. पांडुरंग खानखोजे कायमचे भारतात आले आणि नागपूरमध्ये स्थायिक झाले.

*********************************

३.डॉ. हरगोबिंद खुराणा

जीवरसायनशास्त्रज्ञ हरगोबिंद खुराना (खोराना) यांचा आज स्मृती दिन. निधन ९ नोव्हेंबर २०११. त्यांचा जन्म ९जानेवारी १९२२ रोजी ब्रिटिश भारतातील मुलतान-पंजाबमधील रायपूर (सध्याचे पाकिस्तान) येथे झाला. झाडाखाली भरणाऱ्या शाळेत त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते मुलतानमधील दयानंद आर्य समाज माध्यमिक शाळेत गेले. त्यानंतर शिष्यवृत्त्यां मिळवून त्यांनी लाहोरच्या पंजाब विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.

पदव्युत्तर शिक्षण चांगल्या प्रकारे प्राप्त करून तत्कालीन भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडच्या लिव्हरपूल युनिव्हर्सिटीत सेंद्रिय रसायनशास्त्रातील पीएच्.डी.करण्यासाठी दाखल झाले.तेथे त्यांना रॉजर बीर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्. डी.मिळाली.त्यानंतर एक वर्ष ते स्वित्झर्लंड येथील झुरिकच्या इटीएच संस्थेत व्लादिमिर प्रेलॉग यांच्यासोबत क्षारीय रसायनशास्त्र या विषयावर काम करत होते. त्यानंतर ते भारतात परत आले, परंतु मनासारखे काम न मिळाल्यामुळे शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडमधील केंब्रिजला ते परत गेले. तेथे त्यांनी जॉर्ज केन्नर आणि अलेक्झांडर टॉड यांच्यासोबत पेप्टाईड आणि न्यूक्लियोटाइड यावर दोन वर्षे संशोधन केले.

वर्ष १९५२ मध्ये ते ब्रिटिश कोलंबियातील व्हॅन्कुव्हर येथे राहणेस गेले. तेथे ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ब्रिटिश कोलंबिया रिसर्च कौन्सिलमध्ये त्यांना नोकरी मिळाली. या ठिकाणी फारशा सोयी नसल्या तरी त्यांना कामामध्ये पूर्ण स्वातंत्र्य होते. येथे त्यांनी केंद्रकाम्ले आणि अनेक महत्त्वाच्या जैवरेणूंचे संश्लेषणावर (synthesisˈसिन्‌थ़सिस्‌) संशोधन केले.
खुराना यांनी १९६० मध्ये विस्कॉन्सिन, मॅडिसन येथील इन्स्टिट्यूट फॉर एन्झाइम रिसर्च केंद्राच्या सह-संचालक पदाची सूत्रे हाती घेतली. नंतर ते जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्यांच्या या पदाला कॉनरॅड-ए-एल्वेजेम जीवनविज्ञानाचे प्राध्यापक असे नाव देण्यात आले. या ठिकाणी त्यांनी दोन किंवा अधिक आरएनए आणि प्रथिनांच्या संश्लेषण यंत्रणेचा (synthesisˈसिन्‌थ़सिस्‌) अभ्यास केला. याच कामाबद्दल त्यांना १९६८ साली विभागून नोबेल पारितोषिक मिळाले. नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या कामामधील त्यांचा सहभाग म्हणजे त्यांनी विकरांच्या मदतीने आरएनए साखळ्या तयार केल्या. या बनवलेल्या आरएनएच्या सहाय्याने बहुपेप्टायडे संश्लेषित केली. बहुपेप्टायडातील अमिनो आम्ल क्रमाच्या अभ्यासामुळे अनेक घटकांची उकल झाली. या संशोधनामुळे अमिनो अॅसिडची रचना आणि अनुवांशिक गुणधर्म यांच्यातील संबंध समजून घेणे शक्य झाले, आणि शास्त्रज्ञाना आता अनुवांशिक रोगांचे कारण आणि त्यावर मात करण्याचे शक्य झाले आहे. रासायनिक पद्धतीने ऑलिगोन्यूक्लिओटाईड तयार करणारे खोराना हे पहिले शास्त्रज्ञ होते. वरील पद्धतीचा अवलंब करून पहिले कृत्रिम जनुक (gene) खोरानांनी तयार केले. त्यांनी पॉलिमरेझ आणि लायपेझ यांचा वापर करून डीएनएचे तुकडे एकमेकांशी जोडून दाखवले. या प्रयोगामुळेच नंतर पॉलिमरेझ चेन रिॲक्शनचा शोध लागला. या कृत्रिम जनुकांचा उपयोग जीवशास्त्रामध्ये नवीन वनस्पती आणि प्राण्यांमध्ये क्लोनिंग, सीक्वेन्सिंग इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात होतो. मानवी उत्क्रांती आणि माणसांमध्ये होणाऱ्या अनुवांशिक आजारांच्या अभ्यासासाठीही याचा खूप उपयोग होतो. आता खोरानाच्या संशोधनाच्या आधारे अनेक कंपन्या स्वयंचलित यंत्रांच्या मदतीने व्यावसायिक स्तरावर कृत्रिम जनुके व ऑलिगोन्यूक्लिओटाईड आवश्यकतेनुसार तयार करून देतात. वर्ष १९६६ मधे त्यांनी अमेरिकन नागरिकत्व पत्करले .खोराना १९७० च्या सुरुवातीला मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. नंतर स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये वैज्ञानिक राज्यपाल मंडळाचे सदस्य बनले. २००७ मध्ये ते मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून निवृत्त झाले.

******************************

४.राजगोपाल चिदंबरम


अणुस्फोटांचे जादुगारः डॉ. राजगोपाल चिदंबरम
.. . . श्री. नरेंद्र गोळे , ज्येष्ठ सेवानिवृत्त अभियंता, भाभा परमाणुअनुसंधान केंद्र

आज डॉ.राजगोपाल चिदंबरम यांचा जन्मदिन आहे. हे भारतातील सर्वात विख्यात प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते भाभा अणू संशोधन केंद्राचे संचालक (१९९० ते १९९३) राहिलेले आहेत. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे सचिवही (१९९३ ते २०००) राहिलेले आहेत. तसेच, भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागारही (नोव्हेंबर २००१ ते मार्च २०१८) राहिलेले आहेत. अणुऊर्जा विभागाच्या होमी भाभा अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून ते आजही कार्यरत आहेत. डॉ. चिदंबरम यांनी मूलभूत विज्ञान आणि आण्विक तंत्रांच्या अनेकविध पैलूंत मोलाची भर घातलेली आहे [१]. डॉ. होमी भाभांनी निवडलेल्या मोजक्या शास्त्रज्ञांपैकी हे एक आहेत.
.
अणुस्फोटांचे जादुगारः डॉ.राजगोपाल चिदंबरम
.
जादूगार जसे जना भुलवतो शोधून युक्ती नवी
तैसे दंग चिदंबरम् करवुनी योजीति सार्‍या कृती ।
झाले स्फोट कळे, नियोजन कधी झाले कुणा ना कळे
झाली पूर्व तयारिही कशि, कुणी काही न संवेदले ॥ १ ॥
.
धक्का जो बसला जगास सगळे गेले विरोधातही
रोखील्या रसदा युरेनियमच्या तंत्रे न देती नवी ।
राष्ट्रा लागत ते इथेच घडुनी संशोध नेला पुढे
केले सज्ज स्वराष्ट्र ठोस दिधला विश्वास चोहीकडे ॥ २ ॥
.
आम्हीही अणु अस्त्र धारण करू, होऊन विश्वा गुरू
आम्हीही अणुला विभक्त करुनी, ऊर्जा अणूची वरू ।
आम्ही शांति उगा न सोडु तरीही, धाका न सोसू जनी
हा संदेश चिदंबरम् विखुरती, स्फोटा करूनी रणी ॥ ३ ॥
.
नरेंद्र गोळे २०२०१११२
.
डॉ. चिदंबरम यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३६ रोजी चेन्नई येथे झाला. डॉ. चिदंबरम यांनी सुरूवातीचे शिक्षण मीरत आणि चेन्नई येथे घेतले. १९५६ साली ते मद्रास विद्यापीठातून बी.एस.सी. (ऑनर्स) पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एम.एस.सी. भौतिकशास्त्र विषयात पदव्यूत्तर प्रशिक्षण घेत असतांना ते प्राथमिक भौतिकी प्रयोगशालेय अभ्यासक्रमांना शिकवतही असत. सदृश संगणक (अनालॉग कॉम्प्युटर्स) या विषयावर शोधनिबंध लिहून ते १९५८ साली भौतिकशास्त्रात एम.एस.सी. झाले. भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथे पी.एच.डी. करता त्यांनी नाव नोंदवले. १९६२ साली, त्यांच्या अणुगर्भी चुंबकीय अनुनाद विकासाच्या संशोधन कार्यास मान्यता लाभून, ते पी.एच.डी. झाले. हा शोधनिबंध, भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू यांचेकडे नोंदविण्यात आलेल्या सर्व शोधनिबंधांपैकी सर्वोत्तम आढळून आल्याने मार्टिन फॉस्टर पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. चिदंबरम हे अष्टपैलू प्रज्ञावंत आहेत. पी.एच.डी. झाल्यानंतर स्फटिकालेखन आणि संघनित पदार्थ भौतिकीत त्यांचा रस वाढला. त्या काळात त्यांनी लिहिलेल्या लेखांनी, आधुनिक पदार्थ विज्ञानाच्या (मटेरिअल सायन्स) विकासात कळीची भूमिका बजावली. भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथे त्यांनी केलेल्या प्रयोगांवर आधारित संघनित पदार्थ भौतिकी आणि पदार्थ विज्ञानातील विकासांची दखल घेऊन त्याकरता त्यांना डी.एस.सी. ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना निरनिराळ्या वीस संस्थांनी भौतिकशास्त्रातील डॉक्टरल पदव्या प्रदान केलेल्या आहेत [२, ४].
.
बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतून पी.एच.डी. झाल्यावर, १९६२ साली ते भाभा अणुसंशोधन केंद्रात वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. डॉ. चिदंबरम यांनी १९६२ साली, विरक्तक (विरक्तक म्हणजे न्यूट्रॉन. अण्वंतर्गत तीन कणांपैकी विद्युत प्रभारित नसलेला विरक्त कण) विवर्तन आणि स्फटिकालेखन (न्यूट्रॉन डायफ्रॅक्शन अँड क्रिस्टलॉग्राफी) यावर काम सुरू केले. विरक्तक विवर्तन-मापकाच्या आधारे स्वयंचलित विदा संकलन सुरू करणारे ते पहिलेच शास्त्रज्ञ होते. भारतात स्फटिकालेख संगणन सुरू करण्यात ते पथप्रदर्शक राहिले. आण्विक स्फोटकांच्या अभिकल्पनाचे कार्य त्यांनीच सुरू केले. प्ल्युटोनियमचे प्रावस्था समीकरण शोधून काढणारे ते पहिलेच शास्त्रज्ञ होते [१].
.
१९७४ साली पोखरण येथे चाचणी करण्यात आलेल्या (अणुविस्फोटक) साधनाकरता अंतर्स्फोटाची पद्धतही त्यांनीच विकसित केली होती. याकरता त्यांनी, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेसोबतच्या घट्ट परस्पर समन्वयातून, भाभा अणुसंशोधन केंद्रात धक्कालहरींचे (शॉकवेव्हज चे) संशोधन सुरू केले. १९९८ च्या (अणु) चाचण्यांकरता त्यांनी अत्यंत सुटसुटीत अंतर्स्फोटक प्रणाली उपयोगात आणली, जिचे रूपांतरण पुढे अण्वस्त्रांत करता आले. पोखरण चाचणीनंतर डॉ. चिदंबरम यांनी उच्च दाब भौतिकीच्या क्षेत्रात ’खुले संशोधन’ सुरू केले. याकरता संपूर्ण पल्ल्यातील उपकरणे, जसे की हिराऐरणीघट (डी.ए.सी.-डायमंड ऍनव्हिल सेल्स, या घटांचा उपयोग मिलिमीटरहूनही कमी आकाराच्या पदार्थांवर प्रायोगिकरीत्या अब्जावधी वातावरणांच्या दाबाइतका उच्च दाब देण्यासाठी, भूशास्त्रात केला जातो) आणि वायु-बंदूक (गॅस-गन, वस्तुप्रक्षेपण करण्यासाठी ही वापरली जाते). प्रक्षेपित वस्तूंच्या संपूर्ण निदानाकरताच्या सुविधाही त्यांनी संपूर्णपणे स्वदेशी तंत्रांनी उभ्या केल्या. प्रावस्था समीकरणे, पदार्थांची प्रावस्था स्थिरता इत्यादींच्या आकडेमोडीकरता त्यांनी, सैद्धांतिक उच्चदाब संशोधनाचा पाया रचला. भाभा अणुसंशोधन केंद्रात महासंगणकाचा विकास सुरू करण्यासही डॉ. चिदंबरम हेच कारणीभूत ठरले होते [१].
.
त्यांच्याच अणु आयोगाचे अध्यक्ष असतांनाच्या कार्यकाळात अणुऊर्जा कार्यक्रमाला भरपूर गती मिळाली. अणुऊर्जा संयंत्रांची संख्या खूप वाढली. १९९४-९५ दरम्यान ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीच्या प्रशासकीय मंडळाचे ते अध्यक्ष राहिले. २००८ साली आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीने, “२०२० आणि नंतरच्या कालातील अडतीची भूमिका” तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या विख्यात व्यक्तींच्या आयोगाचे ते सदस्य होते. १९९०-९९ दरम्यान ते आंतरराष्ट्रीय स्फटिकालेखन संघाच्या कार्यकारी समितीचे सदस्य राहिले. पुढे तिचे ते उपाध्यक्षही झाले. मार्च २०१८ पर्यंत ते राष्ट्रीय ज्ञान जालाकरताच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय पंचसंदर्भित नियतकालिकांतून त्यांचे २०० हून अधिक शोधनिबंधही प्रकाशित झालेले आहेत [३].
.
भारत सरकारने पद्मश्री (१९७५) आणि पद्मविभूषण (१९९९) पुरस्कार प्रदान करून डॉ. चिदंबरम यांच्या कार्याचा वेळोवेळी गौरव केलेला आहे. त्यांनी इतर अनेक पुरस्कारही प्राप्त केलेले आहेत. १९९१ साली त्यांना भारतीय विज्ञान संस्थेचे विख्यात विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले. १९९२ मध्ये त्यांना जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दीनिमित्त, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सन्माननीय आंतरराष्ट्रीय पाहुणे सदस्यत्व देण्यात आलेले होते. लोकमान्य टिळक पुरस्कार (१९९८), वीर सावरकर पुरस्कार (१९९९), दादाभाई नौरोजी सहस्रक पुरस्कार (१९९९), भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून मेघनाद साहा पदक (२००२), श्री. चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय ख्याती पुरस्कार (२००३), भारतीय अणुकेंद्रकीय समाजाचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार (२००६), भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी कडून अभियांत्रिकीतील जीवनगौरव पुरस्कार (२००९) आणि भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सी.व्ही.रमण पदक (२०१३); तसेच ऊर्जापेढी परिषदेकडून (कौन्सिल ऑफ पॉवर युटिलिटीज कडून) जीवनगौरव (२०१४) हे पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत [३].
.
२००१ सालची, भारतीय अणुकेंद्रकीय समाजाची (आय.एन.एस.सी.-२००१ इंडियन न्युक्लिअर सोसायटीज ऍन्युअल कॉन्फरन्स-२००१) वार्षिक परिषद इंदौर येथील प्रगत तंत्रज्ञान केंद्रात (हल्लीचे आर.आर.सी.ए.टी.- राजा रामण्णा सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी), १० ते १२ ऑक्टोंबर दरम्यान भरली होती. मीही ’आभासी उपकरणना’वरचा एक शोधनिबंध वाचणार असल्याने परिषदेस आमंत्रित होतो. दिवसभर तांत्रिक निबंधवाचनांचे कार्यक्रम चालत. संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम असत. एके दिवशीचा कार्यक्रम चोखी ढाणीला भेट देण्याचा होता. परिषदेकरता जमलेले सारे प्रतिनिधी गोलाकार आसनांवर बसलेले होते. मध्यभागी एक जादुगार जादूचे प्रयोग दाखवित होता. एका क्षणात त्याने एक नाणे सर्वांना दाखवले. पहा ओळखून ठेवा असे सांगितले. मग ते उंच उडवले. वर आकाशात खूप उंचावर गेले ते. अंधारात दिसेनासेही झाले. मात्र ते परत खाली आलेच नाही. मग जादूगार म्हणाला आपल्यापैकीच कुणीतरी ते लपवले आहे. असे म्हणत तो चिदंबरम बसलेले होते तिथे गेला. त्यांच्या खिशाला हात लावला आणि तेच नाणे सगळ्यांना दाखवू लागला. नाण्याची ओळख पटवली गेली. नाणे तेच होते. चिदंबरमही थक्क झाले! मात्र त्याच्याकडे ते पुन्हा आले कसे, हे कुणालाच कळले नाही. धन्य ती जादू आणि धन्य तो जादुगार!
.
चिदंबरमही असेच जादुगार आहेत. कुणाही परक्याला पत्ता लागू न देता १९७४ आणि १९९८ च्या अणुस्फोटक चाचण्या त्यांच्याच देखरेखीखाली अत्यंत सुरळितपणे आणि कमालीच्या गोपनीयतेसहित पार पडल्या होत्या [५]. गोपनीयता काय असते ते त्यांनीच जगाला दाखवून दिलेले होते. चिदंबरम हे प्रखर बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयांत सखोल आकलन असलेले व्यक्ती आहेत. भारताचे द्रष्टे शास्त्रज्ञ आहेत. चिदंबरम हे फर्डे वक्ते आहेत. अणुऊर्जाविभागात ३१ वर्षे सेवा केल्याने, अतिशय प्रज्ञावंत शास्त्रज्ञांची व्याख्याने ऐकण्याचा मला योग लाभला. त्या सगळ्यांत ज्यांचे व्याख्यान ऐकावेसे वाटे ते चिदंबरम होते. गोष्ट सांगावी तसे ते घटना समजावून सांगतात. १९९८ च्या चाचण्यांनंतर भाभा अणुसंशोधन केंद्रातील मध्यवर्ती संकुलात (सेंट्रल कॉम्प्लेक्समध्ये) त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. चाचणीच्या यशाची गोष्ट सांगण्याकरता.
.
सारे सभागृह गच्च भरलेले. आसनांसमोरच्या मोकळ्या जागेतही शास्त्रज्ञ दाटीवाटीने बसलेले मला आठवतात. जगाला थक्क करणारे प्रयोग त्यांनी प्रत्यक्षात कसे घडवले तेही त्यांनी सांगितले होते आणि मिळालेल्या निष्कर्षांवर समाधानही त्यांनी व्यक्त केलेले होते. एवढेच नव्हे तर आता आपल्याला आणखी चाचण्या करण्याची आवश्यकता भासणार नाही हेही सांगितले होते. केवढा आत्मविश्वास होता त्यांच्या कथनात. या सार्‍या यशोगाथेच्या पाठीशी कुठेतरी आम्हीही सारे होतोच ना, असा अभिमानही तेथे उपस्थित असलेल्या सर्व शास्त्रज्ञांत दिसून येत होता.
.
विद्यमान भारतात जगाला दिपवून टाकणारे, भारताला भवितव्यातील वैज्ञानिक नवाविष्कारांची पहाट दाखवू शकणारे आणि सिद्धहस्त सामर्थ्यांनी देशाचा गौरव वाढवणारे जे मोजके शास्त्रज्ञ आपल्याला लाभलेले आहेत, डॉ. चिदंबरम त्यातील बिनीचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या प्रज्ञेस, कार्यसंचितांस आणि भारतमातेच्या त्यांनी केलेल्या अपार सेवेस सादर प्रणाम!
.
पूर्वप्रसिद्धीः विद्याप्रसारक मंडळ, ठाणे, यांच्या “दिशा” मासिकाचा नोव्हेंबर-२०२१ चा अंक.
.
संदर्भः
.
१. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संकेतस्थळावरील माहिती http://www.barc.gov.in/leaders/rc.html
.
२. विकिपेडियावरील डॉ. राजगोपाल चिदंबरम यांची माहिती https://en.wikipedia.org/wiki/Rajagopala_Chidambaram
.
३. भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या संकेतस्थळावरील माहिती http://psa.gov.in/profile/dr-r-chidambaram
.
४. भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू यांच्या संकेतस्थळावरील माहिती https://www.iisc.ac.in/…/06/Biodata-Dr-Chidambaram.pdf
.
५. वॉशिंग्टन टाईम्समध्ये आलेली बातमीः इंडिया ब्लास्टस टेक यू.एस.इंटेलिजन्स बाय सरप्राईज https://www.globalsecurity.org/…/1998/05/980512-wt.htm

. . . . . .

डॉ.चिदंबरम यांना मीही भेटलो आहे आणि त्यांच्या भेटींच्या काही आठवणी माझ्या स्मृतिकोशामध्ये मी जपून ठेवल्या आहेत. डॉ.चिदंबरम मला नेहमीच ओळखीचे वाटत होते, पण त्यांच्या कामाबद्दल मला काहीही माहिती नव्हती. श्री.गोळे यांनी ती सविस्तर दिल्याबद्दल धन्यवाद. मीसुद्धा डॉ.चिदंबरम यांची काही अप्रतिम व्याख्याने ऐकली आहेत. एकदा दिल्लीच्या अतिथिगृहामध्ये योगायोगाने मी त्यांना जेवणाच्या टेबलवर भेटलो होतो, तेंव्हा तिथे आम्ही दोघेच होतो आणि आमचे थोडे मनमोकळे बोलणे झाले होते. म्हणजे त्यांनी आपुलकीने माझी चौकशी केली होती. त्यावेळी डॉ. डॉ.चिदंबरम संचालक झाले नव्हते. त्यानंतर दोन तीन वेळा मला एसएफ इंटरव्ह्यू कमिटीमध्ये त्यांच्या रांगेत बसायला मिळाले होते. तेंव्हाही ते समोर आल्यावर नेहमी हसून ओळख दाखवायचे. उच्च पदावर असल्याचा ताठा ते कधीच दाखवत नसत.
. . . आनंद घारे

५. सर जगदीशचंद्र बोस

वनस्पतींना सुद्धा वेदना भावना असतात हे ज्यांनी सिद्ध केले तसेच पहिल्यांदाच १८९४ सालच्या नोव्हेंबर महिन्यात कलकत्त्यामध्ये बिनतारी लहरींचा वापर करून ज्यांनी नी एक घंटा वाजवून दाखवली.अश्या जगदीशचंद्र बोस यांचे आज पुण्यस्मरण . (३० नोव्हेंबर १८५८- २३ नोव्हेंबर १९३७).
सर जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकीविज्ञ व वनस्पती शरीरक्रिया- वैज्ञानिक. वनस्पतींच्या वृद्धीचे व प्रकाश, विद्युत्, स्पर्श यांसारख्या बाह्य उद्दीपनांना मिळणाऱ्या वनस्पतींच्या प्रतिसादांचे मापन करण्याकरिता त्यांनी केलेल्या आद्य कार्याकरिता प्रसिद्ध होते .

बोस यांचा जन्म बंगालमधील (आता बांगला देशातील) मैमनसिंग येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथील सेंट झेवियर कॉलेजमध्ये झाले. कलकत्ता विद्यापीठाची बी.ए. पदवी मिळविल्यानंतर ते वैद्यकाचा अभ्यास करण्यासाठी लंडन विद्यापीठात गेले. तथापि शिष्यवृत्ती मिळाल्याने ते केंब्रिज विद्यापीठात निसर्गविज्ञानाचा अभ्यास करण्याकरिता गेले. तेथे लॉर्ड रॅली या सुप्रसिद्ध भौतिकीविज्ञांच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ मिळाला. १८८४ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पदवी संपादन केली. त्यानंतर १८८५ मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. या पदावर नेमणूक होणारे ते पहिलेच भारतीय असल्यामुळे सुरुवातीला त्यांना वर्णभेदाला तोंड द्यावे लागले; पण काही वर्षांनंतर त्यांची योग्यता ओळखल्यावर असामान्य शास्त्रज्ञांत त्यांची गणना होऊ लागली. १९१५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर कलकत्ता विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९१७ साली कलकत्ता येथे त्यांनी बोस रिसर्च इन्स्टिट्यूट ही संशोधन संस्था स्थापन केली आणि मृत्यूपावेतो तिचे संचालक म्हणून त्यांनी काम केले.

बोस यांनी १८९५ मध्ये अतिशय लघू तरंगलांबी असलेल्या रेडिओ तरंगांच्या प्रकाशसदृश गुणधर्मांसंबंधी [प्रणमन व ध्रुवण; ⟶ प्रकाशकी] काटेकोर प्रयोग केले व त्यामुळे त्यांची किर्ती सर्वत्र पसरली. विद्युत् ऊर्जा प्रेषणासंबंधी त्यांनी केलेले कार्य जे. सी. मॅक्सवेल व एच्. आर्.हर्ट्‌झ यांच्या कार्याचा विस्तार करणारे होते. या कार्यातून रेडिओ संदेशवहनाच्या शक्यतेत त्यांना रस निर्माण झाला आणि त्यांनी याबाबत केलेले काही प्रयोग एम्.जी. मार्कोनी यांच्या प्रयोगांशी समकालीनही होते. १८९५ मध्ये त्यांनी कलकत्त्यात रेडिओ संदेशवहनाचे प्रात्यक्षिकही करून दाखविले होते, असे म्हटले जाते. या प्रयत्नांतून त्यांनी त्या काळी रेडिओ तरंगांच्या अभिज्ञानासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी) वापरण्यात येणाऱ्या लोहचूर्णयुक्त नलिकाकार उपकरणात सुधारणा केल्या. या सुधारणा ⇨घन अवस्था भौतिकीच्या विकासात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

काही अजव पदार्थ विविध उद्दीपनांना देत असलेल्या प्रतिसादांचे जैव प्रतिसादांशी असलेले साम्य बोस यांच्या लक्षात आले. या निरीक्षणावरून प्राणी व वनस्पती यांच्या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांच्या) वर्तनांची तुलना करण्याकडे त्यांचे लक्ष ओढले गेले आणि उर्वरित आयुष्यात त्यांनी याच्याच अभ्यासावर विशेष भर दिला. त्यांनी या विषयावर लिहिलेल्या निबंधांना व दिलेल्या व्याख्यानांना व्यापक मान्यता मात्र मिळाली नाही. १९०१ मध्ये व १९०४ मध्ये त्यांन लंडनच्या रॉयल सोसायटीला सादर केलेले या विषयावरील निबंध स्वीकारण्यात आले नाहीत. याचे अंशतः कारण म्हणजे त्यांनी या निबंधात विषयाचे तत्त्वज्ञानात्मक विवरण केलेले होते. तथापि वनस्पतींच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी योजलेल्या वनस्पतींच्या अतिसूक्ष्म हालचालींची नोंद करणाऱ्या अतिशय संवेदनशील स्वयंचलित उपकरणांबद्दल आणि या उपकरणांच्या साहाय्याने त्यांनी विविध उद्दीपनांमुळे होणाऱ्या वनस्पतींतील सूक्ष्म बदलांविषयी सातत्याने जमा केलेल्या माहितीबद्दल त्यांची किर्ती जगभर पसरली. वनस्पतींच्या वाढीचे एक कोटी पट विवर्धन करू शकणारे क्रेस्कोग्राफ हे स्वयंचलित उपकरण त्यांनी तयार केले होते. या उपकरणाच्या साहाय्याने बोस यांनी वनस्पतींनाही संवेदनाग्रहणक्षमता (उदा., इजा झालेल्या वनस्पतींचे थरथरणे) असते, असे प्रयोगांनी दाखवून दिले. यावरून आधुनिक जीवभौतिकीविज्ञांना आता आढळलेल्या वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या ऊतकांतील संवेदनाग्रहणातील साम्यासंबंधी बोस यांना अगोदरच अंदाज आलेला होता, असे दिसून येते.

केंब्रिज विद्यापीठाने त्यांना १८९६ मध्ये सन्माननीय डी.एस्‌सी. पदवी दिली व रॉयल सोसायटीने त्यांना १९२० मध्ये सदस्यत्व बहाल केले. ब्रिटिश सरकारने १९१७ साली त्यांना ‘नाइट’ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी युरोप व अमेरिकेत दौरे करून अनेक व्याख्याने दिली. त्यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन-लिव्हिंग (१९०२), प्लँट रिस्पॉन्स ॲज ए मीन्स ऑफ फिजिऑलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन (१९०६), द मोटर मेकॅनिझम ऑफ प्लँट्स (१९२८) वगैरे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचे संशोधनपर निबंध कलेक्टेड फिजिकल पेपर्स या शीर्षकाखाली त्यांनीच स्वतः संकलित करून १९२७ मध्ये प्रसिद्ध केले. ते अतिशय देशाभिमानी होते व भारतीयांनी आपल्या महान सांस्कृतिक परंपरेत वैज्ञानिक संशोधन करून भर घालावी, अशी त्यांची उत्कट इच्छा होती. त्यांनी कलकत्ता विद्यापीठात आणि नंतर बोस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनाला अतिशय प्रोत्साहन दिले. ते बंगालमधील (आता बिहारमधील) गिरिडी येथे मृत्यू पावले.(मराठी विश्वकोष )

हेन्रिच हर्ट्झला पहिल्यांदा सापडलेल्या बिनतारी लहरींचा म्हणजेच रेडिओ वेव्हजचा अभ्यास पुढे आपल्याच जगदीशचंद्र बोस (१८५८-१९३७) यांनी १८९४ साली सुरू केला. त्याच वर्षी दुर्दैवानं अतिशय प्रतिभावान असलेला हर्ट्झ वयाच्या ३७ व्या वर्षीच मरण पावला होता. बोसनी तीन भिंतींचं अंतर पार करून हे बिनतारी संदेश एकीकडून दुसरीकडे हवेतून जातात हे दाखवूनसुद्धा दिलं. या कामाची रॉयल सोसायटीनं दखल तर घेतलीच; पण त्याचबरोबर लंडन विद्यापीठानं बोसना मानद डॉक्टरेटसुद्धा प्रदान केली. हे सगळं असूनसुद्धा बोसना त्यांचं स्वत:चंच कॉलेज अपमानास्पद वागणूकच द्यायचं, आणि त्यांच्या संशोधनात अडथळे आणायचं.

माधव विद्वांस

श्री.माधव विद्वांस आणि फेसबुकवरून साभार दि. २४-११-२०२१

**************

६. श्रीनिवास रामानुजन

पूर्ण नाव श्रीनिवास रामानुजन अय्यंगार
जन्म २२ डिसेंबर १८८७ एरोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू २६ एप्रिल, १९२० (वय ३२) मद्रास, ब्रिटिश भारत
निवासस्थान कुंभकोणम
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र गणित
प्रशिक्षण ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, युनायटेड किंग्डम
डॉक्टरेटचे मार्गदर्शक जी.एच्.हार्डी
ख्याती लांडाउ-रामानुजन स्थिरांक, रामानुजन मूळ संख्या, रामानुजन थीटा फंक्शन
वडील के. श्रीनिवास
आई कोमलताम्मा
पत्नी एस. जानकीअम्मा

श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, २२ डिसेंबर १८८७; – कुंभकोणम, २६ एप्रिल १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे सतत गणिताचा विचार करीत असत. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

जन्म व संशोधन
या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. रामानुजन यांना गणिताचं इतकं वेड होतं की ते गणित सोडून इतर विषयाचा अभ्यास नीट करत नसत. परिणामी अकरावीला एकदा आणि बारावीला दोन वेळा ते नापास झाले. [१]

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच . हार्डी एका मोटारीतून गेले, त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९. हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी ‘नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.’ असं सांगितलं.
१२^३+१^३=१७२९
आणि
१०^३+९^३=१७२९.
तेव्हापासून १७२९ या संख्येला हार्डी – रामानुजन संख्या म्हटले जाते . १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्स मध्ये नापास झाले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या. एका वहीमध्ये ३५१ पाने होती. त्यांत १६ धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत,अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये २५६ पाने होती. त्यातील २१ स्पष्ट होती, तर १०० पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता . तिसऱ्या वहीमध्ये ३३ पाने अव्यवस्थित होती . सांगत होते

मृत्यू

शारंगपाणीजवळच्या रस्त्यावर, कुंभकोणम येथे रामानुजनच्या घरी
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले.

विकीपीडियावरून साभार . . . दि. २२-१२-२०२१

*************************

७. विश्वकर्म्यांच्या कथा

८.डॉक्टर हिम्मतराव बावसकर

या वर्षी प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांची माहिती देणारा डॉ.अनिल अवचट यांनी लिहिलेला लेख इथे संग्रहित करीत आहे. दुर्दैवाने डॉ.अवचट यांचे अलीकडेच दुःखद निधन झाले. डॉ.बावसकर यांनी आयोडीनयुक्त मिठाबद्दल लिहिलेल्या लेखाचे कात्रणहि खाली जोडले आहे.

विंचू दंशावर औषध उपचार शोधणारे डॉक्टर हिम्मतराव बावसकर
लेखक : डॉ.अनिल अवचट

ह्या विंचवाला उतारा!
     मी अभय बंगवर लेख लिहिला नसता, तर माझी डॉ. बावस्करांची ओळखही झाली नसती. मी राणी, अभयच्या (बंग) कामावर आणि संशोधनावर लेख लिहिला. तो वाचून महाडच्या डॉ. गोखल्यांचं पत्र आलं की “आमच्या महाडमध्येही असाच एक संशोधक आहे. ज्याचं संशोधन लॅन्सेट’ (जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल) मध्ये प्रसिद्ध झालंय. मला आश्चर्यच वाटलं. ” कारण लॅन्सेटमध्ये ओळ छापून यायलाही फार लायकी लागते. मी ताबडतोब त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांचे पेपर्स मागवून घेतले. ते वाचताना थक्कच झालो. मग महाडला त्यांना भेटायला गेलो. नतर तेही घरी आले. बावस्करांकडे पाहिलंत तर, जगप्रसिद्ध संशोधक तर दूरच, पण ते डॉक्टरही वाटणार नाहीत. रस्त्याने जाताना जी ‘साधी’ माणसं दिसतात, त्यातले एक. उभट चेहरा, चष्मा, कपाळ थोडं पुढे आलेलं, केस दोन्ही बाजूंनी मागे गेलेले, दात किंचित पुढे. उंच, शिडशिडीत, बोलण्याला खेडूत वळण. त्याच वळणाची इंग्रजी वापरायची अतोनात हौस, बोलताना थोडं थांबून ‘काय, आलं का लक्षात’, म्हणून नंतर काही वेळ गूढ शांतता निर्माण करायची शैली; अशी त्यांची वैशिष्ट्यं. पण या साध्या माणसाचा पराक्रम समजून घेतला तेव्हा वाटलं, क्या बात है, निसर्गात प्रत्येक माणसाचं डोकं कसं वेगळं घडलेलं असतं !
      बावस्कर मराठवाड्यातले, एम्. बी. बी. एस्. नागपूरला झाले. आणि नोकरी करायला आले कोकणात, महाड जवळच्या बिरवाडी गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात. थोरले भाऊ कोकणातच जांभूळपाड्याला ॲग्रिकल्चर सुपरवायझर म्हणून नोकरी करीत होते. भाऊ आणि ते बिरवाडीला निघाले. वाटेत पालीच्या देवळात रात्रीचा मुक्काम केला. भाऊ म्हणाला, “खाटा मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं. पण जरा जपूनच राहा. रात्री दिव्याशिवाय इकडं तिकडं जाऊ नको. इथले विंचू फार विषारी असतात. ते चावले तर माणूस मरतोच.”
बावस्करांना आश्चर्य वाटले. एकतर त्यांच्या गावाकडे विंचू होते. पण चावला तरी काही काळ झिणझिण्या येऊन नंतर तो उतरत असे. आणि विंचवाने माणूस मरतो हे एम्. बी. बी. एस्. च्या कुठल्याही पुस्तकात लिहिलं नव्हतं. आणि सांगितलंही गेलं नव्हतं. ते विचार करीत पडले, उद्या अशी केस आपल्याकडे आली तर आपण काय करणार आहोत ? आणि खरोखरीच ते बिरवाडीला आल्या आल्या कळलं की पाचच दिवसांपूर्वी एक मुलगी विंचू चावून मेली. ती आबा बागडे नावाच्या सरपंचांची १८ वर्षांची मुलगी. बावस्कर त्यांना भेटायला गेले. विंचू चावल्यापासून तो ती मुलगी जाईपर्यंत काय काय, कसं कसं झालं ते विचारलं. उलट्या, घाम, दम लागला. खोकला सुरू झाला. थुंकीतून रक्त पडत होते, एवढे कळले. त्यावरून यांना खुलासा काही प्राप्त झाला नाही. पण ‘मुलगी शेवटपर्यंत बोलत होती’ हे ऐकल्यावर त्यांनी एक निष्कर्ष काढला की सेंट्रल नर्व्हस सिस्टीम (मेंदू – मज्जारजू – मज्जातंतू ) ला बाधा झाली नव्हती.
      मग त्यांनी जवळच्या गावामधल्या डॉक्टरांना विचारले. काहीजण म्हणाले, ‘विषामुळे रक्ताचे पाणी होतं’. काही म्हणाले, ‘आम्ही अशा केसेस ठेवूनच घेत नाही. आल्या आल्या परत पाठवतो.’ थोडक्यात तिकडूनही काही कळेना. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे अशा केसेस येतात. आधीच्या डॉक्टरांच्या काही नोट्स मिळतात का, म्हणून त्यांनी मागचे केसपेपर्स काढले. पण ते इतके त्रोटक, की काही समजेना. मोदी या लेखकाच्या टॉक्सिकॉलॉजीच्या पुस्तकात डॉ. मुंडले यांचा संदर्भ मिळाला. योगायोगाने ते जवळच्या गोरेगाव या गावी राहत होते. त्यांचा ६१ साली ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये लेख आला होता. त्यात त्यांच्या १४ वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये विंचू चावल्याच्या ७८ केसेस आल्या आणि त्यातल्या २३ दगावल्या, असे होते. बावस्कर त्यांना भेटलेही.
बावस्करांकडे अशा केसेस येऊ लागल्या.
      ते अशा केसेसवर पुस्तकात दिलेले उपचार करायचे. पण उलट त्या झपाट्याने जायच्या. ते जवळच्या अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलला केसेस घेऊन जायचे; पण डेडबॉडी घेऊन परत यावे लागे. आठवड्यात दोनदोन मृत्यू त्यांच्या दवाखान्यात या कारणाने होऊ लागले. बावस्करांचं डोकं फिरायची पाळी आली. त्यांनी काही केसेस पुण्याला, मुंबईला प्रसिद्ध हॉस्पिटलकडे पाठवल्या. पण अगदी अद्ययावत आयु. सी. यू. (इन्टेंसिव्ह कार्डियक युनिट)मध्ये. अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पुढ्यातही माणसे जायची, पण ते काही करू शकत नसत.
      बावस्कर सांगत होते, “लहान लहान मुलं यायची. खेळताना दगड उचलायला जायचे आणि विंचू चावायचा. मोठी तगडी माणसं यायची. कुणी अनवाणी असल्याने पायाला विंचू चावायचा. शेतात गवताची गंजी उचलायला गेले की चावला विंचू, खणायला गेले विंचू. उबेसाठी गवताच्या छतात विंचू असतात, ते खाली पडतात आणि चावतात. बुटात जाऊन बसतात. कपड्यांच्या खिशात जाऊन बसतात. आणि चावला की माणूस चाललाच वर ! तिथले लोक सांगायचे मला की विंचू चावला की आम्ही एकीकडे मयतीची तयारीच करू लागायचो. एक लग्न तर शहरात झालं. मुलीचं गाव इकडचं. म्हणून देवदर्शनाला ती इथल्या खेड्यात आली आणि इकडे विंचू चावला. दोन दिवसांत ती नवीन लग्न झालेली तरुण मुलगी बघता बघता गेली. लहान मुलं जायची, तेव्हा मला फार वाईट वाटायचं. दोन दिवस त्यांच्या उश्या-पायथ्याला मी बसायचो, हातपाय चेपून द्यायचो. त्यामुळे जवळीक निर्माण होतेच ना. ते मूल गेलं की

नातेवाईक रडायला लागायचे, त्याबरोबर मीही रडायचो.’ मी विचारलं, “पण हा विंचू आहे तरी कसा ? आम्ही इंगळी म्हणतो तसा का ?
     ते म्हणाले, “लोकांचा गैरसमज आहे. इंगळीने माणूस मरत नाही. हा छोटा, लालसर विंचू असतो. ‘मेसोबथस रॅम्युलस’ असं त्याचं पुस्तकातलं नाव आहे.” त्यांनी उठून त्यांच्या आतल्या खोलीतून दोन बरण्या आणल्या. त्यात फारमॅलिनच्या द्रावात एकेक विंचू ठेवला होता. एक मोठ्ठी काळी इंगळी ठेवली होती. दुसरा कुठेही दिसतो तसा साधा विंचू होता. बावस्कर म्हणाले, “विषारी आहे की नाही हे ओळखायची एक खूण आहे. नांगी जाड आणि पुढचे, ज्यात तो भक्ष्य पकडतो ते पाय लहान किंवा पातळ, तर विंचू विषारी. आता इंगळी बघा. पुढचे पाय खूप जाड आहेत. पण नांगी पातळ आहे. बिनविषारी.”
     मला नांगीच्या शेवटी शेंगदाण्याच्या आकाराची ग्रंथी आणि त्याला हुकासारखा काटा दिसला. तो पुढे कसा आणून मारत असेल असा प्रश्न पडला. बावस्कर म्हणाले, “तो उलटा, मागे मारतो. धोका वाटला, तर मागे नांगी मारून तसेच पुढे पळून जातो. हा माणसाच्या आधी लक्षावधी वर्ष जन्मलेला चिवट प्राणी. अणुबॉम्बच्या स्फोटानंतर फक्त हाच प्राणी तिथं जिवंत राहिला. जग कशामुळे नष्ट झालं तरी हा जगेल असं संशोधक म्हणतात. तीन तीन महिने अन्न नाही मिळालं तरी जगू शकतो. परत हा कॅनिबल आहे. “म्हणजे ?” स्वतःच्या जातीला खाऊ शकतो.
     नंतर मी एक लेख वाचला. त्यात होतं, विचवाचे नर मादी, आपण बॉल डान्स करतो तसे प्रियाराधन करतात. पण समागम झाल्यावर मादीला इतकी भूक लागते की ती त्या नर विंचवालाच खाऊन टाकते. ‘विंचवाचे बिहाड पाठीवर’ अशी म्हण आहे. त्याप्रमाणे खरोखरीच पाठीवर पिल्लांना घेऊन ‘विंचवीण’ इकडून तिकडे जात असते. पण ती पिलेही तिला खातात. माझ्या मित्राने पाहिलेले दृश्य सांगितले. विंचवाची छोटी छोटी पिल्ले विचविणीच्या पाठीवर होती आणि तिला पिल्ले खात राहिल्याने ती अगदी पांढरीफटक (पारदर्शक) पडली होती आणि मरायच्या वाटेवर होती.’
      बावस्करांनी त्या वेळच्या कात्रणांची फाईल दाखविली. तिथली जिल्हा, तालुका छोटी छोटी वर्तमानपत्रे. पण त्यात अधून मधून बातम्या याच. ‘विचू- दंशाने अमुक मृत्युमुखी’. बावस्करांनी हाफकीन इन्स्टिट्युटला लिहिले, याच्यावर काही ‘अँटीव्हेनॉम’ (विषाचा उतारा) आहे का ? त्यांचे नकारार्थी उत्तर आले. जगात असे अँटीव्हेनॉम आहे; पण ते तेवढे परिणामकारक नाही. असे विषारी विंचू भारतातल्या कोकणपट्टीत आहेत, कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात आहेत, आंध्र, इस्रायल, सौदी अरेबिया, ब्राझील व मेक्सिको येथे आहेत. हे अँटिव्हेनॉम खूप महाग, भारतात उपलब्ध नाही. म्हणून तोही रस्ता बंद झाला. शहरात पाठवून उपयोग नाही. कार्डियॉलॉजिस्टच्या समक्ष माणसं मरत होती. काही प्रवासात मरत होती. मग बावस्करांनी ठरवलं की आता पेशंट कुठेही पाठवायचे नाहीत. जे काही व्हायचं ते इथंच होईल. उपाय सापडो न सापडो. आपण या केसेसची निरीक्षणं तर करून ती संग्रहित करूया. म्हणून मग ते पेशंट आला की मुक्काम दवाखान्यातच करून दहा-दहा मिनिटांनी नाडीचे ठोके, श्वासोच्छ्वासाचा दर मोजत, ब्लडप्रेशर घेऊन ठेवत. स्टेथॉस्कोपने हृदयाची, फुप्फुसाची परिस्थिती नोंद करून ठेवू लागले.
      त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटपैकी चाळीस ते पन्नास टक्के पेशंट मृत्यू पावत होते. जे वाचत होते, त्यांच्यावरून दिसत होते, की विंचू चावलेल्या सर्वच पेशंटना चावल्याच्या जागी प्रचंड वेदना होत असत. आणि त्यापुढे त्यांचे दुखणे जात नसे. आपोआप उतार पडून ते वाचत. काहींच्या वेदना थांबत, पण ते बरे व्हायच्या ऐवजी रोगाच्या पुढच्या टप्प्यावर जात आणि तिथून गुंतागुंत सुरू होई. काही आणखी पुढच्या टप्प्यावर जाऊन मृत्युजवळ जात. तर काही परत येत. परत येताना त्यांच्या वेदना परत सुरू होत. आणि मग काही तासांनी त्यांना उतार पडत असे. या वेदना परत येणे हे चांगले चिन्ह, ही बावस्करांना चालना देणारी बाब ठरली.
   असं का होतं ?
बरं, जी काही गुंतागुंत होई, त्यावरून एक गोष्ट उघड झाली की विषाची सर्व ॲक्शन हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होते. सापाच्या विषाच्याबाबत ती मज्जासंस्थेवर – नर्व्हस सिस्टिमवर असते. विंचवाच्या विषामुळे काही पेशंटमधे बरोबर उलटं म्हणजे ती ॲक्शन खूप कमी व्हायची. ब्लडप्रेशरचं ही तसेच. काहींचं वर चढायचं तर काहींचं खूपच कमी झालेलं असायचं. हातपाय गार पडलेले असायचे. खोकला सुरू होई. मरणारांच्या सर्वांच्या तोंडाने फेस येत असे. त्यात लालभडक, शुद्ध रक्तही दिसे.

आपल्या शरीरात मध्यवर्ती अशी मज्जासंस्था आहे. (सेंट्रल नर्व्हस सिस्टिम) त्यात मेंदू, मज्जारज्जू आणि स्नायू, त्वचा आदीपर्यंत जाणारे मज्जातंतू आहेत. आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. तशीच मज्जासंस्थेला समांतर, पण आपले नियंत्रण नसलेली दुसरी एक मज्जासंस्था आहे. तिचे नाव ऑटॉनॉमिक नर्व्हस सिस्टिम (स्वायत्त मज्जासंस्था) त्यातही दोन प्रकार आहेत. एक सिंपथॅटिक आणि दुसरी पॅरासिंपथॅटिक, दोन्हीच्या ॲक्शन्स एकमेकांविरोधी आणि त्यामुळे तोल साधणाऱ्या.
     या विंचूदंशानंतर विविध प्रकारची चिन्हे दिसत. काही पॅरासिंपथॅटिक मज्जासंस्था उत्तेजित असल्याची, तर काही सिंपथॅटिकची. बावस्करांनी त्यांची प्रतवारी करून ठेवली. काहींना खूप घाम येत असे. उलट्या होत असत, लाळ गळत असे. पुरुषांचे, लहान मुलांचे लिंग ताठ होत असे. (याला प्रायोपिझम म्हणतात). बुबुळाचे मधले वर्तुळ विस्तारत असे. ही सगळी पॅरासिंपथॅटिक उत्तेजित झाल्याची चिन्हं. पुढची ब्लडप्रेशर, हार्टरेट वगैरे सगळी सिंपथॅटिक उत्तेजनाची चिन्हं.
     शेवटी पेशंटच्या तोंडात फेस येतो. त्याचे कारण बावस्करांनी निश्चित केले की हा पल्मनरी इडिमा. म्हणजे फुप्फुसात पाणी साठतेय. हे प्लुरसी नव्हे. प्लुरसीमध्ये फुप्फुसाच्या आवरणात पाणी साठते. इथे चक्क फुप्फुसात असते. याचा अर्थ हृदय इतके फेल झालेय की त्याच्या आकुंचन-प्रसरणातून फुप्फुसात शुद्ध झालेलं रक्त ते ओढून घेऊ शकत नाही. म्हणून फेसावाटे जे रक्त येई, ते ऑक्सिजन मिळालेले शुद्ध, तांबडेजर्द रक्त असे. मृत्यूकडे जायचा शेवटचा टप्पा म्हणजे पल्मनरी इडिमा.

या सगळ्याचा उलगडा करायला बावस्करांकडे काही साधने नव्हती. ते साध्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरचे एक डॉक्टर. स्टेथोस्कोप आणि ब्लडप्रेशर ॲपरॅटसशिवाय काहीच हाताशी नाही. (मधल्या काळात ते एम्. डी. झाल्यावर इ. सी. जी. मशीन कामी येऊ लागले. पण ते तेवढेच.)
     त्यांनी एक निश्चित केलं, की या विषामुळे सर्व ऑटॉनॉमिक नर्व्हस सिस्टिमच ‘स्टॉर्म’ मधे जातेय. उत्तेजित होतेय. यातल्या पॅरासिंपथॅटिक उत्तेजनाकडे त्यांनी दुर्लक्ष करायचं ठरवलं. पेशंटला घाम येतो. लाळ खूप गळते किंवा उलट्या होतात. त्याने पाणी शरीराबाहेर जातं. असं असलं तरी तोंडातून पाणी घेऊन तो तोटा भरून काढता येईल. प्रायोपिझमने शरीराचं काहीच बिघडत नाही. खरी धोकादायक ठरतील, ती सिंपथॅटिकची लक्षणे.

पण पुस्तकात जी ॲट्रोपिन, अँटिहिस्टॅमिनिक्स औषधे द्यायला सांगितली होती, ती या पॅरासिंपथेटिक उत्तेजनाला विरोध करणारी. त्यामुळे ती लक्षणे ब्लॉक व्हायची. पण त्याने सिंपथॅटिक सिस्टीम आणखीनच उत्तेजित व्हायची. (कारण या दोन्ही सिस्टिम परस्परविरोधी काम करीत असतात.) त्यामुळे पेशंट झपाट्यानेच मृत्यूकडे जायचा. ते उपचार प्रथम बावस्करांनी थांबवले. काय करायचं नाही, ते निश्चित झाले. टेक्स्टबुक्स प्रमाण मानून आपण चालतो, ते बहुतेक वेळी सही ठरत असलं तरी इथे ते मृत्यूची वाटच दाखवीत होते.
     सिंपथॅटिकच्या बाबतीत त्यांनी कशातून काय होत जाते याचा अभ्यास केला. मला बावस्कर समजावून सांगत होते. ते झपाट्याने खूप तांत्रिक शब्द वापरीत, उड्या मारीत पुढे जात. मी त्यांना थांबवून एकेक समजावून घेई. जे डोळ्यासमोर उभे राहिले, ते अगतिक हृदय. (साहित्यिक अर्थाने नव्हे.) मला या हार्ट, कार्डिओग्रॅममधल्या टर्म्स कळत नाहीत. पण या सगळ्यातून मी उलटीकडून विचार करू लागलो, तसा उलगडा होत गेला. बावस्करांना विचारलं, असंच होतं का ? त्यांनीही मान डोलावली. यात माणूस कशामुळे जातो ? तर पल्मनरी इडिमामुळे, म्हणजे तोंडातून रक्तमिश्रित फेस यायला लागतो तेव्हा. हा इडिमा किंवा फुप्फुसाला सूज कशामुळे येते ? तर फुप्फुसात शुद्ध झालेले रक्त हृदय खेचू शकत नाही. तसे का करू शकत नाही ? तर ते फेल्युअरमधे गेलेले असते. त्यातल्या स्नायूंची ताकद संपून ते शिथिल झालेले असते. ते फेल्युअरमधे का जाते ? तर हातापायांच्या, परिघावरच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावलेल्या असतात. त्या तशा का आकसतात ? तर विंचवाच्या विषामुळे ॲड्रेनल ग्लँड उत्तेजित होऊन, भरपूर ॲड्रेनलिन रक्तवाहिन्यात ओतले जाते म्हणून.
     काय होतंय त्याचा उलगडा तर झाला.
      पण काय करायचं हा प्रश्न होताच. रूढ असलेली ॲट्रोपिन ट्रीटमेंट तर त्यांनी बंदच केलेली. पुण्याला बी. जे. मेडिकलच्या, मुंबईत के. ई. एम्. , जे. जे., हाफकिन इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीत अधूनमधून शनिवार रविवार ते जात आणि सगळी जर्नल्स् वाचून काढीत. जे अँटिव्हेनॉम म्हणून परदेशात वापरले जात होते, त्याच्याही मर्यादा त्यांच्या ध्यानात येत होत्या. तिकडे परदेशांतही अँटिव्हेनॉम दिले तरी पुढे हृदयाबाबतच्या होणाऱ्या परिणामांसाठी पेशंट्सना आय. सी. यू. (इन्टेंसिव्ह कार्डियक युनिट) मधे ट्रीटमेंट द्यावी लागत होतीच. कारण सापाप्रमाणे हे विष पसरत जाऊन नुकसान करणारे नव्हते (म्हणूनच विंचू चावल्यावर पट्टी बांधून टुर्निकेटचा उपयोग होत नसे) तर जो ऑटॉनॉमिक नर्व्हस सिस्टिमला विषाचा झटका बसला आणि ॲड्रेनलिन रक्तात ओतलं गेलं की पुढची गुंतागुंत आपोआपच साखळी प्रक्रिया सारखे चालू होत राही. ती परतवण्याला काहीच इलाज सापडत नव्हता.
     हार्ट फेल्युअरची एरवी ‘डिजिटॅलिस’ वगैरे औषधंही लागू पडत नसत. थोडक्यात रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर म्हणजे औषधांना दाद न देणारे ‘कोडगे’ हार्ट फेल्युअर होते.
      बावस्कर पुण्याला येऊन एम्. डी. करून गेले. त्या काळात आय. सी. यू. चा अनुभव घेतला होता. तिथल्या उपाययोजना अंगवळणी पडलेल्या होत्या. पण तिढा सुटत नव्हता.
      त्यांच्या मनात एकदम कल्पना आली की सगळीकडच्या, विशेषतः परिघावरच्या (पेरिफेरल व्हासो कॉन्स्ट्रिक्शन) रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. त्यांना आपण रक्तवाहिन्या प्रसरण पावणारी व्हासोडायलेटर्स औषधे दिली तर ? पण त्यावेळेस ब्लडप्रेशर इतके कमी, म्हणजे ६०च्या आसपास आलेले असते. त्यावेळी ही औषधे दिली तर ब्लडप्रेश आणखी खाली येऊन पेशंट मरून जाईल. पण एक मन सांगत होते की त्या औषधांनी रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या की रक्तपुरवठा सुरळीत होईल. हृदयावरचे (अक्षरशः ) दडपण कमी होईल. त्यामुळे फुप्फुसातले शुद्ध रक्त हृदयाकडे खेचलं जाऊन फुप्फुसाची सूज कमी होईल आणि या सगळ्याने ब्लडप्रेशर कमी व्हायच्या ऐवजी वाढेल. या दोहोतले नेमके काय होईल, ते सांगता येत नव्हते.
     याच सुमारास, म्हणजे ऑक्टो. ८३ मधे, एक मुलगा विंचू चावल्यामुळे ॲडमिट झाला. नांदवी (मुख्यमंत्री ना. मनोहर जोशी यांचं गाव) गावच्या उपसरपंच येळमकर यांचा ८ वर्षांचा मुलगा. रात्री आठ वाजता ॲडमिट झाला. रूटीन ट्रिटमेंटने उतार पडेना. सकाळी नऊ वाजता त्याला पल्मनरी इडिमा डेव्हलप झाला. आता काय होणार, हे उघड झाले.
     बावस्कर सांगत होते, “मी पेशंटला कधी अशा अवस्थेत परत पाठवत नाही. आय ट्रीट हिम टू द डेथ. मी त्यांना म्हटलं, एक औषध आहे माझ्याकडे. पण त्याने ९९ टक्के तो मुलगा जाईल, पण १ टक्का वाचेलही. ते म्हणाले, ‘तुम्ही ते द्या. फक्त एक करा. तो दगावलाच तर माझ्याबरोबर हे मूल घेऊन गावापर्यंत या.’ मी होकार दिला आणि तयारी केली.
सलाईन लावली होतीच. वास्तविक नायट्रोप्रसाईड हे औषध हॉस्पिटलमधल्या आय. सी. यू. तच दिले जाते. पण त्या खेड्यातल्या दवाखान्यात (पोलादपूरच्या रूरल हॉस्पिटलमधे) ते सलाईनमधे मिसळले. बावस्कर नाडीवर हात ठेवून बसले. पाच-पाच मिनिटांनी ब्लडप्रेशर घेत होते. जरा सुद्धा ब्लडप्रेशर आणखी खाली जातंय असं वाटलं, तर सलाईनची ड्रिप लगेच बंद करणार होते. पण ब्लडप्रेशर स्थिर होते. अर्ध्या तासात खोकला थांबला, तीन तासांनी मुलाने पहिला हुंकार दिला. ब्लडप्रेशर वाढत जाऊन नॉर्मलला आलं. परत मुलाला विंचू चावल्याच्या जागी ठणका जाणवू लागल्या. बावस्कर आनंदाने नाचू लागले. उपसरपंचांना कळेना, की वेदना व्हायला लागल्या तर डॉक्टर नाचताहेत का ? बावस्कर म्हणाले, “वाचला तुमचा मुलगा. आता विंचूदंशाने कोणाला मी मरू देणार नाही.” चोवीस तासांनी मुलगा आपल्या पायांनी चालत घरी गेला.
      हे ऐकताना मला अगदी आर्किमिडिजची आठवण झाली. अभय बंगला मी नंतर हे सांगितले. तो म्हणाला, “विज्ञानाच्या प्रगतीच्या सुरुवातीच्या काळात साध्या झोपड्यांमधे कित्येक महत्त्वाचे शोध लागले. याचीच आठवण झाली.
     पण बावस्करांचं पूर्ण समाधान झालं नव्हतं. कारण विंचू चावलेले लोक खेड्यातून त्यांच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येणार. तिथं हे जालीम नायट्रोप्रसाईड कोण देणार ? कुठले तरी सुरक्षित औषध शोधलं पाहिजे.
      त्यांनी पुण्या-मुंबईच्या हृदयरोगतज्ज्ञांना विचारलं, जर्नल्स वाचली. एका जर्नलमध्ये ‘प्राझोसिन’ नावाच्या व्हासोडायलेटरची माहिती आली होती. पुढे त्यात म्हटले होते, की या प्राझोसिनला ‘तोंडाने देता येईल असे नायट्रोप्रसाईड च म्हटले जाते. यावरून बावस्करांनी हिंट घेतली. ड्रगची चौकशी सुरू केली. पण ते अगदी नुकतेच निघालेले ड्रग, भारतात मिळत नव्हते. पण मुंबईचे काही केमिस्ट अशी ड्रग्ज मिळवून देतात, असे ऐकले होते. एका बड्या डॉक्टरांच्या ओळखीने ते त्या केमिस्टकडे गेले. त्याने यांची खातरजमा करून घेण्यासाठी तासभर बसवून ठेवले, नंतर प्राझोसिनच्या गोळ्या हातात ठेवल्या. (आता या गोळ्या अगदी खेड्यातल्या केमिस्टकडेही मिळतात.)
     पोलादपूरला आल्यावर त्यांनी प्राझोसिन वापरून पाहिलं. याला तर सलाईन नको, आणि पाचपाच मिनिटांनी तपासणी नको. चार तासांनी एक गोळी, तोंडातून. (या सगळ्या प्रकरणात पेशंट शेवटपर्यंत जागा असतो, तोंडाने पाणी पिऊ शकतो) आणि काय, पेशंट सुखरूप बाहेर येऊ लागले. त्यांच्याकडे लांबलांबून पेशंट येऊ लागले. बावस्करांच्या सुरुवातीच्या काळात ३० ते ४०
टक्के मृत्यूचे प्रमाण होते, ते ८४ सालात हे औषध सापडल्यावर ६ टक्के झाले आणि ८९ सालात हे प्रमाण शून्यावर आले.
    प्राझोसिनच्या केवळ व्हासोडायलेटर ॲक्शनमुळे कृतीचा उलगडा अधिकाधिक होत गेला. विषामुळे रक्तातली इन्शुलीनची पातळी घसरते. त्यामुळे साखरेचं प्रमाण वाढून हायपर ग्लायसेमिया होतो. प्राझोसिनविषयीच्या लॅब टेस्टमधे सिद्ध झालंय की, त्याने शरीरातलं इन्शुलीन प्रॉडक्शन वाढतं. त्यामुळे उद्भवलेला तो दोष आपोआपच दूर होतो. विषामुळे हृदयाच्या पेशीमधला कॅल्शियम बाहेर येतो, प्राझोसिनमुळे तोही परिणाम उलटा होतो. असे अनेक परिणाम बावस्करांनी मला सांगितले. काही कळले, बरेच कळले नाहीत. एवढं कळलं की यांचा हात अगदी योग्य औषधावर पडलेला आहे.
     नुसता शोध लावून ते थांबले नाहीत. त्याचा लोकांना उपचार व्हायला पाहिजे होता. त्यांच्याकडे तिन्ही जिल्ह्यांतून केसेस यायच्या. त्यात वेळ खूप गेल्यामुळे पेशंट दगावयाचा. त्यांना तिथल्या तिथं दोन-चार तासांत ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. म्हणून त्यांनी सर्व डॉक्टरांना ट्रेन करायचे ठरवले. स्वखर्चाने कोकणात दौरा केला आणि जे कुणी डॉक्टर असतील मग ते एम् . डी. असोत की आर. एम्. पी., एल्. एम्. पी. असोत; त्यांच्याकडे जाऊन लेक्चर्स दिली. इतके सोपे, सुटसुटीत उत्तर मिळाल्यावर गेल्या तीन- चार वर्षात सबंध कोकणपट्टीत माणूस विंचू चावून मेल्याची एकही बातमी स्थानिक पेपरात आलेली नाही. बावस्करांकडे मी गेलो असताना दोन- तीन असे डॉक्टर्स त्यांना भेटायला आले होते. ते म्हणाले, ‘पूर्वी आम्ही अशा केसेस ठेवूनच घेत नसू. आता पेशंट डोलीतून येतो आणि पायांनी चालत जातो.”
     बावस्करांचा स्वभाव जिद्दी आणि कष्टाळू. पण नुसत्या या गुणांवर भागणार नव्हतं. तर ते संशोधक वृत्तीचे आहेत. अभय बंग जिथं शिकला, त्या नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये बावस्कर अभयला ज्युनियर होते. अभय सांगत होता, “आम्हाला त्यावेळी कळलं की फर्स्ट एम्.बी. बी. एस्. ला एक मुलगा आलाय. त्याचं ‘ग्रे’ ॲनॉटॉमीचं अख्खं पुस्तकं पाठ आहे. सिनियर मुलं त्याला बोलायचे. अमुक एक टॉपिक म्हण, की तो घडाघडा सुरू करायचा.” मी ते ऐकून उडालोच. हजाराहून अधिक पानांचा तो ठोकळा आहे. बावस्कर म्हणाले , ‘या पाठांतरामुळं माझे फाउंडेशन पक्कं झालंय.’ सेकंड एम्. बी. बी. एस्. च्या पॅथॉलॉजी परीक्षेत डॉ. के. डी. शर्मा नावाच्या परीक्षकांनी बावस्करांना ब्लडची स्लाईड दाखवली आणि विचारले, ‘ही पुरुषाच्या रक्ताची आहे की स्त्रीच्या रक्ताची ? गडबडलेच. पण मायक्रोस्कोपखाली ती लक्षपूर्वक पाहिली आणि
सांगितले की ही स्त्रीची आहे. डॉ के. डी. शर्मा थक्कच झाले. विचारलं, कशावरून? बावस्करांनी एका पेशीच्या आत (स्त्रीचे क्रोमोसोम्स एक्स-एक्स असल्यामुळे दिसणारे) बार बॉडिज नावाचे अतिसूक्ष्म ठिपके दाखवले. डॉ. शर्मांनी सर्वांना बोलावून घेतलं आणि सांगितले, “बघा हा अंडर ग्रॅज्युएट लेव्हलचा मुलगा हे ओळखू शकलाय.” पुस्तक पाठ करायची. सर्व मनापासून शिकायचं. कष्टा कडे पाहायचे नाही; यामुळे त्यांना विषय पक्के माहीत होते
      या विंचू चावल्याच्या केसेसचे त्यांनी असेच अतिशय कष्ट व काळजीपूर्वक रेकॉर्ड ठेवले. आल्या आल्या ज्या १७ केसेस आल्या. त्यातल्या ५ मृत्यू पावल्या. त्यांची थोडक्यात काय लक्षणे होती अशी माहिती हाफकिनच्या डॉ. गायतोंडेंना कळवली होती. त्यांनी थोडी भर घालून ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील जगप्रसिद्ध जर्नलसाठी पेपर पाठवला. तो गायतोंडे-जाधव- बावस्कर अशा नावाने १९७८ साली प्रसिद्ध झाला . ‘लॅन्सेट’ मधे ओळ छापून येणं परमभाग्याचं. तिथे जे साहित्य येतं. त्यातलं ९८ टक्के साहित्य संशोधनाच्या कसाला न उतरल्याने परत केलं जातं. तिथं याचे नावासहित अख्खे साडेतीन इंच लांबीचं पत्र छापून आले. तिथं बावस्करांना संशोधनाची चव कळली. वास्तविक पाहता डॉ. गायतोंड्यांसारख्या सिनियर माणसाने बावस्करांचे नाव पहिले टाकायला काही हरकत नव्हती. कारण मूळ काम बावस्करांनी केलेले होते. तिथून पुढे मात्र त्यांनी संशोधन एकट्याच्या जिवावर आणि नावावर केलं.
     नंतर ८२ साली, ५१ पेशंटचे रेकॉर्ड समोर ठेवून त्यांनी दुसरा पेपर लिहिला. विंचवाच्या दंशामुळे काय काय आणि कसं कसं होत जातं याचा उलगडा करणारा तो लेख होता. तो स्वतंत्रपणे बावस्कर या नावाने ‘लॅन्सेट’ मध्ये छापून आला. तो अख्खा दीड पानी होता. त्यात यांनी काढलेल्या पल्मनरी इडिमा झालेल्या फुप्फुसाचा एक्स-रेही छापला होता. सुरुवातीला चौदा ओळीत सर्व लेखाचा सारांश द्यावा लागतो, तसा दिलेला होता. चार टेबल्स देऊन वय, स्त्री – पुरुष, त्यांची लक्षणं-चिन्हं, ज्या केसेस गेल्या त्यांचे तपशील असं व्यवस्थित दिलेलं होतं. शेवटी निरीक्षणं मांडल्यावर त्यांची चर्चा केलेली होती.
   मधल्या काळात प्राझोसिनचा उपाय सापडल्यावर त्यांनी ८४ साली दाखल झालेल्या १२६ केसेसवर प्राझोसिन उपचारांचा सज्जड पुरावा दाखल केला. हा पेपर ‘लॅन्सेट’मधे मार्च ८६ मधे छापून आला. जवळपास पाऊण पानाचा हा पेपर होता. यावेळी त्यांच्या नावाखाली आणखी एक नाव होतं, ते त्यांच्या घरी नव्याने दाखल झालेल्या प्रमोदिनीताईंचे, पी. एच. बावस्कर असे.
     जागतिक पातळीवरच्या ‘टॉक्सिकॉलॉजी’च्या क्षेत्रात या पाऊण पानाने प्रचंड खळबळ उडवून दिली. इस्रायलच्या डॉ. एम. गुरियन या तज्ज्ञाचे लगेच पत्र आले. आम्ही तुमच्याशी संपूर्ण सहमत आहोत. आता यापुढे अटिव्हेनॉम द्यायच्या ऐवजी तुमची पद्धत (प्राझोसिन) वापरणार आहोत. बावस्करांनी मला त्यांना आलेल्या पत्रांच्या फाइल्स दाखवल्या. परदेशातनं निरनिराळी विद्यापीठं, संशोधन संस्था, संशोधक यांनी ‘तुमच्या सर्व पेपर्सच्या प्रती पाठविण्याची’ विनंती करणारी शे-दोनशे तरी पत्रं होती. त्या कार्डपाकिटांवरचे स्टॅंप काढले तरी तिकिटांचा मोठा जागतिक संग्रह होईल. मी विचारले, “मग तुम्ही पाठवण्याचे काही चार्जेस घ्यायचे का?”

“नो, नो, नो, नो, इटस् ऑनर. त्यांना तर पाठवायचोच. पण इथल्या सगळ्या मेडिकल कॉलेजेस, संस्था, संबंधित डॉक्टर्स सगळ्यांना मी प्रती पाठवल्या. त्यापायी आतापर्यंत माझा लाखभर तरी खर्च झाला असेल. ती फाईल पाहताना भारतातून आलेले एकही पत्र दिसले नाही. त्याविषयी विचारले. बावस्कर म्हणाले, “हीच दुःखाची गोष्ट आहे. भारतातून मला अद्याप असं एकही पत्र आलेलं नाही. जगातल्या कानाकोपऱ्यातले लोक पेपर मागवतात, ट्रीटमेंटचा फायदा करून घेतात. तसं इथं लोकांना वाटतच नाही. भारतातील संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च अशी आय्. सी. एम्. आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ही सरकारपुरस्कृत मोठी संस्था. त्यांना मी माझे पेपर्स स्वतःच पाठवले. म्हणजे त्यांच्याकडे कुणी विचारणा केली, तर ते पेपर उपलब्ध करून देतील. दोन वर्षांनी मी टेस्ट म्हणून त्यांना पत्र लिहिलं ‘विंचू दंशावर काही साहित्य तुमच्याकडे आहे का ?’ त्यावर उत्तर बघा काय आलंय.” त्यांनी दाखवलेल्या आयु, सी. एम्. आर च्या उत्तरात लिहिलं होतं, की ‘आमच्याकडे या विषयावरचं साहित्य नाही.’ बावस्कर म्हणाले, ‘म्हणजे मी पाठवलेले माझे पेपर्स फेकूनच दिले असणार.’ बावस्करांचे जवळजवळ ३६ पेपर्स आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आले. पण त्यांनी आय. सी. एम्. आर. च्या ए. सी. आय. या जर्नलसाठी पाठवलेला पेपर ‘इंग्लिश चांगले नाही’ या कारणासाठी नाकारला गेला. बावस्कर म्हणाले, “मी इंटरनॅशनल जर्नल्सकडे इतके लेख पाठवले, तर कुणी माझ्या इंग्लिशविषयी तक्रार केली नाही. ती माणसं फार वेगळी आहेत. ओरिजिनल रिसर्च असेल ना, तर दे जंप ऑन इट. इंग्लिश सुधारून घेतात. पण तसं करताना पोलाइटली ‘तुमची भाषा थोडी ॲडजस्ट केली तर चालेल ना,’ असं विचारतात, प्रूफ ॲप्रूव्हलसाठी पाठवतात.
      लॅन्सेटच्या संपादकांचं पत्र होतं, ‘प्रतिकूल वातावरणात तुम्ही केलेल्या संशोधनाचं आमच्याकडे खूप कौतुक होत आहे.’ डी. ए. वॉरेल नावाचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतले ट्रॉपिकल मेडिसीनचे प्रोफेसर आहेत. त्यांनी लिहिलेलं भलं मोठं टेक्स्ट बुक मला बावस्करांनी दाखवले. ते म्हणाले, “वॉरेल ही जागतिक कीर्तीची ॲथॉरिटी आहे. जगभर फिरून विशेषतः सर्पदंशावर त्याने विशेष काम केलं आहे. हे लोक उगाच पुढं येत नाहीत. आपल्यापेक्षा अनेक पटींनी ते काम करीत असतात.” हे वॉरेल बावस्करांच्या प्रेमातच पडले आहेत. त्यांचा बराच पत्रव्यवहार पाहिला. त्यांनी एका पत्रात लिहिलंय, ‘यू हॅव व्हर्च्युअली सॉल्व्हड द प्रॉब्लेम ऑफ लाइफ थ्रेटनिंग स्कॉर्पियन एनुव्हेनॉमेशन’. ती टेक्स्टबुकची प्रत त्यांनी भेट पाठवली. एक त्यांचा विद्यार्थी इंग्लंडहून बावस्करांच्याकडे काही दिवस राहायला पाठवला.
      या संशोधनाची अंगे-उपांगे घेऊन बावस्करांनी अनेक पेपर्स लिहिले. ब्रिटिश हार्ट जर्नल, अनल्स ऑफ ट्रॉपिकल पेडियाट्रिक्स, जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन अँड हायजिन, टॉक्सिकॉन… अशी अनेक. भारतातल्या इंडियन हार्ट जर्नल, बाँबे हॉस्पिटल जर्नल, महाराष्ट्र मेडिकल जर्नलमध्ये त्यांचे लेख आले. इतर डॉक्टरांनी ॲट्रोपिन देऊन हार्ट फेल्युअरमधे गेलेल्या अनेक केसेस त्यांच्याकडे यायच्या. त्यांच्याशी प्राझोसिन दिलेल्या पेशंटची तुलना करून एक पेपर लिहिलाय. त्यातला एक पेपर मला गमतीदार वाटला. एखाद्याला विंचू चावला की तो ओरडतो, त्याला बघायला घरातलं दुसरं कुणीतरी येतं, आणि विंचू कुठे ते बघायला जातं, आणि त्या माणसाला तोच विंचू चावतो. दोघांनाही बावस्करांकडे आणलं जातं. आधीच्या माणसाला थेट हार्ट फेल्युअर, पल्मनरी इडिमापर्यंत दुखणं होतं. नंतरच्या माणसाला फक्त वेदना होतात आणि त्यातनं तो काही तासांनी बरा होतो, अशा त्यांना वीस की एकवीस जोड्या सापडल्या. आणि त्यांनी मांडलं की किती विष शरीरात जातं, यावर पुढचे परिणाम अवलंबून असतात. पहिल्या दंशात बहुतेक विष आधीच्या माणसांच्या अंगात गेलेलं असतात, म्हणून परिणाम खूप होतो.
     लहान मुलांवर सर्वात वाईट परिणाम होतात आणि या सगळ्यात वृद्ध फारसे दिसत नाहीत. यावर बावस्करांचे म्हणणे की वृद्धांमध्ये ॲड्रेनल ग्लँडचं सिक्रिशन संपलेलं असतं. म्हणून विंचू चावला तरी ॲड्रेनलच रक्तात ओतलं न गेल्याने परिणाम काही होत नाहीत. दंशाच्या जागी वेदना होतील तेवढ्याच
केवळ आणि केवळ कुनिर्सात doctor बावसकर सर यांना…

. . . . .

हा लेख डॉ.बावसकरांच्या नावाने लिहिला असला तरी यातील माहितीबद्दल मतभेद आहेत. आयोडाइड मिठाचा आज सर्रास उपयोग केला जात आहे, त्या अर्थी ते नुकसानकारक नसावे असे मला वाटते. . . . . . . . . . आनंद घारे

****************************

९. सत्येंद्रनाथ बोस

सत्येंद्रनाथ बोसः पुंज भौतिकीचे जनक : जन्म १ जानेवारी १८९४, मृत्यूः ४ फेब्रुवारी १९७४

लेखक : श्री.नरेंद्र गोळे, भूतपूर्व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, भाभा परमाणु संशोधन केंद्र

https://vigyanprasar.gov.in/bose-satyendra-nath/

सामान्य अनुभवांना दूरस्थ असलेल्या नैसर्गिक आविष्कारांच्या तपासातून लाभलेला मुख्य मानवी निष्कर्ष म्हणजे, वस्तुनिष्ठ ज्ञान आणि सुयोग्य प्रयोगांद्वारे निसर्गाला प्रश्न विचारून निस्संदिग्ध उत्तरे मिळवण्याचे आपले सामर्थ्य, यांतील अविभाज्यतेस मिळालेली मान्यता होय. – निल्स बोहर

सत्येंद्रनाथ बोस आणि मेघनाद साहा यांनी भारतात आधुनिक सैद्धांतिक भौतिकीची स्थापना केली. बोस यांनी सांख्यिक यामिकी (स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स), पुंज सांख्यिकी (क्वांटम स्टॅटिस्टिक्स), एकाच क्षेत्रसिद्धांताद्वारे सर्व बलांची व्याख्या करणे, क्ष-किरण विवर्तन आणि विद्युत्चुंबकीय लहरींचे मूलकांबरातील परस्परसंबंध या विषयांत लक्षणीय प्रगती घडवली. १९२४ मध्ये बोस यांनी कृष्णवस्तू प्रारण नियम शोधून काढला. मात्र त्याकरता, मॅक्स कार्ल एर्नेस्ट लुडविग प्लँक (१८५४-१९४७) यांनी केला तसा अभिजात विद्युतगतीशास्त्राचा (क्लासिकल एलेक्ट्रोडायनामिक्स) वापर त्यांनी केला नाही. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी केलेल्या, बोस यांच्या कार्याच्या व्यापकीकरणातून (जनरलायझेशन), सांख्यिकी पुंजयामिकी प्रणाली (सिस्टिम ऑफ स्टॅटिस्टिकल क्वांटम मेकॅनिक्स) अवतरली. आता ती ’बोस-आईन्स्टाईन सांख्यिकी’ म्हणून ओळखली जाते. ही प्रणाली ’पूर्णांक फिरत (इंटिग्रल स्पिन), असलेल्या कणांचे वर्णन करते. हे अनेक कण एकच पुंजावस्था (क्वांटम स्टेट) व्यापत असतात. सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरून, अशा कणांना ’बोसॉन’ म्हणूनच ओळखले जाते. यामुळे सत्येंद्रनाथ बोस यांचे नाव आधुनिक भौतिकीचा एक भाग झाले. भौतिकी पाठ्यपुस्तकांत आईन्स्टाईन यांच्यासोबत इतर कुणाचेही नाव एवढ्या स्पष्टतेने जोडले गेलेले नाही. बोस यांचे कार्य खरोखरीच लोकोत्तर आहे. आधुनिक भौतिकीच्या इमारतीचा ते मध्यवर्ती आधारस्तंभ ठरलेले आहे.

बोस हे बहुरूपदर्शकाचे (कॅलिडोस्कोपचे) अष्टपैलूत्व आणि सदाबहार उत्साह यांचा अपवादात्मक संयोग होते. वयाची विशी पार करण्यापूर्वीच त्यांनी गणितीय भौतिकीत एक महत्त्वाचे योगदान दिलेले होते. रसायनशास्त्र, खनिजशास्त्र, जीवशास्त्र, मृदाविज्ञान, तत्त्वज्ञान, पुरातत्त्वशास्त्र, अभिजात कला, साहित्य आणि भौतिकशास्त्रासारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलेले आहे.

भारतात बोस यांचे नाव लोकांना फारसे ज्ञात नाही. भारतीय विज्ञानाची ही अवस्था दुःखदच आहे. जी. वेंकटरामन म्हणतात, ’भौतिकशास्त्रात सत्येंद्रनाथांचे नाव चिरकाल टिकून राहील. दुर्दैवाने भारतातील बव्हंशी लोकांनी त्यांचे नाव कधीही ऐकलेलेच नाही. आपल्या बहुतेक शास्त्रज्ञांनाही त्यांच्या नावाव्यतिरिक्त त्यांचेबाबत फारसे काही माहीत नाही असे आढळले, तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. मी पैज लावायला तयार आहे. तुरळक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ वगळल्यास, आपल्या भौतिकी जगतातील बहुसंख्य शास्त्रज्ञांनाही बोस यांचेबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचे नाव जरी त्यांनी ऐकलेले असले तरी, त्यांच्या कामाचे महत्त्व त्यांना माहीत असेलच असे नाही.’

सत्येंद्रनाथांचा जन्म १ जानेवारी १८९४ साली कोलकात्यात झाला. नादिया जिल्ह्यातील बारा जगुलिया गावी त्यांचे घर होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कोलकाता अजून महानगर म्हणून उदयास आलेले नव्हते. बंगालमधील सांस्कृतिक आणि बौद्धिक घडामोडींचे केंद्र नादियाच होते. नादियातील बोलीभाषेसच पुढे प्रमाण बंगाली भाषा म्हणून मान्यता मिळाली. सुरेंद्रनाथ बोस आणि आमोदिनी बोस यांचे ते सर्वात ज्येष्ठ पुत्र होते. त्यांना सहा बहिणी होत्या. सुरेंद्रनाथ रेल्वेत काम करत असत. सत्येंद्रनाथांचे आजोबाही सरकारी सेवेतच होते. घरानजीकच्या ’नॉर्मल स्कूल’ मध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. याच शाळेत रविंद्रनाथ टागोरही काही काळ शिकत असत. ते पुढे स्वतःच्या घरात राहायला गेल्याने, मग शाळाही बदलावी लागली. यावेळी ते ’न्यू इंडियन स्कूल’ मध्ये भरती झाले आणि पुढे मग ’हिंदू स्कूल’ मध्ये जाऊ लागले.

’हिंदू स्कूल’ मधील गणित शिक्षक उपेंद्र बक्षी एक विख्यात व्यक्ती होते. एकदा त्यांनी एका चाचणी परीक्षेत बोस यांना १०० पैकी ११० गुण दिले. हे काहीसे चमत्कारिकच वर्तन होते. त्याकरता मुख्याध्यापकांनी स्पष्टीकरण मागितले. शिक्षकांना त्यांच्या वर्तनाबाबत जराही खंत वाटत नव्हती. ते उत्तरले, ’सत्येन याने पर्यायी प्रश्नांतील आवश्यक तेवढेच प्रश्न न सोडवता, सर्वच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे, दिलेल्या वेळात पूर्ण केली.’ १९०८ साली ते प्रवेश परीक्षा देणार होते. मात्र परीक्षेच्या दोन दिवस आधी त्यांना कांजिण्या झाल्या. ते परीक्षेला बसूच शकले नाहीत. बोस यांनी हा काळ प्रगत गणित आणि संस्कृत वर्गाचे अभ्यास करण्यात उपयोगात आणला. १९०९ साली ते ’हिंदू स्कूल’ मधूनच प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले.

त्यानंतर ते इंटरमिडिएट सायन्स कोर्स करता कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजात रुजू झाले. इथे त्यांना प्रफुल्लचंद्र रे (१८६१-१९४२) आणि जगदीशचंद्र बोस (१८५८-१९५७) हेही शिकवत असत. इंटरमिडिएट परीक्षा ते १९११ साली उत्तीर्ण झाले. इथे हे नमूद करावे लागेल की या परीक्षेकरता शरीरविज्ञान हाही एक विषय त्यांना अभ्यासाकरता होता. त्यात त्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले होते. १९१३ साली ते प्रथम क्रमांकाने बी.एस.सी ऑनर्स उत्तीर्ण झाले. अलीकडच्या परिभाषेप्रमाणे ते उपायोजित गणित किंवा गणितीय भौतिकीत एम.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झाले. याही परीक्षेत ते पहिलेच आले. एवढेच नव्हे तर ९२% गुण प्राप्त करून त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या इतिहासात नवा उच्चांकही प्रस्थापित केला होता. दोन्हीही परीक्षांत मेघनाद साहा दुसरे आलेले होते. नवीनच सुरू झालेल्या ’युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्समध्ये’ दोघेही व्याख्याते म्हणून रुजू झाले.

सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील बोस यांचे पहिले महत्त्वाचे काम म्हणजे, साहा यांच्यासोबत लिहिलेला ’रेणूंच्या सांत आकारमानाचा प्रावस्था समीकरणावरील प्रभाव (ऑन द इन्फ्लुएन्स ऑफ द फायनाईट वॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स ऑन द इक्वेशन ऑफ स्टेट)’ हा एक शोधनिबंध होता. १९१८ साली ’फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये’ तो प्रकाशित झाला. १९२० साली पुन्हा साहा यांचेसोबत मिळून त्यांनी ’फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये’ ’प्रावस्था समीकरणां’वर एक संयुक्त शोधनिबंध प्रकाशित केला. त्यानंतर १९२० सालीच, बोस यांचा ’वर्णपट प्रारण सिद्धांतावरून राईडबर्ग नियमाचे निष्कर्षण (ऑन द डिडक्शन ऑफ राईडबर्ग्ज लॉ फ्रॉम क्वांटम थेअरी ऑफ स्पेक्ट्रल एमिशन्स)’ हा शोधनिबंध ’फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये’ प्रकाशित झाला.

१९२१ मध्ये डाक्का विद्यापीठाची स्थापना होताच बोस तिथल्या भौतिकशास्त्र विभागात प्रपाठक म्हणून रुजू झाले. डाक्का विद्यापीठातील स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना प्लँकच्या प्रारण नियमाची तत्कालीन पद्धतीने उकल करून दाखवत असतांना, त्यांना ती असमाधानकारक वाटली. साहा यांच्यासोबत त्यावर चर्चा केल्यानंतर बोस यांनी त्याकरता, आईन्स्टाईन यांच्या प्रकाशकण संकल्पनेवर आधारित, समाधानकारक उकल तयार केली. पूर्वीप्रमाणेच त्यांनी आपला शोधनिबंध ’फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये’ प्रकाशित करण्यासाठी पाठवला. मात्र त्यांनी तो नाकारल्यामुळे ते निराश झाले. मग त्यांनी आपला शोधनिबंध ’zeitschrift für physi” या नियतकालिकात प्रकाशित करण्यासाठी पाठवला. हा एक धाडसी निर्णय होता. त्याकरता त्यांनी आईन्स्टाईन यांना लिहिलेले एक पत्र विज्ञानाच्या इतिहासात आता महत्त्वाचा दस्त झाले आहे. ४ जून १९२४ च्या पत्रात बोस लिहितातः

“आपले मत आणि कार्यवाही यांकरता सोबतचा लेख तुम्हाला पाठवण्याचे साहस मी करत आहे. त्याबाबत आपला अभिप्राय जाणून घेण्य़ास मी उत्सुक आहे. आपल्या लक्षात येईल की, केवळ काळ आणि अवकाश यांतील प्राथमिक क्षेत्रे गृहित धरून, अभिजात विद्युत गतिकीनिरपेक्षपणे, प्लँक यांच्या नियमातील सहगुणक शोधून काढण्याचा, मी प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण शोधनिबंधाचा अनुवाद करू शकेन एवढे जर्मन भाषेचे ज्ञान मला नाही. आपल्याला जर हा शोधनिबंध ’zeitschrift für physi” या नियतकालिकात प्रकाशनास योग्य वाटला, तर तशी व्यवस्था करावी. मी त्याकरता कृतज्ञ असेन. आपल्याकरता मी संपूर्णपणे अपरिचित असलो तरी, ही विनंती करतांना मला संकोच वाटत नाही. कारण आम्ही सारेच आपले विद्यार्थी आहोत. आपल्या लिखाणांतून आपल्या शिकवणुकीचा आम्ही लाभ घेत असतो. मागे सापेक्षतेबाबतच्या आपल्या लेखांचा इंग्रजी अनुवाद करण्याची अनुमती कोलकात्याहून कुणीतरी मागितलेली आपणास आठवते काय? आपण तशी अनुमती दिलेली होतीत. आता तर पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. व्यापक सापेक्षतेवरील त्या आपल्या शोधनिबंधांचा अनुवाद मीच केलेला होता.”

आईन्स्टाईन यांनी बोस यांच्या पत्राची दखल घेतली एवढेच नव्हे तर त्यांना आश्वस्तही केले की, ते स्वतः या संशोधनास महत्त्वाचे मानत असल्याने ते त्यास प्रकाशित करवून घेतील. आईन्स्टाईन यांनी स्वतः बोस यांच्या शोधनिबंधाचा जर्मन अनुवाद केला आणि मग तो लेख ’zeitschrift für physi” या नियतकालिकाच्या ऑगस्ट-१९२४ च्या अंकात प्रकाशित झाला. त्याचे शीर्षक होते “Plancksgesetz Lichtquantenhypothese” (प्लँकचा नियम आणि प्रकाशाचे पुंज गृहितक). अनुवादकाचा अभिप्राय म्हणून असे लिहिले होते की, “बोस यांनी काढलेले प्लँक नियमाचे सूत्र म्हणजे प्रगतीच्या दिशेने टाकलेले एक पुढचे पाऊल आहे. इथे वापरलेली पद्धत आदर्श वायूचा पुंजसिद्धांतही देते. मीही हे अन्यत्र दाखवणारच आहे.” अशा रीतीने पुंज सांख्यिकीचा जन्म झाला. इथे हेही नमूद केले पाहिजे की, सांख्यिकी संकल्पनांचा भौतिकीतील प्रवेश, जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१-१८७९) आणि लुडविग एडवर्ड बोल्टझमन (१८४४-१९०६) यांच्या वायूगतिकीसिद्धांतावरील कामामुळे, सुमारे एक शतकापूर्वीच झाला होता. आईन्स्टाईन यांनी बोस यांच्या पद्धतीचा उपयोग, आदर्श पुंज वायू सिद्धांत देण्यासाठी केला आणि बोस-आईन्स्टाईन संघननाच्या आविष्काराचे भाकीतही केले (प्रेडिक्टेड बोस-आईन्स्टाईन कन्डेन्सेशन फिनॉमिनॉन).

जेव्हा बोस पुन्हा एकदा प्लँक यांच्या नियमाची उकल करत होते, तेव्हा मात्र त्यांना याची जाणीवही नव्हती की, ते एक क्रांतीकारक शोध लावत आहेत. प्लँक यांचा नियम माहीत झाल्याला वीसहून अधिक वर्षे होऊन गेलेली होती आणि त्याकरताच्या अनेक उकली अस्तित्वात आलेल्या होत्या. स्वतः आईन्स्टाईन यांनी केलेली एक उकलही त्यात होतीच. जे. मेहरा यांना बोस म्हणाले होते की, “मला कल्पना नव्हती की, मी केलेले काम एक नाविन्यपूर्ण काम आहे. मला वाटे की, वस्तूंकडे पाहण्याचा बहुधा तोच एक दृष्टीकोन आहे. मी खरोखरीच काही मोलाचे करत आहे, हे समजण्याएवढा मी सांख्यिकी तज्ञ नव्हतो. मात्र बोल्टझमन यांनी त्यांची सांख्यिकी वापरून जे काही केले असते, त्याहून ते खरोखरीच निराळे होते. प्रकाशाच्या पुंजांना केवळ कण मानण्याऐवजी, मी त्यांना अवस्था समजून त्यांविषयी बोलत असे. कसेही असले तरी, मी आईन्स्टाईन यांना भेटलो होतो, तेव्हा त्यांनी विचारलेला प्रश्न हाच होता की, प्लँक यांचे सूत्राप्रत पोहोचण्याकरता, मी या पद्धतीपर्यंत कसा पोहोचलो? प्लँक आणि आईन्स्टाईन यांच्या प्रयासांतील विरोधाभास मी हेरला आणि माझ्या पद्धतीने सांख्यिकीचा वापर केला. मात्र ते बोल्टझमन यांच्या सांख्यिकीहून निराळे आहे असे मी मानत नव्हतो.” इथे त्याची नोंद करावी लागेल की, अगदी आईन्स्टाईनही, बोस यांच्या संकल्पनेचे संपूर्ण सामर्थ्य जाणू शकले नव्हते आणि उपायोजन संभावनांचे भाकीतही करू शकलेले नव्हते. नंतर फर्मींनी केलेल्या विकासाने, मूलभूत कणांचे दोन गटांत वर्गीकरण करण्याचा आधार पुरवला. बोस यांचे नाव दिले गेलेले ’बोसॉन’ आणि फर्मी यांचे नाव दिले गेलेले ’फर्मिऑन्स’.

१९२४ साली बोस यांनी डाक्का विद्यापीठातून दोन वर्षांची रजा घेतली. ज्यादरम्यान ते त्यांच्या क्षेत्रातील प्रचलित विकासाची अवस्था जाणून घेण्याकरता युरोपात जाणार होते. आईन्स्टाईन यांनी लिहिलेले प्रशंसात्मक पोस्टकार्ड, डाक्का विद्यापीठाच्या कुलगुरूंना दाखवल्यावरच त्यांना तशी अनुमती मिळालेली होती. त्यामुळेच बोस यांनी आईन्स्टाईन यांना लिहिलेल्या एका पत्रात लिहिले की, “आपले पहिले पोस्टकार्ड निर्णायक क्षणी येऊन पोहोचले आणि इतर कशाहीपेक्षा, त्यामुळेच माझा हा युरोपातील निवास शक्य झाला आहे.”

बोस ऑक्टोंबर १९२४ मध्ये युरोपात पोहोचले. बर्लिनला जाऊन आईन्स्टाईन यांना भेटण्यापूर्वी, काही आठवडे पॅरीसमध्ये व्यतीत करावे असा त्यांचा हेतू होता. जर्मन भाषेपेक्षाही फ्रेंच भाषा त्यांना अधिक सोयीची भासे. मात्र पुढे पॅरीसमध्ये ते जवळपास एक वर्ष राहिले. मेहरांना याचे स्पष्टीकरण देतांना ते लिहितात, “विदेशात मला थेट बर्लीनलाच जायचे होते. मात्र मी थेट जाण्याचे साहस केले नाही. कारण मला माझ्या जर्मन भाषेच्या ज्ञानाबद्दल खात्री नव्हती. बहुधा काही आठवडे पॅरीसमध्ये व्यतीत केल्यावर मी बर्लीनला आईन्स्टाईन यांना भेटायला जाऊ शकेन असा विचार करून मी बाहेर पडलो. मात्र त्यानंतर दोन गोष्टी घडून आल्या. तिथे पोहोचल्यावर माझ्या स्वागतास तिथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रांनी मला ते राहत होते त्या प्रवासीनिवासात (बोर्डिंग हाऊसमध्ये) नेले. मी तिथेच राहावे असा त्यांनी आग्रहही केला. मलाही मित्रांसोबत राहणे सोयीचे वाटले.”

पॅरीसला पोहोचल्यावर त्यांनी आईन्स्टाईन यांना पत्र लिहून त्यांचेसोबत काम करण्याची अनुमती मागितली. दुसर्‍या शोधनिबंधावरील त्यांचा अभिप्रायही विचारला. ते लिहितातः

“माझा शोधनिबंध स्वतः अनुवाद करून प्रकाशित केलात, त्याखातर मी अंतःकरणपूर्वक कृतज्ञ आहे. जूनच्या मध्यावर मी आणखीही एक शोधनिबंध पाठवला आहे. त्याचे शीर्षक, “पदार्थांच्या उपस्थितीत प्रारणीय क्षेत्रातील औष्णिक संतुलन (थर्मल इक्विलिब्रियम इन द रेडिएशन फिल्ड इन द प्रेझेन्स ऑफ मॅटर) आहे. आपला अभिप्राय जाणून घेण्यास मी उत्सुक आहे, कारण मला तो महत्वाचाच वाटतो. ’zeitschrift für physi” या नियतकालिकात हाही प्रकाशित होईल काय ते मला माहीत नाही. माझ्या विद्यापीठाने मला दोन वर्षांची रजा देऊ केलेली आहे. एका आठवड्यापूर्वीच मी पॅरीसमध्ये आलेलो आहे. आपल्यासोबत जर्मनीत मला कार्य करता येणे शक्य होईल काय तेही मला माहीत नाही. मात्र आपण मला तशी अनुमती दिलीत तर मला आनंद होईल. माझे दीर्घकाळ जोपासलेले स्वप्न त्यामुळे सत्यात उतरू शकेल.”

आईन्स्टाईन यांनी बोस यांचा दुसरा शोधनिबंध मिळाल्याची पोच दिली नव्हती, मात्र या वेळी त्यांनी उत्तर दिले. ३ नोव्हेंबर १९२४ रोजी बोस यांना लिहिलेल्या पत्रात ते लिहितात, “आपल्या २६ ऑक्टोंबरच्या पत्राकरता मनःपूर्वक धन्यवाद. आपल्याशी परिचय होण्याची संधी मला लवकरच मिळेल याचा मला आनंद आहे. आपले शोधनिबंध काहीसे पूर्वी, आधीच प्रकाशित झाले आहेत. दुर्दैवाने त्याच्या प्रती तुम्हाला पाठवल्या जाण्याऐवजी मलाच पाठवल्या गेलेल्या आहेत. प्रारण आणि पदार्थ यांतील परस्परसंबंधाच्या संभाव्यतेबाबतच्या तुम्ही दिलेल्या मूलभूत तत्त्वाशी मी सहमत नाही. अभिप्रायात मी त्याकरताची कारणेही नोंदवली आहेत. तुमच्या शोधनिबंधांसोबतच तीही प्रकाशित झालेली आहेत. तुम्ही इथे याल तेव्हा आपण त्यावर तपशीलाने चर्चा करू.” दुसर्‍या शोधनिबंधावरील आईन्स्टाईन यांच्या या अभिप्रायामुळे बोस स्वाभाविकतः निराश झाले. मात्र त्यांनी, आईन्स्टाईन यांनी उपस्थित केलेल्या हरकतींवर गांभीर्याने विचार सुरू केला. आईन्स्टाईन यांना त्यांनी कळवले की, त्यांच्या टीकेस ते एका शोधनिबंधाद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. वस्तुतः बोस यांनी त्याचे हस्तलिखित पॉल लँगेव्हिअन (१८७२-१९४६) यांना पॅरीसमध्येच दाखवलेले होते. ते प्रकाशित होण्याच्या दर्जाचे आहे असे त्यांना वाटत होते. मात्र तो शोधनिबंध कधीही प्रकाशित झाला नाही.

पॅरीसमध्ये बोस यांचे एक मित्र प्रबोध बागची यांनी त्यांची ओळख सिल्व्हियन लेव्ही यांचेशी करून दिली. ते तेथील विख्यात भारतविद्यातज्ञ (इंडॉलॉजिस्ट) होते. त्यांनीच मग पॉल लँगेव्हिअन यांच्याकरता बोस यांचा परिचय करून देणारे पत्र दिले. सैद्धांतिक आणि प्रायोगिक भौतिकशास्त्रातील अद्ययावत विकासाची तोंडओळख करून घेण्याचा बोस यांचा उद्देश होता. त्यानुसार बोस यांनी असा विचार केला की, त्यांनी प्रारणसक्रिय तंत्रे मेरी क्युरी (१८६७-१९३४) यांचेकडून शिकून घ्यावी. क्ष-किरण वर्णपटदर्शनशास्त्रा (एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी) बाबतही मॉरीस द ब्रॉगिली (१८९२-१९६७) यांचेकडून शिकून घेण्याची त्यांना इच्छा होती. लँगेव्हिअन यांनी असे सुचवले की बोस यांनी क्युरी यांच्या प्रयोगशाळेत काम करता येण्याची शक्यता पडताळून पाहावी. त्यांनी क्युरींकरता बोस यांना ओळखपत्र दिले. त्यानुसार बोस क्युरींना भेटले. क्युरीनी हे ओळखले की बोस बुद्धिमान आहेत. तरीही सुरूवातीस स्वतःच्या प्रयोगशाळेत त्यांना प्रवेश देण्याबाबत त्यांचा निर्णय होत नव्हता. त्यांना बोस यांच्या फ्रेंच भाषेच्या ज्ञानाबाबत साशंकता होती. त्यापूर्वी त्यांना एका भारतीय विद्यार्थ्याबाबत आलेल्या असमाधानकारक अनुभवाचाच हा परिणाम होता. त्या विद्यार्थ्यास फ्रेंच भाषेचे काहीच ज्ञान नव्हते. यास्तव त्यांनी बोस यांना, फ्रेंच भाषा जाणणे किती महत्त्वाचे आहे, यावर एक मोठेच भाषण ऐकवले. त्यामुळे मग काही महिने फ्रेंच शिकून बोस परत क्युरींच्या प्रयोगशाळेत गेले. तिथे त्यांनी दाबविद्युत प्रभावाबाबत काही अवघड मापने केली. मात्र बोस यांची प्रारणसक्रियतातंत्रे शिकण्याची इच्छा फलद्रुप झाली नाही. लँगेव्हिअन यांनी दिलेले ओळखपत्र घेऊन बोस ब्रॉगिलींना भेटले. त्यांनी बोस यांना त्यांच्या मुख्य साहाय्यक असलेल्या अलेक्झांडर दौव्हिलिअर यांचेसोबत काम करण्याची अनुमती दिली. ब्रॉगिलींच्या प्रयोगशाळेत बोस स्फटिकालेखनाची विविध तंत्रे शिकले, एवढेच नव्हे तर स्फटिक वर्तनांच्या सैद्धांतिक पैलूंत त्यांना रुचीही निर्माण झाली.

तिथे सुमारे एक वर्ष राहिल्यानंतर, ऑक्टोंबर १९२५ मध्ये, बोस बर्लीनला गेले. आईन्स्टाईन यांना भेटण्यास ते उत्सुक होते. ते मात्र त्यांच्या वार्षिक भेटीकरता लेडनला गेलेले होते. बोस यांनी आईन्स्टाईन यांचेसोबत काम केले नाही. मात्र त्यांची भेट त्यांच्याकरता लाभदायक ठरली. आईन्स्टाईन यांनी त्यांना दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे ते विद्यापीठाच्या वाचनालयातून पुस्तके नेऊ शकत, भौतिकशास्त्रातील व्याख्यानांना उपस्थित राहू शकत असत. आईन्स्टाईन यांच्या मदतीने काही सर्वोच्च जर्मन शास्त्रज्ञांना ते भेटू शकले. फ्रित्झ हेबर (१८६८-१९३४), ऑट्टो हान (१८७९-१९६८), लिझ माईटनर (१८७८-१९६८), वॉल्थर बोथे (१८९१-१९५७), मायकेल पोलान्यी, मॅक्स व्हॉन लौए (१८७९-१९६०), वॉल्टर गॉर्डन (१८९३-१९४०), पॉल युजीन विग्नर (१९०२-१९९५) आणि इतरांचा त्यांत समावेश होता. पोलान्यी यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी क्ष-किरण स्फटिकालेखनावर काम केले आणि गॉर्डन यांचेसोबत सैद्धांतिक कामात व्यग्र झाले. हान आणि माईटनर यांच्या किरणोत्सार प्रयोगशाळेसही त्यांनी वारंवार भेटी दिल्या. बोस गॉटिंगटन यांनाही भेटले. तिथेच त्यांची भेट मॅक्स बॉर्न (१८८२-१९७०) आणि एरिच हकल (१८९६-१९८०) यांचेशीही झाली.

१९२६ च्या उत्तरार्धात बोस डाक्क्याला परतले. तिथे १९२७ साली, बोस यांची प्राध्यापक आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. ते प्रायोगिक भौतिकीत काम करू लागले. स्फटिक संरचनांचा अभ्यास त्यांनी सुरू केला. बहुधा देशात अशा प्रकारचा अभ्यास प्रथमच सुरू झालेला होता. स्वतःच्या प्रायोगिक उपस्कराचे अभिकल्पन, त्यांनी स्वतःच हाती घेतले. त्यांनी क्ष-किरण विवर्तन प्रकाशचित्रक अभिकल्पित करून तयारही केला. परिभ्रमण चित्रण आणि पूड (पावडर) चित्रणास तो उपयुक्त ठरला. दंडगोलाकार प्रकाशचित्रकात नोंदित, लौए प्रकाशचित्रांच्या, परावर्तन प्रतलांचे निर्देशांक शोधून काढण्याकरता त्यांनी एक सोपी पद्धत तयार केली. त्यांना रसायनशास्त्रातही स्वारस्य होते. १९३८ मध्ये प्रारणलहरींच्या मूलकांबरातील परावर्तनांचा त्यांनी अभ्यास केला.

१९४५ साली बोस कोलकात्यात परत आले. आता ते कलकत्ता विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे खैरा प्राध्यापक झालेले होते. १९५३-५४ दरम्यान बोस यांनी, एकीकृत क्षेत्रसिद्धांतावर (युनिफाईड फिल्ड थेअरीवर) पाच महत्वाचे शोधनिबंध प्रकाशित केले. हे शोधनिबंध खूप महत्त्वाचे होते. त्यांनी हे शोधनिबंध आईन्स्टाईन यांनाही पाठवले. भौतिकशास्त्रात किती नेमकेपणाने बोस यांची समाधानपद्धती उपयोगात आणता येईल, याबाबत आईन्स्टाईन साशंक होते, त्यांच्या एका शोधनिबंधात त्यांनी यावर चर्चाही केलेली आहे. बोस यांनीही त्यास तपशीलाने उत्तर दिले. सापेक्षता सिद्धांताच्या सुवर्णमहोत्सवी, ५०-व्या, वर्धादिनानिमित्त होऊ घातलेल्या समारोहप्रसंगी आईन्स्टाईन यांना प्रत्यक्ष भेटून बोस, यावर चर्चाही करणार होते. मात्र तसे घडले नाही. १९५५ मध्येच आईनस्टाईन निवर्तले.

१९४६ मध्ये पॉल डिरॅक यांनी [३] अण्वंतर्गत कणांची वर्गवारी करतांना, अनुक्रमे सत्येंद्रनाथ बोस आणि एन्रिको फर्मीं यांच्या सन्मानार्थ अण्वंतर्गत कणांच्या दोन वर्गांना प्रथमच, अनुक्रमे ’बोसॉन’ आणि ’फर्मिऑन’ म्हटले. बोस यांची सांख्यिकी अनुसरणारे कण ’बोसॉन ठरले, तर फर्मी-डिरॅक सांख्यिकी अनुसरणारे कण ’फर्मिऑन ठरले. ’बोसॉनां’ची फिरत (स्पिन) पूर्णांक संख्या असते, तर ’फर्मिऑनां’ची फिरत विषम संख्या भागिले दोन इतकी असते.

युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्सच्या, शुद्ध भौतिकी प्रयोगशाळेत, बोस यांनी सेंद्रिय रसायनशास्त्र प्रयोगशाळा स्थापन केलेली होती. बोस यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थांच्या एका गटाने भारतीय मातीतील खनिजांचा विस्तृत अभ्यास सुरू केला. क्ष-किरणे, रासायनिक विश्लेषणे आणि धनमूलक विनिमय तंत्रे (कॅट आयॉन एक्सचेंज टेक्निक्स) यांचा उपयोग ते करत होते. भारतीय गंधक खनिजांत त्यांनी जर्मेनियमचा प्रणालीबद्ध शोध सुरू केला. बोस यांच्यासोबत, अनेक क्षराभांच्या (अल्कलाईडांच्या) संरचना आणि त्रिमिती रसायनशात्र (स्टिरिओ केमिस्ट्री) यांवर काम केलेल्या एक विख्यात भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. असिमा चॅटर्जी म्हणतात, “असेंद्रिय संश्लिष्ट क्षार आणि मातीतील खनिजांवरील काम हे प्रा. बोस यांचे आणखी एक प्रमुख योगदान होते. मोठ्या संख्येतील मातीचे नमुने, देशाच्या निरनिराळ्या भागांतील खडक आणि धूळ अभ्यासिली गेली. क्ष-किरण विवर्तन पद्धती आणि फरकात्मक उष्णता विश्लेषणे यांचा उपयोग याकरता करण्यात आला. त्यात, धुळीतील सामान्य खनिजांची अणुसंरचना जाणून घेणे हा उद्देश होता. या तपासात एक जुळणीपरिवर्तनशील सपाट पाटी प्रकाशचित्रक (ऍडजस्टिबल फ्लॅट प्लेट कॅमेरा) अभिकल्पिला आणि वापरला गेला. वर्तमान तपासात वापरलेल्या फरकात्मक उष्णता विश्लेषक बर्केलहेमर अभिकल्पनाबरहुकूम तो निर्माण करण्यात आला होता. हा प्रकल्प हाती घेतला तेव्हा या विषयावर, भारतात त्याकाळी खूप कमी काम झालेले होते. विविध बदलत्या परिस्थितींत माती घडत असल्याने, आजवर न शोधल्या गेलेल्या भागांतील खनिजांचा अभ्यास करणे, नवीन माहिती मिळवण्याकरता आणि वैधता पडताळणीकरताही महत्त्वाचे असते. हा उद्देश लक्षात घेता, प्रयोगशाळेत निरनिराळ्या स्त्रोतांतून मिळवलेल्या आणि वेगळ्या ठेवलेल्या अनेक भारतीय मृदांच्या अभ्यासाकरता फरकात्मक उष्णता विश्लेषक आणि एक सूक्ष्मकेंद्र क्ष-किरण नलिका अभिकल्पित केली गेली.”

बोस यांच्यासाठी केवळ भौतिकशास्त्रच महत्त्वाचे नव्हते. त्यांच्या स्वारस्याची क्षेत्रे अपरिमित होती. या संदर्भात बी.एम. उद्‌गावकर बोस यांचेबाबत म्हणतात की, “अल्पसंतुष्ट राहिल्याने ते मागे राहिले. ते भौतिकशास्त्र आणि गणितात प्रशिक्षित होते. त्यांची तल्लख, कुशाग्र आणि अष्टपैलू बुद्धी त्यांना; रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मृदाविज्ञान, खनिजशास्त्र, तत्त्वज्ञान, पुरातत्त्व, अभिजात कला, साहित्य आणि संगीत इत्यादी विविध क्षेत्रे आपल्या कर्तृत्वाने व्यापून टाकणे शक्य करीत असे. १९५४ साली वयाच्या साठाव्या वर्षी कौशल्यपूर्ण कार्याचा परिचय देत, त्यांनी एकीकृत क्षेत्रसिद्धांतावरील काही महत्त्वाचे शोधनिबंध प्रकाशित केले. त्यावरून त्यांचे गणिती कौशल्य अजूनही तेवढेच सक्षम असल्याचे सिद्ध होत होते.” त्यांच्या विज्ञानातील अतुल्य कार्याच्या गौरवार्थ १९५४ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

१९५६ मध्ये बोस, रविंद्रनाथांनी शांतिनिकेतन येथे स्थापन केलेल्या ’विश्व भारती विद्यापीठा’चे कुलगुरू झाले. त्यांनी आता तेथे विज्ञान शिकवण्यास सुरूवात केली नव्याने निर्मिलेल्या विद्यापीठात त्यांना आता वैज्ञानिक संशोधनही सुरू करायचे होते. इथे हे नमूद केले पाहिजे की, टागोरांनी त्यांचे पुस्तक ’विश्व परिचय’ हे बोसांना समर्पित केलेले आहे. १९५८ मध्ये रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे ते फेलो निवडले गेले. १९५९ मध्ये त्यांची ’राष्ट्रीय प्राध्यापक’ म्हणून नियुक्ती झाली. ते आमरण या पदावर राहिले.

सभा, परिषदांत किंवा सार्वजनिक व्यासपीठांवर बोस बहुधा डोळे मिटून घेत असत. लोकांना वाटत असे की, त्यांना झोपच लागली आहे. मात्र सर्व वेळ ते अत्यंत सावध असत. एस. डी. चटर्जी सांगतात, “एकदा साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्समध्ये प्रा. निल्स बोहर एक व्याख्यान देत होते. बोस यांनी डोळे मिटून घेतलेले होते आणि असे वाटत होते की त्यांना झोप लागली असावी. मात्र फळ्यावर काही लिहित असतांना बोहर अडखळले आणि म्हणाले की, ’बहुधा प्रा. बोस इथे मला मदत करू शकतील.’ तेव्हा ताबडतोब त्यांनी डोळे उघडले, गणिती मुद्दा स्पष्ट केला आणि मग पुन्हा ध्यानस्थ झाले. आणखी एका प्रसंगी, त्याच ठिकाणी, प्रा. फ्रेडरिक जोलिओट क्युरी यांच्या व्याख्यानाकरता ते अध्यक्ष होते. व्याख्यात्याची इंग्लिशमध्ये ओळख करून दिल्यानंतर, नेहमीप्रमाणे त्यांनी डोळे मिटून घेतले. मग प्रा. जोलिओट यांनी फ्रेंचमधून इंग्रजीत अनुवाद करणार्‍या व्यक्तीची मदत मागितली. कुणीच समोर आले नाही. तेव्हा प्रा. बोस यांनी डोळे उघडले. ते उभे राहिले आणि प्रा. जोलिओट यांच्या भाषणाचा त्यांनी दर वाक्यागणिक अनुवाद केला.”

बोस यांचे संगीत आणि अभिजात कलांवर प्रेम होते. एस. डी. चॅटर्जी लिहितात, “बोस यांच्या व्यक्तिमत्त्वातून त्यांची बुद्धिमत्ता प्रकट होत असे. लोक त्यांना त्यांच्या हयातीतच महान व्यक्ती मानत असत. अनेकदा अनौपचारिक संगीतसभांत, अभिजात संगीताचे रसिक असलेले बोस, डोळे मिटून घेत असत, झोपले आहेत असेच वाटे. शेवटास ते डोळे उघडत आणि सादरकर्त्यास अत्यंत प्रसंगोचित असा प्रश्न विचारत असत. त्यांना वादनास्वाद कमालीचा आवडत असे. ते स्वतः उत्तमरीत्या एस्राज वाजवतही असत [२]. घराच्या एकाकी कोपर्‍यात एस्राज वाजवत असतांना लोकांनी त्यांना पहिलेले आहे. कित्येकदा अशा एखाद्या प्रसंगी त्यांच्या डोळ्यातून अश्रूही ओघळत असत. ते एस्राज वाजवत असत हे बहुश्रुतच आहे. मात्र ते बासरीही वाजवत असत, हे मात्र बहुतेकांना माहीत नसते. अभिजात कलांत त्यांना स्वारस्य होते. जैमिनी रॉय यांच्यासारख्या तज्ञांसोबत ते भित्तीचित्रांच्या लावण्याची चर्चाही करत असत. संगीतरजनीस, सांस्कृतिक कार्यक्रमास वा कलाप्रदर्शनास बोलावले असता, उपस्थित राहण्यास ते क्वचितच नकार देत. संगीत त्यांना आधीपासूनच प्रिय होते. लोकसंगीतापासून तर अभिजात संगीतापर्यंत आणि भारतीय संगीतापासून तर पाश्चात्य संगीतापर्यंत त्यांच्या आवडीचा पल्ला विस्तारलेला होता. प्रा. धुर्जटीप्रसाद मुखर्जी त्यांचे भारतीय संगीतावरील पुस्तक लिहित होते तेव्हा, त्यांचे मित्र असलेल्या बोस यांनी, त्यांना अनेक उपयुक्त सूचना केल्या होत्या. धुर्जटीप्रसाद असे म्हणत असत की, बोस जर शास्त्रज्ञ झाले नसते तर संगीतज्ञ झाले असते.”

बोस हे थोर विज्ञान प्रसारक होते. त्यांना प्रखरतेने असे वाटे की, सामान्य माणसाला त्यांच्याच भाषेत विज्ञान समजावून सांगणे, ही त्यांची जबाबदारीच आहे. विज्ञान लोकप्रिय व्हावे म्हणून ते बंगालीत लेखन करत. ’बंगीय विज्ञान परिषदे’च्या स्थापनेत त्यांचा मोलाचा सहभाग होता. स्वदेशी भाषेतून विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे आणि विज्ञान लोकप्रिय करणे हीच परिषदेची उद्दिष्टे होती. २५ जानेवारी १९४८ रोजी तिची स्थापना झाली. स्थापनेबाबतच्या परिपत्रकात म्हटले होते की, “आपल्याला प्रत्येक टप्प्यावर विज्ञान हवे आहे. मात्र आपली शिक्षणप्रणाली आपल्याला त्याकरता तयार करत नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यांत आपण विज्ञानाचा वापर करू शकत नाही. परकीय भाषेतून शिक्षण मिळत असल्याने तो एक प्रमुख अडथळा होता. आता तसे राहिलेले नाही. नव्या आशा आणि आकांक्षा निर्माण होत आहेत. स्वभाषेतून विज्ञान लोकप्रिय करणे, ही आपल्या वैज्ञानिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे लोकांत निरोगी वैज्ञानिक विचारसरणी निर्माण होऊ शकेल. या प्रयासातील पहिली पायरी म्हणून ’बंगीय विज्ञान परिषदे’ची स्थापना केली जात आहे. प्रा. सत्येंद्रनाथ बोस यांच्या प्रेरक नेतृत्वामुळेच हे शक्य होत आहे.” बंगालीत विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी परिषदेने मासिक सुरू केले. ’ज्ञान ओ विज्ञान’ असे त्याचे नाव होते. याचाच एक भाग म्हणून बोस, स्नातकोत्तर विद्यार्थ्यांनाही बंगालीतून सापेक्षता शिकवू लागले होते.

४ फेब्रुवारी १९७४ रोजी, वयाच्या ८० व्या वर्षी, बोस निवर्तले. एस. डी. चटर्जी लिहितात, “प्रा. सत्येन बोस यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे. भारतात विज्ञान निर्माण करण्यार्‍या महान नेत्यांच्या युगाचा अस्त झाला आहे.” आज कोलकात्यात बोस यांच्या नावाने एक संस्था आहे. सत्येंद्रनाथ राष्ट्रीय मूलभूत विज्ञानकेंद्र (नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस).

पूर्णांक फिरत (इंटिग्रल स्पिन) असलेल्या अण्वंतर्गत कणांना आपले नाव देणार्‍या, मातृभाषेतून विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी ’बंगीय विज्ञान परिषदे’ची स्थापना करणार्‍या, असंख्य उदयोन्मुख शास्त्रज्ञांना प्रेरित करणार्‍या, भारतमातेच्या या बुद्धिमान पुत्राने सैद्धांतिक भौतिकीच्या इतिहासात आपले नाव नोंदवलेले आहे. अजरामर केलेले आहे. आपल्याला त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणा आणि उत्साह देत राहोत हीच प्रार्थना!

’बोसॉन’ हे नाव कणास दे त्या, एस्राज जो उत्तम वाजवी त्या ।
सैद्धांतिकाला मनि स्थान द्यावे, सत्येंद्रनाथा तुज आठवावे ॥ १ ॥

लोकांत विज्ञान रुजो म्हणूनी, बंगीय विज्ञान परीषदेला ।
स्थापून सत्कार्य पुरे करे त्या, सत्येंद्रनाथा तुज आठवावे ॥ २ ॥

नरेंद्र गोळे २०२१०११२

https://nvgole.blogspot.com/2021/03/blog-post_22.html?fbclid=IwAR2T2fik6SLzkMoEPs1R1nIKnEvywR-UWOKiJMT3eBZL561Ku-QwSQCqsGA

*********************************

१०.व्ही.जी.कुलकर्णी

यांनी विज्ञानशिक्षणाच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे.

११. डॉ.वसंत गोवारीकर

प्रख्यात शास्त्रज्ञ व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत रणछोड गोवारीकर (25 मार्च 1933 – 2 जानेवारी 2015) हे भारतीय अवकाश संशोधन संघटनेचे (#ISRO) संचालक होते आणि त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वामध्ये कार्य केले होते.
गोवारीकर यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही काम पाहिले होते. गोवारीकर यांनी अंतराळ संशोधन, हवामान आणि लोकसंख्या या क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान दिले.
ते मान्सूनच्या अंदाज मॉडेलसाठी परिचित होते. कारण स्वदेशी हवामान अंदाज मॉडेल विकसित करणारे ते पहिले वैज्ञानिक होते, ज्यांनी मान्सूनचा योग्य अंदाज वर्तविला होता.
1991 ते 1993 या काळात ते विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिवही होते. गोवारीकर यांना 1984 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना फाय फाऊंडेशन पुरस्कारही मिळाला आहे. त्यांंच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
त्यांंच्याविषयी अधिक माहितीसाठी वाचा- https://en.wikipedia.org/wiki/Vasant_Gowarikar

हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेल तयार करणारे डॉ.वसंत रणछोडदास गोवारीकर यांची आज जयंती. यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. १९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले. अग्निबाणांसाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वर्षे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे. १९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही त्यांनी तयार केले. नंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले.(लोकसत्ता )
ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. २ जानेवारी २०१५ रोजी वयाचा ८१व्या वर्षी त्यांचे पुण्यात निधन झाले.

. . . दोन्ही लेख फेसबुकवरून साभार . . दि.२४-०३-२०२२

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आणि अभियंता दिवस

दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस (इंजिवियर्स डे) म्हणून साजरा केला जातो. मी स्वतः अभियंता असल्यामुळे मला याचा अभिमान आहेच. मी या दिवशी काही ठिकाणी पाहुणा म्हणून जाऊन भाषणेही दिली आहेत. या वर्यी या निमित्याने डॉ.विश्वे्वरय्या यांच्याबद्दल माहिती आणि इंजिनियरांवर लिहिलेल्या काही मजेदार गोष्टी या पानावर संग्रहित केल्या आहेत. सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🔸सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.🔸

🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.

डॉ. विश्वेश्वरैया यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे झाला. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम या गावचे. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते.

विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजामध्ये झाले. १८८० मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. १८८३ मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले.

स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला. १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. नासिक जिल्ह्यात त्यांची प्रथम नियुक्ती झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे त्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. १९०४ साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली.

खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्यांच्यामुळे त्यांनी पाण्याचा अपव्यय टाळला. १९०६ साली एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची साहाय्यक बंदर अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणून काम केले. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेत त्यांनी भाग घेतला. १९०७ साली मुंबई सरकारच्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली.

१९०९ साली हैदराबाद संस्थानात विशेष सल्लागार अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. हैदराबाद शहराची पुनर्रचना, मूसा व इसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुरापासून शहराचे संरक्षण ही कामे त्यांनी केली. याच वर्षी म्हैसूर संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या विनंतीनुसार त्यांनी म्हैसूर संस्थानच्या प्रमुख अभियंता पदाची सूत्रे हाती घेतली. १९१२ ते १९१८ ही सहा वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण, उद्योग,कृषी आदी सर्व क्षेत्रांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. म्हैसूर आर्थिक परिषदेला स्थायी रूप देऊन अनेक विकासकामे हाती घेतली. उदा., म्हैसूर बँक, म्हैसूर विद्यापीठ, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, मुलींचे पहिले वसतिगृह व शेतकी महाविद्यालय, वृंदावन गार्डन यांची उभारणी, कन्नड साहित्य अकादमी, आर्थिक लेखा परीक्षणाबरोबरच कार्यक्षमता लेखा परीक्षण वगैरे. रेशीम उत्पादन, चंदन तेल, साबण, धातू व क्रोम टॅनिंग, सिमेंट, साखर कारखाने, लघू उद्योग, हॉटेल व उपाहारगृहे, विश्रामधाम, मुद्रणालये, क्लब यांच्या निर्मिती उद्योगास त्यांनी चालना दिली.

म्हैसूरसाठी भाटकलला बंदराची सोय केली. आपल्या प्रयत्‍नांनी रेल्वेचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या कक्षेत आणले. काही ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग उभारले. सेवाभरती शर्ती, मागासवर्गीयांसाठी राखीव जागा आदी समाजोन्मुख कार्ये त्यांनी केली. १९२६ साली त्यांनी म्हैसूर संस्थानच्या सेवेचा स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, श्री जय चामराजेंद्र ऑक्युपेशनल इन्स्टिट्यूट वगैरे संस्थांशी घनिष्ट संबंध आला.

मुंबईची प्रिमियर ऑटोमोबाइल इंडस्ट्री स्थापण्यातही त्यांनी विशेष प्रयत्‍न केले. हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी (सध्याची दि हिंदुस्थान एरॉनॉटिक्‌स) व ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेतही त्यांनी भाग घेतला.

विश्वेश्वरय्या यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने देशातील अनेक योजना साकार झाल्या. धुळे जिल्ह्यातील पांजरा नदी ते दात्रटीपर्यंत वक्रनलिकेने पाणीपुरवठा ही योजना साकार करून त्यांनी धुळे शहर पाणीपुरवठा योजना व सुरत शहर पाणीपुरवठा योजनाही साकार केली. सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याचा बिकट प्रश्न त्यांनी सक्कर बंधाऱ्यांची उभारणी करून सोडविला. शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या व कमीत कमी पाण्यात अनेक तऱ्हेच्या पिकांना पाणी देण्याची गट पद्धती त्यांनीच सुरू केली. ओरिसा राज्यातील महापूराच्या नियंत्रणाचे निर्मातेही तेच. म्हैसूरपासून १८ किमी. वरील कृष्णराजसागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. सु. ४० मीटर उंचीला लागणारा पाया लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. आज या धरणामुळे सु. ८ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येते. १२.५ कोटी रुपयांची कावेरी बंधारा योजना त्यांनीच पूर्ण केली.

यांखेरीज कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड व विजापूर शहर पाणीपुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांनी अभिकल्पित केल्या. नवी दिल्लीची योजनाबद्ध सुधारणा त्यांनीच केली. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर केलेले कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष (१९२१-२२), भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष (१९२५), मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, मुंबई बॅक बे चौकशी समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार, भद्रावती पोलाद कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष, अखिल भारतीय उत्पादक संस्था (१९४१) संचालक, जमशेटपूर टाटा लोखंड व पोलाद कारखाना, मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र, मुंबई प्रांत आरोग्य समितीचे सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक उद्योग उन्नती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. मुंबई, कराची, बडोदा, सांगली, मोरवी, भोपाळ, पंढरपूर, अहमदनगर, नागपूर, भावनगर,राजकोट, गोवा या नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले.

विश्वेश्वरय्या यांनी पाच वेळा अमेरिकेचे दौरे केले. खेरीज जपान, इटली, इंग्‍लंड, स्वीडन, रशिया, कॅनडा, सिलोन (श्रीलंका), जर्मनी व फ्रान्स या देशांना विविध निमित्तांनी भेटी दिल्या.

शिस्त हा त्यांच्या परवलीचा शब्द होता. ते सतत कठोर परिश्रम करीत. प्रत्येक काम नियमित, नीटनेटके व स्वच्छ असावे हा त्यांचा आग्रह असे.

भारताच्या प्रगतीसाठी आपल्या भाषणांतून व लेखनांतून ते तळमळीने विचार मांडीत. भारताच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय संरक्षणातील धोके, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रबांधणी व राष्ट्रीय कार्यक्षमता या विषयांवर त्यांनी व्यक्त केलेले विचार मार्गदर्शक होतील. आपल्या विषयातील त्यांचे ज्ञान अत्यंत अचूक होते. एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना रेल्वेच्या बदललेल्या आवाजावरून त्यांनी १.५ किमी. वरील रेल्वे रूळ उखडले आहेत असे अचूक अनुमान काढून हजारो प्रवाशांचे प्राण वाचविले होते.

रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया (१९२०), प्‍लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया (१९३४), प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेम्वॉयर्स ऑफ माय वर्किंग लाइफ (१९६०) ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.

नवभारताचे एक निर्माते म्हणून विश्वेश्वरय्या यांच्या विविधोपयोगी कार्याचा व त्यांच्या ज्ञानाचा अनेक संस्थांनी, विद्यापीठांनी व शासनांनी गौरव केला. लोकांमध्ये ते एम्. व्ही. या नावाने परिचित होते.

ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहाबाद व म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन गौरवले. १९५५ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्‍न’ देऊन गौरवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले. विश्वेश्वरय्यांनी अनेक संस्थांना लाखो रूपयांच्या देणग्या दिल्या. देशातील अनेक संस्थांना विश्वेश्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले आहे. सर विश्वेश्वरय्या यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बंगलोर येथे ‘सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम’ उभारले आहे. हे म्युझियम भारतातील सर्वांत मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनी अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांस प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जातो.

त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेही १९९८ पासून त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित झाले. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्‍न सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने १९९७ पासून ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे.

विश्वेश्वरय्यांनी आपल्या जन्मगावी सुंदर घर बांधले असून १९७१ मध्ये त्याचा राष्ट्रीय स्मारकात समावेश केला गेला आहे. या घरातील वस्तुसंग्रहालयात विश्वेश्वरय्या यांच्या नित्य वापरातील काही वस्तू, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू व भारतरत्‍न गौरवपदक ठेवण्यात आले आहे. गावातील विशाल बागेत त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. बंगलोर येथे या शतायुषी महापुरुषाचे निधन झाले.

स्रोत: मराठी विश्वकोश, कुलकर्णी, सतीश वि.
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

अभियंत्यांचे दैवत डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

नोकरीतून निवृत्त झाल्यावर सर्वसामान्य व्यक्ती कुटुंबाबरोबर व्यक्तिगत जीवन जगते;मात्र निवृत्तीनंतरही पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने थोडीथोडकी नव्हे तर ५५ वर्षे देशाच्या जनतेच्या सेवेसाठी देणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने भारतरत्न असते.होय,मी आज ज्यांच्याबद्दल माहिती सांगतोय ते आहेत- देशातील साऱ्या अभियंत्यांचे दैवत,आधुनिक भारताचे रचनाकार ‘सर,भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या’
१५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन! संपूर्ण भारतभर १९६८ पासून त्यांचा जन्मदिन हा अभियंता दिन (इंजीनियर्स डे) म्हणून साजरा होतो.सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील सक्कर या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी कल्पकतेने सोडवला. घाणेरडे,दूषित पाणी प्यावे लागत असलेल्या तिथल्या लोकांना अतिशय कमी खर्चात शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यायला मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि भारताच्या एका युवक आणि कल्पक अभियंत्याचे नाव जागासमोर आले. १८८४ मध्ये त्यांना इंग्रज सरकारने नाशिक विभागात अभियंत्याची नोकरी दिली.मात्र १९०७ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. अर्थात ती आराम करण्यासाठी नव्हे तर आपल्या कर्तृत्वाला नवनवीन क्षितिजे निर्माण करून देण्यासाठी! आपल्या निवृत्ती वेतनातून आपल्या गरजेएवढे पैसे घेऊन उर्वरित पैसे ते गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करीत. शालेय शिक्षण घेत असतानाच ते आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले होते.त्यांच्या घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती.पण त्यांची आई मनाने श्रीमंत आणि जिद्दी होती. आपल्या शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून त्यांनी शिकवण्या करून पैसा उभा केला आणि नंतरच्या सर्वच परीक्षा ते पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. शिक्षणासाठी आपल्यासारखा संघर्ष करण्याची वेळ अन्य कुणावर येऊ नये म्हणून आपल्या निवृत्ती वेतनातून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पैसा देऊ केला होता.
निवृत्तीनंतर ते स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी युरोपला गेले.हैदराबादच्या निजामाच्या निरोपानुसार तिथला दौरा अर्धवट सोडून ते भारतात परत आले आणि मुसा नदीच्या पुराच्या पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढला. यामुळे त्यांचा नावलौकिक अधिकच वाढला.म्हैसूरचे मुख्य अभियंता झाल्यावर त्यांनी कावेरी नदीवर कृष्णसागर नावाचे धरण उभे केले. महात्मा गांधी देखील हे अजस्त्र धरण पाहून चकित झाले होते.या धरणाच्या पाण्यावर त्यांनी वीज निर्मिती केली.या विजेने त्यावेळी म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन गार्डन उजळून निघाले.पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या म्हैसूर संस्थांचे दिवाण झाले. त्या सहा वर्षातच त्यांनी म्हैसूर विद्यापीठ,पोलाद कारखाना, सिमेंटचा कारखाना, रेशीम,चंदन,तेल,साबण यांची उत्पादने त्यांनी त्याकाळात सुरू केली.शिक्षण,उद्योग आणि शेती या क्षेत्रातही म्हैसूर संस्थानने नेत्रदीपक कामगिरी केली.मुंबई औद्योगिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष,भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष,नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार असे विविध पदे त्यांनी भूषविली. कराची,बडोदा,सांगली,नागपूर, राजकोट,गोवा आदि नगरपालिकांना आणि इंदोर, भोपाळ,कोल्हापूर,फलटण अशा संस्थांनांना त्यांनी अडचणीच्या काळात मदत केली.हैदराबाद शहर वसविले, पुण्याजवळील खडकवासला जलाशय उभारण्यात योगदान दिले.
राष्ट्र बांधणीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना इंग्रज सरकारने सर हा सर्वोच्च मानाचा किताब दिला तर मुंबई, कोलकाता,अलाहाबाद,म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना मानाची डिलीट ही पदवी दिली.भारत सरकारने १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न या उपाधीने अलंकृत करून त्यांच्या कार्याला सलाम केला.
विश्वेश्वरय्या हे आधुनिक काळातील विश्वकर्मा होते. झिजलात तरी चालेल पण गंजू नका हा मंत्र त्यांनी तरुणांना दिला. वयाची नव्वदी ओलांडल्यावरही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता.१५ सप्टेंबर १९६१ ला भारतभर त्यांची जन्मशताब्दी म्हणजे १०० वा वाढदिवस साजरा झाला. निष्ठावान,चारित्र्यवान आणि विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता असल्याचा गौरव पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला.पृथ्वीवर प्रकाश पर्व निर्माण करणाऱ्या या अभियंत्याची प्राणज्योत १४ एप्रिल १९६२ ला मावळली.एक कल्पक इंजिनिअर,वैज्ञानिक, निर्माता आपल्यातून निघून गेला. १९६८ पासून त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो.

सुनियंत्रित आचरण,प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद ही त्यांच्या प्रदीर्घ जीवनाची पंचसूत्री होती.त्यांच्या स्मृती आणि कार्यास विनम्र अभिवादन!!! देशातील सर्वच अभियंत्यांना इंजिनियर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!!!

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

. . . . नरेंद्र गोळे
अवकाशप्राप्त अभियंता, भाभा अणुसंशोधन केंद्र आणि संलग्न अध्यापक, विद्याप्रसारक मंडळ ठाणे

१५ सप्टेंबर २०१८ हा दिवस म्हणजेच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांचा १५८ वा जन्मदिन आहे. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांच्या नावाने सुरू झालेल्या ’विश्वेश्वरय्या प्रादेशिक अभियांत्रिकी विद्यालय, नागपूर’ ह्या संस्थेतून मी विद्युत अभियंत्रज्ञ झालेलो असल्याने, त्यांच्या जन्मदिनानिमित्त बोलण्याची संधी मला लाभत आहे ही फारच आनंदाची गोष्ट आहे. मला नेहमीच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांबाबत आपुलकी वाटत आलेली आहे. ह्याचे आणखीही एक कारण आहे. ते म्हणजे माझे पणजोबा नारायण गोडबोले, विश्वेश्वरय्यांसोबतच पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून इंजिनिअर झालेले होते.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी चिकबल्लापूर, म्हैसूर येथे झाला होता. त्यांचा जन्मदिन अभियंत्रज्ञदिन म्हणून पाळला जातो. त्यांची मातृभाषा तेलुगू आहे. पुढे विश्वेश्वरय्यांनी प्रथम तत्कालीन म्हैसूर संस्थानाकरता आणि नंतर भारत देशाकरता अत्यंत महत्त्वाची अनेक पदे भूषवली. देशांतर्गत अनेक महत्त्वाच्या अभियांत्रिकी प्रकल्पांची संकल्पना रुजवली आणि ते देशाच्या सर्वोच्च आदरास पात्र ठरले.
ते विख्यात अभियंत्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. आधुनिक भारताच्या निर्माणात त्यांनी अत्यंत कळीची भूमिका बजावलेली आहे. ते कृष्णराजसागर धरण आणि प्रसिद्ध वृंदावन उद्यानाचे शिल्पकार होते. धरणांच्या दरवाजांकरता त्यांनी प्रथमच पोलादी झडपांचा उपयोग केला. हल्लीच्या पाकिस्तानातील सुक्कूर गावास सिंधू नदीचे पाणी पुरविण्याची योजना त्यांनी केली.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (जन्मः १५ सप्टेंबर १८६०, मृत्यूः १४ एप्रिल १९६२ )
१९१२ ते १९१८ दरम्यान ते म्हैसूर संस्थानचे दिवाण होते. त्या काळात त्यांनी संस्थानात चंदनतेल आणि चर्म वस्तूंच्या उद्योगांची निर्मिती केली. भद्रावती पोलाद प्रकल्प सुरू केला. तिरुमला आणि तिरुपती दरम्यानचा रस्ता त्यांनी निर्माण केला.
१९०६-०७ दरम्यान प्रतिनियुक्तीवर एडनमध्ये असतांना त्यांनी एडन शहराची पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजना निर्माण केली. निजामाकरता काम करत असता, हैदराबाद शहराकरता त्यांनी पूरनियंत्रण योजना राबवली तर विशाखापट्टणम शहरास समुद्री क्षरणापासून संरक्षण करणारी योजना दिली. १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न पदवी दिली गेली. पंचम जॉर्ज बादशहाने त्यांना ब्रिटिश भारतीय साम्राज्याचा नाईटहूडही दिलेला होता. ते शंभर वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या हयातीतच, भारत सरकारने त्यांचे नावे पोस्टाचे तिकीट काढले. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांना बंगळुरू येथे देवाज्ञा झाली.
भारतातील अग्रगण्य अभियंत्यांत मानाचे स्थान असलेल्या ह्या आधुनिक भारताच्या आद्य अभियंत्यास अभियंत्रज्ञदिनी आदरपूर्वक प्रणिपात!

इंजिनियर असल्याचा अभिमान बाळगा पण सिव्हील इंजिनियर असल्याचा दुप्पट अभिमान बाळगा. कारण ही एकमेव अशी शाखा आहे जी, भवन ते विमानतळ, धरण ते कृषी, सिंचन ते पर्यावरण, ऊर्जा ते वास्तुरचना, पथ ते उद्यान या सर्वाशी संबंधित आहे. समाजाच्या सर्व आयामांना स्पर्श करणारी ही विद्या शाखा असल्यानेच तिला नागरी (Civil) असे संबोधले जाते. या शाखेला अव्दितीय उंचीवर नेण्याचे काम डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले. त्यांना प्रणाम करुया आणि सिव्हील इंजिनियर असल्याचा अभिमान बाळगुन कायम समाजहितैषी असे काम करुया.
🙏🏻💐अभियंता दिनाच्या शुभेच्छा..💐🙏🏻

🏦🏡⛩️🏣🏬🏨🏭🏣🏟️🏪🎢🛤️🛣️🌉🌌🛬🚠🛳️🚉🗼⛽🚧🚥🚏

This group is Engineers dominated, so wish you all a very happy 😊 ❤ 😀 💜 “Engineers Day”. This is another feather in your cap that new Gujarat CM Bhupendra Patel is also a civil engineer, that is, he is one among you. Mr. Patel is notebly a Diploma holder too.

भारत के सर्वश्रेष्ठ महान इंजीनियर्स जिनको आज इंजीनियर्स डे पर सम्मान पूर्वक याद करना जरूरी है।

 1. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
 2. डॉ ए पी जे अब्दुल कलाम -मिसाइल मैन
  3.श्री सतीश धवन -एरोस्पेस सुपरसोनिक इंजीनियरिग इसरो।
  4 ई श्रीधरन -मेट्रो मेन
  5 सुंदर पिचाई- गूगल के संथापक
  6 कल्पना चावला- पहली एस्ट्रोनॉट
  7सत्या नाडेला- माइक्रोसॉफ़्ट
  8 नागदरा रोमोराव नारायण मूर्ति -इंफोसिस
  9 वर्गीज़ कुरियन- स्वेत क्रांतिकारी- अमूल डेयरी
  10 सत्यनारायण गंगाराम पित्रोदा-मोबाइल
  11 आदिशिर गोदरेज-बिज़नेस मेन
  12 सुब्रम्हयम रामदोराई-स्किल डेवलपमेंट
  13 थॉमस कालीनाथ – इलेक्ट्रिकल ईइजीनियर -हिताची
  14 विक्रम साराभाई -स्पेस टेक्नोलॉजी
  15 सत्येंद्र दुबे -नेशनल हाई वे
  16 रवि ग्रोवर – न्यूकलर एनेर्जी
  17 प्रोफेसर एम एम शर्मा -केमिकल इंजीनियरिंग
  18 रछपाल सिंह गिल- भाखरानंगल बांध
  19 चेवांग नोरफेल -ग्लेशियर मैन
  20 सचिन बंसल -फ्लिपकार्ट
  21 राजेन्द्र कुमार पचौरी -क्लाईमेट चेंज
  [12:00, 15/09/2021] +91 89528 28005: 22 नीतीश कुमार -मुख्य मंत्री
  23 पी के थेरेशिया – भारत की पहली महिला मुख्य अभियंता
  24अजय भट्ट- यू एस बी के आविष्कारक

25आयलासोमायजुला ललिता -भारत की पहली महिला इंजीनियर

ENGINEER
Someone asked an engineer,”Why do you feel proud of being an engineer?” He smiled and replied. The income of a lawyer increases with the increase in crimes and a doctor’s income increases with the increase in diseases, but an engineer’s income increases with the increase in the prosperity of people or even the whole nation. That’s why, we
engineers feel so proud.”
A file in hand is the identity of a lawyer stethoscope in hand-a doctor and a chalk in hand-a teacher, but nothing in hand and everything in mind is the identity of an engineer.

Happy Engineer’s Day …

Today Sept 15th is Sir M.Visvesvaraya ‘s birthday. The Greatest civil engineer ever born in the country. Built Krishna Raja Sagardam in Mysore on Cauvery river with stone and Hydraulic lime. It is one of the largest dams in Asia and also built Brindavan garden down stream. Sir MV has done many works in the country. The Maharaja of Mysore appointed him Devaan and He carried out many works in the country .TheHarihar Steel plant, Sukkur dam and also advised Vizag port to sink a sand barge to protect it sea erosion. Born Inthe year 1861 died in the year 1961. I remember when he was bed ridden Smt. Savitri Telugu cinema star visited him. He advised his assistants to dress him with his regular dress including coat and head gear. He gave education to many students who cannot afford. He use to arrange by post their school fees exact amount in Rs and Annas. His habits were also very appreciable. Never taken home the office pen or pencil. Salutations to the great soul. . . . . . . Shantaram.

विश्वेश्वरैयांचे वंशज

हे लोक सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे कोणी नातू किंवा पणतू नाहीत, पण त्यांनी विश्वेश्वरय्या यांचा वारसा पुढे चालवला आहे.

आज अभियंता दिनाच्या निम्मिताने आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया याचं स्मरण करतो. या निम्मिताने मी आजवर जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या विश्वेश्वरैयांच्या काही खास अशा वंशजांची ओळख करून देत आहे.

१. कोल्हापुरात डॉ डी. वाय. पाटील यांना भेटायला एक VIP व्यक्ती हेलिकॉप्टरने आली होती. भेट झाल्यावर निघतांना हेलिकॉप्टर काही सुरु होईना.
पायलट हेलिकॉप्टर कंपनीच्या टेक्निकल टीमशी बोलले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या VIP नां तत्काळ पुढे निघायचं होतं, त्यात कंपनीच्या टेक्निकल टीमला दुरुस्तीसाठी जागेवर यायला ३ दिवसांचा वेळ लागेल असं कळवलं. परिसरात दुसरं हेलिकॉप्टरसुद्धा उपलब्ध नव्हतं.
मग डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव श्री संजय पाटील यानी कोल्हापुरातील एका कार मिस्त्रीला तिथं बोलावलं. या मिस्त्रीने आयुष्यात कधी हेलिकॉप्टरला हातही लावला नव्हता पण त्या अवलियाने अर्ध्या तासात हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला. पायलटने खात्री केल्यावर आलेली VIP मंडळी सुखरूपपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली.
गंमत म्हणजे बेकायदा हेलिकॉप्टर दुरुस्ती केली म्हणून नागरी उड्डयन मंत्रालयाने या मिस्त्रीची चौकशी लावली होती.
याच मिस्त्रीने २००६ साली भंगारात गेलेल्या एका कारमध्ये बदल करून ती कोल्हापुरात रंकाळ्याच्या पाण्यावर चालवून दाखविली होती.
फिरोज मोमीन हा तो अवलिया.

२. विजार-शर्टातला ITI शिकलेला इचलकरंजीमधला एक तरुण ५० वर्षापूर्वी ४ सीटर इलेक्ट्रिक कार तयार करून शहरातून चालवत होता. सर्वजन कुतूहलाने पहात असतांना ही कार खंडाळ्याचा घाट चढणार का, असा टोमणा त्यातील एकाने मारला.
त्या तरूणाने कार चार्ज केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कार मुंबईत मंत्रालयासमोर उभी केली.
पुढे त्यांनी किमान ५० एक नवे शोध लावले, प्रत्येकाची एक इंडस्ट्री उभी केली, त्यातील काही कंपन्या जागतिक पातळीवर सुद्धा गेल्या.
१९७६ साली एका प्रख्यात जापानीज कंपनीला आपल्या एका प्रोडक्टच्या निर्मितीसाठी २० सेकंद लागणारं Cycle Time यांने इचलकरंजीमध्ये ते १२ सेकंदात बसवून दाखवलं.
जगप्रसिद्ध फाय गृपचे संस्थापक श्री पंडितराव कुलकर्णी हे या अभियंत्याच नाव.

३. युरोप मध्ये फिरता रंगमंच पाहून “तो मी नव्हेच” या नाटकासाठी ते महाराष्ट्रात बनवायचं स्वप्न घेवून नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आले होते. बऱ्याच अभियंत्यांना, रचनाकारांना आणि कंपन्यांना भेटून सुद्धा त्यांना हवं तसं डिझाईन मिळत नव्हतं.
कोल्हापुरात एकदा प्रयोग संपल्यावर त्यांचा एका मित्र पणशीकराना एका लोहाराच्या पालावर घेवून गेला. पणशीकरांनी अगदी इनिछेने आपली संकल्पना त्याला समजावून सांगितली.
त्या लोहाराने दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या फिरत्या चाकावर पुली आणि लिव्हर गिअर वापरून फिरता बहुमजली रंगमंचाचा मॉडेल चालवून दाखविला जो पुढे पणशीकर आणि इतर सर्वच नाटककारांनी आपल्या वापरता आणला.
किर्लोस्करांनी डीझेलवर चालणारा जनरेटर मार्केटमध्ये आणला तेव्हां या लोहाराने कोळश्यावर चालणारा जनरेटर बनवला जो डीझेल जनरेटरच्या दुप्पट कार्यक्षमतेने चालणारा आणि फक्त ३० % किमतीत बनवला होता.
ही असामी म्हणजे इयत्ता दुसरी शिकलेले म्हादबा मिस्त्री अर्थात महादेव शेळके.

४. उद्योगाची आणि अभियांत्रिकी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला पाथरवट (वडार समाजातील एक उपजात) समाजातील एका तरुण दगड फोडता-फोडता, धरणाच्या कालवा खुदाईची कंत्राटे घेऊ लागला.
पुढे बंधारे, धरण, रस्ते, पाईपलाईनची कामे घेत वस्त्रोद्योग, उर्जा, महामार्ग, बांधकाम सारख्या क्षेत्रात आपला उद्योगविस्तार १००० कोटींच्याही पुढे नेला.
कित्येक उच्चशिक्षित अभियंत्याना घडवणारा बंडी, धोतर, गांधीटोपी वेशातला हा अशिक्षित पण विद्वान अभियंता म्हणजे रामचंद्र मारुती मोहिते.

५. सांगली जिल्ह्याच्या पेड गावातील चांभार कुटुंबातील एक युवक मुंबईतील माझगाव डॉक वर वेल्डरचं काम करणाऱ्या आपल्या मोठ्या भावासोबत शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू झाला. तिथे काम करता-करता इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. देश-विदेशात काम करून व्यावसायिक अनुभव मिळवला. पुढे स्वतःची कंपनी सुरु केली (त्या कंपनीच्या नावात आपल्या सर्व भावांच्या नावाचा समावेश आहे) जिथे ४५०० लोक काम करतात आणि आजचा टर्नओवर ५०० करोड आहे. २०१४ ला आपल्या भावाला मिरजेचा आमदार बनवला.
बालपणी जाती-व्यवस्थेचे चटके खात ज्या गाव-विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायला मनाई होती त्याच गावात त्यांनी सार्वजनिक विहीर खोदून दिली.
हे आहेत मुंबईतील DAS Offshore चे श्री अशोक खाडे, आणि DAS चा फुल्लफॉर्म आहे – दत्ता, अशोक, सुरेश

६. टाटा मोटर्स मध्ये काम करणाऱ्या एका इंजिनीअरने टाटा इस्टीम या गाडीच्या निर्मिती प्रक्रीयेमध्ये आपलं कौशल्य वापरून कंपनीचे २.५ करोड रुपये वाचविले.
त्याच्या बक्षीसापोटी मिळणारं प्रमोशन नाकारून आपल्या गावाकडच्या अल्पशिक्षित तरुण मित्रांना कंपनीत नोकरी देण्यासाठी विनंती केली.
टाटा मोटर्सने ती आनंदाने मान्य केली आणि अल्पावधीत याद्वारे ३०० तरुणांना रोजगार मिळाला. यातूनच २००१ साली सेवा क्षेत्रातील एका नव्या व्यवसायाचा उदय झाला ज्याची मजल आज ७५,००० लोकांच्या रोजगारापर्यंत येऊन पोचली आहे.
पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, संसद भवन, सुप्रीमे कोर्ट, १०० एक महत्वाच्या खाजगी कंपन्या, १५ महत्वाची विमानतळे, ५० महत्वाची मंदिरे आणि अजून बरंच काही…
२२ राज्यातील ७० शहरात कार्यालये उघडली. सोबत शेती, Life Science, महाराष्ट्र आणि जम्मू मधील १०८ Emergency Medical Service , मेगा फूड पार्क, न्यूक्लिअर सायन्सचे Peace Applications, शहरी कचरा व्यवस्थापन या आणि अशा अजून बऱ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली.
आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी या युवकाने आपल्या देशाच्या विकासाच स्वप्नं पाहून त्याच नावाने कंपनी स्थापन केली होती. आज याची वार्षिक उलाढाल २००० कोटींची पुढे आहे.
महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगतीत गेल्या ६० वर्षात महत्वाच योगदान दिलेल्या (हयात असलेल्या) ६० व्यक्तींमध्ये याचं नाव अग्रक्रमावर येतं.
आपल्या व्यवसायामुळे १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले पाहिजेत, १० लाख लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपली कंपनी १०० देशात कार्यरत असली पाहिजे या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे, मानवता जपणारे आणि जगणारे, अत्यंत संवेदनशील आणि सदैव हसतमुख असणारे, मुळचे रहिमतपूरचे आणि VIT कॉलेजचे Electronics इंजिनीअर असणारे
BVG म्हणजेच भारत विकास ग्रुपचे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड

या सगळ्यांनी आम्हांला प्रेरणा दिली, आमचं जीवन सुखकर केलं आणि देशाच्या निर्मितीत भरीव योगदान दिलं.

माहितीत असलेल्या, नसलेल्या अशा सर्वच विश्वेश्वरैयांच्या खऱ्याखुऱ्या वंशजांना अभियंता दिनाच्या निमित्ताने मानाचा सलाम ! 🙏

 • कुलभूषण बिरनाळे

ख-या इंजिनिअर तर सगळ्या महिलाच आहेत. ….. डब्याचं झाकण उघडत नसेल तर कोणत्या बाजूने दणका घालायचा ते तिलाच माहिती… निसटणारी पक्कड कशी पकडायची… डुगडुगणारं पोळपाटाचा पाट स्थिर कसा करायचा… गळणारा नळ बंद करताना कसा हळुच रिव्हर्स करायचा… गॅस शेगडी कमी जास्त करताना मध्येच बंद पडत असेल तर, बंद न पडू देता कशी वापरायची… संपलेल्या पावडरच्या डब्यातून शेवटच्या कणापर्यंत हातावर आपटून कशी पावडर काढायची…

अशा एक ना अनेक कुशलतेची कामं करणाऱ्या महिला इंजिनिअर्स ना खूप खूप शुभेच्छा🙏

कालनिर्देशन

निरनिराळी पंचागे, ‘भिंतीवरी असावे’ असे कालनिर्णय, कॅलेंडरे, पारशी आणि हिजरी कालगणना वगैरेंबद्दल इत्थंभूत माहिती देणारा हा अभ्यासपूर्ण लेख श्री. प्रकाश घाटपांडे यांनी लिहिला आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार.
या विषयावर मी लिहिलेली ‘आजीचे घड्याळ’ ही मनोरंजक लेखमालाही वाचावी.
https://anandghare2.wordpress.com/category/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%a8%e0%a4%be/

नवी भर दि. ०७-११-२०२१ : दाते पंचांगाची माहिती … खाली पहा

कालनिर्देशन

प्रकाश घाटपांडे


“पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे”. अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत असतो, पहात असतो. पण हा कालनिर्णय नसून कालनिर्देशनाचा प्रकार आहे. निर्णय घेणारे तुम्ही कोण लागून गेले? तुम्हाला जर तुमची जन्मतारीख विचारली आणि तुम्ही जर त्याला ‘ माझा जन्म भारतीय सौर दिनांक अमुक अमुक रोजी झाला’ किंवा भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके १८८४ रोजी झाला ‘असे सांगितले तर तो नक्कीच भारतीय असून सुद्धा विक्षिप्त नजरेने तुमच्या कडे बघेल.

मानव जसा उत्क्रांत होत गेला तसतशी त्याला दैनंदिन व्यवहारासाठी कालमापनाची व कालनिर्देशनाची गरज निर्माण झाली. शिकार ते शेती या प्रवासात शेती हा मुख्य मानवी जीवनाचे अंग झाल्याने निसर्गाचे मानवी जीवनाशी नातं सांगणारे दिवस रात्र, उन, पाउस, थंडी, वारा,सागरातील भरती ओहोटी याचा अवकाशातील विशिष्ट ग्रह ताऱ्यांच्या स्थितीशी संबंध हळूहळू लक्षात येउ लागला. समाजजीवनातील सर्व कृत्ये ही अप्रत्यक्षरित्या शेतीशीच निगडीत होउ लागली. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुराशी लोकजीवन अवलंबून होते. त्यामुळे या संबंधांचे निरिक्षण करुन त्यावरुन काही आडाखे बांधता येउ लागले. यातूनच ज्योतिषशास्त्राचा म्हणजे आताच्या खगोलशास्त्रीय भागाचा उगम झाला.

पंचांग हा कालनिर्देशनाचा ज्योतिषशास्त्रीय भाग आणि ज्योतिष हे धर्माच पारंपारिक अंग म्हणून पंचाग प्रचलित झाले ते धार्मिक कृत्याचा दैनंदिन जीवनात आचरण्यासाठी असलेल्या कालनिर्देशनाच्या गरजेपोटीच. पंचांगाची पाच अंगे म्हणजे १) तिथी २) नक्षत्र ३) वार ४) योग ५) करण भारतीय ज्योतिर्गणित हे पृथ्वी केंद्रबिंदू मानून तयार झाले असल्याने सूर्य हा तारा असला तरी त्याला ग्रहाप्रमाणे स्थान देउन तो चल झाला आहे. चंद्र व सूर्य यांच्यात पृथ्वी सापेक्ष बारा अंशाचे अंतर पडण्यास जो कालावधी लागतो त्याला तिथी म्हणतात. चंद्र हा पृथ्वीभोवती २९.५ दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. तरी व्यवहारात तिथी ३० या पुर्णांकात घेतल्या आहेत.

तिथी हे पंचांगाचे बरेच जुने अंग आहे. इ.स. पू १४०० वर्षी तिथी व नक्षत्र ही दोनच अंगे प्रचारात होती. पंचांगात एखादी तिथी दोनदा आलेली असते तर एखाद्या तिथीचा क्षय झालेला असतो. याचे कारण चंद्र व पृथ्वी यांची गती कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते.सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते. ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते.त्यामुळे त्या तिथीचा क्षय होतो. एखादी तिथीबाबत ती दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतर संपते त्यामुळे त्या तिथीची वृद्धी होते. थोडक्यात लॉज मधल्या चेक आउट टाईमप्रमाणे ही गणना होते. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी संबंधित असल्याने तिथी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत मानली जाते. संकष्टी, अंगारिका चतुर्थी हे शब्द आपण नेहमी ऐकतो. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी मंगळवारी आली कि झाली अंगारिका.

प्रत्येक तिथीला एक देवता पण बहाल केली आहे. चतुर्थीची देवता गणेश ही आहे. अमावस्येची देवता पितर ही आहे. नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूहाचे पट्टे. त्यातील ठळक ताऱ्याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात. पण हे झाले स्थूल मानाने. अवकाश गोल म्हणजे एक कलिंगड आहे असे मानले तर त्याचे समान २७ खाप करायचे. म्हणजे एक फोड झाली १३ अंश २० कलांची. थोडक्यात अवकाशगोलातील १३ अंश २० कलांचा दक्षिणोत्तर पट्टा म्हणजे नक्षत्र. चंद्र २९.५ दिवसात या २७ नक्षत्रांची प्रदक्षिणा पूर्ण करतो. एखादे धार्मिक कृत्य अमुकामुक नक्षत्रावर करावे असे म्हणतात त्यावेळी चंद्र त्या नक्षत्रात असताना करावे असा अर्थ अभिप्रेत असतो. जन्मनक्षत्र याचा अर्थ तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते नक्षत्र.

पंचांगातील वार हे अंग मात्र उशीरा प्रचलीत झाले. हे अंग मूळ भारतीयांचे नव्हे. ते आपल्याकडे इ.स.पूर्व ५०० ते १००० वर्षांपूर्वी आले. ते खाल्डियन,इजिप्शियन वा ग्रीक संस्कृतीकडून आपल्याकडे आले असावेत. महाभारतात वार अस्तित्वात नव्हते असे भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या ग्रंथाचे कर्ते शं.बा.दिक्षित सांगतात. होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एक अहोरात्रचे २४ समान भाग केले असता. एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या तास या अर्थाने. प्रत्येक होऱ्याला कुठलातरी ग्रह अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे. योग व करण ही पंचांगाची अंगे व्यवहारात अजिबात उपयोगाची नाही. चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात.असे एकूण २७ योग म्हणजे नक्षत्राइतकेच आहेत. करण हा पण असाच कालावधी आहे तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण असे एकूण सात करणे आहेत. शिवाय अजून ४ करणे आहेत. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे एक करण. या योग आणि करण यांची नावे उच्चारायची म्हणजे जड जीभ असणाऱ्या माणसाचे काम नव्हे.

पंचागातील इतर कालमापक संज्ञा म्हणजे संवत्सर, मास, घटी, पळे. बारा चांद्र मासांचे एक संवत्सर. एक चांद्रमास २९.५ दिवसांचा. अशी ६० संवत्सरे आहेत.अशी आवर्तने चालू असतात. एक सौर वर्ष म्हणजे ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट व ४५ सेकंदचे आहे. चांद्र मासानुसार वर्ष ढोबळपणे ३५४ दिवसांचे होते. तर सौर मानाने येणाऱ्या ११ दिवसांचा फरक भरुन काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एका महिन्याची भर घालतात.यालाच अधिक मास म्हणतात. दुष्काळात तेरावा महिना अशी जी म्हण आहे त्यातला तेरावा महिना म्हणजेच हा अधिक महिना.

घटी पळे या गूढ वाटणाऱ्या कालमापक संज्ञा हल्ली पंचांगात कलाक मिनिटात देतात. २४ तास म्हणजे ६० घटिका,१ तास म्हणजे २|| घटिका व एक मिनिट म्हणजे २|| पळे, एक सेकंद म्हणजे २|| विपळे. आताचे पंचांगक्रर्ते हे सर्व गणित नॉटिकल अल्मानॅक वरुन तास मिनिटे सेकंद या परिमाणात करतात. पूर्वी राजे राजवाड्यांच्याकडे एक घंगाळ (पाण्याचे साठवणूक करणारे एक विशिष्ट प्रकारचे मोठे भांडे) असे. त्यात पाणी विशिष्ट पातळीपर्यंत भरले जाई. त्यात एक विशिष्ट आकाराचे छिद्र असलेले एक छोटे पात्र असे. त्याला घटिका पात्र म्हणत त्यातून पाणी हळू हळू आत शिरत असे. ते पूर्ण भरले की बुडत असे. तेव्हा घटिका भरली असे म्हणत. त्यासाठी स्वतंत्र माणूस नेमला जाई.

उज्जैन ला वेधशाळा होती. तेथे वालुकायंत्र, छायायंत्र अशी कालमापनाची विविध यंत्रे असत. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीच्या काल गणना आहेत. इजिप्तमध्ये पिरॆमिडच्या टोकाची छाया कशी पडते यावरुन दिवस किती गेला व किती राहिला हे ठरवत असत. म्हणजे एक प्रकारचे छायायंत्रच झाले. मध्ययुगिन काळात चीन मध्ये एक दोरी घेउन विशिष्ट अंतरावर गाठी मारत, दोरीचे जळते टोक प्रत्येक गाठीपर्यंत आल्यावर किति काळ झाला हे ठरवत. युरोप मध्ये त्याच काळात मेणबत्ती किती जळाली यावरुन दिवस किती झाला हे ठरवले जात असे. कारण साधे आहे चर्चमध्ये मेणबत्तीचा वापर सहज उपलब्ध होता. आजही खेडेगावात सवसांच्या टायमाला, दिवस कासराभर वर आला आसन तव्हा, माथ्यावर आला होता, कोंबड आरवायच्या टायमाला अशा वर्णनातून दिनमानाचे भाग जुन्या काळातले लोक सांगतात.


पंचांगातील पौराणिक कालगणना
६० वर्षे (संवत्सरे) = १ संवत्सर चक्र
३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे = १ दिव्य वर्ष
१२०० दिव्य वर्षे = १ कलियुग
२४०० दिव्यवर्षे = १ द्वापार युग
३६०० दिव्य वर्षे= १ त्रेता युग
४८०० दिव्य वर्षे= १ कृत युग
४ युगे = १ महायुग
७१ महायुगे = १ मनु
१४ मनु= १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
३६००० कल्प= ब्रह्मदेवाचे पुर्ण आयुष्य
१००० ब्रह्माची आयुष्ये=१ विष्णुची घटका
१००० विष्णुच्या घटिका म्हणजे १ शिवनिमिष
१००० शिवनिमिष = १ महामाया निमिष

पंचांगवादाचे स्वरुप
आपल्याकडे निरनिराळी पंचांगे प्रचारात आहेत. गुजराथ मध्ये जन्मभूमी पंचांग, वैदर्भिय राजंदेकर पंचांग, सोलापूरचे दाते पंचांग, रुईकर पंचांग, लाटकर पंचांग, ढवळे पंचांग, टिळक पंचाग इत्यादि नावे प्रसिद्ध आहेत, पण पंचांगाचे मुख्य पक्ष दोनच. सायन आणि निरयन. अगदी रिपब्लिकन आणि डेमोक्रॆटिक पक्षासारखे. निरयन पक्षाचे म्हणणे असे कि क्रांतीवृत्तावरिल एक विवक्षित बिंदु. हा स्थिर बिंदु मानून ते राशीचक्राचे आरंभस्थान मानावे. त्यानुसार पंचांगाचे गणित असावे. सायन पक्षाचे म्हणणे हा संपात बिंदुच मुळी स्थिर नसल्याने आरंभस्थान हे चल आहे. त्याचे चलन हे वर्षाला सरासरी ५०.२ विकला असे आहे. निरयन पक्षात पुन्हा उपपक्ष आहेतच. कोणता विवक्षित बिंदु आरंभस्थान मानावे? झीटा किंवा रैवत पक्ष, ग्रहलाघव, चित्रा, मद्रास या प्रत्येक उपपक्षाचा आरम्भस्थान वेगळे आहे. हा वाद गेली शंभर वर्ष चालूच आहे. लोकमान्य टिळक हे झीटा अथवा रैवत पक्षाच्या शुद्धपंचांग प्रवर्तक मंडळाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होते. हे पंचांग केरुनाना छत्रे व आबासाहेब पटवर्धन इ.स. १८६५ पासून चालू केले. त्यांच्या गणितानुसार रेवती नक्षत्रातील झीटा पिशियम तारा हे आरंभस्थान मानले आहे. सध्या टिळक पंचांग म्हणून ते ओळखले जाते. चित्रा पक्षाचे म्हणणे आरंभस्थान हे चित्रा नक्षत्राच्या समोरील १८० अंश विरुद्ध असलेला बिंदु हा शके २१२ मध्ये वसंतसंपात बिंदु होता. या पक्षाचे मुख्य समर्थक बेळगावचे भास्कराचार्य ज्योतिषी, पुण्याचे गोपाळ बळवंत जोशी. सध्या सोलापूरचे दाते पंचांग हे चित्रा पक्षाचे आहे. एकच एक पंचांग असावे यासाठी बरेच प्रयत्न झाले. परंतु समन्वय होऊ शकला नाही. ते निर्णय फक्त त्या त्या अधिवेशनापुरतेच राहिले. आरंभ स्थिर मानलेला संपात बिंदु आणी चल असलेला संपात बिंदु यातील अंतर म्हणजेच अयनांश. सरकारमान्य चित्रा पक्षाचे अयनांश हे २००७ मध्ये २३अंश ५७ कला २० विकला असे आहेत.

पंचांग
भारतीय सौर पंचांग
भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर राष्ट्राला सुट्सुटीत सोपे असे दैनंदिन कॆलेंडर असावे अशी गरज निर्माण झाली कारण अशा प्रकारची पंचांगे ही सरकारी अथवा व्यवहारात उपयोगी आणणे अतिशय गैरसोयीचे होते. प्रत्येक पंचांगानुसार धार्मिक सण पण वेगवेगळे येउ लागले. टिळक पंचांगानुसार दिवाळी वेगळ्या दिवशी येते तर दाते पंचांगानुसार वेगळी येते. शिवाय प्रादेशिक पंचांगानुसार निर्माण होणारी प्रादेशिक चालीरिति जपणारी अस्मिता. या सर्वांना सामावून घेणाया एखाद्या कॆलेंडरमध्ये आपली सांस्कृतिक प्रतिमा जपली पाहिजे. राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण झाली पाहिजे. या दृष्टिकोणातून भारत सरकारने १९५२ साली डॉ. मेघनाथ सहा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.प्रा. ए.सी. बॆनर्जी वाईस चॆन्सलर अलाहाबाद. डॊ के.एल.द्फ्तरी नागपूर, श्री ज.स. करंदीकर पुणे, डॊ गोरखप्रसाद. प्रा.र.वि. वैद्य उज्जैन, श्री एन.सी लाहिरी कलकत्त्ता हे दिग्गज त्या समितीत होते. त्यांनी भारतातील वेगवेगळ्या ठीकाणी चालणाऱ्या सुमारे ६० प्रकारच्या पंचांगांचा अभ्यास केला. तिने तीन वर्षात अभ्यास करुन एक अहवाल सादर केला. यात सुचवलेली दिनदर्शिका म्हणजेच भारतीय सौर कॆलेंडर. यात सरकारी कामकाजासाठी दिवस अथवा वार हा मध्यरात्रीपासून चालू होतो. पण धार्मिक कारणासाठी मात्र सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ करावा. वर्षगणना शालिवाहन शकाचीच चालू ठेवावी.
१) चैत्र ३०/३१ दिवस २२ मार्च/ २१ मार्च (लिप इयर असताना)
२) वैशाख ३१ दिवस
३) ज्येष्ट ३१ दिवस
४) आषाढ ३१ दिवस
५) श्रावण ३१
६) भाद्रपद ३१
७) आश्विन ३०
८) कार्तिक ३०
९) मार्गशीर्ष ३०
१०) पौष ३०
११) माघ ३०
१२) फाल्गुन ३०
हे भारतीय सौर कॆलेंडर आकाशवाणी,दूरदर्शन, सरकारी गॆझेट यात फक्त उल्लेख या स्वरुपात असतात. ते सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे म्हणून. पंचांगात पारशी सन, हिजरी सन तसेच त्यातील महिने दिलेले असतात. पारशी वर्ष पर्शिया (इराण) येथे चालू झाले. ३० दिवसांचा महिना व १२ महिन्याचे वर्ष. सौर वर्षाशी मेळ घालण्याच्या सोयीसाठी पुढ्चे वर्ष हे ५ दिवसानंतर चालू होते. या ५ दिवसांना पारशी लोक गाथा म्हणतात. पारशी वर्षाचे महिने असे १) फरवदिन २) अर्दिबेहस्त ३) खुदार्द ४) तीर ५) अमरदाद ६) शेहेरवार ७) मेहेर ८) आबान ९) आदर १०) दय ११) बेहमन १२) अस्पंदाद हिजरी सन हा मोगल साम्राज्य आल्यापासून चालू झाला. मूळ अरबस्तानातले. महंमद पैगंबर यांनी मक्केहून ज्या दिवशी मदिनेला पलायन केले त्याची आठवण म्हणून खलिफ उमर याने हा सन सुरु केला आहे. तो दिवस म्हणजे गुरुवार १५ जुलै ६२२. मुस्लिमांचा दिवस धार्मिक दृष्ट्या सूर्यास्ताला चालू होतो व दुसया दिवशीच्या सूर्यास्ताला संपतो. बारा चांद्रमहिन्याचे एक वर्ष असल्याने व सौरवर्षाशी मेळ घालण्याची भानगड नसल्याने. त्यांचा वर्षारंभ हा १० दिवस दर वर्षी मागे जातो. त्यामुळे ताबूत ३३ वर्षातून सर्व ऋतूतून फिरतो. इसवी सनानुसार एखाद्याचे वय ३३ असेल तर हिजरी सनानुसार त्याचे वय ३४ वर्षे असते. हिजरी सनातील महिने असे १) मोहरम २) रा सफर ३) रबिलावल ४) रबिलाखर ५) जमादिलावल ६) जमादिलाखर ७) रज्जब ८) साबान ९) रमजान १०) सव्वाल ११) जिल्काद १२) जिल्हेज

विक्रम संवत हे मालवांचा राजा विक्रमादित्य याच्या नावाने चालू झाला तर शालिवाहन शक हा सातवाहन राज्यांच्या काळात चालू झाला. सर्वसामान्यपणे जेते राजे आपल्या अथवा वंशाच्या नावाने काहीतरी अस्तित्व चालू इतिहासाच्या पानावर असावे अशी इच्छा व्यक्त क्ररित व त्याची अंमलबजावणी ही राजज्योतिषी व भाट यांच्यावर सोपवीत. आज देखिल ही फार काही वेगळे घडते आहे असे नाही. चौकाचे, रस्त्याचे, विद्यापीठाचे, पूलाचे, इमारतीचे, विमानतळाचे, टर्मिनसचे नामकरण हे आपापल्या स्फूर्तीस्थानांनी व्हावीत यासाठी रक्तपात होतात.

पंचांग धार्मिक प्रथमोपचाराची पेटी.
कुठलही काम करताना देवाधर्माचा कौल घेतलेला बरा असतो. कधी तो मांत्रिक तांत्रिकाच्या माध्यमातून तर कधी पुजारी,बडवे,गुरव यांच्या माध्यमातून. गर्भादान संस्कार, बारसे, मुंज, विवाह, गुणमेलन, मुहूर्त, सण वार, व्रत वैकल्य,मकर संक्रांत, ग्रह उपासना, नवग्रह स्तोत्र, चंद्र व सूर्य ग्रहणे, ग्रहपीडा, दाने व जप. भूमीपूजन, पायाभरणी, गृहप्रवेश, वास्तुशांती , अशौच निर्णय, हवामान व पर्जन्यविचार, नांगरणी पेरणी पासून ते धान्य भरण्यापर्यंत, संत महंतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या, जत्रा, यात्रा. मासिक भविष्य, राजकीय व सामाजिक भविष्ये, धर्मशास्त्रीय शंका समाधान, ब्राह्मणातील शाखा उपशाखा, त्यांचे गोत्र वंशावळ, ९६ कुळी मराठा समाजातील वंश गोत्र देवक. ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेला ग्रहगती, रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती, गणिताची आकडेमोड वाचवणारी रेडिमेड कोष्टके. दशा, अंतर्दशा, लग्नसाधना, नवमांश, अवकहडा चक्र, राशींचे घात चक्र इ. अशा एक ना अनेक गोष्टींचा माहिती कोष म्हणजे पंचांग.

गरजेप्रमाणे त्यात बदल होत गेले. कालबाह्य प्रथा परंपरा यांना धर्मशास्त्राचाच आधार देउन समयोचित पर्याय देण्याचे शहाणपण देखिल काही पंचांगांनी केलं. उदाहरणार्थ गणपतीची मूर्ती ही धातूची असावी किंवा शाडूची असावी. गणेश विसर्जन प्रदूषित नदीत न करता बाद्ली च्या पाण्यात करुन ते पाणी झाडांना घालावे. निर्माल्य हे नदीत न टाकता त्याचे झाडांसाठीच कांपोस्ट खत तयार होऊ शकते.ते झाडालाच घालावे. तरी देखील पुलावरून एखादी होंडा. मर्सीडीस गाडी जाताना थांबते, एखादा माणूस उतरतो निर्माल्य असलेली प्लास्टीकची पिशवी नदीत भिरकावतो आणि पुढील मार्गक्रमणा करतो.

राजेराजवाड्यांच्या काळात दरबारात राजज्योतिषी असे. तो वर्षारंभी पंचांगाची पूजा करुन राजास संवत्सरफल कथन करुन सांगे. राज्यावर काही संकट, पूर, अतिवृष्टी. दुष्काळ, आदि नैसर्गिक संकटांची काय चाहूल लागते आहे? ते सांगत असे. राजा त्याला योग्य बिदागी देत असे. त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालत असे.ज्योतिषाचा सत्कार करुन त्याजकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल असे संवत्सरफलातच म्हटले आहे. आज सुद्धा खेडेगावात भिक्षुकी करणारा ब्राह्मण समाज वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने पंचांगाद्वारे लग्न, मुहुर्त, सत्यनारायण पूजा, अभिषेक, नावरास काढून देणे, धार्मिक कृत्यांचा व्यवहारपयोगी अन्वयार्थ काढून देणे इत्यादि कामे करत असतो. लोक त्याला त्यामोबदल्यात धान्य, भाजीपाला, दूध, पैसे इत्यादि मोबदला देतात. एक प्रकारची बलुतेदारीच म्हणा ना. त्यावर त्याची गुजराण चालते. त्यामुळे पंचांग हे ज्योतिषी कम भिक्षुकाचे पोटापाण्याचे साधन बनले. कर्मसंकट आले कि कायदेशीर कचाट्यातून पळवाटा शोधून मार्ग काढणारा वकील आणी धर्मसंकट आले कि त्यावर धर्मशास्त्रीय तोडगा काढून सुटका करणारे धर्ममार्तंड एकाच प्रकारचे. संकटाचे उपद्रवमूल्य किती? यावर मोबदला ठरतॊ आणि मोबदला किती मिळणार यावर पळवाटा व तोडगे यातील अन्वयार्थ व फेरफार ठरतात. शिवाजी महाराजांची देखील यातून सुटका झाली नाही. राज्याभिषेकाच्या वेळी स्थानिक धर्मपंडिता ऐवजी त्यांनी सरळ काशीहून गागाभट्ट आयात केले. घरात प्रथमोपचाराची जशी औषधे असतात तसा धार्मिक अंगाचा प्रथमोपचार म्हणून बहुतेकवेळा घरात टांगलेले दिसते.

पंचांगाचे सुलभीकरण
पंचांगाचे स्वरुप व प्रकृती यामुळे पंचांग ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली. कालानुसार दैनंदिन गरजांची मर्यादा बदलली. मक्तेदारी वाढल्यामुळे पंचांग ज्या जनसामान्यांसाठी निर्माण झालं तिथ ते रुजण अवघड झाले. व्यावसायिकदृष्ट्या या गोष्टीचा खपावर परिणाम होउ लागला. म्हणूनच पंचांगाचे सुलभीकरण होणे गरजेचे झाले. घटिका पळे दैनंदिन जीवनाचा भाग नसल्याने कलाक मिनिटे पंचांगात येउ लागली. संस्कृतचं प्राकृतीकरण झाले, ज्योतिर्गणितेच्या सुलभतेसाठी सुर्योदयीन ग्रहाच्या स्थितीऐवजी पहाटे साडेपाचचे स्पष्ट ग्रह देण्यात आले. धर्मशास्त्रार्थ सुलभपणे सांगितला गेला. त्यामुळे विशिष्ट गटाची मक्तेदारी काही प्रमाणात मोडली. पंचांगाचा अर्थ लोकांना समजायला थोड सोप झालं. सध्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे लोकांचे दैनंदिन जीवन गतिमान झाले आहे.धार्मिक कृत्याचे संक्षिप्तिकरण झाले. महत्वाच्या वाटणाऱ्या धार्मिक गोष्टींसाठी पंचांग धुंडाळ्ण्यापेक्षा तीच माहीती दिनदर्शिकेत उपलब्ध होणे गरजेचे वाटू लागले. याचं नेमक निरीक्षण केले ते जयंतराव साळगावकरांनी व त्यातूनच त्यांनी सुमंगल पब्लिकेशन काढून पंचांग, मेनू, दैनंदिन कामातील विविध गरजेच्या माहितीचे टिपण. पाककृती, राशीभविष्य, मान्यवरांचे काही लेख अशा आविष्कारांची दिनदर्शिका तयार केली अन ती अल्पावधित लोकप्रिय झाली. आज अशा प्रकारच्या अनेक दिनदर्शिका बाजारात आहेत. आता पंचांग आणि भविष्य हे मोबाईलवर सशुल्क सुविधा म्हणून देखील उपलब्ध आहे. संकष्टि चतुर्थीचा उपवास लक्षात न राहिल्यामुळे मोडू नये म्हणून रिमाईंडर पण लावता येतात. म्हणजे कालनिर्णय आता मोबाईलवर पण आले आहे. पोपटवाला ज्योतिषाकडे पण हातात
एक जुनेपाने पंचांग असते. पोपटाने भविष्याची चिठ्ठी उचलणे आणि पंचाग याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसतो. पण पंचांग हे ज्योतिषाचा ट्रेड मार्क झाला आहे.

प्राचीन रोमन कॆलेंडर ते आताचे ग्रेगरियन कॆलेंडर
इंग्रजी कॆलेंडर इसवी सनाची सुरवात जिझस ख्राईस्टच्या जन्मापासून झाली असे म्हणतात पण ते चुकीचे आहे. ख्रिस्ताची जन्म व मृत्यू या बाबत बरीच मतमतांतरे आहेत. प्राचीन रोमन वर्षगणनेत ज्युलियस सीझरने सुधारणा करुन सौर वर्षमान प्रचारात आणले. त्यासाठी काही बदल देखिल करावे लागले होते. इ.स. पूर्व ४५ वे वर्षी वर्षाचे दिवस ४४५ दिवसांचे धरावे लागले होते. तेव्हा सुद्धा २५ डिसेंबरला वर्षारंभ पकडायचा कि १ जानेवारी असा प्रश्न पडलाच होता.ज्युलियस वर्षमान हे ३६५ दिवस ६ तासांचे धरले होते. म्हणजे खऱ्या सौरवर्षापेक्षा ११ मिनिटे १४ सेकंद अधिक धरले गेले. त्यामुळे इ.स. १५८२ पर्यंत १० दिवसांचे अंतर पडले. ते अंतर भरुन काढण्यासाठी १३ वा पोप ग्रेगरी याने नियम करुन ४ आक्टोबर १५८२ नंतर येणाऱ्या दिवसास १५ आक्टोंबर १५८२ असे संबोधले गेले. दर चौथ्या लीप ईयर चा नियम तसाच ठेवला. सध्याच्या कालगणनेनुसार सौरवर्षापेक्षा २६ सेकंद अधिक असते. त्यामुळे सध्याच्या कालगणनेनुसार ३००० वर्षांनी एक दिवस फरक पडण्यास कारणीभूत होईल. ज्युलियस सीझरने १-३-५-७ हे महिने ३१ दिवसांचे व ४-६-८-१०-१२ हे महिने ३० दिवसांचे ठरविले होते. पुढे ऒगस्टस सीझर याला ही वाटणी मान्य झाली नाही.ज्युलियस च्या जुलै महिन्याला ३१ दिवस आणि आपल्या नावाच्या ऒगस्ट महिन्याला मात्र ३० दिवस ही गोष्ट ऒगस्टसला आवडली नाही. त्याने ऒगस्ट महिन्याला पण ३१ दिवस बहाल केले. त्या ऐवजी फेब्रुवारी महिन्याच्या २९ दिवसातील एक दिवस काढून घेतला. हेच ते सध्याचे इंग्रजी कॆलेन्डर प्रचारात आहे. जिथे जिथे इंग्रजांच्या वसाहती होत्या तिथे ते रुजलं गेलं आणि अंगवळणी पडले. राष्ट्र संघाच्या योजनेत समिति १९२३ साली नेमली व त्यात ग्रेगरियन गणनेत वाटणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कॆलेंडर तयार करण्यात आले. त्यात १३ महिन्यांचे वर्ष व २८ दिवसांचा मास सुचवला. पण तो वार तारीख यांचा मेळ राखण्यास व्यावहारिक दृष्ट्या असमर्थ ठरले.
त्यामुळे सध्याचे ग्रेगरियन कॆलेंडर सुटसुटीत व अंगवळणी पडल्याने इ.स. ३००० पर्यंत तरी कालनिर्देशनाची चिंता नाही.

आंतरराष्ट्रिय कालगणना

सन १९२५ सालापासून शून्य रेखांशावरील ग्रिनीच या लंडन जवळील शहराची स्थानिक वेळ ही आंतरराष्ट्रीय प्रमाणित वेळ म्हणून मान्यता पावली. त्या हिशोबाने भारताची प्रमाण वेळ ही ८२.५ पूर्व रेखांशावरील स्थानिक वेळ असल्याने ग्रिनिच पेक्षा साडेपाच तासाने पुढे आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ग्रिनिच ला मध्यान्हीचे बारा वाजले असतील त्या वेळी भारतात दुपारचे साडेपाच वाजले असतील. हे झालं वेळेबद्दल. पण वाराचे काय? त्यासाठी १८० अंश वृत्ताच्या जवळ समांतर अशी पॆसिफिक समुद्रातून जाणारी काल्पनिक रेषा निश्चित केली.ती ओलांडताना पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असाल तर पुढचा वार धरावा. पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असेल तर मागचा वार धरावा. त्याला आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणून मान्यता आहे. त्यावरुन विमान किवा जहाजे जाताना आपापली घड्याळे त्या ठिकाणी सुनिश्चित करावी लागतात. आता या गोष्टी स्वयंचलित होतात.

पूर्वप्रकशित- उपक्रम संकेतस्थळ व फलज्योतिष चिकित्सा मंडळ अनुदिनी

. . . . .

नवी भर दि.२१-१२-२०२१ :

खर्‍या अर्थाने आज मकर संक्रांत आहे. सूर्य मकर संक्रमण करतो व उत्तरायणाला सूरवात होते. भारतातील सगळ्यात लहान दिवस आज आहे.सूर्य जास्तीत जास्त द्क्षिणेला आज असतो. हळू हळू तो आता उत्तरेकडे म्हणजे विषुववृत्ताकडे सरकत जाईल
तीळ गुळ घ्या गोड बोला वाली मकर संक्रांत मात्र 14 जानेवारीला आहे. हा फरक निरयन व सायन पंचांग गणितामुळे असतो. पंचांगाचे मुख्य पक्ष दोनच. सायन आणि निरयन. अगदी रिपब्लिकन आणि डेमोक्रॆटिक पक्षासारखे.निरयन पक्षाचे म्हणणे असे कि क्रांतीवृत्तावरिल एक विवक्षित बिंदु. हा स्थिर बिंदु मानून ते राशीचक्राचे आरंभस्थान मानावे. त्यानुसार पंचांगाचे गणित असावे. सायन पक्षाचे म्हणणे हा संपात बिंदुच मुळी स्थिर नसल्याने आरंभस्थान हे चल आहे. त्याचे चलन हे वर्षाला सरासरी ५०.२ विकला असे आहे. निरयन पक्षात पुन्हा उपपक्ष आहेतच. कोणता विवक्षित बिंदु आरंभस्थान मानावे? झीटा किंवा रैवत पक्ष, ग्रहलाघव, चित्रा, मद्रास या प्रत्येक उपपक्षाचा आरम्भस्थान वेगळे आहे. हा वाद गेली शंभर वर्ष चालूच आहे. लोकमान्य टिळक हे झीटा अथवा रैवत पक्षाच्या शुद्धपंचांग प्रवर्तक मंडळाचे संस्थापक
व पहिले अध्यक्ष होते.हे पंचांग केरुनाना छत्रे व आबासाहेब पटवर्धन इ.स. १८६५ पासून चालू केले. त्यांच्या गणितानुसार रेवती नक्षत्रातील झीटा पिशियम तारा हे आरंभस्थान मानले आहे. सध्या टिळक पंचांग म्हणून ते ओळखले जाते. चित्रा पक्षाचे म्हणणे आरंभस्थान हे चित्रा नक्षत्राच्या समोरील १८० अंश विरुद्ध असलेला बिंदु हा शके २१२ मध्ये वसंतसंपात बिंदु होता. या पक्षाचे मुख्य समर्थक बेळगावचे भास्कराचार्य ज्योतिषी, पुण्याचे गोपाळ बळवंत जोशी. सध्या सोलापूरचे दाते पंचांग हे चित्रा पक्षाचे आहे. एकच एक पंचांग असावे यासाठी बरेच प्रयत्न झाले. परंतु समन्वय होऊ शकला नाही. ते निर्णय फक्त त्या त्या अधिवेशनापुरतेच राहिले. आरंभ स्थिर मानलेला संपात बिंदु आणी चल असलेला संपात बिंदु यातील अंतर म्हणजेच अयनांश. यामुळे ही मकर संक्रांत सध्या 14 जानेवारीला येत असते. ते काहीही असल तरी खरंही बोलायच व गोडही बोलायच हे काम अवघड आहे ना? मग ती संक्रांत कधीही साजरी करा.😂

. . . . . . . ..

दाते पंचांग

दाते पंचांगाच्या संगणकीकरणाची मुहूर्तमेढ कै श्रीधरपंत दाते यांनीच रोवली. त्यांचे आज पुण्यस्मरण (निधन २८ सप्टेंबर २०००)
त्यानिमित्त पंचांगाच्या शतक महोत्सवा बद्दल लोकसत्तामधील लेख तुमच्यासाठी. देशभरातील विद्वान हे अण्णांशी सल्लामसलत करण्यासाठी, त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सोलापूरला येत असत. ‘सोलापूर व दाते पंचांग’ असे समीकरण असल्याने सोलापूरचे व पर्यायाने महाराष्ट्राचेही नाव मोठे झाले, याबाबत शंकाच नाही. १९७७ पासून अण्णांचे चिरंजीव श्री. मोहनराव ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्र, पत्रिका यांचा अभ्यास त्यांनी आपले वडील व काका यांच्याकडेच केला असल्यामुळे ते त्यात पारंगत झाले आहेत. पंचांगातील गणिताची जबाबदारी श्रीधरपंतांचे चिरंजीव विनय सांभाळत आहेत.
शुभ दिन, शुभ वेळ पाहताना पंचांगातील तिथी, वार, नक्षत्र पाहिले जात असल्याने समाजजीवनात पंचांगाचे महत्त्व आजही खूप आहे. पं. लक्ष्मणशास्त्री दाते (नाना) यांनी सोलापूर येथे नव्याण्णव वर्षांपूर्वी ‘दाते पंचांगा’ची मुहूर्तमेढ रोवली. दाते पंचांगकर्त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा हा वेध, शतक महोत्सवाच्या निमित्ताने..
कोणत्याही भाषेचा उगम ही काही अचानक घडणारी गोष्ट नव्हे, मराठी भाषेचा उगम व विकास हीसुद्धा एक दीर्घकालीन प्रक्रिया होती. काळ हा त्याच्या गतीने पुढे-पुढे जात असतो. त्या त्या काळात काही घटना घडतच असतात व त्या घडलेल्या घटना पुढे इतिहासाचा पाया ठरतात. अशीच एक घटना नव्याण्णव वर्षांपूर्वी घडली ती म्हणजे कै. पं. लक्ष्मणशास्त्री दाते (नाना) यांनी सोलापूर येथे एकहाती ‘दाते पंचांगा’ची मुहूर्तमेढ रोवली. त्या वेळी त्यांनी कल्पनादेखील केली नसेल की, त्यांनी रोवलेल्या बीजाचा आज एवढा वटवृक्ष होईल.
शतक महोत्सव म्हणजे शंभरी! शंभर वर्षे एखादी संस्था किंवा घराणे पिढय़ान्पिढय़ा एखादे कार्य अखंडपणे अव्याहत करू शकते हेच मुळी अकल्पनीय आहे आणि तेही उत्तरोत्तर प्रगती करत, म्हणजे आणखीच अतुलनीय! असेच अतुलनीय काम केले आहे दाते पंचांगकर्त्यांनी! इंग्रजीत दाते लिहिताना ऊं३ी (डेट) असे लिहिले जाते आणि ऊं३ी म्हणजे तारखा! अशा तारखांचा वेळेशी मेळ घालून, तिथी, नक्षत्र, वार यांची मांडणी करण्याची महनीय कामगिरी गेली शतकभर दाते पंचांग करत आहे.
आजही समाजात रोजच्या जीवनात कोणतेही कार्य करताना किंवा घटना घडल्यावर काळ, वेळ व दिवस पाहिला जातो; मग ते घरात होणारे जन्म वा मृत्यू असो, वास्तुप्रवेश असो की नूतन व्यवसायारंभ असो, यासाठी शुभ दिन, शुभ वेळ पाहताना पंचांगातील तिथी, वार, नक्षत्र पाहिले जात असल्याने समाजजीवनात पंचांगाचे महत्त्व आजही खूप आहे. पंचांग हे धर्म, श्रद्धा व भक्ती यावर आधारित नसून ते आकाशातील खगोलीय गणितावर आधारित आहे. त्यामुळे खगोलप्रेमी, आकाश निरीक्षण करणारे विद्यार्थी यांनादेखील पंचांग मार्गदर्शक ठरते. पंचांगाचा समाजाच्या जडणघडणीत फार मोठा सहभाग आहे. भारतीय संस्कृतीत रामायण-महाभारतासारख्या मोठय़ा पुराण ग्रंथातही पंचांगाचा संदर्भ असल्याचे दिसते. आपल्याकडे पंचांगाची एक फार मोठी परंपरा आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कर्नाटक, मुंबई व इतर काही भागांतून पंचांग प्रसिद्ध होत होती, पण ती प्रांतिक व ठरावीक पंथीय लोकांसाठीच उपलब्ध होती व त्यातही एकवाक्यता नव्हती. खगोलीय गणिताचे पंचांगात फार महत्त्वाचे स्थान आहे. कै. नानांचा विचार पडायचा की, जर सर्व पंचांग खगोलीय गणितावरच आधारित आहेत तर प्रत्येक पंचांग वेगळे कसे! अभ्यास करता त्यांच्या लक्षात आले की, ही पंचांग दोन सिद्धांतावर आधारित आहेत. ‘सूर्य सिद्धांत’ आणि ‘ग्रहलाघव’! ग्रहलाघव सिद्धांत हा सुमारे ६०० वर्षांपूर्वी मांडला गेला होता, तर सूर्य सिद्धांत हा त्याच्याही पूर्वी. त्यामुळे ते विसाव्या शतकांपर्यंत कालबाह्य़ झालेले होते. या सिद्धांतापासून केलेली गणितीय मांडणी त्यामुळेच अचूक होत नव्हती, पण इतर पंचांगकर्ते ही गोष्ट मानायला तयार नव्हते. त्यांचे म्हणणे होते की, ग्रहलाघव सिद्धांत हा धर्मशास्त्रावर आधारित आहे आणि त्याच वेळेला पंचांग म्हणजे आकाशाचा आरसा असावा, पंचांगात जे लिहिले आहे ते आकाशात प्रत्यक्ष दिसले पाहिजे. म्हणून पंचांग गणित हे (दृक्तुल्य) पाहिजे, असे मत लोकमान्य टिळकांनी व्यक्त केले. त्याकरिता त्यांनी १९०६ मध्ये एक ज्योतिष परिषद भरविली होती. त्यात खूप मतभिन्नता आढळली. पण त्या वेळेला नानांनी हे ताडले की, टिळक म्हणत आहेत ते खरंच आहे. ग्रहांचा आणि धर्मशास्त्राचा काही संबंध नाही आणि त्यांनी शके १८३८ ला आपले पहिले पंचांग प्रसिद्ध केले. या पंचांगातील गणित मांडण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्या काळी आजच्यासारखे कॉम्प्युटर्स किंवा कॅलक्युलेटर्स नव्हते तर सगळी आकडेमोड स्वत: करायला लागायची. गणिते मांडण्यासाठी नाना हे भिंतीचा वापर करीत आणि पंचांगात सूक्ष्म गणित वापरण्याची प्रथा सुरू झाली, जी पुढे इतर पंचांगकर्त्यांनीदेखील अवलंबली.
कै. नानांचे सुपुत्र पं. धुंडिराज (अण्णा) यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून खगोल गणित, धर्मशास्त्र व मुहूर्तशास्त्राचे आपल्या वडील व आजोबांच्या हाताखाली शिक्षण घ्यायला सुरुवात केली व त्यात विद्वत्ता संपादन केली. ती. अण्णांनी आपल्या विद्वत्तेने अनेकांना पटवून दिले की, गणित व धर्मशास्त्र या दोन स्वतंत्र शाखा आहेत. नाना स्वत: पंचांगासाठी लागणाऱ्या खगोल गणित, धर्मशास्त्र व मुहूर्तशास्त्र यात पारंगत होते पण पंचांगाचे गणित कसे असावे, हे धर्मशास्त्र सांगत नाही, ही गोष्ट पंचांगकर्त्यांना पटविण्यात अण्णांचा फार मोठा वाटा होता. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातसह संपूर्ण भारतातील ९० टक्के पंचांगकर्त्यांनी दृक्प्रत्ययी गणिताचा वापर करायला सुरुवात केली. हा पंचांग क्षेत्रासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा ‘माइलस्टोन’ ठरला.
१९५४ मध्ये त्या वेळचे पंतप्रधान पं. नेहरू यांनी ‘कॅलेंडर रिफॉर्म कमिटी’ची स्थापना केली. महाराष्ट्रामधून त्या समितीने अण्णांना आमंत्रित केले व पुढे २० वर्षे हे काम ‘दाते पंचांग’ करत होते.
पुढे अण्णांचे धाकटे बंधू श्रीधरपंत यांनी पंचांगकार्यात मदत करण्यास सुरुवात केली. ते खगोलीय गणिताचे गाढे अभ्यासक होते. पंचांग वापरणाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक कोष्टके व रचना केल्या, ज्या पुढे जाऊन दाते पंचांगाची वैशिष्टय़े ठरल्या. १९५५ पासून दाते पंचांगाने घटीपळाबरोबरच घडय़ाळातील वेळा देण्यास सुरुवात करून दाते पंचांग सुलभ केले. क्षयमास हा १४१ वर्षांनी आणि त्यानंतर १९ वर्षांनी येतो. अण्णांच्या काळात १४१ वर्षांनी येणारा क्षयमास आला. त्या वेळेस अहमदाबाद येथील वेधशाळेने पंचांगकर्त्यांचे संमेलन बोलावले. त्यात अनेक मत-मतांतरे होती, अण्णांचे वाक्य प्रमाण मानून अध्यक्षांनी अण्णांचाच निर्णय योग्य मानला व त्यामुळे भारत सरकारला वर्षभरातील आधी जाहीर केलेल्या सुट्टय़ादेखील बदलायला लागल्या!
कै. धुंडिराजशास्त्री दाते व कै. श्रीधरपंत दाते यांनी जवळजवळ ५० वर्षे दाते पंचांगाचे काम समर्थपणे सांभाळले.
महाराष्ट्र, गुजरात पंचांगकर्त्यांत मतभिन्नता होती हे ओळखून मोहनरावांनी पुढाकार घेतला व सर्वानी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज इतर पंचांगकर्त्यांच्या लक्षात आणून दिली की, ज्यामुळे समाजात सण-उत्सव याबाबत गोंधळ होणार नाही. आता वर्षांतून एकदा सर्व पंचांगकर्ते जमून शास्त्रचर्चा करून निर्णय घेतला जातो. ज्यामुळे मधली दरी नाहीशी झाली आहे.
आता दाते पंचांगाची चौथी पिढी, चिरंजीव ओंकार कार्यरत झाली आहे. दाते पंचांग दिनदर्शिका आता कन्नड व हिंदी भाषेतही प्रकाशित होते. नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतीय सांस्कृतिक परंपरेची जगाला नव्याने ओळख करून ग्लोबल होणारे व पोथीच्या पानावरून वेबसाइटच्या जगात झेप घेणारे ‘दाते पंचांग’ असेच मोठे होवो. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारे दाते पंचांग आता मोबाइल क्षेत्रात प्रवेश करून ‘स्मार्ट’ही होत आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी, पंचाहत्तरावे दाते पंचांग माझे वडील दिवंगत ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते. त्या वेळी भाषण करताना त्यांनी सांगितले होते, ‘‘दाते पंचांगाची शंभरी साजरी होईल तेव्हा मी या जगात नसेन, परंतु माझा उत्तराधिकारी इथे असेल.’’ आज तसेच घडत आहे, मी ‘दाते पंचांग शतक महोत्सव समिती’चा अध्यक्ष या नात्याने शंभरीच्या सोहळ्यात सहभागी झालोय. हे भाग्य मला मी साळगावकर कुटुंबात जन्माला आलो म्हणूनच लाभू शकले. या शतक महोत्सवाला आणि दाते पंचांगाच्या भावी वाटचालीला कालनिर्णय परिवारातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो.
(लेखक ‘कालनिर्णय’चे संचालक आहेत.)

*******************

भारतातले नववर्षदिन

·
१४ एप्रिल -नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
विनय उवाच
होय !! भारताच्या अनेक भागात आज पासून नाविन वर्ष सुरु होत आहे.पंजाब,बंगाल,आसाम ,उडीसा , तामिळनाडू ,केरळ या राज्यात आज नव वर्षारंभ साजरा केला जातो. भारतात जशी भाषा ,वेशभूषा ,खानपान यांच्यात विविधता आहे अगदी तशीच कालगणना आणि कॅलेंडर मध्ये देखील आहे.सौरशुद्ध चांद्र/ चांद्र सौर /शुद्ध सौर ,सायन /निरयन, अमान्त – पौर्णिमान्त
विक्रम संवतीय/ शालिवाहन संवतीय, अशा अनेक प्रकारचे ६० हून अधिक वेगवेगळ्या कालगणना भारतात प्रचलित होत्या /आहेत .आणि अर्थातच या मुळे भारतीयांचे नवीन वर्ष वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या दिवशी सुरु होते. कालगणनेची इतकी विविधता जगात कुठेच नसावी!!!
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इथे चांद्र-सौर अमांत शालिवाहन कालगणना चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरु होते. गुजराथी वर्ष दिवाळीच्या पाडव्यापासून सुरु होते. उत्तर भारतात विक्रम संवत पौर्णिमान्त असतो. काठेवाड, गुजरात व राजस्थानचा काही भाग इथे आषाढात चालू होणारी पंचांगे प्रचलित होती. शेतीसाठीची फसली व शुहूर कालगणनेची सुरवात सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केल्यावर होते. आणि सौर पंचांगे सूर्याने मेष राशीत प्रवेश केल्यावर म्हणजे आज १४ एप्रिल पासून सुरु होतात. हा दिवस पंजाबमध्ये बैसाखी, आसाममध्ये रोंगाली किंवा बोहाग बिहू, तामिळनाडू मध्ये पुथंडु, केरळ मध्ये विशू , ओडीसात पाना संक्रांति तर बंगाल मध्ये पहेला वैशाख म्हणून साजरा होतो.
अरे बापरे!!! मग सगळे भारतीय एकमेकांना एकसाथ Happy New Year कधी करू शकतील???? या सगळ्या गोंधळात एक दिवस मात्र असा आहे जो अख्या भारताचा नवीन वर्षारंभ म्हणता येऊ शकेल. तो दिवस १ जानेवारी असं उत्तर मनात आलं असेल तर साफ चूक !!!! तो दिवस कोणता आणि भारताचं अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर कोणतं हे जाणून घ्यायचं असेल तर लोकमत मध्ये प्रकाशित झालेला हा लेख वाचायला हवा !!
विनय जोशी
vinayjoshi23@gmail.com

भारतातल्या निरनिराळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नववर्षदिन साजरे केले जातात. ते या नकाशात पहा.

नववर्षाच्या बहुभाषिक शुभेच्छा
नववर्ष सुखसमृद्धीचे जावो ……… मराठी

मंगलम् नूतनम् वर्षम् ……….. संस्कृत
नववर्षकी शुभकामनाएं ………. हिंदी
पुत्ताण्डु नलवाषत्तुकल ……….. तामीळ
नवें सालदी वदायी ………… पंजाबी
नव वर्षा आशंसकल ……….. मल्याळी
नव्य वरियुक मुबारख ………. काश्मीरी
नतून बच्छरर हुमेश्या थाकिल ….. आसामी
होस वर्षद शुभाषयगळु ………. कानडी
नबवर्षर शुभेच्छा ………… ओरिया
नतून बर्षेर प्रीतिओ शुभेच्छा …… बंगाली
नूतन संवत्सर शुभकांक्षलु ……. तेलुगु
नववर्षनी शुभकामना ……… गुजराथी
नया साल मुबारक ………. उर्दू
नये साल जूं वाधायूं हुजनिव ….. सिंधी

प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ -आर्यभट

महान भारतीय शास्त्रज्ञ आर्यभटापासून या पानाची सुरुवात करीत आहे.

पृथ्वी स्वताचे भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांची आज जयंती १२-०६-२०२१

दि. १९एप्रिल१९७५ रोजी ’आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला.
आर्यभट्टाने वर्षाचे कालमापन केले होते. ते ३६५ दिवस, १५ घटी, ३१ पळे व १५ विपळे भरले. कोणतीही आधुनिक साधने नसताना सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी आर्यभट्टाने केलेले हे वर्षाचे कालमापन जवळजवळ अचूक आहे.
पहिला आर्यभट्ट (देवनागरी लेखनभेद: पहिला आर्यभट संस्कृत: आर्यभटः ) (इ.स. ४७६ – इ.स. ५५०) हा भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. ११ ऑगस्ट इ.स. ५१९ चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टाला काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. लोकांच्या अज्ञानामुळे आर्यभट्टास उपेक्षा भोगावी लागली.
लेखन
त्याने इ.स. ४९९ च्या सुमारास रचलेला आर्यभटीय हा गणित व खगोलशास्त्रावरील विवेचनात्मक ग्रंथ या विषयांवरील प्राचीनतम भारतीय साहित्यकृतींमधील एक मानला जातो. वराहमिहिराच्या साहित्यातील संदर्भांनुसार त्याने आर्य सिद्धान्त नावाचा अन्य एक ग्रंथही रचला. त्याचे भाग (१) गीतिका पाद, (२) गणितपाद,(३) कालक्रियापाद, (४) गोलपाद. मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही असे दिसून येते. अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. व वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते.
आर्यभटाने ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच पृथ्वी स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा तो पहिला शास्त्रज्ञ होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच ‘पाय’ नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे सूर्य सिद्धान्तावर याने लिहिलेला एक टीका ग्रंथ ‘सूर्य सिद्धान्त-प्रकाश ‘ या नावाने प्रसिद्ध आहे.
आर्यभट्ट यांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग खगोलशास्त्र विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होते. त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणेही सोपे जात असे. जसे –वर्गाक्षराणि वर्गेऽ वर्गेऽ वर्गाक्षराणि कात्‌ मौ यः । खद्विनवके स्वरा नववर्गेऽ वर्गे नवान्त्यवर्गे वा ॥ (विकिपीडियामधून )”
श्री.माधव विद्वांस आणि फेसबुक चे आभार

शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे

शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या महान भारतीय आणि मराठी शास्त्रज्ञाचे नाव फारसे ऐकले जात नाही. विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हे नाव असे उपेक्षित का राहिले माहीत नाही. विेजेच्या दिव्यासारख्या क्रांतिकारक शोधाने थॉमस आल्वा एडिसनचे नाव अजरामर झाले, पण कदाचित असे सर्व जनतेच्या उपयोगाचे शोध न लावल्यामुळे या ”हिंदुस्थानच्या एडिसन” ला मात्र अंधारात रहावे लागले असे दिसते.


“हिंदुस्थानचे एडिसन “असे ज्यांना संबोधिले होते. दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे एकस्व (पेटंट) संपादन करणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या अमेरिकेन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणाऱ्या डॉ.शंकर आबाजी भिसे यांचे आज पुण्यस्मरण (जन्म २९ एप्रिल १८६७ -मृत्यू ७ एप्रिल १९३५).

भारतीय अनुप्रयुक्त संशोधक. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय कल्याण, जळगाव, धुळे व पुणे येथे मॅट्रिकपर्यंतच झाले; लहानपणापासून त्यांचा कल शास्त्रीय विषयांकडे होता. १८८८-९७ या काळात त्यांनी महालेखापालांच्या कार्यालयात नोकरी केली. नोकरीत असतानाही ते शास्त्रीय ज्ञानावर आधारित चमत्कृतिजनक व मनोरंजक उपक्रम करीत. १८९३ मध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ‘द सायंटिफिक क्लब’ ही संस्था त्यानी स्थापन केली व संस्थेतर्फे त्यांनी १८९४ मध्ये ‘विविध कलासंग्रह’ हे मासिक सुरू केले. तसेच १८९०-९७ या काळात ते आग्रा लेदर वर्क्स या कारखान्याच्या संचालक मंडळावर होते. १८९९ मध्ये ते इंग्‍लंडला गेले. तेथील वास्तव्यात दादाभाई नवरोजी यांनी यांना सहाय्य केले. भिसे यांनी तेथे जाहिराती दाखविणारे यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन वितरण व नोंदणी करणारे यंत्र इ. यंत्रांविषयी संशोधन केले.
लंडन येथील सोसायटी ऑफ सायन्स, लेटर्स अँड आर्ट्‌स या संस्थेने १८९७ मध्ये जाहीर केलेल्या ‘स्वयंमापक यंत्र निर्मिती’ स्पर्धेत त्यांनी भाग घेतला व तीत यशस्वी होऊन बक्षीस मिळविले. यामुळे त्यांना त्या संस्थेचे सन्माननीय सभासद करून घेण्यात आले.

यानंतर १९०० मध्ये भिसे यांचे लक्ष मुद्रण व्यवसायातील यंत्रसामग्रीकडे लागले व त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो, मोनो इ. यंत्रांच्या रचना व कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी ‘भिसोटाइप’ या यंत्राचा शोध लावला व त्याचे प्रथम इंग्‍लंडमध्ये व पुढे अमेरिका, जर्मनी, फ्रान्स इ. देशांत एकस्व (पेटंट) घेतले. या यंत्राच्या उत्पादनासाठी सर रतनजी टाटा यांचे सहकार्य मिळवून द टाटा-भिसे इन्‌व्हेन्शन सिंडिकेट ही कंपनी लंडन येथे १९१० मध्ये स्थापन केली; पण १९१५ मध्ये ती बंद पडली. त्याच सुमारास दर मिनिटास सु. १,२०० विविध प्रकारचे छपाईचे खिळे पाडणारे ‘गुणित मातृका’ हे यंत्र आणि १९१४ मध्ये खिळे पाडणारे आणखी एक असेच नवे यंत्र शोधून काढले व १९१६ मध्ये ते विक्रीस आणले. १९१६ साली ते अमेरिकेस गेले. तेथे त्यांनी युनिव्हर्सल टाइप मशिन या कंपनीच्या विनंतीनुसार ‘आयडियल टाइप कास्टर’ हे यंत्र शोधून काढले व अमेरिकेत त्याचे एकस्व घेतले आणि यंत्राच्या उत्पादनासाठी भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन करून १९२१ मध्ये पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय मुद्रण व्यवसायातील आणखी अशीच यंत्रे त्यांनी शोधून काढली.

इ. स. १९१७ मध्ये त्यांनी कपडे धुण्यासाठी वापरता येईल असे एक संयुग तयार केले, त्यास ‘शेला’ हे नाव देऊन त्याच्या निर्मितीचे हक्क एका इंग्लिश कंपनीला विकले. १९१० मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातील एक भारतीय औषध फार गुणकारी ठरले. त्याचे रासायनिक पृथःकरण त्यांनी करवून त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे हे त्यांनी जाणले व १९१४ मध्ये स्वतःच एक नवीन औषध बनवून त्यास ‘बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले व पहिल्या महायुद्धात त्याचा अमेरिकन लष्कराने मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यावर आणखी संशोधन करून आयोडीन घटक असलेले पोटात घेता येईल असे एक ओषध त्यानंतर त्यांनी तयार केले व त्याच्या उत्पादनासाठी १९२३ मध्ये न्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७ मध्ये त्याचे उत्पादन व वितरण यांचे हक्क त्यांनी शेफलीन कंपनीला विकले. या औषधास त्यांनी ‘आटोमिडीन’ (आणवीय आयोडीन) हे नाव दिले. हे औषध बऱ्याच रोगांवर उपयुक्त ठरले.

भिसे यांनी विद्युत् शास्त्रातही बरेच प्रयोगात्मक संशोधन केले. त्यांनी विविध क्षेत्रांत सुमारे २०० शोध लावले व सुमारे ४०च्या वर एकस्वे घेतली.
भिसे यांना भारतातील तत्कालीन राजकारणाविषयी आस्था होती. शेवटी ते अध्यात्माकडे वळले आणि एकी, शांतता व जाणीव या तत्त्वांवर आधारलेल्या जागतिक धर्माचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी अमेरिकेत लोटस फिलॉसाफी सेंटरची स्थापना केली.
माउंट व्हर्नान येथील चेंबर ऑफ कॉमर्सचे ते सदस्य होते. अमेरिकन हूज हू मध्ये समाविष्ट झालेले ते पहिलेच भारतीय होत. इंग्‍लंड व अमेरिका येथील यंत्रतज्ञांनी त्यांना “हिंदुस्थानचे एडिसन” असे संबोधिले होते. अमेरिका व इंग्‍लंड येथील निय़तकालिकांतून तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रविद्या इ. विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले. ते न्यूयॉर्क येथे हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.””
भिसे यांनी आविष्कार केलेली यंत्रे
स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले.
स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र – त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला.
भिसे मुद्रण यंत्र – हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले.
मिनिटाला २४०० टाइप (खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते.
समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा.
वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र.
धुण्यासाठी ‘ रोला ‘ नावाचा रासायनिक पदार्थ.
जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) – या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली.

 • श्री.माधव विद्वांस (फेसबुक) आणि मराठी विश्वकोशावरून साभार

विकिपीडिया: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87
हिंदीमधून माहिती:
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87

शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या महान भारतीय आणि मराठी शास्त्रज्ञाचे नाव फारसे ऐकले जात नाही. विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हे नाव असे उपेक्षित का राहिले माहीत नाही. विेजेच्या दिव्यासारख्या क्रांतिकारक शोधाने थॉमस आल्वा एडिसनचे नाव अजरामर झाले, पण कदाचित असे सर्व जनतेच्या उपयोगाचे शोध न लावल्यामुळे या ”हिंदुस्थानच्या एडिसन” ला मात्र अंधारात रहावे लागले असे दिसते.


“हिंदुस्थानचे एडिसन “असे ज्यांना संबोधिले होते. दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे एकस्व (पेटंट) संपादन करणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या अमेरिकेन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणाऱ्या डॉ.शंकर आबाजी भिसे यांचे आज पुण्यस्मरण (जन्म २९ एप्रिल १८६७ -मृत्यू ७ एप्रिल १९३५).

भारतीय अनुप्रयुक्त संशोधक. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय कल्याण, जळगाव, धुळे व पुणे येथे मॅट्रिकपर्यंतच झाले; लहानपणापासून त्यांचा कल शास्त्रीय विषयांकडे होता. १८८८-९७ या काळात त्यांनी महालेखापालांच्या कार्यालयात नोकरी केली. नोकरीत असतानाही ते शास्त्रीय ज्ञानावर आधारित चमत्कृतिजनक व मनोरंजक उपक्रम करीत. १८९३ मध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ‘द सायंटिफिक क्लब’ ही संस्था त्यानी स्थापन केली व संस्थेतर्फे त्यांनी १८९४ मध्ये ‘विविध कलासंग्रह’ हे मासिक सुरू केले. तसेच १८९०-९७ या काळात ते आग्रा लेदर वर्क्स या कारखान्याच्या संचालक मंडळावर होते. १८९९ मध्ये ते इंग्‍लंडला गेले. तेथील वास्तव्यात दादाभाई नवरोजी यांनी यांना सहाय्य केले. भिसे यांनी तेथे जाहिराती दाखविणारे यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन वितरण व नोंदणी करणारे यंत्र इ. यंत्रांविषयी संशोधन केले.
लंडन येथील सोसायटी ऑफ सायन्स, लेटर्स अँड आर्ट्‌स या संस्थेने १८९७ मध्ये जाहीर केलेल्या ‘स्वयंमापक यंत्र निर्मिती’ स्पर्धेत त्यांनी भाग घेतला व तीत यशस्वी होऊन बक्षीस मिळविले. यामुळे त्यांना त्या संस्थेचे सन्माननीय सभासद करून घेण्यात आले.

यानंतर १९०० मध्ये भिसे यांचे लक्ष मुद्रण व्यवसायातील यंत्रसामग्रीकडे लागले व त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो, मोनो इ. यंत्रांच्या रचना व कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी ‘भिसोटाइप’ या यंत्राचा शोध लावला व त्याचे प्रथम इंग्‍लंडमध्ये व पुढे अमेरिका, जर्मनी, फ्रान्स इ. देशांत एकस्व (पेटंट) घेतले. या यंत्राच्या उत्पादनासाठी सर रतनजी टाटा यांचे सहकार्य मिळवून द टाटा-भिसे इन्‌व्हेन्शन सिंडिकेट ही कंपनी लंडन येथे १९१० मध्ये स्थापन केली; पण १९१५ मध्ये ती बंद पडली. त्याच सुमारास दर मिनिटास सु. १,२०० विविध प्रकारचे छपाईचे खिळे पाडणारे ‘गुणित मातृका’ हे यंत्र आणि १९१४ मध्ये खिळे पाडणारे आणखी एक असेच नवे यंत्र शोधून काढले व १९१६ मध्ये ते विक्रीस आणले. १९१६ साली ते अमेरिकेस गेले. तेथे त्यांनी युनिव्हर्सल टाइप मशिन या कंपनीच्या विनंतीनुसार ‘आयडियल टाइप कास्टर’ हे यंत्र शोधून काढले व अमेरिकेत त्याचे एकस्व घेतले आणि यंत्राच्या उत्पादनासाठी भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन करून १९२१ मध्ये पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय मुद्रण व्यवसायातील आणखी अशीच यंत्रे त्यांनी शोधून काढली.

इ. स. १९१७ मध्ये त्यांनी कपडे धुण्यासाठी वापरता येईल असे एक संयुग तयार केले, त्यास ‘शेला’ हे नाव देऊन त्याच्या निर्मितीचे हक्क एका इंग्लिश कंपनीला विकले. १९१० मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातील एक भारतीय औषध फार गुणकारी ठरले. त्याचे रासायनिक पृथःकरण त्यांनी करवून त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे हे त्यांनी जाणले व १९१४ मध्ये स्वतःच एक नवीन औषध बनवून त्यास ‘बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले व पहिल्या महायुद्धात त्याचा अमेरिकन लष्कराने मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यावर आणखी संशोधन करून आयोडीन घटक असलेले पोटात घेता येईल असे एक ओषध त्यानंतर त्यांनी तयार केले व त्याच्या उत्पादनासाठी १९२३ मध्ये न्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७ मध्ये त्याचे उत्पादन व वितरण यांचे हक्क त्यांनी शेफलीन कंपनीला विकले. या औषधास त्यांनी ‘आटोमिडीन’ (आणवीय आयोडीन) हे नाव दिले. हे औषध बऱ्याच रोगांवर उपयुक्त ठरले.

भिसे यांनी विद्युत् शास्त्रातही बरेच प्रयोगात्मक संशोधन केले. त्यांनी विविध क्षेत्रांत सुमारे २०० शोध लावले व सुमारे ४०च्या वर एकस्वे घेतली.
भिसे यांना भारतातील तत्कालीन राजकारणाविषयी आस्था होती. शेवटी ते अध्यात्माकडे वळले आणि एकी, शांतता व जाणीव या तत्त्वांवर आधारलेल्या जागतिक धर्माचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी अमेरिकेत लोटस फिलॉसाफी सेंटरची स्थापना केली.
माउंट व्हर्नान येथील चेंबर ऑफ कॉमर्सचे ते सदस्य होते. अमेरिकन हूज हू मध्ये समाविष्ट झालेले ते पहिलेच भारतीय होत. इंग्‍लंड व अमेरिका येथील यंत्रतज्ञांनी त्यांना “हिंदुस्थानचे एडिसन” असे संबोधिले होते. अमेरिका व इंग्‍लंड येथील निय़तकालिकांतून तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रविद्या इ. विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले. ते न्यूयॉर्क येथे हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.””
भिसे यांनी आविष्कार केलेली यंत्रे
स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले.
स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र – त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला.
भिसे मुद्रण यंत्र – हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले.
मिनिटाला २४०० टाइप (खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते.
समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा.
वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र.
धुण्यासाठी ‘ रोला ‘ नावाचा रासायनिक पदार्थ.
जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) – या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली.

 • श्री.माधव विद्वांस (फेसबुक) आणि मराठी विश्वकोशावरून साभार

विकिपीडिया: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87
हिंदीमधून माहिती:
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87


गुरु शनि महायुति २०२०

गुरू हा ग्रह आपल्या सूर्यमालिकेतला सर्वात मोठा ग्रह आहे, म्हणजे केवढा मोठा? त्याचा व्यास आपल्या पृथ्वीच्या सुमारे अकरापट आहे. त्याच्या खालोखाल असलेला शनि हा ग्रहसुद्धा पृथ्वीच्या सुमारे साडेनऊपट मोठा आहे. या दोन्ही ग्रहांचे आकारमान (घनफळ) पृथ्वीच्या सुमारे हजारपट इतके आहे. म्हणजे गुरु आणि शनि हे मोठा भोपळा आणि कलिंगडाएवढे असले तर पृथ्वी आणि तिच्याहूनही लहान असलेले मंगळ, शुक्र आणि बुध हे सर्व ग्रह जेमतेम बोरे किंवा आवळ्याइतपत पिटुकले आहेत. या दोन्ही मोठ्या ग्रहांच्या पृष्ठभागावर खडकच नसल्यामुळे ते अवाढव्य वायुरूप गोळे वाटतात. इतर लहानसहान ग्रह त्यांना धडकले तर ते त्या वायूंमध्ये बुडून जातील आणि ते कुठे गेले ते समजणारही नाही. पण असे काहीही होण्याची अजीबात शक्यता नाही त्यामुळे काळजी करायचे काही कारण नाही.

गुरु आणि शनि हे दोन मोठे ग्रह आपल्या पृथ्वीपासून खूपच दूर अंतरावरून सूर्या भोवती फिरत असतात आणि त्यांच्या मानाने आपण सूर्याच्या जवळ असल्यामुळे ते आपल्यालाही प्रदक्षिणा घालत असतात. गुरू हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या पाचपट दूर तर शनि नऊपट दूर असतो. तरीही चंद्राप्रमाणेच सूर्याचा प्रकाश परावर्तित करणारा गुरु हा एक तेजस्वी असा ग्रह दिसतो, पण त्या मानाने शनि बराच फिकट दिसतो. गुरूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला सुमारे बारा वर्षे लागतात, तर शनीला ३० वर्षे लागतात, इतक्या संथ चालीने चालत असल्यामुळे ते एकोणीस वीस वर्षांमध्ये एकदा एकमेकांच्या जवळ आलेले दिसतात, म्हणजे पृथ्वीवरून तसे दिसते, प्रत्यक्षात ते एकमेकांपासून कित्येक कोटी किलोमीटर्स दूरच असतात.

असा एक योग येत्या २१ डिसेंबरला येत आहे. आजसुद्धा सूर्यास्तानंतर रात्री पश्चिमेच्या आकाशात पाहिले तर जराशा दक्षिणेच्या बाजूला आपल्याला ठळक गुरु दिसतो आणि त्याच्या थोडासा वर मंद शनि दिसतो. सध्या हे दोन्ही ग्रह मकर राशीमध्ये आहेत. ते तसे कुंडलीमध्ल्या एका घरात दिसत असले तरी जवळजवळ बसून गप्पा मारत नसतात. पृथ्वीपासून गुरु ग्रह जितका लांब आहे, जवळ जवळ तितक्याच अंतराने शनि हा ग्रह त्याच्याही पलीकडे दूरवर फिरत आहे. आपल्याला मात्र रोज रात्री पहात राहिल्यास त्यांच्यामधील अंतर कमी कमी होतांना दिसेल आणि २१ तारखेला ते दोघे अगदी जवळ जवळ दिसतील. हा योग मात्र तब्बल चारशे वर्षांनंतर येत आहे. म्हणजे जे दृष्य गॅलीलिओने आकाशात पाहिले असेल ते या दिवशी आपल्याला दिसणार आहे. तेंव्हा ते दुर्मिळ आणि अद्भुत दृष्य पाहण्यासाठी सज्ज रहा आणि एकादी दुर्बिण मिळाली तर फारच छान.

या ग्रहांची सविस्तर माहिती इथे
https://en.wikipedia.org/wiki/Jupiter
https://en.wikipedia.org/wiki/Saturn

या ग्रहांची थोडक्यात माहिती अशी आहे.

 1. ग्रहाचे नाव – पृथ्वी

सूर्यापासुन चे अंतर – 14.96
परिवलन काळ – 23.56 तास
परिभ्रमन काळ – 365 1/4 दिवस
इतर वैशिष्टे – सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

 1. ग्रहाचे नाव – गुरु

सूर्यापासुन चे अंतर – 77.86
परिवलन काळ – 9.50 तास
परिभ्रमन काळ – 11.86 वर्षे
इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.

 1. ग्रहाचे नाव – शनि

सूर्यापासुन चे अंतर – 142.6
परिवलन काळ – 10.14 तास
परिभ्रमन काळ – 29 1/2 वर्ष
इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.

*****


गुरु -शनी महायुती
Great conjunction of Jupiter and Saturn

येत्या २१ डिसेंबरच्या संध्याकाळी आकाशात एक दुर्मिळ घटना बघता येणार आहे मकर तारकासमूहात दिसणारे गुरु आणि शनी जवळ येत येत २१ डिसेंबरला एकमेकांच्या अगदी जवळ दिसणार आहेत.

कधीकधी पृथ्वीवरून बघतांना दोन खगोलीय घटक ( ग्रह ,तारे ,चंद्र इत्यादी ) एकमेकांच्या जवळ आल्यासारखे आपल्याला दिसतात याला युती (conjunction) असे म्हटले जाते.प्रत्यक्षात हे घटक एकमेकांच्या जवळ असतीलच असे नाही.गुरुला सूर्याभोवती प्रदक्षिणा मारायला १२ वर्षे तर शनीला २९.५ वर्षे लागतात.दोघांच्या या परिभ्रमण काळात दर २० वर्षांनी गुरु- शनी एकमेकांच्या जवळ आल्यासारखे वाटत त्यांची युती आपल्याला दिसते.या आधी ३१ मे २००० रोजी अशी युती होती तर या पुढे ५ नोव्हेंबर २०४०ला पुढील अशी युती असेल.

दर २० वर्षांनी गुरु -शनी युती होत असली तरी २१ डिसेंबर २०२० ची महायुती(Great conjunction) मात्र दुर्मिळ आहे.यावेळी शनी आणि गुरु हे एकमेकांच्या अगदी जवळ आल्यासारखे दिसणार आहे.यावेळी त्यांचातील पृथ्वीसापेक्ष कोनीय अंतर ६ आर्क सेकेंद इतके कमी असेल.यामुळे साध्या डोळ्यांना गुरुच्या तेजस्वी ठिपक्याला अगदी लागून शनी दिसू शकेल.द्वैती तार्यासारखे गुरु-शनी जणू “द्वैती ग्रह”(Double Planet) असल्यासारखे या वेळी आपल्याला वाटतील.

सध्या हे दोन्ही ग्रह सूर्यास्तानंतर काही वेळ पश्चिम आकाशात दिसत आहेत. यांचे रोज निरीक्षण केल्यास गुरु हळूहळू शनीच्या जवळ येताना आपल्याला दिसेल. २१ डिसेंबरच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर संधीप्रकाशात तेजस्वी गुरु दक्षिण -पश्चिम आकाशात दिसायला लागेल. संपूर्ण अंधार पडल्यावर ही महायुती अधिक चांगली दिसेल. साध्या डोळ्यांनी देखील दृश्य दिसणार आहे.दुर्बीण असल्यास अधिक चांगले निरीक्षण आणि फोटोग्राफी देखील करता येऊ शकेल.दुर्बिणीतून पट्टेदार तेजस्वी गुरु ,त्याचे ४ प्रमुख उपग्रह, अगदी जवळ कडीदार शनी आणि त्याचे उपग्रह असे सुंदर दृश्य एकाच फ्रेम मध्ये दिसेल.साधारण ८ च्या सुमारास हे ग्रह मावळेपर्यंत हे दृश्य बघता येईल.

या आधी १६ जुलै १६२३ मध्ये अशी महायुती झाली होती.पण तेव्हा हे दोन्ही ग्रह सूर्यापासून फक्त १३ अंशावर असल्याने हे दृश्य दिसले असण्याची शक्यता कमी आहे.त्याच्या आधी ४ मार्च १२२६ ला अशी महायुती दिसली होती.
म्हणजे २१ डिसेंबरला तब्बल ८०० वर्षांनंतर मानवाला गुरु आणि शनी इतके जवळ असल्याचे दिसणार आहे.म्हणून ही घटना दुर्मिळ आहे.तेव्हा २१ डिसेंबरला ही सुंदर खगोलीय घटना बघायला विसरू नका.

विनय जोशी
खगोल मंडळ नाशिक
From WhatsApp वॉट्सअॅपवरून साभार

*****

श्रुष्टीचा विलोभनीय चमत्कार ! गुरु शनी एकत्र

मित्रांनो, येत्या 16 डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी आकाशात पश्चिमेला एक नाट्य रंगणार आहे. हे नाट्य सुमारे400 वर्षानंतर घडत आहे, ज्याचा सर्वोच्च बिंदू हा 21 डिसेंबर हा असणार आहे. जर आपण हे नाट्य बघायला विसरलो तर , आपणास हे नाट्य बघायला थेट 2089 ची वाट बघावी, लागेल , अर्थात तो पर्यंत आपण असण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने ही संधी चुकवणे आपणास अत्यंत महाग पडू शकते . या नाट्यातील प्रमुख पात्रे आहेत गुरु ग्रह आणि शनी ग्रह .

तर मित्रानो, 16 डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत गुरु ग्रह आणि शनी ग्रह यातील पृथ्वीसापेक्ष कोनीय अंतर अत्यंत कमी असणार आहे. ज्यामुळे गुरु ग्रह आणि शनी ग्रह हे वेगवेगळे न दिसता एकत्रच दिसणार आहेत . त्यामुळे दोन्ही ग्रहांचा प्रकाश एकत्र होऊन आकाशात एकच मोठा ग्रह असल्याचे पृथीवरून दिसेल . पृथ्वीवर हा देखावा विषुववृत्तावर सर्वात उत्तम दिसणार आहे. याचा परमोच्च क्षण हा 21 डिसेंबर हा असणार आहे ,या दिवशी या दोन ग्रहातील कोनीय अंतर फक्त 0.0060 अंश असणार आहे . मानवी डोळा 0.0025 अंशापर्यंत फरक ओळखू शकतो. हे बघता यातील गंमत लक्षात येऊ शकते .

शनी ग्रह सूर्याभोवती पृथ्वीच्या एका वर्षाचा विचार करता साडे29 वर्षात एक फेरी पूर्ण करतो. तर गुरु ग्रह 11.86 वर्षात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो . त्यामुळे दर 20 वर्षांनी गुरु ग्रह आणि शनी ग्रह हे एकमेकांच्या जवळ येतात. मात्र 2020 साली जितके जवळ आले आहेत तितके जवळ येण्याचा प्रसंग सुमारे 400 ते 800 वर्षांनी जवळ येतात. सध्या गुरु आणि शनी हे मकर राशीत आहेत . त्यामुळे जर तुम्हाला मकर रास आकाशात ओळखता आल्यास तुम्ही या गोष्टीचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. सध्या सूर्य वृश्चिक राशीत असल्याने मकर रास सूर्यास्तानंतर लवकर उगवते (दिसू लागते) आणि मावळते . ( सूर्य ज्या राशीत असतो ती रास आकाशात तर दिसतच नाही. मात्र राशीचक्रातील त्या पुढच्या राशी सूर्यास्तानंतर लवकर उगवतात आणि लवकर मावळतात . त्यामुळे मकर रास लवकर मावळणार आहे ) त्यामुळे येत्या आठवड्याभरात तुम्ही सूर्यास्तानंतर लगेच आकाशदर्शन केल्यास तुम्ही या नाट्याचा आनंद ,मनमुराद घेऊ शकता
हाच नव्हे तर , कोणताही खगोलीय चमत्कार बघण्यामुळे काहीही अनुचित होत नाही. अर्थात सूर्यग्रहणासारख्या काही गोष्टी बघताना डोळ्यांचे नुकसान होऊन अंधत्व येऊ नये म्हणून काही खबरदारी घ्यावी लागते इतकेच. ती घेतली की, खगोलीय चमत्कार बघण्यासारखे स्वर्गसुख नाही. हा चमत्कार साध्या डोळ्याने देखील दिसू शकतो , मात्र द्विनेत्री ( Binocular ) अथवा दुर्बीण(Telescope ) असल्यास उत्तम आहे . मग बघताय ना हा श्रुष्टि चमत्कार?

From WhatsApp वॉट्सअॅपवरून साभार

*****

या विषयावरील श्री.रवि खोत यांचा फेसबुकवरील इंग्रजी लेख खाली दिला आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार.

Ravi Khot
·
Dear Teachers, Colleagues, Relatives, Friends and Students,
Most of you are aware of the event of 21st December. I am not talking of Winter Solstice but of the Conjunction of Saturn and Jupiter. Conjunction in astronomy is used to describe the coming together/meetings of two major celestial objects, in this case – Jupiter and Saturn. (Technically, A conjunction is said to have occured when tho celestial objects have the same ecliptic longitude). This will occur on the 21st of December, 2020. It coincides with the date of the winter solstice. This conjunction last occured in 2000 and this particular one is the closest one after the one in 1623. On 21st of December, Jupiter and Saturn will appear only 0.1 degrees apart!
To get an idea of what this means, consider the full Moon. The disk of the Full Moon subtends an angle of 31 arc minutes or in simple words, one/half degree to the eye. So you can just imagine, how close Jupiter and Saturn will appear when they are they are just tenth of a degree apart! Just imagine when they are just a tenth of a degree apart, you can see them in the field of view of binocular or telescope together!
You may use a telescope to view this event. But a binocular will do very well if you have one! Through a telescope the sight will be an absolute delight! (Refer to the jpg file with this message) Don’t worry even if you don’t have a telescope or a binocular, as it will look spectacular even to the naked eye!
What is of importance that you make it a point to see Jupiter and Saturn every evening from today. Just observe how they get closer and closer as days go by. All through this lockdown, I have been observing them and informing you all about them but now comes the climax as they appear to rapidly approach each other. For the uninitiated, Jupiter and Saturn are not actually coming closer but only appear to come closer in the sky as seen by us. This depends on the position of Jupiter, Saturn and the Earth.
How to spot them? Oh! You can’t miss them! Simply the brightest spots in the evening sky after the Moon seen towards the west, slighly inclinded to the South.
When to watch them? Right as soon as the Sun sets till the planets bow down in to the horizon. I will be observing the planets, I hope you will too! Share this post with interested people especially children and students. Make an effort to show this to event to others and to see it everyday till the climax on 21st.

गुरु शनि महायुतीची छायचित्रे