आठवणीतले (चित्रमय) पुणे

नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पहायला जाऊ नये असे म्हणतात. त्या म्हणीत आता एक नवीन भर पडली आहे ती म्हणजे ‘कायअप्पा’ (व्हॉट्सॅप)वर भिरभिरत येणाऱ्या ढकलपत्रांची (फॉरवर्ड्सची). मूळ लेखकाने आवर्जून खाली आपले नाव लिहिले असले आणि ती पोस्ट पुढे ढकलणाऱ्यांनी त्याचा मान राखला तरच आपल्याला ते समजते. अशाच भिरभिरत आलेल्या एका पोस्टामध्ये पुण्याची ऐतिहासिक छायाचित्रे मिळाली. त्यांच्यासोबत काही अर्धवट माहितीही होती, त्यात व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत. अर्थातच या माझ्या आठवणी नाहीत आणि त्यांची सत्यता पडताळून पहाण्याचे कोणतेही साधन माझ्याकडे नाही. यातल्या काही वास्तू तर मी कधीच पाहिलेल्या नाहीत किंवा आता त्या अस्तित्वातही नसतील. तरीही माहिती असावी म्हणून मी ही दुर्मिळ चित्रे या भागात संग्रहित करीत आहे. ज्या कुणी ही इतकी छायाचित्रे गोळा करून कायअप्पावर टाकली असतील त्याचे मनःपूर्वक आभार.

पुणे आणि पुणेकर याविषयीची माहिती इथे पहा
https://anandghare.wordpress.com/2018/12/02/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a1/

नवी भर दि. ०४-०६-२०२१ : सारसबाग आणि तळ्यातला गणपती

*************

पुण्यातली एक ऐतिहासक पेठ

***************************

पुण्याची जुनी छायाचित्रे

एका काळातली सहलीची ठिकाणे – आता ती गजबजून गेली आहेत

जनसेवा दुग्धमंदिर, लक्ष्मी रोड – एक लोकप्रिय खाद्यगृह

पुणे का आवडते ?

नवी भर : आवडते जुने पुणे  …..  दि.२८-०५-२०२० खाली पहा


 

पुणे शहराविषयीचे अनेक मजेदार लेख मी “पुणे मार्गदर्शक (मिस)गाईड” या भागात एकत्र केले आहेत. https://anandghare.wordpress.com/2018/12/02/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a1/
हा लेख जरा मोठा असल्यामुळे स्वतंत्रपणे प्रकाशित करत आहे. याच्या लेखकाचे नाव माहीत नाही, पण इतिहासकाळापासून अगदी आजच्या संगणकयुगापर्यंत बदलत गेलेल्या पुण्याची सगळी वैशिष्ट्ये त्याने गोळा केली आहेत.
……. वॉट्सअॅपवरून साभार

सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,

पेशव्यांच्या ‘सर्व’ पराक्रमांचे पुणे..

लाल महालात ‘तोडलेल्या’ बोटांचे पुणे..

इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे..

‘कोटी’सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे..

नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणा-या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे..

“सौ. विमलाबाई गरवारे च्या पोरांचा गर्वच नाही तर माज आहे पुणे”

सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणा-या नू.म.वि., भावे स्कूल चे पुणे..

SP, FC, BVP, SIMBY, Modern, MIT आणि वाडिया चे पुणे..

आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून (की बांधून?) Two Wheeler वाल्या मुलींचे पुणे..

RTO कडून License to kill इश्यू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे..

Info Tech park चे पुणे..

Koregaon Park चे पुणे..

कॅम्पातल्या श्रूजबेरी वाल्या कयानींचे पुणे..

चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे..

वैशाली च्या yummy सांबार चे पुणे..

रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे..

तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे..

खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे..

JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे..

कॅड बी आणि कॅड एम चे पुणे..

सोडा शॉप चे पण पुणे..

अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे..

University मध्ये शिकणा-यांचे पुणे, आणि University च्या जंगलात ‘दिवे लावणा-यांचे पुणे..

कधी ही न थकणा-या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे (तिथली साधी डोक्याची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही)..

खवय्यांसाठी जीव देणा-या German Bakery चे पुणे, आणि चवी साठी जीव टाकणा-या खवय्यांचे पुणे..

बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg ‘थाळी’ वाले पुणे..

सदशिवातले बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपु-यातले रात्रीचे लजीज पुणे..

मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणा-या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे..

शिकणा-यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणा-यांचे पण पुणे..

‘सरळ’ मार्गी प्रेमिकांच्या ‘Z’ bridge चे पुणे..

सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे..

ताजमहाल पाहून सुद्धा “बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान” अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे..

फटकळ, खवचट, उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे..

‘इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही’ अशी ख्याती मिरवणारे पुणे !..

पेशवे पार्कातल्या पांढ-या मोरांचे आणि वाघांचे पुणे..

आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणा-या “फुलराणी” चे पुणे..

भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे..

पुरुषोत्तम आणि फिरोदियाच्या जल्लोषाचे पुणे..

bollywood ला acting ची अक्कल शिकवणा-या wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणा-या ‘NFAI’ चे पुणे..

फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्व्हा, भानुविलास आणि नटराज चे पुणे..

आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे..

गोगलगायीशी स्पर्धा करणा-या PMPML चे पुणे..

प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणा-यांचे पुणे आणि
कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे..

लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे..

प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे..

Christmas ला MG Road ला हौसेने केक खाणारे पुणे..

भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे..

सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे..

Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे…

पहिला संपूर्ण भारतीय सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे..
आणि “आम्हाला कशाला लागतोय mobile ?” असे पण म्हणणारे पुणे..

जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Mercs, VolksWagon आणि Jaguar, Nano बनवणारे पुणे..

सकाळ संध्याकाळी फिरायला जाणा-या थकलेल्या पायांचे पुणे,

Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणा-यांचे पुणे..

पर्वती वर प्रॅक्टीस करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे..

पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे..

उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,..

Sunday ला सकाळी पॅटीस, पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणा-यांचे पुणे,
कसबा आणि गुरूवारातल्या भावड्यांचे पुणे..

सदाशिव, नारायण, शनिवारातल्या भाऊंचे पुणे..

बारा महिने २४ तास online असणारे, पण दुकान मात्र दुपारी दोन-चार तास बंद ठेवणारे,
असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेवाद्वितीय पुणे !!💪😎े Share the post if you’re proud to be a punekar

*************************
नवी भर दि. २८-०५-२०२०
 पुणेकरांना नक्कीच आवडेल

आमचे जुने पुणे

(लेखकाचा शोध घेतला, पण तो काही भेटला नाही.)
६०- ७० वर्षांपूर्वीचे पुणे पाहीलात का?
लकडी पुलावर पूर्वी मांडी घालून बसलेली वीतभर उंचीची ‘सगुणा’ नावाची स्त्री ही बाया बापड्यांचे खास आकर्षण असे. त्यांनी विचारलेल्या अवखळ प्रश्नांना सगुणा बिनधास्त उत्तरे देऊन लीलया टोलवत असे!
१९४० चे दशक असावे ते. आज मागे वळून पाहिले तर पुण्याचे ते रस्ते, ती माणसे, ते पडके वाडे, ते टांगेवाले, त्या सायकली सगळे सगळे नामशेष झाले आहे. उरलेले अवशेषही संपण्याच्या मार्गावरच आहेत. पर्वती, चतुःशृंगी, शनवार वाडा हे पुण्याचे मानदंड. आजची शानदार सारस बाग त्या काळी पुण्यात नव्हती. खोल तळ्यात गणपती बुडालेला होता.
पेशवे पार्कचा ऐसपैस प्रदेश आणि तेथली गर्द झाडी थेट निसर्गाच्या कुशीतच माणसांना ओढून न्यायची. संभाजी पार्क त्यावेळी नव्याने आकाराला आले होते. सगळे पुणे संध्याकाळी आणि विशेषतः रविवारी संभाजी पार्ककडे चाललेले असायचे. गणेश पेठेतून जिमखान्यापर्यंत फक्त १० पैशांत आरामात जाता यायचे. त्या वेळी शनिवार वाड्याचे भव्य पटांगण व्याख्यात्यांना बोलावण्याची एक महत्त्वाची जागा होती. मस्तानी दरवाज्या जवळच्या पिंपळाच्या गर्द सावलीत जादूगार आपली जादू पेश करायचे.
ही जादू पाहण्यासाठी खूप गर्दी होत असे. बाहेरून आलेला पाव्हना जेवण्यासाठी हमखास विजयानंद थिएटर जवळ असणाऱ्या, आगगाडीसारख्या लांबच लांब पसरलेल्या ‘ गुजराथ लॉज ‘ मध्ये जात असे. डुल्या मारुती, जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, भिकारदास मारुती अशा वैविध्यपूर्ण आणि पुणेकरांप्रमाणेच अस्सल नावे धारण करणारा हनुमान आपल्या जयंतीला साऱ्या पुण्यातच धुमाकूळ घालायचा.
तुळशी बाग, बेलबाग ही पुणेकरांची खास श्रद्धास्थाने. धुपारती, दीपारती होताना निर्माण होणारे येथील वातावरण पुणेकरांच्या भक्तीभावनेचेच प्रतीक असे. या ठिकाणी प्रसिद्ध ह.भ.प. कीर्तनकारांची सदाच चालणारी कीर्तने ऐकण्यासाठी घरातल्या आजीबाई हाताने फुलवाती वळता – वळता बुवांच्या सुश्राव्य कीर्तनातील मोक्याच्या जागांना दाद देताना टाळ्या वाजवण्यासाठी हातही जरा मोकळे ठेवीत.
तुळशीबाग म्हणजे लहान मुलांची खेळणी मिळण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. राम-लक्ष्मण- सीता यांच्यासमोर उभ्या असणाऱ्या मारुतीच्या उजव्या हाताला लांब सरळ रेषेत जमिनीवरच त्यावेळी बायका हारीने दुकाने मांडून बसलेल्या असत.
तसेच पुढे गेल्यावर नगाऱ्याची देवडी असे. त्या बोळकंडीतील अंधाऱ्या जागी दोन्ही कट्टयांवर काही माणसे चक्क झोपलेली असायची. त्या काळात चितळ्यांचे प्रस्थ पुण्यात नव्हते. काका हलवाई व दगडूशेठ हलवाई यांनीच पुणेकरांचे तोंड गोड करण्याचा मक्ता घेतलेला होता.
सोन्या मारुती चौकातील कन्हैय्यालाल सराफाची पेढी भलतीच जोशात होती. एस.पी.कॉलेज समोरचे जीवन रेस्टॉरंट कॉलेज विद्यार्थ्यांची जान होती. सामिष भोजनासाठी त्याकाळी लक्ष्मी रोडवर गोखले हॉल समोर ‘सातारकर हेल्थ होम’ हे भोजनगृह होते.
प्रसिद्ध पहिलवानांचे फोटो तेथे ओळीने लावलेले असत. त्यांचे पिळदार स्नायू, पिळदार पोटऱ्या दाखवणारी बलदंड शरीरे आम्हां तरुणांच्या डोळ्यांत भरत.
सामिष भोजनाचा हा परिणाम आहे, असे वाटून तेथे तगड्या शरीराचे तरुण यायचे, तसेच काडीपैलवानही मोठ्या आशेने जेवण्यासाठी यायचे !
डेक्कन जिमखान्यावरील कॅफे गुडलक व लकी ही दोन इराणी रेस्टॉरंट समाजातील उच्चभ्रूंचे अड्डेच समजले जात. त्याकाळी उडप्यांची मिरासदारी पुण्यात फारशी जाणवत नव्हती. सोन्या मारुती चौकात त्याकाळी जुनी दूधभट्टी होती. ती गवळी लोकांनी नुसती भरून जात असे. कोणत्याही कुलुपाची किल्ली हमखास बनवून देणारा ‘बाबूलाल किल्लीवाला’ याच रस्त्यावर आपले दुकान थाटून बसलेला होता. तेव्हाचे हे डुप्लिकेट किल्ल्या बनवून देणारे एकमेव दुकान पुण्यात होते.
त्या काळात पुण्यात उत्तम जिलब्या ‘मथुरा भवन’ मध्ये मिळत. पायातल्या चपला हमखास चोरीला जाण्याचे ठिकाण म्हणजे दगडू शेठ दत्तमंदिर! आजच्या इतके पुण्याचे ओद्योगिकीकरणं झालेले नव्हते.
पुणे हे विद्येचे माहेरघर व शिक्षणाचे केंद्रस्थान असल्याने लांबून- लांबून मुले शिकण्यास येत. त्या काळात आजच्यासारखा जीवनाचा भन्नाट वेग नव्हता. रस्त्यावरून व्यवस्थित चालता यायचे. झोपडपट्टया मोठ्या प्रमाणावर नव्हत्या. रस्त्यावरून जाताना भेटणारे ओळखीचे लोक थांबून मनापासून बोलत.
बोलता- बोलता मुलांच्या हातावर ढब्बू पैसा तरी ठेवत वा शेंगदाणे, खारे दाणे, खारका असा खाऊ मूठभर ठेवत. त्याकाळात सिमेंटच्या गगनचुंबी इमारती पुण्यात नव्हत्या.
आठवते तिथपर्यंत पर्वती, भांबुरडा, कोथरूड गावठाण, एरंडवणे ही त्या काळातली जंगले होती. हल्ली सारेच पुणे सिमेंटचे जंगल झालेले आहे! पोस्टमन, शाळेतला शिपाई आणि फार तर पोलीस हीच ड्रेसवाली मंडळी वेगळी अशी उठून दिसायची. सायकली मात्र अमाप दिसायच्या. कारण पुणेकरांचे जीवनच सायकलवर अवलंबून होते. पुणेरी टांगेवाले हे एक मासलेवाईक प्रकरण होते. त्यावेळी भल्या सकाळी मोराची पिसे लावलेली उंच टोपी घालून रामनामाचा गजर करीत येणारा ‘वासुदेव’ पुणेकरांच्या घरातीलच एक झालेला असे. तो सगळ्यांना नवलाख पायऱ्यांवरून थेट जेजुरीला घेऊन जायचा, चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करणाऱ्या वारकऱ्यांच्या घोळक्यात नेऊन पांडुरंगाचे दर्शन घडवायचा.
तेथून तुळजापूरच्या भवानी व कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायांवर घालून आणायचा. ‘चाईला औखद, वाताला औखद’ म्हणणाऱ्या वैदू बायका पुण्यात घरोघर हिंडायच्या. जालीम जडीबुटी देणाऱ्या या बायकांची माजघरापर्यंत उठबस असे. भाकरीच्या तुकड्यावर सागरगोटे देणाऱ्याही काही बायका टोपलीला चहुबाजूंनी गोधडी सारखे कापड लावून तीत सागरगोटे, बांगड्या, करगोटे, खडे, अंगठया ठेवीत आणि ती टोपली डोक्यावर व काखोटीला मूल घेऊन पुण्याचे गल्ली बोळ तुडवीत असत. गर्दीचे पुण्याला वेडच असावं. तीन डोळ्यांचं पोरं लोकांना रस्त्यावर दाखवून त्यातून पैसा मिळवणारे लोक इथेच गोळा होत. मग त्या पोराला पाहायला ही झुंबड उडे.
त्या काळी पुण्यात वाहनांचे अपघात क्वचितच होत. त्यामुळे एखादा अपघात झाला तरीही ते दृश्य पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमे.
मला आठवते त्याप्रमाणे ताराचंद हॉस्पिटल जवळ, श्री समर्थ व्यायाम मंदिरा समोरच्या मोकळ्या पटांगणात गोल रिंगणातून सतत सायकल चालविण्याची शर्यत त्यावेळी एक चर्चेचा, आकर्षणाचा विषय झालेला होता. त्या फिरणाऱ्या सायकलवरच आंघोळ करणे, कपडे बदलणे इ गोष्टी तो इसम करीत असे!
सतत ७२ तास सायकल चालवण्याचा विक्रम पाहण्यासाठी लोक तोबा गर्दी करीत. जादूचे खेळ, डोंबाऱ्यांची कसरत, गारुड्यांचे नागाचे, दरवेशी लोकांचेअस्वलाचे व माकडवाल्यांचे भागाबाईचे खेळ कुठे ना कुठे चालत असत व लोक खूष होऊन पैसे फेकीत. मुठा नदीला पावसाळ्यात आलेला पूर पाहण्यासाठी होणारी गर्दी व या पुरात उड्या टाकून पोहणाऱ्या धाडसी तरुणांना पाहण्यासाठी व प्रोत्साहन देणाऱ्यांची गर्दी हा प्रसंगअविस्मरणीय असे.
लकडी पुलावर पूर्वी मांडी घालून बसलेली वीतभर उंचीची ‘सगुणा’ नावाची स्त्री ही बाया बापड्यांचे खास आकर्षण असे. त्यांनी विचारलेल्या अवखळ प्रश्नांना सगुणा बिनधास्त उत्तरे देऊन लीलया टोलवत असे!
लोकांची हसून-हसून मुरकुंडी वळे. मग तिला लोक प्रेमाने पैसे देत, खायला आणून देत. त्या काळात पुण्यातील उंच इमारत म्हणजे विश्रामबाग वाड्यासमोरील बँक ऑफ महाराष्ट्रची इमारत. त्यानंतर मग कॉर्पोरेशनची इमारत आणि तिसरी लकडी पुलाजवळील एल आय.सी.ची बिल्डिंग. पुण्याचे हे ६०-७० वर्षांपूर्वीचे रूप आजही माझ्या मनातून पुसले गेलेलं नाही.
पुण्यातील गल्ली-बोळ माझ्या पायांनी तुडवले गेले असल्याने व पुढे सायकल वरून आख्खे पुणे पालथे घातले असल्याने, मी ते विसरूच शकत नाही. तो माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे —श्री संजीव वेलणकर यांच्या face book page वरून साभार.लेखक अज्ञात🙏🏻
Comments
Sudhir Dandekar
सर्व निरिक्षणे खूपच छान शब्दांकन करून मांडल्यामुळे आपल्या आठवणी चलतचित्राप्रमाणे सर्व जिवंत झाल्या. खूपच सुखद. हे पाहून लेखकाने आपले नांव सांगितलं आम्हालाही त्यांच्याशी संपर्क साधायला आवडेल
फेसबुकावरून साभार दि. २८-०५-२०२०

शनिवारवाडा, पर्वती, तुळशीबाग, अप्पा बळवंत चौक, स्वारगेट वगैरे

पुणे शहराबद्दल इतर माहिती

पुणे आणि पुणेकर मार्गदर्शक

पुणे का आवडते ?

साठसत्तर वर्षांपूर्वीचे पुणे कसे होते याच्या काही मजेदार आठवणी आता या पानावर दिल्या आहेत.
https://anandghare.wordpress.com/2020/04/07/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a4%e0%a5%87/

या पानावर पहा :

१.अप्पा बळवंत चौक
२.स्वार गेट
३.पर्वतीवरील देवदेवेश्वर’ मंदिर
४.तुळशीबाग
५.पुण्यामधील देवळांची विचित्र नावे
६.मोदी गणपती
७. शनिवारवाडा
८. आर्यन थिएटर
९. सदाशिव पेठ 
१०.सारस बाग आणि तळ्यातला गणपती
११. पुण्यातील १७ पेठा

१२. पुण्यातील टिळक टँक 

 

१.अप्पा बळवंत चौक

पुणे शहराचा नावाजलेला भाग असणारा , ‘ हार्ट ऑफ द सिटी ‘मध्ये मोडला जाणारा ”अप्पा बळवंत चौक” . आता इंग्रजीच्या भडिमारात व शॉर्टफॉर्मच्या जमान्यात हल्ली हा चौक A.B.C. म्हणून ओळखला जातो . पुस्तकांची आणि इतर गोष्टींची दुकाने , ग्रामदेवता जोगेश्वरी मंदिर व दगडूशेठ गणपती मंदिर , हुजूरपागा व नू.म.वि. या शाळा, प्रभात-रतन-वसंत ही चित्रपटगृहे , अनेक महत्वाचे रस्ते या चौकाजवळ असल्याने हा भाग सतत रहदारीचा व गजबजलेला असतो . पण मग या चौकाच्या नावामागची कथा काय ? हे अप्पा बळवंत कोण होते ? चला तर या नावामागे दडलंय काय… याचा शोध घ्यायचा हा छोटासा प्रयत्न .

तर हे अप्पा बळवंत म्हणजेच ‘कृष्णाजी बळवंत मेहेंदळे’ . त्यांचे वडील बळवंतराव गणपत मेहेंदळे हे पेशव्यांचे एक प्रमुख सेनापती होते . अत्यंत कुशल लढवय्ये असणाऱ्या बळवंतरावांनी त्यांच्या कारकिर्दीत पराक्रम गाजविला होता . पण दुर्दैवाने ते १७६० मध्ये पानिपत रणसंग्रामात मरण पावले. अब्दालीने त्यांचे शिर सदाशिवभाऊंना भेट म्हणून पाठवले होते . त्यांची पत्नीही तिथे सती गेल्या. तेव्हा या अवघ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन कृष्णाजी उर्फ अप्पांची जबाबदारी पेशव्यांनी घेतली .

एके दिवशी सवाई माधवराव पेशवे पर्वतीहून शनिवारवाड्याकडे हत्तीवरून परतत होते . त्यांच्याबरोबर त्यावेळेस अंबारीत अप्पा बळवंत हे देखील होते . त्यावेळेस येताना पेशवे यांना भोवळ आली . आणि सवाई माधवराव पेशवे खाली पडणार तोच मागे बसलेल्या अप्पा बळवंतांनी प्रसंगावधान दाखवून त्यांना सावरले , या अपघातातून वाचविले . पेशवे खाली पडले असते तर मोठा अनर्थ झाला असता . आपल्यावरील संकट टळले म्हणून हा प्रसंग जेथे घडला , ती जागा अप्पा बळवंतांच्या नावाने ओळखली जाईल , असे सवाई माधवराव पेशवे यांनी जाहीर केले . तर ही आहे या चौकाच्या नावामागची आख्यायिका . १७९८ मध्ये अप्पा बळवंतांचे निधन झाले .

पुढे याच चौकात म्हणजे आत्ताच्या किबे लक्ष्मी थिएटर समोर सरदार बळवंत मेहेंदळ्यांनी इ.स. १७६१ च्या आधी ३ मजली ४ चौकी असा भव्य वाडा उभारला होता असे कळते . या वाड्यातील एक भुयार थेट शनिवारवाड्यापर्यंत होते. काही गुप्त बैठका घ्यायच्या असतील तर पेशवे या भुयारातून मेहेंदळ्यांकडे येत . भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना याच वाड्यात आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १८३२ म्हणजे ७ जुलै १९१० रोजी झाली . याप्रसंगी सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे व विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे दोघेच उपस्थित होते . काळाच्या ओघात येथे रस्ता रुंदीकरणात त्यांच्या वाड्याचा जवळपास सगळाच भाग त्यात गेला . परंतु आज अप्पा बळवंत हे नाव मात्र चौकाच्या निमित्ताने राहिले आहे .


**********

अप्पा बळवंतांच आडनाव?

अप्पा बळवंत चौक सर्वज्ञात ठिकाण. या अप्पा बळवंतांचं आडनाव काय?
कोणतंही पुस्तक पाहिजे असेल तर ते हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे अप्पा बळवंत चौक. गणपतीची आरती असो, देवीची आराधना करणारं श्रीसूक्त. शाळा, कॉलेज, अभियांत्रिकी विद्यालय, वैद्यकीय विद्यालय, या सर्वांची पुस्तकं असो, ती मिळणारच या चौकातल्या ओळीने बसलेल्या दुकानातूनच. जुन्या पुस्तकांची खरेदी-विक्रीही इथेच चालते. मोठाल्या पिशव्यातून पुस्तकं भरून ठेवून विक्रेते ग्राहक पटवतात. रस्ता अडवला म्हणून तक्रार करणारे अधिकारी आले तर, पुस्तकाच्या पिशव्या त्वरेने बाजूला नेतात. या पुस्तकपुराणा च्या नादात वर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर राहिलंच.

अप्पा बळवंत त्याचं आडनाव ‘मेहेंदळे’

🥊 ‘बळवंतराव मेहेंदळे’ हे होते पेशव्यांचे सेनापती. पानिपतच्या युध्दामध्ये ते मारले गेले. त्यांच्या पत्नी या ही त्या वेळी पानिपतला होत्या. पतीनिधनानंतर शोकाकुल झालेल्या पत्नीने पती बरोबर सहगमन करण्याचे ठरविले. त्या सती गेल्या. सती जाण्यापूर्वी त्यांनी आपला बारा वर्षांचा मुलगा अर्थात ‘अप्पा’ यांस पेशव्यांच्या स्वाधीन केलं पुण्यात अप्पा बळवंत यांचा प्रभात टॉकीज समोर मेहेंदळे वाडा आहे. आप्पा बळवंत हे पेशव्यांच्या अत्यंत विश्वासातले, ते सावलीप्रमाणे श्रीमंत भाऊसाहेब पेशव्यांच्या बरोबर असत. एकदा श्रीमंत पेशवे हत्तीवर अंबारीत बसून चालले होते, तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनाला. शनिवार वाड्यापासून निघाल्यावर थोडे पुढे आल्यावर एक अपघात झाला. अंबारीतून श्रीमंत पेशवे खाली घसरून पडत होते, तेवढ्यात प्रसंगावधान राखून अंबारीत बसलेल्या आप्पा बळवंत यांनी श्रीमंतांचा अंगरखा धरून त्यांना पडताना वाचवलं. दुर्घटना टळली. हा प्रसंग ज्या चौकाजवळ घडला त्या चौकाला ‘अप्पा बळवंत’ यांचं नाव दिले गेले अप्पा बळवंत यांचे आडनाव काय हा प्रश्न मी पुण्यातल्या दोन मेहेंदळ्यांना विचारला, त्यांना त्याचं उत्तर सांगता आले नाही. ते काम मंदा खांडगे यांच्या लेखाने केले. दोनशे वर्षांपूर्वीचा ‘मेंहंदळ्यांचा वाडा’ अजूनही प्रभात टॉकीज समोर आहे. सध्या त्यांच्या आठव्या पिढीतील लोक त्याचं वास्तव्य करून आहेत. वाड्यातल्या भिंती इतक्या रुंद की त्यातूनच वरच्या मजल्यावर जायला जिना आहे. वाड्यात मध्यभागी अत्यंत थंड राहील अशी लोणच्याची खोली🍏! आता फ्लॅटचे स्क्वेअर फुटात दर ऐकणारे आपण ‘लोणच्याची खोली’ हे वाचून थक्क होतो. तिथं मोठमोठ्या रांजणात लोणची साठवायची म्हणजे वापरही तसा असणारच. कै.न.चिं. केळकर, कै. दत्तो वामन पोतदार,व अप्पा बाळवंतांच्या वंशामधील खंडेराव चिंतामणी मेहेंदळे यांनी ‘भारत इतिहास संशोधन मंदिराची’ स्थापना याच वाड्यात केली. या संस्थेच्या वस्तुसंग्रहालयात अप्पा बळवंत यांचा अंगरखा जतन करून ठेवला आहे. या वाड्यात एकुण जिने होते चौसष्ट. त्यातून एक वाट भुयारातून थेट शनिवारवाड्यात निघायची. गुप्त खलबतां साठी पेशवे शनिवार वाड्यातील या भुयारातून इथं येत. असा आहे या चौकाचा इतिहास.

सदरची पोस्ट ‘पुणं एक साठवण’ या प्राध्यापक श्याम भुर्के यांच्या पुस्तकातून घेतलेली आहे.

—————————–

२.स्वार गेट

‘स्वारगेट’ या नावामागे दडलंय काय???

पुण्यात राहून स्वारगेट माहित नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. पुण्यातल्या पुण्यात कुठे जायचे असेल किंवा पुण्याबाहेर जायचे असेल तर हे ठिकाण टाळणं अशक्यच.

खर तर स्वारगेटला पुण्याचे दळणवळणाचे केंद्रस्थान म्हटले पाहिजे. जसे हे ठिकाण आज महत्वाचे आहे तसेच ते पूर्वीही महत्वाचे होते. मुख्य गावापासून लांब असणारा हा परिसर होता. सध्याचे स्वारगेट भरवस्तीतच गणले जाते. त्यावेळेस स्वारगेटला काय होते ? हे नाव कसे पडले ? आज बघू “स्वारगेट” या नावामागे दडलयं काय…

पुण्यात प्रवेश करण्यासाठीचा एक पर्यायी मार्ग येथून जात असे. पुण्याची वस्ती वाढत होती, पेठा वसत होत्या. रस्ते बनत होते. त्यामुळे पूर्वी गावाबाहेर संरक्षणासाठी गस्त ठेवली जात असे. त्यासाठी घोडेस्वार तैनात असत. अशा ठिकाणांना नाक्याचे ठिकाण किंवा पहाऱ्याच्या चौक्या म्हणत असत. अशी ही महत्वपूर्ण ठिकाणं इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली. कारण त्या ठिकाणांचे महत्व तसेच राहिले होते. इंग्रज अमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव ‘गेट’ असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे “स्वारगेट” असे ओळखले जाऊ लागले. आजतागायत ते नाव तसेच राहिले आहे.

स्वारगेट चौक:
इ.स.१६६० साली शायिस्तेखान पुण्यात आला, तेव्हा त्याने कात्रज घाट उतरल्यावर पहिली मोठी गस्तीची चौकी स्वारगेट परिसरात उभारली होती. मोठ्या फौजफाट्यासह त्याने पुण्यात तळ ठोकला होता. पुढे सातारा ही राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी वसवली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी, जकात वसूल करण्यासाठी सुद्धा होत असे. स्वारगेट सोडून रामोशीगेट, म्हसोबागेट, पुलगेट ही गेट आजही पुण्यात अस्तित्वात आहेत. पैकी रामोशीगेट येथे चौक्यांवर पहारेकरी म्हणून रामोशी समाजातील लोकांची नेमणूक केली जायची. त्यावरून तिथल्या जागेला ‘रामोशीगेट’ असे नाव मिळाले.

इ.स. १९४० मध्ये स्वारगेटहून पहिली बस धावली. त्याच्याआधी पुण्यात टांगे अस्तित्वात होते. आज हा परिसर स्वारगेट नावाने ओळखला जातो तरी येथील बसस्थानकाचे नाव ‘छत्रपती राजर्षि शाहू महाराज बसस्थानक’ असे आहे. स्वारगेट चौकाचे नाव ‘देशभक्त केशवराव जेधे चौक’ असे आहे. त्यांचा पूर्णाकृती पुतळ्यासह त्यांचा संक्षिप्त जीवनपट येथे लावला आहे. चौकातून गेलेल्या उड्डाणपुलास सुद्धा त्यांचेच नाव आहे. तरीही तो स्वारगेट चौक या पुण्यातल्या इतर ठिकाणांप्रमाणे जुन्या नावानेच ओळखला जातो. पण दुर्दैवाने आपल्याकडून अशा गोष्टी बघितल्या सुद्धा जात नाहीत. जुने नाव टिकले चांगली गोष्ट आहे पण निदान अशा गोष्टी आपल्याला माहित तरी पाहिजे.

पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे काम चालू झाले आहे. त्यात ‘पिंपरी चिंचवड ते स्वारगेट’ हा मार्ग पुणे मेट्रोच्या तीन मुख्य कॉरिडॉर पैकी एक कॉरिडॉर असणार आहे. ‘पुणे मेट्रो स्वारगेट मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ लवकरच येथे उभे राहणार असल्याचे कळते. हे देशातले पहिलेवहिले मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब असणार आहे. मध्यंतरी स्वारगेटजवळ भुयारी मेट्रोचे काम चालू असताना २ भुयारी मार्ग सापडले. स्वारगेट ते सारसबाग या रस्त्यावर इ.स. १९१५ मध्ये स्वारगेट जलकेंद्र होते. सुमारे शंभरवर्षांपूर्वी पाण्याच्या व्यवस्थेसाठी ही भुयारं बांधली असतील.

स्वारगेटचे महत्व बसस्थानक आणि एस.टी. स्टॅन्डमुळे सध्याच्या काळात वाढलेले दिसते. कधिकाळचा गावाबाहेर असणाऱ्या या परिसराने आज संपूर्ण शहराला जोडले आहे. पूर्वीचे स्वारगेटचे महत्व, तिथला दरारा आता संपला आहे. ना घोडेस्वारांचे ठाणे उरले, ना पहारेकरांच्या चौक्या. एका बाजूला चौकात छोटी पोलीस चौकी आहे. ती रहदारीच्या, गजबजलेल्या या भागाचा भार सांभाळत उभी आहे.

स्वारांचा पहारा किंवा गेट या जागेवर पूर्वी होते त्यामुळे नाव ”स्वारगेट” पडले, हा इतिहास विस्मृतीत जाऊ नये म्हणून हा ब्लॉगमार्फत केलेला छोटासा प्रयत्न….🙏🙏🙏💐💐🌹

….. वॉट्सॅपवरून साभार  दि.२९-०५-२०१९

————————

३.पर्वतीवरील देवदेवेश्वर’ मंदिर

पर्वती

..नानासाहेब पेशव्यांनी उभारलेले ” पर्वती” टेकडीवरील मंदिर

२३ एप्रिल १७४९ साली नानासाहेबांनी ‘देवदेवेश्वर’ मंदिर बांधले व नाव दिले ‘पर्वती’. नानासाहेबांनी प्रतिष्ठा केलेल्या शंकराच्या पिंडिला ‘देवदेवेश्वर’ असे नाव दिले. देवस्थानचा उभारणीचा आरंभ जरी नानासाहेबांनी केला असला तरी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत पायऱ्या बांधल्या गेल्या.

या ठिकाणी २२ मार्च व २३ सप्टेंबरला सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण शिवपिंडीवर पडतात. हे पाहण्यासाठी काहीच अवधी असतो. मात्र, यावेळी चांगलीच गर्दी होते. मुख्य मंदिराच्या बाहेरील चारही कोपऱ्यांवर सूर्यनारायण, गणेश, पार्वती आणि जनार्दन विष्णू यांची छोटी मंदिरे आहेत.

थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांची कारकिर्द म्हणजे १७४०-१७६१ या कारकीर्दीत पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे मध्यवर्ती केंद्र बनले होते. पेशव्यांनी पुणे शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याचा विकास व सुशोभीकरण करताना नानासाहेब पेशव्यांनी पर्वती देवस्थान व सारसबाग वसवली. या पाठोपाठच पुण्यातील अनेक पेठा, वाडे, मंदिरे, रस्ते, हौद यांचा विकास केला.

पूर्वी मंदिराच्या व्यवस्थेसाठी पेशव्यांच्या दरबारातूनच रकमेची व्यवस्था करण्यात येत असे. सवाई माधवरावांची मुंजही या मंदिरात झाल्याची नोंद इतिहासात सापडते. कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा आदी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. कार्तिक महिन्यातील त्रिपुरीपौर्णिमेचे दिवशी म्हणजे नोव्हेंबरमध्ये दर्शनासाठी येथे गर्दी होते. तसेच श्रावणात सोमवारी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते.

१७६१ला पानिपताच्या तिसऱ्या लढाईत मराठी साम्राज्याची प्रचंड हानी झाली. मुलगा विश्वासराव व भाऊसाहेब गेल्यामुळे खचून गेलेल्या नानासाहेबांनी जून १७६१ पर्वतीवर ‘‘भाऊ भाऊ…’’ करीत देह ठेवला. मंदिराच्या बाहेरील बाजूस नानासाहेब पेशवे यांची समाधी आहे. पर्वतीवर अनेक थोरांचे पाय लागले. नाना फडणवीस, भाऊसाहेब, माधवराव, महादजी शिंदे, रामशास्त्री, दुसरा बाजीराव, पेशवे घराण्यातील स्त्रिया येथे दर्शनासाठी नेहमीच येत असत. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकी येथे सुरू असलेली ब्रिटीशांबरोबरची लढाई याच पर्वतीवरून पाहिल्याची नोंद आहे.

  – संतोष डी.पाटील

   …… फेसबुकवरून साभार   दि.१७-०६-२०१९

————————————

४.तुळशीबाग

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सुप्रसिद्ध विश्रामबाग वाड्याच्या समोर असलेलं ठिकाण म्हणजेच ‘तुळशीबाग’! राममंदिरासाठी प्रसिद्ध तसंच सर्वांचंच आणि मुख्यत्वे स्त्रियांचं हे आवडतं ठिकाण. स्वयंपाकाची भांडी असोत की बाकी घरातल्या वस्तु असोत, सौंदर्य प्रसाधने असोत की दागिने असोत किंवा कपडे असोत. पुजा साहित्याचीही अनेक दुकाने, अगदी देवांच्या सुबक मुर्तींपासून पुजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची दुकानं इथे आहेत. भरपुर मोठा भाग फिरलो आपण तुळशीबागेत! भुक लागली असेल नं?? चला की मग! इथे मस्त उपहार गृहे सुद्धा आहेत. अहो !! पण तुळशीबाग तुळशीबाग म्हणता आणि साधी एक तुळस नाही दाखवलीत हो तुम्ही! थट्टा करता काय??’

यासाठी थोडे मागे इतिहासात जाऊया!

पेशवाईतील गोष्ट! साताऱ्याजवळ पाडळी नावाचे एक गाव आहे. या गावात आप्पाजी खिरे नावाचे एक गृहस्थ राहत. हे त्या गावचे वतनदार होते. त्यांच्याकडे या गावचं कुलकर्णीपणाची जवाबदारी होती. अप्पाजींना नारायण नावाचा धाकटा मुलगा होता. तो कुटुंबात फार लाडका होता. साधारण १७०० च्या दरम्यानचा याचा जन्म! नारायण हा खुप हट्टी होता. यामुळे त्याच्या भविष्याबद्दल आई-वडिलांना फार चिंता वाटत होती. एकदा आई त्याला यावरुन काहीतरी बोलली म्हणुन हा नऊ दहा वर्षांचा मुलगा ‘आपलं नशीब मी स्वतः घडवुन दाखवीन’ या इर्षेने घरातुन एकटाच चालत चालत निघाला आणि पुण्यात आला. पुण्यात शहरभर हा फिरला आणि दिवस मावळेपर्यंत हा एकदम थकुन गेला होता. मग पुण्यातील आंबिल ओढ्याच्या काठी असलेल्या रामेश्वराच्या मंदिरात तो आला आणि महादेवाचे दर्शन घेऊन तिथेच एका कोपऱ्यात तो निजुन गेला. त्या मंदिरात दररोज सकाळी सुर्योदयाच्या वेळी गोविंदराव खासगीवाले देवदर्शनासाठी येत. त्या दिवशी आल्यावर त्यांनी नारायणाला कोपऱ्यात गाढ झोपलेलं पाहीलं. त्याला त्यांनी उठवलं आणि त्याची आस्थेने चौकशी केली. सगळं प्रकरण कळल्यावर त्यांनी त्याला आश्रय दिला. स्वतःकडे आपल्या शागिर्दांमध्ये नोकरीस ठेवले. त्याला ते लाडाने ‘नारो’ म्हणत आणि पुढं त्यांचं तेच नाव रूढ झालं. ब्राह्मण असल्यामुळे त्याचाकडे खासगीवाल्यांनी आपल्या रोजच्या पुजा अर्चेसाठी तुळशी, बेल, दुर्वा, फुले वगैरे आणण्याचं काम दिलं. आजची जी तुळशीबाग आहे ती त्या काळी पुण्याच्या बाहेर होती. एक एकर भर पसरलेल्या या जागेत त्या काळी खासगीवाल्यांची स्वतःच्या मालकीची तुळशीची बाग होती. विविध फुले वगैरे इथे त्यांनी वाढवली होती आणि तुळस ही तिथे जास्त प्रमाणात होती. म्हणुन त्याच नाव ‘तुळशीबाग’ असे पडले. या बागेतुन तेव्हा नारो तुळस फुले आणायचा. आपल्या कामातील मेहनतीच्या बळावर त्याने खासगीवाल्यांचा विश्वास संपादन केला. कामातील निष्ठा पाहुन पुढे खासगीवाल्यांनी आपल्या लाडक्या नारोला पेशव्यांच्या खासगीतील हिशोब वगैरे करण्यासाठी चाकरीत सामावुन घेतले. पुढे नानासाहेब पेशव्यांनी त्याची कामाची पद्धत, शिस्त, वागणुक आणि चोख हिशोब वगैरे पाहुन त्याला कोठी खात्याच्या कारकून पदावर नेमले. एकदम एवढी मोठी जवाबदारी अंगावर आल्याने त्याला गर्व झाला. एकदा दसऱ्याच्या दिवशी खासगीवाल्यांनी नारोला आपल्या घरी जेवायला बोलावले. पण इतरांसारखे आपल्याला चांदीची ताटे वगैरे न देता साध्या पंगतीत बसवले, यामुळे तो चिडुन उपाशी पोटीच तिथून उठुन निघुन आला. खासगीवाल्यांना हे कळल्यावर त्यांनी लगेच दोन माणसे नारोच्या मागावर पाठवुन त्याला धरुन आणण्यास सांगितलं. त्याला आणल्यावर संतापलेल्या खासगीवाल्यांनी नारोला कडक शब्द सुनावले. त्यामुळे नारोला आपली चुक समजली आणि तो वठणीवर आला. त्याचा गर्व गळुन गेला. नारोने मग खासगीवाल्यांची क्षमा मागितली. खासगीवाल्यांनीही त्याला माफ करुन छत्रपतींच्या दरबारी साताऱ्यास जमाखर्च लिहिण्यासाठी पाठवुन दिले. तिथेही त्याने छत्रपतींची मर्जी संपादन केली. छत्रपतींनी त्याला इंदापुर प्रांताचा मुकादम केले. ‘कामाचे मर्दाने लिहिणारा’ असा नारो आप्पाजींचा लौकीक झाला. १७४७ साली पेशव्यांनी पुन्हा या हुशार माणसाची पुणे दरबारी गरज असल्याचे सांगुन त्याला पुणे दरबारी पाठविण्याची विनंती छत्रपतींना केली. छत्रपतींनी ती विनंती मान्य केली आणि नारो आप्पाजीस पुणे दरबारी पाठविले. पुण्यात आल्यावर नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुणे सुभ्याची दिवाणगिरीची जवाबदारी सोपविली. त्याचसोबत पेशव्यांच्या कोठी खात्याचे कारभारीपद देखील त्यांस दिले. १७४९ साली खासगीवाल्यांच्या तुळशीबागेची व्यवस्था नारो आप्पाजींवर सोपवली. १७५० साली त्यांची काम करण्याची पद्धत, मुत्सद्दीपणा वगैरे गुण पाहुन नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुण्याचे सरसुभेदार केले. पुढे पुणे शहराचे मुख्य रचनाकार या नात्याने नानासाहेब पेशव्यांचे स्वप्नातील पुणे शहर निर्माण करण्यात नारो आप्पाजींनी खुप मोलाची मदत केली. यामुळे नारो आप्पाजींनी नानासाहेबांचा अजुनच विश्वास संपादन केला. श्रीमंती वाढली. वेळप्रसंगी अनेक गोष्टी त्याग करून आपल्या पेशव्यांसाठी स्वतःच्या तिजोरीतुन ते पैसा पुरवीत. १७५७ साली नानासाहेबांनी नारो अप्पाजींना पालखीची नेमणुक करून दिली.

१७५८ साली पुण्यात एक रामाचे मंदीर असावे असे नारो आप्पाजींच्या मनीं आले. यासाठी त्यांनी खासगीवाल्यांकडून एक एकरभर पसरलेली तुळशीबाग विकत घेतली. सर्व जागा तुळशी वगैरे काढुन मोकळी केली गेली. त्याला तटबंदी बांधली आणि पेशव्यांकडे राम मंदिर बांधण्याची परवानगी मागितली. नानासाहेबांनी ही मागणी मंजुर केली. माघ महिन्यात या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. तुळशीबागेचे मालक झाल्यामुळे त्यांना ‘तुळशीबागवाले’ म्हणुन लोक संबोधु लागले आणि त्यांचे खिरे हे आडनाव लोप पावले.

पानिपताच्या पराजयाने खचुन नानासाहेबांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने हे बांधकाम थांबले. पुर्ण पुणे या दुहेरी दुःखात बुडाले होते. थोरले माधवराव पेशवे झाले आणि काही दिवसांनी स्वतः त्यांनी तुळशीबागवाल्यांना बोलावून राम मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरु करण्याची आज्ञा दिली. १७६३ सालच्या अखेरीस मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाले आणि विधिपूर्वक समारंभाने मंदिरास उंबरा बसविण्यात आला. मंदिराला १४० फुट उंच शिखर बांधण्यात आले होते. त्याला नारो आप्पाजींनी सोन्याचा कळस बसविला. हे काम पुर्ण झाल्यावर थोरल्या माधवरावांनी तुळशीबागवाल्यांना वढू हे गाव इनाम दिले. मंदिराच्या रोजच्या खर्चासाठी सरखेल आंग्रे यांनी कुलाबा गाव इनाम दिला. १७६५ साली उमाजीबुवा पंढरपुरकर यांच्याकडुन रामरायाची सुंदर मुर्ती घडविण्यात आली आणि तिची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली. यानंतर राम मंदिराच्या आजुबाजुला अनेक छोटी मंदिरे बांधुन त्यात गणपती, विष्णु, त्र्यंबकेश्वर महादेव, विठ्ठल रखुमाई इत्यादी देवतांची स्थापना केली. रामापुढे दासमारूतीची स्थापना केली. या सर्व मुर्ती घडविण्यास ३५० – ४०० रुपये खर्च आला. मंदिराला एक मुख्य दरवाजा बांधण्यात आला. याचे संगीत दरवाजा असे नामकरण करण्यात आले. पहिल्या रामनवमी उत्सवास २००० रुपये खर्च आला.

१७६३ साली निजामाने पुणे उध्वस्त करु नये म्हणुन तुळशीबागवाल्यांनी निजामाला दीड लाख रुपये खंडणी देऊ केली. पण तरीही सूडाची भावना मनी घेऊन निजामाने पुणे पुर्ण जाळले. हि घटना स्वारीवर असलेल्या थो. माधवराव पेशव्यांना समजताच त्यांनी निजामाच्या राजधानीत घुसुन निजामाची पळता भुई थोडी केली. पुण्यात परतल्यावर पेशव्यांना पुण्याची अवस्था पहावली नाही. त्यांनी लगेच तुळशीबागवाले यांना ‘मुख्य नगर रचनाकार’ हे पद देऊन शहराच्या अवस्थेस सुधरवण्याची आज्ञा दिली. तुळशीबागवाल्यांनी काही वर्षातच अत्यंत खुबीने होते त्याही पेक्षा सुंदर रितीने पुणे शहर वसविले. थोरल्या माधवराव पेशव्यांवर त्यांचा विशेष जीव होता. त्यांचे थेऊर मुक्कामी निधन झाल्याने तुळशीबागवाले खुप खचून गेले होते. तशाच अवस्थेत ते खंबीर राहुन आपली सुभेदारी सांभाळीत. नारायणरावांच्या वधानंतरही पुण्याची तात्काळ नाकाबंदी करून गारद्यांपासून पुणे वाचविले. शनिवारवाड्यावर खडे पहारे ठेवले. श्रीमंत नारायणरावांच्या पत्नी गंगाबाईसाहेब यांना पुरंदर किल्ल्यावर सुखरूप हलवले. गंगाबाईंच्या नावे पेशवाईचा कारभार सुरु झाल्यावर त्यांच्या नावाची द्वाही पुर्ण पुण्यात तुळशीबागवाल्यांनी फिरवली. मार्च १७७५ साली वयाच्या ७५व्या वर्षी नारो आप्पाजी खिरे उर्फ़ तुळशीबागवाले यांचे पुण्यात देहावसान झाले.

तुळशीबागवाल्यांच्या मृत्युनंतरही तब्बल २० वर्षे राम मंदिराचे बांधकाम चालले. खरड्याच्या लढाईनंतर सवाई माधवराव पेशव्यांनी संगीत दरवाज्यावर नगारखाना बांधला आणि तिथे वर्षासने लाऊन नित्य सनई चौघडा झडू लागला. शनिवार तिसऱ्या प्रहरी थोरल्या बाजीराव पेशव्यांना पुणे इनाम मिळाले. याची आठवण म्हणुन दर शनिवारी दुपारी ३ वाजता साधारण अर्धा तास चौघडा वाजवण्याची प्रथा सवाई माधवरावांनी सुरु केली जी आजतागायत सुरु आहे. मंदिराच्या दक्षिणेला आणि पश्चिमेलाही प्रवेशद्वार पेशव्यांनी बांधुन घेतले. १७८९ मध्ये मंदिरातील देवांच्या दागदागिन्यांची चोरी झाली. तेव्हा सवाई माधवरावांनी दोन हजार चौदा रुपये बारा अणे इतक्या किमतीचे दागिने रामरायास अर्पण केले. मंदिराचा नित्य चौघडा १८९५ मध्ये सुरु झाला. एकुण ३५ वर्ष राम मंदिराचे बांधकाम चालु राहिले, ज्याला त्याकाळी १ लाख ३६ हजार ६६७ रुपये खर्च आला. श्रीमंत सवाई माधवराव इथे नेहमी दर्शनास येत. त्यांच्या कारकिर्दीत हे मंदिर फार प्रसिद्ध झाले. एका पोवाड्यात वर्णन आहे,

श्रीरामाच्या मुर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या।
ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या।।

अशी मंदिराची ख्याती होती. ह्या मंदिरात कीर्तन, प्रवचनकारांचा, पुराणिक, कथाकारांचा राबता असे. असे सांगितले जाते की, या मंदिरात जो कीर्तनकार, प्रवचनकार श्रोत्यांची वाहवा मिळावी तो सगळीकडेच श्रेष्ठ समजला जाई.

आता मंदिराच्या आजुबाजुला भरपुर दुकाने झाली आहेत. दर एकादशीला एखाद्या जत्रेसारखी तुळशीबागेबाहेर म्हणजेच या राम मंदिराबाहेर दुकाने बसत. तीच कालांतराने तिथे पन्नास साठ वर्षांपुर्वीपासून नित्य वसु लागली आणि आता या दुकानांनी प्रसिद्ध बाजारपेठेचे स्वरूप घेतले आहे. अगदी सगळीकडून पुण्यात कुणी आलं की तो तुळशीबागेत येतोच येतो. खरेदीसाठी!! पण इथुन पुढे आठवणीने खरेदी करण्या आधी या रामरायाच्या दर्शनासाठी नक्की जात जा.

पुण्याचे आद्य नगररचनाकार नारो आप्पाजी खिरे अर्थात तुळशीबागवाल्यांची ही तुळशीबाग! त्यांच्या कार्याची, प्रसंगी केलेल्या कष्टांची, त्यागाची आणि पेशव्यांप्रती, आपल्या राज्याप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेची जाणीव आपल्याला करुन देते. या थोर मुत्सद्याचे वर्णन एका श्लोकात खुबीने केले आहे….

जयाने स्वशौर्ये पुणें रक्षियेलें।
जयें पुण्यनगरी सह भूषविलें।
तशी मंदिरीं स्थापिलीं राममुर्ती।
अशी पंत नारो खिरे ख्यात किर्ती।।

….. वॉट्सॅपवरून साभार  दि.२८-०६-२०१९


५.पुण्यामधील देवळांची विचित्र नावे

 ….  आशुतोष बापट

नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही. पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावे ठेवलेली आढळतात. या नावांतून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो. तिथे असलेला बाजार, वस्ती, तिथे घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळे पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नावे खूप उपयुक्त ठरतात. ‘‘नावात काय आहे?’’ असे कोणीतरी म्हटले होते, परंतु ‘‘नावातच सर्व इतिहास दडलेला आहे’’ असे ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतात!

‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण पुणेकर सर्वार्थाने सार्थ करत असतात. काहीतरी आगळंवेगळं, आकर्षक आणि काहीसं विचित्र अशा अनेक गोष्टी पुण्यात पाहायला मिळतात. गोष्टीच कशाला, विचित्र व्यक्तींचीसुद्धा पुण्यात काही कमतरता नाही. कितीही चर्चेचा विषय होत असला तरीसुद्धा पुणेकरांनी आपले निराळेपण अगदी आजच्या काळातसुद्धा जपून ठेवले आहे. जशा पुणेरी पाटय़ा हा एक मोठा चर्चेचा विषय आहे तशीच पुण्यातल्या देवांना असलेली नावे हासुद्धा तितकाच मजेशीर विषय आहे.

कुठलीही व्यक्ती, संस्था, देवालये ही एका विशिष्ट नावाने ओळखली जाते, पण पुण्यात मात्र देवांना जी काही नावे ठेवलेली आहेत ती बघितली की, आपण थक्क होऊन जातो. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत पुण्याला शहराचा लौकिक प्राप्त झाला. पुण्याच्या जडणघडणीत नानासाहेब पेशव्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या काळात पुणे विस्तारत गेले. वस्ती वाढत गेली. विविध प्रांतांतून लोक येऊन पुण्यात वस्ती करू लागले. पुणे ही एक व्यापाराची मोठी पेठ तयार होत गेली आणि पुण्यात वेगवेगळ्या देवांची मंदिरे आणि देवस्थाने उभी राहू लागली. त्यांची ओळख करून घेताना, त्यांची नावे समजून घेताना मोठी मौज वाटते. पुण्यात सर्वात जास्त देवळे ही मारुतीची असावीत. त्या खालोखाल शंकर, गणपती, विष्णू, देवी आणि इतर देवतांची मंदिरे दिसतात.

शनिवारवाडय़ासमोरच्या पटांगणात बटाटय़ाचा बाजार भरत असे. त्यामुळे तिथे असलेला मारुती झाला ‘बटाटय़ा मारुती’. तसेच सराफांची दुकाने असलेल्या ठिकाणचा झाला ‘सोन्या मारुती’. आजच्या केईएम हॉस्पिटलसमोर पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफिला थांबायचा. तिथे उंटांचा तळ असायचा. त्यामुळे तिथला मारुती झाला ‘उंटाडय़ा मारुती’, तर स्मशानाकडे जाणारी अंत्ययात्रा खांदापालट करण्यासाठी जिथे थांबायची, त्या ठिकाणचा मारुती झाला ‘विसावा मारुती’. ‘डुल्या मारुतीची’ कथा काही औरच! पानिपत इथे मराठी सैन्याची कत्तल झाली म्हणून तो थरथर कापत होता, डुलत होता. तो झाला ‘डुल्या मारुती’. याबद्दल अजून एक वेगळी आख्यायिका सांगितली जाते. दुसऱया बाजीराव पेशवे यांनी पुणे सोडावे का यासाठी म्हणे या मारुतीला कौल लावला आणि या मारुतीने मान डोलवून त्याला मान्यता दिली. म्हणून हा झाला डुल्या मारुती ! भिकारदास शेठजींच्या जागेत आला म्हणून ‘भिकारदास मारुती’, तर गुरुवार पेठेत मृतदेह समोर ठेवून रडायची प्रथा होती म्हणून ‘रडय़ा मारुती’ आणि याचसोबत सुरू होते चमत्कारिक नावांची परंपरा. गवत्या मारुती, दंगल्या मारुती, धनगरांची वस्ती असलेल्या ठिकाणचा ‘लेंडय़ा मारुती’, भांग्या मारुती, बंदिवान मारुती, हलवायांची दुकाने असलेला भाग आणि त्यामुळे मारुतीच्या गळ्यात रोज जिलब्यांची माळ घातली जायची म्हणून तो झाला ‘जिलब्या मारुती’, तल्लीन मारुती, झेंडय़ा मारुती, पत्र्या मारुती. आजच्या फरासखाना इथे पूर्वी चापेकर बंधूंनी मारुतीच्या साक्षीने गोफण क्लब सुरू केला आणि तो मारुती झाला ‘गोफण्या मारुती’. दक्षिणमुखी मारुती आणि गावकोस मारुती असे अनेक मारुती आपल्या खास नावांनी प्रसिद्ध आहेत.

मारुतीबरोबरच इतरही देवस्थानांना असलेली चमत्कारिक नावे आपल्याला पुण्यात पाहायला मिळतात. एक आहे ‘दाढीवाला दत्त’! खरे तर दत्ताचा आणि दाढीचा इथे काहीच संबंध नाही. नारायण पेठेत दत्तात्रय घाणेकर यांनी १९११ मध्ये बाळप्पा महाराजांच्या प्रेरणेने एक दत्तमंदिर बांधले. त्याचे मूळ नाव श्रीपाद मंदिर, पण दत्तात्रय घाणेकरांना दाढी होती. त्यामुळे पुणेकरांनी या दत्ताचे नामकरण केले दाढीवाला दत्त. विजय टॉकीजजवळ आहे ‘सोटय़ा म्हसोबा’. म्हसोबा ही रक्षक देवता आहे. या देवाला नवस बोलत असत आणि तो पूर्ण झाला की, त्याला लाकडी सोटा वाहायची पद्धत होती. कदाचित रक्षक म्हणून त्याच्या हातात सोटा हवा ही भावना असू शकेल. या मंदिराच्या छताला हे भक्तांनी वाहिलेले सोटे टांगून ठेवत असत.

अजून एक वेगळे नाव असलेले मंदिर म्हणजे ‘उपाशी विठोबा’. इथे मात्र प्रथा काहीशी निराळी आणि भक्तिपूर्ण अशी आहे. जवळ जवळ तीन पिढय़ांच्या उपासाच्या व्रतामुळे या देवाला हे नाव पडले आहे. पेशवाईत गिरमे सराफांनी हे मंदिर बांधले. गिरमे उपास करताना लाह्यांचे पीठ आणि ताक असे एकत्र करून त्याचे सेवन करीत असत. त्यामुळे या विठोबाला ‘ताकपिठय़ा विठोबा’ असेही नाव पडले होते. पुढे गिरमे यांनी आपले उपासाचे व्रत नाना गोडबोले यांना सुपूर्त केले. नानांनी हे उपासाचे व्रत अंगिकारले आणि या विठ्ठलाची सेवा करू लागले. नाना गोडबोले हे उत्तम कीर्तनकार होते. पुढे त्यांनी आपल्या कीर्तन संचातील गंगाधरबुवा काळे यांच्याकडे आपले व्रत आणि हे मंदिर सुपूर्त केले. काळ्यांनी त्याच भक्तिभावाने हे व्रत अंगिकारले. सध्या साठे कुटुंबीयांकडे या मंदिराची व्यवस्था आहे. तीन पिढय़ांनी अंगिकारलेल्या उपासाच्या व्रतामुळे हा विठोबा मात्र ‘उपाशी विठोबा’ म्हणून प्रसिद्धीस पावला. असाच अजून एक विठोबा पुण्यात आहे तो म्हणजे ‘निवडुंग्या विठोबा’. नाना पेठेत असलेले मंदिर. वारीच्या वेळी संत तुकोबारायांची पालखी या मंदिरात उतरते. एका भक्ताला निवडुंगाच्या फडात ही मूर्ती मिळाली. पुढे गोसावींनी इथे मंदिर बांधले आणि तो झाला ‘निवडुंग्या विठोबा’. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उतरते तो आहे ‘पालखी विठोबा’. तद्वत पासोडय़ांचा बाजार जिथे भरायचा, तिथे आधी मंदिर झाले पासोडय़ा मारुतीचे आणि त्याच्या नंतर त्याच्या जवळ मंदिर झाले ते ‘पासोडय़ा विठोबाचे’. याशिवाय चोळखण आळीत असलेला ‘खणाळ्या म्हसोबा, नागाचे स्वतंत्र मंदिर आणि त्यात विराजमान असलेली दगडात कोरलेली नागाची जोडी म्हणून तो झाला ‘दगडी नागोबा’.

यांच्यात भर घालायला आलेली देवळे म्हणजे ‘गुडघेमोडी माता’, ‘शितळादेवी’, ‘भाजीराम मंदिर’, मातीपासून केलेला ‘माती गणपती’, ‘गुपचूप गणपती’, पेशवाईत नाना फडणवीसांचा सहकारी असलेल्या नागोजी गुंड याच्या घराजवळ असलेला गणपती झाला ‘गुंडाचा गणपती’. अजून दोन नावे अशीच आगळीवेगळी आहेत. एक आहे ‘बीजवर विष्णू’. खरे तर विष्णूचे एकच लग्न झालेले आहे ते लक्ष्मीशी. मग पुण्यात बीजवर विष्णू कसा काय आला? तर झाले असे की, विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तींपैकी लक्ष्मीची मूर्ती भग्न झाली. तिच्या जागी दुसरी मूर्ती आणून वसवली म्हणून हा देव झाला बीजवर विष्णू ! आणखी एक देवस्थान म्हणजे ‘खुन्या मुरलीधर’. सन १७९७ मध्ये गद्रे सावकारांनी हे मंदिर बांधले आणि त्याच्या रक्षणासाठी अरब शिपाई ठेवले. त्यांच्यात आणि इंग्रजी सैन्यात इथे लढाई झाली. त्यात ६० लोक मारले गेले. दुसरे असे की, चापेकर बंधूंनी रँड या ब्रिटिश अधिकाऱयाचा खून केला. त्यांच्या कटात आधी सामील असलेले द्रविड बंधू नंतर फितूर झाले आणि त्यांनी पोलिसांना सगळी माहिती दिली. हे द्रविड या मुरलीधर मंदिरासमोरच राहायचे. फितुरीची बातमी कळल्यावर या द्रविड बंधूंचा इथेच खून करण्यात आला. त्यामुळे हा मुरलीधर झाला ‘खुन्या मुरलीधर’.

अशी अजूनही अनेक नावे आणि देवळे पुण्यात पाहायला मिळतील. नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही. तीन सोंडी असलेला म्हणून त्रिशुंड गणपती इथपर्यंत ठीक आहे, पण पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावे ठेवलेली आढळतात. खरे तर ही नावे अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशीच ठेवलेली आहेत. या नावांतून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो. तिथे असलेला बाजार, वस्ती, तिथे घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळे पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नावे खूप उपयुक्त ठरतात. ‘‘नावात काय आहे?’’ असे कोणीतरी म्हटले होते, परंतु ‘‘नावातच सर्व इतिहास दडलेला आहे’’ असे ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतात!
– Anand: एक दशभुजा गणपतीही आहे.

….. वॉट्सॅपवरून साभार  दि.२१-०७-२०१९

६.मोदी गणपती

बोंबल्या गणपतीचा मोदी गणपती कसा झाला?

पेशव्यांची राजधानी पुणे म्हणजे भारताच ऑक्सफर्ड. पण इथ जेवढी इंजिनियरिंग कॉलेजसं आहेत, जेवढे स्पर्धापरीक्षाचे क्लासेस आहेत त्या सगळ्यापेक्षा जास्त इथ देवळ हायत. हां पास नापासचं टेन्शन असणाऱ्या आमच्या सारख्या पोरांना देऊळ हाताशी असलेलं बर असतंय. पण याचा अर्थ असं नाही की ही देवळ परीक्षा देणाऱ्यांसाठी बनली. पेशव्यांच्या काळापासून पुण्यात देवळं आहेत.

सदाशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ, गंज पेठ असे पुण्यात एकूण सतरा पेठा आहेत. १८१० साली केलेल्या नोंदीनुसार या सगळ्या पेठांमध्ये एकूण चारशेच्या वर मन्दिरे होती. यात गेल्या दोनशे वर्षात वाढच झाली. आताचा आकडा नक्की माहित नाही. पण पेशव्यांच्या काळातल्या देवळांचा थाटचं निराळा होता हे खरं!!

या पुण्याच्या देवांची नावेही एकदम पुणेरी वळणाप्रमाणे तिरकस आहेत. #पासोड्या मारुती, #सोट्या म्हसोबा, #खुन्या मुरलीधर, #उपाशी विठोबा , #डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, #जिलब्या मारुती, #पानमोड्या म्हसोबा अशी बरीच देवस्थाने आहेत. पण #पेशव्यांच्या पुण्याचं आराध्य दैवत आहे गणपती. हां गणपतीचीही नावे बरीच विचित्र आहेत, #दगडूशेठ हलवाई गणपती तर सगळ्यांना माहित असतो पण कसबा गणपती, #गुंडाचा गणपती, #गुपचूप गणपती, #चिमण्या गणपती, #हत्ती गणपती, #मद्रासी गणपती असे हजार प्रकारचे गणपतीचे आहेत.

पण आज आपण चर्चा करणार आहे #मोदी गणपती बद्दल.

होय खरंच. तुम्हाला वाटल निवडणुकीची आचारसंहिता संपल्या म्हणून बोल भिडू काय पण चेष्टा करालाय. पण नाही हे खरं आहे. चाणक्य शप्पथ. पुण्यात नारायण पेठेत जावा. तिथ पत्ता विचारत बसू नका कोण पण सांगणार नाही. सरळ गुगल मॅपमध्ये टाका आणि खालच्या अंगान वरच्या अंगान जाऊन डायरेक्ट #मोदी गणपतीच्या दर्शनाचा लाभ होईल.

तर आधीच सांगतो, आपल्या देशात २०१४ पासून देश बदलला, आपल्या कड अच्छे दिन आले असं म्हणतात पण त्याच्या आधीच म्हणजे #दोनशे वर्षापासून #मोदी गणपती #पुण्यात आहे.

गोष्ट आहे अठराव्या शतकातली….

पुण्यात तेव्हा दुसऱ्या बाजीरावचा कारभार सुरु होता. इंग्रजांनी मराठी सत्तेच्या भोवती विळखा घट्ट करायचं काम सुरु केलं होतं. त्यांचा एक रीजेन्ट तेव्हा पेशव्यांच्या सदरेवर असायचा. एकूण कामकाज कसे चालते यावर त्याचे बारीक लक्ष असायचे. खरे तर तिथे आलेल्या बेरकी इंग्रज अधिकाऱ्यांनी मराठी शिकून घेतलेली असायची. पण तरीही रोजच्या कामात मदतीला एखादा दुभाषी कम एजंट हवा असायचा. असाच एक एजंट होता त्याच नाव खुश्रू सेठ मोदी.

हा खुश्रू मोदी म्हणजे मुळचा गुजरातचा पारसी. पण महाखटपट्या माणूस. पेशव्यांच्या दरबारात राहून इंग्रज आणि बाजीराव या दोघांनाही खुश ठेवायची कला त्याला चांगलीच अवगत झाली होती. यामुळे दोन्ही कडची मलई खाऊन शेठजीने चांगलीचं माया गोळा केली होती. पेशव्यांनीही त्याला काही गावे इनाम दिली होती.

या खुश्रूसेठ मोदीने नारायणपेठेत भला मोठा वाडा आणि सुंदर बाग उभारली . जिला लोक मोदी बाग म्हणून ओळखायचे. माउंट स्टुअर्ट एलफिस्टन पुण्यात येई पर्यंत या खुश्रू मोदीने पुणे शहरात बराच धुमाकूळ घातला. पुढे कुठल्या तरी पुणेकराने त्याच्या वर विषप्रयोग करून मारले. कोणी म्हणतो त्याने आत्महत्या केली. असो.

याच काळात कोकणातल्या शिरगाव रत्नागिरी जिल्ह्यातून एक भट आडनाव असलेले गरीब ब्राम्हण कुटुंब कामाच्या शोधात पुण्याला आल होतं. पेशवाईमध्ये आपल्याला नक्की आश्रय मिळेल याची त्यांना खात्री होती. याचं भट घराण्यातल्या एका व्यक्तीला मोदी बागेजवळ एक स्वयंभू गणपतीची मूर्ती सापडली. भटांची सिद्धीविनायकावर खूप श्रद्धा होती. त्यांनी एक छोट देऊळ बांधून त्याची पूजा अर्चा सुरु केली.

पुढे कालांतराने भट घराण्याच्या सावकरीच्या व्यवसायाला उर्जितावस्था आली तसा त्यांनी आपल्या मन्दिराचाही जीर्णोद्धार केला. हे साल होत १८६८ . तेव्हा या सुंदर मंदिराला लाकडी सभामंडप बांधला गेला. इथल्या गर्भगृहावरचा कळस, देवळातली गोळवणकर पेंटरनी चितारलेली अप्रतिम चित्रे , श्रींची मूर्ती ही एकदा जाऊन बघण्या सारखीच आहेत.

बर या गणपतीच नाव मोदी गणपती कसे पडले?

या मोदीबागेच्या भागात बरेच मच्छीमार लोक मासे विकायला बसत . ही मंडळी कोकणातून आली असल्यामुळे भटांच्या गणपतीची भक्त होती. या मासेबाजाराचा कलकलाट म्हणा, किंवा बोंबील विकायला येणाऱ्या भक्तांचा गणपती म्हणा या गणपतीचे नाव बोंबल्या गणपती पडले. आजही पेठेत राहणारे जख्ख आजोबा या गणपतीला बोंबल्या गणपती म्हणूनच ओळखतात.

पुढे कालांतराने हा मच्छी बाजार बंद झाला. देवाला असली विचित्र नावे ठेवणारी पिढीही कमी झाली पण मोदी बाग अजूनही तशीच होती. याच बागेमुळे भटांच्या बोंबल्या गणपतीचे नामकरण मोदी गणपती असे झाले.

संदर्भ- ग्रँटडफ. व्हॉ. ३; पेशवाईची अखेर; पेशव्यांची बखर; भा. इ. मं. अहवाल १८३८; दुसरे बाजीराव यांची रोजनिशी

#पुणेरीडायरी #पुणेकर #मोदीगणपती #गणेशोत्सव

….. वॉट्सॅपवरून साभार  दि.०४-०९-२०१९


७. शनिवारवाडा

Shaniwarwada

….. वॉट्सॅपवरून साभार  दि.२७-०८-२०१९

Shaniwarwada

पुण्याचे वैभव असलेल्या शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली.
शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत.पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा, १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना बाजीरावानंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब याला मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर नानासाहेबांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.(विकिपीडिया )
एक यवन सरदाराने वाड्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे “”बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो .

श्री. माधव विद्वांस

….. फेसबुकवरून साभार  दि.१०-०१-२०२०
************

पुण्यनगरीचा मानबिंदू शनिवारवाडा…

शनिवारवाडा १

आज १० जानेवारी…
पेशव्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा आणि पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या शनिवारवाड्याचे भूमिपूजन झाले तो दिवस होता दि.१० जानेवारी १७३० म्हणजेच माघ शुद्ध तृतिया,शके १६५१ होय..! आज या ऐतिहासिक घटनेला २९२ वर्षे झाली.शनिवारवाड्याच्या जागेसंबंधी एक दंतकथा *प्रचलित आहे ती म्हणजे…
सकाळी नेहमीप्रमाणे घोड्यावरुन रपेट करायला निघालेल्या थोरल्या *बाजीरावांना एक अदभुत दिसले. एक ससा शिकारी कुत्र्याचा पाठलाग करीत असल्याचे पाहून ती जागा आपल्या वास्तव्यासाठी शुभदायक ठरेल असा विश्वास बाजीरावांच्या मनी आला व त्यांनी या ठिकाणी स्वतःचे घर उभारण्याचे ठरविले. येथे त्यावेळी उभारली गेलेली वास्तू दुमजली व दोनचौकी होती. बाजीरावांनी स्वतःच्या हाताने स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या लालमहालाची थोडी माती काढून आणून टोपलीने शनिवारवाड्याच्या पायात टाकली व पायास मुहूर्त केला असेही सांगीतले जाते.

स्मरणात ठेवण्यालायक चांगली माहिती👌👌
पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा(फीरोजा), १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या(लहसुनीया) असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. बाजीरावांनंतर त्याचा दत्तक पुत्र दुसरे नानासाहेब यांचा कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर यांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.

विश्वास पटवर्धन
….🙏🙏🌸

शनिवारवाडा 🌹🌹🌹

Shanivarwada

• दहा जानेवारी. पुण्यातील शनिवारवाडयाचे भूमिपूजन याच दिवशी झाले. त्याला 292 वर्षे झाली.( 10 जाने 1730 ) एकेकाळी देशाचे राजकारण या वाड्याने ढवळून काढले होते. अनेक पराक्रमी लढवय्ये या वास्तूतून प्रेरणा घेऊन रणांगणावर जाऊन लढले. विजयी झाले.त्याचे असे झाले की, कसबा पेठेतील पटांगणावर एक ससा शिकारी कुत्र्याचा जोरदार पाठलाग करतो आहे.असे दृश्य बाजीराव पेशव्यांना दिसले. हा शुभशकून आहे. असे मानून त्यांनी याच जागेवर वाडा बांधण्याचा निर्णय घेतला. तोच तो हा शनिवारवाडा.अशी आख्यायिका सांगितली जाते. या वाड्याची वास्तूशांत 22 जानेवारी 1732 रोजी मोठ्या थाटामाटात झाली. तेव्हापासून 1818 पर्यंत म्हणजे तब्बल 86 वर्षे या वाड्याची मालकी मराठा एम्पायरकडे होती.या कालावधीत तिथे पेशवाई नांदत होती. त्यानंतर 1947 पर्यंत म्हणजे जवळपास 129 वर्षे हा वाडा ब्रिटीशांच्या, काहीकाळ ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीचा होता.त्यानंतर मात्र आता तो भारत सरकारच्या मालकीचा झाला आहे.
25 एकर एवढ्या विस्तीर्ण भूभागावर वसलेला हा वाडा.मराठा वास्तूशैलीचा उत्तम नमूना मानला जातो.काही तज्ञ हा भुईकोट किल्ला आहे असेच मानतात.तो सात मजली होता. सातव्या मजल्यावर मेघडंबरी होती. स्वतः पेशवे या मजल्यावर रहात होते. या मेघडंबरीतून आळंदी व तेथील संत श्री ज्ञानेश्वरमहाराज यांचे मंदिर दिसत होते.वाड्याच्या पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम दगडी होते. तर उरलेल्या सहा मजल्यांचे बांधकाम विटांचे होते. या बांधकामासाठी चिंचवडच्या खाणीतून दगड आणले गेले. जुन्नरच्या जंगलातून लाकूड आणि जेजुरी येथून चुना आणला गेला . राजस्थानातील कुमावत क्षत्रिय या ठेकेदाराने ही भव्य वास्तू उभी केली. कोंडाजी सुतार, शिवराम कृष्ण, देवजी सुतार, व मोरारजी पाथरवट या आर्किटेक्ट मंडळींनी शनिवारवाड्याचे डिझाईन तयार केले. राघो नावाच्या पेंटरने संपूर्ण वाड्याचे रंगकाम केले. वाड्याच्या बांधकामाला 16110 रूपये एवढा खर्च आला.1760 पर्यंत वाड्याचे आतील बांधकाम चालू होते. दिल्ली दरवाजा हे या वाड्याचे महाद्वार. ते जसेच्या तसे आज अस्तित्वात आहे.मोगलांचे राज्य ज्या दिशेला होते त्या दिशेला हा दरवाजा बसविण्यात आला. असे संदर्भ वाचायला मिळतात. याच दिशेला मस्तानी दरवाजा आहे. तो मस्तानीच्या वापरात असायचा. अग्नेय दिशेला गणेश दरवाजा आहे. ग्रामदेवत कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हा दरवाजा वापरात होता. आतमध्ये गणेश रंगमहाल होता. तो नानासाहेब पेशव्यांनी १७५५ साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्याचे फवारे यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे. पश्चिमेला खिडकी दरवाजा होता. तर दक्षिणेला जांभूळ दरवाजा होता.तिथून दासदासी जा ये करीत असत.हे सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते. दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा पर्यटक आवर्जून पहातात. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढलेली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.सर्वच दरवाज्यांवर अष्टौप्रहर गारद्यांचा जागता पहारा असे.दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरूज लागे. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता. आणि त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे जरीपटक्याचे भगवे निशाण फडकत असे. बुरुजाच्या आत तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती. कमानींतून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस दोन दोन लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाड्याची मुख्य इमारत होती. तिथे चार मोठमोठे चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असे नाव होते, पण तो बाहेरील चौक या नावानेही ओळखला जाई. नैर्ऋत्येकडील चौकास मोतीचौक असे म्हणत. त्या चौकाला बाईंचा (गोपिकाबाई) चौक असेही म्हणत. वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असे नाव असून तो मधला चौक या नावाने ओळखला जात असे. शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकास माणिकचौक म्हणत.या मोठया चौकांशिवाय फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादि अनेक पोटचौक होते. त्यांपैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकात असून त्यांत पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकांत मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसेमहाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादी अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादी अनेक देवघरे होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पीलखाना, उष्ट्रखाना, शिकारखाना, शिलेखाना अशी दालने होती. वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधलेले होते.मध्यभागी अनेक हौद व कारंजी असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकातले हजारी कारंजे कमलाकृती असून त्याचा घेर सुमारे ऐशी फूट होता. त्यात सोळा पाकळया होत्या. प्रत्येक पाकळीत सोळा याप्रमाणे दोनशे छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती. वाड्याचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचे होते.त्यांतील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय होते. दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा सभामंडप व चारी बाजूंस चार दालने काढलेली होती. सभामंडपाचे काम सुरूदार नक्षीचे होते. त्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांवर पक्षी, फळे, वेलबुट्टी अशी चित्रे कोरलेली होती.. विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपती महालात रामायण-महाभारतातील कथांची चित्रे होती. जयपुरमधील भोजराज नावाच्या चित्रकाराने हे काम केले होते.कमळाच्या आकाराचे जै कारंजे होते. त्याला हजारी कारंजे असे नाव होते. सवाई माधवराव बालपणी तेथे खेळत असत. थोरल्या रायांचा दिवाणखाना, जुना आरसेमहाल,न्याय निवाडा करण्याचे दालन,नृत्याचा दिवाणखाना, ठिकठिकाणचे हौद,अशी या वाड्याची अंतर्गत रचना होती.वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादीची व्यवस्था वेगवेगळ्या चौकांतून करण्यात आली होती. कात्रज येथे तलाव बांधून त्यातून पाणी शहरात आणून ते वाड्यात सर्वत्र खेळविले होते.असे वर्णन कवि साधुदास यांनी ‘पौर्णिमा’ या कादंबरीत केले आहे. ठिकठिकाणी सिलींगला काचेच्या हंड्या बसविलेल्या होत्या. विवाह सोहळे. सैनिक सभा यामुळे वाड्यात सतत वर्दळ असायची अनेक घटना, दुर्घटनांचा हा वाडा साक्षीदार आहे. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. समोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य उभे असायचे. 1758 मध्ये या वाड्यात सुमारे एक हजार लोक रहात होते.1808,1812 व 1813 या वर्षात या वाड्याला लहान मोठ्या आगी लागल्या होत्या. पुण्याचे पहिले जिल्हाधिकारी हेनरी डंडास राॅबर्टसन 1817 मध्ये या वाड्यात रहात होते असे संदर्भ वाचायला मिळतात. त्यानंतरच्या काळात वाड्यात तुरूंग होता.पोलीसांची घरे होती.पंगुगृह होते.1828 मध्ये शनिवार वाड्याला आग लागली. ती आठवडाभर धुमसत होती. त्यात आतील वाडा भस्मसात झाला. त्यानंतर ब्रिटीशांनी 1919 मध्ये संरक्षित स्मारक म्हणून शनिवारवाडा जाहीर केला. 1923 मध्ये उत्खननासाठी कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत पाडण्यात आली. आता या वाड्यात एकही इमारत अस्तित्वात नाही. नऊ बुरूज मात्र शाबूत आहेत. पुण्यातील मध्यवस्तीत ते दिमाखाने उभे आहेत. या बुरूजांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी ‘पागेचा बुरूज’ आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. आता हा वाडा पर्यटन स्थळ झाल्याने तिथे दिवसभर वर्दळ असते. वाड्याच्या पटांगणावर आता खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. काही विद्यार्थी अभ्यासासाठी आत बसलेले दिसतात. बाहेर बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा. जाहीर कार्यक्रमांसाठी आसनव्यवस्था असलेले पटांगण. भेळपुरीच्या गाड्या. या वैशिष्टयांसह पेशवाईला उजाळा देण्याचे काम करीत हा वाडा रूबाबात उभा आहे. वाड्याच्या चारही दिशेचे रस्ते प्रचंड रहदारीमुळे सतत जॅम असतात.वाहनांच्या गराड्यातच हा वाडा सापडला आहे असे मी म्हणेन. स्वातंत्र्यानंतर शनिवार वाड्यावर गाजलेल्या सभा हा राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासाचा विषय आहे.आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाचे रणशिंग याच वाड्याच्या पटांगणातून फुंकले. उपमहापौर प्र. बा. जोग यांची भाषणे हा शहरभर चर्चेचा विषय असायचा. या वाडयाचा निर्माता महान सेनानी पहिले बाजीराव पेशवे यांनी मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतापर्यंत विस्तारल्या. त्यांनी पस्तीस लढाया केल्या. त्या सर्वच्या जिंकल्या. शंभर टक्के सक्सेस रेट असणारा हा महापुरूष सर्वार्थाने शनिवार वाड्याशी समरस झाला होता .जोडला गेला होता. त्याला माझा मुजरा.
🎷🎺🎷🎺
मधुपर्णी
✨👑✨👑     . . .  वॉट्सॅपवरून साभार दि.१२-०१-२०२२

**************************************************

८. आर्यन थिएटर

आज ७ फेब्रुवारी
आर्यन चित्रमंदिर’ हे पुण्यातील पहिले चित्रपटगृह. ७ फेब्रुवारी १९१५ रोजी गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी लोकरंजनाचे नवीन साधन म्हणून ‘आर्यन’ चित्रपटगृहाची स्थापना केली. त्याचे संस्थापक होते, गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक. ते चित्रपटगृह महात्मा फुले मंडई परिसरात लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर होते. महापालिकेने ते २२ सप्टेंबर १९८३ रोजी पाडले व तेथे पार्किंग स्टँड उभारले. कारण ती जागा महापालिकेची होती. त्याचा शतकमहोत्सवी समारंभ बापुसाहेबांचे चिरंजीव आनंदराव पाठक यांनी पुण्यातील फिल्म अर्काईव्हजच्या दालनात साजरा केला. ‘आर्यन’ १९१५ साली सुरू झाले, तेव्हा तेथे मूकपट दाखवले जात होते. मूकपटांतील दृश्यात जिवंतपणा यावा यासाठी पडद्यामागे बाजाची पेटी, तबला, घोड्याच्या पळतानाच्या टापांचा आवाज वाटावा म्हणून नारळाच्या रिकाम्या करवंट्या वाजवल्या जात. पेटी, तबला वाजवण्याचे काम करणा-या मुलांमध्ये राजा परांजपे यांचा समावेश होता. पुढे ते विख्यात दिग्दर्शक झाले. पुण्यात पहिले चित्रगृह उभारणा-या व पहिला मूकपट ‘डायमंड रिंग’, पहिला भारतीय बोलपट ‘आलम आरा’, पहिला मराठी बोलपट ‘संत तुकाराम अर्थात जय हरि विठ्ठल’. ‘संत तुकाराम’ आर्यनमध्ये दाखवणा-या गंगाधरपंतांचे स्मरणही केले जात नाही, त्याबद्दल आनंदरावांनी दु: ख व्यक्त केले. सिनेमा म्हणजे काय, अशी उत्सुकता असणा-या प्रोजेक्टरद्वारे चालतीबोलती चित्रे दाखवून ‘आर्यन‘ चित्रपटगृहाने लोकरंजनाचा इतिहास निर्माण केला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारा ‘आर्यन’मध्ये आपण स्वत: अनेक मूकपट व बोलपट पाहिले आहेत असे सांगितले.

महात्मा फुले मंडईत स्थापन झालेल्या त्या चित्रपटगृहाने मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळात सिंहाचा वाटा उचलला; तसेच अनेक मराठी चित्रपटांचे रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव व हीरकमहोत्सव साजरे केले. ते चित्रपटगृह मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी आधारवडच होते. ७ फेब्रुवारी १९२० रोजी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला होता. ‘आर्यन’ला पन्नास वर्षें पूर्ण झाली तेव्हा सुवर्णमहोत्सवी समारंभ झोकात साजरा झाला होता. महापौर बी.डी. किल्लेदार समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. दैनिक ‘सकाळ’चे संपादक ना.भि. परुळेकर हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते अरुण सरनाईक, अनंत माने आदी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. ‘आर्यन’ चित्रगृहास प्रथमपासून भेट देणा-यामध्ये लोकमान्य टिळक, रँग्लर परांजपे, ना.ह. आपटे, वसंतदादा पाटील, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, जयंतराव टिळक, इंदुताई टिळक, काकासाहेब गाडगीळ, मा. विठ्ठल, हिराबाई बडोदेकर, ग.दि. माडगुळकर, दादा कोंडके, उषा चव्हाण, जयश्री गडकर आदींचा समावेश आहे. आचार्य अत्रे यांनी लिहिलेला ब्रम्हचारी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यावर ‘आर्यन’मध्ये त्याने पन्नास आठवडे पूर्ण केले. तो विक्रमच आहे. ‘एक गाव, बारा भानगडी’ (92 आठवडे), ‘केला इशारा जाता जाता’ (75 आठवडे), ‘सवाल माझा ऐका’ (45 आठवडे), ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ (60 आठवडे), ‘एकटा जीव सदाशिव’ (25 आठवडे), ‘गनिमी कावा’ (23 आठवडे), ‘मोलकरीण’ (25 आठवडे) असे लोकप्रिय चित्रपट तेथे दाखवले गेले. हिंदी ‘बेटीबेटे’, ‘मैं चूप रहूंगी’ हे चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. बापुसाहेब पाठक यांनी पुण्यानंतर सांगली, सोलापूर, बडोदा, पाचगणी येथे तेथील पहिली चित्रपटगृहे सुरू केली. ‘आर्यन’ हे खरे चित्रमंदिरच होते. तेथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा होत असे. मंडईतील फळभाजी विक्रेते रात्री तेथे चित्रपट पाहण्यास येत. मिरर स्क्रीन येथे आला, तेव्हा महामहोपाध्याय द.वा. पोतदार उद्घाटनास आले होते. राज कपूर, शत्रुघ्न सिन्हा यांनीही ‘आर्यन’च्या समारंभात भाग घेतला होता. बापुसाहेब पाठक यांचे ६ ऑक्टोबर १९७० रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव आनंदराव व बाबूराव यांनी व्यवस्था पाहिली.

पुणेकरांच्या आठवणींत आणि इतिहासात विशेष स्था्न मिळवलेले ते चित्रपटगृह काही वर्षांनंतर प्रेक्षकांपासून दूरावले. ‘आर्यन’ची जागा महापालिकेकडून भाडे कराराने घेण्यात आली होती. त्यांनी चित्रपटगृहाला टप्प्याटप्प्याने मुदतवाढ दिली; परंतु त्यानंतर मुदतवाढ द्यायची नाही, असा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला. चित्रपटगृह वाचवण्यासाठी आनंद पाठक यांनी तत्कालीन महापौर, आयुक्तांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेकांशी पत्रव्यवहार केला. परंतु उपयोग झाला नाही. अखेर चित्रपट क्षेत्रातील ती ऐतिहासिक वास्तू २२ सप्टेंबर १९८३ रोजी जमीनदोस्त करण्यात आली.

चित्रपटगृहाच्या शताब्दीनिमित्त आनंद पाठक यांनी ‘आर्यन’च्या आठवणींना उजाळा देणारे खास कॅलेंडर तयार केले. त्यानिमित्ताने चित्रपटगृहावर आधारित लघुपटही तयार करण्यात आला.
संजय दिनकर/ थिंक महाराष्ट्र
संकलनसं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

….. फेसबुकवरून साभार  दि.०७-०२-२०२०

———————————-

नवी भर दि. २७-०५-२०२०

९. सदाशिव पेठ

पुण्यातील सदाशिव पेठेचा इतिहास…
ही पेठ सदाशिवराव भाऊ यांच्या स्मरणार्थ वसवण्यात आली. पूर्वी इथे नायगाव नावाचे एक खेडे होते. सण 1769 च्या सुमारास आप्पाजी मुंढे यांनी माधवरावांच्या सांगण्यावरून येथे वसाहत निर्माण केली. सुरुवातीची 7 वर्षे येथे जकात माफ होती. ही जकात किमती वस्तूंवर माफ असल्याने व्यापारी, सावकार, सरदार यांनी याचा फायदा घेतला आणि पेठेत आपले वाडे बांधले. सन 1765 मध्ये येथे फक्त 87 घरे होती व सन 1818 मध्ये हीच संख्या 752 पर्यंत जाऊन पोहोचली.
पेठेत पाणी पुरवठा करण्याचे काम नाना फडणीस यांनी पार पाडले. आंबेगाव येथून नळाद्वारे पाणी आणून ते पेठेतील हौदात सोडले. त्यावेळी या योजनेला सुमारे 8 हजार रुपये इतका खर्च आला होता. सदाशिव पेठेचा विस्तार हा पुढे मोठ्या प्रमाणावर झाला. विश्रामबागवाडा, सेनापती गोखले यांचा वाडा तसे गद्रे सावकारांची बाग ही याच पेठेतली. गद्रे सावकारांच्या बागेच्या परिसरातच खुन्या मुरलीधराचे मंदिर आहे. सदाशिव पेठेत तब्बल 32 मंदिरे आहेत. मंदिरांच्या संख्येत या पेठेचा क्रमांक हा कसबा आणि शुक्रवार यांच्या खालोखाल लागतो. उपाशी विठोबा, चिमण्या गणपती, खुन्या मुरलीधर ही काही देवतांची अजब नावे सुद्धा याच पेठेतली.. मराठ्यांच्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर भर घालणारी संस्था म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळ. ही संस्था सुद्धा याच पेठेत आहे याचा सदाशिव पेठकरांना अभिमान असला पाहिजे.
संदर्भ – पुण्याचे पेशवे, अ. रा. कुलकर्णी
– शंतनु परांजपे
पेशवे यांच्या फेसबुक पानावरून साभार दि.२७-०५-२०२०

*********

१०. सारसबागेतला (तळ्यातला) गणपती

सारसबागेतील गणपती मंदिराला आज २३७ वर्षे पूर्ण झाली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिराला तळ्यातला गणपती या नावाने प्रसिद्ध आहे.
सारसबागेतील ‘तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक
समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते.परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे.
पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होते. पुण्याची वाढती पाण्याची गरज पाहून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७५४ साली आंबील ओढ्याच्या प्रवाह बदलून मोठे तळे बांधले. या तलावाचे काम १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. या तलावात ‘सारस पक्षी’ सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ‘सारस बाग’ असे नामकरण केले. हैदरअलीवर स्वारी करायला जाण्यापूर्वी येथील तळ्यात श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. मंदिराची सर्व व्यवस्था देवदेवेश्वर संस्थान पाहते. सारसबाग हे उद्यान व तेथील गणपती पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे.
संजीव वेलणकर पुणे.

या ठिकाणाची मोहक छायाचित्रे या पानावर पहा : https://anandghare.wordpress.com/2021/02/14/%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87/
फेसबुकवरून साभार दि. ०४-०६-२०२१

११. पुण्यातील १७ पेठा

पुण्यात एकूण १७ पेठा आहेत. प्रत्येक पेठ आपली वेगळी ओळख घेऊन उभी आहे. प्रत्येक पेठ ही मराठे आणि पेशव्यांच्या काळात उभी केली होती. यापैकी सात पेठांची नांवे वारांवरुन ठेवली आहेत, तर उरलेल्या पेठांची नांवे त्या काळातील दरबारात काम करणाऱ्या कर्तबगार लोकांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत.
१. कसबा पेठ
१४ व्या शतकात उभा केलेला हा पुण्यातील सर्वात जुना भाग. इथेच लालमहाल आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला कसबा गणपती आहे. ही पेठ चालुक्यांच्या काळात उभी राहिली आहे.
२. सोमवार पेठ
त्रिशुंड म्हणजे तीन सोंडेचा गणपती असलेलं पेशवेकालीन गणपती मंदिर इथं आहे, पण पूर्वी याची शाहपुरा अशी ओळख होती आणि बँका अस्तित्वात येण्यापूर्वी पैसे उधार उसनवार द्यायचं काम इथं चालायचं. मजेचा भाग म्हणजे पैसा उसने देणारे लोक गोसावी म्हणून ओळखले जात.
३. मंगळवार पेठ
पूर्वी या भागाला शाईस्तेपुरा म्हणत. आता इथं वाहनांची खरेदी विक्री होते. येथे आठवड्यातील दोन दिवस जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीचा बाजार भरतो.
४. बुधवार पेठ
पुण्यातील अतिशय गजबजून गेलेला भाग म्हणजे बुधवार पेठ. औरंगजेबाने या भागाचं नांव मोहिताबाद ठेवलं होतं, पण बाळाजी विश्वनाथ या पहिल्या पेशव्यांनी ही पेठ वसवून हिचं नाव ठेवलं बुधवार पेठ. श्रीमंत दगडूशेठ गणपती, लक्ष्मी रोड, सिटी पोस्ट इत्यादी ठिकाणे बुधवार पेठेत मोडतात. याच पेठेत देहविक्रय व्यवसाय चालतो. याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात बुधवार पेठ अधिक लोकप्रिय आहे.
५. गुरुवार पेठ
१७३० साली अस्तित्वात आलेली ही पेठ आधी विठ्ठल पेठ म्हणून ओळखली जायची. कारण इथं विठ्ठलाचं मंदिर होतं. हत्तीच्या झुंजीसाठी ही पेठ प्रसिद्ध होती.
६. शुक्रवार पेठ
पूर्वी ही पेठ विसापूर या नावाने ओळखली जायची, पण बाळाजी विश्वनाथ यांनी १७३४ मध्ये जीवाजीपंत खासगीवाले यांच्या मदतीने ही पेठ उभारली. आजही या पेठेत महात्मा फुले भाजी मंडई आहे.
७. शनिवार पेठ
प्रसिद्ध वास्तू शनिवारवाडा ही याच पेठेत आहे. मुस्लिम कारभारात हा भाग मूर्तूजाबाद या नांवाने ओळखला जायचा, पण पेशव्यांच्या काळात याचे नांव शनिवार पेठ करण्यात आले.
८. रविवार पेठ
मलकापूर हे नांव असलेला हा भाग नंतर रविवार पेठ म्हणून ओळखला जाऊ लागला. इथे सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी विक्री होते. तसंच इथं लक्ष्मीनारायण मंदिर आणि राम मंदिर प्रसिद्ध आहेत. आता प्लॅस्टिकची मोठी बाजारपेठ इथं आहे.
९. सदाशिव पेठ
पेशव्यांचे भाऊ आणि पानिपत युद्धाचे नायक सदाशिवराव भाऊ जे १७६१ साली युद्धात कामी आले, यांच्या स्मरणार्थ ही पेठ उभारली. इथे विश्रामबागवाडा, सारसबाग यासह अन्य अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
१०. नाना पेठ
पेशवाईतील अत्यंत मुत्सद्दी आणि हुशार अशा नाना फडणवीस यांच्या स्मरणार्थ निहाल पेठेचं नांव नाना पेठ असं केलं. होलसेल किराणा मालाची बाजारपेठ इथे आहे, तसंच ऑॅटोमोटीव्ह स्पेअर पार्ट्सचा मोठा व्यापार इथे चालतो. टू व्हीलरचे सर्व स्पेअर पार्टस या भागात मिळतात.
११. गणेश पेठ
सवाई माधवराव पेशव्यांनी ही पेठ १७५५ मध्ये उभारली. गणपतीच्या नांवाने गणेश पेठ असं या पेठेचं नांव ठेवलं.
१२. भवानी पेठ
१८६३ मध्ये भवानीमातेचं मंदिर इथं बांधलं गेलं. आणि त्यावरुनच या पेठेचं नांव भवानी पेठ असं ठेवलं. पूर्वी इथं बोरांची खूप झाडं होती. याला बोरवन असं म्हणत ,पण आता ही भवानी पेठ लाकडी, स्टील आणि हार्डवेअरची मोठी बाजारपेठ आहे.
१३. घोरपडे पेठ
पेशव्यांचे पराक्रमी सरदार घोरपडे यांच्या स्मरणार्थ ही पेठ बनवली आहे, पण आता हा भाग रहिवासी क्षेत्र आहे.
१४. नारायण पेठ
नारायणराव पेशवे यांनी १७७३ मध्ये ही पेठ उभारली. नारायण पेठेत गायकवाड वाडा या इमारतीत टिळकांनी आपलं केसरी हे मराठी वर्तमानपत्र सुरू केलं होतं. ही इमारत आता केसरी वाडा नावाने ओळखली जाते.
१५. गंज पेठ
सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात मुजफ्फरगंज हे एक व्यवसाय केंद्र होतं. नंतर याचं नांव गंज पेठ केलं. आता महात्मा फुले पेठ या नावाने ही पेठ ओळखली जाते.
१६. नवी पेठ
पुण्यातील सर्वात नवी पेठ म्हणजेच नवी सदाशिव पेठ ही ब्राह्मण पेठ उर्फ नवी पेठ. लाल बहादूर शास्त्री मार्गाशी जोडलेली ही पेठ ही सगळ्या पेठातील नवीन पेठ. म्हणून या पेठेचं नांव नवी पेठ.
१७. रास्ता पेठ
१७७६ मध्ये ही पेठ शिवपुरी म्हणून ओळखली जायची. पेशव्यांचे सरदार आनंदराव लक्ष्मणराव रास्ते यांच्या स्मरणार्थ रास्ता पेठ असं या पेठेचं नामकरण केलं…….

. . . . .

१२. पुण्यातील टिळक टँक

आज ३० एप्रिल. ३० एप्रिल १९२२ रोजी पुण्यातील टिळक टँक सुरू झाला. आदल्याच वर्षी त्याचं भूमिपूजन झालं होतं.
अवघ्या पुणेकरांनी त्या वर्षी तोंडात बोटं घातली असतील. टँक? तोसुद्धा पोहण्यासाठी? हो… तो काळच तसा होता. स्वातंत्र्यलढ्यानं भारलेली पिढी होती ती. पण त्यातही निघाले काही द्रष्टे. देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखायचं तर पुढली पिढी बलवान हवी हे ध्येय बाळगणारे…! त्यांच्या कल्पनेतून सुरू झालेला लोकमान्य टिळक तलाव आज शंभरावा वाढदिवस साजरा करत आहे.
डेक्कन जिमखान्याची स्थापना १९०६ मध्ये झाली. त्यानंतर जिमखान्यावर स्वप्न पाहिलं गेलं ते भारतीय खेळाडू ऑलिंपिकला पाठविण्याचं. सर दोराबजी टाटा यांच्या पुढाकारानं जिमखान्यावर पहिली बैठक झाली आणि १९२० च्या अँटवर्प ऑलिंपिकला भारतीय खेळाडू गेलेसुद्धा. इंडियन ऑलिंपिक संघटनेची स्थपनासुद्धा येथेच झाली. त्याआधी जिमखान्यावर झालेल्या ऑलिंपिक निवड चाचणी स्पर्धांचा खर्च भागविण्यासाठी जिमखान्याने शिरोळे पाटलांकडून लिजवर काही अतिरिक्त जागा घेऊन तिथं प्लॉट पाडले आणि डेक्कन जिमखाना वसाहत आकाराला आली. या वसाहतीच्या बंगल्यांसाठीचे दगड जवळच असलेल्या दगडाच्या खाणीतून मिळाले.
या खाणीत नैसर्गिक पाणी लागलं आणि बी. एन. भाजेकर, एल आर. भाजेकर, एस. आर. भागवत, साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांसारख्या जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांना कल्पना सुचली ती जलतरण तलाव बांधण्याची. हा केवळ विचार राहिला नाही तर एप्रिल १९२१ मध्ये भूमिपूजन करून कामाला सुरुवातही झाली. पुढच्या वर्षभरात तलावाचे काही काम पूर्ण झालं आणि गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिल १९२२ ला तलावाचा काही भाग पोहण्यासाठी खुला करण्यात आला. त्याचं उद्घापटन तात्यासाहेब तथा न. चिं. केळकर यांच्याच हस्ते झालं. तात्यासाहेब केळकर त्यावेळी पूना म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष होते. ज्यांच्या प्रेरणेतून हा तलाव उभा राहिला त्या लोकमान्यांचं नाव तलावाला देण्यात आलं. महिलांसाठी वेगळा विभाग असणारा हा त्याकाळचा एकमेव जलतरण तलाव.
त्या वेळी जिमखान्याचे असलेले सभासद कुठे आयसीएस, इंजिनिअर अशा मोठ्या हुद्द्यांवर काम करणारे. त्यामुळे या तलावाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण अशीच झाली. हा तलाव रस्त्यापासून खालच्या पातळीवर आहे. त्यामुळे खाणीतल्या झऱ्यातून आलेले अतिरिक्त पाणी शेजारीच असलेल्या कॅनालमध्ये आणि तिथून थेट नदीत सोडण्याची व्यवस्था केली गेली, जी आजपर्यंत अस्तित्वात आहे. डेक्कन जिमखान्याच्या मैदानाला पाणी लागते हे लक्षात घेऊन पुढच्या काळात तलावापासून जिमखान्याच्या मैदानापर्यंत पाणी पंप करून नेण्याची व्यवस्था केली गेली. त्यामुळे जिमखाना पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.


रामचंद्र मुजूमदार, सदूभाऊ गोडबोले, जे. व्ही. ओक, पी. पी. जोशी, शंकरराव लागू, राजाभाऊ नरवणे, राजाभाऊ भिडे, बुवा रिसबूड, सुरेश (मायकेल जोशी) या व अशा प्रशिक्षकांच्या हाताखाली शिकलेली माणसं आजही भेटतात. अशाच प्रशिक्षकांच्या हाताखाली तयार झालेल्या पुढच्या पिढ्यांनी जलतरण प्रशिक्षणाचं काम नेटानं सुरु ठेवलं आणि आजही सुरू आहे. जलतरणाबरोबरच या तलावानं परंपरा जपली ती वॉटरपोलोचा खेळ पुढे नेण्याची. सत्तरच्या दशकात इथले वॉटरपोलोचे सामने पाहायला क्रिकेट सामन्यांप्रमाणे गर्दी व्हायची.
नंतर कालौघात तलावाचं नूतनीकरण झालं. ५० मीटरचा आठ लेनचा ऑलिंपिक दर्जाचा तलाव बांधला गेला. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात उरलेल्या जुन्या भागात स्लॅब घालून २५ मीटरचा आठ लेनचा आणखी एक तलाव तयार झाला. ज्यांना केवळ पाण्यात चालायचंय त्यांच्यासाठी ‘वॉकिंग पूल’ तयार केला गेला. संपूर्ण तलावासाठी सौर ऊर्जेची पॅनेल बसवली गेली. नैसर्गिक झऱ्यांचे पाणी आणि नैसर्गिक ऊर्जा यावर चालणारा हा भारतातला पहिला जलतरण तलाव बनला.
दोन वर्षापूर्वी कोरोनाची साथ आली आणि तलाव बंद झाला. पण त्या काळातही डेक्कन जिमखान्याच्या व्यवस्थापनानं सुरू असलेलं नूतनीकरणाचं काम पूर्ण केलं. ज्यांनी तलावासाठी आपल्या जिवाच पाणी केलं त्यातले अनेक जण आज आमच्यात नाहीत. पण त्यांच्या स्मृती चिरकाल मनात राहतील हे निश्चित. आज तलावाचं शताब्दी वर्ष सुरू होतंय. या दिवशीही सरकारी निर्बंधांमुळे तलाव बंदच आहे. पण तरीही इथले प्रशिक्षक, जलतरणपटू आणि त्यांचे पालक, तलावाचा स्टाफ यांच्या मनातली ऊर्जा कणभरही कमी झालेली नाही. जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा त्याच तडफेने हे सगळे जण तलावावर असतील हे निश्चित. कारण या तलावामागं ऊर्जा आहे ती लोकमान्यांची. त्यांच्या ‘पुनश्च हरी ओम’ या मंत्राची!
वास्तविक तलावाचे काम १९१३ मध्ये करायचे असे उद्दिष्ट त्या काळच्या मंडळींनी ठेवलं होतं. त्यासाठी चक्क डिबेंचर्सही काढले होते. पण दुसऱ्या महायुद्धाचं संकट आडवं आलं आणि हे काम लांबलं. पण जे करायचं ते भव्य असंच करायचं हा ध्यास घेतलेल्या त्या मंडळींनी संधी मिळाली तेव्हा काम हाती घेतलं. तेव्हा उद्दिष्ट ठेवलं ते १०० यार्ड लांबीचा तलाव करण्याचं. आणि ते काम पूर्णही केलं. नैसर्गिक झऱ्यांची साथ लाभलेला मानवनिर्मित एवढा मोठा तलाव बहुधा संपूर्ण आशिया खंडात नसावा.

पूर्वी जिमखाना गावाबाहेर. पण आता मध्यवस्तीत आलेला. ज्यावेळी तलाव बांधला त्यावेळी पोहणे शिकवणे, पोहण्याच्या शर्यती घेणे आणि जीवरक्षणाचं प्रशिक्षण अशी तिहेरी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवण्यात आली होती. हा वसा न टाकता पुढची ९९ वर्षं या तलावानं आपलं कार्य पार पाडलं. पुण्याच्या अनेक कुटुंबातल्या पिढ्या याच तलावावर पोहणे शिकल्या. शेकडो जलतरणपटू या तलावानं घडवले. या तलावाच्या १२ जलतरणपटूंना श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. यातले अनेकजण आंतरराष्ट्रीय पातळीवरही चमकले.

. . . . . . . नवी भर दि.०४-०५-२०२२

*****************************

पुणे आणि पुणेकर मार्गदर्शक

यात पुण्यातल्या काही प्रसिद्ध जागांच्या नावांचे काही मजेदार अर्थ दिले आहेत. त्या जागा तशा निघाल्या नाहीत तर उगाच आश्चर्य वाटून घेऊ नये. त्यानंतर पुण्यामधील आणखी काही जागांची खास पुणेरी स्टाइलने पोस्टर्समधून ओळख करून दिली आहे तसेच खास पुणेरी विनोद (पुणेरी तडका) ही दिले आहेत 

याशिवाय पुणेरी शिष्टाचार, पुणेरी चौकसपणा याही जगावेगळ्या गोष्टी आहेत. आणि हो,  पुण्याला मोठा इतिहास आहे. आता इथे आलाच आहात, तर हे सगळेही खाली दिलेल्या दुव्यांवर वाचालच.
पुण्याचा इतिहास

असे घडत गेले ऐतिहासिक पुणे

पुणेरी आचारसंहिता http://anandghan.blogspot.com/2009/01/blog-post_08.html

‘शनिवारवाडा, पर्वती  अप्पा बळवंत चौक आणि स्वारगेट वगैरे’ https://anandghare.wordpress.com/2019/02/21/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95

पुणे, आयपीएल आणि पुणेरी पाट्या (सन २०१०मध्ये पुणे संघाला आयपीएलवर प्रवेश दिला होता त्या काळातल्या)
https://anandghare.wordpress.com/2010/03/28/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/

पुणे का आवडते?

https://anandghare.wordpress.com/2020/04/07/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a4%e0%a5%87/

आठवणीतले (चित्रमय) पुणे

आठवणीतले (चित्रमय) पुणे


या पानावर वाचा ………..
पुण्यातल्या काही प्रसिद्ध जागा
पुणेरी सभागृहातील आचारसंहिता
पुण्यासंबंधीचे चुटकुले
पुणे आणि स्कार्फ
पुणेरी झटका…
पाणी वाचविण्याचे काही पुणेरी उपाय

पुणेरी शिष्टाचार
पुणेरी तिरकसपणा
अमुचे पुणे
अस्सल पुणेकर

पुण्याची कहाणी
पुणेरी ससा ?
नव्या पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन
सुवासिक पुणे
माजोरी पुणे
हिंजवडीची चीड ?
खास पुणेरी शब्दकोष
पुण्याची वाडा संस्कृति
पुण्यवान!

————————————————

पुण्यातल्या काही प्रसिद्ध जागा

आडवी तिडवी वाट — वाकडेवाडी

धनवान रस्ता — लक्ष्मी रस्ता

आजोबांची पेठ — नाना पेठ

थंड हवेचे ठिकाण — सिमला ऑफीस

आदर्श वसाहत — मॉडेल कॉलनी

एकमेकांना मदत करणारा गाव — सहकार नगर

उग्र देवतेचा कट्टा — शनिपार

देवांचे पाघरुण — पासोड्या विठोबा

एक फळ देणारा दरवाजा — पेरुगेट

बेवडा ब्रीज — दारुवाला पूल

दगडाचा देव — पाषाण

अरण्यात रहाणाऱ्या देवाचे नाव — अरणेश्वर

थकल्या भागल्यांची वाडी — विश्रांतवाडी

पाव दरवाजा — क्वार्टर गेट

सुखी लोकांचे गाव — सुखसागरनगर

Pune guide 1

Pune guide 2

WhatsApp Image 2018-11-22 at 08.18.43

पुणेरी सभागृहातील आचारसंहिता

पुणेरी आचारसंहिता

पुण्यासंबंधीचे चुटकुले

मुंबईकर- तुमच्याकडे वडापावमध्ये तिखट चटणी का नसते?

पुणेकर- आमच्या जिभेला जन्मजात लावलेली असते..

😜😝😂

मुंबईकर : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो

पुणेकर : वा तरीच छान थंड होता

किमान शब्दात कमाल अपमान

😁😜

पुणेरी झणझणित खमंग फोडणी (PUNERI. TADKA)
😄😄😄😄😄

पुणेरी गिऱ्हाईक : मारुती चे Spare Parts आहेत काय?

पुणेरी दुकानदार : डोळे फुटले आहेत की वाचता येत नाही? बाहेर इतका मोठा बोर्ड टांगलाय आम्ही फक्त मारुतीचेच Spare Parts विकतो.

पुणेरी गिऱ्हाईक : ठीक आहे, एक गदा द्या

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

लेटेस्ट पुणेरी किस्सा

जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?

नेने : हो, पण पैसे पडतील

जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुण्याच्या टिळक रस्त्यावरून, बाईक वरून जात होतो. एक स्त्री पुढे स्कूटरवर होती. अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली (अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता).
मी तिला धडकलो. तिला म्हणालो, “अहो कमीतकमी हात तरी दाखवा वळताना”
तर ती म्हणाली, “त्यात काय हात दाखवायचा?, मी रोजच इकडे वळते”

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना

पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत

पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय??

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

मुलगा : चाहूंगा मॆ तुझे सांज सवरे

मुलगी : आणि दुपारचे काय?

मुलगा : १ ते ४ विश्रांती. मी पुण्याचा आहे
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुण्यातल्या एका फ्री वायफाय नेटवर्कचा पासवर्ड, “घे भिकारड्या”
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना

पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी : हा आहे साहेब

पुणेकर : आधी ते खर्च कर
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुण्यातील एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले. कितीही मोठा केला तरी ते आजून मोठा करायला सांगायचे.

म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा”

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

जोशी काकू : बघा, मंडईतून भाजी आणण्यापासून ओलिंपिक मेडल पर्यन्त सगळं बायकांनाच आणावं लागतंय

जोशी काका : आम्ही पुरुष मेडल बीड्ल्सच्या भानगडीत पडत नाहीत कारण कोणतंही मेडल आणले तरी बायको नाक मुरडणारच आणि ते बदलून आणायला पाठवणार…. अगदी गोल्ड मेडल जरी आणले तरी बायकोला डिझाईन पसंत पडेलच याची काय गॅरंटी?

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

आमच्या पुण्यातल्या लोकांना सगळं कसं जवळ हवं असतं
पश्चिमेकडे प्रति शिर्डी तयार करून ठेवलीय आणि
दक्षिणेकडे प्रति बालाजी
आता फक्त खडकवासल्यात प्रति अरबी समुद्र तयार करायचा बाकी आहे
मग सगळं कसं जवळ जवळ

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

स्वारगेट वर मुंबईची मुलगी आपल्या कॉलेज स्टाईल मध्ये तुच्छतेने कंन्डक्टरला विचारते : हे डबडं केव्हा हलणार इथून?

कंन्डक्टर (अदबीने, सस्मित) : कचरा भरल्यानंतर लगेचच !

तात्पर्य : महामंडळाच्या कंन्डक्टरचा नाद करू नये
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुणेकर : काका पावशेर रताळे द्या

दुकानदार : पिशवीत देऊ?

पुणेकर : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत होत्या.
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.

काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या, “अय्या तू कोण???”
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुण्यातील एक नामवंत डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं…

पुणेरी पेशंट : हरकत नाही… तुमची उतरल्यानंतर येतो मी परत
🤣🤣🤣😃

धन्य ते पुणेकर!!!
एक पुणेकराने बंगल्याबाहेर एक पाटी लावली.
“वस्त्रपात्रप्रक्षालिका पाहिजे”
जो तो ती पाटी वाचून विचारात पडायला लागला. की बुवा याचा नेमका अर्थ काय? आता विचारायचे तरी कुणाला?

दुसर्‍याच दिवशी एका ‘जाणकार’ चाणाक्ष पुणेकराने त्या बंगल्याबाहेर शेजारीच एक टेबल मांडले, आणि त्यावर एक पाटी लटकाविली,

“शेजारी लिहिलेल्या पाटीवरील मजकूराचा अर्थ पाहिजे असल्यास खालील क्रमांकावर १० रुपयांचे डिजीटल पेमेंट करावे, मेसेज द्वारे उत्तर मिळेल.”

ज्यांनी ज्यांनी पेमेंट केले, त्यांना त्यांना मेसेज मिळत राहिला, “भांडी धुणे करायला बाई पाहिजे”

28-08-2019

😃😃😃🤣🤣

जपान मधे एक म्हण आहे,
If one can do,
You must do,
If no one can do,
You should do.
पुण्यात हीच म्हण होते
If one can do,
Let him do,
If no one can do,
मी कशाला धडपडू.

😃😃😃🤣🤣

तो दिसायला एकदम साधारण होता. ती पण जरा सावळीच होती. तरी सर्व मोहल्यातील लोक त्यांना

लक्ष्मी-नारायणाचा जोडा म्हणायचे;

कारण …..

.

.

तो लक्ष्मी रोडला राहायचा आणि ती नारायण पेठेत राहायची… !!!

. . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . .. . . . . . . . .. .. .  . .15/09/2019
😂🤣😂🤣😂🤣

एक पालेभाजीपूर्ण वाक्य (अर्थात पुण्यातीलच)

तू “माठ”आहेस, सारख्या “चुका” करतोस, उद्या “पालका” सोबत ये! 😡
यावर विद्यार्थी म्हणाला…

“पडवळ” मॅडम… मला “गवार” समजू नका… माझ्या डोक्यात “बटाटे” भरलेत का?
दिसायला “लिंबू” टिंबू असलो तरी “कोथिंबीरे” आडनाव आहे माझं…
आणि कोणीही “आलं” गेलेलं मला ‘”भुईमुगाच्या” टरफला सारखं फेकू शकत नाय..

ना “कांदा” ना “लसून”….
आमच्या नादाला लागाल तर डायरेक्ट ससुन…

. . . . . . . . . . . . . . नवी भर दि. १०-१०-२०२०
😄😄😄 😁😁😁😁😁

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

पुणे आणि स्कार्फ

ही लंडनमध्ये 2015 मध्ये घडलेली सत्य घटना आहे.. ………. (असं म्हंटलं की लोकांना ते खरं वाटतं असं आमच्या पुण्याच्या लोकांना वाटतं)
लंडनमध्ये एका उच्चभ्रू , श्रीमंत gorge कुटुंबीय सहलीला गेलेले असताना त्यांच्या घरात जबरी चोरी होते..CCTV च्या फुटेजचा आधार आणि कुटुंबाशी संबंधित इतर सर्वांची माहिती घेऊन पोलिस काही संशयित तरुणांना पकडून आणतात.. परंतु CCTV फुटेज मध्ये चोरांनी चेहरा घट्ट झाकला असल्याने पोलिसांना त्यांना ओळखणे अवघड जात होते..त्याच वेळी त्यांना एक खबर मिळते कि लंडनमध्ये एक भारतीय युवक आहे तो या कामी तुम्हाला मदत करु शकेल.. हे संमजताच पोलिस त्या युवकाला पाचारण करतात आणि cctv फुटेज पाहून संशियत ओळखायला त्याची मदत मागतात..तो तरूण आपल्या लौकिकास जागतो, आणि काही वेळातच ते फुटेज पाहून त्या संशियातमधील नक्की चोर कोण आहे हे ओळखतो..पुढे अर्थात पोलिस त्या चोराची ट्रायल घेऊन , त्याच्या घराची तलाशी घेऊन मुद्देमाला सकट हि केस solve करतात.

पुढे यथावकाश त्या चोराला शिक्षा होते..आणि आपल्या घरातला मुद्देमाल परत मिळाला म्हणुन Gorge कुटुंबियांतर्फे एक पार्टी आयोजित केली जाते..त्यामध्ये चोर ओळखणाऱ्या त्या तरुणालासुद्धा आंमत्रित केले जाते आणि त्याला सर्व जण विचारतात कि , तुझे आम्ही अत्यंत आभारी आहोत, तुझ्यामुळेच आमची चोरी पकडली गेली..पण हे एक प्रश्न आहे कि त्या चोरानी इतके घट्ट तोंडाला बांधले होते..अक्षरशः पोलिस सुद्धा cctv फुटेज पाहुन ओळखु शकले नाही. पण तू हे कस काय ओळखु शकलास ?

यावर अत्यंत विनम्रपणे तो मुलगा उत्तर देतो, actually माझ नाव विनय आहे….माझा जन्म पुण्यातला,
* तिथे आम्ही लहांनपणापासून मुलींना स्कार्फमध्येच पाहतो. हळू हळू वाढत्या वयाबरोबर हे स्कार्फ प्रकरण मनात इतके घट्ट रुजत जाते कि आम्ही कोणी कितीही घट्ट स्कार्फ बांधला असला तरीही त्याला आम्ही सहज ओळखु शकतो इतका आमचा खोल अभ्यास होतो…………
* कारण जगाच्या पाठीवर आमचे पुणे हे एकमात्र शहर असे आहे कि जिथे ऋतु कोणताही असला तरीही “स्कार्फ” बाँधणे हे सक्तीचे असते..!

🤣😂🤣😂🤣

पुणेरी झटका..😄

सिनेमाच्या इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या जोशीकाकूंनी सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले, “का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने ते कळवळले..!😳 ते तुम्हीच का?

रागाने लालबुंद झालेला तो, “हो.. मग काय…. अत्ता सॉरी म्हणणार आहात का?”😛

जोशीकाकू :- सॉरी..? नाही हो..

(मागे वळून पाहत) या. बरोबर आहे. हीच लाईन ..!

😜😂😜 😜 😜 😜 😜
वॉट्सॅपवरून साभार.

—————————

नवी भर दि. १८-०४-२०१९ :

उन्हाळयानिमित्त पाणी वाचविण्याचे काही पुणेरी उपाय ..

१) पाणी दुसऱ्याला ‘धुण्यासाठी’ वापरू नका.😃😃

२) कोणालाही ‘पाण्यात पाहू’ नका.😃😃

३) ‘लिव्ह-इन’ सोडून ‘पाणिग्रहण’ करा😃😃.

४) हजामत करायची असल्यास ‘बिनपाण्याने’ करा !😃😃

५) पाहुणे आल्यास ‘आमटीत पाणी न वाढवता’ मसाला वाढवा.😃😃

६) पाणचट ‘विनोद’ करू नका.😃😃

७) कोणाच्याही माहेरच्या/सासरच्या माणसांचा ‘पाणउतारा’ करू नका.😃😃

८) मित्रांबरोबर बसलात तर, ‘पाणी कमी’ टाका.🍹🍹😃😃😃😃😃😃😃

😄😜😝😂😂🤑😛😉😉😜😝😀😀😄😜😝😂😂🤑😛😉😉😜😝😀😀
हिंदी शेजारीण (मराठी बाईला) : “दोपहर को क्या करती हो..???”🤔🤔🤔

पुणेरी (मराठी) बाई : “थोडा गिरती हूँ…!!”

शेजारीण : “क्या???”🤔🤔

मराठी बाई : “हाँ, हमारे पुणे में सब लोग दोपहरको 1 से 4 थोडा थोडा गिरते हैं..!!”

शेजारीण : “गिरनेसे आप लोगों को लगता नहीं…??”🤔🤔

मराठी बाई : “लगता है ना,

गिरने के बाद ताबड़तोब डोळा👁 लगता है….!!”
😄😜😝😂😂🤑😛😉😉😜😝😀😀
मुंबईकर :- ” काय करता आपण ?”

पुणेकर :– ” मोठा बिझनेस आहे माझा ! ”

मुंबैकर:–” कसला बिझनेस आहे आपला ?”

पुणेकर :–” सेलिंग ऑफ सॉफेस्टिकेटेड मॅन्यूअल गारमेंट होल्डिंग डिव्हाइसेस !!! ”

मुंबैकर :– ” वा वा ! म्हणजे नक्की काय ? ”

पुणेकर :– “पायजमा , परकर यांचे नाडे विकतो मी !!!”
😎😜😆🤪😄😜😝😂😂🤑😛😉😉😜😝😀😀


श्री.समीर जाधव यांच्या #आम्ही_ते_वेडे_ज्यांना_आस_इतिहासाची  या ब्लॉगवर पुण्यासंबंधी एक खास लेख आहे आणि त्यासोबत पुण्याची ऐतिहासिक छायाचित्रे दिली आहेत. ती या स्थळावर पहा : https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B8_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80?source=feed_text&epa=HASHTAG


पुणेरी शिष्टाचार

पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते. म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती आहे. काही उदाहरणे देत आहोत ..

पुणेकराकडून पुणेकरांसाठी

Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks
………….. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .

Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls
………. ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे.. तुमच्या गप्पांसाठी नाही

Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first
…………….. ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल ..

Please don’t use the same elevator in case the same is being used by an associate along with client
…………… ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही.

Avoid speaking in regional languages within the office premises
………….. गावच्या गप्पा घरी !

Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette buds only into ash pans provided for
…………… ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडी चावापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत. गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही ..

When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office
…………. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.

Please keep a check on the noise levels in the pantries
………… संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसंआहोत.

. . . . . . . . . . . संपादन (नवी भर) दि.२५-०६-२०१९


पुणेरी तिरकस चौकसपणा

पुणेरी चौकसपणा

. . . . . . . . . . . संपादन (नवी भर) दि.२५-०६-२०१९

—————————————-

अमुचे पुणे

पुणे राकट    पुणे चिकट   पुणे हेकट
असेना का?

पुणे भाग्यवंत    पुणे धनवंत    पुणे ज्ञानवंतही
आहे ना?

पुणे गर्विष्ठ    पुणे महाशिष्ट     पुणे पोथीनिष्ठ
असेना का?

पुणे इतिहास    पुणे भविष्य     पुणे वर्तमानही
आहे ना?

पुणे वादांचे    पुणे वेदांचे     पुणे वेडाचेही
आहे ना?

पुणे शिवबाचे      पुणे रावबाचे    पुणे पुण्याईचे
आहे ना?

पुणे घाटी   पुणे मऱ्हाटी  पुणे भटी
असेना का?

चिकित्सकांचे    विक्रमवीरांचे    टिळक-आगरकरांचेही
आहे ना?

वाहनांच्या बेशिस्तीचा     पुंडांच्या मदमस्तीचा     सत्तेवरच्या हस्तींचा
आखाडा हा असेना का?

महाराष्ट्राच्या धरतीचे    मुळामुठेच्या भरतीचे      मुंबईकरांच्या विश्रांतीचे
आद्य ठिकाण आहे ना?

जगात प्रसिध्द    स्वयंसिध्द     लक्ष्मीलुब्ध
आहे ना?

विनोदाचे लक्ष्य    टिंगलीला भक्ष्य    सर्वांसमक्ष
असेना का?

सुंदरीलाच मिळतात    शालजोड्या शेलक्या    पुनवडी सुंदर
आहे ना?
_______

पुणे पुणे नी निव्वळ पुणे        गल्लोगल्ली बापट काणे
संगे वसती चव्हाण राणे        जगण्यापुरते नसते खाणे
जोतो अपुल्या चवीने हाणे      जिवंत येथे अस्सल गाणे
हरेक घरटी अस्सल नाणे      मिळती कोठे इतके शाणे
हरेक जपतो अपुले बाणे      अभिमानाचे सोळा आणे
सौजन्याच्या चवल्या उणे      तरीही विनंती परमेश्वरा
सत्वर व्हावे   अमुचे पुणे

खास पुणेकर आणि पुणेकरांसाठी ही स्पेशल कविता

कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🏻

वॉसॅपवरून साभार दि.२९-०५-२०१९

**************************

३४६ पुणेरी चांभार

वॉसॅपवरून साभार दि.०६-०६-२०१९


खरा पुणेकर

मुळात पुण्यात जन्म घ्यायलाच पुण्य लागतं… पहिल्या उष्टावणात पु ना गाडगीळां कडून घेतलेली अंगठी चितळ्यांच्या श्रीखंडात बुडवून बाळाला चाटवली की त्या बाळाच्या पुणेकर होण्यास सुरुवात होते… कोवळे नाजूक दात आले की काका हलवाया कडची आंबा बर्फी किंवा काजू कतली खाल्ली की मग हा पुणेकर कोणाचेही दात घशात घालू शकतो… शालेय जीवनात कयानीचा केक खाल्ला नाही तर पुणे महानगर पालिका पालकांना दंड करते म्हणे… वैशाली, रुपाली, वाडेश्वर मध्ये एकदा तरी खाल्लं नसेल असा माणूस यौवनाची पायरी घसरून एकदम म्हातारा झाला असंच समजावं… उगा कोल्हापुरातील २-३ आणि नाशकातील २-३ मिसळींचं कौतुक ऐकवणाऱ्याला प्रत्येक चौकात नव्या चवीची मिसळ खिलवणारा खरा पुणेकर … आमची गणेशोत्सवाची लांबणारी मिरवणूक दिसते पण मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी खरं कळतं ते पुणे, पुणेरी आणि पुणेरीपण अख्खी पुण्यनगरी दृष्ट लागेल अशी सजलेली असते… मराठी संस्कृती आणि नाविन्याची कास धरायची वृत्ती जपली असेल तर ती फक्त आणि फक्त पुण्यानेच… बाकी पुणेकरांपेक्षा १ ते ४ बंदचा त्रास पुणेतरांनाच जास्त होतो तो त्या वेळेमुळे नाही तर आपलं शहर पुण्यासारखं नाही यामुळेच

बहुत काय लिहिणे ?

ता. क.
जन्म नुसता पुण्यात असून चालत नाही तर तो कसबा , शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रास्ता पेठ नाना, गणेश, नारायण ,सदाशिव ह्या पेठांमधील असला तर सोन्याहून पिवळं .

😊😊

                    .. . . . . . . वॉटसॅपवरून साभार दि.१६-०६-२०१९

अस्सल पुणेकर

घाई आणी गर्दीत दगडूशेठ किंवा तळ्यातल्या गणपतीकडे बघुन जो जागेवरूनच मनोभावे नमस्कार करतो तो पुणेकर !
बाकरवडी आणी श्रीखंड चितळेंचच आणणारा आणि खाणारा तो पुणेकर !
एके ठिकाणी मिसळ चापतांना , दुसरी कडची मिसळ कशी भारी ह्याची चर्चा करणारा पुणेकर !
कॅम्प आणि एफ सी रोडवर ‘हिरवळ’ पहायला जातो तो पुणेकर !
पुणे मुंबई प्रवास डेक्कन क्वीन ने करून ऑम्लेट खाणारा तो पुणेकर !
पुण्यातील अठरा पेठांची नावे घडा घडा सांगतो तो पुणेकर !
पेशव्यांबद्दल आदर आणि पेशवाई चा थाटाबद्दलं अभिमान बाळगतो , तो पुणेकर!
कोणत्याही उपनगरात रहात असतांना , मुळ शहरात आल्यावर ‘ गावांत आलो ‘ असे म्हणतो , तो पुणेकर !
पुण्याला ‘ पुना’ म्हणणा-यांचा तिरस्कार करतो तो पुणेकर!
एम एच १२ सोडुन इतर नंबरच्या गाड्यांना गनिम समजतो तो पुणेकर !
हेल्मेट वापरण्याबद्दल जो न्यूनगंड बाळगतो तो पुणेकर !
इंच इंच भुमी लढवणार्या सैनिका प्रमाणे ट्रॅफीक मधे इंच इंच अंतर गाडी पुढे सरकवतो तो पुणेकर !
पुण्यात बाहेरून रहायला येउन स्वतःला उगाच पुणेकर म्हणवणार-याकडे दयाबूद्धीने बघून मनातल्या मनात हसतो तो पुणेकर !
वयाच्या साठीत आपल्या शाळा कॉलेजचा अभिमान बाळगतो तो पुणेकर !
मानाचे पाच गणपती चटकन सांगतो तो पुणेकर आणी विसर्जनाची मिरवणूक किती तास चालली ह्याची अभिमानाने चर्चा करतो तो पुणेकर !
आपल्या व्यवहारी स्वभावाला कंजूस आणी सडेतोड बोलण्याला कुजकट म्हणणा-यांकडे भुतदयेने बघुन दुर्लक्ष करणारा पुणेकर !
प्रत्येक गोष्टीत पुर्वी सारखी मजा राहिली नाही म्हणून हळहळणारा पुणेकर !
खरी गुणवत्ता ओळखून मनापासुन दाद देऊन , कौतूक करून , डोक्यावर बसवतो , तो पुणेकर !
सवाई गंधर्व महोत्सवापासुन जुन्या गाणांच्या कार्यक्रमांचा रसिकपणे आस्वाद घेतो तो पुणेकर !
जिलब्या गणपती, पत्र्या मारूती , पासोड्या विठोबा , खुन्या मुरलीधर , उंटाडे मारूती , दत्ताचे देऊळ, माती गणपती ही देवस्थाने ओळखतो तो पुणेकर!
खरेदीसाठी मॉल पेक्षा तुळशीबाग , लक्ष्मी रोड , फॅशन स्ट्रीट ज्याला जवळची तो पुणेकर !
श्री ,बेडेकर ,रामनाथ , अप्पा , खिका ह्या शब्दांची उकल ज्याला जमली तो पुणेकर !
भाऊ महाराजाचा बोळ , पंतसचिवाची पिछाडी, तपकीर गल्ली , तांबे बोळ, घसेटी पुल , खजिना विहीर, साततोटी ही ठीकाणे ज्याला कळाली तो पुणेकर !
वैशाली ,रुपाली , वाडेश्वर ह्या खांद्यसंस्थांनांना वारंवार अनुभवण्याचा वारसा जो पुढच्या पिढीपर्यंत पोहचवतो तो पुणेकर !
आपल्या बोलण्यात अरेच्चा , आयला , च्यायला , बोंबला पासून अस्खलित , अद्ययावत , यच्चयावत ह्या सारख्या शब्दांचा वापर सहज करतो तो पुणेकर !
सर्वांनी कर जोडावेत असा जो असतो तो पुणेकर !!!
सर्व अस्सल पुणेकरांना समर्पित !!🌹😊

🙏💐🙏 .. . . . . . . वॉटसॅपवरून साभार दि.२९-०१-२०२१

पुण्याची कहाणी

आटपाट नगर होतं ​
विद्येचं माहेरघर होतं ​​​​
​​​​
सह्याद्रीच्या कुशीत होतं​​​​
टेकड्यांच्या मुशीत होतं ​​​​
​​
मुळा-मुठा निर्मळ होती ​​​​​
गोड पाण्याची चंगळ होती ​​
​​
​काळ्या मातीत कस होता​​​​​​
वरण भात बस्स होता​​​​​​

निसर्गाचं देणं होतं ​​​​
पाताळेश्वरी लेणं होतं ​​​​
​​​​
नाव त्याच पुणं होतं ​​​​
खरंच काही उणं नव्हतं ​​​​
​​​​​
शिवबाचं बालपण होतं​​​
जिजामातेचं धोरण होतं​​​
​​
मोगलाई कारण होतं​​​
पुण्याचं ज्वलन होतं​​​
​​​
​छत्रपतींचं स्वराज्य होतं​​​​
पेशव्यांचं अटकेपार राज्य होतं​​​​
​​​​
निधड्या छातीचे मावळे होते​​​​
पराक्रमाने न्हायले होते​​​​

पर-स्त्री मातेसमान होती​​​​
कोल्ही-कुत्री गुमान होती​​​​
​​
नवसाला पावणारे गणपती होते​​​​
तालमीसाठी मारुती होते​​​​
​​
चिरेबंदी वाडे होते​​​​
आयुर्वेदाचे काढे होते​​​​

अंगणात रांगोळी होती​​​​​​
घराची दारं उघडी होती​​​​​
​​​​​​
संध्याकाळी दिवेलागणी होती​​​​
घरोघरी शुभंकरोती होती​​​​

गृहिणी अन्नपूर्णा होत्या​​​​
तडफदार स्वयंसिद्धधा होत्या
​​​​
जेवायला साधी पत्रावळ होती ​​
चौरस आहाराने परिपूर्ण होती​​​

वेदांचा अंगिकार होता​​​​​​​
विद्वान लोकांचा संचार होता​​​​​​

टिळकांची सिंहगर्जना होती​​​​
आगरकरांची सुधारणा होती​​​​
​​​​
फडके चाफेकरांचं बंड होतं
सावरकरांचं अग्निकुंड होतं
​​​
रानडे, फुले, कर्वे झटले होते​​​
बायकांचे जगणे फुलले होते​​​
​​
विद्वत्तेची पगडी होती​​​​
सन्मानाची भिकबाळी होती​​​​

घरंदाज पैठणी होती
शालिन नथणी होती

काटकसरीचा वारा होता
उधळपट्टीला थारा नव्हता

सायकलींचे शहर होतं
निवृत्त लोकांचे घर होतं

एका दमात पर्वती चढणं होतं
दुपारी उसाचा रस पिणं होतं

पुण्याची मराठी प्रमाण होती​​​​
शुद्धतेची कमाल होती​​​​

कलाकारांची कर्मभूमी होती​​​
पुणेकरांची दाद जरूरी होती​​​

सवाई गंधर्व, वसंत उत्सव होते
पुणेकरांना अभिमानास्पद होते
​​​​
सार्वजनिक मंडळे विधायक होती​​​​
समाज-स्वास्थाला तारक होती​​​​
​​​​
पण परंतु किन्तु….​​​​​
​​​​​
औद्योगिक क्रांती झाली​​​​
पुण्यामध्ये पिंपरी आली​​​​
​​
चारी दिशांनी कामगार आले​​​​​​
स्थानिक मात्र बेरोजगार झाले​​​​​​
​​
​​​कारखाने धूर ओकू लागले ​​
पुणेकर सारखे खोकू लागले ​​

संगणकाची नांदी झाली ​​
हिंजवडीची चांदी झाली ​​
​​
पुण्याची आय-टी पंढरी झाली​​
तज्ञांची मांदियाळी आली​​

तांत्रिक भाषा ओठावर रूजली​​​​​
मराठी मात्र मनातच थिजली​​​​​

उंच इमारतींचे पीक आले​​
शेती करणे अहित झाले

टेकड्यांवर हातोडा पडला
सह्याद्रीच तेवढा कळवळला

मुळा-मुठा सुकून गेली
सांडपाण्याने बहरुन आली
​​​​​
रस्ता गाड्यांमध्ये हरवत गेला​​​​​​
चालताना श्वास कोंडत गेला

पिझा बर्गर ‘जेवण’ झाले
सार्‍यांनाच आजारपण आले

डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली
बँकांनी आरोग्यासाठी कर्जे दिली
​​​​​
‘युज अँड थ्रो’ प्रतिष्ठेचे झाले​​​​​​
जागोजागी ढीग कचऱ्याचे आले​​​​​​
​​​​
तरुणाई रेव पार्टीत रंगली​​​​
चारित्र्याची कल्पना मोडीत निघाली​​​​
​​
मारामारी, खून, बलात्कार झाले​​
निर्ढावलेल्या मनांचे साक्षात्कार झाले ​​
​​​​
​एकेकाळची पुण्य नगरी​​​​
होतेय आता पाप नगरी​​​​
भिन्न प्रांतीयांची भाऊगर्दी
कुठे हरवला अस्सल पुणेरी?​​​​​

. . . .    .. . . . . . . वॉटसॅपवरून साभार दि.१६-०६-२०१९
​​​​​

—————

पुणेरी ससा ???

पुणेरी ससा

.. . . . . . . वॉटसॅपवरून साभार दि.३०-०६-२०१९


नव्या पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन

पुणेरी पाट्या १

पुणेरी पाट्या २

पुणेरी पाट्या ३

पुणेरी पाट्या ४

.. . . . . . . वॉटसॅपवरून साभार दि.११-०९-२०१९
————–

सुवासिक पुणे

त्या जागांच्या गंधकोशी, सांग पुणेकरा तू आहेस का?

काही गोष्टींचा वास हा सुवास, सुगंध त्या त्या ठिकाणच्या म्हणून ओळखला जातो, पुण्यात अशा काही जागा आहेत त्या तिथल्या गंधामुळे…
वैशालीच्या गल्लीत सांबारचा
रुपालीच्या कॉफीचा
सुप्रीम च्या पावभाजीचा
संतोष बेकरीच्या पॅटिस चा
भिडे पुलाशी नदीचा
राजमाचिकरांच्या गिरणीचा
अप्पा बळवंत चौकात नवीन पुस्तकांचा
लक्ष्मी रोड ला कोऱ्या साड्यांचा
सोन्या मारुती चौकात अत्तराचा
लकडे सुगंधीशी उदबत्तीचा
सुजाताच्या मस्तानीचा
भडबुंज्याशी फुटाणे भाजल्याचा
कल्पनाच्या भेळेचा
बादशाहिच्या पीठल्याचा
भारत दुग्धालयाशी दुधाचा
मंडई मधल्या कांद्याचा
गोल मंडई च्या कोथिंबिरीच्या
कुलकर्णी पंपावर पेट्रोल चा
न म शा च्या गल्लीत बुचाच्या फुलांचा
जबरेश्वरच्या चहाचा
शीतळा देवीशी डोसा, उत्तप्याचा
कयानीच्या श्रुजबेरीचा
मारझोरिंन पाशी सँडविच चा
चतुरशृंगी रोड च्या तंदुरी चा
दगडूशेठ पाशी निशिगंधाचा
दत्ताच्या देवळाशी खव्याचा
मृत्यूंजयेश्वराशी मोगऱ्याचा
जोगेश्वरीशी खारे दाण्याच्या वर ठेवलेल्या निखऱ्यांचा
अप्पाच्या बुर्जीचा
बेडेकरच्या मिसळ चा
बालगंधर्व मधल्या गजरा आणि सेंट चा
प्रभाच्या इथल्या बटाटे वड्याचा
आवारेच्या चिकन रस्स्सचा
स प च्या खो खो ग्राऊंडला पाणी मारल्या नंतरचा
डेक्कन च्या सिग्नल ला थांबल्यावर जुई च्या गजऱ्याचा

अशी अनेक ठिकाणं त्यांच्या सुवासामुळे ओळखली जातात,
त्या गोष्टी न खाता, न पीता, न विकत घेता त्यांचा अनुभव मिळतो, आणि घर करून राहतो मनात…….

. . . . . . . . वॉट्सॅपवरून साभार.       दि. २८-०५-२०२०

 

माजोरी पुणे (?)

पुणे –
हा जगाच्या पाठीवरचा एक अद् भूत त्रिकोणी भूप्रदेश आहे. मुठा नदी, टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता या त्याच्या तीन सीमा आहेत.
(बर्म्यूडा ट्रँगलने उगाच माज करू नये, त्या पापत्रिकोणात सर्व हरवते आणि या पूण्यत्रिकोणात हवे ते सापडते. )
शनिवार, सदाशिव आणि नारायण असे तीन स्वर्ग येथे नांदतात

दुपारी १ ते ४ या वेळात दुकानेच काय, वैकुंठ स्मशानभूमीही बंद असल्यास आम्हाला नवल वाटत नाही. कारण इथले ‘यम’नियमही स्वतंत्र आहेत.
वैशालीची इडली, गुड्लकचा बनमस्का नुकतीच अस्तंगत झालेली अप्पाची खिचडी, बेडेकरांची, रामनाथची अथवा श्रीकृष्णची मिसळ यापेक्षा जगात काही खाण्यालायक चवी असू शकतात यावर पुणेकरांचा विश्वास नाही. आम्ही चहाच्या दुकानालाही टपरी असे न संबोधता ‘अमृततूल्य’ म्हणतो

पुणे-मुंबई रस्त्याला मुंबई-पुणे रस्ता असे म्हणत नाहीत. कारण मानाच्या शहराचे नाव आधी घेण्याची पद्धत आहे.

येथे कोणाच्याही चुका काढून मिळतात ( विनामूल्य नव्हे तर चुका करणाऱ्याचा अपमान करून ) उदा. – गुगलवर मराठी टाईप करताना अद् भूत हा शब्द अद् आणि भूतच्यामध्ये स्पेस न टाकता लिहिता येत नाही. (जिज्ञासूंनी खात्री करून पहावी) त्यामूळे गुगल हे पुण्यात क्षूद्र मानले जाते.   ….. हे खरे नाही
गुगलपेक्षाही अधिक ज्ञानवंत माणसे पुण्यात गल्लोगल्ली सापडतात.
पुण्याच्या त्रिसीमा ओलांडून आत येताना त्यांच्याकडून अपमान सहन करण्याची तयारी ठेवली काय आणि नाही ठेवली काय, फरक पडत नाही कारण अपमान तुम्हाला विचारून होतच नाही. आपला अपमान झाला यातच धन्यता मानून आपल्या गावी परत जावे.
तरीही आजकाल, ‘गणपती बघायला आले आणि इथेच राहिले’ या तत्त्वावर घुसलेली आणि मूळ पुण्यवासियांच्या उपकारांवर जगणारी माणसे स्वतःला पुणेकर म्हणवतात. परंतू त्यांच्यात आणि अस्सल पुणेकरांत चितळ्यांची बाकरवडी आणि काका हलवाईची बाकरवडी एवढा फरक असतो.
असे तोतया पुणेकर ओळखण्यासाठी त्यांना खालील प्रश्नपत्रिका सोडवायला द्यावी –

एका वाक्यात उत्तरे द्या
१. मानाच्या ५ गणपतींची नावे आणि क्रम काय ?
२. अप्पा बळवंतांचे आडनाव काय ?
३. श आणि ष असलेले प्रत्येकी किमान ५ शब्द सांगा

खालील विषयांवर निबंध लिहा –
१. पूण्यनगरीचा सरकता प्रेमबिंदू सारसबाग ते Z ब्रीज
२. जागतिक रंगभूमीचा आधार – अर्थात, पुरुषोत्तम करंडक.

सविस्तर उत्तरे द्या –
१. सवाई गंधर्वात तिकीट न काढता कसे घुसावे ? (२ युक्त्या सांगा)
२. मस्तानी आणि मिल्कशेक विथ आईस्क्रीम यातील नेमका फरक सांगा
३. पत्र्या, जिलब्या, भांग्या, डुल्या, सोन्या, खुन्या ही देवांची नावे कशी निर्माण झाली ?

हिंमत असल्यास पुढील मुद्दे खोडून दाखवा. –
१. पर्वती ही जगातील सर्वात उंच टेकडी आहे
२. तुळशीबागेमध्ये अॅमेझॉनपेक्षा जास्त विक्री होते
३. पुण्यात गाडी चालवता येणं हे सूपर नॅचरल स्कील असून ते जन्मतःच यावं लागतं. RTO ही अंधश्रध्दा आहे
४. टिळक टँकची खोली अरबी समुद्रापेक्षा जास्त आहे.

योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा – (अर्थात सर्व पर्याय बरोबरच आहेत) –
१. पुणेकर ….. असतात
(चोखंदळ / रसिक / ज्ञानी / विचारवंत)
२. कोणत्याही विषयावर चर्चा हे इथले …… आहे
(व्यवच्छेदक लक्षण / आद्यकर्तव्य / मूख्य काम / वेळ घालवायचे साधन )
३. फर्ग्यूसन रस्त्यावर ….. आढळते
(ज्ञान / सौंदर्य / चव / सर्व काही)
४. एस् पी कॉलेज चा फूल फॉर्म ….. असा आहे.
(सूंदर पोरींचे / सपक पोरांचे / सनातन प्रकृतीचे / सर परशुराम)

अर्थात ही केवळ लिटमस टेस्ट आहे. पुण्यात शिरण्याची पळवाट नाही. पुणेकर म्हणवणे ह यूएस् चा व्हिजा मिळवण्याएवढे सोपे नाही हे लक्षात ठेवावे.
यातील एकाही प्रश्नाचे उत्तर चुकले आणि १०० पेक्षा कमी गुण मिळाले तर तो गृहस्थ अपमानित होण्याच्याही लायकीचा नाही असे समजावे आणि भूतदया दाखवून त्याला वेशीबाहेर सोडून द्यावे…
लेखक माहीत नाही. 💐

. . . . . . . . वॉट्सॅपवरून साभार.    दि. ०६-०६-२०२०

*****

हिंजवडीला जाणारी लोकं चिडलेली का असतात?

सदैव “वाकड” यात शिरतात. उलट बोलल्याशिवाय त्यांना “रावेत” नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र “पाषाण”. तडफदार आणि “बाणेर”. अहंकाराने “औंध” झाले आहेत सगळे. त्यांच्या भल्याचे “सांगवी” तर ऐकत नाहीत. सतत असलेल्या ट्रॅफिकशी काहीतरी “निगडी”त आहे. त्यामुळे त्यांना सारखा “देहू” दंड भोगावा लागतो. खूप कष्ट “सूस” वे लागतात. IT मध्ये खूप “बावधन” आहे पण ट्रॅफिक मूळे डोक्याचा “भुगाव” होतो. खूप वेळ ट्रॅफिक हलले नाही की एकमेकांचा हॉर्न वाजवून “भोसरी” च्या म्हणत उद्धार करतात. ट्रॅफिक बघून त्यांना “खडकी”च भरते. पहाटे “गहूनजे’ निघतात ते सूर्य “म्हाळुंगे” ला तरी घरी येत नाहीत. “बालेवाडी”त घातलेल्या पोरांना ,आईबाप एकदम मॅट्रिक पास झाले की च भेटतात.
अवघड आहे एकंदर.. वा रे पुणेरी

🧐🙄😃😆😝🤣😜😉        नवी भर दि. ०६-११-२०२०

🧐🙄😃😆😝🤣😜😉 🧐🙄😃😆😝🤣😜

हा शब्दकोश किती खरा आहे की खोटा आहे हे मला माहीत नाही. यातले काही अर्थ आवडले नाहीत तर सोडून द्यावेत.      . . . .  नवी भर दि. ११-०१-२०२१

पुणेरी शब्दकोष

केशव – साधा सरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा.
सामान – त्याची प्रेयसी.
काटा काकु – चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त.
खडकी – एकदम टुकार.
झक्कास – एकदम चांगले.
काशी होणे – गोची होणे.
लई वेळा – नक्की, खात्रीने.
चल हवा येवू दे – निघून जा.
मस्त रे कांबळे – छान, शाब्बास.
पडीक – बेकार.
मंदार – मंद बुध्दीचा.
चालू – शहाणा.
पोपट होणे – फजिती होणे.
दत्तू – एखाद्याचा हुज~या.
बॅटरी – चश्मेवाला / चश्मेवाली.
पुडी – माणिकचंद व दुसरा गुटखा.
राष्ट्रगीत वाजणे – संपणे / बंद पडणे.
पुडी सोडणे – थाप मारणे.
खंबा – दारुची / बीयरची बाटली.
पावट्या – एकदम मुर्ख.
खडकी दापोडी – हलक्या प्रतीचे.
टिणपाट – काहीच कामाचा नसलेला.
पेताड / बेवडा – खुप दारु पिणारा.
डोलकर – दारु पिवून झिंगणारा.
सावरकर – दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा.
वकार युनूस – दारु पिवून ओकारी करणारा.
सोपान – गांवढंळ माणुस.
श्यामची आई – 18+ सिनेमा.
सांडणे – पडणे.
जिवात जिव येणे – गरोदर रहाणे.
पाट्या टाकणे – रोज तेच तेच काम करुन वेळ घालवणे.
भागवत – दुस-याच्या जिवावर जगणारा.
पत्ता कट होणे – शर्यतीतुन बाहेर होणे.
फणस लावणे – नाही त्या शंका काढणे.
फिरंगी – कोकाटे इंग्लीश फाडणारा.
पेटला – रागावला.
बसायचे का? – दारु प्यायची का?
चड्डी – एखाद्याच्या खुप जवळचा.
हुकलेला – वाया गेलेला.
डोळस – चष्मेवाला/ली.
यंत्रणा – जाड मुलगी.
दांडी यात्रा – ऑफीसला बुट्टी मारणे/खाडा.
चैतन्य कांडी – सिगारेट/बिडी.
चैतन्य चुर्ण – तंबाखु.
चेपणे – पोटभरुन खाणे.
कल्ला – मज्जा.
सदाशिव पेठी – कंजुष.
बुंगाट – अती वेगाने.
टांगा पल्टी – दारुच्या नशेत `आउट’ झालेला.
थुक्का लावणे – गंडवणे.
एल एल टी टी – तिरळा. लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो.
घ्या श्रीफळ – जा आता घरी.
कर्नल थापा – थापाड्या.
सत्संग – ओली पार्टी

😝🤣😜😉 🧐🙄😃

नवी भर दि.२७-०२-२०२१ : पुण्याची वाडा संस्कृति

– पुण्याची वाडा संस्कृती !!
पेशवाईतील सरदार व प्रतिष्ठित मंडळींनी त्यावेळी नवीन वसलेल्या पेठांमध्ये आपल्या कुटुंब-कबिल्याच्या वस्तीसाठी प्रशस्त वाडे बांधले. या वाड्याचे प्रवेशद्वार म्हणजे मोठा – क्वचित प्रसंगी उघडला जाणारा भक्कम लाकडी दरवाजा, रोजची जा-ये करण्यासाठी ठेवलेला लहान दिंडी दरवाजा. आत शिरल्यावर लगेच ओसरी, मोठा चौक व त्यानंतर बंदिस्त अशा राहण्याच्या खोल्या. मागच्या बाजूला मोठे अंगण.. बाहेरचा दरवाजा एकदा बंद केला की वाड्याला पूर्ण संरक्षण मिळे.
पेशवाईचा अस्त व त्यानंतर होत गेलेले सामाजिक बदल यामुळे कुटुंबे छोटी झाली, त्यांना रहाण्यासाठी मोठ्या वाड्याची गरज संपली. अनेक मालकांनी हे जुने वाडे योग्य ती डागडुजी करून बाहेरच्या कुटुंबांना भाड्याने देणे चालू केले. पुढे जुने वाडे व चाळ यांचे दुवे म्हणता येतील असे – अनेक कुटुंबे भाड्याने राहू शकतील अशा वाडे-वजा इमारती पुण्यातील पेठामध्ये बांधण्यात आल्या. बहुतांशी, ब्राम्हण कुटुंबे येथे राहू लागली – त्यांनी पुण्याची संस्कृती जपली व वाढवली..
मुंबईतील चाळी व पुण्यातील वाडे यांच्यामधील फरक असण्याचे हे महत्त्वाचे कारण असावे.
सरकारी खात्यात कारकुनी करणारे वा निवृत्त लोक वाड्यात राहणे पसंत करीत. बहुतेक कुटुंबांकडे १०’ X १०’ च्या एक किंवा दोन खोल्याच असत. दोन खोल्या असणारे कुटुंब श्रीमंत समजले जाई. घरातील लहान मुले व वृद्ध वाड्याच्या व्हरांड्यात अगर अंगणातच कायम असत. जणू काही एकच कुटुंब असल्यासारखे राहणाऱ्या सर्व कुटुंबात एकोपा असे.. सुख – दुःखाच्या प्रसंगी हे आवर्जून लक्ष्यात येई. सगळे सण-वार, लग्न-मुंजी सारखे समारंभ यात सर्वांचा सहभाग असे.
मिळून मिसळून वागणे, नेतृत्व गुण, अनेक कलांचे शिक्षण, सामाजिक भान, धिटाई अशा अनेक गोष्टी मुले आपोआपच वाडा संस्कृतीत शिकत. त्यातून जगाच्या घकाधकीला सहज तोंड देऊ शकणारे सुजाण व सुशिक्षित नागरिक घडणे सोपे होई.
मोकळ्या वेळात मुले विटी-दांडू, लगोरी, हुतूतू, खोखो, रिंग टेनिस, क्रिकेट, हे वर्षभर चालणारे खेळ अंगणात खेळत. अनेकवेळा क्रिकेटची खरी बॅट, बॉल, स्टंप्स विकत घेण्याची ऐपत नसल्याने, लाकडी फळी ही बॅट, तुटलेल्या लाकडी पाटाचे स्टंप, तर सायकलची रबरी ट्यूब कापून त्याचे गोल गोल तुकडे कागदाच्या अगर चिंधीच्या बोळ्यावर बांधून केलेला बॉल करून क्रिकेट खेळत. चुकून कुणाला बॉल लागला अगर कुणाच्या घरात गेला व त्या लोकांनी तो परत दिला नाही तर वाड्याच्या सामायिक शिमग्याला सर्वजण त्या लोकांचा उद्धार करायचे .. अर्थात त्यातून कौटुंबिक संबंधात कोणतीच कटूता येत नसे.
काळाच्या ओघात ते आठवणीतील माझे सुंदर पुणे त्याचबरोबर ते वाडे व मुख्यतः वाडा संस्कृती कुठे व केव्हा वाहून गेले ते कळलेच नाही… बहुधा पानशेतच्या पुरामध्ये ते वाहून गेले असावे.
सुरेश नाईक

– – – – – – – – – –

पुणे आणि पुणेकर ह्यांना अनेक जण नावे ठेवताना आढळतात. ह्याचे कारणच मला अद्याप आढळले नाही..
पण तरी त्या नावे ठेवणार्यांना एक उत्तर द्यावे असे मात्र आज ठरवले आहे..
ही कविता समस्त पुणेकरांनी अगदी अभिमानाने पुढे पाठवावी अशी इच्छा आहे..!
😄

पुण्यवान!

पुण्यवान किती आम्ही खरोखर
नागरिक हो पुण्याचे
विद्येच्या माहेरी करितो
स्वागत साऱ्या साऱ्यांचे ||१||

शुद्ध भाषा आम्ही बोलतो
चोखंदळ हो भलतेच
इथून पावती घेऊन मिरवती
तरी पुणे ह्यांना सलतेच..||२||

जन्मापासून आम्हीच पेशवे
रुबाब का आम्ही करू नये ?
पाट्या वाचून हसणार्यांनी
पाऊलच पुण्यात ठेऊ नये ||३||

मिसळ पुणेरी, अन चितळ्यांची
करू नका कुणी बरोबरी
आमच्या इकडे अन्नपूर्णा हो
पाणी भरते घरोघरी.. ||४||

असे बिघडले , तसे बिघडले
कशास करता तक्रारी
जगभरातले लोक नांदती
ही पुण्यभूमीची जादूगरी ||५||

पुण्यवान हो आम्ही पुणेकर
गुण अजून मी काय गावे?
इथे जन्मण्यासाठी ऐका
शत जन्माचे पुण्य हवे ||६||

शेवटचे एकच सांगून ठेवते
ठेवलीत जर नावे पुण्याला
दुर्लक्ष करूनि हेच म्हणू आम्ही
द्राक्षे आंबट कोल्ह्याला!! ||७||

अश्विनी देशपांडे, २२/०९/२०२० (पुणेकर)

. . . . . . .  वॉट्सॅपवरून साभार  दि.१०-०६-२०२१

​​​​​

पुणे, आयपीएल आणि पुणेरी पाट्या

पुणेरी टी शर्ट आणि शर्टावरील पुणेरी पाटी

१०१ punebanian

…………………………………………………………………………………………………….

यापूर्वी मी फक्त एकच पुणेरी पाटी दाखवली होती. आता त्यांचा संपूर्ण संच हाती आला आहे.

या पाट्या हरिप्रसाद ऊर्फ छोटा डॉन याने आपल्या ब्लॉगवर आधी दाखवल्या अशी माहितीही मिळाली आहे, पण मला या सर्व पाट्या त्यांच्या इंग्रजी अनुवादांसकट ढकलपत्रांमधून मिळाल्या.

आयपीएलमध्ये पुण्याच्या नावाने एक संघ उतरला होता त्या निमित्याने हे विनोद निर्माण झाले होते, पण हा संघ फार काळ टिकला नाही आणि आयपीएलमधून बाहेर गेला. आता तो संघही नाही आमि त्याच्यावरील विनोदही नाहीत.

*ह्या पाट्या आहेत त्या’मैदानावरच्या’ …..

Signboards at the stadium

१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.

The match timings are printed in bold letters on your ticket. Do not crowd this place by showing up whenever you please.

२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.

Entry begins 30 minutes before the match and not before that. Your haste will not ‘prepone’ the match.

३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा… एका खुर्चीवर एकच !

Chairs are strictly meant for sitting ONLY. And only one person on each chair please.

४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.

Only tap water will be provided inside. The price of chilled or filtered water is not included in your ticket. Do not bring such silly complaints to the organizers.

५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.

The cameras in the stadium are only to record and telecast the match. Do not try to distract the cameraman with your silly gestures.

६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.

Please remember that you are watching the match in a city that is the epitome of culture. Do not bring disgrace to Pune by making lewd gestures or ogling at the cheerleaders. Such acts will be met with not just police action, but also with public humiliation.

७. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.

Smokers (cigarettes, bidis), Spitters (tobacco, gutkha, paan) and Sneezers (snuff inhalers and swine flu carriers) prohibited.

८. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.

Sale of alcohol is forbidden, bringing alcohol is forbidden and entry when drunk is forbidden.

९. मैदानात विकत मिळणार्‍या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.

Do not throw any kind of waste (paper, plastic, cans) into the playing field. Be aware that players can slip and injure themselves.

१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !

During a match, keep your voice low when cheering for your team. This is a cricket stadium, not a fish market or a tamasha.

११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये … व्यक्तींसह !

Do not touch unknown objects… or people!

१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.

The stadium fans will be turned on in the afternoon, and in crowded stands only. Do not argue loudly with the organizers just because you want to sit under the nearest fan.

१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.

Do not loiter needlessly near the ladies restrooms, players’ pavilion, cheerleaders’ podium, VIP gallery, press box, etc.

14. सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.

Do not vent your anger at any incident (losing the match, run-out, sixer, dropped catch, etc.) on the stadium chairs.

15. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे ‘फोटु काढुन मिळणार नाहीत’ किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.

The audience is forbidden from snapping photos with players, cheerleaders, VIPs or at the pitch, press box, pavilion, VIP box, etc. Permission for the same will not be granted.

16. सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.

Management cannot be held responsible for your stolen purses, lost mobiles or broken spectacles. There is a police station nearby. Take your complaints there.

17. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नव्हे. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.

This is Pune, not Shimla. It is obvious that summers will be very hot. This does not mean you can take off your shirt. Such indecent spectators will be thrown out of the stadium.

18. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.

The ticket price will not be refunded in case of rain. Please check with the meteorological department before you buy your tickets.

19. परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?

Do not needlessly rush to make bodily contact with the foreign players, or pass lewd remarks at them in the local language. They are our guests. Do we behave like this with guests in our own home?

20. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.

Do not ask for ‘free passes’ just because you know a politician, government official or a local goon. If you can’t afford tickets, climb on nearby trees and enjoy the match.

21. खेळाडूंना गाढव, माकड असल्या कुठल्याही प्राण्यांच्या उपमा देऊन चिडवू नये. असे करताना आपणच त्या प्राण्यासारखे दिसतो.

Do not insult players by addressing them as a donkey, monkey or any other animal. You will look like one if you do.

22. स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावे. स्वच्छतागृहातून घाण येते याची तक्रार खपवून घेतली जाणार नाही.

Keep the restrooms clean. Do not complain about foul odour from restrooms.

23. समोर नाचत असलेल्या चीयर लीडर्स जरी “मस्तानी” असल्या तरी आपण “बाजीराव” नाही. म्हणून कृपया सामना खाली बसून बघावा.

The cheerleaders are as attractive as Mastani, but you are not Bajirao. Therefore, please be seated during the match.

24. वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्‍या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्‍या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.

Please note that the above rules are not to be taken lightly. If you are caught poking fun at them, you will be kept in solitary confinement in a dark cell till the end of the tournament.

********************************

***ह्या पाट्या आहेत त्या’आयपीएल-पुणे संघाच्या कार्यालयातल्या” ….

Signboards outside the IPL Pune team office :
१. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी १-३ असा विश्रांतीचा वेळ राखुन ठेवावा लागेल.

All matches will be played only during the day. Also, keep in mind that 1 p.m.-3 p.m. is our afternoon nap time and this will not be compromised at any cost.

२. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थीत रात्री ८ वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसर्‍या दिवशी खेळता येईल.

Matches played during the night will be charged extra. It will be the organizers’ responsibility to end the match by 8 p.m. The rest of the match may be played out the next day, at the sole discretion of the team management.

३. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.

Monday will be a holiday.

4. सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की “आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) ” हा आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन “मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र” ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही. त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेच त्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.

We hereby declare that ‘IPL Pune team’ has no affiliation to ‘Mumbai Indians’. Any transactions done with Mumbai Indians will not be honoured by us just because they are Marathi too. Likewise, do not inquire about Mumbai Indians here.

5. हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडुंची चौकशी अथवा मागणी करु नये.

Please note that this is a cricket team. Do not needlessly make inquiries or demands for our players to make appearances at singing competitions, water-fountain inaugurations, ribbon-cutting ceremonies or other similar activities.

6. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.

Please note that cricket is a sport. Since we do not fix matches, there is no guarantee that we will win.

7. देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्त प्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.

Donation seekers, benefit-match organizers, survey-takers or representatives of any organization seeking ‘free passes’ for publicity and similar persons or entities are strictly prohibited. No concessions shall be made on this policy for any reason.

8. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.

We are aware that competing IPL teams play for a lower price — you do not have to inform us. Such teams know what their performance is worth. Quality is of utmost importance to us, so we will not consider lowering our price.

9. आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसाल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.

If you are satisfied with the team’s performance, kindly let us know. If not, write to us in civil language. We shall look into it.

10. आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही

We do not train school teams.

11. आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स, ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणा करु नये.

Under the terms and conditions agreed upon, you will not receive any t-shirts, track pants, caps, bats, balls, etc. as memorabilia after the tournament. Do not display your obscene greed here. Tantrums won’t work.

संघाचा गणवेष भगवा (पूर्वीच दाखवलेला आहे, त्यामुळे तो या ठिकाणी पुन्हा दाखवला नाही.)
Team jersey : (saffron)

आणखी कांही नव्या पाट्या

पुणे आयपीएलच्या सूचनाफलकावरील:

Pune IPL Team notice board:

1.”फलंदाजा कडून धावा निघत नसतील तर मैदानावर उगीच टवाळक्या करत बसू नये”

2.गोलंदाजांनी चेंडू जपून वापरावा अन्यथा प्रत्येक नविन चेंडूचे ३ रुपये आकारण्यात येतील …….

३.क्षेत्रारक्षकांनी दुपारी १ ते ४ या वेळेत उगीचच Howzzat म्हणून गोंधळ करू नये ,लोक इकडे झोपलेली असतात