चहाचा महिमा

काल म्हणे आंतरराष्ट्रीय चहा दिवस होता. या निमित्याने मिळालेली काही मजेदार आणि काही उद्बोधक ढकलपत्रे (फॉरवर्ड्स) इथे संग्रहित केली आहेत. सर्व मूळ लेखक आणि विशेषतः श्री. कौस्तुभ केळकर नगरवाला यांचे मनःपूर्वक आभार

मी २०१०मध्ये लिहिलेली ही पोस्टही पहा : चहाचे स्तोत्र आणि चहापान एक स्वभावदर्शन
https://anandghare.wordpress.com/2010/01/31/%e0%a4%9a%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/

☕☕☕☕☕☕☕☕☕ ☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕

चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो

उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो

मुंबईत तो पिला जातो
पुण्यात घेतला जातो
कोल्हापुरात टाकला जातो तर,
नागपुरात तो मांडला जातो
चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो

क्षण आनंदाचा असो
वा आलेल असो टेंशन
आळस झटकायला लागतो तसाच
थकवा घालवायला ही लागतो
चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो

काहीच काम नसताना पण चालतो
आणि खूप काम असलं तरी पण लागतो
गप्पा मारताना जसा लागतो
तसाच एकटेपणा मिटवायला ही लागतो

चहा ला वेळ नसते पण,
वेळेला चहाच लागतो
चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो…….

एक चहाप्रेमी ☕ कडून
चहा दिनाच्या मंगलमय शुभेच्छा !

        शुभ प्रभात

तुमचा दिवस आनंदात जावो
☕☕☕☕☕☕☕☕☕

माझे मित्र दिलीप पेंडसे यांची आठवण : मी मुंबैमधे चहाचे ऐस्क्रीम चवीने खाल्ले आहे, १९६१ साली.आपण?अरुणाचल मधे एका खेडेगावी चहाचे गरम डिकाॅक्शन वर याक या प्राण्यांचे दुधापासून बनविलेल्या लोण्याचा विरघळणारा गोळा हलवत चहा घेतला आहे!


चहा गीत : रात्रीचा समय सरुनि येत उष:काल हा, प्रिये चहाsss

☕☕☕☕☕☕☕☕☕


चहाची आरती – अप्पासाहेब पाटील

जय देव जय देव जय चहामाई
एक घोट घेता स्फूर्ती तू देई जय देव जय देव

प्रातःकाले तुजवीण कोणी नाही
सकाळ संध्याकाळ तुजसंगती जाई
वेळी अवेळी तुझी आठवण येते
चुलीवरती चहाचे भांडे ते चढते
जय देव जय देव

नाश्त्यासोबत तू शोभून दिसशी
भजी वड्या शेजारी तुझीच बशी
ढगाळ दुपारी तुज वाचून घालवू कैसी
गारठा पडला कि तुच तारीसी
जय देव जय देव

सरकार दरबारी तुझी हाजेरी
चहाशिवाय फाईल कैशी जाईल वरी
फौजदार जमादार तुझे दस्तक
सारे नमवीती तुजपुढे मस्तक
जय देव जय देव जय

ऐसे गुण गाण तुझे गाता गाता
पुढला चहाचा कप झाला रिता
आता कोण्या देवीचे पाय मी धरु
आपला चहा आता आपणच करू
जय देव जय देव जय

😀😀😀

जय जय चहा 👍👍🌹

चाहूँगा मै तुझे (चहा, tea)
साँझ सवेरे

☕☕☕☕☕☕☕☕☕

इस दिवस के उपलक्ष्य में.
मजाकिया मिथुनवाला बीबी से,
सुनो जैसे तुम्हारी बनायी हुई चाय मे शक्कर नही.
.
वैसे मेरा किसी और के साथ चक्कर नही.. ☕😳😳

☕☕☕☕☕☕☕☕☕

अंतरराष्ट्रीय चाय दिवस

मला हे comparison आवडले.

चहा…! की कॉफी…!!

चहा म्हणजे उत्साह..,
कॉफी म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..,
कॉफी म्हणजे प्रेम..!!

चहा एकदम झटपट..,
कॉफी अक्षरशः निवांत…!

चहा म्हणजे झकास..,
कॉफी म्हणजे वाह मस्त…!!

चहा म्हणजे कथासंग्रह…,
कॉफी म्हणजे कादंबरी…!

चहा नेहमी मंद दुपार नंतर…,
कॉफी एक धुंद संध्याकाळी…!!

चहा चिंब भिजल्यावर…,
कॉफी ढग दाटुन आल्यावर…!

चहा = discussion..,
कॉफी = conversation…!!

चहा = living room….,
कॉफी = waiting room…!

चहा म्हणजे उस्फूर्तता…,
कॉफी म्हणजे उत्कटता…!!

चहा = धडपडीचे दिवस…,
कॉफी = धडधडीचे दिवस!…!

चहा वर्तमानात दमल्यावर…,
कॉफी भूतकाळात रमल्यावर…!!

चहा पिताना भविष्य रंगवायचे…,
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची…!!!
☕🍵 ☕☕☕☕☕☕☕☕☕

एक ऐतिहासिक माहिती

मिरजेत दोनशे वर्षांपूर्वी आला चहा सन १७९९ च्या पत्रात उल्लेख,
चांदीची चहादाणी, परशुराम भाऊंनी मिरजेतून युध्दभूमीवर मागवला चहा
शंभर वर्षांपूर्वी मिरजेत गाजलं चहाचं ग्रामण्य,
नामजोशींबरोबर चहा पिणाऱ्या त्रिंबक साठेंच्या घरावर बहिष्कार

मानसिंगराव कुमठेकर
मिरज

आज जागतिक चहा दिन..त्या निमित्ताने चहाच्या इतिहासाची चर्चा होत आहे. मिरज शहरात चहा हे पेय पेशवाईच्या उत्तरार्धात आल्याचे आढळून येते. प्रसिध्द सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सन १७९९ मध्ये मिरजेतून चहा मागविल्याची नोंद आहे. त्यामुळे सुमारे २२१ वर्षे चहा हे पेय मिरजकरांची तल्लफ भागवत आहे. तर, चहा पिण्यावरून शंभर वर्षांपूर्वी मिरजेत मोठे ग्रामण्य प्रकरण उद्भवले होते. किर्लोस्कर नाटक मंडळीचे तत्कालीन मॅनेजर त्रिंबक साठे यांच्या घरावर मिरजेतील ब्राम्हणांनी बहिष्कार घातला होता.
अनेक शतकांपासून भारतात चहा हे लोकप्रिय पेय आहे. पूर्वी टपरीवर मिळणाऱ्या चहांचे विशेष ब्रॅन्डस ही तयार झाले आहे. त्यांच्या शाखा निरनिराळ्या शहरांतून चहाशौकिनांची तल्लफ भागवत आहेत.
मात्र, मिरज शहरात चहा हे पेय पेशवाईच्या उत्तरार्धात आल्याचे आढळून येते. सन १७९९ मध्ये प्रसिद्ध सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनी युध्द भूमीवरून मिरजेस आपले पुतणे गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन यांना पत्र पाठवून चहा आणि चहादाणी मागविली होती. १५ एप्रिल १७९९ च्या या पत्रातील मागणीनुसार बाळासाहेब पटवर्धन यांनी २२ एप्रिल रोजी चहा व चांदीचे पात्र परशुराम भाऊंकडे रवाना केल्याची नोंद आहे. या नोंदीनुसार सुमारे २२१ वर्षांपूर्वी चहा हे पेय मिरजेत आल्याचे दिसून येते.

चहा मुळे मिरजेत उद्भवले ग्रामण्य
एकमेकांना एकत्र आणणारा हाच चहा मात्र, काही व्यक्तिना त्रासदायक ठरला होता. सन १८९१ मध्ये पुण्यात पंचहौद मिशनमध्ये चहा घेतल्याने पुण्यातील ४२ व्यक्तिंवर जातिबहिष्कृतपणाचे ग्रामण्य सुरू होते. याच प्रकरणातील एक सदस्य नामजोशी हे २९ सप्टेंबर सन १८९२ रोजी मिरजेत आले. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर त्यांनी रिफ्रेशमेंट रूममध्ये त्रिंबकराव साठे यांच्याबरोबर चहा घेतला. त्रिंबकराव साठे हे प्रसिध्द अशा किर्लोस्कर नाटक मंडळीचे मॅनेजर होते. त्यांनी ‘पंचहौद’ प्रकरणातील व्यक्ति बरोबर चहा घेतल्याने मिरजेतील भिक्षुक मंडळीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. तीन-चार वर्षे त्यांच्या घरी श्राध्द, महालय, श्रावणी व अन्य विधी करण्यास ब्राम्हण येत नसत. प्रख्यात नाटककार गोविंद बल्लाळ देवल हे हरिपूरमधून जरूरीपुरते भिक्षुक आणून साठेंच्या घरची धर्मकृत्ये करीत. मिरजेतील या ग्रामण्याची काही कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहेत.

सन १८९५ मध्ये साठे यांच्या मातोश्रींचे निधन झाले. मध्यरात्रीची वेळ होती. नाट्याचार्य देवल हे साठेंच्या घरीच होते. मात्र, अंत्येष्टीसाठी भिक्षुक आवश्यक होता. मिरजेतल्या मंडळींनी तर बहिष्कार टाकला होता. रात्रीच्या वेळी मिरजेपासून दूर असणाऱ्या हरिपूरमधून भिक्षुक आणणेही अवघड होते. त्यामुळे नाट्याचार्य देवल यांनीच रात्रीच्या त्या समई अंत्येष्टीची पोथी कुणाकडून स्वतःच अंत्येष्टीचे विधी करण्याचे ठरवून मंत्राग्नीचे पाठ एकदा वाचून घेतले. साठेंच्या मातोश्रीची अंतयात्रा मध्यरात्रीनंतर तीन मैलावर असलेल्या कृष्णा नदीवर पोहचली. तितक्यात हरिपूरचे रावजी भटजी टांग्यातून येऊन त्यांनी मंत्राग्नीचा संस्कार केला. पुण्यातील पंच हौद प्रकरणाचा मिरजेशी अर्थाअर्थी काही संबंध नसताना केवळ नामजोशींबरोबर चहा पिल्याने त्रिंबकराव साठें सारख्या एका प्रतिष्ठीत गृहस्थावर ही वेळ आली होती. एका चहामुळे हा प्रसंग साठे कुटुंबावर सलग तीन-चार वर्षे ओढवला होता.

☕☕☕☕☕☕☕☕☕

आज बऱ्याच चहावरील पोस्ट वेगवेगळ्या ग्रुपवर वाचायला मिळाल्या
त्यातलीच एक आवडलेली…….

आवड “टी”

सगळं टिपीकल. ठरवून आणलेला सहजयोग. मान खाली घालून, आपल्याच पायाचा अंगठा बघत तिची एन्ट्री. हातात कांदेपोही ट्रे डोळ्याच्या एका कोपर्यातून, तो तिला हलकेच डोळभरू बघतो. त्याला ती आवडते बहुतेक. पुढचा अर्धा तास. अपेक्षित 21 सवाल जवाब. बोलून दमलेली सिनीयर मंडळी.
“तुम्ही दोघं बोला आता मनमोकळे…”
त्या दोघांच्या वाट्याला मागच्या गॅलरीचा एक कोपरा. अरेच्च्या… गोड आहे तिचा आवाज. जवळून आणखी छान दिसतेय. पसंत आहे मुलगी. बहुतेक…
हाच तर प्राॅब्लेम आहे त्याचा. पटकन् डिसीजन घेताच येत नाही त्याला.
ती हळूच त्याच्याकडे बघते. त्याच्या डोक्यावर देवानंदी कोंबडा. ऊंच गोरापान. बँकेत नोकरी. स्वतःचं घर. आणखीन् काय हवं ? चालतंय की… तिची हरकत नाहीये.
हवापाण्यावर फालतू चर्चा करून , दोघं ती पंधरा मिनटं वेस्ट करतात.. वडीलमंडळी आत बोलावतात. ती दोघं आत.
ती स्वयपाकघरात सटकते. पाचच मिनटात ती चहाचा ट्रे घेऊन हजर. फुलांची बेलबुट्टी नेसलेले ठेवणीतले कप. नाजूक किणकिणणारे. चहाचा कप देताना झालेला की केलेला ओझरता स्पर्श. शॉक लगा शॉक लगा… तो चहाचा पहिला घोट घेतोक आणि… ठरलं..
तीच चव. त्याच्या आईसारखीच चव. तोच घट्ट दुधाळ चहा. एकदम कड्डक.
“आठवल्यांकडचं दूध आणि.. राज एम्पोरियमचा फॅमिली मिक्श्चर ?” तो विचारतो.
“अगदी बरोबर…” तिच्या बाबांच्या पांढऱ्या भरघोस मिशीतून, चहा गाळल्यासारखे शब्द सांडतात.
चहा आवडतो, चहा पटतो.. म्हणून ती आवडते आणि तीही पटते. चट मंगनी पट ब्याह…
त्याचे बाबा साखरपुड्याच्या वेळी शम्मीकपूर होतात. “बारात ठीक सात बजे पहुँच जायेगी. घबराईये नही.. हमें कुछ नही चाहीये.. हम सिर्फ ई इतना चाहते है की, हमारे घर आये मेहमानोंका स्वागत, सूनबाई ऐसेही चायसे करे..”
सगळे खो खो खेळत ढगफुटी हसतात.
आज तीस वर्षांनी त्याला सगळं आठवतंय. आयुष्याच्या संध्याकाळी, दिवसाच्या संध्याकाळी गॅलरीत बसून दोघं चहा ढोसतायेत.
“तुझ्या हातचा टी आवडला , म्हणून तुला पसंत केली.”
ती दातदिखाई तोंडभर हसते. ‘बघण्याच्या कार्यक्रमाच्यावेळी, माझ्याबरोबरची माझी मावसबहीण आठवत्येय ?” तिनं विचारलं.
” ती गोरीगोरी, घारोळी, कुरळ्या केसांची, सारखी खिदळणारी, साधना कट ?” तो नकळत बोलून जातो.
“तिनंच केला होता चहा. मला चहा करताच येत नव्हता तेव्हा. साखरपुडा ते लग्न. मधे महिना होता फक्त. घोटून घोटून चहा करायची प्रॅक्टीस केली रोज.”
ती निरागस इनोसन्टली बोलून जाते.
“अर्रर …… ती पण चालली…” तो जीभ चावतो.
तिचा चेहरा पडतो. त्याचं नेहमी असंच होतं. पटकन् कुठलाच डिसीजन घेता येत नाही त्याला. बास झालं. चहाचा रसाळ घोट फुरकावून, यावेळी तो फर्मली बोलून जातो.
“मला तेव्हा तूच आवडली होतीस. आणि आत्ताचा तुझ्या हातचा चहा सुद्धा…”
ती खूष.
“तूच माझी आवड”टी”..” त्याच्या डोळ्यात ती हा एका वाक्याचा शिनेमा बघते
आणि.. नव्याने दोन कप चहा टाकायला सुसाट किचनमधे पळते.
हॅप्पीवाला “टी”डे टुडे !

……..कौस्तुभ केळकर नगरवाला.

*माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.. . . . . . .

.. .अनुमतिसाठी आभार

देवा रे देवा .. Oh My God !

अगदी लहानपणापासून आपल्या मनावर जे संस्कार होत असतात त्यात देवाला खूप महत्वाचे स्थान आहे. तो सर्वसाक्षी असतो, चराचरात भरलेला असतो, त्याच्या इच्छेनुसारच हे जग चालत असते. तसाच तो दयाळू, कृपाळू असतो. कठीण प्रसंगी सहाय्य करतो, संकटांपासून संरक्षण करतो. यामुळे त्याची आराधना, प्रार्थना आणि त्याचे स्मरण करत रहावे असेच सर्व प्रमुख धर्मांमधूनही शिकवले जाते. देवाची आराधना, त्याचे स्वरूप, त्याची योजना, त्याची किमया वगैर विषयांवरील काही मजेदार किस्से आणि विनोद मी या ब्लॉगच्या सुरुवातीपासून संग्रहित केले होते. ते आता या पोस्टमध्ये एकत्रित केले आहेत. पूर्वी जमवलेले बहुतेक लेख इंग्रजीमधून घेतलेले आहेत. ते मूळ रूपात देऊन त्याचा मराठीत अनुवाद किंवा सारांश दिला आहे.

मीच पूर्वी लिहिलेला ‘देवाचे खाते’ हा लेख इथे वाचावा. http://anandghan.blogspot.com/2008/06/blog-post_29.html

या भागातील लेख

१. आमच्या घरातले देव
२. एक महिला आणि देव A WOMAN AND GOD
३. या जगात खरोखरच देव आहे. GOD DOES EXIST
४. देवाची योजना
५. देवा रे देवा Hospital Bill
६. देव तारी तिला कोण मारी
७. आणि देव हसतच राहिला
८. देवबाप्पाशी गप्पा
९. देव तारी तयांना …… (११ सप्टेंबर)
१०. परमेश्वर – एका आठ वर्षांच्या बालकाच्या नजरेतून
११. देव म्हणाला “कधीही धीर सोडू नका”

१. आमच्या घरातले देव

माझ्या लहानपणी मी आमच्या घरी पाहिलेले देवपूजेचे स्वरूप या अनामिक कवीने लिहिलेल्या कवितेत अगदी अचूक टिपले आहे. ही रचना अनेकांना आपल्या लहानपणीची आठवण करून देईल. …… वॉट्सअॅपवरून साभार. ……. ऑगस्ट २०१८
————————————————————-
देवपूजेच्या सध्याच्या प्रचलित, पंचतारांकित , खर्चिक पद्धती पाहिल्या म्हणजे मला आठवते पाच – पंचवीस वर्षांपूर्वींची आईची देवपूजा…
वर्षाकाठी रिमझिमत्या श्रावणात एखादा सत्यनारायण घातला की जणू आमच्या घरी देव वर्षभर राबण्यासाठी नियुक्त केले आहेत असे वाटायचे. तिच्या साध्याभोळ्या भक्तीला सुगंध होता. तिची श्रद्धा उत्सवी नव्हती. तिचे देवही समजदार होते. त्यांनी तिचे चारचौघात हसे होवू दिले नाही. दोन हात आणि तिसरं मस्तक इतक्या अल्प भांडवलावर देवांना आपलंसं करणाऱ्या तिच्या देवपूजेची ही कहाणी….

देव आमच्या घरी वर्षभर राबायचे…
देव किती लवकर पावत नवसाला,
एक दोन सत्यनारायण होऊनच जात वर्षाला.देव आणत स्थळ ताईसाठी शोधून,
आक्काचा पाळणा हलकेच देत हलवून….
दोनचार देव तर नेहमीच असत तिच्या दिमतीला,
ती सांगायची त्यांना फक्त तिचं कुंकू जपायला…

देवांशी तर तिची थेटच ओळख असायची,
रामा.. गोविंदा जगदंबा असं बिनधास्त पुकारायची.
देवाच्या द्वारी ती क्षणभर उभी राहात असे,
पण त्यासाठी तिला बापू दादा अण्णांचा टेकू कधी लागत नसे…
ती कधी देवांना वर्गणी देत नसे,
मासिकांच्या मेंबरशीपचे तिला कधी टेंशन नसे…

मनःशांती साठी तिने कधी कोठला कोर्स केला नाही,
देवांनीही तिला तसा कधी फोर्स केला नाही….
साधे भोळे होते देव तिचे तसे,
चारचौघात त्यांनी तिचे होऊ दिले नाही हसे….
गरीब होते बिचारे मुकाट फळीवर राहायचे,
संगमरवरी देव्हाऱ्याचे स्वप्न त्यांनाही नाही पडायचे….
भाजी आणि भाकरीचा नैवेद्य गोड मानून घ्यायचे,
एका सत्यनारायणाच्या मोबदल्यात
देव आमच्या घरी वर्षभर राबायचे….

—————————————
२. एक महिला आणि देव A WOMAN AND GOD

एका मध्यमवयीन बाईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला इस्पितळात दाखल केले. ती अगदी मरणासन्न अवस्थेत गेली असतांना देवाला तिने दुरूनच विचारले, “माझे आयुष्य संपले का?”
देव म्हणाला, “नाही, तुझी अजून ४० वर्षे शिल्लक आहेत.”
हृदयविकारातून बरे वाटल्यानंतर ती आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहिली आणि तिने आपला चेहेरा, कंबर वगैरेंवर सर्जरी करून आपले सौंदर्य कृत्रिमरीत्या वाढवून घेतले, तिच्या कायापालट होण्याचे सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर घरी परत जातांना वाटेतच तिला अपघात होऊन मरण आले.

देवाघरी गेल्यावर तिने लगेच देवाला विचारले, “तू तर म्हणाला होतास की मी अजून ४० वर्षे जगणार आहे, मग मला या अपघातातून का वाचवले नाहीस?”
पुढे वाचा…..
.
A middle aged woman had a heart attack and was taken to the hospital. While on the operating table she had a near death experience.
Seeing God She asked “Is my time up?” God said,”No, you have another 43 years, 2 months and 8 days to live”
Upon recovery, the woman decided to stay in the hospital and have a Facelift, liposuction, and a tummy tuck. She even had someone come in and change her hair color. Since she had so much more time to live, she figured she might as well make the most of it. After her last operation, she was released from the hospital. While crossing the street on her way home, she was killed by an ambulance.
Arriving in front of God, she demanded, “I thought you said I had another 40 years? Why didn’t you pull me from out of the path of the ambulance?”

(You’ll love this!!!)

. .

.
देव म्हणाला, God replied,
.
“काय करू? मी तुला ओळखलेच नाही गं ! ” “I didn’t recognize you.”

.. . . . फेब्रूवारी २०१३

———————————————————————–

३. या जगात खरोखरच देव आहे. GOD DOES EXIST

१५ सैनिकांची एक तुकडी हिमालयातल्या कारगिलमधल्या पोस्टिंगवर हजर होण्यासाठी दुर्गम भागातून चालत जात असते. थंडीमुळे सारेजण गारठून गेलेले असतात. अशा वेळी मस्तपैकी गरमागरम चहा मिळावा असे त्यातल्या प्रत्येकाला वाटत असते. त्या डोंगराळ भागातल्या रस्त्यात त्यांना एक चहाची टपरी दिसते, पण ती बंद असते. चहा पिण्याची इच्छा अनावर झाल्यामुळे ते सैनिक आपल्या अधिका-याची परवानगी घेऊन त्या झोपडीच्या दरवाजाला लावलेले कुलुप तोडून आत प्रवेश करतात. तिथल्या साहित्यामधून स्वतःच चहा तयार करून ते सगळेजण पितात आणि ताजे तवाने होऊन पुढे जायला निघतात. आपले हे कृत्य योग्य नाही असे वाटल्यामुळे त्यांचा नायक त्याच्या खिशातल्या पाकीटामधून १००० रुपयांची नोट काढून ती साखरेच्या डब्याखाली ठेवतो. आता त्याला सदसद्विवेकबुध्दीची टोचणी रहात नाही आणि ते सर्वजण पुढे आपल्या पोस्टिंगच्या जागी जाऊन रुजू होतात.
काही महिन्यांनंतर ती तुकडी परत जात असतांना पुन्हा त्या टपरीवर थांबते. या वेळी ते दुकान उघडलेले होते. एक म्हातारा माणूस ते चालवत होता. त्याने तयार करून दिलेला चहा सर्वांनी घेतला आणि त्या वयोवृध्द माणसाशी संवाद साधला. त्याचा देवावर दृढ विश्वास होता. त्याने सांगितले, “अहो, माझ्यावर केवढा कठीण प्रसंग आला होता. काही अतिरेक्यांनी माझ्या मुलाला जबरदस्त मारहाण केली होती. त्यामुळे त्या दिवशी मी दुकान लवकर बंद करून त्याला घेऊन इस्पितळात गेलो होतो. त्याच्या इलाजासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. अशा अवस्थेत मी दुसरे दिवशी सकाळी दुकानात आलो तर दरवाजाचे कुलूप तोडलेले पाहून मला आणखीनच धक्का बसला. म्हणजे याच वेळी माझे दुकानसुध्दा लुटले गेले असणार असे मला वाटले. पण आत जाऊन पाहतो तो दुकानातल्या सगळ्या वस्तू जागेवर होत्या आणि माझ्या दुकानात १००० रुपयांची नोट ठेवलेली होती. अशा अडचणीच्या वेळी प्रत्यक्ष देवच माझ्यासाठी धावून आला आणि मला मदत करून गेला पहा. अशा वेळी अशा ठिकाणी आणखी कोण येणार होता? या जगात नक्की देव आहे.”
देव अशा प्रकारे कोणाच्या तरी रूपाने संकटात सापडलेल्या चांगल्या लोकांची मदत करत असतो, कदाचित कोणासाठी तो तुमच्या रूपानेसुध्दा धावून येईल.

मूळ सविस्तर कथा खाली वाचा.
READ ON THIS FACTUAL STORY “The Tea Shop”

A group of fifteen soldiers led by their Major Sahib were on their way to the post in Himalayas where they would be deployed for next three months. Another batch, which will be relieved, would be waiting anxiously for their arrival so that they could fall back to safer confines of their parent unit.
Some would proceed on leave and meet their families.
They were happy that they were to relieve a set of comrades who had done their job.
It was a treacherous climb and the journey was to last till the next evening. Cold winter with intermittent snowfall added to the torture.
If only someone could offer a cup of tea, the Major thought, knowing completely well that it was a futile wish.
They continued for another hour before they came across a dilapidated structure which looked like a small shop. It was locked. It was 2 o’clock in the night and there was no house close to the shop where the owner could be located. In any case it was not advisable to knock any doors in the night for security reasons.
An ancient village in Kargil. It was a stalemate. “No tea boys, bad luck” said the Major. The Major told the men to take some rest since they had been walking for more than three hours now.
Sir, this is a tea shop indeed and we can make tea. We will have to break the lock though.
The officer was in doubt about the proposed action but a steaming cup of tea was not a bad idea.
He thought for a while and permitted for the lock to be broken. The lock was broken. They were in for luck. The place was a shop indeed and had everything required to prepare tea, and also a few packets of biscuits.
The tea was prepared and it brought great relief to all in the cold night. They were now ready for the long and treacherous walk ahead of them and started to get ready to move.
The officer was in thought. They had broken open the lock and prepared tea and consumed biscuits without the permission of the owner. The payment was due but there was no one in sight. But they are not a band of thieves.
They are disciplined soldiers. The Major didn’t move out without doing what needed to be done. He took out a Rs. 1000/- note from his wallet and kept it on the counter, pressed under the sugar container, so that the owner sees it first thing when he arrives in the morning. He was now relieved of the guilt and ordered the move.

Days, weeks and months passed. They continued to do gallantly what they were required to do and were lucky not to lose any one from the group in the intense insurgency situation.
And then one day, it was time to be replaced by another brave lot. Soon they were on their way back and stopped at the same shop, which was today open with the owner in place. He was an old man with very meager resources and was happy to see fifteen of them with the prospect of selling at least fifteen cups of tea that day.
All of them had their tea and spoke to the old man about his life and experiences in general, selling tea at such remote a location. The poor, old man had many stories to tell all of them, replete with his faith in God.
If there was a God will he leave you in this Pitiable / Poor condition, asked a Soldier!!
“No Sir, Don’t say like that, God actually Exists. I got the Proof a few months ago.I was going through very tough times because my only son had been severely beaten by the terrorists who wanted some information from him which he did not have.
I had closed the shop early that day and had taken my son to the hospital. There were medicines to be purchased and I had no money. No one would give me a loan from fear of the terrorists. There was no hope, Sahib.
“And that day Sahib, I had prayed to Allah for help. And Sahib, Allah walked into my shop that day.
“When I returned to my shop that day and saw the lock broken, I thought someone had broken in and had taken away whatever little I had. But then I saw that ‘Allah’ had left Rs. 1000/- under the Sugar Pot. Sahib, I can’t tell you what that Money was Worth that day. Allah exists Sahib, He does.
“I know people are dying every day here but all of you will soon meet your near and dear ones, your children, and you must thank your God Sahib, he is watching all of us. He does exist. He walked in to my shop that day and broke open the lock to give me the money I desperately needed. I know He did it.”
The faith in his eyes was unflinching. It was unnerving. Fifteen sets of eyes looked at their officer and read the order in his eyes clear and unambiguous,’Keep quiet.’
The officer got up and paid the bill and hugged the old man.
“Yes Baba, I know, God does exist and yes the tea was wonderful.”
Fifteen pairs of eyes did not miss the moisture building in the eyes of the Major, a rare sight.

And the Real Truth is that Any One of us can be a God to Somebody.

.. . . . फेब्रूवारी २०१३

४. देवाची योजना

देहप्रदर्शन करणारे कपडे घालून दोन मुली आपल्या वडिलांना भेटायला गेल्या. त्यांच्याकडे पाहून ते बोलले, ” परमेश्वराने जेवढ्या मूल्यवान वस्तू बनवल्या आहेत त्या सगळ्या सहज सापडू नयेत अशा रीतीने झाकून ठेवल्या आहेत. हिरे कुठे मिळतात? खूप खोल खाणीमध्ये सुरक्षितपणे झाकून ठेवलेले. मोती कुठे मिळतात? समुद्राच्या तळाशी शिंपल्यामध्ये सुरक्षितपणे ठेवलेले. सोने कुठे मिळते? ते सुध्दा खडकांच्या अनेक थरांनी झाकलेले असते. यातले काही पाहिजे असेल तर ते मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुमची कायासुध्दा पवित्र आहे, सोने, हिरे, मोती यांपेक्षा जास्त मोलाची आहे. तिला तुम्ही वस्त्रांमध्ये अवगुंठित करून ठेवायला हवे.”

An incident transpired when daughters arrived at home wearing clothes that were quite revealing. Here is the story as told by one of the daughters:
When we finally arrived, the chauffeur escorted my younger sister and me up to my father’s suite. As usual, he was hiding behind the door waiting to scare us. We exchanged many hugs and kisses as we could possibly give in one day.
My father took a good look at us. Then he sat me down on his lap and said something that I will never forget.
He looked me straight in the eyes and said, My princess, everything that God made valuable in the world is covered and hard to get to.
Where do you find diamonds? Deep down in the ground, covered and protected.
Where do you find pearls? Deep down at the bottom of the ocean, covered up and protected in a beautiful shell.
Where do you find gold? Way down in the mine, covered over with layers and layers of rock.
You’ve got to work hard to get to them.
He looked at me with serious eyes. Your body is sacred. You’re far more precious than diamonds and pearls, and you should be covered too.

.. . . . फेब्रूवारी २०१३

५. देवा रे देवा Hospital Bill

एक माणूस दुकानात गेलेला असतांना हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले गेले, त्याची शस्त्रक्रिया झाली. तो शुध्दीवर आला तेंव्हा त्याच्या शेजारी अनेक फॉर्म घेऊन एक नन बसली होती. तिने विचारपूस सुरू केली. “तुमचा विमा उतरवलेला आहे का ?”,
” नाही”
“तुमच्या बँकेत पैसे आहेत का?”,
” नाहीत”
” तुमचे कोणी नातेवाईक आहेत का?”
” हो. माझी लग्न न झालेली बहीण आहे, ती नन आहे.”
” असे कसे म्हणता? नन्सचे देवाशी लग्न लागलेले असते”
” छान. मग हे बिल माझ्या मेहुण्याकडे पाठवून द्या.”

A man suffered a serious heart attack while shopping in a store.The store clerks Called 911 when they saw him collapse to the floor.
The paramedics rushed the man to the nearest hospital where he had emergency Open heart bypass surgery.
He awakened from the surgery to find himself in the care of nuns at the Catholic Hospital. A nun was seated next to his bed holding a clipboard Loaded with several forms, and a pen. She asked him how he was going to Pay for his treatment.
“Do you have health insurance?” she asked.
He replied in a raspy voice, “No health insurance.”
The nun asked, “Do you have money in the bank?”
He replied, “No money in the bank.”
Do you have a relative who could help you with the payments?” asked the Irritated nun.
He said, “I only have a spinster sister, and she is a nun.”
The nun became agitated and announced loudly, “Nuns are not spinsters! Nuns are married to God.”
The patient replied, “Perfect. Send the bill to my brother-in-law.”

OMG

. . . . . . . जानेवारी २०१३

६. देव तारी तिला कोण मारी

एका अरण्यातली एक गर्भवती हरिणी पिलाला जन्म देण्याच्या बेतात आहे. तिच्या एका बाजूला पाण्याने भरून दुथडी वाहणारी नदी आहे तर दुस-या बाजूला गवताचे रान वणव्यामुळे पेटलेले आहे. तिच्या डाव्या बाजूला एक शिकारी धनुष्याला बाण लावून तयार उभा आहे आणि उजव्या बाजूला एक भुकेला सिंह तिच्यावर चाल करून येत आहे. तिने बिचारीने आता काय करावे? तिचे आणि तिच्या पिलाचे आता काय होईल?

आता हरिणी काय करेल ?

.
.
.
काहीच न करता ती पिलाला जन्म देण्याकडे लक्ष देते. त्या क्षणी आभाळात वीज चमकते. त्या प्रकाशाने दिपून गेल्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकतो आणि त्याचा बाण सिंहाला लागून तो घायाळ होतो. धोधो पाऊस कोसळतो आणि पेटलेल्या गवताला विझवून टाकतो. हरिणी आपल्या पिलाला घेऊन गवतात निघून जाते.

Stochastic Probability Theory – Pregnant Deer Scenario
Consider this scenario: In a remote forest, a pregnant deer is about to give birth to a baby. It finds a remote grass field near by a river and slowly goes there thinking it would be safe. As she moves slowly, she gets labor pain, at the same moment, dark clouds gather around that area and lightning starts a forest fire. Turning left she sees a hunter who is aiming an arrow from a distance. As she tries to move towards right, she pots a hungry lion approaching towards her.
What can the pregnant deer do, as she is already under labor pain ?What do you think will happen ?
Will the deer survive ?
Will it give birth to a fawn ?
Will the fawn survive ? or
Will everything be burnt by the forest fire ?

That particular moment ?

Can the deer go left ? Hunter’s arrow is pointing
Can she go right ? Hungry male lion approaching
Can she move up ? Forest fire
Can she move down ? Fierce river

Answer: She does nothing. She just focuses on giving birth to a new LIFE.
The sequence of events that happens at that fraction of a second (moment) are as follows:
In a spur of MOMENT a lightning strikes (already it is cloudy ) and blinds the eyes of the Hunter. At that MOMENT, he releases the arrow missing and zipping past the deer. At that MOMENT the arrow hits and injures the lion badly. At that MOMENT, it starts to rain heavily and puts out the forest fire. At that next MOMENT, the deer gives birth to a healthy fawn.

In our life, it’s our MOMENT of CHOICE and we all have to deal with such negative thoughts from all sides always. Some thoughts are so powerful they overpower us and make us clueless. Let us not decide anything in a hurry. Let’s think of ourselves as the pregnant deer with the ultimate happy ending. Anything can happen in a MOMENT in this life. If you are religious, superstitious, atheist, agnostic or whatever, you can attribute this MOMENT as divine intervention, faith, sudden luck, chance (serendipity), coincidence or a simple ‘don’t know’. We all feel the same. But, whatever one may call it, I would see the priority of the deer in that given moment was to giving birth to a baby because LIFE IS PRECIOUS.
Hence, whether you are deer or a human, keep that faith and hope within you always.

. . . . . . . जानेवारी २०१३

  • * * * *

७. आणि देव हसतच राहिला

बायबलातले एक वाक्य आहे.
“चांगल्या आणि आज्ञाधारक पत्नी जगाच्या सर्व कोप-यांमध्ये सापडतील” असे आश्वासन देवाने पुरुषांना दिले.
.
त्याने वर्तुळाकार पृथ्वीची रचना केली
आणि तो हसतच राहिला, हसतच राहिला, हसतच राहिला……….
Today’s Short Reading From The Bible …** A Reading from Genesis *
And God promised men that good and obedient wives would be found in all corners of the earth. Then he made the earth round … And he laughed and laughed and laughed.

. . . . . . . जानेवारी २०१३


८. देवबाप्पाशी गप्पा

देवबाप्पाने मला काय काय सांगितलं माहीत आहे? तुम्हीच वाचून पहा. शब्दांतून ते छान व्यक्त झाले आहेच, त्यातल्या चित्रामध्ये दिसणारे भाव पहातांना बहार येईल.
God Said NO!!
I hope that you can get the effects on your computers!
The words are great, but the movements of the faces add a lot….

मी बाप्पाला सांगितले, “माझ्या सवयींतून मला मोकळे कर.”
I asked God to take away my habit.

बाप्पा म्हणाला, “नाही. मी त्या सवयींना काढून घेणार नाही, तुझ्या तुलाच त्या सोडून द्यायच्या आहेत.
God said, No.

It is not for me to take away, but for you to give it up.

उतावीळपणा सोडून धीर धरायची बुध्दी मला देण्याची विनंती मी बाप्पाला केली.
बाप्पा म्हणाला, “नाही. विचारपूर्वक वागलास तर तुला धीर धरता येईल. हा गुण देता येत नाही. तो शिकावा लागतो.”

I asked God to grant me patience.
God said, No. Patience is a byproduct of tribulations; it isn’t granted, it is learned.

मला सुख देण्याचा आग्रह मी धरला.
बाप्पा म्हणाला, “नाही. मी फक्त आशीर्वाद देतो. सुखी रहाणे तुझ्याच हातात आहे.”

I asked God to give me happiness.
God said, No. I give you blessings; Happiness is up to you.

मला कष्टांमधून मुक्त करण्याची विनंती मी केली.
बाप्पा म्हणाला, “नाही. दुःख सहन करणेच तूला भौतिक जगतापासून दूर नेऊन माझ्या जवळ आणेल.”

I asked God to spare me pain.
God said, No. Suffering draws you apart from worldly cares and brings you closer to me.

माझ्या आत्म्याची उन्नती करायला मी बाप्पाला सांगितले
बाप्पा म्हणाला, “नाही. तुझी उन्नती तूच करायची आहेस. तू सफल होशील यासाठी मी त्यावर अंकुश ठेवीन”

I asked God to make my spirit grow.
God said, No. You must grow on your own, but I will prune you to make you fruitful.
मला जीवनाचा आनंद लुटण्याची सारी साधने दे असे मी त्याला सांगितले.
बाप्पा म्हणाला, “नाही. तू जीवनातल्या सर्व आनंदांचा उपभोग घ्यावास यासाठी मी तुला जीवन देईन”

I asked God for all things that I might enjoy life.
God said, No. I will give you life, so that you may enjoy all things.
तो माझ्यावर जेवढे प्रेम करतो तेवढे प्रेम मी इतरांवर करण्यासाठी मला मदत कर अशी विनंती मी बाप्पाला केली,
बाप्पा म्हणाला, “अह्हा. अखेर एकदाचा तुझ्या डोक्यात प्रकाश पडला.”

I asked God to help me LOVE others, as much as He loves me.
God said… Ahhhh, finally you have the idea.

. . . . . . . जानेवारी २०१०

९. देव तारी तयांना …… (११ सप्टेंबर)


न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर ही इमारत ज्यात उद्ध्वस्त झाली त्या ११ सप्टेंबरच्या घटनेनंतर त्यातून जे लोक वाचले त्यांच्या कहाण्या प्रकाशात आल्या. ज्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांचे प्राण वाचले त्या अशा आहेत.
– एका गृहस्थाचा मुलगा त्या दिवशी पहिल्यांदा बालवर्गात गेला.
– एका माणसाची त्या दिवशी डोनट आणायची पाळी असल्यामुळे तो तिकडे गेला.
– एका महिलेच्या घड्याळाचा गजर त्या दिवशी वाजला नाही.
– एक माणूस अपघातात अडकून पडला.
– एका माणसाची बस चुकली
– एका महिलेच्या कपड्यांवर अन्न सांजल्यामुळे तिला कपडे बदलावे लागले.
– एका माणसाची गाडी सुरू झाली नाही.
– एक माणूस फोन घेण्यासाठी दारातून घरी परत गेला.
– एका माणसाचे लहान मूल चाळे करत राहिले आणि लवकर तयार झाले नाही.
– एका माणसाला टॅक्सीच मिळाली नाही

  • एका माणसाने घेतलेले नवे जोडे चावल्यामुळे त्याचा पाय दुखावला आणि त्यावर लावाला पट्टी घेण्यासाठी तो ओषधांच्या दुकानात गेला.

या सर्वांना त्या दिवशी देवानेच वाचवले असे म्हणता येईल…..
पण जे लोक त्यांच्या ध्यानी मनी नसतांना, विनाकारण किंवा अशाच छोट्या कारणामुळे त्या जागी गेले आणि त्या घटनेत सापडले त्यांचे काय ?

माझ्या माहितीमधली एक मुलगी लग्न करून पतीगृही चालली होती. तिची तो पहिलाच परदेश प्रवास होता. ती न्यूयॉर्कच्या आसपाससुध्दा कोठे गेली नाही. पण त्या घटनेनंतर अमेरिकेतली विमानवाहतूकव्यवस्था कोसळली. त्यामुळे तिचे विमान भलत्याच विमानतळावर गेले, तिचा नवरा दुसरीकडेच तिला घेण्यासाठी गेला होता. तेंव्हा मोबाईल फोन नव्हते त्यामुळे त्यांना एकमेकांशी संपर्क साधता आला नाही आणि त्यात तिचे अतोनात हाल झाले. तीसुध्दा देवाचीच मर्जी !

मूळ लेख :
The Little things

After Sept. 11th, one company invited the remaining members of other companies who had been decimated by the attack on the Twin Towers to share ! their available office space.
At a morning meeting, the head of security told stories of why these people were alive… and all the stories were just: the ‘L I T T L E’ things.
As you might know, the head of the company survived that day because his son started kindergarten.
Another fellow was alive because it was his turn to bring donuts.
One woman was late because her alarm clock didn’t go off in time.
One was late because of being stuck on the NJ Turnpike because of an auto accident.
One of them missed his bus.
One spilled food on her clothes and had to take time to change.
One’s car wouldn’t start.
One went back to answer the telephone.
One had a child that dawdled and didn’t get ready as soon as he should have.
One couldn’t get a taxi.
The one that struck me was the man who put on a new pair of shoes that morning, took the various means to get to work but before he got there, he developed a blister on his foot.
He stopped at a drugstore to buy a Band-Aid. That is why he is alive today.
Now when I am stuck in traffic, miss an elevator, turn back to answer a ringing telephone…
all the little things that annoy me. I think to myself, this is exactly where God wants me to be at this very moment..

Next time your morning seems to be going wrong, the children are slow getting dressed,
you can’t seem to find the car keys, you hit every traffic light, don’t get mad or frustrated; God is at work watching over you!
May God continue to bless you with all those annoying little things and may you remember their possible purpose.

Pass this on to someone else, if you’d like. There is NO LUCK attached. If you delete this, it’s okay:
God’s Love Is Not Dependent On E-Mail

. . . . . . . जून २००९

१०. परमेश्वर – एका आठ वर्षांच्या बालकाच्या नजरेतून


माणसांना बनवणे हे परमेश्वराचे मुख्य काम आहे. पण तो एकदम मोठी माणसे न बनवता लहान बाळांना बनवतो. कारण ती आकाराने छोटी आणि तयार करायला सोपी असतात. शिवाय त्यांना चालायला, बोलायला शिकवण्याचे काम त्याचे आईबाबा करतात, त्यामुळे देवाचा वेळ वाचतो.
प्रार्थना ऐकणे हे परमेश्वराचे दुसरे महत्वाचे काम आहे. पण जगात सगळीकडे इतक्या प्रार्थना चाललेल्या असतात की त्या ऐकण्यातून देवाला टीव्ही किंवा रेडिओ ऐकायला फुरसत मिळत नाही. तरीही त्यांचा केवढा मोठा गोंगाट त्याच्या कानात होत असेल. तो हा आवाज बंद करू शकत असेल का?
देव सगळीकडे असतो आणि सगळे पहात व ऐकत असतो. त्यात तो फारच गुंतलेला असणार. त्यामुळे तुमचे आईबाबा जे देऊ शकत नाही असे सांगतात ते त्याच्याकडे मागून त्याचा वेळ वाया घालवू नये.
नास्तिक लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. पण असे लोक आमच्या गावात नाहीत, निदान चर्चमध्ये येणा-या लोकात तर नाहीच नाहीत.
येशू ख्रिस्त देवाचा मुलगा आहे. पाण्यावर चालणे, चमत्कार करून दाखवणे यासारखी कष्टाची कामे तो करायचा, शिवाय लोकांना देवाबद्दल सांगायचा. त्याच्या शिकवण्याला कंटाळून अखेर लोकांनी त्याला क्रूसावर चढवून दिले.
पण तो आपल्या बाबांसारखाच दयाळू आणि प्रेमळ होता. हे लोक काय करताहेत ते या लोकांना समजत नाही म्हणून त्यांना क्षमा कर असे त्याने देवाला सांगितले आणि देवाने ते मान्य केले.
येशूने केलेली मेहनत देवाला आवडली आणि त्याने येशूला रस्त्यावरून न भटकता स्वर्गातच रहायला सांगितले. तो तिथे राहिला. आता तो देवाला त्याच्या कामात मदत करतो. लोकांच्या प्रार्थना ऐकतो, देवासाठी काय महत्वाचे आहे आणि काय नाही हे पाहून ठेवतो आणि फक्त महत्वाच्या गोष्टी त्याच्यापुढे मांडतो.
तुम्ही पाहिजे तेंव्हा प्रार्थना करा. परमेश्वर आणि येशू या दोघांपैकी एकजण तरी नेहमी कामावर हजर असतोच.
तुम्ही सब्बाथच्या वेळी चर्चमध्ये गेलात तर देव खूष होतो. आणि तुम्हाला तेच पाहिजे असते.
बीचवर जाऊन मजा करण्यासाठी चर्चला जाणे टाळू नका. नाही तरी सूर्याचे ऊन बीचवर पसरायला दुपार होतेच.
तुम्ही देवावर विश्वास ठेवला नाहीत तर तुम्हाला नास्तिक म्हणतीलच, शिवाय तुम्ही एकटे पडाल. तुमचे आईबाबा काही नेहमीच सगळीकडे तुमच्यासोबत येऊ शकणार नाहीत, पण देव येऊ शकेल. अंधार झाला किंवा दांडगट मुलांनी तुम्हाला खोल पाण्यात फेकून दिले आणि त्यामुळे तुमची भीतीने गाळण उडाली तर त्या वेळी देव जवळपास आहे या कल्पनेने तुम्हाला बरे वाटेल, धीर येईल.
पण तुम्ही सतत देव तुमच्यासाठी काय करू शकेल याचाच विचार मात्र करू नये, कारण तो आपल्याला परतसुध्दा नेऊ शकतो.
…… आणि म्हणून मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.

Subject: A Little Boy’s Explanation of God — Fabulous!!!

The following essay was written by an 8-year-old named Danny Dutton, who lives in Chula Vista, CA . He wrote it for his third grade homework assignment, to ‘explain God.’ I wonder if any of us could have done as well?
[ … And he had such an assignment, in California , and someone published it, I guess miracles do happen ! … ]

EXPLANATION OF GOD:

’One of God’s main jobs is making people. He makes them to replace the ones that die, so there will be enough people to take care of things on earth.
He doesn’t make grownups, just babies. I think because they are smaller and easier to make. That way he doesn’t have to take up his valuable time teaching them to talk and walk. He can just leave that to mothers and fathers.’
‘God’s second most important job is listening to prayers. An awful lot of this goes on, since some people, like preachers and things, pray at times beside bedtime.
God doesn’t have time to listen to the radio or TV because of this. Because he hears everything, there must be a terrible lot of noise in his ears, unless he has thought of a way to turn it off.’
‘God sees everything and hears everything and is everywhere which keeps Him pretty busy. So you shouldn’t go wasting his time by going over your mom and dad’s head asking for something they said you couldn’t have.’
‘Atheists are people who don’t believe in God. I don’t think there are any in Chula Vista . At least there aren’t any who come to our church.’
‘Jesus is God’s Son. He used to do all the hard work, like walking on water and performing miracles and trying to teach the people who didn’t want to learn about God. They finally got tired of him preaching to them and they crucified him.
But he was good and kind, like his father, and he told his father that they didn’t know what they were doing and to forgive them and God said O.K.’
‘His dad (God) appreciated everything that he had done and all his hard work on earth so he told him he didn’t have to go out on the road anymore. He could stay in heaven. So he did. And now he helps his dad out by listening to prayers and seeing things which are important for God to take care of and which ones he can take care of himself without having to bother God. Like a secretary, only more important.’
‘You can pray anytime you want and they are sure to help you because they got it worked out so one of them is on duty all the time.’
‘You should always go to church on Sabbath because it makes God happy, and if there’s anybody you want to make happy, it’s God!
Don’t skip church to do something you think will be more fun like going to the beach. This is wrong. And besides the sun doesn’t come out at the beach until noon anyway.’
‘If you don’t believe in God, besides being an atheist, you will be very lonely, because your parents can’t go everywhere with you, like to camp, but God can. It is good to know He’s around you when you’re scared, in the dark or when you can’t swim and you get thrown into real deep water by big kids.’
‘But…you shouldn’t just always think of what God can do for you. I figure God put me here and he can take me back anytime he pleases.

And…that’s why I believe in God.’*

. . . . . . नोव्हेंबर २०१०

************

नवी भर दि. १८-०५-२०२१

११. भगवंताचे अस्तित्व

बोधकथा… ज्याचा देवावर विश्वास नाही त्यांनी नक्की वाचावी …………………..

भगवंताचे अस्तित्व

थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते , ते प्रोफेसर नास्तिक होते त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले “अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता , वय पण 45 एक आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा , हे बायबल वाचून काय होणार? फेकून द्या बघू ते रेल्वे च्या बाहेर.” हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसन ना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोचले.
आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले , त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते , आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले “वा , काय प्रयोगशाळा आहे तुमची , खरच तुम्ही फार मोठे आहात , किती दिवस लागले हो हे सगळं करायाला?” त्यावर एडिसन म्हणाले “छे हो , हे मी काहीच केलेलं नाही , सगळे आधीच तयार होते मी फक्त इथे येऊन प्रयोग केले.”
त्यावर प्रोफेसर म्हणाले “माझी चेष्टा करताय काय, अस आपोआप काही तयार होत होय?” त्यावर एडिसन हसले व म्हणाले “अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आपोआप आली अस म्हटलेलं तुम्हाला पटलं नाही ना, मग हे ब्रह्मांड आपोआपच निर्माण झालं हे मला कस पटेल.”
पुढे त्यांनी एक सिद्धांत मांडला आहे , ते म्हणतात “Where there is a creation there should be a creator ,Without a creator there is no creation so god exists.”
तात्पर्य- मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा देवाचे अस्तित्व मान्य केलं आहे.👌👌

१२. देव म्हणाला “कधीही धीर सोडू नका”

मी पूर्णपणे हताश होऊन सर्वसंगपरित्याग केला आणि आपल्या जीवनाचासुध्दा त्याग करायचे ठरवले. त्यापूर्वी एकदा परमेश्वराशी बोलून घ्यावे म्हणून गर्द वनराईत जाऊन त्याला भेटलो.
मी म्हंटले,”हे देवा, मी धीर सोडू नये असे एक तरी चांगले कारण तू दाखवू शकशील कां?”
त्याने दिलेले उत्तर ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणाला, “जरा सभोवताली पहा, तुला ही हिरवळ आणि बांबूंची बेटे दिसताहेत ना?”
“हो.”
“मीच जेंव्हा या हिरवळीची आणि वेळूची बीजे जमीनीत पेरली तेंव्हा दोन्हींचीही चांगली काळजी घेतली. त्यांना पाणी, उजेड, वारा वगैरे दिले. हिरवळ लगेच जमीनीतून वर उठली आणि सर्व बाजूला पसरून तिने हिरवागार गालिचा तयार केला. बांबूच्या बीजातून कांहीच वर उठले नाही.
पण मी त्याचा नाद सोडला नाही. दुसऱ्या वर्षी हिरवळ जास्तच घनदाट झाली आणि दूरवर पसरली. पुन्हा वेळूची कांहीच हालचाल दिसली नाही. पण मी त्याला आधार देतच राहिलो. असेच तिसरे आणि चौथे वर्षही गेले.
पांचव्या वर्षी अचानक बांबूचा एक इवलासा अंकुर फुटून बाहेर आला. बाजूच्या हिरवळीत तो दिसत सुध्दा नव्हता. पण सहा महिन्यात तो वाढत गेला आणि त्याचा १०० फूट उंच बांबू उभा राहिला.
पहिली पाच वर्षे तो आपली मुळे बळकट करत होता. जमीनीवर आल्यानंतर त्याचे पोषण करून त्याला जगवत ठेवण्यासाठी आणि ताठ उभे राहण्यासाठी आवश्यक तेवढा मजबूतपणा त्यांना आणत होता. कोणालाही झेपणार नाही एवढे मोठे आव्हान मी त्याच्यापुढे ठेवत नाही.”
तो पुढे म्हणाला, “हे वत्सा, इतकी वर्षे तू जी धडपड करीत आहेस, त्यातून तुझी मुळे बळकट होत आहेत. (तू खंबीर आणि सुदृढ बनत आहेस) मी जसा बांबूला सोडले नाही तसेच तुलाही वाऱ्यावर सोडणार नाही. तू तुझी तुलना इतरांशी करू नकोस. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. बांबू आणि हिरवळ यांची उद्दिष्टे वेगळी असतात, पण दोन्हींमुळे वनाला शोभा येते. जेंव्हा तुझी वेळ येईल तेंव्हा तू सुध्दा उंची गांठशील.”
“किती?”
“बांबू केवढी गांठतो?”
“त्याला हवी असेल तेवढी?”
“हो. तुझी इच्छा असेल तेवढी उंची गांठून मला गौरवशाली कर.”
परमेश्वर कधीच आपल्याला सोडून देत नसतो. त्यामुळे गेल्या दिवसाची खंत कधीही मनात धरू नका.

………. इंग्रजी लेखाचे भाषांतर. मूळ लेख खाली दिला आहे

One day I decided to quit…

One day I decided to quit… I quit my job, my relationship, my spiri tuality… I wanted to quit my life.
I went to the woods to have one last talk with God. “God”, I said. “Can you give me one good reason not to quit ?” His answer surprised me…
“Look around”, He said. “Do you see the fern and the bamboo?” “Yes”, I replied.
When I planted the fern and the bamboo seeds, I took very good care of them. I gave them light. I gave them water. The fern quickly grew from the earth. Its brilliant green covered the floor. Yet nothing came from the bamboo seed.
But I did not quit on the bamboo. In the second year the Fern grew more vibrant and plentiful.
And again, nothing came from the bamboo seed. But I did not quit on the bamboo. He said.
“In the third year, there was still nothing from the bamboo seed. But I would not quit. In the fourth year, again, there was nothing from the bamboo seed. “I would not quit.” He said. “Then in the fifth year a tiny sprout emerged from the earth. Compared to the fern it was seemingly small and insignificant… But just 6 months later the bamboo rose to over 100 feet tall. It had spent the five years growing roots. Those roots made it strong and gave it what it needed to survive. I would not give any of my creations a challenge it could not handle.”
He said to me. “Did you know, my child, that all this time you have been struggling, you have actually been growing roots.”
“I would not quit on the bamboo. I will never quit on you. ” Don’t compare yourself to others ..” He said. ” The bamboo had a different purpose than the fern … Yet, they both make the forest beautiful.”
Your time will come, ” God said to me. ” You will rise high! ” How high should I rise?” I asked.
How high will the bamboo rise?” He asked in return. “As high as it can? ” I questioned.
” Yes. ” He said, “Give me glory by rising as high as you can. ”
I hope these words can help you see that God will never give up on you. He will never give up on you. Never regret a day in your life.

Apr 17, 2009

WhatsApp – एक गंमत – नाला की काठी ?


आजकाल सगळ्या लोकांना वॉट्सअॅपचे एक प्रकारचे व्यसन लागले आहे. सकाळी उठल्या उठल्या ते पाहिल्याशिवाय चैन पडत नाही आणि झोपण्यापूर्वी आज काय काय आले हे पाहणे होतेच. या सामाजिक संपर्काचे स्वरूप एकाद्या वाहत्या नाल्यासारखे असते असे आरती महाजन सांगतात. त्यातून काय काय वहात असते याचे खुमासदार वर्णन त्यांनी फेसबुकावर दिलेल्या या पोस्टमध्ये केले आहे. आरती महाजन यांचे आभार मानून ही पोस्ट इथे संग्रहित करत आहे.

पण वयोवृद्ध लोकांना विशेषतः आजकालच्या दिवसात वॉट्सॅप हाच एक आधार कसा झाला आहे याचे खुसखुशीत वर्णन खाली दिलेल्या कवितेत केले आहे. … दुसऱ्या एका कवितेत वॉट्सॅपवरल्या स्माइलींचे खुशखुशीत वर्णन केले आहे.

दिलसे …….❤️
व्हॅाटस्अप..????

😄😄ऐकुनच बरं वाटलं ना ??
बस नाम ही काफी है ।😄
व्हॅाटस्अप हा एक वाहता नाला आहे ..
आपल्या नागपूरचं भूषण असलेल्या नागनदीसारखाच 😄
जो येतो तो आपल्या या नागनदीत कचरा फेकतो व त्यामुळे त्याचं रूपांतर नागनाल्यात झालयं …तसचं काहिसं व्हॅाटसॅपचं पण झालयं ..
माफ करा कुणाच्या भावना दुखावू शकतात 🙏..पण मी स्वत: ही अधून मधून ह्या नाल्यात यथेच्छ डुबक्या मारत असते ..
काही पोस्ट्स तर प्लॅस्टिक च्या पिशव्यांसारख्याच असतात कधीही नाश न पावणाऱ्या न सारख्या इकडून तिकडून परत परत उडून येणाऱ्या ..
काही पोस्ट्स भक्तीमार्गप्रदिप पुस्तकातल्यां सारख्या ..त्याचं केविलवाणं निर्माल्य पण सतत तरंगत राहतं जथ्याजथ्यानी ..बरं इतकं ज्ञान वाचून शहाणं झाल्यासारखं तर कुणी वागत नाहीच तरी ज्ञानाचं निर्माल्य ओतायचं काही कमी होत नाही.
काही अध्यात्मिक पोस्ट्स वाचल्या की जो पाठवतो त्याचं विपरीत वागणं लक्षात येऊन असा प्रश्न पडतो की बॅा ह्याने वाचला असेल का ही पोस्ट अन् मग वाचली असेल तर मग हा असा का वागतो? किंवा मग हे आपल्यासाठी काही सुचक तर नसेल??
असा केमिकल लोच्या होतो 😄
काही अवजड बौद्धिक पोस्टी तर कचऱ्यासारख्याच ,ज्या फक्त पाठवणाऱ्यालाच समाधान देतात न बाकीच्यांच्या डोक्यावरून वाहून जातात..
काही बिचाऱ्या निरूपयोगी कुणालाही सुख तर नाहिच पण दु:ख ही न देणाऱ्या , जश्या टिनपाट ,भंगार वस्तू , त्यापण मस्त मजेत तरंगत राहतात ना नाल्यात इकडून तिकडे ..
तर काही सुंदर पुस्तकातील पानांसारख्या ओलसर, गहिवर उमाळे आणणाऱ्या ..
म्हणजे बघा एक पोस्ट जशी वृध्दाश्रमातल्या केविलवाण्या मायबापांची तर दुसरी लगेच त्याच्या विपरीत रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना आंघोळ वगैरे घालून त्यांना टिव्हीवर आणून टीआरपी वाढवून अथक सेवा करणाऱ्याची ..दु:खाचे कढ च्या कढ आणणारी ..
प्रेमाच्या पोस्टी तर विचारूच नका सतत❤️😘❤️🥰ह्यांनी भरलेल्या असं वाटत की जगात फक्त रजनीशांनी सांगितलेलं प्रेम न प्रेम च शिल्लक आहे आता ..
तर लगेच दुसरीकडे प्रेमभंगाच्या दुखभऱ्या शायरीचे रकाने भरत गालिबचं व गुलजारचं अख्ख खानदान उभं करणाऱ्या ..
कधीकधी हाईट म्हणजे एकच सुविचार टागोर ,अब्दुल कलाम, विवेकानंद व बुध्दाच्या नावावर सतत इकडून तिकडे फिरत असतो ..
सगळ्यांत भयंकर अन् वात आणणाऱ्या म्हणजे त्या ‘Tiktok’ पोस्टी (नशीब आता बंद झाल्यात) ..लहानांपासुन मोठ्यांपर्यंत व गावठींपासुन तर शिल्पा शेट्टी पर्यंत , सर्वच पोत्या पोत्यांनी हा कचरा फेकत असतात..
पण काही सुंदर गाण्यांच्या भुले बिसरे गीत, आज रात्री का खुबसूरत गीत ..अशापण असतात
तर काहींचे स्वत:च्याच स्वरसाजाने स्वत:ला हवे तसे नटवलेलं हौशी संगीत ते पण सहन करावे लागतं 😛😘
रूचकर पदार्थांच्या पण मस्त रूचकर पौष्टिक पोस्टी मग त्यावर लगेच ‘yummy’😋चा रिप्लाय अन् मग लगेच वजन कसं आटोक्यात ठेवायचं ह्या पण पोस्टी ..
शिवाय वर्षभर चालणारे बर्थडे ,ॲनिव्हर्सरी,मदर्स ,फादर्स डे,अलाने फलाने डे हे तर विचारूच नका
गुडमॅार्निंग पासुन शुभरात्रींच्या पर्यंत,
देवापासुन नराधमांपर्यंत ..
जन्मापासुन मरणापर्यंत,
लग्नापासुन बारश्यापर्यंत…
दिवाळी पासुन श्राध्दापर्यंत,
राजकारणापासुन समाजकारणापर्यंत,
स्वातंत्र्यापासुन शहिदांपर्यंत ..
पदार्थ करण्यापासुन ते पचवण्या पर्यंत..
पुरणापासुन वरणापर्यंत ..
आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी पासुन ते युनानी , घरगुती उपचारांपर्यंत..
पुराणांपासुन ते विज्ञानापर्यंत..
व्यायामांपासुन नियमांपर्यंत ..
प्रलयापासुन ते महामारीपर्यंत ..
प्रेमापासुन ते प्रेमभंगापर्यंत ..
अगदी अविरतपणे हा कचरा व्हॅाटस्ॲप नामक नाल्यात वाहत असतो ..
काही दिवसांनी बाळंतपण ,ॲापरेशन्स वगैरे पण व्हॅाटस्अप वरच होतील ..हो कारण आता ‘‘वर्क फ्रॅाम होम’ चा नवा ट्रेंड येऊ घातलाय कोरोनामुळे ..तर डॅा. पण घरूनच कामं करतील .😄
आता नविन म्हण -‘वाहत्या नाल्यात हात धुऊन घ्या ..पण हात सॅनिटाईझ करायला विसरू नका’😛
तर असा हा नाला सतत तुडुंब भरून कधी सुगंघ पेरत तर कधी दुर्गंधी पसरवत खळखळून वाहत असतो ..
ह्या वाहत्या नाल्यांतून कचरा अलगदपणे बाजूला सारून सोन्याचे कण वेचता आले तर वेचायचे अन् त्यातुन स्वत:च्या व्यक्तिमत्वाला अगदी चोवीस कॅरेट नाही तरी बावीस कॅरेटची झळाळी आणायचा प्रयत्न करायचा ..
कारण शेवटी
The quality of life depends on how we manage our surroundings n ourselves ..
कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा “*शिल्पकार *”!

😃🔆😃🔆😃🔆😃

नवी भर दि. २२-०५-२०२१

🏒व्हाट्सपची काठी ! 😃

म्हातारपणी मिळाली व्हाट्सउपची काठी !
कपाळावरची मिटली आपोआप आठी !!

वेळ कसा जातो आता हेच कळत नाही !
वर्तमान पत्राच पान सुद्धा हल्ली हलत नाही !

चहा पिताना लागतो व्हाट्सअप हाताखाली !
डाव्या बोटाने हलके हलके मेसेज होतात वरखाली !

कुणाचा वाढदिवस आहे ? कोण आजारी आहे ?
कोण चाललंय परदेशात अन काय घडतंय देशात ?

कधी लताची जुनी गाणी तर कधी शांताबाई ची कविता !
बसल्या बसल्या डुलकी लागते कधी एखादी गझल समोर येते !

टीव्ही वरच चॅनेल सुद्धा हल्ली बदलत नाही
व्हाट्सउप शिवाय आमचं पान जरा सुद्धा हलत नाही !!

वय जरी होत चाललं हातपाय जरी थोडे थकले !
तरी व्हाट्सउपच्या औषधाने मन मात्र रिलॅक्स झाले !!

आता फार काळजी करत नाही आता चिडचिड सुद्धा होत नाही !
व्हाट्सउप चा मित्र भेटल्या पासून आता मनात सुद्धा रडत नाही !!

आनंदी कसे जगायचे याचे आता कळले आहे तंत्र !!
व्हाट्सउप च्या या जादूच्या काठी ने दिला सुखाचा मंत्र !!

😃🔆😃🔆😃🔆😃 वॉट्सॅपवरूनच साभार दि.२२-०५-२०२१

🤩😎🥰🤪🤩☺️🤩😎🥰🤪🤩☺️🤩😎🥰🤪🤩☺️🤩😎🥰🤪🤩☺️

नवी भर . . दि.२७-०७-२०२१ : वॉट्सॅपमुळे स्माइली आले की स्माइलींमुळे वॉट्सॅपला शान आली ?

स्माईली 😇😀🤓

स्माईली तू व्हॉट्सॲपचा बहिरा,
नाकाचा पत्ता नाही,
तरी जिवंत चेहरा
😀😃

खळखळून हसतोस
डोळ्यात पाणी आणत
😅😂🤣😆

किंचित स्मितहास्य करताना
बघतोस डोळे मिचकावत
☺😄

पदार्थ अन् रेसिपीला
जिभल्या चाटतोस
😋😋😋

ओठांचा चंबू करत
किती गोsड भावतोस
😚😚😘😘

मिश्किल वागतोस
डोळा एक मारत
😜😜

हळूच गालात हसतोस
जीभ बाहेर काढत
😋😝

वाकड्या ओठांनी
दिसते तुझी नापसंती
😏😒

मनासारखे नाही झालं की
रडतोस किती
😫😩😢😭

लटक्या रागाचा पिवळा तू
क्रोध दिसतो तुझा लाल रंगातून
😠😡

भिती नि अचंबा दाखविशी तू
मोठ्या डोळ्यातून
😨😲😳😱

केविलवाण्या नि दु:खद भावना
कळतात एका थेंबातून
😰😢

स्थितप्रज्ञाची भूमिका वठवतोस
रेषा ओठांची सरळ करुन
😑😐

आजारपणात डोक्यावर पट्टी
नि थर्मामीटर तोंडात
🤒🤕

कधी तोंडाला पट्टी
अन् शिंक नाकात
😷🤧

इतक्या सगळ्यातून
झोपाळू चेहरा ना लपत
😴

एखाद्याची टर उडवून
जोकर व्हायचं नाही सोडत
🤡🤠

विविध भावभावनांचे चेहरे तुझे
कळतात बरं साऱ्यांना
🤓🤗

पण समोरच्याचे चेहरे
वाचता नाही येत माणसांना…!!
😎😇
🌹🤩😎🥰🤪🤩☺️🤩😎🥰🤪🤩☺️

नवी भर दि. २३-०८-२०२१

स्क्रोल

सोशल मीडिया माणसाला खूप स्क्रोल करवतो
लोक नुसते भराभर मागे पुढे होत राहतात
एखाद्या चांगल्या वॉलवर, पोस्टवर थांबत नाहीत
पुढेपुढे जात राहतात
नुसते स्क्रोल होत राहतात
पुढे जाऊन याची सवय होते

सलग गाणं ऐकत नाहीत
एका कडव्यानंतर बदलतात
टीव्ही पाहत बसल्यावर अवघ्या काही मिनिटागणिक चॅनेल बदलत राहतात
पुस्तके वाचत नाहीत, वाचायला घेतलीच तर भराभर पाने पालटतात
फिरायला गेले तर एका जागी बसत नाहीत
सिनेमा नाटकास गेले तर दहाव्या मिनिटाला विचलित होतात
प्रवासात असले तर खिडकी बाहेरचं जग पाहत नाहीत
कुठे काही दिसलं जाणवलं तर डोळ्याने पाहत नाहीत हातातला मोबाईल काढून शूट करू लागतात !
लोक नुसते पुढे पुढे जात राहतात

बाजारात गेले तर दुकानामागून दुकाने पालथी घालतात
गप्पा मारताना सलग काही तास एका जागी बसू शकत नाहीत
एकत्रित सिलेब्रेशन करताना देखील पहिल्या तासानंतरच वेगवेगळे कोंडाळे करून बसतात
बातम्या पाहताना वाचताना कहर करतात नुसत्याच हेडलाईन्स पाहतात,
दृश्ये पटापट पुढे सरकावित यासाठी तिष्ठतात
खोलात जाऊन विचार करणं, स्वतःला प्रश्न विचारणं बंद केलंय
मन कशातच लागत नाही, वागण्या बोलण्यातली सलगता हरवून बसतात
सिनेमे आठवड्यात बदलतात, गाणी दिवसाला बदलतात
आताच्या घडीला ट्रेंड कुठला आहे हे पाहण्याचा सोस बाळगतात
ट्रेंडप्रमाणे बोलतात, लिहितात, रडतात, हसतात, धावतात, थांबतात, श्रद्धांजली वाहतात, शुभेच्छा देतात
लोक नुसते बाहुले झालेत, नुसते धावताहेत

मी वाट पाहतोय टॉलस्टॉयच्या गोष्टीतल्या शेवटाची
जमिनीच्या हव्यासापोटी धावणाऱ्याच्या कोसळण्याची,
आहे तो आनंद गमावून बसल्याची जाणीव होण्याची !

माणसांच्या वागण्यात, विचारात, जीवनात, सामुदायिक वर्तनात जुने काहीच उरलेले नाही
माणसाचाच एक ट्रेंड झालाय

मी टॉलस्टॉयला शोधतोय.
तुम्हाला दिसला का तो ?

  • समीर गायकवाड

वॉट्सॅपवरून साभार दि.२३-०८-२०२१

🤩😎🥰🤪🤩☺️🤩😎🥰🤪🤩☺️

पुलंच्या नावाने काही पण !

आजकाल पु.ल.देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्य या थोर लेखकाच्या रचना वाचायला मिळाल्या. तसेच काही उत्साही लोक पुलंच्या नावाने काही पण खपवायचा प्रयत्न करत असतात ते ओळखू येतेच.

असेच दोन मजेदार ढकललेख वॉट्सअॅपवर वाचण्यात आले. ते खाली दिले आहेत.

नंतरच्या काळात त्यात भर पडत आली आहे.


नवी भर दि. १८-०१-२०२१ : 

यश म्हणजे काय?

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यानी एका व्याख्यानात यश म्हणजे काय?यावर केलेले मिश्कील भाष्य

वयाच्या चौथ्या वर्षी यश म्हणजे …
आता चड्डीत ‘ शू ‘ न करणे,

आठव्या वर्षी यश म्हणजे …
घरी परत येण्याचा नेमका रस्ता माहित असणे,

बाराव्या वर्षी यश म्हणजे
मित्रमंडळी जमा होणे,

अठराव्या वर्षी यश म्हणजे
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे,

तेवीसाव्या वर्षी यश म्हणजे
विद्यापिठातून पदवी संपादन करणे ,

पंचवीसाव्या वर्षी यश म्हणजे
मनाजोगता जॉब मिळवणे,

तिसाव्या वर्षी यश म्हणजे
लग्न करून स्थिरस्थावर होणे ,

पस्तिसाव्या वर्षी यश म्हणजे
बऱ्यापैकी पैसा कमावणे,

पंचेचाळीसाव्या वर्षी यश म्हणजे
अद्यापही आपण तरूण असल्याचा भास निर्माण करणे ,

पन्नासाव्या वर्षी यश म्हणजे
मुलांना चांगले शिक्षण देणे,

55 व्या वर्षी यश म्हणजे
आजही सगळी कर्तव्ये पार पाडण्यासाठी सक्षम असणे ,

60 व्या वर्षी यश म्हणजे
ड्रायव्हिंग लायसेन्सचे नुतनीकरण करणे ,

65 व्या वर्षी यश म्हणजे
निरोगी आयुष्य जगणे ,

70 व्या वर्षी यश म्हणजे
कुणालाही आपले ओझे न वाटणे … याचे समाधान असणे,

75 व्या वर्षी यश म्हणजे
जुन्या मित्रां सोबत लहानपणीच्या गप्पा मारणे,

80 व्या वर्षी यश म्हणजे
घरी परत येण्याचा रस्ता लक्षात राहणे,

आणि …

85 व्या वर्षी यश म्हणजे
पुन्हा एकदा चड्डीत ‘ शू ‘ न करणे ..

पु. ल.देशपांडे

एक वर्तुळ पूर्ण……….🔘

हाच लेख मी इंग्रजी आणि हिंदीमध्येही वाचला आहे आणि त्यामुळे मला तो पुलंचा वटत नाही.

*********

नवी भर दि.०३-०३-२०२०

३. एक सर्वोत्कृष्ट प्रार्थना

पु ल देशपांडे लिखित एक सर्वोत्कृष्ट प्रार्थना अणि शुभेच्छा !

हे परमेश्वरा…
मला माझ्या वाढत्या वयाची जाणीव दे. बडबडण्याची माझी सवय कमी कर
आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य इच्छा कमी कर.

दुसर्‍यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व त्यांच्या खाजगी प्रश्नांची दखल घेउन ते मीच
सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजूत माझी होऊ देऊ नकोस.

टाळता येणारा फाफटपसारा व जरुर नसलेल्या तपशिलाचा पाल्हाळ न लावता शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची माझ्यात सवय कर.

इतरांची दुःख व वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करच पण त्यावेळी माझ तोंड शिवल्यासारखे बंद राहु दे. अशा प्रसंगी माझ्याच निराशा, वैफल्यांचे रडगाणे ऐकवण्याची माझी सवय कमी कर.

केंव्हा तरी माझीही चूक होउ शकते, कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो, गैरसमजुत होऊ शकते
ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात प्रेमाचा ओलावा, गोडवा, लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही हे मला माहीत आहेच, पण एक बिलंदर बेरकी खडूस माणूस म्हणून मी मरू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

विचारवंत होण्यास माझी ना नाही पण मला लहरी करू नकोस. दुसर्‍याला मदत करण्याची इच्छा आणि बुद्धी जरूर मला दे पण गरजवंतांवर हुकूमत गाजवण्याची इच्छा मला देऊ नकोस.

एवढीच माझी प्रार्थना…

– पु.ल.देशपांडे

—————————————–

१. रिटायर्ड माणूस

जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस…   – पु.लं.

रिटायर्ड माणसांनो, भावांनो, सहकार्यांनो…

जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर माणूस.
पु.लं च्या भाषेत सांगायचं म्हणजे पुण्यांच्या दुकानदारांच्या नजरेतून सगऴ्यांत दुर्लक्षीत प्राणी म्हणजे
गिर्हाईक. अगदी त्याचप्रमाणे समजा…

गरिब बिचारा, भांबावलेला, बावरलेला, आत्मविश्वास हरवलेला असा हा प्राणी असतो.

कोणे एके काळी या माणसाचे पण सुगीचे दिवस असतात. त्याचा रूबाब वाखाणण्याजोगा असतो. सर्व गोष्टी हातात मिळत असतात. घरी व कार्यालयात.

टेबलावरून फायली फिरत असतात. मोठ्या मोठ्या करारांवर सह्या होत असतात. नुसती बेल वाजवली ना तरी तीन तीन शिपाई धावत येत असतात. एक चहा घेऊन. एक बिस्कीटं घेऊन, तर एक बडीशोप घेऊन.

अहाहा… त्या शिपायाच्या चेहऱ्यावर भाव असतो, तो हा, की साहेब हे फक्त आपल्याचसाठी.

आणि आता, टेबलावर मिरच्यांची देठं काढली जातात. भेंडी पुसली जाते. लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतात.
अरेरे… किती हा विरोधाभास.

रिटायर्ड माणसाला कुठंही डोकं चालवायला वा मध्ये घालायला बंदी असते. कधी कधी मला, तर वाटतं, की रिटायर माणूस त्याचं डोकं फक्त उशीवर टेकवायलाच वापरत असावा सध्या. बिच्चारा.

कुणी समदु:खी माणूस त्याला घरी भेटायला आलाच, तर हिंदी चित्रपटात यात्रेत हरवलेला भाऊ भेटल्यावर नायकाला जो आनंद होतो, अगदी तसाच किंबहूना  त्याहून जास्त आनंद रिटायर्ड माणसाला होतो. पण त्यांचं बोलणं किचनचा सी.सी. टिपत असतो, हे त्याच्या ध्यानी नसतं.

आपल्या सुगीच्या दिवसांत हा माणूस कट्टयावर मित्रांसमवेत हास्य विनोद करत असतो. मधून मधून नेत्र व्यायामही  सुरू असतो. तोच बिचारा  आता मंदिराच्या कट्टयावर वा वाचनालयाच्या ओट्यावर
विसावलेला असतो.

ज्या चौपाटीवर सणसणीत भेळ, रगडा, बर्फाचा गोळा खातांना नजर भिरभीरत ठेवलेली असते, गार वार वारा
अंगावर घेत रिटायर्ड नंतरच्या आयुष्याची स्वप्न रंगवलेली असतात, तिथेच चटई टाकून योगा करायची वेळ आलेली असते.

दिवसभरांत टोमणे ऐकावे लागतात. ते शेजारचे बघा, या वयातही किती फीट व धीट आहेत. नाही तर तुम्ही बघा, भित्रे काळवीट. वगैरे वगैरे. अरे कांय, आहे कांय हे…!?

एक नवीन मुद्दा मला कळलांय, तो तुम्हाला सांगतो. या रिटायर्ड माणसांचा उल्लेख पुराणांत म्हणजे महाभारतातसुध्दा आला आहे.

चक्रावलात नां..? मग ऐका. समोर सागराप्रमाणे पसरलेला विशाल सैन्याचा समुह. त्यातले स्नेही, आप्तेष्ट पाहून अर्जुन जेव्हा युध्द करायला नकार देतो, तेंव्हा कृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात…

अर्जुना असा रिटायर्ड माणसासारखा हताश व निराश होऊ नकोस. उठ व लढायला सज्ज हो…!!

पुढं कालांतरानं रिटायर हा शब्द गीतेतून वगळण्यांत आला. कां, तर भविष्यांत रिटायर्ड लोकांच्या भावना
दुखाऊ नयेत.

बघा, लोकहो… त्या काळांत पण यांच्या भावनांची कदर केली जात होती आणि आता सुकलेल्या पालापाचोळ्याप्रमाणे त्या पायदळी तुडवल्या जातात. अरेरे…!!

सरते शेवटी भगवंतानं रिटायर्ड लोकांना हताश न होण्याचा मार्ग सुचवला.भगवान म्हणाले…

अरे वत्सा, रिटायर्ड माणसा… हताश व निराश होऊ नकोस, मी तुला फंड व पेन्शन या दोन गुळाच्या वेेली देतो. जो पावेतो त्या तुझ्याकडं आहेत, तोवर तुला मरण नाही.

मरण नाही, म्हणजे खरं मरण नाही. रोजच्या जीवनात तू ज्या यातना वा अपमान भोगशील, त्या यातना तुझ्याकडं असलेल्या या दोन शस्रांनी सुसह्य होतील. फंड व पेन्शन जो पावेतो तुझ्याकडे आहेत, तो पर्यंत सारे तुझे असतील.

उठ, वत्सा उठ आणि आयुष्याच्या संग्रामास तयार हो. उठ…!!

खाडकन जाग आली…

भानावर आलो. आणि की माझी ती दोन शस्त्रे जागेवर आहेत, की नाही हे बघण्यासाठी अंथरूणातून बाहेर आलो..


२. पु. ल. म्हणतात

पु. ल. म्हणतात –
👌👌👌👌👌
जळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.

खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

आयुष्य फार सुंदर आहे…
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे…
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे…

ही वाक्ये मला पुलंची तर वाटत नाहीत, पण ती वपुंची असण्याची शक्यता आहे.


दि. २८-०८-२०१९

पुलंच्या नावाने आलेला आणखी एक फॉरवर्ड

पुलं दी ग्रेट ..।।।।।
😃😃😃😃😃
मराठीत “लागण्याची” गंमत बघा: हा लेख मी पूर्वीच या ठिकाणी संग्रहित केला आहे.

https://anandghare.wordpress.com/2018/09/08/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4/

मराठी ग्राफिटी आणि पुणेरी पाट्या

मला वॉट्सॅपवरून काही मजेदार हास्यघोष मिळाले आहेत ते या ठिकाणी संकलित केले आहेत. या ग्राफिटीज ज्यांनी तयार केल्या आहेत त्यांचे आभार मानून त्यांच्या अनुमतीची याचना करीत आहे.

संपादन दि.१३-०७-२०२० : मागच्या वर्षी पुण्यात एक पाट्यांचे प्रदर्शन भरले होते. त्यातल्या काही पाट्या म्हणजे ग्राफिटीचे नमूनेच आहेत. ते या पानावर संग्रहित केले आहेत. सर्व रचनाकारांचे मनःपूर्वक आभार.

ग्राफिटी

काही टोमणे काही सुविचार

नवी भर दि. २३-०९-२०१९ : वॉट्सअॅपवरून साभार

३८७ विचारशब्द

नवी भर दि. २५-०९-२०१९

आणखी काही जुन्या ग्राफिटीज माझ्या संग्रहातून

या ग्राफिटीज कुणी तयार केल्या होत्या ते मला तेंव्हाही माहीत नव्हते.  ज्यांनी तयार केल्या आहेत  त्यांचे आभार मानून त्यांच्या अनुमतीची याचना करीत आहे.

जुनी ग्राफिटी १

जुनी ग्राफिटी २

प्रदर्शनातल्या पुणेरी पाट्या

काही अस्सल पुणेरी पाट्या इथे http://assal-marathi-puneri-patya.blogspot.com/

मकरसंक्रातीची माहिती आणि शुभेच्छा

नवी भर दि.१५-०१-२०२१

चंद्रकळा

आठवणीतील चंद्रकळेचा
गर्भरेशमी पोत मऊ
गर्भरेशमी पदरापोटी
सागरगोटे नऊखऊ

आठवणीतील चंद्रकळेवर
तिळगूळनक्षी शुभ्र खडी
कल्पनेत मी हलक्या हाती
उकलून बघते घडी घडी

आठवणीतील चंद्रकळेचा
हवाहवासा वास नवा
स्मरणानेही अवतीभवती
पुन्हा झुळझुळे तरुण हवा!

आठवणीतील चंद्रकळेच्या
पदराआडून खुसूखुसू
जरा लाजरे,जरा खोडकर
पुन्हा उमटते गोड हसू.

आठवणीतील चंद्रकळेवर
हळदीकुंकू डाग पडे
संक्रांतीचे वाण घ्यावया
पदर होतसे सहज पुढे

शांता शेळके

मकर संक्रांति २०२१

makar sankrant2

नवी भर दि. १५-०१-२०२०

🌞
भास्करस्य यथा तेजो
मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो
वर्धतामिति कामये।।
🌞
मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।
💐🙏
अर्थात
जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
🌹🌞मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🕉🚩🌹
—–
दाणा तिळाचा
गोडी गुळाची
जेव्हा भेटले
मिसळून गेले
करू म्हणता वेगळे
भलते कठीण झाले
तैसे होऊन रहावे
तिळगुळासम जगावे.
डाॅ. तरुजा
——————-
कणभर तीळ (आठवणीतील कविता)

वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा
उडत चालले टणाटणा !
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण !

तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर !
” तिळा , तिळा , कसली रे गडबड ? ”
” थांबायला वेळ नाही .
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड !”
” ऐक तर जरा , पहा तर खरा ,
कणभर तिळाचा मणभर नखरा ! ”
“बघा तरी थाट ! सोडा माझी वाट !”
” बघू या गंमत , करू या जंमत !
चला रे जाऊ याच्याबरोबर .”

तीळ चालला भराभर . वाटेत लागले ताईचे घर .
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात !
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
” घाल मला पाकात, हलवा कर झोकात.”
ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत .
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा गेले घाबरून!

पण तीळ पाहा कसा ?
हाय नाही , हुय नाही , हासे फसफसा !
पाकाने खुलतोय , काट्याने फुलतोय !
अरे , पण हे काय ? तीळ कुठे गेला ?
काटेरी , पांढरा हलवा कुठून आला ?

” वाटाण्या , फुटाण्या , शेंगदाण्या,
पाहिलीत गंमत ? कणभर तिळाची मणभर करामत !
एवढासा म्हणून हसलात मला,
खुलवीन मी तर सर्व जगाला ! ”

(१९७८-७९ इ.२ री बालभारती कवीचे नाव -अज्ञात)


संक्रांत १

संक्रांत २

संक्रांत ३

संक्रांत ४

संक्रांत ५


मकर संक्रांत २०१९

makar sankranti

वैविध्य संक्रांतीचे

मानव हा उत्सवप्रिय प्राणी आहे. म्हणूनच भारतात लोक कोणता ना कोणता सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात, त्यातलाच हा ‘संक्रांत’ सण! ज्यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसाला मकरसंक्रांत – ‘मकर संक्रमण’ असं म्हणतात. त्या वेळी उत्तरायण सुरू होते आणि दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. पौष महिन्याच्या कृष्णपक्षात सुरुवातीलाच हा सण येतो. हवीहवीशी वाटणारी ऊबदार गुलाबी थंडी आता जाण्याच्या मार्गावर असते. या वेळी नवीन आलेले धान्य प्रथम देवाला अर्पण करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. असा हा संक्रात सण आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रांतात उत्साहाने साजरा केला जातो, कसा ते पाहा –
बंगालमधील लोक या वेळी नवीन आलेले धान्य, तांदूळ यांच्या लोंब्या घेऊन लक्ष्मी-दुर्गाची पूजा करतात. ते लोक पक्वान्नही नवीन आलेल्या तांदळाचेच बनवतात. त्याला ‘पिथे’ म्हणतात. म्हणजे नवीन आलेल्या तांदळाच्या पिठाची पारी करून नारळ, गुळाचे पुरण घालून गोड करंजी बनवतात.
मध्य प्रदेश – उत्तर प्रदेश येथील तिळगुळाला ‘रेवडी’ म्हणतात. ती आपण येथेही पाहतो. पण ‘गझग’ हा तिळाचा विशेष प्रकार येथे असतो. साखरेच्या पाकातील चिक्की प्रकारासारखाच हलका पण कुरकुरीत असा हा पदार्थ असतो. तो फक्त येथेच मिळतो.
गुजरात-सौराष्ट्र-काठेवाड येथे स्त्रिया संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला ‘खिचडा’ करतात. त्यात हरभरे, मटार, गहू, तांदूळ, ज्वारी, ऊस, बाजरी, मूग, गाजर, फ्लॉवर, वांगी घालतात. तिळाचे दाणे, खोबरे, गूळ घालून लाडू करतात. ते घरी येणार्‍यांना दिले जातात. विशेष म्हणजे येथील स्त्रिया कुरमुरे, दाणे, डाळे यांचे गुळाचे लाडू बनवतात.
बंगलोर-(कर्नाटक) येथेही नवीन आलेल्या तांदळाची चणाडाळ, दूध, गूळ घालून ‘हुग्गी’ (खीर) करतात. या ‘हुग्गी’ बरोबर चिंचकोळ, दाणे, तीळ, मेथी, जिरे, गूळ, मीठ, मिरची, कढिपत्ता घालून ‘गोज्जू’ही करतात.
मद्रास येथील ‘पोंगल’ ही खीर फार प्रसिद्ध आहे. मूगडाळ आणि तांदूळ तुपावर भाजून शिजवायचे आणि त्यात दूध, गूळ घालून ही खीर बनवायची.
पंजाबमध्ये तर संक्रातीच्या आदल्या दिवशीच हा सण साजरा करतात. एक दिवस आधीच ‘सरसो का साग’, ‘मकारोटी’, ‘खिचडी’ करून ती दुसर्‍या दिवशी म्हणजे संक्रातीला खातात. तसेच थोडी लाकडे जाळून त्यावर मक्याची कणसे भाजून, मुळा, खीर, रेवडी, भुईमुगाच्या शेंगा एका ताटात घ्यायच्या. अग्नीची पूजा करून त्यात ताटातील थोड्या-थोड्या वस्तू टाकायच्या आणि पूजा संपवायची. प्रसाद म्हणून घरातील सर्वांना खाण्याच्या या वस्तू दिल्या जातात.
आंध्रप्रदेश-तेलंगणात भोगीला ‘खिचडी’ करतात. मिश्र भाजीही असते. आपण महाराष्ट्रात तिळगुळाचे लाडू करतो तर येथे त्याच सामानाच्या कुटाच्या तिळगूळपोळ्या केल्या जातात. हे येथील विशेष पक्वान्न असते.
महाराष्ट्रातही भोगीच्या दिवशी खिचडी, मिश्रभाजी, तीळ घालून भाकरी करतात. संक्रातीच्या दिवशी गूळपोळी करतात.
दाणे, खोबरे, तीळ – हे स्निग्धता, तर प्रेम, गूळ, हे गोडी ही प्रेम व माधुर्याची प्रतीके आहेत. थंडीच्या दिवसात या नवीन आलेल्या पदार्थांचा वापर मुद्दाम केला जातो, कारण आपल्या शरीरात त्यामुळे उष्णता निर्माण होते आणि शरीराचे रक्षण होते. या दिवशी धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक कार्यक्रम केले जातात. ते राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असतात. तिळगूळ देण्याघेण्याने परस्परांवर प्रेम करावे, द्वेष, मत्सर सोडून गोड मधूर भाषण करावे अशी आपली संस्कृती या उत्सवाच्यारूपाने आपल्याला प्रेरणा देते. एकमेकांच्या भेटीने सद्गुणांचे ‘संक्रमण’ करावे, हा या सणाचा हेतू आहे. विद्यार्थी मित्रांनो संक्रांत सणाच्या शुभेच्छा! ‘तिळगूळ घ्या गोड बोला!’
-मीनल पटवर्धन

शिक्षणविवेकवरून …
(Shikshan Vivek) http://shikshanvivek.com//Encyc/2019/1/15/Vaividhya-sankrantiche-.aspx


मकरसंक्रांतीपर्वानिमित्य शुभेच्छा.

मकरसङक्रान्तिपर्व: प्रीत्यर्थे
सर्वेभ्य: शुभाशय: |

मधुरं मधुरं तीलगुडं सकलाम
दत्वा इदं शुभावसरे सकलाम
मधुर संभाषणार्थे प्रार्थयाव:।

🌞 भास्करस्य यथा तेजो
मकरस्थस्य वर्धते।

तथैव भवतां तेजो
वर्धतामिति कामये।।🌞

मकरसङ्क्रान्तिपर्वणः
सर्वेभ्यः शुभाशयाः।💐

अर्थात
जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 👏🏻🙏🏻

हलव्या प्रमाणे,सर्वांगिण धवल यश आणि तिळगुळा सारखे, आप्त ईष्टांचे स्निग्ध मधुर प्रेम, यानी आपले जीवन आनंदमय व
सुसमृद्ध होवो,
ही संक्रांत शुभेच्छा

नात्यांच्या गोडव्याचा हा
सण आहे आला

देतसे तिळ गुळ हा
सदा गोड गोड बोला
.

सर्वाना मकर संक्रांतीच्या शुभेछा
………………..

Sankrant 2014

………………….
One winter festival which marks the start of new season is called by so many names, and in every culture the food prepared is essentially Khichdi (Lentil & Rice preparation) both Sweet (traditionally with Jaggery) and Spicy varieties. The festival traditionally involved eating sweets made of Sesame-Jaggery in all cultures. No matter what you call by name the festival is celebrated all over with similarity.

🌹 🌹 🌹

मकरसंक्रांत लोहडी

Happy Makara Sankranti -_(AP , Karnataka, Kerala, Goa, Maharashtra)

Happy Pongal –(TN & Pondicherry)

Happy Lohri –(Punjab & Haryana)

Sakraat & Makraat — (Bihar, UP, Uttarakhand)

Happy Uttarayan — (Gujarat, Diu, Daman)

Happy Suggi — (Karnataka)

Happy Magh Saaji –(HP)

Happy Ghughuti –(Kumaon)

Happy Makara Chaula -(Odhisha)

Happy Kicheri —(Poorvanchal East UP)

Happy Pousha Sankranti — (Bengal & NE)

Happy Magh Bihu –(Assam & NE)

Happy Shishur Sankraat –(Kashmir )

Happy Makara Vilakku — (Like)

Happy Maaghe Sankrant — Nepal

Happy Tirmoori — Sindh Pakistan

Happy Songkran — Thailand

Happy Pi Ms Lao — Laos

Happy Thingyan –Myanmar

Happy Mohan Songkran — Cambodia

Unity in Diversity

———————————————————————-
पतंग !

यानि, ज़िन्दगी का
पूरा फ़लसफ़ा.
हवा के परों पर
पूरा जीवन.

ज़िन्दगी का हर रंग
रंगीन उम्मीदें ,
रंगीन उतार-चढ़ाव,
जीवन का संतुलन,
हवा के ख़िलाफ़
संघर्ष और ऊँचाई,
सही और ग़लत
दिशा की तमीज़,
जीवन का विस्तार,
अनंत ऊँचाई तक पहुँचने
के सपने और ख़ुशी.
यही कुछ तो है
ज़िन्दगी का फ़लसफ़ा.
संक्रांति शब्द में लगाव है,
जुड़ाव है
यह शीत और बसंत
की सन्धि है,आकाश और धरती का मिलन है,
लोक और शास्त्र का समन्वय है
तन का स्नान
धन का दान
मन की उड़ान और
सूर्य की स्वर्णिम किरणों से सुख और स्वास्थ्य प्राप्त करने का पर्व है मकर संक्रांति
प्रकृति से जुड़े इस पर्व की परम्पराएं ऋतु अनुकूल और आरोग्यदायक हैं
परिवर्तन के पर्व मकर संक्रांति की हार्दिक
शुभकामनाएं🙏🏻🙏🏻

💐गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..🌺

💗मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…💗

🍚या संक्रांतीला तीळगुळ🍚
🌷खाताना आमची आठवण राहू द्या….🌷

🍁उत्कर्षाचे अत्तर सुगंधी🍁
🌸चोहिकडे शिंपावे,…!! 🌸

🌱सुखाचे मंगल क्षण🌱
💐आपणांस लाभावे……….!! 💐
🙏

🌺🌞शुभ सकाळ🌞🌺
💐
🌷मकर संक्रांतिच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा🌷
🌸🙏
💐💐🌹🍚🌹💐💐

तिळगुळ घ्या…..🍚
गोड…गोड..बोला 😊
——————————
रसाळ उसाचे पेर

कोवळा हुरडा अन् बोरं

वांगे गोंडस गोमटे

टपोरे मटार पावटे
हिरवा हरभरा तरारे

गोड थंडीचे शहारे

गुलाबी ताठ ते गाजर

तीळदार अन् ती बाजर
वर लोण्याचा गोळा

जीभेवर रसवंती सोहळा

डोळे उघडता हे जड

दिसे इवल्या सौख्याचे सुगड
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा ….
———————————-

पुणेरी संक्रांत

( पुणेकर वाचकांची क्षमा मागून  थोडी गंमत )

तिळगूळ देण्याचे Timing

सकाळी ९ ते १
संध्याकाळी ४ ते ८

तिळगूळ दिल्यावरच गोड बोलले जाईल !!!! 😁😁

पण हा नियम नाही अपमान पण होऊ शकतो !!!!
😛😝😛😝
दुपारी १ ते ४ तिळगूळ स्वीकारला
जाणार नाही !!!! 😛😛
तसेच दुपारी १ ते ४ गोड बोलले जाणार नाही !!!! 😝😝
मोठी वडी दिल्यास छोटी वडी परत मिळेल !!!!😛😛
छोटी वडी दिल्यास हलवा मिळेल !!!! 😛😛
हलवा दिल्यास परत काही मिळणार नाही !!!!😝😝
हलवा रंगीत Mix कलर चा मिळेल !!!!

उगाच रंगीत दाणे वेचून घेऊ नयेत !!!! 😝😝
हलव्याला किती काटे आहेत हे बघत थांबू नये !!!!😝😝
वडीचा आकार व रंग याबद्दल काहीही Comment करू नये !!!! 😛😝
वडी शांतपणे घरी घेऊन जावी आणि मग खावी !!!! 😛😜
वरील कोणत्याही गोष्टीसंदर्भात शंका असल्यास तिळगूळ देऊ नये. आपापल्या घरी खावा !!!!

😜😜😜😜😜😜😜😜😜
Happy Makar Sankranti

३१ डिसेंबरची (२०१८) गाणी

सूर्योदय ०४

३१ डिसेंबर २०१८, या वर्षातला अखेरचा सूर्यास्त होऊन गेला आहे. आता आणखी काही तासांमध्येच हे वर्षही अस्ताला जाणार आहे. या निमित्याने दोन मजेदार आणि एक गंभीर प्रकृतीचे गाणे सादर करीत आहे.

पहिले गाणे कदाचित गटारी अमूशेचे असेल किंवा ३१ डिसेंबरचे. या वर्षाची मजेदार सांगता करायला फिट्ट आहे. श्री.चिंतामणी जोगळेकर यांचे आभार आणि स्व.शांताबाई शेळके यांची क्षमा मानून ……..

किणकिण किणकिण ग्लास बोलती
झुळझुळ झुळझुळ बियर वाहती
जागोजागी चखणे दिसती
मद्यपी सारे तुटून पडती…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

त्या गावाची गंमत न्यारी
तिथे नांदती व्यसने सारी
कुणी न मोठे कुणी धाकटे
कुणी न बसते तिथे एकटे
सारे झिंगुन, गाती नाचती,
कोणी रडके नाही…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

नाही ऑफिस, नाही वेळा
गटारातही खुशाल लोळा!
उडो, बागडो, पडो, धडपडो,
लागत कोणा नाही…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

तिथली पिंपे वाइन देती
पर्‍या हासर्‍या पेले भरती
झाडावरती मुर्ग लटकती
पेग बनवते तिथली आन्टी
म्हणाल ते ते सारे मिळते,
उणे न कोठे काही…

*स्वप्‍नी आले काही,*
*एक मी गाव पाहिला बाई!*

©चिंतामणी जोगळेकर

हे विडंबन आता पुन्हा एकदा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना वाचायला मिळेल. नावासह प्रसिद्ध करणाऱ्या सर्वांना धन्यवाद..

शांताबाई शेळके यांच्याविषयी पूर्ण आदर आहेच.
———————————

असेच दुसरे एक मद्यगीत

फिटे अंधाराचे जाळे या गाण्याची चाल असलेले ३१ डिसेंबरचे गीत……..

पिती अंधारात सारे
झाले मोकळे हो ग्लास
नाकातोंडातून वाहे
एक उग्र असा वास !!१!!

बार जागे झाले सारे
बारबाला जाग्या झाल्या
सारे जमता हो एकत्र
बाटल्याही समोर आल्या
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास !!२!!

दारु पिऊन नवेल्या
झाल्या बेवड्यांच्या जाती
बारमधेच साऱ्यांच्या
सरु लागल्या हो राती
क्षणापूर्वीचे पालटे
जग भकास भकास !!३!!

जुना सकाळचा प्रकाश
झाला संध्येचा काळोख
दारुड्यांचा दारुड्यांना
दारुनेच अभिषेक
एक अनोखे हे मद्य
आले ग्लासात ग्लासात !!४!!

🍻🍻🍻😝😝😝

कवी- श्री.दे.शि.दारूडे
——————————————————————–

आता एक गंभीर गाणे. डिसेंबर आणि जानेवारी यांना व्यक्तीमत्वे आहेत अशी कल्पना करून त्यांना रंगवणारे.

कितना अजीब है ना,
दिसंबर और जनवरी का रिश्ता?
जैसे पुरानी यादों और नए वादों का किस्सा…

दोनों काफ़ी नाज़ुक है
दोनो मे गहराई है,
दोनों वक़्त के राही है,
दोनों ने ठोकर खायी है…

यूँ तो दोनों का है
वही चेहरा-वही रंग,
उतनी ही तारीखें और
उतनी ही ठंड…
पर पहचान अलग है दोनों की
अलग है अंदाज़ और
अलग हैं ढंग…

एक अन्त है,
एक शुरुआत
जैसे रात से सुबह,
और सुबह से रात…

एक मे याद है
दूसरे मे आस,
एक को है तजुर्बा,
दूसरे को विश्वास…

दोनों जुड़े हुए है ऐसे
धागे के दो छोर के जैसे,
पर देखो दूर रहकर भी
साथ निभाते है कैसे…

जो दिसंबर छोड़ के जाता है
उसे जनवरी अपनाता है,
और जो जनवरी के वादे है
उन्हें दिसम्बर निभाता है…

कैसे जनवरी से
दिसम्बर के सफर मे
११ महीने लग जाते है…
लेकिन दिसम्बर से जनवरी बस
१ पल मे पहुंच जाते है!!

जब ये दूर जाते है
तो हाल बदल देते है,
और जब पास आते है
तो साल बदल देते है…

देखने मे ये साल के महज़
दो महीने ही तो लगते है,
लेकिन…
सब कुछ बिखेरने और समेटने
का वो कायदा भी रखते है…

दोनों ने मिलकर ही तो
बाकी महीनों को बांध रखा है,
.
अपनी जुदाई को
दुनिया के लिए
एक त्यौहार बना रखा है..!

या गाण्यांच्या कवीचे नाव मला माहीत नाही, पण ही गाणी वॉट्सॅपवर भरपूर फिरत आहेत.

नववर्षासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

WISH YOU A HAPPY NEW YEAR

अशाही (मजेदार) पाट्या

पुणेरी पाट्या आता जगप्रसिध्द झाल्या आहेत. त्यांची भरपूर टिंगलही होत असते. पण काही ठिकाणच्या पाट्यांमधला वेगळेपणा हा गुण जगभरात सगळीकडे दिसतो. काही पाट्यांमध्ये अज्ञानाने किंवा चुकून अभावितपणे चुका केलेल्या असतात आणि त्यामधून विनोद निर्माण होतो, तर काही ठिकाणी अफलातून विनोदबुद्धीमधून मुद्दाम सूचक किंवा द्व्यर्थी पण आकर्षक शब्द निवडून त्या लक्षवेधी केलेल्या असतात.
आधी भारतातल्याच पण काही नमूनेदार अमराठी पाट्या पहा. त्यातल्या बहुतेक पाट्या म्हणजे आचरटपणाचेच नमूने आहेत.

अशा पाट्या

खोचक अमेरिकन पाट्या

पुणेरी पाट्यांसारख्याच खोचक अमेरिकन पाट्या पहा. यातल्या ज्या पाट्यांमध्ये केवळ इंग्रजी भाषेतली शाब्दिक कसरत आहे त्यांचा मराठी अनुवाद करता येत नाही कारण उच्चारात साम्य असलेल्या दोन इंग्रजी शब्दांच्या मराठी प्रतिशब्दांमध्येसुद्धा साम्य दिसेल अशा जोड्या मिळणे कठीण आहे. ज्यात मतितार्थ दडलेला आहे अशा पाट्यांचे मी मराठी भाषांतर केले आहे. काही अप्रचलित इंग्रजी शब्दांचे अर्थही शोधून दिले आहेत. त्याने त्या पाटीमधली खोच समजायला मदत होईल.

The Sign Says It All! (नामफलकच सारे काही सांगतात!)

Sign over a Gynaecologist’s Office:
“Dr. Jones, at your cervix.”
(Service च्या ऐवजी cervix)
**************************
In a Podiatrist’s office:
“Time wounds all heels.”
मूळ इंग्लिश म्हण Time heals all wounds,
Podiatrist: a person qualified to diagnose and treat foot disorders
**************************
On a Septic Tank Truck:
Yesterday’s Meals on Wheels
कालचे जेवण आज सेप्टिक टँकमध्ये
**************************
On a Plumber’s truck:
“We repair what your husband fixed.”
प्लंबर सांगतो “तुमच्या नवऱ्याने केलेली (ना)दुरुस्ती आम्ही ठीक करून देतो.”
**************************
On another Plumber’s truck:
“Don’t sleep with a drip. Call your plumber.”
इथे drip या शब्दाचे दोन अर्थ होतात.
**************************
On a Church’s Bill board:
“7 days without God makes one weak.”
Week च्या ऐवजी Weak
**************************
At a Tyre Store
“Invite us to your next blowout.”
**************************
On an Electrician’s truck:
“Let us remove your shorts.” (- Short circuits)
आणि Short म्हणजे अर्धी चड्डीसुद्धा
**************************
In a Non-smoking Area:
“If we see smoke, we will assume you are on fire and take appropriate action.”
आम्हाला धूर दिसला तर तुम्हाला आग लागली आहे असेच समजून त्यानुसार कारवाई करण्यात येईल,
**************************
On a Maternity Room door:
“Push. Push. Push.”
सूतिकागृहाच्या दरवाजावरील पाटी – ढकला, जोर लावून ढकला
**************************
At an Optometrist’s Office:
“If you don’t see what you’re looking for, you’ve come to the right place.”
नेत्रतज्ज्ञ – तुम्हाला जे पहायचे आहे ते दिसत नसेल तर तुम्ही योग्य जागी पोचला आहात
**************************
On a Taxidermist’s window:
“We really know our stuff.”
A taxidermist is a person whose job is to prepare the skins of dead animals and birds and fill them with a special material to make them look as if they are alive.
**************************
On a Fence:
“Salesmen welcome! Dog food is expensive!”
कुंपणावर लावलेली पाटी – विक्रेत्यांनो या, कुत्र्याचे खाद्य महाग असते.
**************************
At a Car Dealership:
“The best way to get back on your feet – miss a car payment.”
मोटारींच्या दुकानातली पाटी – आपल्या पायांवर उभे रहायचे असेल तर मोटारखरेदीचा हप्ता चुकवा
**************************
Outside a Car Exhaust Store:
“No appointment necessary. We hear you coming.”
वेळ ठरवून येण्याची गरज नाही. तुमचे आगमन आम्हाला ऐकू येते
**************************
In a Restaurant window:
“Don’t stand there and be hungry; come on in and get fed up.”
**************************
In the front yard of a Funeral Home:
“Drive carefully. We’ll wait.”
स्मशानाच्या दारी – वाहन काळजीपूर्वक चालवा, आम्ही वाट पाहू.
**************************
Sign on the back of yet another Septic Tank Truck:
“Caution – This Truck is full of Political Promises”
कचरागाडीच्या मागे – सावधान, यात राजकारण्यांची आश्वासने भरली आहेत
—————————————————————

दिव्य इंटरनॅशनल इंग्रजी पाट्या

जरा या इंटरनॅशनल पाट्या वाचून तर पहा. भारतातल्या काही अडाणी लोकांनी इंग्रजीची कशी वाट लावली आहे ते वर पाहिलेच आहे, पण इतर भाषिक लोकही काही कमी नाहीत. त्यांनी वापरलेली यातली दिव्य इंग्रजी भाषा आणि त्यातून निघणारे मजेदार अर्थ??? त्याची मजा मराठी भाषांतरात कशी येणार? तो प्रयत्न उगाच नकोच!

Wonderful English from Around the World
In a BangkokTemple : IT IS FORBIDDEN TO ENTER A WOMAN, EVEN A FOREIGNER, IF DRESSED AS A MAN.

Cocktail lounge , Norway :
LADIES ARE REQUESTED NOT TO HAVE CHILDREN IN THE BAR.

Doctor’s office, Rome :
SPECIALIST IN WOMEN AND OTHER DISEASES.

Dry cleaners, Bangkok :
DROP YOUR TROUSERS HERE FOR THE BEST RESULTS.

In a Nairobi restaurant:
CUSTOMERS WHO FIND OUR WAITRESSES RUDE, OUGHT TO SEE THE MANAGER.

On the main road to Mombasa, leaving Nairobi :
TAKE NOTICE: WHEN THIS SIGN IS UNDER WATER, THIS ROAD IS IMPASSABLE.

In a City restaurant:
OPEN SEVEN DAYS A WEEK AND WEEKENDS.

In a Cemetery:
PERSONS ARE PROHIBITED FROM PICKING FLOWERS, FROM ANY BUT THEIR OWN GRAVES .

Tokyo hotel’s rules and regulations:
GUESTS ARE REQUESTED NOT TO SMOKE, OR DO OTHER DISGUSTING BEHAVIOURS IN BED.

On the menu of a Swiss Restaurant:
OUR WINES LEAVE YOU NOTHING TO HOPE FOR.

In a Tokyo Bar:
SPECIAL COCKTAILS FOR THE LADIES WITH NUTS.

Hotel , Yugoslavia :
THE FLATTENING OF UNDERWEAR WITH PLEASURE, IS THE JOB OF THE CHAMBERMAID.

Hotel , Japan :
YOU ARE INVITED TO TAKE ADVANTAGE OF THE CHAMBERMAID.

In the lobby of a Moscow Hotel, across from a Russian Orthodox Monastery:
YOU ARE WELCOME TO VISIT THE CEMETERY, WHERE FAMOUS RUSSIAN AND SOVIET COMPOSERS, ARTISTS AND WRITERS ARE BURIED DAILY, EXCEPT THURSDAY.

A sign posted in Germany ‘s Black Forest :
IT IS STRICTLY FORBIDDEN ON OUR BLACKFOREST CAMPING SITE, THAT PEOPLE OF DIFFERENT SEX, FOR INSTANCE, MEN AND WOMEN, LIVE TOGETHER IN ONE TENT, UNLESS THEY ARE MARRIED WITH EACH OTHER FOR THIS PURPOSE.

Hotel, Zurich :
BECAUSE OF THE IMPROPRIETY OF ENTERTAINING GUESTS OF THE OPPOSITE SEX IN THE BEDROOM, IT IS SUGGESTED THAT THE LOBBY BE USED FOR THIS PURPOSE.

Advertisement for donkey rides, Thailand :
WOULD YOU LIKE TO RIDE ON YOUR OWN ASS?

Airline ticket office, Copenhagen :
WE TAKE YOUR BAGS AND SEND THEM IN ALL DIRECTIONS.

A Laundry in Rome :
LADIES, LEAVE YOUR CLOTHES HERE AND THEN SPEND THE AFTERNOON HAVING A GOOD TIME.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

या काही विनोदी पाट्या पहा

काल कटिंग सलूनच्या दुकानावर एक पाटी वाचली….
“आम्ही तुमच्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही, मात्र डोक्यावरचे ओझे नक्कीच कमी करू “..😇

इलेक्ट्रिकच्या दुकान वाल्याने फलकावर लिहिलं होतं…..
“तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार”…🤩

चहाच्या टपरीवर असा फलक होता…
“मी साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो.”🤪

एका उपाहारगृहाच्या फलकावर वेगळाच मजकूर होता …
“इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या”😅

इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं वाचून माझं मन भरून आलं ..😢
“आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा “…🙃

पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..🤔
“पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं, म्हणजे जबडा मोठा उघडा” …😲

फळं विकणाऱ्या माणसाने कमालच केली. ..🙄
“तुम्ही फक्त कर्म करा, फळ आम्ही देऊ “…🥴

घड्याळाच्या दुकानदाराने अजब मजकूर लिहिला होता ..🙆‍♂️
“पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा..”😜

ज्योतिषाने फलक लावला होता आणि त्यावर लिहिलं होतं…
“या आणि फक्त १०० रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा …”😳

हसत रहा, हसवत रहा,
स्वस्थ रहा, मस्त रहा 🙏

नवी भर दि. १७-०४-२०२१ . . . . . वॉट्सॅपवरून साभार

पुणे आणि पुणेकर मार्गदर्शक

यात पुण्यातल्या काही प्रसिद्ध जागांच्या नावांचे काही मजेदार अर्थ दिले आहेत. त्या जागा तशा निघाल्या नाहीत तर उगाच आश्चर्य वाटून घेऊ नये. त्यानंतर पुण्यामधील आणखी काही जागांची खास पुणेरी स्टाइलने पोस्टर्समधून ओळख करून दिली आहे तसेच खास पुणेरी विनोद (पुणेरी तडका) ही दिले आहेत 

याशिवाय पुणेरी शिष्टाचार, पुणेरी चौकसपणा याही जगावेगळ्या गोष्टी आहेत. आणि हो,  पुण्याला मोठा इतिहास आहे. आता इथे आलाच आहात, तर हे सगळेही खाली दिलेल्या दुव्यांवर वाचालच.
पुण्याचा इतिहास

असे घडत गेले ऐतिहासिक पुणे

पुणेरी आचारसंहिता http://anandghan.blogspot.com/2009/01/blog-post_08.html

‘शनिवारवाडा, पर्वती  अप्पा बळवंत चौक आणि स्वारगेट वगैरे’ https://anandghare.wordpress.com/2019/02/21/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95

पुणे, आयपीएल आणि पुणेरी पाट्या (सन २०१०मध्ये पुणे संघाला आयपीएलवर प्रवेश दिला होता त्या काळातल्या)
https://anandghare.wordpress.com/2010/03/28/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/

पुणे का आवडते?

https://anandghare.wordpress.com/2020/04/07/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a4%e0%a5%87/

आठवणीतले (चित्रमय) पुणे

आठवणीतले (चित्रमय) पुणे


या पानावर वाचा ………..
पुण्यातल्या काही प्रसिद्ध जागा
पुणेरी सभागृहातील आचारसंहिता
पुण्यासंबंधीचे चुटकुले
पुणे आणि स्कार्फ
पुणेरी झटका…
पाणी वाचविण्याचे काही पुणेरी उपाय

पुणेरी शिष्टाचार
पुणेरी तिरकसपणा
अमुचे पुणे
अस्सल पुणेकर

पुण्याची कहाणी
पुणेरी ससा ?
नव्या पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन
सुवासिक पुणे
माजोरी पुणे
हिंजवडीची चीड ?
खास पुणेरी शब्दकोष
पुण्याची वाडा संस्कृति
पुण्यवान!

————————————————

पुण्यातल्या काही प्रसिद्ध जागा

आडवी तिडवी वाट — वाकडेवाडी

धनवान रस्ता — लक्ष्मी रस्ता

आजोबांची पेठ — नाना पेठ

थंड हवेचे ठिकाण — सिमला ऑफीस

आदर्श वसाहत — मॉडेल कॉलनी

एकमेकांना मदत करणारा गाव — सहकार नगर

उग्र देवतेचा कट्टा — शनिपार

देवांचे पाघरुण — पासोड्या विठोबा

एक फळ देणारा दरवाजा — पेरुगेट

बेवडा ब्रीज — दारुवाला पूल

दगडाचा देव — पाषाण

अरण्यात रहाणाऱ्या देवाचे नाव — अरणेश्वर

थकल्या भागल्यांची वाडी — विश्रांतवाडी

पाव दरवाजा — क्वार्टर गेट

सुखी लोकांचे गाव — सुखसागरनगर

Pune guide 1

Pune guide 2

WhatsApp Image 2018-11-22 at 08.18.43

पुणेरी सभागृहातील आचारसंहिता

पुणेरी आचारसंहिता

पुण्यासंबंधीचे चुटकुले

मुंबईकर- तुमच्याकडे वडापावमध्ये तिखट चटणी का नसते?

पुणेकर- आमच्या जिभेला जन्मजात लावलेली असते..

😜😝😂

मुंबईकर : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो

पुणेकर : वा तरीच छान थंड होता

किमान शब्दात कमाल अपमान

😁😜

पुणेरी झणझणित खमंग फोडणी (PUNERI. TADKA)
😄😄😄😄😄

पुणेरी गिऱ्हाईक : मारुती चे Spare Parts आहेत काय?

पुणेरी दुकानदार : डोळे फुटले आहेत की वाचता येत नाही? बाहेर इतका मोठा बोर्ड टांगलाय आम्ही फक्त मारुतीचेच Spare Parts विकतो.

पुणेरी गिऱ्हाईक : ठीक आहे, एक गदा द्या

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

लेटेस्ट पुणेरी किस्सा

जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?

नेने : हो, पण पैसे पडतील

जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुण्याच्या टिळक रस्त्यावरून, बाईक वरून जात होतो. एक स्त्री पुढे स्कूटरवर होती. अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली (अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता).
मी तिला धडकलो. तिला म्हणालो, “अहो कमीतकमी हात तरी दाखवा वळताना”
तर ती म्हणाली, “त्यात काय हात दाखवायचा?, मी रोजच इकडे वळते”

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना

पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत

पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय??

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

मुलगा : चाहूंगा मॆ तुझे सांज सवरे

मुलगी : आणि दुपारचे काय?

मुलगा : १ ते ४ विश्रांती. मी पुण्याचा आहे
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुण्यातल्या एका फ्री वायफाय नेटवर्कचा पासवर्ड, “घे भिकारड्या”
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना

पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी : हा आहे साहेब

पुणेकर : आधी ते खर्च कर
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुण्यातील एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले. कितीही मोठा केला तरी ते आजून मोठा करायला सांगायचे.

म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा”

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

जोशी काकू : बघा, मंडईतून भाजी आणण्यापासून ओलिंपिक मेडल पर्यन्त सगळं बायकांनाच आणावं लागतंय

जोशी काका : आम्ही पुरुष मेडल बीड्ल्सच्या भानगडीत पडत नाहीत कारण कोणतंही मेडल आणले तरी बायको नाक मुरडणारच आणि ते बदलून आणायला पाठवणार…. अगदी गोल्ड मेडल जरी आणले तरी बायकोला डिझाईन पसंत पडेलच याची काय गॅरंटी?

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

आमच्या पुण्यातल्या लोकांना सगळं कसं जवळ हवं असतं
पश्चिमेकडे प्रति शिर्डी तयार करून ठेवलीय आणि
दक्षिणेकडे प्रति बालाजी
आता फक्त खडकवासल्यात प्रति अरबी समुद्र तयार करायचा बाकी आहे
मग सगळं कसं जवळ जवळ

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

स्वारगेट वर मुंबईची मुलगी आपल्या कॉलेज स्टाईल मध्ये तुच्छतेने कंन्डक्टरला विचारते : हे डबडं केव्हा हलणार इथून?

कंन्डक्टर (अदबीने, सस्मित) : कचरा भरल्यानंतर लगेचच !

तात्पर्य : महामंडळाच्या कंन्डक्टरचा नाद करू नये
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुणेकर : काका पावशेर रताळे द्या

दुकानदार : पिशवीत देऊ?

पुणेकर : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत होत्या.
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.

काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या, “अय्या तू कोण???”
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुण्यातील एक नामवंत डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं…

पुणेरी पेशंट : हरकत नाही… तुमची उतरल्यानंतर येतो मी परत
🤣🤣🤣😃

धन्य ते पुणेकर!!!
एक पुणेकराने बंगल्याबाहेर एक पाटी लावली.
“वस्त्रपात्रप्रक्षालिका पाहिजे”
जो तो ती पाटी वाचून विचारात पडायला लागला. की बुवा याचा नेमका अर्थ काय? आता विचारायचे तरी कुणाला?

दुसर्‍याच दिवशी एका ‘जाणकार’ चाणाक्ष पुणेकराने त्या बंगल्याबाहेर शेजारीच एक टेबल मांडले, आणि त्यावर एक पाटी लटकाविली,

“शेजारी लिहिलेल्या पाटीवरील मजकूराचा अर्थ पाहिजे असल्यास खालील क्रमांकावर १० रुपयांचे डिजीटल पेमेंट करावे, मेसेज द्वारे उत्तर मिळेल.”

ज्यांनी ज्यांनी पेमेंट केले, त्यांना त्यांना मेसेज मिळत राहिला, “भांडी धुणे करायला बाई पाहिजे”

28-08-2019

😃😃😃🤣🤣

जपान मधे एक म्हण आहे,
If one can do,
You must do,
If no one can do,
You should do.
पुण्यात हीच म्हण होते
If one can do,
Let him do,
If no one can do,
मी कशाला धडपडू.

😃😃😃🤣🤣

तो दिसायला एकदम साधारण होता. ती पण जरा सावळीच होती. तरी सर्व मोहल्यातील लोक त्यांना

लक्ष्मी-नारायणाचा जोडा म्हणायचे;

कारण …..

.

.

तो लक्ष्मी रोडला राहायचा आणि ती नारायण पेठेत राहायची… !!!

. . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . .. . . . . . . . .. .. .  . .15/09/2019
😂🤣😂🤣😂🤣

एक पालेभाजीपूर्ण वाक्य (अर्थात पुण्यातीलच)

तू “माठ”आहेस, सारख्या “चुका” करतोस, उद्या “पालका” सोबत ये! 😡
यावर विद्यार्थी म्हणाला…

“पडवळ” मॅडम… मला “गवार” समजू नका… माझ्या डोक्यात “बटाटे” भरलेत का?
दिसायला “लिंबू” टिंबू असलो तरी “कोथिंबीरे” आडनाव आहे माझं…
आणि कोणीही “आलं” गेलेलं मला ‘”भुईमुगाच्या” टरफला सारखं फेकू शकत नाय..

ना “कांदा” ना “लसून”….
आमच्या नादाला लागाल तर डायरेक्ट ससुन…

. . . . . . . . . . . . . . नवी भर दि. १०-१०-२०२०
😄😄😄 😁😁😁😁😁

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुणे आणि स्कार्फ

ही लंडनमध्ये 2015 मध्ये घडलेली सत्य घटना आहे.. ………. (असं म्हंटलं की लोकांना ते खरं वाटतं असं आमच्या पुण्याच्या लोकांना वाटतं)
लंडनमध्ये एका उच्चभ्रू , श्रीमंत gorge कुटुंबीय सहलीला गेलेले असताना त्यांच्या घरात जबरी चोरी होते..CCTV च्या फुटेजचा आधार आणि कुटुंबाशी संबंधित इतर सर्वांची माहिती घेऊन पोलिस काही संशयित तरुणांना पकडून आणतात.. परंतु CCTV फुटेज मध्ये चोरांनी चेहरा घट्ट झाकला असल्याने पोलिसांना त्यांना ओळखणे अवघड जात होते..त्याच वेळी त्यांना एक खबर मिळते कि लंडनमध्ये एक भारतीय युवक आहे तो या कामी तुम्हाला मदत करु शकेल.. हे संमजताच पोलिस त्या युवकाला पाचारण करतात आणि cctv फुटेज पाहून संशियत ओळखायला त्याची मदत मागतात..तो तरूण आपल्या लौकिकास जागतो, आणि काही वेळातच ते फुटेज पाहून त्या संशियातमधील नक्की चोर कोण आहे हे ओळखतो..पुढे अर्थात पोलिस त्या चोराची ट्रायल घेऊन , त्याच्या घराची तलाशी घेऊन मुद्देमाला सकट हि केस solve करतात.

पुढे यथावकाश त्या चोराला शिक्षा होते..आणि आपल्या घरातला मुद्देमाल परत मिळाला म्हणुन Gorge कुटुंबियांतर्फे एक पार्टी आयोजित केली जाते..त्यामध्ये चोर ओळखणाऱ्या त्या तरुणालासुद्धा आंमत्रित केले जाते आणि त्याला सर्व जण विचारतात कि , तुझे आम्ही अत्यंत आभारी आहोत, तुझ्यामुळेच आमची चोरी पकडली गेली..पण हे एक प्रश्न आहे कि त्या चोरानी इतके घट्ट तोंडाला बांधले होते..अक्षरशः पोलिस सुद्धा cctv फुटेज पाहुन ओळखु शकले नाही. पण तू हे कस काय ओळखु शकलास ?

यावर अत्यंत विनम्रपणे तो मुलगा उत्तर देतो, actually माझ नाव विनय आहे….माझा जन्म पुण्यातला,
* तिथे आम्ही लहांनपणापासून मुलींना स्कार्फमध्येच पाहतो. हळू हळू वाढत्या वयाबरोबर हे स्कार्फ प्रकरण मनात इतके घट्ट रुजत जाते कि आम्ही कोणी कितीही घट्ट स्कार्फ बांधला असला तरीही त्याला आम्ही सहज ओळखु शकतो इतका आमचा खोल अभ्यास होतो…………
* कारण जगाच्या पाठीवर आमचे पुणे हे एकमात्र शहर असे आहे कि जिथे ऋतु कोणताही असला तरीही “स्कार्फ” बाँधणे हे सक्तीचे असते..!

🤣😂🤣😂🤣

पुणेरी झटका..😄

सिनेमाच्या इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या जोशीकाकूंनी सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले, “का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने ते कळवळले..!😳 ते तुम्हीच का?

रागाने लालबुंद झालेला तो, “हो.. मग काय…. अत्ता सॉरी म्हणणार आहात का?”😛

जोशीकाकू :- सॉरी..? नाही हो..

(मागे वळून पाहत) या. बरोबर आहे. हीच लाईन ..!

😜😂😜 😜 😜 😜 😜
वॉट्सॅपवरून साभार.

—————————

नवी भर दि. १८-०४-२०१९ :

उन्हाळयानिमित्त पाणी वाचविण्याचे काही पुणेरी उपाय ..

१) पाणी दुसऱ्याला ‘धुण्यासाठी’ वापरू नका.😃😃

२) कोणालाही ‘पाण्यात पाहू’ नका.😃😃

३) ‘लिव्ह-इन’ सोडून ‘पाणिग्रहण’ करा😃😃.

४) हजामत करायची असल्यास ‘बिनपाण्याने’ करा !😃😃

५) पाहुणे आल्यास ‘आमटीत पाणी न वाढवता’ मसाला वाढवा.😃😃

६) पाणचट ‘विनोद’ करू नका.😃😃

७) कोणाच्याही माहेरच्या/सासरच्या माणसांचा ‘पाणउतारा’ करू नका.😃😃

८) मित्रांबरोबर बसलात तर, ‘पाणी कमी’ टाका.🍹🍹😃😃😃😃😃😃😃

😄😜😝😂😂🤑😛😉😉😜😝😀😀😄😜😝😂😂🤑😛😉😉😜😝😀😀
हिंदी शेजारीण (मराठी बाईला) : “दोपहर को क्या करती हो..???”🤔🤔🤔

पुणेरी (मराठी) बाई : “थोडा गिरती हूँ…!!”

शेजारीण : “क्या???”🤔🤔

मराठी बाई : “हाँ, हमारे पुणे में सब लोग दोपहरको 1 से 4 थोडा थोडा गिरते हैं..!!”

शेजारीण : “गिरनेसे आप लोगों को लगता नहीं…??”🤔🤔

मराठी बाई : “लगता है ना,

गिरने के बाद ताबड़तोब डोळा👁 लगता है….!!”
😄😜😝😂😂🤑😛😉😉😜😝😀😀
मुंबईकर :- ” काय करता आपण ?”

पुणेकर :– ” मोठा बिझनेस आहे माझा ! ”

मुंबैकर:–” कसला बिझनेस आहे आपला ?”

पुणेकर :–” सेलिंग ऑफ सॉफेस्टिकेटेड मॅन्यूअल गारमेंट होल्डिंग डिव्हाइसेस !!! ”

मुंबैकर :– ” वा वा ! म्हणजे नक्की काय ? ”

पुणेकर :– “पायजमा , परकर यांचे नाडे विकतो मी !!!”
😎😜😆🤪😄😜😝😂😂🤑😛😉😉😜😝😀😀


श्री.समीर जाधव यांच्या #आम्ही_ते_वेडे_ज्यांना_आस_इतिहासाची  या ब्लॉगवर पुण्यासंबंधी एक खास लेख आहे आणि त्यासोबत पुण्याची ऐतिहासिक छायाचित्रे दिली आहेत. ती या स्थळावर पहा : https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B8_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80?source=feed_text&epa=HASHTAG


पुणेरी शिष्टाचार

पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते. म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती आहे. काही उदाहरणे देत आहोत ..

पुणेकराकडून पुणेकरांसाठी

Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks
………….. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .

Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls
………. ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे.. तुमच्या गप्पांसाठी नाही

Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first
…………….. ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल ..

Please don’t use the same elevator in case the same is being used by an associate along with client
…………… ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही.

Avoid speaking in regional languages within the office premises
………….. गावच्या गप्पा घरी !

Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette buds only into ash pans provided for
…………… ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडी चावापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत. गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही ..

When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office
…………. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.

Please keep a check on the noise levels in the pantries
………… संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसंआहोत.

. . . . . . . . . . . संपादन (नवी भर) दि.२५-०६-२०१९


पुणेरी तिरकस चौकसपणा

पुणेरी चौकसपणा

. . . . . . . . . . . संपादन (नवी भर) दि.२५-०६-२०१९

—————————————-

अमुचे पुणे

पुणे राकट    पुणे चिकट   पुणे हेकट
असेना का?

पुणे भाग्यवंत    पुणे धनवंत    पुणे ज्ञानवंतही
आहे ना?

पुणे गर्विष्ठ    पुणे महाशिष्ट     पुणे पोथीनिष्ठ
असेना का?

पुणे इतिहास    पुणे भविष्य     पुणे वर्तमानही
आहे ना?

पुणे वादांचे    पुणे वेदांचे     पुणे वेडाचेही
आहे ना?

पुणे शिवबाचे      पुणे रावबाचे    पुणे पुण्याईचे
आहे ना?

पुणे घाटी   पुणे मऱ्हाटी  पुणे भटी
असेना का?

चिकित्सकांचे    विक्रमवीरांचे    टिळक-आगरकरांचेही
आहे ना?

वाहनांच्या बेशिस्तीचा     पुंडांच्या मदमस्तीचा     सत्तेवरच्या हस्तींचा
आखाडा हा असेना का?

महाराष्ट्राच्या धरतीचे    मुळामुठेच्या भरतीचे      मुंबईकरांच्या विश्रांतीचे
आद्य ठिकाण आहे ना?

जगात प्रसिध्द    स्वयंसिध्द     लक्ष्मीलुब्ध
आहे ना?

विनोदाचे लक्ष्य    टिंगलीला भक्ष्य    सर्वांसमक्ष
असेना का?

सुंदरीलाच मिळतात    शालजोड्या शेलक्या    पुनवडी सुंदर
आहे ना?
_______

पुणे पुणे नी निव्वळ पुणे        गल्लोगल्ली बापट काणे
संगे वसती चव्हाण राणे        जगण्यापुरते नसते खाणे
जोतो अपुल्या चवीने हाणे      जिवंत येथे अस्सल गाणे
हरेक घरटी अस्सल नाणे      मिळती कोठे इतके शाणे
हरेक जपतो अपुले बाणे      अभिमानाचे सोळा आणे
सौजन्याच्या चवल्या उणे      तरीही विनंती परमेश्वरा
सत्वर व्हावे   अमुचे पुणे

खास पुणेकर आणि पुणेकरांसाठी ही स्पेशल कविता

कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🏻

वॉसॅपवरून साभार दि.२९-०५-२०१९

**************************

३४६ पुणेरी चांभार

वॉसॅपवरून साभार दि.०६-०६-२०१९


खरा पुणेकर

मुळात पुण्यात जन्म घ्यायलाच पुण्य लागतं… पहिल्या उष्टावणात पु ना गाडगीळां कडून घेतलेली अंगठी चितळ्यांच्या श्रीखंडात बुडवून बाळाला चाटवली की त्या बाळाच्या पुणेकर होण्यास सुरुवात होते… कोवळे नाजूक दात आले की काका हलवाया कडची आंबा बर्फी किंवा काजू कतली खाल्ली की मग हा पुणेकर कोणाचेही दात घशात घालू शकतो… शालेय जीवनात कयानीचा केक खाल्ला नाही तर पुणे महानगर पालिका पालकांना दंड करते म्हणे… वैशाली, रुपाली, वाडेश्वर मध्ये एकदा तरी खाल्लं नसेल असा माणूस यौवनाची पायरी घसरून एकदम म्हातारा झाला असंच समजावं… उगा कोल्हापुरातील २-३ आणि नाशकातील २-३ मिसळींचं कौतुक ऐकवणाऱ्याला प्रत्येक चौकात नव्या चवीची मिसळ खिलवणारा खरा पुणेकर … आमची गणेशोत्सवाची लांबणारी मिरवणूक दिसते पण मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी खरं कळतं ते पुणे, पुणेरी आणि पुणेरीपण अख्खी पुण्यनगरी दृष्ट लागेल अशी सजलेली असते… मराठी संस्कृती आणि नाविन्याची कास धरायची वृत्ती जपली असेल तर ती फक्त आणि फक्त पुण्यानेच… बाकी पुणेकरांपेक्षा १ ते ४ बंदचा त्रास पुणेतरांनाच जास्त होतो तो त्या वेळेमुळे नाही तर आपलं शहर पुण्यासारखं नाही यामुळेच

बहुत काय लिहिणे ?

ता. क.
जन्म नुसता पुण्यात असून चालत नाही तर तो कसबा , शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रास्ता पेठ नाना, गणेश, नारायण ,सदाशिव ह्या पेठांमधील असला तर सोन्याहून पिवळं .

😊😊

                    .. . . . . . . वॉटसॅपवरून साभार दि.१६-०६-२०१९

अस्सल पुणेकर

घाई आणी गर्दीत दगडूशेठ किंवा तळ्यातल्या गणपतीकडे बघुन जो जागेवरूनच मनोभावे नमस्कार करतो तो पुणेकर !
बाकरवडी आणी श्रीखंड चितळेंचच आणणारा आणि खाणारा तो पुणेकर !
एके ठिकाणी मिसळ चापतांना , दुसरी कडची मिसळ कशी भारी ह्याची चर्चा करणारा पुणेकर !
कॅम्प आणि एफ सी रोडवर ‘हिरवळ’ पहायला जातो तो पुणेकर !
पुणे मुंबई प्रवास डेक्कन क्वीन ने करून ऑम्लेट खाणारा तो पुणेकर !
पुण्यातील अठरा पेठांची नावे घडा घडा सांगतो तो पुणेकर !
पेशव्यांबद्दल आदर आणि पेशवाई चा थाटाबद्दलं अभिमान बाळगतो , तो पुणेकर!
कोणत्याही उपनगरात रहात असतांना , मुळ शहरात आल्यावर ‘ गावांत आलो ‘ असे म्हणतो , तो पुणेकर !
पुण्याला ‘ पुना’ म्हणणा-यांचा तिरस्कार करतो तो पुणेकर!
एम एच १२ सोडुन इतर नंबरच्या गाड्यांना गनिम समजतो तो पुणेकर !
हेल्मेट वापरण्याबद्दल जो न्यूनगंड बाळगतो तो पुणेकर !
इंच इंच भुमी लढवणार्या सैनिका प्रमाणे ट्रॅफीक मधे इंच इंच अंतर गाडी पुढे सरकवतो तो पुणेकर !
पुण्यात बाहेरून रहायला येउन स्वतःला उगाच पुणेकर म्हणवणार-याकडे दयाबूद्धीने बघून मनातल्या मनात हसतो तो पुणेकर !
वयाच्या साठीत आपल्या शाळा कॉलेजचा अभिमान बाळगतो तो पुणेकर !
मानाचे पाच गणपती चटकन सांगतो तो पुणेकर आणी विसर्जनाची मिरवणूक किती तास चालली ह्याची अभिमानाने चर्चा करतो तो पुणेकर !
आपल्या व्यवहारी स्वभावाला कंजूस आणी सडेतोड बोलण्याला कुजकट म्हणणा-यांकडे भुतदयेने बघुन दुर्लक्ष करणारा पुणेकर !
प्रत्येक गोष्टीत पुर्वी सारखी मजा राहिली नाही म्हणून हळहळणारा पुणेकर !
खरी गुणवत्ता ओळखून मनापासुन दाद देऊन , कौतूक करून , डोक्यावर बसवतो , तो पुणेकर !
सवाई गंधर्व महोत्सवापासुन जुन्या गाणांच्या कार्यक्रमांचा रसिकपणे आस्वाद घेतो तो पुणेकर !
जिलब्या गणपती, पत्र्या मारूती , पासोड्या विठोबा , खुन्या मुरलीधर , उंटाडे मारूती , दत्ताचे देऊळ, माती गणपती ही देवस्थाने ओळखतो तो पुणेकर!
खरेदीसाठी मॉल पेक्षा तुळशीबाग , लक्ष्मी रोड , फॅशन स्ट्रीट ज्याला जवळची तो पुणेकर !
श्री ,बेडेकर ,रामनाथ , अप्पा , खिका ह्या शब्दांची उकल ज्याला जमली तो पुणेकर !
भाऊ महाराजाचा बोळ , पंतसचिवाची पिछाडी, तपकीर गल्ली , तांबे बोळ, घसेटी पुल , खजिना विहीर, साततोटी ही ठीकाणे ज्याला कळाली तो पुणेकर !
वैशाली ,रुपाली , वाडेश्वर ह्या खांद्यसंस्थांनांना वारंवार अनुभवण्याचा वारसा जो पुढच्या पिढीपर्यंत पोहचवतो तो पुणेकर !
आपल्या बोलण्यात अरेच्चा , आयला , च्यायला , बोंबला पासून अस्खलित , अद्ययावत , यच्चयावत ह्या सारख्या शब्दांचा वापर सहज करतो तो पुणेकर !
सर्वांनी कर जोडावेत असा जो असतो तो पुणेकर !!!
सर्व अस्सल पुणेकरांना समर्पित !!🌹😊

🙏💐🙏 .. . . . . . . वॉटसॅपवरून साभार दि.२९-०१-२०२१

पुण्याची कहाणी

आटपाट नगर होतं ​
विद्येचं माहेरघर होतं ​​​​
​​​​
सह्याद्रीच्या कुशीत होतं​​​​
टेकड्यांच्या मुशीत होतं ​​​​
​​
मुळा-मुठा निर्मळ होती ​​​​​
गोड पाण्याची चंगळ होती ​​
​​
​काळ्या मातीत कस होता​​​​​​
वरण भात बस्स होता​​​​​​

निसर्गाचं देणं होतं ​​​​
पाताळेश्वरी लेणं होतं ​​​​
​​​​
नाव त्याच पुणं होतं ​​​​
खरंच काही उणं नव्हतं ​​​​
​​​​​
शिवबाचं बालपण होतं​​​
जिजामातेचं धोरण होतं​​​
​​
मोगलाई कारण होतं​​​
पुण्याचं ज्वलन होतं​​​
​​​
​छत्रपतींचं स्वराज्य होतं​​​​
पेशव्यांचं अटकेपार राज्य होतं​​​​
​​​​
निधड्या छातीचे मावळे होते​​​​
पराक्रमाने न्हायले होते​​​​

पर-स्त्री मातेसमान होती​​​​
कोल्ही-कुत्री गुमान होती​​​​
​​
नवसाला पावणारे गणपती होते​​​​
तालमीसाठी मारुती होते​​​​
​​
चिरेबंदी वाडे होते​​​​
आयुर्वेदाचे काढे होते​​​​

अंगणात रांगोळी होती​​​​​​
घराची दारं उघडी होती​​​​​
​​​​​​
संध्याकाळी दिवेलागणी होती​​​​
घरोघरी शुभंकरोती होती​​​​

गृहिणी अन्नपूर्णा होत्या​​​​
तडफदार स्वयंसिद्धधा होत्या
​​​​
जेवायला साधी पत्रावळ होती ​​
चौरस आहाराने परिपूर्ण होती​​​

वेदांचा अंगिकार होता​​​​​​​
विद्वान लोकांचा संचार होता​​​​​​

टिळकांची सिंहगर्जना होती​​​​
आगरकरांची सुधारणा होती​​​​
​​​​
फडके चाफेकरांचं बंड होतं
सावरकरांचं अग्निकुंड होतं
​​​
रानडे, फुले, कर्वे झटले होते​​​
बायकांचे जगणे फुलले होते​​​
​​
विद्वत्तेची पगडी होती​​​​
सन्मानाची भिकबाळी होती​​​​

घरंदाज पैठणी होती
शालिन नथणी होती

काटकसरीचा वारा होता
उधळपट्टीला थारा नव्हता

सायकलींचे शहर होतं
निवृत्त लोकांचे घर होतं

एका दमात पर्वती चढणं होतं
दुपारी उसाचा रस पिणं होतं

पुण्याची मराठी प्रमाण होती​​​​
शुद्धतेची कमाल होती​​​​

कलाकारांची कर्मभूमी होती​​​
पुणेकरांची दाद जरूरी होती​​​

सवाई गंधर्व, वसंत उत्सव होते
पुणेकरांना अभिमानास्पद होते
​​​​
सार्वजनिक मंडळे विधायक होती​​​​
समाज-स्वास्थाला तारक होती​​​​
​​​​
पण परंतु किन्तु….​​​​​
​​​​​
औद्योगिक क्रांती झाली​​​​
पुण्यामध्ये पिंपरी आली​​​​
​​
चारी दिशांनी कामगार आले​​​​​​
स्थानिक मात्र बेरोजगार झाले​​​​​​
​​
​​​कारखाने धूर ओकू लागले ​​
पुणेकर सारखे खोकू लागले ​​

संगणकाची नांदी झाली ​​
हिंजवडीची चांदी झाली ​​
​​
पुण्याची आय-टी पंढरी झाली​​
तज्ञांची मांदियाळी आली​​

तांत्रिक भाषा ओठावर रूजली​​​​​
मराठी मात्र मनातच थिजली​​​​​

उंच इमारतींचे पीक आले​​
शेती करणे अहित झाले

टेकड्यांवर हातोडा पडला
सह्याद्रीच तेवढा कळवळला

मुळा-मुठा सुकून गेली
सांडपाण्याने बहरुन आली
​​​​​
रस्ता गाड्यांमध्ये हरवत गेला​​​​​​
चालताना श्वास कोंडत गेला

पिझा बर्गर ‘जेवण’ झाले
सार्‍यांनाच आजारपण आले

डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली
बँकांनी आरोग्यासाठी कर्जे दिली
​​​​​
‘युज अँड थ्रो’ प्रतिष्ठेचे झाले​​​​​​
जागोजागी ढीग कचऱ्याचे आले​​​​​​
​​​​
तरुणाई रेव पार्टीत रंगली​​​​
चारित्र्याची कल्पना मोडीत निघाली​​​​
​​
मारामारी, खून, बलात्कार झाले​​
निर्ढावलेल्या मनांचे साक्षात्कार झाले ​​
​​​​
​एकेकाळची पुण्य नगरी​​​​
होतेय आता पाप नगरी​​​​
भिन्न प्रांतीयांची भाऊगर्दी
कुठे हरवला अस्सल पुणेरी?​​​​​

. . . .    .. . . . . . . वॉटसॅपवरून साभार दि.१६-०६-२०१९
​​​​​

—————

पुणेरी ससा ???

पुणेरी ससा

.. . . . . . . वॉटसॅपवरून साभार दि.३०-०६-२०१९


नव्या पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन

पुणेरी पाट्या १

पुणेरी पाट्या २

पुणेरी पाट्या ३

पुणेरी पाट्या ४

.. . . . . . . वॉटसॅपवरून साभार दि.११-०९-२०१९
————–

सुवासिक पुणे

त्या जागांच्या गंधकोशी, सांग पुणेकरा तू आहेस का?

काही गोष्टींचा वास हा सुवास, सुगंध त्या त्या ठिकाणच्या म्हणून ओळखला जातो, पुण्यात अशा काही जागा आहेत त्या तिथल्या गंधामुळे…
वैशालीच्या गल्लीत सांबारचा
रुपालीच्या कॉफीचा
सुप्रीम च्या पावभाजीचा
संतोष बेकरीच्या पॅटिस चा
भिडे पुलाशी नदीचा
राजमाचिकरांच्या गिरणीचा
अप्पा बळवंत चौकात नवीन पुस्तकांचा
लक्ष्मी रोड ला कोऱ्या साड्यांचा
सोन्या मारुती चौकात अत्तराचा
लकडे सुगंधीशी उदबत्तीचा
सुजाताच्या मस्तानीचा
भडबुंज्याशी फुटाणे भाजल्याचा
कल्पनाच्या भेळेचा
बादशाहिच्या पीठल्याचा
भारत दुग्धालयाशी दुधाचा
मंडई मधल्या कांद्याचा
गोल मंडई च्या कोथिंबिरीच्या
कुलकर्णी पंपावर पेट्रोल चा
न म शा च्या गल्लीत बुचाच्या फुलांचा
जबरेश्वरच्या चहाचा
शीतळा देवीशी डोसा, उत्तप्याचा
कयानीच्या श्रुजबेरीचा
मारझोरिंन पाशी सँडविच चा
चतुरशृंगी रोड च्या तंदुरी चा
दगडूशेठ पाशी निशिगंधाचा
दत्ताच्या देवळाशी खव्याचा
मृत्यूंजयेश्वराशी मोगऱ्याचा
जोगेश्वरीशी खारे दाण्याच्या वर ठेवलेल्या निखऱ्यांचा
अप्पाच्या बुर्जीचा
बेडेकरच्या मिसळ चा
बालगंधर्व मधल्या गजरा आणि सेंट चा
प्रभाच्या इथल्या बटाटे वड्याचा
आवारेच्या चिकन रस्स्सचा
स प च्या खो खो ग्राऊंडला पाणी मारल्या नंतरचा
डेक्कन च्या सिग्नल ला थांबल्यावर जुई च्या गजऱ्याचा

अशी अनेक ठिकाणं त्यांच्या सुवासामुळे ओळखली जातात,
त्या गोष्टी न खाता, न पीता, न विकत घेता त्यांचा अनुभव मिळतो, आणि घर करून राहतो मनात…….

. . . . . . . . वॉट्सॅपवरून साभार.       दि. २८-०५-२०२०

 

माजोरी पुणे (?)

पुणे –
हा जगाच्या पाठीवरचा एक अद् भूत त्रिकोणी भूप्रदेश आहे. मुठा नदी, टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता या त्याच्या तीन सीमा आहेत.
(बर्म्यूडा ट्रँगलने उगाच माज करू नये, त्या पापत्रिकोणात सर्व हरवते आणि या पूण्यत्रिकोणात हवे ते सापडते. )
शनिवार, सदाशिव आणि नारायण असे तीन स्वर्ग येथे नांदतात

दुपारी १ ते ४ या वेळात दुकानेच काय, वैकुंठ स्मशानभूमीही बंद असल्यास आम्हाला नवल वाटत नाही. कारण इथले ‘यम’नियमही स्वतंत्र आहेत.
वैशालीची इडली, गुड्लकचा बनमस्का नुकतीच अस्तंगत झालेली अप्पाची खिचडी, बेडेकरांची, रामनाथची अथवा श्रीकृष्णची मिसळ यापेक्षा जगात काही खाण्यालायक चवी असू शकतात यावर पुणेकरांचा विश्वास नाही. आम्ही चहाच्या दुकानालाही टपरी असे न संबोधता ‘अमृततूल्य’ म्हणतो

पुणे-मुंबई रस्त्याला मुंबई-पुणे रस्ता असे म्हणत नाहीत. कारण मानाच्या शहराचे नाव आधी घेण्याची पद्धत आहे.

येथे कोणाच्याही चुका काढून मिळतात ( विनामूल्य नव्हे तर चुका करणाऱ्याचा अपमान करून ) उदा. – गुगलवर मराठी टाईप करताना अद् भूत हा शब्द अद् आणि भूतच्यामध्ये स्पेस न टाकता लिहिता येत नाही. (जिज्ञासूंनी खात्री करून पहावी) त्यामूळे गुगल हे पुण्यात क्षूद्र मानले जाते.   ….. हे खरे नाही
गुगलपेक्षाही अधिक ज्ञानवंत माणसे पुण्यात गल्लोगल्ली सापडतात.
पुण्याच्या त्रिसीमा ओलांडून आत येताना त्यांच्याकडून अपमान सहन करण्याची तयारी ठेवली काय आणि नाही ठेवली काय, फरक पडत नाही कारण अपमान तुम्हाला विचारून होतच नाही. आपला अपमान झाला यातच धन्यता मानून आपल्या गावी परत जावे.
तरीही आजकाल, ‘गणपती बघायला आले आणि इथेच राहिले’ या तत्त्वावर घुसलेली आणि मूळ पुण्यवासियांच्या उपकारांवर जगणारी माणसे स्वतःला पुणेकर म्हणवतात. परंतू त्यांच्यात आणि अस्सल पुणेकरांत चितळ्यांची बाकरवडी आणि काका हलवाईची बाकरवडी एवढा फरक असतो.
असे तोतया पुणेकर ओळखण्यासाठी त्यांना खालील प्रश्नपत्रिका सोडवायला द्यावी –

एका वाक्यात उत्तरे द्या
१. मानाच्या ५ गणपतींची नावे आणि क्रम काय ?
२. अप्पा बळवंतांचे आडनाव काय ?
३. श आणि ष असलेले प्रत्येकी किमान ५ शब्द सांगा

खालील विषयांवर निबंध लिहा –
१. पूण्यनगरीचा सरकता प्रेमबिंदू सारसबाग ते Z ब्रीज
२. जागतिक रंगभूमीचा आधार – अर्थात, पुरुषोत्तम करंडक.

सविस्तर उत्तरे द्या –
१. सवाई गंधर्वात तिकीट न काढता कसे घुसावे ? (२ युक्त्या सांगा)
२. मस्तानी आणि मिल्कशेक विथ आईस्क्रीम यातील नेमका फरक सांगा
३. पत्र्या, जिलब्या, भांग्या, डुल्या, सोन्या, खुन्या ही देवांची नावे कशी निर्माण झाली ?

हिंमत असल्यास पुढील मुद्दे खोडून दाखवा. –
१. पर्वती ही जगातील सर्वात उंच टेकडी आहे
२. तुळशीबागेमध्ये अॅमेझॉनपेक्षा जास्त विक्री होते
३. पुण्यात गाडी चालवता येणं हे सूपर नॅचरल स्कील असून ते जन्मतःच यावं लागतं. RTO ही अंधश्रध्दा आहे
४. टिळक टँकची खोली अरबी समुद्रापेक्षा जास्त आहे.

योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा – (अर्थात सर्व पर्याय बरोबरच आहेत) –
१. पुणेकर ….. असतात
(चोखंदळ / रसिक / ज्ञानी / विचारवंत)
२. कोणत्याही विषयावर चर्चा हे इथले …… आहे
(व्यवच्छेदक लक्षण / आद्यकर्तव्य / मूख्य काम / वेळ घालवायचे साधन )
३. फर्ग्यूसन रस्त्यावर ….. आढळते
(ज्ञान / सौंदर्य / चव / सर्व काही)
४. एस् पी कॉलेज चा फूल फॉर्म ….. असा आहे.
(सूंदर पोरींचे / सपक पोरांचे / सनातन प्रकृतीचे / सर परशुराम)

अर्थात ही केवळ लिटमस टेस्ट आहे. पुण्यात शिरण्याची पळवाट नाही. पुणेकर म्हणवणे ह यूएस् चा व्हिजा मिळवण्याएवढे सोपे नाही हे लक्षात ठेवावे.
यातील एकाही प्रश्नाचे उत्तर चुकले आणि १०० पेक्षा कमी गुण मिळाले तर तो गृहस्थ अपमानित होण्याच्याही लायकीचा नाही असे समजावे आणि भूतदया दाखवून त्याला वेशीबाहेर सोडून द्यावे…
लेखक माहीत नाही. 💐

. . . . . . . . वॉट्सॅपवरून साभार.    दि. ०६-०६-२०२०

*****

हिंजवडीला जाणारी लोकं चिडलेली का असतात?

सदैव “वाकड” यात शिरतात. उलट बोलल्याशिवाय त्यांना “रावेत” नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र “पाषाण”. तडफदार आणि “बाणेर”. अहंकाराने “औंध” झाले आहेत सगळे. त्यांच्या भल्याचे “सांगवी” तर ऐकत नाहीत. सतत असलेल्या ट्रॅफिकशी काहीतरी “निगडी”त आहे. त्यामुळे त्यांना सारखा “देहू” दंड भोगावा लागतो. खूप कष्ट “सूस” वे लागतात. IT मध्ये खूप “बावधन” आहे पण ट्रॅफिक मूळे डोक्याचा “भुगाव” होतो. खूप वेळ ट्रॅफिक हलले नाही की एकमेकांचा हॉर्न वाजवून “भोसरी” च्या म्हणत उद्धार करतात. ट्रॅफिक बघून त्यांना “खडकी”च भरते. पहाटे “गहूनजे’ निघतात ते सूर्य “म्हाळुंगे” ला तरी घरी येत नाहीत. “बालेवाडी”त घातलेल्या पोरांना ,आईबाप एकदम मॅट्रिक पास झाले की च भेटतात.
अवघड आहे एकंदर.. वा रे पुणेरी

🧐🙄😃😆😝🤣😜😉        नवी भर दि. ०६-११-२०२०

🧐🙄😃😆😝🤣😜😉 🧐🙄😃😆😝🤣😜

हा शब्दकोश किती खरा आहे की खोटा आहे हे मला माहीत नाही. यातले काही अर्थ आवडले नाहीत तर सोडून द्यावेत.      . . . .  नवी भर दि. ११-०१-२०२१

पुणेरी शब्दकोष

केशव – साधा सरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा.
सामान – त्याची प्रेयसी.
काटा काकु – चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त.
खडकी – एकदम टुकार.
झक्कास – एकदम चांगले.
काशी होणे – गोची होणे.
लई वेळा – नक्की, खात्रीने.
चल हवा येवू दे – निघून जा.
मस्त रे कांबळे – छान, शाब्बास.
पडीक – बेकार.
मंदार – मंद बुध्दीचा.
चालू – शहाणा.
पोपट होणे – फजिती होणे.
दत्तू – एखाद्याचा हुज~या.
बॅटरी – चश्मेवाला / चश्मेवाली.
पुडी – माणिकचंद व दुसरा गुटखा.
राष्ट्रगीत वाजणे – संपणे / बंद पडणे.
पुडी सोडणे – थाप मारणे.
खंबा – दारुची / बीयरची बाटली.
पावट्या – एकदम मुर्ख.
खडकी दापोडी – हलक्या प्रतीचे.
टिणपाट – काहीच कामाचा नसलेला.
पेताड / बेवडा – खुप दारु पिणारा.
डोलकर – दारु पिवून झिंगणारा.
सावरकर – दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा.
वकार युनूस – दारु पिवून ओकारी करणारा.
सोपान – गांवढंळ माणुस.
श्यामची आई – 18+ सिनेमा.
सांडणे – पडणे.
जिवात जिव येणे – गरोदर रहाणे.
पाट्या टाकणे – रोज तेच तेच काम करुन वेळ घालवणे.
भागवत – दुस-याच्या जिवावर जगणारा.
पत्ता कट होणे – शर्यतीतुन बाहेर होणे.
फणस लावणे – नाही त्या शंका काढणे.
फिरंगी – कोकाटे इंग्लीश फाडणारा.
पेटला – रागावला.
बसायचे का? – दारु प्यायची का?
चड्डी – एखाद्याच्या खुप जवळचा.
हुकलेला – वाया गेलेला.
डोळस – चष्मेवाला/ली.
यंत्रणा – जाड मुलगी.
दांडी यात्रा – ऑफीसला बुट्टी मारणे/खाडा.
चैतन्य कांडी – सिगारेट/बिडी.
चैतन्य चुर्ण – तंबाखु.
चेपणे – पोटभरुन खाणे.
कल्ला – मज्जा.
सदाशिव पेठी – कंजुष.
बुंगाट – अती वेगाने.
टांगा पल्टी – दारुच्या नशेत `आउट’ झालेला.
थुक्का लावणे – गंडवणे.
एल एल टी टी – तिरळा. लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो.
घ्या श्रीफळ – जा आता घरी.
कर्नल थापा – थापाड्या.
सत्संग – ओली पार्टी

😝🤣😜😉 🧐🙄😃

नवी भर दि.२७-०२-२०२१ : पुण्याची वाडा संस्कृति

– पुण्याची वाडा संस्कृती !!
पेशवाईतील सरदार व प्रतिष्ठित मंडळींनी त्यावेळी नवीन वसलेल्या पेठांमध्ये आपल्या कुटुंब-कबिल्याच्या वस्तीसाठी प्रशस्त वाडे बांधले. या वाड्याचे प्रवेशद्वार म्हणजे मोठा – क्वचित प्रसंगी उघडला जाणारा भक्कम लाकडी दरवाजा, रोजची जा-ये करण्यासाठी ठेवलेला लहान दिंडी दरवाजा. आत शिरल्यावर लगेच ओसरी, मोठा चौक व त्यानंतर बंदिस्त अशा राहण्याच्या खोल्या. मागच्या बाजूला मोठे अंगण.. बाहेरचा दरवाजा एकदा बंद केला की वाड्याला पूर्ण संरक्षण मिळे.
पेशवाईचा अस्त व त्यानंतर होत गेलेले सामाजिक बदल यामुळे कुटुंबे छोटी झाली, त्यांना रहाण्यासाठी मोठ्या वाड्याची गरज संपली. अनेक मालकांनी हे जुने वाडे योग्य ती डागडुजी करून बाहेरच्या कुटुंबांना भाड्याने देणे चालू केले. पुढे जुने वाडे व चाळ यांचे दुवे म्हणता येतील असे – अनेक कुटुंबे भाड्याने राहू शकतील अशा वाडे-वजा इमारती पुण्यातील पेठामध्ये बांधण्यात आल्या. बहुतांशी, ब्राम्हण कुटुंबे येथे राहू लागली – त्यांनी पुण्याची संस्कृती जपली व वाढवली..
मुंबईतील चाळी व पुण्यातील वाडे यांच्यामधील फरक असण्याचे हे महत्त्वाचे कारण असावे.
सरकारी खात्यात कारकुनी करणारे वा निवृत्त लोक वाड्यात राहणे पसंत करीत. बहुतेक कुटुंबांकडे १०’ X १०’ च्या एक किंवा दोन खोल्याच असत. दोन खोल्या असणारे कुटुंब श्रीमंत समजले जाई. घरातील लहान मुले व वृद्ध वाड्याच्या व्हरांड्यात अगर अंगणातच कायम असत. जणू काही एकच कुटुंब असल्यासारखे राहणाऱ्या सर्व कुटुंबात एकोपा असे.. सुख – दुःखाच्या प्रसंगी हे आवर्जून लक्ष्यात येई. सगळे सण-वार, लग्न-मुंजी सारखे समारंभ यात सर्वांचा सहभाग असे.
मिळून मिसळून वागणे, नेतृत्व गुण, अनेक कलांचे शिक्षण, सामाजिक भान, धिटाई अशा अनेक गोष्टी मुले आपोआपच वाडा संस्कृतीत शिकत. त्यातून जगाच्या घकाधकीला सहज तोंड देऊ शकणारे सुजाण व सुशिक्षित नागरिक घडणे सोपे होई.
मोकळ्या वेळात मुले विटी-दांडू, लगोरी, हुतूतू, खोखो, रिंग टेनिस, क्रिकेट, हे वर्षभर चालणारे खेळ अंगणात खेळत. अनेकवेळा क्रिकेटची खरी बॅट, बॉल, स्टंप्स विकत घेण्याची ऐपत नसल्याने, लाकडी फळी ही बॅट, तुटलेल्या लाकडी पाटाचे स्टंप, तर सायकलची रबरी ट्यूब कापून त्याचे गोल गोल तुकडे कागदाच्या अगर चिंधीच्या बोळ्यावर बांधून केलेला बॉल करून क्रिकेट खेळत. चुकून कुणाला बॉल लागला अगर कुणाच्या घरात गेला व त्या लोकांनी तो परत दिला नाही तर वाड्याच्या सामायिक शिमग्याला सर्वजण त्या लोकांचा उद्धार करायचे .. अर्थात त्यातून कौटुंबिक संबंधात कोणतीच कटूता येत नसे.
काळाच्या ओघात ते आठवणीतील माझे सुंदर पुणे त्याचबरोबर ते वाडे व मुख्यतः वाडा संस्कृती कुठे व केव्हा वाहून गेले ते कळलेच नाही… बहुधा पानशेतच्या पुरामध्ये ते वाहून गेले असावे.
सुरेश नाईक

– – – – – – – – – –

पुणे आणि पुणेकर ह्यांना अनेक जण नावे ठेवताना आढळतात. ह्याचे कारणच मला अद्याप आढळले नाही..
पण तरी त्या नावे ठेवणार्यांना एक उत्तर द्यावे असे मात्र आज ठरवले आहे..
ही कविता समस्त पुणेकरांनी अगदी अभिमानाने पुढे पाठवावी अशी इच्छा आहे..!
😄

पुण्यवान!

पुण्यवान किती आम्ही खरोखर
नागरिक हो पुण्याचे
विद्येच्या माहेरी करितो
स्वागत साऱ्या साऱ्यांचे ||१||

शुद्ध भाषा आम्ही बोलतो
चोखंदळ हो भलतेच
इथून पावती घेऊन मिरवती
तरी पुणे ह्यांना सलतेच..||२||

जन्मापासून आम्हीच पेशवे
रुबाब का आम्ही करू नये ?
पाट्या वाचून हसणार्यांनी
पाऊलच पुण्यात ठेऊ नये ||३||

मिसळ पुणेरी, अन चितळ्यांची
करू नका कुणी बरोबरी
आमच्या इकडे अन्नपूर्णा हो
पाणी भरते घरोघरी.. ||४||

असे बिघडले , तसे बिघडले
कशास करता तक्रारी
जगभरातले लोक नांदती
ही पुण्यभूमीची जादूगरी ||५||

पुण्यवान हो आम्ही पुणेकर
गुण अजून मी काय गावे?
इथे जन्मण्यासाठी ऐका
शत जन्माचे पुण्य हवे ||६||

शेवटचे एकच सांगून ठेवते
ठेवलीत जर नावे पुण्याला
दुर्लक्ष करूनि हेच म्हणू आम्ही
द्राक्षे आंबट कोल्ह्याला!! ||७||

अश्विनी देशपांडे, २२/०९/२०२० (पुणेकर)

. . . . . . .  वॉट्सॅपवरून साभार  दि.१०-०६-२०२१

​​​​​

लावालावी, लागणे – एक मराठी गंमत !

लावणे या मराठी भाषेतल्या  एकाच  क्रियापदाचा उपयोग किती वेगवेगळ्या अर्थांनी केला जातो याचे एक मजेदार संकलन या लेखात केलेले आहे. वॉट्सअॅपवरून आलेल्या या लेखाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत ते मला माहीत नाही, कुणीतरी हा लेख चक्क  पुलंच्या नावावर सुद्धा खपवला आहे. पण  ज्यानी कुणी हा लेख लिहिला आहे त्यांनी खूप परिश्रम घेऊन हा लेख तयार केला आहे यांत शंका नाही. त्यांचे आभार मानून आणि संमति गृहीत धरून हा लेख इथे दिला आहे.  

भाषेच्या गंमती:  शब्द एक, अर्थ अनेक

‘लावणे’ ह्या क्रियापदाचा अर्थ’

मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे.
असेल आठवी-नववीत. पण चेन्नईहून थेट पुण्याला;
मग मराठीचा गंध कसा असणार?
थोडं शिकवल्यावर मी तिला काही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती.
एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले.
तीन चार शब्दांचे अर्थ सांगितले.

शेवटचा शब्द होता– लाव/लावणे.
मी तिला म्हटलं, ‘अगं, वाक्य लिहून आणायचंस, नुसता अर्थ कसा सांगू?
काहीही असू शकेल’.
एका शब्दाचा / व्हर्बचा अर्थ काहीही?

तिला कळेना.

‘ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज’. ती म्हणाली.
तिला वाटलं, असतील दोन तीन अर्थ!
पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता.

मी मनात म्हटलं,
चला, आजचा वेळ या लावालावीतच घालवू.

‘हे बघ, तू मराठीचा क्लास लावला आहेस.’

‘ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास ‘. लगेच वहीत क्लास लावणे= जॉईन असं लिहिलं.

‘क्लासला येताना तू आरशासमोर काय तयारी केलीस? पावडर लावलीस? ‘
‘ओ येस’

‘आपण पार्टीला,फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू/टिकली लावतो.

‘येस, आय अंडस्टँड’ — टु अप्लाय. तिनं लिहिलं. ‘पण आपण केसांना पिन्स, हेअरबँड लावतो. तिथे तो अर्थ होत नाही’.

‘ओके; वी पुट ऑन दॅट’.
‘आता बघ. मी चहाचा कप तोंडाला लावला, आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड लावलं.
आपण बाळाच्या गालाला हात लावतो. इथे काय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच्!’
चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, हां, तुम्ही पार्क मधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी; फुलांना हात लावू नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, पुस्तकाला पाय लावू नको. सो— टु टच्

‘मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर’.

‘हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच ‘.

‘ मीन्स लाव, बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर! ‘

‘बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर. पण दिवा लाव = स्विच ऑन.

म्हणूनच तुला म्हटलं वाक्य लिहून आण बाई! संदर्भ / रेफरन्स शिवाय नुसता ‘लाव’ कसा समजणार?

आणखी खूप ठिकाणी लावणे हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत’.

‘नो, नो, प्लीज टेल मी मोअर’_.
म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.
‘बरं! आता आपण इलेक्ट्रिकचा दिवा, टी.व्ही., रेडिओ इ. लावतो तेव्हा स्विच ऑन करतो. पण देवासमोर निरांजन, उदबत्ती, समई लावतो तेव्हा काय करतो? लाइट ऑन! पेटवतो. फटाके लावतो, आग लावतो, गॅस लावतो = पेटवतो’. ती भराभरा लिहून घेत होती.

तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली. ‘बघ, मी कुकर लावलाय’. दोघी हसलो. आधीचा कुठला अर्थ आहे का यात?
खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द— लावलाय. आंघोळीचं पाणी लावलंय मधे असंच!’

‘मी रोज सकाळी अलार्म लावते. ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. ओह्! एव्हरीथिंग इज सो डिफरंट!’ ‘सो कन्क्लूजन? –एव्हरी ‘लाव’ इज डिफरंट!’

जिगसॉ पझल घेऊन बसलेल्या नातवाला मी हाक मारली. तर तो म्हणाला, ‘थांब गं आजी! मी हे लावतोय ना! ‘

‘हे, लुक. तो लावतोय= ही इज अरेंजिंग द पीसेस. टु अरेंज!’
‘तो शहाणा आहे. वह्या-पुस्तकं कपाटात नीट लावून ठेवतो. कपाट छान लावलेलं असतं त्याचं’.

वहीत लिहून घेऊन ती उठली, ‘गुड बॉय’ असं त्याचं कौतुक करून ती घरी गेली.

पण माझं विचारचक्र चालूच राहिलं. आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर लाव, लावते, लावले हे सगळं बोल्ड मधे यायला लागलं.
रोजच कोणालातरी आपण फोन लावतो.
बडबड, कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो, ए, काय लावलंय मगापासून?
आजीने कवळी लावली = फिक्स केली आणि आजी कवळी लावते म्हणजे रोज वापरते. (यूझ)

पट्टा लाव = बांध. बक्कल, बटन लाव = अडकव
बिया लावणे झाडे लावणे= पेरणे, उगवणे.
इतके इतके मजूर कामाला लावले. (एम्प्लॉइड)

वजन ढकलणारा, ओढणारा नेट/जोर लावतो. (अप्लाइज स्ट्रेंग्थ)

आपण वडिलांचं, नवऱ्याचं नाव लावतो म्हणजे काय करतो?

सुंदर गोष्ट मनाला वेड लावते या शब्दांच्या खेळानंही मला वेड लावलं.

इतक्यात आमची बाई आली. आल्याआल्याच म्हणाली, ‘विचारलं काहो सायबांना? (मुलाच्या नोकरीबद्दल)’

‘विचारलं की, पाठव म्हणाले उद्या’.

‘हा, मंग देते त्याला लावून उद्या’. (ओहो! लावून देते = पाठवते)

आणि लावालावी मधे तर कोण, कुठे काय लावेल!

अशी आपली ही मायमराठी! शिकणाऱ्याला अवघड, पण आपल्याला सुंदर!
आता ‘हे आर्टिकल ग्लोबल मराठीवर लाव’. घरच्यांनी सल्ला दिला.
‘आणि नाही लावलं तर मनाला लावून घेऊ नको ‘ अशी चेष्टाही केली.

👆संदर्भ विचारु नकोस कारण मला तो माहित नाही, तुला कुठला लावायचा असेल तो/तसा लाव. 😂


या लावालावीमध्ये लेखकाकडून दोन महत्वाच्या गोष्टी लिहायच्या राहून गेल्या आहेत.

पहिली म्हणजे महाराष्ट्राची सर्वात प्रसिद्ध असलेली लोककला … लावण्यवति लावणी

आणि दुसरे आपल्या रोजच्या जेवणातले तोंडी लावणे


दि.२८-०८-२०१९

आता लागणे हा शब्द किती प्रकारांनी लागतो ते पहा

😃😃😃😃😃
मराठीत “लागण्याची” गंमत बघा:
——————————————
बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता.
तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला “लागला”.
त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच “लागला” होता.
बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला “लागला”.
घरचे जेवायचा आग्रह करू “लागले”. मला जेवणात गोड “लागतं” हे माहिती असल्याने गोड केलं होतं.
भात थोडा “लागला” होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला “लागली”. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार “लागली”.
निघताना बस फलाटाला “लागली”च होती, ती “लागली”च पकडली.
पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस “लागली”. मग काय …
घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी “लागली” कारण आल्या आल्या घाईची “लागली”.
थोडक्यात माझी अगदी वाट “लागली”..
घरची मंडळी हसायला “लागली”.
😅😉 🙏