श्रेष्ठ संत आणि त्यांच्या रचना

हे पान ज्ञानेश्वरी जयंतीसाठी उघडले होते. त्यात इतर संतांसंबंधित लेख एकत्र केले आहेत दि.२३-०३-२०२२

संत मुक्ताबाई यांच्या मुंगी उडाली आकाशी आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा या अभंगांचे सविस्तर विवेचन या पानावर दिले आहे. https://anandghare.wordpress.com/2021/05/19/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95/

१. ज्ञानेश्वरी जयंती

आज भाद्रपद वद्यषष्ठी ज्ञानेश्वरी जयंती.
संत ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी जीवनाला मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून आजही भक्तीभावाने वाचला जातो. या ग्रंथाविषयी सविस्तर अधिक माहिती मराठी विश्वकोशात दिली आहे. https://vishwakosh.marathi.gov.in/20299/. ज्ञानेश्वरी जयंतिच्या निमित्याने मला फेसबुक आणि वॉटसॅपवर मिळालेली माहिती खाली दिली आहे. मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.

गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांनी आपल्या गीतेवरील ग्रंथात केलेले विवेचन थोडक्यात असे : ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान व साक्षात्कार ह्यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरांचे सृष्टिनिरीक्षण किती सखोल व सूक्ष्म होते, हेही त्यातून दिसून येते. सर्व विश्वाचे आदिकारण, त्याचा कर्ता आणि नियामक ईश्वर मानला पाहिजे, हे ज्ञानेश्वरांनी विश्व-प्रपंचावरून सिद्ध करणारे प्रमाण उत्कृष्ट रीतीने मांडले आहे (९.२८०–२८५). न्यायशास्त्रातील निरनिराळ्या प्रमाणांचा – विशेषतः बुद्धिप्रामाण्य व शब्दप्रामाण्य ह्यांचा – फोलपणा दाखवून ज्ञानेश्वरांनी भक्तीचा सिद्धान्त प्रस्थापित केला आहे. कोणतेही तार्किक प्रमाण मायानदी तरून जाण्यास उपयोगी पडत नसून त्यासाठी सद्गुरू, भक्ती आणि आत्मानुभव ह्यांचाच आधार घ्यावा लागतो. तो घेऊन मायानदी उतरून जाण्यास आरंभ केला, की तरून जायला तिच्यात पाणीच शिल्लक उरत नाही. भक्ती हा दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा एकमेव मार्ग होय, हा सिद्धान्त ज्ञानेश्वरांनी मांडला. साधक भक्तिमार्गाची वाट चालत असताना त्याच्या शरीरावर आणि मनावर काही प्रतिक्रिया घडून येतात. हेच अष्ट सात्त्विक भाव होत. त्यांचे मनोज्ञ चित्रण ज्ञानेश्वरांनी केले आहे. त्याचप्रमाणे आनंद आणि शांती ह्या विरोधी भावना आत्मसाक्षात्कारात कशा एकत्व पावतात, हेही त्यांनी उत्तम प्रकारे दाखविले आहे. देव आणि भक्त यांच्या अंतिम ऐक्याचा विचारही त्यांनी विविध प्रकारे मांडला आहे पण हे ऐक्य संपूर्ण होत नाही. साधक ईश्वराच्या अधिकाधिक निकट जात असला, तरी देव आणि साधक ह्यांच्या ऐक्यात काही उणेपणा राहतो. जसे चतुर्दशीचे चंद्रबिंब पौर्णिमेच्या चंद्राहून किंचित उणे असते. असे होण्याचे कारण देह, मन इ. बंधने आहेत. ती असेपर्यंत देव तो देव आणि भक्त तो भक्त असेच हे नाते राहणार. प्रवासास निघाल्याबरोबर कोणी इष्ट स्थळी पोचत नाही. चांगल्या संगतीने इष्ट स्थळी आनंदाने पोचता येते. तरी प्रवास संपण्यासाठी काही वेळ लागतोच. साधकाच्या अंतिम विजयाचे ज्ञानेश्वरांनी जे रूपकात्मक वर्णन केले आहे, ते अतुलनीय असेच आहे.
गुरुदेव रानडे ह्यांच्या मते ज्ञानेश्वरांनी केलेला गीतेचा तात्पर्यार्थ पूर्णपणे साक्षात्कारपर असून एका दृष्टीने शंकराचार्यांच्या वेदान्तपर अर्थाच्या पलीकडचा, वरचा आहे. ज्ञानेश्वरांच्या ठायी तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती ह्यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम हेच त्यांच्या गीतेवरील भाष्याचे महान वैशिष्ट्य होय.

आज ज्ञानेश्वरी जयंती भाद्रपद वद्यषष्ठी. मराठीतील गीतेवरील पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरीच्या शेवटी स्थळ, ग्रंथकर्त्याचें नांव, ग्रंथ लेखन करणाराचे नाव, ग्रंथाचा काळ यांचा उल्लेख करणाऱ्या ओव्या आहेत. सच्चिदानंद बाबा यांनी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर सांगत असलेली ज्ञानेश्वरी कागदावर उतरवली. म्हणुन लेखकु म्हणुन त्यांचा उल्लेख आहे. तसेच महाराष्ट्रमंडळी या शब्दामुळे त्यावेळी महाराष्ट्र नाव प्रचलित असावे असे वाटते. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस खाली नमूद केलेली एक कालनिदर्शक ओवी आहे


ऐसें युगीं वरि कली। आणि महाराष्ट्रमंडळी।
श्री गोदावरीचा कुलीं। दक्षिणिली॥
तेथे भुवनैकपवित्र । अनादिपंवकोश क्षेत्र ।
जगाचें जीवनसूत्र । जेथ श्रीमहालसा॥
तेथ इंदुवंशविलासु । जो सकळकलानिवासु।
न्यायातें पोखीत क्षितीशु । श्रीरामचंद्रु॥
तैं माहेशान्वयसंभुतं । श्रीनिवृत्तिनाथसुतें।
केलें ज्ञानदेवें गीतें । देशीकारलेणें॥
शके बारा शत बारोत्तरें । तै टीका केली ज्ञानेश्वरें ।
सच्चिदानंदबाबा आदरें ॥ लेखकु झाला॥


मात्र त्याकाळी छपाई नसल्याने एकमेकांकडून प्रत लिहून घेण्याची पद्धत होती. त्यामुळे अनेक कानामात्रा वेलांटी चुकत गेल्या म्हणून त्या दुरुस्त करून ज्या दिवशी ज्ञानेश्वरी पुर्ण झाली म्हणजेच भाद्रपद वद्य षष्ठीला ती शुद्ध झाली. म्हणून ज्ञानेश्वरीची जयंती साजरी करण्यात येते.
शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.
सभामंडपात संत नामदेव यांचा एक श्लोक लिहिला आहे त्यात ‘म्हाळसापुरी ‘असे नेवासे गावाचा उल्लेख आहे. म्हाळसा म्हणजे खंडेरायाची पत्नी तिचे माहेर म्हणजे नेवासा.
सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ ; मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत (गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तामिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.
शके १६१४ ते १६१६ म्हणजेच इसवी सन १६९२ ते १६९४ अशी २ वर्षे रामजी यांनी अजानवृक्षाखाली बसून ‘श्री ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे पुनर्लेखन केले .जो सध्या सर्वांत जुन्या ग्रंथांपैकी एक मानला जातो. ही प्रत पंढरपूर येथील होळकर वाड्यात वसंतराव बोरखेडकर-बडवे यांनी जतन केली आहे.
नेवासे हे पुणे औरंगाबाद मार्गावर नगरचे पुढे गोदावरी काठी आहे ,प्रवरा संगम ,देवगड,तसेच एक जुने हेमाडपंथी देवालय हे तेथील आकर्षण आहे.नेवासे येथे गेल्यावर मनचक्षुपुढे पाचही पोरकी भावंडे येतात. परकर पोलके घातलेली ज्ञानेश्वरांचे बोट धरून चालणारी छोटी मुक्ताई दिसते व मन हेलावून जाते.
शके १२१२ किंवा इ. स. १२९० मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने – ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत.
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर ह्यांनी गीतेवर रचिलेली टीका. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी ह्याग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे तथापि संत नामदेवांनी ह्या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशीनावे पुढीलांनी रूढ केली असावीत. ज्ञानेश्वरांनी आपले कार्य निवृत्तीनाथ यांना सादर केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी हे फक्त नऊ पद्य असलेल्या पसायदान लिहून केले. पसायदानाचा शब्दशः अर्थ असा होतो की, ईश्वराकडून आश्रय मागणे. पसायदानामध्ये, ज्ञानेश्वराने स्वतःसाठी काहीच मागितले नाही परंतु त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी प्रार्थना केली. पसायदानाचे दुसरे काव्यात, ज्ञानेश्वर भगवंताला विनंती करतात की त्यांना असे वरदान द्यावे कि ज्यामुळे ते सर्व द्रुष्ट लोकांच्या मनातील वाईट गोष्टीं काढून त्यांना एका धार्मिक मार्गावर आणता येईल. मानवातील वाईट गोष्टी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि अहंकार. त्यांनी प्रार्थना केली की या वाईट गोष्टींची जागा दया, नम्रता, सहिष्णुता, क्षमा आणि भक्ती आणि देवाला शरण याने घेऊ दे .


…………. 🌹 🌹 #पसायदान 🌹 🌹
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||


ज्ञानेश्वरीवर मुद्रण व्यवस्था अस्तित्वात आलेवर सुरू झालेवर सुमारे १९६ पुस्तके तयार झाली. तसेच संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.त्यामध्ये
‘ज्ञानेश्वरी’ लिहून घेणारे लेखक – सच्चिदानंद बाबा
‘ज्ञानेश्वरी’चे पहिले भाष्यकार – संत निवृत्तीनाथ महाराज.
‘ज्ञानेश्वरी’चे पहिले संशोधक – संत एकनाथ.
‘ज्ञानेश्वरी’चा पहिला संकलनकार – संत महिपती.
‘ज्ञानेश्वरी’चे पहिले प्रसारक – संत नामदेव.

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील फळ्यावरून साभार दि.२७-०९-२०२१

********************************


२. बहुकाळपर्वणी गोमटी| भाद्रपदमास कपिलाषष्ठी|
(श्रीसंत एकनाथमहाराज)
फक्त दोनच ग्रंथांची जयंती साजरी होते असे आपण जाणतो, एक श्रीगीता जयंती आणि दुसरी श्रीगीतेवरील टीका असणारा ग्रंथ श्रीज्ञानेश्वरीची! दोन्ही ग्रंथ श्रेष्ठ आहेत,जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे आहेत. मराठी सारस्वताचे वैभव म्हणून ज्ञानेश्वरीकडे पाहिले जाते.श्रीसंत एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन पूर्ण केले ती आजची तिथी,भाद्रपद वद्य षष्ठी, ज्ञानेश्वरी जयंती म्हणून गणली जाते.शके १५०६, तारण नाम संवत्सर त्यावेळी सुरू होते हा उल्लेख नाथ महाराजांनी केला आहे. कालगणनेनुसार प्रत्येक संवत्सर दर साठ वर्षांनी पुन्हा येते.२००४ मध्ये तारण नाम संवत्सर आले होते. सोलापूरचे आदरणीय वै दा का तथा भाऊ थावरे ह्यांच्या मार्गदर्शनात पैठण येथील नाथांचे समाधी मंदिरात तीन दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण ह भ प मुकुंद महाराज जाटदेवळेकर ह्यांचे नेतृत्वात करण्यात आले होते.प्रत्येकाच्या जीवनात तारणनाम संवत्सर येण्याचा योग बहुधा एकदाच येतो ती पर्वणी आपण साधली पाहिजे असे भाऊंचे सांगणे होते,हा लाभ त्यांनी अनेक भाविकांना घडविला.
पैठणच्या भव्य माहेश्वरी धर्मशाळेत सर्वांच्या निवासाची सोय केली होती. श्रीसंत साहित्य सेवा संघ सोलापूर आणि खंडाळकर अण्णा ह्यांच्या सहयोगाने त्रिदिवसीय पारायण उत्तम रीतीने संपन्न झाले.शेवटचे दिवशी नाथ समाधी मंदिर ते नाथांचे पवित्र निवासस्थान अशी ज्ञानेश्वरी मस्तकी धारण करून दिंडी मिरवणूक निघाली होती. शांतिब्रह्म नाथांचे समाधी नजीकच गोदावरी,अर्थात भागीरथी संथ वाहते, सायंकाळी आरती समयी पादुकांच्या भागीरथी स्पर्शाने वातावरण अधिकच भक्तिमय होते.
ज्ञानेश्वरी संशोधनाची आवश्यकता काय होती हे श्रीएकनाथांनी सांगितले आहे,माऊलींची तशी प्रेरणा होती आणि मुळातच शुध्द असणाऱ्या ग्रंथात थोडे पाठभेद निर्माण झाले होते ते दूर झाल्याने प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी चा निर्वाळा त्यांनी दिला आहे. ज्ञानेश्वरीतील ओवी साडेतीन चरणांची आहे, ग्रंथात जिथे चार चरणांची ओवी आलेली आहे,ती नाथमहाराजांनी संशोधित केली असावी हे भाऊंचे म्हणणे सुयोग्य वाटते.श्रीएकनाथांचे ज्ञानेश्वरीचा महिमा वर्णन करणारे बरेच अभंग आहेत.
श्रीज्ञानदेवा चरणी|मस्तक असो दिन रजनी
संस्कृताची भाषा|मऱ्हाठी निःशेष अर्थ केला
ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी|अनुभव दावी भाविकां
एका जनार्दनी अनुभव|समाधि ठाव अलंकापुरी
हे ज्ञानेश्वरीचे श्रेष्ठत्व सांगतात.
अभ्यासकांसाठी ज्ञानेश्वरी अत्युत्तम काव्य आहे, उपासकांसाठी अनुभवाची खाण आहे,ज्ञानवंतांसाठी तत्वज्ञानाचे भांडार आहे, सिद्धपुरुषांसाठी सर्व शास्त्रांचे सरोवर आहे आणि भाविकांसाठी भक्तीरसाचे आगर आहे. ज्ञानेश्वरीची सेवा प्रत्येकाला कृपेची सावली प्रदान करते हे नक्की!
साच बोलाचे नव्हे हे शास्त्र
पै संसारु जिणते हे शस्त्र
आत्मा अवतरविते मंत्र
अक्षरे इये
(श्रीज्ञानेश्वरी १५.५७६)
शास्त्राचा संबंध विचाराशी आहे,शस्त्राचा संबंध कृतीशी आहे आणि मंत्राचा संबंध परिणाम दर्शवितो म्हणूनच श्रीगीता आणि श्रीज्ञानेश्वरी हे श्रेष्ठ ग्रंथ आहेत यासाठी त्यांची जयंती साजरी होते, त्यांचे चिंतन,मनन आणि पठण सुफळ प्रदान करतात!
🙏🙏🙏🙏🙏
संजीव प्र कुसूरकर,पुणे

********************

३. ज्ञानेश्वरी जयंती
(भाद्रपद वद्य षष्ठी, स्रोतः कायप्पा)
आज २७ सप्टेंबर भाद्रपद वद्य षष्ठी. हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा केला जातो. वास्तविक ज्ञानेश्वरी ग्रंथ नेमका कोणत्या दिवशी पूर्णत्वास गेला ती तिथी अज्ञात आहे. परंतु एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचे काम या दिवशी पूर्ण केले. म्हणून हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा करतात. नाथांचे त्यांच्या जीवनातील महत्वाचे कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करणे. एके दिवशी त्यांचा घसा दुखू लागला. त्यावर औषधोपचार झाले. पण गुण येईना. तिसर्‍या दिवशी ज्ञानदेव त्यांच्या स्वप्नात आले. त्यांना म्हणाले, ‘माझ्या मानेस अजानवृक्षाच्या मुळीचा गळफास बसला आहे. तो तू स्वत: येथे येऊन काढ. म्हणजे तुझा घसा बरा होईल. म्हणून समुदाय बरोबर घेऊन कीर्तन करीत नाथ शके १५०५ मधे आळंदीस आले. याविषयी नाथांचा अभंग प्रसिद्ध आहे.
श्रीज्ञानदेवें येऊनी स्वप्नात ।
सांगितली मात मजलागी ॥१॥
दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा ।
परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥
अजानवृक्षाची मुळी कंठास लागली ।
येऊनी आळंदी काढी वेगे ॥३॥
ऐसें स्वप्न होता आलो अलंकापुरी ।
तंव नदी माझारी देखिले द्वार ॥४॥
एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले ।
श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥
स्वप्नातील दृष्टांतानुसार नाथ आळंदीस आले. आळंदीस सिद्धेश्वराचे स्थान प्राचीन होते. ते स्थान गर्द झाडीने वेढलेले होते. बरोबरच्या मंडळींना बाहेर बसवून नाथ समाधिस्थानाच्या शोधार्थ निघाले. दूरूनच त्यांना अजानवृक्ष दिसला. समाधीचे दार उघडून ते आत शिरले. तेथे त्यांना वज्रासन घालून बसलेले ज्ञानराज दिसले. त्यांचे दर्शन होताच एकनाथांनी त्यांच्या पायी दंडवत घातले. तीन अहोरात्र त्यांना ज्ञानराजांचा सहवास लाभला असे केशवांनी नाथचरित्रात लिहीले आहे. अजानवृक्षाची मुळी मस्तकाला लागल्याचे निमित्त करून ज्ञानदेवांनी नाथांना प्रत्यक्ष दर्शन दिले व ज्ञानेश्वरीचा लोकात प्रसार करण्यची आज्ञा केली. नाथ समाधीच्या बाहेर आल्यावर लोकांनी पूर्ववत समाधीस्थानावर दगड रचून टाकले.
पैठणला परतल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधनाचे कार्य हाती घेतले. लोकांच्या व पाठकांच्या चुकीमुळे काही अशुद्ध व अबद्ध पाठ त्यात घुसडले गेलेले होते. ते त्यांनी काढून टाकले व ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत वाचकांच्या हाती दिली. नाथांना ज्ञानदेवांचे दर्शन शके १५०५ मधे ज्येष्ठात झाले व ज्ञानेश्वरी संशोधनाचे काम शके १५०६ मधे तारण नाम संवत्सरी संपले. ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी हा ज्ञानेश्वरी शु्द्धिकरणाचा काळ नोंदवला आहे. तो ग्रंथ मूळचा अतिशय शुद्ध असून लोकांच्या पाठभेदामुळे अशुद्ध झाला होता तो संशोधित करून आपण ही प्रत तयार केली आहे असे त्यांनी सांगितले आहे. आज आपण वाचतो ती एकनाथांनी तयार केलेली ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत. भाद्रपद वद्य षष्ठीला हे काम पूर्ण झाले. म्हणून तो दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून मानण्यात येतो.

श्री.नरेंद्र गोळे यांच्या चर्यापुस्तकभिंतीवरून साभार . . दि. २७-०९-२०२१

****************************************

२. संत तुकाराम महाराज

तुकारामबीजेनिमित्य संत तुकाराम महाराज यांच्यासंबंधी मिळालेले दोन लेख खाली दिले आहेत.

‘तुका आकाशाएवढा’ इथे पहा.
https://anandghare2.wordpress.com/2010/07/28/%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%8f%e0%a4%b5%e0%a4%a2%e0%a4%be/

👏🏻१. देवाकडे काय मागावं👏🏻

तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते…
ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असंत…
आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या…
पण बोल्होबा काही तिचे ऐकत नसंत…
अशी अकरा वर्षे गेली.
बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेचना.
ती आपल्या पतीला म्हणाली की…
“जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच.”
बोल्होबांचा नाईलाज झाला कारण स्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना..!!
ते म्हणाले…
” मी तुला माझ्या बरोबर नेईन पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदीरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही”
कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगीतले की मी काही मागणार नाही.
पती पत्नी पंढरपुरास निघाले..
तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू..!!
यात्रतेतली बांगड्याची, खेळण्यांची दुकाने हरखुन पहात पहात ती बोल्होंबांच्या मागून चालत असल्याने त्या दोघांत अंतर पडले…
बोल्होबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहीली…

इकडे बोल्होबा मंदीरात पोहोचल्या बरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली…

रखुमाईने पांडुरंगाला विचारले की…
“सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्होबा आल्यानंतर तुमची मान खाली की झुकली??”
यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले कि…
“तो जो सावकार असतो ना..त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी.”
म्हणजे बघा, बोल्होबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली…

इतकी भक्ती केली की, प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला…

बोल्होबा फक्त भक्तीचे डिपाँझिटच करीत राहीले मागणीचे विड्राँवल कधी केलेच नाही…

त्यांनी संपुर्ण आयुष्यभर देवाची भक्ति केली पण त्याच्याकडे कधीही काहीही मागितलेच नाही.
परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी ..!!!
(आम्ही दोनशे.पाचशे.रुपयाचे प्रसाद हार.नारळ चढवतो आणी लाक्खो रुपयांची मागणी करतो)
इकडे बोल्होबा पांडूरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कणकाई माऊली देवळात आली…
तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पहात राहीली..
तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले…
“बोल तुला काय पाहीजे..??”
कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे??
पतीची आज्ञा तर मोडता येत नाही…
पण मनुष्य मोठा हुषार प्राणी आहे बरं का…
चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते!!
तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगीतलेय की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठे सांगीतलेय की देव जर स्वत:हून काही देत असेल तर घेऊ नकोस…!!
ती पाडुरंगाला म्हणाली “पोटी संतान नाही.”
देव म्हणाला “जा निश्चिंतपणे घरी, तुला मुलगा होईल.”
ती खुप आनंदली हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का? हिनेही बर्याच प्रदक्षिणा घातल्या…
इकडे बोल्होबा बाहेर वाट पहात होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तीने देवाकडे काहीतरी मागितले असणार…
असा विचार करीत असतानाच कणकाई माऊली समोरून येताना दिसली…
तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगीतला…
ते सारे ऐकताक्षणीच बोल्होबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले…
पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले…
“याने तुला आशिर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा…!!!”
“जर मला तु पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासागणिक तुझेच नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे..!!!!”

आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला…
ज्यांचा नावाचा डंका आजही वाजतोय…
फळाची आशा धरून देवाची भक्ती कधीच करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर हि अशी असावी मागणी..!!!
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻


संत तुकाराम . . . चित्र गूगलवरून साभार

२.लेकीसाठी वैकुंठातुन👨‍👧

भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पुजा झाली.तुळसीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरानं हाक दिली.
काही काळजी आहे का संसाराची? पोरींची? तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. महाराज शांतपणे म्हणाले, आवले योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होत. योग्य वेळ येवू द्यावी लागते. परंतु जिजाबाईची नेहमीची कटकट ऐकून महाराज एकदिवशी जवळच यलवडी नावाचं गाव होतं. तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले. तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहुन त्यांना खुप आनंद झाला. आणि महाराजांची मुलगी भागिरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपल जिवन परिपूर्ण झालं, संतकुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्त्यानंद झाला.
अखेर लग्न झालं.भागिरथी महाराजांच्या गळ्यात पडून रडू लागली. महाराजांनी भागिरथीच्या तोंडावरून हात फिरवला म्हणाले, नांदा सुखानं नांदा पण विसरू नको तु तुकाराम महाराजाची मुलगी आहे. भागिरथी नांदायला सासरी गेली. इकडे महाराजांच जीवन पुन्हा पुर्ववत सुरु झालं. भजन किर्तन नामस्मरण नित्य सेवा सुरु झाली.
भागिरथीचं यलवडी गाव जवळच होतं पण येणंजाणं नव्हतं. देहुची माळीण भाजी विकायला यलवडीला जायची. राञी देहुमध्ये झालेलं आपल्या बापाचं, तुकाराम महाराजांच किर्तन ऐकण्यासाठी भागिरथी माळीणबाईची आतुरतेने वाट पाहायची. महाराजांच किर्तन, उपदेश ऐकून भागिरथीचे डोळे बापाच्या आठवणीनं भरून यायचे. माळीणबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं, महाराजाचं रोज दर्शन होतय या भावनेनं भागिरथी कृतकृत्य व्हायची.
अखेर तो दिवस आला. तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा. फाल्गुन वैद्य द्वितीया, सोमवार चा दिवस होता. प्रथमप्रहर,प्रात:काळ.बीजेच्या दिवशी शेवटचं किर्तन केलं. गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला. भागिरथी ला सांगाव, पण तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. देहु गावचं रत्नं गेल.
देहु गाव शोकसागरात बुडून गेल.सर्व निश्चल बसलेले. कुणाच कशात लक्ष लागत नाही.
पण शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती माळीणबाई यलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली. आणि जड पाऊलाने भागिरथीच्या दारात पोहोचली. बरेच दिवस माळीणबाई का आली नाही? माळीणबाई तुझा चेहरा का उतरला? असा प्रश्न भागिरथीने माळीणबाईला विचारला. जड अंतकरणानं माळीणबाई म्हणाली, भागिरथी तुझे बाबा माझे गुरू, जगतगुरू तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी सदेह वैकुंठाला गेले.
आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागिरथी धायमोकलुन रडु लागली . परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाहीत या विचाराणं भागीरथीनं तुकाराम तुकाराम नामजप सुरू केला. आणि आपल्या कन्येचा आवाज ऐकुन तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले. नारायणाची परवानगी घेऊन भुतलावरच कार्य पुर्ण करण्यासाठी महाराज भागिरथीच्या घरी आले.
भागिरथी असा आवाज दिला. वैकुंठाला गेलेल्या आपल्या बाबांचा आवाज ऐकुन भागिरथीने धावत येवून तुकाराम महाराजांना कडकडुन मिठी मारली, आनंदाश्रु घळघळ वाहु लागले. भागिरथीला शांत करत महाराज म्हणाले बाळा किती ञास करून घेतलास. तशी भागिरथी म्हणाली बाबा तुम्ही नाही तर जगण्यात अर्थ काय? कुणासाठी जगावं? तुकाराम महाराजांनी भागिरथीच्या तोंडावरून हात फिरवला. भागिरथी म्हणाली, बाबा मी तुमच्या आवडीचं गोडधोड जेवन करते. महाराज म्हणाले भागिरथी मी आता न जेवणा-या गावी गेलो. आपल्या भागिरथीला मायेनं जवळ घेतलं आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत, परत हाक मारू नको अशी विनंती केली. तशी भागिरथी म्हणाली, बाबा तुम्ही गेलाय अस वाटु देऊ नका, मी हाक मारणार नाही. भागिरथीला आशिर्वाद दिला.
भागिरथीच जिवन परिपूर्ण झालं. हे बाप-लेकीच अलौकिक नातं आहे. मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते. बाप आपलं दु:ख आईच्या ह्रदयासमान लेकीला सांगुन मन हालक करत असतो. जगतगुरू तुकाराम महाराज आणि भागिरथीचं हे नातं बाप लेकीच्या अलौकिक नात्याचं ह्रदयस्पर्शी उदाहरण आहे. म्हणून अस म्हणतात कि बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असत, कारण एका लेकीसाठी एका बापालाही वैकुंठहुन यावा लागलं होतं !!

दोन्ही लेख वॉट्सॅपवरून साभार दि. २३-०३-२०२२

🍃🍃🍃🙏 🙏 🍃🍃🍃🌹🚩🏵️

३. संत शिरोमणी नामदेव महाराज

संत नामदेव . . . चित्र गूगलवरून साभार

महान संत शिरोमणी नामदेव महाराज [जन्म :: जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)//संजीवन समाधी :: आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ (इ.स.१३५०)] हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख प्रचारक,संत कवी साहित्यिक होते.आज आषाढ वद्य त्रयोदशी म्हणजे तिथी अनुसार महान संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ६७१ वी पुण्यतिथी पुण्य-स्मरण दिन. आम्हां धोपावकर बंधु भगिनी आणि परिवार,अहमदनगर तसेच वारकरी संप्रदायाच्या कोटयावधी भक्त मंडळींतर्फे महान संत शिरोमणी वारकरी संत कवी साहित्यिक नामदेव महाराज ह्यांचे चरणी कोटि कोटि शिरसाष्टांग दंडवत . सादर प्रणाम.

नामदेव महाराजांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषां मधील सर्वाधिक जुन्या काळातील साहित्यिक कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार,आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.

भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

दामाशेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद-भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी (नरसी नामदेव) हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०) मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत शिरोमणी नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून संत गोरोबा काकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारी विषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगा नंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.

संत नामदेवांची पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.

संत नामदेवांच्या कीर्तनांत अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी नंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाब मधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी संत नामदेवांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

भगवद-भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो. संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभर फिरले.

.

.. . . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.२३-०३-२०२२

.. . . . . .

४. संत चोखा मेळा

संत चोखामेळा यांचे पुण्यस्मरण (वैशाख कृ पंचमी )
चोखामेळा (चोखोबा) (अज्ञात वर्ष – इ.स. १३३८) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते.
चोखोबांची पत्नी सोयराबाई हि सुद्धा अभंग रचायची ,!!अवघा रंग एक झाला !! हा अभंग तिने रचलेला
चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात असलेले मेहुणा किवा मेहुणपुरी झाला. (चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात.) चोखोबा मूळ वर्‍हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ … असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्‍न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणाऱ्या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दु:ख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखोबांचे सुमारे ३५० अभंग आजच्या घडीला उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम ‘अभ्यंग अनंतभट्ट’ हे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात.(विकिपीडिया)
‘धाव घाली विठू आता। चालू नको मंद।
बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’
‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार।
बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’
‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती।
जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’
‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।।
चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’
‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’
हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत.
चोखोबांच्या रचनांत भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसेतच, तसेच उपेक्षेची खंत जाणवते आणि ‘वेदनेचा जो सूर’ लागलेला दिसतो, तो अंत:करण हेलावून टाकतो.
‘आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण। वेदांचे वचन न कळे आम्हा।।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझे।।’
‘जन्मता विटाळ मरता विटाळ। चोखा म्हणे विटाळ आदिअंती।।’
‘आदि अंती अवघा, विटाळ साचला। सोवळा तो झाला कोण न कळे।
चोखा म्हणे मज नवल वाटते। विटाळापरते आहे कोण।।’
या रचनांतून उपरोक्त उल्लेख केलेल्या भावभावना दिसतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’
या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत चोखोबा ज्ञानेश्ववर माउलींबद्दल ‘प्राणसखा’ हा अतिशय सुंदर शब्द सहजगत्या योजून जातात. यातून तेराव्या शतकातील या ‘संतकवी’चे साहित्यगुणही दिसून येतात.
त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्तिपरायण होते. त्या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्‍नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग-रचना आहेत. संत चोखोबांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत. संत चोखोबांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वतःला ‘विठू पाटलाचा बलुतेदार समजत असत.
संत चोखोबा मंगळवेढ्याचे होते. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उद्धाराची सतत चिंता होती. त्यांना समान-हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले.
गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना एका दुर्दैवी अपघातात त्यांचा अंत झाला, असे उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात आढळतात. संत नामदेवांनी त्यांच्या सर्व अस्थी गोळा केल्या. त्यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद त्यांनी ऐकला. संत नामदेवांची महाद्वारात जिथे पायरी आहे, त्याच्या बाजूला संत चोखोबांची समाधी पंढरपूरमध्ये आहे.
चोखोबांच्या मनात जातिहीनत्वाची झोंबणारी जाणीव असतांनाही ते ते चोख (स्वच्छ) होते. कोणताही संत जन्मतः संत असत नाही. ‘संतत्व’ ही प्राप्त केलेली मनोवस्था आहे. हे त्यांच्यावरून निदर्शनास येते.
‘शुद्ध चोखामेळा करे नामाचा सोहळा’ अशी आपल्या नावामागे ते शुद्धत्वाची ग्वाही देऊन. देहभाव नष्ट झाल्याचे सांगतो. मेळा (अपवित्र) असणारा माणूसही भगवंताच्या दारी (चोख) पवित्र होतो. चोखोबांनी ‘वाणी नाही शुद्ध | धड न ये वचन’ असे आपल्या अभंगात म्हटले असले तरी, तो त्यांचा विनय आहे. त्यांची अभंगवाणी निर्दोष असलेली दिसते. व्याकरण, विवेचन आणि वाङ्‌मय या तीनही दृष्टीनी त्याची वाणी चोख आहे. उत्कटता, सामाजिक आशय, बांधीव रचना, या गुणांमुळे त्यांच्या अभंगाला मराठी सारस्वतात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
नामदेवप्रणीत भक्तियात्रेत संत चोखोबा, पत्‍नी संत सोयराबाई , बहीण निर्मळा, पुत्र कर्ममेळा आणि मेहुणा बंका हे कुटुंबीय सहभागी झाले होते. नामदेवाप्रमाणे समग्र कुटुंबच भक्तिभावात एकरूप झाले दिसते.

फेसबुकवरील श्री.माधव विद्वांस यांच्या नोंदीवरून साभार . . . दि.२१-०५-२०२२

५. संत एकनाथ महाराज

संत एकनाथांचा उल्लेख वर ज्ञानेश्वरीच्या संदर्भात आला आहेच. त्यांनी अनेक अभंग आणि पोथ्या लिहिल्या होत्या. गौळण आणि फटका हे संत एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. एक लोकप्रिय फटका खाली दिला आहे.

संत एकनाथांच्या कथा आणि रचना इथे पहा.

·
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दीवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी म्हणे हरी हा भक्तची ओळखावा
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
रचनाः संत एकनाथ, प्रकारः फटका, संगीतः शाहीर साबळे, गायकः शाहीर साबळे

६. संत निवृत्तीनाथ

निवृत्तिनाथयांची आज पुण्यतिथी . संत ज्ञानेश्वर यांचे हे थोरले बंधु . नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
निवृत्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ किंवा १२६८ असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. ‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हाचि होय । गयिनीनाथे सोय दाखविली ॥’, असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेविले आहे सुमारे तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथापि निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे. त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले’ असे निवृत्तिनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ ‌‌‌त्यांच्या सोबत होतेच.निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा. म. आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेविली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे.

हे संत निवृत्तीनाथ रचित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले काव्य आहे
जेथोनि उद्गार प्रसवे ॐकार ।
तोचि हा श्रीधरू गोकुळीं वसे ॥१॥
जनक हा जगाचा जिवलग साचा ।
तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥
नमो ये वैकुंठी योगियांचे भेटी ।
पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥
निवृत्ति साधन कृष्णरूपे खूण ।
विश्व विश्वीपूर्ण हरि माझा ॥४॥

श्री.माधव विद्वांस आणि फेसबुकचे आभार. दि.२५-०६-२०२२

गणेशोत्सव २०२१

श्रीगजाननाची स्थापना करून या वर्षाच्या गणेशोत्सवाची सुरुवात केली आहेच.

या कालावधीत मला मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण लेखांचे संकलन मी या पानावर करणार आहे. जसजसे लेख आणि चित्रे मिळत जातील तसतशी ती या पानावर देत जाईन . मला यातले बहुतेक लेख व चित्रे फेसबुक किंवा वॉट्सॅपवर मिळणार आहेत. सर्व मूळ लेखकांचे मनापासून आभार मानून त्यानी आपली अनुमति द्यावी अशी विनंति आधीच करत आहे. दि.१०-०९-२०२१

गणपतीची ११ संस्कृत स्तोत्रे आणि गणेश पुराणाचे मराठीतून संक्षिप्त ओवीबद्ध रूपांतर इथे : https://anandghan.blogspot.com/2021/07/blog-post_15.html

माझा हा जुना संग्रह अवश्य पहा : गणेशोत्सव २०१९ : https://anandghare.wordpress.com/2019/09/08/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%af/

🔆ॐ गं गणपतये नमः🔆

‼ श्री गणेश पंचरत्न स्तोत्र ‼

मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्तिसाधकम् ।
कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् ।
अनायकैक नायकं विनाशितेभदैत्यकम् ।
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ॥

नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् ।
नमत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरम् ।
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं ।
महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ॥

समस्त लोकसंकरं निरस्तदैत्यकुंजरम् ।
दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् ॥
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् ।
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् ॥

अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्ति भाजनम् ।
पुरारिपूर्व नन्दनं सुरारि गर्वचर्वणम् ॥
प्रपंच नाशभीषणं धनंजयादि भूषणम् ।
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ॥

नितान्तकान्तदन्तकान्ति मन्तकान्तकात्मजम् ।
अचिन्त्य रुपमन्तहीन मन्तरायकृन्तनम् ।
ह्रदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनाम् ।
तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् ॥

फलश्रुती

महागणेश पंचरत्नम् आदरेण योन्वहम् ।
प्रजल्पति प्रभातके ह्रदि स्मरन् गणेश्वरम् ॥
अरोगितामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम् ।
समाहितायु रष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् ॥

🌹🌿🔆🌸🙏🌸🔆🌿🌹

दुर्वांचे महत्व का? आणि २१ दुर्वा का?

दुर्वा हा शब्द = दु: + अवम. दु: म्हणजे दूरचा – अर्थात परमात्मा, अवम = जवळ येऊ दे. थोडक्यात आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकत्र येऊ देत अशी प्रार्थना म्हणजे दुर्वा.
संपूर्ण मी, माझ्या तिन्ही देहासकट( देह्त्रय = स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर) तुला अर्पण करतो अशा भावनेने ३ तृणाची दुर्वा वाहायची.
२१ वेळा का? मांडुक्य उपनिषदात आपल्या शरीराचे भाग सांगितले आहेत. ते म्हणजे ५ ज्ञानेंद्रिये (कान, डोळे, जीभ, त्वचा, नाक ), ५ कर्मेंद्रिये (हात,पाय इ.) ५ प्राण(प्राण, अपान, समान, उदान, व्यान), मन, बुद्धी(बुद्धीचे २ भाग – मेधा(स्मरणशक्ती), प्रज्ञा (विवेकबुद्धी), अहंकार, चित्त. या सर्व २० भागांनी आणि आत्मा – अशा सर्व २१ गोष्टी म्हणजे संपूर्ण मी ! असा पूर्ण मी तुझ्याशी एकरूप होऊ दे म्हणून २१ दुर्वा वाहतात.
एक मराठीतील भक्तीगीत – अष्टांगाची करुनी घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी – त्यात दूर्वांची जुडी म्हणजे पूर्ण आपण हा अर्थ सहजतेने सांगितला आहे.

– नीलिमा कुलकर्णी, रेस्टन, वर्जिनिया

. . . . . . . . . . .

🤔 बाप्पाचा प्रत्येक अवयव आपल्याला काय शिकवितो?

गणपती बाप्पाचा प्रत्येक अवयव म्हणजे शिक्षकच. ज्यापासून आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. चला तर, जाणून घेऊया, बाप्पाचा प्रत्येक अवयव आपल्याला काय-काय शिकवितो?
▪️ शीर : बाप्पाचे मस्तक हत्तीचे असून हत्ती हा सर्व प्राण्यांपैकी सर्वात बुद्धिमान आहे. याचा अर्थ असा की आयुष्यात उंची गाठण्यासाठी बुद्धिमान व्हायला हवे.
▪️ मोठे कान : बाप्पाचे कान सूपासारखे असतात आणि सूपाची खासियत म्हणजे टरफल फेकून अन्न (सत्व) ठेवणे. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांचे ऐकतो, पण त्यातून चांगल्या गोष्टींचे सार घ्या आणि बाकीचे सोडून द्या.
▪️ छोटे डोळे : हे व्यक्तीला जीवनात सूक्ष्म दृष्टी ठेवण्यासाठी प्रेरणा देतात. तथापि ते दीर्घदृष्टीचेही सूचक आहेत.
▪️ लांब सोंड : हे आपल्याला दूरदृष्टी ठेवण्यास शिकवतो. याचा अर्थ असा की आपण दूरच्या विचाराने चालले पाहिजे आणि कोणत्याही धोक्याची अगोदरच जाणीव करून घेण्याचा किंवा त्याचा अंदाज घेण्याची गुणवत्ता असावी.
▪️ लांब पोट : बाप्पाला लंबोदर असेही म्हणतात. त्याच्या पोटाचा मोठा आकार म्हणजे प्रत्येकाच्या ऐकलेल्या गोष्टी आपल्या पोटात ठेवाव्यात.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .


गणेश चतुर्थी विशेष

गणों के ईश का नाम गणेश है। गणेशजी शिरोभाग में निवास करते हैं।नेत्र, श्रोत्र, नासिका, त्वचा, जिह्वा-ये सब इन्द्रियगण हैं। जो इनका स्वामी है, जो इनको अपने काबू में रखने वाला है, उसको गणेश बोलते हैं। वेदों में जो मन्त्र अाते हैं-‘गणानां त्वा गणपतिं गुं हवामहे’; निसुषीद गणपति गणेषु’; इत्यादि, उनसे यह सिद्ध होता है कि गणेश प्रज्ञा के देवता हैं, और भी जहाँ-जहाँ गणपति की चर्चा आती है, वहाँ-वहाँ यह सिद्ध होता है कि गणेश बुद्धि के देवता हैं।अपनी प्रज्ञा की शुद्धि के लिये प्रज्ञा के अधिपति गणेशजी की वन्दना करनी चाहिये।

गणेशजी को यह वरदान प्राप्त है कि किसी भी कार्य के प्रारम्भ में उनकी वन्दना करने से वह कार्य निर्विघ्न रूप से सिद्ध हो जाता है।

नारायण! कोई भी काम प्रारम्भ करना हो, तो उसकी निर्विघ्नता से पूर्ति और अभिवृद्धि के लिये सबसे पहले गणेशजी की वन्दना करनी चाहिये। ‘गोस्वामी तुलसीदासजी महाराज’ अपने अमृतमय-रसमय ग्रन्थ ‘श्रीरामचरित मानस’ की रचना करते समय सबसे पहले वर्ण, अर्थ, रस, छन्द और मंगल के मालिक वाणी और विनायक का वन्दन करते हुये कहते हैं-

 वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि।
 मड़्गलानां च कर्त्तारौ वन्दे वाणीविनायकौ।।

स्वामी अखण्डानन्द सरस्वती, वृन्दावन


🌹गणेशाचा अभंग🌹

उत्सवा कारणे येई प्रथमेश
लाडका गणेश घरोघरी ll
होई आगमन वाजत गाजत
रांगोळी दारात रेखियली ll
भावपूर्ण सारे भक्तीमय वारे
सजली मखरे बाप्पासाठी ll
घातले मंडप लागली तोरणे
आले हो पाहुणे गणराज ll
तोच उध्दारक चैतन्य प्रेरक
तोच संजीवक सर्वांसाठी ll
सुखाचा कारक दीनांचा तारक
करु या मोदक नैवेद्यासी ll
रुपाचे लावण्य विलसली प्रभा
आनंदाचा गाभा गवसला ll
देवा गणराया लाभो तुझी साथ
पाठीवरी हात असू द्यावा ll
🙏🙏🙏🙏

शांता लागू.. पणजी गोवा. . . . . वॉट्सॅपवरून साभार

************************************

परदेशांमधील गणपतीच्या मूर्ती

जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती

गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे. या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आलं आहे, तिकडेच ही ३९ मीटर उंच गणपतीची कांस्याची मूर्ती आहे.
गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळाचं फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलं आहे. या मूर्तीला कांस्याच्या ८५४ वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आलं आहे. गणपतीच्या मूर्तीसह हे पार्क बनवायला २००८ ते २०१२ अशी ४ वर्ष लागली. थायलंडमध्ये जी ४ फळं पवित्र मानली जातात, त्या फळांना गणपतीच्या हातात ठेवण्यात आलं आहे. यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळ्याचा समावेश आहे.
थायलंडमध्ये आंब्याला समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. गणपतीच्या पोटावर सापाने वेटोळे घातले आहेत, तर बाप्पाच्या सोंडेमध्ये लाडू आणि पायाखाली उंदीर आहे. थायलंडमध्येही गणपतीला ज्ञान आणि बुद्धीमत्तेची देवता म्हणून मानलं जातं.
थायलंडमध्ये गणपतीची ही मूर्ती नेमकी बनवली कोणी याचा किस्साही रंजक आहे. थायलंडमधली अयोध्या म्हणजेच अयुथ्या साम्राज्याबाबत विस्ताराने वाचलं असता, याचे दाखले मिळतात. या साम्राज्यामध्ये चाचोएंगशाओ नावाचं शहर १५४९ मध्ये वसवण्यात आलं होतं. याच शहराची चाचोएंगशाओ असोसिएशन ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्य करायला नेहमीच पुढे असते. या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातली गणपतीची सगळ्यात मोठी मूर्ती बनवायचं ठरवलं. यानंतर त्यांनी जागा शोधायला सुरूवात केली.
संस्थेला ख्लॉन्ग ख्वान्ग शहरात ४० हजार वर्ग मीटर जागा निश्चित करण्यात आली. ही जमीन सुपीक आणि कृषीप्रधान क्षेत्र असल्यामुळे ही जागा गणपतीची मूर्ती स्थापन करण्यासाठी निवडण्यात आली. सगळ्यात आधी या जागेवर इंटरनॅशनल गणेश पार्क बनवण्यात आलं. यानंतर मग मूर्ती बसवण्यात आली.
चाचोएंगशाओ असोसिएशनने इकडे एक सेंट्रल म्युझियमही बनवलं आहे. स्थानिक इतिहासाचं संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी हे म्युझियम बनवण्यात आलं. या भागामध्ये कित्येक शतकांपासून हिंदू संस्कृतीही नांदत आहे.
मागच्या काही वर्षांपासून थायलंडच्या बँक पॅकांग नदीच्या आसपासचं क्षेत्र सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र झालं आहे. त्यामुळे तिथले लोक आंतरराष्ट्रीय देवाची सगळ्यात मोठी मूर्ती तिकडेच असावी, अशी मागणी करत होते. अखेर गणपतीची मूर्ती बसवण्यावर सगळ्यांची सहमती झाली.
गणपतीची जगातली सगळ्यात मोठी मूर्ती तिथले प्रख्यात मूर्तीकार पिटक चर्लेमलाओ यांनी तयार केली आहे.

गणपतीची ही मूर्ती जगातली सगळ्यात उंच असून अजूनपर्यंत कोणीही यापेक्षा उंच मूर्ती असल्याचा दावा केला नसल्याचं असोसिएशनने सांगितलं आहे.

*****

वैश्विक गणेश यात्रा / १ … उगवत्या सूर्याच्या देशात…

जपान. उगवत्या सूर्याचा देश. प्राचीन सांस्कृतिक परंपरा असलेला समृध्द आणि सुसंस्कृत देश.
अश्या ह्या जपान मध्ये आपल्या विघ्नहर्त्या गजाननाची एकूण २४३ मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरं सुमारे चारशे ते चौदाशे वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. जपान्यांचं कौतुक असं, की त्यांनी ही सर्व मंदिरं नुसती जपलीच नाहीत, तर ती नांदती ठेवली. या सर्व मंदिरांमध्ये रोजची पूजा-अर्चा व्यवस्थित होईल, अशी एक पध्दती विकसित केली. त्यामुळे टोकियो मधील ‘असाकुसा’ चे ‘मात्सूचियामा शोदन मंदिर’, जे सन ६०१ मध्ये बांधल्या गेलं होतं, ते आजही तसंच आहे. यातील श्री गणेशाची मूर्ती ही १४२० वर्ष जूनी आहे.
जपान मध्ये गणपती ला साधारण पणे ३ – ४ नावांनी ओळखतात. ‘बिनायक-तेन’ हे त्यातील एक नाव. जपानीत ‘तेन’ म्हणजे देव, ईश्वर. ‘गनबाची’, ‘गनवा’, ‘गणहत्ती’ ही नावं सुध्दा चालतात. पण जपान मध्ये गणपती साठी सर्वात प्रचलित असलेलं नाव आहे – ‘कांगितेन’. जपान मध्ये गणेशाचं आगमन झालं ते प्रामुख्याने बौध्द भिक्षुंच्या माध्यमातून. ओडिशा च्या बौध्द भिक्षुन्नी ‘तांत्रिक बौध्द धर्मात’ गती घेतली होती. ते प्रथम चीन मध्ये गेले आणि नंतर तेथून जपान मध्ये. साधारण दीड हजार वर्षांपूर्वी, जपानी लोकांना, ‘गणपति’ ह्या देवतेची ओळख झाली.
आपल्या भारता सारखंच, जपान मध्ये सुध्दा गणेशाला ‘विघ्नहर्ता’ समजलं जातं. पण यात थोडा फरक आहे. जपानी मान्यतेनुसार गणपती ही देवता, पहिले एखाद्या कामात अडथळे निर्माण करते आणि मग मात्र पूर्ण ताकतीनिशी, ह्या सर्व अडथळ्यांचं निवारण करून मांगल्य निर्माण करते.

ऐतिहासिक हिरोशिमा शहाराजवळ ‘इत्सुकूशिमा’ द्वीपावर गणेशाचे एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे – ‘दाईशो – इन’. असं म्हणतात, हे मंदिर सन ८०६ मध्ये बांधण्यात आलं. पण हे त्या ही पेक्षा जुनं असावं. गंमत म्हणजे, आपल्या गणेशाचा जपानी अवतार, ‘मोदक’ फारसा खात नाही. त्याची आवडती गोष्ट म्हणजे ‘मुळा’. होय. मुळा… अनेक प्राचीन मूर्तींमध्ये गणेशाच्या हातात, शस्त्रांसोबत ‘मुळा’ दाखविलेला आहे. मात्र मोदकाचेही एक विशिष्ट स्थान जपान मध्ये आहे. भारतीय मोदकाचा अवतार, ‘कांगिदन’ या नावाने जपान मध्ये प्रचलित आहे. ह्या गोड ‘ब्लिस बन’ चा नैवेद्य, गणपती ला दाखवला जातो. असं म्हणतात, जपान मध्ये ‘इदो (तोकुगावा) काळात, म्हणजे सतराव्या शतकापासून, एकोणीसाव्या शतकाच्या काळात, ‘कांगितेन’ ची हजारो मंदिरं होती. भक्तगण मोठ्या संख्येने गणेशाच्या जपानी अवताराची पूजा करायला यायचे. सध्या मात्र २४३ मंदिरं सुस्थितीत आहेत.

जपान मध्ये दोन तोंडांच्या गणपतीचे सुध्दा प्रचलन आहे. त्याला ‘सशीन कांगितेन’ म्हटलं जातं. आपल्या पुराणात जी ‘नंदिकेश्वराची’ कल्पना आहे, तीच ही देवता. जुन्या मूर्तींवर, चित्रांवर, वस्तूंवर ह्या ‘सशीन कांगितेन’ चा ठसा आहे. दक्षिण जपान च्या ओसाका शहराच्या बाहेर असलेलं, गणेशाचं ‘होझांजी मंदिर’ हे जपान मधील श्री गणेशाच्या, सर्वाधिक भक्त संख्या असलेल्या मंदिरांपैकी एक आहे. तुलनेने अलिकडच्या, म्हणजेच सतराव्या शतकात बांधलेल्या ह्या मंदिरा बद्दल, जपान्यांच्या मनात प्रचंड श्रध्दा आहे.
जपान मध्ये गणेशाची काही मंदिरं अगदी अलीकडे, म्हणजे गेल्या पन्नास वर्षात बांधलेली आहेत. त्यातील चिबा शहराच्या साकुरा भागात असलेलं ‘गणेश मंदिर’, प्रसिध्द असून याच नावाने ओळखलं जातं.

एकुणात काय, तर सूर्याचं सर्वप्रथम दर्शन घेणार्‍या ह्या देशात, गणेश भक्तीची परंपरा फार प्राचीन आणि सनातन आहे. आणि आता तर गणेश भक्तांची संख्याही वाढते आहे.

प्रशांत पोळ . . . . वैश्विक_गणेश #GlobalGanesh

बाप्पा इंडोनेशियातील

भारताबाहेर अनेक देशात गणपती बसविले जातात .तसेच गणपतीवर श्रद्धाही आहे. इंडोनेशियातील माउंट ब्रोमो येथे असलेल्या जागृत ज्वालामुखीचे विवराजवळच ७०० वर्षांपूर्वी या गणपतीची स्थापना झाल्याचे सांगितले जाते. इंडोनेशियातील चलनी नोटेवरही गणपतीचे चित्र आहे.


समर्थ रामदास स्वामी स्थापित शिवकालीन श्रीगणेशोत्सव !


सुखकर्ता दुःखहर्ता……ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हटली जाते. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे. गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे. भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे. प्रचलीत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.
“समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !!” समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले. दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती. या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो. वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ! हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो . समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !! आकारा आकरी खंडी कोठी पाठविली ! हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!! ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे. पहा….. दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !! शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.

  • प्रसन्न खरे
    (माहिती आंतरजालावरून संग्रहित)

दगडूशेट हलवाई गणपती

पुण्यातील अत्यंत प्रासादिक दगडूशेठ गणपतीच्या इतिहास …पुण्यातील जुन्या काळातील नामवंत मल्ल.
पैलवान दगडूशेठ किसनशेठ हालवाई .
संस्थापक – जगोबादादा तालीम व दगडू शेठ हलवाई गणपती.

सन १८५६ साली जन्मलेल्या दगडूशेठ हलवाई यांना कुस्तीचा प्रचंड छंद होता. त्याकाळी जगोबादादा हे मल्लविद्येचे उपासक पुण्यात होते, किसनशेठ हलवाई हे व्यापारी व्यक्तिमत्व, मिठाई चा मोठा व्यापार त्यांनी भारतभर विस्तारला होता, पण अर्थार्जनाबरोबर शरीर संपदा उत्तम हवी अशी त्यांची धारणा असायची. स्वतः सतत प्रवास करण्याने त्यांना व्यायाम करणे जमत नसे मात्र आपल्या मुलाने मोठे पैलवान व्हावे अशी त्यांची खूप इच्छा होती.
जगोबादादा यांना त्यांनी त्याकाळी स्वतःच्या जागेत पत्र्याचे शेड बांधून तालीम उभी करून दिली.
जगोबादादा हे खूप नामांकित मल्ल होते ते त्यांच्या डाव पेचावर, अनेक मल्ल त्यांनी या तालमीत घडवले, याच तालमितील मल्ल पुढे पुढे स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सहभागी झाले.

किसनशेठ हलवाई यांचे चिरंजीव दगडूशेठ हलवाई हे वडिलांप्रमाणेच दानतदार व्यक्तिमत्व. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी जगोबादादा यांचेकडे कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरवात केली. दगडूशेठ हे स्वतः गणपती चे परमभक्त होते.पुणे म्हणजे जिजाऊ मासाहेबांची स्थापन केलेले शहर. शहराची स्थापनाच गणपती च्या अधिष्ठानाने झाली असल्याने बहुतांशी लोक गणपती चे परमभक्त होते. दगडू शेठ हलवाई यांच्या घराजवळ सुद्धा एक छोटे गणपती चे मंदिर होते.

दरम्यान दगडू शेठ हलवाई यांची कुस्ती ठरली त्याकाळचे प्राख्यात मल्ल पुंजीराम काची या बलाढ्य मल्लासोबत. कुस्तीच्या दिवशी जगोबादादा यांनी गणपतीला नवस करून दगडूशेठ याच्या विजयासाठी निर्जळी उपवास केला होता. कुस्तीचा दिवस उगवला व ठरल्या प्रमाणे तुफानी लढत झाली व दगडूशेठ यांनी काची पैलवान वर मात केली आणि पुण्यातून विजयी मिरवणूक निघाली. या विजयामुळे महाराष्ट्रभर दगडूशेठ यांचे नाव झाले,त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांनी त्यांचे वस्ताद जगोबादादा व गणपती यांना दिले व त्याकाळी लाखो रु.खर्चुन जगोबादादा यांना कायम स्वरूपी पक्की तालीम व “श्रीमंत दगडूशेठ हलवाई” हे गणपती चे मंदीर उभा करून लोकांना अर्पण केले.
जगोबादादा हे आजन्म ब्रम्हचारी राहिले व लाल मातीची सेवा करत राहिले व त्यांनी शेवटचा श्वास सुद्धा तालमीतच घेतला.

पुढे दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर हे पुण्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्र नव्हे तर जगभर प्रसिद्ध झाले…एका छोट्याश्या मंदिरातील गणपती ला आज इतके भव्य रूप येईल हे त्याकाळी हलवाई पैलवानांना वाटले देखील नसावे.

माणसे जन्माला येतात व मरून जातात,सृष्टीचे हे चक्र कधीच थांबत नाही,पण त्यांनी उभी केलेली चळवळ,रुजवलेले विचार आणि अग्निसारखे धगधगते जगलेले जीवन कधीच मृत्यू मारू शकत नाही,त्यापैकी एक म्हणजे कै. पै.दगडूशेठ हलवाई होय. आज पुण्यातील मल्लविद्येच्या वैभवाचा श्रीगणेशा करणारे दगडूशेठ हलवाई यांचे विसमरण होऊ नये.

|| श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती || पुणे

सन १८९३ श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वत: व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथीत झाले.

दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री.माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की,आपण काही काळजी करू नका, आपण श्री दत्त महाराज व श्री गणपतीची मुर्ती तयार करा व त्याची रोज पुजा करा व ही दोन दैवते आपल्या।मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी श्री दत्त महाराजांची एक संगमरवरी व श्री.गणपतीची मातीची मुर्ती बनविली व ती गणपती बाप्पाची मुर्ती म्हणजेच आपली पहिली मुर्ती आहे. ही पहिली मुर्ती आज सुध्दा आपण शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पुजा चालू आहे.
ह्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे,भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यासह सर्व थरातील लोकांनी एकत्र येऊन या समारंभाची मंगलज्योत प्रदिप्त केली. तिच्या मंद पण तेजस्वी प्रकाशात आसमंत उजळून निघाले.
भक्तिची धूप आणि श्रध्देची निरांजन लावून ही जी पुजा त्यांनी केली त्यास सर्व थोर लोकांनी मनोमन आशीर्वाद दिले आणि अशा रितीने ही मंगल परंपरा सुरू झाली.

सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मुर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतू त्यांनी निर्माण केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी, तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती कै. श्री. दगडूशेठ हलवाई बाहूलीचा हौद, सार्वजनिक गणपती म्हणून प्रचलित होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरूण मंडळ करीत होते. सध्या ही मुर्ती आपल्या बाबुराव गोडसे कोंढवा येथील पिताश्री वृध्दाश्रमातील मंदिरात आहे.

सन १८९६ साली केलेल्या मुर्तीची थोडी जीर्ण अवस्था झाली होती व सन १९६७ साली आपल्या गणपती बाप्पाच्या अमृत महोत्सव साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सुवर्णयुग तरूण मंडळाच्या प्रमुख म्हणजेच सर्वश्री प्रताप गोडसे, दिंगबर रासने, रघुनाथ केदारी, शंकर सुर्यवंशी, चंद्रकांत दरोडे, उमाजी केदारी, प्रल्हादशेठ शर्मा, रमाकांत मारणे, वसंत कोद्रे, कांता रासने, दत्तात्रय केदारी, उल्हास शेडगे, उत्तम गावडे यांनी बऱ्याच कार्यकर्त्यांनी नविन गणपतीची मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिध्द शिल्पकार श्री.शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मुर्ती आकृती म्हणून करून घेतली व श्री.बाळासाहेब परांजपे यांनी प्रोजेक्टर वरून मोठया पडद्यावर कार्यकर्त्यांना दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मुर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर प्रत्यक्ष मोठया मुर्तींचे काम सुरू झाले. संपूर्ण मुर्ती तयार झाल्यानंतर श्री.शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. श्री. गणेश यंत्राची पुजा केली व त्यानंतर ज्याठिकाणी मातीची मुर्ती तयार केली, त्या ठिकाणी येऊन विधीवत धार्मिक गणेश याग केला व ते सिध्द श्रीयंत्र मंगलमुर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. या मंगलमुर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पुजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले.

आजतागायत हे सर्व अत्यंत निठेने व प्रामाणिकपणे सुरू आहे व त्यामुळे आपणा सर्वांना त्या गणपती बाप्पाचे आर्शिवाद लाभले आहेत. अशा प्रकारे सध्या आपल्या गणपती मंदिरात असलेली श्रींची सर्वांग सुंदर,नवसाला पावणारी व त्याकाळी सुमारे ११२५/- (एक हजार एकशे पंचवीस रूपये) ही मुर्ती बनविण्याचा खर्च आला होता.
🙏©️®️🙏

गणपती बाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या ।