चहाचे स्तोत्र आणि चहापान एक स्वभावदर्शन

चहापान. ..स्वभावदर्शक क्रिया
(एक शोधनिबंध)

‘चहा पिणे’ या मानवाच्या कृतीने माणसाचा स्वभावधर्म ओळखता येतो. म्हणजे जसा अक्षरावरून तो ओळखतात, राशीवरून अंदाज करतात. ..त्याच धर्तीवर! कारण माणसाचा स्वभाव हा त्याच्या कृतीतून व्यक्त होत असतो.

आता असे काही कृतीवरून अंदाज बांधायचे तर ती कृती रोजच्या जीवनातील हवी, तिच्यात सातत्य हवे व ती एका मोठ्या समुदायाने केलेली हवी. ‘चहा पिणे’ हे या निकषांवर नक्कीच उतरते.

आता चहाच का? कॉफी का नको. संशोधनाकरीता याचा विचार केला होता. तेंव्हा जाणवले की
कॉफी पिणारे हे खास असतात. म्हणजे पहा…कॉफी पिणारी व्यक्ती नेहमी जोरात सांगते , “मी नाही कधी चहा घेत. मला कॉफीच लागते”. तसे चहा पिणाऱ्यांचे नसते. चहा पिणारा वेळ आली तरी चहाची तहान कॉफीवर भागवून घेतो. ‘चहाची टपरी’ असते तर ‘कॉफीचा कॅफे’. असो. ‘K v T’ हा इथला विषय नसल्याने इथेच थांबतो. थोडक्यात चहा हे सर्वसामान्यांचे पेय आहे…म्हणून अभ्यासाकरीता चहापान.

अजून एक. ‘चहापान’ ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली आहे. यात फक्त चहा पिणे इतकेच विचारात घेतलेले नसून त्यात चहा बनवण्याची पद्धत, चहामध्ये वापरलेले पदार्थ, चहा पिण्यामागचा उद्देश याचाही समावेश केलेला आहे.

चहा बनवण्याची खालील पद्धत ही एक सर्वसामान्य पद्धत गृहीत धरलेली आहे.
चहाचे प्रमाण: एक कप पाण्यासाठी दोन चमचे साखर, एक कप चहापत्ती. आधी पाणी व त्यात साखर घालून ते उकळवणे. पाणी उकळायच्या थोडे
आधी चहापत्ती घालणे. मग तो गाळून त्यात चहाचा रंग येईल इतपत दूध घालणे. व मग चहा गरम गरम पिणे.

आता स्वभाव दर्शनाच्या मुख्य विषयाकडे वळूया.

* वरती जी एक चहा बनवण्याची सामान्य पद्धत दिली आहे त्या नुसार जे चहा बनवतात त्या व्यक्ती या प्रवाहानुसार पोहत जाणार्‍या असतात. त्यांना चार चौघांसारखे जीवन जगायला आवडते.

* काहीजण पाणी, दूध, चहा, साखर हे सगळे एकदम एकाचवेळी चहाच्या भांड्यात उकळवून चहा करतात. अशा व्यक्ती ह्या उत्तम  time management करणाऱ्या असतात. गॅस चालू करा..उकळी येईतो मोबाईल अपडेट पहा. ..मग चहा घ्या. हे त्यांना छान जमते.

* घरात काही चहात साखर घेणारे काही बिनसाखरेचा घेणारे. ..असे जरी असले, तरी सगळ्यांसाठी एकच बिनसाखरेचा चहा बनवून ठेवायचा अन मग ज्याने त्याने आवडीनुसार तो बनवून घ्यावा हा विचार मनात ठेवणाऱ्या व्यक्ती ह्या स्वावलंबनाच्या मोठ्या पुरस्कर्त्या असतात.

* प्रत्येक वेळी ताजा चहा बनवणे हे ज्यांना जमते त्या सेवाभावी व्यक्ती असतात. त्या न थकता न कंटाळता सतत सेवा करत राहतात. घरात त्यांना मानाचे स्थान असते. आदराचे स्थान असते.

* पाणी व दूध हे अर्धे अर्धे घेऊन चहा बनवणारे हे एक समतोल विचार करणारे असतात. त्यांचे सगळे कसे प्रमाणात असते. एका ठरावीक विचारधारेने ते चालू इच्छितात.

*कोरा चहा, बिनसाखरेचा चहा पिणारे हे आपल्यावर नियंत्रण ठेवू शकणारे असतात. त्याचवेळी अशा व्यक्तींना आपले वेगळेपण जपायला आवडते आणि त्याची संधी ते सहसा सोडत नाहीत. चारचौघांमधे ते आपल्याकडे लक्ष कसे जाईल हे त्यांना माहीत असते.

* काही जणांना चहा गार झाल्यावर मगच प्यायला आवडते. अशा व्यक्ती ह्या सारे कसे शांतपणे घेणाऱ्या असतात. त्यांना.. हे असेच हवे ते तसेच पाहीजे असले हट्ट नसतात. ते सगळे सहजपणे स्विकारतात.

* चहा म्हणजे त्यात आले हवे, सुंठ हवी, गवतीचहा हवाच. हे मानणारे रसिक असतात, कलाकार असतात. त्यांना समृद्ध जीवन जगायला आवडते.

* काही जणांना चहामध्ये गवतीचहा घातला की उसाच्या रसाचा वास येतो. ह्या व्यक्ती फार चाणाक्ष असतात. कुठलीही लपवाछपवी त्यांच्या ताबडतोब नजरेस येते.

* दुधाळ चहा आवडणारे हे मवाळ, वेळेशी सामावून घेणारे तर काळा (कोरा नव्हे) चहा पिणारे हे कर्मठ वृत्तीचे असतात. परंपरेला जपणारे. चहावर मलईमारके पिणारे हे श्रीमंतीत रहाणारे व तसेच रहायला आवडणारे असतात. ‘खाईन तर तुपाशी’ सारखे त्यांचे वागणे असते.

* चहा सोबत. …एखादा झुरका किंवा झुरक्यासोबत एक चहाचा घोट. ..या व्यक्ती ‘king size’ जीवन जगू इच्छितात. अगदी कुठलाही धोका पत्करून देखील ते तसे जगतात.

* चहा बिस्किट हे एक छान काँबिनेशन. यातही स्वभावाच्या छटा दिसतात.  मारी, ग्लुकोज खाणारे हे तब्येत जपणारे….गुड्डे खाणारे हे रॉयली जगणारे ….तर खारी, मोनॅको खाणारे हे उमद्या स्वभावाचे असतात.

* चहा सोबत चिवडा, खाखरा, भजी ज्यांना लागतात ते ‘ये दिल मांगे मोर’ कॅटेगरीतले. त्यांना थोडक्यात समाधान नसते. गोड, तिखट असे एक चवदार जीवन त्यांना जगायला आवडते.

* सकाळी उठल्या उठल्या चहा हवाच, दुपारचा चहा चुकला तर डोके चढते. अशा व्यक्तींना आयुष्यात आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे हे क्लियरकट माहीत झालेले असते. त्यांचा प्रवास त्या मार्गाने सुरू असतो.

टिपा: १) हा एक आंतरीक रिपोर्ट आहे. २) सगळ्याच नियमांना किंवा ऑब्झर्वेशन्सना अपवाद असतो.

वॉट्सॅपवरून साभार  दि.१९-०४-२०१९

लेखक: anandghare

आंजर्जालविश्वात भटकत असतांना वेचलेले शंख, शिंपले आणि गारगोट्या या ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे. त्यात एकादा मोती किंवा हिरकणी पण सापडेल कदाचित.

3 thoughts on “चहाचे स्तोत्र आणि चहापान एक स्वभावदर्शन”

  1. फारच छान ! रोज सकाळी दुपारी आणि सायंकाळी अत्यंत आदराने १तासभर आळ्वल्यास हमखास गुण येतो,शांती लाभते.असा अनुभव कोणाला आला असल्यास अवस्य कळवावे !!!!

  2. हे शिवव्रतासारखे आहे. एकदा याचा नेम धरला की त्यानंतर हे स्तोत्र आळवले नाही तर मात्र अस्वस्थता वाटते असा अनेक लोकांचा अनुभव आहे. :))

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s