पुलस्मरण

स्व.पु.ल.देशपांडे यांच्या जन्माचे शतसांवत्सरी वर्ष सुरू झाले आहे. या कालावधीत आंतरजालावर आणि वॉट्सअॅपवर सहज सर्वांना उपलब्ध होत असलेले त्यांच्यासंबंधीचे लेख आणि व्यंगचित्रे यांचे संकलन या पानावर करणार आहे. मी सर्व मूळ लेखकांचा मनापासून आभारी आणि ऋणी आहे आणि त्यांच्या अनुमतिची याचना करत आहे.

शाळेत शिकत असतांनापासूनच मला पु.ल.देशपांड्यांचे विनोदी लेखन अतीशय आवडत होते. कॉलेजात असतांना त्यांची नाटके पाहिली, पुढे त्यांचे ‘बटाट्याची चाळ’ आणि ‘वाऱ्यावरची वरात’ सारख्या सबकुछ पुल कार्यक्रमांचे प्रयोग पाहिले, गुळाचा गणपतीसारखे जुने चित्रपट पाहिले आणि माझ्या मनातली त्यांच्याबद्दलची भक्ती वाढतच गेली. माझ्यासाठी ते फक्त लेखक आणि कलाकार नव्हते तर माझ्या पिढीमधल्या मध्यमवर्गीयांसाठी मार्गदर्शक होते. जीवन कसे जगायचे असते हे त्यांनी आम्हाला शिकवले.

या स्थळावरील लेख

१. नवरा आणि नारळ – कसे निघतील कोण जाणे!
२. बदललेल्या परिस्थितीतली पुलंची पात्रे
३. अखेरचा अध्याय – एक श्रद्धांजलि
४. पुलंनी लिहिलेल्या पुस्तकांमधील वाक्यांवर काढलेली व्यंगचित्रे

नवी भर……..
५. मासे, भात आणि निर्वाण
६. बसण्याविषयी थोडेसे
७. पुलंचे पन्नास विनोद … दि.२०-१२-२०१८
८. कपड्यांच्या दुकानातले नोकर … दि.२२-१२-२०१८
९. विनोदबुद्धी …. दि. १३-०१-२०१९
१०. पुलोत्सव : शिक्षणविवेक मासिकातली लेख माला … दि.३०-०१-२०१९
११. पु.ल. आणि वारा …… दि.०५-०४-२०१९.
१२. एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत! … दि.१६-०५-२०१९
१३.पुलंचा संक्षिप्त परिचय … श्री. माधव विद्वांस .. दि. १२-०६-२०१९
१४. पुलंचे लतादीदींना लिहिलेले पत्र  दि. ३०-०९-२०१९
१५. पुलंचं वेगळेपण  …. अमोल दांडेकर दि. ०८-११-२०१९
१६. पुलंचे निवडक वेचे    दि. ०८-११-२०१९
१७. पुलोपदेश – नवविवाहित पतीसाठी दि. १३-११-२०१९
१८. पुलंच्या साहित्यामधील निवडक वाक्ये   … दि. १२-०६-२०२०
१९. पुल आणि सुनीताबाईंचे लग्न, केवळ आठ आण्यात … दि. १२-०६-२०२०
२०. पुलंच्या हस्ताक्षराचा फाँट … दि.१४-६-२०२०
२१. श्री.उमाकांत व रमाकांत देशपांडे यांची मुलाखत  … दि. १५-०७-२०२०
२२. गवय्या होते होते  … दि.१८-१०-२०२०
२३. पुलं आणि सुनीताबाई यांच्या आठवणी … सुभाष अवचट  … दि.२८-०१-२०२१
२४. चाळीची साठी . . . सुनील शिरवाडकर  … दि.१६-०४-२०२१
२५. लोक मात्र हसायला हवेत … पुलंचा किस्सा … दि.१०-०६-२०२१
२६. पुलोत्सव .. . . शरद पांडुरंग काळे … दि. १४-०७-२०२१ 
२७. असा मी असामी  . .  पुलं काय म्हणतात? . .  दि.२०-०८-२०२१
२८. एक शून्य मी . . . पु.ल.देशपांडे दि. २१-१०-२०२१ 
२९. व्यक्ती आणि वल्ली .. बुकगंगा.कॉम   दि. ९-११-२०२१
३०. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व .. माधव विद्वांस  दि.९-११-२०२१  
३१. बाबासाहेब पुरंदरे   …  पु.ल.देशपांडे     दि. १७-११-२०२१
३२. मा.बाळासाहेब ठाकरे आणि पु.ल. यांची ती भेट  दि. ०९-०२-२०२२
३३. आठवणींचा जागर  … दि.१६-०६-२०२२

 

या ब्लॉगवरील खालील लेखसुद्धा पु.ल.देशपांडे यांच्या संबंधीचे आहेत. त्यांच्या लिंक्स दिल्या आहेत.
१. पुलंचे उपदेशपर पत्र
https://anandghare.wordpress.com/2013/03/08/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/
२. देशपांडे (पु.ल) ऑन देशपांडे (वसंतराव)
https://anandghare.wordpress.com/2018/09/09/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A4%B2-%E0%A4%91%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/
३. खाण्यातली खानदानी मजा
https://anandghare.wordpress.com/2018/09/10/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81/
४. आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे
https://anandghare.wordpress.com/2011/07/09/%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA/

५. अमृतयोग – पुल, गदिमा आणि बाबूजी यांची गीते आणि पुलंचे लेखन यांचे संकलन – दि.२६-०५-२०१९      https://anandghare.wordpress.com/2019/05/26/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/

६. पु.ल.देशपांडे स्मृतिदिवस http://anandghan.blogspot.com/2008/07/blog-post_4322.html

७. हे सदरसुद्धा वाचण्यासारखे आहे : पुलंच्या नावाने काही पण
https://anandghare.wordpress.com/2019/08/14/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a3/

 

१. नवरा आणि नारळ 😁

(स्व.पु.ल.देशपांडे. यांच्या नावासह हा लेख वॉट्सअॅपवर प्रसारित झाला आहे, पण मला तो नक्की कोणी लिहिला आहे किंवा कोणत्या पुस्तकातला आहे याचा संदर्भ माहीत नाही.)

नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची.
बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही. दोन्हीही कसेही निघाले तरी ‘पदरी पडले, पवित्र झाले’.
दोघांनाही देवघरात स्थान, दोघेही पूज्य.

पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासीअण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे.
हल्ली ऑन लाईन साईटवर सगळ्या किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात.

नारळ म्हटलं कि मला धडधडतं. चांगला ओळखायचा कसा ?
मी उगाचच कानाजवळ नेऊन हलवून वगैरे बघत असे.

अण्णाला कळायचं हे गिऱ्हाईक  नवीन आहे. तो आपली जाड पितळी आंगठी दोन तीन नारळावर टांग टांग वाजवून
हातात एक नारळ द्यायचा.  ये, लो ! म्हणायचा.

मी विचारायचो ‘खवट’ निकलेगा तो ?

तो म्हणायचा ‘तुम्हारा नसीब !!’
आजी म्हणायची नारळ गोड निघाला तर दडपे पोहे, सोलकढी व खोबऱ्याच्या वड्या आणि काय काय !

खवट निघाला तर पाण्यात उकळून  वर तरंगणारं कच्च तेल बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं.
कापलं, भाजलं, ओठ फुटले, टाचाना भेगा पडल्या, केसांना लावलं, थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात टाकलं,
उत्तम घरगुती औषध. किती उपयोगी .. किती बहुगुणी !!
थोडक्यात काय,
नवरा काय ? नारळ काय ? गोड निघाला तर नशीब, खवट निघाला तर उपयोगी,
हे कोकणी तत्त्वज्ञान. ह्याला जीवन ऐसे नांव !!

– पु ल देशपांडे

ता. क.  या मध्ये नवरा या ठिकाणी बायको लिहून ही वाचू शकता. सारखाच आनंद मिळेल!
——-

बालपण

वरातीच्या बँडचा आणि विमानाचा आवाज आल्यावर ज्याला धावत जाऊन बघावसं वाटतं नां,
त्यातलं बालपण अजून जिवंत आहे!

-पु.ल.

😂😂😂😂
*मराठीला जी “मज्जा संस्था” वाटते
ती इंग्रजीला “नर्व्हस सिस्टीम” वाटते.
दृष्टीकोनातला फरक दुसरं काय?*😄

….. पु. ल. देशपांडे
————————

 

२. बदललेल्या परिस्थितीतली पुलंची पात्रे

बटाट्याची चाळ आता जमीनदोस्त झाली आहे.

त्रिलोकेकर, सोमण, गुप्ते यांच्या पुढच्या पिढ्या आता स्वतःच्या गाड्यांनी फिरू लागल्या आहेत.

असामी असा मी मधले गिरगांवातले रस्ते आता भलतेच रुंदावले आहेत. हातात जीपीएस फोन आणि गुगल मॅप्स आल्यामुळे बेंबट्या आता भर उन्हातान्हात पत्ता शोधत फिरत बसत नाही, मॅप लावून झटदिशी डेस्टिनेशन गाठतो.

लग्नातल्या जेवणावळी, श्लोक, आहेर कधीच इतिहासजमा झाले आहेत. नांव घेणं मात्र नाममात्र उरलं आहे.

कोकणातल्या अंतू बर्वा सुद्धा तब्येतीन् चांगलाच सुधारला आहे आणि विचारांनीही.

मुलाच्या घरची सगळी अपसव्य त्याला आता मान्य झाली आहेत, ना जातीची ना पातीची सून त्याची चांगली काळजी घेते आहे.

नामू परटान् आता लौंड्रि घातली आहे, आता तो स्वतःचे कपडे वापरतो आणि दुसरी कसली भट्टी पण लावत नाही.

नारायणाने पण आता नसते उद्योग करायचे सोडून आपल्या कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, त्याचा मुलगा आता लग्नात फुल चड्डी आणि टाय घालून बुफे घेत असतो आणि नारायण देखिल त्याला एटिकेट्स शिकवित असतो.

हरितात्यांनी आता इतिहासातल्या गोष्टींचं पुस्तक लिहिलं आहे, त्यांना आता आजोबांनी पुरवलेल्या भांडवलावर बुडित धंदे करायची आवश्यकता राहिली नाही.

लखू रिसबुड आता चांगलाच सुधारला आहे, त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यात सोन्याची जाड साखळी आली आहे. कुणाच्या बातम्या देऊन फायदा होईल हे त्याला चांगलेच उमगले आहे.

आता लखू शब्दकोडी लिहित नाही, मोठं मोठ्या नेत्यांना आपल्या लेखांतून कोडी घालतो आणि ती कोडी सोडविण्याची बक्षिसं देखिल पटकावतो.

सखाराम गटणे आता कॉम्प्युटरच्या भाषा शिकतो, त्याला सुवाच्य हस्ताक्षराची आणि नितीमत्तेची आवश्यकता उरली नाही. कॉम्प्युटरच्या अनेक भाषांत पारंगत झाल्यामुळे त्याची साहित्याची आवड पार मागे पडली.

नंदा प्रधान पहिल्या पासून जरा फॉरवर्डच होता, त्यानेही तीन ब्रेकअप्स नंतर आता लॉंगटर्म रिलेशनशिप करण्यात सक्सेसफुल झाला आहे.

नाथा कामत मात्र आहे तसाच राहिला आहे, त्याचा बुजरेपणा कधी जाईल देव जाणे.

बबडू आता राजकारणात शिरला आहे, तो कुठलातरी महापौर वगैरे झाला होता, पहिल्यापासूनच लटपट्या होता तो, कुठल्या युनिव्हर्सिटीचा चॅनसेलर सुद्धा झाला तर मला नवल वाटणार नाही.

पेस्तनकाका आणि काकी मात्र हल्ली दिसत नाहित आणि कधी दिसलेच तर ते १००% वाटत नाहित.

नाही म्हणायला चितळे मास्तर हरवल्याची खंत मात्र हृदयात बोचते.

ऑनलाईन टीचिंग, टेस्ट सिरीज, प्रोफेशनल टीचिंगच्या या जमान्यात संस्कार पेरणारे मास्तर मात्र हरवलेले आहेत.

भगवद्गीता पाठ न करता त्यातले तत्व जगणारे काकाजी आता सापडेनासे झाले आहेत, पण आचार्यांचा वेश चढवून गीता मुखोद्गत करून नाही ते धंदे करणारे बोगस आचार्य फोफावले आहेत.

दोन तत्वांचा वाद त्यांच्यातल्या प्रामाणिकपणाबरोबरच मिटलाय आणि फक्त ऐहिक सुखांचा पाठलाग सुरू राहिला आहे.

पुलंनी लिहिलेल्या एक एक व्यक्तिरेखा हा बदलणाऱ्या संस्कृतीचा प्रवास सांगणाऱ्या होत्या.

त्यांनी लिहिलेली बटाट्याची चाळ आणि असामी असा मी हे बदलत्या सामाजिक जीवनाचे प्रवासवर्णनच होते. त्या संस्कृतीमध्ये एकेकाळी पुरता मिसळून गेलेल्या मला, आज मागे वळून बघताना ती संस्कृती अनोळखी वाटू लागली आहे आणि माझ्या मुलांकडे बघितल्यावर असे जाणवू लागते कि आज मी स्वीकारलेली हि आधुनिक संस्कृती सुद्धा फार वेगाने कालबाह्य होत चालली आहे.

पुलंनी हा बदल त्यांच्या लिखाणातून नेमकेपणाने दाखवला. बदलत्या काळाची पाऊले कशी ओळखायची आणि त्या नव्या काळाचं हसतमुखाने स्वागत कसं करायचं हे पुलंनी आम्हाला शिकवलं.

काळ बदलला, संस्कृती बदलली, वेशभूषा बदलली, आर्थिक स्थिती बदलली तरी माणूस तोच आहे.  त्या बदललेल्या वेष्टणातला माणूस वाचायला पुलंनी आम्हाला शिकवलं.

भले त्यांच्या व्यक्तिरेखा जुन्या झालेल्या असोत किंवा त्यांची विचारसरणी आज पूर्णपणे बदललेली असो, पुलंनी टिपलेली त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अमर आहे. नितळ मनानं केलेलं ते समाजाचं निरीक्षण आहे.

पुलं आज असते तर शंभरीत पदार्पण करते झाले असते, आणि आज बदललेल्या सुशिक्षित आणि श्रीमंत समाजाचीही त्यांनी तितक्याच कुशलतेने दाढी केली असती.

पुलंनी आम्हाला जगण्याची दृष्टी दिली, संगीताचा कान दिला, राजकारण्यांच्या भाषणातला आणि कृतीतला फरक हि दाखवून दिला.

आणीबाणीत वागण्यातला निर्भयपणा आणि सच्चेपणा दाखवून दिला.

खऱ्या अर्थाने आयुष्य बुद्धिनिष्ठ विचारांनी आणि प्रामाणिकपणे जगलेला मराठी साहित्यिक असे मी त्यांना म्हणेन.

त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणाचा संपूर्ण वेध घेणे हे माझ्या बुद्धीच्या पलीकडले असले तरी माझ्या क्षीण बुद्धीला त्या ज्ञान समुद्रातल्या खजिन्याचे जेवढे दर्शन घडले त्यातील थोडेफार मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.

या व्यतिरिक्त त्यांची प्रवास वर्णनं, नाटकं, पुरचुंडी सारखे लेख, गोळाबेरीज, हसवणूक सारखी पुस्तकं, भाषांतरं, चित्रपट पटकथा लेखन, दिग्दर्शन, एकपात्री प्रयोग, कथाकथन, मराठी साहित्याचा गाळीव इतिहास यासारखी विनोदी शैलीत लिहिलेली विद्वत्ता पूर्ण पुस्तकं, इत्यादी साहित्याचा आणि अंगभूत कलेचा वेध घेण्यासाठी एखाद्यास त्यांच्या साहित्यात डॉक्टरेट केले तरी आयुष्य कमीच पडेल यात काहीच शंका नाही.

या आमच्या आयडॉलला लक्ष लक्ष प्रणाम.

~ विनय भालेराव.
————————————-

३.       पु.ल. – अखेरचा अध्याय

पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक सुरेख लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख.
यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा ‘घाट’ घातला. (अलीकडे ‘वळण’ जरी ‘सरळ’पणाकडे ‘झुकत’ असलं, तरी ‘घाटा’चा ‘कल’ मात्र अजूनही अवघडपणाकडेच आहे हे यावेळी माझ्या लक्षात आलं.) हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो…
पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली ‘ओ दूर जानेवाले’ ची रेकॉर्ड आठवली.

हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला ‘मेडिकल लँग्वेज’ म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच ‘जवळून’ जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) …
त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.

अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं, बसत होतं – एवढ्यात नकळतपणे – मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची ‘बातमी फुटली’! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे जेवढं खरं आहे तेवढंच ‘व्यक्ती तितके सल्ले’ हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना ‘एका व्यक्तीमागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती’ अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) लोकांचे सल्ले मात्र चालूच होते… ‘स्वस्थ पाडून राहा’, ‘विश्रांती घ्या’ इथपासून ‘पर्वती चढून-उतरून या’ इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं ‘सिंहगड’सुद्धा सुचवला!) ‘प्राणायाम’, ‘योगासनं’ पासून ‘रेकी’पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा ‘मसाज’, ‘मालिश’ असे शब्द उच्चारले, तेव्हा मात्र डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.

हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!… मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली… अशा विचारांतच मला झोप लागली…मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! (अगदी ‘बटाट्याच्या चाळी’च्या कार्यक्रमाच्या वेळेची लोकांची कुरकुरही बटाट्याच्या चाळीबद्द्ल नसून बटाट्याच्या वेफर्सची आहे हे जाणून घेतलं होतं मी!) आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत?

नव्हतं सहन होत मला हे. (आणि त्यांनाही.) मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते! की कळूनही उपयोग नव्हता?… ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले… अगदी कायमचेच…

आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील… अगदी कायमचीच….
**

लेखक – कुमार जावडेकर
——————————————————–

४. व्यंगचित्रे

स्व.पु.ल देशपांडे यांनी लिहिलेल्या वाक्यांवर दोन व्यंगचित्रकारांनी काढलेली व्यंगचित्रे खाली दिली आहेत.

WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.02

 WhatsApp Image 2018-11-09 at 10.19.56

-वाढदिवस-

—————————————————————————————————————————-

WhatsApp Image 2018-11-09 at 10.19.57(1)


WhatsApp Image 2018-11-09 at 10.19.57


WhatsApp Image 2018-11-09 at 10.19.58


WhatsApp Image 2018-11-09 at 10.19.59


WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.00


WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.01


WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.05


WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.07

म्हैस


WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.09


WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.11

पुणेकर


WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.12

मुंबईकर 


WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.13

आणि  …. नागपूरकर

————————————————————————

WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.14(1)


WhatsApp Image 2018-11-09 at 10.20.14

पेस्तनकाका


WhatsApp Image 2018-11-09 at 10.25.06

रावसाहेब

————————————————————————————————————————————-

WhatsApp Image 2018-11-09 at 10.25.07(1)

सखाराम गटणे

————————————————————————————————————————————–

WhatsApp Image 2018-11-09 at 10.25.07

माझा शत्रुपक्ष ….. पुण्यात  घर बांधणारा आणि वीट आणणारा

——————————————————————————————

WhatsApp Image 2018-11-09 at 10.25.05

—————————————————————————————————————————————–

 

५.मासे, भात आणि  निर्वाण

फक्त #पुल असे लिहू शकतात: ……………..✍🏻

माझी सुखाची कल्पना एकच आहे…
आदल्या रात्री चार-साडेचार वाजेपर्यंत गाण्याची मैफल रंगलेली असावी…
.सकाळी दहा वाजता उठून दोन वेळा चहा झालेला असावा…
.हवा बेताची गार असावी…
.हातातली एखादी, लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी…
.ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा-साडेबारा व्हावे…
.आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साद घातल्यासारखा स्वाद घालावा…
.दोन मिनिटांत आंघोळ उरकेपर्यंत पाने मांडली जावी…
.आणि क्षणार्धात आंबेमोहोर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे…
.यथेच्छ भोजन व्हावे…
.मस्त पान जमावे…इब्राहिमी जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा…
.गार पाणी प्यावे…आणि
.संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणीही झोपेतून उठवू नये!
.कधी कधी देवाजी करूणा करतो, आणि असे घडतेही.
.त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की, संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस नवर्‍यासारखा फिरायलादेखील जातो; विश्वास ठेवा अगर ठेवू नका, तिला वेणीदेखील घेऊन देतो!
.
बुद्धाला ही सुखाची किल्ली सापडती, तर तो निर्वाणाच्या मागे लागला नसता.
.बोधिवृक्ष कधी घरातल्या, तर कधी बाजारच्या चुलीजवळ आहे, हे शुद्धोधनाचा मुलगा असूनही त्याला कळले नाही.
.कसे कळावे? त्या बिचार्‍याने सेकंड लॅंग्वेज पाली घेतली होती, आणि ‘ओदन’ म्हणजे ’भात’ हे संस्कृतात आहे, पालीत नसावे!
.ते कळते, तर भाताचा ढीग आणि बांगड्याची आमटी ओरपीत तो ’मत्स्यं शरणं गच्छामि’ म्हणत म्हणत निर्वाणाप्रत पोहोचला असता!

.पु. ल. देशपांडे…….………………………


६.बसण्याविषयी थोडंसं

पुल बलणे

 

७. पुलंचे पन्नास विनोद …

(दि.२०-१२-२०१८.)

पु ल देशपांडे यांचे म्हणून त्यांच्या नावाने अनेक विनोद प्रसारित होत असतात. त्याले किती खरे आणि किती खोटे कुणास ठाऊक ! त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने कुणी तरी वॉटसॅपवर पन्नास विनोद पसरवलेले होते. त्यात निदान दोनशे तरी व्याकरणाच्या चुका होत्या आणि काही पुनरुक्ती होती. त्यातल्या जमतील तेवढ्या चुका दुरुस्त करून मी ते विनोद जसेच्या तसे खाली दिले आहेत.

१) त्यांच्या ओळखीच्या एका मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले “बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो”.
__________________

२) माहेरचा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले ‘हिने तर वर्मावरच घाव घातला’ .
__________________

३) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले, तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, “हा माझा मित्र शरद तळवलकर”
“हो का? अरे व्वा!” पु.ल म्हणाले होते, “चांगला मनुष्य दिसतो! नव्हे, हा चांगलाच असरणार!” “हे कशावरून म्हणतोस तू?” वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं. “अरे, याच्या नावावरून कळतेय ते!” पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!”
__________________

४) पु.लं.च्या “उरलंसुरलं” ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद – ” मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणाऱ्यांचा आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ‘प्लीज जरा मोठ्याने बोलता का?’ असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ.”
__________________

५) पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा वर्षाचे असताना लोकमान्य सेवा संघात साहीत्य सम्राट न.चि. केळकराचं व्याख्यान होतं. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती. त्या काळी भारतानं फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालू होती. शाळकरी पुरुषोत्तम उभा राहीला आणि त्यानं तात्यासाहेबांना फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला. त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. “स्वीकारू नये, पण राबवावं” यावर पुरुषोत्तम म्हणाला, “मला आपलं उत्तर कळलं नाही.” तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, “बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा.”
ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला, “पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे”
तात्यासाहेबांचं काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.
__________________

६) एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. “तुमच्या घरी काय, तुम्ही आणि सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार”. ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले. “तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवारीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?”
__________________

७) पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात. ‘आनंदवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती. समोरच्या पंगतीत
‘किर्लोस्कर’ मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते. मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या कॅमेऱ्यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांचं पान गेलेलं. त्यांची शोधक नजर पाहून पु.ल. लगेच उद्गारले, “मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये.”
__________________

८) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “रेडिओवरच्या मराठीतून ‘अमूक वृत्त पोलीस सूत्रांनी दिले’ असं मी
जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससूत्र हे काय प्रकरण आहे, ते मला कळेना! आता कळलं. ‘सूत्र’ हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतून ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकाला काय पोलिसांनी पकडलं
असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडून एखादी बातमी कळली, तरी ती ‘मंगळसूत्रा’कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!”
__________________

९) माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखत घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखत ऎकत होते. हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, “तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?”
लग्नाला खूप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या. ते पाहून पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्तपणे मोठ्यानं म्हणाले, “अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या ‘वर्मा’वर नको रे बोट ठेवूस!”
__________________

१०) कोल्हापूर आणि तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सांगताना ते म्हणाले, ‘इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगाऱ्याचा नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊंस लावला’ याच इंग्रजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ‘He applied U’S In his farm असं केलं
होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं ‘यू’ वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.
__________________

११) एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पातळाऎवजी पु.ल. चे ‘हसवणूक’ हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, ‘प्रिय _हीस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पातळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द
हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच_!’ त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेट पु.ल.कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाक्ष्ररीनिशी त्याला समजावले, ‘आपल्याकडे नवऱ्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!”
__________________

१२) नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, ‘मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, ‘पोरांनो लिवा.कयाssssळs!’
__________________

१३) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काही कारणास्तव हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ते ऎकताच पु.ल. उद्गारले, ‘त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता ‘गर्वसे कहो, हम हिंदुजा में है’ असं लिहायला हरकत नाही.’
__________________

१४) साहित्य संघात कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल.ना आर्वजून बोलावले होते. नाटकाचा पहिला अंक चालू असतांनाच काहीतरी पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल.ना म्हणाला, ‘काय पडलं हो? ‘
‘नाटक. दुसरं काय?’ पु.ल. उत्तरले.

१५) कोल्हापूरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मैत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सांगत होती, काय सुंदर सुंदर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात? अप्रतीम नमूने आणि सूंदर कलाकुसर, अन् भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की
दुसरं काहीच घालायला नको.’ हे ऎकत जवळपास असलेले भाई मिश्कीलपणे हळूच म्हणाले, ‘खरं सागंतेस की काय?’ क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर मैत्रिणीची लाजून व आमची हसून मुरकुंडी वळली.
__________________

१६) ‘वैद्यकातली एकच गोष्ट या क्रिकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चूर्ण व्हावे. पोट साफ.’ – इती पु.ल.
__________________

१७) एकदा वसंतराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले “ही मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे’. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले ‘म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!
__________________

१८) एकदा आपली आणि सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की “मी ‘देशपांडे’ आणि ह्या ‘उपदेशपांडे”
__________________

१९) एकदा एका भोजन समारंभात पु.लं.च्या एक बाजूला श्री ना.ग. गोरे आणि दुसऱ्या बाजुला श्री भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, “आफतच आहे. एकीकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!”
__________________

२०) एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मिळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या. सुनिताबाईंचा ‘सर्व काही जपून ठेवण्याचा ” स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली ” अगं, एवढा सुंदर सेट फुटू नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?” त्यावर पु.लं. पटकन म्हणाले “हो तर !! सुनीता मला कधी ऑमलेट सुद्धा करुन देत नाही … अंडी फुटतील म्हणुन !!!”
__________________

२१) पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले. हे बघून व्यापारी म्हणाला “काय राव, काय झाले येवढे”? पु.लं. म्हणाले,
“बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही” घरात हशा पिकला होता !
__________________

२२) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यांना कोणीतरी भेटला, तो त्यांचा चाहता होता. तो म्हणाला की माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे, एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही. माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वराच्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय. तर पु.लं. म्हणाले “अहो असं काही करु नका नाहीतर लोक विचारतील, ज्ञानेश्वरांनी ज्याच्या कडुन वेद म्हणवून घेतले तो रेडा हाच का म्हणून?”
__________________

२३) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगितले. दुकानातील व्यक्ती म्हणाली “खोक्याचा चार्ज पडेल”. त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), “अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?”
__________________

२४) एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंना दिलेल्या खुर्चीवर ते बसताच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली. ओशाळलेले
प्रिन्सिपल पुलना म्हणाले, “माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही.” पुल मिश्किलीत म्हणाले, “अहो करवत (!) नसेल”
__________________

२५) डॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक यांना त्याच्या विवाहानिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र. “आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा. सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता.”
__________________

२६) स्वत:च्या खास विनोदी पद्धतीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात,” मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे”
__________________
२७) आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले,” या घरात मी तेवढा देशपांडे आहे. तू ’उपदेश-पांडे’ आहेस.”
__________________

२८) भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसिध्द विनोदी कलाकाराची कन्या. त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणि दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते! त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तिला पाहिले तेव्हा म्हणाले “ही मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!”
__________________

२९) पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य निर्मिती केली आहे. नंतर त्यांच्याकडें बघत ते पुढे म्हणाले “सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मितिस काय कमी?”
__________________

३०) पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले,” मी कुठल्याही समारंभाला ‘बो’लावल्याशिवाय जात नाही.
__________________

३१) एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले,” आता मला कळले, पायांना पाव का म्हणतात ते!”
__________________

३२) पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले “अगदी बरोबर नाव
ठेवले आहे, भानुविलास!”
__________________

३३) ‘वाऱ्यावरची वरात’चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले…
‘प्रयोग संपेपर्यंत थांब!’ लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, ‘उद्या याची ‘वरात’ निघणार आहे, पण तो आजच
‘वाऱ्यावर’ स्वार होऊन आला आहे’…आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
__________________

३४) पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळी निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश
माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग . महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्रसंचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही
कुणी काही कार्यक्रम सुचवले. पु.ल. म्हणाले “गांधीजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये.” यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.
__________________

३५) एकदा एक ‘कदम’ नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले…..पु लं नी आशीर्वाद दिला ……. ‘कदम कदम बढाये जा’
__________________

३६) सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून “पुलं’ म्हणतात,
“त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।’
__________________

३७) एका संगीत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता. ’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशिवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकऱ्याला विचारलं “काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?” त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला “या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।”
__________________

३८) काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं. गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदूषणात भर घालणारी गाणी ऐकून ‘ पुलं ‘ गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले, ‘ आजकाल
मला आपला गणपतीबाप्पा ‘ गणपतीपप्पा ‘ झाल्यासारखा वाटतं
__________________

३९) आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले, ‘ मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच’ असे शब्द
आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !’ पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ‘ त्यांना आता कंठ फुटला आहे ‘ असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते. त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ‘ गळा
यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !
__________________

४०) एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं. प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ? एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता. तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं
नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ‘ हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले… ‘ पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ‘अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ‘अवतार’ ध्यान का म्हणतात, ते समजलं.
__________________

४१) एकदा पुलं गोव्याहून पुण्याला मोटारनं येत होते. त्यांच्यासोबत वसंतराव देशपांडे आणि सुनीताबाई होत्या. वाटेत एक जंगल लागलं. जंगलाच्या आडवळणावर एक महाकाय बायसन (गवा / रानरेडा) त्यांच्या गाडीसमोर आडवा आला. रानरेडा हा महाशक्तिशाली आणि आक्रमक प्राणी ! त्यानं धडक दिली तर ट्रकही आडवा होईल. तिथं फिअॅट गाडी काहीच नाही. एक अर्थानं समोर प्राणसंकटच उभं ठाकलेलं. प्राणभयानं घाबरुन गेलेले वसंतराव देशपांडे पुलंना हळूच म्हणाले, ‘ भाई ही इज चार्जिंग !’ वसंतरावांच्या तोंडचे हे इंग्रजी  उद्गार ऐकून तसल्या जीवघेण्या प्रसंगातही पु.ल. म्हणाले, ‘ त्या गव्याला कळू नये, म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलताहेत !
__________________

४२) एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पहात पुलंनी ‘ बॉक्स मिळेल का ?’ म्हणून विचारलं. ‘ हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ‘ दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ‘ अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.
__________________

४३) गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ‘
__________________

४४) हौसेसाठी प्रवास करणाऱ्या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ‘ त्यात काय ? ‘ सफरचंद ‘ म्हणावं. ‘
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘ एअरहोस्टेसला आपण ‘ हवाई सुंदरी ‘ म्हणतो, तर नर्सला ‘ दवाई सुंदरी ‘ का म्हणू नये ? आणि वाढणाऱ्याला आपण जर ‘ वाढपी ‘ म्हणतो, तर
वैमानिकाला ‘ उडपी ‘ का म्हणू नये ?’ त्याच सुरात पुलं खूप दारू पिणाऱ्याला ‘ पिताश्री ‘ किंवा ‘ राष्ट्रपिता ‘ म्हणतात
__________________

४५) अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले, ‘ चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज. ‘ चायनीज फूड पाहताच
त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते. जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे
लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ‘ आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. ‘ चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापरला जातो. त्यावर
पुलंचं भाष्य : ‘ चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !’
__________________

४६) पुलंच्या ‘ सुंदर मी होणार ‘ या नाटकावर आधारित असलेला ‘ आज और कल ‘ हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ‘ हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ‘ आज और कल !’
__________________

४७) १९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ‘ पुलायन ‘ ही दीर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ‘ पुलंकित ‘ शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.
__________________

४८) ‘ माझे खाद्यजीवन ‘ या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात, ” चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ‘ रम ‘ ला जी झणझणीत साथ दिली, ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली….” हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा – सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्वीकारा. त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !

४९) ” हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी … ” ” काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?” फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु. लं. ना दाद द्यायच्या … बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस .
उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ‘ खोड्या काढीत ‘ साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ‘ बारा जून ‘ हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा .
__________________

50) एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले, ” ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण विकायचे ना ? ” त्यावर पु ल लगेच म्हणाले, ” हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचं ना म्हणून विकायचो आम्ही. “

***********************************************************************************

नवी भर : दि. १९-११-२०१९

शंतनुरराव किर्लोस्कर हे कधीही टाय आणि बो शिवाय दिसले नाहीत.
कुणीतरी पु. लं. ना विचारलं “ते कां बो कायम लावत असतील?”
पु. लं. नी सांगितलं “त्याच्या आईनं त्यांना लहानपणी सांगितलं होतं की बोलावल्याशिवाय  कधी कुठे जाऊ नको.”

**************************************************************

८. कपड्याच्या दुकानात नोकरी

माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल  तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.
– पु. ल. देशपांडे

कापड दुकानातले नोकर लोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻.

बनारसी शालू आणि राजापुरी पंचा  एकाच निर्विकार मनानं दाखवतात. 😄😄😄

कसलाही आग्रह नाही. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत.

बायका काय वाटेल ते बोलतात. “शी ! कसले हो हे भडक रंग.!” ☺☺☺

लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्या सारखा चेहरा करुन असतो.

निष्काम, निरहंकारी चेहरा.! 🙂🙂

समोरची बाई म्हणत असते, “कसला हा भरजरी पोत.!” 😏😏

हा शांत. 😑😑

गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाही तर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते. समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ, अथोक्षजाय नम:। अच्युताय नम:। उपेंद्राय नम:।
नरसिंहाय नम:। ह्या चालीवर सांगत असतो. 😇😇

सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच,  “ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं.?” 🍋🍋😴😴

एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच.

आपली स्वतःची बायको असून सुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते. पण कापड दुकानातले ते
योगीराज शांतपणं म्हणतात, “नारायण, इचलकरंजी लेमन घे” .👏�👏�

खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.

——— पु. ल. देशपांडे


९ .विनोदबुद्धी

पु.ल.देशपांडे
.
.

“तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?”

ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्याला मी इष्टेट लिहून देईन.
मला वाडवडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे.
आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे.
विनोदबुद्धी कोण देणार?
ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू?
गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला.
चित्रककलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे.
सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले.
इतिहासाचा तिटकारा मात्र इतिहासाच्याच
गुरूजींनी निर्माण केला!
त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्लसबरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही – सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत.
संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळीअवेळी पेटी बडवणाऱ्या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली.
नाटकात पहिली भूमीका मिळाली, ती ‘नरवीर तानाजी मालुसरे’ ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी ‘डायरेक्शन’ केलेल्या प्रयोगात!
तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला.
-“मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे,” हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख!

तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्या हाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत ‘डायरेक्शन’ केलेले स्मरते.
सुटलेला कल्ला आणि जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो.
त्या आघाताने तो मेलेला तानाजी कोकलत जिवंत झाला.

असो; हे विषयांतर झाले.

विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे मात्र मला अजिबात स्मरत नाही………

  – नसती उठाठेव


१०. पुलोत्सव

पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या लेखनाचे विविध पैलू दाखवणारी एक लेखमाला -आराधना जोशी यांनी शिक्षणविवेक या ई नियतकालिकेवर सुरू केली आहे. तिचे तीन भाग आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत.

१. आनंदयात्री पु. ल. http://shikshanvivek.com//Encyc/2018/11/22/Aanandyatri-pu-La-.aspx

२. गुणग्राही पु. ल. http://shikshanvivek.com//Encyc/2018/12/8/Gunagrahi-Pu-La-.aspx

३.  ‘अपूर्वाई’ प्रवासवर्णनांची http://shikshanvivek.com//Encyc/2019/1/9/Apurvai-Pravasvarnanachi.aspx

पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतून माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली

असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे त्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष यंदा सुरू होत आहे. ८ नोव्हेंबर १९१९ साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य, त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज आणि माणुसकी कायमच दिसून आली.

‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व’ असं लांबलचक बिरुद पुलंना अनेक वर्षांपासून चिकटलेलं होतं. किंवा असं म्हणणं जास्त योग्य होईल की मराठी भाषिकांनीच उत्स्फूर्तपणे त्यांना ही पदवी दिलेली होती. अर्थात जनतेने दिलेल्या या अनौपचारिक पदवीचं मोल सरकारी सन्मानांपेक्षा जास्त मोठं होतं. म्हणूनच तर ना. सी. फडके यांनीही पुलंना लिहिलेल्या पत्रात “सर्वांत अधिक लोकप्रिय साहित्यिक या किताबावर गेली कित्येक वर्ष तुम्ही अविवाद्य हक्क गाजवीत आला आहात” असं लिहून एकप्रकारे त्यांचा गौरवच केला होता. निरनिराळ्या वयोगटातील, व्यवसायातील, ग्रामीण, शहरी, देश, विदेश अशा सगळ्या ठिकाणी पुलंची लोकप्रियता व्यापून राहिली आहे. म्हणूनच तर पुलंना दररोज येणाऱ्या सरासरी २५ पत्रांमध्ये नुकतीच शाळेत अक्षर ओळख झालेल्या छोट्या मुलांपासून ते बालगंधर्वांचा काळ बघितलेल्या वृद्धांपर्यंत, प्लंबर किंवा पोस्टमनपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांनी त्यांना पत्र पाठवली होती. यातल्याच एका पत्रात एका छोट्याने ‘पुल आजोबा, हत्तीला शेपूट लावण्यात माझा पहिला नंबर आला!’ असं सांगून पुलंबरोबर आजोबा नातवाचं नातं जोडलं होतं.

व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णनं, गद्य आणि पद्य विडंबन, ललित निबंध, बालवाङमय, भाषांतरीत साहित्य, वैचारिक वाङमय, नाटकं, एकांकिका, वक्तृत्व, संगीत, अभिवाचन, अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, सांस्कृतिक कार्य यांच्याबरोबरीने सामाजिक जाणीवेतून झालेलं दातृत्वाचं मुक्तांगण हे सगळे गुण फक्त एकाच व्यक्तीमध्ये ठासून भरलेले होते ते म्हणजे पु. ल. देशपांडे.

जगभरच्या अनेक देशांत
देशस्थ होऊन फिरले
पण मनातील मराठीपणा
कधी मावळला नाही –
दुनियेच्या बाजारपेठेत
मनमुराद वावरले
पण काळजातील बुद्ध
कधी काळजाला नाही

पुलंच असं वर्णन केलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी. पुलंसारखं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व फक्त एकाच लेखात बसवणं शक्य नाही. म्हणूनच पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या लेखनाचे विविध पैलू आपण यानंतरच्या भागांमधून बघणार आहोत. आपल्या ओळखीच्या पुलंची आणखी ओळख होईल. ज्यांना पुलं माहिती नाहीत त्यांनाही जाणून घेता येईल. पुलंच्या अनेक अनोळखी पैलूंची नव्याने ओळख होईल, प्रेम असेल ते आणखी डोळस होईल.
-आराधना जोशी


११. पु.ल. आणि वारा

पुलंचा हजरजबाबीपणा, उस्फुर्तता किती अफाट होती ह्याची एक झलक…

१९६०-६१ आसपास कधीतरी वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती..त्यातील संवाद पाहा:

वसंत सबनीस : आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता. हीच ‘वरात’ तुम्ही आता ‘वाऱ्यावर’ सोडली आहे हे खरं आहे काय?

पुलं : “वाऱ्याचीच गोष्ट काढलीत म्हणून सांगतो…”

“भावगीत गायक झालो तो काळ ‘वारा फोफावला’ चा होता…!”

“नट झालो नसतो तर ‘वारावर’ जेवायची पाळी आली असती…”

“शिक्षक झालो त्यावेळी ध्येयवादाचा ‘वारा प्यायलो’ होतो…”

“संगीत दिग्दर्शक झालो त्यावेळी पेटीत ‘वारा भरून’ सूर काढत होतो…”

“नाट्य दिग्दर्शक झालो त्यावेळी बेकार ‘आ-वारा’ होतो…”

“प्राध्यापक झालो तेव्हा विद्वत्तेचा ‘वारा अंगावरून गेला’ होता…”

“पटकथा लिहिल्या त्या ‘वाऱ्यावर उडून’ गेल्या…”

“नुसताच साहित्यिक झालो असतो तर कुणी ‘वाऱ्याला उभं नसतं राहिलं…!”

“ही सर्व सोंगं करतांना फक्त एकच खबरदारी घेतली. ती म्हणजे ‘कानात वारं शिरू न देण्याची…!

“आयुष्यात अनेक प्रकारच्या ‘वाऱ्यांतून हिंडलो.’ त्यातून जे जिवंत कण डोळ्यात गेले ते साठवले आणि त्यांची आता ‘वरात’ काढली…!”

“लोक हसतात… माझ्या डोळ्यात आतल्या आत कृतज्ञतेचं पाणी येतं आणि म्हणूनच अंगाला अहंकाराचा ‘वारा लागत’ नाही!”
🙏🙏🙏 वा राव !
पुलंना उभा महाराष्ट्र
साष्टांग दंडवत घालतो
ते उगीच नाही!

***

(मंगला गोडबोले यांच्या – ‘पुलं… चांदणे तुझ्या स्मरणाचे’ या पुस्तकातून).

**🙏🌷🙏**

१२.एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत!

कस जेवाव ते शिकाव पुलंकडुनच…..😋😋😊😋😋👇

एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत!

– पु. ल. देशपांडे

सगळ्यांत उत्तम ‘एटीकेट म्हणजे’ सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात.

ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये.

आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण तयार करून मध्ये वाढायला सांगावी. वरण मात्र भातावरच, वरणावरील तुपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असताना गरमगरम कालवावा.

ताक भात आणि आमटी भात यांची कृती तीच तशीच वरणभात आणि दहीभात यांचीही एकच कृती.

जेवताना म्हणजे भाताचा घास घेताना तळहात कोरडा राहायला हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास, केरळ इथे बदली होऊ शकते.

रसगुल्ले किवा तत्सम प्याराबोला चमच्याने तुकडे करून खाणाऱ्या मंडळींचा स्वतःवर विश्वास नसतो, पाक अंगावर सांडेल ही भीती त्यांना वाटत असते, हे पदार्थ अंगठा व तर्जनी यात धरून थोडे तोंड वर करून जिभेवर सरकवायचे असतात.

जिलबी मात्र मठ्ठ्यात बुचकळून ज्यांना आवडते त्यांनी पाकात बुचकळून तुकड्या तुकड्याने तोंडात सरकवायची असते.

श्रीखंड चमच्याने खाणे हा शुद्ध बावळटपणा आहे, हे तर्जनीवर घेऊन गंधासारखे जिभेला लावायचे असते.

पुरीचा तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुलासारखा आकार करायचा व त्यात श्रीखंड, बासुंदी, आमरस ही मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात.

मिठाच्या डावीकडील पदार्थ काही लोक पोळीला लावून किंवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे.

कधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही, ऐकणार्‍याचा आणि सुरांचा जीव घेत त्याचा प्रवास सुरू असतो आणि मध्येच एकदम अनपेक्षित एखादा गंधार किवा पंचमाचा सूर सणकन लागतो आणि मैफील चमकून जागी होते, चटण्या, कोशिंबिरी हे देखील असे अचानक लागणारे खणखणीत सूर आहेत, यांची बोट जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ओढायची असतात. पंचामृतातील मोहोरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा.

पापड, कुरड्या हे पदार्थ फक्त जागा अडवणारे आहेत, चविष्ट आहेत पण जेवणाच्या ताटात थोडे बेसुरच.

हल्ली छोट्या आकाराचे बटाटेवडे वगैरे करतात. बटाटावड्याच एवढं बालिश आणि ओंगळ रूप दुसरे नाही. बटाटावडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे का ? भजी मात्र चालतात.

स्वच्छतेच्या आचरट कल्पनांनी या चमचा संस्कृतीला जन्म दिलेला आहे.

साधा किवा मसाला डोसा जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्याबद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले की हे लोक पोळी देखील काटा चमच्याने तोडून खात असतील ही शंका मनात पिंगा घालायला लागते.

चिवड्याला चमचा नको पण या यज्ञकर्मात मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे.

ही पाच बोटे ही पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत. उदा. करंगळी म्हणजे जलतत्त्व. जेवताना ही पंचमहाभूतं जेवणात उतरायला हवीत.

राजकारणात आणि जेवणात हे चमचे मंडळी आली आणि भारताची तब्येत बिघडली.

पु. ल. देशपांडे


१३. पुलंचा संक्षिप्त परिचय

पुलदेशपांडे

ज्यांनी महाराष्ट्राला हसायला शिकवलं ते म्हणजे पु.ल. देशपांडे.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व,
अभिनेते ,लेखक ,नाटककार ,संगीतकार ,निर्माता ,दिग्दर्शक ,विनोदाचे बादशहा “”””पु. ल.”””” यांचे आज पुण्यस्मरण
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ – जून १२, इ.स. २०००)
त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ‘ऋग्वेदी’ हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते, आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ..
‘गुळाचा गणपती’ या ‘सबकुछ पु. ल.’ म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्‍न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले.
मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.
पु.ल.देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत. मात्र ते अतोनात हुशार होते. सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे पैसे त्यांच्या नशिबात नसत. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. अशी भाषणे सात वर्षे चालली. त्यानंतर मात्र, वयाच्या बाराव्या वर्षापासून पु.ल.देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले, इतकेच नव्हे तर इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.पु.लं.चे १२ जून, इ.स. २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.(अधिक माहितीसाठी मराठी विश्वकोश )अभिवादन “””

  श्री. माधव विद्वांस .. दि. १२-०६-२०१९

—————————————–

१४. पुलंचे लतादीदींना लिहिलेले पत्र

पुल पता पत्र

नवी भर दि. ३०-०९-२०१९   … वॉट्सअॅपवरून साभार

PL and Lata


अमेरिकेत रहात असलेल्या या पुलंच्या एका परमभक्ताने त्यांना दिलेली ही आदरांजली.

आज ८ नव्हेंबर, आज पुलं जन्मोत्सव

पुलंचं वेगळेपण

आज ८ नव्हेंबर, आजचा दिनविशेष म्हणजे आज पु. लं चा वाढदिवस , साधासुधा नव्हे तर आज जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाले. आपल्या संपूर्ण आयुष्यात दुसऱ्याला फक्त आनंद आणि निखळ आनंद देणाऱ्या पुलंचे आपण अनेक किस्से अनेक विनोदी लेख, पुस्तकं वाचली आहेत. पण आणिखीन काय विशेष होतं त्यांच्यात? आज इतकी वर्ष होऊनही ते आपल्या सगळ्यांना आठवतात, हवे हवेसे वाटतात? विनोदी पुस्तकांपलिकडे, शब्दांच्या कोटी करण्या पलीकडेले पुलं काय आहेत? त्यांच्यात काय वेगळेपण?

नव्याच स्वागत आणि नवोदितांना कौतुकाची थाप
पूल जसे कलाकार तसेच हाडाचे रसिक. त्यांच्या रसिकतेचेही अनेक किस्से आहेत. त्यांना जे आवडलं त्याच त्यांनी हातच राखून न ठेवता तोंडभरून कौतुक केलं आणि नव्या कलाकारांना प्रोत्साहन दिलं. संदीप खरे जेव्हा नवोदित कवी होता आणि ‘कवी’ संदीप खरे म्हणून नावारूपाला यायचा होता तेव्हाची गोष्ट. काही कामानिमित्त तो पुलंना भेटायला गेला होता. काम झालं आणि निघणार तितक्यात त्यानी स्वतःहून सांगितलं की मी कविता करतो, ही माझी नवीन कॅसेट ‘दिवस असे की…’ मग काय काय कविता आहे हे सांगितलं. इतक्यात सुनीता बाईंनी “सरीवर सर….” हे कॅसेटवर वाचलं आणि त्या म्हणाल्या की अरे अशीच एक कविता आमच्या “बाकी बांची (बा. भ. बोरकर) पण आहे रे. त्यावर संदीप म्हणाला हो बरोबर खूप सुंदर कविता आहे पण ही कविता थोडी वेगळी आहे. मग सुनीता बाईंनी त्याला टी कविता म्हणायला सांगितली. पूलही समोर व्हील चेयर वर बसले होते. त्यांना खूप आवडली पण इतक्यात पूल काही कारणानी आत गेले आणि त्या पाठोपाठ सुनीता बाईही गेल्या. पुन्हा २ मिनिटांनी सुनीता बाई बाहेर आल्या आणि त्या म्हणाल्या की अरे पुलंना तुझी कविता आवडली. ते विचारतात आहेत की त्या मुलाला वेळ असेल तर तो आणखीन काही ऐकवेल का? मग संदीप ने आणखीनही काही कविता ऐकवल्या.
साधारण १९९८-२००० या काळात अनेक नवोदित कलाकार त्यांचा भेटीला जात आणि सगळ्यांना असाच काहीसा अनुभव येई. त्या काळात त्यांना फारस बोलता येत नसे, व्हिलचेयरवर बसावं लागे आणि एक नर्सही सतत त्याच्या जवळ असे पण सुनीताबाईंच्या माध्यमातून ते आपल बोलणं मांडत. अश्या परिस्थितीतही त्यांची विनोद बुद्धी शाबूत होती. नर्स वक्तशीर गोळ्या देई तर ते लगेच म्हणत की पहा हे असा गोळीबार सुरु असतो माझ्यावर!
राहुल देशपांडे तर केवळ पुलंमुळे महाराष्ट्राला मिळाला.

माणसांवर जीवापाड प्रेम करणारा माणूस
आपल्या महाराष्ट्रात विनोदी लेखकांची परंपरा आहे. म्हणजे गडकरी, चि. वि. जोशी, आचार्य अत्रे. प्रत्येकाची एक विनोदी शैली. महाराष्ट्रानं अत्र्यांवरही खूप प्रेम केलं, पण अत्र्यांचा विनोद कधी कधी माणसावर प्रहार करणारा होता, त्यात कधी कोणी त्या प्रहारच्या तडाख्यात येई त्यातून वाद निर्माण होई आणि आघात झालेली व्यक्ती अत्र्यांपासून दुरावे कधी कधी तर शत्रुत्व निर्माण होई. पण पु. ल.नी कधीही वयक्तिक टीका, कोणाच्या गुणांवर बोट ठेवून विनोद केला नाही. त्यांच्या त्या खुसखुशीत विनोदी शैलीतून ते माणसं जोडत गेले.

पुलंचा मराठी बाणा
ते इंग्लडला प्रसिद्ध कवी वर्डस्वर्थचे घर (संग्रहालय) बघायला गेले होते. सगळं पाहत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की वर्डस्वर्थच्या कवितांचं अनेक भाषांमध्ये भाषांतर केलेलं तिथं त्यांना दिसलं त्यात काही भारतीय भाषा ही होत्या पण त्यात त्यांना मराठी कुठं दिसली नाही. ते खूप बेचैन झाले, त्यांनी भारतात परत आल्यावर पहिले हे काम हाती घेतलं. त्या संग्रहालयाला सगळं पचवून दिलं, आज आपण या संग्रहाला भेट दिली तर हे बघायला मिळू शकत. याला म्हणतात खरा मराठी बाणा, आणि खरोखर करून दाखवलं!

सामाजिक कार्य आणि पुलं
पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर उभं राहण्यामागे पुलंचा सिहाचा वाटा आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या भागास झोपडपट्टी होती, त्या वस्तीला तिथून दुसरीकडे स्थलांतरित करावं लागलं. याच्यावर लेखक अनिल अवचटांनी पुलंवर खूप टीका केली. एका कार्यक्रमात दोघ एकत्र आले तेव्हा अनिल अवचटांना वाटले की आता पूल बोलतील काहीतरी. पण त्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली आणि उलट त्यांना सांगितलं की तुझ्या कामाला मी कसा मदत करू शकतो हे सांग? नंतर पूल आणि सुनीताबाई यांनी अनिल अवचट यांच्या मुक्तांगण संस्थेला खूप भरभरून मदत केली.

विज्ञान निष्ठ पुलं
जयंत नारळीकर आणि पुलंचे चांगले संबंध होते. पूल कुतूहलापोटी अनेक विज्ञानातल्या गुंतागुंतीच्या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारत. अश्या वेगवेगळ्या विषयातल्या जाणकार व्यक्ती बरोबर ते त्या त्या विषयात डोकावून पाहात आणि या सगळ्यांबरोबर माणसं जोडत.

ही जी त्यांची विशेषता आहे त्या मूळे ते अधिक आपलेसे वाटतात. मी तर जन्मशताब्दीच्या निमित्ताने गुजराती समाजाने त्यांच्या बिगारी ते मॅट्रिक ह्या लेखाचे गुजरातीत केलेले वाचन एऐकले आहे आणि श्रोत्यांचा हशा ही ऐकला आहे. महाराष्ट्र्याच्या सीमा ओलांडून इतर भाषेतली मंडळी आपलीशी करणारे पूल सगळ्यांना आपलेआपलेसे वाटले त्यात नवल काय, खूप नैसर्गिक आहे ते.

-अमोल दांडेकर


१६. पुलंचे निवडक वेचे

पुलं १

पुलं२

पुलं३

पृ १५पुलं लिहितात

                                                                          ——- नवी भर दि. २०-०६-२०२०

पुल किस्सा

नवी भर दि. १८-०६-२०२१:पुल केस


१७. पुलोपदेश – नवविवाहित पतीसाठी

डॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक आडारकर यांना त्यांच्या विवाहानिमित्त पु. ल. देशपांडे यांनी पाठविलेले पत्र…

पु. ल. देशपांडे,
१, रुपाली, ७७७, शिवाजी नगर, पुणे – ४.

८ जून १९८० प्रिय अशोक आजचा दिवस तुझ्या आणि कोमलच्या आयुष्यात सर्वात महत्वाचा. सुमारे चौतीस वर्षांपूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता. या चौतीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर ‘लग्न’ या विषयावर तुला चार उपदेशपर गोष्टी सांगाव्या, असं मला वाटतं.
वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर चार शब्द सांगू नये, असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरीही यशस्वी संसारासंबंधी चार युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या, असं मला वाटलं. या संबंधात ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव.
“A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding”.
लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणाऱ्या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो.
मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या हॅटवर. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याच्या त्या हॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही.
एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या माझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे.
यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याचा दु:खापेक्षा ‘मी अव्यवस्थित आहे’, या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो.
आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे ‘तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस’, असा जर तिचा गैरसमज झाला, तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू भक्कम आहेस असं वाटत असलं, तरी स्री-दृष्टी हा एक खास प्रकार आहे. या नजरेने पुरुषमाणसाला पाहता येत नाही. तेव्हा तू स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नाहीस, रात्रंदिवस हापिसच्या कामाचीच चिंता करतोस असा जर कोमलचा समज झाला, तर अधूनमधून खोकला वगैरे काढून तो समज टिकवून ठेव. तिने दिलेली गोळी वगैरे खाऊन टाक. डॉक्टरीण बायकोने केलेल्या सांबाऱ्यापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते, असे एका डॉक्टरणीशी लग्न केलेल्या फिजिओथेरापिस्टचे मत आहे.
आता खोकला काढताना या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही, याची खात्री करून घे. (‘तरुणी’ हे वय हल्ली ६७-६८ वर्षांपर्यंत नेण्यात आले आहे. कारमायकेल रोडवरून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे कळेल.)

गाफीलपणाने खोकला काढलास तर ‘हा खोकला कुणासाठी काढला होता ते खरं सांगा?’ या प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत बाळगावी लागेल. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी.

सुखी संसारात नवऱ्याला स्वत:चे मत नसणे, यासारखे सुख नाही. विशेषत: प्रापंचिक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशे दायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील. पण भरलेले पापलेट आणि तळलेले पापलेट यातले अधिक चांगले कुठले? या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून तेच ग्राह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे ‘राव’ या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणी कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाच्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीन्द्रनाथांविषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव ‘ठाकूर’ आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे ‘बोरकर’ या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही.
(बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.)
उदाहरणार्थ, ‘मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,’ हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, ‘बापरे! डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,’ हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेचा उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे Medical Profession संबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे. तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वधुपक्षीयांनी सध्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक.
(यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे! )
म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, हा समज ( गैरसमज म्हणत नाही!) पक्का होईल.
आणि Diamond Shamrock मधला तूच काय तो डायमंड आणि इतर सगळे Sham किंवा निर्बुद्ध rock हा समज वाढीला लागून घरात इज्जत वाढेल.

कोमलच्या गृहप्रवेशानंतर तुमच्या घरातली स्री-मतदारांची संख्या एका आकड्याने वाढत आहे, हे विसरू नये
घरात सतत होणाऱ्या ‘शॉपिंगला’ उगीचच विरोध न करता बाजारातून जे जे काही म्हणून घरात विकत आणले जाईल, याचे ”अरे वा!”, ”छान!”, ‘ O Wonderful!” अशा शब्दांनी स्वागत करावे. बाहेर जाताना
‘ ही साडी नेसू का ? ’ हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला, तरी कौटुंबिक व्याकरणात ते एक
‘ मी ही साडी नेसणार आहे’ असं Firm Statement असते. या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा (साडीकडे) अभिनय करून- वा! हूंss! – हो हो -, छान – फार तर Fantastic Idea, असे प्रसंग पाहून आवाज काढावे. अगर ‘ही नेसतेस?’ – अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा.

कृपा करून ‘कुठलीही नेस. कोण बघतंय’ 😜😜 यासारखी वाक्यं ओठाशी आली, तरी गिळून टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच agreed म्हणून सही. राष्ट्रपतींचे हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावे. उलट पार्टीला वगैरे जाताना ‘यातला कुठला बुशशर्ट घालू? तुझा Choiceनेहमीच फसक्लास असतो – वगैरे वाक्यं टाकावी. माझ्या Choice पेक्षा तुझा Choice चांगला असतो 😜😜😜, या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही, याची खात्री बाळगावी.
नाहीतर ‘कळतात ही बोलणी …’ हे वेदाइतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला ‘मला नाही माहीत’ हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट. सौ.च्या वाढदिवसाची तारीख विसरू नये 🎂🎂.
एक वेळ ऑफिसात जाताना पॅण्ट घालायला विसरलास तरी चालेल. पण बायकोची जन्मतारीख विसरणाच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. presents सुद्धा देतात. पण इतर कुठल्याही Present पेक्षा या दिवशी नवऱ्याने ऑफिसला Absent राहण्यासारखे दुसरे Present नाही. कांदेनवमीला जसे आपल्याला कांदा आवडला नाही, तरी धार्मिक भावनेने कांदा खातात, तसे बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी, ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावे असे वाटते – तसल्या, बायकोच्या तमाम नातेवाईकांना, काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलावण्याचा बायकोला आग्रह करावा, असे एका तज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना “गिळायला” बोलावल्यामुळे ती दिवसभर स्वैपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि यांची प्रजा. घरातली काचेची भांडी या बालकांच्या सहज हाती लागतील, अशा जागी ठेवावी☺☺. भावाच्या किंवा बहिणीच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौ.चा ‘आवाज’ बंद. आपणही हा मोका साधून – अहो – मुलंच ती – करणारच मस्ती. वगैरे बोलावं. आणि मेहुणे-मेव्हण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा वस्तू यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात☺.
फक्त जिथे आपला टेपरेकॉर्डर, डिक्स वगैरे असतात, या खोलीतल्या विजेच्या बटणांना शॉक येतो असे सांगून ती खोली बंद ठेवावी. मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा☺☺, याला महत्व नाही.

असो. नवीन लग्न झालेल्या वराचा फार वेळ घेऊ नये. असा वेळ घेणारा माणूस पुढल्या जन्मी गुरखा नाही तर दूधवाला भय्या होतो म्हणतात.
पण माझा हा उपदेश पाळणाऱ्यास उत्तम संसारसुख प्राप्त होऊन, ताजे मासे, धनधान्य, संतती, संपत्ती, साखर, मुलांना शाळेत प्रवेश, वह्या, बसमध्ये आणि लोकलमध्ये खिडकीजवळची जागा, टेलिफोनवर हवा तोच नंबर मिळणे वगैरे सर्व गोष्टींचा भरपूर लाभ होवो आणि संसारात सदैव आनंदी, आनंद नांदेल.
तथास्तु.

तुझा
पी. एल. काका

    – वॉट्सअॅपवरून साभार   दि.१३-११-२०१९
——————-

१८. पुलंच्या साहित्यामधील निवडक वाक्ये

पुल वाक्य

पुलं लिहितात

शंकरपाळे पुल

अंतूशेटचे वाक्यः
रत्नांगिरीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे, झंप्या?

अपूर्वाई”
“त्या॑ची द्राक्ष स॑स्कृती आणि आपली रुद्राक्ष स॑स्कृती “

गारुडी,
काम करायचा क॑टाळा येतो म्हणून ऑफिसला येतो …

माणसांना जेवायला बोलावल्यांनंतर “चला वाढायला घ्या” ह्या वाक्याइतके उत्साहवर्धक वाक्य नाही..

नाथा कामत –
अविवाहीत तरूणींच्या बापांविषयी बोलताना नाथा कामताच्या जिभेवर साक्षात सरस्वती केस मोकळे सोडून, शंकराकडून रुंडमाळा उसन्या आणून गळ्यात घालून नाचते.

अंतू बर्वा – “‘म्हणजे ? अंतूशेटना मुलगा आहे ?”
“आहे ? म्हणजे काय ? चांगला कलेक्टर आहे !”
“‘कलेक्टर ?”
“भायखळ्याच्या स्टेशनावर तिकिटं गोळा करतो.” चेहऱ्यावरची सुरकुती हलू न देता अण्णा म्हणाले.

शेवटी काय घड्याळाचे पट्टे नी तबकड्या बदलतात.. सुखाने टळलेली दुपार पहायला तबकडी आणि पट्ट्या कुठल्या का असेना”

“हिने कुठल्याही पतिपरायणस्त्रीप्रमाणे आपल्या नवर्‍याचा गाढवपणा चार चौघात उघड केला”

“फादर फादर हे काय आहे?”
“डुक्कर”
“अच्छा म्हणजे तुम्ही मला सारखं म्हणता ते हेऽऽऽ!!!!”

“मास्तराच्या बायकोच्या गळ्यात नाही पण डोळ्यात मोती पडले”

“मग काचांच्या तुकड्यांतून हा व हा ग आहे हे झालं”

“आहे तुझ्या वर्गात कोणी? लपेल फडताळात? म्हणेल चिंता करतो विश्वाची?”

“इथे सगळं विका.. बाल्य विका.. तारुण्य विका.. कौमार्य विका.. विकण्यासारखं नसतं ते वार्धक्य.. ‘विका’ हा ज्या देशाचा मूलमंत्र मंत्र आहे तिथे वार्धक्याचे निर्माल्य होत नाही पाचोळा होतो”

“दारू म्हणजे काय रे भाऊऽऽ??!!”

“गोरंऽ! म्हटल्याबरोबर ही एवढ्यांदा ओरडली की मी ज्या अंगाकडे पहात होतो ते देखील दचकलं.. आता कपडे अंग झाकण्यासाठी घेतात हे मला ठाऊक कपड्याला स्वतःचं अंग असतं हे कसं कळणार?”

“कॉसमॉस? कॉसमॉस!! हा हा कॉसमॉस!!!!!!”

“नाम्या तो माझा शर्ट आहे!!!”
“अंगाला बरोबर आला माझ्या”

“त्याने त्या सुटाच्या एवढ्या ट्रायल घेतल्या की इंग्रजीत गुन्हेगाराच्या सुनावणीला ट्रायल का म्हणतात हे मला कळून चुकलं”

शेवटी तुम्ही आम्ही काय, पत्रातल्या पत्त्याचे धनी.. मजकूराचा मालक मात्र निराळाच असतो!!

एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्यास मराठीत “वीट येणे” का म्हणतात हे मला समजले.

“ती वीट तासभर घेतल्यावर एखाद्या गोष्टीला कंटाळा येण्याला वीट येणे का म्हणतात ते मला कळलं”

नवीन घर बांधणारे जोशी पु लं ना अत्याधुनिक सोयी दाखवत असतात … त्यांनी ‘नोकरांचा व घरच्यांचा संडास’ वगैरे दाखवल्यावर पु लं म्हणतात ना … “काय हो, इथे पण automatic होतं की काय ?”

त्याच गोष्टीतली आणखी काही … “नको असलेला पाहुणा असेल तर एक automatic कुत्रा चावतो” … “मला सार्वजनिक पूजेसाठी देणगी मागायला येणारी अजून बरीच माणस त्यांच्याकडे पाठवायची आहेत”
माझा शत्रूपक्ष

      नवी भर दि. १२-०६-२०२०

—————————-

१९. पुल आणि सुनीताबाईंचे लग्न, केवळ आठ आण्यात

आठ आण्यातलं लग्न   (महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला आज १२ जून रोजी वीस वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या लग्नाची ही कथा).

साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात ‘ओरिएंट हायस्कूल’ नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने (पु.ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळाने मीही! भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना. (तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.)

शिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग ‘आपण लग्न करूया’ असा भाईचा आग्रह सुरू झाला… वाढतच राहिला.

लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. समजा, उद्या आपलं पटेनासं झालं, तर लग्नात ‘शुभ मंगल सावधान’ म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करणारा तो कायदेतज्ज्ञ हे आपली भांडणं मिटवायला येणार आहेत का? मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय? माझं ताठ मन वाकायला तयार नव्हतं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त ‘हो’ म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,’ या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी! खरं तर तत्पूर्वी एकदा भाईचं लग्न झालेलं होतं. या गुणी मुलाला आपली लाडकी लेक देऊन मोठ्या थाटामाटात कर्जतच्या दिवाडकर लोकांनी त्याला जावई करून घेतला होता. पण लग्नानंतर १५-२० दिवसांतच ती मुलगी तापाने आजारी पडली आणि डॉक्टरी उपचारांचाही उपयोग न होऊन बिचारी मृत्यू पावली.

माझ्या आईने लेकीसाठी काही स्थळं हेरून ठेवली होती. एक तर तिला या बिजवराशी मी लग्न करणं मुळीच पसंत नव्हतं. शिवाय परजातीतला जावई हेही खटकत होतं. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले. ‘भाईने टपाल घेऊन येणाऱ्या बसने यावे, ती गाडी आधी पोस्टात येते, तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडीतळावर जाते. पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे, मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणीन,’ असे मी भाईला सांगितले होते. प्रत्यक्षात भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा हरकाम्या बाळू तेंडुलकर यांच्यासह आला. मी आप्पा-आईशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी उभयतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या १०-१५ मिनिटांतच भाईने सर्वांना हसवून आपलेसे करून घेतले. ‘हसवण्याचा माझा धंदा’ या नावे पुढच्या काळात भाई रंगभूमीवर एक कार्यक्रम करत असे. माझा अनुभव मात्र सांगतो- हसवणं हा त्याचा धंदा नव्हता, त्याचा तो धर्मच होता.

पुढल्या ४-५ दिवसांत लग्न रजिस्टर करायचं होतं. त्यावेळी भरायचा छापिल फॉर्म आठ आण्याला मिळे, तेवढाही खर्च इतर कुणावर पडू नये म्हणून मी तो फॉर्मही विकत आणून ठेवला होता आणि आप्पांनाही दाखवला होता.

आमचे आप्पा- म्हणजे माझे वडील हे स्वत: रत्नागिरीतले नामवंत वकिल तर होतेच, पण संत प्रवृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांचा लौकिक होता. भाई रत्नागिरीला आल्यावर दोन-तीन दिवसांतच लग्न रजिस्टर करून टाकावे, असे आई-आप्पांना मनातून वाटत होते. त्याप्रमाणे आप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेह्यांना “मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल?” असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, “मग आत्ताच जाऊ या की!” म्हणून ते आप्पांबरोबरच निघाले.

रत्नागिरीचे मुख्य ऑफिस आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये होते. तसेच घरासमोरच जिल्हा न्यायालय होते. दुपारी आप्पा घरी परतत तेव्हा दुपारचा चहा होत असे. त्या सुमाराला आमच्या वाड्याला फाटकाची खिटी वाजली की आप्पा आले, असे आम्ही खूशाल मानत असू. आईने चहाला आधण ठेवले होते. खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिले, तर आप्पांच्या सोबत आणखी तीन-चारजण येताना दिसले. मी आईला ते सांगतच तिने आधणात आणखी चार-पाच कप पाणी वाढवले.

हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या दहा-पंधरा मिनीटांत आमचे लग्न होणार आहे, याची घरच्या आम्हाला कुणालाच पूर्वकल्पना नव्हती. उन्हाळयाचे दिवस. वधू घरच्याच साध्या, खादीच्या सुती साडीतच होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा, बिनबाह्यांचा बनियन घालून, चहाची वाट पाहत, गप्पा मारत ऊर्फ सर्वांना हसवत बसलेले. आप्पांनी आल्या आल्या मला हाक मारली. जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयतांना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितले. आमच्या आणि साक्षीदारांच्याही सह्या झाल्या आणि लग्न ‘समारंभ’ संपला. नेहमीच्या दुपारच्या चहाबरोबरच लग्नही झाले आणि माझ्या लक्षात आले की, आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून ‘कु. सुनीता ठाकूर’ हिचे नाव ‘सौ. सुनीता देशपांडे’ करण्याचे काम फक्त आठ आण्यात आणि दोन-चार मिनीटांत उरकले.

एका योगायोगाचे मात्र मला नवल वाटते. आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती १२ जून, आणि त्यानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. आठ आण्यात आणि दोन-तीन मिनिटांत जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं. पण त्या चोपन्न वर्षाचं एकत्र जीवन खूप रंगीबेरंगी आणि एकूण विचार करता खूप संपन्नही जगलो खरं!

— सुनीता देशपांडे

पुल भरलेला खिसा

२०.पुलंच्या हस्ताक्षराचा फाँट

हस्ताक्षरांवरची वरात!
.
भाग्येश अवधानींच्या भिंतीवरून साभार……
.
पुलंचं हस्ताक्षर :
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुलंचे हस्ताक्षर आता डिजिटल फॉन्टमध्ये ‘बी बिरबल’ या संस्थेनं तयार केलंय. फॉन्ट डाउनलोड करून पुलंचाच एक हजरजबाबी किस्सा त्यांच्या हस्ताक्षर फॉन्टमध्ये टाकण्याचा मोह आवरला नाही !
आज त्यांची पुण्यतिथी ! त्यानिमित्त महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाचं आदरपूर्वक स्मरण !

पुल हस्ताक्षर

पृ १५ पुल हस्ताक्षर १ 

नवी भर दि. १४-०६-२०२० फेसबुकवरून साभार

******************************

पु.ल.यांचे बंधु श्री.उमाकांत व रमाकांत देशपांडे यांची मुलाखत

(स्मिता मनोहर आणि मनोज प्रभू यांनी श्री.उमाकांत व रमाकांत देशपांडे यांची घेतलेली मुलाखत – दि. ४ जून २००२)
५, अजमल रोड, त्र्यंबक सदन’…. पार्ल्यात पोहोचलो आणि ‘त्र्यंबक सदना’च्या दिशेनी आम्ही भारावल्यासारखे चालू लागलो. गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न…..पु.लं.च्या घरी जायचं… जे कदाचित स्वप्नच राहिल असं वाटत होतं, ते आज पूर्ण होत असल्याचा आनंद, बरीचशी उत्सुकता, पण एक हुरहुर अशा संमिश्र भावना मनात दाटून येत होत्या. पु.लं.चं बालपण, त्यानंतरचं समृध्द जीवन याच्या अनेक वर्षांच्या आठवणी जिथे दडल्या आहेत, तिथे आम्ही आज जात होतो, पण पु.ल. नसतांना. पु.ल. आज पार्ल्याचाच काय पण या जगाचाच निरोप घेऊन गेल्यानंतर आज त्र्यंबक सदन कसं असेल?…. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा योग यावा, पण प्रत्यक्ष परमेश्वरानी त्याआधीच तिथून आपला मुक्काम कायमचा हलवावा, अशा वेळी भक्ताची जी अवस्था होईल ती अनुभवत मी आणि मनोज गेट जवळ पोहोचलो.
मनोज मूळचा पार्लेकरच. त्यामुळे पूर्वीचं त्र्यंबक सदन, त्यासमोरचा रस्ता, रोज संध्याकाळी तिथल्या बाकावर पु.लं.चे भाऊ उमाकांतकाका बसत ती जागा आणि ते हुबेहुब पु.लं.सारखे दिसत असल्याने फसलेला मनोज आणि त्याचा मित्र. अशा गमती जमती त्याच्याकडून ऐकतच आम्ही जिना चढून वर गेलो.

रमाकांतकाका आमचीच वाट बघत होते. हे पु.लं.चे सर्वात धाकटे भाऊ. पु.लं.पेक्षा १० वर्षांनी लहान. तर उमाकांतकाका ३ वर्षांनी लहान. ते आम्हाला उमाकांतकाकांच्या खोलीत घेऊन गेले. ८० वर्षांचे उमाकांतकाका आता पूर्णपणे अंथरुणावरच असतात. ‘भावाची साहित्यिक नाही तरी ही गादी मात्र चालवत आहे,’ असं ते म्हणाले आणि आम्ही हेलावून गेलो. गेल्या ८० वर्षांच्या काळात पु.लं.ची लहानपणापासूनची जडणघडण, अनेक चांगले वाईट अनुभव, लाभलेले मानसन्मान, पु.लं.ना रसिकांचे मिळालेले उदंड प्रेम आणि हेवा करायला लावणारे पु.लं.चे समृध्द आयुष्य या दोघांनीही अगदी जवळून पाहिले असल्याने, असंख्य आठवणींचा खजिनाच त्यांच्याकडे आहे. आज या खजिन्यातील काही आठवणी प्रत्यक्ष या दोघांकडून ऐकायला मिळणार होत्या. स्वत:च्याच भाग्याचा हेवा करत त्यांचा शब्द न शब्द मी कानात साठवू लागले.

बोलता बोलता उमाकांतकाका ६०-७० वर्ष मागे गेले. आम्ही सुरुवातीला जोगेश्वरीला ज्या सोसायटीत रहायचो तिचं नाव ‘सरस्वती बाग’. सुरुवातीला आम्हाला तिथे रहायला जागा मिळेना. सोसायटीतच एका पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही रहायचो. मग वर्ष- दोन वर्षानी आम्हाला रहायला जागा मिळाली. त्याकाळी जोगेश्वरीत टाकी महाराज म्हणून होते. ‘पुरुषोत्तम’ हे नाव त्यांनी ठेवलं. हल्लीच्या महाराजांसारखे ते बुवाबाजी वगैरे करणारे नव्हते. ते education inspector होते. Retire झाले होते आणि प्रवचन करायचे. भाईचं, माझं, रमाकांतचं नाव त्यांनीच ठेवलं. २८-३० साली आम्ही जोगेश्वरीहून पार्ल्याला आलो ते आत्तापर्यंत इथेच आहोत. भाई, मी आणि रमाकांत आमच्यापासून ते आमची तिसरी पिढी सुध्दा ‘पार्ले टिळक’ मध्येच शिकली. आम्ही शाळेत असतांना, जात-पात वगैरे गोष्टींबाबत लोक जागरुक असत. ‘मासे कोण खातात त्यांनी हात वर करा’ असंही चक्क शाळेत विचारत. मग आम्हीही आपले इमाने इतबारे हात वर करत असू. कोकणस्थ नाही तो अस्पृश्य असंच समजलं जायचं. अर्थात आम्हालाही कधी या गोष्टीचं वाईट वाटलं नाही. राग यायचा कधीकधी पण ते त्यावेळचे संस्कारच होते तसे. पण जे दोस्त होते ते मात्र सगळे ब्राह्मण. एकदा माझ्या समोरच घडलेला हा किस्सा- आमची आई शेव छान करायची. संध्याकाळी शाळा सुटली कि शेव खायला सगळे जण आमच्या घरी. एकदा भागवत आडनावाच्या एका मित्राने भाईला विचारलं,”पुरुषोत्तम, तू देशपांडे म्हणजे सारस्वत ना?” भाई म्हणाला, “हो”
“मग तुम्हाला काय म्हणायचे माहितीये?”
“काय?”
“तुम्हाला शेणवी म्हणत असत. कारण तुमचे पूर्वज शेण विकायचे.”
भाईनी ताबडतोब उत्तर दिलं. “तुमचे पूर्वज शेण खायचे म्हणून आमचे पूर्वज शेण विकायचे.”

शाळकरी वयापासून अशा प्रसंगांना हसत हसत पु.ल. टोला मारत. जाती व्यवस्थेविषयी पु.लं.च्या मनात चीड म्हणूनच निर्माण झाली असावी. पुढे वयाने, कार्याने मोठे झाल्यावर पु.ल. हा राग बाहेर काढू शकत होते.पण उलट त्यांनी माणूस ही एकच जात कायम मानली आणि ते स्वत:ही कायम तसेच वागले.

लहानपणापासूनच हजरजबाबी असलेल्या पु.लं.चा आणखी एक किस्सा सांगताना रमाकांतकाका म्हणाले, नागपूरच्या एका सभेमध्ये सुरुवातीला अत्रे बोलले. नेहमीप्रमाणे हशा, टाळ्या सगळी सभा अत्र्यांनी जिंकली. मग भाई उभा राहिला. आता हा काय बोलणार असा सगळ्यांना प्रश्न पडला. पण सुरुवातीलाच अत्र्यांची ओळख करुन देताना भाई म्हणाला,’नरसिंहासारखी बलदंड शरीरयष्टी असलेल्या या माणसाचे नाव प्रल्हाद!’ आणि या एका वाक्याने भाईने सभा फिरवली. तसंच एकदा वहिनीनी काहितरी काम सांगितलं. दोन-तीनदा सांगूनही ते काम झालं नाही. तेव्हा वहिनी म्हणाली,” हे बरं आहे, तुम्हा पुरुषांची सगळी कामं बायकांनी केली पाहिजेत. पण बायकांचं काम मात्र तुम्ही पुरुष कधीच करत नाहीत.” भाई म्हणाला,” असं बोलू नको, बालगंधर्वांनी आयुष्यभर बायकांचीच कामं केली.”

वहिनीला सुध्दा तो गमतीनी ‘उपदेशपांडे’ म्हणायचा. शिस्त, नियम या बाबतीत ती फारच कडक होती, पण तिला तसं रहावंच लागलं. जिद्द, मेहनत, धडाडी अशा गुणांमुळे संपूर्ण देशपांडे कुटुंबाला सुनीताबाईंनीच सावरलं, सांभाळलं. त्यांच्याविषयीचा आदर उमाकांतकाका आणि रमाकांतकाकांच्या शब्दा शब्दात जाणवत होता.” तुम्हाला सांगतो, ती जर व्यवस्थित नसती ना तर भाईला लोकांनी हैराण केलं असतं हे मात्र नक्की. त्याचं काय होतं काहीही झालं की जाऊ दे ना, असू दे ना, पण वहिनी मात्र अगदी Particular होती. ‘वाऱ्यावरची वरात’ मध्ये सुरुवातीचे प्रसंग हे अनुभवातूनच लिहीलेले आहेत. कुठेही भाषणाचं वगैरे बोलावणं असेल आणि भाईला वेळ नसला तर हे लोक ‘ते येणार होते पण येणार नाहीत म्हणून कळ्वलं आहे’ असं सांगून मोकळे. म्हणजे दोष भाईलाच. असे प्रसंग घडल्यावर वहिनीनी मग कुठलेही कार्यक्रम, सगळं ठरवणं वगैरे ताब्यात घेतलं. आणि ती ते व्यवस्थित सांभाळायची. कारण कोणाला दुखवायचं वगैरे भाईला जमत नसे. पण वहिनी सुरुवातीला सेवादलात असल्यामुळे एक प्रकारची शिस्त, व्यवस्थितपणा तिच्यात होता.”

पु.लं.च्या यशामागे सुनीताबाईंचा असलेला वाटा, त्यांची जिद्द याविषयी उमाकांतकाका आणि रमाकांतकाका भरभरुन बोलत होते. पु.ल. आणि सुनीताबाईंनी दिलेल्या देणग्यांचा विषय निघाला. “देणग्या तर भाईनी लाखो रुपयांच्या दिल्या. पण एकदाही घरात काही सांगितलं नाही. आम्ही पेपरात वाचायचो, तेव्हा आम्हाला समजायचं. तो लोकांना म्हणायचा, तुम्ही मला दाता वगैरे म्हणू नका. मी दाता वगैरे कोणी नाही. जिथे मला असं वाटतं खड्डा आहे तिथे तो बुजवता आला तर शक्य तेवढं मी करु शकतो. दाता वगैरे म्हटलं तर ते घेणारा कोणीतरी कमी आहे असं वाटतं. म्हणून तो म्हणायचा मी दाता वगैरे नाही.”

मी एकदा बंगलोरला गेलो होतो. एका तलावाजवळ आम्ही होडीने फिरण्यासाठी म्हणून गेलो. एक बाई धावत आली. म्हणाली, ‘तुम्ही देशपांडे का?’ मी म्हटलं, ‘हो’. ‘पु.लं.चे भाऊ का?’ ‘हो. का?’ तर म्हणाली,’मी परवाच पु.लं.कडे गेले होते. चेक आणायला.’ असं म्हटल्यावर मला आश्चर्य वाटलं. भाईकडे चेक मागायला कोण गेलं असेल? मी म्हटलं, ‘असं का. का बरं?’ तेव्हा समजलं, सोलापूर जवळ कुठेतरी एक Open University होती. तेथे भाईनी देणगी दिली होती. मी विचारलं,’किती?’ तर ती म्हणाली,’बारा लाख!’ हे मला त्या दिवशी त्या बाईकडून समजलं. पण भाईनी किंवा वहिनीनी आम्ही कोणाला इतके पैसे दिले, हे कधी आयुष्यात आम्हाला सुध्दा सांगितलं नाही.

होतकरु वयात भाईनी सहन केलेले अपमान मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. आमचे वडील अचानक गेले. तेव्हा भाई १९ वर्षाचा होता. मी १७ वर्षाचा तर रमाकांत १०-११ वर्षाचा. भाई तेव्हापासूनच शिकवण्या करायला लागला. भावगीतं गायचा. शाळेत असल्यापासूनच चाली लावायचं त्याला वेड होतं. ‘माझिया माहेरा जा’ ची चाल त्यांनी तो कॉलेजमध्ये असतानाच बसवली होती. नंतर मग ती ज्योत्स्नाबाईंनी गायली. राजा बढे आमच्या घरी यायचे. तेव्हा त्यांनी लिहिलेली ती कविता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना ती चाल भाईनी बसवली. आम्ही तेव्हा पैशासाठी म्हणून १५ रुपयाला कार्यक्रम करायचो. तशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते. भाई पेटी वाचवून गायचा. मी तबल्यावर आणि मधू गोळवलकर सारंगीवर. १५ रुपये मिळायचे. ५-५ रुपये आम्ही वाटून घ्यायचो. त्या काळात अशा परिस्थितीतून आम्ही गेलो होतो. असं होतच असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. रिक्षाने जायला पैसे नसायचे, म्हणून मग चालत जावं लागे. याचा परिणाम म्हणून असेल भाईकडे दातृत्व आलं. अनेकांना ही गोष्ट माहित नाही, त्यांनी अनेक साहित्यिकांना पुष्कळदा मदत केली आहे. पण परत मागणं वगैरे काही नाही. आणि वहिनीचा Support हा भाईला कायम होता. एक प्रसंग मला आठवतो, एक साहित्यिक नवीनच मुंबईला आला. त्याचं नाव नाही सांगत, पुढे तो खुपच मोठा झाला. पण सुरुवातीला त्याला रहायला जागा नव्हती. एक खोली मिळत होती, पण ९०० रुपये हवे होते. आणि त्याच्याकडे पैसेच नव्हते. त्यावेळेला भाईचं ‘बटाट्याची चाळ’ फार जोरात चाललं होतं. आणि त्या बुकिंगवर मी असायचो. भाई तेव्हा सांताक्रूझला रहायचा. त्या दिवशी जमलेली कॅश घेऊन मी भाईकडे गेलो होतो आणि त्याच वेळेला तो लेखक आला होता. तो म्हणत होता, वसईला अशी – अशी जागा मिळतेय, पण ९०० रुपये मागतायेत. भाई जरा विचारात पडला. ५ मिनिटांत वहिनी बाहेर आली आणि ९०० रुपये त्याच्या हातावर ठेवले. आमचं जे Collection होतं त्यातले ते ९०० रुपये होते. पण तरी तू परत कधी करणार असं विचारलं सुध्दा नाही. याचं कारण मला असं वाटतं, लहानपणी जे भोगावं लागतं, त्याची दोन reactions होतात. माणूस एक तर फार सूडबुद्धीने तरी वागतो, किंवा अत्यंत प्रेमळ तरी बनतो. सुदैवाने सूडबुद्धी भाईकडे नव्हतीच.

यासंदर्भात आणखी एक उदाहरण सांगतो. नाव नाही सांगत त्या व्यक्तिचं. कारण ती सुद्धा मोठी लोकं आहेत. भाई All India Radio वर होता. Program Executive म्हणून. नंतर त्याची लंडनला बी. बी. सी. वर टेलिव्हिजनच्या शिक्षणासाठी निवड करण्यात आली. जायच्या आधी त्याला सांगितलं गेलं, तुझ्या जागेवर योग्य व्यक्तिची तू निवड करुन ठेव. हे कळल्यावर रेडिओवर applications यायला लागली. एकेकाळी भाई ज्या नाटक कंपनीत होता, त्या नाटक कंपनीचा बोजवारा उडाल्यामुळे तिचा मालक कामाच्या शोधात होता. त्यानीही application दिलं. इतरही ओळखीच्या लोकांनी application केलं होतं. पण भाईनी त्यांना सांगितलं, की तुम्ही सगळे आधीपासून नोकरीवर आहात. त्याला खरी गरज आहे. आणि त्याची निवड भाईनी केली. पण याच माणसाकडे जेव्हा भाई नोकरीला होता आणि एम.ए. करायचं म्हणून भाईनी नोकरी सोडायची ठरवली, तेव्हा तो मालक म्हणाला होता, परत माझ्या दारात आलास तर तुला नोकरी देणार नाही. आणि आज तोच माणूस भाईकडे आला होता. पण भाई त्याच्याशी सूडबुद्धीनी वागला नाही.
भाईची नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पार्ल्यात भाईचा मोठा सत्कार झाला होता. अनेक मोठी माणसं त्यावेळी उपस्थित होती. अतिशय ह्रदयस्पर्शी असा तो कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपल्यानंतर भाईभोवती लोकांची गर्दी जमली. भाईला प्रत्येकजण हार वगैरे घालत होते. तेवढ्यात गर्दीतून माझा एक मित्र एका व्यक्तिला हाताला धरून घेऊन येत होता. बघतो तर भाईचे शाळेतले तारपुंडे मास्तर होते! भाईला ज्यांनी नाटक शिकवलं. ते गिरगावात रहायचे. गर्दीमुळे त्यांना आत यायला मिळत नव्हतं. आमचा एक मित्र त्यांना हाताला धरुन स्टेजवर घेऊन आला. त्यांनी भाईच्या गळ्यात हार घातला. भाईनी साष्टांग नमस्कार घातला त्यांना. लोक आश्चर्याने बघायला लागले. ते आमचे शाळेतले शिक्षक होते. सायन्स शिकवायचे. पण नाटक, sports activities या गोष्टींना त्यांचे सतत प्रोत्साहन असे.”

पु.लं.च्या पेटीविषयी ऐकण्याची माझी खूपच उत्सुकता होती. “भास्कर संगीत विद्यालयात राजोपाध्ये म्हणून मास्तर होते, त्यांच्याकडे आम्ही शिकायला जायचो. आमच्याकडे एक असा नियमच होता, वडील संध्याकाळी ऑफिसमधून आले, की ७ ते ८ भाई पेटी वाजवायचा आणि मी तबल्यावर साथ करायला. पण एक तास पेटीचा रियाझ झाल्याशिवाय आम्ही जेवायला बसत नसू. आमची आईसुद्धा ऐकायला बसत असे. वडील बसत असत. आई चांगली गायची सुद्धा. पेटीची आणि सूरांची ओढ भाईला लहानपणीच लागली. पेटीतर त्यानी ऐकूनच वाढवली. दरवर्षी त्या क्लासचा समारंभा व्हायचा. त्यात कार्यक्रम व्हायचे. एका कर्यक्रमाला बालगंधर्व आले होते. भाई तेव्हा पेटी वाजवायला बसला. त्यांनी कुठलं तरी नाट्यगीत वाजवलं होतं. गंधर्व खुर्चीवरुन उठले आणि भाईच्या समोर येऊन बसले. त्यांनी ते इतकं मन लावून ऐकलं, आणि संपल्यावर भाईच्या पाठीवर शाबासकी दिली! ती पेटी त्यानी पुढे आयुष्यभर सुरु ठेवली. जपली, वाढवली.”
२२ रु. ला घेतलेली पेटी, आणि ३ रु. ला घेतलेल्या तबल्याची आठवण उमाकांत काकांना अजून आहे. तो तबला त्यांनी अजूनही आठवण म्हणून जपून ठेवला आहे.

“गाणी ऐकायला आणि नाटकं बघायला वडीलांनी कधीही अटकाव केला नाही. रमाकांत अगदी लहान होता. भाईला आणि मला घेऊन वडील शनीवारी ऑपेरा हाऊसला जायचे. रात्रीचं नाटक असे. बालगंधर्व, मा. कृष्णराव सगळ्यांना स्टेजवर आम्ही शाळकरी वयात होतो, तेव्हा पाहिलं आहे. रात्री पार्ल्याला परत यायला गाड्या नसायच्या. १-१:३० वाजता नाटक संपलं, की मराठा हायस्कूल मध्ये बाक ओढून मी, भाई आणि वडील आम्ही तिघेही झोपायचो आणि सकाळी पहिली गाडी पकडून परत यायचो. पण वडीलांनी कधीही मनाई केली नाही. गणेशोत्सवातल्या सगळ्या गाण्यांना आम्ही न चुकता जात होतो. या सगळ्यासाठी वडीलांकडून, आईकडून खूप प्रोत्साहन मिळालं आणि त्याचा भाईनी खूप चांगला उपयोग करुन घेतला.
भाईकडे लेखन आलं, ते आजोबांकडून. आमचे आजोबा- ऋग्वेदी, यांनी त्या काळात बरंच लिखाण केलं होतं. ‘आर्यांच्या सणांचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास’ असं त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. आपले सगळे सण, त्यांची माहिती, त्यांचं महत्त्व असं बरंच अभ्यासपूर्ण आणि वेगळं पुस्तक होतं ते. टागोरांची गीतांजली त्यांनी संपूर्ण अभंगात रचली होती. त्यांचं शिक्षण कानडीत झालं होतं, पण मराठी लेखन करायचे ते. शिवाय गीतांजली वाचण्यासाठी म्हणून बंगाली सुद्धा शिकले. मग ती संपूर्ण अभंगात रचली आणि ते पुस्तक टागोरांना नेऊन दाखवलं. त्यामुळे लेखनासाठीचं प्रोत्साहन भाईला आजोबांकडून मिळालं.

भाषणाच्या बाबतीत सुद्धा वडील सांगत तुझं भाषण तूच लिहून काढलं पाहिजेस. वडीलांच्यामुळेच शाळकरी वयात भाईंच्या वकतॄत्व कलेला प्रोत्साहन मिळालं. मला शाळेत असतानाच त्यानी किर्तन सुद्धा लिहून दिलं होतं. अगदी पूर्वरंग, उत्तररंगासकट! ‘बेबंदशाही’ हे नाटक भाईनी स्त्री पात्र वर्ज्य करुन लिहिलं. आम्ही ते शाळेत असतांना सादर सुद्धा केलं होतं. भाई स्वत: संभाजी झाला होता. आम्हाला मावळे केलं होतं. (कारण मावळ्यांना भाषण नव्हतं.)

हे करु नको, ते करु नको, असं आम्हाला घरुन कधीही सांगितलं गेलं नाही. अभ्यासातही लक्ष असायचं, तसंच ह्या activities मध्येही. आईवडीलांचा यात खूप मोठा हात आहे.
भाईच्या उत्स्फूर्तपणा, वक्तृत्व या गुणांना यामुळे लहानपणीच प्रोत्साहन मिळालं. कुठेही काही कार्यक्रम झाले, खाडिलकरांनी पोवाडे म्हटले, की दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पोवाडा. पुढे जे एकपात्री त्यानी केलं, ते तो लहानपणापासूनच करत होता.”

एकपात्री वरून सहाजिकच ‘बटाट्याच्या चाळी’चा विषय निघाला. उमाकांतकाका म्हणतात,’चाळीवर’ ते एक पुस्तक लिहू शकतील एवढ्या आठवणी आहेत त्यांच्याकडे. अत्रे, नाथ पै, मामा वरेरकर अशा दिग्गज मंडळींनी ‘चाळीच्या’ प्रयोगाला दिलेल्या भेटीच्या आठवणी ते सांगत होते.
मामा वरेरकर दिल्लीहून खास प्रयोग बघण्यासाठी म्हणून आले होते. interval ला काही हवं का म्हणून विचारलं, तर म्हणाले, नको. तो दमला असेल. मी बसतो इथेच. आणि खुर्चीत बसून राहिले. मी भाईला जाऊन सांगितलं. त्यांना तुला भेटायचं आहे, पण म्हणाले तू दमला असशील. जरा वेळाने भेटतो. भाई म्हणाला, नाही नाही. मी येतो आत्ताच. भाई आला. तोपर्यंत लोक निघून गेले होते. मामा वरेरकर खुर्चीतच बसून होते. भाई आल्याबरोबर ये, बस म्हणाले. आपल्या शेजारी बसवलं आणि पाठीवरुन हात फिरवत म्हणाले, ‘बाळा दमला असशील रे.’ इतकं त्यांचं प्रेम होतं भाईवर. भाईनी रेडिओवरची नोकरी सोडल्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटलं असेल ते मामा वरेरकरांना. मला न सांगता तू नोकरी कशी सोडलीस म्हणून त्यांना रागही आला होता. इतके प्रेमळ होते ते.

एकदा अत्रे ‘चाळीच्या’ प्रयोगाला आले होते, पण न भेटताच निघून गेले. भाईला वाटलं त्यांना प्रयोग आवडला नसेल. प्रयोग संपल्यावर रात्री आम्ही सगळे भाईच्या घरी जायचो. तिथे जेवून वगैरे गप्पा मारत बसलो होतो. १-१:३० वाजता फोन वाजला. भाईनी फोन उचलला. कानाला लावला. आम्ही सगळे बघत होतो. ‘मी बाबुराव अत्रे बोलतोय. आत्ताच तुझ्यावर अग्रलेख लिहून संपवला आहे. आता मी मरायला मोकळा.’ आणि खरोखरीच त्यांनी दुसऱ्या दिवशी मराठा मध्ये ‘चाळी’वर चार कॉलमचा अग्रलेख लिहिला! तो अजूनही ‘टिळक मंदिरात’ ठेवला आहे.

‘बटाट्याची चाळ’ नंतर, ‘पु.ल.देशपांडे सहकुटुंब सहपरिवार’.. ‘वराती’च्या प्रयोगाबद्दल ऐकायला साहजिकच आम्ही उत्सुक होतो.
रमाकांतकाका सांगायला लागले, “आम्ही सगळे नातलग, मित्र मिळूनच ‘वाऱ्यावरची वरात’ करायचो. भाई, वहिनी, मी, काही दिवस उमाकांत, माझा एक भाचा, एक बहीण आणि आमची इतर सगळी मित्र-मंडळी सुद्धा अगदी घरच्यासारखीच. आमची अशी नाटक कंपनी वगैरे नव्हती. सगळे घरचेच. त्यामुळे वातावरण सुद्धा खेळीमेळीचं असायचं. आणि प्रयोग सुद्ध कसे, तर दररोज व्हायचे. ‘असा मी असामी’ चा प्रयोग सुद्धा भाईनी १५ दिवस सलग केला आहे. ‘वराती’च्या वेळेला प्रत्येकाची नोकरी धंदा यामुळे आम्ही शनिवार, रविवार सलग पाच प्रयोग सुद्धा केले आहेत. शनिवारी २ प्रयोग आणि रविवारी ३ प्रयोग.

तेव्हा आम्ही सगळे खूप काही actor वगैरे नव्हतो. पण एकत्र मिळून करायचो. आता लालजी देसाई, त्याला स्टेजवर जाऊन एक वाक्य बोलता येत नाही. स्टेजवर गा म्हटलं तर गाईल, पण नाटकात काम कर म्हटलं तर शक्य नाही. भाईनी सांगितलं, मी तुला असं काम देतो, की त्यात फक्त तुला गायला लागेल. वाक्य दोन-चारच असतील. आणि मग त्याला ‘देसाई मास्तर’चं काम दिलं ती ४-५ च वाक्य होती काहितरी. पण ती सुद्धा तो बिचार पाठबिठ करुन म्हणत असे. श्रीकांत मोघे, दत्ता भट, शशी झावबा हे सगळे मित्रच होते त्याच आमचे.

आमचा एक भाचाही होता. त्याल नुसतं येऊन बसायचंच काम होतं. कोणीतरी गावातला वगैरे माणूस म्हणून. बोलायचं काही नव्हतं. मग तो आपला येऊन नुसता बसायचा. म्हणजे अशी सगळी घरचीच मंडळी होती. लालजी देसाईला तसं फक्त गायचंच काम होतं. आणि ४-५ वाक्य. पण एकदा त्याला यायला उशीर होणार होता, म्हणून भाईनी त्याला मुंबईहून पुण्याला विमानानी नेला. भाईची प्रत्येकालाच अशी घरच्यासारखी treatment होती. त्यामुळे ते ही सगळे फार खूष असायचे. आणखी एक जण म्हणजे मधू गानू. जो भाईचा आयुष्यभर सेक्रेटरी म्हणून राहिला. आणि अजूनही वहिनीला मदत करतो. पुरुषोत्तम मंत्रीसारखा ऑफिसरसुद्धा धोब्याचं काम करायचा वरातीत. नीला देसाई (नीलम प्रभू), विजया मेहता असे आम्ही सगळे जण एकाच कुटुंबातले असल्यासारखे होतो.”

पु. लं.ना मिळालेली लोकप्रियता, रसिकांचे उदंड प्रेम याचेही अनेक किस्से या दोघांकडे आहेत. उमाकांत काका अगदी भाईंसारखे दिसत असल्यामुळे फसलेलेही बरेच लोक आहेत. त्यांनी एक किस्सा सांगितला. “आम्ही म्हैसूरला फिरायला गेलो होतो. एक ठिकाणी तलावाजवळ उभे होतो. तिथेच मला वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर भेटले. आम्ही तिघेही बोलत होतो. तेवढ्यात एक फोटोग्राफर धावत आला आणि दोघांना म्हणाला, “तुम्ही दोघे बाजूला व्हा. मला पु.लं.चा फोटो घ्यायचा आहे.” वसंत बापटांनी डोक्याला हात लावून सांगितले, हा पु.लं.चा भाऊ आहे. मी वसंत बापट आणि हे पाडगावकर आहेत.

तसंच एकदा पार्ल्यात रस्त्यावरुन फिरत असतांना पु.लं.चे भाऊ म्हणून मला एका साऊथ इंडियन माणसाने अक्षरश: साष्टांग नमस्कार घातला होता.”
उमाकांत आणि रमाकांत काका आठवणींची एकेक लड उघडत होते. आम्ही ज्या खोलीत बसलो होतो, त्या खिडकीबाहेरुन निरनिराळ्या पक्ष्यांचे गोड आवाज पार्श्वसंगीताचं काम करत होते. आणि त्या काळचं ते घर, वातावरण याची कल्पना येत होती. त्या खिडकीबाहेरची ती झाडं, आम्हीसुद्धा या सगळ्याचे साक्षीदार आहोत बरं का! असंच जणू सांगत होती.

शब्दांशी लीलया खेळणारा, सुरांच्या हातात हात घालून चालणारा, जीवनातला प्रत्येक क्षण अक्षरश: जगलेला आणि मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत बनलेला तो जादूगार… त्याच्या आठवणी एका तासात थोडीच संपणार होत्या? पण त्यातल्या ज्या काही आमच्या वाट्याला आल्या, त्या मात्र आमची ‘पुलकित’ संध्याकाळ सोनेरी करुन गेल्या.

स्मिता मनोहर.

(श्री. उमाकांत व रमाकांत काकांच्या प्रेमळ सहकार्याबद्दल, आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. ही ‘पुलकित’ संध्याकाळ सौ. अनुराधा देशपांडे यांच्यामुळे शक्य झाल्याने त्यांचे आभार शब्दात मांडणे शक्य नाही. आमचा मित्र मनोज प्रभू याची मदत सुद्धा खूप मोलाची होती.) – स्मिता.

********

नवी भर दि.१८-१०-२०२० (वॉट्सअॅपवरून साभार)

गवय्या होते होते

तसा मी काही फारसा महत्वाकांक्षी माणूस नाही. नेपोलियन हा जगातला सर्वात महत्वाकांक्षी पुरूष मानला जातो. त्याच्याशीच तुलना करायची म्हणजे नेपोलियनचं एक तीनशे पानांचं चरित्र माझ्या कपाटात आहे, ते वाचून काढायची माझी एक महत्वाकांक्षा आहे. वास्तविक मी होऊन नेपोलियनच्या वाटेला कधीच जाणार नव्हतो.

एकदा मित्रांच्या बैठकीत मी माझी एक माफक महत्वाकांक्षा बोलून दाखवली होती. तेव्हा माझ्या एका विद्वान मित्रानं चिडून माझ्यावर हे नेपोलियनचं तीनशे पानी चरित्र मारलं होतं. तेव्हापासून तो नेपोलियन माझ्या कपाटात बंदिस्त होता. वास्तविक माझ्या मित्राला चिडण्याचं कारण नव्हतं. त्याची महत्वाकांक्षा आमच्या गावातल्या मुन्सिपाल्टीचा अध्यक्ष व्हायची होती आणि माझी महत्वाकांक्षा ज्या नोकरीत दुपारी तीन तास झोप घेता येईल अशी नोकरी मिळवणं एवढीच होती. असली क्षुद्र महत्वाकांक्षा ठेवल्याबद्दल त्यानं माझ्यावर अख्खा नेपोलियन मारला होता.

अल्पसंतोष हा सुखी जीवनाचा पाया आहे, असं माझं माझ्यापुरतं मत आहे. आणि अनुभवानं माझं हे मत पक्कं झालं आहे. लहानपणी वडील माणसं “बाळ, तु मोठा झाल्यावर कोण होणार रे?” असा प्रश्र्न मला विचारून मग आपणच पस्तावत असत. माझी पहिली महत्वाकांक्षा हॉटेलात भजी तळणारा होणं ही होती.

आमच्या घरासमोरच एक ‘धि न्यू बलभीम सुग्रास हॉटेल’ होतं. संध्याकाळी पाच वाजले की हॉटेलच्या दारात एक दणदणीत उघडाबंब गृहस्थ भजी तळायला बसायचा. त्या सुगंधानं वातावरण भरून जायचं. त्याची ती झारा फिरवण्याची ऎट! तेल उकळलं की नाही पाहायला तो त्या तापल्या कढईत पाण्याने चार थेंब टाकून चर्रर्र असा आवाज करायचा. मग सराईत हातांनी पिठाचे गोळे वळायचा. कांदा तर असा सुंदर चिरायचा की देखते रहना. मग झपाझप भजी तळायला लागायचा. तळता तळता कपाळावरचा घाम मोठ्या ऎटीत पुसायचा. एवढं सर्व चालू असताना त्याच्या तोंडात विडीदेखील असायची. आणि त्याचे लांब केस झाऱ्याचा हालचालीबरोबर पुढंमागं झटकले जायचे ते मनोहर दृश्य आजदेखील माझ्या डोळ्यांपुढं उभं आहे. त्यामुळं लहानपणी कोणीही विचारलं की,

“बाळ, मोठा झाल्यावर कोण होणार?” की माझं ठरलेलं उत्तर होतं, “भजीवाला!!” पाहुण्यांना जरा धक्काच बसायचा, “काय?” मग माझे वडील वगैरे काही तरी सांगून मला तिथून हुसकावत. तात्पर्य, पहिला आदर्श भजीवाला, तिथून मग कल्हईवाला, मग पाणी नारिएलवाला-अशा माझ्या महत्वाकांक्षा बदलत होत्या.

असल्या ह्या माझ्यासारख्या अत्यंत माफक महत्वाकांक्षी माणसाच्या मनात मी `गवय्या’ व्हावं हे नक्की कधी आलं हे सांगण कठीण आहे. आलं, हे मला नक्की आठवतं. पण महत्वाकांक्षेचा उगम सापडत नाही. बाकी आयुष्यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचा उगम सापडणं अवघड आहे. आपल्याला सर्दी नेमकी कुठल्या वेळेपासून झाली हे कुठं सांगता येतं? मला पहिली शिंक काल तीन वाजून दोन मिनिटांनी आली आणि तिथून सर्दी सुरू झाली, असं सांगणारा महाभाग मला तरी भेटला नाही. माझ्यासमोर पडलेल्या नेपोलियनला तरी फ्रान्सचा बादशहा होण्याचं पहिलं स्वप्न कधी पडलं हे सांगता आलं असतं, असं मला नाही वाटत.

पण माझा गवई संकल्प आणि तो भजीवाला याचा काही तरी संबंध असावा. हल्लीचे दिवस हे अंतर्मनाच्या भानगडीतून नाती जुळवण्याचे आहेत. वास्तविक गायन आणि भजी यांचा अजिबात संबंध नाही असं नाही. अनेकांच्या आवाजाचं भजं' झालेलं आपण ऎकलं असेल किंवा मैफलीत भिकार गवयाला भज्यांचा अहेर केल्याचं ठाऊक असेल आपल्याला! परदेशात अशा वेळी म्हणे नासक्या अंड्यांच्या किंमती वाढतात. भारत अहिंसक असल्यामुळं अंड्यांची हिंसा न मारता अहिंसक शाकाहारी भज्यांचा वापर करतो, हे आपल्या अहिंसक प्रवृत्तीला साजेसंच आहे. दारापुढला तो भजीवाल्याचा आणि माझ्या गवई होण्याचा संबधं आहे म्हणतो तो तसा नव्हे. दारापुढला तो भजीवाला हा माझा आदर्श होता. मोठेपणी मी त्याच्याइतके लांब केस वाढवणार होतो. ओठाच्या एका कोपऱ्यात विडी ठेवणार होतो. आणि भजी तळता तळता त्याच्यासारख्या ताना मारणार होतो. हो, ताना मारणार होतो. कारण तो भजीवाला भज्यांचं पीठ उकळणाऱ्या तेलात मुठीतून फिरवून फिरवून टाकता टाकता जोराजोरात ताना मारायचा. झाऱ्यानं भजी उचलून टोपलीत टाकता‘पिया बिन नही आवत चैन…’ म्हणायचा. मला वाटतं, गवई होण्याची कल्पना माझ्या डोक्यात प्रथम रुजली ती त्या प्रसंगातुन! पुढं अनेक पाव्हण्यांच्या प्रश्र्नांना `मी भजीवाला होणार’ हे माझं उत्तर ऎकून माझ्या तीर्थरुपांनाही काळजी वाटायला लागली असावी आणि त्यांनी घर बदललं!

आता आम्ही निराळ्या गल्लीत राहायला गेलो; पण आपण भज्यांच्या आगीतून निघून संगीताच्या फुफाट्यात पडलो याची माझ्या तीर्थरुपांना कल्पनाही नव्हती.

आमच्या नव्या घरासमोरच गाण्याचा क्लास होता. बाहेर बोर्ड होता:- “तुंबरू संगीत यूनिवर्सिटी! इथं शास्त्रोक्त गायन, सुगम संगीत, सतार, दिलरुबा, व्हायोलिन, हार्मोनियम, सारंगी, फ्लूट, सरोद, विचित्रबीन, गोटुवाद्दम, क्लॅरेओनेट, मृदुंगम आणि घटम शास्त्रीय पद्ध्तीनं शिकवण्यात येईल. संध्याकाळी सहा ते सात शॉर्टहॅंड व टायपिंगही शिकवण्यात येईल.”

मला लहानपणी तो बोर्ड पाठ झाला होता. एका दहा बाय आठच्या जागेत ही तुंबरू संगीत युनिव्हर्सिटी होती. आणी युनिव्हर्सिटीचे एकमेव प्रोफेसर माष्टर भगवानकुमार सकाळच्या वेळी ती खोली झाडताना मला माझ्या गॅलरीतून दिसायचे. दिसायला तेही माझ्या आदर्श भजीवाल्यासारखेच होते. त्यांचेही केस लांब होते आणि दातांत विडी धरून बोलायची त्यांनाही सवय होती.

मग आठ वाजता क्लास सुरू व्हायचा, मी इकडे गणितं सोडवत बसत असे, आणि तिकडून ‘तुम जागो मोहन प्या~रे' सुरू व्हायचं! त्या संगीताशी मी इतका तन्मय होत असे की अनेक वेळा मी गणिताची उत्तरं गमपधनीसा वगैरे लिहून शाळेतल्या माझ्या मास्तर नावाच्या साता जन्मीच्या वैऱ्याचा मार खाल्ला होता. पण ध्येयासाठी हाल सोसावे लागतात हे माझ्या धड्यातलं वाक्य मी पाठ केलेलं होतं. गॅलरीत गणितं सोडवता सोडवता मला‘तुम जागो मोहन प्यारे…’, ‘धिट लंगरवा कैसे घर...' ‘येरी आली पिया बिन…’ वगैरे चिजा पाठ झाल्या होत्या आणि वडील कचेरीला गेले की एकलव्याच्या निष्ठेनं कंठगत केलेल्या त्या चिजा गाऊन मी घर डोक्यावर घेत असे. कुणालाही कल्पना नव्हती की त्या घरात उद्याचा तानसेन मोठा होतो आहे.

पण एकदा तो दुर्दिन उजाडला. असेच कोणी तरी पाव्हणे आले होते, आणि कुठल्याही पाव्हण्याप्रमाणं त्यांनी प्रश्र्न केला,
“बाळ, मोठा झाल्यावर कोण होणार तू?”
वडिलांचा खर्रकन उतरलेला चेहरा मला अजूनही आठवतो. माझ्या “भजीवाला होणार” या उत्तराची ते वाट पाहत होते. पण माझी महत्वाकांक्षी बदलल्याची त्यांना दाद नव्हती.
मी चटकन सांगितलं, ” प्रोफेसर माष्टर भगवानकुमार.” पाहुण्यांना काही कळलं नाही. “अच्छा प्रोफेसर होणार!” ते म्हणाले.
“कसला प्रोफेसर?” मी चटकन तो बोर्ड म्हणून दाखवला: “येथे शास्त्रोक्त गायन, सुगम संगीत, फिल्मी संगीत, सतार, दिलरुबा, व्हायलिन, हार्मोनियम, सांरगी, फ्लूट, सरोद, विचित्रबीन, गोटुवाद्दम, क्लॅरिअओनेट, मृदुंगम आणि घटम शास्त्रीय पद्धतीनं शिकवण्यात येईल. संध्याकाळी सहा ते सात शॉर्टहॅंड व टाइपरायटिंगही शिकवण्यात येईल.”

त्यानंतर वडिलांनी पुन्हा ते घर बदललं. नवीन घर घेताना समोर हॉटेल, गायनशाळा वगैरे काही नाही याची खात्री करून घेतली आणि एका गुरांच्या दवाखान्यापुढं आम्ही राहायला गेलो. गवई होण्याची संधी हुकली, परंतु मनातून ती इच्छा गेली नव्हती.

मी मोठा झाल्यावर गाण्याच्या बैठकींना जाऊ लागलो. मागं दोन तंबोरे, पुढे खॉंसाहेब, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला त्यांचे साथीदार, ती वाहवा, ते `क्या कहने’ हे मैफिलीतल्या रसिकांचे उदगार! मी रात्री घरी परत अस्वस्थ होऊन येत असे. येता येता गवई झाल्याची स्वप्नंदेखील पाहत असे.

दारात म्युझिक सर्कल्सच्या सेक्रेटरींची रांग लागली आहे, भगिनी-समाजाच्या कार्यकर्त्या महिला ” ते काही नाही. तुमचं गाणं झालंच पाहिजे हं आमच्या क्लबात!” म्हणून लडिवाळपणं माझ्याशी बोलताहेत आणि मी “नाही हो परवा पहा मला जालंधरला प्रोग्राम आहे. मग कलकत्त्याला कॉन्फरन्स आहे. तिथून आफ्रिकेत आमचं कल्चरल डेलिगेशन जाणार, त्यात मी आहे…” अशी मखमली उत्तरं देतो आहे…
मग त्या बायका “हे हो काय!” असं म्हणताहेत…. असली स्वप्नं पाहत रात्रीच्या रात्री जागून काढत असे.

तशी माझी संगीताची इतर तयारी झाली होती. मी चांगला भक्कम तंबाकू खात होतो. डझनभर कुडते' शिवून घेतले होते. वाढत्या वयाबरोबर टक्कल पडत गेल्यामुळं लांब केसांचं जमलं नाही म्हणून लांब मिशा वाढवल्या होत्या. बागेश्री, भैरव, भीमपलास ही नावं मी वांगी, बटाटे, कांदे म्हटल्याच्या सहजतेनं घेत असे. मला रागबीग ओळखता येत नव्हते. अशा वेळी कोणी रागाचं नाव विचारलं, की तोंडात तंबाकू असल्याचा बहाणा करून मी हाताच्या खूणेनं रागाचं नाव सांगण्याचा प्रयत्न करत असे. त्याखेरीज आग्रा घराणं, रामपूर घराणं, पतियाळा घराणं, गांधर्व महाविद्यालय, भातखंडे वगैरे नावं पेरत असे. शिवाय फत्तेअलिखांचा मुलगा गुलाम अली, त्याचा भाचा बर्कतुल्ला, त्याचा पुतण्या अब्बासमिया, अब्बासमियांचा नातू फलाणखां, त्याचा भाऊ ठिकाणेखां असल्या वंशावळीही पाठ होत्या. बाकी होतं फक्त‘आ’ करून गायला सुरवात करणं.

पण अशी जय्यत तयारी करून एक दिवस मी एका वस्तादजींच्या घरी गेलो.
“वाया”
वस्तादजींनी माझं स्वागत केलं. मी गाणं शिकण्याची माझी इच्छा व्यक्त केली. “छान छान! आपण यापूर्वी गाणं शिकला आहांत का कुठं?”
“हो! लहानपणी शिकलो आहे.” मी एक ठेवून दिली.
“किती वर्ष?”
“चांगला चार-पाच वर्ष शिकलो आहे!”
“म्हणता का काही?”
“हो! काय म्हणू?” जणू काय पाच-पन्नास राग माझ्या गळ्यात उड्या मारताहेत, अशा थाटात मी विचारलं.
“काहीही म्हणा. अरे बेटा उस्मान, तंबोरा काढ.”
मग आतून एक पन्नास एक वर्षांचा बेटा उस्मान आला. त्यानं तंबोरे काढलं.
“काय स्वर?”
इथं पंचाईत आली. पण मी काळी चार, काळी पाच वगैरे शब्द ऎकले होते. मी मनात म्हटलं, उगीच चार-पाच नको. ते पुढं लावता येतील. एक-दोनपासून सुरूवात होऊ द्या !.
“माझा स्वर काळी दोन!”
“बहोत अच्छा!” उस्माननं तंबोऱ्याच्या खुंट्या पिळल्या. आणि मी प्रोफेसर माष्टर भगवानकुमारांचं नाव घेऊन सुरुवात केली :
“लट उलझी सुलझाsssss!.
पुढं काय झालं मला नीटसं आठवत नाही. डोक्यात एक हातोडी बसली असावी; कारण माझ्या कपाळावर ती खूण अजून आहे. आणि दुसरी गोष्ट आठवते म्हणजे माझ्या चपलांचा जोड त्या उस्तादजींच्या घरी आहे. त्याखेरीज एकच आठवतं म्हणजे माझा स्वर ऎकल्याबरोबर म्हातारे उस्तादजी ओरडले होते, “बेवकूफ! गाणं म्हणजे काय भजी तळणं वाटलं काय तुला?”

माझ्या गाण्यात भजीवाला, माष्टर प्रो० भगवानकुमार आणि गुरांच्या दवाखान्यातले पेशंट ह्या तिघांचाही समन्वय झाला असावा.

पुन्हा त्या दिशेला गेलो नाही. आता मला तबले, तंबोरे दिसले की घेरी येते. माझ्या त्या `लट उलझी सुलझा’ मध्ये अशी काय शक्ती होती, की ज्यामुळं त्या ऎंशी वर्षाच्या उस्तादाचं ऎंशी वर्ष पोटात साठलेलं पित्त खवळून बाहेर आलं, देव जाणे! पण चांगलं हातातोंडाशी आलेलं गाणं गेलं एवढंच! भारतीय संगीताचंच दुर्दैव नाही तर काय, एक तानसेन जन्माला येण्यापूर्वीच मेला.
पु.ल. देशपांडे

या लेखाची शैली खास पुलंची वाटत असली तरी हा त्यांनीच लिहिला आहे का याबद्दल मी आधी साशंक होतो, पण गूगलवर अशी माहिती मिळाली. ’आपल्या दीर्घ व विविधरूपी कलानिर्मितीच्या जीवनात पु. ल. देशपांडेयांनी नभोवाणी / आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. … त्यांच्या भाषणांची व श्रुतिकांची बहुतेक हस्तलिखिते जिव्हाळ्याने व साक्षेपाने सुनीता देशपांडे यांनी जपून ठेवली होती. त्यांतील निवडक प्रस्तुत संग्रहात, दोन भागांत, प्रसिद्ध होत आहेत.’

**********

नवी भर दि.२८-१-२०२१ (वॉट्सअॅपवरून साभार)

पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या आठवणी

१९७८- ८०च्या आगची मागची गोष्ट असेल. पुण्यात होतो. चिक्कार काम असे. एकदा मधुकाका कुलकर्णी म्हणाले, ‘‘अरे, पुलंचं नवं पुस्तक करतो आहे ‘तुका म्हणे आता’ नावाचं. कव्हर कर की!’’
मी म्हटलं, ‘‘करतो. त्यात काय?’’
पुलं नेहमी भेटत. गप्पाटप्पा चालत. तोवर पुलंच्याभोवती बरीच प्रभावळ विणली गेलेली होती; पण मला तेव्हा कशाचा म्हणता कशाचा पत्ता नसे. त्यांचं लेखन सोडलं तर त्यांच्याबद्दल बाकी फार काही माहिती नव्हतं. बरंच होतं ते म्हणजे.
कव्हर झालं. ब्राऊन पेपरवर पांढऱ्या रंगाने वारकऱ्याच्या कपाळावरचा टिळा बोटाने ओढला होता आणि खाली काळ्या बुक्क्य़ाचा ठिपका.
मधुकाका खूश! मला म्हणाले, ‘‘मी पुलंना फोन करून ठेवतो. तूच जाऊन त्यांना एकदा दाखवून ये!’’
मी म्हटलं, ‘‘जातो!’’
आणि गेलो एका सकाळी. जोशी हॉस्पिटलच्या शेजारची ती ‘रूपाली’.. दार बंद वगैरे!
बेल वाजवली. दारात बाई. मला म्हणाल्या, ‘‘कोण तुम्ही?’’
मी म्हटलं, ‘‘सुभाष अवचट.’’
‘‘म्हणजे कोण?’’
माझ्या डोक्यात खटकी पडलीच. तरी म्हटलं, ‘‘चित्रकार!’’
बाईंनी विचारलं, ‘‘काय काम आहे?’’
मी सरळ म्हणालो, ‘‘माझं काहीही काम नाही. मधुकाका कुलकर्णीनी भेट सांगितलं, म्हणून आलो होतो. आता चाललो.’’
तेवढय़ात घरातून हालचाल झाली. ते पुलं होते. म्हणाले, ‘‘अगं, येऊ दे, येऊ दे त्याला.. ये रे, ये तू!!’’
स्वत: पुढे येत पुलं मला हाताला धरून बैठकीच्या खोलीत घेऊन गेले. मऊ, ऊबदार घर. सकाळचा सुंदर प्रकाश. पुलंना कव्हर दाखवलं. फार खूश झाले. मला म्हणाले, ‘‘मस्त रे!!!’’
बाई तिथेच बसलेल्या.
म्हणाल्या, ‘‘बघू काय केलंय ते!!’’
माझं आर्टवर्क बघतानाची त्यांची ती धारदार नजर मला आवडली नाही. वरून प्रश्न.. ‘‘काय आहे हे? असंच का केलंय? यातून काय सांगायचंय?’’
मला या असल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला अजिबात आवडत नाहीत. त्यातून डोक्यात खटकी पडलेलीच होती.
मी काहीही बोललो नाही. विषय बदलत म्हणालो, ‘‘अहो बाई, एवढी मस्त सकाळ आहे. जरा चहा टाका की आमच्यासाठी!!’’
एक तर या बाई कोण, त्या माझ्या आर्टवर्कबद्दल का बोलतायत असे प्रश्न मला पडलेले. पुलंनी सावरून घेतलं. ‘चहा हवाच आता..’ म्हणाले.
बाई नाइलाज असल्यासारख्या उठून चहा टाकायला आत गेल्या.
मी सहज पुलंना विचारलं, ‘‘कोण हो या?’’
ते म्हणाले, ‘‘अरे, ही सुनीता. माझी बायको. ओळखलं नाहीस का?’’
बापरे! मी झटका बसल्यासारखा गप्पच बसलो!
काहीच सुचेना. तेवढय़ात सुनीताबाई चहा घेऊन आल्या. माझ्यासमोर कप धरत म्हणाल्या, ‘‘घे चहा!!’’
घशातून गरम जाळ खाली उतरल्यावर मग मला जीभ उचकटायला थोडा धीर आला. पुलं होतेच, त्यांनी वातावरणातला ताण अलगद काढला. मग बाईही खुलल्या. गप्पा झाल्या.
ही अशी सलामी. ती झडली त्या पहिल्या दिवशी आपल्याला एक ताठ कण्याची मैत्रीण मिळणार आहे, हे मला माहिती नव्हतं.
हळूहळू भेटी व्हायला लागल्या. सूर जुळले. सुनीताबाईंच्या नजरेतल्या करारी पाण्याला स्नेहाची मऊ धार असे.. ती दिसायला लागली.
त्याचदरम्यान काही काळासाठी भांडारकर रोडवरच्या एका बंगल्यात मी माझा स्टुडिओ थाटला होता. दगडी, गारेगार भिंतींचा देखणा बंगला. भोवती झाडी आणि मस्त शांतता. बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये माझा स्टुडिओ. तिथे मी काम करीत बसलेला असे. समोरच्याच गल्लीत माझं घर होतं. माझी बायको सुमित्रा. दोन छोटी मुलं.
पलीकडे तात्या माडगूळकर. आणि आम्ही दोघेही पुलंच्या फिरायला जायच्या रस्त्यावरच अगदी.
फार श्रीमंत दिवस होते ते. संध्याकाळ उतरली की पुलं चक्कर मारायला जाताना दिसत. खरं तर त्यांचा स्वभाव बैठा. त्यांना अशा चालण्या-बिलण्यापेक्षा मस्त बैठक जमवून गप्पा-गाणी करायला जास्त आवडत. त्यामुळे स्टुडिओत मी दिसलो की चालणं सोडून ते सरळ आत येत. मला म्हणत, ‘‘काय चित्रकार? काय चाललंय?’’
ते बसतात, तोवर अनेकदा तात्या माडगूळकर डोक्यावर टोपी चढवून आणि हातात त्यांची ती लाडकी काठी घेऊन रमतगमत बंगल्याच्या फाटकातून आत शिरत! की झालंच मग! सगळा कल्ला नुसता!!! माझ्या रंगांच्या उघडय़ा टय़ुबांना झाकणं लागलीच लगेच!! ज्या काय गप्पा रंगत.. तोड नाही!
क्वचित कधीतरी वि. म. दांडेकरांना फिरता फिरता आतल्या माहोलाचा सुगावा लागे. मग ते फाटकातून जोराने हाक देत, ‘‘हं.. काय रे?’’
की मी बाहेर जाऊन त्यांना आत घेऊन येई!! मज्जा!!
संध्याकाळ उतरणीला लागली की तात्यांना मूड आलेला असे. ते डोळे मिचकावत म्हणत, ‘‘मग काय अवचट, काही वाईट विचारबिचार येतायत की नाही मनात?’’
आम्ही तयारच असायचो मैफिलीला! दांडेकरांकडे अनेकदा विमानतळावरून डय़ुटी-फ्रीमधून आणलेली महागडी स्कॉच असे. ते म्हणत, ‘‘थांबा, मी आलोच!’’
पुलंचा पाय असा सुट्टा नसे. ते म्हणत, ‘‘बसलो असतो रे आज.. पण सुनीताला कोण सांगणार?’’
मी लगेच उडी मारून म्हणायचो, ‘‘थांबा, मी करतो फोन. माझं ऐकतात त्या!’’
नुस्तं ‘हॅलो’ म्हटलं की सुनीताबाई वेळ-काळ बरोब्बर ओळखत. म्हणत, ‘‘चित्रकारा, काही सांगू नकोस तू. भाई आत्ता तुझ्याकडे आहे आणि त्याला यायला उशीर होईल, शिवाय तो जेवायला नसेल; हेच ना? माहित्ये मला ते!’’
पण हे इथेच संपत नसे.
घरी माझी बायको सुमित्रा एकटी आहे, ही इतकी माणसं आयत्यावेळी जेवायला नेऊन मी तिला त्रास देणार आहे; याबद्दल आधी माझी यथास्थित खरडपट्टी निघे. मग म्हणत, ‘‘बरं, किती जण आहात जेवायला? सुमित्राला सांग, काळजी करू नकोस. मी दोन-तीन पदार्थ आणते करून!’’
आमची जमवाजमव होऊन आम्ही समोरच्या गल्लीतल्या माझ्या घरी पोचतो म्हणेतो गरमागरम जेवणाचे डबे बास्केटमध्ये घालून सुनीताबाई हजर!!
माझा मुलगा धृव तेव्हा अगदी लहान होता. आम्ही त्याला ‘बन्या’ म्हणू. ख्यालीखुशाली होऊन आम्ही गच्चीवर बैठक जमवायला निघालो की आमच्या पायापायात करत बन्याही आमच्या मागोमाग येई. ग्लास मांडणं, खाण्याचे पदार्थ वर आणणं या सगळ्यात मदतीला बन्या पुढे! मग जी मैफल रंगे.. काय विचारता!!!
मद्यपान नाममात्रच. खरी मजा गप्पांची. पुलं म्हणत, ‘‘पेटी हवी होती रे सुभाष! आणतोस का घरून?’’
मी म्हणायचो, ‘‘मुळीच नाही! इथे गाणी नकोत तुमची!! गप्पा कशा होणार मग आपल्या? आपल्या गप्पा हाच पूरिया धनश्री आहे असं समजा!’’
पुलंशी मी हे असं भांडण काढलं की सुनीताबाई नुसत्या हसत बसत. त्या गप्पा, तो सहवास, त्या रंगलेल्या रात्री.. मोठी श्रीमंती आहे ती माझी!
जेवायची तयारी झाली की कधी तात्यांच्या, कधी दांडेकरांच्या, सुनीताबाईंच्या मांडीवर बसलेला बन्या खाली जाऊन त्याची एक हॅट होती ती घेऊन येई. प्रत्येकासमोर धरून म्हणे, ‘टिप प्लीज..’ पुलंच्या खिशात कधी एक नाणंही नसे. ते त्यांचा रिकामा खिसा उलटा करून बन्याला दाखवत. मग सुनीताबाई आपल्या कमरेची चंची काढून बन्याला टिप देत आणि त्याच्या गालावर हात फिरवून दुरूनच मुका घेत.
गप्पांच्या मैफिलीनंतर रात्री उशिरा जेवणं आवरली की स्वयंपाकघर आवरून, उरलंपुरलं भांडय़ांत काढून ठेवून, खरकटी भांडी घासूनपुसून जागच्या जागी गेली, की मगच सुनीताबाई कमरेच्या चंचीतली गाडीची किल्ली काढून पुलंना घेऊन घरी जायला निघायच्या. सुमित्राला अगदी कसंनुसं होऊन जाई. पण बाईंच्या कामाच्या झपाटय़ापुढे आम्ही कुणीच काही बोलू शकायचो नाही.
हळूहळू आम्ही एकमेकांच्या स्वभावांना रुळलो आणि कुठे नाटक-सिनेमाला जायचं असेल तर सुनीताबाई फोन करून विचारू लागल्या,
‘‘काय चित्रकार, येणार का?’’
मी तयारच असायचो. एकदा असेच लक्ष्मीनारायण थिएटरमध्ये ‘झोर्बा द ग्रीक’ हा अफलातून सिनेमा पाहायला गेलो होतो. त्यांची ती फियाट चालवायला सुनीताबाई स्टिअरिंगवर. वाटेत कुणीतरी अचानक मधे आलं तर बाईंनी करकचून ब्रेक दाबले.
म्हटलं, ‘‘काय हो हे?’’
तर म्हणाल्या, ‘‘अरे, महाराष्ट्रातली दोन मोठी माणसं तुम्ही! माझ्या गाडीत तुम्हाला काही झालं, तर लोक फाडून खाणार नाहीत का मला?’’
दिसणं, बोलणं सगळं कसं अगदी शिस्तीत. रेखीव आणि नेटकं. ही एक लवलवती ताठ रेघच आपल्याभोवती वावरते आहे असं मला वाटे. मी अनेकदा उगीचच त्यांच्याकडे नुसताच पाहत बसलेलो आहे.
गप्पा व्हायला लागल्या तसे एकमेकांच्या जिव्हाळ्याचे विषयही उमजू लागले. जी. ए. कुलकर्णी गेले तेव्हाची गोष्ट. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते गोविंदराव तळवलकर. जीएंच्या बातमीच्या मागोमाग गोविंदरावांचा फोन आला. मला म्हणाले, ‘‘जीए गेल्याचं आत्ताच कळतं आहे, तर तू त्यांच्यावर एक लेख लिही महाराष्ट्र टाइम्ससाठी!’’
गोविंदरावांना कोण नाही म्हणणार?
मी म्हटलं, ‘‘लिहितो की.. त्यात काय?’’
लिहायला बसलो, लिहीत गेलो. पण नंतर मात्र फाटली. म्हटलं, एवढा मोठा साहित्यिक! आपण उगीच काही चावटपणा तर नाही ना केलाय?
मला एकदम विंदा आठवले. ते मला म्हणत, ‘‘अवचटा खवचटा, फार भरवसा धरू नये रे आपल्या अकलेचा!’’
आता आली का पंचाईत!
मी सरळ सुनीताबाईंना फोन लावला. म्हटलं, असं असं आहे.. ‘‘मी आत्ताच्या आत्ता तुमच्याकडे येतो. मी लिहिलंय ते काय लायकीचं आहे ते मला सांगा!’’
मला म्हणाल्या, ‘‘ये! तुझ्यासाठी चहा टाकतेच आहे मी!’’
गेलो. पुलं आणि सुनीताबाई दोघेही घरी होते. म्हटलं, ‘‘ऐका!’’
सरळ वाचत गेलो. लेख संपला तरी दोघे होते तस्से बसून. काही प्रतिक्रिया नाही. म्हटलं, मेलो! आता चंपी!
काही वेळाने पाहतो तर सुनीताबाईंच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. जवळ येऊन माझ्या हातावर हात ठेवत मऊ आवाजात मला म्हणाल्या, ‘‘अरे नालायका, तू काय तोडीचं लिहिलंयस माहिती तरी आहे का तुला?’’
जीएंवरचा माझा तो दीर्घ लेख त्या दोघांना इतका आवडला, की सुनीताबाईंनी तात्काळ ठरवून टाकलं : आता या लेखाचं पुस्तकच होणार. त्यात चित्रं जाणार. फोटो जाणार. हा लेख वर्तमानपत्रात छापून येणारच नाही.
मी घाबरून म्हणालो, ‘‘अहो, पण गोविंदराव?’’
सुनीताबाईंनी काही न बोलता गोविंदरावांचा नंबर फिरवला. ‘सुभाषचा लेख तुम्हाला मिळणार नाही,’ असं स्पष्ट सांगितलं. मागोमाग श्रीपुंना फोन केला आणि जीएंवर सुभाषचं पुस्तक मौज करणार आहे असं स्वत:च जाहीर करून टाकलं.
मी नुस्ता पाहत बसलो होतो मख्खासारखा!
पुढे सुनीताबाईंनी माझं ते दिव्य अक्षरातलं हस्तलिखित आपल्या ताब्यात घेतलं आणि माझ्या पुस्तकाचं बाळंतपण एकहाती निभावलं.
अशा! प्रेम करतील तर तेही असं करारी!!
एकदा मला दुपारीच फोन आला. मला म्हणाल्या, ‘‘अरे चित्रकारा, आज संध्याकाळी मी बालगंधर्वमध्ये बोरकरांच्या कविता वाचणार आहे. येतोस का माझ्याबरोबर!’’
मी उडी मारून म्हणालो, ‘‘म्हणजे काय? येईन की!’’
ठरल्या वेळी सुनीताबाई गाडी घेऊन मला न्यायला आल्या. आम्ही दोघेच गेलो. बालगंधर्व खचाखच भरलेलं. त्या भल्या प्रशस्त स्टेजवर काही म्हणता काही प्रॉपर्टी नाही. चौकोनी ठोकळ्यांची एक काळी बैठक आणि समोर एक माईक. एवढंच!! ना लाइट्सची जादू, ना संगीत, ना ड्रेपरी.. काही म्हणजे काहीच नाही. आणि समोर ही गर्दी! पहिल्या रांगेत बसून मी आपला काळजीत.. कसं होणार या बाईंचं? त्यात कविता अशा जाहीरपणे वाचतात ते मला कधी आवडायचं नाही. कविता ही खाजगी गोष्ट.. ती एकटय़ाने एकटय़ापुरती वाचायची असते असं मला वाटे. अजूनही वाटतं. त्यामुळे मी कधी कवितावाचनाच्या वाटेला गेलोच नव्हतो.. आणि बालगंधर्वमध्ये तर लोकांचा समुद्र उसळलेला.
पडदा बाजूला झाला- तर समोर गोऱ्या, लखलखत्या, तेजस्वी सुनीताबाई! काळ्या पडद्यासमोर एक शुभ्र ताठ रेघ. माईकसमोर बसलेली. उगीच मान वेळावणं नाही, गळेपडू प्रास्ताविक नाही. थेट कविताच. बोरकरांच्या. एकामागून एक. जादू उलगडत जावी तशा. ते अनपेक्षित लाघव मला पेलवेना. मी खुर्चीत थिजून गेलो. त्या संध्याकाळी अख्खं बालगंधर्व बोरकर नावाच्या लाटेवर उसळून ओसंडून जात राहिलं.. एका साध्या माईकच्या समोर बसलेल्या त्या शुभ्र, ताठ रेघेने हा उसळता दर्या एकटीने उभा केला होता!!!
कार्यक्रम संपवून परत निघालो. गाडीत मी गप्प. दातखीळच बसल्यासारखी झालेली. हे आपण काय पाहिलं, ऐकलं, अनुभवलं; माझं मलाच उलगडत नव्हतं. सुनीताबाईंनी विचारलं, ‘‘काय? कसं वाटलं तुला? जमलं का रे आज?’’
मी म्हटलं, ‘‘बाई, तुम्ही काहीतरी अद्भुत उभं केलं होतंत आज. मला काही सुचत नाहीये कसं सांगू तुम्हाला ते. मी तुम्हाला एक पत्र लिहून कळवीन!’’
म्हणाल्या, ‘‘चालेल चालेल! पण नक्की लिही बरं का! टांग नको देऊस!’’
मी म्हटलं, ‘‘नक्की लिहितो!’’
भेटी होत राहिल्या. स्नेह जडला होताच; तो अधिक घट्ट  झाला. सुनीताबाईंशी भांडण काढायची भीती अशी कधी नव्हतीच. पण वादविवाद झाले की मजा यायला लागली.
हळूहळू मी कामात अधिक बुडत गेलो. प्रवास वाढले. त्यांच्यामागेही अनेक व्यवधानं होती. शिवाय नवनवी व्यवधानं लावून घेण्याची असोशीही होती.
एव्हाना महाराष्ट्रदेशी आणि परदेशीही पुलं आणि सुनीताबाई हे एक मिथक तयार झालं होतं. गोतावळा, गोष्टी, कथा, दंतकथा सगळ्याला पूरच येत गेला. मी त्यापासून लांब होतो.
त्यातच केव्हातरी सुनीताबाईंनी एक पुस्तक लिहून मराठी वाङ्मयाच्या चिमुकल्या वर्तुळात बॉम्ब फोडला. ‘आहे मनोहर तरी’! मी वाचलं आणि बाजूला ठेवलं. माझा अपेक्षाभंग झाला होता. म्हटलं, मुद्दाम कशाला सांगायला जा?
पण सुनीताबाईंचा कधीतरी फोन आलाच. त्यांना माझ्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती. मी म्हटलं, ‘‘असं फोनवर नाही, पुण्यात भेटायला येतो. माझ्यासाठी चहा टाका तुम्ही. मग सांगतो.’’
गेलो.
विषय त्यांनीच काढला. कसं वाटलं सांग म्हणाल्या. समोर पुलं बसलेले. आता आली का पंचाईत!
पण म्हटलं, असतील! खरं बोलायला आपलं काय जातं?
सुनीताबाईंना म्हटलं, ‘‘ते तुमचं कौतुक वगैरे होतंय ते सगळं ठीक आहे हो.. पण रात्री उशिरा मैफल रंगात आलेली असताना कुमार गंधर्वाना साधा चहा हवा होता, तर तुम्ही नाही म्हणजे नाही दिलात, हे काही मला आवडलेलं नाही!’’
त्या उसळून म्हणाल्या, ‘‘अरे, पण कुमारला रात्री दुधातून औषध द्यायचं होतं; म्हणून नाही दिला मी चहा! लिहिलंय की त्यात!’’
‘‘तेच- कशाला लिहिलंय म्हणतो मी!’’ मी मागे हटायला तयार नव्हतो. पुलंचं अख्खं आयुष्य ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीची एवढी प्रदीर्घ कहाणी आहे, ती तुमच्यादेखत घडली. तुमच्या काळातली आकाशाएवढय़ा उंचीची अनेक माणसं तुमच्या आयुष्यात, घरात राहून, वावरून गेली. अनेक प्रसंगांना, गप्पांना, महत्त्वाच्या वादविवादांना तुम्ही साक्षी होतात. हे सगळं नोंदवणारी, टिपू शकणारी, त्याचं महत्त्व माहिती असणारी प्रखर बुद्धिमत्ता तुमच्यापाशी होती; तर तुम्ही त्यातलं काहीही न लिहिता पुलंनी कपाटात ठेवलेल्या शर्टाच्या घडय़ा मोडून त्यांची इस्त्री कशी विस्कटली, हे इतकं सामान्य काहीतरी कसं काय लिहिता तुमच्या पुस्तकात? याला काही अर्थ तरी आहे का?’’
मी सुटलो होतो.
मला मध्ये मध्ये अडवत त्या म्हणत, ‘‘अरे, मला काही डॉक्युमेंटेशन नव्हतंच मुळी करायचं. मी वेगळ्या दृष्टीने लिहिलं आहे हे!’’
त्या खुलासे देत राहिल्या, मी त्यांच्याशी भांडत राहिलो.
‘‘तुमच्या इतक्या श्रीमंत आयुष्यातल्या इतक्या महत्त्वाच्या माणसांबद्दल, घटना-प्रसंगांबद्दल न लिहिता तुम्ही हा असला कचरा का भरलाय पुस्तकात? मराठी माणसांच्या पुढल्या पिढीला कशी कळणार ही श्रीमंती? तुमच्याशिवाय कोण सांगणार आम्हाला? का नाही सांगितलं तुम्ही? का नाही लिहिलं?’’
शेवटी आम्ही दोघंही थकलो आणि विषय संपला. पुलं मंद हसत आमची ही कुस्ती शांतपणे बघत बसलेले होते.
सुनीताबाईंनी माझ्यासाठी चहा टाकला.
मग मध्ये काही र्वष गेली.
मग तर पुलंही गेले.
सुनीताबाई एकटय़ा पडल्या. त्यांच्यात शिगोशिग भरलेली तेजस्वी, चमचमती जादू मग मंदावतच गेली.
असाच केव्हातरी त्यांना भेटायला गेलो होतो पुण्यात. घर बदललेलं. सुनीताबाईही पूर्वीच्या नव्हत्याच उरलेल्या.
मला तिथे त्यांच्यासमोर बसवेना.
मी सहज म्हटलं, ‘‘आज चहा नको मला!’’
तर त्या खोल हसून म्हणाल्या, ‘‘अरे चित्रकारा, मी कुठून देणार आता तुला चहा? मला नाही जमत रे पूर्वीसारखा! चहासुद्धा नाही जमत आता!!’’
त्यांच्या जवळ जाऊन मी एक हलकी मिठी मारली आणि निघालो.
डोळे भरून आले होते. सुनीताबाईंच्या नजरेतली अजूनही अखंड तेवणारी मऊ धार लखलखताना दिसली, ती शेवटची!
मग त्या गेल्याच.
त्यांना कबूल केलेली एक गोष्ट मी शेवटपर्यंत केली नाही. बालगंधर्वमधली त्यांची कवितावाचनाची मैफल मला किती आवडली, हे त्यांना कळवणारं पत्र लिहिणार होतो मी. नाही लिहिलं.
आज सांगतो..
सुनीताबाई, त्या संध्याकाळी तुम्ही जे जादूचं जग उभं केलं होतंत, ते माझ्या मनातून आजतागायत विझलेलं नाही…

सुभाष अवचट

. . . . . . . . . . . .

२४. चाळीची साठी

“चाळीची साठी” १६ फेब्रुवारी १९६१. स्थळ..भारतीय विद्या भवन,मुंबई.
‘इंडियन नैशनल थिएटर'(आय एन टी) चा महोत्सव.
रिकाम्या रंगमंचावर फक्त एक कलाकार.. त्याचा एक मफलर.. आणि एक बाकडं.
बस्स एवढ्या सामग्रीवर अडिच तीन तास लोकांना खिळवुन टाकलं त्या कलाकारानी.
तो कार्यक्रम होता..’बटाट्याची चाळ’.
आणि तो सादर केला पु.ल.देशपांडे यांनी.
‘बटाट्याची चाळ’ चा हा पहिला प्रयोग. दोन वर्षापासून आयएनटी वाले मागे लागले होते. आपल्या महोत्सवात पु.लं.नी एखादा कार्यक्रम सादर करावा. त्यावेळी पु.लं.दिल्लीत दुरदर्शन केंद्रावर काम करत होते. त्यांना त्या कामातुन अजिबातच फुरसत मिळत नव्हती. लागोपाठ दोन वर्षे नकार दिल्यानंतर मात्र आयएनटी वाले ऐकुन घेईनात.पु.लं.साठी महोत्सव पुढे ढकलण्याची तयारी त्यांनी दाखवली. मग मात्र पु.लं.ची पुरती नाकेबंदी झाली. आणि त्यांनी या महोत्सवासाठी एक नवीन कार्यक्रम बनवण्याचे ठरवले
खरंतर ‘बटाट्याची चाळ’ चा हा प्रयोग…प्रयोग म्हणण्यापेक्षा या पुस्तकाचे वाचन त्यांनी तीन वर्षापुर्वीच केले होते. त्यावेळी पु.ल. लंडनमध्ये होते. बीबीसी ची कार्यपद्धती आणि ब्रिटिश रंगभूमीचा अभ्यास यासाठी माहिती आणि प्रसारण खात्याने त्यांना इंग्लंडला पाठवले होते.
लंडनमधील मराठी भाषिक दिवाळी साजरा करतात.आता पु.लं.इथे आलेलेच आहे तर त्यांनी एखादा कार्यक्रम सादर करावा अशी त्यांची इच्छा. ‘कोणालाही नाराज करायचे नाही’ हे पु.लं.चे ब्रीद.
लंडनमधील कॉर्नवॉल स्ट्रीटवरच्या एका हॉलमध्ये त्या दिवशी पु.लं.नी बटाट्याच्या चाळीतले काही भाग वाचुन दाखवले. कार्यक्रम तुफान रंगला.वाक्यावाक्याला हशा आणि टाळ्या. पुढेही कितीतरी दिवस लंडनमधील मराठी बांधवांमध्ये याच कार्यक्रमाची चर्चा.
आणि मग त्यानंतर तीन वर्षांनी झालेला ‘चाळी’ चा अधिक्रुत पहिला प्रयोग. त्यादिवशी खरंतर पु.लं.तापाने फणफणले होते.घशात कोरड पडलेली. सारखे विंगेत जाऊन पाणी प्यायचे.आपल्याकडुन प्रयोग होईल की नाही असंही त्यांना वाटलं.असा घोट घोट पाणी पीत केलेला तो प्रयोग अपेक्षेप्रमाणे रंगलाच असणार यात नवल नाही.
आणि मग दर शनिवार रविवार चाळीचे प्रयोग सुरु झाले. दर आठवड्याला दिल्लीहून महाराष्ट्रात यायचं..प्रयोग करायचे.. तसं पाहिलं तर हे सगळंच खुप दमवणारं होतं.पण प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादाने पु.लं.चं मन भरुन येई.
पु.लं.या प्रयोगाला’बहुरूपी खेळ’ असं म्हणत.’एकपात्री’ हा शब्द त्यांना आवडत नसे.जुन्या काळातील कथेकरी,किंवा किर्तनकार कशी वेगवेगळी उदाहरणे देत,गोष्टी सांगत कथा पुढे नेत..आणि मग शेवटी आपल्या मुळपदावर येत..अगदी तसाच प्रयोग पु.ल. करत.चाळीचं शेवटचं चिंतन याच प्रकारचं होतं.
चाळीच्या पुर्वार्धात ‘उपास’,आणि ‘भ्रमणमंडळ’..तर उत्तरार्धात ‘संगितिका’, आणि ‘चिंतन’ यांचे अंश ते सादर करत.त्रिलोकेकर,कोचरेकर,काशिनाथ नाडकर्णी ही पात्र ते अक्षरशः जिवंत करीत.त्यात मधुन मधुन गायन..तेही विविध ढंगाचं.हे सगळंच तसं पाहिलं तर खुप थकवणारं होतं.आणि शेवटचं चिंतन? ते तर अक्षरशः प्रेक्षकांना हेलावून सोडत असे.
‘बटाट्याची चाळ’ चं बुकिंग सुरु झालं की काही तासातच हाऊसफुल्ल चा बोर्ड हॉलवर लागत असे. शेवटी ठरवण्यात आले..एका प्रेक्षकाला फक्त चारच तिकिटे मिळतील.मराठी रंगभूमी साठी हे सगळंच नवीन होतं.त्याहीपेक्षा पु.लं.साठी तर खासच.तिकिटांचे दर असायचे ७-५-३-आणि २रुपये. असं असुनही खुप मोठी रक्कम जमा व्हायची. पु.लं.च्या आयुष्यात एवढी मोठी कमाई करण्याची ही पहीलीच वेळ. सुनीताबाई तर म्हणाल्याही होत्या..
“बटाट्याची चाळ हा भाईसाठी अकाउंट पेयी चेक होता”
पु.लं.जेव्हा लंडनमध्ये होते.. तेव्हा त्यांनी एम्लिन विल्यम्स चा एक शो पाहीला होता.’A boy growing up’ या नावाचा.हे असंच..एक काळा पडदा, एक खुर्ची, एक नट.अडीच तास हसु आणि आसुचा खेळ.बटाट्याच्या चाळीचा शो बसवताना त्यांच्या डोळ्यासमोर हाच एम्लिन विल्यम्स होता.तो एकदा भारतात आला. पु.लं.नी त्याला चाळीचा शो पहाण्यासाठी बोलावले. तो तर थक्कच झाला. त्याला अजुन एका गोष्टीचे कौतुक वाटले की या कलाकाराला स्क्रिप्टसाठी दुसर्या वर अवलंबुन रहावे लागत नाही.तो पु.लं ना म्हणालाही..तुझे स्क्रिप्ट तुच लिहु शकतोस ही केवढी मोठी सोय आहे.
बटाट्याच्या चाळीला..पु.लं.ना अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. पण जशी प्रेम करणारी माणसे असतात.. तशी द्वेष करणारीही असतातच ना. तर अश्याच एका शो च्या मध्यंतरातली ही घटना.खरंतर मध्यंतरात पु.लं.ना भेटायची परवानगी कोणालाही नसायची. तसा दंडकच सुनीताबाईंनी घातला होता. पु.लं.ची एकाग्रता भंग होऊ नये हा त्यांचा उद्देश. एकदा एक तथाकथित पुल भक्त मध्यंतरात आला.. सुनीताबाईंना भेटला. त्याने सोबत पु.लं.ना आवडणारा पानाचा विडा आणला होता. तो पु.लं.ना द्यावा अशी विनंती केली. या भक्ताचा फारच आग्रह झाला.. म्हणून सुनीताबाईंनी तो घेतला. आत जाताना त्यांनी तो विडा सहजच उघडून पाहिला.तर त्यात काही खिळे आणि चुका भरलेल्या होत्या. पु.लं.नी हे पान तोंडात घातलं असतं तर कसलं मोठं संकट ओढवलं असतं.
तर अशी ही ‘बटाट्याच्या चाळी’ ची कहाणी. तो शो कालांतराने पु.लं.नी थांबवला.पु.लं.नी म्हणण्यापेक्षा सुनीताबाईंनी.कारण भाईसारख्या असाधारण प्रतिभेच्या कलाकाराने आत्मत्रुप्त राहु नये..स्वतःच्या यशाच्या आव्रुत्त्या काढत बसु नये.. नवनवीन आव्हाने स्विकारावी..आणि ती पेलावी यावर त्या ठाम होत्या. आणि मग त्यांनी बटाट्याच्या चाळीचे शो थांबवले.
बटाट्याच्या चाळीचे शो थांबले.. नंतर पु.लं ही गेले. पण ही चाळ पुस्तक रुपाने मात्र मराठी मनात कायमस्वरुपी घर करुन बसली आहे.
शेवटी जाता जाता एक आठवण..
बटाट्याच्या चाळीचा शो पाहण्यासाठी एकदा आचार्य अत्रे आले.प्रयोग संपल्यानंतर रंगमंचामागे गेले.. पु.लं.ना कडकडुन मिठी मारली. तोंडभरून कौतुकही केले. घरी गेले. एक अग्रलेखही लिहीला.त्यानंतर झोपले. पण झोप काही येईना. डोळ्यासमोर चाळ..चाळीतले भाडेकरू.. आणि ती पात्रे जिवंत करणारे पु.ल.
शेवटच्या रात्री दोन अडीचच्या सुमारास त्यांना काही राहवेना. त्यांनी थेट पु.लं.ना फोन लावला. काय चाललंय वगैरे विचारलं.
“अहो झोपलोय.रात्रीच्या दोन अडीचला सभ्य माणूस दुसरं काय करणार?
पण तुम्ही फोन कशासाठी केलाय एवढ्या रात्री?”
त्यावर अत्रे म्हणाले..
मी प्रयोग बघुन आलो.मला झोपच नाही. वा वा वा…पुल..खरं सांगु तुला,
सगळं पाहीलं..हसलो.. डोळ्यात अश्रू आले. सगळं झाल्यावर म्हटलं,आता वाटतं..”
“काय? काय वाटतं..?
“वाटतंय की झालंय माझ्या आयुष्याचं सार्थक..काय पहायचं राहीलंय?आता मी मरायला मोकळा झालो”

सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८.

२५. लोक मात्र हसायला हवेत

पु. ल. म्हणायचे, घरात गंभीर राहून घराला हॉस्पिटल नका बनवू. आपल्याला असं वाटतं की, चिडल्या शिवाय, रागवल्या शिवाय आपलं कुणी ऐकणारच नाही. आपण जरी चिडलो तरी लोक मात्र हसायला हवेत आणि आपलं ऐकालयालही हवेत. ही किमया पुल करतात. त्यांनीच सांगितलेला हा किस्सा….

” एकदा मी पुण्याहून कोल्हापूरला एस टी ने जायला निघालो. जवळ पास एक तासाने थांब्यावर बस थांबली. एक ग्रामीण महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन बस मधे शिरली आणि नेमकी माझ्या समोर येऊन बसली. आमच्या दोघांच्याही सीट्स खिडकी जवळच होत्या. बस सुरू झाली. अर्धा तास झाल्यानंतर तीच लहान मूल रडायला लागल. लेकराला सू लागली असावी म्हणून तीने त्याला बाजूलाच सीट खाली उभ केलं आणि त्याला सू s s s सू ss सू ss असं म्हणू लागली. मी माझं पुस्तक वाचण्यात रमलो होतो. पण तिचा तो जप सुरू झाल्याने मी थोडा विचलित झालो. आता पाच मिनिटे झाली,दहा मिनिटे झाली पण त्या बाईच पोराला सू ss म्हणणं थांबेना आणि ते पोर सू काही करेना. मी आता खूप डिस्टर्ब झालो आणि त्या बाई वर जवळ जवळ ओरडलो च आणि म्हणालो ‘ अहो बाई आता हे बंद करा, आता परिणाम माझ्यावर व्हायची वेळ आली आहे.’ हे ऐकल्याबरो बर कंडक्टर, ड्राइव्हर सह पूर्ण बस हास्य कल्लोळात न्हाऊन निघाली. ताबडतोब बस थांबली. बाई आपल्या बाळाला बाहेर नेऊन त्याला शांत करून पुन्हा माझ्या समोर येऊन बसली. ते छोट बाळ आणि त्याची आई माझ्याकडे पाहून खूप गोड हसले. पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला तेव्हा संपुर्ण बस मस्त हसत होती.
😄

२६. पुलोत्सव

पुलोत्सव – भाग १ शरद पांडुरंग काळे
निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र

आज पुलंना या पृथ्वीतलावरून जाऊन एकवीस वर्षे पूर्ण झाली. पण खरं सांगू, पुल आपल्यातून गेलेच नाहीत. शरीर रूपाने ते नसले तरी त्यांच्या साहित्य रूपाने ते अमर झाले आहेत आणि ते आपल्यातच वावरत आहेत असे जाणवत राहाते. पुलं हे आमच्या घरचेच दैवत आहे. ह्या दैवताला साष्टांग नमस्कार करीत असतांना त्यांच्या लौकिक पुण्यतिथी निमित्त त्यांच्या अलौकिक साहित्यातून मी काय अनुभवतो, हे वाचकांसमोर मांडायला मला आवडेल. आजच्या जगात एकाच वेळी मोठा लेख समोर आला तर तो वाचण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढा देता येईल अशी अपेक्षा प्रत्येकाकडून करता येत नाही. म्हणून छोट्या छोट्या भागांमधून माझ्या भावना मला वाचकांपर्यंत पोहोचविणे अधिक सुलभ होईल असे वाटले. म्हणून आज या देवत्व प्राप्त झालेल्या माझ्या आवडत्या लेखकाविषयी मला नेमके काय वाटते, त्याचा हा पहिला भाग.
मराठी भाषिक म्हणून जन्माला आल्याचा प्रचंड आनंद मला व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचल्यानंतर झाला होता. इतका आनंद कदाचित आमच्या समस्त सात पिढ्यांना देखील झाला नसेल. त्यावेळी मी महाविद्यालयात जात होतो. पु. ल. देशपांडे या लेखकाविषयी माझ्या मनात तेंव्हा एक वेगळा कप्पा तयार झाला आणि पाहता पाहता त्याने माझे सर्व जीवनच व्यापून टाकले. पु. लं चे असे एकही पुस्तक नाही जे मी कमीत कमी चारदा तरी वाचलेले नाही! त्यांची सर्वच पुस्तके इतकी सुंदर आहेत की त्यात डावे उजवे ठरविणे अतिशय अवघड आहे. त्यामुळे मला जर कुणी विचारले की पु. लं. चे कोणते पुस्तक तुला जास्ती आवडते? माझे या प्रश्नाला उत्तर असेल की, तुमच्यासमोर जर हिरे, मोती, पाचू, माणिक आणि मोती पसरून ठेवले तर, त्यांच्या सौन्दर्याचा तुम्ही आस्वाद घेणार की, त्यातील कोणता खडा अधिक सुंदर हे ठरविण्याचा करंटेपणा करीत आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालविणार?
पुलं ची आणि माझी प्रत्यक्ष ओळख होण्याचा योग कधीच आला नाही. ती ओळख होती का नव्हती, ह्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. प्रत्येक श्वासागणिक ज्याचे कुठले ना कुठले वाक्य आठवत राहते, तो लेखक केवळ ओळखीचाच नसतो, तर तो जीवनाचा एक अविभाज्य अंग बनलेला असतो. फारतर त्यांची व माझी थेट भेट झाली नव्हती एव्हढेच म्हणता येईल. जर आपण एखाद्या वारकऱ्याला विचारले की, “का हो बाबा, विठ्ठलाची आणि तुमची कधीची ओळख?” तर तो तुमच्याकडे असे काही पाहिलं की, तुमचा बावळटपणा तुमच्या लक्षात आल्याशिवाय रहाणारच नाही! तो वारकरी जसा विठ्ठलाशी एकरूप झालेला असतो, तसाच काहीसा प्रकार माझ्या आणि पु. लं. च्या बाबतीत आहे. आणि मला खात्री आहे की विठ्ठलाचे जसे कोट्यावधी भक्त त्याच्याशी एकरूप आणि त्याच्या चरणी तल्लीन झालेले असतात, तसे असंख्य वाचक जगभर पु. लं. शी एकरूप झालेले आहेत. दिवसातून दहादा तरी पुल आणि त्यांचे साहित्य यांचा आधार मला घ्यावासा वाटतो. विज्ञानाचे विषय शिकवीत असतांना पुलंचे साहित्य मला खूप उपयोगी पडते हे आवर्जून सांगावेसे वाटते.
पुल केवळ विनोदी लेखन करायचे म्ह्णून ते माझे आवडते लेखक आहेत असे मात्र अजिबात म्हणता येणार नाही. पुलंचा विनोद आणि त्यांची विनोदबुद्धी वादातीत होती हे जरी सत्य असले तरी, त्यांच्या लेखातील विनोद हा त्यांच्या साहित्याविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू नव्हता. त्यांच्या विनोदात जबरदस्त ताकद होती. अर्थात पुलं च्या विनोदाला प्रमाणपत्र देण्याचा अधिकार माझा नाही. साक्षात सूर्याला काजव्याने सांगायचे की तुझे तेज जबरदस्त आहे बर का! तर ते जेव्हढे हास्यास्पद असेल, तसाच हा काहीसा प्रकार असेल. सांगायचा मतलब असा की पुलंचे लेखन माझ्यासाठी भगवद्गीता आहे. गीतेत जसे जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे तसेच तत्वज्ञान पुलंनी देखील त्यांच्या विविध साहित्यातून अगदी सोप्या शब्दात सांगितलेले आहे. अर्थात ते समजले पाहिजे, कारण पुलंच्या लिखाणाची भाषा थोडी कठीण आहे. हा दोष अजिबात नाही. प्रत्यक्ष श्री सरस्वती देवीचा वरदहस्त लाभलेले हे सिद्धहस्त लेखक होते. त्यांची भाषा प्रासादिक आहे, अलंकारांनी सुशोभित झालेली आहे आणि म्हणूनच त्यातील तत्वज्ञान समजण्यास थोडेसे अवघड वाटते. पण एकदा त्या भाषेची लय सापडली की मात्र त्यांचे साहित्य आपल्या मनात फुलून येते, आणि त्यांची थोरवी समजू लागते.

पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली पुस्तकातील नंदा प्रधान ही व्यक्तिरेखा जीवनाचे तत्वज्ञान अतिशय सुरेख रीतीने सांगते. जसजसे आपण हे व्यक्तिचित्र वाचीत जातो, तसतसे आपण नंदा प्रधान मध्ये गुरफटत जातो. तो आपल्याला आवडायला लागतो. त्याच्या समस्यांची उत्तरे आपणच शोधू लागतो. त्यातील इंदू, तिचे खलनायक वडील, त्याची जर्मन मैत्रीण विल्मा, त्याचे आई वडील ही पात्रे आपल्या अवतीभवती वावरत आहेत असे आपल्याला वाटू लागते. मुख्य म्हणजे वाचन पूर्ण झाल्यावर आपले विचारचक्र सुरु होते आणि पुन्हा पुन्हा ते व्यक्तिचित्र नव्याने वाचावेसे वाटू लागते. दरवेळी त्यातील नवनवे कंगोरे लक्षत येऊ लागतात. कधी ते घायाळ करतात तर कधी हलकेच गुदगुल्या करतात. पण त्या गुदगुल्या होत असतांना डोळे ओले झाल्याशिवाय राहात नाहीत. पुलंच्या लिखाणाचा आवाका प्रचंड आहे. त्यांच्या त्या लिखाणाची उंची आपल्याला वाक्यावाक्यात जाणवत राहाते. पुलंनी केलेल्या “नंदा, जगात देव नाही का रे?” या प्रश्नाला उत्तर देतांना नंदा म्हणतो, “अरे, या जगात काहीच खरं नसत! आपण जो श्वास घेतो ना, तेव्हढाच क्षण फक्त खरा असतो!” हे तो सहजपणे सांगून जातो. त्यात कुणाबद्दल राग नसतो, द्वेष नसतो, किंवा तिरसटपणा देखील नसतो. असते ते फक्त एक चिरंतन सत्य. आणि इथे पुलंच्या विचारांची उंची समजते. ताजमहाल किंवा पिरॅमिड्स पाहात असतांना जे भाव मनामध्ये असतात तसेच काहीसे भाव पुलंचे प्रत्येक वाक्य वाचीत असतांना मनात असतात. देवत्व यापेक्षा काय वेगळे असते? पुलंच्या विचारांना एक वैज्ञानिक अधिष्ठान आहे. श्वास आणि जिवंतपणा यातील महत्व एका वाक्यात इतक्या समर्पकपणे त्यांनी सांगितले आहे की सहजपणे ते पटलेच पाहिजे. त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या अहं ब्रह्मास्मि या तत्वाची आठवण करून दिली आहे. जो क्षण आपण जगत असतो, त्या जिवंत क्षणाचा नेमका उपयोग आपण कशासाठी करतो, त्यावर जीवनाचे यशापयश अवलंबून असते. नाती गोती आपणच निर्माण करतो, ती आपल्या सोयीसाठी हे पुलंचे म्हणणे आपल्याला तंतोतंत पटते. विशेषतः जेंव्हा एखाद्या हास्यास्पद कारणासाठी, क्षुल्लक स्वार्थासाठी किंवा आपल्या वैयक्तिक अहंकारापोटी ही नाती पायदळी तुडविली जातात, तेंव्हा त्यातील फोलपणा आपल्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. प्रत्येकाच्या वाट्याला असा एखादा क्षण येतोच! माणूस म्हणून जे संस्कार आपण पाळायला पाहिजेत, ते न पाळता केवळ स्वार्थासाठी आपण ते सोयीस्कररीत्या विसरून जातो, तेंव्हा त्यातील विदारकता आणखी स्पष्ट स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळते.

मग जी नातीगोती वर्षानुवर्षे टिकली त्यांचे काय? भौतिकशास्त्रात एखाद्य पदार्थात चुंबकीय गुणधर्म आहेत की नाहीत हे ठरविण्यासाठी तो लोखंडाला आकर्षित करतो का ते पाहात नाहीत, तर तो पदार्थ दुसऱ्या चुंबकाला प्रतिकर्षित करतो कि नाही ते पाहिले जाते. प्रतिकर्षण हीच चुंबकत्वाची खरी कसोटी असते. तसेच या वर्षानुवर्षे टिकलेल्या नात्यासंबंधी म्हणता येईल. जोपर्यत ही नाती वैयत्तिक महत्वाकांक्षांच्या आड येत नाहीत, भागीदारीत प्रश्न निर्माण करीत नाहीत, सहसा श्रेयाबद्दल भांडत नाहीत किंवा कुणाचा अहंकार दुखावत नाही तो पर्यंत सर्व काही ठीक असते. हे सर्व हाताळून जी नाती टिकली त्यांची संख्या इतकी कमी असते की त्यांना अपवाद म्हणूनच मोजावे लागेल. भावा भावांमधील भांडणे, पिता पुत्रातील बेबनाव, पती पत्नींमधील झगडे पाहिले की सख्ख्या नात्यांमध्येच इतके प्रश्न असतील तर चुलत, मामे, आते यासारखे सम्बन्ध तर केव्हढे कुचकामी असतील याची कल्पनाच केलेली बरी असे वाटू लागते. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही साधी अपेक्षा पुलंची आहे. संत ज्ञानेश्वरांना देखील हाच माणूस धर्म अपेक्षित होता. मात्र अपेक्षा साधी असली तरी प्रत्यक्ष आचरणात आणणे ही बाब महाकर्मकठिण असते हे वेगळे सांगायची गरज नाही. पुलंच्या लिखाणातून हे विविध कंगोरे अगदी प्रकर्षाने जाणवतात, टोचतात आणि म्हणूनच वास्तववादी असतात. ते आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतात, हे पुलंचे निर्भेळ यश म्हणावे लागेल.

नात्यागोत्याचा विचार न करता, समाजासाठी काही ना काही करीत राहणारे आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचार करणारे बापू काणे आणि परोपकारी गंपू ही पुलंची दोन पात्रे आणि मैत्रीसाठी स्वतःला झोकून देणारे रावसाहेब, समाज रथ ज्या चाकांवर न घसरता चालत असतो त्या चाकांची प्रातिनिधिक उदाहरणे म्हणावी लागतील. नंदा प्रधानचा तो “जिवंत क्षण” जगणारी ही सर्व माणसे आहेत. म्हणूनच समाजरथ खेचण्याची त्यांची ताकद आहे. सुशीने केलेला झुणका परांजपे कलेक्टरने एकट्याने चेपला हे सांगणारा बापू काणे फक्त कलेक्टरचेच नाही तर सर्व समाजाचे पोट भरीत असतो. गाण्यातले काहीही न समजणारा बापू समाजासाठी गाण्यांचे आयोजन का करतो? नाटकाच्या स्पर्धा का आयोजित करीत असतो? कचेरीत त्याच्याच मेजाभोवती लोकांचे कोंडाळे का असते? गंपू न विचारता शेजारच्या काकूंना भाजी का आणून देतो? चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले रावसाहेब स्टेजवर काम करणाऱ्या मुलीबाळींना खिळे टोचू नयेत म्हणून झाडू का हाती घेतात? कोर्टात भांडण नेणाऱ्या मित्राला ते संध्याकाळी जेवायला घरी का बोलावितात? असे कितीतरी बापू काणे, परोपकारी गंपू आणि रावसाहेब आपल्याला जीवनात भेटत असतात. लोकांच्या प्रचंड गर्दीत यांची संख्या कमी असते हे मानले, तरी ते असतात ह्यात वादच नाही. हा पुलंचा कल्पनाविलास नक्कीच नाही, तर ते वास्तवतेचे चित्रण आहे. म्हणूनच ते हृदयाला भिडते आणि प्रबोधन देखील करते. जे साहित्य माणसाच्या संवेदना जागृत असते, म्हणून तर पुलंचे हे वास्तववादी चित्रण कालातीत असून समाज प्रबोधन करीत राहीलच असे आहे.

पुलंचे चितळे मास्तर हे मला वाटते, त्यावेळच्या सर्वच शाळांमधील शिक्षकांचे अगदी अचूक प्रतिनिधीत्व करते. आमच्या नगरच्या सोसायटी माध्यमिक शाळेतील शिक्षक याच चितळे मास्तरांसारखे प्रेमळ, विद्यार्थीप्रिय, विद्यार्थ्यावर प्रेम करीत त्यांना शिकविणारे आणि पुस्तकांच्या पलीकडील शिक्षण देणारे होते हे निर्विवादपणे आम्ही म्हणू शकतो. विद्यार्थ्यांना जीवनाचे वळण लावणे हे काम शिक्षकाचे असते हे त्या पिढीतील शिक्षकांना सांगावे लागत नव्हते. मुलगा हातात आला की त्याला निस्वार्थपणे घासून पुसून समाजात पाठवायचे हेच त्यांचे ध्येय होते. पुलंच्या या चितळे मास्तरांना विनोदाचे वावडे नव्हते. म्हणूनच पुलं मधील विनोद फुलला आणि समाजाला फुलवीत राहिला. शाळेतील शिक्षकांचे संस्कार एव्हढे जबरदस्त होते की विसरू म्हंटल्याने विसरायचे नाहीत. त्यांनी मुलांना फक्त शिकविले नव्हते तर घडविले होते. चितळे मास्तरांचा प्रत्येक ओळीत आठ शब्द लिहिण्याचा दंडक होता. पण मुलांनी तो शाळेतच नव्हे तर शिक्षण संपल्यानंतर कार्यालयीन कामात देखील पाळला होता. याला खरे शिक्षण म्हणतात.

जयवंत दळवींनी जेंव्हा पु. ल. एक साठवण हा ग्रंथ जुळवायला घेतला होता, तेंव्हा त्यांना त्यात पुलंच्या नक्की कोणत्या साहित्याचा अंतर्भाव करावा असा गहन प्रश्न पडला होता. सारेच तर हिऱ्यासारखे लखलखीत, मग नेमके काय निवडायचे?त्यांनी पुलंच्या आईंना तो प्रश्न विचारला. त्यावर पुलंच्या आईने जे उत्तर दिले ते वाचल्यावर त्यांच्या साहित्याबद्दल जनमानसात जी भावना आहे तीच त्यांनी अगदी समर्पकपणे व्यक्त केलेली आहे हे लक्षात येते. त्या म्हणाली, “भाईची कोणती पुस्तके तुम्ही निवडावी हे मी सांगू? पण जेंव्हा कधी माझे मन सैरभैर होते, कुठे लक्ष लागत नाही, तेंव्हा मी त्याचे हाताला लागेल ते पुस्तक काढते व वाचायला सुरुवात करते. काही क्षणांमध्ये माझे मन शांत होते.” मला वाटते की पुलंच्या साहित्याबद्दल इतक्या कमी शब्दांमध्ये इतके मार्मिक विवेचन आणखी कुणालाच जमणार नाही. मी जेंव्हा कामानिमित्त बाहेरगावी जातो, तेंव्हा पुलंचे एखादे पुस्तक माझ्या बॅगेत असतेच आणि संपूर्ण प्रवासात ते माझी सोबत करीत असते. दरवेळी मला त्यातून काहीतरी नवीन सापडते. मनाला आलेली उदासीनता झटकून टाकून शिडात हवा भरण्यासाठी पुलंचे साहित्य हा रामबाण उपाय आहे. सकारात्मकता काय असते ते हे साहित्य शिकविते. पुलं च्या साहित्याला अमरत्व प्राप्त आले आहे ते यामुळेच असे मला प्रामाणिकपणे वाटते.

पुलोत्सव – भाग २ -शरद पांडुरंग काळे
निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र

जवळजवळ चार दशकांपूर्वी मी पुलंचा “काही अप्स, काही डाउन्स” हा लेख वाचला होता. मला तो वाचल्यावर पुलंना भेटलेच पाहिजे असे अगदी प्रकर्षाने वाटले. मी त्यांना एक साधे पात्र पाठविले होते. माझे वडील त्यावेळी अहमदनगर जवळ असलेल्या बेलवंडी नावाच्या स्टेशनचे स्टेशन मास्टर होते. पुलंनी वर्णन केलेल्या चिमुकल्या स्टेशनसारखेच ते स्टेशन होते, त्यामुळे मला ती प्रचंड आत्मीयता त्यांच्या लिखाणाबद्दल वाटली होती. मी त्यांना या बेलवंडी स्टेशनला त्यांनी यावे, अशी आग्रहाची विनंती केली होती. आपण रेल्वे कारभाराचे जितक्या बारकाईने वर्णन केले आहे ते शब्दातीत आहे. तुमचे पाय आमच्या स्टेशनला लागतील तर आम्ही धन्य होऊ, अशा मजकुराचे पत्र त्यांना मिळाले होते आणि त्यावर त्यांनी आपल्या हस्ताक्षरात त्याचे उत्तर पाठविले होते. त्यांनी त्या पत्रात मला आशीर्वाद दिला होता! गुडघेदुखीमुळे ते बाहेर पडत नसल्यामुळे माझ्या निमंत्रणाचा स्वीकार करता येत नाही, असे त्यांनी सखेद नमूद केले होते. दुखणे ठीक झाले तर यायचे त्यांनी कबूल केले होते. तो योग दुर्दैवाने नंतर कधी आला नाही. कित्येक वर्ष ते पत्र मी जपून ठेवले होते. अनेक ठिकाणी स्थलांतरे झाल्यामुळे ते केंव्हातरी हरवून गेले. मात्र पुलंचे पत्र आल्याचा आणि त्यांचा आशीर्वाद लाभल्याचा आनंद मी मनाच्या एका खोल कप्प्यात अगदी छान जपून ठेवला आहे. ही आठवण मला आयुष्यभराची सोबत म्हणून लाभली आहे ह्यापेक्षा भाग्य ते कोणते? मन उदास असले की मी ती आठवण काढतो आणि उदासीनता कुठल्याकुठे पळून जाते!
पुलंनी प्रवासवर्णने खूप छान लिहिली आहेत. अतामी झगमगू लागली, माझी लंडनची यात्रा, निळाई, फ्लोरेन्स व आद्य शंकराचार्य, उदंड जाहले पाणी अशी त्यातील काही प्रकरणे आमच्या शाळेच्या मराठीच्या धड्यांमध्ये अभ्यासाला असायचीय. पुढे त्यांचे अपूर्वाई, जावे त्यांच्या देशा, पूर्वरंग आणि वंगचित्रे ही पुस्तके वाचली आणि जणू आपणच ह्या सहलीला जाऊन ते प्रत्यक्ष अनुभवतोय असा स्वर्गीय आनंद ते वाचत असतांना घेतला आहे आणि अजूनही घेत आहे. शाळेच्या पुस्तकातील ते धडे आमच्यासाठी आभासाचे नव्हते तर मनाला अतीव आनंद देणारे व हवेत उंच उंच उडणारे रंगबिरंगी आकर्षक शेपट्या लावलेले ते पतंग होते. त्या पतंगांवर बसून आम्ही त्या सर्व देशांच्या सफरीला जात होतो. अनेकांनी प्रवासवर्णने लिहिली असतील, यापुढेही लिहिली जातील, पण पुलंची प्रवासवर्णने “झाले बहु, होईल बहु, परि यासमचि हा” यातले आहे, यात दुमत नसावे. त्यांची वर्णने वाचतांना, जणू आपण पुलं चे बोट धरून त्यांच्याबरोबर जात आहोत, हे शब्दाशब्दातून जाणवत राहाते. वाचकांशी प्रत्यक्ष संवाद साधल्यासारखी लिहिलेली ती प्रवासवर्णने पुलंच्या प्रतिभाशाली लेखणीची आणखी एक अप्रतिम झलक आहे. त्यांनी पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांची वर्णने त्या प्रेक्षणीय स्थळांपेक्षा नक्कीच सुंदर असावीत असे आधी वाटायचे आणि प्रत्यक्ष ती स्थळे पाहिल्यानंतर त्या वाटण्यावर बऱ्याचवेळा शिक्कामोर्तबच झाले!
पूर्वरंग या पुस्तकात पुलंनी त्यांच्या पूर्वेकडील देशांच्या भेटींवर आधारित प्रवासवर्णने लिहिली आहेत. लिहिली आहेत असे म्हणण्यापेक्षा ही प्रवासचित्रे रंगविली आहेत असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. जपान, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर आणि हॉंगकॉंग या देशांची त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने वाचत असतांना आपल्याला त्या देशांमधील संस्कृतीची अगदी झकास ओळख होते. त्या देशांमधील प्रेक्षणीय स्थळांची वर्णने लिहीत असतांना, सोबत तेथील लोकांच्या स्वभाव वैशिष्ट्याची जी वर्णने ते करतात, त्यामुळेच त्यांची प्रवासवर्णने अधिक वाचनीय आणि माहितीपूर्ण असतात असे नक्की जाणवत राहते. एखाद्या विश्वकोशात किंवा विकिपीडियात जशी नीरसपणे माहिती दिली जाते, त्या नीरसतेचा लवलेश देखील पुलंची वर्णने वाचताना आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे ते केवळ प्रवासवर्णन न राहाता, त्या त्या देशाचे जिवंत असे शब्दचित्रच वाटू लागते. मनुष्य स्वभावाचे इतक्या बारकाईने निरीक्षण करण्याच्या बाबतीत पुलंचा हात कोणीही धरू शकणार नाही. त्यांनी या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीत सन १९६३ मध्ये जपानचे जे वर्णन केले आहे, ते माझ्या सन २००७ च्या भेटीत मला सतत आठवत होते, कारण त्या वर्णनाच्या शब्दाबरहुकूम सारे काही होते असे आवर्जून सांगायचे आहे. तोच प्रकार मलेशिया, सिंगापूर आणि इतर देशांबद्दल म्हणता येईल. त्यांची प्रवासवर्णने मला माझ्या या देशांच्या भेटीत मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडली. पुलंचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या गावाचे किंवा शहराचे वर्णन करीत असतांना ते आपल्या देशाच्या समकालीन व समान अर्थी गोष्टींचा किंवा माणसांचा उल्लेख करून त्यातील साधर्म्य किंवा तफावत आपल्यासमोर अशा खुबीने मांडतात, की आपणही मग नकळतपणे त्या तुलनात्मक अभ्यासातून अनेक गोष्टी अगदी सहजतेने शिकून जातो. मला वाटते की पुलं मधील शिक्षक यावेळी त्यांच्यातील विनोदी लेखकावर आपले अधिराज्य गाजवीत असतो आणि त्यामुळेच ही प्रवासवर्णने अनेक पाठयपुस्तकांमधून नव्या पिढयांना मार्गदर्शन करीत राहातात.
अपूर्वाई या पुस्तकात त्यांनी इंग्लंड आणि फ्रांस या दोन देशांचे अतिशय मनोरंजक असं वर्णन लिहिले आहे. हे पुस्तक सन १९६० मध्ये पहिल्याप्रथम प्रसिद्ध झाले होते. जवळजवळ साठ वर्षांनंतर देखील या पुस्तकाची रंगत कमी होत नाही. परदेश प्रवास सोपा झाल्यामुळे पुलंच्या लेखनातील महत्व अनेक वाचकांच्या लक्षात येऊ लागले आहे. आजवर पुलंच्या या पुस्तकाच्या पंचवीस, पूर्वरंगाच्या एकोणीस तर, जावे त्यांच्या देशा या पुस्तकाच्या अठरा आवृत्त्या निघाल्या आहेत. या तिन्ही पुस्तकांच्या नवीनतम आवृत्ती २०१४ मध्ये प्रकाशित झाल्या आहेत. यावरून पुलंविषयी आणि त्यांच्या साहित्याविषयी मराठी वाचकांच्या मनात अजूनही तोच आदर आणि ताजेपणा आणि तशीच लोकप्रियता असल्याचे निदर्शनास येते. इंग्लंड देशावर पुलंचे मनस्वी प्रेम होते, ते मुख्यतः तो शेक्सपियरचा देश म्हणून! आणि त्या देशातील नाट्यवेडयांच्या मुळे! शेक्सपियरवर त्यांचा अतोनात जीव जडलेला होता. स्ट्रॅटफर्ड ऑन एव्हन या त्याच्या गावी त्याच्या समाधी स्थळाला जेंव्हा पुलंनी भेट दिली, त्यावेळी आळंदीला निघालेल्या भाविक वारकऱ्यांसारखी त्यांची मानसिक स्थिती होती असे त्यांनी जे लिहिले आहे, त्यावरून त्यांचा शेक्सपियरबद्दलचा भक्तिभाव लक्षात येतो. कधी कधी ही अशी जीव ओवाळून भक्ती करणारी पुलं सारखी माणसे भेटतात, आणि मग जगात देव असलाच पाहिजे याची प्रचिती येते. प्रत्यक्षात जेंव्हा पुल शेक्सपियरच्या समाधी स्थळाजवळ उभे राहिले त्यावेळी त्यांचे भान हरपले होते. एखादी गोष्ट आवडते म्हणजे नेमके काय असते ते पुलंकडून शिकावे!
ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठे इंग्लंडचे दोन ज्ञानचक्षू आहेत, अशी जेंव्हा ते उपमा देतात, तेंव्हा त्यांची नित्य बहरात असलेली प्रतिभा आणखी एका दिव्य स्वरूपात आपल्या चक्षूंसमोर येऊन उभी राहाते आणि आपण नतमस्तकच होतो. डॉक्टर राईल या ऑक्सफर्ड विस्थपिठातील प्रसिद्ध तत्ववेत्त्याला जेंव्हा पुल भेटायला गेले, तेंव्हा पहिल्या भेटीतच डॉक्टरसाहेबांच्या रूपात मानवी संस्कृतीच जणू आपल्यापुढे उभी आहे असे त्यांना वाटले होते. एखाद्या माणसाविषयी अशी भावना मनात निर्माण होण्यासाठी त्या माणसाची जशी ती पातळी असावी लागते, तशी पातळी त्याला पाहाणाऱ्याची देखील असावी लागते. पुलंनी ती पातळी निश्चितच गाठली होती असे ठायी ठायी जाणवत राहाते. डॉक्टरसाहेबांची आणि त्यांची उद्बोधक चर्चा देखील झाली होती. त्यांचे ग्रंथ भांडार त्यांनी पाहिले, त्यांचे घर पुलंना आश्रमासारखे वाटले आणि तिथल्या शिष्यगणांचे आपल्या गुरुजींवर असलेले अलोट प्रेम आणि अतीव श्रद्धा पाहून थांना गहिवरून आले, ते केवळ प्रासंगिक भावनातिरेकाचा उद्रेक झाल्यामुळे नक्कीच नव्हते! तर त्यातील शाश्वत मूल्ये त्यांच्या ध्यानात आल्याचा तो परिणाम होता. पुलंना जीवनाच्या प्रत्येक वळणावर अशी अनेक शाश्वत मूल्ये जपणारी देवमाणसे भेटली हे त्यांचे भाग्य, आणि त्यांच्या लेखणीतून ती आपल्याला अनुभवायला मिळाली हे आपले परमभाग्य!
पुलंच्या या असल्या दैवी जाणीवांमध्येच, त्यांच्या या हरवून जाण्याच्या वृत्तीमध्ये आणि समोरच्या व्यक्तीच्या रूपात, सत्यम शिवम सुंदरम या चिरंतनाचा आस्वाद घेण्याच्या मानसिकतेमध्येच, त्यांचे माणूसपण आणि मोठेपण प्रत्ययास येते. त्यामुळेच मराठी वाचकांच्या हृदयसिंहासनाचे अढळपद त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांना जसे स्वदेशातील रामूभय्या दाते, वसंतराव देशपांडे, बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, कुमार गंधर्व, रविशंकर, विलायत खां साहेब, आणि रवींद्रनाथांनी मोहविले होते तसेच पाश्चात्य लेखक, नाटककार, शास्त्रज्ञ, आणि संगीतकार यांनीदेखील भान हरपायास लावले होते. त्यांच्या व्हेव्हे भेटी दरम्यान, त्यांना अचानक त्यांच्या आवडीच्या चार्ली चॅप्लिन या अभिनेत्याचे आणि महान कलावंताचे प्रत्यक्ष दर्शन घडले होते. त्या प्रसंगी अतोनात गर्दी भोवती असल्यामुळे जागेअभावी त्यांना या महान मूकनायकाला साष्टांग दंडवत घालता आला नाही याचे अतोनात वाईट वाटले होते. मनोमनी त्याला दंडवत घालीत असतानां त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. आम्ही जेंव्हा व्हेव्हे गावी दोन वर्षांपपूर्वी चार्ली चॅप्लिन यांच्या स्मारकास भेट दिली, त्यावेळी आम्ही देखील गहिवरून गेलो होतो, आणि त्या स्मारकात गर्दी नसल्यामुळे दंडवत घालू शकलो होतो. तो दंडवत घालतांना, पुलंना ही मनोमन दंडवत घातला होता.
एखादी चांगली गोष्ट पाहिली की ती सर्वांना सांगावी, त्यातील आपल्याला झालेला आनंद संक्रांतीच्या तिळगुळासारखा वाटत जावा, त्यातील सौन्दर्याचा मनसोक्त आस्वाद सर्वांनी मिळून घ्यावा असे त्यांना मनापासून वाटत असे आणि तसे ते करीतही असत. पुलंची महती त्यांच्या या आभाळाएव्हढ्या असलेल्या मानसिकतेतच दडलेली आहे.

पुलोत्सव – भाग ३ – शरद पांडुरंग काळे
निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र
इटली मधील भूमध्य सागरातील कॅप्री बेटानजीक असलेल्या नीलकुहराचे आणि त्यातील त्या दैवी निळाईचे जे वर्णन पुलंनी त्यांच्या, “जावे त्यांच्या देशा” या पुस्तकातील “निळाई” याच नावाने लिहिलेल्या लेखात केले आहे, ते लिहिताना हे वर्णन प्रत्यक्ष सरस्वतीदेवीनेच त्यांच्या लेखणीतून केले आहे आहे असे मला वाटते. पुलंनी त्यात लिहिले आहे की त्या नील कुहरातील पाण्यात वितळलेल्या निळ्या प्रकाशाच्या रूपात तो सृष्टीतील असीम चमत्कार पाहातांना,
शांताकारम भुजगशयनं पद्मनाभम सुरेशम
विश्वाधारम गगनसदृशं मेघवर्णम शुभांगम ।।
यातील मेघवर्णम शुभांगम या वरपांगी विरोधी वाटणाऱ्या वर्णनातील रहस्य त्यांना उलगडले होते. पुस्तकांमधून वाचलेल्या किंवा इतरेजनांकडून ऐकलेल्या वर्णनापेक्षा, त्यांना जे त्या नीलकुहरातील निळाईचे जे प्रत्यक्ष दर्शन झाले होते, ते कैक पटींनी श्रेष्ठ तर होतेच, शिवाय रंग – रेषा – नाद – स्वर या सगळ्याच अलौकिक माध्यमांचे थिटेपण जाणवून देणारा तो स्वर्गीय अनुभव होता. त्या लेखाचा शेवट करतांना त्यांनी आपल्या लेखन कौशल्याची परिसीमा गाठली आहे, असेच म्हंटले पाहिजे. लेखाचा शेवट करतांना ते लिहितात, “आता माथ्यावरच्या निळ्या आकाशाला मी मोठ्या अभिमानाने सांगतो, की तुझ्या निळाईचा अर्थ सांगणाऱ्या त्या नीलकुहरातील पाण्याला मी भेटून आलो आहे!” हे वर्णन वाचून झाल्यानंतर दरवेळी हे अप्रतिम सुंदर असे नीलकुहर आपल्या डोळ्यांसमोर तरळत राहाते, आणि अंगावर रोमांच उभे राहातात. माझा दिवस त्या निळाईच्या नुसत्या काल्पनिक दर्शनाने आणि स्पर्शाने सोनेरी होऊन जातो. महाभारतातील एका दरिद्री कुटुंबातील लोकांच्या अलौकिक यज्ञाच्या अनुभूतीने, अर्धे अंग सोनेरी झालेल्या मुंगुसाला, त्याचे उरलेले अर्धे अंग सोनेरी करण्यासाठी, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचा वरदहस्त लाभलेल्या राजसूय यज्ञातील विभूतीचादेखील उपयोग होऊ शकला नव्हता अशी एक कथा आहे. मात्र पुलंच्या या अलौकिक अशा लेखनशैली मध्ये आमचे अंगच काय तर सारे आयुष्यच सोनेरी करण्याची ताकद आहे. पुलंना याठिकाणी मी मनापासून साष्टांग दंडवत घालतो, आणि दिवस दिवस मग कधीही न पाहिलेल्या पण पुलंच्या लेखणीतून अनुभवलेल्या त्या निळाईत हरवून जातो. इंटरनेटच्या माध्यमातून मी हे नीलकुहर पाहिले देखील, पण पुलंनी केलेल्या वर्णनाच्या आसपास देखील हे माध्यम पोहोचू शकत नाही. साक्षात देवस्वरूप जे आहे त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय त्याचे आकलन होत नसते. पण पुलंची लेखनसीमा मात्र हे सगुणात्मक दर्शन हातचे राखून न ठेवता आपल्याला घडविते. त्यातून पुलंची महानता पुन्हा एकदा आपल्या प्रत्ययाला येते.
सन फ्रॅन्सिस्को या अमेरिकेतील अत्यंत सुंदर शहराचे आणि त्यातील भारतीयांचे, त्यांच्या भावभावनांचे चित्रण करतांना पुलंनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या
नवलाख तळपती दीप वीजेचे येथ
जणू उतरली तारकादळे नगरात
परि स्मरते आणि करिते व्याकुळ जेंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्यांची वात
या काव्यपंक्तीचा जो वापर केला आहे, त्यामुळे त्या वर्णनाला दैवी स्पर्श झाल्यासारखेच वाटते. भौतिकाशी संवाद साधत असतांना हे आधिभौतिक तत्वज्ञान पुलंचे वेगळेपण ठळकपणे नजरेस आणते. म्हणूनच विनोदी लेखणीच्या झालरीखाली वावरणारा हा महर्षी आम्हाला नेहेमीच गुरुस्थानी राहिला आहे.
फ्लोरेन्स मधील डॉक्टर गास्तोने उगुच्चियानी यांच्या भेटीचे जे वर्णन पुलंनी केलेले आहे, ते वाचून वाटते की, हे डॉक्टर गास्तोने उगुच्चियानी जसे अफलातून व्यक्तिमत्व होते, तसेच पुल या माणसाला देखील खरोखरीच दैवी अधिष्ठान लाभलेले होते. इतके लोक आपल्या देशातून त्या काळात इटलीला गेले असतील, पण आद्य शंकराचार्यांच्या भक्त असलेल्या या मानसोपचार तज्ज्ञाला भेट द्यावी असे किती जणांच्या मनात आले असेल? आणि प्रत्यक्षात किती जणांच्या नशिबात तो योग आला असेल? हा योग आल्यानंतर इटालियन संस्कृतीत वाढलेल्या, पण मनाने सर्वस्वी भारतीय असलेल्या या ऋषितुल्य माणसाची ओळख आपल्या मायदेशातील नागरिकांना करून देण्याची संधी खरोखरीच किती जणांनी साधली असेल? पुलंनी आपल्या खास शैलीत या इटालियन मानसोपचार तज्ज्ञाची खरी ओळख आम्हाला करून दिली आहे. डॉक्टरांच्या आद्य शंकराचार्यांवर असलेल्या निस्सीम भक्तीचा परिचय त्यांनी आम्हाला करून दिला. साता समुद्रापलीकडे असे काही महात्मे राहातात याची जाणीव त्यांनी दहा कोटी मराठी जनांना करून दिली यातच पुलंचे मोठेपण दडलेले आहे. प्रत्येकाने आयुष्याचे काही क्षण तरी कुणाचे तरी जीवन घडविण्यात व्यतीत करावेत, कुणाचा तरी एखादा दिवस अजरामर करून दाखवावा, यासारखे दुसरे समाधान नसते, असे आपल्याला आपली भारतीय संस्कृती शिकविते. येथे तर पुलंनी शब्दागणिक प्रत्येक वाचकाचा एखादा दिवसच नव्हे तर त्याचे संपूर्ण आयुष्यच आनंदमयी करून सोडले आहे. म्हणून पुल हे व्यक्तिमत्व प्रातःस्मरणीय आहे यात शंकाच नाही.
हंगेरी या छोट्याच देशाचे वर्णन करतांना पुलंची प्रतिभा आपल्याला अशीच ठायी ठायी जाणवत राहाते. तिथल्या सामान्य लोकांमधील असामान्यत्व पुलंना दिसले. त्या देशातील नागरिकांचा जाज्वल्य देशाभिमान त्यांना भावला. हंगेरियन जीवनातील कलासंपन्नतेचा प्रत्यय त्यांना आला. आणि तो त्यांनी आमच्यापर्यंत अतिशय मार्मिक शब्दांमधून पोहोचविला. या छोटेखानी देशातील सार्वजनिक श्रीमंतीचे त्यांनी जे वर्णन केले आहे, ते आजच्या जगातील सर्वच पाश्चिमात्य देशांना आणि जपानसारख्या अति पूर्वेकडील देशाना तंतोतंत लागू पडते. आपल्या देशातील वैयक्तिक स्वार्थापोटी समाजात आलेली सार्वजनिक मरगळ, त्यामुळे अधिकच विदारक आणि भेसूरपणे आपल्याला जाणवू लागते. ती दूर करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, हेही पुल आपल्याला सांगून जातात. जवळजवळ चाळीस वर्षांनी देखील आपल्या देशात फारसा फरक झालेला नाही ही खेदाची गोष्ट आहे.
केवळ विनोदासाठी पुलंची पुस्तके नाहीत हे आपल्याला त्यांच्या वाक्यावाक्यातून जाणवत राहाते. मात्र त्याच्या आकलनासाठी थोडा विचार करावा लागतो आणि थोडा वेळ देखील लागतो. खरतर विनोदाच्या व्याख्येतच एखाद्याच्या असहाय्य्यतेचा किंवा अवघड परिस्थतीचा फायदा घेऊन केलेली टिप्पणी, असा व्यक्तिनिष्ठ विनोदाचा अर्थ अपेक्षित धरलेला आहे. असले विनोद बहुतांशी सर्वांना हसवितात पण अगदी सर्वांनां नाही! काहींना तर असे हे विनोद विलक्षण दुखावून जातात. अशा लेखनाला विनोदी सोडा, लेखन म्हणणे देखील गुन्हा आहे. पुलंनी मात्र त्यांच्या लेखनात चुकूनदेखील असले विनोद केलेले नाहीत, ह्यातच त्यांच्या लेखनाची पातळी आपल्याला समजते. त्यांच्या स्वभावातच हे बसत नव्हते. त्यांचे विनोद निखळ असतात, निरागस असतात आणि अगदी सर्वांनाच खळखळून हसवितात. याला अपवाद नाही. बापू काणे विचारतो, “कसं काय बोललं रे लुगडं?” हा शेरा प्रत्यक्षात त्या विदुषीने ऐकलं असता तरी तिने न रागावता त्याला मनापासून दादच दिली असती. तो विनोद समजायला बापूचे निर्मळ मन देखील समजायला हवे आणि त्याचा निर्व्याजपणा समजायला हवा असतो. अंतू बर्वा या ज्येष्ठ आणि वृद्ध माणसाचे सगळेच बोलणे तिरकस आणि विनोदी असते. त्या बोलण्याला बुद्धीची धार आहे हे जसे जाणवते, तशीच त्याला असलेली दुःखाची झालर देखील जाणवते. गावात होत असलेल्या संगीत एकच प्याला नाटकाच्या संदर्भात त्यांची आणि व्यवस्थापकाची चर्चा रंगविताना पुलंचा विनोद फुलून येतो. “काय सोडताय काय अर्ध्या तिकिटात? एरवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं त्या ऐवजी ते बरं!” असं म्हणणारे ते मिस्कील आजोबा आपल्याला हसवितात, पण त्यांच्या विनोदात कुठेतरी, कधीतरी झालेल्या आणि बऱ्या न होणाऱ्या जखमांच्या वेदना आहेत, गरिबीमुळे नाटक पहाता येत नाही हा सल देखील आहे. “वीजेची नळी कशाला घ्यायची? त्या उजेडात पोपडे वर आलेले दळिद्रच बघायचं ना?” या वाक्याने घरात विजेच वापर न करण्याचे कारण देणारे, खरतर अंतर्यामी दुःखी असलेले, पण वरपांगी हसरे वाटणारे हे आजोबा! प्रत्यक्षात जे वाटत ते न बोलता, आनंदी आणि विनोदी वाटणारे हे आजोबा! गंगेच्या गडूचे सील कधी उघडतो याची मनापासून वाट बघणारे हे आजोबा आहेत!
यातून पुलंना असहाय्य आणि वेदनेने भरलेले म्हातारपणाचे जे चित्रण करायचं आहे, ते अचूकपणे साकार झाले आहे. समाजाने अडगळ असा छाप मारलेली अशी अनेक वृद्ध माणसे समाजात आपल्याला दिसतात. त्यांच्यासाठी चांगले वृद्धाश्रम नाहीत, घरी कुणी विचारीत नाही आणि मरणही येत नाही, अशा भीषण परिस्थतीत हे जगत असतात. आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांच्याकडून फक्त प्रेमाची अपेक्षा असलेल्या या वृद्धांना ते ही मिळत नाही, याचे हे भीषण चित्रण आहे. प्रेम आणि वेळ यांच्या बदल्यात पैशांचे मनिऑर्डरने येणारे पोस्त त्यांना नको असते. पण हे लक्षात कोण घेतो? समाजाने पाठ फिरविलेली असताना ह्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आता ज्येष्ठ नागरिक संघटना प्रयत्नशील आहेत आणि सरकार दरबारी देखील प्रयत्न होत आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. पुलंची असली व्यक्तिचित्रे मनाला घायाळ करतात. कोणत्या विनोदी लेखकाने जीवनाचे हे तत्वज्ञान इतक्या मोजक्या हलक्या फुलक्या आणि सुंदर शब्दांमध्ये मांडले आहे? कारुण्याला विनोदाची झालर देणाऱ्या या व्यक्तिरेखा आपल्याला अंतर्मुख करतात, एका वेगळ्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहायला शिकवितात आणि आपल्यातील हरवलेल्या भावनांना हळुवारपणे साद घालतात. एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यावर भाविकांना जो आनंद मिळतो, भीमसेन जोशी किंवा वसंतराव देशपांड्यांच्या सुरांच्या सागरात पोहोतांना किंवा विलायत खां किंवा रविशंकर यांच्या सतारीतून निघणाऱ्या सुरात भिजत असतांना संगीतप्रेमींना जसा आजूबाजूचा विसर पडतो, नेमका तोच प्रकार पुलंचे साहित्य वाचीत असताना असंख्य वाचकांच्या बाबतीत होत असतो. त्यांच्या मनात असलेली पुलंची प्रतिमा ही दैवी स्पर्श लाभलेली असते.

पुलोत्सव – भाग ४ – शरद पांडुरंग काळे
निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र

मानवी जीवनातील विसंगतीवर नेमके बोट ठेवण्याचे, आणि त्यातून योग्य दिशा देण्याचे काम विनोदी साहित्यिकांचे असते. ते काम पुलंनी कुणालाही न दुखविता उत्तमपणे पार पाडले आहे असेच म्हणावे लागेल. तुझं आहे तुझपाशी हे नाटक त्यासाठी वाचायला हवे. त्यातील प्रत्येक पात्र आणि प्रत्येक प्रसंग आपल्याला हसता हसता बरेच काही शिकवून जातात. त्यातील वासू अण्णा भांगेची गोळी चढवून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आत्मा अमर आहे असे जेंव्हा सांगतो, तेंव्हा हसून हसून आपली पुरेवाट होते. तोच वासू अण्णा जेंव्हा इथे डिके घराण्याच्या तीन पिढ्यांचं इमान राबत आहे हे सांगतो, तेंव्हा त्याच्यातील सेवक आणि त्या सेवकाची मालकाच्या घराशी असलेली निष्ठा बोलत असते. आपल्याला असे इमानी वासू अण्णा समाजात अजूनही आढळतात. त्या नाटकातील दोन मध्यवर्ती पात्रे म्हणजे काकाजी आणि आचार्य पोफळे गुरुजी. दोन वेगळ्या पातळ्यांवर आयुष्य जगणारी ही दोन्ही पात्रे आपल्याला खूप काही विचार करायला लावतात. आचार्यांच्या जीवनात फक्त शिस्त, नियम आणि बंधने यांनाच थारा आहे. त्यांचे सर्व जीवन त्यात बंदिस्त झालेले आहे. त्यात त्यांना आनंदही आहे. पण त्यांच्या सभोवती वावरणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत मात्र वागण्यात अजिबात मोकळेपणा नसतो. ही मंडळी नेहेमीच कसल्यातरी दडपणाखाली सातत्याने वावरत असतात. एखाद्या क्षुल्लक चुकीलासुद्धा त्यांच्याकडून क्षमा नसते. माणसाने चुकून सुद्धा चुकीचे वागू नये असे त्यांच्याकडून अपेक्षित असते. समाजाने आपले फक्त अनुकरण केले पाहिजे असे आचार्यांना वाटत असते. ती त्यांची स्वाभाविकता झालेली आहे. त्यातून ते बाहेरच येऊ शकत नाहीत. पण जेंव्हा आयुष्यभर उराशी बाळगलेल्या या मूल्यांचा फोलपणा त्यांच्या लक्षात येऊ लागतो, आयुष्यभर डोळेझाक करून, दुर्लक्षिलेल्या त्यांच्या स्वतःच्याच भावना जेंव्हा उफाळून येऊ लागतात आणि त्यांच्याभोवती फेर धरून नाचू लागतात, तेंव्हा आयुष्याच्या संध्याकाळी त्यांची अवस्था होरपळून गेल्यासारखी होते. ही त्यांची खरी शोकांतिका पुलंनी समर्थपणे हाताळली आहे.
हे नाटक मी शाळेत असतांनाच वाचले होते. नंतर ते मी गेली चाळीस वर्षे मधून अधून वाचीतच असतो. दरवेळी माझ्या आचार्यांविषयीच्या भावना थोडयाथोडया बदलता गेल्या. सुरुवाती सुरुवातीला त्यांचा राग यायचा, नंतर त्या व्यक्तिरेखेविषयी आदरही वाटू लागला, कारण “स्वार्थ” दूर ठेवून समाजासाठी ते कार्य करीत राहिले. गीतेवर (नाटकातील पात्र) त्यांनी अन्याय केला, तिच्या असहाय्यतेचा वेगळया पध्दतीने फायदा घेतला व तिला आश्रय देण्याच्या बदल्यात, त्यांना हवी असलेली वेठबिगारी मोलकरीण म्हणून तिच्याकडे पाहिले, असेही मधल्या काळात वाटून गेले होते. तिच्या भावना, तिच्या अपेक्षा, यांचा विचारही न करता फक्त आपलेच घोडे ते पुढे दामटीत राहिले. मात्र त्यांच्याविषयी पहिल्या वाचनात निर्माण झालेली अनुकंपा मात्र आजही तेवढयाच तीव्रतेने मला जाणवते. पुलंचे हेच तर वैशिष्टय आहे. त्यांची पात्रे कालातीत आहेत असे जे मला वाटते, त्याचेच ही व्यक्तिरेखा प्रतीक आहे. काकाजींची व्यक्तिरेखा याच्या उलट आहे. त्यांनीही जीवनात स्वतःची मूल्ये जपली, स्वतःला हवे तसे ते वागले, कदाचित प्रस्थापित रीतींच्या विरुध्दही ते वागले असतील, पण त्यासाठी त्यांना पश्चाताप करावा लागला नाही. नीतीमूल्यांच्या त्यांच्या व्याख्या वेगळया असतील, त्या सगळयांनाच पचतील असेही नाही, पण या व्याख्यांशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले. त्यांच्याही आयुष्यात नियम होते, पण सभोवती वावरणाऱ्यांना, त्यांचा त्यांनी कधी त्रास जाणवू दिला नाही. उलट जीवनात प्रत्येक गोष्टीतून मझा कसा घ्यायचा याचेच मजेदार वर्णन ते करीत राहिले, त्यांनी गायनातील आनंद उपभोगला, विविध खाद्य पदार्थांच्या रुचींचा आस्वाद घेतला, बुध्दिबळातील राजे महाराजांच्या लढाया ते लढले. म्हणूनच आयुष्याच्या संध्याकाळी ते उषा, शाम, गीता व खिलाडू डॉक्टर सतीश यांच्याबरोबर समवयस्क असल्यासारखेच बोलत, त्यांना जीवनातील विविध आनंदांचे व ते कसे उपभोगावेत, याचे धडे देऊ शकत होते. झालेल्या चुकांबद्दल खन्त करीत न राहता त्या पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेत पुढे जात राहायचे, “चुकलो त्याची खंत नसे पण, चुकता चुकता घडते जीवन” असले काकाजींचे साधे पण अतिशय व्यवहारी तत्वज्ञान होते. प्रसिध्द तबलावादक रामूभैय्या दाते यांच्यावरुन काकांजींची व्यक्तिरेखा पुलंनी रेखाटली असावी, असे अनेकांना वाटते आणि तसे ते असेलही. मात्र पुलंची ही व्यक्तिरेखा अतिशय प्रभावी झाली आहे यात शंकाच नाही. या दोन्ही व्यक्तिरेखांमधे श्रेष्ठ कोणती हे ठरविणे ज्याचे त्याचे आपले आपले काम आहे. मला त्या दोन्ही व्यक्ति श्रेष्ठच वाटतात. त्यांच्यामधे तुलना करण्याचे कारण नाही!
रावसाहेब ही व्यक्तिरेखाही काकाजींच्याच पठडीतील आहे. काकाजींपेक्षा थोडी अधिक मनस्वी वाटणारी ही रावसाहेबांची व्यक्तिरेखा पुलंचीही अतिशय आवडीची आहे असे मला नेहेमी वाटते. रोजच्या जीवनातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षणात भावना ओतणारी ही पुलंची पात्रे आणि स्वतः पुल, हे माझे आयुष्याच्या वाटेवरील नेहेमीच वाटाडे होते व या पुढच्या जीवनातही असणार आहेत. त्यांचा मला नेहेमीच मोठा आधार वाटतो. आराध्य दैवताकडून यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असते? पुलंना शेक्सपियर, रविन्द्रनाथ टागोर, अर्नेस्ट हेमिंग्वे, चार्लस डिकन्स, मार्क ट्‌वेन, चार्ली चॅप्लिन आणि वुडहाउस हे कलासेवक खूप आवडायचे. म्हणजे बाकीचे आवडत नव्हते असे नाही! सर्वश्री बालगंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी, श्री बाबासाहेब पुरंदरे, दिलीप प्रभावळकर, भीमसेन जोशी, सतीश दुभाषी, प्रां ग. बा. सरदार, राम नगरकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार, डॉ. अनिल अवचट, डॉ. अरुण लिमये, विजय तेंडुलकर, निळू फुले, किशोरी अमोणकर, मल्लिकार्जुन मन्सूर, केशवसुत, कुसुमाग्रज, राम गणेश गडकरी, बालकवी, भालचंद्र नेमाडे, वीणा सहस्त्रबुध्दे, डॉ. आश्विनी भिडे, श्रुती सडोलीकर, पंं. कुमार गंधर्व व इतर अनेक कलाकारांबद्दल पुल नेहेमीच आदराने बोलत किंवा लिहित असत. त्यांच्या या आवडीतच पुलंची सर्वव्यापी गुणग्राहकता प्रकर्षाने जाणवते.
कालिदासापेक्षा मला शेक्सपियरने अधिक काही दिले असे म्हणणारे पुल कालिदासाविषयी अनादराने बोलत नसतात, तर शेक्सपियर विषयीच्या अतीव आदराने आपल्या भावना व्यक्त करीत असतात. मात्र ते समजावून घेण्यासाठी पुलंचे शेक्सपियर प्रेम का होते, हे समजावून घेणे जरुरीचे असते. पुलंचे कोणतेच लेखन वरपांगी नव्हते. त्यांचे लेखनविषय कदाचित उस्फूर्त असतीलही (पुलंच्या एकूण लिखाणावरुन केलेला हा माझा अंदाज आहे, कदाचित तो समज चुकीचाही असू शकतो), पण त्या विषयातला त्यांचा अभ्यास अगदी सखोल असायचा. केवळ मनात आले ते लिहून टाकले अशातला हा प्रकार नव्हता. शेक्सपियरचे प्रत्येक नाटक कोळून प्यालेले पुल, फारशा न वाचलेल्या कालिदासासंबंधी जर असा विचार करीत असतील, तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल. कदाचित कालिदासाची नाटके त्यांनी अशीच सखोल अभ्यासिली असती, तर त्याच्यावरही त्यांनी सुंदर लेखन केले असते यात शंका नाही. कलेचा आस्वाद घेतांना त्यातले निखळ सौंदर्य त्यांना जर भावले तर त्या कलाकाराला डोक्यावर घेणारे पुल, कलाकार कोण व कुठला आहे ह्याची चर्चा करण्यात वेळ घालवीत नसत! कलाकाराला भौगोलिक मर्यादा घालणे हा नुसत्या त्या कलाकाराचाच नाही तर कलेचाच अपमान आहे!
गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर हे उत्तुंग व्यक्तिमत्व पुलंच्या अतिशय आवडीचे होते, ते केवळ नोबेल पारितोषिक विजेता म्हणून नव्हे. कदाचित त्या शिक्क्यामुळे ते त्यांच्याकडे आकर्षित झाले असावेत. पण त्यानंतर मात्र टागोरांचे शांतिनिकेतन, त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्रच झाले होते. त्यांनी बंगाली भाषा शिकण्याचा ध्यास घेतला होता व वयाच्या पन्नाशीत शांतिनिकेतनचा रस्ता धरला. त्यांना बंगाली भाषा शिकायची होती, कारण रविन्द्रनाथांचे व शरदबाबू यांचे सारे साहित्य त्यांना बंगालीमधून वाचून अनुभवायचे होते. तसेच त्यांना स्वामी विवेकानंदांचे ओजस्वी वाङ्गमयाचाही आनंद मूळ बंगालीमधूनच घ्यायचा होता. पुलंचे हे विचार वाचूनच मी नतमस्तक होतो. पुलंसारख्या प्रतिथयश लेखकाला काय गरज होती असली धडपड करण्याची? पण पुलंमधील विद्यार्थी वयाच्या पन्नासाव्या वर्षी देखील नाविन्याच्या सतत शोधात होता, त्यासाठी त्यांनी बंगाली भाषा शिकण्याचे ठरविले व त्यात ते कमालीचे यशस्वी देखील झाले. भाषा हा दोन मनांना जोडणारा दुवा आहे तो पक्का असला तर भावनांची देवाणघेवाण सुलभ होते व जुळण्यासारख्या तारा असतील तर एखादे रविन्द्रसंगीत साकार होऊ लागते. सदैव माणुसकीची भावना मनात तेवत ठेवणा–या आनंदयात्री रविन्द्रनाथांना, बंगाली शिकून घेऊन विश्वभारती आणि शांतिनिकेतन यांची ओळख मराठी जनांना करून देऊन जी आदरांजली पुलंनी वाहिली, त्यात त्यांनी आपले हृदय ओतले आहे. पुलंची वंगचित्रे वाचतांना म्हणूनच त्या सर्व लिखाणाला पुस्तकांपलिकडचा दैवी अर्थ प्राप्त होतो हे मात्र नक्की आहे.
पुलं नी लिहिलेला वुडहाउस या लेखकावर लिहिलेला लेख असेच एक नितांत सुंदर शब्दचित्र आहे. वुडहाउसच्या पुस्तकांनी अनेकांना अक्षरशः वेड लावले आहे, पण त्याच्या एकूण जीवनाविषयी पुलंनी जे या निबंधात लिहिले व ज्या रीतीने लिहिले आहे, ते वाचून मन अगदी गहिवरुन येते. ह्या मस्त माणसाला आपले साधे जीवन जगत असतांना अचानकपणे नाझींच्या छळांना तोंड द्यावे लागते, तेंव्हा किती धैर्याने व स्वतःची विनोदबुध्दि शाबूत ठेवून त्यांनी त्या परिस्थितीशी सामना केला, याचे सुंदर वर्णन पुलंनी केले आहे. जर्मनांनी या ज्यू कैद्यांना अगदी वाईट वागणूक दिली, त्यांना दिवसेंदिवस उपाशीच ठेवले, या तुरुंगातून त्या तुरुंगात फिरविले. वुडहाउसची तुरुंगातली जेवतांनाची पावतोडयाची भूमिका व पाव खाण्यासाठी त्यांनी केलेला आगपेटीतील काडयांचा आणि सुनीत लिहिलेल्या कागदाचा वापर, डोळयात पाणी आणल्याशिवाय राहात नाही! जर्मनांनी या लेखकोत्तमाला संडास साफ करायला लावले, तेंव्हाही या विनोदमहर्षिची विनोदबुध्दि ढळली नाही. वुडहाउसने लिहिले होते की, या प्रसंगानंतर कित्येक वर्षांनी देखील त्यांच्या अंगावरुन वाहाणारा वारा ज्यांच्याकडे जायचा, ते त्यांना तुम्ही कैदेत असतांना संडास साफ करण्याचे काम करता का? असा प्रश्न करीत असत! स्वतःच्या इतक्या विदारक हाल अपेष्टांचे विनोदी वर्णन करणारा हा लेखक एकमेवाद्वितीयच म्हणावयास हवा. हे सारे सहन केल्यानंतर, त्यांच्याच देशवासियांनी वुडहाउसने देशाशी गद्दारी केली अशी ओरड केली, तेंव्हा त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची मी तरी कल्पना करु शकत नाही. तरीही या माणसाचे मन किती विशाल होते ते पहा, त्यांना कोणीतरी विचारले की “का हो, जर्मनांचा तुम्हाला तिटकारा वाटत नाही का?” त्यावर त्यांचे (पुलंच्या मराठीतील) उत्तर असे होते की, “गडयांनो, मला असा घाऊक तिटकारा कुणाचाच वाटत नाही रे!” वुडहाउसचे हे वाक्य मला मन वढाय वढाय या जुन्या मराठी कवितेची आठवण देऊन गेले. त्या कवितेत आमच्या बहिणाबाईंनी किती समर्पकपणे लिहिले आहे ना,
मन एव्हढ एव्हढ जस खसखसच दान
मन केवढ केवढ आभायतबि मावेन!
या लेखाचा शेवट देखील पुलंनी अगदी खास त्यांच्या शैलीत केला आहे. त्यांनी जेंव्हा वुडहाउसच्या मृत्युची बातमी सकाळ मधे वाचली, तेंव्हा त्यांनी लिहिले होते, “माझ्या एका डोळयात हसू आणि दुसऱ्या डोळयात अश्रू होते”ं पुलंनी एका सुंदर पाश्चात्य व्यक्तिमत्वाची मराठी जनांना ही जी ओळख करुन दिली त्याची दाद दिलीच पाहिजे. पुलंच्या या लेखामुळे आता वुडहाउसचीे पुस्तके वाचतांना त्यांची गोडी अधिक वाढलेली असते हे मात्र अगदी नक्की.

पुलोत्सव – भाग ५ – शरद पांडुरंग काळे
निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र

प्रसिध्द शिवचरित्रकार मा. श्री ब. मो. उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव माहित नसलेला एकही शिवाजी महाराजांचा भक्त आज महाराष्ट्रात आढळून येणार नाही. सुरुवातीला जेंव्हा बाबासाहेबांचे राजा शिवाजी ह्या विषयावरील दहा खंड प्रसिध्द झाले, त्यावेळी त्यातील पहिल्या खंडातील प्रस्तावनेत बाबासाहेबांनी महाराष्ट्रातील सर्व शुभदेवतांना केलेले आवाहन वाचून पुल स्तिमित होऊन गेले होते. त्यांनी बाबासाहेबांवर एक अतिशय सुंदर असा लेख लिहून त्यांची एक वेगळीच ओळख महाराष्ट्राला त्यावेळी करुन दिली होती. इतिहास हा माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे, इतकेच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया व लेकीसुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे, असे म्हणणारा हा इतिहासकार पुलंना अतिशय वेगळा वाटला. एका मनस्वी तपस्व्याला दुसऱ्या मनस्वी तपस्व्याने अचूक ओळखले व त्याची पावती देणारा लेख पुलंनी आपल्या गणगोत या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचविला. बाबासाहेबांमधले स्फुल्लिंग पुलंना त्या प्रस्तावनेतच जाणवले होते व बाबासाहेबांच्या देवकार्याला पुलंच्या आशीर्वादांची जोड लाभली होती.
पुल १९७४ साली इचलकरंजी येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते, त्यावेळी त्यांनी केलेले भाषण मराठी साहित्य रसिकांच्या दीर्घ काळ स्मरणात राहील असेच आहे. त्यांनी त्या भाषणात सांगितले होते की, “इतिहासाला पूर्ण विराम माहीत नसतो. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वरालादेखील
गतिस्त्वम्‌ गतिस्त्वम्‌ त्वमेका भवानी।
असे म्हंटले आहे. या गतिमान जीवनात साहित्य देखील प्रगतच होत राहाणार आहे. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे आविष्कार, नवे विषय आले तर त्यांचं स्वागतच केलं पहिजे, त्यातील अस्सल असेल तेच टिकेल आणि बाकीचं काळाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. लेखक जर “दुरितांचे तिमिर जावो” या भावनेने, त्याला जाणवणारे सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर “जो जे वांछील तो ते लाहो” च्या ठिकाणी “जो जे वांछील तो ते लिहो” अशी आपली धारणा असली पाहिजे, असे मला वाटते”. पसायदानाचा खरा अर्थ पुलंना समजला होता, व श्वासा श्वासातून पुल पसायदान जगत होते.
माणूस लेखक का बनतो? जेंव्हा त्याच्या स्वतःकडे दुस–याला सांगण्यासारखे काही असते व ते इतरांपर्यंत पोहोचवावे असे त्याला वाटते, तेंव्हा तो लेखणी हातात घेतो. एकदा लेखणी हाती घेतली की त्या लेखणीची सर्व बंधने त्याला पाळावी लागतात. लेखकाचे खरे काम असते समाज प्रबोधनाचे. हे काम करतांना लेखनाचा कोणता प्रकार निवडायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. काही लेखक ललितलेखन करतात, तर काही नाटकांच्या मार्गाने जातात. कोणी कवितेच्या माध्यमातून हे प्रयत्न करतात तर कुणाला कथा कादंबऱ्या लिहाव्याशा वाटतात. विनोदी लेखनातून समाजप्रबोधन हा मार्ग अतिशय अवघड असा आहे. लोकांना हसविणे आणि लोकांना शिकविणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. पण पुलंनी हे शिवधनुष्य इतक्या सहजतेने पेलले आहे की त्यामुळे असा समज व्हावा, की हे अतिशय सोपेच काम आहे! काही लोकांची एखादे काम करण्याची रीतच अशी असते की ते करीत असलेले अतिशय अवघड काम पाहाणाऱ्याला अगदी सोपे वाटावे. पण जर तेच काम दुसऱ्या कुणी करावयास घेतले, तर मात्र त्यातील अवघड वाट लक्षात येते. हा मानसिकतेचा व सकारात्मक दृष्टीकोनातून प्रत्येक गोष्टीकडे पाहता येण्याचा परिपाक असतो व ही सकारात्मकता आयुष्यभर जोपासणे तर खरोखरीच एखादे वरदान वाटावे एवढे दुर्मिळ आहे. कारण नित्याच्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी, चढउतार व हेवेदावे यांना तोंड देतादेता ही सकारात्मकता कधी हरवून जाते हेही लक्षात येत नाही. म्हणूनच विनोदी लेखन व समाज प्रबोधन हे दोन्ही प्रकार प्रत्येक कलाकृतीत यशस्वीपणे हाताळणारे पुल एकमेव लेखक आहेत. आचार्य अत्रे देखील या पठडीतील आहेत, पण त्यांच्या जीवनात रूळ बदलण्याचे अनेक प्रसंग आल्यामुळे ते या क्षेत्रात सर्वस्वी होते असे म्हणता येणार नाही.
पुलंना किती पुरस्कार मिळाले ह्याची यादी तपासण्याची गरज नाही. पुरस्कारांवरुन उंची मोजण्याच्या कितीतरी पलिकडचे पुलंचे साहित्य आहे. अभिजात लेखकाला किंवा कलाकाराला बक्षिसांमधे किंवा पुरस्कारांमधे फारसा रस नसतोच, कारण त्यांची कला त्या आशेने बहरलेली नसते. पुरस्काराचे महत्व त्यामुळे कमी किंवा अधिक होत नाही. मात्र काही पुरस्कार असे असतात, की जे मिळाल्यानंतर कलाकाराला मनापासून आनंद तर मिळतोच, पण त्या कलाकाराचा जो चाहता वर्ग असतो त्यांनाही त्यांच्या लाडक्या कलावंताचा खरा सन्मान झाल्यासारखे वाटते. रविन्द्रनाथांना जेंव्हा गीतांजलीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता, तेंव्हा प्रत्येक भारतीय हरखून गेला होता. कारण रविन्द्रनाथांची गुणवत्ता एवढी प्रचंड होती की नोबेल पारितोषिका शिवाय तिची मोजमाप करणारी दुसरी एकही फूटपटटी अस्तित्वातच नव्हती. पुलंच्या बाबतीत देखील असेच म्हणावे लागेल. त्यांना ज्ञानपीठ व नोबेल ही दोन्ही पारितोषिके मिळायला हवी होती. पुलंच्या लिखाणात जबरदस्त ताकद आहे, पण विनोदी लेखनाच्या नावाखाली वर्गीकरण झाल्यामुळे असेल कदाचित, त्यांच्या लेखनाकडे त्या दृष्टीने पाहायचा बहुतेक सर्व समीक्षकांना विसरच पडला होता.
पुलंच्या साहित्याला खरंतर विनोदाची फक्त झालर आहे. एखाद्या हिऱ्याला जसे कोंदण शोभून दिसते तसे पुलंच्या लेखनाला ही विनोदाची झालर शोभिवन्त बनविते. त्यांच्या लेखनात कारुण्य आणि सहानुभूति अगदी सुरुवातीपासून असते व तिची तीव्रता शेवटी शेवटी वाढू लागते. पण त्यांच्या विनोदी शैलीमुळे ते कारुण्य वाचकाच्या मनाचा हळूहळू कब्जा घेत आहे, हे त्याच्या लक्षातही येत नाही. लेखनाच्या शेवटी शेवटी तर ती मनाला इतकी हलवते, की डोळयातून दोन चार अश्रू निसटल्यानंतरच लक्षात येते की लेखकाला हवी असलेली दाद आपल्या नकळत आपण देउन बसलो आहोत. हे कारुण्य त्यांना वाचकांची सहानुभूति मिळावी म्हणून त्यांनी त्यांच्या साहित्यात आणलेलं नाहीे, तर ते त्यांच्या जीवनाकडे पाहाण्याच्या सहज प्रवृत्तीमुळे आलेले आहे. त्यांच्या लेखनातून काही ना काही तरी दर वाचनाला नव्याने शिकता येते. शब्दांच्या कसल्याही कसरतींमधे न अडकता ते आपल्याला जीवनातील अनेक हलके फुलके आणि गहिरे रंगही विलक्षण ताकदीने दाखवीत राहातात. कारुण्य, प्रेम, राग, लोभ, दुःख हे सारे रस त्यांच्या लेखनात विखुरलेले असतात व या सर्वांना त्यांनी विनोदाच्या भरतकामात इतके सुरेख गुंफलेले असते की वाचकाला त्यांची अनुभूती घेत असतांना, स्थळ काळ असल्या वास्तवाचा काही काळ तरी संपूर्ण विसर पडल्याशिवाय राहात नाही.
त्यांचा नारायण लग्नातील सारी कामे मन लावून करता करता, सगळयांना हसवित, आपली जबाबदारी पार पाडतांना, निर्माण झालेले गुंते वा तिढे, अधिक गुंतागुंत न होउ देता सोडवितांना, आपल्याला मात्र शेवटी रडवून जातो, ते केवळ तो गरीब आहे, दयेस पात्र आहे म्हणून नाही, तर एवढे सारे करुनही तो उपेक्षितच राहातो म्हणून! ही असली उपेक्षा सर्वसामान्य जीवन जगतांना प्रत्येकाच्याच वाटयाला कधी ना कधी आलेली असते. आयुष्याची उमेदीची वर्षे मुलांसाठी आणि भावंडांसाठी खस्ता खाण्यात घालवून, विसाव्याच्या वेळी त्याच मुलांनी आणि भावंडांनी नवश्रीमंतीच्या जोरावर पाठ फिरविली, तर तेंव्हा जसे वाटेल, किंवा एखाद्या कार्यक्रमात अंग मोडून काम करावे, त्याच्या यशस्वितेसाठी जीवाचे रान करावे व तो संपल्यानंतर त्या कष्टांची साधी आठवण देखील आयोजकांना राहिली नाही तर जसे वाटेल, त्याच भावना पुल जेंव्हा अधोरेखीत करतात, त्यावेळी या कधीतरी झालेल्या हृदयस्थ जखमा मग भळभळा वाहू लागतात व अश्रूंच्या स्वरुपात नकळतच दृग्गोचर होऊन जातात. काही वेळा आपल्याच हरविलेल्या वा दुखावलेल्या भावनांचे चित्रण अचानक त्यांच्या लिखाणातून डोळयासमोर येते व त्याही वेळी त्यातील कारुण्य मनाला साद घालते.
नाथा कामतला बोहोल्यावर चढवितांना लागलेल्या रुखरुखीची ते जेंव्हा भरपूर आहेराच्या स्वरुपात देऊन भरपाई करण्याचा प्रयत्न करतात, तेंव्हा त्यातील फोलपणा त्यांनाही जाणवलेला असतो. पण नाथाच्या स्वप्नातील सुंदरी त्याला मिळवून देण्याची स्वतःची असमर्थतता लपविण्यासाठी मग लौकिक बाबींचा आधार त्यांना घ्यावा लागतो. मला वाटते आपल्या आयुष्यातही असे अनेक क्षण येऊन जातात. दुकानात आवडलेली एखादी साडी किंवा दागिना पत्नीने न मागता तिला द्यायला म्हणून जावे, आणि खिशाला न परवडणारी किंमत ऐकल्यावर माघारी यावे, त्यामुळे लागलेली चुटपुट आयुष्यभर त्रास देत राहाते. मुलांचा हट्‌ट पुरविता आला नाही, येऊन गेलेल्या पाहुण्याच्या आदरातिथ्यात ऐपत असूनही केवळ दुर्लक्ष झाल्यामुळे कमतरता भासली, शान्त व मृदु स्वभावाच्या माणसाशी वागतांना आपल्याकडून काही आगळीक घडली, नकळत आवाज चढल्यामुळे समोरच्याच हिरेमोड झाला, मनात असूनही दूर प्रवासाला जातांना मोठयांना खाली वाकून नमस्कार करता आला नाही, शक्य असूनही आपल्या जवळच्या व आवडत्या व्यक्तिला काही देता आले नाही, उगीचच गैरसमजामुळे नात्यात दरी निर्माण झालेल्या व्यक्तिला मनातील भावना सांगता आल्या नाहीत, अशा अनेक भावनांचे कल्लोळ जवळजवळ प्रत्येकाच्या मनात खोलवर चालू असतात. दैनंदिन जीवनातील धकाधकीमुळे हे कल्लोळ आपल्या लक्षात येत नाहीत. काळाच्या ओघात कधीकधी त्या भावनांमधील दाहकता किंवा तीव्रता कमी होत जाते, पण उरीचे शल्य मात्र तसेच राहाते. पुल त्यांच्या लेखनातून मनाच्या ह्या नेमक्या विसरलेल्या कोपऱ्याला जागे करण्याचे काम करतात! होमियोपथीचे औषध अगदी नाममात्र मात्रेत जसे शरीरातील सुप्त प्रतिकार शक्तीला जागे करण्याचे काम करते, अगदी तोच प्रकार पुलंचे लेखन वाचतांना होत असतो. त्यामुळे त्याला असलेली विनोदाची झालर जरी आपल्याला हसविण्याचे कार्य करीत असली, तरी त्यांच्या लेखनातील वाचकांच्या सुप्त भावनांना जागविणारी ही त्यांची शक्ति समीक्षकांच्या लक्षात आली नाही असे मला प्रामाणिकपणाने वाटते, आणि त्यामुळेच त्यांच्या लेखनाला म्हणावी तशी पावती मिळू शकली नाही.
प्रत्येक गाण्याचे काही वैशिष्टय असते. गायक किंवा गायिकेच्या गळयातून ते उमटतांना त्यातील काही बहारदार जागा त्या गाण्याला अजरामर करीत असतात. नवगायकाची परीक्षा होते, ती तो त्या जागा कशा सांभाळतो त्या कौशल्यावर! लताताईंनी झुक गया आसमान या चित्रपटातील “उनसे मिली नजर” हे गाणे गातांना “हाय रह गई मैं हैरान!” हे म्हणतांना त्या “हाय” ची जागा अशी काही घेतली की सायराबानूंचा तो गोड चेहेरा नजरे समोरुन हटतच नाही. आशाताईंच्या “जिवलगा, राहीले रे, दूर घर माझे” या गाण्यातील जागाही अशाच मनाला हूरहूर लावणाऱ्या आहेत. अर्थात ही उदाहरणे अगदीच त्रोटक आहेत, पण पटकन आठवली तशी ती लिहिली एवढेच! पुलंच्या लिखाणातही अशा अनेक जागा आहेत की तिथे, वाह क्या बात है! ही दाद दिलीच जाते. पॅरिसचे संग्रहालय बघतांना, त्यातील चित्राकडे टक लावून बघणारे रसिकच पुलंना अतिशय आवडतात व ते लिहून जातात, भगवंतापेक्षा मला भक्तच अधिक आवडतात! स्कॉटलंड मधील अतिशय सुंदर अशा डोंगराळ भागातील संध्याकाळ पाहातांना अचानक आलेल्या बॅगपाईपच्या स्वरांनी वातावरण भारले गेले, तेंव्हा पुल लिहितात की, “त्या रम्य सांध्यभावात ते पुंगीसारखे स्वर इतके मिसळून गेले की, ते दृश्य मनात चित्रांकितच नव्हे तर स्वरांकितही होऊन गेले!” पुलंची असली वाक्ये आपल्या मनाच्या सतारीच्या तारा अशा काही छेडतात की, त्यातून निघणारे सूर मग आपल्याला आयुष्यभर सोबत करीत राहातात.
आणीबाणीच्या कालखंडामधे पुलंनी केलेली वक्तव्ये न आवडल्यामुळे राजकीय रंगमंचावरुन त्यांची विदूषक म्हणून संभावना केली गेली होती. तशी संभावना करण्यामागे त्यांची हेटाळणी करण्याचा एकमात्र उद्देश्य होता. पण त्यांना विदूषक म्हणतांना आपण त्यांना सन्मानित करीत आहोत, हे मात्र तो पदवीदान समारंभ करणाऱ्या लोकांच्या लक्षातच आले नाही. विदूषक हा सर्वगुणसंपन्न असला पाहिजे, ही विदूषक होण्यासाठीची किमान पात्रता असते! सर्कशीतल्या विदूषकाला आकाशात उंच उंच झोके घेता यायला हवे असतात, तेंव्हाच तो उंचावरुन हात निसटल्याचा अभिनय करीत खालच्या जाळीत आत्मविश्वासाने पडू शकतो व लोकांना हसवू शकतो. हा विदूषक उत्तम रिंग मास्टर असतो, इतरांच्या सवयींचे बारकाईने निरीक्षण करीत त्यांचे अनुकरण करतांना तो एक उत्तम शिक्षकाच्या रुपात पुढे येत असतो. कारण त्या अनुकरणातून तो सुधारणा सुचविण्याचे कार्य करीत असतों प्राचीन वाङ्गमयातदेखील विदूषकाची महती आपल्याला सांगितली गेली आहे. आर्य चाणक्याच्या नीतिमधे समाजसुधारणेचे कार्य विदूषकाकडेच सोपविलेले होते. स्वतःचे दुःख विसरुन इतरांना सतत हसवित राहाणे ही अजिबात सोपी गोष्ट नसते. समाजाच्या आत्मविश्वासाची पातळी, सातत्याने प्रगतिपथावरील घोडदौडीच्या वेगाशी संवाद साधीत राहील, अशी ठेवणे हे साधे काम नाही. चार्ली चॅप्लिन यांनी त्यांच्या मूक चित्रपटाच्या माध्यमातून केले तर पुलंनी त्यांच्या साहित्यातून ते केले आहे. हे काम करीत असतांना लोकांची मने प्रसन्न राहावीत म्हणून दोघांनीही कमालीचे प्रयास केले व दोघेही त्यात अतिशय यशस्वी होऊ शकले. म्हणूनच पुलंना काही जणांनी उपहासाने दिलेली विदूषक ही पदवी वास्तवात अगदी सार्थच होती असे म्हणावे लागेल.
पुलंना पारितोषिके किती मिळाली ह्यावरुन पुलंची महति ठरवायची गरज खऱ्या मराठी साहित्य रसिकांना कधीच जाणवली नाही व जाणवणारही नाही. केवळ एक शल्य जे वाटले ते लिहिले एवढेच. त्यांनी आपल्या लिखाणातून जो अमर्याद आनंद आम्हाला दिला, आमच्या मनाला ताजेतवाने ठेवण्याचे काम वर्षानुवर्षे केले व त्यातून साऱ्या समाजालाच एक नवचैतन्य दिले, त्याबद्दल तमाम मराठी रसिक पुलंना कधीच विसरणार नाहीत. त्यांनी दिलेले हे लेखनऋण आम्ही आमच्या आयुष्यात आमचे जीवन समृध्द व आनंदमय करण्यासाठी तर रोज शिरोधार्य धरीत आहोतच, पण मराठी रसिकांच्या येणाऱ्या अनेक पिढया हे त्यांचे लेखनऋण हसत हसत स्वीकारतील व त्यांच्या जीवनात आनंदाचे गुलाब फुलवतील ह्याबद्दलही शंका वाटण्याचे काहीच कारण नाही.
समाप्त

२७. असा मी असामी

तुळशीवृंदावनापासून ते कॅक्टसच्या कुंडीपर्यंत कळत न कळत काळाबरोबर वाहत वाहत गेलेल्या एका कारकूनाचे हे आत्मचरित्र आहे. निरनिराळ्या मासिकांतून त्यातला बराचसा भाग यापूर्वीच आला आहे. मुख्यत: ‘दीपावली’च्या दिवाळी अंकांतून ‘असा मी असामी’ व त्यानंतर ‘पुन्हा मी पुन्हा मी’ असे दोन भाग प्रसिद्ध झाले होते.

ह्या काल्पनिक आत्मचित्राचा नायक माझ्या मनात अनेक वर्षे घर करून बसला आहे. निरनिराळ्या लेखांतून तो डोकावतो. त्याला मी इथे ह्या पुस्तकात पकडून ठेवला तरी माझ्या मनातले घर सोडायला तो तयार नाही. ह्या अफाट मुंबई शहरातल्या ज्या मध्यमवर्गीय समाजात मी वाढलो त्यातलाच हा एक! कुठल्यातरी हपिसासाठी जगायचे आणि पेन्शनीसाठी किंवा प्राविडंट फंडाकडे डोळे लावून दिवसादिवसाने म्हातारे होत जायचे याहून मोठी महत्त्वाकांक्षा त्याला परवडलीच नाही. लोकलगाडीसाठी धावताना, ट्राम गाठताना किंवा बसच्या रांगेत आमच्या भेटीगाठी झाल्या-आजही होतात; यापुढेही होतील. बटाट्याच्या चाळीतसुद्धा ह्याच्या नात्याची माणसे आहेतच. ह्याचेही बरेचसे आयुष्य तसल्याच खास मुंबई फ्याशनीच्या वास्तूत गेले आहे. त्याच्या ह्या आठवणी आहेत. नव्या जगाशी जुळवून घेताना लागलेल्या धापा आहेत. रक्तातूनच आलेल्या कोकणी खवटपणाला हा काही अगदीच पारखा नाही. आणि म्हणूनच वैतागाच्या क्षणीही तो थोडासा हसतो आणि थोडासा हसवतोही. मात्र कुणी हसल्याबद्दल त्याला मुळीच राग येणार नाही. त्वेषाने चिडून वार करायला जाणे त्याला जमणार नाही. असल्या स्वभावाला कोणी डरपोकपणा म्हणेल; त्यालाही त्याची हरकत नाही. आपले चरित्र सांगण्याचे त्याने धारिष्ट्य दाखवले हेच पुष्कळ झाले.
ह्या चरित्रातल्या निरनिरळ्या घटनांच्या संदर्भात आलेल्या माणसांच्या नावांशी कुण्या वाचकाचे नाव जुळून आले तर तो केवळ योगायोग आहे असे त्याने अगर तिने समजण्याची कृपा करावी.
~ पु. ल. देशपांडे

२८. एक शून्य मी . . .

. . . . . . . पु.ल.देशपांडे

किराणा दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. .
तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.
दुकानदार “तेलाचं भांडं कुठाय?” म्हणून खेकसला.
ती म्हणाली, “येवढं पणतीभर द्या.”
“अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?” पोरगी गांगरली.
पण दारिद्रय धिटाई शिकवते. लगेच सावरुन म्हणाली,
“दिवाळी कसली? खायला त्याल द्या…”
“ह्मा पणतीत?” दुकानदार म्हणाला.
मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले.
“यवड्या पैशात किती बसतं ते द्या”
“अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?”
“पण आमच्याकडे धाच पैशे हाइत.”
तिने आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. कारण तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे ‘खायाचे तेल’ परवडत नाही.
आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पण त्यांची आरास पाहिली, की ‘आमच्याकडं धाच पैसे हाइत्’ म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो.

२९. व्यक्ती आणि वल्ली

१९४३ साली ’अभिरुची’ च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार? ’ अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या मानकर्‍यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले.
ते कसब तेथेच न थबकता, अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले, एकेकसुद्धा भान हरवील असा; ‘किमु यत्र समुच्चयम्‌’? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही! अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाचं!
देशपाड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्‍हातर्‍हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्या-वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात! आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ति आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्‍या-वाईटाचे अंतर्नाटय देशपांडयांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्या आमच्यांत आहे आणि लेखकातही!
व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून २५% सवलतीत घरपोच मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.
https://www.bookganga.com/R/418VC दि.९-११-२०२१

३०.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व

ज्यांनी महाराष्ट्राला हसायला शिकवलं ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच पु_ल. अभिनेते ,लेखक ,नाटककार ,संगीतकार ,निर्माता ,दिग्दर्शक ,विनोदाचे बादशहा पु. ल. यांची आज जयंती
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ – जून १२, इ.स. २०००) त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ‘ऋग्वेदी’ हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते, आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ..
‘गुळाचा गणपती’ या ‘सबकुछ पु. ल.’ म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्‍न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.
पु.ल.देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत. मात्र ते अतोनात हुशार होते. सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे पैसे त्यांच्या नशिबात नसत. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. अशी भाषणे सात वर्षे चालली. त्यानंतर मात्र, वयाच्या बाराव्या वर्षापासून पु.ल.देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले, इतकेच नव्हे तर इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले. पु.लं.चे १२ जून, इ.स. २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.(अधिक माहितीसाठी मराठी विश्वकोश )अभिवादन “””
पु. लची साहित्य संपदा
विनोद : बटाट्याची चाळ (१९५८), असा मी असामी (१९६४), अघळ पघळ (पुस्तक) (१९९८),, उरलं सुरलं (१९९९), कोट्याधीश पु.ल. (१९९६), खिल्ली (१९८२), खोगीरभरती (१९४९),गोळाबेरीज (१९६०),नस्ती उठाठेव (१९५२), पुरचुंडी (१९९९), मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास (१९९४), हसवणूक (१९६८)
प्रवासवर्णन[संपादन]: अपूर्वाई (१९६०), पूर्वरंग (१९६३), जावे त्यांच्या देशा (१९७४),वंगचित्रे (१९७४)
व्यक्तिचित्रे[संपादन]: गणगोत (१९६६),गुण गाईन आवडी (१९७५), व्यक्ती आणि वल्ली (काल्पनिक) (१९६६), मैत्र (१९९९), आपुलकी (१९९९),स्वागत (१९९९)
कादंबरी (अनुवाद)[संपादन]: काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली), एका कोळियाने (१९६५) (मूळ कथा: The Old Man and the Sea लेखक : अर्नेस्ट हेमिंग्वे), कान्होजी आंग्रेचरित्र[संपादन], गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)संकीर्ण[संपादन]
दाद :रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १, रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २, रवींद्रनाथ : तीन व्याख्याने
रंगमंच : एकपात्री प्रयोग[संपादन]: बटाट्याची चाळ (१९६१– )नाटक[संपादन], तुका म्हणे आता (१९४८), अंमलदार (नाटक) (१९५२) (मूळ लेखक – निकोलाय गोगोल), भाग्यवान (१९५३), *तुझे आहे तुजपाशी (१९५७), सुंदर मी होणार (१९५८), पहिला राजा/आधे अधुरे (१९७६) (मूळ लेखक: जगदीशचंद्र माथुर), तीन पैशाचा तमाशा (१९७८) (मूळ लेखक – बेर्टोल्ट ब्रेश्ट्). राजा ओयदिपौस (१९७९) (मूळ लेखक – सोफोक्लीझ), ती फुलराणी (१९७४) (मूळ लेखक – जॉर्ज बर्नार्ड शॉ) (मूळ नाटक – पिग्मॅलियन), एक झुंज वाऱ्याशी (१९९४), वटवट (१९९९)
एकांकिका-संग्रह : मोठे मासे आणि छोटे मासे (१९५७, विठ्ठल तो आला आला (१९६१),आम्ही लटिके ना बोलू (१९७५)
लोकनाट्य : पुढारी पाहिजे (१९५१), वाऱ्यावरची वरात
काही विनोदी कथा : एका रविवारची कहाणी, बिगरी ते मॅट्रिक, हरी तात्या, मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर? म्हैस. या कथेवर मराठी्त एक चित्रपट बनत आहे. मीआणि माझा शत्रुपक्ष, पाळीवप्राणी, पानवाला, काहीनवेग्रहयोग, माझेपौष्टिकजीवन, पेस्तन काका,रावसाहेब,सखारामगटणे, नामू परीट, उरलासुरला, नारायण, अंतू बरवा(विकिपीडिया )

माधव विद्वांस … फेसबुकवरून साभार दि.९-११-२०२१

३१. बाबासाहेब पुरंदरे

पु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेब पुरंदरे वरील लेख

मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगाने काउंटरवर पडलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड हाती पडला. साऱ्या महाराष्ट्रातल्या शुभदेवतांना केलेल्या सुरुवातीच्या आवाहनानेच मनावरची धूळ झटकली. “सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं व्याख्यान मांडलंय-आई, तू ऐकायला ये” ही तुळजाईला घातलेली हाक जिवाला चेतवून गेली. त्या शिवचरित्रातला ‘उदो उदो अंबे’चा जागर म्हणजे महाराष्ट्राचा पाना- दोन पानांत उभारलेला सांस्कृतिक इतिहास आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे नामक कोण्या इतिहासकाराने लिहिलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड वाचत मी काउंटरपाशीच खिळून राहिलो. ते दहाखंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले. आपण काही तरी अद््भुत अनुभवातून न्हाऊन बाहेर पडल्यासारखे वाटले. महाराष्ट्रात जन्माला आल्याच्या धन्यतेने मी फुलून निघालो होतो.

जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच गवसले. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नावाच्या मुलाला शिवनेरीच्या शिवरायाने झपाटले. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. उगीचच ‘शिवाजी’ म्हटल्यावर हाताचे आणि जिभेचे पट्टे फिरवणे नाही. त्यांच्या अंतःकरणातला कवी मोहोरबंद, गोंडेदार भाषा लिहितो; पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही, वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.

पुरंदरे इतिहासात सहजतेने डुबकी घेतात. माशाला पोहायची ऐट मिरवावी लागत नाही, तशी पुरंदऱ्यांना शिवभक्तीचा दर्शनी टिळा लावण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनाने सांगतो, की “माझ्या रचनेतल्या चुका दाखवा. पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते साऱ्यांचं धन आहे. त्यात कुठं हीण आलं असेल तर ते पाखडून फेकून द्यायला हवं! इथं वैयक्तिक अहंकार गुंतवण्याचं कारण नाही.” त्यांच्या शिवचरित्राच्या खास आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी ते म्हणाले होते, “शिवाजीला मी माणूस मानतो, अवतार नव्हे. आजवर ठपका द्यावा, असा ह्या माणसाविरुद्ध सबळ पुरावा आढळला नाही. आढळला तर न लपवता तो शिवचरित्रात घालीन.” आणि म्हणूनच पुरंदरे ऐतिहासिक घटनांविषयी बोलताना कोणत्याही नाटकी अभिनिवेशाने बोलत नाहीत.

पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. अतिशय रंगतदार भाषेत बोलतानादेखील इतिहासकार म्हणून ते एक प्रसन्न अलिप्तपणा सांभाळू सकतात. आज इतकी वर्षे मी त्यांच्या तोंडून शिवचरित्रातले प्रसंग ऐकतो, पण कधी मुसलमान व्यक्तीचा मुसलमान म्हणून त्यांनी तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला मला स्मरत नाही. परधर्मीयांची कुचेष्टा नाही. अवहेलना नाही. इतिहास ही वस्तू अनेक जण अनेक कारणांनी राबवतात. खुद्द शिवाजी महाराजांचे चित्र दुसऱ्या महायुद्धात रिक्रूटभरतीसाठी राबवले होते. “सोळा रुपये पगार, कपडालत्ता फुकट…शिवाजी न्यायासाठी लढला” हे पोस्टर अजून आठवते. काहींना इतिहासातले नाट्य रुचते. काहींचा रोख आजवर झालेले इतिहास संशोधन चुकीचे होते आणि आपलेच कसे खरे हे अट्टहासाने दाखवण्यावर असतो. इतिहासाचे काही भक्त तर सदा उन्मनी अवस्थेतच असल्यासारखे वागतात. उगीचच ‘रायगड रायगड’ करीत उड्या मारण्याने शिवरायांवरची आपली निष्ठा जाज्वल्य असल्याची लोकांची कल्पना होते, अशी यांची समजूत असावी; पण शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असायला प्रत्येक किल्ल्याचा चढउतार केलाच पाहिजे, असे मानायचे कारण नाही.

दरवर्षी रायगडावर जाऊन डोळे गाळायचे ही शिवभक्ती नसून शिवभक्तीची जाहिरात आहे. आणि म्हणूनच गड-कोटांविषयी पुरंदरे बोलायला लागले की शिवाजी महाराजांच्या जीवनाचे मूळ सूत्र जो विवेक न गमावता ते रंगून बोलतात, म्हणून मला त्यांचे कौतुक अधिक वाटते. स्वतःच्या डोळ्यात आधीच लोटीभर पाणी आणून ऐतिहासिक कथा सांगण्याचा देखावा त्यांनी कधी केला नाही-ते करणारही नाहीत. कारण त्यांनी इतिहासाकडे “हरहर ! गेले ते दिवस!’’ असले उसासे टाकीत पाहिले नाही.

पुष्कळदा वाटते की, त्यांनी शिवचरित्र कसे लिहिले याचा इतिहास एकदा लिहावा. किती निराशा, कसले कसले अपमान, केवढी ओढग्रस्त! त्यातून पुरंदऱ्यांचे खानदान मोठे! वडील भावे स्कुलात ड्राॅइंग मास्तर. पर्वतीच्या पायथ्याशी पुरंदऱ्यांचा वाडाही आहे. भिक्षुकी, मास्तरकी हे व्यवसाय अफाट दैवी संपत्तीचे धनी करणारे. त्या धनातून मंडईतली मेथीची जुडीदेखील येत नसते. महागाईच्या खाईत भारत इतिहास संशोधक मंडळाकडून मिळणारे माहे पाऊणशे रुपये घेऊन पुरंदऱ्यांनी संसार सजवला. रुपयांचा अखंड शेकडा एकजिनसी न पाहिलेले ग. ह. खरे हे पुरंदऱ्यांचे गुरू. ऋषी हा शब्द फारच ढिलेपणाने वापरला जातो; पण ऋषी म्हणावे अशी खऱ्यांसारखी माणसे क्वचित आढळतात. खऱ्यांचे सहायक म्हणून पुरंदऱ्यांनी खूप वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळात काम केले.

वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. “मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही” हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही.

इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद््गार काढावेत इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्यशाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा “माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,” असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी – लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो.

वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून आजतागायत आपल्या सुखाचे, स्वास्थ्याचे नव्हे, तर आयुष्याचे दान देऊन गोळा केलेले हे शिवचरित्राचे हे धन. एका मास्तरचा हा मुलगा शिवरायाचे चरित्र आठवीत आडरानातल्या वडपिंपळाखाली पालापाचोळ्याचे अंथरूण आणि दगडाची उशी करून झोपला. हल्ली रस्त्यारस्त्यातून जिल्हा परिषदेच्या जीपगाड्या धावताना आढळतात.

शिवाजी महाराजांच्या पावलांच्या खुणा शोधत जाणाऱ्या पुरंदऱ्यांना कोण जीपगाडी देणार! पार्लमेंटात हात वर करण्यापुरते जागे असणाऱ्या सभासदांना आसेतुहिमाचल आगगाडीच्या पहिल्या वर्गाचा फुकट पास असतो. पुरंदरे कुठल्याशी गावी कागदपत्रं मिळायची शक्यता आहे, हे कळल्यावर थर्ड क्लासच्या खिडकीपाशी तिकिटासाठी रांग धरून उभे असतात !

निरनिराळ्या जागा धरून किंवा अडवून ठेवण्याच्या ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेली माणसे एकूणच कमी. बाराशे मावळे दीड लाख मोगली फौजेचा धुव्वा उडवीत होते. कारण ते बाराशे मावळे “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा!” ह्या शिवाजीराजाने त्यांच्या कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले होते. कोणत्याही कार्याच्या सिद्धीला असा एखादा मंत्र लागतो; पण सिद्धीपेक्षा प्रसिद्धी मोठी, अशी भावना रुजायला लागते तेव्हा माणसांची बाहुली होतात. पुरंदरे शिवाजीचे चरित्र गाईन हा संकल्प सोडून जगताहेत. इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भुताची चित्रे एकदम दिसतात. हे दिसणे भाग्याचे ! ही भाग्याची वेडे !

– पु. ल. देशपांडे

३२. शिवसेनाप्रमुख आणि पुलंची ‘ती’ भेट…!


पुलंना महाराष्ट्र शासनाच्यावतीनं ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावर पुलंनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शासनावर टीका केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तर प्रमोद नवलकर हे सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. पुलं भाषणात म्हणाले होते,
“वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सर्वांत अधिक अस्वस्थ करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर ही आहे. विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा ‘लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो’ वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? ‘निराशेचा गाव आंदण आम्हासी’ ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते! अलीकडं राज्य, राजकारण, राज्य शासन, राजकीय पक्ष वगैरे शब्द भ्रष्टाचार, गुंडगिरी, खुनाखुनी, जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे. उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली, की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडत जातो. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा तर आनंदाचा अनुभव देणारी निर्मिती करण्यातला उत्साहच नाहीसा होतो. आपल्या मताला अनुसरून लिहिण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य हे मला फार महत्त्वाचं वाटते. लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही, तरी सत्य लोकांपुढे आणलंच पाहिजे, असा आग्रह धरणारे विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत. आपल्याला न पटलेला विचार सत्ताबळानं दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात!
साहजिकच पुलंच्या या वक्तव्याला मोठी प्रसिद्धी लाभली होती. शिवसेनाप्रमुख पुलंच्या मतप्रदर्शनानं व्यथित झाले होते. शिवसेनाप्रमुखांनी बोलण्याच्या ओघात पुलंच्या वक्तव्यावर आपल्या शैलीत एक वक्तव्य केलं होतं. त्यावर वादंग झाला होता. पुलंनी जाहीर कार्यक्रमात परखडपणे अशा चार गोष्टी सुनावणं, ही गोष्ट बाळासाहेबांना रुचली नाही. मग दोन दिवसांनंतर एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मंचावरून बाळासाहेबांनी पुलंवर आगपाखड केली.
“झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला. आम्ही ठोकशाहीवाले तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता?”
असं बाळासाहेब म्हणाले आणि त्यांनी पुलंची ‘मोडका पूल’ अशी संभावनाही केली होती.
प्रसिद्धीमाध्यमांनी यावर उलटसुलट बातम्या दिल्या होत्या. त्यामुळं बाळासाहेब आणि पुलं यांच्यात दुरावा निर्माण झालाय असं लोकांना वाटत होतं. या घटनेच्या काही दिवसानंतर नाट्यनिर्माते मोहन वाघ आणि राज ठाकरे यांनी पुण्यात पुलंच्या घरी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे पुलंना म्हणाले,
“काकांना तुम्हाला भेटायचं आहे, त्यांना आपल्याकडं घेऊन येऊ का?”
त्यावर पुलं उत्तरादाखल म्हणाले,
“अरे कोण बाळ ना….! तो माझ्याकडं कधीही येऊ शकतो. अरे, तो माझा विद्यार्थी आहे ओरिएंटल हायस्कुल, मुंबईचा…!
काही दिवसांनी राज ठाकरेंनी भेट ठरवली. ठरल्यादिवशी बाळासाहेब पुलंच्या घरी साडेचार वाजता येणार होते. ते येत असताना पोलिसांचा फौजफाटा, कार्यकर्त्यांचा लवाजमा असं काही त्यांच्यासोबत असणार नाही. याची दक्षता घ्यायला पुलंनी सांगितलं. बाळासाहेब आणि पुलंच्या त्या ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. वृत्तांकनासाठी माझ्यासोबत छायाचित्रकार म्हणून मनोज बिडकरही हजर राहणार होता.
…..आणि तो दिवस उजाडला, भांडारकर रोडवरच्या ‘मालती माधव’ या पुलंच्या निवासस्थानी राज ठाकरे यांच्यासह हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आले. सोबत फक्त रवि म्हात्रे होता. या भेटीची कुणालाच कल्पना दिली नव्हती त्यामुळं कोणीही सोबत नव्हतं. पोलिसांचा तुरळक बंदोबस्त रस्त्यावर होता. पुलं वयोमानानुसार व्हीलचेअरवर होते. राज ठाकरे पुढे झाले, त्यांनी बाळासाहेब आल्याचं पुलंना सांगितलं. सुनीताबाई सामोरं गेल्या. बाळासाहेबांनी घरात प्रवेश केला. सुनीताबाईंनी
“या, बाळासाहेब…!”
या शब्दात त्यांचं स्वागत केलं. चेहऱ्यावर नम्र भाव असलेले बाळासाहेब उत्तरले,
” मी बाळासाहेब बाहेरच्यांकरता या घरात मी बाळंच आहे….!”
पुलं व्हीलचेअरवर जखडून बसले होते. अंग कंपवातामुळं थरथरत होतं. बाळासाहेब त्यांच्यासमोर गेले. खाली गुडघ्यावर बसले आणि डोकं झुकवून पुलंच्या पायांवर ठेवलं. पुलं गहिवरले. खोलीत असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. पुलंनी आपला हात बाळासाहेबांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले,
“बाळ, मला तुझा अभिमान वाटतो…!”
बाळासाहेबांनी झाल्याप्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. पुलंनी दिलखुलासपणे हसत जणू काही घडलंच नव्हतं, असं व्यक्त झाले. त्या क्षणाचं शब्दचित्र मी सामनाचा प्रतिनिधी म्हणून तर छायाचित्र बिडकर यानं टिपलं होतं.
त्यानंतर तासभर पुलं, सुनीताबाई, बाळासाहेब, राज ठाकरे यांच्या दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. ती खासगी भेट असल्यानं मी, म्हात्रे आणि मनोज तिथं उपस्थित राहणं योग्य नव्हतं म्हणून आम्ही तिथून बाहेर येऊन खाली येऊन थांबलो. मालती माधव मधून बाहेर पडताना बाळासाहेबांनी मला बोलावून घेतलं. याची बातमी वा फोटो प्रसिद्ध करायचं नाही, असं बजावलं. बाळासाहेबांचं पुलंच्या घरी येणं हे बाळासाहेबांच्या मोठ्यापणाची, मनाची प्रचिती देऊन गेलं. महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात बाळासाहेब आणि पुलं यांच्यात निर्माण झालेला वाद हे पेल्यातलं वादळ ठरलं होतं…!

हरीश केंची

*****************************

३३. आठवणींचा जागर

पु.ल.देशपांडे
निधन : १२ जून,२०००

जगभर जिथे जिथे मराठी माणूस पोचला आहे तिथे पु.ल. देखील पोचले आहेतच. अगदी दक्षिण ध्रुवावर असलेल्या दक्षिण गंगोत्री या भारतीय तळावर असलेल्या मराठी माणसांनी सोबत पुलंची पुस्तके नेली आहेत. असे भाग्य अन्य कोणाला लाभले नसावे. त्यांच्या साहित्या व्यतिरिक्त, त्यांचे किस्से ,कोट्या आणि विचार,त्याच बरोबर त्यांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या काही गाण्यांबद्दल माहिती त्यांच्या स्मृतीदिनी आठवणींचा जागर करताना देतो आहे.

कोट्या
मामा नावाची गंमत
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ’
भारती मालवणकर
पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच ‘ ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय ’ असे उद्गार काढले.
माणिक वर्मा
माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.नी केलेल्या खुमासदार कोटीमुळे धमाल उडाली . ‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’ असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल.पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की.

किस्से
गुळाचा गणपती
पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे ‘गुळाचा गणपती’ त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा,पटकथा,संवाद,गीते, संगीत आणि दिग्दर्शन,एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ‘ गुळाचा गणपती ‘ प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला.

प्रतिशब्द
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘एअर होस्टेस ला आपण ‘हवाई सुंदरी’ म्हणतो,तर नर्सला ‘दवाई सुंदरी’ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘वाढपी’ म्हणतो, तर वैमानिकाला ‘उडपी’ का म्हणू नये ?’

संजय उवाच
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,’मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच ’ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला’

माझ्या बंधू आणि भगिनींनो
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पुलंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांच्या असंख्य चाहत्यांपैकी काही निवडक जणांची प्रातिनिधिक भाषणं होणार होती. त्यात सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंतराव नारळीकरांचं नाव होतं.
भाषणाला सुरुवात करताना गर्दीचा वेध घेत नारळीकर म्हणाले,‘ सभ्य स्त्रीपुरुष हो… मी नेहमीप्रमाणे भगिनींनो म्हणत नाही, कारण समोरच माझी पत्नी बसलेली आहे.
’त्यानंतर पु.लं. जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा जयंतराव नारळीकरांच्या दाद मिळालेल्या भाषणाचा सूर पकडत भाषणाची सुरुवात करत म्हणाले,‘बंधू आणि भगिनींनो… समोर माझी पत्नी बसलेली आहे, तरीही मी ‘ बंधू आणि भगिनींनो… ’ अशीच सुरुवात करतोय, कारण ती मला ‘ भाई ’ म्हणते ’

द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती
तुमचं कुठलं यमक चांगलं जुळलं ? असं विचारल्यावर ते म्हणाले . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेन घेताना त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय, असं कुणी तरी विचारल्यावर मी चटकन म्हणालो, ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणि आमची रुद्राक्ष संस्कृती

हवाई गंधर्व
पंडित भीमसेन जोशी यांचे साऱ्या देशभर आणि परदेशात सारखे दौरे सुरु असायचे. त्या मुळे त्यांच्या वारंवार होणाऱ्या विमानप्रवासांमुळे त्यांना पु. ल. देशपांडे यांनी गमतीने ‘हवाई गंधर्व’ ही पदवी बहाल केली होती.

पु. लं चे विचार
जगा इतके की आयुष्य कमी पडेल.
हसा इतके की आनंद कमी पडेल.
भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो.
खरं तर सगळे कागद सारखेच. फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे देखील हतबल होतात.
चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते,मित्रांना नाही.

संगीतकार पु.ल
पुलंनी खूप गाण्यांना अतिशय सुंदर संगीत दिलं आहे.त्या मुळे ही गाणी श्रवणीय झाली आहेत.त्यांनी संगीत दिलेली काही गाणी
इंद्रायणी काठी देवाची आळंदी
कबीराचे विणतो शेले
तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग
माझे जीवन गाणे
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
शब्दावाचून कळले सारे
हसले मनी चांदणे
ही कुणी छेडिली तार

गायक पु.ल.
पुलंनी काही गाणी देखील गायली आहेत
जा जा ग सखी जाऊन
पाखरा जा त्यजूनिया प्रेमळ शीतल छाया
बाई या पावसानं
ललना कुसुम कोमला

तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या पु.ल. (भाई) बद्दल काही लिहायला मिळाले हे तर माझे भाग्यच.
पुलंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .
प्रसाद जोग.सांगली.
. . . . . . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.१६-०६-२०२२

. . . वॉट्सॅपवरून साभार दि. ०९-०२-२०२२

%d bloggers like this: