मराठी कवी आणि कविता

मराठी कवी

हा ब्लॉग सुरू केल्यापासून वेळोवेळी निरनिराळ्या कवींची माहिती आणि त्यांच्या काही उत्कृष्ट कविता यांचे संकलन मी निरनिराळ्या लेखांमध्ये करत आलो आहे. त्यानंतर मला जसजशी अधिक माहिती मिळत गेली तसतशी ती माहिती मी त्या त्या पानांवर देत गेलो आहे. त्या सगळ्यांचे दुवे या पानावर खाली दिले आहेत. यापुढे मिळणाऱ्या कवींची माहिती आणि त्यांच्या कविता मी आता या पानावर साठवत जायचे ठरवले आहे.
दि.०८-०१-२०२०

मराठी कवी

असे छायाचित्र तुम्ही कधी पाहिले असेल असे वाटत नाही,ना असे छायाचित्र परत कधी काढले जाईल, मराठीतले नऊ नामवंत कवी एकाच फोटोत! ज्यांची नावे आपण फक्त शाळेच्या पाठ्यपुस्तकात तर कधी सुंदर काव्याच्या पुस्तकावर बघत आलो असे नऊ नामवंत कवी.

नवरत्ने : (बसलेले) संजीवनी मराठे,पद्मा गोळे,कवी यशवंत,बा.भ.बोरकर व वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज.

(मागे उभे) मंगेश पाडगावकर,वसंत बापट, ग.दि.माडगूळकर, वा.रा.कांत


या पानावर नवी भर घालण्यात येत आहे.

१. कविवर्य कुसुमाग्रज             दि.२६-०२-२०२०

२. कवी आणि राजकारणी      दि. १४-०२-२०२०

३. कवी पी.सावळाराम          दि.२३-०२-२०२०, ०४-०७-२०२१

४. कवी अनिल                     दि. ०८-०५-२०२०

५. कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)     दि.२६-०५-२०२०

६. कवयित्री शांताबाई शेळके आणि त्यांचे कवित्व     दि. ०६-०६-२०२०

७. केशवकुमार (आचार्य प्र,के.अत्रे)         दि. १४-०६-२०२० 

८. बहिणाबाई चौधरी दि.२३-०६-२०२०

९. कवि दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी दि.१८-०७-२०२०

१०. बाबा आमटे दि.१९-०९-२०२०

११.भा.रा.तांबे दि.२८-१०-२०२०

१२.कवी सुधांशु दि.१९-११-२०२०

१३. कवी यशवंत दि.२६-११-२०२०

१४. साने गुरुजी दि.२४-१२-२०२०

१५. सुधीर मोघे दि. ०८-०२-२०२१

१६.स्वातंत्र्यशाहीर गोविंद दि. ०९-०२-२०२१

१७. वासुदेवशास्त्री खरे दि. २७-०३-२०२१

१८. आरती प्रभू (चिं.त्र्यं.खानोलकर ) दि.२६-०४-२०२१

१९. संदीप खरे दि. १३-०५-२०२१

२०. कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते) दि. ०२-०६-२०२१

२१. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर दि. ०२-०६-२०२१

२२. निसर्गकवी ना.धों.महानोर दि. १३-०७-२०२१

२३. कृ. ब. निकुम्ब दि. ०९-०८-२०२१

२४. गुरु ठाकूर दि. ३०-०८-२०२१

२५. शंकर वैद्य दि. २२-०९- २०२१

२६. स्वातंत्र्यवीर सावरकर दि. २५-०९-२०२१

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

या पोस्ट्सही पहा :

१. कवीवर्य विंदा करंदीकरांना आदरांजली Mar 28, 2010
कविता : चुकली दिशा तरीही, धीर थोडासा हवा, उपयोग काय त्याचा, सब घोडे बारा टक्के, देणाऱ्याने देत जावे, त्याला तयारी पाहिजे, एवढे लक्षात ठेवा, त्याला इलाज नाही https://anandghare.wordpress.com/2010/03/28/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8/

२. बालकवी ठोंबरे, श्रावणमासी कविता आणि विडंबने
https://anandghare.wordpress.com/2012/07/17/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a1/

३.छत्रपती शिवाजी महाराजांची गीते (शिवकल्याणराजा) आणि सेर सिवराज है|
सरणार कधी रण, वेडात मराठे वीर, अरुणोदय झाला,
https://anandghare.wordpress.com/2014/10/30/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%b9%e0%a5%88/


४. प्रसिद्ध कवींच्या काव्यरचना Nov 25, 2014 11:00 PM
सतारीचे बोल : केशवसुत,
सिंहस्थ, तळघर, नदीबाई, देव आहे की नाही : कुसुमाग्रज,
धीर थोडासा हवा : विंदा करंदीकर,
जगत मी आलो असा : सुरेश भट
https://anandghare.wordpress.com/2014/11/25/%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%be/

५. कवयित्री इंदिरा संत Jan 7, 2019
कविता : कुब्जा (अजून नाही जागी राधा), आली बघ गाई गाई, नको नको रे पावसा, नको पाठवू
https://anandghare.wordpress.com/2019/01/07/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4/

६. कवी केशवसुत 25/01/2019
कविता : तुतारी, सतारीचे बोल, अढळ सौदर्य (हस्ताक्षरात)
https://anandghare.wordpress.com/2019/01/25/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a4/

७. कविवर्य मंगेश पाडगावकर आणि त्यांची गीते मार्च 27, 2019
कविता : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, इतर कवितांमधील निवडकउतारे
https://anandghare.wordpress.com/2019/03/27/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86/

८. कविवर्य सुरेश भट आणि त्यांच्या कविता मार्च 26, 2019
कविता : जगत मी आलो असा, कापूर, कोण जाणे कोण हे जवळून गेले?, आशा भोसले यांना काव्यमय पत्र, सुरेश भटांचे शेर. अ ते ज्ञ
https://anandghare.wordpress.com/2019/03/26/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%ad%e0%a4%9f/

९. महाराष्ट्र गीते मे 1, 2019
बहु असोत सुंदर :श्री.कृ.कोल्हटकर, मंगल देशा :गोविंदाग्रज, जय जय महाराष्ट्र माझा : राजा बढे, मराठी असे आमुची मायबोली : माधव ज्यूलियन, माझा महाराष्ट्र : वसंत बापट
https://anandghare.wordpress.com/2019/05/01/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87/

१०. कविवर्य ग्रेस मे 14, 2019
कविता : पांढरे हत्ती, वाटेपाशी, तुझी बहार मंदशी, तुझ्यात नभवाहिनी, अज्ञेयाहून गूढ, जे सोसले नाही, पद्मबंध, निरोप, काळीज धुक्यानेउडते, दुःख घराला आले, आठवण, असे रंग, बदाम झाडे, ती गेली तेंव्हा रिमझिम,
https://anandghare.wordpress.com/2019/05/14/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8/

११. पावसाची गाणी जून 27, 2019
नको नको रे पावसा : इंदिरा संत
ए आई मला पावसात जाऊ दे : वंदना विटणकर
नभं उतरू आलं : शांता शेळके
भेट तुझी माझी स्मरते : मंगेश पाडगांवकर
मन चिंब पावसाळी : ना. धों. महानोर
राया मला, पावसात नेऊ नका : वसंत सबनीस
https://anandghare.wordpress.com/2019/06/27/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80/

१२ कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या कविता Nov 30, 2019
तेथे कर माझे जुळती, त्या दिसा वडाकडेन, तू गेल्यावर, नाही पुण्याची मोजणी, सरिंवर सरी आल्या गं, समुद्रराग, अनंता तुला कोण पाहूं शके, कांचनसंध्या,
जीवन त्यांना कळले हो, प्रतिएक झाडामाडा, झिणि झिणी वाजे बीन
https://anandghare.wordpress.com/2019/12/01/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%ad-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af/

१३. कृष्ण – दोन कविता : कृष्णा : दुर्गा भागवत, कृष्ण भेटायलाच पाहिजे : अज्ञात
https://anandghare.wordpress.com/2019/09/24/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be/

१४. कवि, कविता आणि विडंबने ऑक्टोबर 11, 2019
आम्ही कोण : केशवसुत, विडंबन : केशवकुमार (आचार्य अत्रे)
दासबोध : समर्थ रामदास, उदासबोध : मंगेश पाडगावकर
‘विरामचिन्हे’ : राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज, विडंबन : केशवकुमार
रांगोळी घालतांना पाहून : केशवसुत, विडंबन: गोविंदाग्रज :
स्वयंवर झाले सीतेचे : ग दि माडगूळकर, विडंबन झाले कवितेचे : खोडसाळ
जन पळभर म्हणतील : भा रा तांबे, विडंबन : मकरंद करंदीकर
https://anandghare.wordpress.com/2019/10/11/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a5%87/

१५ भोंडल्याची / हादग्याची १६ गाणी – पारंपरिक
https://anandghare.wordpress.com/2019/10/01/%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a5%a7%e0%a5%ac/

१६. लोककवि मनमोहन नातू

लोककवि मनमोहन नातू

१७. स्व.यशवंत देव यांना श्रद्धांजलि
https://anandghare.wordpress.com/2018/11/18/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-

पृष्ठ ३ शाळेतल्या कविता
१. केशवसुत : आम्ही कोण, काठोकाठ भरू द्या पेला, तुतारी, सतारीचे बोल, आम्हीच नव्हतो
२. भा.रा.तांबे : पिवळे तांबुस ऊन, मधुघट, जन पळभर, रुद्रास आवाहन, तुझ्या गळा माझ्या गळा
३. ना.वा.टिळक : केवढे हे क्रौर्य
४. बालकवी ठोंबरे : श्रावणमासी, औदुंबर
५. केशवकुमार : आजीचे घड्याळ
६. ग.दि.माडगूळकर : नाच रे मोरा
७. भानूदास : पडू आजारी
८. वि.म.कुलकर्णी : आधी होते मी दिवटी
९. अनंत फंदी : बिकट वाट वहिवाट नसावी
१०. माधव ज्यूलियन : भ्रांत तुम्हा का पडे
११. बा.भ.बोरकर : दिव्यत्वाची जेथ प्रचीती
१२. बहिणाबाई चौधरी : मन वढाय वढाय, अरे खोप्यामाजी खोपा
१३. कुसुमाग्रज : जीर्ण पाचोळा
१४. यशवंत : आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी

https://anandghare.wordpress.com/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af/
पृष्ठ १६ : स्व.गदिमा आणि बाबूजी
गाणी : घन घन माला नभी दाटल्या, एकतारीसंगे एकरूप झालो, माना मानव वा परमेश्वर
https://anandghare.wordpress.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%9c%e0%a5%80/?frame-nonce=6de4fea64c

*********************************************

नवी भर    दि.२६-०२-२०२०

१. कुसुमाग्रज

कुसुमाग्रज १

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पद्मभूषण वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज हे महान चतुरस्र साहित्यिक होते. कथा, कविता, कादंबऱ्या, नाटके आदि मराठी साहित्याच्या सर्व दालनांमध्ये त्यांनी उत्तमोत्तम रचना करून त्याला समृद्ध केले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेतच, त्यांच्या साहित्यावर इतर नामवंत लेखकांनी लेखन केले आहे. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. २७ फेब्रूवारी हा या थोर साहित्यिकाचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

त्यांच्यासंबंधी समग्र माहिती या संकेतस्थळांवर दिली आहे

कुसुमाग्रज प्रतिष्ठान
https://www.kusumagraj.org/index.php

वि.वा. शिरवाडकर (विकीपीडिया)
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF.%E0%A4%B5%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0
——————————————————–
खालील माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावरून साभार

कुसुमाग्रज

वि.वा. शिरवाडकर यांचे खरे नांव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक गेल्यामुळे त्यांचे नांव विष्णु वामन शिरवाडकर झाले. २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातून पास झाले.

१९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा ‘रत्नाकर’ मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्‍या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. त्यांचा आवडता लेखक पी. जी. वुडहाऊस व आवडता नट चार्ली चाप्लिन होता.

१९४२ साली प्रसिध्द झालेला ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भुरळ घालते. ‘मराठी माती’, ‘स्वागत’, ‘हिमरेषा’ यांचबरोबर ‘ययाती आणि देवयानी’ व ‘वीज म्हणाली धरतीला’ ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली ‘वैष्णव’ ही कादंबरी व ‘दूरचे दिवे’ हे नाटक प्रसिध्द झाले.

‘नटसम्राट’ ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत नाजुक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरूणांचाही वृध्दांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला.

कुसुमाग्रज एक वेगळं व्यक्तिमत्व
त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ, त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले. नाशिकच्या प्रसिध्द सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असं असूनही यश साजरं करतांना ते मागे राहणंच पसंत करत.

साहित्यसूर्य मावळला
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कुसुमाग्रजांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. नाशिककरांना तर आपल्या घरातील वडीलधारं माणूस गमावल्याचं दु:ख आहे. मानवतेचा कळवळा व मराठी भाषेवरचं प्रभुत्व यामुळेच ‘नटसम्राट’ व ‘विशाखा’ सारखे साहित्य जन्माला आले. एवढं उत्तुंग कर्तृत्व व अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व अत्यंत साधे तर होतेच पण शेवटपर्यंत अत्यंत नम्र व सत्कार्याला वाहून घेतलेले जीवन ते शेवटपर्यंत जगले. शिक्षणक्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आजची परीक्षा पध्दती मुलांसाठी निष्ठुर पध्दती आहे असे त्यांचे मत होते. इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवले. त्यांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे समाजातील गरीब, गरजू व मागासलेल्या जनतेसाठी योगदान वाखाणण्यासारखे आहे.
————-

जीवनपट

वर्ष                        वाटचाल
२७ फेब्रुवारी १९१२ : पुणे येथे जन्म, नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक विधान व नामांतर – विष्णु वामन शिरवाडकर
१९१९ – २४ प्राथमिक शिक्षण – पिंपळगांव बसवंत
१९२४- २९ माध्यमिक शिक्षण – नाशिक येथील न्यू इंग्लिश स्कूल (आत्ताची जु. स. रुंगठा हायस्कूल, नाशिक)
१९२९ बालबोधमेवा (संपादक – दे. ना. टिळक) मध्ये लेखन व कविता, मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण मुंबई विद्यापीठ
१९३० हं. प्रा. ठा महाविद्यालयात प्रवेश व ‘रत्नाकर’ मासिकात कवितांना प्रसिध्दी
१९३२ काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभाग
१९३३ धृव मंडळाची स्थापना, ‘नवा मनू’ मध्ये वृत्तपत्रीय लेखन, ‘जीवन लहरी’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
१९३४ बी. ए. परीक्षा उत्तीर्ण (मराठी – इंग्रजी)
१९३६-१९३८ गोदावरी सिनेटोनमध्ये प्रवेश, ‘सती सुलोचना’ कथालेखन व लक्ष्मणाची भूमिका
१९३८- १९४६ वृत्तपत्र व्यवसाय, साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी, नवयुग इत्यादी. विशाखा काव्यसंग्रह प्रकाशित (१९४२)
१९४४ विवाह. पत्नीचे नाव मनोरमा ( माहेरचे नाव गंगुबाई सोनवणी )
१९४६ ‘वैष्णव’ पहिली कांदबरी. ‘दूरचे दिवे’ पहिले नाटक
१९४६-१९४८ साप्ताहिक ‘स्वदेश’ संपादन
१९५० लोकहितवादी मंडळ स्थापना, संस्थापक सदस्य, शालेय पुस्तकांचे संपादन
१९५६ अध्यक्षपद मुंबई उपनगर साहित्य (मालाड)
१९५९ संयुक्त्त महाराष्ट्राच्या चळवळीत सत्याग्रह
१९६० मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ६२ व्या वार्षिक उत्सवाचे अध्यक्षपद
१९६० राज्य पुरस्कार ‘मराठी माती’ (काव्यसंग्रह)
१९६२ राज्य पुरस्कार ‘स्वगत’ (काव्यसंग्रह)
१९६४ राज्य पुरस्कार ‘हिमरेषा’ (काव्यसंग्रह)
१९६४ अध्यक्षपद, ४५ वे मडगाव (गोवा) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिवेशन
१९६४ ‘जीवनगंगा’ नाशिक नगर पालिका शतसांवत्सरिक ग्रंथाचे संपादन
१९६६ राज्य पुरस्कार ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकास
१९६७ राज्य पुरस्कार ‘वीज म्हणाली धरतीला’ नाटकास
१९६४-१९६७ पुणे विद्यापीठ विधी मंडळावर सदस्य
१९७० अध्यक्षपद, मराठी नाटय संमेलन, कोल्हापूर
१९७१ राज्य पुरस्कार ‘नटससम्राट’ नाटकास
१९६२-१९७२ अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, नाशिक
१९७२ सौ. मनोरमाबाईंचे निधन
१९७४ ‘नटसम्राट’ नाटकास साहित्य अकादमी पुरस्कार (ताम्रपट व पाच हजार रूपये)
१९८५ अखिल भारतीय नाटयपरिषदेचा राम-गणेश गडकरी पुरस्कार
१९८६ डि. लिट् पुणे विद्यापीठ
१९८७ अमृत महोत्सव
१९८८ संगीत नाटयलेखन अकादमी पुरस्कार
१९८८ ज्ञानपीठ पुरस्कार
१९८९ अध्यक्ष, जागतिक मराठी परिषद, मुंबई
१९९१ पद्मभूषण
१९९६ कुसुमाग्रज तारा
१० मार्च १९९९ कुसुमाग्रजांचे निधन
२००३ पोष्टाचे तिकीट प्रकाशन

बळी : नवी भर दि.१९-११-२०२०

कुसुमाग्रज जयंतिनिमित्त त्यांची एक सुंदर कविता

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……
– कुसुमाग्रज

नवी भर दि.१२-०४-२०२१


एका हिंदी कवीने म्हंटले आहे,

पाँव सूखे हुवे पत्तोंपे अदबसे रखना, धूपमें माँगी थी तुमने पनाह इनसे कभी !!!

नवी भर

२. कवी आणि राजकारणी      दि. १४-०२-२०२०

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात ज्यांनी गांवोगांवी काव्यवाचनाचे प्रयोग करून मराठी कवितांना लोकप्रियता मिळवून दिली त्या कवींमध्ये विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर हे प्रमुख होते. राजकारणी लोकांचे वागणे त्यांच्या संवेदनशील मनाला कसे खुपत होते हे त्यांनी असे व्यक्त केले आहे.

१.विंदा करंदीकर : सब घोडे बारा टक्के!

जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी) ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा, मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!

__विंदा करंदीकर

२. मंगेश पाडगांवकर
१९८१ सालातील मंगेश पाडगावकर रचित ही कविता कालबाह्य कधी होईल ???

थोर आपण मानिली
ही भ्रष्ट सारी माकडे…
अन् दिले हातांत त्यांच्या
पेटलेले काकडे !

कां अता छाती पिटावी
लागतां आगी घरां…
देव येइल कोणता
हे निस्तराया सांकडे !

धर्म यांचा मारणे
सोयीप्रमाणे या उड्या…
याचसाठी लाभलेले
पाय यांना फाकडे !

काल ज्या झाडांवरी
ही आश्रयाला थांबली…
आज ही शत्रूप्रमाणे
पाहती त्यांच्याकडे !

जा कुठेही हीच तेथे
चेहरे फेंदारुनी…
पाय जेथे टाकिती
ते सर्व रस्ते वाकडे !

पक्ष यांचा कोठला,
टोळी तयांची कोठली ?
जात यांची एक अंती,
प्रश्न सारे तोकडे !

हालवोनी शेपट्यांना
घोषणा यांनी दिल्या…
आणि तुमच्या चितेस्तव
शोधुनी ही लाकडे !

🙉🙈🙊
——————————
-मंगेश पाडगांवकर : १० मार्च, १९८१ 🙏🏻

वॉट्सअॅपवरून साभार  दि. १४-०२-२०२०


नवी भर दि.२३-०२-२०२०

३. कवी पी.सावळाराम

पी सावळाराम

लेखक : माधव विद्वांस

जनकवी, ठाणे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पी. सावळाराम यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म कोल्हापूर जवळील येडेनिपाणी येथे 4 जुलै 1913 रोजी झाला.त्यांचे मूळ नाव निवृत्ती रावजी पाटील असे होते. विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील ‘सावळ्यातांडेल’ या पात्रावरून त्यांना प्रेमाने ‘पी. सावळाराम’ हे नाव दिले. ते नावच नंतर रूढ झाले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण येडेनिपाणी येथे झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथे गेले. तेथे कविवर्य माधव ज्युलियन हे त्यांना प्राध्यापक होते.कॉलेजमध्ये असताना ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ ही कविता लिहिली. वर्ष 1943 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर ते कुर्ला-मुंबई येथे रेशनिंग ऑफिसमध्ये रुजू झाले. वर्ष 1949 मध्ये ‘राघू बोले मैनेच्या कानात’ हे त्यांचे पहिले भावगीत एचएमव्हीने ध्वनिमुदित केले. ‘राम राम पावणं’ या चित्रपटाचे गीतलेखनही त्यांनी केले. गीत लेखनाला वेळ देता यावा यासाठी कुर्ल्याच्या रेशनिंग ऑफिसमधील सरकारी नोकरी त्यांनी सोडली. सुमारे 50 हून अधिक चित्रपटांच्या कथा-पटकथांचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या कवितेत भाव, भक्‍ती, कुटुंबातील संबंध हळुवारपणे गुंफले आहेत.त्यामुळे त्यांच्या सर्वस्पर्शी कविता पाहून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली. कुसुमाग्रज असे म्हटले आहे, पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांद्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरातही पोहोचले आहेत.

पंढरपुरातील पुजाऱ्यांच्या विळख्यात अडकलेला विठोबा पाहून ‘पंढरीनाथ झडकरी आता पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत सुचले. ‘गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गीतही सगळ्यांनाच भावले. सर्वच घरात हा प्रसंग येतोच. तीनच कडव्यांचे हे गीत हेलावून टाकते.

‘गोड गोजरी लाज लाजरी’ या गीतातून लहान भावंडांचे आपल्या मोठ्या बहिणीचे कौतुकही दिसून येते’. ‘ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता’ या गीतातून ज्ञानदेव देवालाच गीता सांगतो ही किती उत्तुंग कल्पना, त्यातून मराठी व ज्ञानदेवाची थोरवी ध्वनित होते. ‘माझ्या शेतात सोनंच पिकतंय पानापानात लखलख करतंय साता समिंदराचं माणिक मोती’ या कवितेतून त्यांच्यातील मूळचे मातीशी असलेले नातेही दिसून येते. ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. 1982 सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 1985 मध्ये जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांनी भूषविले होते.

——————
पी.सावळाराम यांची गाजलेली गीते

१. कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला
वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला
तुम्ही गेला आणिक तुमच्या देवपण नावा आले
सप्तस्वर्ग चालत येता थोरपण तुमचे कळले
गंगेकाठी घर हे अपुले तीर्थक्षेत्र काशी झाले!
तुम्हावीण शोभा नाही वैभवाच्या देऊळाला
सूर्य-चंद्र तुमचे डोळे दुरुनीच ते बघतात
कमी नाही आता काही कृपादृष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची पंचप्राण तुमचे त्यात
पाठीवरी फिरवा हात या हो बाबा एकच वेळा
https://www.youtube.com/watch?v=bTNOY03Dxgs

२. कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेरबाई, येऊन मिळालं सासरला

कृष्णेचं पाणी, कोयनेचं पाणी एकरुप झालं, आलिंगनी बाई आलिंगनी
ओळाखायचं सांगा कसं कुणी ?
संसाराच तीर्थ बांधलं, लक्ष पायऱ्या घाटाला

एक आईच्या पोटी येऊनी, ताटातूटी जन्मापासूनी
सासर माहेर नाव सांगूनी, नयनी नातं गहिवरुनी
बहीण भेटली बहिणीला

शतजन्माची ही पुण्याई, घेऊन आली कृष्णामाई
कोयना येई झुलवित डोई, मंगल घट ते न्हाऊ घालण्या
सुवासिनीच्या प्रीतीला
https://www.youtube.com/watch?v=D3SE3LAVF9s

३. कोकिळा गा गा गा रे
भूलोकीच्या गंधर्वा तू अमृतसंगीत गा, गा रे
सप्तसुरांचा स्वर्ग उभारून
चराचराला दे संजीवन
अक्षय फुलवित हे नंदनवन
पर्णफुलांतून गा
कुहुकुहु बोलत मधुर गायनी
मोहित होता सारी अवनी
कुसुमकोमला ही वनराणी
नाचत थयथय गा
मन्मथ मनीचा इंद्रधनुला
शरपंचम तो लावुनी आला
प्रीत भेटता अनुरागाला
मिलन होऊन गा
https://www.youtube.com/watch?v=plc7BF1x8JA

४. गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ?
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा

कडकडुनी तू मिठी मारता बाळे,
बाळपण आले, आले, घुमवित घुंगुरवाळे
आठवले सारे सारे, गहिवरले डोळे
कढ मायेचे तुला सांगती, जा

दारात उभी राहिली खिलारी जोडी
बघ दीर धाकले बसले, खोळंबुन गाडी
पूस ग डोळे या पदराने, सावर ही साडी
रूप दर्पणी मला ठेवुनी जा

मोठयांची तू सून पाटलिण मानाची
हसले तुझे ग, हिरवे, बिलवर लगीनचुडे
बघु नकोस मागे मागे, लाडके बघ पुढे
नकोस विसरू परि आईला, जा
https://www.youtube.com/watch?v=qgfk6OrWuOA

५. जो आवडतो सर्वाला तोचि आवडे देवाला
दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालुनी
दुःख नेत्रिचे घेता पिउनी, फोडी पाझर पाषाणाला
घेउनि पंगू अपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी
पायाखाली त्याच्यासाठी, देव अंथरि निज हृदयाला
जनसेवेचे बांधुनि कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन अपुले दृढ सिंहासन, नित भजतो मानवतेला
https://www.youtube.com/watch?v=vxgrKmKj518

नवी भर दि. ०४-०७-२०२१

गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जेथे सागरा धरणी मिळते अशी सुंदर भावगीते रचणाऱ्या जनकवी पी सावळाराम यांची आज जयंती (०४-०७-२०२१)
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ज्यांना ‘जनकवी’ या उपाधीने गौरविले ते ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्षही होतें राघू बोले मैनेच्या कानात हे त्यांचे पहिले भावगीत एचएमव्हीने ध्वनीमुदित केले. राम राम पावणं या चित्रपटाचे गीतलेखन त्यांनी पहिल्यांदा केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुमारे ५० हून आधिक चित्रपटांच्या कथा – पटकथाचे लेखन त्यांनी केले. जनकवींनी लिहिलेल्या २५० हून अधिक गीतांचे पार्श्वगायन लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, तलत मेहमूद, मन्ना डे, ह्लदयनाथ मंगेशकर या सारख्या दिग्गजांनी केले. सावळाराम यांचा आणखीही एक विशेष दिसून येतो. तो म्हणजे संतसाहित्याचे, लावणी-पोवाडय़ांचे, लोकगीतांचे त्यांनी केलेले परिशीलन होय. त्यामुळे त्यांची रचना ग्रांथिक, विद्वज्जड वा क्लिष्ट न वाटता ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. उदाहरणार्थ, ‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. इथे संतांबद्दलचा अतीव जिव्हाळा आणि सगुण उपासनेचे मर्म ते सहज पकडतात. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात.
सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. लता मंगेशकर-आशा भोसले यांच्या सुरेल सुरांमध्ये ती ध्वनिमुद्रित झाल्याने घराघरात पोहोचली.
पी. सावळाराम यांची गाजलेली १२५ गीते
अपुरे माझे स्वप्‍न राहिले —- अरुण उगवला अनुरागाचा —— असावे घर ते अपुले छान —–आई कुणा म्हणू मी —– आई होऊन चुकले का मी आठवणींनो उघडा डोळे —– आली दिवाळी आली दिवाळी—–आली हासत पहिली रात —– उघडी द्वार पूर्वदिशा — उठि गोविंदा उठि गोपाला —–ओळख पहिली गाली हसते—ओळखले मी ओळखले —— कलेकलेने चंद्र वाढतो—-कल्पवृक्ष कन्येसाठी ——-का चिंता करिसी—— काय करू मी बोला —– कुबेराचं धन माझ्या शेतात ——कोकिळ कुहुकुहु बोले —- कृष्णा मिळाली कोयनेला—–खरा ब्राम्हण नाथची —- गळ्यात माझ्या तूच—–गा रे कोकिळा गा —- गोड गोजरी लाज लाजरी —– गोड तुझ्या त्या स्वप्‍नामधली—— गंगा जमुना डोळ्यांत उभ्या
गंध फुलांचा गेला ——- घट डोईवर घट कमरेवर —- घरोघरी वाढदिन —– चंद्र तोच अन्‌ तेच तारे —–चंद्रकळा रुक्मिणी नेसली — चंद्रा रे मी तुझी रोहिणी—– चंपक गोरा कर कोमल —- छुन छुन बोलतीया —- जनता येथे राज्य करी—–जय देवी मंगळागौरी —-जिथे सागरा धरणी मिळते —– जीवित माझे हवे तुला —–जो आवडतो सर्वांला —— जो तो सांगे ज्याला त्याला ——टक्‌टक्‌ नजर पडतोय्‌ —–डाव टाका नजर माझी —-तुजसाठी शंकरा भिल्लीण—-तुझे डोळे पाण्याने भरले —-तुझ्याचसाठी तुझे घेउनी —–तू असता तर कधि नयनांनी —– तू सहज मला पाहिले —– तूच कर्ता आणि करविता ——दर्पणी बघते मी गोपाळा —– दिलवर माझा नाही आला ——दे कंठ कोकिळे मला—— देव जरी मज कधी भेटला—— देवरूप होऊ सगळे ———देशिल का रे मजला क्षणभर—— धागा धागा अखंड —– नशिब शिकंदर माझे—— नसता माझ्या मनात काही —–नसती झाली भेट तुझी ती —–नीज गुणिले नीज लवलाही —–पर्णपाचू सावळा सावळा —-पाहिलेस तू ऐकिलेस तू —–पाहुणा म्हणूनी आला—–पूर्व दिशेला अरुणरथावर—— पैठणी बिलगुनी म्हणते—–पंख हवे मज पोलादाचे —– पंढरीनाथा झडकरी —-प्रीत माझी पाण्याला जाते—– प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे —– प्रेम करुन मी चुकले—–प्रेम तुझ्यावर करिते मी —–प्रेमा काय देऊ तुला—–फुटतो पान्हा पुन्हा—– बघता हसुनी तू मला —– बघा ना छळतो हा —–बाळा होऊ कशी उतराई —–भक्‍तिच्या फुलांचा बोलतो——-मजवरी माधव रुसला बाई ——मनात नसता काहि गडे —– मनात नसता तुझ्या गडे——-मनी वसे जे स्वप्‍नी दिसे —–महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी —-माझिया नयनांच्या कोंदणी —— माझ्या शेतात सोनंच —–मानसकन्या कण्वमुनींची —– मानसीचा चित्रकार तो —-मी आज बहिण हो भावाची —— मुली तू आलीस अपुल्या —- मूर्त रूप जेथे ध्यान —–मोहरला मधुमास —–म्हण भाबडी तू —–म्हणे यशोदा माझा —-यश हे अमृत झाले —-रघुनंदन आले आले —–रघुपति राघव गजरी गजरी—-राधा कृष्णावरी भाळली—–राधा गौळण करिते —- रामा हृदयी राम नाही—–रिमझिम पाऊस पडे —— लख लख चांदणं—–लेक लाडकी या घरची —- वसंत जेथे तेथे सुमने——विठु माझा लेकुरवाळा —–विठ्ठल तो आला आला —-विठ्ठल रखुमाईपरी — विठ्ठला समचरण तुझे —- वीणावती मी तुझी प्रियकरा —– शपथ दुधाची या —- शिकवितेस तू शिकता — शिका शिका रे शिका—-शेत बघा आलंया —- शंकर भेटता मजसी —– सखी ग मुरली मोहन —सखू आली पंढरपूरा —-सजू मी कशी —-सप्‍तपदी हे रोज चालते —– सारी भगवंताची करणी Sari —– सावध हरिणी सावध —–सुख येता माझ्या दारी —–सांग धावत्या जळा—- सांजवात लाविते —स्वप्‍न उद्याचे आज — हरवले ते गवसले का —- हसले आधी कुणी Hasale—- हसले ग बाई हसले—- हसुनि एकदा मला मुकुंदा —-हर्षाचा वर्षाचा दिवाळीहासता मी हाससी का—- हिरव्या कुरणी घडली कहाणी —- ज्ञानदेव बाळ माझा—- हृदयी जागा तू अनुरागा — श्रीरामा घनश्यामा बघशिल”

*************************************


नवी भर दि. ०८-०५-२०२०

४. कवी अनिल

आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचा स्मृती दिन
(८ मे,१९८२)

मुर्तिजापूर ह्या गावी त्यांचा जन्म ११ सप्टेंबर, १९०१ (9/11 !) रोजी झाला. तेथेच शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते १९१९ मध्ये पुण्याला आले. फर्गसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी मिळवलीपदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी ते कोलकाता इथे गेले . ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले . त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी त्यांनी संपादली. सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला.
त्यांची लोकप्रिय गाणी

अजुनी रुसून आहे.
आज अचानक गाठ पडे.
केळीचे सुकले बाग.
गगनी उगवला सायंतारा.
बाई या पावसानं
थकले रे डोळे माझे.
वाटेवर काटे वेचीत चाललो
वेळ झाली भर मध्यान्ह
कुणी जाल का ,सांगाल का.

एखादी संध्याकाळ हसत हसत अवतरते आणि मन प्रसन्न करुन जाते. मात्र एखादी निरव संध्याकाळ उदासीची छाया घेऊन येते नि प्रत्यक्षात काहीही उदासवाणं घडलेलं नसतानाही, जीव कातर होतो. अशावेळी आपण एकटे असलो, तर अधिकच एकाकी वाटायला लागतं. एकटेपणाची-एकाकीपणाची ही जाणीव जीवघेणी असते. विरहाची उजळणी करणारी असते.

जेव्हा एखादी संध्याकाळ अंगावर येते, तेव्हा कवी अनिल यांची गाणी मनात रुंजी घालू लागतात . कारण ती गाणी विरहवेदना, एकांत अधिक गहिरा करणारी आहेत. मनात एखादा भाव जागृत झाल्यावर जर विशिष्ट गाणी आठवत असतील, तर ते त्या गाण्याचं यशच म्हणायला हवं.अगदी उदाहरण देऊन सांगायचं तर अनिलांचं “केळीचे सुकले बाग असुनिया पाणी” हे गाणं आठवून पाहा-म्हणजे काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

प्रसाद जोग.सांगली.

वॉट्सअॅपवरून साभार दि.०८-०५-२०२०

#मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक कवि अनिल यांचा आज स्मृतिदिन
कवी अनिलांचा जन्म सप्टेंबर ११, इ.स. १९०१ रोजी मुर्तिजापूर ह्या गावी झाला. तेथेच शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले. फर्गसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम करीत असतानाच कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर आणि ऑक्टोबर ६, १९२९ ला विवाहात परिणती.पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय. १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक. १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे मुख्याधिकारी या, आणि पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ह्या पदांवर नेमणुका.असा मार्गक्रम करत असताना मराठी वाङ्मयात महत्त्वाचे योगदान. कवी अनिलांना इ.स. १९७९ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली.मे ८, इ.स. १९८२ रोजी नागपूरला निर्वाण.
श्री.माधव विद्वांस
                         . . . . . . . .. फेसबुकवरून साभार दि.०८-०५-२०२०
************************************************

नवी भर दि.२६-०५-२०२०

५. कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)

ज्यांनी महाराष्ट्र गीत लिहिले, तसेच एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि ‘भावबंधन’ अशी सुंदर नाटके लिहिणारे शब्दप्रभू श्री.राम गणेश गडकरी,यांची आज जयंती

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात – जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर
हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले.
वाग्वैजयंती हा गडकर्‍यांचा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत.

आज गडकरींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांची एक सुंदर कविता

एखाद्याचे नशीब

काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते !
कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हेमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला ;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !
झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !
चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवी यापरी
पाही कोण अशा हताश हृदया? जो तो असे आपला,
देवा ! तू तरि टाकि अश्रु वरुनी, त्यासाठी तो तापला !

विकीपीडियावर मिळालेली माहिती

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात – जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि ‘भावबंधन’ ही चार पूर्ण नाटके (आणि ‘राजसंन्यास’ आणि ‘वेड्यांचा बाजार’ ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली.

राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते.

विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.

नागपूरला ’राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखाना आहे.

जीवन
गडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या ‘करमणूक’ नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाले.

नाटके
गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.

एकच प्याला ,गर्वनिर्वाण, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास, भावबंधन, मित्रप्रीती (अप्रकाशित), राजसंन्यास, वेड्याचा बाजार

काव्य
वाग्वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे. यात मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करीत. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती राजहंस माझा निजला ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते.

विनोदी लेखन
गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी ‘मासिक मनोरंजन’मध्ये ‘बाळकराम’ ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह ‘रिकामपणची कामगिरी’ ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.

अन्य साहित्य
नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.

याशिवाय, गडकऱ्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्य:-

चिमुकली इसापनीती
समाजात नटाची जागा आणि इतर दोन निबंध
नाट्यकलेची उत्पत्ती
गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र
—————-
राम गणेश गडकरी यांची एक अप्रसिद्ध गद्य कविता
भांबूराव आणि दाणेवाला यांच्यातील संवाद :-

भांबूराव : आंबेमोहर काय भाव?
दाणेवाला : असडी सत्तविसाने दिला.
भांबूराव : बोला; एकच गोष्ट
दाणेवाला : हा मण दिला, आत्ताच गोमाजिला.
भांबूराव : जातो.
दाणेवाला : माल जरा पहा तर खरे; भावात सव्वीस घ्या.
भांबूराव : साडे पंच्विस द्या.
दाणेवाला : हं घ्या. कितिकसा (हवा?)
भांबूराव : पल्ला.
दाणेवाला : चला माप घ्या.

हाच मजकूर शार्दूलविक्रीडित वृत्तात :-

आंबे॒मो | हर का | य भाव | असडी सत्तावि |साने | दिला
बोला; | एकच गोष्ट | हा | मण दिला,| आत्ताच | गोमा |जिला.|
जातो | माल जरा |पहा | तर खरे; | भा | वात | सव्वीस घ्या |
साडे पंच्विस द्या. | हं घ्या | कितिकसा? | पल्ला. || चला माप घ्या. ||

***********************************

नवी भर दि.०६-०६-२०२०

६.कवयित्री शांताबाई शेळके आणि त्यांचे कवित्व

‘काटा रुते कुणाला’ गाण्याच्या निर्मितीच्या वेळचा हा किस्सा आहे. जितेंद्र अभिषेकींना हवं तसं गाणं तयार होत नव्हतं. शांताबाई थोड्या वैतागल्या, त्यांनी अभिषेकींना विचारलं की त्यांना नक्की काय हवं आहे. तेव्हा ..

आप काटों की बात करते है हमने फुलोंसे जख्म खाये है,
आप गैरोंकी बात करते हमने अपनोसें भी जख्म खाये है
असा एक शेर त्यांनी ऐकवला, आणि शांताबाईंच्या लेखणीतून शब्द उमटले,

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे.

*

हृदयनाथ मंगेशकर आणि शांताबाईंनी काही कोळीगीतं करायची ठरवली. त्यानुसार त्या भागाचा दौरा करून आले. त्यानंतर एक महिना शांताबाईंचा काही पत्ता नाही. एक महिन्यानंतर जेव्हा शांताबाई हृदयनाथांना भेटायला गेल्या तेव्हा ते थोडे चिडले. शांताबाई हृदयनाथांच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागल्या आणि सांगितलं की त्यांना नागिण झाली होती. त्यामुळे त्यांना उशीर झाला. बरं त्याही अवस्थेत गाणी कोणती लिहावीत तर, ‘वल्हव रे नाखवा हो’ .. त्यात कोळीबांधवांसाठी त्यांनी ‘दर्याचा राजा’ हा सुंदर शब्द वापरला आहेत.

‘हात नका लावू माझ्या साडीला’ हे गाणं शांताबाईंनीच लिहिलं आहे. हे गाणं मंगेशकरांच्या घरात रचलं. पदराची जी किनार असते त्यासाठी शब्द सुचत नव्हता. तेव्हाच कुणीतरी घरात खायला शेव आणली. तेव्हा ‘तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला’ या ओळी प्रकटल्या.

कविता म्हटलं की फक्त प्रेम असं नाही. प्रेमकवितांच्या प्रांतात शांताबाईंनी मुशाफिरी केलीच पण त्याबरोबर लहान मुलांसाठीही ‘किलबील किलबील पक्षी बोलती’ सारख्या सुंदर कविता आणि गाणी रचली.

गणेशोत्सवाच्या काळात हमखास ऐकू येणारी ‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्री गणराया’ ही गाणी शांता शेळकेंच्या लेखणीतून अवतरली आहेत. घरून निघताना आठवणारे ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ हे गाणंही त्यांचीच देणगी. या गाण्यातली ‘ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे’ ही ओळ आली की हमखास डोळ्यात पाणी येतं आणि आपण शांताबाईंपुढे नतमस्तक होतो.

नाट्यसंगीत, लावणी या गीत प्रकारातही शांताबाईंनी आपला ठसा उमटवला आहे. प्रतिभा हा शब्द थिटा पडावा अशा दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई अर्थात ‘शान्ता.ज.शेळके’ यांचा आज स्मृतीदिन.

शांताबाईंना शतश: नमन.

…….. नवी भर दि.१३-०६-२०२०

. . . . . . . . . . . . .

लेखीका, कवयित्री, शांता शेळके यांची आज #जयंती (१२ ऑक्टोबर १९२२-निधन ६ जून २००२) त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथिल . पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. तेथे श्री. म. माटे, के. ना. वाटवे हे प्राध्यापक म्हणून त्यांना लाभले. याच सुमाराला प्रा. रा. श्री. जोग फर्ग्युसन महाविद्यालयात शांता शेळके आले. काव्यलेखनाबाबत त्यांचे त्यांना मार्गदर्शन व उत्तेजन मिळाले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले (१९४४). त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, चित्रपटगीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले; तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून त्या विशेष प्रसिद्घ आहेत.

त्यांनी एक गोष्ट मात्र नमूद केली होती कि संस्कृत मुळे माझे लेखन ,भाषण सुधारले खरंच आज लोकांनी या भाषेकडे पाठ फिरविली आहे त्यामुळे दर्जेदार साहित्य निर्मिती होत नाही.
वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्या नंतर रुपसी (१९५६), तोच चंद्रमा … … (१९७३), गोंदण (१९७५), अनोळख (१९८६), जन्मजान्हवी (१९९०), पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९९) इ. काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रसिद्घ झाले. त्यांनी विपुल बालकथा, बालगीतेही लिहिली (थुई थुई नाच मोरा, १९६१; टिप् टिप् चांदणी, १९६६; झोपेचा गाव, १९९०). गीतांचे इतरही अनेक प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. उदा., लावण्या, कोळीगीते. मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे. नादलयींचे नेमके भान जपणारी सुभग, प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्यलेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात.

नवी भर दि.06-06-2021ः

एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली.ग्रामीण भागात जन्मलेल्या या विदुषीने संस्कृत मध्ये प्राविण्य मिळविले ,तसेच माझी साहित्यसंपदा त्यामुळेच बहरली असे त्या आवर्जून सांगत

शांताबाईची #गीत #काव्य #संपदा

अजब सोहळा—-अपर्णा तप करिते काननी—–अशीच अवचित भेटून जा —– असता समीप दोघे हे — असेन मी नसेन मी —— अहो जाईजुईच्या फुला —आई बघ ना कसा हा—-आज चांदणे उन्हात हसले — आज मी आळविते केदार—-आज मी निराधार एकला — आज सुगंध आला लहरत — आधार जिवा — आला पाऊस मातीच्या वासात– आली सखी आली प्रियामीलना —आले वयात मी बाळपणाची —एक एक विरते तारा —- कर आता गाई गाई — कशि गौळण राधा — कशी कसरत दावतुया न्यारी —कळले तुला काही — कळ्यांचे दिवस फुलांच्या — का धरिला परदेश — काटा रुते कुणाला— कान्हू घेउन जाय — काय आणितोसी वेड्या–काय बाई सांगू — किलबिल किलबिल पक्षि— कुणीतरी सांगा हो सजणा — खोडी माझी काढाल तर — गगना गंध आला — गजानना श्री गणराया —गणराज रंगी नाचतो — गाव असा नि माणसं अशी — गीत होऊन आले सुख माझे– गोंडा फुटला दिसाचा —घन रानी साजणा — घर परतीच्या वाटेवरती–चित्र तुझे हे सजीव होऊन — चंद्र दोन उगवले — चांदणं टिपूर हलतो वारा — चांदण्या रात्रीतले ते— छेडियल्या तारा —जय शारदे वागीश्वरी — जा जा रानीच्या पाखरा —जा जा जा रे नको बोलु –जाईन विचारित रानफुला —जायचे इथून दूर –जिवलगा राहिले रे दूर — जीवनगाणे गातच रहावे— जे वेड मजला लागले
जो जो गाई कर अंगाई —झाला साखरपुडा ग बाई — झुलतो झुला जाई आभाळा –टप टप टप टाकित टापा — डोळ्यांत वाकुन बघतोस– तळमळतो मी इथे तुझ्याविण—तुझा गे नितनूतन सहवास —तुझा सहवास —तुझी सूरत मनात राया —तुला न कळले मला न —तू नसता मजसंगे वाट—तू येता सखि माझ्या—तोच चंद्रमा नभात — दशदिशांस पुसतो —दाटतो हृदयी उमाळा दाटून कंठ येतो– दिवस आजचा असाच गेला —दिसते मजला सुखचित्र–दु:ख हे माझे मला — दूर कुठे चंदनाचे बन —दैव किती अविचारी— नको रे नंदलाला —ना ना ना नाही नाही — ना मानो गो तो दूँगी — नाही येथे कुणी कुणाचा
निळ्या अभाळी कातरवेळी—पप्पा सांगा कुणाचे —पहा टाकले पुसुनी डोळे —- पाऊस आला वारा आला —पाखरा गीत नको गाऊ—– पायावरी प्रियाच्या सर्वस्व —पालखी हाले डुले —-पावनेर ग मायेला करू —-पुनवेचा चंद्रम आला– प्राणविसावा लहरि सजण –प्रीतफुले माझी सोनेरी —प्रीति जडली तुझ्यावरी — बहरुन ये अणुअणू —बाळ गुणी तू कर अंगाई —बाळा माझ्या नीज ना —बोल बोलना साजणा — मध्यरात्रिला पडे तिच्या — मनाच्या धुंदीत लहरीत — मराठी पाउल पडते पुढे —मला आणा एक हिर्‍याची — मागते मन एक काही —मागे उभा मंगेश — माजे रानी माजे मोगा —–माजो लवताय डावा डोळा —माज्या मुखार गर्भच्छाया
माज्या सारंगा राजा –माझी न मी राहिले –माझ्या मना रे ऐक जरा —-माझ्या मायेच्या माहेरा —माणुसकीचे पाईक आम्ही — मानत नाही श्याम —मारू बेडूक उडी गड्यांनो —मी आळविते जयजयवंती —मी डोलकर डोलकर —मी नवनवलाचे स्वप्‍न — मी ही अशी भोळी कशी ग –राघुमैना रानपाखरं —राम भजन कर लेना —- रूपसुंदर सखी साजिरी —-रूपास भाळलो मी— रेशमाच्या रेघांनी —वहिनी माझी हसली ग –वादलवारं सुटलं गो—- विकल मन आज झुरत —विकल सांजवेळी —विहीणबाई विहीणबाई उठा—शारद सुंदर चंदेरी—शालू हिरवा पाच नि — शूर अम्ही सरदार —शोधितो राधेला श्रीहरी
शोधू मी कुठे कशी — सब गुनिजन मिल गावो –साजणी सई ग — सुकुनी गेला बाग — सुख भरुन सांडते —सुखवितो मधुमास हा— सूर येती विरुन जाती — संगीतरस सुरस — संपली कहाणी माझी —संपले स्वप्‍न ते—- सांग सांग नाव सांग — सांगू कशी प्रिया मी — सांज आली दूरातून —स्पर्श सांगेल सारी — स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला — स्वप्‍ने मनातली का — हा दु:खभोग सारा —हा माझा मार्ग एकला— हाऊस ऑफ बॅम्बू —हिरव्या रंगाचा छंद —ही कनकांगी कोण ललना– ही चाल तुरुतुरु—ही वाट दूर जाते — हे बंध रेशमाचे — हे रान चेहर्‍यांचे –हे श्यामसुंदर राजसा –क्षणभर भेट आपुली — ऋतु हिरवा ऋतु बरवा — श्रावणसरी

माधव विद्वांस

. . . . . . . . . . . नवी भर दि.१२-१०-२०२० : फेसबुकावरून साभार

नवी भर दि. १२-०६-२०२१:

एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली.
ग्रामीण भागात जन्मलेल्या या विदुषीने संस्कृत मध्ये प्राविण्य मिळविले , तसेच माझी साहित्यसंपदा त्यामुळेच बहरली असे त्या आवर्जून सांगत.
गीतांचे इतरही अनेक प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. उदा., लावण्या, कोळीगीते. मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे. नादलयींचे नेमके भान जपणारी सुभग, प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्यलेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात.
त्यांच्या दीर्घ लेखन-कारकीर्दीत मराठी साहित्यनिर्मिती व साहित्यविचार ह्यांत अनेक स्थित्यंतरे झाली आणि त्यांच्या अनुषंगाने वादविवादही झाले; तथापि कोणत्याही पक्षाची वा पंथाची बाजू घेऊन त्यात न गुंतता आस्वादक आणि स्वागतशील वृत्तीने त्या ह्या सर्व स्थित्यंतरांना सामोऱ्या गेल्या. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. ह्यांखेरीज फाय फाउंडेशन; मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘ वाक्‌विलास ’; यशवंतराव चव्हाण; गदिमा; सु. ल. गद्रे इ. अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभले. त्यांच्या चिमणचारा, कविता करणारा कावळा, गोंदण इ. ग्रंथांसही महाराष्ट्र शासनाचे वाङ्‌मयीन पुरस्कार मिळाले.

. . . माधव विद्वांस आणि फेसबुकचे आभार

नवी भर दि. २४-०६-२०२१ :

४, ‘शाकुंतल’..

‘साहित्य सहवासा’तला हा पत्ता मूळचा माझा नव्हे. तो शांताबाईंचा.

शांताबाई म्हणजे एकच- शेळके!

१९८० च्या आसपास कधीतरी पहिल्यांदा मी या घराचं दार वाजवलं होतं. दुपार सरत आलेली. वाटलं, बाई असतील; तर दारात त्यांचे मित्र. प्रभुणे. चट्टय़ापट्टय़ाचा लेंगा आणि वर बनियन- असे. हातात एक फाऊंटन पेन होतं आणि शाई भरायचा ड्रॉपर.

‘आत या..’ म्हणाले. मी गेलो.

– तर एखादा जुनाट, थकलेला, विटका माणूस असावा तसं घर. सगळीकडे अंधार. चिमुकल्या खिडक्या. आत नुस्त्या भिंती आणि ज्यात त्यात का कोण जाणे, पार्टिशन्स घातलेली. पुस्तकांचा हा एवढा पसारा. पुस्तकं तेवढी चकचकीतशी. बाकी सगळ्या घरावर जुनाट, कुबट कळा.

एक भिंत आणि आणखी एका पार्टिशनच्या मागल्या खोलीत जुन्या प्रचंड पलंगावर शांताबाई बसलेल्या होत्या. गादीवर. मुटकुळं केल्यासारख्या. समोर उतरत्या पाठीचं लाकडी डेस्क. लिहिता लिहिता शाई संपली असावी. प्रभुणे मला आत घेऊन गेले. त्यांनी मला तिथे बसवलं. ताजी शाई भरलेलं पेन पुन्हा नीट पुसून शांताबाईंना दिलं आणि माझ्यासाठी चहा टाकायला म्हणून ते आणखी एका भिंतीच्या आत गडप झाले.

मग शांताबाईंशी गप्पा झाल्या. चहा झाला. मी तिथे कशाला गेलो होतो ते आता आठवत नाही. आठवते ती त्यांची गाठोडय़ासारखी आकृती आणि त्यांच्या कपाळावरचं ते हसरं, ठळक, ठसठशीत लाल कुंकू!

निघायच्या तयारीत निरोप घेत मी उठलो, तर शांताबाई हसून म्हणाल्या,‘‘चल, आज मी तुला भेळ खायला नेते. कवितेचं मानधन आजच आलंय. दहा रुपये. आपण भेळेची पार्टी करू!’’

साहित्य सहवासच्या कोपऱ्यावर तेव्हा गुप्ता नावाचा कुणीएक भेळवाला होता, त्याच्याकडे ही पार्टी होणार होती.

प्रभुण्यांनी बनियनवर शर्ट चढवला आणि शांताबाईंच्या हाताला धरून अलगद जिने उतरून ते त्यांना खाली घेऊन आले. एकेक पाऊल टाकणं म्हणजे शांताबाईंना फार त्रास होत होता. एकमेकांच्या आधाराने चालणारी ती दोन थकलेली माणसं पाहताना माझ्या पोटात तुटत राहिलं. शांताबाईंचा चेहरा मात्र चमचमीत भेळेच्या नुसत्या कल्पनेनेच चमकत होता. आम्ही शेवटी ती भेळ खाल्ली. पैसे द्यायला पाकीट काढलं तर मला रागावल्या. म्हणाल्या, ‘‘अरे सुभाष, मी आज श्रीमंत आहे रे! मानधन आलंय ना कवितेचं!! तेव्हा आजची पार्टी मीच देणार. तू असा येत जा मात्र. गप्पांना ये. नक्की ये हो!!’’

मी कुठला नेहमी जाणार गप्पांना?

शांताबाई मुंबईत. मी पुण्यात.

पण आम्ही गप्पांना रोज एकत्र भेटणार हे नियतीने आधीच ठरवलेलं होतं.

प्रभुणे निवर्तले आणि शांताबाई मुंबईत अगदीच एकटय़ा पडल्या. त्यांना साधं घर चालवणं जमेना. कसं जमणार? आयुष्यात कधी घरात काही पाहिलं नव्हतं. संसार असा केला नव्हता. स्वयंपाक सोडा, साधा आमटी-भातही कधी रांधला नव्हता. मुंबईतलं त्यांचं अख्खं आयुष्य हे अभ्यास, लेखन, कविता, गाणी आणि उदंड यश, कीर्ती यांच्या समृद्ध वैभवाने अखंड गजबजलेलं होतं. इतक्या कमिटय़ांवर कामं केली. इतका अभ्यास, इतकं लेखन, इतकी गाणी लिहिली. गायक-संगीतकारांबरोबर इतक्या बैठकी रंगवल्या. खुद्द लताबाई आणि अख्ख्या मंगेशकर कुटुंबासह आयुष्यात इतकी स्नेहाची श्रीमंती मिळवली. दुसऱ्याकशाला जागा होती कुठे कधी?

शांताबाईंच्या अवघ्या आयुष्याला लखलख देणारे हे सगळे दिवे हलके हलके मंदावू लागल्यावर मग मात्र उतरत्या उन्हांनी कदाचित काहीशी कासाविशी आणली असावी त्यांच्या आयुष्यात.

प्रभुणे गेले.. आणि त्या कासावीस जंगलात एकाकीपणाचं श्वापद घुसलं.

शांताबाईंचे बंधू राम शेळके. पुण्यात राहात. मोठा दिलदार माणूस. रामभाऊंशी, शांताबाईंच्या वृद्ध, पण खणखणीत आईशी माझी सख्खी मैत्री होती. माझं त्या घरी जाणं-येणं होतं.

रामभाऊंना वाटे, आयुष्यभर कुटुंबाबाहेरच राहिलेल्या आपल्या गुणी बहिणीने आता घरी परतावं. तिची निवृत्ती सुखाची व्हावी. एका भेटीत त्यांनी माझ्याकडे विषय काढला. म्हणाले, ‘‘बंगला आहे एवढा. वर एक खोली बांधतो मी तिच्यासाठी स्वतंत्र. सगळ्यांमध्ये आनंदात राहील इथे पुण्यात!’’

शांताबाईंच्या आईनेही गळ घातली होतीच. मग मी मुंबईत जाऊन एकदा भेटलोच शांताबाईंना. म्हटलं, ‘‘रामभाऊ एवढे म्हणतायत तर आता ऐका की त्यांचं! चला पुण्याला!!’’

शेवटी माझ्यासारखे मित्र आणि कुटुंबाच्या अगत्याचा मान राखून शांताबाई मुंबईतला त्यांचा एकाकी संसार उचलून पुण्यात यायला तयार झाल्या. आल्याही. रामभाऊंच्या बंगल्यात वर एक नवी खोली बांधली गेली. ती पुस्तकांनी सजली. शांताबाईंच्या उत्तरायुष्यातला पुण्यातला काळ सुरू झाला.

मीही पुण्यातच होतो. माझ्या स्टुडिओत कामांचा पूर असे तेव्हा. माझा गोतावळा मोठा. स्टुडिओत मित्रांचे अड्डे पडलेले असत. मी भरपूर मजा करीत असे. दंगा घालत असे. त्याहून दुप्पट कामही करीत असे.

असाच एके दिवशी दुपारी शांताबाईंचा फोन. मला म्हणाल्या, ‘‘अरे सुभाष, मी आज येऊ का तुझ्या स्टुडिओत संध्याकाळी? माझं काहीही काम नाहीये तुझ्याकडे. फक्त गप्पा मारायच्या आहेत.’’

मी म्हटलं, ‘‘अहो शांताबाई, विचारताय काय? या की!!!’’

त्या आल्या.

आणि मग येतच राहिल्या.

अख्खं आयुष्य मुंबईत गेलेलं. इथे पुण्यात आल्यावर त्या एकटय़ा पडल्या होत्या. त्यांना माणसांची भूक फार. माणसं आणि गप्पा यावरच त्या जगत.. आणि खाणं!!

गप्पा मारायला म्हणून दुपारच्या स्टुडिओत आल्या की जमिनीवर अंथरलेल्या गादीवर मुटकुळं करून बसत. डोक्यावरचा पदर सारखा सावरीत लडिवाळ, गोड, आग्रहाचं, लाघवी बोलत राहत. मला म्हणत, ‘‘सुभाष, तुला त्रास नाही ना रे होत माझ्या बोलण्याचा? मी आपली रिकामी आहे, तू असा कामात!! म्हणशील, काय म्हातारीची टकळी काही थांबत नाही!’’

मी म्हणायचो, ‘‘नाही हो शांताबाई, बोला तुम्ही.. मला कसलाही त्रास नाही होत.’’

कधी कधी मी कामात असलो की नुसत्याच अवघडल्यासारख्या बसत. मग एकदा त्यांना विचारलं, ‘‘कागद देऊ का तुम्हाला लिहायला?’’

‘‘कागद?’’ त्यांनी काहीशा विचित्र रिकाम्या नजरेने माझ्याकडे पाहिलं अन् म्हणाल्या, ‘‘काही सुचत नाही रे आता..’’

चटका बसल्यासारखा मी चरकलो.

मग त्याच म्हणाल्या, ‘‘तू असं कर, मला एक ड्रॉईंग पेपर दे. मला चित्र काढायचंय.’’

मग मी त्यांना ड्रॉईंग पेपर द्यायला लागलो. सोबत पेन्सिली, रंगखडू असत. शांताबाई दोनच चित्रं काढत. एक त्यांच्या लाडक्या मांजरीचं चित्र आणि दुसरी म्हणजे स्मिता पाटील!

स्मिता त्यांची फार लाडकी. तिचं चित्र म्हणजे काय, तर तिचा चेहरा रेखणाऱ्या काही रेघा आणि कपाळावर कुंकू. ही स्मिता. तिच्या-माझ्या प्रेमाबद्दल शांताबाईंना भारी कुतूहल आणि कौतुकही!! स्मिताची आठवण आली की त्यांच्या डोळ्यात लगेच पाणीच भरे!!

मी म्हणायचो, ‘‘शांताबाई, स्मिताचं चित्र काढायची ही आयडिया भारी आहे तुमची! दोन-चार रेषा काढल्या आणि वर एक कुंकू ठेवलं की झालं!’’

त्या म्हणायच्या, ‘‘हो रे सुभाष!! तुला माझंही असंच चित्र काढता येईल. एक मोठ्ठं गाठोडं काढ आणि त्याच्यावर एक कुंकू ठेव, की झाल्या शांताबाई शेळके! काय?’’

असं साधंच बोलता बोलता अचानक इतक्या उन्मळून हसत की त्यांच्या डोळ्यांतून पाणीच वाहू लागे. मग गप्पगप्पशा होऊन जात. असं अस्वस्थ अबोलपण आलं की मी त्यांना चित्र काढायला नवा कागद द्यायचो. मग शांतपणे काहीतरी रेघाटत खूप वेळ मुक्याने त्या बसून राहात.

आठवडय़ातून दोन-चारदा यायला लागल्या तशी मला शांताबाईंची तहान हळूहळू उमजू लागली. घरचे लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत असत. पण कुटुंबाबरोबर कसं राहायचं याची त्यांना सवयच नव्हती. घरातल्या कामांत रस नसे. साधं भाजी निवडणं, देवपूजा, घरातल्या शिळोप्याच्या गप्पा हे त्यांनी आयुष्यात कधी केलेलंच नव्हतं. तरी घरातला प्रत्येक जण त्यांच्यासाठी जीव पाखडीत असे. शांताबाई त्या प्रेमाने गुदमरून जात आणि अधिकच एकटय़ा होत.

त्यांची नजर सतत भिरभिरत असे आणि नाकाला सारखे कसकसले वास येत. स्टुडिओत आल्या की म्हणत, ‘‘खमंग वास येतोय रे सुभाष!!’’

हा खमंग वास खालच्या बाजूला तळल्या जाणाऱ्या काका हलवाईंच्या सामोशाचा असे. मग मी विचारी, ‘‘खाणार का सामोसा शांताबाई?’’

‘‘कशाला रे उगीच ते तळकट खायचं?’’ असले लटके नकार त्या देत खरे, पण त्यांची लकलकलेली नजर बरोबर पकडायला मी एव्हाना शिकलो होतो. मग मी विचारायचो, ‘‘हे बघा, स्टुडिओच्या खाली उतरलं की कल्पना भेळ मिळते, सामोसे मिळतात आणि पलीकडच्या गल्लीत फक्कड आल्याचा चहा मिळतो. काय खायचंय तुम्हाला?’’ की त्या खूश होऊन म्हणत, ‘‘आज सामोसे खाऊ, चल!’’

वरून आवाज दिला की काका हलवाईंच्या दुकानातला मुलगा सामोशांच्या बशा घेऊन धावत आलाच वर!

तेव्हा मी ‘तुंबाडचे खोत’ या पुस्तकाचं काम करत होतो. पेंडश्यांचं हे एवढं भलंमोठं पुस्तक! चांगलंच वजनदार.

हलवाईंचा तो गरगरीत सामोसा बघून एकदा शांताबाई हसून म्हणाल्या, ‘‘अरे सुभाष, हा तुंबाड सामोसाच आहे की रे!’’

तेव्हापासून आम्ही त्याला ‘तुंबाड सामोसा’च म्हणायला लागलो. शांताबाई एका वेळी दोन-तीन तुंबाड सहज संपवत असत. मला हळूहळू त्यांची काळजी वाटायला लागली होती. यांचा हा एकटेपणा कसा संपवावा याचा विचार माझ्याही नकळत मी करायला लागलो. म्हटलं, पुणं नवं आहे यांना.. अजून रुळल्या नाहीयेत इथे!! तर आता आपणच काहीतरी करू या!

संध्याकाळ झाली की माझ्या स्टुडिओत संपादक, प्रकाशक, लेखक, कवींचा राबता सुरू होई. गप्पांचे अड्डे जमत. सुभाषच्या स्टुडिओत शांताबाई असतात, ही बातमी पसरायला पुण्यात कितीसा वेळ लागणार? मग त्यांच्याशी गप्पा मारायला म्हणून मुद्दाम लोक येऊ लागले. कुणी आलं आणि गप्पा रंगल्या की मी ‘आलोच’ म्हणून हळूचकन् निसटून माझी कामं करून यायचो. संध्याकाळ उतरली की मग खायच्या-प्यायच्या ओढीने स्टुडिओ बंद करून आम्ही सगळे बाहेर पडत असू. हळूहळू आग्रह करकरून आम्ही शांताबाईंनाही आमच्याबरोबर नेऊ लागलो. त्या असल्या की जुन्या आठवणींचा पाऊस अखंड कोसळत असे. आम्ही सगळे चिंब भिजून जात असू. मैफिलीत खुललेल्या शांताबाईंना बघताना माझ्या पोटातला त्यांच्यासाठीचा खड्डा तेवढय़ापुरता का असेना, आनंदाने भरून जाई. रात्री उशिरा शांताबाईंना घरी सोडायलाही जो-तो आनंदाने तयार असे. त्या गाडीत नीट बसल्या का, त्यांची साडी दारातून नीट आत घेतली का, अशी काळजी करून आपल्या आज्जीला सांभाळून न्यावं तसं लोक त्यांना अलगद घेऊन जात.

अर्थात रोज त्यांना स्टुडिओत बोलावणं शक्य नसे. मग मी मुद्दाम प्रयत्न करून शांताबाईंना कुणाकुणाच्या घरी गप्पांची आमंत्रणं मिळतील असं पाहू लागलो. कधी तात्या माडगूळकर, कधी मिरासदार.. हळूहळू शांताबाईंना पुण्यात कार्यक्रमाची निमंत्रणं येऊ लागली. पुढे खुद्द शंतनुराव किर्लोस्करांशी त्यांची मैत्री झाली. शंतनुराव त्यांना गाडी पाठवून गप्पांसाठी बोलावत. हलके हलके शांताबाईंची स्वत:ची वर्तुळं पुण्यात तयार झाली.

मग एकदा मला कुठला तरी पुरस्कार मिळाला. कार्यक्रम कोल्हापूरला होता. मी आयोजकांना म्हटलं, ‘मला शांताबाईंच्याच हस्ते पुरस्कार घ्यायला आवडेल.’ सगळे खूश! कोल्हापूरच्या प्रवासाचा बेत ठरल्यावर शांताबाई लहान मुलीसारख्या खुलल्या. तेव्हा व्होल्व्हो गाडय़ा नुकत्याच सुरू झालेल्या. आम्ही त्या गाडीने फक्त पुण्याहून कोल्हापूरला गेलो, तर शांताबाईंनी गाडीत खायला म्हणून पिशव्याच्या पिशव्या भरून खाऊ आणलेला! मी म्हटलं, ‘‘अहो, मोजून पाच तासांत पोचू आपण कोल्हापूरला! कशाला हे?’’

तर म्हणाल्या, ‘‘मला सारखी भूक लागते रे, सुभाष!! तोंड चाळवायला हवं काहीतरी बरोबर!!’’

कोल्हापुरातले मित्र आधीच आतिथ्यशील. त्यातून शांताबाई बरोबर.. मग काय विचारता!! खाण्यापिण्याची, कोडकौतुकाची नुसती धूम उडाली. यजमानांच्या घरच्या लेकी-सुना, त्यांनी बोलावलेल्या पाहुण्या मुलीबाळी शांताबाईंना चिकटल्याच. शांताबाई मुळातच लाघवी स्वभावाच्या.. सगळ्यांमध्ये विरघळून गेल्या. यजमानीणबाईंनी मला विचारलं, ‘‘जेवायला काय करू? शांताबाईंना काय आवडेल?’’ मी म्हटलं, ‘‘त्यांना काय तुम्ही साबुदाण्याची खिचडी देणार की काय? शांताबाई म्हणजे फक्त मटण!!! बास!! दुसरा विचारसुद्धा करू नका.’’

सकाळी नाश्ता झाला, दुपारी मटण झालं, संध्याकाळी च्याऊम्याऊ झालं आणि मग पार्टी सुरू झाली. शांताबाई आमच्या यजमान डॉक्टरांना सारखं म्हणत होत्या, ‘‘डॉक्टर, काहीतरी उपाय सांगा हो, माझं वजन फार वाढलंय. गुडघे फार दुखतात हो सारखे!’’

डॉक्टरांना यजमानधर्म निभावणं भाग होतं. ते म्हणत राहिले, ‘‘जाऊ दे हो शांताबाई, वयानुसार अशा तक्रारी असायच्याच आता!’’

की शांताबाई लगेच म्हणणार, ‘‘अगंबाई, हो का? तरी सांगा हो काहीतरी.. गुडघे फार दुखतात!!’’

शेवटी एकदाचे ते गोरेपान काळे डॉक्टर म्हणाले, ‘‘खरं सांगू का शांताबाई तुम्हाला, तुम्ही तुमच्या तोंडाला चिकटपट्टी लावा!!’’

‘‘अगंबाई, म्हणजे खायचं नाही का? तसंच करते आता.’’ शांताबाई गंभीर होऊन म्हणाल्या.

ही रात्रीची गोष्ट.

सकाळी उठून सगळे नाश्त्याच्या टेबलाशी आलो. पोहे, खिचडी, इडली-सांबार असे कितीएक प्रकार हौसेने रांधलेले. टेबल मस्त सेट केलेलं. शांताबाई अंघोळ करून नाश्त्याला आल्या. डोक्यावरचा पदर सरळ करत घरातल्या तरुण, उत्साही सुनेला कौतुकाने म्हणाल्या, ‘‘किती गं बाई हौशी तू!! किती छान मांडलंयस हे सगळं! पण ते कालचं मटण असेल ना शिळं? मुरलं असेल आता छान. तेच दे मला नाश्त्याला. बरोबर एखादा पाव चालेल!’’ मी थक्क होऊन बघत राहिलो. काय बोलणार?

कोल्हापूरच्या त्या मुक्कामात ‘महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन मला बांगडय़ा भरायच्यात..’ म्हणून हट्ट धरून बसल्या. मी म्हटलं, ‘‘अहो, गाडी नाही जात आतपर्यंत. कशा चालणार तुम्ही? एक पाऊल नाही टाकता येत तुम्हाला!!’’

तरीही मेहतांच्या दुकानात जाऊन गप्पा मारून आलोच आम्ही! संध्याकाळच्या कार्यक्रमात इतकं सुंदर भाषण केलं शांताबाईंनी- की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एकदा बोलायला लागल्या की खरंच सरस्वती असे त्यांच्या वाणीत. स्मरणशक्ती, पाठांतर, वाचन, कविता आणि अनुभवांची स्तिमित करणारी श्रीमंती!!

हळूहळू शांताबाईंना बाहेरगावच्या कार्यक्रमांची निमंत्रणं येऊ लागली. त्या हौसेने सगळीकडे जायला लागल्या. कार्यक्रम झाला की मानधनाचं पाकीट मिळे आणि त्यांच्या आवडीची एक साडी. मग मला त्या कौतुकाने दाखवीत. शांताबाईंना ना त्या पाकिटातल्या पैशांची मिरास होती, ना त्या साडीचं अप्रूप. आयुष्याच्या उतरत्या एकाकी संध्याकाळी मिळणारा मानसन्मान, कानात प्राण आणून त्यांचा शब्दन् शब्द टिपून घेणारे श्रोते, त्यांच्याकडची पोतडी उघडून गाण्यांच्या निर्मितीच्या कहाण्या ऐकणारे रसिक या लोभात त्या गुंतून पडल्या होत्या. स्वत:चं कौतुक ऐकायला कुणाला आवडत नाही? पण तरीही इतकं लखलखतं वैभव अनुभवलेल्या शांताबाईंमध्ये अजूनही टिकून असलेली ही तहान समजून घेताना मी सारखा अडायचोच.

शेवटी हे सगळे प्रवास, दगदग त्यांना झेपेनाशी झाली. रामभाऊ माझ्याकडे तक्रार करीत. मला म्हणत, ‘‘तू तरी सांग रे तिला. आता नाही होत तिच्याच्याने.’’ मलाही ते दिसत होतंच. शेवटी एकदा स्टुडिओत आल्या तेव्हा विषय काढलाच. म्हटलं, ‘‘शांताबाई, आता खूप झाले तुमचे कार्यक्रम आणि प्रवास. आता बास करा!! लोक प्रेम करतात तुमच्यावर. त्यांना हव्या असता तुम्ही. पण आता तुम्हाला चालता येत नाही, उभं राहता येत नाही. कशाला स्वत:ला एवढा त्रास घेता करून? घरी बसा आता छान!’’

‘‘अरे, पण मी घरी बसून करू काय?’’ त्या एकदम कळवळल्याच! मी म्हटलं, ‘‘का? लिहा की भरपूर. खूप दिवसांत काही लिहिलं नाहीये तुम्ही. इतके प्रकाशक मागे असतात सारखे तुमच्या. मी करतो कव्हर. मी सगळं करतो. तुम्ही फक्त लिहा!!’’

‘‘..नाही रे सुचत आता काही!’’ त्या म्हणाल्या आणि एकदम गप्पच बसल्या.

मी त्यांच्या उदास, रिकाम्या, भरून आलेल्या डोळ्यांत खोल पाहिलं.

इतके दिवस मला छळणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथे होतं.

अवघं आयुष्य सर्जनाच्या प्रांतात मनमुक्त विहरलेल्या शांताबाईंजवळ सगळं होतं. वैभव, कीर्ती, प्रेम करणारी माणसं, जीव लावणारं कुटुंब. उरली नव्हती ती फक्त त्यांच्यावर जन्मभर प्रसन्न असलेली त्यांची प्रतिभा!! जे जे म्हणून लिहून झालं होतं, त्या त्या सगळ्याची पुस्तकं काढून झाली होती. सगळं खरवडून, उपसून संपलं होतं. आता दिवाळी अंकासाठी लेख, कथा, कविता मागणारे फोन येतात, त्यांना द्यायला आपल्याजवळ नवं काही असत नाही, या दु:खाचा लसलसता निखारा शांताबाईंना आतून जाळून काढत होता.

मला काय बोलावं सुचेना.

उगीच अपराधी वाटत राहिलं.

मुंबईत रुजलेल्या या बाईंना तिथून उचकटून ज्यांनी पुण्यात आणलं, त्यात आपणही होतो.. अवेळी उपटल्याने वठलं असेल का त्यांच्या मनातलं झाड? इतक्या जिवंत, रसरशीत शांताबाई या अशा वाळत का गेल्या असतील?

मी हडबडलोच.

त्याही विझल्यासारख्या समोर बसल्या होत्या.

मग उगीचच शब्द जुळवून मी म्हटलं,

‘‘डॉक्टरांकडे जा. चेकअप् करायला हवंय तुमचं. औषधाने बरं वाटेल तुम्हाला.’’

तर म्हणाल्या, ‘‘नाही रे सुभाष! काही उपयोग नाही.. आता कशाचाही उपयोग नाही.’’

त्या सळसळत्या झाडाने आता आपला पसारा आवरायला घेतला होता. आपल्याकडे फार दिवस शिल्लक नाहीत याची कसली तरी विचित्र खूण शांताबाईंना नक्की मिळाली होती. त्यांना झालेलं जीवघेणं दुखणं डॉक्टरांना कळायच्या आत त्यांनी स्वत:च ओळखलं होतं. आधी शांताबाईंच्या कविता, त्यांची गाणी गेली. कवितांच्या मागोमाग शांताबाई गेल्या. मग कालांतराने त्यांचं शरीरही गेलं.

..तरी त्यांची एक खूण आहे माझ्याजवळ!

‘४, शाकुंतल’मध्ये ज्या गादीवर बसून त्यांनी अमर्याद सौंदर्याची निर्मिती केली, ती त्यांची गादी!

साहित्य सहवासातलं शांताबाईंचं हे घर मी विकत घेतलं आणि राहायला यायच्या आधी त्या कुबट, दमलेल्या घरातला सगळा अंधार उपसून बाहेर काढला. भिंती पाडल्या. आधीच्या चिटकूर खिडक्या उखडून मोठय़ा केल्या. फक्त एकच गोष्ट ठेवली जपून : शांताबाईंची गादी!

माझ्या हॉलमध्ये अजून आहे ती. मी तिथेच असतो दिवस-रात्र. त्या गादीच्या बैठकीवर. गप्पा मारतो. गाणं ऐकतो. शांत बसतो. विचार करतो. मित्रांना शिव्या घालतो. दंगा करतो. तिच्याचसमोर बसून मी हजारो पेंटिंग्ज रंगवली असतील आजवर. अमिताभ बच्चनपासून विंदा करंदीकरांपर्यंत आणि श्रीदेवीपासून राशीद खानपर्यंत किती स्नेही आले माझ्या घरात; तेही त्याच गादीवर गप्पांना बसले.

..आता माझे दोन नातू त्या गादीवर खेळतात.

आज शांताबाई असत्या तर आम्ही दोघांनी त्या गादीवर बसून मजेत दोन-दोन ‘तुंबाड’ खाल्ले असते.
सुभाष अवचट

वॉट्सॅपवरून साभार . . दि.२४-०६-२०२१

– – – – – – –

चंद्रकळा

आठवणीतील चंद्रकळेचा
गर्भरेशमी पोत मऊ
गर्भरेशमी पदरापोटी
सागरगोटे नऊखऊ

आठवणीतील चंद्रकळेवर
तिळगूळनक्षी शुभ्र खडी
कल्पनेत मी हलक्या हाती
उकलून बघते घडी घडी

आठवणीतील चंद्रकळेचा
हवाहवासा वास नवा
स्मरणानेही अवतीभवती
पुन्हा झुळझुळे तरुण हवा!

आठवणीतील चंद्रकळेच्या
पदराआडून खुसूखुसू
जरा लाजरे,जरा खोडकर
पुन्हा उमटते गोड हसू.

आठवणीतील चंद्रकळेवर
हळदीकुंकू डाग पडे
संक्रांतीचे वाण घ्यावया
पदर होतसे सहज पुढे

शांता शेळके

नवी भर दि. १४-०१-२०२१

. . .. . . .. .

गौराई

चल ग सये चल चल बाई
गौराई आल्यात सोन्याच्या पायी

गौराई तुमची पुण्याई मोठी
चढून या ग अंगण ओटी
तुमच्या सांगाती लक्षुमी येई

गौराई तुमचे पाऊलठसे
घरात दारात उठले कसे
सुखाची बरसात अवघ्या ठायी

गौराई कोठीत पाऊल ठेवा
धान्यानं कुणगा भरून जावा
धनाला आता कमती नाही

सैपाकघरात गौराई बसा
चुलीला द्यावा अन्नाचा वसा
सुखाचा घास मुखात जाई

हातात चुडा कपाळी कुंकू
तुमच्या कृपेनं काळाला जिंकू
झुकते पायी ठेवते डोई

गीतकार : शांता शेळके, चित्रपट : सासुरवाशिण (१९७८)

. . . . . . नवी भर दि.१२-०९-२०२१

********


 

७. केशवकुमार (आचार्य  प्रल्हाद केशव अत्रे)

आचार्य अत्रे यांची माहिती आणि त्यांचे लेख इथे पहा : https://anandghare.wordpress.com/2011/07/09/%e0%a4%86%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%81-%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%aa/

आज आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त थोडेसे .
आचार्य हे नाव त्याना कुठून मिळाले ? ते काही काळ शिक्षणक्षेत्रात होते . माध्यमिक शाळेत ते बहुधा प्राचार्य असावेत . त्यातला प्र गेला आणि आचार्य उरले .
मुळाना शाळेत करण्यासाठी त्यानी गुरुदक्षिणा हे छोटेसे नाटक लिहिले . सांदिपनी ऋषीन्च्या आश्रमात कृष्ण शिकत असतो . राक्षस त्यांच्या मुलाला पळवितात . कृष्ण त्याला सोडवून आणतो . ही ती गुरुदक्षिणा . या नाटकात संस्कृत वर खूप विनोद आहेत . मी दारु पिऊन नाही वारी पिऊन दारु आणायला जातो . ( दारु म्हणजे संस्कृतमध्ये लाकडे ) एक जण संस्कृतमध्ये कारिका पाठ करत आहे तेव्हा ” कोण इथे बेडकाचे आवाज काढत आहे ? ” असे एक शिष्य म्हणतो . कदाचित संस्कृतचा अपमान म्हणून आजच्या काळात हे पुस्तक बॅन पण करतील .
***
वि . द . घाटे यांच्या मदतीने त्यानी माध्यमिक शालेय पुस्तके ” नवयुग वाचन माला ” या नावाने काढली . शिवाजी महाराज यांचा उल्लेख पूर्वी एकेरी होत असे . या पुस्तकातून प्रथम “छत्रपती शिवाजी महाराज ” असा उल्लेख झाला आणि तो रूढ झाला .
***
शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकर ( हल्ली अण्णाभाऊ साठे पण ) आणि मधूनमधून ” त्या ठिकाणी ” असे बोलत भाषण करायची हल्ली पद्धत आहे . पण फुले याना महात्मा फुले प्रथम अत्रे यांनीच बनविले. ७० वर्षांपूर्वी त्यानी ” महात्मा फुले ” हा सिनेमा काढला .
***
साने गुरुजी यांचेवर अपार प्रेम . ” श्यामची आई ” ला अत्रे यांची प्रस्तावना आहे उत्कृष्ट साहित्याचा तो अद्भुत नमुना आहे . ” आईचे मंगल स्तोत्र ” असे या पुस्तकाला त्यानी म्हटले आहे .श्यामची आई हा पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालेला मराठी सिनेमा त्याची निर्मिती त्यानी केली
पंढरपूरचे मंदिर हरिजनांना खुले व्हावे म्हणून साने गुरुजीनी आमरण उपोषण केले . तेव्हा महाराष्ट्रात त्यानी जनजागृतीसाठी अनेक सभा घेतल्या .
***
२७ मे १९६४ ला पंडित नेहरू यांचे निधन झाले . त्यावेळी मराठा मध्ये सूर्यास्त, पंतप्रधान नेहरू , स्वातंत्र्यसेनानी नेहरू, शांतिदूत नेहरू, साहित्यिक नेहरू , रसिक नेहरू, चाचा नेहरू असे एकापाठोपाठ एक १४ लेख मराठात प्रसिध्द झाले .
***
ते सर्व क्षेत्रात वावरले . नाटक ,सिनेमा आणि राजकारण हे त्यांची खास आवडती क्षेत्रे . पण त्याबद्दल सर्वानाच माहिती असते .
****
कवी म्हणून पण ते प्रसिद्ध आहेत . ” झेंडूची फुले ” या काव्यसंग्रहात त्यानी केशवसुत , गडकरी आणि खास करून माधव जूलियन अशा अनेक थोर कविताकारांच्या कवितेची विडंबन- काव्ये केली . कवी म्हणूनच त्यानी ” केशव- कुमार ” हे नाव धारण केले .
***
राम गणेश गडकरी हे त्यांचे दैवत . २३ जानेवारी हा सुभाषबाबू यांचा वाढदिवस आणि गडकरी यांचा स्मृतिदिन .
एकदा शाळेत २३ जानेवारी ला सुभाषबाबू यांच्याबद्दल बोलायला त्याना बोलावले होते . तेव्हा ३०-४० मिनिटे ते गडकरी यांचेबद्दलच बोलले .
त्याना कोणीतरी चिठ्ठी पाठवून – सुभाषबाबू – अशी आठवण करून दिली . मग १ तास भर ते सुभाषबाबू यांचेबद्दल बोलले .
म्हणजे त्याना तयारीची गरज नसे !
अशा महान लेखकाला आणि वक्त्याला सलाम !
***

श्री.श्यामसुंदर केळकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

झेंडूची फुलेनधील एक विडंबन कविता

आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।
फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥
किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥

ते आम्ही – परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।
ते आम्ही – न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।
त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥

काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी, ।
दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे, ॥
दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा उदे ।
दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं! ॥ ३ ॥

आम्हाला वगळा – गतप्रभ झणीं होतील साप्ताहिके! ।
आम्हाला वगळा – खलास सगळी होतील ना मासिके! ॥

विडंबन: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार, १९२२


८. कवयित्री बहिणाबाई चौधरी

नको नको ज्योतिषा,
माझ्या दारी नको येऊ ।
माझे दैव मला कळे,
माझा हात नको पाहू ।
धनरेषांच्या चऱ्यांनी,
तळहात रे फाटला ।
देवा तुझ्याबी घरचा,
झरा धनाचा आटला ।
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह,
तळहाताच्या रेघोट्या ।
बापा नको मारू थापा,
अशा उगा खऱ्या खोट्या ॥

अशिक्षित बहिणाबाईंनी हे दारी आलेल्या ज्योतिषाला १०० वर्षांपूर्वी सुनावलं.
वॉट्सअॅपवरून साभार …..🙏🏽

दि. ०५-०७-२०२०

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा,
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्यारे लाटा.
मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं
जसं वारा वाहादन.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.
मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर,
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर.
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.
देवा, कसं देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !
देवा, आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले
आसं सपन पडलं !
कवयित्री : बहिणाबाई चौधरी
या कवितेत बहिणाबाईंनी माणसाच्या मनाचं वर्णन त्यांच्या अहिराणी बोलीतून यथार्थपणे केलं आहे. मानवी मन हे फार विलक्षण असतं. एवढं विलक्षण असतं की, जणू काही ईश्वराला जागेपणी पडलेलं ते स्वप्नच असावं.
.
रामदास स्वामी म्हणतात
अचपळ मन माझें नावरे आवरीता.

नवी भर दि. १५-०७-२०२०

९. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी

मोहरा इरेला पडला

बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||२||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला

तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||

 • कै. दु. आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून

कवि दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी (जन्म १८८७, मृत्यु १९३९) यांची माहिती:

खानदेशात राहणार्‍या दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांचे घराणे उत्तर हिंदुस्थानातले होय. रजपूत व मराठे यांच्या पराक्रमाने भारून गेलेल्या तिवारींनी देशभक्ती आणि वीरशक्ती यांचा गौरव करणारी स्फूर्तीपर गीते लिहिली.

‘काव्यकुसुमांजली’ (१९१६) व ‘काव्यरत्नमाला’ (१९२०) या स्फुट कविता. यांव्यतिरिक्त तिवारींनी ‘मराठ्यांची संग्राम गीते’ (१९२०), ‘मनोहरलीला’ (१९२०), ‘ऐतिहासिक खंडकाव्य’ (१९२०), ‘काव्यतुषार’, (१९२३, राष्ट्रीय कविता) ‘चंडीशतक’ (१९२७) अशी विविध प्रकारची दीर्घकाव्येही लिहिली. शौर्य, वीर्य, स्वातंत्र्य अशा भावनांची उत्कटता त्यांच्या काव्यात अवतरते. त्यासाठी झुंजलेल्या वीरांचा त्यांना अभिमान वाटे. ‘झाशीची संग्रामदेवता’ (१९२५) या काव्यसंग्रहात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या पराक्रमाचे वर्णन येते. ‘मेरी झाँसी नही दूंगी’ या प्रतिज्ञेपासून तिच्या बलिदानापर्यंतच्या पराक्रमावर त्यांनी दहा कवने लिहिली आहेत.

पूर्वसूरींच्या पराक्रमाची आठवण देऊन वाचकाला अंतर्मुख करणारे त्यांचे आणखी एक ओजस्वी खंडकाव्य ‘महाराणा प्रतापसिंह’ (१९२६) हे फार गाजले.

‘मनोहरलीला’, ‘मान्यांची यमुना’ (१९२६) आणि ‘नंदिनी’ (१९३०) ही अद्भुतरम्य कल्पित व इतिहास यांचे मिश्रण असलेली खंडकाव्ये आहेत. ‘पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाल’ असे प्रतिपादन करण्यासाठी या पराक्रमाची कवने निर्माण झाली असे दिसते.

शिवकालीन हिंदी कवी भूषण यांच्या ‘शिवबावनी’, ‘शिवप्रताप’, ‘शिवराजभूषण’ या काव्यांची मराठी रूपांतरेही त्यांनी केली. मायभूमीसाठी प्राणाची बाजी लावणार्‍या वीर पुरुषांचा सातत्याने जयजयकार करणार्‍या तिवारींचे मराठी काव्यसृष्टीत वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.

नवी भर दि.१८-०७-२०२० वॉट्सअॅप आणि गूगलवरून

———–

१०. माणूस माझे नाव – बाबा आमटे

नवी भर दि. १९-०९-२०२०

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा
सातारचे डॉ कवारे यांचे बरोबर वरोरा येथील आनंदवनातील आनंद अनुभवण्याचा योग आला .
दिव्यत्वाची येथे प्रचीती येथे कर अमुचे जुळती . दिसते करणे खूप अवघड आहे सामन्यांचे हे कामच नाही यालाच अवतार म्हणतात .
बाबांचे आश्रमातील सर्वावर प्रेम होते .
तेथे सर्वांसाठी जेवण एकाच स्वयपाक घरात होते. बाबांचे कुटुंब ,व अभ्यागत यांना तसेच आश्रमातील रुग्णानाही एकाच पाकशालेतील जेवण नाष्टा दिले जाते .
बाबा आमटे यांचे मूळ नाव मुरलीधर देवीदास आमटे. कुणी ऋषी किंवा संत म्हणून त्यांना बाबा म्हणत नव्हते. तर त्यांच्या घरातच त्यांना लहानपणी बाबा म्हटले जायचे आणि एका क्षणी कुष्ठरोग्यांसाठी जीवन वेचण्याचा निर्णय घेऊन हा मुरलीधर लाखो कुष्ठरोग्यांना आपलासा वाटणारा ‘ बाबा ‘ झाला.
त्यांचा जन्म वर्ध्यातील हिंगणघाटच्या जहागीरदार कुटुंबातला. २६ डिसेंबर १९१४ सालचा. बाबांचे वडिल देवीदास हरबाजी आमटे प्रशासकिय सेवेत होते. प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणारे बाबा आमटे बालपणापासूनच साहसी आणि निर्भय होते. अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे बाबा सदैव आपल्या कर्तव्य पथावर एका कर्मवीर योद्ध्याप्रमाणे अथक लढले.
गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.
श्रम ही है श्रीराम हमारा’ असं म्हणणार्‍या बाबांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर ‘आनंदवन’ उभारलं. कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. विकास आणि प्रकाश या त्यांच्या अफाट कर्तृत्ववान मुलांनी बाबांचा वारसा चालवला. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे हे गेली अनेक वर्षं भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं, म्हणून प्रयत्नरत आहेत.”

माधव विद्वांस

********

११.कविवर्य भा.रा.तांबे

कविवर्य भा.रा.तांबे यांच्या अनेक कविता मी शाळेत असतांना पाठ केल्या होत्या आणि मला अतीशय आवडत होत्या. त्या मी ‘शाळेतल्या कविता’ या पानावर दिल्या आहेत.

कवीवर्य भा.रा.तांबे

कविवर्य भा.रा.तांबे यांची संक्षिप्त माहिती – विकीपीडियावरून

भा रा तांबे
भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ – डिसेंबर ७, १९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
————————–

श्री. माधव विद्वांस यांच्या फेसबुक पानावरून साभार. (संपादित) दि. २७-११-२०१९

डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका !! असे सुंदर भाव गीत लिहिणारे स्वर्गीय कविवर्य भा. रा. तांबे यांचा आज जन्म दिवस .(२ ७ नोव्हेंबर १ ८ ७ ४ )
मरावे परी गीत रुपी उरावे .
हिंदी भाषिक प्रदेशात जन्म घेऊन व त्याच भागात जीवन घालविलेल्या या कविश्रेष्ठाची मराठी प्रतिभा अदभुत होती
त्यानी २२५ चे वर कविता लिहिल्या त्यांचा जन्म ग्वाल्हेर जवळ मुगावली येथे झाला तर शिक्षण अलाहाबाद व आग्रा येथे झाले. महाराष्ट्राच्या बाहेर राहूनही त्यांनी त्यानी २२५ चे वर कविता लिहिल्या मराठीची केलेली सेवा उल्लेखनीय आहे
त्यांची लोकप्रिय अजरामर गाणी ”’ नव वधु प्रिया मी बावरते — मधु मागसी माझ्या सख्या –तुज्या गळा माझ्या गळा — डोळे हे जुलमी गडे – कला ज्या लागल्या जीवा -जन पळभर म्हणतील हाय हाय -मावळत्या दिनकरा–रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी -कवी वासुदेव गोविंद मायदेव यांनी त्यांच्या ७ ५ कविता संपादित केल्या तर डॉ माधवराव पटवर्धनानी “तांबे यांची समग्र कविता” हे पुस्तक १ ९ ३ ५ मध्ये प्रकाशित केले. तांबे यांचे मुलाचे (डॉ र भा. तांबे ) घरी भावनगर येथे १ ९ ६ २ साली जाणेचा योग आला होता त्यावेळी शाळेत असल्याने तांबे यांचे तैलचित्र पाहून यांचा फोटो तुमचेकडे कसा ? या प्रश्नावर माझे वडील असे ऐकताच मला खूप आनंद झाला होता .
!!अभिवादन !!
त्यांची गाजलेली गीतें
नववधू प्रिया मी ——तुझ्या गळां माझ्या गळां —–मधु मागशि माझ्या —-मावळत्या दिनकरा ——या बालांनो या — रे या हिंदबांधवा थांब——-अजुनि लागलेंचि दार —– कशी काळनागिणी—— कळा ज्या लागल्या जीवा —–कुणि कोडें माझें उकलिल —-घट तिचा रिकामा —-घन तमीं शुक्र बघ—– चरणिं तुझिया मज देईं —–जन पळभर म्हणतिल —– डोळे हे जुलमि गडे —–तिनिसांजा सखे मिळाल्या ——–तें दूध तुझ्या त्या — —— निजल्या तान्ह्यावरी माउली —– पिवळे तांबुस ऊन कोवळे —– भाग्य उजळलें तुझे —-

‘नववधू प्रिया मी’ ही मी शाळेत न शिकलेली कविता आणि मी श्री.ठाकूर यांच्या लेखातून घेतलेली त्यांची माहिती खाली दिली आहे.

आज कविराज आणि राजकवी भा.रा. तांबे यांचा एकशेसत्तेचाळीसावा वाढदिवस ! जे कवी आपल्या कवितेने चिरंजीव चिरायु झालेले आहेत, त्यांचे वाढदिवस साजरे करायचे ! पुण्यदिन नाहीत. कविराज आणि राजकवी या उपाधी पेक्षा तांबे लोककवीच जास्त होते. जन पळभर म्हणतील हाय हाय, सायंकाळची शोभा आणि या बालांनो या केवळ तीनच कविता लिहून तांबेनी आपली काव्यलेखणी थांबविली असती , तरीही ते अमरकवीच झाले असते. एका पोलीस सुपरिटेण्डेंटनी ह्या अमर कविता लिहिल्या आहेत याचे आजही खाकीवर्दीला आश्चर्य आणि कौतुक वाटेल ,अशा या कविता ! आधुनिक गीतकाव्याचे आद्यप्रवर्तक भा. रा तांबे मध्यप्रदेशातील मुंगावली येथे जन्मले असले, तरीही त्यांच्या कवितेतील नाद, लय, गेयता, शब्दांच्या सुंदर अर्थछटा, यामुळे कविवर्य तांबे गेले शतकभर मराठी मनात दरवळतच राहिले आहेत. मध्यभारतातील सरकारी वकील, पोलीस सुपरिटेडेंट, न्यायाधीश, शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी, ग्वाल्हेर संस्थानचे ‘राजकवी ‘ आधी अनेक सन्मान त्यांना लाभले. पण गेयतापूर्ण काव्यरचनेमुळे “आपलेच अजरामर स्मारक आपणच उभारून गेलेला कविराज” हे पद फारच मोठे आहे.

विद्यापीठ आणि लोकपीठ यांचा इंद्रधनुचा गोफ विणून गेलेल्या या कविराजांना आणि राजकवींना माझा मानाचा मुजरा!
कविवर्य भा.रा.तांबे यांची कविता संग्रहरुपाने रसिकांसमोर आली त्याचे हे शतकमहोत्सवीवर्ष आहे.
सुरेश शामराव ठाकूर

. . . . .. . . . वॉट्सअॅपवरून साभार .. दि.२८-१०-२०२०

भास्कर रामचंद्र तांबे

विकीपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ तेे डिसेंबर ६, १९४१ ), अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. त्यांच्या काही प्रसिद्ध कविता :

अजुनि लागलेचि दार , कशी काळ नागिणी, कळा ज्या लागल्या जीवा, कुणि कोडे माझे उकलिल का, घट तिचा रिकामा, घन तमीं शुक्र बघ, चरणि तुझिया मज देई, जन पळभर म्हणतील हाय हाय, डोळे हे जुलमि गडे, तिनी सांजा सखे मिळाल्या, तुझ्या गळा माझ्या गळा, ते दूध तुझ्या त्या, नववधू प्रिया मी बावरते, निजल्या तान्ह्यावरी माउली, पिवळे तांबुस ऊन कोवळे, भाग्य उजळले तुझे, मधु मागशी माझ्या, मावळत्या दिनकरा, या बाळांनो या रे या, रे हिंदबांधवा थांब


नववधू प्रिया मी

नववधू प्रिया, मी बावरते;
लाजते, पुढे सरते, फिरते

कळे मला तू प्राण-सखा जरि,
कळे तूच आधार सुखा जरि
तुजवाचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरते

मला येथला लागला लळा,
सासरि निघता दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडिता कसे मन चरचरते !

जीव मनीचा मनी तळमळे
वाटे, बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे
परि काय करू ? उरि भरभरते

चित्र तुझे घेऊनि उरावरि
हारतुरे घालिते परोपरि,
छायेवरि संतोष खुळी करि,
तू बोलविता परि थरथरते

अता तूच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे :
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरे घर ते !

कवी : भा.रा.तांबे, संगीत : वसंत प्रभू, गायिका : लता मंगेशकर
https://www.youtube.com/watch?v=aSMzPWNAD5c

या गाण्याचे एक रसग्रहण :
सन १९७२-७३ चा काळ होता. आकाशवाणीवर लतादीदींच्या आवाजातलं ‘नववधू प्रिया मी बावरते’ हे गाणं लागलं होतं. त्याचे सूर ऐकून मी त्या गाण्याकडे ओढली गेले आणि मन लावून ऐकू लागलं. गाणं ऐकून मला इतकंच समजलं की सासरी जाणारी नववधू तिच्या मनातल्या भावना व्यक्त करीत आहे. यानंतर बीएला शिकत असताना ‘समग्र तांबे’ अभ्यासले. त्यावेळी या गीतातला गर्भितार्थ मला समजला. हा नवाच अर्थ लागल्यावर हे गाणं एक वेगळाच आनंद देऊन गेलं आणि ‘मनातलं गाणं’ बनलं. कवीवर्य भा. रा. तांबे म्हणजे महान प्रतिभेचा कवी. आपल्या कवितेतून त्यांनी मृत्युलाही सुंदर बनवलं. हे गाणंसुद्धा असंच आहे. जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधी मरणारच.तरीही मृत्युला सामोरं जाताना प्रत्येकाच्या जीवाची घालमेल होते. ती व्यक्ती गांगरून जाते, बावरून जाते; अगदी तशीच जशी सासरी जाणारी एखादी नववधू बावरलेली असते.
मला येथला लागला लळा, सासरी निघता दाटतो गळा
लग्न होऊन सासरी जाताना आपल्याही मनात अशा भावना नाही का आल्या? असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला आणि हे गाणं कायमचं माझं होऊन गेलं.
जीव मनीचा मनी तळमळे, वाटे बंधन करुनि मोकळे, पळत निघावे तुजजवळ पळे, परि काय करु ? उरी धडधडते
अशा परस्परविरोधी भावना मनात निर्माण होतात. पण शेवटी निग्रहाने म्हणावंच लागतं,
आता तूच भय लाज हरी रे, धीर देऊनि ने नवरी रे, भरोत भरतील नेत्र जरी रे, कळो पळभर मात्र खरे घर ते
ऐन तारुण्यातली ती भावना आणि आता उतार वयात मृत्युकडे कधीतरी जावंच लागणार न्हणून व्याकुळलेलं मन… या भावना या गीताशी जोडल्या गेलेल्या आहेत.
नववधू आणि मृत्युची चाहूल लागलेली व्यक्ती या दोघांच्या मनातील भावनांचा कल्लोळ खोलवर पोहोचणारा आहे. मुळात भा. रा. तांबेंच्या या कल्पनाविष्कारालाच सलाम करायला हवा.
लतादिदींच्या सुरेल स्वरामुळे ही भावना अधिक गडद आणि गहिरी झाली आहे. मृत्युच्या अपरिहार्यतेमुळे कातर होणा‍‍ऱ्या माझ्या मनाला हे गाणं मृत्युबद्दल सकारात्मकता देऊन जाते. मृत्युकडे पाहण्याचा दृष्टीकोनच या गाण्यामुळे बदलून जातो म्हणूनच हे गाणं माझ्या मनातलं आहे.

पण सर्व सामान्य लोकांना नववधूचे गाणेच इतके छान वाटते की ते ऐकताना परमात्म्याचा विचार मनात येत नाही आणि समजा आता तो आला तरी त्यात वाईट काय आहे? असे या गाण्यात सुचवले आहे असे मला वाटते. . . . . . . .. . .. . नवी भर दि. ०६-११-२०२०

***********

१२. कवी सुधांशु

इथेच आणि या बांधावर, अशीच श्यामल वेळ———तसेच दत्त दिगंबर दैवत माझे———–
हे सर्वांचे तोंडी असलेले गोड गीत लिहिणारे कै.सुधांशु यांचे आज पुण्यस्मरण १८ नोव्हेंबर, इ.स. २००६ (जन्म ६ एप्रिल १९१७ )
पूर्ण नाव हणमंत नरहर जोशी, अर्थात “#काव्यतीर्थ” कवी सुधांशु (६ एप्रिल, इ.स. १९१७:औदुंबर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र – :सांगली, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील कवी होते. त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत.


मराठी कवी कुंजविहारी यांनी ह.न. जोश्यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.
खालील परिच्छेद **यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्य.मधून ..
श्री. सुधांशु हे आमच्या कृष्णाकाठचे संवेदनशील प्रसिद्ध कवी आहेत. आपल्या साध्या, पण संवेदनशील जीवनात रममाण असणारा हा कवी अवतीभोवतीच्या समाजजीवनात सहानुभूतीने समरस होणारा खराखुरा साहित्यिक आहे. त्यांच्या कवितांचे प्रसिद्ध झालेले छोटे छोटे काव्यसंग्रह यापूर्वीच मराठी वाचकांपुढे आलेले आहेत, आणि त्या सर्व कविता मी पहिल्यापासून अत्यंत आवडीने वाचीत आलो आहे. त्यांच्याबद्दल व त्यांच्या कवितांबद्दल मला वाटणारा जिव्हाळा मी येथे व्यक्त करीत आहे. काव्याच्या क्षेत्रात जाणता वाचक या नात्याखेरीज अकारण प्रवेश करण्याचा मला फारसा अधिकार नाही, हे मी जाणतो.


इ.स. १९३७पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. सुधांशूंना एकदा रा. अ. कुंभोजकर यांनी ’तुम्ही कवी कसे झालात?’ असे विचारले. त्यावर ते म्हणाले, ’मी दोन मातांच्यामुळे कवी झालो. एक माझी जन्मदात्रीमाऊली आणि दुसरी कृष्णामाई. एकीने माझ्या अंत:करणात कवितेची बीजे रुजवली आणि दुसरीने आपल्या निर्मलतेने आणि समृद्धीने मला काव्यदृष्टी दिली.’
कवी सुधांशु यांनी आयुष्यभर खादीचे कपडे घातले. त्यांच्या अंगावर सतत एक शाल असे. सुधांशूंनी भारताच्या १९४२सालच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी स्वातंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली. त्यांच्या घरी काही भूमिगत स्वातंत्र्यसैनिक एकदोन दिवसांसाठी गुप्तपणे मुक्कामासाठी राहून जात. गावकऱ्यांच्या कवी सुधांशूंवर असलेल्या अतूट प्रेमामुळे ही बातमी पोलिसांपर्यंत कधीच पोहोचली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. इ.स.१९६०मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि १९६५पर्यंत त्या पदावर राहिले. त्याच सुमाराला गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कारही मिळाला. कवि सुधांशु दत्ताचे पुजारी होते आणि ते पौरोहित्यही करीत.
औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून कवी सुधांशूंनी १९३९पासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. दरवर्षी मकर संक्रातीला होणाऱ्या या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यरसिक येतात. १८ नोव्हेंबर, इ.स. २००६ला कवि सुधांशु यांचे निधन झाले. (विकीपीडिया )अभिवादन


औदुंबर हे पवित्र दत्तस्थान आहे तर सुंदर पर्यटन स्थळ आहे आवर्जून भेट द्यावी असे


त्यांची गाजलेली गीते
अनसुयेच्या धामी आले——- इथेच आणि या बांधावर —— गोकुळाला वेड लाविले —— जय जय दत्तराज माउली —–दत्तदिगंबर दैवत माझे —— दिगंबरा दिगंबरा श्रीपाद —–देव माझा विठू सावळा ——-भुकेला भक्‍तीला भगवान ——— भुलविलेस साजणी —- मनी माझिया नटले गोकुळ —— माझ्या मनात विणिते नाव —–मी खरंच रुसले ——या धुंद चांदण्यात तू —– राधिके ऐक जरा बाई —- स्मरा स्मरा हो —– हिरवे-पिवळे तुरे उन्हाचे
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे ॥धृ॥
अनुसूयेचे सत्य आगळे । तीन्ही देवही झाली बाळे
त्रैमुरि अवतार मनोहर । दीणोध्दारक त्रिभुवनी गाजे ॥१॥
तीन शिरेम कर सहा शौभती । हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी, पायी घडावा । भस्मविलोपित कांती साजे ॥२॥
पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ति । आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती । हळू हळू सरते मीपण माझे ॥३॥

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार दि.१९-११-२०२०

***********

१३. यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ कवी यशवंत

 • आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी.
  ती हाक येई कानी, मज होय शोककारी
  —- स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी
  आईचे महत्व सांगणारी सुंदर कविता लिहिणारे यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ कवी यशवंत यांचे आज पुण्यस्मरण. (२६ नोव्हेंबर १९८५). त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात चाफळ येथे ९ मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बालपण तेथेच. आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची श्रद्धास्थाने. संस्कारक्षम वयात डॉ. दत्तोपंत पटवर्धन यांची लोकमान्य टिळकांची युयुत्सू राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांना स्फूर्तिप्रद वाटायची.
  “छंद लागला टिटवीला । तिने समुद्रहि आटविला” हे शब्द त्यांच्या अंतःकरणावर कोरलेले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंतीत्युत्सवाचा संस्कार त्यांच्यावर झालेला. तेव्हापासून त्यांच्या भावविश्‍वात समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले.यशवंतांच्या लौकिक जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर होता. शालेय शिक्षणास ते सांगलीला राहिले. तेथील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही.
  ‘महाराष्ट्रकवी’ म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते.
  आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. रविकिरण मंडळातील’ सप्तर्षींमध्ये माधव जूलियन सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे.
  यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले आणि एक कहाणी या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. ‘एक कहाणी’ मध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे. ‘चमेलीचे झेले’मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. ‘एका वर्षानंतर’ या कवितेत सुरवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते. ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी, मम सौख्यांची झाली होती तुझ्यांत साठवणी! या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्‍यामुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्‌गारतो…
  सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी!
  समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!
  नीज नीज माझ्या बाळा, करू नको चिंता
  काळजी जगाची सार्‍या आहे भगवंता !
  अंगावर पांघरूण ओढुनिया काळे
  देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले
  लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून
  पिता तो जगाचा बैसे जागत अजून
  ज्याने मांडियला सारा विश्वाचा हा खेळ
  तोच चालवील त्याला, तोच सांभाळील
  झोपली पाखरे रानी, झोपली वासरे
  घरोघरी झोपी गेली आईची लेकरे
  नको जागू, झोप आता, पुरे झाली चिंता
  काळजी जगाची सार्‍या आहे भगवंता

माधवविद्वांस यांच्या फेसबुक भिंतीवरून दि. २६-११-२०२०

* कवी यशवंत यांची आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी ही कविता मी शाळेतल्या कविता या पानावर दिली आहे.

———————-

विकीपीडियावरील अधिक माहिती :
पुणे वास्तव्य आणि साहित्यिक सहवास
पुढे यशवंत पुण्याला गेले. अभिरुचिसंपन्न कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले. प्रा. श्री. बा. रानडे आणि सौ. मनोरमा श्रीधर रानडे या प्रेमळ दांपत्याची पाखर त्यांना लाभली. मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जिजी होती. माधव जूलियन यांच्यासारख्या व्युत्पन्न, प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला. दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते. शिवाय वि. द. घाटे, प्रा. द. ल. गोखले आणि ग. त्र्यं. माडखोलकर होते. या समानधर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले. औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाने भरून काढली. एकीकडे लौकिक जीवनातील वैशाखवणवा होता, तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते. अशा संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही. त्याविषयीची मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात, “कारकुनी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राखरांगोळीच! अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवून जायचे. पण वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली.” काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.

१९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

स्थायीभाव
उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव आजच्या गतिमान जीवनप्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणारे नाही. पण, एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा जनमानसावर उमटवली होती. एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्‍वत जीवनमूल्यांचा त्यांनी उद्‌घोष केला. त्यांची कुटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांतून प्रकट होते. १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या “आई’ या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे.

“आई” म्हणोनि कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी

स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी
या ओळींतील आर्तता आणि करुणा अंतःकरणाला स्पर्श करते. मातेची महत्ता समुचित शब्दांत कवीने वर्णिलेली आहे.

आई! तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे

“दैवतें माय-तात” या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञताभाव परिणामकारक शब्दांत व्यक्त झाला आहे. आपल्या मनातील भाव-भावनांचे कढ, आशा-निराशेची स्पंदने आणि तीव्र दुःखाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या. “समर्थांच्या पायांशी’, “माण्डवी’ व “बाळपण’ अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. “लाह्या-फुले’ या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो. माझें हें जीवित तापली कढई मज माझेंपण दिसेचि ना माझें जीवित तापली कढई तींत जीव होई लाही-लाही वसन्त, हेमन्त, निशा किंवा उषा लाहीच्या विकासासारखेंच लाह्या-फुलें ऐशीं देहीं फुलतात. ऐश्‍वर्य अनन्त हेंच आम्हां!

प्रेम कविता
यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. “प्रीतिसंगम’, “प्रेमाची दौलत’, “चमेलीचे झेले’ आणि “एक कहाणी’ या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. “एक कहाणी’ मध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे. “चमेलीचे झेले’मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. “एका वर्षानंतर’ या कवितेत सुरवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते… ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी मम सौख्यांची झाली होती तुझ्यांत साठवणी! या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्‍यामुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्‌गारतो… सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी! समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!

सामाजिक आशयाची कविता
यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कविमनाचा विकास होत गेला. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वांतत्र्यांचा ध्यास घेतला. “आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन. पण स्वातंत्र्यलक्ष्मी, तुझ्या चरणांशी लीन होईन. (स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा/यशोधन) ” स्वातंत्र्यभानूने भारतात लवकर दर्शन द्यावे. तेव्हाच आपण पावन होऊ. असे ते उद्‌गारतात. (तुरुंगाच्या दारात/यशोधन) “तुटलेल्या तारा’ या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे दर्शन घडते. “सिंहाची मुलाखत’ या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोन्ही मूल्यांचा पुरस्कार ते करतात. “गुलामाचे गाऱ्हाणे’ आणि “इशारा’ या प्रतिकात्मक आशय करणाऱ्या कविता आहेत. राष्ट्रजीवनातील पुरूषार्थाला जाग आलेली आहे, तिचे प्रतिबिंब या कवितांत आढळते. “तुरुंगाच्या दारात’ या कवितेत कवी उद्‌गारतो… वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती मन्मना नाही क्षिती. भिंतिच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी? मुक्त तो रात्रंदिनी.
शृंखला पायात माझ्या चालताना रुमझुमे, घोष मंत्रांचा गमे. या ओळीतून आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी दर्शन घडते. “मायभूमीस अखेरचे वंदन’ या कवितेत मृत्यूवर मात करणारी वृत्ती दिसून येते.
जीवनाचे विविध पैलू यशंवतांनी आपल्या कवितेतून आकळले. त्यांची कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. “बंदीशाळा’ हे बालगुन्हेगांरांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. “काव्यकिरीट’ हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणविषयावरील खंडकाव्य आहे. “जयमंगला’ मधील २२ भावगीतांमधून यशवंतांनी हृदयसंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हटले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवन त्यांनी “छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य रचले. “मुठे, लोकमाते’ हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे. “मोतीबाग’ हा त्यांचा एकमेव बालगीतांचा संग्रह आहे. यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे.

गद्यलेखन
यशवंतांनी लिहिलेली ’घायाळ’ ही कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वाईग यांच्या Downfall of the Heart या दीर्घकथेचे रूपांतर आहे. यशवंतांनी या पुस्तकाला मोठी प्रस्तावना लिहिली आहे.तीत त्यांनी स्टीफन झ्वाईग यांची प्राथमिक माहिती, मराठीत झालेले त्यांचे अनुवाद, मराठी साहित्यिकांना वाटत असलेले झ्वाईग यांचे महत्त्व इत्यादी विस्तृत टिप्पणी केली आहे.

प्रस्तावनेच्या शेवटी यशवंतांनी झ्वाईग यांच्या सपत्‍नीक आत्महत्येचा तपशील सांगितला आहे, तो असा – झ्वाईग यांनी महायुद्धाने समग्र भूगोलाची आणि मानवी संस्कृतिविजयाची राखरांगोळी होणार हे पाहून, कल्पनाचक्षूंना दिसणारे जगाचे भेसूर भवितव्य न सहन होऊन २३ फेब्रुवारी १९४२ रोजी पत्‍नीसह आत्महत्या केली.

नवी भर दि.२६-११-२०२०

******

१४. साने गुरुजी

हे खरे तर माझ्या पिढीमधल्या लोकांचे बालपणातले सर्वात आवडते गद्य लेखक म्हणूनच अधिक प्रसिद्ध आहेत, पण त्यांची एक देशभक्तीपर कविता अजरामर आहे.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो………. हे गीत लिहिणारे सर्वांचे लाडके सानेगुरुजी.

लेखक,कवी ,स्वातंत्र्यसैनिक, अध्यापक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक. पांडुरंग सदाशिव साने, तथा परंतु साने गुरुजी यांची आज (२४ डिसेंबर) जयंती . त्यांचा जन्म पालगड (ता. दापोली; जि. रत्नागिरी ) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला; माध्यमिक शिक्षण दापोली, औंध, पुणे येथे. बी. ए. ची पदवी घेऊन (१९२२) मुंबई विद्यापीठाची एम. ए. ची पदवी (१९२४) त्यांनी संपादन केली. अमळनेर ( जि.जळगांव ) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलो); पुढे तिथल्याच ‘प्रताप हायस्क्रूल’ मध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून काम केले. १९३०–३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नासिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला. नासिक जिल्ह्यातील चांदवड येथे बिटिश सरकारविरुद्ध परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली (१९४०). दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला.
तिरुचिरा-पल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला. भारतात ‘आंतरभारती’चे केंद्र असावे; त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यांत असाव्यात; त्यांच्या माध्यमातून विविध राज्यांतील भाषा, चालीरीती, परंपरा, कला, कारागिरी, लोकसाहित्य, नृत्ये ह्यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेने राष्ट्रीय एकात्मता साधावी, अशी त्यांची कल्पना होती. १९४८ साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले .समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी, हा त्यामागील हेतू होता. विद्यार्थी (मासिक), काँग्रेस (साप्ताहिक), कर्तव्य (सायंदैनिक) अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही त्यांची ह्या लेखनामागची भूमिका होती; तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत, हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने श्यामची आई (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय. त्यात श्याम हा आपल्या आईच्या आठवणी सांगत आहे आणि त्या स्मृतींतून भारतीय संस्कृतीतल्या उदात्त पैलूंनी समृद्घ झालेले एका मनस्वी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व विलोभनीयपणे आकारत गेलेले आहे. आपल्या मुलांचे आयुष्य उन्नत करण्याची केवढी मोठी अंतःशक्ती आईमध्ये असू शकते, ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे येतो. श्यामची आईचे अर्धेअधिक यश प्रांजळ, सरळ आणि निश्चल आत्मनिवेदनात आहे. मराठी कादंबरीवर झालेला गांधीवादाचा अनुकूल प्रभाव लक्षात घेता कादंबरी आणि स्मृतिचित्रे यांच्या मीलनरेषेवर उभी असलेली साने गुरुजींची एकमेव कृती श्यामची आई हीच सर्वार्थाने गांधीवादी व अजरामर ठरलेली कृती होय. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून वर्णिल्या गेलेल्या ह्या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट-निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला (१९५४).(मराठी विश्वकोष )

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील लेखावरून साभार दि.२४-१२-२०२०

नवी भर :दि.११-०६-२०२१

स्वातंत्र्य सैनिक,समाजवादी विचारसरणीच्या ,सृजनशील ,भावनाशील , साने गुरुजींचे आज पुण्यस्मरण (११ जून १९५०)
त्यांचे बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो !!!असे सुंदर गीत सगळ्यांच्याच आजही तोंडी आहे
साने गुरुजी यांनी ७३चे र पुस्तके लिहिली,भारतीय संस्कृती ,व श्यामची आई ,तसेच साधना साप्ताहिक हि त्यांचीच अपत्ये . आचार्य अत्र्यांनी त्यांचे श्यामच्या आई कथेवरून सुंदर चित्रपटाची निरमिती झाली .
हरिजनांच्या विठ्ठल मंदीर प्रवेश्या साठी त्यांनी पंढरपूर येथे उपोषणहि केले .लहन मुलांचे साठी त्यांनी भरपूर साहित्य लिहिले.
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.(विकिपीडिया )
अभिवादन “”
साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य
अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)आपण सारे भाऊ भाऊ आस्तिक इस्लामी संस्कृति कर्तव्याची हाकक ला आणि इतर निबंध कला म्हणजे काय?कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतरक्रांतिगीताहृदय गुरुजींच्या गोष्टीगोड गोष्टी (कथामाला), भाग १ ते १० भाग १ – खरा मित्र भाग २ – घामाची फुले भाग ३ – मनूबाबा भाग ४ – फुलाचा प्रयोग भाग ५ – दुःखी भाग ६ – सोराब आणि रुस्तुम भाग ७ – बेबी सरोजा भाग ८ – करुणादेवी भाग ९ – यती की पती भाग १० – चित्रा नि चारू गोड निबंध भाग १, २गोड शेवट गोष्टीरूप विनोबाजीजीवनप्रकाश तीन मुले ते आपले घर त्रिवेणी दिल्ली डायरीदे शबंधु दास धडपडणारी मुले नवा प्रयोगपंडित ईश्वरचंद्र विद्यासागर पत्रीभगवान श्रीकृष्ण व इतर चरित्रे भारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत) मानवजातीचा इतिहास मोरी गाय मृगाजिन रामाचा शेला राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)विनोबाजी भावे विश्राम श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)श्यामची आई श्यामची पत्रे सती संध्या समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)साधना (साप्ताहिक)(संस्थापक, संपादक)सुंदर पत्रे सोनसाखळी व इतर कथासोन्या मारुती स्त्री जीवन स्वप्न आणि सत्य स्वर्गातील माळ **हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे”(गुरुजींचे स्केच Uday Kolambekar यांचे )

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील लेखावरून साभार दि.११-०६-२०२१

१५.सुधीर मोघे

मराठी कवी, गीतकार व संगीतकार सुधीर मोघे यांची आज जयंती त्यांचा जन्म किर्लोस्करवाडी येथे , ८ फेब्रुवारी, इ.स. १९३९ रोजी झाला. (निधन १५ मार्च, इ.स. २०१४) सुधीर मोघे हे पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. स्वरानंदच्या सर्व कार्यक्रमांचेही ते अध्यक्ष असत. नाट्य‌अभिनेते श्रीकांत मोघे हे सुधीर मोघे यांचे थोरले बंधू.
मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात सुधीर मोघे यांचा संचार होता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरली होती. ’विमुक्ता’ या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग होण्याआधीच सुधीर मोघे यांचे निधन झाले.
सुधीर मोघे मूळचे किर्लोस्करवाडीचे. ते इ.स. १९६८-६९च्या सुमारास पुण्यात आले. त्या वेळी ते ’किर्लोस्कर’ कारखान्यात नोकरी करत होते. १९७१ मध्ये त्यांनी ’स्वरानंद’ सादर करीत असलेल्या ’आपली आवड’ या रंगमंचीय कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करावयास सुरुवात केली. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची खास ’स्टाइल’ होती. स्वतः जातिवंत कवी असल्याने, कधी स्वतःचीच कविता, तर कधी एखाद्या नामवंत कवीची कविता वापरून ते प्रत्येक गाण्याची अप्रतिम काव्यातून ओळख करून द्यायचे.
’कविता पानोपानी’ या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे हे कागद हातात न घेता, ध्वनिप्रकाश योजनेच्या साहाय्याने स्वत:च्या मराठी कविता, गीते सादर करीत असत. ’राजा शिवछत्रपती’ या चित्रपटापासून सुधीर मोघे गीतकार झाले. त्या चित्रपटांत त्यांनी एक भूमिकाही केली होती. ’समिंदरा समिंदरा माझ्या भाग्याचा मुहूर्त झाला’ अशी त्यां चित्रपटातील एका गाण्याची ओळ होती. आणि खरोखरच त्यांचा चित्रपटातून त्यांच्या भाग्याचा उदय झाला, आणि पुढील आयुष्यात त्यांनी अनेक चित्रपटांची गाणी लिहिली.

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश
रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास
दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापुर्वीचे पालटे जग उदास उदास
झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास
गीतकार :सुधीर मोघे
गायक :श्रीधर फडके
संगीतकार :श्रीधर फडके

सुधीर मोघे यांनी लिहिलेली रसिकप्रिय भावगीते आणि चित्रपट गीते
अरूपास पाहे रूपी, आदिमाया अंबाबाई, आला आला वारा, एक झोका चुके काळजाचा, एकाच ह्या जन्मी जणू, ॐकार अनादि अनंत अथांग, कधी गौर बसंती, काजल रातीनं ओढून नेला, कुण्या देशीचे पाखरू, गुज ओठांनी ओठांना, गोमू संगतीनं माझ्या तू, घर दोघांचे, घरकुल पाखरांचे, जरा विसावू या वळणावर, झुलतो बाई रास-झुला, तपत्या झळा उन्हाच्या, तिथे नांदे शंभू, तूच मायबाप बंधू, त्या प्रेमाची शपथ तुला, दयाघना का तुटले, दिसलीस तू फुलले ॠतू, दिसं जातील दिसं येतील, देवा तुला शोधू कुठं, दृष्ट लागण्याजोगे सारे, नवाडाव चल मांडायाला, निसर्गासारखा नाही रे, फिटे अंधाराचे जाळे, बारा पुण्यक्षेत्रे झाली बारा ज्योतिर्लिंगे, भन्‍नाट रानवारा, मस्तीत शीळ (संगीत स्वत:चेच),भेटशील केव्हा माझिया जिवलगा , (संगीत स्वतःचेच), मन मनास उमगत नाही, मन लोभले मनमोहने, मना तुझे मनोगत, मनी जे दाटले, माझे मन तुझे झाले (संगीत स्वतःचेच), माय भवानी तुझे लेकरू, मी फसले ग फसले, मी सोडुन सारी लाज, मंदिरात अंतरात तोच, रात्रीस खेळ चाले, विषवल्‍ली असुनी भवती, विसरू नको श्रीरामा, शंभो शंकरा करुणाकरा, सखि मंद झाल्या तारका, सजणा पुन्हा स्मरशील ना, सप्‍तस्वरांनो लय, सूर कुठूनसे आले अवचित, सांग तू माझाच ना, सांज ये गोकुळी सावळी सावली, हे जीवन सुंदर आहे, हे नायका जगदीश्वरा_

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील लेखावरून साभार दि.०८-०२-२०२१

१६. स्वातंत्र्यशाहीर गोविंद

स्वातंत्र्यशाहीर गोविंद यांचे पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर मूळ गाव – कन्हेर पोखरी ता.पारनेर (जन्म: ९ फेब्रुवारी, इ.स. १८७४ – २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६) यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले.
नाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी ‘मित्रमेळा’ ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना ‘लघु अभिनव माला’मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच ‘मित्रमेळा’ ‘अभिनव भारत’ या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.
‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ‘,’सुंदर मी होणार’, ‘कारागृहाचे भय काय त्याला? ‘, ‘नमने वाहुनि स्तवने उधळा’, ‘मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे? ‘ (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.
प्रखर देशभक्तिपर कविता लिहिणार्‍या या स्वातंत्र्यशाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्‍तही करण्यात आल्या होत्या.(विकिपीडिया)
**क्रांतिवीर बाबाराव यांना त्या चार आक्षेपार्ह कवितां प्रसिध्द केल्याबद्दल जन्मठेप दिली गेली व काळ्यापाण्याची जन्मठेप सुनावण्यात आली.पुढे या अपंग कवीसही सरकारी जुलूम व छळ यांना सामोरे जावे लागले, मात्र आपल्या कवितांमुळे बाबारावांना शिक्षा झाली याचा सल त्यांना कायम होता.
त्यांचे कवितेतील एक कडवे
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।एज
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मीळाले॥


देशाचा पालनवाला, तो शिवाजि राजा झाला!
धर्माचा रक्षणवाला, तो शिवाजि राजा झाला!
त्रिभुवनात डमरू ज्याचे, नांदताच नंदी नाचे!
जो परित्राण या भूचे, शंकर भोला, तो शिवाजि!


१७. वासुदेवशास्त्री वामन खरे

वासुदेव वामन खरे ऊर्फ वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म कोकणातील गुहागर इथे १८५८ साली झाला.  त्यांच्या घराण्यात शास्त्राध्ययनाची आणि पुराण सांगण्याची परंपरा होती. पण त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यांना तीन भाऊ व दोन बहिणी होत्या. वासुदेवशास्त्री बुद्धिमान होते. गुहागरच्या मराठी शाळेत ते सहावीपर्यंत शिकले. कवितांची आणि नाट्यकलेची त्यांना देण होती. गावातल्या देवीच्या उत्सवाच्या वेळी नाटक मंडळींना ते नाटके लिहून व बसवून देत. १८७२च्या डिसेंबर महिन्यात त्यांचा विवाह झाला. त्यानंतर विद्याभ्यासासाठी आणि जमल्यास उद्योग करण्यासाठी वासुदेवशास्त्री यांनी कोकण सोडले व ते साताऱ्यास आले.

साताऱ्यात वासुदेवशास्त्री तत्कालीन विख्यात संस्कृत पंडित अनंताचार्य गजेंद्रगडकर यांच्या हाताखाली संस्कृत शास्त्र विद्या शिकण्यासाठी राहिले. अनंताचार्य यांच्याकडे वासुदेवशास्त्र्यांनी काव्ये, तर्कसंग्रह व व्याकरण यांचा अभ्यास केला. त्यांची शास्त्रींची बुद्धिमत्ता आणि अभ्यासाची कळकळ पाहून आचार्य त्यांच्यावर संतुष्ट झाले आणि लवकरच त्यांनी आपल्या घरीच वासुदेवशास्त्री यांची जेवणाची सोय केली. साताऱ्याला वासुदेवशास्त्री अडीच वर्षे होते. त्यांचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले पण नंतर त्यांना पैशांची मोठी चणचण भासू लागली. एकदा शास्त्री साताऱ्यातील भटमहाराजांच्या हौदावर गेले असता पुण्याचे शिक्षक बजाबा बाळाजी नेने यांच्याशी त्यांची गाठ पडली. नेने मास्तर व वासुदेवशास्त्री यांच्यात ‘एखाद्या विषयावर कोण जास्त चांगली व जलद कविता करतो’ याची पैज लागली व वासुदेवशास्त्रींनी ती पैज जिंकली. नेने मास्तर वासुदेवशास्त्र्यांच्या ज्ञानावर खूष झाले व त्यांनी पुण्याला शाळेत आपल्या बदली नोकरीवर जाण्यासंबंधी विचारले. शास्त्रीबुवा त्यासाठी लगेच तयार झाले. त्यानंतर वासुदेवशास्त्री पुण्यात दरमहा पंधरा रुपये पगारावर शाळेत रुजू झाले.

पुण्यात आल्यावर वासुदेवशास्त्री यांची माधवराव कुंटेश्रीधर विठ्ठल दातेलोकमान्य टिळकगोपाळ गणेश आगरकरसार्वजनिक काकाविष्णुशास्त्री चिपळूणकर अशा थोरामोठ्यांशी ओळख झाली. विष्णुशास्त्र्यांनी काढलेल्या ‘काव्येतिहास संग्रह’ या मासिकातील संस्कृत विभागाचे संपादन विष्णुशास्त्र्यांच्या गैरहजेरीत वासुदेवशास्त्रींनी केले. लोकमान्य टिळक आणि वासुदेवशास्त्रींची ओळख डेक्कन कॉलेजपासून होती. म्हणूनच वासुदेवशास्त्रींनी आपली शाळेतील नोकरी सोडून टिळक, आगरकर व विष्णुशास्त्री यांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. टिळक व आगरकर यांनी काढलेल्या वर्तमानपत्राला ‘केसरी’हे नाव वासुदेवशास्त्री यांनी सुचवले होते.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वासुदेवशास्त्रींनी केवळ दहा महिने शिकवले. त्यानंतर त्यांनी पुणे सोडले व २८ नोव्हेंबर १८८० रोजी ते मिरजेत नव्याने स्थापन झालेल्या हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून रुजू झाले. मिरज येथील शाळेत ते संस्कृत आणि मराठी हे विषय शिकवत. शाळेतील विद्यार्थी त्यांना फार घाबरत. पण तेच वासुदेवशास्त्री विद्यार्थांना जीव ओतून शिकवत. सर्व विद्यार्थांना ते समान वागणूक देत. गरीब-श्रींमंत असा भेदभाव करत नसत. तसेच ते शाळेप्रमाणे घरीही मुलांना बोलवून शिकवत असत.

लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या पहिल्या पानावर वरच्या भागी वासुदेवशास्त्री खरे यांचा हा श्लोक असे.
गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी।
मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
नखाग्रांनी येथे गुरुतर शिला भेदुनि करीं।
भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥
इथे गजालिश्रेष्ठ म्हणजे ब्रिटिश राजवट आणि झोपलेला सिंह म्हणजे भारतीय जनता असे रूपक होते असे मला वाटत होते. हा श्लोक म्हणजे वासुदेवशास्त्री खरे यांनी जगन्नाथ पंडिताच्या भामिनीविलासमधील श्लोकाचा मराठी समश्लोकी काव्यानुवाद होता.
जगन्नाथ पंडिताचा मूळ श्लोक :
स्थितिं नो रे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।
गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि।
असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-
गुरुग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:॥

वासुदेवशास्त्री खरे यांची एक प्रसिद्ध कविता अशी आहे.

पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन,
मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन ।
नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव,
राहो चित्ती प्रिय मम परि जन्मभूमी सदैव ।।
जेथे माझे जनन घडले पूर्व पुण्येच थोर,
जेथे गेले दिवस,असता बाळ, सौख्यात फार ।।

इंटरनेट आणि विकीपीडियावरून साभार. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87

१८. आरती प्रभू (चिं.त्र्यं.खानोलकर)

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ——–हे गीत लिहिणारे नाटककार ,कादंबरी लेखक आरती प्रभू यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचे नाव चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (मार्च ८, इ.स. १९३०- एप्रिल २६, इ.स. १९७६) कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री, खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणाऱ्या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने ‘मौज’मधे छापण्यास पाठवून दिल्या. ‘मौज’च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.
ये रे घना, ये रे घना, न्हाउं घाल, माझ्या मना …
खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला.कुडाळला असताना चि.त्र्यं.खानोलकरांनी एक तीन अंकी नाटक लिहिले होते. त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता, पण ते लिखित नाटक कुठेतरी गहाळ झाले. त्यानंतर खानोलकरांनी ’एक शून्य बाजीराव’ लिहिले, ते ‘रंगायन‘ने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केले आणि प्रेक्षकांना आवडले. नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता होत्या.
त्यांची साहित्यसंपदा
अजगर (कादंबरी, १९६५)—–अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)—–अभोगी (नाटक)—–अवध्य (नाटक, १९७२)—–आपुले मरण—–एक शून्य बाजीराव (नाटक, १९६६)—–कालाय तस्मै नमः (नाटक, १९७२)—–कोंडुरा (कादंबरी, १९६६)——गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)—–चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)—–जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)—–त्रिशंकू (कादंबरी, १९६८)—–दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)—–नक्षत्रांचे देणे (काव्यसंग्रह, १९७५)—–पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)——पिशाच्च ((कादंबरी, १९७०)——रखेली (नाटक)——राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)——–रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)——श्रीमंत पतीची राणी (नाटक)—–सगेसोयरे (नाटक, १९६७)——सनई (कथा संग्रह, १९६४)—-हयवदन (नाटक)
त्यांची गीत संपदा
एकाच एकाच वेळे ——– कसे ? कसे हासायाचे ——-कुणाच्या खांद्यावर——- गेले द्यायचे राहून ——–ती येते आणिक जाते ——-तुम्ही रे दोन दोनच ——- तू तेंव्हा तशी ——तो एक राजपुत्र मी ——दुःख ना आनंदही ——नाही कशी म्हणू तुला——- बंद ओठांनी निघाला ——– मीच मला पाहते आजच —— ये रे घना ये रे घना ——- लवलव करी पातं ——- विश्रब्ध मनाच्या कातरवेळी —— समईच्या शुभ्र कळ्या —– ही निकामी आढ्यता का


कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ।।
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्‍त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे ।।
दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे ।।
अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे ।।

श्री.माधव विद्वांस यांच्या मुखपुस्तक भिंतीवरून (Face Book Wall) साभार दि.२६-०४-२०२१

*******

ये रे घना, ये रे घना , न्हाऊ घाल माझ्या मना…

मला हा अर्थ माहित नव्हता.. मला सुद्धा हे पावसाचे गाणे आहे असेच वाटायचे!
गाणं ऐकताना पावसाचं वाटतं, पण पु.लं देशपांडे यांच्या पत्नी सुनीता बाईंनी या मागची गोष्ट सांगितली होती, ती थोडक्यात अशी –
खूप प्रसिद्धी मिळू लागल्यावर आपल्याला अहंकार होऊन प्रतिभा तर कोमेजून जाणार नाही ना, अशी भीती खानोलकरांना वाटली. त्या वेळेस परमेश्वराची भाकलेली ही करुणा आहे..

ये रे घना, ये रे घना (परमेश्वरा धाव) न्हाऊ घाल माझ्या मना (माझ्या मनाला शांतव)
फुले माझी अळुमाळू (माझ्या काव्य प्रतिभेची सुकुमार फुले)
वारा बघे चुरगळू (अहंकाराचा वारा चुरगळू पहात आहे)
नको नको म्हणताना गंध गेला रानावना (कितीही नाही म्हणताना या फुलांचा सुगंध दूरवर पसरला आहे, पसरत आहे)

टाकूनिया घरदार नाचणार नाचणार, नको नको म्हणताना मनमोर भर राना (मी कितीही नको म्हंटलं, तरी माझा मनमोरही त्या प्रसिद्धीवर नाचतोच)
नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू (कितीही नको म्हंटले तरी या कवितांची गाणी होणार, कोणीतरी गुणगुणणार)
बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना (त्या अहंकाराचा सोसाट्याचा वारा मला त्या प्रसिद्धीचा रसास्वाद घ्यायला बोलावतोच आहे)
म्हणून तू येरे घना, येरे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना…
🌸

वॉट्सॅपवरून साभार . . दि.१०-०६-२०२१
१९. संदीप खरे

मला माहीत असलेले नव्या पिढीमधले एकमेव प्रसिद्ध कवी. मी शाळेत असतांना त्यांचा जन्मही झालेला नव्हता, त्यामुळे मी त्यांच्या कविता शिकण्याचा प्रश्नच नाही. ‘आयुष्यावर बोलू काही’ या अप्रतिम कार्यक्रमामुळेच मला ते माहीत झाले आणि आवडले. पूर्वी कवीवर्य मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट वगैरेंचे कविता वाचनाचे कार्यक्रम होत असत, पण आजच्या युगात फक्त कवितांवर आधारलेला दुसरा कुठलाही इतका यशस्वी कार्यक्रम मी पाहिला नाही.

संदीप खरे (जन्म : १३ मे १९७३) हे प्रसिद्ध मराठीकवी व गायक आहेत. त्यांचे ‘दिवस असे की’ आणि ‘आयुष्यावर बोलू काही’ हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. त्या कार्यक्रमाचे हजाराच्यावर प्रयोग झाले आहेत. आजही त्यांचे कार्यक्रम हाऊसफुल असतात. आयुष्यावर बोलू काही बरोबरच, ते कवी वैभव जोशी ह्यांच्यासोबत ‘इर्शाद’ हा कवितांचा कार्यक्रम देखील करतात. संदीप यांनी ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या मराठी चित्रपटात प्रमूख भूमिकाही केली आहे.

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने

पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

आयुष्यावर बोलू काही !

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही

तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही

उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही

शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही

. . . . . . . . . .

आजी आणि तिची नातवंडं यांच्या नात्यावरची एक खूप सुंदर कविता आहे, संदीप खरे यांची…

आजी म्हणते काढल्या खस्ता
जन्मभर मी केले कष्ट
तू म्हणजे त्या सगळ्याची
शेवट गोड असलेली गोष्ट

सगळं कथा पुराण झालं
देव काही दिसला नाही
कुशीत येतोस तेंव्हा कळतं
कृष्ण काही वेगळा नाही . . .

 • संदीप खरे

ह्या कवितेला नातवाने दिलेले उत्तर :

प्रश्न खूप पडतात ग, आज्जी,
देशील का मज उत्तरं त्यांची?
ठाऊक आहेत देवकी-यशोदा,
पण . . . .
आज्जी होती का कृष्णाची?

खाण्यासाठी चोरून माखन
उगाच करी सवंगड्यांसी गोळा?
खडीसाखरेवरती आज्जी
देई न त्या लोण्याचा गोळा?

बांधुन ठेवी माय यशोदा
उखळासी करकच्चुन त्याला,
धावूनी का ग गेली नाही
आज्जी त्याला सोडविण्याला?

कधी ऐकले, त्यास आजीने
दिला भरवुनी मऊ दूधभात?
निळ्या मुखावर का ना फिरला
सुरकुतलेला थरथरणारा हात?

असेल मोठ्ठा देव, तरी पण
आज्जी त्याला नव्हती नक्की,
म्हणूनी सांगतो मी सर्वांना ..
कृष्णापेक्षा मीच लकी.

 • सर्व आज्ज्यांना समर्पित
  🙏🙏🌹🌹 वॉटसॅपवरून साभार दि. १९-०६-२०२१

. . . . . . . . . .

संदीप खरे यांची काही अत्यंत लोकप्रिय झालेली गाणी :

दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई।
नीज दाटली डोळ्यात तरी घरी कुणी नाही।।
http://www.youtube.com/watch?v=Q-qlT0-XuL8&NR=1

दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला

http://www.youtube.com/watch?v=xaH5-4Lp1qw&feature=related

२०. कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते

चाफा बोलेना चाफा चालेना……. चाफा खंत करी, काही केल्या फुलेना अश्या सुंदर कविता गाणी लिहिणारे कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते यांची आज जयंती (जून १, १८७२ – ऑगस्ट ३०, १९४७)
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका’ १८९१ साली ‘करमणूक’ मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे ‘कवी बी’ कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.
‘फुलांची ओंजळ’ हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला त्यांच्या प्रणयपत्रिका, बकुल, माझी कन्या, चाफा, वेडगाणे या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता! यातील ‘माझी कन्या‘ ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे आणि ‘चाफा‘ ही कविता लता मंगेशकरांच्या समधुर स्वरात गीतबद्ध झाल्यामुळे सर्वोपरीचीत आहे. (हा मूळ कविताचा एक भाग आहे. पूर्ण कविता खाली दिली आहे.)
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी
नागासवे गळाले देहभान रे
चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया
खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम
हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण
उणे करु आपण दोघे जण
जन विषयाचे किडे, ह्यांची धाव बाह्याकडे
आपण करु शुद्ध रसपान रे
चाफा फुले आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटून

कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे”

श्री.माधव विद्वांस – फेसबुकवरून साभार

. . . . .

30-08-2021 . . . चाफा बोलेना चाफा चालेना अश्या सुंदर कवितेचे रचनाकार कवी “बी ” तथा नारायण मुरलीधर गुप्ते यांची आज पुण्यतिथी
नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी (जून १, १८७२ – ऑगस्ट ३०, १९४७) हे मराठी कवी होते. त्यांनी प्रेमगीते, भावगीते , सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका’ १८९१ साली ‘करमणूक’ मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे ‘कवी बी’ कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.
‘फुलांची ओंजळ’ हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे.
आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी विश्वकोशातील लेख , तुमच्यासाठी
प्रणयपत्रिका’ ही ‘बीं’ची पहिली कविता १८९१ची; पण १९११ मध्ये लिहिलेल्या ‘वेडगाणे’ या कवितेपासून त्यांनी ‘बी’ हे टोपणनाव घेतले; रसिकांचे लक्ष वेधून घेणारी त्यांची पहिली कविता तीच.
‘बी’ हे केशवसुतांचे समकालीन; आणि वृत्ती व विचार यांबाबत तत्कालीन कवींत केशवसुतांना सर्वांत जवळचे. तसेच खऱ्या अर्थाने आधुनिक असलेल्या कवींतील श्रेष्ठांपैकी एक; परंतु ते त्यांच्या हयातीत एकंदरीने उपेक्षितच राहिले. त्यांचे अल्प लेखन (एकुण कविता ४९) व प्रसिद्धीबाबतची उदासीनता यामागे ‘उणीव रसिकांचीच खरी, आज भासते परोपरी’ ही त्यांची भावनाच असावी. त्यांच्या कित्येक कवितांतील विचार जटिल आहे आणि त्याला अध्यात्माचे अंग आहे. त्यांची लेखनसरणी काहीशी वेगळी, अल्पाक्षरी आणि दुर्बोध आहे; ती दुर्बोधता अध्यात्माच्या परिभाषेचा स्पर्श झाल्यामुळे, तर कित्येकदा क्लिष्ट शब्दयोजनेमुळेही, आलेली आहे. ‘बीं’ची बहुतेक कविता ज्या काळात लिहिली गेली, (१९११ ते १९२३) तो काळ गोविंदाग्रजांच्या आणि काहीसा बालकवींच्या झळाळीचा, म्हणून ‘बी’ निष्प्रभ ठरले असावेत. नंतरच्या काही वर्षांतील अभिरुचीशीही त्यांचा सुर जमणे कठीण होते. फुलांची ओंजळ या ‘बीं’च्या अडतीस कवितांच्या पहिल्या संग्रहाला (१९३४) प्र. के. अत्रे यांच्या दीर्घ प्रस्तावनेने उठाव दिला आणि जाणकारांपर्यंत ती पोहोचली. दुसरी आवृत्ती १९४७ साली प्रसिद्ध झाली. ह्या आवृत्तीत नंतरच्या अकरा कवितांचा ‘पिकले पान’ या शीर्षकाखाली समावेश केला गेला. त्यानंतर आणखी पाच आवृत्त्या निघाल्या. दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या या कवितेला असे थोडे साफल्य लाभले; पण हा सामान्य वाचकाच्या सहज पचनी पडणारा कवी नव्हेच.
केशवसुतांचा ‘बीं’ वरील प्रभाव विविध तऱ्हांनी जाणवतो. एक तऱ्हा म्हणजे ‘डंका’, ‘आम्ही’, ‘भगवा झेंडा’ इ. कवितांतील जुने नष्ट करण्याची चेतना देणाऱ्या बंडखोर विचाराची; दुसरी ‘वेडगाणे,’‘पिंगा’, ‘चाफा’ यांसारख्या अलौकिकाचा ध्यास व्यक्त करणाऱ्या गूढ कवितांची; तिसरी, ज्यांत ‘आनंदाला म्‍लानपणा नच सौदर्याला क्षय’ अशा पूर्णाकडे जग जाणार असल्याचा निर्भर आशावाद उच्चारणाऱ्या‘फुलांची ओंजळ’ सारख्या कवितांची. सौंदर्यानंदाची तीच आस आणि ‘सान्त अनन्ताची मिळणी’ झाल्याचा उत्फुल्ल क्षणी होणारा साक्षात्कार, ‘बीं’चे बालकवींशी साधर्म्य दाखवतो.‘आठवण’-मधील निसर्गचित्रण काहीसे बालकवींच्या ढंगाचे आहे. ‘विचार-तरंगां’मध्ये वारंवार बालकवींच्या ‘फुलराणी’चा भास होतो.‘कमळा’ ही कथन-कविता गोविंदाग्रजांच्या इतिहासविषयक स्वच्छंदतावादी वृत्तीची आणि मधूनमधून त्यांच्या शाहिरी थाटाच्या शब्दकळेची आठवण जागी करते. पण ही साधर्म्ये कमीअधिक वरवरची. काही प्रमाणात ती एकाच युगातील समानधर्मी कवींची प्रस्फुरणे. पण ‘बीं’च्या स्वतंत्र काव्यव्यक्तित्वाला त्यांनी ढळ पोचत नाही.
‘बीं’ नी काव्यासंबंधीची आपली मते ‘कविवंदन’, ‘विचारतरंग,’ यांसारख्या कवितांत ठामपणे व्यक्त केली आहेत. छन्द – व्याकरण – रसादींची जुनी मापेकोष्टके लावून आधुनिक कवितेवर रोष धरणाऱ्या विद्वद्वर्यांचा (ते ‘विशाळ मणिगोटे’) ‘बी’ धिक्कार करतात. ‘संस्कृत-भाषानियमांची का तुजवरि बळजोरी’ असे मराठी भाषेला विचारतात; पण त्यांची स्वतःची भाषा बरीच संस्कृतप्रचुर आहे. ‘कमळा’ या कवितेत ते ‘निळ्या सारणीमध्ये वाहते मोत्याचे पाणी’ अशी नायिकेविषयी सहजसुंदर, चित्रमय, लावणी बाजाची ओळ लिहून जातात; पण तिच्यावर ‘विकासोन्मुखलावण्य-शुद्धशालीन्यसुगुणशाली,’‘तमालदल-सन्निभाभिरामा’ यांसारखी जडजंबाल विशेषणेही लादतात. संस्कृत आणि पंडिती कवितेप्रमाणे शाहिरी कविताही ‘बीं’ नी आत्मसात केली होती; पण त्या निरनिराळ्या शैलींच्या विसंवादी मिश्रणांमुळे ‘बीं’ची शब्दकळा गंगाजमनी झाली; त्याच्या तात्त्विक विचाराशी विसंगत झाली. बहिरंग हे गौण; अंतरंगातच सौंदर्य असते, ही त्यांची धारणा एका परीने खरी असली, तरी ती हा दोष पुरा झाकू शकत नाही.


किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,
करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.
या ओळींवरून आपल्या पतीचा विरह सहन होत नाहीये त्या प्रेयसीला हे दिसून येते तर,
तरल मन नराचे राहते ऐकते मी
विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.
कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी
अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.
विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?
म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता
********************

मराठबोली दिवाळी अंक 2020 मधील दीर्घ लेख, ‘कवी बी- पिंगा आणि चाफा नव्या अर्थासह’

-मनीषा अतुल(मनीषा साधू)

‘पिंगा’ आणि ‘चाफा’ या कवी ‘बी’ यांच्या अगदीच साध्याशा वाटणाऱ्या पण अद्भुत अशा कविता आहेत.साध्याशा कश्या?आणि मग अद्भुत तरी कशा?
त्यांच्याच माझी कन्या या कवितेतल्या सारखा,
‘लाट उसळोनी जळी खळे व्हावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे
तसे गाली हासता तुझ्या व्हावे उचंबळूनी लावण्य वर वहावे।’ किंवा
‘उष्ण वारे वाहती नासिकांत गुलाबाला सुकविती काश्मिरात
नंदनातील हलविती वल्लरीला कोण माझ्या बोलले छबेलीला।’
यासारख्या चमत्कृतीजन्य प्रतिमांचा स्पष्ट खेळ यात नाही. तर ढगांनी आच्छादिलेल्या आभाळात नजर जावी आणि क्षणार्धात कुठेतरी वीज लकाकून जावी. मग आपण भरले अभाळ विसरून त्यामागच्या विजेची लकीर निर्माण करणाऱ्या जलतत्त्वाचा शोध घेत बसावे, तशी अवस्था या दोन कविता वाचताना होते. साध्या शब्दांमधून आपल्याला एका अद्भुत विश्वपसाऱ्यात त्या गुंतवत नेतात.
त्यांच्या पिंगा या कवितेवर लिहावं,वारंवार लिहावं,अशी ही कविता आहे.जीव आणि परमात्मा यांच्या मिलनातून निर्माण होणारा अद्वयानंद तर त्यांनी रेखाटला आहेच,मात्र त्यासोबतच हे होत असतांनाच्या, म्हणजे या प्रक्रियेदरम्यानच्या पायऱ्या आणि त्याची कारणे ज्या सहज क्रियांमधून उलगडत नेली आहे, त्यामुळे एकदा ती कविता भिनू लागली तर आपल्यालाही भौतिक आणि परातात्त्विक पिंगा घ्यायला लावते.
नारायण मुरलीधर गुप्ते म्हणजे कवी बी,यांच्या कवितांचा आधारच तत्त्वज्ञान आहे,त्यात त्यांच्या गूढगुंजनपर कवितांमध्ये जीव आणि आत्मा किंवा प्रकृती आणि अतीन्द्रिय भावना यांची एक लयबद्ध सांगड घातली गेलेली दिसते. विशेषतः पिंगा या कवितेचा विज्ञानाच्या सर्व अंगाने अभ्यास करता येईल.जसे, शारीरिक हालचालीतून मानसिक उत्तेजना,त्यामुळे स्त्रवणाऱ्या हॉर्मोन्सने मेंदूला मिळणारी उत्तेजना,त्याने येत जाणारी तरल अवस्था, त्या अवस्थेमुळे जिवाला भौतिक जाणिवेतून अध्यात्मिक जाणिवेचा स्पर्श होण्याची पातळी गाठता येणे, हे सगळे आले आहे.पिंगा या कवितेत जीव आणि परमात्मा यांच्या मिलनातून होणारा अद्वयानंद रेखाटतांनाच मायेत गुरफटलेल्या जीवाला या भौतिक हालचालींच्या दरम्यान, मूळ आत्मस्वरूपाचे ज्ञान होणे आणि त्याने त्याचे दुर्बलपण संपून, द्वैताच्या जाणिवेचे निराकरण होणे आणि पुन्हा मूळ पदावर येत,द्वैताचा समंजस स्वीकार करणे,हे ज्या सुंदर आणि सहज क्रियेतून उलगडले आहे ते निव्वळ अद्भुत आहे!
आता या कवितेच्या माध्यमातून या सगळ्या पायऱ्या चढत जाऊया.या कवितेची सुरुवात बघा, एक स्त्री आहे. ती अनेक स्त्रियांसह रिंगण करून उभी राहते. त्या हातात हात घालतात आणि पिंगा घालू लागतात.हळूहळू ती एकटी आहे याचा तिला विसर पडून ती समूहाचा एक अविभाज्य भाग होते. मी’पणाचा विसर पडू लागला, की चैतन्यानं मन- शरीर फुलून येतं. पिंगा घेत शरीर झुलू लागलं की चित्तालादेखील गुंगी येते.नशा येते.’मिळून आम्ही सर्वजणी।नाच मांडिला एकपणी।’ आपल्या अनेक आवृत्त्या सभोवती पसरल्यात, चैतन्यानं भारल्यात, याचा प्रत्यय ‘स्व’च्या उर्जेला अनेक पटीनं वाढवतो. ‘अनेक नेत्रांचे बघणे।अनेक कंठांचे गाणे।
अनेक चरणांचे जाणे।अनेक चित्तांचे स्फुरणे।दृष्टी,वाणी, गती,मती।एकच येथून तेथून ती।’
या साऱ्या जणीतर माझ्याचसारख्या.काय फरक आहे माझ्यात,यांच्यात?आम्ही साऱ्याजणीतर त्याचेच अंश आहोत.अगदी एकसारख्याच की! म्हणजे सर्व जीव सारखेच? मग माझे वेगळेपण काय? मीही एक जीव इतरांसारखाच.आणि हे जाणवण्याचाच क्षण साक्षात्काराचा क्षण ठरतो.मी अनेकांमधली एक आहे.विश्व चैतन्याचा एक भाग आहे.पण विश्व चैतन्याचा एक लहानसा भाग असल्याने का होईना माझं महत्त्व आहे.म्हटलं तर एक, म्हटलं तर मिळून विशालच की.
‘ प्रवाह बहुमुख जो होता। वाहे एक मुखे आता। वृत्तींचे बळ मज मिळता। विश्व सहज आले गिळता।’
याच्या पायऱ्या बघा,सुरुवात एकटेपणाने होते.एकली स्त्री नाचाला उभी राहते. मग अनेक जणी एक असल्याचा प्रत्यय येतो. स्वतःला खूप मोठ्या कॅनव्हासवर मोठ्या चित्राचा एक लहानसा भाग म्हणून बघणं होतं. मग परत स्वतःत परत येऊन मीपणाचा साक्षात्कार होतो. पण आताचं एकटेपण हे नाचाला सुरुवात होण्यापूर्वीच्या एकटेपणापेक्षा वेगळं आहे.आपल्या अस्तित्वाचा अर्थ गवसल्यानंतरचा, आपले स्थान कळल्यानंतरचा निराळेपणा आहे हा. म्हणजे एकदम एका बिंदूवर जगापासून सुटून,स्वतःला विलग करता येऊन तटस्थ बघता यावं आणि इतकं अद्वैत व्हावं की त्याचक्षणी द्वैताचाही साक्षात्कार व्हावा,ही खरी त्या कवितेतील गंमत आहे आहे.
अधिक उलगडून बघूया.मी आहे.मी एक अस्तित्व आहे. परंतु मी एकटी नाही,या विश्वाचा अंश आहे.आता माझं मीपण लख्ख होऊन माझ्या समोर उभं आहे. मला ओळखल्यानंतरची ही मी आहे.सारं स्वच्छ आहे.कारण आता मला उमगतं आहे की,
‘ दानव मानव सुरासुर। मी,मजविण ते नि:सार।
मी येता उदयोन्मुख ते। जग तेव्हाची संभवते।’
हे जग मी आहे म्हणून आहे. मी आहे तोवर आहे. माझ्या जगाची सुरुवात माझ्या जन्मानंतर होते आहे. शाश्वत जगाच्या जाणीवेची सुरुवातच जन्मानंतर होते आहे.म्हणजे माझ्यामुळे माझं जग संभवतं. आता गंमत अशी की स्वतःहून सुटून विश्व दर्शनाचा साक्षात्कार झाल्यावर, क्षणभर मी तिथे हरवते की काय असं वाटतं. माझं मीपण शूद्र वाटतं.पण पुढल्याच क्षणी, ते क्षूद्र नसून त्यामुळेच हे सारं आहे हा प्रत्यय येऊन त्याचं महत्त्व कैकपट वाढतं.आता मी या विश्वाचा एक भाग म्हणूनही महत्त्वाची.
‘झपुर्झा गडे झपुर्झा’ या कवितेची आठवण इथे झाल्याशिवाय रहात नाही. एकटेपण-द्वैत-एकटेपणात परत, असा प्रवास या नृत्यादरम्यान होतो. त्याने काय होतं?
‘दुर्बलपण पहिले गेले। क्षूद्रपणातून मी सुटले।
जीर्णबंध सारे तुटले। मी माझी मज सापडले।
स्वार्थजनित सद्गुण भास। जडले होते अंगास
ते गुण झाले मम धर्म। प्रेमास्तव आता प्रेम।’
आणि हा चमत्काराचा क्षण सांगून जातो,
‘मज कसले येणे-जाणे। भाव-अभावाविण असणे। बुदबुद हो की कल्लोळ। अर्णवपद माझे अटळ।
काय करू पण कसे करू?मीपण माझे का विसरू? दीपकळी गे! दीप्तीला। सोड- म्हणे का बुध तिजला?’
माझ्या मीपणाचं एक निराळंच महत्त्व मला पटतं. आत चैतन्याची ज्वाला आहे.हे शरीर कुडी आहे. परंतु ज्योतीची ज्वाला पणती टाकून देत नाही. पणती आहे म्हणून ज्योतीला धरून आहे. दोघांचेही असणे अटळ आहे, महत्त्वाचे आहे. मी आहे म्हणून हा चैतन्याचा साक्षात्कार आहे. हे द्वैत आहे म्हणून त्या परमेश्वराची ओढ आहे.जेव्हा मी माझं असणं नि:शंकपणे स्वीकारलं तेव्हा हेही स्वीकारल्या गेलं की मग शरीर आहे तर वृत्ती आहेत.
‘नाच परी मम राहिना। स्वभाव मूळचा जाईना।’ मोह माया आहे.आता त्यांच्याकडे अलिप्त भावाने बघता येते आहे. भोगता येते आहे. मायेचा खेळ समजून घेऊन परत त्यात शामील होण्यासारखा शहाणा आनंद नाही.
‘ नाचा माझ्या वृत्तींनो। नाचा भुवन समूहांनो।
नाच आपुला भुताला। होवो शांतीप्रद सकला।’
हा पिंगा खेळ म्हणजे जीवनखेळ आहे. हा खेळच मुळी चालतो तो चित्तवृत्ती शांत करण्यासाठी चालतो.मन अधीर होतं,नाचतं, ऊर्जेचा वापर करतं शांत होतं.त्याकरिता हा प्रपंचखेळ त्याकरिता हा वासनाखेळ.
पिंगा कविता लेखाच्या शेवटी दिली आहे.आता दुसऱ्या कवितेकडे वळू.
कवी ‘बी’ची, ‘चाफा’ ही अशी बहुचर्चित कविता आहे जिने समीक्षकांना कायम मोहात पाडले आहे. या कवितेचा समीक्षकांनी अनेक तऱ्हेने अर्थ लावू पाहिलाय. बहुतांश समीक्षकांच्या मते ही रूपकात्मक प्रेम कविता आहे, ज्यात द्वैताचा लोप होऊन अद्वैताचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. जीवाची अध्यात्मिक अनुभूती देणारी ही कविता आहे.
समीक्षक या कवितेबद्दल काय म्हणतात ते अगोदर बघूया.
डॉ. अमृता इंदूरकर यांच्या ग्रंथात समीक्षकांच्या निरनिराळ्या मतांचा उल्लेख आढळतो. समीक्षकांच्या मते जीवरूपी प्रेयसी,आत्मारूपी चाफ्याला म्हणजे प्रियकराला मोहवते आहे. प्रणयोत्सुक होऊन त्याला साद घालते आहे.परंतु तो रूसलेला आहे.बोलत नाही.त्याला खुलवण्यासाठी ती त्याला निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जाते आहे. आंब्याच्या बनात नेते.केतकीच्या बनात नेते.माळावर हिंडवून आणते.डोंगरकड्यावरून कोसळणारे पाणी दाखवते.निसर्गातील युग्मांच्या जोड्या दाखवते, जसे वीज- ढग, राघू-मैना,वारा- कलिका, नदी-डोंगरकडा. परंतु या प्रणयचेष्टांमध्ये चाफ्याला रस वाटत नाही.ती त्याला मुखस्तंभराणा म्हणते. मग ती त्याला झिम्मा फुगडी खेळायला बोलावते आणि म्हणते, हे विश्वाचे अंगण आपल्याला लग्नाचे आंदण म्हणून मिळाले आहे, ते आपण आपल्या व्यापक आणि विशुद्ध प्रेमाने थिटे करू. चाफा एकदम खुलतो.जीवाचे-आत्म्याचे अद्वैत होते व सर्व दिशा तेजामध्ये आटून जातात.
कृ.बा.मराठे यांच्या मते, शिवपार्वतीचा संबंध नाट्यमय रीतीने इथे आला असल्याने या गीताला नाट्यगीत म्हणता येईल.कर्मेन्द्रियांप्रमाणेच ज्ञानेंद्रियांचा खोल तपास करणारी ही रचना आहे.
डॉ द भि कुलकर्णी यांनी म्हटलं आहे,चाफा हा आत्मा आणि या आत्मतत्त्वाला खेचू पाहणारी प्रेयसी म्हणजे,तत्त्वज्ञानात जी माया, प्रकृती,अहंता,जीव इत्यादी नावांनी ओळखल्या जाते ती आहे. तिला इंद्रियवृत्ती असं त्यांनी म्हटलं आहे.सांख्य दर्शनाने प्रकृतीला नर्तकीची उपमा दिली आहे.त्या प्रकृतीची ही इंद्रियवृत्ती असं ते म्हणतात.
गो.मा. कुलकर्णी,श्यामसुंदर स्वात यांनीही साधारण याच प्रकारे या रूपकांना बघितले आहे.
चाफा वाचताना मला वाटलं की ही कविता काहीतरी निराळं सांगते आहे.इतरजण जातात त्या अर्थापेक्षा निराळ्या अर्थाकडे जाते आहे.वाटलं एका कलावंताचं रसरशीत जगणं आणि चाफा यात काहीच अंतर नाहीये.
ते कसं हे सांगते.आधी कविता वाचू आणि मग त्या शब्दाबर या नव्या अर्थासह फिरुया.
‘चाफा बोलेना,चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या फुलेना।।
गेले आंब्याच्या बनी , म्हटली मैनांसवे गाणी, आम्ही गळ्यात गळे मिसळून।
गेले केतकीच्या बनी , गंध दरवळला मनी, नागासवे गळाले देहभान।
आले माळ सारा हिंडुन, हुंबर पशूंसवे घालून, कोलाहलाने गलबले रान।
कडा धिप्पाड वेडी, घाली उडयावर उडी, नदी गर्जून करी विहरण।
मेघ धरू धावे, वीज चटकन लवे, गडगडाट करी दारूण।
लागुन कळिकेच्या अंगा, वायू घाली धांगडधिंगा, विसरूनी जगाचे जगपण।
सृष्टी सांगे खुणा, आम्हा मुखस्तंभराणा, मुळी आवडेना!रे आवडेना!!
चल ये रे ये रे गड्या! नाचु उडु घालू फुगड्या, खेळु झिम्मा झिम-पोरी-झिम-पोरी झिम।
हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण, उणे करू आपण दोघेजण।
जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे, आपण करू शुद्ध रसपान।
दिठी दीठ जाता मिळुन,गात्रे गेली पांगळुन, अंगी रोमांच आले थरथरून।
चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी-चाफा? कोठे दोघे जण?
मला वाटतं,ही कविता म्हणजे कलावंताची तडफड आहे प्रतिभेला बहरवत ठेऊ पाहण्याची.इथे थोड्यावेळासाठी कलावंत म्हणून कवी घेऊ.कवी हा जीव आणि त्याची प्रतिभा, त्याची सर्जनशीलता म्हणजे चाफा.इथे प्रियकर-प्रेयसी नाहीये आणि प्रणय देखील नाही. चाफ्याचे झाड म्हणजे कविचं बाह्य स्वरूप.जे रुक्ष, अनाकर्षक असू शकतं. त्याला काही बारा महिने फुलं नसतात. महिनोन् महिने ते नुसतं कटरलेली,राकट पानं घेऊन सरळसोट उभं असतं.बाहेरून कुठलीही लवचिकता, नाजूकता लक्षात येत नाही.मात्र जेव्हा निर्मिती होते तेव्हा कवितेनं बहरून आलेलं ते झाड किती सुंदर दिसतं! हे सुंदर रूप काही नेहमी नसतं. प्रतिभा बहरायला किती त्रास सोसावा लागतो कवीला. प्रतिभा जेव्हा रुसते, तेव्हा कवी काय करतो? तो वेगवेगळे उपाय करतो.त्याचे उपाय कसे असतील? तर तो निरनिराळ्या ठिकाणी जाऊन बघतो. की चल बागेत जाऊन बघू. फुलं उमलताना बघून,किंवा कळीची, हवेची नाजूक हालचाल बघून तरी प्रतिभा उमलेल का बघूया. वीज-पाणी यातलं काहीतरी आत खळबळ निर्माण करेल का? नाहीतर डोंगरावर जाऊन तिथून कोसळणारे पाणीतरी आत काही हलवून सोडेल का? पशूंसोबत हंबरून बघू का, काही सूर उमटतात का ते?
त्याला वाटतं,कदाचित या उपायांनी सापाच्या कातीसारखं आपलं देहभान गळून जाईल आणि प्रतिभा सळसळेल. तो तिला लोभवायला सगळं करतो आहे. इथे चाफ्याचं झाड, फुल,सगळं कविच आहे.म्हणजे तो स्वतःलाच खुलवायला हे सगळं करतो आहे.आपल्या प्रतिभेला कुरवाळतो आहे.पण ती, म्हणजे प्रतिभा मुखस्तंभराणा!शब्द येईल तर शपथ!
मग हळूहळू ती खुलते.झिम्मा- फुगडी सुरू होते. शरीर झुलायला लागतं, हलायला लागतं आणि पिंगा कवितेच्या बाबतीत सांगितलं, तसं मेंदूत हॉर्मोन्स स्त्रवायला लागतात. सकारात्मकता निर्माण होते. आणि शरीर-मन तरल होत जातं. मग प्रतिभेला पंख फुटतात. इथे ‘पिंगा’ कवितेतली अवस्था या कवितेतल्या झिम्मा अवस्थेशी मेळ खाते आहे . या दोन्ही कवितेत हे एकच तत्वज्ञान आहे, की ‘दिठी दिठ जाता मिळून। गात्रे गेली पांगळून। अंगी रोमांच आले थरथरून।’ त्या क्षणाचा रोमांच फक्त आणि फक्त कविच सांगू शकतो.गात्रे पांगळून जातात. दोघांचं अस्तित्व उणं होऊन एकाच कवितेच्या रूपानं बहरायला लागतं. हे विश्वाचं अंगण थिटं पडेल इतकी प्रतिभा झरू लागते. मग कोण चाफा? कुठली कविता? कुठला कवी? कोण मी-चाफा ?कोठे दोघेजण?इथे तर कविच कविता बनवून गेला की!
समीक्षक चाफ्याला प्रियकर का म्हणतात हा प्रश्न मला नेहमीच पडतो. कधी पाहिला आहे का की प्रियकर रुसला आहे,तो बाईसारखा अबोला धरतो आहे आणि ती त्याला घेऊन इकडे तिकडे फिरवतेय की हे बघ,हे कसं प्रेम करताहेत,आपण असं करायचं का? आणि हा मख्ख उभा.प्रियकर या भूमिकेत कसासाच वाटतो. प्रेयसीला रुसणं शोभतं,लाजणं शोभतं,अबोलाही शोभतो.
तसेच आत्म्याला प्रियकर समजून जीव त्याच्याशी खेळायला बघतो, प्रणय करायला बघतो असं जेव्हा सांगितल्या जातं, तेव्हा प्रश्न पडतो की,जेव्हा जीव भोगात असतो त्यावेळी आत्मा हा त्या भोगाचा समान वाटेकरी असतो. प्रणयात आत्मा नसेल तर तो फक्त वासनाखेळच होतो.अगदी खाता-पितांना किंवा प्रत्येकच भोगात जीव एकटा भोगू शकतच नाही. तर आत्म्याच्या सोबतीने भोगतो. इथे भोग्य विषय वेगळा असतो आणि भोगणारे जीव आणि आत्मा हे भागीदार असतात. दोघे मिळून तिसऱ्या गोष्टीचा आस्वाद घेतात. एकमेकांना नाही भोगत. जीव एकटा बरेचदा घेतो आस्वाद,पण त्यात आत्मिक अनुभूतीचा अभाव राहतो.तो फक्त वासनाखेळ होतो.
या कवितेतून भारतीय तत्त्वज्ञानाच्या जीव आणि आत्मा यांचा अद्वैतभाव सांगता येतो परंतु तेही प्रियकर-प्रेयसीच्या रूपात मांडण्याची आवश्यकता नाही.
डॉ.द भि कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे चाफा म्हणजे आत्मतत्त्व आणि त्याला खेचून पाहणारी प्रेयसी म्हणजे प्रकृती,माया.
मी म्हणेन की माणसातली लालसा, इंद्रिय वासना आणि त्याचा अलौकिकाचा साक्षात्कार झालेली अवस्था,हे दोन्ही चाफ्याच्याच झाडातून व्यक्त होते.फुले न आलेले नुसते रांगडे, अनाकर्षक झाड आणि पाने गळून पडलेले गुळगुळीत, फांद्यांच्या टोकांवर फुलांनी लगडलेले ध्यानस्थ चाफ्याचे सुगंधी झाड ही दोन्ही माणसाच्या मनाची प्रतीके आहेत.
कवितेचा आस्वाद घेताना अनेक प्रश्न पडू लागतात.कवीने चाफ्याचंच झाड का निवडलं असेल? इतर फुलझाडं म्हटली असती ? मोगऱ्याची फुलं सुगंधित आहेत, मोगरा म्हटलं असतं. गुलाब किती सुंदर आहे गुलाब म्हटलं असतं.मग चाफाच का?कदाचित चाफ्याचे झाड दारात असेल. त्याच्याशीच रोज संवाद होत असेल.कधी मला वाटतं,ते पुरुषासारखं राकट, रांगडं,जाडीभरडी पानं असलेलं, रूक्ष वाटणारं आहे म्हणून तर निवडलं नसेल? जे स्थितप्रज्ञासारखं वर तोंड करून उभं असतं! त्याच्याकडून कुणी फार अपेक्षा करीत नाही बहरायची.पण जेव्हा ते बहरून येतं,तेव्हा बरेचदा पानं गळून जातात आणि नाजूक फुलांनी डवरलेल्या त्या राकट झाडातूनही कोमलता डोकावते.पुरुष असाच तर असतो. त्याच्या आतली कोमलता, सुंदरता, त्याच्यातलं नाजूक प्रेमळ मन हे फक्त प्रेयसीच उमलवू शकते. प्रेमात पडलेल्या पुरुषाचं एक वेगळं,कोवळं रूप जगाला दिसतं.
कवीही असाच असतो चाफ्यासारखा. वास्तव जीवनात,भौतिक व्यवहार सांभाळत रुक्ष.त्यालादेखील त्याच्यातील प्रतिभा उमलण्याची वाट बघावी लागते.नाना प्रयोग करावे लागतात तिला खुलवायला.आणि मग शब्दांनी लगडलेला,उमललेला,बहरलेला तो चाफ्याच्या झाडासारखा दिसतो.

 • पिंगा- कवी बी –
  माझा पिंगा गोड गडे, अद्वयरंगी रंग चढे।
  नाचण मी मुळची मोठी , उद्भवल्या माझ्या पोटी
  कोमल नवनीतापरिस, जोत्सनेहुनि कांती सरस
  दिकरांगाहुनी दिव्यतर, चंचल चपलेच्याही पर
  वृत्ती गोरट्या अकलंकी, माय तशा झाल्या लेकी।
  प्रसन्न हृदयाच्या कोशि, असती सौरभ रसराशी
  त्यांस लुटाया पोटभरी, वृत्ती झाल्या हो भ्रमरी!
  गोंगाटाला थांबविले, श्रवनमनाला कळु न दिले
  कौशल्याची नवलाई, रस चोरुनि प्याल्या बाई!
  तो प्रमादांचा संभार, लोटूनि आला अनिवार
  बळेंची माझा धरुनि कर, मज केले नृत्याकार
  धुंद नशा भरली नेत्री, जीवन मुसमुसले गात्री
  गुरू लघुतेची कृत्रिम ती, पार उडाली मम भ्रांती
  मिळून आम्ही सर्वजणी, नाच मांडीला एकपणी
  अनेक नेत्रांचे बघणे , अनेक कंठांचे गाणे
  अनेक चरणांचे जाणे , अनेक चित्तांचे स्फुरणे
  दृष्टी ,वाणी,गती, मती , एकच येथून तेथुन ती
  प्रवाह बहुमुख जो होता, वाहे एकमुखे आता
  वृत्तींचे बळ मज मिळता, विश्व सहज आले गिळता
  पिंगा माझा सोन्याचा, पंजर रत्नाचा त्याचा
  पहा!उघडिले दाराला, पिंगा आकाशी गेला!
  पिंगा माझा अलौकिक, शोधूनि आला भूलोक
  चारी खाणी मी वाणी, सांगितले त्याने कानी!
  पिंगा माझा स्वर्गाला, भूवरि घेऊनि त्या आला
  अंघ्रीतली दडपूनी त्याला, नाच वरी म्या मांडियला
  दानव मानव सुरासुर, मी,मजविण ते नि:सार
  मी येता उदयोन्मुख ते, जग तेव्हाची संभवते!
  दुर्बलपण पहिले गेले, क्षुद्रपणातुन मी सुटले
  मी माझी मज सापडले!,
  स्वार्थजनित सद्गुणभास, जडले होते अंगास,
  ते गुण झाले मम धर्म, प्रेमास्तव आता प्रेम!,
  तारा सारंगीवरल्या, सम सुरीं लागुनी गेल्या,
  भूतें आली साम्याला, मोहर आंनदा आला!,
  विश्वबंधुता एकांगी, न पुरे माझ्या पासंगी,
  भृतें मी,मजला नाते, द्वैत कसे हे संभवते?,
  मज कसले येणे जाणे!, भाव-अभावावीण असणे,
  बुदबुद हो की कल्लोळ, अर्णवपद माझे अढळ!
  काय करू पण कसे करू?, मी पण माझे का विसरू?
  ‘दिपकळी गे!दिप्तीला, सोड-‘म्हणे का बुध तिजला?
  म्लानपणाविण लावण्य, क्षीणपणाविण तारुण्य
  मंगल मांगल्यायतन, नित्यानंद निरावरण
  विश्ववैभवालंकरण, ते माझे ते- स्वयंपण
  पिंगा आला भर रंगा, आत्मभान भिडला अंगा
  नाच परि मम राहिना, स्वभाव मूळचा जाईना!
  नाचा माझ्या वृत्तींनो!, नाचा भुवनसमूहांनो!
  नाच आपुला भुतांला, होवो शांतीप्रद सकला! -मनीषा अतुल(मनीषा साधू)
 • गूगल आणि फेसबुकावरून साभार

२१.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

बहु असोत सुंदर संपन्न की महा” या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित कवी, विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्त दैनिक प्रभात पुणे दिनांक १ जून २०२१ पुणे मधील माझा लेख त्यांचा जन्म नागपूर येथे दिनांक २९ जून १८७१ रोजी झाला.त्यांचे वडील शिक्षक होते.कोल्हटकर कुटुंब मूळचे रत्नागिरी जवळील नेवरे येथील होते.त्यांचे पणजोबा गोविंदभट वाई येथे येऊन राहिले.त्यांना हरिपंत व महादेवशास्त्री ही दोन मुले, हरिपंत हे श्रीकृष्ण यांचे आजोबा. कोल्हटकरांच्या घराण्यात नाटक आणि लेखन जणू मुरलेलेच होते.हरिपंतांचे बंधू महादेवशास्त्री हे “अथेल्लो”चे भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते.हरिपंतांचे पुत्र कृष्ण हे श्रीपाद कोल्हटकरांचे वडील.कृष्णराव नोकरीनिमित्ताने अमरावतीस येऊन राहिले.श्रीपाद यांना वयाच्या ९ व्या वर्षी तोंडाला लकवा आला व मान आणि जीभ यावर परिणाम झाला होता.त्यामुळे त्यांचे शिक्षणाचे १ वर्ष वाया गेले याची त्यांना खंत होती.त्यांच्या शारीरिक विकलांगतेची थट्टा होऊ लागल्याने ते काहीसे एकलकोंडे झाले होते.मात्र त्यांचे याच काळात वाचन सुरु झाले.ते पाचवीत असताना संगीत शाकुंतल या नाटकाची चर्चा होऊ लागली होती,व त्यांना नाटक लिहावेसे वाटू लागले.त्यांनी एक “ सुखमालिका “नावाचे ५ अंकी नाटक लिहूनही काढले.
श्रीपाद कृष्ण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकोला येथे झाले नंतर पुणे डेक्कन कॉलेज अधे त्यांनी प्रवेश घेतला, दरम्यान त्यांचे वयाच्या १५ व्या वर्षी खामगावचे वकील वामनराव जोशी यांच्या कन्येशी विवाह झाला.त्यावेळी मुलीच्या वडिलांनी मुलाला व मुलाच्या वडिलांनी मुलीला पहिले नव्हते.
पुणे तेथे शिकत असतांना त्यांना शिवराम महादेव परांजपे, वि. का.राजवाडे, एस. एस. देव यांच्यासारखे शिक्षक लाभले.१८८७ साली कोल्हटकरांनी एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले व ते अकोला येथे वकिली व्यवसाय करू लागले,याच वेळी वकिली बरोबरच कोल्हटकरांच्या स्वतंत्र लेखनालाही बहरआला. वर्ष १८९१ मध्ये कोल्हटकरांनी पहिल्यांदा संस्कृत नाटक मृच्छकटिकमध्ये अभिनय केला.त्यांनी आपल्या वाङ्म्यसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला.त्यांचा ‘साक्षीदार’ हा विनोदी लेख वर्ष १९०२ मधे ऑगस्ट-सप्टेंबरच्या ‘विविधज्ञानविस्तार’च्या अंकात प्रसिद्ध झाला.न्यायालयातील साक्षीदारांच्या उलटतपासणीतून निर्माण झालेले विनोद त्यांनी मांडले आहेत. तीन पात्रांचा समावेश असणाऱ्या या विनोदी कथासंग्रहात सुदामा, बंडुनाना आणि पांडुतात्या अश्या तीन व्यक्ति रेखांचे माध्यमातून त्यांनी तत्कालीन धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील विसंगतींवर त्यांनी बोट ठेवले. त्यांच्या अशा १८ लेखांचा ‘सुदाम्याचे पोहे ’ हा संग्रह १९१० साली प्रसिद्ध झाला. त्यात पुढे आणखी १४ लेखांची भर घालून १९२३ साली ‘सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्यबत्तिशी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले ‘‘वर्ष १९१३ मधे ‘ ज्योतिर्गणित ’ हा ज्योतिषशास्त्रावरील विवेचक ग्रंथही कोल्हटकरांनी लिहिला.त्यांनी त्यांचे आत्मचरित्राची लिहिले आहे.त्यामध्ये त्यांनी त्यांच्या काव्य नाट्य व इतर लेखनासंबंधी लिहिले आहे.त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना १९२२ साली पुण्यास भरलेल्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद व १९२७ साली महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले.वर्ष १९२० मधे सांगली येथे भरलेल्या तृतीय ज्योतिष संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.१ जून १९३४ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

– श्री.माधव विद्वांस – फेसबुकवरून साभार

महाराष्ट्र गीत –
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे ।
रमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरीपटका भगवा झेंडाही डोलती ।
धर्म राजकारण समवेत चालती ।
शक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्ती धृतिही जेथ अंतरी ठसो ।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।


. . . . . . . .
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

जन्म : २९ जून १८७१, मृत्यू : १ जून १९३४
मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्‍मयसमीक्षक. जन्म विदर्भातील बुलढाण्यास. अकोला, पुणे आणि मुंबई येथे बी.ए., एल्एल्. बी. पर्यंतचे शिक्षण. व्यवसाय वकिलीचा. त्यांनी आपल्या वाङ्‍मयसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला. संगीत वीरतनय (१८९६) हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी मूकनायक (आवृ. तिसरी, १९२२, प्रथम प्रयोग १९०१), गुप्तमंजूष (१९०३), मतिविकार (१९०७), प्रेमशोधन (१९११), वधूपरीक्षा (१९१४), सहचारिणी (१९१८), जन्मरहस्य (१९१८), परिवर्तन (आवृ. दुसरी, १९२३), शिवपावित्र्य (१९२४), श्रमसाफल्य (१९२९) आणि मायाविवाह (१९४६) ही नाटके लिहिली. उपर्युक्त बारा नाटकांपैकी पहिली आठच रंगभूमीवर आली. ‘साक्षीदार’ हा त्यांचा पहिला विनोदी लेख विविधज्ञानविस्तारात प्रसिद्ध झाला (१९०२). सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे (१९१०) हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह. त्याची तिसरी आवृत्ती सुदाम्याचे पोहे- अर्थात साहित्य बत्तिशी ह्या नावाने प्रसिद्ध झाली (१९२३). त्यांचे समीक्षालेख, अध्यक्षीय भाषणे, निबंध कोल्हटकरांचा लेखसंग्रह (१९३२) ह्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. दुटप्पी की दुहेरी (१९२५) आणि श्यामसुंदर (१९२५) ह्या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत. गीतोपायन (१९२३) हा त्यांचा कवितासंग्रह. ‘बहु असोत सुंदर संपन्न’ ह्या सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताचे ते जनक आहेत. साधारणपणे १९२० पर्यंतच्या त्यांच्या जीवनाचा आढावा त्यांनी आपल्या आत्मवृत्तात (१९३५) घेतला आहे. भारतीय ज्योतिर्गणित (१९१३) ह्या ग्रंथातून त्यांच्या ज्योतिर्गणितविषयक व्यासंगाचा प्रत्यय येतो.
कोल्हटकरांचे नाव घेतले जाते ते मुख्यत: नाटककार, विनोदकार आणि वाङ्‍मयसमीक्षक म्हणून. त्यांची नाटके जरी त्यांच्या हयातीतच रंगभूमीवर नाहीशी झाली, तरी त्यांचा मराठी नाट्यलेखनावर झालेला परिणाम दुर्लक्षणीय नाही. त्यांच्या पदरचनेने ज्याप्रमाणे रंगभूमीवरील संगीताला वेगळे आकर्षक वळण लावले, त्याचप्रमाणे त्यांच्या संवादलेखनाने मराठी नाटकांतील संवादांमध्ये खटकेबाजपणा आणि कोटित्व आणले. आपल्या असाधारण कल्पकतेच्या साहाय्याने नाट्यसंवादांतून आणि विनोदी लेखांतून त्यांनी जी विरुद्धकल्पना–न्यासात्मक चमकदार वाक्यरचना–रूढ केली, तिला त्यांच्या हयातीत गडकऱ्यांनी व त्यानंतर प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे इत्यादींनी सुरूप प्राप्त करून दिले. त्यांचे सुदाम्याचे पोहे… हे पुस्तक हा मराठीचा बहुमोल वाङ्‍मय ठेवा आहे. त्यात संगृहीत झालेल्या त्यांच्या उपहासगर्भ व विनोदी लेखनाने एका अभिनव वाङ्‍मयप्रकाराला आणि लेखनपरंपरेला जन्म दिला. गडकरी, चिं.वि. जोशी, अत्रे, पु.ल. देशपांडे इ. विनोदी लेखक याच परंपरेतील. कोल्हटकरांचे सुदाम्याचे पोहे… मधील लेखन असामान्य कल्पनाविलास व कोटित्व यांच्याबरोबच समाजचिंतनातून जन्माला आलेल्या सामाजिक सुधारणांविषयीच्या पुरोगामी भूमिकेतून स्फुरलेले असल्यामुळे ते जितके रंजक तितकेच विचारप्रवर्तक ठरले. सुदाम्याचे पोहे… मध्ये संगृहीत झालेल्या लेखांची संख्या बत्तीसच असली, तरी त्यांतून प्रकट होणाऱ्या उपहासविषयांची व्याप्ती फार मोठी आहे. धर्मव्यवहार, सार्वजनिक जीवनव्यवहार, वाङ्‍मयव्यवहार ह्या आणि महाराष्ट्र समाजजीवनाच्या इतर अनेक व्यवहारांचे कोल्हटकरांनी त्यामध्ये विनोदगर्भ व उपहासगर्भ परीक्षण केले आहे. कोल्हटकरांचे वाङ्‍मयसमीक्षात्मक लेखन प्रत्येक प्रश्नाचा खोलवर जाऊन शास्त्रशुद्धपणे विचार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचे निदर्शक आहे. ह्या वृत्तीतून ते समग्र लेखन झालेले असल्यामुळे तद्वारा कोल्हटकरांनी मराठी वाङ्‍मयविचाराला भरभक्कम असे तात्त्विक अधिष्ठान प्राप्त करून दिले. पुस्तकपरीक्षणे, ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे व खास लिहिलेले अभ्यासलेख यांमधून त्यांनी जे मूलभूत स्वरूपाचे वाङ्‍मयीन प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले व त्यांची जी शास्त्रीय काटेकोरपणे चर्चा केली, त्यामुळे मराठी वाङ्‍मयविचाराला योग्य दिशा मिळाली. त्यांच्या असाधारण कल्पकतेला व्यासंगाची, शास्त्रीय दृष्टीची, शिस्तप्रियतेची व परिश्रमशीलतेची सतत जोड मिळाल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत भारदस्त व प्रभावी ठरले आणि म्हणूनच विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत कोल्हटकर ही केवळ एक व्यक्ती न राहता ती संस्था बनली.
त्यांनी केलेल्या साहित्यसेवेबद्दल त्यांना १९२२ साली पुण्यास भरलेल्या द्वितीय कविसंमेलनाचे अध्यक्षपद व १९२७ साली पुण्यासच भरलेल्या महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. सांगली येथे भरलेल्या तृतीय ज्योतिष संमेलनाचेही (१९२०) ते अध्यक्ष होते. पुणे येथे ते निधन पावले.
संदर्भ : १. कुळकर्णी, वा. ल. श्रीपाद कृष्ण : वाङ्‍मयदर्शन, मुंबई, १९५९.
२. खानोलकर, गं. दे. साहित्य-सिंह श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (जीवन गाथा), मुंबई, १९७२.
लेखक : वा.ल.कुळकर्णी
स्त्रोत : मराठी विश्वकोश …… विकासपीडियावरून साभार

२२. निसर्गकवी ना.धों.महानोर

जन्म १६ सप्टेंबर १९४२, पळसखेड (औरंगाबाद जिल्हा)

जीवन
महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले[ संदर्भ हवा ]. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले[ संदर्भ हवा ]. मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.

नामदेव धोंडो महानोर (जन्म : पळसखेड-कन्नड तालुका-औरंगाबाद जिल्हा, १६ सप्टेंबर १९४२) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत.
महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे.
ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध येतो.
झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना गायल्या गेल्या त्या शशांक पोवार याने संगीतबद्ध केल्या होत्या. देवकी पंडित यांनी महानोरांनी लिहिलेली काही चित्रपट गीते गायली आहेत, ती अशी :-
जाळीमधी झोंबतोया गारवा (कवी -ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक, सहगायक – रवींद्र साठे)
तुम्ही जाऊ नका हो रामा (कवी – ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक, सहगायक – आशा भोसले)
सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा (कवी – ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक)
श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.
डाॅ. शुभा साठे यांनी ना.धों. महानोरांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
संगीत दिगदर्शक हर्षित अभिराज यांनी ना.धों. महानोर यांच्या ‘दूरच्या रानात केळीच्या बनात’ या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध करून आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली कोती..

. . . . विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

*********

घन ओथंबून येती
बनांत राघू ओघिरती
पंखावरती
सर ओघळती
झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती
नदीस सागरभरती
डोंगरलाटा
वेढित वाटा
वेढित मजला नेती

घन ओथंबून आले
पिकात केसर ओले
आडोशाला
जरा बाजूला
साजण छेलछबिला
घन होऊन बिलगला

🍃🍃🍃🍃🍃🍃

गीत -ना. धों. महानोर, संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर, स्वर – लता मंगेशकर

ना. धों. महानोरांचे एक वैशिष्ट्य- यांच्या कवितेला निसर्ग, खेडे, शेत, पाऊस, पीकपाणी इ. यांतून बाहेरच पडता येत नाही. स्वत: कवीलाही आणि म्हणून वाचकालाही. खेड्याचे दु:ख ते कवीचे दु:ख, ओल्या जमीनीचा आनंद तो ह्याचा आनंद, शेताचे सृजन ते ह्याचे सृजन !
कवी काव्य का लिहतो? “अनुभवांच्या अभिव्यक्तीची आंतरिक निकड” हा एक निकष मानला तर समजणे थोडे सोपे जाईल. हा कवी खेडेगावात जन्मला, शेतकरी म्हणून वाढला. कविता लिहिल्या, विधान परिषदेत गेला, तरी शेतकरीच राहिला. त्यामुळे सगळे अनुभव या गोष्टींशीच निगडित. हा लळा इतका गाढ कीं कवी व निसर्ग एकरूपच होऊन गेले आहेत असे वाटावे. दोन उदा. बघून मग वरील कवितेकडे वळू.

(१) या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे
(२) ज्वार उभार, गर्भार, हिरव्या पदराला जर, निर्‍या चाळताना वारा घुसमटे अंगभर.

पहिल्यात मेघांनी भुईला दान दिले व पाणी कवीच्या डोळ्यांत आले तर दुसर्‍यात ज्वार गर्भार ! माणुस निसर्गात व निसर्ग मानवात एकरूप होऊनच कवितेत येतात. या वर जरा जास्त लिहावयाचे असल्याने येथे थांबू व कवितेकडे वळू.
घन ओथंबुन आल्यावर प्रथम कवी वनात बघतो, मग आजुबाजुला नदीनाल्यात व शेवटी शिवारात.. एकदा कावळे, कबुतरे व पोपट कसे उडतात ते बघाच व मगच ‘घिरघिरती’ याचा आनंद लुटा. पंखांवरचे पाणी झाडावर झडझडते यात ‘झ’ व ‘ड’ याची पुनरुक्ती महत्वाची नाही, जोरदार पावसात झाडाखाली भिजण्याकरिता उभे रहा व झडझडणारे पाणी उपभोगा.
आता हा पाऊस नदीत पडतो आहे. त्याने नदीला सागरभरती आणली, नदी ही सागरासारखी झाली आहे आणि लाटा डोंगरलाटा झाल्या आहेत. मला पहिल्यांदी ही अतिशयोक्ती वाटली पण या पावसाळ्यात नदीत बोट उलटी होऊन ३६ स्‍त्रीया बुडल्याचे वाचून या डोंगरलाटांची कल्पना आली. नदीवर पाणी भरावयाला जाण्याच्या वाटा आता वाटा रहिल्या नाहीत, ते ओसंडून वाहाणारे ओढे झाले आहेत. रोजची पायाखालची वाट पाण्याने वेढली नाही, तीच्यांबरोबर हीही वेढली गेली आहे. निसर्गाबरोबरची समरुपता तीलाही संगतीने घेऊन जात आहे.
खरी बहार तिसर्‍या कडव्यात आली. शिवारातल्या फुलांतले केसरच ओले झाले असे नव्हे; ही भिजली व तीला आठवण कसली झाली? छेलछबिल्या, साजणाची. जरा आडोशाला बिलगणार्‍या साजणाची. आणि इथे हा घनच साजण झाला आहे. खरा रसिक दिसतो नाही? (तेच पुरुष भाग्याचे !)
कवितेत निसर्ग व माणुस आपापल्या भुमिका कशा सहजतेने बदलतात पहा. लयही नैसर्गिक आहे.
(संपादित)

संकलन:अनिल कुमकर

****************

२३. कृ. ब. निकुम्ब

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात…
एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कविवर्य कृ. ब. निकुम्ब यांची आज जयंती .
डॉ संध्या देशपांडे यांनी पुढारी मध्ये त्यांचे बद्दल लिहिलेला लेख तुमच्यासाठी —-
‘घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात…’ असे हळूवारपणे लिहिणारे कृ. ब. निकुम्ब जितके कवी म्हणून प्रसिद्ध होते तितकेच एक गुरु म्हणूनही फार मोठे होते.
सर त्यावेळी लिंगराज कॉलेजमध्ये ‘साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय’ हा विषय समरसून शिकवायचे. शिकविण्याच्या ओघात कितीतरी कवींच्या कविता सहज म्हणायचे. प्रत्येक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा सर प्रयत्न करायचे. त्यांच्या व्याख्यानातून विद्वतेचा फार मोठा ओघ विद्यार्थ्यांच्या काळजापर्यंत पोहोचायचा. कितीतरी कविता, ज्ञानेश्‍वरी सरांना पाठ होती. गर्व, अहंकार यापासून लांब राहून विद्यार्थ्यांत मिसळून सर समजावून द्यायचे. काही वर्षांपूर्वी आही ‘शब्दगंध’ कवी मंडळाची स्थापना केली. त्यावेळी सर आवर्जुन उपस्थित राहिले आणि बेळगाव भागात साहित्यिक चळवळ चालू केल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले. गुरूपौर्णिमेदिवशी आम्ही त्यांच्या घरी जात असू. सर आपल्या विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद द्यायचे. काहीतरी गोड खाऊ घालायचे. आज गुरुपौर्णिमा असूनही सर आमच्यात नाहीत. त्यामुळे आठवणी दाटून येतात. पण सरांच्या साहित्यातून सरांचे प्रेमळ आशीर्वाद सतत पाठराखण करत राहतात, याचे समाधान वाटते.
अभिवादन

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात !
“”सुखी आहे पोर””- सांग आईच्या कानात
“”आई, भाऊसाठी परि मन खंतावतं !
विसरली का ग भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं.
फिरुन-फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो.
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार !
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय… !””
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !”

२४. गुरु ठाकूर

गुरू ठाकूर: मराठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गुरु ठाकूर यांनी स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा, संवाद लेखक, गीतकार अशी चौफेर मुशाफिरी केली असून त्यांतल्या प्रत्येक क्षेत्रात लोकप्रियतेसोबत त्या त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्तम छायाचित्रकार, अभिनेता आणि कवी म्हणूनही त्यांनी स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे.

तू बुद्धि दे तू तेज दे

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे

जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धमण्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

गीतकार : गुरु ठाकूर, गायक : विभावरी आपटे, संगीतकार : राहुल रानडे , गीतसंग्रह/चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)

. . . . . . आंतर्जालावरून साभार.

२५. शंकर वैद्य

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गतजन्मीची खूण सापडे ओळखले का मला असे सुंदर गीत रचणाऱ्या कविवर्य शंकर वैद्य यांचे आज पुण्यस्मरण.
त्यांचा जन्म: ओतूर (पुणे जिल्हा), येथे १५ जून १९२८ रोजी झाला ; (मृत्यू : मुंबई, २३ सप्टेंबर २०१४) ते समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही सर्वपरिचित होते
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर २७ वर्षांनी त्यांचा ‘दर्शन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.
कवी कुसुमाग्रजांच्या निवडक कविता असलेल्या ’प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहाचे, आणि कवी मनमोहन यांच्या कविता असलेल्या ’आदित्य’ या काव्यसंग्रहांचे संपादन शंकर वैद्य यांनी केले होते.

त्यांची गाजलेली गीते
आज हृदय मम —– रिमझिम चाले तनमन ओले——-वाळवंटांतून भीषण —— शतकांच्या यज्ञातुन ——– स्वरगंगेच्या काठावरती


स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला
वदलीस तू, मी सावित्री ती
शकुंतला मी, मी दमयंती
नाव भिन्‍न परि मी ती प्रिती
चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला
अफाट जगती जीव रजःकण
दुवे निखळता कोठुन मीलन
जीव भुकेला हा तुजवाचुन
जन्मांमधूनी पिसाट फिरता, भेट घडे आजला!!

२६. स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती त्यांच्यावरील दोन लेखांमध्ये दिली आहे. त्यांनी रचलेले एक प्रसिद्ध गीत आणि एक नाट्यगीत खाली दिले आहे.

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

🌹⚜️🌸🇮🇳🙏🇮🇳🌸⚜️🌹

शतजन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थानबद्धतेत असताना अनेक नाटके लिहिली, त्यातील सन्यस्त खड्ग हे नाटक ९० वर्षापुर्वी १८सप्टेंबर१९३१ रोजी बळवंत संगीत मंडळींनी रंगभूमीवर आणले. त्यातील काही गीते त्यांनी लिहिली होती त्यातील शतजन्म शोधिताना शोधिताना हे एक नाट्यगीत . भैरवी रागात असून ते वझेबुवांनी संगीतबद्ध केले होते. मास्टर दीनानाथ, पंडित वसंतराव देशपान्डे तसेच प्रभाकर कारेकर यांनी ते गायले . याखेरीज या नाटकातील आणखी सहा गीतेही त्यांनीच लिहिली होती .
शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥
हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥
. . . . . नवी भर दि.२५-०९-२०२१