अक्षरब्रह्म

“माझा मऱ्हाटाचि बोलू कौतुके, तरी अमृताते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन” असे संत ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे. मराठी भाषा तर गोड आहेच, पण तिच्या लिपीमधली अक्षरेसुद्धा किती सुरेख आणि डौलदार आहेत हे अरुंधती दीक्षित यांनी खाली दिलेल्या लेखात छान उदाहरणांसह सांगितले आहे. माझ्याकडे योग्य असा मराठी काँप्यूटर फाँट नसल्यामुळे त्यातली ल या अक्षरासारखी काही सौंदर्यस्थळे इथे दिसू शकत नाहीत. याबद्दल क्षमस्व. माझे अमेरिकानिवासी आप्त श्री.अमोल पालेकर यांनी केलेल्या दोन हस्तलिखित सुलेखनाचे नमूने खाली दिले आहेत.

या ब्लॉगवरील ‘अक्षरे’ या विषयावरील पूर्वी दिलेल्या लेखांचे संकलनही मी या पोस्टमध्ये केले आहे. सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.
१. “अक्षर” ओळख – अरुंधती दीक्षित
२. सुलेखनाचे नमूने
३. अक्षरे … रेतीवरली आणि खडकावरली
४. अक्षरांची वेगळी जुळवाजुळव
५. अक्षर गणेश
६. अक्षरांची पौराणिक कथा
७. क,ख,ग काय सांगतात ?
८. हस्ताक्षरशास्त्र : डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
९. लेखनक्रियानिरूपण : समर्थ रामदासस्वामी
१०. ब्राह्मी ते देवनागरी
११. अनुस्वारांचे उच्चार

. . . . . . . . .


१.“अक्षर” ओळख

 • Arundhati Dixit
  प्रवीण ड्युक विद्यापीठात Masters in International Development Policy करत होता. मलाही त्यांच्या स्कूल मधे जायला परवानगी होती. एकदिवस तेथील कॉम्प्युटरवर मी आपले वृत्तपत्र वाचत असतांना आलाबामाची एक मैत्रिण माझ्या मागे येऊन उभी राहिली.
  “तू हे काय वाचतीएस? ही कुठली भाषा आहे?”
  “ही आमची भाषा आहे. मराठी!”– मी
  “ही तुमची भाषा आहे? तुम्ही रेघेच्या खाली लिहीता?” ती त्या कॉम्प्युटरकडे बारकाईनी पहात होती.
  “हो!” – मी
  “ही अक्षरं किती सुंदर आणि कमनीय आहेत. एखाद्या चित्रकारानी काढल्यासारखी वाटताएत.” – ती
  बाऽऽबे!! सदान्कदा कसली गं गात राहते!----- आणि त्या सोबत नाचरेपणा सोड तुझा.’’ नेहमी अशी घरची मुक्ताफळं ऐकणारी मुलगी टिव्हीवरच्या सारेगम च्या चुरशीत पहिली आली तर तिच्या घरच्यांना जसं वाटेल तसं माझं उर अभिमानानी भरून आलं. तिच्या कौतुकाने माझीही पहायची दृष्टी बदलून गेली. आपल्याच भाषेतील अक्षरांच्या कमनीयतेकडे आपण कसं बरं इतक्या वर्षात पाहिलं नाही? अक्षरांकडे पाहता पाहता मला दुसरीचा वर्ग स्पष्टपणे डोळ्यासमोर दिसू लागला. ज्यांचं अक्षर चांगलं असेल त्या मुलींना शाळा भरायच्या आधी किंवा सुटल्यावर अर्धा तास काटदरे बाई सुलेखन शिकवायच्या. शाळा भरायच्या आधी बाई जेंव्हा फळा लिहीत असत तेंव्हा, त्यांच्या एका एका अक्षराच्या जादूकडे बघत मागे 10- 20 तरी मुली उभ्या असत. साधन म्हणून वापरलेल्या शरीरालाही एखाद्या निर्लेप योग्याने तुच्छतेनी टाकून द्यावे त्याप्रमाणे लिहिता लिहीता खडू संपत आला की बाईंची खडू टाकून द्यायची ढब मला आजही आठवते. अक्षरांचे कित्ते पुण्याच्या सुप्रसिद्ध ABC म्हणजे आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक जोडणार्‍या रस्त्यावरील बालाजी मंदिरासमोरील सामक ब्रदर्स कडून आणायचे. त्यांच्याकडेच राणी निब मिळायचं. बाकीची निब्स पिवळी बसकी छोटी असत. राणी निब मात्र चंदेरी लांब असायचं. पिवळं निब पाच पैशाला असलं तर राणी निब 10 किंवा 15 पैशाला येई. ते टाकावर खोचून शाईच्या दौतीत बुडवून एक एक अक्षर डौलदार काढावं लागे. एअरमेल किंवा काळेज पेन, चेलपार्कची रॉयल ब्ल्यू किंवा जेट ब्लॅक शाईची दौत आणि पेनात शाई भरायचा ड्रॉपर मिळाल्याचं पाचवीत काय अप्रूप असे. पण त्या आधी चार वर्ष सुलेखनाचे कित्ते पहिल्यांदा पेन्सिलीने आणि नंतर बोरूने लिहावे लागत. तिरका छेद दिलेल्या बोरूच्या टोकाने लिहितांना - ल चे दोन्ही गाल सारखेच गोबरे असले तरी नदीत एक पाय सोडून बसलेल्या तरुणी प्रमाणे उजवा पाय खाली सोडून बसलेला आकर्षकल‘’
  हातात लामणदिवा घेऊन उभा असलेला “ज”
  रथात डावा पाय खंबीर रोवून छाती पुढे काढून उभ्या राहिलेल्या पार्थाप्रमाणे असलेला “र”
  गणपतीच्या सोंडेप्रमाणे सरळ खाली येऊन गोलाकार वळलेला “ग”
  कमळ पाकळी सारखा “क”
  क्षत्रियाने धनुष्याला दोरी ताणून बसवत बाण लावल्याप्रमाणे “क्ष”
  अगदी नळाच्या तोटी प्रमाणे “न”
  बाळकृष्णाच्या कपाळावर रेखलेल्या गंधाप्रमाणे “ण”
  एका पायावर टॅप डान्स करणारा “ह”
  वेलीला लोंबणार्‍या गोलमटोल टरबुज बाळाप्रमाणे “ट” आणि “ठ” हृदयाचा ठाव घेऊन गेली पाहिजेत.
  प्रत्येक अक्षराचा खाली टेकलेला पाय रशियन बॅले करणार्‍या नर्तिकेनी तिच्या पायाच्या बोटांवर उभं रहावं तसा अक्षराला सावरून धरत मोठ्या नजाकतीने उभा असला पाहिजे. गुढीच्या काठीसारखा नाही. सगळं वाक्य कसं गजगामिनी सारखं तोर्‍यात झुलत पुढे गेल्यासारखं वाटायला पाहिजे. हत्ती चालतांना फक्त त्याच्या बोटांवर चालत असतो. म्हणून त्याची गजगामिनी चाल वहाव्वा म्हणायला लावते. तसच अक्षरांचंही. लिहितांना शब्द कसे बॅले करत कागदाच्या रंगमंचावर उतरायला पाहिजेत. लिहिणं ही कार्यपद्धती असायची. टक टक टक टक बोटं कीपॅडवर दाबतांना पूर्वी अक्षरं जिवंत व्हायची हे आपण विसरूनच गेल्यासारखं वाटलं
  शब्दांवर दिली जाणारी रेघ शब्दाच्या थोडी आधी सुरू होऊन शब्द संपेपर्यंत न तुटता सलग ओढली गेली पाहिजे आाणि शब्द संपल्यावर घराच्या शेड सारखी थोडी पुढे आली पाहिजे. शब्दामधे ताठ शिस्तीच्या सैनिकाप्रमाणे “भ” उभा असेल तर वरून येणारी रेष त्याच्या अभिमानानी उंचावलेल्या मस्तकाला जराही बाध न आणता किंचित थांबून पुढे गेली पाहिजे “ध” ची धनुकली मोडता कामा नये. थ च्या थव्याला उडायला आडकाठी नको. छ ची छकुली अबाधित रहायला हवी. लहान बाळाच्या जावळावरून फुंकर मारल्यारखी वरची रेघ अक्षरांना न दुखावता शब्दांना सुखावत गेली पाहिजे. रेष काढतांना सुरवातीचा कोन 20 ते 30 अंशाच्या चढावर चढल्याप्रमाणे तर शेवट रँपवरून उतरल्यासारख्या नजाकतीचा यायला पाहिजे. पाहणार्‍याची नजर हलकेच रेघेवर चढत गेली पाहिजे आणि शब्दासोबत हलकेच उतरून पुढच्या शब्दावर गेली पाहिजे. अक्षरांची डोकी छेदत जाणारी रेषा मनालाही जखमी करत जाते.
  बोरुनी लिहितांना अक्षराच्या वळणाप्रमाणे कुठे बारीक कुठे जाड दिसलं पाहिजे हे काटदरे बाईंनी इतकं घोटून घेतलं होतं. की आजही चित्रातल्या नर्तकींप्रमाणे कमनीय देहाची ती अक्षरं माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली.
  अरुंधती लिहीतांना “अ” चा खालचा गोल लामणदिव्याच्या “ज” सारखा थोडा वरपर्यंत आणायला मला आवडायचा. मग रथात उभ्या असलेल्या मर्दानी योद्ध्यासारखा “र” रेखल्यानंतर “ध” ची धनुकली रेखता रेखता कधी मी अक्षरांच्या प्रेमात पडले हे मलाच कळलं नाही.
  हुजुरपागेच्या आमच्या काटदरे बाईंनी 18 फेब्रुवारीला वयाची 102 वर्षे पूर्ण करून 103 व्या वर्षात पदार्पण केलं. बाई आजही त्यांची सर्व कामं स्वतः करतात. साडीला फॉल लावण्यापासून सर्व!
  त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानी परत सर्व अक्षरं माझ्या मनात माझ्यासोबत उठून उभी राहली. कधी “ब” नी माझ्या कमरेभोवती हात घातला आणि अगं म्हणत कधी “ग” च्या खांद्यावर मी अलगद हात ठेऊन “ह” सारखा tap dance च्या स्टेप्स घेत तर कधी “क” ला दिलेल्या कान्या प्रमाणे Toe वर उभी राहून मनानी बॅले करायला लागले हे मलाच कळलं नाही.

अक्षरांमधे प्राण ओतून त्यांना सजीव करणार्‍या काटदरे बाईंना आज मातृभाषेदिनी शतशः नमन🙏 बाईंना जीवतु शरदः शतम् । ह्या पलिकडच्या उत्तमोत्तम शुभेच्छा शोधाव्या लागत आहेत ह्याचा मनाला होणारा आनंद विलक्षण आहे. आज मातृभाषा दिनी एक छोटासा लेख लिहून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत आहे.

लेखणी अरुंधतीची –

फेसबुकावरून साभार

. . . . . . . . . . . .

२.सुलेखनाचे नमूने

३.अक्षरे … रेतीवरली आणि खडकावरली

दोन मित्र एका वाळवंटातून जात होते. त्यांच्यात थोडा वाद झाला आणि त्यातल्या ताकतवान मित्राने दुसऱ्याच्या मुस्कटात ठेऊन दिली. त्याने कांही न बोलता वाळूवर लिहिले, “आज माझ्या जिवलग मित्राने मला थोबाडीत मारली.”
दोघे चालत चालत एका ओअॅसिसपाशी पोचले आणि आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले. दुसरा मित्र पाण्यात बुडायला लागला होता, पण पहिल्याने त्याला वाचवले. भानावर आल्यानंतर त्याने एका दगडावर एक वाक्य कोरले, “आज माझ्या जिवलग मित्राने माझे प्राण वाचवले.”
त्याने असा फरक का केला हे विचारल्यावर तो मित्र उद्गारला, “जर तुम्हाला कोणी दुखवलं तर ते वाळूवर लिहून ठेवा. क्षमेच्या एका झुळुकेसरशी ते पुसले जाईल, पण जर कोणी तुमच्यासाठी कांही चांगले केले तर ते दगडावर कोरून ठेवलेत तर कोणत्याही वाऱ्याने ते पुसले जाणार नाही.”

तुमचे नकारात्मक अनुभव मनातल्या वाळूवर आणि सकारात्मक अनुभव स्मरणाच्या दगडावर कोरायला शिका.

मूळ इंग्रजी लेख
A story tells that two friends were walking through the desert During some point of the Journey they had an Argument, and one friend Slapped the other one In the face. The one who got slapped was hurt, but without saying anything, wrote in the sand:
TODAY MY BEST FRIEND SLAPPED ME IN THE FACE .
They kept on walking until they found an oasis, where they decided to take a bath. The one who had been slapped got stuck in the mire and started drowning, but the friend saved him. After he recovered from the near drowning, he wrote on a stone:
TODAY MY BEST FRIEND SAVED MY LIFE.
The friend who had slapped and saved his best friend asked him, “After I hurt you, you wrote in the sand and now, you write on a stone, why?”
The other friend replied “When someone hurts us we should write it down in sand where winds of forgiveness can erase it away. But, when someone does something good for us, we must engrave it in stone where no wind can ever erase it.”

LEARN TO WRITE YOUR HURTS IN THE SAND AND TO CARVE YOUR BENEFITS IN STONE!!!

Forget the things that made you sad,
Remember things that made you glad,
Forget the trouble that passed away,

Remember the blessings that come each day.

४.अक्षरांची वेगळी जुळवाजुळव

Word Scrabble

ही इंग्रजी भाषेतली अक्षरे असल्यामुळे त्याचे मराठीकरण करता येत नाही. ती मुळातूनच वाचून पहा आणि त्याची मजा घ्या.

” DILIP VENGSARKAR ”
When you rearrange the letters:
” SPARKLING DRIVE ”
———————————————————-
PRINCESS DIANA
When you rearrange the letters:
END IS A CAR SPIN
———————————————————
MONICA LEWINSKY
When you rearrange the letters:
NICE SILKY WOMAN
————————————————————
DORMITORY:
When you rearrange the letters:
DIRTY ROOM
———————————————————-
ASTRONOMER:
When you rearrange the letters:
MOON STARER
———————————————————-
DESPERATION
When you rearrange the letters:
A ROPE ENDS IT
———————————————————–
THE EYES:
When you rearrange the letters:
THEY SEE
———————————————————-
A DECIMAL POINT:
When you rearrange the letters:
I M A DOT IN PLACE
———————————————————-
AND FOR THE GRAND FINALE:
” MOTHER – IN – LAW ”
When you rearrange this letters:

Guess……………………….
Can u find it or think ……………..
Apply your mind …………………………….
Imagine……
What can you find it out or can guess or imagine or think…..
No answer……..

Leave it….
I will tell you…

Here it is :
———————————————————-
WOMAN HITLER
———————————————————-

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

५.अक्षर गणेश

उद्या गणेशजयंती आहे आणि या महिन्यात मराठी भाषा दिवस येतो. या निमित्याने काही अक्षरगणेशांचे दर्शन.

अक्षरगणेशाची ही चित्रे मी गेल्या दोन तीन वर्षांपासून निरनिराळ्या ठिकाणी पाहिली आहेत तसेच मला ईमेलमधूनही मिळाली आहेत. या अनुपम चित्रांच्या चित्रकाराचे नांव त्याच्या उंदराच्या पायात लपलेले आहे, (असे कोणीतरी म्हणाले) पण मला तरी ते स्पष्टपणे दिसत नाही. त्या अज्ञात चित्रकाराचे आभार मानून आणि त्याची क्षमा मागून या गणेशोत्सवाच्या निमित्याने ती या ठिकाणी चिकटवत आहे. यात कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्कभंग करण्याचा माझा विचार नाही. याला कोणाचा विरोध असल्यास ती लगेच काढून टाकली जातील.

या लेखाचे संपादन केले दि. १७ सप्टेंबर २०१८

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

६.अक्षरांची पौराणिक कथा


आज गणेश जयंती त्यानिमित्ताने 🌹

एक प्रसिद्ध आख्यायिका आहे की, व्यासांनी श्रीगणेशाला महाभारत लिहिण्यासाठी लेखनिक होण्याची विनंती केली. लिहिताना मला थांबावे लागू नये अशा प्रकारे सलग मजकूर सांगण्याची अट श्रीगणेशाने घातली. सलग मजकूर सांगताना थोडी सवड मिळावी म्हणून व्यासांनी श्रीगणेशाला प्रतिअट घातली की, त्याने महाभारत लिहिताना नव्या आणि परिपूर्ण अक्षरसंचासह आणि नव्या परिपूर्ण लेखन पद्धतीने लिहिले पाहिजे.

श्रीगणेशाने ही अट पाळताना व्यासांच्या उच्चारांचे नीट अवलोकन केले. उच्चारांशी सुसंगत अक्षरचिन्हे निवडली. लेखन वेगाने होण्यासाठी श्रीगणेशाने जोडाक्षर पद्धती विकसित केली. श्रीगणेशाने तेव्हा विकसित केलेल्या लेखन पद्धतीत काही बदल होत होत आजची मराठी देवनागरी लिपी उपलब्ध झाली आहे. ही उपलब्ध लिपी अतिशय शास्त्रीय आहे. जगातील सर्व मानवांना तेहेतीस मणके असतात. या तेहेतीस मणक्यांशी या देवनागरी लिपीतील तेहेतीस चिन्हे एकास एक संगतीने जुळलेली आढळतात, त्यांना सध्या मराठी देवनागरी लिपीतील तेहेतीस व्यंजनचिन्हे म्हणून ओळखले जाते. मणक्यांच्या वरील भागातील मुखाशी संबंधित सोळा उच्चारांशी सोळा अक्षरचिन्हे जुळलेली आहेत त्यांना मराठी देवनागरी स्वरचिन्हे म्हणून सध्या ओळखले जाते. या चिन्हांच्या सहाय्याने श्रीगणेशाने जोडाक्षर पद्धतीही विकसित केली. यासह तीन संयुक्त व्यंजनचिन्हेही श्रीगणेशाने निर्माण केली. श्रीगणेशाने ही सर्व बावन्न चिन्हे ॐ या बीजाक्षराच्या विविध अवयवांपासून निर्माण केली होती. या बावन्न चिन्हांचा उपयोग करून २०७३७ दोन अक्षरी जोडाक्षरे, ७४६४९६ तीन अक्षरी जोडाक्षरे, २६८७३८५६ चार अक्षरी जोडाक्षरे, ९६७४५८८१६ पाच अक्षरी जोडाक्षरे निर्माण होतात. श्रीगणेश या देवाने हा अक्षरसंच व लेखन पद्धती निर्माण केली आणि ती नागरिकांच्या वापरासाठी खूपच सोयीची ठरली
म्हणून कोणीतरी विद्वानाने या व्यवस्थेला देवनागरी लिपी हे नाव दिले. या लिपीतील , , ही तीन अक्षरचिन्हे या लिपीतील इतर चिन्हांपेक्षा वेगळी आहेत. या तीन चिन्हांच्या बाराखडीतील पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे. ग,ण,श या तीन अक्षरांचे हे वेगळेपण, ही स्वर व्यंजन व्यवस्था गणेश या देवतेनेच निर्माण केल्याचे सूचक मानून श्रद्धाळू गणेशभक्त देवनागरी लिपीला गणेशविद्या म्हणतात.

गणेशविद्या या चिन्ह व्यवस्थेत स्थळ, काळानुरूप बदल होत होत सध्या वापरात असलेल्या मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड, बांग्ला, उडिया, मल्याळी, तेलुगू, गुजराती, पंजाबी, शारदा लिप्या विकसित झाल्या आहेत. श्रीगणेशाने मानवाला दिलेल्या या वैज्ञानिक लेखन व्यवस्थेची माहिती गणेश जयंती निमित्त सर्व जगापर्यंत पोचवावी हे आवाहन!

सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
(नाथ संप्रदाय फेसबुक वरून ५ डिसेंबर २०१६)

फेसबुकवरून साभार

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मूळ लेख दि.२३-०२-२०१६

७.क, ख, ग आपल्याला काय सांगतात?

जरा विचार करून बघा.
क – क्लेश करू नका.
ख – खंत करू नका.
ग – गर्व करू नका.
घ – घाण करू नका.
च – चिंता करू नका.
छ – छळ करू नका.
ज – जबाबदारी स्वीकारा.
झ – झाडे लावा.
ट – टिप्पणी करु नका.
ठ – ठगू नका.
ड – डाग लागू देऊ नका.
ढ – ढ राहू नका.
त – तत्पर राहा.
थं – थुंकू नका.
द- दिलदार बना.
ध – धोका देऊ नका.
न – नम्र बना.
प – पाप करु नका.
फ – फ़ालतू काम करू नका.
ब – बिघडू नका.
भ – भावुक बना.
म – मधुर बना.
य – यशस्वी बना
र – रडू नका.
ल – लोभ करू नका.
व – वैर करू नका.
श – शत्रुत्व करू नका.
ष – षट्कोनासारखे स्थिर राहा.
स – सेवा करा.
ह – हसतमुख राहा.
क्ष – क्षमा करा.
त्र – त्रास देऊ नका.
ज्ञ – ज्ञानी बना.

********************

नवी भर दि. २६-०१-२०२२ :

८. हस्ताक्षरशास्त्र

हस्ताक्षरशास्त्र या विषयाबद्दल मला कुतूहल वाटत आले आहे. त्याची थोडी ओळख या लेखात आहे.

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर – सफर विज्ञानविश्वाची

“माझं हस्ताक्षर पुर्वी चांगलं होतं पण नंतर मी डाॅक्टर झालो”या वाक्यातला बहुतांशी विनोदाचा आणि किंचित वास्तविक भाग सोडला तर मला माणसं आणि त्यांची वेगवेगळी ‘हस्ताक्षरं’ याबद्दल नेहमी एक कुतूहल वाटतं..
किरटं-तिरपं-छापीव अश्या वेगवेगळ्या हस्ताक्षरांचं आपण ढोबळपणं सुंदर,ठिकठाक आणि गलिच्छ असं वर्गीकरण करू शकतो पण माणसांची हस्ताक्षरं वेगवेगळी कशी आणि का असतात?
शब्द एकसारखेच असले तरी माणसागणिक हस्ताक्षर का बदलतं?
अक्षर आपल्या व्यक्तित्वाचं प्रतिबिंब असतं का?
हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मते,”तुमचं हस्ताक्षर हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतं” किंबहुना ते अवचेतन मनाचं प्रतिबिंबच असतं..
चांगलं आणि वाईट हस्ताक्षर नेमकं कसं ठरवावं? तर व्यवस्थित-सुवाच्य-शैलीदार हस्ताक्षर म्हणजे चांगलं तर दुर्बोध-गलिच्छ-निष्काळजीपणं लिहिलेलं म्हणजे वाईट हस्ताक्षर..
शाळकरी वयात जसं पुस्तकात असेल तश्या अक्षराची हुबेहूब चांगली नक्कल करता येणं हा सर्वाधिक महत्वाचा गुण आणि हुशारीचं एक महत्वाचा मापदंड मानला जायचा आणि ज्यांना तितकी हुबेहूब नक्कल करता यायची नाही त्यांना चक्क सराव-शुद्धलेखन ही शिक्षा मिळायची..
बुद्धिमत्तेशी थेट संबंध नसला तरी विद्यार्थ्याला अहंगड आणि न्यूनगंड तयार होण्याच्या प्रक्रियेत शाळकरी वयात अक्षराचा मोठा वाटा होता..
‘मला कळलं बस झालं’ म्हणून कसंही लिहिणं आणि ‘कुणालाही किमान वाचता येईल’ असं लिहिणं इतकं साधंसोपं गणित यामागं असलं तरी ते आपलं व्यक्तिमत्व नेमकं कसं दर्शवतं?
या प्रश्नाचं उत्तर ग्राफोलाॅजी अर्थात ‘हस्ताक्षरशास्त्र’ शोधण्याचा प्रयत्न करतं किंबहुना सोबतच लिहिणाऱ्याची मन:स्थितीही समजावून घेतं..
हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मते हस्ताक्षरशास्त्र ही विज्ञानशाखा माणसाच्या हस्ताक्षरातील जागा-गोलाई-फटकारे यावरून व्यक्तिमत्वाचा अंदाज घेऊन मानसशास्रीय विश्लेषण करतं अन् यातून वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेल्या लोकांचा अभ्यास करणं सहज होतं..
जगाला ‘आयक्यू’ या बौद्धिक परिमाणाची ओळख करून देणारा फ्रेंच मनोविश्लेषक अल्फ्रेड बिनेट याच्या मते ‘हस्ताक्षरशास्त्र हे भविष्य सांगणारं नव्हे तर भविष्यातलं महत्वाचं शास्त्र’ आहे तर काही अभ्यासकांच्या मते हे छद्मशास्त्र आहे..
काही हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मते उजव्या बाजूला तिरकं झालेलं हस्ताक्षर असलेला व्यक्ती बहिर्मुख आणि नव्या अनुभवास सज्ज असल्याचं संकेत आहे,डाव्या बाजूला तिरकं झालेलं अक्षर असलेला व्यक्ती अंतर्मुख आणि एकलकोंड्या असण्याचं द्योतक आहे तर कुठंच तिरकं न होता ‘सरळ’ अक्षर हे तार्किक-संतुलित-व्यवहारी व्यक्तीमत्वाचं निदर्शक आहे..
मोठं अक्षर म्हणजे लक्ष्य वेधून घेण्याची आवड,लहान अक्षर म्हणजे लाईमलाईट न आवडणं तर मध्यम आकारातलं अक्षर म्हणजे ना कुठं पोहोण्याची घाई,ना कुठं थांबण्यास हरकत..
र-स-श ही अक्षरं लिहितांना जिथं अक्षरात कोन बदलतो तिथं ‘➰’ असं लिहित किंचित रेंगाळणारी माणसं निवांत,उत्स्फुर्त आणि उदारमतवादी असतात तर कोनात न थांबता ‘<‘ असं चटकन शब्द संपवतात ती माणसं साशंक,तणावग्रस्त आणि पुराणमतवादी असतात..
अक्षरातली जागाही काही वैशिष्ट्ये अधोरेखित करते जसं ‘मोकळं’ लिहिणाऱ्यांना गर्दीत आवडत नाही,गोंधळ खपत नाही आणि त्यांना स्वत:चा अवकाश प्रिय असतो तर गिचमीड लिहिणाऱ्यांना एकटं रहाण्याची भिती वाटण्यासोबतच गर्दीत चटकन विरघळून जाणंही जमतं..
कलाकार-सृजनशील-स्वप्नाळू व्यक्तीचं अक्षर ‘गोलाकार’ असतं तर आग्रही-बुद्धिवादी-व्यावहारिक व्यक्तीचं अक्षर धारदार असतं..
यात धारदार अक्षरही शैलीदारपणे फिरवणारे या दोन्ही व्यक्तीमत्वांचं बेमालूम मिश्रण असतात..
अनुस्वार देतांना तुम्ही तो अती वर देत असाल तर तुम्ही कल्पकतेला महत्व देताय,अनुस्वार किंचित खाली देताय तर तुम्ही भावना दाखवणं टाळताय आणि अनुस्वार म्हणून ‘ं’ न वापरता तुम्ही ‘॰’ असा पोकळ गोल वापरत असाल तुमच्यात बालसुलभ कुतूहल तर आहेच परंतु तुम्ही दुरदर्शीही आहात,बाकी ं किंवा ॰ न वापरता तुम्ही ‘ असं काहीही वापरत असाल तुम्ही अधीर आहातच पण इतरांना धारेवर धरणारेही आहात..
ब किंवा ष चं पोट फाडतांना तुम्ही योग्य ठिकाणी योग्य तितकं पोट फाडत असाल तर तुम्ही माणुस म्हणूनही संतुलित आहात मात्र गरजेहून अधिक पोट फाडत असाल तर तुमच्यात आत्मविश्वास पुरेसा असला तरी तुम्ही अंमळ हट्टी आहात बाकी अर्धवट आणि कुठंही पोट फाडणारे असाल तर तुम्ही एक नंबरचे आळशी आणि निरुत्साही..
अर्थात ‘घेतला पेन आणि लिहिलं काहीतरी’ म्हणजेच केवळ हस्ताक्षर नाही..लिखाणाची शैली-आकार-वेग यावर अनेक गोष्टी परिणाम करत असतात अगदी गुणसूत्रही..
तुम्ही पेन नेमका कसा पकडता यापासून डोळे-हात यांचं संतुलन-मानसिक स्थिती-इतरांचा प्रभाव अश्या अनेक बाबींवर हस्ताक्षर अवलंबून असतं..
मनस्थिती-आजुबाजूची परिस्थिती-स्वत:त झालेले बरेवाईट बदल यामुळं हस्ताक्षर बदलत रहातं पण आताशा हे सगळंही कदाचित लवकरच इतिहासजमा होईल कारण जमाना किपॅड-टचपॅड-व्हाॅईस टूल्स यांचा आलाय..खिश्याला पेन लावणारी जमात विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे..
बहुतांश अभ्यासकांच्या मते ‘हस्ताक्षरशास्र’ हे छद्मशास्त्र असलं तरी या बाबतीत मी अल्फ्रेड बिनेटशी अंशत: सहमत आहे..
सहमत यासाठी की मी ही मानसशास्त्र-वर्तणुकशास्त्र यांचा विद्यार्थी आहे आणि अंशत: यासाठी की मन-शरीर यांना प्रभावित करणारे घटक इतके वाढलेत की ‘कोअर’ माणूस तसाही कितपत शिल्लक रहातो याबद्दल मला थोडी शंकाये..
बाकी “चांगल्या अक्षराचा खूप गर्व नको तसं वाईट अक्षराची फारशी लाजही नको” आपलं हस्ताक्षर आपल्याला वाचता यायला हवं बस्स😅

आज जागतिक हस्ताक्षरदिनी सहज🖋

. . . . . फेसबुकवरून साभार

********************

९. लेखनक्रियानिरूपण

– समर्थ रामदासस्वामी

॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक एकोणविसावा : शिकवण समास पहिला : लेखनक्रियानिरूपण

ब्राह्मणें बाळबोध अक्षर ।
घडसुनी करावें सुंदर ।
जें देखतांचि चतुर ।
समाधान पावती ॥ १ ॥
वाटोळें सरळें मोकळें ।
वोतलें मसीचें काळें ।
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें ।
मुक्तमाळा जैशा ॥ २ ॥
अक्षरमात्र तितुकें नीट ।
नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्या हि नीट ।
आर्कुलीं वेलांड्या ॥ ३ ॥
पहिलें अक्षर जें काढिलें ।
ग्रंथ संपेतों पाहात गेलें ।
येका टांकेंचि लिहिलें ।
ऐसें वाटे ॥ ४ ॥
अक्षराचें काळेपण ।
टांकाचें ठोसरपण ।
तैसेंचि वळण वांकाण ।
सारिखेंचि ॥ ५ ॥
वोळीस वोळी लागेना ।
आर्कुली मात्रा भेदीना ।
खालिले वोळीस स्पर्शेना ।
अथवा लंबाकार ॥ ६ ॥
पान शिषानें रेखाटावें ।
त्यावरी नेमकचि ल्याहावें ।
दुरी जवळी न व्हावें ।
अंतर वोळींचे ॥ ७ ॥
कोठें शोधासी आडेना ।
चुकी पाहातां सांपडेना ।
गरज केली हें घडेना ।
लेखकापसुनी ॥ ८ ॥
ज्याचें वय आहे नूतन ।
त्यानें ल्याहावें जपोन ।
जनासी पडे मोहन ।
ऐसें करावें ॥ ९ ॥
बहु बारिक तरुणपणीं ।
कामा नये म्हातारपणीं ।
मध्यस्त लिहिण्याची करणी ।
केली पाहिजे ॥ १० ॥
भोंवतें स्थळ सोडून द्यावें ।
मधेंचि चमचमित ल्याहावें ।
कागद झडतांहि झडावें ।
नलगेचि अक्षर ॥ ११ ॥
ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा ।
प्राणी मात्रास उपजे हेवा ।
ऐसा पुरुष तो पाहावा ।
म्हणती लोक ॥ १२ ॥
काया बहुत कष्टवावी ।
उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लाउनी सोडावी ।
कांहीं येक ॥ १३ ॥
घट्य कागद आणावे ।
जपोन नेमस्त खळावे ।
लिहिण्याचे सामे असावे ।
नानापरी ॥ १४ ॥
सुर्या कातर्या जागाईत ।
खळी घोंटाळें तागाईत ।
नाना सुरंग मिश्रित ।
जाणोनि घ्यावें ॥ १५ ॥
नाना देसीचे बरु आणावे ।
घटी बारिक सरळे घ्यावे ।
नाना रंगाचे आणावे ।
नाना जिनसी ॥ १६ ॥
नाना जिनसी टांकतोडणी ।
नाना प्रकारें रेखाटणी ।
चित्रविचित्र करणी ।
सिसेंलोळ्या ॥ १७ ॥
हिंगुळ संग्रहीं असावे ।
वळले आळिते पाहोन घ्यावे ।
सोपें भिजौनी वाळवावे ।
संग्रह मसीचे ॥ १८ ॥
तगटी इतिश्रया कराव्या ।
बंदरी फळ्या घोटाव्या ।
नाना चित्रीं चिताराव्या ।
उंच चित्रें ॥ १९ ॥
नाना गोप नाना बासनें ।
मेणकापडें सिंदुरवणें ।
पेट्या कुलुपें जपणें ।
पुस्तकाकारणें ॥ २० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लेखनक्रियानिरूपणनाम समास पहिला ॥ श्रीराम ॥
हस्ताक्षर दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

१०. ब्राह्मी ते देवनागरी

अक्षरांचे आकार कसकसे बदलत गेले ते पहा.

अक्षरातील उत्क्रांति १
अक्षरातील उत्क्रांति २

११. अनुस्वाराचा उच्चार

अनुस्वाराचा उच्चार जाणून घेण्यासाठी ‘अनुनासिक’ म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचं आहे.
बोलताना ज्यांचा उच्चार नाकातून होतो, अशी व्यंजनं म्हणजे अनुनासिकं. मराठी भाषेत ‘ङ्, ञ्, ण्, न्, म्’ ही पाच अनुनासिकं आहेत. क्, ख्, ग्, घ् या व्यंजनांसाठी ङ् हे अनुनासिक वापरलं जातं. अश्या प्रकारे अनुनासिकांची वर्गवारी करण्यात आली आहे. शब्दात ज्या अक्षरावर अनुस्वार असेल, त्याच्या पुढच्या अक्षराच्या अनुनासिकावरून उच्चार कळतो.
उदा.
१. अंक – अनुस्वारानंतर क असल्यामुळे ङ् असा उच्चार. . . . पंख, रंग, संघ इ.
२. पंच – अनुस्वारानंतर च असल्यामुळे ञ् असा उच्चार. . . . मंच, मंजुळ, संजय इ.
३. कंठ – अनुस्वारानंतर ठ असल्यामुळे ण् असा उच्चार. . . . घंटा, सुंठ, सोंड इ.
४. संथ – अनुस्वारानंतर थ असल्यामुळे न् असा उच्चार. . . . संत, पंथ, मंद इ.
५. सुंभ – अनुस्वारानंतर भ असल्यामुळे म् असा उच्चार. . . . संप. बंब, शुंभ इ.
हे शब्द पञ्च, कण्ठ असेही लिहिता येतात. यांना नासिक्य वर्ण असंही म्हणतात.

इतर व्यंजनं म्हणजे य् ,र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह्, ळ्, क्ष्, ज्ञ् यांच्यासाठी हे नियम बंधनकारक नसतात.
उदा. संयम, कंस, संज्ञा इत्यादी.

. . . आंतर्जालावरून साभार दि. ०४-०४-२०२२

ओळखा पाहू – भाग २

आजकाल व्हॉट्सअॅपवर अनेक मजेदार कोडी प्रसारित होत असतात. अशीच काही कोडी संग्रहित करायचे मी ठरवले. अशी २० कोडी पहिल्या भागात संग्रहित करून झाल्यानंतर आणखी कोडी येतच राहिली. म्हणून मी आता हा दुसरा भाग उघडला आहे. यात नवी कोडी दिली आहेत. तुम्हीही आधी ही कोडी सोडवायचा प्रयत्न तर करून पहा.
मला मिळालेली जमतील तेवढी उत्तरे मी खाली दिली आहेत.

पहिली वीस कोडी खाली दिलेल्या लिंकवर पहा.

ओळखा पाहू – भाग १

२१.ऋषींची नावे ओळखा

१.ज्यांनी समुद्रप्राशन केला…??
२.ह्या ऋषींना भगवान परशुरामांनी पृथ्वी दान केली होती…??
३.ह्या ऋषींनी कुंतीला वरदान दिले होते…??
४.ह्या ऋषींच्या अस्थी पासून एक शस्त्र बनविले होते…??
५. परशुरामाचे वडील आणि शंकराचा एक अवतार…??
६.चंद्राचे वडील…??
७.महर्षी वेद व्यासांचे वडील…??
८.ह्या ऋषींचा ग्रह , तारे, तसेच भविष्य शास्त्र याचा अभ्यास होता…??
९.मेनका हिने या ऋषींचा तपोभंग केला होता…??
१०.विष्णूचा अवतार वामन ह्यांच्या आई वडिलांची नावे…??
११.श्री रामाचे गुरु…??
१२.श्री कृष्णा चे गुरु…??
१३.कौरव आणि पांडव यांचे गुरु…??
१४.द्रोण भीष्म पितामह यांचे गुरू…??
१५.ह्या ऋषींनी शकुंतला हीचा सांभाळ केला होता…??
१६.ह्या ऋषींचा अणु रेणू चा अभ्यास होता…??
१७.या ऋषींच्या नावाने एक पक्षी आहे…??
१८.लवकुशांचा सांभाळ केला
१९.गुरुपौर्णिमा हा उत्सव यांचे स्मरण म्हणून केला जातो
२०. गणपतीस्तोत्र या महर्षींनी लिहिले…??

.

.
१.अगस्ति
२. कश्यप
३. दुर्वास
४. दधिची
५. जमदग्नि
६. अत्रि
७. पराशर
८. भृगु
९. विश्वामित्र
१०. अदिती, कश्यप
११. वसिष्ठ
१२. सांदिपनी
१३. द्रोणाचार्य, कृपाचार्य
१४. परशुराम
१५. कण्व
१६. कणाद
१७. भारद्वाज
१८. वाल्मिकी
१९. व्यास
२०. नारद


२२ त्य चे शब्द

हे सोडवा बरं
* खालील शब्दांसाठी शेवटी त्य अक्षर येणारे प्रतिशब्द लिहा.
😘😘😘😘😘😘😘
1 भिक्षुकी =
2 नेतृत्व/मुख्याधिकार =
3 उद्धटपणा =
4 नवरा बायकोची जोडी/युगुल =
5 अष्टप्रधान मंडळातील एक =
6 वाङ्मय =
7 वाखाणण्याजोगा =
8 संतान =
9 सूर्याचे एक नाव =
10 शेवटचे =
11 धन्य =
12 केलेले काम =
13 एक उपदिशा =
14 नियमितपणा =
15 पाडाव =
16 वाईट काम =
17 द्वाड =
18 आपुलकी =
19 राक्षस =
20 सती सावित्रीच्या गुण =
21 पश्चिमेकडील =
22 दक्षिण दिशेकडील =
23 पूर्वेला असणारे =
24 खरे =
25 सतत असलेले =
😊😊😊😊😊😊😊
धन्यवाद !

.

.

.

१.पौरोहित्य
२. अमात्य
३.औद्धत्य
४. दांपत्य
५. अमात्य
६. साहित्य
७. स्तुत्य
८. अपत्य
९.आदित्य
१०. अंत्य
११. कृतकृत्य
१२. कृत्य
१३. नैऋत्य
१४. सातत्य
१५. पारिपत्य
१६. दुष्कृत्य
१७.व्रात्य
१८. अगत्य
१९. दैत्य
२०.पातिव्रत्य
२१. पाश्चिमात्य
२२. दक्षिणात्य
२३. पौर्वात्य
२४. सत्य
२५. सातत्य


२३ प्रार्थना

काही प्रार्थना कित्येकांच्या मुखोद्गत असतात.
असेच काही छोटे श्लोक व प्रार्थना पुढील अक्षरांवरुन तुम्हाला ओळखायचे आहेत
जसे प्रा वि क ग वि द सा
प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा।
१ मो मो मी बा ता
२ व म सू को स
३ या कुं तु हा ध या शु व
४ स मं मां शि स सा
५ क व ल क म स
६ गु र्ब्र गु र्वि गु र्दे म
७ ग जो ई स गु
८ म स भ पं जा
९ आ प तो य ग सा
१० शां भु श प सु
११ ब्र नं प सु के ज्ञा मू
१२ स सु स स स नि
१३ स स यो तु घ
१४ व क घे ना घ्या श्री
१५ शु क क आ ध सं
१६ प्र म रा चिं जा
१७ कै शि चं फ मा मु झ
१८ व सु दे कं चा म
१९ मा रा म रा स्वा रा म रा
२० त्व मा पि त्व त्व बं स त्व
२१ ज्या ज्या ठि म जा मा त्या त्या ठि नि रू तु

२२ भी रू म रु व ह मा
२३ रा रा स वि रा र भ

🙏सौ. चारुलता घोंगे🙏

.

.
१.मोरया मोरया मी बाळ तान्हे
२. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
३. या कुंदेंदु तुषार हार धवला
४. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
५. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
६. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
७. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
८. मना सज्जना भक्ति पंथेचि जावे
९. आकाशात् पतितम् तोयम् यथा गच्छति सागरम्
१०. शांताकारम् भुजगशयनम् पद्मनाभं सुरेशम्
११. ब्रह्मानंदं परमसुखदम् केवलं ज्ञानमूर्तीम्
१२.
१३. सदा सर्वदा योग तूझा घडावा
१४. वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
१५. शुभंकरोति कल्याणम् आरोग्यं सुखसंपदा
१६. प्रभाते मनी राम चिंतीत जावा
१७. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी
१८. वसुदेवसुतम् देवम् कंसाचाणूरमर्दनम्
१९. माता रामो मत्पिता रामचंद्रः
२०. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुः सखा त्वमेव
२१. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे

२२. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
२३. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे


२४. पुण्यातली ठिकाणे

🌹आजचा time-pass 🌹

खाली दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील ठिकाणे ओळखा ।

१ बाग आहे पण फुले नाहीत
२ वहात्या पाण्याचा थांबा
३ सांगायला दगड पण आहे गाव
४ थकल्या भागल्यांची वाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको
७ आडवी तिडवी वस्ती
८ लहान पाखरू ढेरी मोठी
९ फाॅरेनची गल्ली
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली
१२ मिठाई वाला हनुमान
१३ बेवडा ब्रीज
१४ पिडाकारी दैवताचा ओटा
१५ हार आहे तोही दगडाचा
१६ याचे थालीपीठ होत नाही
१७ नकार देणारी पेठ
१८ नमुनेदार वसाहत
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत
२० इथे बांगडीवाले आहेत का हो?
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली
२२ गिळंकृत करणारे मास्तर
२३ सगळे इथे एेटीत
२४ सुगंधित नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय!

तुमची वेळ सुरु होतेय आत्ता :

कालावधी : वाचल्यानंतर 3 तास. …. नाहीच जमले तर उत्तरे खाली पहा
🤨🤨🥱😴🙂☺️

.

.

.

१ बाग आहे पण फुले नाहीत – तुळशीबाग
२ वहात्या पाण्याचा थांबा – नळस्टॉप
३ सांगायला दगड पण आहे गाव – पाषाण
४ थकल्या भागल्यांची वाडी – विश्रांतवाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे – सहकारनगर
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको – येरवडा
७ आडवी तिडवी वस्ती – वाकडेवाडी
८ लहान पाखरू ढेरी मोठी – चिमण्या गणपती
९ फॉरेनची गल्ली – हॉंगकॉंग लेन
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती – लोकमान्य नगर
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली – धनकवडी
१२ मिठाई वाला हनुमान – जिलब्या मारुती
१३ बेवडा ब्रीज – दारुवाला पूल
१४ पिडाकारी दैवताचा ओटा – शनी पार
१५ हार आहे तोही दगडाचा – खडकमाळ
१६ याचे थालीपीठ होत नाही – विद्यापीठ
१७ नकार देणारी पेठ – नाना पेठ
१८ नमुनेदार वसाहत – मॉडेल कॉलनी
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत – हिराबाग
२० इथे बांगडीवाले आहेत का हो? – कासारवाडी
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली – घोरपडी पेठ
२२ गिळंकृत करणारे मास्तर – हडपसर
२३ सगळे इथे ऐटीत – हिंजवडी
२४ सुगंधित नगर- चंदन नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय! -मगरपट्टा

🤨🤨🥱😴🙂☺️🤨🤨🥱😴🙂☺️🤨🤨🥱😴🙂☺️

२५. ळीकारांत शब्द

बघुया तुमचे मराठी किती पक्के !
.
किमान १० उत्तरे देणारा हुशार ! 😊🙏
.
प्रत्येक उत्तर लिहिताना शेवटचे अक्षर “ळी” आले पाहिजे.

1 हाताचे शेवटचे बोट,.,
2 एक कडधान्य……
3 फणसातील बी….
4 कृत्रिम दात…..
5 केरळमध्ये राहणारा माणूस…
6 पावसाचे पाणी पत्र्यावरून खाली पडते..
7 प्राण्यांचे नाव..
8 आचमनासाठी वस्तू…
9 फाल्गुन महिन्यातील सण….
10 वाळलेली केळी….
11 सरळ नाक असलेल्या स्त्रीच्या नाकाची उपमा..
12 रामदास स्वामींच्या खांद्याला असते ती…
13 सकाळी म्हणायचे भजन..
14 दोन्ही हातांनी वाजवतो ती…
15 भाजी चिरायचे साधन…
16 नारळाच्या झाडाची फांदी…
17 पायच्या बोटातील दागिना …
18 एक रंग….
19 संतांच्या हातातील वाद्य…
20 महाराष्ट्रातील एक जात…
21 डॉक्टरांचे औषध ..
22 लहान लाकडे एकत्र बांधून केलेली ..
23 पुरात न मोडणारे..
24 तीन ठिकाणची केलेली यात्रा …
25 फुल उमलण्यापूर्वीची अवस्था…
26 अनेक डाळींच्या पिठाचा घा
27 श्रीखंड बासुंदीत शोभेसाठी घालतात..
28 गव्हाच्या पिठाची करतात ती ..
29 पेशव्यांच्या कानातील दागिना…
30 मदतीसाठी मोठय्याने मारतात ती,..
31 सण समारंभात दारात काढतो ती..
32 पूरण घालून करतो ती…
33 दिवाळीतील तिखट पदार्थ…
34 दूध घालतो ती..
35 बागकाम करणारा ..
36 दिव्यांचा सण ..
37 झाडाची पण खाते ती..
38 संक्रातीला या रंगाची साडी नेसतात ..
39 गालावर पडते ती..
40 प्रतिस्पर्ध्याची मात ..

चला मित्रमंडळी तुमची वेळ सुरू होते आहे आता …….
आपल्याकडे तर पैकीच्या पैकी गुण मिळवणारे हुषार लोक आहेत.🙂

.

.


१. करंगळी
२. चवळी
३. आठळी
४. कवळी
५. केरळी, मल्याळी
६. पन्हळी
७. शेळी
८. पळी
९. होळी
१०. सुकेळी
११.चाफेकळी
१२. झोळी
१३. भूपाळी
१४. टाळी
१५. विळी
१६. झावळी
१७. मासोळी
१८. शेवाळी
१९. चिपळी
20. कोळी
21. गोळी
22. मोळी
२३. लव्हाळी
२४. त्रिस्थळी
25. कळी
२६. आंबोळी
27. चारोळी
28. पोळी
29. बाळी
30. आरोळी
31. रांगोळी.
32. पुरणपोळी
३३. कडबोळी
34. गवळी
35. माळी
36. दिवाळी
37. अळी
38. काळी
39. खळी
४०. खेळी


२६. मजेदार प्रॉडक्ट्सची नावे

आज मी एक मजेदार प्रश्न मंजुषा घेऊन येत आहे. तुम्ही रोजच advertise बघता ना टीव्ही वर. तिथलेच काहीसे उत्तर. मग तयार ना…
1)नृत्य देवताच्या नावाने प्रसिद्ध पेन्सिल
2)फुलाच्या नावाने प्रसिद्ध बाम
3)अमर प्रेमाचे प्रतीक असलेला चहा
4)हिंदु देवताच्या नावाने प्रसिद्ध चार चाकी वाहन
5)काकाच्या नावाने ओळखले जाणारे चिप्स
6)उद्योग पतीच्या नावाने प्रसिद्ध बल्ब
7)उंच शिखराच्या नावाने प्रसिद्ध मसाला
8)अति महत्त्वाची व्यक्ती या नावाने सुटकेस
9) उत्तराखंड तील पर्वताच्या नावाने फेस वॉश
10)उद्योग पतीच्या आडनाव ने न. वन साबण
11)बगिच्याच्या नावाने ओळखले जाणारी साडी
12)एका शहराच्या नावाने ओळखले जाणारे चादर
13)एका झाडाच्या नावाने प्रसिद्ध असलेले टूथ पेस्ट
14)आशिया खंड या नावाने प्रसिद्ध असलेले पेंट
15)एका पक्षाच्या नावाने प्रसिद्ध साबण
16)वरदान देणाऱ्या पिठाचे नाव
17)बाय बाय करनारे प्रसिद्ध नमक
18)डोकं आणि खांदा चा वापर करून बनवलेला कोंडा शाम्पू
19 पहिली प्रसिद्ध धावपटु च्या नावाने प्रसिद्ध पंखा
20)चाकाच्या नावाने असलेले कपडे धुण्याचे साबण

.
.
.

1)नृत्य देवताच्या नावाने प्रसिद्ध पेन्सिल.
नटराज .
2)फुलाच्या नावाने प्रसिद्ध बाम.
झंडू बाम
3)अमर प्रेमाचे प्रतीक असलेला चहा.
ताजमहाल चहा .
4)हिंदु देवताच्या नावाने प्रसिद्ध चार चाकी वाहन.
मारुती .
5)काकाच्या नावाने ओळखले जाणारे चिप्स.
अंकल चिप्स
6)उद्योग पतीच्या नावाने प्रसिद्ध बल्ब.
बजाज
7)उंच शिखराच्या नावाने प्रसिद्ध मसाला.
एव्हरेस्ट
8)अति महत्त्वाची व्यक्ती या नावाने सुटकेस.
व्हीआयपी
9) उत्तराखंडातील पर्वताच्या नावाने फेस वॉश.
हिमालय
10)उद्योग पतीच्या आडनाव ने नं. वन साबण.
टाटा
11)बगिच्याच्या नावाने ओळखले जाणारी साडी.
गार्डन सिल्क
12)एका शहराच्या नावाने ओळखले जाणारे चादर.
सोलापूरी
13)एका झाडाच्या नावाने प्रसिद्ध असलेले टूथ पेस्ट.
नीम टूथ पेस्ट
14)आशिया खंड या नावाने प्रसिद्ध असलेले पेंट.
एशियन पेंट
15)एका पक्षाच्या नावाने प्रसिद्ध साबण.
डोव्ह साबण
16)वरदान देणाऱ्या पिठाचे नाव.
आशीर्वाद आटा
17)बाय बाय करनारे प्रसिद्ध नमक.
टाटा नमक
18)डोकं आणि खांदा चा वापर करून बनवलेला कोंडा शाम्पू .
हेड ऐंड शोल्डर
19 पहिली प्रसिद्ध धावपटु च्या नावाने प्रसिद्ध पंखा.
उषा पंखा
20)चाकाच्या नावाने असलेले कपडे धुण्याचे साबण.
व्हील साबण


२७ ष्ट / ष्ठ चे शब्द

शब्द सुचवा,

मात्र प्रत्येक शब्दाच्या शेवटी “ष्ट” किंवा ” ष्ठ” असे जोडाक्षर असावे.

उदा. नाश पावलेले = नष्ट

१) कथा =
२) स्वच्छ, उघड =
३) तगडा =
४) पीठ, चूर्ण =
५) संकट =
६) पुरवणी =
७) ठळक, काहितरी वेगळे =
८) घट्ट, दृढ =
९) खडूस =
१०) ध्येय, साध्य =
११) चांगला =
१२) सर्वात चांगला =
१३) दर्जाहीन =
१४) नातेवाईक =
१५) एक आडनाव..
१६) वफादार =
१७) अंतर्भूत =
१८) सभ्य / सुसभ्य =
१९) वाईट =
२०) वेडा, खुळा =
२१) मेहनत =
२२) योग्य =
२३) पोषण झालेला =
२४) सर्वात मोठा =
२५) समाधानी =
२६) अनुचित =
२७) इच्छीलेली वस्तू =
२८) आठ =
२९) आकर्षित =
३०) खरकट =
३१) गुंतागुंतीचे =
३२) खलनायकी =
३३) रुचकर =
३४) चवदार =
३५) लहरी =
३६) नाद लागलेला =
३७) लाचखोर =
३८) भांडण =
३९) सर्वात लहान =
४०) संलग्न, चिकटलेले =
४१) मधूर =
४२) मिजासखोर=
४३ ) बाळाला लागते ती =
४४) अंक

.
.
१. गोष्ट
२. स्पष्ट
३. धष्टपुष्ट
४. पिष्ट
५. अरिष्ट
६. परिशिष्ट
७. विशिष्ट
८. घनिष्ट
९. खाष्ट
१०. उद्दिष्ट
११. उत्कृष्ट
१२. सर्वोत्कृष्ट
१३. निकृष्ट
१४. आप्तेष्ट
१५. वसिष्ट
१६. स्वामीनिष्ठ
१७. समाविष्ट
१८. शिष्ट
१९. दुष्ट
२०. भ्रमिष्ट
२१. कष्ट
२२. इष्ट
२३. पुष्ट
२४. ज्येष्ठ
२५. संतुष्ट
२६. अनिष्ट
२७. इष्ट
२८. अष्ट
२९. आकृष्ट
३०. उष्टं
३१.क्लिष्ट
३२. दुष्ट
३३. स्वादिष्ट
३४. चविष्ट
३५. छंदिष्ट
३६. नादिष्ट
३७. भ्रष्ट
३८. वितुष्ट
३९. कनिष्ठ
४०. घनिष्ट
४१. मिष्ट
४२. गर्विष्ठ
४३. दृष्ट
४४. अष्ट


२८. ‘की’ कारांत शब्द

नमस्कार मंडळी. आज आपल्या साठी एक नवीन कोडे पाठवित आहे. थोडासा विचार केला तर सहजपणे सोडविता येईल. अट फक्त एकच, शेवटचे अक्षर “की”असलेले शब्द शोधायचे आहेत.

०१ दाराची बहीण
०२ मातीची भांडी
०३ कृष्णाची माता
०४ नवनागातील एक नाग
०५ एक कडधान्य
०६ छोटे लाकूड
०७ एक अलंकार
०८ एक काव्यप्रकार
०९ एक आजार
१० एक नाते
११ दोन बोटांनी केलेला आवाज
१२ छोटी पोळी
१३ रामपत्नी
१४ छोटे तालवाद्य
१५ नाकाचा अलंकार
१६ केवडा
१७ आखूड
१८ पाहिजे तेव्हढी
१९ चकचकीत
२० एक रंग
२१ शारीरिक आवेग
२२ केरळमधील धरण
२३ ३॥ पट
२४ संगीत वैशिष्ट्य
२५ दुफळी
२६ रंग उडालेली
२७ एका घाटाचे नांव
२८ ढोंगी
२९ नाचणारी
३० पतंगाची मदतनीस
३१ गुद्दा
३२ स्वतःभोवती फिरणे
३३ एक नदी
३४ अशुभ चेहरा
३५ मोडलेली
३६ आवडती
३७ लबाड
३८ निराधार
३९ भीती
४० दुरावा असलेली
४१ एक जुने नाणे
४२ क्षणिक झोप
४३ कापसाचे बी
४४ बडबडी
४५ एक ऋषी
४६ भावंडातील दुजाभाव
४७ एक विद्यापीठ
४८ कीड पडलेली
४९ एक छोटे तालवाद्य
५० पराक्रम

.

.

.

१. खिडकी
२. मडकी
३. देवकी
४. वासुकी
५. मटकी
६. काटकी
७. वाकी
८. साकी
९. पटकी
१०. काकी
११. टिचकी
१२. फुलकी / चानकी
१३. जानकी
१४. टिमकी
१५. चमकी
१६. केतकी
१७. तोटकी
१८. मोजकी
१९. चकाकी
२०. खाकी
२१. उचकी
२२. इडुक्की
२३. औटकी
२४. गायकी
२५. बेकी
२६. विटकी
२७. खंबाटकी
२८. नाटकी
२९. नर्तकी
३०. फिरकी
३१. बुक्की
३२. गिरकी
३३. गंडकी
३४. सुतकी
३५. मोडकी
३६. लाडकी
३७. बेरकी
३८. पोरकी
३९. धडकी
४०. परकी
४१. दिडकी
४२. डुलकी
४३. सरकी
४४. बोलकी
४५. वाल्मिकी
४६. भावकी
४७. रुरकी
४८. किडकी
४९. ढोलकी
५०. मर्दुमकी

२९. क्रियापदावरून मराठी गाणे लिहा

गाण्याच्या पहिल्या ओळीत संबंधित शब्द आला पाहिजे.
उदाहरणार्थ : नेणे = ने मजसी ने…

१] उगवणे =
२] झुलणे =
३] धरणे =
४] लाजणे =
५] पहाणे =
६] भांडणे =
७] निजणे =
८] विसरणे =
९] फुलणे =
१०] जाणे =
११] भोगणे =
१२] कळणे =
१३] गमणे =
१४] रुसणे =
१५] गाठ पडणे =
१६] तळमळणे =
१७] मिळणे =
१८] मालविणे =
१९] पिकणे =
२०] समजावणे =
२१] मावळणे =

.

.

१. उगवला चंद्र पुनवेचा
२.झुलतो बाई रास झुला
३. कर हा करी धरिला शुभांगी
४. लाजून हासणे अन् हासून ते पहाणे
५. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
६.डाव मांडून भांडून मोडू नको
७. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे
८. विसरशील खास मला दृष्टीआड होता
९. फुलले रे क्षण माझे फुलले रे
१०. जाईन विचारित रानफुला
११. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
१२. तुला न कळले मला न कळले
१३. मज गमे ऐसा जनक तो
१४. अजुनी रुसून आहे खुलता कळी खुलेना
१५. आज अचानक गाठ पडे
१६. अरे वेड्या मना तळमळसी
१७. कृष्णा मिळाली कोयनेला
१८. मालवून टाक दीप
१९. जाळीमंदी पिकली करवंदं
२०. समजावुनी व्यथेला समजावता न आले
२१. मावळत्या दिनकरा


३०. शब्दाचा दुसरा अर्थ

दिलेल्या वाक्यावरून शब्दाचा दुसरा अर्थ सांगायचा आहे.
🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏
1 हार पण गळ्यातील नाही
2 बंडल पण नोटांचे नाही
3 चपला पण पायताण नाही
4 समाधी पण थडगे नाही
5 मजला पण मला नाही
6 फूल पण देवासाठी नाही
7 पत्र पण डाक नाही
8 फळ पण खाण्याचे नाही
9 तळ पण मुक्काम नाही
10 चीज पण खाण्याचे नाही
11 ठोक पण मार नव्हे
12 बेडी पण लग्नाची नाही
13 उत्तर पण दिशा नाही
14 कुडी पण दागिना नाही
15 सडा पण फुलांचा नाही
16 कळ पण वेदना नाही
17 धार पण पाण्याची नाही
18 जरा पण किंचीत नाही
19 दागिना पण चिंचेशी संबंध नाही
20 काटा पण फुलाचा नाही
🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏

१. पराजय
२. थापा
३. वीज
४. समाधी लावणे
५. माळा प्लोअर
६. मूर्ख
७. पान
८. परिणाम, कर्माचे फळ
९. तळपाय
१०. उपयोग
११. घाऊक
१२. हातकडी
१३. प्रश्नाचे उत्तर
१४. शरीर
१५. सडाफटिंग
१६. यंत्राचा भाग
१७. सुरीची धार
१८. म्हातारपण
१९.चिंचपेटी
२०. वजनाचा काटा

३१.हिंदी गाणी -१

आजची क्वीझ : आजचे प्रश्न सोपेच आहेत
विषय — प्रत्येकात दोन उत्तरे आहेत .
१) आशा भोसले यांचा दागिना हरवला आहे ,त्या एकदा मराठीत सांगतात तर एकदा हिंदीत.कोणत्या गाण्यातून सांगतील .
मराठी: बुगडी माझी सांडली ग.
हिंदी : झुमका गीरा रे
२) एकात नायिका सांगते ती मागे च आहे तर दुसऱ्यात नायक सांगतोय तो पण मागेमागेच आहे.पहिलं आशाचं दुसरं रफीचं .
3)सलील चौधरी यांचे संगीत फार उच्च दर्जाचे मानले जाते .स्वतः लता त्यांची फॕन ! त्यांचे दोन सिनेमे कोणते ज्यात एकही गाणं नव्हतं ,तरीही ते सिनेमे गाजले.
४)पूर्वी मुलींची लग्न जुळणं हा एक प्रॉब्लेम असायचा ,आता मुलगा असो मुलगी असो लग्न जुळणं (आणि ते टिकणं) हा प्रॉब्लेम आहेच .त्यामुळे जाहिराती वधुवरसुचक मंडळ यांचा सहारा घ्यावा लागतो .
आता जी दोन गाणी ओळखायची आहेत ती तर चाळीस पन्नास वर्षांपूर्वीची आहेत .एकात नायक चक्क वधुवरसुचक मेळाव्यात जशी माहिती नाव आडनाव घराचा संपूर्ण पत्ता घरात कोणकोण हे सांगावं लागतं तसं सांगतो. तर दुसऱ्यात तो जाहिरात दिल्यासारखं सांगतो.
दोन्हीही किशोरकुमार ची गाजलेली गाणी आहेत .
५)साधनाची दोन गाणी ,एकात तिचा दागिना हरवला आहे तर दुसऱ्यात तोच दागिना सापडला आहे
६) ही दोन्ही गाणी नाना ची आहेत.एकात खरे नाना आहेत म्हणजे आजोबा (मुखड्याच्या शेवटी उल्लेख येतो).तर दुसरे डुएट आहे.
पहिल्यात हिरो हिरॉईनला स्टोरी सांगत असतो तर दुसऱ्यात तिच्या कडून western dance शिकत असतो.दोन्हीही एकाच सिनेमाची गाणी. एक रफीचे दुसरे रफी सुमनचे .
७)ही दोन रफी आशाची गाणी .दोन्हीही मध्ये रफीचं म्हणणं आहे की आत्ता आता तर आली आहेस आणि आत्ताच?
दोन्हीही अतिशय गाजलेली गाणी एकात देवआनंद तर दुसऱ्यात जितेंद्र .
८)कावळ्याला उडून जा सांगणारी ही दोन गाणी .त्याला कोणतीही भाषा येत नसल्याने कुठल्याही भाषेत सांगितलं तरी काय फरक पडतो. एकात लता मराठीतील एका गाण्याच्या कडव्यात कावळ्याला उड उड म्हणतेय तर दुसऱ्यात उदित नारायण पंजाबी मिश्रित हिंदीत उडुन जा म्हणतोय !
९)आता थोडी काठिण्यपातळी वाढवू
रामायणात सीता तरी वनवासात रामाच्या बरोबरच होती.पण लक्ष्मणाच्या बायकोच्या दुखाःचं काय .मराठीत तरी एका गाण्याने तिला न्याय दिला आहे. हिंदीत शेवटी आनंद बक्षीनीच एका गाण्यात तिची कैफियत मांडली आहे. सर्वांसमक्ष ती रामाला तिच्या दुखाःबद्दल सांगते ? दोन्हीही गाणी ओळखा
१०)ही दोन्हीही गाणी सलील चौधरी ची ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांची . एक लताचं दुसरं आशाचं . खरं तर ह्या डॉक्टरला सांगायच्या गोष्टी क्षणा क्षणाची ह्रदयाची वाढती धडधड वगैरे .
एकात वैजयंतीमाला तर एकात तनुजा !

कोड्याचे उत्तर-

२- जरा हौले हौले चलो मोरे साजना ( सावन की घटा)
दिवाना मुझसा नहीं इस अंबर के नीचें ( तीसरी मंजिल )
३ – कानून, इत्तेफाक
४- माय नेम इज एंथोनी गोन्साल्विस (अमर अकबर)
जरूरत है जरूरत है जरूरत है(मनमौजी)
५- झुमका गिरा रे(मेरा साया)
मिला है किसीका झुमका(परख)
६- एक था गुल और एक थी बुलबुल
ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे
७- अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं
ढल गया दिन हो गयी शाम
८ – मराठी- पैल तो गे काऊ कोकताहे
हिंदी- उड़ जा काले कावा तेरे मूँह विच खंड पावा ( गदर )
९- मराठी- उर्मिले त्रिवार वंदन तुला ( भावगीत)
हिंदी- ओ रामजी बडा़ दुख दीना (रामलखन)
१०- घड़ी घड़ी मेरा दिल धड़के (मधुमती)
बागमें कलियाँ खिली (चाँद और सूरज)

३२. हिंदी गाणी -२

हमारे जमानेके हिन्दी सिनेमाके कुछ प्रसिद्ध गानोंके अंतरे की एक पंक्तियों को नीचे दिया गया है।

 1. बेवजह तारीफ़ करना आप की आदत तो नहीं
 2. उनकी तमन्ना दिल में रहेगी , शम्मा इसी महफ़िल में रहेगी
 3. नशे की रात ढल गयी , अब खुमार ना रहा
 4. ज़िन्दगी है इक सफ़र, कौन जाने कल किधर
 5. जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
 6. शबनम के मोती, फूलों पे बिखरे
 7. बदले दुनिया सारी, तुम न बदलना
 8. दूर है मंज़िल दूर सही प्यार हमारा क्या कम है
 9. इन होंठों की हसरत में , तपते जलते होते
 10. ऐसा कहाँ रे, ऐसा कहाँ रे

पूर्ण उत्तर
१. आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है … घर – गुलजार
२. प्यार किया तो डरना क्या … मुगले आझम – शकील बदायुनी
३. दोस्त दोस्त ना रहा .. संगम – शैलेंद्र
४. आ जा सनम मधुर चाँदनी मे हम .. चोरी चोरी – हसरत जयपुरी
५. मै जिंदगी का साथ निभाता चला गया … हम दोनों – साहिर लुधियानवी
७. गाता रहे मेरा दिल … गाइड – शैलेंद्र
८. राही मनवा दुख की चिंता क्यूँ सताती है … दोस्ती -आनंद बक्षी
९. तुमने मुझे देखा होकर मेहरबाँ … तीसरी मंजिल – मजरूह सुलतानपुरी
१०. गोरी तेरा गाँव बडा प्यारा …. चितचोर – रविंद्र जैन

३३. मराठी गाणी

खालील वाक्यांवरून मराठी गाणी ओळखायची आहेत.

१) Oh my dear friend , you are asking me honey but —
2) The same moon is shining in the sky
3) I am a brave soldier of a new period , new era
4) The sons of human are helpless / dependent in this world
5) The Goddess Saraswatee has sat on a peacock
6) People will feel sorry for a very few days
7) We should love this life and enjoy it hundred times
8) Here I am swallowing glasses after glasses of drink carelessly
9) These trees , climbers and the animals in this forest are my relatives
10) The star of Venus and a gentle breeze


१. मधु मागसि माझ्या सख्या परी
२. तोच चंद्रमा नभात
३.
४. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
५.
६. जन पळभर म्हणतिल हाय हाय
७. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
८. धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
९. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
१०. शुक्रतारा मंद वारा

३४ ‘स’ शेवटचे अक्षर असलेले शब्द

डोकेबाज कोड आहे. असे चार अक्षरी शब्द लिहा की त्यातले शेवटचे अक्षर “स” आले पाहिजे.

1 आजूबाजूला-
2 प्रशस्त-
3 दूधाचा एक पदार्थ –
4 संगत सोबत-
5 चेष्टा-
6 हट्ट किंवा हेका –
7 लाळ –
8 काकडीचे लोणचे –
9 घाबरणे किंवा तळमळ –
10 हुज्जत घालणे –
11 कथेकरी बुवा –
12 अधिक महिना –
13 लंघन –
14 फालतू बडबड –
15 एकरूप होणे –
16 एक संत –
17 एक गोड पक्वान्न –
18 डौलदार पक्षी-
19 तर्क वितर्क –
20 एक अलंकार –
21 वर्षातील चार महिन्याचा काळ –
22 भाबडा –
23 उदंड –
24 खमंग-
25 एक राग –
26 बंदुकीची गोळी –
27 पोरकं किंवा अनाथ –
28 एक तीर्थक्षेत्र-
29 मसाल्याचा एक पदार्थ –
30 राबता –
31 तरफदारी –
32 “D” जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारा आजार-

१.आसपास, २. ऐसपैस, ३. खरवस, ४. सहवास, ५. उपहास, ६. अट्टाहास, ७. मुखरस, ८. कायरस, ९. कासावीस, १०. घासाघीस, ११. हरिदास, १२. मलमास, १३. उपवास, १४. बकवास, १५. समरस, १६. रामदास, रविदास, १७. सुधारस, १८. राजहंस, १९. अदमास, २०. कर्णघोस, २१. चातुर्मास, २२. निरागस,
२३. भरघोस, २४. खरपूस, २५. मालकंस, २६. काडतूस, २७. बेवारस, २८. बनारस, २९. खसखस, ३०. ऊठबस, ३१. शिफारस, ३२. मुडदुस

1 आजूबाजूला- आसपास
2 प्रशस्त- ऐसपैस
3 दूधाचा एक पदार्थ – खरवस
4 संगत सोबत- सहवास
5 चेष्टा- उपहास
6 हट्ट किंवा हेका – ध्यास
7 लाळ – मुखरस
8 काकडीचे लोणचे – कायरस
9 घाबरणे किंवा तळमळ – कासावीस
10 हुज्जत घालणे – घासाघीस
11 कथेकरी बुवा – हरदास
12 अधिक महिना – मलमास
13 लंघन – उपवास
14 फालतू बडबड – बकवास
15 एकरूप होणे – सहवास
16 एक संत – रामदास
17 एक गोड पक्वान्न – सुधारस
18 डौलदार पक्षी- राजहंस
19 तर्क वितर्क – अदमास
20 एक अलंकार – कर्णघोस
21 वर्षातील चार महिन्याचा काळ – चातुर्मास
22 भाबडा – निरागस
23 उदंड – भरघोस
24 खमंग- खरपूस
25 एक राग – मालकंस
26 बंदुकीची गोळी – काडतुस
27 पोरकं किंवा अनाथ – बेवारस
28 एक तीर्थक्षेत्र- बनारस
29 मसाल्याचा एक पदार्थ – खसखस
30 राबता – उठबस
31 तरफदारी – शिफारस
32 “D” जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारा आजार- मुडदुस

**************

३५ उकाराचे तीन अक्षरी शब्द

प्रत्येक शब्द तीन अक्षरी हवा. शब्दाची सुरवात उ अक्षराने व्हायला हवी. बाराखडीच्या क्रमाने शब्द शोधल्यास कोडे लवकर सुटेल.

१ मोदकाची पारी
२गर्मी
३कुटण्याचे साधन
४नदीची सुरवात
५पाऊस थांबणे
६आगाऊ रक्कम
७धिंगाणा
८निमगोरा
९वैराण
१०प्रकाश
११दिवाळीत अंगाला
लावतात
१२झोप उघडणे
१३मालाचा खप
१४दक्षिणेतील आचारी
१५झेप
१६एक डाळ
१७कमतरता
१८चांगले
१९जबाब
२०प्रगती
२१भव्यदिव्य
२२खोल नव्हे ते
२३पाणी
२४सूर्य उगवणे,विकास
२५पोट
२६खिन्न
२७व्यापार
२८भले करणे
२९बोलीवर पैसे,वस्तु देणे
३०कंटाळा
३१बाग
३२विष्णू
३३भरती
३४खोडकर
३५एक नास्ता
३६अनशन
३७समुद्रातील वाळू काढणे
३८खोकल्याची ढास
३९दोघे
४०मनाची प्रसन्नता
४१शंकर
४२लक्ष्मणाची पत्नी
४३कामाची गती
४४जास्त होणे
४५सरळ नव्हे ते
४६वमन
४७बोलणे,श्लोक म्हणणे
४८विलंब
४९दम टाकणे
५०शिजवलेले कडधान्य.

व्ही.जी.कुलकर्णी यांचे कोडे आहे


१. उकड
२. उकाडा
३. उखळ
४. उगम
५. उघाडी
६. उचल
७, उच्छाद
८. उजळ
९. उजाड
१०. उजेड
११. उटणे
१२. उठणे
१३. उठाव
१४. उडपी
१५. उड्डाण
१६. उडीद
१७. उणीव
१८. उत्तम
१९. उत्तर
२०. उत्कर्ष
२१. उत्कृष्ट
२२. उथळ
२३. उदक
२४. उदय
२५. उदर
२६. उदास
२७. उदीम
२८. उद्धार
२९. उधार
३०. उद्वेग
३१. उद्यान
३२. उद्धव
३३. उधाण
३४. उनाड
३५. उपमा
३६. उपास
३७. उपसा
३८. उबळ
३९. उभय
४०. उमेद
४१. उमेश
४२. उर्मिला
४३. उरक
४४. उलटी
४५. उलटे
४६. उलटी
४७. उच्चार
४८. उशीर
४९. उसासा
५०. उसळ

३६.पूजेचे साहित्य ओळखा

खाली पूजेचे साहित्य दिले आहे, अक्षरे विस्कळीत आहेत ती बरोबर करून पूजेला लागणाऱ्या साहित्याची यादी मिळवा..😊👍🏻

उदा. प दी प धु = धूपदीप

1 टा शं घं ख
2 म्ह प ता ण ळी
3 दा ध क्ष गं अ
4 ले हा र फु
5 न ई रा म जं स नि
6 न ग स ट रं आ पा चौ
7 र द शे कुं दुं ळ कुं ह
8 क्का ला बु ल गु
9 ब ऱ्या पा म सु दा
10 ई ळे ठा फ मि
11 र उ त्ती पू ब का द
12 र श ना ल क ळ
13 स्त्र का व सा प चे
14 वे ड न जो जा
15 ने ड्या पा ची वि
16 ळे आं हा चे ड ब्या
17 कुं क ळ रि ह खा ड
18 णे र र प ता उ ब पिं
19 रे ळ ब गु खो
20 ल र्वा स बे दू ळ तु
21 ती ल वा ते वा ल ती फु
22 टी ण ओ ख
23 ब चे ळी खां के
24 से क्षि पै टे णा सु द
25 डे ब्या भां तां
26 ळ हू दु ग तां
27 क चे त ती ब र आ
28 ती पा र धु
29 ती पु र का र आ
30 त ध मृ ख चा दू र सा पं
31 द्य हा वे म नै

बघुया किती उत्तर बरोबर येतात..
😀👍

31 महा नैवेद्य
30 दुधसाखर पंचामृत
29 कापूरआरती
28 धुपारती
26 गहूतांदुळ
25 तांब्याभांडे
24 दक्षिणा सुटेपैसे
23 केळीचे खांब
22 खणओटी
21 तेलवाती फूलवाती
20बेल दुर्वा तुळस
19 गूळखोबरे
पितांबर उपरणे 18
17 हळकुंड खारीक
16 आंब्याचे डहाळे
15 विड्याची पाने
14 जानवे जोड
13 कापसाचे वस्त्र
12 नारळ कलश
11 कापूर उदबत्ती
10 मिठाई फळे
9 बदाम सुपा-या
8 बुक्का गुलाल
6 आसन चौरंग पाट
4 हार फुले
3 गंध अक्षता
2 पळी ताम्हण
1 घंटा शंख

*********

३७. रफारयुक्त तीन अक्षरी शब्द

एक कोडे जरा विरंगुळा आणेल
मधल्या अक्षरावर रफार असणारे 3 अक्षरी शब्द लिहा
उदाहरणार्थ :
एक शहर = कर्जत

१] कथानकाचा पहिला अर्धा भाग =
२] सगळ्या गोष्टींची माहिती असणारा =
३] बरा न होणारा आजार =
४] चिखल =
५] नवजात शिशू =
६] पाषाणहृदयी =
७] गुजराण =
८] दर्शविणे,दाखविणे =
९] पक्का विचार =
१०] आरसा =
११] स्वच्छ,नितळ =
१२] त्याज्य,वगळलेला =
१३] निडर =
१४] विनवणी,साकडे =
१५] नेहमी =
१६] हवा नसलेला =
१७] अभिनंदनाचा एक प्रकार =
१८] माजोरडा =
१९] तक्रार =
२०] एकांत ठिकाण =
२१] माल परदेशात पाठविणे =

मला सुचली तेवढी उत्तरे दिली आहेत. कृपया बाकीची कळवावी.
१. पूर्वार्ध
२. सर्वज्ञ
३. दुर्धर
४. कर्दम
५. अर्भक
६. निर्दय
७. निर्भर
८. दर्शन
९. निर्धार
१०. दर्पण
११. निर्मळ
१२.
१३. निर्भय
१४.
१५. सर्वदा
१६. निर्वात
१७.
१८.
१९.
२०.
२१. निर्यात

*************

३८. नाट्यगीते ओळखा

प्रश्नमंजुषा

नाट्यपदे ओळखा.
उदाहरणार्थ :
शु मी वं = शुरा मी वंदिले

१. ते लो गो =
२. म म भा हा =
३. हृ ध हा बो ख =
४. उ चं पु =
५. ख तो प्रे =
६. प्री सु दु =
७. न कृ स =
८. ग स रा सा =
९. न वि सं मी =
१०. वि म मी या =
११. प्र अ ग =
१२. मृ र मो =
१३. प्रि प रा स स =
१४. म मं सा =
१५. जी मु तू ज टा पा ज =
१६. यु म दा र =
१७. स व व ना =
१८. ज गं भा =
१९. दे हा श =
२०. घे छं म =
२१. र मी चं क =

प्रश्नमंजुषाकार..

AK मराठे,कुर्धे, पावस,रत्नागिरी

१.तेजोनिधि लोहगोल
२. मला मदन भासे हा
३.हृदयी धरा हा बोध खरा
४. उगवला चंद्र पुनवेचा
५. खरा तो प्रेमा
६. प्रीती सुरी दुधारी
७. नरवर कृष्णासमान
८. गर्द सभोती रान साजणी
९. नको विसरू संकेत मीलनाचा
१०. विलोपिले मधुमीलनात या
११. प्रभू अजि गमला मनी तोषला
१२. मृगनयना रसिक मोहिनी
१३. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनि
१४. मदनाची मंजिरी साजिरी
१५. जीवनातल्या मुशाफिरा तू जपुन टाक पाऊल जरा
१६. युवति मना दारुण रण
१७. सत्य वदे वचनाला नाथा
१८. जय गंगे भागीरथी
१९. दे हाता शरणागता
२०. घेई छंद मकरंद
२१. रवी मी चंद्र कसा मज

३९. शब्दावरून गाणे ओळखा

उदाहरणार्थ : चंद्र = उगवला चंद्र पुनवेचा

१. झाड =
२. माड =
३. पान =
४. कळ्या =
५. फुले =
६. बकुळ =
७. पारिजात =
८. चाफा =
९. मोगरा =
१०. सदाफुली =
११. शेवंती =
१२. काटा =
१३. आकाश =
१४. ढग =
१५. तारका =
१६. चांदणे =
१७. बगळे =
१८. पोपट =
१९. बदके =
२०. चिमण्या =
२१. चकोर=

.

१. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
२. रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना
३. पान जागे फूल जागे भाव नयनी दाटला
४. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
५. फुले का पडती शेजारी, फुले वेचत बहरू कळियांसी आला
६. घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला
७. बहरला पारिजात दारी ,
८. चाफा बोलेना, चाफा चालेना
९. मोगरा फुलला
१०. अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते
११. अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती हो
१२. काटा रुते कुणाला, आक्रंदताति कोणी
१३. आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
१४. वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं
१५. सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का
१६. चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचले
१७. बगळ्यांची माळ फुले अजूनि अंबरात
१८. नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायचा
१९. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
२०. या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या
२१, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर

******************************

४०. पासवर्ड ओळखा

A man locked his personal computer with a password and wrote some words in the hint box.
One day his wife tries to login in his absence using the hints which contained the following:

4 grapes 🍇🍇🍇🍇
1 apple 🍎
7 bananas 🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
7 mangoes 🍋🍋🍋🍋🍋🍋🍋
2 pineapples 🍍🍍
1 orange 🍊
8 pomegranates 🍑🍑🍑🍑🍑🍑🍑🍑

What is the password?
IAS question…………let’s c who is intelligent in our group…….

.

.

PASSION

ओळखा पाहू – भाग १

आजकाल व्हॉट्सअॅपवर अनेक मजेदार कोडी प्रसारित होत असतात. अशीच काही कोडी या भागात संग्रहित करायचे ठरवले आहे. मला ही कोडी जशी मिळत गेली तसतशी नवी कोडी वर देऊन जुनी कोडी खाली ठेवली आहेत. त्यामुळे ती क्रमवार दिसत नाहीत. तुम्हीही आधी सोडवायचा प्रयत्न तर करून पहा.
मला मिळालेली जमतील तेवढी उत्तरे मी खाली दिली आहेत.

या पहिल्या भागात मी २० कोडी दिली आहेत. यापुढील आणखी  कोडी इथे पहा. https://anandghare.wordpress.com/2020/05/28/%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8/

****************************************
नवी भर दि.१३-०५-२०२० : १७, १८, १९, २०

१७. फुले आणि मिठाया

🌸🍫🍀🍩🌹🍪💐🥮🍥
फुल आणि मिठाई एकत्र झाली आहे बघुया कोण वेगळं करून दाखवतो.
१)ढाणीरापेतरा
२)र्फीनिबधाशिगं
३)गुभोबराजलाग
४)रईसईमजाला
५)वंबुंडुशेदीलाती
६)अजिस्टलेरबी
७)स्वंसवदबेडीनजा
८)कघीनेवरर
९)सणीफुफेदाली
१०)चुगतीररामोमो
११)ल्लामेचरलीगुस
१२)काईजुलीजुतक
१३)चंबलरोपामदा
१४)खंगुबालश्रीक्षीड
१५)रहरमोलखीगु
१६)शिरीकजापारात
१७)लाकंलीदकली

.

.

१. रातराणी पेढा
२. निशिगंध बर्फी
३. गुलाब राजभोग
४. जाई रसमलाई
५. शेवंती बुंदीलाडू
६. अॅस्टर जिलेबी
७. जास्वंद बेसनवडी
८. कणेर घीवर
९. सदाफुली फेणी
१०. मोगरा मोतीचूर
११. चमेली रसगुल्ला
१२. जुई काजूकतली
१३. चंपा दालमोठ ?
१४. गुलबाक्ष श्रीखंड
१५. गुलमोहर खीर
१६. पारिजातक शिरा
१७. लिली कलाकंद

**************

१८. मराठी चित्रपट

हिंदी वाक्यातून मराठी चित्रपट ओळखा.

१. बंद मंदिर
२. महाराष्ट्र राजधानीका दामाद
३. भाईके पत्नीकी चूडियाँ
४. लव कुश के सम्राट पिता
५. धरतीके पीठपे
६. एक गाडी दो सवारी
७. अभिनेताओंका बादशाह
८. मेरा शोहर सबसे अमीर
९. मन्नतसे माँगा मेरा पती
१०.ऐसा ये फसाना
११.पेडगाँवके होशियार लोग
१२. बेटी ससुराल चली
१३. बाबुलके घरकी साडी
१४. पिछा करना
१५. पुराना वो सोना
१६. चँपियन बननेका मिशन
१७. जीता हुआ
१८.हम हमारे गाँव जाते हैं
१९. कुली की मौज
२०. था एक जोकर
२१. बेटी का दान
२२. कानून की बात किजिये
२३. साससे बढकर दामाद
२४. एक आवारा दिन
२५. मेरी प्यारी सौतन
२६. हनिमून
२७. आगे का पैर
२८. कितने देर तेरी राह देखूँ
२९. मकान
३०. बेटा मैं तेरे लिये कैसी लोरी गाऊँ

.

१. देऊळ बंद
२.मुंबईचा जावई
३.वहिनींच्या बांगड्या
४. अयोध्येचा राजा / रामराज्य
५. जगाच्या पाठीवर
६. डबलसीट
७. नटसम्राट
८. माझा पती करोडपती
९. नवरा माझा नवसाचा
१०. अशी ही बनवाबनवी
११. पेडगावचे शहाणे
१२. लेक चालली सासरला
१३.माहेरची साडी
१४. पाठलाग
१५. जुने ते सोने
१६. मिशन चँपियन
१७. विजेता
१८. आम्ही जातो अमुच्या गावा
१९. हमाल दे धमाल
२०. एक होता विदूषक
२१. कन्याादान
२२. कायद्याचं बोला
२३. सासू वरचढ जावई
२४. एक उनाड दिवस
२५. सवत माझी लाडकी
२६. मधुचंद्र
२७. पुढचं पाऊल
२८. पाहू रे किती वाट
२९. घरकुल , ते माझे घर
३०. बाळा गाऊ कशी अंगाई

***************

१९. स्त चे शब्द

शेवटचे अक्षर स्त असलेले शब्द

१ पाठीवर असणारा हात
२ एक धातू
३ संपूर्ण नायनाट
४ त्रासून गेलेला
५ एक नक्षत्र
६ खूप छान
७ बांधून ठेवलेला
८ अगदी योग्य
९ लाजरा बुजरा
१० मित्र
११ शिमग्यात मागितलेली बिदागी
१२ एखाद्यावर टाकलेला विश्वास
१३ प्रभावी व्यक्तिमत्त्व
१४ सगव्ठे खाऊन सपवणे
१५ चौकशी
१६ कमी मूल्य असलेले
१७ खूप सारे
१८ सूर्य मावळणे
१९ रात्रीची राखण
२० पींकदाणी
२१ नेमून दिलेले काम करणारा
२२ भरवसा देणे
२३ सगळे विखुरलेले असणे
२४ घटनेची तीव्रता सांगणारा शब्द
२५ खूप मोठे

१ वरदहस्त,
२ जस्त
३ उध्वस्त
४ त्रस्त
५ हस्त
६ मस्त
७ बंदीस्त
८ रास्त
९ भिडस्त
१० दोस्त
११ पोस्त
१२ भिस्त
१३ भारदस्त
१४ फस्त
१५ वास्तपुस्त
१६ स्वस्त
१७ समस्त
१८ सूर्यास्त
१९ गस्त
२० तस्त
२१ नेमस्त
२२ आश्वस्त
२३ अस्ताव्यस्त
२४
२५ प्रशस्त

*******************

२०. चार अक्षरी शब्द

तुम्हाला असे चार अक्षरी शब्द शोधायचे आहेत की त्या शब्दाच्या पहिल्या अक्षरावर फक्त अनुस्वार असेल. पहिल्या अक्षराला काना मात्रा ऊकार काही नसेल. उदाहरण —
जमिनीखाली येणारी भाजी—
उत्तर—कंदमुळ

तर चला मग सोडवा तुमचे शब्दकोडे😊😊

१)ग्रहणाचा एक प्रकार—
२)कचर्‍याची गाडी—
३)शंकराचे एक नाव—
४)देवासमोर अखंड लावायचा दिवा—
५)पूज्य—
६)खुप गार—
७)कैदी—
८)साष्टांग नमस्कार—
९)गंगेचे पाणी
१०)विद्रोह करणारा—
११)एक रोग—
१२)संघाचे हे खुप शिस्तबद्ध असते—
१३)सांज—
१४)गणपतीचा प्रसाद—
१५)रावण—
१६)राजकपुरनी आणलेली एक नायिका किंवा एक नदी—
१७)रांगोळी—
१८)गाढव—
१९)रावणाची बायको—
२०)गणपतीचे एक नाव—
२१)हत्तीच्या कान आणि डोळ्यामधले स्थान—
२२)तामिळनाडुतील एक जिल्हा—
२३)एखाद्या माहितीबद्दल काहीही खबर नसणे
२४)काळोख—
२५)कुळाची यादी—
२६)साठवुन ठेवलेले पैसे—

तर सुरु करा सोडवायला असंही आज सर्वांकडे भरपूर वेळ आहे !😊

१. खंडग्राास
२. घंटागाडी
३. गंगाधर
४. नंदादीप
५. वंदनीय
६. थंडगार
७. बंदीवान
८. दंडवत
९. गंगाजल
१०. बंडखोर
११. संधीवात
१२. संचलन
१३. संध्याकाळ
१४. पंचखाद्य
१५. लंकाधीश
१६. मंदाकिनी
१७. रंगवल्ली
१८. लंबकर्ण
१९. मंदोदरी
२१. लंबोदर
२२. तंजावूर
२३.
२४. अंधःकार
२५. वंशावळ
२६. गंगाजळी

आता उरलेला एक शब्द कुणीतरी सांगावा.
आनंद घारे

श्री गजानन काळे यांनी उत्तर दिले आहे २३. गंधवार्ता. त्यांचे आभार.

नवी भर दि.२४-०४-२०२० : १५, १६

१५. प्रसिद्ध नायिका

ओळखा पाहू – प्रसिद्ध नायिका

1) न र्णा से प अ
2) र ला गो र्मि टा श
3) ख शा रे आ पा
4) म शा द ग म बे श
5) ना र रो शि क ड क्षि मि
6) ना र्थ भ म स शो
7) दा न मा हि ह रे व
8) हा न नू ज र
9) धु ला बा म
10) री कु मी मा ना
11) न त नू
12) ली ता बा गी
13) सि ला मा न्हा
14) रा ना दि
15) मा ती ला यं ज वै
16) नी द प मि
17) न ञा से चि सु
18) रा नो बा सा य
19) नी मा मा हे लि
20) मा नो म र
21) ना सा ध
22) ब स्सु त म
23) ध्या सं
24) ता म ज मु
25) खा रे
26) बा वि न द्या ल
27) ता ली बा गी यो
28) ता रं जी
29) भा री या दु ज
30) से मु न मू न न
31) टे भा खो शु
32) रा णा रु णी अ ई
33) या प डी प डिं ल का
34) राॅ री ना य
35) बी वी न र प बाॅ
36) ग नी सिं तु
37) राॅ नि रु य पा
38) वा लि ता ल र प
39) न ल हे
40) की ला श
41) मी र्जी च स मौ ट
.
.
.

१)अपर्णा सेन
२)शर्मिला टागोर
३)आशा पारेख
४)शमशाद बेगम
५)मीनाक्षी शिरोडकर
६)शोभना समर्थ
७)वहीदा रेहमान
८)नूरजहान
९)मधुबाला
१०)मीनाकुमारी
११)नूतन
१२)गीताबाली
१३)मालासिन्हा
१४)नादिरा
१५)वैजयंतीमाला
१६)पद्मिनी
१७)सुचित्रा सेन
१८)सायराबानो
१९)हेमामालिनी
२०)मनोरमा
२१)साधना
२२)तबस्सुम
२३)संध्या
२४)मुमताज
२५)रेखा
२६)विद्या बालन
२७)योगीता बाली
२८)रंजीता
२९) जया भादुरी
३०)मुनमूनसेन
३१)शुभा खोटे
३३)डिंपल कपाडिया
३४) रीना रॉय
३५)परवीनबाबी
३६)नीतुसिंग
३७)निरुपा रॉय
३८)ललिता पवार
३९)हेलन
४०)शकीला
४१)मौसमी चटर्जी


१६. जिल्हयांची नावे

नमस्कार महाराष्ट्रीयन मंडळी
🙏🏻 🙏🏻
खाली महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची नावे लपलेली आहेत… बघा ओळखता येतात का❓

1) 🌙🌊
2) 🕯️🤷🏻‍♀️
3) 🦊🌊
4) 🐮 Dha ❌
5) 🍽️🍴🥄 Ra
6) 🐍🌊
7) 🔥❌
8) 🐝 D
9) 💎🚶‍♀️🧎‍♀️
10) 7️⃣ Aara
11) 🔥 gaon
12) 🦎🏠
13) 🛕🏜️ Chi 😭
14) 📯 Ne
15) 🅰️🍹
16) Gon 🪔
17) 🦵 Oor
18) 🥞 1 1/2
19) ❌😤
20) ⬆️ Dha

👍👍😅👍👍

१. चंद्रपूर
२. मुंबई ?
३. कोल्हापूर
४. बुलढाणा
५. भंडारा
६. नागपूर
७. जालना
८. बीड
९. रत्नागिरी
१०. सातारा
११. जळगाव ?
१२. पालघर
१३.गडचिरोली
१४. पुणे ?
१५. अकोला
१६. गोंदिया
१७. लातूर
१८. नांदेड
१९. नाशिक
२०. वर्धा

************************
नवी भर दि.१९-०४-२०२० : ११,१२,१३,१४

११. शब्द ओळखा

[ चार अक्षरी शब्द ओळखा.तिसऱ्या अक्षरावर अनुस्वार आला पाहिजे.]
जसे रानमेवा ……करवंद
1——एक लांब आकाराचा दगड
2—–लाकडी चारपायी
3—–एक बैठक
4—-भरपुर केस असलेली अळी
5—-वालुकामय प्रदेश
6—-खुप मोठे भांडण
7—-भरपुर, न संपणारे
8—-अडवुन धरणे
9—-कोणत्याही कामात तरबेज
10—-ऊन्हाळ्यात मुद्दाम खातात
11—-नल प्रेमिका
12—–कसलाच काही नेम नाही
13—दुधाचा गोड पदार्थ
14—-अगदी मापात
15—दुसऱ्याबद्दल मनात कणव असणारा
16—–अल्प बुध्दीचा
17—-ताकदवान ,खुप शक्तीशाली
18—–रामाचा सेवक
19—-अयोध्यापती
20—-गालफुगी
21—-दह्यापासुन बनविलेला एक पदार्थ
22—–गावचा अधिकारी ,कारभारी
23—-जखमी होणे
24—-एक गोड वडीचा प्रकार
25—-जगन्माता ,देवी
26—-गणपतीचे एक नाव
27—-प्रख्यात ,सुप्रसिध्द
28—-एक स्त्रीयांचा अलंकार
29—–परमेश्वर
30—-विरस होणे,

.

.
१. वरवंटा
२. घडवंची
३. सतरंजी
४. सुरवंट
५. वाळवंट
६. खडाजंगी
७. गडगंज
८. प्रतिबंध
९.
१०. गुलकंद
११. दमयंती
१२. निरबंध
१३. कलाकंद
१४. मापदंड
१५. दयावंत
१६. मतिमंद
१७. बलवंत
१८. हनुमंत
१९. रामचंद्र
२०. गालगुंड
२१. आम्रखंड
२२. सरपंच
२३. जायबंदी
२४. कलाकंद
२५.जगदंबा
२६.एकदंत
२७. नामवंत
२८. बाजूबंद
२९. भगवंत
३०. रसभंग


१२.नाटके

या गाजलेल्या मराठी नाटकांची नावे सांगा…

1) हि ला सू पा ले णू र्य मा स

2) ळ श ल्लो सं क य

3) चि क य त दा दा

4) ज ध ला र णा वी म्ह ति ली

5) ची ली फु श्रुं झा ले अ

6) का गो ल ए ष्ट ची ग्ना

7) ही ही स स रे

8) ची ठी मि दा ह बा को ई

9) ड न लं नि ऱ्हा घा ला ड व य लं

10) ची त रा ऱ्या र व व वा

11) चे चं चा का द्र

12) या मा सा ली हि ची ल व

13) ष पु रू

14) र ईं खा स बा रा ड म

15) ची रू व मो शी मा

16) था ले द्या अ क ची क च्या कां

17) व ध ला णी डे कु मा क गे

18) तो ल मी म रा बो य थू से न ड गो

19) नी नी म ध्या

20) रे ला लो झा च्या

.

.
१.सूर्य पाहिलेला माणूस
२.संशयकल्लोळ
३.यदाकदाचित
४.वीज म्हणली धरतीला
५. अश्रूंची झाली फुले
६. एका लग्नाची गोष्ट
७.सही रे सही
८.हमीदाबाईची कोठी
९.बिऱ्हाड निघालं लंडनला
१०. वाऱ्यावरची वरात
११.काचेचा चंद्र
१२. हिमालयाची सावली
१३. पुरुष
१४.सखाराम बाइंडर
१५.मोरूची मावशी
१६.अकलेच्या कांद्याची कथा
१७.गेला माधव कुणीकडे
१८. मी नथूराम गोडसे बोलतोय
१९.ध्यानीमनी
२०.लोच्या झालारे


१३. साहित्यिक

खालील दिलेल्या अक्षरांत काही सुप्रसिद्ध मराठी लेखक किंवा कवींची नावे दडलेली आहेत..
ओळखा पटापट..

१. वी य त ळ वं ज द
२. आ ह ना य टे री ण प रा
३. के अ द श प्र द त्रे ल्हा
४. बा नी रो र स ब जि
५. ट सं प त बा व
६. भा र्गा त ग दू व
७. भें ष सु डे भा
८. म ल्ली ती प रु चि मा त
९. ई ण त दे जि सा र
१०. पां ल दे डे पु श
११. रे अ णा ढे रू
१२. वा ए श कुं र ज म ल हे
१३. गि र ळ गं ड ध गा गा
१४. क णे री म ग ग रा ड श
१५. बो ग गो मं ले ड ला
१६. ध ख र गो द्या ले वि
१७. चिं ण ना शी वि ता जो य म क
१८. द बा म बा क
१९. रू त्त सं पु ळे षो व का त म
२०. णे त का अ र नं क
२१. क ष णे री क शि र
२२. का ट त र सं ने व क
२३. क गे धू र्णि मं श म क
२४. ती र्वे रा इ क व
२५. की जा री र गि

हार्दिक शुभेच्छा

Complied by …  GUNESH BHIDE

.

.

१.जयवंत दळवी
२. हरी नारायण आपटे
३. प्रह्लाद केशव अत्रे
४. सरोजिनी बाबर
५. वसंत बापट
६. दुर्गा भागवत
७. सुभाष भेंडे
८. मारुती चितमपल्ली
९.रणजित देसाई
१०. पु ल देशपांडे
११. अरुणा ढेरे
१२. महेश एलकुंचवार
१३. गंगाधर गाडगीळ
१४. राम गणेश गडकरी
१५. मंगला गोडबोले
१६. विद्याधर गोखले
१७. चिंतामण विनायक जोशी
१८. बाबा कदम
१९. वसंत पुरुषोत्तम काळे
२०. अनंत काणेकर
२१. शिरीष कणेकर
२२. वसंत कानेटकर
२३. मधू मंगेश कर्णिक
२४. इरावती कर्वे
२५. गिरीजा कीर


१४.भाज्या

पुढील वर्णना नुसार भाज्या
ओळखा… …
1) माणूस म्हणलं की होणारच…
2) ही अशी नजर म्हणजे धाकच बाई……
3) हे फळ म्हणजे एक तीर्थक्षेत्र…..
4) याला ‘ट’ लावलं की झालं माकडाचं…….
5) यातला ‘ब’ काढला की बाय-बाय……
6) याला कापलं कि यानं रडवलंच समजा……
7) चार बायका एकत्र आल्या की त्यांचा संपतच नाही……
8) पुण्या जवळून वाहणारी नदी……….
9) सांभाळ करणारे…..
10) पाठ खरबड, खायची परवड………
11) बायकांची नाजूक नाजूक बोटं………
12) फुल च, पण जरा जाडजूड आणि वेगळं……
13) थंड हवेचं, बर्फाळ प्रदेशातील एक पर्यटन स्थळ…..
14) केसांची एक प्रकारची रचना, फक्त शेवटी वेलांटी द्या….
15) गोष्टीतल्या म्हातारीची गाडी…….

.
१.चुका
२.करडी
३. काशीफळ
४.शेपू
५.बटाटा
६.कांदा
७.घोळ
८.मुळा
९.पालक
१०.दोडका
११.भेंडी
१२. प्लॉवर
१३.सिमला मिरची
१४. कोबा
१५.भोपळा

*******************************

नवी भर दि. ०५-०४-२०२० : ८,९,१०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

८. राम नवमी निमित्त श्री रामाची गाणी ओळखा.

1… रा र आ क ये
2… उ श्री रा प झा
3… पा र सा ला सी स्व
4… वी प श्री झ अं
5… रा ज ग स रा ज
6… कौ रा बा कौ रा
7… घ घ च तू आ रा
8… र रा ग ग तो बो श
9… वी न श्री म
10.. र आ आ ध का बो
11… रा ह्र रा ना
12.. श्री घ ब क तू रे तू ल – कु बा
13.. श्री च ध द मा पा व्हा
14.. पा वे का तू ब श्री
15.. रा क प पा गा भ आ
16.. र आ प स्प पा म के
17.. रा म मो ने भ पा का
18.. स्व श्री. रा प्र ऐ कु ल रा गा
19.. से बां से बां रे सा सी रा की ज
20.. न नौ प फी ग न गं उ भ … श्री नां सां श्री पा क

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
१. रामा रघूनंदना आश्रमात या कधी रे येशिल
२. उठी श्रीरामा पहाट झाली
3. पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवराला
४.
५. राम जन्मला ग सखी राम जन्मला
६.कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
७. घडी घडी घडी चरण तुझे आठवते रामा
८. रघुपती राघव गजरी गजरी, तोडित बोरे शबरी
९.
१०. रघुनंदन आले आले, धरणीमाता कानी बोले
११. रामाहृदयी राम नाही
१२ श्रीरामा घनश्यामा बघशिल कधी रे तू
१३. श्रीरामाचे चरण धरावे दर्शनमात्रे पावन व्हावे
१४.
१५.
१६.
१७,
१८. स्वये श्रीरामप्रभू ऐकती
१९.सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी
२०. नकोस नौके परत फिरू
मी बरीचशी गाणी ओळखली आहेत. उरलेली वाचकांनी सांगावी.

९. भारतीय खाण्यातले पदार्थ ओळखा

Hey foodies………
Guess the names of these indian food dishes…

1. K.5/2 🅿️🚰
2.💪🅰️L⛎
3.👑🅿️🚰
4.L🅰️ch🅰️ 🅿️🅰️®️👋
5.But®️ ❎🅰️n
6. Ch❎ 👩💲L 🅰️
7. 🅿️🚰 but®️ 👩💲L.A.
8. 👩laℹ k🅾️ f👋
9. ♏ℹ❎ 🍆🍐🍠
10. 🍅 🍵
11. 👩t ®️ 🅿️⛎la🅾️
12. 🍹👩la ℹ
13. 👩 💲la 👨d
14. ✈️ ❎n

१.कढाई पनीर
२. दम आलू
३. शाही पनीर
४.लच्छा पराठा
५. बटर नान
६. चना मसाला
७. पनीर बटर मसाला
८. मलाई कोफ्ता
९. मिक्स्ड व्हेजिटेबल
१०.टोमॅटो सूप
११. मटर पुलाव
१२. रसमलाई
१३. मसाला पापड ?
१४. हवाई नान ?
————

१०. म्हणी ओळखा

आजचा खेळ थोडा गमतीचा आहे
म्हणी ओळखायचा
अद्याक्षरे दिलेली आहेत तुम्ही दिलेल्या अद्याक्षरावरून म्हणी ओळ्खयच्या आहे
उदा. अ ते मा — अति तेथे माती.

१. दे दे दं
२. चो म चां
३. व ते वां
४. पु पा मा स
५. ए ना ध भा चिं
६. आ बि ना
७. अ ना गा पा ध
८. उं मां सा
९. झा मु स ला
१०. वा लं गा श
११. आ जी बा उ
१२. न फुं सो इ ति गे वा
१३. मा म मा ज
१४.दा क का
१५. घ मा चु
१६. इ आ ति वि
१७. न ल स वि
१८. क ना त्या ड क
१९. आ अं घे शिं
२०. ए गा बा भा

चला सुरू करा …..!!!

.

.

1 देखल्या देवा दंडवत २ चोराच्या मनात चांदणे 3 वड्याचे तेल वांग्यावर 4 पुढचे पाठ मागचे सपाट 5 एक ना धड भाराभर चिंध्या 6 आयत्या बिलावर नागोबा 7 अडला नारायण गाढवाचे पाय धरी 8 उंदराला मांजर साक्षी 9 झाकली मूठ सव्वा लाखाची 10 वासरात लंगडी गाय शहाणी 11 आयजीच्या जीवावर बायजी उदार 12 नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे 13 माय मरो मावशी जगो 14 दाम करी काम 15 घरो घरी मातीच्या चुली 16 इकडे आड तिकडे विहीर 17. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने 18 कर नाही त्याला डर कशाला 19 आला अंगावर घेतला शिंगावर 20 एक गाव बारा भानगडी

*****************************

नवी भर दि. २९-०३-२०२०

७. मराठी गाणी 

💿📀    मराठी गाणी ओळखा    📀💿
( एक-दोन गाणी जुनी आहेत पण तुम्ही ऐकलेली आहेत)
उदा. सा वि तु रे म वे हे ला
उत्तर – सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड हे लागले
(1) घ सुं श्री अ झा
(2) गो गो पा फु छा दा म ए व आ
(3) सां क क तु भा मा म
(4) दि म सु न मी सं मा रे
(5) न न अ सु फु
(6) गो गो न मां आ
(7) दा कं ये ओ ये गा
(8) ह ह जो बा पा पा म झु खे
(9) ह हा नं घ पा त्या दे ह गो
(10) सां ये गो सा सा
(11) उ शु चां
(12) रा ही बा ह रा ही बा
(13) म जा द्या घ आ वा की बा
(14) निं झा चं झो गं बा
(15) या ज या ज श प्रे क

गाणी परिचयाची असली तरी  विचारण्याची पद्धत वेगळी असल्याने थोडा वेळ लागेल.

मराठी गाणी ओळखा कोड्याचे उत्तर-
१ घनःश्याम सुंदरा श्रीधरा
२ गोरी गोरी पान फुलासारखी छान
३ सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
४ दिसते मजला सुखचित्र नवे


७ दाटून कंठ येतो
८ हलके हलके जोजवा
९ हले हा नंदाघरी पाळणा
१० सांज ये गोकुळी सावळी सावळी
११ उगवली शुक्राची चांदणी
१२ राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
१३ मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा
१४ निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला गं बाई
१५ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

*****************************************

नवी भर दि. २३-०३-२०२०

६. शब्दांच्या अजब जोड्या
चला डोक्याला अजून एक नविन खाद्य !
खालील कोड्यात दिलेल्या कंसामधे अशी अक्षरे लिहा की ज्या मुळे कंसाच्या आधी दिलेला शब्द पूर्ण होईल आणि कंसाच्या पुढे दिलेल्या शब्दासाठी सुरुवात होईल.
कंसामध्ये जेवढे डॅश दिले आहेत तेवढी अक्षरे लिहायची आहेत.
उदा. वानर (_ _) पती . उत्तर आहे ( सेना) वानरसेना आणि सेनापती.

१) उप(_ _) दान
२) चंद्र (_ _) दालन
३) सदा(_ _) मान
४) सम(_ _) भरीत
५) श्री (_ _) भूमी
६) बस(_ _) खर
७) स्वयं(_) पती
८) दान(_ _)वीर
९) शूर (_ _)माता
१०) नंदा(_ _)दान
११) मान (_ _)गर
१२) सदा(_ _) चौघी
१३) यश(_) फळ
१४) सह(_ _ _) दान
१५) वजन(_ _) वान
१६) पाठ(_ _)वड
१७) व्यंग(_ _) पट
१८) सह(_ _) दान
१९) राज(_ _)वृक्ष
२०) सुख(_ _)पाठ

.

.

.

१) उप(_ _) दान     –  वर
२) चंद्र (_ _) दालन    – कला
३) सदा(_ _) मान    – वर्त
४) सम(_ _) भरीत    -रस
५) श्री (_ _) भूमी     – रंग
६) बस(_ _) खर     – कण
७) स्वयं(_) पती     – भू
८) दान(_ _)वीर    – शूर
९) शूर (_ _)माता    – वीर
१०) नंदा(_ _)दान    – दीप
११) मान (_ _)गर    – धन
१२) सदा(_ _) चौघी    – चार
१३) यश(_) फळ    – श्री
१४) सह(_ _ _) दान   – जीवन
१५) वजन(_ _) वान    – दार ?
१६) पाठ(_ _)वड     – लाग
१७) व्यंग(_ _) पट    –  चित्र
१८) सह(_ _) दान   – मत
१९) राज(_ _)वृक्ष     – वट
२०) सूख(_ _)पाठ    – शांति

नवी भर दि. २२-०३-२०२० : ४,५

४.खालील हिंदी गाणी ओळखा

1.पुरे झाली आजची भेट उद्या पाहिजे तेवढ्या गप्पा मार
2.आता तर तुझ्यामुळेच आहे माझा प्रत्येक आनंद
3.पुन्हा पुन्हा पहा हजार वेळा पहा
4.तू जिथे जिथे जाशील माझी सावली बरोबर असेल
5.तुझ्या डोळ्या शिवाय या जगात काय ठेवलय
6.हळू हळू चाल चंद्र आभाळात आहे
7.माझ प्रेम पत्र वाचून तू रागवू नकोस
8.कधीच तुझा पदर सोडणार नाही मी
9.या रंग बदलणार्‍या जगात माणसाची वागणूक ठीक नाही
10.दिवस कलला संध्याकाळ झाली
11.हे हृदय वगैरे प्रेम वगैरे मी नाही जाणत
12.तुझं माझ्याशी पहिल्यापासून काहीतरी नात आहे
13. पूर्ण शहरात तुझ्यासारखे कोणी नाही
14. तू जर साथ देण्याचे वचन दिले तर मी अशीच गाणी म्हणत राहीन.
15. जीवन हे प्रेमाचे गाणे आहे रोज सगळ्यानी गायले पाहिजे.
✍चला तर मग लागा कामाला🧐
कोरोना मॅसेज पासून आराम🙌
सुट्टीतला डोक्याला व्यायाम🤗

———–
कोड्याचे उत्तर-
१ आज की मुलाकात बस इतनी
२ अब तो है तुमसे हर खुशी अपनी
३ बार बार देखो हजार बार देखो
४ तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा
५ तेरी आंखों के सिवा दुनियामें रखा क्या है
६ धीरे धीरे चल चाँद गगनमें
७ ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना होना
८ कभी तेरा दामन ना छोडेंगे हम
९ इस रंग बदलती दुनियामें इन्सान की नीयत ठीक नहीं
१० ढल गया दिन हो गयी शाम
११ दिल विल प्यार व्यार मैं क्या जानूं रे
१२ तेरा मुझसे है पहले का नाता कोई
१३ सारे शहरमें आपसा कोई नही
१४ तुम अगर साथ देने का वादा करो
१५ जिंदगी प्यार का गीत है
***************************

५. प्र अक्षराने सुरू होणारे शब्द

काय घरीच आहात ना?
🙏🏻
चला खेळूया काहीतरी…

प्र चे कोडे. पहा जमतेय का?
खालील शब्दांना योग्य प्रतिशब्द शोधा. शब्दाची सुरुवात प्र पासून असावी

1घटना
2संसार
3पध्दत
4पहाट
5पराक्रम
6धबधबा
7ॐकार
8उजेड
9जगबुडी
10अनुभव
11जहाल/तीव्र
12सखोल
13पोहचवणे/पसरवणे
14रोगाची लागण
15चाबूक
16गणपतीचे नाव
17अल्हाददायक
18सुर्याचे नाव
19देशाटन
20उन्नती
21नागरिक
22वादल
23उद्देश/हेतु
24गमक
25अपराध
26आनंद
27हुशारी
28पणतु
29श्रृंगार
30तेजोवलय
31मार्गस्थ होणे
32त-हा
33कमल
34निसर्ग
35घाव
36माप
37लांबलचक/विस्तृत
38विरोध
39वर्गवारी
40पहिला
41परिणाम होणे
42रोज
43आग्रहाने सांगणे
44पहिली तिथी
45ऐसपैस
46देणे
47उलटून बोलणे
48कष्ट
49विशाल
50विश्वासघात
————–

कोड्याचे उत्तर-
१ प्रसंग
२ प्रपंच
३ प्रघात
४ प्रभात
५ प्रताप
६ प्रपात
७ प्रणव
८ प्रकाश
९ प्रलय
१० प्रचिती
११ प्रखर
१२ प्रगल्भ
१३ प्रचार
१४ प्रसार
१५ प्रतोद
१६ प्रथमेश
१७ प्रसन्न
१८ प्रभाकर
१९ प्रवास
२० प्रगती
२१ प्रजा
२२
२३ प्रयोजन
२४
२५ प्रमाद
२६ प्रमोद
२७ प्रज्ञा
२८ प्रपौत्र
२९ प्रसाधन
३० प्रभावळ
३१ प्रयाण
३२ प्रथा
३३ प्रमोदिनी
३४ प्रकृती
३५ प्रहार
३६ प्रमाण
३७ प्रदीर्घ
३८ प्रतिबंध
३९ प्रतवारी
४० प्रथम
४१
४२ प्रतिदिन
४३ प्रतिपादन
४४ प्रतिपदा
४५ प्रशस्त
४६ प्रदान
४७ प्रत्युत्तर
४८ प्रयास
४९ प्रचंड
५० प्रतारणा

*****************************

१. पौराणिक पति

आपण आपल्या बालपणापासून रामायण व महाभारत या कथा ऐकल्या आहेत. या कथे मधिल काही असामान्य स्त्रियांचे पती कोण होते, ते आज आपणास ओळखण्याची कामगिरी पार पाडायची आहे.

१ देवयानी
२ मंदोदरी
३ वृषाली
४ माद्री
५ जानकी
६ सुदेष्णा
७ यशोदा
८ हिडींबा
९ उर्मिला
१० अहिल्या
११ उत्तरा
१२ सुभद्रा
१३ तारा
१४ सुमित्रा
१५ शकुंतला.

पाहूया कोण कोण ओळखू शकतो..? 🚩

.

.

.

१ ययाती
२ रावण
३ कर्ण
४ पंडु
५ श्रीराम
६ विराट
७ नंद
८ भीम
९ लक्ष्मण
१० गौतम ऋषि
११ अभिमन्यू
१२ अर्जुन
१३ सुग्रीव व वाली
१४ दशरथ
१५ दुष्यंत

——————–
२. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने… बौद्धिक खुराक.

आपल्या मराठीच्या ज्ञानाची चाचणी… आणि पर्यायाने ज्ञानात भर…..
खाली दिलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहायचा आहे
कुठलाही काना, मात्रा, वेलांटी, उकार, जोडाक्षर वा अनुस्वार नसलेले उत्तर असावे

१. हत्ती –
२. पंकज-
३. तोंड –
४. पाणी –
५. नमस्कार –
६. बाप –
७. बाण –
८. बाग –
९. समस्या –
१०.घास –
११.धाक –
१२.भांडण –
१३.नवरा –
१४.पर्वत –
१५.कठीण –
१६.पुरुष –
१७.द्रव्य –
१८.आवश्यकता –
१९.उलगडा-
२०.दूध –
२१.रूची-
२२.गंध –
२३.गृह –
२४.घोडा –
२५.पाऊल –
२६.डोळा –
२७.तृण –
२८.रस्ता –
२९.हात –
३०.वारा-
३१.सुवर्ण –
३२ अंबर –
३३.खून –
३४.रास –
३५.कप्पा –
३६.पक्षी –
३७.किल्ला –
३८.अवचित –
३९. मृत्यू –
४०.अग्नि –
४१.काळ –
४२.जंगल –
४३.अविरत –
४४.आश्चर्य –
४५.अभिनेता-
४६.ढग –
४७.पोट-
४८.अंधार-
४९.ध्वनि –
५०.ओझे –

🙏🏻🙏🏻🙏🏻
कु. दिशा दिनेश जोशी

.

.

.

१. हत्ती – गज
२. पंकज- कमल
३. तोंड – वदन
४. पाणी – जल
५. नमस्कार – नमन
६. बाप – जनक
७. बाण – शर
८. बाग – उपवन
९. समस्या – अडचण
१०.घास – कवळ
११.धाक – वचक,जरब
१२.भांडण – कलह
१३.नवरा – धव
१४.पर्वत – अचल,नग
१५.कठीण – अवघड
१६.पुरुष – नर
१७.द्रव्य – धन
१८.आवश्यकता – गरज
१९.उलगडा- उकल
२०.दूध – पय
२१.रूची- चव
२२.गंध – दरवळ
२३.गृह – घर,सदन
२४.घोडा – हय
२५.पाऊल – चरण
२६.डोळा – नयन
२७.तृण – गवत
२८.रस्ता – पथ
२९.हात – कर
३०.वारा- पवन
३१.सुवर्ण – कनक
३२ अंबर – वसन,पट, नभ
३३.खून – वध
३४.रास – खच
३५.कप्पा – खण
३६.पक्षी – खग
३७.किल्ला – गड
३८.अवचित – एकदम
३९. मृत्यू – मरण
४०.अग्नि – अनल
४१.काळ – समय
४२.जंगल – वन
४३.अविरत – सतत
४४.आश्चर्य – नवल
४५.अभिनेता- नट
४६.ढग – घन,जलद
४७.पोट- उदर
४८.अंधार- तम
४९.ध्वनि – रव
५०.ओझे – वजन


३. आजचे कोडे… मराठी नाट्यगीते

नाट्यगीत रसिकांसाठी खास…  इंग्रजी वर्णनावरून मराठी नाट्यगीते ओळखा …

1. I hold your hand oh beautiful
2. Whom do I seek asylum
3. How do I give up this position at your feet
4. I find my life meaningless
5. Not so old, merely 75
6. I will not talk to you dear
7. See dear, the night is over
8. I find in him god of love
9. This scarf is so boring
10. She is like a crescent of moon
11. You are a delicate flower in the midst of a dangerous jungle
12. I have a moon on my forehead
13. The sky is full of dark clouds
14. Don’t you rush so much
15. Don’t you forget sign of our meeting

.

.

.

१.कर हा करी धरिला शुभांगी
२. वद जाऊ कुणाला शरण
३. कशी या त्यजू पदाला
४. अर्थशून्य भासे मज हा
५. म्हातारा इतुका न
६. नाही मी बोलत नाथा
७. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनि
८. मला मदन भासे हा
९. अरसिक किती हा शेला
१०. चंद्रिका ही जणू
११. गर्द सबोती रान साजणी तू तर चाफेकळी
१२. भाळी चंद्र असे धरिला
१३. नभ मेघांनी आक्रमिले
१४. घाई किती .. आले रे बकुळफुला
१५, नको विसरू संकेत मीलनाचा

कवी, कविता आणि विडंबने

सन २००६ मध्ये मनोगत या त्या काळातल्या प्रमुख मराठी संकेतस्थळावर श्री.नरेंद्र गोळे यांनी या विषयावर एक लेखमालिका लिहिली होती. त्यांचे मनःपूर्वक आभार मानून ती मालिका इथे संग्रहित केली आहे. या लेखमालिकांमध्ये त्या कविता लिहिणाऱ्या कवींची माहितीही दिली आहे.

नवी भर :  त्यानंतरच्या काळात मिळालेली अनेक विडंबनेही मूळ कवितांसह संग्रहित केली आहेत 
———————-

प्रेषक नरेंद्र गोळे (०५/०७/२००६)

विडंबने-१ आम्ही कोण?
विडंबने-२ दासबोध आणि उदासबोध
विडंबने-३ ‘विरामचिन्हे’ आणि कवीची ‘विरामचिन्हे’
विडंबने-४ ‘रांगोळी घालतांना पाहून’ आणि ‘रांगोळी घातलेली पाहून’
विडंबने-५ ‘माझे जीवन गाणे’ आणि ‘माझे जीवन खाणे’
विडंबने-६ ‘स्वयंवर झाले सीतेचे’ आणि ‘विडंबन झाले कवितेचे’


नवी भर दि. ०७-११-२०१९:  याशिवाय  ‘जन पळ भर’ ही कविता, कविवर्य भा.रा.तांबे यांची माहिती आणि श्री.मकरंद करंदीकर यांनी केलेले   तिचे विडंबनही खाली दिले आहे 

नवी भर दि. ०५-०७-२०२०ः दिवस तुझे हे फुलायचे ही कविता आणि विडंबन

नवी भर दि.१९-०६-२०२१: दिवस तुझे आणि किलबिल किलबिल यांची विडंबने

नवी भर दि.२२-०६-२०२१: एक विरसग्रहण – काही बोलायाचे आहे

नवी भर दि. ०१-०९-२०२१ : झुकुझुकु झुकुझुकु अगीनगाडी, किलबिल किलबिल आणि फिटे अंधाराचे जाळे – कविता आणि विडंबने

नवी भर दि.०३-०३-२०२२ : लिसन माझ्या सोन्या बाळा कविता आणि तिचे भाषांतर

नवी भर दि.०६-०६०२०२२ : ‘जन पळ भर’ या कवितेचे आणखी एक विडंबन

——————————————————-

१.आम्ही कोण?

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।
दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥ १ प्रमुख

सारेही बडिवार येथिल पाहा! आम्हापुढे ते फिके ।
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूप्रती द्यावया ॥
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजी या ।
फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके ! ॥ २ ॥

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे ? ।
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ? ॥
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ।
ते आम्हीच, शरण्य मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते ! ॥ ३ ॥

आम्हाला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥

मूळ कवीः कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत
फैजपूर, २९ नोव्हेंबर, १९०१
मनोरंजन, मे, १९०२
ही कविता त्यांच्या ‘हरपले श्रेय’ ह्या कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या १९८५ सालच्या पुनर्मुद्रणातून घेतलेली आहे.

कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत (०७-१०-१८६६ ते ०७-११-१९०५) हे मराठी नवकवितेचे आद्य उद्गाते होत. केशवसुत मुख्याध्यापक होते. ते वयाच्या 39 व्या वर्षी प्लेगने वारले. केशवसुतांच्या निवडक कविता ‘हरपले श्रेय’ ह्या त्यांच्या कवितासंग्रहात प्रसिद्ध झालेल्या आहेत. ‘अढळ सौंदर्य’ ह्या कवितेत, त्यांनी निसर्गाचे सौंदर्य कसे अढळ असते, त्याचे बहारदार वर्णन केलेले आहे. त्यांची ‘गोष्टी घराकडील’ ही कविता, गावातील स्वगृहाचे स्वाभिमानाने गुणगान करण्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यांनी ‘दुर्मुखलेला’ ह्या कवितेत, त्यांना दुर्मुखलेला म्हणणाऱ्या शिक्षकाला उद्देशून, ‘लंगड्यास लंगडा म्हटल्याने काहीच साध्य होत नाही, लंगडा मात्र मनाने दुखावला जातो’ हे जगन्मान्य सत्य निर्विवादपणे उजागर केलेले आहे. लोकमानसात त्यांच्या तुतारी कवितेचे स्थान अढळ आहे. ‘आम्ही कोण?’ ह्या कवितेत त्यानी व्यक्तविलेला कवीविषयक दृष्टिकोन आजवर मी वाचलेल्या सर्व अभिप्रायात सर्वोत्कृष्ट म्हणता येईल. त्यातून केवढा आत्मविश्वास प्रकट होतो ते प्रत्यक्षच वाचून सहज समजेल.

आम्ही कोण? (विडंबन)

केशवसुत, क्षमा करा.

आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।
फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥
किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥

ते आम्ही – परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।
ते आम्ही – न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।
त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥

काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी, ।
दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे, ॥
दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा उदे ।
दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं! ॥ ३ ॥

आम्हाला वगळा – गतप्रभ झणीं होतील साप्ताहिके! ।
आम्हाला वगळा – खलास सगळी होतील ना मासिके! ॥

विडंबन: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार, १९२२

ही कविता आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुले ह्या, परचुरे प्रकाशनतर्फे १९८६ साली प्रसिद्ध झालेल्या, अकराव्या आवृत्तीतून घेतलेली आहे.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार (१३-०८-१८९८ सासवड, ते १३-०६-१९६९) हे, मराठी शिक्षणक्षेत्र (कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत प्रिन्सिपॉल, अनेक शिक्षक परिषदांचे अध्यक्ष, बी.टी. चे परीक्षक), वाङमय (कऱ्हेचे पाणी हे आत्मवृत्त, बडोदा वाङमय परिषदेचे अध्यक्ष), साहित्य (झेंडूची फुले, बडोद्याच्या कुमारसाहित्य परिषदेचे अध्यक्ष, नाशिक साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष), नाटक (साष्टांग नमस्कार, ब्रह्मचारी, घराबाहेर, उद्याचा संसार), चित्रपट (पायाची दासी, पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता शामची आई, चित्रमंदिर चित्रपटगृहाचे मालक, अत्रे पिक्चर्स चे निर्माता), पत्रकारिता (जयहिंद सायंदैनिक, दैनिक मराठा, नवयुग साप्ताहिक, समीक्षक मासिक यांचे संपादन, बेळगावच्या पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष, अत्रे प्रिंटींग प्रेस), राजकारण (कॉन्ग्रेस, समाजवादी पक्ष, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांचे कार्यकर्ते, आमदार, लोकसभा निवडणुकीत अपयश), समाजकारण (संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते) या सर्वांवर अमिट छाप सोडणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. व्यवसायाने शिक्षणतज्ञ (बी.ए., बी.टी., टी.डी. लंडन) असणाऱ्या अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अत्यंत कळीची भूमिका बजावली. त्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच खंडी आत्मवृत्ताच्या प्रस्तावनेत ते म्हणतात:

“आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. ढोंगाचा मी पहिल्यापासून शत्रू. माझ्या नाटकांतून, चित्रपटांतून आणि वृत्तपत्रांतून ढोंगाचे मी क्रूरपणे वाभाडे काढलेले आहेत. गेली पन्नास वर्षे समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत, शाळामास्तरापासून तो गिरणीमालकापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. त्यामुळे समाजाच्या बहिरंगामध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये केवढी फारकत आहे, ह्याची जाणीव माझ्या इतकी दुसऱ्या कुणालाही असणे शक्य नाही. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.”

त्यांचा झेंडूची फुले नावाचा विडंबनात्मक कवितासंग्रह जगद्विख्यात आहे. मराठीत तरी दुसरा विडंबनकाव्यसंग्रह वाचल्याचे मला स्मरत नाही. त्यांच्या सर्वव्यापी अनुभवाचे सार रोकड्या शब्दात, त्यामध्ये व्यक्त झालेले आहे. हे पुस्तक मुळातच वाचनीय आहे. त्यातच ‘आम्ही कोण’ ह्या केशवसुतांच्या कवितेचे हे विडंबन दिलेले आहे. विडंबनाची व्याख्या, वापर आणि मर्यादा ह्यांबाबत त्या पुस्तकाचे संपादक श्री.स.गं.मालशे, स्वत: आचार्य अत्रे आणि त्यांचे गुरू साहित्याचार्य श्रीपाद कृष्ण उर्फ तात्यासाहेब कोल्हटकर यांचे विचार ह्या पुस्तकात ग्रथित केलेले आहेत.
——————-

विडंबने-२ दासबोध आणि उदासबोध

प्रेषक नरेंद्र गोळे ( १७/०७/२००६ )

॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक १ ॥
॥ स्तवननाम दशक प्रथम ॥
॥ श्रीराम ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ। काय बोलिलें जी येथ ।
श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १ ॥
ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद ।
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २ ॥
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्म निरोपण। निरोपिलें ॥ ३ ॥
भक्तिचेन योगें देव। निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव। ईये ग्रंथीं ॥ ४ ॥
मुख्य भक्तीचा निश्चयो। शुद्धज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो। बोलिला असे ॥ ५ ॥
शुद्ध उपदेशाचा निश्चयो। सायोज्यमुक्तीचा निश्चयो ।
मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६ ॥
शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो ।
अलिप्तपणाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ७ ॥
मुख्य देवाचा निश्चयो। मुख्य भक्ताचा निश्चयो ।
जीवशिवाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ८ ॥
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो ।
आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९ ॥
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण ।
नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १० ।
मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण ।
कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११ ॥
नाना किंत निवारिले । नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२ ॥
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें ।
तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३ ॥
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४ ॥
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५ ॥
नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये ।
तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६ ॥
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती ।
नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७ ॥
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८ ॥
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता ।
गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९ ॥
इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ ।
भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २० ॥
भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे
भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१ ॥
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२ ॥
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३ ॥
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला ।
अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४ ॥
कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५ ॥
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६ ॥
मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७ ॥
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ। येकसरां ॥ २८ ॥
मार्ग सांपडे सुगम। न लगे साधन दुर्गम ।
सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९ ॥
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३० ॥
योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य ।
चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१ ॥
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२ ॥
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥
बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष ।
अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४ ॥
नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५ ॥
नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६ ॥
ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती ।
मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७ ॥
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम
॥ समास पहिला ॥ १ ॥

दासबोधात वीस दशके असून प्रत्येक दशकात अनेक समास आहेत. वर पहिल्या दशकातील पहिला समास दिलेला आहे.

सतराव्या शतकात मुसलमान राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला त्रासले होते. सामान्यजन भयग्रस्त झालेले होते. अशा वेळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी व शूर राजाचे जाणत्या राजात रूपांतर होण्यासाठी ज्या संताचा लाभ महाराष्ट्राला झाला तो म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. जांब गावी १५३० चैत्र शुद्ध नवमीस माध्यान्ही त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव नारायण सयाजीपंत ठोसर. वयाच्या बाराव्या वर्षी, विवाहप्रसंगी ‘सावधान’ शब्द ऐकून ते लग्नमंडपातून पळून गेले. नंतर नाशिकजवळ, गोदावरीकाठी टाकळी येथे त्यांनी बारा वर्षे एकाग्रतेने रामोपासना केली. आत्मसाक्षात्कार होऊन ते स्वानुभवारूढ झाले. आत्मज्ञानाने संपन्न होऊन ते वयाच्या चोविसाव्या वर्षी तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. बारा वर्षे सबंध हिंदुस्तानभर त्यांनी पायी प्रवास केला. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी, शके १५६६ मध्ये ते कृष्णातीरी आले. त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली. शिवाजीमहाराजांना स्वराज्यहितोपदेश केला. महाराजांनी राज्य त्यांच्या झोळीत टाकल्यावर त्यांनी ते महाराजांनाच सांभाळण्यास सांगून स्वराज्यास भगवा ध्वज दिला. मनाचे श्लोक, दासबोध, विविध आरत्या इत्यादी विपुल साहित्य त्यांनी निर्माण केलेले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक पिढ्यांचे जीवन घडलेले आहे.

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ॥
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा ।
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ॥

उदासबोध (दासबोधाचे विडंबन)

-मंगेश पाडगावकर

आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।
अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे ।
त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥
या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ?
लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥
भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश ।
दुर्जना यश, सज्जना अपेश। सर्वत्र दिसे ॥ ४ ॥
नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा ।
सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥
देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती ।
भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥
कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती ।
तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥
येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती ।
त्यातुन कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥
कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुन्ड राज्य करी ।
प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥
दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे ।
काळा कडु गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥
सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी ।
भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥
ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद ।
काळा कडु आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥

इति श्री उदासबोधे कविजनतासंवादे ग्रंथारंभनाम समास

उदासबोधातील पहिला समास वर दिलेला आहे. संपूर्ण ग्रंथात असे पन्नास समास आहेत.

मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ला, सिंधुदूर्ग इथे झाला. त्यांनी मराठी व संस्कृत मधून, मुंबई युनिव्हर्सिटीतून एम.ए. केले. ते युनायटेड स्टेटस् इन्फोर्मेशन सर्व्हिस मध्ये संपादक होते. जरी ते कवी म्हणून जास्त प्रसिद्ध असले तरी सिद्धहस्त लेखकही आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रह आणि अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातील ‘बोलगाणी’ खूपच प्रसिद्ध आहे.
——————-

विडंबने-३ ‘विरामचिन्हे’ आणि कवीची ‘विरामचिन्हे’

प्रेषक नरेंद्र गोळे ( २०/०७/२००६ )

‘विरामचिन्हे’
– राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज

जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा ‘स्वल्पविराम’ मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!

आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे ते ‘प्रश्नचिन्हां’कित.

अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला ‘अर्धविराम’ तेथ; गमले येथून हालू नये !

झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची ‘उद्गार’वाची मन !

आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश –
ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश !
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,
देवा! ‘पूर्णविराम’ त्या तव पदी दे शीघ्र आता मला !

राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज (२६ मे १८८५- २३ जानेवारी १९१९, सावनेर) हे मराठीतील संगीत नाटकांचे प्रख्यात नाटककार होते. मात्र ते तेवढेच सिद्धहस्त कवी आणि विनोदी लेखकही होते. विनोदी लेखन त्यांनी ‘बाळकराम’ ह्या टोपणनावाने केले. त्यांच्या कवितांचा संग्रह डॉ.भीमराव कुलकर्णी यांनी ‘संपूर्ण वाग्वैजयंती’ ह्या नावाने प्रसिद्ध केलेला आहे. प्रस्तुत कविता ह्याच पुस्तकाच्या २६ मे १९८५ ह्या त्यांच्या जन्मशताब्दीदिनी प्रसिद्ध झालेल्या पंधराव्या आवृत्तीतून घेतलेली आहे.

कवीची ‘विरामचिन्हे’ (‘विरामचिन्हे’ चे विडंबन)

– आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार

मानवी जीवनलेखांतील गोविंदाग्रजांनी दर्शविलेल्या ‘विराम-चिन्हां’ पेक्षा कवीच्या आयुष्यातील ‘विरामचिन्हे’ निराळी असावीत ही गोष्ट हल्ली शुद्धलेखनासंबंधी चालू असलेल्या वादास धरूनच नाही काय!

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर ‘करू का काव्य?’ वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा ‘स्वल्पविराम’ मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !

झाले काव्य लिहून – यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी ‘प्रश्नचिन्हा’ कुल!

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला ‘अर्धविराम’ तेथ; गमले तेथून हालू नये !

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे ‘गायन’ ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची ‘उद्गार’ वाची मन !

पुढील श्लोक ‘कोरसा’ दाखल असून तो वाचकांनी कवीला ऐकू न जाईल अशा हलक्या स्वरांत गुणगुणावयाचा आहे. बाकी ऐकू गेले तरी काय व्हायचे आहे म्हणा?

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी –
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, ‘पूर्णविराम’, त्या कविस या देशी न का आजला? १

१. आमच्या गायनप्रिय रसिक वाचकांसाठी वरील कवितेचे ‘नोटेशन’ आम्ही येथे देत आहोत. त्यामुळे कवितेच्या अर्थाबरोबर तिच्यातील ‘संगीत’ ही वाचकांना सहज समजून येईल. काव्यगायनेच्छू बालकवींचीही त्यामुळे चांगलीच सोय होणार आहे. मात्र ‘स्वरलेखन’ करतांना आम्ही ‘प्रो.मौलाबक्षांची चिन्हे’ न वापरता आमची स्वतःची ‘चिन्हे’ वापरली आहेत, हे एक सुचिन्हच नव्हे काय? स्थलाभावामुळे टंकालयातील (फौंड्री) टंचाईमुळे दर श्लोकातील एकाच चरणाचे नोटेशन देणे शक्य झाले आहे.

, ? ; ! . ॥ ध्रु ॥

,ऽऽ ;ऽ ,ऽऽऽ ,ऽऽऽ ,ऽऽऽऽऽ १
?ऽऽ ?ऽ ?ऽऽऽ ?ऽऽऽ ?ऽऽऽऽऽ २
;ऽऽ ;ऽ ;ऽऽऽ ;ऽऽऽ ;ऽऽऽऽऽ ३
!ऽऽ !ऽ !ऽऽऽ !ऽऽऽ !ऽऽऽऽऽ ४
.ऽऽ .ऽ .ऽऽऽ .ऽऽऽ .ऽऽऽऽऽ ५

आचार्य अत्रे ह्यांचा परिचय विडंबने-१ मध्ये दिलेलाच आहे.
—————-

विडंबने-४  ‘रांगोळी घालतांना पाहून’ आणि ‘रांगोळी घातलेली पाहून’

प्रेषक नरेंद्र गोळे ( ३०/०७/२००६ )

रांगोळी घालतांना पाहून
– कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत

होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.

होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!

चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.

आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!

तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!

चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
“जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!”

“आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी.”
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.

साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!

१८ डिसेंबर, १८९६
करमणूक, २६-१२-९६
का. रत्नावली, फे., १९०१

कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांचा परिचय विडंबने-१ मध्ये दिलेलाच आहे. ही कविता त्यांच्या ‘हरपले श्रेय’ ह्या कवितासंग्रहातून घेतलेली आहे.

रांगोळी घातलेली पाहून (‘रांगोळी घालतांना पाहून’चे विडंबन)

– राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज

“साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे;
नित्याच्या अवलोकने परि किती होती जगी आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,”
रांगोळी बघुनीच केशवसुता हे आठवे बोलणे.

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्या! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य कथणे वाटे तुला काय तो?
जो तूते वदवे न अर्थ मनिचा तोंडात आला तरी,
तो मी बोलुनि दाखवीन अगदी साध्याच शब्दी परी.

चैत्री आंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
रांगोळीहि कुणी तिथे निजकरी ती घातली त्यावर.
ज्यां आमंत्रण त्या घरी मुळि नसे ऐशा स्त्रियांलागुनी
त्या चिन्हांतुनि हा विशेष निघतो आहे गमे मन्मनी-

या या! आज असे सुरेख हळदीकुंकू पहा या स्थली
बत्तासे बहु खोबरे हरभरे खैरात ही चालली!
ठावे कोण न जात येत- दिधले कोणास आमंत्रण;
नाही दाद घरात ही मुळि कुणा; दे धीर हे लक्षण.

संधी टाकुनि छान फौज तुमची कोठे पुढे चालली?
बायांनो! अगदी खुबी विसरता तैलंगवृत्तीतली !
नाते, स्नेह, निदान ओळख तुम्हा येथे न आणी तरी,
या; आमंत्रण राहुं द्या; परि शिरा सार्‍याजणी या घरी!

लाभे ते फुकटातलेच हळदीकुंकू तुम्हाला जरी,
होई काय नफा अचानक तयामाजी न कित्तीतरी?
ही आगंतुकवृत्ति आपण जरी धिक्कारिली यापरी,
प्राप्ती चार घरे उगीच फिरुनी होईल का हो तरी?

चाले काय असे उगीच भिऊनी? तुम्हीच सांगा खरे!
या डोळा चुकवून नीट; डरतां आता कशाला बरे?
कोणाच्या नजरेत येइल तरी होणे असे काहि का?
केला का खटला कुणावर कुणी ऐसा अजुनी फुका!

बायांनो! तर या, नकाच दवडू संधी अशी हातची,
जा जे काही मिळेल तेच भरल्या रस्त्यातुनी खातची!
कामे ही असली हितावह कधी होतील का लाजुनी?
या-या-या तर धावुनी; त्यजु नका रीती पुराणी जुनी!

कोणाच्या घरचे असेल हळदीकुंकू कधी नेमके
ज्या बायांस नसेल हे चुकुनिया केव्हा तरी ठाउके,
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे चालत काय काय अगदी हे नेहमी पाहणे!

राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज ह्यांचा परिचय विडंबने-३ मध्ये करून दिलेलाच आहे. हे विडंबन त्यांच्या ‘संपूर्ण वाग्वैजयंती’ ह्या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे.
————————–

विडंबने-५ ‘माझे जीवन गाणे’ आणि ‘माझे जीवन खाणे’

प्रेषक नरेंद्र गोळे ( ३०/०७/२००६ )

माझे जीवन गाणे
– मंगेश पाडगावकर

माझे जीवन गाणे, गाणे || धृ ||
व्यथा असो, आनंद असू दे |
प्रकाश किंवा तिमिर असू दे ||
वाट दिसो, अथवा ना दिसू दे |
गात पुढे मज जाणे || १ ||

कधी ऐकतो गीत झर्‍यांतुन |
वंशवनाच्या कधी मनांतुन ||
कधि वार्‍यांतुन, कधि तार्‍यांतुन |
झुळझुळताती तराणे || २ ||

तो लीलाघन स्तय चिरंतन |
फुलापरी उमले गीतांतुन ||
स्वरास्वरांतुन आनंदाचे |
नित्य नवे नजराणे || ३ ||

गा विहगांनो माझ्यासंगे |
स्वरांवरि हा जीव तरंगे ||
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन |
उसळे प्रेम दिवाणे || ४ ||

मंगेश पाडगावकर यांचा परिचय विडंबने-२ मध्ये दिलेलाच आहे. त्यांचे हे गीत वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेले आहे. आणि खूपच विख्यात आहे. तुम्हीही नक्कीच ऐकलेले असेल.

माझे जीवन खाणे (माझे जीवन गाणे चे विडंबन)

– प्रभाकर बोकील, मुंबई

माझे जीवन खाणे, खाणे || धृ ||

पथ्य असो, उपवास असू दे |
प्रकार इतुके, फिकिर नसू दे ||
वाट असो, वा ताठ ‘उभ्याने’ |
खात निरंतर रहाणे || १ ||

कधी झोडतो, पंचपक्वान्ने |
दंश जिभेला, कधी ठेच्यातून ||
कधी भज्यांतून, कधी वड्यांतून |
विरघळतात ‘बहाणे’! || २ ||

खा, जन खा हो, माझ्यासंगे |
जिव्हेवरी हा, जीव तरंगे ||
तुमच्या मुखी, रसस्वादसुखाचे |
उसळो खाद्य-तराणे || ३ ||

लोकसत्ता हास्यरंग पुरवणी-नोव्हेंबर २००३ च्या अंकात, विडंबन काव्य स्पर्धेच्या अंतर्गत हे विडंबन प्रसिद्ध झाले होते. लेखकांविषयी चार शब्द लिहावेत एवढी मला त्यांचेविषयी माहिती नाही. माहीतगार मनोगतींनी अवश्य मदत करावी. मात्र त्यांच्या विडंबनाचा आनंद मी मनसोक्त आस्वादिला आहे. धन्यवाद प्रभाकरजी!
———————————

विडंबने-६ ‘स्वयंवर झाले सीतेचे’ आणि ‘विडंबन झाले कवितेचे’

प्रेषक नरेंद्र गोळे (०९/०७/२००९ )

विख्यात कविता आणि त्यांची तेवढीच विख्यात विडंबने यांच्या या मालिकेत, आता विडंबन कशाला म्हणू नये याचे एक उत्तम उदाहरण पेश करतो आहे.
मूळ कविता गदिमांच्या गीतरामायणामधली आहे.

स्वयंवर झालें सीतेचे

आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे ॥ धृ ॥

श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतू अंतरींचे
उभे ठाकले भाग्य सांवळे समोर दुहितेचें ॥ १ ॥

मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजीं एकवटुनिया निजशक्ती सारी
फुलूं लागलें फूल हळू हळू गालीं लज्जेचें ॥ २ ॥

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे ॥ ३ ॥

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे ॥ ४ ॥

हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी
“आज जानकी अर्पियली मी दशरथापुत्रासी”
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे ॥ ५ ॥

पित्राज्ञेने हळू उठे ती, मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधीर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचे ॥ ६ ॥

नीलाकाशी जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेच भरले रामांगी मधू नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झाले माया-ब्रह्माचे ॥ ७ ॥

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजी देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे ॥ ८ ॥

अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वाचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे ॥ ९ ॥

गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी! त्यांच्या गीतरामायणातले हे एक सुप्रसिद्ध गीत आहे.

कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात ग. दि. माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा – संवाद – गीतलेखनाचे काम केले. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान केवळ अजोड आहे. प्राचीन मराठी काव्यातील गीतभांडाराला अर्वाचीन काळात माडगूळकरांनी अधिक समृद्ध केले.

संताच्या काव्यातील आंतरिक गेयगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांच्या काव्यातील स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील प्राथमिक पण सरळ भिडणारा लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून माडगूळकरांची गीते निर्माण झाली. अध्यात्म, देशभक्ती, बालकविता, शृंगार हे सर्व विषय त्यांनी अतिशय सहजतेने हाताळले.

आरंभी ते वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत होते. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा (१९४९), जोगिया (१९५९), चार संगीतिका (१९५६), गीतरामायण (१९५७), काव्यकथा (१९६२), चैत्रबन (चित्रपटगीते) (१९६२), गीतगोपाल (१९६७), गीतसौभद्र (१९६ ८)-अशी काव्यनिर्मिती झाली. ‘वैशाखी’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे १५ लघुकथा लिहिल्या; आकाशाची फळे, उभे आडवे धागे या कादंबऱ्या व युद्धाच्या सावल्या हे नाटक – इत्यादी स्वरूपाचे लेखनही त्यांनी केले. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८० पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १० हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद – यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ (२४ मराठी व १ हिंदी) चित्रपटांत अभिनयही केला.

चित्रपटातील पात्रांच्या भावनांनुसार, कथाविषयाला खुलावट आणणारी चित्रपटगीते लिहिण्यात ते सिद्धहस्त होते. गेयता, नादमाधुर्य, लयकारी आणि मराठी भाषेतील गोडवा ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये. उद्धवा अजब तुझे सरकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, बाई मी विकत घेतला शाम यांसारख्या अनेक गीतांमधून साध्या सोप्या भाषेत ते मोठे तत्त्वज्ञान सांगून जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या लेखणीने लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली होती. १९४२ च्या आंदोलनात, सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पोवड्यांची निर्मिती केली होती.

गीतरामायण ही गदिमांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली एक साहित्यिक देणगीच म्हणावी लागेल. त्यांच्या गीतरामायणाने व त्याला दिलेल्या बाबूजींच्या (ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके) संगीताने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. गीतरामायणाचे शेकडो प्रयोग झाले. मराठी रसिकांनी गदिमांना प्रेमादरपूर्वक महाराष्ट्राचे ‘आधुनिक वाल्मिकी’ अशी पदवी बहाल केली. यातूनच त्यांच्या रसिकप्रियतेची खात्री पटते. गीतरामायणाचे पुढील काळात हिंदी, बंगाली, तेलगू व कानडी या भाषांत भाषांतरही झाले.

गदिमांना भारत सरकारने पद्मश्री (१९६९) हा किताब बहाल केला. ते संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले.

१९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते. १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले तरी जनमानसहृदयात ते गीतकार व गीतरामायणकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले.

श्रेयअव्हेर: वरील गदिमांची ओळख मनसेच्या संकेतस्थळावरून साभार घेतलेली आहे.

विडंबन झाले कवितेचे हे त्याचे विडंबन खोडसाळ यांनी खालीलप्रमाणे सादर केले.
मनोगतावर स्वतंत्र कविता म्हणून, तर त्यांच्या ‘तेंडूची पाने’ या अनुदिनीवर कविता आणि विडंबन या दोन्हीही सदरांत.
ते काव्य असे आहे.

विडंबन झाले कवितेचे

प्रेषक खोडसाळ ( १२/०८/२००८)

साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे
विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे
पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतू अंतरीचे
उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे ॥१॥

वक्र टाळकी कसून वाचती काव्य अर्थवाही
नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टी पाही
फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे ॥२॥

सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही
तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई
कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे ॥३॥

अंगारुनिया आले डोळे, चरफडले राजे
मुक्त हासऱ्या प्रतिसादांचे बघून सडे ताजे
पडू लागले तृतीय लोचन अमुच्यावर त्यांचे ॥४॥

हात जोडुनी म्हणे विडंबक तो कविराजासी
“आज विडंबन अर्पियले मी अपुल्या चरणासी”
संतापाने मिटले डोळे क्रुद्ध का कवीचे? ॥५॥

देवाज्ञेने स्फुरे अम्हाला रोज शब्दक्रीडा
अधिर लेखणी, अधिर तीहुनी डोक्यातिल कीडा
अर्थहीन हे चरण लावती लेबल पद्याचे ॥६॥

काव्याकाशी कशी भरावी उषःप्रभा लाल
उगी राहिलो वामांगी शब्देविण कंगाल
कवन रचुनिया धनी जाहलो शरसंधानाचे ॥७॥

नाही उरला राम, चालले ते वनवासाला
कविराजांच्या हात घालसी का कासोट्याला
त्यांच्या वर्मी घाव बैसले खो खो हास्याचे ॥८॥

खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?
कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता
साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे? ॥९॥

खोडसाळांनी त्यांच्या ’तेंडूची पाने’ या अनुदिनीस लिहीलेली प्रस्तावना हाच त्यांचा सर्वज्ञात खराखुरा परिचय आहे. “मनोगत ह्या मराठी भाषेला वाहिलेल्या (बहुधा) सर्वोत्कृष्ट संकेतस्थळावर अनेक प्रतिभावान हौशी कवी आपल्या रचना सादर करतात. त्या वाचून आपल्याला असे काही लिहिता येत नाही याचा मला खूप राग यायचा. सांगू नका कोणाला, पण माझी अवस्था ते काय असूयाग्रस्त की मत्सरग्रस्त म्हणतात ना तशी व्हायची. मग ठरवलं – नाही ना आपल्याला असे काही छान छान, नवनवीन कल्पनांनी नटलेले, साहित्यिक मूल्यांनी ओतप्रोत, इ. इ. लिहायला जमत, मग ठीक आहे. जे लिहितात त्यांची विडंबनात्मक टर उडवायची. कोल्ह्याला द्राक्षं आंबट, दुसरं काय. परत विडंबन करणे तुलनेने बरेच सोपे, खासकरून छंदबद्ध कविता वा गजलांचे. तयार जमीन, तयार यमकें, रेडीमेड कवाफी. आपण फक्त ओळी जराशा उलटसुलट केल्या की झाले विडंबन तयार. वाचणाऱ्यांनाही गंभीर रचनांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा ‘हसा आणि विसरून जा’ छाप विडंबने वाचणे सोयीस्कर वाटते. त्यामुळे आमच्यासारख्यांची चलती असते. कोणी नाक मुरडलेच तर कानाच्या पाळ्या धरून आचार्य अत्र्यांच्या ‘ झेंडुची फुले’ चा वारसा सांगावा. वर अत्यंत आदराने (नाटकं करायला आपलं काय जातय) ‘ क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्प विषयामती: ‘ वगैरे वाक्यं टाकावी. एकाच वेळी आपला विनम्रपणा आणि सु’संस्कृत’पणा दाखवण्याची संधी का सोडा? (संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्ये पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या कामी येतात. ) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर ‘टाकणार आहे’ लिहिणार होतो पण ‘देण्याचा मानस आहे’ कसे भारदस्त वाटते, नाही? मूळ रचनांचा दुवाही देईन. विडंबन आवडो न आवडो, वाचकहो, त्या मूळ रचना जरूर वाचा ही मात्र खोडसाळाची कळकळीची विनंती आहे. त्या प्रतिभावंतांची थट्टा करण्याच्या माझ्या पापाचे यामुळे थोडे तरी परिमार्जन होईल.”

खोडसाळ हे मनोगतावरील एक अत्यंत प्रथितयश प्रतिभावान आहेत. त्यांच्या विडंबनांची मोहिनी पडलेले असंख्य लोकच त्यांच्या प्रतिभेची खरीखुरी कल्पना देऊ शकतील.

मात्र या विडंबनात त्यांनी मूळ काव्यविषयाचे विडंबन केलेलेच नाही. तर केवळ प्रसिद्ध चालीचा, आकृतीबंधाचा, नवविडंबकांच्या आवडत्या वस्तूवर हल्ला बोलण्याच्या वृत्तीचे विडंबन करण्यासाठी, उत्तम उपयोग करून घेतलेला दिसून येतो. वरील दुव्यावरही त्यांनी हे काव्य स्वतंत्र कविता म्हणूनच दिलेली होती. प्रतिसादकांनी मात्र त्याचे विडंबन म्हणूनच कौतुक केलेले दिसून येते.

दोन्हीही काव्ये सुंदर आहेत. ‘विडंबन झाले कवितेचे’ हे मूळ ‘स्वयंवर झाले सीतेचे’ या गीताचे कुठल्याच निकषाने विडंबन ठरत नाही. तथाकथित विडंबनात मूळ गीताच्या चालीव्यतिरिक्त कोणतेही साम्य वा संबंध दिसून येत नाही. मात्र हे “नवविडंबकांच्या आवडत्या वस्तूवर हल्ला बोलण्याच्या वृत्तीचे विडंबन” आहे यात कसलाही संशय नाही.

म्हणून विडंबन कशाला म्हणू नये याचे मात्र हे एक चांगले उदाहरण ठरले आहे.
———————-

कविता आणि विडंबन
प्रेषक यशवंत जोशी ( ०६/०७/२००९)
प्रतिभा
(१२-५-०९ ला सुचलेली रचना )

कविता उमेद कवीची मरगळ झाडून टाकते
विडंबन तगडे असे कवितेस झाकून टाकते ॥

कविता जणू नवी नवरी भाववेडी फाकडी
विडंबन दादला धटिंगण वळते कवितेची बोबडी॥

कविता रमविण्या जनां नवरसांचे चाळ बांधते
विडंबन राजा रसाचा निखळ हास्य ओठी विलसे ॥

कविता सत्यभामा पुराणी स्वर्गीय प्राजक्तवेडी
विडंबन खट्याळ नारद कृष्णासही घाली बेडी ॥

स्वांतस्सुखे परमार्थ साधणे ती कवितेची मनीषा
रांगडा आनंद लुटणे ही विडंबनास अभिलाषा ॥
——————————-

विडंबन
प्रेषक केशवसुमार (०३/०३/२००७)

प्रथम लिहीणाऱ्या कवीचा आदर नंतर लिहीलेल्या कवितेची खिल्ली
प्रथम लिहीलेल्या शब्दांची नोंद नंतर त्यांच शब्दांची फेर मांडणी
प्रथम मिळालेल्या अनुभवांची आठवण नंतर घेतलेल्या अनुभवांची टवाळी

केशवसुमार…
————————–

Makarand Karandikar, October 6 at 10:43 PM ·
जन पळभर म्हणतील बायबाय**
आता निवडणुका होतील. जनसेवेसाठी आसुसलेले आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी सर्वकाही करणारे नेते आपण पाहतोय ! निवडणुकीचे निकाल लागल्यावर काय होईल हे खुद्द निवडणूकच आपल्याला सांगत्ये आहे.
कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेवरून मला सुचलेली कविता …
( त्यांची विनम्र क्षमा मागून )

मी होता राहील कार्य काय,
जन पळभर म्हणतील बायबाय ।।

निकाल लागता, थोडे चिडतील,
ईव्हीएम फोडीत, शिव्या घालतील,
उठतील बसतील, तुम्हा विसरतील,
तुमचा त्यांचा संबंध काय, ।।१।।

पक्ष बदलतील, पक्ष फोडतील,
सारे आपुला क्रम आचरतील,
शिव्या घालतील, मिठ्या मारतील,
पुन्हा जाऊनी पैसेच खाय ।।२।।

खड्डे पडतील, पूलही पडतील,
सारे आपुल्या कामी लागतील,
कमिशन घेतील, ठेके देतील,
कुणी मरता त्यांचे काय जाय ।।३।।

झाडे तुटतील, घरे पाडतील,
नाले भरतील, नद्या आटतील,
शेतकरी हे जीवही देतील,
ते मरता त्यांचे यांस काय? ।।४।।

घरी बसोनी काय कुढावे,
मतदाना का विन्मुख व्हावे,
तेथे जावे, मत नोंदावे,
चांगले कुणी निवडोनी जाय ।।५।।
***मकरंद करंदीकर, makarandsk@gmail. com
( शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावी ) पण मतदान मात्र नक्कीच करा !!
———–

याच कवितेचे आणखी एक विडंबन :

जन पळभर म्हणतील RIP RIP
मी जाता होईल weep weep
फोटो सारे करतील upload
Share होतील आठवणी गोड
श्रद्धांजली च्या post मध्ये
त्यांचे branding करेल creep
ग्रुप एकदिवस बदलेल DP
दिवस सरता चालू TP
तेच emoji तेच अंगठे
सरकत राहील एकेक clip
Forwards येतील, reels नाचतील
ट्रेंड्स नवनवे viral होतील
अखंड scrolling चालू राहील
वाजत राहील beep beep
अशा virtual जगास्तव का कुढावे
Followers च्या वाढीमागे का गुंतावे ?
थोडकीच पण घट्ट विणावि
नाती मोजकी deep deep
सलिल
(परवा गायक KK च्या अकस्मात मृत्यूच्या बातमीनंतर सोशल मीडियावर त्याबद्दल अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट्स वाचण्यात आल्या. त्यानंतर जे वाटलं त्यातून ही कविता शब्द बद्ध केली.
ही कविता टीका म्हणून केलेली नाही. एक समाज म्हणून आपण कसे बदलतोय याबद्दल आहे. मी स्वतः देखील याचाच भाग आहे. म्हणून स्वतःलाच समज देणाऱ्या या ओळी लिहिल्या आहेत.
तुम्हालाही त्या relevant वाटतील अशी आशा आहे.)
सलील चौधरी

श्री.सलील चौधरी यांच्या फेसबुकवरून साभार दि.०६-०६-२०२२

. . . .
मूळ कविता – श्री. भा.रा.तांबे

जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’
मी जातां राहील कार्य काय।।

सूर्य तळपतिल चंद्र झळकतिल।
तारे अपुला क्रम आचरतिल।।
असेच वारे पुढे वाहतिल।
होईल कांही का अंतराय।।

मेघ वर्षतिल शेतें पिकतिल।
गर्वानें या नद्या वाहतिल।।
कुणा काळजी कीं न उमटतिल।
पुन्हा तटावर हेच पाय।।

सखे सोयरे डोळे पुसतिल।
पुन्हा आपल्या कामी लागतिल।।
उठतील बसतील हसुनि खिदळतिल।
मी जातां त्यांचें काय जाय।।

राम कृष्णही आले गेले।
त्यां विन जग कां ओसचि पडले।।
कुणीं सदोदित सुतका धरिलें।
मग काय अटकलें मजशिवाय।।

अशा जगास्तव काय कुढावें ।
मोहिं कुणाच्या कां गुंतावें।।
हरिदूता कां विन्मुख व्हावें ।
कां जिरवुं नये शांतींत काय।।

कविवर्य भा.रा.तांबे यांची संक्षिप्त माहिती – विकीपीडियावरून

भा रा तांबे
भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ – डिसेंबर ७, १९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
————————–

श्री. माधव विद्वांस यांच्या फेसबुक पानावरून साभार. (संपादित) दि. २७-११-२०१९

डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका !! असे सुंदर भाव गीत लिहिणारे स्वर्गीय कविवर्य भा. रा. तांबे यांचा आज जन्म दिवस .(२ ७ नोव्हेंबर १ ८ ७ ४ )
मरावे परी गीत रुपी उरावे .
हिंदी भाषिक प्रदेशात जन्म घेऊन व त्याच भागात जीवन घालविलेल्या या कविश्रेष्ठाची मराठी प्रतिभा अदभुत होती
त्यानी २२५ चे वर कविता लिहिल्या त्यांचा जन्म ग्वाल्हेर जवळ मुगावली येथे झाला तर शिक्षण अलाहाबाद व आग्रा येथे झाले. महाराष्ट्राच्या बाहेर राहूनही त्यांनी त्यानी २२५ चे वर कविता लिहिल्या मराठीची केलेली सेवा उल्लेखनीय आहे
त्यांची लोकप्रिय अजरामर गाणी ”’ नव वधु प्रिया मी बावरते — मधु मागसी माझ्या सख्या –तुज्या गळा माझ्या गळा — डोळे हे जुलमी गडे – कला ज्या लागल्या जीवा -जन पळभर म्हणतील हाय हाय -मावळत्या दिनकरा–रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी -कवी वासुदेव गोविंद मायदेव यांनी त्यांच्या ७ ५ कविता संपादित केल्या तर डॉ माधवराव पटवर्धनानी “तांबे यांची समग्र कविता” हे पुस्तक १ ९ ३ ५ मध्ये प्रकाशित केले. तांबे यांचे मुलाचे (डॉ र भा. तांबे ) घरी भावनगर येथे १ ९ ६ २ साली जाणेचा योग आला होता त्यावेळी शाळेत असल्याने तांबे यांचे तैलचित्र पाहून यांचा फोटो तुमचेकडे कसा ? या प्रश्नावर माझे वडील असे ऐकताच मला खूप आनंद झाला होता .
!!अभिवादन !!
त्यांची गाजलेली गीतें
नववधू प्रिया मी ——तुझ्या गळां माझ्या गळां —–मधु मागशि माझ्या —-मावळत्या दिनकरा ——या बालांनो या — रे या हिंदबांधवा थांब——-अजुनि लागलेंचि दार —– कशी काळनागिणी—— कळा ज्या लागल्या जीवा —–कुणि कोडें माझें उकलिल —-घट तिचा रिकामा —-घन तमीं शुक्र बघ—– चरणिं तुझिया मज देईं —–जन पळभर म्हणतिल —– डोळे हे जुलमि गडे —–तिनिसांजा सखे मिळाल्या ——–तें दूध तुझ्या त्या — —— निजल्या तान्ह्यावरी माउली —– पिवळे तांबुस ऊन कोवळे —– भाग्य उजळलें तुझे —-
———————————————————

”दिवस तुझे हे फुलायचे! झोपाळ्या वाचून झुलायचे”!!
या गाण्याचे विडंबन.

दिवस कधी हे सरायचे,
घरातल्या घरात फिरायचे।।
कामवालीची झाली मजा,
घरात मी भोगी सजा।
घरकाम किती मी करायचे,
घरातल्या घरात फिरायचे।।१||
कधी ना घासली भांडी,
झाडून कधी ना काढी।
बोळ्याने फरशीला पुसायचे,
घरातल्या कामात रमायचे।।२||
कपडे हे धुता धुता,
दमले गं बाई मी आता।
पसारा कितीदा आवरायचे,
घरातल्या घरात दमायचे।।३||
बाहेरचे खाण्याचा छंद,
हॉटेल बेकऱ्या बंद।
उपवास किती मी करायचे,
घरात उपाशी मरायचे।।४||
स्वयंपाकाचा येई मज आळस,
बाई येईना स्वयंपाकास।
वरण भाताने पोट हे भरायचे,
घरातल्या घरात गिळायचे।।५||
कुणाकडे नसे जाणे,
कुणीच घरी ना येणे।
व्हाट्सऍप हाती धरायचे,
घरातून साऱ्यांशी बोलायचे।।६||
बाहेर कोठे ना जाऊ,
टीव्हीवर रामायण पाहू।
उरलेल्या वेळात घोरायचे,
घरातल्या घरात रहायचे।।७||
कधी होईल करोनाचा नाश,
कधी सुटेल मृत्यूचा पाश।
प्रतीक्षा करत जगायचे,
घरातल्या घरात झुरायचे ||८||

(कवी कोण माहीत नाही, पण वस्तुस्थितीचे फारच मार्मिक वर्णन केले आहे.) 👌

फेसबुकवरून साभार दि.०५-०७-२०२०

—————-
मूळ गाणे

दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे

स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटत गाणे
गाण्यात हृदय झुरायचे,
झोपाळ्यावाचून झुलायचे

मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे

थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे

माझ्या या घरच्यापाशी, थांब तू गडे जराशी
पापण्या मिटून भुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे

दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे

कवी : मंगेश पाडगावकर

—- याच गाण्याची आणखी दोन विडंबने —-

१.पाडगावकरानी आता ‘दिवस तुझे हे फुलायचे’ याचे विडंबन
चाळीशी नंतर ‘दिवस तुझे हे फुगायचॆ’ केलयं. त्या अनाम कवीला सलाम
😂😂 😝😝👇👇

दिवस तुझे हे फ़ुगायचे
मोजून मापून जेवायचे ॥ध्रु॥

लाडकी माझी तु राणी
नको तु खाऊ गं लोणी
पाण्यात लिंबाला पिळायचे
मोजून मापून जेवायचे॥१॥
दिवस तुझे…..

साजुक तुपाची धार
वाढवी calories फ़ार
पोटात salad भरायचे
मोजून मापून जेवायचे॥२॥
दिवस तुझे…..

प्रभाती फिराया जाणे
जाताना धापा टाकणे
दमून मटकन बसायचे
मोजून मापून जेवायचे॥३॥
दिवस तुझे…..

वजन वाढते फ़ार
सोसेना काट्याला भार
कळेना काय ते करायचे
मोजून मापून जेवायचे॥४॥
दिवस तुझे …..

आपुल्या घरच्यापाशी
फिर तू गडे जराशी
हालत चालत राहायचे
मोजून मापून जेवायचे॥५॥
दिवस तुझे ….
😆😆😆😆 फेसबुकवरून साभार दि.१९-०६-२०२१  😆😆😆😆

२. अविनाश चिंचवडकर, बंगलोर यांनी केलेले विडंबन 

दिवस घरी हे बसायचे!

दिवस घरी हे बसायचे
खिडकीच्या बाहेर बघायचे

घराच्या बाहेर न जाणे
कंटाळा आला की खाणे,
टी. व्ही. च्या समोर बसायचे!

मोजावी घराची खोली
गिळावी भाजी अन पोळी,
बायकोचे टोमणे ऐकायचे!

करावे ऑफिसचे काम
बॉसचा त्रासही जाम,
दिवसभर ऑनलाईन रहायचे!

माझ्या या घराच्या पाशी
थांबव तो करोना राक्षसी,
देवाला विनवणी करायचे!

– अविनाश चिंचवडकर

 😆😆😆😆 😆😆😆

टकमक टकमक डोळे फिरती

टकमक टकमक डोळे फिरती
भिरभिर भिरभिर मेसेज हिंडती
जागोजागी मोबाईल दिसती
मेंबर सारे व्हाट्सअप्प पाहती
स्वप्नी आले काही एक मी
ग्रुप पाहिला भारी
टकमक टकमक डोळे फिरती।।1।।

या ग्रुपची गंमत न्यारी
इथे नांदती मेंबर्स सारी
कुणी न मोठे कुणी धाकटे
कुणी न बसती मुकाट एकटे
मेसेज सारे अख्खा वाचती
कोणी रागवत नाही
स्वप्नी आले काही एक मी
ग्रुप पाहिला भारी।
टकमक टकमक डोळे फिरती।।2।।

नाही ऑफिस नाही शाळा
“सुप्रभात”ची वेळ पाळा
मेसेज तुम्ही केंव्हाही टाका
बंधन कोणा नाही
विनोद अन कविता पाठवी
कोणी सिनेसंगीत पाठवी
मेसेज आवडती भारी।
स्वप्नी आले काही एक मी
ग्रुप पाहिला भारी।
टकमक टकमक डोळे फिरती।।3।।

इथले मेंबर्स हुशार भारी
नियमांचे काटेकोर पालन करती
ऍडमिन येथे दोन असती
मनोरंजनात ते भारी असती
म्हणाल ते ते सारे मिळते
उणे न कोणा काही
स्वप्नी आले काही एक मी
ग्रुप पाहिला भारी।
टकमक टकमक डोळे फिरती।।4।।

अशोक कुलकर्णी    . . . . .  फेसबुकवरून साभार दि.१९-०६-२०२१ 

मूळ कविता :
गीत – शान्‍ता शेळके, संगीत – श्रीनिवास खळे, स्वर – सुषमा श्रेष्ठ

किलबिल किलबिल पक्षि बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई !

त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही

नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही

तिथल्या वेली गाणी गाती, पर्‍या हासर्‍या येती जाती
झाडावरती चेंडु लटकती, शेतामधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही
***************************************

विरसग्रहण ( कुसुमाग्रजांची क्षमा मागून)

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
हाय का डेरिंग बोलायचं? डेरिंगच नाय तर कसा बोलशील. अन डेरिंग करुन बोललाच तर फुकाट जोड खाशीन याच भ्याव हाये ना. आन नको तोलु देवळाच्या दारात भक्ती. भक्तीत खोट निघाली तर चारचौघात खोटा पडशीन!
माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही
आरं ते प्लास्टिकच फूल हाये फुलाचा शेंट मारलेला डिट्टो फुलावानी दिसतय. मधमाशाबी फशीत्यात. आता कलाकारीच हाये म्हन्ल्यावर कशी पाकळी फुलनं?
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
त्ये नक्षत्र का काय हाये त्येंच्या गावात बंटा मारलेले ल्वॉक र्‍हात्यात. काही बी बरळत्यात. त्येंच्या बरळन्यात कोन्ला काय घावनं काय सांगता येत नाही. त्येन्ला शब्दात पकडायला गेल की तेल लावलेल्या पैलवानावानी निसटत्यात.
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही
आबाळामधी पाखर असत्यात चान्न्या असत्यात तसे ढग बी असत्यात. काही ढवळे असत्यात काही काळे असत्यात. काही काळे ढग जांभळावानी दिसत्यात. ढग हाये म्हनून त पाउस पडतुया. र्‍हातोय यखांदा ढग कोपर्‍या मदी पडून. वार्‍या वावधनाचा त्योबी वाहून जातोय. समद्याच ढगातून काय पानी येत नसतयं. काही रहस्य बिहस्य नसतयं.
दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही
आता गलबत म्हनल्यावर लांबच हुब र्‍हानार ना! ती काय व्हडी हायका फळकुटाची किनार्‍याव यायला. किनारा उथळ असतुय. किनार्‍याकं यायच म्हनल तर तटून बसन. रुतून बी बसन वाळूत. समद्या दर्यावर्द्यांना माहीत अस्तय हे. व्हडीतुन गलबतापोतुर जात्यात ल्वॉक.
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही
कह्याचा आलाय कृपाकटाक्ष? डोळ्यातून आग वकत होती. निस्ते आगीचे फव्हारे. मग वन्वा लागनार नाय तर काय व्हनार? अन आगीलाच निखार्याोवं कसा जाळनार तू? याड लागलय का?
😂😂😂😂😂

प्रकाश घाटपांडे
(मिसळपाव ,ऐसी अक्षरे वर पूर्वप्रकाशित )

फेसबुकवरून साभार  दि. २२-०६-२०२१


मामाच्या अशा गावाला जाऊया का ?

हे विडंबन कुणी केले ते माहीत नाही. पण भविष्यातली ही संभाव्य परिस्थिती विदारक आहे. शहरीकरणामुळे मामाची गावेच कमी होत चालली आहेत आणि जी आहेत तिथे पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे मामाच भाच्यांना बोलवायला धजत नाही.

सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ……..
झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂🚎🚎🚎🚎

विडंबन कविता:

झुक झुक झुक झुक आगीनगाडी🚂
पाण्याचे डबे आणून सोडी🚎
वाळकी झाडे पाहूया🎍🌾
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाचा गाव मोठा 😆
पाण्याचा लय तोटा🚱
हंडा रांगेत लावूया🏮🏮
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाची बायको सुगरण 💃🏻
पाण्यासाठी फिरते वणवण😰
बिनआंघोळीचे राहूया😝
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाची बायको गोरटी☺
म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜
पाण्यासाठी भांडुया😡
मामाच्या गावाला जाऊया👫

मामा मोठा तालेवार 👳🏻
आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार💊
कोरड्या पाण्याने न्हाऊया🗑
मामाच्या गावाला जाऊया👫

😝😂😆
झाडे लावा झाडे जगवा
उन्हाळ्याच्या सुटीत झुकुझुकु झुकुझुकु अगीनगाडीत बसून पळती झाडे पहात मामाच्या गावाला जाण्यात भाच्यांची मजा असायची. आता ती धुरांच्या रेषा हवेत काढणारी आणि कोळशाच्या इंजिनावर झुकुझुकु चालणारी कूऊऊऊ गाडीही राहिली नाही आणि बहुतेक मामांची दुष्काळग्रस्त गावे भाच्यांसाठी नव्हे तर पाण्याच्या टँकरसाठी येणाऱ्या आगगाडीची वाट पाहू लागली आहेत.

मूळ गाणे
झुकुझुकुझुकुझुकु अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली चोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाच्या गावाला जाऊया

मामा मोठा तालेवार
रेशिम घेइल हजार वार
कोटविजारी घेऊया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊ याऽऽ जाऊ याऽऽ

. . . .  ग.दि.माडगूळकर

*********************************

३१ डिसेंबर २०१८ वर्षअखेरची ओली पार्टी
पहिले गाणे कदाचित गटारी अमूशेचे असेल किंवा ३१ डिसेंबरचे. या वर्षाची मजेदार सांगता करायला फिट्ट आहे. श्री.चिंतामणी जोगळेकर यांचे आभार आणि स्व.शांताबाई शेळके यांची क्षमा मानून ……..

किणकिण किणकिण ग्लास बोलती
झुळझुळ झुळझुळ बियर वाहती
जागोजागी चखणे दिसती
मद्यपी सारे तुटून पडती…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

त्या गावाची गंमत न्यारी
तिथे नांदती व्यसने सारी
कुणी न मोठे कुणी धाकटे
कुणी न बसते तिथे एकटे
सारे झिंगुन, गाती नाचती,
कोणी रडके नाही…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

नाही ऑफिस, नाही वेळा
गटारातही खुशाल लोळा!
उडो, बागडो, पडो, धडपडो,
लागत कोणा नाही…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

तिथली पिंपे वाइन देती
पर्‍या हासर्‍या पेले भरती
झाडावरती मुर्ग लटकती
पेग बनवते तिथली आन्टी
म्हणाल ते ते सारे मिळते,
उणे न कोठे काही…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

©चिंतामणी जोगळेकर

हे विडंबन आता पुन्हा एकदा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना वाचायला मिळेल. नावासह प्रसिद्ध करणाऱ्या सर्वांना धन्यवाद..

शांताबाई शेळके यांच्याविषयी पूर्ण आदर आहेच.

मूळ गाणे
किलबिल किलबिल पक्षि बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुलें बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई!
त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही
नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही
तिथल्या वेली गाणी गाती, पर्‍या हासर्‍या येती जाती
झाडांवरती चेंडु लटकती, शेतांमधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही
. . . शांता शेळके
——————

असेच दुसरे एक मद्यगीत

फिटे अंधाराचे जाळे या गाण्याची चाल असलेले ३१ डिसेंबरचे गीत……..

पिती अंधारात सारे
झाले मोकळे हो ग्लास
नाकातोंडातून वाहे
एक उग्र असा वास !!१!!

बार जागे झाले सारे
बारबाला जाग्या झाल्या
सारे जमता हो एकत्र
बाटल्याही समोर आल्या
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास !!२!!

दारु पिऊन नवेल्या
झाल्या बेवड्यांच्या जाती
बारमधेच साऱ्यांच्या
सरु लागल्या हो राती
क्षणापूर्वीचे पालटे
जग भकास भकास !!३!!

जुना सकाळचा प्रकाश
झाला संध्येचा काळोख
दारुड्यांचा दारुड्यांना
दारुनेच अभिषेक
एक अनोखे हे मद्य
आले ग्लासात ग्लासात !!४!!

🍻🍻🍻😝😝😝

कवी- श्री.दे.शि.दारूडे

मूळ गीत …
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखोऱ्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश

रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी
संगे जागल्या साऊल्या
एक अनोखे लावण्य
आले भरास भरास

दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे
जग उदास उदास

झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास

साऱ्या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ
गेली तळास तळास
. . . . सुधीर मोघे
——————————————

नवी भर दि. ७-०१-२०२२

मूळ कविता

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक

कवी: ग.दि.माडगूळकर

विडंबन

एका ढिगात होती, वस्त्रे बहु सुरेख
होती पडून छोटी, चिंधी तयांत एक
शिंपी तिला न घेई, शिवण्यास पाटलोणी
चिंधीस का कधीही, समजेल वस्त्र कोणी?
कधी चोर त्या दुकानी, चोरून माल नेती
तेही न त्रास देती, चिंधीस काही एक
चिंधीस खंत वाटे, का मी निरूपयोगी?
हेटाळणी एवढी का, माझ्याच फक्त भोगी?
फडके म्हणून का, माझी नसे महत्ता?
मज गोधडीत घ्या ना, तुकडा म्हणून एक!
एके दिनी परंतु, चिंधीस त्या कळाले
साथीमधे तियेचे, उजळून भाग्य आले
भारी विशेष वस्त्रे, असुयेत होती खाक
मिरवे बनून चिंधी, कोविड 😷मास्क एक
😄😀
(Fb वर सापडली, कवी अज्ञात)

—————

नवी भर दि.०३-०३-२०२२ : लिसन माझ्या सोन्या बाळा

लिसन माझ्या सोन्या बाळा

आता या विंग्रजाळलेल्या कवितेचे श्री.नरेंद्र गोळे यांनी केलेले भाषांतर

मराठी अनुवाद करणे हे तर रोजचे घावन घाटलं.
मात्र ह्याचा अनुवाद करावा लागेल असे स्वप्नातही ना वाटलं!
.
ऐक माझ्या सोन्या बाळा, केव्हाच झाली सकाळ
निर्वाणीची सुचना आता, अंथरुणातून उगव
.
छानपैकी दात घास, चमकव तुझे दात
हसण्यावारी नेऊ नकोस, हितच आहे त्यात
.
गरमगरम दूध केलंय, घालून हळद साखर
हाताने तू विटा फोडशील, हे प्यायलास तर
.
एक पेला दोनदा प्यायलास, तर जीवनसत्त्व भरपूर
होशील धोनी तूही आणि मग धावांना येईल पूर
.
गणिताच्या गुरूजींना विचार सार्‍या शंका
मधल्या सुट्टीत पाठ कर मराठीच्या कविता
.
शाळा सुटल्यावर संध्याकाळी घरी ये लवकर
येता येता वाटेतच पाठ कर वाक्प्रचार
.
आजोबांच्या वाढदिवसाचे रात्री आहे जेवण
अशा भवतालातच होते मुलांचे संगोपन
.
मराठीची शिकवणीही लावू तुला खास
दैनिकांत शोधलं खूप पण लागला नाही माग
.
मूळ कवीः मुरारी देशपांडे ९८२२०८२४९७
.
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००२२८


श्रावणमासी हर्ष मानसी या कवितेचे विडंबन याच संकेतस्थळाच्या या भागात.

https://anandghare.wordpress.com/2012/07/17/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a1/

मराठी पीजे, ग्राफिटी आणि पुणेरी पाट्या

मला वॉट्सॅपवरून काही मजेदार हास्यघोष मिळाले आहेत ते या ठिकाणी संकलित केले आहेत. या ग्राफिटीज ज्यांनी तयार केल्या आहेत त्यांचे आभार मानून त्यांच्या अनुमतीची याचना करीत आहे.

संपादन दि.१३-०७-२०२० : मागच्या वर्षी पुण्यात एक पाट्यांचे प्रदर्शन भरले होते. त्यातल्या काही पाट्या म्हणजे ग्राफिटीचे नमूनेच आहेत. ते या पानावर संग्रहित केले आहेत. सर्व रचनाकारांचे मनःपूर्वक आभार.

संपादन दि.२६-०२-२०२२ : बारा वर्षांपूर्वी संग्रहित केलेले काही विनोद (पीजे) या पानावर आणले आहेत. ते जुने असले तरी आजही ओठांवर हंसू आणतील.

ग्राफिटी

काही टोमणे काही सुविचार

नवी भर दि. २३-०९-२०१९ : वॉट्सअॅपवरून साभार

३८७ विचारशब्द

नवी भर दि. २५-०९-२०१९

आणखी काही जुन्या ग्राफिटीज माझ्या संग्रहातून

या ग्राफिटीज कुणी तयार केल्या होत्या ते मला तेंव्हाही माहीत नव्हते.  ज्यांनी तयार केल्या आहेत  त्यांचे आभार मानून त्यांच्या अनुमतीची याचना करीत आहे.

जुनी ग्राफिटी १

जुनी ग्राफिटी २

प्रदर्शनातल्या पुणेरी पाट्या

काही अस्सल पुणेरी पाट्या इथे http://assal-marathi-puneri-patya.blogspot.com/

मराठी पीजे

मराठी पीजे या नांवाने हे विनोद माझ्याकडे आले. पीजे म्हणजे पांचट जोक की पुणेरी जोक ते तुम्हीच वाचून ठरवा.

अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेर
—————–
चिनी कुत्र्याचे नाव काय ?
हे हुंग ते हुंग
—————–
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर
—————–
नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
—————–
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की
—————–
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
—————–
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल
—————–
ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली
लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
—————–
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात
ती वेळ कुठली असते ?
घड्याळ दुरुस्त करण्याची !
—————–
दोन चिमण्या असतात
.

त्यातली एक म्हणते “चिऊ”
.
दुसरी काहीच म्हणत नाही!
.
का?
.
कारण दुसरी चिमणी कारखान्याची असते.
—————–
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत.

का बरे ?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
—————–
ढिशुम ढिशुम
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत.
का बरं?????
.
कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना….
—————–
रावणाच्या लंकेला “सोन्याची लंका” का म्हणतात???
.
कारण लहानपणी ..
रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने
“सोन्या” म्हणायचे..
—————–
पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता
स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?
दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे.
जो जास्त घासला गेला असेल,
तो स्त्रीचा!!!!
—————–
संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता.
मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, ”तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?”
संता म्हणाला, ”आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!”
—————–
पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठाय?
मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.
—————
नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली.
आणि त्यात ससा मागे पडला.
पण तरीही शर्यत ससाच जिंकला… का

कारण…
….
….
शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.
————–
एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत
मंदिरात जातात.
पण, कोंबडी जात नाही.
का?
कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.

. . . . . . . . . .फेब्रुवारी 12, 2010

हसण्यासाठी जन्म आपला!

मांडवामध्ये लग्नसोहळा सुरू होता.
😂😂😂
सरपंचाने जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली…
हे लग्न झाल्यामुळे जर कुणाला प्रॉब्लेम होणार असेल तर त्याने पुढं यावं. ….
हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर शांतपणे जगू द्यावं उभ्या आयुष्यात कधी वाटेला जाऊ नये. ….
सरपंचाचे बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक सुंदर स्त्री
पुढे येऊ लागली.
तिच्या हातात एक छोटं बाळ होतं…
सगळ्या मंडपात भयाण शांतता….
मग कुजबूज सुरू झाली…..
त्या स्त्रीला पाहताच नवऱ्या मुलीने नवरदेव च्या मुस्काटात मारली.
मुलीचे वडील त्यांची बंदूक आणायला धावले.
मुलीच्या आईने विषाची बाटली बाहेर
काढली.
मुलीच्या भावांनी मुठी वळल्या.
पाहुणे मंडळींनी फेटे सोडले….
सरपंचाने ,
कसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं,
ताई, तू का पुढे आली आहेस ?
.
.
.
.
.
.
ती म्हणाली,
तुम्ही बोललेलं मागे काहीही ऐकू येत नव्हतं म्हणून!!!!
😍😍😂😂😍😍
……………………..
नुसती घाई…
अन् गैरसमज ….
दमच नाही कुणाला
🤣🤣🤣
सोशल मिडियावरच्या 99 टक्के प्रतिक्रिया अश्याच असतात…म्हणून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्या अगोदर स्वतः खात्री करून घ्या….
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

शिमग्याची आकाशवाणी %^$@# &%^$@# !!!

जंगलात एक शिकारी झाडांवर बसलेल्या कबुतरांच्या टोळक्याकडे मोठ्या आशावादी नजरेने बघत होता. बराच वेळ विचार करून नेम धरून त्याने शेवटी गोळी झाडली. ती दुसरीकडेच गेली. सगळी कबुतरं उडाली.
“गेली चायला.. &%^$@# नेम चुकला..” – शिकारी.
शेजारी एक साधू काही जप करत बसला होता. त्यानं एकदा भयंकर रागीट नजरेनं त्या शिकार्‍याकडे पाहिलं. आणि पुन्हा जप करू लागला.
शिकार्‍याचं लक्ष आता एका सशाकडे होतं.. नेम धरून पुन्हा एक गोळी झाडली.. तीही दुरून गेली.. ससाही पळाला..
“आयला .. काय चाललंय.. &%^$@# नेम चुकला परत..”

त्या साधूला शिकार्‍याचं हे बोलणं रुचलं नसावं.. म्हणून तो त्या शिकार्‍याला म्हणाला.. “बाळा .. अरे अशा शिव्या देऊ नये. वाईट गोष्ट आहे ती..”
“अरे ए साधुरड्या.. तू तुझं काम कर मला माझं काम करू दे..” – शिकारी.
साधू गपगार होऊन पुन्हा जप करू लागला.. “पुन्हा एकदा जर तू शिवी घातलीस ना तर मी तुला शाप देईन..”
आता शिकार्‍याला एक हरीण दिसू लागलं. पुन्हा बराच वेळ वाट पाहून नेम धरून पठ्ठ्यानं गोळी झाडली .. तीही भलतीचकडे गेली.. आणि इतक्यांदा प्रयत्न फसल्यानं वैतागलेला तो शिकारी म्हणाला.. ” &%^$@# नेम चुकला.. चायचं नशीब फुटकं .. ए साधुरड्या .. बघ &%^$@# नेम चुकला..”

आता मात्र साधूला राहवेनासं झालं .. तो वैतागून उठला आणि म्हणाला.. ” हे बघ मी तुला एकदा ताकीद दिली होती तू ऐकले नाहीस.. आता तर तू मलाच शिवी घातलीस .. मी तुला शाप देतो.. आता आकाशातून वीज पडेल आणि तुझी क्षणात राख होईल..” असं म्हणून साधून त्याच्या कमंडलूतून पाणी वगैरे काढून त्या शिकार्‍यावर शिंपडलं.. तसा ढगांचा गडगडाट झाला.. वीजा चमकू लागल्या.. शिकारी घाबरला आणि त्याने डोळे मिटून घेतले.. क्षणात एक जोरदार वीज कडाडली आणि साधूवर येऊन पडली.. साधू क्षणार्धात राख झाला..

तोच आकाशातून जोरदार आवाज आला..
“&%^$@# … नेम चुकला!!!!!””

मिसळपाववरून साभार . . . फेब्रुवारी 28, 2010
—————–

महाराष्ट्र गीते

महाराष्ट्र दिन २

आज महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्याने काही जुनी महाराष्ट्रगीते सादर करीत आहे.

महाराष्ट्र गीत – १
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे ।
रमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरीपटका भगवा झेंडाही डोलती ।
धर्म राजकारण समवेत चालती ।
शक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्ती धृतिही जेथ अंतरी ठसो ।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

कवि – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
……….

महाराष्ट्र गीत – २

महाराष्ट्र दिन १
दुसऱ्या एका सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताची दोन कडवी खाली उद्धृत करीत आहे.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।
अंजन कांचन करवंदीच्या कांटेरी देशा ।
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा ।
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी, व्यवहारा परमार्गासी ।
वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

अपर सिंधूच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा ।
सह्याद्रीच्या सख्या जिवलगा, महाराष्ट्र देशा ।
पाषाणाच्या देही धरिसी तू हिरव्या वेषा ।
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटीच्या रेषा ।
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ।
मंगल वसती, जनस्थानींची श्रीरघुनाथांची ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी, व्यवहारा परमार्गासी, वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

….. गोविंदाग्रज
………..

महाराष्ट्र गीत – ३

महाराष्ट्र दिन ४
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी ।
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ।
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा ।
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा ।
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा ।
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी ।
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी ।
दरिद्र्याच्या उन्हात शिजला ।
निढळाच्या घामाने भिजला ।
देशगौरवासाठी झिजला ।
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।

——- राजा बढे
——————————

महाराष्ट्र दिन ३

मराठी भाषेसंबंधीची माधव ज्यूलियनांची संपूर्ण कविता खाली दिली आहे.

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; ।।।
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं, ।
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं।।
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां ।
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा ।।
न घालू जरी वाङ्‌मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ।
’मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।

माधव ज्यूलियन


माझा महाराष्ट्र

भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो “एका” हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी; जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकांठी भावभक्तिची पेठ खुले

रामायण तर तुमचेंमाझे भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
हृदयाच्या हृदयांत; परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचे शेवटचे तो शब्द अजुनि हृदयामाजीं
बच जायें तो और लढें
पाउल राहिल सदा पुढे
तुम्हांस तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी; राहील गाठी; मरहट्याचा हट्ट खरा

तुमचें माझें ख्यालतराणे दोघेही ऐकू गझलां
होनाजीची सोनलावणी वेड लावते; परि मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन मुरली
थाप डफाची कडकडतां परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरी-दरीमधुनी घुमला
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासशी दृढ नातें

कळे मला काळाचे पाउल द्रुतवेगानें पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणीं अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरुन अवघ्या विश्वातें कवळी
विशाल दारें माझ्या घरची, खुशाल हीं राहोत खुली
मज गरीबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करुनि झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत

— वसंत बापट (सेतू, १९५७)
**********************

महाराष्ट्र कवींची महाराष्ट्र गीते
दिनांक: 30 Apr 2019

मराठी कवि

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात इंग्रजांशी चाललेल्या लढ्यात अनेक देशभक्तांनी आपले सर्वस्व पणाला लावले, त्यांच्या पराक्रमाला कवींच्या तेजस्वी शब्दांची जोड मिळाली. १८५७च्या लढ्यातला सेनापति अजीमुल्लाखानपासून स्वा. सावरकर, सेनापति बापट, पं. रामप्रसाद बिस्मिल असे अनेक देशभक्त स्वत: कवी होते.

“रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले” असे लिहिणारे गोविंद दरेकर हे शरीराने अपंग असले तरी मनाने कणखर होते. त्यांच्या शब्दांतून मनाचा तो कणखरपणा व्यक्त झाला आणि “राष्ट्रकवी गोविंद” या नावाने कवी गोविंद ओळखले जाऊ लागले. शिवरायांची स्तुती गाणारे कवी भूषणाचे शब्द, मातृभूमीचे स्तवन गाणारे बंकिमचंद्रांचे “वंदे मातरम” हे शब्द, अशी अनेक उदाहरणे आपल्याला उज्ज्वल इतिहासात दिसतील.

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. हळूहळू भाषावार प्रांतरचना झाली. वळवंटापासून बर्फाच्छादित प्रदेशापर्यंत खूप मोठी भौगोलिक विविधता असलेल्या या देशात संस्कृतिक परांपरही वेगवेगळ्या आहेत. जशी भाषा, तसा वेश, तशी संस्कृती अशा या भारताच्या मध्याच्या जवळ असणारा महाराष्ट्र सर्वार्थाने भारताचे गौरवस्थान ठरला आहे. संत नामदेवांनी महाराष्ट्रधर्म पंजाबमध्ये नेला. रामदासांनी काशीपासून बद्रीनाथपर्यंत मारूतींची स्थापना केली.

औरंगजेबाची सत्तेची धुंदी उतरवणारे छत्रपती शिवराय याच मराठी मातीतले. सतत परकीय आक्रमणांनी गांजलेल्या उत्तर भारतात दिल्लीच्या गाडीवर मराठ्यांचा झेंडा फडकावत शत्रूला अफगाण सीमेपर्यंत पळवून लावत अटकेवर भगवा फडकावला, तो याच महाराष्ट्रातल्या पेशव्यांनी.

परकीयांनी पेशवे, शिंदे, होळकर यांच्या तलवारीचा धसका घेतला. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना होताना १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्रची निर्मिती झाली. ज्ञानेश्वरांपासून आजच्या काळापर्यंत अनेक मराठी कवींनी आपापल्या शब्दांमध्ये या महाराष्ट्रची थोरवी वर्णन केली आहे.

“माझा मराठीची बोल कवतिके” असे, म्हणणारे ज्ञानेश्वर, या महाराष्ट्रभूमीला “आनंदवनभुवनी” म्हणणारे समर्थ रामदास अशा संतांनी आपल्या मराठीबद्दल व महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त केले. गेल्या १०० वर्षांतील बालकवी, केशवसुत, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट, ग.दि. माडगूळकर, शाहीर अमर शेख, आण्णाभाऊ साठे अशा सर्वांनी थोर संतकवींचा वारसा पुढे नेला. महाराष्ट्राचे वर्णन करताना त्यांच्या शब्दांना धार आली, तर कधी पंढरीच्या चंद्रभागेच्या, इंद्रायणीच्या, गोदावरीच्या आठवणीने त्यांची मने भक्तिभावाने उचंबळून आली.

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा ||
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ||

असे राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांनी वर्णन केले आहे.
तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर लिहितात –
गगनभेदी गिरीविण अण, नच जिथे उणे |
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे |
अटकेवरी जेथिल तुरगि जल पिणे |
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथे दु:सहा ||१||
बहुत असोत सुंदर संपन्न की महा |
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ||धृ||

भारताचा मानबिंदू हिमालय असला तरी आमचा सह्याद्रि त्यापेक्षा कमी नाही. हिमालयाच थरकाप उडवणार्‍या उंचीप्रमाणे आमचा हरिश्चंद्रगडाचा कोकणकडाही तेवढाच बेलाग आहे. कवी बापट लिहितात –
भव्य हिमालय तुमचा अमुचा,
केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा,
मनात पूजिन रायगडा
तुमच्या आमुच्या गंगायमुना,
केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ,
प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला,
बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त, बुद्ध विश्वाचे शास्ते,
तुकयाचा आधार मला

अशा या कवींमध्ये मराठी कवयित्रीसुद्धा मागे नाहीत. कवयित्रि पद्मा गोळे म्हणतात –

आम्ही महाराष्ट्रकन्या, मायमराठी अमुची
स्वर्गाहूनही आम्हाला माया मराठी भूमीची
मुक्ता, जना जागविति भोळ्या भक्तीने पहाटे
जिजा, लक्ष्मी, शिकविति आम्हा स्वातंत्र्याची गीते
आम्ही महाराष्ट्रकन्या, नका जाऊ कोणी वाटे ||
हिरव्या कोकणात आहे गुप्त तलवारीचे पाते
म्हणा कळ्या या जाईच्या परी मायभूमीसाठी
करू हातांची ढाल बाळ बांधूंनिया पाठी ||

अशी ही महाराष्ट्राची भूमी….जशी वीरांची तशीच संतांची. जसा मराठ्यांचा शौर्याचा भगवा झेंडा, तसाच पंढरीच्या वारकर्‍यांची भगवी पताकाच. तुकोबा म्हणतात –

“मऊ मेणाहूनही कठीन वज्रासही भेदू ऐसे अशी आम्हा मराठी माणसे”. ज्ञानेदेवांची “अमृतवाणी”, तुकोबांची “अभंगगाथा”, तुकोबांची “वज्रवाणी”, मोरोपंतांच्या नादमधूर “आर्या”, होनाजिबाळा, सगनभाऊ रामजोशी यांच्या “लावण्या”, प्रभाकरांसारख्या शाहीरचे मराठी “पोवडे” यांसारख्या कवींनी आपल्या महाराष्ट्राला कायम जागरूक ठेवले. अभंग गाताना तल्लीन होणारी मने शाहीरच्या डफावरच्या थापेने थाररून उठत. अशा या वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या कवींनी आपापल्या शब्दांत महाराष्ट्रची महती गायली.

कवी विंदा करंदीकर म्हणतात –

स्वतंत्रतेचा मंत्र ज्यांना गर्भामध्ये मिळे
तेच मराठी आम्ही, आम्ही सह्याद्रीचे सुळे
स्वराज्यातुनी पुढे चला रे, चला सुराज्याकडे

अशा हा शौर्याचा, भक्तीचा वारसा आपल्या सर्वांना देणारा महाराष्ट्र तुम्ही मुले या उद्याच्या महाराष्ट्रचे नवनिर्माते ठरणार आहात. ज्ञानाच्या, विज्ञानाच्या आधाराने तुम्हीच या महाराष्ट्राला भारताच्या गौरवस्थानी नेऊन ठेवणार आहात. कधी सोपानदेव चौधरी लिहितात –

उद्याचा नवा महाराष्ट्र ऐसा हवा
नव्या अंकुरसवे फुटाव्या तोडलेल्या शाखा, आणखी भराने
व्हावी उज्ज्वल इतिहासाची पाने
जावोत खोल मुळे लक्ष लक्ष
बहरावा असा महाराष्ट्र वृक्ष
या बहराला तेज चढावे मराठी मातीमधले !
याचे बी-बियाणे आहे तेजाचे
असा हा याचा विकास
भारताला प्रकाश व्हावा उद्याचा नवा महाराष्ट्र ऐसा व्हावा !

अशा थोर कवींच्या मनातला, महाराष्ट्र मुलांनो तुम्हाला उभा करायचाय. महाराष्ट्राला मिळालेला हा तेजस्वी वारसा तुम्हाला चालवायचाय. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सैन्यदलात जनरल थोरात, एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर, जनरल अरुणकुमार वैद्य अशांनी सैन्यदलात शौर्य दाखवत महाराष्ट्रचे नाव उज्ज्वल केले. देशाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणार्‍या चीन आक्रमणाच्या वेळी महाराष्ट्रचा सह्यकडा दिल्लीच्या मदतीला गेला. म्हणूनच सेनापती बापट म्हणतात –

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले l मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले ll
खरा वैरी पराधीनतेचा l महाराष्ट्र आधार या भारताचा ll १ ll
महाराष्ट्र तेजस्विता नाही मेली l
महाराष्ट्र तेजस्विता ही निजेली l
महाराष्ट्र तेजस्विता जगावाया l
चला या चला बंधुंनो ! या चला या ll २ ll

– मिलिंद सबनीस
शिक्षणविवेकवरून साभार.

मोल्सवर्थ, थॉमस कँडी आणि तर्खडकर

लोकमान्य टिळक, समाजसुधारक आगरकर, महात्मा ज्योतीबा फुले वगैरे आपले थोर पुढारी इंग्रजी शिकून त्या भाषेत प्रवीण झाले होते. या मराठी लोकांना इंग्रजी भाषा कुणामुळे समजली असेल? इंग्रजी आणि मराठी भाषांना एकमेकींना जोडणारा शब्दकोष लिहिण्याचे कठीण काम एका इंग्रजाने केले होते. त्याचे नाव आहे जेम्स थॉमस मोल्सवर्थ. त्याने मोठ्या चिकाटीने केलेल्या प्रयत्नांची माहिती देणारा हा लेख वॉट्सॅपवरून साभार. 

थॉमस कँडी यांनी जेम्स मोल्सवर्थ यांच्या इंग्लिश-मराठी शब्दकोशाच्या निर्मितीत बहुमोल मदत करून मराठी भाषेच्या पुनर्नवीकरणात अतिमहत्वाचे योगदान दिले. कँडी यांनी मराठी भाषेत विरामचिह्ने कशी व कोठे वापरावी याविषयी स्वतंत्र ग्रंथ लिहिला. विरामचिन्हांची परिभाषा नावाच्या या ग्रंथाचा लिखित मराठी भाषेच्या आत्ताच्या स्वरुपावर मोठा प्रभाव आहे. 

मराठी भाषेचे पाणिनि या नावाने प्रसिद्ध असलेल्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची माहितीही या पोस्टवर दिली आहे . दि.१६-१०-२०२०

या  सर्वांवर विकीपीडियावरून मिळालेली माहितीही खाली दिली आहे.

. . . . . . . . . . . . . 

नवी भर दि.१२-०८-२०२१ :जेम्स थॉमस मोल्सवर्थ

आज १३ जुलै, आज पहिला मराठी शब्दकोश तयार करणारे जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा स्मृतिदिन.
जन्म. १५ जून १७९५
जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काहीही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करुन घेतात काय, सगळेच अघटित आहे.
जेम्स थॉमस मोल्सवर्थ या ब्रिटिश अधिकाऱ्याचे मराठीवर अनंत उपकार आहेत!!!
मोल्सवर्थची मराठी-इंग्रजी डिक्शनरी प्रथम १८३१ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये छापली गेली.
आज १००० पानांचा मोल्सवर्थचा हा शब्दकोश मराठीतला सर्वांत मोठा शब्दकोश आहे. महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात.
मोल्सवर्थ या ब्रिटीश माणसाने आपल्याला ही मराठी डिक्शनरी तयार करुन दिली. इंग्रजांच्या काळात घडलेली त्या शब्दकोश निर्मितीची सत्यकथा अचंबित करणारी आणि आजच्या तरुणांना प्रेरणा देणारी अशी दोन्ही आहे. प्रत्येक मराठी माणसाला ती निदान माहीत तरी असायला हवी.
जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक ब्रिटीश लष्करी अधिकारी. शालेय शिक्षण व बालपण ब्रिटनमध्ये गेलेलं. त्याकाळी किशोरवयीन ब्रिटीश मुलांना लष्करात दाखल करण्याची पद्धत होती. जेम्स वयाच्या १६ व्या वर्षी ब्रिटीश लष्करात दाखल झाला. एप्रिल १८१२ मध्ये १७ व्या वर्षी त्याला भारतात पाठवण्यात आले. ब्रिटीश लष्कराच्या पद्धतीप्रमाणे भारतात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला मराठी आणि हिंदी भाषा शिकावी लागे. परीक्षा घेतल्या जात आणि त्यात पास होण्याची लष्करी सक्तीही असे. म्हणून खरंतर जेम्स त्या परीक्षांसाठी मराठी शिकू लागला आणि मराठी भाषेच्या चक्क प्रेमातच पडला.
मराठी शब्द जमवण्याचा छंद त्याला लागला. पुढे १८१४ मध्ये त्याला लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. १८१८ मध्ये त्याची बदली सोलापूरला झाली. तेव्हा तो २३ वर्षांचा होता. मराठीत
भाषांतर करण्यासाठी तो जे शब्द टिपून ठेवत होता त्याची संख्या दिवसेदिवस वाढत होती.
पुढे १८२४ मध्ये मात्र त्याची बदली गुजरातमधील खेडा भागात झाली. महाराष्ट्रातील मराठी वातावरणाची सवय झालेल्या मोल्सवर्थला गुजरातमध्ये करमेना. त्याने पुढल्या काही महिन्यांत ब्रिटीश सेनेकडे मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार करण्याचा प्रस्ताव पाठवला आणि महाराष्ट्रात बदलीही मागितली. शब्दकोशासाठी सहकाऱ्यांचा पगार, स्टेशनरी वगैरेंचा मिळून एकूण खर्च २००० रुपये येईल त्यास मंजुरी मिळावी अशी प्रस्तावात विनंती होती. पण ब्रिटीश सेनेने त्याचा प्रस्ताव फेटाळला. इंग्रज सरकारला मराठी शब्दकोशाशी कसले देणेघेणे ? त्यांना आपले साम्राज्य सांभाळायचे आणि त्यासाठी लढाया करायच्या एवढेच माहिती.
मोल्सवर्थच्या प्रस्तावावर ब्रिटीश सेनेचे म्हणणे होते की लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी यांनी एक मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार केला आहे. तो पुरेसा आहे. म्हणून प्रस्ताव नामंजूर.
पण मोल्सवर्थ तर मराठी शब्दकोशाच्या कल्पनेने झपाटला होता. गुजरातमध्ये राहून मराठी शब्दकोश होणे शक्य नव्हते. आणि त्याची महाराष्ट्रात तर बदली होत नव्हती. शेवटी कंटाळून त्याने एक धमकी आणि एक ऑफर ब्रिटिशांना दिली. धमकी अशी की, बदली झाली नाही तर मी लष्करी नोकरीच सोडून देईन. ऑफर अशी की शब्दकोशासाठी रजा दिली तर त्याला मिळणारे सर्व भत्ते तो सोडून द्यायला तयार आहे. एवढं टोक गाठल्यावर त्याची बदली मुंबईत करण्यांत झाली. शब्दकोश तयार करण्याची परवानगीही त्याला देण्यांत आली.
मोल्सवर्थवर अधिकारी म्हणून लष्करी जबाबदाऱ्या होत्या, त्यात आणखी एक भर म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा (BNES) कारभार पाहण्याचं कामही त्याला दिलं गेलं. बीएनईएस संस्थेत त्याची भेट मराठी भाषा उत्तम जाणणाऱ्या काही शास्त्री मंडळींशी झाली.
सोलापूरला असताना त्याची ओळख थॉमस कँडी यांच्याशी झाली होती. थॉमस कँडी आणि त्यांचा जुळा भाऊ जॉर्ज दोघेही मराठी उत्तम जाणणारे होते. थॉमस तर संस्कृत पाठशाळेचे प्राचार्य म्हणून काम करीत असत.
कँडी बंधू एप्रिल १८२६ मध्ये मुंबईला आले. आता मराठी शब्दकोशाचं काम वेगात सुरु झालं. पण मुंबईत पावसाने थैमान घातलं. त्यामुळे मुंबई सोडून कोकणात जावं असं त्यांनी ठरवलं. त्यानुसार शब्दकोशाचं पुढलं काम बाणकोट आणि दापोली येथे झालं.
१८२८ च्या डिसेंबरात शब्दकोशाची अंतिम प्रत तयार झाली. बीएनईएस संस्थेचा लिथो छापखाना होता. तिथे शब्दकोशाची छपाई करावी असं ठरलं. मोल्सवर्थला उपलब्ध असलेले मराठी टाईप आवडले नव्हते. त्यामुळे त्याने नवा आणखी सुबक टाईप शब्दकोशासाठी करुन घेण्याचे ठरवले.
त्यावेळी टाईप फक्त कलकत्त्यात (सध्याचं कोलकाता) तयार होत. काही आठवड्यांत कलकत्त्याहून नवे टाईपही आले. तयार झालेला शब्दकोश २५,००० शब्दांचा होता. कलकत्त्याहून टाईप यायला जो वेळ लागला तेवढ्या वेळात मोल्सवर्थने आणखी १५,००० शब्द जमा केले आणि शब्दकोशातील शब्दांची संख्या ४०,००० केली. शब्दकोशाला नाव दिले ‘महाराष्ट्र भाषेचा कोश’.
छपाई पूर्ण होऊन प्रती हाती यायला १८३१ साल उजाडले. मोल्सवर्थने काही प्रती एका पत्रासोबत ब्रिटीश सेनाप्रमुखांकडे पाठवल्या. पत्रात लिहिले की “कामाचा आवाका, आणि झालेल्या कामाचा दर्जा (याबाबत मी बोलण्यापेक्षा) प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कल्पना येईल.
लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडींनी तयार केलेला मराठी शब्दकोश ८००० शब्दांचा होता. मोल्सवर्थचा ४०,००० शब्दांचा. पण सरळ कौतुक करतील तर ते ब्रिटीश कसले ? शब्दकोशाचा दर्जा ठरवण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली. त्यात लेफ्टनंट कर्नल केनेडी, लेफ्टनंट जॉर्ज पोप आणि रॉबर्ट कॉटन मनी हे तीन सदस्य नेमले.
केनेडींच्या मते मराठी ही फक्त एक बोली भाषा होती, आणि त्यात जे मोजके शब्द आहेत त्यांचा कोश त्यांनी तयार केलेला होता. नव्या कोशाला मुळातच त्यांचा विरोध होता. त्यांनी मत दिले की मोल्सवर्थने संस्कृत, पर्शियन, फारशी, अरबी वगैरे शब्दांचा भरणा करून शब्दसंख्या वाढवली आहे.
मराठीत एवढे शब्दच नाहीत. जॉर्ज पोप यांनीही केनेडींचीच री ओढली. पण रॉबर्ट मनी यांनी मोल्सवर्थचं कौतुक केलं. भारतात आजपर्यंत झालेल्या छपाईत ही छपाई उजवी असल्याचे सांगून त्यांनी लिहिलं की “अशा मोठ्या शब्दकोशाची विद्यार्थ्यांचा विचार करता गरजच होती. शब्दकोश समृद्ध आणि अचूक आहे. मऱ्हाठा (मराठी) भाषेचे विशाल ज्ञान त्यात आहे. हा ग्रंथ गौरवास पात्र आहे.”
त्रिसदस्य समितीची उलट सुलट मते पाहून इंग्रज सरकार बुचकळ्यात पडले. त्यांनी आता १८ सदस्यांची एक समिती मोल्सवर्थ डिक्शनरीचे मूल्यमापन करण्यासाठी नेमली. त्या समितीने मात्र एकमुखाने मोल्सवर्थच्या कामाची वाखाणणी केली.
ही डिक्शनरी नसती तर किती तरी मराठी शब्द युरोपियनाना कधीच समजले नसते असा अभिप्राय बहुतेक सदस्यांनी दिला. पाठोपाठ सप्टेंबर १८३१ मध्ये इंग्रज सरकारनी मोल्सवर्थची प्रशंसा करणारे पत्र त्याला पाठवले. मोल्सवर्थने आता इंग्रजी – मराठी डिक्शनरीही तयार करावी असं इंग्रज सरकारने सुचवलं आणि त्या खर्चास मंजुरीही दिली.
मोल्सवर्थने कँडी यांच्या मदतीने इंग्रजी – मराठी डिक्शनरीचे काम सुरुही केले. पण १८३२ च्या सुमारास त्याला प्रकृतीचा त्रास होऊ लागला. जिद्दीने मराठी – इंग्रजी शब्दकोशाचे काम करताना त्याचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले होते.
आयुष्यातली इतकी सारी वर्ष मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार करण्यांत गेली होती. तो आता ३७ वर्षांचा झाला होता. लग्न करायचं राहूनच गेलं होतं. थंड हवेच्या ठिकाणी गेलं तर तब्येत सुधारेल म्हणून तो उटीजवळच्या भागात दक्षिण भारतात काही दिवस जाऊन राहिला. पण तब्येत त्याला साथच देत नव्हती. नाईलाजाने तो १८३६ मध्ये इंग्लंडला परत गेला.
१८३६ ते १८५१ ही १५ वर्षे मोल्सवर्थ मराठी आणि महाराष्ट्रापासून दूर साता समुद्रापार इंग्लंडमध्ये राहिला. दरम्यान शब्दकोशाची पहिली आवृत्ती संपत आली होती. दुसरी सुधारित आवृत्ती तयार करायची होती.
इंग्रज सरकारने १५ वर्षांनंतर मोल्सवर्थला विनंती केली की, दुसरी आवृत्ती तयार करायला भारतात या, मराठीसाठी तुमची गरज आहे. त्या विनंतीला मान देऊन मोल्सवर्थ १८५१ साली पुन्हा भारतात आला. वय ५६ वर्षांचे होते. पण तब्येत सुधारली होती.
त्याला सर्वांशी उत्साहाने उत्कृष्ट मराठीत बोलताना पाहून लोक तोंडात बोट घालत होते. १८५१ ते १८५७ ही सात वर्षे मोल्सवर्थने मराठी – इंग्रजी शब्दकोशासाठी पुन्हा वाहून घेतले. हे काम त्याने पुणे आणि महाबळेश्वर येथे राहून केले.
तयार झालेल्या नव्या सुधारित शब्दकोशात आता ६०,००० मराठी शब्द होते. १८५७ साली हा ९५२ पानांचा सुधारित मोल्सवर्थकृत मराठी इंग्रजी शब्दकोश प्रकाशित झाला. आज आपण हीच आवृत्ती पहात असतो. अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीने ही डिक्शनरी इंटरनेटवर (सर्चसह) उपलब्ध केली आहे हे आज बहुतेकांना माहित आहे.
मोल्सवर्थ १८६० मध्ये इंग्लंडमध्ये परत गेला. शब्दकोशाच्या कामात मोल्सवर्थला मदत करणारी कितीतरी शास्त्री मंडळी होती. त्यात अलिबाग, नागावची बरीच होती. ते सारे मोल्सवर्थला मोलेसर शास्त्री म्हणत. काही जणांनी तर मोरेश्वर शास्त्री असेच बारसे करून टाकले होते.
आजही महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. मोल्सवर्थच्या कार्याचा गौरव करताना विश्वकोशकर्ते पं. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहीले, “‘मोल्सवर्थने मोठ्या आकाराचा पहिला मराठी शब्दकोश तयार केला. त्याने त्याच्या या शब्दकोशाच्या प्रचंड कामासाठी कितीतरी विद्वानांना प्रेरित केले आणि त्या कामात सहभागी करून घेतले. स्वत: मोल्सवर्थनेही या शब्दकोशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. मराठी भाषा आणि महाराष्ट्र, मोल्सवर्थचे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही.’
जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचे निधन १३ जुलै १८७१ रोजी झाले.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.   …  संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

. . . . . .  फेसबुकवरून साभार  दि.१४-०७-२०२१

—————————————————–

जेम्स थॉमस मोल्सवर्थ या ब्रिटिश अधिकाऱ्याचे मराठीवर अनंत उपकार आहेत!!!

मोल्सवर्थचा मराठी – इंग्रजी शब्दकोश ऐकूनही माहीत नाही असा मराठी माणूस सापडणं कठीण. पण हा मोल्सवर्थ नेमका कोण हे माहीत असणारी मराठी माणसंही तशी कमीच. मोल्सवर्थची मराठी-इंग्रजी डिक्शनरी प्रथम १८३१ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये छापली गेली. आजही सुमारे १००० पानांचा मोल्सवर्थचा हा शब्दकोश मराठीतला सर्वांत मोठा शब्दकोश आहे. महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. मोल्सवर्थ ह्या ब्रिटीश माणसाने आपल्याला ही डिक्शनरी तयार करून दिली. इंग्रजांच्या काळात घडलेली त्या शब्दकोश निर्मितीची सत्यकथा अचंबित करणारी आणि आजच्या तरूणांना प्रेरणा देणारी अशी दोन्ही आहे. प्रत्येक मराठी माणसाला ती निदान माहीत तरी असायला हवी.

जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक ब्रिटीश लष्करी अधिकारी. जन्म १५ जून १७९५ चा. शालेय शिक्षण व बालपण ब्रिटनमध्ये गेलेलं. त्याकाळी किशोरवयीन ब्रिटीश मुलांना लष्करात दाखल करण्याची पद्धत होती. जेम्स वयाच्या १६ व्या वर्षी ब्रिटीश लष्करात दाखल झाला. एप्रिल १८१२ मध्ये १७ व्या वर्षी त्याला भारतात पाठवण्यांत आले. ब्रिटीश लष्कराच्या पद्धतीप्रमाणे भारतात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला मराठी आणि हिंदी भाषा शिकावी लागे. त्याच्या परिक्षा घेतल्या जात, आणि त्यात पास होण्याची लष्करी सक्तीही असे. जेम्स त्या परिक्षांसाठी मराठी शिकू लागला आणि मराठी भाषेच्या चक्क प्रेमातच पडला. मराठी शब्द जमवण्याचा छंद त्याला लागला. पुढे १८१४ मध्ये त्याला लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. १८१८ मध्ये त्याची बदली सोलापूरला झाली. तेव्हा तो २३ वर्षांचा होता. मराठीत भाषांतर करण्यासाठी तो जे शब्द टिपून ठेवत होता त्याची संख्या दिवसेदिवस वाढत होती. पुढे १८२४ मध्ये त्याची बदली गुजरातमध्ये खेडा भागात झाली. मराठी वातावरणाची सवय झालेल्या मोल्सवर्थला गुजरातमध्ये करमेना. त्याने पुढल्या काही महिन्यांत ब्रिटीश सेनेकडे मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार करण्याचा प्रस्ताव पाठवला आणि महाराष्ट्रात बदलीही मागितली. शब्दकोशासाठी सहकाऱ्यांचा पगार, स्टेशनरी वगैरेंचा मिळून एकूण खर्च २००० रूपये येईल त्यास मंजुरी मिळावी अशी प्रस्तावात विनंती होती. पण ब्रिटीश सेनेने त्याचा प्रस्ताव फेटाळला. इंग्रज सरकारला मराठी शब्दकोशाशी कसले देणेघेणे ? त्यांना आपले साम्राज्य सांभाळायचे आणि त्यासाठी लढाया करायच्या एवढेच माहिती. मोल्सवर्थच्या प्रस्तावावर ब्रिटीश सेनेचे म्हणणे होते की लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी यांनी एक मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार केला आहे. तो पुरेसा आहे. सबब, प्रस्ताव नामंजूर.

पण मोल्सवर्थ तर मराठी शब्दकोशाच्या कल्पनेने झपाटला होता. गुजरातमध्ये राहून मराठी शब्दकोश होणे शक्य नव्हते. वारंवार विनंती अर्ज, स्मरणपत्र पाठवूनही त्याची महाराष्ट्रात बदली होत नव्हती. शेवटी कंटाळून त्याने एक धमकी आणि एक ऑफर ब्रिटीशांना दिली. धमकी अशी की बदली झाली नाही तर मी लष्करी नोकरीच सोडून देईन. ऑफर अशी की शब्दकोशासाठी रजा दिली तर त्याला मिळणारे सर्व भत्ते तो सोडून द्यायला तयार आहे. एवढं टोक गाठल्यावर त्याची बदली मुंबईत करण्यांत झाली. शब्दकोश तयार करण्याची परवानगीही त्याला देण्यांत आली. मोल्सवर्थवर अधिकारी म्हणून लष्करी जबाबदाऱ्या होत्या, त्यात आणखी एक भर म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा (BNES) कारभार पाहण्याचं कामही त्याला दिलं गेलं. बीएनईएस संस्थेत त्याची भेट मराठी भाषा उत्तम जाणणाऱ्या काही शास्त्री मंडळींशी झाली. सोलापूरला असताना त्याची ओळख थॉमस कँडी यांच्याशी झाली होती. थॉमस कँडी आणि त्यांचा जुळा भाऊ जॉर्ज दोघेही मराठी उत्तम जाणणारे होते. थॉमस तर संस्कृत पाठशाळेचे प्राचार्य म्हणून काम करीत असत. दोघा कँडी बंधूंना मुंबईला बीएनईएस मध्ये पाठवण्यांत यावं ही मोल्सवर्थची विनंतीही ब्रिटीशांनी मान्य केली.

कँडी बंधू एप्रिल १८२६ मध्ये मुंबईला आले. आता मराठी शब्दकोशाचं काम वेगात सुरू झालं. पण जून महिन्यांत मुंबईत पावसाने थैमान घातलं. हवामान पार बदलून गेलं. कँडी आणि मोल्सवर्थ सगळेच त्या पावसाने हैराण झाले. मुंबई सोडून कोकणात जावं असं त्यांनी ठरवलं. त्यानुसार शब्दकोशाचं पुढलं काम बाणकोट आणि दापोली येथे झालं. १८२८ च्या डिसेंबरात शब्दकोशाची अंतिम प्रत तयार झाली. बीएनईएस संस्थेचा लिथो छापखाना होता. तिथे शब्दकोशाची छपाई करावी असं ठरलं. मोल्सवर्थला उपलब्ध असलेले मराठी टाईप आवडले नव्हते. त्यामुळे त्याने नवा आणखी सुबक टाईप शब्दकोशासाठी करून घेण्याचे ठरवले. त्यावेळी टाईप फक्त कलकत्त्यात तयार होत. काही आठवड्यांत कलकत्त्याहून नवे टाईपही आले. तयार झालेला शब्दकोश २५,००० शब्दांचा होता. कलकत्त्याहून टाईप यायला जो वेळ लागला तेवढ्या वेळात मोल्सवर्थने आणखी १५,००० शब्द जमा केले आणि शब्दकोशातील शब्दांची संख्या ४०,००० केली. शब्दकोशाला नाव दिले ‘महाराष्ट्र भाषेचा कोश’. छपाई पुर्ण होऊन प्रती हाती यायला १८३१ साल उजाडले. मोल्सवर्थने काही प्रती एका पत्रासोबत ब्रिटीश सेनाप्रमुखांकडे पाठवल्या. पत्रात लिहीले की “कामाचा आवाका, आणि झालेल्या कामाचा दर्जा (याबाबत मी बोलण्यापेक्षा) प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कल्पना येईल. लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडींनी तयार केलेला मराठी शब्दकोश ८००० शब्दांचा होता. मोल्सवर्थचा ४०,००० शब्दांचा. पण सरळ कौतुक करतील तर ते ब्रिटीश कसले ? शब्दकोशाचा दर्जा ठरवण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली. त्यात लेफ्टनंट कर्नल केनेडी, लेफ्टनंट जॉर्ज पोप, आणि रॉबर्ट कॉटन मनी हे तीन सदस्य नेमले. केनेडींच्या मते मराठी ही फक्त एक बोली भाषा होती, आणि त्यात जे मोजके शब्द आहेत त्यांचा कोश त्यांनी तयार केलेला होता. नव्या कोशाला मुळातच त्यांचा विरोध होता. त्यांनी मत दिले की मोल्सवर्थने संस्कृत, पर्शियन, फारशी, अरबी वगैरे शब्दांचा भरणा करून शब्दसंख्या वाढवली आहे. मराठीत एवढे शब्दच नाहीत. जॉर्ज पोप यांनीही केनेडींचीच री ओढली. पण रॉबर्ट मनी यांनी मोल्सवर्थचं कौतुक केलं. भारतात आजपर्यंत झालेल्या छपाईत ही छपाई उजवी असल्याचे सांगून त्यांनी लिहीलं की “अशा मोठ्या शब्दकोशाची विद्यार्थ्यांचा विचार करता गरजच होती. शब्दकोश समृद्ध आणि अचूक आहे. मऱ्हाठा (मराठी) भाषेचे विशाल ज्ञान त्यात आहे. हा ग्रंथ गौरवास पात्र आहे.”

त्रिसदस्य समितीची उलट सुलट मते पाहून इंग्रज सरकार बुचकळ्यात पडले. त्यांनी आता १८ सदस्यांची एक समिती मोल्सवर्थ डिक्शनरीचे मूल्यमापन करण्यासाठी नेमली. त्या समितीने मात्र एकमुखाने मोल्सवर्थच्या कामाची वाखाणणी केली. ही डिक्शनरी नसती तर किती तरी मराठी शब्द युरोपियनाना कधीच समजले नसते असा अभिप्राय बहुतेक सदस्यांनी दिला. पाठोपाठ सप्टेंबर १८३१ मध्ये इंग्रज सरकारनी मोल्सवर्थची प्रशंसा करणारे पत्र त्याला पाठवले. मोल्सवर्थने आता इंग्रजी – मराठी डिक्शनरीही तयार करावी असं इंग्रज सरकारने सुचवलं आणि त्या खर्चास मंजुरीही दिली.

मोल्सवर्थने कँडी यांच्या मदतीने इंग्रजी – मराठी डिक्शनरीचे काम सुरूही केले. पण १८३२ च्या सुमारास त्याला प्रकृतीचा त्रास होऊ लागला. जिद्दीने मराठी – इंग्रजी शब्दकोशाचे काम करताना त्याचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले होते. आयुष्यातली इतकी सारी वर्ष मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार करण्यांत गेली होती. तो आता ३७ वर्षांचा झाला होता. लग्न करायचं राहूनच गेलं होतं. थंड हवेच्या ठिकाणी गेलं तर तब्येत सुधारेल म्हणून तो उटीजवळच्या भागात दक्षिण भारतात काही दिवस जाऊन राहिला. पण तब्येत त्याला साथच देत नव्हती. नाईलाजाने तो १८३६ मध्ये इंग्लंडला परत गेला.

१८३६ ते १८५१ ही १५ वर्षे मोल्सवर्थ मराठी आणि महाराष्ट्रापासून दूर साता समुद्रापार इंग्लंडमध्ये राहिला. दरम्यान शब्दकोशाची पहिली आवृत्ती संपत आली होती. दुसरी सुधारित आवृत्ती तयार करायची होती. इंग्रज सरकारने १५ वर्षांनंतर मोल्सवर्थला विनंती केली की दुसरी आवृत्ती तयार करायला भारतात या, मराठीसाठी तुमची गरज आहे. त्या विनंतीला मान देऊन मोल्सवर्थ १८५१ साली पुन्हा भारतात आला. वय ५६ वर्षांचे होते. पण तब्येत सुधारली होती. त्याला सर्वांशी उत्साहाने उत्कृष्ट मराठीत बोलताना पाहून लोक तोंडात बोट घालत होते. १८५१ ते १८५७ ही सात वर्षे मोल्सवर्थने मराठी – इंग्रजी शब्दकोशासाठी पुन्हा वाहून घेतले. हे काम त्याने पुणे आणि महाबळेश्वर येथे राहून केले. तयार झालेल्या नव्या सुधारित शब्दकोशात आता ६०,००० मराठी शब्द होते. १८५७ साली हा ९५२ पानांचा सुधारित मोल्सवर्थकृत मराठी इंग्रजी शब्दकोश प्रकाशित झाला. आज आपण हीच आवृत्ती पहात असतो. अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीने ही डिक्शनरी इंटरनेटवर (सर्चसह) उपलब्ध केली आहे हे आज बहुतेकांना माहित आहे.

मोल्सवर्थ १८६० मध्ये इंग्लंडमध्ये परत गेला. शब्दकोशाच्या कामात मोल्सवर्थला मदत करणारी कितीतरी शास्त्री मंडळी होती. त्यात अलिबाग नागाव कडली बरीच होती. ते सारे मोल्सवर्थला मोलेसर शास्त्री म्हणत. काही जणांनी तर मोरेश्वर शास्त्री असेच बारसे करून टाकले होते. मोल्सवर्थ १३ जुलै १८७२ रोजी कलीफ्टन येथे वारला. असं म्हणतात की तो गेल्याचे कळल्यावर आपल्याकडल्या अनेक शास्त्र्यांनी मोलेसर शास्त्र्याचा श्राध्दपक्षही केला होता.
जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काहीही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करून घेतात काय, सगळेच अघटित आहे. अगदी मोल्सवर्थइतकं समर्पण आज मिळण्याची अपेक्षा नाही, पण निदान त्याच्याकडून प्रेरणा घेण्याइतपत तरी क्षमता आजच्या मराठीजनांमध्ये असायला हवी. असावी.

मोल्सवर्थच्या कार्याचा गौरव करताना विश्वकोशकर्ते पं. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहीले, “‘मोल्सवर्थने मोठ्या आकाराचा पहिला मराठी शब्दकोश तयार केला. त्याने त्याच्या या शब्दकोशाच्या प्रचंड कामासाठी कितीतरी विद्वानांना प्रेरित केले आणि त्या कामात सहभागी करून घेतले. स्वत: मोल्सवर्थनेही या शब्दकोशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. मराठी भाषा आणि महाराष्ट्र, मोल्सवर्थचे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही.’
वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्र मोल्सवर्थचे ऋण विसरला आहे.

(हा लेख अज्ञात लेखकाचा आहे, परंतु उपयोगी माहिती असल्याने आम्ही इथे तो प्रकाशित करत आहोत.)

शेअरिंगचं सौजन्य : श्रीराम मोघे


विकीपीडियावरील माहिती
https://mr.wikipedia.org/s/1g05

जेम्स थॉमस मोल्सवर्थ
जन्म इ.स. १७९५
मृत्यू जुलै १३, इ.स. १८७२
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
वडील रिचर्ड मोल्सवर्थ
आई कॅथेरीन कॉब
जेम्स थॉमस मोल्सवर्थ (इ.स. १७९५ – जुलै १३, इ.स. १८७२ हे पहिल्या मराठी-इंग्लिश आणि इंग्लिश-मराठी बृहद्‌ (मोठ्या) स्वरूपातील शब्दकोशांचे लेखक व संपादक होते.

जीवन
मोल्सवर्थचा जन्म इ.स. १७९५मध्ये झाला. त्यांना लंडनच्या सेंट गाईल्स चर्चमध्ये १५ जून १७९५ रोजी बाप्तिस्मा दिल्याची नोंद आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी जेम्स ब्रिटिश सैन्यात दाखल झाला. ३ एप्रिल १८१२ रोजी सैन्यातल्या एनसाइन या कनिष्ठ अधिकारी पदावर जेम्स मोल्सवर्थची नेमणूक करून त्याला भारतात पाठविण्यात आले. ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना त्या काळी मराठी व हिंदुस्थानी (हिंदी) भाषा सक्तीने शिकाव्या लागत, एवढेच नव्हे तर त्या भाषांच्या परीक्षाही द्याव्या लागत. त्यानुसार मोल्सवर्थने मराठी व हिंदी या दोन्ही भाषा शिकायला सुरुवात केली. १८१२ साली मोल्सवर्थचे वय फक्त १७ होते. आपली मातृभूमी इंग्लंड सोडून सातासमुद्रापलीकडे भारतात, तेही लष्करातल्या नोकरीत आलेल्या १७ वर्षाच्या युवकाने १८१२ पासून पुढे वयाच्या ७७ व्या वर्षी मृत्यूला सामोरे जाईपर्यंत मराठीचा अभ्यास सोडला नाही. ७७ वर्षाच्या आयुष्यातली ६० वर्षे मराठीचा ध्यास घेतलेला हा ब्रिटिश माणूस शेवटपर्यंत अविवाहित होता.

शब्दकोशांचे स्वरूप
जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक इंग्रज सैनिकी अधिकारी.मोल्सवर्थ केवळ मराठी भाषा शिकला नाही, तर त्याने त्यावर प्रभुत्व मिळवले. त्याने मराठी-इंग्रजी शब्दकोश संपादित केला. ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशांसाठीही तो उपयोगी पडेल एवढ्या दर्जेदार शब्दकोश निर्मिणारा मोल्सवर्थ मराठी भाषेने झपाटला होता. शब्दकोशाची पान संख्या ९१९ होती. भाषा आणि लष्कर हे दोन्ही एका आयुष्यात सामावणारा मोल्सवर्थ शब्दकोशाच्या पहिल्या पानावर इंग्रजीत एक ब्रीदवाक्य आहे. ते असे : ‘Language is the armoury of the human mind, and it contains at once the trophies of the past, and the weapons of its future conquests.’ (भाषा हे मानवी मनाचे शस्त्रागार आहे. या शस्त्रागारात भूतकाळातील पदके आणि करंडक जसे सामावलेले आहेत, तशीच त्यात भविष्यकाळातील विजयांची शस्त्रेही सामावलेली आहेत.) भाषा आणि शस्त्र यांचा विचार मोल्सवर्थ एकाच वेळी कसा करीत होता हे शब्दकोशाच्या ब्रीदवाक्यावरून पटकन लक्षात येते.

मोल्सवर्थचा मूळ मराठी-इंग्रजी शब्दकोश दिवाळी अंकाच्या आकारातील सुमारे हजारभर पानांचा होता. अक्षरे (टाईप) अतिशय बारीक ठेवूनही तो एक हजार पानांचा होता. मोल्सवर्थने त्या शब्दकोशात साठ हजार मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत दिले.

मराठीच्या शब्दकोशासाठी लहान-मोठे प्रयत्न काही ब्रिटिशांनी मोल्सवर्थच्या अगोदरही केले होते. पण मोल्सवर्थचा कोश सर्व बाबतीत सरस ठरला. मोल्सवर्थच्या या मराठी-इंग्रजी शब्दकोशाला मुंबईच्या विल्सन महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. जॉन विल्सन यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली होती. हे डॉ. जॉन विल्सन मराठी भाषेचे अभ्यासक होते. त्यांच्या प्रस्तावनेत मराठी भाषेबद्दलचे अनेक अभ्यासपूर्ण संदर्भ आढळतात. एके ठिकाणी ते लिहितात ‘मराठीत एकूण (सुमारे) तीन हजार म्हणी आहेत. त्या म्हणी या (मोल्सवर्थ) शब्दकोशात फार मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत.’ शब्दांचे अर्थ देताना मोल्सवर्थने मराठी म्हणींचे आणि वाक्प्रचारांचे अर्थही सांगितले आहेत.
———————————————–

थॉमस कँडी

थॉमस कँडी

इंडियन पीनल कोडचे ज्यांनी मराठीत भाषांतर केले.मराठीत विरामचिन्हे वापरण्यास ज्यांनी प्रथम सुरूवात केली त्या मेजर थॉमस कॅन्डी यांचा आज जन्मदिवस १३ डिसेंबर १८०४ – ते मराठी इंग्रजी कोशकार व शिक्षणतज्ञ होते ,त्याचं जन्म ब्रिटन मध्ये झाला ,ते १८२२ मध्ये भारतात आले ख्रिस्ती धर्म कसा उत्पन्न झाला आणि कसा पृथ्वीवर वाढला (The Origin and Growth of Christianity on Earth, 1832)हे मराठीतून त्यांनी पहिले पुस्तक लिहिले २६ फेब्रुवारी १८७७रोज महाबळेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला

https://mr.wikipedia.org/s/1uar

मेजर थॉमस कँडी (१३ डिसेंबर, इ.स. १८०४:इंग्लंड – २६ फेब्रुवारी, इ.स. १८७७:महाबळेश्वर, महाराष्ट्र, भारत) हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील अधिकारी, शिक्षक आणि कोषकार होते. यांनी मराठी भाषेच्या पुनर्नवीकरणात अतिमहत्वाचे योगदान दिले.[१]

कँडी व त्यांचा जुळा भाऊ जॉर्ज यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माग्डालेन कॉलेजमध्ये भारतीय भाषांचे शिक्षण घेतले होते. यानंतर दोघांची नेमणूक ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात क्वार्टरमास्टर म्हणून झाली. इ.स. १८२२मध्ये हे भारतात आले. येथे असताना त्यांनी अनेक पायदळ रेजिमेंटांमध्ये दुभाषाचे काम केले. १८३०च्या दशकात दोघा भावांनी कॅप्टन जेम्स मोल्सवर्थ यांच्या इंग्लिश-मराठी शब्दकोशाच्या निर्मितीत बहुमोल मदत केली. मोल्सवर्थ इंग्लंडला परतल्यावर थॉमस कँडी यांनी १८०४०-४७ दरम्यान हे काम नेटाने पूर्ण केले.

शब्दकोशाचे काम पूर्ण झाल्यावर जॉर्ज कँडी इंग्लंडला परतले परंतु थॉमस महाराष्ट्रातच राहिले. त्यांनी आपल्या ख्रिस्ती धर्माच्या शाळांसाठी मराठीतून पाठ्यपुस्तके तयार केली. याशिवाय त्यांनी अनेक त्याकाळच्या महत्वाच्या ग्रंथांची मराठीत भाषांतरे केली. यात इंडियन पीनल कोड आणि इंडियन सिव्हिल प्रोसिजर कोड यांचाही समावेश होता. आपल्या कामाबरोबरच त्यांनी इतर अनेक इंग्लिश-मराठी भाषांतरकारांची कामे तपासून सुधारली व त्यांना सल्लागार म्हणून मदत केली. ब्रिटिश सरकारने १८६०च्या दशकात त्यांची मुख्य सरकारी भाषांतरकार पदावर नेमणूक केली.[२]

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेत विरामचिह्नांचा उपयोग होत नसे.[ दुजोरा हवा] कँडी यांनी मराठी भाषेत विरामचिह्ने कशी व कोठे वापरावी याविषयी स्वतंत्र ग्रंथ लिहिला. विरामचिन्हांची परिभाषा नावाच्या या ग्रंथाचा लिखित मराठी भाषेच्या आत्ताच्या स्वरुपावर मोठा प्रभाव आहे. कँडी यांच्या समग्र लिखाणाचा एकोणिसाव्या शतकातील मराठी भाषेवरच एकूण मोठा प्रभाव दिसून येतो.[१]

कँडी हे पूना संस्कृत कॉलेजचे मुख्याधिकारी होते. याशिवाय ते डेक्कन कॉलेजचे मुख्याध्यापकही होते.

२६ फेब्रुवारी, इ.स. १८७७ रोजी महाबळेश्वर येथे त्यांचे निधन झाले.

*****

नवी भर दि. २६-०२-२०२२ :

मराठीभाषा पंडित मेजर थॉमस कॅन्डी

मराठीत विरामचिन्हे वापरण्यास ज्यांनी प्रथम सुरूवात केली, तसेच एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इंग्रजी-मराठी कोशकार व शिक्षणतज्ज्ञ,ज्यांनी इंडियन पीनल कोडचे ज्यांनी मराठीत भाषांतर केले त्या मेजर थॉमस कॅन्डी यांचा आज जन्मदिवस.त्यानिमित्त माझा दैनिक प्रभात पुणे दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ मधील लेख त्यांचा जन्म ब्रिटनमधील ईस्ट नॉयले (व्हिल्टशर, ) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबातमध्ये १३ डिसेंबर १८०४ रोजी झाला. त्यांनी मॅग्डेलेन कॉलेज (ऑक्सफर्ड विद्यापीठ) येथे शिक्षण घेतले.
ते वर्ष१८२२ मध्ये भारतात आले. थॉमस आयुष्याच्या अखेर पर्यंत पंचावन्न वष्रे भारतातच राहिले. वर्ष १८३२ मराठीतून त्यांनी पहिले पुस्तक लिहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोलअभ्यास केला.
तसेच त्यांनी भारतात आलेवर ईतर भारतीय भाषांचे अभ्यासपूर्वक ज्ञान संपादन केल्यामुळे त्यांची ईस्ट इंडिया कंपनीतील पायदळात दुभाषी व क्वार्टर मास्टर ह्या पदांवर नियुक्ती करण्यात आली.त्यांनी भारतातील ब्रिटिश लष्करात लेफ्टनंट, कॅप्टन व मेजर ह्या हुद्द्यांवर काम केले.जेम्स मोल्सवर्थ इंग्रजी-मराठी कोश तयार करीत होते,त्यांनी थॉमस कॅन्डी यांना साहाय्यक म्हणून घेतले. दरम्यान मोल्सवर्थ हे इंग्लंडला गेल्यामुळे हे काम लांबणीवर पडले. या वेळी कँडी यांनी सरकारी नियमावलीतील मराठी भाषांतरातील काही चुका दुरुस्त केल्या. वर्ष १८३५ मध्ये सरकारने हिंदु कॉलेज व दक्षिणेकडील सरकारी शाळा यांचा सुपरिटेंडेंट म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यांनी जेम्स मोल्सवर्थ यांचे अपूर्ण राहिलेल्या इंग्रजी-मराठी कोशाचे काम स्वीकारले आणि परिश्रम घेऊन आपल्या भावाच्या मदतीने सहा-सात वर्षांत (१८४० ते ४७) पूर्ण केले. यासाठी त्यांना पुण्याच्या पाठशाळेतील अनेक विद्वान पंडितांचे साहाय्य मिळाले; कारण त्यांच्याकडे वर्ष १८३७ मध्येच पुणे पाठशाळेच्या मुख्याध्यापकाचे कामही आले होते. कोशाच्या कामानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष मराठी पाठ्यपुस्तके व इंग्रजी ग्रंथांचे सुगम भाषांतर यांवर केंद्रित केले.
मराठी लिखाणात १९व्या शतकापर्यंत विरामचिन्हांशिवाय लेखन होत असे. मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही ‘दंड’ सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. त्यांनी ‘विरामचिन्हांची भाषा’हे पुस्तक लिहून त्यांची कशी आवश्यकता आहे हे पटवून दिले दिले. मेजर थॉमस कँडी यांनी मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. विरामचिन्हामुळे मराठी लेखन वाचन आणि भाषणही समृद्ध झाले. ब्रिटिश सरकारने थॉमस यांची १८६० मधे प्रमुख भाषांतरकार या पदावर नेमणूक केली. पुणे येथील संस्कृत कॉलेजचे ते मुख्याधिकारी व डेक्कन कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पहिले. दक्षिण महाराष्ट्रातील शाळांचे ते अधीक्षकही होते. ब्रिटिश सरकारकडे भारतीय भाषांमधील अनुवाद करण्याची पुस्तके किंवा मराठीत नवीन पुस्तकांचे जे काम येई ते सर्व थॉमस कँडींकडे प्रथम तपासणीसाठी व अभिप्रायासाठी येत असे. कँडी यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी.नीतिबोधकथा , नवीन लिपिधारा, विरामचिन्हांची परिभाषा, वाचनपाठमाला , भाषणसांप्रदायिक वाक्ये , हिंदुस्थानचे वर्णन इत्यादी.ग्रंथ निमिर्ती केली .ब्रिटिश भारत सरकारने थॉमस कँडी यांना ‘कंपॅनियन ऑफ द स्टार ऑफ इंडिया’हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. २६ फेब्रुवारी १८७७ रोजी थॉमस यांचे महाबळेश्वर येथे निधन झाले.

श्री. माधव विद्वांस . . . फेसबुकवरून साभार दि.२६-०२-२०२२

*****

दादोबा पांडुरंग तर्खडकर

दादोबा पांडुरंग तर्खडकर (तथा दादोबा पांडुरंग) (९ मे, १८१४ – १७ ऑक्टोबर, १८८२) हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धयु होते त्यांच्या प्रयत्नातूनच प्रार्थना समाजाची स्थापना झाली. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणतात.
मी लहान असतांना म्हणजे एकोणीसशे पन्नासीच्या दशकात तर्खडकरांचे पुस्तक वाचून इंग्रजी भाषा शिकलो आहे. म्हणजे ते पुस्तक छापले गेल्यानंतर शंभर वर्षांनीसुद्धा ते प्रचारात होते.

. . . . . . . . . . . . . .

मराठी भाषेचे पाणिनी!
शाळेत असताना तर्खडकरांचे व्याकरण ही महत्वाची संज्ञा होती. त्यांच्या इंग्रजी व्याकरणाची खुबी ही की अतिशय सहजतेने ते डोक्यात रुजायचे. मराठी वातावरणात जन्मलेल्या व शिकणाऱ्या माझ्यासारख्या तीन पिढ्यांचे ते इंग्रजांच्या दीपस्तंभ बनले.
ज्येष्ठ भाषांतरकार, लेखक व मराठी भाषेचे पाणिनी, असे ज्यांचे सार्थ वर्णन होते, असे हे व्याकरणततज्ज्ञ. त्यांचा आज १२८ वा स्मृतिदिन.
तर्खडकर आज विस्मृतीच्या गर्तेत असले, तरी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीच्या व्याकरणाला तर्कशुद्ध करण्याचे महत्वाचे काम तर्खडकरांनी केले होते.
मराठीबरोबरच संस्कृत, फारसी, उर्दू व इंग्रजी भाषेचे सखोल ज्ञान यांच्या जोरावर त्यांनी मराठी व इंग्रजी व्याकरण, शब्दरचना व वाक्यरचना यावर मार्गदर्शन करणारी पुस्तके लिहिली.
त्यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी मुंबईत खेतवाडीत झाला. सुरुवातीला पंतोजींच्या वर्गात शिकल्यावर तर्खडकर एल्फिन्स्टन शाळेत दाखल झाले. तिथेच त्यांना आधुनिक पाश्चिमात्य भाषाशास्त्राची गोडी लागली.
पुढे त्यांना कृष्णशास्त्री चिपळूणकर व थॉमस कॅन्डी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच लिंडली मर्फी या इंग्रजी व्याकरणकाराच्या धर्तीवर त्यांनी मराठी भाषेच्या व्याकरणावर सविस्तर व पुढे संक्षिप्त ग्रंथ लिहिले.
त्यांचे हे कार्य अमूल्य होते, कारण त्यामुळेच लेखी मराठीला आजचे सौष्ठव लाभले.
इतके मोठे कार्य करूनही तर्खडकर प्रसिद्धीपासून दूरच राहिले. १८९२ रोजी आजच्या दिवशी मराठी भाषेच्या या पाणिनीचे निधन झाले.
त्यांच्या स्मृतींना आदरांजली!

भारतकुमार राऊत

अधिक माहिती :
मराठी व्याकरण
१८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली.

१८५० साली शिक्षणविभागाकरता ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली. ही आवृत्ती शाळाखात्याकरता असल्याने मेजर थॉमस कॅन्डी, कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्यांसारख्या शिक्षणविभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले. ही आवृत्ती अमेरिकन मिशन प्रेसच्या छापखान्यात छापून प्रकाशित करण्यात आली.

१८६५ साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती मराठी लघु व्याकरण ह्या नावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. १८८२पर्यंत ह्या लघु व्याकरणाच्या १२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १९४४पर्यंत ह्या ग्रंथांच्या सुमारे १ लाख प्रती विकल्या गेल्या.

दादोबांच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या़ ७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनी मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका हा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्या मोठ्या व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत.

दादोजींचे मराठी व्याकरणविषयक अग्रेसर कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.

विकिपीडियावरील माहिती इथे https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0

********

दादोबा पांडुरंग तर्खडकर

अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ‘मराठीभाषेचे पाणिनी’ ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक. दादोबा पांडुरंग तर्खडकर, यांचे आज पुण्यस्मरण (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२). लहानपणी आमचे वडील तर्खडकर यांची पुस्तके आम्हाला देत असत.

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या जन्माला यंदा #२०६वर्षे होत आहेत.
संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्‌मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र (१९४७, संपादक अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये. यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८०) आणि शिशुबोध (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्‌स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.(मराठी विश्वकोश)

माधव विद्वांस

त्यांच्या फेसबुकवरील पानावरून साभार. दि. १८-१०-२०२०

जागतिक मराठी भाषा दिवस

२७ फेब्रूवारी हा कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला गेला. यानिमित्य मिळालेल्या शुभेच्छा संदेशांचे संकलन करून हे पान उघडले होते. त्यानंतर त्यात काही चांगले लेख  आणि कविता यांची भर घातली आहे.  तसेच या ब्लॉगवरील मराठी भाषेसंबंधित इतर लेखांचे दुवे (लिंक्स) दिले आहेत.

Marathi Divas

नवी भर दि. ०९-०३-२०२१ : या विषयावरील एक सुंदर लेख: लेखक डॉ.शरद काळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भाभा अणुसंशोधन केंद्र .यांचे मनःपूर्वक आभार.

याशिवाय खाली :एक कविता : इंग्रजीच्या नादापाई, आणखी काही कविता :लाभले आम्हास भाग्य, जैसी दीपामाजी दिवटी, मंगल देशा पवित्र देशा, माझ्या मातीचे गायन, मराठी असे आमुची मायबोली,

मराठीचा इतिहास : शिलालेख ते पेनड्राइव्ह – श्री.माधव विद्वांस . .  त्यांचे मनःपूर्वक आभार

मराठी भाषेविषयीचे विविध लेख या ठिकाणी एकत्र केले आहेत.
https://anandghare.wordpress.com/2018/08/23/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%9a%e0%a5%80/

मराठी भाषेचे सौंदर्य त्याच्या शब्दांमधून कसे खुलून दिसते ते पहा . https://anandghare.wordpress.com/2019/01/16/%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6-%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6-%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a/

काही मराठी विनोद, ग्राफिटी आणि पुणेरी पाट्या इथे पहा. :  https://anandghare.wordpress.com/2019/06/03/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a5%80/

नवी भर २०२२ : या वर्षी मिळालेले काही लेख आणि विनोद या पानाच्या अखेरीस जोडले आहेत. दि.२८-०२-२०२२ 

 

मराठी भाषा दिवस

शरद पांडुरंग काळे
निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र
sharadkale@gmail.com
आज २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्म दिवस. २७ फेब्रुवारी १९१२ रोजी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांना सहा भाऊ आणि एक बहीण होती. बहिणीचे नाव कुसुम होते. ही बहीण भावंडांमध्ये सर्वात लहान होती. म्हणून पुढे त्यांनी कुसुमाग्रज असे टोपण नाव घेतले आणि त्याच नावाने ते आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलेले आहेत. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव विष्णू ठेवले. म्हणून ते विष्णू वामन शिरवाडकर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. वि. स. खांडेकर यांना “ययाती” कादंबरीसाठी सन १९७४ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्या नंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते दुसरे मराठी साहित्यिक होते. सन १९८७ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना त्यांच्या “नटसम्राट” या नाटकासाठी मिळाला होता. त्यांचे हे नटसम्राट नाटक रंगभूमीवर तर प्रचंड गाजलेच होते, पण त्यावरचा चित्रपट देखील अत्यंत लोकप्रिय झाला आहे. एका अतिशय तोलामोलाच्या रंगभूमीवरील नटाच्या नशिबी आलेली वृद्धावस्थेतील फरफट त्यांनी अतिशय प्रभावीपणे रेखाटली आहे. समाजात वृद्ध व्यक्तींविषयी असलेल्या उदासीनतेचे, त्यांना कस्पटासमान लेखणाऱ्या तरुण वर्गाचे प्रतिबिंब म्हणजे हे नाटक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले गणपतराव बेलवलकर रंगभूमीवर डॉ. श्रीराम लागू यांनी तेव्हढ्याच ताकदीने साकार केले आणि नटसम्राट अजरामर झाले. मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व पाहाता त्यांना सरस्वतीचे वरदान मिळाले होते असेच वाटते. त्यांनी बावीस नाटके लिहिली. नटसम्राट इतकी लोकप्रियता त्यांच्या इतर नाटकांना मिळाली नाही. पण म्हणून मराठी भाषेतील या नाटकांचे महत्व तसूभर देखील कमी होत नाही. शेक्सपिअरच्या ऑथेल्लो या नाटकाचे मराठीत त्यांनी केलेले भाषांतर असेच अतिशय सुंदर आहे. कवी, नाटककार आणि लेखक या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
आपल्या सभोवती जे पर्यावरण असते त्याच्याशी आपण कळत नकळत सातत्याने संवाद साधत असतो. प्रतिभावान कलाकार त्यांच्या कलेच्या माध्यमातून हा संवाद आपल्या समोर मांडत असतात. कुणी चित्राच्या स्वरूपात, कुणी कवितेच्या रुपात तर कुणी गद्य लेखनातून ते साध्य करतात. या पर्यावरणातून येणाऱ्या विविध तरंग येत असतात. त्या तरंगांची भाषा त्यांना समजते. या तरंगांचे विश्लेषण आणि त्यातून येणारे संदेश हे प्रतिभावान कलाकार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा उत्कटतेने प्रयत्न करीत असतात. ते पोहोचले की या कलाकारांना मनस्वी आनन्द होतो. त्याला त्याचा अहंकार व्यापक झाल्याचे समाधान मिळते. अहंकार जेंव्हा असूया किंवा द्वेष निर्माण करतो, त्यावेळी तो दुर्गुण ठरतो. पण तोच अहंकार प्रतिभेच्या उच्चतम पातळीकडे कलाकाराला नेतो, त्यावेळी तो सद्गुण ठरतो. कविवर्य कुसुमाग्रजांनी त्यांच्या प्रतिभेच्या तरलतेने आपल्याला साहित्यिक क्षेत्रातील उंचीची कल्पना दिली आहे. त्यांचे कालातीत यश त्यातच सामावलेले आहे.
त्यांच्या एकूणच साहित्याचा आविष्कार आणि त्याचे रूपांतर संवादात होते. जेंव्हा गायनाच्या माध्यमातून लताजी, आशाजी, पद्मजाजी, किशोर दा किंवा रफीसाहेव काळजाला हात घालतात, श्रोत्यांशी संवाद साधतांना त्यांना परमोच्च आनंदाच्या महासागरात डुंबत ठेवतात, त्याचे कारण हा संवादच असतो. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या अभिनयातून नेमके हेच साधत असतात. बालगंधर्व, वसंतराव देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, रमेश देव, निळू फुले, दत्ता भट, मीनाकुमारी, रेखा, अमिताभ, अशोककुमार, मधुबाला यासारख्या दिग्गजांची मोहिनी समाजमनावर त्यांच्या अभिनय संवादातूनच घातली जाते. भीमसेन जोशींच्या अमर स्वरातून विठ्ठल संवादाचा आनन्द आपल्याला उपभोगायला मिळत असते.सचिन, तेंडुलकर, विराट कोहली किंवा सुनील गावस्कर यांच्या बॅटी असाच संवाद प्रेक्षकांशी साधत असतात. गदिमा, पुल, कुसुमाग्रज, विंदा, केशवसुत, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, रवींद्र भट, गो. नी. दांडेकर, भा. रा. तांबे, बालकवी यांच्यासारखे कवी आणि साहित्यिक त्यांच्या अक्षरसंवादातून असाच परिणाम साधत असतात. एखाद्या भाषेचे सौन्दर्य काय असते, त्याची प्रचिती या अक्षर आणि स्वर संवादातून येत असते. म्हणूनच अशा संवादांची प्रशंसा तर होत असतेच, पण त्या संवादांच्या संवेदना, त्यांचे तरंग समाज घडविण्याचे कार्य करीत असतात, त्या संवादांना अजरामर करीत असतात.
शब्द अतिशय सामर्थ्यशाली असतात. त्यांचा वापर जसा मने जोडण्यासाठी होतो, तसाच तो तोडण्यासाठी देखील होत असतो. म्हणून शब्दांचा वापर तारतम्याने करावा लागतो. विशेषतः साहित्य निर्मिती करीत असतांना समाज जोडणी हे अलिखित ध्येय असल्यामुळे हे भान ठेवणे अधिक गरजेचे असते. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेच्या आविष्कारात आपल्याला हे प्रकर्षाने शिकायला मिळते. कुसुमाग्रज शब्दांचा वापर करून, त्यांच्या आविष्कारातून संवादाकडे जातात. त्यांची शब्दांची निवड आणि त्यांचे सौन्दर्य खुलविणाऱ्या छंद, यमक, लय आणि प्रतिमा यांचा अप्रतिम मिलाफ आपण त्यांच्या साहित्यामधून अनुभवतो. शब्दांची सामाजिकता आणि कवीची कल्पकता यांची प्रक्रिया येथे घडून येते. या प्रक्रियेचे आणखी स्पष्टीकरण देतांना कुसुमाग्रज म्हणतात, “नदीचे वाहते पाणी एखाद्या खड्ड्यात थांबते, साचते आणि तिथे डोह तयार होतो. त्याप्रमाणे जीवनासंबंधीच्या प्रतिक्रिया काही व्यक्तित्वात थांबतात, साचतात, आणि काव्याला जन्म देतात. ही निर्मितीदेखील पूर्णतः स्वयंभू नसते, तर अपरिहार्यपणे संस्कारित असते. हे संस्कार पूर्वसूरींचे असतात, प्रचलित ज्ञानाचे असतात, आणि ज्या परिसरात कवी जन्मतो, वावरतो, त्या परिसराचेही असतात.”
नवलाख विजेचे दीप तळपती येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केंव्हा
ती माजघरातील मंद दिव्याची वात॥
वाऱ्यावर येथिल रातराणी ही धुंद
टाकता उसासे चरणचाल होई मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केंव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध॥
हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक व्याकुळ करतो केंव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट॥
बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नुपूर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक व्याकुळ करतो केंव्हा
तो आर्त मला तू ऐकविला अभंग॥
लावण्यवतींचा लालस येथ विलास
मदिरेत माणकांपरी तरारे फेस
परि स्मरती आणिक व्याकुळ करती केंव्हा
ते उदास डोळे, त्यातील करुण विलास॥
या कवितेतून कुसुमाग्रजांनी जो संवाद वाचकांशी साधला आहे, त्यातून त्यांना वाटत असलेला आपल्या मातीचा अभिमान अतिशय प्रभावीपणे प्रकट झाला आहे. पुल जेंव्हा सन फ्रान्सिस्को शहर पाहात होते, त्याच्या अप्रतिम सौन्दर्याने मोहित होत होते, तेंव्हा त्यांना कुसुमाग्रजांची हीच कविता आठवली. दोन महान कलाकारांच्या मनाच्या तारा कशा जुळतात याचे हे उत्तम उदाहरण आपल्याला खूप काही शिकवून जाते. विश्वातील प्रत्येक “सत्यम शिवम सुंदरम” ची अनुभूती घेत असतांना त्याची जोड आपल्या वास्तवाशी कशी जोडावी, आपल्या कडे ही हेच “सत्यम शिवम सुंदरम” नेमके कशात शोधायचे असते हे शिकविण्यासाठी ही कविता अगदी समर्पक आहे. नाहीतर सागर किनाऱ्यावर आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उंच इमारती पाहून कुसुमाग्रजांना आपल्या गावच्या नदी किनाऱ्यावरील भंगलेल्या घाटाची आठवण झालीच नसती! ही आठवण होण्यासाठी मन अतिशय संवेदनशील असावे लागते. ह्या संवेदनशील मनातील भावनांचे प्रतिबिंब दाखविणारी प्रतिमा, शब्दांचा आरसा वापरून ती समाजापुढे ठेवतांना, त्या प्रतिमेतील भ्रामकतेचे वास्तवात कधी रूपांतर होते ते आपल्याला कळत देखील नाही, पण आपण ते वास्तव प्रत्यक्ष अनुभवतो, तेंव्हा कुसुमाग्रजांचे आणि मराठी भाषेचे वैभव पाहून नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाही.
मराठी भाषा दिवसाच्या सर्वाना मनापासून शुभेच्छा
……..///////……///////… शरद काळे

कृपया हे पानही पहा : मराठी असे आमुची
https://anandghare.wordpress.com/2018/08/23/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%9a%e0%a5%80/

……///////…

एक कविता

इंग्रजीच्या नादापाई,
मराठीचा डब्बा गोल ।।
मराठी माणसा,
आता तरी मराठीत बोल ।।
इंग्रजीच्या पेपरात होतो
वर्ग सारा पास ।।
पण मराठीचा पोरगा होतो
मराठीत नापास ।।
प्रेम करतो म्हटलं की
पोरगी समजते शेंबड्या ।।
अन आय लव यू म्हटल्यावर
मनात मारते उड्या ।।
माय झाली मॉम आणि
बाप झाला डॅड।।
रेव्ह पार्टीत नाचून
पोर झाली मॅड ।।
भांडण करते बायको
धरते एकच हेका ।।
कायबी झालं तरी चालंल
पोरगं इंग्लीश शाळंत टाका ।।
मराठी माणसापासूनच आहे
खरा मराठीला धोका ।।
शाळेला मिळत नाही
मराठीचा शिक्षक,
मराठी माणूसच आहे
मराठीचा भक्षक ।।
तुकोबाची अभंगवाणी,
आन् मराठीचा गोडवा।।
मराठी माणसाचे नववर्ष
असतो गुढीपाडवा ।।
सावध व्हा मित्रहो,
जपा मायबोली ।।
भाषा रक्षणासाठी
बोला मायबोली ।।
🚩।। जय महाराष्ट्र , मी मराठी ।।🚩

*************************

लाभले आम्हास भाग्य        बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य           ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक          जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय         मानतो मराठी

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

————

जैसी दीपांमाझी दिवटी !          कां तिथींमाझी पूर्णिमा गोमटी !
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी !          सर्वोत्तम !!

जैसी सरितांमध्ये गोदावरी !      कां पर्वतांमधे रत्नागिरी !
तैसी भाषांमध्ये साजरी !          मऱ्हाटी पै !!

हरळांमध्ये रत्नकिळ !            कां पुष्पांमध्ये कमळ !
तैसी भाषांमध्ये सोज्वळ !       शोभिवंत दिसे !!

दुर्गावरि शोभे चरी !              कां मुक्ताफळे शोभती हारी !
तैसी शोभे भाषां माझारी !      मऱ्हाटी पैं !!

तीर्थांमध्ये काशी !                व्रतांमध्ये एकादशी !
भाषांमध्ये तैशी !                 मऱ्हाटी शोभिवंत !!

परिमळांमध्ये कस्तुरी !        कां अंबरामध्ये शंबरारी !
तैसी मऱ्हाटी सुंदरी !          भाषांमध्ये !!
🌹मराठी राजभाषादिनाच्या शुभेच्छा🌹
——————————-
🚩 मराठी भाषा दिन; चला मराठी बनूया…


मराठी माझी माय बोली
काय वर्णावी तिची गोडी ⚘

⚘काना, मात्रा, वेलांटी, उकार
शोभे अलंकृत ही बाराखडी ⚘

🌹.. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …🌹


मराठीतील श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. यामुळेच 27 फेब्रुवारी हा दिवस जगभरातील मराठी भाषिकांकडून ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषा दिवस आपण साजरा करत असलो तरी हा दिवस कृतीतून सुद्धा साजरा करता आला पाहिजे. म्हणून आजपासून व्यक्त होताना मराठीतच बोलायला शिका. कारण मराठीसारखी ताकदवान दुसरी भाषा नाही. मराठी भाषेसाठी मराठी जगायला शिकले पाहिजे, तरच हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा होईल…

मराठी भाषेसाठी आपण काय करू शकतो?

👉 आपण दिवसातून अनेक वेळेस ‘सॉरी’ म्हणत असतो. मात्र सॉरीच्या ऐवजी ‘माफ करा’ म्हणलं पाहिजे.

👉 फोनवर बोलताना सुरुवात ‘हॅलो’ पासून होते. मात्र फोनवर बोलताना हॅलो ऐवजी फोनची सुरुवात ‘नमस्कार’ने करू शकतो.

👉 आपले एखादे काम असेल तर ते करून घेण्यासाठी आपण ‘प्लिज’ हा शब्द वापरत असतो. मात्र प्लीज ऐवजी ‘कृपया’ वापरून पाहायला हवे.

👉 विविध कारणास्तव आपण एकमेकांना भेटवस्तू देत असतो. अशावेळी भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके / काव्यसंग्रह / नाटय़कृती यांचा आपण विचार करायला हवा.

👉 वर्षांकाठी किमान दोन मराठी पुस्तके विकत घेऊन वाचले पाहिजेत. ही सहज जमणारी कृती असून आपल्या भाषेसाठी काही केल्याचा आनंद देऊन जाणारी आहे.

👉 बँका, विमा कंपन्या, मोबाईल कंपन्या यांच्याकडे मराठीतून माहिती-सूचना पुस्तिका-प्रपत्रे (फॉर्म्स) इत्यादी देण्याचा आग्रह करायला हवा.

👉 जर शक्य असेल तर आपली स्वाक्षरी मराठीतून करायला हरकत नाही.

👉 मराठीतील दररोज किमान एक तरी नवीन शब्द त्याच्या सर्व छटांसहित नव्याने समजून घेतला पाहिजे.

👉 मराठी महिने व तिथीविषयी आपल्याला माहिती असायला हवी आणि ते त्याच तिथीनुसार बोलता यायला हवेत.

सर्वात शेवटी आणि सर्वात महत्वाचे हा संदेश कमीत कमी 10 जणांपर्यंत पोहचविणे. कारण मराठी भाषा संवर्धनासाठी आपला हातभार लागला पाहिजे…
—————————————

कविवर्य स्व.सुरेश भट यांनी मोठ्या अभिमानाने मायमराठीचे केलेले गुणगान नक्कीच स्फूर्तीदायक आहे.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी


मंगल देशा, पवित्रा देशा या सुप्रसिध्द महाराष्ट्रगीतात कवी गोविंदाग्रज यांनी मराठी भाषेचा इतिहास थोडक्यात असा सांगितला आहे.
रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला
पहिलावहिला अष्टांगांनी प्रणाम हा त्याला
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा
अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडि तुझ्या नामा
वाल्मीकीचे शत कोटी यश विष्णुदास नामा
मयूरकविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा
कवि कृष्णाच्या निर्यमका हे महाराष्ट्र देशा
देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ
तिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ
जिथे रंगली साधीभोळी जनाइची गाणी
तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी
विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी
तुला जागवी ऐन पहाटे गवळी गोपाळ
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ
मर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी
उभा ठाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी


कवी कुसुमाग्रज यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये असे लिहिले आहे.

माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे

माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खुलून, कधी पाहशील का रे

माझ्या जहाजाचे पंख, मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा, कधी लावशील का रे

माझा रांगडा अंधार, मेघामेघात साचला
तुझ्या उषेच्या कानी, कधी टिपशील का रे

——————————————————

कवी माधव ज्यूलियन यांच्या अजरामर गीताचे बोल असे आहेत.

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्‍ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्‍नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं ।।

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्‍ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।

———————————————————–

नवी भर दि. २२-०२-२०२२ :

मराठीचा इतिहास : शिलालेख ते पेनड्राइव्ह

” आ..ई..ग..” …असे ठेच लागल्यावर म्हणतो तोच मराठी. इ .स ,८००पासून आतापर्यन्त थोडक्यात मराठीची समृद्धी सांगणारा तीनवर्षपूर्वी दैनिक प्रभात पुणे मध्ये प्रसिद्ध झालेला लेख :
आद्यकाल<>इ.स.८०० ते १२०० पूर्व काळ. साधारण आठवे शतका पर्यंत सातवाहन राजवटीत प्राकृतभाषेचा वापर महाराष्ट्रात होता.महारथी या शब्दातून मराठी व महाराष्ट्र शब्द आले साधारण १० व्या शतकात मराठी रूढ झाली. कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ अक्षी येथे पहिला मराठी शिलालेख सापडला तो १० व्या शतकातील आहे तो पुढील प्रमाणे.
गी सुष संतु | स्वस्ति ओ | पसीमस- मुद्रधिपति | स्री कोंकणा चक्री- वर्ती |स्री केसिदेवराय | महाप्रधा- न भइर्जू सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने | सकू संवतु : ९३४ प्रधा- वी संवसरे: अधीकु दीवे सुक्रे बौ- लु | भइर्जूवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु | महलशु – मीची वआण | लुनया कचली ज /
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर खोदला असून त्या शिळेच्या माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली पुन्हा चंद्रसूर्य असे खोदकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे.
अर्थ :–जगी सुख नांदो ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीच्या बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. ‘लुनया ‘हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील एक शिलालेखहि साधारण त्याच सुमारचा असावा.
देवगिरीच्या यादव राज्यात मराठीचा ग्रंथरूपात खरा वापर सुरु झाला तो श्रीपतीने “ज्योतीशास्त्रमाला “हा ग्रंथ लिहिला तेंव्हा पासून. तो उत्तम गणितीही होता.१२ व्या शतकात कवी मुकुंद राज यांनी विवेकसिंधु हा ग्रंथ लिहिला.
अंबेजोगाई जवळ त्यांची समाधी आहे (यादवकाल इ.स. १२५० ते इ.स. १३५०)
इ. स. १२७८ मधे लिहिलेला लीळा चरित्र ‘ हा आद्य मराठी चरित्र ग्रंथ होय.पंडित म्हाइंभट सराळेकर यांनी चक्रधर स्वामींच्या आख्यायिका संकलीत करून ठेवल्या.

संत नामदेव ( इ.स.१२५९) मराठीतील पहिले कीर्तनकार व भागवत धर्माचे आद्य प्रचारक होते.

ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९० मधे ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका ) व अमृतानुभव हे ग्रंथ लिहिले. गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत (गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली आहेत.

पसायदान रचना करून ज्ञानेश्वरांनी विश्व व त्यातील सर्वच प्राण्यांचे भले चिंतून जातीभेद प्राणीभेद याच्याही पलीकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला.
संत नामदेव हे त्यांचे पेक्षा वयाने मोठे होते त्यांनी किर्तन परंपरा वाढविली. ते ज्ञानेश्वरीचे ते आद्य प्रचारक होते. गुरुग्रंथ साहेब मध्ये त्यांचे ६५ श्लोक अंतर्भूत केले आहेत.

त्याचवेळी चोखामेळा व त्याची पत्नी सोयरा अभंग करू लागली.”अवघा रंग एक झाला ” या लोकप्रिय अभंगाची कर्ती सोयराबाई आहे.त्यांचा मुलगा कर्मामेळा, सावतामाळी, गोऱ्हाकुम्भार, नामदेवाची शिष्या जनाबाई, एकनाथ -नरहरी सोनार -सेना महाराज-रोहिदास या तळागाळातील संतांनी भक्ती मार्गातून मराठी समृद्ध केली. संत एकनाथांनी भारुड ,गवळण ,अभंग,ओवी या प्रकारात काव्य करून मराठी माणसाच्या घराघरात मराठी रुजवली.

तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, गाथे सारखा ग्रंथ लिहिला, म्हणून म्हणतात !!! ज्ञानदेवे रचिला पाया कलश चढविला वारी तुकयाने !! तुकोबांच्या अभंगानी वारकरी संप्रदायावर अधिराज्य केले ते आजही चालू आहे. सामान्य माणसाला समजेल अश्या भाषेत तुकोबांचे अभंग असल्याने ते लोकप्रियही झाले.

बहामनी काल<>इ.स. १३५० ते इ.स. १६०० :अंबेजोगाई येथे दासोजीपंतांनी (इ.स. १५५९) हजारो ओव्या रचल्या तर ४० फूट लांब व ४ फूट रुंद कापडावर पासोडी प्रकारात काव्य तसेच चित्ररूप कथा लिहिली .याच काळात फारसी भाषेचा मराठीवर परिणाम झाला . पत्रव्यव्हारमध्ये तसेच कारभारा मधेही फारसी शब्द आले.

शिवाजी महाराजांचे काळामधे व्यवहारात फारसी शब्दांचे वर्चस्व होते ते त्यांनी संपविण्याचा प्रयत्न सुरु केला. शिवाजी महाराजांनी तंजावरच्या रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले.

वामन पंडितांच्या (इ.स.१६३६ ते १६९५) काव्य रचना याच काळात आल्या. याच काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे लोकमान्यताही मिळू लागली. शिवाजी महाराजांचा स्वराज्य लढा सुरु झाला ,वासुदेवाने आपल्या गीतांनी महाराष्ट्र हलवून टाकला

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची तैसी आर्या मयूरपंताची ते वाक्प्रचार रूढ झाले.

रामदास स्वामींनी मनाचे श्लोक व दासबोध ही मराठी माणसास दिलेली भेट आहे. समर्थ रामदास्वामीनि दासबोध लिहिलाच पण आरती रूपाने प्रत्येक घरात आजही उत्सवात ते आपल्याबरोबर असतात.

पेशवे काळ आला (इ.स. १७०० ते इ.स. १८१८). शाहीरांनी मराठीला लावण्याचा साज चढविला ,शाहीर परशुराम ,होनाजी बाळा .राम जोशी सारखे शाहीर फड गाजवू लागले त्याचवेळी बखर हा नवीन कथा प्रकारही अस्तित्वात आला.

मराठीलेखन समृद्ध होण्यामागे ब्रिटिश अधिकारी थॉमस कँडी यांनीहि मोलाचे योगदान दिले आहे . मराठी लिखाणात १९व्या शतकापर्यंत विरामचिन्हांशिवाय लेखन होत असे. मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही ‘दंड’ सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. ब्रिटिश मेजर थॉमस कँडी यांनी मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. त्यांनी ‘विरामचिन्हांची भाषा’हे पुस्तक लिहून त्यांची कशी आवश्यकता आहे हे पटवून दिले दिले. पुढे हे सर्वमान्य आणि रूढ झाले. विरामचिन्हामुळे मराठी लेखन वाचन आणि भाषणही समृद्ध झाले.

इंग्रजी कालखंड आला याच काळात (१८१८ ते १९४७) महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचे मुळे सामान्य मराठी माणसाला शिक्षणाची गोडी लागली. सत्यशोधक विचारही प्रचारात आले. ज्योतिबा व सावित्रीबाई स्वतः कविता करीत असत. त्यांनी लेखन केले, भाषणातून प्रबोधनही केले .तर संत गाडगे महाराजानी कीर्तनातून समतेचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला.

दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केले, लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिलेच पण केसरी सारखे वर्तमान पत्रही सुरु केले. याच काळात मराठी नाटक ,कादंबरी ,संगीत यांनी बहरु लागली. कथा कीर्तनातून कथांतून रामायण महाभारताची पारायणे सुरु झाली, राष्ट्रवादही उफाळून आला. मराठीत नाट्यलेखनहि याच सुमारास सुरु झाले व कलाकारांनाही मंच मिळाला. या काळात मराठीच्या वैभवाचा अत्युच्च काळ गाठला.

कीर्तन परंपरा पुन्हा फोफावली. लोकमान्य टिळकांनी डॉ पटवर्धनांना कीर्तनातून राष्ट्रवादाचा प्रचार करण्यास सांगीतले ,त्यांनीही पेशा सोडून कीर्तने सुरु केली ती ‘पुढे अगदी ६० वर्षांपूर्वी पर्यंतचालू होती ,गोविंदस्वामी आफळे बुवा, नेऊरगावकर,कान्हेरे बुवा असे कीर्तनकार उभे राहिले,
स्वातंत्र्या नंतर मराठी अधिक समृद्ध झाली. बाबामहाराज सातारकरांनी ज्ञानेश्वरी सामान्यांचे घरात पोचवली.
साहित्यात अनेक प्रकार आले, विद्रोही साहित्य, ललित वाङ्मय, प्रवास वर्णने, ऐतिहसिक कादंबऱ्या , ऐतिहासिक माहिती, आत्म चरित्रे, लोकनाट्य , विज्ञान, विनोद , रहस्यकथा , भयकथा असे अनेक नवीन विषय आले.
लोकसत्ता ,महाराष्ट्र टाइम्स हि उद्योग कंपन्यांची वृत्तपत्रे सुरु झाली
प्रभात ,केसरी ,सकाळ ,मराठा ,तरूण भारत, लोकमत ,संह्याद्री ,गावकरी ,पुढारी ,काळ (नवाकाळ ) ऐक्य हि वृत्तपत्रे सुरु झाली , राजकारणाचा पक्षांचा प्रभाव असलेली मुखपत्रेही अशी त्यातही वर्गवारी आहे. अगदी खेडेगावात पारावर बसून ग्रामस्थ वृत्तपत्र वाचताना दिसू लागले. त्यामुळे मराठी अधिकच समृद्ध झाली.
नामदेव ढसाळ ,शंकरराव खरात ,शाहीर अण्णाभाऊ साठे ,दया पवार यांचे सारखी झाकली माणकेही पुढे आली. विद्रोही साहित्याचे धुमारे निघू लागले.
बाबुराव अर्नाळकर ,बाबा कदम यांचे सारखे लेखक रहस्य कथा लिहू लागले ,पु ल देशपांडे ,यांच्या सारखे लेखक खुसखुशीत विनोदही नाटकेही लिहू लागले . ना सी फडक्यांच्या प्रेम-शृंगार कथा आल्या, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र कथास्वरूपात रंजकतेने लोकांचे पुढे आणले.
आधुनिक वाल्मिकी कै ग.दि. माडगूळकरांनी गीतरामायण लिहून त्याला सुधीर फडके संगीत देऊन व स्वतः गाऊन इतिहास घडविला.
शांता शेळके ,सरोजिनी बाबर ,बहिणाबाई , पी. सावळाराम (निवृत्तीनाथ रावजी पाटील ), जगदीश खेबुडकर, कुसुमाग्रज ,यादी फारच मोठी होईल. असे अनेक गीतकार कवी लेखक उदयाला आले.
पठ्ठे बापूरावांनी तमाशा हा लोकनाट्यप्रकार आपल्या दिलखुलास लावण्यांनी बहरात आणला लोकनाट्यालाही प्रतिष्ठा मिळाली,अमर शेख, शाहीर साबळे ,शाहीर फरांदे,वामनराव कर्डक ,विठ्ठल उमप, अशी अनेक मंडळी पुढे आली
मराठीत गीते आली त्यातही भाव ,भक्ती ,प्रेम ,इतिहासही आला, त्याला संगीताचा साज आला ,वसंत पवार , राम कदम,अशोक पत्की, सुधीर फडके, श्रीनिवास खळे,अश्या अनेक दिग्गजांनी संगीत क्षेत्र समृद्ध केले. गीताला संगीताचा व त्याचेवर नृत्य यामुळे काव्याचे कोंदण मोठे झाले.
आनंद शिंदे, प्रल्हाद शिंदे यांचा पोपट ग्रामीण भागा बरोबर शहरी रसिकांनाही डोलवू लागला. गीत आणि संगीत बंगल्यातून झोपडीतही शिरले.
कै प्राचार्य शिवाजीराव भोसल्यानी त्यांच्या व्याख्यानाला एक स्थान मिळवून वक्ता दश सहस्रेशु म्हण सार्थ केली.
नाटकावर पाश्च्यात्य नाटकांचा प्रभाव पडून नव्याने नाटकेही आली. दूरदर्शन मुळे संगीत नाटकांचे प्रमाण कमी झाले तरी सुबोध भाव्यांचे मुळे पुन्हा संगीत नाटकांची लोकांना आवड निर्माण होत आहे. सुधीर गाडगीळांनी मुलाखती घेणे, सूत्रसंचालनकरणे हि पण एक कला अस्तित्वात आणली.
राजकीय सभेत भाषण करणे हि सुद्धा एक कला लोकशाहीत आली, यशवंतराव चव्हाण,रामभाऊ म्हाळगी, अत्यंत मुद्देसूद बोलत असत त्यांचेवर “मी असे बोललो न्हवतो विपर्यास केला “असे कधीही म्हणायची वेळ आली नाही.
फेसबुक ,व्हाट्स अप ,ट्विटर हि माध्यमेही लोकप्रिय होत आहेत.
दूरदर्शन मालिकांमुळे मराठी आता छोट्या पडद्यावर वेगळ्या स्वरूपात लोकप्रिय झाली आहे.सध्या मराठी चित्रपटालाही चांगले दिवस आले आहेत
जडीबोली(आदिवासी ) -ठाकरी -मालवणी –वऱ्हाडी –अहिराणी – खानदेशी -नगरी -कोकणी -तेलगु मिश्रित सोलापुरी -रांगडी सातारी-राकट कोल्हापुरी -बेळगावी -मुंबईची हिंदी मिश्रित -आणि खास वस्त्रगाळ पुणेरी असे अनेक प्रकार सध्या अस्तित्वात आहेत.
लेखन माधव विद्वांस (Madhav Vidwans)

नवी भर २०२२

१. मराठी भाषा दिन–
जैसी हरलामाजी रत्नकिळा ,
कि रत्नामाजी हिरा निळा .
तैसी भाषामाजी चोखळा , भाषा मराठी !
जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी ,
कि परिमला माजी कस्तुरी ,
तैसी भाषामाजी साजिरी , मराठीया !
पखियांमध्ये मयुरू , रुखियांमध्ये कल्पतरू
भाषांमध्ये मानू थोर , मराठीयेसी !
—— फादर स्तीफंस ( १५४९ – १६१९ )

२.

आई वडिलांनी ठरवून मराठी माध्यमातच शिकवलं.
इतर भाषा शिकण्याचा पाया मातृभाषेनं पक्का केला..
दीड, अडीच, ‘सव्वा’, ‘पावणे’ म्हणजे किती? असे सुमार प्रश्न कधी विचारलेच नाहीत…
नक्षत्र, रानमेवा, सांजवेळ, या शब्दांत गोडवा सापडला, प्रश्न नाहीत…
“साणशी, खलबत्ता, पाटा-वरवंटा, केरसुणी, सुपली दे गं” अशी स्वयंपाकघरातून आलेली सुचना मख्ख चेहर्‍याने ऐकली नाही….
उत्साह, प्रफुल्लित होणं, म्हणजे काय हे मनात खोल खोल आत जाणवायचं..
‘जमीन’ आणि ‘लादी’ म्हणणार्‍यांची शहरं आपसूक कळायची..
ओढ, प्रेम, आकर्षण यातला फरक शिकवायला शब्दच समर्थ होते..
अशा किती किती गोष्टी…
ज्या मातृभाषेत शिकल्यानंच समजण्यात, उमजण्यात, जगण्यात परिपूर्णता लाभली..
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा 💚
(हर्षदा स्वकूळ )

३. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मराठीमय शुभेच्छा🙏🙏

बालवाडी ते दहावी सगळं शिक्षण मराठी शाळेतच झालं.मराठीवरचं प्रेम म्हणजे शाळा सुरू व्हायच्या आधी नवीन आणलेल्या पुस्तकांमधले फक्त मराठीचे पुस्तक सगळयात आधी उत्साहाने उघडून त्याचा प्रथम सुगंध नाकात ओढत घेऊन सगळे धडे,कविता वाचून काढायच्या हे इतपत.

परीक्षेत मराठीचा पेपर हातात पडला की निबंधाचे विषय आधी बघायचे ,कारण निबंध लिहायला खूप आवडायचे.पण लिहायच्या नादान इतका वेळ जायचा की पेपरला वेळ पुरायचाच नाही आणि हमखास 8 ते 10 मार्कांचे येत असूनही राहून जायचं.
मला आठवतंय की मी आठवीत का सातवीत असताना पोस्टटकार्डावर एक मराठी कविता लिहून लोकसत्ताच्या पत्त्यावर पोस्टही करणार होते ,पण राहूनच गेली.
कुणाच्याही घरी गेले की ,मला तेव्हा बोलायला ,गप्पा मारायला ,अगदी खेळायला सुदधा आवडायचे नाही.मी त्यांना “तुमच्याकडे गोष्टीचं पुस्तक आहे का एखादं वाचायला?”हे विचारायचे आणि मला अगदी जादूची चटई, दिव्यातला राक्षस,अशी पुस्तकंही वाचायला चालायची.
गोट्या, सिंदबादच्या सात सफरी, चांदोबा,बोक्या सातबंडे, ठकठक,अश्या पुस्तकांचे पारायण केले जायचे.मला तर श्रावणातील वारांच्या कहाण्या सुद्धा आईकडून ऐकायला खूप आवडायच्या

मुळात आमच्या घरी एक चालतं बोलतं मराठीचं पुस्तक होतं माझी आई.तिचं शिक्षण फक्त सातवी पास ,पण सगळ्या म्हणी ,सगळी गाणी अगदी तोंडपाठ.तिच्या प्रत्येक वाक्यात एक म्हण पेरलेली असायचीच.पावकी,निमकी,पाऊणकी,अडीच की सगळं तिचं पाठ.रोज शुभंकरोती म्हणून झालं की नेटाने ती आम्हला हे म्हणायला लवायचीच

आता हे मराठीवरचं प्रेम आपण मुद्दाम व्यक्त करतो ,कारण ते आहे हे प्रत्येकाला दाखवायचं असतं. सध्याचा जमाना (इंग्रजी शब्दच वापरायचा)तर एक्सप्रेस व्हायचा आहे. “व्यक्त व्हा व्यक्त व्हा”असं सांगावं लागतं,केवळ अत्ता व्यक्त होतो म्हणून अत्ता मराठीवर प्रेम आहे आणि तेव्हा नव्हतं असं तर नाहीये ना हो!
तर ह्या मराठी भाषेवर प्रेम आधीही होतं ,आताही आहे आणि पुढेही राहणार आहे .

एक शेवटचा किस्सा
परवा व्हाट्सअप्प वर मी एकाला ‘ओके’ असा प्रत्युत्तर मेसेज केला तेव्हा तो म्हणाला ‘ok’ इतकं सोप्प असताना हे ‘ओके’ इतकं कशाला लिहीत बसलीस ,तर त्याला म्हंटल मराठी फॉन्ट आहे ना ,तर त्याचीच सवय लागली आहे, आणि नंतर कळलं त्याने मराठी फॉन्ट डाउनलोड केलाच नव्हता त्याच्या फोन मध्ये , त्यामुळे त्याला ते कठीण वाटलं असणार कदाचित.
असो इंग्रजी सुद्धा आम्ही मराठीत लिहितो ,ह्याला म्हणतात खरं मराठी वरचं प्रेम ….हो की नाही ??😊

मानसी चापेकर

४. —– शृंगार मराठीचा ———–

अनुस्वारी शुभकुंकुम ते
भाळी सौदामिनी |

प्रश्नचिन्ही डुलती झुमके
सुंदर तव कानी |

नाकावरती स्वल्पविरामी
शोभे तव नथनी |

काना काना गुंफुनी माला
खुलवी तुज मानिनी |

वेलांटी चा पदर शोभे
तुझीया माथ्याला |

मात्रां चा मग सूवर्णचाफा
वेणीवर माळला |

उद्गारा चा तो गे छल्ला
लटके कमरेला |

अवतरणां च्या बटा
मनोहर भावती चेहर्‍याला |

उ काराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरी |

पूर्णविरामी तिलोत्तम तो
शोभे गालावरी ॥

———- !! मराठी भाषेचा श्रृंगार !! ——–मराठी भाषा दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा💐💐💐🙏🏼🌹-

५.

न आणि ण,
श आणि ष,
ळ आणि ड,
चांदणीमधील च आणि चंद्रमधील च
जहाजमधील ज आणि जीवनमधील ज
यांच्या उच्चारातील
फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !

बाकीच्यांणा मराठी भाशा दिणाच्या मणापासूण षुभेच्छा!!!

६. विंग्रजाळलेल्या मराठी मुलाचे गाणे

६. ग्रामीण मराठीच्या तऱ्हा

“मीबी गेलथो”* हे कोणत्याही आफ्रिकन महिलेचे नाव नाही ,
हे तुम्हाला नगरला गेल्यावर कळेल !
“उबाका बस्की” हे कुठल्याही रशियन माणसाचे नाव नाही,
हे तुम्हाला सांगलीत गेल्यावर कळेल !
“शायना झालाकाबे” हे कुठल्या जर्मन बाईचे नाव नाही,
.
हे मला नागपूरला गेल्यावर कळलं!.
“अस्का कराईलीस” हे कुठल्याही ग्रीक माणसाचे नाव नाही,
.
हे तुम्हाला कोल्हापूरात गेल्यावर कळेल !
“च्यापी फुकून” हे कुठल्याही जपानी मुलीचे नाव नाही,
हे तुम्हाला लातुरला गेल्यावर कळेल!
आणि “Go by bus (गो बाय बस)” हे इंग्लिश वाक्य नाही,
हे तुम्हाला मालवणला गेल्यावर कळेल!
बोली भाषेची गम्मत, अजून काय?
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🙏🏼सुप्रभात🙏🏼

शब्द, अर्थ आणि त्यांची गंमत

अक्षरे, शब्द आणि वाक्ये मिळून भाषा तयार होते. शब्द हे त्यातले महत्वाचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. त्यांची महत्ती दाखवणाऱ्या दोन कविता आणि शब्दांच्या काही गंमती खाली दिल्या आहेत. यातले काही अलीकडचेच वाचन आहे, तर काही मी दहा वर्षांपासून गोळा केलेल्या आहेत.

याशिवाय पहा

अडगळीत गेलेले शब्द ,     लावालावी  आणि लागणे,   पाणी या शब्दाच्या अर्थांचे विविध रंग

या लेखातील गंमती : शब्दांचा गोडवा, शब्दांमुळेच …, जुने शब्द ……….. नव्या व्याख्या, काही शब्दांच्या व्याख्यांची उदाहरणे, मीठी की मिठी,  मासा आणि माशी, कसं असतं पहा ……., मराठीही फारशी सोपी नाही..!!, दोन अर्थ -एक शब्द  (द्व्यर्थी शब्दांची गंमत), मराठीची अवखळ वळणे…., ळ ची गंमत, स्त्रीचा पदर,  आईचा पदर,  गंमत ४ ची , बारा १२ या अंकाची बहादुरी,  शेवटी त्र असलेले शब्द, हरवलेले जादूई शब्द,  मराठीतली  खास विशेषणे,  पाऊल आणि पाय,  कीकारांती शब्द, मराठी भाषेत घुसलेले शब्द, आयुष्याबद्दल  छान भाष्य, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द, पोत, भेट, मराठी विलोमपद, ऋकार शब्दांचे काव्य, मजेदार प्रश्नमंजुषा, मार्ग या अर्थाचे शब्द, उपसर्ग, ABCDवरून शब्द, लस शब्द, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले शब्द, घासावा शब्द, तासावा शब्द, मायंदाळ बक्खळ लई इ.


शब्द

शब्दांचा गोडवा

शब्द पेरती गोडवा , शब्द अमृताची वाणी ,
अमृताते पैजा जिंकी , ऐशी शब्दांची करणी ,

शब्द ज्ञानेशाची ओवी , शब्द तुक्याचा अभंग ,
शब्द प्रेम भाव भक्ती , शब्द झाला पांडुरंग ,

शब्दे व्यापिले आकाश , शब्द तेजाचीच रास ,
शब्द काळीज कोदंण , शब्द मांगल्याचा ध्यास ,

स्नेह शब्दांचा गोडवा , स्नेह वृध्दीगंत व्हावा ,
शब्द अमृताची वाणी , मैत्र जिवलगी व्हावा ,

नको खल मनामधी , नको वेदनांचा सल ,
दिसामागून जाते रात , रोज नवा उषःकाल

शब्द शीतल चांदणं , शब्द मायेची पाखरं ,
शब्द जीवाचे जीवन , शब्द स्नेहाची भाकर ,

गोड शब्दांचा गोडवा , तिळा तिळाने रूजावा ,
आलो तुमच्या मी दारी ,थोडा तिळगूळ घ्यावा !

कविचे नाव माहीत नाही. वॉट्सअॅपवरून साभार
………………………………………………….

शब्दांमुळेच …

शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला,
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी…
“म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि
जो मन जिंकेल तो जग जिंकेल “

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.. !

कविचे नाव माहीत नाही. वॉट्सअॅपवरून साभार


जुने शब्द ……….. नव्या व्याख्या

सिगारेट …. चिमूटभर तंबाखूची कागदात गुंडाळी, तिच्या एका टोकाला आग आणि दुसऱ्या टोकाला मूर्ख
CIGARETTE: A pinch of tobacco rolled in paper with fire at one end and a fool at the other!

लग्न … या करारनाम्यात पुरुष आपली बॅचलरची पदवी गमावून बसतो आणि स्त्रीला मास्टरची पदवी मिळते.
MARRIAGE: It’s an agreement wherein a man loses his bachelor degree and a woman gains her master

घटस्फोट … लग्नाचे भविष्यरूप
DIVORCE: Future Tense of Marriage

परिसंवाद … एका माणसाच्या मनातला गोंधळ गुणिले सभासदसंख्या
CONFERENCE:The confusion of one man multiplied by the number present

कॉलेजमधील तास … प्राध्यापकांच्या नोट्समधील माहिती (कोणाच्याही डोक्यात न शिरता) विद्यार्थ्यांच्या टिपणवहीत भऱण्याची कला.
LECTURE: An art of transmitting Information from the notes of the lecturer to the notes of students without passing through the minds of either .

तडजोड … आपल्यालाच सर्वात मोठा तुकडा मिळाला आहे असे प्रत्येकाला वाटावे अशा प्रकाराने केक कापून वाटण्याची कला
COMPROMISE: The art of dividing a cake in such a way that everybody believes he got the biggest piece

अश्रू … पुरुषाच्या इच्छासक्तीला पराभूत करणारी स्त्रियांची जलऊर्जा
TEARS: The hydraulic force by which masculine will power is defeated by feminine water-power!

शब्दकोष … ज्या टिकाणी फारकत व घटस्फोट लग्न व विवाह यांच्या आधीच येतात अशी जागा, जिथे सक्सेस हा शब्द वर्क या शब्दाच्या आधी येतो. ( मराठीमध्ये मात्र आधी सुरुवातीलाच कामाचा क आणि खूप उशीरानंतर शेवटी शेवटी यशाचा य येतो
DICTIONARY: A place where divorce comes before marriage, success comes before work

संमेलनकक्ष … जिथे सर्व लोक बोलतात, कोणीच ऐकून घेत नाही, पण अखेर सर्वांचे मतभेद होतात अशी जागा
CONFERENCE ROOM: A place where everybody talks, nobody listens and everybody disagrees later on

परमानंद … यापूर्वी कधीही जसे (छान) वाटलेले नव्हते असे कांही तरी आता वाटणार आहे असे ज्या वेळी वाटते त्या वेळची भावना
ECSTASY: A feeling when you feel you are going to feel a feeling you have never felt before

दर्जेदार पुस्तक …. लोक ज्याची तोंडभर प्रशंसा करतात पण स्वतः कधीही वाचत नाहीत असे पुस्तक
CLASSIC: A book which people praise, but never read

स्मितरेषा … खूप गोष्टींना सुतासारख्या सरळ करून देऊ शकणारी वक्ररेषा
SMILE:A curve that can set a lot of things straight!

इत्यादि ….. तुम्हाला प्रत्यक्षात जेवढी माहित असेल त्याहून अधिक आहे असे इतरांना वाटायला लावणारा शब्द
ETC: A sign to make others believe that you know more than you actually do

समिती … जे लोक एकेकट्याने कांहीच करू शकत नाहीत आणि कांहीही करता येणे शक्यच नाही असे ठरवण्यासाठी जे एकत्र येतात अशा लोकांचा जमाव
COMMITTEE: Individuals who can do nothing individually and sit to decide that nothing can be done together

अनुभव … आपण केलेल्या चुकांना माणसांनी दिलेले गोंडस नांव
EXPERIENCE: The name men give to their Mistakes

अणुबाँब … सर्व शोधांचा अंत घडवून आणण्यासाठी लावलेला शोध
ATOM BOMB: An invention to bring an end to all inventions

कार्यालय … घरातल्या कामाने थकून भागून जिथे गेल्यावर जिथे गेल्यावर तुम्ही निवांतपणे आराम करू शकता अशी जागा
OFFICE: A place where you can relax after your strenuous home life

जांभई … विवाहित पुरुषांना मिळणारी तोंड उघडण्याची एकमेव संधी
YAWN: The only time when some married men ever get to open their mouth

तत्ववेत्ता … आपल्या मृत्यूनंतर इतरांनी आपल्याविषयी बोलावे यासाठी हा वेडा आयुष्यभर स्वतःलाच छळत असतो
PHILOSOPHER: A fool who torments himself during life, to be spoken of when dead

मुत्सद्दी … हा माणूस तुम्हाला अशा खुबीने नरकात जायला सांगतो की तुम्ही आतुर होऊन त्या यात्रेची वाट पहायला लागता.
DIPLOMAT: A person who tells you to go to hell in such a way that you actually look forward to the trip

संधीसाधू … असा माणूस जो अपघाताने नदीत पडला तरी लगेच आपल्या स्नानाला सुरूवात करतो.
OPPORTUNIST: A person who starts taking bath if he accidentally falls into a river

आशावादी … असा माणूस जो आयफेल टॉवरवरून खाली पडत असतांनासुध्दा वाटेत स्वतःला सांगतो, “बघ, मी अजून जखमी झालेलो नाही.”
OPTIMIST: A person who while falling from EIFFEL TOWER says in midway “SEE I AM NOT INJURED YET!”

निराशावादी … य हे अक्षर यश या शब्दाचे पहिले अक्षर आहे असे न म्हणता तो शून्य या अक्षरामधला शेवटचा भाग आहे असे म्हणतो
PESSIMIST: A person who says that O is the last letter in ZERO, Instead of the first letter in OPPORTUNITY

कंजूस, चिक्कू …. श्रीमंत होऊन मरण्यासाठी जो दारिद्र्यात जगतो
MISER: A person who lives poor so that he can die RICH!

बाप … निसर्गाने दिलेला कर्जदाता
FATHER: A banker provided by nature

गुन्हेगार … पकडला गेला नाही तर अगदी इतरांसारखाच
CRIMINAL: A guy no different from the other, unless he gets caught

वरिष्ठ अधिकारी (बॉस) … तुम्हाला उशीर होतो तेंव्हा लवकर येणारा आणि तुन्ही लवकर गेलात तर स्वतः उशीरा येणारा
BOSS: Someone who is early when you are late and late when you are early

राजकारणी … जो निवडणुकीपूर्वी तुमचा हात हातात घेऊन हलवतो आणि त्यानंतर तुमच्या आत्मविश्वासाला हलवतो
POLITICIAN: One who shakes your hand before elections and your Confidence Later

डॉक्टर … जो औषधाच्या गोळ्यांनी तुमच्या रोगाला खतम करतो आणि बिलाने तुम्हाला
DOCTOR: A person who kills your ills by pills, and kills you by bills

संकलन : दि.२३-०४-२००९

………..

आणखी काही नव्या व्याख्या

शाळा … पालकांच्या खर्चाने जिथे मुले खेळतात
School : A place where Parents pay and children play

आयुर्विमा … तुम्ही श्रीमंत अवस्थेत मरावे यासाठी आयुष्यभर तुम्हाला गरीबीत ठेवणारा अनुबंध
Life Insurance : A contract that keeps you poor all your life so that you can die Rich.

नर्स … तुम्हाला जागे करून झोपेच्या गोळ्या खायला देणारी
Nurse: A person who wakes u up to give you sleeping pills.

व्याख्यान … व्याख्यात्याच्या टिपणातली माहिती कोणाच्याही मस्तकात न शिरता विद्यार्थ्यांच्या वहीत पोचवण्याची कला.
Lecture : An art of transferring information from the notes of the Lecturer to the notes of the students without passing through “the minds of either”

संमेलन … एका माणसाच्या मनातल्या गोंधळाला सदस्यांच्या संख्येने होणारा गुणाकार
Conference : The confusion of one man multiplied by the number present.

पिता … निसर्गाने निर्माण केलेला बँकर
Father : A banker provided by nature

साहेब … जेंव्हा तुम्हाला उशीर होतो तेंव्हा जो लवकर येतो आणि तुम्ही लवकर आलात तर जो उशीरा येतो असा माणूस
Boss : Someone who is early when you are late and late when you are early

दर्जेदार साहित्य … ज्याची सर्वजण स्तुती करतात, पण जे कोणीच वाचत नाही.
Classic : Books, which people praise, but do not read.

स्मितहास्य … अनेक गोष्टींना सरळ करणारी वक्ररेषा
Smile : A curve that can set a lot of things straight.

वगैरे … तुम्हाला खरोखर जेवढे ठाऊक असेव त्यापेक्षा जास्त माहिती आहे असे इतरांना भासवण्याचे चिन्ह
Etc. : A sign to make others believe that you know more than you actually do.

तत्वज्ञ … शहाणे होण्यासाठी आयुष्यभर स्वतःला छळणारा मूर्ख
Philosopher : A fool who torments himself during life, to be wise
————————————–

काही शब्दांच्या व्याख्यांची उदाहरणे

१.श्रध्दाः सर्व गावकऱ्यांनी पावसासाठी देवाकडे प्रार्थना करायचे ठरवले, पण फक्त एक मुलगा छत्री घेऊन आला.

विश्वास २
२. विश्वासः लहान बाळाला हवेत उडवले तर ते हसते, कारण तुम्ही त्याला झेलालच असा त्याला विश्वास असतो.

विश्वास १
३. आशाः रात्री झोपायला जातांना आपण दुसरे दिवशी सकाळी जीवंत असणारच याची शाश्वती नसते, तरीही आपण घड्याळात गजर लावतो.
४. आत्मविश्वासः भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची आपल्याला सुतराम कल्पना नसते, तरीही आपण योजना आखतो.

विश्वास ३
५. फाजील आत्मविश्वासः सगळे जग वैतागलेले स्पष्ट दिसत असते, तरीही आपण लग्न करतो.

विश्वास ४

NICE LITTLE STORIES.
1.Once, all villagers decided to pray for rain, on the day of prayer all the People gathered but only one boy came with an umbrella.
THAT’S FAITH!
. . . . .
2. When you throw a baby in the air, she laughs because she knows you will catch her.
THAT’S TRUST!
. . . . .
3.Every night we go to bed, without any assurance of being alive the next
Morning but still we set the alarms to wake us up.
THAT’S HOPE!
. . . . .
4. We plan big things for tomorrow inspite of zero knowledge of the future.
THAT’S CONFIDENCE!
. . . . .
5. We see the world suffering.
But still we get married?
THAT’S OVER CONFIDENCE!!

संकलन : दि.२२-०१-२०१३
—————————————————————

मीठी की मिठी

बायको : ए, सांग ना
मिठीतली ‘मी’ पहिली की दुसरी..?

नवरा : अॅ..? आता हे काय..?
बायको : अरे सांग ना पहिली की दुसरी..?

अनेक चेहरे डोळ्यासमोर येत होते
चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ लपवता येत नव्हता
बायको : अरे लवकर सांग,

नवरा : तुला का ते जाणून घ्यायचंय..? कोणाचा तरी भूतकाळ उकरून काढण्याची ही वेळ आहे का..?

बायको : अरे लेख लिहितेय मी,
‘मिठी’ की ‘मीठी’ लिहू..?
माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे. You know ना, माझ्या किती चूका होतात. म्हणून विचारलं मिठीतली मी पहिली की दुसरी…!

नवरा मरता मरता वाचला

वॉट्सअॅपवरून साभार

😆😆😂😂😂🤣🤣

मासा आणि माशी

मासा आणि माशी यांचा परस्पर काही संबंध नाही- पण शब्दांची गम्मत अशी की माशाला स्रीलिंग नाही (मासाला  असे न म्हणता माशाला कां म्हणतात?)  आणि माशीला पुल्लिंग नाहीं! …. (पहायला गेले तर मासोळी असा एक स्त्रीलिंगी शब्द आहे.)
त्यातही गम्मत अशी की हे दोघंही कोळ्याच्या जाळ्यात अडकतात. पण त्या दोन्ही ‘कोळ्यां’चा एकमेकांशी काही संबंध नाही! … आणि त्यांच्या जाळ्यांचाही.

…………………………………………………………

कसं असतं पहा …….

बदलते ते वय
बदलत नाही ती सवय

भावतो तो भाव
भोवतो तो स्वभाव

अविचल असतो तो श्रीरंग
सतत बदलतो तेव्हा होतो बेरंग

वहात जाते ती लय
वहावत नेतो तो प्रलय

आनंदाचा शोध असते जगणं
आनंदच दुरावतं ते वागणं

स्वेच्छेने करतो ते अर्पण
उपेक्षा करतो तो दर्पण

ती/तो येता उठती ते तरंग
ती/तो नसता कण्हते ते अंतरंग

अकस्मात् जडते ते प्रेम
पुरून उरते ते दृढ सप्रेम!

वॉट्सअॅपवरून साभार


मराठीही फारशी सोपी नाही..!!👍👍

१. म्हणे “शिरा” खाल्ल्याने “शिरा” आखडतात.

२. “काढा” पिऊन मग एक झोप “काढा”.

३. “हार” झाली की “हार” मिळत नाही.

४. एक “खार” सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर “खार” खाऊन आहे.

५. “पळ” भर थांब, मग पळायचे तिथे “पळ”.

६. “पालक” सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात मेथी, “पालक” इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.

७. “दर” वर्षी काय रे “दर” वाढवता..??

८. “भाव” खाऊ नकोस, खराखरा “भाव” बोल.

९. नारळाचा “चव” पिळून घेतला तर त्याला काही “चव” राहत नाही.

१०. त्याने “सही” ची अगदी “सही* *सही” नक्कल केली.

११. “वर” पक्षाची खोली “वर” आहे.

१२. खोबर्‍यातला मुलांचा “वाटा” देऊन मग बाकीच्याची चटणी “वाटा”.

१३. “विधान” सभेतील मंत्र्यांचे “विधान” चांगलेच गाजले.

१४. फाटलेला शर्ट “शिवत” नाही तोपर्यंत मी त्याला “शिवत” नाही.

१५. भटजी म्हणाले, “करा” हातात घेऊन विधी सुरू “करा”.

१६. धार्मिक “विधी” करायला कोणताही “विधी” निषेध नसावा.

१७. अभियंता मला म्हणाला, इथे “बांध* *बांध”

१८. उधळलेला “वळू” थबकला, मनात म्हणाला, इकडे “वळू” कि तिकडे “वळू”.

१९. कामासाठी भिजवलेली “वाळू” उन्हाने “वाळू” लागली.

२०. दरवर्षी नवा प्राणी “पाळत” मी निसर्गाशी बांधिलकी “पाळत” असतो.

२१. फुलांच्या “माळा” केसांत “माळा”.

: मराठीची अवखळ वळणे….

ज्यांना तोंडावर “बोलून टाकणं” जमत नाही ते पाठीमागे “टाकून बोलत” राहतात.
.
शहाणा माणूस “पाहून हसतो”, निर्मळ माणूस “हसून पाहतो”.
.
काम सोपं असेल तर ते आपण “करून पाहतो”, अवघड असेल तर “पाहून करतो”.
.
स्वयंस्फूर्त लेखक आणि उचलेगिरी करणारा उचल्या ह्यांच्यात फारसा फरक नसतो….

एकजण “लिहून बघतो” तर दुसरा “बघून लिहितो”.
.
ही अशी सुंदर, लवचीक, अवखळ मराठी आणि आपणच तिची पायमल्ली करत असतो, नाही का? आता हेच बघा ना,

एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ, तर हकालपट्टी करताना देतो नारळ!!

😆😆😂😂    वॉट्सअॅपवरून साभार  😂🤣🤣

दोन अर्थ – एक शब्द

मराठी भाषेत एकाच शब्दाचे दोन भिन्न अर्थ थक्क करून सोडतात याची आणखी काही उदाहरणे

१ संताप, संगीत प्रकार – राग
२ पायताण, विद्युलता – चपला
३ ज्येष्ठ बंधू, गावगुंड    – दादा
४ कागदाचा, कापडाचा शत्रू, कमतरता  – कसर
५ मांडी, गणित    – अंक
६ फसवणूक, मंतरलेला दोरा  – गंडा
७ पुलंचा हातखंडा, एक संख्या  – कोटी
८ देवांचे जेवण, ग्रहदशा  – भोग
९ अनेक रहिवासी असलेली इमारत, पैंजण  – चाळ
१० एक अवयव, प्रतिष्ठा  – मान
११ दानवांचे पेय, मानेवरून फिरवल्यास मरण नक्की  – सुरा
१२ परिमल, मुक्काम – वास
१३ चतकोर, वड्याचा साथीदार – पाव
१४ प्रकाश देणारी, मुलीच्या मुलीची मुलगी  – पणती
१५ सन, फळाचे आवरण  –  साल
१६ वित्त, आशय  –  अर्थ
१७ जन्मदाते, पालेभाजी  –  पालक
१८ पराजय, गळयातील माळ  – हार
१९ बोलता न येणारा, बाळाची पापी  – मुका
२० वैद्याचा स्टेथोस्कोप, सलवारीची सोबतीण – नाडी


➰〰➿〰➰    ळ ची गंमत  ➰〰➿〰➰

‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी…!!! (हे तितकेसे खरे नाही, गुजराथी आणि दक्षिणेकडील सर्व भाषांमध्ये ळ हे अक्षर असते)

आणि म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे!

‘ळ’ अक्षर नसेल तर

पळणार कसे
वळणार कसे
तंबाखू मळणार कसे
दुसर्‍यावर जळणार कसे
भजी तळणार कशी
सौंदर्यावर भाळणार कसे

पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी

तीळगूळ कसा खाणार ?
टाळे कसे लावणार ?
बाळाला वाळे कसे घालणार
खुळखुळा कसा देणार
घड्याळ नाही तर
सकाळी डोळे कसे उघडणार ?
घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार
वेळ पाळणार कशी ?
मने जुळणार कशी ?
खिळे कोण ठोकणार ?

तळे भरणार कसे ?
नदी सागरला मिळणार कशी ?
मनातली जखम भळाभळा वाहणार कशी
हिवाळा,उन्हाळा, पावसाळा
नाही उन्हाच्या झळा
नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा !

कळी कशी खुलणार ?
गालाला खळी कशी पडणार ?
फळा, शाळा मैत्रिणींच्या
गळ्यात गळा
सगळे सारखे, कोण निराळा?

दिवाळी, होळी सणाचे काय ?
कडबोळी,पुरणपोळी
ओवाळणी पण नाही ?

तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ?

भोळा सांब ,
सावळा श्याम
जपमाळ नसेल तर
कुठून रामनाम ?

मातीची ढेकळे नांगरणार कोण?
ढवळे पवळे बैल जोततील कोण?
पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ?

निळे आकाश,
पिवळा चाफा
माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा !

नारळ, केळ, जांभूळ, आवळा,

नवर्‍याला बावळट बोलणार कसे

काळा कावळा,
पांढरा बगळा

ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा

अळी मिळी गुपचिळी,
बसेल कशी दांतखिळी?

नाही भेळ,
नाही मिसळ
नाही जळजळ
नाही मळमळ
नाही तारुण्याची सळसळ

पोळ्या लाटल्या जाणार नाहीत
टाळ्या आता वाजणार नाहीत !
जुळी तीळी होणार नाहीत !
बाळंतविडे बनणार नाहीत !
तळमळ कळकळ वाटणार नाही !
काळजी कसलीच उरणार नाही !

पाठबळ कुणाचे मिळणार नाही
सगळेच बळ निघून जाईल,

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

पण काहीच कळेनासे होईल ‘ळ’ शिवाय !
ळ अक्षराची माहिती सांगणारा लेख 👌
ज्याने कोणी लिहिले आहे सुंदर आहे.

वॉट्सअॅपवरून साभार

————————————

ळ या अक्षराचा उपयोग करून ग दि माडगूळकरांनी लिहिलेले हे अजरामर गीत

घननीळा, लडिवाळा
झुलवु नको हिंदोळा !

सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्‍याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा !

सांजवेळ ही, आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कलिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा !


• 🌹 स्त्रीचा पदर 🌹••

👉🏻 पदर काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द.

पण केवढं विश्‍व सामावलेलं आहे त्यात….!!

किती अर्थ, किती महत्त्व…  काय आहे हा पदर…….?

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खाद्यावर रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा भाग…….!!

तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण,
आणखी ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो.

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल, ते सांगताच येत नाही.

सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. …..!!

लहान मूल आणि आईचा पदर, हे अजब नातं आहे. मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन अमृत प्राशन करण्याचा हक्क बजावतं. …..!!

जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा पदर पुढे करते ….

मूल अजून मोठं झालं, शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चाल-ताना आईच्या पदराचाच आधार लागतो.
एवढंच काय, जेवण झाल्यावर हात धुतला, की टाॅवेल ऐवजी आईचा पदरच शोधतं आणी आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात मुलानं पदराला नाक जरी पुसलं, तरी ती रागावत नाही …

त्याला बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो…..!!

महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या वरून मागे सोडला जातो…..!!

तर गुजरात, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या. पिसाऱ्यासारखा फुलतो ….!!

काही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात ..
तर काही जणी आपला लटका राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !

सौभाग्यवतीची ओटी भरायची ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं वाण लुटायचं ते पदर लावूनच.

बाहेर जाताना उन्हाची दाहकता थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब मिळते….!!

काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच गाठ बांधली जाते .
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबतच बांधली जाते…..!!

पदर हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना…..?

नवी. नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते, पण संसाराचा संसाराचा राडा दिसला, की पदर
कमरेला खोचून कामाला लागते

देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना …..?  माझ्या चुका ” पदरात ” घे.‘

मुलगी मोठी झाली, की आई तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन्‌ काय
म्हणते अगं, चालताना तू पडलीस तरी चालेल. ….!! पण, ” पदर ” पडू देऊ नकोस !
अशी आपली भारतीय संस्कृती.

अहो अशा सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा विनयभंग तर दुरच, ती रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे वर नजर करून साधे पाहणार ही नाहीत. उलटे तिला वाट देण्या साठी बाजुला सरकतील एवढी ताकत असते त्या “पदरात” ……. !!

देवाने दिलेलं दान ‘पदरात’ पडतं आणि एक म्हण आहे, ‘पदरी पडलं आणि पवित्र झालं.’

ही आहे आपली भारतीय संस्कृती

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

आई वेगळी आणि आईचा पदर वेगळा

खरं तर आईची ओळख झाली आणि
मग नऊ महिन्यांनी तिच्या पदरा ची ओळख झाली.

पाजताना तिनं पदर माझ्यावरून झाकला,
आणि मी आश्वस्त झालो…
तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला…
आणि मग तो भेटतच राहिला… आयुष्यभर…

शाळेच्या पहिल्या दिवशी तो रुमाल झाला,
उन्ह्याळात कधी तो टोपी झाला,
पावसात भिजून आल्यावर तो टॉवेल झाला,
खावून घाईत खेळायला पळताना तो नँप्कीन झाला,
प्रवासात तो कधी शाल झाला…

बाजारात भर गर्दीत कधी आई दिसायची नाही
पण पदराच टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचो…
त्या गर्दीत तो माझा दीपस्तंभ झाला
गरम दूध ओतताना तो चिमटा झाला
उन्हाळयात लाईट गेल्यावर तो फँन झाला

निकालाच्या दिवशी तो पदर माझी ढाल व्हायचा
बाबा घरी आल्यावर,
चहा पाणी झाल्यावर,
तो पदरच प्रस्ताव करायचा….
छोटूचा रिझल्ट लागला…
चांगले मार्क पडले आहेत
एक-दोन विषयात कमी आहेत
पण आता अभ्यास करीन अस तो म्हणलाय..
बाबांच्या सु-याची सुरी होताना
मी पदराच्या आडून पाहायचो
हाताच्या मुठीत पदराच टोक घट्ट धरून…. ! ! !

त्या पदरानेच मला शिकवलं
कधी-काय अन कस बोलावं

तरुणपणी पदर जेव्हा बोटाभोवती घट्ट गुंडाळला
त्याची खेच बघून तिसऱ्या वेळी आईने विचारलंच,
“कोण आहे ती…नाव काय??”
लाजायलाही मला पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला

रात्री पार्टी करून आल्यावर… जिन्यात पाऊल वाजताच
दार न वाजवताच…
पदरानेच उघडलं दार
कडी भोवती फडकं बनून…
कडीचा आवाज दाबून
त्या दबलेल्या आवाजानेच दिली शिकवण नैतिकतेची

पदराकडूनच शिकलो सहजता
पदराकडूनच शिकलो सौजन्य
पदराकडूनच शिकलो सात्विकता
पदराकडूनच शिकलो सभ्यता
पदराकडूनच शिकलो सहिष्णुता
पदराकडूनच शिकलो सजगता

काळाच्या ओघात असेल, अनुकरणाच्या सोसात असेल
किंवा
स्वतःच्या शोधात असेल,
साडी गेली… ड्रेस आला… टाँप आला… पँन्ट आली… स्कर्ट आला… छोटा होत गेला

प्रश्न त्याचा नाहीच आहे…
प्रश्न आहे तो,
आक्रसत जाऊन गायब होऊ घातलेल्या पदराचा…

खरं तर सदऱ्यालाही फुटायला हवा होता पदर

….(Forwarded)

 . . . .  . . . . . .  . वॉट्सअॅपवरून साभार . . . . .  दि.०८-०८-२०१९

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

 गंमत ४ ची

1) औषधोप४
२) मानसोप४
3) प्रथमोप४

1) समोप४
2) पाहुण४
3) सदवि४
4) दूरवि४

1) सं४
2) वि४
3) आ४
4) प्र४
5) ला४

1) सदा४
2) समा४
3) शिष्टा४
4) भ्रष्टा४
5) अत्या४
6) सुवि४
7) उप४
8) अवि४
9) कुवि४
10) हिंसा४

‘चार’ची गाथा…
थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !

चारची खरी बाजू ‘ चार ‘ दिशेत आहे !

‘ चार ‘ खांबांशिवाय घर बांधता येत नाही.

‘ चार ‘ गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.

‘ चार ‘ चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ‘ चार ‘ बोटे उमटल्या शिवाय राहत नाहीत.

‘ चार ‘ शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ‘ चार ‘ आवाज काढण्या सारखेच असते.

चौघे म्हणजे जणू ‘ चार ‘ वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.

‘ चार ‘चा ‘वर्ग’ केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.

“चार”च्या ‘वर्गा’स पुन्हा “चार”ने गुणले की जगातल्या सर्वात ‘बुद्धि’मान खेळातले चौसष्ट घरांचे ‘बळ’ मिळते !

यांची टीका ही ‘ चौफेर ‘ असते.
यांचे फटके म्हणजे ‘ चौकार ‘ असतात !

चारचे सामर्थ्य देवीच्या ‘ चार ‘ भुजांसारखे असते अन पावित्र गाईच्या ‘ चार ‘ पावलांसारखे असते…

ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ‘ चार ‘ परस खोल असावीच लागते.

‘ चार ‘ वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.

‘ चार ‘ पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !

जगातल्या ‘ चौघां ‘चेही असेच असते. यांनी ‘ चार ‘ शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.

अन ‘ चार ‘ गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.

ज्या घरात आपण राहतो तेदेखील ‘ चौसोपी ‘ असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !

चौसोपी घराबाहेर ‘ चारचाकी ‘ असली की शान अधिक वाढते !

‘ चार ‘चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.

‘ चार ‘ लोकांपासून ‘ चार ‘ हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !

युगे देखील ” चार “झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ‘ चौघां ‘चा महिमा जाणावा.

स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ‘ सारेगम ‘ कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !

आपल्या जीवनाचे आधार देखील ‘ चार ‘च आहेत – दोन हात अन दोन पाय !
लीप वर्ष देखील ‘ चार ‘ वर्षानी येते !

जमीन सुद्धा ‘ चौरस ‘च शुभ समजली जाते.

माणूस हुशार झाला की त्याला ‘ चौकस ‘ बुद्धीचा समजलं जातं …

चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !

‘ चार ‘ ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.

‘ चार ‘ कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.

‘ चार ‘ संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.

‘ चार ‘ घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.

‘ चार ‘ घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.

‘ चार ‘ वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.

‘ चार ‘ पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.

मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ‘ चौ ‘घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!

‘ चार ‘ वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ ‘चौकडी’ होते.

‘ चार ‘ चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.

इतकेच कशाला चितेवर ‘ चार ‘ लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.

‘ चौघां ‘च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.

आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ‘ चार ‘ फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !

सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
‘ चार ‘ मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!


बारा ची बहादुरी

1⃣2⃣⬅अंकाची बहाद्दुरी➡1⃣2⃣

१२    हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक.

मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.
आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्ष १२ महिन्यांचे.

आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात. बारावा गुरू,शनि,मंगळ हानिकारक समजले जातात.
पूर्वी तपश्चर्या १२ वर्षे करीत, गुरूगृही अध्ययनही १२ वर्ष चाले.
घड्याळात आकडे बारा. पूर्ण दिवस जरी २४ तासांचा असला तरी आपण त्याचे १२/१२ तासांचे विभाजन केले आहे मध्यानपूर्व व मध्यान्हनंतर असे.पूर्वी रात्रीचे १२ वाजले म्हणजे मध्यरात्र झाली असे समजत.
एखादी गोष्ट संपली तिचा निकाल लागला म्हणजे बारा वाजले असे म्हणतात.

जिकडेतिकडे सकाळी भरलेला बाजार साधारण बारा वाजता उठतो त्यावेळी राहिला उरला सुरला माल स्वस्त दरात विकण्यात येतो म्हणून एखादी वस्तू कूचकिमतीला काढून टाकायची असेल तर ती १२ च्या भावात काढून टाका असा शब्दप्रयोग आहे.
पूर्वी १२ व्या वर्षी मुलींचे लग्न करत नसत.
आपल्याकडे पूर्वी १२ पयांचा एक आणा होत असे
इंग्लंडमधे १२ पेन्सचा १ शिलींग.
नवीन जन्मलेल्या अपत्याचे नामकरण १२ व्या दिवशी करतात त्याला बारसे म्हणण्याची पध्दत आहे
तसेच मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांनी करतात.
१२बलुतेदार, बारभाई, बारावाटा, बाराबंगले इ.शब्दप्रयोग अर्थपूर्ण आहेत.
एखाद्या अनुभवी बेरकी माणसाला १२ गावचं पाणी प्यायलेला आहे असं म्हणतात.

तसेच न ऐकणाऱ्या रगेल दांडगट स्वभावाच्या व्यक्तीलाही ‘ काय बाराचा आहे हा!’ असा शब्दप्रयोग वापरतात.
१२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत.
मराठी भाषेच्या वर्णमालेत स्वर १२ आहेत त्यावरूनच बाराखडी म्हणण्यात येते.
१२ गावचा मुखिया.
जमिनीला ७/१२ चा उतारा लागतोच.

अशी ही १२ ची किमया…..

म्हणूनच
…..
पुण्याच्या वैशिष्टपूर्ण बेरकीपणासाठी RTO ने पुण्यास MH 12 हा नंबर बहाल केला आहे !
😀😀

दि. २२ -०२-२०१९


शब्दात शेवट “त्र” असलेले समानार्थी शब्द

1 सखा मित्र
2 लक्ष्मणाचे दुसरे नाव सौमित्र
3 अग्नी सतत प्रज्वलीत असणे अग्निहोत्र
4 सगळीकडे सर्वत्र
5 पंचगव्यातील एक गोमुत्र
6 महाभारतातील लढाई झाली ते ठिकाण कुरुक्षेत्र
7 अभ्यासक्रमातील 6 महिन्याचा काळ सत्र
8 मुलगा पुत्र
9 विद्यार्थी छात्र (हिंदीमध्ये)
10 कारस्थान षडयंत्र (हिंदीमध्ये)
11 केवळ / फक्त मात्र
12 गणितातील नियम सूत्र
13 डोळे नेत्र
14 नाटकातील कलाकार पात्र
15 श्लोक सूत्र
16 निशा रात्र
17 विज्ञान शास्त्र
18 तारे , ग्रह नक्षत्र
19 चालचलन चरित्र  (हिंदीमध्ये)
20 एक ऋषी अत्री
21 टपाल पत्र
22 कापड वस्त्र
23 पूर्वज /ऋषी कडून चालत आलेले कुळ गोत्र
24 धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र
25 हत्यार शस्त्र
26 सख्खे नसलेले सावत्र
27 विक्षिप्त विचित्र
28 शुभ / पावन पवित्र
29 सौभाग्यलेणे मंगळसूत्र
30 हजार सहस्त्र


ते हरवलेले जादुई शब्द

तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, तर आई/बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवुन म्हणायचे “काही झालं नाही, तो बघ उंदीर पळाला!” आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो.

किंवा ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई/बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे/वस्तूकडे डोळे वटारून म्हणायचे “हात् रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . .” आणि असं म्हंटल्यावर आपल्याला ही आनंद व्हायचा, वाटायचं कि आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो.

कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आई-बाबांना दाखवायला गेलो कि ते त्यावर ‘फूsss’ असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे “काही नाही. . . आता फू केलंय ना , मग बरं होईल हं ते.”

पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आई-बाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्द बोलणं बंद केलं आणि आपणही ते ऐकणं !

मोठं झाल्यावर वाटायला लागल हि काय बालिशपणा होता तो. . . अस फू करून कधी जखम बरी होते का?

पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला त्या शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते.

जखम ‘फू’ नी नाही बरी व्हायची . . . . तर त्या हळुवार ‘फू’ मधल्या प्रेम, माया आणि विश्वासाने बरी व्हायची.

खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा दंगा करायला तयार व्हायचो.

जसे मोठे झालो तसे आपण सो कॉल्ड ‘ओपन वर्ल्ड’ मध्ये आलो. कॉलेज, नोकरी, छोकरी, स्पर्धा, करियर, मान मरातब, पैसा या आणि अशा अनेक गोष्टीनमधें गुरफटत गेलो. रोज अनेक शारीरिक, मानसिक जखमा व्हायला लागल्या, अनेक गोष्टी खुपू लागल्या, धर्मवाद, जातीवाद, राजकारण, व्यसनं, भोंदूगिरी, गरीबी, गुंडगिरी, उच्शृंखलता, दहशतवाद जीवघेणी स्पर्धा लचके तोडायला लागली. . रोज नवी आव्हान समोर येऊ लागली . . . रोज नव नवीन कृत्रिम गरजांना बळी पडायला लागलो . . . . पण दुर्दैवाने या वेळी “काही झाला नाही, उंदीर पळाला!”, “हात् रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . .” असं करून त्या सर्व दुःखांकडे डोळे वटारून बघायला, “फू केलंय ना , मग बरं होईल हां ते” असं म्हणून त्या जखमांवर फुंकर मारायला कोणी कोणी नव्हतं.

ते जादुई शब्द हरवले होते आता . . . . कदाचित असते तर हे सारं घडलंच नसतं.

कितीही मोठे झालो तरी त्या ‘बालिश’ शब्दांचं मूल्य आता कळायला लागलं. . .

ते शब्द फक्त सांत्वन करणारे नव्हते तर सामर्थ्य देणारे होते. आपला दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे, आपल्या जखमा विसरून पुन्हा खेळायला लावणारे शब्द होते ते. वर वर पोरकट वाटणाऱ्या या शब्दांमध्ये प्रेम आणि विश्वास यांचं प्रचंड सामर्थ्य होतं.

कधीतरी वाटतं कि कितीही मोठं झालो आणि कितीही मोठं संकट आल, तरी जर का पुन्हा कोणी “. . . . उंदीर पळाला!”, “हात् रे. . . . ” “फू. . .” हे शब्द उच्चारले, तर सारी संकटं, सारी दुःखं पळून जातील त्या लहानपणीच्या अदृष्य उंदराप्रमाणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या नियतीशी दोन हात करायला, पुन्हा एकदा त्या ओपन वर्ल्ड मध्ये दंगा करायला आपण सज्ज होऊ. . . . .

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी त्या ‘फू sss’ ची गरज पडतेच. अगदी आई बाबांना सुद्धा . . . . . त्याला त्याच्या विश्वासू माणसाकडून मिळालेली ‘फू sss’ नवसंजीवनी देऊन जाते.

जाता जाता वि. वा. शिरवाडकर यांच्या कालातीत कवितेतील एक ओळ आठवते:

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा. . . “

– एक फूsssss सर्वांच्या संकटासाठी!!

दि.२६-०१-२०१९

🌷🌹💐🌺🌸

नवी भर दि. १९-०६-२०१९

शब्द एक, अर्थ अनेक : पान

बाल्कनीतल्या रोपांची ‘पानं’ मलूल झाल्यासारखी वाटल्याने मी पाणी फवारण्याच्या छोट्या बाटलीने हलकेच पाणी स्प्रे करत होते. ते पाहून हाॅलमध्ये समोरच पुस्तक उघडून बसलेल्या रोहिनने, माझ्या नातवाने, धसमुसळेपणानं पुस्तक बंद करून,
‘मीs, मी करणार’ म्हणत धाव घेतली.

“अरे, अरे! जर्रा सावकाश !! ‘पानं’ दुमडतील नं अशानं “

“आज्जी अगंss, मी ‘पानांना’ हात तरी कुठे लावलाय अजून “😲

“अरे, पुस्तकाची ‘पानं’ म्हणतेय मी ! किती घाई तुझी पुस्तक बंद करायची”

“ओह् !! म्हंजे पेजेस बद्दल म्हटलंस ! किती कन्फ्युझिंग आहे गं ! झाडाची ‘ पानं’ नि पुस्तकाची पण ‘पानं’च ?🤔”

“ अरे, ‘Leaf’ आणि ‘pages’ असे दोन वेगवेगळे शब्द वापरावे लागतात ते तुमच्या मिडियममध्ये.
आमचं पहा, एका शब्दात काम होतंय😃”

मराठीची प्रशंसा करायच्या संधीचा मी लाभ उठवला.

“अगं , काय चाललंय तुम्हा दोघांचं ? वाजले बघ किती ? ‘पानं’ नाही वाढलीस ती अजून ? दुपारी चारच्या सुमाराला माझे मामा-मामी यायचेत, लक्षात आहे नं?”

आजोबांच्या एण्ट्रीच्या वाक्याने रोहिनला खुदकन हसू आलं नि आणखी एका ‘पाना’ साठी टाळीच
मिळाली मला त्याच्याकडून !
इतक्या इंटरेस्टने ऐकतो नं रोहिन की, शब्दांची गंमत त्याला समजावतांना मला खूप गंमत वाटते. मग जेवतांना मी जाणूनबुजून म्हटलं,

“अहो, मामांना जेवणानंतर ‘पान’ लागतं हं ! तुम्ही त्याना आणायला जाल तेव्हा न विसरता तेवढं घेऊन या”

“आज्जी, जेवायच्या आधी ,यू सेड ‘पान’ वाढलंय नि आता आजोबांना म्हणतेयस, जेवणानंतर ‘पान’ लागतं !हे कोणतं पान ?सांग ना गं ! आणि आज गेस्ट येणारेत का आपल्याकडे ?”

“जेवणानंतरचं ‘पान’ म्हंजे एक प्रकारचं पान , विड्याचं पान असं म्हणतात त्याला ! पचनासाठी,
I mean digestion साठी त्या पानाचा उपयोग होतो. आणि अरे गेस्ट नाही ‘पणजी’ यायची आहे”

“पण ‘पणजी’ तर प्लेसचं नावै नं आज्जी ?”

“होs! म्हंजे तसं बरोबर आहे तुझं!पण, आजी म्हंजे ग्रॅंड मदर आणि ग्रेट ग्रॅंड मदर म्हंजे मराठीत पणजी अन् ग्रेट ग्रॅण्ड फादर म्हंजे पणजोबा”
रोहिनच्या प्रश्नांना उत्तरं देता देता एकीकडे किचनमधली झाकपाकही केव्हाच उरकली.

“चला आता थोडावेळ झोपायचं.
मीही तुझ्याबाजूला पडते नि पेपर चाळते जरा”

“विशेष काही नाहीये आज पेपरात
नाही म्हणायला संप मिटल्याची तेवढी बातमी आहे.पण संपकरयांच्या तोंडाला ‘पानं’च पुसलीयेत शेवटी”

आजोबांचं वाक्य कानावर पडलं मात्र नि लगेच रोहिनचा प्रश्न आला

“म्हंजेsss,आता ही कोणती ‘पानं’? पुसली का नि कोणी?😳
सांग ना गं आज्जी “

मग ‘तोंडाला पाने पुसणे’ ही एक phrase म्हंजे वाक्प्रचार असून , अर्थ आणि वापर कसा होतो हे सविस्तर सांगत असतांना रोहिनची expressions बघतांना मला मजाच वाटली.

“मामींसाठी साडी घेतलीयस ते माहितेय मला. मग मामांना काय ‘धोतराचं पान ‘ द्यायचं का ? रीतसर ‘मानपान’ करणं पाळणारया पिढीतली आहेत दोघं
म्हणून विचारतोय.”

“आज्जी, काय विचारलं आजोबांनी आत्ता ? Again ‘पान’,
तेही धोतराचं ?🤔धोतर मिन्स?आणखी ते ‘मानपान’ म्हणाले ते पान कसं अस्तं?”

रोहिनच्या कानावर आजोबांचे बोलणं पडताच त्याचे प्रश्न येणार ह्याचा अंदाज असल्याने मी सावध होतेच.🤓

“अरे, धोतर म्हंजे पणजोबांचं काॅटन आऊटफिट असतं. त्याला धोतराचं पान असं म्हणायची पध्दत आहे.”

“आज्जी, काॅटन आऊटफिटला तुम्ही ‘पान’ म्हणता ? 😲आणि दसरयाच्या दिवशी, काय ते नाव सांगितलं होतंस ? हां, आठवलं, त्या आपट्याच्या ‘पाना’ला , “सोनं” म्हणायचं असं सांगितलं होतंस”

“मग ? आहे की नाही मराठी इंटरेस्टिंग नि गंमतीशीर ?”😃

“हुं, आज्जी ,पण एवढे सगळे मिनिंग्ज ऐकतांना मी दमलोय आता. आणि इनफ आॅफ दॅट ‘पान’ फाॅर मी☺”

असं म्हणून स्वारीने आवडती दुलई घेऊन भिंतीकडे तोंड वळवलं सुध्दा !

“काल फोनवर बोलतांना , ‘पिकली पानं’झालोयत आता, भेटायचं मनात आलं की लगेच बेत अंमलात आणायचा’ असं मामा म्हणाले खरं पण आवाजाची धार कायम होती.”

“हो का ? तशा तब्येती व्यवस्थित आहेत दोघांच्या पण वयाची पंचाऐशी पार केल्यानंतर , ‘कोणास ठाऊक पुढे ‘पानात ‘ काय वाढून ठेवलंय?’ टाईपचे विचार येणं स्वाभाविकच आहे , नाही का ?”

माझी प्रतिक्रिया गेली ह्यांच्या बोलण्यावर नि बोलण्याच्या ओघात पुन्हा पुन्हा झालेला ‘पान-उल्लेख’ ध्यानात आल्याने मी सावध होऊन रोहिनने नुसतेच डोळे मिटलेयत की कसं ? हे चेक करून घेतलं.😊

त्याला शांत झोप लागलेय हे ध्यानात आल्यावर मग ‘पान’ हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे रोहिनपर्यंत पोचवल्याच्या समाधानात कुशीवर वळले, अर्थातच त्या विषयाचं
‘पान’ उलटून !!😃

© अनुजा बर्वे.

हा लेख इथे संग्रहित करण्यासाठी अनुमति द्यावी अशी अनुजाताईंना विनंति

…….  वॉट्स अॅपवरून साभार  दि. १९-०६-२०१९

—————————————-

मराठीतली खास विशेषणे

आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?

लुसलुशीत- पोळी/ पुरणपोळी
खुसखुशीत- करंजी
भुसभुशीत- जमीन
घसघशीत- भरपूर
रसरशीत- रसाने भरलेले
ठसठशीत- मोठे
कुरकुरीत- चकली, कांदा भजी
चुरचुरीत- अळूवडी
झणझणीत- पिठले, वांग्याची भाजी
सणसणीत- मोठया आकाराची पोळी, भाकरी, पराठा
ढणढणीत- मोठ्या आवाजात लावलेले संगीत
ठणठणीत- तब्येत
दणदणीत- भरपूर
चुणचुणीत- हुशार
टुणटुणीत- तब्येत
चमचमीत- पोहे, मिसळ
दमदमीत- भरपूर नाश्ता
खमखमीत- मसालेदार
झगझगीत- प्रखर
झगमगीत- दिवे
खणखणीत- चोख
रखरखीत- ऊन
चटमटीत/ चटपटीत- खारे शंकरपाळे, भेळ
खुटखुटीत- भाकरी/ दशमी
चरचरीत- अळूची खाजरी पाने
गरगरीत- गोल लाडू
चकचकीत- चमकणारी गोष्ट
गुटगुटीत- सुदृढ बालक
सुटसुटीत- मोकळे
तुकतुकीत- कांती
बटबटीत- मोठे डिझाइन
पचपचीत- पाणीदार
खरखरीत- रफ
खरमरीत- पत्र
तरतरीत- फ़्रेश
सरसरीत/सरबरीत- भज्यांचे पीठ
करकरीत- सफरचंद, पेरूच्या फोडी
झिरझिरीत- पारदर्शक
फडफडीत- मोकळा भात
शिडशिडीत- बारीक
मिळमिळीत- कमी तिखट मसाला असलेला पदार्थ
गिळगिळीत- मऊ लापशी
बुळबुळीत- ओलसर चिकट वस्तूचा स्पर्श
झुळझुळीत- साडी
कुळकुळीत- काळा रंग
तुळतुळीत- टक्कल
जळजळीत- टिळकांचे अग्रलेख
टळटळीत- दुपारचे रणरणते ऊन
ढळढळीत- सत्य
डळमळीत- पक्के नसलेले
गुळगुळीत- स्मूथ
गुळमुळीत- स्पष्ट न बोलणे
कडकडीत- अतिशय गरम
सुळसुळीट- सैल (कपडे)
टकटकीत- फ्रेश
गुबगुबीत- अंगाने भरलेला/ली
घमघमीत- भज्यांचा मस्त वास

ह्या शब्दांना इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा.

आहे जगातली इतर कोणती भाषा इतकी समृद्ध ?

…….  वॉट्स अॅपवरून साभार  दि.१९-०७-२०१९


पाऊल आणि पाय

पाऊल व पाय दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात; पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात..

पाऊल नाजूक ..व मुलायम.. तर पाय भक्कम अन् मजबूत असावा लागतो..!

पाऊलखुणा उमटतात तर पायांचे ठसे …!!

पाऊलवाटेवर कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते; पण पायवाट ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते..!

पाऊल जपून टाकायचे असते; पण पाय हा रोवायचा असतो.. !!

काय कमाल आहे बघा..
नावडत्या व्यक्तीच्या घरी “कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही” असे म्हणतो; पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र आपला पाय लवकर निघत नाही..!!☺

नको त्या ठिकाणी पाऊल घसरते तर बहारदार संगीत मैफिलीत पाय रेंगाळत राहतो !

पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते !

जीवनात किंवा व्यवसायात टाकलेले पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो तर येणार्‍या अनुभवांमुळे आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा इतरांसाठी केलेली पायपीट ही अटळ व गरजेची असते… …!

बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही……..
………..

जन्माला येताना स्वतःच्या पावलांनी न येणारे आपण ,…परत जातानादेखील आपल्या पायांनी मात्र जात नाही एवढंच काय ते दोघांत साम्य आहे…!

अभिजीत उपाध्ये.
९/१०/२०१९

…….  वॉट्स अॅपवरून साभार  दि.१७-१०-२०१९


नवी भर दि. ६-१-२०२०     कीकारान्ती शब्द

नमस्कार मंडळी. आज आपल्या साठी एक नवीन कोडे पाठवित आहे. थोडासा विचार केला तर सहजपणे सोडविता येईल. अट फक्त एकच ,शेवटचे अक्षर “की”असलेले शब्द शोधायचे आहेत.  (उत्तरे खाली दिली आहेत)

०१ दाराची बहीण
०२ मातीची भांडी
०३ कृष्णाची माता
०४ नवनागातील एक नाग
०५ एक कडधान्य
०६ छोटे लाकूड
०७ एक अलंकार
०८ एक काव्यप्रकार
०९ एक आजार
१० एक नाते
११ दोन बोटांनी केलेला आवाज
१२ छोटी पोळी
१३ रामपत्नी
१४ छोटे तालवाद्य
१५ नाकाचा अलंकार
१६ केवडा
१७ आखूड
१८ पाहिजे तेव्हढी
१९ चकचकीत
२० एक रंग
२१ शारीरिक आवेग
२२ केरळमधील धरण
२३ ३॥ पट
२४ संगीत वैशिष्ट्य
२५ दुफळी
२६ रंग उडालेली
२७ एका घाटाचे नांव
२८ ढोंगी
२९ नाचणारी
३० पतंगाची मदतनीस
३१ गुद्दा
३२ स्वतःभोवती फिरणे
३३ एक नदी
३४ अशुभ चेहरा
३५ मोडलेली
३६ आवडती
३७ लबाड
३८ निराधार
३९ भीती
४० दुरावा असलेली
४१ एक जुने नाणे
४२ क्षणिक झोप
४३ कापसाचे बी
४४ बडबडी
४५ एक ऋषी
४६ भावंडातील दुजाभाव
४७ एक विद्यापीठ
४८ कीड पडलेली
४९ एक छोटे तालवाद्य
५० पराक्रम
—————
उत्तरे
१. खिडकी
२. मडकी
३. देवकी
४. वासुकी
५. मटकी
६. काटकी
७. वाकी
८. साकी
९. पटकी
१०. काकी
११. चुटकी
१२. चांदकी
१३. जानकी
१४. टिमकी
१५. चमकी
१६. केतकी
१७. तोटकी
१८. मोजकी
१९.लकाकी
२०. खाकी
२१. उचकी
२२. इडुकी
२३. औटकी
२४. गायकी
२५. बेकी
२६. विटकी
२७. खंबाटकी
२८. नाटकी
२९. नर्तकी
३०. फिरकी
३१. बुक्की
३२. गिरकी
३३. गंडकी
३४. सुतकी
३५. मोडकी
३६. लाडकी
३७. बेरकी
३८. पोरकी
३९. धडकी
४०. परकी
४१. दिडकी
४२. चुटकी
४३. सरकी
४४. बोलकी
४५. वाल्मिकी
४६. भाऊबंदकी
४७. रुडकी
४८. किडकी
४९. ढोलकी
५०. मर्दुमकी

…….  वॉट्स अॅपवरून साभार  


मराठी भाषेत घुसलेले शब्द

चुकीच्या शब्दाचा एक वार, अनेक मराठी शब्दच ठार !

एकीकडे महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी ,’ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ‘ देण्याची मागणी, केंद्र सरकारकडे केली आहे. तर दुसरीकडे मराठीची सर्वत्र सर्रास चाललेली कत्तल आपण पाहतोय. बोलीभाषा ही कुणीही कशीही बोलावी पण प्रत्येक भाषेची एक लिखित ‘ प्रमाण भाषा ‘ ( शुद्ध किंवा अशुद्धपेक्षा ) म्हणून अधिकृत भाषा असते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजवर अन्य भाषांमधून अक्षरशः हजारो शब्द मराठीत आले, नात्यातले झाले, स्थिरावले आणि मराठीच झाले. सार्वत्रिक संगणकीकरणानंतर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वाढत्या वापराबरोबरच अपरिहार्यपणे अनेक इंग्रजी शब्दच थेट मराठीत आले आहेत. पण आज कित्येक शब्द हे धटींगण उपऱ्यांसारखे डोक्यावर बसत आहेत. उत्तमोत्तम मराठी शब्दांचे अनौरस पर्याय म्हणून येत आहेत. बोलणाऱ्यांना ( त्यात मराठी मातृभाषिक अधिक प्रमाणात आहेत ) योग्य मराठी शब्दच येत नाहीत किंवा ते बोलणे कमीपणाचे वाटते म्हणून ते अन्य भाषी शब्द घुसवत आहेत.

शब्दांचे टंकलेखन करतांना होणाऱ्या चुकांमुळे किंवा लिपी ( “फॉन्ट”) च उपलब्ध नसल्यामुळे महत्वाच्या मराठी वृत्तपत्रांमधून काही चुकीचे मराठी शब्द कायमचे रूढ झाले आहेत. उदा. उद्धाटन ( उद्घाटन ), करणार्या ( करणाऱ्या ) ! चुकीच्या शब्दावर अनुस्वार देण्याची विकृती तर अलीकडे फोफावतच चालली आहे. मुबंई, जवांनाची, राजंहस, उंदड, जगंल, जंगदबा असे लिहिलेले शब्द वाचताही येत नाहीत. अनेक हिंदी शब्द थेट आयात केल्यामुळे अनेक उत्तम छटा असलेले मराठी शब्द कालबाह्य ठरत आहेत. योगदान हा एकच शब्द वापरून पूर्वीचे हातभार, सहभाग, महत्वाचा वाटा, खारीचा वाटा, सिंहाचा वाटा हे प्रचलित शब्दच बाद झाले आहेत. आयाम या एका शब्दामुळे परिमाण, दिशा, छटा, खोली असे उत्तम शब्द बाद होत आहेत. यश ऐवजी यशस्विता, उपयोग ऐवजी उपयोगिता कधी आले ?

मराठी वृत्त वाहिन्या आणि मालिका वाहिन्या आपल्या मराठी भाषेचे ज्या वेगाने आणि जे वैविध्यपूर्ण धिंडवडे काढतायत, ते पाहिल्यावर या वाहिन्या मराठी भाषेच्या शववाहिन्या ठरणार काय अशी भीती वाटू लागली आहे. मूळचे उत्तमोत्तम मराठी शब्द असूनही हेराफेरी, पर्दाफाश, भांडाफोड, छेडछाड, तामझाम, करूयात / जाऊयात / पाहुयात, मोठा खुलासा ( गौप्यस्फोट ), हिरवी झेंडी दाखविली, जन्मदिवस ( वाढदिवस), प्रधानमंत्री ( पंतप्रधान ), रक्षामंत्री ( संरक्षण मंत्री), वित्तमंत्री (अर्थमंत्री) अशा एकाहून एक अगम्य / आगाऊ आणि भाडोत्री शब्दांनी ओसंडून वाहणारी मराठी भाषा सतत ऐकावी लागते. एखाद्या घटना स्थळावरून वार्ताहर जेव्हा, ” हा रस्ता जो आहे, ही झाडे जी आहेत, इथली माणसे जी आहेत, वाहने जी आहेत ” अशा मराठीत वर्णन करू लागतो तेव्हा आपणच अवाक होतो. काही मुख्य वाहिन्यांच्या निवेदकांना विदर्भ, विद्यार्थी, विद्यापीठ हे शब्द म्हणताच येत नाहीत. त्या ऐवजी ते अनुक्रमे विधर्ब, विध्यार्ती, विध्यापीट असे म्हणतात. अनेक निवेदक, स्पर्धात्मक कार्यक्रमांचे परीक्षक हे भयंकर मराठी बोलतात. देशभक्तीपर गीत ऐकून त्यांच्या “अंगावर काटा ” येतो. वास्तविक रोमांच उभे राहायला हवेत. प्रेमळ स्पर्शाने अंग मोहरून येते, भीतीच्या कल्पनेने अंग शहारून येते, भयंकर भीतीने सरसरून काटा येतो ! मग अशा विद्वान मंडळींचे मराठी, संपूर्ण मराठी भाषाच प्रदूषित करीत आहे. अशुद्ध, भ्रष्ट, भेसळयुक्त मराठीच्या महासागरात, नक्की योग्य काय हेच समजेनासे झाले आहे.

मराठी साहित्य संमेलने, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे प्रयत्न, राज्यभाषा पंधरवडा, मराठीतून कारभार करण्याचे नित्यनेमाने निघणारे सरकारी आदेश, महाराष्ट्रातच मराठी भाषा भवन उभारण्याच्या योजना…. सर्व काही खूप छान आहे. पण किमान प्रमाणित मराठी भाषा तरी आपण बोलायला, लिहायला हवीच ना !

( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा ).
***** मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com

फेसबुकावरून साभार दि.०७-०२-२०२०


आयुष्याबद्दल काय छान भाष्य आहे पहा

बदलते ते वय
बदलत नाही ती सवय

भावतो तो भाव
भोवतो तो स्वभाव

सतत बदलतो तो रंग
अविचल असतो तो श्रीरंग

समज वाढवते ती संगती
अतिसंगाने जाणवते ती विसंगती

आतून उमटतो तो सूर
भावनाहिन सूर तो भेसूर

वहात जाते ती लय
वहावत नेतो तो प्रलय

आनंदाचा शोध ते जगणं
आनंदहि दुरावतं ते वागणं

ती/तो येता उठती ते तरंग
ती/तो नसता कण्हते ते अंतरंग

ति/त्या च्यासह असते ते घर
ति/त्या च्या विणा उरते ती घरघर

🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹

स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी शब्द

आपल्या मराठीची एक गम्मत आहे. यात वस्तूंना नावं खूप सुंदर दिली आहेत. साधारणपणे मोठ्या वस्तूंना पुल्लिंगी आणि त्याच्याशी संबंधित लहान, नाजूक आणि हालचाल जास्त करणाऱ्या वस्तूंना स्त्रीलींगी नावं दिलेली आहेत. तसेच बहुतेक वेळा या वस्तू एकमेकांना पूरक आहेत.
बघा वाचून मजा येईल.😊🙏
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
जराशी गम्मत 😅
ती कैरी आंबट ,🥴
तो आंबा गोड 🥭🥭
ती चांदणी लुकलुकणारी ,✨
तो चंद्र तेजोमय 🌝
ती वेल नाजूक,🌿
तो वृक्ष मोठा 🌳
ती फांदी छोटीशी , 🌿
तो बुंधा जाड🌳
ती झुळूक सुखावणारी,
तो वारा सोसाट्याचा
ती माळ नाजुकशी,
तो हार मोठा.
ती साखळी नाजुकशी ,
तो साखळदंड जाडजूड
ती बांगडी नाजुकशी,
तो कडा जाड💫
ती कविता गोड ,🙂
तो धडा रटाळ 🙁
ती घागर , कळशी ,
तो माठ , रांजण, घडा आणि हंडा
ती सुरी ,
तो सुरा🍴
ती ओळ ,
तो परिच्छेद
ती नदी वाहणारी,
तो सागर अथांग🌊
ती झोपडी , माडी लहान🏕⛺
तो महाल , बंगला महान 🏠🏘
ती खिचडी साधीशी,
तो मसाले भात आणि पुलाव 🥘
ती मीटिंग, बैठक
तो परिसंवाद
ती खिडकी,
तो दरवाजा
ती टेकडी छोटीशी , 🗻
तो डोंगर भलामोठा⛰🌋
ती जखम लहान,
तो घाव मोठा
ती दोरी बारीकशी,
तो दोर जाडजूड
ती डबी छोटीसी ,
तो डबा मोठा
ती थाळी ,
तो थाळा
ती पोळी , भाकरी साधी,
तो मात्र पराठा आणि ब्रेड
ती सायकल , स्कुटी रिक्षा बस
तो ट्रक, रणगाडा प्रचंड
ती पाटी छोटी
तो फळा मोठा
ती वाटी ,
तो कुंडा

जीवनाचा पण हाच आहे का फंडा?

फेसबुकवरून साभार दि.०५-०७-२०२०


पोत

कापडाच्या स्पर्शाशी संबंधित असलेला हा शब्द हल्ली ऐकायलाही मिळत नाही फारसा. हल्ली सगळे
कापडाचा Feel घेतात. मात्र लहानपणी निरुपायाने आईबरोबर खरेदीला जावं लागलं की हा शब्द हमखास कानावर पडायचा. काल खादी भांडारात हा शब्द अचानक फिरुन समोर आला. एकदम वाटलं, अरे पोत फक्त कापडाला थोडाच असतो !

पोत आवाजालासुद्धा असतो की. लताजींच्या आवाजाला निर्मळतेचा पोत, मेहेंदी हसनच्या आवाजाचा
मखमली पोत, आमच्या संस्कृतच्या वैशंपायन सरांच्या आवाजाचा विद्वत्तेचा पोत, माझ्या आजीच्या आवाजाचा विशुद्ध मायेचा पोत.

….आवाजातला नम्रपणाच्या आच्छादनाखाली असलेला कणखर पोलादाचा पोत जाणवतो, तर काही जणांच्या खोट्या स्तुतिसुमनांच्या मागे दडलेला किळसवाण्या स्वार्थाचा पोत उघड असतो.

अगदी एकेकाच्या स्वभावालासुद्धा पोत असतो. देशस्थांच्या स्वभावाचा पोत घोंगडीसारखा असतो, जरा
खरखरीत पण ऊबदार. कोकणस्थांच्या स्वभावाचा पोत मात्र पार्‍यासारखा असतो, कितीही जवळ आलं तरी स्वतःचं अस्तित्व वेगळं टिकवून ठेवतो.

काही जणांच्या स्वभावाला सुरवंटाच्या केसांचा पोत असतो, जवळीक साधायचा प्रयत्न केला की कातडी सोलवटलीच पाहिजे.

अगदी माझ्याच स्वभावाला फणसाच्या सालीचा पोत आहे, दुखवत नाही पण फार जवळही येऊ देत नाही.
माझ्या बायकोच्या स्वभावाला मात्र निरांजनाच्या प्रकाशाचा पोत आहे, शांत, शीतल, प्रसंगी दाहक, पण
तरीही घर उजळून टाकणारा.

एकेका वयालासुद्धा निरनिराळा पोत असतो. बालपणाला सायसाखरेचा पोत असतो, पौगंडाला गुळगुळीत
कागदावरच्या देखण्या चित्राचा पोत असतो, जे हवंहवंसं वाटतं पण हाती गवसत नाही.
तारुण्याला फुलपाखराच्या पंखांचा पोत असतो, देखणं, सुंदर पण विस्कटून जायला तत्पर.
तिशी-पस्तिशीला पाचशे रुपयांच्या कोर्‍या करकरीत नोटेचा पोत असतो, तर पन्नाशीला धुऊन वापरून मऊ
झालेल्या सोलापुरी चादरीचा पोत असतो. साठीला मातीच्या मडक्याचा पोत असतो, दिसतं कणखर, पण
असतं हळवं. सत्तरीपुढे मात्र मिठाईवरच्या राजवर्खाचा पोत होतो, पाहताच मनात आदर निर्माण करणारा, मात्र काळजीपूर्वक हाताळायला हवं याचं भानदेखील देणारा.

बघता बघता किती तऱ्हेतऱ्हेचे पोत या पोतडीत गोळा झालेत नाही !

माणसांच्या मनाचा पोत हि लवकर समजत नाही🙏🏼

वॉट्सअॅपवरून साभार दि. २०-०९-२०२०

**********

नवी भर दि.०४-१२-२०२०

‘भेट’…

किती प्रगल्भ व्याप्ती आहे ‘भेट’ या शब्दाची !
खरंच, खूपच अर्थपूर्ण.

कोण? कुणाला? कुठे? केव्हा?
कशाला? ‘भेटेल’

आणि

का? ‘भेटणार नाही’

ह्याला ‘प्रारब्ध’ म्हणावं लागेल.

‘भेट’ ह्या शब्द संकल्पनेविषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन.

‘भेट’ कधी ‘थेट’ असते,
कधी ती ‘गळाभेट’ असते,
कधी ‘Meeting’ असते,
कधी नुसतंच ‘Greeting’ असते.

‘भेट’ कधी ‘वस्तू’ असते प्रेमाखातर दिलेली.
‘भेट’ कधी ‘देणगी’ असते कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली.

‘भेट’ कधी ‘धमकी’ असते…
‘बाहेर भेट’ म्हणून दटावलेली.
‘भेट’ कधी ‘उपरोधक’ असते…
‘वर भेटू नका’ म्हणून सुनावलेली.

‘भेट’ थोरा-मोठ्यांची असते,
इतिहासाच्या पानात मिरवते.
‘भेट’ दोन बाल-मित्रांची असते…
फार वर्षांनी भेटल्यावर,
पिकल्या केसांचा अंदाज घेत चाचपलेली.

‘भेट’ कधी अवघडलेली,
‘झक’ मारल्यासारखी.
‘भेट’ कधी मनमोकळी,
मनसोक्त मैफिल रंगवलेली.

‘भेट’ कधी गुलदस्त्यातली,
कट-कारस्थान रचण्यासाठी.
‘भेट’ कधी जाहीरपणे,
खुलं आव्हान देण्यासाठी.

‘भेट’ कधी पहिली- वहिली
पुढल्याची ओढ वाढवणारी
‘भेट’ कधी अखेरची ठरते.
मनाला चुटपूट लावून जाते.

‘भेट’ कधी अपुरी भासते,
…बरंच काही राहून गेल्यासारखी.
‘भेट’ कधी कंटाळवाणी,
घड्याळाकडे पाहून ढकलल्यासारखी.

‘भेट’ कधी चुकून घडते,
…पण आयुष्यभर पुरून उरते.
‘भेट’ कधी ‘संधी’ असते,
निसटून पुढे निघून जाते.

‘भेट’ कोवळ्या प्रेमिकांची.
लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर.
‘भेट’ घटस्फोटितांचीही असते.
…हक्क सांगण्यासाठी मुलांवर.

‘भेट’ एखादी आठवणीतली असते.
मस्त ‘Nostalgic’ करते.
‘भेट’ नकोशी भूतकाळातली.
…..सर्रकन अंगावर काटा आणते.

‘भेट’…
विधिलिखीत…काळाशी न टाळता येण्याजोगी !

‘भेट’…
कधीतरी आपलीच आपल्याशी.
अंतरातल्या स्वत:शी.
आयुष्याच्या नाजुक वळणापाशी.

…’पुन्हा भेटू

🙏🙏🙏
भेटी चे सगळे प्रकार दिसले … !
.
आता भेटावेसे वाटतेय ना …. !

वॉट्सअॅपवरून साभार दि. ०४-१२-२०२०

***

नवी भर दि.२४-०१-२०२१

⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️
माझी मराठी
सहज गंमत म्हणून……वाक्य डावीकडून उजवीकडे वाचा किंवा उजवीकडून डावीकडे वाचा…अक्षरे त्याच क्रमाने येतात.
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते जसे सरळ वाचताना…… तसा ऱ्हस्वदीर्घांमध्ये फरक आहे.
👇👇👇👇👇👇

१. चि मा का य का मा ची
२. भा ऊ त ळ्या त उ भा
३. रा मा ला भा ला मा रा
४. का का, वा च वा, का का
५. का का, वा ह वा ! का का
६. ती हो डी जा डी हो ती
७. तो क वी डा ल डा वि क तो
८. तो क वी मो मो वि क तो
९. तो क वी सा मो सा वि क तो
१०. तो क वी को को वि क तो
११. तो क वी ई शा ला शा ई वि क तो
१२. तो क वी री मा ला मा री वि क तो
१३. तो क वी वा मा ला मा वा वि क तो
१४. तो क वी व्ही टी ला टी व्ही वि क तो
१५. तो क वी वि की ला कि वी वि क तो
१६. तो क वी च हा च वि क तो
१७. तो क वी का वि क तो?
१८. तो क वी लि ली वि क तो
१९. तो क वी ऊ मा ला मा ऊ वि क तो
२०. तो क वी ठ मा ला मा ठ वि क तो
२१. तो क वी क णि क वि क तो
२२. तो क वी बे ड व ड बे वि क तो
२३. तो क वी ठ मी ला मी ठ वि क तो
२४. म रा ठी रा म
२५. तो क वी च क्का च वि क तो
२६. तो क वी हा च च हा वि क तो
२७. तो क वी रा शी ला शि रा वि क तो
२८. तो क वी टो मॅ टो वि क तो
२९. टे प आ णा आ प टे
३०. शि वा जी ल ढे ल जी वा शी.
३१. स र जा ता ना प्या ना ता जा र स.
३२. हा च तो च हा

वॉट्सअॅपवरून साभार दि.२८-०१-२०२१

ऋकार-काव्य !!!

ऋ आद्याक्षर शोधिता शब्द
माझी मीच झाले निःशब्द!
ऋ काराचे मोजकेच शब्द
करती मन शान्त स्तब्ध!
ऋ षी परम्परा आर्यावर्तात
असे प्राचीन प्रचलित !
ऋ ग्वेदमन्त्र गाती सूरात
श्रोते ऐकती शांत चित्त !
ऋ चा पठन एकामागून एक
सर्गामागुनी सर्ग अनेक !
ऋ ण मातेचे ते मातृ-ऋण
पित्याचे निर्व्याज पितृऋण !
ऋ ण हे फिटता नच फिटे
प्रयत्न सारे होती थिटे !
ऋ द्धी सिद्धी अन समृद्धी
होतसे आयुरारोग्य वृद्धी!
ऋ जुता असो निरंतर मनी
चित्तही असो समाधानी!
ऋ तूचक्र हे फिरते अविरत
जीवनाचे रंग नित बदलत!
ऋ तू वसंत येई शिशिरानंतर
घेऊन येतसे साथ बहार!
ऋ तूराजाची ऐट हा मिरवत
गातो राग बहार वसंत !
ऋ तूराज्ञी वर्षा करीआगमन
हर्षित तन मन सुमन !
ऋ तूचक्र फिरे सहा ऋतूंचे
सौन्दर्यअनुपम निसर्गाचे!
ऋ षभ असे हा सदा श्रेष्ठ
भरतर्षभ अर्जुन ही श्रेष्ठ!
ऋ षभ हा गातो मधुर गीत
अद्वितीय स्वर संगीतात !
ऋ त्विज् ही यज्ञ पुरोहित
शुभकार्यी यज्ञयाग करित!
ऋ चा अन वेदमन्त्र पठन
आहूती तथा होमहवन !
ऋ ष्यक असे एक हरिण
वेगवान सुंदर नयनबाण!
ऋ ष्यक हा चञ्चल चपल
व्याध करी त्यास घायाळ !
ऋ ऋषीचा असो ऋग्वेदाचा
स्वरअनमोल आयुष्याचा!
………. रेखा मोघे…..😊

वॉट्सअॅपवरून साभार दि.०८-०२-२०२१

**********

ज्यांना मराठीची मजा चाखता येते, त्यांच्यासाठी खास….

मजेदार प्रश्नमंजुषा..

बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतात कां?

१. पगाराला दोनने ‘गुणले’ तरी … ‘भागत’ का नाही?
२. लग्नाची ‘बेडी’ नक्की … कोणत्या गुन्ह्यासाठी ‘पडते’?
३. अक्कल ‘खाते’ … कोणत्या बँकेत ‘उघडता’ येते?
४. ‘भाऊगर्दीत’ … ‘बहिणी’ नसतात का?
५. ‘बाबा’ गाडीत … ‘लहान बाळांना’ का बसवतात?
६. ‘तळहातावरचा फोड’ … किती मोठा होईपर्यंत ‘जपावा’?
७. मनाचे मांडे भाजायला .. ‘तवा’ का लागत नाही?
८. ‘दुग्धशर्करा योग’… ‘मधुमेहींना’ वर्ज असतो का?
९. ‘आटपाट’ नगर … कोणत्या ‘जिल्ह्यात’ येते?
१०. ‘तिखट प्रतिक्रिया’ … ‘गोड’ मानून घेता येते का?
११. सतत ‘मान खाली’ घालायला लावणारा मित्र -… ‘मोबाईल’ असावा कां?
१२. ‘काहीही’ या पदार्थाची … ‘रेसिपी’ मिळेल का?
१३. ‘चोरकप्पा’ … नक्की ‘कोणासाठी’ असतो?
१४. ‘पालक’ ‘चुका’ दाखवून … मुलांना ‘माठ’ ठरवत असतात का?
१५. ‘पैशांचा पाऊस’ असेल … तर ‘छत्री’ उलटी धरावी का?
१६. ‘भिंतीला’ कान असतात … तर बाकीचे अवयव कुठे असतात?
😃😃😃😃😃😃😃
चेहरा खुलवणारी प्रश्नमंजुषा! ……. दि.०५-०६-२०२१

मार्ग

मार्ग या अर्थाचे किती शब्द आहेत पहा.

‘गल्ली’ ला असती दोन्ही दिशांना दारे । ‘बोळा’ स परंतु एक दिशाच खुली रे ॥
मळलेली असते ‘पाऊलवाट’ जुनी रे । हे शब्द सुचविती ‘मार्ग’ मराठीत सारे ॥१॥
‘वाटे’ वर असती काटे नित्य स्मरा रे । ती ‘सडक’ कडक जरी धुंडित गाव पुढारे ॥
‘रस्त्या’ स दुतर्फा ‘पदपथ’ रक्षित बा रे। हे शब्द सुचविती ‘मार्ग’ मराठीत सारे ॥२॥
समस्येचे करिती ‘समाधान’ जन सारे । प्रश्नाला शोधिती ‘उत्तर’ कुठेही बा रे ॥
उत्तरा दिसती जे ‘पर्याय’ पहा सारे । हे शब्द सुचविती ‘मार्ग’ मराठीत सारे ॥३॥
कुणी धर्म पूजती कुणास ‘पंथ’ हवा रे । तुम्ही संकटात, सत्याचा ‘पक्ष’ धरा रे ॥
अन् नाम जपा जर ‘उपाय’ थकले सारे। हे शब्द सुचविती ‘मार्ग’ मराठीत सारे ॥४॥

नरेंद्र गोळे

उपसर्ग

.
उपसर्गानी शब्दाचा अर्थ तो बदलतो पुरा ।
प्रहार आहार विहार संहारापरी तो स्मरा ॥ धृ ॥
.
‘प्रहार’ करतो वार, ‘आहार’ भूक भागवी ।
‘विहार’ घडवी संचार, ‘संहार’ नाहीसे करी ॥ १ ॥
.
कार, कार्य, काज, काम उपसर्गे त्रस्त सर्वही ।
एकेकाची गती पाहू, अर्थ ते बदलती कसे ॥ २ ॥
.
‘सत्कार’ करी सन्मान, ‘बेकारा’ तो न लाभतो ।
‘आकार’ घडवितो दर्शन, ‘प्रकार’ वेगवेगळे ॥ ३ ॥
.
‘सत्कार्य’ चांगले म्हणती, ‘दुष्कार्या’ म्हणती वाईट ।
‘कार्य’ कार्यालयी होते, ‘मत्कार्य’ माझे असे ॥ ४ ॥
.
‘कामकाज’ होत सर्वत्र, ‘काजं’ गुंडीसवे रत ।
‘कृषीकाज’ पिकविते अन्न, ‘वैश्यकाज’ देतघेत ते ॥ ५ ॥
.
‘काम’ मोहास कारण हो, ‘निष्काम’ म्हणुनी असा ।
‘नाकाम’ स्फोटही होती, ‘घरकाम’ भासते कठीण ॥ ६ ॥
.
नरेंद्र गोळे

************

ABCD वरून शब्द

A क मुलगी होती.
B कानेर ला राहत होती.
C मा तिचे नाव होते.
D स्को डान्स करत होती.
E मामी क्रीम वापरत होती.
F वाय बी. ए. शिकत होती.
G न्स पँट वापरत होती.
H M T घड्याळ वापरत होती.
I ते खाण्याची सवय होती.
J जूरीला जाणार होती.
K दारची मैत्रीण होती.
L आय सी ची एजंट होती.
M 80 वर जात होती.
N T रामारावची फॅन होती
O ळख वाढवून LIC काढत होती.
P यानो वाजवत होती.
Q बाला गेली होती.
R रशात सारखी पहात होती.
S टी ने प्रवास करत होती.
T नाच्या घरी जात होती.
U गंधर कादंबरी वाचत होती.
V डी ओ पाहण्याची आवड होती.
W W F ची फॅन होती.
X बॉयफ्रेंड शी बोलत होती.
Y फळ बडबड करण्याची सवय होती.
Z पी जवळ रहात होती.

जमलं का 🤔😀😀
लॉक डाऊन टाईमपास..
एन्जॉय करा. 😃😃 . . . . . . . . . . वॉट्पसॅवरून साभार दि.२४-०६-२०२१

🙏🌹🌹🙏😇🤪

लस शब्द

सध्या लसीकरण मोहीम (कोविड 19 ) बरीच चर्चेत आहे.विविध शब्द त्यासंबंधी येऊ शकतात .त्यातला लसातूर हा शब्द आणि लसस्वी हा आधीच प्रचारात आला होता .हे सारे केवळ विनोदी अंगाने घ्यावे .नवीन शब्द सुचले तर ऍड करू ,आपणही करा ….
*
*
१.लस घेऊन फ्रेश वाटणे—लस लशीत वाटणे
२.लस घेण्यास आतुर —– लसातूर
३.लस विरुद्ध बोलणारा—लसासुर
४.लस संबंधी लूट इ. करणारा—लसण्या उद
५.लस केव्हा मिळेल ह्याची शक्यता वर्तवणारा शब्द—————लसंभाव्यता
६.लस मिळू शकण्याच्या समूहात बसू शकणारा—–—————लसेबल
७.लस मिळू दे हा आशीर्वाद—लसस्वी भव किंवा लसवंत हो
८.लस मिळालेला———लसवंत
९.दोन्ही लसी मिळालेला— द्विलसवंत (एक लसवंत-पहिली लस मिळालेला)
१०.लसीला दाद देणारा—–लसज्ञ
११.लस घेऊनही उलट सुलट बोलणारा——————-लसघ्न
१२.क्रम नसतांना लस घेण्यास मध्ये घुसू पाहणारा————लसंतुक

मंडळी,सगळ्यांना स्कोप आहे,वेळ आहे नवीन शब्द ऍड करा.
धन्यवाद😊🙏

ता. क.
१.लसोजेनिक—-लस घेताना फोटो काढण्यास इच्छुक
२.लसेन्द्र बाहुबली—-लस घेऊन शक्तीवान झाल्याचा फील येणारा
३.लसेच्छूक———लस घेण्याची इच्छा असणारा!

*******************************

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुचवलेले मराठी प्रतिशब्द

नवी भर . . दि.०३-०३-२०२२ वॉट्सॅपवरून साभार

घासावा शब्द, तासावा शब्द

घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये ||

 • संत तुकाराम
  मला हा अभंग वॉट्सॅपवर मिळाला आहे. तो संत तुकारामांनीच लिहिला असेल याची मला खात्री नाही, पण कसे बोलावे याचे उत्तम मार्गदर्शन. . . . दि.२०-०३-२०२२

मायंदाळ, बख्खल, लई . . माझी मराठी भाषा😌

मायंदाळ म्हणजे काय?बक्कळ,
बक्कळ म्हणजे काय?पुष्कळ,
पुष्कळ म्हणजे काय?लय,
लय म्हंजी काय? भरघोस,
भरघोस म्हणजे काय? जास्त,
जास्त म्हणजे काय?भरपूर,
भरपूर म्हणजे काय?खूप,
खूप म्हणजे काय?मुबलक,
मुबलक म्हणजे काय?विपुल,
विपुल म्हणजे काय? चिक्कार,
चिक्कार म्हणजे काय,मोक्कार ,
मोक्कार म्हणजे काय?मोप,
मोप म्हणजे काय ? रग्गड,
रग्गड म्हणजे काय? प्रचंड,
प्रचंड म्हणजे काय?कायच्या काय, कायच्या काय म्हणजे काय ?
लय काय काय….

कळलं का की इंग्रजीत सांगू
😝😝

लावालावी, लागणे – एक मराठी गंमत !

लावणे या मराठी भाषेतल्या  एकाच  क्रियापदाचा उपयोग किती वेगवेगळ्या अर्थांनी केला जातो याचे एक मजेदार संकलन या लेखात केलेले आहे. वॉट्सअॅपवरून आलेल्या या लेखाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत ते मला माहीत नाही, कुणीतरी हा लेख चक्क  पुलंच्या नावावर सुद्धा खपवला आहे. पण  ज्यानी कुणी हा लेख लिहिला आहे त्यांनी खूप परिश्रम घेऊन हा लेख तयार केला आहे यांत शंका नाही. त्यांचे आभार मानून आणि संमति गृहीत धरून हा लेख इथे दिला आहे.  

भाषेच्या गंमती:  शब्द एक, अर्थ अनेक

‘लावणे’ ह्या क्रियापदाचा अर्थ’

मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे.
असेल आठवी-नववीत. पण चेन्नईहून थेट पुण्याला;
मग मराठीचा गंध कसा असणार?
थोडं शिकवल्यावर मी तिला काही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती.
एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले.
तीन चार शब्दांचे अर्थ सांगितले.

शेवटचा शब्द होता– लाव/लावणे.
मी तिला म्हटलं, ‘अगं, वाक्य लिहून आणायचंस, नुसता अर्थ कसा सांगू?
काहीही असू शकेल’.
एका शब्दाचा / व्हर्बचा अर्थ काहीही?

तिला कळेना.

‘ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज’. ती म्हणाली.
तिला वाटलं, असतील दोन तीन अर्थ!
पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता.

मी मनात म्हटलं,
चला, आजचा वेळ या लावालावीतच घालवू.

‘हे बघ, तू मराठीचा क्लास लावला आहेस.’

‘ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास ‘. लगेच वहीत क्लास लावणे= जॉईन असं लिहिलं.

‘क्लासला येताना तू आरशासमोर काय तयारी केलीस? पावडर लावलीस? ‘
‘ओ येस’

‘आपण पार्टीला,फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू/टिकली लावतो.

‘येस, आय अंडस्टँड’ — टु अप्लाय. तिनं लिहिलं. ‘पण आपण केसांना पिन्स, हेअरबँड लावतो. तिथे तो अर्थ होत नाही’.

‘ओके; वी पुट ऑन दॅट’.
‘आता बघ. मी चहाचा कप तोंडाला लावला, आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड लावलं.
आपण बाळाच्या गालाला हात लावतो. इथे काय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच्!’
चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, हां, तुम्ही पार्क मधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी; फुलांना हात लावू नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, पुस्तकाला पाय लावू नको. सो— टु टच्

‘मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर’.

‘हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच ‘.

‘ मीन्स लाव, बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर! ‘

‘बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर. पण दिवा लाव = स्विच ऑन.

म्हणूनच तुला म्हटलं वाक्य लिहून आण बाई! संदर्भ / रेफरन्स शिवाय नुसता ‘लाव’ कसा समजणार?

आणखी खूप ठिकाणी लावणे हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत’.

‘नो, नो, प्लीज टेल मी मोअर’_.
म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.
‘बरं! आता आपण इलेक्ट्रिकचा दिवा, टी.व्ही., रेडिओ इ. लावतो तेव्हा स्विच ऑन करतो. पण देवासमोर निरांजन, उदबत्ती, समई लावतो तेव्हा काय करतो? लाइट ऑन! पेटवतो. फटाके लावतो, आग लावतो, गॅस लावतो = पेटवतो’. ती भराभरा लिहून घेत होती.

तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली. ‘बघ, मी कुकर लावलाय’. दोघी हसलो. आधीचा कुठला अर्थ आहे का यात?
खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द— लावलाय. आंघोळीचं पाणी लावलंय मधे असंच!’

‘मी रोज सकाळी अलार्म लावते. ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. ओह्! एव्हरीथिंग इज सो डिफरंट!’ ‘सो कन्क्लूजन? –एव्हरी ‘लाव’ इज डिफरंट!’

जिगसॉ पझल घेऊन बसलेल्या नातवाला मी हाक मारली. तर तो म्हणाला, ‘थांब गं आजी! मी हे लावतोय ना! ‘

‘हे, लुक. तो लावतोय= ही इज अरेंजिंग द पीसेस. टु अरेंज!’
‘तो शहाणा आहे. वह्या-पुस्तकं कपाटात नीट लावून ठेवतो. कपाट छान लावलेलं असतं त्याचं’.

वहीत लिहून घेऊन ती उठली, ‘गुड बॉय’ असं त्याचं कौतुक करून ती घरी गेली.

पण माझं विचारचक्र चालूच राहिलं. आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर लाव, लावते, लावले हे सगळं बोल्ड मधे यायला लागलं.
रोजच कोणालातरी आपण फोन लावतो.
बडबड, कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो, ए, काय लावलंय मगापासून?
आजीने कवळी लावली = फिक्स केली आणि आजी कवळी लावते म्हणजे रोज वापरते. (यूझ)

पट्टा लाव = बांध. बक्कल, बटन लाव = अडकव
बिया लावणे झाडे लावणे= पेरणे, उगवणे.
इतके इतके मजूर कामाला लावले. (एम्प्लॉइड)

वजन ढकलणारा, ओढणारा नेट/जोर लावतो. (अप्लाइज स्ट्रेंग्थ)

आपण वडिलांचं, नवऱ्याचं नाव लावतो म्हणजे काय करतो?

सुंदर गोष्ट मनाला वेड लावते या शब्दांच्या खेळानंही मला वेड लावलं.

इतक्यात आमची बाई आली. आल्याआल्याच म्हणाली, ‘विचारलं काहो सायबांना? (मुलाच्या नोकरीबद्दल)’

‘विचारलं की, पाठव म्हणाले उद्या’.

‘हा, मंग देते त्याला लावून उद्या’. (ओहो! लावून देते = पाठवते)

आणि लावालावी मधे तर कोण, कुठे काय लावेल!

अशी आपली ही मायमराठी! शिकणाऱ्याला अवघड, पण आपल्याला सुंदर!
आता ‘हे आर्टिकल ग्लोबल मराठीवर लाव’. घरच्यांनी सल्ला दिला.
‘आणि नाही लावलं तर मनाला लावून घेऊ नको ‘ अशी चेष्टाही केली.

👆संदर्भ विचारु नकोस कारण मला तो माहित नाही, तुला कुठला लावायचा असेल तो/तसा लाव. 😂


या लावालावीमध्ये लेखकाकडून दोन महत्वाच्या गोष्टी लिहायच्या राहून गेल्या आहेत.

पहिली म्हणजे महाराष्ट्राची सर्वात प्रसिद्ध असलेली लोककला … लावण्यवति लावणी

आणि दुसरे आपल्या रोजच्या जेवणातले तोंडी लावणे


दि.२८-०८-२०१९

आता लागणे हा शब्द किती प्रकारांनी लागतो ते पहा

😃😃😃😃😃
मराठीत “लागण्याची” गंमत बघा:
——————————————
बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता.
तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला “लागला”.
त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच “लागला” होता.
बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला “लागला”.
घरचे जेवायचा आग्रह करू “लागले”. मला जेवणात गोड “लागतं” हे माहिती असल्याने गोड केलं होतं.
भात थोडा “लागला” होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला “लागली”. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार “लागली”.
निघताना बस फलाटाला “लागली”च होती, ती “लागली”च पकडली.
पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस “लागली”. मग काय …
घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी “लागली” कारण आल्या आल्या घाईची “लागली”.
थोडक्यात माझी अगदी वाट “लागली”..
घरची मंडळी हसायला “लागली”.
😅😉 🙏