हा भाऊ कोण…?

मुंबईला ‘धक्का’ देणारा हा  भाऊ कोण…?

मुंबईच्या जुन्या रहिवाशांना भाऊचा धक्का हे नांव चांगल्या ओळखीचे असेल. कोकण रेल्वे सुरू व्हायच्या बरीच वर्षे आधी कोंकणातल्या गांवागांवाहून मुंबईला येणारी एस.टी. सेवा सुरू झाली होती. ती आजही लोकप्रिय आहेच. पण ती सुरू होण्यापूर्वी म्हणजे १९५० च्या दशकापर्यंत कोंकणातले लोक आगबोटींनी मुंबईला नोकरीसाठी येत असत. त्यांची बोट मुंबईतल्या ज्या गोदीमध्ये लागत असे त्याला भाऊचा धक्का असे नाव होते. बोरीबंदर हे रेल्वे स्टेशन आणि भाऊचा धक्का ही दोन मुंबईच्या दळणवळणाची मुख्य ठिकाणे होती. आता आगबोटीने होणारी प्रवासी वाहतूक बंदच झाली आहे आणि मालवाहतुकीसाठी न्हावा शेवा इथे जे एन पी टी इथल्या बंदराचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. हा भाऊचा धक्का आता नांवापुरताच उरला आहे. त्यातला हा भाऊ म्हणजे कोण याची माहिती खाली दिली आहे.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी म्हणजे साधारण १९३२ च्या सुमारास महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूकीस सुरुवात झाली. मात्र एसटीचा जन्म तेव्हा झाला नव्हता. तो झाला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात. मात्र तोपर्यंत म्हणजे अगदी १८व्या शतकातही वाहतूकीचे महत्वाचे साधन जलमार्ग किंवा काही खासगी कंपन्यांकडून सुरु असलेली रस्ते वाहतूक हेच होते. कोकणतील लोकांचा मुख्य आधार समुद्रमार्गे बोटी अथवा गलबतांव्दारे होणारी वाहतूक हाच होता. मुंबई बेटावर मालाची अथवा प्रवांशांची वाहतूक मचवे किंवा गलबतांद्वारे होत असे. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात कुठेही नांगर टाकत असे. मग खच्चून भरलेल्या मचव्यांवर हिंदकळत कोकणी माणूस चिखलाने भरलेल्या मुंबईच्या किनाऱयावर उतरत असे. हे हाल नेहमीचे असत. त्यामुळे काही छोट्या- मोठ्या दुर्घटानाही घडत होत्या. ब्रिटीशांनाही या त्रासाची कल्पना होती, त्यांना कळत होतं पण वळत नव्हतं.

हे रोजच दृश्य पाहून तेथे कंत्राटदारी करणारा एक माणूस हळहळत होता. त्याचं नाव होतं… लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य. या अस्सल मुंबैकर पाठारे प्रभूचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण जवळच्या कारंजा गावचा, १७८८ सालचा. हे अजिंक्य कुटुंब १८०१ मध्ये मुंबईत आले. अत्यंत मेहनती आणि हुशार असलेल्या लक्ष्मण यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या गन कॅरिएजमध्ये नाेकरी लागली. कुलाब्याच्या या गन फॅक्टरीत तोफखाना विभागात कॅप्टन रसेल हा अधिकारी होती. त्याच्या विभागात एका मराठी माणसाने एकदा चोरी केली. लष्करी शिस्तीनुसार त्याला फटक्यांची सजा सुनावण्यात आली. सर्वासमक्ष या भारतीय कामगाराला फटके खावे लागणार या विचारानेच लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाले. त्यांनी रसेलसाहेबांकडे रदबदली केली. स्वत: राष्ट्राभिमानी असलेल्या रसेल साहेबांना लक्ष्मण यांचे कौतुक वाटले. बेहद खूष होउन त्यांनी लक्ष्मण यांना मिठी मारून माय ब्रदर असे उदगार काढले. त्यावेळी कामगारांमध्येही लक्ष्मण यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला. ते त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानू लागले, आणि लक्षम्ण अजिंक्य यांचे ’भाऊ’ असे नामकरण झाले. ते अखेरपर्यंत भाऊ याच नावाने ओळखले गेले.

याच पार्श्वभूमीवर कॅ. रसेलने लक्ष्मण यांना व्यापार क्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले. भाऊ कंत्राटदार झाले. हातात पैसा खेळू लागला. मुंबईच्या पूर्व किना-यावरील बोटीच्या प्रवाशांची समस्या दिवसेंदिवस जास्त प्रकर्षाने जाणवू लागली. व्यापारामध्ये बंदराची निकड होतीच. सरकारचा खजिना रिकामा असल्यामुळे मालकी हक्काने बंदर बांधण्यासाठी इंग्रजांनी अर्ज मागवले. लक्ष्मण अजिंक्य उर्फ भाऊंनी अर्ज भरला. काही अटी-शर्तींवर तो मंजूरही करण्यात येऊन, बंदराचा आराखडा सादर करावा असे भाऊंना सांगण्यात आले. भाऊंनी आराखडा तयार करताना समुद्राच्या भरती-ओहोटीचा आणि एकूणच पर्यावरणाचा अभ्यास केला. मातीचा भराव टिकणार नाही म्हणून कच-याचा भराव टाकण्याची भाऊंची संकल्पना होती. कचरा विल्हेवाटीचे कंत्राट भाऊंकडे होतेच. त्यामुळे ओला झाल्यावर कच-याचा लगदा होतो हे भाऊंना माहित होते. त्यांनी समुद्रात कच-याचा भराव टाकला. अनेक अडचणींवर मात करीत तब्बल चार वर्षांच्या अथक परिश्रमनंतर या धक्क्याचे काम पूर्ण झाले. तो पुढे भाऊचा धक्का या नावाने ओळखला जाऊ लागाला.

कोकणातील चाकरमान्यांचा जिवाभावाचा सखा म्हणजे हा धक्का…या चाकरमान्यांची घराकडे जाण्याची ओढ आणि या अवाढव्य मुंबापुरीत पाउल ठेवल्यावर होणारी हुरहुर …हे दोन्ही या भाऊच्या धक्क्याने अनुभवले. १९७० पर्यंत सदासर्वकाळ गजबजलेला हा धक्का आता काहीसा ओस पडला आहे. ब्रिटीश आमदानीतील सगळ्याच महत्वाच्या वास्तू केवळ ब्रिटीशांनीच उभारल्या आणि त्यामुळेच त्या टिकल्या या आपल्या गोड गैरसमजाला छेद देणारे एक बांधकाम म्हणजे हा ’भाऊचा धक्का’! त्याला आता दीडशे वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने हे स्मरण.

… सर्चशास्त्री

……………………………………… वॉट्सअॅपवरून साभार

 

 

 

ववववव

 

 

– सर्चशास्त्री

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

One thought on “हा भाऊ कोण…?”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s