कृतज्ञता, शुक्रिया, Gratitude

कृतज्ञता हा एक फार मोठा दैवी गुण आहे. खाल्ल्या मिठाला जागणारे इमानदार सेवक तर असतातच, स्वामीभक्त घोड्यांच्याही रोचक कथा आहेत. कुत्रा हा पाळीव प्राणी तर इमानदारीचे प्रतीकच आहे. भाकरी किंवा नोकरी देणाऱ्याबद्दल जर कृतज्ञता वाटते तर हे जीवन देणाऱ्या त्या परमेश्वराबद्दल मनात किती आदर बाळगला पाहिजे. कविवर्य ग.दि.माडगूळकरांनी हा भाव “देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी” अशा शब्दांमध्ये किती चांगला व्यक्त केला आहे?
याच विषयावरील एक पंजाबी गीत “क्यों ना शुकर मनावा..” आणि एक इंग्रजी कविता “Drinking From The Saucer खाली देत आहे. तसेच ‘कृतज्ञतेचा निर्देशांक’ हा वाचनीय लेख देत आहे.
. . . . . . . . .

क्यों ना शुकर मनावा

बुल्ले शाह 17 वीं शताब्दी के पंजाब के दौरान एक पंजाबी दार्शनिक और सूफी कवि थे।
फकीर बुल्लेशाह से जब किसी ने पूछा कि आप इतनी गरीबी में भी भगवान का शुक्रिया कैसे करते हैं तो बुल्लेशाह ने कहा..

चढ़दे सूरज ढलदे देखे,
बुझदे दीवे बलदे देखे ।
हीरे दा कोइ मुल ना जाणे,
खोटे सिक्के चलदे देखे ।
जिना दा न जग ते कोई,
ओ वी पुत्तर पलदे देखे ।
उसदी रहमत दे नाल बंदे,
पाणी उत्ते चलदे देखे ।
लोकी कैंदे दाल नइ गलदी,
मैं ते पत्थर गलदे देखे ।
जिन्हा ने कदर ना कीती रब दी,
हथ खाली ओ मलदे देखे ।
कई पैरां तो नंगे फिरदे,
सिर ते लभदे छावा…
मैनु दाता सब कुछ दित्ता,
क्यों ना शुकर मनावा…

When someone asked Fakir Bulleshah how do you thank God even in such poverty, Bulleshah said ..
I have seen the downfall of once rich and powerful,
while those, doomed stood up and reached the sky.
when diamond was not valued better than a brass farthing,
and counterfeit coins were being used freely.
Even orphans with no near dear ones
were taken care of by grace of God;
Those who are blessed by God;
they may even walk on water.
People tell me that chana is not cooking
I saw the melting of stones.
Those who think they are superior to God
They were seen rubbing their empty hands.
When many are seen walking barefoot,
And living without a roof on top
God has given me everything,
So why I should not thank him.

. . . . . . . . . . . . . . . .

Drinking From The Saucer

  • John Paul Moore_

I’ve never made a fortune,
And I’ll never make one now
But it really doesn’t matter
‘Cause I’m happy anyhow.

As I go along my journey
I’m reaping better than I’ve sowed
I’m drinking from the saucer
‘Cause my cup has overflowed.

I don’t have a lot of riches,
And the going’s sometimes tough
But with kin and friends to love me
I think I’m rich enough.

I thank God for the blessings
That His mercy has bestowed
I’m drinking from the saucer
‘Cause my cup has overflowed.

He gives me strength and courage
When the way grows steep and rough
I’ll not ask for other blessings
For I’m already blessed enough.

May we never be too busy
To help bear another’s load
Then we’ll all be drinking from the saucer

When our cups have overflowed.

  • – – – – – – – – – – –

कृतज्ञतेचा निर्देशांक

असंच एकदा एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने मला विचारमग्न केलं. आयुष्यातली सकारात्मकता याविषयावरचा तो लेख होता. मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं; “Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!”. (कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!). मला ‘कृतज्ञतेचा निर्देशांक’ ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञताभावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं. लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा;

१. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे :
म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं, याबद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल.

२. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मानणे :
आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे फुगवे धरतो आपण. पण या नात्यांची किंमत अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलांना पाहून कळेल. त्यांच्या डोळ्यात मायेचा एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं की सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून झाल्यावर नमस्कार करण्यासाठी आईवडील असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ते. भांडायला, खेळायला, एकत्र वाढायला भावंडं असणं, हट्ट पुरवायला, लाड करायला मामा, काका, मावशी, आत्या असणं याची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं इतक्या महत्वाची नाती खचितच आहेत ही.

३. मला मिळालेल्या साधन संपदेबाबत कृतज्ञता मानणे :
म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, निजायला अंथरून असणे, पांघरायला पांघरूण असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चांगल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्ठित सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं कृतज्ञता बाळगण्यासारख्या नाहीत का? . चहा थोडा गार झाला तर चिडतो मी. पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती? या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला?

४. माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे :
मला तळमळीने शिकवणारे शिक्षक, मार्गदर्शक, शेजारी पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर, ड्राइवर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का?

विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मी एक उपाय शोधून काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो संधी शोधून “धन्यवाद” देण्याचा परिपाठ अमलात आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज घरचा कचरा नेणाऱ्या बाई पर्यंत सगळ्यांना ते जेव्हा समोर येतील तेव्हा “थँक यू” असं ठरवून म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून “थँक यू” म्हणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. गम्मत म्हणून अशा किती जणांना मी दिवसभरात “थँक यू” म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक दररोज रात्री निजण्यापूर्वी मी काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही निर्देशांकासारखा दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख (ग्राफ) हा चढता असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो.

या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येकवेळी माझं थँक यू आपोआपच पोहोचतं …

म्हणूनच ज्याने मला हे जीवन दिले,मला जगण्यासाठी श्वास दिला,पोटासाठी अन्न दिले परमेश्वराला थँक्यू म्हणण्यासाठी मी दिवसाच्या चोवीस तासातील किमान चोवीस मिनिटे दिली पाहिजेत. भगवंताचे नामस्मरण हीच त्याच्या प्रती व्यक्त होणारी कृतज्ञता!
🙏 🙏🏻🙏🏻🙏🏼

. . . . . . . . . . वॉट्सॅपवरून साभार

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s