आयुष्य हे . . .

‘आयुष्य’ या विषयावर मी वेळोवेळी जमवलेले शिंपले, गारगोट्या आणि मोती या भागात एकत्र केले आहेत.
सुरुवातीला एक अप्रतिम इंग्रजी कविता आणि तिचे मराठी रूपांतर.

 1. My soul has a hat
 2. आयुष्याचे गणित
 3. गणितातली चिन्हे
 4. ३६चा आकडा आणि ६३चा आकडा
 5. आधी कळस मग पाया … In my next life
 6. माझ्या आताच्या आवडत्या गोष्टी – ज्यूली एँड्र्यूज
 7. शेवटी अंतर सारखंच राहतं
 8. उरले सुरले जपून …
 9. होतं असं कधी कधी
 10. दुसऱ्यांचा विचार करावा
 11. सोडून द्यावं
 12. अलिप्तपणा
 13. आहे त्याचा स्वीकार करा
 14. चुलीवरले कांदेपोहे
 15. येईलंच कसा कंटाळा
 16. मला पडलेले काही प्रश्न
 17. सुख म्हणजे नक्की काय असतं ?
 18. दोन “पिढ्या” मधील तुलना
 19. चहाच्या कपातली साखर
 20. ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं
 21. ए जिंदगी बहुत हैरान हूं मैं।
आयुष्य हे … याचा उपयोग करून घ्या

मारिओ दि अन्द्रादे (1893 – 1945) या ब्राझीलियन कवीची ‘MY SOUL HAS A HAT’ ही कविता (मराठी अनुवादित)

कविता : माझ्या आत्म्याने हॅट घातली आहे

आज मी माझी सरलेली वर्षं मोजली आणि अचानक लक्षात आलं ..अरेच्चा!
जेवढं जगून झालंय .. त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं..
मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना…
खूप आवडीचा खाऊ खाताना.. तसं झालं काहीसं…

सुरवातीला तो आवडीने खाऊ खातोच पण जेंव्हा त्याच्या लक्षात येतं की आता
थोडासाच खाऊ उरलाय, तेंव्हा मात्र ते मूल खाऊ अधिकच चवीचवीने
आणि अगदी मन लावून खायला लागतं…
कुठल्याच संकेत, नियम आणि कायद्यांचं पालन होणार नाहीय
हे पुरेपूर ठाऊक असताना..

केवळ त्यांचीच चर्चा करणाऱ्या प्रदीर्घ बैठकांसाठी आता माझ्याकडे वेळ नाही.

ज्यांची केवळ वयंच वाढलीत.. बुद्धी नाही..
अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम आता माझ्यात अजिबात उरलेला नाही…

फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे.. आता मला फक्त अर्क हवा आहे..
आत्मा घाईत आहे माझा.. फार थोडा खाऊ शिल्लक आहे माझ्याजवळ आता..

मला माणसांच्या जवळ जगायचंय आता.. खऱ्याखुऱ्या माणसांच्या…
ज्यांना माहीत आहे, आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं..
ती माणसं.. जी विजयाच्या गर्वाने फुगलेली नाहीत
आणि ती माणसं… जी त्यांनी केलेल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेतात.
खरंतर अशा प्रकारेच माणसाची प्रतिष्ठा अबाधित राहते आणि आपण कायम सत्य आणि प्रामाणिकतेच्या मार्गावर राहतो.
आपलं आयुष्य कामी येणं उपयुक्त होणं हे अत्यंत महत्त्वाचं.

मला अशी माणसं माझ्या अवतीभवती हवी आहेत की ज्यांना दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा हे चांगलंच ठाऊक आहे..
अशांच्या हृदयाला… ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत, आत्म्याच्या पवित्र, मधुर स्पर्शाने ज्यांना तरीही मोठं केलंय..

हो आहे मी घाईत.. मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे..
ती उत्कटता… जी केवळ प्रगल्भतेतून येते.
आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई फुकट घालवायची माझी इच्छा नाहीय..

मला नक्की माहीत आहे की ही मिठाई अतिशय उत्तम आहे..
मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही खूप सुग्रास!

माझं आता एकच ध्येय आहे.. माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सदसद्विवेकबुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत अखेरचा क्षण गाठणं..
बस!

आपल्याकडे बरं का दोस्तांनो .. दोन आयुष्य असतात..
आणि दुसरं आयुष्य सुरू होतं जेंव्हा लक्षात येतं की आपल्याकडे जगायला फक्त एकच आयुष्य आहे!

–मारिओ दि अन्द्रादे
(मुक्त मराठी भाषांतर – कॅप्टन वैभव दळवी)

My Soul Has A Hat

I counted my years and realized that I have less time to live by, than I have lived so far.
I feel like a child who won a pack of candies: at first, he ate them with pleasure but when he realized that there was little left, he began to taste them intensely.
I have no time for endless meetings where the statutes, rules, procedures and internal regulations are discussed, knowing that nothing will be done.
I no longer have the patience to stand absurd people who, despite their chronological age, have not grown up.
My time is too short: I want the essence; my spirit is in a hurry. I do not have much candy in the package anymore.
I want to live next to humans, very realistic people who know how to laugh at their mistakes and who are not inflated by their own triumphs and who take responsibility for their actions. In this way, human dignity is defended and we live in truth and honesty.
It is the essentials that make life useful.
I want to surround myself with people who know how to touch the hearts of those whom hard strokes of life have learned to grow with sweet touches of the soul.
Yes, I’m in a hurry. I’m in a hurry to live with the intensity that only maturity can give.
I do not intend to waste any of the remaining desserts. I am sure they will be exquisite, much more than those eaten so far.
My goal is to reach the end satisfied and at peace with my loved ones and my conscience.
We have two lives and the second begins when you realize you only have one.

Mario de Andrade
(San Paolo 1893-1945) – The Valuable Time of Maturity


२. आयुष्याचे गणित


यात दोन रचना आहेत. पहिल्या रचनेमध्ये आयुष्यातले काही विरोधाभास दाखवून आश्चर्य व्यक्त केले आहे. दुसऱ्या रचनेत आयुष्याचे अंकगणित योग्य चिन्हे वापरून सोडवण्याचे उपाय सुचवले आहेत.या दोन्ही रचना कुणाकुणाच्या आहेत ते मला माहीत नाही. त्यांना सादर प्रणाम आणि अनुमतिसाठी विनंति
…………………………………………………………………….

१.देवाला पण सुटत नाही
जी आपल्याला आवडते
तिला आपण आवडत नाही

जिला आपण आवडतो…
ती आपल्याला आवडत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

तिने याच्यात काय पाहिलं
ह्याने तिच्यात काय पाहिलं

हे फक्त त्यांनाच माहिती
बाकीच्याना कळत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

तो असे ना का सावळा
तिला त्यात शाम दिसतो

असेना का ती साधी
तिच्यात तो राधा पाहतो

दोघांमध्ये असं काय असत
तुम्हा आम्हाला कळत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

नसेल येत तिला जेवण करता
तुम्ही का उदास होता…

तो जेवतोय ना सुखाने
तुम्ही का चेहरा पाडता…

नवरा बायकोचं अलवार नातं
सासूला का कळत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

लेक गेली सासरी…
संसार तिला करू दे

तू कशाला काळजी करते
तिला तीच सावरू दे

लेकीच्या आयांना …
हेच कसं कळत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

प्रेम करा स्वतःवर अन
प्रेम करा जीवनावर…

दुसऱ्यात गुंतलात जर कधी
वेळीच या भानावर

हे इतकं साधं सोपं
कुणालाच कसं कळत नाही

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…

🙏🏼🙏🏼 🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼 🙏🙏🙏🙏

३.गणितातली चिन्हे ➕➖✖➗

आयुष्याचे गणित चुकले
असे कधीच म्हणू नये .

आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते,
चुकतो तो चिन्हांचा वापर…!

बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
ही चिन्हें योग्य पद्धतीने वापरली कि
उत्तर मनासारखे येते.
आयुष्यात कुणाशी बेरीज करायची,
कुणाला केंव्हा वजा करायचे,
कधी कुणाशी गुणाकार करायचा
आणि भागाकार करताना
स्वतः व्यतिरिक्त किती
लोकांना सोबत घ्यायचे हे
समजले कि उत्तर मनाजोगते येते..!
आणि मुख्य म्हणजे
जवळचे नातेवाईक, मित्र
आप्तेष्ट यांना हातचा समजू नये,
त्यांना कंसात घ्यावे!
कंस सोडविण्याची हातोटी
असली कि गणित
कधीच चुकत नाही ……..!!

आपल्याला शाळेत त्रिकोण,
चौकोन, लघुकोन,
काटकोन, विशालकोन
इत्यादी सर्व शिकवतात..
पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो
तो कधीच शिकवला जात नाही.
तो म्हणजे “दृष्टीकोन”.
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला,
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील..
आयुष्याचे calculation खूप वेळा केले, पण ‘सुख दुःखाचे’ accounts कधी जमलेच नाही…
जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की ‘आठवण’ सोडून काहीच balance उरत नाही…

😊😊😊👍👍👍😊😊😊👍👍👍😊😊😊👍👍👍

तात्पर्य : गणितामध्ये काही ठराविक फॉर्म्युले असतात. त्यात दिलेले आकडे घातले की उत्तराचा अचूक आकडा येतोच. .. पण काही लोकांचा गोंधळ होतो. आयुष्यातले फॉर्म्युले कधी कठीण असतात आणि कधी कॅल्क्युलेशन चुकते. त्यामुळे नेहमीच अपेक्षित उत्तरे येत नाहीत.

४. ३६चा आकडा आणि ६३चा आकडा

छत्तीस च्या आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.

त्याप्रमाणे माणसांच असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात.

आता ६३ आकडा पहा.
या आकड्याने साठी ओलांडल्या मुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी जेवढ्यांना विसरला त्यांची आठवण काढत बसतो. ६३ च्या आकड्या प्रमाणेच.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो.

आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर, तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा…!!

****

५. आधी कळस मग पाया …… In My Next Life

माझे पुढचे आयुष्य मला उलट क्रमाने जगावेसे वाटते.

काळनिद्रेतून मला जाग येईल तेंव्हा माझी आपली जवळची माणसे पलंगाच्या बाजूला असतील. त्यानंतर दररोज मला अधिकाधिक बरे वाटत जाईल.
तब्येत पुरेशी सुधारून मी हिंडू फिरू लागेन, मला पेन्शन मिळू लागेल.
नोकरीला लागल्याच्या पहिल्याच दिवशी मला मोठ्या समारंभपूर्वक हार तुरे घालून माझा सत्कार होईल आणि सोन्याचे घड्याळ भेट म्हणून मिळेल.
त्यानंतर चाळीस वर्षे मी काम करत राहीन, त्या काळात खाणे, पिणे, मौज, मजा या सगळ्यांची धमाल करेन. माझा रंगेलपणा रोज वाढत जाईल.
सगळी मजा उपभोगून झाल्यानंतर मी शाळेत जाईन, खेळेन, खोड्या करेन. माझ्यावर कसलीही जबाबदारी असणार नाही.
शेवटचे नऊ महिने मी उबदार कोषात तरंगत राहीन आणि मीलनाच्या परमोच्च क्षणी अंतर्धान पावेन.
In my next life, I want to live my life backwards. You start out dead and get that out of the way.
Then you wake up in an old folks home feeling better every day.
You get kicked out for being too healthy, go collect your pension,
and then when you start work, you get a gold watch and a party on your first day.
You work for 40 years until you’re young enough to enjoy your retirement.
You party, drink alcohol and are generally promiscuous,
then you are ready for high school.
You then go to primary school, you become a kid, you play.
You have no responsibilities, you become a baby until you are born.

And then you spend your last nine months floating in a luxurious spa
and end up as an orgasm.

ATTRIBUTED TO WOODY ALLEN

६. माझ्या आताच्या आवडत्या गोष्टी – ज्यूली एँड्र्यूज


साउंड ऑफ म्यूजिक हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. त्यातली ज्यूली अँड्र्यूजची भूमिका आणि डो अ डीअर, दीज आर अ फ्यू ऑफ माय फेव्हरिट थिंग्ज वगैरे गाणीसुध्दा अजून कानात घुमत असतील. ज्यूलीने आता वृध्दापकाकात सांगितलेल्या तिच्या आवडत्या गोष्टी पहा.

When Julie Andrews Turned 69

To commemorate her birthday , actress/vocalist, Julie Andrews made a special appearance at Manhattan ‘s Radio City Music Hall for the benefit of the AARP. One of the musical numbers she performed was ‘My Favorite Things’ from the legendary movie ‘Sound Of Music’.

Here are the lyrics she used: (Sing It!) – If you sing it, its especially hysterical!!!

Botox and nose drops and needles for knitting,
Walkers and handrails and new dental fittings,
Bundles of magazines tied up in string,
These are a few of my favorite things.

Cadillacs and cataracts, hearing aids and glasses,
Polident and Fixodent and false teeth in glasses,
Pacemakers, golf carts and porches with swings,
These are a few of my favorite things.

When the pipes leak, When the bones creak,
When the knees go bad,
I simply remember my favorite things,
And then I don’t feel so bad.

Hot tea and crumpets and corn pads for bunions,
No spicy hot food or food cooked with onions,
Bathrobes and heating pads and hot meals they bring,
These are a few of my favorite things.

Back pain, confused brains and no need for sinnin’,
Thin bones and fractures and hair that is thinnin’,
And we won’t mention our short shrunken frames,
When we remember our favorite things.

When the joints ache, When the hips break,
When the eyes grow dim,
Then I remember the great life I’ve had,
And then I don’t feel so bad.
(Ms. Andrews received a standing ovation from the crowd that lasted over four minutes)

७. शेवटी अंतर सारखंच राहतं…

शेवटी अंतर तेवढचं राहीलं !

😌😌😌😌😌😌😌

लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं… आपण ही खावं…, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं…
मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली…
😢 शेवटी अंतर तेवढच राहीलं 😪

लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे…
मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले… सुती कपडे महाग झाले.
😢 शेवटी अंतर तेवढच राह्यलं 😪

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,… शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची…
मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले…
😢 शेवटी अंतर तेवढच राह्यलं 😪

लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा… अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो… वाटायचं आपणही प्यावा पण ?
आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.
😢 शेवटी अंतर तेवढच राह्यलं 😪

लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत…
😢 शेवटी अंतर तेवढंच राहीलं 😪

लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं…
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावतात.
😢 शेवटी अंतर सारखच राहतं…😪

लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट / विपशना ) मध्ये राहतात तेंव्हा
😢 शेवटी अंतर सारखंच राहतं… 😪

आता कळलं…हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं जसा आहे, तसाच राहाणार… कुणाचं पाहून बदलणार नाही…
म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी म्हंटले होते ,
ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान …

मित्रांनो खूष रहा, समाधानी राहा, वाट्याला आलेले जिवन खुप सुंदर आहे, त्याचा मनमुराद आनंद उपभोगा.
कुणाचं पाहून आपल्या स्व-आनंदाची व्याख्या बदलवू नका.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

८. उरलेसुरले जपून वापरायची …

उरले सुरले

उरले सुरले जपून वापरायची सवय किती छान होती,
आयुष्य साधंच होतं तरी मजा काही औरच होती!

तोडकी मोडकी कंपास पुन्हा जोडून वापरत होतो,
झिजली जरी पेन्सील तरी टोपण लावून लिहीत होतो!

तुटलेला पेन पुन्हा पुन्हा स्प्रिंग बदलून वापरत होतो,
एकच पेन खूप जपून रिफील करून वापरत होतो!

जुनीच पुस्तके वर्तमानपत्राचे कव्हर घालून वापरत होतो,
तुझी पुस्तकं दे बरं मला आधीच सांगून ठेवत होतो!

जुन्या वह्यांची कोरी पानं दाभण वापरुन शिवत होतो,
जुन्यातूनच नाविन्याचा आनंद आम्ही घेत होतो!

सायकलच्या जुन्या टायरचे गाडे आम्ही चालवत होतो,
तोल कसा सांभाळावा ते बेमालूमपणे शिकत होतो!

फुटलेल्या फटाक्यांची दारू गोळा करत होतो,
उरलेल्या चिंध्याचा मस्त गरगरीत चेंडू करत होतो!

तुटलेल्या स्लीपरला पीन लावून वापरत होतो,
ध्येयाकडे न थांबता तरीही पाऊले टाकत होतो!

फुटलेल्या बांगड्यांनाही वाया घालवत नव्हतो,
दगडांचा बच्चू तर फरशीची लगोरी आम्ही करत होतो!

फाटलेल्या गोधडीला ठिगळं लावून सजवत होतो,
उसवलेल्या कपड्यांना धाग्या दोऱ्याने सांधत होतो!

गंध जरी जुना असला तरी छंद मात्र नवा होता,
काटकसर अन बचतीचा संस्कारच चिरकाल होता!

वापरा आणि फेकून द्या याचा हल्ली जमाना आलाय,
किंमत नाही वस्तूंची म्हणून नव्याचा कचरा झालाय!

सुई धागा हरवला नाही, पण तो हल्ली कोण घेत नाही.
फाटलेली नाती आणि वस्तू खरं तर कोणीच शिवत नाही!

कुणी लिहिले माहीत नाही पण खूप छान आहे म्हणुन पाठवत आहे.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 🌻🌼🌻🌼🌻🌼🌻

९. होतं असं कधी कधी

खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण…
बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली….
इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण…
संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते…
परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे…
टाळतो आपण कॉल करायचा….
त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो…
‘तुझ्या ऑफिस बाहेर होतो…
भेटलो असतो…’
जुन्या आठवणी काढत बसतो आणि मन रमवतो त्यातच..
स्वतःला खोटं खोटं समजावत…!
होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁
कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली…
रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना…
माया,कणव दाटून येते मनात आपल्या…
‘कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??’
पाकिटात हात जातो…
शंभराची नोट लागते हाती…
व्यवहार जागा घेतो ममतेची…
समोरचा म्हातारा ओळखतो… बदलतो…
“दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा…”
तो सुटका करतो आपली पेचातून…
आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून…
होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁
दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले…
आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते…
तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा वेळी…
दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात…
ती येते…
काम आटोपते…
तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना, कामवाली एक डब्बा देते हातात आपल्या…
चिवडा लाडू असतो त्यात…
“तुम्ही दर वेळा देता… आज माझ्याकडून तुम्हाला…”
‘कोण श्रीमंत कोण गरीब’, हा विचार सोडत नाही पिच्छा आपला…
होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁
ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर…
आई उठवते उन्हं अंगावर आल्यावर…
अंगात ताप असतो तिच्या…
आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती…
मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत…
दिवस उलटतात…
वडिलांचा एके रात्री फोन येतो…
“काम झालं असेल तर आईला एक फोन कर… आज तिचा वाढदिवस होता…”
कोडगेपणा म्हणजे हाच तो काय…!
चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले birthday विश आठवतात…..
लाजत तिला फोन करतो…
“आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा…”
ती बोलते…
कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो…
अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून…
काहीतरी खूप खूप दूर जातंय आपल्या पासून असं जाणवत राहतं…!!
खरंच,
होतं असं कधी कधी.
👍👍👍

१०. अ) दुसऱ्यांचा विचार करावा

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं, आणि ओवलेला दोरा संपला, तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा, दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.
पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं, दुसऱ्यानं तिसऱ्या साठी, जेणेकरुन वेळ आणि इंधनबचत व्हायचीच, पण गैरसोयही टाळता यायची.
सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.
आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं (नीट पुरवणी आत ठेऊन) निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो, शोधाशोध करावी लागत नाही.
पाण्याची बाटली आपण रिकामी केली व लगेच भरुन फ्रीजमधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.
बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं, ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.
पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून/घासून ठेवायचे, हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.
खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे, आपली टर्न आल्यावर संपल्या/बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.
घर सगळयांचं असतं, ‘सगळी जवाबदारी गृहिणीची’ असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे.
प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो, चुकीच्या सवयी लागतात.
घर ही एक संस्था समजून घराची एक शैली, एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात, तसे घरातही काही नियम असले पाहिजेत, तरच त्याचं हाॅटेल होणार नाही. (खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच!)
लाॅकडाऊनचा काळ ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत. काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर by भविष्यात फायदा होईलच आणि नातीसुध्दा चांगली होतील. लहान मुलांना हे शिकवता येईल.
थोडं थांबून आपल्या नंतर येणाऱ्याचा विचार केला तर ही मदतीची साखळी सुरु राहील. मुख्य म्हणजे आपली वेळ येईल तेव्हा आपल्यालाही फायदे मिळतील.

😊🙏

१० आ). गोष्ट खूप छोटी असते हो….

तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का ? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं…
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

अंधारात तुम्ही कधी पाय अडखळुन पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी skin चं मलम देऊन टाकायचं…
गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.

कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं thank you ऐकायला मस्त वाटतं….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.
माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची!

******************************************

११. सोडून द्यावं

🍁 सोडून द्यावं 🍁

🍁एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं
सोडून द्यावं🍁
🍁मुलं मोठी झाल्या वर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं
सोडून द्यावं*🍁
🍁
मोजक्याच लोका॑शीच ऋणानुबंध जूळतात, एखाद्याशी न पटले तर बिघडले कुठे..
सोडून द्यावं🍁
🍁एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं
सोडून द्यावं🍁
🍁आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं
सोडून द्यावं🍁
🍁ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं
सोडून द्यावं🍁
🍁प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं
सोडून द्यावं🍁
🍁आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं
सोडून द्यावं🍁

समजंल तर ठिक नाहितर हे हि सोडून द्यावं.!!*
😜😜😜🍧🍧🌹🌹

१२. Detachment अलिप्तपणा

अलिप्त होणे, Disconnect with somebody…..
धक्का बसला नं मित्रांनो, पण खरं आहे…..
पटणार नाही काहींना, आयुष्यात वेळ आली की Detach होणचं योग्य……..
असं म्हणतात, साठी नंतर ही प्रक्रिया सुरु करावी. अलिप्त म्हणजे separation नाही, aloof नाही, कुठलीही गोष्ट मनाला लावून नं घेणे….. ज्या गोष्टी जशा आहेत, त्याचा स्वीकार करणे, खोटी आशा बाळगू नये……
एक लक्षात असावे, माणसाचा स्वभाव बदलत नाही, स्वभावाला औषध नाही, खरं आहे…..
त्याचा मोठया मनाने स्वीकार करावा, ते बदलण्याचा प्रयत्न पण करू नये…… Detach….
मुलगा /मुलगी परदेशी आहेत…. हो.. त्यांची सारखी भेट होणार नाही, प्रत्यक्ष होणं शक्य नाही, हे मनाला सांगणे….. अलिप्त……
आपली स्थावार जंगम Property, खूप कष्टाने उभी केलेली, मान्य….. पण आता उपभोग घेण्याची शक्ती नाही, आसक्ती नाही, त्यावर शांतपणे विचार करून निर्णय घेणे…. Disconnect
आपल्या घरामध्ये खूप वस्तू असतात, कधी Marketing tricks मुळे तर कधी पत्नीचा, मुलांचा आग्रह… खरं सांगा अशा कित्येक वस्तू आपल्या घरात असतात, खरं आहे नं…. आपण वापरत नाही पण जपून ठेवतो, May be emotional attachment…..
भांडी असंख्य, Dinner sets, काचेचे वेगवेगळे glasses, Mugs, अगणित वाट्या, पेले इत्यादी….
कल्पना करा, लग्नानंतर छोट्या घरात संसार झाला नं, आता घर मोठं आहे, खूप साधने आहेत, पण माणसं दोन… काय करायचं… अशा वेळी Detach होणं चं महत्वाचं….
हे झालं निर्जीव वस्तूंबद्दल.. आता सजीव माणसं चेक करू या…….
काही वर्षांपूर्वी कोणाच्याही आयुष्यात आपण डोकावणे, स्वाभाविक होतं, कारण व्यक्ती वेगळ्या होत्या, सगळं स्वच्छ मोकळ्या आकाशा सारखं होतं…. आज परिस्थिती बदलली आहे मित्रांनो, विचार share होत नाहीत, कोणी सल्ला मागत नाही, काही नं पटणाऱ्या गोष्टी विचारता येत नाहीत…. Detach….
रिक्त होण्यात सुख आहे मित्रांनो, दुःखाला delete करायला यायला पाहिजे, खूप कठीण आहे, मान्य, मग पूढे नाही जाऊ शकत…….
अशा वेळी कृष्णा चे चिंतन करावे…
त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही…. कधी वाटलं नसेल का कृष्णाला कि देवकीला घट्ट मिठी मारावी आणि चार क्षण तिच्या कुशीत घालवावे…😥
कधी गोकुळात जाऊन गोपिकांच्या घागरी फोडाव्या, मनसोक्त बासरीच्या मंद आवाजात सगळं विसरून जावं……..
मान्य आहे, कृष्ण परम परमेश्वर होता 🙏🏻… आपण कृष्ण होऊ शकत नाही.. अशक्य… आयुष्यात जर कधी अलिप्त व्हायचं असेल तर कृष्ण आठवा…. तो स्फूर्ती देईल……..
मुलं लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात रमतात… काय गैर आहे, काही नाही, ते जर त्यांचे कर्तव्य पार पाडीत असतील तर तक्रारीला जागा नसावी…. पण माझं ऐकावं हा हट्ट बरा नाही… निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते, मान्य, पण जबरदस्ती नको….. लागू द्या ठेचा… शिकेल मुलगा,/मुलगी…
लहानपणी आई म्हणायची, तुला कळणार नाही आता, एकदा बाप झाला की कळेल….. किती साध्या भाषेत एवढं मोठं तत्वज्ञान आईच सांगू शकते…..
अलिप्त होण्यात सुख आहे…. पाऊस पडल्यानंतर नीरभ्र आकाशा सारखं मन स्वच्छ होईल मित्रांनो……
वाईट भावना, वाईट विचार कोलमडून जातील आणि स्वच्छंद आनंदाचा अनुभव प्राप्त होईल…
मनात प्रेम, सहानुभूती राहणार, पण गुंतणे नाही….
जिथे व्यक्ती गुंतते, तिथे राग, लोभ, येणार….हे मळभ दूर झाले की सर्व छान, स्वच्छ, निर्मळ……….
बघा प्रयत्न करून, जमलं तर ठीक….
नुकसान मात्र नाही…..

विद्याधर फाटक
17 जुलै 2021


१३ आहे त्याचा स्वीकार करा

खूप छान आहे वाचा 👇Real Life 😍🥰
नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा,
व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी,
घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं,
एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहण्यात मजा आहे
वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही,
गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा,
शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे,
देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं,
परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो,
केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान,
कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता.
एक मूल असतं त्याला वाटतं दोन असती तर,
दोन असणाऱ्याला वाटतं एक वाला मजेत,
मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता,
मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते,
ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल,
नावे ठेवणारे रामातही दोष बघतात
कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात.
मिळून काय?
नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही.
मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे.
किती गोंधळ रे देवा हा?
म्हणुन जे आहे त्याचा स्वीकार करा आणि आयुष्य आनंदात जगा…
🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

१४. चुलीवरले कांदेपोहे

प्रसिद्ध गीतसंगीतकार आणि गायक श्री.अवधूत गुप्ते यांचे हे गाणे काही वर्षांपूर्वी खूपच गाजले होते. या गाण्यावरूनच मला या लघुलेखसंग्रहाचे शीर्षक सुचले.

भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांति
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
आले मिटुनी लाजाळूपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

दूर देशिच्या राजकुमारा ची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागुन ध्यानी मनी नसताना
नकळत आपण हरवुन जावे स्वतःस मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

भूतकाळच्या धुवुन अक्षता तांदुळ केले ज्यांनी
आणि सजवाला खोटा रुखवत झाडांच्या फांद्यांनी
भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा
हातावरच्या मेंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

************************************

१५.येईलंच कसा कंटाळा

🙏 माझं घर 🙏

येईलंच कसा कंटाळा

काहीतरीच तुमचं … तुमचा प्रश्नच आहे वेंधळा
आपल्याच घरात आपल्याला … येईल कसा कंटाळा.

माझ्या घरातली धूळ सुध्दा … माझ्यावरती प्रेम करते
किती झटकली तरीही … पुन्हा पुन्हा येऊन बसते.

ताट वाटी भांडं … ही सारीच माझी भावंडं
जेवताना रोज असते सोबत … पिठलं असो की श्रीखंड

फ्रीज, मिक्सर, गिझर, टिव्ही … साऱ्या नव्हेत नुसत्याच वस्तू
रिमोट हातात घेतला की … लगेच म्हणतात ‘ तथास्तु ‘

कपाट नुसतं उघडलं की … उघडतात मनाचेही कप्पे
वरून खाली दिसत जातात … आयुष्याचे सर्व टप्पे

पलंगावर आडवं पडून … खोचून घेतली मच्छरदाणी
तरी लपून बसलेला एक डास … कानामध्ये गुणगुणतो गाणी

खिडकी, गँलरी, पँसेज, बाल्कनी … घर असतंच नंदनवन
कितव्याही मजल्यावर घर असो … घरातंच तयार होतं अंगण

पती, मुलं, सुना, नातू … घरात नेहमीच असते जाग
टेबलावरची एक कुंडी … फुलवते आयुष्याची बाग

घरात नुसतं बसून रहा … वाढतं जाईल जिव्हाळा
आपल्याच घरात आपल्याला … येईलंच कसा कंटाळा.

🙏🙏

१६. मला पडलेले काही प्रश्न ???

******************

१७. सुख म्हणजे नक्की काय असतं ?

१८. दोन “पिढ्यां” मधील तुलना

किती सुंदर उत्तर!
दोन “पिढ्या” मधील तुलना……. प्रत्येकाने जरूर वाचा 👌👌

एका तरुणाने त्याच्या वडिलांना विचारले: “तुम्ही लोक आधी कसे जगता-
तंत्रज्ञानात प्रवेश नाही
विमाने नाहीत
इंटरनेट नाही
संगणक नाहीत
नाटके नाहीत
टीव्ही नाहीत
हवाई बाधक नाहीत
गाड्या नाहीत
मोबाईल फोन नाहीत?”

त्याच्या वडिलांनी उत्तर दिले:
“आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याप्रमाणे –

प्रार्थना नाहीत
करुणा नाही
सन्मान नाही
आदर नाही
वर्ण नाही
लाज नाही
नम्रता नाही
वेळेचे नियोजन नाही
खेळ नाही
वाचन नाही”

“आम्ही, 1940-1980 दरम्यान जन्मलेले लोक धन्य आहोत. आमचे जीवन एक जिवंत पुरावा आहे:

👉 खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट घातले नाही.
👉 शाळा सुटल्यावर संध्याकाळपर्यंत खेळायचो. आम्ही कधीच टीव्ही पाहिला नाही.
👉 आम्ही इंटरनेट मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलो.
👉 आम्हाला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यायलो बाटलीचे पाणी नाही.
👉 आम्‍ही कधीही आजारी पडलो नाही, तरीही आम्‍ही चार मित्रांसोबत एकच ग्लास ज्यूस शेअर करायचो.
👉 आम्ही रोज भरपूर भात खात असलो तरी आमचे वजन कधीच वाढले नाही.
👉 अनवाणी पायी फिरूनही आमच्या पायाला काही लागले नाही.
👉 आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर केला नाही.
👉 आम्ही स्वतःची खेळणी तयार करायचो आणि त्यांच्याशी खेळायचो.
👉 आमचे आई वडील श्रीमंत नव्हते. त्यांनी आम्हाला प्रेम दिले, सांसारिक साहित्य नाही.
👉 आमच्याकडे सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, व्हिडिओ गेम्स, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅट कधीच नव्हते – पण आमचे खरे मित्र होते.
👉 आम्ही आमच्या मित्रांच्या घरी विनानिमंत्रित गेलो आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
👉 तुमच्या जगाच्या विपरीत, आमचे जवळ जवळ राहणारे नातेवाईक होते त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नातेसंबंध एकत्र आनंदात होते.
👉 आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये असू शकतो पण त्या फोटोंमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी आठवणी सापडतील.
👉 आम्ही एक अद्वितीय आणि, सर्वात समजूतदार पिढी आहोत, कारण आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्यांच्या पालकांचे ऐकले.
तसेच, प्रथम ज्यांना त्यांच्या मुलांचे ऐकावे लागले.
आणि आम्ही तेच आहोत जे अजूनही हुशार आहोत आणि तुमच्या वयात असताना कधीही अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता तुम्हाला मदत करत आहोत!!!

🌹🙏🙏🌹

१९. चहाच्या कपातली साखर

पु ल देशपांडे :

चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता …
अवती भोवती पाहता पाहता हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते..
अरेच्या !
साखरच घालायला विसरलो कि काय….
पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर….
आयुष्य असच असतं…
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे….
एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे….
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे….
मान-अपमान मैत्रीत काहीच नसतं….
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहीजे.
जगाच्या या रंगमंचावर असे वावरा, की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.
जगातील सर्वात महाग पाणी कोणते, तर अश्रू … कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात.
त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका..
हसा आणि हसवत रहा…!!

२०. ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नही।

कृष्ण बिहारी ‘नूर’

ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं

अपने दिल की किसी हसरत का पता देते हैं
मेरे बारे में जो अफ़वाह उड़ा देते हैं

ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं
और क्या जुर्म है पता ही नहीं

इतने हिस्सों में बंट गया हूँ मैं
मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं

ज़िंदगी मौत तेरी मंज़िल है
दूसरा कोई रास्ता ही नहीं

जिसके कारण फ़साद होते हैं
उसका कोई अता-पता ही नहीं

कैसे अवतार कैसे पैग़मबर
ऐसा लगता है अब ख़ुदा ही नहीं

ज़िंदगी की तल्ख़ियाँ अब कौन सी मंज़िला पाएं
इससे अंदाज़ा लगा लो ज़हर महँगा हो गया

ज़िंदगी अब बता कहाँ जाएँ
ज़हर बाज़ार में मिला ही नहीं

सच घटे या बढ़े तो सच ना रहे
झूठ की कोई इँतहा ही नहीं

धन के हाथों बिके हैं सब क़ानून
अब किसी जुर्म की सज़ा ही नहीं

चाहे सोने के फ्रेम में जड़ दो
आईना झूठ बोलता ही नहीं

अपनी रचनाओं में वो ज़िन्दा है
‘नूर’ संसार से गया ही नहीं

 • कृष्ण बिहारी ‘नूर’

शायर कृष्ण बिहारी नूर ने इस ग़ज़ल को मुशायरे में पेश किया, वीडियो देखें – https://www.youtube.com/embed/WgT033R74k4

२१. ए जिंदगी बहुत हैरान हूं मैं।

एक कविता मौके पर पेश है

ए जिंदगी बहुत हैरान हूं मैं।
कभी उलझनों को सुलझाने से,
तो कभी खुद ही में उलझ जाने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं।
कभी दूसरों के हराने से,
तो कभी खुद से ही हार जाने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं।
कभी लोगों की मतलबी बातों से,
तो कभी खुद भी मतलबी हो जाने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं।
कभी भूख के न मिट पाने से,
तो कभी भूख ही ना आने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं।
कभी नींद के ना आने से,
तो कभी ख्वाबों के टूट जाने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं।
कभी दिल के टूट जाने से,
तो कभी अपनों के रुठ जाने से,
परेशान हूं मैं, ऐ ज़िन्दगी बहुत हैरान हूं मैं-बहुत हैरान हूं मैं।।

 • मनोज कुमार सूर्यवंशी

देवा रे देवा .. Oh My God !

अगदी लहानपणापासून आपल्या मनावर जे संस्कार होत असतात त्यात देवाला खूप महत्वाचे स्थान आहे. तो सर्वसाक्षी असतो, चराचरात भरलेला असतो, त्याच्या इच्छेनुसारच हे जग चालत असते. तसाच तो दयाळू, कृपाळू असतो. कठीण प्रसंगी सहाय्य करतो, संकटांपासून संरक्षण करतो. यामुळे त्याची आराधना, प्रार्थना आणि त्याचे स्मरण करत रहावे असेच सर्व प्रमुख धर्मांमधूनही शिकवले जाते. देवाची आराधना, त्याचे स्वरूप, त्याची योजना, त्याची किमया वगैर विषयांवरील काही मजेदार किस्से आणि विनोद मी या ब्लॉगच्या सुरुवातीपासून संग्रहित केले होते. ते आता या पोस्टमध्ये एकत्रित केले आहेत. पूर्वी जमवलेले बहुतेक लेख इंग्रजीमधून घेतलेले आहेत. ते मूळ रूपात देऊन त्याचा मराठीत अनुवाद किंवा सारांश दिला आहे.

मीच पूर्वी लिहिलेले ‘देवाचे खाते’ आणि ‘धर्म, विज्ञान आणि परमेश्वर’ हे लेख या पानात समाविष्ट केले आहेत. दि.२४-०३-२०२२

या भागातील इतर लेख

१. आमच्या घरातले देव
२. एक महिला आणि देव A WOMAN AND GOD
३. या जगात खरोखरच देव आहे. GOD DOES EXIST
४. देवाची योजना
५. देवा रे देवा Hospital Bill
६. देव तारी तिला कोण मारी
७. आणि देव हसतच राहिला
८. देवबाप्पाशी गप्पा
९. देव तारी तयांना …… (११ सप्टेंबर)
१०. परमेश्वर – एका आठ वर्षांच्या बालकाच्या नजरेतून
११. देवाचे अस्तित्व
१२. देव म्हणाला “कधीही धीर सोडू नका”
१३. देवांवर विश्वास एक मानसिक आजार
१४. देवपूजा – एक मेडिटेशन

माझे लेख – १. देवाचे खाते

जन्माला आलेले मूल नुसतेच डोळे मिचकावत असते. त्याच्या पांच ज्ञानेंद्रियामधून मिळणाऱ्या संदेशांचे कितपत आकलन त्याला होते ते कळायला मार्ग नाही. हळू हळू त्याची नजर स्थिर होते. चेहरा व आवाज ओळखून ते प्रतिसाद देऊ लागते. शब्दाशब्दाने भाषा शिकते. बोलायला लागल्यावर अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडते. त्याच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे पालकांच्याकडे नसतात किंवा कांही कारणाने त्यांना ती द्यायची नसतात. यातूनच “देवाचे खाते” उघडले जाते. जे जे आपल्याला माहीत नाही किंवा सांगता येणे शक्य नाही ते सगळे त्याच्या खात्यात मांडले जाते. त्या क्षणी तरी हा सर्वात सोपा मार्ग वाटतो. जसजसे त्या मुलाचे ज्ञान वाढत जाईल तसतशा कांही गोष्टी देवाच्या खात्यातून त्याच्या खात्यात जमा होतात. पण देवाचे खाते त्यामुळे कमी होते कां? मोठेपणीसुध्दा जगातल्या सगळ्याच विषयातल्या सगळ्याच गोष्टी समजणे किंवा समजावून सांगणे कोणालाच शक्य नसते. अनेक वेळा अनपेक्षितपणे घडलेल्या घटनांचे तर्कशुध्द विश्लेषण करता येत नाही. देवाची मर्जी म्हणून त्या सोडून द्याव्या लागतात. त्यामुळे ठाऊक झालेल्या पण न समजलेल्या गोष्टी देवाच्या खात्यात जमा होत जातात.

‘कां’, ‘कुणी’, ‘कधी’, ‘कुठे’, ‘कसे’, ‘कशामुळे’, ‘कशासाठी’, वगैरे प्रश्नरूपी दरवाजे ज्ञानाच्या प्रत्येक दालनाला असल्यामुळे कोठलाही एक दरवाजा उघडताच त्या दालनातील विहंगम दृष्य दिसते, तेथील गोष्टींचा आस्वाद घेता येतो पण त्याचबरोबर अनेक बंद दरवाजे समोर दिसतात. वेगवेगळे लोक त्यातून त्यांना आकर्षक वाटतील असे दरवाजे उघडून पलीकडील दृष्य पाहतात व जगाला दाखवतात अशा प्रकारे ज्ञानाचा सतत विस्तार व प्रसार होत जातो. या परिस्थितीत कोणालाही सगळे कांही समजले आहे ही स्थिती कधीही येणे अशक्य आहे. जेवढ्या गोष्टी देवाच्या खात्यातून माणसाच्या खात्यात वर्ग होतील त्याच्या अनेक पट गोष्टी देवाच्या खात्यात (निदान ‘गॉड नोज’ या सदराखाली) वाढत जातील.

उदाहरणादाखल पहा. वीस पंचवीस वर्षापूर्वी संगणक माझ्या आयुष्यात आला, त्यावर काम करतांना आजही अनपेक्षित गोष्टी रोज घडत असतात. जेंव्हा आपणच केलेली चूक लक्षात येते तेंव्हा आपण “ऊप्स” म्हणतो, ती नाही आली तर “गॉड नोज”. यापायी दिवसातून किती तरी वेळा तसे म्हणावे लागते. वीसपंचवीस वर्षापूर्वी माझ्या देवाच्या खात्यात हे पान नव्हते. म्हणजे देवाचे खाते दिवसेदिवस वाढतच चालले आहे.

पुलंच्या एका लेखात त्यांनी लिहिले आहे की कोणीतरी कोणाला विचारले,
“हे गाणे कोण गाते आहे?”
“लता मंगेशकर.”
“ती घराच्या आंत बसली आहे कां?”
“नाही. तिचा आवाज रेडिओतून येतो आहे.”
“ती झुरळासारखी रेडिओच्या आत शिरून बसली आहे कां?”
“नाही. गाण्याच्या रेडिओ लहरी रेडिओ स्टेशनवरून प्रक्षेपित केल्या जात आहेत”
“म्हणजे ती आता तिथे बसली आहे कां?”
“नाही. तिचे हे गाणे पूर्वीच रेकॉर्ड केले होते”
“म्हणजे कोणी व कधी?”, “बरं मग पुढे काय?”, “ते आतां कसे ऐकू येते आहे?” टेप, डिस्क, प्लेअर, ट्रान्स्मिटर, रिसीव्हर, फिल्टर, स्पीकर, अँप्लिफिकेशन, मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन इ.इ. माहिती त्यातून पुढे येते, पण प्रश्न कधी संपतच नाहीत.
शेवटी पु.ल. म्हणतात “तू असाच बोलत रहा. कांही मिनिटांनी तुलाच समजेल की तुलाही सगळे कांही समजलेले नाही.”
माणसाच्या ज्ञानाचे खाते संपून गेले की पुढे सगळे ‘देवाचे खाते’.

२. धर्म, विज्ञान आणि परमेश्वर

या विश्वामधील प्रत्येक पदार्थाला अनेक गुणधर्म असतात आणि निरनिराळ्या कारणांमुळे त्यात जे बदल होत असतात त्यांनाही निसर्गाचे नियम असतात. उदाहरणार्थ लोखंडाला ऊष्णता देत राहिल्यास ते तापते, जास्त तापल्यावर ते मऊ आणि लाल होते आणि आणखी जाास्त तापवल्यावर ते वितळते. असे होणे हा लोखंडाचा धर्म आहे असे आपण म्हणतो. सजीव प्राणी आणि वनस्पति यांनाही अनेक गुणधर्म असतात. झाडाने वाढणे, फुले, फळे आणि प्राणवायू देणे हा झाडांचा धर्म असतो. माणसांनी एकमेकांशी कसे वागावे याचेही अनेक नियम आहेत. आईने मुलावर माया करावी हा तिचा धर्म निसर्गानेच दिलेला आहे तर गुरूने, शेजाऱ्याने किंवा राजाने काय करावे हे ऋषी, मुनी, तत्वज्ञानी वगैरे विद्वानांनी सांगितले आणि बहुतेक लोकांना ते पटले यामधून शेजारधर्म, राजधर्म वगैरे तयार झाले.
या जगाची उत्पत्ती, त्याचे व्यवहार आणि विनाश हे सगळे एका अदृष्य अशा महाप्रचंड शक्तीकडून होत असते असा साक्षात्कार काही महान लोकांना झाला आणि त्यांनी परमेश्वर, गॉड, अल्ला वगैरे नावांनी त्या नियंत्याची जगाला ओळख करून दिली, तसेच त्याच्या विविध रूपांची उपासना कशा प्रकारे करावी हे ते सांगत गेले. त्यामधून हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम वगैरे धर्म आणि त्यांचे पंथ तयार होत गेले. अशा प्रकारे धर्म या शब्दाचेसुद्धा अनेक अर्थ आहेत.
निरीक्षण, परीक्षण, विश्लेषण वगैरेंमधून आपल्या आजूबाजूच्या सजीव तसेच निर्जीव यांचे गुणधर्म तसेच स्वभावधर्म यांचा अभ्यास करणे, त्यातली सुसंगति आणि विसंगति पाहून त्यावरून तर्कशुद्ध असे निष्कर्ष काढणे आणि त्यांचा उपयोग कसा करून घेता येईल याचा विचार करणे हे विज्ञानाचे स्वरूप आहे. अग्नि किंवा चाक यांच्या शोधापासून ते आजच्या काळापर्यंत यात प्रगति होत आली आहे. विज्ञानामधून मिळालेल्या माहितीचा उपयोग धार्मिक विधींमध्येसुद्धा होत आलेला आहे. माणसाच्या ऐहिक जीवनातली प्रगति विज्ञानामधून होत आली आहे तर त्याची आध्यात्मिक उन्नति तसेच समाजाने गुण्यागोविंदाने कसे रहावे याचे मार्गदर्शन धर्मांमधून दिले जात आले आहे. यामुळे धर्म आणि विज्ञान यांच्यामध्ये कोणतीही स्पर्धा किंवा वैमनस्य नाही. धर्म श्रेष्ठ की विज्ञान असा विचार करणे योग्य नाही.

१. आमच्या घरातले देव

माझ्या लहानपणी मी आमच्या घरी पाहिलेले देवपूजेचे स्वरूप या अनामिक कवीने लिहिलेल्या कवितेत अगदी अचूक टिपले आहे. ही रचना अनेकांना आपल्या लहानपणीची आठवण करून देईल. …… वॉट्सअॅपवरून साभार. ……. ऑगस्ट २०१८
————————————————————-
देवपूजेच्या सध्याच्या प्रचलित, पंचतारांकित , खर्चिक पद्धती पाहिल्या म्हणजे मला आठवते पाच – पंचवीस वर्षांपूर्वींची आईची देवपूजा…
वर्षाकाठी रिमझिमत्या श्रावणात एखादा सत्यनारायण घातला की जणू आमच्या घरी देव वर्षभर राबण्यासाठी नियुक्त केले आहेत असे वाटायचे. तिच्या साध्याभोळ्या भक्तीला सुगंध होता. तिची श्रद्धा उत्सवी नव्हती. तिचे देवही समजदार होते. त्यांनी तिचे चारचौघात हसे होवू दिले नाही. दोन हात आणि तिसरं मस्तक इतक्या अल्प भांडवलावर देवांना आपलंसं करणाऱ्या तिच्या देवपूजेची ही कहाणी….

देव आमच्या घरी वर्षभर राबायचे…
देव किती लवकर पावत नवसाला,
एक दोन सत्यनारायण होऊनच जात वर्षाला.देव आणत स्थळ ताईसाठी शोधून,
आक्काचा पाळणा हलकेच देत हलवून….
दोनचार देव तर नेहमीच असत तिच्या दिमतीला,
ती सांगायची त्यांना फक्त तिचं कुंकू जपायला…

देवांशी तर तिची थेटच ओळख असायची,
रामा.. गोविंदा जगदंबा असं बिनधास्त पुकारायची.
देवाच्या द्वारी ती क्षणभर उभी राहात असे,
पण त्यासाठी तिला बापू दादा अण्णांचा टेकू कधी लागत नसे…
ती कधी देवांना वर्गणी देत नसे,
मासिकांच्या मेंबरशीपचे तिला कधी टेंशन नसे…

मनःशांती साठी तिने कधी कोठला कोर्स केला नाही,
देवांनीही तिला तसा कधी फोर्स केला नाही….
साधे भोळे होते देव तिचे तसे,
चारचौघात त्यांनी तिचे होऊ दिले नाही हसे….
गरीब होते बिचारे मुकाट फळीवर राहायचे,
संगमरवरी देव्हाऱ्याचे स्वप्न त्यांनाही नाही पडायचे….
भाजी आणि भाकरीचा नैवेद्य गोड मानून घ्यायचे,
एका सत्यनारायणाच्या मोबदल्यात
देव आमच्या घरी वर्षभर राबायचे….

—————————————
२. एक महिला आणि देव A WOMAN AND GOD

एका मध्यमवयीन बाईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला इस्पितळात दाखल केले. ती अगदी मरणासन्न अवस्थेत गेली असतांना देवाला तिने दुरूनच विचारले, “माझे आयुष्य संपले का?”
देव म्हणाला, “नाही, तुझी अजून ४० वर्षे शिल्लक आहेत.”
हृदयविकारातून बरे वाटल्यानंतर ती आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहिली आणि तिने आपला चेहेरा, कंबर वगैरेंवर सर्जरी करून आपले सौंदर्य कृत्रिमरीत्या वाढवून घेतले, तिच्या कायापालट होण्याचे सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर घरी परत जातांना वाटेतच तिला अपघात होऊन मरण आले.

देवाघरी गेल्यावर तिने लगेच देवाला विचारले, “तू तर म्हणाला होतास की मी अजून ४० वर्षे जगणार आहे, मग मला या अपघातातून का वाचवले नाहीस?”
पुढे वाचा…..
.
A middle aged woman had a heart attack and was taken to the hospital. While on the operating table she had a near death experience.
Seeing God She asked “Is my time up?” God said,”No, you have another 43 years, 2 months and 8 days to live”
Upon recovery, the woman decided to stay in the hospital and have a Facelift, liposuction, and a tummy tuck. She even had someone come in and change her hair color. Since she had so much more time to live, she figured she might as well make the most of it. After her last operation, she was released from the hospital. While crossing the street on her way home, she was killed by an ambulance.
Arriving in front of God, she demanded, “I thought you said I had another 40 years? Why didn’t you pull me from out of the path of the ambulance?”

(You’ll love this!!!)

. .

.
देव म्हणाला, God replied,
.
“काय करू? मी तुला ओळखलेच नाही गं ! ” “I didn’t recognize you.”

.. . . . फेब्रूवारी २०१३

———————————————————————–

३. या जगात खरोखरच देव आहे. GOD DOES EXIST

१५ सैनिकांची एक तुकडी हिमालयातल्या कारगिलमधल्या पोस्टिंगवर हजर होण्यासाठी दुर्गम भागातून चालत जात असते. थंडीमुळे सारेजण गारठून गेलेले असतात. अशा वेळी मस्तपैकी गरमागरम चहा मिळावा असे त्यातल्या प्रत्येकाला वाटत असते. त्या डोंगराळ भागातल्या रस्त्यात त्यांना एक चहाची टपरी दिसते, पण ती बंद असते. चहा पिण्याची इच्छा अनावर झाल्यामुळे ते सैनिक आपल्या अधिका-याची परवानगी घेऊन त्या झोपडीच्या दरवाजाला लावलेले कुलुप तोडून आत प्रवेश करतात. तिथल्या साहित्यामधून स्वतःच चहा तयार करून ते सगळेजण पितात आणि ताजे तवाने होऊन पुढे जायला निघतात. आपले हे कृत्य योग्य नाही असे वाटल्यामुळे त्यांचा नायक त्याच्या खिशातल्या पाकीटामधून १००० रुपयांची नोट काढून ती साखरेच्या डब्याखाली ठेवतो. आता त्याला सदसद्विवेकबुध्दीची टोचणी रहात नाही आणि ते सर्वजण पुढे आपल्या पोस्टिंगच्या जागी जाऊन रुजू होतात.
काही महिन्यांनंतर ती तुकडी परत जात असतांना पुन्हा त्या टपरीवर थांबते. या वेळी ते दुकान उघडलेले होते. एक म्हातारा माणूस ते चालवत होता. त्याने तयार करून दिलेला चहा सर्वांनी घेतला आणि त्या वयोवृध्द माणसाशी संवाद साधला. त्याचा देवावर दृढ विश्वास होता. त्याने सांगितले, “अहो, माझ्यावर केवढा कठीण प्रसंग आला होता. काही अतिरेक्यांनी माझ्या मुलाला जबरदस्त मारहाण केली होती. त्यामुळे त्या दिवशी मी दुकान लवकर बंद करून त्याला घेऊन इस्पितळात गेलो होतो. त्याच्या इलाजासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. अशा अवस्थेत मी दुसरे दिवशी सकाळी दुकानात आलो तर दरवाजाचे कुलूप तोडलेले पाहून मला आणखीनच धक्का बसला. म्हणजे याच वेळी माझे दुकानसुध्दा लुटले गेले असणार असे मला वाटले. पण आत जाऊन पाहतो तो दुकानातल्या सगळ्या वस्तू जागेवर होत्या आणि माझ्या दुकानात १००० रुपयांची नोट ठेवलेली होती. अशा अडचणीच्या वेळी प्रत्यक्ष देवच माझ्यासाठी धावून आला आणि मला मदत करून गेला पहा. अशा वेळी अशा ठिकाणी आणखी कोण येणार होता? या जगात नक्की देव आहे.”
देव अशा प्रकारे कोणाच्या तरी रूपाने संकटात सापडलेल्या चांगल्या लोकांची मदत करत असतो, कदाचित कोणासाठी तो तुमच्या रूपानेसुध्दा धावून येईल.

मूळ सविस्तर कथा खाली वाचा.
READ ON THIS FACTUAL STORY “The Tea Shop”

A group of fifteen soldiers led by their Major Sahib were on their way to the post in Himalayas where they would be deployed for next three months. Another batch, which will be relieved, would be waiting anxiously for their arrival so that they could fall back to safer confines of their parent unit.
Some would proceed on leave and meet their families.
They were happy that they were to relieve a set of comrades who had done their job.
It was a treacherous climb and the journey was to last till the next evening. Cold winter with intermittent snowfall added to the torture.
If only someone could offer a cup of tea, the Major thought, knowing completely well that it was a futile wish.
They continued for another hour before they came across a dilapidated structure which looked like a small shop. It was locked. It was 2 o’clock in the night and there was no house close to the shop where the owner could be located. In any case it was not advisable to knock any doors in the night for security reasons.
An ancient village in Kargil. It was a stalemate. “No tea boys, bad luck” said the Major. The Major told the men to take some rest since they had been walking for more than three hours now.
Sir, this is a tea shop indeed and we can make tea. We will have to break the lock though.
The officer was in doubt about the proposed action but a steaming cup of tea was not a bad idea.
He thought for a while and permitted for the lock to be broken. The lock was broken. They were in for luck. The place was a shop indeed and had everything required to prepare tea, and also a few packets of biscuits.
The tea was prepared and it brought great relief to all in the cold night. They were now ready for the long and treacherous walk ahead of them and started to get ready to move.
The officer was in thought. They had broken open the lock and prepared tea and consumed biscuits without the permission of the owner. The payment was due but there was no one in sight. But they are not a band of thieves.
They are disciplined soldiers. The Major didn’t move out without doing what needed to be done. He took out a Rs. 1000/- note from his wallet and kept it on the counter, pressed under the sugar container, so that the owner sees it first thing when he arrives in the morning. He was now relieved of the guilt and ordered the move.

Days, weeks and months passed. They continued to do gallantly what they were required to do and were lucky not to lose any one from the group in the intense insurgency situation.
And then one day, it was time to be replaced by another brave lot. Soon they were on their way back and stopped at the same shop, which was today open with the owner in place. He was an old man with very meager resources and was happy to see fifteen of them with the prospect of selling at least fifteen cups of tea that day.
All of them had their tea and spoke to the old man about his life and experiences in general, selling tea at such remote a location. The poor, old man had many stories to tell all of them, replete with his faith in God.
If there was a God will he leave you in this Pitiable / Poor condition, asked a Soldier!!
“No Sir, Don’t say like that, God actually Exists. I got the Proof a few months ago.I was going through very tough times because my only son had been severely beaten by the terrorists who wanted some information from him which he did not have.
I had closed the shop early that day and had taken my son to the hospital. There were medicines to be purchased and I had no money. No one would give me a loan from fear of the terrorists. There was no hope, Sahib.
“And that day Sahib, I had prayed to Allah for help. And Sahib, Allah walked into my shop that day.
“When I returned to my shop that day and saw the lock broken, I thought someone had broken in and had taken away whatever little I had. But then I saw that ‘Allah’ had left Rs. 1000/- under the Sugar Pot. Sahib, I can’t tell you what that Money was Worth that day. Allah exists Sahib, He does.
“I know people are dying every day here but all of you will soon meet your near and dear ones, your children, and you must thank your God Sahib, he is watching all of us. He does exist. He walked in to my shop that day and broke open the lock to give me the money I desperately needed. I know He did it.”
The faith in his eyes was unflinching. It was unnerving. Fifteen sets of eyes looked at their officer and read the order in his eyes clear and unambiguous,’Keep quiet.’
The officer got up and paid the bill and hugged the old man.
“Yes Baba, I know, God does exist and yes the tea was wonderful.”
Fifteen pairs of eyes did not miss the moisture building in the eyes of the Major, a rare sight.

And the Real Truth is that Any One of us can be a God to Somebody.

.. . . . फेब्रूवारी २०१३

४. देवाची योजना

देहप्रदर्शन करणारे कपडे घालून दोन मुली आपल्या वडिलांना भेटायला गेल्या. त्यांच्याकडे पाहून ते बोलले, ” परमेश्वराने जेवढ्या मूल्यवान वस्तू बनवल्या आहेत त्या सगळ्या सहज सापडू नयेत अशा रीतीने झाकून ठेवल्या आहेत. हिरे कुठे मिळतात? खूप खोल खाणीमध्ये सुरक्षितपणे झाकून ठेवलेले. मोती कुठे मिळतात? समुद्राच्या तळाशी शिंपल्यामध्ये सुरक्षितपणे ठेवलेले. सोने कुठे मिळते? ते सुध्दा खडकांच्या अनेक थरांनी झाकलेले असते. यातले काही पाहिजे असेल तर ते मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुमची कायासुध्दा पवित्र आहे, सोने, हिरे, मोती यांपेक्षा जास्त मोलाची आहे. तिला तुम्ही वस्त्रांमध्ये अवगुंठित करून ठेवायला हवे.”

An incident transpired when daughters arrived at home wearing clothes that were quite revealing. Here is the story as told by one of the daughters:
When we finally arrived, the chauffeur escorted my younger sister and me up to my father’s suite. As usual, he was hiding behind the door waiting to scare us. We exchanged many hugs and kisses as we could possibly give in one day.
My father took a good look at us. Then he sat me down on his lap and said something that I will never forget.
He looked me straight in the eyes and said, My princess, everything that God made valuable in the world is covered and hard to get to.
Where do you find diamonds? Deep down in the ground, covered and protected.
Where do you find pearls? Deep down at the bottom of the ocean, covered up and protected in a beautiful shell.
Where do you find gold? Way down in the mine, covered over with layers and layers of rock.
You’ve got to work hard to get to them.
He looked at me with serious eyes. Your body is sacred. You’re far more precious than diamonds and pearls, and you should be covered too.

.. . . . फेब्रूवारी २०१३

५. देवा रे देवा Hospital Bill

एक माणूस दुकानात गेलेला असतांना हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले गेले, त्याची शस्त्रक्रिया झाली. तो शुध्दीवर आला तेंव्हा त्याच्या शेजारी अनेक फॉर्म घेऊन एक नन बसली होती. तिने विचारपूस सुरू केली. “तुमचा विमा उतरवलेला आहे का ?”,
” नाही”
“तुमच्या बँकेत पैसे आहेत का?”,
” नाहीत”
” तुमचे कोणी नातेवाईक आहेत का?”
” हो. माझी लग्न न झालेली बहीण आहे, ती नन आहे.”
” असे कसे म्हणता? नन्सचे देवाशी लग्न लागलेले असते”
” छान. मग हे बिल माझ्या मेहुण्याकडे पाठवून द्या.”

A man suffered a serious heart attack while shopping in a store.The store clerks Called 911 when they saw him collapse to the floor.
The paramedics rushed the man to the nearest hospital where he had emergency Open heart bypass surgery.
He awakened from the surgery to find himself in the care of nuns at the Catholic Hospital. A nun was seated next to his bed holding a clipboard Loaded with several forms, and a pen. She asked him how he was going to Pay for his treatment.
“Do you have health insurance?” she asked.
He replied in a raspy voice, “No health insurance.”
The nun asked, “Do you have money in the bank?”
He replied, “No money in the bank.”
Do you have a relative who could help you with the payments?” asked the Irritated nun.
He said, “I only have a spinster sister, and she is a nun.”
The nun became agitated and announced loudly, “Nuns are not spinsters! Nuns are married to God.”
The patient replied, “Perfect. Send the bill to my brother-in-law.”

OMG

. . . . . . . जानेवारी २०१३

६. देव तारी तिला कोण मारी

एका अरण्यातली एक गर्भवती हरिणी पिलाला जन्म देण्याच्या बेतात आहे. तिच्या एका बाजूला पाण्याने भरून दुथडी वाहणारी नदी आहे तर दुस-या बाजूला गवताचे रान वणव्यामुळे पेटलेले आहे. तिच्या डाव्या बाजूला एक शिकारी धनुष्याला बाण लावून तयार उभा आहे आणि उजव्या बाजूला एक भुकेला सिंह तिच्यावर चाल करून येत आहे. तिने बिचारीने आता काय करावे? तिचे आणि तिच्या पिलाचे आता काय होईल?

आता हरिणी काय करेल ?

.
.
.
काहीच न करता ती पिलाला जन्म देण्याकडे लक्ष देते. त्या क्षणी आभाळात वीज चमकते. त्या प्रकाशाने दिपून गेल्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकतो आणि त्याचा बाण सिंहाला लागून तो घायाळ होतो. धोधो पाऊस कोसळतो आणि पेटलेल्या गवताला विझवून टाकतो. हरिणी आपल्या पिलाला घेऊन गवतात निघून जाते.

Stochastic Probability Theory – Pregnant Deer Scenario
Consider this scenario: In a remote forest, a pregnant deer is about to give birth to a baby. It finds a remote grass field near by a river and slowly goes there thinking it would be safe. As she moves slowly, she gets labor pain, at the same moment, dark clouds gather around that area and lightning starts a forest fire. Turning left she sees a hunter who is aiming an arrow from a distance. As she tries to move towards right, she pots a hungry lion approaching towards her.
What can the pregnant deer do, as she is already under labor pain ?What do you think will happen ?
Will the deer survive ?
Will it give birth to a fawn ?
Will the fawn survive ? or
Will everything be burnt by the forest fire ?

That particular moment ?

Can the deer go left ? Hunter’s arrow is pointing
Can she go right ? Hungry male lion approaching
Can she move up ? Forest fire
Can she move down ? Fierce river

Answer: She does nothing. She just focuses on giving birth to a new LIFE.
The sequence of events that happens at that fraction of a second (moment) are as follows:
In a spur of MOMENT a lightning strikes (already it is cloudy ) and blinds the eyes of the Hunter. At that MOMENT, he releases the arrow missing and zipping past the deer. At that MOMENT the arrow hits and injures the lion badly. At that MOMENT, it starts to rain heavily and puts out the forest fire. At that next MOMENT, the deer gives birth to a healthy fawn.

In our life, it’s our MOMENT of CHOICE and we all have to deal with such negative thoughts from all sides always. Some thoughts are so powerful they overpower us and make us clueless. Let us not decide anything in a hurry. Let’s think of ourselves as the pregnant deer with the ultimate happy ending. Anything can happen in a MOMENT in this life. If you are religious, superstitious, atheist, agnostic or whatever, you can attribute this MOMENT as divine intervention, faith, sudden luck, chance (serendipity), coincidence or a simple ‘don’t know’. We all feel the same. But, whatever one may call it, I would see the priority of the deer in that given moment was to giving birth to a baby because LIFE IS PRECIOUS.
Hence, whether you are deer or a human, keep that faith and hope within you always.

. . . . . . . जानेवारी २०१३

 • * * * *

७. आणि देव हसतच राहिला

बायबलातले एक वाक्य आहे.
“चांगल्या आणि आज्ञाधारक पत्नी जगाच्या सर्व कोप-यांमध्ये सापडतील” असे आश्वासन देवाने पुरुषांना दिले.
.
त्याने वर्तुळाकार पृथ्वीची रचना केली
आणि तो हसतच राहिला, हसतच राहिला, हसतच राहिला……….
Today’s Short Reading From The Bible …** A Reading from Genesis *
And God promised men that good and obedient wives would be found in all corners of the earth. Then he made the earth round … And he laughed and laughed and laughed.

. . . . . . . जानेवारी २०१३


८. देवबाप्पाशी गप्पा

देवबाप्पाने मला काय काय सांगितलं माहीत आहे? तुम्हीच वाचून पहा. शब्दांतून ते छान व्यक्त झाले आहेच, त्यातल्या चित्रामध्ये दिसणारे भाव पहातांना बहार येईल.
God Said NO!!
I hope that you can get the effects on your computers!
The words are great, but the movements of the faces add a lot….

मी बाप्पाला सांगितले, “माझ्या सवयींतून मला मोकळे कर.”
I asked God to take away my habit.

बाप्पा म्हणाला, “नाही. मी त्या सवयींना काढून घेणार नाही, तुझ्या तुलाच त्या सोडून द्यायच्या आहेत.
God said, No.

It is not for me to take away, but for you to give it up.

उतावीळपणा सोडून धीर धरायची बुध्दी मला देण्याची विनंती मी बाप्पाला केली.
बाप्पा म्हणाला, “नाही. विचारपूर्वक वागलास तर तुला धीर धरता येईल. हा गुण देता येत नाही. तो शिकावा लागतो.”

I asked God to grant me patience.
God said, No. Patience is a byproduct of tribulations; it isn’t granted, it is learned.

मला सुख देण्याचा आग्रह मी धरला.
बाप्पा म्हणाला, “नाही. मी फक्त आशीर्वाद देतो. सुखी रहाणे तुझ्याच हातात आहे.”

I asked God to give me happiness.
God said, No. I give you blessings; Happiness is up to you.

मला कष्टांमधून मुक्त करण्याची विनंती मी केली.
बाप्पा म्हणाला, “नाही. दुःख सहन करणेच तूला भौतिक जगतापासून दूर नेऊन माझ्या जवळ आणेल.”

I asked God to spare me pain.
God said, No. Suffering draws you apart from worldly cares and brings you closer to me.

माझ्या आत्म्याची उन्नती करायला मी बाप्पाला सांगितले
बाप्पा म्हणाला, “नाही. तुझी उन्नती तूच करायची आहेस. तू सफल होशील यासाठी मी त्यावर अंकुश ठेवीन”

I asked God to make my spirit grow.
God said, No. You must grow on your own, but I will prune you to make you fruitful.
मला जीवनाचा आनंद लुटण्याची सारी साधने दे असे मी त्याला सांगितले.
बाप्पा म्हणाला, “नाही. तू जीवनातल्या सर्व आनंदांचा उपभोग घ्यावास यासाठी मी तुला जीवन देईन”

I asked God for all things that I might enjoy life.
God said, No. I will give you life, so that you may enjoy all things.
तो माझ्यावर जेवढे प्रेम करतो तेवढे प्रेम मी इतरांवर करण्यासाठी मला मदत कर अशी विनंती मी बाप्पाला केली,
बाप्पा म्हणाला, “अह्हा. अखेर एकदाचा तुझ्या डोक्यात प्रकाश पडला.”

I asked God to help me LOVE others, as much as He loves me.
God said… Ahhhh, finally you have the idea.

. . . . . . . जानेवारी २०१०

९. देव तारी तयांना …… (११ सप्टेंबर)


न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर ही इमारत ज्यात उद्ध्वस्त झाली त्या ११ सप्टेंबरच्या घटनेनंतर त्यातून जे लोक वाचले त्यांच्या कहाण्या प्रकाशात आल्या. ज्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांचे प्राण वाचले त्या अशा आहेत.
– एका गृहस्थाचा मुलगा त्या दिवशी पहिल्यांदा बालवर्गात गेला.
– एका माणसाची त्या दिवशी डोनट आणायची पाळी असल्यामुळे तो तिकडे गेला.
– एका महिलेच्या घड्याळाचा गजर त्या दिवशी वाजला नाही.
– एक माणूस अपघातात अडकून पडला.
– एका माणसाची बस चुकली
– एका महिलेच्या कपड्यांवर अन्न सांजल्यामुळे तिला कपडे बदलावे लागले.
– एका माणसाची गाडी सुरू झाली नाही.
– एक माणूस फोन घेण्यासाठी दारातून घरी परत गेला.
– एका माणसाचे लहान मूल चाळे करत राहिले आणि लवकर तयार झाले नाही.
– एका माणसाला टॅक्सीच मिळाली नाही

 • एका माणसाने घेतलेले नवे जोडे चावल्यामुळे त्याचा पाय दुखावला आणि त्यावर लावाला पट्टी घेण्यासाठी तो ओषधांच्या दुकानात गेला.

या सर्वांना त्या दिवशी देवानेच वाचवले असे म्हणता येईल…..
पण जे लोक त्यांच्या ध्यानी मनी नसतांना, विनाकारण किंवा अशाच छोट्या कारणामुळे त्या जागी गेले आणि त्या घटनेत सापडले त्यांचे काय ?

माझ्या माहितीमधली एक मुलगी लग्न करून पतीगृही चालली होती. तिची तो पहिलाच परदेश प्रवास होता. ती न्यूयॉर्कच्या आसपाससुध्दा कोठे गेली नाही. पण त्या घटनेनंतर अमेरिकेतली विमानवाहतूकव्यवस्था कोसळली. त्यामुळे तिचे विमान भलत्याच विमानतळावर गेले, तिचा नवरा दुसरीकडेच तिला घेण्यासाठी गेला होता. तेंव्हा मोबाईल फोन नव्हते त्यामुळे त्यांना एकमेकांशी संपर्क साधता आला नाही आणि त्यात तिचे अतोनात हाल झाले. तीसुध्दा देवाचीच मर्जी !

मूळ लेख :
The Little things

After Sept. 11th, one company invited the remaining members of other companies who had been decimated by the attack on the Twin Towers to share ! their available office space.
At a morning meeting, the head of security told stories of why these people were alive… and all the stories were just: the ‘L I T T L E’ things.
As you might know, the head of the company survived that day because his son started kindergarten.
Another fellow was alive because it was his turn to bring donuts.
One woman was late because her alarm clock didn’t go off in time.
One was late because of being stuck on the NJ Turnpike because of an auto accident.
One of them missed his bus.
One spilled food on her clothes and had to take time to change.
One’s car wouldn’t start.
One went back to answer the telephone.
One had a child that dawdled and didn’t get ready as soon as he should have.
One couldn’t get a taxi.
The one that struck me was the man who put on a new pair of shoes that morning, took the various means to get to work but before he got there, he developed a blister on his foot.
He stopped at a drugstore to buy a Band-Aid. That is why he is alive today.
Now when I am stuck in traffic, miss an elevator, turn back to answer a ringing telephone…
all the little things that annoy me. I think to myself, this is exactly where God wants me to be at this very moment..

Next time your morning seems to be going wrong, the children are slow getting dressed,
you can’t seem to find the car keys, you hit every traffic light, don’t get mad or frustrated; God is at work watching over you!
May God continue to bless you with all those annoying little things and may you remember their possible purpose.

Pass this on to someone else, if you’d like. There is NO LUCK attached. If you delete this, it’s okay:
God’s Love Is Not Dependent On E-Mail

. . . . . . . जून २००९

१०. परमेश्वर – एका आठ वर्षांच्या बालकाच्या नजरेतून


माणसांना बनवणे हे परमेश्वराचे मुख्य काम आहे. पण तो एकदम मोठी माणसे न बनवता लहान बाळांना बनवतो. कारण ती आकाराने छोटी आणि तयार करायला सोपी असतात. शिवाय त्यांना चालायला, बोलायला शिकवण्याचे काम त्याचे आईबाबा करतात, त्यामुळे देवाचा वेळ वाचतो.
प्रार्थना ऐकणे हे परमेश्वराचे दुसरे महत्वाचे काम आहे. पण जगात सगळीकडे इतक्या प्रार्थना चाललेल्या असतात की त्या ऐकण्यातून देवाला टीव्ही किंवा रेडिओ ऐकायला फुरसत मिळत नाही. तरीही त्यांचा केवढा मोठा गोंगाट त्याच्या कानात होत असेल. तो हा आवाज बंद करू शकत असेल का?
देव सगळीकडे असतो आणि सगळे पहात व ऐकत असतो. त्यात तो फारच गुंतलेला असणार. त्यामुळे तुमचे आईबाबा जे देऊ शकत नाही असे सांगतात ते त्याच्याकडे मागून त्याचा वेळ वाया घालवू नये.
नास्तिक लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. पण असे लोक आमच्या गावात नाहीत, निदान चर्चमध्ये येणा-या लोकात तर नाहीच नाहीत.
येशू ख्रिस्त देवाचा मुलगा आहे. पाण्यावर चालणे, चमत्कार करून दाखवणे यासारखी कष्टाची कामे तो करायचा, शिवाय लोकांना देवाबद्दल सांगायचा. त्याच्या शिकवण्याला कंटाळून अखेर लोकांनी त्याला क्रूसावर चढवून दिले.
पण तो आपल्या बाबांसारखाच दयाळू आणि प्रेमळ होता. हे लोक काय करताहेत ते या लोकांना समजत नाही म्हणून त्यांना क्षमा कर असे त्याने देवाला सांगितले आणि देवाने ते मान्य केले.
येशूने केलेली मेहनत देवाला आवडली आणि त्याने येशूला रस्त्यावरून न भटकता स्वर्गातच रहायला सांगितले. तो तिथे राहिला. आता तो देवाला त्याच्या कामात मदत करतो. लोकांच्या प्रार्थना ऐकतो, देवासाठी काय महत्वाचे आहे आणि काय नाही हे पाहून ठेवतो आणि फक्त महत्वाच्या गोष्टी त्याच्यापुढे मांडतो.
तुम्ही पाहिजे तेंव्हा प्रार्थना करा. परमेश्वर आणि येशू या दोघांपैकी एकजण तरी नेहमी कामावर हजर असतोच.
तुम्ही सब्बाथच्या वेळी चर्चमध्ये गेलात तर देव खूष होतो. आणि तुम्हाला तेच पाहिजे असते.
बीचवर जाऊन मजा करण्यासाठी चर्चला जाणे टाळू नका. नाही तरी सूर्याचे ऊन बीचवर पसरायला दुपार होतेच.
तुम्ही देवावर विश्वास ठेवला नाहीत तर तुम्हाला नास्तिक म्हणतीलच, शिवाय तुम्ही एकटे पडाल. तुमचे आईबाबा काही नेहमीच सगळीकडे तुमच्यासोबत येऊ शकणार नाहीत, पण देव येऊ शकेल. अंधार झाला किंवा दांडगट मुलांनी तुम्हाला खोल पाण्यात फेकून दिले आणि त्यामुळे तुमची भीतीने गाळण उडाली तर त्या वेळी देव जवळपास आहे या कल्पनेने तुम्हाला बरे वाटेल, धीर येईल.
पण तुम्ही सतत देव तुमच्यासाठी काय करू शकेल याचाच विचार मात्र करू नये, कारण तो आपल्याला परतसुध्दा नेऊ शकतो.
…… आणि म्हणून मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.

Subject: A Little Boy’s Explanation of God — Fabulous!!!

The following essay was written by an 8-year-old named Danny Dutton, who lives in Chula Vista, CA . He wrote it for his third grade homework assignment, to ‘explain God.’ I wonder if any of us could have done as well?
[ … And he had such an assignment, in California , and someone published it, I guess miracles do happen ! … ]

EXPLANATION OF GOD:

’One of God’s main jobs is making people. He makes them to replace the ones that die, so there will be enough people to take care of things on earth.
He doesn’t make grownups, just babies. I think because they are smaller and easier to make. That way he doesn’t have to take up his valuable time teaching them to talk and walk. He can just leave that to mothers and fathers.’
‘God’s second most important job is listening to prayers. An awful lot of this goes on, since some people, like preachers and things, pray at times beside bedtime.
God doesn’t have time to listen to the radio or TV because of this. Because he hears everything, there must be a terrible lot of noise in his ears, unless he has thought of a way to turn it off.’
‘God sees everything and hears everything and is everywhere which keeps Him pretty busy. So you shouldn’t go wasting his time by going over your mom and dad’s head asking for something they said you couldn’t have.’
‘Atheists are people who don’t believe in God. I don’t think there are any in Chula Vista . At least there aren’t any who come to our church.’
‘Jesus is God’s Son. He used to do all the hard work, like walking on water and performing miracles and trying to teach the people who didn’t want to learn about God. They finally got tired of him preaching to them and they crucified him.
But he was good and kind, like his father, and he told his father that they didn’t know what they were doing and to forgive them and God said O.K.’
‘His dad (God) appreciated everything that he had done and all his hard work on earth so he told him he didn’t have to go out on the road anymore. He could stay in heaven. So he did. And now he helps his dad out by listening to prayers and seeing things which are important for God to take care of and which ones he can take care of himself without having to bother God. Like a secretary, only more important.’
‘You can pray anytime you want and they are sure to help you because they got it worked out so one of them is on duty all the time.’
‘You should always go to church on Sabbath because it makes God happy, and if there’s anybody you want to make happy, it’s God!
Don’t skip church to do something you think will be more fun like going to the beach. This is wrong. And besides the sun doesn’t come out at the beach until noon anyway.’
‘If you don’t believe in God, besides being an atheist, you will be very lonely, because your parents can’t go everywhere with you, like to camp, but God can. It is good to know He’s around you when you’re scared, in the dark or when you can’t swim and you get thrown into real deep water by big kids.’
‘But…you shouldn’t just always think of what God can do for you. I figure God put me here and he can take me back anytime he pleases.

And…that’s why I believe in God.’*

. . . . . . नोव्हेंबर २०१०

************

नवी भर दि. १८-०५-२०२१

११. भगवंताचे अस्तित्व

बोधकथा… ज्याचा देवावर विश्वास नाही त्यांनी नक्की वाचावी …………………..

भगवंताचे अस्तित्व

थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते , ते प्रोफेसर नास्तिक होते त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले “अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता , वय पण 45 एक आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा , हे बायबल वाचून काय होणार? फेकून द्या बघू ते रेल्वे च्या बाहेर.” हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसन ना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोचले.
आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले , त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते , आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले “वा , काय प्रयोगशाळा आहे तुमची , खरच तुम्ही फार मोठे आहात , किती दिवस लागले हो हे सगळं करायाला?” त्यावर एडिसन म्हणाले “छे हो , हे मी काहीच केलेलं नाही , सगळे आधीच तयार होते मी फक्त इथे येऊन प्रयोग केले.”
त्यावर प्रोफेसर म्हणाले “माझी चेष्टा करताय काय, अस आपोआप काही तयार होत होय?” त्यावर एडिसन हसले व म्हणाले “अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आपोआप आली अस म्हटलेलं तुम्हाला पटलं नाही ना, मग हे ब्रह्मांड आपोआपच निर्माण झालं हे मला कस पटेल.”
पुढे त्यांनी एक सिद्धांत मांडला आहे , ते म्हणतात “Where there is a creation there should be a creator ,Without a creator there is no creation so god exists.”
तात्पर्य- मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा देवाचे अस्तित्व मान्य केलं आहे.👌👌

१२. देव म्हणाला “कधीही धीर सोडू नका”

मी पूर्णपणे हताश होऊन सर्वसंगपरित्याग केला आणि आपल्या जीवनाचासुध्दा त्याग करायचे ठरवले. त्यापूर्वी एकदा परमेश्वराशी बोलून घ्यावे म्हणून गर्द वनराईत जाऊन त्याला भेटलो.
मी म्हंटले,”हे देवा, मी धीर सोडू नये असे एक तरी चांगले कारण तू दाखवू शकशील कां?”
त्याने दिलेले उत्तर ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणाला, “जरा सभोवताली पहा, तुला ही हिरवळ आणि बांबूंची बेटे दिसताहेत ना?”
“हो.”
“मीच जेंव्हा या हिरवळीची आणि वेळूची बीजे जमीनीत पेरली तेंव्हा दोन्हींचीही चांगली काळजी घेतली. त्यांना पाणी, उजेड, वारा वगैरे दिले. हिरवळ लगेच जमीनीतून वर उठली आणि सर्व बाजूला पसरून तिने हिरवागार गालिचा तयार केला. बांबूच्या बीजातून कांहीच वर उठले नाही.
पण मी त्याचा नाद सोडला नाही. दुसऱ्या वर्षी हिरवळ जास्तच घनदाट झाली आणि दूरवर पसरली. पुन्हा वेळूची कांहीच हालचाल दिसली नाही. पण मी त्याला आधार देतच राहिलो. असेच तिसरे आणि चौथे वर्षही गेले.
पांचव्या वर्षी अचानक बांबूचा एक इवलासा अंकुर फुटून बाहेर आला. बाजूच्या हिरवळीत तो दिसत सुध्दा नव्हता. पण सहा महिन्यात तो वाढत गेला आणि त्याचा १०० फूट उंच बांबू उभा राहिला.
पहिली पाच वर्षे तो आपली मुळे बळकट करत होता. जमीनीवर आल्यानंतर त्याचे पोषण करून त्याला जगवत ठेवण्यासाठी आणि ताठ उभे राहण्यासाठी आवश्यक तेवढा मजबूतपणा त्यांना आणत होता. कोणालाही झेपणार नाही एवढे मोठे आव्हान मी त्याच्यापुढे ठेवत नाही.”
तो पुढे म्हणाला, “हे वत्सा, इतकी वर्षे तू जी धडपड करीत आहेस, त्यातून तुझी मुळे बळकट होत आहेत. (तू खंबीर आणि सुदृढ बनत आहेस) मी जसा बांबूला सोडले नाही तसेच तुलाही वाऱ्यावर सोडणार नाही. तू तुझी तुलना इतरांशी करू नकोस. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. बांबू आणि हिरवळ यांची उद्दिष्टे वेगळी असतात, पण दोन्हींमुळे वनाला शोभा येते. जेंव्हा तुझी वेळ येईल तेंव्हा तू सुध्दा उंची गांठशील.”
“किती?”
“बांबू केवढी गांठतो?”
“त्याला हवी असेल तेवढी?”
“हो. तुझी इच्छा असेल तेवढी उंची गांठून मला गौरवशाली कर.”
परमेश्वर कधीच आपल्याला सोडून देत नसतो. त्यामुळे गेल्या दिवसाची खंत कधीही मनात धरू नका.

………. इंग्रजी लेखाचे भाषांतर. मूळ लेख खाली दिला आहे

One day I decided to quit…

One day I decided to quit… I quit my job, my relationship, my spiri tuality… I wanted to quit my life.
I went to the woods to have one last talk with God. “God”, I said. “Can you give me one good reason not to quit ?” His answer surprised me…
“Look around”, He said. “Do you see the fern and the bamboo?” “Yes”, I replied.
When I planted the fern and the bamboo seeds, I took very good care of them. I gave them light. I gave them water. The fern quickly grew from the earth. Its brilliant green covered the floor. Yet nothing came from the bamboo seed.
But I did not quit on the bamboo. In the second year the Fern grew more vibrant and plentiful.
And again, nothing came from the bamboo seed. But I did not quit on the bamboo. He said.
“In the third year, there was still nothing from the bamboo seed. But I would not quit. In the fourth year, again, there was nothing from the bamboo seed. “I would not quit.” He said. “Then in the fifth year a tiny sprout emerged from the earth. Compared to the fern it was seemingly small and insignificant… But just 6 months later the bamboo rose to over 100 feet tall. It had spent the five years growing roots. Those roots made it strong and gave it what it needed to survive. I would not give any of my creations a challenge it could not handle.”
He said to me. “Did you know, my child, that all this time you have been struggling, you have actually been growing roots.”
“I would not quit on the bamboo. I will never quit on you. ” Don’t compare yourself to others ..” He said. ” The bamboo had a different purpose than the fern … Yet, they both make the forest beautiful.”
Your time will come, ” God said to me. ” You will rise high! ” How high should I rise?” I asked.
How high will the bamboo rise?” He asked in return. “As high as it can? ” I questioned.
” Yes. ” He said, “Give me glory by rising as high as you can. ”
I hope these words can help you see that God will never give up on you. He will never give up on you. Never regret a day in your life.

Apr 17, 2009

१३. “देवांवर विश्वास एक मानसिक आजार…!!!”

“देवावर श्रध्दा “ ह्या विषयावर अमेरिकेत अनेक वर्षापासुन संशोधन सुरु होत. शेवटी “देवावर श्रध्दा हा मानसिक आजार आहे” असे तेथील Psychological Association नी जाहीर केले. सर्वप्रथम भारतात “चार्वाक” यांनी असे म्हटले की प्रमाणाशिवाय कशालाही मान्यता देवु नये”. त्यानतर बुध्द आले. बुध्द हे मनोवैज्ञानिक (Human Scientist) होते. त्यांनी यावर अनेक वर्ष चिन्तन (meditation) केले. शेवटी त्यांनी देव ह्या शब्दालाच तिलांजली दिली. बुध्द म्हणतात एखादी गोष्ट अनुश्रयावरुन म्हणजे ऐकीव माहितीवरुन स्वीकारु नका. परंपरा आहे म्हणुन स्वीकारु नका. कोणी तरी असे असे आहे म्हणून स्वीकारु नका. एखादी गोष्ट पिटकातून आली आहे एवढ्यावरुन स्वीकारु नका. बाह्य रुपाचा विचार करुन स्वीकारु नका. अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो म्हणून स्वीकारु नका. ( किंवा एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे म्हणून स्वीकारु नका.) (सांगणा-याचे) सुंदर रुप पाहुन स्वीकारु नका. (किवा संभाव्यता आहे एवढ्यावरुन स्वीकारु नका.) हा श्रमण आपला गुरु आहे, असा विचार करुन स्वीकारु नका. अशाप्रकारचे विचार पसरवुन बुध्दानी माणसाच्या मनामध्ये बुध्दिप्रामाण्य वाद रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय इतर अवैज्ञानिक रुढी, परंपरा, देव याचा समावेश धम्मात होवु नये, याची पुरेसी काळजी बुध्दाने घेतलेली आहे. यानंतर बुध्द धम्माची पिछेहाट झाली. मनुवाद पुढे आला आणि बुध्दिप्रामण्यवाद मागे पडला. बुध्दाचे मुळतत्वज्ञानचा आपल्याला विसर पडला. भारतात मानवी मेंदू गोठवण्याचे तत्वज्ञान पेरण्यात आले. परिणाम हा झाला की त्यामुळे धर्म विरुध्द विज्ञान ही लढाई फक्त युरोप मधेच सुरु झाली. भारतामध्ये ही लढाई सुरु झालीच नाही, आजही आपण विज्ञान स्वीकारत नाही. आपण फक्त तंत्रज्ञान स्वीकारतो. आपल्या देशात अणुभट्टीमधे काम करणारा माणुस सुध्दा भलमोठे गंध लावून जातो. इथल्या धर्मग्रंथानी विचार निर्माण होण्याकरिता माणसामधे मेंदूच शिल्लक ठेवला नाही. ईश्वर कोणीही पाहीलेला नाही, त्याला काहीही प्रमाण नाही. तरीही आपण त्याचे पुजन करतो. त्याचे नमन करतो. मला जे काही मिळालेले आहे ते ईश्वराच्याच कृपेने मिळालेले आहे असे मानतो. ही मानसिक गुलामगिरी आहे. जे मुळात अस्तित्वाचच नाही. त्याला मान्यता देणे, त्याची पुजा करणे ही मानसिक विकृतीच आहे. हा मानसिक आजार आहे. अमेरिकेतील Psychological Association नी जगासमोर मांडलेले संशोधन हा चार्वाक आणि बुध्द विचारांचा विजय आहे. पुन्हा एकदा देवाच विसर्जन करुया, अंधश्रद्धेच्या बेड्या तोडुया. देव, धर्म , रुढी ,परम्परा, कर्मकांड,भविष्य ,बुवाबाजी अंधश्रध्देचा हा हजार पायांचा ऑक्टोपस आहे, याला कायमचे मनातुन काढुन व्यक्तिस्वातंत्र्याचे आत्मतत्वच गहाण टाकणा-या देवाला रिटायर करुया.. . . . . . . . फेसबुकवरून साभार दि.२०-०३-२०२२

१४ . देवपूजा – एक मेडिटेशन

पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली.
मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची.

माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं. भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत.
सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही) सुंदर अनुभव.
फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्याजागी स्थानापन्न करतात.
एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध ऊगाळतात.
तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव.
खऱ्या भक्तीभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना ‘तो’ आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, ‘तो’ समर्थ आहे, मी कशाला ऊगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो.
चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धूपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफिल.
ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की.
तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्रं.
खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी. सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी. तुम्हाला जास्त प्रेमळ, करूणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी.
मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही ऊत्तमच होईल’ असा भक्कम विश्वास देऊ करणारी.
हळूहळू तुमच्यातला ‘अहं’ विसरायला लावणारी….
अशी ही रोजची पूजा.

ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का?
या वेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का?
यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही ऊपयोग होईल का?
पूजा ही कुणा बाहेरच्या ‘देवाला’ प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीये, तर स्वत:मधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सुरूवात सकारात्मक ऊर्जेने आणि ऊत्साहाने करायचा तो एक सहजसोपा आणि सुंदर मार्ग आहे.

३१ डिसेंबरची (२०१८) गाणी

सूर्योदय ०४

३१ डिसेंबर २०१८, या वर्षातला अखेरचा सूर्यास्त होऊन गेला आहे. आता आणखी काही तासांमध्येच हे वर्षही अस्ताला जाणार आहे. या निमित्याने दोन मजेदार आणि एक गंभीर प्रकृतीचे गाणे सादर करीत आहे.

पहिले गाणे कदाचित गटारी अमूशेचे असेल किंवा ३१ डिसेंबरचे. या वर्षाची मजेदार सांगता करायला फिट्ट आहे. श्री.चिंतामणी जोगळेकर यांचे आभार आणि स्व.शांताबाई शेळके यांची क्षमा मानून ……..

किणकिण किणकिण ग्लास बोलती
झुळझुळ झुळझुळ बियर वाहती
जागोजागी चखणे दिसती
मद्यपी सारे तुटून पडती…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

त्या गावाची गंमत न्यारी
तिथे नांदती व्यसने सारी
कुणी न मोठे कुणी धाकटे
कुणी न बसते तिथे एकटे
सारे झिंगुन, गाती नाचती,
कोणी रडके नाही…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

नाही ऑफिस, नाही वेळा
गटारातही खुशाल लोळा!
उडो, बागडो, पडो, धडपडो,
लागत कोणा नाही…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

तिथली पिंपे वाइन देती
पर्‍या हासर्‍या पेले भरती
झाडावरती मुर्ग लटकती
पेग बनवते तिथली आन्टी
म्हणाल ते ते सारे मिळते,
उणे न कोठे काही…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

©चिंतामणी जोगळेकर

हे विडंबन आता पुन्हा एकदा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना वाचायला मिळेल. नावासह प्रसिद्ध करणाऱ्या सर्वांना धन्यवाद..

शांताबाई शेळके यांच्याविषयी पूर्ण आदर आहेच.
———————————

असेच दुसरे एक मद्यगीत

फिटे अंधाराचे जाळे या गाण्याची चाल असलेले ३१ डिसेंबरचे गीत……..

पिती अंधारात सारे
झाले मोकळे हो ग्लास
नाकातोंडातून वाहे
एक उग्र असा वास !!१!!

बार जागे झाले सारे
बारबाला जाग्या झाल्या
सारे जमता हो एकत्र
बाटल्याही समोर आल्या
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास !!२!!

दारु पिऊन नवेल्या
झाल्या बेवड्यांच्या जाती
बारमधेच साऱ्यांच्या
सरु लागल्या हो राती
क्षणापूर्वीचे पालटे
जग भकास भकास !!३!!

जुना सकाळचा प्रकाश
झाला संध्येचा काळोख
दारुड्यांचा दारुड्यांना
दारुनेच अभिषेक
एक अनोखे हे मद्य
आले ग्लासात ग्लासात !!४!!

🍻🍻🍻😝😝😝

कवी- श्री.दे.शि.दारूडे
——————————————————————–

आता एक गंभीर गाणे. डिसेंबर आणि जानेवारी यांना व्यक्तीमत्वे आहेत अशी कल्पना करून त्यांना रंगवणारे.

कितना अजीब है ना,
दिसंबर और जनवरी का रिश्ता?
जैसे पुरानी यादों और नए वादों का किस्सा…

दोनों काफ़ी नाज़ुक है
दोनो मे गहराई है,
दोनों वक़्त के राही है,
दोनों ने ठोकर खायी है…

यूँ तो दोनों का है
वही चेहरा-वही रंग,
उतनी ही तारीखें और
उतनी ही ठंड…
पर पहचान अलग है दोनों की
अलग है अंदाज़ और
अलग हैं ढंग…

एक अन्त है,
एक शुरुआत
जैसे रात से सुबह,
और सुबह से रात…

एक मे याद है
दूसरे मे आस,
एक को है तजुर्बा,
दूसरे को विश्वास…

दोनों जुड़े हुए है ऐसे
धागे के दो छोर के जैसे,
पर देखो दूर रहकर भी
साथ निभाते है कैसे…

जो दिसंबर छोड़ के जाता है
उसे जनवरी अपनाता है,
और जो जनवरी के वादे है
उन्हें दिसम्बर निभाता है…

कैसे जनवरी से
दिसम्बर के सफर मे
११ महीने लग जाते है…
लेकिन दिसम्बर से जनवरी बस
१ पल मे पहुंच जाते है!!

जब ये दूर जाते है
तो हाल बदल देते है,
और जब पास आते है
तो साल बदल देते है…

देखने मे ये साल के महज़
दो महीने ही तो लगते है,
लेकिन…
सब कुछ बिखेरने और समेटने
का वो कायदा भी रखते है…

दोनों ने मिलकर ही तो
बाकी महीनों को बांध रखा है,
.
अपनी जुदाई को
दुनिया के लिए
एक त्यौहार बना रखा है..!

या गाण्यांच्या कवीचे नाव मला माहीत नाही, पण ही गाणी वॉट्सॅपवर भरपूर फिरत आहेत.

नववर्षासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

WISH YOU A HAPPY NEW YEAR

आमची एक “भाग्यवान” पिढी, महातारा

लहानपणचा काळ कसा होता याबरोबरच उतारवयात कसा विचार करावा आणि कसे रहावे या विषयावरील मराठी, इंग्रजी आणि हिंदी लिखाण खाली संकलित केले आहे.

१. आमची एक “भाग्यवान” पिढी… We are a unique generation
२. हम कितने खुश नसीब लोग हैं !!
३. मजे में हूँ ।
४. म्हातारा नव्हे महातारा
५. तरीही माझं जीवन सुखाचं होतं   दि. १६-११-२०१९
६ “ज्येष्ठ is The Best….” दि. १४-०३-२०२०
७. कळलेच नाही   ….   दि.११-१०-२०२० 
८. निवृत्तीनंतर . . . . . . दि.१५-१०-२०२०
९. आमचाही एक ‘जमाना’ होता ..   . .  दि. २७-०७-२०२१
१०. लहानपणचे खेळ  . . . .  दि. २९-०७-२०२१
११. साला अडाणी होतो तेच बरं होतं  . . . दि.३१-०७-२०२१
१२. उरलं सुरलं वापरायची सवय . . .    दि.३१-०७-२०२१

१३. सेवानिवृत्तीनंतरचा उद्योग      . . . दि. १२-१२-२०२१ ( जुना लेख ७-७-२०१२)

१४. पुन्हा उभारी घेऊन आता राहिलेले जगून घेऊ  दि.१३-०४-२०२२

१५. दोन पिढ्यांमधील तुलना   दि.२४-०४-२०२२

—————————————————————

१. आमची एक “भाग्यवान” पिढी…

मी तांत्रिक दृष्ट्या या पिढीच्या वयोमर्यादेत बसत नसलो तरी या लेखात दिलेले सगळे अनुभव मला माझे स्वतःचेच वाटतात.

1951 to 1955
ही पीढ़ी आता ६०ओलांडून ७० कडे चाललीय, ‘ह्या’आपल्या पिढीचं सगळ्यांत मोठं यश म्हणजे या पिढीनं
खूप मोठा “बदल” पाहिला आणि पचवला…
आणि या पिढीची एक मोठी “अडचण” म्हणजे ही पिढी कायम “उंबरठ्यावर”च राहिली…
शाई-बोरु/पेन्सिल/पेन पासून सुरूवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लँप्टॉप, पीसी,
या उतारवयांतही “सराईत”पणे हाताळत आहे…
ज्या पिढीच्या बालपणी सायकलसुद्धा एक “चैन” असलेली वस्तू. पण, आता ह्या उतारवयांत
सराईतपणे “स्कूटर, कार” चालवणारी ही पिढी.

कधी अवखळ, तर कधी गंभीर, खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्णत: “संस्कारीत” अशी ही पिढी….
टेपरेकॉर्डर, पॉकेट ट्रांझिस्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी “मिळकत” होती. अशी ही पिढी…
मार्कशीट आणि टिव्ही यांच्या येण्यानं या पिढीच्या बालपणाचा “बळी” घेतला नाही,
“अशी ही शेवटची पिढी”…
कुकरच्या रिंग्स, टायर,असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं यांत त्यांना कधीही
“कमीपणा” वाटला नव्हता…
‘सळई जमिनीत रूतवत जाणं'(शीगरूपी) हा कांही “खेळ” असू शकतो कां ? पण होता…

‘कैऱ्या तोडणं’ ही यांच्यासाठी “चोरी” नव्हती, आणि…

कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं यामध्ये कसलंही एथीक्स “तुटत” नव्हतं…
मित्राच्या आईनं जेऊ घालणं यांत कसलाही “उपकाराचा” भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं
यांत कसलाही “असूयेचा” “अभाव” असणारी ही शेवटची पिढी…
वर्गांत किंवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा बिचकत बोलणारी ही पिढी…
पण, गल्लीत कुणाच्याही घरांत कांहीही असलं, तरी वाट्टेल ते “काम” कसलाही “विधिनिषेध न बाळगता” करणारी ही पिढी…
कपील, सुनिल गावसकर, वेंकट, प्रसन्नाच्या बोलिंगवर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या
टेनिसवर, तर राज, देव, दिलीप ते राजेश, अमिताभ आणि धर्मेंद्र, जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन
कलाकारांवर, अगदी आमिर, सलमान, शाहरुख माधुरी, अनिल वर वाढलेली ही पिढी…
भाड्यानं VCR आणून ४-५ पिक्चर, पैसे गोळा करून “एकत्र” पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी…
लक्ष्या-अशोकच्या निर्व्याज विनोदावर हसलेली, नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा,सोनम,किमी, सोनाली, हे कलाकार पाहिलेली पिढी…
कितीही शिकलं तरी ‘स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ यावर “विश्वास” असणारी ही पिढी…
‘शिक्षकांचा मार खाणं’ यात कांहीही “गैर” नाही, फक्त घरी कळू नये. कारण, ‘घरांत परत “धुतात”‘ ही
भावना “जपणारी” पिढी…
ज्यांच्या पालकांनी शिक्षकांवर कधीही आवाज चढवला नाही अशी पिढी…
वर्गात कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षांनीसुद्धा निवृत्त शिक्षक
येतांना दिसले, तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी…
कॉलेजला सुट्टी असली, तर आठवणींत स्वप्न रंगवणारी पिढी …
नां मोबाईल, नां SMS, नां व्हाट्सअप. पण, भेटण्यासाठी आतुरतेनं वाट पाहणारी ही पीढ़ी…
पंकज उधासच्या _’तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया’_ या ओळीला “डोळे पुसणारी” पिढी…
दिवाळीच्या पांच दिवसांची कथा माहित असणारी पिढी..
“लिव्ह इन” तर सोडाच, “लव मॅरेज” म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी ही पिढी, अहो.. शाळेत आणि महाविद्यालयांत पण मुलींशी बोलणारी मुलं “अँडव्हांस” समजली जाणारी पिढी…
पुन्हा डोळे झाकू यां…?

दहा, वीस…….
ऐंशी, नव्वद………..
पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ …
“गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी”…..असं न समजणारी सूज्ञ पिढी. कारण,
“आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार” असं मानणारी ही पिढी..?
धन्य ते जीवन, जे खरं “आपणच” जगलोय !!!
 
आपल्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी.
*******************************************************
 

“We are a unique and the most understanding generation, because we are
the last generation who listened to their parents….
and also the first which have to listen to their children.
We are not special ,but
LIMITED EDITION. ”
Are we?

———————————————

२. हम कितने खुश नसीब लोग हैं !! 😎
=====================

क्योंकि हम वो आखरी लोग हैं जिन्होंने
मिटटी के घरों में बैठ कर परियों और राजाओं की कहानियां सुनीं
हम वो आखरी लोग हैं जिन्होंने
बचपन में मोहल्ले के मैदानों में अपने दोस्तों के साथ पम्परागत खेल, गिल्ली डंडा, सतोलिया, खो खो, कबड्डी कंचे जैसे खेल खेले
हम वो आखरी लोग हैं जिन्होंने
लालटेन की रौशनी में होम वर्क किया और नावेल पढ़े
जिन्होंने अपनों के लिए अपने जज़्बात खतों में लिख कर भेजे
हम वो आखरी लोग हैं जिन्होंने
मिटटी के घड़ों का पानी पिया
कूलर और एसी के बिना बचपन और जवानी गुज़ारी
हमारे जैसा तो कोई नहीं क्योंकि
हम बालों में सरसों के तेल उंढेल कर आखों में सुरमा लगा कर शादियों में जाया करते थे
हम वो आखरी लोग हैं जिनके पतलून की पिछली एक जेब में छोटा कंघा और दूसरी में कढ़ा हुआ रुमाल हुआ करता था
कहीं भी आइना देखते ही जेब से कंघा बाहर आ जाया करता था
हम वो बेहतरीन लोग हैं जिन्होंने
तख्ती पर मुल्तानी मिटटी का लेप किया, लिखने की क़लम को तराशना सीखा, और स्याही दावात से कपडे और हाथ काले नीले किये
हम वो आखरी लोग हैं
जिन्होंने फिल्म हाल की अगली सीटों पर बैठकर गानों पर चिल्लर लुटाई

हम वो खुशनसीब लोग हैं जिन्होंने
रिश्तों की मिठास देखी है
हम वो आखरी लोग हैं जो
मोहल्ले के बुज़ुर्गों को दूर से देखकर नुक्कड़ से भाग कर घर आ जाया करते थे !
हम वो आखरी लोग हैं जिन्होंने
अपने स्कूल के सफ़ेद केनवास शूज़ पर खड़िया का पेस्ट लगाकर चमकाया !
हम वो आखरी लोग हैं जिन्होंने
गोदरेज सोप की गोल डिबिया से शेव बनाई
जिन्होंने गुड़ की चाय पी
मक्का, ज्वार और बाजरे की रोटियां खाईं
हम वो आखिर लोग हैं
जिन्होंने रात को छतों पर चांदनी रातों में रेडियो पर BBC लन्दन की ख़बरें और प्रोग्राम सुने
कभी वो भी ज़माने थे :
हम सब मिलकर रात होते ही छत पर पानी का छिड़काव किया करते थे
उसके बाद सफ़ेद चादरें बिछा कर सोते थे
एक स्टैंड वाला पंखा सब को हवा के लिए हुआ करता था
सुबह सूरज निकलने के बाद भी ढीठ बने सोते रहते थे
वो सब दौर बीत गया, चादरें अब नहीं बिछा करतीं, डब्बों जैसे कमरों में कूलर, एसी के सामने रात होती है, दिन गुज़रता है
वो खूबसूरत रिश्ते और उनकी मिठास बांटने वाले कम होते गए
उस दौर के लोग कम पढ़े लिखे होते थे लेकिन मुख्लिस हुआ करते थे
उन लोगों के घर भले ही कच्ची मिटटी के होते थे, मगर क़द में वो आज के इंसानों से बड़े हुआ करते थे
अब लोग जितना पढ़ लिख रहे हैं उतना ही खुदगर्ज़ी, बे मुरव्वत और मफ़ादात में खोते जा रहे हैं !
काश कि वो ज़माने फिर से लौट आएं !! 🤔
—————————–

————————–

३. मजे में हूँ

ये कविता किसने लिखी है मै नहीं जानता हूँ लेकिन उम्र के इस पड़ाव पर भी जिन्दगी के मजे लेने में कम नहीं है ।
घुटने बोलते हैं
लड़खड़ाता हूँ
छत पर रेलिंग पकड़कर जाता हूँ
दाँत कुछ ढीले हो चले
रोटी डुबा कर खाता हूँ
वो आते नहीं , बस फोन पर पूछते हैंकि कैसा हूँ ?बड़ी सादगी से कहता हूँ
मजे में हूँ मजे में हूँ ।😄😄😄😄

दिखता है सब
पर वैसा नहीं दिखता

लिखता हूँ सब
पर वैसा नहीं लिखता

आसमान और आँखों के बीच अब
कुछ बादल सा है दिखता

पढ़ता हूँ अखबार
पर कुछ याद नहीं रहता

डॉक्टर के सिवाय
किसी और से
कुछ नहीं कहता

पूछते हैं लोग तबियत
बड़ी सादगी से कहता हूँ
मजे में हूँ मजे में हूँ ।

😁😁
कभी दो रंगी मोजे
जूतों में हो जाते हैं

कभी बढ़े हुऐ नाखून
यकायक चश्मे से
किसी महफिल में दिखाई देते हैं

फिर अचकचा कर
उनको छुपाता हूँ
कभी बीस व तीस
का अन्तर
सुनाई नहीं देता

बहुत से काम
अब अंदाजे से कर लेता हूँ

कोई कभी
पूछ लेता है
कहाँ हूँ कैसा हूँ
हँस कर कह देता हूँ

मजे में हूँ मजे में हूँ

😁😁
बीत गया है लंबा सफर
पर इंतज़ार बाकी है
हासिल कर ली हैं मंज़िलें
पर प्यास अभी बाकी है

ख़ुद तो दौड़ सकता नहीं
अब अपनों में बाज़ी लगाता हूँ

ठहर गयीं हैं यादें
पुरानी बातें सुनाता हूँ

क्या मज़ा है जिंदगी का
उनके जबाब का इंतज़ार अभी बाकी है

ये दिल है कि मानता नहीं
अब भी धड़कता वैसे ही है

बूढ़ा तो हो चुका है
पर मानता नहीं
शरीर दुखता है
पर आँखों की शरारत जारी है

इसलिये तो बार बार कहता हूँ
मजे में हूँ मजे में हूँ।

😊😊😁😁😁😁

Applies to each one of us beyond an age. It is a fact that body ages but mind refuses to accept it. Ageing is a process and is irreversible but one needs to learn to age gracefully. That is the beauty of life.
————————————

४. म्हातारा नव्हे महातारा

स्वतःला म्हातारा समजण्या पेक्षा
महा तारा 🌟 समजावे

म्हातारपणाला नाव छान ,
कोणी म्हणत संन्यासाश्रम ,
कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम ,
मी म्हणतो आनंदाश्रम,

म्हातारपणात कसं राहायचं ,
घरात असेल तर आश्रमासारखं ,
आश्रमात असेल तर घरासारखं ,
कशातच कुठे गुंतायचं नसतं ,
जुन्या आठवणी काढायच्या नाही ,
“आमच्या वेळी” म्हणायचं नाही ,
अपमान झाला समझायचं नाही ,
उगाच लांबण लावायची नाही ,

सुखाची भट्टी जमवत जायच,
साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं ,
राग लोभाला लांब पळवायचं ,
आनंद सारखा वाटत जायचं ,

म्हातारपण सुद्धा छान असतं ,
लेन्स इम्प्लांट ने स्वच्छ दिसतं ,
नव्या दातांनी सहज चावता येतं ,
कान यंत्राने ऐकु येतं ,

पार्कात जाऊन फिरुन यावं ,
क्लबात जाऊन पत्ते कुटावं ,
देवळात जाऊन भजन करावं ,
टी.व्ही. मधल्या सिरियल बघावं ,
मुलांसमोर गप्प बसावं ,
नातवंडांशी खेळत रहावं ,
बायकोबरोबर भांडत जावं,
मित्रांबरोबर बोलत सुटावं,
जमेल तेंव्हा टूर वर जावं*
बायकोच लगेज सोबत न्यावं,
थकलं तिथेच बसून घ्यावं,
वाटेल तेव्हा उसाचा रस प्यावं,
लायन रोटरी अटेण्ड करावं ,
वेळ असेल तर गाण गावं ,
एकांतात ठेक्यावर नाचुन घ्यावं,
पाहिल कुणी व्यायाम म्हणावं,
कंटाळा आला झोपुन जावं,
जाग आली फेसबुक बघावं,
बघता बघता घोरत राहावं,
टोकल कोणी वाटसाप उघडाव,
एकटं घरी किचन पहाव,
दुधाची साय गायब करावी,
मुलांचा खाऊ टेस्ट करावा
आलं मनात साखर खावी
जुना शर्ट घालत राहावं,
थोडे केस सावरत राहावं,
आरशालाच बोगस म्हणावं,
कोणी नसल वाकूली करावं,
पोराचा मोबाईल उघडून बघावा,
पासवर्ड असला ठेऊन द्यावा,
डब्बा मोबाइल वापरात राहावं,
बंद पडतो आदळत राहावं,

छान रंगवावी सुरांची मैफल ,
मस्त जमवावी जेवणाची पंगत ,
सुरेल जुळवावी गप्पांची संगत,
लुटत रहावी जगण्याची गम्मत,
स्वाद घेत, दाद देत ,
तृप्त मनानं आनंद घेत ,
हळुच आपण असं निघुन जावं ,
पिकलं पान गळुन पडावं …!!!!
🌹😁🙏🏼😁🌹 महा तारा


५ तरीही माझं जीवन सुखाचं होतं

‘व. पु. ची अशीच एक भन्नाट कविता’ — असे म्हणून ही कविता वॉट्सअॅपवर फिरत आहे. कां कुणास ठाऊक पण मला ही रचना व पु काळे यांची वाटत नाही. तरीही मी लहानपणी पाहिलेल्या काळाचे सुंदर वर्णन या कवितेत आहे. शहरातच जन्माला येऊन फ्लॅट संस्कृतीत वाढलेल्या मुलांनी याचा अनुभवच घेतलेले नसल्यामुळे त्यांचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण फक्त एक दोन पिढ्यांपूर्वी महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाचे जीवन खरोखर असे होते.

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं
आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत,
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं
घरादाराला कधीही ’लॉक’ नव्हतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||१||

आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होतं
स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होतं,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होतं
आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||२||

घरासमोर छोटंसं अंगण होतं
तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होतं
विहिरीवरून पाणी भरणं कष्टाचं होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ३ ||

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा,
माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा-
दगडाने अंग घासणं फ़ारसं सुसह्य नव्हतं
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ४ ॥

पायात चप्पल असणं सक्तीच नव्हतं
अंडरपॅट बनियनवर फ़िरणं जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं
मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ५ ॥

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता
घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता
छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ६ ॥

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता,
नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता
कलांना “भिकेचे डोहाळे” असंच नाव होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ७ ॥

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा
पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकडूनच मिळायचा
तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीच होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ८ ||

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या
पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा –
उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्य राज्य होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ९ ||

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे
घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे –
नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १० ||

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होतं
नंबरावर बक्षीस/छड्या यांचं प्रमाण ठरत असतं,
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हतं
वशिल्याने पास होणं माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ११ ||

गावची जत्रा हीच एक करमणूक असायची –
चक्र-पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची
विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १२ ||

गावाबाहेरचं जग हिरवागार असायचं
सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचं,
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं,
प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १३ ||

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा
क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या
डे-नाईट, ट्वेंटी- २० चं नावही नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १४ ||

प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा
गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
हॅन्डल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा
लक्झरी, फर्स्टक्लास एसीचं नावही नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १५ ||

दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी होती
चमनचिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती
लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १६ ||

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची
बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीओ सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची
ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १७ ||

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा
दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा
हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १८ ||

मामाच्या गावाला कधी जाणं-येण होतं
धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होतं,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं
भाऊबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १९ ||

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे
बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचं
प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || २० ||

पाव्हणे रावळे इ.चा घरात राबता असायचा
सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा
पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || २१ ||

आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे
मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे
फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत
दूध, बूस्ट, काॅम्प्लानचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कॅल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे
कपडे, युनिफोर्म क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
बालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे || २३ ||

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे
सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्टीविटीजना घरात सन्मान आहे
छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे
मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे
सध्या बाय वन गेट वनचा जमाना आहे..
म्हणून
पैशांवर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||


६. “ज्येष्ठ is The Best….”

आम्ही नाही म्हातारे,
आम्ही आहोत ‘ज्येष्ठ’
उचलू आम्ही जबाबदारी,
आम्ही नाही ‘वेस्ट’ ….

फक्त थोडी लागते आता,
मधून मधून ‘रेस्ट’
कारण दुखतात आता,
हात ,पाय , कधीतरी ‘चेस्ट’ ..

खाण्याचेही शौकिन आम्ही,
घेतो सगळ्याची ‘टेऽस्ट’
त्यामुळेच घ्याव्या लागतात
पॅथॉलॉजीच्या ‘टेस्ट’ …

जीवनातील गोष्टींचीही
माहिती आम्हां ‘लेटेस्ट’
तरीही माहीत नाही
उरल आयुष्य किती ‘rest ‘…

वाट पाहतो त्याची कारण,
केव्हांतरी सांगेल तो,
तुम्ही आहात ‘नेक्स्ट’ …

तोपर्यंत काळजी कशाला?
उरलेले आयुष्य छान घालवू,
आम्ही आत्ता ‘बेस्ट’
कारण ,आम्ही आहोत जातीवंत ‘जेष्ठ’

जेष्ठ नागरिक दिनाच्या सर्व जेष्ठांना शुभेच्छा !!

नवी भर दि.१४-०३-२०२० ……… फेसबुकावरून साभार

*****

७. कळलेच नाही  🌷🙏…
——————

वर्षेचे वर्षे निघून गेली,
धका धकीच्या जीवनात
वय केंव्हा वाढले
कळलेच नाही।।

खांद्यावर खेळविलेली मुलं
खांद्याएवढी कधी झाली
कळलेच नाही।।

भाड्याच्या घरात सुरू झालेला संसार,
स्वतःच्या घरात केंव्हा रुळला कळलेच नाही

सायकलचे पायडल मारून दमत होतो,
केंव्हा कारमध्ये फिरायला लागलो
कळलेच नाही।।

कधी मुलांची जबाबदारी होती,
आपली त्यांच्यावर केंव्हा गेली
कळेलच नाही।।

एकेकाळी, दिवसा ढाराढुर झोपायचो
रात्रीची झोप केंव्हा उडाली
कळलेच नाही।।

ज्या काळ्या केसावर भाव मारत होतो
ते पांढरे कधी झाले कळलेच नाही।।

वणवण भटकत होतो नोकरीसाठी।
रिटायर केंव्हा झालो
कळलेच नाही।।

मुलांसाठी बचत करीत होतो।
कधी मुले दूर गेली कळलेच नाही।।

आता विचार करतो
स्वतःसाठी काही करायचं
पण, शरीराने केंव्हा साथ सोडली
कळलेच नाही।।
😔😔

म्हणून म्हणतो… अजूनही वेळ आहे ..थोडं तरी जगून घ्या.. सुंदर अशा जगण्याला डोळे भरुन बघून घ्या
🙏🙏
जिंदगी ना मिलेगी दोबारा🌹

वॉट्सअॅपवरून साभार    . . .  दि.११-१०-२०२०

८. निवृत्ती नंतर

पहाटे उठावे स्वतः चहा करावा !!
झोप मोडेल असा आवाज नसावा !!

प्राणायाम करावा योग साधावा !!
हाडे मोडतील इतपत तो नसावा !!

फिरायला जावे प्रमाणात असावे !!
सोबत मोबाईल खिशात असावा !!
पडाल कोठे तर नक्की सापडाल !!

आंघोळीला तुमचा नंबर शेवटचा !!
न रागावता गोड मानुन घ्यावा !!

किराणा भाजी पोस्ट बँक
फिरणे समजुन आनंद घ्यावा !!

ज्येष्ठ मंडळीचा कट्टा असावा !!
पण त्यात कुठला वाद नसावा !!

मनमुराद गप्पांचा आनंद घ्यावा !!
लिहीणे वाचणे वाजवणे गाणे
एखादा तरी छंद नक्की असावा !!

मी कोणी मोठा होतो हे विसरा !!
मोठेपणाची झुल खुंटीवर ठेवा !!

मित्रमंडळी सगे सोयरे नातीगोती !!
लक्षात ठेवा हीच कामाला येती !!

आता काय ऱ्हायल ? म्हणु नका !!
कुणाला उपदेश करत सुटु नका !!

पर्यटन सिनेमा नाटक तमाशा !!
राहुन गेले असेल तर उरका !!
पत्नीला सोबत घ्या विसरु नका!!

प्रकृती आणि पैसा येती कामा !!
या दोघाना सांभाळून ठेवा !!

संध्याछाया भिववती हृदया
हे विसरण्याची साधावी किमया !!

  सप्रेम सादर

💐🙏🏻🙏🏻💐 वॉट्सअॅपवरून साभार    . . .  दि.१५-१०-२०२०

🤩😎🥰🤪🤩☺️
९. आमचाही एक ‘जमाना’ होता ..

पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची लेखणी जिभेने चाटत कॅल्शियमची कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.😅😅
अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक चावून झेललं होतं…🤪
पास / नापास हेच आम्हाला कळत होतं… % चा आमचा संबंध कधीच नव्हता.😛
शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची…. कारण “ढ” असं हीणवलं जायचं…🤣🤣🤣
पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता…☺️☺️
कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.😁
दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा…🤗
आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती आणि ना ही आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडे वळत नव्हती आमच्यामध्ये टॅलेंट च तेवढं होतं…🤭🤗🤭
एका मित्राला सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून, आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही… बस्सं!……काही धूसर आठवणी उरल्यात इतकंच…….!!🥸😎
शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा ‘ईगो’ कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला ‘ईगो’ काय असतो हेच माहीत नव्हतं…🧐😝
मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की, ‘चला, कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून……😜🤣😜
आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला ‘आय लव यू’ 🥰🥰🥰 म्हणणं माहीतच नव्हतं…
आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय तर काही ‘काय माहीत….? कुठे हरवलेत ते…!😇😇
आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की, आम्ही वास्तव दुनियेत जगलो, आणि वास्तवात वाढलो.🙃😉🙃
कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच नाही. त्या🎈 बाबतीत आम्ही मूर्खच राहिलो.
आपल्या नशिबाला कबूल करून आम्ही आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत नाहीतर जे जीवन आम्ही आतापर्यंत जगलोय त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही.😌😗😌
आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही एक ‘जमाना’ होता.✨
☺🙏☺

वॉट्सॅपवरून साभार . . . दि.२७-०७-२०२१

🤩😎🥰🤪🤩☺️

१०.लहानपणचे खेळ

Not At Home….
खरंतर Not at home हा परफेक्ट शब्द.
पण लहानपणी मे महिन्यात सगळी भावंडं एकत्र जमलो कि पत्त्यात हा डाव रंगायचाच.पण तेव्हा विंग्रजी फार यायचं नाही मग जो तो ज्याला जसं ऐकू आला उच्चार तसं म्हणायचा.
नॉट्याट होम,नॉटॅ ठोम काय वाट्टेल ते !!
तसंही आपण आपल्याच घरात तरी कुठे असायचो?ते ही Not At Home च.
कधीही मित्र मैत्रिणीच्या घरी जाऊन हुंदडायला मिळवायचं.येऊ का?वगैरे विचारण्याच्या formalities नव्हत्या.

“Challenge” ला पण चायलेन्ज,चॉलेन्ज काय वाटेल ते म्हणायचो.
“लॅडीज” नावाचा खेळ फक्त लेडीजनीच खेळायचा असं आपलं उगीच वाटायचं मला.त्यात एक वख्खई बोलली जायची. लाडूची म्हणजे 32 कळ्या किंवा अर्धा लाडू 16 कळ्या वगैरे.झब्बू पण असाच एक डाव.झब्बू देताना एक पानी आणि गड्डेरी.मजाच सगळी.
हे सगळे शब्द कुठून आले देव जाणे.?
काचापाणी,पट,सागरगोटे हे अजून काही प्रकार बैठ्या खेळातले. काचापाणीसाठी भांड्यांच्या काचा जमवायला अगदी कचराकुंडी पण गाठलीय.
सगळेच खेळ आपल्याला जिवंत ठेवायचे.वेगळा असा “स्पोर्टस् डे”नसायचा. रोजच खेळ. शाळा दुपारची असली कि दप्तर फेकून धावत सुटायचं.
कारण उशीरा पोहचलं खेळायला तर “कटाप”करायचे (actually cut off) खेळातून.
तळहातावर थोडसं चाटून “टॅम्प्लीज”(टाईम प्लीज खरा शब्द) करणं, लपंडावात “धप्पा” म्हणणे, “रडीचा डाव खडी “असं चिडवणे मग समोरच्यानी आपल्याला “जो म्हणतो तोच”असं बोट आपल्यापुढे नाचवत म्हणणे या सगळ्याची मजा काही औरच.
आजच्या मुलांना काय कळणार ती??

लगोरीsss असं सात ठिक-या एकमेकांवर ठेवून त्यावर पाय फिरवणे,तो नाही फिरवला तर लगोरी लागली असं धरत नसत. ही “डब्बा ऐसपैस” पत्र्याचा एक फालतू डबा पण अनन्यसाधारण महत्व मिळालेला.
डालडाचा वनस्पती तुपाचा हिरवं नारळाचं झाड असणारा डबा पण फार महत्त्वाचा. तो कमरेला बांधून विहीरीत धपाधप उड्या मारणे हा रविवार सकाळचा कार्यक्रम.
“लपंडाव” खेळताना मुलं मुद्दाम एकमेकांचे शर्ट, टी शर्ट बदलून गंडवायचे आणि शर्टाची बाही दिसेल असे लपायचे. मग चुकीचं नाव घेतलं कि धप्पा मिळायचा “राज्य” असणा-याला.
राज्य असणा-यालाच पकडायला लावायचं हा काय न्याय !! पण अशा नियमांवर अपील नसायचंच.
“जोडसाखळी,रस्सीखेच”म्हणजे नुसती ओढाओढी.
“दगड का माती” म्हटले कि जे म्हणेल त्यावर उभं रहायचं . दगडावर उभं रहायचं असेल तर तो सापडेपर्यंत फक्त धावायचं.
“विषामृत”मधे विष म्हणुन स्पर्श करायचा मग विष मिळाले कि स्तब्ध उभं रहायचं. मग कुणी तरी येऊन अमृत द्यायचं…काय एकेक मज्जा!!
पावसाळ्यात घरी बसू असं तर मुळीच नाही. पावसाळ्यात “रूतवणी” हा खेळ.
एक लोखंडी सळई घेऊन चिखलात रुतवत जायचे. त्याचे पॉईन्ट्स मोडायचा. सळई पडली कि दुसरा खेळायचा. पहिला औट.
“आबाधूबी”लई भारी गेम. पाठ शेकुन काढणारा.
यात शक्यतो प्लास्टीकच्या बॉल घेतला जायचा.
रबरी ट्यूब कच-यातून,भंगारातून शोधून तिचे तुकडे करून त्याचाही बॉल केला जायचा.
साबणाचे फुगे करायला कागदाची बारीक सुरनळी करणे,करवंटीचे फोन, काडेपेटीत वाळू भरून टिचकीनी ती उगडून अंगावर उडवणे. what a creativity !!!

काही नाही तर बॉल घेऊन “टप्पा टप्पा” हा खेळ तरी व्हायचाच. ते मोजले जायचे ते ही सार्वजनिक रित्या, मोठ्याने बोंबलत.
क्रिकेट खेळताना फळकूट पण चालायचं. एखादी बोळ पण चालायची. टीम पाडायच्या. आपणच अनेक नियम बनवायचे. या कंपाउंड बाहेर गेला बॉल कि फोर, तिकडे सिक्स, एक टप्पा औट, रन आऊट चे नियम वेगळे.
कुणाच्या खिडकीची काच फोडली तर सार्वजनिक धूम ठोकणे हा अलिखित नियम.

मुली,मुलगे एकत्र खेळायचो तेव्हा. सगळेच मुलींचे “दादा”.
क्रिकेट; कबड्डी साठी टीम मेंबर कमी असले कि मुलींना डिमांड.

“टीपी टीपी टीप टॉप”, व्हॉट कलर डू यू वाँट”? काहीतरी भारी रंग सांगायचा. मग नसेल तर औट करायचे. यातही धावायचंच.
“ढप,गोट्या” रिंगण आखून जो सांगितला जाई तो ढप किंवा गोटी रिंगणाबाहेर नेम धरून उडवायची. ऑलिंपिक लेव्हलची नेमबाजी.!!
मग यात चंदेरी,पाणेरी, काळी, घारी अशी गोट्यांची वर्णनं.
एक जबराट खेळ होता.टायर्स फिरवणे.जुने टायर्स घेऊन ते काठीने बडवत पळवत नेऊन त्याची शर्यत लावायची.खूप धमाल यायची टायर्स पळवायला!
ठिक्कर पाणी हा फक्त मुलींचा खेळ समजला जायचा. एखादा मुलगा जरी यात आला तर ” मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा” म्हणुन चिडवायचेच. फरशीची खपटी घेऊन त्याला थुंकी लावुन ती रकान्यात फेकायची आणि एका बाजुने लंगडी खेळत जाऊन ती पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायची. रेषेवर पडली तर औट.
कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, खांब खांब खांबोळी, शिवाजी म्हणतो, दोरीवरच्या उड्या, मामाचं पत्रं हरवलं, भातुकली हे तर सगळे गर्ल्स स्पेशल खेळ. मुलींची monopoly.
नाव, गाव, फळ, फूल, नाटक/सिनेमा, रंग, प्राणी, पक्षी, वस्तू काय वाटेल ते. वह्याच्या वह्या भरायच्या.
भातुकली, दो-या बांधून घर घर खेळणं, दाण्याचे लाडू आणि चुरमु-याचा भात एवढाच कायम स्वैपाक असायचा भातुकलीत.
व्यापार,सापशिडी,सागरगोटे,काचापाणी हे दुपारचे खेळ.
वारा पडलेला असेल तर बॅडमिंटन.
पण तो श्रीमंती खेळ. जिच्या हाती रॅकेट ती/तो फार भाव खायचे. मग रॅकेट नसणारे एकत्र यायचे आणि बॅडमिंटन पेक्षा बाकी खेळ कसे भारी यावर वादावादी.
कॅरम पण तसाच श्रीमंती खेळ.
ते नको असायचे. त्यात धांगडधींगा करता यायचा नाही ना !!
“पतंग बदवणे” यात जो माहिर,तो सगळ्यात भारी.
मुली आपल्या ही काट, ती काट सांगायच्या आणि फिरकी धरायचा. मग ती काटताना ढील देणे वगैरे प्रकार करावे लागायचे. काटता आली नाही पतंग कि मग मांजा नीट नाही, कन्नी नीट बांधली नाही या तक्रारी .

दिवेलागणी झाली की परवचा म्हणून रात्री जेवणं झाली कि अंताक्षरी आणि  भुताच्या गोष्टी.
निव्वळ Nostalgic !!!
समृद्ध,श्रीमंत बालपण होतं आपलं.
करता येईल का तसं आजच्या लहान मुलांचं???
काहीतरी जादू घडावी आणि होऊन जावं आपल्यागत.
नाही का???
अनुश्री

*************************

११. साला अडाणी होतो मी.. तेच बरं होत…😗

साला अडाणी होतो मी तेच बर होत…
साधा सर्दी खोकला झाला की
आलं, तुळस काढा घ्यायचो,
पोट दुखल की ओवा चावत जायचो,
ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो,
ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट,
ना हॉस्पिटल च्या एडमिशन मध्ये अडकत होतो…
निरोगी आयुष्य जगत होतो…😎
साला अडाणी होतो मी तेच बर होत…

राम राम ला राम राम,
सलाम वालेकुम ला, वाले कुम अस सलाम
चे प्रेमाने उत्तर देत होतो,
ना धर्म कळत होते,
ना जात कळत होती,
माणूस म्हणून जगत होतो…☺️
साला अडाणी होतो मी तेच बर होत…

सकाळी न्याहारीला दूध भाकरी,
दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि…
रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो,
हेल्थी ब्रेकफास्ट चा मेनू,
लंच चा चोचलेपणा आणि
डिनर च्या सोफेस्टिकेटेड उपासमारी पेक्षा
दिवस भर भरपेट चरत होतो…😀
साला अडाणी होतो मी तेच बर होत…

शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो,
रामायणात रंगून जात होतो,
चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो,
ना वेबसिरीज ची आतुरता,
ना सासबहु चा लफडा,
ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो…
खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो…😍
साला अडाणी होतो मी तेच बर होतो…

सण असो की जत्रा सुट्टी मिळेल तेव्हा
वेळ मस्त कुटुंबासोबत घालवत होतो,
चार मित्रांमध्ये मिसळत होतो,
लोकांमधी उठत बसत होतो…
ना टार्गेट ची चिंता होती,
ना प्रमोशमन चे टेन्शन होत,
ना पगार वाढ ची हाव होती,
तणावमुक्त जीवन जगत होतो…😉
साला अडाणी होतो मी तेच बर होत…

गावातले वाद गावात मिटवत होतो,
झाली भांडण तरी रात्री मंदिरात एकत्र येत होतो,
सकाळी पुन्हा एकत्र फिरत कामाला लागत होतो..
ना पोलीस केस ची भीती, ना मानहानी चा दावा,
ना कोर्टाच्या चकरा मारत होतो…
खरोखर सलोखा जपत होतो… 🤓
साला अडाणी होतो मी तेच बर होत…

कुटुंबाला प्रेमाने पत्र लिहीत होतो, पत्राची वाट बघत होतो,
पत्राच्या प्रत्येक ओळीत प्रेमाचा ओलावा अनुभवत होतो…
ना मोबाईलवर कोरडी बोलणी, ना फॉरवर्ड म्यासेज,
ना ऑनलाइन ची निरर्थक चॅटिंग,
उगाच चा फक्त दिखावा करत नव्हतो …😄
साला अडाणी होतो मी तेच बर होत…

मातीच्या घरात रहात होतो,
सारवलेल्या अंगणात बागडत होतो,
ऐसपैस अर्धा एकरभर जागेत
सुखात सगळे नांदत होतो…
ना एक बिएचके मध्ये कोंबलो होतो,
ना बाल्कनी साठी भांडत होतो,
ना मास्टर बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेत होतो…
मस्त मोकळ्या हवेत,
उगढ्या ढगाखाली मोकळा श्वास घेत होतो…🤩
साला अडाणी होतो मी तेच बर होत…

अडाणी असताना सुशिक्षीतात जाऊन
त्यांचे आयुष्य जगावे अशी स्वप्न पाहत होतो,
त्या साठी मेहनत करत होतो,
आणि जेव्हा सुशिक्षित झालो,
त्या भपकेबाजीत घुसू लागलो,
ढोंगी ते जग बघू लागलो,
आणि मग परत वाटू लागलं…

साला अडाणी होतो मी तेच बरं होत…😥

********************************

१२. उरले सुरले जपून वापरायची सवय

उरले सुरले जपून वापरायची सवय किती छान होती,
आयुष्य साधंच होतं तरी मजा काही औरच होती!

तोडकी मोडकी कंपास पुन्हा जोडून वापरत होतो,
झिजली जरी पेन्सील तरी टोपण लावून लिहीत होतो!

तुटलेला पेन पुन्हा पुन्हा स्प्रिंग बदलून वापरत होतो,
एकच पेन खूप जपून रिफील करून वापरत होतो!

जुनीच पुस्तके वर्तमानपत्राचे कव्हर घालून वापरत होतो,
तुझी पुस्तकं दे बरं मला आधीच सांगून ठेवत होतो!

जुन्या वह्यांची कोरी पानं दाभण वापरुन शिवत होतो,
जुन्यातूनच नाविन्याचा आनंद आम्ही घेत होतो!

सायकलच्या जुन्या टायरचे गाडे आम्ही चालवत होतो,
तोल कसा सांभाळावा ते बेमालूमपणे शिकत होतो!

फुटलेल्या फटाक्यांची दारू गोळा करत होतो,
उरलेल्या चिंध्याचा मस्त गरगरीत चेंडू करत होतो!

तुटलेल्या स्लीपरला पीन लावून वापरत होतो,
ध्येयाकडे न थांबता तरीही पाऊले टाकत होतो!

फुटलेल्या बांगड्यांनाही वाया घालवत नव्हतो,
दगडांचा बच्चू तर फरशीची लगोरी आम्ही करत होतो!

फाटलेल्या गोधडीला ठिगळं लावून सजवत होतो,
उसवलेल्या कपड्यांना धाग्या दोऱ्याने सांधत होतो!

गंध जरी जुना असला तरी छंद मात्र नवा होता,
काटकसर अन बचतीचा संस्कारच चिरकाल होता!

वापरा आणि फेकून द्या याचा हल्ली जमाना आलाय,
किंमत नाही वस्तूंची म्हणून नव्याचा कचरा झालाय!

सुई धागा हरवला नाही, पण तो हल्ली कोण घेत नाही.
फाटलेली नाती आणि वस्तू खरं तर कोणीच शिवत नाही!

कुणी लिहिले माहीत नाही पण खूप छान आहे म्हणुन पाठवत आहे.


१३. सेवानिवृत्तीनंतरचा उद्योग

काही अनुभवी लोकांनी या बाबतीत केलेली कामगिरी इतरांना स्फूर्तीदायक ठरते. हॅरॉल्ड श्लूम्बर्ग हे त्यातलेच एक. ते म्हणतात, “मी एक केमिकल इंजिनीयर आहे आणि बीयर, व्हिस्की व वाईन यांचे मूत्रामध्ये परिवर्तन करायला मला खूप आवडते. हे काम मी रोज करतो आणि मला त्यात खूप मजा वाटते.”
धन्य या थोर माणसाची !!!

The importance of an occupation after retirement
As we get older we sometimes begin to doubt our ability to “make a difference” in the world. It is at these times that our hopes are boosted by the remarkable achievements of other “seniors” who have found the courage to take on challenges that would make many of us wither. Harold Schlumberg is such a person:
THIS IS QUOTED FROM HAROLD:”I’ve often been asked, ‘What do you do now that you’re retired?
‘Well…I’m fortunate to have a chemical engineering background and one of the things I enjoy most is converting beer, wine and whisky into urine. It’s rewarding, uplifting, satisfying and fulfilling. I do it every day and I really enjoy it.”
Harold is an inspiration to us all. CHEERS ……………………

०७-०७-२०१२

😊🙏

१४. पुन्हा उभारी घेऊन आता राहिलेले जगून घेऊ

आज “पेंशनर्स डे”. सगळ्या पेंशनर्सना आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा


सर्व निवृत्ती वेतन धारकांना खूप खूप शुभेच्छा
आरोग्यासह शतायुषी व्हावे हीच आमची सदिच्छा ||१||

अठ्ठावन-साठ हे काय निवृत्तीचं वय असतं
तेव्हाच आपलं खरं तर दुसरं बालपण सुरू होतं ||२||

मोकळा वेळ भरपूर असतो, अंगात उसनं बळ असतं
उत्साह ओसंडून वहात असतो आणि कुठलंही बंधन नसतं ||३||

जबाबदाऱ्या संपल्या असतात, आर्थिक ताण उरला नसतो
वरिष्ठांचे बॉसिंग नसते, धावपळ सुध्दा संपली असते ||४||

आपल्या मनाचे आपण राजे, सगळं काही आपण ठरवणार
केव्हा उठायचं केव्हा झोपायचं, हे निर्णय आपलेच असणार ||५||

बायको नुसती राबत होती, तिला द्यायला वेळ नव्हता
आता तिला सारं द्यायचय, निर्णय माझा झाला आता ||६||

मुलांचं विश्व वेगळं झालं, त्यांचे संसार थाटले गेले
आमच्या साठी वेळ नाही, त्यांच्या संसारात ते रमले ||७||

तब्येत चांगली आहे तोवर, इच्छा साऱ्या पूर्ण करू
आनंदाचे क्षणन् क्षण गोळा करून बेगमी करू ||८||

अजून खूप खूप जगायचं आहे, जमलं नाही ते करायचं आहे
आप्त, मित्रां सवे दंगा-मस्तीत पुन्हा थोडं रमायचं आहे ||९||

जुनं सारं फेकून देऊ, नव्याने सुरूवात करू
पुन्हा उभारी घेऊन आता राहिलेले जगून घेऊ ||१०||

*सर्व निवृत्ती धारकांना ” निवृत्ती धारक दिवसाच्या” खूप खूप हार्दिक शुभेच्छा *

१५. दोन “पिढ्या” मधील तुलना

किती सुंदर उत्तर!
दोन “पिढ्या” मधील तुलना……. प्रत्येकाने जरूर वाचा 👌👌

एका तरुणाने त्याच्या वडिलांना विचारले: “तुम्ही लोक आधी कसे जगता-
तंत्रज्ञानात प्रवेश नाही
विमाने नाहीत
इंटरनेट नाही
संगणक नाहीत
नाटके नाहीत
टीव्ही नाहीत
हवाई बाधक नाहीत
गाड्या नाहीत
मोबाईल फोन नाहीत?”

त्याच्या वडिलांनी उत्तर दिले:
“आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याप्रमाणे –

प्रार्थना नाहीत
करुणा नाही
सन्मान नाही
आदर नाही
वर्ण नाही
लाज नाही
नम्रता नाही
वेळेचे नियोजन नाही
खेळ नाही
वाचन नाही”

“आम्ही, 1940-1980 दरम्यान जन्मलेले लोक धन्य आहोत. आमचे जीवन एक जिवंत पुरावा आहे:

👉 खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट घातले नाही.
👉 शाळा सुटल्यावर संध्याकाळपर्यंत खेळायचो. आम्ही कधीच टीव्ही पाहिला नाही.
👉 आम्ही इंटरनेट मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलो.
👉 आम्हाला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यायलो बाटलीचे पाणी नाही.
👉 आम्‍ही कधीही आजारी पडलो नाही, तरीही आम्‍ही चार मित्रांसोबत एकच ग्लास ज्यूस शेअर करायचो.
👉 आम्ही रोज भरपूर भात खात असलो तरी आमचे वजन कधीच वाढले नाही.
👉 अनवाणी पायी फिरूनही आमच्या पायाला काही लागले नाही.
👉 आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर केला नाही.
👉 आम्ही स्वतःची खेळणी तयार करायचो आणि त्यांच्याशी खेळायचो.
👉 आमचे आई वडील श्रीमंत नव्हते. त्यांनी आम्हाला प्रेम दिले, सांसारिक साहित्य नाही.
👉 आमच्याकडे सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, व्हिडिओ गेम्स, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅट कधीच नव्हते – पण आमचे खरे मित्र होते.
👉 आम्ही आमच्या मित्रांच्या घरी विनानिमंत्रित गेलो आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
👉 तुमच्या जगाच्या विपरीत, आमचे जवळ जवळ राहणारे नातेवाईक होते त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नातेसंबंध एकत्र आनंदात होते.
👉 आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये असू शकतो पण त्या फोटोंमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी आठवणी सापडतील.
👉 आम्ही एक अद्वितीय आणि, सर्वात समजूतदार पिढी आहोत, कारण आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्यांच्या पालकांचे ऐकले.
तसेच, प्रथम ज्यांना त्यांच्या मुलांचे ऐकावे लागले.
आणि आम्ही तेच आहोत जे अजूनही हुशार आहोत आणि तुमच्या वयात असताना कधीही अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता तुम्हाला मदत करत आहोत!!!

🌹🙏🙏🌹 वॉट्सॅपवरून साभार दि.२४-०४-२०२२