वैद्यकीय माहिती

हे पान २००९ साली उघडले होते, पण नंतरच्या काळात त्यात  काहीच भर घातली गेली नव्हती. आता या अनुदिनीवरील काही इतर लेख एकत्र आणले आहेत. दि.२०-०८-२०२१ 

हा खास लेख अवश्य वाचावा :  मेंदू करा रे प्रसन्न
https://anandghare.wordpress.com/2013/02/20/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8/

. . . . . . . . . . . . . . . . . .  .  . . . . . . . .  .

१. उच्च रक्तचाप


यात दिलेली माहिती ही एका व्यक्तीची वैयक्तिक मते आहेत. उपचार घेण्यासाठी आपल्या डॉक्टरकडे जावे.

PLEASE LEARN BY HEART

Herewith I am just forwarding the information on the Awareness On Your Blood Pressure Status, which is self explanatory 

 BP

Human Blood Pressure Range Diagram

The 1st Number: Systolic pressure is the pressure generated when the heart contracts .

The 2nd Number: Diastolic pressure is the blood pressure when the heart is relaxed.

What is Normal Blood Pressure ? Buy and use a blood pressure monitor.
Compare your BP reading with the numbers on the chart above. Draw a line from your systolic pressure to your diastolic pressure.
Is the slope of the line about the same as shown on the chart? Where do YOU fit in? What are your risk factors?
Are your blood pressure readings within the normal blood pressure range? Should you take anti-hypertension medication to lower your blood pressure?

Normal human daily Blood Pressure Range can vary widely, so any single blood pressure monitor reading is not reliable. BP monitor readings must be taken at different times of day, to determine AVERAGE blood pressure over time.

What is important is your AVERAGE BP, or MAP (Mean Arterial Pressure) over time. Or,

where are those numbers sitting MOST of the time?

Normal MAP is about 93 mm of mercury.

HIGH Blood Pressure Symptoms -Stressed, Sedentary, Bloated, Weak, Failing Systolic –

Diastolic

210 – 120 – Stage 4 High Blood Pressure

180 – 110 – Stage 3 High Blood Pressure

160 – 100 – Stage 2 High Blood Pressure

140 – 90 – Stage 1 High Blood Pressure

140 – 90 – BORDERLINE HIGH

130 – 85 – High Normal

120 – 80 – NORMAL Blood Pressure

110 – 75 – Low Normal

90 – 60 – BORDERLINE LOW

60 – 40 – TOO LOW Blood Pressure

50 – 33 – DANGER Blood Pressure

LOW Blood Pressure Symptoms -Weak, Tired, Dizzy, Fainting, Coma 

मूळ लेख २००९

————————————————————————————————————————-

२. पक्षघात कसा ओळखायचा

शंका आल्यास रोग्याला खालील ४ गोष्टी करायला सांगा
१. स्मितहास्य
२. एक वाक्य बोलणे
३. दोन्ही हात वर करणे
४. जीभ बाहेर करून दाखवणे
यातील कशातही कांहीही अडचण असेल तर त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्या.

IMPORTANT TO READ:Blood clot – for everyone’s safety.

bloodClotPlease have a look….This 5 mins may save a life, you could save a life.

STROKE: Remember The 1st Three Letters… S.T.R …
My friend sent this to me and encouraged me to post it and spread the word. I agree. If everyone can remember something this simple, we could save some folks.

STROKE IDENTIFICATION:
During a party, a friend stumbled and took a little fall – she assured everyone that she was fine and just tripped over a brick because of her new shoes. (they offered to call ambulance)

They got her cleaned up and got her a new plate of food – while she appeared a bit shakenup, Ingrid went about enjoying herself the rest of the evening. Ingrid’s husband calledlater telling everyone that his wife had been taken to the hospital – (at 6:00pm , Ingridpassed away.)
She had suffered a stroke at the party . Had they known how to identify the signs of astroke, perhaps Ingrid would be with us today.
Some don’t die. They end up in a helpless, hopeless condition instead. It only takes a minute to read this…

STROKE IDENTIFICATION:

A neurologist says that if he can get to a stroke victim within 3 hours he can totallyreverse the effects of a stroke…totally. He said the trick was getting a stroke recognized, diagnosed, and then getting the patient medically cared for within 3 hours, which is tough.

RECOGNIZING A STROKE

Remember the ‘3’ steps, STR. Read and Learn!
Sometimes symptoms of a stroke are difficult to identify. Unfortunately, the lack ofawareness spells disaster.
The stroke victim may suffer severe brain damage when people nearby fail to recognize the symptoms of a stroke.
Now doctors say a bystander can recognize a stroke by asking three simple questions:

S * Ask the individual to SMILE…
T * = TALK. Ask the person to SPEAK A SIMPLE SENTENCE (Coherently) (eg ‘It is sunny out today’).
R * Ask him or her to RAISE BOTH ARMS.

If he or she has trouble with ANY ONE of these tasks, call the ambulance and describe the symptoms to the dispatcher.

NOTE: Another ‘sign’ of a stroke is
1. Ask the person to ‘stick’ out their tongue.
2. If the tongue is ‘crooked’, if it goes to one side or the other that is also anindication of a stroke.

A prominent cardiologist says if everyone who gets this e-mail sends it to 10 people; you can bet that at least one life will be saved and it could be your own.

मूळ लेख २००९

. . . . . . . . . . .

नवी भर दि. ७-९-२०२१

आईची घरगुती औषधे

जास्तीतजास्त घरगुती औषध करण्याकडे माझ्या आईचा कल असतो. मी लहान असताना मला रात्री बराच खोकला यायचा.खोकल्याची ती उबळ थांबता थाबत नसे.मग आई सरळ चमचाभर खोबरेल तेल मला प्यायला लावी. आई कधी कांदा किसून त्याचा रस काढते त्यात गुळ घालून ते पाव पेलाभर तरी प्यायला लावते.दोन तीन दिवस घेतल्यावर सर्दीखोकला आपसूक जातो.
लवंग,मिरी जरा गरम करुन त्याचे चुर्ण मधात घालून देते.कधी मधात हळद कालवून देते तर कधी सुंठपूड कधी खडीसाखर ..
काढा तर ठरलेलाच.त्यात अडुळसा,तुळस यांची पानं,अळशी,दोन मिरी,दालचिनीचा तुकडा,दोन लवंगा,सफेद कांदादोन तुकडे केलेला,जरासं आलं,दोन लसूण पाकळ्या हे सारं उकळवत ठेवते त्यात एक गुळाचा खडा टाकते.ते एक त्रुतियांश शिल्लक राहिलं की तिच्या मऊ साडीच्या फडक्याने गाळून प्यायला लावते.नियमित तीन चार दिवस घ्यावं लागतं.
कधीकधी अजिर्ण होतं.हे अजिर्ण अतिखाण्यानेच होतं असं नाही कधी भितीने,चिंतेनेही होतं.आई मग एक आल्याचा लहानसा तुकडा,दोन लसणीच्या पाकळ्या व दोन तीन मीरी या वाटून त्याचा रस वस्त्रगाळ करुन एका वाटीत ठेवून देते.दहा मिनिटाने गाळ खाली बसतो.वरती जे पाणी रहातं ते प्यायचं. हेही दोन तीन दिवस अनशा पोटी घेतात.हे औषध घेतल्यावर तासभर काही खात नाहीत.
अजिर्णावर हल्ली आलंलिंबूपाचक म्हणून आयुर्वेदिक दुकानांत औषध मिळतं तेही चांगलं असतं.छातीत जळजळत असेल तर लगेच आराम मिळतो.
जुलाब होत असले तर भरपूर लिंबूपाणी प्यावे.ताक प्यावे,केळी खावी.दही व चमचाभर मेथी खावी.कोऱ्या कॉफीत लिंबू पिळून घ्यावे.पण दुधाचे पदार्थ घेऊ नये.
एसिडीटीसाठी आईचं औषध म्हणजे थंड दूध किंवा रुम टेंपरेचरवरचं दूध.आईसक्रीमही चालतो बरंका एसिडीटीवर.उपवासाने एसिडीटी होते.झेपेल तेवढेच उपवास करावे.उगा पोटाला उपाशी मारु नये.
एसिडीटी तीव्र असणाऱ्यांनी चहा,कॉफी नियंत्रणात प्यावी.बंद करता आली तर उत्तम.ताकभात,कोकमकढीभात,मुगाचं वरण भात असे पचायला हलके पदार्थ खावे.मिरची बेडगी वापरावी.पांडी लय तिखट असते.किंवा दोन्ही अर्ध्या अर्ध्या वापराव्या.थोडक्यात तिखट कमी खावं.
डोळे लाल झाले,आले असले तर आई धणे भिजत घालते.पातळाच्या फडक्याने त्याची बारीक पोटली बांधून ती डोळ्यांवर ठेवायची.खूप आराम येतो. वेलची केळ्याच्या साली पापण्यांवर ठेवल्या की सगळी उष्णता शोषून घेतात.
पायात काटा घुसला तर आई थोडा गुळ गरम करून तिथे लावते.सकाळपर्यंत तो फॉरिन ऑब्जेक्ट बाहेर पडतो.
शरीरात उष्णता वाढली,उन्हाळे लागले असतील तर आई अर्ध दूध,अर्ध पाणी मिक्स करुन ग्लासभर देते.असं दोनतीनदा घेतलं की आराम वाटतो.धणे भिजत घालून त्याचं पाणी प्यालं तरी उन्हाळ्यात आराम येतो.मुळात उन्हाळे लागू नये म्हणून कडकडीत उन्हाशी संपर्क टाळावा.डोक्यावर टोपी घालूनच बाहेर जावं.
कुठे मुकामार लागला तर आई आलं ठेचून जरा किंचीत गरम करुन ते दुखऱ्या जागी ठेवते व बांधून घालते.
किंवा हळद,तुरटी याची बारीक पुड करुन ठेवायची.मुकामार लागला तर रात्री ती चमच्याभर तेलात मिक्स करुन जरा गरम करायची व दुखऱ्या भागावर ठेवायची.त्यावर कापूस ठेवून फडक्याने बांधायचे.रोज रात्री दोन तीन दिवस केलं की सूज ओसरते.
दात दुखत असला की तोंडाचा हनुमान होतो व खूप कळा येतात.अशावेळी आई त्या सुजऱ्या जागी चंदन उगाळून लावते.त्यामुळे थोड्याच वेळात त्या असह्य वेदनांपासून मुक्तता मिळते.अर्थात हा फक्त डॉक्टरकडे जाईपर्यतचा उपाय.
हातापायांच्या बोटांत चिखल्या होतात यावर कोकमतेल जरा किंचीत गरम करुन बोटांमध्ये लावतात.
चाकू लागला व रक्त वहात असेल तर जखम स्वच्छ धुवून घ्यायची.चहापावडर बारीक वाटायची व त्या जखमेवर हलकेच दाबून वर कापूस ठेवून पातळ चिंधीने बांधावं.लहान जखम असल्यास उघडीच ठेवावी. चहापूडमुळे जखम पिकत नाही. लवकर खपली धरते व बरी होते.
उन्हामुळे कानात ठणके मारत असले तर खोबरेल तेलात लसूण उकळवतात व ते तेल गरम करून कोमट झालं की त्याचे थेंब कानात घालतात.
उष्णतेने फोड/उभाळ आलं तर त्याठिकाणी ओलसर कुंकू दाबून लावल्यास थोड्याच तासात ते उभाळ वाहू लागतं.जरा दाबून एकदा आतली बी बाहेर पडली की उभाळ फिनीश.टी बेक्ट म्हणून मलम मिळते.तेही फायदेशीर आहे.
उन्हामुळे पित्त वाढतं,गरगरल्यासारखं होतं.अशावेळी सुतशेखर मात्रा आणून ठेवावी व सतत बरं वाटेपर्यंत बाटलीवर दिलेल्या सूचनेनुसार त्या गोळ्या घ्याव्या.
मुलांच्या चेहऱ्यावर जास्त मुरमं येत असतील तर चेहरा दिवसातून तीनदा तरी फेशवॉशने धुवावा.मुलतानी मातीचा पेक लावावा.त्यात गुलाबपाणी घालावं.कसं गारेगार वाटतं बघा.आणि चेहऱ्यावरची छुपी हुई घाणही नष्ट होते.ते धुतलं की वायच पाणी टोपात गरम करत ठेवतात व वाफ घेतात.
तापात डोकं खूप दुखतं असलं तर आई वेखंड सहाणेवर उगाळते व त्याचा लेप कपाळावर लावते.
उन्हाळ्यात बेंबीजवळ ओढल्यासारखं झाल्यास,तीत जरा तेल घालून निपचित पडून रहावं.खूप आराम मिळतो.
कोणाला मुळव्याधचा त्रास असेल तर सुरणाच्या फोडी धुवून मीठ,कोकम,तिखट घालून उकडतं ठेवायच्या.उकडल्या की त्या माणसाला खाऊ घालायच्या.हा उपाय नियमित करावा लागतो.
शरीरातील इलेक्ट्रोल्स कमी झाले की पायात गोळे येतात.अशावेळी इलेक्ट्रोल पावडर आणून ठेवावी.हीचं सरबत बनवून पीत रहावं किंवा लिंबू सरबत प्यावं.
टेंशन घालवण्यासाठी छानछान गाणी ऐकावी.चित्र काढावी,किंवा माझ्या आईसारखं झाडांत रमावं.सगळ्या झाडांशी मैत्री करावी.

अर्थात डॉक्टरांकडे जायचंच असतं पण आधी घरगुती उपाय करुन बघावं.✍️

. . . . .. . . . . .

संकलित केलेले लेख

१.आरोग्य म्हणी
🌿🌱🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🍍🍅🍆🌶🌽🌿

१. खाल दररोज गाजर-मुळे,
तर होतील सुंदर तुमचे डोळे.

२. सकाळी नाश्ता करावा मस्त,
मोड आलेले धान्य करावे फस्त.

३. डाळी भाजीचे करावे सूप,
अखंड राहील सुंदर रूप.

४. तरोट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त,
आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.

५. जवळ करा लिंबू संत्री,
दूर होईल पोटातील वाजंत्री.

६. पपई लागते गोड गोड,
पचनशक्तीला नाही तोड.

७.पालेभाज्या घ्या मुखी;
आरोग्य ठेवा सदा सुखी.

८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका;
आरोग्य धोक्यात आणू नका.

९. दररोज एक फळ खावू या;
आरोग्याचे संवर्धन करु या.

१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास;
थांबवेल आरोग्याचा ऱ्हास.

११. प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार;
आहारात यांचे महत्व फार.

१२. हिरवा भाजीपाला खावा रोज;
राहील निरोगी आरोग्याची मौज.

१३. जेवणा नंतर केळी खा;
पचनशक्तीला वाव द्या.

१४. साखर व तूप यांचे अती सेवन करु नका,
मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.

१५. खावी रोज रसरशीत फळे;
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन वेगळे.

१६. गालावर खेळते सदा हास्य,
फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.

१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त,
डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

१८. सुका मेवा ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.

१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका,
जीवनसत्वांचा नाश करु नका.

२०. जो घेईल सकस आहार,
दूर पळतील सारे आजार.

२१. भाजीपाल्याचं एकच महत्व,
स्वस्तात मिळेल भरपूर सत्व.

२२. शेंगेत शेंग, शेवग्याची शेंग,
तिचा पाला, तीच अंग, सत्व आहे तिच्या संग.

२३. कळणा कोंडा खावी नाचणी,
मजबूत हाडे कांबीवाणी.

२४. आरोग्य म्हणींचे हे उपयोगी सत्र;
अंमलात आणाल तर रहाल कायमचे निरोगी मात्र.

🌿🌱🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🍍🍅🍆🌶🌽🌿

आता थोडा विनोद

एक पालेभाजीपूर्ण वाक्य (अर्थात पुण्यातीलच)

तू “माठ”आहेस, सारख्या “चुका” करतोस, उद्या “पालका” सोबत ये! 😡
यावर विद्यार्थी म्हणाला…

“पडवळ” मॅडम… मला “गवार” समजू नका… माझ्या डोक्यात “बटाटे” भरलेत का?
दिसायला “लिंबू” टिंबू असलो तरी “कोथिंबीरे” आडनाव आहे माझं…
आणि कोणीही “आलं” गेलेलं मला ‘”भुईमुगाच्या” टरफला सारखं फेकू शकत नाय..

ना “कांदा” ना “लसून”….
आमच्या नादाला लागाल तर डायरेक्ट ससुन…
😄😄😄 😁😁😁😁😁😁



२. बहुगुणी राजगिरा . . . एकादशी स्पेशल

“राजगिरा” लाडू धरतीवरील “अमृत”

समुद्रमंथनातून “अमृत” निर्माण झाल्यानंतर त्यातील काही थेंब जमिनीवर पडले , ते काही वनस्पतींनी शोषून घे्तले असा पुराणात दाखला आहे, त्यापैकीच एक “राजगिरा” असावा।।
राजगिरा किंवा अमरन्थ म्हणजे ग्रीकमध्ये ‘अमर’. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा।
राजगिऱ्या ला हिंदीत “रामदाणा” म्हणतात।
रामाचे स्मरण उपवासाच्या दिवशी व्हावे हा त्यामागचा उद्देश असावा। राम म्हणजेच अमरत्व असाही अर्थ असू शकतो।
उपवास आणि राजगिरा यांचं नातं अतूट ।
उपवासादिवशी पोटात कमी अन्न जाते त्यामुळे बऱ्याच वेळा थकवा येतो , त्याचा antidote म्हणजे राजगिरा।राजगिऱ्यात गव्हापेक्षा कैक पटीने जास्त लौह , कॅल्शियम, व्हिटॅमिन C, असते। त्याजोडीला fibre जास्त असल्यामुळे मलबद्धता होत नाही। किती सूक्ष्म आरोग्यविचार।
राजगिरा हा भाजून लाही स्वरूपात किंवा लाडू रूपात जास्त कार्यकारी।
भाजल्या मुळे त्यातील पाणी जाऊन हलकेपणा येतो तसेच तो पचायला सोपा होतो।
लाडूमध्ये गूळ असल्याने तो अजून जास्तच आरोग्यहीतकरी ठरतो. राजगिरा व गुळातील जास्तीचे लौह,कॅल्शियम थकवा येऊच देत नाही।
यामुळे राजगिरालाडू हा “वैद्यमित्र” म्हणून ओळखला जातो।
राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्रोत आहे. शिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. इतर धान्यात नसलेलं ‘क’ जीवनसत्त्वही राजगिऱ्यात आहे. यात चोथा, कर्बोदके आणि रिबोफ्लोविनही आहे. शिवाय पचनाला हलका असल्याने केवळ उपवासालाच नव्हे तर सर्वानी विशेषत: वयस्कर लोकांनी/बालकांनी राजगिरा रोजच्या आहारात अवश्य घ्यावा. राजगिऱ्याच्या लाह्य़ा तर पचायला आणखी हलक्या.
राजगिऱ्या च्या नियमित सेवनाने मधुमेह व बीपी आपण लांब ठेवू शकतो. याचे कारण राजगिरा हा 0%फॅट असणारा पदार्थ आहे. शरीरात जमा होणारी अनावश्यक चरबी व पाणी राजगिरा शोषून घेतो.मधुमेहात फक्त राजगिरालाह्या खाव्यात.
पित्तज शिरशूलात(migrain) राजगिरा लाडू अतिरिक्त पित्ताचे शोषण करतो जोडीला गुळ मधुर रसाचा असल्याने पित्त शमन करतो.अशा रुग्णांनी राजगिरा नित्य वापरात ठेवावा। तसेच साठवूनही ठेवावा।
खलित्य म्हणजेच केस गळत असल्यास राजगिरा अमृतासम , याचे कारण राजगिऱ्यात असणारे प्रचुर minerals। जास्तीचे लौह,कॅल्शियम।
बऱ्याच समस्यांचे मूळ असणारा राग। राजगिरा- रागावर मात करणारा राजा।
राग जास्त असणाऱ्यांनी राजगिरा लाडू सतत खाल्यास त्यांचा रागही कमी होतो कारण पित्त व राग हे जुळे भाऊच असतात।
बऱ्याच वेळा आजच्या मातांना सकाळी प्रश्न पडतो डब्यात काय द्यावे, अशा मातांसाठी राजगिरा लाडू वरदानच।
उपवासाच्या दिवशी पोटात अन्न कमी गेल्यामुळे मलबद्धता होण्याची जास्त शक्यता असते। अशावेळी राजगिऱ्या तील extra fibre मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत करते।
भूक जास्त लागत असल्यास राजगिरा लाडू उपयोगी पडतो। कारण त्यातील अतिरिक चांगले घटक व पोषण मूल्य।
असा हा बहुगुणी राजगिरा लाडू। आपण खावे घरी आलेल्या अतिथींना द्यावे।
धन्यवाद।
शुभम् भवतू।।

One thought on “वैद्यकीय माहिती”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s