पुराणातल्या गोष्टी- शुक्राचार्य, गोविंदा, हयग्रीव

दानवांचे गुरु शुक्राचार्य, तिरुपतीचा व्यंकटरमणा गोविंदा, हयग्रीव अवतार अशांच्या पुराणांमधील गोष्टी या एकाच पोस्टमध्ये संकलित केल्या आहेत. दि. ०२-०७-२०२१

****************************

१.शुक्राचार्य आणि शुक्राचार्यांचे मंदिर

देवांचे गुरु बृहस्पति यांच्या जीवनाविषयी मी कधी फारसे ऐकले किंवा वाचलेले नाही, पण दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्याबाबतीत मात्र काही कथा मी लहानपणापासून ऐकल्या आहेत. या महान गुरूकडे संजीवनी मंत्र होता. मद्यसेवनामुळे त्यांचा घात झाला. त्यांच्या नावाने “झारीतले शुक्राचार्य” अशी एक म्हणही पडली आहे. त्यांच्या नाट्यमय अशा जीवनावर संगीत विद्याहरण, ययाती आणि देवयानी यासारखी काही मराठी नाटकेही आली आहेत. आकाशात रात्रीच्या वेळी चमकणारी सर्वात तेजस्वी चांदणी दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातल्या एका गावात त्यांचे एक देऊळसुद्धा आहे मात्र मला माहीत नव्हते. हे पुराणातले शुक्राचार्य आणि आजही उभे असलेले हे देऊळ यांची माहिती खाली दिली आहे.
मला ही माहिती वॉट्सॅपवर मिळाली आहे. मी मूळ लेखकाचा आभारी आहे.

  • – – – – – – – – –

🌹 पौराणिक कथा 🌹

भृगुपुत्र शुक्राचार्य यांची दैत्य गुरू कसे झाले कथा

श्रीरामांनी वसिष्ठाला विचारले,”हा बाहेरील संसार मनामध्येच कसा विस्तारला जातो, हे आपण मला दृष्टांताने समजावून सांगावे.” यावर वसिष्ठांनी शुक्राची कथा सांगितली. भृगुऋषी मंदार पर्वतावर तप करीत असता, त्यांचा बुद्धिमान पुत्र शुक्र त्यांची सेवा करीत असे. ज्ञान व अज्ञानाच्या सीमारेषेवर असलेला तरुण शुक्र वेगवेगळ्या कल्पना करीत आपला वेळ घालवीत असे. एकदा भृगुऋषी समाधिस्थ असता शुक्राची नजर आकाशमार्गे चाललेल्या एका अप्सरेकडे गेली. शुक्र देहाने जरी तिच्या मागून गेला नाही, तरी तो मनाने तिच्यात गुंतला. डोळे मिटून तो मनोराज्यात गढून गेला. तिच्या मागून तो स्वर्गात पोचला, नंदनवनात हिंडला, कल्पवृक्षाखाली बसला, एवढेच काय त्याने इंद्राला जवळून वंदन केले. इंद्रानेही त्याला सन्मानाने वागवून तेथे ठेवून घेतले. तिथे ती अप्सरा त्याला भेटली व दोघांनी अनेक वर्षे तेथे सुखाने वास्तव्य केले. पुढे त्याला आपले पुण्य क्षीण झालेसे वाटले व आता आपण पृथ्वीवर पडणार, या भीतीने त्याचे दिव्य शरीर नष्ट होऊन तो खरेच खाली पडला.

शुक्राचा स्थूल देह नष्ट झाला; पण मरतेसमयीच्या नाना प्रकारच्या वासनांनी अनेक जन्म, अनेक वेगवेगळी शरीरे यांचा अनुभव घेत घेत शेवटी समंगा ऊर्फ महानदीच्या काठी तो मोठ्या समाधानाने तप करीत बसला. भृगूच्याजवळ असलेला शुक्राचा देह आता क्षीण, जर्जर झाला व जमिनीवर कोसळला. समाधीतून जागे झाल्यावर पुत्राचा देह पाहातच भृगू कालावर संतापले. आपल्या पुत्राचे त्या कालाने हरण केले म्हणून ते त्याला शाप देणार, एवढ्यात भगवान कालच प्रकट होऊन म्हणाले,”नेमून दिलेले काम आम्ही केले. शाप देऊन तू आपल्या तपाचा नाश कशाला करतोस? तू समाधीत असता शुक्राचे मन अनेक ठिकाणी आसक्त झाले, अनेक जन्म उपभोगून आता तो समंगातीरावर तप करीत आहे.” मग भृगूने योगदृष्टीने आपल्या पुत्राच्या चरित्राचा विचार केला. कालाची क्षमा मागितली. भूतमात्रांना स्थूल व सूक्ष्म अशी दोन शरीरे असून, ती दोन्ही वस्तुतः मनच होत, हा सिद्धांत त्याला पटला.

भगवान काल व भृगू शुक्राकडे गेले. काळाच्या आज्ञेनुसार शुक्र भानावर येऊन ते तिघेही मंदार पर्वतावर परत आले. मग शुक्राने आपल्या पूर्वीच्या शरीरात प्रवेश केला. प्रथम जन्मातच ज्ञानसंपन्न झालेल्या या तुझ्या तनूला दैत्यांचे गुरुत्व करायचे आहे, महाप्रलयाचे वेळी तू ही तनू कायमची सोड व या प्राक्तनरूपी तनूने तू जीवन्मुक्त होऊन दैत्यगुरू बनून राहा, अशी काळाने शुक्राला आज्ञा केली. जो पुरुष चित्तरहित झाला त्याला इष्ट, अनिष्ट भेदाभेद राहत नाही, हे समजून घेत तो शुक्र परमपदापासून पूर्वकल्पातील आपल्या संकल्पामुळे उत्पन्न झाला. या नंतर शुक्राचार्य दैत्यांचे गुरू होऊन त्यानी वेळोवेळी देवाना त्रस्त करून सोडले .
दैत्य गुरू शुक्राचार्य हे महर्षी भृगु यांचे पुत्र होत तर ब्रम्हदेव यांचे नातू होत.
गुरू शुक्राचार्य यांना भार्गव असेही म्हटलेले आहे। आपल्या सर्वांच्याच पत्रिकेत असलेला शुक्र बिघडला की विवाहसौख्य पार बिघडते. शुक्र हा सौख्याचा तारक ग्रह आहे. तेव्हा खालील जप सांगितले जातो.
हिमकुंद मृणालाभं दैत्याना परम गुरू l
सर्व शास्त्र प्रवक्तारं भार्गवम प्रणमाम्यहं l


गुरु शुक्राचार्य महाराज मंदीर

महाराष्ट्रातील शिर्डी पासून 15 किलोमीटरवर असलेले कोपरगाव येथे गोदावरी नदीच्या किनारी गुरु शुक्राचार्य यांचे समाधी मंदि‍र आणि आश्रम परिसर आहे. या गुरू शुक्राचार्य मंदि‍रात शुभकार्य, वि‍वाह करण्‍यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदि‍र आहे. अगदी सिंहस्थ काळ असला तरीही. (बेट कोपरगांव ) हे ब्रम्हदेव पुत्र महर्षी भृगु त्यांचे पुत्र व दैत्‍यांचे गुरु शुक्राचार्य उर्फ भार्गव यांचे हे कर्मस्‍थान असून त्‍यांनी तप व वास्‍तव्‍य केलेला हा परिसर आहे. त्‍यामुळे यास ऐतिहासिक तितकेच पौराणिकही महत्‍त्‍व प्राप्‍त झाले असून त्‍याची आख्यायिका अशी आहे.
समुद्रमंथनातून देवांना अमृत मिळाल्‍यामुळे देवांना अमरत्‍व प्राप्‍त झाले. त्‍यामुळे दैत्‍य कुळांचा नाश हा निश्‍चित झाला. तो होऊ नये व दैत्‍य कुळ पुढेही चालू रहावे त्‍यासाठी दैत्‍यांनाही अमरत्‍व प्राप्‍तीसाठी पर्याय असणे जरुरीचे वाटल्‍याने दैत्‍यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शंकराची अति घोर तपश्‍चर्या करुन गायत्री व महामृत्‍यूंजया पासून तयार झालेला ” संजीवनी ” मंत्र की , ज्‍या योगे मृत झालेली व्‍यक्‍ती पुन्‍हा जिवंत होऊ शकेल असा मंत्र शंकराकडून प्राप्‍त करुन घेतला व त्‍या मंत्राच्‍या आधारे ते मृत झालेल्‍या दैत्‍यांना पुन्‍हा जिवंत करुन देवांविरुध्‍द युध्‍दासाठी संजीवन करत असत. त्‍यामुळे दैत्‍यांचा संहार व नाश करणे हे देवांना क्रमप्राप्‍तच झाले. त्‍यासाठी देवांनी बृहस्‍पतीकडे जावून यावर उपाय विचारला असता बृहस्‍पतीनी देवांना असे सांगितले की, जर हा संजीवनी मंत्र लोप पावला तर या मंत्राचा काहीही प्रभाव चालणार नाही व गेलेले दैत्‍य पुन्‍हा जिवंत होऊ शकणार नाहीत. यासाठी शुक्राचार्यांकडून या मंत्राची दिक्षा घेणे अथवा मंत्र लोप करणे या शिवाय पर्याय राहिला नाही म्‍हणून सर्व देव व बृहस्‍पती या सर्वानी हा संजीवनी मंत्र हस्‍तगत करण्‍यासाठी बृहस्‍पती पुत्र कच याची नेमणूक केली व त्‍यास गुरु शुक्राचार्य यांच्‍याकडे पाठविले. कच जेथे संजीवनी विद्या प्राप्‍तीसाठी आला ते हे स्‍थान असून शुक्राचार्य मंदीर हे गुरु शुक्राचार्याचे स्‍थान आहे. ते पूर्व गोदावरी नदीच्‍या पश्चिम तीरावर (ऐलतीरावर) होते व कच जेथे गुरु सेवेकरिता आला ते स्‍थान गोदावरीच्‍या पैलतीरावर होते. ते स्‍थान कचेश्‍वर मंदीर म्‍हणून प्रसिध्‍द असून ते शुक्‍लेश्‍वर मंदीराच्‍या उत्‍तर पूर्व बाजूस असून ते शुक्राचार्य व कचेश्‍वर यांचे एकत्रित पिंडीच्‍या स्‍वरुपात स्‍थापित आहे. गोदावरीच्‍या ऐलतीरावर गुरुचे स्‍थान व पैलतीरावर शिष्‍याचे स्‍थान आहे. पूर्वीच्‍या नदीवरील घाट व त्‍याच्‍या खुणा अजूनही मंदीराच्‍या समोरील श्री विष्‍णू व गणपती मंदिराजवळ दिसून येतात. त्‍याच ठिकाणी गुरु शुक्राचार्य यांच्‍याकडून कच व देवयानी यांना हा ” संजीवनी ” मंत्र मिळविल्‍याचे संजीवनी पाराचे स्‍थान असून त्‍यात मंत्र मिळाल्‍यानंतर स्‍वर्गातील देवगण कचेश्‍वरावर पुष्‍पवृष्‍टी करण्‍यासाठी आले. त्‍यामुळे इतर देवांच्‍याही पिंडीच्‍या स्‍वरुपात प्रतिकात्‍मक मूर्ती आपणांस पहावयास मिळतील. हे स्‍थान अत्‍यंत जागरुक असून पावणारे आहे, अशी भक्‍तांची धारणा आहे.

गुरुची सेवा करण्‍यासाठी सर्व शिष्‍य कचासह रोज पैल तीरावरुन ऐलतिरावर म्‍हणजे हल्‍लीच्‍या शुक्‍लेश्‍वर मंदीराचे स्‍थानावर नित्‍यनियमाने येत असत. या शिष्‍यांना नदीच्‍या विशाल पात्रातून येण्‍या -जाण्‍याचा त्रास होऊ नये म्‍हणून शुक्राचार्यांनी आपल्‍या हाताचा कोपर मारुन नदीचा प्रवाह बदलला. आज जो गोदावरी नदीचा प्रवाह आपणांस दिसत आहे तो बदलेला प्रवाह आहे. हाताच्‍या कोपराने नदीचा प्रवाह बदलल्‍यामुळे या भागास कोपरगांव असे नाव पडल्‍याची आख्‍यायिका आहे.

सर्व शिष्‍यांमध्‍ये कच हा अत्‍यंत भक्तिभावाने गुरुची सेवा करत असल्‍यामुळे सहाजिकच तो सर्व शिष्‍यांमध्‍ये गुरुचा लाडका शिष्‍य होता. ही गोष्‍ट इतर दानवांना सहन होत नसे. त्‍यामुळे कचावर दानवांची फार वाईट दृष्‍टी होती. द्वेषापोटी त्‍यांनी कचास देान वेळा ठार मारुनही टाकले. गुरु शुक्राचार्याना देवयानी नावाची एकुलती एक कन्‍या होती. तिचा कचावर जीव जडला होता. त्‍यामुळे तिने कचास दोन्‍ही वेळा वडि‍लांकडून संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करुन घेतले. परि‍णामी सर्व दैत्‍य संतापले व त्‍यांनी कचाचा संपूर्ण नायनाट करण्‍याचे ठरविले. पुन्‍हा तिस-यांदा कचास ठार मारुन त्‍यांच्या शरीराची राख केली व ती राख आपले गुरु शुक्राचार्य यांना सोमरसातून प्राशन करविली. दैत्‍यांचे गुरु असल्‍यामुळे शुक्राचार्य हे सोमरस प्राशन करीत असत. त्‍याचा गैरफायदा घेवून दैत्‍यांनी डाव साधला. कच दिसेना म्‍हणून देवयानीने आपल्‍या वडिलांकडे कचासाठी पुन्‍हा हट्ट धरला. यावेळी अंतर्ज्ञानात गुरुंनी पाहिल्‍यानंतर त्‍यांच्‍या असे लक्षात आले की कच हा आपल्‍याच पोटात आहे. ही गोष्‍ट त्‍यांनी आपली लाडकी व एकुलती एक कन्‍या देवयानी हीस सांगून कचास जिवंत करणे अवघड असल्‍याचे सांगितले. तरी ही देवयानीने कसेही करुन कचास जिवंत करा हा आग्रह धरल्‍यामुळे शुक्राचार्यांनी देवयानीस सांगितले की जर कच जिवंत झाल्‍यास तो माझे पोट फाडून बाहेर येईल व मी मृत पावेल. त्‍यावर देवयानी हिने आपले वडील शुक्राचार्य यांना असे सुचविले की, आपण मला संजीवनी मंत्र शिकवावा त्‍या योगे मी तो मंत्र म्‍हणून आपणांस जिवंत करते. मुलीच्‍या हट्टाने व मद्य व्‍यसनामुळे जी गोष्‍ट घडून गेली, ती गेली गुरु शुक्राचार्यानी हा मंत्र आपली कन्‍या देवयानीस सांगितला (जपला). तो कचाने शुक्राचार्यांच्‍या पोटात असतांना ऐकला. कच जिवंत होऊन गुरुंचे पेाट फोडून बाहेर आला. शुक्राचार्य मृत झाले. परंतु देवयानीने संजीवनी मंत्राने पुन्‍हा त्‍यांना जिवंत केले. ही घटना जेथे घडली तो संजीवनी पार या घटनेची मंदि‍रासमोर साक्ष देत आहे. संजीवनी मंत्र हा गुरु शुक्राचार्य, देवयानी व कचदेव यांनी ऐकल्‍यामुळे तो षट्कर्णी झाला व मंत्राचा लोप झाला. अशा त-हेने या मंत्राचा प्रभाव शिल्‍लक न राहि‍ल्‍यामुळे दैत्‍यांना पुन्‍हा-पुन्‍हा जिवंत करण्‍याची शक्‍ती शुक्राचार्यांमध्‍ये राहिली नाही. देवांचे कार्य साध्‍य झाल्‍यामुळे मूळ देवलोकी जाण्‍यास कच निघाला, परंतू आश्रमात आल्‍यापासून देवयानीचे कचावर प्रेम जडल्‍यामुळे तिने त्‍यास लग्‍नासाठी याचना केली. आपण दोघेही एकाच वडि‍लाच्‍या उदरातून बाहेर आल्‍यामुळे आपले नाते हे गुरुबंधू व गुरु भगिनींचे झाल्‍यामुळे मी तुला वरु शकत नाही, असे सांगितले. या गोष्‍टीचा राग येवून वअपेक्षाभंगाच्‍या दुःखामुळे देवयानीने कचास शाप दिला की, तू जी विद्या प्राप्‍त करुन चाललास त्‍या विद्येचा तुला व कोणासही कधीही उपयोग होणार नाही, देवयानीची शापवाणी ऐकूल आपण एवढे समजावून सांगत असताना देखील देवयानी ऐकत नाही व विवाहाचा हट्ट धरते आहे यावर क्रोधीत होऊन कचदेव हि देवयानीस शाप देतात की तुलाही या विद्येचा काहीही उपयोग होणार नाही व तू ब्राह्मण कन्या असूनही तुझा विवाह ब्राह्मणेतर व्यक्तिबरोबर होईल. अशारितीने संजीवनी मंत्राचा प्रभाव एकमेकांना शापित केल्याने पूर्णपणे लोप पावतो व कचदेव हे देवलोकी निघून जातात.

पुढे ही शापवाणी खरी ठरुन शुक्राचार्य ब्राह्मण कन्या देवयानी हिचा विवाह क्षात्रकुळातील ” ययाती ” राजाशी झाला. अशी ही पौराणिक कथा आहे.
कच देवाने देवयानीस दिलेली शापवाणी पुढे खरी ठरते. एकदा वनविहारास गेली असताना असूर राजा वृषपर्वा यांची कन्या शर्मिष्ठा देवयानीला एका छोट्याशा विहिरीत ढकलून देते. आपला जीव वाचविण्यासाठी धावा करित असताना तेथे शिकारीसाठी आलेले महापराक्रमी क्षत्रिय राजा ययाती’ आपला हात हातात देऊन देवयानीस वाचवितात. हात हातात घेतल्याने त्यांच्यावर ‘पाणीग्रहण संस्कार’ होतात. (पाणिग्रहण संस्कार म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रीया कुठल्याही परपुरुषांच्या हातात आपला हात देत नसत. जर चुकूनहि हात हातात घेतला गेला तरि त्यांचे ‘पाणिग्रहण संस्कार’ झाले म्हणजे विवाह झाला असे समजले जात असे.) पाणीग्रहण संस्कार झाल्यामुळे ब्राह्मण कन्या असूनही देवयानी हिस क्षत्रिय राजा ययाती यांच्या बरोबर विवाहबद्ध व्हावे लागले होते. पाणीग्रहण झाले त्यावेळी ग्रह, नक्षत्र अनुकूल नव्हते व सिंहस्थ काळ असल्यामुळे कुठलाहि शुभमुहूर्त निघत नव्हता. म्हणून गुरु शुक्राचार्य महाराजांनी आपल्या आश्रमात गोदातीरी ‘विवाह सिद्ध होम’ करुन आपल्या तपोबलाने संपूर्ण परिसर पावन करुन ग्रह नक्षत्र अनुकूल करुन घेतले व या पावन भूमीस असे वरदान दिले की, यापुढे केव्हाही या भूमीत कोणतेही पवित्र कार्य (विवाह, इत्यादी शुभकार्य) करण्यास कुठलाही मुहूर्त, नक्षत्र, तिथी, वेळ व सिंहस्थकाळ पहावा लागणार नाही व येथे केलेले शुभकार्य हे विशेष यशस्वी होतील.

हि कथा हजारो-हजारो वर्षापूर्वी घडलेली असून गुरु शुक्राचार्य व कचदेव यांच्या तपाने पावन झालेली हल्लीची बेट कोपरगांव पावन भूमी आहे. अशा या पावनभूमीस आपण अवश्य भेट देऊन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज व परम शिष्य कचदेव यांच्या कोटीकोटी आशिर्वादास प्राप्त व्हावे.

महर्षी शुक्राचार्य यांची मुलगी देवयानी ही कच देवाच्या शापामुळे क्षत्रिय राजा ययाती यांचेशी विवाहबद्ध झाली त्यांच्या पुढील झालेल्या यदु वंशात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला तर राजा ययाती आणि त्यांची प्रथम पत्नी शर्मिष्ठा यांच्या पुढील वंशात पराक्रमी भीष्माचार्य, पांडव, कौरव यांचा जन्म झालेला आहे.
आजही शुक्राचार्यांचे हे स्‍थान त्‍यांच्‍या तपोबलाने पुनीत झाल्‍यामुळे या भूमीवर जी-जी विवाह कार्ये होतात. त्‍यासाठी मुहूर्त, वेळ, नक्षत्र, तिथी यांचा कोणताही दोष लागत नाही. येथे केव्‍हाही विवाह होतात. (कोपरगांवचे माजी खासदार कै. मा. शंकररावजी काळे साहेब व अनेक मान्‍यवरांचे विवाहसुध्‍दा याच मंदिरात झाले आहे )

या सर्व गोष्‍टींची साक्ष हा परिसर देत असून देवळाच्‍या ओव-या पूर्वी येथे असलेल्‍या पेशव्‍यांच्‍या वाडयाच्‍या अवशेषातून बांधलेल्‍या आहेत. तसेच समोर श्री विष्‍णू व गणपती यांची मंदिरे आहेत. श्री विष्‍णुचे मंदिर हे काळया गुळगुळीत दगडातून बांधलेले असून मंदिराच्‍या पायथ्‍याशी पूर्वी नदीचा घाट होता. त्‍याच्‍या खुणा व शिलालेख आजही बघावयास मिळतो. तसेच दोन्‍ही मंदि‍राच्‍या मध्‍यात ” संजीवनी पार ” म्‍हणजे येथे कचास ” संजीवनी ” विद्या प्राप्‍त झाली व कच आणि देवयानी यांनी एकमेकांस शापित केले. त्‍याचे हे स्‍थान असून याचे उत्‍तर पूर्वेस शुक्राचार्य शिष्‍य कचदेव यांचे गुरुसह मंदिर व ओव-या ( कचेश्‍वर मंदिर) असून त्‍या स्‍थळी संजीवनी मंत्र देते वेळी श्री शंकर भगवान (त्र्यंबकेश्‍वर) गुप्‍त रुपाने तेथे आल्‍यामुळे त्‍यांचेही श्री त्रिंबकेश्‍वर मंदिर आहे. श्री शंकर भगवान येथे गुप्‍त रुपाने आल्‍यामुळे सदर मंदिरासमोर नंदीची स्‍थापना झालेली नाही. कचेश्‍वर मंदिरात सेवा ( प्रदक्षिणा) घालण्‍याचा रिवाज आहे.

आजही गुरू शुक्राचार्याच्या स्थानावर मुहूर्त वेळ-नक्षत्र यांचे कोणतेही दोष न लागता बाराही महिने विवाह सोहळे होतात. पेशव्यांनी वाडय़ाच्या अवशेषातून देवळाच्या ओवऱ्या पूर्वी बांधलेल्या असून समोर विष्णू, गणपती यांची मंदिरे आहेत. काळ्या गुळगुळीत दगडाचे विष्णू मंदिर प्रसिद्ध आहे, त्याच्या पायथ्याशी पूर्वी गोदावरी नदीचा घाट होता. त्याच्या खुणा व शिलालेख आजही पाहावयास मिळतो. दोन्ही मंदिरांच्या मध्यात संजीवनी पार उत्तरपूर्वेस कच देवाचे मंदिर असून संजीवनी मंत्र देतेवेळी भगवान शंकर (त्रंबकेश्वर) येथे गुप्त रूपाने आले असे मानले जात असल्याने प्रतित्रंबकेश्वराचे मंदिर येथे आहे. भगवान शंकर गुप्त रूपाने येथे आले असे मानले जात असल्याने या मंदिरासमोर नंदीची स्थापना झालेली नाही. महाशिवरात्र पर्व काळात येथे मोठय़ा प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. शुक्राचार्य मंदिराचा रामानुग्रह ट्रस्टच्या वतीने व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमा उत्सव काळातही येथे मोठे उत्सव होतात. गुरू शुक्राचार्याची पालखी गंगाभेटीस तसेच दसरा (विजयादशमी) सीमोल्लंघनाच्या वेळी देवी मंदिरात नेण्याचा प्रघात येथे आहे.

कुंभमेळा पर्वात या मंदिरापासून गोदावरी नदी पात्रापर्यंत शोभायात्रा काढली गेली. शिर्डी साईबाबा मंदिरापासून नगर-मनमाड महामार्गावर हे बेट कोपरगाव स्थान 15 किलोमीटर अंतरावर आहे.

ज्यांच्या पत्रिकेत शुक्रबळ नसेल , शुक्र अस्तंगत झाला असेल , विवाह जुळत नसेल, विवाह सौख्य नसेल अशा व्यक्तींनी या गुरू शुक्राचार्य यांच्या स्थानास अवश्य भेट घेऊन मूर्तीस अभिषेक करावा. पौराणिक कथा सांगितली जाते. सर्व बांधवांनी एकदा तरी अवश्य या दैत्य गुरू , चिरंजीवी शिल्पाचार्य शुक्राचार्य यांचे समाधी मंदिरास भेट देऊन दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.

लेखक वि. स. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी मुळ शुक्राचार्य, कच आणि देवयानी यांच्या जीवनावर आधारित असून कोपरगाव येथे गुरू शुक्राचार्य मंदिर परिसरात या सर्व घडलेल्या प्राचीन घटनांचे घटनास्थळ आजही अस्तित्व दाखवते आहे.

वॉट्ट्सॅपवरून मिळालेल्या लेखाचे थोडे संपादन केले आहे.

🙏🏻🙏🏻

२.वेंकटरमणा गोविंदा

तिरुपती बालाजी यांना गोविंदा म्हणून का म्हटले जाते?

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
एक विस्मयकारक आणि अतिशय मनोरंजक गोष्ट आहे ….

महालक्ष्मीच्या शोधात भगवान विष्णु जेव्हा भुलोकला आले तेव्हा एक सुंदर घटना घडली … .. जेव्हा त्यांनी भुलोकात प्रवेश केला, तेव्हा त्यांना तहान आणि भुक यासारखे मानवी गुण मिळाले, भगवान श्रीनिवास एकदा ऋषी अगस्त्य यांच्या आश्रयस्थानात गेले आणि म्हणाले, “मुनिंद्र, मी एका विशिष्ट मोहिमेवर भु लोका (पृथ्वी) येथे आलो आहे आणि कलीयुग संपेपर्यंत येथे रहायला आलो आहे ….
मला गायीचे दूध खूप आवडते आणि माझ्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी मला अन्न म्हणून त्याची गरज आहे.
मला माहित आहे की तुमच्याकडे अनेक गायींसह एक मोठी गोशाळा आहे. तेव्हा माझ्या गरजा भागविण्यासाठी तुम्ही मला एक गाय देऊ शकता का? “

ऋषी अगस्त्य हसले आणि म्हणाले, “स्वामी, मला चांगले माहित आहे की आपण श्रीनिवास यांच्या मानवी स्वरूपात श्री विष्णु आहात. मला खूप आनंद आहे की या विश्वाचा निर्माता आणि शासक माझ्या आश्रमात आला आहे, पण मी आपली माया जाणतो व मला हे देखील माहित आहे की तूम्ही माझी भक्ती तपासण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहात. “
“तर स्वामी, माझी एक अट आहे की माझ्या गोशाळेतील पवित्र गाय केवळ अशा व्यक्तीला मिळाली पाहिजे जो त्याच्या पत्नीबरोबर येईल. मला तुम्हाला गाय भेटवस्तू म्हणून द्यायला नक्कीच आवडेल परंतु जेव्हा तुम्ही माझ्या आश्रमात देवी लक्ष्मीसह याल आणि गो दान देण्यासाठी विचाराल तेव्हाच मी तसे करू शकेन. तोपर्यंत मला क्षमा करावी. “
श्रीनिवासन हसले आणि म्हणाले, “ठीक आहे, मुनिद्र, तुम्हाला जे पाहिजे होते ते मी नक्की करीन. “आणि ते त्यांच्या जागी परतले.

नंतर भगवान श्रीनिवासांनी देवी पद्मावतीशी विवाह केला. विवाहाच्या काही दिवसांनंतर, भगवान श्रीनिवास त्यांच्या दिव्य पत्नी पद्मवतीबरोबर ऋषी अगत्स महामुनींच्या आश्रमात आले. पण त्यावेळी ऋषि आश्रमात नव्हते. भगवान श्रीनिवासाना त्यांच्या शिष्यांनी विचारले की”आपण कोण आहात आणि आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो?”
प्रभुने उत्तर दिले, “माझे नाव श्रीनिवास आहे आणि ही माझी पत्नी पद्मावती आहे.
मी आपल्या आचार्यना माझ्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी एक गाय दान करण्यास सांगितले. पण त्यांनी सांगितलेले की बायकोसोबत येऊन दान मागितले तरच गायदान देईन ,अशी तुमच्या आचार्यांची अट होती. म्हणून मी आता सपत्नीक आलो आहे व मी येण्याची बातमी तुमच्या आचार्यना माहिती आहे का?”
शिष्य म्हणाले की”आमचे आचार्य आश्रमात नाहीत , म्हणून कृपया आपली गाय घेण्यासाठी पुन्हा परत या. “ऋषीच्या शिष्यांनी नम्रपणे सांगितले.
श्रीनिवासन हसले आणि म्हणाले, “मी सहमत आहे. परंतु मी संपूर्ण ठिकाणचा सर्वोच्च शासक आहे म्हणून तुम्ही सगळे शिष्यगण माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि मला एक गाय देऊ शकता. मी पुन्हा येऊ शकत नाही “
शिष्य म्हणाले “कदाचित आपण या ठिकाणचे शासक आहात किंवा हे संपूर्ण विश्वही तुमचे असू शकते. परंतु आमचे दिव्य आचार्य आम्हासाठी सर्वोच्च आहे आणि त्याच्या नजरेत व त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणतीही गोष्ट करणार नाही, “जिद्दी शिष्यांनी उत्तर दिले.
हळू हळू हसत हसत पवित्र भगवान म्हणाले, “मी तुमच्या आचार्यबद्दल आदर करतो. कृपया परत आल्यावर आचार्यांना सांगा की मी सपत्नीक येऊन गेलो, असे म्हणून भगवान श्रीनिवास परत वळले आणि तिरुमाला सात टेकड्यांच्या दिशेने जाऊ लागले.
काही मिनिटांनीच, ऋषी अगस्त्य आश्रमात परतले आणि जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांकडून त्यांच्या अनुपस्थितीत श्रीनिवासच्या आगमनानंतर ऐकले तेव्हा त्यांना अत्यंत नैराश्य आले.”श्रीमन नारायण स्वतः लक्ष्मीसह माझ्या आश्रमात आले होते तेव्हा दुर्दैवाने मी आश्रमात नव्हतो ,खुप मोठा योग माझ्याकडून हुकला ,तरीही काही हरकत नाही पण श्रीना हवी असलेली गाय मला दिलीच पाहिजे ” व ऋषि ताबडतोब गोशाळेत दाखल झाले आणि एक पवित्र गाय घेऊन भगवान श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांच्या दिशेने धावत निघाले.

थोड्या अंतरावर धावल्यानंतर त्यांना श्रीनिवासन व त्यांच्या पत्नी पद्मावती दृष्टीक्षेपात आले. त्यांच्या मागे धावत ऋषीनी तेलुगू भाषेत हाक मारायला चालू केली.
“स्वामी(देवा) गोवु(गाय)इंदा (घेऊन जा) तेलुगूमधील गोवु म्हणजे गाय आणि इंदा म्हणजे घेऊन जा.
स्वामी, गोवु इंदा .. स्वामी, गोवु इंदा .. स्वामी, गोवु इंदा.. स्वामी, गोवु इंदा .. .. (स्वामी, ही गाय घ्या) .. स्वामी, गोवु इंदा .. स्वामी, गोवु इंदा .. स्वामी, गोवु इंदा .. स्वामी, गोवु इंदा ..
“पण तरीही भगवान मागे वळले नाहीत ……
इकडे मुनींनी गती वाढवली आणि त्यांनी हाक मारताना बोललेल्या शब्दाबद्दल विचार करायला सुरुवात केली .. महान ऋषींनी विचार केला की ते ‘स्वामी गोवु इंदा म्हणत आहेत पण भगवंताची लीला आहे की त्या शब्दांचे रुपांतर काय झाले?
“… स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंद .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. स्वामी गोविंदा .. गोविंदा गोविंदा. गोविंदा .. गोविंदा .. गोविंदा ..
गोविंदा .. गोविंदा .. गोविंदा .. “
ऋषींनी ओरडल्यानंतर भगवान श्रीनिवास वेंकटेश्वर व देवी पद्मावती परत वळले आणि ऋषींकडून पवित्र गाय स्वीकारली व म्हणाले,
“प्रिय मुनींद्रा, तुम्ही ज्ञात किंवा अज्ञातपणे आता माझे सर्वात आवडते नाव गोविंदा 108 वेळा घेतले आहे.
मी कलीयुगांतापर्यंत या पवित्र टेकड्यांवर मूर्तीच्या स्वरूपात भुलोकामध्ये रहात आहे, मला माझें सर्व भक्त गोविंदा या नावाने संबोधतील. “
“या पवित्र सात टेकड्यांवर माझ्यासाठी एक मंदिर बांधले जाईल आणि दररोज मला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येत राहतील. हे भक्त, या टेकड्यांवर चढत असताना किंवा मंदिरात माझ्या समोर असताना ते मला या गोविंदा नावावरून हाक मारतील “
“कृपया मुनिंवर लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी मला या नावाने संबोधले जाते तेव्हा तुम्हालाही स्मरले जाईल कारण या प्रेमळ नावामागे तुम्हीच आहात.
जर कुठल्याही कारणास्तव कोणताही भक्त माझ्या मंदिरात येण्यास असमर्थ असेल व माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करेन. “
“सात पवित्र पर्वतावर चढत असताना जो कोणी गोविंदा या पवित्र नावाचे 108 वेळा नाम घेईल त्या सर्व श्रद्धावानांना मी मोक्ष देईन.”
“वेंकटारमण गोविंदा”

. . . . वॉट्सॅपवरून साभार दि. ०२-०७-२०२१

*************************

३. हयग्रीव अवतार

हयग्रीव अवतार

माझ्या एका जुन्या मित्राचे नांव हयवदन राव असे होते. हयवदन म्हणजे घोड्याचे तोंड. त्याचे असे विचित्र नांव कां ठेवले आहे असे मी एकदा त्याला विचारले तेंव्हा ते एका देवाचे नांव आहे एवढे त्याने सांगितले, पण त्याला स्वतःला त्या देवाची फारशी माहिती नव्हती. मी तर या देवाबद्दल आधीही कधी ऐकले नव्हते आणि नंतरही नाही. पुढे गिरीश कर्नाड यांचे या नांवाचे नाटक प्रसिद्ध झाले होते, पण माझ्या माहितीप्रमाणे ते सामाजिक असावे. मागच्या आठवड्यात अचानक हयवदन म्हणजेच हयग्रीव या देवाची माहिती वॉट्सअॅपवरून मिळाली ती खाली दिली आहे. या गोष्टीतल्या दैत्याचे नांवही हयग्रीव आहे आणि त्याला मारणाऱ्या विष्णूच्या अवताराचे नांवसुद्धा हयग्रीव असेच आहे. हा अवतार श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून ही माहिती दिली होती. आपल्याला भागवतपुराणात सांगितलेले दशावतार माहित असतात, पण भगवान विष्णूचे चोवीस अवतार समजले जातात. हयग्रीव हा अवतार दशावतारांशिवाय वेगळ्या अवतारांमधला आहे दि. ७-९-२०१८
ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः
मित्रो आज श्रावण पूर्णिमा है, आज के ही दिन भगवान हयग्रीव का अवतार हुआ था। आज हम आपको भगवान विष्णु के पांचवें अवतार हयग्रीव की कथा विस्तार से बतायेंगे!!!!!!!
ऋषि बोले — हे सूत जी ! आप के यह आश्चर्यजनक वचन सुन कर हम सब के मन में अत्याधिक संदेह हो रहा हे।

सब के स्वामी श्री जनार्धन माधव का सिर उनके शरीर से अलग हो गया !! और उस के बाद वे हयग्रीव कहलाये गये – अश्व मुख वाले ,आह ! इस से अधिक और आश्चर्यजनक क्या हो सकता हे। जिनकी वेद भी प्रशंसा करते हैं, देवता भी जिसपर निर्भर हैं, जो सभी कारणों के भी कारण हैं, आदिदेव जगन्नाथ, आह ! यह कैसे हुआ कि उनका भी सिर कट गया ! हे परम बुद्धिमान ! इस वृत्तांत का विस्तार से वर्णन कीजिये।
सूत जी बोले — हे मुनियों, देवों के देव, परम शक्तिशाली, विष्णु के महान कृत्य को ध्यान से सुनें। एक बार अनंत देव जनार्धन दस सहस्त्र वर्षों के सतत युद्ध के उपरान्त थक गए थे। तब भगवान एक मनोरम स्थान में पद्मासन में विराजमान हो, अपना सिर एक प्रत्यंचा चढ़ाकर धनुष पर रखकर सो गए। उसी समय इन्द्र तथा अन्य देवों, ब्रह्मा और महेश, ने एक यज्ञ प्रारम्भ किया।

तब वे सब देवों के हित में यज्ञ की सफलता के लिए, सभी यज्ञों के स्वामी, भगवान जनार्धन के पास वैकुंठ में गए. वहाँ विष्णु को न पा कर उन्होंने ध्यान द्वारा उस स्थान को जाना जहां भगवान विष्णु विश्राम कर रहे थे। वहाँ जाकर उन्होंने देवों के देव भगवान विष्णु को योगनिद्रा में बेसुध देखा। उन्हें सोते हुए देखकर ब्रहमा, रूद्र और अन्य देवता चिंतित हो गए।
इन्द्र बोले — “हे श्रेष्ठ देवों ! अब क्या किया जाये. हम भगवान को निद्रा से कैसे जगाएं?”
इन्द्र के यह वचन सुन शम्भु बोले — “हे उत्तम देवों ! अब हमें अपना यज्ञ पूर्ण करना चाहिए।

परन्तु यदि भगवान की निद्रा में बाधा डाली गयी तो वे क्रुद्ध होंगे।”
शंकर के यह शब्द सुनकर परमेष्ठी ब्रह्मा ने वामरी कीट की रचना की तांकि वह धनुष के अग्र भाग को काट दे जिससे धनुष ऊपर उठ जाये और विष्णु की निद्रा टूट जाये। इस प्रकार देवों का प्रयोजन निश्चय ही पूर्ण हो जायेगा। इस प्रकार निश्चय कर ब्रहमा के वामरी कीट को धनुष काटने का आदेश दिया।
इस आदेश को सुनकर वामरी बोले — “हे ब्रह्मा ! मैं देवों के देव, लक्ष्मी के स्वामी, जगतगुरु की निद्रा में कैसे बाधा डाल सकता हूँ? किसी को गहरी नींद से उठाना, किसी के भाषण में बाधा डालना, किसी पति – पत्नी को पृथक करना, किसी माता से सन्तान को अलग करना, ये सब कर्म ब्रह्महत्या के अनुरूप हैं।

इसलिए हे देव ! मैं देवदेव की निंद्रा कैसे भंग कर सकता हूँ। और मुझे धनुष काटने से क्या लाभ होगा. यदि किसी मनुष्य की कोई व्यक्तिगत रूचि हो तो वह पाप कर भी सकता है, यदि मेरा भी कोई लाभ हो तो मैं धनुष काटने को तैयार हूँ।
ब्रह्मा बोले — हम सब तुम्हें भी अपने यज्ञ में भाग देंगे, इसलिए अपना कार्य करो और विष्णु को उनकी निद्रा से जगा दो। होम के समय में जो भी घी होम – कुंड से बाहर गिरेगा, उस पर तुम्हारा अधिकार होगा, इसलिए शीघ्र अपना कार्य करो।
सूत जी बोले — ब्रह्मा के आदेश अनुसार वामरी ने धनुष के अग्रभाग, जिसपर वह भूमि पर टिका था, को काट दिया. तुरंत प्रत्यंचा टूट गयी और धनुष ऊपर उठ गया और एक भयानक आवाज हुई। देवता भयभीत हो गए और सम्पूर्ण जगत उत्तेजित हो गया। सागर में उफान आने लगे, जलचर चौंक उठे, तेज हवा चलने लगी, पर्वत हिलने लगे और अशुभ उल्का गिरने लगे।

दिशाओं ने भयानक रूप धारण कर लिया और सूर्य अस्त हो गया। विपत्ति की इस घड़ी में चिंतित हो गए।

हे सन्यासियों ! जिस समय देव इस चिंता में थे, देवदेव विष्णु का सिर मुकुट सहित गायब हो गया, और किसीको भी यह पता ना चल सका कि वह कहाँ गिरा है।

जब वह घोर अन्धकार मिटा, ब्रहमा और महादेव ने विष्णु के सिर – विहीन विकृत शरीर को देखा। विष्णु की उस बिना सिर के आकृति देखकर वे बहुत हैरान थे, वे चिंता के सागर में डूब गये और शोक से अभिभूत हो, जोर से रोना शुरू कर दिया.
हे प्रभु! स्वामी हे! हे देवा देवा! हे अनन्त! क्या अप्रत्याशित असाधारण दुर्घटना आज हमारे लिए हुई है! हे देव ! आप को तो कोई छेद नहीं सकता, कोई इस प्रकार से काट सकता है, और ना ही जला सकता है, तब फिर आपका सिर गायब कैसे हो सकता है।

क्या यह किसी की माया है, हे सर्व व्यापक ! आपकी ऐसी दशा होते देवता किसी प्रकार जीवित रह सकते हैं। हम सब अपने स्वार्थ के कारण रो रहे हैं, शायद यह सब इसी से हुआ है। यह किसी दैत्य, यक्ष या राक्षस ने नहीं किया है। हे लक्ष्मी पति ! यह दोष हम किसे मढेंगे? देवताओं ने स्वय ही अपनी हानि की है?

हे देवताओं के स्वामी ! देवता अब आश्रित हैं. ये आपके अधीन हैं। अब हम कहाँ जायें? अब हम क्या करें? अब मूढ व मूर्ख देवताओं की रक्षा कौन करेगा?

उसी समय शिव और अन्य देवों को रोता देखकर वेदों के ज्ञाता ब्रहस्पति इस प्रकार बोले — “हे महाभागे ! अब इस प्रकार रोने और पछताने से क्या लाभ है?

अब तुम्हें अपनी इस विपत्ति के निवारण के बारे विचार करना चाहिए। हे देवताओं के स्वामी ! भाग्य और कर्म दोनों समान हैं। यदि भाग्य से सफलता प्राप्त नहीं होती तो अपने प्रयास और गुणों से निश्चित ही सफलता प्राप्त होती है।
इन्द्र बोले — तुम्हारे परिश्रम को धिक्कार है, जबकि हमारी आँखों के सामने भगवान विष्णु का सिर गायब हो गया। तुम्हारी बुद्धि और शक्ति को धिक्कार है, मेरे विचार से भाग्य ही सर्वोच है।
ब्रहमा बोले — शुभ या अशुभ, दैव की आज्ञा सब को माननी पडती है, कोई भी दैव को नकार नहीं सकता। इसमें कोई संदेह नहीं है की जो शरीर धारण कर्ता है उसे सुख और दुःख भुगतने ही पड़ते है।

आह ! भाग्य की विडम्बना से ही भूत समय पहले शम्भु ने मेरा एक सिर काट दिया था। तथा एक श्राप के कारण उनका प्रजनांग कट गया था. उसी प्रकार आज भगवान विष्णु का सिर भी क्षीर सागर में गिर गया है। समय के प्रभाव से ही शचीपति इन्द्र को भी स्वर्ग त्याग कर मान सरोवर में रहना पड़ा था, और भी अनेक कष्ट सहने पड़े थे।

हे यशस्वी ! जब इन सब को दुःख भुगतना पड़ता है तो फिर संसार में ऐसा कौन है जिसे कष्ट नही होता? इसलिए अब शोक मत करो और अनंत महामाया, सब की माता, का ध्यान करें, जो सब का आश्रय हैं, जो ब्रह्मविद्या का स्वरूप हैं, और जो गुणों से परे हैं, जो मूल प्रकृति हैं, और जो कि तीनों लोकों, सम्पूर्ण ब्रह्मांड और चर – अचर में व्याप्त है।

अब वे ही हमारा कल्याण करेंगी.
सूत जी बोले — इस प्रकार देवताओं को कहकर, देव कार्य की सफलता के लिये वेदों को आदेश दिया.

ब्रहमा जी बोलें — “हे वेद ! अब आप सब पूजनीय सर्वोच्च महा माया देवी की स्तुति करें, जो की ब्रह्मविद्या हैं, जो सभी कार्य सफल करती हैं, सभी रूपों में तिरोहित हैं”.
उनके वचन सुनकर समस्त वेद महामाया देवी की स्तुति करने लगे।

सूत जी बोले — इसप्रकार वेदों, उनके अंगों, सम-अंगों, द्वारा स्तुति किये जाने पर निर्गुण महेश्वरी महामाया देवी प्रसन्न हुई। उस समय सब को खुशी देने वाली आकाश वाणी सुनाई दी — ” हे देवो ! सब चिंता त्याग दो। तुम सब अमर हो। होश में आओ। मैं वेदों द्वारा की गयी स्तुति से अत्यंत प्रसन्न हूँ। जो भी मनुष्य मेरे इस स्तोत्र को श्रद्धा पूर्वक पड़ेगा उसकी सब मनोकामनाएं पूर्ण होंगी। जो भी तीनों संध्याओं में इसे सुनेगा उसकी सभी विपत्तियां दूर होंगी और प्रसन्नता प्राप्त होगी। वेदों द्वारा गाया गया यह स्तोत्र वेद के ही समान है।

क्या इस संसार में कुछ भी बिना किसी कारण के होता है? अब सुनों हरि का सिर क्यों कट गया। बहुत पहले एक समय अपनी प्रिय पत्नी लक्ष्मी देवी का सुंदर मुख देख कर वे उन के समक्ष ही हंस पड़े।
इस पर लक्ष्मी देवी विचार करने लगी – “निश्चय ही श्री हरि ने मेरे मुख पर कुछ कुरूपता देखी हैं जिस कारण वे हंस रहे हैं. परन्तु ऐसा क्या कारण हैं कि उन्होंने यह कुरूपता पहले नही देखी और बिना किसी कुरूपता को देखे वे किस कारण से हंसेंगे। या हो सकता हैं कि उन्होंने किसी और सुंदर स्त्री को अपनी सह-पत्नी बना लिया है”।
इस प्रकार विचार करते-करते महालक्ष्मी क्रुद्ध हो गयी और धीरे धीरे तमोगुण के अधीन हो गयी. उसके बाद, भाग्य से, ईश्वरीय कार्य की पूर्ती हेतु, स्त्यादिक तमस-शक्ति ने उनके शरीर में प्रवेश किया तथा वे क्रुद्ध हो बोली – “तुम्हारा सिर गिर जाये”।
इस प्रकार बिना किसी शुभ-अशुभ का विचार किये लक्ष्मी ने श्राप दिया जिस कारण उन्हें यह कष्ट उठाना पड़ा है।

झूठ, व्यर्थ का साहस, शठता, मूर्खता, अधीरता, अधिक लोभ, अशुद्धता और अशिष्टता स्त्री का प्राकृतिक गुण है। इसी श्राप के कारण वासुदेव का सिर कट गया है। हे देवताओ ! इस घटना का एक कारण ओर भी है।
प्राचीन काल में एक प्रसिद्ध दैत्य – ह्यग्रीव ने सरस्वती के तट पर कठोर तपस्या की।

सभी प्रकार के भोग त्याग कर, इन्द्रियों को वश में कर ओर भोजन का त्याग कर और मेरे सम्पूर्ण आभूषणों से सुसज्जित परम शक्ति रूप ध्यान करते हुए उस दैत्य ने एक अक्षरी माया बीज मंत्र का जप करते हुए एक हजार वर्ष तक कठोर तपस्या की। मैं भी उसी तामसी रूप में शेर पर सवार हो उसके समक्ष प्रकट हुई और बोली — “हे यशस्वी ! हे सुव्रत का पालन करने वाले ! मैं तुम्हें वर देने के लिये आयी हूँ”।
देवी के यह कथन सुन कर वह दैत्य शीघ्र उठ खड़ा हुआ और देवी के चरणों में दंड के समान गिर गया, उनकी परिक्रमा की, मेरे रूप को देख उसकी आँखें प्रेमभाव से प्रसन्न हो गयी और उनमें आँसू उमड़ आये, तथा वह मेरी स्तुति करने लगा।
हयग्रीव बोला — “देवी महामाये को प्रणाम हे, मैं इस ब्रह्मांड की रचयिता, पालक और संहारक को झुक कर प्रणाम करता हूँ। अपने भक्तों पर कृपा करने में दक्ष, भक्तों की इच्छा पूर्ण करने वाली, आपको प्रणाम है। हे देवी, मुक्ति की दाता, हे मंगलमयी देवी, मैं आपको प्रणाम करता हूँ। आप ही पन्च-तत्वों – प्रथ्वी, जल, वायु, अग्नि और आकाश – की कारण हो। आप ही रूप, रस, गंध, ध्वनि और स्पर्श का भी कारण हो। हे महेश्वरी ! आपने ही पांच जननेंद्रियाँ तथा पांच कर्मेन्द्रियों की रचना की है।
देवी बोली — हे बालक ! मैं तुम्हारी अद्भुत तपस्या और श्रद्धा से संतुष्ट हूँ, तुम क्या वर चाहते हो? मैं तुम्हारी इच्छा अनुसार वर दूँगी”।
हयग्रीव बोला — हे माता ! मुझे वर दें कि मृत्यु कभी मेरे निकट ना आये और मैं सुर तथा असुरों से अजेय रहूँ, मैं अमर हो जाऊं।
देवी बोली — “मृत्यु के बाद जन्म तथा जन्म के उपरान्त मृत्यु होती है, यह अपरिहार्य है। यह संसार का नियम है, इसका उलंघन कभी नहीं हो सकता. हे श्रेष्ट राक्षस ! इस प्रकार मृत्यु को निश्चित जानकर और विचार कर कोई अन्य वर मांगों”।
हयग्रीव बोला — “हे ब्रह्मांड कि माता ! यदि आप मुझे अमरता का वरदान नहीं देना चाहती तो मुझे वर दीजिए कि मेरी मृत्यु केवल उसी से हो जिसका मुख अश्व का हो. मुझपर दया कीजिये और मेरा इच्छित वर प्रदान करें।
“हे महा भागे ! घर जाओ और अपने साम्राज्य का शासन करो, तुम्हारी मृत्यु ओर किसी से नहीं अपितु केवल अश्व के समान मुख वाले से ही होगी”।
इस प्रकार वर देकर देवी चली गयी. हयग्रीव भी अपने राज्य चला गया, तभी से वह देत्य देवों और मुनियों को पीड़ित कर रहा है।

तीनों लोकों में ऐसा कोई नहीं जो उसको मार सके। इसलिए अब विश्वकर्मा से कहो कि वे विष्णु के सिर-विहीन शरीर पर अश्व का मुंह स्थापित कर दें। तब हयग्रीव भगवान उस पापी असुर को मार कर देवताओं का हित करेंगे।
सूत जी बोले — देवताओं से इस प्रकार बोलकर देवी मौन हो गयी। देवता प्रसन्न हो गये और विश्वकर्मा से बोले – कृपा कर यह देव-कार्य करो और विष्णु का सिर लगा दो. वे हयग्रीव बन उस अदम्य असुर का वध करेंगे”।
सूतजी बोले — यह वचन सुनकर विश्वकर्मा ने तुरंत अपने फरसे से घोड़े का सिर काट कर विष्णु जी के शरीर पर लगा दिया।

महामाया की कृपा से घोड़े के मुख वाले ( हयग्रीव ) बन गये. तब कुछ दिनों उपरान्त भगवान हयग्रीव ने उस शत्रु, अहंकारी दानव का अपनी शक्ति द्वारा वध कर दिया। जो मनुष्य इस उत्कृष्ट उपाख्यान को सुनता है, वह निश्चित ही सब कष्टों से मुक्ति पा जाता है, देवी महामाया के इस उत्तम, शुद्ध तथा पाप-नाशक वृत्तांत को जो भी सुनने अथवा पढ़ने से सब प्रकार की सम्पत्ति की प्राप्ति होती है।