काम करण्याचे तीन प्रकार

डिसेंबर 8, 2011

आम्ही तीन प्रकारांनी कामे करतो – स्वस्त, झटपट आणि चांगली, यातले कोणतेही (फक्त) दोन तुम्ही निवडू शकता.
१. चांगले आणि त्वरित .. पण ते स्वस्तात होणार नाही.
२. चांगले आणि स्वस्त .. पण ते लगेच होणार नाही.
३. स्वस्त आणि झटपट .. मग ते चांगले असणार नाही.

We do three types of jobs – Cheap, Quick and Good. You can have any two.”

1.“A good quick job – won’t be cheap”
2.“A good job cheap – won’t be quick”
3.“A cheap job quick – won’t be good.”

यशाची गुरुकिल्ली (जुनी आणि गंजलेली)

डिसेंबर 7, 2011

एक वार्ताहर एका यशस्वी उद्योगपतीची मुलाखत घेत होता.
” आपल्या यशाचे रहस्य काय?”
” दोन शब्द”
” कोणते?”
” चांगले निर्णय”
“ते कसे घेतलेत ?”
” एक शब्द”
” कोणता?”
” अनुभव”
” तो कसा मिळाला?”
” दोन शब्द”
“कोणते ?”
” चुकीचे निर्णय”

Secret of success
Sir, What is the secret of your success?” a reporter asked a company president.
“Two words.”
“And, sir, what are they?”
“Good decisions.”
“And how do you make good decisions?”
“One word.”
“And sir, what is that?”
“Experience.”
“And how do you get Experience?”
“Two words.”
“And, sir, what are they?”
“Bad decisions.”

 

रूढी कशा पडतात

नोव्हेंबर 24, 2011

शास्त्रज्ञांनी पाच माकडांना एका पिंज-यात कोंडून ठेवले. त्या पिंज-यात एक शिडी ठेऊन तिच्या माथ्यावर केळ्यांचा घड ठेवला होता. जेंव्हा जेंव्हा त्यातले एकादे माकड केळे घेण्यासाठी शिडीवर चढायला जाईल त्या वेळी इतर चार माकडांवर अतीशय थंड गार पाण्याचा वर्षाव केला जाईल अशी व्यवस्था केली गेली होती. काही काळानंतर जर एकादे माकड शिडीवर चढायला गेले तर लगेच इतर माकडे त्याला बुकलून काढू लागली. त्यामुळे केळ्याचा घड पाहूनसुध्दा ते खाण्याच्या मोहाने शिडीवर चढणे माकडांनी बंदच केले. असे काही दिवस गेले. त्यानंतर थंड पाण्याचा शिडकावा करणे बंद केले गेले. तरीही माकडे शिडीवर चढायला धजत नव्हती.

त्यानंतर पूर्वीच्या एका माकडाला बाहेर काढून त्याच्या जागी एका नव्या माकडाला आत सोडण्यात आले. लगेच ते माकड शिडीकडे धावले आणि इतर चार माकडांनी त्याची मनसोक्त धुलाई केली.  असे काही वेळा झाल्यानंतर त्या नव्या माकडाने शिडीवर चढायचे नाही असे ठरवले. त्यानंतर दुसरे माकड बदलले गेले. पहिल्या माकडाच्या वेळी झालेल्या प्रसंगांची पुनरावृत्ती झाली. या वेळी दुस-या माकडाला बदडण्यात पहिले माकडसुध्दा सामील झाले. तिसरे, चौथे आणि अखेरीस पाचवे माकड सुध्दा क्रमाक्रमाने बदलले गेले आणि तसेच घडत गेले.
आता त्या पिंज-यात जी पाच माकडे होती त्यामधील एकानेसुध्दा थंड पाण्याच्या शिडकाव्याचा अनुभव घेतलेला नव्हता. तरीही जर त्यातले एक माकड चुकूनही शिडीकडे गेले तर इतर चौघे त्याला बदडूक काढत.
त्या माकडांना जर वाचा असती तर त्यांनी सांगितले असते,  ”का कोणास ठाऊक, इथे हे असेच चालते”
ही गोष्ट ओळखीची वाटते ना?

”हे विश्व आणि माणसांचा मूर्खपणा या दोनच गोष्टींना मर्यादा नसते…. त्यातल्या पहिल्या गोष्टीबद्दल मला शंका आहे.”
—————– आल्बर्ट आइन्स्टाईन
 

A group of scientists placed 5 monkeys in a cage and in the middle, a ladder with bananas on the top.
Every time a monkey went up the ladder, the scientists soaked the rest of the monkeys with cold water.
After a while, every time a monkey went up the ladder, the others beat up the one on the ladder.
After some time, no monkey dare to go up the ladder regardless of the temptation.
Scientists then decided to substitute one of the monkeys.  The 1st thing this new monkey did was to go up the ladder.  Immediately the other monkeys beat him up.
After several beatings, the new member learned not to climb the ladder even though never knew why.
A 2nd monkey was substituted and the same occurred. The 1st monkey participated on the beating for the 2nd monkey. A 3rd monkey was changed and the same was repeated (beating).  The 4th was substituted and the beating was repeated and finally the 5th monkey was replaced.
What was left was a group of 5 monkeys that even though never received a cold shower, continued to beat up any monkey who attempted to climb the ladder.
f it was possible to ask the monkeys why they would beat up all those who attempted to go up the ladder…..
I bet you the answer would be….

“I don’t know – that’s how things are done around here”

Does it sounds familiar?
Don’t miss the opportunity to share this with others as they might be asking themselves why we continue to do what we are doing if there is a different way out there.

“Only two things are infinite: The universe and human stupidity.  And I am not so sure about the former.”

Albert Einstein

लावालावी

ऑक्टोबर 31, 2011

‘लावणे’ ह्या क्रियापदाचा अर्थ !      मराठी भाषेच्या गंमती –  शब्द एक, अर्थ अनेक

मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी-नववीत. पण चेन्नईहून थेट पुण्याला; मग मराठीचा गंध कसा असणार? थोडं शिकवल्यावर मी तिला कही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले.तीन चार शब्दांचे अर्थ
सगितले. शेवटचा शब्द होता– लाव/लावणे. मी तिला म्हटलं, ‘अगं, वाक्य लिहून आणायचंस, नुसता अर्थ कसा सांगू? काहीही असू शकेल’. एका शब्दाचा/व्हर्बचा अर्थ काहीही? तिला कळेना. ‘ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज’. ती म्हणाली.तिला वाटलं असतील दोन तीन अर्थ! पण मराठीचा
इंगा तिला अजून कळायचा होता. मी मनात म्हटलं, चला, आजचा वेळ या लावालावीतच घालवू.
‘हे बघ, तू मराठीचा क्लास लावला आहेस ‘.
‘ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास ‘. लगेच वहीत क्लास लावणे = जॉइन असं लिहिलं.
‘क्लासला येताना तू आरशासमोर काय तयारी केलीस? पावडर लावलीस? ‘
‘ओ येस ‘.
‘आपण पार्टीला,फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू/टिकली लावतो. ‘
‘येस, आय अंडस्टँड ‘.—टु अप्लाय. तिनं लिहिलं.
‘पण आपण केसांना पिन्स, हेअरबॅंडही लावतो.तिथे तो अर्थ नाही होत ‘.
‘ओके; वी पुट ऑन दॅट”.
‘आता बघ. मी चहाचा कप तोंडाला लावला, आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड लावलं. आपण बाळाच्या गालाला हात लावतो. इथे काय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच्! ‘
चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, हां, तुम्ही पार्कमधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी; फुलांना हात लावू नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, पुस्तकाला पाय लावू नको. सो—टु टच्.
‘मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर ‘.
‘हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच ‘.
‘मीन्स लाव,बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर! ‘
‘बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर. पण दिवा लाव = स्विच ऑन.
म्हणूनच तुला म्हटलं वाक्य लिहून आण बाई! संदर्भ/रेफरन्स शिवाय नुसता लाव कसा समजणार?
आणखी खूप ठिकाणी लावणे हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत. ‘
‘नो,नो. प्लीज टेल मी मोअर ‘. म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.
‘बरं! आता अपण इलेक्ट्रिकचा दिवा, टी.व्ही, रेडिओ इ. लावतो तेव्हा स्विच ऑन करतो.पण देवासमोर नीरांजन,उदबत्ती,समई लावतो तेव्हा काय करतो? लाइट ऑन! पेटवतो.फटाके लावतो, आग लावतो,
गॅस लावतो = पेटवतो.’ ती भराभरा लिहून घेत होती.
तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली. ‘बघ, मी कुकर लावलाय. दोघी हसलो. आधीचा कुठला अर्थ आहे का यात? खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द—लावलाय. आंघोळीचं पाणी लावलंय मधे असंच! ‘
‘मी रोज सकाळी अलार्म लावते. ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. ओह्! एव्हरीथिंग इज सो डिफरंट!

‘सो कनक्लूजन? –एव्हरी लाव इज डिफरंट! ‘

मला आलेल्या ढकलपत्रावरून साभार. अनामिक लेखिकेचे आभार.

पावलीला निरोप

जुलै 10, 2011

पावली किंवा चार आणे किंवा पंचवीस पैशांचे नाणे आता कालबाह्य झाले आहे. त्याचा संक्षिप्त इतिहास असाः
No longer a legal tender: The road has finally come to an end for the humble 25 paise coin. The Reserve Bank of India is withdrawing from circulation coins of 25 paise and below from June 30, 2011. Coins of denomination of 25 paise and below will not be accepted for exchange at the bank branches from July 1, 2011 onwards. We trace the history of the 25 paise coin from the British era to contemporary India.

१८३० ईस्ट इंडिया कंपनीने काढलेले पाव रुपयाचे पहिले चांदीचे नाणे म्हणून पावली
1830s: The first of the quarter rupee coins were issued in India during the reign of William IV. The coins were made of silver.

१८४०  महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकानंतर काढलेले नाणे
1840s: The longest reigning monarch of the United Kingdom, Queen Victoria also held the title of the Empress of India. During her reign a number of quarter rupee coins were issued. Soon after her ascent to the throne, a silver quarter rupee coin was issued in India. The coins featured the bust of a young Queen Victoria. She was made the queen soon after her 18th birthday

१८७०   वयस्क महाराणीचे चित्र असलेले नाणे
1870s: The coins issued later in Queen Victoria’s reign had a more mature looking bust of the queen. The one-fourth rupee coins were made of silver.

१८९०  वयस्क महाराणीचे चित्र असलेले नवे नाणे
1890s: While Queen Victoria was adding to her years in real life, she also put in a bit of weight on the her image on the coins.

१९००  महाराजा सातवा एडवर्ड याचे नाणे
1900s: The new century also witnessed a change on the British monarchy. Following the death of his mother Queen Victoria, Edward VII was crowned as the King of the United Kingdom and also as the Emperor of India. All new coins issued during the time bore his name and face.

१९१९  पंचम जॉर्जचे चित्र असलेले चार आण्याचे चांदीचे नाणे
1910s: A new design of coins were introduced in 1919 that sought to replace the existing silver quarter rupee coins. The new equivalent of the quarter rupee coin was the 4 aana coin, that was made from cupro-nickel instead of silver. The rising silver prices following the First World War necessitated this change. These coins had the effigy of King George V.

१९२० पाव रुपयाचे नाणे परत आणले गेले
1920s: George V was crowned the King in 1910. He was also the first reigning British Monarch to tour India. The 4 aana coins introduced in 1919 didn’t gain popularity and soon the quarter rupee coins had to be brought back.


 
१९३०  सहाव्या जॉर्ज राजाचे चित्र असलेले नाणे
1930s: King George VI was the last of the British monarchs to rule over India. His predecessor Edward VIII abdicated the throne in order to marry divorced American socialite Wallis Simpson. There were no coins issued for Edward VIII. While coins of other denominations went for a design change, the quarter rupee coins continued, with only a new monarch replacing the old.

१९५०  स्वतंत्र भारताचे निकेलचे चार आण्याचे नाणे
Early 1950s: Following the Independence of India the currency system continued with the British series of coins till the establishment of the Indian Republic. The first coins of independent India were introduced on August 15, 1950 and it included the quarter rupee coin made of nickel. The coins had the words ‘char aana’ embossed in Devnagri script and had the Ashoka Emblem on one side.

१९५७ पच्चीस नये पैसे ……. १९६४ पच्चीस पैसे
Late 1950s: Another major landmark in the history of the 25 paise coin happened following the introduction of the decimal series in accordance with the Indian Coinage Act that came into force from April 1, 1957. The 19 mm 25 paise coins were called ’25 naye paise’. The tern ‘naye paise’ was used for wider public recognition of the new coinage system and was discontinued from June 1, 1964 when the term ‘naye’ was dropped. The coins weighed 5 grams and were made of nickel.

१९७० फारसा फरक नाही
1970s: By the late 1960s, Indians had become used to the new coinage system. The text ‘rupaiye ka chautha bhag’ (one fourth of a rupee) was also replaced by 25 paise. While other coins of lower denominations underwent a major change and moved to aluminium, the 25 paise coin didn’t change much.

१९८८ पच्चीस पैसे स्टेनलेस स्टीलचे नाणे … २००२ नाणे बनवणे थांबले
Late 1980s to the 2000s: In 1988 the 25 paisa coin went steel and was made of ferratic stainless steel. It was a little heavier than its predecessor at 2.83 grams but was of the same size. The last 25 paise coins seen in popular circulation were minted in the year 2002.

२०१०  रुपये आणि पैसे यासाठी नवे चिन्ह तयार केले गेले. पंडवीस पैशांचे नाणेच निघत नसल्यामुळे या चिन्हाचा उपयोग मात्र केला गेला नाही.
A new symbol: In July 2010 the Government of India unveiled the new symbol for the Indian Rupee and designer D Udaya Kumar also designed a new symbol for the paise. But with the 25 paise going out of circulation we are unlikely to see the image above anywhere.

२०११ पंचवीस पैशांचे नाणे रद्दबातल.

आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे

जुलै 9, 2011

आचार्य अत्रे यांनी पु.ल.देशपांडे यांच्यावर लिहिलेला लेख

डॉक्टर डॉक्टर

मे 26, 2011

डॉक्टर डॉक्टर ….
MY  DOCTOR…
माझे डॉक्टर फारच चांगले आहेत
Let me tell you about my doctor. He’s very good!
———
तुम्हाला वेगळा सल्ला (सेकंड ओपीनियन) हवा असला तर …
ते बाहेर जाऊन परत येतील (आणि तो सांगतील)

If you tell him you want a second opinion, He’ll go out and come in again.
~~~~~
त्यांनी एका स्त्रीला पिवळ्या आजारासाठी तीन वर्षे उपचार केल्यानंतर त्यांना समजले ….
की ती बाई चिनी आहे
He treated one woman for yellow jaundice for three years Before he realized she was Chinese.
~~~~~
आणखी एकाला त्यांनी फक्त सहा महिने आय़ुष्य उरले असल्याचे सांगितले होते. सहा महिने झाले तेंव्हा त्याची फी मिळाली नाही ….
डॉक्टरांनी त्याला आणखी सहा महिने बहाल केले
Another time, he gave a patient six months to live. At the end of the six months, the patient hadn’t paid his bill,
So, the doctor gave him another six months.
~~~~~
नर्सने येऊन त्यांना सांगितले,”बाहेरचा रोगी म्हणतो आहे की त्याला गायब झाल्यासारखे वाटते आहे.” डॉक्टर म्हणाले, “त्याला सांग की मी त्याला पाहू शकत नाही.”
While he was  talking to me, his nurse came in and said, “Doctor, there is a man here who thinks he’s invisible.” The doctor said, “Tell him I can’t see him.”
~~~~~
आणखी एका माणसाने ओरडत सांगितले,”माझ्या मुलाने फिल्म गिळून टाकली आहे” डॉक्टर म्हणाले,”ठीक आहे, तिला डेव्हलप झाल्यावर पाहू”
Another time, a man came running in the office and yelled, “Doctor, doctor! – my  son just swallowed a roll of film!”
The doctor calmly replied, “Let’s just wait and see what  develops.”
~~~~~
एका रोग्याने सांगितले,”मला काही आठवत नाही”. डॉक्टरांनी विचारले,”केंव्हापासून?”
रोग्याने विचारले,”केंव्हापासून काय?”
One patient  came in and said, “Doctor, I have a serious memory problem.” The doctor asked, “When did it start?”
The man replied, “When did what start?”
~~~~~
मी डॉक्टरांना सांगितले,”माझ्या कानात (फोनच्या) घंटेचा आवाज येतो. डॉक्टर म्हणाले,”मग तू उचलू नकोस”"
I remember one time I told my doctor, I had a ringing in my ears. His advice: “Don’t answer  it.”
~~~~~
एकाने त्यांना सांगितले, “मला घंटी असल्यासारखे वाटते” त्याला डॉक्टरांनी सांगितले,”या गोळ्या खा, त्या लागू पडल्या नाहीत तर मला रिंग कर
My doctor sure has his share of nut cases. One said to him, “Doctor, I think I’m a bell.”
The doctor gave him some pills and said, “Here, take these  – If they don’t work,  give me a ring.”
~~~~~
आणखी एकाने सांगतले,”मी पत्त्याचा गठ्ठा झालो आहे” डॉक्टर म्हणाले,”तिथे बस, मी तुला नंतर डील करेन”
Another guy told the doctor that he thought he was a deck of cards. The doctor simply said, “Go sit over there. I’ll deal with you  later.”
~~~~~
मी डॉक्टरांना सांगितले, “माझे तंगडे २ ठिकाणी मोडले आहे”. ते म्हणाले,”पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नकोस”
When I told my doctor I broke my leg in two places, He told me to stop going to those places.
~~~~~
You know, doctors can be so frustrating. You wait a month and a half for an appointment,
Then he  says, “I wish you had come to me sooner.”

दसपटीने जास्त

मे 13, 2011

एक महिला वनात गेली असतांना पिंज-यात अडकून बसलेला एक बेडूक तिला दिसला. तिने त्याची मुक्तता केली तर तिला तीन वर मागायला बेडकाने सांगितले.
बेडकाने त्याची सुटका झाल्यावर सांगितले की ती जे काही मागेल ते तिला मिळेलच पण त्याच्या दसपट तीच गोष्ट तिच्या नवरोबाला पण मिळेल.
बाईंनी पहिला वर मागितला, “मला जगातली सर्वात सुंदर स्त्री बनव.” तिचा नवरा अत्यंत देखणा बनण्याला तिची हरकत नव्हती.
दुसरा वर, ” मला जगातली सर्वात श्रीमंत स्त्री बनव.” तिचा नवरा जरी दहापट श्रीमंत झाला तरी त्याची संपत्ती म्हणजे तिचीच असा विचार तिने केला.
तिसरा वर, “मला एक सौम्य असा हृदयविकाराचा झटका येऊ दे”
तात्पर्यः बायका लई बेरकी असतात
.
.
.
तात्पर्य काढण्याची एवढी घाई करू नका.
.
.
.
.
.
.
.
.
.
तिच्या नव-याला दहापटीने सौम्य असा अगदी मामूली झटका येऊन गेला.
.
दुसरे तात्पर्य
पहिले तात्पर्य तितकेसे बरोबर नाही

दारू प्याल्यावर ….. १० वचने

एप्रिल 29, 2011

दारू प्याल्यावर मित्र काय बडबडतात ?    नेहमी म्हंटली जाणारी १० वाक्ये

१) तू माझा भाऊ आहेस रे
२) गाडी मीच चालवणार
३) मी तुला मनापासून मानतो
४) मी पिऊन बोलतोय असे समजू नको
५) भाव्, एवडी कमी पडणार
६) १ शेवटचा ३० चा पेग होवूदे
७) तू बोल भाव्,  तुला काय पाहिजे
८) तुझ्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे रे
९) आज ती असती तर आपली ही हालत झाली नसती …………. बेस्ट… फेमस डायलॉग
१०) उद्या पासून दारू बंद….

नवजोतसिंगने तोडलेले तारे – भाग २

एप्रिल 21, 2011

नवजोतसिंग विनोदी आहेच. त्यातले एकेक नमूने वाचा आणि हंसून घ्या.

६. सचिनशिवाय भारतीय संघ म्हणजे वरवरचे चुंबन
16.  Indian team without Sachin is like giving Kiss without a Squeeze.
१७. अंडे फोडल्याशिवाय ऑमलेट करता येत नाही 
17.  You cannot make Omelets without breaking the eggs.
१८. दीप दासगुप्ता विकेटकीपर नाही, गोलकीपर आहे.
18.  Deep Dasgupta is not a Wicket Keeper, he is a goalkeeper. He must be given a free transfer to Manchester United.
१९. तो सापाशी लढेल आणि त्याचा चावासुध्दा घेईल
19.  He will fight a rattlesnake and give it the first two bites too.
२०. फासा उडवल्याशिवाय सहा (चे दान) मिळत नाही
20.  One, who doesn’t throw the dice, can never expect to score a six.
२१. एडी निकोलसला दोन्ही हातांनी आपले नितंभसुध्दा सापडत नाही.
21.  This quote was made after Eddie Nichols, the third umpire, ruled Shivnarine Chanderpaul ‘NOT OUT’ in the second test   at Port of Spain, T&T …  “Eddie Nichols is a man who cannot find his own buttocks with his two hands.”
२२. समुद्र शांत असेल तर कोणीही त्यात नौका चालवेल
22.  Anybody can pilot a ship when the sea is calm.
२३. एकाद दुसरे चाक पंक्चर न होता कोणीही यशाचा प्रवास करू शकत नाही
23.  Nobody travels on the road to success without a puncture or two.
२४. कंबरेचा पट्टा आवळा नाही तर पँटला घसरू द्या
24.  You got to choose between tightening your belt – or losing your pants.
२५. मांजराला हातमोजे घालून उंदीर पकडता येत नाही.
25.  The cat with gloves catches no mice.
२५. तारुण्याची आग शमवण्यासाठी वय हेच उत्तम अग्निनिरोधक आहे
26.  Age has been perfect fire extinguisher for flaming youth.
२७. तुमचे हृदय सोन्याचे असेल, उकडलेल्या अंड्याचे सुध्दा असते
27.  You may have a heart of gold, but so does a hard-boiled egg.
२८. तो लाथा झाडण्याच्या काँपिटिशनमधील एका पायाच्या खेळाडूसारखा आहे
28.  He is like a one-legged man in a bum kicking competition.
२९. नॅपीजप्रमाणे तिसरा अंपायर सारखा बदलत रहायला हवा, त्याच कारणासाठी
29.  The third umpires should be changed as often as nappies … and for the same reason.
३०. खुंबळेचे बोलिंग डोशालारखे सपाट आहे. 
30.  Kumble’s bowling at the moment is flat as a Dosa.


Follow

Get every new post delivered to your Inbox.