स्व.गदिमा आणि बाबूजी

महाकवि स्व.गजानन दिगंबर माडगूळकर आणि महान संगीतकार व गायक स्व.सुधीर फडके म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके गदिमा आणि बाबूजी या दोघांच्याही जन्मशताब्दीचे वर्ष सध्या चालले आहे. या दोघांनी मिळून इतके मोठे काम करून ठेवले आहे की यातल्या कुणाही एकावरचा लेख दुसऱ्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून मी या दोघांबद्दल मिळालेले लेख या पानावर संग्रहित केले आहेत आणि हे काम वर्षभर चालू राहील.

१. सुधीर फडके यांचे मराठी... आसाम- मणिपूरमध्ये - ---- श्री. मकरंद करंदीकर
२. असे हे मराठी प्रतिभावंत
३.'आधुनिक वाल्मिकी'गदिमा .. शिक्षणविवेक दि.१४-१२-२०१८ ..डॉ. उषा कोटबागी 
४. बाबूजी ... सूर अजूनही गाती .... पं.सुरेश वाडकर
५. मला भावलेले गीत रामायण ... प्रसन्न गोरे 
६. गीतरामायणाची माहिती ... माधव विद्वांस दि.०१-०४-२०१९ 
७. घनघनमाला कधी दाटल्या ... सुमित्र माडगूळकर दि.१६-०६-२०१९
८. एकतारीसंगे एकरूप झालो ... ग.दि.माडगूळकर दि. ०९-०७-२०१९
९. बाबूजींची प्रसिद्ध गाणी  ..... माधव विद्वांस दि. २५-०७-२०१९
१०. माना मानव वा परमेश्वर ... सुधीर फडके  दि.१०-०८-२०१९
११. सरस्वतीसेवक गदिमा .... सुमित्र माडगूळकर दि.१२-१०-२०१९
१२. घननीळा लडिवाळा ...  गीताची कहाणी दि. ०५-०३-२०२०
१३. नदी सागरा मिळता  ... ग.दि.माडगूळकर  दि. १५-०७-२०२० 
१४. नाचनाचुनी अति मी दमले ... ग दि मा दि.०८-१०-२०२०
१५. जोगिया     . . . . ग.दि.माडगूळकर दि. २९-०४-२०२१
१६. का रे दुरावा? . . . ग.दि.माडगूळकर + सुधीर फडके दि. १०-०६-२०२१
१७. विलक्षण योगायोग - गदिमा आणि मजरूह सुलतानपुरी दि. १८-०६-२०२१
१८. बिन भिंतीची उघडी शाळा - ग.दि.माडगूळकर   दि.०१-०८-२०२१ 
१९. काय वाढले पानावरती . . . ग.दि.माडगूळकर   दि. २९-०९-२०२१ 
२०. मरावे परी गीतरुपी उरावे !! गदिमा . माधव विद्वांस दि. ०३-१०-२०२१
२१. आठवणीतील गदिमा - . . . . . पु.ल. देशपांडे  दि. ०३-१०-२०२१ 
२२. संथ वाहते कृष्णामाई . . .  गदिमा  दि.२२-०१-२०२२
२३. या चिमण्यांनो परत फिरा . . . गदिमा दि.०-०३-२०२२   

यांच्याशिवाय खाली दिलेले लेख अवश्य वाचावेत
१. स्वरगंधर्व बाबूजी – (सुधीर फडके) —-लेखक : सुमित्र माडगूळकर
https://anandghare.wordpress.com/2018/08/22/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0/

२. गीतरामायणाचे रामायण
https://anandghare.wordpress.com/2018/03/26/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3/

३. “संत माळेतील मणी शेवटला…  आज ओघळला एका एकी … ”  …….सुमित्र माडगूळकर

संत माळेतील मणी शेवटला… स्व.गदिमा

४. जन्मशताब्दि अमृतयोग : गदिमा, बाबूजी आणि पुल यांच्या गीतांचे संकलन आणि ‘पुल’कित गदिमा  दि.२६-०५-२०१९

जन्मशताब्दि अमृतयोग

५. तोच चंद्रमा नभात या भावगीताची कथा  दि. २२-१०-२०१९

तोच चंद्रमा नभात या भावगीताची कथा

 स्व. बाबूजी, गदिमा आणि पुल यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने अमेरिकेमधील उत्साही तरुणांनी तयार केलेले व्हीडीओ.   भाग -१

भाग २

 

१. सुधीर फडके यांचे मराठी… आसाम- मणिपूरमध्ये !
(बाबूजींचा एक अज्ञात पैलू !)

—- श्री. मकरंद करंदीकर

बाबूजी म्हणजे कै. सुधीर फडके यांची जन्मशताब्दी आपण साजरी करीत आहोत. त्यांचे व्यक्तिमत्व हे असंख्य पदर असलेले एक भरजरी वस्त्र होते.

गायक, वादक, संगीतकार म्हणून आपण त्यांना ओळखतोच.
या शिवाय गीत रामायण म्हटले तर आधी पटकन बाबूजी आणि नंतर ग. दि. माडगूळकर आठवतात.
सावरकरांवरील चित्रपट म्हणजे बाबूजींच्या आयुष्याचा कळसाध्याय !
दादरा – नगरहवेली मुक्तीसंग्राम आठवला की बाबूजी आठवतात.
सुंदर सुरावटींसाठी वाद्ये हाती धरणाऱ्या बाबूजींच्या हातांनी देशासाठी बंदूकाही हाती घेतल्या होत्या.

कै. सुधीर फडके यांचा एक फारसा माहित नसलेला एक पैलू मुद्दाम सांगण्यासारखा आहे.

त्यांचा सुपुत्र श्रीधर आणि मी कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो.
आमच्या दोघांच्या मैत्रीमुळे मी खूपवेळा त्यांच्या दादरच्या घरी गेलो आहे.
घरी कायम अनेक प्रतिष्ठितांचा राबता असायचा.

त्यांच्या घरात ईशान्य भारतातील ( आसामी तोंडवळ्याची, गोरी, बारीक डोळे असलेली ) काही मुले राहत असत.
त्यांचे वेगळेपण लगेच लक्षात येत असे.

तेथील मुलांना, देशभरातील ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा लोकांनी आपापल्या घरी नेऊन, सांभाळून त्यांच्या शिक्षणाची सोय करावी अशी संघाची सर्वांना विनंती होती. त्याला साद देऊन बाबूजींनी आसाम, मेघालय, अरुणाचलप्रदेश, अशा राज्यातील काही मुलांना आणून दादरला आपल्या घरी पूर्ण वेळ ठेऊन घेतले.
त्यांचा सर्व खर्च ते करीत असत.
शिकून काही मुले त्यांच्या घरी परत गेली की आणखी काही मुले बाबुजींकडे येऊन राहत असत.

ही मुले त्यांच्याकडे अगदी घरच्यासारखी राहत.
ही मुले मराठी शिकत असत, बोलत असत. श्रीधरच्या आईला ( ललिताबाई फडके ) मदत करीत असत.
यातील एक मुलगा तर आमच्याबरोबरच कॉलेजमध्ये शिकत होता.

बाबूजी म्हणजे काही कोट्यवधी रुपये कमविणारे बॉलिवूडचे संगीतकार नव्हते. पण त्यांचे जे काही उत्पन्न होते त्यातून ते हा सर्व खर्च करीत असत.
देशभक्तीचे पक्के संस्कारच त्यांना हे करायला उद्युक्त करीत असावेत.
हे सर्व ते कुठल्याही गाजावाजाशिवाय करीत होते.
अशा या मुलांमधून मोठा झालेला एक मुलगा आता ईशान्य भारतातील एका राज्याचा मोठा अधिकारी आहे.
त्याचे नाव (बहुधा) श्री. फुनशी असावे.
कांही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर सह्याद्री वाहिनीच्या साडेनऊच्या बातम्यांमध्ये त्याची मुलाखत घेण्यात आली.
तो खूप छान मराठी बोलत होता. बाबुजींबद्दल बोलतांना तो खूप हळवा झाला होता.

अगदी घरगुती भाषेत तो म्हणाला, “अण्णा (बाबूजी) आजारी झाल्यावर मला त्यांना भेटता आले नाही.
नंतर ते गेले तरी मी येऊ शकलो नाही. पण अण्णांनी माझ्यासाठी दादाजवळ (श्रीधरजवळ) एक अंगठी देऊन ठेवली होती. मी भेटल्यावर दादाने ती मला आठवणीने दिली.”

बाबुजींकडे वाढलेले असे अनेक ‘ फुनशी ‘ आज ईशान्य भारतात आहेत.
लोकांना ही गोष्ट फारशी माहितीही नाही. म्हणूनच मला हे सांगितल्याशिवाय राहवत नाही.

आसाममध्ये कधी पर्यटनाला गेलात आणि एखाद्या घरातून सीडीवर बाबूजींचे मराठी सूर ऐकू आले तर दचकू नका.
बाबूजींनी मराठी मातीत त्यावेळी वाढविलेली रोपे आता वृक्ष होऊन तेथे नांदतायत !

बाबुजींसारखी माणसे अशा अनेक मोठ्या गोष्टी किती सहजपणे करीत होती ! बाबूजींच्या या अनमोल कार्याला सलाम !
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावी).

* श्री. मकरंद करंदीकर यांच्या लेखावरून
——————————————————

२. असे हे मराठी प्रतिभावंत ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे ह्यांच्या प्रतिभेचा एक अप्रतिम व अफलातून किस्सा:

१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीच वातावरण होतं.

त्यावेळी साहीर लुधियानवी (हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी) मंचावर आले. ते म्हणाले- “अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।”

पु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलवल. आणि म्हणाले, “साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही”. असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.

मग साहीरजींनी तो शेर ऐकवला –
“एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी, एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।
सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,
खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?
अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,
रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।”

आणि साहीरजींचा शेवटचा “जी” पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.
“एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी
ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी
सेजेशी समई मी लावू कशाला?
जुळत्या जीवालागी जळती कशाला?
अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,
रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी”.

ह्यातील “झुंझुरता” ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा…. आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.

असे हे आपले मराठी प्रतिभावंत…

एक नंबरी सोनेरी नाणं, धन्य धन्य ती माय मराठी ।।


————————————————————-

एका अजरामर बालगीताचा जन्म!

गदिमा आणि पु.लं. ‘देवबाप्पा’ या चित्रपटासाठी एकत्र बसले होते. त्यांना दुसऱ्याच दिवशी गाणं रेकॉर्ड करायचं होतं, पण काम सोडून बराच वेळ गप्पा मारण्यात गेला. उशीर झाल्याचं लक्षात येताच पु.लं. म्हणाले, “माडगुळकर, पोरकटपणा बास झाला आता. तुम्ही गाणं कधी देताय?” गदिमांनी विचारलं, “तुम्हाला कसं गाणं हवंय ते सांगा.” “पु.लं. म्हणाले मला बालगीत हवं आहे आणि चाल साधारण ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू?’ अशी असायला हवी. मग काय, गदिमा लगेच म्हणाले, “घ्या लिहून, ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच’ …आणि झाला एका अजरामर बालगीताचा जन्म!


गदिमा आणि बाबूजींच्या गाण्याविषयीच्या आठवणींमध्ये आज ‘सेतू बांधा रे सागरी’ या गीतरामायणातील एक खास आठवण…

आकाशवाणीवर जेव्हा गीतरामायणाचा कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा रेडिओच्या इतिहासात न भूतो न भविष्यती, असा पत्रांचा पाऊस पडला होता. हेच त्या कार्यक्रमचं यश! यावेळची ‘सेतू बांधा रे सागरी’ या गाण्याची विशेष आठवण आहे. या गाण्यासाठी जास्त वादकांची गरज होती आणि आकाशवाणीचा स्टुडिओ फार लहान होता. त्यामुळे या गाण्याचं रेकॉर्डिंग करत असताना वादकांना स्टुडिओचं दार उघडं ठेवून बाहेरच्या पॅसेजमध्ये बसवलं होतं. बाबूजींनी तालवाद्यांत ढील वगैरे सारखी परंपरागत वाद्य हवी होती, पण ती उपलब्ध नव्हती. तेव्हा त्यांनी साईड ड्रम, बेस ड्रम या पाश्चिमात्य वाद्यांचा वापर केला, पण त्यातून निर्माण होणार संगीत हे पारंपरिक(भारतीय ) वाटेल याकडे लक्ष दिल्याने म्युझिकचा उत्तम बॅलन्स साधला गेला आणि जन्मलं एक अप्रतिम संगीत.
………………………..

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

गदिमांचा जन्म अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वयाच्या फक्त १७-१८ व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि चित्रपटसृष्टीत येण्यासाठी कोल्हापूर गाठलं.

उमेदीच्या काळातच ‘सुखाचे सोबती’ या चित्रपटासाठी त्यांनी ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक…’ हे प्रत्येकाला आपलंस वाटेल असं गाणं लिहिलं. पण तो चित्रपट काही कारणांनी रखडला.

श्रीनिवास खळे यांनी या गाण्याला चाल लावली आणि ते एच.एम.व्ही. या कंपनीकडे गेले, तेव्हा तेथील लोकांनी हे काय गाणे आहे, बदके काय, पिल्ले काय म्हणून या गाण्याची टर उडवली. पण गदिमा आणि खळे आपल्या गाण्यावर ठाम होते. शेवटी गाणं आशा भोसले यांच्या आवाजात आणि खळे यांच्या संगीतात रेकोर्ड झालं. आणि गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
—–


३. ‘आधुनिक वाल्मिकी’ गदिमा

आपल्या ‘गीतरामायणा’मुळे ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून गौरविले गेलेले गजानन दिगंबर माडगूळकर साहित्यक्षेत्रात आणि जनमानसात ‘गदिमा’ म्हणून प्रसिद्ध होते. माडगूळकरांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी शेटेफळ, ता. आटपाडी, जि. सांगली येथे झाला. शिक्षण आटपाडी, कुंडल, औंध संस्थानात झाले. आटपाडी हे सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाही राज्यात होते. नंतर ते औंध संस्थानात आले. हे गाव आटपाडी-महाल म्हणून ओळखले जाई.
आटपाडीने महाराष्ट्राला ‘गदिमा’, त्यांचे कथाकार आणि ग्रामीण जीवनदर्शन घडविणारे धाकटे भाऊ व्यंकटेश आणि शंकरराव खरात असे तीन साहित्यिक दिले. आयुष्यभर त्यांच्यावर आईच्या (बनुबाई) अभंग, ओव्यांचा, स्वाभिमानी असण्याचा व वडिलांच्या प्रामाणिकपणाचा, कष्टाळू-पणाचा, अशा सर्व सुसंस्कारांचा खोल परिणाम होता. माडगूळला, महाराष्ट्रात त्या काळी असलेली बारा बलुतेदार पद्धती होती. गल्ल्यांची नावेही जातिवाचक ब्राह्मणगल्ली, वाणीगल्ली, कासारगल्ली, कुंभारगल्ली, परीटगल्ली अशी होती. माडगूळकरांचे शेतातले घरही ‘बामणाचा पत्रा’ म्हणून ओळखले जायचे. लहानपणी माडगूळकरांचे सायन्स व गणिताशी सख्य नव्हते; पण प्रतिभेचे लेणे होते. अंगात अभिनय व नाट्यगुण होते. त्याची औंधच्या महाराजांना व शिक्षकांना कल्पना होती. ह्या प्रतिभेमुळे आणि कष्ट, जिद्द व सुसंस्कारांमुळे ते महाकवी म्हणून ओळखले गेले.
घरी अठराविश्वे दारिद्र्य. घरामध्ये ‘गदिमा’ सगळ्यांत मोठे. आईवडिलांचे कष्ट कमी करायला हवेत, भावंडांना आर्थिक मदत करून कुटुंब वर आणायला हवे हा विचार लहानपणापासून त्यांच्या मनात होता. वडिलांचे पायी जायचे कष्ट वाचावे म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्करांकडे ‘हिशेबाचे काम मला द्या. वडिलांऐवजी मी ते काम करीन’, असे सांगायला ‘गदिमा’ गेले, तेव्हा ते फक्त इयत्ता चौथीत होते.
अभ्यासाची ठरावीक पठडी पार न करू शकल्याने गदिमा मॅट्रिक उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांच्या तरुणपणाचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. स्वातंत्र्यचळवळीने भारण्याचे ते दिवस होते. शिवाय औंधच्या शाळेचे संस्कार होते. फैजपूर काँग्रेसला शेतकर्‍यांची प्रचंड उपस्थिती व त्यांचे गांधीजींवरील प्रेम बघून ते प्रभावित झाले. मित्रामुळे त्यांनी नीरा आश्रमात सूतकताईपासून मैला वाहण्यापर्यंत सर्व सेवाभावी कामे केली. बेळगाव काँग्रेसला गांधीजी जात असताना नीरा स्टेशनवर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. गांधीजींनी निधी मागितला, तर तिथल्यातिथे थोड्या घोषणा, थोडे भाषण असे करून त्यांनी निधी जमवून दिला. शंकरराव देवांनी सांगितल्यावरून कुंडलला जाऊन त्यांनी प्रौढशिक्षणाचे वर्ग चालविले.
गांधी व काँग्रेस यांच्या संयुक्त सहवासाचा परिणाम म्हणून ‘वंदे मातरम्’ सिनेमासाठी ‘वेदमंत्राहुनी आम्हां वंद्य वंदे मातरम्’, अशी गीते पुढे लिहिली गेली. कुंडलमध्ये समाजकार्य चालू होते, पण अर्थार्जनाचा पत्ता नव्हता. ‘हरिश्चंद्राचे पुण्य गाठीला मारायला आधी धन जमवावे लागते’, अशा अर्थाचे आईचे बोलणे व कमवत नाही म्हणून हितचिंतकाचे त्याच दिवशी बोलणे मनाला लागून त्यांनी पुण्याचा रस्ता धरला. पुण्यात ‘दीनबंधू’ साप्ताहिकात त्यांनी नोकरी धरली; पण गांधीजींच्या विरोधात न लिहिण्याची तत्त्वनिष्ठा आड आली. त्यांनी स्वतःच्या मतांसाठी नोकरी सोडली. पराडकरांची ‘सुगंधी धूप सोंगटी’ ते विकू लागले. अशा वेळी त्यांना त्यांचे पूर्वीचे औंधच्या शाळेचे मुख्याध्यापक भा.वि.काळे भेटले. काळे सरांनी माडगूळकरांमधील कलागुण ओळखलेले होते. त्यांनी आचार्य अत्र्यांना गदिमांसाठी चिठ्ठी दिली.
अत्र्यांची व गदिमांची भेट मार्च १९३८मध्ये झाली. आचार्य अत्रे ‘झेंडूच्या फुलां’मुळे कीर्तीच्या शिखरावर पोहोचले होते. त्यांनी माडगूळकरांना कोल्हापूरला मा.विनायकांकडे जायला सांगितले. आणि ‘ब्रह्मचारी’ सिनेमापासून गदिमांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. येथून पुढे १५७ मराठी आणि २३ हिंदी चित्रपटांच्या श्रेयनामावलीत पटकथालेखक, संवाद, गीते, अभिनेते, कशात ना कशात श्रेयनामावलीत आणि रसिकांच्या हृदयात गदिमांचे नाव कायम विराजमान झाले.
कोल्हापूरमध्ये असतानाच प्रसिद्ध लेखक वि.स.खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करण्याची संधी गदिमांना मिळाली. त्या निमित्ताने त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात व ‘लेखन करा, यशस्वी व्हाल’ हा आशीर्वाद त्यांना मिळाला. लेखनाबद्दल ओढ, व्यासंगाची गोडी वाढली. ‘ब्रह्मचारी’त बाबूराव पेंढारकरांच्या बापाची भूमिका केली. त्याचे पुढे व्ही. शांताराम यांनी कौतुक केले. बाबूरावांनी त्यांना ‘नवहंस’ या संस्थेत स्टाफवर ‘कवी’ म्हणून घेतले. तेथे नव्या विचारांचे व अभ्यासू दिग्दर्शक विश्राम बेडेकरांशी त्यांचा संपर्क आला. ‘पहिला पाळणा’ या चित्रपटासाठी गदिमांनी लिहिलेली सर्व गीते बाबूराव व विश्राम बेडेकरांना पसंत पडली. रसिकांकडूनही पसंतीची पावती मिळाली.
‘हंस’ नंतर मा.विनायकांनी ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ काढले. त्यातही त्यांनी गदिमांना स्थान दिले. एच.एम.व्ही.कडून त्यांना मागणी होतीच. शिवाय हंसमधील पूर्वीचे खजिनदार वामनराव कुलकर्णी यांनी ‘मंगळचित्र’ म्हणून संस्था काढली होती. त्यात ‘जयमल्हार’, ‘जिवाचा सखा’ या चित्रपटांचे नामांकन, पटकथालेखन, गीते, संवाद हे सर्व गदिमांवर सोपविले होते. याच वेळी भालजी पेंढारकरांशी त्यांचा संपर्क आला. ‘भक्त दामाजी’ या भालजींच्या चित्रपटातील गाणी गदिमांना करायला मिळाली. आणि या वेळेपासून अभिनय, उत्तम शब्दकला आणि देवदत्त प्रतिभेच्या जोरावर वाङ्मयाच्या सर्व क्षेत्रांत माडगूळकरांचा यशस्वी संचार सुरू झाला. ‘भक्त दामाजी’, ‘संत जनाबाई’ची गीते लिहिणारे गदिमा आणि ‘रामजोशी’मधील सवाल-जवाब लिहिणारे गदिमा एकच का अशी शंका यावी, इतकी प्रतिभेची विविधता त्यांत आहे.
तमाशा चित्रपटांचे एक नवे पर्व ‘रामजोशीं’च्या रूपाने गदिमांनी सुरू केले. ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’ व ‘रामजोशी’मधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘सवाल-जबाब’ हा शाहिरी प्रकार रामजोशीत आणून त्यांनी ‘रामजोशी’ चित्रपटाची सांस्कृतिक बाजू उंचावली. ‘माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं’, ‘काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला’ ह्या त्यांच्या लावण्या गाजल्या. ‘जगाच्या पाठीवर’मधील ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’, ‘एक धागा सुखाचा’मधील ‘थकले रे नंदलाला’,‘बाई मी विकत घेतला श्याम’, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ इत्यादी गीतांमधून त्यांची नादमधुरता, गेयता, लयकारी ही सारी वैशिष्ट्ये दिसतात.
कोल्हापूरच्या ‘हंस’, ‘नवहंस’, ‘प्रफुल्ल’ ह्या चित्रपटकंपन्या बंद पडल्या. १९४८ साली भालजी पेंढारकरांचा सुसज्ज स्टुडिओ आगीत जळाला आणि मराठी चित्रपटसृष्टी पुण्याकडे वळली. ‘संत जनाबाई’च्या वेळी प्रभातच्या स्टाफवर गदिमा होते. ‘प्रभात समयो पातला। आता जाग बा विठ्ठला’ ही काकड आरती गाजली होती. कोल्हापूरपासूनच राम ऊर्फ सुधीर फडके त्यांच्या बहुतेक गीतांचे संगीत दिग्दर्शक होते. पुण्याच्या श्रीविजय पिक्चर्सने ‘सीतास्वयंवर’ काढले. त्यातील ‘मनोरथा चल त्या नगरीला, एक गुपित सांगते गडे, हे वदन तुझे की कमळ निळे?’ ही गदिमांची गाणी घरोघरी म्हटली जात असत. शब्दसुरांची एक अलौकिक वीण गदिमा सुधीर फडके यांनी लावणी, काकड आरती, अभंग, भावगीत या सर्वांमध्ये दाखविली.
याच सुमारास पुण्यात रेडिओ स्टेशन सुरू झाले. आपली लेखणी पैसा देते; पण काळावरती कायमचा ठसा उमटवत नाही ही रुखरुख ह्या महाकवीला होती. ‘रामायणा’वर गीते करायला सीताराम लाडांनी भरीस घातले व या रामभक्ताने भारतीय आदर्शाची ओळख करून देणारे, ५६ गीते असलेले व्यक्तिचित्र, समूहगीत या विविध प्रकारांनी भरलेले ‘गीतरामायण’ लिहिले. त्यातील सर्वच गीते एकापेक्षा एक सुरेख, भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारी आहेत. ‘स्वये श्रीरामप्रभू’पासून शेवटपर्यंत बहुतेक गीते महाराष्ट्राच्या पिढीच्या ओठांवर आहेत. सुगंधी धूप विकणार्‍या ह्या महाकवीने पुढील पिढीसाठी भारतीय संस्कृतीचा हा धूप महाराष्ट्राच्या घराघरांतून दरवळत ठेवला आहे.
सुगंधी वीणा, जोगिया (राज्य पुरस्कार), पूरिया, काव्यकथा, चार संगीतिका, चैत्रबन (राज्य पुरस्कार), दोन नृत्यनाटिका (राज्य पुरस्कार), गीतगोपाळ, गीतसौभद्र; हिंदी, बंगाली, कानडी, तेलगू यांत भाषांतरित झालेले ‘गीतरामायण’, ‘वैशाखी’ हे काव्यसंग्रह, १४ लघुकथासंग्रह, ‘मंतरलेले दिवस’ हे राज्य पुरस्कारित आत्मचरित्र, ‘दे टाळी ग घे टाळी’ (बालवाङ्मय) केंद्र पुरस्कार, दोन कादंबर्‍या, नाटक, असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी लिहिले. संगीत नाटक अकॅडमीने १९५७चे अवॉर्डही त्यांना मिळाले होते. परंतु, सर्वसामान्यांना ‘गदिमा’ ज्ञात आहेत ते आधुनिक वाल्मिकी गीतरामायणकार म्हणूनच.
१४ डिसेंबर १९७७ रोजी या महाकवीने इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या जन्मगावी, शेटेफळ येथे त्यांचे स्मारक आहे. दरवर्षी तेथे स्मृतिदिन साजरा होतो आणि महाराष्ट्राच्या मनामनांत ते गीतरामायणाने भरून उरले आहेत.
-डॉ. उषा कोटबागी
सौजन्य : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण – शिल्पकार चरित्रकोश
साहित्य खंड

—— शिक्षणविवेक – दिनांक: 14 Dec 2018 


४. बाबूजी….  सूर अजूनही गाती….   पं. सुरेश वाडकर

जगभरातील मराठी माणसाच्या भावविश्वाचा एक हळवा कोपरा सदैव व्यापून असलेले श्रेष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ लाडके बाबूजी यांचं जन्मशताब्दी वर्ष येत्या २५ जुलैपासून सुरू होत आहे. बाबूजींची गाणी आणि त्यातलं वैविध्य आज एवढ्या वर्षांनंतरही तेवढंच मोहवून टाकतं. त्यांच्या गाण्याचं, संगीताचं आणि स्वरवैभवाचं विश्लेषण एखाद्या उत्तम गायकाहून अधिक चांगल्या प्रकारे कोण सांगू शकेल?

बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्याबरोबर खूप काम करण्याचा योग मला आला नाही. परंतु त्यांची गाणी स्वतःत मुरवण्याचा योग मात्र भरपूर आला. त्यांनी संगीतबद्ध केलेली, त्यांनी गायलेली गाणी लहानपणापासून ऐकत आलो. सुरुवातीला ती गाणी, त्यातल्या अवीट गोडीच्या सुरांमुळे भावली. थोडंसं संगीत कळायला लागल्यावर त्याच गाण्यांमधली तीच अवीट गोडी तिच्या मर्मासकट समोर आली आणि प्रत्येक गाणं हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे; हे पुरेपूर पटलं. एकेक ओळ सुरांनी रंगवताना ती बाबूजींनी खूप जबाबदारीनं रंगवली, असं त्यांचं प्रत्येक गाणं ऐकताना आपल्या लक्षात येतं.

रोज आपण बोलतो ती भाषा गायनातून कशी म्हणावी ते त्यांनी सोदाहरण सांगितलं. त्यांच्या शुद्ध उच्चारणाचा आग्रह हा त्यातूनच आलेला आहे. अर्थात, यात कुठंही अट्टहास नाही. एखादा आकार गायचाय म्हणून कोणताही अभिनिवेश न करता तो साहजिक कसा गावा, हे त्यांनी दाखवून दिलं. असं करताना आपण भावसंगीत गातो आहोत, त्यामुळे त्यांतला अर्थ – जो शब्दांच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहे; तो प्रत्येक शब्द स्पष्ट कळावा हा मात्र त्यांचा आग्रह असे. त्यामुळे अगदी लांबवर जरी बाबूजींचं गाणं वाजत असलं तरी त्यातले शब्द स्पष्ट ऐकू यायचे.
बाबूजींची गाणी ही सर्व वयोगटातल्या श्रोत्यांना आवडतील अशी आहेत. असं सर्व वयोगटात प्रिय होण्याचं भाग्य फार कमी व्यक्तींना मिळतं. अनेक संगीतकार किंवा गायक हे तरुणांमध्ये लोकप्रिय असतात आणि ते त्याच वयोगटात लोकप्रिय राहतात. परंतु बाबूजींची लोकप्रियता ही सर्व वयोगटात आहे, म्हणूनच ती कालातीत आहे. याचं कारण, मला असं वाटतं की त्यांची संगीताची व्याप्ती किंवा रेंज फार मोठी आहे. भक्तिगीतांपासून ते लावण्यांपर्यंत आणि प्रेमगीतांपासून विरहगीतांपर्यंत त्यांनी सांगीतिक योगदान दिलेलं आहे.

माझे सुगम संगीत क्षेत्रातले तीन आदर्श आहेत- बाबूजी, लताबाई आणि आशाताई. बाबूजींचा संगीतकार म्हणून मी जेव्हा विचार करतो, तेव्हा मला लताबाईंचं वाक्य नेहमी आठवतं. त्या म्हणतात, की गाण्यातून तो संगीतकार दिसला पाहिजे. बाबूजींच्या प्रत्येक गाण्यातून ते स्वच्छ दिसतात. त्यांच्या गाण्यांमधल्या बारीक बारीक जागा आपल्याला मोहवून टाकतात. त्यामुळे त्यांचं प्रत्येक गाणं एकताना हे आपण सहज गाऊ शकू, असं वाटतं खरं; पण बारकाईनं ऐकत गेलात तर त्यातल्या असंख्य जागा तुम्हाला अचंबित करून टाकतात. या जागा काही चमत्कृती करायची म्हणून तिथं घातलेल्या नाहीत.

बाबुजींचं प्रत्येक गाणं हे समाधी अवस्थेकडे नेणारं आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ते गाणं आत्मिक आनंद देणारं आहे. त्यांना मी ज्या ज्या वेळेला ऐकतो, तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून येतात. त्यांचं गाणं थेट काळजाला भिडतं.

‘आम्ही जातो अमुच्या गावा’ चित्रपटातलं ‘हवास मज तू हवास तू’ हे गाणं उदाहरणादाखल घेऊ. हे गाणं म्हटलं तर उडत्या चालीचं आहे; तरीही ते काळजाला भिडणारं आहे. त्यात प्रसंगानुसार केलेली गंमत आहे. नुसतं गाणं ऐकलं तरी संपूर्ण प्रसंग डोळ्यांसमोर रंगवता येतो, इतकी ताकद त्या सुरावटीमध्ये आहे. इथं सुरांचा प्रयोग फार छान केलाय. ‘लाखाची गोष्ट’ मधलं ‘त्या तिथे पलीकडे तिकडे…’ हे गीतही असंच आहे. त्यातल्या प्रत्येक शब्दाला न्याय देताना त्याचा अर्थ चालीतून प्रतिबिंबित होईल, याचं भानं बाबूजींनी ठेवलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे या मुखड्यातून ते ‘माझिया प्रियेचे झोपडे’ किती अंतरावर असेल याचा पूर्ण अंदाज श्रोत्याला देतात.

शब्दाचं वजन तर प्रत्येक संगीतकार ओळखतो. पण अनेक संगीतकार गाणं सुचलं आणि ते केलं असं करतात. बाबूजींच्यात आणि त्यांच्यात थोडासा फरक असा आहे की, बाबूजी गाणं सुचलं म्हणून करताना ते सुचलं – त्यावर विचार केला आणि ते केलं, या पायरीने जात होते. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही गाण्याचा आत्मा हा त्यातल्या उत्स्फूर्ततेत आहे हे आपल्या लक्षात येतं.

बाबूजी संगीतकार होते, तसंच ते गायकही होते. त्यामुळे त्यांनी संगीतबद्ध करून स्वतः गायलेल्या गाण्यांना १०० टक्के न्याय मिळाला, असं म्हणता येईल. ‘आकाशी झेप घे रे पाखरा’, ‘प्रभातसमयो पातला’, ‘पराधीन आहे जगती’ अशी अनेक गाणी उदाहरणदाखल घेता येतील, की ज्यातून संगीतकार बाबूजीच गायक असल्यामुळे त्याला शतप्रतिशत न्याय मिळाला.

बाबूजींनी यमन, धानी, भीमपलास, भूप अशा रागांवर आधारित खूप गाणी बांधली. तुम्ही संगीतगुरूंकडे गेलात तर अनेकजण यमन राग शिकवण्यापासून सुरुवात करतात, तेव्हा लोकांना वाटतं की यमन हा सोपा राग आहे. पण वास्तवात यमन हा अत्यंत कठीण राग आहे. त्याचे असंख्य पैलू आहेत. त्याच्या मानमर्यादा सांभाळण्यासाठी रियाजात अनेक वर्षं घालवावी लागतात. रोज हा राग नवं रूप घेऊन समोर उभा राहतो. भूप हा पाच स्वरांचा राग. तोही खूप अवघड आहे. त्याच्यावर प्रभुत्व मिळवलंत की मग अन्य राग तुम्ही नीट हाताळू शकता. अर्थात हे तुम्हा-आम्हाला रियाजाने साधू शकतं. पण बाबूजींसारखी काही व्यक्तिमत्त्वं ही दैवी देणगीच असते आपल्याला मिळालेली. त्यांना हे सगळं सहजशक्य होतं. त्यामुळे बाबूजींनी यमन रागाचा उपयोग अप्रतिम केलाय. त्याचे अनेक पैलू त्यांनी चालींमधून दाखवले. ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘तोच चंद्रमा नभात’ ही यमनवर बेतलेली गीतं नुसती आठवून पाहा. अंगावर रोमांच उभे राहतील.

बाबूजींचा गायनामागचा दृष्टिकोन हा प्रेमभक्तिमय होता. ‘बाई मी पतंग उडवित होते’ हे त्यांचं गाणं मला खूप आवडतं. ‘जाऊ द्या सोडा जाऊ द्या’ ही बैठकीची लावणीही त्यांनी अप्रतिम केली आहे. ‘जाळिमंदी पिकली करवंदं’ हे गाणंही असंच गोड झालंय. ‘हा माझा मार्ग एकला’ हे गीत पाहा. यातली ‘…संपली कहाणी’ हे दोनच शब्द पुनःपुन्हा ऐका. त्यातली आर्तता काळजाला भिडते. ‘संपली कहाणी’ म्हणताना त्यातली हताशा त्यांनी दाखवली आहे.

असा सखोल विचार हिंदीमध्ये एस. डी. बर्मनसारख्या निवडक लोकांनी केला आहे.  त्यावेळचे संगीतकार फार विचारपूर्वक, त्यांच्या चालीला कोण न्याय देऊ शकेल, त्यालाच गायला बोलवायचे. बाबुजींनी त्यांच्या चालींना न्याय देतील, अशाच गायक-गायिकांना बोलावलं, केवळ तो गायक किंवा ती गायिका लोकप्रिय आहे म्हणून त्यांनी कधीही बोलावलं नाही. ‘मुक्या या कळीला तुझा स्पर्श व्हावा’ यासारखी अप्रतिम चालीची गाणी त्यांनी मला दिली. त्यातलं ‘तुझा स्पर्श व्हावा’ ही ओळ त्यांच्यासारखी मला जमायला दोन दिवस लागले. त्यांनी मला विश्वास दिला. ते म्हणायचे, ‘वाडकर, तुम्ही गाताय, तुम्ही गाता आणि तुम्ही गाल!’

बाबूजींचाच वारसा चालवत श्रीधर पुढे जातोय. त्याच्याबरोबर ‘तेजोमय ज्ञानब्रह्म’ केलं तेव्हा पदोपदी बाबूजींचा भास व्हायचा. किंबहुना श्रीधर आणखी कठीण आहे बाबूजींपेक्षा, असं मी म्हणेन!
‘तोच चंद्रमा नभात’चं उदाहरण पुन्हा घेतो. त्यातली ‘तीच चैत्रयामिनी’ ही ओळ म्हणताना त्यांनी दोन मात्रांमधला अंश सुरांनी भरला आहे. हे गाणं म्हणजे गाताना कुठं थांबावं, शब्द कसा म्हणावा, शब्दाला जोडलेल्या सुराच्या आसेचा विचार कसा करावा, याचा वस्तुपाठच आहे. त्यामुळे ते गाणं नुसत्या ठोक्यावर किंवा बीटवर नाहीये, सुरांचा अंश भरत भरत बीटवर गायचं ते गाणं आहे. आपल्याकडे काही संगीतकारांची गाणी गायला नुसतीच कठीण असतात. बाबूजींची गाणी गायला कठीण असूनही आनंद देणारी असतात.

‘गीत रामायण’ हा तर एक चमत्कारच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मला असं म्हणावंसं वाटतं की, ‘गीत रामायण’ हे संगीत आणि शब्दांचं सुंदर प्रारब्ध आहे! चांगल्या अर्थानं असं म्हणावं लागेल की बाबुजी आणि गदिमांना पिसाटलं होतं. ते पिसाटणं कलात्मकेच्या अत्युच्च पातळीवर गेलं नसतं, तर ‘गीत रामायण’ झालंच नसतं. पन्नासहून अधिक गाणी, प्रसंगानुरूप, अर्थानुरूप करणं हे सोपं काम नाहीच. त्यात विषय आहे, तो काळ आहे, त्या काळाला अनुरूप असे शब्द निवडण्याचं कसब आहे आणि संपूर्ण कथेला प्रवाहीपण देताना सुश्राव्य चाली देणं ही परीक्षाही आहे. बरं हे व्यक्त करायला केवळ ध्वनी हे एकच माध्यम आहे. हे अवघड होतं. म्हणूनच ते दैवी आहे. त्यातही ‘गीत रामायणा’चं श्रेय द्यावं लागेल ते आकाशवाणी मुंबईलाही. त्या माध्यमानं त्या काळी हे धाडस केलं आणि हा चमत्कार श्रोत्यांपर्यंत पोहोचवला.

शेवटी एकच सांगेन, प्रत्येक नवोदित गायकाने, संगीतकाराने बाबूजींची गाणी लक्षपूर्वक ऐकावीत. त्यांचा रियाज करावा. हा स्वरखजिना हाताळावा. तरच तुम्हाला काव्यात येणारे कठीण वर्ण त्यांचा गोडवा कमी न करता मृदुपणे कसे उच्चारायचे ते कळू शकेल, भाषेची ताकद दाखवताना त्यातली भावात्मकता कशी जपून ठेवायची ते कळू शकेल आणि मुख्य म्हणजे सांगीतिक चमत्कृती न करता सुरांना लडिवाळपणे कसं हाताळायचं त्याचंही भान येऊ शकेल. ऐकणारा आणि गाणारा किंवा संगीत देणारा यांची हृदयं जुळली, सूर जुळले तर ते संगीत दीर्घकाल टिकून राहतं. बाबूजींच्या गाण्यांच्या ओळी आहेत- ‘त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती…’ बाबूजींचे सूर आपल्यासाठी अजूनही गात आहेत, गात राहतील

– सुरेश वाडकर


५. मला भावलेले गीत रामायण ..

श्री.प्रसन्न गोरे यांच्या Prasanna’s Corner या ब्लॉगवरून साभार   लेखन दि. 2 February 2012

‘ गीत रामायण ‘ मराठी संगीताला पड़लेले एक मधुर स्वप्न आहे. ‘महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकि’ असे गौरविलेले ग. दि. माडगुलकर (गदिमा) आणि ‘बाबूजी’ या लाड़क्या नावाने परिचित असलेल्या सुधीर फडके यांनी रचलेला हा एक चमत्कार आहे. गदिमांचे अद्भुत शब्द, बाबूजींच्या श्रवणीय चाली आणि त्यांचाच सुरेल आवाज यांचा जमून आलेला सुन्दर मिलाफ म्हणजे ‘गीत रामायण’ ! आज इतक्या वर्षांनंतर देखील त्याची गोडी कमी झाली नाही यातच या दोघांच्या अपूर्व प्रतिभेचा प्रत्यय येतो.

गीत रामायणाची संकल्पना आकाशवाणी चे श्री सीताकांत लाड़ यांचा मनात सर्वप्रथम आली आणि ती म्हणजे आकाशवाणीवर दर रविवारी रामायणातील एक प्रसंग गीत रूपाने सादर करण्याची . कल्पना विलक्षण होती , पण ती साकार करण्या साठी तेवढ्याच ताकदीचे कलाकार हवे होते. त्यांनी गदिमा आणि सुधीर फडके यांचाशी भेट घेवून आपले मनोगत सांगितले. दोघे ही भारावून गेले . पण हे काही सोपे काम नव्हते. आठ दिवसात गीत लिहिणे, त्याला चाल लावणे, रिहर्सल करून लाईव्ह सादर करणे … ते ही पूर्ण वर्ष, न चुकता ! पण बाबूजी आणि गदिमा ही काही सामान्य माणसे नव्हती , ते तर दैवी प्रतिभेचा वरदान लाभलेले सरस्वती पुत्र होते. त्यांनी हे आह्वान स्वीकारले आणि १ अप्रैल १९५५ च्या मंगल दिनी राम नवमीचा मुहूर्त साधून पहिले गाणे रेडियो वर प्रसारित झाले . ते होते ‘स्वये श्री राम प्रभु ऐकती , कुश लव रामायण गाती’ . अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले.त्या नंतरचे सम्पूर्ण वर्ष तर महाराष्ट्र जणू राममय झाला. या अभूतपूर्व कलाकृतीचे नऊ भारतीय भाषांमध्ये रूपांतर झाले आहे : असमिया , बंगाली,इंग्लिश ,हिंदी,कन्नडा,कोंकणी ,सिंधी, तेलुगु आणि ओरिया.
गीत रामायणाचा आणि माझा प्रथम परिचय १९८१ साली झाला. त्या वेळी घरात टेप रेकॉर्डर किंवा रेकॉर्ड प्लेयर असणे मोठी अपूर्वाई होती. सर्व सामान्यांची संगीताची क्षुधा शमविण्याचे कार्य रेडियो करीत असे. मी दहा वर्षाचा असताना आमच्या घरी पहिला छोटा सा टेप रेकॉर्डर आला. टेप रेकॉर्डर बरोबर माझ्या वडीलांनी काही कॅसेट्स पण आणल्या होत्या . त्यात काही मराठी तर काही हिंदी कॅसेट्स होत्या. गीत रामायणाच्या आठ कॅसेट्स चा संच देखील त्यामध्ये होता. आमच्या टेप रेकार्डर चे उद्घाटन गीत रामायण लावूनच झाले. प्रथम भेटीतच या स्वर्गीय रचनेच्या प्रेमात पडलो. त्या नंतर आज पर्यंत अक्षरशः हजारो वेळा ऐकले पण त्याची गोडी तसूभरही कमी झालेली नाही.

गदिमा यांनी गीत रामायणात आपली समस्त प्रतिभा पणाला लावली आहे. रामायणातील ठळक घटना आणि व्यक्तिरेखा यातील गाण्यांमध्ये येतात. श्रीराम, दशरथ,कौसल्या,लक्ष्मण,भरत,सीता,शूर्पणखा यांना एकापेक्षा जास्त तर सुग्रीव,हनुमान,जाम्बुवंत,कुम्भकर्ण,शबरी,अहिल्या इत्यादींचे एक एक गाणे आहे. काही गीते समूहस्वरात तर काही निवेदकाच्या तोंडी आहेत. सुधीर फडके यांनी त्या त्या गाण्याच्या भाव ओळखून अनुरूप रागातील स्वरसाज चढवला आहे.
खरे तर या कलाकृतितील शब्दन् शब्द श्रेष्ट आहे पण ज्या प्रमाणे एखाद्या सुंदर उद्यानामध्ये पण काही स्थळे विशेष सुंदर असतात. अशाच काही सौंदर्यस्थळांचा , म्हणजे मला भावलेल्या काही ओळींचा सर्वाना परिचय व्हावा म्हणून हा लेखनप्रपंच !
गीत रामायणाची सुरुवात अयोध्येतील अश्वमेध यज्ञाचा प्रसंगानी होते. श्रीरामचन्द्रांच्या अश्वमेध यज्ञा साठी अयोध्येत अपार जनसमुदाय जमला आहे.त्यातच दोन अत्यंत सुन्दर आणि सुकुमार असे बटू आले आहेत. आणि हे बटू राम चरित्राचे गायन राज्यसभे मध्ये करत आहेत. ‘स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती’ !!! हे दोन्ही बटू म्हणजे श्रीरामांचीच बाळे लव आणि कुश ! श्रीराम म्हणजे साक्षात् तेज आणि ही दोन बालके म्हणजे त्या तेजाचेच अंश. पुत्राने आपल्या पित्याचे चरित्र गायन करणे म्हणजे जणू ‘ज्योतीने तेजाची आरती’ ! किती सुंदर उपमा आहे .
लव आणि कुश ,रामचरित्राचा प्रारंभ अयोध्या नगरीच्या वर्णनाने करतात ‘शरयू तीरा वरी अयोध्या मनु निर्मित नगरी’. अयोध्या नगरी ही अत्यंत वैभवशाली , समृद्ध आहे . तिचा राजा दशरथ अत्यंत राजकारण कुशल, धर्मपरायण, आणि प्रजावत्सल आहे. दशरथ राजा आपल्या प्रजेला अपत्याप्रमाणे प्रेम करतात पण ते स्वतः अपत्यहीन असावेत हे किती दुर्दैव. लोकांच्या आशा ‍‌‌आकांक्षा कल्पतरु प्रमाणे पूर्ण करण्यात समर्थ असलेल्या दशरथ राजांचे स्वतःचे मनोरथ पूर्ण न व्हावे ? अयोध्येच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात हा सल आहे. माडगुळकर या सुन्दर पंक्ति द्वारे तो व्यक्त करतात ‘कल्पतरुला फूल नसे कां वसंत सरला तरी, अयोध्या मनु निर्मित नगरी’ .
दशरथ राजाच नव्हे तर महाराणी कौसल्याची दशा काही वेगळी नाही. वंश वेलीला फूल नसल्या मुळे उदास असलेल्या कौसल्येची मनःस्थिती फारच विचित्र झाली आहे. वेली वर फुललेली फुले पाहून देखील तिचे मन उदास होते’.ती म्हणते ‘पुन्हां का काळिज माझे उले , पाहुनी वेली वरची फुले ‘. हरिणी-पाडस, गाय-वासरू ,एवढेच काय तर पिलाला भरवत असलेल्या पक्षिणीला पाहून सुद्धा ती व्यथित होते. एक निर्जीव पाषाणही मूर्तीला जन्म देते तर कौसल्या का पाषाणाहून हीन आहे? ’मूर्त जन्मते पाषाणातुन ,कौसल्या काय हीन शिळेहुन’ . आकाशात हजारो तारका बघून ती म्हणते ‘गगन आम्हांहुन वृद्ध नाही कां, त्यात जन्मती किती तारका , अकारण… जीवन हे वाटले पाहुनी वेलीवरची फुले’ अलौकिक प्रतिभेचा धनी असलेला कवीच अशी सुंदर कल्पना करू शकतो !.
दशरथ आपल्या गुरुजनांची अनुज्ञा घेवून अपत्य प्राप्ती साठी पुत्रकामेष्टि यज्ञ करतात.यज्ञ सफल होतो. प्रत्यक्ष अग्निदेव त्यांना दिव्य कामधेनुनच्या दुधातील क्षीर देतात. त्या कृपाप्रसादाने राजांच्या घरी चार बालकांचा जन्म होतो. अयोध्या नगरीत आनंदी आनंद पसरतो. राम जन्माचे गीत अयोध्याजन गाऊ लागतात. चैत्र मास आहे, आम्रवृक्ष मोहरले आहेत, उष्ण पण सुगंधयुक्त वायु वाहत आहे, अशा वेळी भर दुपारी सूर्य आकाशात थबकला कारण…राम जन्मला आहे !!! ‘चैत्र मास शुद्ध त्यात नवमी ही तिथी, गंध युक्त तरीही वात उष्ण हे किती ; दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला’. अत्यानंदाने आम्रवृक्षावर कोकिला देखील मूक झाल्या आहेत ‘बावरल्या आम्रशिरी मूक कोकिला’ . सूर, ताल, राग रंग याने न्हालेली धरतीसुद्धा डोलू लागते कारण तिला धारण करणारा शेषनाग डोलत आहे. ‘ बुडुनी जाय नगर सर्व नृत्य गायनी ,सूर ताल राग यात मग्न मेदिनी, डोलतसे ती ही जरा शेष डोलला ; राम जन्मला ग सखे राम जन्मला’
श्रीराम, लक्ष्मण , भरत आणि शत्रुघ्न चारी भाऊ अयोध्येच्या राज प्रासादात खेळू लागतात , त्यांचा बाल लीलांमध्ये सगळा राज प्रासाद गुंग होतो. याचे सुरेख चित्रण ‘सावळा ग रामचंद्र’ या गीतात आहे. या गाण्याची एक विशेषता म्हणजे हे ‘ओवी’ या छंदात लिहिलेले आहे. ओवी हा वात्सल्य रसाने परिपूर्ण छंद आहे. निरागस बालकाकड़े बघून मातेला स्फुरते ती ओवी ! या गीतात माडगूळकर उपमा अलंकारांचा अप्रतिम उपयोग करतात’ . ‘सावळा ग रामचंद्र माझ्या मांडी वर न्हातो अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळाला येतो’ सद्यःस्नात नील वर्ण रामचंद्राच्या अंगाचा अष्ट गंधाचा सुवास म्हणजे जसा नीलकमलाला येणारा अष्ट गंधाचा सुवास . सावळा राम तीन गौर वर्ण भावंडांमध्ये असा वाटतो जसा ‘हीरकांच्या मेळाव्यात नीलमणि उजळतो’. कुठे तर कौसल्या एका अपत्यासाठी आसुसलेली होती आणि आता तिचे भाग्य असे फळाला आले की ती चार चार पुत्रांची माता झाली. ती म्हणते ‘सांवळा ग रामचंद्र , त्याचे अनुज हे तीन ,माझ्या भाग्याचा श्लोकाचे चार अखंड चरण’ .
चारही बंधू मोठे होतात . राज्यसभेत बसू लागतात . एके दिवशी ऋषि विश्वामित्र अयोध्येला येतात. वनात राक्षसांनी धुमाकूळ घातला होता.यज्ञयाग , तप करणे अशक्य झाले होते. विश्वामित्र , राम लक्ष्मणाना राक्षसांचा संहार करण्या साठी घेवून जातात. त्राटिका ,मारीच,सुबाहु इत्यादि असुरांचा वध करून तापसजनांस अभय देतात.
विश्वामित्रांना मिथिलेहून राजा जनकांचे यज्ञाचे आमंत्रण येते.ऋषि विश्वामित्र श्रीराम लक्ष्मणानाही आपल्या बरोबर येण्याचे निवेदन करतात. मिथिलेला जात असताना वाटेत एक ओसाड आश्रम आणि शिलारूप स्त्री रामांना दिसते. ते विचारतात की हे ऋषि हा आश्रम असा ओसाड का आहे आणि ही शिलारूप स्त्री कोण आहे? विश्वामित्र त्यांना अहल्येची कथा वर्णन करतात आणि त्या शिलेला पदस्पर्श करण्याची आज्ञा देतात. श्रीरामांच्या पदस्पर्श होताच त्या निर्जीव शिलेत प्राणांचा संचार होतो, अहल्या पुनर्जीवित होते.वर्षानुवर्ष गोठलेले श्वास मुक्त होतात.रामांच्या चरणी मस्तक ठेवून ती सती म्हणते ‘मुक्त जाहले श्वास चुम्बिती पावन ही पाउले, आज मी शाप मुक्त झाले’. रामांची चरण रज म्हणजे जणूं ‘चरण धूलिचे कुमकुम माझ्या भालासी लागले’. शापाचे हलाहल युगानुयुगे पीत असलेली अहल्या सांगते ‘ तुझ्या कृपेने आज हलाहल अमृतात नाहले’
विश्वामित्र मुनीं बरोबर दोघे बंधू मिथिला नगरीत पोहोचतात. तिथे यज्ञ तर असतोच त्याच बरोबर मिथिलेच्या राजकुमारी सीतेचे स्वयंवरही असते. त्यात एक अत्यंत कठीण पण असतो आणि तो म्हणजे जनकांना प्रत्यक्ष भगवान शिवाने दिलेल्या महाप्रचंड धनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा. जो वीर त्या चापाला प्रत्यंचा लावेल त्याचा बरोबर सीतेचा विवाह होईल. अनेक रथी महारथी वीर प्रयत्न करतात पण कुणालाच जमत नाही. महाराजा जनक आणि मिथिलाजन चिंतित होतात.शेवटी श्रीराम उठतात, धनुष्याला वंदन करून ते प्रत्यंचा लावण्याच प्रयत्न करतात , अचानक तडिताघाता सारखा आवाज होतो आणि ते प्रचंड धनुष्य मोडून पडते.जनक सीतेचे कन्यादान करतात. श्रीराम आणि जानकी चे लग्न होते. मिथिला नगरजन गाऊ लागतात ‘आकाशाशी जड़ले नाते धरणी मातेचे , स्वयंवर झाले सीतेचे’ . किती अपूर्व कल्पना आहे. भूमिकन्या सीता आणि श्रीविष्णु अवतार प्रभु राम यांचा विवाह म्हणजे आकाश आणि पृथ्वी यांचे जडलेले नातेच तर आहे. ‘प्रभु रामचंद्रांच्यारूपाने जणू सीतेचे भाग्यच सावळे रूप लेवून तिच्या समोर उभे आहे. ‘उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे’ . राम आणि सीतेचे मिलन म्हणजे तर माया अणि ब्रह्माचे मिलन ! ‘सभा मंडपी मीलन झाले माया ब्रह्माचे, स्वयंवर झाले सीतेचे’ !!!!
श्रीराम,लक्ष्मण,जानकी अयोध्येला परततात. अयोध्येच्या आनंदाला तर सीमाच राहात नाही. दशरथ श्रीरामांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय करतात. श्रीराम राजा होणार, सीता महाराणी होणार. पृथ्वीची कन्याच तिची स्वामिनी होईल असा दुर्लभ योग कुठे बघावयास मिळणार? ‘तुझ्याच अंकित होइल धरणी,कन्या होइल मातृस्वामिनी ’
पण मनी इच्छिले ते साकार झाले असे आयुष्यात नेहमीच कुठे होते? रामावतार घेतलेले प्रत्यक्ष श्रीविष्णु ही याला अपवाद नाही. कैकयी दशरथ राजाला खूप पूर्वी दिलेल्या दोन वरांचे स्मरण करून देते . आणि दोन वर मागून घेते, ते म्हणजे रामाला १४ वर्षांचा वनवास आणि भरताला राज्यपद !!! भरताच्या नकळत , तो मातुल गृही गेला असताना. श्रीराम वनवासाला निघतात. जानकी आणि लक्ष्मणही बरोबर जातात. पुत्र वियोगाने शोकाकुल दशरथ प्राण सोडतात. आजोळाहून परत आलेल्या भरतासाठी हा धक्का जबरदस्त असतो. तो राम-लक्ष्मण-सीतेला परत आणण्यासाठी वनात येवून भेटतो आणि अयोध्येस परतण्याचा आग्रह करतो. सर्वज्ञ श्रीराम त्याला सांगतात ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा , दोष ना कुणाचा’. गीत रामायण रूपी गीत मालेचे मेरुमणि समजले जाणारे हे गीत म्हणजे जीवनाचे सार आहे .श्रीराम म्हणतात ,’अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात ,खेळ चाललासी माझ्या पूर्वसंचिताचा’ जे काही झाले ते अचानक झाले असेल पण अतर्क्य नाही झाले .यात दोष कुणाचाच नसून माझ्या पूर्वसंचितांचा खेळ आहे. ‘अंत उन्नति चा पतनी होई या जगात ,सर्व संग्रहांचा वत्सा नाश हाच अंत ,वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा ‘…. किती सुंदर पंक्ती आहेत, या जगात प्रत्येक वस्तुचा क्षय हा अटळ आहे, उन्नतीचा अंत नेहमी पतन हाच असतो ! ‘जरामरण यातुन सुटला कोण प्राणिजात , वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा’ ही ओळ खूप सखोल अर्थ सांगून जाते. आपल्याला वरपांगी जे जे वाढत असताना दिसते , खरे तर ते क्षयाकडे अग्रसर होत असते. आयुष्यातील क्षण भंगुरता सांगणारा एक संस्कृत श्लोक आहे ‘यथा काष्ठं च काष्ठं च सम्येताम महादधौ, समेत्याचे व्यापे यथाम तद्वत भूत संगमा’ . याचा अर्थ आहे ‘ समुद्रात दोन लाकडे वाहत असताना काही काळ जवळ येतात, समुद्राची एक लाट एका क्षणात त्याना विलग करते त्याच प्रमाणे आयुष्यात बंधु बान्धव इष्ट मित्रांचे मिलन क्षणिक असते.’ या श्लोकाचा किती सारगर्भित अनुवाद माडगुळकर करतात ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोड़ी दोघां पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा ;पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा , दोष ना कुणाचा ’.
श्रीराम भरताची समजूत घालून त्यांस अयोध्येचा राजा होण्याचा सल्ला देतात तेव्हां तो आदर्श भाऊ म्हणतो ‘वैनतेयाची भरारी काय मशका साधते , का गजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादते ,राज्य करणे राघवांचे अज्ञ भरता शक्य का ‘ गरुडाची भरारी एक यःकिश्चित चिलटाला कशी साधेल? पाठीवर हत्तीचा भार वाहणे एका घोडयाला शक्य आहे का ? त्याच प्रमाणे हे राघवा आपले राज्य चालवणे या लहान भरतास कसे शक्य आहे? तो निवेदन करतो की हे रामा , मला आपल्या पादुका हव्या आहेत. सिंहासनावर या पादुका ठेवून मी राज्य करीन .’नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारखा’ ज्या प्रमाणे कमलपत्र जलात असून ही अलिप्त असते तशाच अलिप्त वृत्तीने मी आपले राज्य चालवीन !
सीताहरण झाल्या नंतर तिच्या शोधात वनात फिरत असलेले श्रीराम-लक्ष्मण शबरीच्या आश्रमात येवून पोहोचतात. त्यांचा या भेटीचे सुंदर वर्णन माडगुळकरांनी ‘धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणे आश्रमा’ या गीतात केले आहे. गदिमांच्या प्रतिभेला या गीतात अक्षरशः बहर आला आहे.खरे म्हणाल तर हे पूर्ण गीतच प्रासादिक आहे पण काही ओळी तर अप्रतिम आहेत. अत्यानंदाने रोमांचित झालेली वृद्ध शबरी श्रीराम-लक्ष्मणाला बघून म्हणते ‘रोमांचाची फुले लहडली वठल्या देहद्रुमा, लागली श्री चरणे आश्रमा’. अनादी अनंत श्रीविष्णुचे अवतार रामांना ती म्हणते ‘अनंत माझ्या समोर आले, लेवुनिया नीलिमा’ … किती समर्पक पंक्ती आहेत. चराचर सृष्टीची क्षुधा शमविण्यास समर्थ असलेले श्रीराम जेव्हां प्रेमाने तिला काही खाण्यास मागतात तेव्हां ती भावविभोर होउन म्हणते ‘ आज चकोरा घरी पातली भुकेजली पौर्णिमा, लागली श्री चरणे आश्रमा’. वनवासिनी शबरीजवळ श्रीराम-लक्ष्मणाला देण्यास कन्दमूल फळे या शिवाय काय असणार? ती दोघां समोर अत्यंत प्रेमाने बोरे समोर ठेवत म्हणते ‘ वनवेलीनी काय वाहणे याविन कल्पद्रुमा , लागली श्री चरणे आश्रमा’. कल्पवृक्षाला एका वनवेलीने याहून जास्त काय वाहावे ??? रामाला दिलेली बोरे शबरीने आधीच चाखून पाहिली आहेत आणि फक्त गोड तेवढी समोर ठेवली आहेत. लक्ष्मणाच्या हे लक्षात येते तेव्हां त्याच्या मनातील शंका ओळखून ती म्हणते ‘का सौमित्रे शंकित दृष्टी, अभिमंत्रित ही नव्हेत उष्टी , या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा’ दिवस रात्र भक्तीतच लीन असलेल्या शबरीने चाखून पहिलेली ही बोरे उष्टी नसून अभिमंत्रित आहेत !!!
सीतेला मुक्त करण्यासाठी श्रीराम-लक्ष्मण , सेनापति सुग्रीव आणि समस्त सेना लंका नगरीच्या बाहेर येवून ठाकली आहे. युद्ध सुरु करण्या आधी व्यूह रचना होत असताना सुग्रीवाची दृष्टी लंकापुराच्या गवाक्षात उभ्या असलेल्या रावणाकड़े जाते. सुग्रीव कुणाला काही न सांगता एक उड्डाण घेऊन त्याचा जवळ जातो आणि द्वंद्वयुद्धाचे आह्वान देतो.महाबलाढ्य रावण त्याला चांगलीच टक्कर देतो. आपली शक्ति कमी पडत आहे असे समजताच सुग्रीव चपळाईने निसटतो आणि पुन्हा परत येतो. अचानक झालेल्या या प्रसंगाने सगळे आश्चर्यचकित होतात. आपल्या सेनापतिने, कुणाला ही पूर्व कल्पना न देता केलेले हे धाडस श्रीरामाना आजिबात आवडत नाही. त्याला सौम्य परंतु कणखर शब्दात श्रीराम म्हणतात ‘सुग्रीवा हे साहस असले , भूपतीस तुज मुळी न शोभले’. या गाण्यात दोन अतिशय सुंदर ओळी आहेत. ‘काय सांगू तुज शत्रु दमना , नृप नोळखती रणी भावना, नंतर विक्रम प्रथम योजना, अविचारे जय कुणा लाभले’ . राजनीति असो ,युद्धाचे मैदान असो किंवा प्रबंधन , नेहमीच प्रथम योजना (planning) आणि नंतर विक्रम (implementation ) असाच क्रम असायला हवा. नाही तर पराजय निश्चित आहे !!!
राम रावणाचे तुमुळ युद्ध होते. तिन्ही लोक या भीषण युद्धाने कम्पित होतात. शेवटी श्रीराम एक अभेद्य बाण मारून रावणाचा वध करतात. सगळीकड़े आनंदीआनंद होतो. स्वर्गलोकीचे गन्धर्व किन्नर श्री रामाचा जयजयकार करू लागतात. ते म्हणतात ‘हा उत्पत्ति स्थिति लय कारक, पद्मनाभ हा त्रिभुवन तारक ;शरण्य एकच खल संहारक , आसरा हाच ब्रह्मगोला भू वरी रावण वध झाला ’ !!!
सीता माता मुक्त होते. श्रीराम, लक्ष्मण,सीता माई आणि समस्त वानर सेना अयोध्येला परत येतात. भरत त्यांची चातका सारखी वाट पाहत असतो. श्रीरामांचा राज्याभिषेक होतो. समस्त भूवर राम राज्य नांदू लागते.राम राज्य आदर्श राज्याची अशी कल्पना आहे की जिथे काहीच उणे नाही. अशा राम राज्यात कलंक असेल तर तो फक्त चंद्रकलेवर किंवा कज्जलरेखित स्त्री नयनांमध्येच असेल. ‘राम राज्य या असता भूवर , कलंक केवल चंद्र कले वर; कज्जल रेखित स्त्री नयनांवर ,विचारातले सत्य आणतिल अयोध्येत आचार, त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार’
‘समयी वर्षतील मेघ धरेवर,सत्य शालिनी धरा निरंतर ;शांति शांति मुनि वांछिती ती घेवो आकार ; त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार’ या पंक्ति किती छान आहेत. सुख, समृद्धी, शांति, आरोग्य सर्व काही राम राज्यात साकार होईल!!!
या माझ्या मनाला स्पर्शून गेलेल्या काही सुंदर जागा ! मला खात्री आहे की या महासागरात केवळ इतकीच रत्ने नाहीत. प्रत्येकाला त्याच्या दृष्टी प्रमाणे अनेक रत्ने आढळतील. कारण गीत रामायण म्हणजे ‘काव्य नव्हे हे अमृत संचय’ . या सागराचे मंथन करून निघालेल्या या अमृताची मी चाखलेली गोडी तुम्ही ही अनुभवावी आणि यात सखोल जाऊन आणखी नवनवीन रत्ने शोधावीत हीच इच्छा !!!
Posted by prasanna gore at 07:56 – 2 February 2012

श्री.गोरे यांचे आभार मानून  या स्थळावर संग्रहित केले  … दि. ३०-०१-२०१९.


55917893_2091073370991015_678129762140422144_n

६. गीतरामायणाची माहिती    –     Madhav Vidwans

64 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (1 एप्रिल55 ) सर्व मराठी रसिकांच्या हृदयावर कोरलेले गीतरामायण आकाशवाणीवर प्रसारित झाले.
**त्यानिमित्त ‘गदिमा फेसबुक ‘वरील लेख तुमच्या साठी ***
गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला.1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण 1953 साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी 28000 श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण 56 गीतांत शब्दबध्द केली आहे.
माडगूळकरांनी श्रीराम कथेचा भाग एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून गीतातून प्रकट केला आहे,या कथाभागात एकूण 27 व्यक्ती येतात.सर्वाधिक दहा गीते ही श्रीराम या चरित्र नायकाच्या तोंडी आहेत,त्या खालोखाल सीतेची आठ,कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन,दशरथ,विश्वामित्र,लक्ष्मण,सुमंत,भरत,शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक,यज्ञपुरुष,अयोध्येतील स्त्रिया ,आश्रमीय,अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत घातलेले आहे.
संपूर्ण 56 गीतांसाठी सुधीर फडके यांनी 36 रागांचा वापर केला आहे.यात मिश्र काफी चार, मिश्र जोगिया चार, भैरवी चार, भीमपलास, मिश्र मोड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग प्रत्येकी दोन,अशा या 26 रचना सोडल्या तर उर्वरित 30 स्वररचना या 26 रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित आहेत.26 रागांत भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुध्द सारंग, ब्रिंदावनी सारंग, मुलतानी ,तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुध्द कल्याण व मिश्र पहाडी यांचा समावेश आहे.
आकाशवाणीने प्रसारित केलेल्या गीतरामायणाचे निवेदन पुरुषोत्तम जोशी यांनी केले आहे.
गायक व गायिका :सुधीर फडके,माणिक वर्मा,राम फाटक,वसंतराव देशपांडे,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,गजानन वाटवे,ललिता फडके,मालती पांडे,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर ,लता मंगेशकर,सुमन माटे,जानकी अय्यर,सौ.जोग.
वादक : प्रभाकर जोग,अप्पा इनामदार,अण्णा जोशी,सुरेश हळदणकर,केशवराव बडगे.

1) कुश लव रामायण गाती : सुधीर फडके
2) सरयू तीरावरी : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
3) उगा का काळिज माझे उले : ललिता फडके
4) उदास कां तूं ? : बबनराव नावडीकर
5) दशरथा,घे हे पायसदान : सुधीर फडके
6) राम जन्मला ग सखी : समूह गान
7) सांवळा ग रामचंद्र : ललिता फडके
8) ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा : राम फाटक
9) मार ही ताटिका रामचंद्रा : राम फाटक
10) चला राघवा चला : चंद्रकांत गोखले
11) आज मी शापमुक्त जाहले : मालती पांडे
12) स्वयंवर झाले सीतेचे : सुधीर फडके
13) व्हायचे राम अयोध्यापति : समूह गान
14) मोडुं नका वचनास : कुमुदिनी पेडणेकर
15) नको रे जाउ रामराया : ललिता फडके
16) रामाविण राज्यपदी कोण बैसतो ? : सुरेश हळदणकर
17) जेथे राघव तेथे सीता : माणिक वर्मा
18) थांब सुमंता,थांबवि रे रथ : समूह गान
19) जय गंगे,जय भागिरथी : समूह गान
20) या इथे लक्ष्मणा,बांध कुटी : सुधीर फडके
21) बोलले इतुके मज श्रीराम : गजानन वाटवे
22) दाटला चोहिकडे अंधार : सुधीर फडके
23) मात न तूं वैरिणी : वसंतराव देशपांडे
24) चापबाण घ्या करीं : सुरेश हळदणकर
25) दैवजात दु:खे भरता : सुधीर फडके
26) तात गेले ,माय गेली,भरत आता पोरका : वसंतराव देशपांडे
27) कोण तू कुठला राजकुमार ? : मालती पांडे
28) सूड घे त्याचा लंकापति : योगिनी जोगळेकर
29) मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा : माणिक वर्मा
30) याचका,थांबु नको दारांत : माणिक वर्मा
31) कोठे सीता जनकनंदिनी ? :सुधीर फडके
32) ही तिच्या वेणिंतिल फुले : सुधीर फडके
33) पळविली रावणें सीता : राम फाटक
34 ) धन्य मी शबरी श्रीरामा! : मालती पांडे
35) सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला : व्ही.एल.इनामदार
36) वालीवध ना,खलनिर्दालन : सुधीर फडके
37) असा हा एकच श्रीहनुमान् : वसंतराव देशपांडे
38) हीच ती रामांची स्वामिनी : व्ही.एल.इनामदार
39) नको करुंस वल्गना : माणिक वर्मा
40) मज सांग अवस्था दूता,रघुनाथांची : माणिक वर्मा
41) पेटवी लंका हनुमंत : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
42) सेतू बांधा रे सागरी : सुधीर फडके,समूह गान
43) रघुवरा बोलत कां नाही ? : माणिक वर्मा
44) सुग्रीवा हें साहस असले : सुधीर फडके
45) रावणास सांग अंगदा : सुधीर फडके
46) नभा भेदुनी नाद चालले : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
47) लंकेवर काळ कठिण आज पातला : व्ही.एल.इनामदार
48) आज का निष्फळ होती बाण ? : सुधीर फडके
49) भूवरी रावण-वध झाला : समूह गान
50) किति यत्नें मी पुन्हा पाहिली तूंते : सुधीर फडके
51) लोकसाक्ष शुध्दी झाली :सुधीर फडके
52) त्रिवार जयजयकार,रामा : समूह गान
53) प्रभो,मज एकच वर द्यावा : राम फाटक
54) डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे : माणिक वर्मा
55) मज सांग लक्ष्मणा,जाउं कुठे ? : लता मंगेशकर
56) गा बाळांनो,श्रीरामायण :सुधीर फडके”

   – श्री.माधव विद्वांस आणि फेसबुक यांचे आभार मानून

*****************************************


७. ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा…..’

सुमित्र माडगूळकर

१२ जुलै १९६१,पुण्यात हाहाकार माजला होता,जो तो ओरडत पळत होता ‘पाणी आलं ..पाणी आलं…’,गोष्टच तशी होती पानशेत धरणाला मोठी भेग पडली होती,भारतीय जवानांनी अथक परिश्रम करुन वाळूची हजारो पोती रात्रभर रचली होती व रात्रीच फुटणारे धरण सकाळ पर्यंत थोपवून धरल होतं.पुणेकर झोपेत असताना रात्री पाणी आलं असत तर पुण्यात प्रचंड जिवितहानी झाली असती,पण शेवटी व्हायचे तेच झाले पहाटे पहाटे पानशेत धरण शेवटी फु़टलं व त्याच्या मुळे थोडया वेळाने पुढचे छोटे खडकवासला धरण पण फुटले व पुण्यात पाणीच पाणी झालं हाहाकार माजला,जो तो आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता.

पुणे मुंबई रस्त्यावर असलेला गदिमांचा ‘पंचवटी’ बंगला, शिवाजीनगर स्टेशन पासून अगदी जवळ, मुळा नदी पासून जेमतेम ५०० मी अंतरावर असावा,पण थोडया उंच जागी असल्यामुळे पाणी बंगल्याच्या पर्यंत आले नव्हते,बंगला पाण्याखाली गेला नव्हता,त्यामुळे आसपास नदीकाठची जवळ जवळ १५०-२०० माणसे पंचवटीच्या आश्रयाला आली होती.पण हळू हळू पाणी वाढू लागले,पंचवटीच्या पहिल्या पायरी पर्यंत येऊन पोहचले तशी गदिमांना चिंता वाटू लागली,पाणी पंचवटीत शिरले असते तर अनेकांचे प्राण धोक्यात आले असते.शेवटी गदिमांनी निर्णय घेतला की माणसांना हळू हळू जवळच असलेल्या शेतकी कॉलेज व त्याच्या आजुबाजूच्या परिसरात पोहोचवायचे,तो भाग अजून जास्त उंचावर होता.

गदिमांच्या सांगण्यावरुन जवळच राहणारा काची नावाचा माणूस आपली होडी घेऊन पंचवटीत आला,७-८ माणसे एकावेळी असे करुन पंचवटीतून माणसे पुढे जास्त सुरक्षीत स्थळी पाठवायला सुरवात झाली,ही होडी ढकलायला होते स्व:ता गदिमा,लेखक पु.भा.भावे,व्यंकटेश माडगूळकर,हिंदी साहित्यकार-लेखक हरी नारायण व्यास, रेडिओ कलाकार नेमिनाथ उपाध्ये,गदिमांचे मित्र बाळ चितळे.

गदिमांचे मित्र बाळ चितळे नदीच्या काठी पेठेत रहात होते,त्यांचे घर पण पाण्याखाली गेले होते,पण स्व:तच्या होणार्‍या नुकसाना पेक्षा त्यांना चिंता लागली होती ती गदिमांच्या एका हस्तलिखीताची,गदिमांनी नुकतेच ‘वरदक्षिणा’ चित्रपटाची पटकथा लिहुन त्यांच्याकडे दिली होती व पुराच्या तडाख्यात ती घरातच राहून गेली होती,त्या काळात झेरॉक्स वगैरे प्रकार नव्हते त्यामूळे ती एकमेव प्रत होती,व तीचे काय झाले असेल याची चिंता त्यांना लागून राहीली होती.होडीने माणसे पुढे जायला लागली,गदिमांच्या पत्नी विद्याताईंनी हळदी कुंकवाने पाण्याची-नदीची पुजा केली व प्रार्थना केली ‘माते सर्वांचे रक्षण कर’.

पुढे काही तासांनी पाणी उतरण्यास सुरवात झाली,पुण्यात झालेल्या हानीचे चित्र सगळीकडे दिसतच होते, चितांक्रांत असणारे बाळ चितळे आपल्या घरी येऊन पोहोचले,घराचे दार उघडले,घरात सर्वत्र चिखल साचला होता,सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या.भिंतीवर २-३ फुटांपर्यंत पाणी चढल्याच्या खुणा होत्या,गदिमांचे स्क्रिप्ट वाचणे शक्यच नव्हते,धडधडत्या हृदयावर स्वार होऊन चितळे आतल्या खोलीत पोहचले,पण काय आश्चर्य समोरच्या टेबलावर गदिमांचे स्क्रिप्ट जसेच्या तसे पडले होते,कोरडेच्या कोरडे,पाण्याचा एकही थेंब त्यावर पडला नव्हता.

गंमत अशी झाली की जसेजसे पाणी वाढू लागले तसे तसे ते लाकडी टेबल पाण्यावर तरंगू लागले,पाणी जसे वाढे तसे पाण्याबरोबर ते टेबल वर तरंगत गेले व पाणी उतरताच त्याबरोबर खाली आले व गदिमांचे स्क्रिप्ट जसेच्यातसे राहीले!,बाळ चितळे धावत टेबलाजवळ गेले,स्क्रिप्ट चाळू लागले व समोरच गदिमांच्या सुंदर हस्ताक्षरातील गाणे लिहिलेले होते ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा…..’

याच दरम्यान परिसरात पुरानंतर पाणीटंचाई निर्माण झाली,पंचवटीपासून जवळच एक जुनी विहीर होती,गदिमांनी उद्योजक किर्लोस्करांना फोन लावला,गदिमांच्या शब्दाचा मान ठेऊन त्यांनी या विहीरीवर चक्क एक मोठा पंप लाऊन दिला व आसपासच्या लोकांची पाणीटंचाई दूर केली…आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याचा विसर गदिमांना कधीच पडला नव्हता,आपल्या साहित्यकृतीतून जितके शक्य होईल तितके समाजाचे उतराई होण्याचे प्रयत्न ते करत होते.

पुढे ‘वरदक्षिणा’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला, हुंडा देणे-घेणे या अनिष्ठ प्रथेवर हल्ला करणारा हा एक सामाजिक चित्रपट होता. ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा…..’,’एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात….’ सारखी अप्रतिम गाणी या चित्रपटात होती.हिंदी चित्रपट गायक मन्नाडे यांनी ‘घन घन माला’ हे गाणे आपल्या गायकीने अमर करुन टाकले होते.

गदिमा मोठया अभिमानाने म्हणत…

”ज्ञानियाचा वा तुक्याचा,तोच माझा वंश आहे,
माझिया रक्तात थोडा,ईश्वराचा अंश आहे”

तुकारामाचे अभंग जसे पाण्यातून वर तरंगत आले जणू तेच भाग्य गदिमांच्या ‘वरदक्षिणा’ या संहितेला लाभले होते!

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा

केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा
कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा
वर्षाकालिन सायंकाळी
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा
कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा

गीतकार : – ग. दि. माडगूळकर
स्वर : – मन्ना डे
संगीतकार:- वसंत पवार
चित्रपट :- वरदक्षिणा

   ……. वॉट्स अॅपवरून साभार  दि.१६-०६-२०१९

————————————

एकतारीसंगे एकरूप झालो – गीतकार ग.दि.माडगूळकर

ekatarisange

९. सुधीर फडके यांची (बाबूजींची) गाजलेली गाणी

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील पोस्टमधून साभार

अनादि मी अनंत मी —- अनुपमेय हो सुरूं युद्ध — अपराध मीच केला —अय्याबाई इश्श्बाई — – – – अरे देवा तुझी मुले अशी – – – अशी न राहील रात्र – – – — अशी पाखरे येती आणिक – — — असा नेसून शालू हिरवा — – — असा हा एकच श्रीहनुमान् — – – — असेच होते म्हणायचे तर – — – आकाशी झेप घे रे — आज कां निष्फळ होती बाण — – – — आज चांदणे उन्हात हसले — — – — आज प्रीतिला पंख हे — – – आज मी शापमुक्त जाहलें — – – — आज राणी पूर्विची ती — – आनंद सांगूं किती सखे ग — – – – आम्ही चालवू हा पुढे — — – इवल्या इवल्या वाळूचं — — — उगा कां काळिज माझें उले – – – – उगी उगी गे उगी उदासीन का वाटती – – — उद्धवा अजब तुझे सरकार — — — उमलली एक नवी भावना — – — ऊठ ऊठ पंढरीनाथा – – — —
ऊठ पांडुरंगा आता – — — एक धागा सुखाचा — — एकतारिसंगे एकरूप — – – एकवार पंखावरुनी – — अंतरीच्या गूढ गर्भी — – कर्तव्याने घडतो माणूस — — – कर्म करिता ते निष्काम – — – कशी नशीबाने थट्टा आज – — — — कसा ग विसरू तो — – – कानडा राजा पंढरीचा — — — कामापुरता मामा —- — कुठे शोधिसी रामेश्वर — कुरवाळू का सखे मी — – – कोठें सीता जनकनंदिनी – – – कोण तूं कुठला राजकुमार — — कृष्ण तुझा बोले कैसा – – — खरा ब्राह्मण नाथची — — — खाई दैवाचे तडाखे – — — गड्या रे प्रपंच हा — — – गा बाळांनो श्रीरामायण – — — गुरुविण कोण दाखविल — गेलीस सोडुनी का – गोकुळ सोडुन गेला माधव – — गौरीहरा दीनानाथा — — चल सोडून हा देश
चला राघवा चला — — — चापबाण घ्या करीं – — – – चाल बैला चाल – – – चंदनाच्या देव्हार्‍यात —- — चंद्र आहे साक्षिला — — — चंद्र दोन उगवले — — चंद्र होता साक्षीला — – — चंद्रातुनी तुझ्या या — – – चंद्राविना ठरावी जशी — — – छेडिली मी आसावरी — जग हे बंदिशाला – — जय जयकारा करा गर्जू – — — – जा झणि जा रावणास सांग – – – —- – जिण्याची झाली शोककथा – – — जे वेड मजला लागले — — जेथें राघव तेथें सीता — – ज्येष्ठ तुझा पुत्र मला – – – — झडल्या भेरी झडतो — — झाडावरती घडे लटकले —- – — झाला महार पंढरिनाथ — — — डाव मांडून भांडून — – – डोहाळे पुरवा रघुकुलतिलका – — — डोळे माझे त्यात तुझे रूप – – डोळ्यापुढे दिसे गे मज – – डोळ्यांत वाच माझ्या – – —
डोळ्यांमधले आसू पुसती — — – तळमळतो मी इथे तुझ्याविण —- – तात गेले माय गेली — — तुज सगुण म्हणों कीं – – तुझीमाझी प्रीत जगावेगळी – — – तुझे गीत गाण्यासाठी — तुझे रूप चित्ती राहो – तुझ्या गळा माझ्या गळा – — — — तुला न कळले मला न – – — — – तुला या फुलाची शपथ – – – — तू नजरेने ‘हो’ म्हटले — — तू नसतिस तर — – ते स्वप्‍न भाववेडे — – तोच चंद्रमा नभात — — तोडितां फुलें मी सहज – — तंबाखूची रसाळ पोथी — — तांबुस गोरा हात साजिरा – – — — त्या तरुतळी विसरले गीत – – – — थोराहुनही थोर श्रीहरी – – थांब सुमंता थांबवि – — — दशरथा घे हें पायसदान —- दाटला चोहिकडे अंधार — – — दाम करी काम येड्या — – — – दिसलीस तू फुलले ॠतू – – देव देव्हार्‍यात नाही
देवाजीचं नाव घ्यावं — — — देहाची तिजोरी – धन्य मी शबरी — — धुंद एकांत हा – – धुंद येथ मी स्वैर – धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना — नकळत होते तुझी आठवण — —- नको करूंस वल्गना रावणा – – — — नको रे जाउं रामराया – – – — नकोस नौके परत फिरूं – – — नवीन आज चंद्रमा – — — नसे राउळी वा नसे मंदिरी – – – – – नाम घेता मुखी राघवाचे — – नारदा मुनीवरा — — निजरूप दाखवा हो – — निळा समिंदर निळीच – — पक पक पकाक – – — पर्णपाचू सावळा सावळा — – — — पराधीन आहे जगतीं — — — पळविली रावणें सीता — — – पाटीवरती गिरवा अक्षर — — — पाठ शिवा हो पाठ शिवा — – — – पावसात नाहती लता — — — — पाहिली काय वेलींनो – — पेटवी लंका हनुमंत – — —
पोटापुरता पसा पाहिजे – — — – प्रभो मज एकच वर – – – – प्रिया आज माझी नसे – — – – प्रेमगीते आळविता —- फिटे अंधाराचे जाळे — – बघत राहु दे तुझ्याकडे — – बसा मुलांनो बसा सांगतो — – — — बाजार फुलांचा भरला — — — बाळ गुणी तू कर अंगाई — – — बाळ जा मज बोलवेना — – – — बिन भिंतीची उघडी शाळा – बोलत नाही वीणा – – – बोलले इतुके मज श्रीराम – – – भाग्य पांगळे भोग — — भावविकल ओठांवर — O– भूवरी रावणवध झाला – — — — भंगलेल्या त्या स्मृतींना — – – मज सांग अवस्था दूता – – — – मज सांग लक्ष्मणा जाउं – – — – मधुराणी तुला सांगू का — – – – मनाचिया घावांवरी मनाची — — महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी —– महेशमूर्ती तुम्ही सभाजन – माझ्या रे प्रीती फुला — – माता न तूं वैरिणी
माना मानव वा — — – माय यशोदा हलवी — — — मार ही ताटिका रामचंद्रा — — — मीच माझ्या धामी रामा — – — मुलुख त्यात मावळी – – — मोडुं नका वचनास-नाथा — — — मंदिरात अंतरात तोच — — यशवंत हो जयवंत हो — — या इथें लक्ष्मणा बांध – — – या मीलनी रात्र ही रंगली – – — — याचका थांबु नको — – – योग्य समयिं जागविलें – — — रघुवरा बोलत कां नाहीं — – – – रवि आला हो रवि आला – — – — राजा झाला गुलाम राणी — — – – रात आज धुंदली — — – रात चांदणी गंध चंदनी — — — राम जन्मला ग सखी – — – – रामचंद्र स्वामी माझा — – — रामाविण राज्यपदीं कोण — — रूपास भाळलो मी – — रंगुबाई गंगुबाई हात — — — लळा-जिव्हाळा शब्दच — — — लक्ष्मणा तिचींच ही पाउलें — – लाकडाच्या वखारीत
लाडके कौसल्ये राणी — — – लीनते चारुते सीते— – लोकसाक्ष शुद्धी झाली — – – वालीवध ना खलनिर्दालन – – – – — विकत घेतला श्याम – — – विठुमाऊली तू माऊली जगाची – – — विठ्ठला तू वेडा कुंभार — – – विसर प्रीत विसर गीत – – वेदमंत्राहून आम्हां — — शोध शोधता तुला — – सखि मंद झाल्या तारका – – — — सत्य शिवाहुन सुंदर हे — – – सन्मित्र राघवांचा सुग्रीव — —- समचरण सुंदर —- – समाधि साधन संजीवन — — — सरयू तीरावरी अयोध्या — — — सहस्‍त्ररूपे तुम्ही सदाशीव — सारी भगवंताची करणी – —- — सासुर्‍यास चालली लाडकी — — — सुकुनी गेला बाग – — सुख देवासी मागावे – – — सुग्रीवा हें साहस असलें – — — सुटले वादळ झाड – — – सूड घे त्याचा लंकापति — — सेतू बांधा रे सागरीं
संथ वाहते कृष्णामाई — — — संपली कहाणी माझी — — – सांवळा ग रामचंद्र — – —- स्वप्‍नांत रंगले मी — — स्वयें श्रीरामप्रभु ऐकती – – – स्वयंवर झालें सीतेचे — – स्वर आले दुरुनी – — स्‍त्रीजन्मा ही तुझी कहाणी — — हा माझा मार्ग एकला – — – — हाती नाही येणे – – हीच ती रामांची स्वामिनी — – श्रमिक हो घ्या इथे – – त्रिवार जयजयकार रामा”


माना मानव

मल्हार रागावर आधारीत सुंदर संगीतरचना आणि अर्थपूर्ण काव्य !🙏
https://www.youtube.com/watch?v=fH8mdq6Z2wM

माना मानव वा परमेश्वर,
मी स्वामी पतितांचा
भोगी म्हणुनी उपहासा,
मी योगी कर्माचा ।।

खरं तर राम आणि कृष्ण ही दोन्ही आपली दैवतं. दोघांनाही काही कार्य करण्यासाठी मानवी अवतार घ्यावा लागला .मात्र दोघांचीही प्रवृत्ती ही भिन्न, राम हा एक पत्नीव्रताचं पालन करणारा तर कृष्णाची प्रतिमा मात्र भोगी, विलासी अशीच रंगवली जाते .कृष्णाने 16 सहस्त्र स्त्रियांशी विवाह केला ही गोष्ट वारंवार अधोरेखित केली जाते. पण मुळात ती तशी आहे का? तर मग स्वत: श्रीकृष्ण आपली कैफियत मोठ्या उद्वेगाने कवी आणि संगीतकार मनोहर कवीश्वर यांच्या शब्दांच्या आधारे, आणि सुधीर फडके यांच्या स्वरात आपल्या समोर मांडतो

माना मानव वा परमेश्वर,
मी स्वामी पतितांचा
भोगी म्हणुनी उपहासा,
मी योगी कर्माचा ||

दैवजात दुःखाने
मनुजा पराधीन केले
त्या पतितांचे केवळ रडणे
मजला ना रुचले
भूषण रामा एकपत्नी व्रत,
मला नको तसले
मोह न मजला कीर्तीचा,
मी नाथ अनाथांचा |

रुक्मिणी माझी सौंदर्याची
प्रगटे जणू प्रतिमा
किंचित हट्टी परंतू लोभस
असे सत्यभामा
तरीही वरितो सहस्त्र सोळा
कन्या मी अमला
पराधीन ना समर्थ घेण्या
वार कलंकाचा ||

कर्तव्याला मुकता माणूस,
माणूस ना उरतो
हलाहलाते प्राशुन शंकर
देवेश्वर ठरतो
जगता देण्या संजीवन
मी कलंक आदरितो
वत्सास्तव मम ऊर फुटावा
वत्सल मातेचा ||
भोगी म्हणुनी उपहासा
मी योगी कर्माचा ||

या संपूर्ण गीताला संदर्भ आहे तो नरकासुराचा श्रीकृष्णाने वध केल्यानंतर त्याच्या जनानखान्यात डांबुन ठेवलेल्या 16 सहस्त्र नारींना श्रीकृष्णाने मुक्त केले ,पण त्यांना समाजाने अव्हेरल्यामुळे श्रीकृष्णानेच त्यांच्याशी विवाह केला आणि त्यांना आपले नाव दिले हा तो संदर्भ!
म्हणून मग पहिल्या कडव्यात श्रीकृष्ण म्हणतात की दैवजात असलेलं त्या पीडित पतितांचं दुःख मला सहन झालं नाही म्हणून रामाप्रमाणे एकपत्नीव्रताचं पालन न करता कीर्तीचा मोह टाळून मी या अनाथांचा नाथ झालो
दुसऱ्या कडव्यात श्रीकृष्ण म्हणतात की माझ्याकडे रुख्मिणी आणि सत्यभामा या सारख्या सौंदर्यवती आणि लोभस अशा माझ्या सहचारिणी असूनही मी या 16 सहस्त्र स्त्रीयांना वरीले ,ज्या अमला ( मलीन नसलेल्या किंवा शुद्ध या अर्थाने) होत्या परंतु पराधीन होत्या आणि नरकासुराकडे राहिल्यामुळे त्या तो कलंकाचा घाव सहन करू शकत नव्हत्या म्हणून मी त्यांना वरीले.
आणि तिसऱ्या कडव्यात तर कवीची कमाल आहे.
श्रीकृष्ण म्हणतात की मला माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे कर्तव्य पार पाडणं आणि माझं देवत्व सिद्ध करण्यासाठी हे हलाहल प्राशन करणं भागच होतं .तर जगताला संजीवनी देण्यासाठी मला हे करावं लागलं.
मुळात एका खूप वेगळ्या विषयावरील ही कविता बाबूजी सुधीर फडक्यांनी नेहमीप्रमाणेच जीव ओतून गायलीय बाबूजींचा स्वर गाण्यातला उपहास, दुःख, हळवी भावना, सारं सारं उलगडून दाखवतो. किंचित हट्टी परंतु लोभस हे त्यांचे उच्चार आणि शब्दफेक आणि त्या नंतर तरीही वरितो सहस्त्र सोळा असा कणखर स्वर गाण्यातील भावना अधिकच गडद करतो.मनोहर कवीश्वर यांची उत्तम शब्दरचना, सुयोग्य चाल , आणि श्रवणीय संगीत यामुळे गाणं अत्यंत श्रवणीय झालंय. गाण्याच्या सुरुवातीचे सतारीचे बोल अवर्णनीय ! 1974 च्या सुमारास रेकॉर्ड झालेलं हे गाणं आजही 43 वर्षांनी सकाळी आकाशवाणीवर ऐकताना देखील बाबूजींच्या स्वरातून श्रीकृष्णाची ही कैफियत थेट हृदयाला भिडते आणि अस्वस्थ करते . मूळ गाणं ऑडिओ रुपात वर दिलंय जरूर ऐका

…  वॉट्सअॅपवरून साभार   दि.१०-०८- २०१९


११.  सरस्वतीसेवक गदिमा – सुमित्र माडगूळकर 

🤔 सरस्वतीसेवक गदिमा – “गदिमांच्या आंघोळीच्या ‘मिशा’ ते ‘ग.दि.माडगूळकर पोल्ट्री फार्म’…” 😌

©सुमित्र माडगूळकर

गदिमांच्या आयुष्यात घडलेल्या काही गंमतशीर गोष्टी, त्यांच्या काही सवयी ज्या तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.

गदिमांना त्यांच्या मित्रांना गंमतशीर नावांनी हाक मारण्याची सवय होती, नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मधुकर कुळकर्ण्यांना “पेटीस्वारी”, राम गबालेंना “रॅम् ग्याबल”, वामनराव कुळकर्ण्यांना “रावराव”, पु.भा.भाव्यांना ‘स्वामी’, पु.ल.देशपांड्यांना ‘फूल्देस्पांडे’, राजा मंगळवेढेकर यांना ‘मंगळ’, ‘राजा ऑफ मंगळवेढा’. पंचवटीत येणारा नवखा असेल तर ‘या’ असे भारदस्त आवाजात स्वागत व्हायचे सलगीच्या लोकांना ‘क्यो गुरू’, ‘काय माकडेराव?’, ‘कसं काय फास्टर फेणे ?’ असे स्वागत ठरलेले असायचे. अनेक मित्रांची अशी वेगवेगळी नावे ठरलेली असायची.

पु.भा.भावे म्हणजे गदिमांचे खास मित्र तेही गदिमांना काही नावाने हाक मारत गम्पटराव, बुवा, स्वामी, डेंगरु, लाल डेंगा, वुल्फ ऑफ माडगूळ, चित्तचक्षुचमत्कारिक! ..आणि गदिमां कडून चक्क त्या नावांस प्रतिसाद ही मिळत असे.

त्या काळात जशी गदिमा-बाबूजी जोडगोळी प्रसिद्ध होती तशी त्याच्या आधी एक त्रिकूट प्रसिद्ध होते ‘लाड-माड-पाड’ .. लाड म्हणजे गीतरामायणाचे जनक सिताकांत लाड, माड म्हणजे ग.दि. माडगूळकर व पाड म्हणजे पु.ल.देशपांडे.

गदिमा आनंदात असले कुठले काम किंवा गोष्ट मनासारखी झाली किंवा आवडली तर त्यांचे वाक्य असे ‘गुड रे,गुड गुड गुड गुड गुड गुड….’, तर कधी ‘बेस्टम बेस्ट आणि कोपरानं टूथपेस्ट’.

एकदा गदिमांचा संबंध कोल्हापूरच्या ‘उत्तमराव शेणोलीकर’ नावाच्या गृहस्थांशी आला, त्यांना हे नाव इतके आवडले की त्यांनी त्या नावाचे रूपांतर ‘उत्तमराव’ –> ‘बेष्टराव’ शेणोलीकर असे करून टाकले, घरात कुठला चांगला पदार्थ झाला की त्यांचे पेट वाक्य ठरलेले असे ‘एकदम ‘बेष्टराव शेणोलीकर’ झाला आहे’.

गदिमांना एक फोन आला त्यांनी स्वतःच उचलला, समोरून आवाज आला मला ग.दि. माडगूळकर यांच्याशी बोलायचे आहे मी ‘सत्येन टण्णू बोलतो आहे’, गदिमांना वाटले कोणीतरी गंमत करतो आहे त्यांनी हे आडनाव ऐकले नव्हते ते लगेच उत्तरले “मी ‘माडगूळकर अण्णू बोलतो आहे,बोला”.

गदिमांनी मराठी चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवले होते, ते इतके व्यस्त असत की सकाळी एक, दुपारी एक व रात्री एक अश्या तीन चित्रपटांच्या कथा ते दिवसभरात लिहायला बसत. कधी कधी त्यात साहित्यिक कार्यक्रम असत, ते १२ वर्षे आमदार होते त्यासंबंधित कार्यक्रम असत, ते तयार होत, जाणे आवश्यक असे पण कंटाळले की तयार होऊन म्हणत ‘आम्ही नाय जायचा’, नाही जायचा की अजिबात नाही जायचा … मग अगदी मुख्यमंत्रांचीही भेट ठरलेली का असेना.

बऱ्याच वेळा सकाळी उठल्यापासून मित्रांच्या बैठकी रंगत, विद्याताई मधूनच राहिलेल्या आंघोळीची आठवण करत, शेवटी गदिमा नाखुषीने उठता उठता म्हणत ‘पाच मिनिटात आंघोळीच्या मिशा लावून येतो.’, आंघोळीच्या मिशा हे एक गंमतशीर प्रकरण होते. एक गाणे होते. गौळण खट्याळ कृष्णाला यमुनेच्या काठावर लाडिक रागाने म्हणत असते ‘आंघोळीच्या मिषाने भिजविलेस अंग..’. पण एकदा गदिमांच्या नेम्याला (नेमीनाथ उपाध्ये उर्फ पुणे आकाशवाणीचे ‘हरबा’) प्रश्न पडला की ‘आंघोळीच्या मिशा’ कसल्या ? आणि तेव्हा पासून गदिमा ‘आंघोळीच्या मिशा लावू का ? ‘, ‘आंघोळीच्या मिशा लावून टाकतो म्हणजे सुटलो’ असेच स्नानाच्या बाबतीत भाषा वापरत असत.

गदिमांचे एक मित्र होते ‘बाळ चितळे’ नावाचे, त्यांची एक वेगळीच तऱ्हा होती सगळ्यानं सारखे न करता वेगळे काहीतरी करायचे. उदा. सगळे जण हॉटेल मध्ये गेले आहेत व सगळ्यांनी डोसा मागविला तर हे मिसळ मागविणार ! अगदी सगळे करतील त्याच्या बरोबर उलटे करायचे यात त्यांचा हातखंडा होता त्यामुळे आमच्या घरात कोणी असे वेगळे वागायला गेला की त्याला ‘बाळ चितळे’ ही पदवी मिळत असे.

गदिमांना कधी कधी छोटे अगदी सर्दी सारखे आजार पण सहन होत नसत, मग अगदी शिंक आली तरी त्यांचे मरण वाक्य सुरू होई ‘मरतय की काय आता!’ बिलंदरपणा हा त्यांच्यात ठासून भरलेला होता, हे सर्व गुण जन्मजात माडगूळच्या मातीतून आलेले होते, एकदा माडगूळ गावात सभा झाली, सभेनंतर एकाने टेबल-खुर्ची-सतरंजी या सकट अध्यक्ष , वक्ते यांचे आभार मानले. ते आभाराचे भाषण सीतारामबापू नावाच्या सरपंचाना इतके आवडले की पुढे बोलताना बापू आभार शब्दाशिवाय बोलेनासेच झाले. अगदी त्यांना कोणी सांगितले की अमक्या तमक्याला मुलगा झाला तर ते चटकन म्हणायचे ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं’, कोणी बातमी दिली की कडब्याच्या गंजीला आग लागली तर बापू झटक्याने म्हणणार ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं’. शेवटी सगळ्या गावाने त्यांचे नाव ‘आभार सीताराम’ असे ठेवले होते. तर सांगायचे असे की हे विनोदी गुण बहुतेक गदिमांना आपल्या गावाकडच्या मातीतून व माणसांकडून उपजतच मिळाले होते.

गदिमांच्या धाकट्या भावाचे लग्न होते, वऱ्हाड घेऊन मंडळी लग्नघरी गेली, नवरा मुलगा बघायला नवरीच्या मैत्रिणींची पळापळ सुरू झाली, नवरा मुलगा कुठला हे कोणालाच माहीत नव्हते, एक कोणतरी मैत्रीण मोठ्याने गावाकडच्या टोन मध्ये म्हणाली ‘कोन्ता ग कोन्ता?’ झालं पुढचे अनेक दिवस कुठल्याही बाबतीत चौकशी करायची असेल तर गदिमांचे वाक्य तयार असे ‘कोन्ता ग कोन्ता?’ ..एखादे वाक्य दुसऱ्याला कंटाळा येई पर्यंत लावून धरणे हे आम्हा माडगूळकरांचे खास वैशिष्ट्य.

राजा नीलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली सुंदर कविता होती पण खाली लेखकाचे नाव होते ‘रा.नी.बढे’ आधी गदिमांना लक्षात येईना की हे कोण लेखक, मग आठवले की अरे हे तर आपले ‘राजा बढे’, पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले,त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे ‘राधे तुझा सैल अंबाडा’ हे गाणे गाजत होते त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदार पणे मान डोलावत म्हणू लागले…

“कुणी ग बाई केला? कसा ग बाई केला ?
आज कसा राजा बढे, रानी बढे झाला ?”

एकदा गदिमांच्या एका कोल्हापुरी मित्राने त्यांना चक्क व्यवसाय करायची गळ घातली, साधासुधा नाही तर चक्क पोल्ट्री फार्म काढायचा म्हणून, मराठी चित्रपट सृष्टीत तसा पैश्याचा खळखळाटच असायचा, त्यांनी असे काही चित्र रंगविले की गदिमा त्याला तयार झाले, घरात बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर मराठी माणसाने एक मोठा उद्योजक होण्याची स्वप्ने पहायला सुरवात केली. नशिबाने ‘ग.दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’ असे नाव नाही दिले पण त्या काळात गदिमांनी चक्क १०,००० रुपये तरी त्या गृहस्थांना दिले असतील. ५-६ महिने असेच गेले असतील. गदिमा आपल्या कामात व्यस्त होते, श्रावण महिन्यातील मुहूर्त काढून हे गृहस्थ एकदा ३-४ डझन अंडी घेऊन घरी आले, ‘अण्णा ही आपल्या फार्म मधली अंडी’. श्रावण असल्यामुळे सर्वच्या सर्व अंडी नोकर चाकरांना देऊन टाकावी लागली. असेच पुढे काही महिने गेले व गृहस्थ रडत आले की ‘अण्णा अमुक तमुक रोग झाला व सर्व कोंबड्या मरून गेल्या.’ झालं गदिमांची व्यावसायिक होण्याची स्वप्ने धुळीस मिळाली व महाराष्ट्र एक मोठ्या पोल्ट्री उद्योजकाला मुकला !

गदिमांना गीतरामायणामुळे ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणत असत, शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते, त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते, म्हणून ललित मासिकात त्यांनी स्वतः बद्दलच बिंगचित्र लिहिले होते, गदिमांच्या हातात कुर्‍हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..

“कथा नाही की कविता नाही, नाही लेखही साधा
काय वाल्मिक, स्विकारिसी तू पुन:श्च पहिला धंदा ?”

अशा कितीतरी गंमतशीर गोष्टी, प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले होते, गदिमा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते अगदी हिमनगासारखे …… त्यांच्यात एक बिलंदर खेडूत दडलेला होता, एक सुसंस्कृत प्रकांड पंडित दडलेला होता, एक सच्चा राजकारणी दडलेला होता….. काय नव्हते… पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक खरा माणूस दडलेला होता, कधीकधी वाटते आपल्यासमोर त्यांची जी बाजू आली त्याच्या हजारो पट ते आजही पडद्याआड आहेत….अगदी त्यांच्या शताब्दीतसुद्धा…

सुमित्र माडगूळकर

…  वॉट्सअॅपवरून साभार   दि.१२ – १० – २०१९


१२. घननीळा लडिवाळा … गीताची कहाणी

ळ अक्षराचा घडलेला किस्सा… घननीळा लडिवाळा

सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी ग दि माडगूळकर यांना, प्रत्येक ओळींच्या शेवटी ळ हे अक्षर येईल असे वेगळे भावगीत लिहून द्या असे सांगितलं….
अण्णांनी ते चॅलेंज स्वीकारलं, आणि केवळ 15 मिनिटांत गाणं लिहिलेला कागद बाबूजींना आणून दिला…
आणि म्हणाले,बाबूजी, तुला ळ हे अक्षर हवे होते ना? घे…
एवढे बोलून गदिमा निघाले, तसे बाबूजी म्हणाले, आण्णा, कुठे निघालात? गाण्याची चाल ऐकूनच जा….
आणि बाबूजींनी हार्मोनियम घेतली, चाल कंपोझ केली….
आणि “यमन” रागात एक अप्रतिम भावगीत जन्माला आले…
गदिमा यांनी लिहिलेल्या त्या भावगीताच्या ओळी अशा होत्या….
घननीळा लडिवाळा
झुलवू नको हिंदोळा

सुटली वेणी केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या साऱ्याचा उद्या गोकुळी
होईल अर्थ निराळा
झुलवू नको हिंदोळा

सांजवेळ ही, आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कलिंदीच्या तटी खेळतो
गोपसुतांचा मेळा !

घननीळा लडिवाळा
झुलवू नको हिंदोळा

हे भावगीत बाबूजींनी माणिक दादरकर (माणिक वर्मा) यांच्याकडून गाऊन घेतले, ते आजही उत्तम आहे, लोकप्रिय आहे, अजरामर आहे….

ग्रेट गदिमा….ग्रेट बाबूजी…
खरे प्रतिभासंपन्न..

हे गाणं शुभा खोटेंवर चित्रित केले…आणि तबल्यावर साथ करत आहेत उस्ताद अहमद जान थिरकवा आणि हार्मोनियम वर तुळशीदास बोरकर… अतिशय दुर्मिळ क्लिप

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – माणिक वर्मा
चित्रपट – उमज पडेल तर (१९६०)
राग – पहाडी
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

वॉट्सअॅप आणि यूट्यूबवरून साभार ०५-०३-२०२०

**********

याच गाण्याची वॉट्सअॅपवरून भिरभिरत आलेली दुसरी कहाणी

आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगूळकरांची कृष्णभक्ती व्यक्त करणारी ही सुंदर भावकविता .

आटोपशीर लांबी असलेली ही आदर्श भावकविता आहे . यमक , अनुप्रास या शब्दालंकारांनी नटलेली ही कविता गदिमांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन घडवते . राधा कृष्णाची अलौकिक प्रेमकथा सगळ्याच कवींना भुरळ घालते . गदिमांच्या लेखणीतून ती अजरामर भावकवितेच्या रुपात आपल्या समोर येते .

या कवितेत ‘ ळ ‘ या शब्दावर इतका सुंदर अनुप्रास अलंकार साधला आहे की , तो फक्त गदिमाच करू जाणे . खरं तर ळ हे अक्षर कवितेत फारसे वापरले जात नाही .पद्यामध्ये ळ हे अक्षर तसे दुर्मिळ आहे . पण , या कवितेत गदिमांनी ‘ ळ ‘ चा अति लडिवाळ वापर केला आहे . ग.दि.माडगूळकर , पु.भा.भावे आदि मित्रांची मैफल जमली असता , भाव्यांनी अण्णांना कोपरखळी मारली , अण्णा , तुमच्या एवढ्या कविता वाचल्या , ऐकल्या पण ‘ ळ ‘ हे अक्षर कुठेही आढळत नाही . आधुनिक वाल्मिकी क्षणकाळ ध्यानस्थ झाले . अण्णा कागद पेन घेऊन बसले , आणि जन्म झाला एका अद्भुत कवितेचा .
” घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा …. ” कागद सरकावून अण्णा म्हणाले , मोजा किती ‘ ळ ‘ आहेत यात !

राधा कृष्ण या दैवी अद्वैतावर आपण मर्त्य मानवांनी काय बोलावे . ते काम गदिमांसारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचेच . कृष्ण राधेच्या या मुग्ध लीलेचे वर्णन गदिमा आपल्या डोळ्यासमोर उभे करतात .

किती तरल असू शकते कल्पनाशक्ती !

या गाण्याचे आणखी एक रसग्रहण – सौ. सुनीता सहस्रबुद्धे यांनी केलेले


१३. नदी सागरा मिळता   ..  ग.दि.माडगूळकर   

नवी भर दि. १५-०७-२०२०

१४. नाच नाचूनी अति मी दमले……

गाण्याचा अर्थ समजावून घेऊन ते गीत जर नीट ऐकलं तर आपल्याला त्या गाण्याचा खरा अर्थ ध्यानांत येतो. गदिमांचं जन्मशताब्दी वर्ष सुरूं झालं आहे. त्या निमित्ताने गदिमांची गाणी ऐकत होतो. त्यांचं ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटातलं एक अतिशय सुप्रसिद्ध गीत ‘नाचनाचुनी अति मी दमले’ हे गीत पुन्हां पुन्हां ऐकतांना मनांत जे विचार आले ते मी खाली मांडत आहे.

मला जो प्रश्न पडला तो असा कीं गदिमांनी हे गीत त्या चित्रपटात अभिनेत्री सीमा त्या अंध मुलीच्या रूपात रस्त्यावर नाचत असतात (आणि राजा परांजपे पेटी वाजवीत असतात) इतक्या मर्यादित अर्थाने त्या दृश्यासाठी लिहिलं असेल कां ? नक्कीच नाही. एक म्हणजे हे गीत मीराबाईच्या ‘आज नाची मै बहुत गोपाल’ (शब्द थोडेसे चुकत असतील, क्षमा करा, किंवा कोणाला माहीत असतील तर बरोबर शब्द इथे द्या) या भजनाचे अप्रतिम मराठी रूपांतर आहे. त्यात अध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. मला जो अर्थ साधारण समजला तो इथे मी माझ्या समजुतीनुसार देत आहे –

आयुष्याच्या शेवटी शेवटी जीवनाच्या उत्तरार्धात महफिल संपत आली असतांना एक असा भैरवीचा काळ येतो, अशी केविलवाणी परिस्थिती येते कीं आतां मला कांही नको, कांही नको, असं वाटतं. आजपर्यंतच्या आयुष्यात ज्या कांही चुका कळतनकळत झाल्या असतील, कांही हेतुपूर्वक केल्या गेल्या असतील त्यांबद्दल पश्चाताप होतो आणि एका क्षणीं आपण त्याचा जमाखर्च मांडू लागतो, स्वत: स्वत:लाच आरशात अलिप्तपणें पाहूं लागतो आणि ‘जाहल्या कांही चुका अन् सूर कांही राहिले’ ची जाणीव मन पोखरूं लागते. “छोड दे अपनी खुदनिगरी को, तोड दे अपना आईना” अशी वेळ येते, असाच कांही भावार्थ मला या ‘‘नाचनाचुनी अति मी दमले’ या गाण्यातून जाणवला. आयुष्यात आपलं काय काय चुकलं त्याचा घेतलेला मागोवा, पाहूंया. गाण्याचा अर्थ फार कांही कठीण नाही.

निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानीं, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शत कमलांची, कंठी घातली माला || थकले रे ..

(आयुष्यभर मी स्वत:ला कसं नटवलं आहे, तर कमरेला निलाजरेपण नेसले, निर्लज्जपणाचा शेला अंगावर घेतलाय, आत्मस्तुतीची कर्णभूषणे घालून माझ्यावर मीच खूष होऊन सजले आहे, कपाळावर गर्वाची उटी लावली, आणि गळयांत आयुष्यात घेतलेल्या नाना त-हेच्या घेतलेल्या उपभोगाची माळ घातली आहे)

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नुपूर पायीं, कुसंगती करताला
लोभ-प्रलोभन नाणीं फेकीं, मजवर आला गेला || थकले रे ..

(आयुष्य सरत आलं तरी अजून विषय वासना (वाईट वासना) कांही कमी होत नाही, अतृप्तीच्या तालावर ती वासना बरोबर घेऊन नाचतांना कुसंगती (वाईट संगती) टाळ्या वाजवीत आहे, एका पायात ‘अनय’ आणि दुस-या पायात ‘अनीती’ची पैंजणे घातली आहेत, (अनय हा राधेचा नवरा. अनय चा अर्थ चांगला नाही, नकारात्मकच आहे. त्याचा अर्थ थोडासा ‘अन्याय’ असाही आहे. तो अर्थ न कळल्यामुळे कांही ठिकाणी मुलाचं नांव ‘अनय’ ठेवतात.) माझ्या सुप्त मनातले लोभ आणि विविध प्रलोभने एखाद्या आंबटशौकीन प्रेक्षकांसारखी माझ्या अंगावर नाणीं फेकीत आहेत).

स्वत:भोवती घेतां गिरक्या, अंधपणा कीं आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठून गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला || थकले रे ..

(आयुष्यभर भणभण करून, तकतक करून, काहीही विशेष न करतां स्वत: स्वत: वरच, खूष होऊन अविरतपणे निष्क्रीयपणे स्वत:भोंवती चक्कर येईपर्यंत गिरक्या घेतल्या, इतक्या कीं आतां डोळ्यांपुढे अंधारी आली. माझा आतां तोल जात आहे, मला आतां मी इतकी सैरभैर झाले आहे कीं मला आतां तालही समजेनासा झाला आहे, बेताल झाली आहे, आला आतां कसला आवाजही येत नाही, माझा स्वत:चा आवाजही आतां पार गोठून गेला आहे…. अशा वेळी मी एका अनाकलनीय अशा गूढ अंधारात एकटीच दिशाहीन होऊन गेले आहे.. आतां माझा जीवच जगण्याला भ्यायला आहे).

थोडक्यात आतां मी जगण्याला कंटाळले आहे, थकले आहे, आयुष्यभर नाचून नाचून मी दमले आहे…. परमेश्वरा, मला या वेगापासून वाचव, वाचव, मला थांबव, मला थांबव…

सुभाष जोशी, ठाणे

वॉट्सअॅपवरून साभार .. दि.०७-१०-२०२०

याच गाण्याचे आणखी एक रसग्रहण वॉट्सअॅपवर भिरभिरत आहे ते खाली दिले आहे. दि.१३-१०-२०२०

नाच नाचुनी अती मी दमले
थकले रे नंदलाला

💥 हे गाणे जेव्हा फारशी समज नव्हती तेव्हा ऐकतांना ..वाटे कोणीतरी नर्तकी नाचून किती दमलेय मी ते सांगतेय कृष्णाला ..मात्र जेव्हा बऱ्यापैकी समज आली ..पुलाखालूनच नव्हे तर पुलावरूनही बरेच पाणी गेले तेव्हा हे गाणे नीट अर्थासहित ऐकले अन हादरलोच ..वाटले ही तर आपलीच व्यथा सांगतेय ..या मोहमायेच्या चक्रात आपणही असेच नाचतोय ..भरकटतोय ..चकवा लागलाय ..

निलाजरेपण कटीस नेसले,
निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी,
गर्व जडविला भाला
उपभोगाच्या शतकमलांची, कंठी घातली माला

💥. जनाची नाही तर मनाची तरी हवी म्हणतात ..तसेच झालेय मनाचीही संपलीय ..कोणीही कितीही निंदा ..आमचा एकच धंदा असेच ..सतत स्वतची स्तुती..प्रशंसा..तारीफ ऐकायला आवडतेय आपल्याला ..हा ‘ स्व ‘ विरघळून जाण्याऐवजी आपण त्यालाच कुरवाळत बसलोय ..माझ्या इच्छा ..माझ्या आवडी ..माझे आनंद ..खाण्याच्या पदार्थांपासून ते सर्व भौतिक सुखांचा हव्यास ..तोच ध्यास ..

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नुपूर पायी, कुसंगती कर ताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवर आला गेला

💥. काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर हे सारे विकार नेहमी मनात कोणती ना कोणती अभिलाषा उत्पन्न करतात ..त्या भोगांच्या आशेने जीव सुखावतोय..काही न काही हवेच आहे ..’ समाधान ‘ मात्र अजिबात नाही ..या विकारांच्या कुसंगतीत अतृप्ती अजूनच पेटणार …वेग येणार हव्यासपूर्ती साठी ..

स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला

💥. हे असे किती काळ ? मी ..माझे सुख ..माझा आनंद ..माझी मजा ..यातच आयुष्य निघून जाते ..अगदी आयुष्याच्या संध्याकाळी समजते आपण कुठेच पोचलो नाही ..त्याच त्याच ठिकाणी रमतोय ..मनावर निबरपणाचा थर साचतो ..जेव्हा गात्रे थकतात..हाकेच्या अंतरावर मृत्यू वाट पाहतोय असे जाणवते तेव्हा खरी भीती वाटू लागते ..भूतकाळाच्या सावल्या मानगुटीवर बसतात ..वर्तमान धूसर होत जातो तर पुढे अंधार ..छे असे काही होण्यापूर्वी सावरता आले तर किती छान ..

हे विकार..हेवेदावे ..हव्यास ..अट्टाहास..काही काही सोबत येणार नाहीय ..त्याऐवजी जर कोणाशी चार गोड शब्द बोललो ..कोणाला संकटात मदत केली ..कोणाच्या भावना जीवापाड जपल्या ..तर तर ..आधीच सावरता येईल हे नक्की ,
त्या विध्यात्याने जसे मानवाला विकार दिलेत तसेच मोक्षाचेही ज्ञान दिलेय ..मुक्तीचाही मार्ग दाखवलाय ..आता हे नाचणे बंद करावे हेच खरे !

ग.दि . माडगुळकर, सुधीर फडके , आशा भोसले

आपल्याला साष्टांग दंडवत !

ही रसग्रहणे वाचल्यावर माझे कुतूहल जागे झाले आणि मी सूरदासांचे मूळ पदशोधून काढले. ते असे आहे.
अब मैं नाच्यौ बहुत गुपाल।
काम-क्रोध कौ पहिरि चोलना, कंठ बिषय की माल॥
महामोह के नूपुर बाजत, निंदा सबद रसाल।
भ्रम-भोयौ मन भयौ, पखावज, चलत असंगत चाल॥
तृष्ना नाद करति घट भीतर, नाना विधि दै ताल।
माया कौ कटि फेंटा बाँध्यौ, लोभ-तिलक दियौ भाल॥
कोटिक कला काछि दिखराई जल-थल सुधि नहिं काल।
सूरदास की सबै अबिद्या दूरि करौ नँदलाल॥

. . . . . . . . . . दि.१३-१०-२०२०

१५. जोगिया – गदिमा

१६. का रे दुरावा ?

लेखक – श्री. नवीन काळे

पूर्वीच्या पिढीतील मराठी लोकांना ‘मुंबईचा जावई’ हा सिनेमा माहित नाही, असे म्हणणे म्हणजे आताच्या पोरांना ‘फेसबुक’ माहित नाही असे म्हणण्यासारखे आहे. १९७० साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने ‘त्या वेळच्या’ मुंबईला आपले प्रमुख पात्र केले होते. घरात ‘पार्टिशन’ करून राहणाऱ्या जोडप्याचं भावविश्व या सिनेमातून समोर आलं. एक जॉईंट फॅमिली चाळीत राहत आहे. आई वडील आणि लग्न झालेली त्यांची दोन मुलं. जागा लहान आहे. मोठ्या भावाला प्रायव्हसी मिळालीय ती मोठ्या भावाच्या अधिकाराने आणि अर्थातच आधी लग्न झाल्याने. लहान भावाच्या ‘प्रायव्हसी’चे मात्र वांदे आहेत. त्याची पत्नी कोकणातून मुंबईच्या या चाळीत सून म्हणून आलेली. कोकणातल्या ऐसपैस घरातून या काड्यापेटीच्या घरात तिची फारच कुचंबणा होते. ‘प्रायव्हसी’ पासून वंचित झालेलं ते नवविवाहित जोडपं, त्यांची ती घालमेल, या सगळ्यामुळे नात्यांमध्ये आलेले कडू गोड तणाव इतकीच या सिनेमाची थीम. पण दिग्दर्शक राजा ठाकूर आणि त्यांच्या मेहनतीला न्याय देणारे सर्व प्रतिभावंत कलाकार (विशेषतः शरद तळवलकर, अरुण सरनाईक, भालचंद्र कुलकर्णी, सुरेखा, रत्नमाला) या मंडळींनी जी धमाल उडवून दिल्ये, की विचारू नका! त्यामुळेच हा सिनेमा आजही फ्रेश वाटतो.

‘मुंबईचा जावई’ या सिनेमाची कथा वपुंची आहे हे अनेकांना माहित नसेल. याच कथेवर / सिनेमावर आधारित एक हिंदी सिनेमाही येऊन गेला. पिया का घर. ‘राजश्री प्रोडक्शन’च्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक होते बासू चटर्जी. ‘ये जीवन है’ हे किशोरचे अप्रतिम गाणे याच सिनेमातले! कर्जत स्टेशन आल्यावर दिवाडकरांचा वडा खाल्ल्याशिवाय तरणोपाय नाही, त्याचप्रमाणे ‘मुंबईचा जावई’ सिनेमातील गाण्यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाणे म्हणजे घोर पाप आहे. सिनेमातली एकेक गाणी ती काय ! क्या बात है ! फडके-माडगूळकर जोडीच्या अजरामर कलाकृतींमधील ‘मुंबईचा जावई’ हे ‘वन ऑफ द बेस्ट’ म्हणावे लागेल. प्रथम तुज पाहता, आज कुणीतरी यावे, का रे दुरावा… विषय निघालाच आहे, तर या शेवटच्या गाण्याजवळ थोडं रेंगाळण्याचा मोह होतोय.

‘मुंबईचा जावई’ सिनेमात येणारे हे गाणे कथेचा भाग म्हणून येते. गाण्याची सिच्युएशन खूप बोलकी आहे. नवरा रुसून बसलाय. त्याला बोलतं करायचंय. का रे दुरावा…का रे अबोला…? असं विचारत नायिका त्याला मनवते आहे. त्याच घरात एका खोलीत लहान भावाची बायको एकटीच झोपली आहे – झोपायचा प्रयत्न करते आहे. तिचा नवरा तिच्यापासून दूर – एकटा झुरतोय ! या सगळ्या नाट्याच्या पार्श्वभूमीवर हे गाणं कमालीचं प्रभावी ठरतं मुख्य म्हणजे त्या गाण्यातला ‘रोमान्स’ जपताना दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी ज्या संयतपणे चित्रण केलंय की त्याला तोड नाही.

बाबूजींच्या (सुधीर फडके) सर्वोत्कृष्ट गाण्यांत या गाण्याचा क्रमांक नेहमीच वरचा राहील. चाल गोड आहे, संगीत संयोजन अप्रतिम आहे, यात वादच नाही. पण मला गंमत वाटते ती आणखी काही गोष्टींची. नवरा रागावलाय. बायकोने (कधी नव्हे ती!) शरणागती पत्करली आहे. तिची शरणागती, तिची माघार, तिचा लाडिकपणा, तिचे आर्जव चालीच्या प्रत्येक फ्रेजमध्ये दिसत राहतात. का रे दुरावा, का रे अबोला या ओळीतील ‘प्रश्नचिन्ह’ बाबूजी गाण्याच्या चालीत आणतात. बाबूजी का ग्रेट होते, ते शेवटच्या अंतऱ्यात कळते. नवरा अजून आपल्याला ‘वश’ झालेला नाही तोवर पहिले दोन अंतरे खालच्या स्वरात सुरु होतात. आधी त्याच्या ‘मूड’चा अंदाज घेणे चालू आहे. पहिले दोन अंतरे संपतात तेव्हा नवरा आता आपल्याला पूर्णपणे वश झालाय हे तिच्या लक्षात आलंय. आता बाजी पलटलीय. तिसरा अंतरा सुरु होतो. ती आता राणी आहे. तिने फक्त त्याला आदेश द्यायचा आहे. आता बाबूजी तिसरे कडवे वरच्या सुरात घेतात…

‘रात जागवावी असे आज वाटे, तृप्त झोप यावी पहाटे पहाटे …!’ टीपकागदाने टिपून घ्यावे त्याप्रमाणे आशाताईंनी संगीतकाराचा हा ‘थॉट’ गाण्यात असाच्या असा मांडलाय. गाण्यातले एक्सप्रेशन म्हणजे काय असतं हे कळण्यासाठी प्रत्येक नवोदित गायिकेने (आणि गायकाने सुद्धा !) हे गाणे कमीत कमी हजार वेळा तरी ऐकावे. ‘कुणी ना विचारी धरी हनुवटीला’ या ओळी मुद्दाम ओरिजिनल गाण्यात ऐका. तुमचे नाव ‘आशा भोसले’ नसेल तर या ओळीत एक्स्प्रेशन्स ओतायला तुम्हाला हजारो जन्म घ्यावे लागतील.

गदिमा लिहायला बसले की शब्द त्यांच्या समोर रांग लावून उभे राहत. याचा प्रत्यय या गाण्यात देखील येतो. ‘का रे दुरावा, का रे अबोला’ हे दुसरा एखादा गीतकार लिहिलही कदाचित. पण ‘हात चांदण्याचा घेई उशाला’ लिहायला तिथे माडगूळकरच हवेत. एकेक कडव्याची पायरी चढत ‘ती’ कसा गड काबीज करते, हे पाहणंही लोभसवाणे ठरेल. ‘नीज येत नाही मला एकटीला, कुणी ना विचारी धरी हनुवटीला’ अशी तक्रार करणारी ती पुढच्या कडव्यात ‘तुझ्यावाचुनी ही रात जात नाही..’म्हणत त्याचा इगो जिंकते. ‘रात जागवावी असे आज वाटे, तृप्त झोप यावी पहाटे पहाटे’ या ओळीतला शृंगार कुठेही आपली मर्यादा सोडत नाही. ‘मर्यादा का सोडत नाही’ यालाही एक सबळ कारण आहे. तो शृंगार एका मध्यमवर्गीय घरात संसार करणाऱ्या मराठी पतीपत्नीचा आहे, याची योग्य जाण गदिमांना आहे. म्हणूनच तो सूचक आहे. चार भिंतींच्या पार्टिशनबाहेर त्याने जाणे प्रशस्त होणार नाही. हा ‘सेन्स’ असणे हा त्या काळाचाही महिमा आहे.

‘मुंबईचा जावई’ सिनेमातल्या अनेक गोष्टींशी आपण आज रिलेट होऊ शकणार नाही, कदाचित. पण तरीही मराठी माणसाच्या भावविश्वात या सिनेमाचे एक आगळे स्थान आहे. कारण आपल्यापैकी अनेकांची, किंवा त्यांच्या आई-बाबांची, आजी आजोबांची ती कहाणी आहे. मी स्वतः गिरगावातल्या चाळीत लहानाचा मोठा झालोय, मी स्वतःला या सिनेमाच्या कहाणीत शोधतो. दहा बाय दहाच्या दोन खोल्यांत माणसं किती आनंदानं राहतात हे मी खूप जवळून पाहिलंय. सकाळी नळांवर भांडणारी माणसं संध्याकाळी गप्पा मारताना पाहिली आहेत. टुकीनं संसार करत, काटकसर करून आपल्या मुलांची शिक्षणं करणारे आईबाप माझ्या चाळीत होते. आज आलिशान घरांमध्ये राहणाऱ्या अनेकांची ‘मूळं’ अजूनही त्या चाळीत आहेत. ‘मुंबईचा जावई’ सिनेमा, ही मुंबईकरांच्या स्पिरीटला दिलेली मानवंदना आहे. म्हणूनच मुंबईतील हेरीटेज वास्तूंप्रमाणे या सिनेमालाही रसिकांच्या हृदयात नेहमीच आगळे स्थान राहणार आहे.

नवीन काळे

वॉट्सॅपवरून साभार . . दि. १०-०६-२०२१

******************************

१७. विलक्षण योगायोग : गदिमा आणि मजरूह सुलतानपुरी

मला कमालच वाटते देवाची, आणि दैवाचीही. एकाच वर्षी, एकाच महिन्यात, एकाच दिवशी… दोन बाळं जन्माला आली. एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात, तर दुसरं पार तिथे उत्तर प्रदेशातील निझामाबादेत. एकाचा जन्म हिंदू कुळातील… तर दुसर्‍याचा जन्म मुस्लिम घराण्यात. पण अखेर उमेदीच्या काळात, दोघेही कार्यरत झाले एकाच क्षेत्रात. एकाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली, तर दुसर्‍याने हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून. एकाला आद्य ‘वाल्मिकी’ म्हणून ओळखत लोक, तर दुसर्‍याला इस जमानेका ‘गालिब’. खोर्‍याने गीतं लिहिली दोघांनीही, अगदी आपापल्या शेवटच्या श्वासापर्यंत. अर्थातच एक गेला ह्या इहलोकीची यात्रा संंपवून अंमळ लवकरच, त्या दुसर्‍याच्या मानाने.

एकाने लिहिलं…

‘तुझ्यावाचूनीही रात जात नाही
जवळी जरा ये हळू बोल काही
हात चांदण्यांचा घेई उशाला
अपराध माझा असा काय झाला’

तर दुसर्‍याने लिहिलं…

‘रातकली एक ख्वाब में आई
और गले का हार हुई
सुबह को जब हम नींद सें जागे
आँख तुम्ही सें चार हुई’

म्हणजे ही दोन गाणी अनुक्रमे ‘मुंबईचा जावई’ आणि, ‘बुढ्ढा मिल गया’ ह्या चित्रपटांतली. हे दोन्ही चित्रपट आले तेव्हा, ह्या दोघांनीही वयाची पन्नाशी ओलांडलेली. असे अगणीत चमत्कार उतरलेयत ह्या दोघांच्या, सिद्धहस्त लेखणीतून… स्वतःच्या त्या त्या वेळच्या वयाला न जुमानता.

हेच बघा आणिक एकेक वानगीदाखल…

‘सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्‍याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा’

आणि…

‘ये है रेशमी ज़ुल्फों का अँधेरा
न घबराइए
जहाँ तक महक है मेरे गेसुओं की
चले आइये’
१ ऑक्टोबर रोजी ह्या दोघांचा जन्मदिन होता… आणि दोघांचंही जन्मवर्ष एकच… १९१९.

ग.दि.माडगुळकर , मजरुह सुलतानपुरी

आपापल्या आकाशात… स्वयंतेजाने तळपलेल्या ह्या दोन्ही सुर्यांना, आपल्या मनःपुर्वक अभिवादनाचं अर्ध्य.

—सचिन

वॉट्सॅपवरून साभार . . दि. १०-०६-२०२१

*****************************

१८. बिन भिंतीची उघडी शाळा

बिन भिंतीची उघडी शाळा … लाखो इथले गुरू…
झाडे, वेली, पशु, पाखरे … यांशी गोष्टी करू!

बघू बंगला या मुंग्यांचा, … सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील … फिरते फुलपाखरू…
बिन भिंतीची उघडी शाळा … लाखो इथले गुरू!

सुगरण बांधी उलटा वाडा, … पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे … बेडकिचे लेकरू…
बिन भिंतीची उघडी शाळा … लाखो इथले गुरू!

कसा जोंधळा रानी रुजतो, … उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा … फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा … लाखो इथले गुरू!

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, … कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या … अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा … लाखो इथले गुरू!
– ग. दि. माडगूळकर (गदिमा)

. . . . . . . . . . . . . .

१९. काय वाढले पानावरती

महाराष्ट्राचे महाकवी, आधुनिक वाल्मिकी कै. ग. दि. माडगूळकर यांनी जेवणातील ५० हुन अधिक पदार्थ आणि भाज्यांचा उल्लेख करून एक कविता रचली होती. त्यांनी वापरलेली विशेषणेही खासच आहेत. ही कविता खाली देत आहे.

।। काय वाढले पानावरती ।।

काय वाढले पानावरती,
ऐकून घ्यावा थाट संप्रती,
धवल लवण हे पुढे वाढले,
मेतकूट मग पिवळे सजले
आले लोणचे बहु मुरलेले,
आणि लिंबू रसरसलेले,
किसून आवळे मधुर केले,
कृष्णा काठचे वांगे आणले,
खमंग त्याचे भरित केले,
निरनिराळे चटके नटले,
चटण्यांचे बहु नवे मासले,
संमेलनची त्यांचे भरले,
मिरची खोबरे ती सह ओले,
तीळ भाजूनी त्यात वाटले,
कवठ गुळाचे मिलन झाले,
पंचामृत त्या जवळी आले,
वास तयांचे हवेत भरले,
अंतरी अण्णा अधीर जाहले!
भिजल्या डाळी नंतर आल्या,
काही वाटल्या काही मोकळ्या,
काही वाटुन सुरेख तळल्या,
कोशिंबिरी च्या ओळी जमल्या,
शुभ्र काकड्या होत्या किसल्या,
मुळा कोवळा मिरच्या ओल्या,
केळी कापून चकल्या केल्या,
चिरुन पेरुच्या फोडी सजल्या,
एकरूप त्या दह्यात झाल्या,
भाज्या आल्या आळू-घोसाळी,
रान कारली वांगी काळी,
सुरण तोंडली आणि पडवळी,
चुका चाकवत मेथी कवळी,
चंदन बटवा भेंडी कवळी,
फणस कोवळा हिरवी केळी,
काजुगरांची गोडी निराळी,
दुधी भोपळा आणि रताळी,
किती प्रकारे वेगवेगळी,
फेण्या, पापड्या आणि सांडगे,
कुणी आणुनी वाढी वेगे,
गव्हल्या नकुल्या धवल मालत्या,
खिरी तयांच्या शोभत होत्या,
शेवयांच्या खिरी वाटल्या,
आमट्यांनी मग वाट्या भरल्या,
सार गोडसे रातंब्याचे,
भरले प्याले मधुर कढीचे,
कणीदार बहू तूप सुगंधी,
भात वाढण्या थोडा अवधी ….

…. महाकवी ग दि माडगुळकर.

**************

२०.मरावे परी गीतरुपी उरावे !!

. . . . . माधव विद्वांस यांच्या मुखपुस्तकावरून साभार

माणदेशासारख्या दुष्काळी भागात जन्मलेल्या तरीही कवितेची हिरवळ वाढविणारे, कथाकार नाटककार अभिनेते संगीतकार, चित्रपटनिर्माते पटकथाकार दिग्दर्शक राजकारणी माजी_आमदार, कवी (शाहीर,भावगीतकार,लावणीकार,अभंगकार, समरगीतकार ) सर्वांचे लाडके कै गदिमा तथा ग दि माडगूळकर यांची आज जयंती

त्यांचा जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा.विनायक दिग्दर्शित ‘ब्रम्हचारी’ (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोटया भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिध्द साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. ‘नवयुग चित्रपट लि.’ ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. नवसंह पिक्चर्सच्या ‘भक्त दामाजी’ (१९४२) आणि ‘पहिला पाळणा’ (१९४२) ह्या चित्रपटांनी गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या ‘लोकशाहीर रामजोशी’ (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहिली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली;

गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते ‘चैत्रबन’ (१९६२) ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिध्द झालेल्या आहेत. (तीन चित्रकथा, १९६३). ‘युध्दाच्या सावल्या’ (प्रयोग, १९४४) ह्या नावाने एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. संगीतामधील बहुतेक प्रकारात त्यांनी गीते लिहिली लावणी , भावगीत हे तर त्यांचे होम पिच, त्यांनी लिहिलेली शेकडो गीते आजही लोकांचे तोंडी अहेत. गदिमा आणि गीतरारामायण हे समीकरण झाले. त्याची अवीट गोडी कधीही न संपणारी आहे .
गदिमा यांची गाजलेली ४१५ गीत्यांची यादी त्यांच्या जयंती निमित्त तुमच्यासाठी
अनुपमेय हो सुरूं युद्ध – – अपराध मीच केला – – अबोल झालीस का साजणी .–अय्याबाई इश्श्बाई – – अल्लड माझी प्रीत .—-असा नेसून शालू हिरवा ..—–असा हा एकच श्रीहनुमान् .—-अहो सजना दूर व्हा.—- आई आणखी बाबा यातुन .—-आई व्हावी मुलगी माझी.—-..१आईपण दे रे … आईसारखे दैवत सार्या .. .. .. .. आज कुणीतरी यावे .. . . आज कां निष्फळ होती बाण .. . . .. आज गूज सांगते तुला .. .. . आज दिसे का चंद्र गुलाबी .. . .. . आज मी शापमुक्त जाहलें .. . . .. आज या एकांत काली .. . . . आज सुगंधित झाले .. . . आठव येतो मज … . आठवतो का बालपणा …. . …. आठवे अजुनी यमुना तीर … . .. आता कसली चोरी ग … .. . आधार जीवाला वाटावा … .. … आनंद आगळा हा मी
आनंद सांगूं किती सखे ग .. . . . आभाळ फाटलेले टाका कुठे … .. .. आमुची वसने दे श्रीहरी .. .. . आला वसंत देही … .. आली बाई पंचिम रंगाची .. . . .. आवडती भारी मला माझे …. . .. . आवडसी तू एकच ध्यास …. . . आसावल्या मनाला माझाच ….. … .. आश्रम की हरिचे हे … . आंधळेपणा फिटे जिवंत ….. . इथेच टाका तंबू .. . इवल्या इवल्या वाळूचं .. .. .. इवल्याइवल्याशा .. … इंद्रायणी काठी .. . उगा कां काळिज माझें उले . . . . उगी उगी गे उगी उघडले एक चंदनी दार .. .. .. उघडी नयन शंकरा . .. … उडाला राजहंस गगनात .. . .. … उदासीन का वाटती . . .. उद्धवा अजब तुझे सरकार .. .. .. उद्याचा कोण धरी .. . उपवर झाली लेक लाडकी .. . .. उमा म्हणे यज्ञी माझे . . . . ऊठ ऊठ पंढरीनाथा . . .. ..
ऊठ पंढरीच्या राजा . … .. ऊठ मुकुंदा सरली रात . . .. .. ऊठ शंकरा सोड समाधी . … एक कोल्हा बहु भुकेला . . . एक धागा सुखाचा .. .. एक फुलले फूल आणि . .. एक होता चिमणा . .. एकटी शिवारी गडे . . . एकदा येऊन जा .. . एकवार तरी राम दिसावा .. . . .. एकवार पंखावरुनी . … एका तळ्यांत होती बदके . .. .. ऐकशील माझे का रे .. . . ओटीत घातली मुलगी .. . ओळखिले मी तुला नाथा . . .. औंदा लगीन करायचं (२) .. . (2) अंगणी गुलमोहर फुलला .. . .. अंगणी गंगा घरात काशी .. .. .. . अंबिका माया जगदीश्वरी .. .. .. आंधळ्यांनी का म्हणावे … . .. कधी तू दिसशील डोळ्यांपुढे . . कधी मी पाहीन ती पाऊले . . . कधी रे पाहिन डोळां तुला . . . . कधीतरी तुम्ही यावे इथे .. . कबीराचे विणतो शेले .. .
कर्म करिता ते निष्काम . .. . करु देत शृंगार . . कशी करू स्वागता . . … कशी झोकात चालली . . .. कशी मी सांगु वडिलांपुढे . . .. कळी उमलते मना एकदा . .. .. .. का रे दुरावा . .. का मोगरा फुलेना . .. . का हो धरिला मजवर . .. … काजवा उगा दावितो दिवा … . . . कानडा राजा पंढरीचा … .. … काय करू मी ते सांगा .. . .. काय सामना करू तुझ्याशी .. … . . काल मी रघुनंदन पाहिले .. … . काल रात सारी मजसी .. .. . .. काही तरी तू बोल . . किती दिसांनी आज भेटसी . .. . किती वयाचे धराल भय .. .. . कुणी तरी बोलवा दाजिबाला . .. … कुणी म्हणेल वेडा तुला . . . कुणीतरी सांगा श्रीहरीला . .. .. कुरवाळू का सखे मी .. . . केतकीच्या बनात .. .. कोठें सीता जनकनंदिनी . . . कोण तूं कुठला राजकुमार .. ..
कुंभारासारखा गुरू नाही ….. . कृष्ण तुझा बोले कैसा . . .. खराच कधी तू येशिल .. . खाई दैवाचे तडाखे . .. .. खेड्यामधले घर कौलारू (१) … . (1) गगनी अर्धा चंद्र उगवला .. .. .. गा बाळांनो श्रीरामायण . .. … गिरीधर वर वरिला . . .. गुरुविण कोण दाखविल .. गेला दर्यापार घरधनी . … .. गेलीस सोडुनी का . गोकुळ सोडुन गेला माधव . .. गोकुळिचा राजा माझा . .. .. गोपाला गोपाला देवकीनंदन .. .. . गोमू माहेरला जाते हो … . गोरी गोरीपान फुलासारखी . … गोरी बाहुली कुठुन आली . .. गंगा आली रे अंगणी .. .. .. गंध हा श्वास हा .. . . . घन घन माला नभी . . .. . घननीळा लडिवाळा . . … घनश्याम नयनीं आला … .. … घर हीच राजधानी . .. चल ग सये वारुळाला . . . … चल सोडून हा देश . .
चला राघवा चला .. … .. चला सख्यांनो हलक्या .. .. … चापबाण घ्या करीं . .. . . चाल बैला चाल . . . चाल राजा चाल सर्जा . .. . .. चंदाराणी चंदाराणी का ग … . . . चंद्र आणखी प्रीती .. … चंद्रावरती दोन गुलाब …. . चांद किरणांनो जा जा . .. .. .. चांद मोहरे चांदणे . . .. चांदणे झाले ग केशरी .. . . . चांदण्यात चालु दे … . चांदोबा चांदोबा भागलास .. .. चिंचा आल्यात पाडाला . … … चिंधी बांधिते द्रौपदी . .. जग हे बंदिशाला . … जन्मच हा तुजसाठी … . . जय जयकारा करा गर्जू . … .. . जय जवान जय किसान . .. . . जळते मी हा जळे दिवा .. . . . जा झणि जा रावणास सांग . . . …. . जा बाळे जा . . . जा मुलि शकुंतले सासरी . .. .. जाग रे यादवा . … जाण आहे आपणांसी मी .. .. ….
जाशिल कोठे मुली तू . जाहली जागी पंचवटी .. . … जाळीमंदी पिकली करवंद .. . …. जिण्याची झाली शोककथा . . .. जिवलगा कधि रे येशील तू … . जुळत आली कथा . .. .. जेथें राघव तेथें सीता .. . जो जो जो बाळा .. जोगिया . जिंकू किंवा मरू . . ज्येष्ठ तुझा पुत्र मला . . . .. झटकून टाक जिवा .. . . झडल्या भेरी झडतो … .. झरा प्रीतिचा का असा .. . . .. झाडावरती घडे लटकले …. . … झाला महार पंढरिनाथ .. .. … झाली ग बरसात फुलांची . . .. . झाली भली पहाट . . .. झाले ग बाई संसाराचे . . . … झुक झुक झुक झुक अगीनगाडी . . झांजीबार झांजीबार .. .. डोहाळे पुरवा रघुकुलतिलका . .. … डोळ्यापुढे दिसे गे मज . . डोळ्यांत वाच माझ्या . . .. ताईबाई अता होणार लगीन .. .. . .
तात गेले माय गेली .. .. तिन्हीसांज होते तुझी याद . .. तुझी रे उलटी सारी . . तुझे नि माझे इवले गोकुळ . . तुझे रूप चित्ती राहो . तुझ्या कांतिसम रक्तपताका . .. .. तुझ्या मनी तेच माझ्या . . .. तुम्ही माझे बाजीराव . .. तुला पाहते रे तुला . .. . तुला या फुलाची शपथ . . . .. ते माझे घर ते माझे . . . तोडितां फुलें मी सहज . .. तंबाखूची रसाळ पोथी .. .. तांबुस गोरा हात साजिरा . . .. .. त्या तिथे पलीकडे तिकडे . .. . थंडीची झोप मला . .. थांब सुमंता थांबवि . .. .. दशरथा घे हें पायसदान …. दहा वीस असती का रे .. .. . दाटला चोहिकडे अंधार … . .. दिलवरा दिल माझे ओळखा .. . .. दिवा लाविते दिवा . . . दूर कुठे राउळात दरवळतो .. … देव देव्हार्याअत नाही .. . देवा दया तुझी की . ..
देश हीच माता .. दैव जाणिले कुणी . . दो दिसांच्या संगतीची .. .. धक्का लागला ग .. … . धन्य मी शबरी .. .. धाव-पाव सावळे विठाई . .. .. . धुंद मधुमती रात रे .. .. धुंद येथ मी स्वैर . धौम्य ऋषी सांगतसे .. … नका गडे माझ्याकडे .. . … नको करूंस वल्गना रावणा . . … … नको बावरूनि जाऊ . .. . नको मारूस हाक . . .. नको रे जाउं रामराया . . . .. नको रे बोलूस माझ्याशी . .. नकोस नौके परत फिरूं . . .. नवल वर्तले गे माये .. .. . नवीन आज चंद्रमा . .. … नसे राउळी वा नसे मंदिरी . . . . . नाकात वाकडा नथीचा .. … .. नाच रे मोरा अंब्याच्या . . … नाच लाडके नाच . .. . नाचनाचुनी अति मी . . . नाविका चल तेथे .. . निघाले असतिल राजकुमार . .. ..
निजरूप दाखवा हो . … निळा समिंदर निळीच . .. नीज वो श्रीहरी चांद ये . . न्याहरी कृष्णाची घेउनी .. . पक पक पकाक . . .. पतित पावन नाम ऐकुनी . .. .. . पदरावरती जरतारीचा ….. … पराधीन आहे जगतीं .. .. .. पहिले भांडण केले कोणी . .. पळविली रावणें सीता .. .. . पाठ शिवा हो पाठ शिवा .. . .. . पाण्या तुझा रंग कसा .. . . .. पाण्यात पाहती का माझे .. .. . . पावसात नाहती लता … .. .. .. पार्वती वेची बिल्वदळें .. .. पाहिली काय वेलींनो . .. पात्रापरी नदीच्या रस्ता … .. .. पेटवी लंका हनुमंत . .. .. पोटापुरता पसा पाहिजे . .. … . पिंगा घाल ग गौळणी . . . .. प्रथम तुज पाहता .. … प्रभातसमयो पातला .. .. … प्रभो मज एकच वर . . . . प्रिया तुज काय दिसे . . प्रीतिच्या पूजेस जाता . ..
प्रीती प्रीती सारे म्हणती . .. प्रेमवेडी राधा साद घाली .. .. . प्रेमात तुझ्या मी पडले . . .. फड सांभाळ तुर्याीला ग . .. .. . फुला फुला रे फुला . . . फांद्यावरी बांधिले ग … . . बघुन बघुन वाट तुझी . . .. बदलती नभाचे रंग कसे … .. . बसा मुलांनो बसा सांगतो .. . .. .. बहरला पारिजात दारी …. .. . बाई माझी करंगळी मोडली . . … . बाई मी पतंग उडवीत होते . .. . बाळ तुझे नवसाचे- यशोदे .. … बाळा जो जो रे .. बिनभिंतीची उघडी शाळा . बियावाचुनि झाड वाढते .. . .. बुगडी माझी सांडली ग . . .. . बैल तुझे हरणावाणी . …. बोल ग मैने बोल . . बोलले इतुके मज श्रीराम . . . भावूक दोन डोळे . भूवरी रावणवध झाला . .. .. .. मज आवडले हे गाव . …. .. मज नकोत अश्रू घाम . . . . मज सुचले ग मंजुळ . . . .
मज सांग अवस्था दूता . . … . मज सांग लक्ष्मणा जाउं . . … . मथुरेत मी गोकुळी कान्हा . .. मधु इथे अन्‌ चंद्र . . .. मधुराणी तुला सांगू का .. . . . मधुरिके नाच चंद्रिके . . . मनोरथा चल त्या … . . मला आणा कोल्हापुरी साज .. … . .. महेशमूर्ती तुम्ही सभाजन . माझा होशिल का .. . माझे दुःख न जाणे कोणी . . . . माझं ठरल्यालं लगीन .. …. . माझ्या रे प्रीती फुला .. . माता न तूं वैरिणी .. . . मानसी राजहंस पोहतो .. .. . माय यशोदा हलवी .. .. .. मार ही ताटिका रामचंद्रा .. .. … मिटुन डोळे घेतले मी . मी आज पाहिला बाई .. .. . मी गुणगुणते अबोध काही .. . . मी तर प्रेम दिवाणी . . मी तुमची जाहले . .. मी पुन्हा वनांतरी फिरेन . … मी भीक मागणारी … मी वाजवीन मुरली .. .
मीच गेले जवळ त्याच्या .. … मीच माझ्या धामी रामा .. . .. मुक्कामाला र्हारवा पाव्हणं … .. … मुलुख त्यात मावळी . . .. मैना राणी चतुर-शहाणी .. . . .. मोठंमोठं डोळं तुझं . . . . मोडुं नका वचनास-नाथा .. … .. यश तेची विष झाले . . यशवंत हो जयवंत हो .. … या इथें लक्ष्मणा बांध . … . या कातरवेळी (१) . .. (1) या कोकणात आता . .. … या घरची मी झाले . . . या चिमण्यांनो परत फिरा . .. .. . या डोळ्यांची दोन पाखरें . . .. या सुखांनो या (१) . . . (1) याचका थांबु नको … . . याल कधी हो घरी .. . . ये निद्रादेवी . येणार नाथ आता . . … येणे-जाणे का हो सोडले . . . योग्य समयिं जागविलें . .. .. रघुवरा बोलत कां नाहीं … . . . रघुवीर आज घरी . .. . रचिल्या कुणि या प्रेमकथा .. . ..
रम्य ही स्वर्गाहून लंका .. .. रागारागाने गेलाय्‌ निघून .. .. . रानांत सांग कानांत .. . .. रानी लिंबास आला बहार . . … .. राम जन्मला ग सखी . … . . रामचंद्र स्वामी माझा … . .. रामा रघुनंदना .. …. रामाविण राज्यपदीं कोण .. … रंग फेका रंग रे . . . रंगवि रे चित्रकारा .. … रंगुबाई गंगुबाई हात .. .. .. रंगू बाजारला जाते हो . …. . लढा वीर हो लढा लढा .. .. .. लपविलास तू हिरवा चाफा … .. .. लळा-जिव्हाळा शब्दच .. .. .. लक्ष्मणा तिचींच ही पाउलें … . लाकडाच्या वखारीत …. .. लाज वाटे आज बाई .. . .. . लाडके कौसल्ये राणी .. .. . लावियले नंदादीपा .. … लीनते चारुते सीते . . लोकसाक्ष शुद्धी झाली .. . . लंगडा ग बाई लंगडा … . . … लिंबलोण उतरू कशी . . . वनवास हा सुखाचा … . ..
वळते वाट चढता घाट .. .. … . वाजवि मुरली श्यामसुंदरा .. . . वाजवी पावा गोविंद .. .. वारा सुटे सुखाचा .. .. वालीवध ना खलनिर्दालन . . . . .. विकत घेतला श्याम . .. . विझले रत्नजदीप नगरात . .. … विठ्ठला तू वेडा कुंभार .. . . विठ्ठलाच्या पायी थरारली … . … वेदमंत्राहून आम्हां .. … शपथ तुला प्रेमा .. . . शपथ या बोटांची .. . . शब्द शब्द जुळवुनि . . . शेपटीवाल्या प्राण्यांची … .. शोध शोधता तुला .. . सजणाच्या मर्जीखातर …. . .. सन्मित्र राघवांचा सुग्रीव .. …. सप्रेम नमस्कार विनंती . … . समचरण सुंदर …. . सरयू तीरावरी अयोध्या .. .. .. सहस्त्र रूपे तुम्ही सदाशीव … ‘सा’ सागर उसळे कैसा . .. . .. साडी दिली शंभर . .. सासरच्या घरी आले … . .. सासुर्यातस चालली लाडकी .. .. ..
सुखद या सौख्याहुनि . . .. सुग्रीवा हें साहस असलें . .. .. सुटले वादळ झाड . .. . सुरावटीवर तुझ्या उमटती … . .. सूड घे त्याचा लंकापति .. … सेतू बांधा रे सागरीं .. .. सैनिक माझे नाव . . .. सैनिक हो तुमच्यासाठी . … संथ वाहते कृष्णामाई .. .. .. सांग ना मला गडे . . .. . सांग सख्या तुज काय . .. .. सांगा या वेडीला .. . . सांवळा ग रामचंद्र … . …. सांवळाच रंग तुझा …. . . सौंदर्याची खाण पाहिली … . . स्ना न करिती लोचने . . . स्वप्नाखवरी स्वप्न पडे … .. . स्वयें श्रीरामप्रभु ऐकती . . . स्वयंवर झालें सीतेचे … . स्वर उमटावे शुभंकरोती . .. स्त्रीलजन्मा ही तुझी कहाणी .. .. हरवले माझे काही तरी … . . . हरि तुझी कळलि चतुराई . .. .. हले डुले हले डुले . . ही कुणी छेडिली तार ..
हीच ती रामांची स्वामिनी .. . हुकुमाची राणी माझी . . . हे कधी होईल का . . हे गीत जीवनाचे .. हे चिंचेचे झाड दिसे . हे राष्ट्र देवतांचे .. .. हे वदन तुझे की .. हेच ते ग तेच हे ते . हेच ते चरण अनंताचे .. … होणार स्वयंवर तुझे . … होशी काय निराश . . हृदयि प्रीत जागते . .. श्रावण आला ग वनी .. … . . श्रीहरी विदुराघरि पाहुणा . . . त्रिवार जयजयकार रामा . ..

श्री.माधव विद्वांस आणि फेसबुक यांचे मनःपूर्वक आभार दि.०१-१०-२०२१


****************

२१. आठवणीतील गदिमा

. . . . . . . . पु.ल.देशपांडे

पुण्याला ‘बालगंधर्व’ थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, “स्वामी, चार ओळी हव्या आहेत ….बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी”.मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,”असा बालगंधर्व आता न होणे.” तेवढय़ात कुणीतरी आले. गप्पागोष्टी सुरु झाल्या. मी समस्यापूर्तीची वाट बघत होतो. तासाभरात निघायचे होते. त्या श्लोकाला चाल लावायची होती.

उदघाटन -समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या. त्यांत माडगूळकरांचे “असे आमुचे पुणे” होतेच. तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आला. सुरेख, वळणदार अक्षरात लिहिलेला. बकुळ पंडितला मी चाल सांगितली. रंगमदिराच्या उदघाटनाच्या वेळी रसिकांनी भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले.रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या ‘नारायण श्रीपाद राजहंस’ आणि ‘स्वयंवरातली रुक्मिणी’ अशी दोन दर्शने घडवणार्‍या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजुला केले, आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरु झाल्यावर रसिकांना कळेना , की त्या रंगशिल्पाला दाद दयावी की गीतातल्या शब्दशिल्पाला !. प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी त्या ‘रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्’ ह्या अनुभूतीने पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशांतले शेकडो हातरुमाल अश्रू पुसत होते.

गीतांच्या जन्मकाळाशी गुंतलेल्या अशा किती आठवणी….

डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यातून जाताना एका विजेच्या खांबापाशी आलो की आठवते: रात्रीचे चित्रीकरण आटपून चालत आम्ही दोघे घरी येत होतो. पहाट होत होती, रस्त्यातले म्युनिसिपालटीचे दिवे मालवले. त्या खांबापाशी क्षणभर थांबून माडगूळकर उदगारले,
“विझले रत्नदीप नगरात !”
“आता जागे व्हा यदुनाथ”
गीत भावनेच्या तादात्म्य पावण्याच्या त्यांच्या असंख्य खुणा त्यांच्या गीतातून आढळतात.शब्दयोजनेतले त्यांचे अवधान सुटत नाही. अशी शेकडो गीते त्यांनी रचली. चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिल्यामुळे आमच्या ‘आर्डरी’ ही विचित्र असायच्या. ‘आर्डरी’ हा त्यांचाच शब्द. कधीकधी चाल सुचलेली असायची.
“स्वामी,असं वळण हवं.”
“फूल्देस्पांडे, तुम्ही बाजा वाजवीत राहावे”.

मित्रांच्या नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मग मधुकर कुळकर्ण्याला “पेटीस्वारी”,राम गबालेला “रॅम् ग्याबल”, वामनराव कुळकर्ण्यांना “रावराव”…कुणाला काय , कुणाला काय असे नाव मिळायचे. चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन त्या चालीचे वजन त्यांच्या ध्यानात येई. मग त्या तालावर झुलायला सुरुवात. बैठकीवर उगीचच लोळपाटणे. पोटाशी गिरदी धरुन त्याच्यावर चिमटय़ात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढय़ात ठेवून कातरायला सुरवात. मग अडकित्याची चिपळी करुन ताल …नाना तर्‍हा . एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे , इथे गीत आकाराला येते आहे, की नुसताच पोरकटपणा चाललाय !. एखादे दांडगे मूल पाहावे तसे वाटत असे. त्यांच्यातला नकलाकार जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा. खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे टाकून शैशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे. ह्या स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते. प्रापंचिक जबाबदाय्रा फार लवकर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते, त्यातून ही मूलपणाकडची धाव असायची की काय, ते आता कोणी सांगावे ?..

गडकरी गेले त्या वेळी रसिक महाराष्ट्र असाच सुन्न झाला होता म्हणतात. माडगूळकरांना गडकर्‍यांविषयी अतोनात प्रेम. आम्ही जोडीने केलेल्या प्रवासात गडकर्‍यांच्या कवितांचेच नव्हे, तर नाटकांतील उतार्‍यांचे पठण हा आमचा आवडता छंद असायचा. हरिभाऊ आपटे, नाथमाधव, गडकरी , बालकवी, केशवसुत, फडके, खांडेकर, अत्रे ह्या आधुनिक काळातल्या साहित्यकारांचे मार्ग पुसैतु आम्ही ह्या साहित्याच्या प्रांतात आलो. मी मुंबंईत वाढलो आणि माडगूळकर माडगुळ्यात वाढले, तरी आमच्या साहित्यप्रेमाचे पोषण एकाच पध्दतीने चाललेले होते. गडकर्‍यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आतच आमचा जन्म. माडगूळकर माझ्यापेक्षा फक्त एक महिन्याने मोठे, बालपणातले आमचे इतर वातावरण मात्र निराळे होते.

“त्या तिथे, पलिकडे, तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे” ही कविता प्रथम त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मी म्हणालो होतो, “महाकवी, तुम्ही लकी !” (माडगूळकर मात्र स्वताला ‘महाकाय कवी’ म्हणत.) तुमच्या प्रियेच्या झोपडय़ाकडे वळताना त्या वळणावर आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो त्या वातावरणात वळणावर जळाऊ लाकडांची वखार !

“महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत. इतर काहीही देण्या-या माणसापेक्षा समाजाला गाणे देणा-या माणसाचे उपकार फार मोठे असतात. Song has longest life अशी एक म्हण आहे. एक गाणे माणसांच्या पिढय़ानुपिढय़ा बांधून ठेवते एवढेच कशाला ?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते. हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंत:करण होते. माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली. चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात , देवळात , शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत… त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे ?.

माडगूळकरांचे चिरंजीवित्व गाण्यांनी सिध्द झाले आहे, व्यक्तिश: मला तर माडगूळकरांचे स्मरण करणे माझ्या पंचविशीपासून ते आता साठीकडे वळलेल्या माझ्याच आयुष्याकडे पुन्हा वळून पाहण्यासारखे वाटते. आम्ही काम केलेला एखादा जुना चित्रपटच पाहण्यासारखे. त्यातली माडगूळकरांची भूमिका आणखी खूप पाहायला मिळणार अशी आशा होती. कवितेच्या त्या जिवंत झर्‍यातून अजून कितीतरी ओंजळी भरभरुन प्यायला मिळणार आहेत अशी खात्री होती. प्राणांन्तिक संकटातून ते वाचले होते. इडापीडा टळली असा भाबडय़ा मनाला धीर होता. आणि अचानक चित्रपटगृहातल्या अंधारात ती बाहेर पडायच्या दरवाजावरची Exit ची लाल अक्षरे पेटावी, आणि “म्हणजे ? एवढय़ात संपला चित्रपट ?” असे म्हणता म्हणता ‘समाप्त’ ही अक्षरे कुठल्या रिळाच्या शेवटी लिहिली आहेत हे कुणाला कळले आहे ?. मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते, “मित्रा, अशी मैफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे. आम्ही आता काय म्हणावे ? आणि कुणाला म्हणावे ?.

गदिमांनी टोपण नावाने काही बिंगचित्रे लिहिली होती, त्यातलच एक पुलं विषयी
पाया पडती राजकारणी! करणी ऐसी थोर!
मराठीत तु बिनदाढीचा रविंद्र टैगोर!
गदिमांच्या शेवटच्या काळात त्यांच्या हातून लिखाण होत नव्हते म्हणून स्वतः बद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं
कथा नाही की नाही कविता,नाही लेखही साधा
काय वाल्मिकी स्विकारसी तु पुनश्व पहिला धंदा!

 • पु.ल. देशपांडे

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

२२.संथ वाहते कृष्णामाई

संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही

नदी नव्हे ही निसर्ग नीती
आत्मगतीने सदा वाहती
लाभ हानीची लवही कल्पना
नाही तिज ठायी

कुणी नदीला म्हणती माता
कुणी मानिती पूज्य देवता
पाषाणाची घडवून मूर्ती
पूजित कुणी राही

सतत वाहते उदंड पाणी
कुणी न वळवुनी नेई रानी
आळशास ही व्हावी कैसी
गंगा फलदायी

गीतकार : ग. दि. माडगूळकर,
संगीतकार : दत्ता डावजेकर,
स्वर : सुधीर फडके,
चित्रपट : संथ वाहते कृष्णामाई (१९६७) 

कृष्णेच्या तीरावर तीन जण फिरत होते…. राजा भाऊ परांजपे म्हणाले काय संथ वाहतेय ना ही कृष्णामाई…. त्यांच्या बरोबर चालणारे डी डी अर्थात संगीतकार दत्ता डावजेकर, अण्णांना अर्थात गदिमा ना म्हणाले… काय अण्णा लिहिणार का यावर काही…. तुम्ही चाल लावणार असाल तर लगेच लिहितो… डीडींनी होकार दिल्यावर काही वेळातच गीत तयार झालं संथ वाहते कृष्णामाई..
मग गाऊन घेतलं बाबुजींकडून…. पण त्यावेळी सुरू असलेल्या चित्रपटासाठी नाही केलं हे गीत…. पुढे गंगा आली रे अंगणी या नावाने चित्रपट करणार होते…. त्यात हे गीत घेतलं आणि चित्रपटाचं नावच संथ वाहते कृष्णामाई ठेवलं…..
नदी आपली आपली वाहत असते, तीरावर काय चाललंय, सुख आहे की दुःख आहे याची जाणीव सुद्धा तिला नसते… कृष्णामाई हे सर्वच नद्यांचं प्रतीक आहे….या गीतात..
ही नुसती नदी नाही तर निसर्ग नीती आहे.. तिच्या तिच्या गतीने ती चालत असते, कधी संथ, कधी उथळ, कधी पिकांना पूरक, तर कधी पूर आल्यावर भीषण रुपात ती वाहते, लाभ अथवा हानी कसलीच कल्पना तिला नसते.. कारण ती निसर्ग नीती आहे, मनुष्य जसा वागतो तसं फळ त्याला देणारी न्यायदेवता आहे …..
कुणी तिला माता म्हणतात, कुणी देवी म्हणतात… तिची मूर्ती बनवून तिची पूजा करतात, तर कुणी तिच्या कुशीत लोटून देऊन पाण्याचा आनंद घेतात, कुणी पिण्यासाठी वापर करतात तर कुणी धुणी धुवायला…. खरा उपयोग कुणीच करत नाहीत….
सतत वाहणारं मुबलक पाणी असताना सुद्धा लोक त्या नदीचा खरा वापर करत नाहीत, खरा आनंद घेत नाहीत….फक्त पाणी फुकट जातं… कुणी ते वळवून उजाड पडलेल्या जमिनीवर नेत नाहीत याची खंत चित्रपटातल्या एका माणसाला वाटत असते, ज्याला लोकं वेडा समजत असतात, अशा आळशी लोकांना ही कृष्णा रुपी गंगा कधीच फलदायी ठरणार नाही… असं या माणसाला वाटतं….. पण एक दिवस एक तरुण या माणसाचं ऐकतो, कृष्णामाईला कालवे करून शेतात पाणी आणतो… आणि ही गंगा सगळ्या गावाला फलदायी ठरते…..
काही चित्रपट पाहण्यासारखे असतात, जरूर हा चित्रपट पहा.. म्हणजे या गाण्याचा अर्थ अजून जास्त कळेल….

💿 💿 💿 वॉट्सॅपवरून साभार . . . दि.२२-०१-२०२२

२३. या चिमण्यानो परत फिरा रे

हे गाणे घराभोवती चिव चिव करणाऱ्या चिमण्याना उद्देशून लिहिले असेल असे मला आधी वाटत होते, पण लक्ष देऊन ऐकल्यावर लक्षात आले की एका आईने तिचा अंतकाळ जवळ आल्यावर दूर गेलेल्या मुलांना घातलेली आर्त अशी साद हे.

या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे अपुल्या –जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या
दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर –अशा अवेळी असू नको रे आईपासून दूर
चुकचुक करते पाल उगीचच चिंता मज लागल्या –जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या
इथे जवळच्या टेकडीवरती, आहो आम्ही आई –अजून आहे उजेड इकडे, दिवसही सरला नाही
शेळ्या, मेंढ्या अजून कुठे गं, तळाकडे उतरल्या –जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या
अवती भवती असल्यावाचून, कोलाहाल तुमचा –उरक नं होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा
या बाळानो, या रे लौकर, वाटा अंधारल्या –जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: