क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव,तालूका खंडाळा, जिल्हा सातारा जानेवारी ३, इ.स. १८३१, मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनर्‍यानी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये पहिली Co-ed शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचेकेशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्‍या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.
सत्कार : पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
दूरदर्शन मालिकासंपादन करा
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर दूरदर्शनच्या ’किसान’ वाहिनीवर २८ सप्टेंबर २०१५ पासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील हिंदी मालिका दाखविली जात आहे..
सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके :
काव्यफुले (काव्यसंग्रह, १८५४)सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य :
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना.ग. पवार) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर) त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हे नाटक (एकपात्री प्रयोगकर्ती अभिनेत्री : सुषमा देशपांडे) साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे) सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते) सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके) सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील ) सावित्रीबाई फुले -श्रध्दा (लेखक : मोहम्मद शाकीर) सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले ) सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले) सावित्रीबाई फुले (लेखिका : मंगला गोखले) सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना.ग. पवार) ‘हाँ मैं सावित्रीबाई फुले’ (हिंदी), (प्रकाशक : अझिम प्रेमजी विद्यापीठ) ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे) Savitribai – Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)
सावित्रीबाई संमेलन/अभ्यासकेंद्र/पुरस्कार
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते. पुणे विद्यापीठाव्या नावाचा विस्तार करून ते ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले. पुणे विद्यापीठात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र’ या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍यास एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार, महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ‘आदर्श माता’ पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून), सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणार्‍र्‍या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्‍न पुरस्कार : आदर्श माता रत्‍न, उद्योग रत्‍न, कला रत्‍न, क्रीडा रत्‍न, जिद्द रत्‍न, पत्रकारिता रत्‍न, प्रशासकीय रत्‍न, वीरपत्‍नी रत्‍न, शिक्षण रत्‍नमराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, माझी मैत्रीण ट्रस्टतर्फे देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार : २११६ साली हा पुरस्कार सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांना देण्यात आला.
अधिक वाचन : फुलवंता झोडगे. ‘साध्वी सावित्रीबाई फुले’. चिनार पब्लिकेशन, पुणे. (मराठी मजकूर) डॉ. विजया वाड. ‘त्या होत्या म्हणून’. अनुश्री प्रकाशन.(मराठी मजकूर) “दै. सकाळमधील लेख”, सकाळ, ३ जानेवारी, इ.स. २००९. (मराठी मजकूर) कष्टाने शिक्षण घेतलेल्या मुलीला किंवा स्त्रीला सावित्रीची लेक म्हणायची रीत पडली आहे. त्यामुळे शिकलेल्या स्त्रियांच्या परिचय-ग्रंथाला ‘सावित्रीच्या लेकी’ किंवा ‘लेकी सावित्रीच्या’ अशी नावे देण्यात येतात. त्यामुळे या नावाची पुस्तके अनेक लेखकांनी लिहिली आहेत. उदा० निर्मलाताई काकडे यांच्या यू.म. पठान यांनी लिहिलेल्या चरित्राचे नाव “लेक सावित्रीची’ असे आहे.‘सावित्रीच्या लेकी’ नावाचे एक मासिकही आहे.आम्ही सावित्रीच्या लेकी. (पुस्तक : लेखिका सुधा क्षिरे) आम्ही सावित्रीच्यालेकी (लेखिका – भारती पाटील) सावित्रीच्या लेकींचा परिचय (मधुरिमा मासिकातले पाक्षिक सदर) .🙏🙏🙏 -वाचाल तर वाचाल-राष्ट्रनिर्माते डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
श्री.आर आर थोरात . . . . . फेसबुकवरून साभार

विकीपी़डियावरील माहिती
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87

सावित्रीच्या लेकी क्षितिजापार निघाल्या
क्रांतीज्योतीने दश दिशा उजळल्या

केशवपन करू नका. ते पाप आहे असे नाभिकाना सांगणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे आज पुण्यस्मरण (जन्म ३ जानेवारी १८३१-निधन १० मार्च १८९७)
एकदा शाळेत जात असतांना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून ,”मुलींना आणि महार – मांगाना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही” अशी धमकी दिली. हे ऐकताच सावित्रीबाईंनी त्याला चपराक लगावली. सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या.
दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी-देशी शाळांचे पर्यवेक्षक असतांना त्यांनी थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली हे भूषावह आहे असा शेरा दिला. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे कारण विधवा स्त्री ने संन्यासिनी सारखे जीवन जगावे अशी रूढी होती. स्त्रीला अपशकुनी समजले जात असे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत असे. त्यांना घरात कोंडून ठेवले जात असे हे स्त्रियांचे दुख त्यांनी जवळून पहिले होते. केशवपनाची दृष्टप्रथा नष्ट झाली पाहिजे असे त्यांना वाटे, पण लोक ऐकत नव्हते म्हणून जोतीबा आणि सावित्रीबाईंनी सर्व नाव्ह्यांची सभा बोलावली. आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो हे मोठे पाप आहे याची जाणीव करून दिली. नाव्ह्यांनाही त्याची जाणिव झाली आणि त्यांनी पाठिंबा दिला. जास्त करून ब्राह्मण समाजात केशवपन प्रथा होति.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ जवळ नायगाव येथे त्यांचा जन्म झाला .म .ज्योतिबा फुले यांचे सारख्या युग युग पुरुषाबरोबर त्यांचा विवाह झाला . त्यांच्या बरोबर त्यांनी समाजकारणाचा वसा घेतला . स्त्री शिक्षणाचे ओढीने त्यांनी पुणे येथे शाळा सुरु केली . ब्राह्मण परीत्यक्तेचा मुलगा दत्तक घेऊन त्यांनी अनोखा आदर्श ठेवला . त्या स्वत: कवयित्री होत्या ” का व्य फुले ” व “बावनकशी सुबोध रत्नाकर ” हे त्यांचे काव्य संग्रह. सावित्रीबाई यांनी प्लेगचे साथीतहि रुग्ण सेवा केली . व त्याची बाधा त्यानांही झाली व त्यांचा अंत झाला.

सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तरी भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.
सावित्रीबाई यांनी प्लेगचे साथीतहि रुग्ण सेवा केली . व त्याची बाधा त्यानांही झाली व त्यांचा अंत झाला
अभिवादन”
माधव विद्वांस . . . फेसबुकवरून साभार

स्वामी विवेकानंद

११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत शिकागो इथे केलेल्या प्रसिद्ध भाषणाची आठवण करून देणारा एक लेख माझ्या वाचनात आला. तो इथे संग्रहित केला आहे. मूळ लेखिकेचे मनःपूर्वक आभार. या लेखाने उघडलेल्या या पानावर स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी ‘उत्तिष्ठत जाग्रत’ या आणि आणखी काही सुंदर लेखांची आणि विवेकानंदांच्या काही प्रेरणादायक संदेशांची भर घातली आहे.
या विषयावर मी लिहिलेला लेख या स्थळावर दिला आहे. https://anandghan.blogspot.com/2021/09/blog-post.html

नवी भर दि. १२-०१-२०२२ : आज स्वामींची जयंती
स्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एका उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो.आज स्वामींची जयंती. (१२- ०१ २०२२)
विवेकानंदांच्या ग्रंथांचा प्रभाव
नोबेल पारितोषिकप्राप्त जागतिक कीर्तीचे लेखक रोमां रोलां म्हणतात, ‘आज तीस वर्षांनंतरही विवेकानंदांच्या ग्रंथांना हात लावताना माझ्या शरीरभर विद्युतलहरी खेळून गेल्यासारखे वाटत आहे. मग हे जळजळीत शब्द त्या नरवीराच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकताना ऐकणार्‍यांना किती हादरे बसले असतील. कशी धुंदी चढली असेल.’
साहित्यातून स्वाभिमान जागला
स्वामी विवेकानंदांनी निकोलस टेस्ला यांच्यासारख्या विश्वविख्यात शास्त्रज्ञाला प्रेरित केले तसे आधुनिक जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांचे जीवन बदलून टाकले. लिओ टॉलस्टॉयसारखे विश्वविख्यात लेखकही त्यांचे चाहते बनले. स्वामी विवेकानंदांची भाषणे ऐकून हजारो लोक प्रेरित झाले, त्याच पद्धतीने त्यांच्या वाङ्मयामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला गती मिळाली. शेकडो वर्षांच्या परकीय आक्रमणामुळे स्वत्व हरवलेल्या भारतीयांमध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागवण्याचे काम त्यांच्या साहित्याने केले.

खाली स्वामींचे शिकोगो परिषदेमधील इतर धर्म प्रतिनिधी बरोबर छायाचित्र


लक्ष लक्ष प्रणाम
श्री.माधव विद्वांस

*******

नवी भर : आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतिनिमित्य त्यांची काही अनमोल सुवचने देत आहे. दि.१२-०१-२०२२

उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. …
आपण जे विचार करता ते व्हाल. आपण स्वत: ला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान व्हाल.
आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे, जी तुम्हाला पायथ्यावरुन शिखरावर पोहोचवू शकते.
जे इतरांसाठी जगतात तेच जगतात.
स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. …
एखाद्या दिवशी, जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही – आपण चुकीच्या मार्गावर जात आहात याची आपल्याला खात्री असू द्या
जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही, त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे,
जग एक विशाल व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी आलो आहोत.
सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू.
कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. …
सत्य हजार मार्गांनी सांगितले जाऊ शकते, परंतु प्रत्येक सत्य असेल.
हृदयाचे आणि मनाच्या संघर्षात हृदय ऐका.
बाह्य स्वभाव हा आंतरिक स्वभावाचा फक्त एक मोठे रूप आहे.
आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात.
एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.


*********

उत्तिष्ठत ! जाग्रत !

अवघं ३९ वर्षाचं आयुष्य. पण त्यात केलेलं कार्य ? अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारं ! त्या अद्भुत कार्याचे यश संपूर्ण जग अनेक शतके गाईल, अनेक युगे ते कार्य टिकून राहील, इतक्या भक्कम आधारावर निर्माण करण्यात आलेले आहे. कोण हा महामानव ? की मानवीरूपात अवतरलेला कोणी देवच ? आज ज्यांची १५९ वी जयंती सानंद साजरी होत आहे, तेच ते युगपुरुष, योद्धा संन्यासी, वादळी हिंदू ( Cyclonic Hindu ), श्री रामकृष्ण परमहंसांचे लाडके शिष्य नरेंद्र अर्थात् स्वामी विवेकानंद !

कलकत्ता महानगरातील सिमुलीया भागात दत्त कुटुंब सुप्रसिद्ध होते. याच कुटुंबातील विश्वनाथ दत्त व त्यांच्या पत्नी भुवनेश्वरीदेवींच्या पोटी, १२ जानेवारी १८६३ रोजी सूर्योदयानंतर लगेचच एक तेजस्वी बालसूर्य जन्माला आला. भुवनेश्वरी शिवभक्त होत्या व त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवांची खूप उपासना केलेली होती. त्याचे फळ म्हणूनच जणू काही कैलासपती भगवान शिवच पुत्ररूपाने त्यांच्या पोटी आले. शिवप्रसादाने जन्मला म्हणून मुलाला आपल्या कुलदेवतेचे ‘वीरेश्वर’ असे नाव ठेवण्यात आले. पुढे त्यांना नरेंद्र असे नाव ठेवले व तेच रूढही झाले.

बाल नरेंद्र अत्यंत खोडकर होते. कोणाच्याही कुठल्याही धाक-धपटशाचा त्याच्यावर उपयोग होत नसे. भीती हा शब्दच त्याच्या कोशात नव्हता. भुवनेश्वरीदेवी त्राग्याने म्हणत असत, ” पुष्कळ उपासना करून शिवाकडे एक मुलगा मागितला होता. परंतु त्याने पाठवले आहे एक भूत ! ” त्या बिचाऱ्या मातेला काय माहीत की पुढे जाऊन हेच भूत अवघ्या जगाला झपाटून सोडेल !
नरेंद्र जात्याच नेतृत्वगुण घेऊन आलेला होता. तो जन्मजात पुढारीच होता. सगळ्या मित्रमंडळींच्या खेळात पण तो कायम राजाच होत असे. आणि आश्चर्य म्हणजे त्याचे सगळे वागणे-बोलणे राजासारखेच होते. मुक्या प्राण्यांवर त्याचे खूप प्रेम होते. शरीर बलदंड, कुस्ती खेळण्यात तरबेज. तलवार चालवणे, शारीरिक कसरती तसेच विविध खेळांमध्येही त्याने प्राविण्य मिळवलेले होते. अतुलनीय धाडस हा तर त्याचा स्वाभाविक गुण होता. भीती त्याला नव्हती कशाची, कधीही ! लहान मुले बागुलबुवा किंवा भुताला घाबरतात. नरेंद्राला जर भुताची भीती घातली तर तो कधीच घाबरत नसे, उलट ते भूत समोर यावे म्हणून मुद्दाम तिथे जाई. पण हेच धाडस, साहस त्याला खिशात एक दमडाही नसताना जगभराचा प्रवास करण्यासाठी उपयोगी पडले. विविध ज्ञानशाखांमधील त्याची हुशारी तर आश्चर्यकारक होती. बी.ए. होईपर्यंत त्याने भारतवर्षाचा सगळा इतिहास आवडीने वाचला होता. न्यायशास्त्र, इंग्लंड व युरोपचा वर्तमान व प्राचीन इतिहास तसेच पाश्चात्य दर्शनशास्त्र देखील त्याने आत्मसात केलेले होते. अलौकिक स्मरणशक्तीची देणगी असणारा हा असामान्य विद्यार्थी आपल्या प्रतिभेने व चारित्र्यसंपन्न वागणुकीने सर्वांचा लाडका झालेला होता. तेजस्विता हा त्याच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. त्याने आपला बाणेदारपणा कधीच सोडला नाही. त्याची वाचनाची क्षमता इतकी प्रगत होती की तो काही क्षणातच पान वाचत असे.
तरुणपणी केशवचंद्र सेनांच्या प्रभावाने नरेंद्र ब्राह्मसमाजाचा पुरस्कर्ता झालेला होता. त्यामुळे मूर्तिपूजेला विरोध, हिंदू धर्माची निंदा करणे, जातिभेद न मानणे अशा तत्कालीन बाबींमध्ये तो सहभागी होई. पण त्यानेही त्याची मानसिक भूक भागली नाही. ईश्वराचा शोध काही त्याला लागला नाही. तो भेटलेल्या सर्वांना आवर्जून विचारीत असे की ” तुम्ही ईश्वर पाहिला आहे का ? ” त्याच्या या रोखठोक प्रश्नाचे, ” हो, जसा तुला पाहतो तसाच मी ईश्वरालाही पाहतो ! ” असे अद्भुत उत्तर देणारा महात्मा त्याला वयाच्या अठराव्या वर्षी, १८८१ साली पहिल्यांदाच भेटला. ते होते परमहंस श्री रामकृष्णदेव ! श्री रामकृष्णांनीच या असामान्य मुलातला खरा स्फुल्लिंग ओळखला व त्याला हळूहळू मार्गदर्शन करीत उच्च पदावर पोहोचवले.
बालवयापासूनच गंभीर ध्यानात मग्न होणे, अगदी बाह्य जाणीवही लोपून त्याच स्थितीत बराच काळ राहणे नरेंद्रला आपोआप जमत असे. रात्री झोपले की त्यांच्या डोळ्यांसमोर विविध रंगांचे तेजस्वी बिंदू येत आणि त्यातून साकारत असे प्रकाशाचा अनोखा खेळ. श्री रामकृष्णांनी त्यांचा हा अनुभव ऐकून त्यांच्याविषयी प्रसंशोद्गार काढले होते की, ” हे ध्यानसिद्धाचे लक्षण आहे ! “
नरेंद्र लहानपणापासून अतिशय तार्किक होते. विलक्षण प्रज्ञा असल्यामुळे अनेक विषयांमध्ये प्रचंड गती होती. कोणताही मुद्दा योग्य तर्काच्या आधाराने पटल्याशिवाय ते मानतच नसत. हीच सवय त्यांना वेदान्तादी शास्त्रांच्या सखोल अभ्यासासाठी खूप उपयोगी पडली. त्यांचा गळा अतिशय गोड होता व शास्त्रीय संगीताचेही त्यांना सखोल ज्ञान होते. त्यांनी तरुणपणीच भारतीय संगीतावर एक अभ्यासपूर्ण ग्रंथ रचलेला होता. आपल्याकडील संगीतक्षेत्रातील एक दिग्गज पं.रामकृष्णबुवा वझे हे काही काळ त्यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी जाऊन राहिलेले होते.

श्री रामकृष्णांकडून अनुग्रह प्राप्त झाल्यावरही नरेंद्र त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करी. त्यांचे प्रसंगी वादही होत. पण श्री रामकृष्णदेव त्याचे यथायोग्य समाधान करीत असत. रामकृष्णांनी नरेंद्र नावाच्या जातिवंत हिऱ्याला देखणे पैलू पाडून त्याला जगद्वंद्य केले यात शंका नाही !
१८८६ साली श्रीरामकृष्णांनी देहत्याग केला. त्यानंतर लगेचच नरेंद्रांच्याच नेतृत्वाखाली काही भक्तांनी संन्यासदीक्षा घेतली. या सर्वांना रामकृष्णांनीच भगवी वस्त्री पूर्वी देऊन ठेवलेली होती. नरेन्द्राचे नाव झाले विवेकानंद ! आज याच नावाने अवघे जग ढवळून काढलेले आहे.
एकांताची अत्यंत आवड असणारा हा पूर्ण वैराग्यवान संन्यासी मनाने खासच करुणामय होता. संन्यासी म्हणजे कर्तव्यकठोर, रुक्ष अंतःकरणाचाच असावा, या प्रचलित समीकरणात ते बसतच नसत. दीन दुबळ्यांच्या दुःखाने हेलावून जाऊन अश्रू गाळणारा हा महामानव फार फार कोमल अंतःकरण घेऊनच जगभर संचारला. याच जोरावर पहिल्याच वाक्यात त्याने जागतिक धर्मपरिषदही सहज आपलीशी केली. वक्तृत्वाचा ओजस्वीपणा तर अनुपमेय होता त्यांचा ! भारतीय तत्त्वपरंपरेचा, आपल्या प्राचीन ज्ञानवैभवाचा आत्यंतिक आदर व अभिमान बाळगणारा हा आधुनिक ऋषी अमेरिका, इंग्लंड, युरोपादी देशांमधील सुबुद्ध तत्त्ववेत्यांना आपल्या व्याख्यानांनी सहज खिळवून ठेवीत असे. या तरुण, तडफदार आणि तेजस्वी संन्याशाला पाहून, त्याची अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकून अनेकांनी भारताविषयीचे आपले मतच समूळ बदलून टाकले. त्यांच्या दृष्टीने खेडवळ, गावंढळ, मागास असा भारत आता ज्ञानाचा एकमात्र आधार ठरलेला होता. म्हणूनच स्वामी विवेकानंदांच्या या अद्भुत कार्याविषयी त्याकाळचे अनेक विद्वज्जन प्रशंसोद्गार काढीत असत.
स्वामी विवेकानंदांनी आपल्या अत्यल्प आयुष्यात अक्षरशः तोंडात बोटे घालावे इतके अलौकिक कार्य केलेले आहे. प्रचंड दगदग, योग्य अन्नाची कायमची ददात, शरीराच्या मनाने प्रचंड प्रवास व फिरस्ती यामुळे त्यांच्या आरोग्याची पूर्ण हेळसांड झालेली होती. त्यातच त्यांना डायबिटीस, बहुमूत्रता, दमा, निद्रानाश, क्षय इत्यादी अनेक रोगांनी पछाडलेले होते. इतक्या सगळ्या नकारात्मक परिस्थितींमध्येही या महामानवाची जिद्द इतकी विलक्षण होती, की तिच्या जोरावरच त्याने संपूर्ण जग हलवून सोडले. सर्वसामान्य माणूस त्यांच्याइतके कार्य तर सोडा, तेवढ्या कार्याची कल्पनाही करू शकणार नाही. त्यांची दूरदृष्टी, त्यांचे कल्पनाविश्व, त्यांचा परिस्थितीचा सखोल अभ्यास आणि या सर्वांच्या मुळाशी असणारा खरा कळवळा, करुणा….. अक्षरशः अगाध होते सर्व काही. म्हणूनच त्यांना अवतारी महात्मा म्हटले जाते व ते सार्थही आहे !
स्वामी विवेकानंदांचे विचार फार मूलगामी परिणाम करणारे आहेत. त्यांच्या चिंतनामध्ये मातृभूमी भारताच्या तत्कालीन स्थितीचा खूप मोठा भाग होता. त्यांना भारताला गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे, अशी दुर्दम्य आकांक्षा होती व त्यादृष्टीने त्यांनी प्रचंड चिंतन केलेले आजही पाहायला मिळते. तेच विचार आपण जर आज अमलात आणले तर भारत हीच पुन्हा जागतिक महासत्ता होईल, यात तिळमात्र शंका नाही.
स्वामीजींच्या मनात तरुण मुलांबद्दल फार आपुलकी होती. भारताच्या विकासाचे खरे शिल्पकार तरुणच आहेत असे त्यांचे स्पष्ट मत असल्याने त्यांनी कायमच तरुणांना खूप मार्गदर्शन केले. ते म्हणत की, ‘एका ध्येयाने, एका दिलाने प्रेरित झालेल्या मोजक्याच पण शारीरिक मानसिकरित्या सशक्त तरुणांच्या आधारे ते संपूर्ण भारताचा कायापालट करू शकतील ! ‘ म्हणून १२ जानेवारी ही त्यांची जयंतीच ‘ राष्ट्रीय युवक दिवस ‘ म्हणून साजरा होतो. याच ध्येयाने भारून जाऊन स्वामीजींनी काही मोजक्या ध्येयवेड्या तरुणांना सोबत घेऊन, १ मे १८९७ रोजी ‘श्रीरामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. आज या संस्थेचा महान वटवृक्ष झालेला आपण पाहतोच आहोत.
भारताच्या अवनतीला दोन महत्त्वाची कारणे आहेत असे त्यांचे मत होते. एक म्हणजे शिक्षणाचा अभाव आणि दुसरे म्हणजे आत्मविस्मृती, आपल्या संपन्न वारशाचा, राष्ट्राचा, तत्त्वज्ञानाचा अभिमान नसणे. त्यांनी शिक्षणाविषयी मांडलेली मते खूप चिंतनीय आहेत. आजच्या शिक्षणाच्या दिवाळखोरी व शिक्षण सम्राटांच्या मनमानीच्या भयंकर परिस्थितीत तर विवेकानंदांचे हे विचार दीपस्तंभासारखे आहेत. आम्ही आमची अस्मिताच हरवून बसलेलो आहोत. आजमितीस शिक्षणाच्या नावावर जो बाजार भरवलाय आणि आम्हीच खतपाणी घालून तो वाढवतोय, ते पाहून हा योद्धा संन्याशी अक्षरशः ढसाढसा रडला असता. त्याच्या भावनेत्रांनी जाणीवपूर्वक पाहिलेले स्वर्गीय हिंदुस्थानचे सुस्वप्न आज आम्ही धुळीला मिळवतो आहोत, हे पाहून त्याचे कोमल अंतःकरण शतशः विदीर्ण झाले असते.
” Manifestation of Perfection already present in man. ” अशी शिक्षणाची वेगळीच व्याख्या स्वामीजी करतात. पुस्तकी शिक्षणाला ते कुचकामी मानतात. दुर्दैवाने आज आम्ही त्याच पुस्तकी व मार्कांच्या शिक्षणाला सर्वश्रेष्ठ मानून बसलेलो आहोत.
त्यांच्या काळात तर भारताचा फार मोठा भाग शिक्षणापासून वंचित होता. म्हणून ते म्हणतात, ” If the poor cannot come for education, education should reach the poor. ” शिक्षणाच्या अभावामुळेच आपण आपली अस्मिता हरवून बसतो आणि मग त्यामुळेच आपल्याला कोणा ना कोणाची गुलामगिरी पत्करावी लागते !
स्वामीजींना ‘चतुर्विध विकास’ अभिप्रेत होता. ‘निर्बलतेने गुलामगिरी वाढते.’ म्हणून ‘शारीरिक विकास’ हवा ! बलवान शरीरच खरे कार्यक्षम असते. ‘बळी तो कान पिळी’ म्हणतात ते खोटे नाही. शरीरात ताकद असेल तरच आपल्या म्हणण्याला किंमत. ताकदीने हिंमत वाढते. यशस्वी होता येते. स्वामी विवेकानंद सुरवातीला काशीमध्ये असताना एकदा त्यांच्यामागे माकडांचा कळप लागला. ते पळू लागले. त्यावर शेजारच्या एका संन्याशाने त्यांना सांगितले की, ‘पळू नकोस. त्यांना तोंड दे !’ ते ऐकून स्वामीजी हिमतीने मागे वळून खंबीरपणे उभे राहिले. त्याबरोबर माकडांनी पळ काढला. या प्रसंगातूनच सबलता, हिंमत आणि संकटांना न घाबरता तोंड देण्याची क्षमता यांचे महत्त्व त्यांना समजले. हाच शारीरिक विकास त्यांना पहिल्या स्तरावर अभिप्रेत आहे.
दुसरा ‘ मानसिक विकास ‘. मनाने खंबीरता बाळगली पाहिजे. विजिगिषू वृत्ती नसेल तर साध्या साध्या ध्येयांचीही प्राप्ती कठीण होऊन बसेल. एकाग्रतेने मानसिक शक्ती वाढते, असे ते आवर्जून सांगत. एकाच ध्येयावर सर्वांगाने मन केंद्रित करण्याची सवय लावली पाहिजे.
तिसरा ‘ सामाजिक विकास ‘. आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना दृढमूल हवी. सामाजिक विकासासाठी मातृभूमीवर अपार प्रेम व आदर हवा. समाजाप्रति आपली नैतिक बांधिलकीच आपण विसरलो आहोत. जोवर ही बांधिलकी पक्की होत नाही तोवर एकजूट होणारच नाही आणि सामाजिक एकजूट नसेल तर कोणतेच राष्ट्र प्रगती करू शकणार नाही.
स्वामीजींना भारताविषयी फार प्रेम होते. अमेरिकेत एका स्त्रीने त्यांना विचारले, “मी तुमच्या कार्यात कशाप्रकारे मदत करू शकते ?” त्यावर स्वामीजींनी दिलेले उत्तर त्यांच्या हृदयातले मातृभूमीचे अपार प्रेम सांगणारे आहे. ते म्हणाले, ” Love India! ” म्हणूनच हा सामाजिक विकासही फार महत्त्वाचा आहे.
आणि सर्वात महत्वाचा ‘आत्मिक विकास ‘. आत्मिक विकास म्हणजे आध्यात्मिक जीवनशैली अंगीकारणे. स्वामीजी म्हणतात, ” आपल्या मातृभूमीच्या राष्ट्रीय जीवनाचा पाया आहे धर्म ! तोच आपला मेरुदंड आहे. दुसऱ्यांकडून शिकायला जाऊन त्यांचे संपूर्ण अनुकरण करून आपले स्वातंत्र्य हरवू नका ! ” किती सूक्ष्म दूरदृष्टी आहे पाहा त्यांची. आज आम्ही आमचे स्वत्त्व सोडून Americanize होण्यात धन्यता मानतो आहोत. हेच करू नका, म्हणून स्वामीजी शंभर वर्षांपूर्वी आपल्याला जागे करीत होते.
” जो धर्म गरिबांचे दुःख दूर करू शकत नाही. त्यांना पोटभर जेवायला घालू शकत नाही. मानवाला देवता बनवत नाही तो खरा धर्मच नव्हे ! ” असे त्यांचे स्पष्ट मत होते. म्हणूनच ‘ शिवभावाने जीवसेवा ‘ या महान सिद्धांताचा त्यांनी आपल्या मिशनद्वारे भक्कम पाया रोवला. ‘दरिद्रीनारायणाची सेवा’ करणे हे आद्य कर्तव्य आहे, असे ते मुद्दाम म्हणत व तसेच कार्य आजही त्यांच्या संस्थेद्वारे जगभर चालू आहे.
आत्मिक विकासासाठी, ध्यानाचा अवलंब करणे, भक्तिभावाने प्रेरित होऊन भगवंताला आळवणे आणि सदाचारी, चारित्र्यसंपन्न, आयुष्य असणे खूप गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या ज्ञाननेत्रांनी ‘ प्रबुद्ध भारत ‘ पाहिलेला होता. त्यांना ते स्वप्न साकारायचेच होते, पण दुर्दैवाने नियतीने त्यांना तेवढा काळच हातात दिला नव्हता ! परंतु त्यांच्या सद्विचारांची ज्योत आजही तितकीच तेजस्वी आहे, आपल्याला सुयोग्य मार्ग दाखविण्यासाठी समर्थ आहे. त्या चिरंतन ज्योतीच्या स्निग्ध प्रकाशात आपले सर्वांचे आयुष्य, पर्यायाने संपूर्ण भारतच पुन्हा एकदा ऊर्जस्वल होईल, तेजस्वी, ओजस्वी होईल आणि अवघ्या जगासाठी आदर्श ठरेल, यात शंका नाही !
आज स्वामीजींच्या १५५ व्या जयंतीच्या महन्मंगल पर्वावर, त्यांच्या तेजस्वी स्वप्नांसारखे कार्य करण्यासाठी तुम्हा आम्हा तरुणांनी कटिबद्ध होऊन Work is Workship मानून अखंड सावधानतेने प्रयत्न करायला हवेत. ही आजच्या काळाची नितांत गरज आहे, आणि त्या दृष्टीने सर्वबाजूंनी अग्रेसर होणे हीच या अलौकिक महामानवाला वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल ! स्वामीजींनी आयुष्यभर कळकळीने व उच्च रवाने दिलेला उपनिषदांचा संदेशच आपले खरे प्रेरणास्थान व्हायला हवा. उत्तिष्ठत ! जाग्रत ! प्राप्यवरान्निबोधत !!!!
लेखक – रोहन विजय उपळेकर

( स्वामी विवेकानंदांच्या १५१ व्या जयंतीदिनी, रविवार दि. १२ जानेवारी २०१४ रोजी बेळगावच्या दै.तरुण भारतच्या अक्षरयात्रा पुरवणीमध्ये छापून आलेल्या लेखाचा संपादित अंश. )
[ असे अनेक लेख वाचण्यासाठी कृपया खालील ब्लॉगला भेट द्या व ब्लॉग फॉलो करा.
http://rohanupalekar.blogspot.in ]

वॉट्सॅपवरून साभार दि. १२-०१-२०२२. श्री.उपळेकर यांचे मनःपूर्वक आभार.

**********

🚩शिकागोत स्वामी विवेकानंद🚩

🔹श्रीरामकृष्ण परमहंस यांचे शिष्य म्हणून नरेन्द्रनाथ अडीच वर्षे परिव्राजक म्हणून भारतभर हिंडले ते आपला हिंदुस्तान समजून घ्यायला, आपली संस्कृती आणि आपला हिंदू धर्म याची परिस्थिति कशी आहे हे समजून घ्यायला, लोकजीवन समजून घ्यायला. पारतंत्र्याच्या काळात, इंग्रजी सत्तेच्या काळात आपल्या सामान्य हिंदू जनतेची उपेक्षा कशामुळे होत होती याची कारणं त्यांना या परिभ्रमणात समजली होती. आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल? त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ ते चिंतन करत होते.
प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणि उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच-दहा माणसं आणि पैसा हवाच. आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे, तिथे जाऊन भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची उभारणी करावी, म्हणून सर्व धर्म परिषदेला अमेरिकेत जायचा त्यांचा निर्णय झाला.
🔹 पाश्चात्य देशात आपला जाण्याचा उद्देश काय यासाठी रामेश्वर, मद्रास, म्हैसूर, सिकंदराबाद आदि ठिकाणी त्यांचा प्रवास आणि व्याख्याने झाली. सर्वांनी मिळून पैशांची तयारी केली. म्हैसूरच्या राजांनी मोठी रक्कम दिली. खेतडीचे राजे अजित सिंग यांना तर खूप आनंद झाला, त्यांनीही मोठी सोय केली. जो काही खर्च येईल तो सर्व अजित सिंग देणार होते. शिवाय पश्चिमेकडे जाणार म्हणून तिथे शोभेल असा राजेशाही पेहराव त्यांनी तयार करून दिला. तर विवेकानंदांच्या आईला दरमहा काही रक्कम पाठवून आर्थिक मदत त्यांनी चालू केली, ज्यामुळे विवेकानंद निश्चिंत मनाने शिकागोला जाऊ शकले.
🔹 शिकागोतल्या सर्वधर्म परिषदेचे विशेष निमित्त होते. कोलंबस अमेरिकेत उतरला त्या घटनेला चारशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मोठा महोत्सव अमेरिकेत भरवण्यात आला होता. या निमित्ताने जागतिक पातळीवरचा समारोह आणि प्रदर्शने भरविण्यात आली होती. बौद्धिक ज्ञान शाखांशी संबंधित एकूण वीस परिषदा झाल्या. धर्म आणि तत्वज्ञान यावरची सर्व धर्म परिषद ही त्यापैकी एक होती. ही परिषद शिकागोच्या ‘आर्ट इन्स्टिट्यूट’च्या भव्य इमारतीत भरली होती. ११ सप्टेंबर १८९३ ला परिषदेचे उद्घाटन झाले. भारतातून आलेले इतर प्रतिनिधी होते; बुद्ध धर्माचे धर्मपाल, जैन धर्माचे विरचंद गांधी, ब्राह्मो समाजाचे प्रतापचंद्र मुजूमदार व बी. बी. नगरकर, थिऑसॉफिकल सोसायटीच्या डॉ. बेझंट व ज्ञानचंद्र चक्रवर्ती. उच्च विद्याविभूषित, विचारवंत, ख्यातनाम विद्वान, पत्रकार असे श्रोते समोर होते. उद्घाटनाच्या दुपारच्या सत्रात विवेकानंद यांचे एक छोटेसे भाषण झाले. शिकागो म्हटलं की सर्वांना आतापर्यंत एकच भाषण झालं असं वाटतं. परंतु विवेकानंदांनी उद्घाटन, समारोप या निमित्ताने आणि हिंदू धर्म विषयक प्रबंध वाचन, अशी अनेक भाषणे दिली. त्याशिवाय प्रत्येक वेळी जे जे हिंदू धर्माबद्दल आरोप वा टीका करत असत, त्या त्या भाषणाला विवेकानंद उत्तरादाखल त्याचं खंडन करत असत. अशी त्यांची अनेक भाषणे या परिषदेत झाली. ही सर्व भाषणे खूप गाजली. थोडक्यात त्याचा गोषवारा असा …
🔹 ११ सप्टेंबरचे उद्घाटनपर भाषण –
“अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधुनो” या पहिल्याच वाक्याला टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या भाषणाला टाळ्या पडल्या होत्या पण पहिल्याच संबोधनाला असा प्रतिसाद नव्हता मिळाला, त्यांनाही आश्चर्य वाटले. टाळ्या थांबण्याची वाट पाहत विवेकानंद थांबले होते. शांतता झाल्यावर त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. “सुंदर शब्दांमध्ये जे आपले स्वागत केले गेले आहे त्याबद्दलचा आनंद अवर्णनीय आहे. जगातील सर्वात प्राचीन असा हिंदू धर्म, त्यातील सर्वसंगपरित्यागी संन्याशांची परंपरा यांच्या वतीने मी जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मन:पूर्वक धन्यवाद देतो!”. त्यांनी परिषदेच्या आयोजकांचे आभार मानले. आधीच्या वक्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रत्येक मताबद्दलची सहिष्णुता आणि जगातील सर्व धर्म विचारांच्या बाबतीतली स्वीकारशीलता हे हिंदू धर्माचे वैशिष्ठ्य आहे असे सांगून, पारशी लोक आपल्या जन्मभूमीतून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. त्यांना निश्चिंतपणे राहण्यासाठी आसरा मिळाला, ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगून, अशा देशातून आपण आलो आहोत आणि अशा धर्माचा मी प्रतिनिधी आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो, याचा त्यांनी उल्लेख केला. साऱ्या जगातून इथे आलेल्या सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्मवेडेपणाची मृत्युघंटा ठरेल, लेखणी किंवा तलवार यांच्या सहाय्याने केल्या जाणार्‍या मानवाच्या सर्व प्रकारच्या छळाचा तो अंतिम क्षण असेल आणि आपआपल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही, कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव यानंतर शिल्लक राहणार नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे”. असे पाच मिनिटांचे आपले भाषण विवेकानंदांनी थांबवले आणि पुन्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
🔹 हे छोटसं भाषण हा एक उत्स्फूर्त आविष्कार होता. विवेकानंदांनी परिषदेच्या उद्दिष्टालाच स्पर्श केला होता. स्वागतपर भाषणाला उत्तर म्हणून अशी चोवीस भाषणे झाली त्यात विवेकानंदांचे विसावे भाषण होते. अजून खरा विषय तर मांडला जायचा होता. ही परिषद सतरा दिवस चालू होती. रोज तीन-तीन तासांची तीन सत्रे होत.
🔹 सर्वधर्म परिषद सुरू झाली. धर्मविषयक वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होत होत्या. यात प्रामुख्याने दोन भाग केले होते, पहिला भाग होता, प्रत्येक धर्मातील तत्वचिंतन आणि विविध सिद्धांत, तर दुसर्‍या भागात, परमेश्वराचे स्वरूप, धर्माचे महत्व, ईश्वरी साक्षात्कार, परमेश्वराचा अवतार, अनैतिकतेच्या कल्पना असे विषय होते. या चर्चा दहा दिवस चालल्या होत्या. तर उत्तरार्धात चर्चेचे विषय होते, कौटुंबिक जीवन, ललित कला, विज्ञानातील शास्त्रे, नीतीविषयक सिद्धांत, अखिल मानवमात्राविषयीचे प्रेम, ख्रिस्त धर्मप्रचारक मिशनर्‍यांची कार्यपद्धती. भिन्न धर्माच्या अनुयायांनी एकमेकांना समजून घ्यावे हा याचा हेतू होता.
🔹 नवव्या दिवसाचे भाषण-
या परिषदेत विवेकानंदांना हिंदू धर्मावरची टीका, आरोप-प्रत्यारोप ऐकावे लागले होते, पण नवव्या दिवशी त्यांनी हिंदू धर्मावरचा त्यांचा निबंध सादर केला. इतर धर्मियांच्या टीकेचा कठोर शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, “आम्ही पूर्वेकडून आलेल प्रतिनिधी गेले काही दिवस इथे बसलो आहोत आणि एका अधिकारपदाच्या भूमिकेतून आम्हाला सांगितलं जात आहे की, आम्ही सर्वांनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार करायला हवा. का? तर ख्रिस्त धर्मीय राष्ट्रे आज सर्वात अधिक प्रगतीशील आहेत. आम्ही आमच्या आसपास पाहतो, तर आम्हाला असं दिसतं की इंग्लंड हे ख्रिस्त धर्मीय राष्ट्र आज जगात सर्वात पुढारलेले आहे आणि ते पंचवीस कोटी लोकांच्या मानेवर पाय रोवून उभं आहे. आम्ही इतिहासात मागे वळून पाहतो, तर आम्हाला आढळून येतं की, ख्रिस्त धर्मीय युरोपच्या समृद्धीचा प्रारंभ स्पेनपासून झाला. या स्पेनच्या समृद्धीची सुरुवात झाली ती, मेक्सिकोवर आक्रमण करण्यापासून! आपल्या बांधवांचे गळे कापून ख्रिस्त धर्म प्रगतीशील होत जातो. अशा प्रकारची किंमत देऊन मिळणारी समृद्धी सौम्य प्रकृतीचा हिंदू स्वीकारणार नाही. मी इथे बसलो आहे आणि मी जे काही सारं ऐकलं तो असहिष्णु वृत्तीचा कळस होता. इस्लाम धर्माचे गोडवे गायलेले मी आता ऐकले. हे मुसलमान भारतात हातात तलवार घेऊन अत्याचार करीत आले आहेत. रक्तपात आणि तलवार ही हिंदूंची साधनं नाहीत. आमचा धर्म सर्वांविषयीच्या प्रेमाच्या आधारावर उभा आहे”. यावर श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
🔹 २० सप्टेंबरला ‘पेकिंगमधील धर्म’ हा विषय हेडलँड यांनी मांडला तेव्हा त्याला जोरदार उत्तर देत विवेकानंदांनी त्याचाही खरपूस समाचार घेतला.
🔹 २७ सप्टेंबर- समारोपाचे भाषण –
शेवटच्या दिवशी ७ ते ८ हजारांनी खच्चून भरलेले कोलंबस आणि वॉशिंग्टन सभागृह … ऐतिहासिक गर्दीचा हा उच्चांक होता. सर्वधर्म परिषदेच्या समारोपात तर, एखाद्या संगीत मैफिलीची भैरवीने सांगता होते तसे विवेकानंदांनी सर्व धर्माच्या अनुयायांना संदेश देऊन भाषण संपवले. ते म्हणाले, “कोणत्याही ख्रिस्ती माणसानं हिंदू वा बौद्ध होण्याची गरज नाही किंवा कोणत्याही हिंदू वा बौद्ध माणसाने ख्रिस्ती होण्याची गरज नाही. प्रत्येकानं दुसर्‍या धर्मातलं सारभूत तत्व ग्रहण करायचे आहे. त्याच वेळी आपलं वैशिष्ट्यही जपायचं आहे आणि अखेर स्वत:च्या स्वाभाविक प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास करून घ्यायचा आहे”.
🔹 स्वामीजींनी सर्वांच्या मनात विश्वबंधुत्वाचा भाव निर्माण केला. ते म्हणाले, “आपले मार्ग भिन्न असले, विचारधारा वेगळ्या असल्या, तरी आपण सर्वजण भिन्न मार्गाने जात असलेल्या पूर्णतेचे यात्रिक आहोत”.
🔹 शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतली स्वामी विवेकानंदांची भाषणे आणि श्रोत्यांचा त्यांस मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे भारताच्या गौरवाचं सुवर्णाक्षरांनी लिहिलेल पान होतं. विश्वबंधुत्व आणि विश्वधर्म यांचे उद्गाता असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान यात असामान्य, अद्वितीय अशी कामगिरी केली होती. त्यांचे नाव अमेरिकेच्या कानाकोपर्‍यात पोहोचले होते. स्वामी विवेकानंद आता वैश्विक स्तरावर ख्यातनाम झाले होते. त्यांनी भारताबाहेर जाऊन केलेला आपली उच्च संस्कृती, हिंदू धर्माची वैशिष्ट्ये, तत्वज्ञान, आपल्या राष्ट्राबद्दलचा अभिमान व प्रेम यांचा जागर हे शिकागोच्या परिषदेनंतर १२८ वर्षानी आज आपण जाणून घेणे, माहिती करून घेणे अत्यंत महत्वाचे ठरेल. कारण त्याची आज नितांत आवश्यकता आहे.

 • 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 डॉ. नयना कासखेडीकर, पुणे. *********************************

आत्मनो मोक्षार्थं जगत हिताय च ।

देवाच्या अस्तित्वाच्या शोधात रामकृष्ण परमहंसांच्या सानिध्यात आलेल्या नरेन्द्राला रामकृष्ण परमहंस एकेदिवशी काली मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात पाठवतात…

बाहेर येतांना नरेन्द्र अगदी प्रफुल्लित आणि आनंद गगनात मावेना ह्या अविर्भावाने परमहंसांच्या जवळ येऊन घडलेल्या त्या निर्गुणाच्या दर्शनाचा वृत्तांत सांगतो. “माझं कित्येक वर्षांच स्वप्न आज पूर्ण झालं. आज मला तुमच्यामुळे परमात्म्याचा अनुभव आला. तो परमेश्वर आज मला भेटला. मी खूप आनंदी आहे” हे ऐकताच परमहंस चिडून त्याला म्हणतात,
“बाजूला हो, क्षणभर इथे उभा राहू नकोस, दूर हो माझ्या नजरेसमोरून. ह्यासाठी का आला होतास तू माझ्याकडे ? ” हे ऐकताच नरेंद्र म्हणतो,”माझं काय चुकलं? मग कशाला आलो होतो मी ?” तेव्हा ठाकुरजी नरेन्द्राला म्हणतात,”स्वतःच्या मोक्षाचा विचार करून फक्त स्वतःच्याच आनंदात मश्गुल होऊन जायचं. अवती-भोवती दुःखात असणाऱ्या लोकांना सोडून आपल्याच आनंदात रममाण होण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही. ह्यादेशात चहुबाजूला इतकं दुःख, दारिद्र्य, अधर्म माजलेला असतांना तुला ह्यातच आनंद वाटत असेल तर, तू स्वतःला अजून ओळखलेलं नाहीयेस. तू जा इथून, दूर हो… ” त्याच क्षणी नरेन्द्राने ठाकुरजींचे पाय धरले होते आणि खऱ्या अर्थाने तिथूनच नरेन्द्राच्या विवेकानंद होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली होती…

पुढे शिकागोच्या प्रवासाला जातांना १८९३ मध्ये विवेकानंदांची भेट जमशेदजी टाटांसोबत झाली होती. तेव्हा विवेकानंदांनी त्यांना सांगितलं होतं की,”जो पर्यंत हा देश विशेषकरून ह्यादेशातील तरुण उद्योग आणि संशोधनाशी जोडला जात नाही; तोपर्यंत ह्यादेशाचे दारिद्र्य दूर होणार नाही आणि ह्याचसाठी तुम्ही तुमचा वेळ खर्च करावा.”
म्हणूनच, त्यांच्याच सांगण्यावरून टाटांनी ‘Tata Institute of Science’ म्हणजेच, आताच्या ‘Indian Institute of Science’ आणि ‘TISCO’ म्हणजेच, ‘Tata Steel’ ची स्थापना करून ह्या देशात संशोधन व उद्योग ह्या दोन्हीची सांगड घातली आणि देशात खऱ्या अर्थाने ‘MAKE IN INDIA’ धोरण राबवलं.

विवेकानंद हे फक्त ‘MAKE IN INDIA’ चेच मुळपुरुष नव्हते तर, पूर्वेला पाश्चिमात्य देशांशी जोडून विश्वबंधुत्वाचा संदेश देत त्यांनी खऱ्या अर्थाने ‘World Is a Global Village’ म्हणजेच, ‘GLOBALIZATION’ चा यशस्वी प्रयोग करून दाखवला होता.

आत्मनो मोक्षार्थं जगत हिताय च । ऋग्वेदामधील एका श्लोकातील हे वाक्य एकाच वेळी मानवी जीवनाची दोन उद्दिष्टे प्रकट करते – पहिले मोक्ष व दुसरे जगाच्या कल्याणासाठी कार्य करणे आणि ह्या दोन्ही गोष्टी अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात स्वामी विवेकानंदांनी करून दाखवल्या…

आज १२ जानेवारी म्हणजेच, स्वामीजींचा जन्मदिवस…

जगत कल्याणासाठी संपुर्ण आयुष्य वेचणाऱ्या निस्सिम देशभक्त आधुनिक ऋषिला शत शत नमन …

 • अनुप देशपांडे, संभाजीनगर

© विश्व संवाद केंद्र, देवगिरी

. . . . . . वॉट्सॅपवरून साभार. हा लेख संग्रहित करायला अनुमती द्यावी अशा विनंति.

******************

आज १२ जानेवारी २०२२- स्वामी विवेकानंदांची जयंती- भारतामधे युवा दिन म्हणून साजरी केली जाते.
या निमित्ताने, लोकसत्ताचे माजी निवासी संपादक व विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे प्रमुख श्री. सुधीर जोगळेकर यांचे विचार.

१२ जानेवारी आणि अमेरिका

२०२२ च्या विवेकानंद जयंतीला खरं तर भारतात असायला हवं होतं.. याचं मुख्य कारण २०२२-२३ हे विवेकानंद केंद्राचं सुवर्णमहोत्सवी वर्ष.. पण पूर्वनियोजित प्रवासामुळे अमेरिकेत यावं लागलं,
स्वाभाविकपणेच यंदाच्या १२ जानेवारीच्या काही नोंदी स्वामीजी आणि अमेरिका याविषयी..

 • स्वामी विवेकानंदांना अवघं ३९ वर्षांचं आयुष्य लाभलं..
  त्या ३९ वर्षातही स्वामी विवेकानंद दोनदा अमेरिकेत आले..
  सगळा मिळून प्रवास झाला आठ वर्षांचा.. १८९३ ते १९०१ असा..
  अगदी पहिल्यांदा ते आले शिकागोत होणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेसाठी..
  ते वर्ष होतं १८९३ आणि दुसऱ्यांदा आले ते १८९९ मध्ये..
  पण तो प्रवास त्यांचा शेवटचाच प्रवास ठरला..
  तो प्रवास संपवून ते भारतात गेले आणि १९०२ मध्ये त्यांचं निधन झालं..
  *

१८९३ सालचा अमेरिकेचा प्रवास स्वामीजींनी सुरु केला होता तो मुंबईतून, पेनिनसुला जहाजानं..
स्वामीजींना जहाजात बसवून द्यायला खेत्रीच्या महाराजांचा खाजगी सचिव मुद्दाम आला होता..
भगव्या रंगाचा वेष महाराजांनी मुद्दाम शिवून दिला होताच, परंतु नरेंद्र दत्तचं नामकरण स्वामी विवेकानंद असंही केलं होतं..
स्वामीजींच्या प्रवासाचा तो दिवस होता ३१ मे १८९३ चा..
पहिल्या वर्गाचं तिकीट महाराजांनी काढून दिलं होतं..
मुंबईतून निघून श्रीलंका, सिंगापूर, हाँगकाँगमार्गे ते जहाज चीन, जपान आणि कॅनडामार्गे अमेरिकेला पोचलं होतं..
चीनच्या पहिल्या मुक्कामात त्यांनी काही बौद्ध मठांना भेटी दिल्या होत्या..
संस्कृत आणि बंगाली भाषेतील काही मूळ संहिता त्यांना तिथे पहावयास मिळाल्या होत्या..
त्यांचा दुसरा मुक्काम होता जपानमधल्या नागासाकी शहरात..
ओसाका, क्योटो, टोकियो शहरांना भेटी देऊन ते योकोहामाला पोचले होते..
योकोहोमाहून व्हॅन्कुव्हरचा त्यांचा पुढचा प्रवास व्हायचा होता आरएमएस एम्प्रेस जहाजातून..
या प्रवासातच जहाजात त्यांची भेट झाली होती भारतातील उभरते उद्योगपती जमशेटजी टाटा यांच्याशी..
भारतातली पहिली कापड गिरणी त्यांनी सुरु केली होती,
परंतु आज सांगूनही विश्वास बसणार नाही, जमशेटजींचे पूर्वज तेव्हा चीनशी व्यापार करत होते अफूचा..
त्यापासून फारकत घेत व्यवसायाच्या नव्या संधी शोधण्यासाठी आणि शिकागोत भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी जमशेटजीही निघाले होते शिकागोला..
जपानमध्ये ज्या हॉटेलात जमशेटजी राहिले होते, त्याच हॉटेलात स्वामीजीही राहिले होते..
परंतु दोघांमध्ये तेव्हा काहीच संभाषण झाले नव्हते..
ज्या जहाजातून त्यांचा प्रवास व्हायचा होता त्याच जहाजावर त्यांना पुन्हा भेटले होते स्वामी विवेकानंद..
संपूर्ण भारताची पायी परिक्रमा करत असताना आलेले अनुभव त्यांनी जमशेटजीना सांगितले होते..
ब्रिटीश सत्ता भारतीय बांधवांवर करत असलेल्या अन्यायाच्या आंखोदेखी कहाण्या त्यांनी विषद केल्या होत्या..
चीन भेटीत संस्कृत आणि बंगाली भाषेतील संहिता त्यांना कशा पाहायला मिळाल्या ते त्यांनी सांगितलं होतं..
पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतींचा मेळ घालण्याचा प्रयत्न आपण शिकागो परिषदेत करणार आहोत असं ते म्हणाले होते..
जपानने केलेली भौतिक प्रगती आणि तंत्रज्ञानातला विकास त्यांना मोहित करून गेला होता..
ते तंत्रज्ञान भारतात यायला हवं आणि भारतात पोलाद उद्योगाची पायाभरणी व्हायला हवी अशी त्यांची इच्छा होती.. पण मशिनरी आयात न करता टाटांनी ती निर्माण करावी आणि भारतातील गरीब, ग्रामीण जनतेला रोजगाराच्या संधी देऊ कराव्यात असं स्वामीजींचं म्हणणं होतं..
संशोधनाला वाहिलेली एखादी शिक्षणसंस्था भारतात का सुरु करत नाही असा सवाल स्वामीजींनी त्यांना केला होता..
अशी संस्था सुरु करण्यासाठी आपण सहकार्य करावं या टाटांच्या विनंतीवर बोलताना स्वामीजी म्हणाले होते, पश्चिमेचा तपस्वीपणा आणि भारताची मानवता एकत्र याव्या असं माझं मत आहे..
पॅसिफिक महासागर ओलांडून २५ जुलैला स्वामीजी ब्रिटीश कोलंबियात व्हॅन्कुव्हरला पोचले होते..
तिथून पुढचा शिकागोपर्यंतचा त्यांचा प्रवास होता रेल्वेतून..
शिकागोला ते पोचले ३० जुलै १८९३ ला..
परिषद सुरु व्हायला जवळपास दीड महिना होता..

शिकागोचं राहणीमान महागडं होतं, तुलनेनं स्वस्त अशा बॉस्टनला जायचं असं ठरवून स्वामीजी तिकडे गेले..
तिथे त्यांची भेट झाली हार्वर्ड विद्यापीठाच्या जॉन हेन्री राईट नावाच्या प्राध्यापक महोदयांशी..
स्वामीजींशी झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीनं राईट प्रभावित झाले..
तुम्ही जागतिक धर्मपरिषदेला गेलं पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला..
परंतु स्वामीजींकडे निमंत्रण नाही, परिचयपत्र नाही हे कळल्यावर राईट म्हणाले..
“ स्वामीजींकडे परिचयपत्र मागणं म्हणजे सूर्याकडे आकाशात तळपण्यासाठीची
परवानगी कुणी दिली हे विचारण्यासारखं आहे..”
पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे..
**

अमेरिकेच्या याच प्रवासात स्वामीजींना भेटले होते निकोला टेसला..
ही घटना होती १८९५ मधली..
सारा बर्नहार्डट या विख्यात अभिनेत्रीनं गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित इझिएल नावाच्या नाटकात भूमिका केली होती..
ते नाटक पाहायला स्वामीजी गेले होते..
श्रोत्यात भगव्या वेशात बसलेल्या स्वामीजींना पाहिल्यानंतर सारानं स्वामीजींना भेटायची इच्छा व्यक्त केली होती..
त्या भेटीच्या वेळेस टेसला उपस्थित होते..
एका ब्रिटीश मित्राला लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी टेसलाना भेटायचा विचार तत्पूर्वीच बोलून दाखवला होता..
स्वामीजी म्हणाले होते,
“ बल आणि पदार्थ यांचा ऊर्जेशी असलेला संबंध गणितीय सूत्राद्वारे मांडता येतो असं टेसला यांना वाटतं,
ते खरं असेल तर वैदिक तत्वज्ञान जगापुढे मांडण्यासाठीचा उत्तम पाया रचला जाईल असा विश्वास मला वाटतो..आता
मी सध्या ब्रह्मांड विज्ञान आणि परलोकीय विज्ञान यांचा वेदांताच्या दृष्टीकोनातून अभ्यास करतो आहे..
त्यांचा आधुनिक विज्ञानाशी असलेला संबंध मला स्पष्टपणे दिसून येतो आहे..
निकोला टेसला जे क्वान्टम फिजिक्सचे तत्वज्ञान मांडतात ते आणि वेदांचे तत्वज्ञान यात मोठ्या प्रमाणावर साम्य आहे..
टेसला असे मानतात की आपल्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही आकाशतत्वापासून बनलेली असते.
त्यातूनच प्राण अथवा उर्जा निर्माण होते..
आकाशतत्व हे अविनाशी आहे, ते ब्रह्मांडाचं आणि अंतराळाचं मूलतत्व आहे..
ते अनंतकाळासाठी अस्तित्वात राहतं, त्यामुळे ते उत्पत्ती आणि विनाशापलीकडे असतं..
संपूर्ण पोकळीत एक विशिष्ठ प्रकारची उर्जा आहे, आणि ती गतिज आहे..
पदार्थ म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसतं, तर ती गतिज उर्जाच असते..””
स्वामीजींची आणि टेसला यांची भेट झाल्यानंतर टेसला यांना “ टेसला कॉईल जनरेटर “ निर्मितीची प्रेरणा मिळाली..
त्यातूनच “ वायरलेस ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर “ या संकल्पनेचा पाया रचला गेला..
टेसला भेटीनंतर स्वामीजी सर विल्यम थॉम्पसन, लॉर्ड केल्विन यांनाही भेटले होते..
अनेक विद्युत उपकरणांचा शोध लावणारे टेसला स्वामीजींच्या वैदिक तत्वज्ञानानं पुरते भारावून गेले होते..
टाटांनंतर प्रभावित झालेलं आणि विज्ञानाधारीत उत्पादनांकडे वळलेलं टेसला हे दुसरं व्यक्तिमत्व..
टेसला नावाची विजेवर चालणारी कार ही त्यांच्याच सिद्धांताच्या मांडणीतून निर्मित झाली..
*

स्वामीजींमुळे प्रभावित झालेली ही दोन्ही व्यक्तिमत्वं आठवली आणि आठवले डॉ. रघुनाथ माशेलकर..
इनोव्हेटिव्ह फौंडेशन ही त्यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली
आणि एका अर्थानं मेक इन इंडिया संकल्पनेची पायाभरणी करणारी संस्था..
या संस्थेच्या सीईओ पदासाठी मुलाखती सुरु होत्या तेव्हाची गोष्ट, कुठेतरी वाचलेली..
पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये भारतातील तरुण बुद्धिमान, अनुभवी व्यक्ती होत्या,
तसेच अमेरिकेत राहून गडगंज पैसा कमावलेले परंतु आता भारतात परत जाण्याची
इच्छा बाळगून असलेले तरुणही होते..
डॉ. माशेलकरांचा त्यांना सवाल होता भारत आणि अमेरिका या देशांकडे तुम्ही कसे पाहता..
त्यावरचं त्या तरुणांचं उत्तर होतं, भारत ही बुद्धिमत्ता जन्माला घालणारी भूमी आहे, तर अमेरिका ही ती बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी संधी देणारी भूमी आहे..
डॉ. माशेलकरांना हे उत्तर अपेक्षितच होतं..
ते म्हणाले, भारत ही नव-कल्पनांना जन्म देणारी भूमी आहे, फौंडेशनचं उद्दिष्ट आहे, असे तरुण शोधून काढण्याचं आणि त्यांच्या नव-कल्पनांचं सृजन करण्यासाठी योग्य असं वायुमंडल भारतातच निर्माण करण्याचं..
त्या मुलाखतीचं पुढे काय झालं ते समजलं नाही,
पण फौंडेशनचं काम त्या दिशेनं सुरु आहे हे नक्की..
**

जमशेटजी टाटा हा होता एक असाच भारतीय युवक..
नव-कल्पना शोधायला निघालेला आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भारतीय भूमीच निवडणारा..
स्वामीजींबरोबरच्या चर्चेनं प्रभावित झालेला..
आणि निकोला टेसला देखील होता असाच दुसरा युवक..
स्वामी विवेकानंदांच्या विचारानं प्रभावित झालेला आणि नव-कल्पनांचा ध्यास घेऊन बसलेला..
टेसलाचे विचार प्रभावित झाले होते ते भारतीय तत्वज्ञानातील संकल्पनांमुळे..

स्वामीजी अमेरिकेत आले होते, ते जागतिक धर्मपरिषदेत हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी..
भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्म याचं दर्शन जगाला घडवण्यासाठी..
एका अर्थानं शिकागोची धर्मपरिषद ही त्यांच्यासाठी एक संधीच होती…
ती संधी साधत त्यांना प्रज्वलित करायची होती भारतीय तरुणांची मनं,
आणि भारतीय तत्वज्ञानातून नव-कल्पना शोधणारी टेसलासारख्या अमेरिकी तरुणांची मनं..

आजच्या राष्ट्रीय युवा दिनी त्या बुद्धिमान तरुणाईला शोधणाऱ्या स्वामीजींची आठवण येणं अपरिहार्य..
**

-सुधीर जोगळेकर

–II ● विवेक विचार ● II–
‘उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’
उठा ! जागे व्हा !! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका !!! उठा धीट बना, सर्वशक्तिसंपन्न बना तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या आणि जाणीव असू द्या की तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात, देशाला लोखंडी स्नायूंची, पोलादी मज्जतंतूची, वज्राचे मन असलेल्या पुरुषार्थ, क्षात्र, तेज, वीर्य, ब्रम्हसंपन्न तरुणांची खरी गरज आहे.
*स्वामी विवेकानंद …

स्वातंत्र्यवीर सावरकर – २

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनानिमित्य सामाजिक माध्यमांमधून मिळालेले लेख आणि चित्रे यांचा संग्रह. सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील लेखांचा हा संग्रहही पहावा.
https://anandghare.wordpress.com/2021/02/26/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0/

*************

नाभिषेको न संस्कार सिंहस्य क्रियते वने
विक्रमार्जित राजस्य .स्वयमेव मृगेंद्रता ।।
म्हणून हिंदुहृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
. . . . . . . .

सावरकर…. एकमेवाद्वितीय…..
हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी. सन १९०० मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती…

१८५७ च्या बंडास “स्वातंत्र्ययुद्ध” म्हणून गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.
१८५७ च्या समरानंतर हिंदुस्थानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने काढलेल्या पत्रकास, “मॅग्ना कार्टा” ला “एक भिकार चिटोरे” म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच, १९०० साली म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी…

देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी.ए. ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी… परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच पुढारी, सन १९०५ मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला, मात्र कॉंग्रेसच्या गांधींनी १९२१ साली सावरकरांचे हेच तत्व तंतोतंत उचलले आणि लोकप्रिय झाले.

परदेशी मालाच्या होळीमुळे देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…

मे,१९०९ मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…
शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन) त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिलेच…

शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी…

प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे पहिलेच क्रांतीकारक…
शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतिकारी…

शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच….
स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले…

भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील क्रांतिकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच पहिले… त्यासाठी तुर्की, रशियन, आयरिश, इजिप्शियन, फ़्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क केला होता…

विसाव्या शतकात २ जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फक्त सावरकरच…
अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने आणि खिळ्याने महाकाव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर….
तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीत लिहिल्या, मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर…

बालपणी वहीनी व बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वितीय… तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर हेच एकमेव… व्याकरणात त्या व्रूत्तांना “वैनायक” म्हणून ओळखले जाते.

भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..
सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणून गौरवीत असतना, मातृभाषा व राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फक्त सावरकरच पहिले…
प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून, “लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या” असा दिव्य दाहक संदेश देणारे पहिले साहित्यिक सावरकरच…
शास्त्रशुद्ध अभ्यास करून देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य बनवणारे सावरकरच….
लिपीमध्ये सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फक्त सावरकरच…

लंडनमधे एक चौकात सावरकरांचा अर्धकृति पुतळा आहे. हा तिथे बसवू नये म्हणून Conservative पक्षाने संसदेत वाद घातला होता, पण सरकारने सांगितले.
“इंग्लंडच्या सर्व शत्रुंमधे जे सर्वश्रेष्ठ आहेत,सावरकर हे त्यातील एक आहेत,इंग्लंड हे भाग्यवान राष्ट्र आहे,त्याला सावरकर यांच्या सारखा चारित्र्य संपन्न,प्रखर राष्ट्रभक्त आणि कमालीचा बुद्धिमान शत्रु मिळाला.”


जीवनातली ईतिकर्तव्य संपली. जगायचं कारण संपलं. म्हणून देह ठेवणारे शेवटचे संत, योगी, राजकारणी, समाज सुधारक, इतिहासकार, महाकवी, साहित्यिक, समस्त क्रांतिकारकांचे गुरू स्वा. हिंदुहृदयसम्राट वि.दा.सावरकर ह्यांची आज जयंती.
ह्या महान विभूतीला मानाचा मुजरा !
जय हिंदूराष्ट्र.
. . . . . . .
सावरकर म्हणजे …..
साक्षात धगधगते यज्ञकुंड…..
सूर्याची उबदार प्रखरता….
वाऱ्याचा वेग…..
खडकाने हेवा करावा अशी कठोरता…
आणि…..
प्रत्यक्ष बृहस्पतीने शिष्यत्व पत्करावे ……
अशी बुद्धीची प्रगल्भता …..

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर पेटलेले अग्निकुंडच उभे राहते…
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
🚩💐🙏🙏🙏💐🚩

सावरकरांचा माफीनामा ? सत्य जाणूनघ्या

 • माधव विद्वांस
  गेले अनेक दिवस प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वा.सावरकरांची बदनामी केली जाते.प्रथम त्यांची माझी जन्मठेप वाचावे मग आपले मत बनवावे.सावरकरांनी या सर्व गोष्टींचा आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे ते वाचावे म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
  सावरकरांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली नाही. तसे त्यांच्या सुटकेच्या अर्जात कोठेही लिहिलेले नाही. त्यांनी भरला होता तो एक सुटकेसाठीचा प्रचलित फ़ॉर्म होता (Amnesty definition: An amnesty is an official pardon granted to a group of prisoners by the state.). व त्यामधे मला सोडता येत नसेल तर सर्व राजबंद्यांना सोडावे असेही लिहिले होते. त्याची संकेत कुलकर्णी यांनी लंडन लायब्ररीमधील छायांकित प्रत सोबत जोडली आहे. या दरम्यान भारतात सावरकरांना सोडावे अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यावेळच्या विधिमंडळानेही कैद्यांच्या सुटकेसाठी ठराव केले होते.
  सावरकर स्पष्टवक्ते होते त्यांच्या मार्सेलिस बंदरातील बोटीवरच्या उडीच्या अतिरंजित गोष्टींचा त्यांनी इन्कार केला आहे.काही बातम्यात तंर एक दोन किलोमीटर पोहून गेले त्यावर त्यांनी असे काहीही घडले नाही तर मी बोटीवरून उडी मारून लगेचच धक्क्यावर आलो व पळत जाऊन फ्रान्सच्या पोलिसाला मला अटक कर असे विनवू लागलो पण मी काय म्हणतो ते त्याला समजेना व तेवढ्यात तेथे ब्रिटिश नौकेवरील पोलीस आले व मला परत घेऊन गेले. फ्रान्सच्या पोलिसांनी अटक केली असती तर त्यांची जन्म ठेप नक्कीच वाचली असती. या वेळी मादाम कामा यांनी आंतराष्ट्रीय न्यालयात दावाही दाखल केला होता. सावरकर जर फ्रान्सच्या पोलिसांच्या स्वाधीन झाले होते तर ब्रिटिश पोलिसांना त्यांना तेथे पकडण्याचा अधिकार नव्हता. पण ती गोष्ट न्यायालयाने विचारात घेतली नाही.

आता आदरांजली
सर्वांच्या तोंडी असणारे स्वतंत्रतेचे स्तोत्र लिहिणारे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती (२८ मे, इ.स. १८८३:भगूर – २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भूगुर या गावी झाला.

घटना समितीकडे १९४९ मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरीलिपी ही राष्ट्रलिपी करावी; आणि तसेच घडले. हिंदी हि राष्ट्र भाषा झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता तसेच अंदमान बेटावर पर्यटन केंद्र होईल हि त्यांची भविष्यवाणी आज खरी ठरलि आहे. डॉ आंबेडकर यांना राममंदिरात प्रवेश करून द्यावा. तसेच हिंदू धर्मातील जाती पाती नष्ट व्हाव्या हि त्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिराची स्थापना केली !!!!!

गुहागरजवळ सांवरवाडी म्हणून एक ठिकाण आहे. त्यावरून ‘सावरकर’ हे आडनाव आले असावे, असा अंदाज प्रत्यक्ष सावरकरांनीच केला आहे. थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी.पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली.

* १८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले; तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी १९०० मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी गोविंद ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४ मध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून जोसेफ मॅझिनी ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण; सैन्यांत व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे; रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे; इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे; शस्त्रास्त्रे साठवणे इ. मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते.

***लंडनला सावरकरांच्याबरोबर असलेले सेनापती बापट ह्यांनी बाँब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साहाय्याने माहीत करून घेतली होती.ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. पुढे वसई येथे बाँबचा कारखाना काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती. त्यातली काही सर सिकंदर हयातखान ह्यांनी आणली होती. ब्रिटनविरुद्घ जागतिक पातळीवर मोठे षड्‌यंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.

** अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयवर बाँब टाकण्याच्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर ह्यांनाही अटक झाली होती.ह्या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला.या सुमारास त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले.तेथे ते भिकाजी रुस्तुम कामा ह्यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नासिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन ह्याचा खून झाला.ह्या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसी छळ सुरू झाला. ह्या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले.

**** १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकुपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’ मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही, ह्या मुद्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली.

सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालविण्यात आले. जॅक्सनच्या वधाला साहाय्य केल्याचा तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण ह्या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. ह्या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली; त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली (२४ डिसेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११).

*** सावरकरांना अंदमानात ४ जुलै १९११ रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली. तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले, पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचावयास घेतले.अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल ह्यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला.

**** सावरकरांची सशर्त मुक्तता १० मे १९३७ रोजी करण्यात आली.त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकरांनी हिंदुमहासभेतर्फे निःशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले : एक, भागानगरचा आणि दुसरा, भागलपूरचा. भागानगरचा लढा निझामाच्या अत्याचारांविरुद्घ होता. परिणामतः निझामाच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या, तेथे त्यांना पन्नास टक्के जागा निझामाला द्याव्या लागल्या. भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्घ होता.

* दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८). तीत सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली; तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. (काही माहिती मराठी विश्वाकोशातून )

महात्मा गांधी यांनी वर्ष १९३० मध्ये सावकरांची रत्नागिरी येथे जाऊन भेट घेतली होती तसेच महाराष्ट्राचे दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांनीही सावरकरांची रत्नागिरी येथे जाऊन भेट घेतली होती.त्यांवेळी त्यांनी त्यांची माफीवीर म्हणून नक्कीच गाठ घेतली नव्हती.

खाली सावरकरांचे १९६६ साली तत्कालीन सरकारने काढलेले सावरकरांचे पोस्ट तिकीट. खाली सावरकर यांचा दयेचा अर्ज, तसेच कै. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे आत्मचरित्रामधे सावरकर भेटीचे केलेले वर्णन.

हिंदू ह्र्दय सम्राट, स्वातंत्र्य वीर सावरकर यांना विनम्र अभिवादन
सावरकरांचा अंदमानला काळ्यापाण्याच्या शिक्षेचा कैदेत असतानाचा बिल्ला. त्यांचा बंदीक्रमांक 32778 वर दिसतो.
त्याखाली असलेली 121, 121A, 109, 302 ही सावरकरांवर लावली गेलेली कलमं.
पुढे त्यांच्या काळ्यापाण्याच्या शिक्षेचा कालावधी आणि कारावास सुरु होण्याचा व सुटकेचा दिनांक नमूद केलेला दिसतो.
त्या मधोमध आहे D. या D चा अर्थ Dangerous. धोकादायक. जे ब्रिटिशांना कळले होते, ते आजकालच्या तथाकथित जोकरछाप नेत्यांना कळणार नाही.
संदर्भ – British-Files-on-Savarkar-1911-21👇

*****************

तिमिराच्या क्षितिजावर
उगवे तेजोमयि गोलक
स्वतंत्रतेचा किरणस्रोत
देई वीर विनायक ll धृ.ll

मातृभूमिस्वातंत्र्यास्तव
आत्माsहुती देउनी
स्वतंत्रतेची यज्ञकुंडे
पेटविली जनमनीं
अधमफिरंगीऊरांत
घुसला तोचि तीक्ष्ण सायक
स्वतंत्रतेचा किरणस्रोत
देई वीर विनायक ll १ ll

हाती लेखणीखड्ग
घेऊनी लढला सेनानी
मृतवीरांना संजिवनी
देई तो शुक्रमुनी
हिंदुत्वाचे अमृत पाजी
तोचि हिंदुपालक
स्वतंत्रतेचा किरणस्रोत
देई वीर विनायक ll २ ll

त्यजुनि शिवाशिव
अस्पृश्यांना भेटवी शिवाला
जनरूढीमंथनीं हलाहल
टीकेचे प्याला
समानता आचरणी
आणी तो जनउद्धारक
स्वतंत्रतेचा किरणस्रोत
देई वीर विनायक ll ३ ll

देशभक्तिकोलूने
काढी तेल इंग्रजांचे
अंदमानचे मंदिर झाले
स्वदेशभक्तगणांचे
इथेच झाला शारदेकृपे
तो ‘कमला’नायक
स्वतंत्रतेचा किरणस्रोत
देई वीर विनायक ll ४ ll

श्री. मिलिंद दत्तात्रय करमरकर
२८-०५-२०१९ रोजी सुचलेली काव्यरचना
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयन्तीनिमित्त ही विनम्र आदराञ्जली
💐💐🙏🙏🚩🚩


सावरकर माने तेज
सावरकर माने त्याग
सावरकर माने तप
सावरकर माने तत्व
सावरकर माने तर्क
सावरकर माने तारुण्य
सावरकर माने तीर
सावरकर माने तलवार
सावरकर माने तिलमिलाहट

सागरा प्राण तळमळला…

तलमलाती हुई आत्मा… !
सावरकर माने तितिक्षा
सावरकर माने तीखापन

कैसा बहुरंगी व्यक्तित्व !
कविता और क्रांति ! …

कविता और भ्रांति तो साथ साथ चल सकते है ।
लेकिन कविता और क्रांती का साथ साथ चलना बहुत मुश्किल है…

सावरकरजी का कवी उंची से उंची उडान भरता था ।
सावरकरजी की कविता मे उंचाई भी थी और गहराई भी थी ! …

अटलबिहारी वाजपेयी

शुभप्रभात
✨✨✨☀️✨✨✨
🌺🌺🌺🚩🌺🌺🌺


सावरकर माने तेज,
सावरकर माने त्याग,
सावरकर माने तप,
सावरकर माने तत्व,
सावरकर माने तर्क,
सावरकर माने तारुण्य,
सावरकर माने तीर,
सावरकर माने तलवार।

-अटल बिहारी वाजपेयी जी की कविता ने उस महामानव से साक्षात्कार करा दिया जिसने हिन्दुओं का आत्मसम्मान जगा दिया और देश की स्वतन्त्रता के लिए बलिदानियों की सेना खड़ी कर दी…

आज हम स्मरण कर रहे हैं स्वातन्त्र्यवीर विनायक दामोदर सावरकर को। भारतीय स्वतंत्रता संग्राम के इतिहास में वो नाम, जिसे अंग्रेजी शासन ने सबसे कड़ा दण्ड दिया। काले पानी का दण्ड, वो भी एक नहीं दो बार, अर्थात् 50 वर्षों के लिए। पूरे इतिहास में इतना लम्बा दण्ड किसी भी स्वतन्त्रता सेनानी या क्रांतिकारी को नहीं दी गई। आज इनकी जयंती है। इन्हें वीर सावरकर के नाम से जाना जाता है। वीर सावरकर एक महान विचारक, साहित्यकार, इतिहासकार और समाजसुधारक थे। सावरकर ने अखंड भारत का सपना देखा। वे छुआ-छूत और जाति भेद के घोर विरोधी थे। उनकी पुस्तक ′भारत का प्रथम स्वतंत्रता समर 1857′ ने अंग्रेजों की जड़े हिला दी थी। अंग्रेजों के अंदर फिर से 1857 जैसी स्वन्त्रता संग्राम का डर समा गया। वे पहले भारतीय थे जिन्होंने 1905 में स्वदेशी का नारा दे कर विदेशी कपड़ो की होली जलाई थी। सावकर ऐसे भारतीय थे जिन्होंने ब्रिटिश साम्राज्य की राजधानी लंदन जा कर क्रांतिकारी आंदोलन को संगठित किया।

लंदन में सावरकर भारतीय छात्रों में राष्ट्रधर्म की अलख जगाने लगे। वहां वे क्रांतिकारियों की टोली बनाने लगे। सावरकर युवाओं के प्रेरणास्रोत बन गए। लंदन में ही उन्होंने 1857 के संग्राम की स्वर्ण जयंती मनाई। लंदन में ऐसा पहली बार था जब भारतीय छात्र जो लंदन यूनिवर्सिटी में पढ़ते थे सड़कों पर वंदे मातरम का बिल्ला लगा कर निकले।

भारतीय छात्रों में नई जागृति उत्पन्न हुई। वे भारतीय होने में गर्व महसूस करने लगे। जर्मनी में 1907 के राष्ट्रीय सोशलिस्ट कांग्रेस के अधिवेसन में मैडम कामा ने भारत का पहला झंडा फहराया। वीर सावरकर ने ही भारत का वो पहला झंडा बनाया था। लंदन में उनकी पुस्तक प्रथम स्वाधीनता समर 1857 छपने के लिए तैयार थी लेकिन ब्रिटिश शासन ने उनकी पुस्तक छपने से पहले ही प्रतिबंध कर दी। इस पुस्तक का पहला प्रकाशन गुप्त रूप से 1909 में हालैंड में हुआ। दूसरा लाला हरदयाल ने अमेरिका में, तीसरा संस्करण भगत सिंह और चौथा सुभाषचंद्र बोस ने छपवाया। इन पुस्तकों पर किसी लेखक का नाम नहीं होता था। इस पुस्तक को छपने नहीं देने का एकमात्र कारण था, अंग्रेजों के अंदर ये डर हो गया था कि इस किताब में 1857 के क्रांति को ऐसे दर्शाया गया था जिसे पढ़ कर फिर से वैसी क्रांति आरम्भ हो सकती थी। यह पुस्तक क्रांतिकारियों के लिए गीता के समान थी।

वीर सावरकर ने इंग्लैंड के राजा के प्रति निष्ठा की शपथ लेने से साफ मना कर दिया जिसके कारण उन्हें वकालत करने से रोक दिया गया।

13 मार्च, 1910 को ब्रिटिश सरकार ने सावरकर को ब्रिटिश सरकार विरोधी गतिविधियों के आरोप में बन्दी बना लिया। समुन्द्र के रास्ते उन्हें भारत लाया जा रहा था। वीर सावरकर का साहस था कि वो समुंद्र में कूद कर भाग निकले। बाद में फ्रांस के समुन्द्र तट पर उन्हें फिर पकड़ लिया गया। उनका अभियोग अंतरराष्ट्रीय अदालत हेग में लड़ा गया। ये पहला अवसर था जब किसी क्रांतिकारी का अभियोग अंतरराष्ट्रीय अदालत में लड़ा गया था। विनायक दामोदर सावरकर को दो जन्मों की कठोर कारावास की सजा मिली। कोर्ट में ब्रिटिश अधिकारी ने पूछा कि दो जन्मों का कारावास है यानी 50 वर्षों का सह पाओगे? वीर सावरकर ने जवाब में सवाल किया- तुम्हारी सत्त्ता तब तक रहेगी?

वीर सावरकर 1911 से 1921 तक अंडमान जेल में रहे।

यहां स्वतंत्रता सेनानियों को कड़ा परिश्रम करना पड़ता था। कैदियों को यहां नारियल छीलकर उसमें से तेल निकालना पड़ता था। साथ ही इन्हें यहां कोल्हू में बैल की तरह जुत कर सरसों व नारियल आदि का तेल निकालना होता था। इसके अलावा उन्हें जेल के साथ लगे व बाहर के जंगलों को साफ कर दलदली भूमि व पहाड़ी क्षेत्र को समतल भी करना होता था। रुकने पर उनको कड़ी सजा व बेंत व कोड़ों से पिटाई भी की जाती थीं। इतने पर भी उन्हें भरपेट खाना भी नहीं दिया जाता था।

1921 में वे स्वदेश लौटे और फिर 3 साल जेल भोगी। जेल में ‘हिन्दुत्व’ पर शोध ग्रंथ लिखा।

दुनिया के वे ऐसे पहले कवि थे जिन्होंने अंडमान के एकांत कारावास में जेल की दीवारों पर कील और कोयले से कविताएं लिखीं और फिर उन्हें याद किया। इस प्रकार याद की हुई 10 हजार पंक्तियों को उन्होंने जेल से छूटने के बाद पुन: लिखा।

सावरकर ने 10000 से अधिक पन्ने मराठी भाषा में तथा 1500 से अधिक पन्ने अंग्रेजी में लिखा है। बहुत कम मराठी लेखकों ने इतना मौलिक लिखा है। उनकी “सागरा प्राण तळमळला”, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “जयोस्तुते”, “तानाजीचा पोवाडा” आदि कविताएँ अत्यन्त लोकप्रिय हैं। स्वातंत्र्यवीर सावरकर की 40 पुस्तकें मण्डी में उपलब्ध हैं, जो निम्नलिखित हैं-

अखंड सावधान असावे ; १८५७ चे स्वातंत्र्यसमर ; अंदमानच्या अंधेरीतून ; अंधश्रद्धा भाग १ ; अंधश्रद्धा भाग २ ; संगीत उत्तरक्रिया ; संगीत उ:शाप ; ऐतिहासिक निवेदने ; काळे पाणी ; क्रांतिघोष ; गरमा गरम चिवडा ; गांधी आणि गोंधळ ; जात्युच्छेदक निबंध ; जोसेफ मॅझिनी ; तेजस्वी तारे ; प्राचीन अर्वाचीन महिला ; भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने ; भाषा शुद्धी ; महाकाव्य कमला ; महाकाव्य गोमांतक ; माझी जन्मठेप ; माझ्या आठवणी – नाशिक ; माझ्या आठवणी – पूर्वपीठिका ; माझ्या आठवणी – भगूर ; मोपल्यांचे बंड ; रणशिंग ; लंडनची बातमीपत्रे ; विविध भाषणे ; विविध लेख ; विज्ञाननिष्ठ निबंध ; शत्रूच्या शिबिरात ; संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष ; सावरकरांची पत्रे ; सावरकरांच्या कविता ; स्फुट लेख ; हिंदुत्व ; हिंदुत्वाचे पंचप्राण ; हिंदुपदपादशाही ; हिंदुराष्ट्र दर्शन ; क्ष – किरणें।

फरवरी, 1931 में इनके प्रयासों से मुम्बई में पतित पावन मन्दिर की स्थापना हुई, जो सभी हिन्दुओं के लिए समान रूप से खुला था। वे पहले भारतीय राजनीतिक बन्दी थे जिसने एक अछूत को मन्दिर का पुजारी बनाया था।

25 फ़रवरी 1931 को सावरकर ने बम्बई प्रेसीडेंसी में हुए अस्पृश्यता उन्मूलन सम्मेलन की अध्यक्षता की।

1937 में वे अखिल भारतीय हिन्दू महासभा के कर्णावती (अहमदाबाद) में हुए 19वें सत्र के अध्यक्ष चुने गये, जिसके बाद वे पुनः सात वर्षों के लिये अध्यक्ष चुने गये। 13 दिसम्बर 1937 को नागपुर की एक जन-सभा में उन्होंने अलग पाकिस्तान के लिये चल रहे प्रयासों को असफल करने की प्रेरणा दी थी। 22 जून 1941 को उनकी भेंट नेताजी सुभाष चंद्र बोस से हुई। 9 अक्टूबर 1942 को भारत की स्वतन्त्रता के निवेदन सहित उन्होंने चर्चिल को तार भेज कर सूचित किया। सावरकर जीवन भर अखण्ड भारत के पक्ष में रहे।

सावरकर, सार्जेंट मेजर मोहनदास गांधी के कटु आलोचक थे। उन्होने अंग्रेजों द्वारा द्वितीय विश्वयुद्ध के समय जर्मनी के विरुद्ध हिंसा को गांधीजी द्वारा समर्थन किए जाने को ‘पाखण्ड’ घोषित दिया।

सावरकर ने भारत की आज की सभी राष्ट्रीय सुरक्षा सम्बन्धी समस्याओं को बहुत पहले ही भाँप लिया था। 1962 में चीन द्वारा भारत पर आक्रमण करने के लगभग दस वर्ष पहले ही कह दिया था कि चीन भारत पर आक्रमण करने वाला है।

भारत के स्वतंत्र हो जाने के बाद गोवा की मुक्ति की आवाज सबसे पहले सावरकर ने ही उठायी थी।

ऐसे महामानव के विषय में जितना लिखा जाए उतना कम है।

वे केवल एक क्रांतिकारी नहीं थे अपितु एक भाषाविद, बुद्धिवादी, कवि, दृढ राजनेता, समर्पित समाज सुधारक, दार्शनिक, द्रष्टा, महान् कवि और महान् इतिहासकार और ओजस्वी वक्ता भी थे। उनके इन्हीं गुणों ने महानतम लोगों की श्रेणी में उच्च पद पर लाकर खड़ा कर दिया।

माँ भारती के इस सच्चे सपूत को उनकी जयन्ती पर कोटि-कोटि वन्दन है 🙏🏼

🌹⚜🌹🔆🌅🔆🌹⚜🌹

    🌻 आनंदी पहाट 🌻

       भारतमातेच्या
   महन्मंगलेच्या प्रार्थनेची
 स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

🌹⚜🌸🔆🇮🇳🔆🌸⚜🌹

  भारत देशाप्रती जाज्वल्य निष्ठा आणि देशप्रेमाचे दुसरे नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यागाचे दुसरे नाव म्हणजे सावरकर. भारताच्या भविष्यकाळाची चिंता करुन योग्य मार्गदर्शन करणारे द्रष्टे नेतृत्व म्हणजे सावरकर.
  आज नाशिकची.. भगूरची ओळख जगाला आहे ती श्री. विनायक दामोदर सावरकर या नावामुळे. चाफेकर बंधूंच्या फाशीने दुःखी झालेल्या सावरकरांनी सूर्य न मावळणाऱ्या ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याची प्रतिज्ञाच केली अन् अव्दितीय त्यागाने ती पूर्णही केली.
  स्वा. सावरकर सामान्य कुटुंबातले. बालपणीच आईने जगाचा निरोप घेतला. येसूवहिनीने सांभाळ केला. त्यांनी भारतमाता हीच खरी आई मानली अन् परदास्याच्या शृंखलातून मातेच्या सुटकेसाठी अंदमानात कोरडे खात रक्त सांडले. जगविख्यात ठरलेली मार्सेलीसच्या समुद्रात उडी घेणारे पराक्रमी सावरकरच.
  दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठावताच.. ५० वर्षे जन्मठेप ? पण तोपर्यंत तुमचे सरकार तरी असेल का ? असा १९११ साली निडरपणे प्रश्न विचारणारे सावरकरच. जातीभेद निर्मुलन चळवळ करणारे.. महान कवी.. साहित्यिक.. उत्कृष्ट वक्ते.
  स्वातंत्रवीर हे द्रष्टे राजकीय भविष्यवेत्ते होते. त्यांची विधाने काळाने सत्य ठरवली, म्हणूनच पंतप्रधान अटलजी असो वा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अशा अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना आदर्श मानले.
  स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने बलाढ्य ब्रिटिश सत्तेला धडकी भरायची. तिन्ही सावरकर बंधू आणि त्यांच्या घराण्याने भारतमाते साठी सर्वस्व त्याग केला.. अनन्वित अत्याचार सहन केले आणि तरीही अपूर्व त्यागानंतरही श्रेयापासून दूर राहणेच पसंत केले.
  विनायक सावरकर हे अत्युच्च प्रतिभेचे धनी. जसे अंतरंग तसे शब्द प्रकटतात. बालवयापासूनच स्वदेशप्रेम असे की वयाच्या अकराव्या वर्षीच शब्दांशब्दातून देशप्रेमाने भरलेला स्वदेशीचा मंत्र लिहला. त्यांच्या प्रत्येक शब्दांत.. प्रत्यक्ष कृतीत केवळ आणि केवळ देशप्रेम ओतप्रोत भरलेले आहे. 
  स्वातंत्र्यासाठी देशासमोर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला. शिवप्रभूंची आरती असो.. तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा असो वा १८५७ चे स्वातंत्र्य समर हे सारे लोकांमध्ये देशाप्रतीच्या प्रेम वाढविणारे.. जनजागृती करणारे काव्य. अंदमानच्या कोठडीत कोळशाने महाकाव्य लिहणारा वि. दा. सावरकरांसारखा महाकवी पुनश्च होणे नाही.
  सावरकर या एकाच व्यक्तींची ओळख मोठी. प्रखर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक.. राजकारणी.. समाजसुधारक.. हिंदू तत्वज्ञ.. भाषाशुद्धी व लिपीशुद्धी चळवळ करणारे अशी वेगवेगळी ओळख आहे.
  भारताच्या परम वैभवासाठी सेल्युलर जेलमधील सहन केलेले अनन्वित अत्याचाराची सदैव आठवण आज लोकशाहीत मुक्त स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या प्रत्येक भारतीयाला प्रत्येक क्षणी हवीच. तत्कालीन शत्रू राष्ट्र ब्रिटिशांनीही त्यांचा देशासाठीच्या त्यागाचा सन्मान करुन, इंग्लंडमधे त्यांचा पुतळा उभारला. असे हे अजातशत्रू सावरकर. आज जयंती दिनी विनम्र अभिवादन.
  "तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण.." हा देशप्रती जनतेला मंत्र. भारतमातेचे महन्मंगलाचे हे गीत..

🌹🇮🇳🌸🔆🇮🇳🔆🌸🇮🇳🌹

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

🌹⚜️🌸🇮🇳🙏🇮🇳🌸⚜️🌹

गीत : स्वातंत्र्यवीर सावरकर ✍
संगीत : मधुकर गोळवलकर 🎹
स्वर : लता मंगेशकर 🎤

🎼🎶🎼🎶🎼 🎧

🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹   २८.०५.२०२१

शतजन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थानबद्धतेत असताना अनेक नाटके लिहिली, त्यातील सन्यस्त खड्ग हे नाटक
९० वर्षापुर्वी १८सप्टेंबर१९३१ रोजी बळवंत संगीत मंडळींनी रंगभूमीवर आणले.त्यातील काही गीते त्यांनी लिहिली होती त्यातील शतजन्म शोधिताना
शोधिताना हे एक नाट्यगीत . भैरवी रागात असून ते वझेबुवांनी संगीतबद्ध केले होते. मास्टर दीनानाथ पंडित वसंतराव देशपान्डे तसेच प्रभाकर कारेकर यांनी ते गायले . याखेरीज या नाटकातील आणखी सहा गीतेही त्यांनीच लिहिली होती .
शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥
हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥
. . . . . नवी भर दि.१८-०९-२०२१

🌻⚜🌹⚜🇮🇳⚜🌹⚜🌻

रणी राष्ट्र स्वातंत्र्य युद्धासी ठेले
मरे बाप बेटे लढयासी आले
किती भिन्न रुपॆ किती भंग होतो
तरी राम अंती जयालाच देतो

 • सावरकर

पडत्या देशाला सावरणारे हिंदूराष्ट्रपिता स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम

🌻⚜🌹⚜🇮🇳⚜🌹⚜🌻 🌻⚜🌹⚜🇮🇳⚜🌹⚜🌻

द्वारकानाथ संझगिरी यांचा लेख

काही वर्षांपूर्वी अंदमानच्या पोर्टब्लेअर विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं गेलं. त्याला मार्क्सवाद्यांनी विरोध केला. सावरकर अंदमानच्या तुरूंगातून माफी मागून सुटले वगैरे आरोप त्यांनी केले होते. मला मार्क्सवाद्यांनी कीव आली. ”अंदमाना, हे मार्क्सवाद्यांचे बोबडे बोल मनावर घेऊ नकोस. तुझं सोनं झालंय” हे सांगण्यासाठी मी लिहिलेले स.न.वि.वि. या पुस्तकातील हे पत्र.

प्रिय अंदमान,
स. न. वि. वि.

तुझ्या पोर्टब्लेअरच्या विमानतळाला आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं आणि माझी तबियत खूश झाली. तूही सुखावला असशील ना? त्यांच्यासारख्या क्रांतिकारकांमुळे तू जगाला ज्ञात झालास. ते तुझ्या इथे आलेल्या क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते.
सांग ना, नाही तर आधी तुझं अस्तित्व काय होतं? एक भूगोल असलेला भूभाग! पण इतिहास नाही. चिनी प्रवासी इत्सिंग आणि मार्को पोलोच्या प्रवासवर्णनात तुझा उल्लेख आढळतो. पण बस तेवढ्यापुरताच! आधुनिक संस्कृतीचा स्पर्शच तुला झाला नव्हता.

साहसी गोरे आले आणि तुझ्या इथे वसाहत टाकली. कॅप्टन ब्लेअर तुझ्याकडे आरमार घेऊन आला. तुझ्या इथली रानटी माणसं, श्वापदं आणि घनदाट जंगलं पाहून गोऱ्यांनाही रानटी कल्पना सुचल्या. त्यांनी तिथे अट्टल गुन्हेगारांसाठी जेल बनवले. त्या रानटी वातावरणाला शोभा आणतील असे जेलर ठेवले. मी असं ऐकलंय की तुझ्या इथे असे काही खेकडे आहेत, जे माडाच्या झाडावर चढतात आणि त्यांची नांगी स्ट्रॉसारखी वापरून नारळातलं पाणी पितात? खरंच त्या गोऱ्यांच्या जेलमध्ये जेलर्ससुद्धा खेकडेच होते. तो सावरकरांना छळणारा बारी काय होता? ते कैद्यांचं रक्त प्यायचे. माणसांचं रूप घेतलेले ते खेकडे होते. गोऱ्यांनी तुझं नाव ‘काळं पाणी’ करून टाकलं. ज्याला हालहाल करून मारायचं असेल त्याला ते काळ्या पाण्याला पाठवत. आपल्या १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातले स्वातंत्र्यसैनिकही तुझ्याच जेलमध्ये पाठवले गेले होते. पण ४ जुलै १९११ रोजी ‘महाराजा’ बोट तुझ्या बेटाला लागली आणि इतिहासच तुझ्या धक्क्याला लागला. हातापायात लोखंडी बेड्या ठोकलेला एक तरतरीत बॅरिस्टर त्या बोटीतून उतरला.

साखळदंडांत गुरफटलेल्या दरोडेखोरांची तुला सवय होती, पण हा साधासुधा दरोडेखोर नव्हता. त्याने पैशासाठी कुणाला मारलं नव्हतं. तो ब्रिटिश साम्राज्यावर दरोडा टाकायला निघाला होता. त्यासाठी त्याने स्वतःच्या घराची राखरांगोळी केली होती. तो जवळपास दहा वर्षे तिथे राहिला. हालअपेष्टा भोगल्या. नरक नरक म्हणतात तो कसा असावा याचा त्याने जिवंतपणी अनुभव घेतला. कुणी मानो ना मानो, ती दहा वर्षे मला आमच्या इतिहासाची सोनेरी पानं वाटतात. बॅ. विनायक दामोदर सावरकर तुझ्या कुशीत स्वातंत्र्यवीर झाले.

१९४२ साली असाच एक स्वातंत्र्याचं वारं प्यायलेला आयसीएस तुझ्यापाशी आला. त्याने तुला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केलं. तिथल्या बंदिवानांना सोडलं. तू त्या दिवशी नक्कीच नि:श्वास सोडला असशील. नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पदस्पर्श हा तुझ्या भूमीला झालेला इतिहासाचा दुसरा पदस्पर्श होता. त्यानंतर तुझा भूगोल विसरला गेला. तुझं नाव घेतलं की चटकन आठवतो तो इतिहास!!

पण ज्यांनी तुला इतिहास दिला त्या वीर सावरकरांचं नाव तुझ्या पोर्टब्लेअरच्या विमानतळाला दिल्यावर काही मार्क्सवादी मंडळींच्या पोटात दुखलं. तुझ्या बंदराला पोर्टब्लेअर म्हटलेलं आम्हाला खटकत नाही, विमानतळाला आपल्याच एका सुपुत्राचं नाव मात्र खटकतं. का? तर म्हणे सावरकर ब्रिटिशांची माफी मागून तुझ्या तुरुंगातून बाहेर पडले. होय, सावरकरांनी ब्रिटिशांना राजकारणात न पडण्याची हमी दिली. ज्याला पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती त्याला ब्रिटिश हार-तुरे, श्रीफळ देऊन ‘जा मुक्त संचार कर’ असं सांगणार नव्हतेच. थोडंसं पडतं घेऊनच त्यांना तुरुंगातून बाहेर पडणं शक्य होतं. पण शेवटी तुरुंगात राहण्यापेक्षा बाहेर पडूनच ते देशसेवा जास्त चांगल्या रीतीने करू शकणार होते आणि लादलेल्या अटींतून ब्रिटिशांचा डोळा चुकवून कसं राष्ट्रकार्य करायचं हे सावरकरांपेक्षा जास्त चांगलं कुणाला ठाऊक होतं? रत्नागिरीच्या नजरकैदेत असताना त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य तर केलंच, पण त्यांना राजकारणात पडायची परवानगी नसतानाही देशभरातल्या क्रांतिकारकांशी त्यांचे छुपे संबंध होते. ब्रिटिश पोलीस त्यांच्यावर धाडी घालत. पण सावरकरांनी स्वतःला त्यातून फार चतुराईने वाचवलं होतं.

तरीही स्वातंत्र्यवीरांनी तुझ्या तुरुंगातल्या हालअपेष्टांना कंटाळून जीवाच्या भीतीने ब्रिटिशांची माफी मागितली असं जर कुणाला म्हणायचं असेल तर त्याने आपलं डोकं चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाला दाखवावं. होईल तो खर्च मी करायला तयार आहे. त्यांनी जेव्हा पिस्तुल आणि बॉम्बशी खेळायचं ठरवलं तेव्हाच त्यांना त्यांचा शेवट ठाऊक होता. स्वातंत्र्य किंवा मृत्यू!
ज्या काळात मोठमोठे गुन्हेगार काळ्या पाण्याच्या नावाने चळाचळा कापायचे तेव्हा पन्नास वर्षांची शिक्षा ऐकल्यावर स्वातंत्र्यवीर म्हणाले, “ब्रिटिश साम्राज्य तरी पन्नास वर्षे टिकेल का?”
पळणारा माणूस हा उद्धटपणा दाखवू शकत नाही.
त्यांची बायको जेव्हा त्यांचा निरोप घ्यायला आली तेव्हा स्वातंत्र्यवीर म्हणाले, “मुला-मुलींची वीण वाढवणे आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणायचा असेल तर असले संसार कावळे- चिमण्याही करतात. पण संसाराचा याहून भव्य अर्थ घ्यायचा असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपण कृतकृत्य झालो आहोत. आपली चार चूल बोळकी आपण फोडून टाकली, तर त्यायोगे पुढे-मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल.”
पाहिलेत विचार? ज्या पिढीला पाहिलेलंही नाही त्यांचा विचार करणारी ही माणसं होती. आजच्या राजकारण्यांच्या घरातून जो सोन्याचा धूर निघतो ना ती चिमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या अनेक ज्ञात- अज्ञात मंडळींच्या त्यागावर उभी आहे. त्यांनी कोलू फिरवला, काथ्या कुटला, चाबकाचे फटके खाल्ले, सापांचे तुकडेमिश्रित भाजी पचवली. पाण्यात कालवून भात खाल्ला म्हणून स्वातंत्र्याचा पुलाव आपल्या ताटात पडला. म्हणून लोकशाहीच्या सर्वोच्च सदनात खासदारांना निर्भयपणे बोलता येतं. पण या लोकशाहीचा एकच दुर्गुण आहे. ती कुणालाही जीभ उचलून टाळ्याला लावायची परवानगी देते. त्यामुळे बोबडे बोलही ऐकून घ्यावे लागतात.

एक गोष्ट खरी की, सावरकरांनी शारीरिक यातना प्रचंड सोसल्या. ते काही आडदांड शरीराचे नव्हते आणि शरीर आडदांड असलं तरी कोलू आणि हंटरपुढे फार काळ तग धरू शकत नाही. बैलाची कामं माणसं नाही करू शकत. त्यामुळे आयुष्य संपवून टाकावं असं सावरकरांनाही काही वेळा वाटलं. इंदुभूषण रॉय किंवा आशुतोष लाहिरींसारख्या क्रांतिकारकांनी स्वतःला फास लावून घेतला होता. जो माणूस मृत्यूला आपल्याबरोबर सावलीसारखा घेऊन फिरला आणि शेवटी मृत्यूला कॉलर पकडून धरलं, तो घाबरून माफी मागेल? (टेल धिस जोक टू समबडी एल्स!) त्यांनी तुरुंगाबाहेर पडण्यासाठी मान्य केलेल्या शर्तीना माफी म्हणणं हा त्यांच्या त्यागाचा अपमान आहे.

मार्क्सवादी खासदारांनी म्हणे सावरकरांची नेताजींबरोबर तुलना केली म्हणूनही आगपाखड केली. अंदमाना, तूच सांग या दोन तेजस्वी सुपुत्रांत तू उजवं-डावं करू शकतोस? मला मान्य आहे नेताजी स्वयंभू होते. सावरकरांनी सांगितलं म्हणून त्यांनी देशाबाहेर पलायन केलं आणि आझाद हिंद सेना काढली असं मी म्हणणार नाही. पण त्यांचे काँग्रेसचे मोठमोठे नेते सोडून नेताजींना सावरकरांशी याबाबतीत विचारविनिमय करावासा वाटला यात दोघांचे सूर कुठे तरी जुळत होते असं वाटत नाही?

पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्सवाद्यांनी सावरकरांना राष्ट्रप्रेम शिकवणं हे पार्थिव पटेलने किरमाणीला यष्टिरक्षण शिकवण्यासारखं आहे. मला कार्ल मार्क्सबद्दल प्रचंड आदर आहे. मार्क्सवादाच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आदर आहे. पण काही अपवाद वगळले तर भारतीय मार्क्सवाद्यांबद्दल आदर बाळगण्यासारखं काही नाही. या मंडळींनी बऱ्याचदा सावरकरांच्या हिंदू महासभेचा पाठिंबा घेतला होता. बरं, सावरकरांनाही साम्यवादाबद्दल राग वगैरे नव्हता. एकदा त्यांना जी. पु. गोखलेंनी साम्यवादाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, मला हिंदुस्थानात साम्यवाद्यांचं राज्य आलं तरी चालेल पण नेभळटांचं नको. ते आल्याने धर्माचं प्राबल्य कमी होईल. मला त्यांचे सर्वच मार्ग आवडतील असं नाही. चर्च, परकीय मिशनरी, मुल्ला-मौलवी, मशिदी यांचं प्राबल्य कमी होईल. त्याचबरोबर आमच्या मंदिरांचाही नाश करतील हे साम्यवादी, पण चर्च-मशिदी पडल्यावर मंदिरं पडली तर बिघडलं कुठे? जुन्या रूढी, भोळसट कल्पना नष्ट झाल्या तर आधुनिक शास्त्रावर आधारलेला, बहुसंख्याकांना पोषक म्हणजे हिंदूंना पोषक असा धर्म राहील ना? मग हिंदुत्वाचे आम्ही आग्रही तरी काय मागतो आहोत? आम्हाला प्रगत आणि उन्नत असं हिंदुत्व हवंय.’

कळलं ना, हा माणूस काय होता तो! तो मार्क्सवाद्यांपेक्षाही आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होता.

असो. अंदमाना, तू तरी गैरसमज करून घेऊ नकोस. त्या पुण्यात्म्याने तुझ्याकडे वास्तव्य केल्यामुळे तू फक्त थेट राहिला नाहीस. तू फक्त टुरिस्ट स्पॉट राहिलेला नाहीस. तुझं तीर्थक्षेत्र झालंय. तुझं सोनं झालंय सोनं. तू कृतार्थ झालायस.

तू तरी त्यांचा कृतज्ञ राहा!

तुझा,
द्वारकानाथ संझगिरी

(स.न.वि.वि. या पुस्तकातून)

🌻⚜🌹⚜🇮🇳⚜🌹⚜🌻

💐💐🙏🙏🚩🚩

स्वातंत्र्यवीर सावरकर

-अविनाश धर्माधिकारी

कार्ल मार्क्सच्या मृत्यूच्याच वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आले – 1883 – हा इतिहासात आपोआपच जुळून आलेला, पण अर्थपूर्ण योगायोग आहे. दोघंही कट्टर इहवादी, नास्तिक, तर्ककठोर विज्ञाननिष्ठ. पण मार्क्सनं संपूर्ण मानवी इतिहास वर्गयुद्धाच्या चौकटीत बसवून ‘राष्ट्र’ ही संकल्पनाच ‘बूर्झ्वा’ – शोषकांच्या हातातलं हत्यार – ठरवली. तर सावरकरांनी ‘राष्ट्र’ – तेही ‘हिंदूराष्ट्र’ चिंतनाला आपलं सर्वस्व अर्पण केलं.
असं म्हटलं जातं की सावरकरांना कुणीतरी कधीतरी विचारलं होतं, तुम्ही मार्क्स वाचलाय का, तर सावरकरांनी आपल्या खास शैलीत प्रतिसाद दिला होता – मार्क्सला विचारा त्यानं सावरकर वाचला होता का. आता, मार्क्सच्या मृत्यूच्या वर्षी सावरकर जन्माला आल्यावर बिचारा मार्क्स कुठून, कधी वाचणार सावरकरांना? पण सावरकरांच्या विधानाचा असा अर्थ होऊ शकतो की मार्क्सचं मानव विषयक चिंतन म्हणे मूलगामी आणि सखोल असेलही, पण सावरकरांचं चिंतन आणि कार्यही तितकंच मूलगामी आणि सखोल आहे. फक्त सावरकरांच्या चिंतनाला ‘राष्ट्रीयत्वा’ची ‘फ्रेम ऑफ रेफरन्स्’ आहे.
आधुनिक भारत UN मधे शत्रूराष्ट्रांना जोडा दाखवू शकेल असं समर्थ राष्ट्र झालं पाहिजे आणि तसं होण्यासाठी ‘महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे’, असं स्वप्न पडतं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच. ते सत्यात आणण्यासाठी साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा, आणि बंदुका हाती घ्या’ असं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगतात त्या साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वतंत्र आणि समर्थ भारत हे स्वप्न होतं. 1965 च्या लढाईत भारतानं पाकवर मात केली तेव्हा सावरकरांनी ठरवलं की आता हा देह ठेवावा. त्यांनी योगी पुरुषाच्या नि:संगतेनं प्रायोपवेशनाचा प्रारंभ केला आणि 26 फेब्रुवारी 1966 ला देह ठेवला. 1898 मधे चाफेकर बंधू फासावर जाणार होते. त्या रात्रभर अस्वस्थ होऊन जागरण करणार्‍या ‘विनायक’नं भगूरमधल्या घरातल्या देवीसमोर 15 व्या वर्षी प्रतिज्ञा केली ‘मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन!’ या प्रतिज्ञेनं सुरू झालेला यज्ञ पुढे 69 वर्षे, जीवनाच्या सर्व अंगात प्रतिभासंपन्न स्पर्श करत पेटता राहिला. बंडखोर विद्यार्थी, कुशल संघटक, इतिहासकार, क्रांतिकारक, काळ्या पाण्याला पुरून उरलेला मृत्युंजय, समाजसुधारक, लेखक, कवी, नाटककार, भाषा-प्रभु, विज्ञाननिष्ठ-विवेकनिष्ठ-बुद्धीवादी विचारवंत, जात्युच्छेदनाची भाषा करून कृतीचा मार्ग दाखवणारा मूर्तिभंजक समाज क्रांतिकारक अशा सर्व रूपांमधून सावरकर सतत समृद्धपणे समोर येत राहतात.
त्यांच्या सर्वांगीण प्रतिभेच्या मध्यभागी असतो भारत.
त्या भारताला सावरकरांनी हिंदुराष्ट्र म्हटलं त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या निशाणीला नाव दिलं ‘हिंदुत्व.’ स्वातंत्र्योत्तर भारताला कार्यक्रम दिला ‘सैन्याचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण’
त्यामुळे सावरकरांकडे पाहण्याचे दोन टोकाचे दोन दृष्टिकोन तयार झाले. ‘हिंदुत्व’च्या विचारधारेवर निष्ठा ठेवणार्‍या अनेकांना बुद्धीनिष्ठ-विवेकनिष्ठ-विज्ञाननिष्ठ आणि जाती-उच्छेदांची भाषा करणारे सावरकर पचनी पडत नाहीत. तर सेक्युलर-समाजवादी वगैरे म्हणणारे ‘डावे’ सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ संज्ञेकडे पाहून सगळेच सावरकर निषिध्द ठरवतात; नव्हे नव्हे, त्यांच्या विचारांचं विकृतीकरण करतात. ‘हे मातृभूमी तुजला मन वाहियेले’ म्हणत देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्‍या सावरकरांना पार ब्रिटिशांचे धार्जिणे म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल जाते.
‘Annihilations of caste’ हे आंबेडकरांप्रमाणेच सावरकरांचंही ध्येय आहे. म्हणून सावरकरांनी चवदार तळं आणि काळाराम मंदीर सत्याग्रहांमध्ये आंबेडकरांना पाठिंबा दिला. रत्नागिरीत दलितांच्या हस्ते पतितपावन मंदिराची उभारणी करून ‘वेदोक्ता’चा अधिकार सर्वांसाठी खुला करायची भूमिका घेतली. त्यांना आज ‘मनुवादी’ ठरवायचे प्रयत्न केले जातात.
गांधीजींच्या हत्येच्या आरोपातून सन्मानपूर्वक मुक्तता झाली तरी सावरकरांवरचे आरोप अखंडपणे चालूच राहतात. त्यामुळे अंदमानमधल्या विमानतळाला सावरकरांचं नाव देण्याला विरोध – संसदेमधे सावरकरांची प्रतिमा लावायला विरोध – तो अर्थात राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी जुमानला नाही, हे आपलं भाग्यच. सुभाषबाबू आणि सावरकरांची भेट झाली होती म्हटलं तर ‘डाव्यां’ना वाटतं सुभाषबाबूंचा अपमान केला. म्हणून मंत्रीपदावर असताना मणिशंकर अय्यर अंदमानच्या सेल्युलर जेलमधल्या सावरकरांच्या काव्यपंक्ती काढून टाकून – खरं सावरकरांच्या देशभक्तीचा अपमान करतात. मतभेदांचा आदर करायचा असतो, मतभिन्नतेमुळं सावरकरांचं मोठेपण कमी होत नाही हे समजण्याची शालीनता ते दाखवत नाहीत.
अशी शालीनता स्वातंत्र्यपूर्व किंवा उत्तरकाळातले लोकनेते दाखवत होते. सावरकरांचे आणि गांधींजीचे टोकाचे मतभेद होते, पण दोघांच्याही चारित्र्य, कर्तृत्वत्यागाबद्दल (प्रसंगी सावरकरांनी गांधीजींवर तीव्र टीका केली असली किंवा गांधीजींनी एकदा ‘कोण सावरकर?’ म्हटलं असलं तरी) परस्परांना आदर होता. सावरकरांना अंदमानमधून मुक्त केलं पाहिजे असं गांधीजींनी वेळोवेळी म्हटलं. तर गांधीवादाशी कट्टर मतभेद असले तरी निझामाच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतांना, सावरकरांच्या अध्यक्षतेखालच्या ‘हिंदू महासभेनं’ ‘भागानगरचा सत्याग्रह’च केला. पुढे देशाची रक्तबंबाळ शोकांतिका झाली तरी फाळणीला दोघांचाही विरोध होता, त्यामुळं दोघांनी 15 ऑगस्टला ‘काळा दिवस’ मानलं. आता व्यवहार्य नाही, आणि बहुधा होऊ पण नये – पण दोघांनीही, आपापल्या अलग कारणांसाठी – पण फाळणीची ऐतिहासिक (चूक) दुरुस्त करून, पुन्हा अखंड भारत व्हावा असं स्वप्न पाहिलं.
स्वातंत्र्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणार्‍या आपापल्या संघटना आता स्वातंत्र्यानंतर विसर्जित कराव्यात असं दोघंही म्हटले. अर्थात काँग्रेसनं गांधीजींचं ऐकलं नाही, सावरकरांनी ‘अभिनव भारत संघटना’ विसर्जित केली. ती विसर्जन करण्याच्या समारंभात तत्कालीन भारताच्या राजकीय चित्राचा आढावा घेत, आपल्याला सगळ्यात जवळचं कोण – तर सावरकर सांगतात, गांधीजी.
आपल्या ‘कृष्णाकाठ’ या असामान्य आत्मचरित्रात यशवंतराव चव्हाण आपण सावरकरांच्या आकर्षणानं कसे कर्‍हाडहून रत्नागिरींला गेलो ते सांगतात. तर ‘संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश’ आणल्यावर सावरकर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण या ‘मर्दमराठ्या’ च्या पाठिशी उभं राहयला सांगतात.
सावरकरांच्या कल्पनेतला स्वतंत्र भारत ‘एक व्यक्ती एक मत’ या सुत्रावर आधारित प्रजासत्ताक लोकशाही आहे. त्यामधे कोणाही विशिष्ट धर्माला ‘राजमान्यता (State Religion) नाही. मुस्लिम द्वेष नाही पण हा देश 15 ऑगस्टला अस्तित्वात आलेला नाही किंवा तो ब्रिटिशांनी एकराष्ट्रीयत्वाच्या सूत्रात गुंफलेला नाही. तर या देशाची एकात्मता पाच हजार वर्षे अखंड चालत आली आहे, त्याला सावरकरांनी ‘हिंदुत्व’ ही संज्ञा वापरली. स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं ती संवैधानिक ठरवली आहे.
प्रामाणिकपणे सखोल उतरून सावरकर समजावून घेण्याची इच्छा असणार्‍यांनी शेषराव मोरे यांचे ग्रंथ वाचावेत आणि समग्र सावरकर साहित्याचे मुळातून आकलन करून घ्यावं.
समाजवादी जीवननिष्ठा जगलेले, खरे उदारमतवादी एस्.एम्. ‘आण्णा’ – एकदा म्हणाले होते की आम्हाला 1923 पूर्वीचे सावरकर मान्य आहेत – (सावरकरांचा ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ 1923 मध्ये प्रकाशित झाला). त्यांना प्रतिसाद देताना सुधीर फडके ‘बाबूजी’ म्हणाले होते, तुम्हाला 1923 पर्यंतचे सावरकर आज 50 वर्षांनंतर कळायला, पटायला लागले, तर 1923 नंतरचे सावरकर आणखी 50 वर्षांनी कळतील!
ती 50 वर्षं आता पूर्ण होत आलीत. समर्थक किंवा विरोधक, सर्वांनाच सावरकर कितपत समजू लागलेत हे ज्याचं त्यानं ठरवावं. चांगल्या इंग्लिशमध्ये जसं वर्णन असतं – You can love him or you can hate him, but you cannot neglect him – असं आज सावरकरांचं स्थान आहे. एकेकाळी हृदयनाथ मंगेशकरांना सावरकरांच्या गाण्यांना चाल लावली म्हणून आकाशवाणीवरची नोकरी गमवावी लागली होती – असं उदंड ‘सेक्युलर’ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नांदत होतं! आता ‘जयोस्तुते’ आणि ‘सागरा प्राण तळमळला’ या सार्वकालिक श्रेष्ठ कलाकृती ठरल्या आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासहित अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये पुजारी होण्यासाठी जातीचे निकष संपले. स्त्रिया आणि दलितांसहित सर्वांसाठी सन्मानानं मंदिरं खुली होताहेत. अजूनही वाट खूप लांबची चालायची आहे. पण नवा समर्थ भारत साकारला जातोय, हे निश्‍चित.
आजही आपण विवेकनिष्ठ-बुद्धीनिष्ठ-विज्ञाननिष्ठ असायला हवं. जातीपाती विसर्जित करून, एकात्म, समतापूर्ण समाज उभा करण्याच्या कामाला लागायला हवं. मराठी भाषा प्रवाही, विकसनशील ठेवतांना, नवे नवे प्रवाह सामावून घेताना भाषेची ओळखच पुसून जाणार नाही ना, एवढी भाषाशुद्धीची चळवळ चालू ठेवायला हवी. मराठीची ‘अभिजात’ता जपताना, नवं ज्ञान, नव्या संज्ञा, संकल्पना, संशोधन मराठीत होईल.. व्याकरण-मात्रा-वृत्त-छंद जपत जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रतिभेला नवे धुमारे फुटतील… अशासाठी काम करायला हवं.

अविनाश धर्माधिकारी
फेसबुकवरून साभार दि.२८-०५-२०२१

*******************

मला ही पोस्टवॉट्सॅपवर मिळाली आहे. या पोस्टची सत्यता किती आहे हे मला माहीत नाही. मला त्याबद्दल दाट शंकाच आहे. त्या काळात देशात इतकी दहशत नव्हती असे मला वाटते. पण सावरकरांच्या आणि त्या काळातल्या सरकारी राज्यपद्धतीच्या बाबतीत आजही काय काय लिहिले जाते याचा हा एक नमूना आहे.

गांधीवधाचा अभियोग सुरू होता. त्यात सावरकरांच्या बाजूने लढत होते ज्येष्ठ विधीज्ञ श्री. ल. ब. भोपटकर! अभियोग दिल्लीत. राहायचे कुठे? म्हणून मग हिंदूमहासभेच्या कार्यालयासच त्यांनी आपले बिऱ्हाड केलेले. हिंदूसभेनेही शक्य होईल त्या सर्व सुविधा दिल्या होत्या भोपटकरांना. असेच एके दिवशी अभियोगासंबंधी काही कागदपत्रांचा अभ्यास करत बसलेले असताना भोपटकरांच्या समोरचा फोन खणखणला. त्यांनी तो उचलला. पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकताच भोपटकर दचकलेच!!
एवढ्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला फोन करावा? कश्यासाठी? पलिकडची व्यक्ती म्हणाली, ‘मला तुम्हाला भेटायचंय’. लागलीच भोपटकर म्हणाले, ‘तुम्ही वेळ सांगा फक्त.
लागलीच तुमच्या कार्यालयात येतो’. त्यावर ‘त्या’ व्यक्तीने स्पष्ट नकार दिला. आणि सांगितले की, ‘दिल्लीबाहेर अमुक अमुक ठिकाणी एक मैलाचा दगड आहे. संध्याकाळी
अमुक अमुक वाजता तिथे या’. आणि फोन ठेवून दिला!
भोपटकर बुचकळ्यात पडले. एकतर एवढ्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला फोन करावा, हे आश्चर्य. त्यात त्यांनी स्वत:हून भेटीची इच्छा व्यक्त करावी हे दुसरे आश्चर्य. बरं ती भेटही कार्यालयात राजरोस नव्हे तर एका खुणेच्या ठिकाणी, हे तिसरे आश्चर्य! आश्चर्यांची मोजणी करतच भोपटकर ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी जाऊन पोहोचले. समोरून ‘त्या’ व्यक्तीची कार आली आणि भोपटकरांना आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला – कार ती व्यक्ती स्वत:च चालवत होती. शोफर नाही, आणि त्या व्यक्तीचे राजकीय व
सामाजिक स्थान पाहाता सोबत साहजिकपणे असणारा लवाजमाही नाही. ‘त्यां’नी कार थांबवली. भोपटकरांना एक शब्दही बोलायची संधी न देता त्यांना आत घेतले आणि कार पिटाळली ती थेट एका निर्जन स्थळाकडे. तिथे पोहोचताच त्या व्यक्तीने सांगितले की, “सावरकर या खटल्यात निर्दोष आहेत हे मला पक्के ठाऊक आहे. पण आमच्या
काँग्रेस-मंत्रिमंडळातल्याच एका सर्वोच्च नेत्याला सावरकर यात अडकायला हवे आहेत. म्हणूनच त्यांना गोवण्याचा हा सारा खेळ चालू आहे. आज सकाळीच आम्हां सर्व मंत्र्यांना
तसे स्पष्ट आदेश मिळाले. तिथे मला काही बोलता येईना, म्हणून मी तिथून निघाल्यावर ताबडतोब तुम्हाला फोन केला. तुम्ही जरादेखील काळजी करू नका. नेटाने लढा. सत्य
आपल्या बाजूने आहे. कायद्याची काही जरी मदत लागली तरीही विनासंकोच मला सांगा.
मी आहे”! भोपटकर भावनावेगाने केवळ रडायचेच बाकी होते. बोलणे संपल्यावर त्या व्यक्तीने भोपटकरांना पुन्हा एकवार खुणेच्या जागेवर सोडले. गाडी धुरळा उडवित निघून गेली. पुढे सावरकर त्या खटल्यातून निर्दोष मुक्त झाले, हा इतिहास आहे!!
ही घटना मामा काणे यांनी आपल्या एका लेखात उघड केली. हीच घटना पंढरपूरच्या उत्पात गुरुजींनीही आपल्या ग्रंथांतरी नोंदवून ठेवलेली आहे. भोपटकरांना ऐनवेळी मदतीचा दिलासा देणारी, ‘कायद्याची काहीही मदत लागली तरी मला विनासंकोच सांगा’ असे निर्व्याज भावनेने सांगणारी ती व्यक्ती म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकर!!

*****************************

Forwarded msg…..
अहो सावरकर ,आजच्याच दिवशी तब्ब्ल एकशे अडतीस वर्षांपूर्वी जन्म घेतलात म्हणे , पण फक्त यातना / क्लेश सहन करण्यासाठीच ना हो ..??
अहो सावरकर – कोणी मारणार नाही एवढी उत्तुंग उडी मारली होती ती ही थेट अथांग सागरात; आणि किती अंतर पार केलंत याची मोजदाद होऊच शकत नाही ,कधीच !!
अहो सावरकर तुम्हीही झिजला होतात कीं! कशासाठी तर फक्त देशाला स्वातंत्र्य मिळावे या करिता !!
अहो , Mr.सावरकर तुम्हीच तर केला होता होतात – *काथ्या कूट * शरीराचाही आणि काथ्याचाही .
अहो – श्रीमान सावरकर – शौचकूपाशेजारी बसूनही काढल्यात की अंदमानात ..!
अहो – अहो तुम्हीच ना ते Mr. सावरकर काळकोठडीत असूनही मनाने आणि शरीराने खचून न जाता काव्ये लिहिणारे ??
अहो – तात्याराव -अहो तुम्हीच इंग्रजांनाही मनापासून वन्दन करायला आणि माफ करण्यास भाग पाडलतं म्हणे ..!!
अहो – श्रीयुत सावरकर – असंख्य यातना सहन करूनही नामोहरम केलंत समोरच्याला आपल्या तत्वांनी आणि विचारानेही …!
अहो तात्याराव – सगळं सोडून अगदी घरदार बायका मुलंदेखील स्वातंत्र्य मिळावं एवढ्यासाठी सगळं करीत राहिलात
अहो बॅरिस्टर – आपलं शिक्षण विसरून झिजत राहिलात, यमयातना सोसत राहिलात करायची होतीत कि ऐश आरामातील परदेशी नोकरी ..?
अहो तात्याराव – तुम्ही खरे ‘रत्न’ भगूरला जन्मलेले आणि मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची घातलेले …!
अहो , सावरकर – तुम्हीच ना ते ? दलितांना अस्पृश्याना न्याय्य वागणूक मिळावी यासाठी आरंभणारे ???
अहो – सावरकर असं कुणी कधी करतं का? कोणताच स्वार्थ साधून घेतला नाहीत म्हणजे काय ?
अहो वि.दा. – आता आपल्याला भारतरत्न मिळावा किंवा मिळू नये म्हणून केवढी ती दोघांचीही चढाओढ लागल्ये असं ऐकतोय ह्या स्वतंत्र भारतात ?
पण खरंच
तुम्हाला भारतरत्न मिळावा म्हणून तुम्ही खरंच काही केलंयंत ह्या देशासाठी ???

अहो Mr . विनायक दामोदर सावरकर सांगाच आता तरी …..???

डॉ पुष्कराज 9920149535
फेसबुकावरून साभार दि.२९-०५-२०२१

नवी भर दि.२९-०५-२०२२ :

सिंधु नदीपासून सिंधुसागरापर्यंत पसरलेली ही विशाल भारतभूमी ज्याची पितृभूमी व पुण्यभूमी आहे, तोच हिंदु!

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩

“मला मुसलमानांची भिती वाटत नाही, मला इंग्रजांची भिती वाटत नाही. मला हिंदुंची भिती वाटते, हिंदुंनीच आज हिंदुत्वाशी का वैर सुरू केले आहे?”

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩

“सर्व धर्म-मार्ग एकाच ईश्वराकडे जातात ही भाबडी समजूत आहे. भारताबाहेरून य़ा देशात आलेले सर्व धर्म, राष्ट्रद्रोहाकडेच जातात आणी देशाचे तुकडे पाडतात.”

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩

“विज्ञान हाच आपल्या राष्ट्राचा वेद असला पाहिजे, हिंदुंनी आपली पळीपंचपात्रे वितळवून त्याच्या तलवारी केल्या पाहिजेत. युद्धात उदात्त तत्व नव्हे, तर तलवार टिकते…. आणि जिंकते!”

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩

“शिवरायांचा जयजयकार करता,
गुरुगोविंदसिंहांची भक्ती करता,
महाराणाप्रतापांची स्तुती करता,
पण यातून राष्ट्र उभे राहणार नाही.
शिवराय कृतीत उतरवा, तरुणांनो सैनिक व्हा, लक्ष्य एकच….राजकारणाचे हिंदुकरण….हिंदुंचे सैनिकीकरण.”

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩

“चार काड्या जमवून घरटी बांधणे, चूल-मूल राखणे यालाच जर संसार म्हणत असतील तर असा संसार चिमण्या-कावळेही करतात. आपण आपली चूल बोळकी सोडून असा संसार करू ज्यामुळे देशाच्या घराघरातून सोन्याचा धूर निघेल.”

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩

“जातीभेद मोडून चातुर्वर्ण्य लाथाडून सा-या हिंदु राष्ट्रीयांनी एक व्हावं. वैदिकांची, जैनांची, बौध्दांची आणि शिखांची पित्रुभूमी व पुण्यभूमी एकच ‘हिंदमाता’..! आपली आई वेदनांनी तळमळत असतांना भावंडांनी आपापसात भांडत बसणे घोर पाप ठरेल.”

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩

“आपल्या देशावर शत्रु चाल करून आला तर त्याचा सशस्त्र प्रतिकार करणें पाप नाही. स्वतः जगणे व राष्ट्र जगवणे हे आपले कर्तव्य आहे. त्या करता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच आहे.”

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩

“दुबळ्यांच्या शांती अहिंसेने घात होतो, देश टिकवायचा तर शक्ती हवी….शस्त्रे हवीत….दुबळ्या राष्ट्रांनी मानवतेच्या गप्पा मारू नयेत.”

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩

“भाबडेपणा हा सद्गुण नसून विकृती आहे. कपटी शत्रूला फसवून, भूलवून वेळप्रसंगी खोटी माफी मागून कसाही ठेचावा. अफजलखानाचे ह्रदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे ह्रदय फोडावेच लागते.”

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩

“अहिंदु म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले, तरी ते लाथाडून शेवटचा हिंदु म्हणून मी मरेन!”

 • हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर.🚩🚩🚩🚩🚩

स्वातंत्रवीर सावरकर यांना आयुष्यभर नेहमीच प्रतिकुलताच पहावी लागली, पण प्रत्येक वेळी त्यातून ते आणखी तेजोमय होऊन बाहेर आले व पुढे जात राहिले त्यांचा प्रखर राष्ट्रवाद काँग्रेसला सहन झाला नाही आणि प्रगत हिंदुत्व हिंदुमहासभेला झेपले नाही पण ते कोट्यवधी लोकांत कायम लोकप्रिय राहिले! कोणत्याही पदावर ते नव्हते पण सावरकर जाऊन ६० वर्षे पूर्ण झाली तरी त्यांची लोकप्रियता कायम आहे आणि वाढती आहे आणि दुसरीकडे आपल्या वर लादले गेलेले अनेक राष्ट्रपती व पंतप्रधान आज आठवणीतही नाहीत ही एकच गोष्ट त्यांच्या विचारांचे महत्व पटवून देते! त्यांचे काव्य आजही परिस्थिती पूर्णपणे बदलली असतांना, हजारो युवकांना प्रेरीत करते हेही तितकेच खरे!

– राजू शामराव वाटवे, जमखंडी /नाशिक

एकोणिसाव्या शतकातल्या थोर व्यक्ती

एकोणिसाव्या शतकातल्या महाराष्ट्रात अनेक मोठ्या विभूति होऊन गेल्या. त्यांनी साहित्य, समाजजीवन, राजकारण अशा विविध क्षेत्रातल्या पुढील काळातल्या सुधारणांचा पाया घातला असे म्हणता येईल. मी लहानपणी त्यांची फक्त नावेच ऐकली किंवा वाचली होती, पुढच्या पिढ्यांनी ती कधी ऐकलीही नसतील. अशा काही विद्वानांची थोडक्यात माहिती मी या ब्लॉगवर संग्रहित करीत आलो आहेच. आणखी काही व्यक्तींची माहिती मी मुख्यत्वे श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकाच्या भिंतीवरून या लेखात संग्रहित केली आहे.

या पानावर पहा :

१. बाळशास्त्री जांभेकर
२. केरूनाना छत्रे
३. पुण्याचे चाफेकर बंधू
४. रियासतकार सरदेसाई
५. पं.कृष्णशास्त्री चिपळूणकर
६. डॉ.भाऊ दाजी लाड
७. श्री.गोपाळ गणेश आगरकर
८. लेखक रामचंद्र गुंजीकर
९. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे
१०. जमशेदजी टाटा
११. सर जमशेटजी जीजीभॉय

१२. रावबहाद्दूर डॉ.वि.रा.घोले

१३. लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख

नामदार गोपाळ कृष्ण गोखले, आद्य नाटककार विष्णुदास भावे, देवल, किर्लोस्कर, महात्मा फुले, तर्खडकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, ह.ना.आपटे, केशवसुत, जगन्नाथ शंकरशेट, लहूजी उस्ताद आणि डॉ,रखमाबाई यांची माहिती मी पूर्वी वेगळी दिली आहे ती या दुव्यांवर पहावी.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले
https://anandghare.wordpress.com/2021/05/10/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%96%e0%a4%b2%e0%a5%87/

आद्य नाटककार विष्णुदास भावे, देवल, किर्लोस्कर
https://anandghare.wordpress.com/2019/01/21/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ad/

महात्मा ज्योतिबा फुले
https://anandghare.wordpress.com/2020/09/23/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87/

दादोबा पांडुरंग तर्खडकर
https://anandghare.wordpress.com/2019/04/30/%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%a5%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5/

विष्णुशास्त्री चिपळूणकर
https://anandghare.wordpress.com/2019/03/17/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%82%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%b0/

आद्य कादंबरीकार हरी नारायण आपटे
https://anandghare.wordpress.com/2021/03/03/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be/

कवी केशवसुत
https://anandghare.wordpress.com/2019/01/25/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a4/

मुंबईचे शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ
https://anandghare.wordpress.com/2020/12/12/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%b0/

आद्य क्रांतिकारकांचे गुरु लहूजी वस्ताद
https://anandghare.wordpress.com/2020/02/18/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0/

डॉक्टर रखमाबाई भिकाजी राऊत
https://anandghare.wordpress.com/2019/12/10/%e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88/

मुंबईला ‘धक्का’ देणारा भाऊ लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य
https://anandghare.wordpress.com/2018/08/15/%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%8a-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3/


१. बाळशास्त्री जांभेकर

हे बहुधा सर्वात जुने असावेत. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर आणि १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीच्या काळात त्यांनी आपले कार्य केले आहे.

मराठी वृत्तपत्रव्यवसायाचे जनक आणि पहिल्या आंग्लशिक्षित पिढीतील अग्रगण्य विद्वान बाळशास्त्री जांभेकर, यांची आज पुण्यतिथी . त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी. गंगाधरशास्त्री ह्या व्युत्पन्न पित्याच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईस येऊन सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. अनेक भारतीय व परदेशी भाषांचा त्यांनी परिचय करून घेतला होता. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले. त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ ही करण्यात आले होते (१८४०).
दर्पण हे वृत्तपत्र १८३२ मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला. दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक त्यांनीच १८४० मध्ये काढले. लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हेच हेतू या उपक्रमांमागे होते.
भूगोल, व्याकरण, गणित, इतिहासादी विषयांवर त्यांनी ग्रंथरचना केली. काही पाठांतरे नोंदवून त्यांनी ज्ञानेश्वरीचे संपादन केले. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या कार्यात भाग घेणारे ते पहिले एतद्देशीय विद्वान होत. या संस्थेच्या त्रैमासिकात भारतीय शिलालेख व ताम्रपट यांसंबंधी त्यांचे संशोधनात्मक निबंध येत असत.
त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत त्यांचे निधन झाले.

. . . . . . ..

नवी भर दि.१३-११-२०२१ : वॉट्सॅपवरून साभार :

दुर्लक्षित आचार्य !!!

स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये एका भारतीय व्यक्तीचा २०० वर्षांपूर्वी लिहिलेला अर्ज आदरपूर्वक जतन करून ठेवलेला आहे. नामवंत एल्फिन्स्टन कॉलेजच्या प्राध्यापक पदासाठी केलेला तो अर्ज होता.
नोकरीचा किरकोळ अर्ज संग्रालयात ठेवण्या इतपत प्रभावीपणे मांडणाऱ्या एका मराठी बुद्धिवंताचा थोडक्यात परिचय.
ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या पारतंत्र्यात भारत सखोल बुडालेला असतानाच ६ जानेवारी १८१२ साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वाघोटन खाडीच्या किनाऱ्यावर ‘पोंभुर्ले’ गाव आहे.
या गावात अतिशय गरीब कुटुंबात त्यांचे बालपण गेले. हालाकीची परिस्थिती असतानाही आई सगुणाबाई आणि वडील गंगाधरशास्त्री यांनी त्याना शाळेत घातले आणि पुढे इतिहास घडला.
जन्मजात अफाट बुद्धिमत्ता लाभलेले बाळशास्त्री शालेय जीवनात प्रचंड वेगाने विद्याभ्यास करू लागले . पाठांतर दांडगे असल्यामुळे स्वतःच्या इयत्तेतील पुस्तके समजून घेतल्यानंतर पुढच्या दोन दोन इयत्तामधील अभ्यास ते एकत्रितरित्या करू लागेल. त्यांची तल्लख बुद्धिमत्ता पाहून सर्वजण त्यांना ‘बालबृहस्पती’ म्हणू लागले .१८२६ साली त्यांनी मुंबई एजुकेशन सोसायटी या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. त्यांच्या सखोल अभ्यासामुळे वयाच्या १४ व्या वर्षी त्याच शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली आणि ती सुद्धा पगारी.
परंतु फक्त गणितेय बुद्धिमत्तेपुरते आपले ज्ञान त्यांना मर्यादित ठेवायचे नव्हते आणि त्यामुळेच विविध भाषा शिकण्याचा त्यांनी सपाटा सुरु केला.
जिज्ञासेमुळे अल्पावधीतच मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराथी, कानडी, तेलगू, इंग्रजी, पारशी, फ़्रेंच, लॅटिन, ग्रीक, उर्दू या सर्व भारतीय आणि परदेशी भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. हे कमी पडले म्हणून कि काय त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास सुरु केला आणि त्यातही ते पारंगत झाले .ज्योतिष्य शास्त्रावर सुद्धा त्यांनी आपली पकड घट्ट केली . बॉंबे नेटिव्ह सोसायटीचे बापू छत्रे त्यांचे शिक्षक.
१८३० साली वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी बाळशास्त्री बॉंबे नेटिव्ह सोसायटीचे ‘डेप्युटी सेक्रेटरी’ झाले.
१८३४ साली एल्फिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना झाली.
त्या महाविद्यालयात रुजू होणारे “आचार्य बाळशास्त्री जांभेकर.” हे पहिले मराठी सहायक प्राध्यापक. गणित, भौतिक शास्त्र आणि खगोलशास्त्र हे अवघड विषय ते शिकवायचे. दादाभाई नवरोजी, भाऊ दाजी लाड हे आचार्य बाळशास्त्री यांच्या हाताखाली शिकून गेलेले काही महान विद्यार्थी. एल्फिन्स्टन महाविद्यालयात रुजू होण्यापूर्वी आपल्या जन्मदिनी ६ जानेवारी १८३२ साली त्यांनी ‘दर्पण’ हे द्विभाषिक वर्तमानपत्र मुंबईत काढले.
महाराष्ट्रातील हे पहिले मराठी वर्तमानपत्र !
त्यापूर्वी १७७९ पासून ‘बॉंबे हेरॉल्ड’ हे महाराष्ट्रातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र उपलब्ध होते. परंतु मराठी भाषेमध्ये दर्पण हेच पहिले वर्तमानपत्र बनले. एका बाजूला इंग्रजी आणि दुसऱ्या बाजूला मराठी मजकूर अशा दोन भाषेत हे वर्तमानपत्र होते. जांभेकरां चे वर्गमित्र भाऊ महाजन त्यातील इंग्रजी भाग संपादित करत. सुरवातीला दर्पण हे पाक्षिक होते. ४ महिन्यांनंतर ते साप्ताहिक बनले. याचा आकार १९ इंच लांब आणि साडे एकोणीस इंच रुंद असा होता. एकूण आठ पानांच्या या साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी ६ रुपये होती. दर्पणचा खप ३०० प्रति इतका अत्यल्प असला तरी त्या काळात इतर प्रतिथयश वृत्तपत्रांचा अधिकतम खप ४०० प्रति इतकाच होता .दर्पणमुळे मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रचली गेली. पहिले मराठी पत्रकार होण्याचा मान अर्थातच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या दूरदृष्टीमुळे मिळाला. ते ‘दर्पणकार’ या नावाने आजही ओळखले जातात आणि त्यांचा जन्मदिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
दुर्दैवाने १ जुलै १८४० रोजी ‘लास्ट फेअरवेल’ हा लेख लिहून दर्पणचा प्रसार थांबला. लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रोनिकल’ या पत्रात अखेरीस दर्पण विलीन करण्यात आले.
‘विद्या हे बळ आहे’ असे मानणाऱ्या बाळशास्त्रींनी त्यानंतर ‘दिग्दर्शन’ हे शैक्षणिक मार्गदर्शन करणारे मासिक काढले. हे सुद्धा दर्पण प्रमाणेच इंग्रजी व मराठी अशा दोन भाषेत विभागलेले होते.
भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र, व्याकरण , गणित, भूगोल, इतिहास या विविध शाखेतील विषयांवर बाळशास्त्री दिग्दर्शनमध्ये मार्गदर्शन करत.
त्यांचे वर्गमित्र भाऊ महाजन यांनी त्याच वर्षी ‘प्रभाकर’ नावाचे मराठी मासिक काढले.
संपूर्ण मराठीत असलेले महाराष्ट्रातील हे पहिले मासिक.
लोकहितवादींची गाजलेली १०८ शतपत्रे याच मासिकात छापली गेली.
एकंदरीतच बाळशास्त्री यांच्या दूरदृष्टीमुळे मराठी वृत्तपत्र समूहाने आकार घेतला.
वर्तमानपत्रापुरते मर्यादित न राहता बाळशास्त्रींनी पुस्तके लिहिण्याचा उपक्रम हाती घेतला.
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळासाठी विविध भाषेतील शालेय पाठयपुस्तके निर्मिती करण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे. इतिहास, भूगोल, गणित, छंदशास्त्र , नीतिशास्त्र या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली . बालव्याकरण सारखी मराठी पाठयपुस्तके सर्वप्रथम त्यांनी बनवली. फक्त शाळकरी अभ्यासक्रमापुरते न थांबता उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पुस्तके लिहिली. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फेफरे आणणाऱ्या गणितातील अवघड डिफरनसीएल कॅलक्यूलस सारख्या अवघड विषयावर आधारित ‘शून्यलब्धी’ हे पहिले पुस्तक त्यांनी लिहिले. प्रतिष्टीत रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकांमध्ये बालशास्त्रींचे लेख प्रसारित होत. असा मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते.
शैक्षणिक क्षेत्रातून अध्यात्मिक क्षेत्रात पाऊल टाकत १८४५ साली बाळशात्री जांभेकर यांनी ज्ञानेश्वरीचे पाठभेदांसहित संपादन करून ज्ञानेश्वरीची पहिली छापील प्रत जगाला उपलब्ध करून दिली.
त्याचमुळं त्यांना ज्ञानेश्वरीचे आद्यप्रकाशक म्हणून ओळखले जाते. कोकणात गावागावात जाऊन विविध भाषांमधील उपलब्ध ताम्रपटाचे वाचन करून इतिहास लेखन करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. या त्यांच्या कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे आद्य इतिहासकार म्हटले जाते. विधवा विवाहाचे ते समर्थक होते आणि त्यामुळेच राजा राम मोहन रॉय यांचे ते चाहते होते. रॉय यांचे बंगाली भाषेतील लिखाण वाचता यावे फक्त यासाठी ते बंगाली भाषा शिकले. हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कर्ते असलेले बाळशास्त्री धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात होते . त्यांच्या काळात धर्मांतरावर गाजलेले शेषाद्री प्रकरण आजही चर्चेत आहे.
अंबाजोगाई येथील गोविंद शेषाद्री यांना दोन मुले होती. त्यापैकी मोठा मुलगा नारायण याला ख्रिस्ती मिशनरीजनी धर्मांतर करून ख्रिश्चन धर्मात सामील केले. त्याचा धाकटा भाऊ श्रीपती पुढे त्याच मार्गावर निघाला होता. बाळशात्रीना याची माहिती मिळताच त्यांनी श्रीपतीला गाठले. जस्टीस पेरी यांच्यामार्फत त्याचा ताबा घेतला आणि त्याचे मनपरिवर्तन घडवले. त्याची मंजुरी मिळताच काशी येथे नेऊन त्याची शुद्धी करून त्याला पूर्ववत हिंदू धर्मात प्रवेश करवून घेतला. परंतु त्यानंतर त्यांच्यावर या कृत्याबद्दल कडाडून टीका झाली. ५७ दिवस यवनांकडे राहिलेल्या हिंदू व्यक्तीला पुन्हा धर्मात आणल्याबद्दल अखेरीस पुण्यात त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला.
बाळशास्त्री तत्वाचे पक्के होते. मुंबई विभागाचे शाळा इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती झाली असताना एकदा पगारात १ रुपया जास्त दिला गेला. ही बाब त्यांनी संबंधित ब्रिटिश खात्याकडे कळवली व पुढील महिन्यात तो एक रुपया कमी देण्याची विनंती केली. परंतु पुढील महिन्यात तो वाढीव रुपया वळता केला गेला नाही.
असे चार महिने गेल्यानंतर बाळशास्त्री यांनी अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहून ‘जोपर्यंत तुम्ही मला दिलेला अधिकचा रुपया जमा करत नाही तोपर्यंत मी पगार घेणार नाही’ अशी धमकीच दिली. या त्यांच्या पत्रामुळे अधिकारी हबकलेच.
बाळशास्त्री यांनी अनेक पदे भूषवली. शिक्षक ट्रेनींग स्कुलचे ते संचालक होते. कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. १८४० साली त्यांना जस्टीस ऑफ पीस बहाल करण्यात आले. याद्वारे तंटे सोडवण्याची कायदेशीर जबाबदारी त्यांना मिळाली. विद्यमुकुटमणी, पश्चिम भारतातील आद्यकृषी अशा विविध पदव्या लोकांनी त्यांना दिल्या.
बाळशास्त्री यांनी विविध विषयांवर वैविध्यपूर्ण पुस्तके लिहिली.

इंग्लंड देशाची बखर (१८३२)
ज्योतिषशास्त्र(१८३५)
बाल व्याकरण (१८३६)
भूगोल विद्या (१८३६)
सार संग्रह (१८३७)
नीती कथा (१८३८)
हिंदुस्थानचा इतिहास (१८४६)
हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास (१८४९)
हिंदुस्थानातील इंग्रज राज्याचा इतिहास, शून्यलब्धि
शब्दसिद्धी निबंध मानस शक्ती विषयक शोध
इत्यादी.
दुर्दैवाने आचार्य बाळशास्त्री अल्पायुषी ठरले.१८ मे १८४६ रोजी वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. कोकणातील वनवेश्वर येथे इतिहासलेखन करत असताना ताप येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी येताच मुंबई उच्च न्यायाधीशाने कोर्टाचे कामकाज स्थगित करून त्यांना मानवंदना दिल्याची नोंद आहे. जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही ! ही म्हण आपल्या अल्पायुषी कारकिर्दीत कामाचा प्रचंड डोंगर उभारून बाळशास्त्री यांनी खरी केली. बाळशास्त्री यांचे कार्य अफाट आहे परंतु ते पुढे दुर्लक्षितच राहिले. ‘दर्पण’ मुळे ते थोडेफार चर्चेत आले अन्यथा त्यांच्या विविधांगी कार्याची दखल भारतीय जनतेने फारशी घेतलेली दिसत नाही.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना भावपूर्ण आदरांजली !!
योगेश पवार.

२. केरूनाना छत्रे


यांना भारतातल्या विज्ञानाचे पुनरुज्जीवन केल्याचे श्रेय देता येईल. ते बाळशास्त्रींचे शिष्य होते

गणित, खगोल आणि पदार्थविज्ञानासारख्या अवघड विषयातच नव्हे तर सृष्टिशास्त्र, पंचांग शुद्धीकरण आणि हवामानशास्त्रातही पारंगत असणाऱ्या केरुनाना छत्रे आज पुण्यस्मरण . त्यांच्याविषयी लिहिताना ‘टाइम्स’नं म्हटलं होतं, ‘‘प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळालं असतं तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते.’’ केरुनांनांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा हा लेख त्या निमित्ताने..लोकसत्ता मधील स. पां. देशपांडे यांचा लेख तुमच्यासाठी

१९ व्या शतकात जन्म घेऊन आपल्या कर्तबगारीनं कीर्तिमान झालेल्या प्रभावळीत प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे निस्सीम उपासक विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे यांचं नाव घेणं भाग आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, सुधारकाग्रणी आगरकर यांचे गुरू असलेल्या केरुनानांचा जन्म अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे झाला. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्यानं त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्याकडं यावं लागलं. त्यांच्यामुळंच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडं वस्तुनिष्ठ दृष्टीनं पाहण्याची सवय लागली.
उत्तरायुष्यात केरुनानांनी गणितात संपादन केलेल्या लौकिकाची चाहूल त्यांच्या विद्यार्थी जीवनातच दिसू लागली होती. विशेषत: गणित, खगोल आणि पदार्थविज्ञानासारख्या कठीण शास्त्रात त्यांना पुढं जी गती प्राप्त झाली, त्याचे मूळ त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिटय़ूटमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रो. आर्लिबार या व्यासंगी गुरूंकडून मिळालेल्या मूलभूत ज्ञानात सापडते. त्याच्या जोरावर केरुनानांनी प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन करून या विषयांवर घट्ट पकड बसण्याएवढे त्यातले प्रगत ज्ञान प्राप्त केले. याच्या जोडीला त्यांची असाधारण बुद्धिमत्ता लक्षात घेतली की, पुढे त्यांनी दाखवलेले अध्यापन कौशल्य आणि सरकारदरबारी त्यांना मिळालेल्या मानाच्या जागा यांचे आश्चर्य वाटत नाही.
मुंबईस कुलाबा दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी इ.स. १८४० मध्ये प्रो. आर्लिबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरुनानांची असिस्टंटच्या जागी नेमणूक करण्यात आली. अवघ्या १५ व्या वर्षी द.म. ५० रु. पगारावर मिळालेल्या या नोकरीत नानांनी पुढली १० र्वष जागरुकपणे हवामानशास्त्राचे प्रशिक्षणच घेतलं, असं म्हणता येईल. पुढील आयुष्यात कोणतंही तत्त्व अथवा संकल्पना सिद्ध होऊन पडताळा आल्याशिवाय ते स्वीकारीत नसत, याचं मूळ या नोकरीत आढळतं.
इ.स. १८५१ पासून मात्र पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल, व्हर्नेक्युलर कॉलेज (पुढे ट्रेनिंग कॉलेज म्हणत, ते) आणि अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थांतून त्यांच्या बदल्या झाल्या. या प्रत्येक ठिकाणी गणित, सृष्टिशास्त्र व पदार्थविज्ञान हेच विषय ते जरुरीप्रमाणे इंग्रजी व मराठीत सराईतपणे शिकवीत असत. दरम्यान, त्यांनी इंजिनीअरिंग कॉलेजातसुद्धा सृष्टिशास्त्रावर व्याख्याने दिल्याची नोंद सापडते. मात्र १८६५ पासून सेवानिवृत्तीपर्यंत केरुनाना पुण्याच्या डेक्कन कॉलेजात स्थिरपणे होते. प्रोफेसर व शेवटी हंगामी प्राचार्य म्हणून जागोजागी जबाबदारीची पदे सांभाळूनसुद्धा आपल्या अध्यापनात कधी त्यांनी हयगय केली नाही की खंड पडू दिला नाही. मुलांना समजेल अशा सोप्या रीतीने शिकविण्याची त्यांची हातोटी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाखाणलेली आहे. गणिताशिवाय विद्यार्थ्यांना इतर शास्त्रांचे थोडेबहुत ज्ञान देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. विद्यार्थ्यांने केव्हाही- कुठेही शंका विचारली तरी ते हसत-खेळत हरप्रयत्नाने तिची उकल करीत असत.
चिपळूणकर- आगरकर या केरुनानांच्या नामवंत शिष्यांच्या चरित्रात व ते दिवंगत झाल्यावर खुद्द आगरकरांनी लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांचे विद्याव्यासंग, अध्यापन कौशल्य, स्वभावातील सौजन्य तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आसरा देणे, प्रसंगी फी-पुस्तकांची त्यांची नड भागवणे, या गुणांचे प्रामुख्याने उल्लेखआलेले आहेत. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतींचे ठळक उदाहरण म्हणजे, पहिल्या वर्षांच्या परीक्षेची फी भरायला आगरकरांजवळ पैसे नव्हते म्हणून एक नाटक लिहून ते, ती उभी करणार असल्याचं कळल्यावर केरुनानांनी नाटकाचे कागद काढून घेऊन त्यांची फी भरून टाकली!
मेजर कँडीच्या मराठीतून शाळेय पुस्तकं तयार करण्याच्या उपक्रमात केरुनानांनी सुबोध भाषेत लिहिलेली पुस्तकं लोकप्रिय झाली. अंकगणितात मूलभूत क्रियांबरोबर कर्जव्यवहार, रोखे, सुतार व गवंडी यांच्या कामाची आकारणी इत्यादी व्यावहारिक उदाहरणे घातली आहेत. तर पदार्थविज्ञानात आजूबाजूच्या सृष्टीत घडणारे व्यापार, निसर्ग चमत्कार व पदार्थाचे गुणधर्म यांच्या परिचयाबरोबर प्रयोगासाठी लागणाऱ्या वस्तू व त्यांच्या किमती पुस्तकाच्या परिशिष्टात दिल्या आहेत. कधी कधी या पुस्तकात त्यांनी संवादाचे माध्यमही वापरले आहे.
शास्त्रीय ज्ञान स्वभाषेत व्यक्त करण्यासाठी मुंबईत स्थापन (१८४८) झालेल्या, ‘ज्ञान प्रसारक सभे’च्या व्यासपीठावरून केरोपंतांनी ‘हवा’, भरतीओहोटी, कालज्ञान, सूर्यावरील डाग आणि पर्जन्यवृष्टी यांचा संबंध असे विविध विषयांवर १७ निबंध वाचले. त्यापैकी भरती-ओहोटीच्या निबंधात, भरती अंतराच्या घनाच्या प्रमाणात कमी होते असे कलनाच्या मदतीने त्यांनी दाखवलं आहे.
केरुनानांनी लक्ष घातलेला आणखी एक विषय म्हणजे पंचांग शुद्धीकरणाचा. आपल्या सूक्ष्म अभ्यासाने त्यांच्या असं लक्षात आलं की, परंपरागत पंचांगात केलेलं अशुद्ध गणित व घेतलेली ग्रहस्थितींची स्थूलमाने या चुकांमुळं ऋतुकाल तसंच पंचांगात दाखवलेल्या ग्रहस्थितीचा प्रत्यक्षातल्या ग्रहस्थितीशी मेळ बसत नाही (या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे की, वेधशाळेतील नोकरीमुळे ग्रहांचे वेध घेण्याची कला त्यांना अवगत होती.) तेव्हा ही विसंगती दूर करण्यासाठी त्यांनी पंचांग सुधारण्याचे जे प्रयत्न केले त्याच्या तपशिलात न जाता एवढं म्हणणं पुरेसं ठरेल की, केरुनानांनी या कामी बरेच दिवस आपला बहुमोल वेळ खर्च केला. पण त्यांच्या हयातीत हा उद्योग पूर्णत्वास गेला नाही. मात्र लो. टिळकांसारख्या त्यांच्या नामवंत शिष्यानं राजकारणाच्या धकाधकीतही गुरुऋण जाणून व स्वत:स त्यात असलेला रस म्हणूनही ही चळवळ पुढं नेली.
केरुनानांच्या पुरोगामी विचारसरणीचे द्योतक म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेस त्यांचा पाठिंबा होता. शिवाय ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते, श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणाऱ्या स्त्रियांच्या सभांना हजर राहून त्यांचे शिक्षण करत. स्त्रियांना जड विषयांऐवजी गृहजीवनोपयोगी शिक्षण देण्याच्या मताचे ते होते.
मात्र गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वत: पियानो वाजवण्याची आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटकमंडळीत त्यांचा पायरव होता. फार काय नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकानं नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केलेलं आहे.
केरुनाना दिवंगत झाल्यावर, टाइम्स ऑफ इंडियाने वाहिलेल्या श्रद्धांजलीत, ‘‘जर प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळालं असतं तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते’’ असं म्हटलं होतं. त्यावरून त्यांचा मोठेपणा ध्यानात येईल. असा हा थोर व्यासंगी पुरुष १९ मार्च १८८४ रोजी दिवंगत झाला. त्यांच्या सव्वाशेच्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली.
स. पां. देशपांडे”


३. पुण्याचे चाफेकर बंधू


बाळकृष्णचाफेकरस्मृतीदिन. त्यांनी वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.आज बाळकृष्ण चापेकर यांचे आज पुण्यस्मरण
पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.
रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडचेवर जवळून गोळ्या झाडल्या. रँड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.
चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू शहीद झाले.”

. . . . . . . . . . . .

गोंद्या आला रे…..
आज २२ जुन , शौर्य दिवस
सन १८९७ , पुण्यात प्लेग ने धुमाकूळ घातला होता. तत्कालीन जुलमी इंग्रज अधिकारी “वाॅल्टर चार्ल्स रँड” याने प्रतिबंधक उपायाच्या नावाखाली पुण्यातील जनतेचा, विशेषतः माताभगिंनीं चा छळ चालवला होता
” कुत्रा पिसाळला कि त्याला ठार मारले जाते “
त्या प्रमाणे रँड नावाच्या या पिसाळलेल्या कुत्र्याला दामोदर हरि चाफेकर आणि त्यांचे बंधू बाळकृष्ण, वासुदेव यांनी अतिशय शुरपणे व नियोजन बध्द रितीने आणि गोंद्या आला रे हि घोषणा देत आजच्याच दिवशी म्हणजे २२ जुन १८९७ रोजी गणेश खिंड रोड येथे (सध्याचे सेंट्रल माॅल,ई-स्केवर थिएटर च्या पुढे ) गोळ्या घालून ठार केले
देशाच्या स्वातंत्र लढय़ातील इतिहासात एकाच घरातील तीन सख्खे भाऊ फासावर …जाण्याचे एकमेव उदाहरण म्हणजे क्रां. चाफेकर बंधू
त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


४. रियासतकार सरदेसाई


मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयीची आठ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ”मुसलमानी रियासत” व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचना करणारे रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची आज जयंती
त्यांचा जन्म १७ मे, इ.स. १८६५;रोजी गोविल, रत्नागिरी जिल्हा, येथे झाला ते मराठी इतिहासकार व लेखक होते. मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयीची आठ खंडांत ”मराठी रियासत”, तीन खंडांत ”मुसलमानी रियासत” व दोन खंडांत ”ब्रिटिश रियासत” या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला.
१८८९ मध्ये बडोदेकर संस्थानिक श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडे ‘रीडर’ म्हणून नोकरीस होते.
महाराजांना वर्तमानपत्रे, पुस्तके वाचून दाखवणे आणि राजवाड्यातील राजपुत्र-राजकन्यांना शिकवणे ही कामे त्यांना करावी लागत. मुलांना इतिहास शिकवण्यासाठी काढलेल्या टिपणांतूनच पुढे मुसलमानी, मराठी आणि ब्रिटिश रियासतींचा मिळून ‘हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासा’ची निर्मिती झाली. रियासतकारांनी १८९८ साली सर्वप्रथम मुसलमानी रियासतींचे प्रकाशन केले. सुरुवातीच्या बारा वर्षांच्या नोकरीच्या कालखंडापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत रियासतींचे लेखन चालू होते. पाच तपांच्या तपश्चर्येतून मुसलमानी, मराठी आणि ब्रिटिश रियासतींच्या स्वरूपात गो. स. सरदेसाई यांनी इ.स. १००० ते १८५७ पर्यंत सुमारे साडेआठशे वर्षांचा अखंड हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास सिद्ध केला. त्यासाठी ऐतिहासिक साधने तपासली. त्यांचे संशोधन केले. वरचेवर उपलब्ध होणार्‍या नव्या साधनांची शहानिशा करून त्याची विश्वासार्हता वाढवली. जरूर तिथे गुंतागुंतीच्या घटनांचे विश्लेषण करून त्या अधिक स्पष्ट केल्या. आणि काही मतभेदांच्या प्रकरणांवर स्वतंत्र बुद्धीने भाष्यही केले.
भारतीय केंद्रशासनाने इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी यांना इ.स. १९५७ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.”


५. पं.कृष्णशास्त्री चिपळूणकर

अरबी सुरम्य कथांचे मराठीत पहिल्यांदा भाषांतर करणारे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे आज पुण्यस्मरण (२० मे १८७८)
मराठी ग्रंथकार आणि रसिक विद्वान. जन्म पुणे येथे. निबंधमालाकार विष्णुशास्त्र्यांचे वडील. पुण्याच्या पाठशाळेत कृष्णशास्त्र्यांनी संस्कृताचे अध्ययन केले. अलंकार, न्याय आणि धर्म ह्या तीन शास्त्रांचा त्यांचा गाढा व्यासंग होता. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून त्यांचे गुरूजी मोरशास्त्री साठे हे त्यांना ‘बृहस्पती’ म्हणत. संस्कृताचे अध्ययन पूर्ण केल्यावर ‘पूना कॉलेज’ मधून त्यांनी इंग्रजीचे उत्तम ज्ञान संपादन केले. अर्थशास्त्र, मानसशास्त्र इ. विषयांचाही त्यांनी अभ्यास केला. १८५२ मध्ये अनुवादक म्हणून ते सरकारी नोकरीत शिरले. पुढे पुण्याच्या पाठशाळेत साहाय्यक प्राध्यापक दक्षिणा प्राइझ कमिटीचे चिटणीस, ‘पूना ट्रेनिंग कॉलेज’ चे प्राचार्य, रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस इ.पदांवर त्यांनी कामे केली. ‘पूना ट्रेनिंग कॉलेज’ मध्ये असताना मराठी शालापत्रक ह्या नियतकालिकाचे त्यांनी काही वर्षे संपादन केले. ख्रिस्ती धर्मप्रचारास विरोध करण्यासाठी काढलेल्या विचार लहरी ह्या पाक्षिकाचेही ते संपादक होते.
विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या सहकार्याने त्यांनी अनुवादिलेल्या आरबी भाषेतील सुरस व चमत्कारीक गोष्टींनी मराठीतील मनोरंजक कथावाङ्‌मयाचा पाया घातला. शास्त्रीय विषयांवरील लेखनही सुगम करून दाखविण्याची त्यांची हातोटी अनेकविद्या-मूल तत्त्व संग्रहात (१८६१) प्रत्ययास येते, तसेच मराठी व्याकरणावरील त्यांचे निबंध त्यांच्या सूक्ष्म, चिकित्सक दृष्टीची साक्ष देतात.**अभिवादन (माहिती विश्वाकोशातून )
त्यांची साहित्य संपदा
विचारलहरी (1852)—-सॉक्रेटिसचे चरित्र (1852)—अर्थशास्त्र परिभाषा (1855)—-संस्कृतभाषेचे लघु व्याकरण (1859)—-पद्यरत्नावली (1865)
अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी

६. भाऊ दाजी लाड

ज्यांनी राणीच्या बागेला भेट दिली असेल त्यांनी सुरुवातीला भाऊ दाजी लाड संग्रहालय असा बोर्ड तरी पाहिला असेल. पण मला राणीच्या बागेतले प्राणी आणि पक्षी पहायची घाई असल्यामुळे मी आत जाऊन ते म्यूजियम पाहिले नाही. इतर लोकांचेही तसेच होत असेल. इंग्रजांच्या काळात समाजाची सेवा करणाऱ्या अग्रगण्य लोकांमध्ये भाऊ दाजी लाड यांचे नावही घेतले जाते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्य लिहिलेला हा लेख श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुक फलकावरून साभार


अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाचे संस्थापक , कुष्टारोगावर औषधाचा शोध घेणारे, पहिले भारतीय डॉ.रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड यांचे आज पुण्यस्मरण ३१मे १८७४
लाडांचा जन्म ७ सप्टेंबर १८२२ रोजी गोव्यात मांद्रे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन विद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले. वडिलांपश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाडदेखील शिकून पुढे डॉक्टर बनले.त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले.
सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षणव अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने सहभाग घेतला. १८६९ व १८७१ सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.
राणी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाच्या कार्यकारिणीचे भाऊ दाजी लाड सह-सरचिटणीस होते. या वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली तरीही आर्थिक अडचणींमुळे काही वर्षे त्याचे काम थांबले होते. त्यावेळी भाऊंनी सह-सरचिटणीस म्हणून वस्तुसंग्रहालयासाठी 1 लाख 16 हजार 141 रुपयांचा मोठा निधी उभा केला आणि या संग्रहालयाचे काम पूर्ण होऊन ते सामान्यांसाठी खुले करण्यात आले. पूर्वीच्या सेंट्रल इकॉनॉमिक म्युझियम‘चेच रूपांतरराणी व्हिक्टोरिया‘ आणि `अल्बर्ट वस्तुसंग्रहालया‘त करण्यात आले आणि या व्हिक्टोरिया वस्तुसंग्रहालयाचे त्यांच्या योगदानाची दखल घेऊन स्वातंत्र्यानंतर १९७५ला या वस्तुसंग्रहालयाला डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव दिले गेले.
अभिवादन – श्री.माधव विद्वांस
भाऊंचा व संग्रहातील एका सुंदर मूर्तीचा फोटो

नवी भर दि.७-९-२०२१ : हा लेखही श्री माधव विद्वांस यांच्याच फेसबुक फळ्यावरून घेतला आहे. त्यामुळे यात थोडी पुनरुक्ति आहे.

डॉरामकृष्ण विठ्ठललाड ऊर्फ भाऊ दाजी लाड यांची आज जयंती.त्यानिमित्त माझा दैनिक प्रभात पुणे दिनांक ७ सप्टेंबर २०२१ मधील लेख. त्यांचे मूळ गाव पार्से म्हणून ते लाड-पार्सेकर नावानेही ओळखले जात असत. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १८२२ रोजी आजोळी गोव्यातील मांद्रे/मांजरे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. वर्ष १८३२ मधे व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला गेले तिथे त्यांचे वडील मातीच्या बाहुल्या करून विकत असत.बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले.इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन विद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या.या काळातच त्यांचे पितृछत्र हरपले पण वडिलांचे पश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी पार पाडली.शिकून पुढे ते एल्फिन्स्टन विद्यालयात शिक्षक व ग्रंथपाल म्हणून काम करत होते.त्यावेळी वर्ष, १८४५ मधे नव्यानेच स्थापन झालेल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी सोडून प्रवेश घेतला व डॉक्टर बनले. मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाप्रसंगी नामदार न्यायमूर्ती व्हाइस चॅन्सलर जेम्स गिब्ज यांनी ‘डॉ.भाऊ दाजींचा आदर्श नवीन पदवीधारकांनी ठेवावा,’ असे सांगितले.एल्फिन्स्टन विद्यालयात असताना राजस्थान व गुजरात या भागांतल्या बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला.तो उत्कृष्ट ठरून त्यांना त्या वेळेचे ६०० रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले.वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांना परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याबद्दल फिशर शिष्यवृत्ती मिळाली होती, पण त्यांनी ती योग्य व्यक्तीला त्या पैशांचा फायदा व्हावा म्हणून नाकारली.त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले.
सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षणव अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयीच्या उपक्रमांचेमधे त्यांनी सक्रिय भाग घेतला. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय कार्यक्रमातही त्यांनी स्वारस्याने सहभाग घेतला.वर्ष १८६९ व १८७१ मधे ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.
भायखळा येथील ‘राणीचा बाग’ म्हणजे आत्ताची ‘वीर जिजामाता उद्यान’ स्थापन करण्यात भाऊंचा पुढाकार होता.त्या वेळेला बागेमध्ये ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूझियम’ या नावाचे वस्तुसंग्रहालय तयार करण्यासाठी भाऊंनी निधी जमविण्यासाठी भरपूर कष्ट घेतले.भाऊंनी कष्ट करून ऐतिहासिक चित्रांचा, नाण्यांचा, ताम्रपटांचा, शस्त्रांचा मोठा संग्रतयार केला होता.यामधे हस्तलिखितांमध्ये मध्ययुगीन काळातला शहानामा, सिकंदरनामा, हातिमताई, दिवाण मोगल, मोगलकालीन इतिहास यांवरील पर्शियन भाषेतील हस्तलिखिते आहेत.तसेच उपनिषद सूत्र, आचाङ्सूत्र, निरयावलिम, भगवतीसूत्र या हस्तलिखितांचाही समावेश आहे.संग्रहालयातून इतिहास शिकता व जाणता येतो असे भाऊ म्हणत.खजिना आजही भाऊ दाजी लाड संग्रहालयात पहाता येतो.संस्कृतच्या प्रसाराने मराठीचा उत्कर्ष होईल, असे ते म्हणत असत.स्वातंत्र्यानंतर भाऊंच्या स्मृतिशताब्दी वर्षात, १९७४ साली त्या #संग्रहालयाचे नामकरण ‘डॉ.भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’, असे करण्यात आते उत्तम वक्ते हॊते.,मराठी, गुजराती, इंग्रजी या तीनही भाषांमधून ते व्याख्याने देत असत.ते नाट्यप्रेमी व नाट्यकलेचे आश्रयदाते होते म्हणून आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी भाऊंना पहिल्या दर्जाचा रसिक म्हणून मान दिला.दुर्दैवाने भाऊंना अखेरच्या आयुष्यात विपन्नावस्थेतच ३१मे १८७४ रोजी त्याचे निधन झाले.


विकासपीडियावरील माहिती

भाऊ दाजी लाड
भाऊ दाजी लाड : (१८२२ – ३१ मे १८७४). महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवाक व कुशल धन्वतंरी. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडीलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रूढ झाले. त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत. व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला गेले (१८३२). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत. भाऊदाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरित्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८४३). या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल व व्दारकानाथ हे दोन मुलगे होते. व्दारकानाथ तारूण्यातच निधन पावला. वडीलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घारापुरी) येथे वास्तव्य केले.

भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला. निबंधस्पर्धेत त्यांना ६०० रूपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उद्‌धृत केला आहे.

मुंबईत १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊंनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले. फॅरिश शिष्यवृत्ती मिळविली आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (१८५१). कॉलेजमध्ये असताना त्यांनी ग्रंथपालाचेही काम केले. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अचूक निदान व शस्त्रक्रियेतील हातोटी (कौशल्य) यांमुळे त्यांना लोकप्रियता लाभली व पैसाही मिळू लागला. त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले. खष्ठ (कवटी) म्हणजेच चौलमुग्रा हा सदापर्णी वृक्ष असावा. त्यांच्या बियांपासून तयार केलेले तेल कुष्ठरोगावर गुणकारी आहे. बाँबे ॲसोसिएशनचे ते चिटणीस झाले. पुढे दादाभाई नवरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया ॲसोसिएशन नावाची संस्था काढली. तिच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष झाले. सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले. मुंबईत कागद व कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १८५४ मध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक झाले.

जुन्या रूढी व परंपरा यांना डावलून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झीज सोसली. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होत (१८६३-७३). या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात. विधवाविवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठींबा दिला. लोहार चाळीतील कन्याशाळेला ते दरमहा आर्थिक साहाय्य देत. याच शाळेला पुढे ‘भाऊ दाजी गर्ल्स स्कूल’ हे नाव देण्यात आले. जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे आणि अंधश्रध्देला फाटा द्यावा, या मताचे ते होते. त्यांचे सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली (१८६४-६९).

वनस्पती व प्राचीन इतिहास यांच्या संशोधनात त्यांनी विशेष लक्ष घातले. राणीचा बाग (जिजामाता बाग), ॲल्बर्ट म्यूझीयम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इस्टिट्युट इ. संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते. जिजामाता बागेत त्यांच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे. भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मिळ चित्रे, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, सायण, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालीदासाचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यांवरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्यूलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोद्‌गार काढले आहेत. कालीदासाचे कुमारसंभव व मेरूतुंगाचार्याचा प्रबंध चिंतामणि हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिध्द केले. तसेच रायटिंग्ज अँड स्पिचिस ऑफ डॉ. भाऊदाजी या शीर्षकाने त्र्यं. गो. माईणकर यांनी त्यांचे समग्र लेखन संपादित करून प्रसिध्द केले (१९७४).

त्यांच्यावर १८६५ मध्ये आर्थिक संकट आले. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. परिणामत: त्यांचे उर्वरित आयुष्य दु:ख, दैन्य व वैफल्य यांनी ग्रासले गेले. त्यातच पक्षाघाताने त्यांचा मुबईमध्ये अंत झाला. त्यांच्या स्मरणार्थ संस्कृत विषयात बी. ए. ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला भाऊ दाजी हे पारितोषिक देण्यात येते.

****************

७. श्री.गोपाळ गणेश आगरकर

आठवणीतील पुणे: विज्ञान व बुध्दीप्रामाण्यवादाचे पुरस्कर्ते, समतेचे खंदे समर्थक गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृतिदिन. पुणे ही त्यांची कर्मभूमी. ते पुण्यात ज्या घरांमध्ये रहात होते. त्या घरातील आठवणी वास्तूंविषयीचे हे टिपण :

फर्ग्युसन महाविद्यालयातील बंगल्यात समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर राहत होते, त्या वेळची गोष्ट आहे. ‘सुधारक’ या त्यांच्या वृत्तपत्रातून आगरकर सडेतोडपणे लिहीत. सुधारकाचा हा कर्ता आहे तरी कसा? हे पाहण्याच्या इराद्यानं एक गृहस्थ आगरकरांना पाहायला आले. आगरकरांनी फाटकाजवळच लिहिण्या-वाचण्याची स्वतंत्र खोली बांधली होती. हे गृहस्थ या खोलीत डोकावताच त्यांना काजळीची बारबंदी घातलेला, पंचा नेसलेला, दुसर्‍या पंचाने हापशी बांधलेला आणि चिलीम ओढत बसलेला एक मध्यमवयीन माणूस दिसला. ‘‘सुधारकाचे संपादक आगरकर कोठे आहेत?’’ असे या गृहस्थाने विचारताच हा माणूस म्हणाला, ‘‘आपले त्यांच्याशी काय काम आहे?’’ ‘‘काही विशेष नाही. त्यांची कीर्ती ऐकून त्यांना पाहायला आलो आहे.’’
मध्यमवयीन माणसाने ते ऐकले. चिलीम बाजूला ठेवली आणि ‘‘सुधारकाचा संपादक आगरकर तो मीच,’’ असे त्या गृहस्थाला सांगितले. तसे तो म्हणाला, ‘‘‘उगीच अशी थट्टा का करता?’’ ‘‘मी आपली थट्टा करीत नाही. खरोखरच मीच तो आगरकर,’’ असे आगरकरांनी सांगताच ‘‘स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत, असे सांगणारे आगरकर इतक्या साध्या राहणीचे असतील असे मला वाटले नाही,’’ अशी प्रतिक्रिया त्या गृहस्थाने व्यक्त केली.
कर्ते सुधारक म्हणून ज्यांची महाराष्ट्रात कीर्ती पसरली, ते गोपाळराव आगरकर मूळचे पुणेकर नव्हतेच. कर्‍हाडजवळील टेंभू या गावी त्यांचे पूर्वज राहत असत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंगरी या गावातून त्यांचे पणजोबा वच्चाजीपंत हे टेंभूमध्ये स्थायिक झाले. त्यांचे आजोबा विष्णुपंत वडिलोपार्जित साधनसंपत्तीवरच गुजराण करीत. वडील गणेश हे फारसे उत्साही नव्हते. १८५६मध्ये गोपाळचा जन्म त्याच्या आजोळी कर्‍हाड येथे झाला. कर्‍हाडमध्ये शालेय शिक्षण घेतल्यावर १८७२मध्ये अकोला येथे ते मामाकडे शिक्षणासाठी गेले. तेथे अडचणी उभ्या राहिल्याने विष्णू मोरेश्वर महाजनी या शिक्षकाची चिठ्ठी घेऊन ते पुण्यात आले; परंतु पुण्यात काही दाद मिळेना म्हणून पुन्हा अकोल्याला माघारी फिरले. तेथे वडिलधार्‍यांनी उपदेश केल्यावर १८७२मध्ये ते पुन्हा पुण्याला आले. ते अखेरपर्यंत पुणेकर म्हणूनच राहिले.
त्यांची अंगयष्टी उंच, सडपातळ व काटक होती. डोळे पाणीदार होते. शेंडी मोठी होती, पण डोक्यावर घेरा मोठा नव्हता. स्वभाव मनमिळाऊ, भारदस्त मिशा, लहानपणी स्वभाव हूड होता. वडील माणसांचा मान ठेवण्यात ढिलाई होती. काळी पगडी, पांढरा अंगरखा, क्वचित जनातीचा काळा अंगरखा, शुभ्र काठांचे उपरणे, हातात दीड इंच व्यासाचा महाबळेश्वरी सोटा व पायात ब्राह्मणी चढाऊ जोडा, असा त्यांचा पोषाख असायचा. मुंबईचा टाइम्स, मराठा, केसरी व ज्ञानप्रकाश यांचे वाचन असायचे.
आगरकर हे हयातभर दुसर्‍याच्याच वास्तूत राहिले. स्वराज्य आणि सुधारणा या दोन ध्येयांसाठी झटणार्‍या या ज्ञानवंताचा वैचारिक आणि कृतिशील इतिहास सर्वज्ञात आहे. कर्‍हाडजवळील टेंभू या गावी त्यांचा जन्म झाला असला, तरी त्यांचे कर्तृत्व खर्‍या अर्थाने पुण्यातच फुलत गेले. विद्यार्थिदशेत असताना ते डेक्कन कॉलेजमधील वसतिगृहात राहिले. त्यानंतर शनिवार पेठेतील तांब्यांचा वाडा, भाटवडेकरांचा आणि मेहेंदळे बागेतील मेहेंदळे यांचा बंगला आणि शेवटी फर्ग्युसन महाविद्यालयातील प्राचार्यांचे घर इत्यादी ठिकाणी ते राहिले, असे संदर्भ वाचायला मिळतात.
त्यापैकी डेक्कन कॉलेज, तांबे वाडा आणि फर्ग्युसन महाविद्यालय येथील आगरकरांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या वास्तूंच्या खाणाखुणा शंभर वर्षांनतंर आजही तेथे पाहायला मिळतात. दुर्दैवाने या वास्तूंकडे कोणाही संशोधकाने याकडे म्हणावे तितकेसे लक्ष दिल्याचे दिसत नाही.
मनात आणले असते, तर आगरकरांना पुण्यात स्वतःचे घर बांधणे सहज शक्य होते. असे असूनही या
महापुरुषाने त्याकडे दुर्लक्ष का केले असावे? हे स्पष्ट करणारी एक घटना त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्रात वाचायला मिळाली. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांना फेलोशिप मिळाली होती. आर्थिक विंवचना कमी झाल्याने त्यांनी स्वतःचे लक्ष लोककल्याणावर केंद्रित केले. त्या वेळी आईला लिहिलेल्या पत्रात आगरकरांनी याबाबत स्पष्ट विचार तरुण वयातच मांडले आहेत. ते म्हणतात, ‘‘मुलगा मोठाल्या परीक्षा देत आहे, त्यामुळे त्याला मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळतील आणि तो आपले पांग फेडेल, असे मनोरथ आई तू करीत असशील; परंतु विशेष संपत्तीची हाव न धरता फक्त पोटापुरत्या पैशांवर संतोष मानून सर्व काळ परहितार्थ घालविण्याचे मी ठरवीत आहे.’’
स्वतःच्या घराबाबत आगरकरांनी याच विचाराला पुढे वाहून घेतले. डेक्कन कॉलेजमध्ये ते १८७३ ते १८७६ अशी चार वर्षे राहिले. तिथेच त्यांची लोकमान्य टिळकांशी मैत्री जमली. देशाची स्थिती आणि
स्वतःचे कर्तव्य याबाबत दोघांचेही विचार त्या वेळी समान होते. त्यामुळे बंडगार्डनचा हा परिसर दोघांच्याही जीवनात पुण्यक्षेत्रासारखा ठरला होता. आज तेथे लोकमान्यांची खोली स्वतंत्रपणे जतन करून ठेवली गेली आहे. अकोल्यातून आगरकर पुन्हा पुण्यात आले, तेव्हा खिशात अवघे पन्नास रुपये घेऊन ते डेक्कन कॉलेजमध्ये दाखल झाले. या वास्तूमध्ये पैशांअभावी त्यांच्या हालअपेष्टा सुरू झाल्या. तेव्हा वक्तृत्वोत्तेजक सभेत जाहिरात वाचून त्यांनी एका स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत त्यांना चाळीस रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले. याच वास्तूमध्ये डेक्कन कॉलेजच्या गॅदरिंगनिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली. ‘एकत्र हिंदू कुटुंबापासून फायदे व तोटे’ हा त्याचा विषय होता. आगरकरांनी त्यातही पन्नास रुपयांचे पहिले बक्षीस मिळविले. या काळात त्यांना शिष्यवृत्ती मिळाली; परंतु आर्थिक दारिद्र्य इतके होते, की एकच सदरा ते रात्री धुऊन पुन्हा दुसर्‍या दिवशी वापरावी लागे. डेक्कन कॉलेजच्या या वास्तूने आगरकरांचे हाल आणि अभ्यासू वृत्ती दोन्ही अनुभवले.
एम.ए.च्या परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते म्हणून आगरकरांनी नाटक लिहायचे ठरविले. केरूनाना छत्रे यांना जेव्हा हे कळाले, तेव्हा त्यांनीच त्यांची फी भरली. प्रि. डॉ. सेलवी यांनी फेलो म्हणून निवड केल्यावर त्यांना पोटापुरता पैसा मिळू लागला व सुधारकांचा वैचारिक प्रवास याच वास्तूत खर्‍या अर्थाने सुरू झाला. डेक्कन कॉलेजच्या वास्तूने पुढे टिळक आणि आगरकर यांच्या अनेक आठवणी जतन केल्या. तेथे टिळकांचा पुतळाही आहे. वामन शिवराम आपटे, टिळक आणि आगरकर शेजारी-शेजारी राहत होते, असे अभ्यासक सांगतात; परंतु आगरकरांची निश्चित खोली कोणती, याचा शोध घेण्याचा प्रयत्न मात्र अद्याप झालेला नाही. भावी आयुष्याच्या अनेक योजना आगरकरांनी तेथील सादिलबुवाच्या टेकडीवर आखल्या. चांदण्या रात्रीत भटकंती करून टिळक व आगरकरांनी अनेक विषयांवर वादविवाद केले. राष्ट्रसेवेला सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा उभयतांनी याच वास्तूत केली. त्यामुळे या वास्तूचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे.
गोपाळराव जिथे-जिथे राहिले, तिथे-तिथे त्यांच्या राहणीमानाचे ठसे स्पष्टपणे उमटल्याचे संदर्भ मिळतात. काळी पगडी, पांढरा अंगरखा, शुभ्र काठाचे उपरणे, हातात महाबळेश्वरी सोटा आणि ब्राह्मणी चढाऊ जोडा, अशा त्यांच्या पेहरावाच्या या वास्तू साक्षीदार आहेत, डेक्कन कॉलेजमध्येच त्यांना आनुवंशिक अशा दम्याच्या विकाराने गाठले. त्याकडे दुर्लक्ष करीत ते सदैव कार्य करीत राहिले. या दम्याबाबत त्यांनी एक काव्यपंक्तीही त्या वेळी करून ठेवली आहे. ते म्हणतात –
‘‘मित्र दम्या रे वससी शरीरी ।
माझ्याच तू मानूनि सौख्य भारी ।
परंतु वाटे मज दुःख मोठे ।
मेल्यास मी जाशिल सांग कोठे ॥’’
स्वतःच्या घराचा असा ध्यास न घेतलेल्या या महापुरुषाचे बिर्‍हाड काही काळ शनिवार पेठेतील तांब्यांच्या वाड्यात होते. आज हा परिसर तांबे बोळ म्हणून ओळखला जातो. आजही हा वाडा अस्तित्वात आहे. मूळ मालकांनी त्याचा ट्रस्ट केला असून ते मुंबईला राहतात. आता तेथे ओनरशिपची योजना अस्तित्वात येत आहे. त्यामुळे हा वाडाही लवकरच स्मृतीच्या आड जाण्याची चिन्हे आहेत. पूर्वी हा परिसर घोडके बोळ म्हणून परिचित होता. पानशेतच्या प्रलयात या वाड्याचे दोन मजले पाण्यात होते. त्यानंतर त्याची पडझड होत राहिली. आज धोक्याचे घर म्हणून ही वास्तू ओळखली जाते. आगरकरांची ही साक्ष आता विनाशाच्या मार्गावर आहे.
टिळक, आगरकर, गोखले, श्रीधरपंत करंदीकर, शंकरराव लवाटे अशा मोठमोठ्या व्यक्ती या वाड्यात राहत होत्या, अशा आठवणी वामन मल्हार जोशी यांनी लिहून ठेवल्या आहेत. टिळक आणि आगरकर इथेही शेजारी-शेजारीच राहत होते. त्यापैकी आगरकर आधी राहायला आले आणि टिळक नंतर राहायला आले, असे संदर्भही मिळतात. नैतिक जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करणार्‍या गोपाळरावांच्या विचारांचा विवेकवाद हा पाया होता, हे स्पष्ट करणारी एक घटना वाचायला मिळते. आगरकरांचे रावसाहेब मेहेंदळे नावाचे एक स्नेही होते. त्यांच्या काही वस्तू आगरकरांच्या घरात होत्या. गोपाळरावांकडे त्या काळात चोरी झाली. त्यांनी सिटी पोलीस इन्स्पेक्टर स्मिथ यांच्याकडे तक्रार केली; परंतु वस्तू मिळाल्याच नाहीत. तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी या वस्तूंचे १५० रुपये मेेहेंदळे यांना दिले.
आगरकरांवर जे नाटक लिहिले गेले आहे, त्यातील संदर्भानुसार आगरकरांच्या काळात तांबे वाड्यावरच प्रतीकात्मक प्रेतयात्रा आली होती. त्या दिवशी आगरकर पुण्यात नव्हते असेही म्हटले जात असले, तरी प्रेतयात्रा आणणार्‍या गोपाळ जोशींचे परिवर्तन याच वाड्यात झाल्याचे नाटकात दाखविले आहे. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा सर्वच बाबतींत अत्यंत आधुनिक विचारांचा पुरस्कार करणार्‍या या द्रष्ट्या पुरुषाच्या घरगुती जीवनावरील एक प्रसंग नमूद करण्यासारखा आहे. एकदा दसर्‍याच्या सणाला त्यांनी विष्णू मोरेश्वर महाजनींना घरी जेवायला बोलावले होते. महाजनी हे आगरकरांचे गुरुवर्य होते. त्या वेळी ‘सुधारक’मध्ये गोपाळरावांनी बायकांनी जाकीट घालायला पाहिजे, असे लिहिले होते. आगरकरांच्या पत्नी, यशोदाबाई जेव्हा जेवणाचे आमंत्रण द्यायला गेल्या, तेव्हा सौ. महाजनी म्हणाल्या, ‘‘मी जाकीट घालून यायचे का?’’ तेव्हा ‘‘पुराणातली वांगी पुराणात,’’ असे उत्तर यशोदाबाईंनी दिले. आगरकर पत्नीवर आपली मते लादत नसत, हे स्पष्ट करणारी ही घटना. यशोदाबाईंचे पूजापाठ, व्रतवैकल्ये, कुलाचार यांच्या आड ते आले नाहीत; परंतु त्यातील दांभिकपणा मात्र ते पत्नीला पटवून देत असत. या वास्तू अशा लहानसहान गोष्टींच्या साक्षीदार आहेत.
डेक्कन कॉलेज, केसरी, सुधारक, डेक्कन एज्युकेशन सोसायटी असा आगरकरांचा प्रवास सर्वज्ञात आहे. टिळकपक्ष-आगरकरपक्ष, संमतीबिलाचा वाद, पंचहौद मिशन, चहाचे वादळ, रमाबाईंचे शारदासदन प्रकरण, होळकरांच्या देणगीचा वाद यांतील या दोन पक्षांतील वादांचे तपशील उपलब्ध आहेत.
वास्तूबाबत बेफिकीर राहिलेल्या आगरकरांच्या जीवनाची शेवटची चार वर्षे फर्ग्यसन महाविद्यालयात गेली, तेव्हा तेथे दोन खोल्यांचे छोटेखानी घर अस्तित्वात होते. त्या वेळचे स्वयंपाकघर, धुराडे, गोलाकार रचनेचे दरवाजे, दगडी बांधकाम याच्या खुणा आजही अस्तित्वात आहेत. लाकडी जाळीच्या खिडक्या आणि चुन्याच्या भिंती असलेल्या या वास्तूचे पुढे नूतनीकरण झाले. सहा खोल्या वाढविल्याने त्याचे बंगल्यात रूपांतर झाले.
‘सुधारक’ पत्रात आगरकरांनी अनेक धार्मिक बाबींवर कठोर टीका केली होती. त्याचा परिणाम असा झाला, की काही माथेफिरूंनी ‘आम्ही तुमचा खून करू’ अशी धमकीची पत्रे आगरकरांना पाठविली. त्या वेळी आगरकरांचे सहसंपादक गोपाळराव गोखले होते. दोघेही भाटवडेकरांच्या वाड्यात राहत होते. आगरकर चतुःशृंगीकडे फिरायला निघाले, तेव्हा याच वाड्यात गोखले त्यांना म्हणाले, ‘‘निदान काही दिवस तरी तुम्ही संध्याकाळी फिरायला जायचे सोडून द्या. तुम्ही परताल तेव्हा अंधार असेल. काही माथेफिरूंनी मनात आणले तर..?’’ यावर ‘‘हे काय भलतेच सांगता तुम्ही मला!’’ असे उत्तर देऊन आगरकर म्हणाले, ‘‘अहो या
माथेफिरूंच्या धमक्यांना भिऊन जर मी फिरायला जाणे बंद करू लागलो, तर उद्या सुधारकी पद्धतीने लिहायचेसुद्धा सोडून द्यावे लागेल मला.’’ नंतर आगरकर चतुःशृंगीकडे फिरायला निघून गेले.
फर्गसन महाविद्यालयातील आगरकरांच्या घरात प्रा. वि. मा. बाचल राहत होते. आगरकरांची स्मृती म्हणून ही वास्तू जतन करण्यासारखी आहे; परंतु डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्याबाबत उदासीन आहे. या वास्तूमध्येच टिळक-आगरकरांची शेवटची भेट झाली, या बाबतीत कुणाचेही मतभेद नाहीत. ‘‘टिळकांशी वाकुडपणा ठेवून मला शांत मरण यायचे नाही. हे मरायच्या आधी टिळक अगोदर आमच्याकडे आले, भेटले, बसले, कितीतरी वेळ बोलले आणि मगच गेले. इच्छेप्रमाणे टिळकांशी मैत्री करूनच हे गेले,’’ अशी आठवण यशोदाबाईंनी लिहून ठेवली आहे.
दम्याच्या विकारातच त्यांना यकृताचा त्रास जाणवू लागला. तो दिवस १७ जून १८९५ हा होता. शनिवारी आगरकरांनी रेचक घेतल्यामुळे त्यांची शक्ती क्षीण झाली. रविवारी रात्री ते उठले व शौचास जाऊन आल्यावर, ‘‘मी आता निजतो, तुम्हीही निजा’’ असे यशोदाबाईंना म्हणाले. या वेळी ते निजले ते कायमचेच. आगरकरांचा असा क्लेशदायक अंत या वास्तूने पाहिला. सध्याच्या व्हरांड्यात शिरल्यावर उजव्या बाजूकडील खोलीत त्यांचा अंत झाला. त्या दिवशी ‘सुधाकर’ या पत्राचा ७व्या वर्षाचा ३६वा अंक सकाळी बाहेर पडला होता.
या वास्तूतील टिळक व आगरकरांच्या शेवटच्या भेटीबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. टिळक आले तेव्हा आगरकर भिंतीकडे पाठ करून बोलले, असेही एक मत आहे. आगरकरांचे स्नेही सीतारामपंत देवधर यांच्या आठवणीत, ‘‘मनात वास्तविक तेढ असून बाह्यात्कारी मात्र प्रेमाचा आव आणू पाहणार्‍या भाषणापासून आजारी माणसाला त्रास होतो, हे काही खोटे नाही. कारण तुम्ही येण्यापूर्वी टिळक नक्राश्रू गाळीत बसले होते. त्यांना पाहताच अनेक अनिष्ट प्रसंगांचे स्मरण होऊन मन अस्वस्थ झाले व ‘‘हे येथून केव्हा एकदाचे जातात असे होऊन गेले,’’ असे आगरकर देवधरांना म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. या बाबतही दोन पक्षांच्या दोन बाजू आहेत; परंतु या दोन्ही महान राष्ट्रपुरुषांची संस्मरणीय अखेरची भेट ज्ञानवंतांच्या या वास्तूने पाहिली आहे. अलीकडेच माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, समाजवादी विचारांचे अग्रणी एस. एम. जोशी यांचे पाय या वास्तूला लागले. या सर्व वास्तूंमध्ये राहताना आपल्या पश्चात मुलाबाळांची काय व्यवस्था व्हावी, याचे आगरकरांनी नियोजन करून ठेवले होते. फर्ग्यनसमधील त्यांच्या घरात गोपाळराव गोखले यांना आगरकरांच्या मृत्यूनंतर एक पुरुचुंडी सापडली. त्यात वीस रुपये ठेवलेले होते व ‘माझ्या प्रेतदहनार्थी’ असे त्यावर लिहिलेले होते. संपत्तीची हाव न ठेवता पोटापुरता पैसा मिळविण्यात संतोष मानणार्‍या गोपाळरावांची लोककल्याणासाठीच जगण्याची वृत्ती त्यातून प्रतीत होते. अशा घटनांच्या साक्षीदार असणार्‍या या वास्तूंनी हा लोकनेता जवळून पाहिला.
निवासस्थान : २९०, ओंकारेश्वर देवळाचा चौक, शनिवार पेठ, पुणे ३०.
लेखक :
विकास वाळुंजकर
ज्येष्ठ पत्रकार
. . . . . मी श्री.विकास वाळुंजकर, श्री.सुधीर दांडेकर आणि फेसबुक यांचा आभारी आहे. थोर समाजसुधारक आगरकरांची अधिक माहिती इथे वाचावी. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B

८. लेखक रामचंद्र गुंजीकर

मोचनगड ही मराठीतील पहिली ऎतिहासिक कादंबरी लिहिणारे लेखक रामचंद्र गुंजीकर यांचे आज पुण्यस्मरण (३० एप्रिल १८४३ — १८ जून १९०१)
गुंजीकरांची मोचनगड ही मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी. शिवकालाच्या पार्श्वभूमीवर काल्पनिक पात्रे व प्रसंग निर्माण करून लिहिलेली ही कादंबरी आहे. शिवाजी महाराज ह्या कादंबरीत अगदी अखेरीअखेरीस येतात. कादंबरीच्या उद्दिष्टांविषयी गुंजीकरांच्या निश्चित कल्पना होत्या, असे दिसते. त्यांच्याशी प्रामाणिक राहून त्यांनी शिवकालीन इतिहासाची काटेकोर जाण ठेवली व शिवकालाचे जिवंत वातावरण निर्माण केले. ऐतिहासिक कादंबरीचा एक उत्कृष्ट आदर्श म्हणून अ. का. प्रियोळकरांसारख्या चिकित्सक विद्वानांनी ह्या कादंबरीला मान्यता दिली आहे.

संस्कृत आणि इंग्रजी ह्यांच्या जोडीला उर्दू, कन्नड, गुजराती आणि बंगाली ह्या भाषाही त्यांना येत होत्या. विद्याप्रसारास वाहिलेला मराठी ज्ञानप्रसारक बंद पडल्यानंतर निर्माण झालेली पोकळी विविधज्ञानविस्तार (१८६७) हे दर्जेदार मासिक काढून त्यांनी भरून काढली. ते संपादक म्हणून स्वतःचे नाव मात्र त्यावर घालीत नसत. भाषिकसंशोधन, व्याकरण, ललितवाङ्‌मय इ. विषयांवरील उत्तमोत्तम लेख त्यांनी त्यातून प्रसिद्ध केले आणि महाराष्ट्रातील ज्ञानलालसा व वाङ्‌मयीन अभिरुची ह्यांच्या वर्धनविकासात महत्त्वाचा वाटा उचलला.

मराठी भाषा आणि व्याकरण ह्यांविषयी त्यांनी स्वतः लिहिलेले लेखही उल्लेखनीय आहेत. विशेषतः मराठी व्याकरणासंबंधी त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे महत्त्व सर्वमान्य आहे. सात वर्षांनी विविधज्ञानविस्तारातून ते बाहेर पडले. १८७१ मध्ये निघालेल्या दंभहारक ह्या मासिकाचेही ते अप्रकट संपादक होते. त्यातही त्यांनी लेखन केले. मोचनगड (१८७१) व गोदावरी (अपूर्ण) ह्या कादंबऱ्या, अभिज्ञानशाकुंतलाचे मराठी भाषांतर (१८७०), रोमकेतु – विजया (विविधज्ञान विस्तारात प्रसिद्ध — १८७० — ७२, रोमिओ अँड ज्यूलिएट ह्या शेक्सपिअरच्या नाटकाचे मराठी भाषांतर), कन्नडपरिज्ञान… (१९०९) हे व्याकरणशुद्ध कानडी भाषेचे ज्ञान मराठीतून देण्यासाठी लिहिलेले पुस्तक इ. लेखन त्यांनी केले आहे. शिवाय लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्ति (१८७४) हे पुस्तक लिहून मराठीतून लघुलेखनाची ओळख करून दिली.

*********************

९. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे

इतिहासाचार्य वि.का.राजवाडे

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जन्म : २४ जून १८६३; मृत्यू : ३१ डिसेंबर १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
जीवन : वि. का. राजवाडे यांचा जन्म महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला.
बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले.
१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.
३१ डिसेंबर १९२६ रोजी राजवाडे यांचे निधन झाले.

राजवाडे म्हणायचे – ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेलाो नाही.

राजवाड्यांचा दरारा
महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले.

राजवाड्यांचे लेखन आणि प्रस्तावना
राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचे संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता.

राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकांबद्दल म्हणता येईल.

प्रतिभाशक्ती आणि आत्मविश्वास
राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभाशक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्‍वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयाससुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.

वि.का.राजवाडे यांचे इतिहासातिल कार्य
मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार* विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते.

इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले.
त्यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धेयांच्याच हकिकती नव्हेत’’, असे त्यांचे मत होते.
अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
विकीपीडियावरून साभार
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87

. . . . . . . . . . . . . . . . .

मराठीतून इतिहास भाषाशास्त्र व्युत्पत्ती व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्‍चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान. इतिहाससंशोधक म्हणून विशेषेकरून ते मान्यता पावलेले इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती (२४ जून)
मराठ्यांच्या इतिहासाचा म्हणजे प्रथम मुख्यतः राजकीय इतिहासाचा शोध घेत घेत ते त्यांच्या प्राचीन साहित्याकडेही वळले. जुन्या मराठी साहित्याचा अर्थ उलगडण्यासाठी तत्कालीन मराठी भाषेचे ज्ञान अपरिहार्य ठरले. ह्यांतून ते शब्दाच्या उगमांकडे -व्युत्पत्तिशास्त्राकडे व भाषेतील स्थित्यंतरांच्या अनेकविध प्रश्नांकडे वळले. महाराष्ट्रातील व्यक्तींची उपनामे, ग्रामनामे वगैंरेची मुळे ते शोधू लागले आणि ती बहुशः संस्कृतोद्भव आहेत, अशा निष्कर्षाप्रतही ते पोहोचले. त्यासाठी संस्कृत भाषेचा आणि वैदिक भाषेचाही सखोल विचार करणे आवश्यक झाले आणि त्या दृष्टींनीही त्यांनी संशोधन करून काही प्रंबधही सिद्ध करून ठेवले. त्यांपैकी काही त्यांच्या हयातीत तर काही त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. राजवाड्यांचे ह्या क्षेत्रातील कार्य गौरवास्पद असले, तरी त्यांचे भाषाव्युत्पत्तिविषयक निबंध सदोष असल्याचे काही भाषाशास्त्रज्ञांनी दाखवून दिले. ह्या एवढ्या गहन विषयात शिरणाऱ्या राजवाड्यांनी ललित साहित्याचे वाचन आणि रसग्रहणही सुंदर रीतीने केले, हे त्यांच्या ‘कांदबरी’ ह्या दर्जेदारसमीक्षात्मक लेखावरून कळून चुकते.
माधव विद्वांस

फेसबुकवरून साभार . . दि.२४-०६-२०२१

——————-

Kundan Daulatrao Bacchav
इतिहास-संशोधक इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (12 जुलै 1864 – 31 डिसेंबर 1926) यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या ग्रंथाचे 22 खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. धुळ्याला राजवाडे संशोधन मंडळ या संस्थेत त्यांच्या संशोधनाविषयी अनेक साधने जतन केली आहेत. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या संग्रहाच्या जतनाची व्यवस्था त्यांचे शिष्य तसेच धुळ्याचे सुप्रसिद्ध वकील तात्यासाहेब तथा भास्कर वामन भट यांनी अथक प्रयत्न करुन केली. राजवाडे यांचे स्मारक म्हणून राजवाडे संशोधन मंदिर तात्काळ उभारण्याचा निर्णय झाला.
दिनांक 27 डिसेंबर 1929 रोजी राजवाडे संशोधन मंदिराची कोनशिला बसविण्यात आली आणि दिनांक 5 जानेवारी 1932 रोजी राजवाडे मंदिराचे उद्घाटन सौ. महाराणी इंदिराबाई होळकर (माँसाहेब) यांच्या हस्ते झाले. राजवाडे यांनी गोळा केलेल्या असंख्य दुर्मिळ प्राचीन संस्कृत प्राकृत हस्तलिखित ग्रंथ व ऐतिहासिक कागदपत्राच्या मोठ्या 10 पेट्यांना येथे संग्रहात ठेवण्यात आले. राजवाडे मंडळाच्या दैनंदिन खर्चाच्या सोयीसाठी त्यांनी राजवाडे बँक उभी केली.
राजवाडे यांच्या अमोल ठेव्यांचे दर्शन व्हावे म्हणून वस्तुसंग्रहालयासाठी पैसा उभा केला. संशोधक हे त्रैमासिक सन 1932 पासून सुरु केले. सुमारे 25 हजार पुस्तकांचे ग्रंथालय उभारले.
या ऐतिहासिक ठेव्याचे डिजिटलायजेन करण्यासाठी फार मोठा खर्च येणार होता. त्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्याकडून 10 लाख तर नेहरू केंद्रातर्फे पाच लाख अर्थसहाय्य मिळाले आणि हे कार्य पार पाडले. आणि पवारसाहेबांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन 25 नोव्हेंबर 2014 रोजी झाले.
बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर राजवाडे यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. 1898 साली त्यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. 7 जुलै 1910 रोजी पुण्याला भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.
राजवाडे म्हणायचे – ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीसाठी हपापलेला नाही. महाराष्ट्राच्या विचारविश्‍वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दबदबा होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या.

तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले. राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचं संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या.
राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता. राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकांबद्दल म्हणता येईल. त्यांंच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
💐💐💐👏👏👏

फेसबुकवरून साभार दि.२४-०६-२०२१

💐💐💐👏👏👏

१०. जमशेदजी टाटा

जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ – १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.
त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.

सुरुवातीचे जीवन
जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून कॉलेजच्या प्रिन्सिपॉलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला.
१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.

व्यवसाय
१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.
त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचे उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.

टाटा स्टील
झारखंडमधील साचि गावात टाटांचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. येथील रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे. टाटा स्टील (पूर्वी टिस्को – टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.

टाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस्था
बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था.
टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव – टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.

व्यक्तिगत जीवन
टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.

मृत्यू
१९०० साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेले असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले

. . . . विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून साभार

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील टाटांचा पुतळा

Hurun Research and EdelGive Foundation या संस्थेने २०२१ मधे सादर केलेल्या रिपोर्ट नुसार जगात गेल्या १०० वर्षात ज्या लोकांनी आपल्या कमाईचा सर्वाधिक वाटा लोक कल्याणासाठी दिला अश्या यादीत भारताचे ‘जमशेदची टाटा’ यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. त्यांनी केलेल्या लोक कल्याण कामासाठी दिलेल्या कमाईची अंदाजित किंमत आज जवळपास १०२.४ बिलियन (१ बिलियन म्हणजे १०० कोटी) अमेरीकन डॉलर च्या घरात आहे.

Indian business doyen Jamsetji Tata has emerged as the world’s largest philanthropist in the last 100 years, donating $102 billion, as per a report prepared by Hurun Research and EdelGive Foundation. Jamsetji Tata is ahead of others like Bill Gates and his now-estranged wife Melinda who have donated $74.6 billion, Warren Buffet ($37.4 billion), George Soros ($34.8 billion) and John D Rockefeller ($26.8 billion), the list showed.

*********************

११. सर जमशेटजी जीजीभॉय

जमसेटजी जीजीभॉय यांचा जन्म मुंबईत झाला. सोळा वर्षाच्या वयातच ते कलकत्तामार्गे चीनला गेले. नंतर त्यांनी चीनच्या अनेक सफरी केल्या आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सहाय्याने भारत, इंग्लंड आणि चीन या देशांमध्ये कापूस आणि अफूचा व्यापार इतका वाढवला की त्यामधून त्या काळात कोट्यावधीची कमाई केली. त्यांची स्वतःची जहाजे होती. इंग्रज सरकारतर्फे त्यांना ‘सर’ हा बहुमान मिळाला.
गरीबीमध्ये जन्माला येऊन श्रीमंत झालेल्या जमशेटजींनी अगदी सढळ हाताने दानधर्म केला आणि गरीबांसाठी मुंबईतले पहिले मोठे हॉस्पिटल बांधले, तसेच अनेक ठिकाणी शाळा, धर्मशाळा, विहिरी, तलाव, रस्ते, पूल वगैरे बांधले. मुंबई शहराच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. अधिक माहिती इथे.
https://en.wikipedia.org/wiki/Jamsetjee_Jejeebhoy

जमशेदजी जीजीभाय (Jamsetjee Jejeebhoy) (जन्म : मुंबई, १५ जुलै, इ.स. १७८३; मृत्यू : मुंबई, १४ एप्रिल इ.स. १८५९) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते. त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली. चीन सोबत त्यांनी कापूस आणि अफूच्या व्यापारात मोठा पैसा मिळवला.

लोकहितकारी कामे
माहीम बेट वांद्ऱ्याला जोडणारा ‘माहीम कॉजवे’ जमसेटजींच्या पत्नी अवाबाई यांनी दीड कोटी रुपयांची मदत केली म्हणून १८४५ साली बांधून झाला. जमसेटजींच्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे मुंबईचे ‘जे. जे. हॉस्पिटल’ उभे राहिले. राणीबागेतील ‘डॉ.भाऊ दाजी लाड म्युझियम’ची इमारत जमसेटजी जीजीभाय यांच्या उदार देणगीतून उभी राहिली. जमसेटजींनी दिलेल्या दीड लाख रुपयांच्या देणगीतून १८३१ साली उभी राहिलेली बेलासिस रोड येथील धर्मशाळा आजही कार्यरत आहे. जमसेटजींच्या मोठमोठ्या देणग्यांमधून उभ्या राहिलेल्या सार्वजनिक आणि धर्मादाय संस्थांची संख्या १२६ हून अधिक आहे. त्यामध्ये सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌स, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्किटेक्चर, सर जे.जे. स्कूल ऑफ कमर्शियल आर्ट यांचाही समावेश होतो. जीजीभायनी सुरत, नवसारी, मुंबई आणि पुण्यात रुग्णालये, शाळा, अग्यारी स्थापन करून विहिरी तसेच तलाव खोदले. त्यांनी पांजरापोळ या संस्थेस गुरांच्या पैदाशीसाठी ८०,००० रुपयांची देणगी दिली. मुंबईतल्या ठाकुरद्वार येथे जमसेटजींनी गुरांच्या मोफत चरणीसाठी २०,००० रुपये देऊन समुद्रकाठाजवळ जमीन घेतली. पुढे याच ठिकाणी ‘चर्नी रोड’ हे रेल्वे स्थानक झाले.

पारसी नाटकांसाठी नाट्यगृह
मुंबईमध्ये पारसी नाटकांची सुरुवात जमसेटजी जीजीभाय यांनी केली. त्यासाठी त्यांनी सन १७७६ साली बांधलेले बॉम्बे थिएटर आणि ग्रॅन्ट रोड थिएटर येथून सुरुवात केली. १८५३ साली बहुधा ऑक्टोबर महिन्यात पहिल्या पारसी नाटकाची निर्मिती झाली. सुरुवातीला नवशिक्यांनी सुरू केलेली ही नाट्य चळवळ थोड्याच काळात व्यावसायिक झाली.

पुरस्कार आणि सन्मान
जमशेटजींच्या या समाजहितकारी कार्याची पावती म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाइटहूड’ व ‘बॅरोनेट’चा बहुमान दिला.. हा मान मिळालेले जमशेटजी हे पहिले भारतीय होत.
जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात जमशेटजी जीजीभॉय यांचा भव्य पुतळा उभारला आहे. तो पुतळा आजही वंद्य मानला जातो.
. . . . . विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जे जे हॉस्पिटल दीडशे वर्षांपूर्वीचा देखावा

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट हे नाव कलाशिक्षणामध्ये आदरानं घेतलं जातं. मुंबईला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. या संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं निश्चित असं स्थान निर्माण केलं आहे.
मुंबईत वकील, डॉक्टर असे व्यावसायिक तयार होऊ शकतात, तर चित्रकार, शिल्पकार का निर्माण होऊ नयेत? इतर क्षेत्रात आघाडीवर असणारी मुंबई कलाक्षेत्रात इतकी मागे का, असा विचार गांभीर्याने मांडून वाचकांचं लक्ष वेधून घेणारा लेख तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्र ‘द टेलिग्राफ ऑफ कुरिअन’मध्ये ३ डिसेंबर १८५२ रोजी प्रकाशित झाला होता. कलाशिक्षणाच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जमशेटजी जीजीभाई आणि जगन्नाथ शंकरशेठ यांनी कलाशाळा सुरू करण्यासाठी पुढे यावं असं त्या लेखात सूचित केलं होतं.
पत्रव्यवहार, सल्लामसलती, समित्या असे बरेच काही होऊन अखेर २ मार्च १८५७ रोजी मुंबईत कला व औद्योगिक शाळेचे उद्धाटन झाले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री असे नाव असलेल्या या शाळेत दुसऱ्या दिवसापासून एलेमेन्टरी ड्रॉईंग व डिझाईनचा वर्ग एलफिस्टन शाळेत सुरू झाला. पुढे ब्रिटिश चित्रकार जोसेफ ए. क्रो यांची कलाशाळेचे अधिक्षक म्हणून ऑगस्ट १८५७ मध्ये नेमणूक झाली. मुंबईच्या कला व औद्योगिक शाळेच्या अभ्यासक्रमाची मदत घेऊन अलंकारिक रेखाटन, मॉडेलिंग आणि कास्टिंग, कुंभारकला, लाकडी कोरीव काम, लिथोग्राफी, फोटोग्राफी इत्यादि विषयांबरोबरच डिझाईन आणि रेखाटन या प्राथमिक विषयांनाही प्राधान्य देण्यात आले.
शाळेला स्वतंत्र जागा हवी असल्याची जाणीव सरकारला आणि जमशेटजींना झाली. बाबुला टँक व एस्प्लनेड मैदान यांच्या जवळची जागा देण्याची शिफारस सरकारने केली व कलाशाळेच्या व्यवस्थापक समितीने ती मान्य केली. सुरुवातीला नवीन इमारतीचा आराखडा तत्कालीन प्रसिध्द ब्रिटीश वास्तुकार विल्यम बर्ग यांनी तयार केला होता. त्यांच्या आराखडयात जॉर्ज व्टिग मोलेसी यांनी बदल करून बर्ग, स्मिथ आणि जोन्स यांनी सध्याचा आराखडा तयार केला. त्यात फ्रेंच गॉथिक पध्दतीच्या कमानी, भरपूर उजेड व हवा असलेला स्टुडिओ(हॉल) असलेली दुमजली इमारत साकारली. जॉन फुल्लर यांच्या देखरेखीखाली व खान बहाद्दूर मंचरजी कावसजी मर्झबान यांच्या सहकार्याने तीन वर्षांत डॉ. दादाभाई नौरोजी मार्गावरील (पूर्वीचा हॉर्न बी रोड) सध्याची इमारत बांधण्यात आली आणि १८७८ साली सदर इमारतीत कलाशाळा सुरू करण्यात आली. यासाठी दोन लाख रुपये खर्च आला. त्यातले दीड लाख रुस्तमजी जमशेटजी जीजीभाई यांनी दिले व ब्रिटीश सरकारने १२ हजार रुपये अनुदान दिले होते. मुंबई कला शाळेचे आधीचे नाव ‘द सर जमशेटजी जीजीभाई स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री’असे होते. परंतु या नावातला ‘इंडस्ट्री’ हा शब्द १८७३ साली गाळण्यात आला.

*****************************

१२. रावबहाद्दूर डॉ. विश्राम रामजी घोले

मी पुण्यात इंजिनियरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये रहात होतो त्या काळात जंगली महाराज रोडवरून फिरत असतांना ‘रावबहाद्दूर घोले रोड’ या एका मोठ्या रस्त्याची पाटी नेहमी पहात होतो आणि हे कोण महान गृहस्थ होते असा विचार करत होतो. त्या काळात तरी मला त्यांच्याबद्दल माहिती असणारा कुणी भेटला नव्हता. पन्नास वर्षांनंतर फेसबुकवर श्री.माधव विद्वांस यांचा लेख मिळाला. त्यांचे मनःपूर्वक आभार.

महात्मा फुले यांचे सहकारी नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ विश्राम रामजी घोले यांचे आज पुण्यस्मरण (१०-०९-२०२१)
अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम करणारे निष्णात शल्यविशारद.
पुण्यातल्या जहालांचे आणि मवाळांचे, ब्राह्मणांचे आणि ब्राह्मणेतरांचे मित्र.
शेती उद्योग, वैद्यक, शिक्षण…अनेक क्षेत्रांतल्या विधायक उपक्रमांचे साथी.
नगरपालिकेचे दीर्घकाळचे जागरूक सेवाभावी सभासद. राजहंस प्रकाशना मार्फत “डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार”हे त्यांचे चरित्रावर आधारित अरुणा ढोरे यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे
सागर खरपुडे यांचे ब्लॉगवर कोकणातील यादवांचा संचार हे घोले व तत्सम यादवकुलीन घराण्यांची छान माहिती दिली आहे
खालील माहिती विकिपीडिया मधून
डॉ. विश्राम घोले (इ.स. १८३३ – इ.स. १९००) हे पुण्यातील एक निष्णात शल्यविशारद आणि उदारमतवादी समाजसुधारक होते.
यादव गवळी समाजातून आलेले डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात फर्स्ट कलास सरदाराचा म्हणजे संस्थानिकांच्या बरोबरीचा दर्जा होता. त्यांची लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, जोतिबा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, कृष्णशास्त्री-विष्णूशास्त्री चिपळूणकर अशा पुण्यातल्या अनेक सुधारकांशी मैत्री होती.
विश्राम रामजींना वडील सोजीर असल्याने शिक्षणाची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करुन ते सर्जन झाले. गोर्‍या पलटणीत १८५७च्या धामधुमीतही डॉकटर म्हणून ते भारतभर फिरले आणि मानमरातब प्राप्‍त करून १८७४ साली पुण्यात स्थायिक झाले.
स्त्री-शिक्षण, मागास जातीतील सुधारणा, शेती व उद्योग या क्षेत्रांतही डॉ. विश्राम रामजी घोले या बुद्धिमान आणि कर्तबगार व्यक्तीचे कार्य होते. १८५७ सालच्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात डॉ. घोले यांनी एक सर्जन म्हणून निःपक्षपातीपणे कामगिरी बजावली होती. नंतरच्या काळात, बिटिश अधिकारी तसेच पारशी-मारवाडी समाजातले श्रीमंत पेशंट, तत्कालीन समाजसुधारक व राजकीय चळवळीतले नेते आणि सामान्यजन अशा त्या ऐन इंग्रजी अमदानीतल्या सर्व थरांतील रुग्णांचे ते डॉकटर होते.
विश्राम रामजींची भूमिका समन्वयवादी होती. ‘ज्ञानप्रकाश’च्या संपादक मंडळातही त्यांचे मित्र होते. आणि सत्यशोधक समाजाच्या व्यास-पीठावरही त्यांचा वावर होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि जोतिबा फुले यांच्यातील वैमनस्य विकोपाला जाऊनही या दोघांशी विश्राम रामजींचे सख्य होते.
पुण्यात बाहुलीचा हौद म्हणून जे ठिकाण होते त्या हौदाच्या मध्यावर विश्राम रामजींची थोरली मुलगी काशीबाई ऊर्फ बाहुली हिचे शिल्प होते. वयाच्या नवव्या वर्षी, १८७७ मध्ये काशीबाई मरण पावली. तिला डॉ. घोले यांनी इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. घोले यांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती व महिलांचा याला प्रखर विरोध होता. जातीतील प्रमुख लोकांनी घोले यांनी मुलीला शिकवू नये असा सल्ला अनेक वेळा दिला व तसे न केल्यास जातीतून बहिष्कृत करण्याची धमकीही दिली. काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तींनी काशीबाईला काचांचा लाडू खायला घातल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ती मृत्युमुखी पडली.
मात्र या घटनेनंतरही विश्राम रामजींनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केले.
१८७५ सालच्या दुष्काळानंतर विश्राम रामजींनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आपले लक्ष केंद्रित केले. शेतीविषयक अनेक प्रयोग त्यांनी केले. शेतकरी मासिकाच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला आणि आर्थिक कारणांमुळे हे मासिक बंद पडू नये, याची सुरुवातीच्या काळात त्यांनी काळजी घेतली.
विश्राम रामजींची कन्या गंगूबाईचा विवाह डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्याशी झाला. रघुनाथरावही एक निष्णात सर्जन होते. इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करताकरता त्यांनी वेदान्त धर्माचे अध्ययन आणि अध्यापन चालू ठेवले होते.
घोले यांनी आपल्या दिवंगत मुलीच्या स्मरणार्थ पुण्यात बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातिधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.

श्री. माधव विद्वांस आणि फेसबुक यांचे मनःपूर्वक आभार दि. १०-०९-२०२१


१३. गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी

समाजसुधारणाविषयक शतपत्रे लिहिणारे रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचे आज पुण्यस्मरण. त्यानिमित्त माझा दैनिक प्रभात पुणे मधील लेख त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथेच पार पडले. त्यांनी न्यायमुर्ती रानडे,विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सहकार्याने बुधवारवाडा येथे पुण्यात पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने ७ फेब्रुवारी, इ.स. १८४८ रोजी केली.कालांतराने या ग्रंथालयाचे नाव पुणे नगरवाचन मंदिर झाले. १३ मे १८७९ रोजी बुधवारवाडा आगीत भस्मसात झाला. त्यानंतर दहा वर्षे ग्रंथालय पुणे सार्वजनिक सभेच्या जागेत होते. १५ मे १८८२ रोजी वाचनालयासाठी सध्याची लक्ष्मीपथावरील बेलबागे समोरील जागा खरेदी करणेत आली. सुरवातीस इंग्रजी राजवट सुरु झालेवर ज्या काही मंडळींनी शिक्षण घेतले व शासन दरबारी व समाजात प्रतिष्ठा मिळविली त्यापैकी लोकहितवादींचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. १८४६ मध्ये ते तत्कालीन मुन्सफ या न्यायाधीश समकक्ष पदाची परीक्षा पास झाले. वर्ष १८५१ मधे ते वाई येथे न्यायाधीश झाले. वर्ष १८५६ मधे त्यांची नेमणूक सहाय्यक आयुक्त म्हणून झाली. वर्ष १८५७ ते १८६१ या कालावधीमध्ये ते आयुक्त या पदावर होते. त्यानंतर वर्ष १८६२ मधे त्यांची नेमणूक सहाय्यक न्यायाधीश (मुंबई सरकार ) म्हणून झाली व वर्ष १८७९ मध्ये त्याच पदावरून निवृत्त झाले. वर्ष १८६७ मधे अहमदाबाद येथे स्मॉलकॉज कोर्टात जज्ज म्हणून नियुक्ती झाली. वर्ष १८७८ मधे ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले. वर्ष १८७७ मधे ब्रिटिश सरकार ने त्यांना लॉर्ड लिटन यांच्या हस्ते दिल्ली दरबारात तत्कालीन मानाची रावबहादुर ही पदवी दिली. त्यांनी यांनी भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर ‘ या साप्ताहिकातून वर्ष १८४८ मध्ये शतपत्रे लिहिण्यास सुरुवात केली, त्यातून त्यांनी ऐतिहासिक – धार्मिक – राजकीय व सामाजिक माहिती दिली. त्यांनी वर्ष १८४२ मधे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘हिंदुस्थानचा इतिहास‘ हे पुस्तक लिहिले. मात्र पुस्तकाचे प्रकाशन वर्ष १८७८ मध्ये झाले. वर्ष १८४८ पासून त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकात, लोकहितवादी या नावाने प्रबोधनपर लेखन केले. हे त्यांचे कार्य राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे दीपस्तंभ ठरले आहे. ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारकसुधारक विचारांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळ संख्येने १०० असलेल्या या निबंधमालिकेत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ हे विषयही समाविष्ट केले आहेत. लोकहितवादींनी त्यांनी आपल्या लेखनात समाजहिताला प्राधान्य दिले व त्याअनुषंगाने प्रबोधनपर लेख लिहिले . त्यांनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत, तसेच त्यांना शिक्षण व विवाह याबाबत मतस्वातंत्र्य असावे, विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधातील, पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते.तसेच अर्थशास्त्रावर मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच लेखक ठरले. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. “मातृभाषेतून शिक्षण” या तत्वाचा त्यांनी प्रसार केला.
श्री. माधव विद्वांस . . . . . . फेसबुकवरून साभार दि.०९-१०-२०२१

समाजसुधारणेसाठी व्रस्तस्थ लोकहितवादी!

एकोणिसाव्या शतकातील मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक रावबहादूर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांचा आज स्मृतिदिन. लोकहितवादी या टोपणनावाने त्यांनी प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. १८ फेब्रुवारी १८२३ रोजी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झाला. कोकणातील वतनदार घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव सिद्धये असे होते. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रुढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. गोपाळराव देशमुख यांना ग्रंथसंग्रह करण्याची आणि वाचनाची आवड होती. त्यातही इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. इतिहास विषयावर त्यांनी दहा पुस्तके लिहिली आहेत. १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांमध्ये गोपाळ हरी देशमुख हे एक होते. मराठी शाळेत शिक्षण सुरू असतानाच त्यांनी इंग्रजीचे धडे गिरवले. वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते सदर अदालतीची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९६२ मध्ये ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक, सातारा येथील न्यायालयात काम केले. लोकांनी ज्ञानी व्हावं, जुन्या रुढी परंपरांना बाजूला ठेवावं, त्याप्रमाणेच इंग्रजी भाषेवर असावं, असे लोकहितवादींना नेहमी वाटायचं. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबर तंत्रज्ञान आणि नानाप्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती.
रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया’ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी १८४२ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी ‘हिंदुस्थानचा इतिहास’ हे पुस्तक लिहिले, पण पुस्तकाचे प्रकाशन १८७८ मध्ये झाले. १८४८ पासून त्यांनी मुंबईतून निघणार्‍या प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लेखन करण्यास सुरुवात केली. या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्राद्वारे लेखन केले. अशाप्रकारे १८४८ ते १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान’ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. ‘मातृभाषेतून शिक्षण’ या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर हेन्री ब्राउन यांच्या पुढाकाराने गोपाळरावांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला. गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते. ९ ऑक्टोबर १८९२ मध्ये या थोर समाजसुधारकाचे निधन झाले.

आपलं महानगर वरून साभार दि.०९-१०-२०२१

नामदार गोपाळ कृष्ण गोखले

मी शाळेत शिकत असतांनाच्या काळात न्या.रानडे, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर वगैरे अनेक नावे नुसती ऐकली होती. तेंव्हा मी आमच्या गावाबाहेरचे जग पाहिले नसल्यामुळे ही सगळी मंडळी एकाच काळात पुण्यातल्या एकाद्या वाड्यात किंवा गल्लीत रहात असावी अशी माझी खुळचट कल्पना होती. मोठेपणी लोकमान्य टिळक सोडले तर इतर कुणाविषयी फारसे काही कानावर आलेही नाही.

यांच्यातले न्यायमूर्ती रानडे हे तर सरकारी कोर्टात जज होते म्हणजे थेट सरकारी नोकरच होते. ते यांच्यात सर्वात जुने होते. त्यांना गुरुस्थानी मानणारे नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे काँग्रेसमधील मवाळ किंवा नेमस्त लोकांचे पुढारी होते. दयाळू इंग्रज सरकारला अर्जविनंत्या करून जनतेच्या भल्यासाठी त्यांच्याकडून काही सवलती मिळवाव्यात, जनतेच्या उपयोगाची काही कामे करवून घ्यावीत असे प्रयत्न ते करत असत. याचा अर्थ तेही एका दृष्टीने सरकारशी सहकार्य करत असत आणि सरकारने नेमलेल्या समित्यांवर काम करत असत. लोकमान्य टिळक जहाल पंथाचे होते म्हणजे तेही हातात तलवार किंवा बंदूक घेऊन प्रत्यक्ष लढाई करत नव्हते, पण “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” यासारखे अग्रलेख लिहून सरकारला कागदावरच खडसावत असत. त्यासाठी त्यांच्यावर खटला भरला गेला आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. तेंव्हा त्यांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ही प्रसिद्ध घोषणा न्यायालयामध्येच केली होती. शिवाय त्यांनी गणेशोत्सवासारख्या माध्यमामधून लोकांना एकत्र आणून त्यांच्यात जनजागृति केली होते हे एक फार मोठे काम केले होते. या सगळ्या कारणांमुळे मला लहानपणी तरी नामदार गोखल्यांविषयी तितकासा आदर वाटत नव्हता.

काही लोक गोपाळ कृष्ण गोखल्यांना महात्मा गांधी यांचे गुरु मानतात. तसे गांधीजींनी कुठे लिहून ठेवले आहे का किंवा त्यांच्या चरित्रांमध्ये तसा उल्लेख आहे का हे मला माहीत नाही. गोखले हे व्यवसायाने प्राध्यापक होते, पण गांधीजी कधीच त्यांच्या वर्गात शिकत नव्हते. ते गांधीजींपेक्षा फक्त तीनच वर्षांनी मोठे होते आणि गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परत आल्यानंतर थोड्याच काळाने गोखल्यांचे अकाली निधन झाले. त्यांना एकमेकांचा फारसा सहवास मिळाला असावा असे मला वाटत नाही. पण “इंग्रजांशी लढतांना हिंसेचा मार्ग उपयोगाचा नाही” एवढे गोखल्यांचे तत्व मात्र गांधीजींनी जन्मभर पाळले. गांधीजींनी देशाच्या राजकारणात उतरायच्या आधी देशभर हिंडून त्या काळातल्या सामान्य जनतेची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून घ्यावी असे गोखल्यांनी त्यांना सांगितले आणि त्यानुसार गांधीजींनी देशभर भ्रमंति केली असे म्हणतात. गोखले हे जन्मभर काँग्रेसमध्ये कार्यरत होते आणि गांधीजींनीही भारतात येताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला यात काहीतरी दुवा नक्कीच असणार.

गोपाळ कृष्ण गोखले यांनी इंग्रज सरकारशी सामोपचाराचे धोरण ठेवले असले तरी त्याांनी कधीही सरकारी नोकरी केली नाही आणि सरकारकडून पगार घेतला नाही. याविषयीचा एक लेख खाली दिला आहे. या लेखाचे लेखक संकेत कुलकर्णी आणि माझे मित्र सुधीर काळे यांचा मी आभारी आहे. . . . आनंद घारे

गोपाळ कृष्ण गोखले यांचेविषयी विकिपिडियावरील माहिती इथे
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87

 • – – – – – — — – – — — – –

आज ९ मे. प्रत्यक्ष गांधी ज्यांना ‘महात्मा’ म्हणायचे आणि राजकीय गुरू मानायचे – ज्यांनी १९०१ साली गांधींना आफ्रिका सोडून कायमचे पुन्हा भारतात यायचा आणि संपूर्ण भारत स्वत: फिरून पहायचा सल्ला दिला होता – ज्यांना प्रत्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांनी आपला मानसपुत्र मानलं होतं – त्या गोपाळ कृष्ण गोखल्यांची आज १५५ वी जयंती.
गोपाळ कृष्ण गोखल्यांचे जन्मगाव रत्नागिरीतले कोतळूक. जन्म १८६६ चा. कोल्हापुरात राजाराम कॉलेज आणि नंतर मुंबईत एलफिन्स्टन कॉलेजात शिक्षण. ते संपलं १८८४ मध्ये आणि त्यांनी डेक्कन एज्युकेशन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी पत्करली. ती सुरु असतानाच गोखले कॉंग्रेसमध्ये आले १८८९ मध्ये. थोड्याच कालावधीत कॉंग्रेसमधील मवाळ गटाचे नेतृत्व गोखल्यांकडे आले. इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर गोखल्यांचा विश्वास होता. इंग्रज सरकारशी सामोपचाराने वागून भारतीयांसाठी जास्तीत जास्त हक्क आणि राज्यकारभारात स्वायत्तता मिळवायला हवी हे त्यांचे मत होते. पण हे सगळे करत असताना इंग्रज सरकारची कोणत्याही प्रकारची पगारी नोकरी करणे किंवा इंग्रज सरकारचा कसलाही मिंधेपणा पत्करणे त्यांना मान्य नव्हते. ह्या मताशी ते आयुष्यभर एकनिष्ठ राहिले.
१९१२ साली त्यांची नेमणूक पब्लिक सर्विसेसच्या रॉयल कमिशनवर झाली असतानाची गोष्ट. कमिशनच्या नियमानुसार गोखल्यांना कळविण्यात आलं की कमिशनचं काम सुरु असताना जेव्हा ते भारतात असतील तेव्हा त्यांना महिना १५०० रुपये पगार अधिक रोजचे १५ रुपये अलाऊन्स मिळेल. जेव्हा ते इंग्लंडमध्ये असतील तेव्हा त्यांना महिन्याचे १०० पौंड पगार अधिक रोजचे १ पौंड १ शिलिंग अलाऊन्स मिळेल.
तेव्हा गोखल्यांनी सरकारला खास पत्र लिहून विचारलं की हा जो पगार दिला जातोय तो नुसते कमिशनचे काम सुरु असताना दिला जाणारा तात्पुरता भत्ता आहे की त्यांना सरकारचे पगारी नोकर बनवून त्यांना हा पगार सुरु केलेला आहे? जर ते सरकारी नोकर म्हणून गणले जात असतील तर तो पगार स्वीकारण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही. सरकारनेही पगारी नोकराची वागणूक दिलेली त्यांना अजिबात मान्य नाही.
हे पैशांचे आकडे १९१२-१३ चे आहेत बरं का! ही भरपूर रक्कम होती त्यावेळी. आणि ही जरी सरकारी नोकरी मानली तरी ती संधीही सहजासहजी कोणालाही मिळणारी नव्हती. पण सरकारी नोकर बनून पगार घेतला तर आपण सरकारचे मिंधे बनू आणि आपल्याला बरोबरीच्या नात्याने सरकारशी चर्चा विचारविनिमय करता येणार नाही किंवा योग्य मागण्यांसाठी सरकारवर दबाव टाकता येणार नाही – ह्या फक्त एकाच भावनेतून रॉयल कमिशनवर आमंत्रित ‘मवाळ’ गोखले सरकारला ठणकावून सांगत आहेत की सरकार हे पैसे जर पगार म्हणून देत असेल तर त्यांना ते नकोत. ह्याऊप्पर सरकारचा पगारी नोकर बनणे त्यांना अजिबात मान्य नाही!
सोबत ब्रिटीश लायब्ररीत जपून ठेवलेल्या ह्या गोखल्यांनी लिहिलेल्या पत्राचा फोटो देतोय. नक्की वाचून पहा. खाली गोखल्यांची सहीही आहे – जी सहसा पहायला मिळत नाही.
आज जयंतीनिमित्त गोपाळ कृष्ण गोखल्यांना सादर प्रणाम!

– संकेत कुलकर्णी (लंडन)

स्वातंत्र्यवीर सावरकर – १

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्य मला मिळालेल्या लेखांचे संकलन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील लेखांच्या संग्रहाचा दुसरा भाग : https://anandghare.wordpress.com/2021/05/28/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-2/

विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन (२६ फेब्रुवारी,१९६६)

प्रायोपवेशन करून तात्यारावांनी देह त्यागला. त्या संदर्भात मी इंटरनेटवर शोधाशोध सुरु केली आणि मला सुभाष नाईक हे नाव दिसले .(स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनाच्या स्मृतीनिमित्तानें) त्यानी लिहिलेला एक लघुलेख वाचायला मिळाला..तेवढ्यासाठी मी मा.सुभाष नाईक याना फोन केला,त्यांच्याशी बराच वेळ बोललो. त्यांचा लेख नावानिशी, अपलोड करू का ? म्हणून परवानगी मागितली,त्यांनी त्याला मान्यता दिली त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार .त्यांचा लेख देत आहे.

मृत्यु आणि स्वा. सावरकर : स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनाच्या स्मृतीनिमित्तानें

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेला होता.

‘की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास निसर्गमाने
जे दिव्यदाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे

यावरून त्यांचे सुस्पष्ट विचार आपल्याला कळतात. त्यांच्या जीवनातल्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या आपल्या ‘हे स्वतंत्रते’ या स्फूर्तिप्रद कवितेत त्यांनी म्हटलेलें आहे – ‘तुजसाठि मरण तें जनन , तुजवीण जनन तें मरण’. देशाच्या स्वातंत्र्याचा एवढा ध्यास की त्यावरून निज-जीवन ओवाळुन टाकावें, अशी त्यांची वृत्ती व कृती होती.

लंडनमध्ये मदनलाल धिंग्राने इंग्रज ऑफिसर कर्झन वायली ( Curzon Wyllie) याचा जो वध केला, त्यामागे प्रेरणा सावरकरांचीच होती. तसेंच, त्यानी इंग्लंडमधून भारतात सशस्त्र लढ्यासाठी शस्त्रही धाडली होती. हे सारे मृत्यूशी संबंधित खेळ’च .नंतर, अटकेत पडल्यावर, फ्रान्सच्या मार्सेलीस बंदरात जहाजातून ते पळून गेले, तेव्हां त्यांच्यावर जर गोळीबार झाला असता, तर त्यात मृत्यु पावण्याची शक्यता होतीच, आणि सावरकरांनी पलायनापूर्वी ती नक्कीच विचारात घेतली असणार.

अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा इतकी कडक होती, की तें जीवन असह्य होऊन कांहीं कैद्यांनी आत्महत्याही केली . त्या काळाबद्दल सावरकरांनी स्वत:च लिहून ठेवलें आहे की, त्या काळात, विशेष करून जेव्हां त्यांची प्रकृती प्रचंड खालावलेली होती, त्यावेळीं त्यांना स्वत:ला, या मार्गाचा अवलंब आपणही करावा असें वाटलें होतें. ध्यानात घ्या, सर्व परिस्थिती प्रतिकूल असतांना, एकट्यानें तिला तोंड देतांना, (No support-system) , अशा या ग्रासलेल्या नकारात्मक मन:स्थितीतून बाहेर येणें किती कठीण असेल ! त्याची कल्पनाही करणें कठीण आहे. पण, त्यातूनही सावरकर निग्रहानें सावरले, मृत्यूचें दार न ठोठावतांच त्याच्या संभाव्य मिठीतून बाहेर पडले. खरं सांगायचं तर, त्या वेळी अंदमानातील क्रातिकारकांना मृत्यु म्हणजे ‘साल्व्हेशन’च ( मुक्ती ) वाटत होतें. पण हा ‘निगेटिव्ह’ विचार झाला. त्या salvation च्या , मुक्तीच्या, आकर्षणापासून बाहेर येणें सोपें नव्हे. पण सावकरांनी दुर्दम्य इच्छाशक्तीनें तें साधलें. कारण, आपण जीवित राहून देशासाठी योगदान देऊं शकूं ही त्यांची खात्री . देशासाठी मृत्यूशी जवळीक बाळगणें हा एक संबंध झाला ; आणि नकारात्मकरीत्या त्याला भेटणें, म्हणजे कर्तव्यच्युत होणें, हा अगदी वेगळा संबंध झाला. तसल्या संबंधाला सावरकर बळी पडले नाहींत. मृत्यूची भीती त्यांनी conquer केलेली होती, तिला पूर्णपणें कह्यात आणलें होतें.

अगदी देशाच्या स्वातंत्र्यानंतरही, आपल्याच सरकारनें त्यांना महात्मा गांधीच्या खुनाच्या खटल्यात गोवलें , तेव्हां त्या महापुरुषाला काय वाटलें असेल ? ‘ याचसाठी केला सारा अट्टाहास ?’ असा प्रश्न नक्कीच त्यांच्या मनात आला असेल. जी माणसें दोषी ठरलीं, त्यापैकी दोघांना मृत्युदंड झाला , हें आपल्याला माहीतच आहे. ज़रा कल्पना करा, दोषी नसतांनाही जर सावरकरांना दोषी ठरविलें गेलें असतें, तर काय भयंकर प्रकार झाला असता !! कल्पनेनेही अंगावर शहारे येतात ! अनेकानेक महापुरुषांना , त्यांचा दोष नसतांनाही मृत्यू स्वीकारावा लागला आहे. येशू ख्रिस्त हें एक उदाहरण. पण येशू मृत्यूला घाबरला नाहीं . गांधी खून खटल्यात तर नथूराम व आपटेही घाबरले नाहींत, (टीप – ध्यानीं घ्या, इथें त्यांच्या कृत्याचें ग्लोरिफिकेशन करण्याचा यत्किंचितही हेतू नाही; आपण केवळ मृत्यूवर चर्चा करत आहोत ), तिथें सावरकरांसारखा नरसिंह घाबरणें शक्यच नव्हतें. निग्रहानें त्यांनी स्वत:चा बचाव कोर्टात केला , सत्य त्यांच्या बाजूनें होते, व ते सुटले , पण मृत्यूच्या दाराचें पुन्हां एकवार दर्शन घेऊनच !

१९४५ सालीं स्वातंत्र्यवीरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सांगलीला मृत्युशय्येवर होते. तेही क्रांतिकारक होते, त्यांनीही अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेली होती. त्यांना लिहिलेल्या पत्रात स्वातंत्र्यवीर म्हणतात की आपल्याला तर लहानपणापासूनच मृत्यूची सोबत आहे. आतां शांतपणें त्याला सामोरें जावें. यावरून त्यांचा मृत्यूविषयींचा दृष्टिकोन आपल्याला कळतो.

कांहीं काळ आधी, याच विषयावर स्वातंत्र्यवीर काय म्हणाले, हें पाहणेंही उपयुक्त ठरेल. त्या वेळीं वा. वि. जोशी यांनी, ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी बद्दल चर्चा करून, ‘ज्ञानदेवांनी आत्महत्या केली’ असा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर, ‘ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीला आत्मार्पण म्हणावें की आत्महत्या ?’ असा प्रश्न उपस्थित करून स्वातंत्र्यवीरांनी समर्पक विष्लेषण केलें होतें – ” जें जीवनांत संपायचें होतें तें संपलेलें आहे , आतां कर्तव्य असें उरलेलें नाहीं , अशा कृतकृत्य भावनेनें ‘पूर्णकाम’ झालेले धन्य पुरुष आपण होऊन प्राण विसर्जित करतात. तें कृत्य ‘उत्तान अर्थीं बळानें जीव देणें ’ असूनही, त्याला आत्मसमर्पण म्हणून जें गौरविलें जातें, तें यथार्थ असतें.” यातून सावरकरांचें मृत्युविषयक तत्वज्ञान दिसून येतें.

हिंदूंमधील ‘प्रायोपवेशन’ तसेंच जैनांमधील ‘संथारा’ या प्रकारच्या मृत्युभेटीला सन्मान मिळतो , तें आदराला पात्र ठरतें . ( टीप- इथें धर्माचा उल्लेख हा केवळ वर उल्लेखलेल्या प्रथांबद्दल आहे प्रस्तुत लेखाचा धर्माशी प्रत्यक्षा प्रत्यक्ष कांहीं संबंध नाहीं ). त्या आदराचें कारण सावरकारांच्या वरील विवेचनातून स्पष्ट होतें.

जेव्हां स्वातंत्र्यासाठी क्रांतीलढा सुरूं केला तेव्हां , ‘आपल्याला भारत स्वतंत्र झाल्याचें पहायला मिळेल’ अशी सावरकरांना अजिबात कल्पना नव्हती. देश स्वतंत्र झाल्यावर तसें त्यांनी स्वत: म्हटलेलेंही आहे. नंतरही, स्वत:च्या अधिक्षेपाचा विचार त्यांनी दूर ठेवला ; देश स्वतंत्र होण्याचें त्यांना समाधान होतें , आणि त्यामुळे त्यांना कृतकृत्य वाटलें असल्यास त्यात नवल नाहीं. गांधी खुनाचें किटाळ दूर झाल्यावर, सावरकरांनी स्वत:च्या गतकाळाविषयीं लेखन करून आपल्या सर्वासाठी अमूल्य ठेवा ठेवला. मृत्यूच्या दोन एक वर्षें आधी त्यांनी ‘भारताच्या इतिहासाची सहा सोनेरी पानें’ हा विचारप्रवर्तक ग्रंथ लिहिला .

हें सर्व साध्य झाल्यानंतर, जीवनसाफल्य प्राप्त झालें असें वाटून, त्यांनी प्रायोपवेशन करण्यांचे ठरविले. मंडळी, विचार करा, आपणां सार्‍यांना भूक-तहान काटणें, थोड्या वेळानंतर कठीण होऊन जातें. एक वेळ माणूस अन्नावाचून कांहीं काळ काढूं शकेल ; परंतु पाणी हें तर जीवन आहे, त्याच्यावाचून रहाणें किती कष्टप्रद ! तिथें दिवसेन् दिवस अन्नपाण्यावाचून काढणें यासाठी किती जबरदस्त मनोनिग्रह लागत असेल , याची कल्पनासुद्धां करणें कठीण आहे. प्रायोपवेशनानें सावरकरांनी स्व-देहाचें ‘विसर्जन’ केलें. पण मृत्यूला कसें सामोरें जावें, याचा एक महान वस्तुपाठ ते आपल्यासाठी ठेवून गेले.अशा वेळीं समर्थ रामदासांच्या वचनाची आठवण येते – ‘महाथोर ते मृत्युपंथेंचि गेले ; कितीएक ते जन्मले आणि मेले’. मरणें आणि ‘मृत्युपंथानें जाणें’ यांतील भेद, जो रामदासांनी संगितला आहे, तो सावरकरांच्या कृतीतून आपल्यापुढे एक आदर्श म्हणून नेहमीच उभा राहील.–

सुभाष स. नाईक मुंबई.

मराठी बद्दल ते कायमच आग्रही असायचे,म्हणून आंग्ल भाषेतील शब्दांना मराठीमधे प्रतिशब्द दिले व ते आपण रोज वापरतो. थोडे शब्द उदाहरण म्हणून देतो.
महापौर, दूरध्वनी, दिग्दर्शन, प्राचार्य, संचलन, पटकथा, मुख्याध्यापक, स्थानक, ध्वनिमुद्रण, शस्त्रसंधी, वार्ताहर ,संपादक इत्यादी.
अंतकाळ जवळ आल्यावर त्यांच्या जवळच्या माणसाने नर्सला बोलवा म्हटल्यावर त्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या ओठी शब्द आले, अरे परिचारिकेला बोलवा असे म्हणता येत नाही का?

नेहमी लिखाणाचा शेवट करताना त्या संबंधी एक गाणे देत असतो आज त्या बद्दल विचार करताना अनादी मी अनंत मी हे गाणे अनिवार्यच होते.
मार्सेलिस येथे मोरिया बोटीतून मारलेल्या त्या सुप्रसिद्ध आणि त्रिखंडात गाजलेल्या उडीनंतर त्यांना परत ताब्यात घेतले जाते. आता नानाविध प्रकारे छळ होणार हे नक्की म्हणून त्याला धीरोदत्तपणे तोंड देता यावे म्हणून रचलेली धैर्यदायी कवच मंत्र रचना (सन १९१०) त्यांनी लिहिली,
“अनादी मी अनंत मी “
https://youtu.be/FRDKzNqZVNE

वीर सावरकरांना विनम्र अभिवादन आणि शत शत प्रणाम.

प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०

संदर्भ : इंटरनेट, श्री.सुभाष नाईक, आठवणीतली गाणी, यु ट्युब, विकिपीडिया.

******************

मावळत्या दिनकरा..!

२६ फेब्रुवारी १९६६, होय याच दिवशी सायंकाळी हिंदूस्थानात एक नाही तर दोन सुर्य अस्ताला गेलेत. एक नेहमीचा नैसर्गिक नितीनियमांप्रमाणे पृथ्वीवरील सर्व जीवमात्रांना प्रकाश देऊन कर्मफळाची अपेक्षा न करता मावळला, तर दुसरा आपले क्षात्रतेज निर्माण करुन, मिळालेला मनुष्यजन्म पतित पावन करुन, अखंड हिंदूराष्ट्र निर्मितीचा ज्वालामुखी अखंड तेवत ठेवत प्रायोपवेशनाने मावळला. त्या धगधगत्या ज्वालामुखीचे नांव होते स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर..!
सुर्याची ऊबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनेही शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता, या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे विनायक दामोदर सावरकर..! स्वातंत्र्यवीर सावरकर ही व्यक्ती नाही तर ते अखंड तेवत राहणारे विचारांचे विद्यापीठ आहे.
मातृभूमीच्या रक्षणार्थ, मातृभाषेच्या जिवीतार्थ, स्पृष्य अस्पृशांच्या व जातीभेदाच्या सीमा मिटवून अखंड हिंदवी राष्ट्र निर्मीतीसाठी आपले तन, मन, धन, संसार, मोह, माया पणाला लावणारा एकमेवाद्वितीय हिंदू ह्रदयसम्राट..!
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अवघ्या विश्र्वातील असे एकमेव स्वातंत्र्ययोद्धा होते ज्यांना एकाच आयुष्यात दोन दोन जन्मठेपेची शिक्षा झाली. सदर शिक्षा भोगून आल्यावर देखील हा महान योद्धा आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ पुन्हा राष्ट्र जीवनात सक्रिय झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अवघ्या विश्वातील असे पहिले लेखक आहेत की, ज्यांच्या ‘१८५७ चा भारताचा स्वातंत्र समर’ या पुस्तकावर दोन दोन देशांनी प्रकाशनापूर्व बंदी घातली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे प्रथम स्नातक होते, ज्यांची पदवी, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे, ब्रिटिश सरकारने, हिसकावून घेतली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे प्रथम भारतीय विद्यार्थी होते ज्यांनी मातृभुमीच्या प्रेमाखातर, तात्कालिन ग्रेट ब्रिटनच्या राजा प्रती निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार दिल्याने परिणामस्वरूप त्यांना शिक्षण घेऊनही, ‘बॅरीस्टर’ हि पदवी मिळाली नाही तसेच वकीली करता आली नाही.
स्वातंत्रवीर सावरकर असे प्रथम भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते, ज्यांनी सर्वप्रथम पुण्यात विदेशी वस्त्रांची होळी केली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तिरंगा झेंड्याचे मधोमध धर्म चक्र लावण्याबद्दल सल्ला दिला होता. तात्कालिन राष्ट्रापती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा सल्ला मान्य केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यपुर्व काळातील ब्रिटीश साम्राज्याशी लढा देणारे असे पहिले राजकीय बंदिवान होते, ज्यांचे प्रकरण हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे पहिले क्रांतिकारी होते ज्यांनी हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल चिंतन केले आणि बंदी जीवन समाप्त होताच अस्पृश्यता आणि इतर कुप्रथांविरुद्धच्या सामाजिक कार्यात वाहून घेतले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अवघ्या विश्वातील असे पहिले कवी होते कि, ज्यांनी अंदमानच्या एकांत कारागृहात भीतींवर खीळा आणि कोळशाने मातृभूमीवर विविध कविता लिहून मुखोद्वत केल्या. अशा प्रकारे मुखोद्वत केलेल्या सुमारे दहा हजारांहून जास्त ओळी त्यांनी जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका झाल्यावर पुन्हा लिहून काढल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे वर्णनपर जी सुप्रसिद्ध काव्य लिहिले आहे त्यातही हिंदू राष्ट्राची प्रखर संकल्पना मांडली आहे.

हे हिंदूशक्ती संभूत दीप्तितम तेजा
हे हिंदू तपस्यापुत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा..!

कवी मन असलेले भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदूत्वाबद्दल ‘ हिंदू मेरा परीचय’ हि जी सुप्रसिद्ध कविता लिहिलेली आहे ती वाचत असतांना डोळ्यासमोर एकच तेजोमय प्रतिमा उभी राहते,‌ आणि ती प्रतिमा स्वातंत्रवीर सावरकरां व्यतिरीक्त अन्य असूच शकत नाही.

मेरा परीचय..!
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!
मै शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार–क्षार।
डमरू की वह प्रलय ध्वनि हूँ, जिसमे नचता भीषण संहार।
रणचंडी की अतृप्त प्यास, मै दुर्गा का उन्मत्त हास।
मै यम की प्रलयंकर पुकार, जलते मरघट का धुँआधार।
फिर अंतरतम की ज्वाला से जगती मे आग लगा दूँ मैं।
यदि धधक उठे जल, थल, अंबर, जड चेतन तो कैसा विस्मय..?
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

मै अखिल विश्व का गुरु महान्, देता विद्या का अमरदान।
मैने दिखलाया मुक्तिमार्ग, मैने सिखलाया ब्रह्मज्ञान।
मेरे वेदों का ज्ञान अमर, मेरे वेदों की ज्योति प्रखर।
मानव के मन का अंधकार, क्या कभी सामने सका ठहर..?
मेरा स्वर्णभ मे घहर–घहर, सागर के जल मे छहर–छहर।
इस कोने से उस कोने तक, कर सकता जगती सोराभ्मय।
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

मैने छाती का लहू पिला, पाले विदेश के क्षुधित लाल।
मुझको मानव में भेद नही, मेरा अन्तस्थल वर विशाल।
जग से ठुकराए लोगों को लो मेरे घर का खुला द्वार।
अपना सब कुछ हूँ लुटा चुका, फिर भी अक्षय है धनागार।
मेरा हीरा पाकर ज्योतित परकीयों का वह राजमुकुट।
यदि इन चरणों पर झुक जाए कल वह किरीट तो क्या विस्मय..?
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

होकर स्वतन्त्र मैने कब चाहा है कर लूँ सब को गुलाम..?
मैने तो सदा सिखाया है करना अपने मन को गुलाम।
गोपाल राम के नामों पर कब मैने अत्याचार किया?
कब दुनिया को हिन्दू करने घर–घर मे नरसंहार किया..?
कोई बतलाए काबुल मे जाकर कितनी मस्जिद तोडी..?
भूभाग नहीं, शत–शत मानव के हृदय जीतने का निश्चय।
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..‌!

मै एक बिन्दु परिपूर्ण सिन्धु है यह मेरा हिन्दु समाज।
मेरा इसका संबन्ध अमर, मैं व्यक्ति और यह है समाज।
इससे मैने पाया तन मन, इससे मैने पाया जीवन।
मेरा तो बस कर्तव्य यही, कर दू सब कुछ इसके अर्पण।
मै तो समाज की थाति हूँ, मै तो समाज का हूं सेवक।
मै तो समष्टि के लिए व्यष्टि का कर सकता बलिदान अभय।
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय..!

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं..? त्यावर सावरकर म्हणाले, “ We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं.

लंडनमधलं इंडीया हाऊस हे स्वातंत्र्यवीर कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घेतलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून – ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढत होता.

हे सर्व क्रांतिकार्य देशाबाहेरून चाललं होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणा-यांत सिंहाचा वाटा असलेल्या मॅझेनीचं आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची सावरकरांच्या भाषेतली प्रस्तावना एवढी तेजस्वी आणि प्रेरणादायी होती, की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि तिच्यावर बंदी आणली. अर्थातच ती जास्त प्रसिध्द झाली. सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. याचवेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उदध्वस्त होण्याची वेळ आली.

घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते. कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे खरं तर आजही मोठ्या गौरवाने गावं असं हे मातृभूमीला हूंकारलेले, सागराशी हितगुज करणाऱ्या संकल्पनेचे हे अजरामर काव्यगीत..! आपण अनेकदा ऐकलं अन पुटपुटलं देखील आहे. या काव्याच्या प्रत्येक शब्दांतून मातृभूमीच्या आदरार्थ जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकतांना वाचले पाहिजेत अन वाचतांना ऐकले देखील पाहिजेत..!

स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनला बॅरीस्टरच्या शिक्षणासाठी गेले असतांना, त्यांचा मुलगा प्रभाकर याच्या अकस्मात मृत्यूची बातमी त्यांना समजते. त्यातच ब्रिटीशां सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला सुरु केला. त्यामुळे त्यांना लंडन मध्ये कधीही अटक होण्याची शक्यता होती. या दरम्यान ते सहज साईट सिइंगला लंडन जवळच असलेल्या ब्रायटन नावाच्या एका गावाजवळील समुद्र किनारी गेले होते. भारत भुमीच्या स्वातंत्र्याबद्दल आत्मचिंतन करत‌ असतांना, एकदम त्यानां हे गीत स्फुरलं..!

सदर प्रसंगाची पुर्वपीठीका अशी होती की, ब्रिटनमध्ये भारतीय क्रांतीवीर मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत.

त्या सागरावर रागावलेला, रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.’ भूमातेच्या चरणतला तुज धूता । मी नित्य पाहिला होता. त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास, मित्र मित्राला म्हणतो तसा, की चल जरा फिरायला जाऊ दुस-या देशात..!
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ । सृष्टीची विविधता पाहू
त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
जननी-ह्रद विरहशंकितहि झाले । परि तुवां वचन तिज दिधले.
पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन. जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन। त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी । मी जगदनुभव-योगे बनुनी ।
मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी
पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला l सागरा प्राण तळमळला ।।१।।
लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी । ही फसगत झाली तैशी
पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती । दशदिशा तमोमय होती
तमोमय म्हणजे अंधःकारमय मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे । की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता. प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंचा
राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे बहु जिवलग गमते चित्ता । रे तुज सरित्पते, जी सरिता । रे
हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत. माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।
यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात,
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा ?
माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी । मज विवासना ते देशी
विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे अबला न माझिही माता । रे
माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला
आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.
मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय.
स्वातंत्र्यपुर्व काळात, ब्रिटीश साम्राज्याला सतत आव्हान देऊन सळो की पळो करणाऱ्या या भारतमातेच्या सुपुत्राला स्वतंत्र भारतात मात्र पुन्हा एकांतवासच मिळाला.
स्वातंत्र्योत्तर काळातील कथीत मवाळ गटाच्या नेत्यांशी झालेल्या वैचारिक मतभेदांमुळे या भारतमातेचा सुपुत्राला एकाकी जीवन जगावे लागले. एवढेच नाही तर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा खटला पण त्यांचेवर भरण्यात आला. ऐतिहासिक लाल किल्ल्यात चाललेल्या या खटल्याची सुनावणी झाली अन त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. पण तात्कालीन स्वतंत्र्य भारताच्या सरकारने गांधी हत्येबाबत खटल्याचा न्यायालयीन निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा श्री. जीवन लाल कपुर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करून स्वातंत्र्यवीर सावरकर या निष्काम कर्मयोग्यास पुन्हा एकदा व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला व इतिहासात या स्वातंत्र्यवीरास खलनायक ठरवण्याचा वेळोवेळी प्रयत्न सुरू ठेवला. हा चौकशी आयोग दिनांक २१ नोव्हेंबर १९६६ रोजी आस्तीत्वात आला ( स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजीच प्रायोपवेशनाद्वारे आपला देह निसर्गाच्या स्वाधीन केला होता). त्यानंतर दिनांक ३० नोव्हेंबर १९६९ रोजी या चौकशी आयोगाने आपला चौकशी अहवाल शासनास सादर केला.स्वातंत्र्यवीर सावरकर या जगात राहिलेले नसतांना देखील, या चौकशी आयोगाने आपल्या अहवालात सावरकरावर संशयास्पद ठपका ठेऊन, या महान नरवीरास स्वातंत्र भारताच्या इतिहासात एक प्रकारे व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही असे वाटते.

तरूणपीढीने स्वातंत्रवीर सावरकरांच्या चैतन्यमयी विचारांचे, लिखाणाचे वाचन करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आज रोजी सायंकाळी पश्चिमेला प्रखर तेजोमय झालेला सुर्य हा मावळतांना त्याचा लालबूंद रंग हा प्रखरतेची साक्ष देत होता.
क्षितिजावरचा सुवर्ण पिसारा आवरून ढळणाऱ्या अशा या तेजोमय सुर्याकडे लक्ष द्यायला कोणासा वेळ नव्हताच अन खंतही..!
अस्ताला जाणाऱ्या भास्कराकडे पाहता पाहताच मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीची जाणीव करणाऱ्या असंख्य आठवणी मनांत डोकावू लागल्या. नकळत जेष्ठ कवी कै. भा.रा तांबे यांची एक कविता ओठावर आली.
मावळत्या दिनकरा अर्घ्य तूज जोडोनी दोन्ही करा !
जो तो वंदन करी ऊगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या !
रीत जगाची ही रे सवित्या, स्वार्थपरायणपरा !
जेष्ठ कवीवर्य भा.रा. तांबे यांच्या संवेदनशिल मनात काय विचार असेल या कवितेद्वारे सुर्याशी संवाद साधतांना..?
एखाद्याच्या हातात पद अथवा सत्ता असतांना त्याचा उदोउदो करणारी मंडळीच त्याची सत्ता गेल्यानंतर मात्र त्या व्यक्तीकडे ढुंकूनही पहायला तयार होत नाही.
नेहमी आपल्या अवती भवतीच असलेल्या स्वार्थी जगाचा कटू अनुभव अस्ताला जाणाऱ्या सुर्याकडे पाहून शब्दात मांडण्याचा प्रयत्न या महान अवलीयाने लीलया केलेला आहे.
उपकाराची कुणा आठवण..? ‘शितें तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंड पुजेपण, धरी पाठीवर शरा,
मावळत्या दिनकरा ..!

मोठ्या उद्दीग्न मनाने कवीने या कडव्यामधून खोटारड्या जगाची रीत सांगीतली आहे. तोंडपुजे लोक अवती भवती असतात, पण तुमची पाठ फिरली की तेच लोक निंदेचे शर किंवा वाग्बाण पाठीवर मारणार. प्रेमाचे, स्नेहाचे ढोंग करणारी स्वार्थी माणसे कवीला दिसतात.

असक्त परी तू केलीस वणवण, दिलेस जीवन, हे नारायण,
मनी तू धरीले सानथोरपण, समदर्शी तू खरा..! मावळत्या दिनकरा..

स्वत: अपार कष्ट करून, अवघे आयुष्य पणाला लाऊन समाजासाठी चंदनासारखे झिजलेल्या अनेक महान व्यक्तींचे स्मरण या ओळीतून कवीने चाणाक्षतेने करून दिले आहे.
या कवितेने मावळतीला झुकलेला दिनकरही क्षणभर थांबला अन काव्य प्रतिभेचे अलौकीक तेज लाभलेल्या कवी भास्कराला (भा.रा.तांबे) त्याने वंदन केले..!
मावळत्या दिनकरा..! कदाचित हा मावळता दिनकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मा असल्याचा मला भास होत होता. होय हा सिद्धहस्त स्वातंत्र्यवीर, लेखक, कवी, समाजसेवक, नेता, आजही अश्वत्थाम्यासारखा फिरत असेल अन स्वतंत्र्य भारताच्या आजच्या परीस्थितीकडे पाहून मनातच पुटपुटत असेल, हेची फळ मम तपाला…!
आजच्या तरुण पिढीने याबाबत अंतर्मुख होऊन विचार करणे अभिप्रेत आहे.
थांबतो इथेच. जय सावरकर..!
विचारमंथन..!

राजेश पुराणिक.

अंत्ययात्रा

तात्यांचे प्राणोत्क्रमण झाल्याची दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी साडेबारा वाजता वृत्त प्रसृत केले. वृत्त ऐकताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांतसंघचालक कै. काशीनाथपंत लिमये आणि आचार्य अत्रे आले. त्यांनी तात्यांच्या खोलीत जाऊन अंत्यदर्शन घेतले. आता अंत्ययात्रा काढण्यासाठी प्राथमिक सिद्धता करण्याचे दायित्व सर्वच कार्यकर्त्यांवर-विशेषतः हिंदूसभेच्या कार्यकर्त्यांवर पडले. त्यांनी यात्रेसाठी एक लष्करी गाडा शव वाहून नेण्याकरता मिळवण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिका-यांना तशी विनंती करण्यात आली. परंतु ती नाकारण्यात आली. ही वार्ता आचार्य अत्रे यांना समजल्यावर त्यांनी, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना विनंती केली की, शासनाकडून आपली मागणी पुरी होत नसल्याने व्ही. शांताराम यांनी त्यांच्या चित्रनगरीतून तोफा व बंदुका घेऊन बसलेले सैनिकांचे चित्रफलक लावलेला ट्रक सिद्ध करून द्यावा. त्यांच्या या विनंतीला मान देऊन व्ही. शांतारामांनी अवघ्या वीस-एक तासांत लष्करी गाड्याप्रमाणे एक ट्रक सिद्ध करून धाडला. अंत्ययात्रा सावरकर सदनपासून निघून गिरगावातल्या चंदनवाडी विद्युत्वाहिनीत जाणार होती. म्हणजे तब्बल ६-७ मैलांचे अंतर होते. तरीही सहस्रावधी स्त्री-पुरुष आरंभापासून यात्रेत सामील झाले होते. त्या यात्रेची व्यवस्था आचार्य अत्रेही पाहत असल्याने ते प्रथमपासून उपस्थित होते. त्याआधी दर्शनासाठी शासनाच्या वतीने मंत्री मधुसूदन वैराळे, व्ही. शांताराम व संध्या, लता मंगेशकर आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती येऊन आपली श्रद्धांजली वाहून गेल्या होत्या. शासनाच्या वतीने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा दुखवट्याचा संदेश माझ्या नावे सर्वप्रथम सचिवालयातून आला. मात्र त्या दिवशी मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री शासकीय दौ-यावर मुंबईबाहेर गेले होते. यात्रेतील जनता ‘सावरकर अमर रहे’, ‘सावरकरांच्या राजकारणाचा विजय असो’, ‘हिंदू धर्म की जय’, ‘हिंदू राष्ट्र की जय’ आदी घोषणा देत होते. एका गाडीत ‘नंदादीप समिती’ च्या कार्यकर्त्या सावरकरांची पदे गात होत्या, तर दुसच्या गाडीत भजनी मंडळाच्या स्त्रिया भजने म्हणत मिरवणुकीच्या अग्रभागी जात होत्या. वाटेत ठिकठिकाणी कमानी, फुलांच्या परड्या रस्त्यांवर उभारल्या होत्या आणि तात्यांचे शव ठेवलेला लष्करी गाडा जसा पुढे जात असे तशी त्यावर परड्यांतून पुष्पवृष्टी केली जात होती. यात्रा जेव्हा आर्थर रोड तुरुंगापाशी आली, त्या वेळी एक आगळे दृश्य दिसले. तुरुंगाच्या बाहेरच्या मुख्य दारावर पहारा करणारे पोलीस शवगाडा समोर येताच त्यांचा फिरता पहारा थांबवून खांद्यावरच्या बंदुका खाली उलट्या धरून दक्ष स्थितीत नतमस्तक होऊन उभे राहिले होते, तर त्या चार भिंतीच्या मागे असलेल्या चाळीच्या वरच्या मजल्यावरून जमलेल्या कैद्यांनी स्वयंस्फूर्तीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे’, ‘स्वा. सावरकर की जय’ अशा घोषणा देऊन श्रद्धांजली वाहिली. वरील हृदयस्पर्शी दृश्य शव-गाड्यावरून मला स्पष्ट दिसत होते. पार्थिव देहाची मिरवणूक बॉब सेन्ट्रल रेल्वे स्टेशनपाशी आली. त्या वेळी संघाच्या गणवेषधारी स्वयंसेवकांनी तात्यांना सैनिकी पद्धतीने मानवंदना दिली. मिरवणूक जेव्हा भडकमकर मागनि जाऊ लागली तशी घराघरातून लोक येऊन मिरवणुकीत सामील होत होते. पुढे गिरगाव रस्त्यावरून शवयात्रा चंदनभूमीकडे सरकू लागली त्या वेळी रस्ता शोकाकूल जनतेच्या अलोट गर्दनि व्यापून गेला होता. घराघराच्या गच्च्या माणसांनी भरून गेल्या होत्या. त्या वेळची आठवण झाली की, पुढे साप्ताहिक ‘मार्मिक’ च्या व्यंगचित्राखाली जी ओळ प्रसिद्धली होती त्याचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. तात्यांच्या ‘सागरा, प्राण तळमळला’ ह्या काव्यपंक्तीप्रमाणे रचलेली ती ओळ म्हणजे ‘प्राणा, (जन) सागर तळमळला!!’ शेवटी अंत्ययात्रा चंदनवाडीत पोचली. त्या वेळी भाषण करताना आचार्य अत्रे यांनी निदर्शनास आणले की, स्वा. सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताला श्रद्धांजली वाहण्यास महाराष्ट्र शासनाचा एकही मंत्री उपस्थित असू नये, ही शरमेची गोष्ट आहे. त्या वेळी समाजातूनही ‘शेम’ ‘शेम’ च्या आरोळ्या उठल्या. नंतर अनेक मान्यवर वक्त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यावर सुधीर फडके यांनी ‘श्रीराम, जयराम जय जय राम! चा गजर सुरू केला, आणि तो चालू असताना तात्यांच्या अचेतन शरीराला विद्युत्दाहिनीत अग्नी दिला गेला.

या क्रांतीसूर्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…

संदर्भ- आठवणी अंगाराच्या, पृष्ठ- २६-२८, विश्वास सावरकर

©सावरकरी_विचाररत्ने फेसबुक पेज


आज २६ फेब्रूवारी २०२१ पंचावन्न वर्षापूर्वीचा तो दिवस अजूनही मला चांगलाच आठवतो. सावरकर सदन मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रायोपवेशन चालले होते. १ फेब्रुवारी १९६६ पासून त्यांनी अन्नपाणी, औषधे यांचा त्याग केला होता. आणि आत्मार्पण करण्याचे योजले. त्या आधी ” आत्महत्या आणि आत्मार्पण ” हा लेख लिहून त्यांनी दोन्हीमधला फरक विषद करून सांगितला होता. एखादी व्यक्ती आपले सर्व इप्सित साध्य करते, आता इच्छा म्हणून काहीच उरत नाहीं, तेव्हा केवळ भुईला भार म्हणून न राहता आपले जीवन तृप्तपणे संपवणे म्हणजे आत्मार्पण हे त्यांनी सूचित केले होते. आणि त्याप्रमाणे शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी, ते स्वतःही मृत्यूला सामोरे गेले. त्या दिवशी दादर येथील त्यांच्या घरातून निघालेली प्रचंड अंत्ययात्रा रात्री चंदनवाडीच्या स्मशानभूमीत पोचली. चित्रपती व्ही. शांताराम यांनी स्वतः तोफा ठेवलेली शृंगारलेली गाडी दिली होती त्यावर हिंदुमहासभेच्या भगव्या ध्वजांत गुंडाळलेले त्यांचे पार्थिव एखाद्या सिंहा प्रमाणे जाणवत होते. ते उघड्या डोळ्यांनी गेले होते. अंत्ययात्रेच्या आरंभी आचार्य अत्रे, व्ही. शांताराम , मुंबईचे महापौर, सोपानदेव चौधरी, सुधीर फडके आदी सावरकर भक्त होते. लाखो लोकांचा महासागर चंदनवाडीच्या स्मशानभूमीकडे वळला होता. त्यामध्ये तरुण होते वयस्क होते, पुरुष -स्त्रिया शाळकरी विद्यार्थी असे सर्वच भावनाशील होऊन सामील झाले होते. नव्हते फक्त काॅंग्रेसवाले. खुद्द राज्याचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई हे स्वतः सावरकर भक्त होते. त्यांना स्वातंत्र्यवीरांच्या अंत्ययात्रेत सामील व्हायचे होते, पण सरकारने त्यांनाही मनाई केली होती.

स्मशानभूमीत अत्र्यांनी भाषणात सांगितले,” येथे लाखो लोक जमलेले आहेत पण या महाराष्ट्र सरकारचा एकही मंत्री हजर नाही त्याचा मी धिक्कार करतो. स्वातंत्र्यवीर तात्या आज आपणातून गेले.तात्यांनी जन्मभर मृत्यूशी झुंज दिली. अनंत मरणे मारून ते शेवटपर्यंत जगले. आणि मृत्यूशी झगडता झगडता आज निघून गेले. आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे अप्रिय काम आपल्यावर येऊन पडले आहे. स्वातंत्र्यवीर केवळ स्वातंत्र्यवीर नव्हते. वाङ्मयीन, सामाजीक अशा प्रत्येक क्षेत्रात ते अग्रेसर होते. आज वास्तविक राष्ट्रपतींनी तात्यारावांना ” भारतरत्न ” पदवी द्यावयास हवी होती ! आज महाराष्ट्र सरकारचा कोणीही मंत्री हजर नाही याला काय म्हणावे? तात्या महान क्रांतिकारकच नाहीत , महान साधू आहेत ! त्यांनी प्रायोपवेशन केले ! आत्मार्पण केले ! कुमारील भट्टाने अग्निकाष्टे भक्षण केली. शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. ज्ञानेश्वरांनी – एकनाथांनी समाधी घेतली. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. तसे आमचे तात्या ! त्यांनी आत्मार्पण केले. प्रायोपवेशन केले ! तात्यांसारखा माणूस पुन्हा होणे नाही. यानंतर सुधीर फडके यांनी “ आम्ही जातो आमुच्या गांवा “ हा तुकोबांचा अभंग गात सर्व जमावाला त्यात सामील करून घेतले व थोड्याच अवकाशात तात्याराव अनंतात विलीन झाले.

आणि दुसऱ्या दिवसापासून आचार्य अत्रेंनी ‘दैनिक मराठा ‘ मधून रोज तात्यारावांच्या जीवनाचे एकेक पैलू उलगडणारे चौदा अमर लेख लिहिले. स्वातंत्र्यवीरांची क्रांतिकारी गाथा आणि आचार्य अत्र्यांची सिद्धहस्त लेखणी यांच्या संगमाचा हा एक मनोमिलाप होता. सावरकरांच्या हाल अपेष्टा आणि यमयातना त्यांच्या लेखांतून वाचताना आपले रक्त उसळू लागते. काळजात हजारो सुया टोचल्या जातात. आपल मेंदू जणू उखळात घालून ठेचत आहे असे जाणवते. आणि त्या सावरकर नामक क्रांतीकारकांच्या मुगुटमणीप्रती आपण नतमस्तक होतो. केवळ त्या पवित्र पायावर साक्षात दंडवत घालावेत, हीच एक भावना मनांत शिल्लक रहाते. ते सर्व मृत्युलेख वाचून मी इतका भारावून गेलो की ते सर्व लेख माझ्या हस्ताक्षरात लिहून
त्याचे “मृत्युन्जय ” हा ग्रंथ हस्तलिखीत ग्रंथ तयार करून मी आचार्य अत्रे याना अर्पण केला. एखाद्या छापील पुस्वतकांप्ररमाणे मी त्याची रचना केली होती. आ. अत्र्यांनी दैनिक मराठा मध्ये माझ्यावर लिहून माझे कौतुक केले होते.आचार्य अत्र्यांच्या त्या अग्रलेखांचे पुस्तक कधी निघाले नाही. कदाचित त्यांच्या कुटुंबीयाकडेही हे लेख नसावेत. मात्र आजही ते सर्व अग्रलेख माझ्या संग्रहात आहेत. एकेक अग्रलेख वाचताना आजही अत्र्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचा वास किती प्रभावी होता, याची जाणीव या भाषाप्रभूंची लेखणी आणि वाणी वाचता ऐकताना होते.खुद्द आचार्य अत्र्यांनीच म्हटले होते ‘ भाषा प्रभू म्हणवणारे आम्ही, पण आज आम्हांलाही शब्द वाकवताना कसरत करावी लागते आहे. इतके ते दुःखाने उन्मळून गेले होते. त्यांनी लिहीलेल्या त्या अमर अग्रलेखामधील पहीलाच अग्रलेख मी माझ्या मित्रांच्या अवलोकनार्थ आज स्वातंत्र्यवीरांच्या चोपन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त वाचनासाठी देत आहे. क्रांतीकारकांच्या मुकुटमणीला कोटी कोटी प्रणाम.

— प्रा. मं. गो. राजाध्यक्ष.

१. तात्या गेले !

          अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की ,

               की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
               लब्ध प्रकाश इतिहास - निसर्ग माने,
               जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे,
               बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे !

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला , त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, ” देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !” वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची pज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला ‘ अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की , ‘ १० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. ! ‘ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते.

अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून ‘ मोरिया ‘ बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच ‘ भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी ‘ असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ” आझाद हिंद “चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे ‘ पाया ‘ आणि सुभाषचंद्र हे ‘ कळस ‘ आहेत ! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें , पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. काँग्रेसच्या राज्यांत सावरकरांना काहीं किंमत राहिली नाही. उलट गांधीजींचे खुनी म्हणून त्यांना पकडून त्यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण त्या अग्निदिव्यातून ते सहीसलामत सुटले.

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत ‘ हे कृष्ण, हे श्याम ‘ असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली.
तुकोबा ‘ आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा ! ‘ असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून
कांहीच उरले नाही.

               धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
               कर्तव्यं मे न विद्यते किंचीत
               धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
               प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम
  आचार्य अत्रे.
  दैनिक मराठा : दिनांक २७ मार्च १९६६.

*************

सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले शब्द

शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

सर्व लेख वॉ ट्सअॅपवरून साभार दि.२६-०२-२०२१

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म आमच्या जमखंडी गावात झाला, पण त्या मानाने मी लहानपणी त्यांच्याविषयी फारच कमी ऐकले होते. मोठेपणीसुद्धा इतर समाजसेवकांच्या मानाने त्याच्यासंबंधी फारच कमी लिहिलेले माझ्या वाचनात आले. एका अर्थी ते उपेक्षितच राहिले असे वाटते. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्याने त्यांची ओळख करून देणारा एक संक्षिप्त लेख मला मिळाला. विकीपीडियावरून मिळालेली माहिती त्यात मिळवून मी खाली दिली आहे.

कर्मवीर वि. रा. शिंदे यांच्यासंबंधी मिळालेला आणखी एक लेख खाली जोडला आहे (दि.२६-०४-२०२२)

**********

डीप्रेस्डक्लास मिशन संस्थेचे संस्थापक , अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठविणारे कै.विठ्ठल रामजी शिंदे यांचे आज पुण्यस्मरण .विठ्ठल रामजी शिंद्यांचा जन्म एप्रिल २३, इ.स. १८७३ रोजी वर्तमान कर्नाटक राज्यातील जमखिंडी संस्थानातील मराठी कुटूंबात झाला. त्यांच्या बालमनावर कुटुंबातील उदारमतांचा प्रभाव पडला. १८८८ मध्ये पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून ते बी. ए झाले मुंबई येथे जाऊन त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.
ते प्रार्थना समाजात दाखल झाले, न्या रानडे ,भांडारकर के.बि रानडे यांचेही ते संपर्कात आले. प्रार्थना समाजाने त्यांना इंग्लंडला पाठविले . १९०६ साली त्यांनी Depressed Classes Mission ची स्थापना केली. ग्रामीण महाराष्ट्रा मध्ये आज जो शिक्षणाचा प्रसार झाला आहे त्यामध्ये त्यावेळच्या म. ज्योतिबा फुले यांचेसह विठ्ठल रामजी शिंदे यांचेही नाव घ्यावेच लागेल.
शिंदे यांनी महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळींत उच्चनैतिक भूमिकेवरून भाग घेतला. मुंबई कायदे-कौन्सिलच्या १९२० च्या निवडणुकीत पुण्यातून मराठयांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहत्यांची विनंती त्यांनी अव्हेरली; कारण त्यांना जातीय तत्त्व मान्य नव्हते. उलट मागासलेला जो बहुजनसमाज, त्याचा कैवार घेणारा बहुजनपक्ष स्थापन करून त्याच्यावतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली. या पक्षाने शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व स्त्रीवर्ग यांच्या हितसंबंधांसाठी झटण्याचा निर्धार प्रकट केला. या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही. महात्मा गांधी-प्रणीत १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे, या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था १९०७ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. १९११ साली मुंबईत एक ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ भरविली. १९१८ च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठी त्यांनी चळवळ केली. पुणे येथे १९२८ साली भरलेल्या ‘मुंबई इलाखा शेतकरी परिषदे’चे नेतृत्व शिंदे यांनी केले. अखेर सरकारला सारावाढ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली. १९२६ ते १९३२ या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसांत एकी करावी, कामगारांसमवेत एकजूट करावी तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन केले.
अस्पृश्यवर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबधी १९०५ मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मर मध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला. ‘बहिष्कृत भारत’ (१९०८), ‘अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास’ (१९२२), ‘ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग’ (१९२७) हे लेख व ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (१९३३) हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे या विषयावरील प्रमुख लेखन होय.
अभिवादन.

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकाच्या फलकावरून साभार

. . . . . . . . . . . . . .


नवी भर दि. २६-०४-२०२२ :

महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक,संशोधक व लेखक.
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी येथे २३ एप्रिल १८७३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमखिंडी येथेच झाले.वर्ष १८९१ मध्येते मॅट्रिक झाले.त्यानंतर काही काळ त्यांनी जमखिंडी येथे शिक्षक म्हणूनही काम केले.वर्ष १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे त्यांनी तिलाही त्यांनी पुण्यास हुजूरपागा शाळेत घातले. पुण्यामध्ये खाजगी शिकवण्यां व श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती यावर त्यांनी कष्टाने आपले बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले.
त्या काळात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात मोठा वाटा उचलला होता. ते सवर्ण असलेतरी अस्पृश्यांचे नेतेच मानले जात. न्या.रानडे, रा.गो.भांडारकर, इत्यादी विचारवंतांचा त्यांच्यावर प्रभाव पडून १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. वर्ष १८९८ मध्ये ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यासासाठी मुंबईस गेले. मुंबई येथील प्रार्थनासमाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांचे शिफारशिनुसार ब्रिटिश अॅ.ण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी पाठविले. तेथे १९०१ ते १९०३ या कालावधी त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. वर्ष १९०३ च्या सप्टेंबरमध्ये अॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस भारताचे ब्राह्मो समाजाचे वतीने प्रतिनीधी म्हणून उपस्थित राहिले व ‘हिदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. भारतात परत आल्यावर १९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.
शिंदे यांना रोजनिशी लिहिण्याची सवय होती.त्यातून त्यांच्या विचारांचे आणि व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. इंग्लडमध्ये शिक्षण घेत असताना व भारतातील कायदेभंग चळवळीत भाग घेतल्या बद्दल शिक्षा भोगत असताना १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे,याशिवाय वर्ष १९२८ मधे त्यांनी ‘ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर’ नावाची रोजनिशी लिहिली आहे.इंग्लंडमधील रोजनिशी मधे त्यांनी बोटीवरील प्रवासाचे अनुभव लिहिले आहेत. धर्माचे तौलनिक अध्ययन करण्यासाठी ते ऑक्सफर्डला गेले होते.फ्रान्स मधील भेटीतील रोजनिशीमधे प्रवास वर्णनात व तेथील इमारतींचे कलासौंदर्य ,मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्य व सुधारणा याबाबत लिहिले आहे.वर्ष १९१८ ते १९२० या काळात त्यांनी सर्व भारतात अस्पृश्यता दूर करण्याच्या परिषदांचे आयोजन केले.यापैकी काही परिषदेमधे महात्मा गांधी आणि महाराजा सह्याजीराव गायकवाड हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. महात्माजींशी झालेले त्यांचे संवाद त्यांनी लिहून ठेवले आहेत.वर्ष १९३३ मधे “भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न” हा एक महत्त्वाचा संशोधनपर ग्रंथ त्यांनी प्रसिध्द केला. या विषयावरील प्रकाशित झालेला भारतातील हा पहिला ग्रंथ होय.या विषयावर गांभीर्यपूर्वक संशोधन तसेच सर्वेक्षण त्यांनी अनेक लेख लिहिले.विविध स्वरुपाचे लेख इंग्रजी-मराठीत लिहिणे, सर्वेक्षणे करणे अशी कामे त्यांनी प्रारंभी केली.वर्ष १९०६ मधे त्यांनी “निराश्रित साह्यकारी मंडळी”ची स्थापना केली.संपूर्ण भारतात त्याच्या शाखा काढल्या.या विषयी पोटतिडकीने कार्य करणारे ते राष्ट्रीय पातळीवरील एकमेव समाज सुधारक होते.वर्ष १९१७ मधे काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता राष्ट्रीय प्रश्न म्हणून मान्यता मिळवली ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ मधून अस्पृश्य मुलांना साधारण शिक्षणासह व्यावसायिक शिक्षण देणे, अस्पृश्यता परिषदा भरविणे आणि सहभोजने आयोजित करणे हीही महत्वाची कामे त्यांनी केली आहेत. शेतीमालाचा भाव हा भारतीय शेतीसंबंधीचा कळीचा मुद्दा त्यांनी १९३१ मध्ये उचलून धरला. शेतकरी हा या मालाचा निर्माता असतो. परंतु आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार मात्र त्याला असत नाही. दुर्दैवाने हा प्रश्न ९० वर्षे झाली तरी अजूनही सुटलेला नाही. त्यांचे आयुष्य त्यांनी प्रार्थना समाज,अस्पृश्यता निवारण,स्त्रीशिक्षण,देवदासी व शेतकरी यांच्यासाठी व्यतीत केले.२ जानेवारी १९४४ रोजी त्यांचे निधन झाले. . . . श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकवरील नोंदीवरून साभार.

विकीपीडियावरील माहिती.
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87

विठ्ठल रामजी शिंदे (जन्म : जमखिंडी, २३ एप्रिल १८७३; मृत्यू : २ जानेवारी १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात.

मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले. आपला समाज रूढी व परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांडे आहेत. त्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांना मान्यता देऊन त्या तत्त्वांचा प्रसार लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाचे कार्य करत असताना त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये दौरा करून एकेश्वरी धर्मपरिषद आयोजित केलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

जीवन
शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘’डिप्रेस्ड क्लास मिशन’’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली. या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती : अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणॆ, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे, इत्यादी. या संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या शाखा अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या.

लेखन
शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडांत रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी ‘ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर’ नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून ‘ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर’ या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.

वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसऱ्या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे ३७५ पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.

आत्मचरित्र
‘माझ्या आठवणी व अनुभव’ नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगत. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत.

प्रवासवर्णने
इंग्लंडमधील रोजनिशीत त्यांनी प्रथम त्यांच्या बोटीवरील प्रवासाबद्दल लिहिले आहे. तौलनिक धर्माचे अध्ययन करण्यासाठी ते ऑक्सफर्डला आले होते. ते पॅरिसला गेले व तेथील इमारतींचे कलासौंदर्य पाहून याबाबत फ्रेंचांची ग्रीकांशीच तुलना होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्य व सुधारणा यांचा मिलाफ या राष्ट्रांत झाला आहे, असे त्यांस वाटले.

ब्राह्मो समाजास शंभर वर्षे झाली, त्यानिमित्ताने शिंदे यांनी पश्चिम बंगालची सफर केली. तेव्हा ते ब्राह्मो उपासना केंद्रे चालवणाऱ्या रवींद्रनाथांना भेटले. ‘रवींद्रनाथांचा आवाज अलगुजासारखा कोमल व हृदयप्रवेशी होता. आणि त्या उपासनेत त्यांनी लोकाग्रहाखातर छोटे सुंदर पदही म्हटले, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यानंतर शिंदे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या शहरांत व गावांत ब्राह्मो धर्मावर भाषणे दिली.

शेतकरी चळवळ
वि.रा. शिंदे यांनी इ.स. १९२० ते २६ या काळात शेतकरी चळवळ उभी केली. पण सरकारने तुकडे बंदीचे बिल मागे घेताच चळ‍वळीत वाद सुरू झाले, आणि चळवळ थांबली.

हे पानही पहावे : महात्मा ज्योतीबा फुले

मुंबईचे आद्य शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ

इंग्रजांच्या राज्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याशी सहकार्य करतच पण मुंबईतल्या रहिवाशांच्या जीवनात सुधारणा करण्याचे अत्यंत तळमळीने प्रयत्न करणाऱ्या या एका वेगळ्या प्रकारच्या देशभक्तावर लिहिलेला हा लेख. यावरून असे दिसते की मुंबई शहराची सुरुवातीच्या काळातली उभारणी आणि जडणघडण यात नाना शंकरशेट यांचा खूप मोठा वाटा होता.

******

मुंबईचे आणखी दोन शिल्पकार भागोजी कीर आणि नानासाहेब मोडक यांची माहितीही पहा. https://anandghare.wordpress.com/2019/02/03/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b6%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9f-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81-%e0%a4%ad%e0%a4%be/

BLOG: मुंबईला खऱ्या अर्थाने श्रीमंत करणाऱ्या नाना शंकरशेठ यांची कहाणी

नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ
लेखक : नीलेश बने

मुंबईने ज्यांना श्रीमंत केले असे लक्षावधी लोक आपल्याला भेटतील, पण आपल्या कर्तृत्त्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदीच मोजके. नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ हे त्यातील अग्रगण्य नाव. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत, नानांनी या मुंबईत चोख व्यापार केला. उदंड पैसे कमाविले आणि कमाविलेल्या या पैशाचे फक्त उंच इमले न बांधता त्यातून समाज घडविणाऱ्या संस्था उभ्या केल्या. नानांनी उभारलेल्या संस्था पाहिल्या की आजही आवाक् व्हायला होते. आज नानांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या या खऱ्याखुऱ्या श्रीमंतेचे मॉडेल समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

नानांचा काळ (१८०३-१८६५) हा इंग्रजाविरुद्ध सुरू झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीचा काळ. मुंबई हे शहर म्हणून आकाराला येण्याचा हा कालावधी. समुद्री व्यापारामळे हे शहर घडत होते आणि रोजगाराची संधी शोधण्यासाठी लोक या शहरात येत होते. नानांचे कुटुंब या अशा मुंबईत येणाऱ्या लोकामधील अगदी सुरुवातीला आलेल्यामधले लोक म्हणायला हवे. नानांचे पूर्वज बाबूलशेठ मुरकुटे अठराव्या शतकात कोकणातून मुंबईत आले. मुंबईच्या आघाडीच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणना होत असे.

नानांचे वडील शंकरशेठजी ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचेही सावकार होते. सन १८०० मध्ये त्यांची एकूण संपत्ती १८ लाख रुपयांच्या घरात होती, असे संदर्भ सापडतात. नानांची आई लहानपणीच गेली. त्यामुळे वडिलांनीच त्यांना मोठे केले. त्यावेळच्या पद्धतीनुसार घरीच मास्तर येऊन नानांना भारतीय आणि इंग्रजी असे दोन्ही पद्धतीचे शिक्षण मिळाले. त्यामुळे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांवर नानांचे प्रभुत्व होते. या ज्ञानाचा उपयोग करून नानांनी आपला व्यापार यशाच्या शिखरावर पोहचविला.

ज्या शिक्षणाने आपण घडलो ते शिक्षण आज सर्वांना सहज उपलब्ध नाही, हे नानांनी जाणले होते. त्यासाठीच शिक्षण सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न नानांनी सुरू केले. देशातील मुलांना उत्तम शिक्षण मिळायला हवे यासाठी सुरू झालेल्या ‘नेटिव्ह स्कूल सोसायटी’ नावाच्या पश्चिम भारतातील पहिल्यावहिल्या शिक्षणसंस्थेचे नाना संस्थापक होते. याच संस्थेने पुढे मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला. अर्थातच त्यावेळी त्याला सनातनी लोकांकडून विरोध झाला. नानांनी हा आपल्या अधिकाराने हा विरोध मोडून काढत आपल्या घरात मुलींची शाळा सुरू केली. आजही नानांची ही शाळा ‘स्टुडंट्स लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटी’च्या रुपाने गिरगावात आपले अस्तित्व टिकवून उभी आहे.

एखादा समाज किंवा शहर उभे राहते ते संस्थांच्या जोरावर. समाजातील संस्था जेवढ्या ताकदीच्या, तेवढा तो समाज बलवत्तर म्हणून ओळखला जातो. ऑक्सफर्डसारखे शहर तिथल्या विद्यापीठामुळे ओळखले जाते, तर न्यूयॉर्कमधला शेअर बाजार जगातील सर्वात मोठा ठरतो. या अशा संस्था शहरे घडवित असतात. हे नानांमधल्या दूरदृष्टीच्या शिल्पकाराने जाणले होते. म्हणूनच मुंबईच्या जडणघडणीच्या काळात नानांनी दीर्घकाळ टिकतील, समाजाला समृद्ध करतील अशा संस्थांच्या उभारणीकडे याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. नानांचे हे संस्थाकारण आज पुन्हा एकदा समजून घ्यायची वेळ आली आहे.

१८१९ मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. नानांची आणि एलफिस्टन यांची ओळख झाली. एलफिस्टन यांच्या शिक्षणविषयक कामांमध्ये नानांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. या दोघांच्या प्रयत्नातून १८२२ मध्ये ‘मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तक मंडळी’ची स्थापना झाली. सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण न्यायचे असेल, तर ते मातृभाषेतून दिले जावे याबद्दल दोघांचेही एकमत होते. त्यामुळेच मराठी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये प्रथमच क्रमिक पाठय़पुस्तके छापली गेली.

१८२७ मध्ये एल्फिन्स्टन इंग्लंडला परत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सत्कारासाठी जो निधी गोळा केला गेला, त्यातून एल्फिन्स्टन कॉलेज सुरू झाले. याच एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यासारख्या विद्वानांची पहिली पिढी तयार झाली. याच पिढीने नवे शिक्षण घेऊन समाजात नवा विचार रुजविला. या नव्या विचाराने पुढे काँग्रेसची स्थापना झाली आणि देशाचा स्वातंत्र्यलढा उभारला गेला. त्यामुळे आजच्या आधुनिक भारताची मुळे शिक्षणाच्या प्रसारात आणि नानांसारख्यांच्या दूरदृष्टीत आहे, हे विसरून चालणार नाही.

महिलांच्या शिक्षणाप्रमाणेच सतीच्या अमानुष प्रथेविरोधातही नानांनी आपला विरोध नोंदविला. सतीबंदीसाठी १८२३ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटकडे जो अर्ज करण्यात आला होता, त्यावर राजा राममोहन रॉय आणि जगन्नाथ शंकरशेठ यांच्या प्रमुख सह्या होत्या. या सतीबंदीमुळे मुंबई इलाख्यात सनातन्यांकडून काही प्रतिक्रिया उमटली तर नाना ते सांभाळून घेतील, यावर इंग्रजांचा विश्वास होता. म्हणूनच डिसेंबर १८२९ मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीच्या कायद्यावर सही केली आणि हजारो वर्षांच्या क्रूर प्रथेचे उच्चाटन झाले. फक्त लोकानुनय करून नव्हे तर, प्रसंगी कटू वाटतील पण भविष्यवेधी असतील असे ठोस निर्णय समाजाच्या नेत्याला घ्यावे लागतात, हेच नानांच्या सतीबंदीच्या वेळच्या वागण्यातून स्पष्ट झाले.

१८४५ मध्ये एतद्देशीयांच्या भागीदारीने पश्चिम भारतात वाफेच्या बोटींचा पाया घालणारी ‘द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी’ उभारण्यात नानांचा पुढाकार होता. त्याच वर्षी जे. जे. रुग्णालय आणि ग्रँट मेडिकल महाविद्यालय, १८५१ मध्ये संस्कृतचे शिक्षण सर्वांसाठी खुले करणारे ‘पूना संस्कृत कॉलेज’ (आजचे डेक्कन कॉलेज), १८५५ मध्ये पहिले कायदा महाविद्यालय, १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठ (बॉम्बे युनिव्हर्सिटी) आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, १८६२ मध्ये व्हिक्टोरिया गार्डन (आजची राणीची बाग) अशा महाकाय संस्थांच्या स्थापनेत नानांनी आपला सिंहाचा वाटा उचलला. याव्यतिरिक्त शासकीय मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, मर्कटाइल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया सारख्या बँकांच्या उभारणीतही नानांनी प्रयत्न केले. एकंदरित या कालावधीत मुंबईत झालेल्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक बदलावर नानांनी आपला ठसा उमटविला.

१६ एप्रिल १८५३ रोजी आशियातील पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे अशी धावली. या रेल्वेसाठी नानांचे प्रयत्न महत्वाचे होते. म्हणूनच या पहिल्या रेल्वेप्रवासात जे काही मोजके मान्यवर होते, त्यात नानांचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर बोरिबंदर स्थानकाच्या इमारतीवर (आजचे सीएसएमटी) आजही ज्या एकमेव भारतीयाचा पुतळा आहे, तो नानांचा. रेल्वेमुळे मुंबईत आधुनिकता धावू लागली आणि या शहराचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला, हे कोणीच नाकारू शकत नाही.

भारतीयांच्या समस्या इंग्लंडपर्यंत पोहाचाव्या यासाठी १८५१ मध्ये ‘बॉम्बे असोसिएशन’ नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था स्थापन झाली. या संस्थेचे ‘प्रतिष्ठित’ अध्यक्ष म्हणून जमशेठजी जेजीभाई, तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकरशेठ यांना निवडले गेले. या संस्थेतर्फे ब्रिटिश पार्लमेंटकडे सुधारणांसाठीचे अर्ज केले गेले आणि ते मंजूरही झाले. १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांना मदत केल्याचा आरोप नानांवर झाला. त्यात नानांची चौकशीही झाली. पण काही पुरावे न आढळल्याने त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नाही.

पुढे १८६१ साली लेजिस्लेटीव कौन्सिलमध्ये एतद्देशीय स्थान देण्याचे ठरले तेव्हा या परिषदेचा पहिले सदस्यत्व नानांनाच मिळाले आणि नाना अधिकृतरित्या भारतीयांचे प्रतिनिधी झाले. याच बॉम्बे असोसिएशनचे रूपांतर १८८५ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये झाले. पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सभासदांनीच गोवालिया टँक येथे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली आणि स्वातंत्र्यलढ्याला अधिकृतरित्या सुरुवात झाली.

नानांच्या मालकीची प्रचंड मोठी जमीन मुंबईत होती. असे म्हणतात की आजच्या मरिन लाइन्स ते मलबार हिल परिसरात ही जमीन होती. नानांनी ही जमीन शहराच्या उभारणीसाठी दिली. त्यावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची योग्य ती व्यवस्था शहरात नव्हती. नानांनी स्वतःची जमीन त्यासाठी दिली, अंत्यविधीसाठी लागणारी व्यवस्था तेथे लावून दिली. आजही त्याच नानांच्या मालकीच्या जागेवर मरिन लाइन येथील जग्गनाथ शंकरशेठ स्मशानभूमी उभी आहे.

नानांनी उभारलेले हे काम पाहिले की आपल्याला यासाठी एक जन्म पुरणार नाही असे वाटत राहते. पण नानांनी आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा आणि श्रीमंतीचा उपयोग समाजासाठी केला. जेवढे या शहराकडून घेतले, त्याच्या कैकपटीने या शहराला, समाजाला परत दिले. म्हणूनच नानांच्या या श्रीमंतीचा थोडा तरी अंश प्रत्येकाने घेतला तरी समाज म्हणून आपण खूप श्रीमंत होऊ.

(या लेखाचे लेखक नीलेश बने हे मुंबईतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन येथे रिसर्च फेलो आहेत. हा मूळ लेख ३१ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झाला होता)

*****

मला हा लेख वॉट्सअॅपवरून आणि फेसबुकवरून मिळाला, पण गूगलवर शोध घेत असतांना मला हा लेख आंतर्जालावरील लोकसत्ता दैनिकावरही दिसला आहे. या सर्वांचे आभार मानून मी हा लेख या पानावर संग्रहित करीत आहे. कृपया अनुमति असावी.

वॉट्सअॅपवर भिरभिरत पसरणाऱ्या लेखात याशिवाय खाली दिलेली प्रस्तावना आहे.

सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढण्यापूर्वी दोन वर्षे मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा काढलेली होती. या शाळेत सर्व जातीजमातीच्या मुलींना प्रवेश होता . गेल्या २५० वर्षात भारतात अलौकिक चारित्र्याची व कर्तुत्वाची जी माणसे होऊन गेली त्या सर्व मंडळीमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचे इतका प्रचंड माणूस कोणीही दाखवता येणार नाही. १८३२ साली त्यांनी Bombay Education Society काढली आणि पुढे एलीफेस्टॅन कॉलेज काढले १८४५ साली students literrary and scientific society ची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली. हि शाळा काढल्याबद्दल लोकांनी त्यांना सळो कि पळो करून टाकले. Grant Medical College काढले मुंबई विद्यापीठ स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. पहिली भारतीय रेल्वे सुरु करण्यात नानांचा मोठा सहभाग होता. स्त्रियांसाठी सूतिकागृहाची उभारणी केली. ख्रिश्चन धर्माचे आक्रमण थोपवून धरले. मुंबईत पहिली सूत गिरणी काढली. मराठी व संस्कृत भाषण प्रतिष्ठा मिळवून दिली. पुण्याची संस्कृत पाठशाळा बंद करण्याचा डाव उधळून लावला. हि फक्त नानांची शैक्षणिक क्षेत्रातील कामे. या व्यतिरिक्त प्रचंड कामे केली. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात क्रांतिकारकांना आश्रय दिला. अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. मॉरिशसहून उसाचे बेणे आणून त्याची प्रथम लागवड केली. Municipal Act पास करून घेवून BOMBAY Municipal council ची स्थापना केली. पहिले Grand jury मध्ये त्यांचा समावेश होता. Royal Asiatic Society चे जे प्रचंड ग्रंथालय आहे त्याच्या निर्मितीत त्यांचा मोठा सहभाग होता. अस्पृशांच्या मुलांना समान वागणूक शाळांमधून मिळावी यासाठी त्यांनी चळवळ केली.

. . . . . . .

नवी भर दि. ३१-०७-२०२१

मुंबई ठाणे रेल्वेचे ते पहिले प्रवासी. मुंबई शहराच्या घडणीत ज्यांचा मोठा वाटा मानला जातो. अश्या कै.जगन्नाथ शंकरशेट यांचे पुण्यस्मरण
जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट मुरकुटे (Jagunath Sunkersett) (ऑक्टोबर १०, १८००:मुंबई – जुलै ३१, १८६५) हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो. मुंबई ठाणे रेल्वेचे ते पहिले प्रवासी. तत्कालीन इंडियन रेल्वेचे ते संचालक होते. इंडियन रेल्वे असोशियनचे ते संस्थापक होते . एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सभासद होते.
व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय निर्मितिमधेहि त्यांचा सहभाग होत.
त्यांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली.
अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेट यांच्या हवाली करीत.
त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला.
अभिवादन
माधव विद्वांस

. . . . . . . . . . . . . . . . .

जगन्नाथ शंकरशेट

अलकनंदा पाध्ये
दरवर्षी सुट्टीत जय कोकणात मामाकडे राहायला जायचा. पण यावेळी मात्र त्याची मामेभावंडे मल्हार आणि नेहा कोकणातून त्याच्याकडे आली होती. आई-बाबांनी त्यांच्यासाठी खास वेगवेगळे कार्यक्रम आखून ठेवले होते. पैकी एक दिवस त्याच्या बाबांनी तिघा मुलांना गेटवे ऑफ इंडिया, म्युझियम, फोर्ट.. थोडक्यात मूळ मुंबईची सफर करायचे ठरवले होते. त्यासाठी ठाण्याहून ते लोकल गाडीतून एकेकाळच्या व्ही. टी.आणि सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरले. ते भव्य आणि खूप मोठ्ठं स्टेशन जय, मल्हार आणि नेहा प्रथमच बघत होते. तिथली धावपळ, गडबड पाहून ते भांबावूनच गेले. तिथून वाट काढत बाबाने त्यांना गेटवे ऑफ इंडिया परिसरात नेले. तिथल्या लॉंचमधून सफर करताना आजूबाजूच्या भव्य इमारती, पाण्यात तरंगणाऱ्या मोठ्ठय़ा बोटी बघून नेहाचा तर जीवच दडपला. ताजमहाल हॉटेल, मुंबई विद्यापीठ अशा फोर्ट भागातल्या बऱ्याच जुन्या वास्तूंची माहिती देत बाबाने त्यांना अखेर तो काम करत असलेल्या रिझव्‍‌र्ह बॅंकेपर्यंत आणले.

‘काय जय, आता पाय दुखायला लागलेत की नाही?’ असं बाबांनी सगळ्यांच्या मनातलं ओळखून विचारताक्षणी सगळ्यांनी माना डोलावल्या. तेव्हा ‘चला, आता एका आजोबांची भेट राहिलीय.. ती झाली की आपण घरी जायला मोकळे!’ असे म्हणत त्याने जवळच्याच खूप पायऱ्या असलेल्या पांढऱ्याशुभ्र वास्तूकडे- म्हणजे एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीकडे मोर्चा वळवला.

‘बाबा, इथे कुठले आजोबा राहतात?’ जयचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याने तिघांना एका संगमरवरी पुतळ्यासमोर नेऊन म्हटलं, ‘हे बघा आजोबा. यांचं नाव जगन्नाथ शंकरशेट. पण सगळेजण त्यांना नाना शंकरशेट म्हणूनच ओळखायचे.’ एका संगमरवरी चौथऱ्यावर खूप मोठ्ठी पगडी घातलेल्या त्या रुबाबदार आजोबांच्या दर्शनाने सगळे भारावून गेले आणि नकळत सर्वानी हात जोडले.

‘पण बाबा, यांचा पुतळा इथे का बसवलाय? ते कुणी इथले मुख्य होते का?’

बाबा हसत म्हणाला, ‘चला, थोडा वेळ आपण या पायऱ्यांवर बसू या, मग सांगतो.’ त्याप्रमाणे बसल्यावर बाबाने विचारले, ‘मल्हार, तुमच्या आजोबांना सगळेजण संस्कृत पंडित म्हणायचे हे माहिती असेलच ना तुम्हाला?’

‘हो. आणि त्यांना म्हणे संस्कृतसाठी जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिपपण मिळाली होती.’ मल्हारचे तत्पर उत्तर.

‘अगदी बरोबर मल्हार. तर, ज्यांच्या नावाने ही स्कॉलरशिप दिली जायची, तेच हे जगन्नाथ शंकरशेट आजोबा. मुद्दामच मी तुम्हाला इथे घेऊन आलोय. नाना अत्यंत श्रीमंत घराण्यातले होते. पण संपत्तीचा उपयोग त्यांनी अनेक समाजोपयोगी कामांसाठी केला. नाना त्यांच्या दानशूरपणासाठीसुद्धा खूप प्रसिद्ध होते. तेव्हा आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते. आणि तुम्हाला हेही माहितीच असेल की सुरुवातीला सात वेगवेगळी बेटं एकत्र करून हे मुंबई शहर निर्माण झालेलं आहे. पण आज तुम्हाला दिसतेय ती मुंबई आणि तेव्हाच्या मुंबईमध्ये जमीन-अस्मानाचा फरक होता बरं का! तेव्हाची मुंबई आतासारखी अस्ताव्यस्त वाढलेली नव्हती. आज जगातील अनेक मोठय़ा आणि भरभराटीला आलेल्या शहरांमध्ये मुंबईची गणना होते. या मुंबई शहराला नावारूपाला आणण्यात नानांनी खूपच प्रयत्न केले आहेत. म्हणूनच त्यांना ‘मुंबईचे शिल्पकार’ असंही म्हणतात. नाना फक्त दानशूरच होते असं नाही हं; समाजसेवा, समाजसुधारणा आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे. आज आपण लोकल गाडीने इथवर आलो, ती मुंबईत चालू व्हावी, मुंबईकरांना प्रवास सोयीचा व्हावा म्हणून नाना शंकरशेट तसेच जमशेटजी टाटांसारख्या उद्योगपतींचं मोठं योगदान आहे. त्या दोघांनी ब्रिटिश सरकारकडे सतत पाठपुरावा केला आणि अखेर १६ एप्रिल १८५३ रोजी आपण ज्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरलो तिथून ठाण्यासाठी पहिली लोकल गाडी सुरू झाली. इंग्रज इथे येण्यापूर्वी आपल्या मुलांसाठी विशिष्ट असा अभ्यासक्रम तयार केला गेला नव्हता. मुंबईत त्यादृष्टीने शाळाही नव्हत्या. परंतु आपल्या भारतीय मुलांनाही इंग्रजांप्रमाणे आधुनिक- म्हणजे फक्त शाळेपर्यंत नाही, तर पदवीपर्यंतचे.. कायद्याचे तसेच पाश्चात्त्य वैद्यकीय म्हणजे अ‍ॅलोपॅथीचे शिक्षणही मिळावे, हा नानांचा ध्यास होता. नेहाबाई, आज तुम्हा मुलींना शिकण्यासाठी भरपूर शाळा आहेत. पण त्याकाळी मुलींच्या शिक्षणासाठी ना शाळा होत्या, ना त्यांना शिकण्याची परवानगी होती. पण मुलींनाही शिक्षणाची संधी मिळायला हवी, हा नानांचा आग्रह होता. तेव्हा त्यांच्या पुढाकाराने मुलींसाठी कन्याशाळा सुरू झाल्या. मुलींना प्रोत्साहन म्हणून शिक्षण आणि शिक्षणाचे साहित्यही मोफत दिले जायचे. विशेष म्हणजे, पास झालेल्या मुलींचा त्यांनी स्वत:च्या घरी सत्कारही केला. अर्थात हे सर्व करताना त्यांना त्यावेळच्या कर्मठ समाजाकडून विरोधही भरपूर झाला. शिक्षण समितीमध्ये एक सभासद या नात्याने त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. समितीतील काही इंग्रज विद्वानांनी संस्कृतला प्राचीन भाषा ठरवून अभ्यासक्रमातून काढायचा विचार केला तेव्हा नानांनी त्याला ठाम विरोध केला. ‘संस्कृत ही आमच्या सर्व भारतीय भाषांची माता आहे,’ असे सांगून अभ्यासक्रमात ती असलीच पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. पुढे मॅट्रिकला संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला त्यांच्याच नावाने जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती सुरू झाली; जी तुमच्या आजोबांना मिळाली होती. त्यांनी संस्कृत विद्यालय आणि संस्कृत वाचनालयही सुरू केले होते. आपण एल्फिन्स्टन कॉलेज बघितले ना, त्याच्या उभारणीतही नानांचा सहभाग होता बरं का! आज तुम्ही सहजपणे ज्या विविध विषयांच्या शाखांतून शिक्षण घेत आहात, त्या आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या नानांनी रोवली ती थोर व्यक्ती दाखवायला मुद्दाम मी तुम्हाला इथे आणलं.

ब्रिटिश सरकारलासुद्धा नानांच्या औदार्यामुळे, कार्यामुळे, हुशारीमुळे त्यांच्याबद्दल आदर वाटत असे. आता आपण जिथे बसलोत ना, त्या एशियाटिक सोसायटीच्या कार्यकारी मंडळात तोपर्यंत कुणा भारतीयांना प्रवेश नव्हता. परंतु आपल्या नानांना मात्र इंग्रजांनी पहिले भारतीय सदस्य करून घेतले, हा मोठाच बहुमान होता. अर्थात नानांनी या पदाचा उपयोग स्वत:साठी नाही, तर समाजोपयोगी कामांसाठीच केला. त्यांच्याप्रति आदर म्हणून एशियाटिक सोसायटीच्या आवारात साकारलेला त्यांचा हा पुतळा आपल्याला त्यांच्या महान कार्याची कायम आठवण करून देत असतो. नानांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल अजून खूप काही सांगता येईल; पण आता निघायला हवं,’ असं म्हणत बाबा मुलांसोबत पायऱ्या उतरायला लागला.

नवी भर दि.१०-०८-२०२१

इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली

मुंबईने ज्यांना श्रीमंत केले अशी खूप लोकं आपल्याला दिसतील, पण आपल्या कर्तृत्त्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदी हातावर मोजण्या ईतपतच सापडतील. नानांनी उभारलेल्या संस्था पाहिल्या की आजही आवाक् व्हायला होते. नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ हे ह्या कर्तबगार लोकांच्या यादीतील अग्रगण्य नाव.

आजच्या काळात टाटा, बिरला, महिंद्रा ह्यांना मुंबईचा किंग म्हंटलं जातं पण ह्यांच्याही आधी नाना शंकर शेठ यांच्यामुळेच मुंबईचा हा रुबाब आज सुद्धा टिकून आहे हे मुंबईकरांनी विसरता कामा नये!
१५ सप्टेंबर १८३०. इंग्लंडमध्ये लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर या शहरादरम्यान जगातली पहिली इंटरसिटी रेल्वे धावली. इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनचा काळ होता. मॅन्चेस्टर मध्ये सगळ्या कापड गिरण्या होत्या. अख्ख्या जगाला पुरेलएवढ कापड तिथ तयार होत होता. तर या गावाला लागणारा कच्चा माल कापूस भारत, अमेरिकेतून लिव्हरपूलच्या बंदरावर यायचा आणि मग तिथून मॅन्चेस्टरला रवाना व्हायचा. म्हणून लंडनच्या आधी तिथे पहिली वाफेच्या इंजिनवर धावणारी रेल्वे सेवा सुरु झाली. या रेल्वे मुळे मॅन्चेस्टरच्या प्रगतीचा स्पीड दुप्पट वेगाने सुरु झाला.
इंडस्ट्री मोठी करायची असेल तर तर ट्रान्सपोर्ट चांगला करावा लागणार हे निश्चित होतं.लिव्हरपूल
ते मॅन्चेस्टर दरम्यान टाईमटेबल नुसार रेल्वे धावतीय. शेकडो लोक या गावाहून त्या गावी सुखकर प्रवास करतायत, कच्चा माल निर्धोक पणे कारखान्यावर पोहचतोय हे सगळ त्याकाळच नवल होतं. ही बातमी सगळीकडे पसरली.
* मुंबईमध्ये एका माणसाला यागोष्टीचे खूप अप्रूप वाटलं. आपल्या पण गावात रेल्वे धावली पाहिजे असं त्याच्या मनात बसलं. अजून अमेरिकेत रेल्वे उभी रहात होती आणि हा भारतासारख्या गरीब आणि ब्रिटीशांच्या पारतंत्र्यात असणाऱ्या देशात राहणारा माणूस रेल्वेची स्वप्न बघत होता. दुसरे कोण असते तर लोकांनी खुळ्यात काढलं असत. पण हा माणूस कोण साधा सुधा नव्हता. खुद्द इस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणारा मुंबईचा सावकार नाना शंकरशेठ*
नाना शंकरशेठ यांचं खर नाव जगन्नाथ शंकर मुरकुटे जे इतरांनाच काय पण सोनारांचे नेते म्हणून मिरवणाऱ्यांनाही माहीत नसेल. त्यांचे मूळगाव मुरबाड. पिढीजात श्रीमंत. त्यांचे वडील इंग्रजांना उधारी देणारे मोठे सावकार. इंग्रज टिपू सुलतान युद्धात त्यांनी बराच पैसा कमवलेला. त्यांचाचं एकुलता एक मुलगा म्हणजे नाना.सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेलं हे पोरग. पण फक्त लक्ष्मीच नाही तर सरस्वतीचा ही आशीर्वादाचा हात डोक्यावर होता. बापानेही खास स्पेशल शिक्षक लावून इंग्लिश वगैरे मध्ये पोराला तयार केलं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर घरचा बिझनेस त्यांनी आणखी मोठा केला. सगळ जग इंग्रजांपुढे माना झुकवून उभ राहायचं तेव्हा नाना शंकरशेठच्या आशीर्वादासाठी इंग्रज अधिकारी पाय घासत असत.
एकदा एका पार्टीमध्ये नानांची ओळख मुंबई इलाख्याचा गव्हर्नर लॉर्ड स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनशी झाली. दोघे चांगले दोस्त बनले. एल्फिन्स्टनची भारतीयांबद्दल सहानुभूती होती. इथली गरिबी मिटावी, देश आधुनिक जगाशी जोडला जावा यासाठी तो प्रयत्नशील असायचा
त्याच्या मैत्रीचा इफेक्ट म्हणा अथवा आणखी काय पण नानांनी सुद्धा आपल्या बांधवांच अडाणीपणा दूर व्हावा, आपल्या गावाची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले. मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जेजे स्कूल ऑफ आर्ट, मुंबईमधली पहिली मुलींची शाळा, मुंबई विद्यापीठ अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. मुंबईत अनेक रस्ते उभारले, दवाखाने सुरु केले, भारतातली पहिली जहाज कंपनी सुरु केली.सात बेटांच्या गावाला मुंबई शहर बनवण्यात नाना शंकर शेठ यांचा सिंहाचा वाटा आहे हे इंग्रजही कधी नाकारू शकणार नाहीत.
*तर अशा या नाना शंकरशेठ यांच्या मनात आलं की मुंबईत रेल्वे सुरु करायची. साल होत १८४३. तेव्हा त्यांच्या वडिलांचे मित्र सर जमशेठजी जीजीभोय उर्फ जेजे यांच्याकडे ते गेले. नानांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर नानांसाठी ते वडीलांसमानच होते. या सर जेजेनां त्यांनी आपली कल्पना सांगितली, त्यानाही ही कल्पना पटलीमुंबईत रेल्वे सुरु होऊ शकते का याबद्दल त्यांनी इंग्लंडहून आलेले सुप्रीम कोर्टाचे जज सर थॉमस एरसकीन पेरी यांचं मत घेतलं. ते सुद्धा या कल्पनेने खुश झाले. या तिघांनी मिळून इंडियन रेल्वे असोशिएशनची स्थापना केली ,तेव्हा कंपनी सरकारच्या जरासुद्धा मनात नव्हतं की भारतात रेल्वे व्हावी. पण नाना शंकरशेठ, सर जेजे, सर पेरी असे लोक पाठ लागलेत म्हटल्यावर त्यांना यामध्ये लक्ष घालावेच लागले. १३ जुलै १८४४ रोजी कंपनीने सरकारला प्रस्ताव सादर केला. मुंबईपासून कुठपर्यंत रेल्वे लाइन टाकता येऊ शकते, याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर ‘बॉम्बे कमिटी’ स्थापन करण्यात आली.
नानांनी आणखी काही मोठी व्यापारी मंडळी, ब्रिटीश अधिकारी, बँकर्स यांना एकत्र करून ग्रेट इंडियन रेल्वेची स्थापना केली. याच काळात इंग्लंडमधल्या भांडवलदारांना भारतात मुंबईमध्ये रेल्वे सुरू करण्यासाठी चालू असलेल्या हालचालींची कुणकुण लागली. लगोलग लॉर्ड जे. स्टुअर्ट वॉर्ली यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश भांडवलदारांनी लंडनमध्ये ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वेची स्थापना केली. या कंपनीचं मुंबईमध्ये देखील ऑफिस उघडण्यात आलं.
नानांच्या बंगल्यात कंपनीचं कार्यालय सुरु करण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडहून आलेले तज्ञ इंजिनियर रेल्वेमार्ग उभारणीच काम करू लागले. फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडात पहिल्यांदा रेल्वे धावणार होती.
अखेर तो दिवस उजाडला.१६ एप्रिल १८५३ दुपारी ठीक ३.३० वाजता मुंबईच्या बोरिबंदरहून ठाण्यासाठी ट्रेन निघाली. या ट्रेनला १८ कंपार्टमेंट आणि तीन लोकोमोटिव्ह इंजिन्स होती. पहिल्या प्रवासासाठी खास फुलांनी शृंगारलेल्या या ट्रेनच्या प्रवाशांमध्ये नाना शंकरशेट व जमशेटजी जिजीभोयदेखील होते. सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरु करण्याच क्रेडीट देतात पण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाविषयी, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊक नव्हते
आज भारतीय रेल्वे ही जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक आहे. रेल्वेला मुंबईची तर लाइफ़लाइन समजल जात. आज मुंबई मेट्रो सिटी आहे, उद्योगनगरी म्हणून जगभरात ओळखली जाते या मागे नाना शंकर शेठ या एका मराठी माणसानं पाहिलेलं अशक्यप्राय स्वप्न आहे.
अप्रतिम, कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास नसणारी ही माणसे खूप खूप काही असे करतात की मनोमनी नतमस्तक होऊन जावे असे वाटते🙏👌
🙏 अशा या नाना शंकर शेठ यांना विनम्र अभिवादन 🙏

. . . . . . . नवी भर दि.१६-०६-२०२२ वॉट्सॅपवरून साभार

अणुऊर्जेचे जनक डॉ.होमी भाभा

आज ३० ऑक्टोंबर! हा प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.होमी भाभा यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचा ’संस्थापक दिन (फाऊंडर्स डे)’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. अणुऊर्जा खात्यामध्ये काम करून निवृत्त झालेले श्री.नरेंद्र गोळे यांनी लिहिलेला एक संग्राह्य लेख खाली दिला आहे. श्री.नरेंद्र गोळे यांचे आभार.

डॉ.होमी भाभा यांच्यासंबंधित माझ्या काही आठवणी इथे दिल्या आहेत.
https://anandghare2.wordpress.com/2012/11/01/%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7/

मला भावलेले भाभा

नरेंद्र गोळे
·
आज ३० ऑक्टोंबर!
भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचा ’संस्थापक दिन (फाऊंडर्स डे)’
.
माझ्या आईवडिलांच्या छत्रछायेत मी जेवढा काळ वाढलो, मोठा झालो, त्याहूनही अधिक काळ मी अणुऊर्जाविभागाच्या छत्रछायेत नांदलो आहे. त्याच्या कार्यसंस्कृतीची छाप माझ्या वर्तनावर आढळून आली तर तो अपघात नाही, मी एकतीस वर्षे त्या संस्कृतीचा घटक राहिलो आहे. माझ्या आईवडिलांप्रती मी जेवढा कृतज्ञ आहे, तितकाच मी अणुऊर्जाविभागाप्रतीही कृतज्ञ आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रशालेच्या २३ व्या तुकडीतून अणुऊर्जाशास्त्र शिकल्याचा मला सर्वथैव अभिमान आहे!
.
अणुऊर्जाविभागाच्या निर्मितीस ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या अदमासे निम्म्या वाटचालीत मीही त्यासोबत वाट चाललो आहे. त्याचाही मला अभिमान आहे. ह्यानिमित्ताने यापुढेही अणुऊर्जाविभाग देशाच्या कीर्तीत मोलाची भर घालतच राहो हीच प्रार्थना!
.
होर्मसजी जहांगीर भाभा ह्यांचा आज जन्मदिवस. टाटा मूलभूत विज्ञान संस्था आणि भाभा अणुसंशोधन केंद्र ह्या त्यांनीच निर्मिलेल्या दोन अभिमानास्पद संस्था, त्यांचा जन्मदिवस ’संस्थापक दिन (फाऊंडर्स डे)’ म्हणून साजरा करत असतात.
.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या ’आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत अणुऊर्जा विभाग आजपासूनच तंत्रज्ञान विकसन आणि कार्यान्वयन केंद्रे सुरू करत आहे. त्यांतून विस्तृत व्यापारी उपयोगाकरता तंत्रज्ञानानाचे अनुकूलन केले जाईल. संशोधन व विकास केंद्रे, उद्योग आणि उदयमान उद्योजक, तसेच शैक्षणिक संस्था ह्यांच्या शक्ती एकवटण्याचे प्रयास ह्या केंद्रांतून केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुढील केंद्रांवर आजच ही योजना कार्यान्वित केली जात आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. कमलेश निळकंठ व्यास ह्यांचे हस्ते त्यांचे उद्घाटन होणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रात सकाळी १००० वाजतापासून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
.
१. भाभा अणु संशोधन केंद्र (भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर), मुंबई
२. इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र (इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटोमिक रिसर्च),
कळपक्कम
३. राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञान केंद्र (राजा रामण्णा सेंटर फॉर अडव्हान्सड
टेक्नॉलॉजी), इंदौर
४. चल ऊर्जा आवर्तनक केंद्र (व्हेरायबल एनर्जी सायक्लॉट्रॉन सेंटर),
कोलकाता; आणि
५. भारतीय भौतिकी प्रयोगशाळा (इंडियन फिजिकल लॅबोरेटरी), गांधीनगर
.
त्यानिमित्ताने भाभांच्या आठवणी सांगणारा माझा लेख पुन्हा प्रसारित करत आहे.
.
मला भावलेले भाभा
लेखकः नरेंद्र गोळे २०२००८०३


होर्मसजी जहांगीर भाभा [१]
(जन्मः ३० ऑक्टोंबर १९०९, मुंबई,
मृत्यूः २४ जानेवारी १९६६, माऊंट ब्लांक)
शास्त्राभ्यास करे, कलेत विहरे, नेतृत्व देई पुरे
बांधे संघटना, जनांत विचरे, चित्रांत व्यक्ती भरे ।
ठेवी देश पुढे, नवे घडवि जो, शास्त्रज्ञ देशातले
भाभा होर्मसजी, महान जगती, आदर्श ठेवीतसे ॥ – शार्दूलविक्रीडित
– नरेंद्र गोळे २०२००७१५
.
होमी भाभा ह्यांना आपण सर्वच भारताच्या अणुऊर्जेचे जनक म्हणून ओळखतो. मात्र ह्याव्यतिरिक्त होमी भाभा एक उत्तम नेते होते. एक उत्तम कलाकार होते. उत्कृष्ट पर्यावरणवादी होते. द्रष्टे होते. देशभक्त होते. ह्याचे काही पुरावेच मी इथे सादर करणार आहे.
.
होमी भाभा एक उत्तम नेते
.
भारतातील अवकाशविज्ञानसंशोधनाचे जनक विक्रम साराभाई म्हणाले [२], “ह्या अणुऊर्जा विभागातच नाही तर असंख्य शास्त्रज्ञांत आणि विद्यापीठांतून अणुऊर्जा प्रशालेत येणार्‍या तरूणांत, जो आत्मविश्वास आणि प्रेरणा भाभा निर्माण करू शकत, ज्या प्रकारे त्यांना निरंतर आधार देत असत, तोच खरा त्यांनी आपल्याकरता मागे ठेवलेला वारसा आहे.”
.
होमी भाभांनी केंब्रिज विद्यापीठाच्या कैस महाविद्यालयातून १९२७ साली यांत्रिकी अभियंत्रज्ञ पदवी प्राप्त केली होती. व्यावसायिक म्हणून ते प्रशिक्षित अभियंते होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भौतिकशास्त्रज्ञ होते. टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक होते. भारतीय आण्विक कार्यक्रमाचे जनक म्हणवले जात असत. ’ऍटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे’चे संस्थापक संचालक होते. ह्या संस्थेसच त्यांचेपश्चात त्यांचे नाव देण्यात आले. ती ’भाभा अणुसंशोधन संस्था, झाली. ह्या दोन संस्था म्हणजे भारतीय अण्वस्त्रविकासाच्या कोनशीलाच आहेत.
.
होमी भाभा उत्तम कलाकार होते
.
केंब्रीजमध्ये असतांना होमी भाभांनी काल्ड्रॉन ह्यांच्या ’लाईफ इज अ ड्रीम’, हँडेल ह्यांच्या ’सुस्सान्ह’ आणि मोझार्ट ह्यांच्या ’ईडोमेनो’ ह्या ऑपेरांचे नेपथ्य केले होते [३].
.
ते तेवढ्याच वकूबाचे चित्रकारही होते. संगीत रसिक होते. कलाप्रेमी होते. कलेला आश्रय देणारे थोर व्यक्ती होते. अभिजात कलांप्रती त्यांना लहानपणापासून प्रेम होते. संगीत आणि संस्कृतीच्या वातावरणात ते वाढले. त्यांच्या कुटुंबाचा पुस्तकसंग्रह वैभवशाली होता. त्यात कला आणि संगीतावरील खूप पुस्तके होती. पाश्चात्य अभिजात संगीताच्या तबकड्यांचाही त्यांचेकडे संग्रहच होता. त्यांना चित्रकला आणि रेखाकलेत रुची व गतीही होती. शाळेत असतांना विख्यात पारशी कलाकार जहांगीर लालकाका ह्यांचेकडे ते चित्रकलेचे धडे गिरवत असत. ’बॉम्बे आर्ट सोसायटीच्या’ अनेक वार्षिकोत्सवांतून त्यांनी कलेकरताची पारितोषिके प्राप्त केली होती.
.
होमी भाभा उत्तम रेखाचित्रे काढत असत. आम्ही आमच्या उमेदवारीच्या काळात ज्या प्रशिक्षणशाळेच्या वसतीगृहात राहत होतो, त्याच्या चौदाव्या मजल्यावरील उपाहारगृहातील चारही भिंतींवर त्यांच्या रेखाचित्रांच्या चौकटी विद्यमान आहेत. भारतातील उत्तम चित्रकार मक्बूल फिदा हुसेन ह्यांचेही एक उत्तम रेखाचित्र भाभा ह्यांनी काढलेले आहे.
.
होमी भाभा उत्कृष्ट पर्यावरणवादी होते [४]
.
भाभांना झाडे आणि फुले ह्यांबाबत एक विशेषच आकर्षण होते. दिखाऊ वॄक्षारोपण समारोहांपासून ते स्वतःला वेगळेच ठेवत असत. टाटा मूलभूत विज्ञान संस्थेची उभारणी होत असतांना, सुमारे २५ प्रचंड असे वड आणि पिंपळाचे वृक्ष कापावे लागणार होते. ते त्यांनी उचलून इतरत्र लावले होते. ह्याच संस्थेत नेपिअन-सी-रोड वरून उचलून आणलेले दोन वृक्षही आहेत. एक आहे ३० फुटी पांढरा चाफा आणि एक आहे ३५ फुटी बुचाचे झाड. असेच एकदा त्यांनी पेडररोडच्या पदपथावर महापालिकेच्या लोकांना पर्जन्यवृक्ष तोडण्याच्या तयारीत असलेले पाहिले. त्यांना फार दुःख झाले. ट्रॉम्बेला परतताच त्यांनी तो वृक्ष तोडण्यापूर्वीच रु.३०/- देऊन विकत घेतला आणि केनिलवर्थ इमारतीच्या आवारात लावला. ट्रॉम्बेमध्ये अशाचप्रकारे त्यांनी वाचवलेले सुमारे १०० वृक्ष आहेत.
.
मला आठवते. भाभा अणुसंशोधन केंद्रात ’मॉड्युलर लॅबोरेटरी’ नावाची पाऊण किलोमीटर लांबीची लांबलचक इमारत आहे, तिच्या पाठीमागे स्टेट बँकेपाशी पिंपळ आहे, नंतर ओळीनी दहा प्रचंड वटवृक्ष आहेत, शेवटास एक उंबरही आहे. ह्या वटवृक्षातील एक वृक्ष कृष्णवट आहे. असे ऐकून आहे की, हे सारे वृक्ष असेच मरणाच्या दारातून परत आणलेले आहेत. आज त्यांचे वय संस्थेच्या वयाहूनही अधिक आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच संस्था विकास साधत आहे. येथील शास्त्रज्ञांच्या, सर्व भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशा कामगिरीचे, ते मूक साक्षीदार आहेत.
.
होमी भाभा द्रष्टे होते [५]
.
१९४८ साली जेव्हा भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली आणि भाभा त्या आयोगाचे संस्थापक अध्यक्ष झाले तेव्हा भाभा म्हणाले होते की, “पुढील दोन दशकांत अणुऊर्जा देशातील अर्थव्यवस्थेत आणि उद्योगांत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. औद्योगिकदृष्ट्या आधीच विकसित असलेल्या राष्ट्रांहून भारतास मागे राहायचे नसेल तर अणुऊर्जेचा विकास अधिक ऊर्जस्वलतेने करावा लागेल.”
.
तसा तो विकास आपण घडवलाही. त्यामुळेच १९७४ व १९९८ च्या अणुचाचण्या यशस्वी करून आपण अण्वस्त्रसज्ज देश होऊ शकलो. ह्याबाबतीत सर्व जगात आपण घेतलेली आघाडी हा त्यांच्या दूरदृष्टीचाच परिपाक आहे. अणुऊर्जा आणि अवकाश संशोधन ह्या दोन्हींतही भारताने आज जी नेत्रदीपक प्रगती केलेली ते त्यांच्या दूरदृष्टीचेच फलित आहे.
.
होमी भाभा देशभक्त होते
.
होमी भाभांनी विश्वकिरणांच्या वर्षावांवर मोलाचे संशोधन केले होते. ते ब्रिटनमध्ये राहूही शकले असते. तिथे त्यांना सन्मानही मिळाला असता. मात्र, पुरेसा सन्मान आणि आर्थिक पाठबळ मिळत असेल तर देशातच राहून, इतर सुदैवी देशांत असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या तुल्यबळ संस्था, आपल्या देशातच उभ्या करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांचे मत होते[६]. टाटा मूलभूत विज्ञान संस्था, ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे (ए.ई.ई.टी., भाभांच्या अपघाती मृत्यूनंतर ह्याच संस्थेचे नामकरण भाभा अणुसंशोधन केंद्र असे करण्यात आले) आणि त्याची प्रशिक्षण शाळा, ह्या भारताच्या संशोधनक्षेत्रावर चिरकाल राहणारा ठसा उमटविणार्‍या संस्था त्यांनीच स्थापन केल्या. १९५४ साली पद्मभूषण हा नागरी सन्मान देऊन त्यांच्या ह्या कार्याचा गौरवही करण्यात आला.
.
अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारतास भाभांनी आजवर अग्रेसर ठेवले आहे. शिक्षणाकरता परदेशात गेल्यावर, परदेशातच न राहता जाणीवपूर्वक देशात परतून, देशाकरता एवढी देदिप्यमान कामगिरी करणारे होमी भाभा, कोणत्याही मोजपट्टीने निस्सीम देशभक्तच म्हणावे लागतील!
.
थोर स्फूर्तीदात्याची अनपेक्षित अखेर
.
१९६६ मध्ये भाभा असे म्हणाले होते की [७], भारत येत्या १८ महिन्यांतच अणुस्फोटके तयार करेल. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी, ते २४ जानेवारी १९६६ रोजी सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीच्या (इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सीच्या) शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीसाठी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे, एअर इंडियाच्या १०१ क्रमांकाच्या मुंबई ते न्यूयॉर्क उड्डाणातून, कांचनगंगा नावाच्या बोईंग-७०७ विमानाने जात होते. तेव्हा आल्प्स पर्वतातील माँट ब्लांक शिखरानजीक, त्या विमानाचा चालक आणि जिनेव्हा विमानतळ ह्यांच्यात विमानाच्या स्थितीबाबत गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे अपघात होऊन विमानातील सर्वच्या सर्व ११७ लोक मारले गेले. दुर्दैवाने त्यातच होमी भाभांचा मृत्यू झाला.
.
आज होमी भाभांना ओळखत नाही असा भारतीय विरळाच असेल. उण्यापुर्‍या ५७ वर्षाच्या आयुष्यात देशास अण्वस्त्रसज्जतेप्रत नेणार्‍या अनेक संघटना व व्यक्ती उभ्या करणार्‍या ह्या द्रष्ट्या नेत्यास सादर प्रणाम.
.
थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा ।
आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा ॥
.


[१] होमी जहांगीर भाभा http://nvgole.blogspot.com/2011/10/blog-post_30.html
.
[२] द व्हिजन अँड द व्हिजनरी https://www.icts. http://res.in/…/files/The-Vision-and-the-Visionary.pdf
.
[३] जहांगिर निकल्सन आर्ट फौंडेशनचे संकेतस्थळ http://jnaf.org/artist/homi-bhabha/
.
[४] होमी भाभा- फादर ऑफ न्यूक्लिअर सायन्स इन इंडिया, आर.पी.कुलकर्णी अँड व्ही.शर्मा, बॉम्बे पॉप्युलर प्रकाशन, १९६९.
.
[५] सागा ऑफ ऍटोमिक एनर्जी इन इंडिया कॉमेमोरेटिव्ह व्हॉल्यूम्स ह्या संग्रहातील भाभा ह्यांचे उद्धृत. हे संग्रह भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
.
[६] होर्मसजी जहांगीर भाभा https://anuvad-ranjan.blogspot.com/2012/04/blog-post_13.html
.
[७] घातपात की अपघात? नीरा मुजूमदार, द प्रिंट, २४ जानेवारी २०१८ https://theprint.in/…/the-theories-india-nuclear…/31233/

*****

डॉ.होमी भाभा यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने काढलेली नाणी

तीन पायर्‍यांचा अणुकार्यक्रम

होमी जहांगीर भाभा
(जन्मः ३० ऑक्टो.१९०९, मुंबई, मृत्यूः २४ जाने.१९६६, माऊंट ब्लांक)
होमी जहांगीर भाभा हे बहुधा भारतीय आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. मात्र, भारताच्या विकासातील त्यांची भूमिका अणुऊर्जेच्या क्षेत्राबाहेरही दूरवर पसरलेली आहे. त्यांनी दोन महान संशोधन संस्था स्थापन केल्या. त्या म्हणजे ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ आणि ‘ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे’, जिचे भाभांच्या मृत्यूनंतर ‘भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर’ असे पुनर्नामांकन करण्यात आले. भारतात विजकविद्या विकसित करण्यात त्यांनी कळीची भूमिका बजावलेली होती. भाभा उत्कृष्ट वैज्ञानिक आणि कुशाग्र अभियंते होते.
धन-विजकांच्या, विजकांमुळे होणार्‍या विखुरणांच्या संभाव्यतेकरता त्यांनी सुयोग्य अभिव्यक्ती शोधून काढली होती. अशा विखुरण्यास नंतर भाभा-विखुरणे (भाभा-स्कॅटरिंग) असे नाव पडले.
कार्ल डेव्हिड अँडरसन (१९०५-९१) यांनी, विश्वकिरणांत आढळून येणारा आणि विजक व धनक यांचेदरम्यानचे वस्तुमान असणारा एक नवा कण शोधून काढला होता, तेव्हा त्यांनी त्याला ’मेसॉटॉन’ असे नाव दिले होते. पुढे, बहुधा मिलिकन यांच्या सल्ल्यावरून, त्यांनी ते ’मेसॉट्रॉन’ असे बदलवले. प्राथमिक कणांच्या ह्या वर्गाकरता वापरले जाणारे ’मेसॉन’ हे नाव मग भाभा यांनीच सुचवलेले होते.
केंब्रिज विद्यापीठात होमी भाभांनी प्रथम यंत्र अभियांत्रिकीची ट्रायपॉस पास केली. नंतर गणिताचीही. अर्नेस्ट रुदरफर्ड, पॉल डिरॅक, जेम्स चॅडविक ह्यांसारखे सर्वोच्च शास्त्रज्ञ तिथे कार्यरत होते. सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील पुंज यांत्रिकी क्षेत्र झपाट्याने विकसित होत होते. प्रायोगिक भौतिकशास्त्रात पदार्थांच्या अणुकेंद्रकीय आणि आण्विक संरचनेबाबत शोध लावले जात होते. आण्विक भौतिकशास्त्रात क्रांतिकारक संशोधन होत असलेला तो काळ होता. भाभांनी आपले नाव केंब्रिज येथे पी.एच.डी.करता नोंदवले. धनक (प्रोटॉन), वीजक (इलेक्ट्रॉन) आणि इतर कणांच्या विश्वकिरण वर्षावांबाबतच्या त्यांच्या संशोधनामुळे त्यांना १९३३ मध्ये डॉक्टरेट मिळाली.
डॉ.भाभा भारताचा दीर्घकालीन अणुकार्यक्रम तयार करत होते, तेव्हा त्यांना तो सशक्त पायावर उभा करायचा होता. स्वावलंबी होईल अशा प्रकारे, इतर देशांवर फारसे अवलंबून न राहता, स्वबळावर तयार करायचा होता. लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे देशात असलेली आण्विक पदार्थांची उपलब्धता.
असे अनुमान होते की युरेनियम भारतातल्या खाणींतून उपलब्ध होईल, मात्र त्याचे परिमाण मर्यादितच असेल. जर सर्व अणुकार्यक्रम पूर्णपणे युरेनियमवर आधारलेला ठेवला असता तर, तो अनेक दशके चालला असता. पण त्यानंतर भारतास युरेनियम आयात करावे लागले असते. दुसर्‍या बाजूस, थोरियम, ज्यापासून आपण युरेनियम इंधनाचे दुसरे समस्थानिक निर्माण करू शकतो, तो आपल्या देशात विपुलतेने उपलब्ध आहे. म्हणून भारताच्या अणुकार्यक्रमाने, वीजनिर्मितीकरता थोरियम आधारित तंत्रज्ञानाकडे वाट चालली पाहिजे.
थोरियम आधारित तंत्रज्ञानाचा विकास आणि विद्युतनिर्मितीकरता त्याचा वापर, हे भाभांनी अभिकल्पित केलेल्या भारताच्या अणुकार्यक्रमामागचे पहिले मार्गदर्शक तत्त्व होते.
एकदा इंधन पदार्थांचे अणू, अणुभट्टीत तुकड्यांत विभाजित झाले की, अनेक किरणोत्सारी मूलद्रव्ये जन्म पावतात. किरणोत्सारी मूलद्रव्ये आण्विक प्रारणे दीर्घकाळ उत्सर्जित करतच राहतात. आण्विक प्रारण सजीवांकरता खूपच हानीकारक असते. जळीत इंधनातील बव्हंशी मूलद्रव्ये अनेक महिन्यांनंतर लक्षणीयरीत्या किरणोत्सारी राहत नाहीत तरी, काही मूलद्रव्ये एक लक्ष वर्षे पर्यंत प्रारणे उत्सर्जित करतच राहतात. जळित इंधनातील आण्विक कचर्‍याचे परिमाण किमान पातळीवर आणणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अणुभट्टीतून बाहेर पडणार्‍या जळित इंधनाचे पुनर्प्रक्रियण आणि पुनर्चक्रण करणे आवश्यक ठरते. त्याचा एक मोठा लाभही आहे. त्यात प्लुटोनियमच्या स्वरूपात कृत्रिम इंधनही मिळते, जे दुसर्‍या प्रकारच्या अणुभट्टीत वापरले जाऊ शकते.
अशा प्रकारचे इंधनचक्र, ज्यात इंधनाचे कमाल संभाव्य मर्यादेपर्यंत पुनर्चक्रण केले जाते, त्यास ’बंद इंधनचक्र’ म्हटले जाते. ’बंद इंधनचक्र’ अवलंबणे हे, भाभांनी अभिकल्पित केलेल्या भारताच्या अणुकार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक तत्त्व होते.
ह्या दोन्ही मार्गदर्शक तत्त्वांकरता आवश्यक असलेली, थोरियम आधारित अणुतंत्रज्ञान आणि जळित इंधनाच्या पुनर्प्रक्रियणाचे तंत्रज्ञान ही तंत्रे आपण आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. आण्विक विज्ञान व तंत्रज्ञान तज्ञ देशातच उपलब्ध असण्याचीही आवश्यकता आहे. आण्विक तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याकरता स्वतःची मानवी संसाधने विकसित करणे, हे भाभांनी अभिकल्पित केलेल्या भारताच्या अणुकार्यक्रमाचे तिसरे मार्गदर्शक तत्त्व आहे.
ह्या तीन मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असा, तीन पायर्‍यांचा, अणुकार्यक्रम भाभांनी अभिकल्पित केलेला होता. पहिल्या पायरीत, भारतात नैसर्गिक युरेनियम इंधनावर आधारित अणुभट्ट्या असतील. दुसर्‍या पायरीत, भारतात प्लुटोनियम इंधनावर आधारित अणुभट्ट्या असतील. हे प्लुटोनियम पहिल्या व दुसर्‍या पायर्‍यांतील अणुभट्ट्यांतच निर्माण केले जाईल. तिसर्‍या पायरीत, भारतात युरेनियम-२३३ चा इंधन म्हणून वापर करणार्‍या अणुभट्ट्या असतील. हे युरेनियम-२३३ थोरियमपासून दुसर्‍या व तिसर्‍या पायर्‍यांतील अणुभट्ट्यांतच निर्माण केले जाईल.

. . . . . . . श्री. नरेंद्र गोळे, सेवानिवृत्त ज्येष्ठ अभियंता, भाभा परमाणु अनुसंधान केंद्र

. . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . . . . . . .

वॉट्सअॅपवरून मिळालेला दुसरा लेख :


💥🌸आमचा अन्नदाता🌸💥

होमी जहांगीर भाभा

भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ

जन्मदिन – ऑक्टोबर ३०, इ.स. १९०९

होमी भाभा (इ.स. १९०९ – इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.
जीवन
भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.
इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.
DR HOMI JEHANGIR BHABHA
The physicist, institution builder, musician, painter and artist. Initiator of the atomic energy and space programmes in India. Single author paper in Nature at the age of twenty five, Director of Atomic Energy Establishment Trombay (AEET) at the age of thirtynine, Governor General, International Atomic Energy (IAEA) at the age of forty eight, credited to select Vienna as the Head Quarters of IAEA through his casting vote thanks to his love for music, Mozart and Beethoven, untimely death at the age of 56 in Air India plane crash over Mont Blanc, France. Proud to be part of Bhabha family and remembering his 111 th birthday today, October 30, 2019.
Dr Homi Bhabha

लोकमान्य टिळकांचे अग्रलेख आणि देहावसान

लोकमान्य टिळकांचे देहावसान होऊन या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्याने त्या काळरात्रीची आठवण जागवणारे दोन हृदयस्पर्शी लेख माझ्या वाचनात आले. ते या ठिकाणी संग्रहित केले आहेत. यातला पहिला लेख आचार्य अत्रे यांनी खूप पूर्वी लिहिला होता. दुसरा लेख जुन्या काळातल्या माहितीस्रोतांच्या आधाराने अलीकडे लिहिला गेला आहे.

नवी भर दि.०७-०७-२०२१ : सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? या टिळकांनी लिहिलेल्या ज्या अग्रलेखासाठी त्यांना सहा वर्षे मंडाले इथे तुरुंगवासात ठेवले गेले, तो मला उपलब्ध झाला आणि या ठिकाणी दिला आहे. टिळकांनी गणेशोत्सवानिमित्य लिहिलेल्या लेखांचा सारांश खाली दिलेल्या दुव्यांवर मिळेल.

टिळक आणि गणेशोत्सव : http://anandghan.blogspot.com/2009/08/blog-post_25.html

टिळक आणि गणेशोत्सव -२ : http://anandghan.blogspot.com/2009/08/blog-post_27.html

******

आचार्य अत्र्यांनी लोकमान्य गेले त्या दिवसाच्या स्मृती जागवणारा लेख लिहिला होता. तो दुर्वा आणि फुले या लेखसंग्रहात आहे. ……. सौजन्य प्रद्युम्न परांजपे… वॉट्सअॅपवरून साभार

. . . . . . .

आज एक ऑगस्ट, एक ऑगस्ट ही तारीख कानावर आली किंवा या तारखेची आठवण झाली म्हणजे एकच महान विभूती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते, आणि ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची. वीस सालच्या एक ऑगस्टला रात्रौ बारा वाजून चोवीस मिनिटांनी मुंबई येथे सरदारगृहात लोकमान्य टिळक यांचे अवसान झाले. त्या गोष्टीला आज सत्तावीस वर्षे झाली.टिळकांच्या मरणाचे आणि त्यांच्या विराट स्मशानयात्रेचे ते हृदयभेदक दृश्य अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे. जणू काही कालच ती गोष्ट घडली असे मला वाटते. मी त्या वेळी मुंबईत होतो. “माधवाश्रमा” शेजारच्या एका इमारतीत राहत होतो. म्हणून त्या अलौकिक राष्ट्रपुरुषाचे अंत्यदर्शन घेण्याचे महद् भाग्य त्या वेळी मला लाभले. आज सकाळपासून सत्तावीस वर्षांपूर्वीच्या त्या शोकदायक दिवसाची आठवण मला होते आहे. त्याखेरीज दुसरा कोणताही विचार आज माझ्या मनामध्ये नाही. किंवा दुसरा कोठलाही विषय सुचण्याच्या मनःस्थितीत मी या वेळी नाही. म्हणून वाचकहो, त्या अविस्मरणीय दिवसाबद्दलच मी आज तुमच्याशी बोलावयाचे ठरविले आहे. टिळक त्या वेळी चौसष्ट वर्षांचे होते. सहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर ते जरी थकल्यासारखे दिसत होते, तरी त्यांची प्रकृती तशी काही वाईट नव्हती. त्यांचा आवेश आणि अवसान पूर्वीपेक्षा जास्त प्रखर झालेले होते.

त्यांना अकस्मात मध्येच मरण येईल अशी त्या वेळी तरी कोणाचीच कल्पना नव्हती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना थोडासा हिवताप येऊ लागला. एवढ्यात मुंबई हायकोर्टात काहीतरी कायद्याचे काम निघाले म्हणून अंगात ताप असतानाही ते तसेच मुंबईला आले आणि सरदारगृहात उतरले. एके दिवशी सायंकाळी दिवाण चमनलाल यांनी आपल्या उघड्या मोटारीत त्यांना लांबवर समुद्रकाठी हिंडावयाला नेले. वास्तविक अंगात ताप असताना उघड्या वाऱ्यात टिळकांनी फिरावयास जायला नको होते. त्या संध्याकाळी एकच लहानशी चूक त्यांच्या हातून घडली. पण ती शेवटी प्राणघातक ठरली. हिंडून परत सरदारगृहात आल्यानंतर त्याच रात्री टिळकांच्या तापाने एकदम उचल घेतली. आणि त्या रात्री ते जे अंथरुणावर एकदा पडले ते पुन्हा अखेरपर्यंत उठले नाहीत.

टिळक आजारी पडल्याची बातमी आरंभी फारशी कोणाला कळली नाही; पण त्यांच्या साध्या हिवतापाचे पर्यवसान जेव्हा निमोनियात झाले तेव्हा त्यांच्या आजाराची बातमी वणव्यासारखी साऱ्या शहरात पसरली. टिळकांचा हा शेवटचा आजार आठ-दहा दिवस टिकला. मुंबईमधील उत्तमोत्तम डॉक्टर मंडळी या काळात एकसारखी त्यांच्या बिछान्याजवळ बसून होती. वैद्यकीय उपायांची त्यांनी अगदी पराकाष्ठा करून सोडली, पण आठ-दहा दिवसात टिळकांचा हिवताप एवढासासुद्धा कमी झाला नाही. टिळकांचे हे दुखणे अखेरचे ठरणार आहे असे स्वप्नातसुद्धा कोणाला त्या वेळी वाटले नाही. चार-दोन दिवसांत त्यांचा ताप उतरेल. मग हवापालट करण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी ते कोठेतरी चांगल्या हवेच्या ठिकाणी जातील अशीच सर्वांची कल्पना होती. पण एक-एक दिवस जसा उलटू लागला आणि टिळकांचा ताप कमी होण्याचे लक्षण जसे दिसेनासे झाले तेव्हा मात्र लोकांचे धाबे दणाणून गेले. तरी देखील ऐन वेळी काहीतरी अद्भूत चमत्कार घडून टिळक त्या दुखण्यातून सुरक्षितपणे निभावून जातील, असा जनतेला मनामधून विश्वास वाटत होता. कारण टिळकांचे सारे जीवनच अद्भुतरम्य होते. अनेक चमत्कारांनी ते भरून गेलेले होते. टिळकांच्या हातून अद्याप कितीतरी लोकोत्तर पराक्रम घडतील अशी लोकांना आशा वाटत होती. टिळकांच्या आयुष्याचा शेवट बघण्याची कोणाच्याही मनाची तयारी नव्हती. पण जनतेची ही सारी स्वप्ने धुळीला मिळवून टाकण्याचा दैवाने मात्र जणू काही निर्धारच करून ठेवलेला होता.

त्या वेळची प्रसिद्धीकरणाची साधने आजच्या मानाने पुष्कळच अपुरी होती. तथापि टिळकांच्या प्रकृतीसंबंधीची बातमी घटकेघटकेला जनतेला कळविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ‘संदेश‘ चे धुरंधर संपादक अच्युतराव कोल्हटकर यांचे आणि टिळकांचे संबंध शेवटी शेवटी फारच बिनसलेले होते. टिळकांवर अतिशय कडक टीका करून अच्युतरावांनी टिळकभक्त जनतेचा फारच मोठा रोष आपणांवर ओढवून घेतला होता. तथापि टिळकांच्या या शेवटच्या आजारात त्यांच्या प्रकृतीसंबंधीची ताजी बातमी लोकांना कळविण्यासाठी अच्युतरावांनी आपल्या ‘संदेश‘ च्या दोन-दोन आवृत्त्या काढून आपल्या उज्ज्वल टिळकप्रेमाची जनतेला खातरजमा करून दिली. टिळकांच्या प्रकृतीच्या समाचारासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी लोकांची महाराष्ट्रातून एकसारखी मुंबईकडे रीघ लागली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत साऱ्या हिंदुस्थानचे लक्ष मुंबई शहरातल्या सरदारगृहावर केंद्रित झाले होते. शेवटी शेवटी मुंबईकर जनतेच्या झुंडीच्या झुंडी सरदारगृहासमोर उभ्या राहून चिंतातूर दृष्टीने तासनतास सरदारगृहाच्या तिसऱ्या मजल्याकडे बघू लागल्या. सरदारगृहातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक माणसाचा चेहरा कसा दिसतो त्यावरून लोकमान्य टिळकांच्या प्रकृतीचा अंदाज बांधण्याचा बाहेर उभ्या असलेल्या लोकांना नादच लागून राहिलेला होता. वास्तविक टिळकांचा हा आजार एवढा काही भयंकर नव्हता. त्यांच्या अंगात शक्ती नव्हती म्हणूनच तो घातक ठरला. तापाशी झगडण्याचे त्राणच त्यांच्या देहात उरले नव्हते. त्यामुळे हळूहळू शक्तिपात होत गेला. आणि शेवटच्या तीन-चार दिवसांत त्यांना परिचयाची माणसेही ओळखू येईनाशी झाली. एकतीस जुलै रोजी शनिवार होता. त्या दिवशी संध्याकाळपासून टिळकांच्या प्रकृतीची डॉक्टरांनी आशा सोडली. ही बातमी शहरात एकदम कशी पसरली काही कळत नाही. पण रात्रौ दहा वाजेपर्यंत अक्षरशः लक्षावधी माणसे सरदारगृहासमोरच्या विस्तीर्ण रस्त्यावर जमा झाली. वरून पाऊस एकसारखा कोसळत होता. भोवताली चहूकडे भयाण अंधार पसरला होता. त्या पावसात आणि भयाण अंधारात व्याकूळ चेहरा करून आणि व्यथित मनाने मुंबईकर जनता तासनतास ताटकळत उभी होती. दहा वाजले, अकरा वाजले, बाराही वाजून गेले. काळोख एकसारखा वाढत होता. पाऊस जास्त जास्त कोसळत होता. रस्त्यावरची गर्दी अधिकाधिक पसरत होती. तथापि एवढी गर्दी असूनही एवढासासुद्धा आवाज त्या गर्दीमधून निघत नव्हता.

आजारी माणसाच्या बिछान्याभोवती त्यांची आप्तमंडळी जशी शांतपणे बसलेली असतात तशाच जपणुकीच्या भावनेने सरदारगृहाभोवतीच्या काळोखात माणसे उभी होती. सरदारगृहाच्या तिस-या मजल्यावर जरा काही हालचाल झाली की विजेचे बटन दाबावे तसे हजारो चिंतातूर चेहरे श्वास रोखून एकदम वर बघू लागत. त्या गर्दीत एका झाडाखाली मी रात्री नऊ वाजल्यापासून उभा होतो.

माझ्याजवळ छत्री नव्हती. माझ्या अंगात एक गरम कोट होता. आत सदरा घालायचेही मी विसरलो होतो. माझे डोके आणि कोट भिजून चिंब झाला होता. माझ्या पलीकडे एक वृद्ध दाढीवाला हिंदू हातात जपमाळ घेऊन टिळकांच्या प्रकृतीला आराम पडो असा एकसारखा जप करीत उभा होता. साडेबारा वाजले. जुना दिवस संपून नव्या दिवसाला सुरुवात झाली. तेव्हा आता कदाचित संकट टळले असेल असा कोणाच्या मनात विचार येतो तोच एक मनुष्य वरून खाली येत असल्याचे दिसले. सरदारगृहासमोर पोर्चमध्ये थोडीशी काहोतरी हालचाल झाली आणि गेले' हा एकच शब्द अस्पष्टपणे कोणीतरी कुजबुजले. पण कोणीतरी कोणाच्या तरी कानात भीत भीत कुजबुजलेला तो एकच अशुभ शब्द एकाच वेळी लक्षावधी लोकांना ऐकू आला. त्याबरोबरगेले, गेले’ असे त्या शब्दाचे शेकडो पडसाद रुद्ध स्वरामध्ये चहूकडून आले. हृदयात कसलातरी जबर घाव बसावा असे प्रत्येकाला वाटले. पाय जागच्या जागी खिळल्यासारखे झाले आणि सर्वांच्या डोळ्यापुढे अंधारी आली. बाकीचे सारे मुंबई शहर त्या वेळी झोपलेले होते. पण तास-दीड तासाच्या आतच टिळकांच्या मृत्यूची दुःखकारक वार्ता ऐकून सारे शहर अंथरुणातून उठले. पहाटे तीन वाजल्यापासून तो सकाळी सात वाजेपर्यंत सारी मुंबईकर जनता आपआपल्या घरात जागी होऊन अश्रू ढाळीत होती. बाहेर आभाळ रडत होते. वारा कण्हत होता आणि घराघरात जनता स्फुंदत होती.

मी सरदारगृहासमोर सकाळपर्यंत तसाच बसून राहिलो होतो. वर जवळ जाऊन टिळकांचे शेवटचे दर्शन घेण्याची माझी इच्छा होती. साडेसहा-सात वाजण्याच्या सुमारास टिळकांचा मृतदेह सरदारगृहाच्या गॅलरीत आणून ठेवण्यात आला. त्यांच्या अंगावर शालजोडी घातलेली होती. कपाळाला भस्म लावलेले होते आणि गळ्यात फुलांचे हार घातलेले होते. या सुमारास सरदारगृहाच्या जिन्यावर गर्दी कमी होती. म्हणून मी मनाचा निश्चय करून चटकन वाट काढीत वर गेलो आणि टिळकांच्या शवासमोर जाऊन उभा राहिलो. डोळे शांतपणे मिटून चिरनिद्रित झालेल्या लोकमान्यांचा तो निश्चल चेहरा बघून माझ्या हृदयात विलक्षण कालवाकालव झाली. पंधरा सालच्या फेब्रुवारी महिन्यात नामदार गोखले यांचे शव मी जवळून पाहिले होते. गोखल्यांचा चेहरा मरणानंतरही अत्यंत तेजस्वी आणि सुंदर दिसत होता पण टिळकांचा मृत चेहरा निस्तेज आणि जर्जर दिसत होता. त्यांच्या श्यामल वर्णाचे तेज निघून गेले होते. ‘गीतारहस्या’ च्या प्रस्तावनेच्या आरंभी त्यांनी उल्लेखिलेल्या कारुण्यपूर्ण श्लोकाची मला आठवण झाली. ‘कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली |पुरस्सरगदांसवे झगडता तनू भागली.’ होय, व्याधीशी झगडता झगडता लोकमान्यांची तनू खरोखरच थकूनभागून गेली होती. अधिक वेळ त्या ठिकाणी उभे राहावयास अवकाश नव्हता. त्यांच्या चरणाला स्पर्श करून मी चटकन तेथून बाहेर पडलो. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टिळकांच्या विराट स्मशानयात्रेला सुरुवात झाली.

टिळकांचे मृत शरीर कदाचित पुण्यास नेले जाईल अशा त-हेची बातमी त्या दिवशी सकाळी पसरली होती. सकाळपासून टिळकांच्या शवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सरदारगृहासमोर अलोट गर्दी जमू लागली. शहरातली सारी दुकाने आणि कारखाने आपोआप बंद पडले. टिळकांचा अंत्यविधी चौपाटीच्या विस्तीर्ण वाळवंटात होण्याचे ठरलेले ऐकून मुंबईकर जनतेला बरे वाटले. मुंबईच्या इतिहासात चौपाटीच्या वाळवंटात तो पहिलाच अग्निसंस्कार होता. आदल्या रात्रीपासून पाऊस जो सुरू झालेला होता तो संध्याकाळ होईपर्यंत थोडासुद्धा कमी झाला नाही. सरदारगृहापासून दुपारी दोन वाजता निघालेली स्मशानयात्रा संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास चौपाटीजवळ येऊन पोचली. यात्रा ज्या ज्या रस्त्यांनी गेली ते ते रस्ते गर्दीने अगदी तुडुंब भरून गेले. त्या जनसमुहाला एक- एक पाऊल पुढे टाकायला दहा-दहा, पंधरा-पंधरा मिनिटे वेळ लागत होता. एका उच्च आसनावर सर्वांना नीट दिसेल अशा त-हेने टिळकांचे शव ठेवले होते आणि त्यावर फुलांची एकसारखी वृष्टी होत होती. टिळक हे ‘लोकमान्य’ कसे हे त्या दिवशी सर्वांना दिसून आले. लक्षावधी लोकांच्या मिरवणुकीच्या अग्रभागी उच्चासनावर अधिष्ठित झालेली टिळकांची धीरगंभीर मूर्ती लांबून पाहणारास असे वाटले असते की जनतेच्या हृदयसिंहासनावर हा जणू काही कोणी बादशहाच विराजमान होऊन चाललेला आहे. चौपाटीच्या वाळवंटावर स्मशानयात्रा येताच जनसमूहाने फारच विशाल आणि अमर्याद स्वरूप धारण केले. जनसागरातल्या आणि जलसागरातल्या लाटा उसळण्यास सुरुवात होऊन त्या दोन सागरांची जणू काही परस्परांशी स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर प्रत्यक्ष पाहण्यासारखे असे काहीच राहिले नाही. लोक अंधारात जागच्या जागी निश्चलपणे बसून राहिले होते. त्यानंतर एक गडद धुम्ररेषा वाळवंटामधून उठली आणि त्यामागून काही ठिणग्या आणि ज्वाळा वर उसळल्या. पंचवीस वर्षे ज्या स्वातंत्र्यसिंहाने आपल्या गगनभेदी गर्जनेने कोट्यवधी हिंदी जनता जागी केली होती त्याने महासागराला आणि जनसागराला साक्षी ठेऊन आपल्या आवडत्या मातृभूमीचा अखेर निरोप घेतला . सुन्न मस्तकांनी लक्षावधी लोक मुकाट्याने उठले आणि दुःखाचे निश्वास टाकीत घरोघर चालते झाले. त्याच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईत एका ठिकाणी महात्मा गांधीनी आपल्या असहकाराची घोषणा केली. देशाच्या राजकीय रंगभूमीवरून लोकमान्यांनी ज्या क्षणी प्रयाण केले त्याच क्षणी गांधीजीनी त्या रंगभूमीवर दुस-या बाजूने प्रवेश केला. जनतेच्या स्वातंत्र्याची मशाल टिळकांनी खाली पडू दिली नाही. जाता जाता ती त्यांनी गांधीजींच्या हाती देऊन टाकली. हिंदी स्वातंत्र्याच्या इतिहासात, एक ऑगस्ट हा दिवस अविस्मरणीय आहे. टिळकयुगाचा आणि गांधीयुगाचा तो एक महान संधिकाल आहे. तो संधिकाल पाहण्याचे भाग्य माझ्याप्रमाणे ज्यांना लाभले ते धन्य होत.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

************

टिळक गेले त्या वेळची गोष्ट…

“हजारो लोक मुंबईच्या सरदारगृहापुढे रस्त्यावर उभे होते. अखेर मध्यरात्र उलटली. १२ वाजून गेले. १ ऑगस्ट १९२०चा दिवस सुरु झाला आणि थोड्या वेळानेच लोकमान्यांचे देहावसान झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली. त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. त्याचे स्मरण झाले की, अजूनही अंगावर कंप उठतो. काही लोक तर धाय मोकलून रडले. ज्यांचे डोळे पाण्याने भरुन आले नाहीत, असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला नसता. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली, मग रात्री झोप कोणाला येणार? लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबईनगरी त्या रात्री अक्षरशः ढळाढळा रडली, असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये.” टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेंचे! ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते. टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली. त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या ‘भावबंधन’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. बाराशे रुपयांची तिकीट विक्री होऊन प्रयोग हाऊसफुल्ल झालेला. चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली. मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोल्हटकर थांबले. तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली. खेळ आपसूकच बंद झाला. ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे, त्यांना ते मिळतील, अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीटबारीवर जाऊन थांबला. पण, पैसे मागायला कुणी येईचना, सुमारे हजाराचा तो रसिकवर्ग एकाएकी उठला सरदारगृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला. टाचणी पडली तरी भलामोठा आवाज यावा, असा सन्नाटा थिएटरभर पसरला होता. या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात, “पायांचे आवाजसुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले. जमिनीला कान लावून ऐकणाऱ्यालासुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे!” रडण्याचे कढ हळूहळू वाढतच चालले होते. लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदारगृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती. शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला, हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित होते. ते सांगतात, “प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येई. टिळकांना बघितल्यावर त्याला भडभडून येत असे. एक माणूस म्हणाला, एका माणसाने त्या शवापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला. एक म्हातारा मनुष्य म्हणाला, बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे?” असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडूच लागला.

“श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू, राजारामाचे अकाली मरण, पानिपतचा रणसंग्राम, नारायणराव पेशव्यांचा वध, सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास, या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती, त्यांच्याहून अणूमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून, तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे,” अशा शब्दांत या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकरांनी! टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनेच हादरली. रडू आवरत कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले. नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या. सरकारला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली. टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे, अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती; इच्छा कसली त्यांचा हट्टच होता, नव्हे नव्हे हक्कही होता त्यांचा. कारण, पुणे ही टिळकांची कर्मभूमी! पण, मुंबईकरही हट्टाला पेटले होते. त्यांचेही म्हणणे बरोबरच होते, टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे ‘लोकमान्य’ झालेले होते. तात्यासाहेब केळकर निघाले. पुण्याला आले. त्यांना ‘केसरी’चा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती. याच ‘केसरी’च्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आले होते, लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील. आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे माहिती होतं की, पुढच्या ‘केसरी’च्या अंकात टिळकांच्या मृत्यूची काळीज करपून सोडणारी बातमी आपल्याला वाचावी लागणार म्हणून! ‘केसरी’चा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला. ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच्या कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही. टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला.

आणि इकडे मुंबईत, अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाणयात्रा दुपारी दीड वाजता सुरु झाली. दोन लाखांच्यावर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती. स्त्रिया, पुरुष, म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, हरेक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता. आकाशाची शिवण उसवावी, आभाळ फाटावे असा पाऊस त्यादिवशी पडत होता. टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये, अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी बहुतेक. त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघगर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाणयात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती, ती गर्जना होती, ‘टिळक महाराज की जय!’ लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते. टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते. घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती. माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते. खापर्डे, गांधी हेही लोकांच्या जथ्थ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते. या महानिर्वाणयात्रेत ३५-४० वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता. लोकमान्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलकावे खात होती. तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय, अशी अवस्था होती. हे पाहून तिचा मुलगा म्हणाला, “आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”

धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे लोक ओलेचिंब झाले होते. रस्त्यावर चिखल झाला होता. माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळीठिक्कर पडली होती. मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती. त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले, तोच त्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली. साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले. लोकमान्यांना अग्निडाग दिला आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला. लोकमान्य गेले, आता आपण तरी जगून काय करायचे, असे म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली. तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला. त्याला दवाखान्यात नेले, पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला. संध्याकाळचे ७ वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती. टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य ‘याचि डोळा’ अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात, “आम्ही त्या रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो. अखेर शेवटचा घाला झाला. मन सुन्न झाले. हृदयात काय होत होते, हे सांगताही येईना. पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूंच्या धारा कोणत्या, हे समजेना. अग्निसंस्कार झाला, पण चौपाटीवरून पायच निघेना.”

जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली. मृत्युलेख लिहिले, पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम. खरे तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते, तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते. त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता. या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते, “लोकमान्य, तुम्हाला आता कुठे पाहू? तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू? तुम्हाला कुठे शोधू? तुम्हाला कुठे धुंडाळू? आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता. आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता. आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेले होते. आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते. लोकमान्य! आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल? कुठे दिसाल? तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे. आमच्या प्राणांना क्लेष पडत आहेत. काट्याच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे, त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत. लोकमान्य, आमचे प्राण तुमच्या स्वाधीन! आमचे मन तुमच्या स्वाधीन! आमचे जीवन तुमच्या स्वाधीन! लोकमान्य, आम्ही, तुमचे तुम्ही आमचे आहात! बोला, काय वाटेल ते सांगा, वाटेल ती आज्ञा करा, वाटेल तो हुकूम फर्मावा, आणि बोला, तुम्हाला कुठे शोधू? लोकमान्य, आम्ही तुम्हाला कुठे शोधू? आमचा वीर, हा आमचा हिरो, हा आमचा प्राण, हा आमचा लोकमान्य! इतका सर्वव्यापी होता की, त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर, सजीव आणि अजीव, सचेतन आणि अचेतन, इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव, देव, किन्नर, विभूती या महाराष्ट्रातील साधू, संत, योगी, तपस्वी या महाराष्ट्रातील जल, स्थल, पाषाण, तरु, लता, उद्यान, पुरेपूर व्यापून टाकले होते. आमच्या लोकमान्या, लोकांच्या लोकमान्या, महाराष्ट्राच्या लोकमान्या, तुझ्याशिवाय जीवाला ओढणी का रे लागते! लोकमान्या, तुझ्याशिवाय जीव तुटतो रे!

४० वर्षांपर्यंत इथल्या जनतेला वेड लावणाऱ्या जादुगारा, लोकमान्या, यावेळी आम्हाला सोडून चाललास? जनतेच्या जनतानंदा या शोकसागरात आम्हाला लोटलेस? लोकांच्या प्रेमातील लोकमान्या, अश्रूंच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस? देशबांधवांच्या कैवल्या, आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलेस? भारत देशाच्या कुलदीपक तिलका. आम्हास असाहय्य दीन, अनाथ केलेस? बोला, लोकमान्य बोला! राग टाकून बोला, पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की, तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा?… कारण लोकमान्या, तू गेलास आज तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला आहे! तू गेलास, तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेला आहे! लोकमान्य बाळ गंगाधर, तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचे महाभारत, महाराष्ट्राचे रामायण, लुप्त होऊन गेलेले आहे! आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो. पण, तुमचीच निवड करताना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले?”

त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकजण पुन्हा टिळकांच्या चितेजवळ गेले. त्यापैकी अनेकांनी टिळकांची ती राख एका पुडीत घेतली. ती पुडी हृदयाशी लावली. काहींनी चांदीच्या, सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवले. टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले, तरीसुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले. १२ जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते, ते स्वतःच्या पायावर चालत. पण, आता ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने. फुलांच्या माळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत, एका चारचाकी रथात टिळकांच्या अस्थी पुण्यात आणल्या गेल्या. केळकर लिहितात, “जाताना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले, पण येताना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धरण केले होते. जाताना ते आपल्या पायांनी गेले, येताना ते एका वितभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता, येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता. जाताना ते वासनापूर्ण होते, येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकांविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाता जाता त्यांनी टिळकपूर्ण असे पुणे सोडले, येताना त्यांनी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला.”

ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला, त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना. पण, यात वेगळे काहीच नाही, असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात, “टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार? लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या? कोणकोणते बेत गूढ स्वरूपात होते? कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोणकोणत्या महत्त्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या, त्याचा शोध आता कसा लागणार? असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील? श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय? नर्मदातीरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का? सिकंदर किंवा पिटर दि ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय? आहो, पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की, त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात. पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीने धावत असल्याकारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे, हे एका आयुष्याला अशक्यच आहे! एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल, पण पराक्रमी कधीही असणार नाही. आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात, त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण! आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार? लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही, तो याच कारणामुळे होय.”

“टिळकांवर लोकांचे खरे प्रेम असेल तर ‘लोकमान्य’ ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्यसामान्यच ठेवली पाहिजे. ‘लोकमान्य’ या शब्दाने यापुढील हिंदुस्तानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नये.” केळकरांनी ही अपेक्षा व्यक्त करून १०० वर्षं झाले. टिळक जाऊन १०० वर्षं झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आठवावी, आळवावी या हेतूने केलेले हे टिळकांच्या सिंहगर्जनेचे सिंहावलोकन! ‘लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक’ हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल, तोवर टिकून राहो. लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावले लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होवोत, या चिमण्या प्रार्थनेसह ‘सिंहगर्जनेचे सिंहावलोकन’ इथेच पुरे करतो!

पार्थ बावस्कर
संकलन.सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.