ही गाणी ऐकलीत का?

हे पान उघडले तेंव्हा आंतरजालावरील उपलब्ध असलेल्या गाण्यांची संख्या कमी होती आणि ती शोधावी लागत असत. आजकाल यू ट्यूबवरील गाणी मोबाइल फोनवर ऐकणे खूप सोपे झाले आहे आणि त्यांची संख्या असंख्य इतकी झाली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वीच मी या पानावर नवी माहिती जमवणे थांबवले आहे. १०-१२-२०२१.

पं.रविशंकर सतार वादन

https://www.youtube.com/watch?v=S_mfO7uhvbU

शुभदिन आयो – उस्ताद बडे गुलामअली खान.. –  मुगलेआझम
http://www.youtube.com/watch?v=m_xiXuhbYAM&feature=related
————————————————————————————————————–

भारतरत्न पं.भीमसेन जोशी

माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई
पुंडलीक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू
माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा
एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण
http://www.youtube.com/watch?v=Fbxd_zndHhU

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देवविठ्ठल देवपूजा
माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल
गुरू विठ्ठल गुरूदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला म्हणून कळिकाळा पाड नाही
http://www.youtube.com/watch?v=Vobk4NI6WNw&NR=1

इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची
ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव नाचती वैष्णव मागेपुढे
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे
उजेडी राहिले उजेड होउन निवृत्ती सोपान मुक्ताबाई
http://www.youtube.com/watch?v=YZtb0zq6ikU&NR=1
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
दरबारी आले रंक आणि राव,  सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होउनी निस्संग
जनसेवेपायी काया झिजवावी, घाव सोसुनीया मने रिझवावी
ताल देउनीया बोलतो मृदंग
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाय़ी एकएक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग
http://www.youtube.com/watch?v=5DLeSsL-FHw&NR=1
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग
भावभक्ती भीमा उदक ते वाहे बरवा शोभतहे पांडुरंग
दया क्षमाशांती हेचि वाळवंट मिळालासे थाट वैष्णवांचा
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाचि वेणुनाद शोभतसे
दश इंद्रियांचा एकमेळा केला ऐसा गोपाळकाला होत असे
देखिली पंढरी देही जनी वनी एका जनार्दनी वारी करी

http://www.youtube.com/watch?v=VUZjuYpjqA8&NR=1
भीमसेन जोशी लता मंगेशकर- श्रीनिवास खळे
बाजे रे मुरलिया बाजे
अधर धरे मोहन मुरलीपर होठपे माया बिराजे
हरे हरे बाँसकी बनी मुरलिया मरममरमको छुए अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया जिसपर कनकमुंदरीया साजे
पीली मुंदरी अंगुरी स्याम मुंदरीपर राधाका नाम
आखर देखे सुने मधुर स्वर राधा गोरी लाजे
भूल गयी राधा भरी गगरिया भूल गयी गोधनको चारिया
जाने न जाने ये वो जाने जाने रग जग जागे
http://www.youtube.com/watch?v=1TBmyHhmwDk&feature=related
शास्त्रीय संगीत

पं,भीमसेन जोशी
मियाकी मल्हार
ममदसारंगीलेरे तुमबिन मैका

http://www.youtube.com/watch?v=Bu2O21kASKw&feature=related

http://www.youtube.com/watch?v=Bu2O21kASKw

मुलतानी
नैननमे आनबान
http://www.youtube.com/watch?v=eEgEqWDyJxA&feature=related

वृंदावनी सारंग
गाऊंमै तोरे बलिहारी
http://www.youtube.com/watch?v=S5GEIOlFJhg&feature=related

दरबारी कानडा
झनकनकवा मोरेबिचवा
http://www.youtube.com/watch?v=z_L4fiy1GA0&feature=related

भैरवी
जो भजे हरीको सदा वोही परम पद पावेगा
http://www.youtube.com/watch?v=Zm76KV-Vfu0&feature=related
http://www.youtube.com/watch?v=dsD3hBs6Ap0

भज मन रामचरम सुखदायी
http://www.youtube.com/watch?v=iqxEgpdNecM&feature=related

यमनकल्याण
श्याम बजाये आज मुरलिया
http://www.youtube.com/watch?v=a24p1kBjrZ0&feature=related
जुगलबंदी पं,भीमसेन जोशी डॉं बालमुरलीकृष्ण
मानस भजरे गुरुदेवम्
अमृतमधुरसंगीतसुधाकरम्
अमलगुणान्वितम्अद्भुतचरितम्
तंबुरवीणावंशीलोलम् त्यागराजगुरुस्वामीनम् सततम्
http://www.youtube.com/watch?v=OKtM1StoAco&feature=related

जुगलबंदी पं,भीमसेन जोशी डॉं बालमुरलीकृष्ण
तराना
तगिततिदतिंदनादतिदना
http://www.youtube.com/watch?v=NT1sFn3a7kE&NR=1
पं.भीमसेन जोशी
जयजगदीश्वरी मात सरस्वती
http://www.youtube.com/watch?v=SmFfhvYk-rQ

भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
चित्रपटः NODI SWAMI NAAVIRODU HEEGE … Sung my maestro pt.Bhimsen Joshi..lyrics by purandara dasaru.. feat: ananthnag shankarnag , julie lakshmi
http://www.youtube.com/watch?v=LqypyI0u390&feature=related

देवा बंदानम्म स्वामीबंदानो – पुरंदरदास
http://www.youtube.com/watch?v=Oh1m1VoMoAA&feature=related

अणुरेणिया थोकडा संत तुकाराम पं.भीमसेन जोशी

—————————————————————————-

राग यमनः- सखी ये री आली.. (येथे ऐका)

संजीव अभ्यंकर
http://www.youtube.com/watch?v=TmKMG0F2V-I&feature=related

हेच गाणे लतादीदींच्या आवाजात
लता मंगेशकर
http://www.youtube.com/watch?v=fRAM68Wgqn4&feature=related

सखी ये री आली पिया बिन…यमन रागातली ही पारंरिक बंदिश..हिंदुस्थानी रागसंगीताचा बादशहा राग यमन..!
यमनबद्दल काय बोलावं, काय लिहावं? सारे शब्द तोकडे पडतात! प्रसन्नता, प्रासादिकता म्हणजे यमन. माणसातलं माणूसपण म्हणजे यमन, चांगुलपणा म्हणजे यमन, माणुसकी म्हणजे यमन, हळवेपणाम्हणजे यमन, संवेदनाशीलता म्हणजे यमन! कुणा सुहृदाने पाठीवरून प्रेमानं फिरवलेला हात म्हणजे यमन, यमन म्हणजे राम, यमन म्हणजे कृष्ण, यमन म्हणजे साक्षात परब्रह्म!
ज्याला यमन गाता आला त्याला गाणं आलं, ज्याला यमन कळला त्याला गाण्यातलं मर्म कळलं, ज्याने यमन ऐकला तो आयुष्य जगला, ज्याने यमन ऐकला त्याचा मानवजन्म सार्थकी लागला!
आपल्या रागसंगीतातले राग हे ऋषिमुनींनी निर्माण केले असं म्हणतात.. ज्या कुणा ऋषीला, ज्या कुणा मानवाला यमनची स्वरसंगती सुचली त्याची मानसिक अवस्था किती उन्नत असेल!
संजीवने ही बंदिश अगदी साधी सुंदर गायली आहे, छान गायली आहे…
— तात्या अभ्यंकर.

—————————————————————————————-

पद्मनाभा नारायणा .. एकच गाणे दोन गायकांच्या आवाजात .. रघुनंदन तर नावाजलेले आहेतच, मुग्धाचे गाणे पण मुग्ध करणारे आहे.
पं.रघुनंदन पणशीकर

आणि बाल कलाकार मुग्धा वैशंपायन

————————————————————————————————————————————————-

राग झिंझोटीवर आधारलेली काही गाणी

http://chandrakantha.com/raga_raag/film_song_raga/jhinjhoti.shtml

Badli Badli Duniya Hai Meri  Film – Sangeet Samrat Tansen Year – 1962
Chhup Gaya Koi Re Door Se Pukar Ke –    Film – Champakali     Year – 1956
Ghungharu Ki Taraha, Bajta hi Raha Hun Main –    Film – Chor Machaye Shor     Year – 1974
Jaa Jaa Re Jaa, Balmava –    Film – Basant Bahar     Year – 1956
Jaun Kahan Bata E Dil –    Film – Chhoti Bahen     Year – 1959
Koi Hamdam Na Raha, Koi Sahara Na Raha      Film – Jhumroo    Year – 1961
Mere Maheboob Tujhe Meri Muhabbat Ki Qasam –    Film – Mere Mehboob    Year – 1963
Mose Chal Kiye Jaye Hai Re Hai Hai Dekho Saiyan Beiman    Film – Guide    Year – 1965
So Ja Rajkumari So Ja –    Film – Zindagi    Year – 1940
Teri Ankhon Ke Siva Duniyan Mein –    Film – Chirag    Year – 1969
Thumak Chalat Ramchandra, Baajat Paijaniya  – a traditional bhajanTum Mujhe Yun Bhula Na Paoge –    Film – Pagla Kahin Ka    Year – 1970

——————————————————————————————————–

स्वरसम्राज्ञी लतादीदींची कांही अजरामर खूप जुनी गाणी

तुम ना जाने किस जगापे खोगये …
…..
लूट कर मेरा जहाँ, छुप गये हो तुम कहाँ..
***

http://www.youtube.com/watch?v=qbTowIKKPZA&feature=related

जानेवालेसे मुलाकात न होने पायी । दिलकी दिलमेंही रही बात म होने पायी ।।
चित्रपट – अमर
http://www.youtube.com/watch?v=ZQwGWVP_-c4&feature=related

———————————————————————————————————-

 

आशा भोसले यांची कांही गाणी

आशा भोसले यांची गाणी त्यांच्याच तोंडून ऐका आणि पहा.
जिवलगा कधी रे येशील तू.. http://www.youtube.com/watch?v=hJDWdhHxV0k&feature=related
मन तृप्त करणारं अप्रतिम गाणं! बाबूजींनी बांधावं (त्यांनाही पहा) आणि आशाताईंनी सार्‍या बारकाव्यानिशी सही सही गावं!

माझा होशित कां http://www.youtube.com/watch?v=hheTQcfRJ1s&feature=related

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास कां रे … सुरेश भटांचे काव्य आणि हृदयनाथांचे संगीत

http://www.youtube.com/watch?v=c3umoZhf2Mw&feature=related

————————————————————————————————————————————————-

लहान लहान बालकांचे मनोगत ह्या गाण्यात किती हळूवारपणे प्रश्नोत्तरामध्ये घातले आहे…!!!
ती जीवनाची सुरेख अशी philosophy आहे खरी…
आशा-रफी यांचे स्वर अक्षरश: मोहवून टाकतात…संगीत अत्यंत गोड आहे…
वाटतं १९५६ साली हे जे भारत कसा होणार हे सांगितले आहे
नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठीमे क्या है

———————————————————————————————————-

संदीप खरे – सलिल कुलकर्णी

दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला

http://www.youtube.com/watch?v=xaH5-4Lp1qw&feature=related

I&feature=player_embedded#!

दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई।
नीज दाटली डोळ्यात तरी घरी कुणी नाही।।
http://www.youtube.com/watch?v=Q-qlT0-XuL8&NR=1

————————————————————————————————————————————————-

श्री.तात्या अभ्यंकरांची शिफारस

एकदाच यावे सखया तुझे गीत कानी । धुंद होउनी मी गावे धुंद त्या स्वरांनी।।
गायिकाः सुमन कल्याणपूर
http://www.youtube.com/watch?v=z5x7XysL12I

केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर।
गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर।।
गायिकाः सुमन कल्याणपूर
http://www.youtube.com/watch?v=E-FivmXWUQ0&feature=related

 

 

 

————————————————————————————————————————————

 

डोली मी बिठाई के कहार लाए मोहे सजनाके द्वार..
<a href=”http://www.youtube.com/watch?v=gFIZfJeTZ1A”>(येथेऐका)</a>

‘ओ रामा रे..!’ थोरल्या बर्मनदांची खास बंगाली ढंगाची गायकी.. आवाजाची जात जरा वेगळीच, परंतु स्वर मात्र सच्चा, अगदी सुरेल! खेमट्याचा किंवा दुगुन रुपकचा छान ठेका.. बंगाली लोकसंगीतातून जन्माला आलेली चाल..सचिनदा अगदी मन लावून ताहेत…एकतानतेने एका परित्यक्तेची कर्मकहाणी सांगताहेत! खास करून पश्चिम बंगालचा सामाजिक आशय असलेलं गाणं.. मूल होत नाही म्हणून बायकोला अगदी सहजरित्या टाकून दुसरं लग्न करणे आणि पहिलीचा छळ सुरू होऊन तिची हकालपट्टी होणे. पुन्हा माहेरी जायची सोय नाही कारण माहेरी खाणार काय? माजोरी सरंजामशाही, सावकारी आणि त्यामुळे पश्चिम बंगालच्या खेड्यापड्यात उत्पन्न झालेली वर्षानुवर्षाची गरिबी आणि सहज दृष्टीस पडणारी अन्नान्न दशा..!

पतझड, ओ बन गयी पतझड, बैरन बहार..! आणि परित्यक्तेपासून ते कोठ्यापर्यंतचा पुढला प्रवास! तिथे भेटणारा एक संगीतरसिक, द्रोणातून कचोरी-समोसे आणि मिठाई आणणारा, जीव ओवाळून टाकणारा कुणी आनंदबाबू..! ‘रैना बिती जाए’, ‘चिन्गारी कोई भडके’ यासारखी एकसे एक गाणी देणारे पंचमदा, किशोरदा आणि दिदि!

अमरप्रेम! सामाजिक आशय असलेली उत्तम कथा, उत्तम संगीत, उत्तम अभिनय! हिंदी चित्रपटसृष्टीला पुन्हा येतील का हो असे वैभवाचे दिवस?

खिजाकेफूलपे आती कभी नही बहार नही। मेरे नसीबमें ऐ दोस्त तेरा प्यार नही। — किशोरकुमार
http://www.youtube.com/watch?v=pkQyWjNhqt0

ःःःःःःःःःःः—————————–ःःःःःःःःःःःःःःः—————————————

“मारुती कांबळेचं काय झालं?”

“मास्तर, गप-गुमान र्‍हावा की.. कशाला उगाच नसत्या चौकश्या?”

‘सख्या रे घायाळ मी हरिणी..’

http://www.youtube.com/watch?v=yCE7BpAN25g&feature=related

सामना चित्रपटातलं एक जबरदस्त गाणं.. भास्कर चंदावरकरांची खानदानी चाल, जगुअण्णांचे शब्द आणि दीदीची उच्च गायकी!

स्मशान शांतता असलेल्या एका ऐसपैस महालातली एक निर्घृण हत्या! सत्याचा अवाज दाबून टाकणारी..! उषा नाईक नाचते आहे आणि हे गाणं गाते आहे.. पण नाचणारी ती उषा नाईक नव्हे, तिचं नाव नियती! मजेत, मस्तीत नाचणारी नियती!

कुण्या द्वाडानं घातला घाव,
केली कशी करणी..!
सख्या रे घायाळ मी हरिणी!

सारी किमया ‘सख्या रे..’ तल्या कोमल धैवताची. जबराच..!

का़जळकाळी गर्द रात अन् कंप कंप अंगात,
सळसळणार्‍या पानांनाही रातकिड्यांची साथ.!

गाण्याचं चित्रिकरण, चाल, शब्द, स्वर, गायकी, डॉ लागू, मोहन आगाशे, आणि बिनदिक्कतपणे कोल्डब्लडेड खून करणारे निळूभाऊ! सगळंच भन्नाट..!

अजूनही साखरसम्राटांच्या महाराष्ट्रात मारुती कांबळेचे आणि मोहन आगाशेचे आवाज असे कायमचे दाबून टाकले जात असतील का हो? कुणास ठाऊक?!

———————————————————————————————————————————-

तुम हो मेरे दिल की धडकन..
(येथे ऐका) http://www.youtube.com/watch?v=QIiDp2VDeAw

मंझील चित्रपटातलं ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणं सगळ्यांनाच माहित्ये. परंतु हे गाणं त्या मानानं अनवट…पंचमदांच्या या गाण्याचा स्वभाव, चाल, अगदी शांत.. शब्दही छान.. बच्चनसाहेबांची मैफल सुरू आहे.. पुढ्यात हार्मोनियम घेऊन गवयाचं जॅकेट वगैरे घालून बच्चनसाहेब शांतपणे गाताहेत..

तुम जो़ नही तो कैसी खुशी  मायुसियोंमे डुबी है जिन्दगी..

बच्चनसाहेब गाताहेत परंतु मैफलीत त्यांचं मन नाही. कारण गाणं ऐकायला त्यांची प्रेयसी मौशमी चॅटर्जी अजून आलेली नाहीये..

तुम्हे जो देखा तो पलको तले    लाखो दियेसे देखो जलने लगे!

आली! सुंदर, प्रसन्न दिसणारी मौशमी मैफलीत आली आणि बच्चनसाहेबांचा चेहरा खुलला! म्हटलं तर अगदी साधंच गाणं, पण तितकंच सुरेख आणि शांत! अमिताभ बच्चन.. एक खूप मोठा कलाकार.. अगदी साधा, सुंदर परंतु बोलका अभिनय केला आहे हे गाणं म्हणताना त्यांनी.. मै हू ‘झुम झुम झुम झुम झुमरू’ किंवा ‘देखा ना हाए रे सोचाना..’ या सारखी गाणी गाणारेही किशोरदाच आणि हे शांत गाणं गाणारेही किशोरदाच! असा कलावंत होणे नाही..!

— तात्या अभ्यंकार.

————————————————————————————-

उंबरठा
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे।
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे।।
http://www.youtube.com/watch?v=wVk5SzDOhFI

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो। सारखे अस्तित्व माझे पेटतांना दरवळू दे ।।
लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु,  तापल्या मातीत माझा मानाने गळू  दे!
भटसाहेबांना सलाम..!

———————————————————————————————————————————

‘एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात’

http://www.youtube.com/watch?v=7vv3pJfEoDk

पुन्हा एकवार एक सुंदर यमन..!
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात..! किती सुंदर, चित्रदर्शी कल्पना आहे!
एक साधं, सुरेख गाणं.. भजनी ठेका, यमनातली चाल.. गदिमांचे शब्द, वसंत पवारांचं संगीत, बाबूजींचा स्वर…अजून काय पाहिजे?
वने, माळराने, राई,   ठायी, ठायी केले स्नेही
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात..
‘वने माळरानी राई..’ तल्या शुद्ध गंधाराबाबत, बाबूजींच्या आवाजातल्या गोडव्याबद्दल, स्वरातल्या भावाबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल काय बोलावं? ‘ठायी ठायी केले स्नेही..’ – म’धनिध पगपप संगती किती हळवी गेली आहे! सारे शब्द तोकडे पडतात..!
पंखावरून हात फिरणं, पाठीवरून हात फिरणं हाच खरा तर ओलावा..हेच खरं तर माणूसपण..!
असो.. इतकी साधी, परंतु तितकीच सुंदर गाणी कुठे गेली आता?

———————————————————————————————————————————————-

दो नैना और एक कहानी..  चित्रपट – मासूम
http://www.youtube.com/watch?v=MZL_dpb_6Lo
पंचमदांचं एका सहज सुंदर चालीतलं परंतु एक वेगळंच गाणं..आरती मुखर्जीने म्हटलंयही अगदी छान..
दो नैना और एक कहानी, थोडासा बादल, थोडासा पानी, और एक कहानी!
गाण्याची चाल अगदी कुणी सहज बोलल्यासारखी-गप्पा मारल्यासारखी, सुलझी हुई, समजावणीची, मर्मबंधातल्या ठेवीची! ‘और’ शब्दावरचं मिंडकाम सुरेख..! ‘एक कहानी’ ची ‘पप ध म’प..’ ही स्वरसंगती अगदी भाबडी, निरलस..
थोडीसी है जानी हुई, थोडीसी नयी, जहा रुके आसू वही पुरी हो गई, है तो नयी फिर भी है पुरानी..!
गुलजार साहेबांनी सुंदर लिहिलंय गाणं..
केवळ त्या कहानी करताच नव्हे, तर ह्या गाण्याच्या चालीकरताही ‘थोडीसी है जानी हुई, थोडीसी नयी’ किंवा ‘है तो नयी फिर भी है पुरानी’ हे शब्द अगदी फिट्ट बसतात..’थोडीसी नयी’ आणि ‘पुरी हो गई’ ची स्वरसंगती अगदी कॉन्ट्रास्ट तरीही अनोखी.. आणि हीच पंचमदांची खासियत..! आणि अश्या काहीश्या वैचित्र्यपूर्ण स्वरसंगतीतूनही अगदी नैसर्गिक वाटणारं, स्वाभाविक वाटणारं गाणं बांधणं हीच पंचमदांची प्रतिभा..!

सलाम.

—————————————————————————————————————————————-

किनारे किनारे दरिया ..
कृपया येथे ऐका – http://www.youtube.com/watch?v=SM0mgE2otrw&feature=relatedकुमारांची एक छान रंगलेली मैफल. कुमार रंगून गात आहेत आणि श्रोते तेवढ्याच रसिकतेने दाद देत आहेत अशी ही मैफल.. राग सुरू आहे अर्थातच यमन.
———————-
प्यार का पेहेला खत लिखने मे वक्त तो लगता है.. नये परिंदे को उडने मे वक्त तो लगता है..!
कृपया येथे ऐका – http://www.youtube.com/watch?v=AQxty4mjwpo
जगजितसिंगसाहेबांची सुरेख मैफल रंगली आहे..  त्यंत दर्दभ-या, सुरिल्या, ओल्या आवाजाचे धनी जगजितसिंगसाहेब..! आणि त्यांची ही सुंदर गझल..
जिस्म की बात नही थी उनके दिल तक जाना था लंबी दूरी तै करने मे वक्त तो लगता है.. क्या केहेने..!फार लौकर गेले जगजितसिंगसाहेब.. अजून खूप खूप हवे होते…– तात्या.
——————————————-
दिल ढुंढता है..
मदनमोहनसाहेबांचं दीदी आणि भुपेन्द्र सिंगने गायलेलं माझं अतिशय आवडतं गाणं..
गुलजारसाहेबांचा मौसम.. एक सुरेख चित्रपट..

Dil Dhoondhta hai phir wahi…furssat ke raat din (Good Quality Video)

Beautiful song from movie Mausam , featuring Sharmila tagore and Sanjeev kumar…..super
———————

पं रविशंकर यांचं एक सुरेख गाणं..

शामकल्याणसारख्या अत्यंत प्रसन्न रागाचा बेस.. तितकीच प्रसन्न आणि ओघवती चाल अत्यंत Rich म्हणावं असं ऍरेंजिंग, आणि दीदीची दैवी गायकी..!
जाने कैसे सपनो में.. कृपया येथे ऐकाhttp://www.youtube.com/watch?v=WteixWvAeFk

2 thoughts on “ही गाणी ऐकलीत का?”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: