नुकताच होलिकोत्सव होऊन गेला. त्यानिमित्य मला मिळालेल्या काही शुभेच्छा, कविता, विनोद आणि आठवणी यांचे लहानसे संकलन.
सर्वांना होळी पौर्णिमा आणि होलिकोत्सवाच्या शुभेच्छा. या विषयावर माझे काही लेख इथे
https://anandghare2.wordpress.com/2013/03/24/%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%a1-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5/

१. संत जनाबाई यांची मानसहोळी…
कराया साजरा । होलिकेचा सण ।
मनाचे स्थान । निवडीले ।।
ऐसे ते स्थान । साधने सारवले ।
भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।
त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।
त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।
रचलीया तेथे। लाकडे वासनांची ।
इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।
गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।
अर्पिले तयात । ऐसे केले ।।
रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।
भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।
वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले । झाली कृपा ।।
दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।
झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ । नूरले काही ।।
वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी ।।
जेणे मुक्तीची दिवाळी। अखंडित ।।
🙏🙏🙏
२. सुरा समर्थन – काका हाथरसी
दोस्तों, आज काका हाथरसी की
हास्य कविता – सुरा समर्थन का आनन्द लें.
भारतीय इतिहास का, कीजे अनुसंधान
देव-दनुज-किन्नर सभी, किया सोमरस पान
किया सोमरस पान, पियें कवि, लेखक, शायर
जो इससे बच जाये, उसे कहते हैं ‘कायर’
कहँ ‘काका’, कवि ‘बच्चन’ ने पीकर दो प्याला
दो घंटे में लिख डाली, पूरी ‘मधुशाला’
भेदभाव से मुक्त यह, क्या ऊँचा क्या नीच
अहिरावण पीता इसे, पीता था मारीच
पीता था मारीच, स्वर्ण- मृग रूप बनाया
पीकर के रावण सीता जी को हर लाया
कहँ ‘काका’ कविराय, सुरा की करो न निंदा
मधु पीकर के मेघनाद पहुँचा किष्किंधा
ठेला हो या जीप हो, अथवा मोटर कार
ठर्रा पीकर छोड़ दो, अस्सी की रफ़्तार
अस्सी की रफ़्तार, नशे में पुण्य कमाओ
जो आगे आ जाये, स्वर्ग उसको पहुँचाओ
पकड़ें यदि सार्जेंट, सिपाही ड्यूटी वाले
लुढ़का दो उनके भी मुँह में, दो चार पियाले
३. पुरणपोळी
शाळेत असताना व्याकरणात शिकवलेली वॄत्ते आठवा…..
एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना….!
😋😍
इंद्रवज्रा:
चाहूल येता मनि श्रावणाची
होळी तथा आणखि वा सणाची
पोळीस लाटा पुरणा भरोनी
वाढा समस्ता अति आग्रहानी ||
भुजंगप्रयात:
सवे घेउनी डाळ गूळा समाने
शिजो घालिती दोनही त्या क्रमाने
धरी जातिकोशा वरी घासुनीते
सुगंधा करावे झणी आसमंते || (जातिकोश – जायफळ)
वसंततिलका :
घोटा असे पुरण ते अति आदराने
घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने
पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते
पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||
मालिनी :
अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते
हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते
कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती
कडक नच करावी राहुद्या तैलवंती
मंदाक्रांता:
घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी
ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती
बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा
पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||
पृथ्वी :
करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे
पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे
समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे
असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||
शार्दूल विक्रिडित:
हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या
उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या
वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे
नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे ||
आज पासून सुरू होणाऱ्या होलिकोत्सवा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…..!!
🌷🌷🌷🌷🌷
४. पियक्कडचंद
पूरी बोतल गटकिये, होय ब्रह्म का ज्ञान
नाली की बू, इत्र की खुशबू एक समान
खुशबू एक समान, लड़्खड़ाती जब जिह्वा
‘डिब्बा’ कहना चाहें, निकले मुँह से ‘दिब्बा’
कहँ ‘काका’ कविराय, अर्ध-उन्मीलित अँखियाँ
मुँह से बहती लार, भिनभिनाती हैं मखियाँ
प्रेम – वासना रोग में, सुरा रहे अनुकूल
सैंडिल-चप्पल-जूतियां, लगतीं जैसे फूल
लगतीं जैसे फूल, धूल झड़ जाये सिर की
बुद्धि शुद्ध हो जाये, खुले अक्कल की खिड़की
प्रजातंत्र में बिता रहे क्यों जीवन फ़ीका
बनो ‘पियक्कड़चंद’, स्वाद लो आज़ादी का
एक बार मद्रास में देखा जोश – ख़रोश
बीस पियक्कड़ मर गये, तीस हुये बेहोश
तीस हुये बेहोश, दवा दी जाने कैसी
वे भी सब मर गये, दवाई हो तो ऐसी
चीफ़ सिविल सर्जन ने केस कर दिया डिसमिस
पोस्ट मार्टम हुआ, पेट में निकली ‘वार्निश
५. शिमग्याची आकाशवाणी %^$@# &%^$@# !!!
जंगलात एक शिकारी झाडांवर बसलेल्या कबुतरांच्या टोळक्याकडे मोठ्या आशावादी नजरेने बघत होता. बराच वेळ विचार करून नेम धरून त्याने शेवटी गोळी झाडली. ती दुसरीकडेच गेली. सगळी कबुतरं उडाली.
“गेली चायला.. &%^$@# नेम चुकला..” – शिकारी.
शेजारी एक साधू काही जप करत बसला होता. त्यानं एकदा भयंकर रागीट नजरेनं त्या शिकार्याकडे पाहिलं. आणि पुन्हा जप करू लागला.
शिकार्याचं लक्ष आता एका सशाकडे होतं.. नेम धरून पुन्हा एक गोळी झाडली.. तीही दुरून गेली.. ससाही पळाला..
“आयला .. काय चाललंय.. &%^$@# नेम चुकला परत..”
त्या साधूला शिकार्याचं हे बोलणं रुचलं नसावं.. म्हणून तो त्या शिकार्याला म्हणाला.. “बाळा .. अरे अशा शिव्या देऊ नये. वाईट गोष्ट आहे ती..”
“अरे ए साधुरड्या.. तू तुझं काम कर मला माझं काम करू दे..” – शिकारी.
साधू गपगार होऊन पुन्हा जप करू लागला.. “पुन्हा एकदा जर तू शिवी घातलीस ना तर मी तुला शाप देईन..”
आता शिकार्याला एक हरीण दिसू लागलं. पुन्हा बराच वेळ वाट पाहून नेम धरून पठ्ठ्यानं गोळी झाडली .. तीही भलतीचकडे गेली.. आणि इतक्यांदा प्रयत्न फसल्यानं वैतागलेला तो शिकारी म्हणाला.. ” &%^$@# नेम चुकला.. चायचं नशीब फुटकं .. ए साधुरड्या .. बघ &%^$@# नेम चुकला..”
आता मात्र साधूला राहवेनासं झालं .. तो वैतागून उठला आणि म्हणाला.. ” हे बघ मी तुला एकदा ताकीद दिली होती तू ऐकले नाहीस.. आता तर तू मलाच शिवी घातलीस .. मी तुला शाप देतो.. आता आकाशातून वीज पडेल आणि तुझी क्षणात राख होईल..” असं म्हणून साधून त्याच्या कमंडलूतून पाणी वगैरे काढून त्या शिकार्यावर शिंपडलं.. तसा ढगांचा गडगडाट झाला.. वीजा चमकू लागल्या.. शिकारी घाबरला आणि त्याने डोळे मिटून घेतले.. क्षणात एक जोरदार वीज कडाडली आणि साधूवर येऊन पडली.. साधू क्षणार्धात राख झाला..
तोच आकाशातून जोरदार आवाज आला..
“&%^$@# … नेम चुकला!!!!!””
मिसळपाववरून साभार दि. २८-०२-२०१०
६. होळी सणातले माझे दोन चित्तथरारक अनुभव…
. . श्री.प्र.ह.जोशी
१९५४-५५ चार काळ.मी ११-१२ वर्षांचा…
कर्नाटकात होळी जोरात साजरी करतात.फाल्गुन १ शुद्धपासूनच सुरुवात होते.
गोव-या,लाकडे चोरी करून आणून ती साठवून पौर्णिमेला होळी पेटवायची ही पद्धत ( झाडे तोडली जात नसत.)
आमच्या गल्लीतील टीम मध्ये मी आणि सुभाष ( त्याचे वडील पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते ) लीडर होतो.थौडे जास्त उंच व धीट असल्यामुळे असेल.
अनुभव १…रात्री चांदणे छान पडले होते् रात्री ९ चा सुमार असेल.आमच्या टीमने , बऱ्याच गोवऱ्या बंगल्याच्या आवारात होत्या त्या हेरून ठेवल्या होत्या.मी व सुभाषने कुंपणाच्या भिंतीवर चढायचे आणि आत उडी मारून गोव-या बाहेर टाकायच्या असे ठरले.
दोन्ही कोप-यावर २-२ मुले ठेवली.कोणी एकदम आले तर टाळ्या वाजवून आम्हाला सावध करायचे ठरले.
आम्ही भिंतीवर चढलो आणि रस्त्यावरून कोणी आल्याचा भास झाला.आम्ही दोघे उड्या मारून पळत सुटलो.मागे वळून बघितले तर कोणी नव्हते .पुन्हा आम्ही तिथे गेलो.पुन्हा तोच प्रकार.आम्ही दोघानी मित्रांना शिव्या घालून प्रयत्न थांबविला. ( त्यानी सावध न केल्याचा राग ) मी मागे वळून बघितले तर ८-९ फूट उंचीची एक बाई हातात सोटा घेऊन आमच्या मागे येत होती.सुभाषने तर चड्डीतच शू केली.नंतर कळले की त्या तिथे पूर्वी एक झौपडी होती.आणि एक गर्भार बाईचा तिथे मृत्यू झाला होता.तिचे भूत तेथे वावरत असते.म्हणजे आम्ही भूत पाहिले तर!!!
अनु.नं २….पौर्णिमेच्या दिवशी..आमची टीम एक मोठा ओंडका चोरायच्या उद्देशाने एका बंगल्याच्या आवारात गेलो.कोणी नाही हे पाहून ओंडका उचलायला लागलो तर त्यावर साप दिसला.आम्ही ओंडका टाकून दिला.दोन वेळा आपटला.साप गेला असे समजून तो ओंडका खांद्यावरून रचलेल्या होळीपर्यंत आणला.टाकला, तर साप बाहेर पडला.मारायचा प्रयत्न केला तर तो रचलेल्या होळीत शिरला. होळी पेटवली.कडेनं फिरून बोंबा मारल्या.( यात मोठीही सामील होत असत )
दुस-या दिवशी जागा स्वच्छ करताना् पाहिले तर तो साप मधल्या पुरलेल्या लाकडाच्या खड्ड्यात,नारळावर मेलेला आढळला…बिचारा.
तो साप ओंडका उचलत असता कोणाला चावला असता तर.?. अजून अंगावर काटा यैतो