मराठी सुभाषिते आणि घोषवाक्ये

जुनी मराठी सुभाषिते

तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली , जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो।।

फळे मधुर खावया असति नित्य मेवे तसे,
हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे,
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे,
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे,
सशाचेही लाभे, विपिन फिरता शृंगही जरी,
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी

विद्यासमन्वितही दुष्ट परित्यजावा|
त्यासी बुधे न सहवास कधी करावा||
ज्याच्या असे विमलही मणी उत्तमांगी |
तो सर्प काय न डसे खल अंतरंगी ||

आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला।
झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला।
झाली तयास तदनंतर भूतबाधा।
लीला वदूं मग किती कपिच्या अगाधा।।

योजी हिताप्रति निवारूनि पापकर्मे
गुह्ये करोनि प्रकटी गुण तो स्वधर्मे
दे आपणास असतां व्यसनी त्यजीना
सन्मित्रलक्षण असे वदताति जाणा
– वसंततिलका, मराठी अनुवादः वामन पंडित, ख्रिस्तोत्तर सतरावे शतक

वृक्ष फार लवती फलभारे
लोंबती जलद देउनि नीरें ॥
थोर गर्व न धरी विभवाचा
हा स्वभाव उपकारपराचा ॥

होता जोवरि अंबरी तपत तो चंडांशु तेजे निशे।
झाला निष्प्रभ तारकाधिपतिही, बोला कशाला दुजे।।
राहुच्या वदनी अजी गवसता तो भानु दैवे पहा।
कैसे क्षुद्रही काजवे चमकती त्याच्यापुढे हे पहा।।
…………. कृष्णशास्त्री चिपळूणकर

—————————————————————

कवितांमधल्या सुभाषितवजा ओळी किंवा घोषवाक्ये (स्लोगन्स)

कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला
थांबला तो संपला, …….. माधव ज्यूलियन

धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे
भ्रांत तुम्हा का पडे? ……. माधव ज्यूलियन

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
……… अनंतफंदी

सत्पात्राचा त्रास मनी। उपजे प्रभूचे मनातूनी।।
ज्या पुरुषास न पुसे कोणी। आधी त्यास भजावे।।
………..   अनंतफंदी

आघंतीचे क्षण सोडुनिया अशेष जीवनि या देख।
परिस्थितीचा रंग काढिंता क्षणयुग्मचि उरते एक।।
…………….. गोविंदाग्रज

उसीरा न चालिजे मार्गु। उणीयासी न कीजे सांगु।।
उपशांति न कीजे रागु। स्त्री बाळकाचा।।
…………    विष्णुदास नामा

वक्ता अतिपाडें अनुवादे।आणि श्रोतयाच्या मनी व्यग्रता नांदे।।
तरी कवित्व रसराज मंदे। जैसा जळेविण अंकुरू।।
……………….  कृष्णदास मुद्गल

जळ तुंबता तडागी फोडावा लागतो जसा पाट।
शोकक्षोभी रोदन हृदयस्थैर्या नसे दुजी वाट।।

……………. परशुरामपंत तात्या गोडबोले

साध्याही विषयांत आशय कधी मोठा किती आढळे।
नित्याच्या अवलोकनें जन परि होती पहा आंधळे।।

………………………. केशवसुत

 

मराठी भाषेमधील लेखांमध्ये उद्धृत केली जाणारी  संस्कृत भाषेमधील प्रसिद्ध घोषवाक्ये.

महत्वाचा संदेश थोड्या शब्दात पण आकर्षकपणे देण्यासाठी घोषणा किंवा घोषवाक्यांच्या स्वरूपात दिला जातो. खाली दिलेली घोषवाक्ये संस्कृत भाषेत असली तरी हिंदी, मराठी आदि इतर भारती भाषांमध्ये त्यांचा सर्रस उपयोग केला जातो.

१. मौनं सर्वार्थसाधनम् ॥
भावार्थ : मौन यह सर्व कार्य का साधक है ।
मौनाने सगळी कामे साध्य होतात.
२. कुलं शीलेन रक्ष्यते ॥
भावार्थ : शील से कुल की रक्षा होती है ।
शीलामुळे घराण्याचे रक्षण होते.
३. सर्वे मित्राणि समृध्दिकाले ॥
भावार्थ : समृद्धि काल में सब मित्र बनते हैं ।
समृद्धीकाळामध्ये सगळे मित्र होतात.
४. न मातुः परदैवतम् ॥
भावार्थ : माँ से बढकर कोई देव नहीं है ।
आईपेक्षा मोठे कुठलेही दैवत नाही.
५. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥
भावार्थ : पुत्र कुपुत्र होता है लेकिन माता कभी कुमाता नहीं होती ।
वाईट मुलगा असू शकतो, पण आई कधीही वाईट होत नाही.
६. गुरुणामेव सर्वेषां माता गुरुतरा स्मृता ॥
भावार्थ : सब गुरु में माता को सर्वश्रेष्ठ गुरु माना गया है ।
सर्व गुरूंमध्ये आईला सर्वात मोठा गुरू मानले जाते.
७. मनः शीघ्रतरं वातात् ॥
भावार्थ : मन वायु से भी अधिक गतिशील है ।
मनाचा वेग वायूपेक्षा ही जास्त असतो.
८. मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ॥
भावार्थ : मन हि मानव के बंधन और मोक्ष का कारण है ।
मन हेच माणसाचे बंधन आणि मुक्ति यांचे कारण असते.
९. भाग्यं फ़लति सर्वत्र न विद्या न च पौरुषम् ॥
भावार्थ : भाग्य हि फ़ल देता है, विद्या या पौरुष नहीं ।
विद्या किंवा पराक्रमामुळे नाही, तर भाग्यातअसले तर फळ मिळते.
१०. चराति चरतो भगः ॥
भावार्थ : चलनेवाले का भाग्य चलता है ।
चालणाऱ्याचे भाग्यही चालते.

————————————————————

श्री नरेंद्र गोळे यांनी केलेले अनुवाद

१     आवाज ना ये भरल्या घटाचा ।
येतो परी ना भरल्या घटाचा ॥
विद्वान तो गर्व करीत नाही ।
पांडीत्य दावीत अजाण राही ॥ – इंद्रवज्रा
.
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २०१८११२२नरेंद्र गोळे .

२  पैलू पाडतांचे कष्ट, सोसू शके हिरा जरी ।
मातीचे ढेकुळ कधी, सोसू न शकते तयां ॥

३    अनंत शास्त्रे व असंख्य विद्या ।
वेळच कमी अन् बहु अडचणीही ॥
जे सार, ते उपास्य सारेच आहे ।
पाण्यातले दूध पीई हंस तैसे ॥

४     विषातले अमृत ग्राह्य, बालाचे सुभाषित ।
अमित्राचे सद्गुणही, स्वर्ण मातीतले तसे ॥

५     अमंत्र नसे अक्षरं नच मूळ अनौषधी ।
नाढळे नर अयोग्य असे दुर्मीळ योजक ॥

६      जो मित्र वाचवत पाप हितास साधे
राखे रहस्य अभिव्यक्ति गुणांस दे जो
सोडी न संकटि सहाय्य करे सदा जो
सन्मित्र त्यास म्हणतात जगात संत

७      अन्नदान महादान विद्यादान महत्तर ।
अन्नानी मिटते भ्रांत विद्येने तृप्ती आजीव ॥

८      अपूर्व किती हा कोश तुझा गं भारती असे ।
खर्चता वाढतो आणि संग्रही नष्ट होतसे ॥

९      प्रयत्नांती लाभे दगड दळता तेलहि जरी ।
तहानेला लाभे मृगजळ पिण्यानेहि संतृप्ती ॥
सशाचेही लाभे वनि हुडकता शिंगहि जरी ।
कधीही मूर्खांचे मन न कळते तर्क करुनी ॥           ———–शिखरिणी

१०     करू ये समाधान, अजाण त्याचे
कळते सुखे अंतर जाणत्याचे
न जाणे न नेणे अशा मानवाचे
विधाता करू ना शके काहि त्याचे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

3 thoughts on “मराठी सुभाषिते आणि घोषवाक्ये”

 1. नमस्कार,
  सोन्याचे शल्य वर्णन करणारा एक श्लोक आहे,

  अग्निदाहे न मे दुःखम,
  मला संस्कृत श्लोक माहिती आहे. परंतू,
  याची एक मराठी समश्लोकी आहे, त्यातील अंतिम चरण असा आहे

  *’ गुंजेसवेची मजला तुळितात लोक ‘*
  *असा आहे,*

  मला ही पूर्ण समश्लोकी हवी आहे, तुम्हाला माहिती असेल तर मला पाठवा. धन्यवाद.
  😊👍

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: