कार्ल मार्क्सचे सांगणे आणि भाकिते

कार्ल मार्क्स नावाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेल्या लेखकाने जे प्रक्षोभक लिखाण केले त्याचा जगभर प्रसार झाला आणि कोट्यावधी लोक त्या विचारांनी भारावून गेले किंवा पेटून उठले. पहिल्या महायुद्धानंतर रशियामध्ये रक्तरंजित क्रांती होऊन साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाची राजवट प्रस्थापित झाली तर दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्टांनी चीनवर कब्जा मिळवला. या देशांनी त्याच्या आजूबाजूच्या काही देशांमध्येही साम्यवाद पसरवला. भारतातही साम्यवादाचे लोण इंग्रजांच्या राज्यातच आले होते, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आधी केरळ आणि तेलंगण आणि कालांतराने बंगालमध्ये त्याने जोर धरला. पुढे रशीया आणि चीननेच मार्क्सच्या मूळ तत्वांपासून काही प्रमाणात फारकत घेतल्यानंतर भारतातला त्यांचा जोर कमी होत असल्यासारखे दिसत आहे. मार्क्सने नक्की काय सांगितले होते आणि त्याचे पुढे काय होत गेले याची मुद्देसूद चर्चा श्री.राजीव साने यांनी या लेखात केली आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार.

हा लेख नीटपणे समजायला थोडा कठीण आहे. कार्ल मार्क्स १८८४ साली वारला तोपर्यंत कुठल्याही देशात कम्युनिस्ट राजवट आलीच नव्हती. त्यामुळे मार्क्सने सांगतलेली सगळी फक्त थिअरी होती. नंतरच्या काळात काही गोष्टी त्याने वर्तवल्याप्रमाणे घडल्या, पण अनेक गोष्टी विपरीतपणे घडत गेल्या. मार्क्सच्या विचारसरणीमुळे जगाच्या इतिहासात मोठी खळबळ उडाली, त्याला एक वेगळे वळण लागले हे मात्र खरे.

काल 5 मे, कार्ल मार्क्सची जयंती त्या निमित्त त्यावर राजीव साने यांचा लेख

कार्ल मार्क्स: श्रमस्वधर्माच्या वरदानाला सत्तामार्गाचा शाप

लेखक : राजीव साने

लहरीपणाने भलभलते आदर्श मानायचे आणि वास्तवावर डोके आपटून तरी घ्यायचे, किंवा आदर्श मानणे आरपार सोडून तरी द्यायचे, या कोंडीतून माणसाला सोडवणारा सर्वात महान विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स. त्याचे मुख्य म्हणणे असे होते की वास्तवाला स्वतःची अशी एक गती असते. इतिहासाच्या विविध टप्प्यांवर ही गती वेगवेगळी असते. या गतीच्या आरपार विरोधात जाणे व्यर्थ असते. पण मार्क्स नियतीवादी नक्कीच नव्हता. परिवर्तनवाद्यांची शक्ती व्यर्थ जाऊ नये ही तळमळ त्यामागे होती. इतिहासाच्या गतीला उलटा स्ट्रेट ड्राइव्ह मारायचा नसतो तर फ्लिक किंवा ग्लान्स करून जास्त चांगली दिशा देता येते हा मुद्दा होता.

“मूल्ये बिल्ये सब झूठ” असे त्याचे म्हणणे नव्हते. ‘मुद्दा आहे जग बदलण्याचा’ या सिंहगर्जनेमुळे तत्त्वचिंतनाचा अर्थच त्याने बदलवला. इतकेच नव्हे तर तो जाणीवेच्या जगाला दुर्लक्षित करतो हा आरोपही खरा नाही. “एखादी कल्पना जेव्हा जनतेचे स्वप्न बनते तेव्हा ती एक भौतिक शक्तीच बनते” या वचनावरून त्याचा भौतिकवाद का आवर्जून द्वंद्वात्मक (डायलेक्टिकल) म्हणावा लागतो हे ध्यानात येते.

विशेषतः तरुण वयातील लेखनात मूल्यदृष्टी ठळकपणे दिसून येते. आपल्या सृजनशीलतेला वाव देत स्व-सृष्टी घडविणे हा मानवी स्वधर्म आहे, असे तो मानत होता. उत्पादक काम या स्वाभाविक गोष्टीला लादलेपण आल्याने निर्माण होणारा आत्मवियोग (एलियनेशन) कसा दूर करता येईल ही त्याची मुख्य आस्था होती. एकीकडे निसर्गाशी आणि दुसरीकडे समाजरचनेशी झुंज देत मनुष्य दुर्भिक्ष्याच्या अवस्थेतून समृद्धीच्या अवस्थेत जाईल ही त्याची श्रद्धा होती.

त्याची न्याय-कल्पना सुटसुटीत समतावादी नव्हती. किंबहुना समता हा शब्दही त्याच्या साहित्यात अभावानेच आढळतो. अनुत्पादक राज्यकर्ते उत्पादकांची नाडणूक करतातच पण त्याभरात ते उत्पादकतेच्या वाटांमध्ये अडथळे निर्माण करतात आणि हे थांबले पाहिजे अशी त्याची शोषणमुक्तीची कल्पना होती. श्रीमंताचे काढून गरीबात वाटा अशी नव्हती.
उत्पादकांनी उत्पादकशक्तींची वाट अडविणारे राज्यकर्ते झिडकारून वाट मोकळी करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे हा त्याचा संदेश आजही प्रस्तुत ठरणाराच आहे.

भाकिते का व कशी चुकत गेली
मार्क्सने अनुभवलेली भांडवलशाही ही एकोणीसाव्या शतकातील अवजड तंत्रज्ञानावर आधारित होती. त्यामुळे भांडवल-गुंतवणूक जास्ती जास्ती लागत जाणे आणि उत्पादकता मात्र त्यामानाने न वाढणे हे तेव्हा सत्यच होते. त्यामुळे नफ्याचे दर घसरणार, पिळवणूक तीव्र होत जाणार, कामगारवर्गाचे कंगालीकरण होत जाणार आणि व्यवस्था अरिष्टात सापडणार, याचे गणित त्याने मांडले. परंतु विसाव्या शतकात झालेले तांत्रिक बदल इतके विस्मयजनक आहेत की ते प्रत्यक्ष करत असणाऱ्या तंत्रज्ञांनाही स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. इतके आरपार वेगळे दृश्य कल्पिण्यास १८८४ ला निधन पावलेला मार्क्स असमर्थ ठरला, हा ‘त्याचा’ दोष खचितच म्हणता येणार नाही. अवजड तंत्रामुळे येणारी अडचण ही भांडवलशाही या व्यवस्थेचाच अपरिहार्य परिणाम आहे असे समजण्यात मार्क्सने चूक केली. सरंजामशाहीतून भांडवलशाहीत हे संक्रमण अगदी चिकित्सकपणे मांडणारा मार्क्स; भांडवलशाहीतून समाजसत्तावादाकडे हे संक्रमण इतक्या घिसाडघाईने करता येईल असे मानण्यात उतावीळ ठरला. भांडवलशाहीचा असा ‘बालमृत्यू’ झालाच नाही. अत्यंत लवचिकपणे स्वतःला दुरुस्त करत नेणारी ती व्यवस्था आहे हे तिने सिद्ध केले. “तुम्ही जर लोकांत क्रयशक्ती पसरवली नाहीत तर मागणीअभावी मराल” हे सांगणारा केन्स द्रष्टा ठरला. केन्सप्रणित ‘औदार्याला’ लोकशाहीची जोड मिळून कल्याणकारी राज्य ही नवीच गोष्ट अस्तित्वात आली जिचा सुगावा मार्क्सला लागलाच नाही. त्यामुळे त्याची भाकिते धडाधड चुकत गेली. कामगारवर्गाचे कंगालीकरण न होता त्याचे श्रीमंत कामगार आणि गरीब कामगार या दोन वर्गात विभाजन झाले. श्रीमंत कामगाराला भांडवलशाही हवीशीच वाटली आणि गरीबात तिच्याशी लढण्याची ताकद उरली नाही. समाजाचे मालक आणि मजूर या दोन वर्गात ध्रुवीकरण होत जाईल असे मार्क्स मानत होता. प्रत्यक्षात नोकरदार मध्यमवर्ग आणि स्वयंरोजगारी लहान उद्योजक स्वरूपातला मध्यमवर्ग मिळून ध्रुवीकरण न होता अनेक स्तरांचा वर्गसमन्वय निर्माण झाला. भांडवलशाही मरणपंथाला लागून तेथे कामगारक्रांत्या झाल्याच नाहीत.

उलट जिथे अद्याप भांडवलशाहीचा पत्ताच नाही अशा देशात त्या झाल्या. त्या खरेतर सरंजामशाहीविरोधी क्रांत्या होत्या. भांडवली लोकशाही प्रस्थापित करणे हे त्यांचे ऐतिहासिक कार्य असायला हवे होते. पण लेनिन स्टालिन माओ या मंडळीना भांडवलशाही हा टप्पा गाळून थेट समाजसत्तावादात जाण्याचा मोह पडला. मूळ मार्क्सवादाशी प्रतारणा करून निर्माण झालेल्या या नोकरशाही व्यवस्था, गोर्बाचेव्हने वॉर्सॉ-सैन्य मागे घेताच कश्या वेगाने कोसळून पडल्या हे आपण पाहिलेच आहे. तसेच डेंग ज्याव बिंग नंतरचा चीन कसा कट्टर भांडवलशाहीवादी बनला हेही आपण पाहिले आहे. विसाव्या शतकाचा बदलाचा झपाटा लक्षात घेता भाकिते चुकणे ही गोष्ट क्षम्य किंवा स्वाभाविकच मानायला हवी.

सैद्धांतिक घोटाळे
उत्पादक अनुत्पादक हा वर्गविग्रह नष्ट व्हावा, तसेच शोषणमुक्ती व्हावी, या प्रेरणा वंदनीयच आहेत. परंतू हे परिवर्तन रक्तरंजित क्रांतीनेच, एकदाचे आणि कायमचे होउन जाईल, असा आग्रह धरणे अनावश्यक होते. शोषण तीव्र होऊन ते असह्य होऊन क्रांतीच होईल, असे नसून तर शोषण सौम्य करत नेणारी सततची सुधारणा पुढे पुढे नेणे, हे शक्य व समंजसपणाचे आहे. पण मार्क्स आणि त्याचे क्रांतीवादी अनुयायी ‘सुधारणावाद’ ही शिवी म्हणून वापरू लागले.

त्याहूनही महत्वाचा घोटाळा असा की, या सर्व परिवर्तनाची वाहक ही राज्यसंस्था स्वतःच असेल, व एकदा का ती कामगारवर्गाच्या हातात आली की, ती वर्गविग्रह कायमचा नष्ट करून टाकेल, हे गृहीत धरणे चूक होते. विशेषतः सर्वहाऱ्याची या नावाखाली चालणारी ‘हुकुमशाही’ हे काम करेल असा दावा करणे अक्षम्यपणे चूक होते. किंबहुना समाजात सत्ता आधी येते आणि ती सत्ताच वर्ग निर्माण करते असे युध्दसंस्थेच्या इतिहासाने नेहमीच दाखवले आहे.

“कामगारवर्गाच्या हातात राज्यसंस्था आली, की तो जरी पूर्वाश्रमीचा कामगार असला तरी क्रांतीनंतर तो ‘कामगार’च उरणार नाही आणि कम्युनिस्ट पक्षाची नोकरशाही हा स्वतःच एक शोषक वर्ग बनेल”. हा इशारा मार्क्सला बाकूनिनने थेटपणे दिला होता. पण मार्क्सने दुराग्रहीपणे बाकूनिनला हाकलून दिले.

वेगळा विचार मांडणाऱ्यांना गद्दार ठरवून खच्ची करायचे ही कम्युनिस्ट परंपरा खुद्द मार्क्सनेच चालू केली होती हे खेदाने म्हणावे लागते. मोठ्या लोकांच्या चुकाही मोठ्याच ठरतात हेच खरे.

समृद्धीच रोखून कधीच न्याय आणता येत नाही आणि उत्पादकाला चेपून समृद्धी येत नाही हे सांगणारा आणि माणूसच स्वतःचा इतिहास घडवतो, पण लहरीनुसार नव्हे, हे सांगणारा द्रष्टा पुरुष म्हणून मार्क्स नेहमीच आपला स्फूर्तिदाता राहील यात शंका नाही.


नैसर्गिक आणि कृत्रिम बुद्धीमत्ता

हा लेख आधी ‘कृत्रिम बुद्धीमत्ता आणि आपले भवितव्य’ या नावाने सादर केला होता. बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ती किती प्रकारची असते याची माहिती देणारा एक लेख यात समाविष्ट केला आहे. त्यात दिलेल्या आठ प्रकारांपैकी किती प्रकारच्या बुद्धिमत्ता कृत्रिमरीत्या विकसित करता येणार आहेत याचाही विचार करायला हवा. २२-०३-२०२२

आजकाल कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयावर बरीच चर्चा सुरू आहे. ही गोष्ट आता फक्त शक्यतेच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात उतरायला लागली आहे. हिची अमर्याद वाढ होऊन त्यातून मानवजातीचा संहार होईल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. ती यायच्या आधी आज उपलब्ध असलेल्या आधुनिक साधनांमुळेही माणसाच्या मेंदूवर आघात होत आहेत. या अंकीय प्रणालीवरील वाढते परावलंबित्व आपले माणूसपण हरवत आहे. हा काय प्रकार आहे आणि किती गांभिर्याने घेतला पाहिजे यावर माझे मित्र आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मश्री शरद पांडुरंग काळे यांचा एक वाचनीय लेख त्यांचे आभार मानून खाली देत आहे.

१. होमो डिजीटॅलीस

शरद पांडुरंग काळे
निवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र

आपला मेंदू हा एक प्रकारचा अतिशक्तीशाली असा संगणकच आहे. लॅपटॉप, टॅबलेट, डेस्क संगणक असे संगणकाचे जसे वेगवेगळे प्रकार आहेत, तसाच मेंदूदेखील एक संगणक आहे, पण तो नैसर्गिक आहे. त्याला कार्यरत ठेवण्यासाठी जी ऊर्जा द्यावी लागते, ती बाहेरून विद्युत प्रभाराच्या स्वरूपात द्यावी लागत नाही, तर ती अन्नातून मिळते, हा या कृत्रिम आणि नैसर्गिक संगणकांमधील मोठा फरक आहे. संगणकाचा प्रभार संपला की त्याला विद्युतजोडणी करून प्रभार पुरवावा लागतो. हा प्रभार संपल्याचा प्रकार सहसा घडत नसला तरी, तो कमी झाला तर मेंदूच्या बाबतीतही प्रभार द्यावा लागतोच! जर पोटात कावळे ओरडायला लागले, तर आपला संगणक बंद पडत नाही, पण चिडचिडा मात्र होतो. पोट भरलेले असले की तो नीट काम करू शकतो. कृत्रिम संगणकातील प्रणाली काही ठरावीक काळानंतर जुनी होते. बाजारात नवीन येणाऱ्या विविध ऍप्सच्या स्वरूपातील आज्ञावल्यांशी जमवून घेणे तिला जमेलच असे नसते! त्यामुळे आज्ञावल्यांच्या नवीन पिढीशी समतोल साधण्यासाठी ही संगणकाची मूळ प्रणाली बदलावी लागते. त्यामुळे कदाचित त्याला सामावून घेणारे हार्डवेअर किंवा प्रत्यक्ष काम करणारे भाग बदलावे लागतात. काही वर्षांनी कोणताही तांत्रिक बिघाड न होता देखील संगणक बदलावा लागतो, कारण त्याच्या जुन्या चालक प्रणालीस नव्या ऍप्सना चालविण्याइतका वेग तरी नसतो, किंवा स्मृतिमंजुषा तरी नसते. मेंदूच्या बाबतीत असे काही शक्य नसते! जन्मतः त्याला जी प्रणाली मिळालीली असते, तिला पर्याय नसतो. जी स्मृतिमंजुषा आपल्याला एकदा मिळालेली असते, ती टिकवून ठेवावी लागते.

शिक्षणाने आणि अनुभवाने आपल्या या नैसर्गिक संगणक चालकप्रणालीचा वेग, एका ठरावीक मर्यादेपर्यंत वाढविता येतो. आयुष्यभर त्या प्रणालीच्या साथीनेच आपल्याला जगावे लागते. त्याचे वायरिंगही बदलता येत नाही किंवा हार्डवेअर देखील बदलता येत नाही! जगात बदल तर रोज होत असतात. या नव्या बदलांशी सामावून घेत असतांना किंवा त्यांच्याशी समतोल साधण्यासाठी, प्रणालीत जी कमालीची लवचिकता असावी लागते, ती निसर्गाने कोणत्या स्वरूपात आपल्याला दिली आहे, हे सांगता येत नसले तरी, ती दिली आहे हे मात्र नक्की सांगता येते. त्यामुळे बैलगाडीत बसलेला माणूस सहजपणे विमानात बसू शकतो. कदाचित थोडे आश्चर्य त्याला नक्की वाटेल, थोडी भीतीदेखील वाटेल, पण विमान प्रवासाशी तो जमवून घेतोच. आयुष्यभर जमिनीवर बसून स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीच्या हातची चव आधुनिक स्वयंपाकघरात अजिबात बदलत नाही. म्हणजे हार्डवेअर बदलले म्हणून प्रॉडक्टमध्ये फरक पडत नाही! त्याचे कारण आपल्या मेंदूचा संगणक लवचिक आणि अतिशक्तीशाली प्रणालीचा आहे हेच असते! संगणक क्षेत्रातील प्रगतीचा वेग आश्चर्यकारक तर आहेच, पण ज्या तऱ्हेने कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) इथे धुमाकूळ घालत आहे, तो पाहता संवेदनशील मनामध्ये काही विचारतरंग उमटत आहेत. मेंदूला हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा पर्याय निर्माण करीत असतांना, आणि अंकीय प्रणालीवरील भर देतांना, आपण आपल्या मेंदूच्या आज्ञावलीचे पुनरप्रणाली लेखन तर करीत नाही ना? आपल्या मेंदूला आपण असंवेदनशील तर बनवत नाही ना? त्याच्या भावना बोथट होत आहेत का? आपल्या मानवी इतिहासात हजारो वर्षांपासून जी भावना मूल्ये जपली गेली आहेत, त्यांना तडे तर जात नाहीत ना? आपल्या जीवनातील नेमकी ध्येये गाठत असतांना, जीवनात मिळणारे समाधान किंवा आनंद आपण हरवून तर बसणार नाही ना? वैयक्तिक महत्वाकांक्षा नाती विसरायला लावीत आहेत का?

नील स्टीफनसन ह्यांच्या स्नो क्रॅश नावाच्या विज्ञानकथेत अशी कल्पना केली आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावाखाली, माणूस चेतासंस्थेतील जैवरसायनशास्त्रात अधोगतीच्या गर्तेत चालला आहे. ह्यातून मानवतेला वाचविण्यासाठी कथेचा नायक हिरो यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली जाते. हा जो हिरो असतो तो कोणत्याही सॉफ्टवेअर प्रणालीचा भेद करण्यात कुशल असतो. हिरोचे पहिले काम म्हणजे जगभरातील माणसांच्या मनाचा वेध घेणाऱ्या स्नो क्रॅश नावाच्या विषाणूंचा बंदोबस्त करणे हेच असते. ह्या विषाणूंच्या प्रभावामुळे माणसांचे रूपांतर हे एक प्रकारच्या जैविक यंत्रात होते. या यंत्राला सद्सद्विवेकबुद्धी, स्वतःची उर्मी, सृजनशीलता किंवा व्यक्तिमत्त्व असे काहीच नसते! मेंदूच्या मुळाशी एकदा का त्याचे रोपण झाले की, हा विषाणू आपल्या हातपायांचे नियंत्रण करणाऱ्या बाह्यपटलाखाली असलेल्या प्रणालीचा ताबा घेतो. त्यामुळे प्रतिक्षिप्त क्रियांवरचे नियंत्रण नाहीसे होते, व माणसाचे रूपांतर चलप्रेतात होते! या चलप्रेताची विचारशक्ती संपलेली असते आणि त्याचा नैसर्गिक सावधपणा पूर्णतः लयाला गेलेला असतो. आता प्रश्न असा आहे की, माणसाची सध्याची स्थिती ह्या चलप्रेतांसारखी होत आहे का? अंकीय तर्कशास्त्रावर आधारित लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट इत्यादी भ्रामक वास्तवतेच्या प्रभावामुळे, आपण मानव म्हणून जे अतिशय उत्कृष्ट अशा भावना अनुभवतो, त्या परस्पर संवाद, सौन्दर्याचा आस्वाद घेण्याची प्रवृत्ती, सहानुभूती, संवेदनशीलता, सर्जनशीलता, आंतरिक उर्मी आणि प्रेम यांना कायमचे मुकण्याची शक्यता कितपत आहे? न संपणाऱ्या अंकीय प्रणालीच्या राजमार्गावर धावत असतांना आणि अधिकाधिक स्वयंचलित गोष्टींचा ध्यास घेत असतांना, ज्ञानाचे आकलन होण्याची मानवी क्षमता कमी तर होणार नाही ना?

एलन ट्युरिंग ह्यांना आधुनिक संगणक प्रणालीचा जनक असे संबोधले जाते. सन १९३० मध्ये त्यांच्या मते प्राण्यांचा मेंदूला किंवा माणसाची मध्यवर्ती चेतासंस्थेला अंकीय संगणक म्हणून संबोधता येईल. या विषयावर त्या काळात बराच वादविवाद आणि चर्चा झाली होती. जे कृत्रिम बुद्धिमत्तेचे संशोधक आहेत, त्यांच्यामते अंकीय प्रणालीवर आधारित यंत्रांना माणसासारखी बुद्धिमत्ता मिळू शकेल. त्यांना एलन ट्युरिंग यांचे म्हणणे स्वीकारार्ह आहे. काही चेतातज्ञांच्या (नयूरोलॉजिस्ट) मते त्यात तथ्यदेखील आहे. त्यांना असेही वाटते की माणसाच्या मेंदूची अंकीय प्रणालीत हुबेहूब प्रतिकृती बनवीता येऊ शकेल. बरेचसे चेतातज्ञ, तत्वज्ञ आणि भौतिकी शास्त्रज्ञ मात्र या मताशी अजिबात सहमत होत नाहीत. काही जण तर ह्या विचाराला दिवास्वप्न असेही म्हणतात! काहीजण त्याला गूढ विश्वास समजतात! मानवी मेंदूमध्ये समस्या सोडविण्यासाठी जी पद्धती वापरली जाते, ती ट्युरिंगच्या संगणकाशी मिळतेजुळती आहे ह्या कल्पनेला छेद देणारा एक विचार रोनाल्ड सिक्युरेल आणि मिग्वेल निकोलेलीस यांनी मांडला आहे. त्यांच्या मते मानवी मेंदूमध्ये एक अतिशय वेगळ्या धर्तीची संगणकीय प्रणाली असते. अंकीय प्रणालीपेक्षा ही सर्वस्वी भिन्न असते. हिला त्यांनी ऑरगॅनिक कॉम्प्युटर किंवा सेंद्रिय संगणक असे संबोधले आहे. ह्यात अंकीय आणि अनलॉग प्रणालींचे आवर्ती मिश्रण असते. मेंदूकडे येणारे संदेश आणि माहिती नानाविध पद्धतींनी येत असते. त्या सर्व input किंवा येणाऱ्या सांकेतिक, दृश्य, श्राव्य आणि भावार्थ सिग्नलचे विश्लेषण करून, त्यावर योग्य तो output देणे आणि त्यांची नेमकी तामिली कशी होती ते पाहाणे, हे कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम संगणकीय प्रणालीत बसत नाही. संगणकाची असेंब्ली भाषा आणि input सिग्नल्सचा ताळमेळ असतो, आणि दिलेल्या संगणकासाठी तो बदलत नाही. मेंदूत अशा अनेक असेंब्ली भाषा आणि input भाषा असतात. याचे outputsदेखील अनेक पद्धतींनी व्यक्त होत असतात. मेंदूचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यातील सीमारेषा आपल्याला ओळखता येत नाहीत. त्यांच्या इंटरफेसेस याही सेंद्रिय स्वरूपाच्या असतात. त्यातूनच ह्या सेंद्रिय संगणकाचे कार्य चालत असते. ह्या सेंद्रिय संगणकातून वेगवेगळ्या पातळ्यांवर शरीराचे नियंत्रण केले जाते.आंतरपेशीय प्रथिन संयुगे हे या सेंद्रिय संगणकाचे दृश्य संदेशवाहक असतात.त्यांच्या मार्फत पेशींचे प्रजनन, वाढ, कार्य आणि नाश होत असतो. त्यातूनच आपण शिकतो, शिकवितो, गातो, गाणे ऐकत असतो, कलांचा आस्वाद घेत असतो, निराशेने त्रासून जातो, आनंदाने बेहोष होतो, सार काही या सेंद्रिय संगणकाचा प्रताप असतो.

या सेंद्रिय संगणकाचे आज्ञालेखन किंवा प्रोग्रॅमिंग नक्की कसे होते, कधी होते, त्यातील बग्ज किंवा दोष दूर कसे होतात ही कोडी अजून पूर्ण उलगडलेली नाहीत. त्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की, सेंद्रिय संगणकांना ट्युरिंग संगणकासारखे हाताळता येत नसले तरी, अनेक विविध जैविक प्रक्रियांद्वारे त्यांना आज्ञांकीत केले जाऊ शकते. अगदी मूलभूत स्तरावर, ज्याला या सेंद्रिय संगणकाची असेंब्ली भाषा म्हणता येईल, त्या मानवी आनुवंशिक नकाशातील असंख्य जनुकांमार्फत अभिव्यक्त होत, उत्क्रांतीमध्ये निवड होत होत विकसीत होत गेलेल्या आज्ञावल्या ह्या शरीराच्या जडणघडणीत वास्तुविशारद म्हणून कार्य करतात. प्रसवपूर्व काळात म्हणजे मूल गर्भावस्थेत असतांना आणि जन्मल्यानंतर मेंदूची त्रिमिती रचना पूर्ण करण्यात ह्या आज्ञावल्यांचा मोलाचा वाटा असतो. सुमारे एक लाख वर्षांपूर्वी जे मानवी चेताजाळे (न्यूरल नेटवर्क) विकसित झाले होते त्याचे हे प्रतिबिंब आहे, म्हणजे निसर्गात हा वास्तुविशारद तेंव्हापासून कार्यरत आहे. त्यामानाने मानवाने निर्माण केलेला संगणक अवघ्या शंभर वर्षांचा आहे! एकदा मूल जन्माला आले की, आपल्या कौटुंबिक, सामाजिक आणि भौतिक पर्यावरणाशी संवाद साधण्यासाठी हे चेताजाळे सक्षम असते. अर्थात आज्ञावल्यांचे लेखन, पुनर्लेखन, सुधारित आवृत्त्या हा निसर्गक्रम त्यात अव्याहतपणे चालूच आहे. मानवी संस्कृतीचे विविध कंगोरे आणि सामाजिक परस्पर संवाद यांच्या आंतरक्रियांमुळे मध्यवर्ती चेतासंस्था अधिक प्रगल्भ आणि अधिक कार्यशील होत राहाते. एखाद्या कलाकाराला आपली कला रसिकांसमोर सादर करतांना, आपले आजचे प्रदर्शन कालच्या किंवा आधीच्या प्रदर्शनापेक्षा सुंदर व्हावे अशीच इच्छा असते. शिवाय या कलेत निष्णात होऊन सर्वोत्कृष्ट प्रदर्शन कसे करता येईल यासाठी त्याची धडपड सुरू असते. ह्या सर्व भावना मेंदूमध्येच निर्माण होत असतात. त्यासाठी आज्ञावल्यांमध्ये जे फाईन ट्युनिंग किंवा तरल संतुलन असावे लागते, ते बदल नकळतपणे होत राहातात. सामाजिक मेंदू हा जो प्रकार असतो, तो म्हणजे एखाद्या प्रजातीच्या एकत्रित विचारशक्तीचा प्रभाव दर्शवतो.

होमो सेपियन्स म्हणजे आधुनिक मानवाच्या बाबतीत बोलायचे झाले तर उत्क्रांतीदरम्यान त्याच्या निओकॉर्टिकल म्हणजे दृक्श्राव्य संवेदनांशी संबंधित पेशीसमूहात खूपच वाढ झालेली आढळून येते. दैनंदिन जीवनात अनुभवास येणाऱ्या विविध सामाजिक जटिल प्रश्नांशी ही वाढ संबंधित आहे. जर समाजात तणाव असेल, मग तो धार्मिक असो, राजकीय असो वा तीव्र स्पर्धेमुळे असो, त्याला सामोरे जाण्यासाठी सातत्याने मानवाला प्रयत्न करावे लागतात. संघर्ष हा जीवनाचा मूलमंत्र असतो. बहुतांशी जनतेत आपल्या वयाची पन्नाशी किंवा साठी गाठेपर्यंत हा संघर्ष असतोच. काहींच्या वाट्याला तो उतारवयात देखील नशिबी असतो. अर्थात संघर्षमय जीवनातून यशाच्या शिखराकडे जाणारे अनेक असतात. अशा संघर्षमय यात्रा मानवाच्या जनुकीय नकाशात दूरगामी परिणाम घडवून आणू शकतात. मानवी समाजात आपण परस्परसंवाद साधण्याची क्षमता खूप वाढविली आहे. त्या मानाने चिंपॅंझी (पॅन ट्रोग्लोडाईट) आणि बबुन (पॅपीओ पॅपीओ किंवा पॅपीओ अनुबिस) यांच्यामध्ये सामाजिक संवादाची मर्यादा फारशी वाढली नाही. त्याच प्रमाणात त्यांच्या दृक्श्राव्य संवेदनांशी संबंधित पेशीसमूहात फारशी वाढ झालेली आढळून येत नाही.

आपल्या मेंदूला आज्ञावल्या लिहिण्याचे किंवा पुनर्लेखनाचे अजूनही मार्ग आहेत. मेंदू आणि यंत्र यांच्या इंटरफेस वर झालेल्या गेल्या शतकातील मुलभूत आणि नैदानीक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, मानवी मेंदू कृत्रिम साधनांचा वापर करून या आज्ञावल्यांमध्ये बदल घडवू शकतो. रोबोटीक किंवा यंत्रमानव हा त्याचाच नमुना आहे. शरीरात कृत्रिम हातपाय सामावून घेण्यासाठी मेंदू त्याच्या आज्ञावल्यांमध्ये बदल घडवू शकतो. म्हणजेच कृत्रिम साधनांच्या वापरासाठी न्यूरल नेटवर्क किंवा चेताजाळे स्वतःला अभिमुख करून घेऊ शकते. ह्या निष्कर्षांचा गर्भितार्थ असा आहे की, आपल्या स्वतःच्या भावना ह्या बाह्य घटकांचा समावेश करण्यासाठी सहजपणे पुनर्लिखीत होऊ शकतात! गंभीर स्वरूपाच्या अर्धांगवायूने गलितगात्र झालेल्या रुग्णांमध्ये कृत्रिम अवयवांच्या रोपणास प्रतिसाद देणाऱ्या आत्मसंवेदना, मेंदू आणि यंत्र यांच्या इंटरफेसवर नोंदल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच कॉर्टिकल किंवा सबकॉर्टिकल बदलांमुळे घडून येणाऱ्या कायम स्वरूपी आज्ञावलींचे पुनर्लेखन आंशिक स्वरूपात का होईना, पण अशा रुग्णांना वरदान ठरू शकतात.

म्हणजे आपण पुन्हा एकदा त्याच मुद्यावर येतो. मेंदूचे रूपांतर आपण फक्त अंकीय संगणकात करू शकलो नाही तरी, ही प्रणाली वापरणाऱ्या उपकरणांच्या वाढत्या संख्येमुळे आणि वाढत्या अवलंबत्वामुळे मानवी मेंदू बदलेल का? तो अंकीय प्रणालीच्या आहारी जाईल का? तसे झाले तर मानवी मेंदूची जी भावनिक जडणघडण आहे, त्यात मोठाच बदल घडू शकतो. त्यामुळे मानवाचे रूपांतर एका जैविक यंत्रात होऊ शकते! अंकीय प्रणालीची मानवी जीवनात होणारी ही ढवळाढवळ चांगली मानावी की भविष्यातील धोक्याची नांदी? मानवी वर्तन आणि मानवी कौशल्य या दोन्ही महत्वाच्या गोष्टींचे अवमूल्यन होऊन माणूस शक्तिशाली बनला तरी मानवतेचा पराभव यामध्ये आहे का, ह्यावर गंभीर पणे विचारविनिमय होणे अपेक्षित आहे. अंकीय प्रणालीच्या सातत्याने संपर्कात राहिल्यामुळे वैमानिकांच्या उड्डाणकौशल्यापासून रेडिओलॉजिस्टच्या नमुना ओळखण्याच्या कौशल्यापर्यंत, मानवी कार्यक्षमतेवर खोलवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यावरून आपण गृहीतक मांडू शकतो की, वैमानिकांच्या बाबतीत आधुनिक विमानांच्या अंकीय प्रणालींमुळे, रेडिओलॉजिस्टच्या बाबतीत अंकीय प्रतिमा विश्लेषणात्मक प्रणालीमुळे, त्यांच्या सर्जनशीलता, आंतरिक उर्मी आणि समस्या उकल करण्याची क्षमता नक्कीच कमी होऊ शकतात. जेंव्हा एखादा विषय समजावून घेतांना, त्याच्याशी संबंधित महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे असतात. ऑनलाइन हे मुद्दे कधीही मिळतील अशी खात्री असते, तेंव्हा ते मुद्दे लक्षात न राहण्याची किंवा त्यासाठी मेहेनत न घेण्याकडे लोकांचा कल असेल, हे साधे तर्कशास्त्र आहे! कित्येक वर्षे आपण दूरध्वनी क्रमांक सहजपणे लक्षात ठेवीत होतो. आपल्या बँकेशी संबंधित खाते क्रमांक सहसा विसरला जात नसे. आपली स्मृती मंजुषा उत्तम प्रकारे कार्य करीत होती. पण गेल्या दशकात आपली भिस्त आता हातातील भ्रमणध्वनीवर अधिक आहे. जर फोन हरवला तर आपल्या स्मृतींची पाटी कोरी झाल्यासारखे वाटते. इतरांचा सोडा, स्वतःचा तरी भ्रमणध्वनी क्रमांक आठवेल की नाही याचीचशंका येते. स्मार्टफोन तर आता एव्हढे स्मार्ट झाले आहेत की, फोन हरवला, तर नवीन सिम टाकले की नव्या फोन मध्ये सर्व माहिती जशीच्या तशी उमटते! म्हणजे कुठे काही लिहून ठेवण्याची सुद्धा गरज राहात नाही. थोडक्यात तुम्हाला अधिकाधिक परावलंबी करण्याचा जणू या स्मार्टफोन आणि संबंधित प्रणालींनी विडाच उचलला आहे. माहिती विश्वसनीय पद्धतीने मेंदूत साठविली जाण्याची आपली क्षमता कमी होत जाणार आहे.

फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप यासारख्या संगणकीय किंवा अंकीय सामाजिक माध्यमांच्या प्राबल्यामुळे, आपल्या नैसर्गिक आणि सामाजिक वर्तनावर बराच अनिष्ट परिणाम होत चाललेला आहे. शेरी टर्केल नावाच्या लेखिकेने या विषयावर “Alone together” अशी एक वास्तवावर आधारित कादंबरी लिहिली आहे. त्यात मानव आता तंत्रज्ञानाकडून अधिक अपेक्षा करतो आणि एकमेकांपासून दूर जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. संदेश पाठविणे, आलेले संदेश फॉरवर्ड करीत राहाणे आणि निरर्थक किंवा दुरान्वयेदेखील संबंधित नसलेल्या गोष्टींवर मत व्यक्त करीत फक्त असंतोष वाढवीत राहणाऱ्या नवीन पिढीतील काही किशोर वयीन मुलांच्या मुलाखती तिने त्यासाठी घेतल्या होत्या. या भ्रामक वास्तवतेच्या माध्यमांचे व्यसन हे माणसाला निराशेच्या गर्तेत ढकलण्याची शक्यता वाढत चालली आहे. मानवी सहानुभूतीचा अभाव आणि परस्पर संवाद कमी होत जाणे, एकटेपणात अजून नैराश्य येणे ह्या सर्व गोष्टी या मुलाखती दरम्यान लेखिकेला तीव्रतेने जाणवल्या होत्या. या मुलाखती वाचल्यावर आणि बऱ्याच गोष्टींचा स्वतः अनुभव घेतल्यानंतर ही सारखी “कनेक्टेड” राहण्याची जी प्रवृत्ती अतिशय वेगाने पसरत आहे, त्यामुळे ज्यांच्याशी आपण जवळून संपर्क साधू शकतो, अशा लोकांची संख्या लॉगॅरिथमिक प्रमाणात वाढत आहेत. फेसबुकवर किती मित्र जोडले गेले यावरून तुमची लोकप्रियता ठरते! म्हणजे आपल्या दृक्श्राव्य क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक मोठ्या संख्येने आपण लोकांच्या संपर्कात येतो! पण त्याचा खरोखरीच काही उपयोग आहे का? त्या मोठ्या मित्रमंडळातील किती लोक खरेच तुमचे हितचिंतक किंवा खरे मित्र आहेत? तुम्ही स्वतः लिहिलेल्या पोस्ट या माध्यमांमध्ये महत्वाच्या नसतात, तर तुम्ही किती पोस्ट शेअर केल्या, त्यावर तुमची कार्यप्रवणता ठरत असते! शेवटचा महत्वाचा प्रश्न, तुमच्या प्रगतीत (की अधोगतीत?) या सामाजिक माध्यमांचा किती सहभाग आहे? दिवसाच्या शेवटी मानसिक तणाव वाढविणाऱ्या या गोष्टींपासून चार हात दूर राहून, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे महत्वाचे आहे, हेच खरे आहे.

या अंकीय प्रणालीवरील वाढते परावलंबित्व आपले माणूसपण हरवत आहे. होमो सेपियन्स या आपल्या शास्त्रीय नावात बदल करून ते होमो डिजिटॅलीस असे करावे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ही गंभीर परिस्थिती आहे का? ह्याकडे लक्ष द्यायला हवे का? मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम तर आहेतच, पण या अंकीय प्रणालीचे वाढते प्रस्थ असे काही सामाजिक तणाव निर्माण करतील, की त्यांचा दूरगामी परिणाम मानवाच्या भविष्यावर अनिष्ट परिणाम करू शकेल. या लक्षवेधक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे हेही खरे आहे.

. . . . . . . . . .

या लेखावर आलेले काही प्रतिसाद खाली दिले आहेत.

नरेंद्र गोळे
माहिती विश्वसनीय पद्धतीने मेंदूत साठविली जाण्याची आपली क्षमता कमी होत जाणार आहे. .>>> हे खरे आहे. कारण वैधता पडताळणीचे दर टप्प्यावरील निकष ’विसरत’ राहिल्याने, अवचित आलेले पडताळणीचे काम करणेच अशक्यप्राय होऊन, मिळालेल्या माहितीची विश्वसनीयता संशयास्पदच रहाणार आहे.

Shriram Paranjape
विचार करायला लावणारा लेख. बहुतेक whatsapp groups चा forwarded messages हा प्राण असतो. याचाच सरळ अर्थ असा की कुठल्या तरी संघटित टोळ्या आपल्या विचारांना एक ( बहुधा अनिष्ट) वळण देण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांचा कब्जा घेण्याच्या प्रयत्नात असतात.

Rajesh Pishte-Deshmukh
खूपच सुंदर लेख. या सगळ्या ज्ञान अन माहितीच्या जंजाळात मानव कमालीचा विसरभोळा होऊन एकटेपणाचा साथीदार बनेल का सर असा मला प्रश्न पडलायं.

Sangeeta Godbole
सर ..डोळ्यांत अंजन घालणारा लेख . चुरचुरले तरी व्याधी बरा करणारा ..वस्तुस्थिती अशीच आहे .विचार तर करायलाच हवा .आणि सुस्थितीत बाहेरही पडता यायला हवे.

Anand Ghare
खूपच विस्तृत लेख, मलाही एका दमात पूर्ण वाचता आला नाही. संगणकांमुळे माणसाच्या काही कौशल्यांमध्ये घट होण्याची शक्यता आहे, उदाहरणार्थ पाठांतर, तोंडचे हिशोब वगैरे गोष्टी पुढील पिढी करतच नाही. मानवी भावना कशा निर्माण होतात आणि त्यांवर कसा किंवा कितपत ताबा ठेवता येतो हेच मुळात गूढ आहे. त्यांच्यावर कृत्रिम बुद्धीमत्तेचा जास्त परिणाम होऊ नये असे मला वाटते. संगणक आणि स्मार्ट फोन यांचा अती वापर होत असल्यामुळे माणसांच्या सवयीच बदलत आहेत ही गोष्ट निश्चितच चिंताजनक आहे. पण यांच्या विरोधात येणाऱ्या संदेशांचाही महापूर येत आहे.

उत्तर – Sharad Kale
Anand Ghare साठीच्या किंवा सत्तरीच्या पुढे आपण आहोत. नवीन पिढीत आणि आपल्यात ४० -५० वर्षांचे अंतर आहे. पाठांतरावर भर देणारा अभ्यास किंवा स्मृतींवर अवलंबून असलेले दैनंदिन जीवन बदलत चालले आहे यात शंका नाही. त्यामुळे लेखात व्यक्त केलेल्या काही विचारांवर विरोधी सूर किंवा नाराजीचा सूर उमटू शकतो. पण माझ्या दृष्टीने प्रश्न तो नाही. जेंव्हा आपण दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींसाठी किंवा आवश्यक गोष्टींसाठी तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांवर अवलंबून राहात असतांना, बुद्धीचा आणि शरीराचा वापर अपेक्षित नसेल तर त्यातून जो रिकामा वेळ उपलब्ध होणार आहे, त्याचे योग्य नियोजन आपण करू शकू का? व्यसनांच्या आहारी जाण्यासाठी हा वेळ वापरला तर जाणार नाही ना? काळाबरोबर चालत असतांनादेखील सृजनशीलता नवीच असते. त्यामुळे नवीन वाटा, नवे व्यवसाय, नवे छंद निर्माण होतीलच. प्रश्न तो नाही. प्रश्न आहे की, आपला समाज त्या दृष्टीने प्रगल्भतेच्या रस्त्यावर आहे की नाही हा! काळजी ती आहे. सोशल माध्यमांवर आपण किती वेळ घालवत आहोत, याचे मोजमाप होत असतेच. त्यावरून जर प्रत्येकाने विचार करून आपल्या जीवनाची दिशा योग्य आहे की नाही ते ठरवायचे आहे. लोकांनी पाठांतर करीत राहिले पाहिजे, असा अन्वयार्थ नसून ज्ञानमार्गावर आपण बुद्धीचा विकास न झाल्यामुळे दिशाहीन तर होणार नाही, हे पाहिले पाहिजे.

**************************************

२. बुद्धिमत्तेचे प्रकार

असे सांगतात की प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन याला तो ‘ढ’ आहे असे म्हणून शाळेतून काढून टाकले होते, आइन्स्टाइन याला त्याच्या कॉलेजातल्या कमी गुणांमुळे कुठे नोकरी मिळत नव्हती म्हणून त्याने कारकुनाची नोकरी धरली होती, रामानुजम याला मॅट्रिकची परीक्षा पास होणे अवघड झाले होते. हे सगळे अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी होते हे त्यांनी केलेल्या प्रचंड कार्यावरून जगाला दिसून आले. मला वॉट्सॅपवर मिळालेला या विषयावरील एक लेख खाली दिला आहे. अज्ञात मूळ लेखकाचे मनःपूर्वक आभार. दि. २२-०३-२०२२
. . . . .

प्रचलित शिक्षण व्यवस्थेमुळे कितीतरी लोक न्यूनगंडामध्ये गेले असतील. असे होऊ नये म्हणून आपल्या मुलांची ‘बुद्धिमत्ता’ ओळखा.

 "आमचं लेकरू हुशार आहे पण जरा अभ्यासात कमी आहे", अशा वाक्याला बरेच जण अजुनही हसतात.
  शाळेच्या अभ्यासात कमी आहे किंवा परीक्षेत फार मार्क्स मिळत नाहीत, तर ती व्यक्ती 'बुद्धीमान' नाही हा आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे.
 खरंतर गार्डनर (Howard Gardner) या मानसशास्त्रज्ञाने ही समजूत कशी ठार चूकीची आहे हे सांगितलंय.
त्याने बुद्धीमत्तेचे मुख्य आठ प्रकार पाडले. कुठल्याही व्यक्तीमध्ये या आठ प्रकारांपैकी एक किंवा अधिक बुद्धिमत्तांचं कमी-अधिक प्रमाण असतं, असं त्याचं त्याचं मत होतं.
1. Visual - Spatial Intelligence :- 
 या प्रकारामध्ये अचूक नकाशा बघणे, random भटकत असतानाही दिशांचा योग्य अंदाज येणे, फोटो-ग्राफ्स-तक्ते मधून अर्थ काढणे, कोडी सोडवणे, चित्र, patterns मध्ये गती असणं हे सगळं येतं. आर्किटेक्ट, इंजिनीयर, चित्रकार वगैरे यात येतात.
 1. Linguistic – Verbal Intelligence :-
  या प्रकारात भाषेवर प्रभुत्व, शब्दांवर पकड, भारी बोलता येणं किंवा मध्ये मध्ये शाब्दिक विनोद/कोट्या करता येणं हे सगळं येतं. यात शिक्षक, वकील, पत्रकार, काही राजकारणी वगैरे येतात.
 2. Logical – Mathematical Intelligence :-
  आपल्या शाळेत ज्या लोकांना “हुशार” समजतात, अशी मंडळी या प्रकारात येतात. गणित सोडवणं, abstract गोष्टींची लॉजिकल उत्तरं देणं हे सगळं येतं. वैज्ञानिक, गणितज्ज्ञ, इंजिनीयर, कॉम्प्युटर प्रोग्रामर वगैरे लोक यात येतात.
  1. Bodily – Kinesthetic Intelligence :-
   शरीराची वेगवान हालचाल करणं, शरीरावर प्रचंड कंट्रोल असणं, मेंदू आणि डोळ्यांत/इतर अवयवांत भन्नाट co-ordination असणं, हे सगळं या प्रकारात येतं. खेळाडू, डान्सर, शिल्पकार वगैरे लोक यात येतात.
  2. Musical Intelligence :-
   चाल, धून, ताल वगैरे लक्षात राहणं, वाद्यांबद्दल आवड असणं, लवकर नवीन गाणी किंवा विविध वाद्यं शिकता येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगीतिक बुद्धीमत्ता होय. गायक, संगीतकार, कंपोझर वगैरे मंडळी यात येतात.
  1. Interpersonal Intelligence :-
   लोकांशी संवाद साधता येणं, लोकांच्या भावना समजून घेता येणं, त्यानुसार स्वतःच्या वागण्यात बदल करून घेणं, मित्रमंडळी बनवता येणं, त्यांना जपणं, कुठे कसं वागावं हे समजणं, वाद सोडवणं हे सगळं यात येतं. मानसशास्त्रज्ञ, टीम लिडर, काऊन्सीलर, सेल्सपर्सन, राजकारणी माणसं वगैरे
  2. Intrapersonal Intelligence :-
   हे वरच्या प्रकारच्या उलट. हे स्वतःमध्ये हरवलेले असतात. यांना स्वतःच्या विश्वात दंग राहायला आवडतं. स्वतःचे strengths आणि weaknesses यांना माहिती असतात. नवनवीन कल्पना ते मांडतात (पण मोस्टली मनातल्या मनात ). विचारवंत, वैज्ञानिक, लेखक अशी माणसंं या प्रकारची बुद्धीमान असतात.
  3. Naturalistic Intelligence :-
   हा प्रकार त्याने जरा उशीरा मांडला. काही लोकांना निसर्ग आवडत असतो. पक्षी, जंगलं, समुद्र, डोंगर, जैवविविधता अशा सगळ्या गोष्टींचे ते चाहते असतात. शहरात फार मन लागत नाही, खेड्याकडे जाऊन मोकळ्या आभाळाखाली चांदण्यात झोपणं फार आवडत असतं. पर्यावरणतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी वगैरे सगळे लोक यात येतात. अशा प्रकारे आपली एक बुद्धीमत्ता ओळखली आणि त्यानुसार आपल्या जीवनाची दिशा ठरवली तर आनंदमय होईल सगळं भविष्य. एकापेक्षा जास्त बुद्धीमत्ता असल्यास उत्तमच, मग अशा वेळी भविष्याचा स्कोप अजुन मोठा होतो.
   आपल्या शालेय वयात ज्या बॅक बेंचर्सना आपण अभ्यासामुळे, कमी मार्क्स मुळे हलक्यात घेतो ते लोक कसले भारी खेळाडू, कलाकार असतात हे जरा आठवा. आपल्या एकूणच प्रचलित शिक्षणव्यवस्थेमुळे कितीतरी लोक depression, न्यूनगंडामध्ये गेले असतील हे सुद्धा आठवा.
   त्यामुळे इंटरनेट वर अलरेडी उपलब्ध असलेली ही माहिती सोप्या शब्दांत इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. वाचकांपैकी कोणाचा फायदा झाला तर मला आनंदच होईल

आयुष्य हे . . .

‘आयुष्य’ या विषयावर मी वेळोवेळी जमवलेले शिंपले, गारगोट्या आणि मोती या भागात एकत्र केले आहेत.
सुरुवातीला एक अप्रतिम इंग्रजी कविता आणि तिचे मराठी रूपांतर.

 1. My soul has a hat
 2. आयुष्याचे गणित
 3. गणितातली चिन्हे
 4. ३६चा आकडा आणि ६३चा आकडा
 5. आधी कळस मग पाया … In my next life
 6. माझ्या आताच्या आवडत्या गोष्टी – ज्यूली एँड्र्यूज
 7. शेवटी अंतर सारखंच राहतं
 8. उरले सुरले जपून …
 9. होतं असं कधी कधी
 10. दुसऱ्यांचा विचार करावा
 11. सोडून द्यावं
 12. अलिप्तपणा
 13. आहे त्याचा स्वीकार करा
 14. चुलीवरले कांदेपोहे
 15. येईलंच कसा कंटाळा
 16. मला पडलेले काही प्रश्न
 17. सुख म्हणजे नक्की काय असतं ?
 18. दोन “पिढ्या” मधील तुलना
 19. चहाच्या कपातली साखर
 20. ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं
 21. ए जिंदगी बहुत हैरान हूं मैं।
आयुष्य हे … याचा उपयोग करून घ्या

मारिओ दि अन्द्रादे (1893 – 1945) या ब्राझीलियन कवीची ‘MY SOUL HAS A HAT’ ही कविता (मराठी अनुवादित)

कविता : माझ्या आत्म्याने हॅट घातली आहे

आज मी माझी सरलेली वर्षं मोजली आणि अचानक लक्षात आलं ..अरेच्चा!
जेवढं जगून झालंय .. त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं..
मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना…
खूप आवडीचा खाऊ खाताना.. तसं झालं काहीसं…

सुरवातीला तो आवडीने खाऊ खातोच पण जेंव्हा त्याच्या लक्षात येतं की आता
थोडासाच खाऊ उरलाय, तेंव्हा मात्र ते मूल खाऊ अधिकच चवीचवीने
आणि अगदी मन लावून खायला लागतं…
कुठल्याच संकेत, नियम आणि कायद्यांचं पालन होणार नाहीय
हे पुरेपूर ठाऊक असताना..

केवळ त्यांचीच चर्चा करणाऱ्या प्रदीर्घ बैठकांसाठी आता माझ्याकडे वेळ नाही.

ज्यांची केवळ वयंच वाढलीत.. बुद्धी नाही..
अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम आता माझ्यात अजिबात उरलेला नाही…

फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे.. आता मला फक्त अर्क हवा आहे..
आत्मा घाईत आहे माझा.. फार थोडा खाऊ शिल्लक आहे माझ्याजवळ आता..

मला माणसांच्या जवळ जगायचंय आता.. खऱ्याखुऱ्या माणसांच्या…
ज्यांना माहीत आहे, आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं..
ती माणसं.. जी विजयाच्या गर्वाने फुगलेली नाहीत
आणि ती माणसं… जी त्यांनी केलेल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेतात.
खरंतर अशा प्रकारेच माणसाची प्रतिष्ठा अबाधित राहते आणि आपण कायम सत्य आणि प्रामाणिकतेच्या मार्गावर राहतो.
आपलं आयुष्य कामी येणं उपयुक्त होणं हे अत्यंत महत्त्वाचं.

मला अशी माणसं माझ्या अवतीभवती हवी आहेत की ज्यांना दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा हे चांगलंच ठाऊक आहे..
अशांच्या हृदयाला… ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत, आत्म्याच्या पवित्र, मधुर स्पर्शाने ज्यांना तरीही मोठं केलंय..

हो आहे मी घाईत.. मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे..
ती उत्कटता… जी केवळ प्रगल्भतेतून येते.
आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई फुकट घालवायची माझी इच्छा नाहीय..

मला नक्की माहीत आहे की ही मिठाई अतिशय उत्तम आहे..
मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही खूप सुग्रास!

माझं आता एकच ध्येय आहे.. माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सदसद्विवेकबुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत अखेरचा क्षण गाठणं..
बस!

आपल्याकडे बरं का दोस्तांनो .. दोन आयुष्य असतात..
आणि दुसरं आयुष्य सुरू होतं जेंव्हा लक्षात येतं की आपल्याकडे जगायला फक्त एकच आयुष्य आहे!

–मारिओ दि अन्द्रादे
(मुक्त मराठी भाषांतर – कॅप्टन वैभव दळवी)

My Soul Has A Hat

I counted my years and realized that I have less time to live by, than I have lived so far.
I feel like a child who won a pack of candies: at first, he ate them with pleasure but when he realized that there was little left, he began to taste them intensely.
I have no time for endless meetings where the statutes, rules, procedures and internal regulations are discussed, knowing that nothing will be done.
I no longer have the patience to stand absurd people who, despite their chronological age, have not grown up.
My time is too short: I want the essence; my spirit is in a hurry. I do not have much candy in the package anymore.
I want to live next to humans, very realistic people who know how to laugh at their mistakes and who are not inflated by their own triumphs and who take responsibility for their actions. In this way, human dignity is defended and we live in truth and honesty.
It is the essentials that make life useful.
I want to surround myself with people who know how to touch the hearts of those whom hard strokes of life have learned to grow with sweet touches of the soul.
Yes, I’m in a hurry. I’m in a hurry to live with the intensity that only maturity can give.
I do not intend to waste any of the remaining desserts. I am sure they will be exquisite, much more than those eaten so far.
My goal is to reach the end satisfied and at peace with my loved ones and my conscience.
We have two lives and the second begins when you realize you only have one.

Mario de Andrade
(San Paolo 1893-1945) – The Valuable Time of Maturity


२. आयुष्याचे गणित


यात दोन रचना आहेत. पहिल्या रचनेमध्ये आयुष्यातले काही विरोधाभास दाखवून आश्चर्य व्यक्त केले आहे. दुसऱ्या रचनेत आयुष्याचे अंकगणित योग्य चिन्हे वापरून सोडवण्याचे उपाय सुचवले आहेत.या दोन्ही रचना कुणाकुणाच्या आहेत ते मला माहीत नाही. त्यांना सादर प्रणाम आणि अनुमतिसाठी विनंति
…………………………………………………………………….

१.देवाला पण सुटत नाही
जी आपल्याला आवडते
तिला आपण आवडत नाही

जिला आपण आवडतो…
ती आपल्याला आवडत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

तिने याच्यात काय पाहिलं
ह्याने तिच्यात काय पाहिलं

हे फक्त त्यांनाच माहिती
बाकीच्याना कळत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

तो असे ना का सावळा
तिला त्यात शाम दिसतो

असेना का ती साधी
तिच्यात तो राधा पाहतो

दोघांमध्ये असं काय असत
तुम्हा आम्हाला कळत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

नसेल येत तिला जेवण करता
तुम्ही का उदास होता…

तो जेवतोय ना सुखाने
तुम्ही का चेहरा पाडता…

नवरा बायकोचं अलवार नातं
सासूला का कळत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

लेक गेली सासरी…
संसार तिला करू दे

तू कशाला काळजी करते
तिला तीच सावरू दे

लेकीच्या आयांना …
हेच कसं कळत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

प्रेम करा स्वतःवर अन
प्रेम करा जीवनावर…

दुसऱ्यात गुंतलात जर कधी
वेळीच या भानावर

हे इतकं साधं सोपं
कुणालाच कसं कळत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

🙏🏼🙏🏼 🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼 🙏🙏🙏🙏

३.गणितातली चिन्हे ➕➖✖➗

आयुष्याचे गणित चुकले
असे कधीच म्हणू नये .

आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते,
चुकतो तो चिन्हांचा वापर…!

बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
ही चिन्हें योग्य पद्धतीने वापरली कि
उत्तर मनासारखे येते.
आयुष्यात कुणाशी बेरीज करायची,
कुणाला केंव्हा वजा करायचे,
कधी कुणाशी गुणाकार करायचा
आणि भागाकार करताना
स्वतः व्यतिरिक्त किती
लोकांना सोबत घ्यायचे हे
समजले कि उत्तर मनाजोगते येते..!
आणि मुख्य म्हणजे
जवळचे नातेवाईक, मित्र
आप्तेष्ट यांना हातचा समजू नये,
त्यांना कंसात घ्यावे!
कंस सोडविण्याची हातोटी
असली कि गणित
कधीच चुकत नाही ……..!!

आपल्याला शाळेत त्रिकोण,
चौकोन, लघुकोन,
काटकोन, विशालकोन
इत्यादी सर्व शिकवतात..
पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो
तो कधीच शिकवला जात नाही.
तो म्हणजे “दृष्टीकोन”.
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला,
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील..
आयुष्याचे calculation खूप वेळा केले, पण ‘सुख दुःखाचे’ accounts कधी जमलेच नाही…
जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की ‘आठवण’ सोडून काहीच balance उरत नाही…

😊😊😊👍👍👍😊😊😊👍👍👍😊😊😊👍👍👍

तात्पर्य : गणितामध्ये काही ठराविक फॉर्म्युले असतात. त्यात दिलेले आकडे घातले की उत्तराचा अचूक आकडा येतोच. .. पण काही लोकांचा गोंधळ होतो. आयुष्यातले फॉर्म्युले कधी कठीण असतात आणि कधी कॅल्क्युलेशन चुकते. त्यामुळे नेहमीच अपेक्षित उत्तरे येत नाहीत.

४. ३६चा आकडा आणि ६३चा आकडा

छत्तीस च्या आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.

त्याप्रमाणे माणसांच असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात.

आता ६३ आकडा पहा.
या आकड्याने साठी ओलांडल्या मुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी जेवढ्यांना विसरला त्यांची आठवण काढत बसतो. ६३ च्या आकड्या प्रमाणेच.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो.

आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर, तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा…!!

****

५. आधी कळस मग पाया …… In My Next Life

माझे पुढचे आयुष्य मला उलट क्रमाने जगावेसे वाटते.

काळनिद्रेतून मला जाग येईल तेंव्हा माझी आपली जवळची माणसे पलंगाच्या बाजूला असतील. त्यानंतर दररोज मला अधिकाधिक बरे वाटत जाईल.
तब्येत पुरेशी सुधारून मी हिंडू फिरू लागेन, मला पेन्शन मिळू लागेल.
नोकरीला लागल्याच्या पहिल्याच दिवशी मला मोठ्या समारंभपूर्वक हार तुरे घालून माझा सत्कार होईल आणि सोन्याचे घड्याळ भेट म्हणून मिळेल.
त्यानंतर चाळीस वर्षे मी काम करत राहीन, त्या काळात खाणे, पिणे, मौज, मजा या सगळ्यांची धमाल करेन. माझा रंगेलपणा रोज वाढत जाईल.
सगळी मजा उपभोगून झाल्यानंतर मी शाळेत जाईन, खेळेन, खोड्या करेन. माझ्यावर कसलीही जबाबदारी असणार नाही.
शेवटचे नऊ महिने मी उबदार कोषात तरंगत राहीन आणि मीलनाच्या परमोच्च क्षणी अंतर्धान पावेन.
In my next life, I want to live my life backwards. You start out dead and get that out of the way.
Then you wake up in an old folks home feeling better every day.
You get kicked out for being too healthy, go collect your pension,
and then when you start work, you get a gold watch and a party on your first day.
You work for 40 years until you’re young enough to enjoy your retirement.
You party, drink alcohol and are generally promiscuous,
then you are ready for high school.
You then go to primary school, you become a kid, you play.
You have no responsibilities, you become a baby until you are born.

And then you spend your last nine months floating in a luxurious spa
and end up as an orgasm.

ATTRIBUTED TO WOODY ALLEN

६. माझ्या आताच्या आवडत्या गोष्टी – ज्यूली एँड्र्यूज


साउंड ऑफ म्यूजिक हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. त्यातली ज्यूली अँड्र्यूजची भूमिका आणि डो अ डीअर, दीज आर अ फ्यू ऑफ माय फेव्हरिट थिंग्ज वगैरे गाणीसुध्दा अजून कानात घुमत असतील. ज्यूलीने आता वृध्दापकाकात सांगितलेल्या तिच्या आवडत्या गोष्टी पहा.

When Julie Andrews Turned 69

To commemorate her birthday , actress/vocalist, Julie Andrews made a special appearance at Manhattan ‘s Radio City Music Hall for the benefit of the AARP. One of the musical numbers she performed was ‘My Favorite Things’ from the legendary movie ‘Sound Of Music’.

Here are the lyrics she used: (Sing It!) – If you sing it, its especially hysterical!!!

Botox and nose drops and needles for knitting,
Walkers and handrails and new dental fittings,
Bundles of magazines tied up in string,
These are a few of my favorite things.

Cadillacs and cataracts, hearing aids and glasses,
Polident and Fixodent and false teeth in glasses,
Pacemakers, golf carts and porches with swings,
These are a few of my favorite things.

When the pipes leak, When the bones creak,
When the knees go bad,
I simply remember my favorite things,
And then I don’t feel so bad.

Hot tea and crumpets and corn pads for bunions,
No spicy hot food or food cooked with onions,
Bathrobes and heating pads and hot meals they bring,
These are a few of my favorite things.

Back pain, confused brains and no need for sinnin’,
Thin bones and fractures and hair that is thinnin’,
And we won’t mention our short shrunken frames,
When we remember our favorite things.

When the joints ache, When the hips break,
When the eyes grow dim,
Then I remember the great life I’ve had,
And then I don’t feel so bad.
(Ms. Andrews received a standing ovation from the crowd that lasted over four minutes)

७. शेवटी अंतर सारखंच राहतं…

शेवटी अंतर तेवढचं राहीलं !

😌😌😌😌😌😌😌

लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं… आपण ही खावं…, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं…
मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली…
😢 शेवटी अंतर तेवढच राहीलं 😪

लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे…
मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले… सुती कपडे महाग झाले.
😢 शेवटी अंतर तेवढच राह्यलं 😪

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,… शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची…
मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले…
😢 शेवटी अंतर तेवढच राह्यलं 😪

लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा… अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो… वाटायचं आपणही प्यावा पण ?
आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.
😢 शेवटी अंतर तेवढच राह्यलं 😪

लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत…
😢 शेवटी अंतर तेवढंच राहीलं 😪

लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं…
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावतात.
😢 शेवटी अंतर सारखच राहतं…😪

लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट / विपशना ) मध्ये राहतात तेंव्हा
😢 शेवटी अंतर सारखंच राहतं… 😪

आता कळलं…हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं जसा आहे, तसाच राहाणार… कुणाचं पाहून बदलणार नाही…
म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी म्हंटले होते ,
ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान …

मित्रांनो खूष रहा, समाधानी राहा, वाट्याला आलेले जिवन खुप सुंदर आहे, त्याचा मनमुराद आनंद उपभोगा.
कुणाचं पाहून आपल्या स्व-आनंदाची व्याख्या बदलवू नका.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

८. उरलेसुरले जपून वापरायची …

उरले सुरले

उरले सुरले जपून वापरायची सवय किती छान होती,
आयुष्य साधंच होतं तरी मजा काही औरच होती!

तोडकी मोडकी कंपास पुन्हा जोडून वापरत होतो,
झिजली जरी पेन्सील तरी टोपण लावून लिहीत होतो!

तुटलेला पेन पुन्हा पुन्हा स्प्रिंग बदलून वापरत होतो,
एकच पेन खूप जपून रिफील करून वापरत होतो!

जुनीच पुस्तके वर्तमानपत्राचे कव्हर घालून वापरत होतो,
तुझी पुस्तकं दे बरं मला आधीच सांगून ठेवत होतो!

जुन्या वह्यांची कोरी पानं दाभण वापरुन शिवत होतो,
जुन्यातूनच नाविन्याचा आनंद आम्ही घेत होतो!

सायकलच्या जुन्या टायरचे गाडे आम्ही चालवत होतो,
तोल कसा सांभाळावा ते बेमालूमपणे शिकत होतो!

फुटलेल्या फटाक्यांची दारू गोळा करत होतो,
उरलेल्या चिंध्याचा मस्त गरगरीत चेंडू करत होतो!

तुटलेल्या स्लीपरला पीन लावून वापरत होतो,
ध्येयाकडे न थांबता तरीही पाऊले टाकत होतो!

फुटलेल्या बांगड्यांनाही वाया घालवत नव्हतो,
दगडांचा बच्चू तर फरशीची लगोरी आम्ही करत होतो!

फाटलेल्या गोधडीला ठिगळं लावून सजवत होतो,
उसवलेल्या कपड्यांना धाग्या दोऱ्याने सांधत होतो!

गंध जरी जुना असला तरी छंद मात्र नवा होता,
काटकसर अन बचतीचा संस्कारच चिरकाल होता!

वापरा आणि फेकून द्या याचा हल्ली जमाना आलाय,
किंमत नाही वस्तूंची म्हणून नव्याचा कचरा झालाय!

सुई धागा हरवला नाही, पण तो हल्ली कोण घेत नाही.
फाटलेली नाती आणि वस्तू खरं तर कोणीच शिवत नाही!

कुणी लिहिले माहीत नाही पण खूप छान आहे म्हणुन पाठवत आहे.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 🌻🌼🌻🌼🌻🌼🌻

९. होतं असं कधी कधी

खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण…
बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली….
इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण…
संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते…
परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे…
टाळतो आपण कॉल करायचा….
त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो…
‘तुझ्या ऑफिस बाहेर होतो…
भेटलो असतो…’
जुन्या आठवणी काढत बसतो आणि मन रमवतो त्यातच..
स्वतःला खोटं खोटं समजावत…!
होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁
कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली…
रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना…
माया,कणव दाटून येते मनात आपल्या…
‘कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??’
पाकिटात हात जातो…
शंभराची नोट लागते हाती…
व्यवहार जागा घेतो ममतेची…
समोरचा म्हातारा ओळखतो… बदलतो…
“दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा…”
तो सुटका करतो आपली पेचातून…
आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून…
होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁
दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले…
आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते…
तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा वेळी…
दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात…
ती येते…
काम आटोपते…
तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना, कामवाली एक डब्बा देते हातात आपल्या…
चिवडा लाडू असतो त्यात…
“तुम्ही दर वेळा देता… आज माझ्याकडून तुम्हाला…”
‘कोण श्रीमंत कोण गरीब’, हा विचार सोडत नाही पिच्छा आपला…
होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁
ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर…
आई उठवते उन्हं अंगावर आल्यावर…
अंगात ताप असतो तिच्या…
आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती…
मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत…
दिवस उलटतात…
वडिलांचा एके रात्री फोन येतो…
“काम झालं असेल तर आईला एक फोन कर… आज तिचा वाढदिवस होता…”
कोडगेपणा म्हणजे हाच तो काय…!
चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले birthday विश आठवतात…..
लाजत तिला फोन करतो…
“आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा…”
ती बोलते…
कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो…
अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून…
काहीतरी खूप खूप दूर जातंय आपल्या पासून असं जाणवत राहतं…!!
खरंच,
होतं असं कधी कधी.
👍👍👍

१०. अ) दुसऱ्यांचा विचार करावा

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं, आणि ओवलेला दोरा संपला, तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा, दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.
पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं, दुसऱ्यानं तिसऱ्या साठी, जेणेकरुन वेळ आणि इंधनबचत व्हायचीच, पण गैरसोयही टाळता यायची.
सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.
आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं (नीट पुरवणी आत ठेऊन) निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो, शोधाशोध करावी लागत नाही.
पाण्याची बाटली आपण रिकामी केली व लगेच भरुन फ्रीजमधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.
बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं, ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.
पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून/घासून ठेवायचे, हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.
खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे, आपली टर्न आल्यावर संपल्या/बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.
घर सगळयांचं असतं, ‘सगळी जवाबदारी गृहिणीची’ असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे.
प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो, चुकीच्या सवयी लागतात.
घर ही एक संस्था समजून घराची एक शैली, एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात, तसे घरातही काही नियम असले पाहिजेत, तरच त्याचं हाॅटेल होणार नाही. (खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच!)
लाॅकडाऊनचा काळ ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत. काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर by भविष्यात फायदा होईलच आणि नातीसुध्दा चांगली होतील. लहान मुलांना हे शिकवता येईल.
थोडं थांबून आपल्या नंतर येणाऱ्याचा विचार केला तर ही मदतीची साखळी सुरु राहील. मुख्य म्हणजे आपली वेळ येईल तेव्हा आपल्यालाही फायदे मिळतील.

😊🙏

१० आ). गोष्ट खूप छोटी असते हो….

तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का ? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं…
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

अंधारात तुम्ही कधी पाय अडखळुन पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी skin चं मलम देऊन टाकायचं…
गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.

कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं thank you ऐकायला मस्त वाटतं….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.
माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची!

******************************************

११. सोडून द्यावं

🍁 सोडून द्यावं 🍁

🍁एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं
सोडून द्यावं🍁
🍁मुलं मोठी झाल्या वर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं
सोडून द्यावं*🍁
🍁
मोजक्याच लोका॑शीच ऋणानुबंध जूळतात, एखाद्याशी न पटले तर बिघडले कुठे..
सोडून द्यावं🍁
🍁एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं
सोडून द्यावं🍁
🍁आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं
सोडून द्यावं🍁
🍁ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं
सोडून द्यावं🍁
🍁प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं
सोडून द्यावं🍁
🍁आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं
सोडून द्यावं🍁

समजंल तर ठिक नाहितर हे हि सोडून द्यावं.!!*
😜😜😜🍧🍧🌹🌹

१२. Detachment अलिप्तपणा

अलिप्त होणे, Disconnect with somebody…..
धक्का बसला नं मित्रांनो, पण खरं आहे…..
पटणार नाही काहींना, आयुष्यात वेळ आली की Detach होणचं योग्य……..
असं म्हणतात, साठी नंतर ही प्रक्रिया सुरु करावी. अलिप्त म्हणजे separation नाही, aloof नाही, कुठलीही गोष्ट मनाला लावून नं घेणे….. ज्या गोष्टी जशा आहेत, त्याचा स्वीकार करणे, खोटी आशा बाळगू नये……
एक लक्षात असावे, माणसाचा स्वभाव बदलत नाही, स्वभावाला औषध नाही, खरं आहे…..
त्याचा मोठया मनाने स्वीकार करावा, ते बदलण्याचा प्रयत्न पण करू नये…… Detach….
मुलगा /मुलगी परदेशी आहेत…. हो.. त्यांची सारखी भेट होणार नाही, प्रत्यक्ष होणं शक्य नाही, हे मनाला सांगणे….. अलिप्त……
आपली स्थावार जंगम Property, खूप कष्टाने उभी केलेली, मान्य….. पण आता उपभोग घेण्याची शक्ती नाही, आसक्ती नाही, त्यावर शांतपणे विचार करून निर्णय घेणे…. Disconnect
आपल्या घरामध्ये खूप वस्तू असतात, कधी Marketing tricks मुळे तर कधी पत्नीचा, मुलांचा आग्रह… खरं सांगा अशा कित्येक वस्तू आपल्या घरात असतात, खरं आहे नं…. आपण वापरत नाही पण जपून ठेवतो, May be emotional attachment…..
भांडी असंख्य, Dinner sets, काचेचे वेगवेगळे glasses, Mugs, अगणित वाट्या, पेले इत्यादी….
कल्पना करा, लग्नानंतर छोट्या घरात संसार झाला नं, आता घर मोठं आहे, खूप साधने आहेत, पण माणसं दोन… काय करायचं… अशा वेळी Detach होणं चं महत्वाचं….
हे झालं निर्जीव वस्तूंबद्दल.. आता सजीव माणसं चेक करू या…….
काही वर्षांपूर्वी कोणाच्याही आयुष्यात आपण डोकावणे, स्वाभाविक होतं, कारण व्यक्ती वेगळ्या होत्या, सगळं स्वच्छ मोकळ्या आकाशा सारखं होतं…. आज परिस्थिती बदलली आहे मित्रांनो, विचार share होत नाहीत, कोणी सल्ला मागत नाही, काही नं पटणाऱ्या गोष्टी विचारता येत नाहीत…. Detach….
रिक्त होण्यात सुख आहे मित्रांनो, दुःखाला delete करायला यायला पाहिजे, खूप कठीण आहे, मान्य, मग पूढे नाही जाऊ शकत…….
अशा वेळी कृष्णा चे चिंतन करावे…
त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही…. कधी वाटलं नसेल का कृष्णाला कि देवकीला घट्ट मिठी मारावी आणि चार क्षण तिच्या कुशीत घालवावे…😥
कधी गोकुळात जाऊन गोपिकांच्या घागरी फोडाव्या, मनसोक्त बासरीच्या मंद आवाजात सगळं विसरून जावं……..
मान्य आहे, कृष्ण परम परमेश्वर होता 🙏🏻… आपण कृष्ण होऊ शकत नाही.. अशक्य… आयुष्यात जर कधी अलिप्त व्हायचं असेल तर कृष्ण आठवा…. तो स्फूर्ती देईल……..
मुलं लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात रमतात… काय गैर आहे, काही नाही, ते जर त्यांचे कर्तव्य पार पाडीत असतील तर तक्रारीला जागा नसावी…. पण माझं ऐकावं हा हट्ट बरा नाही… निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते, मान्य, पण जबरदस्ती नको….. लागू द्या ठेचा… शिकेल मुलगा,/मुलगी…
लहानपणी आई म्हणायची, तुला कळणार नाही आता, एकदा बाप झाला की कळेल….. किती साध्या भाषेत एवढं मोठं तत्वज्ञान आईच सांगू शकते…..
अलिप्त होण्यात सुख आहे…. पाऊस पडल्यानंतर नीरभ्र आकाशा सारखं मन स्वच्छ होईल मित्रांनो……
वाईट भावना, वाईट विचार कोलमडून जातील आणि स्वच्छंद आनंदाचा अनुभव प्राप्त होईल…
मनात प्रेम, सहानुभूती राहणार, पण गुंतणे नाही….
जिथे व्यक्ती गुंतते, तिथे राग, लोभ, येणार….हे मळभ दूर झाले की सर्व छान, स्वच्छ, निर्मळ……….
बघा प्रयत्न करून, जमलं तर ठीक….
नुकसान मात्र नाही…..

विद्याधर फाटक
17 जुलै 2021


१३ आहे त्याचा स्वीकार करा

खूप छान आहे वाचा 👇Real Life 😍🥰
नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा,
व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी,
घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं,
एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहण्यात मजा आहे
वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही,
गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा,
शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे,
देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं,
परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो,
केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान,
कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता.
एक मूल असतं त्याला वाटतं दोन असती तर,
दोन असणाऱ्याला वाटतं एक वाला मजेत,
मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता,
मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते,
ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल,
नावे ठेवणारे रामातही दोष बघतात
कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात.
मिळून काय?
नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही.
मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे.
किती गोंधळ रे देवा हा?
म्हणुन जे आहे त्याचा स्वीकार करा आणि आयुष्य आनंदात जगा…
🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

१४. चुलीवरले कांदेपोहे

प्रसिद्ध गीतसंगीतकार आणि गायक श्री.अवधूत गुप्ते यांचे हे गाणे काही वर्षांपूर्वी खूपच गाजले होते. या गाण्यावरूनच मला या लघुलेखसंग्रहाचे शीर्षक सुचले.

भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांति
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
आले मिटुनी लाजाळूपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

दूर देशिच्या राजकुमारा ची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागुन ध्यानी मनी नसताना
नकळत आपण हरवुन जावे स्वतःस मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

भूतकाळच्या धुवुन अक्षता तांदुळ केले ज्यांनी
आणि सजवाला खोटा रुखवत झाडांच्या फांद्यांनी
भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा
हातावरच्या मेंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

************************************

१५.येईलंच कसा कंटाळा

🙏 माझं घर 🙏

येईलंच कसा कंटाळा

काहीतरीच तुमचं … तुमचा प्रश्नच आहे वेंधळा
आपल्याच घरात आपल्याला … येईल कसा कंटाळा.

माझ्या घरातली धूळ सुध्दा … माझ्यावरती प्रेम करते
किती झटकली तरीही … पुन्हा पुन्हा येऊन बसते.

ताट वाटी भांडं … ही सारीच माझी भावंडं
जेवताना रोज असते सोबत … पिठलं असो की श्रीखंड

फ्रीज, मिक्सर, गिझर, टिव्ही … साऱ्या नव्हेत नुसत्याच वस्तू
रिमोट हातात घेतला की … लगेच म्हणतात ‘ तथास्तु ‘

कपाट नुसतं उघडलं की … उघडतात मनाचेही कप्पे
वरून खाली दिसत जातात … आयुष्याचे सर्व टप्पे

पलंगावर आडवं पडून … खोचून घेतली मच्छरदाणी
तरी लपून बसलेला एक डास … कानामध्ये गुणगुणतो गाणी

खिडकी, गँलरी, पँसेज, बाल्कनी … घर असतंच नंदनवन
कितव्याही मजल्यावर घर असो … घरातंच तयार होतं अंगण

पती, मुलं, सुना, नातू … घरात नेहमीच असते जाग
टेबलावरची एक कुंडी … फुलवते आयुष्याची बाग

घरात नुसतं बसून रहा … वाढतं जाईल जिव्हाळा
आपल्याच घरात आपल्याला … येईलंच कसा कंटाळा.

🙏🙏

१६. मला पडलेले काही प्रश्न ???

******************

१७. सुख म्हणजे नक्की काय असतं ?

१८. दोन “पिढ्यां” मधील तुलना

किती सुंदर उत्तर!
दोन “पिढ्या” मधील तुलना……. प्रत्येकाने जरूर वाचा 👌👌

एका तरुणाने त्याच्या वडिलांना विचारले: “तुम्ही लोक आधी कसे जगता-
तंत्रज्ञानात प्रवेश नाही
विमाने नाहीत
इंटरनेट नाही
संगणक नाहीत
नाटके नाहीत
टीव्ही नाहीत
हवाई बाधक नाहीत
गाड्या नाहीत
मोबाईल फोन नाहीत?”

त्याच्या वडिलांनी उत्तर दिले:
“आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याप्रमाणे –

प्रार्थना नाहीत
करुणा नाही
सन्मान नाही
आदर नाही
वर्ण नाही
लाज नाही
नम्रता नाही
वेळेचे नियोजन नाही
खेळ नाही
वाचन नाही”

“आम्ही, 1940-1980 दरम्यान जन्मलेले लोक धन्य आहोत. आमचे जीवन एक जिवंत पुरावा आहे:

👉 खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट घातले नाही.
👉 शाळा सुटल्यावर संध्याकाळपर्यंत खेळायचो. आम्ही कधीच टीव्ही पाहिला नाही.
👉 आम्ही इंटरनेट मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलो.
👉 आम्हाला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यायलो बाटलीचे पाणी नाही.
👉 आम्‍ही कधीही आजारी पडलो नाही, तरीही आम्‍ही चार मित्रांसोबत एकच ग्लास ज्यूस शेअर करायचो.
👉 आम्ही रोज भरपूर भात खात असलो तरी आमचे वजन कधीच वाढले नाही.
👉 अनवाणी पायी फिरूनही आमच्या पायाला काही लागले नाही.
👉 आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर केला नाही.
👉 आम्ही स्वतःची खेळणी तयार करायचो आणि त्यांच्याशी खेळायचो.
👉 आमचे आई वडील श्रीमंत नव्हते. त्यांनी आम्हाला प्रेम दिले, सांसारिक साहित्य नाही.
👉 आमच्याकडे सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, व्हिडिओ गेम्स, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅट कधीच नव्हते – पण आमचे खरे मित्र होते.
👉 आम्ही आमच्या मित्रांच्या घरी विनानिमंत्रित गेलो आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
👉 तुमच्या जगाच्या विपरीत, आमचे जवळ जवळ राहणारे नातेवाईक होते त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नातेसंबंध एकत्र आनंदात होते.
👉 आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये असू शकतो पण त्या फोटोंमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी आठवणी सापडतील.
👉 आम्ही एक अद्वितीय आणि, सर्वात समजूतदार पिढी आहोत, कारण आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्यांच्या पालकांचे ऐकले.
तसेच, प्रथम ज्यांना त्यांच्या मुलांचे ऐकावे लागले.
आणि आम्ही तेच आहोत जे अजूनही हुशार आहोत आणि तुमच्या वयात असताना कधीही अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता तुम्हाला मदत करत आहोत!!!

🌹🙏🙏🌹

१९. चहाच्या कपातली साखर

पु ल देशपांडे :

चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता …
अवती भोवती पाहता पाहता हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते..
अरेच्या !
साखरच घालायला विसरलो कि काय….
पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर….
आयुष्य असच असतं…
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे….
एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे….
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे….
मान-अपमान मैत्रीत काहीच नसतं….
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहीजे.
जगाच्या या रंगमंचावर असे वावरा, की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.
जगातील सर्वात महाग पाणी कोणते, तर अश्रू … कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात.
त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका..
हसा आणि हसवत रहा…!!

२०. ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नही।

कृष्ण बिहारी ‘नूर’

ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं

अपने दिल की किसी हसरत का पता देते हैं
मेरे बारे में जो अफ़वाह उड़ा देते हैं

ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं
और क्या जुर्म है पता ही नहीं

इतने हिस्सों में बंट गया हूँ मैं
मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं

ज़िंदगी मौत तेरी मंज़िल है
दूसरा कोई रास्ता ही नहीं

जिसके कारण फ़साद होते हैं
उसका कोई अता-पता ही नहीं

कैसे अवतार कैसे पैग़मबर
ऐसा लगता है अब ख़ुदा ही नहीं

ज़िंदगी की तल्ख़ियाँ अब कौन सी मंज़िला पाएं
इससे अंदाज़ा लगा लो ज़हर महँगा हो गया

ज़िंदगी अब बता कहाँ जाएँ
ज़हर बाज़ार में मिला ही नहीं

सच घटे या बढ़े तो सच ना रहे
झूठ की कोई इँतहा ही नहीं

धन के हाथों बिके हैं सब क़ानून
अब किसी जुर्म की सज़ा ही नहीं

चाहे सोने के फ्रेम में जड़ दो
आईना झूठ बोलता ही नहीं

अपनी रचनाओं में वो ज़िन्दा है
‘नूर’ संसार से गया ही नहीं

 • कृष्ण बिहारी ‘नूर’

शायर कृष्ण बिहारी नूर ने इस ग़ज़ल को मुशायरे में पेश किया, वीडियो देखें – https://www.youtube.com/embed/WgT033R74k4

२१. ए जिंदगी बहुत हैरान हूं मैं।

एक कविता मौके पर पेश है

ए जिंदगी बहुत हैरान हूं मैं।
कभी उलझनों को सुलझाने से,
तो कभी खुद ही में उलझ जाने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं।
कभी दूसरों के हराने से,
तो कभी खुद से ही हार जाने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं।
कभी लोगों की मतलबी बातों से,
तो कभी खुद भी मतलबी हो जाने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं।
कभी भूख के न मिट पाने से,
तो कभी भूख ही ना आने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं।
कभी नींद के ना आने से,
तो कभी ख्वाबों के टूट जाने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं।
कभी दिल के टूट जाने से,
तो कभी अपनों के रुठ जाने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं-बहुत हैरान हूं मैं।।

 • मनोज कुमार सूर्यवंशी

देवा रे देवा .. Oh My God !

अगदी लहानपणापासून आपल्या मनावर जे संस्कार होत असतात त्यात देवाला खूप महत्वाचे स्थान आहे. तो सर्वसाक्षी असतो, चराचरात भरलेला असतो, त्याच्या इच्छेनुसारच हे जग चालत असते. तसाच तो दयाळू, कृपाळू असतो. कठीण प्रसंगी सहाय्य करतो, संकटांपासून संरक्षण करतो. यामुळे त्याची आराधना, प्रार्थना आणि त्याचे स्मरण करत रहावे असेच सर्व प्रमुख धर्मांमधूनही शिकवले जाते. देवाची आराधना, त्याचे स्वरूप, त्याची योजना, त्याची किमया वगैर विषयांवरील काही मजेदार किस्से आणि विनोद मी या ब्लॉगच्या सुरुवातीपासून संग्रहित केले होते. ते आता या पोस्टमध्ये एकत्रित केले आहेत. पूर्वी जमवलेले बहुतेक लेख इंग्रजीमधून घेतलेले आहेत. ते मूळ रूपात देऊन त्याचा मराठीत अनुवाद किंवा सारांश दिला आहे.

मीच पूर्वी लिहिलेले ‘देवाचे खाते’ आणि ‘धर्म, विज्ञान आणि परमेश्वर’ हे लेख या पानात समाविष्ट केले आहेत. दि.२४-०३-२०२२

या भागातील इतर लेख

१. आमच्या घरातले देव
२. एक महिला आणि देव A WOMAN AND GOD
३. या जगात खरोखरच देव आहे. GOD DOES EXIST
४. देवाची योजना
५. देवा रे देवा Hospital Bill
६. देव तारी तिला कोण मारी
७. आणि देव हसतच राहिला
८. देवबाप्पाशी गप्पा
९. देव तारी तयांना …… (११ सप्टेंबर)
१०. परमेश्वर – एका आठ वर्षांच्या बालकाच्या नजरेतून
११. देवाचे अस्तित्व
१२. देव म्हणाला “कधीही धीर सोडू नका”
१३. देवांवर विश्वास एक मानसिक आजार
१४. देवपूजा – एक मेडिटेशन

माझे लेख – १. देवाचे खाते

जन्माला आलेले मूल नुसतेच डोळे मिचकावत असते. त्याच्या पांच ज्ञानेंद्रियामधून मिळणाऱ्या संदेशांचे कितपत आकलन त्याला होते ते कळायला मार्ग नाही. हळू हळू त्याची नजर स्थिर होते. चेहरा व आवाज ओळखून ते प्रतिसाद देऊ लागते. शब्दाशब्दाने भाषा शिकते. बोलायला लागल्यावर अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडते. त्याच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे पालकांच्याकडे नसतात किंवा कांही कारणाने त्यांना ती द्यायची नसतात. यातूनच “देवाचे खाते” उघडले जाते. जे जे आपल्याला माहीत नाही किंवा सांगता येणे शक्य नाही ते सगळे त्याच्या खात्यात मांडले जाते. त्या क्षणी तरी हा सर्वात सोपा मार्ग वाटतो. जसजसे त्या मुलाचे ज्ञान वाढत जाईल तसतशा कांही गोष्टी देवाच्या खात्यातून त्याच्या खात्यात जमा होतात. पण देवाचे खाते त्यामुळे कमी होते कां? मोठेपणीसुध्दा जगातल्या सगळ्याच विषयातल्या सगळ्याच गोष्टी समजणे किंवा समजावून सांगणे कोणालाच शक्य नसते. अनेक वेळा अनपेक्षितपणे घडलेल्या घटनांचे तर्कशुध्द विश्लेषण करता येत नाही. देवाची मर्जी म्हणून त्या सोडून द्याव्या लागतात. त्यामुळे ठाऊक झालेल्या पण न समजलेल्या गोष्टी देवाच्या खात्यात जमा होत जातात.

‘कां’, ‘कुणी’, ‘कधी’, ‘कुठे’, ‘कसे’, ‘कशामुळे’, ‘कशासाठी’, वगैरे प्रश्नरूपी दरवाजे ज्ञानाच्या प्रत्येक दालनाला असल्यामुळे कोठलाही एक दरवाजा उघडताच त्या दालनातील विहंगम दृष्य दिसते, तेथील गोष्टींचा आस्वाद घेता येतो पण त्याचबरोबर अनेक बंद दरवाजे समोर दिसतात. वेगवेगळे लोक त्यातून त्यांना आकर्षक वाटतील असे दरवाजे उघडून पलीकडील दृष्य पाहतात व जगाला दाखवतात अशा प्रकारे ज्ञानाचा सतत विस्तार व प्रसार होत जातो. या परिस्थितीत कोणालाही सगळे कांही समजले आहे ही स्थिती कधीही येणे अशक्य आहे. जेवढ्या गोष्टी देवाच्या खात्यातून माणसाच्या खात्यात वर्ग होतील त्याच्या अनेक पट गोष्टी देवाच्या खात्यात (निदान ‘गॉड नोज’ या सदराखाली) वाढत जातील.

उदाहरणादाखल पहा. वीस पंचवीस वर्षापूर्वी संगणक माझ्या आयुष्यात आला, त्यावर काम करतांना आजही अनपेक्षित गोष्टी रोज घडत असतात. जेंव्हा आपणच केलेली चूक लक्षात येते तेंव्हा आपण “ऊप्स” म्हणतो, ती नाही आली तर “गॉड नोज”. यापायी दिवसातून किती तरी वेळा तसे म्हणावे लागते. वीसपंचवीस वर्षापूर्वी माझ्या देवाच्या खात्यात हे पान नव्हते. म्हणजे देवाचे खाते दिवसेदिवस वाढतच चालले आहे.

पुलंच्या एका लेखात त्यांनी लिहिले आहे की कोणीतरी कोणाला विचारले,
“हे गाणे कोण गाते आहे?”
“लता मंगेशकर.”
“ती घराच्या आंत बसली आहे कां?”
“नाही. तिचा आवाज रेडिओतून येतो आहे.”
“ती झुरळासारखी रेडिओच्या आत शिरून बसली आहे कां?”
“नाही. गाण्याच्या रेडिओ लहरी रेडिओ स्टेशनवरून प्रक्षेपित केल्या जात आहेत”
“म्हणजे ती आता तिथे बसली आहे कां?”
“नाही. तिचे हे गाणे पूर्वीच रेकॉर्ड केले होते”
“म्हणजे कोणी व कधी?”, “बरं मग पुढे काय?”, “ते आतां कसे ऐकू येते आहे?” टेप, डिस्क, प्लेअर, ट्रान्स्मिटर, रिसीव्हर, फिल्टर, स्पीकर, अँप्लिफिकेशन, मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन इ.इ. माहिती त्यातून पुढे येते, पण प्रश्न कधी संपतच नाहीत.
शेवटी पु.ल. म्हणतात “तू असाच बोलत रहा. कांही मिनिटांनी तुलाच समजेल की तुलाही सगळे कांही समजलेले नाही.”
माणसाच्या ज्ञानाचे खाते संपून गेले की पुढे सगळे ‘देवाचे खाते’.

२. धर्म, विज्ञान आणि परमेश्वर

या विश्वामधील प्रत्येक पदार्थाला अनेक गुणधर्म असतात आणि निरनिराळ्या कारणांमुळे त्यात जे बदल होत असतात त्यांनाही निसर्गाचे नियम असतात. उदाहरणार्थ लोखंडाला ऊष्णता देत राहिल्यास ते तापते, जास्त तापल्यावर ते मऊ आणि लाल होते आणि आणखी जाास्त तापवल्यावर ते वितळते. असे होणे हा लोखंडाचा धर्म आहे असे आपण म्हणतो. सजीव प्राणी आणि वनस्पति यांनाही अनेक गुणधर्म असतात. झाडाने वाढणे, फुले, फळे आणि प्राणवायू देणे हा झाडांचा धर्म असतो. माणसांनी एकमेकांशी कसे वागावे याचेही अनेक नियम आहेत. आईने मुलावर माया करावी हा तिचा धर्म निसर्गानेच दिलेला आहे तर गुरूने, शेजाऱ्याने किंवा राजाने काय करावे हे ऋषी, मुनी, तत्वज्ञानी वगैरे विद्वानांनी सांगितले आणि बहुतेक लोकांना ते पटले यामधून शेजारधर्म, राजधर्म वगैरे तयार झाले.
या जगाची उत्पत्ती, त्याचे व्यवहार आणि विनाश हे सगळे एका अदृष्य अशा महाप्रचंड शक्तीकडून होत असते असा साक्षात्कार काही महान लोकांना झाला आणि त्यांनी परमेश्वर, गॉड, अल्ला वगैरे नावांनी त्या नियंत्याची जगाला ओळख करून दिली, तसेच त्याच्या विविध रूपांची उपासना कशा प्रकारे करावी हे ते सांगत गेले. त्यामधून हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम वगैरे धर्म आणि त्यांचे पंथ तयार होत गेले. अशा प्रकारे धर्म या शब्दाचेसुद्धा अनेक अर्थ आहेत.
निरीक्षण, परीक्षण, विश्लेषण वगैरेंमधून आपल्या आजूबाजूच्या सजीव तसेच निर्जीव यांचे गुणधर्म तसेच स्वभावधर्म यांचा अभ्यास करणे, त्यातली सुसंगति आणि विसंगति पाहून त्यावरून तर्कशुद्ध असे निष्कर्ष काढणे आणि त्यांचा उपयोग कसा करून घेता येईल याचा विचार करणे हे विज्ञानाचे स्वरूप आहे. अग्नि किंवा चाक यांच्या शोधापासून ते आजच्या काळापर्यंत यात प्रगति होत आली आहे. विज्ञानामधून मिळालेल्या माहितीचा उपयोग धार्मिक विधींमध्येसुद्धा होत आलेला आहे. माणसाच्या ऐहिक जीवनातली प्रगति विज्ञानामधून होत आली आहे तर त्याची आध्यात्मिक उन्नति तसेच समाजाने गुण्यागोविंदाने कसे रहावे याचे मार्गदर्शन धर्मांमधून दिले जात आले आहे. यामुळे धर्म आणि विज्ञान यांच्यामध्ये कोणतीही स्पर्धा किंवा वैमनस्य नाही. धर्म श्रेष्ठ की विज्ञान असा विचार करणे योग्य नाही.

१. आमच्या घरातले देव

माझ्या लहानपणी मी आमच्या घरी पाहिलेले देवपूजेचे स्वरूप या अनामिक कवीने लिहिलेल्या कवितेत अगदी अचूक टिपले आहे. ही रचना अनेकांना आपल्या लहानपणीची आठवण करून देईल. …… वॉट्सअॅपवरून साभार. ……. ऑगस्ट २०१८
————————————————————-
देवपूजेच्या सध्याच्या प्रचलित, पंचतारांकित , खर्चिक पद्धती पाहिल्या म्हणजे मला आठवते पाच – पंचवीस वर्षांपूर्वींची आईची देवपूजा…
वर्षाकाठी रिमझिमत्या श्रावणात एखादा सत्यनारायण घातला की जणू आमच्या घरी देव वर्षभर राबण्यासाठी नियुक्त केले आहेत असे वाटायचे. तिच्या साध्याभोळ्या भक्तीला सुगंध होता. तिची श्रद्धा उत्सवी नव्हती. तिचे देवही समजदार होते. त्यांनी तिचे चारचौघात हसे होवू दिले नाही. दोन हात आणि तिसरं मस्तक इतक्या अल्प भांडवलावर देवांना आपलंसं करणाऱ्या तिच्या देवपूजेची ही कहाणी….

देव आमच्या घरी वर्षभर राबायचे…
देव किती लवकर पावत नवसाला,
एक दोन सत्यनारायण होऊनच जात वर्षाला.देव आणत स्थळ ताईसाठी शोधून,
आक्काचा पाळणा हलकेच देत हलवून….
दोनचार देव तर नेहमीच असत तिच्या दिमतीला,
ती सांगायची त्यांना फक्त तिचं कुंकू जपायला…

देवांशी तर तिची थेटच ओळख असायची,
रामा.. गोविंदा जगदंबा असं बिनधास्त पुकारायची.
देवाच्या द्वारी ती क्षणभर उभी राहात असे,
पण त्यासाठी तिला बापू दादा अण्णांचा टेकू कधी लागत नसे…
ती कधी देवांना वर्गणी देत नसे,
मासिकांच्या मेंबरशीपचे तिला कधी टेंशन नसे…

मनःशांती साठी तिने कधी कोठला कोर्स केला नाही,
देवांनीही तिला तसा कधी फोर्स केला नाही….
साधे भोळे होते देव तिचे तसे,
चारचौघात त्यांनी तिचे होऊ दिले नाही हसे….
गरीब होते बिचारे मुकाट फळीवर राहायचे,
संगमरवरी देव्हाऱ्याचे स्वप्न त्यांनाही नाही पडायचे….
भाजी आणि भाकरीचा नैवेद्य गोड मानून घ्यायचे,
एका सत्यनारायणाच्या मोबदल्यात
देव आमच्या घरी वर्षभर राबायचे….

—————————————
२. एक महिला आणि देव A WOMAN AND GOD

एका मध्यमवयीन बाईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला इस्पितळात दाखल केले. ती अगदी मरणासन्न अवस्थेत गेली असतांना देवाला तिने दुरूनच विचारले, “माझे आयुष्य संपले का?”
देव म्हणाला, “नाही, तुझी अजून ४० वर्षे शिल्लक आहेत.”
हृदयविकारातून बरे वाटल्यानंतर ती आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहिली आणि तिने आपला चेहेरा, कंबर वगैरेंवर सर्जरी करून आपले सौंदर्य कृत्रिमरीत्या वाढवून घेतले, तिच्या कायापालट होण्याचे सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर घरी परत जातांना वाटेतच तिला अपघात होऊन मरण आले.

देवाघरी गेल्यावर तिने लगेच देवाला विचारले, “तू तर म्हणाला होतास की मी अजून ४० वर्षे जगणार आहे, मग मला या अपघातातून का वाचवले नाहीस?”
पुढे वाचा…..
.
A middle aged woman had a heart attack and was taken to the hospital. While on the operating table she had a near death experience.
Seeing God She asked “Is my time up?” God said,”No, you have another 43 years, 2 months and 8 days to live”
Upon recovery, the woman decided to stay in the hospital and have a Facelift, liposuction, and a tummy tuck. She even had someone come in and change her hair color. Since she had so much more time to live, she figured she might as well make the most of it. After her last operation, she was released from the hospital. While crossing the street on her way home, she was killed by an ambulance.
Arriving in front of God, she demanded, “I thought you said I had another 40 years? Why didn’t you pull me from out of the path of the ambulance?”

(You’ll love this!!!)

. .

.
देव म्हणाला, God replied,
.
“काय करू? मी तुला ओळखलेच नाही गं ! ” “I didn’t recognize you.”

.. . . . फेब्रूवारी २०१३

———————————————————————–

३. या जगात खरोखरच देव आहे. GOD DOES EXIST

१५ सैनिकांची एक तुकडी हिमालयातल्या कारगिलमधल्या पोस्टिंगवर हजर होण्यासाठी दुर्गम भागातून चालत जात असते. थंडीमुळे सारेजण गारठून गेलेले असतात. अशा वेळी मस्तपैकी गरमागरम चहा मिळावा असे त्यातल्या प्रत्येकाला वाटत असते. त्या डोंगराळ भागातल्या रस्त्यात त्यांना एक चहाची टपरी दिसते, पण ती बंद असते. चहा पिण्याची इच्छा अनावर झाल्यामुळे ते सैनिक आपल्या अधिका-याची परवानगी घेऊन त्या झोपडीच्या दरवाजाला लावलेले कुलुप तोडून आत प्रवेश करतात. तिथल्या साहित्यामधून स्वतःच चहा तयार करून ते सगळेजण पितात आणि ताजे तवाने होऊन पुढे जायला निघतात. आपले हे कृत्य योग्य नाही असे वाटल्यामुळे त्यांचा नायक त्याच्या खिशातल्या पाकीटामधून १००० रुपयांची नोट काढून ती साखरेच्या डब्याखाली ठेवतो. आता त्याला सदसद्विवेकबुध्दीची टोचणी रहात नाही आणि ते सर्वजण पुढे आपल्या पोस्टिंगच्या जागी जाऊन रुजू होतात.
काही महिन्यांनंतर ती तुकडी परत जात असतांना पुन्हा त्या टपरीवर थांबते. या वेळी ते दुकान उघडलेले होते. एक म्हातारा माणूस ते चालवत होता. त्याने तयार करून दिलेला चहा सर्वांनी घेतला आणि त्या वयोवृध्द माणसाशी संवाद साधला. त्याचा देवावर दृढ विश्वास होता. त्याने सांगितले, “अहो, माझ्यावर केवढा कठीण प्रसंग आला होता. काही अतिरेक्यांनी माझ्या मुलाला जबरदस्त मारहाण केली होती. त्यामुळे त्या दिवशी मी दुकान लवकर बंद करून त्याला घेऊन इस्पितळात गेलो होतो. त्याच्या इलाजासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. अशा अवस्थेत मी दुसरे दिवशी सकाळी दुकानात आलो तर दरवाजाचे कुलूप तोडलेले पाहून मला आणखीनच धक्का बसला. म्हणजे याच वेळी माझे दुकानसुध्दा लुटले गेले असणार असे मला वाटले. पण आत जाऊन पाहतो तो दुकानातल्या सगळ्या वस्तू जागेवर होत्या आणि माझ्या दुकानात १००० रुपयांची नोट ठेवलेली होती. अशा अडचणीच्या वेळी प्रत्यक्ष देवच माझ्यासाठी धावून आला आणि मला मदत करून गेला पहा. अशा वेळी अशा ठिकाणी आणखी कोण येणार होता? या जगात नक्की देव आहे.”
देव अशा प्रकारे कोणाच्या तरी रूपाने संकटात सापडलेल्या चांगल्या लोकांची मदत करत असतो, कदाचित कोणासाठी तो तुमच्या रूपानेसुध्दा धावून येईल.

मूळ सविस्तर कथा खाली वाचा.
READ ON THIS FACTUAL STORY “The Tea Shop”

A group of fifteen soldiers led by their Major Sahib were on their way to the post in Himalayas where they would be deployed for next three months. Another batch, which will be relieved, would be waiting anxiously for their arrival so that they could fall back to safer confines of their parent unit.
Some would proceed on leave and meet their families.
They were happy that they were to relieve a set of comrades who had done their job.
It was a treacherous climb and the journey was to last till the next evening. Cold winter with intermittent snowfall added to the torture.
If only someone could offer a cup of tea, the Major thought, knowing completely well that it was a futile wish.
They continued for another hour before they came across a dilapidated structure which looked like a small shop. It was locked. It was 2 o’clock in the night and there was no house close to the shop where the owner could be located. In any case it was not advisable to knock any doors in the night for security reasons.
An ancient village in Kargil. It was a stalemate. “No tea boys, bad luck” said the Major. The Major told the men to take some rest since they had been walking for more than three hours now.
Sir, this is a tea shop indeed and we can make tea. We will have to break the lock though.
The officer was in doubt about the proposed action but a steaming cup of tea was not a bad idea.
He thought for a while and permitted for the lock to be broken. The lock was broken. They were in for luck. The place was a shop indeed and had everything required to prepare tea, and also a few packets of biscuits.
The tea was prepared and it brought great relief to all in the cold night. They were now ready for the long and treacherous walk ahead of them and started to get ready to move.
The officer was in thought. They had broken open the lock and prepared tea and consumed biscuits without the permission of the owner. The payment was due but there was no one in sight. But they are not a band of thieves.
They are disciplined soldiers. The Major didn’t move out without doing what needed to be done. He took out a Rs. 1000/- note from his wallet and kept it on the counter, pressed under the sugar container, so that the owner sees it first thing when he arrives in the morning. He was now relieved of the guilt and ordered the move.

Days, weeks and months passed. They continued to do gallantly what they were required to do and were lucky not to lose any one from the group in the intense insurgency situation.
And then one day, it was time to be replaced by another brave lot. Soon they were on their way back and stopped at the same shop, which was today open with the owner in place. He was an old man with very meager resources and was happy to see fifteen of them with the prospect of selling at least fifteen cups of tea that day.
All of them had their tea and spoke to the old man about his life and experiences in general, selling tea at such remote a location. The poor, old man had many stories to tell all of them, replete with his faith in God.
If there was a God will he leave you in this Pitiable / Poor condition, asked a Soldier!!
“No Sir, Don’t say like that, God actually Exists. I got the Proof a few months ago.I was going through very tough times because my only son had been severely beaten by the terrorists who wanted some information from him which he did not have.
I had closed the shop early that day and had taken my son to the hospital. There were medicines to be purchased and I had no money. No one would give me a loan from fear of the terrorists. There was no hope, Sahib.
“And that day Sahib, I had prayed to Allah for help. And Sahib, Allah walked into my shop that day.
“When I returned to my shop that day and saw the lock broken, I thought someone had broken in and had taken away whatever little I had. But then I saw that ‘Allah’ had left Rs. 1000/- under the Sugar Pot. Sahib, I can’t tell you what that Money was Worth that day. Allah exists Sahib, He does.
“I know people are dying every day here but all of you will soon meet your near and dear ones, your children, and you must thank your God Sahib, he is watching all of us. He does exist. He walked in to my shop that day and broke open the lock to give me the money I desperately needed. I know He did it.”
The faith in his eyes was unflinching. It was unnerving. Fifteen sets of eyes looked at their officer and read the order in his eyes clear and unambiguous,’Keep quiet.’
The officer got up and paid the bill and hugged the old man.
“Yes Baba, I know, God does exist and yes the tea was wonderful.”
Fifteen pairs of eyes did not miss the moisture building in the eyes of the Major, a rare sight.

And the Real Truth is that Any One of us can be a God to Somebody.

.. . . . फेब्रूवारी २०१३

४. देवाची योजना

देहप्रदर्शन करणारे कपडे घालून दोन मुली आपल्या वडिलांना भेटायला गेल्या. त्यांच्याकडे पाहून ते बोलले, ” परमेश्वराने जेवढ्या मूल्यवान वस्तू बनवल्या आहेत त्या सगळ्या सहज सापडू नयेत अशा रीतीने झाकून ठेवल्या आहेत. हिरे कुठे मिळतात? खूप खोल खाणीमध्ये सुरक्षितपणे झाकून ठेवलेले. मोती कुठे मिळतात? समुद्राच्या तळाशी शिंपल्यामध्ये सुरक्षितपणे ठेवलेले. सोने कुठे मिळते? ते सुध्दा खडकांच्या अनेक थरांनी झाकलेले असते. यातले काही पाहिजे असेल तर ते मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुमची कायासुध्दा पवित्र आहे, सोने, हिरे, मोती यांपेक्षा जास्त मोलाची आहे. तिला तुम्ही वस्त्रांमध्ये अवगुंठित करून ठेवायला हवे.”

An incident transpired when daughters arrived at home wearing clothes that were quite revealing. Here is the story as told by one of the daughters:
When we finally arrived, the chauffeur escorted my younger sister and me up to my father’s suite. As usual, he was hiding behind the door waiting to scare us. We exchanged many hugs and kisses as we could possibly give in one day.
My father took a good look at us. Then he sat me down on his lap and said something that I will never forget.
He looked me straight in the eyes and said, My princess, everything that God made valuable in the world is covered and hard to get to.
Where do you find diamonds? Deep down in the ground, covered and protected.
Where do you find pearls? Deep down at the bottom of the ocean, covered up and protected in a beautiful shell.
Where do you find gold? Way down in the mine, covered over with layers and layers of rock.
You’ve got to work hard to get to them.
He looked at me with serious eyes. Your body is sacred. You’re far more precious than diamonds and pearls, and you should be covered too.

.. . . . फेब्रूवारी २०१३

५. देवा रे देवा Hospital Bill

एक माणूस दुकानात गेलेला असतांना हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले गेले, त्याची शस्त्रक्रिया झाली. तो शुध्दीवर आला तेंव्हा त्याच्या शेजारी अनेक फॉर्म घेऊन एक नन बसली होती. तिने विचारपूस सुरू केली. “तुमचा विमा उतरवलेला आहे का ?”,
” नाही”
“तुमच्या बँकेत पैसे आहेत का?”,
” नाहीत”
” तुमचे कोणी नातेवाईक आहेत का?”
” हो. माझी लग्न न झालेली बहीण आहे, ती नन आहे.”
” असे कसे म्हणता? नन्सचे देवाशी लग्न लागलेले असते”
” छान. मग हे बिल माझ्या मेहुण्याकडे पाठवून द्या.”

A man suffered a serious heart attack while shopping in a store.The store clerks Called 911 when they saw him collapse to the floor.
The paramedics rushed the man to the nearest hospital where he had emergency Open heart bypass surgery.
He awakened from the surgery to find himself in the care of nuns at the Catholic Hospital. A nun was seated next to his bed holding a clipboard Loaded with several forms, and a pen. She asked him how he was going to Pay for his treatment.
“Do you have health insurance?” she asked.
He replied in a raspy voice, “No health insurance.”
The nun asked, “Do you have money in the bank?”
He replied, “No money in the bank.”
Do you have a relative who could help you with the payments?” asked the Irritated nun.
He said, “I only have a spinster sister, and she is a nun.”
The nun became agitated and announced loudly, “Nuns are not spinsters! Nuns are married to God.”
The patient replied, “Perfect. Send the bill to my brother-in-law.”

OMG

. . . . . . . जानेवारी २०१३

६. देव तारी तिला कोण मारी

एका अरण्यातली एक गर्भवती हरिणी पिलाला जन्म देण्याच्या बेतात आहे. तिच्या एका बाजूला पाण्याने भरून दुथडी वाहणारी नदी आहे तर दुस-या बाजूला गवताचे रान वणव्यामुळे पेटलेले आहे. तिच्या डाव्या बाजूला एक शिकारी धनुष्याला बाण लावून तयार उभा आहे आणि उजव्या बाजूला एक भुकेला सिंह तिच्यावर चाल करून येत आहे. तिने बिचारीने आता काय करावे? तिचे आणि तिच्या पिलाचे आता काय होईल?

आता हरिणी काय करेल ?

.
.
.
काहीच न करता ती पिलाला जन्म देण्याकडे लक्ष देते. त्या क्षणी आभाळात वीज चमकते. त्या प्रकाशाने दिपून गेल्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकतो आणि त्याचा बाण सिंहाला लागून तो घायाळ होतो. धोधो पाऊस कोसळतो आणि पेटलेल्या गवताला विझवून टाकतो. हरिणी आपल्या पिलाला घेऊन गवतात निघून जाते.

Stochastic Probability Theory – Pregnant Deer Scenario
Consider this scenario: In a remote forest, a pregnant deer is about to give birth to a baby. It finds a remote grass field near by a river and slowly goes there thinking it would be safe. As she moves slowly, she gets labor pain, at the same moment, dark clouds gather around that area and lightning starts a forest fire. Turning left she sees a hunter who is aiming an arrow from a distance. As she tries to move towards right, she pots a hungry lion approaching towards her.
What can the pregnant deer do, as she is already under labor pain ?What do you think will happen ?
Will the deer survive ?
Will it give birth to a fawn ?
Will the fawn survive ? or
Will everything be burnt by the forest fire ?

That particular moment ?

Can the deer go left ? Hunter’s arrow is pointing
Can she go right ? Hungry male lion approaching
Can she move up ? Forest fire
Can she move down ? Fierce river

Answer: She does nothing. She just focuses on giving birth to a new LIFE.
The sequence of events that happens at that fraction of a second (moment) are as follows:
In a spur of MOMENT a lightning strikes (already it is cloudy ) and blinds the eyes of the Hunter. At that MOMENT, he releases the arrow missing and zipping past the deer. At that MOMENT the arrow hits and injures the lion badly. At that MOMENT, it starts to rain heavily and puts out the forest fire. At that next MOMENT, the deer gives birth to a healthy fawn.

In our life, it’s our MOMENT of CHOICE and we all have to deal with such negative thoughts from all sides always. Some thoughts are so powerful they overpower us and make us clueless. Let us not decide anything in a hurry. Let’s think of ourselves as the pregnant deer with the ultimate happy ending. Anything can happen in a MOMENT in this life. If you are religious, superstitious, atheist, agnostic or whatever, you can attribute this MOMENT as divine intervention, faith, sudden luck, chance (serendipity), coincidence or a simple ‘don’t know’. We all feel the same. But, whatever one may call it, I would see the priority of the deer in that given moment was to giving birth to a baby because LIFE IS PRECIOUS.
Hence, whether you are deer or a human, keep that faith and hope within you always.

. . . . . . . जानेवारी २०१३

 • * * * *

७. आणि देव हसतच राहिला

बायबलातले एक वाक्य आहे.
“चांगल्या आणि आज्ञाधारक पत्नी जगाच्या सर्व कोप-यांमध्ये सापडतील” असे आश्वासन देवाने पुरुषांना दिले.
.
त्याने वर्तुळाकार पृथ्वीची रचना केली
आणि तो हसतच राहिला, हसतच राहिला, हसतच राहिला……….
Today’s Short Reading From The Bible …** A Reading from Genesis *
And God promised men that good and obedient wives would be found in all corners of the earth. Then he made the earth round … And he laughed and laughed and laughed.

. . . . . . . जानेवारी २०१३


८. देवबाप्पाशी गप्पा

देवबाप्पाने मला काय काय सांगितलं माहीत आहे? तुम्हीच वाचून पहा. शब्दांतून ते छान व्यक्त झाले आहेच, त्यातल्या चित्रामध्ये दिसणारे भाव पहातांना बहार येईल.
God Said NO!!
I hope that you can get the effects on your computers!
The words are great, but the movements of the faces add a lot….

मी बाप्पाला सांगितले, “माझ्या सवयींतून मला मोकळे कर.”
I asked God to take away my habit.

बाप्पा म्हणाला, “नाही. मी त्या सवयींना काढून घेणार नाही, तुझ्या तुलाच त्या सोडून द्यायच्या आहेत.
God said, No.

It is not for me to take away, but for you to give it up.

उतावीळपणा सोडून धीर धरायची बुध्दी मला देण्याची विनंती मी बाप्पाला केली.
बाप्पा म्हणाला, “नाही. विचारपूर्वक वागलास तर तुला धीर धरता येईल. हा गुण देता येत नाही. तो शिकावा लागतो.”

I asked God to grant me patience.
God said, No. Patience is a byproduct of tribulations; it isn’t granted, it is learned.

मला सुख देण्याचा आग्रह मी धरला.
बाप्पा म्हणाला, “नाही. मी फक्त आशीर्वाद देतो. सुखी रहाणे तुझ्याच हातात आहे.”

I asked God to give me happiness.
God said, No. I give you blessings; Happiness is up to you.

मला कष्टांमधून मुक्त करण्याची विनंती मी केली.
बाप्पा म्हणाला, “नाही. दुःख सहन करणेच तूला भौतिक जगतापासून दूर नेऊन माझ्या जवळ आणेल.”

I asked God to spare me pain.
God said, No. Suffering draws you apart from worldly cares and brings you closer to me.

माझ्या आत्म्याची उन्नती करायला मी बाप्पाला सांगितले
बाप्पा म्हणाला, “नाही. तुझी उन्नती तूच करायची आहेस. तू सफल होशील यासाठी मी त्यावर अंकुश ठेवीन”

I asked God to make my spirit grow.
God said, No. You must grow on your own, but I will prune you to make you fruitful.
मला जीवनाचा आनंद लुटण्याची सारी साधने दे असे मी त्याला सांगितले.
बाप्पा म्हणाला, “नाही. तू जीवनातल्या सर्व आनंदांचा उपभोग घ्यावास यासाठी मी तुला जीवन देईन”

I asked God for all things that I might enjoy life.
God said, No. I will give you life, so that you may enjoy all things.
तो माझ्यावर जेवढे प्रेम करतो तेवढे प्रेम मी इतरांवर करण्यासाठी मला मदत कर अशी विनंती मी बाप्पाला केली,
बाप्पा म्हणाला, “अह्हा. अखेर एकदाचा तुझ्या डोक्यात प्रकाश पडला.”

I asked God to help me LOVE others, as much as He loves me.
God said… Ahhhh, finally you have the idea.

. . . . . . . जानेवारी २०१०

९. देव तारी तयांना …… (११ सप्टेंबर)


न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर ही इमारत ज्यात उद्ध्वस्त झाली त्या ११ सप्टेंबरच्या घटनेनंतर त्यातून जे लोक वाचले त्यांच्या कहाण्या प्रकाशात आल्या. ज्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांचे प्राण वाचले त्या अशा आहेत.
– एका गृहस्थाचा मुलगा त्या दिवशी पहिल्यांदा बालवर्गात गेला.
– एका माणसाची त्या दिवशी डोनट आणायची पाळी असल्यामुळे तो तिकडे गेला.
– एका महिलेच्या घड्याळाचा गजर त्या दिवशी वाजला नाही.
– एक माणूस अपघातात अडकून पडला.
– एका माणसाची बस चुकली
– एका महिलेच्या कपड्यांवर अन्न सांजल्यामुळे तिला कपडे बदलावे लागले.
– एका माणसाची गाडी सुरू झाली नाही.
– एक माणूस फोन घेण्यासाठी दारातून घरी परत गेला.
– एका माणसाचे लहान मूल चाळे करत राहिले आणि लवकर तयार झाले नाही.
– एका माणसाला टॅक्सीच मिळाली नाही

 • एका माणसाने घेतलेले नवे जोडे चावल्यामुळे त्याचा पाय दुखावला आणि त्यावर लावाला पट्टी घेण्यासाठी तो ओषधांच्या दुकानात गेला.

या सर्वांना त्या दिवशी देवानेच वाचवले असे म्हणता येईल…..
पण जे लोक त्यांच्या ध्यानी मनी नसतांना, विनाकारण किंवा अशाच छोट्या कारणामुळे त्या जागी गेले आणि त्या घटनेत सापडले त्यांचे काय ?

माझ्या माहितीमधली एक मुलगी लग्न करून पतीगृही चालली होती. तिची तो पहिलाच परदेश प्रवास होता. ती न्यूयॉर्कच्या आसपाससुध्दा कोठे गेली नाही. पण त्या घटनेनंतर अमेरिकेतली विमानवाहतूकव्यवस्था कोसळली. त्यामुळे तिचे विमान भलत्याच विमानतळावर गेले, तिचा नवरा दुसरीकडेच तिला घेण्यासाठी गेला होता. तेंव्हा मोबाईल फोन नव्हते त्यामुळे त्यांना एकमेकांशी संपर्क साधता आला नाही आणि त्यात तिचे अतोनात हाल झाले. तीसुध्दा देवाचीच मर्जी !

मूळ लेख :
The Little things

After Sept. 11th, one company invited the remaining members of other companies who had been decimated by the attack on the Twin Towers to share ! their available office space.
At a morning meeting, the head of security told stories of why these people were alive… and all the stories were just: the ‘L I T T L E’ things.
As you might know, the head of the company survived that day because his son started kindergarten.
Another fellow was alive because it was his turn to bring donuts.
One woman was late because her alarm clock didn’t go off in time.
One was late because of being stuck on the NJ Turnpike because of an auto accident.
One of them missed his bus.
One spilled food on her clothes and had to take time to change.
One’s car wouldn’t start.
One went back to answer the telephone.
One had a child that dawdled and didn’t get ready as soon as he should have.
One couldn’t get a taxi.
The one that struck me was the man who put on a new pair of shoes that morning, took the various means to get to work but before he got there, he developed a blister on his foot.
He stopped at a drugstore to buy a Band-Aid. That is why he is alive today.
Now when I am stuck in traffic, miss an elevator, turn back to answer a ringing telephone…
all the little things that annoy me. I think to myself, this is exactly where God wants me to be at this very moment..

Next time your morning seems to be going wrong, the children are slow getting dressed,
you can’t seem to find the car keys, you hit every traffic light, don’t get mad or frustrated; God is at work watching over you!
May God continue to bless you with all those annoying little things and may you remember their possible purpose.

Pass this on to someone else, if you’d like. There is NO LUCK attached. If you delete this, it’s okay:
God’s Love Is Not Dependent On E-Mail

. . . . . . . जून २००९

१०. परमेश्वर – एका आठ वर्षांच्या बालकाच्या नजरेतून


माणसांना बनवणे हे परमेश्वराचे मुख्य काम आहे. पण तो एकदम मोठी माणसे न बनवता लहान बाळांना बनवतो. कारण ती आकाराने छोटी आणि तयार करायला सोपी असतात. शिवाय त्यांना चालायला, बोलायला शिकवण्याचे काम त्याचे आईबाबा करतात, त्यामुळे देवाचा वेळ वाचतो.
प्रार्थना ऐकणे हे परमेश्वराचे दुसरे महत्वाचे काम आहे. पण जगात सगळीकडे इतक्या प्रार्थना चाललेल्या असतात की त्या ऐकण्यातून देवाला टीव्ही किंवा रेडिओ ऐकायला फुरसत मिळत नाही. तरीही त्यांचा केवढा मोठा गोंगाट त्याच्या कानात होत असेल. तो हा आवाज बंद करू शकत असेल का?
देव सगळीकडे असतो आणि सगळे पहात व ऐकत असतो. त्यात तो फारच गुंतलेला असणार. त्यामुळे तुमचे आईबाबा जे देऊ शकत नाही असे सांगतात ते त्याच्याकडे मागून त्याचा वेळ वाया घालवू नये.
नास्तिक लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. पण असे लोक आमच्या गावात नाहीत, निदान चर्चमध्ये येणा-या लोकात तर नाहीच नाहीत.
येशू ख्रिस्त देवाचा मुलगा आहे. पाण्यावर चालणे, चमत्कार करून दाखवणे यासारखी कष्टाची कामे तो करायचा, शिवाय लोकांना देवाबद्दल सांगायचा. त्याच्या शिकवण्याला कंटाळून अखेर लोकांनी त्याला क्रूसावर चढवून दिले.
पण तो आपल्या बाबांसारखाच दयाळू आणि प्रेमळ होता. हे लोक काय करताहेत ते या लोकांना समजत नाही म्हणून त्यांना क्षमा कर असे त्याने देवाला सांगितले आणि देवाने ते मान्य केले.
येशूने केलेली मेहनत देवाला आवडली आणि त्याने येशूला रस्त्यावरून न भटकता स्वर्गातच रहायला सांगितले. तो तिथे राहिला. आता तो देवाला त्याच्या कामात मदत करतो. लोकांच्या प्रार्थना ऐकतो, देवासाठी काय महत्वाचे आहे आणि काय नाही हे पाहून ठेवतो आणि फक्त महत्वाच्या गोष्टी त्याच्यापुढे मांडतो.
तुम्ही पाहिजे तेंव्हा प्रार्थना करा. परमेश्वर आणि येशू या दोघांपैकी एकजण तरी नेहमी कामावर हजर असतोच.
तुम्ही सब्बाथच्या वेळी चर्चमध्ये गेलात तर देव खूष होतो. आणि तुम्हाला तेच पाहिजे असते.
बीचवर जाऊन मजा करण्यासाठी चर्चला जाणे टाळू नका. नाही तरी सूर्याचे ऊन बीचवर पसरायला दुपार होतेच.
तुम्ही देवावर विश्वास ठेवला नाहीत तर तुम्हाला नास्तिक म्हणतीलच, शिवाय तुम्ही एकटे पडाल. तुमचे आईबाबा काही नेहमीच सगळीकडे तुमच्यासोबत येऊ शकणार नाहीत, पण देव येऊ शकेल. अंधार झाला किंवा दांडगट मुलांनी तुम्हाला खोल पाण्यात फेकून दिले आणि त्यामुळे तुमची भीतीने गाळण उडाली तर त्या वेळी देव जवळपास आहे या कल्पनेने तुम्हाला बरे वाटेल, धीर येईल.
पण तुम्ही सतत देव तुमच्यासाठी काय करू शकेल याचाच विचार मात्र करू नये, कारण तो आपल्याला परतसुध्दा नेऊ शकतो.
…… आणि म्हणून मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.

Subject: A Little Boy’s Explanation of God — Fabulous!!!

The following essay was written by an 8-year-old named Danny Dutton, who lives in Chula Vista, CA . He wrote it for his third grade homework assignment, to ‘explain God.’ I wonder if any of us could have done as well?
[ … And he had such an assignment, in California , and someone published it, I guess miracles do happen ! … ]

EXPLANATION OF GOD:

’One of God’s main jobs is making people. He makes them to replace the ones that die, so there will be enough people to take care of things on earth.
He doesn’t make grownups, just babies. I think because they are smaller and easier to make. That way he doesn’t have to take up his valuable time teaching them to talk and walk. He can just leave that to mothers and fathers.’
‘God’s second most important job is listening to prayers. An awful lot of this goes on, since some people, like preachers and things, pray at times beside bedtime.
God doesn’t have time to listen to the radio or TV because of this. Because he hears everything, there must be a terrible lot of noise in his ears, unless he has thought of a way to turn it off.’
‘God sees everything and hears everything and is everywhere which keeps Him pretty busy. So you shouldn’t go wasting his time by going over your mom and dad’s head asking for something they said you couldn’t have.’
‘Atheists are people who don’t believe in God. I don’t think there are any in Chula Vista . At least there aren’t any who come to our church.’
‘Jesus is God’s Son. He used to do all the hard work, like walking on water and performing miracles and trying to teach the people who didn’t want to learn about God. They finally got tired of him preaching to them and they crucified him.
But he was good and kind, like his father, and he told his father that they didn’t know what they were doing and to forgive them and God said O.K.’
‘His dad (God) appreciated everything that he had done and all his hard work on earth so he told him he didn’t have to go out on the road anymore. He could stay in heaven. So he did. And now he helps his dad out by listening to prayers and seeing things which are important for God to take care of and which ones he can take care of himself without having to bother God. Like a secretary, only more important.’
‘You can pray anytime you want and they are sure to help you because they got it worked out so one of them is on duty all the time.’
‘You should always go to church on Sabbath because it makes God happy, and if there’s anybody you want to make happy, it’s God!
Don’t skip church to do something you think will be more fun like going to the beach. This is wrong. And besides the sun doesn’t come out at the beach until noon anyway.’
‘If you don’t believe in God, besides being an atheist, you will be very lonely, because your parents can’t go everywhere with you, like to camp, but God can. It is good to know He’s around you when you’re scared, in the dark or when you can’t swim and you get thrown into real deep water by big kids.’
‘But…you shouldn’t just always think of what God can do for you. I figure God put me here and he can take me back anytime he pleases.

And…that’s why I believe in God.’*

. . . . . . नोव्हेंबर २०१०

************

नवी भर दि. १८-०५-२०२१

११. भगवंताचे अस्तित्व

बोधकथा… ज्याचा देवावर विश्वास नाही त्यांनी नक्की वाचावी …………………..

भगवंताचे अस्तित्व

थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते , ते प्रोफेसर नास्तिक होते त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले “अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता , वय पण 45 एक आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा , हे बायबल वाचून काय होणार? फेकून द्या बघू ते रेल्वे च्या बाहेर.” हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसन ना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोचले.
आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले , त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते , आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले “वा , काय प्रयोगशाळा आहे तुमची , खरच तुम्ही फार मोठे आहात , किती दिवस लागले हो हे सगळं करायाला?” त्यावर एडिसन म्हणाले “छे हो , हे मी काहीच केलेलं नाही , सगळे आधीच तयार होते मी फक्त इथे येऊन प्रयोग केले.”
त्यावर प्रोफेसर म्हणाले “माझी चेष्टा करताय काय, अस आपोआप काही तयार होत होय?” त्यावर एडिसन हसले व म्हणाले “अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आपोआप आली अस म्हटलेलं तुम्हाला पटलं नाही ना, मग हे ब्रह्मांड आपोआपच निर्माण झालं हे मला कस पटेल.”
पुढे त्यांनी एक सिद्धांत मांडला आहे , ते म्हणतात “Where there is a creation there should be a creator ,Without a creator there is no creation so god exists.”
तात्पर्य- मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा देवाचे अस्तित्व मान्य केलं आहे.👌👌

१२. देव म्हणाला “कधीही धीर सोडू नका”

मी पूर्णपणे हताश होऊन सर्वसंगपरित्याग केला आणि आपल्या जीवनाचासुध्दा त्याग करायचे ठरवले. त्यापूर्वी एकदा परमेश्वराशी बोलून घ्यावे म्हणून गर्द वनराईत जाऊन त्याला भेटलो.
मी म्हंटले,”हे देवा, मी धीर सोडू नये असे एक तरी चांगले कारण तू दाखवू शकशील कां?”
त्याने दिलेले उत्तर ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणाला, “जरा सभोवताली पहा, तुला ही हिरवळ आणि बांबूंची बेटे दिसताहेत ना?”
“हो.”
“मीच जेंव्हा या हिरवळीची आणि वेळूची बीजे जमीनीत पेरली तेंव्हा दोन्हींचीही चांगली काळजी घेतली. त्यांना पाणी, उजेड, वारा वगैरे दिले. हिरवळ लगेच जमीनीतून वर उठली आणि सर्व बाजूला पसरून तिने हिरवागार गालिचा तयार केला. बांबूच्या बीजातून कांहीच वर उठले नाही.
पण मी त्याचा नाद सोडला नाही. दुसऱ्या वर्षी हिरवळ जास्तच घनदाट झाली आणि दूरवर पसरली. पुन्हा वेळूची कांहीच हालचाल दिसली नाही. पण मी त्याला आधार देतच राहिलो. असेच तिसरे आणि चौथे वर्षही गेले.
पांचव्या वर्षी अचानक बांबूचा एक इवलासा अंकुर फुटून बाहेर आला. बाजूच्या हिरवळीत तो दिसत सुध्दा नव्हता. पण सहा महिन्यात तो वाढत गेला आणि त्याचा १०० फूट उंच बांबू उभा राहिला.
पहिली पाच वर्षे तो आपली मुळे बळकट करत होता. जमीनीवर आल्यानंतर त्याचे पोषण करून त्याला जगवत ठेवण्यासाठी आणि ताठ उभे राहण्यासाठी आवश्यक तेवढा मजबूतपणा त्यांना आणत होता. कोणालाही झेपणार नाही एवढे मोठे आव्हान मी त्याच्यापुढे ठेवत नाही.”
तो पुढे म्हणाला, “हे वत्सा, इतकी वर्षे तू जी धडपड करीत आहेस, त्यातून तुझी मुळे बळकट होत आहेत. (तू खंबीर आणि सुदृढ बनत आहेस) मी जसा बांबूला सोडले नाही तसेच तुलाही वाऱ्यावर सोडणार नाही. तू तुझी तुलना इतरांशी करू नकोस. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. बांबू आणि हिरवळ यांची उद्दिष्टे वेगळी असतात, पण दोन्हींमुळे वनाला शोभा येते. जेंव्हा तुझी वेळ येईल तेंव्हा तू सुध्दा उंची गांठशील.”
“किती?”
“बांबू केवढी गांठतो?”
“त्याला हवी असेल तेवढी?”
“हो. तुझी इच्छा असेल तेवढी उंची गांठून मला गौरवशाली कर.”
परमेश्वर कधीच आपल्याला सोडून देत नसतो. त्यामुळे गेल्या दिवसाची खंत कधीही मनात धरू नका.

………. इंग्रजी लेखाचे भाषांतर. मूळ लेख खाली दिला आहे

One day I decided to quit…

One day I decided to quit… I quit my job, my relationship, my spiri tuality… I wanted to quit my life.
I went to the woods to have one last talk with God. “God”, I said. “Can you give me one good reason not to quit ?” His answer surprised me…
“Look around”, He said. “Do you see the fern and the bamboo?” “Yes”, I replied.
When I planted the fern and the bamboo seeds, I took very good care of them. I gave them light. I gave them water. The fern quickly grew from the earth. Its brilliant green covered the floor. Yet nothing came from the bamboo seed.
But I did not quit on the bamboo. In the second year the Fern grew more vibrant and plentiful.
And again, nothing came from the bamboo seed. But I did not quit on the bamboo. He said.
“In the third year, there was still nothing from the bamboo seed. But I would not quit. In the fourth year, again, there was nothing from the bamboo seed. “I would not quit.” He said. “Then in the fifth year a tiny sprout emerged from the earth. Compared to the fern it was seemingly small and insignificant… But just 6 months later the bamboo rose to over 100 feet tall. It had spent the five years growing roots. Those roots made it strong and gave it what it needed to survive. I would not give any of my creations a challenge it could not handle.”
He said to me. “Did you know, my child, that all this time you have been struggling, you have actually been growing roots.”
“I would not quit on the bamboo. I will never quit on you. ” Don’t compare yourself to others ..” He said. ” The bamboo had a different purpose than the fern … Yet, they both make the forest beautiful.”
Your time will come, ” God said to me. ” You will rise high! ” How high should I rise?” I asked.
How high will the bamboo rise?” He asked in return. “As high as it can? ” I questioned.
” Yes. ” He said, “Give me glory by rising as high as you can. ”
I hope these words can help you see that God will never give up on you. He will never give up on you. Never regret a day in your life.

Apr 17, 2009

१३. “देवांवर विश्वास एक मानसिक आजार…!!!”

“देवावर श्रध्दा “ ह्या विषयावर अमेरिकेत अनेक वर्षापासुन संशोधन सुरु होत. शेवटी “देवावर श्रध्दा हा मानसिक आजार आहे” असे तेथील Psychological Association नी जाहीर केले. सर्वप्रथम भारतात “चार्वाक” यांनी असे म्हटले की प्रमाणाशिवाय कशालाही मान्यता देवु नये”. त्यानतर बुध्द आले. बुध्द हे मनोवैज्ञानिक (Human Scientist) होते. त्यांनी यावर अनेक वर्ष चिन्तन (meditation) केले. शेवटी त्यांनी देव ह्या शब्दालाच तिलांजली दिली. बुध्द म्हणतात एखादी गोष्ट अनुश्रयावरुन म्हणजे ऐकीव माहितीवरुन स्वीकारु नका. परंपरा आहे म्हणुन स्वीकारु नका. कोणी तरी असे असे आहे म्हणून स्वीकारु नका. एखादी गोष्ट पिटकातून आली आहे एवढ्यावरुन स्वीकारु नका. बाह्य रुपाचा विचार करुन स्वीकारु नका. अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो म्हणून स्वीकारु नका. ( किंवा एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे म्हणून स्वीकारु नका.) (सांगणा-याचे) सुंदर रुप पाहुन स्वीकारु नका. (किवा संभाव्यता आहे एवढ्यावरुन स्वीकारु नका.) हा श्रमण आपला गुरु आहे, असा विचार करुन स्वीकारु नका. अशाप्रकारचे विचार पसरवुन बुध्दानी माणसाच्या मनामध्ये बुध्दिप्रामाण्य वाद रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय इतर अवैज्ञानिक रुढी, परंपरा, देव याचा समावेश धम्मात होवु नये, याची पुरेसी काळजी बुध्दाने घेतलेली आहे. यानंतर बुध्द धम्माची पिछेहाट झाली. मनुवाद पुढे आला आणि बुध्दिप्रामण्यवाद मागे पडला. बुध्दाचे मुळतत्वज्ञानचा आपल्याला विसर पडला. भारतात मानवी मेंदू गोठवण्याचे तत्वज्ञान पेरण्यात आले. परिणाम हा झाला की त्यामुळे धर्म विरुध्द विज्ञान ही लढाई फक्त युरोप मधेच सुरु झाली. भारतामध्ये ही लढाई सुरु झालीच नाही, आजही आपण विज्ञान स्वीकारत नाही. आपण फक्त तंत्रज्ञान स्वीकारतो. आपल्या देशात अणुभट्टीमधे काम करणारा माणुस सुध्दा भलमोठे गंध लावून जातो. इथल्या धर्मग्रंथानी विचार निर्माण होण्याकरिता माणसामधे मेंदूच शिल्लक ठेवला नाही. ईश्वर कोणीही पाहीलेला नाही, त्याला काहीही प्रमाण नाही. तरीही आपण त्याचे पुजन करतो. त्याचे नमन करतो. मला जे काही मिळालेले आहे ते ईश्वराच्याच कृपेने मिळालेले आहे असे मानतो. ही मानसिक गुलामगिरी आहे. जे मुळात अस्तित्वाचच नाही. त्याला मान्यता देणे, त्याची पुजा करणे ही मानसिक विकृतीच आहे. हा मानसिक आजार आहे. अमेरिकेतील Psychological Association नी जगासमोर मांडलेले संशोधन हा चार्वाक आणि बुध्द विचारांचा विजय आहे. पुन्हा एकदा देवाच विसर्जन करुया, अंधश्रद्धेच्या बेड्या तोडुया. देव, धर्म , रुढी ,परम्परा, कर्मकांड,भविष्य ,बुवाबाजी अंधश्रध्देचा हा हजार पायांचा ऑक्टोपस आहे, याला कायमचे मनातुन काढुन व्यक्तिस्वातंत्र्याचे आत्मतत्वच गहाण टाकणा-या देवाला रिटायर करुया.. . . . . . . . फेसबुकवरून साभार दि.२०-०३-२०२२

१४ . देवपूजा – एक मेडिटेशन

पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली.
मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची.

माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं. भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत.
सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही) सुंदर अनुभव.
फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्याजागी स्थानापन्न करतात.
एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध ऊगाळतात.
तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव.
खऱ्या भक्तीभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना ‘तो’ आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, ‘तो’ समर्थ आहे, मी कशाला ऊगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो.
चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धूपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफिल.
ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की.
तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्रं.
खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी. सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी. तुम्हाला जास्त प्रेमळ, करूणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी.
मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही ऊत्तमच होईल’ असा भक्कम विश्वास देऊ करणारी.
हळूहळू तुमच्यातला ‘अहं’ विसरायला लावणारी….
अशी ही रोजची पूजा.

ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का?
या वेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का?
यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही ऊपयोग होईल का?
पूजा ही कुणा बाहेरच्या ‘देवाला’ प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीये, तर स्वत:मधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सुरूवात सकारात्मक ऊर्जेने आणि ऊत्साहाने करायचा तो एक सहजसोपा आणि सुंदर मार्ग आहे.

कृतज्ञता, शुक्रिया, Gratitude

कृतज्ञता हा एक फार मोठा दैवी गुण आहे. खाल्ल्या मिठाला जागणारे इमानदार सेवक तर असतातच, स्वामीभक्त घोड्यांच्याही रोचक कथा आहेत. कुत्रा हा पाळीव प्राणी तर इमानदारीचे प्रतीकच आहे. भाकरी किंवा नोकरी देणाऱ्याबद्दल जर कृतज्ञता वाटते तर हे जीवन देणाऱ्या त्या परमेश्वराबद्दल मनात किती आदर बाळगला पाहिजे. कविवर्य ग.दि.माडगूळकरांनी हा भाव “देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी” अशा शब्दांमध्ये किती चांगला व्यक्त केला आहे?
याच विषयावरील एक पंजाबी गीत “क्यों ना शुकर मनावा..” आणि एक इंग्रजी कविता “Drinking From The Saucer खाली देत आहे. तसेच ‘कृतज्ञतेचा निर्देशांक’ हा वाचनीय लेख देत आहे.
. . . . . . . . .

क्यों ना शुकर मनावा

बुल्ले शाह 17 वीं शताब्दी के पंजाब के दौरान एक पंजाबी दार्शनिक और सूफी कवि थे।
फकीर बुल्लेशाह से जब किसी ने पूछा कि आप इतनी गरीबी में भी भगवान का शुक्रिया कैसे करते हैं तो बुल्लेशाह ने कहा..

चढ़दे सूरज ढलदे देखे,
बुझदे दीवे बलदे देखे ।
हीरे दा कोइ मुल ना जाणे,
खोटे सिक्के चलदे देखे ।
जिना दा न जग ते कोई,
ओ वी पुत्तर पलदे देखे ।
उसदी रहमत दे नाल बंदे,
पाणी उत्ते चलदे देखे ।
लोकी कैंदे दाल नइ गलदी,
मैं ते पत्थर गलदे देखे ।
जिन्हा ने कदर ना कीती रब दी,
हथ खाली ओ मलदे देखे ।
कई पैरां तो नंगे फिरदे,
सिर ते लभदे छावा…
मैनु दाता सब कुछ दित्ता,
क्यों ना शुकर मनावा…

When someone asked Fakir Bulleshah how do you thank God even in such poverty, Bulleshah said ..
I have seen the downfall of once rich and powerful,
while those, doomed stood up and reached the sky.
when diamond was not valued better than a brass farthing,
and counterfeit coins were being used freely.
Even orphans with no near dear ones
were taken care of by grace of God;
Those who are blessed by God;
they may even walk on water.
People tell me that chana is not cooking
I saw the melting of stones.
Those who think they are superior to God
They were seen rubbing their empty hands.
When many are seen walking barefoot,
And living without a roof on top
God has given me everything,
So why I should not thank him.

. . . . . . . . . . . . . . . .

Drinking From The Saucer

 • John Paul Moore_

I’ve never made a fortune,
And I’ll never make one now
But it really doesn’t matter
‘Cause I’m happy anyhow.

As I go along my journey
I’m reaping better than I’ve sowed
I’m drinking from the saucer
‘Cause my cup has overflowed.

I don’t have a lot of riches,
And the going’s sometimes tough
But with kin and friends to love me
I think I’m rich enough.

I thank God for the blessings
That His mercy has bestowed
I’m drinking from the saucer
‘Cause my cup has overflowed.

He gives me strength and courage
When the way grows steep and rough
I’ll not ask for other blessings
For I’m already blessed enough.

May we never be too busy
To help bear another’s load
Then we’ll all be drinking from the saucer

When our cups have overflowed.

 • – – – – – – – – – – –

कृतज्ञतेचा निर्देशांक

असंच एकदा एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने मला विचारमग्न केलं. आयुष्यातली सकारात्मकता याविषयावरचा तो लेख होता. मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं; “Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!”. (कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!). मला ‘कृतज्ञतेचा निर्देशांक’ ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञताभावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं. लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा;

१. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे :
म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं, याबद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल.

२. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मानणे :
आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे फुगवे धरतो आपण. पण या नात्यांची किंमत अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलांना पाहून कळेल. त्यांच्या डोळ्यात मायेचा एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं की सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून झाल्यावर नमस्कार करण्यासाठी आईवडील असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ते. भांडायला, खेळायला, एकत्र वाढायला भावंडं असणं, हट्ट पुरवायला, लाड करायला मामा, काका, मावशी, आत्या असणं याची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं इतक्या महत्वाची नाती खचितच आहेत ही.

३. मला मिळालेल्या साधन संपदेबाबत कृतज्ञता मानणे :
म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, निजायला अंथरून असणे, पांघरायला पांघरूण असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चांगल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्ठित सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं कृतज्ञता बाळगण्यासारख्या नाहीत का? . चहा थोडा गार झाला तर चिडतो मी. पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती? या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला?

४. माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे :
मला तळमळीने शिकवणारे शिक्षक, मार्गदर्शक, शेजारी पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर, ड्राइवर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का?

विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मी एक उपाय शोधून काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो संधी शोधून “धन्यवाद” देण्याचा परिपाठ अमलात आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज घरचा कचरा नेणाऱ्या बाई पर्यंत सगळ्यांना ते जेव्हा समोर येतील तेव्हा “थँक यू” असं ठरवून म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून “थँक यू” म्हणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. गम्मत म्हणून अशा किती जणांना मी दिवसभरात “थँक यू” म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक दररोज रात्री निजण्यापूर्वी मी काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही निर्देशांकासारखा दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख (ग्राफ) हा चढता असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो.

या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येकवेळी माझं थँक यू आपोआपच पोहोचतं …

म्हणूनच ज्याने मला हे जीवन दिले,मला जगण्यासाठी श्वास दिला,पोटासाठी अन्न दिले परमेश्वराला थँक्यू म्हणण्यासाठी मी दिवसाच्या चोवीस तासातील किमान चोवीस मिनिटे दिली पाहिजेत. भगवंताचे नामस्मरण हीच त्याच्या प्रती व्यक्त होणारी कृतज्ञता!
🙏 🙏🏻🙏🏻🙏🏼

. . . . . . . . . . वॉट्सॅपवरून साभार

कागदाचे पान

मंगेश पाडगावकर पान

कसं आहे ना?

एक कागदाचं पान असतं…!!

‘श्री’ लिहलं, की पूजलं जातं …

प्रेमाचे चार शब्द लिहले, की जपलं जातं…

काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं…

एक कागदाचं पान असतं…!!

कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं…

कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं…

कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं…

आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं…

एक कागदाचं पान असतं….!!

जे लेखकाच्या लेखणीला हात देतं…

जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं…

जे व्यापाऱ्याच्या हिशोबाला ज्ञात ठेवतं…

आणि हो, वकीलासोबत कोर्टात गेलं, की साक्षही देतं…

एक कागदाचंपान असतं…..!!

पेपरवेट ठेवला, की एकदम गप्प बसतं…

काढून घेतला, की स्वच्छंदी फिरतं आणि
कशांत अडकलं, तर फडफडायला लागतं…

एक कागदाचंपान असतं…..!!

ज्यावर बातम्या छापल्या, की वर्तमानपत्र बनतं…

प्रश्न छापले, की प्रश्नपत्रिका बनतं…

विवाहाचं निमंत्रण छापलं, की लग्नपत्रिका बनतं…

तर कधी आदेश~संदेश लिहले, की तेच टपालही बनतं…

एक कागदाचं पान असतं….!!

माणसाच्या जीवनांत आणि त्यांत खूप साम्य असतं…!!

एक कागदाचंपान असतं…!!🎊🎊🎊

नवरात्र २०१९

 या वर्षीच्या नवरात्राच्या काळात या निमित्याने लिहिल्या गेलेल्या खास लेखांचे  आणि चित्रांचे  छोटेसे संकलन या पोस्टवर करणार आहे.
—————–

एक सुंदर पोस्ट..

नवरात्र नवआवाहन ….

👣👏👣👏👣👏👣      …… वॉट्सअॅपवरून साभार

दरवर्षी त्याच घटरूपी शरीरातील भावना बदलू शकतात. जसं पेरावं तसं उगवतं ना? चला आपण स्वतः मधील दैवी अंशाला नव्यानी ओळखूया, जागवूया आणि पुजूया.

पहिली माळ
आधी आत्मा! पहिल्या दिवशी छान नाहुन माखून, खुषीने जे आवडेल ते लेवून, जे आवडेल तेच करावं. करण्याआधी मनाला एक प्रश्न मात्र विचारायचा आहे, मी हे का करते आहे? मला आवडतय म्हणून? का जग करतय म्हणून मला करून बघायचय म्हणून? आजचा दिवस तुमचा असावा, जगाची नक्कल करण्याचा नाही. तुम्ही स्वतःशी बसून स्वतःला विचारायचं आहे कि तुम्ही जगापेक्षा वेगळ्या का आहात? मग तेच करा. कुणी छान स्वयंपाक करेल, कुणी पेंटिग, कुणी छान नटेल, कुणी देवासमोर बसून मनोभावे पूजा करेल, कुणी तरी कुणाला तरी माफ करेल किंवा माफी मागून स्वत:च मन मोकळं करेल. मनातलं स्वत:ला आवडणारच फक्त करून संध्याकाळी छान आरती करा. दिव्यात समाधानानं उजळणारा तुमचा चेहरा बघून ती देवी आई नक्की सुखावणार.

माळ दुसरी
तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रायोरिटीज काळानी जरूर बदलणार, पण तरीही अत्यंत महत्वाची असणारी माणसं तीच रहाणार. आज त्यांच्याकडे पुर्ण लक्ष द्यायचं, सांगून सवरून बरंका. त्यांच्या आवडीचं काही शिजवा, त्यांना भेट आणा, ओवाळून हातात द्या आणि त्यांच्या पर्यंत हे जरूर पोचवा कि तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. आपण सेल्फी टाकताना इतर दिवशी लाजत नाही, ना नवरात्रीचे रंग पाळताना. मग आपल्याच माणसांवरचं प्रेम (जग) जाहीर करायची कसली लाज? विश्वास ठेवा. फार मोठी ताकद मिळते. इडापिडा टळते, एकी वाढते. कुठल्या मातेला आपल्या लेकरांना समाधानी बघून आनंद नाही बरं होणार?

माळ तिसरी
आज जाऊया त्या सगळ्यांकडे, ज्यांच्याबरोबर आपण आयुष्यातला बराच काळ काढतो. मग ते कुटूंबीय असतील किंवा आपल्या कामावरचे सहकारी किंवा सोसायटी मधील मैत्रिणी. त्यांना काहीतरी छानसं लहानसं भेट द्या, बरोबर पेढा किंवा खाऊ द्या. घरी बोलवा किंवा बाहेर जाऊन भेटा. पण तुम्ही हे मनापासून करताय हे त्यांना जाणवलं कि झालं. छान आनंदात संध्याकाळी आरती कराल. नक्कीच!

माळ चौथी
आजचा दिवस आपल्या मदतनीसांचा. मग कामवाल्या काकू असतील किंवा वॉचमन किंवा कचरा साफ करणार्‍या मावशी. त्यांना आवर्जून भेट, खाऊ किंवा पैसे द्या, ते ही मानाने! आई बघतीये! तिचाच एक तेजकण दुसऱ्या तेजकणाचं कौतुक करताना!

माळ पाचवी
आजूबाजूला असलेल्या जीवजंतू, प्राणी पक्ष्यांवर आपण जाणीवपूर्वक कायमच अन्याय करतो. आम्ही मानव इथे रहातो, म्हणुन आमची ही पृथ्वी. तुम्ही आमचे खाद्य किंवा सेवक, किंवा तुम्ही आम्हाला नकोत. हे कोण परग्रहवासी का मग? ती नाहीत का मुलं त्या देवीची? शहाणसुरते निर्णय घेऊन त्यांना मदत करूया. अनेक संस्था आहेत. कदाचित त्यांना किंवा घरातल्या प्राण्यांसाठी काही करा. पुर्वी गोग्रास ठेवायची पद्धत अशाच भावनेतून असावी का?

माळ सहावी
आज आजूबाजूच्या वातावरणातील झाडं, वनस्पती, फुलं यांचं महत्त्व ओळखायचं आहे. एक रोपटं तरी लावूया? त्यांना थोडसं पाणी, प्रेम आणि सूर्यप्रकाश पुरतो.

माळ सातवी
आपलं जग इतकच लहान असतं का? आज कुणाला पुजाल? तुमच्या रहात्या वास्तूला आणि कामाच्या जागेला. त्यातील वापरत्या वस्तूंना. स्वच्छता तर झालेली असतेच आधीच. जस्ट एक फुलांची माळ, रांगोळी आणि धूप. वातावरणात सकारात्मकता तुमच्या परीनी भरून टाका.

माळ आठवी
आज अष्टमी. प्रचंड उर्जा देणारा दिवस. आज ठरवा तुम्ही तुमच्या, कुटुंबाच्या तसच ह्या जगाच्या हानीला हातभार लावणार नाही. काय त्यागू शकता तुम्ही? प्लॅस्टिक, नॉनस्टिक, अ‍ॅल्युमिनियमच्या फॉईल्स… अजुन काय आणि का? योग्य गटांमधे चर्चा करा. चुकीच्या गोष्टी जग करतय म्हणून करू नका. इथं दुर्गारूप जरूर धारण करा. तुम्ही जे सोडणार, त्याचा जरूर गवगवा करा. पर्यावरणाची हानी एक टक्क्यानी जरी कमी झाली तरी दैवी उर्जा नक्कीच जास्त प्रबळ होईल.

माळ नववी
आज आसमंतातल्या सकारात्मक उर्जेला आवाहन करा. दिवसातून एकही नकारात्मक विचार जाणीवपूर्वक बोलू नका. सर्वांसाठी आणि स्वतः साठीही मंगल इच्छा व्यक्त करा. बघा पूर्ण होतात कि नाही. जमलच तर आजपासून ध्यानात बसायला सुरूवात करून बघा.

दसरा
सुख म्हणजे आणखी काय असतं आणि घरबसल्या ते कसं मिळतं ते जरूर अनुभवा. मनापासून दैवी शक्तीचे आभार माना.

ह्या व्रतासाठी नियम
-मनात असेल ते आणि तितकंच करा. नियम नाही हाच नियम.
मनापासून दुसऱ्या कुणाचंही नुकसान न करता स्वतः सह सर्वांचं मंगल चिंतण्यासाठी व्रतस्थ रहाता आलं तर का नाही?
– देविका श्रीकांत


कलाकार महेंद्र मोरे यांनी  कागदावर कोरलेल्या  नवदुर्गा

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकवरील पानावरून साभार

71281510_2408204589277890_6109901367256547328_n

71523993_2406261312805551_9036055443490734080_n

71542932_2411897282241954_1259477070535196672_n

71695570_2409757555789260_431703595465834496_n

३९९ नवदुर्गा ५

३९९ नवदुर्गा ६

मराठी पीजे, ग्राफिटी आणि पुणेरी पाट्या

मला वॉट्सॅपवरून काही मजेदार हास्यघोष मिळाले आहेत ते या ठिकाणी संकलित केले आहेत. या ग्राफिटीज ज्यांनी तयार केल्या आहेत त्यांचे आभार मानून त्यांच्या अनुमतीची याचना करीत आहे.

संपादन दि.१३-०७-२०२० : मागच्या वर्षी पुण्यात एक पाट्यांचे प्रदर्शन भरले होते. त्यातल्या काही पाट्या म्हणजे ग्राफिटीचे नमूनेच आहेत. ते या पानावर संग्रहित केले आहेत. सर्व रचनाकारांचे मनःपूर्वक आभार.

संपादन दि.२६-०२-२०२२ : बारा वर्षांपूर्वी संग्रहित केलेले काही विनोद (पीजे) या पानावर आणले आहेत. ते जुने असले तरी आजही ओठांवर हंसू आणतील.

ग्राफिटी

काही टोमणे काही सुविचार

नवी भर दि. २३-०९-२०१९ : वॉट्सअॅपवरून साभार

३८७ विचारशब्द

नवी भर दि. २५-०९-२०१९

आणखी काही जुन्या ग्राफिटीज माझ्या संग्रहातून

या ग्राफिटीज कुणी तयार केल्या होत्या ते मला तेंव्हाही माहीत नव्हते.  ज्यांनी तयार केल्या आहेत  त्यांचे आभार मानून त्यांच्या अनुमतीची याचना करीत आहे.

जुनी ग्राफिटी १

जुनी ग्राफिटी २

प्रदर्शनातल्या पुणेरी पाट्या

काही अस्सल पुणेरी पाट्या इथे http://assal-marathi-puneri-patya.blogspot.com/

मराठी पीजे

मराठी पीजे या नांवाने हे विनोद माझ्याकडे आले. पीजे म्हणजे पांचट जोक की पुणेरी जोक ते तुम्हीच वाचून ठरवा.

अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेर
—————–
चिनी कुत्र्याचे नाव काय ?
हे हुंग ते हुंग
—————–
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर
—————–
नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
—————–
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की
—————–
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
—————–
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल
—————–
ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली
लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
—————–
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात
ती वेळ कुठली असते ?
घड्याळ दुरुस्त करण्याची !
—————–
दोन चिमण्या असतात
.

त्यातली एक म्हणते “चिऊ”
.
दुसरी काहीच म्हणत नाही!
.
का?
.
कारण दुसरी चिमणी कारखान्याची असते.
—————–
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत.

का बरे ?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
—————–
ढिशुम ढिशुम
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत.
का बरं?????
.
कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना….
—————–
रावणाच्या लंकेला “सोन्याची लंका” का म्हणतात???
.
कारण लहानपणी ..
रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने
“सोन्या” म्हणायचे..
—————–
पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता
स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?
दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे.
जो जास्त घासला गेला असेल,
तो स्त्रीचा!!!!
—————–
संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता.
मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, ”तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?”
संता म्हणाला, ”आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!”
—————–
पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठाय?
मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.
—————
नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली.
आणि त्यात ससा मागे पडला.
पण तरीही शर्यत ससाच जिंकला… का

कारण…
….
….
शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.
————–
एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत
मंदिरात जातात.
पण, कोंबडी जात नाही.
का?
कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.

. . . . . . . . . .फेब्रुवारी 12, 2010

हसण्यासाठी जन्म आपला!

मांडवामध्ये लग्नसोहळा सुरू होता.
😂😂😂
सरपंचाने जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली…
हे लग्न झाल्यामुळे जर कुणाला प्रॉब्लेम होणार असेल तर त्याने पुढं यावं. ….
हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर शांतपणे जगू द्यावं उभ्या आयुष्यात कधी वाटेला जाऊ नये. ….
सरपंचाचे बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक सुंदर स्त्री
पुढे येऊ लागली.
तिच्या हातात एक छोटं बाळ होतं…
सगळ्या मंडपात भयाण शांतता….
मग कुजबूज सुरू झाली…..
त्या स्त्रीला पाहताच नवऱ्या मुलीने नवरदेव च्या मुस्काटात मारली.
मुलीचे वडील त्यांची बंदूक आणायला धावले.
मुलीच्या आईने विषाची बाटली बाहेर
काढली.
मुलीच्या भावांनी मुठी वळल्या.
पाहुणे मंडळींनी फेटे सोडले….
सरपंचाने ,
कसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं,
ताई, तू का पुढे आली आहेस ?
.
.
.
.
.
.
ती म्हणाली,
तुम्ही बोललेलं मागे काहीही ऐकू येत नव्हतं म्हणून!!!!
😍😍😂😂😍😍
……………………..
नुसती घाई…
अन् गैरसमज ….
दमच नाही कुणाला
🤣🤣🤣
सोशल मिडियावरच्या 99 टक्के प्रतिक्रिया अश्याच असतात…म्हणून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्या अगोदर स्वतः खात्री करून घ्या….
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

शिमग्याची आकाशवाणी %^$@# &%^$@# !!!

जंगलात एक शिकारी झाडांवर बसलेल्या कबुतरांच्या टोळक्याकडे मोठ्या आशावादी नजरेने बघत होता. बराच वेळ विचार करून नेम धरून त्याने शेवटी गोळी झाडली. ती दुसरीकडेच गेली. सगळी कबुतरं उडाली.
“गेली चायला.. &%^$@# नेम चुकला..” – शिकारी.
शेजारी एक साधू काही जप करत बसला होता. त्यानं एकदा भयंकर रागीट नजरेनं त्या शिकार्‍याकडे पाहिलं. आणि पुन्हा जप करू लागला.
शिकार्‍याचं लक्ष आता एका सशाकडे होतं.. नेम धरून पुन्हा एक गोळी झाडली.. तीही दुरून गेली.. ससाही पळाला..
“आयला .. काय चाललंय.. &%^$@# नेम चुकला परत..”

त्या साधूला शिकार्‍याचं हे बोलणं रुचलं नसावं.. म्हणून तो त्या शिकार्‍याला म्हणाला.. “बाळा .. अरे अशा शिव्या देऊ नये. वाईट गोष्ट आहे ती..”
“अरे ए साधुरड्या.. तू तुझं काम कर मला माझं काम करू दे..” – शिकारी.
साधू गपगार होऊन पुन्हा जप करू लागला.. “पुन्हा एकदा जर तू शिवी घातलीस ना तर मी तुला शाप देईन..”
आता शिकार्‍याला एक हरीण दिसू लागलं. पुन्हा बराच वेळ वाट पाहून नेम धरून पठ्ठ्यानं गोळी झाडली .. तीही भलतीचकडे गेली.. आणि इतक्यांदा प्रयत्न फसल्यानं वैतागलेला तो शिकारी म्हणाला.. ” &%^$@# नेम चुकला.. चायचं नशीब फुटकं .. ए साधुरड्या .. बघ &%^$@# नेम चुकला..”

आता मात्र साधूला राहवेनासं झालं .. तो वैतागून उठला आणि म्हणाला.. ” हे बघ मी तुला एकदा ताकीद दिली होती तू ऐकले नाहीस.. आता तर तू मलाच शिवी घातलीस .. मी तुला शाप देतो.. आता आकाशातून वीज पडेल आणि तुझी क्षणात राख होईल..” असं म्हणून साधून त्याच्या कमंडलूतून पाणी वगैरे काढून त्या शिकार्‍यावर शिंपडलं.. तसा ढगांचा गडगडाट झाला.. वीजा चमकू लागल्या.. शिकारी घाबरला आणि त्याने डोळे मिटून घेतले.. क्षणात एक जोरदार वीज कडाडली आणि साधूवर येऊन पडली.. साधू क्षणार्धात राख झाला..

तोच आकाशातून जोरदार आवाज आला..
“&%^$@# … नेम चुकला!!!!!””

मिसळपाववरून साभार . . . फेब्रुवारी 28, 2010
—————–

भगवद्गीतेमधील तत्वज्ञान – भगवद्गीतासार

भगवद्गीतेमधील अठरा अध्यायांचा सुरस असा सारांश इथे पहा.
https://anandghare.wordpress.com/2020/04/10/%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0/

नवी भर : अतिशय उत्तम वाचनीय अशी पोस्ट कॉपी पोस्ट आहे। वॉट्सॅपवरून साभार . . दि. ०५-०५-२०२१

श्री. शंकर अभ्यंकर यांनी सांगितलेले घरातल्या जीवनातले गीतासार 🙏🏻🙏🏻🌷🌷

आमच्याकडे ती व्यक्ती जेवायला बसली होती. जेवणाच्या ताटाला नमस्कार करून त्यांनी चार पाच घास घेतले व सर्व पदार्थांना दाद दिली. अगदी कोशिंबिरीत दाण्याच्या कुटाबरोबर आणखी काय घातलंय वगैरेही विचारून घेतलं. मी मुद्दाम वेगळा गोड पदार्थ म्हणून श्रीखंड-बासुंदी ऐवजी मोदक केले होते. त्याचीही छान पावती दिली. मला फार प्रसन्न वाटत होतं कि पाहुणे आवडीने जेवताहेत. त्यांच्या बरोबर माझे सासरे व मुलीही जेवत होत्या. सासरे, मी व पाहुणे त्यांचा हातखंडा विषय “गीतासार ” त्यावरची व्याख्यानं, प्रवास व इतर उपक्रम याबद्दल बोलत होतो. पण मुली मात्र शांतपणे जेवत होत्या.
मधेच पाहुण्यांनी मुलींशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्या बोलायला बिचकताहेत हे त्यांच्या लक्षात आलं. जेवण झाल्यावर पुन्हा काही तरी विचारल्यावर, माझ्या मुलीने सांगितलं कि काका, तुम्ही गीता या विषयावर बोलत होतात. त्यात मला काय कळणार, म्हणून मी मधे बोलले नाही !!

ह्यावर पाहुणे छान हसले व तिला म्हणाले, “अगं, गीता कळायला खूप सोप्पी आहे. तुला न कळायला काय झालं?
आत्ताचंच उदाहरण घेऊ या. तुझ्या आईने आम्हाला, सास-यांनी जेवायला बोलावलंय हे कळल्यावर, तत्परतेने आणि वेळेवर छान स्वयंपाक केला. हो ना बाळा ?
हाच कर्मयोग !! आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदाने व वेळच्या वेळी करणे !!

माझ्या मुलीला हे इंटरेस्टिंग वाटलं ! पाहुणे पुढे म्हणाले, तुझ्या आईला स्वयंपाक कसा करावा हे शिकावं लागलं असेल. तिच्या आईकडून,
मैत्रिणींकडून, किंवा पुस्तकं वाचून तिनं हे ज्ञान मिळवलं. ते स्वतः प्रॅक्टिस करून वाढवलं व आज योग्य पद्धतीनं वापरलंय. खरं ना?
मुलीला हे सगळं छान पटत होतं! नवनवीन गोष्टी योग्य गुरूंकडून शिकणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा प्रत्यक्षात उत्तम उपयोग करणं. हाच गीतेतला ज्ञानयोग आहे, बरं का बाळा !!

काकांचं बोलणं पटकन कळल्या मुळे मुलीला इंटरेस्ट घेऊन ऐकावसं वाटत होतं. मी ही थक्क झाले.
मग काका म्हणाले, आता आणखी एक गंम्मत सांगतो. तुझ्या आईने किती सुंदर पद्धतीनं केलेले पदार्थ ताटात वाढले होते व प्रेमाने आग्रहाने स्वतः बाजूला उभी राहून ती वाढत होती, आग्रह करीत होती. होय ना बाळा ?
हो, पण त्यात काय नवीन! .. मोकळेपणाने कन्या विचारती झाली.
अगं, यालाच म्हणायचं भक्तियोग !!
समोर जर देण्या योग्य कोणी असेल, तर आपल्याकडे जे असेल ते प्रेमाने, भावपूर्वक, आनंदाने समोरच्याला द्यावे, हेच तर भक्तियोगात सांगितलंय !!

गीतेतील हे कळीचे मुद्दे एवढ्या सोप्या शब्दात, साध्या पद्धतीने सांगणारे हे पाहुणे होते,
विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

नवी भर गीताजयंति दि.२५-१२-२०२०

१८ श्लोक गीता हिंदी

गीता ध्यानम्
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् ।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम्- अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्- गीते भवद्वेषिणीम् ॥ १॥
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ॥ २॥
प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ।
ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः ॥ ३॥
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नन्दनः ।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥ ४॥
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥ ५॥
भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला ।
अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः ॥ ६॥
पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा- सम्बोधनाबोधितम् ।
लोके सज्जनषट्पदैरहरहः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमल- प्रध्वंसिनः श्रेयसे ॥ ७॥
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥ ८॥
यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ।
ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः ॥ ९॥

नमस्कार ,🙏🙏
गीताजयंती निमित्त आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा !!
नित्यनूतन असणारी ही गीता !🌺
प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखकमलातून
स्रवलेली ही मधुर गीता !!🌺
उपनिषदांचे सार असलेली गीता !!🌺
🌺कर्म, ज्ञान , भक्ती यापैकी कोणताही मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य साधकाला देणारी गीता !! 🌺
संभ्रमित मनाला उचित मार्ग दाखवणारी गीता !!🌺
मुक्याला बोलका करणारी गीता !!🌺
कर्मफळावरील नजर तिथून हटवून उत्तम कर्म करायला शिकवणारीअशी नित्य पठनीय गीता !! 🌺
अशा गीतेला आपण सारेजण सुगीता करु या … म्हणजेच ती आचरणात आणू या …
त्यासाठी गीतामातेचेच आशीर्वाद मागूया …स्वत:ला घडवूया …🌺
उद्धरेदात्मनात्मानम् !!🙏🙏

गीताअध्यायसार ही वाचनीय अशी लेखमाला अवश्य वाचावी.
https://anandghare.wordpress.com/2020/04/10/%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0/

नवी भर  दि.०८-१२-२०१९

श्रीमद्भगवद्गीतेमधील प्रत्येक अध्यायाचा संस्कृतमध्ये सारांश

🌹🌹श्वः ‘गीताजयन्ती’दिवसो वर्तते । तं पवित्रं दिवसं लक्ष्यीकृत्य गीतायाः अष्टादशाध्यायानां प्रत्येकम् अध्यायस्य सारांशः यथाज्ञानम् अत्र प्रस्तूयते–

१ अ. – किं कर्तव्यम्, किं वा न इति द्विविधभावः मनुष्येषु सांसारिकमोहकारणतः भवति । अतः सः मोहः त्यक्तव्यः ।
२ अ.- शरीरं नाशवत् परन्तु आत्मा अविनाशी इति ज्ञातव्यम् ।
३ अ.- निष्कामभावेन परहितार्थं कार्यं कर्तव्यम् ।
४ अ.- कर्मबन्धनात् मुक्तिं लब्धुम् उपायद्वयम् अस्ति– निःस्वार्थतया कर्मणः सम्पादनम्, तत्त्वज्ञानस्य अनुभूतिः चेति ।
५ अ. अनुकूल-प्रतिकूलस्थित्यादिषु समचित्तता दिव्यानन्दायै भवति ।
६ अ.- मनुष्यस्य अन्तःकरणे समता न भवेच्चेत् निर्विकारता दुर्लभा ।
७ अ.- सर्वमपि भगवतः एव रूपम् इति स्वीकरणमेव सर्वश्रेष्ठसाधनं स्यात् ।
८ अ.- अन्तकालीन-चिन्तनानुगुणं मनुष्यस्य गतिर्भवति । अतः सर्वदा कर्तव्यस्य पालनेन सह भगवतः स्मृतिः आवश्यकी ।
९ अ.- सर्वः अपि मनुष्यः भगवत्प्राप्तेः अधिकारी वर्तते । अत्र वर्णः, जातिः, सम्प्रदायः, देशः, वेशः इत्यादयः नापेक्ष्यन्ते ।
१० अ.- जगति यत्र यत्र विलक्षणता, सुन्दरता, महत्ता इत्यादिकं दृश्यते तत्सर्वं भगवतः एव इति मन्तव्यम् ।
११ अ.- इदं जगत् भगवतः एव स्वरूपं इति मत्वा मनुष्यः विश्वरूपस्य दर्शनं कर्तुं शक्नुयात् ।
१२ अ.- यः भक्तः देह-इन्द्रिय-मनोबुद्धिभिः सह स्वयम् आत्मानं भगवते अर्पयति सः भगवतः प्रियतमः भवति ।
१३ अ.- जगति एकमात्रं भगवान् हि ज्ञातुं योग्यः अस्ति । सः ज्ञातव्यः चेत् साधकस्य अमरता सिद्ध्येत ।
१४ अ.- ईश्वरस्य अनन्यभक्त्या मनुष्यः सत्त्वरजोतमोगुणेभ्यः अतीतो भवितुमर्हेत् ।
१५ अ.- एतज्जगतः एकमात्रं मूलाधारः परमपुरुषो वर्तते, सः एव परमात्मा, यश्च सर्वदा भजनीयः इति ।
१६ अ.- नाना पापकारणतः मनुष्यः नरकं याति, जन्ममरणचक्रे च पतति । ततः मोक्तुं दुर्गुणदुराचारादयः त्यक्तव्याः ।
१७ अ.- मनुष्यः सश्रद्धं यत् शुभकार्यं करोति ततः पूर्वं भगवन्नाम्नः स्मरणं कुर्यात् ।
१९ अ.- यः अनन्यभावेन भगवतः शरणं याति तस्य सम्पूर्णं पापं नाशयित्वा, भगवान् तस्मै मुक्तिं दास्यति इति ।

🌹ॐ श्रीमद्भगवद्गीतायै नमः ! ॐ शुभसन्ध्या !
— नारदः, ०७/१२/१९.

Essence of Gita in simple language chapterwise is given below:
1. What is to be done, what should not he done – this confusion of duality arises owing to delusion caused by mundane objects. That delusion should be abandoned.
2. Body (including mind, intellect) is subject to destruction. But Atma is indestructible. This should be firmly known.
3. Action should be performed for the good of others with selfless attitude.
4. There are two means of attaining liberation from the bondage of Karma- performing actions selflessly, and realising the Truth through knowledge (discrimination).
5. Equanimity in favourable and unfavourable circumstances leads to divine bliss.
6. If equanimity in one’s mind is absent, steadiness and changelessness of mind are difficult to attain.
7. Realising that everything is indeed the form of Bhagavan alone is the best means of Liberation.
8. The last thought at the time of death determines the course ahead of man. Hence in addition to performance of one’s duty, continuous remembrance of Bhagavan is essential.
9. All men are equally qualified in attaining Bhagavan, irrespective of Varna, Jati, tradition, country, appearance etc.
10. Wherever unique beauty and splendour are visible in the world, know it all to be of Bhagavan only.
11. By looking at everything in the world as the form of Bhagavan, it is possible to have the vision of the universal form, Visvarupa of Bhagavan.
12. One, who dedicates his entire being including body, senses, mind and intellect to Bhagavan, becomes indeed most dear to him.
13. It is only Bhagavan that is to be known in the world. Once he is known, man becomes immortal.
14. Through unwavering devotion to Bhagavan , man can transcend the attributes of Satva (tranquillity), Rajas (agitation) and Tamas (slughishness).
15. The only foundation, substratum of this world is Paramatma; he should always be worshipped.
16. Man attains to Naraka and falls into the cycle of birth and death, by committing various sins. Hence evil qualities and conduct should be eschewed.
17. Sraddha, faith is essential in any auspicious act; at the beginning of any such act, the name of Bhagavan should be chanted and meditated upon.
18. To one, who takes refuge in Bhagavan as the sole resort, Bhagavan grants Liberation.

Gita Jayanti was celebrated on 8th December 2019.
P R Kannan.

श्री.कण्णन यांच्या सौजन्याने …. वॉट्सअॅपवरून साभार

——————-

महाभारत युद्धामध्ये पांडव आणि कौरव यांच्या सेनांमध्ये अठरा दिवस महाभयंकर युद्ध झाले आणि त्या युद्धाच्या पहिल्याच दिवशी कुरुक्षेत्राच्या रणांगणाच्या मधोमध उभ्या केलेल्या रथामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली असे आपण लहानपणापासून ऐकत आणि वाचत आलो आहे. जिला हिंदू धर्माचे सार समजले जाते आणि गेल्या हजारो वर्षांमध्ये असंख्य विद्वानांनी जिच्या अठरा अध्यायांचा अर्थ लावण्याचे असंख्य प्रयत्न केले आहेत, अशी ही महान गीता अशा ठिकाणी आणि थोड्याशा वेळात कशी काय सांगितली गेली असेल हेच आपल्याला अद्भुत वाटते. कोणा एका पंडिताने या घटनेचा असाही अर्थ काढला आहे की खरे तर हे कुरुक्षेत्र मानवाच्या मनातच असते आणि तिथे हे युद्ध आयुष्यभर चाललेले असते. या पंडिताचे नाव मलाही माहीत नाही, पण मी हे इंटरप्रिटेशन तीस चाळीस वर्षांपूर्वी माझ्या भावाकडून ऐकले आहे. यावरील एक पोस्ट आजकाल वॉट्सॅपवर फिरते आहे. ती खाली दिली आहे.

संजय प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.

‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ?

मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ?’

याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.

त्याने चहूदिशांना पाहिले, ‘खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?’

“यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही, मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!”

एक आवाज ऐकू आला। एक वृद्ध योगी गूढपणे प्रकट झाला आणि म्हणाला:

“काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?”

संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.

” महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे. “

वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
“महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?”
“नक्कीच, ऐक तर,”
वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.

“पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, ‘नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?” वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.

संजयाने मानेने नकार दर्शवला.

“कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे? “

संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.

“तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!”

वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!

” भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही. “

संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, “महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?”

वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,

” याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!

मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे.”

संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, “मग कर्णाबद्दल काय?”

“वा!”

वृद्ध योगी उद्गारला, “वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!”

“कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!’

संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.

पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून…!
🙏🙏

वॉट्सॅपवरून साभार


नवी भर : दि.२६-०७-२०१९

भगवद्गीतासार

Bhagavadgeeta Sar

भगवद्गीता प्रत्येक अध्याय एका वाक्यात
अध्याय १ चुकीचा विचार ही जीवनातली एकमेव समस्या आहे.
अध्याय २ योग्य ज्ञान हा सर्व समस्यांवरील उपाय आहे.
अध्याय ३ निस्वार्थ वृत्ती हा प्रगति आणि समृद्धीकडे नेणारा मार्ग आहे.
अध्याय ४ प्रत्येक क्रियेमध्ये प्रार्थना असते.
अध्याय ५ आपला अहम् सोड आणि अनंताच्या आनंदाचा अनुभव घे.
अध्याय ६ दर रोज स्वतःला परब्रह्माशी जोडून घे.
अध्याय ७ जे शिकलास तसा जग.
अध्याय ८ स्वतःला सोडून देऊ नकोस.
अध्याय ९ तुला मिळालेल्या वरदानाची किंमत ठेव.
अध्याय १० सगळीकडे ईश्वरतत्व पहा.
अध्याय ११ शरण जाऊन सत्य काय आहे ते पहा.
अध्याय १२ तुझ्या मनाला परब्रह्माशी एकरूप कर.
अध्याय १३ मायेपासून मुक्त होऊन ईश्वराशी जवळीक कर.
अध्याय १४ तुझ्या दृष्टीनुसार जीवनशैली ठेव.
अध्याय १५ देवत्वाला प्राथमिकता दे.
अध्याय १६ चांगले असणे हे स्वतःच बक्षिस असते.
अध्याय १७ सुखकराऐवजी योग्य त्याची निवड करणे ही सामर्थ्याची खूण आहे.
अध्याय १८ जा, ईश्वराशी एकरूप हो.

वर दिलेल्या इंग्रजी फलकाचा मी माझ्या मतीनुसार अनुवाद केला आहे. श्रीमद्भगवद्गीतेत प्रत्यक्षात काय लिहिले आहे याचा मी अभ्यास केलेला नाही.

हे ही पहा : भगवद् गीता का पूरा सार 10 मिनट में
https://www.youtube.com/watch?v=GGCbT3XpQp4
—————–
BHAGAVAD GITA SUMMARY IN HINDI (गीता सार)

३६९ gita_saar

क्यों व्यर्थ की चिंता करते हो? किससे व्यर्थ डरते हो? कौन तुम्हें मार सक्ता है? आत्मा ना पैदा होती है, न मरती है।
जो हुआ वह अच्छा हुआ, जो हो रहा है, वह अच्छा हो रहा है, जो होगा, वह भी अच्छा ही होगा। तुम भूत का पश्चाताप न करो। भविष्य की चिन्ता न करो। वर्तमान चल रहा है।

तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो? तुम क्या लाए थे, जो तुमने खो दिया? तुमने क्या पैदा किया था, जो नाश हो गया? न तुम कुछ लेकर आए, जो लिया यहीं से लिया। जो दिया, यहीं पर दिया। जो लिया, इसी (भगवान) से लिया। जो दिया, इसी को दिया।
खाली हाथ आए और खाली हाथ चले। जो आज तुम्हारा है, कल और किसी का था, परसों किसी और का होगा। तुम इसे अपना समझ कर मग्न हो रहे हो। बस यही प्रसन्नता तुम्हारे दु:खों का कारण है।
परिवर्तन संसार का नियम है। जिसे तुम मृत्यु समझते हो, वही तो जीवन है। एक क्षण में तुम करोड़ों के स्वामी बन जाते हो, दूसरे ही क्षण में तुम दरिद्र हो जाते हो। मेरा-तेरा, छोटा-बड़ा, अपना-पराया, मन से मिटा दो, फिर सब तुम्हारा है, तुम सबके हो।
न यह शरीर तुम्हारा है, न तुम शरीर के हो। यह अग्नि, जल, वायु, पृथ्वी, आकाश से बना है और इसी में मिल जायेगा। परन्तु आत्मा स्थिर है – फिर तुम क्या हो?
तुम अपने आपको भगवान के अर्पित करो। यही सबसे उत्तम सहारा है। जो इसके सहारे को जानता है वह भय, चिन्ता, शोक से सर्वदा मुक्त है।
जो कुछ भी तू करता है, उसे भगवान के अर्पण करता चल। ऐसा करने से सदा जीवन-मुक्त का आनंन्द अनुभव करेगा।

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

नवी भर दि. १०-०३-२०२१

माझे मुक्तचिंतन……….

गीता : श्री.राज कुलकर्णी
रामायण ,महाभारत आणि गीता या प्रमुख ग्रंथांबरोबरच वेद आणि उपनिषदे, वेदांत सूत्रे आदी प्राचीन भारतीय ग्रंथांचा एकूणच भारतीय मनावर प्रचंड प्रभाव आहे. अध्यात्मिक आणि धर्मश्रद्ध हिंदू मन या ग्रंथातील अनेक वचनांनी व विचारांनी भारलेले आहे. पण गीतेचा प्रभाव सर्वाधिक आहे. खरेतर गीता ही एक स्वतंत्र निर्मिती असली तरीही ती, महाभारतातील एक उपकथानक म्हणून समोर येते. अर्थात विद्वानांत याबाबत मतभिन्नता असेल, परंतु मी गीतेकडे कसे पाहतो हा माझ्या लेखनाचा मुख्य विषय आहे, त्यामुळे ऐतिहासिक तथ्यांपेक्षा जनमानसात असणारा गीतेचा प्रभाव मला अधिक महत्वाचा वाटतो.

देशातील अनेकविध भाष्यकार, तत्त्ववेत्ते, विद्वान आणि विशिष्ट संप्रदायाचे संस्थापक यांचा गीतेकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन आहे. प्राचीन भारतीय गौडपादाचार्य, शंकराचार्य, शतकिर्ती, अभिनवगुप्त, रामानुज, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, निवृत्तीनाथ, मध्ययुगीन काळातील ज्ञानेश्वर, चक्रधर, तुकाराम, चैतन्य महाप्रभू यांच्यापासून ते आधुनिक काळातील दयान्नाद सरस्वती, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, जे. कृष्णमुर्ती ते अगदी ओशो राजीनिश यांनीही गीतेचे स्वतःचे स्वतंत्र आकलन मांडले आहे. भक्ती संप्रदायाचा प्रमुख आधार असणाऱ्या या ग्रंथास कांहींनी श्रीकृष्ण स्मृती म्हटले आहे तर काहंनी गीतोपनिषद देखील म्हटले आहे. म्हणजे परंपरेने गीतेस श्रुती आणि स्मृती अशी दोन्ही मान्यता आहे.
प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करताना सातत्याने असे जाणवते की, गीता म्हणजे उपदेश आहे, मार्गदर्शन आहे, आणि तत्वचिंतन देखील आहे. अर्थात या मार्गदर्शनाला आणि तत्वचिंतनाला काळाच्या मर्यादा आहेतच. गीता म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने युद्धभूमीवर निर्णय घेण्याच्या मनस्थिती नसलेल्या अर्जूनाला युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी केलेला तत्वचिंतनपर उपदेश म्हणून सर्वत्र प्रचलित आहे! मात्र प्राचीन भारतीय ग्रंथात केवळ एवढी एकाच गीता नसून अनेक गीता आहेत. श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेप्रमाणेच धतराष्ट्र विदुर संवादावर आधारलेली विदुर गीता, संजय आणि धृतराष्ट्र यांची संजय गीता, युधिष्ठाराला धृतराष्ट्र मार्गदर्शन करतो ती धृतराष्ट्र गीता, यक्ष व युधिष्ठीर संवादाची युधिष्ठीर गीता, युधिष्ठीर व भीष्म संवादाची भीष्म गीता शिवाय कर्णगीता,पराशरगीताही आहेत. या सर्व गीतेपासून ते गुरुगीता, विनोबाजींची गीताई, साने गुर्जींचे कर्मयोगावरील लेखन आणि राष्ट्रसंत तुकोडोजी महाराजांची ग्रामगीता देखील आहे.

प्रत्येक गीतेचे महत्व आणि त्यातील संदेश हा त्या त्या काळातील समाज धुरिणांना मार्गदर्शक ठरलेला आहे. त्यामुळे कोणत्याही गीतेचा कसलाच प्रभाव ज्यावर नाही असा भारतीय व्यक्ती सापडणे दुर्मिळच ! हिंदू धर्मियांसोबतच राहुल सांकृत्यायन या बौद्धमहा पंडितास देखील गीतेवर लिहावे वाटले तर शेख महंमद आणि सिद्धांतबोध लिहिणारे महानुभावी शहाबाबा या मुस्लीम संतांनाही भाष्य करावे वाटले हे खूप सुचक आहे. मुघल सम्राट अकबर यांने भगवदगीतेचे फारशी भाषांतर करून घेतले होते आणि त्याने त्याच्या ‘दिन- ए- ईलाही’ या धर्मात तीच्यातील तत्वचिंतनास स्थान दिले होते. दारा शुकोह हा शहाजहानपुत्रही गीतेने प्रभावित होता. तर आधुनिक काळातील अल्डस हक्सले, जे.ओपनहायमर, डेव्हीड थोरो, एॅनी बेझंट अगदी ब्रिटीश व्हाईसरॉय वॉरन हेस्टींग्ज देखील गीतेने प्रभावित झालेले होते. यावरूनच गीतेची महानता आणि सर्वस्विकृती स्पष्ट होते!

ब्रिटीशांच्या पारतंत्र्यात असताना , साम्राज्यवादाच्या विरोधात लढताना गीतेने अनेकांना प्रेरणा दिली हे वास्तव आहे. गीता हातात घेवून खुदिराम बोस सारखा सशस्त्र क्रांतिकारक फासांवर गेला , त्याच गीतेने टिळकांसारख्या जहाल राष्ट्रवादी विचारांच्या नेत्याला कर्मयोग शिकवला , तीच गीता नेहरू सारख्या अज्ञेयवादी व्यक्तीला पारलौकिक बाबींवर अवलंबून न राहता मानवी प्रयत्न महत्वाचे आहेत याचे शिक्षण देते , तीच गीता महात्मा गांधींना अहिंसा शिकवते आणि तीच गीता विनोबा भावे यांना सर्वोदयाची प्रेरणा देते ! तर त्याच गीतेतून प्ररणा घेवून योगी अरविंदांनी स्वातंत्र्य लढा सोडून गीतेतील ज्ञानयोगाची कास धरली आणि त्यांनी योगदर्शनास जगभर पोचवले. म्हणूनच गीता ही खऱ्या अर्थाने भारतीयत्वाचे प्रतिक आहे, कारण ती अगदी गंगेसारखी सारखी आहे. सर्व प्रवाह तिच्यात मिसळतात आणि सर्व कांही तिच्यात तिने स्वत: सामावून घेतले आहे.

गीतेकडे माझ्यासारखा व्यक्ती प्रयत्नवादाचे आणि चिकित्सक वृत्तीचे प्रतिक म्हणून पाहतो. गीता मानवी कर्तृत्वाला महत्व देणारी आहे , अलौकीक शक्तीचा प्रभाव किंवा परिणाम कांही प्रमाणात उदासीन असल्याचेही स्पष्ट करणारी आहे. मी गीता मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहतो आणि गीता सर्वांना प्रेरणा का देते ,याचा विचार करतो , तेंव्हा लक्षात येते की, आयुष्य जगात असताना प्रत्येक व्यक्तीच्या समोर अनेक प्रश्न असतात, आणि कांही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना मानवी मनात यशापयशाच्या भीतीने किंवा संदिग्ध्तेने मनात सतत द्वंद्व चालू असते!

गीता वाचताना माझ्या मनात नेहमी अशीच भावना निर्माण होते. कारण मानवी मन द्वंद्व, संभ्रम, किंतु-परंतु आणि विचार कलह यांनी व्यापलेले आहे, मानवी मनाची ही अवस्था गीतेचा मूळ गाभा आहे. म्हणून गीता सर्वांना आपल्या मनाचे प्रतिक वाटते आणि सर्वांना ती जवळची वाटत असावी. द्वंद्व मनात घेवून आयुष्याकडे आशाळभूत नजरेने राहणारा मानव किंवा प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर अर्जुन असतो आणि तोच व्यक्ती कोणासाठी तर कृष्ण देखील असतो. तो कधी अर्जुन होवून कोणाला प्रश्न विचारतो तर कधी कृष्ण होवून कोणाला तरी उत्तर देतो , शंकाच निरसन करतो ,कधी मार्गदर्शन देखील करतो. मानव असे विविध रूपे घेवून वेगवेगळ्या भूमिका वठवून आयुष्य आनंदमय करत असतो. कधी कधी एकाच व्यक्तीच्या मनात अर्जुन आणि कृष्ण दोघेही विराजमान असतात आणि आयुष्याच्या कुरुक्षेत्रावर त्याच्या विचाराचा रथ कोणत्या दिशेने मार्गक्रमित करावा याचे द्वंद्व चालू असते!

मानवी मन हळवे आहे तेवढेच ते कठोर देखील आहे. हृदय हे अर्जुनासारखे हळवे आहे तर मन अथवा मेंदू हा कृष्णाप्रमाणे कठोर आहे आणि धूर्त आहे. पण या मनातील कृष्ण अर्जुनाचा संवाद सतत चालत राहतो आणि मग एक अवस्था अशी येते की, आपल्यातीलच अर्जुनाला आपल्यातील कृष्ण एक विराट रूप दाखवतो,आणि मार्ग दर्शन करतो. आपल्यातील कृष्णाचे विराट रूप पाहून अर्जुनाचे डोळे दिपून जातात ,तेंव्हा खरे म्हणजे आपणच आपली नव्याने भेट घेतलेली असते. हा आत्मसाक्षात्कार आपल्या मनातील द्वंद्व संपवतो ,कोणी यालाच दिव्याज्ञानाची प्राप्ती असे म्हटले आहे. याच पद्धतीने सिद्धार्थाच्या मनातील द्वंद्व संपवून त्यांना अहिंसेचा आणि सम्यक क्रांतीचा मार्ग सापडला असावा , हाच क्षण भागवान महावीर ,मोझेस ,येशू , महंम्मद या सर्वांनी अनुभवला नसेल कशावरून? आणि मग याच अनुभवातून नवनिर्मिती त्यांनी केलेली आहे, असेही म्हणता येईल!

मानवी मनातील द्वंद्व हा गीतेच्या तत्वविवेचनाचा मुख्य आधार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तीत परस्पर विरोधी मतेदेखील आढळतात. यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ आणि योगापेक्षा भक्तियोग अशी सुटसुटीत मांडणी देखील तीच्यात आहे. राजनितिज्ञ आणि तत्वचिंतक श्रीकृष्णाचे चरित्र हा खरेतर एक स्वतंत्र विषय आहे. मात्र गीतेत श्रीकृष्णाने भक्ती आणि कर्म यांचा एकत्रित असा जो व्यापक विचार मांडला ज्यातून अंधतेने धर्माचे पालन केले तर धर्माची हानी होते हे सांगून, धर्म आणि सत्य यांचा उद्देश मानवाचे कल्याण असल्याचा महत्वपुर्ण संदेश गीता देते. हाच विचार गांधीजींनी अंगीकृत केला होता. नितीकेंद्रित धर्मकल्पना हेच श्रीकृष्णाच्या विचारांचे सार होते. गीता वैदिक संस्कृतीतील अनेक विषमतावादी भूमिकेचे समर्थन करते, कारण वैदिक संस्कृतीच्या चौकटीत समाजाचे सांस्कृतिक एकीकरण हाच श्रीकृष्णाच्या मांडणीचा हेतू असल्याचे मत सदानंद मोरे यांनी त्यांच्या श्रीकृष्णावरील इंग्रजी ग्रंथात व्यक्त केले आहे.

संवेदनशील मनातील द्वंद्व मानवी जीवनाचे महत्व समजून उमजून संपणे म्हणजेच नवनिर्मितीची चाहूल असते. त्यामुळे मनातील द्वंद्व संपण्यासाठी गीता प्रत्येकाच्या आयुष्यात घडणे गरजेचे आहे! म्हणूनच गीता प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्न वादाचा चिरंतन स्रोत म्हणून समाजात प्रचलित आहे. संभ्रम ,अज्ञान संपावे आणि सदसदविवेकाच्या आधारावर निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली तर स्वतःला स्वतःचे विराटरूप प्रत्येक व्यक्तीला पाहता येतील.

उपनिषदांनी सांगितलेला ‘आत्मोदिपोभव्’ आणि त्रीपिटकांतील ‘ ‘अत्त दिप भव’ हा संदेश म्हणजे जणू स्वत:चेच विराटरूप स्वतःच पहा आणि स्वतः स्वतःचे मार्दर्शक व्हा ‘ हात गीतेचा प्रमुख संदेश असून तो आज समस्त मानवजातीसाठी खूप महत्वाचा असल्याचे माझे चिंतन आहे!

© राज कुलकर्णी
(‘माझे मुक्त चिंतन’ या वर्षीच्या सदरातील हा पहिला भाग आहे )

श्री.राज कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार आणि हा लेख या ठिकाणी संग्रहित करायला अनुमति द्यावी अशी नम्र विनंति

शब्द, अर्थ आणि त्यांची गंमत

अक्षरे, शब्द आणि वाक्ये मिळून भाषा तयार होते. शब्द हे त्यातले महत्वाचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. त्यांची महत्ती दाखवणाऱ्या दोन कविता आणि शब्दांच्या काही गंमती खाली दिल्या आहेत. यातले काही अलीकडचेच वाचन आहे, तर काही मी दहा वर्षांपासून गोळा केलेल्या आहेत.

याशिवाय पहा

अडगळीत गेलेले शब्द ,     लावालावी  आणि लागणे,   पाणी या शब्दाच्या अर्थांचे विविध रंग

या लेखातील गंमती : शब्दांचा गोडवा, शब्दांमुळेच …, जुने शब्द ……….. नव्या व्याख्या, काही शब्दांच्या व्याख्यांची उदाहरणे, मीठी की मिठी,  मासा आणि माशी, कसं असतं पहा ……., मराठीही फारशी सोपी नाही..!!, दोन अर्थ -एक शब्द  (द्व्यर्थी शब्दांची गंमत), मराठीची अवखळ वळणे…., ळ ची गंमत, स्त्रीचा पदर,  आईचा पदर,  गंमत ४ ची , बारा १२ या अंकाची बहादुरी,  शेवटी त्र असलेले शब्द, हरवलेले जादूई शब्द,  मराठीतली  खास विशेषणे,  पाऊल आणि पाय,  कीकारांती शब्द, मराठी भाषेत घुसलेले शब्द, आयुष्याबद्दल  छान भाष्य, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द, पोत, भेट, मराठी विलोमपद, ऋकार शब्दांचे काव्य, मजेदार प्रश्नमंजुषा, मार्ग या अर्थाचे शब्द, उपसर्ग, ABCDवरून शब्द, लस शब्द, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले शब्द, घासावा शब्द, तासावा शब्द, मायंदाळ बक्खळ लई इ.


शब्द

शब्दांचा गोडवा

शब्द पेरती गोडवा , शब्द अमृताची वाणी ,
अमृताते पैजा जिंकी , ऐशी शब्दांची करणी ,

शब्द ज्ञानेशाची ओवी , शब्द तुक्याचा अभंग ,
शब्द प्रेम भाव भक्ती , शब्द झाला पांडुरंग ,

शब्दे व्यापिले आकाश , शब्द तेजाचीच रास ,
शब्द काळीज कोदंण , शब्द मांगल्याचा ध्यास ,

स्नेह शब्दांचा गोडवा , स्नेह वृध्दीगंत व्हावा ,
शब्द अमृताची वाणी , मैत्र जिवलगी व्हावा ,

नको खल मनामधी , नको वेदनांचा सल ,
दिसामागून जाते रात , रोज नवा उषःकाल

शब्द शीतल चांदणं , शब्द मायेची पाखरं ,
शब्द जीवाचे जीवन , शब्द स्नेहाची भाकर ,

गोड शब्दांचा गोडवा , तिळा तिळाने रूजावा ,
आलो तुमच्या मी दारी ,थोडा तिळगूळ घ्यावा !

कविचे नाव माहीत नाही. वॉट्सअॅपवरून साभार
………………………………………………….

शब्दांमुळेच …

शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला,
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी…
“म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि
जो मन जिंकेल तो जग जिंकेल “

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.. !

कविचे नाव माहीत नाही. वॉट्सअॅपवरून साभार


जुने शब्द ……….. नव्या व्याख्या

सिगारेट …. चिमूटभर तंबाखूची कागदात गुंडाळी, तिच्या एका टोकाला आग आणि दुसऱ्या टोकाला मूर्ख
CIGARETTE: A pinch of tobacco rolled in paper with fire at one end and a fool at the other!

लग्न … या करारनाम्यात पुरुष आपली बॅचलरची पदवी गमावून बसतो आणि स्त्रीला मास्टरची पदवी मिळते.
MARRIAGE: It’s an agreement wherein a man loses his bachelor degree and a woman gains her master

घटस्फोट … लग्नाचे भविष्यरूप
DIVORCE: Future Tense of Marriage

परिसंवाद … एका माणसाच्या मनातला गोंधळ गुणिले सभासदसंख्या
CONFERENCE:The confusion of one man multiplied by the number present

कॉलेजमधील तास … प्राध्यापकांच्या नोट्समधील माहिती (कोणाच्याही डोक्यात न शिरता) विद्यार्थ्यांच्या टिपणवहीत भऱण्याची कला.
LECTURE: An art of transmitting Information from the notes of the lecturer to the notes of students without passing through the minds of either .

तडजोड … आपल्यालाच सर्वात मोठा तुकडा मिळाला आहे असे प्रत्येकाला वाटावे अशा प्रकाराने केक कापून वाटण्याची कला
COMPROMISE: The art of dividing a cake in such a way that everybody believes he got the biggest piece

अश्रू … पुरुषाच्या इच्छासक्तीला पराभूत करणारी स्त्रियांची जलऊर्जा
TEARS: The hydraulic force by which masculine will power is defeated by feminine water-power!

शब्दकोष … ज्या टिकाणी फारकत व घटस्फोट लग्न व विवाह यांच्या आधीच येतात अशी जागा, जिथे सक्सेस हा शब्द वर्क या शब्दाच्या आधी येतो. ( मराठीमध्ये मात्र आधी सुरुवातीलाच कामाचा क आणि खूप उशीरानंतर शेवटी शेवटी यशाचा य येतो
DICTIONARY: A place where divorce comes before marriage, success comes before work

संमेलनकक्ष … जिथे सर्व लोक बोलतात, कोणीच ऐकून घेत नाही, पण अखेर सर्वांचे मतभेद होतात अशी जागा
CONFERENCE ROOM: A place where everybody talks, nobody listens and everybody disagrees later on

परमानंद … यापूर्वी कधीही जसे (छान) वाटलेले नव्हते असे कांही तरी आता वाटणार आहे असे ज्या वेळी वाटते त्या वेळची भावना
ECSTASY: A feeling when you feel you are going to feel a feeling you have never felt before

दर्जेदार पुस्तक …. लोक ज्याची तोंडभर प्रशंसा करतात पण स्वतः कधीही वाचत नाहीत असे पुस्तक
CLASSIC: A book which people praise, but never read

स्मितरेषा … खूप गोष्टींना सुतासारख्या सरळ करून देऊ शकणारी वक्ररेषा
SMILE:A curve that can set a lot of things straight!

इत्यादि ….. तुम्हाला प्रत्यक्षात जेवढी माहित असेल त्याहून अधिक आहे असे इतरांना वाटायला लावणारा शब्द
ETC: A sign to make others believe that you know more than you actually do

समिती … जे लोक एकेकट्याने कांहीच करू शकत नाहीत आणि कांहीही करता येणे शक्यच नाही असे ठरवण्यासाठी जे एकत्र येतात अशा लोकांचा जमाव
COMMITTEE: Individuals who can do nothing individually and sit to decide that nothing can be done together

अनुभव … आपण केलेल्या चुकांना माणसांनी दिलेले गोंडस नांव
EXPERIENCE: The name men give to their Mistakes

अणुबाँब … सर्व शोधांचा अंत घडवून आणण्यासाठी लावलेला शोध
ATOM BOMB: An invention to bring an end to all inventions

कार्यालय … घरातल्या कामाने थकून भागून जिथे गेल्यावर जिथे गेल्यावर तुम्ही निवांतपणे आराम करू शकता अशी जागा
OFFICE: A place where you can relax after your strenuous home life

जांभई … विवाहित पुरुषांना मिळणारी तोंड उघडण्याची एकमेव संधी
YAWN: The only time when some married men ever get to open their mouth

तत्ववेत्ता … आपल्या मृत्यूनंतर इतरांनी आपल्याविषयी बोलावे यासाठी हा वेडा आयुष्यभर स्वतःलाच छळत असतो
PHILOSOPHER: A fool who torments himself during life, to be spoken of when dead

मुत्सद्दी … हा माणूस तुम्हाला अशा खुबीने नरकात जायला सांगतो की तुम्ही आतुर होऊन त्या यात्रेची वाट पहायला लागता.
DIPLOMAT: A person who tells you to go to hell in such a way that you actually look forward to the trip

संधीसाधू … असा माणूस जो अपघाताने नदीत पडला तरी लगेच आपल्या स्नानाला सुरूवात करतो.
OPPORTUNIST: A person who starts taking bath if he accidentally falls into a river

आशावादी … असा माणूस जो आयफेल टॉवरवरून खाली पडत असतांनासुध्दा वाटेत स्वतःला सांगतो, “बघ, मी अजून जखमी झालेलो नाही.”
OPTIMIST: A person who while falling from EIFFEL TOWER says in midway “SEE I AM NOT INJURED YET!”

निराशावादी … य हे अक्षर यश या शब्दाचे पहिले अक्षर आहे असे न म्हणता तो शून्य या अक्षरामधला शेवटचा भाग आहे असे म्हणतो
PESSIMIST: A person who says that O is the last letter in ZERO, Instead of the first letter in OPPORTUNITY

कंजूस, चिक्कू …. श्रीमंत होऊन मरण्यासाठी जो दारिद्र्यात जगतो
MISER: A person who lives poor so that he can die RICH!

बाप … निसर्गाने दिलेला कर्जदाता
FATHER: A banker provided by nature

गुन्हेगार … पकडला गेला नाही तर अगदी इतरांसारखाच
CRIMINAL: A guy no different from the other, unless he gets caught

वरिष्ठ अधिकारी (बॉस) … तुम्हाला उशीर होतो तेंव्हा लवकर येणारा आणि तुन्ही लवकर गेलात तर स्वतः उशीरा येणारा
BOSS: Someone who is early when you are late and late when you are early

राजकारणी … जो निवडणुकीपूर्वी तुमचा हात हातात घेऊन हलवतो आणि त्यानंतर तुमच्या आत्मविश्वासाला हलवतो
POLITICIAN: One who shakes your hand before elections and your Confidence Later

डॉक्टर … जो औषधाच्या गोळ्यांनी तुमच्या रोगाला खतम करतो आणि बिलाने तुम्हाला
DOCTOR: A person who kills your ills by pills, and kills you by bills

संकलन : दि.२३-०४-२००९

………..

आणखी काही नव्या व्याख्या

शाळा … पालकांच्या खर्चाने जिथे मुले खेळतात
School : A place where Parents pay and children play

आयुर्विमा … तुम्ही श्रीमंत अवस्थेत मरावे यासाठी आयुष्यभर तुम्हाला गरीबीत ठेवणारा अनुबंध
Life Insurance : A contract that keeps you poor all your life so that you can die Rich.

नर्स … तुम्हाला जागे करून झोपेच्या गोळ्या खायला देणारी
Nurse: A person who wakes u up to give you sleeping pills.

व्याख्यान … व्याख्यात्याच्या टिपणातली माहिती कोणाच्याही मस्तकात न शिरता विद्यार्थ्यांच्या वहीत पोचवण्याची कला.
Lecture : An art of transferring information from the notes of the Lecturer to the notes of the students without passing through “the minds of either”

संमेलन … एका माणसाच्या मनातल्या गोंधळाला सदस्यांच्या संख्येने होणारा गुणाकार
Conference : The confusion of one man multiplied by the number present.

पिता … निसर्गाने निर्माण केलेला बँकर
Father : A banker provided by nature

साहेब … जेंव्हा तुम्हाला उशीर होतो तेंव्हा जो लवकर येतो आणि तुम्ही लवकर आलात तर जो उशीरा येतो असा माणूस
Boss : Someone who is early when you are late and late when you are early

दर्जेदार साहित्य … ज्याची सर्वजण स्तुती करतात, पण जे कोणीच वाचत नाही.
Classic : Books, which people praise, but do not read.

स्मितहास्य … अनेक गोष्टींना सरळ करणारी वक्ररेषा
Smile : A curve that can set a lot of things straight.

वगैरे … तुम्हाला खरोखर जेवढे ठाऊक असेव त्यापेक्षा जास्त माहिती आहे असे इतरांना भासवण्याचे चिन्ह
Etc. : A sign to make others believe that you know more than you actually do.

तत्वज्ञ … शहाणे होण्यासाठी आयुष्यभर स्वतःला छळणारा मूर्ख
Philosopher : A fool who torments himself during life, to be wise
————————————–

काही शब्दांच्या व्याख्यांची उदाहरणे

१.श्रध्दाः सर्व गावकऱ्यांनी पावसासाठी देवाकडे प्रार्थना करायचे ठरवले, पण फक्त एक मुलगा छत्री घेऊन आला.

विश्वास २
२. विश्वासः लहान बाळाला हवेत उडवले तर ते हसते, कारण तुम्ही त्याला झेलालच असा त्याला विश्वास असतो.

विश्वास १
३. आशाः रात्री झोपायला जातांना आपण दुसरे दिवशी सकाळी जीवंत असणारच याची शाश्वती नसते, तरीही आपण घड्याळात गजर लावतो.
४. आत्मविश्वासः भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची आपल्याला सुतराम कल्पना नसते, तरीही आपण योजना आखतो.

विश्वास ३
५. फाजील आत्मविश्वासः सगळे जग वैतागलेले स्पष्ट दिसत असते, तरीही आपण लग्न करतो.

विश्वास ४

NICE LITTLE STORIES.
1.Once, all villagers decided to pray for rain, on the day of prayer all the People gathered but only one boy came with an umbrella.
THAT’S FAITH!
. . . . .
2. When you throw a baby in the air, she laughs because she knows you will catch her.
THAT’S TRUST!
. . . . .
3.Every night we go to bed, without any assurance of being alive the next
Morning but still we set the alarms to wake us up.
THAT’S HOPE!
. . . . .
4. We plan big things for tomorrow inspite of zero knowledge of the future.
THAT’S CONFIDENCE!
. . . . .
5. We see the world suffering.
But still we get married?
THAT’S OVER CONFIDENCE!!

संकलन : दि.२२-०१-२०१३
—————————————————————

मीठी की मिठी

बायको : ए, सांग ना
मिठीतली ‘मी’ पहिली की दुसरी..?

नवरा : अॅ..? आता हे काय..?
बायको : अरे सांग ना पहिली की दुसरी..?

अनेक चेहरे डोळ्यासमोर येत होते
चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ लपवता येत नव्हता
बायको : अरे लवकर सांग,

नवरा : तुला का ते जाणून घ्यायचंय..? कोणाचा तरी भूतकाळ उकरून काढण्याची ही वेळ आहे का..?

बायको : अरे लेख लिहितेय मी,
‘मिठी’ की ‘मीठी’ लिहू..?
माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे. You know ना, माझ्या किती चूका होतात. म्हणून विचारलं मिठीतली मी पहिली की दुसरी…!

नवरा मरता मरता वाचला

वॉट्सअॅपवरून साभार

😆😆😂😂😂🤣🤣

मासा आणि माशी

मासा आणि माशी यांचा परस्पर काही संबंध नाही- पण शब्दांची गम्मत अशी की माशाला स्रीलिंग नाही (मासाला  असे न म्हणता माशाला कां म्हणतात?)  आणि माशीला पुल्लिंग नाहीं! …. (पहायला गेले तर मासोळी असा एक स्त्रीलिंगी शब्द आहे.)
त्यातही गम्मत अशी की हे दोघंही कोळ्याच्या जाळ्यात अडकतात. पण त्या दोन्ही ‘कोळ्यां’चा एकमेकांशी काही संबंध नाही! … आणि त्यांच्या जाळ्यांचाही.

…………………………………………………………

कसं असतं पहा …….

बदलते ते वय
बदलत नाही ती सवय

भावतो तो भाव
भोवतो तो स्वभाव

अविचल असतो तो श्रीरंग
सतत बदलतो तेव्हा होतो बेरंग

वहात जाते ती लय
वहावत नेतो तो प्रलय

आनंदाचा शोध असते जगणं
आनंदच दुरावतं ते वागणं

स्वेच्छेने करतो ते अर्पण
उपेक्षा करतो तो दर्पण

ती/तो येता उठती ते तरंग
ती/तो नसता कण्हते ते अंतरंग

अकस्मात् जडते ते प्रेम
पुरून उरते ते दृढ सप्रेम!

वॉट्सअॅपवरून साभार


मराठीही फारशी सोपी नाही..!!👍👍

१. म्हणे “शिरा” खाल्ल्याने “शिरा” आखडतात.

२. “काढा” पिऊन मग एक झोप “काढा”.

३. “हार” झाली की “हार” मिळत नाही.

४. एक “खार” सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर “खार” खाऊन आहे.

५. “पळ” भर थांब, मग पळायचे तिथे “पळ”.

६. “पालक” सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात मेथी, “पालक” इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.

७. “दर” वर्षी काय रे “दर” वाढवता..??

८. “भाव” खाऊ नकोस, खराखरा “भाव” बोल.

९. नारळाचा “चव” पिळून घेतला तर त्याला काही “चव” राहत नाही.

१०. त्याने “सही” ची अगदी “सही* *सही” नक्कल केली.

११. “वर” पक्षाची खोली “वर” आहे.

१२. खोबर्‍यातला मुलांचा “वाटा” देऊन मग बाकीच्याची चटणी “वाटा”.

१३. “विधान” सभेतील मंत्र्यांचे “विधान” चांगलेच गाजले.

१४. फाटलेला शर्ट “शिवत” नाही तोपर्यंत मी त्याला “शिवत” नाही.

१५. भटजी म्हणाले, “करा” हातात घेऊन विधी सुरू “करा”.

१६. धार्मिक “विधी” करायला कोणताही “विधी” निषेध नसावा.

१७. अभियंता मला म्हणाला, इथे “बांध* *बांध”

१८. उधळलेला “वळू” थबकला, मनात म्हणाला, इकडे “वळू” कि तिकडे “वळू”.

१९. कामासाठी भिजवलेली “वाळू” उन्हाने “वाळू” लागली.

२०. दरवर्षी नवा प्राणी “पाळत” मी निसर्गाशी बांधिलकी “पाळत” असतो.

२१. फुलांच्या “माळा” केसांत “माळा”.

: मराठीची अवखळ वळणे….

ज्यांना तोंडावर “बोलून टाकणं” जमत नाही ते पाठीमागे “टाकून बोलत” राहतात.
.
शहाणा माणूस “पाहून हसतो”, निर्मळ माणूस “हसून पाहतो”.
.
काम सोपं असेल तर ते आपण “करून पाहतो”, अवघड असेल तर “पाहून करतो”.
.
स्वयंस्फूर्त लेखक आणि उचलेगिरी करणारा उचल्या ह्यांच्यात फारसा फरक नसतो….

एकजण “लिहून बघतो” तर दुसरा “बघून लिहितो”.
.
ही अशी सुंदर, लवचीक, अवखळ मराठी आणि आपणच तिची पायमल्ली करत असतो, नाही का? आता हेच बघा ना,

एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ, तर हकालपट्टी करताना देतो नारळ!!

😆😆😂😂    वॉट्सअॅपवरून साभार  😂🤣🤣

दोन अर्थ – एक शब्द

मराठी भाषेत एकाच शब्दाचे दोन भिन्न अर्थ थक्क करून सोडतात याची आणखी काही उदाहरणे

१ संताप, संगीत प्रकार – राग
२ पायताण, विद्युलता – चपला
३ ज्येष्ठ बंधू, गावगुंड    – दादा
४ कागदाचा, कापडाचा शत्रू, कमतरता  – कसर
५ मांडी, गणित    – अंक
६ फसवणूक, मंतरलेला दोरा  – गंडा
७ पुलंचा हातखंडा, एक संख्या  – कोटी
८ देवांचे जेवण, ग्रहदशा  – भोग
९ अनेक रहिवासी असलेली इमारत, पैंजण  – चाळ
१० एक अवयव, प्रतिष्ठा  – मान
११ दानवांचे पेय, मानेवरून फिरवल्यास मरण नक्की  – सुरा
१२ परिमल, मुक्काम – वास
१३ चतकोर, वड्याचा साथीदार – पाव
१४ प्रकाश देणारी, मुलीच्या मुलीची मुलगी  – पणती
१५ सन, फळाचे आवरण  –  साल
१६ वित्त, आशय  –  अर्थ
१७ जन्मदाते, पालेभाजी  –  पालक
१८ पराजय, गळयातील माळ  – हार
१९ बोलता न येणारा, बाळाची पापी  – मुका
२० वैद्याचा स्टेथोस्कोप, सलवारीची सोबतीण – नाडी


➰〰➿〰➰    ळ ची गंमत  ➰〰➿〰➰

‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी…!!! (हे तितकेसे खरे नाही, गुजराथी आणि दक्षिणेकडील सर्व भाषांमध्ये ळ हे अक्षर असते)

आणि म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे!

‘ळ’ अक्षर नसेल तर

पळणार कसे
वळणार कसे
तंबाखू मळणार कसे
दुसर्‍यावर जळणार कसे
भजी तळणार कशी
सौंदर्यावर भाळणार कसे

पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी

तीळगूळ कसा खाणार ?
टाळे कसे लावणार ?
बाळाला वाळे कसे घालणार
खुळखुळा कसा देणार
घड्याळ नाही तर
सकाळी डोळे कसे उघडणार ?
घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार
वेळ पाळणार कशी ?
मने जुळणार कशी ?
खिळे कोण ठोकणार ?

तळे भरणार कसे ?
नदी सागरला मिळणार कशी ?
मनातली जखम भळाभळा वाहणार कशी
हिवाळा,उन्हाळा, पावसाळा
नाही उन्हाच्या झळा
नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा !

कळी कशी खुलणार ?
गालाला खळी कशी पडणार ?
फळा, शाळा मैत्रिणींच्या
गळ्यात गळा
सगळे सारखे, कोण निराळा?

दिवाळी, होळी सणाचे काय ?
कडबोळी,पुरणपोळी
ओवाळणी पण नाही ?

तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ?

भोळा सांब ,
सावळा श्याम
जपमाळ नसेल तर
कुठून रामनाम ?

मातीची ढेकळे नांगरणार कोण?
ढवळे पवळे बैल जोततील कोण?
पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ?

निळे आकाश,
पिवळा चाफा
माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा !

नारळ, केळ, जांभूळ, आवळा,

नवर्‍याला बावळट बोलणार कसे

काळा कावळा,
पांढरा बगळा

ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा

अळी मिळी गुपचिळी,
बसेल कशी दांतखिळी?

नाही भेळ,
नाही मिसळ
नाही जळजळ
नाही मळमळ
नाही तारुण्याची सळसळ

पोळ्या लाटल्या जाणार नाहीत
टाळ्या आता वाजणार नाहीत !
जुळी तीळी होणार नाहीत !
बाळंतविडे बनणार नाहीत !
तळमळ कळकळ वाटणार नाही !
काळजी कसलीच उरणार नाही !

पाठबळ कुणाचे मिळणार नाही
सगळेच बळ निघून जाईल,

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

पण काहीच कळेनासे होईल ‘ळ’ शिवाय !
ळ अक्षराची माहिती सांगणारा लेख 👌
ज्याने कोणी लिहिले आहे सुंदर आहे.

वॉट्सअॅपवरून साभार

————————————

ळ या अक्षराचा उपयोग करून ग दि माडगूळकरांनी लिहिलेले हे अजरामर गीत

घननीळा, लडिवाळा
झुलवु नको हिंदोळा !

सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्‍याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा !

सांजवेळ ही, आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कलिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा !


• 🌹 स्त्रीचा पदर 🌹••

👉🏻 पदर काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द.

पण केवढं विश्‍व सामावलेलं आहे त्यात….!!

किती अर्थ, किती महत्त्व…  काय आहे हा पदर…….?

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खाद्यावर रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा भाग…….!!

तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण,
आणखी ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो.

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल, ते सांगताच येत नाही.

सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. …..!!

लहान मूल आणि आईचा पदर, हे अजब नातं आहे. मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन अमृत प्राशन करण्याचा हक्क बजावतं. …..!!

जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा पदर पुढे करते ….

मूल अजून मोठं झालं, शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चाल-ताना आईच्या पदराचाच आधार लागतो.
एवढंच काय, जेवण झाल्यावर हात धुतला, की टाॅवेल ऐवजी आईचा पदरच शोधतं आणी आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात मुलानं पदराला नाक जरी पुसलं, तरी ती रागावत नाही …

त्याला बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो…..!!

महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या वरून मागे सोडला जातो…..!!

तर गुजरात, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या. पिसाऱ्यासारखा फुलतो ….!!

काही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात ..
तर काही जणी आपला लटका राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !

सौभाग्यवतीची ओटी भरायची ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं वाण लुटायचं ते पदर लावूनच.

बाहेर जाताना उन्हाची दाहकता थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब मिळते….!!

काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच गाठ बांधली जाते .
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबतच बांधली जाते…..!!

पदर हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना…..?

नवी. नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते, पण संसाराचा संसाराचा राडा दिसला, की पदर
कमरेला खोचून कामाला लागते

देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना …..?  माझ्या चुका ” पदरात ” घे.‘

मुलगी मोठी झाली, की आई तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन्‌ काय
म्हणते अगं, चालताना तू पडलीस तरी चालेल. ….!! पण, ” पदर ” पडू देऊ नकोस !
अशी आपली भारतीय संस्कृती.

अहो अशा सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा विनयभंग तर दुरच, ती रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे वर नजर करून साधे पाहणार ही नाहीत. उलटे तिला वाट देण्या साठी बाजुला सरकतील एवढी ताकत असते त्या “पदरात” ……. !!

देवाने दिलेलं दान ‘पदरात’ पडतं आणि एक म्हण आहे, ‘पदरी पडलं आणि पवित्र झालं.’

ही आहे आपली भारतीय संस्कृती

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

आई वेगळी आणि आईचा पदर वेगळा

खरं तर आईची ओळख झाली आणि
मग नऊ महिन्यांनी तिच्या पदरा ची ओळख झाली.

पाजताना तिनं पदर माझ्यावरून झाकला,
आणि मी आश्वस्त झालो…
तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला…
आणि मग तो भेटतच राहिला… आयुष्यभर…

शाळेच्या पहिल्या दिवशी तो रुमाल झाला,
उन्ह्याळात कधी तो टोपी झाला,
पावसात भिजून आल्यावर तो टॉवेल झाला,
खावून घाईत खेळायला पळताना तो नँप्कीन झाला,
प्रवासात तो कधी शाल झाला…

बाजारात भर गर्दीत कधी आई दिसायची नाही
पण पदराच टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचो…
त्या गर्दीत तो माझा दीपस्तंभ झाला
गरम दूध ओतताना तो चिमटा झाला
उन्हाळयात लाईट गेल्यावर तो फँन झाला

निकालाच्या दिवशी तो पदर माझी ढाल व्हायचा
बाबा घरी आल्यावर,
चहा पाणी झाल्यावर,
तो पदरच प्रस्ताव करायचा….
छोटूचा रिझल्ट लागला…
चांगले मार्क पडले आहेत
एक-दोन विषयात कमी आहेत
पण आता अभ्यास करीन अस तो म्हणलाय..
बाबांच्या सु-याची सुरी होताना
मी पदराच्या आडून पाहायचो
हाताच्या मुठीत पदराच टोक घट्ट धरून…. ! ! !

त्या पदरानेच मला शिकवलं
कधी-काय अन कस बोलावं

तरुणपणी पदर जेव्हा बोटाभोवती घट्ट गुंडाळला
त्याची खेच बघून तिसऱ्या वेळी आईने विचारलंच,
“कोण आहे ती…नाव काय??”
लाजायलाही मला पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला

रात्री पार्टी करून आल्यावर… जिन्यात पाऊल वाजताच
दार न वाजवताच…
पदरानेच उघडलं दार
कडी भोवती फडकं बनून…
कडीचा आवाज दाबून
त्या दबलेल्या आवाजानेच दिली शिकवण नैतिकतेची

पदराकडूनच शिकलो सहजता
पदराकडूनच शिकलो सौजन्य
पदराकडूनच शिकलो सात्विकता
पदराकडूनच शिकलो सभ्यता
पदराकडूनच शिकलो सहिष्णुता
पदराकडूनच शिकलो सजगता

काळाच्या ओघात असेल, अनुकरणाच्या सोसात असेल
किंवा
स्वतःच्या शोधात असेल,
साडी गेली… ड्रेस आला… टाँप आला… पँन्ट आली… स्कर्ट आला… छोटा होत गेला

प्रश्न त्याचा नाहीच आहे…
प्रश्न आहे तो,
आक्रसत जाऊन गायब होऊ घातलेल्या पदराचा…

खरं तर सदऱ्यालाही फुटायला हवा होता पदर

….(Forwarded)

 . . . .  . . . . . .  . वॉट्सअॅपवरून साभार . . . . .  दि.०८-०८-२०१९

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

 गंमत ४ ची

1) औषधोप४
२) मानसोप४
3) प्रथमोप४

1) समोप४
2) पाहुण४
3) सदवि४
4) दूरवि४

1) सं४
2) वि४
3) आ४
4) प्र४
5) ला४

1) सदा४
2) समा४
3) शिष्टा४
4) भ्रष्टा४
5) अत्या४
6) सुवि४
7) उप४
8) अवि४
9) कुवि४
10) हिंसा४

‘चार’ची गाथा…
थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !

चारची खरी बाजू ‘ चार ‘ दिशेत आहे !

‘ चार ‘ खांबांशिवाय घर बांधता येत नाही.

‘ चार ‘ गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.

‘ चार ‘ चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ‘ चार ‘ बोटे उमटल्या शिवाय राहत नाहीत.

‘ चार ‘ शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ‘ चार ‘ आवाज काढण्या सारखेच असते.

चौघे म्हणजे जणू ‘ चार ‘ वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.

‘ चार ‘चा ‘वर्ग’ केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.

“चार”च्या ‘वर्गा’स पुन्हा “चार”ने गुणले की जगातल्या सर्वात ‘बुद्धि’मान खेळातले चौसष्ट घरांचे ‘बळ’ मिळते !

यांची टीका ही ‘ चौफेर ‘ असते.
यांचे फटके म्हणजे ‘ चौकार ‘ असतात !

चारचे सामर्थ्य देवीच्या ‘ चार ‘ भुजांसारखे असते अन पावित्र गाईच्या ‘ चार ‘ पावलांसारखे असते…

ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ‘ चार ‘ परस खोल असावीच लागते.

‘ चार ‘ वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.

‘ चार ‘ पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !

जगातल्या ‘ चौघां ‘चेही असेच असते. यांनी ‘ चार ‘ शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.

अन ‘ चार ‘ गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.

ज्या घरात आपण राहतो तेदेखील ‘ चौसोपी ‘ असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !

चौसोपी घराबाहेर ‘ चारचाकी ‘ असली की शान अधिक वाढते !

‘ चार ‘चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.

‘ चार ‘ लोकांपासून ‘ चार ‘ हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !

युगे देखील ” चार “झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ‘ चौघां ‘चा महिमा जाणावा.

स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ‘ सारेगम ‘ कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !

आपल्या जीवनाचे आधार देखील ‘ चार ‘च आहेत – दोन हात अन दोन पाय !
लीप वर्ष देखील ‘ चार ‘ वर्षानी येते !

जमीन सुद्धा ‘ चौरस ‘च शुभ समजली जाते.

माणूस हुशार झाला की त्याला ‘ चौकस ‘ बुद्धीचा समजलं जातं …

चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !

‘ चार ‘ ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.

‘ चार ‘ कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.

‘ चार ‘ संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.

‘ चार ‘ घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.

‘ चार ‘ घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.

‘ चार ‘ वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.

‘ चार ‘ पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.

मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ‘ चौ ‘घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!

‘ चार ‘ वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ ‘चौकडी’ होते.

‘ चार ‘ चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.

इतकेच कशाला चितेवर ‘ चार ‘ लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.

‘ चौघां ‘च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.

आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ‘ चार ‘ फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !

सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
‘ चार ‘ मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!


बारा ची बहादुरी

1⃣2⃣⬅अंकाची बहाद्दुरी➡1⃣2⃣

१२    हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक.

मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.
आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्ष १२ महिन्यांचे.

आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात. बारावा गुरू,शनि,मंगळ हानिकारक समजले जातात.
पूर्वी तपश्चर्या १२ वर्षे करीत, गुरूगृही अध्ययनही १२ वर्ष चाले.
घड्याळात आकडे बारा. पूर्ण दिवस जरी २४ तासांचा असला तरी आपण त्याचे १२/१२ तासांचे विभाजन केले आहे मध्यानपूर्व व मध्यान्हनंतर असे.पूर्वी रात्रीचे १२ वाजले म्हणजे मध्यरात्र झाली असे समजत.
एखादी गोष्ट संपली तिचा निकाल लागला म्हणजे बारा वाजले असे म्हणतात.

जिकडेतिकडे सकाळी भरलेला बाजार साधारण बारा वाजता उठतो त्यावेळी राहिला उरला सुरला माल स्वस्त दरात विकण्यात येतो म्हणून एखादी वस्तू कूचकिमतीला काढून टाकायची असेल तर ती १२ च्या भावात काढून टाका असा शब्दप्रयोग आहे.
पूर्वी १२ व्या वर्षी मुलींचे लग्न करत नसत.
आपल्याकडे पूर्वी १२ पयांचा एक आणा होत असे
इंग्लंडमधे १२ पेन्सचा १ शिलींग.
नवीन जन्मलेल्या अपत्याचे नामकरण १२ व्या दिवशी करतात त्याला बारसे म्हणण्याची पध्दत आहे
तसेच मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांनी करतात.
१२बलुतेदार, बारभाई, बारावाटा, बाराबंगले इ.शब्दप्रयोग अर्थपूर्ण आहेत.
एखाद्या अनुभवी बेरकी माणसाला १२ गावचं पाणी प्यायलेला आहे असं म्हणतात.

तसेच न ऐकणाऱ्या रगेल दांडगट स्वभावाच्या व्यक्तीलाही ‘ काय बाराचा आहे हा!’ असा शब्दप्रयोग वापरतात.
१२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत.
मराठी भाषेच्या वर्णमालेत स्वर १२ आहेत त्यावरूनच बाराखडी म्हणण्यात येते.
१२ गावचा मुखिया.
जमिनीला ७/१२ चा उतारा लागतोच.

अशी ही १२ ची किमया…..

म्हणूनच
…..
पुण्याच्या वैशिष्टपूर्ण बेरकीपणासाठी RTO ने पुण्यास MH 12 हा नंबर बहाल केला आहे !
😀😀

दि. २२ -०२-२०१९


शब्दात शेवट “त्र” असलेले समानार्थी शब्द

1 सखा मित्र
2 लक्ष्मणाचे दुसरे नाव सौमित्र
3 अग्नी सतत प्रज्वलीत असणे अग्निहोत्र
4 सगळीकडे सर्वत्र
5 पंचगव्यातील एक गोमुत्र
6 महाभारतातील लढाई झाली ते ठिकाण कुरुक्षेत्र
7 अभ्यासक्रमातील 6 महिन्याचा काळ सत्र
8 मुलगा पुत्र
9 विद्यार्थी छात्र (हिंदीमध्ये)
10 कारस्थान षडयंत्र (हिंदीमध्ये)
11 केवळ / फक्त मात्र
12 गणितातील नियम सूत्र
13 डोळे नेत्र
14 नाटकातील कलाकार पात्र
15 श्लोक सूत्र
16 निशा रात्र
17 विज्ञान शास्त्र
18 तारे , ग्रह नक्षत्र
19 चालचलन चरित्र  (हिंदीमध्ये)
20 एक ऋषी अत्री
21 टपाल पत्र
22 कापड वस्त्र
23 पूर्वज /ऋषी कडून चालत आलेले कुळ गोत्र
24 धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र
25 हत्यार शस्त्र
26 सख्खे नसलेले सावत्र
27 विक्षिप्त विचित्र
28 शुभ / पावन पवित्र
29 सौभाग्यलेणे मंगळसूत्र
30 हजार सहस्त्र


ते हरवलेले जादुई शब्द

तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, तर आई/बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवुन म्हणायचे “काही झालं नाही, तो बघ उंदीर पळाला!” आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो.

किंवा ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई/बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे/वस्तूकडे डोळे वटारून म्हणायचे “हात् रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . .” आणि असं म्हंटल्यावर आपल्याला ही आनंद व्हायचा, वाटायचं कि आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो.

कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आई-बाबांना दाखवायला गेलो कि ते त्यावर ‘फूsss’ असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे “काही नाही. . . आता फू केलंय ना , मग बरं होईल हं ते.”

पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आई-बाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्द बोलणं बंद केलं आणि आपणही ते ऐकणं !

मोठं झाल्यावर वाटायला लागल हि काय बालिशपणा होता तो. . . अस फू करून कधी जखम बरी होते का?

पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला त्या शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते.

जखम ‘फू’ नी नाही बरी व्हायची . . . . तर त्या हळुवार ‘फू’ मधल्या प्रेम, माया आणि विश्वासाने बरी व्हायची.

खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा दंगा करायला तयार व्हायचो.

जसे मोठे झालो तसे आपण सो कॉल्ड ‘ओपन वर्ल्ड’ मध्ये आलो. कॉलेज, नोकरी, छोकरी, स्पर्धा, करियर, मान मरातब, पैसा या आणि अशा अनेक गोष्टीनमधें गुरफटत गेलो. रोज अनेक शारीरिक, मानसिक जखमा व्हायला लागल्या, अनेक गोष्टी खुपू लागल्या, धर्मवाद, जातीवाद, राजकारण, व्यसनं, भोंदूगिरी, गरीबी, गुंडगिरी, उच्शृंखलता, दहशतवाद जीवघेणी स्पर्धा लचके तोडायला लागली. . रोज नवी आव्हान समोर येऊ लागली . . . रोज नव नवीन कृत्रिम गरजांना बळी पडायला लागलो . . . . पण दुर्दैवाने या वेळी “काही झाला नाही, उंदीर पळाला!”, “हात् रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . .” असं करून त्या सर्व दुःखांकडे डोळे वटारून बघायला, “फू केलंय ना , मग बरं होईल हां ते” असं म्हणून त्या जखमांवर फुंकर मारायला कोणी कोणी नव्हतं.

ते जादुई शब्द हरवले होते आता . . . . कदाचित असते तर हे सारं घडलंच नसतं.

कितीही मोठे झालो तरी त्या ‘बालिश’ शब्दांचं मूल्य आता कळायला लागलं. . .

ते शब्द फक्त सांत्वन करणारे नव्हते तर सामर्थ्य देणारे होते. आपला दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे, आपल्या जखमा विसरून पुन्हा खेळायला लावणारे शब्द होते ते. वर वर पोरकट वाटणाऱ्या या शब्दांमध्ये प्रेम आणि विश्वास यांचं प्रचंड सामर्थ्य होतं.

कधीतरी वाटतं कि कितीही मोठं झालो आणि कितीही मोठं संकट आल, तरी जर का पुन्हा कोणी “. . . . उंदीर पळाला!”, “हात् रे. . . . ” “फू. . .” हे शब्द उच्चारले, तर सारी संकटं, सारी दुःखं पळून जातील त्या लहानपणीच्या अदृष्य उंदराप्रमाणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या नियतीशी दोन हात करायला, पुन्हा एकदा त्या ओपन वर्ल्ड मध्ये दंगा करायला आपण सज्ज होऊ. . . . .

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी त्या ‘फू sss’ ची गरज पडतेच. अगदी आई बाबांना सुद्धा . . . . . त्याला त्याच्या विश्वासू माणसाकडून मिळालेली ‘फू sss’ नवसंजीवनी देऊन जाते.

जाता जाता वि. वा. शिरवाडकर यांच्या कालातीत कवितेतील एक ओळ आठवते:

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा. . . “

– एक फूsssss सर्वांच्या संकटासाठी!!

दि.२६-०१-२०१९

🌷🌹💐🌺🌸

नवी भर दि. १९-०६-२०१९

शब्द एक, अर्थ अनेक : पान

बाल्कनीतल्या रोपांची ‘पानं’ मलूल झाल्यासारखी वाटल्याने मी पाणी फवारण्याच्या छोट्या बाटलीने हलकेच पाणी स्प्रे करत होते. ते पाहून हाॅलमध्ये समोरच पुस्तक उघडून बसलेल्या रोहिनने, माझ्या नातवाने, धसमुसळेपणानं पुस्तक बंद करून,
‘मीs, मी करणार’ म्हणत धाव घेतली.

“अरे, अरे! जर्रा सावकाश !! ‘पानं’ दुमडतील नं अशानं “

“आज्जी अगंss, मी ‘पानांना’ हात तरी कुठे लावलाय अजून “😲

“अरे, पुस्तकाची ‘पानं’ म्हणतेय मी ! किती घाई तुझी पुस्तक बंद करायची”

“ओह् !! म्हंजे पेजेस बद्दल म्हटलंस ! किती कन्फ्युझिंग आहे गं ! झाडाची ‘ पानं’ नि पुस्तकाची पण ‘पानं’च ?🤔”

“ अरे, ‘Leaf’ आणि ‘pages’ असे दोन वेगवेगळे शब्द वापरावे लागतात ते तुमच्या मिडियममध्ये.
आमचं पहा, एका शब्दात काम होतंय😃”

मराठीची प्रशंसा करायच्या संधीचा मी लाभ उठवला.

“अगं , काय चाललंय तुम्हा दोघांचं ? वाजले बघ किती ? ‘पानं’ नाही वाढलीस ती अजून ? दुपारी चारच्या सुमाराला माझे मामा-मामी यायचेत, लक्षात आहे नं?”

आजोबांच्या एण्ट्रीच्या वाक्याने रोहिनला खुदकन हसू आलं नि आणखी एका ‘पाना’ साठी टाळीच
मिळाली मला त्याच्याकडून !
इतक्या इंटरेस्टने ऐकतो नं रोहिन की, शब्दांची गंमत त्याला समजावतांना मला खूप गंमत वाटते. मग जेवतांना मी जाणूनबुजून म्हटलं,

“अहो, मामांना जेवणानंतर ‘पान’ लागतं हं ! तुम्ही त्याना आणायला जाल तेव्हा न विसरता तेवढं घेऊन या”

“आज्जी, जेवायच्या आधी ,यू सेड ‘पान’ वाढलंय नि आता आजोबांना म्हणतेयस, जेवणानंतर ‘पान’ लागतं !हे कोणतं पान ?सांग ना गं ! आणि आज गेस्ट येणारेत का आपल्याकडे ?”

“जेवणानंतरचं ‘पान’ म्हंजे एक प्रकारचं पान , विड्याचं पान असं म्हणतात त्याला ! पचनासाठी,
I mean digestion साठी त्या पानाचा उपयोग होतो. आणि अरे गेस्ट नाही ‘पणजी’ यायची आहे”

“पण ‘पणजी’ तर प्लेसचं नावै नं आज्जी ?”

“होs! म्हंजे तसं बरोबर आहे तुझं!पण, आजी म्हंजे ग्रॅंड मदर आणि ग्रेट ग्रॅंड मदर म्हंजे मराठीत पणजी अन् ग्रेट ग्रॅण्ड फादर म्हंजे पणजोबा”
रोहिनच्या प्रश्नांना उत्तरं देता देता एकीकडे किचनमधली झाकपाकही केव्हाच उरकली.

“चला आता थोडावेळ झोपायचं.
मीही तुझ्याबाजूला पडते नि पेपर चाळते जरा”

“विशेष काही नाहीये आज पेपरात
नाही म्हणायला संप मिटल्याची तेवढी बातमी आहे.पण संपकरयांच्या तोंडाला ‘पानं’च पुसलीयेत शेवटी”

आजोबांचं वाक्य कानावर पडलं मात्र नि लगेच रोहिनचा प्रश्न आला

“म्हंजेsss,आता ही कोणती ‘पानं’? पुसली का नि कोणी?😳
सांग ना गं आज्जी “

मग ‘तोंडाला पाने पुसणे’ ही एक phrase म्हंजे वाक्प्रचार असून , अर्थ आणि वापर कसा होतो हे सविस्तर सांगत असतांना रोहिनची expressions बघतांना मला मजाच वाटली.

“मामींसाठी साडी घेतलीयस ते माहितेय मला. मग मामांना काय ‘धोतराचं पान ‘ द्यायचं का ? रीतसर ‘मानपान’ करणं पाळणारया पिढीतली आहेत दोघं
म्हणून विचारतोय.”

“आज्जी, काय विचारलं आजोबांनी आत्ता ? Again ‘पान’,
तेही धोतराचं ?🤔धोतर मिन्स?आणखी ते ‘मानपान’ म्हणाले ते पान कसं अस्तं?”

रोहिनच्या कानावर आजोबांचे बोलणं पडताच त्याचे प्रश्न येणार ह्याचा अंदाज असल्याने मी सावध होतेच.🤓

“अरे, धोतर म्हंजे पणजोबांचं काॅटन आऊटफिट असतं. त्याला धोतराचं पान असं म्हणायची पध्दत आहे.”

“आज्जी, काॅटन आऊटफिटला तुम्ही ‘पान’ म्हणता ? 😲आणि दसरयाच्या दिवशी, काय ते नाव सांगितलं होतंस ? हां, आठवलं, त्या आपट्याच्या ‘पाना’ला , “सोनं” म्हणायचं असं सांगितलं होतंस”

“मग ? आहे की नाही मराठी इंटरेस्टिंग नि गंमतीशीर ?”😃

“हुं, आज्जी ,पण एवढे सगळे मिनिंग्ज ऐकतांना मी दमलोय आता. आणि इनफ आॅफ दॅट ‘पान’ फाॅर मी☺”

असं म्हणून स्वारीने आवडती दुलई घेऊन भिंतीकडे तोंड वळवलं सुध्दा !

“काल फोनवर बोलतांना , ‘पिकली पानं’झालोयत आता, भेटायचं मनात आलं की लगेच बेत अंमलात आणायचा’ असं मामा म्हणाले खरं पण आवाजाची धार कायम होती.”

“हो का ? तशा तब्येती व्यवस्थित आहेत दोघांच्या पण वयाची पंचाऐशी पार केल्यानंतर , ‘कोणास ठाऊक पुढे ‘पानात ‘ काय वाढून ठेवलंय?’ टाईपचे विचार येणं स्वाभाविकच आहे , नाही का ?”

माझी प्रतिक्रिया गेली ह्यांच्या बोलण्यावर नि बोलण्याच्या ओघात पुन्हा पुन्हा झालेला ‘पान-उल्लेख’ ध्यानात आल्याने मी सावध होऊन रोहिनने नुसतेच डोळे मिटलेयत की कसं ? हे चेक करून घेतलं.😊

त्याला शांत झोप लागलेय हे ध्यानात आल्यावर मग ‘पान’ हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे रोहिनपर्यंत पोचवल्याच्या समाधानात कुशीवर वळले, अर्थातच त्या विषयाचं
‘पान’ उलटून !!😃

© अनुजा बर्वे.

हा लेख इथे संग्रहित करण्यासाठी अनुमति द्यावी अशी अनुजाताईंना विनंति

…….  वॉट्स अॅपवरून साभार  दि. १९-०६-२०१९

—————————————-

मराठीतली खास विशेषणे

आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?

लुसलुशीत- पोळी/ पुरणपोळी
खुसखुशीत- करंजी
भुसभुशीत- जमीन
घसघशीत- भरपूर
रसरशीत- रसाने भरलेले
ठसठशीत- मोठे
कुरकुरीत- चकली, कांदा भजी
चुरचुरीत- अळूवडी
झणझणीत- पिठले, वांग्याची भाजी
सणसणीत- मोठया आकाराची पोळी, भाकरी, पराठा
ढणढणीत- मोठ्या आवाजात लावलेले संगीत
ठणठणीत- तब्येत
दणदणीत- भरपूर
चुणचुणीत- हुशार
टुणटुणीत- तब्येत
चमचमीत- पोहे, मिसळ
दमदमीत- भरपूर नाश्ता
खमखमीत- मसालेदार
झगझगीत- प्रखर
झगमगीत- दिवे
खणखणीत- चोख
रखरखीत- ऊन
चटमटीत/ चटपटीत- खारे शंकरपाळे, भेळ
खुटखुटीत- भाकरी/ दशमी
चरचरीत- अळूची खाजरी पाने
गरगरीत- गोल लाडू
चकचकीत- चमकणारी गोष्ट
गुटगुटीत- सुदृढ बालक
सुटसुटीत- मोकळे
तुकतुकीत- कांती
बटबटीत- मोठे डिझाइन
पचपचीत- पाणीदार
खरखरीत- रफ
खरमरीत- पत्र
तरतरीत- फ़्रेश
सरसरीत/सरबरीत- भज्यांचे पीठ
करकरीत- सफरचंद, पेरूच्या फोडी
झिरझिरीत- पारदर्शक
फडफडीत- मोकळा भात
शिडशिडीत- बारीक
मिळमिळीत- कमी तिखट मसाला असलेला पदार्थ
गिळगिळीत- मऊ लापशी
बुळबुळीत- ओलसर चिकट वस्तूचा स्पर्श
झुळझुळीत- साडी
कुळकुळीत- काळा रंग
तुळतुळीत- टक्कल
जळजळीत- टिळकांचे अग्रलेख
टळटळीत- दुपारचे रणरणते ऊन
ढळढळीत- सत्य
डळमळीत- पक्के नसलेले
गुळगुळीत- स्मूथ
गुळमुळीत- स्पष्ट न बोलणे
कडकडीत- अतिशय गरम
सुळसुळीट- सैल (कपडे)
टकटकीत- फ्रेश
गुबगुबीत- अंगाने भरलेला/ली
घमघमीत- भज्यांचा मस्त वास

ह्या शब्दांना इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा.

आहे जगातली इतर कोणती भाषा इतकी समृद्ध ?

…….  वॉट्स अॅपवरून साभार  दि.१९-०७-२०१९


पाऊल आणि पाय

पाऊल व पाय दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात; पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात..

पाऊल नाजूक ..व मुलायम.. तर पाय भक्कम अन् मजबूत असावा लागतो..!

पाऊलखुणा उमटतात तर पायांचे ठसे …!!

पाऊलवाटेवर कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते; पण पायवाट ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते..!

पाऊल जपून टाकायचे असते; पण पाय हा रोवायचा असतो.. !!

काय कमाल आहे बघा..
नावडत्या व्यक्तीच्या घरी “कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही” असे म्हणतो; पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र आपला पाय लवकर निघत नाही..!!☺

नको त्या ठिकाणी पाऊल घसरते तर बहारदार संगीत मैफिलीत पाय रेंगाळत राहतो !

पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते !

जीवनात किंवा व्यवसायात टाकलेले पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो तर येणार्‍या अनुभवांमुळे आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा इतरांसाठी केलेली पायपीट ही अटळ व गरजेची असते… …!

बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही……..
………..

जन्माला येताना स्वतःच्या पावलांनी न येणारे आपण ,…परत जातानादेखील आपल्या पायांनी मात्र जात नाही एवढंच काय ते दोघांत साम्य आहे…!

अभिजीत उपाध्ये.
९/१०/२०१९

…….  वॉट्स अॅपवरून साभार  दि.१७-१०-२०१९


नवी भर दि. ६-१-२०२०     कीकारान्ती शब्द

नमस्कार मंडळी. आज आपल्या साठी एक नवीन कोडे पाठवित आहे. थोडासा विचार केला तर सहजपणे सोडविता येईल. अट फक्त एकच ,शेवटचे अक्षर “की”असलेले शब्द शोधायचे आहेत.  (उत्तरे खाली दिली आहेत)

०१ दाराची बहीण
०२ मातीची भांडी
०३ कृष्णाची माता
०४ नवनागातील एक नाग
०५ एक कडधान्य
०६ छोटे लाकूड
०७ एक अलंकार
०८ एक काव्यप्रकार
०९ एक आजार
१० एक नाते
११ दोन बोटांनी केलेला आवाज
१२ छोटी पोळी
१३ रामपत्नी
१४ छोटे तालवाद्य
१५ नाकाचा अलंकार
१६ केवडा
१७ आखूड
१८ पाहिजे तेव्हढी
१९ चकचकीत
२० एक रंग
२१ शारीरिक आवेग
२२ केरळमधील धरण
२३ ३॥ पट
२४ संगीत वैशिष्ट्य
२५ दुफळी
२६ रंग उडालेली
२७ एका घाटाचे नांव
२८ ढोंगी
२९ नाचणारी
३० पतंगाची मदतनीस
३१ गुद्दा
३२ स्वतःभोवती फिरणे
३३ एक नदी
३४ अशुभ चेहरा
३५ मोडलेली
३६ आवडती
३७ लबाड
३८ निराधार
३९ भीती
४० दुरावा असलेली
४१ एक जुने नाणे
४२ क्षणिक झोप
४३ कापसाचे बी
४४ बडबडी
४५ एक ऋषी
४६ भावंडातील दुजाभाव
४७ एक विद्यापीठ
४८ कीड पडलेली
४९ एक छोटे तालवाद्य
५० पराक्रम
—————
उत्तरे
१. खिडकी
२. मडकी
३. देवकी
४. वासुकी
५. मटकी
६. काटकी
७. वाकी
८. साकी
९. पटकी
१०. काकी
११. चुटकी
१२. चांदकी
१३. जानकी
१४. टिमकी
१५. चमकी
१६. केतकी
१७. तोटकी
१८. मोजकी
१९.लकाकी
२०. खाकी
२१. उचकी
२२. इडुकी
२३. औटकी
२४. गायकी
२५. बेकी
२६. विटकी
२७. खंबाटकी
२८. नाटकी
२९. नर्तकी
३०. फिरकी
३१. बुक्की
३२. गिरकी
३३. गंडकी
३४. सुतकी
३५. मोडकी
३६. लाडकी
३७. बेरकी
३८. पोरकी
३९. धडकी
४०. परकी
४१. दिडकी
४२. चुटकी
४३. सरकी
४४. बोलकी
४५. वाल्मिकी
४६. भाऊबंदकी
४७. रुडकी
४८. किडकी
४९. ढोलकी
५०. मर्दुमकी

…….  वॉट्स अॅपवरून साभार  


मराठी भाषेत घुसलेले शब्द

चुकीच्या शब्दाचा एक वार, अनेक मराठी शब्दच ठार !

एकीकडे महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी ,’ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ‘ देण्याची मागणी, केंद्र सरकारकडे केली आहे. तर दुसरीकडे मराठीची सर्वत्र सर्रास चाललेली कत्तल आपण पाहतोय. बोलीभाषा ही कुणीही कशीही बोलावी पण प्रत्येक भाषेची एक लिखित ‘ प्रमाण भाषा ‘ ( शुद्ध किंवा अशुद्धपेक्षा ) म्हणून अधिकृत भाषा असते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजवर अन्य भाषांमधून अक्षरशः हजारो शब्द मराठीत आले, नात्यातले झाले, स्थिरावले आणि मराठीच झाले. सार्वत्रिक संगणकीकरणानंतर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वाढत्या वापराबरोबरच अपरिहार्यपणे अनेक इंग्रजी शब्दच थेट मराठीत आले आहेत. पण आज कित्येक शब्द हे धटींगण उपऱ्यांसारखे डोक्यावर बसत आहेत. उत्तमोत्तम मराठी शब्दांचे अनौरस पर्याय म्हणून येत आहेत. बोलणाऱ्यांना ( त्यात मराठी मातृभाषिक अधिक प्रमाणात आहेत ) योग्य मराठी शब्दच येत नाहीत किंवा ते बोलणे कमीपणाचे वाटते म्हणून ते अन्य भाषी शब्द घुसवत आहेत.

शब्दांचे टंकलेखन करतांना होणाऱ्या चुकांमुळे किंवा लिपी ( “फॉन्ट”) च उपलब्ध नसल्यामुळे महत्वाच्या मराठी वृत्तपत्रांमधून काही चुकीचे मराठी शब्द कायमचे रूढ झाले आहेत. उदा. उद्धाटन ( उद्घाटन ), करणार्या ( करणाऱ्या ) ! चुकीच्या शब्दावर अनुस्वार देण्याची विकृती तर अलीकडे फोफावतच चालली आहे. मुबंई, जवांनाची, राजंहस, उंदड, जगंल, जंगदबा असे लिहिलेले शब्द वाचताही येत नाहीत. अनेक हिंदी शब्द थेट आयात केल्यामुळे अनेक उत्तम छटा असलेले मराठी शब्द कालबाह्य ठरत आहेत. योगदान हा एकच शब्द वापरून पूर्वीचे हातभार, सहभाग, महत्वाचा वाटा, खारीचा वाटा, सिंहाचा वाटा हे प्रचलित शब्दच बाद झाले आहेत. आयाम या एका शब्दामुळे परिमाण, दिशा, छटा, खोली असे उत्तम शब्द बाद होत आहेत. यश ऐवजी यशस्विता, उपयोग ऐवजी उपयोगिता कधी आले ?

मराठी वृत्त वाहिन्या आणि मालिका वाहिन्या आपल्या मराठी भाषेचे ज्या वेगाने आणि जे वैविध्यपूर्ण धिंडवडे काढतायत, ते पाहिल्यावर या वाहिन्या मराठी भाषेच्या शववाहिन्या ठरणार काय अशी भीती वाटू लागली आहे. मूळचे उत्तमोत्तम मराठी शब्द असूनही हेराफेरी, पर्दाफाश, भांडाफोड, छेडछाड, तामझाम, करूयात / जाऊयात / पाहुयात, मोठा खुलासा ( गौप्यस्फोट ), हिरवी झेंडी दाखविली, जन्मदिवस ( वाढदिवस), प्रधानमंत्री ( पंतप्रधान ), रक्षामंत्री ( संरक्षण मंत्री), वित्तमंत्री (अर्थमंत्री) अशा एकाहून एक अगम्य / आगाऊ आणि भाडोत्री शब्दांनी ओसंडून वाहणारी मराठी भाषा सतत ऐकावी लागते. एखाद्या घटना स्थळावरून वार्ताहर जेव्हा, ” हा रस्ता जो आहे, ही झाडे जी आहेत, इथली माणसे जी आहेत, वाहने जी आहेत ” अशा मराठीत वर्णन करू लागतो तेव्हा आपणच अवाक होतो. काही मुख्य वाहिन्यांच्या निवेदकांना विदर्भ, विद्यार्थी, विद्यापीठ हे शब्द म्हणताच येत नाहीत. त्या ऐवजी ते अनुक्रमे विधर्ब, विध्यार्ती, विध्यापीट असे म्हणतात. अनेक निवेदक, स्पर्धात्मक कार्यक्रमांचे परीक्षक हे भयंकर मराठी बोलतात. देशभक्तीपर गीत ऐकून त्यांच्या “अंगावर काटा ” येतो. वास्तविक रोमांच उभे राहायला हवेत. प्रेमळ स्पर्शाने अंग मोहरून येते, भीतीच्या कल्पनेने अंग शहारून येते, भयंकर भीतीने सरसरून काटा येतो ! मग अशा विद्वान मंडळींचे मराठी, संपूर्ण मराठी भाषाच प्रदूषित करीत आहे. अशुद्ध, भ्रष्ट, भेसळयुक्त मराठीच्या महासागरात, नक्की योग्य काय हेच समजेनासे झाले आहे.

मराठी साहित्य संमेलने, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे प्रयत्न, राज्यभाषा पंधरवडा, मराठीतून कारभार करण्याचे नित्यनेमाने निघणारे सरकारी आदेश, महाराष्ट्रातच मराठी भाषा भवन उभारण्याच्या योजना…. सर्व काही खूप छान आहे. पण किमान प्रमाणित मराठी भाषा तरी आपण बोलायला, लिहायला हवीच ना !

( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा ).
***** मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com

फेसबुकावरून साभार दि.०७-०२-२०२०


आयुष्याबद्दल काय छान भाष्य आहे पहा

बदलते ते वय
बदलत नाही ती सवय

भावतो तो भाव
भोवतो तो स्वभाव

सतत बदलतो तो रंग
अविचल असतो तो श्रीरंग

समज वाढवते ती संगती
अतिसंगाने जाणवते ती विसंगती

आतून उमटतो तो सूर
भावनाहिन सूर तो भेसूर

वहात जाते ती लय
वहावत नेतो तो प्रलय

आनंदाचा शोध ते जगणं
आनंदहि दुरावतं ते वागणं

ती/तो येता उठती ते तरंग
ती/तो नसता कण्हते ते अंतरंग

ति/त्या च्यासह असते ते घर
ति/त्या च्या विणा उरते ती घरघर

🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹

स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी शब्द

आपल्या मराठीची एक गम्मत आहे. यात वस्तूंना नावं खूप सुंदर दिली आहेत. साधारणपणे मोठ्या वस्तूंना पुल्लिंगी आणि त्याच्याशी संबंधित लहान, नाजूक आणि हालचाल जास्त करणाऱ्या वस्तूंना स्त्रीलींगी नावं दिलेली आहेत. तसेच बहुतेक वेळा या वस्तू एकमेकांना पूरक आहेत.
बघा वाचून मजा येईल.😊🙏
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
जराशी गम्मत 😅
ती कैरी आंबट ,🥴
तो आंबा गोड 🥭🥭
ती चांदणी लुकलुकणारी ,✨
तो चंद्र तेजोमय 🌝
ती वेल नाजूक,🌿
तो वृक्ष मोठा 🌳
ती फांदी छोटीशी , 🌿
तो बुंधा जाड🌳
ती झुळूक सुखावणारी,
तो वारा सोसाट्याचा
ती माळ नाजुकशी,
तो हार मोठा.
ती साखळी नाजुकशी ,
तो साखळदंड जाडजूड
ती बांगडी नाजुकशी,
तो कडा जाड💫
ती कविता गोड ,🙂
तो धडा रटाळ 🙁
ती घागर , कळशी ,
तो माठ , रांजण, घडा आणि हंडा
ती सुरी ,
तो सुरा🍴
ती ओळ ,
तो परिच्छेद
ती नदी वाहणारी,
तो सागर अथांग🌊
ती झोपडी , माडी लहान🏕⛺
तो महाल , बंगला महान 🏠🏘
ती खिचडी साधीशी,
तो मसाले भात आणि पुलाव 🥘
ती मीटिंग, बैठक
तो परिसंवाद
ती खिडकी,
तो दरवाजा
ती टेकडी छोटीशी , 🗻
तो डोंगर भलामोठा⛰🌋
ती जखम लहान,
तो घाव मोठा
ती दोरी बारीकशी,
तो दोर जाडजूड
ती डबी छोटीसी ,
तो डबा मोठा
ती थाळी ,
तो थाळा
ती पोळी , भाकरी साधी,
तो मात्र पराठा आणि ब्रेड
ती सायकल , स्कुटी रिक्षा बस
तो ट्रक, रणगाडा प्रचंड
ती पाटी छोटी
तो फळा मोठा
ती वाटी ,
तो कुंडा

जीवनाचा पण हाच आहे का फंडा?

फेसबुकवरून साभार दि.०५-०७-२०२०


पोत

कापडाच्या स्पर्शाशी संबंधित असलेला हा शब्द हल्ली ऐकायलाही मिळत नाही फारसा. हल्ली सगळे
कापडाचा Feel घेतात. मात्र लहानपणी निरुपायाने आईबरोबर खरेदीला जावं लागलं की हा शब्द हमखास कानावर पडायचा. काल खादी भांडारात हा शब्द अचानक फिरुन समोर आला. एकदम वाटलं, अरे पोत फक्त कापडाला थोडाच असतो !

पोत आवाजालासुद्धा असतो की. लताजींच्या आवाजाला निर्मळतेचा पोत, मेहेंदी हसनच्या आवाजाचा
मखमली पोत, आमच्या संस्कृतच्या वैशंपायन सरांच्या आवाजाचा विद्वत्तेचा पोत, माझ्या आजीच्या आवाजाचा विशुद्ध मायेचा पोत.

….आवाजातला नम्रपणाच्या आच्छादनाखाली असलेला कणखर पोलादाचा पोत जाणवतो, तर काही जणांच्या खोट्या स्तुतिसुमनांच्या मागे दडलेला किळसवाण्या स्वार्थाचा पोत उघड असतो.

अगदी एकेकाच्या स्वभावालासुद्धा पोत असतो. देशस्थांच्या स्वभावाचा पोत घोंगडीसारखा असतो, जरा
खरखरीत पण ऊबदार. कोकणस्थांच्या स्वभावाचा पोत मात्र पार्‍यासारखा असतो, कितीही जवळ आलं तरी स्वतःचं अस्तित्व वेगळं टिकवून ठेवतो.

काही जणांच्या स्वभावाला सुरवंटाच्या केसांचा पोत असतो, जवळीक साधायचा प्रयत्न केला की कातडी सोलवटलीच पाहिजे.

अगदी माझ्याच स्वभावाला फणसाच्या सालीचा पोत आहे, दुखवत नाही पण फार जवळही येऊ देत नाही.
माझ्या बायकोच्या स्वभावाला मात्र निरांजनाच्या प्रकाशाचा पोत आहे, शांत, शीतल, प्रसंगी दाहक, पण
तरीही घर उजळून टाकणारा.

एकेका वयालासुद्धा निरनिराळा पोत असतो. बालपणाला सायसाखरेचा पोत असतो, पौगंडाला गुळगुळीत
कागदावरच्या देखण्या चित्राचा पोत असतो, जे हवंहवंसं वाटतं पण हाती गवसत नाही.
तारुण्याला फुलपाखराच्या पंखांचा पोत असतो, देखणं, सुंदर पण विस्कटून जायला तत्पर.
तिशी-पस्तिशीला पाचशे रुपयांच्या कोर्‍या करकरीत नोटेचा पोत असतो, तर पन्नाशीला धुऊन वापरून मऊ
झालेल्या सोलापुरी चादरीचा पोत असतो. साठीला मातीच्या मडक्याचा पोत असतो, दिसतं कणखर, पण
असतं हळवं. सत्तरीपुढे मात्र मिठाईवरच्या राजवर्खाचा पोत होतो, पाहताच मनात आदर निर्माण करणारा, मात्र काळजीपूर्वक हाताळायला हवं याचं भानदेखील देणारा.

बघता बघता किती तऱ्हेतऱ्हेचे पोत या पोतडीत गोळा झालेत नाही !

माणसांच्या मनाचा पोत हि लवकर समजत नाही🙏🏼

वॉट्सअॅपवरून साभार दि. २०-०९-२०२०

**********

नवी भर दि.०४-१२-२०२०

‘भेट’…

किती प्रगल्भ व्याप्ती आहे ‘भेट’ या शब्दाची !
खरंच, खूपच अर्थपूर्ण.

कोण? कुणाला? कुठे? केव्हा?
कशाला? ‘भेटेल’

आणि

का? ‘भेटणार नाही’

ह्याला ‘प्रारब्ध’ म्हणावं लागेल.

‘भेट’ ह्या शब्द संकल्पनेविषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन.

‘भेट’ कधी ‘थेट’ असते,
कधी ती ‘गळाभेट’ असते,
कधी ‘Meeting’ असते,
कधी नुसतंच ‘Greeting’ असते.

‘भेट’ कधी ‘वस्तू’ असते प्रेमाखातर दिलेली.
‘भेट’ कधी ‘देणगी’ असते कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली.

‘भेट’ कधी ‘धमकी’ असते…
‘बाहेर भेट’ म्हणून दटावलेली.
‘भेट’ कधी ‘उपरोधक’ असते…
‘वर भेटू नका’ म्हणून सुनावलेली.

‘भेट’ थोरा-मोठ्यांची असते,
इतिहासाच्या पानात मिरवते.
‘भेट’ दोन बाल-मित्रांची असते…
फार वर्षांनी भेटल्यावर,
पिकल्या केसांचा अंदाज घेत चाचपलेली.

‘भेट’ कधी अवघडलेली,
‘झक’ मारल्यासारखी.
‘भेट’ कधी मनमोकळी,
मनसोक्त मैफिल रंगवलेली.

‘भेट’ कधी गुलदस्त्यातली,
कट-कारस्थान रचण्यासाठी.
‘भेट’ कधी जाहीरपणे,
खुलं आव्हान देण्यासाठी.

‘भेट’ कधी पहिली- वहिली
पुढल्याची ओढ वाढवणारी
‘भेट’ कधी अखेरची ठरते.
मनाला चुटपूट लावून जाते.

‘भेट’ कधी अपुरी भासते,
…बरंच काही राहून गेल्यासारखी.
‘भेट’ कधी कंटाळवाणी,
घड्याळाकडे पाहून ढकलल्यासारखी.

‘भेट’ कधी चुकून घडते,
…पण आयुष्यभर पुरून उरते.
‘भेट’ कधी ‘संधी’ असते,
निसटून पुढे निघून जाते.

‘भेट’ कोवळ्या प्रेमिकांची.
लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर.
‘भेट’ घटस्फोटितांचीही असते.
…हक्क सांगण्यासाठी मुलांवर.

‘भेट’ एखादी आठवणीतली असते.
मस्त ‘Nostalgic’ करते.
‘भेट’ नकोशी भूतकाळातली.
…..सर्रकन अंगावर काटा आणते.

‘भेट’…
विधिलिखीत…काळाशी न टाळता येण्याजोगी !

‘भेट’…
कधीतरी आपलीच आपल्याशी.
अंतरातल्या स्वत:शी.
आयुष्याच्या नाजुक वळणापाशी.

…’पुन्हा भेटू

🙏🙏🙏
भेटी चे सगळे प्रकार दिसले … !
.
आता भेटावेसे वाटतेय ना …. !

वॉट्सअॅपवरून साभार दि. ०४-१२-२०२०

***

नवी भर दि.२४-०१-२०२१

⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️
माझी मराठी
सहज गंमत म्हणून……वाक्य डावीकडून उजवीकडे वाचा किंवा उजवीकडून डावीकडे वाचा…अक्षरे त्याच क्रमाने येतात.
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते जसे सरळ वाचताना…… तसा ऱ्हस्वदीर्घांमध्ये फरक आहे.
👇👇👇👇👇👇

१. चि मा का य का मा ची
२. भा ऊ त ळ्या त उ भा
३. रा मा ला भा ला मा रा
४. का का, वा च वा, का का
५. का का, वा ह वा ! का का
६. ती हो डी जा डी हो ती
७. तो क वी डा ल डा वि क तो
८. तो क वी मो मो वि क तो
९. तो क वी सा मो सा वि क तो
१०. तो क वी को को वि क तो
११. तो क वी ई शा ला शा ई वि क तो
१२. तो क वी री मा ला मा री वि क तो
१३. तो क वी वा मा ला मा वा वि क तो
१४. तो क वी व्ही टी ला टी व्ही वि क तो
१५. तो क वी वि की ला कि वी वि क तो
१६. तो क वी च हा च वि क तो
१७. तो क वी का वि क तो?
१८. तो क वी लि ली वि क तो
१९. तो क वी ऊ मा ला मा ऊ वि क तो
२०. तो क वी ठ मा ला मा ठ वि क तो
२१. तो क वी क णि क वि क तो
२२. तो क वी बे ड व ड बे वि क तो
२३. तो क वी ठ मी ला मी ठ वि क तो
२४. म रा ठी रा म
२५. तो क वी च क्का च वि क तो
२६. तो क वी हा च च हा वि क तो
२७. तो क वी रा शी ला शि रा वि क तो
२८. तो क वी टो मॅ टो वि क तो
२९. टे प आ णा आ प टे
३०. शि वा जी ल ढे ल जी वा शी.
३१. स र जा ता ना प्या ना ता जा र स.
३२. हा च तो च हा

वॉट्सअॅपवरून साभार दि.२८-०१-२०२१

ऋकार-काव्य !!!

ऋ आद्याक्षर शोधिता शब्द
माझी मीच झाले निःशब्द!
ऋ काराचे मोजकेच शब्द
करती मन शान्त स्तब्ध!
ऋ षी परम्परा आर्यावर्तात
असे प्राचीन प्रचलित !
ऋ ग्वेदमन्त्र गाती सूरात
श्रोते ऐकती शांत चित्त !
ऋ चा पठन एकामागून एक
सर्गामागुनी सर्ग अनेक !
ऋ ण मातेचे ते मातृ-ऋण
पित्याचे निर्व्याज पितृऋण !
ऋ ण हे फिटता नच फिटे
प्रयत्न सारे होती थिटे !
ऋ द्धी सिद्धी अन समृद्धी
होतसे आयुरारोग्य वृद्धी!
ऋ जुता असो निरंतर मनी
चित्तही असो समाधानी!
ऋ तूचक्र हे फिरते अविरत
जीवनाचे रंग नित बदलत!
ऋ तू वसंत येई शिशिरानंतर
घेऊन येतसे साथ बहार!
ऋ तूराजाची ऐट हा मिरवत
गातो राग बहार वसंत !
ऋ तूराज्ञी वर्षा करीआगमन
हर्षित तन मन सुमन !
ऋ तूचक्र फिरे सहा ऋतूंचे
सौन्दर्यअनुपम निसर्गाचे!
ऋ षभ असे हा सदा श्रेष्ठ
भरतर्षभ अर्जुन ही श्रेष्ठ!
ऋ षभ हा गातो मधुर गीत
अद्वितीय स्वर संगीतात !
ऋ त्विज् ही यज्ञ पुरोहित
शुभकार्यी यज्ञयाग करित!
ऋ चा अन वेदमन्त्र पठन
आहूती तथा होमहवन !
ऋ ष्यक असे एक हरिण
वेगवान सुंदर नयनबाण!
ऋ ष्यक हा चञ्चल चपल
व्याध करी त्यास घायाळ !
ऋ ऋषीचा असो ऋग्वेदाचा
स्वरअनमोल आयुष्याचा!
………. रेखा मोघे…..😊

वॉट्सअॅपवरून साभार दि.०८-०२-२०२१

**********

ज्यांना मराठीची मजा चाखता येते, त्यांच्यासाठी खास….

मजेदार प्रश्नमंजुषा..

बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतात कां?

१. पगाराला दोनने ‘गुणले’ तरी … ‘भागत’ का नाही?
२. लग्नाची ‘बेडी’ नक्की … कोणत्या गुन्ह्यासाठी ‘पडते’?
३. अक्कल ‘खाते’ … कोणत्या बँकेत ‘उघडता’ येते?
४. ‘भाऊगर्दीत’ … ‘बहिणी’ नसतात का?
५. ‘बाबा’ गाडीत … ‘लहान बाळांना’ का बसवतात?
६. ‘तळहातावरचा फोड’ … किती मोठा होईपर्यंत ‘जपावा’?
७. मनाचे मांडे भाजायला .. ‘तवा’ का लागत नाही?
८. ‘दुग्धशर्करा योग’… ‘मधुमेहींना’ वर्ज असतो का?
९. ‘आटपाट’ नगर … कोणत्या ‘जिल्ह्यात’ येते?
१०. ‘तिखट प्रतिक्रिया’ … ‘गोड’ मानून घेता येते का?
११. सतत ‘मान खाली’ घालायला लावणारा मित्र -… ‘मोबाईल’ असावा कां?
१२. ‘काहीही’ या पदार्थाची … ‘रेसिपी’ मिळेल का?
१३. ‘चोरकप्पा’ … नक्की ‘कोणासाठी’ असतो?
१४. ‘पालक’ ‘चुका’ दाखवून … मुलांना ‘माठ’ ठरवत असतात का?
१५. ‘पैशांचा पाऊस’ असेल … तर ‘छत्री’ उलटी धरावी का?
१६. ‘भिंतीला’ कान असतात … तर बाकीचे अवयव कुठे असतात?
😃😃😃😃😃😃😃
चेहरा खुलवणारी प्रश्नमंजुषा! ……. दि.०५-०६-२०२१

मार्ग

मार्ग या अर्थाचे किती शब्द आहेत पहा.

‘गल्ली’ ला असती दोन्ही दिशांना दारे । ‘बोळा’ स परंतु एक दिशाच खुली रे ॥
मळलेली असते ‘पाऊलवाट’ जुनी रे । हे शब्द सुचविती ‘मार्ग’ मराठीत सारे ॥१॥
‘वाटे’ वर असती काटे नित्य स्मरा रे । ती ‘सडक’ कडक जरी धुंडित गाव पुढारे ॥
‘रस्त्या’ स दुतर्फा ‘पदपथ’ रक्षित बा रे। हे शब्द सुचविती ‘मार्ग’ मराठीत सारे ॥२॥
समस्येचे करिती ‘समाधान’ जन सारे । प्रश्नाला शोधिती ‘उत्तर’ कुठेही बा रे ॥
उत्तरा दिसती जे ‘पर्याय’ पहा सारे । हे शब्द सुचविती ‘मार्ग’ मराठीत सारे ॥३॥
कुणी धर्म पूजती कुणास ‘पंथ’ हवा रे । तुम्ही संकटात, सत्याचा ‘पक्ष’ धरा रे ॥
अन् नाम जपा जर ‘उपाय’ थकले सारे। हे शब्द सुचविती ‘मार्ग’ मराठीत सारे ॥४॥

नरेंद्र गोळे

उपसर्ग

.
उपसर्गानी शब्दाचा अर्थ तो बदलतो पुरा ।
प्रहार आहार विहार संहारापरी तो स्मरा ॥ धृ ॥
.
‘प्रहार’ करतो वार, ‘आहार’ भूक भागवी ।
‘विहार’ घडवी संचार, ‘संहार’ नाहीसे करी ॥ १ ॥
.
कार, कार्य, काज, काम उपसर्गे त्रस्त सर्वही ।
एकेकाची गती पाहू, अर्थ ते बदलती कसे ॥ २ ॥
.
‘सत्कार’ करी सन्मान, ‘बेकारा’ तो न लाभतो ।
‘आकार’ घडवितो दर्शन, ‘प्रकार’ वेगवेगळे ॥ ३ ॥
.
‘सत्कार्य’ चांगले म्हणती, ‘दुष्कार्या’ म्हणती वाईट ।
‘कार्य’ कार्यालयी होते, ‘मत्कार्य’ माझे असे ॥ ४ ॥
.
‘कामकाज’ होत सर्वत्र, ‘काजं’ गुंडीसवे रत ।
‘कृषीकाज’ पिकविते अन्न, ‘वैश्यकाज’ देतघेत ते ॥ ५ ॥
.
‘काम’ मोहास कारण हो, ‘निष्काम’ म्हणुनी असा ।
‘नाकाम’ स्फोटही होती, ‘घरकाम’ भासते कठीण ॥ ६ ॥
.
नरेंद्र गोळे

************

ABCD वरून शब्द

A क मुलगी होती.
B कानेर ला राहत होती.
C मा तिचे नाव होते.
D स्को डान्स करत होती.
E मामी क्रीम वापरत होती.
F वाय बी. ए. शिकत होती.
G न्स पँट वापरत होती.
H M T घड्याळ वापरत होती.
I ते खाण्याची सवय होती.
J जूरीला जाणार होती.
K दारची मैत्रीण होती.
L आय सी ची एजंट होती.
M 80 वर जात होती.
N T रामारावची फॅन होती
O ळख वाढवून LIC काढत होती.
P यानो वाजवत होती.
Q बाला गेली होती.
R रशात सारखी पहात होती.
S टी ने प्रवास करत होती.
T नाच्या घरी जात होती.
U गंधर कादंबरी वाचत होती.
V डी ओ पाहण्याची आवड होती.
W W F ची फॅन होती.
X बॉयफ्रेंड शी बोलत होती.
Y फळ बडबड करण्याची सवय होती.
Z पी जवळ रहात होती.

जमलं का 🤔😀😀
लॉक डाऊन टाईमपास..
एन्जॉय करा. 😃😃 . . . . . . . . . . वॉट्पसॅवरून साभार दि.२४-०६-२०२१

🙏🌹🌹🙏😇🤪

लस शब्द

सध्या लसीकरण मोहीम (कोविड 19 ) बरीच चर्चेत आहे.विविध शब्द त्यासंबंधी येऊ शकतात .त्यातला लसातूर हा शब्द आणि लसस्वी हा आधीच प्रचारात आला होता .हे सारे केवळ विनोदी अंगाने घ्यावे .नवीन शब्द सुचले तर ऍड करू ,आपणही करा ….
*
*
१.लस घेऊन फ्रेश वाटणे—लस लशीत वाटणे
२.लस घेण्यास आतुर —– लसातूर
३.लस विरुद्ध बोलणारा—लसासुर
४.लस संबंधी लूट इ. करणारा—लसण्या उद
५.लस केव्हा मिळेल ह्याची शक्यता वर्तवणारा शब्द—————लसंभाव्यता
६.लस मिळू शकण्याच्या समूहात बसू शकणारा—–—————लसेबल
७.लस मिळू दे हा आशीर्वाद—लसस्वी भव किंवा लसवंत हो
८.लस मिळालेला———लसवंत
९.दोन्ही लसी मिळालेला— द्विलसवंत (एक लसवंत-पहिली लस मिळालेला)
१०.लसीला दाद देणारा—–लसज्ञ
११.लस घेऊनही उलट सुलट बोलणारा——————-लसघ्न
१२.क्रम नसतांना लस घेण्यास मध्ये घुसू पाहणारा————लसंतुक

मंडळी,सगळ्यांना स्कोप आहे,वेळ आहे नवीन शब्द ऍड करा.
धन्यवाद😊🙏

ता. क.
१.लसोजेनिक—-लस घेताना फोटो काढण्यास इच्छुक
२.लसेन्द्र बाहुबली—-लस घेऊन शक्तीवान झाल्याचा फील येणारा
३.लसेच्छूक———लस घेण्याची इच्छा असणारा!

*******************************

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुचवलेले मराठी प्रतिशब्द

नवी भर . . दि.०३-०३-२०२२ वॉट्सॅपवरून साभार

घासावा शब्द, तासावा शब्द

घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये ||

 • संत तुकाराम
  मला हा अभंग वॉट्सॅपवर मिळाला आहे. तो संत तुकारामांनीच लिहिला असेल याची मला खात्री नाही, पण कसे बोलावे याचे उत्तम मार्गदर्शन. . . . दि.२०-०३-२०२२

मायंदाळ, बख्खल, लई . . माझी मराठी भाषा😌

मायंदाळ म्हणजे काय?बक्कळ,
बक्कळ म्हणजे काय?पुष्कळ,
पुष्कळ म्हणजे काय?लय,
लय म्हंजी काय? भरघोस,
भरघोस म्हणजे काय? जास्त,
जास्त म्हणजे काय?भरपूर,
भरपूर म्हणजे काय?खूप,
खूप म्हणजे काय?मुबलक,
मुबलक म्हणजे काय?विपुल,
विपुल म्हणजे काय? चिक्कार,
चिक्कार म्हणजे काय,मोक्कार ,
मोक्कार म्हणजे काय?मोप,
मोप म्हणजे काय ? रग्गड,
रग्गड म्हणजे काय? प्रचंड,
प्रचंड म्हणजे काय?कायच्या काय, कायच्या काय म्हणजे काय ?
लय काय काय….

कळलं का की इंग्रजीत सांगू
😝😝