योग दिवस

योगदिवस

शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्। असे उपनिषदांतले एक वचन आहे. शरीराचे उत्तम आरोग्य राखणे हे धर्माचरणासाठी पहिले साधन आहे. तो सुखी आयुष्याचा मूलमंत्र आहे वगैरे वगैरे सांगायची गरजच नसते. उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी जे उपाय सांगितले जातात त्यात योगसाधनेवर भर दिला जातो. हे बाळकडू लहानपणापासूनच मिळत गेले असल्यामुळे ते अंगात भिनले होते. पण नोकरीला लागल्यावर योगीसने करण्यासाठी वेळच मिळत नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले होते.

जवळजवळ वीस वर्षांपूर्वी आस्था नावाच्या चॅनेलवर योगशास्त्राविषयीचा एक कार्यक्रम सुरू झाला आणि अल्पावधीत त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्या कार्यक्रमात योगासने आणि प्राणायाम वगैरे दाखवत असत. मी अशा प्रकारचे इतर अनेक कार्यक्रम ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शनच्या काळापासून अधून मधून पाहिले होते. त्यातले काही सुमार तर काही उत्तम असत पण “ज्यांना अमके अमके व्याधीविकार आहेत किंवा ज्यांचे वय इतक्याहून जास्त आहेत अशा लोकांनी यातली आसने करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.” असा इशारा अखेरीस दिला असल्यामुळे मला त्यातले काही करून पाहण्याचे धाडस होत नसे. पण आस्थावरल्या या कार्यक्रमात अशी भीती घातली जात नव्हती. माझे काही सहकारी आणि नातेवाईकसुद्धा तो कार्यक्रम पाहून त्याचे चाहते झाले. आमच्या घरी रहायला आलेल्या एका पाहुण्याने भल्या पहाटे उठून टीव्हीवरला तो कार्यक्रम सुरू केला त्या वेळेस आस्था या चॅनेलवरचा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहिला आणि बाबा रामदेव हे नावही मी पहिल्यांदा या कार्यक्रमामुळेच ऐकले.

साधू सत्पुरुषाचा वेश धारण केलेले बाबा ज्या प्रकारची कॉम्प्लेक्स आसने करून दाखवत होते ते कौतुक करण्यासारखे होते. विशेषतः पोटातल्या निरनिराळ्या स्नायूंना ओढून ताणून किंवा फुगवून ते जी काय करामत दाखवत होते ते पाहून माझ्या पोटात गोळा उठत असे. आपल्या पोटात इतके वेगवेगळे स्नायू आहेत तरी की नाही याचीच मला शंका वाटायला लागली होती कारण तिथे जे कोणते स्नायू होते ते चरबीच्या पडद्याच्या आत दडून त्यांचा एकच गोलघुमट झालेला दिसायचा. रामदेव बाबांची वाणी त्यांनी दाखवलेल्या योगासनांपेक्षाही जबरदस्त होती. “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती उपकारे।।” या संतवाणीचे जीवंत उदाहरणच आपण सादर करीत आहोत असा आव ते आणत होते. त्यांच्या सांगण्यात अचाट आत्मविश्वास होता. भसाभसा उछ्वास टाकत कपालभाती प्राणायाम दाखवतांना “साँस बाहर फेकते समय उसके साथ अपने शरीरमेसे सभी रोगोंको और रोगजंतुओंको बाहर फेक दो। जल्दही सभी बीमारियोंसे मुक्त हो जाओगे।” अशा प्रकारची त्यांनी केलेली फेकाफेक ऐकल्यानंतर तो कार्यक्रम पुन्हा पहाण्याची गरज नाही असे मी माझ्यापुरते ठरवले होते. पण इतर लोकांवर बाबांची जबरदस्त मोहिनी पडतच होती. त्यांचे टीव्हीवरले कार्यक्रम कमी होते की काय, लोकांनी त्याच्या सीडी आणल्या आणि त्या पाहणे सुरू केले. निरनिराळ्या शहरांमध्ये मोठ्या मैदानांवर त्यांची योगसाधनेची भव्य शिबिरे भरत आणि हजारो लोक त्यात भाग घेऊ लागले. योगाचे महत्व मला पटलेले असल्यामुळे मी सुद्धा जरी त्यांच्या शिबिराला गेलो नाही तरी त्यांच्या एका शाखेच्या रोज होणाऱ्या योगाभ्यासाची थोडी सुरुवात केली. त्या दिवसापासून गेली सातआठ वर्षे मी नियमितपणे रोज सकाळी तासभर योगिक व्यायाम आणि प्राणायाम करत आहे आणि त्यामुळे माझी पचनशक्ती व रोगप्रतिकारशक्ती तरी नक्कीच वाढली आहे असे मला वाटत आले आहे.

माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर ज्या नवनवीन कल्पनांचा प्रसार केला त्यात प्राचीन भारतीय योगशास्त्राचा जाहीर प्रचार आणि प्रसार केला. इतका की २१ जून हा जागतिक योगदिवस साजरा करायची सुरुवात केली. काल आणि यापूर्वी होऊन गेलेल्या जागतिक योगदिनांनिमित्य मिळालेल्या काही रचना आणि चित्रे खाली संग्रहित केली आहेत.

२१-०६-२०१९
आज के योग दिन के उपलक्ष्य में योग की परिभाषा
(१) पातञ्जल योग दर्शन के अनुसार – योगश्चित्तवृत्त निरोधः अर्थात् चित्त की वृत्तियों का निरोध ही योग है।
(२) सांख्य दर्शन के अनुसार – पुरुषप्रकृत्योर्वियोगेपि योगइत्यमिधीयते। अर्थात् पुरुष एवं प्रकृति के पार्थक्य को स्थापित कर पुरुष का स्व स्वरूप में अवस्थित होना ही योग है।
(३) विष्णुपुराण के अनुसार – योगः संयोग इत्युक्तः जीवात्म परमात्मने अर्थात् जीवात्मा तथा परमात्मा का पूर्णतया मिलन ही योग है।
(४) भगवद्गीता के अनुसार – सिद्धासिद्धयो समोभूत्वा समत्वं योग उच्चते (2/48) अर्थात् दुःख-सुख, लाभ-अलाभ, शत्रु-मित्र, शीत और उष्ण आदि द्वन्दों में सर्वत्र समभाव रखना योग है।
(५) भगवद्गीता के अनुसार – तस्माद्दयोगाययुज्यस्व योगः कर्मसु कौशलम् अर्थात् कर्त्तव्य कर्म बन्धक न हो, इसलिए निष्काम भावना से अनुप्रेरित होकर कर्त्तव्य करने का कौशल योग है।
(६) आचार्य हरिभद्र के अनुसार – मोक्खेण जोयणाओ सव्वो वि धम्म ववहारो जोगो मोक्ष से जोड़ने वाले सभी व्यवहार योग है।
(७) बौद्ध धर्म के अनुसार – कुशल चितैकग्गता योगः अर्थात् कुशल चित्त की एकाग्रता योग है।

विकिपीडिया से

२१-०६-२०१६
आज आंतरराष्ट्रीय योग दिवसके उपलक्ष्य पर मेरी एक छोटीसी रचना प्रस्तुत करता हूँ।
सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये,
योगासन करे, साधना करे, काहे घबराये, काहे घबराये ।।
योगासन कर तनसे, ध्यानसाधना मनसे,
सर पे गुरू का हाथ रहे तो गयी मुष्किले झटसे ।
सुन सुन सुन, अरे यारा सुन,
योग ध्यानमे बडे बडे गुन,
लाख दुखों की एक दवा है, चाहे आजमाये,
काहे घबराये, काहे घबराये ।।

२१-०६-२०२०
आजचा दिवस योगायोगांचा आहे. आज समर सोलस्टाइस म्हणजे या वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. आजच दुर्मिळ असे कंकणाकृति सूर्यग्रहण आहे आणि फादर्स डेही येतो. सर्वांना हा दिवस आनंदाचा जावो आणि अधिक चांगल्या सुखसमृद्ध जीवनाचा शुभारंभ ठरो अशा शुभेच्छा.

आजपासून ५७ वर्षापूर्वीचा म्हणजे २१ जून १९६३ चा दिवस माझ्या चांगला लक्षात राहिला आहे. तेंव्हा मी नुकताच इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रहायला गेलो होतो. नवीन मित्रांशी ओळखी होत होत्या. त्या दिवशी सकाळी आम्ही चार पाच मित्र मिळून जवळच्या उडुपी हॉटेलमध्ये गेलो, सर्वांनी आपापल्या आवडीनुसार इडल्या, वडे, दोसे, उत्तप्पे वगैरे खाल्ले. तृप्त होऊन बाहेर आलो तेंव्हा रस्त्यावरची बरीच मुले आणि माणसे आकाशात काहीतरी बघत असतांना दिसली. आम्हीही पाहिले तेंव्हा तिथे सूर्यग्रहण लागलेले दिसले. त्यापूर्वी मी घरी रहात असतांना मला कधीच ग्रहण लागलेले असतांना काही खाऊ पिऊ दिलेले नव्हते. त्या दिवशी नकळत हा नियम मोडला गेल्याचे लक्षात आल्यावर आधी तर भीतीने माझ्या पोटात गोळाच उठला होता, पण आपल्यासोबत आणखीही बरेच लोक असल्याचे पाहून धीर आला. दिवसभरात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंतही कुणालाच काहीही अपाय झाला नाही हे पाहून मी निर्धास्त झालो. ग्रहण हा एक सावल्यांचा खेळ आहे हे शाळेत शिकवले गेले असले तरी ते कळले होते, पण वळायचे बाकी होते. आज ग्रहण लागलेले असतांना दुपारचे सुग्रास जेवण करतांना तो प्रसंग आठवला. त्या दिवसानंतर आतापर्यंतच्या काळात शंभरावर ग्रहणे लागून आणि सुटून गेली असतील, पण मी कधीच त्या काळात खाणेपिणे वर्ज्य केले नव्हते.

दर एकोणीस वर्षांनी तिथी आणि तारीख यांची पुनरावृत्ती होत असते हे मला माहीत आहे, पण तो दिवस अमावास्येचा आणि ग्रहणाचा असला तर सूर्यग्रहणाचीही पुनरावृत्ती होते की काय ? कोण जाणे !

२१-०६-२०२१
आज पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातला वर्षातला सर्वात मोठा दिवस. पुण्याला तो सुमारे सव्वा तेरा तासांचा असणार आहे. पण म्हणून तो सर्वात गरम असणार आहे का? पुण्यात तरी नाहीच. आज पहाटे छान गारवा होता आणि आता अकरा वाजायला आले तरी फारसे कडक ऊन पडलेले नाही, त्यामुळे दुपारीही अंगाची लाहीलाही वगैरे काही होणार नाही. कारण गेले दोन आठवडे तरी आभाळ ढगाळ आहे आणि अधून मधून पावसाच्या सरी येत आहेत. ढगामुळे सूर्याचे बरेचसे किरण वाटेतच अडवले जातात आणि जमीनीतल्या ओलाव्यामुळे ती फार तापत नाही. शिवाय सगळीकडे हिरवळही पसरली आहे ती डोळ्यांना थंडावा देते. कर्कवृत्तावरील वाळवंटांमध्ये मात्र आज दिवस मोठा असेल आणि शिवाय सूर्याचे किरण सरळ रेषेत येतील. त्यामुळे अशा प्रदेशात आजचा दिवस असह्य असण्याची शक्यता आहे.
आज जागतिक योगदिवस आहे. हवामानही अनुकूल आहे. सर्वांनी सकाळी सकाळी उठून योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे केले असेलच. मीही थोडे करून घेतले.

21-06-2022

आज वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे, जागतिक योग दिवस आहे आणि संगीत दिवससुद्धा आहे.

आज सालभरका सबसे बडा दिन और जागतिक योगदिवस तो है ही, संगीतदिन भी है। उस उपलक्षमे एक रचना वॉट्सॅपसे ……

📯🎼🎵🎶🎷🎸🎹🎺🎻🥁🎷🎶🎵
मैंने गुरुदेवजी से पूछाँ की
🎵🎶 सारे गम 🎷🥁
कैसे दूर होंगे ?

उन्होंने कहा – बेटा
🎻🎺 सा रे ग म 🎺🎹
से ही सारे गम मिट सकते है..तू
🎸🎼 मनि मनि📯🎼 करके पैसे के पिछे मत भाग
🎹🎺 म नि 🎻🥁
करके मन में खुद का
📯🎼 म ध 📯🎼
ढूंढ ले सुरों को ही अपना
🎵🎶 ध नि 📯🥁
बना ले फिर देख

🎻🎺 सा रे ध नि 🎷🎶
तेरे पास आयेंगे..

🎶🎷 सा रे ग म 🎺🎸
मिट जाएंगे..दुःख से
🎷🥁 प रे 🎷🎶
हो जाओगे..

प्रभू का
🥁🎺 सा नि ध 🎹🎼
मिल जाएगा..

🎷🎺 ग म के 🎻🎺🎹
🥁 सा रे सा प 🎷
📯🥁 म रे 🥁🎻🎺
हुए दिखेंगे..

🎷🎼 नि रे 📯🎻
मन के
📯🎷 ध नि 🎻🎹
हो जाओगे..
🎵🎶🎷 अपूर्व 📯🎼🎸 जीवन संगित🎵🎶🎷🥁
गूंज उठेगा…

🌹🍁🍀🌹

अंतर्राष्ट्रीय योग दिवस


योग भगाए रोग खुशी जीवन में मिलती
संयमित होता जीव योग से शांति मिलती।

ध्यान से मिलता ज्ञान योग से आती शक्ति
सेहत,नीयत ठीक हमेशा रहती सबकी।

जीने का सही तरीका हमको योग सिखाता
ज्ञान से ये विज्ञान की ओर हमें ले जाता।

योग हमारी जान योग है शान हमारी
योग से ही तो विश्व में है पहचान हमारी।

योग संजीवन बूंटी है हम सबको करना होगा
ऋषि,मुनियों की परंपरा को जीवित रखना होगा।,,,, गोपी साजन

दक्षिणायन

आजच दक्षिणायनाला सुरुवात होत आहे.

आज२१जूनवर्षातीलमोठादिवस

सूर्याचे_उत्तरायण पूर्ण होऊन उद्यापासून सूर्य दक्षिणेस प्रवास सुरू करेल त्याबाबत मराठी विश्वकोश मधील माहिती*

दक्षिणायन : क्रांतिवृत्त (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीचा मार्ग) खगोलीय विषुववृत्ताला छेदत असल्याने सूर्य विषुववृत्ताच्या कधी उत्तरेस तर कधी दक्षिणेस असतो. सूर्याचे उत्तरेकडे सरकणे २२ जूनला संपते. या दिवशी सूर्य विषुववृत्तापासून उत्तरेस जास्तीत जास्त दूर म्हणजे उत्तर संस्तंभी (विष्टंभी) असतो. या क्षणी सूर्याची क्रांती [⟶क्राति-१] विषुववृत्तापासून जास्तीत जास्त (सु. २३·१/२°) असते. यानंतर सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे सुरू होते. सूर्याच्या या दक्षिणेकडे सरकण्याला दक्षिणायन म्हणतात. हे सरकणे २२ डिसेंबरपर्यंत म्हणजे सूर्य दक्षिण संस्तंभी (अवष्टंभी) येईपर्यंत चालू असते म्हणून सायन कर्कसंक्रांतीपासून ते सायन मकरसंक्रांतीपर्यंतचा काळ दक्षिणायनाचा होय. दक्षिणायनामध्ये एखाद्या विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी सूर्य ज्या स्थानी उगवतो त्याच्या अधिक दक्षिणेला तो त्यानंतरच्या दिवशी उगवतो. दक्षिण गोलार्धात या काळात दिवस मोठामोठा व रात्र लहानलहान होत जाते, तर उत्तर गोलार्धात दिवस लहानलहान व रात्र मोठीमोठी होत जाते. संपातबिंदूंना वर्षाला सु. ५० विकला उलट गती असल्याने दक्षिणायनाचा काळही मागेमागे सरकत असतो [⟶ संपातचलन]. हल्ली आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीस दक्षिणायन सुरू होते. हिंदूंमध्ये दक्षिणायनाला धार्मिक दृष्ट्या कमी लेखलेले आहे. यात देव झोपलेले असतात. उत्तरायणात मृत्यू यावा म्हणून ते लागेपर्यंत भीष्म शरपंजरी पडले होते, अशी कथा आहे. सध्या साधारणपणे आषाढ ते पौष हा काळ दक्षिणायनाचा असतो.

. . . श्री.माधव विद्वांस आणि फेसबुक यांचे आभार.

🌹🍁🍀🌹

मालवणीतलो योगा दिवस

“योगा-दिवस” म्हायती होतो,
सुबेच्चा देणा नाय पटला!
सांगणाऱ्याक अदिकार व्हयो,
माजाच केवडा पॉट सुटला!

बसल्यार उटाक होयत नाय,
उटल्यार बसाक जमना नाय!
उटल्यासुटल्या पत्थ्या पाळण्यात,
आपलो जीव रमना नाय!

जेवन् सुदा दम लागता,
उटाबश्यो खयसून काडणार!
तसो करूक गेलंय तर,
आपलाच तिकिट आपून फाडणार!

कोन शंबर वर्षा जगलो?
सकाळ सांच्याक फासफूस करान्!
योगा करा…भोगा करा,
येवचा तेवाच येतंला मरान्!

येका नाकान् भुतू घेवा,
दुसऱ्या नाकान् भायर सोडा!
ह्याच कायता केल्याशिवाय,
नव्वद वर्षा जगली खोडा!

काम नाय,धंदो नाय,
तेंच्याटीच आसता योगा!
आमी मळ्यात,कलमात मरताव,
आमका नाय ता जमण्याजोगा!

जरासा खावा,कितिवू मरा,
पॉट सुटना हातात नाय!
खानाऱ्याका बारिक ठेवना,
कसब पिटी भातात नाय!

मराचाच तं खावन् मरा,
पत्थ्या करून व्हतंला काय!
न्हेमीपक्षा योगा उलटो,
बुडी टकली,वरती पाय!

जोशयांचो प.मो.देवगाडकार.9423513604

वट पौर्णिमा २०२२

काल होऊन गेलेल्या वटपौर्णिमेनिमित्य सामाजिक माध्यमांमधून आलेले काही लेख आणि कविता यांचे एक संकलन. सर्व मूळ लेखक व लेखिकांचे मनःपूर्वक आभार.

वटपौर्णिमा आणि पर्यावरण या विषयावरील माझा लेख इथे
https://anandghare2.wordpress.com/2013/06/22/%e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a3/?fbclid=IwAR1zhxXBmIFvY78ahYG0DemgXL9aKtN3TjHMn6X16ttFy2VcQH_CAx2ODeY

👩‍❤️‍👨⚜️🚩🔆🔆🚩⚜️👩‍❤️‍👨
🌻 आनंदी पहाट 🌻 👩‍❤️‍👨वटपौर्णिमेची👩‍❤️‍👨

श्रेष्ठ भारतीय संस्कृती ही जीवनात नंदनवन फुलवायला चराचर सृष्टीवर प्रेम करायला शिकविते. प्राणवायूचे महत्त्व जगाने फार उशिरा जाणले. पण या भारतीय संस्कृतीने हे प्राणवायूचे महत्त्व केव्हाच ओळखून प्रत्येक सणाला निसर्गातील पशुपक्षी.. वृक्ष वनस्पतींशी मैत्री करायला शिकवले.
जगदगुरु संत तुकोबांनी तर वृक्षवेलींना सोयरे मानून घरोबाच शिकवला. मग निसर्ग संरक्षण, संवर्धन.. संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत.
वड तर औषधी वृक्ष. याची साल.. पाने.. फळेच काय पण समिधाही जीवनाला उपकारक. वड हा तर मोफत प्राणवायूचा खजिनाच. शेकडो वर्षाचा सेवाव्रती. आजही विस्तिर्ण डेरेदार वृक्षाच्या सानिध्यात पिढ्यानपीढ्या सुखेनैव जगत आहेत.
स्त्रीच्या जीवनात पती हा तिच्या संसाराचा प्राण. यमराजाकडून पतीचे प्राण पुन्हा परत मिळवणारी ही भार्येची.. वटसावित्रीची पूजेची कथा. ही सावित्री वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला सत्यवानाला दीर्घायुष्य लाभण्याचे वरदान प्राप्त करते.
सावित्री ही बुद्धिमान.. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जंगलात राहणारी चतुर पतिव्रता. तीने प्रत्यक्ष यमाशी वादविवाद करुन.. प्रसन्न करुन घेत आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. तसेच अंध सासू सासऱ्यांनाही न्याय मिळवून दिला. आता या कथाभागापेक्षा प्राणवायू देणाऱ्या वड वृक्ष महात्म्य सांगायला इथे पौराणिक कथाशी संबंध जोडलाय.
आज महिला सौभाग्यालंकाराने नटुन मनातील पवित्र सावित्रीभावाने पतीच्या वडवृक्षाप्रमाणे दिर्घायू निरामय जीवनाची कामना करतात. वडवृक्षाप्रमाणेच परिवाराचा विस्तार व्हावा ही प्रार्थना करतात. वडवृक्षाची फळे पक्ष्यांची आवडती अशी मधूर. मग त्याला आम्रफळे.. फुले अर्पण करुन वृक्षाचे पूजन महिला करतात. आज उपवासही.. म्हणजेच निसर्गपूजनाला भक्तीची जोड.
सर्व सत्यवानांच्या सावित्रींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आपले पतीदेव यांना निरायम दीर्घायुष्य लाभो हीच शुभकामना.. !!

🌸🌿👩‍❤️‍👨 🌳 👩‍❤️‍👨🌿🌸

वटपौर्णिमा आली गं,
ओटी आंब्यांन भरूया
सण वर्षाचा आज,
पूजा वडाची करूया llधृ ll

पतिव्रतेचा हा वसा गं,
सुवासिनींचे हे वाण
नारीजातीने करावा,
भोळ्या भ्रताराचा मान
हाथ जोडुनी देवाला,
प्रदक्षिणेला फिरूया

सात जन्माचा सोबती,
धनी माझा पतीदेव
माझ्या संसाराच्या मंदिरी,
लाख मोलाची ही ठेव
काया वाचा मने,
मनामंदी त्याच्या नावाला स्मरूया

सावित्रीच्या कुंकुवाला,
सत्यवानाचा गं रंग
औक्ष उदंड मिळावं,
भाव फिरे धाग्यासंग
भाव सात जन्माचं,
आशा मनात धरूया

👩‍❤️‍👨🍃🌷🌿🌿🌷🍃👩‍❤️‍👨

गीत : जगदीश खेबूडकर ✍️
संगीत : प्रभाकर जोग 🎹
स्वर : अनुराधा पौडवाल 🎤
चित्रपट : जावयाची जात (१९७९)📺
🎼🎶🎼🎶🎼 🎧
👩‍❤️‍👨🙏सुमंगल प्रभात🙏👩‍❤️‍👨 १४.०६.२०२२

🌻🥀🌸🥭🥭🌸🥀🌻


घरोघरी सत्यवान
सावित्रीही घरोघरी
नको भेदभाव काही
असावी बरोबरी
नको उपासतापास
नको पोकळ दिखावा
प्रेमाने एकमेका
कधी घास भरवावा
सात जन्म नको
एक जन्म पुरे जरी
साथ सोबतीची राहो
याच जन्मभरी
आयुष्यरुपी वड
त्याचीच पूजा करू
निरोगी जीवनाची
कास मनी धरू
वटपौर्णिमेचे व्रत
एकच दिस का त्याचा?
रोजच दिवस

सत्यवान,सावित्रीचा………

योग्य प्रबोधन करणारी कविता.
मुळात व्रतवैकल्ये तयार केली ती पुरुषांनी. त्यामुळे त्यांनी स्त्रीयांना कामाला जुंपलं.त्या काळी हे ठीक होतं; पण आज हे कितपत योग्य आहे? म्हणजे तो उपवास, ती वडाची पूजा, ते नटणं इ.इ.
हे श्रद्धेचं प्रदर्शन तर नव्हे?
एरवी स्त्रीया नटतात. पण इथे परंपरेने स्त्रीला बांधून ठेवलंय. तेही विशिष्ट भूमिकेतून.
आज बुद्धिवादी स्त्री यावर चिंतन करते तेव्हा अशी कविता समोर येते.

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

वटवृक्षास…..

कोरोनाकाळतली भीषण टंचाई प्राणवायुची
आज महती कळते तुझ्या असण्याची

तू धरून ठेवतोस चिकाटीनं मातीला
येतोस आपसुकच पारंबीतून जन्माला
हा सर्जनसोहळा थक्क करणारा
तुझ्याशी नातं जोडून ठेवणारा

सदैव बहरून तू टवटवीत
उभा आहेस वादळवा-यात

आता नाही गुंफणार फक्त
कर्मकांडाचा धागा सुताचा
सर्जनसोहळा आज तुझ्या जन्माचा
नव विचाराच्या औक्षणाचा

जेष्ठातलं हिरवं आश्वासन तुला
हे नवे आयाम तुझ्या असण्याचे
तुझ्या साक्षीने सुरुवात नव्या व्रताची
शपथेवर जोपासना करू नात्याची.
डॉ. तरुजा भोसले

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

वटसावित्री!

नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्‍न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग?तर ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे.असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही.
सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, ‘सांग बाबा काही समजावून!’ असे होते. मग म्हणालो ‘वहिनी’ बसा! विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो?

कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना? त्या म्हणाल्या हो! बरोबर.
मी म्हणालो, मग आता सांगा वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही? मी म्हणालो,

मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही? ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती? मग मी म्हणालो, हे काहीच माहिती नाही? कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही! तर मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता? बिचारीजवळ उत्तर नव्हते. अनेकांजवळ नसते.
शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका.

जगात सर्वात दाट सावली असते वडा ची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात-
कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌
| शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌
|अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते. या *तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता.
वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड.

ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. गरमीने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले.
त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:
|’ प्रकारातील समजायची असते. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा!
ती म्हणाली याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट.
सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे.
जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.
संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या.
१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह.

असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत.

शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे. वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला.
आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा!’

खूपच छान माहिती 👌🙏
नक्की वाचा 🙏

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

‼वटपौर्णिमा वैज्ञानिक महत्व‼

वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही?
ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही?
जगात सर्वात दाट सावली असते वडा ची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे,
सुभाषितकार म्हणतात-
कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌ !!
शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌!!
अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते. या तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता.
वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड.
ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. गरमीने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले.
त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:|’ प्रकारातील समजायची असते.

ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा!
सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे.
जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.
संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या.
१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह.
असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत.
शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे. वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला.
आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा!’

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

प्रा. विजय पोहनेरकर यांची विनोदी , खुसखुशीत कविता !😀
गंमतीत जगण्यासाठी केलेली थोडीशी गंमत !😀

वड म्हणला बाई तुला
दोन्ही हात जोडले !
😀😀😀😀😀😀

कवी : प्रा. विजय पोहनेरकर

एक बाई लगबगीनं
पूजे साठी आली
भक्ती भावाने वडाला
चकरा मारू लागली

वड देवा वड देवा
पूजा पदरात घे
जन्मोजन्मी पुन्हा मला
हाच पती दे

आश्चर्याने वडाने विचारलं
हाच नवरा पाहिजे ?
काहीही म्हण बाई तुला
खरंच मानलं पाहिजे

काय करणार वडदादा
खूप विचार केला
हाच नवरा राहूदे म्हणून
आतून आवाज आला 😀

एवढे दुर्गुण असून सुद्धा
त्याचीच निवड केली
म्हणून माय मला तुझी
खूपच दया आली

वडदेवा वडदेवा
तसं काहीच नाही
असं नाही की आमचं
बिल्कुलच पटत नाही 😀

दुसरा नवरा मागायचा
मी ही विचार केला
पण कल्पनेनंच माझा जीव
कासावीस झाला 😀

जास्तच बिलिंदर निघाला तर
मग काय करायचं
म्हणून म्हणलं याच्यासाठीच
वडाभोवती फिरायचं😀

तुम्हाला तर माहितीय देवा
मी ही काय कमी नाही
बिचाऱ्याचा डोक्याला
एक पण केस ठेवला नाही 😀

अधून मधून गुर्रगुर्र करतं
मी थोडंच ऐकते
एका कानांन ऐकून
दुसऱ्याने सोडून देते 😀

माझी आई मला म्हणली
नवरा बदलायचा नाही
एवढा बावळट माणूस तुला
कधीच मिळायचा नाही 😜

तुम्हीच सांगा वड दादा
आईचं मन मोडू का ?
नशिबाने मिळालेलं
चांगलं माणूस सोडू का ?😜

वयोवृद्ध झाडाने पण
गडगडाटी हास्य केले
वड म्हणला बाई तुला
दोन्ही हात जोडले 😜

न विसरता दरवर्षी
पूजेसाठी येत जा
झाडासाठी आयुष्यातला
थोडा वेळ देत जा

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

💠💠बर्थोबर्थी💠💠

मंडळी, शिर्षक वाचून गोंधळलात नं? काल माझी कामवाली ‘लक्ष्मी’ हिनं हाच शब्द उच्चारला, तेव्हा मी देखील अशीच गोंधळात पडले होते.
चार वर्षांपूर्वी लक्ष्मी माझ्या दारात उभी होती.
“तुम्हाला ‘वर्कींग लेडी’ पाहिजे, असं कळलं म्हणून आले.”
“वर्कींग लेडी?”
“म्हंजे कामवाली हो!”
“अच्छा, अच्छा! कुठलं काम करु शकतेस तू?”
“हेच आपलं, किलनिंग, कुकिंग, बेबी केरींग!”
माझ्या चेहर्‍यावर प्रश्न चिन्ह!
“म्हंजे हेच आपलं, झाडू पोछा, सैपाक, बाळाला सांभाळणं! “
आता मला तिचं विंग्रजी थोडं थोडं कळायला लागलं होतं.
” कुठे राहतेस तू? “
” इंद्रा नगर. “
“अच्छा, इंद्रनगरमधे राहतेस का? “
” नाई हो! ती इंद्रा गांधी नव्हती का प्रेम मिनीश्टर, तिचं नाव आहे ते इंद्रानगर!”
“बरं बरं कळलं! शिक्षण किती झालंय तुझं? “
खरं म्हणजे तिच्या शिक्षणाचा माझ्या घरच्या कामाशी काही संबंध नव्हता. पण तिचं इंग्रजी बोलणं ऐकून माझी उत्सुकता वाढली होती.
” एम् एन् म्हंजे टी एफ्! “
तिने समानार्थी शब्द देऊनही मला काहीच कळलं नाही. विद्यापीठानं हा कुठला नविन कोर्स सुरू केलाय आणि ते माझ्या वाचनात कसं काय नाही आलं?
“अगं म्हणजे नेमकं काय शिकली आहेस?”
“अहो म्हंजे मॅट्रिक नापास म्हंजे टेन फेल!”
मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
” बरं तुझं नाव काय?”
“मनी गाॅड, म्हंजे लक्ष्मी!”
तिचं काम आणि पगार ठरला. दोन दिवसानंतर घरात आल्या आल्या…
“वाॅव् ताई! काय डिशेस बनवल्या आज? मस्त वासेस येताहेत! “
मी मुकाट तिच्यासमोर खाण्याचं ठेवलं.
” आज तुला उशीर का झाला लक्ष्मी?”
“अहो इकडं कामावर यायच्या अगोदर मी तिकडं घरी ब्युटी पार्लमेंट चालवते ना, वन अवर! तर आज जरा जास्त केसेस होत्या,म्हणून लेट झाला.”
“काय काय करुन देतेस तू तुझ्या केसेसना? “
” आॅल! मेपक, आयब्रो, फ्यॅशल, हेअर स्टेल! सर्वच!”
एकदा म्हणाली,” ताई मी उद्या पासून चार दिवसांची लीव घेणार आहे. “
” का गं? “
” काल माझ्या सासूला हाॅस्पिटलात अ‍ॅडमिशन केलं. काल रात्री ती अचानकच एकदम कोंबात (कोमात) गेली होती. आज सकाळी आली शुद्धीवर! आता तशी ओके आहे. पण चार दिवस रहावं लागेल हाॅस्पिटलात.”
एक दिवस पुन्हा तिला सुटी हवी होती.
” उद्या एका ब्रेडचा मेपक (!) करायचा आहे. “
” ब्रेडचा? “
आता ब्रेडला बटर चोपडण्यासाठी सुट्टी!
” म्हंजे नवरीचा हो! “
” अच्छा! पण तुझी कधीची इच्छा आहे म्हणून मी तुला उद्या बिग बाजार मधे घेऊन जाण्याचं ठरवलं होतं. “
” हो ताई, पण माझ्या एन्ट्रेनमेंट साठी मुलींवर ब्युटी पार्लमेंट सोपवण्याची ‘रिक्स’ नाही घेऊ शकत नं मी!”
बाकी काही म्हणा, पण लक्ष्मीला कामावर घेण्याची ‘रिक्स’ घेऊन मी माझी एन्ट्रेनमेंट फिक्स केली होती. तिची नवय्रा बद्दल तक्रार अशी नसायची. पण सदैव विरोधी सूर असायचा. त्याला क्लोजअप टुथ पेस्ट आवडते हिला व्हिक्को! त्याला हमाम हवा असतो हिला संतूर! पंधरा वर्षाच्या मुलाची आई असूनही खुप तरुण दिसावं ही सुप्त इच्छा! हिला ‘पोटॅटो भाजी आवडते त्याला वांगी! त्याला लहान दुकानातून सामान घ्यायचं असतं (औकातीत रहावं मानसानं) तर हिला बिग बझार हिंडायची इच्छा!
काल मला म्हणाली, “मी उद्या लिव घेणार आहे ताई!”
“कशासाठी?”
“उद्या वडाच्या ट्री ची पूजा करायची आहे.’ हार्स ‘आणायचे आहेत.”
“हार्स?”
“पूजेसाठी हो! फुलांचे हार्स!”
“अगं पण तुझी एकही गोष्ट नवय्राला पटत नाही म्हणून तक्रार करत होतीस नं?”
“म्हणून काय झालं? नवरा म्हंजे बायकोची चादर आसती. त्या चादरीखाली बायकोची इज्जत सेफ आसती. उद्याच्या पूजेमधे मी ह्याच नवय्राला’ बर्थोबर्थी’ मागूनच घेणार आहे. “
माझं बौद्धिक घेऊन माझ्या कडून ‘हार्स’ साठी ‘फिफ्टी’ रुपीज घेऊन ही ‘मनी गाॅड’ बर्थोबर्थी नवय्राला मागण्यासाठी ‘लिव’ घेऊन निघून गेली.
मी तिला मनोमन ‘हँड्स’ जोडले. 🙏☺️

सौ. आरती देशपांडे पुणे

कार्ल मार्क्सचे सांगणे आणि भाकिते

कार्ल मार्क्स नावाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेल्या लेखकाने जे प्रक्षोभक लिखाण केले त्याचा जगभर प्रसार झाला आणि कोट्यावधी लोक त्या विचारांनी भारावून गेले किंवा पेटून उठले. पहिल्या महायुद्धानंतर रशियामध्ये रक्तरंजित क्रांती होऊन साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाची राजवट प्रस्थापित झाली तर दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्टांनी चीनवर कब्जा मिळवला. या देशांनी त्याच्या आजूबाजूच्या काही देशांमध्येही साम्यवाद पसरवला. भारतातही साम्यवादाचे लोण इंग्रजांच्या राज्यातच आले होते, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आधी केरळ आणि तेलंगण आणि कालांतराने बंगालमध्ये त्याने जोर धरला. पुढे रशीया आणि चीननेच मार्क्सच्या मूळ तत्वांपासून काही प्रमाणात फारकत घेतल्यानंतर भारतातला त्यांचा जोर कमी होत असल्यासारखे दिसत आहे. मार्क्सने नक्की काय सांगितले होते आणि त्याचे पुढे काय होत गेले याची मुद्देसूद चर्चा श्री.राजीव साने यांनी या लेखात केली आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार.

हा लेख नीटपणे समजायला थोडा कठीण आहे. कार्ल मार्क्स १८८४ साली वारला तोपर्यंत कुठल्याही देशात कम्युनिस्ट राजवट आलीच नव्हती. त्यामुळे मार्क्सने सांगतलेली सगळी फक्त थिअरी होती. नंतरच्या काळात काही गोष्टी त्याने वर्तवल्याप्रमाणे घडल्या, पण अनेक गोष्टी विपरीतपणे घडत गेल्या. मार्क्सच्या विचारसरणीमुळे जगाच्या इतिहासात मोठी खळबळ उडाली, त्याला एक वेगळे वळण लागले हे मात्र खरे.

काल 5 मे, कार्ल मार्क्सची जयंती त्या निमित्त त्यावर राजीव साने यांचा लेख

कार्ल मार्क्स: श्रमस्वधर्माच्या वरदानाला सत्तामार्गाचा शाप

लेखक : राजीव साने

लहरीपणाने भलभलते आदर्श मानायचे आणि वास्तवावर डोके आपटून तरी घ्यायचे, किंवा आदर्श मानणे आरपार सोडून तरी द्यायचे, या कोंडीतून माणसाला सोडवणारा सर्वात महान विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स. त्याचे मुख्य म्हणणे असे होते की वास्तवाला स्वतःची अशी एक गती असते. इतिहासाच्या विविध टप्प्यांवर ही गती वेगवेगळी असते. या गतीच्या आरपार विरोधात जाणे व्यर्थ असते. पण मार्क्स नियतीवादी नक्कीच नव्हता. परिवर्तनवाद्यांची शक्ती व्यर्थ जाऊ नये ही तळमळ त्यामागे होती. इतिहासाच्या गतीला उलटा स्ट्रेट ड्राइव्ह मारायचा नसतो तर फ्लिक किंवा ग्लान्स करून जास्त चांगली दिशा देता येते हा मुद्दा होता.

“मूल्ये बिल्ये सब झूठ” असे त्याचे म्हणणे नव्हते. ‘मुद्दा आहे जग बदलण्याचा’ या सिंहगर्जनेमुळे तत्त्वचिंतनाचा अर्थच त्याने बदलवला. इतकेच नव्हे तर तो जाणीवेच्या जगाला दुर्लक्षित करतो हा आरोपही खरा नाही. “एखादी कल्पना जेव्हा जनतेचे स्वप्न बनते तेव्हा ती एक भौतिक शक्तीच बनते” या वचनावरून त्याचा भौतिकवाद का आवर्जून द्वंद्वात्मक (डायलेक्टिकल) म्हणावा लागतो हे ध्यानात येते.

विशेषतः तरुण वयातील लेखनात मूल्यदृष्टी ठळकपणे दिसून येते. आपल्या सृजनशीलतेला वाव देत स्व-सृष्टी घडविणे हा मानवी स्वधर्म आहे, असे तो मानत होता. उत्पादक काम या स्वाभाविक गोष्टीला लादलेपण आल्याने निर्माण होणारा आत्मवियोग (एलियनेशन) कसा दूर करता येईल ही त्याची मुख्य आस्था होती. एकीकडे निसर्गाशी आणि दुसरीकडे समाजरचनेशी झुंज देत मनुष्य दुर्भिक्ष्याच्या अवस्थेतून समृद्धीच्या अवस्थेत जाईल ही त्याची श्रद्धा होती.

त्याची न्याय-कल्पना सुटसुटीत समतावादी नव्हती. किंबहुना समता हा शब्दही त्याच्या साहित्यात अभावानेच आढळतो. अनुत्पादक राज्यकर्ते उत्पादकांची नाडणूक करतातच पण त्याभरात ते उत्पादकतेच्या वाटांमध्ये अडथळे निर्माण करतात आणि हे थांबले पाहिजे अशी त्याची शोषणमुक्तीची कल्पना होती. श्रीमंताचे काढून गरीबात वाटा अशी नव्हती.
उत्पादकांनी उत्पादकशक्तींची वाट अडविणारे राज्यकर्ते झिडकारून वाट मोकळी करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे हा त्याचा संदेश आजही प्रस्तुत ठरणाराच आहे.

भाकिते का व कशी चुकत गेली
मार्क्सने अनुभवलेली भांडवलशाही ही एकोणीसाव्या शतकातील अवजड तंत्रज्ञानावर आधारित होती. त्यामुळे भांडवल-गुंतवणूक जास्ती जास्ती लागत जाणे आणि उत्पादकता मात्र त्यामानाने न वाढणे हे तेव्हा सत्यच होते. त्यामुळे नफ्याचे दर घसरणार, पिळवणूक तीव्र होत जाणार, कामगारवर्गाचे कंगालीकरण होत जाणार आणि व्यवस्था अरिष्टात सापडणार, याचे गणित त्याने मांडले. परंतु विसाव्या शतकात झालेले तांत्रिक बदल इतके विस्मयजनक आहेत की ते प्रत्यक्ष करत असणाऱ्या तंत्रज्ञांनाही स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. इतके आरपार वेगळे दृश्य कल्पिण्यास १८८४ ला निधन पावलेला मार्क्स असमर्थ ठरला, हा ‘त्याचा’ दोष खचितच म्हणता येणार नाही. अवजड तंत्रामुळे येणारी अडचण ही भांडवलशाही या व्यवस्थेचाच अपरिहार्य परिणाम आहे असे समजण्यात मार्क्सने चूक केली. सरंजामशाहीतून भांडवलशाहीत हे संक्रमण अगदी चिकित्सकपणे मांडणारा मार्क्स; भांडवलशाहीतून समाजसत्तावादाकडे हे संक्रमण इतक्या घिसाडघाईने करता येईल असे मानण्यात उतावीळ ठरला. भांडवलशाहीचा असा ‘बालमृत्यू’ झालाच नाही. अत्यंत लवचिकपणे स्वतःला दुरुस्त करत नेणारी ती व्यवस्था आहे हे तिने सिद्ध केले. “तुम्ही जर लोकांत क्रयशक्ती पसरवली नाहीत तर मागणीअभावी मराल” हे सांगणारा केन्स द्रष्टा ठरला. केन्सप्रणित ‘औदार्याला’ लोकशाहीची जोड मिळून कल्याणकारी राज्य ही नवीच गोष्ट अस्तित्वात आली जिचा सुगावा मार्क्सला लागलाच नाही. त्यामुळे त्याची भाकिते धडाधड चुकत गेली. कामगारवर्गाचे कंगालीकरण न होता त्याचे श्रीमंत कामगार आणि गरीब कामगार या दोन वर्गात विभाजन झाले. श्रीमंत कामगाराला भांडवलशाही हवीशीच वाटली आणि गरीबात तिच्याशी लढण्याची ताकद उरली नाही. समाजाचे मालक आणि मजूर या दोन वर्गात ध्रुवीकरण होत जाईल असे मार्क्स मानत होता. प्रत्यक्षात नोकरदार मध्यमवर्ग आणि स्वयंरोजगारी लहान उद्योजक स्वरूपातला मध्यमवर्ग मिळून ध्रुवीकरण न होता अनेक स्तरांचा वर्गसमन्वय निर्माण झाला. भांडवलशाही मरणपंथाला लागून तेथे कामगारक्रांत्या झाल्याच नाहीत.

उलट जिथे अद्याप भांडवलशाहीचा पत्ताच नाही अशा देशात त्या झाल्या. त्या खरेतर सरंजामशाहीविरोधी क्रांत्या होत्या. भांडवली लोकशाही प्रस्थापित करणे हे त्यांचे ऐतिहासिक कार्य असायला हवे होते. पण लेनिन स्टालिन माओ या मंडळीना भांडवलशाही हा टप्पा गाळून थेट समाजसत्तावादात जाण्याचा मोह पडला. मूळ मार्क्सवादाशी प्रतारणा करून निर्माण झालेल्या या नोकरशाही व्यवस्था, गोर्बाचेव्हने वॉर्सॉ-सैन्य मागे घेताच कश्या वेगाने कोसळून पडल्या हे आपण पाहिलेच आहे. तसेच डेंग ज्याव बिंग नंतरचा चीन कसा कट्टर भांडवलशाहीवादी बनला हेही आपण पाहिले आहे. विसाव्या शतकाचा बदलाचा झपाटा लक्षात घेता भाकिते चुकणे ही गोष्ट क्षम्य किंवा स्वाभाविकच मानायला हवी.

सैद्धांतिक घोटाळे
उत्पादक अनुत्पादक हा वर्गविग्रह नष्ट व्हावा, तसेच शोषणमुक्ती व्हावी, या प्रेरणा वंदनीयच आहेत. परंतू हे परिवर्तन रक्तरंजित क्रांतीनेच, एकदाचे आणि कायमचे होउन जाईल, असा आग्रह धरणे अनावश्यक होते. शोषण तीव्र होऊन ते असह्य होऊन क्रांतीच होईल, असे नसून तर शोषण सौम्य करत नेणारी सततची सुधारणा पुढे पुढे नेणे, हे शक्य व समंजसपणाचे आहे. पण मार्क्स आणि त्याचे क्रांतीवादी अनुयायी ‘सुधारणावाद’ ही शिवी म्हणून वापरू लागले.

त्याहूनही महत्वाचा घोटाळा असा की, या सर्व परिवर्तनाची वाहक ही राज्यसंस्था स्वतःच असेल, व एकदा का ती कामगारवर्गाच्या हातात आली की, ती वर्गविग्रह कायमचा नष्ट करून टाकेल, हे गृहीत धरणे चूक होते. विशेषतः सर्वहाऱ्याची या नावाखाली चालणारी ‘हुकुमशाही’ हे काम करेल असा दावा करणे अक्षम्यपणे चूक होते. किंबहुना समाजात सत्ता आधी येते आणि ती सत्ताच वर्ग निर्माण करते असे युध्दसंस्थेच्या इतिहासाने नेहमीच दाखवले आहे.

“कामगारवर्गाच्या हातात राज्यसंस्था आली, की तो जरी पूर्वाश्रमीचा कामगार असला तरी क्रांतीनंतर तो ‘कामगार’च उरणार नाही आणि कम्युनिस्ट पक्षाची नोकरशाही हा स्वतःच एक शोषक वर्ग बनेल”. हा इशारा मार्क्सला बाकूनिनने थेटपणे दिला होता. पण मार्क्सने दुराग्रहीपणे बाकूनिनला हाकलून दिले.

वेगळा विचार मांडणाऱ्यांना गद्दार ठरवून खच्ची करायचे ही कम्युनिस्ट परंपरा खुद्द मार्क्सनेच चालू केली होती हे खेदाने म्हणावे लागते. मोठ्या लोकांच्या चुकाही मोठ्याच ठरतात हेच खरे.

समृद्धीच रोखून कधीच न्याय आणता येत नाही आणि उत्पादकाला चेपून समृद्धी येत नाही हे सांगणारा आणि माणूसच स्वतःचा इतिहास घडवतो, पण लहरीनुसार नव्हे, हे सांगणारा द्रष्टा पुरुष म्हणून मार्क्स नेहमीच आपला स्फूर्तिदाता राहील यात शंका नाही.


शेषन आणि श्रीधरन

शेषन-श्रीधरन : एक जण भारतीय लोकशाहीला शिस्त लावणारा तडफदार माजी निवडणूक आयुक्त तर दुसरा कोकणरेल्वे, दिल्लीमेट्रो सारख्या चमत्काराचा निर्माता मेट्रो मॅन. टी.एन.शेषन आणि ई.श्रीधरन हे दोघंही आपआपल्या क्षेत्रात टॉपचे अधिकारी तर होतेच पण आपल्या कामामुळे अख्ख्या देशाची व्यवस्था सुधारून दाखवली.
पण गंमत म्हणजे हे दोघेही अधिकारी अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून एका वर्गात होते आणि पहिल्या नंबरसाठी त्यांच्यात तुफान स्पर्धा चालायची.
ई.श्रीधरन यांनी एका मुलाखतीमध्ये त्याकाळातल्या आठवणी सांगितल्या आहेत.
दोघेही मुळचे केरळचे. १९४२ साली तिथल्या पलक्कड या गावातल्या सर्वात फेमस असलेल्या बेसल एव्हान्जीकल मिशन हायस्कूलमध्ये श्रीधरन यांनी इंग्रजी दुसरी या वर्गात प्रवेश केला. शेषन आधी पासून त्याच शाळेत होते. वर्गात त्यांचा पहिला नंबर यायचा.
श्रीधरन यांनी आल्या आल्या त्या वर्षी शेषन यांना मागे टाकले.
तिथून या दोघांची स्पर्धा सुरु झाली. शेषन उंचीला कमी असल्यामुळे वर्गात पहिल्या बेंचवर बसायचे तर श्रीधरन उंच असल्यामुळे शेवटच्या बेंचवर. शेषन हे अतिशय अभ्यासू, कायम पुस्तकात बुडालेले असायचे. या उलट श्रीधरन फुटबॉल खेळायचे. इंग्रजी मध्ये मात्र टी.एन.शेषन यांच्या तोडीस तोड अख्ख्या शाळेत कोणी नव्हतं.
बोर्डाच्या परीक्षेत शेषन यांनी श्रीधरन यांना १ मार्काने मागे टाकलं. १९४७ सालच्या sslc बोर्ड परीक्षेत शेषन ४५२ मार्क मिळवून पहिले आले तर श्रीधरन यांना ४५१ मार्क मिळाले होते व त्यांचा दुसरा क्रमांक आला होता.
मार्कांसाठी किती जरी स्पर्धा असली तरी शेषन आणि श्रीधरन चांगले दोस्त होते.
पुढे इंटरमेजीएटसाठी देखील व्हिक्टोरिया कॉलेजला दोघांनी एकत्र अॅडमिशन घेतलं. दोघांनी एकत्र झपाटून अभ्यास केला.
अख्ख्या मद्रास प्रांतामध्ये इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल एवढे मार्क मिळवणारे ते दोघेच होते.: पण टी.एन.शेषन यांना आपल्या भावाप्रमाणे आयएएस अधिकारी बनायचं होत यामुळे त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला नाही व मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये फिजिक्स विभागात प्रवेश घेतला. श्रीधरन मात्र आंध्रमधल्या काकीनाडाच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनियरिंग पूर्ण केलं.
पुढे १९५४ साली युपीएससी परीक्षा पासून होऊन आयएएस बनण्याच स्वप्न शेषन यांनी पूर्ण केलं. याच काळात श्रीधरन यांनी इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेस एक्झाम पास होऊन रेल्वेमध्ये भरती झाले.
योगायोग असा की दोघेही ट्रेनिंगच्या निमित्ताने इंडियन फोरेस्ट कॉलेज डेहराडून येथे एकत्र आले. ते २ महिने शेषन व श्रीधरन सोबत राहिले. त्यानंतर मात्र दोघांचे रस्ते कायमसाठी वेगळे झाले. शेषन यांनी प्रशासकीय कारकिर्दीत एकामागून एक यश मिळवत भारताचे मुख्य कॅबीनेट सचिव बनण्यापर्यंत मजल मारली. हे भारतातील सर्वोच्च पद. १९८९ साली रिटायर झाल्यावर त्यांना निवडणूक आयुक्तपदावर नेमण्यात आलं.
भारतात निवडणूक काळात आचारसंहिता कडकपण राबण्यास शेषन यांनी घालून दिलेली शिस्त कारणीभूत ठरली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून मॅगसेसे पुरस्कार देखील देण्यात आला. तर श्रीधरन यांनी कलकत्ता मेट्रो, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो, कोची मेट्रो, लखनौ मेट्रो असे अशक्यप्राय वाटणारे प्रोजेक्ट स्वतःच्या कर्तबगारीने व नेतृत्वाने पूर्ण केले. विक्रमी वेळेत सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंगचे स्कील दाखवत श्रीधरन यांनी भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडलीत्यांना या बद्दल भारताचा सर्वोच्च पद्मविभूषण हा सन्मान देण्यात आला.
मैत्रीत अनेकदा लोक स्पर्धा करतात. स्पर्धा असावी तर शेषन-श्रीधरन यांच्या प्रमाणे चांगल काम करण्याची. देशाला नंबर वन करण्यासाठी या दोन दोस्तांनी जे प्रयत्न केले त्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा हे नक्की..

गौतम बुद्धांची शिकवण

गौतम बुद्ध यांचे नाव सर्वांना चांगले माहीत आहे. त्यांच्या बौद्ध धर्माचा प्रसार पूर्व आशियाखंडामधील अनेक देशांमध्ये झाला होता, पण कालांतराने भारतातच तो धर्म मागे पडला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केल्यानंतर भारतातही या धर्मीयांची संख्या वाढली आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या ज्ञानाचा थोडक्यात सारांश कुणीतरी ५५ मुद्यांमध्ये खाली दिला आहे.

त्याशिवाय गौतमबुद्धांची शिकवण सांगणारे आणखी काही लेख खाली जमा केले आहेत. दि.११-०५-२०२२

१.तथागत गौतम बुद्ध ने समस्त ज्ञान के सार

इस सार को कुल 55 बिंदुओं में समेट दिया है :—
▪चार – आर्य सत्य
▪पांच – पंचशील
▪आठ – अष्टांगिक मार्ग और
▪अड़तीस – महामंगलसुत्त

बुद्ध के चार आर्य सत्य

 1. दुनिया में दु:ख है
 2. दु:ख का कारण है
 3. दु:ख का निवारण है, और
 4. दु:ख के निवारण का उपाय है

पंचशील

 1. झूठ न बोलना
 2. अहिंसा
 3. चोरी नहीं करना
 4. व्यभिचार नहीं करना और
 5. नशापान/मद्यपान नहीं करना

अष्टांगिक मार्ग

 1. सम्यक दृष्टि (दृष्टिकोण) /Right view
 2. सम्यक संकल्प / Right intention
 3. सम्यक वाणी / Right speech
 4. सम्यक कर्मांत/ Right action
 5. सम्यक आजीविका/ Right livelihood (profession)
 6. सम्यक व्यायाम / Right exercise (physical activity)
 7. सम्यक स्मृति / Right mindfulness
 8. सम्यक समाधि / Right meditation (Vpasana Meditation)

महामंगलसुत्त
तथागत बुद्ध ने 38 प्रकार के मंगल कर्म बताए हैं जो महामंगलसुत्त के नाम से भी जाना जाता है। यह निम्नलिखित प्रकार है..

 1. मुर्खो की संगति ना करना
 2. बुद्धिमानों की संगति करना
 3. शीलवानो की संगति करना
 4. अनुकूल स्थानों में निवास करना
 5. कुशल कर्मों का संचय करना
 6. कुशल कर्मों में लग जाना
 7. अधिकतम ज्ञान का संचय करना
 8. तकनीकी विद्या अर्थात शिल्प सीखना
 9. व्यवहार कुशल एवं विनम्र होना
 10. विवेकवान होना
 11. सुंदर वक्ता होना
 12. माता-पिता की सेवा करना
 13. पुत्र-पुत्री-स्त्री का पालन पोषण करना
 14. अकुशल कर्मों को ना करना
 15. बिना किसी अपेक्षा के दान देना
 16. धम्म का आचरण करना
 17. सगे सम्बंधियों का आदर सत्कार करना
 18. कल्याणकारी कार्य करना
 19. मन, शरीर तथा वचन से परपीड़क कार्य ना करना
 20. नशीले पदार्थों का सेवन ना करना
 21. धम्म के कार्यों में तत्पर रहना
 22. गौरवशाली व्यक्तित्व बनाए रखना
 23. विनम्रता बनाए रखना
 24. पूर्ण रूप से संतुष्ट होना अर्थात तृप्त होना
 25. कृतज्ञता कायम रखना
 26. समय-समय पर धम्म चर्चा करना
 27. क्षमाशील होना
 28. आज्ञाकारी होना
 29. भिक्षुओं, शीलवान लोगों का दर्शन करना
 30. मन को एकाग्र करना
 31. मन को निर्मल करना
 32. सतत जागरूकता बनाए रखना
 33. पाँच शीलों का पालन करना
 34. चार आर्य सत्यों का दर्शन करना
 35. आर्य अष्टांगिक मार्ग पर चलना
 36. निर्वाण का साक्षात्कार करना
 37. लोक धम्म लाभ-हानि, यश-अपयश, सुख-दुःख, जय-पराजय से विचलित ना होना
 38. शोक रहित, निर्मल एवं निर्भय होना . . . . . एक कदम बुद्ध धर्म की ओर

२. दुःखमय जीवन और दुख दूर करने की खोज – गौतम बुद्ध

मनुष्य को समझ आते ही दु:ख के अनुभव होने लगते हैं। आयु अनुसार उन दु:खों की कारण परंपरा अलग होती है। मनुष्य जो चाहता है उसके अनुसार घटित नहीं हुआ या मन के विरुद्ध कुछ घटित हुआ तो मनुष्य को दुख होता है। हर एक की चिंताएं भिन्न होती हैं। अत्यंत गरीब मनुष्य को आज बच्चों को क्या खाना खिलाया जाए इसकी चिंता होती है, तो धनवान आदमी को बेटे के सरदर्द की चिंता और दुख होता है।
इस संसार मे तीन प्रकार के दुख या पीडा होती है। आध्यात्मिक, अधिभौतिक तथा अधिदैविक। शारीरिक व्याधि भूख,प्यास, आदि वजह से होने वाले दु:ख आध्यात्मिक दु:ख कहलाते हैं। बाघ, सांप, चोर, गुनाहगार, दुष्ट आदि से जो दुख होते हैं वह अधिभौतिक दुःख। आंधी, बाढ़, भूकंप, भूत, पिशाच आदि से जो दु:ख होता है, वह आधिदैविक दु:ख है। ऐसे यह तीन प्रकार के दु:ख त्रिताप नाम से जाने जाते हैं।
हम सब देखते हैं कि आजकल के युग में टेंशन नाम का चतुर्थ ताप बहुत ही बढा हुआ है। इतना बढा है, कि जगत के 800 करोड़ लोगों को किसी ना किसी तरह का टेंशन है। यह मानसिक ताप है, तो आध्यात्मिक दु:ख ही है। उसका उपाय भी आध्यात्मिक ही है। भौतिक विज्ञान ने इसके ऊपर उपाय स्वरूप कुछ औषधियों का निर्माण किया। लेकिन उसका परिणाम होता हुआ दिखाई नहीं देता। क्योंकि, औषधी टेंशन नष्ट नहीं कर सकती।

मानवीय दुखों पर इलाज करने के अनुसंधान में बौद्ध धर्म का जन्म हुआ यह हम सब को अच्छी तरह ज्ञात है।
राजा शुद्धोधन के शिशु के जन्म समय पर यह ज्योतिष बताया गया कि बालक आगे चलकर बड़ा संन्यासी होगा। राजा को यह पसंद नही आया। राजा ने सिद्धार्थ को एक बंद महल में ही रखा, और युवावस्था प्राप्त होते ही उसका विवाह कर दिया गया। एक दिन उसने रथ में बैठकर नगर की परिक्रमा की। राह में उसे एक बहुत वृद्ध व्यक्ति मरणासन्न अवस्था में दिखाई दिया। उसने अपने सारथी से पूछा, यह क्या है? सारथी ने राजपुत्र को बताया कि यह वृद्ध हो गया है। राजपुत्र ने पूछा वृद्ध याने क्या? उसे बताया गया कि, जब आयु बहुत ज्यादा बढ़ जाती है तब मनुष्य वृद्धावस्था को प्राप्त होता है। राजपुत्र बहुत चिंतित हुआ उसने पूछा क्या मैं भी वृद्ध हो जाऊंगा? उसे बताया गया, हां सभी वृद्ध होते हैं। राजपुत्र को बहुत दुख हुआ। ऐसे ही राह में एक कोढी मनुष्य, एक शव यात्रा, एक भिकारी, ऐसे अनेक लोग दिखाई दिए और हर समय राजपुत्र के प्रश्न पर बताया गया कि हर एक का ऐसा हो सकता है, तथा मृत्यु अनिवार्य है। राजपुत्र सिद्धार्थ अपने महल में वापस गया और सोच विचार करने लगा, कि यह जो दुख है वह कैसे दूर होगा। यह सोच विचार करते हुए उसमें बैराग्य बुद्धि आई और वह तपस्या करने हेतु वन में चला गया। एक दिन बोधिवृक्ष के नीचे बैठे हुए उसे ज्ञान हो गया। क्या ज्ञान हुआ? अभी राजपुत्र सिद्धार्थ, बौद्ध बन गया। वह जगत को बताने लग गया कि इस दुनिया में दुख है ही नहीं। क्योंकि यह जगत शून्य है। कुछ नहीं है।

वास्तव में बुद्ध ने यह कोई नया सिद्धांत नहीं बताया। उसके पूर्व अत्यंत प्राचीन समय से वैदिक ऋषि मुनियों ने जगत को समझा दिया था, कि यह जगत एक क्षण के लिए भी अस्तित्व मैं आया ही नहीं है, एवं परमात्मा के अलावा दूसरे किसी भी चीज का अस्तित्व होना असंभव है।श्रुति कहती है, ‘नेह नानास्ति किंचन’ (उपनिषद ४.४.१९) । वेद उपनिषदों में ऐसी अनेक श्रुतियां है जो बड़े स्पष्टता से विदित करती हैं, की मानव दु:ख केवल अज्ञान के कारण है। वास्तव में यह जग है ही नहीं, और कोई भी दो या अधिक वस्तु अस्तित्व में नहीं।

. . . . . अनिलजी महाराज . . . . . . . . फेसबुकवरून साभार दि. ०६-०४-२०२२


३. बौद्धदर्शन : द्वादश-निदान

. . . Santosh Karkhanis Thane
दु:खकारण या आर्यसत्याचे निरुपण करताना भगवान बुद्धांनी दु:खाला कारणीभूत असलेली बारा कारणांची मालिका सांगितली. यातील प्रत्येक दुव्याला बुद्धांनी ‘निदान’ असे म्हटले आहे. त्यामुळे ही मालिका ‘द्वादश-निदान’ या नावाने ओळखली जाते. ही बारा निदाने पुढीलप्रमाणे : अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाति, जरामरण.
जरामरणाच्या अनुषंगाने शोक-परिवेदना-दु:ख-दौर्मनस्य येतात असेही सांगितले आहे.
अविद्येमुळे (अविद्येचा अर्थ मागील लेखात स्पष्ट केला आहे) आपल्या मनात विकार निर्माण होतात. यालाच बौद्ध दर्शनात ‘संस्कार’ (पाली भाषेत ‘संखारा’) म्हटले आहे. या विकारातून ‘मी आहे’ अथवा ‘पदार्थ आहेत’ अशी अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. यालाच बौद्ध दर्शनात ‘विज्ञान’ म्हटले आहे. विज्ञानामुळेच ‘नामरूपाची’ निर्मिती होते. ‘नाम’ म्हणजे मन:पिंड आणि रूप म्हणजे शरीरपिंड. या नामरूपामुळे सहा इंद्रिये (पाच ज्ञानेंद्रिये आणि मन) तयार होतात. या सहा इंद्रियांना बाहेरील कोणत्याही गोष्टीचा स्पर्श होतो. डोळ्यांना वस्तू दिसतात, कानाला ऐकू येते, मनात विचार येतात इत्यादी. त्यामुळे सुख-दु:ख इत्यादी भावना निर्माण होतात. त्यांना ‘वेदना’ म्हटले आहे. या सुखद वेदना पुन्हा पुन्हा अनुभवाव्या, दु:खद वेदना परत अनुभवण्यास लागू नये अशी भावना म्हणजे ‘तृष्णा’ निर्माण होते. या तृष्णेची अत्यंतिकता म्हणजे ‘उपादान’ (यालाच ‘आसक्ती’ असेही म्हणता येईल). उपदान मृत्युनंतर पुढील जन्मास (‘भव’) कारणीभूत ठरते. त्यामुळे पुढील आयुष्याला (‘जाती’) सामोरे जावे लागते. आयुष्य आले की वृद्धत्व आणि मृत्यू (‘जरामरण’) आलेच. त्यामुळेच दु:खाची निर्मिती होते. अशी ही दु:खनिर्मितीची साखळी आहे. या मालिकेतील आधीच्या दुव्यामुळे पुढील गोष्ट घडते. याला ‘प्रतीत्यसमुत्पाद’ असेही नाव आहे.
ही शृंखला तोडणे मानवाला शक्य आहे. ‘तृष्णा जागविणे-न जागविणे’ माणसाच्या हातात आहे. समाधी अवस्थेत (समाधीचा अर्थ मागील लेखात स्पष्ट केला आहे) मनाच्या समतोल अवस्थेमुळे नवी तृष्णा जागत नाही आणि मनुष्य या दु:ख निर्माण करणाऱ्या साखळीतून मुक्त होऊ शकतो असे बुद्धाचे प्रतिपादन आहे.
ही मालिका थोडी किचकट आणि ओढून-ताणून आणली आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण ध्यानात खोलवर गेले असता या दुव्यातील अनेक गोष्टींचा अनुभव येतो.
पुढील लेखात प्रतीत्यसमुत्पाद आपण अधिक सोप्या शब्दात समजून घेऊ आणि आपल्या जीवनातील दु:खे कमी करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे पाहू. प्रतीत्यसामुत्पादाचा आणि ध्यान-समाधीचा काय संबंध आहे ते ही पाहू.

सोबतचा फोटो : कार्ला येथील स्तूप

हा लेख आणि माझे बौद्ध आणि अन्य दर्शनासंबंधी लेख माझ्या ब्लॉगवर http://chintan101.blogspot.com/p/blog-page_36.html येथे प्रकाशित झाले आहेत.

*******************४.बौद्ध दर्शन : आर्यसत्ये

Santosh Karkhanis Thane
·
गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यावर पहिले प्रवचन त्यांनी सारनाथ येथे त्यांच्याबरोबर आधी मुक्तीचा मार्ग शोधत असलेल्या पाच श्रमणांना दिले. हे प्रवचन ‘धम्मचक्र प्रवर्तन’ या नावानेही ओळखले जाते. अशोकचक्र याच धम्मचक्राचे प्रतीक आहे.
यावेळी गौतम बुद्धांनी चार आर्यसत्ये सांगितली. (‘आर्यसत्ये’ म्हणजे ‘शाश्वत सत्ये’).
1>दु:ख आहे : या जगात दु:ख आहे हे भगवान बुद्धांनी ठामपणे सांगितले. म्हणूनच काही टीकाकार ‘दु:खवादी’ अशी या धर्मावर टीका करतात. ‘सुख पाहता जवापडे, दु:ख पर्वताएवढे’ किंवा ‘अधिक सुख मिळवावे’ अशी बुद्धाची भूमिका नाही. एखाद्या गोष्टीत काही काल सुख वाटले तरी नंतर ती गोष्ट नाहीशी झाल्यावर दु:खच वाट्याला येते. त्यामुळे सुखाचे अंतिम पर्यावसान दु:खातच होते अशी ही भूमिका आहे. एखादा वैद्य रोगावर औषधोपचार करण्यापूर्वी रोग असल्याची खात्री करून घेतो त्याप्रकारची ही भूमिका आहे.
2>दु:ख समुदाय (दु:ख कारण) : एखादा निष्णात वैद्य रोगाची खात्री करून घेतल्यावर त्या रोगाच्या मूळ कारणांचा शोध घेतो. मूळ कारण सापडल्यावरच त्यावर इलाज करणे शक्य होते. अन्यथा हे इलाज वरवरचे तात्कालिक होतील. दु:खाचे मूळ कारण अविद्या आहे. अविद्या म्हणजे अहंकार (‘मी’) आणि ममत्व (‘माझे’) यातून उगम पावलेली आत्मकल्पना. अविद्येतून तृष्णा आणि तृष्णेतून दु:ख जन्माला येते असे बुद्धाने प्रतिपादन केले. अविद्येतून दु:खाचा जन्म कसा होतो याचे विस्तृत विवेचन बुद्धाने केले आहे. त्याला द्वादश-निदान असे म्हणतात. आपण द्वादश-निदान या लेखमालेत नंतर समजून घेऊ.
3>दु:ख निरोध : रोगाच्या मूळ कारणांचा शोध घेतल्यावर त्यावर काय इलाज करता येईल याचा वैद्य शोधघेतो. मूळ कारण कळल्याने इलाजाची दिशा मिळते. बुद्धाने ‘अविद्येचा नाश केल्यास दु:खापासून मुक्ती मिळते’ असे सांगितले. दु:खापासून मुक्ती ही केवळ कल्पना नाही तर आपण स्वत: दु:खापासून मुक्ती मिळविली असल्याचे ठाम प्रतिपादन केले.
4>दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा (दु:ख निरोधचा मार्ग) : रोगावर इलाज ठरविला की वैद्य औषध कसे घ्यायचे हे विस्तृतपणे सांगतो. तसेच भविष्यात पुन्हा हा रोग उद्भवू नये म्हणून काय काळजी घ्यायची याची माहिती देतो. गौतम बुद्धाने हा दु:खापासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग टप्प्याटप्प्याने विषद केला. आज अडीचहजार वर्षानंतरही सामान्य संसारी माणूस या मार्गाने जाऊन जीवनातील दु:खांवर मात करू शकतो. ‘आर्यअष्टांगमार्ग’ असे त्या मार्गाचे नाव आहे.

पुढील लेखात या ‘आर्यअष्टांगमार्गाचा’ विचार करू.

ही लेखमाला माझ्या ब्लॉगवर http://chintan.karkhanisgroup.com येथे ‘दर्शनशास्त्र’ विभागातही प्रसिद्ध होत आहे. आतापर्यंत प्रकाशित झालेले लेख तेथे अनुक्रमणिकेसह उपलब्ध आहेत.

*****************************

५. नवी भर दि. १६-०५-२०२२ बुद्धपौर्णिमा

.
बुद्ध पौर्णिमा
.
वैशाख पौर्णिमेलाच गौतम बुद्ध (जन्मः इसवीसनपूर्व ५६३ वर्षे; निर्वाणः इसवीसनपूर्व ४८३ वर्षे) यांचा जन्म लुम्बिनी येथे झाला. वयाच्या ३५-व्या वर्षी म्हणजेच इसवीसनपूर्व ५२८ वर्षे, बुद्धगया येथील बोधीवृक्षाखाली त्यांना वैशाख पौर्णिमेलाच ज्ञानप्राप्ती झाली होती. तसेच, वयाच्या ८०-व्या वर्षी, इसवीसनपूर्व ४८३ वर्षे, वैशाख पौर्णिमेलाच कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे निर्वाण झाले. गौतम बुद्ध हे श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी नववा अवतार मानले जातात.
.
भारतातील बुद्धजयंतीचा इतिहास
.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (जन्मः१४ एप्रिल १८९१ मृत्यूः६ डिसेंबर १९५६) यांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती, दिल्ली येथे साजरी झाली. म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्धजयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्धजयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.
.
बुद्धजयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतांमुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष आणि गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह, सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.
.
चार आर्यसत्ये
.
प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा; मानवता, करुणा आणि समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. या जगात अबाधित सत्ये कोणती आहेत आणि जगाचे रहाटगाडगे कसे चालते, यासबंधीचे ज्ञान त्यांना बोधिवृक्षाखाली प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. त्याआधारे त्यांनी जगास, दुःखनिवारणाचा जो आचारधर्म सांगितला, त्यालाच ’बौद्ध धर्म’ असे म्हणतात. ती चार आर्यसत्ये पुढीलप्रमाणे आहेत.
.
१. दुःख सर्वत्र पसरलेले आहे.
२. हाव हे सर्व दुःखांचे मूळ आहे.
३. हाव नाहीशी केली तर दुःखही नाहीसे होऊ शकते.
४. हाव नाहीशी करण्याचा मार्गही असलाच पाहिजे.
.
“बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हाच सनातन धर्म आहे.” अशा प्रकारची प्रार्थना बौद्ध धर्मात केली जाते. सामान्यतः ’बुद्धा’चे म्हणजे विद्वानाचे म्हणणे मानावे. बुद्ध कदाचित भिकार्‍यास भीक देऊ नका असे म्हणेल, कारण भीक दिल्यास माणसे आळशी होतात. मात्र ’धर्म’ करुणेचा मार्ग सांगेल. त्यास दया दाखवावी म्हणेल. अशा प्रसंगी ’धर्मा’चे ऐकावे. मात्र करुणेच्या मार्गाने जात असता समूहच आळशी झाला, तर चालणार नाही. म्हणून संघाचा त्यास विरोधच असेल. अशा प्रसंगी ’संघा’चे ऐकावे. यात जे सर्व प्राणीमात्रांच्या हितकारक असेल तेच करावे. अनुक्रमे ’बुद्ध’, ’धर्म’ आणि ’संघ’ सांगेल तसेच वागावे असे बौद्ध धर्मात सांगितलेले आहे. त्यामुळे ’हाव’ नियंत्रणात राहून मानवी जीवनातील दुःख नाहीसे होऊ शकेल.
.

नरेंद्र गोळे . . . . फेसबुकवरून साभार


एक जुनी गोष्ट आहे . एक बौद्ध मंक (भिक्षू ) बुद्धाचा संदेश जगात पसरवण्यासाठी निघाला होता . जाण्यापूर्वी बुद्धाचे आशीर्वाद घ्यायला तो आला होता त्याने बुद्धांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला तेव्हा बुद्ध म्हणाले – हा पहा दिव्य वरदान लाभलेला मंक त्याने आईला मारले आहे . त्याने वडिलांना मारले आहे . सर्व नातेवाईकांना मारले आहे त्याने राजालाही मारले आहे . सर्व शिष्यांना आश्चर्य वाटले त्यांचा त्यांच्या कानावर विश्वास बसेना . बुद्ध हे काय म्हणत आहेत ?
एका शिष्याने धैर्य एकवटून विचारले – महाराज , तुमच्या बोलण्याचा अर्थ काय ? खुनी माणूस गुणी कसा असेल ? तुम्ही याला वरदान लाभले आहे असे म्हणत आहात .
बुद्ध हसून म्हणाले – एवढेच नाही तर त्याने स्वतःला पण मारले आहे . त्याने आत्महत्या केली आहे .
त्यानंतर त्यानी एक गाणे म्हटले . ” गाथा ” . त्यात त्यानी त्याना काय म्हणायचे होते ते स्पष्ट केले .
प्रत्येकाला एक मूल म्हणूनच वाढविण्यात आले आहे . जगात तुमची पहिली शिकवण तशी आहे . वर्षानुवर्षे तुम्हाला लहान मूल म्हणून रहायलाच शिकविले आहे तुम्हाला परावलंबी ठेवण्यात आले आहे . तुम्हाला नेहमीच कुणा तरी वडिलधाऱ्या व्यक्तीचा आधार घेण्याची सवय लावली आहे . काय करावे आणि काय करू नये हे कुणी तरी अधिकाराने सांगावे असे तुम्हाला वाटत आले आहे ..
परिपक्वता म्हणजे काय ? तर आपले निर्णय स्वतः घेणे . स्वतःच्या पायावर उभे रहाणे . काय करावे , काय करू नये हे स्वतः ठरवणे . पण हे होत नाही प्रत्येकाचे आई वडील मुलांना बिघडवतात .मग शाळा , मग कॉलेज . मग विद्यापीठ सागळे तुम्हाला बिघडविण्यासाठी आतूर असतात . त्यामुळे क्वचितच कोणी प्रौढ – परिपक्व होतो .
समाजाला परिपक्व माणसे नको असतात . ती धोकादायक असतात . असा माणूस स्वतःच्या इच्छे प्रमाणे जगतो . तो स्वतःच्या गोष्टी स्वतः करू लागतो . लोकांचे मत . लोक काय म्हणतील याची तो फिकिर करत नाही . आदर . मान , सन्मान यांच्या तो मागेच नसतो . तो आपले आयुष्य आपल्या मर्जीत जगतो त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो .
पण तो स्वातंत्र्याचा त्याग करायला कधीच तयार नसतो
समाजाला अशी माणसे नको असतात त्यांची समाजाला भीती वाटते . सर्वांचे मानसिक वय ७-१४ एवढेच असावे असे समाजाला वाटते .
ओशो – Maturity या पुस्तकातील दोन पानांचा अनुवाद बुद्ध पौर्णिमेनिमित्त
श्याम केळकर . . . . फेसबुकवरून साभार

*************************************

नवी भर दि. १८-०६-२०२२ :

☸☸☸☸☸☸☸☸☸☸☸
एक बार एक भन्ते जी भिक्षा माँगते हुए एक घर के सामने खड़े हुए और उन्होंने आवाज लगायी,
भिक्षा माते
घर से महिला बाहर आयी। उसने उनकी झोली मे भिक्षा डाली और कहा,
“भन्तेजी, कोई उपदेश दीजिए!”
भन्तेजी बोले, “आज नहीं, कल दूँगा।”
दूसरे दिन भन्तेजी ने पुन: उस घर के सामने आवाज दी – भिक्षा माते
उस घर की स्त्री ने उस दिन खीर बनायीं थी, जिसमे बादाम-पिस्ते भी डाले थे,
वह खीर का कटोरा लेकर बाहर आयी।
भन्ते जी ने अपना कमंडल आगे कर दिया।
वह स्त्री जब खीर डालने लगी, तो उसने देखा कि कमंडल में गोबर और कूड़ा भरा पड़ा है। उसके हाथ ठिठक गए।
वह बोली, “भन्ते ! यह कमंडल तो गन्दा है।”
भन्तेजी बोले, “हाँ, गन्दा तो है, किन्तु खीर इसमें डाल दो।”
स्त्री बोली, “नहीं भन्ते, तब तो खीर ख़राब हो जायेगी। दीजिये यह कमंडल, में इसे शुद्ध कर लाती हूँ।”
भन्तेजी बोले, मतलब जब यह कमंडल साफ़ हो जायेगा, तभी खीर डालोगी न ?”
स्त्री ने कहा : “जी भन्ते !”
भन्तेजी बोले, “मेरा भी यही उपदेश है।
मन में जब तक चिन्ताओ का कूड़ा-कचरा और बुरे संस्करो का गोबर भरा है, तब तक उपदेशामृत का कोई लाभ न होगा।
यदि उपदेशामृत पान करना है, तो प्रथम अपने मन को शुद्ध करना चाहिए,
कुसंस्कारो का त्याग करना चाहिए, तभी सच्चे सुख और आनन्द की प्राप्ति होगी।
बुद्धं सरणं गच्छामि
धम्म सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि

. . . . श्री.आर आर थोरात यांच्या फेसबुकवरील पानावरून साभार
🇮🇳🙏🏻☸💙🌹🦁🌞💙☸🙏🏻🇮🇳

control your emotions

Buddha and his disciples never stay in one place for a long time. Staying for a long time will be a burden to the villagers as they depend on villagers for their food.
One day Buddha went to a village he had never before. He knocked on the door of one of the houses in the village with his begging bowl.
After some time, a lady came out and she became furious to see a monk with a begging bowl in his hand.
Lady started abusing Buddha, “You are looking fit enough to work. Then you want to have food without working”.
And she kept on abusing him. But Buddha stood still listening without any reaction and waiting for her to finish.
She paused to catch her breath. Then she asked, “Why are simply standing like a stone? Say something.”
Buddha said, “Mother If an offer has come and if it is not accepted, to whom does it belong?”.
Lady replied, “I offer you nothing, just get out of my place”.
Buddha gently replied, “Mother, the time I met you, you have been offering me whatever you have?”.
The Lady realized that Buddha was referring to the abuses, she made on him and she asked
“So, your question is, if the offer is not accepted, to whom does it belong”.
Buddha smiled back.
Lady realized her mistake and she bowed to Buddha for forgiveness.
Buddha finally said, “As a mirror reflects an object and as stand still lake reflects the sky, take care of what you speak and how you act is always good. For goodness will always cast back goodness and for harm will always cast back harm”.
Then she bought some food for him. Buddha thanked her and he continued his journey.
Moral of the story:
Never let anyone take control or empower you, through their anger and words. Instead, be the mirror and reflect them. Be mindful and control your emotions.
By controlling yourself, you will never get affected by anyone. And the only person who is going to get affected by the negativity in them.

होळी रे होळी आणि होली आयी रे

नुकताच होलिकोत्सव होऊन गेला. त्यानिमित्य मला मिळालेल्या काही शुभेच्छा, कविता, विनोद आणि आठवणी यांचे लहानसे संकलन.
सर्वांना होळी पौर्णिमा आणि होलिकोत्सवाच्या शुभेच्छा. या विषयावर माझे काही लेख इथे
https://anandghare2.wordpress.com/2013/03/24/%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%a1-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5/

१. संत जनाबाई यांची मानसहोळी…

कराया साजरा । होलिकेचा सण ।
मनाचे स्थान । निवडीले ।।

ऐसे ते स्थान । साधने सारवले ।
भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।

त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।
त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।

रचलीया तेथे। लाकडे वासनांची ।
इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।

गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।
अर्पिले तयात । ऐसे केले ।।

रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।
भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।

वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले । झाली कृपा ।।

दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।

झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ । नूरले काही ।।

वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी ।।
जेणे मुक्तीची दिवाळी। अखंडित ।।

🙏🙏🙏

२. सुरा समर्थन – काका हाथरसी

दोस्तों, आज काका हाथरसी की
हास्य कविता – सुरा समर्थन का आनन्द लें.
 
भारतीय इतिहास का, कीजे अनुसंधान
देव-दनुज-किन्नर सभी, किया सोमरस पान
किया सोमरस पान, पियें कवि, लेखक, शायर
जो इससे बच जाये, उसे कहते हैं ‘कायर’
कहँ ‘काका’, कवि ‘बच्चन’ ने पीकर दो प्याला
दो घंटे में लिख डाली, पूरी ‘मधुशाला’

भेदभाव से मुक्त यह, क्या ऊँचा क्या नीच
अहिरावण पीता इसे, पीता था मारीच
पीता था मारीच, स्वर्ण- मृग रूप बनाया
पीकर के रावण सीता जी को हर लाया
कहँ ‘काका’ कविराय, सुरा की करो न निंदा
मधु पीकर के मेघनाद पहुँचा किष्किंधा

ठेला हो या जीप हो, अथवा मोटर कार
ठर्रा पीकर छोड़ दो, अस्सी की रफ़्तार
अस्सी की रफ़्तार, नशे में पुण्य कमाओ
जो आगे आ जाये, स्वर्ग उसको पहुँचाओ
पकड़ें यदि सार्जेंट, सिपाही ड्यूटी वाले
लुढ़का दो उनके भी मुँह में, दो चार पियाले


३. पुरणपोळी

शाळेत असताना व्याकरणात शिकवलेली वॄत्ते आठवा…..
एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना….!
😋😍

इंद्रवज्रा:

चाहूल येता मनि श्रावणाची
होळी तथा आणखि वा सणाची
पोळीस लाटा पुरणा भरोनी
वाढा समस्ता अति आग्रहानी ||

भुजंगप्रयात:

सवे घेउनी डाळ गूळा समाने
शिजो घालिती दोनही त्या क्रमाने
धरी जातिकोशा वरी घासुनीते
सुगंधा करावे झणी आसमंते || (जातिकोश – जायफळ)

वसंततिलका :

घोटा असे पुरण ते अति आदराने
घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने
पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते
पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||

मालिनी :

अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते
हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते
कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती
कडक नच करावी राहुद्या तैलवंती

मंदाक्रांता:

घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी
ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती
बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा
पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||

पृथ्वी :

करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे
पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे
समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे
असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||

शार्दूल विक्रिडित:

हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या
उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या
वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे
नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे ||

आज पासून सुरू होणाऱ्या होलिकोत्सवा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…..!!
🌷🌷🌷🌷🌷

४. पियक्कडचंद

पूरी बोतल गटकिये, होय ब्रह्म का ज्ञान
नाली की बू, इत्र की खुशबू एक समान
खुशबू एक समान, लड़्खड़ाती जब जिह्वा
‘डिब्बा’ कहना चाहें, निकले मुँह से ‘दिब्बा’
कहँ ‘काका’ कविराय, अर्ध-उन्मीलित अँखियाँ
मुँह से बहती लार, भिनभिनाती हैं मखियाँ

प्रेम – वासना रोग में, सुरा रहे अनुकूल
सैंडिल-चप्पल-जूतियां, लगतीं जैसे फूल
लगतीं जैसे फूल, धूल झड़ जाये सिर की
बुद्धि शुद्ध हो जाये, खुले अक्कल की खिड़की
प्रजातंत्र में बिता रहे क्यों जीवन फ़ीका
बनो ‘पियक्कड़चंद’, स्वाद लो आज़ादी का

एक बार मद्रास में देखा जोश – ख़रोश
बीस पियक्कड़ मर गये, तीस हुये बेहोश
तीस हुये बेहोश, दवा दी जाने कैसी
वे भी सब मर गये, दवाई हो तो ऐसी
चीफ़ सिविल सर्जन ने केस कर दिया डिसमिस

पोस्ट मार्टम हुआ, पेट में निकली ‘वार्निश

५. शिमग्याची आकाशवाणी %^$@# &%^$@# !!!

जंगलात एक शिकारी झाडांवर बसलेल्या कबुतरांच्या टोळक्याकडे मोठ्या आशावादी नजरेने बघत होता. बराच वेळ विचार करून नेम धरून त्याने शेवटी गोळी झाडली. ती दुसरीकडेच गेली. सगळी कबुतरं उडाली.

“गेली चायला.. &%^$@# नेम चुकला..” – शिकारी.

शेजारी एक साधू काही जप करत बसला होता. त्यानं एकदा भयंकर रागीट नजरेनं त्या शिकार्‍याकडे पाहिलं. आणि पुन्हा जप करू लागला.

शिकार्‍याचं लक्ष आता एका सशाकडे होतं.. नेम धरून पुन्हा एक गोळी झाडली.. तीही दुरून गेली.. ससाही पळाला..

“आयला .. काय चाललंय.. &%^$@# नेम चुकला परत..”

त्या साधूला शिकार्‍याचं हे बोलणं रुचलं नसावं.. म्हणून तो त्या शिकार्‍याला म्हणाला.. “बाळा .. अरे अशा शिव्या देऊ नये. वाईट गोष्ट आहे ती..”

“अरे ए साधुरड्या.. तू तुझं काम कर मला माझं काम करू दे..” – शिकारी.

साधू गपगार होऊन पुन्हा जप करू लागला.. “पुन्हा एकदा जर तू शिवी घातलीस ना तर मी तुला शाप देईन..”

आता शिकार्‍याला एक हरीण दिसू लागलं. पुन्हा बराच वेळ वाट पाहून नेम धरून पठ्ठ्यानं गोळी झाडली .. तीही भलतीचकडे गेली.. आणि इतक्यांदा प्रयत्न फसल्यानं वैतागलेला तो शिकारी म्हणाला.. ” &%^$@# नेम चुकला.. चायचं नशीब फुटकं .. ए साधुरड्या .. बघ &%^$@# नेम चुकला..”

आता मात्र साधूला राहवेनासं झालं .. तो वैतागून उठला आणि म्हणाला.. ” हे बघ मी तुला एकदा ताकीद दिली होती तू ऐकले नाहीस.. आता तर तू मलाच शिवी घातलीस .. मी तुला शाप देतो.. आता आकाशातून वीज पडेल आणि तुझी क्षणात राख होईल..” असं म्हणून साधून त्याच्या कमंडलूतून पाणी वगैरे काढून त्या शिकार्‍यावर शिंपडलं.. तसा ढगांचा गडगडाट झाला.. वीजा चमकू लागल्या.. शिकारी घाबरला आणि त्याने डोळे मिटून घेतले.. क्षणात एक जोरदार वीज कडाडली आणि साधूवर येऊन पडली.. साधू क्षणार्धात राख झाला..

तोच आकाशातून जोरदार आवाज आला..

“&%^$@# … नेम चुकला!!!!!””
मिसळपाववरून साभार दि. २८-०२-२०१०

६. होळी सणातले माझे दोन चित्तथरारक अनुभव…

. . श्री.प्र.ह.जोशी
१९५४-५५ चार काळ.मी ११-१२ वर्षांचा…
कर्नाटकात होळी जोरात साजरी करतात.फाल्गुन १ शुद्धपासूनच सुरुवात होते.
गोव-या,लाकडे चोरी करून आणून ती साठवून पौर्णिमेला होळी पेटवायची ही पद्धत ( झाडे तोडली जात नसत.)
आमच्या गल्लीतील टीम मध्ये मी आणि सुभाष ( त्याचे वडील पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते ) लीडर होतो.थौडे जास्त उंच व धीट असल्यामुळे असेल.
अनुभव १…रात्री चांदणे छान पडले होते् रात्री ९ चा सुमार असेल.आमच्या टीमने , बऱ्याच गोवऱ्या बंगल्याच्या आवारात होत्या त्या हेरून ठेवल्या होत्या.मी व सुभाषने कुंपणाच्या भिंतीवर चढायचे आणि आत उडी मारून गोव-या बाहेर टाकायच्या असे ठरले.
दोन्ही कोप-यावर २-२ मुले ठेवली.कोणी एकदम आले तर टाळ्या वाजवून आम्हाला सावध करायचे ठरले.
आम्ही भिंतीवर चढलो आणि रस्त्यावरून कोणी आल्याचा भास झाला.आम्ही दोघे उड्या मारून पळत सुटलो.मागे वळून बघितले तर कोणी नव्हते .पुन्हा आम्ही तिथे गेलो.पुन्हा तोच प्रकार.आम्ही दोघानी मित्रांना शिव्या घालून प्रयत्न थांबविला. ( त्यानी सावध न केल्याचा राग ) मी मागे वळून बघितले तर ८-९ फूट उंचीची एक बाई हातात सोटा घेऊन आमच्या मागे येत होती.सुभाषने तर चड्डीतच शू केली.नंतर कळले की त्या तिथे पूर्वी एक झौपडी होती.आणि एक गर्भार बाईचा तिथे मृत्यू झाला होता.तिचे भूत तेथे वावरत असते.म्हणजे आम्ही भूत पाहिले तर!!!

अनु.नं २….पौर्णिमेच्या दिवशी..आमची टीम एक मोठा ओंडका चोरायच्या उद्देशाने एका बंगल्याच्या आवारात गेलो.कोणी नाही हे पाहून ओंडका उचलायला लागलो तर त्यावर साप दिसला.आम्ही ओंडका टाकून दिला.दोन वेळा आपटला.साप गेला असे समजून तो ओंडका खांद्यावरून रचलेल्या होळीपर्यंत आणला.टाकला, तर साप बाहेर पडला.मारायचा प्रयत्न केला तर तो रचलेल्या होळीत शिरला. होळी पेटवली.कडेनं फिरून बोंबा मारल्या.( यात मोठीही सामील होत असत )
दुस-या दिवशी जागा स्वच्छ करताना् पाहिले तर तो साप मधल्या पुरलेल्या लाकडाच्या खड्ड्यात,नारळावर मेलेला आढळला…बिचारा.
तो साप ओंडका उचलत असता कोणाला चावला असता तर.?. अजून अंगावर काटा यैतो

वैज्ञानिक दृष्टीकोन

आपल्या देशात विज्ञान / तंत्रज्ञान या विषयांमध्ये शिक्षण घेऊन पदवीधर झालेल्या लोकांची संख्या फार मोठी आहे, पण हे लोक त्यांच्या आयुष्यात विज्ञानाला किती महत्व देतात? ते अंधश्रद्धेपासून किती प्रमाणात मुक्त झाले आहेत? याचा विचार करता फार कमी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असतो अशी तक्रार मोठ्या शास्त्रज्ञांनी केली आहे. या वर्षी राष्ट्रीय विज्ञानदिवसाच्या निमित्याने मिळालेला एक लेख. लेखिकेचे मनःपूर्वक आभार.
विज्ञान म्हणजे काय ? हे मी या लेखात सविस्तर विषद केले आहे. https://anandghan.blogspot.com/2018/02/blog-post_16.html

सायंटिफिक टेम्पर

सायंटिया / सायंशिया या मूळ शब्दाचा अर्थ -ज्ञान .यातून पुढे सायन्स,सायंटिफिक, सायंटिस्ट असे शब्द उगम पावले. सायंटिफिक टेम्पर हा शब्द 1976मध्ये भारतीय संविधानात कलम 51-ए मध्ये ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्य काय असतात’ या विधाना अंतर्गत घटनादुरुस्ती द्वारे समाविष्ट करण्यात आला. याची व्याख्या करायची झाली तर ती याप्रमाणे करता येईल:
एखादी गोष्ट फक्त शतकानुशतके वडीलधारी किंवा इतर लोक करत आहेत म्हणून न करता त्याकडे साहसी व समीक्षात्मक दृष्टीने बघणं,नवं संशोधन वा सत्य स्वीकारणं आणि वस्तुस्थितीवर भर देत जितका पुरावा हाती असेल तितक्याच तथ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन अस म्हणता येईल.

पाऊस पडून शेकडो वर्षे बीज रुजत असेल, फांद्या एकमेकांवर घासून हजारो वर्षे आग लागत असेल, शेकडो मृतदेह कुजत असतील, एखाद्या विशिष्ट झाडाची फळं खाऊन आजार बरा होत असेल आणि त्याच झाडाच्या पायथ्याशी उगवलेलं भुछत्र खाऊन विषबाधा अनेक वर्षे होत असेल. पण ज्या क्षणी प्रागैतिहासिक मानवाच्या मनात हे का आणि कसं? असे प्रश्न निर्माण झाले त्याक्षणी माणसाच्या आयुष्यात विज्ञानाचा जन्म झाला असं मानायला हरकत नाही.

तिथपासून ते आज माईंड क्लोन बनवण्याच्या प्रवासापर्यंत आपली मजल गेली असली तरी सायंटिफिक टेम्पर आपल्यात खरोखरच रुजलंय का ,याच उत्तर देणं अवघड आहे. आपल्या दृष्टीने विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळा आणि जीव, भौतिक, रसायन ही तीन शास्त्र आणि त्यांची उपशास्त्र. पण शास्त्र या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला तर, मोजणी, संरचना, अवकाश,आणि बदल यावर आधारित गणित ही शाखा निर्विवादपणे ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ हे दाखवण्याच एक शास्त्र आहे हे आपण विसरतो. अनुमानांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करून विश्लेषण करणारं तर्कशास्त्र आपल्या गावीही नसतं. इतकंच काय समाजाच्या सुव्यवस्थेसाठी निर्मिलेली अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र ही देखील शास्त्रच.

यातली सामाजिक शास्त्र ही अपूर्ण लिविंग सायन्सेस समजली जातात कारण त्यात स्थळ, काल, परिस्थिती, घटना यानुसार 100% वस्तुनिष्ठता येणं अशक्य असतं.त्यात थोडीफार व्यक्तिनिष्ठता येतेच. पण वरील इतर शास्त्र मात्र प्रयोग, निरीक्षण, अनुमान या कसोट्यांवर कुणालाही कुठेही सिद्ध करता येतील अशी आहेत.

स्वतःच्या विचारातील त्रुटी व व्यक्तिनिष्ठतेनुसार झुकणारा कल ओळखायला देखील वैज्ञानिक दृष्टीकोनच लागतो .कारण मेंदूतील सगळ्यात मोठा भाग सेरेब्रम हा स्पर्श, दृष्टी, श्रवण = अनुभव व भावना यासोबतच संभाषण, तर्कबुद्धि व शिकण्याची प्रक्रिया=आकलन यासाठीही जबाबदार असतो. म्हणजेच एकच भाग सायंटिफिक टेम्परसाठी लागणाऱ्या तर्कबुद्धि साठी आणि त्याच वेळी अतार्किक ,अविचारी वागण्याला कारणीभूत ठरणाऱ्या भावना या घटकासाठी सारखाच जबाबदार असतो.आणि यामुळेच वैज्ञानिक दृष्टीकोन व तो तयार व्हावा असं वातावरण असणं अत्यंत गरजेचं आहे.

दोन गट असतात : आपण पहिल्यापासून प्रगतच आहोत म्हणून वसकन अंगावर येणारे
नाहीतर क्वांटम फिजिक्स, molecular डिझाईन , जेनेटिक्स असे शब्द तोंडावर फेकून आपणच विज्ञानवादी असण्याचा दावा करणारे

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आत्मा असलेला बुद्धिप्रामाण्यवाद आपण अव्हेरतो. लोकायत आणि चार्वाकची परंपरा असणाऱ्या देशाला बुद्धिप्रामाण्यवादाचं इतकं वावडं का? याचा विचार करायला हवा. आपल्याकडे विज्ञान शिकणारी व्यक्ती ही वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून असेलच आणि विज्ञान या विषयाशी संबंध नसणाऱ्याचा त्याच्याशी दुरान्वयेही संबंध नसावा असे काही गैरसमज प्रचलित आहेत.

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा न्यूटन ‘ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी समजून घेण्यास फक्त आपणच (मानव) समर्थ आहोत’ असं म्हटल्याने त्याची प्रतिभा, संशोधन व अभ्यास झाकोळते का? अजिबातच नाही. म्हणूनच आपलं यान मंगळावर जाण्याच्या आदल्या दिवशी राधाकृष्णन तिरुपतीला त्याची प्रतिकृती वाहून ‘not to leave anything to chance’ असं म्हणतात तेव्हा मोहीम यशस्वी झाली ती बालाजीमुळे नव्हे तर शास्त्रज्ञांच्या perception व perspiration मुळे याचं भान आपण बाळगलं पाहिजे आणि राधाकृष्णन यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांच्या कृतीला वैयक्तिक श्रद्धा म्हणून त्यांच्यातील शास्त्रज्ञातून वेगळं काढता आलं पाहिजे.

वरील गैरसमज खरे ठरता, ,भारताच्या औद्योगिक जगताची पायाभरणी करणारा एक उद्योजक आणि हिंदुराष्ट्र व अध्यात्म यांची महती जगाला सांगायला चाललेला भगव्या कपड्यातील एक संन्यासी यांच्यात 1893 साली जपानहून कॅनडाकडे जाणाऱ्या जहाजावर जी चर्चा झाली त्याने भारावून जाऊन 1930 आणि 1940 साली दोन जगविख्यात संस्था उभारण्याचं उद्योगपतींना काही प्रयोजनच नव्हतं! त्या दोन महान व्यक्ती होत्या: स्वामी विवेकानंद व जमशेदजी टाटा. आणि विज्ञानाची ही नवलतीर्थे आजही भारताची मान उंचावत आहेत: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च! त्यामुळे जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं हे छापील ,टाळीबाज वाक्य बाजूला ठेवलं तर उत्तम. विज्ञान व अध्यात्म हातात हात घालून चालल्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

दुसरं उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. प्रगतिशील हिंदुराष्ट्र या कल्पनेला आयुष्य वाहून घेतलेले सावरकर म्हणतात : “बुद्धिवादी, विज्ञानवादी सुधारकांनी सर्व प्रकारचा धार्मिक भाबडेपणा, लुच्चेगिरी मग ती वैदिक असो, बायबलीय असो की कुराणीय तिच्या कचाट्यातून मानवी बुद्धी मुक्त करणं हेच पवित्र धर्मकार्य समजावं’

आपल्या श्रद्धांची बेटं ही वादळात सापडलेल्या जहाजाला तात्पुरता आधार देणारी असली तरी जहाजाचा तो मुक्काम नसतो हे लक्षात घेऊन योग्य वेळी ते बेट सोडता यायला हवं आणि श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी या भंपक वाक्याचं श्राद्ध घालता यायला हवं. जिथे श्रद्धा असते तिथे प्रश्न नसतात. त्याअर्थी श्रद्धा डोळस असू शकत नाही. हे काही वेळेला आधार देणारं असलं तरी आपली जगण्याची पद्धत व प्रेरणा तेवढीच आहे का हे जरूर बघायला हवं.

त्यामुळे आपला धर्म, शिक्षण, धारणा, जडणघडण, पूर्वाश्रमीचे संस्कार हे सगळं एका बाजूला ठेवून आपण एखाद्या गोष्टीची who, what, when, where, why and in what way (how) अशी निर्मम तटस्थपणे चिकित्सा करतो तेव्हा आपण विज्ञानाचं बोट धरलंय असं समजायला हरकत नाही. त्यासाठी तुकाराम महाराजांच्या एका ओळीचं स्मरण देखील पुरेसं ठरावं ‘ सत्य असत्याशी मन केले ग्वाही, ना मानियले बहुमता.

आता दुसरी बाजू :
मानवी संस्कृती विकसित झाली ती विज्ञान तंत्रज्ञानाच्या बळावर यात वाद असूच शकत नाही. मात्र आज कल्पनातीत असं तंत्रज्ञान, मध्ययुगीन संस्थारचना आणि अश्मयुगीन भावभावना या परिस्थितीत आपण जगत आहोत. संस्कृतीचा जन्म, उदय आणि विकास कशाच्या जोरावर झालाय हे समजून घेतलं तर लक्षात येईल की त्यासाठी आवश्यक असणारं kin /group selection हे फक्त ज्ञान नव्हे तर भावभावना ,हेतू,गरजा, भाषा ,सुरक्षितता अशा अनेक गोष्टींच्या आधारावर झालं आहे. आणि त्यामुळेच विज्ञान तंत्रज्ञानाला कप्पेबंद असून चालणार नाही. ना ते विज्ञानाच्या सोयीचं आहे ना माणसाच्या. संस्कृतीच्या रसरशीत ,खळाळत्या ,जिवंत प्रवाहाच्या कडेकडेने जात मग त्यात सामील होणं हा पर्याय अधिक सोयीस्कर ठरावा. कारण ? डार्विनचे थेट निसर्गदत्त वारसदार असलेल्या एडवर्ड विल्यम यांच्या शब्दात सांगायचे तर :
परग्रहवासीयांना माणसाच्या तंत्रज्ञानाचं जराही कौतुक नसेल. ते तिथपर्यंत पोहोचलं त्या अर्थी ते प्रगतच असणार! मानवी संस्कृतीचं मूल्यमापन करायचं झाल्यास ते विज्ञान तंत्रज्ञानाने नव्हे तर सुसंस्कृतपणाच्या मोजमापाने करावं लागेल. त्यासाठी कला, संगीत, तत्वज्ञान, धर्म , अशा मानव्यविद्याचा आधार घ्यावा लागेल. या विद्या म्हणजे समाजाचं , त्यांच्या भावभावना ,मानसशास्त्र यांचं प्रतिबिंब.

यामुळेच ज्ञानसूर्य तेजाने तळपताना हा प्रवाह आटणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे.
विज्ञानासोबत विवेक हवा हे वाक्यही असंच काहीसं फसवं. विज्ञान म्हणजे सत्य , विज्ञान म्हणजे अपूर्णत्व मान्य करण्याचा प्रामाणिकपणा, विज्ञान म्हणजे दुसऱ्याने आपलं म्हणणं सप्रमाण सिद्ध केलं तर त्याला त्याचं श्रेय देण्याचा मोठेपणा, विज्ञान म्हणजे हट्ट सोडता येणं ,ऐकून घेता येणं ,नव्या पद्धतीने विचार करता येणं ,आपल्या आकलनात सुधारणा करणं
विवेक यापेक्षा वेगळा नसतो.

विज्ञान दिनाच्या दिवशी फक्त शास्त्रज्ञांचे फोटो पुढे पाठवत बसण्या ऐवजी आणि विज्ञान शाप की वरदान अशा उथळ चर्चाना प्रोत्साहन देण्याऐवजी संविधानात ‘आपली मूलभूत कर्तव्य’ या विभागात नमूद केलेलं ‘ To develop the scientific temper ,humanism ,spirit of enquiry and reform ‘म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं तरी पुष्कळ,नाही का?

गौरी साळवेकर

सूचना : या लेखात काही तपशिलातल्या चुका दिसतात, पण लेखिकेने मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.

नैसर्गिक आणि कृत्रिम बुद्धीमत्ता

हा लेख आधी ‘कृत्रिम बुद्धीमत्ता आणि आपले भवितव्य’ या नावाने सादर केला होता. बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ती किती प्रकारची असते याची माहिती देणारा एक लेख यात समाविष्ट केला आहे. त्यात दिलेल्या आठ प्रकारांपैकी किती प्रकारच्या बुद्धिमत्ता कृत्रिमरीत्या विकसित करता येणार आहेत याचाही विचार करायला हवा. २२-०३-२०२२

आजकाल कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयावर बरीच चर्चा सुरू आहे. ही गोष्ट आता फक्त शक्यतेच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात उतरायला लागली आहे. हिची अमर्याद वाढ होऊन त्यातून मानवजातीचा संहार होईल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. ती यायच्या आधी आज उपलब्ध असलेल्या आधुनिक साधनांमुळेही माणसाच्या मेंदूवर आघात होत आहेत. या अंकीय प्रणालीवरील वाढते परावलंबित्व आपले माणूसपण हरवत आहे. हा काय प्रकार आहे आणि किती गांभिर्याने घेतला पाहिजे यावर माझे मित्र आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मश्री शरद पांडुरंग काळे यांचा एक वाचनीय लेख त्यांचे आभार मानून खाली देत आहे.

१. होमो डिजीटॅलीस

शरद पांडुरंग काळे
निवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र

आपला मेंदू हा एक प्रकारचा अतिशक्तीशाली असा संगणकच आहे. लॅपटॉप, टॅबलेट, डेस्क संगणक असे संगणकाचे जसे वेगवेगळे प्रकार आहेत, तसाच मेंदूदेखील एक संगणक आहे, पण तो नैसर्गिक आहे. त्याला कार्यरत ठेवण्यासाठी जी ऊर्जा द्यावी लागते, ती बाहेरून विद्युत प्रभाराच्या स्वरूपात द्यावी लागत नाही, तर ती अन्नातून मिळते, हा या कृत्रिम आणि नैसर्गिक संगणकांमधील मोठा फरक आहे. संगणकाचा प्रभार संपला की त्याला विद्युतजोडणी करून प्रभार पुरवावा लागतो. हा प्रभार संपल्याचा प्रकार सहसा घडत नसला तरी, तो कमी झाला तर मेंदूच्या बाबतीतही प्रभार द्यावा लागतोच! जर पोटात कावळे ओरडायला लागले, तर आपला संगणक बंद पडत नाही, पण चिडचिडा मात्र होतो. पोट भरलेले असले की तो नीट काम करू शकतो. कृत्रिम संगणकातील प्रणाली काही ठरावीक काळानंतर जुनी होते. बाजारात नवीन येणाऱ्या विविध ऍप्सच्या स्वरूपातील आज्ञावल्यांशी जमवून घेणे तिला जमेलच असे नसते! त्यामुळे आज्ञावल्यांच्या नवीन पिढीशी समतोल साधण्यासाठी ही संगणकाची मूळ प्रणाली बदलावी लागते. त्यामुळे कदाचित त्याला सामावून घेणारे हार्डवेअर किंवा प्रत्यक्ष काम करणारे भाग बदलावे लागतात. काही वर्षांनी कोणताही तांत्रिक बिघाड न होता देखील संगणक बदलावा लागतो, कारण त्याच्या जुन्या चालक प्रणालीस नव्या ऍप्सना चालविण्याइतका वेग तरी नसतो, किंवा स्मृतिमंजुषा तरी नसते. मेंदूच्या बाबतीत असे काही शक्य नसते! जन्मतः त्याला जी प्रणाली मिळालीली असते, तिला पर्याय नसतो. जी स्मृतिमंजुषा आपल्याला एकदा मिळालेली असते, ती टिकवून ठेवावी लागते.

शिक्षणाने आणि अनुभवाने आपल्या या नैसर्गिक संगणक चालकप्रणालीचा वेग, एका ठरावीक मर्यादेपर्यंत वाढविता येतो. आयुष्यभर त्या प्रणालीच्या साथीनेच आपल्याला जगावे लागते. त्याचे वायरिंगही बदलता येत नाही किंवा हार्डवेअर देखील बदलता येत नाही! जगात बदल तर रोज होत असतात. या नव्या बदलांशी सामावून घेत असतांना किंवा त्यांच्याशी समतोल साधण्यासाठी, प्रणालीत जी कमालीची लवचिकता असावी लागते, ती निसर्गाने कोणत्या स्वरूपात आपल्याला दिली आहे, हे सांगता येत नसले तरी, ती दिली आहे हे मात्र नक्की सांगता येते. त्यामुळे बैलगाडीत बसलेला माणूस सहजपणे विमानात बसू शकतो. कदाचित थोडे आश्चर्य त्याला नक्की वाटेल, थोडी भीतीदेखील वाटेल, पण विमान प्रवासाशी तो जमवून घेतोच. आयुष्यभर जमिनीवर बसून स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीच्या हातची चव आधुनिक स्वयंपाकघरात अजिबात बदलत नाही. म्हणजे हार्डवेअर बदलले म्हणून प्रॉडक्टमध्ये फरक पडत नाही! त्याचे कारण आपल्या मेंदूचा संगणक लवचिक आणि अतिशक्तीशाली प्रणालीचा आहे हेच असते! संगणक क्षेत्रातील प्रगतीचा वेग आश्चर्यकारक तर आहेच, पण ज्या तऱ्हेने कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) इथे धुमाकूळ घालत आहे, तो पाहता संवेदनशील मनामध्ये काही विचारतरंग उमटत आहेत. मेंदूला हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा पर्याय निर्माण करीत असतांना, आणि अंकीय प्रणालीवरील भर देतांना, आपण आपल्या मेंदूच्या आज्ञावलीचे पुनरप्रणाली लेखन तर करीत नाही ना? आपल्या मेंदूला आपण असंवेदनशील तर बनवत नाही ना? त्याच्या भावना बोथट होत आहेत का? आपल्या मानवी इतिहासात हजारो वर्षांपासून जी भावना मूल्ये जपली गेली आहेत, त्यांना तडे तर जात नाहीत ना? आपल्या जीवनातील नेमकी ध्येये गाठत असतांना, जीवनात मिळणारे समाधान किंवा आनंद आपण हरवून तर बसणार नाही ना? वैयक्तिक महत्वाकांक्षा नाती विसरायला लावीत आहेत का?

नील स्टीफनसन ह्यांच्या स्नो क्रॅश नावाच्या विज्ञानकथेत अशी कल्पना केली आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावाखाली, माणूस चेतासंस्थेतील जैवरसायनशास्त्रात अधोगतीच्या गर्तेत चालला आहे. ह्यातून मानवतेला वाचविण्यासाठी कथेचा नायक हिरो यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली जाते. हा जो हिरो असतो तो कोणत्याही सॉफ्टवेअर प्रणालीचा भेद करण्यात कुशल असतो. हिरोचे पहिले काम म्हणजे जगभरातील माणसांच्या मनाचा वेध घेणाऱ्या स्नो क्रॅश नावाच्या विषाणूंचा बंदोबस्त करणे हेच असते. ह्या विषाणूंच्या प्रभावामुळे माणसांचे रूपांतर हे एक प्रकारच्या जैविक यंत्रात होते. या यंत्राला सद्सद्विवेकबुद्धी, स्वतःची उर्मी, सृजनशीलता किंवा व्यक्तिमत्त्व असे काहीच नसते! मेंदूच्या मुळाशी एकदा का त्याचे रोपण झाले की, हा विषाणू आपल्या हातपायांचे नियंत्रण करणाऱ्या बाह्यपटलाखाली असलेल्या प्रणालीचा ताबा घेतो. त्यामुळे प्रतिक्षिप्त क्रियांवरचे नियंत्रण नाहीसे होते, व माणसाचे रूपांतर चलप्रेतात होते! या चलप्रेताची विचारशक्ती संपलेली असते आणि त्याचा नैसर्गिक सावधपणा पूर्णतः लयाला गेलेला असतो. आता प्रश्न असा आहे की, माणसाची सध्याची स्थिती ह्या चलप्रेतांसारखी होत आहे का? अंकीय तर्कशास्त्रावर आधारित लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट इत्यादी भ्रामक वास्तवतेच्या प्रभावामुळे, आपण मानव म्हणून जे अतिशय उत्कृष्ट अशा भावना अनुभवतो, त्या परस्पर संवाद, सौन्दर्याचा आस्वाद घेण्याची प्रवृत्ती, सहानुभूती, संवेदनशीलता, सर्जनशीलता, आंतरिक उर्मी आणि प्रेम यांना कायमचे मुकण्याची शक्यता कितपत आहे? न संपणाऱ्या अंकीय प्रणालीच्या राजमार्गावर धावत असतांना आणि अधिकाधिक स्वयंचलित गोष्टींचा ध्यास घेत असतांना, ज्ञानाचे आकलन होण्याची मानवी क्षमता कमी तर होणार नाही ना?

एलन ट्युरिंग ह्यांना आधुनिक संगणक प्रणालीचा जनक असे संबोधले जाते. सन १९३० मध्ये त्यांच्या मते प्राण्यांचा मेंदूला किंवा माणसाची मध्यवर्ती चेतासंस्थेला अंकीय संगणक म्हणून संबोधता येईल. या विषयावर त्या काळात बराच वादविवाद आणि चर्चा झाली होती. जे कृत्रिम बुद्धिमत्तेचे संशोधक आहेत, त्यांच्यामते अंकीय प्रणालीवर आधारित यंत्रांना माणसासारखी बुद्धिमत्ता मिळू शकेल. त्यांना एलन ट्युरिंग यांचे म्हणणे स्वीकारार्ह आहे. काही चेतातज्ञांच्या (नयूरोलॉजिस्ट) मते त्यात तथ्यदेखील आहे. त्यांना असेही वाटते की माणसाच्या मेंदूची अंकीय प्रणालीत हुबेहूब प्रतिकृती बनवीता येऊ शकेल. बरेचसे चेतातज्ञ, तत्वज्ञ आणि भौतिकी शास्त्रज्ञ मात्र या मताशी अजिबात सहमत होत नाहीत. काही जण तर ह्या विचाराला दिवास्वप्न असेही म्हणतात! काहीजण त्याला गूढ विश्वास समजतात! मानवी मेंदूमध्ये समस्या सोडविण्यासाठी जी पद्धती वापरली जाते, ती ट्युरिंगच्या संगणकाशी मिळतेजुळती आहे ह्या कल्पनेला छेद देणारा एक विचार रोनाल्ड सिक्युरेल आणि मिग्वेल निकोलेलीस यांनी मांडला आहे. त्यांच्या मते मानवी मेंदूमध्ये एक अतिशय वेगळ्या धर्तीची संगणकीय प्रणाली असते. अंकीय प्रणालीपेक्षा ही सर्वस्वी भिन्न असते. हिला त्यांनी ऑरगॅनिक कॉम्प्युटर किंवा सेंद्रिय संगणक असे संबोधले आहे. ह्यात अंकीय आणि अनलॉग प्रणालींचे आवर्ती मिश्रण असते. मेंदूकडे येणारे संदेश आणि माहिती नानाविध पद्धतींनी येत असते. त्या सर्व input किंवा येणाऱ्या सांकेतिक, दृश्य, श्राव्य आणि भावार्थ सिग्नलचे विश्लेषण करून, त्यावर योग्य तो output देणे आणि त्यांची नेमकी तामिली कशी होती ते पाहाणे, हे कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम संगणकीय प्रणालीत बसत नाही. संगणकाची असेंब्ली भाषा आणि input सिग्नल्सचा ताळमेळ असतो, आणि दिलेल्या संगणकासाठी तो बदलत नाही. मेंदूत अशा अनेक असेंब्ली भाषा आणि input भाषा असतात. याचे outputsदेखील अनेक पद्धतींनी व्यक्त होत असतात. मेंदूचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यातील सीमारेषा आपल्याला ओळखता येत नाहीत. त्यांच्या इंटरफेसेस याही सेंद्रिय स्वरूपाच्या असतात. त्यातूनच ह्या सेंद्रिय संगणकाचे कार्य चालत असते. ह्या सेंद्रिय संगणकातून वेगवेगळ्या पातळ्यांवर शरीराचे नियंत्रण केले जाते.आंतरपेशीय प्रथिन संयुगे हे या सेंद्रिय संगणकाचे दृश्य संदेशवाहक असतात.त्यांच्या मार्फत पेशींचे प्रजनन, वाढ, कार्य आणि नाश होत असतो. त्यातूनच आपण शिकतो, शिकवितो, गातो, गाणे ऐकत असतो, कलांचा आस्वाद घेत असतो, निराशेने त्रासून जातो, आनंदाने बेहोष होतो, सार काही या सेंद्रिय संगणकाचा प्रताप असतो.

या सेंद्रिय संगणकाचे आज्ञालेखन किंवा प्रोग्रॅमिंग नक्की कसे होते, कधी होते, त्यातील बग्ज किंवा दोष दूर कसे होतात ही कोडी अजून पूर्ण उलगडलेली नाहीत. त्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की, सेंद्रिय संगणकांना ट्युरिंग संगणकासारखे हाताळता येत नसले तरी, अनेक विविध जैविक प्रक्रियांद्वारे त्यांना आज्ञांकीत केले जाऊ शकते. अगदी मूलभूत स्तरावर, ज्याला या सेंद्रिय संगणकाची असेंब्ली भाषा म्हणता येईल, त्या मानवी आनुवंशिक नकाशातील असंख्य जनुकांमार्फत अभिव्यक्त होत, उत्क्रांतीमध्ये निवड होत होत विकसीत होत गेलेल्या आज्ञावल्या ह्या शरीराच्या जडणघडणीत वास्तुविशारद म्हणून कार्य करतात. प्रसवपूर्व काळात म्हणजे मूल गर्भावस्थेत असतांना आणि जन्मल्यानंतर मेंदूची त्रिमिती रचना पूर्ण करण्यात ह्या आज्ञावल्यांचा मोलाचा वाटा असतो. सुमारे एक लाख वर्षांपूर्वी जे मानवी चेताजाळे (न्यूरल नेटवर्क) विकसित झाले होते त्याचे हे प्रतिबिंब आहे, म्हणजे निसर्गात हा वास्तुविशारद तेंव्हापासून कार्यरत आहे. त्यामानाने मानवाने निर्माण केलेला संगणक अवघ्या शंभर वर्षांचा आहे! एकदा मूल जन्माला आले की, आपल्या कौटुंबिक, सामाजिक आणि भौतिक पर्यावरणाशी संवाद साधण्यासाठी हे चेताजाळे सक्षम असते. अर्थात आज्ञावल्यांचे लेखन, पुनर्लेखन, सुधारित आवृत्त्या हा निसर्गक्रम त्यात अव्याहतपणे चालूच आहे. मानवी संस्कृतीचे विविध कंगोरे आणि सामाजिक परस्पर संवाद यांच्या आंतरक्रियांमुळे मध्यवर्ती चेतासंस्था अधिक प्रगल्भ आणि अधिक कार्यशील होत राहाते. एखाद्या कलाकाराला आपली कला रसिकांसमोर सादर करतांना, आपले आजचे प्रदर्शन कालच्या किंवा आधीच्या प्रदर्शनापेक्षा सुंदर व्हावे अशीच इच्छा असते. शिवाय या कलेत निष्णात होऊन सर्वोत्कृष्ट प्रदर्शन कसे करता येईल यासाठी त्याची धडपड सुरू असते. ह्या सर्व भावना मेंदूमध्येच निर्माण होत असतात. त्यासाठी आज्ञावल्यांमध्ये जे फाईन ट्युनिंग किंवा तरल संतुलन असावे लागते, ते बदल नकळतपणे होत राहातात. सामाजिक मेंदू हा जो प्रकार असतो, तो म्हणजे एखाद्या प्रजातीच्या एकत्रित विचारशक्तीचा प्रभाव दर्शवतो.

होमो सेपियन्स म्हणजे आधुनिक मानवाच्या बाबतीत बोलायचे झाले तर उत्क्रांतीदरम्यान त्याच्या निओकॉर्टिकल म्हणजे दृक्श्राव्य संवेदनांशी संबंधित पेशीसमूहात खूपच वाढ झालेली आढळून येते. दैनंदिन जीवनात अनुभवास येणाऱ्या विविध सामाजिक जटिल प्रश्नांशी ही वाढ संबंधित आहे. जर समाजात तणाव असेल, मग तो धार्मिक असो, राजकीय असो वा तीव्र स्पर्धेमुळे असो, त्याला सामोरे जाण्यासाठी सातत्याने मानवाला प्रयत्न करावे लागतात. संघर्ष हा जीवनाचा मूलमंत्र असतो. बहुतांशी जनतेत आपल्या वयाची पन्नाशी किंवा साठी गाठेपर्यंत हा संघर्ष असतोच. काहींच्या वाट्याला तो उतारवयात देखील नशिबी असतो. अर्थात संघर्षमय जीवनातून यशाच्या शिखराकडे जाणारे अनेक असतात. अशा संघर्षमय यात्रा मानवाच्या जनुकीय नकाशात दूरगामी परिणाम घडवून आणू शकतात. मानवी समाजात आपण परस्परसंवाद साधण्याची क्षमता खूप वाढविली आहे. त्या मानाने चिंपॅंझी (पॅन ट्रोग्लोडाईट) आणि बबुन (पॅपीओ पॅपीओ किंवा पॅपीओ अनुबिस) यांच्यामध्ये सामाजिक संवादाची मर्यादा फारशी वाढली नाही. त्याच प्रमाणात त्यांच्या दृक्श्राव्य संवेदनांशी संबंधित पेशीसमूहात फारशी वाढ झालेली आढळून येत नाही.

आपल्या मेंदूला आज्ञावल्या लिहिण्याचे किंवा पुनर्लेखनाचे अजूनही मार्ग आहेत. मेंदू आणि यंत्र यांच्या इंटरफेस वर झालेल्या गेल्या शतकातील मुलभूत आणि नैदानीक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, मानवी मेंदू कृत्रिम साधनांचा वापर करून या आज्ञावल्यांमध्ये बदल घडवू शकतो. रोबोटीक किंवा यंत्रमानव हा त्याचाच नमुना आहे. शरीरात कृत्रिम हातपाय सामावून घेण्यासाठी मेंदू त्याच्या आज्ञावल्यांमध्ये बदल घडवू शकतो. म्हणजेच कृत्रिम साधनांच्या वापरासाठी न्यूरल नेटवर्क किंवा चेताजाळे स्वतःला अभिमुख करून घेऊ शकते. ह्या निष्कर्षांचा गर्भितार्थ असा आहे की, आपल्या स्वतःच्या भावना ह्या बाह्य घटकांचा समावेश करण्यासाठी सहजपणे पुनर्लिखीत होऊ शकतात! गंभीर स्वरूपाच्या अर्धांगवायूने गलितगात्र झालेल्या रुग्णांमध्ये कृत्रिम अवयवांच्या रोपणास प्रतिसाद देणाऱ्या आत्मसंवेदना, मेंदू आणि यंत्र यांच्या इंटरफेसवर नोंदल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच कॉर्टिकल किंवा सबकॉर्टिकल बदलांमुळे घडून येणाऱ्या कायम स्वरूपी आज्ञावलींचे पुनर्लेखन आंशिक स्वरूपात का होईना, पण अशा रुग्णांना वरदान ठरू शकतात.

म्हणजे आपण पुन्हा एकदा त्याच मुद्यावर येतो. मेंदूचे रूपांतर आपण फक्त अंकीय संगणकात करू शकलो नाही तरी, ही प्रणाली वापरणाऱ्या उपकरणांच्या वाढत्या संख्येमुळे आणि वाढत्या अवलंबत्वामुळे मानवी मेंदू बदलेल का? तो अंकीय प्रणालीच्या आहारी जाईल का? तसे झाले तर मानवी मेंदूची जी भावनिक जडणघडण आहे, त्यात मोठाच बदल घडू शकतो. त्यामुळे मानवाचे रूपांतर एका जैविक यंत्रात होऊ शकते! अंकीय प्रणालीची मानवी जीवनात होणारी ही ढवळाढवळ चांगली मानावी की भविष्यातील धोक्याची नांदी? मानवी वर्तन आणि मानवी कौशल्य या दोन्ही महत्वाच्या गोष्टींचे अवमूल्यन होऊन माणूस शक्तिशाली बनला तरी मानवतेचा पराभव यामध्ये आहे का, ह्यावर गंभीर पणे विचारविनिमय होणे अपेक्षित आहे. अंकीय प्रणालीच्या सातत्याने संपर्कात राहिल्यामुळे वैमानिकांच्या उड्डाणकौशल्यापासून रेडिओलॉजिस्टच्या नमुना ओळखण्याच्या कौशल्यापर्यंत, मानवी कार्यक्षमतेवर खोलवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यावरून आपण गृहीतक मांडू शकतो की, वैमानिकांच्या बाबतीत आधुनिक विमानांच्या अंकीय प्रणालींमुळे, रेडिओलॉजिस्टच्या बाबतीत अंकीय प्रतिमा विश्लेषणात्मक प्रणालीमुळे, त्यांच्या सर्जनशीलता, आंतरिक उर्मी आणि समस्या उकल करण्याची क्षमता नक्कीच कमी होऊ शकतात. जेंव्हा एखादा विषय समजावून घेतांना, त्याच्याशी संबंधित महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे असतात. ऑनलाइन हे मुद्दे कधीही मिळतील अशी खात्री असते, तेंव्हा ते मुद्दे लक्षात न राहण्याची किंवा त्यासाठी मेहेनत न घेण्याकडे लोकांचा कल असेल, हे साधे तर्कशास्त्र आहे! कित्येक वर्षे आपण दूरध्वनी क्रमांक सहजपणे लक्षात ठेवीत होतो. आपल्या बँकेशी संबंधित खाते क्रमांक सहसा विसरला जात नसे. आपली स्मृती मंजुषा उत्तम प्रकारे कार्य करीत होती. पण गेल्या दशकात आपली भिस्त आता हातातील भ्रमणध्वनीवर अधिक आहे. जर फोन हरवला तर आपल्या स्मृतींची पाटी कोरी झाल्यासारखे वाटते. इतरांचा सोडा, स्वतःचा तरी भ्रमणध्वनी क्रमांक आठवेल की नाही याचीचशंका येते. स्मार्टफोन तर आता एव्हढे स्मार्ट झाले आहेत की, फोन हरवला, तर नवीन सिम टाकले की नव्या फोन मध्ये सर्व माहिती जशीच्या तशी उमटते! म्हणजे कुठे काही लिहून ठेवण्याची सुद्धा गरज राहात नाही. थोडक्यात तुम्हाला अधिकाधिक परावलंबी करण्याचा जणू या स्मार्टफोन आणि संबंधित प्रणालींनी विडाच उचलला आहे. माहिती विश्वसनीय पद्धतीने मेंदूत साठविली जाण्याची आपली क्षमता कमी होत जाणार आहे.

फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप यासारख्या संगणकीय किंवा अंकीय सामाजिक माध्यमांच्या प्राबल्यामुळे, आपल्या नैसर्गिक आणि सामाजिक वर्तनावर बराच अनिष्ट परिणाम होत चाललेला आहे. शेरी टर्केल नावाच्या लेखिकेने या विषयावर “Alone together” अशी एक वास्तवावर आधारित कादंबरी लिहिली आहे. त्यात मानव आता तंत्रज्ञानाकडून अधिक अपेक्षा करतो आणि एकमेकांपासून दूर जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. संदेश पाठविणे, आलेले संदेश फॉरवर्ड करीत राहाणे आणि निरर्थक किंवा दुरान्वयेदेखील संबंधित नसलेल्या गोष्टींवर मत व्यक्त करीत फक्त असंतोष वाढवीत राहणाऱ्या नवीन पिढीतील काही किशोर वयीन मुलांच्या मुलाखती तिने त्यासाठी घेतल्या होत्या. या भ्रामक वास्तवतेच्या माध्यमांचे व्यसन हे माणसाला निराशेच्या गर्तेत ढकलण्याची शक्यता वाढत चालली आहे. मानवी सहानुभूतीचा अभाव आणि परस्पर संवाद कमी होत जाणे, एकटेपणात अजून नैराश्य येणे ह्या सर्व गोष्टी या मुलाखती दरम्यान लेखिकेला तीव्रतेने जाणवल्या होत्या. या मुलाखती वाचल्यावर आणि बऱ्याच गोष्टींचा स्वतः अनुभव घेतल्यानंतर ही सारखी “कनेक्टेड” राहण्याची जी प्रवृत्ती अतिशय वेगाने पसरत आहे, त्यामुळे ज्यांच्याशी आपण जवळून संपर्क साधू शकतो, अशा लोकांची संख्या लॉगॅरिथमिक प्रमाणात वाढत आहेत. फेसबुकवर किती मित्र जोडले गेले यावरून तुमची लोकप्रियता ठरते! म्हणजे आपल्या दृक्श्राव्य क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक मोठ्या संख्येने आपण लोकांच्या संपर्कात येतो! पण त्याचा खरोखरीच काही उपयोग आहे का? त्या मोठ्या मित्रमंडळातील किती लोक खरेच तुमचे हितचिंतक किंवा खरे मित्र आहेत? तुम्ही स्वतः लिहिलेल्या पोस्ट या माध्यमांमध्ये महत्वाच्या नसतात, तर तुम्ही किती पोस्ट शेअर केल्या, त्यावर तुमची कार्यप्रवणता ठरत असते! शेवटचा महत्वाचा प्रश्न, तुमच्या प्रगतीत (की अधोगतीत?) या सामाजिक माध्यमांचा किती सहभाग आहे? दिवसाच्या शेवटी मानसिक तणाव वाढविणाऱ्या या गोष्टींपासून चार हात दूर राहून, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे महत्वाचे आहे, हेच खरे आहे.

या अंकीय प्रणालीवरील वाढते परावलंबित्व आपले माणूसपण हरवत आहे. होमो सेपियन्स या आपल्या शास्त्रीय नावात बदल करून ते होमो डिजिटॅलीस असे करावे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ही गंभीर परिस्थिती आहे का? ह्याकडे लक्ष द्यायला हवे का? मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम तर आहेतच, पण या अंकीय प्रणालीचे वाढते प्रस्थ असे काही सामाजिक तणाव निर्माण करतील, की त्यांचा दूरगामी परिणाम मानवाच्या भविष्यावर अनिष्ट परिणाम करू शकेल. या लक्षवेधक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे हेही खरे आहे.

. . . . . . . . . .

या लेखावर आलेले काही प्रतिसाद खाली दिले आहेत.

नरेंद्र गोळे
माहिती विश्वसनीय पद्धतीने मेंदूत साठविली जाण्याची आपली क्षमता कमी होत जाणार आहे. .>>> हे खरे आहे. कारण वैधता पडताळणीचे दर टप्प्यावरील निकष ’विसरत’ राहिल्याने, अवचित आलेले पडताळणीचे काम करणेच अशक्यप्राय होऊन, मिळालेल्या माहितीची विश्वसनीयता संशयास्पदच रहाणार आहे.

Shriram Paranjape
विचार करायला लावणारा लेख. बहुतेक whatsapp groups चा forwarded messages हा प्राण असतो. याचाच सरळ अर्थ असा की कुठल्या तरी संघटित टोळ्या आपल्या विचारांना एक ( बहुधा अनिष्ट) वळण देण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांचा कब्जा घेण्याच्या प्रयत्नात असतात.

Rajesh Pishte-Deshmukh
खूपच सुंदर लेख. या सगळ्या ज्ञान अन माहितीच्या जंजाळात मानव कमालीचा विसरभोळा होऊन एकटेपणाचा साथीदार बनेल का सर असा मला प्रश्न पडलायं.

Sangeeta Godbole
सर ..डोळ्यांत अंजन घालणारा लेख . चुरचुरले तरी व्याधी बरा करणारा ..वस्तुस्थिती अशीच आहे .विचार तर करायलाच हवा .आणि सुस्थितीत बाहेरही पडता यायला हवे.

Anand Ghare
खूपच विस्तृत लेख, मलाही एका दमात पूर्ण वाचता आला नाही. संगणकांमुळे माणसाच्या काही कौशल्यांमध्ये घट होण्याची शक्यता आहे, उदाहरणार्थ पाठांतर, तोंडचे हिशोब वगैरे गोष्टी पुढील पिढी करतच नाही. मानवी भावना कशा निर्माण होतात आणि त्यांवर कसा किंवा कितपत ताबा ठेवता येतो हेच मुळात गूढ आहे. त्यांच्यावर कृत्रिम बुद्धीमत्तेचा जास्त परिणाम होऊ नये असे मला वाटते. संगणक आणि स्मार्ट फोन यांचा अती वापर होत असल्यामुळे माणसांच्या सवयीच बदलत आहेत ही गोष्ट निश्चितच चिंताजनक आहे. पण यांच्या विरोधात येणाऱ्या संदेशांचाही महापूर येत आहे.

उत्तर – Sharad Kale
Anand Ghare साठीच्या किंवा सत्तरीच्या पुढे आपण आहोत. नवीन पिढीत आणि आपल्यात ४० -५० वर्षांचे अंतर आहे. पाठांतरावर भर देणारा अभ्यास किंवा स्मृतींवर अवलंबून असलेले दैनंदिन जीवन बदलत चालले आहे यात शंका नाही. त्यामुळे लेखात व्यक्त केलेल्या काही विचारांवर विरोधी सूर किंवा नाराजीचा सूर उमटू शकतो. पण माझ्या दृष्टीने प्रश्न तो नाही. जेंव्हा आपण दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींसाठी किंवा आवश्यक गोष्टींसाठी तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांवर अवलंबून राहात असतांना, बुद्धीचा आणि शरीराचा वापर अपेक्षित नसेल तर त्यातून जो रिकामा वेळ उपलब्ध होणार आहे, त्याचे योग्य नियोजन आपण करू शकू का? व्यसनांच्या आहारी जाण्यासाठी हा वेळ वापरला तर जाणार नाही ना? काळाबरोबर चालत असतांनादेखील सृजनशीलता नवीच असते. त्यामुळे नवीन वाटा, नवे व्यवसाय, नवे छंद निर्माण होतीलच. प्रश्न तो नाही. प्रश्न आहे की, आपला समाज त्या दृष्टीने प्रगल्भतेच्या रस्त्यावर आहे की नाही हा! काळजी ती आहे. सोशल माध्यमांवर आपण किती वेळ घालवत आहोत, याचे मोजमाप होत असतेच. त्यावरून जर प्रत्येकाने विचार करून आपल्या जीवनाची दिशा योग्य आहे की नाही ते ठरवायचे आहे. लोकांनी पाठांतर करीत राहिले पाहिजे, असा अन्वयार्थ नसून ज्ञानमार्गावर आपण बुद्धीचा विकास न झाल्यामुळे दिशाहीन तर होणार नाही, हे पाहिले पाहिजे.

**************************************

२. बुद्धिमत्तेचे प्रकार

असे सांगतात की प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन याला तो ‘ढ’ आहे असे म्हणून शाळेतून काढून टाकले होते, आइन्स्टाइन याला त्याच्या कॉलेजातल्या कमी गुणांमुळे कुठे नोकरी मिळत नव्हती म्हणून त्याने कारकुनाची नोकरी धरली होती, रामानुजम याला मॅट्रिकची परीक्षा पास होणे अवघड झाले होते. हे सगळे अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी होते हे त्यांनी केलेल्या प्रचंड कार्यावरून जगाला दिसून आले. मला वॉट्सॅपवर मिळालेला या विषयावरील एक लेख खाली दिला आहे. अज्ञात मूळ लेखकाचे मनःपूर्वक आभार. दि. २२-०३-२०२२
. . . . .

प्रचलित शिक्षण व्यवस्थेमुळे कितीतरी लोक न्यूनगंडामध्ये गेले असतील. असे होऊ नये म्हणून आपल्या मुलांची ‘बुद्धिमत्ता’ ओळखा.

 "आमचं लेकरू हुशार आहे पण जरा अभ्यासात कमी आहे", अशा वाक्याला बरेच जण अजुनही हसतात.
  शाळेच्या अभ्यासात कमी आहे किंवा परीक्षेत फार मार्क्स मिळत नाहीत, तर ती व्यक्ती 'बुद्धीमान' नाही हा आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे.
 खरंतर गार्डनर (Howard Gardner) या मानसशास्त्रज्ञाने ही समजूत कशी ठार चूकीची आहे हे सांगितलंय.
त्याने बुद्धीमत्तेचे मुख्य आठ प्रकार पाडले. कुठल्याही व्यक्तीमध्ये या आठ प्रकारांपैकी एक किंवा अधिक बुद्धिमत्तांचं कमी-अधिक प्रमाण असतं, असं त्याचं त्याचं मत होतं.
1. Visual - Spatial Intelligence :- 
 या प्रकारामध्ये अचूक नकाशा बघणे, random भटकत असतानाही दिशांचा योग्य अंदाज येणे, फोटो-ग्राफ्स-तक्ते मधून अर्थ काढणे, कोडी सोडवणे, चित्र, patterns मध्ये गती असणं हे सगळं येतं. आर्किटेक्ट, इंजिनीयर, चित्रकार वगैरे यात येतात.
 1. Linguistic – Verbal Intelligence :-
  या प्रकारात भाषेवर प्रभुत्व, शब्दांवर पकड, भारी बोलता येणं किंवा मध्ये मध्ये शाब्दिक विनोद/कोट्या करता येणं हे सगळं येतं. यात शिक्षक, वकील, पत्रकार, काही राजकारणी वगैरे येतात.
 2. Logical – Mathematical Intelligence :-
  आपल्या शाळेत ज्या लोकांना “हुशार” समजतात, अशी मंडळी या प्रकारात येतात. गणित सोडवणं, abstract गोष्टींची लॉजिकल उत्तरं देणं हे सगळं येतं. वैज्ञानिक, गणितज्ज्ञ, इंजिनीयर, कॉम्प्युटर प्रोग्रामर वगैरे लोक यात येतात.
  1. Bodily – Kinesthetic Intelligence :-
   शरीराची वेगवान हालचाल करणं, शरीरावर प्रचंड कंट्रोल असणं, मेंदू आणि डोळ्यांत/इतर अवयवांत भन्नाट co-ordination असणं, हे सगळं या प्रकारात येतं. खेळाडू, डान्सर, शिल्पकार वगैरे लोक यात येतात.
  2. Musical Intelligence :-
   चाल, धून, ताल वगैरे लक्षात राहणं, वाद्यांबद्दल आवड असणं, लवकर नवीन गाणी किंवा विविध वाद्यं शिकता येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगीतिक बुद्धीमत्ता होय. गायक, संगीतकार, कंपोझर वगैरे मंडळी यात येतात.
  1. Interpersonal Intelligence :-
   लोकांशी संवाद साधता येणं, लोकांच्या भावना समजून घेता येणं, त्यानुसार स्वतःच्या वागण्यात बदल करून घेणं, मित्रमंडळी बनवता येणं, त्यांना जपणं, कुठे कसं वागावं हे समजणं, वाद सोडवणं हे सगळं यात येतं. मानसशास्त्रज्ञ, टीम लिडर, काऊन्सीलर, सेल्सपर्सन, राजकारणी माणसं वगैरे
  2. Intrapersonal Intelligence :-
   हे वरच्या प्रकारच्या उलट. हे स्वतःमध्ये हरवलेले असतात. यांना स्वतःच्या विश्वात दंग राहायला आवडतं. स्वतःचे strengths आणि weaknesses यांना माहिती असतात. नवनवीन कल्पना ते मांडतात (पण मोस्टली मनातल्या मनात ). विचारवंत, वैज्ञानिक, लेखक अशी माणसंं या प्रकारची बुद्धीमान असतात.
  3. Naturalistic Intelligence :-
   हा प्रकार त्याने जरा उशीरा मांडला. काही लोकांना निसर्ग आवडत असतो. पक्षी, जंगलं, समुद्र, डोंगर, जैवविविधता अशा सगळ्या गोष्टींचे ते चाहते असतात. शहरात फार मन लागत नाही, खेड्याकडे जाऊन मोकळ्या आभाळाखाली चांदण्यात झोपणं फार आवडत असतं. पर्यावरणतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी वगैरे सगळे लोक यात येतात. अशा प्रकारे आपली एक बुद्धीमत्ता ओळखली आणि त्यानुसार आपल्या जीवनाची दिशा ठरवली तर आनंदमय होईल सगळं भविष्य. एकापेक्षा जास्त बुद्धीमत्ता असल्यास उत्तमच, मग अशा वेळी भविष्याचा स्कोप अजुन मोठा होतो.
   आपल्या शालेय वयात ज्या बॅक बेंचर्सना आपण अभ्यासामुळे, कमी मार्क्स मुळे हलक्यात घेतो ते लोक कसले भारी खेळाडू, कलाकार असतात हे जरा आठवा. आपल्या एकूणच प्रचलित शिक्षणव्यवस्थेमुळे कितीतरी लोक depression, न्यूनगंडामध्ये गेले असतील हे सुद्धा आठवा.
   त्यामुळे इंटरनेट वर अलरेडी उपलब्ध असलेली ही माहिती सोप्या शब्दांत इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. वाचकांपैकी कोणाचा फायदा झाला तर मला आनंदच होईल

संक्षिप्त दासबोध

समर्थ रामदासांनी लिहिलेला दासबोध हा फक्त संन्यस्त वृत्तीने आध्यात्मिक विचार सांगणारा ग्रंथ नसून यात अनेक प्राचीन धार्मिक ग्रंथांमधील विचारांचे सार आहे. त्यांत भक्तिमार्ग आणि परमार्थ याचे विवेचन आहेच, त्याशिवाय सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनात मार्गदर्शन करेल, अगदी आजच्या युगात उपयुक्त वाटेल असेही खूप कांही यात आहे. पूर्वीच्या काळी घरोघरी दासबोधाची पोथी किंवा पुस्तक असायचे आणि अनेक लोक त्याचे नित्यनियमाने वाचन करीत असत. पुढच्या पिढीतल्या लोकांना कदाचित ते जड वाटेल म्हणून त्यांच्या सोयीसाठी डॉ.धनंजय घारे यांनी संक्षिप्त दासबोधाची रचना केली आहे. ही ओवीबद्ध रचना क्रमाक्रमाने या पानावर देत आहे. सर्वांनी तिचा लाभ घ्यावा अशी विनंति.

खाली दिलेल्या DOWNLOAD या खुणेवर क्लिक केल्यावर संक्षिप्त दासबोध वाचता येईल. वर जिथे 100% असे दाखवले आहे तिथे + या चिन्हावर क्लिक करून अक्षरे 125% इतकी मोठी केल्यास वाचायला मदत होईल.

समर्थ रामदास आणि दासबोध यासबंधीची अधिक माहिती या स्थळावर उपलब्ध आहे.

प्रास्ताविक आणि अध्याय १

स्तवन आणि नाना लक्षणे

अध्याय -२

स्वगुणपरीक्षा व त्रिविधताप व नवविधा भक्ती

. . . . . . . . . .

अध्याय ३.

“सद्गुरुसत्शिष्य, बद्धमुमुक्षुसाधकसिद्ध लक्षणे तथा अन्तर्बाह्य पिण्डब्रह्माण्डस्थित देव_शोधन”

अध्याय ४

“चतुर्दश ब्रह्म, मायोद्भव”

अध्याय ५

गुण, रुप, जगज्ज्योति

अध्याय ६

भीम तथा विवेक वैराग्य

अध्याय ७

” नाम, रूप तथा अखण्ड ध्यान ”

अध्याय ८

आत्मज्ञानसप्ततिन्वयपञ्च_महाभूत 

संगणकाचे बदलते तंत्रज्ञान

सुरुवातीच्या काळातला संगणक अजस्त्र आकाराचा असायचा आणि तो तितकेसे महान काम करत नसे. यामुळे मुंबईमध्ये फक्त टीआयएफआर, बीएआरसी, आय़आयटी अशा संशोधनक्षेत्रातल्या संस्थांकडे तो आला. पुढे आयुर्विमा आणि बँका यांनी त्यांचा वापर सुरू केला तेंव्हा त्याला खूप विरोध झाला होता, पण त्याने जगभरातल्या कामकाजात केलेली क्रांति लक्षात घेता त्याला दामटून पुढे आणले गेले. पीसीचा जन्म झाल्यानंतर तो घराघरात आला. संगणकाला माहिती पुरवणे आणि त्याने दिलेली माहिती गोळा करून तिला सांभाळून ठेवण्यासाठी फ्लॉपी, सीडी, डीव्हीडी यासारखी अधिकाधिक क्षमतेचा साधने निघाली आणि पाहतापाहता ती दिसेनाशीही झाली. याचा आतापर्यंतचा आढावा घेणारा हा सुरेख लेख. श्री.तुषार कुटे या मूळ लेखकाचे मनःपूर्वक आभार आणि त्यांनी या लेखाला इथे संग्रहित करायला अनुमति द्यावी अशी विनंति.

बदलते तंत्रज्ञान

तुषार कुटे – सफर विज्ञानविश्वाची
घर शिफ्ट करत असताना साफसफाईमध्ये घराच्या एका कोपऱ्यामध्ये घेऊन दिलेल्या सीडीचे आणि डीव्हीडीचे पाऊच आणि कंटेनर्स नजरेस पडले. सन २००२ ते २०१२ या दरम्यानच्या काळामध्ये मी जमवलेल्या या सीडी व डीव्हीडी होत्या. मागच्या दहा वर्षांमध्ये त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. परंतु त्यादिवशी या पाऊच आणि कंटेनरने भूतकाळ जागृत केला. माझ्या संग्रहामध्ये जवळपास ४०० सीडी व डीव्हीडी असतील. आज त्या मी ई-कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीकडे सुपूर्द केल्या.

संगणक वापरायला सुरुवात केली त्याच सुरुवातीच्या काळामध्ये माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी फ्लॉपी डिस्कचा आम्ही वापर करायचो. साडेतीन इंच आकार असणाऱ्या या फ्लॉपीमध्ये केवळ १.४४ एमबी पर्यंत माहिती साठवता यायची. याचे देखील आम्हाला अप्रूप वाटत असे. एका संगणकातून दुसऱ्या संगणकामध्ये माहिती कॉपी करण्यासाठी त्याचा आम्ही सहज वापर करायचो. परंतु १५ ते २० वेळा वापरल्यानंतर ही फ्लॉपी खराब व्हायला लागायची. त्यातील डेटा करप्ट व्हायचा आणि मग आम्ही नवीन फ्लॉपी विकत घ्यायचो. त्या काळात सायबर कॅफेमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी प्रति तास तीस रुपये मोजावे लागायचे. त्यामुळे एका तासामध्ये इंटरनेटवरून भराभर माहिती डाऊनलोड करून आम्ही फ्लॉपी डिस्कमध्ये साठवून घरच्या संगणकावर लोड करायचं.

फारच थोड्या कालावधीमध्ये फ्लॉपी ड्राईव्ह देखील कालबाह्य झाले. त्यांची जागा ‘सीडी’ने घेतली. बाजारामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ सीडी उपलब्ध झाल्या. संगणकाच्या सीडी ड्राईव्हद्वारे त्यातली माहिती वाचता यायची. तसेच कॉपी करता यायची. एका सीडीची माहिती साठवण्याची क्षमता ७०० एमबी इतकी होती! त्या काळात ती प्रचंड वाटायची. सीडी ड्राईव्हद्वारे सीडीमधील माहिती फक्त बघता येत होती. परंतु सीडीमध्ये माहिती साठवता येत नव्हती. खूपच कमी लोकांकडे त्यावेळी ‘सीडी राईटर’ उपलब्ध होता. सीडी राईटर असणारा संगणक म्हणजे उच्च प्रतीचा संगणक, असे आम्ही मानत असू. आपल्याला एखादी सीडी राईट करायची असेल तर ज्याच्याकडे सीडी राईटर आहे त्याच्या संगणकाचा वापर करून आम्ही नवीन सीडी बनवून घेत असू. कालांतराने जवळपास सर्वच संगणकांमध्ये सीडी रायटर देखील उपलब्ध झाले. त्यामुळे सीडीमध्ये माहिती साठवणे सोपे झाले होते. संगणकातील बरीचशी महत्त्वाची माहिती आम्ही सीडीमध्ये साठवायला लागलो.

पुढे मागे संगणकाची हार्ड डिस्क जर खराब झाली तर? हा प्रश्न आम्हाला सतावत असायचा. त्यामुळे बरीचशी महत्त्वाची माहिती सीडीमध्ये साठवली जायची. लवकरच या संगणकातील माहितीच्या पिढीमध्ये डीव्हीडी दाखल झाली. डीव्हीडीची क्षमता साडेचार जीबी इतकी प्रचंड होती! याच काळामध्ये री-राईटेबल सीडी आणि डबल साइडेड सीडी व डीव्हीडी देखील उपलब्ध झाल्या होत्या. तंत्रज्ञानाची ही प्रगती खरोखर अचंबित करणारी होती. संगणकीय माहितीचा साठा वाढत चाललेला होता. त्यामुळे अशा नवनवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची आवश्यकता तर होतीच.
डीव्हीडी रीडर बरोबरच राईटर देखील लवकरच बाजारात आले. मग आमचा डीव्हीडी रायटिंग चा उद्योग सुरू झाला. त्याकाळात इंटरनेटवर उपलब्ध होणारी महत्त्वाची माहिती तसेच चित्रपटातली गाणी व चित्रपट देखील डीव्हीडीमध्ये साठवून ठेवू लागलो.

अनेक संगणकीय नियतकालिकांसोबत देखील सीडी आणि डीव्हीडी उपलब्ध होत होत्या. त्यातली माहितीदेखील अमुल्य अशी होती. या सर्व सीडींचा माझ्याकडे बराच मोठा संग्रह तयार झाला. यातून त्या ठेवण्यासाठी नवीन पाऊच आणि कंटेनर देखील मी विकत घेतले होते. कधी कोणती माहिती लागत असेल तर लगेच ती सीडी अथवा डीव्हीडी काढून संगणकामध्ये उघडली जायची. अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

परंतु दहा वर्षांपूर्वी पेन ड्राईव्ह नावाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संगणक विश्वात प्रवेश केला. माहिती साठवण्यासाठी तसेच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हे अतिशय सुलभ तंत्रज्ञान होते. मी पाहिलेला पहिला पेन ड्राईव्ह १२८ एमबी क्षमतेचा होता! कालांतराने त्याची क्षमता वेगाने दुप्पट होत गेली. आज आपल्याकडे टीबी अर्थात टेराबाईटमध्ये देखील पेन ड्राईव्ह उपलब्ध आहेत. पेन ड्राइवचा जमाना आल्यानंतर सीडी आणि डीव्हीडीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. याशिवाय इंटरनेट अन वेबसाईटस देखील वेगाने वाढत होत्या. त्यामुळे कोणतीही गोष्ट लागत असेल तेव्हाच इंटरनेटवरून डाऊनलोड करायला लागलो. अर्थात माहिती साठवून ठेवण्याची आवश्यकता तर नव्हती.

काळाच्या ओघामध्ये सीडी आणि डीव्हीडी ड्राइव्ह देखील आता लॅपटॉप व संगणकामध्ये उपलब्ध होत नाहीत. परंतु संगणकीय माहितीचा साठा करण्यासाठी या तंत्रज्ञानाने संगणकाच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले होते. आज माझ्याकडे असलेल्या सर्व सीडीज व डीव्हीडीची एकूण क्षमता ही एका पोर्टेबल हार्ड डिस्क इतकी आहे! यांना तंत्रज्ञानाची किमयाच म्हणावी लागेल. इंटेलचे संस्थापक गॉर्डन मूर यांनी संगणक विश्वाला मूरचा नियम सांगितला आहे. जरी तो संगणकातील मायक्रोप्रोसेसरला वापरण्यात येत असला तरी संगणकीय माहितीसाठ्याला देखील तो निश्चित लागू होतो. आज आपण वापरत असलेल्या हार्ड डिस्क देखील कालांतराने कालबाह्य होतील आणि नवे तंत्रज्ञान त्याची जागा घेईल. ही काळाची गरज आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान हे इतिहासात तितकेच महत्त्वाचे होते, हे विसरून चालणार नाही!

. . . .

काही माहितीपूर्ण प्रतिसाद :

Ramesh Rahalkar
मी पहिला संगणक बघितला तेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो, १९७८ सालाची गोष्ट आहे. Commodore Pet. Memory – १००० bytes. त्या काळी floppy disks नव्हत्या. Screen, keyboard व tape recorder एकत्र fuse केलेले ते unit होते. तेव्हा अर्थातच DOS सुद्धा नव्हती. फक्त Basic मध्ये काही लहान, सोपे programs लिहिता येत होते (१००० bytes मध्ये किती लिहिणार?). माझ्या प्रोफेसरकडे तो होता, व बघून मी खूपच impress झालो होतो.

Mangesh Anāokar
ऐंशीच्या दशकांत सुरुवातीला आम्ही चक्क ८ १/२ इंची फ्लाॅपी वापरत होतो. त्याच सुमारास स्मगल्ड पीसींची भारतात एण्ट्री झाली, ज्यामध्ये ५ १/४ इंची फ्लाॅपी असायची. ड्राइव्हसुद्धा एकच होता आणि असा पीसी चालायचा डाॅस २.० वापरुन. एकच ड्राइव्ह असल्याने त्याला ‘A’ ड्राइव्ह संबोधिले जायचे.
प्रथम उतलब्ध असलेल्या फ्लाॅपी या SSSD (Single Side Single Density) प्रकारच्या आणि २५६ KB साईजच्या होत्या. मग प्रथम SSDD प्रकारच्या ५१२ KB च्या व नंतर DSDD (Double Side Double Density) प्रकारच्या १.२० MB च्या फ्लाॅपी व ड्राइव्ह आलेत.
तो पर्यंत पीसीचा प्रथम PC-XT हा दोन ड्राइव्हचा पीसी, A आणि B ड्राइव्ह सोबत आला. त्यामुळे आता ‘बॅकअप’ घेणे साध्य होउ लागले.
लगोलग PC-AT हा दोन ५ १/४ इंच फ्लाॅपी ड्राइव्ह सोबत १० MB आकाराच्या ‘राक्षसी’ आकाराचा हार्ड ड्राइव्ह ‘C’ ड्राइव्ह म्हणुन आला.
इथुन पुढे प्रगती झपाट्याने झाली. पहिला पीसी इण्टेल ८०८० वापरुन IBM ने अमेरीकन बाजारात उतरविलेला होता. पण १९८५ पर्यंत इंटेलचे ८०८१, ८०८२, ८०८३, ८०८४, ८०८५ वापरुन बनल्या गेलेल्या संगणका नंतर ८०८६ वापरुन बनलेला संगणक ‘३८६’ म्हणुन बाजारात आला तो पर्यंत डाॅस ३.० सुद्धा आलेली होती.
१९९० नंतर डाॅस ४.० आली. मायक्रोसाॅफ्टची अधिकृत काॅपी सुद्धा ५ १/४ इंची फ्लाॅपीवरच उपलब्ध होती.
या सुमारास ३ १/२ इंच आकाराची १.४४ MB ची फ्लाॅपी व ड्राइव्ह वापरात आले. या फ्लापींना कडक आवरण होते, जे ५ १/४ इंच फ्लाॅपींना नसायचे.
IBM ने नव्वदच्या सुमारास ‘पेण्टीयम’ आणला, ज्यामध्ये CD ड्राइव्ह वापरला होता. सहाजिकपणे अधिकृत आॅपरेटींग सिस्टम CD वरच उपलब्ध होती.
ज्यांना संगणकांच्या इतिहासात उत्सुकता आहे, त्यांनी ‘Osborne’ लिखीत पुस्तके वाचावीत. नांव लक्षांत नाही, पण पहिला खंड ‘Part Zero’ पासुन सुरु होतो.

पहिला मायक्रो प्रोसेसर ४०४० कां व कसा घडला इथपासुन पुढील कांही काळांत कसे बदल घडत गेलेत, याची माहिती त्यांत वाचायला मिळेल.

आनंद घारे : हा लेख आणि त्यावरील कॉमेंट्स वाचून तीनचार दशकांमधला प्रवास डोळ्यांसमोर आला. पीसी हा शब्दसुद्धा ऐकला नव्हता तेंव्हा माझ्या एका मित्राने टीव्हीचा मॉनिटर आणि टेप रेकॉर्डर यांचा उपयोग करून घरी एक खेळातला कॉम्प्यूटर तयार केला होता. काही ऑफिसेसमधल्या कॉंप्यूटर्ससाठी पंच्ड कार्ड्स वापरत असत. मग पीसी, पीसीएक्सटी वगैरे आले. ते डॉसवर चालायचे. तिथपासून बघता बघता आता किती प्रगति झाली आहे ?