वट पौर्णिमा २०२२

काल होऊन गेलेल्या वटपौर्णिमेनिमित्य सामाजिक माध्यमांमधून आलेले काही लेख आणि कविता यांचे एक संकलन. सर्व मूळ लेखक व लेखिकांचे मनःपूर्वक आभार.

वटपौर्णिमा आणि पर्यावरण या विषयावरील माझा लेख इथे
https://anandghare2.wordpress.com/2013/06/22/%e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a3/?fbclid=IwAR1zhxXBmIFvY78ahYG0DemgXL9aKtN3TjHMn6X16ttFy2VcQH_CAx2ODeY

👩‍❤️‍👨⚜️🚩🔆🔆🚩⚜️👩‍❤️‍👨
🌻 आनंदी पहाट 🌻 👩‍❤️‍👨वटपौर्णिमेची👩‍❤️‍👨

श्रेष्ठ भारतीय संस्कृती ही जीवनात नंदनवन फुलवायला चराचर सृष्टीवर प्रेम करायला शिकविते. प्राणवायूचे महत्त्व जगाने फार उशिरा जाणले. पण या भारतीय संस्कृतीने हे प्राणवायूचे महत्त्व केव्हाच ओळखून प्रत्येक सणाला निसर्गातील पशुपक्षी.. वृक्ष वनस्पतींशी मैत्री करायला शिकवले.
जगदगुरु संत तुकोबांनी तर वृक्षवेलींना सोयरे मानून घरोबाच शिकवला. मग निसर्ग संरक्षण, संवर्धन.. संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत.
वड तर औषधी वृक्ष. याची साल.. पाने.. फळेच काय पण समिधाही जीवनाला उपकारक. वड हा तर मोफत प्राणवायूचा खजिनाच. शेकडो वर्षाचा सेवाव्रती. आजही विस्तिर्ण डेरेदार वृक्षाच्या सानिध्यात पिढ्यानपीढ्या सुखेनैव जगत आहेत.
स्त्रीच्या जीवनात पती हा तिच्या संसाराचा प्राण. यमराजाकडून पतीचे प्राण पुन्हा परत मिळवणारी ही भार्येची.. वटसावित्रीची पूजेची कथा. ही सावित्री वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला सत्यवानाला दीर्घायुष्य लाभण्याचे वरदान प्राप्त करते.
सावित्री ही बुद्धिमान.. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जंगलात राहणारी चतुर पतिव्रता. तीने प्रत्यक्ष यमाशी वादविवाद करुन.. प्रसन्न करुन घेत आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. तसेच अंध सासू सासऱ्यांनाही न्याय मिळवून दिला. आता या कथाभागापेक्षा प्राणवायू देणाऱ्या वड वृक्ष महात्म्य सांगायला इथे पौराणिक कथाशी संबंध जोडलाय.
आज महिला सौभाग्यालंकाराने नटुन मनातील पवित्र सावित्रीभावाने पतीच्या वडवृक्षाप्रमाणे दिर्घायू निरामय जीवनाची कामना करतात. वडवृक्षाप्रमाणेच परिवाराचा विस्तार व्हावा ही प्रार्थना करतात. वडवृक्षाची फळे पक्ष्यांची आवडती अशी मधूर. मग त्याला आम्रफळे.. फुले अर्पण करुन वृक्षाचे पूजन महिला करतात. आज उपवासही.. म्हणजेच निसर्गपूजनाला भक्तीची जोड.
सर्व सत्यवानांच्या सावित्रींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आपले पतीदेव यांना निरायम दीर्घायुष्य लाभो हीच शुभकामना.. !!

🌸🌿👩‍❤️‍👨 🌳 👩‍❤️‍👨🌿🌸

वटपौर्णिमा आली गं,
ओटी आंब्यांन भरूया
सण वर्षाचा आज,
पूजा वडाची करूया llधृ ll

पतिव्रतेचा हा वसा गं,
सुवासिनींचे हे वाण
नारीजातीने करावा,
भोळ्या भ्रताराचा मान
हाथ जोडुनी देवाला,
प्रदक्षिणेला फिरूया

सात जन्माचा सोबती,
धनी माझा पतीदेव
माझ्या संसाराच्या मंदिरी,
लाख मोलाची ही ठेव
काया वाचा मने,
मनामंदी त्याच्या नावाला स्मरूया

सावित्रीच्या कुंकुवाला,
सत्यवानाचा गं रंग
औक्ष उदंड मिळावं,
भाव फिरे धाग्यासंग
भाव सात जन्माचं,
आशा मनात धरूया

👩‍❤️‍👨🍃🌷🌿🌿🌷🍃👩‍❤️‍👨

गीत : जगदीश खेबूडकर ✍️
संगीत : प्रभाकर जोग 🎹
स्वर : अनुराधा पौडवाल 🎤
चित्रपट : जावयाची जात (१९७९)📺
🎼🎶🎼🎶🎼 🎧
👩‍❤️‍👨🙏सुमंगल प्रभात🙏👩‍❤️‍👨 १४.०६.२०२२

🌻🥀🌸🥭🥭🌸🥀🌻


घरोघरी सत्यवान
सावित्रीही घरोघरी
नको भेदभाव काही
असावी बरोबरी
नको उपासतापास
नको पोकळ दिखावा
प्रेमाने एकमेका
कधी घास भरवावा
सात जन्म नको
एक जन्म पुरे जरी
साथ सोबतीची राहो
याच जन्मभरी
आयुष्यरुपी वड
त्याचीच पूजा करू
निरोगी जीवनाची
कास मनी धरू
वटपौर्णिमेचे व्रत
एकच दिस का त्याचा?
रोजच दिवस

सत्यवान,सावित्रीचा………

योग्य प्रबोधन करणारी कविता.
मुळात व्रतवैकल्ये तयार केली ती पुरुषांनी. त्यामुळे त्यांनी स्त्रीयांना कामाला जुंपलं.त्या काळी हे ठीक होतं; पण आज हे कितपत योग्य आहे? म्हणजे तो उपवास, ती वडाची पूजा, ते नटणं इ.इ.
हे श्रद्धेचं प्रदर्शन तर नव्हे?
एरवी स्त्रीया नटतात. पण इथे परंपरेने स्त्रीला बांधून ठेवलंय. तेही विशिष्ट भूमिकेतून.
आज बुद्धिवादी स्त्री यावर चिंतन करते तेव्हा अशी कविता समोर येते.

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

वटवृक्षास…..

कोरोनाकाळतली भीषण टंचाई प्राणवायुची
आज महती कळते तुझ्या असण्याची

तू धरून ठेवतोस चिकाटीनं मातीला
येतोस आपसुकच पारंबीतून जन्माला
हा सर्जनसोहळा थक्क करणारा
तुझ्याशी नातं जोडून ठेवणारा

सदैव बहरून तू टवटवीत
उभा आहेस वादळवा-यात

आता नाही गुंफणार फक्त
कर्मकांडाचा धागा सुताचा
सर्जनसोहळा आज तुझ्या जन्माचा
नव विचाराच्या औक्षणाचा

जेष्ठातलं हिरवं आश्वासन तुला
हे नवे आयाम तुझ्या असण्याचे
तुझ्या साक्षीने सुरुवात नव्या व्रताची
शपथेवर जोपासना करू नात्याची.
डॉ. तरुजा भोसले

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

वटसावित्री!

नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्‍न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग?तर ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे.असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही.
सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, ‘सांग बाबा काही समजावून!’ असे होते. मग म्हणालो ‘वहिनी’ बसा! विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो?

कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना? त्या म्हणाल्या हो! बरोबर.
मी म्हणालो, मग आता सांगा वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही? मी म्हणालो,

मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही? ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती? मग मी म्हणालो, हे काहीच माहिती नाही? कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही! तर मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता? बिचारीजवळ उत्तर नव्हते. अनेकांजवळ नसते.
शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका.

जगात सर्वात दाट सावली असते वडा ची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात-
कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌
| शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌
|अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते. या *तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता.
वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड.

ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. गरमीने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले.
त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:
|’ प्रकारातील समजायची असते. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा!
ती म्हणाली याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट.
सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे.
जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.
संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या.
१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह.

असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत.

शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे. वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला.
आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा!’

खूपच छान माहिती 👌🙏
नक्की वाचा 🙏

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

‼वटपौर्णिमा वैज्ञानिक महत्व‼

वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही?
ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही?
जगात सर्वात दाट सावली असते वडा ची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे,
सुभाषितकार म्हणतात-
कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌ !!
शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌!!
अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते. या तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता.
वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड.
ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. गरमीने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले.
त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:|’ प्रकारातील समजायची असते.

ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा!
सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे.
जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.
संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या.
१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह.
असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत.
शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे. वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला.
आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा!’

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

प्रा. विजय पोहनेरकर यांची विनोदी , खुसखुशीत कविता !😀
गंमतीत जगण्यासाठी केलेली थोडीशी गंमत !😀

वड म्हणला बाई तुला
दोन्ही हात जोडले !
😀😀😀😀😀😀

कवी : प्रा. विजय पोहनेरकर

एक बाई लगबगीनं
पूजे साठी आली
भक्ती भावाने वडाला
चकरा मारू लागली

वड देवा वड देवा
पूजा पदरात घे
जन्मोजन्मी पुन्हा मला
हाच पती दे

आश्चर्याने वडाने विचारलं
हाच नवरा पाहिजे ?
काहीही म्हण बाई तुला
खरंच मानलं पाहिजे

काय करणार वडदादा
खूप विचार केला
हाच नवरा राहूदे म्हणून
आतून आवाज आला 😀

एवढे दुर्गुण असून सुद्धा
त्याचीच निवड केली
म्हणून माय मला तुझी
खूपच दया आली

वडदेवा वडदेवा
तसं काहीच नाही
असं नाही की आमचं
बिल्कुलच पटत नाही 😀

दुसरा नवरा मागायचा
मी ही विचार केला
पण कल्पनेनंच माझा जीव
कासावीस झाला 😀

जास्तच बिलिंदर निघाला तर
मग काय करायचं
म्हणून म्हणलं याच्यासाठीच
वडाभोवती फिरायचं😀

तुम्हाला तर माहितीय देवा
मी ही काय कमी नाही
बिचाऱ्याचा डोक्याला
एक पण केस ठेवला नाही 😀

अधून मधून गुर्रगुर्र करतं
मी थोडंच ऐकते
एका कानांन ऐकून
दुसऱ्याने सोडून देते 😀

माझी आई मला म्हणली
नवरा बदलायचा नाही
एवढा बावळट माणूस तुला
कधीच मिळायचा नाही 😜

तुम्हीच सांगा वड दादा
आईचं मन मोडू का ?
नशिबाने मिळालेलं
चांगलं माणूस सोडू का ?😜

वयोवृद्ध झाडाने पण
गडगडाटी हास्य केले
वड म्हणला बाई तुला
दोन्ही हात जोडले 😜

न विसरता दरवर्षी
पूजेसाठी येत जा
झाडासाठी आयुष्यातला
थोडा वेळ देत जा

👩‍❤️‍👨🥀🌿🌸🌸🌿🥀👩‍❤️‍👨

💠💠बर्थोबर्थी💠💠

मंडळी, शिर्षक वाचून गोंधळलात नं? काल माझी कामवाली ‘लक्ष्मी’ हिनं हाच शब्द उच्चारला, तेव्हा मी देखील अशीच गोंधळात पडले होते.
चार वर्षांपूर्वी लक्ष्मी माझ्या दारात उभी होती.
“तुम्हाला ‘वर्कींग लेडी’ पाहिजे, असं कळलं म्हणून आले.”
“वर्कींग लेडी?”
“म्हंजे कामवाली हो!”
“अच्छा, अच्छा! कुठलं काम करु शकतेस तू?”
“हेच आपलं, किलनिंग, कुकिंग, बेबी केरींग!”
माझ्या चेहर्‍यावर प्रश्न चिन्ह!
“म्हंजे हेच आपलं, झाडू पोछा, सैपाक, बाळाला सांभाळणं! “
आता मला तिचं विंग्रजी थोडं थोडं कळायला लागलं होतं.
” कुठे राहतेस तू? “
” इंद्रा नगर. “
“अच्छा, इंद्रनगरमधे राहतेस का? “
” नाई हो! ती इंद्रा गांधी नव्हती का प्रेम मिनीश्टर, तिचं नाव आहे ते इंद्रानगर!”
“बरं बरं कळलं! शिक्षण किती झालंय तुझं? “
खरं म्हणजे तिच्या शिक्षणाचा माझ्या घरच्या कामाशी काही संबंध नव्हता. पण तिचं इंग्रजी बोलणं ऐकून माझी उत्सुकता वाढली होती.
” एम् एन् म्हंजे टी एफ्! “
तिने समानार्थी शब्द देऊनही मला काहीच कळलं नाही. विद्यापीठानं हा कुठला नविन कोर्स सुरू केलाय आणि ते माझ्या वाचनात कसं काय नाही आलं?
“अगं म्हणजे नेमकं काय शिकली आहेस?”
“अहो म्हंजे मॅट्रिक नापास म्हंजे टेन फेल!”
मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
” बरं तुझं नाव काय?”
“मनी गाॅड, म्हंजे लक्ष्मी!”
तिचं काम आणि पगार ठरला. दोन दिवसानंतर घरात आल्या आल्या…
“वाॅव् ताई! काय डिशेस बनवल्या आज? मस्त वासेस येताहेत! “
मी मुकाट तिच्यासमोर खाण्याचं ठेवलं.
” आज तुला उशीर का झाला लक्ष्मी?”
“अहो इकडं कामावर यायच्या अगोदर मी तिकडं घरी ब्युटी पार्लमेंट चालवते ना, वन अवर! तर आज जरा जास्त केसेस होत्या,म्हणून लेट झाला.”
“काय काय करुन देतेस तू तुझ्या केसेसना? “
” आॅल! मेपक, आयब्रो, फ्यॅशल, हेअर स्टेल! सर्वच!”
एकदा म्हणाली,” ताई मी उद्या पासून चार दिवसांची लीव घेणार आहे. “
” का गं? “
” काल माझ्या सासूला हाॅस्पिटलात अ‍ॅडमिशन केलं. काल रात्री ती अचानकच एकदम कोंबात (कोमात) गेली होती. आज सकाळी आली शुद्धीवर! आता तशी ओके आहे. पण चार दिवस रहावं लागेल हाॅस्पिटलात.”
एक दिवस पुन्हा तिला सुटी हवी होती.
” उद्या एका ब्रेडचा मेपक (!) करायचा आहे. “
” ब्रेडचा? “
आता ब्रेडला बटर चोपडण्यासाठी सुट्टी!
” म्हंजे नवरीचा हो! “
” अच्छा! पण तुझी कधीची इच्छा आहे म्हणून मी तुला उद्या बिग बाजार मधे घेऊन जाण्याचं ठरवलं होतं. “
” हो ताई, पण माझ्या एन्ट्रेनमेंट साठी मुलींवर ब्युटी पार्लमेंट सोपवण्याची ‘रिक्स’ नाही घेऊ शकत नं मी!”
बाकी काही म्हणा, पण लक्ष्मीला कामावर घेण्याची ‘रिक्स’ घेऊन मी माझी एन्ट्रेनमेंट फिक्स केली होती. तिची नवय्रा बद्दल तक्रार अशी नसायची. पण सदैव विरोधी सूर असायचा. त्याला क्लोजअप टुथ पेस्ट आवडते हिला व्हिक्को! त्याला हमाम हवा असतो हिला संतूर! पंधरा वर्षाच्या मुलाची आई असूनही खुप तरुण दिसावं ही सुप्त इच्छा! हिला ‘पोटॅटो भाजी आवडते त्याला वांगी! त्याला लहान दुकानातून सामान घ्यायचं असतं (औकातीत रहावं मानसानं) तर हिला बिग बझार हिंडायची इच्छा!
काल मला म्हणाली, “मी उद्या लिव घेणार आहे ताई!”
“कशासाठी?”
“उद्या वडाच्या ट्री ची पूजा करायची आहे.’ हार्स ‘आणायचे आहेत.”
“हार्स?”
“पूजेसाठी हो! फुलांचे हार्स!”
“अगं पण तुझी एकही गोष्ट नवय्राला पटत नाही म्हणून तक्रार करत होतीस नं?”
“म्हणून काय झालं? नवरा म्हंजे बायकोची चादर आसती. त्या चादरीखाली बायकोची इज्जत सेफ आसती. उद्याच्या पूजेमधे मी ह्याच नवय्राला’ बर्थोबर्थी’ मागूनच घेणार आहे. “
माझं बौद्धिक घेऊन माझ्या कडून ‘हार्स’ साठी ‘फिफ्टी’ रुपीज घेऊन ही ‘मनी गाॅड’ बर्थोबर्थी नवय्राला मागण्यासाठी ‘लिव’ घेऊन निघून गेली.
मी तिला मनोमन ‘हँड्स’ जोडले. 🙏☺️

सौ. आरती देशपांडे पुणे

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: